Library
Gyaariibaald'ii
Front matter
TIGHT
BINDING
TEXT FLY WITHIN
THE BOOK ONLY
UNIVERSAL
LIBRARY
OU_184437
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
OSMANIA UNIVERSITY LIBRARY
M
Call No.025:2/K 146fcession No. M 754
Author ofert', . pag
Title' saltarest. 1945
This book should be returned on or before the date
last marked below.
इटालियन वीर ग्यारीबाल्डी
JOSHI BROTH
PUBLISHERSC 2013
GOWL! 10. HD
AKM.
जम्म: २२ जुलै, १८०७
मृत्यु : २ जून, १८८२
No text on this page.
ग्यारीबाल्डी १९४५
No text on this page.
मध्यप्रांत-व-हाडच्या हायस्कूल सर्टिफिकेट परीक्षेकरिता
मराठी विषयांतील टेक्स्ट म्हणून मंजूर.
ग्यारीबाल्डी"
लेखक
नरसिंह चिंतामण केळकर
सहाची आवृत्ति
शके १८६७]
किमत १॥ रुपया
[ सन १९४५
Choom 48P Checked 1965 - -मुद्रक व प्रकाशक- वि. गं. केतकर, महाराष्ट्र मुद्रणशाळा प्रेस, ६२४ सदाशिव पेठ, पुण २. .
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना इतिहासवाचनापासून जे अनेक फायदे आहेत त्यांमध्ये राष्ट्राच्या घडा. मोडींच्या स्थूल अवलोकनाने मनुष्यमात्रास' जो एक प्रकारचा धडा मिळतो तो माझ्या मते सर्वात अत्यंत मौल्यवान् असा फायदा आहे. अशा तहेने स्थूल अवलोकन करणारास हे तेव्हांच दिसून येईल की, जगांतील राष्ट्रांची घडामोड नित्य' चालू आहे, व या घडामोडीपासून उत्कर्षाचे स्थितीत असलेल्या राष्ट्रांनी ज्याप्रमाणे पुढे मागे आपणांस अपकर्ष येण्याचा संभव आहे हे जरूर ध्यानात बाळगिले पाहिजे, त्याचप्रमाणे अपकर्षाचे स्थितीत असणाऱ्या राष्ट्रांनीहि पुढे मागे आपला उत्कर्ष खचित मागे आपला उत्कर्ष खचित होईल अशी सदाशा निरंतर हृदयांत बाळगण्यास हरकत नाही. भरभराटीत असणाऱ्या ज्या राष्ट्रांना आपल्या शहाणपणाची घमेंड असेल त्यांनी मागील इतिहासाकड वळून ग्रीसची स्थिति पाहावी; ज्याला पराक्रमाचा अभिमान असेल त्याने रोमचा इतिहास ध्यानात आणावा; अंगच्या शौर्यावर वाटेल तें करूं असा ज्यांचा बाणा असेल त्यांनी स्पार्टाकडे पाहावें; धर्माभिमान अंगी असला म्हणजे अशक्य असे काहीच नाही असे ज्यांस वाटत असेल त्यांनी मुसलमानी राष्ट्राकडे नजर द्यावी; म्हणजे सर्व प्रकारच्या उद्दाम वृत्ति जागच्या जागीच जिरतील. दुसरे पक्षी जी राष्ट्रे नष्टदशेला येऊन पोचली असतील व ज्यांच्यांतील विचारी देशभक्तांची मने वेळोवेळी निराशेने व्यापून जात असतील त्यांनीहि मागील इतिहासाकडे पाहिले म्हणजे आपत्तीच्या अंधेया रात्रीनंतर ऐश्वर्यसूर्य खचित केव्हां ना केव्हां तरी उगवला पाहिजे असे त्यांस कळून येईल. आतां मृतराष्ट्रांचा पुनर्जन्म होण्यास काही नियम आहेत व त्यांचे उदय एकाच कालछेदाने होतील असे नाही. परिस्थितीचे मानाने ती कालावधि बदलेल. तथापि, त्यास नियम नाहीत असे होत नाही. फार तर राष्ट्रांचा उदर' धूमकेतूंच्या उदयासारखा आहे इतकेंच म्हणता येईल. परंतु धूमकेतूसुद्धां नियमबद्धच आहेत. पुरी हजार वर्षे दु.खांत व पारतंत्र्यांत काढल्यावर पूर्वीचे रोमचा म्हणजे हल्लीचे इटली या राष्ट्राचा अभ्युदय (६) झाला. ग्रीसला हजाराचे ठिकाणी दीड हजार वर्षे घालवावी लागली. परंतु शेवटी त्यांचे पारतंत्र्य जाऊन त्यांना सुस्थिति प्राप्त झालीच. वठलेल्या झाडा सुद्धा पाणी घालीत राहिले असतां क्वचित् अंकुर फुटतात. मग राष्ट्र ही तर काय मनुष्यप्राण्यांचीच बनलेली आहेत ! स्वराष्ट्र कितीहि जीर्णदशेस. आले असले तरी त्याचा उद्धार पुढे मागें होणारच आहे हे ध्यानांत वागविणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. मात्र एक गोष्ट विशेष महत्त्वाची असून अवश्य ध्यानांत धरली पाहिजे; ती ही की, हे कर्तव्य येथेच संपत नाही. राष्ट्रांच्या उदयाचे नियम काय आहेत व स्वराष्ट्राचा उदय होण्यास त्यातील कोणते उपाय विशेषतः योजिले पाहिजेत या गोष्टीचा विचार करणे हे त्या कर्तव्यांत प्रमुखत्वाने येतें. म्हणजे " नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण" या नियमाप्रमाणे चढ- उतार आपोआप ईश्वरी संकेताप्रमाणे होत असतातच, मग आपणाकडे त्याचे काय आहे, अशा त-हेचा केवळ दैववादाचा अनुवाद न करता ज्याने त्याने असें मनांत बाळगिले पाहिजे की, नियति-चक्र फिरविण्यास झाले तरी थोडीबहुत शक्ति लागतेच; ती शक्ति प्रचलित करणे हे अंशतः कोणासहि शक्य आहे. ही शक्ति आपण अंशमानाने तरी व्हावे अशी आकांक्षा प्रत्येक मनुष्याच्या हृदयांत असली पाहिजे. राष्ट्रोत्कर्षाच्या निरनिराळ्या पायऱ्या म्हणजे निरनिराळ्या काळी त्या राष्ट्रांत उत्पन्न होणाऱ्या असामान्य व्यक्ति याच होत, व अशा पायऱ्यांपैकी आपण एक व्हावें ही महत्त्वाकांक्षा ज्या देशांतील लोकांच्या मनांत प्रादुर्भूत होईल याच देशाला नियति-चक्राची अनुकूल अशी कलाटणी मिळून उत्तम दशा पुढे मागे येईल. सुप्रसिद्ध देशभक्त ग्यारीबाल्डी ही इटली देशाच्या उत्कर्षास कारणीभूत झालेली अशी एक असामान्य व्यक्ति होय. त्याचे जीवनचरित्र हा इट- लीच्या चालू शतकांतील इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे यात शंका नाही. ग्यारीबाल्डीचे तरुणपणीं इटली स्वतंत्र होण्याची बिलकुल आशा दिसत नव्हती; तथापि त्याचे मरणापूर्वी तोच इटली स्वतंत्र झालेला पाहण्याचे त्याचे सुदैवांत होते. परंतु ग्यारीबाल्डीने स्वार्थत्याग करून जीवाची आशा न धरितां केवळ स्वदेशभक्तीचे प्रेरणेने जी महत्कृत्ये केली तीं तो जर न करता तर स्वदेश स्वतंत्र झालेला पाहण्याचे त्याचे नशिबीं खचित येतेना. अवध्या राष्ट्राच्या घडामोडींत एकटी एक व्यक्ति काय करूं
(७)
शकते याचे ग्यारीबाल्डीचें चरित्र हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे अशी
माझी खात्री आहे; व माझ्या देशबांधवांस हे चरित्र वाचल्यापासून बराच
बोध होईल असा मला भरंवसा वाटल्यावरून हे लहानसें पुस्तक मी लोकांस
मादर केले आहे.
पुणे
ता. २० ऑक्टोबर १९०१
न. चि. केळकर
--
अनुक्रमणिका पृष्ठ १ ५ ११ २१ वृत्तान्त २७ ३२ ४५ ५२ ... ७० भाग विषय १ जन्मवृत्तान्त २ स्वदेशाभिमानाचा संचार ३ गुप्त मंडळया, बंडाळी व छळ ४ मॅझिनीचा ५ देशकार्याचा ओनामा ६ दक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह ७ मातृभूमीची भेट. ८ स्वातंत्र्याचें घनघोर युद्ध ९ दुर्दैवाचा कळस ... १० वीराचा वानप्रस्थाश्रम ११ मुत्सद्दीपणाचा विजय १२ स्वातंत्र्याकरितां दुसरें युद्ध १३ राजकारणाचें नवीन धोरण १४ नेपल्सवरील स्वारी १५ देशाच्या एकीकरणाचा प्रारंभ १६ शांततेतील सुखें व उद्योग १७ रोमवरील स्वारी १८ इंग्लंडची सफर ... १९ ऑस्ट्रियाशी तिसरी लढाई २० रोमवर अखेरचा धाडसी प्रयत्न २१ ग्यारीबाल्डीची परान्सला मदत २२ अखेरचे दिवस ... परिशिष्ट ७५ ८२ .. ९६ १०४ १०८ ११५ १२३ १२६ १३० १३७ १३९ शपथ ... १४३ ग्यारीबाल्डी भाग १ ला जन्मवृत्तान्त क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे --भोजप्रबंध देवायतं कुले जन्म, मदायत्तं च पौरुषं -वेणीसंहार न्स व इटली या दोन देशांच्या सरहद्दीवर भूमध्य समुद्राला लागून परा असलेल्या आल्प्स पर्वताच्या एका भागाचे पायथ्याशी नाईस या नांवाचें एक शहर हल्ली वसलेले आहे. एकोणिसाव्या शतकाचे प्रारंभी नाईस हे निव्वळ खेडें होतें; तथापि त्याची रचना फारच निसर्गरमणीय होती. एका बाजूस लांबच लांब डोंगर गेलेले असून, दुरून आल्प्स पर्व- ताची बर्फाने आच्छादिलेली पांढरी शुभ्र शिखरें स्वच्छ दिसत. त्याच्या पलीकडे माउंट ओबॅनो नांवाचा बळकट तटबंदीचा व शेंदीडशे वर्षे लढायां- मध्ये झुंजलेला असा भव्य डोंगरी किल्ला एका उंच व तुटलेल्या कड्या- वर उभा होता. त्याच्या भयाण छायेंत हे लहानसें खेडे गडप होऊन जात असे. दुसऱ्या बाजूस पाहिले तर भूमध्य समुद्राच्या सुंदर निळया लाटा या खेड्यांतील घरांच्या पायऱ्यांवर आपटत. निवांत वेळी किनाऱ्यावरील अवघ्या इमारतींच्या ओळींचें प्रतिबिंब समुद्राच्या स्वच्छ पाण्यांत पडत असे. तिसऱ्या बाजूस पाहावें तर आल्प्स पर्वतामधून निघालेला एक मोठा ओढा या गांवाच्या कडेने खळखळ वाहत जाऊन समुद्राला मिळालेला होता. या खेड्यांत चालू शतकाचे आरंभी कोळी लोकांची बरीच वस्ती असे. त्यांनी होडया बाळगाव्या, समुद्रांत जाऊन मासे धरून आणावे, व त्यावर आपली उपजीविका करावी. इतर कोणी याहून बऱ्या स्थितीत होते, त्यांचीहि पण २ ग्यारीबाल्डी उपजीविका समुद्रावरच चाले; म्हणजे कोणी परक्यांच्या जहाजावर नोकरी पत्करून खलाशाचे किंवा तांडेलाचें काम करीत व कोणी स्वतःच्या मालकीची जहाजें ठेवून व्यापार करीत. अशा या खेडेगांवांत या शतकाचे प्रारंभी डोमेनिको ग्यारीबाल्डी व त्याची बायको रोझा असें एक सुखी जोडपें राहत असे. डोमेनिको हा घरचें जहाज ठेवून व्यापार करी व रोझा गृहप्रपंच मोठ्या नीटनेटकेपणाने करून नवऱ्याला सुख देई. डोमेनिको व रोझा दोघेहि स्वभावाने सज्जन व प्रेमळ अशी होती. ग्यारीबाल्डी हे नांव फार जुनाट आहे; तें इतकें की, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रोम येथील प्रजासत्ताक राज्याचे वेळच्या कित्येक वरिष्ठ प्रतीच्या कुळांतून ग्यारीबाल्डी हे उपनांव प्रचलित असलेलें आढळते. परंतु खुद्द डोमेनिको ग्यारीबाल्डीचे घराण्यांत या जुन्या नांवा- पेक्षा दुसरे कोणतेंहि ऐश्वर्य उरलेले नव्हते. डोमेनिकोचा आजा पुरा दरिद्री होता, व त्याच्या बापाने जे काय दोन पैसे मिळविले होते ते त्याचे त्यानेच मूर्खपणानें सट्टयाचे व्यापारधंदे व चैनबाजी करून उडवूनहि टाकिले होते. पुढे डोमेनिको वयांत आला, तेव्हां घरची अगदी गरिबी असल्यामुळे प्रथम प्रथम त्याला निव्वळ कोळयाचा म्हणजे मासेमायचा धंदा करावा लागला. परंतु कोणताहि धंदा नेकीने व मेहनतीने केला असतां तो बहुधा सफल होतो; त्याप्रमाणे डोमेनिकोला असल्या हलक्या धंद्यांतहि चार पैसे मिळाले. नंतर त्याने आपल्या मालकीचे एक जहाज घेऊन व्यापार चालविला. तथापि एकंदरीने पाहतां, डोमेनिकोची घरची स्थिति गरिबीचीच होती म्हटले तरी चालेल. अशा या सुशील, सात्त्विक, धर्मभोळया, व गरीबशा जोडप्यास इ. स. १८०७ सालचे जुलई महिन्याचे २२ व्या तारखेस एक मुलगा झाला. त्याचें नांव जोसेफ. रोझा हिची आपल्या मुलांवर फारच ममता असे. जोसेफला तर ती अगदी जीव की प्राण करी. आपला जोसेफ पुढे अचाट पराक्रमाने जगाला थक्क करून सोडील, व इटलीचा उद्धार करून पृथ्वीवरील स्वदेशभक्त मालिकेतील शिरोमणि किंबहुना अवतारी पुरुष अशी कीर्ति मिळवील, हे त्या बिचारीच्या स्वप्नांतहि कधी आले नसेल. पण असें आलें असते तरी काय? मुलगा म्हणून जोसेफवर तिचे जे प्रेम होतें तें वाढण्याला, त्या तिच्या हृदयांत वावच नव्हता!
जन्मवृत्तान्त ३ जोसेफचा बाळपणीं विद्याभ्यास फारसा झाला नाही. घरचे वळण तिकडे नव्हतेंच, व मुलालाहि जातीने विद्याभ्यासाची फारशी गोडी नव्हती. तथापि इतर मुलांप्रमाणे आपल्या बाळपणी त्याने फारशी उगाच उनाडकी केली नाही. सृष्टिसौंदर्याच्या अभिरुचीचें मात्र त्याला बाळकडूच होतें म्हटले तरी चालेल. केव्हांहि फुरसत सांपडली की, त्याने उठून उंच डोंगरावर जावें व तेथे एकांतवासांत सृष्टिसौंदर्य पाहात तासचे तास घालवावे. त्याला प्रवासाची गोडी केव्हां व कशी लागली असेल ती असो. प्रवास म्हटला की, याचा पाय नेहमी पुढे असावयाचा. त्यांतून समुद्रावरचा प्रवास म्हटला म्हणजे तर त्याला अगदी दुधात साखर पडल्यासारखे वाटे. जोसेफ हा बाळपणापासून किंचित् हूड व साहसप्रिय असा होता. पाण्याचे भय म्हणून कसें तें त्याला ठाऊकच नव्हते. आपल्या इकडे मुलाला कित्त्यावर घालतात, तसा डोमेनि- कोने जोसेफला लहानपणीच होडीवर घातला होता. परोपकारीपणाचाहि त्याचा अंकुर जन्मसिद्धच होता. यामुळे अगदी बाळपणापासून त्याचे हातून परोपकाराप्रीत्यर्थ साहसाची कृत्ये घडली. जोसेफ हा केवळ आठ वर्षांचा असतां त्याने पाण्यात पडलेली परटीण वर काढली अशी गोष्ट कित्येकांस खरी वाटत नाही. परंतु पुढे १२ व्याच वर्षी तो एकदां होडीत बसून समुद्रावर मौजेने चालला असतां अकस्मात् वारा सुटून दुसन्या एका होडींतील माणसे होडी उलटून पाण्यात पडली; हे पाहतांच जोसेफनें उडी टाकून त्यांपैकी काहींचे प्राण वाचविले, ही गोष्ट मात्र महशूर असून तिजबद्दल कोणचाहि वाद नाही. जोसेफ ग्यारीबाल्डी आपल्यास ‘जलमाणूस' असें म्हणवून घेई; व खरोखर त्याची सर्व तालीम व कसरत जहाजावर म्हणजे डोलकाठ्यांचें खांबांवर व अवजारांच्या दोरांवरच तयार झाली होती. समुद्रपर्यटणा- संबंधाने एक गोष्ट त्याच्या चरित्रांत व खुद्द त्याने लिहिलेल्या आत्मवृत्तां- तांतहि नमूद केलेली आढळते. ती अशी :--लहानपणी शाळेत शिकत असतां जोसेफला समुद्रावर सफर करण्याची एक दिवस हुक्की आली. लागलीच त्याने आपले दोन सोबती बरोबर घेतले, व प्रवासाची सामग्री एका लहानशा फडक्यांत बांधून घेऊन हे तिघे प्रवासी बंदरांत जाऊन एका कोळ्याच्या होडीवर चढले. होडी बंदरांतून काढून त्या स्वान्या बाहेर समुद्रावर तर गेल्याच, मग पुढे शेपन्नास कोसांची सफर करावयाचा त्यांचा बेत होता की पण कर्मधर्मसंयोगाने एका गृहस्थाने हया सफरीची वर्दी - काय न कळे!
ग्यारीवाल्डी . जोसेफच्या बापाला दिली तेव्हां लागलीच त्याने त्यांच्या मागोमाग एक होडी पाठवून त्यांना पकडून परत आणिलें ! ग्यारीबाल्डी हा घोड्यावर बसायला व तरवार खेळायला फार चांगले शिकला होता; व बहुधा त्याचा करमणुकीचा सर्व वेळ मर्दुमकीचे खेळ खेळ- ण्यांत जाई. आईबाप शाळेला जा म्हणत, त्यांची आज्ञा मोडावयाची नाही एवढ्याकरितांच तो शाळेला जाई व थोडाबहुत अभ्यासहि करी. परंतु भाईबापांचे मनांत तरी त्याने पुष्कळ अभ्यास करून विद्वान् व्हावें असें कोठे होते? त्या वेळची परिस्थितीच अशी चमत्कारिक होती की, विद्वत्तेला सरकारदरबारांत फारसा मान नव्हता. शिवाय धर्मोपदेशक लोक साया देशभर पसरलेले असत. चांगलासा शिकला सवरलेला मुलगा पाहिला की, 'संसारांत पडून काय करावयाचें ? राजकीय कारभारांत कशाला मन घालतोस? मठवास पत्करून धर्माचें अध्ययन व पोपच्या धर्माचा प्रसार करायला चल आमच्याबरोबर ' असा बुद्धिवाद ते करीत. यामुळे मुलाने शिकून सवरून चार पैसे मिळवावे व राज्यकारभारांत मान्यता संपादावी अशी महत्त्वाकांक्षा असलेल्या आईबापांना, मुलांना शिक्षण देऊन त्यांना मोकळे सोडणे फारच धोक्याचे वाटू लागले होते. इकडे सरकारकडून शिक्ष- णाला उत्तेजन म्हणावे तर तेंहि यथातथाच. त्या काळच्या जुलमी राजांच्या मनाने, शिक्षणाचे योगाने तरुण लोक स्वातंत्र्यप्रिय व बंडखोर होतात अशी दहशत घेतली होती. अनुभवावरून पाहतां त्यांची ती भीति अगदीच निरर्थक होती असे म्हणतां येत नाही. काहीहि असले तरी, त्या काळी सरकारने शिक्षणावर कडक अम्मल व दाब ठेवला होता एवढेच खरें. या सर्व कारणांमुळे शिक्षणासंबंधाने सर्वत्र अनास्था माजलेली होती. या बाहय कारणांची स्वाभाविक मनःप्रवृत्तींत भर पडून जोसेफच्या दप्तराला लवकरच गांठ लागली! तरी पण त्याचे वाचन तेथेच संपले असे झाले नाही. फावल्या वेळी आपल्या आवडीची पुस्तकें मिळवून तीं तो वाची. कांहीं कांहीं शिक्षकांशी त्याचा स्नेह जमला होता, त्यांजपासुन तो स्वदेशाचे जुने इतिहास. घेऊन त्यांची पारायणे करी. देशभक्तांची मनें प्रायः बाळपणीच स्वदेशाच्या जुन्या इतिहासाकडे आपोआप वेधतात, व त्या इतिहास-वाचनाचे योगाने त्यांचे मनांतील स्वातंत्र्यप्रियतेच्या अंकुराला अधिकच पुष्टि मिळते, हा नियम जगाचे इतिहासांत पुष्कळ ठिकाणी पाहण्यांत आलेला आहे. जोसेफ जन्मवृत्तान्त ५ - ग्यारीबाल्डीचीहि गोष्ट अशीच होती. आधींच शिक्षण थोडे व कनिष्ठ प्रतीचें, शिक्षकवर्गात स्वदेशभक्तांचा अभाव' व स्वातंत्र्यप्रियतेचे बीज करपवून टाकण्यासारखी जुलमी अधिकाराची प्रखरता. अशा परिस्थितीत असूनसुद्धा ग्यारीबाल्डीचें मन स्वभावतःच कोणी न शिकवतां न सवरतां स्वदेशाच्या जुन्या इतिहासाकडे वेधलें, ही गोष्ट ध्यानांत धरण्यासारखी आहे. इटलीचा जुना इतिहास वाचावा, त्याचेंच मनन करावें, स्वदेशाचें गतवैभव आठवून वाईट वाटून डोळयांतून पाणी काढावें, व त्या डोळ्यांतील पाण्यानेच मनांतील स्वदेशप्रीतिरूपी वल्लीला पुष्टि मिळावी, हा क्रम जोसेफ ग्यारीबाल्डीचा बाळ- पणापासून चाललेला होता. जुन्या इतिहासांत नावाजलेली व आपल्या पूर्वजांनी 'पराक्रम करून चिरस्मरणीय करून ठेवलेली स्थळे तो प्रसंगाप्रसंगाने पाहून घेत असे. इतिहासांत प्रख्यात असलेले, सर्व जगाची एक वेळ राजधानी होऊन बसलेले, व विद्या आणि कला यांचे योगाने नेहमीच जगद्वंद्य होऊन राहिलेलें रोम शहर, जुलमी पोपच्या व फ्रेंच राजाच्या ताब्यात गेलेलें पाहून त्या वेळी जोसेफ ग्यारीबाल्डीचे मनांत कालवाकालव होऊन जात असे. तात्पर्य, ग्यारीबाल्डीच्या मनाची शिक्षणाची स्थिति अशी होती हे ध्यानांत आणलें म्हणजे त्याच्या आयुष्यातील पुढील सर्व वर्तनक्रम समजतो. वयांत येऊन काही तरी स्वतंत्र धंदा करण्याएवढा झाल्याबरोबर जोसेफनें दर्यावर सफरी करण्यास प्रारंभ केला. तारुण्यांत जो धंदा करावा त्यावर प्रेम बसते. ग्यारीबाल्डीला तर या सफरी म्हणजे जसें कांहीं आनंदाचें निधानच वाटत असे. त्या वेळी त्याचे दृष्टीने सर्व जगांत शूर माणूस म्हणजे जहाजाचा तांडेल. जहाज म्हणजे जशी काय त्याची आवडती बायकोच, प्राणाहून प्यारी! सगळ्या संगीतांत नावाड्यांचे गाणे म्हणजे अगदी गोड. फार काय, पण खलाशी म्हणजे आकाशांतले देव, निदान देवदूत, असें त्याला वाटत होतें. मुलगा लहान पडला आणि सफरीचे काम फार धोक्याचें; यास्तव ग्यारी- बाल्डीचा बाप त्याच्याबरोबर प्रथम प्रथम जात असे. परंतु लवकरच तो स्वतंत्रपणे समुद्रावर जाऊ लागला. ग्यारीबाल्डी हा सुमारे २२ वर्षांचा झाला, त्या वेळी त्याने कॉरटेसी नांवाच्या एका जहाजावर दुय्यम कप्तानाची नोकरी धरली. नोकरी करीत असतां पहिल्या पहिल्या सफरीत तर त्याज- वर पुष्कळच संकटे आली. भूमध्य समुद्रांत तो एक वेळ प्रवास करीत असतां फार जोराचें वादळ झाले. त्याच्या बरोबरचे दुसरें एक जहाज खडकावर .
६ ग्यारीबाल्डी . + आपटून फुटलेंहि. खुद्द त्याचें जहाज मात्र मोठ्या शर्थीने वांचलें. ग्यारी- बाल्डीच्या बऱ्याच सफरी भूमध्य समुद्रांत, काळया समुद्रांत, व विशेषतः ग्रीस देशाच्या किनाऱ्याकडे झाल्या. त्या काळी या समुद्रावर चांचे लोकांचा फारच सुळसुळाट असे. त्यांच्या तावडीत ग्यारीबाल्डी हा तीन वेळां सांपडला होता. पहिल्या खेपेस तर त्याची फारचे दुर्दशा झाली. एके दिवशी माटा- पानचे भूशिरापाशी असताना चांचे लोकांची अकस्मात् गांठ पडून, त्यांनी ग्यारीबाल्डीचें जहाजच्या जहाज लुटले. पोटांत भूक पेटली आहे, पायांत बूटसुद्धां राहिला नाही, अशा स्थितीत तो एकदांचा कसा तरी जमिनीला लागला. नंतर सुदैवाने एका इंग्लिश सद्गृहस्थाची व त्याची गांठ पडली. त्याचे साहाय्याने ग्यारीबाल्डी फिरून नाईस गांवीं परत आला. असे प्रसंग एक का दोन म्हणून सांगावे ! टक्केटोणपे खाऊनच माणसास शहाणपण येतें म्हणतात, त्याप्रमाणे ग्यारीबाल्डीने लहानपणच्या सफरीत अनेक संकट सोसली खरी, परंतु त्यामुळे त्याच्या अंगीं साहस, धैर्य व शहाणपण हे गुण चांगलेच आले. त्याहूनहि विशेष फायदा असा झाला की, त्याचे अंगी स्वातंत्र्यप्रियतेचे एक प्रकारचे वारेंहि खेळू लागले. अशा रीतीने आपल्या वयाची पहिली २५-२६ वर्षे ग्यारीबाल्डीने बाळपणच्या लीला व तरुणपणचे स्वेच्छाचार करण्यांत घालविली. या संथ व निर्मळ आयुष्याच्या प्रवाहांत पुढे त्याचेच हातून घडून येणाऱ्या प्रचंड देशकार्याची छाया पूर्वी कधीहि पडली नव्हती. उन्हाळयांतील एकादे दिवशी सायंकाळी प्रचंड वादळ व्हावयाचे असून त्याची सामग्री हळूहळू दिवसभर जमत असते, तथापि प्रातःकाळच्या स्वच्छ आभाळांत त्याचा मागमूस तरी दिसतो काय ? किंवा आपल्या मुखाजवळ प्रतिसमुद्राचे स्वरूप धारण करून व शेंकडों प्रवाह-बाहूंनी समुद्राला कवटाळून, आपल्या ओघाच्या जोरानें खारे पाणी कित्येक कोसपर्यत मागे हटविणाऱ्या सिंधु नदाचे किंवा गंगा नदीचे पात्र जर उगमाजवळच पाहिले, तर त्यांच्या मुखाजवळच्या पराक्रमाची कोणास कधी तरी कल्पना येईल काय ? ग्यारीबाल्डीच्या बाळपणचीहि गोष्ट अशीच होती. ----- भाग २ रा स्वदेशाभिमानाचा संचार एकेनापि सुपुत्रेण सिंही स्वपिति निर्भयं । सहैव दशभिः पुत्रैर्भार वहति रासभी ॥१॥ -सुभाषित स्वदेशभक्ति अंगी येण्याला शिक्षण मिळावे लागते असे कित्येकांचे मत आहे, परंतु हे अगदी चुकीचें म्हणावे लागते. स्वातंत्र्यप्रियता किंवा स्वदेशभक्ति हे गुण अंगी उपजतच असावे लागतात. हे गुण जातीचेच असतील तर शिक्षणाच्या योगाने त्यांना उज्ज्वलता किंवा दीप्ति येईल, परंतु ते नसतील तर कितीहि शिक्षण दिले तरी तें अळवावरच्या पाण्यासारखें व्यर्थ होय. एवढेच नव्हे, तर स्वार्थपरायण व स्वदेशप्रीतिशून्य माणसाचे शिक्षण हैं, माकडाच्या हातांतील कोलिताप्रमाणे, केवळ देशाच्या नाशास व अनर्थास कारणीभूत होते. दुसऱ्या पक्षी पाहतां शिक्षणाचा गंधहि नसतां कित्येक महात्मे केवळ आपल्या देशभक्तीचे जोरावरच नांवारूपास येऊन, विद्वतेने कधी साध्य न होणारी अशी कृत्ये त्यांनी केल्याची उदाहरणे जगाच्या इतिहासांत किती तरी सांपडतील ? ग्यारीबाल्डीचें चरित्रहि अशाच उदाहरणांपैकी एक नमुने दार प्रमुख उदाहरण म्हणून मनन करण्यासारखे आहे. आपल्या वयाचे २६-२७ व्या वर्षांपर्यत ग्यारीबाल्डीला स्वदेश खरोखर कोणत्या स्थितीत आहे व ही स्थिति सुधारण्याला काय उपाय योजिले पाहिजेत याची कल्पनाहि नव्हती. तथापि एका गोष्टीबद्दल त्याची पुरी खात्री होऊन राहिली होती. ती ही की, आपला देश परकीयांच्या म्हणजे ऑस्ट्रियन लोकांच्या ताब्यात गेलेला असून त्याचे पूर्वीचे सर्व वैभव नष्ट झालेलें आहे. जिकडे पाहावें तिकडे बेबंदशाही माजलेली. राज्याबाहेर समुद्रावर जावें तर दुष्ट जुलमी चांचे लोक प्रवाशांना खुशाल लुबाडून घेऊन अनन्वित कृत्ये करीत, व प्रजेच्या संरक्षणाचा पत्कर घेतलेल्या राज्यकर्त्यांच्या हातून त्यांचा मुळीच प्रतिकार होत नसे. राज्यांत पाहावें तर रयतेच्या तोंडाव तेज नाही. झाडावर रोग पडावा तसा प्रकार पारतंत्र्याने प्रजेचा झालेला.र.
ग्यारीबाल्डी राज्याधिकाऱ्यांच्या करड्या अंमलामुळे शहरांना व खेड्यांना तुरुंगांचे स्वरूप आले होते. अज्ञानाचा अंधःकार चहूंकडे दाट पसरला होता. अभिमानाचा तर मागमूसहि नाहीं; व स्वदेशप्रीतीची एकादी ठिणगी कोठे कधी लकाकलीच, तर आसमंतात् दाही दिशांना माजलेल्या औदासीन्यरूपी अंधःकाराचे योगाने निराशा ही मात्र एकाद्या भुयाराप्रमाणे भयाण दिसे. जुलमी राजांच्या कडक अंमलामुळे वर्तमानपत्रे सर्रास चालत नसत. विचारस्वातंत्र्य तर अगदीच नव्हते. यामुळे जिकडे पाहावे तिकडे अज्ञान व भ्रम माजलेला. लोकमत बनण्यास चांगलीं साधनें मुळीच नव्हती. तथापि आगीवर माती लोटली असतां फार तर ज्वाला दबतात पण धूर येतच असतो, आणि अंतर्यामी निखारे पिचत असतात हे मात्र तो दर्शवितो. त्याचप्रमाणे मुद्रणस्वातंत्र्य नष्ट झाले होते तरी त्या स्थितीमध्येहि, किंचित् विचार करणाऱ्या माणसाला असें तेव्हांच कळून येत असे की, प्रजा व राज्यकर्ते यांजमध्ये पराकाष्ठेचा बेबनाव झालेला असून तो क्षणोक्षणी कमी न होतां उलट वाढतच जात आहे. राजांनी मनस्वितेने व अधिकारमदानें धुंद होऊन कडक कायदे करावे व त्यांचा अंमल सक्तीने चालवावा; आणि इकडे प्रजेच्या मनांत असंतोष अधिकाधिक धुमसत जाऊन नाइलाजास्तव बेफामपणाने बंडे करण्यास त्यांनी प्रवृत्त व्हावें, अशा त-हेची लोकस्थिति लपवून कशी लपणार? प्रख्यात इंग्लिश कवि लॉर्ड बायरन याने इटलीसंबंधी खालील उद्गार काढले आहेत :-" काय सांगावें? या हतभागी देशावर हल्ली जो जुलूम चाललेला आहे त्याचे नुसतें वर्णन करण्यास कोण समर्थ आहे ? आज हजारों लोक या जुलमी राजांनी पकडून तुरुंगांत टाकले आहेत. हजारों देशोधडीला लाविले आहेत. आणि हजारों, त्यांच्यावर कोणत्याहि तन्हेचा आरोप न ठेवितां किंवा कोणत्याहि रीतीने त्यांचा इन्साफ न करतां, बंदीत टाकले आहेत ! मोठमोठी कुळे व घराणी सफई उध्वस्त झालेली आहेत! कोण हे नीच राजे! त्यांचा एकदां नाश तरी होऊ द्या, की पहा इटली देश फिरून पूर्वीप्रमाणे तरतरीत व टवटवीत होईल! ज्या या हतभागी देशाने आजपर्यंत दुःखाचे व निराशेचे सुस्कारे टाकीत कैक शतकें घालविली त्याचा उद्धार करायला आज जी काय किंमत पडेल ती थोडी आहे ! या देशाच्या दुर्दैवी प्रजेनें एक हजार वर्षेपर्यत आशातंतूवर आपला जीव धरून ठेविला. मग आम्हांलाहि तशीच सदाशा का वाटू नये? इटली देशाचें नष्ट स्वातंत्र्य स्वदेशाभिमानाचा संचार ९ अवघ्या व वैभव फिरून मिळवून देणे हा केवढा स्तुत्य व उदात्त हेतु आहे ! इतिहासाच्या नीरस कथानकांत गोड काव्य असे काय तें एवढेच आहे असें मी समजतों!" देशाची ही शोचनीय स्थिति हळुहळू ग्यारीबाल्डीस समजू लागली व तिजबद्दल त्याच्या मनांत अत्यंत क्रोधहि येऊ लागला ! परंतु त्या क्रोधाला बाहेर पडण्यास कोठेहि वाव मिळेना; व स्वदेशाच्या स्थितीबद्दल खरी माहिती मिळविण्याचे काम त्याजकडून अहोरात्र चाललेले असल्यामुळे, त्याच्या मनांतील क्रोधाग्नीला दिवसेंदिवस अधिकाधिक पुष्टीच मिळत चालली होती. यासंबंधानें खुद्द ग्यारीबाल्डीने खालील उद्गार आपल्या 'आत्मचरित्रां'त लिहून ठेविले आहेत : “ अगदी बाळपणापासूनच स्वदेशप्रीति माझ्या हृदयांत बेफाम वाढली होती. देशांत येऊन जुलूम करणारे जे परकीय राजे त्यांच्या- विषयी पराकाष्ठेचा क्रोधाग्नि माझ्या हृदयांत अगदी जळजळत असे. अशा स्थितीत माझ्या देशाची मुक्तता करण्याकरितां कांहीं गुप्त कट चाललेले होते त्यांजमध्ये शिरावे अशी माझ्या मनांत नेहमी उत्कंठा लागलेली होती. तो हेतु सिद्धीस नेण्यास प्रथम इटलीच्या भावी स्वातंत्र्याविषयीं जें जें काय कोठे लिहिलेले असेल तें तें सर्व हुडकून काढून वाचण्याचा, व त्याचप्रमाणे ज्या स्वदेशबांधवांनी या महत्कृत्यास आपलें जीवित अर्पण केले होतें अशांची ओळख व मैत्री संपादण्याचा दीर्घ उद्योग मी चालविला. या मार्गात असतां एके प्रसंगी मी 'टॅगन् रॉक 'कडे जहाजांतून सफरीस गेलो होतो. तिकडे जिनोआ येथील एका स्वदेशाभिमानी पुरुषाची व माझी अवचित् गांठ पडली. त्याने स्वदेशमुक्ततेविषयी काही लोकांचे गुप्त प्रयत्न कोठपर्यत आले होते ते मला सांगितले. ते ऐकतांच मला झालेला आनंद माझ्या हृदयांत मावेना. आपल्या देशाची सोडवणूक करण्याकरितां कंबर बांधून तयार झालेला असा एक माझा देशबांधव मला आज मिळाला, या विचाराने मला जो हर्ष झाला त्याच्यापुढे एक सबंध नवीन जगच्या जग हुडकून काढलेल्या कोलंबसाचा हर्ष तुच्छ आहे असे मला वाटले !" पुढे लवकरच दुसऱ्या एका प्रसंगी बॅरॉल्ट या नांवाच्या एका बाणेदार व शूर देशभक्ताची व ग्यारीबाल्डीची गांठ कॉन्स्टॅन्टिनोपलला जातांना वाटत जहाजावर अवचित् पडली. दोघांचेहि मनांत स्वदेशाविषयी सारखीच प्रेरणा झाली असल्यामुळे त्यांची तेव्हांच परस्परांशी मैत्री जमली. आजपर्यंत ग्यारीबाल्डीचे मनांत ग्यारीबाल्डी फक्त इटलीपुरत्याच कल्पना होत्या. परंतु बॅरॉल्ट याने निरनिराळे इतिहास सांगितल्यामुळे त्याचे मनांत इटलीमधीलच काय परंतु जगाचे पाठीवर सर्व ठिकाणी असणाऱ्या जुलमाबद्दल अत्यंत तिटकारा व द्वेष उत्पन्न झाला. आपल्या देशापुरतें लढण्याचे काम एकादा यःकश्चित् पगारी शिपाईहि करितो. परंतु जो खरा वीर म्हणून असेल त्याने पृथ्वीवर कोठेहि अन्याय अगर जुलूम चालला असेल त्याविरुद्ध लढण्यास तेथें धांव घेतली पाहिजे असें त्याला वाटू लागले. आजपर्यत जहाज म्हणजे निव्वळ व्यापाराचे किंवा सफरीचे साधन इतकीच त्याची कल्पना होती. ती विस्तृत होऊन त्याला तेंच जहाज म्हणजे मनुष्यकृत अन्यायांविरुद्ध खुद्द ईश्वराची हुकमतच अवतरली आहे की काय असे वाटू लागले. न्यायाची संस्थापना करणारी ईश्वराची तरवार हातांत धरून पृथ्वीवर अवतरणारा असा एक देवदूतच मी आहे असेंहि त्याला भासू लागले. आजपर्यंत केवळ व्यापाराच्या दृष्टीने पृथ्वीचें तो निरीक्षण करीत असे, तेव्हां त्याची नजर अगदी कोती होती. परंतु जुलूम व अन्याय यांजवर मोहीम करण्याचा निश्चय मनांत झाल्याबरोबर त्याची तीच दृष्टि जणू काय एकदम फांकली. आजपर्यंत कधींहि न पाहि- लेली दूरदूरची क्षितिजें, एवढेच काय, परंतु भविष्यकाळी स्वदेशांत घडून येणारे जे अनेक चमत्कारिक युद्धप्रसंग, तेहि धुक्यांतून पाहिल्याप्रमाणे आपणास अंधुक अंधुक दिसू लागले की काय असेंहि त्याला वाटू लागले. कर्म- धर्मसंयोगाने त्याच्यासारख्या मनःप्रवृत्तीचे सोबतीहि त्याला लवकरच भेटले. पंढरीच्या वारीला जाण्याचा मनांत निश्चय करून वारकरी अगदी एकटा जरी दूरच्या प्रवासाला निघाला तरी थोड्याच वेळानें वाटेत त्याला पुष्कळ सोबती भेटू लागतात; व माळेने माळ पाहिली की मैत्री जमलीच ! तोच प्रकार देशभक्तांचा आहे. स्वदेशप्रीतीची खूण जरी सप्तपाताळा- इतक्या खोल हृदयांत गुप्त राहिली असली, तरी दूर दूर निराळ्या असणाऱ्या देशभक्तांची हृदयें लोहचुंबकाप्रमाणे ओढ घेऊन एकमेकांस ओळखून काढतात. ग्यारीबाल्डीची देखील अशीच स्थिति झाली. जगाचे इतिहास सांगणाऱ्या बॅरॉल्टनें खुद्द इटली देशांतच एक मॅझिनी नांवाचा देशभक्त वास्तव्य करीत आहे असें ग्यारीबाल्डीला सांगितले होते, व त्याचे मन अदृष्टपूर्व मॅझिनीकडे एकदम इतकें ओढवले होते की त्यास केव्हां एकदांचा पाहीन असें त्याला झाले होते. यास्तव तो लवकरच त्याच्या शोधाकरितां गुप्त मंडळया, बंडाळी व छळ ११ मार्सेलिसला निघून गेला. दोघांचीहि गांठ पडली, व त्यांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी एकमेकांची मैत्री संपादिली. एवढेच नव्हे तर, पुढे देशोद्धाराचे कामी दोघांनी मिळून काय काय करावयाचे याबद्दलचे बेतहि त्यांनी ठरवन टाकले. पुढे ग्यारीबाल्डी हा मॅझिनीचे लेख मनःपूर्वक वाचूं लागला; तेव्हां त्याला त्यांत अस्सल स्वदेशाभिमान व स्वदेशप्रीति थबथबून भरलेली असल्याचे दिसून आले!! मॅझिनीची भाषा अत्यंत आवेशयुक्त व जोरदार असे. यामुळे ते लेख म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराने पृथ्वीवर अवतरून सांगितलेलें शुभवर्तमानच की काय, असें त्याला वाटू लागले. ग्यारीबाल्डीच्या पुढील सर्व आयुष्याच्या क्रमाचा पाया तारुण्याच्या या थोड्या दिवसांतच रचला गेला. आपल्या हतभागी देशाकरितां लढाई करण्यास प्रवृत्त झालेला असा इटलींत मी एकटा एकच नसून माझ्याप्रमाणे इतरहि काही लोक तयार आहेत, असें पाहतांच ग्यारीबाल्डीचे हृदयांतील प्रेरणेस अधिकच दीप्ति आली. सर्व राष्ट्राची एकवटलेली मनोवृत्ति व जोर ही आपल्या मनगटांत आली की काय, असें त्याला वाढू लागले. मॅझिनीसारख्या लेखकाचे लेख वाचून त्याची अंतर्दृष्टि विशाल व सतेज झाली, व स्वदेशाची मुक्तता करण्या- करितां अवतार घेतल्याप्रमाणे त्याचे अंगांत संचार झाला. असो. मॅझिनी हा कोण होता, मॅझिनी आणि ग्यारीबाल्डी यांच्यासारख्या मनःप्रवृत्तीचे लोक त्या वेळी इटलीत आणखी कोण कोण होते, त्यांनी पारतंत्र्याच्या बळकट किल्ल्याचे तटबंदीखाली गुप्तपणे सुरुंग कसे लाविले, व पुढे सुमारे पन्नास वर्षेपर्यत इटली देश संयुक्त व स्वतंत्र करण्याकरितां तिच्या सुपुत्रांनी जे निकराचे तुंबळ रण लवकरच माजविले त्याची पहिली सरबत्ती कशी उडाली, याचा वृत्तान्त पुढील एक दोन भागांत संक्षिप्तपणे सांगण्याचा विचार आहे. भाग तिसरा गुप्त मंडळया, बंडाळी व छळ कॉटलूंचे लढाईत नेपोलियन प्रजापीडनसंतापात्समुद्भूतो हुताशनः । राज्ञांकुलं श्रियंप्राणान् न दग्ध्वा न विनिवर्तते ॥ बोनापार्टाचा पराभव करून, युरोपांतील सर्व राष्ट्रांनी युद्धांतील लूट वांटून घेऊन, पुढे युरोपांत शांतता राख- ग्यारीबाल्डी . ण्यास काय उपाय करावा याचा विचार करण्याकरितां व्हिएन्ना येथे एक सभा भरविली. त्या सभेत झालेल्या तहाच्या योगानें इटली देश कायमचा ऑस्ट्रियाचे ताब्यात गेला. या वेळी इटली या नावाखाली मोडणाऱ्या प्रदेशाचे क्षेत्रफळ पुरें एक लक्ष चौरसमलसुद्धा नव्हते. म्हणजे या वेळचा इटली देश हिंदुस्थानां- तील हल्लींचा मध्यप्रांत, किंवा हैदराबादच्या निजामचे राज्य, यापेक्षा फार तर किंचित् मोठा होता. या वेळी त्याची लोकसंख्या पुरी दोन कोटी म्हणजे हल्लीच्या पंजाबच्या लोकसंख्येइतकीहि नव्हती. असे असतां इटली देशाचे त्या वेळी १० भाग झालेले असून त्यांवर तितकी निरनिराळी स्वतंत्र राज्ये होती. परंतु बहुतेक राजे ऑस्ट्रिया किंवा फ्रान्स यांच्या मदतीच्या जोरावर व त्यांच्या हुकमतीने कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचून प्रजेवर जुलूम करीत होते. काही आपल्याच तंत्राने राज्य चालवीत असत; परंतु ते कमी जुलमी होते असें मात्र नाही. अवघा इटली देश इतक्या नीच स्थितीला आला होता की, त्यामध्ये अज्ञानाचा अंधःकार अमावास्ये. प्रमाणे जिकडे तिकडे पडला होता. आळस, भ्याडपणा, लांचलुचपत, धर्म- भोळेपणा, कलह, हेवादावा व असत्यप्रियता इत्यादि अनेक दुर्गुण केवळ परकीयांच्या कडक अंमलाखाली अनेक वर्षे गेल्यामुळे सर्व देशभर भरून राहिले होते. दोन तीन शतकेंपर्यत इटली देशावर निरनिराळे परकी राजे होऊन गेल्यामुळे, लोकांच्या अंगी आधींच असलेल्या दुर्गुणांत पारतंत्र्याच्या विशेष दुर्गुणांची भर पडली होती. प्रजेला राज्यकारभारामध्ये बिलकुल अधिकार नसल्यामुळे तिचे सर्व लक्ष दुर्गुणांचे परिपोषण करण्याकडे लागलें होतें. वास्तविक इटलीमध्ये या सुमारास काही वर्षेपर्यत जितकी शांतता होती तितकी शांतता त्यापूर्वी कित्येक शतकेंपर्यतहि नव्हती हे खरे. परंतु ती शांतता हितकारक नसून केवळ परकीय व स्वदेशी जुलमी राजे यांचे कडक अंमलामुळे व लोकांचे अंगी आलेल्या क्षीणतेमुळे उत्पन्न झालेली होती. म्हणून ज्याप्रमाणे अष्टौप्रहर दाट सावली पडत असलेल्या दलदलीचे जागी केवळ कर्दमच माजतो, व तेथें विषारी वनस्पति व कृमीच उत्पन्न होतात, चांगल्या जातीचे झाड पोसत नाही, त्याचप्रमाणे इटली देशामध्ये या काळच्या अशा प्रकारच्या शांततेमुळे दुर्गुणांची वाढ मात्र पराकाष्ठेची होऊन लोक हीन, दीन, निस्तेज व निंद्य होऊन राहिले होते. परंतु अशी स्थिति असतांहि इटलीमध्ये पुढे काही मुत्सद्दी, व कांहीं देशभक्त असे गुप्त मंडळघा, बंडाळी व छळ निपजले की, त्यांनी आपल्या उद्योगाने व उदाहरणाने सर्व इटली देशाचें रूपचें रूप बदलून टाकले. जेथें स्वतंत्रतेला कोठेहि थारा मिळत नव्हता, दुर्गुणांचे दाट जंगल माजून राहिले होते, व स्वदेशप्रेमाचा झरा पार आदून गेला होता, अशा शुष्क व रुक्ष वनाचा त्यांनी थोडक्याच काळांत असा सुंदर बगीचा बनवून दिला की, त्या ठिकाणी शक्ति, नीति, शांति, संपत्ति, विद्वत्ता, रसिकता वगैरे आपल्या सर्व सख्यांसह स्वतंत्रतादेवी परत येऊन तिने कालांतराने तें आपलें क्रीडास्थान केले. म्हणूनच 'इटलीचे पुनरु- ज्जीवन' हा युरोपखंडाच्या इतिहासांतील भाग एकाद्या कादंबरीतील अद्भुत व रमणीय कथानकाप्रमाणे मनोवेधक झाला आहे. हा कथाभाग कसा घडून आला, याचें मूळ बीज कोठे आहे, असें हुडकीत गेलों असतां आपणांस असे दिसून येईल की, ज्या गोष्टीमुळे इटली देशाची दुर्दशा झाली होती त्याच गोष्टीमधून इटलीचे पुनरुज्जीवन होण्याचेंहि कारण निघालें होते. इटली देशास परकीयांच्या जुलमाने दुर्दशा प्राप्त झाली; पण त्याच जुलमावर पुष्ट झालेला जो इटलीच्या कांहीं सुपुत्रांचा द्वेषाग्नि त्यानेच पुढे त्या परकीयांचा बळी घेतला. ऑस्ट्रिया व फ्रान्स यांचे साहाय्यावर इटलींतील स्वदेशी राजांच्या जुलमाची पहिली काही वर्षे कोठे कांहीं गडबड न होतां निवातपणे गेली खरी, परंतु पुढे लवकरच लोकांचे मनांत असंतोष व अस्वस्थता ही उत्पन्न झाली. दहा लोकांचे मनांत एकच विचार आल्या- वर ते तो एकमेकांपाशी व्यक्त करणारच. मग त्यांच्या तोंडांस कुलुपें घातली किंवा त्यांस भक्कम तुरुंगांत निरनिराळ्या खोल्यांमध्ये बिडया घालून ठेविलें, तरी ते विचार एकमेकांस कळल्याशिवाय कधीहि राहात नाहीत. ज्या वेळी विचार व्यक्त करण्याची इतर सर्व बाहय द्वारें बंद होतात, त्या वेळी मानवी प्राण्यांच्या मनामध्ये परस्पर गुप्त भाषण करण्याची जी एक शक्ति आहे ती प्रकट होते. समाजांत किंचित् अस्वस्थता उत्पन्न होतांच जुलमी राजांनी इटालियन लोकांच्या पारतंत्र्याच्या दोऱ्या अधिकच आंखड- ण्यास सुरुवात केली. या शतकाचे प्रारंभी इटली देशांत मुद्रणस्वातंत्र्य फारच थोडें होतें; व जें काय थोडें होतें तें सुद्धां लोकांत असंतोषाची चिन्हें दिसू लागतांच या राजांनी एकदम हिरावून घेतले. परंतु याचा परिणाम राजांच्या. इच्छेप्रमाणे न होता, त्याचे योगानें असंतोष मात्र उलट अधिकच फैलावू लागला. जिकडे तिकडे गुप्त पत्रव्यवहार, वर्तमानपत्रांचा गुप्त प्रसार, - .
ग्यारीबाल्डी व गुप्त मंडळया सुरू झाल्या. लहान मोठी बंडे होऊ लागली, व प्रत्येक बंडागणिक राजांचा जुलूम दसपट वाढू लागला. होतां होतां दोन दिवस बंडवाल्यांचे तर दोन दिवस राजांचे व पुन्हा दोन दिवस बंडवाल्यांचे, अशा क्रमाने सर्व इटली देशाचे लोक बंडखोर बनले. शेवटी लोकपक्षाला किंचित् अनुकूल असलेल्या एका राजाने पुढे सरसावून व त्यांचे पुढारीपण घेऊन इटली देश परकीयांचे जुलमापासून सोडविला, व स्वराज्य स्थापित केलें. वर ज्या गुप्त मंडळया म्हणून सांगितल्या त्यांपैकी प्रमुख म्हटली म्हणजे "कारबोनेरी" या नांवाची गुप्त मंडळी ही होय. नेपोलियन बोनापार्टनें ज्या वेळी इटली देश जिंकून आपल्या सरदारांच्या स्वाधीन केला त्या वेळे- पासूनच ही मंडळी अस्तित्वात आलेली होती. या मंडळीचा उत्पादक, निदान मुख्य पुरस्कर्ता, मालघेला या नांवाचा एक इटालियन देशभक्त होता. इ. स. १८१५ साली व्हिएन्नाच्या तहानें इटली ऑस्ट्रियाचे ताब्यात गेल्याबरोबर ऑस्ट्रियन अधिकाऱ्यांनी मालघेलास पकडून सार्डीनियन सरकारच्या स्वाधीन केले व त्यांनी त्यास तुरुंगांत टाकिलें. तथापि कारबोनेरी मंडळीचा पंथ इतका वाढला की, इटलीतील सर्व भागांत हजारों कारबोनेरी कट- वाले थोडक्याच काळांत उत्पन्न झाले. या मंडळीचा नाश करण्याकरितां प्रिन्स ऑफ क्यानोझा या नांवाच्या पोलिसखात्याच्या मुख्य अधिकाऱ्याने दुसरी एक मंडळी उलट स्थापन केली. तिजमध्ये सर्व तन्हेचे बदमाष, उडाणटप्पू, दरोडेखोर व तुरुंगवास भोगून बाहेर पडलेले अपराधी सामील केले. सरकारकडून त्यांस बंदुका वगैरे सामानहि पुरविण्यात आले. अर्थात् अशा लोकांचे हाती काम गेल्यामुळे, कारबोनेरी पक्ष नाहीसा करण्याच्या मिषाने या बदमाषांच्या सैन्याने नाहीं नाहीं ते भयंकर अत्याचार केले. परंतु त्या योगानें कारबोनेरी मंडळीचा नाश न होतां उलट तिचे अनुयायी लोकांत जास्तच एकी झाली! आपल्यासंबंधाने ते अधिक गुप्तपणा राखू लागले. हळुहळू या मंडळीचा प्रसार वाढत चालला. प्रथम पिडमांट, नंतर नेपल्स, व पुढे पोपच्या राज्यांत सर्वत्र त्यांचा शिरकाव होऊन तेथून सर्व इटलीभर त्यांचा फैलाव झाला. या मंडळीच्या निशाणाची खूण जंबिया ही होती, व तिचा सभासद होण्यास एक प्रकारचा विधि करावा लागत असे. कारबोनेरी पंथाची लोकप्रियता लवकरच इतकी वाढली की, सरकारी गुप्त मंडळचा, बंडाळी व छळ लष्करांतील कित्येक पलटणीच्या पलटणींनी तो पंथ स्वीकारला, व वाटेल तेव्हां उघड बंड करण्यास त्यांच्या मनाची तयारी झालेली होती. कारबोनेरी पक्षाचे पहिले बंड नेपल्समध्ये झाले. या बंडवाल्यांविरुद्ध नेपल्सच्या राजाने दोन सरदारांच्या हाताखाली सैन्य देऊन पाठविले. हे सैन्य व कारबोनेरी लोक समोरासमोर आले मात्र, पण या सैन्याने कारबोनेरी पक्षाच्या निशाणावरची खूण पाहतांच त्यांचेविरुद्ध लढण्याचे नाकारिलें. इतकेच नव्हे तर उलट त्यांनाच जाऊन मिळण्याची त्यांची उत्कट इच्छा दिसू लागली. तेव्हां त्या सरदारांस मुकाटयानें सैन्य परतवून नेपल्सला नेणे भाग पडले. शेवटी फर्डीनंड राजास कारबोनेरी मंडळीचे म्हणणे कबूल करावे लागले. १८२० सालच्या जुलई महिन्याचे १३ वे तारखेस फर्डीनंड राजाने देवाच्या मंदिरांत जाऊन, शपथ घेऊन, कारबोनेरी मंडळीचे म्हणण्या- प्रमाणे प्रजेच्यातर्फे एक पार्लमेंट नेमून तिचा अधिकार कबूल केला. केला. फार काय, फर्डीनंड व त्याची प्रजा यांमध्ये असाहि तह झाला की, राजाने प्रजेची परवानगी घेतल्याशिवाय संस्थानच्या बाहेरहि जाऊं नये. येथून इटलीतील धामधुमीस खरी सुरुवात झाली. यानंतरचे बंड म्हटले म्हणजे सिसिलीमध्ये झाले. या बंडास प्रेरणा करण्यासहि कारबोनेरी मंडळीच अप्रत्यक्ष रीतीने कारणीभूत झाली. अशी ही दोन बंडे एकामागून एक होतांच युरोपांतील प्रमुख राष्ट्र बरीच घाबरली. ही बंडाची लाट आतां युरोपभर पसरून सर्व ठिकाणी राजसत्ता बुडवून टाकते की काय अशी त्यांस भीति पडून, लेब्यांक येथे त्यांनी आपली एक सभा भरविली. या सभेस आलेल्या प्रतिनिधीपैकी ऑस्ट्रियाचा राजा प्रमुख असून, प्रशिया, रशिया वगैरे राष्ट्रांचेहि प्रतिनिधी आले होते. सभेकडून नेपल्सचा राजा फर्डीनंड यासहि आमंत्रण गेले होते; परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रजेची परवानगी घेतल्याशिवाय राज्याची सीमा सोडून राजाने जावयाचे नाही असा करार झाला असल्यामुळे त्याला जातां येईना. तेव्हां आपण सभेस गेलों असतां प्रजेला पूर्वी दिलेले अधिकार कायमच करूं, असें वचन लोकांस देऊन त्याने सभेस जाण्याची एकदांची परवानगी मिळविली. परंतु सभेस गेल्यावर फर्डीनंडची बुद्धि फिरली व त्याने इतर राष्ट्रांचे म्हणणे निमूटपणे कबूल केलें. सभेमध्ये असे ठरले की, ऑस्ट्रियन सैन्य मदतीला घेऊन फर्डीनंड राजाने नेपल्स व सिसिली येथील बंडे मोडावी ग्यारीबाल्डी . व नंतर काही दिवस शांतता राखण्याकरितां तें सैन्य आपल्या राज्यांत ठेवून घ्यावे. या ठरावाप्रमाणे फर्डीनंड हा ५०,००० ऑस्ट्रियन सैन्य घेऊन आपल्या प्रजेवर चालून आला! इकडे नेपल्समध्ये कारबोनेरी मंडळीच्या खटपटीमुळे पार्लमेंटनें लढाईशिवाय शरण जावयाचे नाही असा ठराव करून, पूर्वीच्या बंडांत पुढारी असलेला सरदार पेपी यास ८,००० सैन्यानिशी फर्डीनंडचे तोंडावर पाठविले. दोन्ही सैन्यांची लढाई झाली, व त्यांत पेपीचा पराभव होऊन त्याचे सैन्य वाट फुटेल तिकडे पळाले. फर्डीनंड पुन्हा एकवार सत्ताधीश झाल्यावर त्याने बंडवाल्यांवर व विशेषतः कारबोनेरी मंडळीवर फारच भयंकर सूड घेतला. पहिली गोष्ट म्हणजे त्याने लष्करी कायदा एकदम सुरू केला व बंडवाल्यांचे इनसाफ करण्यास एक स्वतंत्र कोर्ट नेमले. या कोर्टाने १८२० सालचे बंडच काय, परंतु १७९३ सालापासून प्रजेने जास्त अधिकार मिळविण्याकरिता जी जी म्हणून बंडाळी केली होती त्या सर्वांत सामील असलेले व नसलेलेहि लोक संशयावरून धरून आणले व त्यांना भराभर शिक्षा ठोठावल्या. फांशी, तुरुंग, हद्दपारी या घोर शिक्षांचा वाटेल तसा सरसकट उपयोग करून अशा रीतीने सुमारे एक हजार लोक या कोर्टानें खपविले. शेंकडों अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार काढून घेऊन हांकून दिले. या इतक्या लोकांपैकी फारच थोडे लोक खरोखर बंडांत सामील होते. बाकीच्यांचा अपराध म्हटला म्हणजे त्यांचा लोकसत्तेकडे साधारणतः कल होता एवढाच काय तो. इतरांपेक्षा कारबोनेरी मंडळीवर राग विशेष म्हणून कित्येक कारबोनेरी लोकांना गाढवांवर बसवून त्यांच्या धिंडका काढल्या, तर कित्येकांस खिळे लावलेल्या चाबकांनी फोडून काढले! त्या क्रूर छळवादाचे प्रकार एक का दोन म्हणून वर्णावे! परंतु या अशा भयंकर दिवसांतच निस्सीम देशभक्तीची व स्वार्थत्यागाची काही उदात्त उदाहरणे दिसून आली. त्यांचे योगाने समाजांत कांहीं वेळ जी भीति व निराशा उत्पन्न झाली होती ती नाहीशी होऊन उलट तिचे ठिकाणी स्वदेशाकरितां हालअपेष्टा सोसण्यांत जी एक प्रकारची मौज असते तिचीच गोडी लोकांना लागून राहिली. याचा परिणाम असा झाला की, निरनिराळ्या ठिकाणी पुन्हा भराभर बंडें सुरू झाली. नेपल्स येथील बंडाच्या पाठोपाठ पिडमांट येथे एक बंड झाले. त्या वेळी गुप्त मंडळया, बंडाळी व छळ १७ - - पिड्मांट येथे पहिला व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजा राज्य करीत होता. या वेळच्या इटलीतील सर्व संस्थानांमध्ये पिडमाँट येथील राज्य कमी जुलमी होते. या राज्यांत दोन पक्ष होते. एकामध्ये उदार तत्त्वांवर राज्य चालावें असें म्हणणारी स्वातंत्र्यप्रिय मंडळी होती व दुसन्या पक्षामध्ये लष्करी कामगार, थोर घराण्यांतील उमराव, वगैरे अधिकारप्रिय लोक होते. परंतु दोन्हीहि पक्षांना पिड्माँटच्या राजाने ऑस्ट्रियाच्या तंत्राने चालावें ही गोष्ट नापसंत होती. त्यांनी राज्यपद्धतीच्या तत्त्वांचा एक नवीन मसुदा तयार केला. त्याचे धोरण राजपद नाहीसे करावे असे नसून फक्त कनिष्ठ व श्रेष्ठ वर्गाच्या प्रजाजनांस कांहीं अधिक सत्ता असावी इतकेंच होतें. व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास तें मुळीच' संमत नव्हतें; तथापि त्याने प्रजेवर एकदम शस्त्र धरले नाही. लोक काही केल्या ऐकेनात, तेव्हां मुकाट्याने राज्य सोडून तो चालता झाला. त्याचे भागून त्याचा वारस चार्लस फेलिक्स हा गादीवर बसावयाचा, परंतु तो पिड्माँट येथे त्या वेळी हजर नव्हता. त्याचे गैरहजेरीत त्याचा जवळचा नातलग चार्लस आलबर्ट हा रीजंट या नात्याने काम पाहात होता. त्याने अलेक्झांड्रिया व टयूरीन येथे बंडे होतांच लोकांच्या मागण्या एकदम कबूल करून त्याप्रमाणे द्वाही फिरविली. परंतु चार्लस फेलिक्स यास ते करणे मुळीच आवडले नाही. शिवाय लोकसत्तेची बंडाळी मोडण्याकरितां ऑस्ट्रिया त्यास हवी ती मदत करण्यास तयार होताच. तसेंच इटलीमध्ये शांतता राखण्याकरितां रशियानेहि एक लाख सैन्य सज्ज केले असून ते इटलीकडे यावयास निघाले अशीहि बातमी पसरली होती. यामुळे पिड्मांट येथील बंडवाल्यांची बरीच निराशा झाली. तथापि कारबोनेरी पंथाची तत्त्वें वरिष्ठ प्रतीचे लोक व तरुण कामगार यांजमध्ये फारच पसरलेली होती. पिडमांट येथील मोठमोठ्या कुलीन स्त्रियाहि कारबोनेरी मंडळीस सामील झाल्या असून काळी, निळी, तांबडी अशी निरनिराळ्या प्रकारची निशाण कारबोनेरी पक्षाचे वतीने त्यांनी उभारली. बंडामुळे लोकांचे अंगांत संचारलेला त्वेष व अभिमान अद्याप जागृत होता. यामुळे बंडवाल्यांनी आपले सैन्य तर ऑस्ट्रियाचे तोंडावर पाठविलेंच, परंतु राजाचे लष्कर आपल्यास सामील होईल अशी जी त्यांस आशा होती ती अगदी आयत्या वेळी खोटी ठरल्यामुळे त्यांचा लढाईत पुरा मोड झाला. बंडवाल्यांचे पुढारी समुद्रावर वाट सांपडेल तिकडे पळून गेले. २ .
१८ ग्यारीबाल्डी यामुळे चार्लस फेलिक्स यास त्यांजवर सूड घेण्याची आपली तृषा प्रत्यक्ष शमवितां आली नाहीं; तथापि सर्व बंडवाल्यांना त्यांचे गैरहजेरीत फांशीची शिक्षा देऊन आपल्या हुकुमाची भेंडोळीच्या भेंडोळी त्याने चोहोंकडे पाठविली. यानंतर काही दिवसांनी पोपच्या संस्थानांत एक बंड झाले. त्याचाहि लवकरच मोड झाला. पार्मा येथेहि एक बंड झाले; परंतु त्यासंबंधानें कांहीं विशेष लिहिण्यासारखें नाहीं. यानंतरचे बंड मॉडिना या संस्थानांत झालें तें मात्र थोडेसें ध्यानात ठेवण्यासारखे आहे. या वेळी म्हणजे १८३० ते ३१ चे सुमारास मॉडिना येथे फ्रान्सिस या नांवाचा ड्यूक राज्य करीत होता. त्याने वेळोवेळी आपल्या भाषणांनी नवीन उदार तत्त्वावर राज्य करण्याची पद्धति आपणास पसंत आहे असे लोकांस दर्शविले होते. त्यावर भरंवसा ठेवून सीरोमेनॉट्टी या नांवाच्या एका देशभक्ताने फ्रान्सिसच्या मदतीने बंड करून सर्व इटली काबीज करण्याचा व मॉडिनाच्या छत्राखाली स्वदेशी साम्राज्य करण्याचा धाडसी बेत केला; परंतु फ्रान्सिसचे बोलणे निव्वळ दिखाऊ असल्यामुळे मेनॉट्टीचे बंडाचा बेत राजाला कळला. हे बंड कांहीं अवधीने व्हावयाचे होते; परंतु फ्रान्सिसने आपल्या गुप्त हेरांकडून बातमी काढून बंडाची पुरी तपारी होण्याचे आधीच एके दिवशी संध्याकाळी मेनट्टीच्या घरास वेढा देऊन त्यास एकदम पकडले. लोक बिथरलेले होते यामुळे फ्रान्सिस हा स्वता भयाने पळून गेला. मात्र त्याने सीरोमेनॉट्टीस आपल्या बरोबर कैद करून घेऊन ऑस्ट्रियाचे स्वाधीन केलें. इकडे सहा हजार ऑस्ट्रियन फौज मॉडिनावर चालून आली त्यामुळे बंडवाले जिकडे तिकडे पळून गेले. जे सांपडले त्यांस घरून शिपायांनी तुरुंगात टाकले. इतके झाल्यावर परान्सिस हा मॉडिनास परत आला. परत आल्यावर सीरोमेनॉट्टीस त्याने फांशी दिले. मेनॉट्टी हा त्या काळी कट्टा देशभक्त म्हणून नावाजलेला होता. त्याचे वधामुळे लोकांना फार हळहळ वाटली. मेनॉट्टीने फ्रान्सिसचा पूर्वी एक वेळ प्राण वाचविलेला होता. असे असतांहि फ्रान्सिसने त्याचा फार अपमान व हाल केले. इतकेंच काय, परंतु मरणाचे दिवशी सकाळी मेनॉट्टीने आपल्या बायकोस शेवटल्या निरोपाचें एक पत्र लिहिले होते तेंहि त्या नीचाने वाटत पकडून अडकवून ठेविलें, कां तर त्या पत्रांत हे शब्द होते म्हणून : “प्रिये, मी तर चाललोच. परंतु माझ्या पश्चात् माझी मुले मोठी झाल्यावर मी आपल्या देशावर किती प्रीति करीत होतो हे त्यांना तूं सांग !
गुप्त मंडळया, बंडाळी व छळ - अशा रीतीने कारबोनेरी मंडळीच्या प्रसारामुळे व शिकवणीमुळे इटलींत जी लहान मोठी बंडे झाली त्या सर्वांचा ऑस्ट्रियाने आपल्या सैन्याचे जोरावर मोड केला. या बंडाच्या संबंधाने एक गोष्ट दिसून येते. ती ही की, कनिष्ठ प्रतीची प्रजा म्हणजे शेतकरी, उदमी, व साधारणतः सर्व अशिक्षित लोक या बंडापासून अलिप्त असत. बंडवाले म्हटले म्हणजे बहुतेक सुशिक्षित लोक असत. निदान पुढारी तरी सुशिक्षितांशिवाय दुसरे कोणी नव्हते. वास्तविक ही गोष्ट युरोपच्या इतिहासातील सामान्य नियमास अनुसरूनच होती. कोणत्याहि देशांत ज्या काही राजकीय चळवळी घडून येतात, त्यांस मध्यम 'प्रतीच्या व शिक्षण पावलेल्या अशा लोकांचा जो एक वर्ग असतो तोच प्रायः कारणीभूत होतो. श्रीमंत लोक बहुधा नेहमीच राज्यक्रांतीच्या विरुद्ध असतात. याचे कारण असे आहे की, तिजमुळे होणाऱ्या स्थित्यंतराने त्यांस आपलें नुकसान होण्याची फार भीति वाटते. दुसन्या पक्षी अगदी गरीब व कनिष्ठ वर्गाचे प्रजाजनहि राज्यक्रांतीला फारसे अनुकूल असत नाहीत. याचे कारण असें आहे की, राज्यक्रांतीचे खरे स्वरूप काय व ती झाली असतां आपली स्थिति कशी सुधारेल, याची त्यांस चांगलीशी कल्पना नसते. अशा रीतीने अति श्रीमान् व अति गरीब लोक, यांचेकडून राज्यक्रांतीची प्रथम चळवळ कधीहि होत नाही. सर्व राज्यक्रांत्या मध्यम स्थितींतील सुशिक्षित लोकां- कडूनच प्रथम घडून येतात. निदान त्यांच्या मूळ कल्पना तरी मध्यम वर्गातील लोकांच्याच डोक्यांतून निघतात; व त्या कल्पना सिद्ध होण्यास जी एक शक्ति, जो एक जोम किंवा त्वेष राष्ट्राच्या अंगी यावा लागतो, तो. सर्व तेच उत्पन्न करतात. वरील बंडांसंबंधाने दुसरी एक गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे, ती ही की, त्या बंडांत प्रत्यक्ष यश आले नसल्यामुळे ती करणाऱ्या लोकांस तत्कालीन शिष्ट लोकांनी मूर्खत काढले. ऑस्ट्रियाचा पाय' इटलीमध्ये जो एक वेळ घुसला होता तो केवळ या बंडांमुळे कायमवाच घुसणार असेंच प्रथम प्रथम कांहीं वेळ लोकांस वाटले. आपली शक्ति ती काय, आपण मूठभर माणसें, आपणांत एकी नाही, परक्यांचे साहाय्य व शत्रु अति प्रबळ, असें असतां अकाली लहानसहान बंड करण्यास प्रवृत्त होणे म्हणजे आपल्या गळयाशी आधींच' बसलेला दास्यत्वाचा फांस अधिक घट्ट करून घेणे होय, असें पुष्कळांचे त्या वेळी म्हणणे होते. तथापि आधी सर्वांची एकी करून व " २० ग्यारीबाल्डी सर्व राष्ट्र सुशिक्षित करून मग कोणतीहि गोष्ट करूं असें म्हणणाऱ्यास ती गोष्ट करण्याची वेळ कधीच येत नाही हे लक्षात ठेविले पाहिजे. लहानसहान बडे करण्याने इटलीतील बंडवाल्यांचे व त्यांच्या अनुषंगाने इतर कांहीं लोकांचे जन्माचे नुकसान झाले हे खरे. परंतु इटली स्वतंत्र करण्यासारखें महत्कार्य अशा रीतीने काही थोड्या लोकांनी स्वार्थत्याग केल्याशिवाय कधीहि साधले नसते. एकादी भव्य इमारत बांधावयाची असतां तिचे काम चारहि अंगांनी एकदम सुरू करूं, म्हणजे पाया, भिती, गच्च्या, शिखरें ही सर्व एकदम बांधावयास लागू असे म्हणणे हा निव्वळ वेडेपणाच होय. एकाद्या इमारतीच्या भव्यतेस किंवा सौंदर्यास घुमट किंवा शिखरें जितकी अवश्य आहेत तितक्या कदाचित् पायऱ्या नसतात, परंतु त्या पायऱ्याच शिखरांच्या आधी घडवाव्या लागतात. राष्ट्रोत्कर्षाचे वेळी पहिल्या पिढीत जे लोक जन्माला येतात त्यांना आपलीं शिरकमले वाहून त्यांच्याच योगाने या पायऱ्या रचाव्या लागतात. राष्ट्रोदयाचे कामी या पायऱ्या घडविणारांनी जरी तत्कालीन लोकांच्या दृष्टीने फारसा बहुमानाचा भाग उचललेला नसतो तरी तोच खरोखर अतिशय महत्त्वाचा असतो व अशा प्रकारच्या विचारांनीच त्या वेळचे इटलीतील देशभक्त प्रवृत्त झाले होते असे दिसते. इ. स. १८२० पासून १८४० पर्यंत इटलीमध्ये लहानसहान बंडे झाली ती बहुधा निष्फळच झाली. तथापि त्यांचे योगाने राष्ट्रामध्ये एक त-हेचा त्वेष उत्पन्न झाला त्याचेच फळ इटली देशाचे स्वातंत्र्य हे होय. असो. येथवर ज्या बंडखोर चळवळींचा निर्देश केला त्या सर्वांचें आदि- करण कारबोनेरी नांवाची गुप्त मंडळी व तिने दिलेले लोकशिक्षण हे होय. या गुप्त मंडळीस प्रत्यक्ष यश आले नाही. कारबोनेरी मंडळीचे काम दहा वीस वर्षे झाल्यानंतर 'तरुण इटली ' या नांवाची दुसरी एक गुप्त मंडळी तिच्या जागी अधिष्ठित झाली. ही मंडळी पहिल्याहून अधिक तेजस्वी व कर्तृत्ववान् असून तिला पहिलीपेक्षां यशहि अधिक आले. या मंडळीचा मूळ. उत्पादक मॅझिनी होता, त्याचा वृत्तान्त पुढील भागांत दिला आहे.
भाग ४ था मॅझिनीचा वृत्तान्त --- न तच्छस्त्रन नागेंद्रेः न हयैर्न च पत्तिभिः । कार्य संसिद्धिमभ्येति यथा बुद्धधा प्रसाधितम् ।। पंचतंत्रम जोसेफ मॅझिनी हा जिनोआ येथे १८०५ साली जन्मास आला. त्याचा बाप गिआकोमो मॅझिनी हा एक प्रसिद्ध वैद्य व शारीर- शास्त्राचा अध्यापक होता. त्याची आई मेराया ही अत्यंत रूपवती, बुद्धिवान व प्रेमळ स्त्री होती. मॅझिनी बाळपणी फार नाजूक व अशक्त असे. तो इतका की, एक दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला उभेसुद्धां राहता येत नसे. तो सुमारे सहा वर्षांचा झाला तेव्हां कोठे त्यास कोणाचा हात न धरतां ताठपणे चालतां येऊ लागले. मॅझिनी हा शरीराने जितका अशक्त तितकाच बुद्धीने प्रबळ होता. बाळपणापासून अन्यायाचा याला संताप असे व कोणाचीहि गरिबी पाहिली की त्याचे कोवळे मन अतिशय द्रवत असे. जन्मतःच तो मानव जातीचा व जुलमाचा शत्रु होता म्हटले तरी चालेल. वास्तविक घराबाहेर तो फारसा पडत नसल्यामुळे आपत्ति व दारिद्रय याचे दुःख कसे असते याची कल्पना त्यास येण्यासारखी नव्हती. परंतु ममता हा त्याचा उपजत गुणच होता. कोणीहि अनाथ, दुबळा, निराश्रित, पंगू किंवा रोगग्रस्त मनुष्य त्याने पाहिला म्हणजे त्याचे गळयास जाऊन मिठीच मारावी, त्याला कुरवाळावें व ‘कांहीं तरी त्याला दे, काही तरी दे, तो किती गरीब आहे पहा ग' असें म्हणून आपल्या आईच्या मागे हट्ट घेऊन लागावें. लहानपणापासून त्याचा स्वभाव गंभीर व विचारी असे. पोरांचे खेळ त्याला मुळीच आवडत नसत. केव्हांहि कोणी तुला काय हवें म्हणून विचारले असतां, नेहमीं 'पुस्तक द्या' असे त्याने म्हणावें. तो अवघ्या पांच वर्षांचा असतां त्याचे बिछान्यावर जिकडे तिकडे पुस्तकें पडलेली असत व कधी पुस्तके वाचीत तर कधीं नकाशावर आडवा पडून भूगोल शिकत असलेला तो दिसे. ही त्याची वृत्ति पाहून पुढे हा कोणी मोठा पुरुष निपजणार अशी पुष्कळ जणांनी त्याच्या आईची खातरजमा केली होती. .
२२ ग्यारीवाल्डी मॅझिनी सुमारे तेरा वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या बापानें जिनोआ येथील विद्यालयांत शिकावयास पाठविले. विद्यालयांत शिकत असतां त्याचा वाचनाचा व्यासंग दांडगा असे. आपल्या नीतिमत्तेने व दानतीने त्याने शिक्षकवर्गाचे मनावर मोठा दाब ठेविला होता. शिकत असल्यापासूनच त्याचे मनांत स्वदेशाविषयींचे विचार नेहमीं घोळत असत. सभोंवतीं समवयस्क विद्यार्थी निष्काळजीपणाने हसून खेळून आयुष्याचा काळ सुखाने घालवीत असतां मॅझिनी हा मात्र उदास, विचारमग्न व एकांतवासप्रिय असा असे. स्वदेश परकीयांचे ताब्यात असल्यामुळे तो मृतप्राय आहे अशी उग्र कल्पना मनांत बाळगून तो एकाद्या सुतकी मनुष्याप्रमाणे अंगावर नेहमी काळा पोषाख घाली. अशी ही त्याची वृत्ति पाहून त्याच्या आईस वाईट वाटे व एकाद्या दिवशी हा कदाचित् आत्महत्या करील की काय अशीहि तिला भीति पडे, सर्व विषयांत मॅझिनीला इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय फार आवडत. विद्यालयांत पांच वर्षे घालविल्यावर मॅझिनीने वकिलीची परीक्षा दिली; परंतु वकिली करून संपत्ति मिळविण्याचा विचार त्याचे मनांत कधीहि आला नाही. त्या काळी इटलीमध्ये असा नियम असे की, प्रत्येक नवीन वकिलाने दोन वर्षेपर्यत गरीब लोकांची कामें फुकट चालविलीच पाहिजेत. मॅझिनीला तर स्वभावतःच गरीब लोकांच्या उपयोगी पडणे हे अत्यंत प्रिय होते. त्यामुळे सर्व जिनोआमध्ये जो म्हणून कोणी गरीब पक्षकार असे तो एकदम मॅझिनीकडे धांव घेई. मागें कारबोनेरी म्हणून जी एक गुप्त मंडळी सांगण्यात आलेली आहे, तिजमध्ये मॅझिनी लवकरच सामील झाला. कारबोनेरी मंडळीचे काही विधि नवीन मनुष्यास तींत प्रथम सामील होतांना आचरावे लागत. मॅझिनी यास ते मुळीच आवडत नसत. तथापि आपल्यास त्यांच्या विधीशी काय करावयाचे आहे, स्वदेश मुक्त करण्याचा त्यांचा व आपला हेतु एकच आहे एवढे बस्स आहे, असें म्हणून तो आपल्या मनाचे समाधान करून घेई. परंतु पुढे पुढे कारबोनेरी मंडळीची मते, निदान त्यांची काम करण्याची रीति, त्यास पसंत पडेनाशी झाली. काही दिवस गेल्यानंतर १८३० सालीं फ्रान्स देशामध्ये जी राज्यक्रांति झाली त्या वेळी कार- बोनेरी मंडळीच्यातर्फे त्याजकडे काही महत्त्वाचे काम सोपविण्यांत आले होते; परंतु याच सुमारास एका गुप्त पोलिसाने त्यास पकडून मॅझिनीचा वृत्तान्त २३ । सरकारच्या स्वाधीन केलें. मॅझिनीस कैद केले त्या वेळेस त्याचा व इतर काही लोकांचा बंडाशी संबंध दाखविण्यासारखे त्याचेपाशी काही कागदपत्र होते, ते त्याने शिताफीने एकदम नाहीसे करून टाकले व तो पोलिसच्य स्वाधीन झाला. पुढे कांहीं एक चौकशी वगैरे न करता सरकारने मॅझिनीला सॅव्होना येथील किल्ल्यांत तुरुंगांत टाकले. ही बातमी कळतांच मॅझिनीचा बाप जिनोआ येथील गव्हर्नराकहे गेला व तुरुंगांत टाकण्याइतका आपल्या मुलाचा काय अपराध झाला हे कळविण्यात यावें, असा त्याने अर्ज केला. त्याचा त्याला असा जाब मिळाला की, तुमचा मुलगा तरुण व बुद्धिमान् आहे. त्याला रात्री बेरात्री एकटयाने सहल करणे फार आवडते. जे तरुण बुद्धिमान् आपल्या मनात काय चालले आहे हे बाहेर कळू देत नाहीत ते सरकारास मुळीच आवडत नाहीत. या कारणा- स्तव तुमच्या मुलास बंदीत टाकण्यात आले आहे. ' असो. तुरुंगवासांत असतांहि त्याने आपल्या स्नेहयांशी गुप्त रीतीने पत्रव्यवहार चालविला होता. त्यावरून त्याला असे कळून आले की, आपणास कैदेत टाकल्यामुळे कार- बोनेरी मंडळीला फार दहशत बसलेली आहे. हे पाहतांच त्या मंडळीच्या भित्रेपणाचा त्याला तिटकारा आला व ज्यामध्ये अद्याप थोडासा जीव उरला आहे अशा लोकांसच हातीं धरून एक नवीन मंडळी स्थापन केली पाहिजे असा त्याने निश्चय केला. अशा रीतीने 'तरुण इटली' या नांवाच्या प्रसिद्ध गुप्त मंडळीचा जन्म एका अंधाऱ्या व भयाण तुरुंगांत झाला. मॅझिनीला आपल्या हेतुसिद्धीच्या मार्गात किती प्रचंड अडचणी होत्या हे माहीत होते. तसेंच में कार्य आपण आरभणार त्या कार्याची सिद्धि आपल्या जन्मांत आपल्या डोळ्यांदेखत होणे शक्य नाहीं हेंहि त्याला दिसत नव्हतें असें नाही. परंतु त्याच्या विचारांत स्वार्थपरायणतेचा लवलेशहि नव्हता; याचमुळे त्याचे अंगी आरंभिलेलें कार्य सिद्धीस नेण्याची उमेद भाली व त्याचे मार्गांत निराशेची छाया कधीहि पडली नाही असे म्हटले पाहिजे. नवीन मंडळीची रचना कशी असावी, व ती उभारण्यास कोणत्या प्रकारचे साहाय्य घ्यावें, क्रांतिप्रवर्तक इतर संस्था व लोक युरोपांतील निरनिराळ्या देशांत जे आगाऊच उत्पन्न झाले होते त्यांच्याशी या नव्या मंडळीचा संबंध कोणत्या रीतीने जुळवावा, वगैरे सर्व गोष्टींचा पुरा विचार तुरुंगाच्या एकांतवासांत मॅझिनीने केला. विचारांती त्याने असें .
२४ ग्यारीवाल्डी ठरविले की, गुप्तपणा राहिल्याशिवाय आपल्या मंडळीचा निभाव लागणार नाही. तरी पण कोणत्याहि मनुष्यास मंडळीचा सभासद करण्यापूर्वी व त्याजकडून गुप्तपणा राखण्याची शपथ घेण्यापूर्वी, मंडळीचे खरे हेतु त्याला कळविलेच पाहिजेत. ज्यास मंडळीत यावयाचे असेल त्याने उघड्या डोळ्यांनी व आपल्या पायांनी चालत यावें! तसेंच जो कोणी मंडळीत येणार त्याजकडून स्वदेश स्वतंत्र करण्याचा मी प्रयत्न करीन, व सर्व इटलीमध्ये एकी करून प्रजासत्ताक राज्याचे छत्र उभारण्याचा प्रयत्न करीन, अशी शपथ घ्यावयाची असेंहि त्याने ठरविले. वरिष्ठ प्रतीच्या लोकांवर मॅझिनीचा बिलकुल विश्वास नव्हता. कधी कांहीं झाले, तर ते मध्यम व कनिष्ठ लोकांचे हातूनच होईल. आज ते जरी मुग्ध आहेत, तथापि त्यांच्या हृदयांत स्वातंत्र्यप्रियतेचे बीज खास रुजले आहे, व 'तरुण इटली' तरुण इटली' मंडळीच्या सभासदांकडून त्याजवर उपदेशामृताचे सिंचन केले असता त्याला हटकून अंकुर फुटेल असा त्याचा विश्वास होता. इटली देश मृत नसून केवळ निद्रिस्त आहे असे मॅझिनीचें मन त्यास सांगत होते. मोठमोठ्या राज्यक्रांत्या किंवा उलाढाली होतात त्या समाजांतल्या व समाजावर प्रीति करणाऱ्या लोकांकडूनच होतात. त्यांना प्रथमतः आपला निश्चय व विश्वास यांच्या जोरावरच कामाची सुरुवात करावी लागते. श्रीमान्, संपन्न व वजनदार लोक नंतर येऊन त्यांत मिळतात, याकरिता एकदम कामासच सुरुवात केली पाहिजे असें मॅझिनीने ठरविले. तुरुगवासांत सहा महिने काढल्यावर मॅझिनीची सुटका झाली. त्याने स्वदेशांत राहूं नये या शर्तीवर त्यास मोकळे करण्यात आले होते. अशा रीतीने स्वदेशांत राहण्याची मनाई झाल्यामुळे मॅझिनी फ्रान्समध्ये निघून गेला. त्या वेळी फ्रान्समध्ये लुई फिलिप बादशाहा राज्य करीत होता. त्याने इटलींतून हद्दपार झालेले कोणीहि लोक आपल्या देशांत राहू द्यावयाचे नाहीत, असा हुकूम फर्माविला होता. त्यामुळे मॅझिनीस गुप्तपणे मार्सेलिस येथे जावे लागले. तेथें जातांच त्याने 'तरुण इटली' नांवाची गुप्त मंडळी जमविण्याचा उद्योग आरंभिला. या मंडळीची निशाणी म्हणजे 'सायप्रेस नांवाच्या झाडाची डहाळी असे. हीच निशाणी असण्याचे कारण की सायप्रेस हे झाड दुःखभावसूचक मानलेले आहे. या खुणेने स्वदेश स्वतंत्र करण्याकरितां ज्यांनी आजपर्यंत आपले प्राण खर्ची घातले, त्यांची आठवण ती निशाणी पाहून आपोआप व्हावी. . .
मैमिनीचा वृत्तान्त २५ या मंडळीचें कार्य झपाट्याने व्हावें व लोकसत्तेच्या मूळ तत्त्वांचा समाजांत जलद प्रसार व्हावा, याकरितां 'तरुण इटली' नांवाचे त्याने एक वर्तमानपत्र काढले. या वर्तमानपत्रामध्ये इटलीने परकीयांचा अंमल झुगारून द्यावा व संयुक्त व स्वतंत्र लोकसत्ताक राज्य स्थापावें हे विचार व इतर धर्मनीति व राजकीय तत्त्वज्ञान यांची तत्त्वे शिकविली जात. अर्थात् हे वर्तमानपत्र इटली देशांत वाढू देऊ नये असा अधिकाऱ्यांचा हुकूम होता. परंतु जितका त्याच्या प्रसारावर प्रतिबंध अधिक, तितका त्याचा प्रसार अधिक होऊ लागला. मार्सेलिस शहरांतून प्रथम जवळच्या अशा दोन तीन किनाऱ्यांवरील शहरांत या वर्तमानपत्राचे अंक लोक गुप्तपणे नेत व तेथून गुप्त छापखान्यांचे द्वारें त्याचा फैलाव इटलीच्या या कोपऱ्यापासून तो त्या कोपऱ्यापर्यंत होई. हे वर्त- भानपत्र वाचण्याची गोडी लोकांस इतकी लागून राहिली होती की, ते वाचण्याकरितां लोक हाल सोसण्यास व क्वचित् प्राण देण्यासहि तयार होत. क्रमाक्रमाने इटलीतील लोक मॅझिनीच्या गुप्त मंडळीस येऊन मिळू लागले. ज्या द्वाराने त्याच्या वर्तमानपत्राच्या हजारों प्रती गुप्तपणे पसरल्या जात, त्याच द्वाराने तयार झालेल्या देशभक्तांची नवीं नवीं हजारों नांवें 'तरुण इटली'च्या मंडळीचे सभासद होण्यास हातीं येऊ लागली. हे पाहून मॅझिनीस आनंद झाला. परंतु त्याचे त्याला बिलकुल आश्चर्य वाटले नाही. कारण त्याची खटपटहि अशीच कांहीं विलक्षण चालू होती. वर्तमानपत्राला ऑफिस नाहीं, लिहिण्यास मदतनीस नाहीं, पत्र छापून काढण्यास हाताखाली चाकर नाहीत, अशा स्थितीमुळे मॅझिनीला अहोरात्र काम करावे लागे. वर्तमानपत्रांतील लेख लिहिणे व इतर पत्रव्यवहार करणे, पत्र छापून निघाले म्हणजे त्याच्या घड्या घालून त्याचे गळे बाधणे, कोणी प्रवासी आला असतां त्याला भेटून हकीकत विचारून घेणे, इत्यादि बहुतेक कामें त्याची त्यालाच करावी लागत. शिवाय तो अगदी दरिद्रावस्थेला आला होता. तथापि पुढे आपल्या राष्ट्राचा भाग्योदय होणार या विचाराने तो नेहमी हंसतमुख व आनंदी असे. कृतघ्न व शंकेखोर माणसें, निंदक लोक, आप- ल्याच तटांतील कलहप्रिय लोक, व तसेंच पूर्वीचा मित्रभाव सोडून बनलेले शत्रु, इत्यादि शेंकडों प्रकारच्या माणसांकडून त्याला त्रास होत असे; तथापि केवळ कर्तव्यावर लक्ष देऊन त्याने आपला क्रम चालू ठेविला होता. यामुळे तरुण इटली' मंडळी स्थापून एक वर्ष होतें न होते तोच तिचे महत्त्व सर्व प्यारीबाल्डी इटलीमध्ये अतिशय वाढले. ही मंडळी स्थापन करणारे लोक अप्रसिद्ध, गरीब, व तरुण असतां इतक्या थोड्याच काळांत तिचे इतके महत्त्व वाढले की, इटलींतील सातहि संस्थानांतील राजे तिला भिऊन तिच्या सभासदांचा छळ करूं लागले. येवढयाच गोष्टीवरून तिचा पाया भक्कम व उदात्त तत्त्वांवर रचिला होता हे सिद्ध होतें. असो. मॅझिनीचें वर्तमानपत्र लोकांना जितकें प्रिय तितकेंच अधिकाऱ्यांना अप्रिय झाले होते. त्यांनी त्या वर्तमानपत्राचा प्रसार बंद करण्याकरितां अनेक खटपटी केल्या. जो कोणी त्या वर्तमानपत्राचे अंक धरून देईल त्यास बक्षिसें दिली जात व ज्या कोणावर त्यांचा प्रसार केल्याचा आरोप शाबीत होई, त्यास जबर शिक्षा देत. येवढेच काय, पण त्या वर्तमानपत्राची नालस्ती किंवा त्यास प्रतिबंध करण्याचा प्रयल न करणे हे एक गुन्हयाचें नवीन सदरच काढलेले असून, तो करणारास दोन वर्षांची शिक्षा व दंड होई, व त्या अप- राधाची बातमी देणारास त्यांतील निम्में बक्षिस मिळे. या व यासंबंधी इतर अपराधांची चौकशी करण्याकरितां लष्करी अधिकाऱ्यांची एक न्याय- सभाहि नेमली होती. या न्यायसभेपुढे मॅझिनीचें वर्तमानपत्र वाचल्याचा ज्यांवर आरोप असेल त्यांस आणीत व ज्यांवर तो शाबीत होई त्यांस पाठीमागून गोळी घालून ठार मारीत. इतकेंहि करून मॅझिनीच्या वर्तमानपत्राचा प्रसार बंद होत नाही असे पाहून, इटलीतील राजांनी फ्रान्सच्या लुई फिलिप राजास मॅझिनीला पकडण्याची विनंति केली. तेव्हां फिलिपच्या हुकुमावरून मॅझिनीला पकडण्यास पोलिस सुटले. परंतु दोन वर्षेपर्यंत त्याचा त्यांस पत्ताच लागला नाही. एका जागेहून दुसरीकडे, दुसरीहून तिसरीकडे, असें करून मॅझिनीने आपल्या राहण्याचे ठिकाण दोन वर्षेपर्यंत गुप्त राखिलें. शेवटी एके दिवशी अशी मौज झाली की, मॅझिनी अमुक एका घरांत आहे असे कळतांच, पोलिसांनी त्या घरास वेढा दिला. तेव्हां मॅझिनीसारखाच किंचित् दिसणारा त्याचा एक स्नेही होता तो मीच मॅझिनी, असे सांगून पोलिसाचे स्वाधीन झाला. इकडे दुतर्फा उभे राहिलेल्या पोलिसांच्या रांगेतून खरा मॅझिनी खुशाल सावकाश चालता झाला व सुरक्षित बाहेर पडून स्वित्सलँड देशास पळून गेला. यापुढे मॅझिनी इटलीत नव्हता, तथापि 'तरुण इटली' मंडळीचे काम बंद पडले नाही. याचे कारण असे की, तें काम अमुक एकानेंच करण्याचे .
देशकार्याचा ओगामा २७ . असे नव्हते. स्वदेशाभिमान एकाद्या समाजांत एकदां जागृत झाला म्हणजे मग तो वणव्यासारखा चरत जातो. मॅझिनी जरी जाग्यावर नव्हता, तथापि त्याच्या शिकवणीने इटलीतील तरुण मंडळीच्या मनांत जें एक स्वदेश- प्रीतीचें बीज रुजलें, तें एकसारखें वाढतच गेलें. इकडे स्वित्सलंडमध्ये गेल्याबरोबर मॅझिनीच्याभोंवतीं जर्मनी, फ्रान्स, इटली, व पोलंड इत्यादि देशांतून हद्दपार केलेली मंडळी बरीच येऊन मिळाली. तरुण इटली ' मंडळीच्या नमुन्यावर 'तरुण युरोप' या नांवाची एक नवीन मंडळी त्यांनी काढली. ही मंडळी काढण्यांत मॅझिनीचा मुख्य हेतु असा होता की, राजकीय जुलुमाविरुद्ध सर्व युरोपखंडांत लोकमत जागृत करावें व जसजशी ही मंडळी हद्दपार होऊन एका देशाहून दुसऱ्या देशांत व दुसन्याहून तिस-या देशांत आसरा घेण्यास जातील, तसतसा लोक- सत्तेच्या उदार तत्त्वांचा प्रसार सर्व युरोपखंडभर व्हावा. मॅझिनीचा हा प्रचंड हेतु अखेर शेवटास गेला हे यानंतर घडून आलेल्या इतिहासावरून सिद्ध होतें. असो. येथवर सांगितलेल्या हकीकतीवरून इटलीमध्ये लोकमताची जागृति कशी झाली वती होण्यास मॅझिनीसारखे लोकशिक्षक व त्यांनी स्थापि- लेल्या मंडळया कशा उपयोगी पडल्या हे कळून येईल. मॅझिनीचें वर्तमानपत्र वाचून व त्याने स्थापन केलेल्या मंडळयांतील प्रमुख देशभक्तांची संभाषणे ऐकल्याने ग्यारीबाल्डीचे मनाची पक्की तयारी होऊन राहिली होती. परंतु, त्याच्या हृदयांत जो त्वेष व उत्साह उसळलेला होता, तो कृतीचे रूपाने बाहेर पडण्यास प्रथम कोणतें कारण झाले याची हकीकत पुढील भागीं येईल. भाग ५वा देशकार्याचा ओनामा विघ्नः पुनःपुनरपि प्रतिहन्यमाना । प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ।। ग्यारीबाल्डीच्या खऱ्या चरित्रास सन १८३४ साली सुरुवात झाली. त्या वेळी तो अवघा २७ बर्षांचा होता. या वेळी २८ ग्यारीबाल्डी इटलीमध्ये, 'बंडवाल्यांचे दोन दिवस संपून राजांचे दोन दिवस ' आले होते. पिड्माँट येथे एक लहानसें बंड झाले. त्याचा चार्लस आलबर्ट राजाने मोड करून त्यांत सामील असलेल्या व नसलेल्याहि लोकांस जबर शिक्षा देण्याचे काम या वेळी चालविले होते. या धामधुमीत पुष्कळ लोकांचा छळ झाला व पुष्कळ लोक सैरावैरा देशांतून पळत सुटले. हे पाहून ग्यारीबाल्डीचे मनास अत्यंत चेव येऊन त्याचे हात देशसेवा करण्यास फुरफुरूं लागले होते. इतक्यांत त्याला एक संधि मिळाली ती अशी : -स्वदेश मुक्त करण्याची बडबड आजपर्यत पुष्कळ झाली, आतां हातून प्रत्यक्ष कांहीं तरी झालेच पाहिजे, असे विचार मनांत सारखे घोळत राहून लोकांस चैन पडेनासें झाले होते. आता यापुढे लोकांस धीर निघत नाही असे पाहून १८३३ सालचे सप्टेंबर महिन्यामध्ये मॅझिनीच्या सल्ल्याने इटालियन लोकांनी एक बंडाचा कट केला. पोलंड देशामध्ये स्वतंत्रता मिळविण्याबद्दल ज्या खटपटी झाल्या त्यांमध्ये, रॅमॅरीनो म्हणून प्रमुखपणाने काम केलेला असा एक वीर हद्दपार होऊन या वेळी इटलीमध्ये आलेला होता. त्याला या बंडामध्ये पुढारी करण्याचे ठरविले होते. ग्यारीबाल्डीकडेहि मॅझिनीने कांहीं कार्यभाग सोपविलेला होता व तो त्याने मोठ्या आनंदाने पत्करला. परंतु रॅमॅरीनोचे हातून व्हावी तितकी खटपट न झाल्यामुळे उघडपणे बंड करण्याचे काम पुढील सालापर्यंत भिजत पडले. पण त्याचेपूर्वीच अधि- काऱ्यांना बंडाची गुप्त बातमी लागली व ते आपली तयारी करून सावधपणे वाट पाहात बसले. इकडे पिड्माँटवर स्वारी करण्याचा बंडवाल्यांचा निश्चय सॅन ज्युलियानो' नावाचे एक लहानसे खेडें होतें तें हस्तगत करून घेण्याचे ठरले. बंडवाल्यांच्या दोन टोळ्या करून दोन दिशां- कडून दोन्ही टोळ्यांनी एकदम हल्ला करावा असाहि बेत ठरला होता. परंतु जलमार्गाने येणाऱ्या टोळीस किचित् उशीर झाल्यामुळे रॅमॅरीनो याने दुसराच एक रस्ता धरला. आपण कोठे जात आहों, हे त्याचे त्यासच पुरतें ठाऊक नव्हते. त्या वेळी थंडी म्हणजे मी म्हणत होती व रस्ते खडबडीत असल्यामुळे प्रवासास फार अडचण होऊ लागली. बंडवाल्यांच्या टोळीत बहुतेक अननुभविक, परंतु केव्हां एकदां लढाई करूं, असें म्हणणारे उल्लू तरणेबांड लोक भरलेले होते. त्यांना उशीराचा कंटाळा येऊन ते अगदी उतावीळ झाले. आपण बंड करण्यास निघालों हे वास्तविक सर्व देशाचेंच झाला. प्रथमतः देशकार्याचा ओनामा कार्य, तेव्हां आपणांस पाहतांच ठिकठिकाणचे लोक आपले अभिनंदन व आदर करून आपणांस मिळतील अशी या तरुण बंडवाल्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष पाहावें तर प्रकार अगदी वेगळाच झाला. कोणीहि सामोरें येईना किंवा तुम्ही कोठले, कोण, कोठे जातां, असें एका शब्दानेहि विचारीना. तेव्हा त्यांची बरीच निराशा झाली. मॅझिनी व रॅमॅरीनो यांचे आपसांत भांडण जुंपलें. इतक्यांत एकाएकी एक बंदुकीचा आवाज चुकून झाला. तो होतांच मॅझिनी बेशुद्धच पडला. रमॅरीनोलाहि काय करावे हे सुचेना व तो आपल्या टोळीनिशी मागे फिरला. अशा रीतीने हे बंड जेथल्या तेथेंच विझलें. ग्यारीबाल्डीची नेमणूक या बंडाचे कामी युरीडाईस नांवाच्या जहाजावर झालेली होती. त्याने जहाजावरील लोकांचे मन बंडास अनुकूल करण्याची खटपट खूप जोराने चालविली. इतक्यांत जिनोआ येथेहि बंड होणार आहे असे कळतांच तो आपले कांहीं स्नेही जहाजावर ठेवून जिनोआस गेला. पण तेथे पाहतो तो कोटेंच काही नाही. बंडाची बातमी आधीच' फुटून कांही लोकांस कैदहि करण्यांत आले होते. बरें, परत निघून यावे तर भोंवतीं सैन्याचा गराडा पडत चालला होता. तेव्हां जलदी करून तो एका बाग- वानिणीच्या घरी गेला व तिला त्याने आपली स्थिति उघड करून सांगितली. तेव्हा तिनें ग्यारीबाल्डीला शेतकऱ्याचा एक पेहराव दिला. तो अंगावर घालून त्याने जिनोआ शहर सोडले. जातांना वाटेत बागांतून लपत छपत, कोठे भिंतीवर चढून' तर कोठे डोंगराचे कडेकडेने चालून तो एकदांचा हमरस्त्यास येऊन मिळाला. आणि नंतर काही दिवस उपास काढीत तर काही दिवस नुसती रानांतील फळे खात खात, हाल काढीत दहा दिवसांनी नाईस शहरी जाऊन पोहोचला. त्या वेळी त्याची इतकी दुर्दशा झाली होती की त्याच्या मावशीने त्याला प्रथम न ओळखतां कोणी भिकारी आला आहे असे समजून दारांतूनच त्यास हुसकून दिले. परंतु नाईस येथे तो फार दिवस थांबला नाही. आपल्या आईची एक वेळ भेट घेऊन तो इटली सोडून निघून गेला. नाईस सोडल्यावर वाटेत एक नदी लागली. तिला पावसाने मोठा पूर आला होता तरी ग्यारीबाल्डी नदीत उडी टाकून पोहून पार गेला. त्याच्या बरोबरच्या दोघां स्नेहयांस मात्र पोहून जाण्याचे धाडस होईना, तेव्हां पैल- ग्यारीबाल्डी तीरावरून ग्यारीबाल्डीने त्यांस रामराम ठोकला व परान्सच्या अधिकाऱ्यांची एक छावणी होती तेथे गेला. आपण कोठले, कोण व जिनोआहून कां आलों हे त्याने त्यांस मोकळया मनाने सांगितले. त्यांनी असा अपरिचित माणूस हातीं सांपडतांच त्यास कैद केले व तुरुंगांत टाकले. या तुरुंगाच्या खोलीत एक खिडकी जमिनीपासून सुमारे १५ फुटांवर होती. ती पाहतांच ग्यारीबाल्डीस मोठा आनंद झाला. तेथपर्यत चढून त्याने खिडकीतून खाली उडी टाकली आणि रखवालदार लोक पाहात असतां तो पार निघून गेला. लवकर ओसाड व डोंगराळ अशा मुलुखांत धुसून तेथून त्याने मार्सेलीसची वाट धरिली. दुसरे दिवशीं वाटेत एक खेडे लागले. तेथल्या खाणावळीची विचारपूस करीत करीत ग्यारीबाल्डी चालला. खाणावळींत एक तरुण पुरुष व स्त्री विस्तवाजवळ शेकत बसली होती. त्यांचेपाशीं ग्यारीबाल्डीहि जाऊन बसला. नंतर खाणावळवाल्याने जेवण तयार केलें. ग्यारीबाल्डी त्या दिवशी इतकें जेवला की त्याचे खाणावळवाल्यास आश्चर्य वाटू लागले. जेवण झाल्या- वर रीतीप्रमाणे मेजावर मद्यहि आले व स्वस्थ चित्ताने इकडच्या तिकडच्या मोष्टी निघाल्या. ग्यारीबाल्डीने आपला सर्व वृत्तान्त मागचा पुढचा विचार न करितां त्या खाणावळवाल्यास खुशाल सांगितला. तो ऐकतांच खाणावळ- वाल्याचा एकदम चेहरा पालटला, व तो ग्यारीबाल्डीस म्हणाला, भल्या गृहस्था, तूं आतां इतका वेळ दिलेला कबुली जबाब ऐकून तुला कैद करणे हे माझें कर्तव्य आहे असे मला वाटते." हे शब्द ऐकून ग्यारीबाल्डीस बिलकुल आश्चर्य किंवा भीति वाटली नाही. तो खदखदा हसून थट्टेच्या स्वराने म्हणाला, "ठीक आहे. माझी त्याला मुळीच हरकत नाही. पण आधी जेवण, खाणे- पिणे सर्व संपवू दे व मग तुला माझं काय डोकेंबिकें मारावयाचे असेल तें " मारून घे. हे बोलणे चालले आहे इतक्यांत त्या खेड्यांतली काही तरुण मंडळी तेथे आली. मग अर्थात्च त्यांच्या गप्पा-गोष्टी, खेळ-तमाशे, दारू पिणे व गाणे- बजावणे चालू झाले. त्यांत ग्यारीबाल्डी हाहि खुशाल मिसळला व त्या मौजेच्या भरात तो खाणावळवालाहि ग्यारीबाल्डीस कैद करण्याची गोष्ट अगदी विसरून गेला. येवढेच नव्हे, तर त्यांनी एकमेकांस स्नेहयांप्रमाणे आलिंगनेंहि दिली. अशी ही रात्र ख्यालीखुशाली व चैनबाजीत काढून सकाळ होतांच ग्यारीबाल्डी पुढे जावयास निघाला. तेव्हा त्याचे रात्रीचे सोबतीहि देशकार्याचा ओनामा ३१ . त्याला पोहोचवायला गेले. तेथून पुढे कांहीं एक दगाफटका न होता ग्यारीबाल्डी मार्सेलिसला जाऊन पोहोचला. तेथें जातांच त्याच्या हाती सहजच एक वर्तमानपत्र पडले. त्यांत पाहतो तों आपणास फाशीची शिक्षा फर्माविलेली आहे असें त्याला आढळून आले. आपले नांव आज प्रथमच पण अशा रीतीने छापलेले पाहून त्याला मोठे नवल वाटले. तेव्हां यापुढे आपले नांव कायम ठेवणे सुरक्षित नाही असा विचार करून एम्. पेन असें नांव त्याने धारण केलें. नंतर काही दिवस एका स्नेहयाच्या येथे काढून पुढे यूनियन नांवाच्या गलबतावर त्याने चाकरी धरली. पुढे मार्सेलिस येथे महामारीचा उपद्रव सुरू झाला. तो इतका भयंकर होता की, त्या वाख्याने हजारों लोक गांव सोडून गेले. कोणाहि वैद्याचें औषध चालेना. रोग्यांना औषधपाणी करण्यास कोणी माणूस मिळेना. जे लोक गांवांत राहिले होते ते घरांतील माड्यांवर राहिलेले असून जेवण. खाणाससुद्धां खाली न येतां अन्नपाणी दोयांनी वर उचलून घेत! अशा या वेळी ग्यारीबाल्डी इस्पितळांत राहून रोग्यांची शुश्रूषा करी. स्वतःच्या प्राणाची त्याला कधींहि पर्वा नसे. परोपकार करण्यामध्ये मृत्यु आला तरी बेहत्तर, परंतु हातून होईल तितका परोपकारच करावयाचा असा त्याचा निश्चय झाला होता. मार्सेलिसहून ग्यारीबाल्डीने निरनिराळ्या जहाजांवर बरीच जलपर्यटणे केली. परंतु त्याच्या चित्तास समाधान नव्हते. आपण इटली सोडण्यापूर्वी कोणचे विचार करीत होतो, व हातून कांहीं एक न घडून येतां पहिल्याच घासाला माशी लागावी त्याप्रमाणे आपला हातीं घतलेला पहिलाच उद्योग निष्फळ होऊन आपणांस फाशीची शिक्षा झाली, ती चुकविण्याकरिता थापण परमुलुखांत येऊन पडलों व इतउत्तर देशकार्य करण्याची पुन्हा संधि येण्याचा संभवहि कायमचा खुंटला, अशा विचाराने तो नेहमी उदास असे. तथापि शेवटी काहींसें वैतागानें व कांहींसें दूर जलपर्यटन करण्याच्या आवडीने स्याने दक्षिण अमेरिकेंत जाणाऱ्या एका गलबतावर नोकरी धरिली; बरेच दिवस प्रवास करून तो रीयोडीजानिरीओ येथे जाऊन पोहोचला. . .
भाग ६ वा दक्षिण अमेरिकेतील पराक्रम व विवाह समानयन् तुल्यगुणं वधूवरम् । चिरस्य वाच्यां न गतः प्रजापतिः । अक्षिण अमेरिकेस पोहोचल्यावर ग्यारीबाल्डी आपला स्नेही रॉझेटी यांजकडे रिओ येथे काही महिने राहिला. तेथें रिओग्रॅडे या नांवाच्या लोकसताक संस्थानच्या मुख्य अधिकाऱ्याची व त्याची सहज गांठ पडली. त्या वेळी अमेरिकेंत राजसत्ता व लोकसत्ता यांचा झगडा चालू असून रिओग्रॅडे संस्थान बेझिल देशाशी लढत होतें. ग्यारीबाल्डीने रिओग्रॅडे संस्थानचा 'पक्ष उचलला. नंतर त्याला त्या संस्थानकडून एक जहाज मिळाले. जहाज हाती येतांच ग्यारीबाल्डीने सुमारे सोळा साथीदार मिळविले व बेझिल देशाच्या राजाबरोबर लढण्यास सुरुवात करण्याचा निश्चय केला. या वेळी त्याचे मनांत राष्ट्रीयत्वाची अत्युच्च कल्पना चांगली बिबली होती. स्वदेश व इष्टमित्र यांना सोडून तो अमेरिकेंत आला होता. परंतु येथेंहि आपल्या देशाप्रमाणेच राजे लोकांचा जुलूम गरीब प्रजेवर फार होत आहे असें पाहतांच इटली देशांतील लोकांप्रमाणेच त्या गरीब प्रजेबद्दल त्याचे मनांत प्रीति उत्पन्न झाली. अवघे जग हाच आपला देश व अवधी मानवजात हेच आपले देशबांधव; जगाचे पाठीवर मानवजातीपैकी कोणीहि कोठेहि जुलमाचे तडाख्यांत सांपडला असतां त्यास सोडविणे हाच आपला देशाभिमान, असे त्यास वाटू लागले होते. असो. असो. आपल्या जहाजाला त्याने आपल्या मित्राच्या स्मरणार्थ 'मॅझिनी' हे नांव दिले व लढाईस एकदम सुरुवात केली. प्रथमतः त्याने बुंद वगैरे भरून नेत असलेलें ऑस्ट्रियाचे एक मोठे जहाज पकडलें. ऑस्ट्रिया हा इटलीचा शत्रु, यामुळे आपल्या शत्रूला प्रथमारंभीच तडाखा देण्यास सांपडला, या गोड विचाराने ग्यारीबाल्डीस मोठा हर्ष झाला. या जहाजावर त्यास कांहीं हिरे मिळाले. नंतर या हस्तगत केलेल्या जहाजास स्कॉनोपिला हे नांव देऊन ही दोन्हीं जहाजे घेऊन ग्यारीबाल्डी हा मॉडोनेटो या नांवाच्या समुद्रकिनाऱ्यावरील एका गांवीं गेला. हे गांव मॉटीव्हिडोचे ताब्यात होते. परंतु माटीव्हिडो दक्षिण अमेरिकेंतील पराकम व विवाह ३३ ३ .. व युराग्वे ही दोन्हीहि लोकसत्ताक संस्थाने असून उभयतांचे परस्पर सख्य नव्हते; यामुळे त्यास तेथून लवकरच परत फिरावे लागले. परत फिरण्याचे पूर्वी एक लहानशी गोष्ट घडून आली ती अशी : मोल- डोनॅटो येथील एका व्यापायाने ग्यारीबाल्डीचे काही हिरे व कांहीं बुंद वगैरे जिन्नस खरेदी घेतले होते. परंतु त्याचे तो लवकर पैसे देईना. पुढे त्यास असें कळून आले की, स्कॉनोपिला या जहाजास बंदर सोडून एकदम जाण्याचा हुकूम झाला आहे. यामुळे तर पैसे पचविण्याच्या बेताने तो अधिकच टाळा- टाळी करू लागला. संध्याकाळ होत चालली, हुकुमाप्रमाणे जहाज हाकार- ण्याचीहि वेळ झाली, तरी अजून पैसे येईनात, असे पाहून ग्यारीबाल्डी याने मुकाट्याने आपलें जोडगोळीचे पिस्तुल खिशांत घातले व जहाजावरून उतरून तो व्यापाऱ्याचे घरी गेला. त्याला पाहतांच तो व्यापारी उडवा- उडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हां ग्यारीबाल्डी एकदम आपलें पिस्तुल त्याचे छातीस लावून म्हणाला, 'पैसे टाक; दुसरी गोष्ट नाही. ' ग्यारी- बाल्डीचे उग्र स्वरूप पाहतांच तो व्यापारी भिऊन गेला व त्याने मुकाट्याने पैशाची थैली आणून दिली. एक चकार शब्द न बोलतां ती थैली खांद्यावर टाकून ग्यारीबाल्डी जहाजावर परत गेला व मध्यरात्री त्याने आपले जहाज बंदरांतून हांकारिलें. पुढे वाटत शिधासामग्री लवकर संपली. समुद्र खवळलेला होता. किनाऱ्याजवळचा प्रदेश खडकाळ असल्यामुळे लाटाहि फार उसळत होत्या जहाजाचे आसपास सुसरीचे कळपचे कळप हिंडत होते. अशा रीतीने संकटांत पुष्कळ दिवस घालविल्यावर शेवटी एकदांची जमीन व त्या जमिनीवर एक लहानसे घर असावेसें दिसले. परंतु जहाजावरून उतरून किनाऱ्याकडे जाण्यास होडी नव्हती. तेव्हां आता काय करावे अशी पंचाईत येऊन पडली. जवळ होडी नाही असे पाहतांच ग्यारीबाल्डीने जहाजावरील एक मेज घेऊन त्याच्या चार पायांस चार पि बांधली, व मेजावर एक काठी रोवून त्याला त्याने आपले कपडे निशाणादाखल बांधले. मग तो व त्याचा एक सोबती असे दोघे जण ही नवीन बनविलेली होडी समुद्रांत लोटून तिच्यावर बसले व वल्हयाच्याऐवजी ती पायांनी वल्हवीत किनाऱ्यास येऊन पोहोचले. किनाऱ्या- पासून दिसलेलें घर समुद्रापासून चांगले चार मैल लांब होते. तेथे येऊन पाहतात तो घरामध्ये एक सुंदर स्त्री गृहकृत्यांत गुंतली होती. तिने ग्यारी- ३ ग्यारीबाल्डी बाल्डीचे चांगले आदरातिथ्य केलें. ती स्त्री स्वतः विद्वान् कवयित्री होती. तिचा नवरा कामाकरितां बाहेर गेला होता. तो घरी येतांच त्यानेंहि त्यांचे आदरातिथ्य केलें. जहाजावरील लोकांस अन्न पाहिजे होते. त्याकरिता त्याने एक मोठा थोरला बैल मारून ग्यारीबाल्डीस दिला. तो त्या मेजाच्या होडीवर घालून व त्या गृहस्थाचे आभार मानून ग्यारीबाल्डी जहाजावर परत आला. नंतर तें जहाज तेथून निघाले. दुसरे दिवशी सकाळी काही अंतरावर दोन जहाजें आपणांकडे येताहेतसें त्याला दिसले. परंतु ती लवकरच शत्रुपक्षाची ठरून त्यांची व ग्यारीबाल्डीचे जहाजाची लढाई सुरू झाली. दोन्हीकडील लोक फार निकराने लढले व गोळीबाराची शिकस्त झाली. या झटापटीत सुकाणूंवाला गोळी लागून पडला. तेव्हां सुकाणूं फिरेना. तें चालविण्याकरितां स्वतः ग्यारीबाल्डी त्या जागी गेला, तो इतक्यांत एक गोळी त्याचेहि गळ्यांत शिरली व तो जहाजावर बेशुद्ध होऊन पडला. ग्यारीबाल्डी पडला तरी त्याचे लोक धैर्याने लढत होते. अशी सुमारे एक तास लढाई झाल्यावर शत्रु आपणच होऊन दमून निघून गेले. यानंतर वाराहि चांगला सुटला व ग्यारीबाल्डीचे जहाज लापलाटा नदीमधून सुरक्षितपणे वर चढले. ग्यारीबाल्डी शुद्धीवर आला तेव्हां त्यास अतिशय ताप भरला होता. तोंडातून शब्द निघेना व डोळे अर्धवट पांढरे झालेले! जहाजावर कोणी वैद्यहि नव्हता. अशा स्थितीत ग्यारीबाल्डीस साधारण बरा होण्यास एकोणीस दिवस लागले. ग्युलाग्वे येथे पोहोचल्यावर त्याचे मानेंतून एका शस्त्रवैद्याने गोळी काढली व तो घोड्यावर बसून बाहेर हवेत थोडथोडा व्यायाम घेण्यासहि जाऊ लागला. अंगांत थोडी शक्तीहि आली. गांवांतील काही लोकांच्या ओळखी झाल्या. अशा रीतीने सहा महिने बरे गेले; परंतु अखेरीस त्यास असे कळून आले की, ग्युलाग्वे येथील अधिकाऱ्यांनी त्याने शहर सोडून जाऊ नये असा गुप्त हुकूम फर्माविला होता. आपण वास्तविक बंदिवान आहों असें ग्यारीबाल्डीस कळल्यापासून तेथून जाण्याची त्याची इच्छा फार वाढली. इतक्यांत लोकांनी त्यास सांगितले की, 'तुम्ही मुकाटयाने निघून जा म्हणजे गव्हर्नर केवळ मुद्दाम होऊन तुम्हांस अडवीलच अशांतला प्रकार काही नाही.' तेव्हां ग्यारी- बाल्डीने गुप्तपणे पळून जाण्याची तयारी केली.
दक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह एके दिवशी संध्याकाळी वादळ सुटले आहे व मनुष्ये फारशी घरांतून बाहेर पडलेली नाहीत अशा वेळी ग्यारीबाल्डी हा घोड्यावर बसून बरोबर एक वाटाड्या घेऊन निघाला. दोघांनी त्या रात्रीत जवळजव ५४ मैलांची मजल मारली. सकाळचे प्रहरी इबीक्यू नांवाचे गांवाजवळ रानांत त्यांनी आपले घोडे एका झाडाला बांधले व वाटाड्या कांहीं कामा- करितां निघून गेला. ग्यारीबाल्डी हाहि थकला असल्यामुळे तो गवतावर हातपाय ताणून खुशाल पडला. परंतु बराच वेळ झाला तरी वाटाड्या येईना, तेव्हा हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरितां ग्यारीबाल्डी उठून कांहींसा दूर गेला. इतक्यांत खाड्खाड् टापा वाजवीत कांहीं घोडेस्वारांची टोळी हातांत नागव्या तरवारी घेऊन त्याचेपाशी येऊन थडकली. ग्यारी- बाल्डीचा घोडा लांब होता त्यामुळे त्यास पळून जातां आले नाही. इतक्यांत त्या घोडेस्वारांनी त्यास कैद करून एका तट्टावर जखडून बांधले व ग्युलाग्वे येथे घेऊन परत आले. परत येतांच तेथील अधिकारी मिलन हा तुरुंगाचे दाराजवळ तयार होता. त्याने ग्यारीबाल्डी येतांच 'तूं पळून कां गेलास? तुला कोणी मदत केली? वगैरे प्रश्न विचारले. परंतु ग्यारीबाल्डी मनासारखें उत्तर देईना. तेव्हां त्याने त्यास आपल्या हातांतील चाबकाने बेदम फोडून काढले. तरी ग्यारीबाल्डी नांवें सांगण्यास कबूल होईना. तेव्हां त्याचे हातास दोरी बांधून तिने त्यास एका तुळईला टांगून ठेविले. या ठिकाणी ग्यारीबाल्डी दोन तास लोंबकळत राहिला होता. मनगटांवरच्या करकोच्यांतून रक्त वाहत होतें, शरीर तापाने भाजत होते, पोट क्षुधेमुळे करपून गेले होते व जवळ उभा असलेला एक शिपाई घशांत मधून मधून पाणी ओतीत होता. ग्यारी- बाल्डीच्या या यातनेचे वर्णन कोण करील? दोन तासांनंतर अधिकाऱ्यांनी त्यास मोकळे केले; परंतु लागलीच त्याचे पायांत बिड्या ठोकल्या. ग्यारी- बाल्डीस तें कांहींच ठाऊक नव्हते. कारण तो बराच वेळ बेशुद्ध होता. जागा होऊन पाहतो, तो खुनी, खिसेकापू वगैरे दुष्ट लोकांच्या सोबतीला आपणांस तुरुंगांत टाकले आहे असे त्याला आढळून आले. तुरुंगांत मात्र यापुढे त्याचे हाल झाले नाहीत. सीनोरा आलेमन नावाच्या एका मायाळू स्त्रीने त्याची शुश्रूषा केली. दोन महिन्यानी तो बरा झाल्यावर, आतां वाटेल तिकडे जा, म्हणून गव्हर्नराने त्याला सोडून दिले.
ग्यारीवाल्ली तेथून निघाल्यावर ग्यारीबाल्डी माँटीव्हिडो येथें आला, परंतु या संस्थानाच्या दोन जहाजांशी ग्यारीबाल्डीने पूर्वी लढाई केली असल्यामुळे तेथे त्यास गुप्तपणे काही दिवस काढावे लागले. एक महिन्यानंतर ग्यारीबाल्डी व रॉझेटी हे दोघे रिओग्रॅडेकडे निघून गेले. वाटेत त्यांस सुमारे दोनशे मैलपर्यत घोड्यावरून प्रवास करावा लागला. परंतु पीरेंटियम् या गांवास आल्यावर त्याचे हाल बहुतेक संपले. कारण या ठिकाणी लोकसत्ताक राज्याच्या लहानशा सैन्याचा तळ पडलेला होता. तेथें जातांच त्याच्या विनंतीवरून बेझिल राजाविरुद्ध लढण्यास जाणाऱ्या एका टोळीबरोबर जाण्याची त्यास परवानगी मिळाली. अशा रीतीने कसे तरी एकदांचे पाय फिरून भुईस लागतांच लोकसत्तेच्या वतीने निकराचें युद्ध करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचे उद्योगास ग्यारीबाल्डी हा एकदम लागला. लढाईवर जाण्याचा हुकूम होतांच ग्यारीबाल्डीने आपल्या भोवती सुमारे तीस लोक जमविले व पुन्हा दोन लहानलहान जहाजें तयार केली. सुमारे चाळीस नीग्रो लोक जहाजांवर खलाशांचे काम करावयास ठेवले. लहानशा दोन पंचरशी तोफाहि त्याने मिळविल्या. यांपैकी एका जहाजाचें नांव रिओपार्डो होते. हे ग्यारीबाल्डीने स्वतः आपल्या हाती घेतले. दुसन्याचें नांव 'रिपब्लिकन' असें होतें. त्यावर जॉन ग्रिग्झ या नांवाच्या आपल्या एका अमेरिकन स्नेहयास त्याने मुख्य नेमिलें. ही जहाजें लहान असल्यामुळे त्यांस किना-याजवळूनच जावे लागे. आणि किनाऱ्याजवळ तर मोठमोठे खडक व भाटी पडलेल्या. त्यांतून जहाज चालविणे फार धोक्याचे असे. असे असतांहि त्यांनी लवकरच शत्रूची बरीचशी लहानसहान जहाजें काबीज केली. शत्रूचें आरमार मोठे होते तरी त्यांनी ग्यारीबाल्डीकडे दुर्लक्ष केलें; यामुळे त्याचे फावले. पुढे एके ठिकाणी किनाऱ्यावर उतरून त्याने आपल्या खलाशांचे दोन तासांत घोडेस्वार बनविले, व केमाक्युअम् या नांवाचा एक समुद्र- किनाऱ्यावरील लहानसा किल्ला हस्तगत केला. अशा रीतीने एकीकडे लढाईमध्ये ग्यारीबाल्डी गुंतला असता, एके दिवशी त्याचे मनांत आपण लग्न करावें अशी एकाएकी अत्युत्कट इच्छा उत्पन्न झाली. यासंबंधाने त्याने आपल्या आत्मचरित्रांत असे लिहिले आहे : यापूर्वी लग्न करण्याचा विचार माझे मनांत कधी आला नव्हता. मला स्वतंत्रपणा नेहमी फार आवडे. मी वारंवार अचाट साहसे करीत असे; - बक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह " यामुळे माझ्यासारख्या मनुष्याने लग्न करणे म्हणजे अगदी गैरसोयीचें. लग्न केलें म्हणजे त्याबरोबर मुलेबाळे व सर्व संसार गळयांत पडलाच. संसार सुखाचा करण्यास कोठे तरी कायमचा निवास व स्वस्थता हवी. पण मी तर आपले सर्व आयुष्य एका विवक्षित कार्यास वाहिले होते. माझ्या अंगांत जो कांहीं जोम होता तो त्या कार्याच्या पायी लढण्यांत खर्च करणे अवश्य होते. यामुळे माझ्यासारख्याने लग्न करणे मुळीच उपयोगी नाही. परंतु दैवाची इच्छाच कांहीं वेगळी होती. हा वेळपर्यत केलेल्या लढायांत मज- बरोबर असलेले माझे बहुतेक स्नेही व देशबांधव मला सोडून परलोकी गेले व मी या जगांत अगदी एकलकोंडा आहे असे मला वाटू लागले. तेव्हां आपणास कोणी तरी जन्माचा सोबती पाहिजे अशी फार फार उत्कट इच्छा होऊ लागली. जे आपल्या सन्निध नेहमी राहील व ज्याच्या समा. गमाने समाधान होईल, असे कोणी तरी मायेचे माणूस जवळ असावें; तें न मिळेल तर जीवित अगदी दुःसह होणार. पण असें मायेचे माणूस परदेशांत मिळणे किती अवघड !" असे विचार मनांत असतांना एके दिवशी बॅरा नांवाच्या एका टेकडीवर कांहीं सुंदर घरें दिसत होती, तिकडे बोटीतून मी सहज गेलो. जवळच्या दुर्बि- णीने पाहतों तो एका घराबाहेरच्या अंगणांत एक तरुण स्त्री उभी आहे असें मला दिसले. तेव्हां अर्थात् तिकडे बोट वल्हवून किनाऱ्यावर उतरून मी त्या घराकडे गेलो. परंतु इतक्या लांबून पाहिलेली स्त्री तीच हटकून आपणांस कशी भेटते अशा विचाराने मी किंचित् निराश झालो. इतक्यांत माझा एक स्नेही तेथे मला भेटला व त्याने मला कॉफी घेण्यास चला म्हणून बोलाविलें. आम्ही दोघे त्याचे घरांत जातो तोच दुर्बिणीतून पाहिलेली तरुण कुमारिका तेथेच समोर उभी होती. आमची परस्पर दृष्टादृष्ट होतांच उभयतां आश्चर्यभरित व तटस्थ झालो. जणू काय आमची ही प्रथमचीच भेट नसून एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहून कांहीं वेळ विसरून गेलेल्या गत गोष्टींची आम्ही फिरून आठवणच करीत आहों. शेवटी मी तिजपुढे किंचित् नम्र होऊन म्हणालों, ‘कुमारिके, तूं माझी पत्नी होशील काय? ' वास्तविक तिची पोर्तुगीज भाषा मला चांगलीशी येत नव्हती. यामुळे मी वरील शब्द इटॅलियन भाषेमध्ये बोललो. पण मी ज्या धिटाईने व मोकळ्या मनाने ते शब्द उच्चारले त्यामध्ये एक प्रकारचा चित्ताकर्षकपणा होता खास. कारण .
ग्यारीबाल्डी त्यांचा अर्थ तिला चांगला उमजला. एवढेच नव्हे, तर त्याच्या योगाने परस्परांच्या मनास मृत्यूशिवाय दुसऱ्या कोणास कधीहि सोडतां यावयाची नाही अशी बळकट गांठ लवकरच पडली. अशा चमत्कारिक रीतीने आमचें चिरंतन प्रेम जुळले. या स्त्रीचें नांव अॅनिटा असें होतें. अॅनिटाही स्त्री लोकोत्तर होती. ग्यारी- बाल्डीसारख्या वीराचे पदरी तिने पडावें हे अत्यंत उचित होते व तें तसेंच घडून आले. दोघांचेहि अंगी सारखेच गुण होते व दोघांनीहि जगांत सारखेच धन्य म्हणवून घेतले. अॅनिटा ही वास्तविक दुसऱ्या एकास देण्याचे तिच्या बापाने आगाऊ ठरविले होते. तिचा एक प्रकारे वाङनिश्चय झाला होता; परंतु विवाह असा अजून व्हावयाचा होता. तोच मध्यंतरी ग्यारीबाल्डीची व तिची गांठ पडली व गांधर्व विवाहाने तिने स्वतःस त्याला अर्पण केले. यामुळे ज्याच्याशी तिचा वाङनिश्चय झाला होता त्याच्या सर्व सौख्यावर ग्यारी- बाल्डीने घाला घातल्यासारखे झाले; परंतु आपल्या हातून एका दृष्टीने हे असत्कार्य होत आहे असें अॅनिटा किंवा ग्यारीबाल्डी यांचे मनांत त्या प्रेमभरांत कोठून येणार? पुढे ज्या वेळी अॅनिटा ही मरण पावली त्या वेळी तिजबद्दल विलाप करतांना तो आपल्या हातून घडलेल्या असत्कृत्याची आठवण काढ काढून रडे. तो म्हणे, “अरेरे ! अॅनिटा मेली यामुळे मी अभागी झालों, परंतु त्या गृहस्थाचा मात्र सूड उगविला गेला खरा. ती मरण पावली तेव्हां तिला फिरून जिवंत करण्याचा मूर्ख प्रयत्न प्रेमातिरेकाने करीत असतां मी त्या प्रेताचा हात घट्ट धरला, व निराशेचे दुःखाने माझ्या डोळ्यांत সম্মু उभे राहिले. त्या वेळी मात्र मी पूर्वी केलेल्या पापाची बरोबर कल्पना माझे मनांत आली." असो. ग्यारीबाल्डीच्या इच्छेप्रमाणे अॅनिटा ही खरोखरच त्याच्या चित्ताच्या समाधानाचे स्थान होऊन बसली. साहसाच्या व दगदगीच्या वेळी त्याच्या जीविताचा अॅनिटा हाच काय तो एक निवाऱ्याचा आश्रय होता. ज्याप्रमाणे वादळ मधून मधून होत असतांहि आकाशांतील एकाद्या ताया. कडे डोळे लावून मनुष्य मार्ग आक्रमण करितो, त्याप्रमाणे लढाया व साहसें करीत असतां ग्यारीबाल्डीचे लक्ष नेहमी अॅनिटाच्या प्रसन्न वदनाकडे लागलेलें असे. लग्न झाल्यामुळे ग्यारीबाल्डीच्या उद्योगास मुळीच व्यत्यय आला नाही.
दक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह कारण कोणत्याहि उद्योगाचे कामी, मग तो उद्योग नुसत्या सफरीचा किंवा लढाईचा का असेना, अॅनिटा ही त्याचा उजवा हात होऊन राहिली होती. लग्नानंतर स्पॅनिअर्ड लोकाबरोबर लढाईचे काम पुन्हा लवकर सुरू झाले. थोडक्याच दिवसांत ग्यारीबाल्डीचे जहाजाची व स्पॅनिश लोकांचे एका जहाजाची गांठ पडली. प्रथम एकमेकांच्या तोफा सोडून झाल्यावर जहाज जवळ येतांच बंदुकी सुरू झाल्या. सुमारे पांच तास लढाई झाल्यावर शत्रूकडील सरदारास गोळी लागून तो मेला. तेव्हां त्याचे लोक जहाज घेऊन पळून गेले. या लढाईमध्ये अॅनिटा ही स्वतः लढत होती. जहाजाचे फळयांवर हातांत तरवार घेऊन ती उभी राहून खलाशांस व लढणाऱ्या लोकांस उत्तेजन देत असे. यासंबंधानें ग्यारीबाल्डीनेच पुढील हकीकत लिहून ठेविली आहे. “ लढाई चालली असतां तोफेच्या एका गोळयाचे धक्क्याने अॅनिटा व तिच्याजवळ असलेले दोघे इसम खाली पडले. ते पाहतांच ती मेली असें वाटून तिच्याजवळ मी एकदम उडी मारून गेलो. पाहतो तो ते इसम मात्र मेलेले असून अॅनिटा ही कांहींएक इजा न होतां उठून उभी राहिली. नंतर तिने खाली जावे म्हणून तिची मी पुष्कळ विनवणी केली. तेव्हां शेवटी ती कबूल झाली व 'ठीक आहे. मी जाते व त्या मेल्या भित्र्या भागूबाईना वर पाठवून देतें' असे म्हणून खाली गेली, व खरोखरच ती गेल्याबरोबर जहाजांत दडून बसलेले कांहीं खलाशी निर्भर्त्सना केल्यामुळे शरम पावून वर आले." येथून पुढे ग्यारीबाल्डी हा आपली जहाजें घेऊन लग्यूना येथे गेला. तें शहर लोकसत्तेविरुद्ध उठले होते. तेव्हां त्या शहरावर त्याने चाल करून ते घेतले. तेथून पुढे गेल्यावर पुन्हा एकवार शत्रूचे एका जहाजाची व त्याची गांठ पडली. ग्यारीबाल्डीपाशी या वेळी तीन जहाजें होती; परंतु त्याचे फारसें चालेना. ग्यारीबाल्डी व अॅनिटा ही दोघे जण लढाईला तोंड देऊन उभी होती. तिने तर आपल्या ताब्यांत एक तोफ स्वतंत्रपणे घेऊन ती रोखून मारण्याचा धडाका चालविला होता. लवकरच ग्यारीबाल्डीचे बहुतेक कामदार मरून पडले. तेव्हां त्याने अॅनिटास एका होडीत उतरविलें व सैन्याचा मुख्य सरदार किनाऱ्यावर होता त्याला तिजबरोबर असा निरोप पाठविला की, आणखी कांहीं कुमक पाठवाल तर लढाई चालवितों पण कुमक न मिळेल तर शेवटी आपल्या जहा- जास आग लावून देतो. अॅनिटाला पाठविण्यांत ग्यारीबाल्डीच्या मनांतील हेतु असा होता की, तिनें किनाऱ्यावर उतरल्यानंतर तेथेच राहावें, परत येऊ नये.
ग्यारीबाल्डी परंतु ती शूर स्त्री, सरदारास निरोप कळवून आणखी कुमक मिळत नाही असें कळतांच तशीच परत फिरली. इकडे शत्रूकडून मारा होत होताच. अॅनिदा परत आल्यावर तिने जहाजांतील होती नव्हती ती हत्यारेंपात्यारे एका होडीत घातली व. इकडे ग्यारीबाल्डीने जहाजामध्ये जिकडे तिकडे आगीनें भडकणारे पदार्थ पसरून ठेवले. दोघेहि एका होडीत उतरून किना-याकडे आली. त्यांच्यामागे थोडक्याच वेळांत त्या जहाजामध्ये एकदम आगीचा भडका उसळला. इकडे लोकपक्षाचें सैन्य हळुहळू रिओग्रँडेकडे वळले. त्याबरोबर ग्यारी- बाल्डी व अॅनिटा आपले उरलेले थोडेसे लोक घेऊन घोड्यावर स्वार होऊन त्या सैन्याबरोबर निघाले. वाटेत त्याचे बरेच लोक त्याला सोडून गेले. यानंतर लढाई कांही दिवसपर्यंत थांबली; तेव्हां ग्यारीबाल्डी हा उरलेले लोक घेऊन निवांत अशा एका खेड्यांत जाऊन राहिला. लग्न झाल्यापासून या लढाऊ जोडप्यास स्वस्थता म्हणून कशी ती माहीत नव्हती; ती या खेड्यांत आल्यावर त्यांना काही दिवस मिळाली. नंतर थोड्याच दिवसांत ग्यारी- बाल्डीस एक मुलगा झाला. त्याचे नांव त्यांनी मिनॉट्टी असें ठेविलें. हा मुलगा पोटांत असतांच अॅनिटा हिने कित्येक लढाया केल्या. तिजवर इतकी संकटे आली होती की, त्यांमध्ये साधारण नशिबाची किंवा साधारण पराक्रमाची स्त्री क्वचितच वांचली असती असे असतां नऊ महिने पूर्ण होऊन ती बाळंतीण झाली, व मुलगा झाला हे पाहून उभयतांस फार आनंद झाला. तथापि तिच्या गर्भारपणांतील संकटांची एक खूण या मुलाचे अंगावर कायमची राहिली होती. मिनॉट्टी हा जन्मला तेव्हांच त्याचे कपाळावर एक जखम पडलेली होती. गर्भारपणीं घोड्यावरून भरधाव जातांना अॅनिटा एक वेळ घोड्यावरून पडली होती, त्या योगाने ही जखम झालेली असावी. अशा रीतीने ग्यारीबाल्डीने संसार तर थाटलाच; परंतु तो संसार वास्त- विक वनवासाहून अधिक कष्टमय होता. अॅनिटा आपला मुलगा घेऊन घरी राही व ग्यारीबाल्डी हा खांद्यावर बंदूक टाकून शिकार मारून आणी. अन्नाची अशा रीतीने व्यवस्था लागली खरी, तरी वस्त्र कसे मिळावें? वस्त्राविणे तर त्या लहान मुलास थंडी होऊ लागली. तेव्हां एके दिवशी ग्यारीबाल्डी घोड्या- वर बसून काही कपडे मिळवून आणण्याकरितां निघाला. त्या वेळी संध्याकाळ झालेली. पाऊस सारखा ओतत होता. रानांतून घोड्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी झाले होते. काहींसें लांब गेल्यावर एका स्नेहयाचे घरी ती रात्र त्याने दक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह ४१ काढिली, व दुसरे दिवशी सकाळी उठून तो चालू लागला. इतक्यांत दूर अंतरावर गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू येऊ लागला ! तथापि कपडे मिळविण्याच्या तांतडीनें तो तसाच सेंटिबिना येथे जाऊन परत आला. परत येऊन पाहतो तो घरांत कोणीहि नव्हते. तेव्हां आदले दिवशीं गोळीबार ऐकला त्या वेळीच कांहीं तरी दगा झाला असावा असे त्यास वाटले; परंतु सुदैवाने खरोखर कांहीं एक दगा झाला नव्हता. मॉरिंग्यू या नांवाचा एक ब्राझिलियन शत्रु हा ग्यारीबाल्डीचे पश्चात् आल्यामुळे आपला प्राण वाचविण्याकरिता अॅनिटा हिनें भर पावसांत घोडा काढला व आपल्या उघडया नागडया मुलास घेऊन ती घर सोडून काही अंतरावर रानांतच परंतु एका निवाऱ्याच्या जागी जाऊन बसली होती. शोध करतां अखेरीस ती ग्यारीबाल्डीला सुरक्षित सांपडली! हे संकट पार पडल्यावर ग्यारीबाल्डीस व त्याचे कुटुंबास पुन्हा दिवस स्वस्थता मिळाली; परंतु सुखामागून दुःख ठेवलेलेच असते. सैन्या- बरोबर परत जात असतां ग्यारीबाल्डी हा वाटेंत मुक्काम करून राहिला होता. पुढे हिवाळा आला होता तरी तेथून त्या सैन्यास लवकरच छावणी मोडणे भाग पडले. दक्षिण अमेरिकेतील हिवाळा म्हणजे अतिशय भयप्रद असतो. पर्वतावर चोवीस तास पर्जन्य मुसळधारेनें ओतत असल्यामुळे आसपासचे प्रदेशांतील नद्यानाले दुथडी भरून वाहत असतात व खालाटीचे उथळ प्रदेश सरोवराप्रमाणे डबडबून जातात. ग्यारीबाल्डीचे सैन्य निघालें त्या वेळी रस्ते मुळीच नव्हते व पाऊलवाटा होत्या त्या बुजून गेल्या होत्या. बरोबर खावयास काहीएक नव्हते. मात्र त्यांनी काही थोडे गाईचे कळप बरोबर घेतले होते. अशा संकटांत तीन महिने प्रवास चालला होता. त्यामध्ये सैन्यांतील बाया-बापड्या, लहान मुलें, बाजारबुणगे बरेच नाश पावले. ग्यारीबाल्डीलाहि फार हाल सोसावे लागले. बरोबर बायको व लहान आलेल्या नद्या लागत त्यांतून तरून जावयाचे म्हणजे मोठेच संकट. अशा प्रसंगी ग्यारीबाल्डी आपल्या लहानग्या मुलास ऊब येण्याकरितां हातरुमालाने गळयाशी बांधून नदी पोहून जात असे. वाटेत अन्न मिळेनासें झाले त्या वेळी ग्यारीबाल्डीने अॅनिटास घोड्यावर घालून पुढे लावून दिले. तेथे काही शिपाई भेटले त्यांनी तिला अन्न दिले व मुलाला काही जुने लोकरीचे कपडेहि दिले. अशा रीतीने त्यांनी २५०-३०० मैलांचा प्रवास केला. - मूल. वाटेत ४२ ग्यारीबाल्डी . मकाणास पोहोचल्यावर प्रवासाचे सर्व श्रम ग्यारीबाल्डीस आठवले इटलीकडून देशस्थितीची किंवा आईची बातमी सहा वर्षांत कळली नव्हती. अरण्यांतून प्रवास व जहाजांवर शत्रूशी लढाया करीत राहावें तर हालअपेष्टांनी बायको व मुलगा खास मरतील, याकरिता काही दिवस कोठे तरी सोईची जागा पाहून स्वस्थ राहावें अशा विचाराने ग्यारीबाल्डीने रजा घेतली व मॉटी- व्हिडो येथे जाण्यास तो निघाला. ग्युलाग्वे येथील लोकसत्ताक राज्यास ज्या ग्यारीबाल्डीने इतकी मदत व त्या कामी शेंकडों साहसे केली, तोच आतां जावयास निघाला तर त्याचेजवळ काहीएक उरले नव्हते. नाही म्हणायला अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने सुमारे नऊशे गुरांचा एक कळप मात्र जमविला. ही गुरे मॉटीव्हिडोस नीट पोहोंचतीं तर त्यांस कांही किंमत तरी येती. परंतु ती जनावरें आधीच रानटी, त्यांना वळवावयाचे काम कठिण, त्यांतून वाटेत नद्या. अशामुळे निम्मीशिम्मी गुरें मेली. बाकी उरली त्यांची कातडी विकली. त्याचे मात्र त्यास शंभर एक पौंड मिळाले. माँटीव्हिडो येथे गेल्यावर प्रथमतः त्याने व्यापाराचे दुकान घातलें. त्यांतल्या त्यांत एका गृहस्थाचे घरी गणिताची शिकवणी पत्करली. अशा रीतीने चरितार्थाला सरासरीने पुरेसे पैसे तो मिळवू लागला. तेव्हां पोटाच्या धंद्याशिवाय हातून दुसरें कांहीं होण्यास वावच नव्हता. परंतु पुढे १८४३ साली युराग्वेचे प्रजासत्ताक राज्यास ब्युनॉसआयर्स येथील रोशंस नांवाच्या जुलुमी सरदाराविरुद्ध लढाई करण्याचा प्रसंग उपस्थित झाला. मॉटीव्हिडो येथील प्रमुख लोकांस ग्यारीबाल्डीची कीर्ति माहीत होती. त्याने सैन्यांत सरदारी पत्करावी असे त्याच्याशी त्यांनी बोलणे लाविलें. ग्यारीबाल्डोनेहि तें काम आनंदानें पत्करले. कारण राजकीय जुलमाविरुद्ध लढण्याचे व्रत त्याने अंगीकारले होते व ते पाळण्यास हा एक नवीन प्रसंग आला. लागलीच अठरा तोफांचे एक जहाज व त्याच्या जोडीला लहानसें दुसरें एक जहाज, अशी दोन जहाजें त्याच्या ताब्यात देण्यात आली. कोरियेंटीस नांवाचा सरदार रोझेसच्या विरुद्ध आगाऊच लढत होता त्याला मदत करण्याचे काम ग्यारीबाल्डीकडे सोपविण्यांत आले. माँटीव्हिडो येथे व्यापारासंबंधाने कित्येक इटालियन लोक येऊन राहिले होते. त्यांस लढाईचे कामी मदत देण्यास तयार होण्याविषयी ग्यारीबाल्डीने विनंति केली. त्याबरोबर प्रथम पांचशे लोक एकदम तयार झाले व थोड्याच' दक्षिण अमेरिकेंतील पराक्रम व विवाह - दिवसांत आणखी तीनशे मिळाले. त्याचप्रमाणे त्याने अनेक नीग्रो लोकहि त्यांना स्वातंत्र्य देऊन लढण्यास तयार केले. इटालियन सैन्य आपल्या हाता- खाली आहे या विचाराने त्याला अतिशय अभिमान व उल्हास वाटे. पहिल्याच लढाईत इटालियन लोकांनी पुष्कळ शौर्य दाखविले त्याबद्दल त्यांस स्वतंत्र निशाण देण्यात आले. त्यावर व्हेसुव्हियस पर्वताचे चित्र ग्यारीबाल्डीने काढविले. त्याचे कारण असे की, ते चित्र पाहून इटालियन लोकांना लढतांना स्वदेशाची आठवण व्हावी. १८४४ साली माँटीव्हिडो शहरास जनरल रोझेंस याने वेढा दिला. या वेढयामध्ये तर इटालियन टोळीने शौर्याची शर्थच केली; ती इतकी की, माँटीव्हिडोच्या सैन्यानेसुद्धा त्याची प्रांजलपणे फार वाहवा केली. त्या योगानें ग्यारीबाल्डीस आपल्या कर्तृत्वाची धन्यता वाटली. मॉटीव्हिडो येथील वेढा उठल्यानंतर ग्यारीबाल्डीने मॅट्ररेरो नांवाच्या स्वतंत्रताप्रिय शूर अशा पहाडी जातीची मदत घेऊन शत्रूच्या हल्ले करण्यास प्रारंभ केला. हे हल्ले पुढे तीन चार वर्षेपर्यत चालले होते. त्यांतील निरनिराळ्या प्रसंगी ग्यारीबाल्डीने असे काहीं अचाट पराक्रम केले की त्यांचे वर्णन एकाद्या कादंबरीप्रमाणे अद्भुत वाटेल. १८४७ चे अखेर ग्यारीबाल्डी मॉटीव्हिडो येथे परत आला. एवढ्या अवकाशांत त्याने व त्याच्या बरोबरीच्या इटालियन टोळीने सर्वोत्कृष्ट कीर्ति संपादन केली. या लढायांमध्ये पुष्कळ तन्हेचा विचित्र अनुभव ग्यारीबाल्डी व त्याच्या सोबत्यांस येऊन, इटलीत पुढे लवकरच जें महत्कार्य करावयाचे होते त्याला ते अगदी लायक झाले. एवढेच नव्हे, तर या लढायां- मध्ये त्यांनी दाखविलेल्या शौर्यामुळे व अचाट पराक्रमामुळे त्यांची सर्व युरोप खंडांत कीर्ति पसरली. ग्यारीबाल्डीच्या विचाराचेच जे लोक इटलीत होते त्यांस ग्यारीबाल्डीचे पराक्रम ऐकून त्याची स्वदेशकार्याला फार मदत होईल अशी आशा येऊन फार उमेद चढली. इटालियन लोकांची टोळी जमविण्यांतहि ग्यारीबाल्डीचा अशाच प्रकारचा हेतु होता. स्वदेशांत लढ-- ण्यास वाव नाही तर परदेशांत तरी स्वतंत्रतेच्या कामी लढून अनुभव व शौर्य संपादन करावें, या कमाईचा पुढे मागें केव्हां तरी खास उपयोग होईल, अशी त्याची मनोदेवता त्यास सांगे. ग्यारीबाल्डी मानाने सर्व सैन्यांतील मुख्य सरदार असा मानला गेला होता; परंतु त्याची मूळची स्थिति मुळीच बदलली नव्हती. मॉटीव्हिडो ४४. ग्यारीबाल्डी येथील अधिकाऱ्यांनी त्याचे उतराई होण्याकरितां पुष्कळ खटपट केली. रिओडीलापलाटा येथील परेंच आरमारावरील सरदाराने तर ग्यारीबाल्डीस असे लिहिले की, “तुम्ही केलेल्या पराक्रमांनी नेपोलियनच्या प्रख्यात सैन्यालासुद्धां भूषण आले असते." माँटीव्हिडो येथील लोकांनी त्यास बहुमानार्थ सरदार ही पदवी दिली; त्यावरूनच पुढे अमेरिका व युरोप- खंडामध्ये सरदार (जनरल) ग्यारीबाल्डी असे त्याचे नांव पडले. परंतु जेव्हां ते लोक त्याला जमिनी वगैरे बक्षीस देऊ लागले, तेव्हां 'केवळ स्वतंत्रतेकरितांच आम्ही लढलों. कोणत्याहि रीतीने पैसा किंवा इतर नफा मिळविण्याकरितां लढलों नाही.' असे सांगून त्याने ते बक्षीस नाकारले. येवढेच काय परंतु स्वतःकरितां किंवा आपल्या लोकांकरितां लष्करी बहु- मानाची बढतीहि त्याने पत्करिली नाही. यासंबंधाने त्याने आपल्या एका पत्रांत लिहिले आहे की, "जें कार्य संपादन करण्यांत माझ्या इतक्या इटालियन देशबांधवांचे बळी पडले, त्याबद्दलचा बहुमान त्यांच्यामागे जिवंत राहून स्वीकारला तर त्या पापाच्या ओझ्याने मी मरण पावेन." अशी काही त्याची निस्पृहता लोकोत्तर होती. या वेळची त्याची गरिबी व साधेपणा मासलेवाईक होता. इतका की, त्याच्या अंगांत कधीं धड सदरा देखील असावयाचा नाही. त्याचे राहण्याचे ठिकाण म्हणजे एक अगदी साधी झोपडी होती. तिच्या कवाडास कडी देखील नसून ते रात्रंदिवस अगदी उघडे असे. एके दिवशीं फ्रेंच आरमारावरचा एक अधिकारी त्यास भेटावयास आला. संध्याकाळ होऊन अंधेर पडला होता. त्या अधिकाऱ्याने कसें तरी एकदां दार उघडून आंत प्रवेश केला, तों वाटत असलेल्या एका खुर्चीची त्याला धडक बसली. तेव्हां ग्यारीबाल्डीस हांक मारून तो विनोदाने म्हणाला, काय हो, तुम्हांस भेटावयास यावयाचे म्हणजे आधीं प्राण दिला पाहिजे! " हे ऐकतांच ग्यारीबाल्डीने आपल्या बायकोस हांक मारून तिला दिवा आणावयास सांगितले. तेव्हा तिनें आंतूनच उत्तर केलें “दिवा कोठचा आणूं! घरांत मेणबत्त्या विकत घ्यावयास पैसे असतील तर ना?" शेवटी त्या उभयतांचे बोलणें अंधेरांत बसूनच झाले. दुसरे दिवशी त्या सरदाराने ग्यारीबाल्डीला वीस पौंड पाठवून दिले. ते तसेच परत करणे वाईट दिसले असते म्हणून त्याने ठेवून घेतले व दुसऱ्या दिवशीं गांवांतील गरीब, विधवा व भिकार जमवून ती सर्व रक्कम त्याने “ - मातृभूमीची भेट - वांटून टाकिली! मात्र तो सरदार पुन्हा रात्री कदाचित् भेटावयास येईल म्हणून मेणबत्त्या विकत घेण्यापुरते पैसे त्याने त्यांतून ठेवून घेतले. तात्पर्य, अमेरिकेंत असतां ग्यारीबाल्डीचे गरिबीस सीमा नव्हती. परंतु त्याचे लक्ष पैशावर किंवा मानावर केव्हांच नव्हते. तुम्ही मला बक्षीस देणारच तर अमक्या एका कैद्यास बंधमुक्त करा किंवा अमक्या दरिद्री माणसास इतकें द्रव्य द्या' असलें बक्षीस तो मागून घेई ! या अशा निरपेक्ष बुद्धीमुळे तर ग्यारीबाल्डीच्या कामगिरीबद्दल मॉटीव्हिडो येथील लोकांस अधिकच उपकार वाढू लागले. ही निरपेक्षता त्याची कीर्ति पसरण्यास विशेष कारणीभूत झाली. केवळ ग्यारीबाल्डीचे हाताखाली नोकरी करून नांव मिळवावें अशा हेतूनें युरोपांतील निरनिराळ्या देशचे तरुण, होतकरू/ शिपाई- गडी अमेरिकेस येऊ लागले. परंतु यानंतर ग्यारीबाल्डीस अमेरिका लवकरच सोडून जाण्याचे कारण पडले. त्याची हकीकत पुढील भागांत दिली आहे. भाग ७ वा मातृभूमीची भेट भर्तुः पिंडानृणकरो यशःक्रयमहापणः। सुरांगना स्वयंग्राहो रम्यः कालोऽयमागतः॥ ग्यारीबाल्डी व मॅझिनी यांचे १८३४ तील छोटेखानी बंड फुकट जाऊन उभयतांसहि फाशीची शिक्षा फर्माविण्यांत आली व ग्यारीबाल्डी अमेरिकेस व मॅझिनी स्वित्सलडास निराशेने निघून गेला; त्या गोष्टीला सुमारे १४ वर्षे झाली होती. दरम्यानचा काळ ग्यारीबाल्डीने कसा घालविला हे मागील भागावरून कळून येईल. इकडे मॅझिनीनेहि आपला लोकशिक्षणाचा उद्योग अविश्रांत चालविला होता व १४ वर्ष नंतर उभयतांचेहि निरपेक्ष देशकार्याचे खटपटीस यश येण्याची चिन्हें दिसू लागली होती. वास्तविक ग्यारीबाल्डी व मॅझिनी हे दोघेहि इटलीत नसतां त्यांच्या पश्चात् त्यांच्याच हेतूप्रमाणे गोष्टी घडून येत चालल्या होत्या. या १४ वर्षांत इटली देशांतील लोकस्थिति बरीच पालटून गेली होती.
४६ ग्यारीबाल्टी इटलीचे निरनिराळे दहा तुकडे झालेले असून त्यांवर स्वतंत्र व निर- निराळ्या प्रकारची राज्ये होती. परंतु त्यांपैकी प्रत्येक राज्यांतील लोकांचे मनांत परकीयांचे अंमलापासून व देशी राजांचे जुलुमापासून मुक्त होण्याची इच्छा प्रादुर्भूत होऊन ती दिवसेंदिवस प्रबळ होत चालली होती. लॉबर्ड व व्हेनिस मिळून झालेल्या संयुक्त राज्यांत मॅझिनीच्या शिक्षणाचा प्रसार विशेष झाला असल्यामुळे तेथील लोक राजकीय हक्क मिळविण्याविषयी उतावळे झाले होते. त्यांच्या मनांतील त्वेष मधून मधून लहानसहान बंडांच्या द्वारे बाहेर पडत असे. नेपल्स व सिसिली मिळून बनलेल्या राज्यांत फर्डीनंड राजाचा जुलूम व क्रूरता शिखरास पोंचली होती, व लोक अतिशय गांजून जाऊन जिवावर उदार होण्याच्या बेतांत आले होते. याटस्कनी संस्थानांत दुसरा लिओपोल्ड या नांवाचा राजा होता. त्याने आपल्या आजाने घालून दिलेल्या सर्व शिस्तींचा उच्छेद करून, इटलींतील इतर संस्थानांच्या जुलुमी राजांचे अनुकरण करण्यास प्रारंभ केला होता. मॉडिना व पार्मा येथें तर मूर्तिमंत ऑस्ट्रियाचा जुलमी अंमल चालू होता व या दोन्हीहि संस्थानांमध्ये लोक अगदी चेपून गेले होते. रोम म्हणजे पोपचे राज्य. लांचलुचपत व इतर हरएक प्रकारची अनीति यांमुळे लोकांची मने पोपविषयी पुष्कळ दिवसांपासून विटून गेली होती. कोणतीहि सुधारणा करण्याची गोष्ट काढली की, पोपने ती हाणून पाडावी. वर्तमानपत्रवाल्यांस व राजकीय आणि धार्मिक गुन्हेगारांस अत्यंत कडक अशा शिक्षा होत; पण दरवडेखोरांनी लोकांस लुटण्याकरितां जणूं काय पोपकडून सनदाच मिळविल्या होत्या! स्वतः पैसे खाऊन पोपने सर्व प्रकारचे मक्ते देऊन टाकल्यामुळे व्यापार जवळजवळ बसला होता! पोस्टांतून खाजगी पत्रे पोपच्या हुकुमाने अधिकारी नेहमीं फोडीत. धार्मिकपणानें कोणी पोपकडे जाऊन आपली पापें गुप्तपणे कबूल केलेली असली तरी त्याचा उघड फायदा घेऊन तो लोकांवर जुलूम करी. खऱ्या धार्मिकपणाचा पुरा नायनाट झाला असून, जिकडे तिकडे पाद्रीवर्गाने थोतांड माजविले होते. या सर्व गोष्टींमुळे सत्यप्रिय, नीतिमान् व स्वदेशाभिमानी असे जे कोणी लोक राज्यांत होते ते पोपचें राज्य एकदां केव्हांचे नाहीसे होईल अशी मार्गप्रतीक्षा करीत बसले होते. अशा स्थितीमुळे जरी इटलीमध्ये निरनिराळी दहा संस्थाने होतीं तथापि मातृभूमीची भेट या लोकांचे मनांत सर्वसाधारण असा एकच हेतु उद्भवून प्रबळ झाला होता. तो हेतु म्हटला म्हणजे, परकीय राजे जे ऑस्ट्रियन त्याजबिषयींचा द्वेषभाव हा होय. स्वदेशी राज्ये असून देखील जुलूम होतो याचे कारण ऑस्ट्रिया होय असे लोकांच्या मनाने पक्कं घेतले होते. ऑस्ट्रियाचा उन्मत्तपणा बेसुमार वाढला होता. थोड्याच काळांत ऑस्ट्रियाने इतकी अप्रीति मिळविली की, सर्व इटालियन लोकांचे मताने ऑस्ट्रियन लोकांचा द्वेष करणे हा एक मोठा गुण, असें वाटू लागले होते. इ. स. १८३० मध्ये फ्रान्स देशांत राज्यक्रांति घडून आली व ती सफळ झाली. तिचे योगाने व्हिएन्ना येथील तह निदान ऑस्ट्रियापुरता तरी रद्द झाल्यासारखा झाला व फार पुरातन काळापासून फ्रान्सचा इटलीशी जो कांहींसा वरिष्ठपणाचा संबंध चालत आला होता तो पुन्हा स्थापित झाला. यामुळे ऑस्ट्रियाचे पाश आपोआपच किंचित् ढिले पडूं लागले होते. इटली स्वतंत्र होण्याचे कामी फ्रान्सकडून मदत झाली असतीच असे नाही. उलट एक दोन प्रसंगी त्या कार्यास फ्रान्सकडून थोडाबहुत अडथळाच झाला. परंतु फ्रान्स देशाचा इटलीमध्ये फिरून शिरकाव झाल्यामुळे ऑस्ट्रियास एक प्रकारचा प्रतिस्पधि किंवा शत्रु उत्पन्न झाला असे म्हणण्यास हरकत नाही. अशा रीतीने १८४८ चे पूर्वी व त्यानंतरहि फ्रान्सचा इटलीमध्ये हात शिर- कल्यामुळे एका बाजूने नुकसान झाले, परंतु दुसऱ्या बाजूने फायदा झाला. याच वेळी कर्मधर्मसंयोगाने दुसरी एक गोष्ट घडून आली. इटलीच्या स्वतंत्रतेचा मुख्य शत्रु जी पोपची गादी तेथूनच या सुमारास इटलीच्या लोक- पक्षास आशा उत्पन्न झाली. ग्रेगरी पोप १८४६ च्या जून महिन्यांत निवर्तला. हा पोप इतर पुष्कळ पोपांप्रमाणे जुलमी असून रोम संस्थानांतील प्रजेस अधिक हक्क देण्याचे विरुद्ध होता; परंतु त्याचे मागून नववा पायस नांवाचा पोप लोकांनी निवडला. त्याची लोकांस हक्क देण्याची प्रवृत्ति तो गादीवर येतांच दिसून आली. पोप पायस हा चांगल्या बुद्धीचा परंतु भित्रा व कम- कुवत होता. गादीवर बसल्यानंतर त्याने पहिले काम हे केले की, जे राजकीय कैदी तुरुंगांत पडले होते त्यांस सोडून दिले, व तसेंच हद्दपार केलेल्या लोकांस परत येण्याची परवानगी दिली. राज्यकारभाराचे बाबतींतहि कांही सुधारणा त्याने केल्या व इटली देश संयुक्त व स्वतंत्र करण्याचे कामी स्याने आपल्या भाषणांत अनुकूल मतें प्रदर्शित केली. खुद्द पोप, कधी न हे म्यारीबाल्डी तो आपले बाजूस वळला या विचाराने लोकांचे मनांत सदाशेचा पूर आला, व पोप पायस एकदम अतिशय लोकप्रिय झाला. लोकांनी त्याचें अभिनंदन करण्याकरितां जिकडे तिकडे दीपोत्सव केले व त्याच्या नांवाचे पोवाडे करून लोक रस्तोरस्ती गाऊ लागले. ही बातमी ऑस्ट्रियन बादशाहास लागतांच त्यास फार भय उत्पन्न झालें व त्याने आपलें सैन्य १८४७ चे उन्हाळयांत जनरल रॅडेट्स्की या सरदाराच्या हाताखाली देऊन त्यास पोपच्या राज्यांत छावणी देऊन राहण्यास पाठविलें. या कृत्याने पोपच्या पवित्र अधिकाराचा उघडपणे उपमर्द केल्यासारखे झाले. त्याबद्दल पोपलाच काय पण सर्व इटालियन लोक व निरनिराळ्या संस्थानांचे राजे यांनाहि फार राग आला; व त्यांनी लगेच एक कौन्सिल भरवून ऑस्ट्रि- यन बादशाहाने जर आपले सैन्य परत घेतले नाही, तर एकदम लढाई सुरू करावी असे ठरविले. या ठरावाप्रमाणे लढाईची तयारीहि झाली असे पाहतांच ऑस्ट्रियाने आपलें सैन्य परत घेतले. वरीलपैकी बऱ्याच गोष्टी ग्यारीबाल्डी हा माँटीव्हिडो येथे असतांच त्या कळल्या. त्या ऐकतांच इटलीचा जितकाळ आला या सुखदायक विचाराने त्याचे मन हर्षभरित झाले. पोप पायस हा इटली स्वतंत्र करण्याचे कामी अनुकूल झाला आहे असें ऐकतांच मनांतील सर्व तिटकारा विसरून जाऊन त्याने पोपला आवेशयुक्त असें एक पत्र लिहिले. त्यामध्ये पायसची स्तुति केलेली असून आपण इटली स्वतंत्र करण्याचे कामी मदत करण्यास एका पायावर तयार आहों व पोपमहाराजांनी या अल्पस्वल्प मदतीचा अंगीकार केला असतां आपणांवर मोठा अनुग्रह केल्यासारखं होईल, असे मोठ्या आदराने व गौरवाने त्याने लिहिले होते. परंतु या पत्राचा त्यास पोपकडून मुळीच जबाब मिळाला नाही. पुष्कळ दिवस वाट पाहिली तथापि कांहींच उत्तर येत नाहीं याचें ग्यारीबाल्डीस वाईट वाटले. परंतु तो बिलकुल निराश झाला नाही. कारण प्रत्यहीं इटलींत निरनिराळया अनुकूल गोष्टी घडून येत होत्या, त्यांची माहिती ग्यारीबाल्डीस हळुहळू टपालांतून मिळू लागली. इकडे माँटीव्हिडोसंबंधीचे कामहि फारसे उरले नव्हते. यामुळे आपण इटलीस परत जावें अशी ग्यारीबाल्डीस उत्सुकता उत्पन्न झाली. त्याने अमेरिकेतील सर्व इटालियन लोकांस एक विनंतिपत्र काढलें, व इटलीच्या प्रवासास लागणारा खर्च भागविण्याकरितां वर्गणी मिळविण्यास सुरुवात केली.
मातृभूमीची भेट इकडे मॅझिनीकडून त्यास सविस्तर पत्रहि आले. त्यांत आनंददायक अशी खबर लिहिलेली असून मॅझिनीने ग्यारीबाल्डीस इटलीत परत बोलाविलें होतें. यामुळे प्रवासाची तयारी जारीने करण्यास त्याला दुप्पट उमेद आली. परंतु पुरेशी वर्गणी जमेना! मॉटीव्हिडोवर ग्यारीबाल्डीचे पुष्कळ उपकार झालेले असल्यामुळे तेथील लोकांनी तरी त्यास कृतज्ञपणाने मदत करावयाची; पण तें एकाच बाजूस राहून, परत जाण्यास जितके म्हणून अडथळे त्यांस आणितां आले तितके त्यांनी आणिले. परंतु ग्यारीबाल्डीचा उद्योग त्याच्या उत्साहा- इतकाच प्रबळ असल्यामुळे त्यांचे हेतु सिद्धीस गेले नाहीत. ज्या जहाजावरून ग्यारीबाल्डी व त्याचे सोबती इटलीस परत जाणार होते, त्याचा मालक त्यांचेपासून अगदी आयत्या वेळी अवाचें सवा भाडे मागू लागला. यामुळे त्यांस आपले अंगांतील कपड्यांखेरीज बाकीची सर्व चीजवस्त, वस्त्रप्रावर्ण विकून त्याचे पैसे करावे लागले. परंतु त्याने तितकेंहि केले. शेवटी एका जिनोई व्यापाऱ्याने त्यास एक मोठी रक्कम बक्षीस दिली, व मॉटीव्हिडो येथील लोकांनी त्यास दोन तोफा व कांहीं बंदुका बक्षीस दिल्या. सरते शेवटी ग्यारीबाल्डी एकदांचा आपल्या सोबत्यासह १८४८ चे मार्चचे २६ वे तारखेस अमेरिका सोडून निघाला. अमेरिका सोडतांना त्याचे मनास अतिशय वाईट वाटले. अमेरिकेवर त्याचे प्रेम होते. कारण सुमारे चौदा वर्षेपर्यत अमेरिका ही त्याच्या निःस्वार्थी पराक्रमांची व यशापयशांची कर्मभूमि होऊन राहिली होती. वास्तविक पाहतां अमेरिका ही परदेशाची भूमि, पण माँटीव्हिडोच्या रक्षणाकरितां त्याने उभारलेले इटालियन स्वयंसेवक, त्यांनी केलेल्या घनघोर लढाया व गाज- विलेले पराक्रम यांचे सतत सान्निध्य असल्यामुळे, तेथेहि एक प्रकारचे स्वदेशत्व निर्माण झाले होते असे म्हटले पाहिजे. शिवाय, पुढे इटलीमध्ये आयत्या वेळी स्वयंसेवक जमवून लढाया करण्याची जी अपूर्व पद्धत त्याने अंमलात आणली तिचें मूळ बीज प्रथम अमेरिकेंतच पेरले गेले. अमेरिकेमध्ये शेंकडों इटालियन स्वयंसेवक स्वतंत्रतेचे कार्यात मरण पावले होते, व अशा उदार सोबत्यांनी ज्या भूमीवर समाधि घेतल्या होत्या ती मागे सोडून जातांना ग्यारीबाल्डीस अर्थातच रडू आले. परंतु किती झाले तरी स्वदेश तो स्वदेश! स्वदेश सोडून चौदा वर्षे झाली व मध्यंतरी त्याच्या जीवितक्रमांत पुष्कळच फरक पडला; तथापि इतक्या ५० ग्यारीबाल्डी अवधींत त्याचा एकहि दिवस असा गेला नाही की, ज्या दिवशी त्याला आपल्या प्रिय इटली देशाची आठवण झाली नाहीं ! किंवा त्याने असें एकहि महत्त्वाचे काम केलें नाहीं की, ज्यापासून स्वदेशकार्यास पुढे मागें केव्हां तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा होण्यासारखा नव्हता. आकाशांत उडणाऱ्या पक्ष्यांची आपल्या घरट्यांवर सदोदित दृष्टि असते, त्याप्रमाणे हद्दपारीच्या हया चोदा वर्षांत त्याची अंतर्दृष्टि आपल्या जन्मभूमीवर' एकसारखी खिळून राहिलेली होती. चौदा वर्षांचे वनवासांत ग्यारीबाल्डीने आपणाकडून होईल तितका परोपकार केला. परंतु अंगीकृत कार्यामुळे हा वनवास त्याला प्राप्त झाला होता; त्याचे सफलतेस पुन्हा एकवार अनुकूल स्थिति प्राप्त झाल्यावर स्वदेशाकडे परत धांव मारल्यावांचून ग्यारीबाल्डीस कसें राहवलें असतें ? इकडे ग्यारीबाल्डी व मॅझिनी यांच्या एकदां जडलेल्या कोवळ्या मैत्रीस चौदा वर्षांच्या वियोगानेंहि भंग पडला नाही. ते मधून मधून एकमेकांस पत्रे पाठवून कुशलवृत्त व देशवृत्तान्त कळवीत असत. ग्यारीबाल्डीचे पराक्रम ऐकून मॅझिनीस फार हर्ष वाटे. त्याचे सुंदर व चटकदार वर्णन करून तो तें लंडन येथे प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रांचे द्वारें इटलींतील आपल्या देश- बांधवांस वाचावयास पाठवी. यामुळे ग्यारीबाल्डी हा जो इटली सोडून जातांना अप्रसिद्ध होता, तो १८४८ त परत येण्याचे वेळी इतका लोकप्रिय व प्रसिद्ध झाला होता की, त्याचे वाटेकडे इटलींतील देशभक्तांचे डोळे लागून राहिले होते. तीन महिने प्रवास केल्यावर, ग्यारीबाल्डीचें जहाज नाईसचे किनाऱ्याजवळ आले. आपली जन्मभूमि चौदा वर्षांनंतर फिरून दृष्टीस पडल्यामुळे त्याचा हर्ष हृदयांत मावेना. परंतु अद्याप पूर्वीची फाशीची शिक्षा सुदर्शन चक्राप्रमाणे त्याचे डोक्यावर फिरत होतीच! यामुळे ग्यारीबाल्डीने एकदम किना-यावर उतरूं नये, अशाबद्दल त्याच्या सोबत्यांनी त्याला फार आग्रहाने व विनंतिपूर्वक सांगून पाहिले, परंतु तो तें मुळीच मनास आणीना. दूर समुद्रावर असतांच त्याने आपल्या जहाजावरील माँटीव्हिडोचें निशाण काढून टाकून, इटलीचें तीन रंगी निशाण फडफडत लाविले होते. आणि आतां नाईस शहरहि डोळ्यांपुढे मूर्तिमंत आले, मग ग्यारीबाल्डीस दम कसचा निघतो? त्याने सगळ्यांचे म्हणणे बाजूस ठेवून किनाऱ्यावर एकदम उतरण्याचा निश्चय केला. ग्यारीबाल्डी आला असे कळतांच ती बातमी हां हां म्हणतां सर्व मातृभूमीची भेट ५१ - गांवभर पसरली, व थोडक्याच वेळमंत अर्धा अधिक गांव किनाऱ्यावर येऊन थडकला. चौदा वर्षे मातृभूमीचा वियोग झाल्यामुळे ग्यारीबाल्डी व त्याचे सोबती यांना किनाऱ्यावर केव्हां एकदांचा पाय ठेवू असे झाले होते. तूं आधी कां मी आधीं, अशी जणूं काय त्यांच्यामध्ये शर्यत लागल्यामुळे, जहाजावरील लोक भराभर उड्या घेऊ लागले. उभयपक्षीहि आनंदाचे भरतें आलेलें असल्यामुळे त्या वेळची त्यांची प्रेमालिंगनें, त्यांचे आनंदाश्रू, किनाऱ्यावरून जहाजावर व जहाजावरून किनाऱ्यावर येण्याजाण्याची गडबड या सर्वांचें वर्णन कोण करू शकेल? ग्यारीबाल्डी इटलीकरिता लढण्याचे हेतूनें अमेरिकेहून आला आहे असें कळतांच तेथल्या तेथेच कित्येक लोक फुकट शिपाईगिरी करण्यास तयार झाले, व त्यांनी ग्यारीबाल्डीचे सैन्यांत आपलीं नांवें नोंदून घेतली. गांवांतील इतर लोकांबरोबर ग्यारीबाल्डीची आई, त्याची बायको अॅनिटा, मुलें व इतर स्नेही हे सर्व अर्थात् किनाऱ्यावर आले होते. परदेशाहून जहाज आलेलें असल्यामुळे क्वारंटाईन वगैरेचे नियमामुळे जहाजावरील लोकांस उतरण्यास वेळ लागला असतां, परंतु ते सर्व नियम नाईस येथील लोकांचेच हातीं असल्याने तो सर्व त्रास टळला. किनाऱ्यावर उतरतांच ग्यारीबाल्डीनें आपल्या आईस प्रेमाने कडकडून मिठी मारली व परस्पर सुखदुःखाच्या गोष्टी सांगत व मंडळींना भेटी देत देत आपल्या सोबत्यांसह तो घरी जाऊन पोचला. परंतु तो घरी फार दिवस राहिला नाही. कारण सरहद्दीवर लढाई आगाऊच जुंपलेली होती. इटलीस येतांच' ग्यारीबाल्डीने एकदम जिनोआस निघून जावें असें ठरले होते. त्याप्रमाणे तो लागलाच निघून गेला. जिनोआ येथे लोक त्याची वाट पाहत बसलेच होते. त्यांनी त्याला नेण्याकरितां मुद्दाम एक जहाजहि पाठवून दिले होते. ग्यारीबाल्डी जिनोआ येथे पोंचतांच नाईसप्रमाणे तेथेंहि लोकांनी जिकडे तिकडे आनंदोत्सव केला.
भाग ८ वा स्वातंत्र्याचे घनघोर युद्ध १८४८ हे साल युरोपच्या इतिहासांत अत्यंत स्मरणीय अशांपैकी एक होऊन गेले. या वर्षी सर्व युरोपखंडांत किंबहुना सर्व पृथ्वीचे पाठी- वर बंडे व राज्यक्रांत्या यांचे वादळ उठले होते. त्यांमध्ये विशेषतः फ्रान्स देशांत भयंकर बंड होऊन फ्रेंच लोकांनी लुई फिलीप बादशाहास पदच्युत करून पुन्हा एकवार लोकसत्ताक राज्य स्थापिलें. इतर देशांतूनहि बडे झाली; परंतु त्या सर्वांत फ्रान्समधील बंडाचा व इटलीचा सर्वांत अधिक निकट संबंध होता. खुद्द इटलीत या सालीं जितकी बंडाळी झाली, तितकी मात्र युरोपांत कोठेहि माजली नसेल. एकंदरीने इटलीचें त्यापासून जितकें नुकसान झाले तितकें दुसऱ्या एकाद्या राष्ट्राचे क्वचितच झाले असेल. इटलीतील बंडास १८४७ चे अखेरीस सुरुवात झाली. पार्मा, मिलन, लेगहॉर्न, मेसिना, पालों वगैरे ठिकाणींहि बंडे झाली. ही बातमी नेपल्स येथे जाऊन पोहोचतांच फर्डीनंड राजाकडून अधिक हक्क संपादण्याकरितां लोकांनी फिरून एकवार डोके वर उचललें. फर्डीनंड हा जात्या भित्रा असल्यामुळे त्याने लोकांच्या मागण्या एकदम कबूल केल्या. इटलीतील सर्व संस्थानांमध्ये पिड्माँट हेच प्रमुख व सर्वांपेक्षा अधिक उदार. त्यानेंहि या वेळी पुढारीपण घेऊन, यापुढे चार्लस आल्बर्ट राजा हा स्वतंत्र (पायस) या नात्याने राज्य करणार अशी द्वाही फिरविली. त्याचे पाठोपाठ टस्कनी- नेहि तोच कित्ता गिरविला. पोप पिओनोनो यानेहि आपल्या धर्माधिकाऱ्यांची सभा भरवून आपल्या राज्यांतील प्रजेस 'राजकीय हक्क देणे कितपत प्रशस्त होईल याची वाटाघाट चालविली. प्रत्यही नवीन नवीन बंड होऊ लागले व ड्यूक राजे वगैरे लोक लढाई करण्याचे भानगडीत न पडतां आपापले अधिकारांचे भराभर राजीनामेच देऊ लागले. याच सुमारास फ्रान्समध्ये राज्यक्रांति घडून आली व नवीन स्थापलेल्या लोकसत्तात्मक राज्याच्या अध्यक्षाने जिकडे तिकडे आपल्या वकिलांमार्फत असें फर्माविलें कीं, व्हिएन्ना येथील तहाने ठरविलेल्या इटलीच्या स्थलसीमा कायम राखणे जरी प्राप्त आहे, तरी कोणत्याहि स्वतंत्र संस्थानावर कोणी स्वातंत्र्याचे घनघोर युट परकीय राजा स्वारी करील तर फ्रान्स, लोकसत्तात्मक राज्य त्या संस्थानचा पक्ष घेऊन लढण्यास उभे राहील. या द्वाहीमुळे तर इटलीतील लोकांस बंड करण्यास अधिकच उमेद आली. इतके झाल्यावर ऑस्ट्रियास लढाई करणे प्राप्त आहे असे वाटू लागले. ही संधि साधून पिड्मॉटचे चार्लस आल्बर्ट राजाने ऑस्ट्रियाविरुद्ध लढाई करण्यास कंबर बांधली. या वेळी त्याने कांकू केले असते तर त्याला मुका- ट्याने राज्य सोडून जाणेच भाग होतें. ऑस्ट्रिया व इटली यांच्या लढाईचे तोंड उत्तरेकडील लॉबर्ड व व्हेनिस या प्रांतांत लागले होते व तेथील लोकांस मदत करण्याचा इतरांनी निश्चय केला. पिड्मॉट येथील सैन्य घेऊन चार्लस आल्बर्ट हा स्वतः मोहिमेस निघाला, व वाटत लोकांनी ठिकठिकाणी इटलीचा राजा या नांवाने त्याचा जयजयकार केला. परंतु त्याचे हातून म्हणण्यासारखा कांहीं कार्यभाग झाला नाही. त्याचे सैन्यास प्रथम एक दोन जय मिळाले खरे; परंतु ऑस्ट्रियाचा सरदार मार्शल रॅडे- टस्की हा जलदी करून मागे फिरला व ऑस्ट्रियाचे इतर सरदारांस जाऊन मिळाला. अशा रीतीने चार्लस आल्बर्ट राजाचा आळस व कांहींशी इतर संस्थानिकांनी दाखविलेली मत्सरबुद्धि यांमुळे या मोहिमेंतून फारसें कांहीं निष्पन्न झाले नाही. शिवाय अगदी आयत्या वेळेस पोपने ऑस्ट्रियाचे विरुद्ध लढण्याचें नाकारलें, यामुळे इटलीचे कार्यास थोडासा अडथळा आला. चार्लस आल्बर्ट हा रोव्हरबेला येथे तळ देऊन राहिला असतां ग्यारी- बाल्डी हा त्यास भेटण्याकरितां गेला. चौदा वर्षांपूर्वी या चार्लस आल्बर्ट- नेच ग्यारीबाल्डीस फाशीची शिक्षा ठरविली होती. परंतु आज उभयतांहि एकाच कार्यात गुंतले असल्यामुळे त्या गोष्टीचे वैषम्य नाहीसे झाले असेल असें निदान ग्यारीबाल्डीस तरी वाटले. बाकी काही असले तरी राजाने त्याची फाशीची शिक्षा अंमलात आणण्याचा हुकूम केला नाहीं हेंहि खरें. चार्लस आल्बर्टनें ग्यारीबाल्डीस भेटण्याची परवानगी दिली एवढेच नव्हे, तर त्याचे हातात हात घालून दक्षिण अमेरिकेंत नांव मिळविल्याबद्दल त्याचे अभिनंदनहि केलें. ग्यारीबाल्डीनें “आपल्या सैन्यांतील एक शिपाई होऊन लढावें अशा इच्छेने आलो आहे" अशी नम्र विनंति केली. परंतु चार्लस आल. बर्टनें “तुम्ही टयूरिन येथें जा म्हणजे तुम्हांस कामगिरी सांगतील" असा अबाब दिला. परंतु ग्यारीबाल्डी हा नुकताच टयूरिन येथून आला असून .
ग्यारीबाल्डी तेथील अधिकाऱ्यांनी "राजाकडे जा, म्हणजे कामगिरी मिळेल" असें सांगितले. तात्पर्य, इकडून तिकडे व तिकडून इकडे असे हेलपाटे घालण्यास' लावल्याने ग्यारीबाल्डीस फार वाईट वाटले. परंतु झालेल्या गोष्टीचा विषाद न मानतां, मिलन येथील लोकांनी अद्याप आपणाकडून लढाई चालविली होती, त्यांस मदत करण्यास ग्यारीबाल्डी निघून गेला. मॅझिनीचे लोक त्या ठिकाणी पूर्वीच येऊन बसले होते. त्यांनी बंडवाल्यांस उत्तेजन देण्याचे व मदत करण्याचे काम चालविले होते. राजाने आपले सैन्यांत कामगिरी सांगितली नाही, यामुळे ग्यारीबाल्डीचे विशेष नुकसान न होतां राजाचंच एक प्रकारें नुकसान झाले. कारण तो राजपक्षास येऊन आयताच मिळत होता तो मॅझिनीसारख्या बंडखोराच्या हातांत अचूक जाऊन पडला! ग्यारीबाल्डी मिलन येथे जातांच त्यास तेथील अधिकाऱ्यांकडून लष्कर उभारण्याची परवानगी मिळाली व थोड्याच काळांत त्याने ३०,००० स्वयं- सेवक जमविले. पुढे लवकरच ऑस्ट्रियन सैन्याने मिलन शहरास वेढा दिला व ग्यारीबाल्डीस शहर लढविण्याचे कामी आपले लोक घेऊन येण्यास पाचारण झाले. परंतु चार्लस आल्बर्ट हाहि त्या सुमारास मिलन येथे आला व त्याने कुणाचा सल्ला न घेतां ऑस्ट्रियन लोकांशी एकदम तहाचे बोलणे लाविलें. या तहाचे योगाने मिलन ऑस्ट्रियाचे ताब्यात गेलें ही गोष्ट ग्यारीबाल्डीस अर्थातच आवडली नाही. लढाईचे तोंड लागले असतां विनाकारण आपल्या अनहिताचा तह करावयाचा व तरवारी म्यानांत फुकट घालून ठेवावयाच्या यापेक्षा अधिक शरमेची गोष्ट कोणती? तेव्हां आपण तरी होता होईतों- पर्यत लढू, असा ग्यारीबाल्डी व त्याचे काहीं सोबती यांनी निश्चय केला. मॅझिनीलाहि चार्लस आल्बर्ट राजाचे करणे पसंत नव्हते. त्यानेंहि त्यास कांहीं थोडे लोक व द्रव्य देण्याचे कबूल केले. परंतु राजाने तह कबूल केलेला असल्यामुळे ग्यारीबाल्डीने लढाई चालविणे म्हणजे ऑस्ट्रिया के चार्लस आल्बर्ट या उभयतांच्या विरुद्ध बंडखोरपणा करण्यासारखें होतें. तथापि ग्यारीबाल्डीने तें कांहीएक मनामध्ये न आणतां आपल्या बरो- बरीचे सैन्य घेऊन तो ऑस्ट्रियाविरुद्ध लढाई करण्यास निघाला. त्याने एक विनंतिपत्र प्रसिद्ध करून त्यामध्ये लोकांस असे जाहीर केले की, ".चार्लस आलबर्ट राजा हा इटली देशाचा पक्का वैरी आहे. कारण त्याने ..
स्वातंत्र्याचे घनघोर युद्ध असा भित्रेपणाचा तह करून हातचें मिलन' घालविलें; यापुढे जो कोणी इटलीतील ऑस्ट्रियन लोक हद्दपार होईपर्यत लढाई थांबवा असें म्हणेल तो आपला शत्रु समजून आपण त्याचे पारिपत्य करूं." ग्यारीबाल्डी आपलें सैन्य घेऊन आल्प्स पर्वताचे पायथ्यास गेला. तेथून भऑस्ट्रियन लोकांबरोबर त्याने लढाई चालविली. लॅगोमॅग्युअर नांवाच्या सरोवरावर ऑस्ट्रियाची दोन जहाजे असता त्याने त्यावर आपले १,५०० लोक चढवून तो लुईनो येथे गेला. यानंतर लवकरच ग्यारीबाल्डीची व ऑस्ट्रियाचे सैन्याच्या एका तुकडीची चकमक उडाली. त्यांतहि त्यास यश आले. परंतु सुमारे अर्ध्या तासांत ऑस्ट्रियन लोक फिरून जमाव करून परत आले. या वेळेस ग्यारीबाल्डीस ताप आला होता तरी तो तसाच घोडयावर स्वार झाला. ऑस्ट्रियन लोक आले ते कांहीं एक कळू न देतां एकदम ग्यारीबाल्डीचे सैन्यांत घुसले. संध्याकाळची वेळ झाली होती व ग्यारीबाल्डीचे लोक रात्रींची विश्रांति घेण्याकरितां व्यवस्था करूं लागले होते. अशा वेळी शत्रूनें गांठल्यामुळे त्यांची थोडी धांदल झाली. परंतु ग्यारीबाल्डी हातांत तरवार घेऊन सर्वांचे पुढे झाला व त्याने आपल्या लोकांस उत्तेजन देऊन शत्रूस मागे हटविलें. परंतु पुढे फारसा निभाव लागणार नाही असा विचार करून ग्यारीबाल्डी रातोरात ती जागा सोडून परत फिरला. त्याने आरोना येथे आपले सर्व लोक एकत्र केले व यापुढे लढाई चालविणे शक्य नाही असें ठरवून त्यांस घरोघर जाण्यास परवानगी दिली व आपण स्वतः एकटाच स्वित्सलडकडे जावयास निघाला. वाटेत कदाचित् कोणी ओळखील म्हणून त्याने एका शेतकरी कुणब्याचा पोषाख अंगावर घातला व त्या प्रदेशांतील एक वाटाड्या बरोबर घेतला. अंगांत ताप होताच, तरी ग्यारीबाल्डी मजल दरमजल करून स्वित्सलडांत पोचला. स्वित्सलडांत जाण्याचे कारण असें होतें कीं, ग्यारीबाल्डीने तहाचे विरुद्ध वर्तन केल्यामुळे चार्लस आल्बर्ट राजाने त्यास पिड्माँट प्रदेशांत परत येण्याची मनाई केली होती. स्वित्सलडांत काही दिवस राहून तापांतून बरा झाल्यावर ग्यारीबाल्डी नाईस येथे गेला व तेथे आपल्या आईस व बायकामुलांस भेटून तो जिनोआ येथे गेला. जिनोआ येथे तो असतां चार्लस आल्बर्ट राजानें ग्यारीबाल्डीस निरोप पाठवून पिड्माँट येथे परत बोलाविलें व आपले सैन्यामध्ये बहुमानाची जागा देण्याचे वचन दिले. ग्यारीबाल्डीने अमेरिकेंत व इटलीमध्ये केलेले ग्यारीबाल्डी पराक्रम पाहून व त्याची निःस्पृहता जाणून, हा मनुष्य केवळ बंडवाला नसून इटलीचा खरोखर हितकर्ता आहे अशी त्याची आतां खात्री झाली होती. परंतु ग्यारीबाल्डी हा अशा कोरड्या बहुमानाचा थोडाच भुकेला होता! त्याने तो बहुमान तर नाकारलाच; परंतु चार्लस आल्बर्ट राजास स्याने उलट असें सांगून पाठविले की, व्हेनिस शहर ऑस्ट्रियाशी मोठ्या शौर्याने लढत आहे त्यास मदत करण्यास मी जाणार. व खरोखरीच त्याने २५० लोक जमविले व तो जिनोआहून व्हेनिसकडे जाण्यास निघाला; परंतु वाटेतच त्यास रोमकडील खबर कळली, त्यामुळे त्याने व्हेनिसला जाण्याचा आपला बेत बदलला. इकडे रोममध्ये अशी हकीकत घडून आली होती की, पोप पिओनोनो याने जरी लोकपक्षाकडे आपला कल प्रथम दाखविला होता, तरी ऑस्ट्रियाशी प्रत्यक्ष लढाई सुरू झाल्यावर त्याच्या कमकुवत व चंचल मनाला धीर धरवेना; व त्याने इतर संस्थानिकांस मदत करण्याचे आयत्या वेळी नाकारलें. पुढे युद्धामध्ये चार्लस आल्बर्ट राजाचे सैन्याचा पराभव झाल्यामुळे तर पिओनोनोचा विचार अर्थातच कायम झाला. परंतु रोम येथील लोकांस त्याचे करणे मुळीच पसंत नव्हते. यामुळे रोमच्या राजसभेत बरेच तंटेबखेडे झाले. मेमियानी नांवाचा, लोकपक्षास अनुकूल असा एक मुख्य मंत्री होता. त्यास पोपने काढून त्याचे जागी कौन्ट रॉमी या नांवाच्या मनुष्याची नेमणूक केली; परंतु तो अत्यंत अप्रिय असल्यामुळे लवकरच कोणी त्याचा खून केला. इतकें घडून आल्याबरोबर शहरांत जिकडे तिकडे एकच बंडाळी माजली. लोक हातांत शस्त्रे घेऊन रस्त्यांतून बेफामपणे फिरूं लागले. आता लवकरच बंड होणार अशी भीति वाटून पोप, धर्माध्यक्ष व मंत्रिमंडळ किल्ल्यांत दडून राहिले. दुसरे दिवशी लोकांनी पोपचे वाड्यास वेढा दिला व राज्यामध्ये एक लोकसभा नेमावी व लोकनियुक्त मंत्रिमंडळ स्थापावें अशी मागणी केली. त्यास पोप कबूल होईना. मग लोकांनी वाड्याचे दरवाजास तोफा लाविल्या, तेव्हां निरुपाय होऊन त्यास त्यांच्या बऱ्याच मागण्या कबूल कराव्या लागल्या. पोप रोममधून निघून गेल्याबरोबर मागें रोमच्या लोकांनी एकदम प्रजा- सत्ताक राज्याची द्वाही फिरविली. रोम येथील बंडाची बातमी ग्यारीबाल्डीस म्हेनिसला जात असतांनाच वाटत कळली. त्याबरोबर तो व्हेनिसकडे न स्वातंत्र्याचे घनघोर युद्ध - जातां एकदम रोमकडे वळला. व्हेनिसपेक्षां रोमवर ग्यारीबाल्डी व मॅझिनी यांची अत्यंत प्रीति होती. रोमच्या नांवामध्ये इटलीच्या सर्व वैभवाची जादू भरून राहिली होती; आणि रोम स्वतंत्र केल्याशिवाय इटलीचे स्वातंत्र्य कधीहि सिद्ध, निदान सार्थ तरी होणार नाही असे प्रत्येक देशभक्ताच्या मनाने घेतले होते. लहानपणापासून रोमच्या नांवाचा किंवा दर्शनाचा कांहीं एक विलक्षण परिणाम ग्यारीबाल्डीच्या मनावर होत असे. तें रोम शहर आज प्रत्यक्ष बंड करण्यास उठले आहे, एवढेच नव्हे तर, लोकांच्या भयाने जुलमी पोप रोम शहर सोडून पळून गेला आहे, ही बातमी कळतांच ग्यारी- बाल्डीने आपले इतर सर्व बेत जशाचे तसे ठेवून रोमकडे धाव घेतली ! या वेळेस मॅझिनीहि रोममध्ये आला होता. तो येतांच शहरांतील सर्व झोक लढाई करण्यास सिद्ध झाले. आतां पोप फिरून रोमला परत येत नाही हैं एक, किंवा आलाच तर परकीय सैन्याच्या मदतीने येऊन पूर्वीपेक्षा अधिक जुलमाचे राज्य करण्यास येणार! असें पाहून मॅझिनीच्या सल्ल्याने रोमच्या नागरिकांनी स्वतंत्र लोकसत्ताक राज्य स्थापण्याचे ठरविलें, व ठिकठिकाणी लोक जमवून त्यांनी नवीन राष्ट्रसभेमध्ये बसण्याकरिता आपल्यातर्फे प्रतिनिधीहि निवडून दिले. या निवडणुकीमध्ये मॅझिनी हा रोमच्यातर्फे व ग्यारीबाल्डी मॉसिरेटा या गांवाच्यातर्फे, असे सभासद निवडले गेले. अशा रीतीने काहीएक रक्तपात न होतां रोम बंडवाल्यांचे ताब्यात आले व त्यांनी तेथें स्वतंत्र प्रजासत्ताक राज्यहि स्थापिलें. पोप रोम सोडून निघून गेलाच होता. त्याने गेटा येथील मुक्कामाहून युरोपांतील रोमन क्याथॉलिक मताच्या राजांकडून मदत मागितली. ही मागणी फ्रान्स, स्पेन, ऑस्ट्रिया, व नेपल्स इतक्या संस्थानांचे राजांनी कबूल केली. प्रथम काही दिवस कोणीच वचनाप्रमाणे लढण्याचे कामी पुढारी- पण घेईना; परंतु चार्लस आल्बर्ट राजाचा नोव्हेंरा येथे पराभव झाल्या- बरोबर ऑस्ट्रियास रोमकडे लक्ष देण्यास फावले. फ्रान्स, ऑस्ट्रिया, व नेपल्स या तिन्ही संस्थानांची सैन्ये तिन्हीकडून एकदम रोमकडे येण्यास निघाली. दक्षिणेकडून सिसिलीचा राजा फर्डीनंड याहि सैन्य रोमवर चालून आले. तेव्हां आतां रोमचा पुढे बचाव कसा करावयाचा याची मॅझिनी, ग्यारीबाल्डी वगैरे लोकांस पंचाईत येऊन पडली. वास्तविक रोममध्ये लोकसत्ताक राज्य स्थापिलें होतें, व आपल्या काळजावरून पोपडे ५८ ग्यारीबाल्डी मोठे दडपण एकदांचे निघाले. या भरंवशाने रोमचे नागरिक लोक मोठ्या आनंदांत होते. शहरांत कोठे दंगाधोपा किंवा काहीएक गडबड न होतां नवीन स्थापिलेलें राज्य शिस्तीच्या मार्गास लागले होते. परंतु अद्यापि रोमच्या बाहेरचे लोक तटस्थ असल्यामुळे रोमच्या नागरिकांस बाहेरून मदत होईल अशी फारशी आशा नव्हती. अशा स्थितीमध्ये रोमच्या लोकांनी आपला आपणच' कसा बचाव करावा या विवंचनेत बंडवाल्याचे पुढारी पडले. इतक्यांत ग्यारीबाल्डी रोम शहरास आला. त्याचे पुढे हे लढाईचे ताट वाढून ठेवलेच होते; आणि ते त्यास हवेच होते. शहराची व्यवस्था करण्या- करितां मॅझिनी व इतर दोन गृहस्थ अशा तिघांस राज्यकारभाराची पूर्ण मुखत्यारी मिळालेली होती. त्यांचे परवानगीने 'कर्नल' ग्यारीबाल्डी हा रीटी नांवाच्या किल्ल्यांत परत गेला व तेथे त्याने तटबंदीची दुरुस्ती करून आगाऊ असलेल्या व प्रत्यहीं नवीन नवीन येऊन मिळणाऱ्या शिपायांना पोषाख वगैरे देऊन कवाईत शिकविण्यास प्रारंभ केला. या वेळी ग्यारी- बाल्डीजवळ सुमारे २,५०० सैन्य होते. त्यामध्ये माटीव्हिडो येथे त्याच्या लष्करांत असलेले पांचपन्नास शिपाई, तसेंच व्हेनिसहून नोकऱ्या सोडून देऊन आलेले ३०० सरकारी नोकर, ४०० युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असे निर- निराळ्या प्रकारचे लोक होते. ग्यारीबाल्डी तापांतून नुकताच उठलेला असून या नवीन उद्योगांत त्याला स्वस्थता मुळीच मिळत नसे. तथापि त्याने लष्कर जमविण्याचे व कवाईत शिकविण्याचे काम खूप जारीने सुरू केले होते. त्याचे उदाहरण पाहून त्याचे लोकहि परस्परांशी एकदिल व देशकार्यात तल्लीन होऊन गेले होते. चार्लस आल्बर्ट राजा अद्यापि समरांगणांत उभा होता. रोमच्या नवीन अधिकाऱ्यांचा प्रथमचा बेत त्यास कुमक करण्याकरितां कांहीं सैन्य पाठ- विण्याचा होता. परंतु पुढे लवकरच नोव्हेंरा येथें चार्लस आल्बर्ट याचा ऑस्ट्रियन सरदाराने पराभव केला. इकडे फ्रान्स व ऑस्ट्रिया यांची सैन्येहि मजल दरमजल करीत रोमवर येत होती. या दोन सैन्यांपैकी फ्रान्सच्या सैन्याने आपण रोममधील लोकसत्तात्मक राज्य मोडण्यास आलों नसून, पोपच्या राज्यांत शांतता करण्याकरितांच आलो आहों अशी बतावणी केली. या बतावणीस मात्र मॅझिनी फसला. परंतु ग्यारीबाल्डीला खरें वर्म माहीत असल्यामुळे त्याने होता होईल तितकें करून फ्रान्सचे सैन्यास आपण रोमचे स्वातंत्र्याचे धनघोर युद्ध ५९ आसपासहि येऊ देऊ नये व त्याजबरोबर एकदम लढाई करावी असा सल्ला देऊन सभेचे मन वळविलें. लढाईचा निश्चय जाहीर होतांच रोम शहरांत रस्तोरस्ती तट घालून त्यांवर ठिकठिकाणी तोफांचे मोर्चे लावण्याची सुरुवात झाली व लोक शह- राचा बचाव करण्याची तयारी करू लागले. इकडे ग्यारीबाल्डी दृष्टीस पडतांच हजारों लोकांच्या झुंडीच्या झुंडी एकदम ‘ग्यारीबाल्डी, ग्यारीबाल्डी' अशा शब्दांनी आनंदाच्या आरोळ्या ठोकं लागल्या. फ्रेंच सरदाराचें सैन्य रोमवर चालून येत होते त्यास वाटेतच प्रतिबंध झाला व तेथेच एक लहानशी लढाई झाली. ही बातमी रोम शहरी येतांच क्यापिटॉल या प्रचंड इमारतींतील मोठ्या घंटा दणादण वाजू लागल्या. शहराचे कोटावरून तोफांचाहि धडाका सुरू झाला व हजारों लोक आपापली कामें धाम सोडून हातास येतील ती हत्यारे घेऊन धांवत सुटले. कारण या ठिकाणीच रोमन सैन्याची व फ्रेंच सैन्याची प्रथम गांठ पडणार अशी त्यांची अटकळ होती. रोम शहरांतून लढाऊ नागरिकांचा जो हा लोंढा बाहेर पडला त्याचेपुढे फ्रेंच लोकांचा टिकाव लागेना. तेव्हां त्यांनी शहरचे दुसरे बाजूस आपला मोर्चा फिरविला. परंतु त्या ठिकाणी ग्यारीबाल्डी हा आगाऊच' सज्ज होऊन बसलेला असल्या- मुळे त्याने त्याजवर एकदम हल्ला करून शत्रूचा धुव्वा उडविला. या चकमकीत यश आल्यामुळे रोमन नागरिकांस अधिकच' स्फुरण चढले. दुसरे दिवशीं ग्यारीबाल्डी कुमक घेऊन पुन्हा हल्ला करणार तो फ्रेंच सरदार ओडीनॉट याने मॅझिनीशी तहाचे बोलणे लाविलें. फ्रान्समधील प्रजासत्ताप्रिय लोकांकडून पुढे मागे बरीच मदत होईल, अशी मॅझिनीस आशा वाटत होती. यामुळे पुन्हा एकवार फ्रेंच सैन्याचा पराभव करून ती आशा कायमची गमवावी हे त्यास बरे वाटेना. याकरिता त्याने ग्यारीबाल्डीस परत फिरण्याचा हुकूम दिला. ग्यारीबाल्डीस फ्रेंच सरदाराचे कपट माहीत होते. म्हणून शत्रूचा पुरा मोड करण्याची ही अमोलिक संधि दवडण्याचे त्याच्या मोठे जिवावर आले, परंतु करतो काय? तो ताबेदार पडला ! मॅझिनी हा नवीन स्थापलेल्या लोकसत्ताक राज्याचा एक मुख्य अधिकारी होता ब या वेळी त्याचेच हाती सर्व लोकसभा आलेली होती. म्हणून त्याचा हुकूम ग्यारीबाल्डीस मानावा लागला. इकडे तहाचे बोलणे चाललें असतां, फ्रेंच सैन्य हळुहळू इटलीत भरत.
ग्यारीबाल्डी चालले होते. लढाई बंद असल्यामुळे त्याविरुद्ध ग्यारीबाल्डीस कांहीं करता येईना; परंतु त्यास मध्येच एक दुसरी कामगिरी मिळाली. नेपल्सचा राजा फर्डीनंड रोमवर चालून येत होता हे मागें सांगितलेच आहे. त्याचे तोंडावर लोकसभेने ग्यारीबाल्डीस ४,००० सैन्य देऊन एकदम गुप्तपणे पाठविले. परंतु त्या वेळी त्याला मुख्य सरदार न करतां रॉझेली या नांवाच्या सरदारास ती बहुमानाची जागा दिली गेली! तथापि याबद्दल यत्किचितहि विषाद न मानतां, आपलें सैन्य घेऊन ग्यारीबाल्डी निघाला. तो सोळा तासांची एक- दमाने मजल मारून झरगारोला येथें फर्डीनंडच्या सैन्याचे वाटेवर जाऊन छावणी देऊन राहिला. पुढे लवकरच शत्रूची व ग्यारीबाल्डीच्या सैन्याची गांठ पडली. ही लढाई पुष्कळ वेळपर्यत चालली व तींत ग्यारीबाल्डीस एक दोन जखमाहि झाल्या. परंतु त्याचे सैन्याने त्याचेप्रमाणे मोठी मर्दुमकी केली. शेवटी फर्डीनंडचे सैन्य २०,००० असूनहि त्याचा मोड होऊन ते पळत सुटले, तें पुढे दोन दिवसांत सरहद्दीच्या पार निघूनहि गेलें. इकडे जनरल ओडीनॉट याला फ्रान्समधून सैन्याची कुमक मिळाल्यामुळे तहाचे बोलणे तसेंच राहून तो फिरून रोम शहरावर आला. तेव्हां फिरून रोमशी लढण्याची तयारी सुरू झाली. लागलीच ग्यारीबाल्डीस फर्डीनंडच्या सैन्याचे पाठीवरून परत बोलावण्यात आले. नेपल्सच्या सैन्याचा पुरा मोड केल्याशिवाय परत फिरणे हेहि ग्यारीबाल्डीच्या जिवावरच आले होते. कारण त्याचे नांवाची त्या सैन्यावर विलक्षण दहशत बसली होती. ग्यारीबाल्डी हा माणूस नसून केवळ 'सैतान' आहे. खुद्द पोप महाराजांनी आपल्या हाताने मंत्रून दिलेल्या तरवारीचे त्याच्याविरुद्ध लढतांना खटाखट तुकडे पडावे, व त्यांनी पवित्र करून दिलेल्या रुपेरी गोळयांपैकी एकसुद्धां गोळी त्याचे अंगांत शिरूं नये, हे तो कोणी खरोखर सैतान असल्याशिवाय होणे शक्य नाहीं असेंहि त्यांना वाढू लागले होते. परंतु त्या सैन्यापासून आतां भीति उरलेली नव्हती. इकडे फ्रेंच सैन्य रोमजवळ असल्यामुळे शहरास वेढा बसणार अशी भीति उत्पन्न झाली. तेव्हां ग्यारीबाल्डी त्याच्या पाठलागाचे काम एकदम सोडून देऊन मागे फिरला. फ्रान्सचे दुटप्पी वर्तन चालू होते. प्रथम तहाचे बोलणे लाविल्यापासून फ्रान्सचा वकील एम्. डी. लिसेप्स हा अद्यापि तहाचे बोलणे पालवीद होताच. तहनाम्यावर सही होण्यास व जनरल ओडीनॉट रोम- स्वातंत्र्याचें घनघोर युद्ध जवळ येण्यास एकच गांठ पडली. त्याने 'मी तहनामा मुळीच जुमानीत नाही, कारण तुम्ही आपल्या अधिकाराबाहेरील गोष्ट केली आहे' असें लिसेप्स यास बोलून झालेला तह एका शब्दाने मोडून टाकला, व गुप्तपणाने रोम शहराच्या आसपासची ठाणी एकदम काबीजहि केली. अद्याप ग्यारी- बाल्डी हा रोम येथे येऊन पोंचावयाचा होता, तोच शहरामध्ये पुन्हा एकवार पहिल्याप्रमाणे गडबड सुरू झाली. भयसूचनार्थ कॅपिटॉलमधील मोठ्या घंटा पुन्हा घणघण वाजू लागल्या, जिकडे तिकडे नौबदीहि झडू लागल्या, व पुन्हा लोक हातांत शस्त्रं घेऊन सैरावैरा धावू लागले. ग्यारीबाल्डी येऊन पोंचतांच त्याने लढाईचे काम एकदम सुरू केले; परंतु या वेळी ओडीनॉट याचे सैन्य पुष्कळच असल्यामुळे ग्यारीबाल्डीच्या शूर शिपायांचेंहि कांहीं चालेना! यामुळे वेढ्याचे पहिल्या दिवशी संध्याकाळ- पर्यंत शहराच्या आसपासची बरीच ठाणी शत्रूच्या हाती गेली. शहरांतील लोकांस मोठी चिता उत्पन्न झाली. ग्यारीबाल्डीने शहराच्या तटावरून तोफांची मारगिरी करण्यास सुरुवात केली व मधून मधून एकदम खाली उतरून शत्रूवर हल्ले करण्याची युक्तीहि योजून पाहिली. तथापि शत्रूस फारसा प्रतिबंध होईना. शिवाय टायबर नदीवरील पुलाखाली दारूगोळयाचें एक जहाज घालून पूल उडवून टाकण्याचे कृत्यांतहि त्यास यश आले नाही. अशा स्थितीमध्ये जेवढा दिवस रोम शत्रूच्या हातीं न लागतां जाईल तेवढा भाग्याचा असें आंतील लोकांस वाढू लागले होतें. अजूनहि मॅझिनीस लिसेप्सने केलेला तहनामा फ्रान्स मंजूर करील अशी आशा होती. परंतु तिची लवकरच निराशा झाली. कारण फ्रान्स येथील सरकारनेंहि जनरल ओडीनॉटप्रमाणे लेसेप्स याचा तहनामा करण्याचे बाबतीत अधिकार नाकबूल केला. वास्तविक असें होण्याचे मुख्य कारण असें होतें कीं, जनरल ओडीनॉट यास हवी तितकी कुमक मिळाली होती व आतां रोम् हाती येणार अशी त्यास बळकट आशा उत्पन्न झाली होती. याप्रमाणे निराश होतांच रोमन लोक रागाने अगदी बेफाम होऊन गेले. मॅझिनी व त्याचे बरोबरीचे इतर दोघे अध्यक्ष यानी, शहराची राखरांगोळी झाली व लोक त्यांत बुडून गेले तरी चिंता नाही, परंतु लढाई ही करावयाची असा निश्चय केला. परंतु आतां तसे करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणाचें भाहे असें म्यारीबाल्डीचें मत पडले. यामुळे मॅझिनी व ग्यारीबाल्डी यांचें ६२ ग्यारीबाल्डी खडाजंगी भांडण झाले. ते इतके की, यापुढे आजन्मांत त्यांचा बेबनाव समूळ नाहीसा झाला नाही! असो. दिवसेंदिवस रोमच्या भोवतालचे पाश अधिकाधिकच आंखडू लागले. फ्रेंच सैन्याने शहरासभोंवार तोफा लाविल्या च गोळ्यांचा भडिमार चालविला. एकेका रात्री दीडदीडशे गोळे शहरांत येऊन आदळत. त्यामुळे शहरांतील आणि आसपासच्या इमारती व बागबगीचे अगदी जमीनदोस्त होऊन जात. असें होतां होतां अखेरीस जूनचे ३० व्या तारखेस शेवटचा निकराचा हल्ला झाला. पहाटे दोन वाजल्यापासून ग्यारी- बाल्डी हातांत तरवार घेऊन आपले शूर व करारी लोक घेऊन लढण्यास निघाला. प्रथम काही वेळपर्यत फ्रेंच सैन्याचा पाय पुढे पडेना; परंतु एवढ्या सैन्यापुढे आंतील लोकांचा निभाव कितीसा लागणार! शेवटी आतां मागे फिरल्याशिवाय दुसरी तोडच नाहीं असे झाल्यावर, त्याने रोमच्या अधिकाऱ्यांस निरोप पाठवून यापुढे लढणे अशक्य आहे असे कळविलें. मॅझिनीप्रभृति अध्यक्षांनी सभा बोलाविली. रक्ताने माखून गेलेला, बंदुकीच्या गोळ्या आणि तरवारीचे घाव यांनी अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झालेल्या, अशा स्थितीत ग्यारीबाल्डी सभेपुढे येऊन हजर झाला. यापुढे लढण्यात काही अर्थ नाही, असे त्याने त्यांस फिरून सांगितलें, व स्थाप्रमाणे लढाई बंद करावी असा हुकूम सुटला. पुढे दोन तीन दिवस तह जमविण्यांत गेले. आतां रोम सोडून जावें लागणार या विचाराने ग्यारीबाल्डीस फार दुःख झाले. परंतु या शहरांत राहण्यांत खास धोका आहे असे झाले तेव्हां त्याने आपले सर्व शिपाई सेंटपिटर्सच्या देवळांत गोळा केले व त्यांस उद्देशून तो म्हणाला : माझ्या शूर शिपायांनो! तुम्हांस देण्यास मजजवळ काहीच उरले नाही. एवढेच नव्हे, तर मजबरोबर जो कोणी येईल त्यास यापुढे निवाऱ्याची झोपडीसुद्धा मिळणार नाही. तहान, भूक, ऊन, वारा हीहि सोसावी लागतील. अन्ना- वांचून मुठीत जीव घेऊन लांबलांबच्या मजलाहि माराव्या लागतील, अशी स्थिति आहे. इतक्यांतूनहि कोणास मजबरोबर यावयाचे असल्यास खुशाल चलावें." हे भाषण संपतांच ४,००० लोक त्याचबरोबर जाण्यास तयार झाले व पुढे एक क्षणाचाहि विलंब न लावतां रोम सोडून टस्कनीच्या पहा- डाच्या आश्रयाला जावयाचे असा बेत करून ही शूर शिपायांची टोळी ट्रिव्होलीच्या रस्त्यास जाऊन मिळाली. ग्यारीबाल्डी शहरांतून निघून गेला, दुर्दैवाचा कळस ६३ ही बातमी कळतांच त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजतां पोपचे निशाण रोमच्या किल्ल्यावर पुन्हा फडकू लागले, व फ्रेंच जनरल ओडीनॉट आपले सैन्य घेऊन रोममध्ये शिरला. भाग ९वा दुर्दैवाचा कळस . संपदसंपदं विपद् विपदमनुबध्नाति ---कादंबरी ग्यारीबाल्डीने रोम सोडल्यापासून पुढे त्याजवर इतके बिकट व चम- त्कारिक प्रसंग आले की, त्यांची एक चांगली कादंबरीच बनेल. निघतांना ग्यारीबाल्डीने आपल्याबरोबरचे सैन्यास अगदी अवश्य ते पैसे सरकारी खजिन्यांतून घेतले. परंतु त्यांतली आपल्या स्वतःच्या उपयोगाकरितां त्याने एक पैहि खचिली नाही. स्वतःच्या खर्चाकरितां त्याने आपले घड्याळ विकलें! वाट चालू लागल्यावर त्यास प्रथम अडचण आली ती अशी की, त्याचे बरोबरीचे लोक त्यास हळूहळू सोडून जाऊ लागले. शिवाय आपणांस ठिक- ठिकाणचे लोक येऊन मिळतील व आपणांस गांवोगांवचे लोक आनंदाने मदत करतील अशी जी त्यास आशा होती तीहि व्यर्थ आहे असे त्यास कळून येऊ लागले. चोहोंकडे ऑस्ट्रियन सैन्य पसरले असल्यामुळे त्यांची गांठ पडण्याची भीतिहि उत्पन्न होऊ लागली. रात्री उठून मजला माराव्या व दिवसां कोठे तरी सुरक्षित ठिकाण पाहून उतरावें, असा क्रम ग्यारीबाल्डीने चालविला. अनोळखी मुलुखांतून हिंडावयाचें व वाटाड्या पाहावा तो मुळीच मिळेना! अशा बिकट अडचणींतून ग्यारीबाल्डीने सॅन मेरिनो येथपर्यंत मजल मारली. येथे मात्र त्यास आशा उत्पन्न होण्यासारखें लोकांकडून आश्वासन मिळाले. ग्यारीबाल्डी आला असे कळतांच तेथील छोटेखानी लोकसत्ताक राज्याने त्याचे स्वागत करण्याकरितां आपले काही अधिकारी त्यास सामोरे पाठविले. परंतु येथेहि ऑस्ट्रियाचे सैन्य त्याच्या मागोमाग येऊन ठेपलेंच! त्याबरोबर ग्यारीबाल्डीचे लोकांची किंचित् धांदल झाली व बरेच लोक शत्रु दिसण्या- पूर्वीच पळू लागले. या वेळी खुद्द त्याने आणि स्वतः अॅनिटा हिनें त्या पळपुटया ग्यारीबाल्डी शिपायांची निर्भर्त्सना करून त्यांस उत्तेजन आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचीहि त्यांस शरम वाटली नाही. सॅन मेरिनो येथील अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रियाचे सैन्य जवळ येऊन ठेपलें असतांहि मोठ्या उदारपणाने व धैर्याने ग्यारीबाल्डीचे उरलेल्या लोकांस कांहीं शिधासामग्री दिली, आणि पुढील मुक्कामी पोंचतें करण्याचे त्यांस आश्वासन देऊन ग्यारीबाल्डीस व त्याचे बायकोस जवळच्या एका देवळांत राहण्याची सोय करून दिली. परंतु आतां पुढे निभाव लागणे कठिण असें पाहून ग्यारीबाल्डीने उरलेल्या लोकांस येथूनच रजा द्यावी व आपण कोठे तरी निघून जावें, असा विचार केला. दुसरे दिवशी देवळाचे पायऱ्यांवर उभा राहून आपल्या सैन्यास उद्देशून तो म्हणाला : “ मजबरोबर येण्याचे तुम्ही मला जें वचन दिले होते त्यामधून मी आज तुम्हांला मुक्त करतो. तुम्ही आतां आपल्या घरी किंवा वाटेल तिकडे जा. परंतु एवढे मात्र नेहमी लक्षात ठेवा की, इटली परकीयांच्या दास्यांत दीन होऊन राहिलेला पाहण्यापेक्षां मरण बरें." हे वीरश्रीचे शब्द बोलून त्याने त्यांस रजा दिली. इकडे सॅन मेरिनोचे सरकारमार्फत ग्यारीबाल्डीने आपल्या स्वाधीन व्हावें अशाविषयों ऑस्ट्रियन सरदाराने बोलणे चालविलें. प्रथम त्याचे म्हणणे ग्यारीबाल्डीने हत्यार खाली ठेवून आपणास शरण यावें असें होतें. परंतु या अटीचा ग्यारीबाल्डीने धिक्कारपूर्वक निषेध केला. तेव्हां ग्यारीबाल्डीने निदान इटलीत तरी राहूं नये, अमेरिकेस निघून जावें, असें पुन्हा बोलणे तेव्हां ग्यारीबाल्डीने आपणच कोठे तरी गुप्तपणे निघून जाऊन सॅन मेरिनो येथील सरकारास विवंचनेंतून सोडवावे असा निश्चय केला, व त्याप्रमाणे मध्यरात्रीचे सुमारास काही निवडक लोक बरोबर घेऊन तो निघाला. अॅनिटाहि अर्थात् त्याचेबरोबर होती. तिची प्रसूतीची वेळ जवळजवळ येऊन ठेपली होती व ती बरीच आजारी होती. म्हणून " सॅन मेरिनो येथेच तूं रहा, येथील लोक चांगले ममताळु आहेत, ते तुला चांगली मदत करतील" असे त्याने तिला परोपरीने सांगून पाहिले. परंतु त्या शूर, करारी, व उदार स्त्रीस या सूचनेचा अतिशय राग आला, व “ मजवर तुमची प्रीतीच नाही, मी तुम्हांला जवळ नको, मला टाकून द्यावयाचा तुमचा विचार आहे म्हणून तुम्ही हे सर्व मायाजाळ पसरतां आहां असें वाटते" असें निष्ठुरतेचें उत्तर तिनें ग्यारीबाल्डीस दिले. तेव्हां अर्थातच निरुतर होऊन तिला बरोबर घेणे त्यास सुरू झालें. .
दुर्दैवाचा कळस भाग पडले. परंतु सर्व लष्करांत ही एकच स्त्री होती. याकरितां तिचं वेषांतर करणे अवश्य होते. म्हणून पहिल्याच मुक्कामावर ग्यारीबाल्डीने एका स्त्री- कडून अॅनिटाचे सर्व केस कातरले, तिला पुरुषाचे कपडे अंगांत घालावयास दिले, व बसावयास एक घोडा दिला. याप्रमाणे अॅनिटा ही घोडेस्वार बनून आपल्या नवऱ्याबरोबर प्रवास करण्यास सिद्ध झाली. यापुढे ग्यारीबाल्डीबरोबर सारे २०० लोक उरले. त्यांस घेऊन तो अॅड्रि- अॅटिक समुद्राचे किनाऱ्यावरील कोणत्या तरी एका बंदरांत जाण्याच्या उद्देशाने निघाला. वाटेंत गॅलोपिनी या नांवाचा एक स्नेही त्यास भेटला व त्याचे. बरोबर सेझेंटीको या गांवचे बंदरास ग्यारीबाल्डी शेवटी एकदांचा जाऊन पोंचला. पण तेथे पुरेशा होड्या मिळेनात. याच सुमारास समुद्र फार खवळला होता, व पाण्यांत होडी घालावयास कोणी खलाशी धजेनात. ग्यारीबाल्डी समुद्र- पर्यटनाचे कामांत पुरा निष्णात होता व प्रसंग बिकट असल्यामुळे त्याचे अगी दुप्पट धर्य आले. रात्रीची वेळ होती व वारा सुटला होता; परंतु ऑस्ट्रियन लोक येऊन पोंचतील ही भीति क्षणोक्षणी वाटत असल्यामुळे ग्यारीबाल्डीने जलदी करून १०।१२ कोळ्यांच्या होड्या पाण्यांत लोटून त्यांवर आपले लोक चढविले, व उजाडतां उजाडतां ते बंदरांतून एकदांचे बाहेर निघण्यास व ऑस्ट्रियन सैन्य गांवांत शिरण्यास एकच गांठ पडली. ग्यारीबाल्डीने जर जलदी करून आपले लोक होड्यांवर चढविले नसते तर दुसरे दिवशी सकाळी ते आयतेच शत्रूच्या हातांत लागते. ग्यारीबाल्डी बंदर सोडून निघण्याचे सुमारास वारा किंचित् अनुकल झाला होता. ग्यारीबाल्डीने त्याचा फायदा घेऊन व्हेनिसकडे आपल्या होड्या चालविल्या. या धामधुमीच्या श्रमानें अॅनिटाचा आजार फारच वाढला. होड्यांवर औषध वगैरे काही नव्हते. फार काय पण गोडे पाणीहि पुरेसें घेतलेले नव्हते. अॅनिटास तापाच्या आगीमुळे अतिशय तहान लागून ती एकसारखी पाणी पाणी करूं लागली. ग्यारीबाल्डीस होड्या तयार करण्याचे कामी साऱ्या रात्रभर श्रम पडल्यामुळे त्यालाहि फार तहान लागली होती, परंतु पाणी म्हणून मिळेना. त्या दिवशी पौणिमेचें चांदणे पडलें होतें, व रात्र स्वच्छ होती, यामुळे ग्यारीबाल्डीस किंचित् बरें बाढू लागले होते. परंतु हे चांदणेच या वेळी ग्यारीबाल्डीस अनहिताचें झालें. कारण या बाजूस समुद्रांत ऑस्ट्रियाची लढाऊ गलबतें हिंडत होती व त्यांस ग्यारीबाल्डीच्या होडया चांदण्याने स्वच्छ दिसू लागल्या. तेव्हां ही गलबतें .
ग्यारीबाल्डी . व किनारा यांजमधून सरळ व जलद गेल्याशिवाय गत्यंतर नाही असे दिसून आले. परतु होड्या लहान व अवजारें थोडीं, यामुळे तें साधेना. शेवटी दिवस उगवण्याचे सुमारास कांहीं होड्या शत्रूचे हाती लागल्या व ज्या कांहीं थोड्या उरल्या त्यांना किनारा गांठणे भाग पडले. इकडे किनान्यावर उतरावें तर गलबतावरून लोक गोळ्या मारीत होते. अशा बिकट प्रसंगी ग्यारीबाल्डीची होडी व इतर तीन होड्या एकदांच्या किनान्यास लागल्या. अशा रीतीने ग्यारीबाल्डी हा शत्रूचे हातांतून निसटला. परंतु तो आनंद नाहींसा करण्याइतकें दुःख दैवाने त्याजपुढे मांडून ठेविले होते. कारण अॅनि- टाची प्रकृति आतां अगदी अत्यवस्थ झाली होती. तिला कशी तरी कवटाळून धरून ग्यारीबाल्डी हा किना-यावर तर एकदांचा उतरलाच, परंतु तेथे थांब- ण्याची बिलकुल सोय नव्हती. कारण शत्रूच्या होड्या मागोमाग येण्याची भीति होती, म्हणून त्याने बरोबरचे लोकांस वाट फुटेल तिकडे जाण्यास सांगि- तलें. किनारा सोडून आत जावें तर तेथेंहि शत्रु हातांत तिलांजली घेऊन उभे होते. त्यांनी ग्यारीबाल्डीच्या बरोबरीचे काही लोकांस तर गोळ्या घालून ठार मारलेच. त्यामध्ये ग्यारीबाल्डीच्या जिवाला जीव देणारे असे कांहीं दोस्त होते. त्यांचे वर्तमान ऐकून त्यास अतिशय शोक झाला. इकडे खुद्द ग्यारी- बाल्डी हा मात्र अॅनिटासह मोठ्या शर्थीनें वांचला. किनारा सोडल्यावर जवळच मक्याचे एक दाट शेत होते. तेथे ग्यारीबाल्डी ॲनिटास घेऊन गेला. परंतु तिचे प्राण यापूर्वीच कंठांत येऊन राहिले होते व या निवाऱ्याचे जागी येतांच अॅनिटा हिने प्राण सोडला. मरतांना “ मुलांची नीट काळजी घ्या" एवढेच शब्द तिने ग्यारीबाल्डीस सांगितले. अशा बिकट प्रसंगांत आपण सांपडूं व परक्या ठिकाणी--अगदी रानांत -मदत करण्यास जवळ कोणी मित्र नाहीं, दवा नाही, पाणी नाहीं, अन्न नाहीं, वस्त्र नाहीं, चोहोंकडून शत्रूचा वेढा पडला आहे, व त्यांचे हातीं आपण सांपडून तोफेचे तोंडी जातों की काय याची क्षणोक्षणी मनांत धास्ती वाटत आहे, अशा स्थितीत आपली प्रिय पत्नी मरण पावणार हे पाहून ग्यारीबाल्डीला काय वाटले असेल याची कल्पनाच केली पाहिजे! परंतु दुर्दैव हात धुवून पाठीस लागलें म्हणजे कधी कोणास कल्पनाहि करता येणार नाही असे अद्भुत अनुभव, तें जगांत मनुष्यमात्रास दाखविते. ग्यारीबाल्डीने आपल्या जन्मांत अनेक दुःखें भोगिली, परंतु या पत्नीवियोगदुःखाइतका दुसऱ्या कोणत्याहि दुःखापासून त्यास शोक -- .
दुर्दैवाचा कळस ६७ झाला नाही. परंतु करतो काय. जो ईश्वर पृथ्वीवर दुःखें पाठवितो, तोच ती सोसण्यास लागणारे सामर्थ्य हि मनुष्यास देतो. आधीच वनवास, तशांत प्रिय पत्नीचा मृत्यु व तिजबरोबरच अकाली प्रसूत झालेल्या बालकाचा मृत्यु; पाठीस शत्रु लागलेले, कोणी जिव्हाळ्याचा स्नेही जवळ नाही, अशा संकटांत ग्यारीबाल्डी सांपडला असतांहि त्यांतून निभावून जाण्यास ईश्वराने त्याचे अंगी बुद्धि व धैर्य दिले होते व तेंच या वेळी शोकाहूनहि प्रभावी झालें. आपण आरंभिलेले देशकार्य अद्याप आपल्या हातून पूर्ण व्हावयाचे आहे, अशा प्रकारची हुरहूर व ते आपण पुढे मागें खास पूर्ण करणार अशा प्रकारची उमेद त्याचे मनांत नेहमी वास करीत असल्यामुळे ग्यारीबाल्डी इतक्याहि संकटांतून निभावून जाण्यास समर्थ झाला. मृतपत्नीच्या गळां पडून मन मोकळे करून रडण्यासहि त्याला त्या वेळी अवकाश नव्हता. कारण ऑस्ट्रियन शिपाई शिकारी कुत्र्याप्रमाणे त्याचे पाठीवर होते. यामुळे त्याने आपल्या पत्नीचे प्रेत कसे तरी गडबडीने एकदांचें पुरलें. व पुढे अनुकूल वेळ आल्यास तेथून तिच्या अस्थी काढून नेऊ असा विचार करून तो पुढे चालता झाला. ग्यारीबाल्डी जातांच ऑस्ट्रियन शिपाई लोक त्या गांवीं येऊन ठेपलेच. ग्यारीबाल्डीस तेथें आसरा मिळाला होता असे कळताच त्यांनी लोकांवर जुलूम चालविला. ज्या परोपकारी शेतक-याने ग्यारीबाल्डीस मदत केली होती त्याला आपल्या सद्गुणाचे प्रायश्चित्त प्राण खर्चुन ध्यावे लागले. तो सांपडतांच त्या नीच शिपायांनी त्याला घराचे आढयास टांगून प्रथम फांशी दिले व नंतर खाली ओढून त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले. इकडे ग्यारीबाल्डी हा तेथून निघाला तो साडिनियास जावें या हेतूनें अरण्यांत शिरला. तो सुमारे पस्तीस दिवसपर्यंत वेष पालटून पर्वताच्या दऱ्याखोऱ्यांतून व गुहांतून लपत छपत हिंडत होता. मधून मधून त्यास कोणी एकादा दयाळ व देशा- भिमानी मनुष्य भेटे, तो त्यास खाण्यापिण्यास देई. परंतु कित्येक वेळां दिवसचे दिवस अन्नाविणे त्यास काढावे लागत. ग्यारीबाल्डीची खुद्द स्वतःची अशी स्थिति होती, तथापि त्याचें नांव मात्र सर्व देशभर अगदी कान्याकोपऱ्यांतूनहि दुमदुमत होते. सर्व इटलीभर ऑस्ट्रियाचे शिपाई फिरत होते, व ग्यारीबाल्डीस पकडण्याकरितां बक्षिसेंहि लावली होती. परंतु द्रव्यलोभाने त्यास कोणी पकडून देईल अशी मुळीच भीति ग्यारीवाल्डी . " नव्हती. उलट जेथे जेथे त्याचे नांव कळे तेथे तेथे लोक त्याला सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवून देत. अशा प्रकारे बऱ्या वाईट त-हेनें सुमारे महिना दीड महिना प्रवासांत काढून ग्यारीबाल्डी पोर्टो व्हिनेरी या बंदरी पोंचला. तेव्हां त्याजबरोबर फक्त त्याचा एकच स्नेही होता. तेथून चियाव्हेरी येथें तो गेला. ती सायंकाळची वेळ होती. तथापि त्याला लोकांनी ओळखिलें. तो आला अशी बातमी कळतांच त्याला पाहण्याकरितां लोकांची एकच गर्दी जमली. परंतु तेथील अधिकाऱ्यांस ते पसंत नसल्याने त्यांनी ग्यारीबाल्डीस विनंति करून असे सांगितले की, तुमच्यामुळे लोकांनी अशी गडबड करावी हे चांगले नाही. याकरितां आम्ही पिड्माँट येथे तुम्ही आल्याची हकीकत कळवून पुढे काय व्यवस्था करावयाची याबद्दल हुकूम आणवितों; तोपर्यंत तुम्हांस येथे आमचे नजरेखाली राहिले पाहिजे व नंतर हुकूम येईल त्याप्रमाणे वागले पाहिजे. ग्यारीबाल्डीने हे तक्रार न करतां निमूट- पणे ऐकून घेतले. आपल्यामुळे गडबड व्हावी हे त्यास मुळीच पसंत नव्हतें. पण ग्यारीबाल्डीस तेथे फार दिवस राहावें लागलंच नाही. कारण पिड्- मोटहून लवकरच हुकूम येऊन ग्यारीबाल्डीस सरकारी अधिकाऱ्यांचे संरक्षणा- खालीं जिनोआ येथे जाण्याची सूचना झाली, त्याप्रमाणे तो जिनोआ येथे निघून गेला. तेथेंहि त्याचेभोंवतीं लोकांची अत्यंत गर्दी झाली व सगळे गांव त्याजविषयींच्या विचाराने अगदी हलून गेलें. कोणी त्यास भेटण्यास, तर कोणी त्याचा सन्मान करून आदरबुद्धि व्यक्त करण्यास जात. परंतु मज- करितां गलबला होऊ नये, हल्लीची वेळ वाईट आहे व आपण जरी मला बहुमान देतां तरी त्यापासून या वेळी माझें हित न होतां अनहित होण्याचा संभव आहे, अशा गोष्टी सांगून युक्ति-प्रयुक्तीनें तो लोकांची गर्दी मोडीत असे. जिनोआ येथे काही दिवस घालविल्यावर त्याला नाईस शहरास जाऊन येण्याची परवानगी मिळाली. पुष्कळ दिवसांत त्याची व त्याच्या आईची व मुलांची भेट झाली नव्हती. यांमुळे त्यांना भेटण्याची त्यास फार उत्कंठा लागली होती. म्हणून तो जलदीने नाईस येथे गेला. परंतु तेथे त्यास फार दिवस राहतां आलें नाहीं; लवकरच परत यावे लागले. परत आल्यावर स्याला पिड्मॉटचे राजाने दिलेली हद्दपारीची शिक्षा फर्माविण्यांत आली! ग्यारीबाल्डीने ही शिक्षा निमूटपणे मान्य केली व तो इटली सोडून देशांतराला निघाला. परमुलुखांत निर्वाहाचें कांहीं तरी साधन पाहिजे दुर्देवाचा कळस याकरिता त्याने प्रथम कांही दिवस नोकरी धरली व नंतर निरनिराळया बंदरां- वर अडत्याचे काम तो करूं लागला. हे पाहून कित्येक सद्गृहस्थांनी त्यास लहान मोठ्या रकमा देऊ केल्या व त्या स्वीकारण्याची विनंतीहि केली. परंतु त्याने त्या सर्व नाकारल्या. इकडे व्यापारास तेजी नसल्यामुळे त्याचा अडतेगिरीचा धंदाहि नीटसा चालेना. तेव्हां पुन्हा एकवार अमेरिकेंत जाऊन आपल्या नशिबाची परीक्षा पाहावी असा ग्यारीबाल्डीने निश्चय केला. त्याप्रमाणे तो लवकर उत्तर अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरी गेला व तेथे त्याने मेणबत्त्यांचा कारखाना काढला. शहराच्या कोपऱ्यांतील एका रस्त्यावर एक लहानसें दुकान घालून त्या ठिकाणी मेणाने हात घाण झाले आहेत अशा स्थितीत तो दिवसाचा दिवस घालवीत असे. कर्मधर्मसंयोगाने ज्या वेळी ग्यारीबाल्डी हा तिथे मेणबत्त्यांचे दुकान घालून बसला होता, त्याच वेळी त्याच शहरांत त्याच्याचसारखे निरनिराळ्या देशांतून हद्दपार झालेले मोठ- मोठे लोक हलक्या प्रतीचे धंदे पोटाकरितां करून राहिलेले होते. ग्यारी- बाल्डीच्या दुकानाजवळच जनरल प्रॉवेझाना हा राहात असे. हा पूर्वी स्वदेशी प्रधानमंडळांत असून युद्ध व लष्कर यांसंबंधींचा सर्व कारभार त्याजकडे सोपविलेला होता. परंतु हल्ली हद्दपार झाल्याने पोट भरावयास काही तरी साधन पाहिजे म्हणून तो तंबाकूच्या विड्या करून रस्त्यांतून विकीत असे. जर्मनीच्या पार्लमेंटांतील एक सभासद हद्दपार होऊन अमेरिकेस गेला होता; त्याने आपलें व बायकापोरांचे पोट भरण्याकरितां हजामाचा धंदा पत्करला होता. फ्रान्समधून हद्दपार होऊन आलेला एक पार्लमेंटचा सभासद गल्लोगल्ली जाऊन भाजी विकत असे. लेड्र रॉलिन याने बंदरावर हमालीचा धंदा पत्करला होता. लुई ब्लॉक हा नृत्य शिकवून पोट भरी. फेलिक्स पायट हा एका नाटकगृहांत पडदे ओढण्याचे काम करी व लामारटाइन हा तर निव्वळ भीक मागून आपला चरितार्थ चालवीत असे. तात्पर्य, ज्यास महात्म्यांचा आपत्काल पाहावयाचा असेल त्यास तो येथे मूर्तिमंत एके ठिकाणी पाहावयास सांपडला असता. पोट हे कोणासहि सुटलेलें नाहीं; तरी पण पोट भरण्याकरितां कोणताहि धंदा प्रामाणिकपणे केला असता त्यांत कमीपणा मानण्याचे कारण नाही. वरील उदाहरणांतील धंदे हलके होते, तरी त्यांनी त्या माणसांस कमीपणा आला नाही. उलट स्या महात्म्यांचे समागमामुळे त्या धंद्यासच महत्त्व आले. स्वदेशभक्तीसारख्या ग्यारीबाल्डी थोर सद्गुणांनी किंवा एकाद्या महत्कार्याचे विचारांनी ज्या मनुष्याचे मन भरून गेलेले असते त्याला आत्मविस्मृति इतकी पडते की, आपला स्वतःचा मानापमान, स्वतःचे हितानहित, फार काय पण स्वतःचे पोट याचेंहि भान राहात नाही. कसेहि बिकट प्रसंग आले तरी त्यांतूनहि आपले कर्तव्य त्यांस नेहमी दिसत असते. भाग १० वा वीराचा वानप्रस्थाश्रम तरच्छाया तोयं यदपि तपसांयोग्यमशनं । फलं वा मूलं वा तदपि न पराधीनमिह वः ॥ --उत्तररामचरित् पोटासाठी मेणबत्त्यांचा धंदा आपणांस करावा लागला याबद्दल ग्यारीबाल्डीस कधीहि वाईट वाटले नाही. हात मेणाने घाण झाले आहेत अशा स्थितीत त्यास कोणी भेटावयास आले असतां तसाच तो त्याची भेट घेई व उलट आपल्या घाण हाताचें तो आपण होऊनच कौतुक करी. परंतु हा त्याचा धंदा नीट चालेना. शिवाय शहरांतील हलकट लोकांपासून त्याला उपद्रव होऊ लागला. तेव्हां त्याने न्यू यॉर्क सोडण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे तो दक्षिण अमेरिकेंतील लिमा या शहरी राहण्यास गेला. या शहरांत त्या वेळी बरेच इटालियन लोक राहात होते. ग्यारीबाल्डीच्या पूर्वीच्या पराक्रमामुळे सर्व दक्षिण अमेरिकेमध्ये इटालियन लोकांचा चांगलाच वचक बसला असून त्यांस मान्यताहि आली होती. शिवाय लिमा येथें तर बहुतेक व्यापाराची सूत्रे यांच्याच हाती आली होती. या लोकांस ग्यारीबाल्डी पेणार अशी बातमी कळतांच त्यांनी एक सभा भरवून त्यास स्वागतपूर्वक मानपत्र देण्याचे ठरविलें, व त्याप्रमाणे तो येतांच त्यांनी त्याचा बहुमान केला. लिमा येथें ग्यारीबाल्डीने दोन वर्षे घालविली. परंतु स्वदेशापासून दूर असल्यामुळे त्याच्या मनास असमाधान वाटे. यास्तव संधि सांपडतांच १८५४ साली तो फिरून युरोपास परत गेला.
वीराचा वानप्रस्थाश्रम परंतु त्याची हद्दपारीची शिक्षा अद्यापि संपली नव्हती म्हणून त्यास इटली- मध्ये प्रवेश करता येईना. यामुळे नाईस व मार्सेलिस या बंदरांचे दरम्यान तो दर्यावर्दीपणाचें काम करू लागला. या धंद्यांत ग्यारीबाल्डीजवळ दोन पैसे शिल्लक पडले. त्याचे एक शेत खरेदी करावे असें आतां त्याच्या मनांत आले. आजपर्यतचे दिवस दगदग करण्यांत घालविले तेव्हां आतां निवांतपणे चार दिवस घालवावयाचें मनांत आले तर सत्तेची टीचभर जमीन असावी या हेतूनें कॅप्रेरा नांवाच्या एका लहानशा बेटाचा निम्मा भाग त्याने खरेदी घेतला. कॅप्रेरा हे बेट साडिनिया नामक बेटाजवळ आहे. याची लांबी सारी पांच मैल असून एकंदर विस्तारहि लहानच म्हणजे सुमारे १५ मैल आहे. या बेटावर वस्ती मुळीच नव्हती म्हटले तरी चालेल. ग्यारीबाल्डीचे पूर्वी सुमारे १५० वर्षे, या बेटांत कासिका येथील एक पुंड दरोडेखोर राहात असे. त्याने त्या वेळी निवाऱ्याचे व गुप्त अशा स्थळी बांधलेली झोंपडी ग्यारी- बाल्डीचे वेळीहि तशीच उभी होती. याशिवाय दुसरे तिसरें मनुष्याचें वसतिस्थान मुळीच नव्हते. पोप हा ग्यारीबाल्डीला पुंड, दरोडेखोर असेंच म्हणत असे. तेव्हां दरोडेखोराचें गुहेत दरोडेखोर घर करून राहिला हे योग्यच झालें असें तो थट्टेने म्हणे. परंतु पूर्वीच्या दरोडेखोरास कॅप्रेरा हे बेट ज्या कारणांनी प्रिय झाले होते, त्यांहून भिन्न कारणांकरितां ग्यारीबाल्डीने हेच ठिकाण पसंत केले होते. त्याला लपून छपून राहावयाचे नव्हते. तरी पण एकांतवास हा त्याला फार प्रिय असे व तें एकांतवासाचें सुख या निर्जन अशा बेटापेक्षा इतर ठिकाणी अधिक कसे मिळणार? सृष्टिसौंदर्याचे दृष्टीने पाहिले असतां कॅप्रेरा हे बेट फारच मनोवेधक होतें. लागवडीस जमीनहि तेथें मुबलक होती. शिवाय कारण पडले असतां शत्रूविरुद्ध लढविण्यास हे बेट सोयीचे होते. चोहों बाजूंनी समुद्र व आजूबाजूच्या किनाऱ्यांवर डोंगरांची निसर्गसिद्ध अशी तटबंदी भसल्यामुळे कित्येक दिवसपर्यत शत्रूशी टक्कर देऊन राहण्यासारखी सोय होती. इंग्लिश आरमारावरील प्रसिद्ध सरदार नेल्सन, त्याचप्रमाणे नेपोलियन बोनापार्ट, यांचा डोळा या कॅप्रेरा बेटावर होता असे म्हणतात. परंतु कर्मधर्मसंयोगानें तें फ्रान्स किंवा इंग्लंड यांच्या ताब्यांत जावयाचे राहिले आणि ग्यारीबाल्डी यास ते विकत घेतां आलें. निम्मे बेट ताज्यांत बाल्याबरोबर ग्यारीबाल्डीने तेथे जाऊन वस्ती केली.
ग्यरीबाल्डी त्याला जात्याच साधेपणा आवडत असे. त्यांतून त्या ठिकाणी इतर कोणाचा संपर्क नव्हता. त्यामुळे ग्यारीबाल्डीस आपली साधेभोळेपणाने राहण्याची हौस तेथें पूर्ण करून घेतां आली. प्रथमतः त्याने शेतांतल्या मांगरासारखें एक लहानसें घर बांधिलें. ते एकमजली असून त्यास आंतून बाहेरून सफेती दिलेली होती. घराच्या आसपासचे रान तोडून त्याने काही जागा लागवडीकरितां तयार करण्याचे हेतूनें दूरदूर जाऊन तेथील मऊ माती आणून घातली. कांटेरी कुंपणे घालून त्यांमधून सुवासिक अशा झाडवेलीहि त्याने लाविल्या. चोहोंकडे दगडाचे गडगे रचून बांध घातले. ठिकठिकाणी पाणी सांठविण्याकरितां डबकी केली. त्यांतील पाण्याच्या योगाने निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला, फुलझाडे, द्राक्षाच्या वेली, ऊस वगैरे प्रकारची बागाइत थोडक्याच काळात त्याने उत्पन्न केली. स्वकष्टाने पिकविलेला भाजीपाला व फळफळावळ आपल्या हाताने तोडून व त्यांचे हरत-हेचे पदार्थ आपल्या हातानें बनवून सेवन करण्यांत जी एक अप्रतिम गोडी असते तिची रुचि ग्यारीबाल्डीस पूर्णपणे होती. ग्यारीबाल्डीचे तबेल्यांत बसावयाचे कांहीं कांही चांगले घोडे होते व त्याचप्रमाणे कांहीं खेंचरेंहि होती. या खेंचरास त्याने मोठमोठ्या लोकांची नांवें ठेविली होती. पोप पिओनोनो, नेपोलियन वगैरे ज्या लोकांचा तो तिटकारा करी, अशांची बरीच नांवें त्यांत होती! गोठ्यांत गायी व मेंढयाहि बन्याच होत्या, त्यामुळे दूधदुभत्याची चंगळ व रेलचेल असे. अशा या सुखनिवासांतील गृहकृत्यांचे काम ग्यारीबाल्डीची एक दूरची बहीण व त्याची आवडती मुलगी थेरेसिटा यांजकडे सोपविलेलें असे. ग्यारी, बाल्डीची प्रिय पत्नी अॅनिटा ही जर या वेळी जिवंत असती तर त्याला या जीवितक्रमाचें सुख शतपट अधिक वाटले असते; परंतु त्याच्या व तिच्या दुर्दैवाने ती मृत झाली होती. तथापि तिचे उत्तम स्मारक म्हणून तिच्या कुरळया केसांची एक बट, शिसवी लाकडाच्या एका डबीत घालून ती त्याने आपल्या निजण्याबसण्याच्या खोलीत समोरच लोंबत ठेविली होती. याशिवाय गृहशोभेचें सामान म्हटले म्हणजे, त्याच्या आईची एक तसबीर, इतर दहापांच चित्रे, व एक मौल्यवान् तरवार एवढेच काय ते होते. तसेंच दुसऱ्या एका खोलीत ग्यारीबाल्डीचीं कांहीं आवडती कवितांची व युद्धशास्त्रासंबंधींची पुस्तकें, स्याने मिळविलेलीं जयचिन्हें-निशाणे-वगैरे वस्तु होत्या. क्रमाक्रमाने लोकहि बीराचा वानप्रस्थाश्रम . . त्याला मौल्यवान् वस्तु नजर करूं लागले. यामुळे खुर्ध्या, मेजें, शेतकीची औतें, हत्यारे वगैरे सामानांचा त्याच्यापाशी हळुहळू संग्रह होत चालला. घरी कायमची माणसें म्हटली म्हणजे, ग्यारीबाल्डी, त्याची मुलगी, त्याची बहीण, व चाकर-नोकर इतकीच काय ती होती; परंतु त्याचे दोघे मुलगे इटलीत असत ते त्यास भेटण्यास वरचेवर येत, व आले म्हणजे बरेच दिवस राहात. शिवाय युरोपांतील सर्व राष्ट्रांतील लहान मोठे लोकहि ग्यारीबाल्डीचे 'घरचा साधा पाहुणचार घेऊन जात. खुद्द इटलींतील मुत्सद्दी व कामगार लोक तर नेहमी येत. ग्यारीबाल्डीचे कुटुंब मोठे नियमितपणाने वागे, सूर्योदयाचे पूर्वी उठून सर्व जण आपापल्या कामास लागत. सकाळचा उपाहार झाल्यानंतर कोठे रस्ते, शेत किंवा बाग यांसंबंधी काय काम निघेल ते सर्व मिळून करीत. दोन प्रहरचे जेवण झाल्यानंतर विश्रांतीचे वेळी ग्यारीबाल्डी हा निरनिराळ्या युद्धप्रसंगांच्या गोष्टी सांगे व थेरेसिटा, स्वदेशाभिमानाने पूर्णपणे भरलेली गाणी किंवा पोवाडे म्हणे. अशा रीतीने ग्यारीबाल्डी हा एकांतवासांत होता तरी त्याचे जगावरील किंवा जगाचे त्याजवरील लक्ष मुळीच सुटलेले नव्हते. दर एक टपालाने त्याला दहावीस पत्रं ही यावयाचीच. ही पत्रे कोणी व कशाबद्दल पाठवावी याचा सुमारच नव्हता. कोणी त्याच्या पराक्रमाची स्तुतिपर काव्ये करून त्याजकडे पाठवीत. कोणी त्यास फिरून लढाई सुरू करून पोप व उपाध्याय- वर्ग यांना जाळून पोळून किंवा कापून काढ अशी विनंति करीत. कित्येक स्त्रिया त्यास काही तरी हातचा लेख लिहून मागत; कोणी त्यास त्याच्या पिकलेल्या केसांची एकादी बट पाठवून देण्याबद्दल लिहीत. फार काय, पण कित्येक स्त्रिया त्याजवर आपले प्रेम बसलें आहे अशा अर्थाची पत्रेहि त्यास पाठवीत. एका फ्रेंच वेड्यापिराने तर त्याला एक यंत्र देऊ केले होते. तें यंत्र त्याने स्वतः शोधून काढलेले असून, त्याचे योगाने एका क्षणांत लाख, पन्नास हजार लोक मारतां येतील असे त्याने प्रतिपादन केलें होतें. तात्पर्य, त्यास कोणी काय लिहावे याचा सुमारच नव्हता. तथापि, या सर्व पत्रांस ग्यारीबाल्डी नम्र व सभ्यपणाची उत्तरें स्वतः लिहून पाठवी. जवळच साडिनिया बेट होते. तेथील लोकांमध्ये शिक्षण कमी होतें असें पाहून त्याने लहान मुलांकरितां तेथे काही शाळा काढल्या. ग्यारीबाल्डीच्या सूचनेस मान देऊन युरोपांतील पुष्कळ शहरी या कार्याकरितां एजंट नेमून ग्यारीवाल्डी वर्गणी मिळविण्याचे काम सुरू झाले. अशा रीतीने ग्यारीबाल्डीचे काम बसल्या बसल्या चालू होते. आळस हा त्याला शत्रूप्रमाणे वाटे. तो जो जो म्हणून उद्योग करी, त्या सर्वात परोपकाराचें बीज नव्हतें असें कधीच झालें नाही. या एकांतव.स.तहि हातून अर्धेमुर्भे राहिलेले स्वदेशकार्य त्याच्या डोळ्यांपुढे सदासर्वदा उभे असे. इटलीत काय गडबड चालली असेल याविषयीची माहिती तो मोठ्या उत्सुकतेने मिळवी. या एकांतवासाचे शीतळाईने त्याच्या मनांतील त्वेषाग्नि मुळीच निवाला नसून, कालगतीने व शांत विचाराने तो अधिकच वृद्धिंगत होत होता. १८५४ साली तो काही कामानिमित्त इंग्लंडास गेला. त्या वेळी न्यूकॅसल येथील लोकांनी त्याचे मोठ्या थाटाने स्वागत केले व एक मानपत्र, एक दुर्बीण, एक तरवार, अशी त्यास नजर केली. ग्यारीबाल्डीस इंग्रजी चांगलेसें बोलतां येत नसे, म्हणून त्याने थोड्याच शब्दांनी त्यांचे आभार मानले; व ते मानतांना असें बोलून दाखविले की, “जी तरवार आज मला माझ्या उदार मित्रांकडून बक्षीस मिळाली आहे, ती माझ्या आवडत्या कार्यात म्हणजे स्वदेशस्वातंत्र्य परत मिळण्याचे कामी उपसण्याचा दिवस सुदैवाने कधी येईल हे आजच मला सांगता येत नाही; परंतु इटली हे पुढे मागे स्वतंत्र होणार यात शंका नाही. माझ्या देशाच्या संकटसमयीं या उदार मनाच्या परदेशीयांनी इटलीस जें साहाय्य केले त्याबद्दल त्यांचे आभार इटलीने मानण्याचा दिवस लवकरच खास उजाडेल. वरील शब्द त्या वेळी जितक्या कळकळीचे होते, तितकेच ते पुढे खरे ठरले. ग्यारीबाल्डीची तरवार इटलीकरितां नेहमी सज्ज होती. परंतु ज्यांचे हातीं इटलीतील सर्व सैन्यावरील सत्ता व राज्यकारभाराची सूत्रे होती, त्यांनी लढाईस प्रारंभ केल्याखेरीज या त्याच्या तरवारीचा उपयोग काय? परंतु ही संधि ग्यारीबाल्डीस लवकरच मिळाली. त्याची हकीकत पुढील भागांत येईल.
भाग ११ वा मुत्सद्दीपणाचा विजय - एका केवलमेव साधनविधौ सेनाशतेभ्योधिका । नंदोन्मलनदृष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तुमागान्मम ॥ -मुद्राराक्षस जगांतील व्यवहारांत नेहमीं असा अनुभव येतो की, कोणतेंहि महत्कृत्य साधण्यास दोन प्रकारचे लोक अवश्य असतात. एक कार्यसिद्धीची संधि आणून देणारे; व दुसरे ती संधि आली असतां ती साधून आपल्या कर्तृत्वाने कार्य सिद्धीस नेणारे. वास्तविक इटलीस स्वतंत्रता मिळण्याची जी पूर्वी एक महासंधि किंवा महापर्वणी आली होती ती आणून देण्यास ग्यारी- बाल्डी न विशेषतः मॅझिनी या देशभक्तांचे उदाहरण व उपदेश हीच मूळ कारणीभूत झाली असे म्हटले पाहिजे. परंतु एकंदरीने पाहतां त्यांजकडे केवळ परोक्ष कर्तृत्व येतें. अपरोक्ष किंवा प्रत्यक्ष कर्तृत्वाच्या यशाचे मालक निराळेच होते. ते म्हणजे इटलीमध्ये राज्याधिकारारूढ व जे मुत्सद्दी होते ते होत. ग्यारीबाल्डी किंवा मॅझिनी यांस एकादें साधे बंड करवावयाचे झाले तरी, किती तरी मेहनत पडे; परंतु या सर्व बंडांचा मुख्य हेतु म्हणजे ऑस्ट्रियाशी युद्ध, तें सुरू करणे म्हटले म्हणजे या अधिकारसंपन्न मुत्सद्दयांच्या एक शब्दाचे काम होते. अशा प्रकारच्या मुत्सद्यांमध्ये त्या काळी दोनच प्रमु होते. एक खुद्द पिड्मॉटचा राजा व्हिक्टर-ए-मॅन्युएल व त्याचाच मंत्री कौन्ट कॅन्हूर. ग्यारीबाल्डी व मॅझिनी यांशिवाय इटली स्वतंत्र करण्यास ज्या देश- भक्तांनी मदत केली त्यांपैकी वर सांगितलेले दोघे मुत्सद्दी अग्रगण्य असून ते सत्ताधीश असल्यामुळे त्यांचे हातून देशकार्यास जितकी प्रत्यक्ष व उपयुक्त मदत झाली, तितकी मॅझिनी व ग्यारीबाल्डी यांचे हातूनहि झाली नाही. ग्यारीबाल्डी हा सुमारे दहा वर्षे हद्दपारीत आपले दिवस घालवीत असतां इकडे इटलीचे स्वातंत्र्याचे धोरणावर नजर ठेवून आपल्या राजनीतिचातुर्याने या दोघां मुत्सद्यांनीच ग्यारीबाल्डीस स्वदेशकार्यासाठी पुन्हा तरवार उपसण्याची संधि आणून दिली.
ग्यारीबाल्डी ही संधि कशी मिळाली हे पाहण्यास इ. स. १८४९ पासून पुढे आठ नऊ वर्षांत इटलीची स्थिति कशी पालटत गेली हे पाहिले पाहिजे. इ. स. १८४८-४९ साली इटलीत बंडे होऊन त्यांचा लगेच मोड झाल्यामुळे पुन्हा एकवार ऑस्ट्रियाचा जुलमी अम्मल स्थापित झाला. त्या साली निरनिराळ्या ठिकाणी एकदम बंडे झाल्यामुळे स्वातंत्र्यप्रिय लोकांच्या मनांत भावी स्थिती- विषयीं जी अत्यंत उज्ज्वल आशा प्रदीप्त झाली होती, ती एकदम समूळ मालवली. १८१५ साली व्हिएन्ना येथील तहानें इटलीत ऑस्ट्रियाचें जुलमी साम्राज्य युरोपियन राष्ट्रांचे बहुमतानें स्थापित केले. तेव्हापासून इटालियन देशभक्त वीर व मुत्सद्दी यांनी तीस पस्तीस वर्षे जे जे अविश्रांत श्रम केले ते सर्व फुकट जाऊन पुन्हा एकवार १८१५ सालची भयंकर स्थिति येऊन पोचली. हजारों लहानसहान देशभक्त मारले गेले; ग्यारीबाल्डी व मॅझिनी यांसारख्या लोकनायकांस हद्दपारीची शिक्षा झाली. इटलीच्या स्वातंत्र्याचा मुख्य शत्रु जो पोप त्याचे डळमळणारे पाय युरोपियन राष्ट्रांच्या मदतीने पुन्हा एकवार रोमच्या गादीवर स्थिर झाले; निरनिराळ्या इटालियन संस्थानांच्या राज्यांतील जुलमास लोकसत्तेच्या प्रभावाने आळा पडला होता तोहि निघून गेला; व सर्व इटालियन संस्थानांत लोकप्रिय, शक्तिमान्, न्यायी व सुधारलेली अशी जी पिड्मॉटची गादी तिला हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याप्रमाणे ऑस्ट्रियाविरुद्ध मांडलेल्या युद्धांत पराजय होऊन अपमानाने व लज्जेने मान खाली घालून बसावे लागले. यापेक्षां इटलीच्या कार्यास अधिक अनिष्ट अशी दुसरी गोष्ट कोणती? इटलीची अशी भयंकर स्थिति झाली होती खरी. तथापि विचारी मनुष्यास त्यांतल्या त्यांत समाधान मानतां येण्यासारख्याहि काही गोष्टी दिसून येत होत्या. १८१५ सालची इटलीची स्थिति व १८४९ सालची स्थिति यांमध्ये एक मोठे अंतर होते. ते हे की, पूर्वी इटलीतील लोकसमाज जो आपल्या गुलामगिरीत सुख मानून राहात होता तो आतां मनांतून असंतुष्ट व महत्त्वा- कांक्षी झाला होता. एवढेच नव्हे तर, आपली दुःखें व आपल्या इच्छा उघडपणे बोलून दाखविण्याइतके ते धीट झाले होते. अद्यापपर्यंत सर्व इटली एकत्र होऊन मॅझिनीच्या कल्पनेप्रमाणे त्यावर लोकसत्तात्मक साम्राज्य स्थापावें इतक्या मजलेपर्यंत कोणाच्या मनाची धांव गेली नव्हती हे खरें; -तथापि आपआपल्या संस्थानास आपापल्या पुरतें का होईना, परंतु जुलमी मुत्सद्दीपणाचा विजय राजापासून स्वातंत्र्य मिळावें, व तें मिळण्यास निदान ऑस्ट्रियाशी युद्ध करण्या- पुरती तरी इटलीची एकी व्हावी, असे लोकांस खास वाढू लागले होते. मॅझिनीचें लोकशिक्षण, ग्यारीबाल्डीचे उदाहरण, व १८२१, १८३१ व १८४७ या तीन साली लोकांनी बंडे करून आपली शक्ति प्रकट करून क्षणभर कां होईना, परंतु जे स्वातंत्र्यसुख अनुभविले होते त्यामुळे कायमचे स्वातंत्र्य मिळविण्याविषयी लोकांच्या मनांत उत्पन्न झालेली लालसा, या इतक्या गोष्टी कांहीं खास फुकट गेल्या नव्हत्या. शेकडों वर्षे ज्यांनी आपल्या मानेवर परदास्याची जड धुरा निमूटपणे वाहिली, त्यांनी क्षणभरच का होईना, परंतु एकदां मान हालवून ती फेंकून दिली या गोष्टींत काहीच अर्थ नसेल काय ? १८१५ सालची स्थिति व १८४९ सालची स्थिति यांमधील मुख्य अंतर हेच होतें कीं, जरी इतर गोष्टी कायम होत्या, तरी लोकांची मने देशकार्याचे बाबतींत सुशिक्षित होऊन लोकमत बनले होतें व समाजांत स्वार्थत्यागी पुढारी बरेच उत्पन्न होऊ लागले होते; आपले कर्तव्य काय व आपला मार्ग कोणता हे लोकांस स्वच्छपणे कळून आले होते; व काय होईल तें होवो, पण त्याच मार्गाने जावयाचे अशी लोकांनी शपथ घेतल्यासारखी होती. वास्तविक अशीच स्थिति देशाभिमानी व अधिकारसंपन्न मुत्सद्दयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव सिद्धीस जाण्यास उपयोगी असते; व याच स्थितीचा फायदा घेऊन मागें सांगितलेल्या दोघां श्रेष्ठ मुत्सद्यांनी आपले कर्तृत्व जगास दाखविले. जगाचे इतिहासांत बंड व मुत्सद्दीपणा यांची सर्वत्र पसरलेली अशी सांखळी दृष्टीस पडते. मुत्सद्दीपणाने बंडाची सामग्री सिद्ध करून द्यावी व बंडाने मुत्सद्दीपणास अनुकूल अशी स्थिति पुन्हा आणून द्यावी, या नियमाचे अनुशासनानेच जगांतील राष्ट्रांच्या उत्कर्षाचा इतिहास बनला असल्या- सारखे दिसते. सर्व इटली देशामध्ये पिड्माँटच्या गादीकडेच सर्व तन्हेचा अग्रणीपणा होता. या गादीचा मालक चार्लस आल्बर्ट हा मनांतून इटलीच्या स्वातंत्र्यास अनुकूल होता; तथापि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याचे हातून कांहीं घडून आले नाही. उलट नोव्हेंरा येथील लढाईमध्ये पराभव झाल्यामुळे ऑस्ट्रिया व इटालियन लोक या दोन्ही पक्षांचा तो उघड शत्रु झाला. त्यामुळे अत्यत खेद पावून त्याने आपल्या गादीचा राजीनामा दिला. त्या गादीवर त्याचा पुत्र व्हिक्टर-ए-मॅन्युएल हा १८४९ साली बसला. हा राजपुत्र शूर, मनाचा थोर, ७८ ग्यारीबाल्डी दिलदार व राजनीति-कुशल होता. येथून पुढे इटली संयुक्त स्वतंत्र होईपर्यंत जो इतिहास घडून आला त्यामध्ये त्यानेच अग्रेसरत्वाचा भाग उचलला. राजा या नात्याने त्याचे हातीं सर्व राज्याधिकाराची सूत्रे सहजच आली होती हे खरे; तथापि त्याने दाखविली इतकी जर बुद्धीची व्यापकता, मनाचा थोरपणा आणि स्वदेशप्रीति ही दाखविली नसती, तर इटली देश स्वतंत्र झाला असता की नाही, याबद्दल शंका आहे. परंतु एकट्या व्हिक्टर- ए-मॅन्युएलच्या हातूनहि फारसे झाले नसते. त्याचा मंत्री कौन्ट कॅव्हर हाहि पराकाष्ठेचा देशाभिमानी व मुत्सद्दीपणांत तरबेज होता; व १८४९ नंतर जी कांहीं कारस्थाने झाली ती या दोघांचे विचारानेच झाली. कॅदर याच्या विशिष्ट राजकीय मतामुळे ग्यारीबाल्डी व मॅझिनी हे त्यास हा देशाचा हितकर्ता नव्हे असें मानीत व अखेरपर्यंत या दोन पक्षांचें वैमनस्य कायमच होते. दोघेहि एकाच हेतूने प्रवृत्त झालेले असल्यामुळे व कोणाचेच अंगी स्वार्थसाधूपणा नसल्यामुळे वेळ पडल्यास त्यांनी एकमेकांस मदत केली हे खरे. परंतु त्यांची तत्त्वें स्वभावतःच विरुद्ध असल्यामुळे त्यांचे कधीहि पटले नाही. कौन्ट कॅव्हूर हा सरदारकुळांत जन्मलेला असून पिड्माँट येथील रहिवासी होता. त्याच्या घराण्याचा व नेपोलियनच्या घराण्याचा सोयरिकीने संबंध जुळ- लेला होता. कॅव्हूरचे बालपणचे शिक्षण संपल्यावर त्याने लष्करी विद्यालयांत बरेच दिवस अभ्यास केला. इ. स. १८३० साली फ्रान्समध्ये राज्यक्रांति घडून आली, त्या वेळी तत्संबंधाचे आपले अनुकूल विचार फार उघडपणे बोलून दाखविल्यामुळे त्यास काही दिवस अटकेंतहि ठेवण्यात आले होते. १८३१ साली त्याने लष्करांतील आपल्या जागेचा राजीनामा दिला, व पुढे बरीच वर्षे प्रवास करण्यांत व निरनिराळ्या देशांतील राज्यकारभाराचें सूक्ष्म निरीक्षण करण्यांत त्याने घालविली. शिवाय शेतकीसंबंधाने त्याने बराच अभ्यास करून शेतकऱ्यांची स्थिति कशी सुधारेल याविषयी पुष्कळ विचार केला होता. इ. स. १८४७ सालीं कौन्ट कॅव्हर याने 'रीझॉझिमेंटो' या नांवाचें एक वर्तमानपत्र सुरू केलें. त्यामधून आपले व आपल्या पक्षाचे विचार इटालियन लोकांपुढे तो मांडीत असे. व्हिक्टर-ए-मॅन्युएल व कौन्ट कॅव्हर हे दोघेहि तरुण आणि बऱ्याच अंशी सारख्या विचाराचे होते. यामुळे त्यांच्या अंमलाखाली फारशी बडे झाली मुत्सद्दीपणाचा विजय ७९ नाहीत. राज्याची दिवसेंदिवस जास्त सुधारणाच होत गेली व लोकांस हक्कहि आपोआप अधिकाधिक मिळत गेले. इ. स. १८४९ ते ५९ या दहा वर्षात या मुत्सद्दयांच्या जोडीने बरेच काम केले. प्रथमतः कॅ हुर याने पिड्मॉट येथील पार्लमेंटची सुधारणा केली. सन १८५० साली कॅव्हूर हा प्रधानमंडळामध्ये शिरला व लागलीच त्याने निरनिराळ्या सुधारणा करण्यास प्रारंभ केला. त्याने जमाबंदीची पद्धति नवीन तत्त्वावर मांडून राज्याची सांपत्तिक स्थिति सुधारण्यास योग्य असे कायदे केले. राज्यांतल्या राज्यांत दळणवळण उत्तम रीतीने चालण्यास अवश्य असे रस्ते वगैरे बांधले. व्यापारावरील घातुक बंधनें काढून टाकिली व त्या बाबतींत युरोपांतील प्रमुख राष्ट्रांशी तह केले. शिवाय पोपचा अधिकार व राजाचा अधिकार यांची विलक्षण प्रकारची गुंतागुंत होऊन गेली होती, तीहि त्याने सोडवून आपल्या राजाचे जखडलेले हात मोकळे केले व इटलीच्या स्वतंत्रतेंत मुख्य आडकाठी जी पोपची सत्ता तिला जबरदस्त प्रतिबंध केला. इ. स. १८५२ साली कौन्ट कॅन्हूर हा राजाचा मुख्य प्रधान झाला. इटलीच्या स्वतंत्रतेसंबंधाने त्याचे असे मत होते की, ती स्वतंत्रता लोक व संस्थानिक यांची एकी होईल तरच मिळणारी आहे, पण ही एकी होण्यास बंडे करणे हा कांहीं खरा उपाय' नसून, जोराने कायदेशीर चळवळ करणे, व दाद लावून घेणे हाच होय. इटली स्वतंत्र करण्याचे काम एकटया पिटमाँटकडे आहे हे खरे. तथापि, जगाचे कामांत वाटेल तसा हात घाल- ण्याचा नसता अधिकार बळकावून बसलेल्या युरोपियन राष्ट्रांस आपल्या संस्थानचा स्वतंत्र अधिकार मंजूर झाला पाहिजे, व हे घडून यावयाचें तर पिड्मॉटच्या राजाने आपल्या महत्त्वाकांक्षेस अनुरूप अशी पुढारीपणाची स्थिति प्रथम प्राप्त करून घेतली पाहिजे. यापुढे कॅन्हूर याने केलेल्या सर्व कारस्थानांत आपल्या राज्यास असें महत्त्व आणणे हेच त्याचे मुख्य तत्त्व होऊन बसलें होतें. अशा प्रकारचे महत्त्व मिळण्यास १८५४ साली एक उत्कृष्ट संधि पिड्मॉटला मिळाली; व त्या धूर्त मुत्सद्द्यांच्या जोडीने ती तेव्हांच उचलली. या साली क्रिमियन वॉर नांवाचे युद्ध युरोपांत सुरू झाले होते. काळया समुद्रावर कोणाच्या आरमाराचे वर्चस्व असावें असें भांडण निघून एका बाजूस रशिया व दुसरे बाजूस इंग्लंड, टर्की व फ्रान्स असे तट होऊन राहिले ८० ग्यारीबाल्डी . होते. इंग्लंड, फ्रान्स व टर्की यांस इतर राज्यांकडून जितकी मदत होईल तितकी पाहिजेच होती; परंतु जर्मनी, ऑस्ट्रिया वगैरे राष्ट्र तटस्थ राहिली होती. अशा वेळी मदत करण्याचे कबूल करून आपण मध्येच घुसलों असतां आपणांस वरिष्ठ प्रतीच्या राष्ट्राचे महत्त्व येईल, व परिणामी आपल्या पक्षाचा जय झाल्यास पिड्मॉटचा फायदा होईल, असा धूर्तपणाचा विचार करून कौन्ट कॅव्हर याने पार्लमेंटपुढे तो प्रश्न आणिला. या कामी अदूर- दृष्टि माणसाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा कांहींच फायदा दिसण्यासारखा नव्हता. यामुळे पार्लमेंट कौन्ट कॅव्हरचे मतास अगदी विरुद्ध होते. परंतु व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजानें नेट धरल्यामुळे पार्लमेंटचे कांहीं चाललें नाहीं. अखेर पिड्मॉटचे २५,००० सैन्य इंग्लंड व फ्रान्स यांस मदत करण्यास गेलें. पुढे क्रिमियन युद्ध लवकरच संपलें; व कौन्ट कॅव्हर याने अटकळ केल्या- प्रमाणे रशियाचा पराभव झाला. अर्थातच फ्रान्स व इंग्लंड यांजबरोबर पिटमाँटचेंहि महत्त्व वाढले. कॅन्हूर व व्हिक्टर-ए-मॅन्युएल यांनी हा एक सट्टयाचा व्यापारच केला होता. तो फसता तर पिड्मॉटचे व त्याबरोबर सर्व इटलीचे पाय पूर्वीहून अधिकच परदास्यपंकांत रुतले असते. परंतु तोच साधल्यामुळे सर्वांसच एकदम उच्च स्थिति प्राप्त झाली. कस्टोझा व नोव्हेंरा या लढायांमध्ये पिड्मॉट ऑस्ट्रियाशी लढाई करतांना पराभव पावल्यामुळे जें अपयश आले होते, तें धुऊन निघून पिड्माँटच्या तोंडास एकदम जरासा उजळाहि आला. या सर्वांचा परिणाम असा झाला की, लवकरच पुढे पॅरिस येथे जी एक युरोपियन राष्ट्रांची सभा भरली तिजमध्ये पिड्मॉटला आमंत्रण येऊन त्यास स्वतंत्रपणाच्या नात्याने व युरोपांतील प्रमुख राष्ट्रीय शक्तीपैकी एक शक्ति अशा जोराने आपल्या बाजूचे म्हणणे सभेपुढे मांडण्यास सांपडलें. वास्तविक पिड्माँट हे ऑस्ट्रियाचे मांडलिक संस्थान अशी स्थिति असतां, या सभेत पिड्मॉटला स्वतंत्र सभासद पाठविण्याचा अधिकार युरोपियन राष्ट्रांच्या उघड कबुलीने मिळाला, यांतच इटलीच्या भावी स्वतंत्रतेचे बीज होते. अर्थातच ऑस्ट्रियाने या कामी तक्रार केली. परंतु त्याचे काही चाललें नाही. या सभेस पिड्मॉटचा मुखत्यार म्हणून कौन्ट कॅव्हूर हा स्वतः हजर होता. कार्यक्रमानुरोधाने पिड्माँटच्या वतीने बोलण्याचा जेव्हां प्रसंग बाला, तेव्हां कॅव्हूर याने इटलीची सर्व स्थिति युरोपियन राष्ट्रांपुढे उत्कृष्ट सन्हेने मांडली. इटलीतील निरनिराळ्या संस्थानांमधून प्रजेवर कसकसे .
मुत्सद्दीपणाचा विजय ८१ अनन्वित जुलम होत होते, हरएक सुधारणेस पोप हे विनाकारण कशी आडकाठी घालीत आले, व ऑस्ट्रियाचे शिरजोर व अनधिकारी वर्तनामुळे इटलीच्या पायांत जड शृंखला कशा पडल्या याचेंहि त्याने हृदयद्रावक वर्णन केलें. ऑस्ट्रियाचा मुख्य प्रधान सभेस हजर असतां त्याचे समक्ष कॅव्हर याने असें स्पष्ट बोलून दाखविले की, 'ऑस्ट्रिया हाच काय तो इटलीच्या स्वातंत्र्यास व सुधारणेस मुख्य शत्रु आहे.' हे शब्द ऑस्ट्रियास कोणी कानांमध्ये पिस्तुलाचा बार करावा त्याप्रमाणे कडक वाटले. परंतु तो काय करणार! असो. या सभेमध्ये पिड्माँटच्या स्वतंत्रतेसंबंधाने मुक्रर असें कांहींच ठरले नाही. परंतु त्या प्रसंगानें इटलीची स्थिति सर्व युरोपखंडाच्या नजरेपुढे उत्तम तन्हेने मांडली गेली; व निरनिराळ्या राष्ट्रांचे मनांत पिड्माँटसंबंधाने सहानुभूति उत्पन्न झाली. सभा विसर्जन झाल्यावरहि कौन्ट कॅन्हूर याने निरनिराळया राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या खाजगी भेटी घेतल्या. त्यावरून त्यास असे कळून आले की, इंग्लंडचे मनांत पिड्मॉटविषयी बरीच कळकळ आहे, तरी त्याचे हातून प्रत्यक्ष अशी फारशी मदत होण्याचा संभव नाही; परंतु तेंच फ्रान्सचे नवीन बादशहा लुई नेपोलियन यांजकडे संधान बांधले असतां तशी मदत होण्याचा बराच संभव आहे. तेव्हां कौन्ट कॅव्हूर व व्हिक्टर-ए- मॅन्युएल यांचा ऑस्ट्रियाशी युद्ध करण्याचा विचार ठरून गेला. तें युद्ध ओढवण्यास अनुकूल अशी इतर कारणेहि घडून येऊ लागली. एकंदर धोरण पाहून ऑस्ट्रियानेंहि पिड्मॉटच्या राज्यांतील प्रजेची हत्यारे काढून घेण्या- विषयी व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास आज्ञा केली; परंतु अशा वेळी आपली प्रजा आपण होऊन निःशस्त्र करण्याइतका तो मूर्ख नव्हता; त्याने मी तें करीत नाही असा साफ जबाब पाठविला. इतकें झाल्यावर युद्धाचे तोंड भापोआपच लागले. ६ भाग १२ वा स्वातंत्र्याकरितां दुसरे युद्ध संग्रामाध्वर दीक्षितो नरपतिः.....। राज्यन्योपनिमंत्रणाय रसति स्फीतं यशोदुंदुभिः ॥ -वेणीसंहार राजकारस्थानाची अशी धामधूम इटलींत चालली असतां ग्यारीबाल्डी हा शेतकाम करून व भाजीभाकरी खाऊन कॅप्रेरा बेटामध्ये एकांत. वासांत निवांतपणे दिवस काढीत होता. मुत्सद्यांचे काम मुत्सद्दी करीत असतात, तो काळ वीरांना झोप घेण्याचा असतो; व ग्यारीबाल्डीने राज- कारणाचे बाबतींतील ही झोंप आज जवळजवळ पांच सात वर्षे घेतली होती. परंतु युद्धास सज्ज होऊन सैन्य बाहेर निघालें व लष्कराच्या नौबदीवर टिपरूं पडले, म्हणजे तेथपासून वीरांच्या जागृतीस प्रारंभ होतो व मुत्स- यांना विश्राति मिळते. १८५९ सालच्या एप्रिलच्या २५ व्या तारखेस ऑस्ट्रियाशी युद्ध करण्याकरितां निघालेल्या सैन्याची पाहणी व्हिक्टर-ए- मॅन्युएल राजाने स्वतः केल्यावर त्याच दिवशी लष्कराने कूच केलें. सैन्य गोटांतून बाहेर पडल्याबरोबर कौन्ट कॅन्हूर दीर्घ उच्छ्वास टाकून म्हणाला, ठीक आहे, इतका वेळ आपण थोडाबहुत म्हणण्यासारखा इतिहास तर केला. आतां खुशाल जेवत बसण्यास हरकत नाही." व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजाने युद्ध करण्याचा निश्चय केल्याबरोबर आपल्या प्रजेस व सैन्यास प्रोत्साहनपर असा एक जाहीरनामा काढिला होता. त्याच्या शेवटचे वाक्य असें होतें : “ इटलीच्या स्वतंत्रतेच्या कार्यात शिपाई होऊन लढाईच्या आघाडीस जावें याइतकी वैभवाची गोष्ट मला दुसरी कोणतीच वाटत नाही. इटलीचा जयजयकार असो! " स्वदेशाभिमानी हृदयांत घुसणाऱ्या या शब्दांनीच ग्यारीबाल्डीची आज इतकी वर्षे लावलेली सात्त्विक समाधि मोडली व तोच जयशब्द घेऊन ग्यारीबाल्डी आपल्या अस्तन्या वर सारून व हातांत नंगी तरवार घेऊन कॅप्रेरा बेटावर चाळविलेल्या समंधा- प्रमाणे पुन्हा एकवार उभा राहिला.
स्वातंत्र्याकरितां दुसरे युद्ध ८३ यापूर्वी इतके दिवसांत कौन्ट कॅन्हूर यास ग्यारीबाल्डीची फारशी आठवण झाली नव्हती. परंतु लढाईचा प्रसंग आला असें पाहून त्या शहाण्या मुत्स' ड्याने पहिले बोलावणे ग्यारीबाल्डीस केले. ग्यारीबाल्डीची खरी योग्यता' त्याचे शौर्य, त्याचे युद्धचातुर्य व त्याची लोकप्रियता या सर्व गोष्टी कॅव्हूर हा पूर्णपणे जाणून होता. ग्यारीबाल्डी हा नुसताच शूर सरदार नाही, तर तो सगळ्या लष्कराच्या आघाडीचे निशाण आहे, असे तो म्हणे. एके दिवशी सकाळी डोक्यावर रुंद टोपी, अंगांत लांबलचक असा तांबडा झगा घातलेला, व हातांत एक भली मोठी काठी घेतलेला असा एक धिप्पाड बांध्याचा पुरुष कौन्ट कॅव्हूरच्या दारापाशी आला. आंत जाऊ लागतांच शिपायाने त्यास अटकाव केला. परंतु ग्यारीबाल्डी हा काही केल्या आपले नांव सांगेना घ शिपाईहि त्यास आंत सोडीना. होतां होतां शेवटी खुद्द कौन्ट कॅन्हूरपर्यंत ती बातमी गेली. हा कोणी तरी एकादा विक्षिप्त माणूस कांहीं तरी मागण्याला आला असावा असा तर्क करून त्याने त्यास आंत बोलाविलें व पाहतो तो ग्यारीबाल्डी. या मुलाखतीपासून कॅन्हूर व ग्यारीबाल्डी या दोघांसहि समाधान वाटले. परस्परांचे मनांत परस्परांबद्दल बहुमान तर होताच, परंतु या प्रसंगी त्यांची एकमेकांस फारच जरूरी होती. कॅव्हूर याने आपणास एवढा मान देऊन जवळ केले व स्वदेशाकरितां लढण्याची परवानगी दिली याबद्दल ग्यारीबाल्डीने कॅव्हूरचे आभार मानिले. कॅव्हरनेंहि त्याची प्रशंसा करून स्वयंसेवक, शिलेदार व शिपाई जमवून ऑस्ट्रियाविरुद्ध तुम्ही लढाई करावी अशी राजाची इच्छा आहे असे सांगितले. एका गोष्टींत मात्र उभयतांचा मतभेद होता. ती ही की, ग्यारीबाल्डीचे मनांत लुई नेपोलियनसंबंधाने अत्यंत तिटकारा व बेभरंवसा होता. व लुई नेपोलियनला मदतीला घेऊन तर कॅहूर याने ऑस्ट्रियाशी युद्ध मांडिले होते. परंतु कॅव्हूर हा मुख्य प्रधान असल्यामुळे ग्यारीबाल्डीचे मतास कोण विचारणार? शिवाय' ऑस्ट्रियाशी युद्ध करणे या गोष्टीपुरतें दोघांचेंहि एकमत होतेंच. यामुळे लुई नेपोलियनबद्दल भांडण वाढविण्याचे कारण नव्हते. ग्यारीबाल्डी लढाईला निघणार असें कळतांच जिकडून तिकडून स्वयंसेवक शिपाई व शिलेदार जमू लागले. सर्व इटलीभर या कामाकरितां सभा स्थापन केलेल्या असून त्यांचे गुमास्ते फेरीवाल्यांचे वेषानें गांवोगांव जात; व जे कोणी ग्यारीबाल्डीचे लष्करांत जाण्यास तयार असतील त्यांस कांहीं खुणेचे ग्यारीबाल्डी कागद देत. ते कागद दाखविले असतां सरहद्दीवर त्यांस अटकाव न होतां येतां यावे, अशी व्यवस्था गुप्तपणे करून ठेवलेली होती. हे फेरीवाले गुमास्ते वीस वीस, तीस तीस लोकांच्या टोळ्या तयार झाल्या म्हणजे त्यांस नेमलेल्या ठिकाणी व नेमलेल्या वेळी जमवीत व त्यांचेबरोबर आपला माणूस देऊन ट्यूरिन अगर जिनोव्हा येथे लष्कराच्या मुख्य छावणीस पाठवून देत. येथे आल्यावर मग हवे तेवढे सरकारी लष्करांत सामील करून बाकीचे ग्यारीबाल्डीचे हाताखाली देण्यांत येत. या स्वयंसेवकांसंबंधाने सर्व प्रकारची मुखत्यारी ग्यारीबाल्डीकडे सोपविण्यात आली होती. त्याने स्वयंसेवकांच्या तीन मोठ्या पलटणी तयार केल्या, व आपल्या मुख्य लष्कराचा तळ डोंगरकठडीवर बेला या नांवाचें एक गांव होतें तेथें दिला. प्यारीबाल्डीचे शिलेदारांमध्ये व शिपायांमध्ये अठरापगड जातीचे व बहुतेक सर्व राष्ट्रांतील लोक होते असे म्हणण्यास हरकत नाही. त्या वेळी युरोपखंडांत व अमेरिकेंत ज्याला म्हणून युद्ध करण्याची हौस आली असेल किंवा ज्या ज्या म्हणून तरुणाचे मनांत स्वातंत्र्याचे वारें शिरले असेल त्या सर्वांचे कौतुक करण्यास व कोड पुरविण्यास ग्यारीबाल्डी हे मायपोट सदा तयार होतेच. त्याचे हाताखाली लढणे हा त्या काळी एक प्रकारचा बहुमान गणला जात असे; एवढेच नव्हे तर, गनिमी कावा शिकण्याची एकच शाळा सर्व युरोपांत असून तिचें नांव ग्यारीबाल्डी हे होते. ग्यारीबाल्डीने आपले लष्कर तर उभारलेच. परंतु त्यास राजाकडून जी मदत व्हावयास पाहिजे होती ती झाली नाही. याचे कारण असे की, सरकारी लष्कराचे मुख्य अधिकारी ग्यारीबाल्डीचा व त्याने उभारलेल्या पथकांचा द्वेष करीत. त्याचे कीर्तीमुळे त्यांस एक प्रकारची स्वाभाविक असूया वाटे. लष्करची शिधासामग्री, हत्यारपात्यार व इतर सामानसुमान ग्यारीबाल्डीस वेळचे वेळी पोचत नसे; एवढेच नव्हे तर, मुख्य हुकमत सरकारी सरदारांकडे असल्यामुळे त्यांनी ग्यारीबाल्डीस व त्याचे लोकांस' वरचेवर निरनिराळे हुकूम देऊन इकडून तिकडे व तिकडून इकडे असे हेलपाटे घालावयास लाविले. यामुळे त्या स्वातंत्र्यप्रिय लोकांस अतिशय त्रास व संताप येऊन गेला. शेवटी खुद्द राजाचे कानावर ही गोष्ट ग्यारीबाण्डीमें समक्ष जाऊन घातली; व त्याचे. कडून स्वतंत्रपणें हुकमत चालविण्याची. त्यास परवानगी मिळाली. ती स्वातंत्र्याकरितां दुसरे युद्ध . देतांना व्हिक्टर-ए-मॅन्युएल किंचित् हंसून ग्यारीबाल्डीस म्हणाला, "तुम्ही खुशाल वाटेल तिकडे जा, व वाटेल तसे युद्ध करा. तुम्हांस मी बिलकुल आडकाठी करणार नाही. मात्र मला इतकेंच वाईट वाटत आहे की, तुमच्या- सारख्या सरदाराच्या हाताखाली लढण्यास मला मोकळीक नाही. स्वतंत्रपणे लढण्याची परवानगी मिळाली हे ऐकून स्वयंसेवकांच्या सैन्यास पराकाष्ठेचा आनंद झाला. पुढे पांच तासांचे आंतच ग्यारीबाल्डीने आपले लष्कर घेऊन कूच केलें. गनिमी काव्याचे लढाईस सुरुवात केल्यामुळे पूर्वीच्या नेमस्त हालचाली आतां अर्थातच बंद पडल्या. यापुढे ग्यारीबाल्डीच्या भरारी मारणाऱ्या मनामध्ये जसजशा प्रचंड व धाडसी कल्पना येत गेल्या त्याप्रमाणे त्या सिद्धीस नेण्याकरितां, क्षणोक्षणी निरनिराळ्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या विद्युत्पाताप्रमाणे, आपले सैन्याकडून तो चपळ हालचाली करूं लागला. मे महिन्याचे ९ वे तारखेस ग्यारीबाल्डी व्हेरूआ नांवाचे गांवीं जाऊन पोचला. त्या रात्री ग्यारीबाल्डीने तळ देऊन खुशाल झोंप घेतली. आसपास लष्कराचा तळ उघड्या मैदानांत पडलेला असून त्याचे शिपाई मोठमोठ्या आगट्या पेटवून त्यांचे भोंवतीं चैनीने गप्पा मारीत, डुलक्या घेत, व चिलीम पीत बसले होते. दक्षिण अमेरिकेंत असतांना अरण्यामध्ये जे बहारीचे दिवस त्याने घालविले त्यांची या प्रसंगी त्यास पुन्हा एकवार आठवण झाली. दुसरा दिवस उजाडतांच लढाईच्या उद्योगास तो लागला. शत्रूस फस- विण्याची युक्ति ग्यारीबाल्डीस फार उत्तम साधली होती. लॉबर्डीचे मुलुखा- कडे जातांना वाटत अॅरोना नांवाच्या एका गांवीं त्याने संध्याकाळी तळ दिला. तेथे त्याने इतकें कांहीं सामानसुमान मागविलें व घरादाराची व्यवस्था केली की, तिजवरून त्याचा या ठिकाणी पांच चार महिने तरी तळ पडणार असें कोणासहि वाटले असते. पण मध्यरात्र उलटते न उलटते तोंच सगळे लष्कर त्याने एकदम हालविले. कॅस्टेलेटो या बंदरावर आगाऊ कांहीं होडया गुप्तपणे जमविण्यांत आल्या होत्या; त्या ठिकाणी तो रातोरात जाऊन पोंचला, व त्या होड्यांतून आपले सर्व सैन्य उतरून तो लांबडीत शिरला. दुसरे दिवशी सकाळी त्याने सर्व लॉबर्डीच्या लोकांस एक जाहीरनामा काढून कळविले की, “ज्याला हत्यार धरता येत असेल त्याने ते उचललेंच पाहिजे. नाही तर तो देशद्रोही गणला जाईल. देशाची गुलामगिरी माता ग्यारीबाल्डी संपविलीच पाहिजे! हा जाहीरनामा वाचतांच लोकांस आवेश चढला. आपणावर ऑस्ट्रियन सैन्य येत आहे असे माहीत असूनहि झुंडीच्या झुंडी जमून त्यांनी ग्यारीबाल्डीचे स्वागत केले. व्हॅरिसिया गांवीं घरोघरी ग्यारीबाल्डीचे शिपायांस बोलावून नेऊन लोकांनी मेजवान्या चालविल्या. दुसरे दिवशी ऑस्ट्रियाचे सैन्य येत आहे असें कळतांच लोकांनी गांवा. भोंवती लांकडी तट बांधिले, व लढाईच्या प्रसंगी ग्यारीबाल्डीने उत्पन्न केलेल्या स्फुरणामुळे ते इतक्या शौर्याने लढले की, ऑस्ट्रियन सरदार जनरल अर्बन याच्या तोफखान्याचें कांहीं न चालून त्यास परत हटावें लागलें तेथून पुढे ग्यारीबाल्डी कोमो शहरी जाक्यास निघाला. वाटेत ऑस्ट्रियन सैन्य असेल याची त्यास कल्पनाहि नव्हती. परंतु या सुमारास एका शूर स्त्रीने ऑस्ट्रियन सरदाराची कांहीं पत्रे वाटेंत पकडून ती ग्यारीबाल्डीस आणून दिली; त्यामुळे त्यास सावध राहतां आलें. कोमो या ठिकाणीहि त्याने ऑस्ट्रियन सैन्याचा पुन्हा एकवार पराभव केला. यामुळे कोमो येथील लोक आनंदाने बेडे होऊन जाऊन त्यांनी ग्यारीबाल्डीचा जयजयकार केला. कोमो शहरची तटबंदी करून व्हरिसी येथे परत येत असतां ग्यारी- बाल्डीचे हातून एक मोठी चूक झाली. ती सुधारण्यास त्याचे अंगी प्रसंगा- बधान नसते तर त्यास कदाचित् शत्रूचे स्वाधीनहि व्हावे लागले असतें. फोमोहून परत येतांना ऑस्ट्रियन सैन्य कोठे कोठे आहे याचा पुरा तलास न केल्यामुळे एके दिवशी सकाळी तो मॉटिसॅक्रो या नांवाच्या टेकडीवर येऊन पोंचला; व खाली पाहतो तो ऑस्ट्रियाचें सैन्य शिस्तीनें । लडाईच्या तयारीने उभे राहिले होते. ग्यारीबाल्डी टेकडीवर आला असें कळतांच जनरल अर्बन याने तिला वेढा दिला व त्यास पकडण्याची त्याला इतकी खात्री वाटली की, त्याने ग्यारीबाल्डीस उद्यांचे दिवसांत जिता किंवा मेलेला धरून आणितों अशी मिलन येथें तार पाठविली. त्याप्रमाणे पहिल्या हल्ल्यांत ग्यारीबाल्डीचा मोड होऊन त्यास माघारहि घ्यावी लागली. मात्र त्या प्रसंगी त्याच्या प्रसंगावधानाने त्यास हात दिला. त्याने अशी खुबी केली की, नेपोलियन व व्हिक्टर-ए-मॅन्युएल यांचे नांवची एक तार केली. त्यांत " माझा मोड होऊन माझी पीछेहाट झाली आहे, माकारिता मारमा मदतीला घोडेस्वारांची एक तुकडी पाठवूम था" असे लिहिलें .
स्वातंत्र्याकरितां दुसरे युद्ध - होते. ही तार त्याने अशा बेताने पाठविली की, ती ऑस्ट्रियन सरदाराचे हातीं हटकून पडावी. वास्तविक आपल्या मदतीस येण्यासारखे घोडेस्वार जवळ- पास नव्हते हे त्यास पक्के माहीत होते; परंतु त्याने केवळ शत्रूस फसवण्या- करितांच ही तार लिहिली होती. ग्यारीबाल्डीची ही युक्ति सोळा आणे साधली. जनरल अर्बनचे शिपायांनी तार वाटेत पकडून त्याजकडे नेली. तिज- बरून ग्यारीबाल्डी आहे तेथेंच मुक्काम करून राहणार असें त्यास वाटले. इकडे रात्र पडतांच ग्यारीबाल्डीने भल्या मोठ्या आगट्या जिकडे तिकडे पेटविल्या; व त्यांच्या पुढून शत्रूस कळून येईल अशा रीतीने इकडे तिकडे उगीच फिरण्यास आपल्या लोकांना त्याने हुकूम दिला. इतक्यांत मोठे वादळ सुरू झालें, विजाहि चमकू लागल्या व मेघगर्जनेचा गडगडाट पर्वतांच्या खोल दऱ्याखोऱ्यांतून होऊ लागला. ही संधि साधून ग्यारीवाल्डीने आपले सर्व सैन्य एकत्र केलें, व डोंगराखाली तो उतरला आणि ऑस्ट्रियन सैन्याचे अगदी तळाजवळून गेला तरी त्यांस त्याची दाद मुळीच लागली नाही. या संकटां- तून एकदा पार पडल्यावर मग स्वस्थपणे रात्रभर घाटांतून व दन्यांतून वाट चालून सकाळी इकडे ऑस्ट्रियन सैन्य त्याजवर हल्ला करण्याचे तयारीस लागणार त्या सुमारास, कित्येक कोसांवर कोमो येथें तो सुखरूप जाऊन पॉचलासुद्धा. अशा रीतीने गनिमी कावा अंगीकारून ग्यारीबार्डी हा आश्चर्याने थक्क करून सोडण्यासारख्या हालचाली करीत असतां इकडे फ्रान्स व पिड्मॉट यांचे सैन्यानेहि लढाईचा बराच नेट लाविला होता. या दोन सैन्यांपुढे मऑस्ट्रियाचे सैन्यास पीछेहाट करावी लागली असून खुद्द ऑस्ट्रियाचे मुलुखांतच आता लढाया होऊ लागल्या. तेव्हां ऑस्ट्रियाचा तरुण बादशहा जोसेफ हा स्वतः पुढे सरसावला व आपल्या सैन्याचे आधिपत्य त्याने आपले हाती घेतले; परंतु त्याचा विशेष उपयोग झाला नाही. कारण पुढे लवकरच सोल- फेरिनो या ठिकाणी जूनचे २४ वे तारखेस दोन्ही सैन्यांची गांठ पडून तुमुल युद्ध झाले. त्यांत ऑस्ट्रियाचा पुरा पराभव झाला. या युद्धांत एके बाजूस स्वतः फ्रॅन्सिस जोसेफ व दुसरे बाजूस फ्रान्सचा बादशहा लुई नेपोलियन व पिड्मॉटचा राजा व्हिक्टर-ए-मॅन्युएल असे तीन मोठे राजे हजर होते. मॉस्ट्रियाचे सैन्य १,७०,००० असून फ्रान्स व इटली यांच्या संयुक्त सैन्याची संख्या १,५०,००० वर होती. अशी प्रचंड सैन्ये युद्धास सज्ज झालेली ८८ ग्यारीवाल्ली असल्यामुळे त्या दिवशींचें युद्धहि मोठे निकराचे झाले. दोन्ही बाजूंस फारच माणनाश झाला. सुमारे ४०,००० लोक त्या दिवशी त्या रणभूमीवर मरून पडले असावेत असे म्हणतात. सोलफेरिनोची लढाई इतिहासातील मोठ्या लढायांमध्ये गणलेली आहे. या मोहिमेचे प्रारंभापासूनच ऑस्ट्रियाचे मागें अपयश लागलेले होते व या पराभवामुळे तर ऑस्ट्रियाची पुन्हा काही दिवस डोके वर निर्धू नये अशी दुर्दशा झाली असे म्हणण्यास हरकत नाही. तेव्हां अर्थात् या सर्व तंटयाचें मूळ कारण जी इटलीची स्वतंत्रता ती सिद्ध होणार असें सर्वांस वाटू लागले. हे संयुक्त सैन्य जर ऑस्ट्रियाचे सैन्याचा तसाच पाठलाग करून त्याचा आणखी एक दोन वेळ पराभव करितें तर ते ओघानेच होणारे होते; परंतु या ऐन आणीबाणीचे घटकेस नेपोलियनने आपला पाय मागे घेतला. नेपोलियनचा या युद्धांत शिरण्यांत मुख्य हेतु कोठे तरी युद्धांत जय मिळवून फ्रेंच लोकांवर छाप पाडावी व धाडसाने व एक प्रकारच्या लबाडीने मिळविलेल्या आपल्या बादशाहीचा पाया भक्कम करावा असा होता. तो सोलफेरिनोच्या लढाईने पूर्ण साधला. दुसरें असें की, आज जरी एवढे मोठे नांव मिळाले आहे तरी ते यापुढे असेंच युद्ध चालविलें असतांहि टिकेल असा काय नेम? युद्धामध्ये जयापजय अनिश्चित असणार व आज जरी ऑस्ट्रियाचे मदतीस कोणतेंहि युरोपियन राष्ट्र आलेले नाही तरी ऑस्ट्रि- याची दुर्दशा झालेली पाहून कोणी तरी सकारण किंवा अकारण बंधु त्यास मदत करण्यास उभा राहणार नाही कशावरून? तेव्हां थोड्यांत गोडी मानन, साधलें तितकेंच सई असा त्याने पोक्त विचार केला. शिवाय सर्व इटली स्वतंत्र करणे म्हणजे पोपची सत्ता झुगारून देण्यासारखें होय व पोपच्या अनुकूलतेचे जे साहाय्य आज आहे तें गमवावे लागेल, याकरिता त्या भानगडीत न पडतां येथूनच माघार घ्यावी असे त्याने ठरविलें. त्याप्रमाणे व्हिक्टर-ए-मॅन्युएल याचे अनुमोदनाची वाट न पाहतां आपल्या जबाबदारीवरच त्याने ऑस्ट्रियाचे बादशहाशी तहाचे बोलणे लाविलें. उभयतां बादशाहांची मुलाखत · होऊन व्हिलापरेका या ठिकाणी करार- माम्यावर सहया पडल्या. या तहांत असें ठरले की, लॉबर्डी प्रांत व्हिक्टर- ए-मॅन्युएलचे राज्यास जोडावा, तेथून ऑस्ट्रियाने आपले सर्व सैन्य काढून ज्यावें, मॉडिना, पार्मा, वगैरे लहान लहान संस्थानांचे राजे, या युद्धामुळे .
स्वातंत्र्याकरिता दुसरे युद्ध ८९ भिऊन पळून गेले होते त्यांस परत आणून त्यांचे गादीवर स्थापावें; त्यांकडून अवश्य त्या राजकीय सुधारणा अंमलात आणण्याचा करार करून घ्यावा; व या सर्व कामगिरीबद्दल सॅव्हॉय व नाईस हे दोन प्रांत पिड्मॉटचे राज्यांत होते ते फ्रान्सला जोडण्यात यावे. नेपोलियन हा जबरदस्त असल्यामुळे व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास हा तह निमूटपणे मान्य करावा लागला. परंतु त्याचा प्रधान कौन्ट कॅन्हूर त्याच- प्रमाणे ग्यारीबाल्डी, मॅझिनी व इतर सर्व राष्ट्रभक्त यांना तो मुळीच आवडला नाही. तसेंच टस्कनी, पार्मा, मॉडिना, रोमना वगैरे संस्थानांतील लोकांनाहि तो नापसंत होता. व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास तरी तो आवडला होता असें नाहीं; कारण एक तर त्याच्या घराण्याचे मूळ स्थान 0 सॅव्हॉय तें आज कायमचे फ्रान्सचे ताब्यात जाणार होते. व दुसरे असे की, सर्व इटली स्वतंत्र करण्याच्या हेतूने त्याने तरवार उपसलेली असून तिला आतांपर्यंत बरेंच यश आले होते व पुढील मार्गहि खुला होता. असे असता केवळ परेच्छेने तिला प्रतिबंध होऊन परत म्यानांत जावे लागत होते. या सर्व गोष्टी खऱ्या परंतु कोणाचाच कांहीं इलाज चालण्यासारखा नव्हता. यामुळे त्याला गप्प बसावे लागले. कौन्ट कॅव्हर याने या सर्व लढाईचा घाट घडवून आणलेला असल्यामुळे त्याला हा अर्धवट स्थितीत झालेला तह पाहून आपले सर्व कारस्थान फुकट गेलें असें वाटून तो चवताळून गेला. ग्यारीबाल्डी तर हा तह ऐकून क्रोधाने बेफाम होऊन गेला. कारण त्याची आवडती जन्मभूमि जे नाईस शहर तें जन्मापासून शत्रुवत् मानलेल्या परान्सच्या ताब्यांत जावयाचे होते. परंतु व्हिक्टर-ए-मॅन्युएलने तह कबूल केल्यामुळे ग्यारीबाल्डीचे काही चालेना. लढाई संपतांच अर्थातच ग्यारीबाल्डीच्या स्वयंसेवक सैन्याचे फारसे कारण उरले नाही. सरकारी लष्कराचे प्रमुख सरदारांस ग्यारीबाल्डी व त्याचे सैन्य यांजबद्दल एक प्रकारचा हेवा व तिरस्कार वाटत असे, असें मागें सांगण्यांत आलंच आहे. व त्याचे लोकांनी अमुकच त-हेनें वागावें, अमुक करूं नये, अमुक प्रकारची कवाईत करावी, वगैरे हुकूम रोज सुटूं लागले. वास्तविक पाहतां सर्व युद्धांत या स्वातंत्र्यप्रिय सरदाराचे स्वतंत्र सैन्याने आपल्या गनिमी काव्याचे जोरावर जसे पराक्रम केले होते, तसे आपल्या शिस्तीची व नियमबद्ध कवाइतीची ऐट मारणाऱ्या सरकारी सैन्याचे हातूनहि झाले नव्हते. .
ग्यारीवाल्डी असे असतां कारण संपल्याबरोबर त्यांच्यामागे काही तरी दुटे लावून त्यांना नाउमेद व हताश करणे म्हणजे एक प्रकारचा कृतघ्नपणाच होता. ग्यारी- बाल्डीने केलेल्या कामगिरीची किंमत व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास माहीत मव्हती असें नाही. कारण त्याने या कामगिरीबद्दल त्यास आपल्या हातची शिकारीची एक बंदूक नजर केलेली असून, लष्करांतील मानाची एक जागा व कांहीं वार्षिक उत्पन्न असें त्यास करून दिले होते. परंतु स्वयं- सेवकांचे वागणुकीसंबंधाने लष्करी अंमलदारांचे म्हणणे त्यास ऐकणे भाग पडे. सोलफेरिनोची लढाई व व्हिला फ्रँकाचा तह यांचे दरम्यान ग्यारी- बाल्डीने आणखी बरेच पराक्रम केले होते; व तोच क्रम पुढे चालवून म्हॅनेशिया व मध्य इटलींतील काही संस्थाने काबीज करण्याचा त्याचा विचार होता. परंतु मध्यंतरी तह झाल्याने त्याची नाउमेद झाली. या सहामुळे उत्पन्न झालेल्या उद्विग्नतेने व स्वतंत्रपणाने आपल्या जबाबदारीवर यापुढे वागतां यावे अशा हेतूने त्याने आपल्या सरकारी लष्करी जागेचा एकदम राजीनामा पाठवून दिला. परंतु व्हिक्टर-ए-मॅन्युएल हा तो राजीनामा स्वीकारीना. त्याने त्यास लिहिले की, " इटलीस आपली व आपल्या पलटणींची अद्याप गरज आहे; याकरितां आपणांस राहिलेच पाहिजे. " ग्यारीबाल्डीचे मनांत व्हिक्टर-ए-मॅन्युएलविषयी पूर्वीपासून बराच आदर असे, व नुकत्याच झालेल्या युद्धांत स्वतः समरांगणामध्ये हजर राहून त्याने जे शौर्य प्रकट केले त्यामुळे तो आदर दुणावला होता. यास्तव त्याची अवज्ञा करून भापलेंच म्हणणे शेवटास नेण्याचे त्याचे हातून होईना. याकरितां आणखी काही दिवस त्याने आपल्या जागेवर राहण्याचे कबूल केलें. भाग १३ वा राजकारणाचे नवीन धोरण तटस्थः स्वानर्थान् घटयति च मौनं च भजते । मालतीमाधव यापुढे लवकरच राजकारणास पुन्हा नवीन धोरण येऊ लागले. व्हिक्टर- ए-मॅन्युएल याचा राजकीय बाबतींतील उदारपणा स्वदेशाभिमान राजकारणाचें नवीन धोरण . पाहून इटलीतील निरनिराळ्या संस्थांच्या लोकांची मने त्याच्या जुलमी व स्वदेशाभिमानशून्य राजांवरून उडून व्हिक्टर-ए-मॅन्युएल याजकडे वेधूं लागली. विशेषतः ग्यारीबाल्डी याने नुकतेच पराक्रम करून आपल्या कांहीं बांधवांना स्वतंत्रता मिळवून दिली होती, यामुळे तो आपल्या मदतीला येईल तर आपणांसहि स्वतंत्रता मिळवून देईल अशी त्यांची खात्री झाली होती. व्हिला- परका येथील तह होऊन शांततेचा अंमल बसतो न बसतो, इतक्यांत इटलीतील कित्येक शहरांनी बंडे करून व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे राज्यास सामील होण्याची इच्छा उघडपणे दर्शविली. याच सुमारास मॅझिनीने. सिसिलीमध्ये लोक पाठवून आपल्या मतांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. जिकडे तिकडे गुप्तपणे सभा भरूं लागल्या, व जो तो चोरून मारून हत्यारें जमविण्याच्या मार्गास लागला. इकडे ग्यारीबाल्डीचे मित्रांनी ऑस्ट्रियाशी झालेल्या लढाईचे वेळी सरकारी लष्करांत जागा पत्करल्या होत्या, त्यांचे भराभर राजीनामे देऊन टाकले व ते आपल्या हाताखाली स्वतंत्रपणे युद्ध करण्यास तयार झाले, हे पाहून ग्यारीबाल्डीने निरनिराळे जाहीरनामे प्रसिद्ध करून लोकांत चळवळ सुरू केली, व फिरून एक वेळ आपल्याच जबाब- वारीवर लढाई सुरू करण्याचा आपला इरादा त्याने जाहीर केला. अशा रीतीने चोहोंकडे स्वदेशाभिमानाचा एकच संचार झाल्यामुळे व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजालाहि ओघाबरोबर जाणे भाग पडले. कौन्ट कॅव्हूर रागावून सहा महिने घरी बसला होता त्यास त्याने परत बोलाविलें; कारण नवीन राजकारणाचे धोरण सांभाळण्यास दुसरा कोणीच समर्थ नव्हता. कौन्ट कॅव्हर यानेंहि प्रसंग पाहून प्रधानकीचे काम फिरून हाती घेतलें. इटलीतील निरनिराळ्या शहरांनी बंडे करून व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे राज्यास सामील होण्याची इच्छा प्रकट केली होती हे वर सांगितलेच आहे. अशा शहरांपैकी सिसिलीच्या राजधानीचे शहर नेपल्स हे प्रमुख होतें; व ग्यारीबाल्डीनेहि सिसिलीवर स्वारी करून नेपल्स येथील लोकांच्या मदतीने तें संस्थान काबीज करून व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे राज्यास जोडण्याचा बेत केला होता. या वेळी कॅव्हर याची स्थिति मोठी चमत्कारिक झाली होती. इकडे ग्यारीबाल्डीस उघड मदत करावयाची म्हटली तर सिसिलीवरच्या स्वारीत फारसे यश येण्याचा संभव दिसत नव्हता. कारण ग्यारीबाल्डीजवळ फक्त एक हजार शिलेदार काय ते होते. एवढयाने सिसिलीच्या सैन्याशी टक्कर ग्यारीबाल्डी कशी देववणार? शिवाय नेपल्सचे राज्यास युरोपांतील फ्रान्स व ऑस्ट्रिया या राष्ट्रांकडून मदत होण्याचा संभव होता. परंतु दुसरे पक्षी पाहता, ग्यारीबाल्डीस व त्याच्या बिथरलेल्या शिलेदारांस प्रतिबंध करणें हेंहि काम तितकेंच बिकट होतें. ग्यारीबाल्डी हा लोकांस या वेळी इतका प्रिय झालेला होता की, त्यांजवर सक्ती करून प्रतिबंध करण्याकरितां हात उचलला असतां कदाचित् लोक बंड करून व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजासच पदच्युत करतील हे त्यास पूर्णपणे माहीत होते. अशा वेळी बेफाम झालेल्या घोड्यास होता होईतों स्वेच्छेने धावू द्यावें व अगदी प्राणावरच बेतेल तेव्हां निरुपाय म्हणून त्याजवर हात टाकावा, अशा त-हेचे धोरण पत्करण्याशिवाय कॅव्हूर यास गत्यंतर नव्हतें. ज्या वेळी ग्यारीबाल्डीची फौज स्वारीवर निघाली त्या वेळी कॅव्हर याने सरकारतर्फे अॅड्मिरल परसॅनो या नांवाचा आरमारावरील अधिकारी त्याचे मागोमाग पाठविला. त्यास दोन प्रकारचे हुकूम देण्यात आले होते. दिखाऊ हुकमाप्रमाणे पाहतां त्यास अशी आज्ञा होती की, ग्यारीबाल्डी हाती लागतांच यास एकदम कैद करून परत आणावें व अशा रीतीने सिसिलीवरील स्वारीस प्रतिबंध करावा. परंतु गुप्त हुकूम असा होता की, परसॅनो याने ग्यारीबाल्डी काय काय करतो यावर फक्त सूक्ष्म नजर ठेवून अगदी आयत्या वेळी शक्य असेल ती त्यास मदतहि करावी. तात्पर्य, ग्यारीबाल्डीचा विजय किंवा पराभव यांपैकी कोणतीहि गोष्ट होवो, तिचा फायदा स्वराज्यास करून घ्यावयाचा असा त्याने घाट घातला. इकडे अशी बेमालूम व्यवस्था केल्यानंतर पर- राष्ट्रांची तोंडे कशी बंद करावयाची या विचारास तो लागला. कारण ग्यारीबाल्डीचे स्वारीच्या योगाने व्हिलाफ्रका येथील तहाचे विरुद्ध सर्व युरोपच्या शांततेचा भंग होत आहे अशी सर्व राष्ट्रांनी कुरकूर करण्यास सुरुवात केली होती; व त्यांपैकी एकाद्याने जर का कंबर' बांधली तर त्याचे योगानें ग्यारीबाल्डीची स्वारी फसेल, एवढेच नव्हे तर, इटलीची स्वतंत्रता हे जें मुख्य कार्य त्यासहि धोका येईल अशी भीति बाळगण्यास कारण होतें. या बिकट प्रसंगी कॅव्हूर यास इंग्लंडचे मात्र थोडेसें पाठबळ मिळाले. याचे कारण असें होते की, यापूर्वी काही वर्षे ग्लॅडस्टनसाहेब फिरत फिरत हे नेपल्स येथे गेले होते; तेथील जुलमी राजसत्तेचें भयंकर स्वरूप त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते; व इंग्लंडास परत गेल्यावर त्यांनी या भयंकर राजकारणाचें नवीन धोरण स्थितीचे जें वर्णन केले त्यामुळे सर्व राष्ट्राची मनें नेपल्सच्या राजाविरुद्ध अत्यंत क्षुब्ध होऊन गेलेली होती. अर्थात् त्याविरुद्ध जो कोणी शस्त्र घरील त्याजबद्दल इंग्लिश लोकांचे मनांत सहानुभूति उत्पन्न होणे हे स्वाभाविकच होतें. इंग्लंडने या वेळी नेट धरल्यामुळे लुई नेपोलियन याने सिसिलीवरील स्वारीस प्रतिबंध करण्याचे मनांत आणले होतें तें सोडून दिले. ऑस्ट्रियाचे राजाचा नुकताच पराभव झाला असल्यामुळे त्यास या प्रसंगी मूग गिळून स्वस्थ बसावे लागले होते व बाकीच्या युरोपियन राष्ट्रांना सिसिली गेली किंवा राहिली तरी त्याबद्दल बरे-वाईट वाटण्याचे कारणच नव्हते. इकडे ग्यारीबाल्डीने आपले लोक जमविले व गुप्तपणे हत्यारे जमविण्याचेहि काम चालू ठेवले. यांपैकी काही हत्यारे सरकारी हुकुमावरून जप्त करण्यांत आली; तथापि मागें सांगितल्याप्रमाणे कॅव्हरनें सिसिलीवरील स्वारीचे बाबतींत 'नरो वा कुंजरो वा' असे म्हणण्याचा प्रथमपासूनच घाट घातला असल्यामुळे ग्यारीबाल्डीचे मार्गात म्हणण्यासारखें विघ्न आले नाही. ता. ५ मे १८६० चे सुमारास ग्यारीबाल्डीबरोबर निघण्यास सुमारे एक हजार लोक सज्ज झाले. यांपैकी सुमारे चारशें सवाचारशे लोक घरचे खाऊन पिऊन सुखी, इभ्रतदार व सुशिक्षित असे होते. शिपाईगिरी हा त्यांचा धंदा नव्हता तथापि त्या वेळी लोकांत असाच काही आवेश संचारला होता की, ज्याने जन्मांत कधीं शिपाईगिरी केली नव्हती त्यासहि लढाईवर जाऊन झाले तर कांहीं देशकार्य करावे असें स्फुरण चढलें होतें. ग्यारीबाल्डीचे हे हजार लोक इतिहासामध्ये प्रसिद्ध होऊन राहिले आहेत. त्यांनी कामगिरीहि तशीच केली. फक्त एक हजार लोकांनी सिसिलीवर स्वारी करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा होय असे कोणीहि म्हटले असते; परंतु जेव्हां मरणाची भीति मनां. तून नाहीशी होते व स्वदेशाभिमानाची पवित्र ज्योति अंतःकरणांत प्रदीप्त होते तेव्हां निव्वळ संख्येवरून कर्तृत्वाची कल्पना करीत बसणे हे चुकीचे ठरतें. ता. ४ मे रोजी जिनोआचे आसपासचे किनाऱ्यावर हे हजार शूर शिपाई पसरले होते. आपले तुटपुंजें सामान बरोबर घेऊन किना-यावरील खडकावरच एकेक दिवस आगाऊ त्यांनी तळ दिला. ग्यारीबाल्डीने जिनोआचे बंदरांतील टिमोंटी आणि लांब? या नांवाच्या दोन आगबोटी वेठीस धरल्या व त्यांवर लोक व सामान चढवून जलदीने निघण्याचा हुकूम केला. या वेळी लोकांत इतका आवेश चढला होता की, ग्यारीबाल्डी या हजार शिपायांना पोहोचविण्याकरितां जे कित्येक लोक किनाऱ्यावर आले होते ते आयते वेळी आम्हीसुद्धा तुम्हांबरोबर येतों; आम्हांस लढाईवर घेऊन चला, असा हट्ट धरून बसले. त्यांची समजूत काढतां काढतां ग्यारी- बाल्डीस पुरें पुरे झाले. या शूर शिपायांच्या आया-बहिणी, बायका त्यांना निरोप देण्याकरितां आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रु वाहत होते. ग्यारीबाल्डीला बंदरांतून पाय काढण्याची फार उत्सुकता झाली होती म्हणून निरुपायास्तव बोटी हाकारण्याचा शेवटी त्याने हुकूम दिला. तेव्हां जवळच्या गांवाहून स्वारीस जाण्यास निघालेले परंतु अद्याप बंदरावर येऊन न पोहोचलेले असे चाळीस लोक मागे राहिले. त्यांजबरोबरच त्याची हत्यारे व दारूगोळाहि मागे राहिला. आगबोटी समुद्रांत बन्याच दूर गेल्यानंतर ग्यारीबाल्डीने या छोटेखानी लष्कराची शिस्त लाविली व त्यास उद्देशून एक सणसणीत व आवेशयुक्त असें भाषणहि केलें. तारीख ११ मे रोजी हे सैन्य मार्साला येथे येऊन पोहोचलें. परंतु त्याचे मागोमाग नेपल्सचे राजाची गलबतें येत होती. हे वर्तमान कळतांच ग्यारीबाल्डीने गडबडीने तास दोन तासांत आपलें सैन्य व सामान- सुमान किनान्यावर उतरविलें, व त्या आगबोटींस आग लावून देऊन आपले लोक घेऊन तो मार्साला शहरांत शिरला. ग्यारीबाल्डी अकस्मात् आला असे पाहून मार्साला येथील लोकांस अत्यंत आश्चर्य वाटले. परंतु त्यांनी त्यास जाऊन मिळण्याची कांहींच चिन्हें दाखविली नाहीत. तेव्हां तेथून निघून तो सालेमी या गांवीं गेला. वाटेने ठिकठिकाणी त्याचा पुष्कळच गौरव झाला. बायका-मुलें, धर्मगुरु यांनीसुद्धा त्याचा जयजयकार केला. सालेमी येथे ग्यारीबाल्डी याने जाहीरनामा काढून, सिसिलींतील राष्ट्रपक्षीय सैन्याचा मुख्य सरदार व दिवाणी, मुलकी, लष्करी या सर्व अधिकारांचा मुख्य अधिकारी असा किताब आपणांस घेऊन व्हिक्टर-ए- मॅन्युएल राजाचे नांवाने द्वाही फिरविली. परंतु मुख्य लढाईचे काम ते पुढेच होते. तो प्रसंग ग्यारीबाल्डीच्या इच्छेप्रमाणे लवकरच घडून आला. कॅल्टफिमी या नांवाचे घांटाचे पायथ्याशी नेपल्सचे राजाच्या सैन्याची व ग्यारीबाल्डीची प्रथम चकमक झडली. या चकमकीत ग्यारीबाल्डीचा मुलगा मेनॉट्टी हा जखमी झाला. प्रथम काही बेळ ग्यारीबाल्डीचे निशाणाचा पाडाव होतो की काय, अशीहि भीति राजकारणाचे नवीन धोरण . वाटत होती. परंतु गनिमी काव्याची ही लढाई असल्यामुळे शेवटी ग्यारीबाल्डीसच यश आलें. पराभव पावलेल्या सैन्याने पालेर्मो या बळकट शहराचा आश्रय धरला. त्याचे पाठोपाठ ग्यारीबाल्डी हाहि आपले सैन्य घेऊन गेला. पालेर्मो शहराच्या रस्त्यांमधून सुमारे चार तास लढाई केल्यावर त्याने शहरचे रक्षण करणान्या बारा हजार नेपॉलिटन लोकांस मागे हटविलें. अद्यापि पालेर्मो येथील किल्ला व राजवाडा हे मात्र ग्यारीबाल्डीचे हाती लागले नव्हते. या किल्ल्यावरून व बंदरांतील जहाजांवरून ग्यारीबाल्डीचे लोकांवर शāनी गोळ्यांचा मारा चालू ठेविला होता. त्याचे योगाने शहरांतील कित्येक इमारती पडून बरेंच नुकसान झाले; तथापि ग्यारीबाल्डीचे सैन्यास मिळालेल्या विजयाबद्दल जिकडे तिकडे मोठा उत्सव चालू होता. आजूबाजूच्या डोंगरांतील शेतकरी कुणबी भराभर पालेर्मो शहरांत जमू लागले व जिकडे तिकडे ढोल, नौबती व तुताऱ्या यांच्या ध्वनींची एकच गर्दी उठली. ग्यारीबाल्डीचा आवडता पेहराव तांबडा झगा हा असल्यामुळे शहरच्या सर्व लोकांनी जिकडे तिकडे तांबड्या झग्याचाच पोषाख केला. गांवच्या सर्व दुकानांतील तांबड्या कापडाचे तागे संपून गेले, व कपडा शिवावयास शिंपी मिळावयाची मारामार पडू लागली. आपल्या गोळीबाराचा काही उपयोग झाला नाही असे पाहून , नेपॉलिटन सैन्याचा सरदार जनरल लँझा याने ग्यारीबाल्डीस मोठ्या गौरवाने पत्र लिहून भेट देण्याची विनंति केली. या भेटीमध्ये प्रथम तात्पुरता तह ठरला. नंतर लवकरच नेपल्स येथून हुकूम आल्यावर एकदोन ठिकाणांखेरीज करून बाकी सर्व सिसिली बेटांतून सैन्याने निघून जाण्याचे कबूल केलें. इकडे ग्यारीबाल्डीचे सांगण्यावरून पालेर्मो येथील लोकांनी शहरची डाग- डुजी व तटबंदी केली. या वेळी शहरवासी लोकांना इतका आनंद व उत्साह आलेला होता की, शहरचे तटबंदीचे कामीं व किल्ला पाडण्याचे कामी गोळा झालेल्या सर्व लोकांस एकदम कामावर लावतां देखील येईना. ग्यारीबाल्डीस विजय मिळतांच कॅव्हर याने अॅड्मिरल फेरिना यास पालेर्मो येथे पाठविले. तेथे जाऊन तें शहर व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे राज्यास सामील करण्याचे बाबतींत लोकांकडून उचल करता येईल तर पाहावे असा स्यास हुकूम होता. परंतु इतक्यांतच ही गोष्ट करण्यास ग्यारीबाल्डी कबूल ग्यारीबाल्डी नव्हता. त्याने फॅरिना यास पालेर्मो येथून हुसकून लावले व पूर्ववत् सर्व अधिकार आपले हाती घेतले. ग्यारीबाल्डी हा या वेळी सर्व सिसिलीचा गव्हर्नर झाला होता. तथापि तो इतक्या साधेपणाने राहात असे की, लष्करचा एकादा शिपाईहि अशा त-हेनें राहात नसेल. देवळांत प्रार्थनेस, गेला असतां त्याच्याकरितां लोकांनी मुद्दाम तयार केलेल्या आसनावर न बसतां लोकांचे गर्दीत मिसळून नुसत्या फरशीवर गुडघे टेकून त्याने ईश्वराची प्रार्थना करावी. त्याने अंगांत नेहमीप्रमाणे एक लांबलचक झगा व डोक्यास कसली तरी एक टोपी घालावी, हे सर्व पाहून तर पालेर्मो येथील लोकांस अतिशय कौतुक वाटे व त्याजबद्दल अत्यंत प्रेम उत्पन्न होई. भाग १४ वा नेपल्सवरील स्वारी साहसे श्रीः प्रतिवसति ॥ -~-मृच्छकटिक तारीख १७ जुलै रोजी ग्यारीबाल्डीस अशी खबर लागली की, नेपॉलिटन सैन्याचा मिलॅझो या गांवीं बराच मोठा जमाव होत आहे. तेव्हां अर्थातच ग्यारीबाल्डीने स्वारीची तयारी केली. मिलॅझो येथें जमणाऱ्या सैन्याचे आधिपत्य नेपॉलिटन सरदार जनरल बॉस्को याजकडे होते. हा सरदार स्वतः शूर असून त्याचे सैन्यहि कवाईत शिकलेले होते व त्यांनी पांगल्या मजबूत ठिकाणचा आश्रय केलेला होता. दुसरे पक्षी ग्यारीबाल्डीचें सैन्य पाहावें, तर, त्यांत युरोपांतील अठरापगड जाती भरलेल्या व लष्करांत नवशिक्या तरुण शिपायांची गर्दी विशेष. अशा या दोन विषम स्थितींतील सैन्यांची मिलॅझो या ठिकाणी लढाई व्हावयाची होती. परंतु ग्यारीबाल्डीची त्या वेळी सद्दीच अशी काही विलक्षण होती की, तो जें जें करील त्यांत त्याला यशच येत गेलें. लढाईचे तोंड लागण्यापूर्वी ग्यारीबाल्डीने बरोबर ५० लोक घेतले. प्रथम, स्याने बॉस्कोचे लष्कराचे उजवे बाजूने हल्ला केला व शत्रूच्या एका तुकडीची .
नेपल्सवरील स्वारी दाणादाण केली. परंतु चुकून याचा असा परिणाम झाला की, तो स्वतः मागे असलेल्या शत्रूच्या तोफेच्या माऱ्यांत आपोआप आला. दुर्दैवाने ही तोफहि फार अंतरावर नव्हती. थोड्याच वेळांत ग्यारीबाल्डीचा घोडा जखमी झाला, व त्याचे पायाखालची रिकीब तुटून पडली. त्याबरोबर घोडा बेफाम होऊन आवरेनासा झाला. या गडबडीत त्याचे पिस्तुल खोगि- रांत राहून गेल्यामुळे हातांत तरवारीशिवाय दुसरें शस्त्रहि राहिले नाही. इतक्यांत शत्रूचे चार शिपाई त्याचे अंगावर धावून आले, व त्यानी त्यास घेरून व हत्यारें उगारून शरण ये व हत्यार' खाली ठेव असें दरडावून सांगितले. परंतु ग्यारीवाल्डी मुळीच न डगमगतां उलट त्यांनाच दरडावून म्हणाला, खबरदार, मी ग्यारीबाल्डी आहे. तुम्हीच मला शरण आले पाहिजे." आतां एका क्षणांत त्या चौघांच्या तरवारीचे वार ग्यारीबाल्डीवर पडणार, इतक्यांत मिझोरी धावून आला. व शनी दचकून किंचित् तोंडें फिरविली. त्या संधीत त्याने व मिझोरी या दोघांनी मिळून त्या चौघांस डार केलें. या कठिण प्राणसंकटांतून बचावल्याबरोबर ग्यारीबाल्डीने तोंड फिरवून तोफखान्याचे बाजूने हल्ला करण्याचा निश्चय केला. स्वतः तो व दुसरे दोन शूर शिपाई यांनी तटावरून चढून जाऊन गोलंदाजांवर चाल करून तोफ काबीज केली. अर्थात् तीच तोफ आतां ग्यारीबाल्डीने उलट शत्रूवर चालू केली. तोफ परत मिळविण्याकरितां नेपॉलिटन सैन्याचा एक सरदार कांहीं लोक घेऊन तोफेवर चालून आला. तेव्हां पुन्हा एक वेळ ग्यारीबाल्डीचे व शत्रूचे छातीला छाती भिडवून युद्ध झाले व त्यांतहि त्यास यश आले. अशा रीतीने काही वेळ लढाई झाल्यावर शत्रूचा मोड झाला, व त्यांस मिलॅझो येथील बालेकिल्ल्यावर आश्रय धरून बसावे लागले. बॉस्को याने कुमक मागण्याकरितां नेपल्स येथे माणूस पाठविला. परंतु पुरेशी कुमक न बाल्याने व तह करण्याचा हुकूम मिळाल्याने बॉस्को याने तहाचे बोलणे लाविलें. किल्ल्यावरील सर्व युद्धाची सामग्री आहे तशी ठेवून, फक्त आपआपली हत्यारे घेऊन बाहेर पडावे अशी तहाची शर्त होती. परंतु शत्रूनें कपट करून कित्येक तोफांच्या कान्यांतून खिळे ठोकून दिले होते; एवढेच नव्हे तर, भुयारांत दारू भरून लांब अंतरावरून त्यास बत्ती देतां यावी व ग्यारी- बाल्डी किल्ल्यावर आल्याबरोबर सुरुंग उडवून द्यावा अशीहि त्यांनी व्यवस्था ग्यारीबाल्डी केली होती. परंतु सुदैवाने हे कपट उघडकीस आले व त्यामुळे किल्ला व ग्यारीबाल्डीचे लोक बचावले. नेपॉलिटन सैन्य किल्ला उतरून जाईपर्यत मिलेझो येथील लोकांनी ग्यारी- बाल्डीस कांहीच मदत केली नव्हती. परंतु परस्पर त्याच्या पराक्रमाने स्वतंत्रता मिळाल्याबरोबर त्यांनी ग्यारीबाल्डीचा जयजयकार केला. जय मिळाल्यावर त्या दिवशी रात्री एका देवळाचे आगाशीत पाण्याचा खुजा 4 एक दोन पाव घेऊन ग्यारीबाल्डीनें भोजन केलें, व उशाला घोडयाचें खोगीर घेऊन त्याने निवांतपणे झोंप काढली. मिलॅझोच्या पुढे मेसीना या नांवाचे एक शहर असून येथेहि नेपॉलिटन सैन्याचे एक ठाणे होतें. ग्यारीबाल्डीने पुढील हल्ला या शहरावर केला. या कामी त्यास मुळीच अडथळा झाला नाहीं व मेसीना आपोआप हाती लागले. या शहरचे लोकांस ग्यारीबाल्डीचे येणें मनांतून नको होते असे नाही. तथापि १८४८ साली झालेल्या बंडानंतर, मेपल्सच्या राजाने बंडवाल्यास अतिशय कडक शिक्षा केल्याने लोकांस जी एकदां दहशत पडली होती ती ते अद्याप विसरले नव्हते. यामुळे ग्यारीबाल्डी आला असे कळतांच लोक अतिशय घाबरून गेले व जो तो आपला जीव घेऊन होड्यांतून बसून बंदराच्या आश्रयाने राहिला होता. परंतु आतो ग्यारीबाल्डीचे ठाणे शहरांत काही दिवस बसल्यानंतर बाहेर गेलेले सर्व लोक परत आले व त्यांनी ग्यारीवाल्डीचा जयजयकार करण्यास प्रारंभ केला. त्यांनी गांवांत तोरणे उभारली व आनदोत्सव केला. इतकेच नव्हे तर, ग्यारीबाल्डीच्या गाडीचे घोडे सोडून त्यांनी त्याचा रथ आपल्या खांद्यांनी ओढीत नेला. अशा रीतीने ग्यारीवाल्डीच्या स्वारीचे काम निम्में फत्ते झाले. 'साहसे श्रीः प्रतिवसति' असें जें मृच्छकटिकांतील विलकाने म्हटले आहे त्याची प्रचीति जगाचे इतिहासांत वारंवार आलेलीच आहे. या अचाट साहसाचे योगानें ग्यारीबाल्डीने अशक्यप्राय वाटणारें सिसिली बेट जिंकलें; एवढेच नव्हे तर, आतां त्याचेजवळ कमीत कमी पंचवीस हजार सैन्य आपोआप जमलें व हजारों बंदुकाहि जुळल्या. इतकी सिद्धता झाल्यावर नेपल्स शहरावर स्वारी करण्याचे मार्गास ग्यारी- बाल्डी हा नेटाने लागला. ग्यारीबाल्डी हा नेपल्सवर आल्याशिवाय आता खास राहात नाहीं असें तेथील राजास वाटले, तेव्हा त्याने शेवटचा उपाय नेपल्सवरील स्वारी - म्हणून व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजाकडे आपला वकील पाठविला. यापूर्वी कॅव्हर व व्हिक्टर-ए-मॅन्युएल यांनी ऑस्ट्रियाविरुद्ध लढाई झाली त्या वेळी आपल्यास येऊन मिळण्यास नेपल्सच्या राजास विनंति केली होती; परंतु इटली स्वतंत्र करावयाची या उदात्त कल्पनेचा त्याला पुरा अर्थहि कळत मसल्यामुळे त्याने व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास मदत करण्याचे नाकारले होते. आतां तोच फ्रान्सिस राजा नम्र होऊन शरण आला होता, व ग्यारीबाल्डीपासून कसें तरी माझें रक्षण करा असे म्हणू लागला होता. व्हिक्टर-ए-मॅन्युएल व कॅव्हूर यांना ग्यारीवाल्डीची नेपल्सवरील स्वारी उघडपणे पसंत करता येत नव्हती. तरी देखील त्यांना परान्सिसचे वकिलास आम्हांस या बाबतीत फारसे कांहीं करता येत नाही असा निराशेचा निरोप देणेच भाग पडले. तथापि व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने ग्यारीबाल्डी याचे मन वळविण्याकरितां म्हणून त्यास पत्र लिहिले व “ हल्ली इटलीतील प्रजेमध्येच परस्पर जी लढाई चालली आहे ती संपविली पाहिजे, व म्हणून आपण नेपल्सवर जाण्याचा प्रस्तुतचा बेत रहित करावा" असे कळविलें. या पत्रास ग्यारीबाल्डीने "आपली आज्ञा मला शिरसावंद्य; तथापि इटलीची स्थिति पाहतां या क्षणी ती मला सर्वथा पाळतां येत नाही. यास्तव महाराजांनी या क्षणी एक वेळ आपली आज्ञा अमान्य करण्याची मेहेरबानीने मला परवानगी द्यावी" अशी अत्यंत नम्रपणाने विनंति केली. वरील पत्रव्यवहाराच्या मासल्यावरूनच सर्व स्थिति एकदम लक्षात येप्या- सारखी आहे. ग्यारीबाल्डीच्या मनांतील जागरूक नम्रसेवकभाव व त्याचे कर्तव्याचे मार्गात प्रतिबंध करणारी राजाज्ञा यांचा विरोध त्यास किती दुःसह झाला असेल, याची कल्पना सहज करता येईल. दुसरे पक्षी, व्हिक्टर-ए- मॅन्युएल राजाच्या मनाची स्थितीहि विचार करण्यासारखी आहे. एवढा महाप्रतापी व स्वामिभक्त वीर आपल्या प्रजाजनांमध्ये आहे. त्याचे व आपले मूळ कार्य एकच आहे; असे असतांहि त्याचे व आपले धोरण सर्वांशी न जुळल्या- मुळे प्रतिक्षणीं विनाकारण विरोध येतो हे पाहून राजासहि किती वाईट वाटले असेल याचीहि सहज कल्पना करता येईल. परतु राजा व राजभक्त यांचा हा विरोध टळण्यासारखा नव्हता. ग्यारीबाल्डीची नजर सर्व इटलीचें स्वातंत्र्य एकदम सिद्ध व्हावें या प्रचंड परंतु दुःसाध्य कल्पनेवर लागलेली असून त्याला कपट, कावा, धोरण किंवा युक्ति ही बाजू मुळीच दिसत नव्हती.
१०० ग्यारीबाल्डी व्हिक्टर-ए-मॅन्युएलची गोष्ट उलट होती. इटलीचे स्वातंत्र्य जरी त्यास परत मिळवावयाचे होते, तरी हातचे राज्य गमावण्यास तो तयार नव्हता; व आपले राज्य कायम ठेवणे हाच पुढील सर्व इमारतीचा पाया आहे हे त्यास माहीत होतें. तात्पर्य, एके बाजूस धीर व युक्ति व दुसरे बाजूस निस्सीम देशभक्ति व उतावळेपणा, अशी स्थिति झाल्यामुळे ग्यारीबाल्डी हा कट्टा स्वामिभक्त सेवक असतांहि अखेरपर्यंत एकादा पुंड बंडवाला असावा त्याप्रमाणे त्याचा व राजाचा संबंध इतिहासांत दिसून येत आहे. राजास वरील प्रकारचे उत्तर लिहिल्यावर ग्यारीबाल्डीने नेपल्सवर जाण्याची तयारी केली,व आपले सैन्य जहाजावर चढविले. त्या रात्रीं धुकें जिकडे तिकडे पसरले होतें, व आभाळांत चंद्र असूनहि अंधःकार पडला होता. परंतु हीच वेळ योग्य असें जाणून ग्यारीबाल्डीने जहाजें हांकारली. ज्या किनाऱ्या- वर उतरावयाचें तो किनारा या सैन्याने पूर्वी कधी पाहिलाहि नव्हता; तथापि त्याचे त्यास काहीच वाटले नाही. किनाऱ्यावर उतरून नेपल्सवर चाल करा. वयाची व तें हस्तगत करून तेथे व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे निशाण लावावयाचें याशिवाय दुसरी तिसरी गोष्टच त्यास दिसत नव्हती. यामुळे वाटत आलेली सर्व संकटें सोसून हे सैन्य एके दिवशी पहाटे चार वाजण्याचे सुमारास इटलीचे दक्षिण किनाऱ्यावर सुखरूपपणे पोहोचले. हा सर्व प्रकार अगदी अवचितपणे घडून आल्यामुळे त्यांना शत्रूकडून मुळींच प्रतिबंध झाला नाही. किनाऱ्यावर उतरतांच ग्यारीबाल्डीने आपली जहाजें पेटवून दिली व एकदम रेगियो या किल्ल्यावर हल्ला केला; सर्व दिवसभर लढाई केल्यावर तो किल्ला हस्तगत झाला. किल्ल्यांतील शिबंदी एका फ्रेंच व्यापारी गल- बतावर बसून नेपल्स येथे पळून गेली. मागे राहिलेल्या त्यांच्या सव्वीस तोफा व इतर लढाईचे पुष्कळ सामान, त्याचप्रमाणे धान्यसामग्री, घोडे व खेंचरें वगैरे या विजयी सैन्याचे हातीं अनायासाने लागली. नंतर लॉटिनो नांवाच्या एका गृहस्थास रेगियो या किल्ल्याचा गव्हर्नर नेमून ग्यारीबाल्डी आपल्या सैन्यासह दुसरे दिवशी बारा वाजतां पुढील मार्गास लागला. सुमारे दोन दिवसांत त्याने डोंगराळ प्रदेशांतून जवळ जवळ ऐंशी मैलांचा प्रवास केला. वाटेने शत्रूच्या सैन्याच्या टोळयांशी त्यास लहानसहान लढाया कराव्या लागल्या. त्या प्रदेशांतील उष्ण हवेने त्याच्या सैन्यास बराच ताप झाला. परंतु त्या सर्वांस न जुमानतां त्याने नेपल्सच्या जवळ जवळ मजल नेपल्सवरील स्वारी १०१. मारली; एवढेच नव्हे तर, मधून मधून कित्येक ठिकाणी आपले लोक पाठवून लोकांकडून नेपल्सचे राजाविरुद्ध बंडेहि उभारविली. परंतु या मोहिमेंत आपल्या शिपायांकडून रयतेस यत्किचितहि उपद्रव होऊं नये असे सक्त हुकूम ग्यारीबाल्डीने सोडले होते. फार काय, रस्त्याचे बाजूच्या द्राक्ष- वेलीच्या ताटव्यांत जाऊन मालकाचे परवानगीशिवाय मूठभर द्राक्षं जरी कोणी तोडली, तरी त्यास शासन द्यावे असा त्याचा कायदा कडक होता. यामुळे अखेरपर्यंत त्याच्या बाजारबुणग्या पेंढारांत उत्तम प्रतीची शिस्त राहिली. कित्येक ठिकाणी तर त्याचा आदरसत्कार लोकांनी इतक्या हौसेनें केला की, तो कांहीं वर्णन करता येत नाही. ग्यारीबाल्डी हा कोणी देव आहे किंवा देवदूत आहे असें झालें. स्टोको या गांवीं तर स्त्रियांनी शुद्ध प्रेमळपणाने त्यास एकाद्या भावाप्रमाणे आलिंगून त्याची चुंबनेंहि घेतली. रस्त्यांतून ग्यारीबाल्डीची गाडी जात असतां एकाद्या देशाभिमानी मातेने आपल्या कडेवरचे बालक उचलून बेलाशक गाडीत टाकून द्यावें. मनातील हेतु असा की, त्या महात्म्याने त्याला उचलून त्याचे चुंबन घेतले व त्यास आशीर्वाद दिला म्हणजे त्याच्या अद्भुत देशभक्तीचा व शौर्याचा कांहीं तरी अंश त्याजमध्ये उतरेल. या प्रसंगी अशी मौज झाली होती की, युरोपांतील निरनिराळ्या वर्तमानपत्रांचे बातमीदार ग्यारीबाल्डीचे सैन्या. बरोबर होते; त्यांना लढायांची चटकदार वर्णने वर्तमानपत्रास पाठवू अशी मोठी हौस होती; परंतु जिकडे जावे तिकडे लढाईच्या ऐवजी ग्यारीबाल्डीच्या स्वागताचाच प्रकार. जेथें जावें तेथें मेजवान्यांचा थाट. असे झाल्यामुळे लढायांच्या वर्णनांच्या ऐवजी त्यांना मेजवान्यांचीच वर्णने लिहून पाठवावी लागत, व ती वाचून ही काय अजब जादू आहे अशा विचाराने सर्व युरोपखंडांतील लोक आश्चर्यचकित होऊन राहिले होते. इकडे ऑलेटा येथें कर्नल पिअर्स नामक ग्यारीबाल्डीच्या एका सरदाराने सरकारी तार ऑफिस हस्तगत करून घेऊन नेपल्स येथील अधिकान्यांस अशी बातमी कळविली की, ग्यारीबाल्डी हा नेपल्सचे अगदी जवळ येऊन ठेपला आहे. ही बातमी कळतांच साले! येथील बारा हजार सैन्य राजाने नेपल्सचे बचावाकरितां एकदम परत बोलाविलें. अशा फसगतीने साले! हे ग्यारी- गाल्डीचे हाती सहज लागले. येथून पुढला मुक्काम नेपल्सचा. नेपल्सचे इसके जवळ आल्यावर ग्यारीवाल्डीस फारच उताविळी झाली; त्याने आपले १०२ ग्यारीबाल्डी सैन्य मागे ठेवून थोडया निवडक लोकांनिशीं सालेनों येथील स्टेशनावर आगगाडीत बसून नेपल्सची वाट धरली. ग्यारीवाल्डी येत आहे असे कळतांच नेपल्स येथे एकच गर्दी उडून गेली. एकीकडे राजाची पांचावर धारण बसून पुढे काय करावे हे त्यास सुचेना. सरकारी लष्कर व आरभ र यांवरील अधिक.रीहि बिथरल्यासारखे दिसू लागले. व खालचे प्रतीच्य शिपायांत तर फंदफितुरी पुष्कळ वेळपासून चालू होतीच. दुसरीकडे लोक हर्षभरित होऊन गेले होते. आगगाडी येण्याचे सुमारास चोहोंकडे लोकांची गर्दीच गर्दी होऊन गेली होती. आगगाडीचे रुळावर रिकाम्या डब्यांवरून जिकडे तिकडे माणसेंच माणसे होऊन गेली होती. स्टेशनचे आवारत तर गाड्या, घोडी,माणसें ही इतकी ठेचून भरली होती की, मुगी रिघावयाला देखील वाव नव्हता असे म्हटले तरी चालेल. चित्रविचित्र निशाणे, तांबड्या रंगाचे हातरुमाल, जिकडे तिकडे फडकत होते; आणि शिंगें व तुताय यांच्या ललकाऱ्यांनी कानठळ्या बसत होत्या. अशा प्रचंड समारंभांत ग्यारीबाल्डीची स्वारी स्टेशनांत येऊन दाखल झाली. ग्यारीबाल्डी स्टेशनांतून बाहेर पडतांच हर्षगजराचा जो एक एकदम कल्लोळ उसळला, त्याचे योगानें किनान्यावर राजा अपल्या बचावासाठी लष्कर सज्ज करून होता त्याचे काळजांत धडकी भरली. त्याचे गोलंदाज हातांत तोडा शिलगावून तटावरील तोफांवर हात ठेवून हुकुमाची वाट पाहत होते; सरबत्तीचा हुकूम झाला असता तर त्या हर्षभरित शहरांत घडाघडा गोळे पडू लागले असते; परंतु हा सरबत्तीचा हुकूम सोडण्यास राजाची छातीच होईना. कित्येक वेळी तर ग्यारीबाल्डी हा तोफांच्या मान्यांतहि आल असेल, परंतु तोफेचा एकहि आवाज कोणाचे कानी आला नाही. त्या दिवशी संध्याकाळचे सुमारास तर राजाचे सैन्याने उघडपणे पापल्या डोक्यावरील टोप्या उडवून दिल्या व 'ग्यारीबाल्डी की जय' असा जयघोष करून घरोघर ते लोक निघून गेले. ग्यारीबाल्डीला अशा प्रकारच्या स्वागताचा मनापासून तिटकारा असल्या. मुळे आगगाडीतून उतरतांच तो राजमार्ग सोडून देऊन एका आडरस्त्याने शहरांत शिरला, व शहराच्या मुख्य सार्वजनिक इमारतींत जाऊन त्याने आपलें बि-हाड ठेवले. तेव्हापासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी वाड्यापुढे येऊन स्यांनी 'ग्यारीबाल्डी की जय' अशा आसेळया द्याव्या. व ग्यारीबाल्डीने नेपल्सवरील स्वारी १०३ ग्यालरीत येऊन त्यांचे सलाम घेऊन त्यांना उत्तेजनपर दोन शब्द बोलून पुन्हा आंत जावे असा क्रम चालू झाला, तो सर्व दिवसभर सुरू होता. रात्री लोकांनी नाना त-हेचे दिवे लावून आपापली घरे सुशोभित केली व हजारों दिवट्या पेटवून मिरवणुकी काढल्या. संध्याकाळचे सुमारास राजा फ्रान्सिस हा आपले लोक बरोबर घेऊन किल्ल्यावरून उतरला, व खाली मान घालून शहरांतून निघून गेला. हा प्रकार पाहण्यास लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती; परंतु मेहेरबानीने त्याचा कोणत्याहि प्रकारे कोणी अवमान वगैरे केला नाही. राजा निघून गेल्यावर सर्व सार्वजनिक ठिकाणची राजचिन्हें काढून टाकून त्या ठिकाणी राजा व्हिक्टर-ए-मॅन्युएल याची निशाणे उभारण्यात आली. दुसरे दिवशी सकाळी आसपासच्या खेडयापाडयांतून ग्यारीबाल्डीने आपल्या लोकांच्या काही टोळ्या पाठविल्या व जिकडे तिकडे लोकांचा एकदिल करून व्हिक्टर-ए- मॅन्युएलच्या नांवाची द्वाही फिरविली. ग्यारीबाल्डीचे सैन्य किल्ल्यावर चढतांच लोकहि किल्ल्यावर मोकळेपणे जाऊ येऊ लागले. यापूर्वी किल्ल्यावर जाणे लोकांस फार धोक्याचे वाटत असे. नेपल्स येथील ज्या तुरुंगाबद्दल युरोपखंडभर जिकडे तिकडे गवगवा झाला होता व ग्लॅडस्टनसारख्या संभावित मुत्सद्दयांनीहि ज्यांचे बाबतीत नेपल्सचे राजास लाखोली वाहिली होती, ते सर्व बंदिखामे अथवा पृथ्वी. वरील सैतानाचे महाल याच किल्ल्यावर होते. या तुरुंगाबद्दल नेपॉलिटन लोकांचे मनांत अत्यंत द्वेष असल्यामुळे किल्ल्यावर चढून जाणाऱ्या प्रत्येक माणसाने त्या तुरुंगाचे भिंतीवर बुटाच्या लाथा माराव्या आणि थुकावें, व अशा रीतीने पूर्वीच्या राजाच्या जुलमी कारकीर्दीबद्दल आपला तिरस्कार दाखवावा असा प्रकार चालला होता. असो; एक दोन दिवसांत जिकडे तिकडे शांतता झाल्यावर ग्यारीबाल्डीने निरनिराळ्या खात्यांवर नवीन अधिकारी नेमून शिस्त लावण्यास सुरुवात केली.
भाग १५ वा देशाच्या एकीकरणाचा प्रारंभ तप्तेन तप्तमयसा घटनाय योग्यम् ॥ ---विक्रमोर्वशीय नेपल्सवरील ग्यारीवाल्डीच्या स्वारीची फत्ते झाली हे वर्तमान कौंट कॅव्हर यास कळतांच हे नवीन मिळालेले राज्य पिड्मॉटच्या राज्यास सामील करावयाच्या खटपटीस तो एकदम लागला. नेपल्सवर ग्यारीबाल्डीने स्वारी केली ती धडधडीत राजाज्ञेच्या विरुद्ध केली होती. तथापि, अनधिकाराने केलेल्या परंतु सफळ झालेल्या या कृत्यापासून आपल्या राजकीय धोरणाला जर फायदा मिळत आहे तर तो कां बुडवा असा कॅव्हूर याने पोक्त विचार केला. तो विचार अर्थात् त्या धूर्त मुत्सद्द्याचे शहाणपणास योग्य असाच होता. ज्या गोष्टीचा आपण पूर्वी एक वेळ निषेध केला तिचाच फिरून अंगिकार कसा करावा अशी शंका त्यास प्रथम उत्पन्न झाली. परंतु त्याच्या धूर्तपणास सुदैवाने या वेळी चांगली मदत केली. ग्यारीबाल्डीस जय मिळाला व नेपल्स त्याचे हाती पडले हे वर्तमान ऐकतांच मॅझिनी नेपल्सकडे जावयाला निघाला. मॅझिनी जेथे जाईल तेथे त्याचे मागोमाग लोकसत्ताक राज्याच्या कल्पना, बंडाळी व बेबंदशाही ही ठेविलेलींच, असा त्या वेळी सार्वजनिक समज होता. त्याचा फायदा घेऊन कॅव्हर याने अशी बतावणी करण्यास प्रारंभ केला की, मॅझिनीच्या योगाने सर्व सिसिली बेटाची दुर्दशा होऊन जाईल व अशा त-हेची स्थिति होणे हे इटलीच्या कार्यास अहितावह आहे; यास्तव पिड्मॉटचे राजाने केवळ सार्वजनिक कल्याणाकरितां नेपल्सचे राज्य आपल्या राज्यास जोडणे हाच काय तो वरील संकट निभावण्यास बिनतोड मार्ग आहे. हा बहाणा तर खराच; परंतु ग्यारीबाल्डी व मॅझिनी हे दोन स्वतंत्र विचाराचे व राजसत्तेस न जुमानणारे देशभक्त एकविचाराचे झाले असतां नेपल्स येथे खरोखरच प्रजासत्ताक राज्य स्थापित होईल, व असा एकदा प्रघात पडला म्हणजे लोकसत्ताक राज्य स्थापण्याची लोकांची इन्छा अनिवार होऊन भापल्या धोरणास आळा पडेल अशी कॅव्हूर यास मनांत मुळीच भीति वाटत देशाच्या एकीकरणाचा प्रारंभ १०५ नव्हती असें मात्र नाही. ते कसेंहि असो, नेपल्सचे राज्य पिड्मॉटचे राज्यास जोडण्याचा निश्चय करून त्या बाबतीत कॅव्हूर याने पार्लमेंटांत अनुकूल असा ठराव करून घेतला येवढें खरें. व्हिक्टर-ए-मॅन्युएल हा कॅव्हूर याचे विचाराबाहेर अर्थातच नव्हता. तथापि एक अडचण येऊन पडली ती अशी की, फ्रान्सचा बादशाहा नेपोलियन याचे हातांत इटलीतील घडामोडीची सूत्रे अद्यापि होती, व पिड्मॉटचे राजाने इटलीतील संस्थाने जिंकून आपल्या राज्यास सामील करण्याची ही रीति त्यास पसंत पडेल किंवा नाही याबद्दल किंचित् शंका वाटत होती. तथापि कॅव्हर याने नेपोलियनचे मन वळवून घेण्याचा प्रयत्न केला व तो सिद्धीसहि गेला. नेपोलियननें कॅव्हरच्या वकिलास असा जबाब दिला की, योजिलेले कृत्य करणे कॅव्हूर यास अत्यावश्यक वाटत असेलच तर तें त्याने आपल्या जबाब- दारीवर खुशाल करावें; परंतु हया कामी ऑस्ट्रियाशी युद्ध करण्याचा प्रसंग आला तर फ्रान्सकडून पूर्वीप्रमाणे मदत होणार नाहीं येवढे मात्र लक्षात ठेवावें. ही पडत्या फळाची आज्ञा मिळतांच कॅन्हूर हा आपल्या तयारीस लागला. त्याने युरोपांतील सर्व राष्ट्रांस लिहून कळविलें कीं, आज जर नेपल्स आम्हीं आपल्या राज्यास जोडले नाही, तर सर्व इटलीचे शांततेस धक्का बसून राजसत्तेस मोठाच अपाय होणार आहे. अशा रीतीने परराष्ट्रांकडून कदाचित् होणाऱ्या प्रतिबंधाचा आगाऊ बंदोबस्त करून कॅव्हर याने नेपल्सवर पाठ- विण्याकरितां सैन्य सज्ज केले. या सैन्याबरोबर राजा व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने स्वतःच जावें असें ठरलें. इकडे कॅव्हूर याने नेपल्स येथे आपल्या गुप्त हेरांकडून फर्डीनंड राजाविरुस बंड करण्यास लोकांना चिथावण्याचा क्रम चालविला होता व वरकरणी फर्डीनंड राजाशी सलोख्याचे बोलणेहि सुरू केले होते. तसेंच फर्डीनंडचे ताब्यांतील मार्चेस या प्रांतांतील कांहीं अर्जदार आपणाकडे आणण्याची गुप्त खेटपट करून कॅव्हर याने त्यांस उघडपणे असे आश्वासन दिले होते की, तुम्हांस योग्य स्वतंत्रता मिळेल अशी आम्ही लवकरच व्यवस्था करूं. इतकी सिद्धता आधीच झालेली होती. शिवाय ग्यारीबाल्डीचे सैन्याने नेपल्स पूर्वीच जिंकलें होतें; तेव्हां व्हिक्टर-ए-मॅन्युएल यास फक्त नेपल्स येथे जाऊन लोकांचे मुजरे घेऊन आपल्या नांवाची द्वाही फिरवावयाची येवढेच काय तें करावयाचे उरले होते. ते करण्यास तो लवकरच निघाला.
प्यारीबाल्डी . इकडे मॅझिनी हा व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे पूर्वीच नेपल्समध्ये जाऊन पोहो पला होता खरा, परंतु त्याचा हेतु साध्य होण्याचा मुळीच रंग दिसेना. मॅझिनी नेपल्समध्ये येईल तर त्यास एकदम कैद करावे असा कॅव्हर याने हकूम देऊन ठेविला होता. ग्यारीबाल्डीने मॅझिनीस कैद केले नाही, परंतु तेथून निघून जाण्याची त्याने त्यास विनंति केली. ती मॅझिनी याने नाकारिली. त्याने ग्यारीबाल्डी यासच उलट असा निरोप पाठविला की, तुम्हीच जर लवकरच नेपल्स सोडून रोमकडे जावयास निघणार नाही, तर तुमच्या हातची सर्व सत्ता जाऊन शेवटी पश्चात्ताप पावा लागेल. परंतु ग्यारीबाल्डीला इतक्यांतच सिसिली बेट सोडून जाणे अशक्य होते. कारण फर्डीनंडचा युद्ध करण्याचा विचार अद्याप दिसत होता. अदमासाप्रमाणे फर्डीनंडचे सैन्याशी ग्यारीबाल्डीस लढाई द्यावी लागलीच. ता. १ ऑक्टोबर रोजी व्होल्टरनो येथे दोन्ही सैन्यांची निकराची लढाई झाली व तीत फर्डीनंडचा पराभव होऊन त्यास गेटा येथील किल्ल्याचा आश्रय घेण्यास निघून जाणे भाग पडले. याउपर ग्यारीबाल्डीस कोणतीच आडकाठी उरली नाही. व्हिक्टर-ए-मॅन्युएल हा स्वतः सैन्यासहवर्तमान नेपल्सकडे येत आहे असें कळतांच ग्यारीबाल्डी राजास सामोरा जाण्याकरितां सैन्य घेऊन निघाला. नेपल्स पिड्मॉटचे राज्यास सामील करण्याच्या कॅन्हूर याच्या बेतास आपण आड जावयाचे नाही असा ग्यारीबाल्डीचा निश्चय या वेळी ठरला होता; व त्याप्रमाणे त्याने मॅझिनीस निक्षून कळविले. त्यामुळे मॅझिनीस नेपल्स सोडून जाणे भाग पडले. हा वेळपर्यत नेपल्ससंबंधाने सर्व अधिकार ग्यारी- बाल्डीचे हातांत होते; परंतु व्हिक्टर-ए-मॅन्युएल आल्यावर ते सर्व अधिकार त्याचे ठिकाणी समर्पण करून आपण बाजूस व्हावे असा हया उदार देश- भक्ताने निश्चय केला. ता. २६ ऑक्टोबर रोजी व्हिक्टर-ए-मॅन्युएल व ग्यारीबाल्डी यांची मुलाखत झाली. त्या वेळी उभयतांच्या मनांत परस्परां. विषयी अत्यंत आदर उत्पन्न झालेला होता. आपण आरंभिलेलें कार्य सुरळीतपणे शेवटास गेले व आपल्या हातून थोडीबहुत राजसेवा घडली, याबद्दल ग्यारीबाल्डीस आनंद वाटला. व दुसरे पक्षी राजासहि, अशा धीर, बीर, निःस्पृह स्वामिभक्त सेवकाकडून देशकार्यात साहाय्य मिळाले याबद्दल धन्यता वाटली. या भेटीचा देखावा डोळयांनी पाहिलेल्या लोकांनी असें देशाच्या एकीकरणाचा प्रारंभ लिहून ठेविलें आहे की, राजा व ग्यारीबाल्डी हे एकमेकांस आदरपूर्वक भेटतांना दोघांचेहि कंठ सद्गदित झाले होते. भेटीनंतर दोघेहि नेपल्सकडे परत फिरले. राजा व ग्यारीबाल्डी यांनी नेपल्समध्ये एकाच गाडीत बसून प्रवेश केला. राजा एका उघड्या गाडीत बसला असून ग्यारीबाल्डी त्याचेच बाजूस डाव्या हाताला बसला होता व समोर सिसिली व नेपल्सचे भावी गव्हर्नर बसले होते. त्या दिवशी पाऊस एकसारखा झिमझिम पडत होता; तथापि रस्त्यातून लोकांची अतोनात गर्दी झालेली होती. त्यांच्या जयजयकाराच्या ध्वनीने त्या वेळी आकाशांत होणारी मेघगर्जनाहि क्षणक लोपून जात असे. जिकडे तिकडे गुढया-तोरणे, निशाणे उभारलेली होती, व ठिकठिकाणी राजाचे गाडीवर लोक फुलें उधळीत होते. अशा थाटाने व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने शहरांतील मुख्य देवळांत प्रवेश केला. तेथे सर्वानी मिळून ईश्वरोपासना केली. हा विधि साल्यावर ग्यारीबाल्डीने आपले सर्व अधिकार राजाचे स्वाधीन केले. सरते शेवटी त्याने जाहीरनामा काढून आपल्या विश्वासु शिपायांचा आणि सिसिलींतील सर्व लोकांचा व देशबांधवांचा नम्रपणे निरोप घेतला. वास्तविक या वेळी ग्यारीबाल्डीची शक्ति अशी होती की, त्याने नुसता ब्र काढण्याची फुरसत, की खुद्द त्याचे पंचवीस तीस हजार सैन्य व नेपल्सचे सर्व लोक त्याच्या हुकुमाप्रमाणे वागण्यास, फार काय पण प्राण देण्यासहि तयार होते. व यामुळे त्याचे मनांत यत्किचितहि जरी अहंभाव किंवा महत्त्वाकांक्षा यांचा · अंकुर उमटला असता तर त्याचे सर्व मनोरथ पूण होण्यास मुळीच पंचाईत पडली नसती. असे असतांहि दुसऱ्याची ठेव निमूट- पणे परत करावी त्याप्रमाणे आपले सर्व अधिकार राजाचे चरणांवर अर्पण करून एकाद्या यःकश्चित् मनुष्याप्रमाणे फिरून ग्यारीबाल्डी हा प्रजाजनांच्या समाजांत मिसळला. हा त्याचा निःस्पृहपणा पाहून त्याचे अंगी खरोखर कांहीं दैवी अंश आहे असें लोकांस वाढू लागले. ग्यारीबाल्डीने गादीची एवढी मोठी कामगिरी बजाविलेली पाहून आता याचे कसें उतराई व्हावें अशी खुद्द राजासहि पंचाईत पडली असेल यांत काही शंका नाही. त्याने त्यास सर्वांत श्रेष्ठ अशी लष्करी मानाची पदवी व पांच लाख फ्रॅक देऊ केले; परंतु ग्यारीबाल्डीने आपण यांतील एक पैशासहि शिवणार नाहीं क बहुमानाची पदवीहि घेणार नाही असें राजास स्पष्ट कळविलें. - ग्यारीवाल्डी वरील समारंभ झाल्यानंतर लागलीच ग्यारीबाल्डीने कॅप्रेरा बेटावरील निवासाश्रमास जाण्याचा निश्चय केला. या वेळी त्याजपाशी फक्त पंधरा शिलिंग काय ते त्याचे असे होते. यास्तव जाण्यापूर्वी त्याने वीस पौंड लोकांपासून उसने घेऊन आपले खाजगी देणें होतें तें वारले; व घरून निघाल्यापेक्षा रतिभर अधिकच दरिद्री अशा स्थितीत हा विजयी व शूर देशभक्त आपल्या घरी परत निघाला. मात्र जाण्यापूर्वी त्याने एक वेळ राजाची गांठ घेतली व दोन मागण्या केल्या; पैकी पहिली अशी होती की, राजाने आपणांस रोमवर स्वारी करण्याची परवानगी द्यावी; व दुसरी अशी की, आजपर्यंत पगार न घेतां केवळ स्वदेशभक्तीने प्रेरित होऊन व जिवाला जीव देऊन, ज्यांनी आपल्या हाताखाली लढाया केल्या त्या शिपायांस व सरदारांस सरकारी सैन्यांत सामील करून त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांस जागा द्याव्या. या दोन्हीहि मागण्यांस राजास रुकार देता आला नाही व त्याची कारणेहि विशेष होती. येथे येवढेच सांगावयाचें की ज्याने सिसिलीचे सबंध राज्य आपल्या धन्यास मिळवून दिले, त्याने वाटखर्चीकरितां लोकांचे पैसे उसनवार काढले व इतमामाशिवाय जसा एकटा तो सिसिलीवर स्वारी करण्याचे पूर्वी घरांतून बाहेर पडला तसाच स्वारीत यश मिळवून सर्व सिसिलीचें राज्य काबीज केल्यावरहि एकांतवासांतील गृहसौख्याचा उपभोग घेण्यास तो एकटाच परत गेला! भाग १६ वा शांततेतील सुखें व उद्योग श्यारीबाल्डी कॅप्रेरा बेटास परत येऊन पाहतो तो तेथील देखावा सर्वच बदललेला. घर सोडून जाते वेळी जिकडे तिकडे प्रदेश ओसाड होता; परंतु आतां तेथें लागवड झालेली असून लहान लहान बागा - शेने तयार केलेली होती. झाडांची लागणहि बरीच झाल्यामुळे जिकडे पाहावें तिकडे हिरवळ दृष्टीस पडे. घरी गेल्याबरोबर तो प्रथम तबेल्यांत शांततेतील सुखें व उद्योग १०९ गेला व आपल्या आवडत्या घोड्यांचे पायबंद सोडून त्याने त्यांस येथेच्छ हिंडावयास मोकळीक दिली. नंतर इकडे तिकडे कमीजास्त आहे नाहीं पाहून व चाकर माणसांच्या व शेजाऱ्यांच्या भेटी घेऊन, पूर्ववत् आपल्या शेत- कऱ्याच्या वर्तनक्रमास त्याने सुरुवात केली. प्रथमतः त्याने एक चक्की आणविली, शेतकीची निरनिराळी औतें जमा केली व थोड्याच दिवसांपूर्वी ज्या हौसेनें रणभूमीवर तो युद्ध करीत होता त्याच हौसेनें तो आतां शेतकीचे काम करूं लागला. तीस हजार सैन्य हाताखालीं वागवून व राजाच्या बरोबरीने रथांत बसून सर्व राष्ट्राकडून जयजयकार व धन्यवाद ऐकत असतां जी .त्याच्या मनाची स्थिति होती, तीच आजमितीस स्वतः हातांत नांगर धरून गड्यांमाणसाबरोबर शेतकाम करीत असतांनाहि होती. ग्यारीबाल्डीचा स्वभाव उद्योगप्रिय असल्यामुळे हळुहळू त्या लहानशा बेटाला गोड रूप येऊ लागले. तथापि त्याचें राहतें घर अगदी साधे असून त्यांत ऐषआरामाचे पदार्थ कांहीच' नव्हते. दूरदूरचे लोक त्याला अनेक त-हेचे पदार्थ भेटीदाखल पाठवून देत. त्यांपैकी कित्येक तर बरेच मौल्यवानहि असत. परंतु अशा भेटी घेणे त्याला मनापासून फारसें आवडत नसे; म्हणून कित्येक वेळां तो त्या भेटी परतसुद्धां करी. याच सुमारास ऑस्ट्रियांत मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हां तेथील लोकांच्या मदतीकरितां त्याने आपण स्वतः वर्गणीने जमविलेले शंभर फ्रँक तिकडे पाठविले. मौल्यवान् नजराणे पाठविण्यापेक्षा दुष्काळपीडित ऑस्ट्रियन लोकांना जर त्यांचे पैसे करून पाठवाल तर मजवर मोठे उपकार होतील;" असेंहि त्याने कित्येकांस सांगितले. त्याच्या या सांगण्याचा कित्येकांस राग आला व आपले हाडवैरी जे ऑस्ट्रियन लोक त्यांना मदत करण्याची ग्यारीबाल्डीस इच्छा व्हावी याचें कित्येकांस आश्चर्य वाटले. परंतु त्यासंबंधानें ग्यारीबाल्डी असें म्हणे की, माझें वैर ऑस्ट्रियन लोकांशी नाही, तर त्यांच्या राजाशी आहे. त्या बिचाऱ्यांनी काय केले आहे ? त्यांचा राजा वाईट आहे, त्या अर्थी ते उलट दयेलाच अधिक पात्र आहेत ! ग्यारीबाल्डीच्या या एकांतवासांत त्याला भेटण्याकरितां अनेक देशचे मोठमोठे लोक येत असत. थोरथोर इंग्लिश अमीर-उमराव सुंदर व सजविलेल्या छोटया जहाजांतून बसून कॅप्रेरा येथे येत. तसेंच प्रवासास निघालेले शोधक लोक किंवा हद्दपार झालेले देशभक्त मधून मधून याचे दर्शनास येत. त्या " मला ग्यारीबाल्डी सर्वांचे तो मोठ्या प्रेमाने स्वागत करी; परंतु त्याच्या आदरातिथ्याच्या प्रकारांत श्रीमंती मुळीच नसे व ती येणार तरी कोठून ? अशा तन्हेचे पाहुणे आले असता त्यांस घेऊन बागेत किंवा शेतांत तो काम करण्यास जाई; व तेथें सुखदुःखाच्या गोष्टी बोलत असतां तो जातीने काम करू लागला म्हणजे तेहि आनदाने अस्तन्या वर सावरून त्याचेबरोबर काम करावयास लागत. पहिल्या पत्नीपासून ग्यारीबाल्डीस तीन अपत्ये झाली होती. पैकी सगळयांत वडील मुलगा मेनॉट्टी; हा आपल्या बापाबरोबर स्वारीस जाण्या- इतका मोठा झालेला होता. एक दोन वेळी त्याने आपल्या शूर पित्याच्या -कीर्तीस योग्य अशी मर्दुमकीहि केली होती. दुसरा मुलगा रिसीऑटी हा इंग्लंडला लिव्हरपूर येथे स्नेहयांच्या देखरेखीखाली विद्याभ्यासाकरिता ठेवलेला होता. ग्यारीबाल्डीची मुलगी थेरेसीटा, ही देखणी असून आपल्या बापासारखी उंच व सशक्त असे. हीच काय ती ग्यारीबाल्डीचा प्रपंच पाहणारी घरधनीण. थेरेसीटा हिने आपल्या बापाप्रमाणेच, पाण्यात पडून बुडत असलेल्या कित्येक लोकांचे प्राण वाचविले होते. ती चपळ असून आपल्या बापाच्या बरोबरीने डोंगरांतून भराभर उड्या मारीत जाई. या मुलीवर ग्यारीबाल्डीचे विशेष प्रेम होतें. नेपल्सच्या स्वारीहून ग्यारीबाल्डी परत आल्यानंतर थेरे. सीटा हिचे कॅनझिओ नांव.च्या एका लष्करी अधिकाऱ्याबरोबर लग्न झाले. या प्रसंगी व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजाने नवऱ्यामुलीस आंदणादाखल एक सुंदर हिन्यांचा हार बक्षीस दिला होता. तात्पर्य, ग्यारीबाल्डीचे सर्व आयुष्यक्रमांत शांततेचा व गृहसौख्याचा काळ असा हा गेला. तथापि हे गृहसौख्य असावें तसें नव्हते. कारण त्याची प्रिय पानी निवर्तलेली होती व मुलेंहि किंचित् आडदांड व बिनमुर्वतखोर अशी निपजली. तथापि केवळ बायकामुलांकडे पाहून सुख पावणाऱ्यांपैकी ग्यारीबाल्डी हा नव्हता. त्याचे खरें सुख स्वदेशसेवेत होते व तें मात्र त्यास सर्व आयुष्यभर यथेच्छ भोगावयास सांपडलें. ग्यारीबाल्डीच्या पहिल्या लग्नाची हकीकत मागे एका ठिकाणी आलीच आहे. त्याची पहिली बायको निवर्तल्यावर पुष्कळ वर्षेपर्यंत याने दुसरे लग्न केले नाही. त्याचे दुसरे लग्न १८५९ साली झाले. त्याची हकीकत चमत्कारिक व मनोरंजक आहे. १८५९ साली ऑस्ट्रिया व इटली यांची लढाई मुंपली, त्या वेळी आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सरोवराचे आसपासच्या प्रदेशात ग्यारीबाल्डी हा फौजेचा तळ देऊन राहिला असतां माक्विस रेमाडी शांततेंतील सुखें व उद्योग "छेः, तुम्ही . या नांवाच्या एका सरदाराच्या तरुण मुलीची प्रीति ग्यारीबाल्डीवर बसली. खुद्द सरदाराचीहि इच्छा ग्यारीबाल्डीसारखा जांवई आपणांस मिळावा अशी होती. असे असतां एके दिवशी ही तरुण मुलगी ग्यारीबाल्डीच्या छावणीत अकस्मात् प्रकट झाली व शत्रूकडील कांहीं पत्रे आपण वाटेत पकडून आणली आहेत असे तिनें ग्यारीबाल्डीस कळविलें. ही पत्रे ग्यारीबाल्डीने घेतली व तिचे त्याने फार फार आभार मानिले. दुसरे दिवशी माक्विस रेमॉडी हा स्वतः ग्यारीबाल्डीचे छावणीत आला व माझ्या मुलीची तुमच्याशी विवाह करण्याची फार इच्छा आहे असे त्याने ग्यारीबाल्डीस कळविलें. हे ऐकून पयारीबाल्डीस अत्यंत आश्चर्य वाटले व तो एकदम म्हणाला, भलतेच कांहीं तरी बोलतां. माझ्या पहिल्या बायकोच्या मरणाच्या दुःखाने माझें काळीज करपून गेलेले आहे व आमरणान्त मी अविवाहित राहण्याचा निश्चय केलेला आहे. दुसरे असे की, तुमच्या कन्येने मला फार तर एक वेळ पाहिले असेल; असे असतां, मजविषयी तिच्या मनांत इतकें प्रेम उत्पन्न व्हावें हे संभवतें तरी कसे? " हे आपणांस नडविणारें उत्तर ऐकून माक्विस रेमॉडी हा निरुत्तर झाला. परंतु ग्यारीबाल्डीच्या भोळ्या अंतःकरणाची कळ कोठे दाबली असता त्याचे हृदय खुलें होईल हे त्या सरदारास पूर्णपणे माहीत होते. यामुळे तो लागलीच म्हणाला, “ साहेब, माझ्या मुलीचे प्रेम व्यक्ति- विषयक आहे असे समजू नका; तर तें 'इटलीचे स्वातंत्र्य ' या मोहक कल्पने- वर जडलेलें आहे व त्या कल्पनेचा आपण केवळ साक्षात् अवतार आहां! या कारणाकरितांच तिला आपणांशी विवाह लावावयाचा आहे. णाचा त्या सरदाराच्या अटकळीप्रमाणेच परिणाम झाला. 'इटलीचे स्वातंत्र्य' या जादूने भरलेल्या शब्दांचा उच्चार होतांच ग्यारीबाल्डीचे करारी मन तेव्हांच विरघळले. स्वदेशाभिमान बाळगणारा कोणताहि मनुष्य त्याला देवदूता- प्रमाणे प्रिय वाटत असे; त्यांतूनहि स्त्रीजातीमध्ये त्याचा इतका संचार झालेला पाहून तो त्या सरदाराचे म्हणण्यास एकदम कबूल झाला. असो. अशा रीतीने केवळ एका शब्दाचे उच्चाराने हे लग्न जुळलें. रीतीप्रमाणे सर्व मंडळी लग्नाकरितां देवळांत जाऊन आली व या दोघांचे लग्नति लागले. इतक्यांत त्या तरुण स्त्रीचे कपट ग्यारीबाल्डीस कळून आले. शत्रू. कडील पकडून आणलेली पत्रे निव्वळ बनावट असून या व्यवहाराच्या मुळांत स्वार्थाशिवाय दुसरें कांहींहि नाहीं असें ग्यारीबाल्डीचे लक्षात येताच, त्याने तिचें मुखावलोकनहि करावयाचे नाही अशी शपथ वाहिली। या भाष- ११२ ग्यारीबाली असो. आतापर्यंत घडलेल्या वृत्तान्तावरून एक गोष्ट ठळकपणे दिसून येते ती ही की, संपत्तीने सुखी किंवा दारिद्रयाने दुःखी व्हावे असा त्याच्या मनाचा पिंडच नव्हता. आपल्या आयुष्यांत ग्यारीबाल्डीने जे जे अधिकार बजावले त्यांमध्ये द्रव्यदृष्टीचा दुसरा एकादा माणूस त्याचे जागी असतां तर त्याने अपार संपत्ति मिळविली असती. परंतु ग्यारीबाल्डी मात्र अखेरपर्यंत कोरडाच्या कोरडा राहिला ! द्रव्यलोभ हाच सर्वांत अति कठिण असतो. तो ज्याने जिंकला त्याने निःस्पृहपणाचा मुख्य पायाच रचिला असें म्हणण्यास हरकत नाही. परंतु ग्यारीबाल्डीचा निःस्पृहपणा द्रव्याचेहि पलीकडे गेला होता. ज्या वयांत त्याने देशकार्यार्थ जीवित घालविण्याचा निश्चय करून मॅझिनीचे शिष्यत्व पत्करिलें व फांशीच्या शिक्षेचे सुदर्शनचक्र डोक्यावर फिरतें घेऊन स्वदेश सोडून पृथ्वीचे पाठीवर वाटेल तिकडे जाण्यास तो प्रवृत्त झाला, त्या वयांत जगांतील बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या तरी आपमतलबी स्वार्थाच्या व्यवसायांत गुंतलेले असतात हे लक्षात घेतले असतां वरील गोष्टीं- तील मर्म कळून येणार आहे. ग्यारीबाल्डीच्याहि आयुष्याचे अनेक दिवस गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे प्रपंच करण्यांत गेले हे खरे. तथापि त्याचा प्रपंच व इतरांचा प्रपंच यांमध्ये एकच मोठा भेद होता; पण तोच अतिशय महत्त्वाचा होता. तो हा की, इतरांचे मन प्रपंच-उपाधींत गुरफटलेले असते व त्यामुळे मनुष्यमात्राचे खरें हित व जीवितकर्तव्य' साधण्यास त्यांना व्यत्यय येतो. परंतु ग्यारीबाल्डीने ऐन तरुणपणी जो कर्तव्यमार्ग आंखून ठेविला होता, तो सोडून बाहेर एक रतिभरसुद्धां प्रपंच-उपाधीने त्यास कधीहि ओढून नेलें नाहीं. भगवद्गीतेमध्ये कर्म करावयाचें तें करून अलिप्त राहण्याचा जो सात्त्विक मार्ग सांगितला आहे, त्याचेच ग्यारीबाल्डीचें चरित्र हे एक उत्तम उदाहरण आहे. ग्यारीबाल्डीचे अंगीं मानुषता सहज असे. म्हणजे सुखदुःखाचे भाव नव्हते असे नाही. उदाहरणार्थ, कोठे काम- गिरी करून तो थकून परत घरी आला असता त्याचे प्रिय पत्नीने प्रफुल्ल चित्ताने व हास्यवदन करून जर त्याचे प्रेमपूर्वक स्वागत केले तर त्यापासून त्याला अनिर्वाच्य सुख होत नसेल असें नाही. किंवा त्याची मुलेबाळें खेळत खेळत येऊन अंगावर पडली असतां-- अंकाश्रयप्रणयिनः तनयान् वहन्तो। धन्यास्तवंगरजसा मलिनीभवन्ति ।
शांततेतील सुखें व उद्योग या कालिदासाच्या मार्मिक वर्णनाप्रमाणे ग्यारीबाल्डीसहि धन्यता वाटली असेल, नाहीं असें नाही. परंतु संसारसुख भोगण्याची पात्रता व सामर्थ्य अंगी असणे निराळे, व संसारसुख हेच जीविताचें सार मानून आपल्या सर्व व्यवसायांचा ओघ तिकडे वळविणे निराळे. जगामध्ये दोन त-हेचे लोक असतात. पंकी काही लोकांच्या मोठेपणास नुसतें बुद्धिवैभव हे कारणीभूत होतें, व कांहीचा मोठेपणा त्यांचे कृत्यांवर अवलंबून असतो. ग्यारीबाल्डी हा दुसऱ्या वर्गातील महात्मा होय. मॅझिनीची निशाणी जशी लेखणी ही होती तशी ग्यारीबाल्डीची निशाणी तरवार ही होय. तथापि ग्यारीबाल्डीचे अंगी बुद्धिवैभव कमी होतें असें नाही. त्याचा पहिल्यापासून विद्येकडे विशेष कल असता किंवा त्याची परिस्थिति खरोखर होती त्याहून जर वेगळी असती तर तो विद्वत्तेचे बाजूने प्रख्यातीस आला नसता असे म्हणणे कठिण आहे. त्याचे शिक्षण किती चुटपुटतें होतें व शाळेचा संस्कार तर त्याला केवळ नांवाचाच होता. असे असतांहि त्याचे भाषण व लेखन हे एकाद्या विद्वानास साजेल असेंच होतें. ग्यारीबाल्डी हा भाषापंडित नव्हता तरी त्यास तीन चार भाषा बोलतां येत असत. इटालियन भाषेच्या सर्व पोटभाषा तो अस्खलित बोलत असे. स्पॅनिश, इंग्लिश, पोली, फ्रेंच याहि फार न अडतां त्यास बोलतां येत असत. परंतु या निरनिराळ्या भाषा शिकण्याचे कारण केवळ विद्येची लालसा हे नसून त्याहून अधिक स्तुत्य व उदात्त असें होतें. पृथ्वीवरील सर्व माणसें ही वास्तविक सख्खीं भावंडे होत. असे असतां केवळ भाषेच्या विविधत्वामुळे त्यांचे व्यवहारास व प्रेमवर्धनास व्यत्यय येतो, असे त्यास वाटे. वास्तविक एकच भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये परस्पर किती प्रेम असते याचा बहुतेक सर्वांस अनुभव असतोच. यामुळे भाषाज्ञानाने प्रेमवृद्धि करण्याची ही कल्पना सर्वांस सारखीच पसंत पडेल असे नाही. तथापि ग्यारीबाल्डीसंबंधानें कोणतीहि गोष्ट घेतली असतां तिजमध्ये त्याच्या विश्वव्यापी प्रेमाचे प्रतिबिंब दिसतें एवढाच या ठिकाणी सांगावयाचा मुद्दा आहे. सर्व मानवी प्राण्यांची एक भाषा करतां पेईल असा त्याचा दृढ भरंवसा होता. असो. शाळेतील त्याचे शिक्षण पुरे झाले नव्हते. असे असतां त्यास पांच चार भाषा येत होत्या. येवढेच नव्हे तर तो आपल्यापरीनें ग्रंथकारहि बनला होता. त्याने लिहिलेल्या दोन तीन कादंबऱ्या उपलब्ध आहेत. या कादंबऱ्यांत ८ ग्यारीबाल्डी त्याची कल्पनाशक्ति जबर असल्याचे दिसून येते. ही कल्पनाशक्ति त्यास उपजत होतीच. परंतु त्यांतूनहि दक्षिण अमेरिकेंत रानावनांत राहून व अनेक त-हेचे चमत्कारिक अनुभव घेऊन त्या कल्पनाशक्तीस वैचित्र्य व परिपक्वता आली असल्यास त्यांत कांहीं नवल नाही. ग्यारीबाल्डीचे कादंबऱ्यांत त्याच्या विचित्र कल्पनाशक्तीचा प्रभाव दिसून येतो. त्यांतील कथानकें, पात्रे, प्रसंग, व तत्त्वबोध ही सर्व त्याच्या स्वदेशप्रीतीचे रंगाने रंगविली गेली आहेत. या पुस्तकाशिवाय ऐतिहासिक दृष्टया उपयुक्त असें एक पुस्तक त्याने लिहिले आहे. ते त्याचे आत्मचरित्र होय. या आत्मचरित्रांत त्याने आपले अनुभव, आपली कृत्ये, आपली मते, यांचे टिप्पण केलेले आहे. हे टिप्पण पहिल्यापासून अखेरपर्यंत संगतवार किंवा शिस्तवार आहे असें नाहीं; तथापि त्याची भाषा चटकदार व जोरदार असल्यामुळे सदरहू पुस्तक बरेंच मनोरंजक झालेले आहे. परंतु त्यास जें एक विशेष महत्त्व आहे त्याचे कारण असे की, ग्यारीबाल्डी हा सत्यप्रिय व स्पष्टवक्ता असल्यामुळे त्याने आत्मचरित्रांत लिहिलेल्या गोष्टींबद्दल कोणास यत्किचितहि शंका येत नाहीं; व अशा रीतीने नेहमी आत्मचरित्र वाचण्यांत जो एक प्रकारचा आनंद असतो तो येथे दुणावतो. ग्यारीबाल्डीची भाषणे, त्याने लिहिलेली पत्रे, व त्याने काढलेले जाहीरनामे यांमधूनहि त्याच्या स्वभावाची व अंतःकरणाची खूण ठिक- ठिकाणी पटते. या सर्वामध्ये भाषावैभव दाखविण्याचा प्रयत्न मुळीच नसून त्यांची सर्व गोडी, निःस्पृहता, उदात्त विचार, स्पष्टवक्तेपणा किंबहुना धाडस यांतच असून, वाचणारास ते लेख नसून त्या ठिकाणी चालता बोलता माणूसच उभा आहे की काय असे वाटते. ग्यारीबाल्डी हा कोणी मोठा तत्त्वशोधक नव्हता हे सांगावयास नकोच. तथापि त्याचे ग्रंथांत, पत्रांत, व भाषणांत निरनिराळया विषयांवर जे विचार नमूद झालेले आहेत त्यांवरून त्याचेविषयींची चांगली कल्पना करता येते. उदाहरणार्थ, धर्म हा विषय घेतला तर असे दिसून येते की, तो जरी वैरी होता, तरी ईश्वरावर त्याचा पूर्ण भरंवसा असून त्याचे मन श्रद्धालु होते. मात्र ईश्वर व मनुष्य यांची ओळख करून देण्यास व मध्यस्थी करण्यास कोणी तिन्हाईत असणे अवश्यच आहे असे त्यास वाटत नव्हते. ज्याने त्याने आपआपल्या बुद्धिसामर्थ्यानुरूप चिंतन, मनन व भक्ति केली असता त्यास अवश्य तितकें ईश्वरज्ञान व शक्य तितकी ईश्वरप्राप्ति पोपचा कट्टा रोमवरील स्वारी ११५ खास होईल, मग हे भटांचे बंड मध्ये उगीच कशाला असें तो म्हणे. भटांनी व धर्मगुरूंनी धर्माचे उदात्त स्वरूप लोपवून त्यास वाणसौद्याच्या जिनसाची योग्यता आणून ठेवली असा त्याचा आक्षेप असे व तो त्या कालमानाने पाहतां अगदी बरोबर होता. स्त्रियांसंबंधींहि त्याचे विचार फार थोर होते. लग्न हा एक अतिशय पवित्र असा संस्कार आहे व तो संस्कार ज्यास झाला त्याने आपल्या धर्मपत्नीचें व अपत्यांचे प्रेमयुक्त अंतःकरणाने पालनपोषण करणे हे त्याचे कर्तव्य आहे असें तो म्हणे. राष्ट्रांतील स्त्रिया सुशिक्षित असल्या तरच त्यांच्या मुलांचे हातून काय वाटेल तें देशकार्य करवून घेता येईल असें तो वारंवार म्हणे. लढाईच्या कामांतून जेव्हां त्यास फुरसत सांपडे तेव्हां तो वेळ स्त्रियांस सुशिक्षण देऊन त्यांचा दर्जा वाढविण्याच्या उद्योगाकडे तो घालवी. त्याने कित्येक ठिकाणी मुलींच्या शाळा काढल्या होत्या, व कोठे मजूरदारांच्या बायकांस पीठ दळण्याच्या चक्क्या विकत घेऊन देऊन, तर कोठे इतर काहीं करून गरीब स्त्रियांस सुखी करण्याचा तो प्रयत्न करीत असे. ग्यारीबाल्डीच्या सर्व जन्मांत त्यास शास्ता असा कोणीहि नव्हता म्हटले तरी चालेल. तथापि त्याने आपली नीति अखेरपर्यत निर्मळ ठेविली होती. त्याचे हाता- खाली वागणारें सैन्य नेहमी बिनपगारी व स्वच्छंदी असे. लष्करी कायद्याचा कडक अंमलहि त्याजवर नसे. तथापि हाताखालच्या शिपाईप्याद्यांकडून स्त्रीजातीचा अपमान झालेला त्याने कधीहि सहन केला नाही. या व इतर कारणांकरितां इटालियन स्त्रियांची ग्यारीबाल्डीवर नेहमी भक्ति असे. भाग १७ वा रोमवरील स्वारी यावेळी सर्व इटालियन लोकांस ध्यानी-मनी-स्वप्नी रोम शहर दिसत होतें. इटलीचें गतकालचे सर्व वैभव एका रोमच्या नांवांत सांठविलें होते. त्यामुळे रोम ही इटलीची फिरून एकवार राजधानी झाल्याशिवाय देश संयुक्त व स्वतंत्र झाला, तरी त्यांत काही अर्थ नाहीं असें लोकांच्या मनाने ग्यारीवाल्डी घेतले होते. कॅन्हूर व व्हिक्टर-ए-मॅन्युएल यांच्याहि मनांत रोम काबीज करण्याची उत्सुकता फार होती. परंतु तसे करण्यास एक मोठी अडचण होती. ती ही की,रोम हे पोपच्या ताब्यात होते व त्यास फ्रेंच बादशाहाचा आश्रय होता. त्यामुळे रोमवर स्वारी करावयाची म्हणजे, प्रथम फ्रान्सबरोबर युद्ध करण्यास तयार होण्यासारखे होते. या विचाराने वरील मुत्सद्दयांचे विचार जागच्या जागीच राहात. परंतु ग्यारीबाल्डीला रोमच्या मार्गातील अडथळे दिसत असले तरी त्यांस तो जुमानणारा नव्हता. त्याचे धैर्य हे डोंगरा- च्या पायथ्यावर तुटून पडून आदळणाऱ्या लाटेप्रमाणे होते. वरील विचारी मुत्सद्यांपेक्षा त्याजमध्ये एक गुण विशेष होता. तो हा की, वरील मुत्सद्दयां- पेक्षां लोकांच्या मनाचा कयास त्यास अधिक बरोबर रीतीने कळत असे. ग्यारीबाल्डीचे पुढारीपण व रोम काबीज करण्याची लोकसमाजाची उत्कट इच्छा, या दोन गोष्टींपुढे मुत्सद्यांच्याने लवकरच निभाव लागेनासा झाला. इ. स. १८६० सालीं इटालियन पार्लमेंटाची नवीन निवडणूक झाली. त्यांत ग्यारीबाल्डीस लोकांचेतर्फे प्रतिनिधि निवडून देण्यांत आले होते. त्याप्रमाणे ता. १८ एप्रिल रोजी तो पहिल्याने सभासद या नात्याने पार्लमेंट सभेस गेला. पार्लमेंटांत त्याचा पोषाख नेहमीप्रमाणेच तन्हेवाईक होता व त्याजकडे सर्व लोक टकमक पाहात होते. या वेळी पार्लमेंटपुढे ग्यारीबाल्डीच्या बिनपगारी शिपाई लोकांसंबंधाने प्रश्न होता. ग्यारीबाल्डीने व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजास आपल्या विश्वासू शिपायांबद्दल एक मागणी केल्याचे मागे सांगितलेंच आहे. ही मागणी राजाने अद्यापि मान्य केली नव्हती. ग्यारीबाल्डी व त्याचे शिपाई यांजबद्दल सरकारी अधिकान्यांस एक प्रकारचा मत्सर वाटत असल्यामुळे, ते त्यासंबंधानें कोणतीहि गोष्ट निघाली असतां राजाचे मन दूषित करण्यास सदोदित तयार असत. ही गोष्ट ग्यारीबाल्डीचे मनास नेहमी लागून राहिलेली असे. यामुळे वर सांगितलेला विषय पार्लमेंटपुढे निघाला तेव्हां उभय पक्षांची मनें क्षुब्ध झालेली होती. बराच वादविवाद होऊन कौन्ट कॅहूर यास वर्मी लागतील असे शब्द भर सभेत बोलून ग्यारीबाल्डी उठून गेला; परंतु तेथे तेवढ्यावरच संपले. पुढे लवकरच ग्यारीबाल्डीच्या सूचने- प्रमाणे देशांतील सैन्याची संख्या वाढविण्याचे पार्लमेंटनें बहुमतानें कबूल केल्यामुळे ग्यारीबाल्डीचा राग बराच निवाला. व्हिक्टर-ए-मॅन्युएल राजानें मध्यस्थी करून कॅव्हूर व ग्यारीबाल्डी यांची मुलाखत खाजगी रीतीने घडवून रोमवरील स्वारी आणून त्यांचे सख्य होण्याचे कामी खटपट केली; व तीस यश येऊन ग्यारी- बाल्डीचें मन कॅव्हूरविषयी बरेंच निवळले. परंतु या दोन देशभक्तांच्या दिल- जमाईचा फायदा राष्ट्रास फार वेळ मिळाला नाही. कारण एक महिन्याचे आंतच कॅव्हूर मरण पावला. कॅव्हर याने आजपर्यंत केलेली देशसेवा यापुढे होणाऱ्या देशसेवेहून फारच अधिक महत्त्वाची होती हे खरें; तथापि त्याच्या मृ यूमुळे इटलीची पुष्कळच हानि झाली यांत कांहीं संशय नाही. कॅव्हूर याचे जागीं मुख्य प्रधान रेंटेझी याची नेमणूक झाली. रोमवर स्वारी करण्याबद्दल काही तरी हालचाल झालीच पाहिजे, नाही तर लोक दंगा केल्याशिवाय खास सोडीत नाहीत, असे पाहून रॅटेझी याने एक युक्ति काढली. व्हिक्टर-ए-मॅन्युएल रोमवर स्वारी करण्यास तयार आहे व त्या कामावर ग्यारीबाल्डीची योजना करावयाची आहे, असा बहाणा करून त्याने ग्यारीबाल्डीची भेट घेतली. या भेटीमध्ये असे ठरले की, ग्यारीबाल्डीने आपले वजन खर्च करून, रॅटेझीच्या पक्षास मदत करावी व तिचा मोबदला म्हणून रॅटेझी याने उलट ग्यारीबाल्डीस रोमवर स्वारी करण्यास साहाय्य करावें. अर्थात् रॅटेझीचे पोटांत कपट होते; परंतु तें ग्यारी- बाल्डीस उमजून आले नाही व तो स्वारीचे तयारीस एकदम लागला. याच सुमारास खुद्द व्हिक्टर-ए-मॅन्युएल याचे स्वदस्तूरचे पत्र ग्यारीबाल्डीस आले. त्यांतील आशयहि ग्यारीबाल्डीने रोमवर स्वारी करावी असाच होता असे म्हणतात. कसेंहि असले तरी, आपण स्वारीचे काम हाती घेतल्यास आपणांस राजाकडून व प्रधानाकडून गुप्त रीतीने का होईना परंतु मदत खास होणार, अशी ग्यारीबाल्डीची पक्की खात्री होती. लवकरच ग्यारीबाल्डीस इटलीच्या राजपुत्रांस बरोबर घेऊन पालेर्मो येथे जाणे भाग पडले. त्या वेळी तेथील लोकांनी ग्यारीबाल्डीचा जयजयकार केला. लष्करी अधि. काऱ्यांनी त्यास मेजवान्या दिल्या. नागरिकांनी त्यास मानपत्र दिले. आता ग्यारीबाल्डी हा रोमवर लवकरच चालून जाणार याबद्दल कोणासहि शंका उरली नाही. सरकारी अधिकाऱ्यांचीहि अशी खात्री झाली होती की, जरी उघड हुकूम सुटलेले नाहीत तरी ग्यारीबाल्डीने आरंभिलेल्या कार्यात राजाचें गुप्तपणे अंग खास आहे. या सर्व गोष्टींमुळे या वेळी थोडेसें साहस करणे हे आपले कर्तव्य आहे असें ग्यारीबाल्डीस वाटू लागले. पार्लमेंट सोडल्यावर ग्यारीबाल्डी थेट रोमच्याच वाटेला लागला. त्याचे ११८ ग्यारीबाल्डी भोंवतीं तरुण, उत्साही व शूर असे बरेच लढाऊ लोक येऊन मिळाले. मार्माला येथें तो जातो, तोच गांव अधिकारी व इतर नागरिक रणवाद्य वाजवीत त्यास सामोरे आले व मोठ्या थाटाने त्यास गांवांत घेऊन गेले. ही सर्व बातमी हां हां म्हणतां जिकडे तिकडे पसरली. फ्रेंच बादशाहा नेपोलियन याने ताबडतोब आपला वकील व्हिक्टर-ए-मॅन्युएलच्या दरबारी पाठविला व तुम्ही ग्यारीबाल्डीस कैद करून आणण्याचे हुकूम एकदम सोडा असें त्याने सक्तीचे बोलणे चालविलें. रॅटेझी याच्या कपटी कारस्थानाचे सिद्धीस ही गोष्ट इष्टच होती; तो परेंच' बादशहाचे म्हणण्यास एकदम कबूल झाला. परंतु खुद्द राजाचे मध्यस्थीमुळे ग्यारीबाल्डीस कैद करण्याचा बेत कांही वेळ तहकूब झाला. मात्र त्या शहाण्या राजाने येवढें केले की, गुप्तपणे ग्यारीबाल्डीस एक पत्र लिहून त्यास असे कळविलें कीं, पालेर्मों येथे केलेल्या भाषणाप्रमाणे उघड भाषणे करणे चांगलें नाहीं, व पुन्हा तशी भाषणे कानावर आली तर फ्रेंच बादशहाचे आग्रहावरून तुम्हांस कैद करणे भाग पडेल! परंतु ग्यारीबाल्डीने ही सूचना मनावर न घेतल्यासारखें केले. त्याने लवकरच जाहीरनामा काढून असें प्रसिद्ध केले की, १८४९ साली रोम येथे जी राज्यक्रांति झाली होती त्या वेळी सर्व नागरिकांच्या मताने आपणांस जो गव्हर्नरचा अधिकार देण्यात आला होता, तो अधिकार बजावण्यास आपण जात आहों, व अशा रीतीने आपल्या रोमवरील स्वारीत गैरकायदा असें कांहींहि नाही. ही सबब पोकळ होती हे सांगावयास नकोच. परंतु कांहींहि सबब किंवा कुरापत काढिली तरी ती चालण्याइतकें लोकमत ग्यारी- बाल्डीस या वेळी अनुकूल झाले होतें येवढे मात्र वरील जाहीरनाम्यावरून स्पष्ट सिद्ध होतें. लोकमत अनुकूल होतें तसेंच अधिकारीवर्गाचे मतहि त्यास गुप्तपणे अनुकूल होते. परंतु फ्रेंच बादशाहाचे जेव्हां फारच टुमणे लागले, तिव्हां राजास ठिकठिकाणच्या लोकांना ग्यारीबाल्डीस मदत न करण्याविषयींचे हुकूम सोडणे भाग पडले. परंतु ते हुकूम निर्जीव होते हैं तेव्हांच दिसून आले. कॅटनिया या गांवीं ग्यारीबाल्डी येण्यापूर्वीच वरील प्रकारचा एक हुकूम येऊन पोचला होता; परंतु तो बाजूस ठेवून लोकांनी ग्यारीबाल्डी येतांच होसेने त्याचें आगतस्वागत केले व त्यास उघड मानपत्रहि दिले. त्यामध्ये ज्या कार्यास ग्यारीबाल्डी हा निघाला होता ते लवकरच सफल होवो अशी रोमवरील स्वारी आशा व्यक्त केली होती. या ठिकाणी सरकारी लष्करांतील कित्येक शिपाईहि आपापल्या जागांचे राजीनामे देऊन ग्यारीबाल्डीच्या स्वयंसेवकांत येऊन मिसळले. या सुमारास त्याचेजवळ कामापुरतें सैन्य जमा झाले होते. कॅटेनिया येथून पुढे जाण्यास सामुद्रधुनी उतरावी लागते. परंतु ग्यारीबाल्डीस इटा. लियन आरमाराची मदत मिळणे शक्य नव्हते. तेव्हां त्याने एक अजब पुक्ति लढविली. एके दिवशी एका लहानशा जहाजांत बसून त्याच बंदरांत नांगरलेल्या फ्रेंच व इटालियन जहाजांवर ग्यारीबाल्डीने अवचित हल्ला केला. त्या जहाजांच्या कप्तानांस कैद केले व त्यांत त्याने आपलें सैन्य भरलें. ही गोष्ट संध्याकाळी घडून आली व लगेच मध्यरात्री त्याने जहाजें हांकारली आणि सकाळपर्यंत प्रवास करून तो मोलटो येथे किनान्यास लागला. दुसरे दिवशी त्याने एक जाहीरनामा काढून लोकांस असें फर्माविलें की, राजाज्ञा मला नेहमी शिरसावंद्य आहे, परंतु राजाच्या मंत्रिमंडळास मात्र मी मुळीच जुमानणार नाही. हे मंत्रिमंडळ स्वदेशभक्तिपराङमुख झालेलें आहे, व फ्रेंच बादशाहा दासानुदास बनलेले आहे. यास्तव मंत्रिमंडळाचे कांहींहि न ऐकतां रोमवरील स्वारीस सर्वानी मदत करावी. इकडे हेच मंत्रिमंडळ आपल्यास पकडण्याकरितां कारस्थानांचे जाळे विणीत बसलेले असून लवकरच आपणांस त्यांत अडकून पडावयाचे आहे हे ग्यारीबाल्डीच्या स्वप्नींहि आले नसेल. त्याचे पाऊल जसजसे पुढे पडत चाललें तसतसें फ्रेंच बादशाहाचें टुमणे अधिकच लागू लागले. शेवटी ग्यारीबाल्डीस प्रतिबंध करण्याकरितां सैन्य पाठविणे हे काही केल्या टळत नाहीं असें पाहून व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने हुकूम सोडले. या सैन्याची ॲसप्रोमॉटी या ठिकाणीं गांठ पडली. ग्यारीबाल्डीचे सैन्यास चारहि बाजूंनी वेढा पडला होता. राजाचे सैन्यास चुकवून जातां आले तर जावें, पण लढाई करूं नये असें ग्यारीबाल्डीनें मनाने ठरविले होते. पण हुकूम अमान्य करून त्याचे सन्यांतील तरुण शिपायांनी गोळीबारास सुरुवातहि केली. हे पाहून तो दोन्ही सैन्यांचे मध्ये झाला. त्याचे दोहों बाजूस असणाऱ्या शिपायांस जखमा झाल्या; उभयपक्षांकडून परस्परांवर गोळयांचा पाऊस पडत होता. अशा स्थितीत ग्यारीबाल्डी हा आपल्या घोडयावर ताठ उभा राहून हात वर करून गोळीबार बंद करा, बंद करा, असे ओरडून सांगू लागला. त्याप्रमाणे १२० ग्यारीवाल्डी भेटला व राजाकडून गोळीबार लवकरच बंद झाला. परंतु तेवढ्या अवधीत त्याला स्वतःला दोन तीन गोळ्या लागल्या. तथापि तो तसाच थोडा वेळ उभा राहून डोक्यावरील टोपी हातात घेऊन व ती फिरवून “गोळीबार बंद करा" असे ओरडून सैन्यास सांगत होता. काही वेळाने त्याच्या लोकांनी त्यास उचलून एका झाडाखाली नेले. लवकरच सरकारी सैन्याचा मुख्य अधिकारी त्याला येऊन आलेला हुकूम त्याने ग्यारीबाल्डीस फर्माविला. या हुकुमाप्रमाणे त्याच्या सर्व सैन्याची हत्यारे काढून घेण्यात येऊन त्यांना घरोघर जाण्याची आज्ञा मिळाली! खुद्द ग्यारीबाल्डीस कॅप्रेरा बेटांत नेऊन सोडण्याचा हुकूम झाला होता. त्याप्रमाणे संध्याकाळच्या थंड वेळी एक डोली करून वर गार गवत व झाडपाला बांधून तींत ग्यारीबाल्डीस निजविलें व त्याचे लोकांनी ती डोली सिला नांवाच्या बंदरापर्यत मोठ्या प्रेमाने आपल्या खांद्यांवरून नेली. तेथे त्यांनी त्यास जहाजांत घातले. जहाज चालू झालें तेव्हां ग्यारीबाल्डीच्याने राहवेना. अंग ठणकत होते तरी तशा स्थितीत तो ताडकन उभा राहिला व मोठ्याने ओरडून म्हणाला, "चला, रोमला चला. परंतु इतके शब्द बोलल्याबरोबर त्यास झीट येऊन तो खाली पडला. ग्यारीबाल्डी जखमी झाल्याची बातमी तेव्हांच युरोपभर पसरून हाहाःकार उडाला व जिकडे तिकडे सभा भरून दुःखप्रदर्शक ठरावहि पास झाले. इंग्लंडमध्ये तर १,००० पौंड वर्गणी एकदम जमा झाली व लोकांनी सुप्रसिद्ध डॉक्टर पारट्रिज यास ग्यारीबाल्डीला औषधोपचार करण्याकरितां पाठविलें. ग्यारीबाल्डीचें जहाज पॅरिगनॅन्टे येथील बंदरांत पोचल्यावर जो देखावा दिसला तो तर हृदयद्रावक होता. कोणी त्याकरितां फळफळावळ, कोणी फुलें, कोणी काहीं, कोणी काहीं असें आणिलें होतें. बायकामुलें तर त्याजभोंवतीं जमून त्याच्या वस्त्राच्या टोकांची चुंबने घेऊ लागली. तेव्हां त्याला व लोकांना दोघांनाहि रडू आले. मग त्यांचे समाधान करण्याकरितां ग्यारीबाल्डी त्यांस धीर देऊन म्हणाला, “माझ्या प्रिय मित्रांनो, धीर धरा. असें रडतां कां ? अद्यापि ग्यारीबाल्डी जिवंत आहे ना? झाले तर मग." थोड्याच दिवसांत इटली, फ्रान्स व इंग्लंड येथून ग्यारीबाल्डीला औषधोपचार करण्याकरिता आलेले डॉक्टर लोक एकत्र जमले. त्या सर्वांनी मिळून आपली शिकस्त केली तरी बरेच दिवसपर्यंत त्याच्या जखमा भरून निघाल्या नाहीत किंवा त्याचे दुःखहि राहिले नाही. त्याच्या प्रकृतीची खबर दररोज जिकडे तिकडे तारेनें .
रोमवरील स्वारी कळविण्यात येई. तो चांगला बरा होईपर्यंत सर्व युरोपखंडभर एक प्रकारची उदासीनता व अस्वस्थता येऊन पसरली होती. त्याच्या दुखण्याइतका दुसऱ्या कोणाच्याहि दुखण्याबद्दल लोकांत इतका गवगवा झाला नसेल. प्रधान रॅटेझी यास तर या प्रकरणास आपण कोठून हात घातला असें झालें! अॅसप्रोमांटीच्या लढाईनंतर इटालियन पार्लमेंटाची जी पहिली सभा भरली तिजमध्ये फारच मोठा कडाक्याचा वाद झाला. ग्यारीबाल्डीस यःकश्चित् गुन्हेगाराप्रमाणे वागविण्यांत आले, त्याची अनास्था झाली, वगैरे दोषारोप करून प्रजापक्षीय सभासदांनी मंत्रिमंडळावर खूपच तडाखा उडविला. परंतु सरकारी अधिकाऱ्यांकडून जरी त्याची कितीहि अनास्था झाली, तरी लोकांनी त्याजबद्दल जी कळकळ दाखविली तिच्या योगाने ती सर्व भरून निघाली असेल यात शंका नाही. त्याच्या उशापायथ्याशी बसून त्याची शुश्रूषा करण्यास मिळावी अशाबद्दल शेंकडों स्त्रियांचे श्रम फुकट गेले असतील. कोण ती गर्दी ! एका गरीब भोळ्या इंग्रज बाईनें असें ऐकले होते की, इंग्लिश मनुष्याचा शब्द ऐकल्यापासून ग्यारीबाल्डीस बरे वाटते. तेव्हां आपला शब्द ग्यारीबाल्डीस ऐकवावा या हेतूने ती आपला कामधंदा सोडून बरोबर आपल्या मुलीला घेऊन, कित्येक कोसांवरून ग्यारीबाल्डी होता तेथे आली होती. कित्येक खाजगी डॉक्टर आपापले धंदे टाकून ग्यारीबाल्डीला औषध देण्यास सांपडावे म्हणून आले होते. या व इतर लोकांची मिळून इतकी विलक्षण गर्दी झाली की, हजारों निरनिराळया सबबी सांगून लोकांस माघारी लावून देतां देतां पुरेवाट झाली. अॅसप्रोमॉटीच्या लढाईनंतर पहिले काही दिवस ग्यारीबाल्डी हा बंडखोर या नात्याने तुरुंगांत असल्यासारखा होता. परंतु लवकरच व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने त्यांस व त्याजबरोबरच्या बहुतेक लोकांस माफी दिली; तेव्हां लोक आपापल्या घरी गेले. ग्यारीबाल्डी हाहि स्वेच्छेनें स्पेझिया येथे व तेथून पुढे पिझा येथे गेला. या ठिकाणी त्याचे जखमेंतील गोळी काढण्यात आली, व तेथून तो बरा होण्याचे मार्गास लागला. या आनंददायक गोष्टीचे स्मरणार्थ पिझा येथील लोकांनी एक बैठा मनोरा बांधविला व त्यावर खालील अक्षरें खोदविली. अॅसप्रोमाटी येथील लढाईत जखमी झालेला ग्यारीबाल्डी येथे येऊन बरा झाला." दुसरे दिवशी सकाळी पिझा येथील गव्हर्नराने हत्यारबंद लोकां- कडून तो मनोरा पाडविला, पण लागलाच लोकांनी फिरून दुसरा उभारला.
१२२ ग्यारीबाल्डी मात्र त्याजवरून असप्रोमाँटी हे उद्वेगजनक शब्द वगळले होते. पुढे गव्हर्नरा. नेहि त्याजविरुद्ध कांहीं उचल केली नाही. त्या दिवशी रात्री पिझा येथील नाटकगृहांत एक प्रयोग व्हावयाचा होता; परंतु जाहीर केलेला प्रयोग करण्याचे ऐवजी प्रेक्षकजनांचे इच्छेने सर्वांनी ग्यारीबाल्डीचे स्तोत्रच वरचेवर म्हणून प्रयोगाची सर्व वेळ घाल. विली. पायांतील गोळी निघाल्यामुळे ग्यारीबाल्डी बरा होण्याचे पंथास लागला होता. त्यास पाहण्याला येणाऱ्या लोकांकडून त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या निजावयाच्या खोलीच्या दाराला एक भोंक पाडून ठेविलें होतें, व सिंहास ज्याप्रमाणे पिंजऱ्याचे फटीतून पाहतात, त्याप्रमाणे या पुरुष. सिंहास पाहून लोकांनी परस्पर निघून जावें अशी व्यवस्था करण्यांत आली होती. तथापि लोकांची गर्दी इतकी कांहीं विलक्षण होती की, नुसत्या गल. बल्याने त्याचे दुखणे उलटेल की काय, अशी भीति वाढू लागली. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने आपल्या कॅप्रेरा बेटास परत जाण्याचे ठरविलें. तो जाण्याचे वेळी लोकांनी मोठी रोषणाई केली व त्याला पोचविण्यास बायकामुलेसुद्धां समुद्रांत आंतपर्यंत गेली होती. इटालियन प्रधान रॅटेझी याचे कपटामुळे ग्यारीबाल्डीचा रोमवर जाण्याचा बेत फसला ही गोष्ट खरी; तथापि या कपटाचा परिणाम खुद्द रॅटेझी यासहि भोगावा लागला. प्रधानमंडळाचे वर्तन ग्यारीबाल्डीशी लबाडीचे होतें असें जो तो उघड बोलू लागला. यामुळे लवकरच रॅटेझीसहवर्तमान प्रधानमंडळास राजीनामा द्यावा लागला. पुढील वर्षी रशियाने पोलंडची बरीच दुर्दशा केली यामुळे पोलंडबद्दल चोहोंकडे सहानुभूति उत्पन्न झाली होती. याहि वेळी ग्यारीबाल्डीचे मनांत आपण पोलंडांत जावें व तेथील लोकांस बंड करण्यास मदत करावी असें एक वेळ आले होते; परंतु काही कारणां. मुळे तो त्याचा बेत मनचा मनांतच राहिला.
भाग १८वा इंग्लंडची सफर "To be the guest of England after having been the liberator of Italy-is beautiful and grand." - Victor Hugo ग्यारीबाल्डीला इंग्लिश लोक फार आवडत. त्यांची स्वातंत्र्यप्रियता, त्यांचा उद्योग, त्यांची सुव्यवस्थित राज्यपद्धति इत्यादि गोष्टीं- मुळे सर्व युरोपखंडांत अधिक सुधारलेले लोक कोण, तर इंग्लिश असे त्याचे मत झाले होतें; व तें तो बोलूनहि दाखवीत असे. यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा, इंग्लंडच्या लोकांसहि ग्यारीबाल्डी विशेष आवडत असे. इंग्लंडच्या अशिक्षित लोकांस त्याच्या पराक्रमांचे मोठे कौतुक वाटे; व नेपल्समधील अनन्वित जुलूम त्याने मोडला यामुळे सुशिक्षित लोकांचेंहि प्रेम त्याजवर बसले होते. कधी काळी पोपमहाराजांचे बंड जर कोणी मोडील तर तो ग्यारीबाल्डीच मोडील असेंहि त्यांस वाटू लागले होते. या. शिवाय वेळोवेळी त्याने इंग्लिश लोकांशी आपला स्नेहभाव अनेक मार्गांनी व्यक्त केलेला होता. इ. स. १८५७ ते ६० या तीन वर्षांत ग्यारीबाल्डीचे सिसिलींतील पराक्रम घडून येण्यापूर्वी त्याच्या अद्भुत कृत्यांची नाटकेहि इंग्लिश रंगभूमीवर होत असत. कॅप्रेरा बेटांत निवांतपणे काही दिवस गेल्यावर ग्यारीबाल्डीने एक वेळ इंग्लंडची सफर करून यावे अशी त्याच्या मित्रांनी गोष्ट काढली. या मित्रांचा हेतु, कदाचित् इंग्लंडला गेल्याने त्याचा परदेशांत जयजयकार व्हावा, व असप्रोमाटी येथे घडून आलेल्या गोष्टीचा जगास विसर पडावा असा असेल नाहीं असें नाहीं; विशेषतः आपल्या स्नेहयांच्या आग्रहानेंच त्याने इंग्लंडची सफर करण्याचा निश्चय केला. तथापि त्याच्या स्वतःच्या मनांतील अंतस्थ हेतु मात्र असा होता की, इंग्लंडांतील मुत्सद्दयांच्या भेटी घेऊन स्वदेश- कार्यास काही मदत झाली तर पाहावी.
१२४ ग्यारीबाल्डी इंग्लंडांतील प्रत्येक मनुष्याच्या मनांत ग्यारीबाल्डी हा इंग्लंडास येणार याबद्दल फार आनंद झाला. परंतु राजकीय दृष्टीने पाहतां त्याचा आदरसत्कार करण्यास एक दोन प्रतिकूल गोष्टी होत्या. ग्यारीबाल्डी हा लोकपक्षाचा कट्टा अभिमानी; तेव्हां त्याचा जयजयकार झाला असतां आधीच बेभान असलेल्या लोकपक्षाचे डोक्यांत वारें शिरून बड्या लोकांविरुद्ध बंडाळी होईल अशी काही जणांस भीति वाटत होती. काहींचे म्हणणे असे होते की, ग्यारीबाल्डी कसाहि असला तरी त्याने आपल्या राजाचा हुकूम मोडला होता; अर्थात् तो बंडखोर ठरला होता व हल्ली जरी त्यास क्षमा करण्यांत आली होती, तरी त्याचा उघडपणे सत्कार करणे हे एकंदरीने बेकायदेशीरपणास उत्तेजन देण्या- सारखें होय. सर्वांत मोठी नड होती ती अशी की, ग्यारीबाल्डी हा रोमवर स्वारी करण्यास निघाल्यामुळे फ्रान्सचा बादशहा नेपोलियन याचा तो उघड शत्रु बनला होता; व प्रस्तुत प्रसंगी फ्रान्सचे मन दुखविण्याची इंग्लंडास सोय नव्हती. या व अशा अनेक कारणांमुळे ग्यारीबाल्डीने इंग्लंडास यावे अशा- बद्दल इंग्लंडच्या प्रधानमंडळाकडून मन मोकळे करून संमति मिळेना. तथापि कांही असले तरी ग्यारीबाल्डीस आणावयाचाच असा त्याच्या कांहीं इंग्लिश मित्रमंडळीने निश्चय केला. मात्र ही बातमी इटालियन सरकारपासून अगदी गुप्त ठेवण्यांत आली होती. मार्च महिन्यांत एके दिवशी सकाळी ग्यारीबाल्डी गुप्तपणे उठून माल्टा येथे निघून गेला व तेथें रिपन नावाच्या इंग्लिश आगबोटीवर चढला. इंग्लंडचे किनाऱ्यास लागण्याचे आदले दिवशी आगबोटीवरील सर्व लोकांनी मिळून या लोकोत्तर पाहुण्यास बडी मेजवानी दिली; साउथैमटन येथे आग- बोट धक्क्याला लागतांच, प्रथमतः इंग्लंडांतील इटालियन लोकांचे प्रतिनिधींनी त्यास सामोरें येऊन त्याचा सन्मान केला. नंतर साउथमटनचा लॉर्ड मेयर सामोरा येऊन त्यानेंहि त्याचे स्वागत केले. दुसरे दिवशी सकाळी ग्यारी- बाल्डीने ठिकठिकाणाहून आलेल्या लोकनियुक्त प्रतिनिधींची भेट घेतली. संध्याकाळी साउथमटन टाउनहॉलांत त्यास मेजवानी देण्यात आली व त्या दिवशी लोकांनी जिकडे तिकडे दीपोत्सव केला. यानंतर लॉर्ड हेनिसन, मि. सीली वगैरे खाजगी गृहस्थांच्या भेटी-परतभेटी वगैरे झाल्यावर ग्यारीबाल्डी लंडनला जाण्यास निघाला. स्टेशनवर तांबड्या रंगाचा पोषाख केलेल्या स्त्री-पुरुषांची जिकडे तिकडे गर्दी झाली होती. रेल्वे कंपनीने त्याजकरितां एक .
इंग्लंडची सफर १२५ . स्वतंत्र सुंदर डबा दिला होता व त्यावर तोरणे लाविली होती. लंडनला पोचण्यापूर्वी वाटतील स्टेशनांवरून ठिकठिकाणचे लॉर्ड मेयर येऊन त्याचा आदरसत्कार करून गेले. जेथे जेथे गाडी उभी राहण्याची होती, तेथे तेथे हजारों लोक सांपडेल त्या उंच ठिकाणावर दिपमाळीसारखे ओथंबले होते. मुख्य स्टेशनाला गाडी पोचण्याचे सुमारास शेकडों संस्थांचे व सभांचे प्रति- निधी प्लॅटफॉर्मवर तयार होतेच, व गाडीखालीं पाय ठेवल्यापासून स्वागतपर मानपत्रांस व हारतुन्यांच्या गर्दीस जी सुरुवात झाली ती तो मुख्य ठिकाणास जाऊन पोचेपर्यत पुरली होती. तात्पर्य, ग्यारीबाल्डीने खुद्द इंग्लंडला स्वातं- त्र्याची जोड मिळवून दिली असती तरी यापेक्षा त्याचा अधिक आदरसत्कार होणे शक्य नव्हते. त्या दिवशी इटली स्वतंत्र होण्यास इंग्लंडची मनांतून सोळा आणे अनुकूलता आहे ही गोष्ट सर्व यूरोपास कळून आली. दुसरे दिवशीं ग्यारीबाल्डीने राणी सरकारचे प्रधान लॉर्ड पामर्टन, लॉर्ड रसेल व इतर कांहीं सरदारांच्या भेटी घेतल्या. लंडनतर्फे मानपत्र दिल्यावर नागरिकत्वाचे हक्क त्याला देण्यात आले. बिलोरी राजवाड्यामध्ये लोकांनी त्यास एक तरवार नजर केली. लंडनचे पाहण्यासारखे देखावे त्याने पाहिले व अशा रीतीने १५ दिवस मोठ्या गडबडीत व मानसन्मानाच्या गर्दीत गेले इंग्लंडांतील व स्कॉटलंडांतील सर्व मुख्य शहरांतून त्याला आमंत्रणे आली होती. व तिकडे प्रवास करण्याचे ग्यारीबाल्डीचे दिवस वगैरे ठरून गेले होते, परंतु इतक्यांत एकदम बातमी पसरली की, 'डॉक्टर लोकांच्या सल्ल्या'ने ग्यारीबाल्डीस इंग्लंडांतून लवकरच परत जावे लागणार आहे. डॉक्टरांचा सल्ला हे अर्थातच ढोंग होतें. खरें कारण असे होते की, फ्रान्सच्या बादशहास इंग्लंडने आपल्या शत्रूचा आदरसत्कार केल्याबद्दल संताप आला होता; व तो शमविण्यास इंग्लिश प्रधानमंडळानें ग्यारीबाल्डीची लवकर उचलबांगडी करून देण्याचे कबूल केले होते. यामुळे लवकरच ग्यारीबाल्डीस इंग्लंडाहून परत फिरावे लागले. निघण्याचे पूर्वी त्याची व ग्लॅडस्टनसाहेबांची मुलाखत झाली. निघतांना त्याने एक जाहीरपत्रक प्रसिद्ध करून त्याचे द्वारे सर्व इंग्लिश लोकांचे फार फार आभार मानिले. इंग्लंडला गेल्याने, म्हणजे तेथील लोकांनी त्याचा जयजयकार केल्याने, ग्यारीबाल्डीच्या स्नेहयांचा हेतु बराच सिद्धीस गेला. त्याची सर्व युरोपखंडांत पूर्वीहून अधिक मान्यता झाली. परंतु खुद्द ग्यारीबाल्डीचा ग्यारीबाल्डी अंतस्थ हेतु फारसा सफळ झाला नाही. इंग्लिश लोकांची एकंदरीने इटलीशी असलेली सहानुभूति दृढ झाली हे खरें; तथापि इंग्लिश मुत्सद्दयांनी त्यास पुढे मदत करण्याचे काहीच स्पष्ट आश्वासन दिले नाहीं ! भाग १९ वा ऑस्ट्रियाशी तिसरी लढाई . पंके निमग्ने करिणि भेको भवति मूर्धगः ॥ ता. १९ जून १८६४ रोजी ग्यारीबाल्डी आपल्या मुलांसह व स्नेहयांसह कॅप्रेरा बेटास विश्रांति घेण्यास परत आला. परंतु प्रथम कांही दिवस ल्याची प्रकृति दुरुस्त न होतां खालावतच चालली. कालांतराने तो बरा झाला. कॅप्रेरा बेटाची शुद्ध हवा, तेथील शांततेचे उद्योग, प्रेमळ स्नेही, व गोड मुलें यांजकडून होणारी शुश्रूषा, व सर्वांत मुख्य म्हटलें म्हणजे मनाची स्वस्थता, यांचे योगाने त्याचे प्रकृतीस हळुहळू गुण पडत चालला. तो बरा होतो न होतो तोच ऑस्ट्रिया व हंगेरी यांमध्ये लढाई उपस्थित होऊन त्याची स्वस्थता भंग पावण्याचा एक प्रसंग आला होता. परंतु त्याचे स्नेहयांनी त्यास हालचाल न करूं दिल्याने तो टळला. इकडे त्याचा शेतकीचा उद्योग सतत चालू होताच व त्याचे योगाने वर्षअखेरीचे पूर्वीच ग्यारीबाल्डीचे अंगीं पूर्वीची ताकद आली. येथपर्यंत वर्णिलेला ग्यारीबाल्डीच्या चरित्राचा भाग हाच विशेष महत्त्वाचा होय. यापुढे ग्यारीबाल्डी एक दोन प्रसंगी सैन्याचे आधिपत्य स्वीकारून रणांगणांत गेला व नेहमीप्रमाणे त्याला यशहि आले, नाहीं असें नाहीं. परंतु आजपर्यंतच्या इटलीच्या स्थितीत व यापुढील स्थितीत एक मुख्य फरक पडला तो असा की, पूर्वी जिकडे तिकडे सामसूम असून योजिलेल्या स्वदेशकार्यास उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक साहसी कृत्याची उठावणी ग्यारीबाल्डीस आपल्या शिरावर जबाबदारी घेऊन किंबहुना शिर देण्यास तयार होऊन करावी लागे. परंतु आजपर्यंत त्याने अविश्रांत श्रम घेऊन केलेल्या मेहनतीमुळे खरें देशकार्य कोणते व्हावयास पाहिजे याबद्दल इटलीतील राजाच्या, मंत्रिमंडळाच्या, व प्रजाजनांच्या- -सर्वांच्याच मनांत चांगला ऑस्ट्रियाशी तिसरी लढाई . प्रकाश पडला होता, व त्या कार्याची बऱ्याच अंशाने सिद्धीहि झाली होती. ऑस्ट्रियाचे जुलमापासून इटली सोडवून संयुक्त व स्वतंत्र केला पाहिजे, अशा विचाराचे राजकीय धोरण आतां इटलीच्या दरबारी ठरून गेलें होतें. शिवाय आजपर्यत ग्यारीबाल्डीने केलेल्या स्वार्थत्यागानें, त्याचे सुयशाने व निस्सीम भक्तीने संतुष्ट होऊनच की काय, इटलीच्या भवितव्याची किंबहुना सर्व जगांतील घडामोडींचे नियमन करणारी अधिष्ठात्री देवता संतुष्ट होऊन तिने इटलीच्या स्वातंत्र्यास अनुकूल अशा अनेक गोष्टी युरोपखंडांत घडवून आणण्याचे योजिलें. यामुळे ग्यारीबाल्डीस यापुढे जातीने फारशी खटपट करण्याचे कारण पडले नाही. निर्वाणीचा मित्र येवढेच ग्यारीबाल्डीचें इंटलीच्या दरबाराशी नातें राहिलेले असल्यामुळे प्रसंग पडल्याखेरीज तो राजकीय गोष्टींत मन घालीत नसे. ग्यारीबाल्डी इंग्लंडहून परत कॅप्रेरा बेटास आल्यावर थोड्याच दिवसांनी खुद्द इटलीचा ऑस्ट्रियाशीं वादाचा एक प्रश्न उपस्थित झाला. मागें १८६० साली इटलीने ऑस्ट्रियाशीं तहनामा करून लॉबर्डी प्रांत घेतला होता व त्याऐवजी व्हेनेशिया प्रांत ऑस्ट्रियास देऊन टाकला होता. या बाबतीत ग्यारीबाल्डीसच राग आला होता असे नव्हे तर सर्व लोकांनाहि वर सांगितलेली देवघेव पसंत नव्हती. यामुळे १८६० साली झालेली चूक दुरुस्त करण्याच्या संधीकरितां इटली टपून बसला होता. ती संधि १८६६ साली ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्यामध्ये उपस्थित झालेल्या लढाईने आयतीच मिळाली. आज कित्येक दिवस ऑस्ट्रियाचें तेग कमी कमी होत चाललें होतें, व जर्मनी- मध्ये वर्चस्व राखण्याचे बाबतींत प्रशियासारख्या तरुण व होतकरू राष्ट्राशी हट्टाला पेटल्यामुळे ऑस्ट्रिया मोठ्या संकटांत सांपडलेला होता. असें पाहून व्हेनेशिया सोडवून घेण्याचा इटलीने विचार केला व प्रशियाशी आंतून सख्य केलें. १८६६ त इकडे ऑस्ट्रिया व प्रशियाचे युद्ध सुरू होतांच इटलीनेहि आपला हात साधून घेतला व लढाई सुरू केली. लढाई सुरू करण्याचे पूर्वी व्हिक्टर-ए- मॅन्युएल याने ग्यारीबाल्डीस आदराने पाचारण केले व त्यास आपल्या स्वयंसेवकांची वीस पलटणें एक वर्ष लढण्याच्या कबुलीने उभारण्यास सांगितले. त्याप्रमाणे सैन्य जमविण्याच्या तयारीस तो एकदम लागला. लढाईला निघावयाचे एवढी गोष्ट त्याने जाहीर करण्याचा अवकाश, त्याचे भक्त भराभरा देशाच्या चारहि कोपऱ्यांतून धावून १२८ ग्यारीबासी ~~ आले, व हां हां म्हणतां हजारों फौज तयार झाली. ऑस्ट्रियावर जाणाऱ्या सैन्याचे आधिपत्य जनरल लामार्मोरा यांजकडे सोपविण्यात आले होतें. तथापि लोकांचे विशेष विनंतीवरून सरकारांतून ग्यारीबाल्डीकडे स्वतंत्र अधिकार सोपविण्यांत आलेला होता. लामार्मोरा हा ग्यारीबाल्डी व त्याचे स्वयंसेवक यांचा मनांतून द्वेष करीत असे; व त्यांना चांगली हत्यारेंपात्यारे व पोषाख वगैरे देण्याचे कामी त्याने फार अडथळे घेतले. तथापि या कामी ग्यारीबाल्डीने आपले म्हणणे खरें केलें. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला या वेळी नाखूष करण्याची कोणाचीहि सोय नव्हती. ता. १९ जून १८६६ रोजी इटलीने लढाई सुरू केली. ऑस्ट्रियाशी लढाई सुरू करावयाची ती हंगेरीचे बाजूस करावी असें ग्यारीबाल्डीचे मनांत फार होते. परंतु लामार्मोरा याच्या हुकुमावरून त्यास टायरोल प्रांताकडे स्वारी करणे भाग पडले व तिकडे आपले सैन्य घेऊन ग्यारीबाल्डी निघाला. ग्यारीबाल्डीचे सैन्याचा पहिला महत्त्वाचा मुक्काम कोमो या बंदरावर झाला. या ठिकाणी त्याचे सैन्य बंदरांत उतरत असतां यथील लोकांनी त्याजवर फुले उधळलीं व दीपोत्सव केला. मध्यंतरी ठिकठिकाणी स्वयंसेवक येऊन त्याचे सैन्यांत भरतच होते. एके ठिकाणी म्युलिएनिया नांवाची एका १७ वर्षांची मुलगी एंटोतिओ डेलफिओरे या नांवाने व शिपायाचा पोषाख घालून ग्यारीबाल्डीचे सैन्यास जाऊन मिळाली ! आपल्या सैन्यांत कोणाहि बदमाषास थारा मिळू नये या हेतूनें ग्यारीबाल्डीने सुमारे ३०० लोक परत पाठविले. परंतु थोड्याच वेळांत त्याचे स्वयंसेवकांची संख्या १८ हजार झाली. लवकरच ऑस्ट्रियन सैन्य व ग्यारीबाल्डीचे सैन्य यांची या स्वारीतील पहिली चकमक झाली. तीत ग्यारीबाल्डीने ऑस्ट्रियन सैन्यास मागे हटवून आस- पासचा डोंगराळ प्रदेश हस्तगत केला. नंतर रॉकोडी आफनो या बळकट पहाडी किल्ल्यावर त्याचे शिपायांनी निकराने हल्ला करून तो सर केला. या हल्ल्यांत ग्यारीबाल्डीचे बरेच लोक पड़ले व खुद्द त्याचे पायास गोळी लागून तो जखमी झाला. यापुढे त्याला गाडीत बसूनच रणांगणांतून फिरावे लागले. रॉकोडी माफनोचा किल्ला हस्तगत झाल्यामुळे ग्यारीबाल्डीस आसपासच्या सर्व मुलुखांतून शत्रूचा निःपात झाला असे वाटले. परंतु एके दिवशी स्टोरो या गांवी दिवसाची टेहळणी करून संध्याकाळी मुक्कामास परत येऊन पाहतो तों भऑस्ट्रियन सैन्य गांवांत शिरलेले. ग्यारीबाल्डी येतांच दबा धरून बसलेल्या त्या ऑस्ट्रियाशी तिसरी लढाई सैन्याने बंदुकांचा एकदम मारा केला. या प्रसंगी ग्यारीबाल्डीच्या आसपास कित्येक गोळ्या येऊन पडल्या. मोठया शर्थीने तो बचावला. शत्रूचे सैन्य थोडकेंच असल्यामुळे त्यास हुसकून लावण्यास फारसा प्रयास पडला नाही. परंतु नजीक असलेला अॅपोला किल्ला सर न करता तसाच सोडून दिल्यामुळे शत्रूस दबा धरून बसण्यास स्थळ सांपडले असे दिसून आल्यावर ग्यारीबाल्डीने त्या किल्ल्याकडे मोर्चा वळविला. या किल्ल्यांतील अधिकान्यांस निदान सहा दिवस तरी किल्ला लढवावा असा हुकूम होता. ग्यारीबाल्डीनें तोफांचा भडिमार करून एका दिवसांत दोन हजार गोळे किल्ल्यात टाकले, तेव्हां किल्लेदाराचा माइलाज झाला. या किल्ल्यावर १३० कैदी व काहीं तोफखान्याचें सामान ग्यारीबाल्डीच्या हाती लागले. हे घेऊन व आसपासच्या मुलुखांतून घोडे पकडून आणून त्याने एक तात्पुरत्या घोडेस्वारांच्या तोफखान्याची तुकडी सजविली. यानंतर बिझेका हया ठिकाणी लढाई झाली तीत ग्यारीबाल्डीचे लोकांनी फारच शौर्य दाखविले. ही लढाई बारा तासपर्यत एकसारखी चालू होती व जय मिळण्यास ग्यारीबाल्डीला जवळजवळ एक हजार सैन्य खर्ची घालावें लागले. लढाईत त्याचे दोनही मुलगे व एकुलता एक जांवई आपापली पथकें घेऊन लढत होते. जावयास तर भारी जखमहि झाली. या लढाईचे योगाने आसपासचा सर्व मोठा प्रांत ग्यारीबाल्डीचे हाती येण्यासारखा होता; परंतु कर्मधर्मसंयोगाने याच सुमारास ऑस्ट्रिया व इटली यांचे मुख्य सैन्यांतील लढाई संपून तहहि करण्यांत आला होता. त्या तहानुरूप आल्प्स पर्वताचे पायथ्याशी लढाई थांबविण्याचा ग्यारीबाल्डीस हुकूम येऊन पोचला. त्यामुळे स्यास ऐन रंगाला आलेले लढाईचे काम सोडून द्यावे लागले. वास्तविक पाहतां लढाई बंद करणे हेच या वेळी इटलीस श्रेयस्कर होते. कारण भऑस्ट्रियन बादशहाने फ्रेंच बादशहा नेपोलियन याचे मध्यस्थीनें बादाचें मूळ जो व्हेनेशिया प्रांत तो इटलीस देण्याचे कबूल केले. लढाई बंद पडली व व्हेनिस परत मिळाले तरी एकंदरीने तहाच्या अटी ग्यारी- बाल्डीस फारशा पसंत नव्हत्या. तथापि आपल्या सैन्यास एकदम रजा देऊन व पार्लमेंटांत जाऊन तहाच्या अटीवरील वादविवादांत भाषणहि न करतां तो कॅप्रेरा बेटास परत आला. झालेल्या लढाईत एकंदरीने इटलीला फारसें भूषण आले असें त्यास वाटत नव्हते. यामुळे तो मनांतून बराच खिन्न व उदासवाणा झाला होता.. ९ भाग २० वा रोमवर अखेरचा धाडशी प्रयत्न "यत्ने कृते यदि न सिद्धचति कोऽत्र दोषः? ग्यारीबाल्डीस तह न आवडण्याचे मुख्य कारण असे होते की त्या तहान्वये रोम येथील पोपची सत्ता आहे तशीच अबाधित ठेवण्याबद्दल इटलीच्या राजानें फ्रान्सच्या बादशाहाशी करार करून आपणास बांधून घेतले होते; व रोम काबीज करून पोपच्या भव्य राजवाड्यावर व्हिक्टर-ए-मॅन्युएलचे निशाण उभारावयाचें ही कल्पना तर ग्यारीबाल्डीचे डोक्यांत एकसारखी भरून राहिली होती. वास्तविक पाहतां एकदा तह झाल्यानंतर रोम काबीज करण्याची उचल करणे हे लोकनियुक्त पार्लमेंट व खुद्द राजा यांचा हुकूम जाणूनबुजून तोडण्यासारखे होते; किंबहुना फ्रान्स देशाशी लढाई उपस्थित करून इटलीस धोक्यांत घालण्या. सारखे होते. परंतु ग्यारीबाल्डीच्या मनाची घटना अशीच कांहीं चमत्कारिक होती की, त्याच्या निस्सीम स्वदेशभक्तीने बहुधा त्याची सर्व विचारशक्ति ग्रासून टाकली होती; व धाडशी मनःप्रवृत्तीला जें म्हणून श्रेयस्कर दिसेल ते एकदम कोणाची भीडमुरवत न धरतां किंबहुना बलाबलाचा विवेकहि न करतां घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हाच काय तो मुत्सद्दीपणा असें त्यास वाटे. अशी स्थिति असल्यामुळे ग्यारीबाल्डीस कॅप्रेरा येथे लवकरच चैन पडेनासे झालें. १८६७ साली एके दिवशी अवचित उठून ग्यारीबाल्डी फ्लॉरेन्स येथे येऊन उतरला. या वेळी पार्लमेंटचे सभासद निवडण्याची धामधूम चाल होती. त्याचबरोबर रोमवर स्वारी करावी असें म्हणणाऱ्यांची खटपटहि जोरात सुरू होती. चार निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांकडून ग्यारीबाल्डीची पार्लमेंटांत निवडणूक झाली. लवकरच फ्लॉरेन्स येथे रोमवर स्वारी करावयाची तयारी करण्याकरितां एक सभा स्थापन होऊन तिनें ग्यारीबाल्डीस 'रोम येथील प्रजासत्ताक संस्थानचा सेनापति' असें नांव दिले. व्हिला कॅरोली या नांवाच्या गांवी त्याने फारच आवेशयुक्त असें भाषण केलें. रोम रोमवर अखेरचा घाडशी प्रयल हे सापाचें बीळ आहे, ते फोडून आंतील विषारी घाण धुवून टाकून इटली- चरील हा मोठा डाग काढला पाहिजे. पोप व उपाध्याय वर्ग हे जरीमरीच्या कृमीसारखे घातक आहेत, वगैरे विलक्षण विशेषणे देऊन त्याने सर्व लोक चिथावून सोडले. दुसरे दिवशी त्याचा मोर्चा एकदम रोमकडे वळला; व नेहमीप्रमाणे त्याच्याभोंवतीं भराभर सैन्य जमू लागले. ही हकीकत प्रधानमंडळास कळतांच बरीच खळबळ उडाली. फिरून एकवार ग्यारीबाल्डीस कैद केल्या- शिवाय गत्यंतर नाही असा निश्चय करून मुख्य प्रधान रॅटेझी याने एकदम गुप्त हुकूम सोडले. हुकमाची बजावणी मोठ्या चमत्कारिक रीतीने घडून आली! ग्यारीबाल्डीस कैद करण्याचे आदले रात्री त्यास सिनॅलंगा या नांवाच्या म्युनिसिपालिटीनें मेजवानी दिली. ही मेजवानी चालू असतां तेथे हजर असणाऱ्या अधिकाऱ्यांचे खिशांतच रॅटेझीचा गुप्त हुकूम होता. तथापि सर्व मेजवानी यथास्थित पार पडली व ग्यारीबाल्डी घरी जाऊन खुशाल निजला. पहाटेस चार वाजण्याचे सुमारास एकदम गडबड झाली व सरकारी अधिकारी घरांत शिरून त्यांनी ग्यारीबाल्डीस बिछान्यांतच कैद केले. त्यास नीट कपडेहि घालू न देता त्यांनी थेट आगगाडीत नेऊन त्यासः बसविलें. ही बातमी फ्लॉरेन्समध्ये कळतांच जिकडे तिकडे गडबड उडाली. वाटेंत ग्यारीबाल्डीने शिपायांस न कळतां पेन्सिलीने एक चिठ्ठी खरडून ती गुप्तपणे लोकांचे अंगावर टाकून दिली. या चिठ्ठींत असा मजकूर होता " रोमन लोकांस पोपनें गुलाम करून सोडलें आहे, व स्वातंत्र्यप्राप्तीकरिता गुलामांना बंड करण्याचा हक्क निसर्गसिद्ध आहे. रोमन लोक बंड करतील तर इटालियन लोकांस त्यांना मदत करणे जरूर आहे, मग एक सोडून पन्नास ग्यारीबाल्डी तुरुंगांत पडले तरी फिकीर नाही. ही चिठी वर्तमानपत्रकारांचे हाती येतांच त्यांनी ती जिकडे तिकडे प्रसिद्ध केली; अर्थात् रॅटेझीविरुद्ध फार गवगवा झाला व लोकांचे तडाख्यांतून वांचण्यास त्याला बऱ्याच युक्त्या योजाव्या लागल्या. आगगाडीचा प्रवास संपल्यावर ग्यारीबाल्डीस अलेसँड्रिया येथील किल्ल्यावर नेले व तेथून भारमाराच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सरकारी जहाजांतून त्याला केंप्रेरा येथे नेऊन सोडून देण्यांत आले. अशा रीतीने ग्यारीबाल्डी हे एक मोठे अवजड प्रकरण होऊन बसले होते.
१३२ ग्यारीबाल्डी त्याला धरावा तरी पंचाईत, मोकळा सोडावा तरी पंचाईत. मनांतून त्यावर सर्वांचे प्रेम; परंतु ते बाहेरून दाखवून सोय नाही. तेव्हां सर्वांत उत्तम युक्ति म्हटली म्हणजे मोकळा सुटलेला हत्ती जसा न मारतां, न दुखवितां युक्तीने चुचकारून ठाण्यावर नेऊन सोडतात, किंवा सर्कसमधील वाघ कसा तरी एकदांचा पिंजऱ्याच्या दारांतून आंत गेला म्हणजे जसा मोकळा सोडून देतात, तसेच ग्यारीबाल्डी अनावर झाला म्हणजे त्याला निरुपाय म्हणून कैद करून परत कॅप्रेरा बेटांत नेऊन सोडून देण्यात येत असे. ग्यारीबाल्डी इकडे अटकेत असतां त्याच्या सोबत्यांनी अनेक तन्हांनी पोपच्या राज्यास धोका आणण्याची खटपट चालू ठेविली होती. करोली नांवाच्या दोघां शूर व साहसी बंधूंनी केलेलें धाडसी कृत्य तर इतिहासांत नावाजण्यासारखे होते. त्यांनी टायबर नदीवर बोटीतून गुप्तपणे हत्यारे नेऊन ती रोमच्या लोकांस पोचविण्याचा प्रयत्न केला. ते किनाऱ्यावर तर उतरलेच, परंतु रोमन लोकांची त्यास कुमक न मिळाल्यामुळे पोपच्या शिपा- यांनी त्या बंधूंपैकी एकास किनाऱ्यावरील द्राक्षवेलींच्या बनांतच ठार केलें द्र दुसऱ्यास पोपच्या भयंकर तुरुंगांत नेऊन टाकले. हे कैरोली कुटुंब अतिशय शूर म्हणून प्रख्यात आहे. या दोन बंधूंपैकी धाकटा भाऊ बेनेडेटो याने १८७८ साली आपला जीव धोक्यात घालून हंबर्ट राजाचा जीव मारेकऱ्यांचे हातून वाचविला होता. पुढे तो राजकारणात प्रधानकीचे काम करून विशेष प्रख्यातीस आला. याच सुमारास पोपच्या शिपायांची एक बराकची बराक कांहीं अत्याचारी लोकांनी डायनामाईटने उडवून दिली व त्या अपघातांत पन्नास लोक मरण पावले. इकडे १२ हजार रोमन लोकांनी पोपला अर्ज करून व्हिक्टर-ए- मॅन्युएलचे सैन्य रोममध्ये आणवावें म्हणून विनंति केली. या सर्व गोष्टींमुळे पोप भ्याला व स्वसंरक्षणार्थ फ्रान्सच्या सैन्याची मदत घेण्याचा त्याने विचार केला. इकडे हे सर्व चाललें असतां कॅप्रेरा बेटांतून आपली सुटका कशी करावी या विचारांत ग्यारीबाल्डीचे मन गढून गेले होते. बेटाचे सभोंवतीं पहाया- करितां चार सरकारी गलबतें ठेवून दिली होती. भोंवतींचे पहारेकरी बहुधा सावध असत. एके दिवशी आपल्या मुलीला घेऊन होडीत बसून तो नित्य- क्रमापेक्षां जरा लांब जात आहे असे पाहतांच सरकारी जहाजांतील लोकांनी रोमवर अखेरचा धाडशी प्रयत्न १३३ त्या दिशेकडे बार काढले. तेव्हां अद्यापि पहारा सक्त आहे असें तो उमजला. परंतु सुटका करून घेण्याचा त्याचा प्रयत्न शिथिल न होता, फक्त युक्ति योजावयाची ती फार कुशल योजिली पाहिजे येवढे मात्र तो वरील गोष्टीवरून शिकला. त्या दिवसापासून त्याने आजारीपणाच्या बहा- ण्यास सुरुवात केली. तो घरच्या माणसाच्यासुद्धां भेटी घेईनासा झाला. ऑक्टोबरचे १४ वे तारखेस संध्याकाळी दाट धुके पडले होते व रात्रहि फारच काळोखी पडेल असा अदमास पाहून एक दोन विश्वासू नोकर बरोबर घेऊन खाजगी होडीत बसून तो स्टॅगनेरेलोच्या बंदराकडे निघाला. या बंदरांत दुसरी एक होडी आगाऊच तयार करून ठेवलेली होती. यास्तव बरोबरच्या नोकरांस निरोप देऊन तो एकटाच हातांत वल्हें घेऊन होडीवर घढला व भर समुद्रांत निघाला. त्या दिवशी समुद्र थोडासा उचंबळलेला होता. परंतु मोठ्या धैर्याने व कुशलतेने तो मॉटिआचे भूशिराजवळ लामॅडेलेना नांवाच्या बेटास सुरक्षित जाऊन पोचला. या बेटावर ग्यारीबाल्डी मिसेस कॉलिन्स नांवाच्या बाईच्या घरीं छपून राहिला व रात्र पडतांच एक तटू मिळवून सहा तासांची मजल मारून साडिनिया येथे गेला. किनाऱ्यावरील झाडीत शिरून एक दिवसभर लपून राहिल्यावर दुसरें एक तटू घेऊन दाढी व अंगावरील तांबडा डगला काढून टाकून पोर्टोपूडेंझा येथे आपला जांवई कॅझिओ यास जाऊन मिळाला. मग दोघेहि एक होडी काढून इटलीच्या किनाऱ्याकडे निघाले. रात्रीची वेळ व त्यांतून वारा जोराचा सुटलेला असल्यामुळे होडी बोरूच्या एका ताटव्याला अडकली. तेव्हां तींतून उतरून व दलदलीतून कशी तरी वाट काढून कित्येक तासपर्यंत मजल मारल्यावर त्यांस एक खेडे लागले. तेथून एक गाडी घेऊन ते लेगहॉर्न येथे गेले. तेथे मात्र त्यांचा त्रास संपला. लेगहॉर्नहून फ्लॉरेन्स- पर्यत जाण्यास त्यांस कांहींच पंचाईत पडली नाही. सर्व लोक ग्यारीबाल्डी कॅप्रेरा बेटांत नजरकैदेत आहे असे मानीत असतां एके दिवशी ग्यारीबाल्डी हा फ्लॉरेन्सच्या राजरस्त्याच्या चौकांतील एका घरांत अचानक प्रकट झाला व आपल्या गच्चीवरून खाली जमणाऱ्या हजारों लोकांस उद्देशून भाषणे करूं लागला. ही बातमी इटलीभर हां हां म्हणतां एकदम पसरली. पण या वेळी ग्यारीबाल्डीस पकडण्याचा हुकूम द्यावा वर लोक खास बंड करतील अशी त्यांची खात्री होऊन चुकली होती. तेव्हां १३२ ग्यारीबाल्डी त्याला धरावा तरी पंचाईत, मोकळा सोडावा तरी पंचाईत. मनांतून त्यावर सर्वांचे प्रेम; परंतु ते बाहेरून दाखवून सोय नाही. तेव्हां सर्वांत उत्तम युक्ति म्हटली म्हणजे मोकळा सुटलेला हत्ती जसा न मारतां, न दुखवितां युक्तीने चुचकारून ठाण्यावर नेऊन सोडतात, किंवा सर्कसमधील वाघ कसा तरी एकदांचा पिंजऱ्याच्या दारांतून आत गेला म्हणजे जसा मोकळा सोडून देतात, तसेंच ग्यारीबाल्डी अनावर झाला म्हणजे त्याला निरुपाय म्हणून कैद करून परत कॅप्रेरा बेटांत नेऊन सोडून देण्यात येत असे. ग्यारीबाल्डी इकडे अटकेत असतां त्याच्या सोबत्यांनी अनेक तन्हांनी पोपच्या राज्यास धोका आणण्याची खटपट चालू ठेविली होती. कैरोली नांवाच्या दोघां शूर व साहसी बंधूंनी केलेलें धाडसी कृत्य तर इतिहासांत नांवाजण्यासारखे होते. त्यांनी टायबर नदीवर बोटीतून गुप्तपणे हत्यारे नेऊन ती रोमच्या लोकांस पोचविण्याचा प्रयत्न केला. ते किनाऱ्यावर तर उतरलेच, परंतु रोमन लोकांची त्यास कुमक न मिळाल्यामुळे पोपच्या शिपा. यांनी त्या बंधूंपैकी एकास किनाऱ्यावरील द्राक्षवेलींच्या बनातच ठार केलें क दुसऱ्यास पोपच्या भयंकर तुरुंगांत नेऊन टाकले. हे करोली कुटुंब अतिशय शूर म्हणून प्रख्यात आहे. या दोन बंधूंपैकी धाकटा भाऊ बेनेडेटो याने १८७८ साली आपला जीव धोक्यात घालून हंबर्ट राजाचा जीव मारेकऱ्यांचे हातून वाचविला होता. पुढे तो राजकारणात प्रधानकीचे काम करून विशेष प्रख्यातीस आला. याच सुमारास पोपच्या शिपायांची एक बराकची बराक कांहीं अत्याचारी लोकांनी डायनामाईटनें उडवून. :दिली व त्या अपघातांत पन्नास लोक मरण पावले. इकडे १२ हजार रोमन लोकांनी पोपला अर्ज करून व्हिक्टर-ए- मॅन्युएलचे सैन्य रोममध्ये आणवा म्हणून विनंति केली. या सर्व गोष्टींमुळे पोप भ्याला व स्वसंरक्षणार्थ फ्रान्सच्या सैन्याची मदत घेण्याचा त्याने विचार केला. इकडे हे सर्व चाललें असतां कॅप्रेरा बेटांतून आपली सुटका कशी करावी या विचारांत ग्यारीबाल्डीचें मन गढून गेले होते. बेटाचे सभोंवतीं पहाय- करितां चार सरकारी गलबतें ठेवून दिली होती. भोंवतींचे पहारेकरी बहुधा सावध असत. एके दिवशी आपल्या मुलीला घेऊन होडीत बसून तो नित्य- क्रमापेक्षा जरा लांब जात आहे असे पाहतांच सरकारी जहाजांतील लोकांनी -- रोमवर अखेरचा धाडशी प्रयत्न त्या दिशेकडे बार काढले. तेव्हां अद्यापि पहारा सक्त आहे असें तो उमजला. परंतु सुटका करून घेण्याचा त्याचा प्रयत्न शिथिल न होतां, फक्त युक्ति योजावयाची ती फार कुशल योजिली पाहिजे येवढे मात्र तो वरील गोष्टीवरून शिकला. त्या दिवसापासून त्याने आजारीपणाच्या बहा. ण्यास सुरुवात केली. तो घरच्या माणसाच्यासुद्धां भेटी घेईनासा झाला. ऑक्टोबरचे १४ वे तारखेस संध्याकाळी दाट धुके पडले होते व रात्रहि फारच काळोखी पडेल असा अदमास पाहून एक दोन विश्वासू नोकर बरोबर घेऊन खाजगी होडीत बसून तो स्टॅगनेरेलोच्या बंदराकडे निघाला. या बंदरांत दुसरी एक होडी आगाऊच तयार करून ठेवलेली होती. यास्तव बरोबरच्या नोकरांस निरोप देऊन तो एकटाच हातांत वल्हें घेऊन होडीवर चढला व भर समुद्रांत निघाला. त्या दिवशी समुद्र थोडासा उचंबळलेला होता. परंतु मोठ्या धैर्याने व कुशलतेनें तो मॉटिआचे भूशिराजवळ लामॅडेलेना नांवाच्या बेटास सुरक्षित जाऊन पोचला. या बेटावर ग्यारीबाल्डी मिसेस कॉलिन्स नांवाच्या बाईच्या घरी छपून राहिला व रात्र पडतांच एक तटू मिळवून सहा तासांची मजल मारून साडिनिया येथे गेला. किनाऱ्यावरील झाडीत शिरून एक दिवसभर लपून राहिल्यावर दुसरें एक तटू घेऊन दाढी व अंगावरील तांबडा डगला काढून टाकून पोर्टोपूडेंझा येथे आपला जावई कॅझिओ यास जाऊन मिळाला. मग दोघेहि एक होडी काढून इटलीच्या किनाऱ्याकडे निघाले. रात्रीची वेळ व त्यांतून वारा जोराचा सुटलेला असल्यामुळे होडी बोरूच्या एका ताटव्याला अडकली. तेव्हां तीतून उतरून व दलदलीतून कशी तरी वाट काढून कित्येक तासपर्यंत मजल मारल्यावर त्यांस एक खेडे लागले. तेथून एक गाडी घेऊन ते लेगहॉर्न येथे गेले. तेथे मात्र त्यांचा त्रास संपला. लेगहॉर्नहून फ्लॉरेन्स- पर्यंत जाण्यास त्यांस कांहींच पंचाईत पडली नाही. सर्व लोक ग्यारीबाल्डी कॅप्रेरा बेटांत नजरकैदेत आहे असे मानीत असतां एके दिवशी ग्यारीबाल्डी हा फ्लॉरेन्सच्या राजरस्त्याच्या चौकांतील एका घरांत अचानक प्रकट झाला व आपल्या गच्चीवरून खाली जमणाऱ्या हजारों लोकांस उद्देशून भाषणे करूं लागला. ही बातमी इटलीभर हां हां म्हणतां एकदम पसरली. पण या वेळी ग्यारीबाल्डीस पकडण्याचा हुकूम द्यावा वर लोक खास बंड करतील अशी त्यांची खात्री होऊन चुकली होती. तेव्हां ग्यारीबाल्डी तिकडे तो ग्यारीबाल्डी आणि रोमचें व फ्रान्सचें सैन्य परस्पर वाटेल ते एकमेकांचें करोत, आपण स्वस्थ राहावें असें त्यांनी ठरविलें. इकडे ग्यारीबाल्डीने पोपविरुद्ध मनसोक्त भाषणे करून जे काय मिळाले तें लढाऊ सामान व सैन्य घेऊन तो फ्लॉरेन्स सोडून निघाला. त्याचे सात हजार सैन्यास' ना पोषाख ना कांहीं, ज्याला हातीं जे लागतील ते कपडे त्याने अंगावर घातलेले; अधिकारी कोण हे ओळखण्याकरितां त्यांजजवळ झाडांच्या डाहाळया तोडून दिलेल्या, अशा थाटाने हे सैन्य रोमवर स्वारी करण्यास निघाले. कांहीं मुक्काम गेल्यावर ग्यारीबाल्डीने या सैन्याच्या दोन टोळ्या केल्या. पैकी एक हमरस्त्याने चालली व दुसरी डोंगरी वाटेने गेली. माँटी रोटोंडो या गांवाजवळ रोमला दोहों बाजूंनी जाऊन पोचणारे दोन रस्ते फुटतात. त्या ठिकाणी पोंचल्यावर एका टोळीनें पूर्वेकडील दर- वाजास आग लावून देऊन आगीतून आत प्रवेश केला व रात्रभर लढून ते शहर घेतले. दुसरे दिवशी सकाळी ग्यारीबाल्डीहि तेथे येऊन पोचला. ही लढाई सुरुवातीपासून सुमारे सत्तावीस तास चालू होती. पोपच्या पक्षाचे लोक अतिशय निकराने लढले. कित्येक धर्माधिकाऱ्यांनी आपलें धर्मपुस्तक बायबल टाकून देऊन ग्यारीबाल्डीरूप सैतानाचा शहरांत प्रवेश होऊ नये म्हणून हातांत शस्त्र धरले होते; पण शेवटी ग्यारीबाल्डीचाच विजय झाला. शहर हस्तगत झाल्यावर त्याचे लोकांनी रोमन क्याथॉलिक देवळे, मूर्ति वगैरेंचा फार उच्छेद केला. या गोष्टीला आपली नापसंती दर्शवावी व जरब बसावी म्हणून त्याने अत्याचारी व दुष्ट अशा सात उच्छेदकांस चवाठ्यावर गोळया घालून मारविले. यानंतर तीन दिवसांनी ग्यारीबाल्डी- जवळ पंधरा हजारांवर सैन्य जुळलें व शस्त्रसामग्रीहि बरीच जमली; तेव्हां त्याने पुढे चाल केली व रोमपासून साडेचार मैलांजवळ तो जाऊन पोंचला. तो येतांच पोपच्या सैन्याच्या आघाडीचे लोक मागे परतले व त्यांनी वाटेतले पूल सुरुंग लावून उडवून दिले. रोम शहरामध्ये खुद्द पोपची फारच धांदल उडून गेली. त्याने आपल्या तुरुंगाचे दरवाजे उघडून अल्पस्वल्प संशयावरून शेकडों लोक आंत कोंबले, व आमच्या रक्षणास कसेंहि करून धावून या, नाही तर सैतानाच्या हाती पोपची गादी खास जाणार, असा तांतडीचा निरोप.फ्रेंच सैन्यास पाठविला. ही बातमी युरोपांत पसरतांच रोमच्या पक्षाभिमानी लोकांत एकच रोमवर अखेरचा धाडशी प्रयत्न हाहाःकार उडाला. व्हिक्टर-ए-मॅन्युएल याने असे प्रसिद्ध केलें की, इटलीचें धोरण सर्व युरोपखंडास विदित आहेच. ग्यारीबाल्डी हा केवळ आपल्या जबाबदारीवर पुंडावा करीत असून त्यांत संस्थानचे अंग नाही, या गोष्टीची खात्री करण्याकरितां म्हणून त्याने सिअलिडनी नामक सेनापतीचे हाताखाली सैन्य देऊन पाठविले. मात्र ग्यारीबाल्डीवर चालून जावे असा त्यास हुकूम नसून फक्त ग्यारीबाल्डी, फ्रेंच व पोपिश सैन्य, यांचे युद्धप्रसंगांत इटलीचें नुकसान होऊ देऊ नये असा मोघम व धरसोडीचा हुकूम त्यास दिला होता. फ्रेंच सैन्याची कुमक येण्यास एक दिवस अवकाश लागतांच रोममधील प्रमुख लोकांनी व धर्माधिकाऱ्यांनी रोम सोडून जाण्याचा निश्चय केला, व त्याप्रमाणे भराभर आपापलें सामानसुमान घेऊन सिव्हिटा व्हेकिया नांवाच्या मजबूत ठिकाणी जाण्यास ते निघाले. परंतु पूल पडल्याने ग्यारीबाल्डीस पुढील साडेचार मैलांची मजल करण्यास बराच वेळ लागला. पोपविरुद्ध असलेल्या रोमच्या नागरिकांस ग्यारीबाल्डी आतां येणार, घटकेने येणार, व व्हॅटिकन येथील पोपच्या बादशाही गादीवर आरूढ होणार असें वाटत होतें. म्हणून तो येण्यास विलंब लागलेला पाहून त्यांना काळजी वाटू लागली. हा विलंब लागण्यास पूल पडला हे तर एक कारण होतेच; परंतु ग्यारी- बाल्डीचा विचार रोम शहर फितुरी करून सर करण्याचा होता असेंहि म्हणतात. रोमचा गव्हर्नर चार हजार पौंड घेऊन शहराचा किल्ला ग्यारीबाल्डीचे स्वाधीन करण्यास तयार झालेला होता. ही रक्कम इंग्लिश मित्रांच्या मदतीने उभारली गेली होती. पण ज्या दिवशी हा फितूर सिद्ध व्हावयाचा त्याच दिवशी सकाळी गव्हर्नरास कामावरून काढण्यात आले. यामुळे म्हणा अगर इतर कारणांमुळे म्हणा, रोम ग्यारीबाल्डीच्या हाती येण्यास अदमासापेक्षा दोन दिवस उशीर झाला; व तेवढ्या अवधीत पोपिश व फ्रेंच सैन्य त्याजवर चालून आले. त्यामुळे त्यास मागे वळून मॉटीरोटोंडोचा आश्रय घ्यावा लागला. कदाचित् धीर धरून त्याने शत्रूस तोंड दिले असते तर फायदा झालाहि असता, परंतु मागून इटालियन सैन्य व पुढून फ्रेंच सैन्य अशा कचाट्यांत सांपडल्याने व प्रतिक्षणी फ्रान्समधून निघालेलें एक प्रचंड सैन्य येऊन पोचणार अशी आवई उठल्याने, त्याचे लोकांचा धीर किंचित् दबला, व रोमवर चालून जाऊन लढाईस तोंड देण्याचा बेत बदलून त्याने मागचा रस्ता धरला. परंतु तोंड वळतांच, वळसा घालून आलेल्या शत्रूचे सैन्याची व त्याची १३६ ग्यारीबाल्डी मटाना गांवाजवळ गांठ पडली. चालून आलेल्या पोपच्या सैन्यास तर त्याने मागे हटविलेंच; परंतु त्याचे मदतीस फ्रेंच सैन्य टेकड्यांमागे दडून बसलें होतें. ते पुढे आल्यामुळे त्यांचे काही चालेना. फ्रेंच सैन्यावरहि ग्यारीबाल्डी चार पांच वेळां तुटून पडला, व त्याचे स्वयंसेवक अगदी हातघाईवर येऊन मोठ्या निकराने लढले. परंतु शेवटी त्यांस मागें हटावे लागले. तेव्हां कोरेझीचे घाटांत त्याने आपले लोक एकत्र केले व त्यांस जिकडे वाट फुटेल तिकडे जाण्याविषयी मोठ्या कष्टाने सांगितले. जखमी झालेल्या लोकांची नीट व्यवस्था करून, रात्री रोमचे दिवे व शत्रूचे सैन्याने पेटविलेल्या आगट्या दुरून दिसत होत्या तिकडे दुःखयुक्त अंतःकरणाने एकवार नजर फेंकून तो निघाला.. फ्लॉरेन्सला जाण्याकरितां त्याने स्पेशल ट्रेन काढली. स्पेशल ट्रेन फिजलाईन स्टेशनवर येतांच इटालियन पोलिसची एक तुकडी स्टेशनांत शिरून तिने आगगाडी थांबवून धरण्याचा हुकूम दिला. पोलिसांचा पुढारी लेफ्टनंट कर्नल कॅमोझी हा ग्यारीबाल्डीच्या डव्यापाशी गेला व आपली मला एकांती भेट घ्यावयाची आहे असे म्हणाला. 'कशाकरितां' असें म्हणून ग्यारीबाल्डीने आपला कान पुढे केला असतां, त्याने हळूच उत्तर केलें आपणांस कैद करण्याकरितां! ग्यारीबाल्डी रागावून म्हणाला : मला कैद करण्याचा तुम्हांला काही अधिकार नाही. मी पार्लमेंटचा सभासद असून अमेरिकन नागरिक प्रजेचे मला हक्क आहेत. शिवाय मी कोणताहि गुन्हा केलेला नसून रोमन रिपब्लिकचा सेनापति या नात्याने माझ्या अधिकारांत मी लढाई केली, व इटलीच्या सरहद्दीवर येतांच मी हत्यार खाली ठेविले आहे. मला बलात्काराने जागेवरून ओढून काढल्याशिवाय मी तुमचा कंदी होणार नाही." परंतु कॅमोझी हा हुकमाचा बंदा. त्याजवळ ही कायदेशीर तक्रार काय चालणार? तथापि त्याने इटलीच्या प्रधानास तार करून, पुढे काय करूं म्हणून विचारले. त्या तारेचा " कैद करा" असा जबाब आला. तेव्हां निरुपाय होऊन ग्यारीबाल्डीस कैद करणे त्यास भाग पडले. हे पाहतांच ग्यारीबाल्डीचे सोबती आगगाडीचे डब्यांत होते त्यांनी आपली हत्यारे सरसावली. लवकरच खूनहि पडले; परंतु ग्यारीबाल्डीने त्यांस हत्यार खाली ठेवण्यास सांगितले व आपण कॅमोझीचे स्वाधीन झाला. शिपायांनी त्यास नेऊन आगाऊ तयार ठेवलेल्या गाडीत घातले. अशा रीतीने पुन्हा एकवार रोम हस्तगत करण्याचा त्याचा धाडसी प्रयत्न व्यर्थ गेला.
ग्यारीबाल्डीची परान्सला मदत वॅरिगनो या ठिकाणी ग्यारीबाल्डीस काही दिवस अटकेत ठेविल्यावर राजाने त्यास कॅप्रेरा येथे परत जाण्याची परवानगी दिली. वास्तविक पाहतां या वेळी खेम काबीज करण्याचा त्याचा बंत फसला हे इटलीच्या हितास .एकंदरीने पाहतां पथ्यकरच होते. कारण फ्रान्सबरोबर युद्ध करणे एकटया इटलीस शक्य नव्हते. ही गोष्ट खुद्द ग्यारीबाल्डी यासहि विचारांती कळली असती. परंतु दैव अनुकूल असले म्हणजे तें इष्टार्थ अगदी अकल्पित रीतीने घडवून आणते. ज्या रोमकरितां ग्यारीबाल्डी साऱ्या जन्मभर तळमळ करीत होता व ज्याचे पायीं आपला प्राण अनेक वेळां धोक्यात घालून, शेंकड़ों देशभक्तांचे रक्त रणांगणी वाहविण्यास तो कारणीभूत झाला, तेंच रोम पुढे लवकरच दोघांचे भांडण व तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे कांहीं एक प्रयास न करतां व्हिक्टर-ए-मॅन्युएलच्या स्वाधीन झालें ! . भाग २१ वा ग्यारीबाल्डीची फ्रान्सला मदत परोपकाराय सतां विभूतयः ।। इ० स० १८७० साली परान्स व जर्मनी यांजमध्ये काही क्षुल्लक कारणावरून एकदम जंगी लढाई सुरू झाली. ती चारच महिने चालली. पण सेडन येथील प्रचंड युद्धामध्ये फ्रेंच बादशहा तिसरा नेपोलियन याचा पूर्ण पराभव होऊन जर्मन सैन्य परिसवर चाल करून निघाले. पॅरिस येथे प्रजासत्ताक राज्य स्थापित होऊन लोकांनीं नेपोलियन यास पदच्युत केलें, व पॅरिस लढविण्याचा विचार करून एम्. गॅबेटा वगैरे फ्रेंच वीरांनी व मुत्सद्दयांनी बरेच दिवस भगीरथ प्रयत्न केले. या सर्व प्रसंगाची हकीकत अत्यंत मनोवेधक आहे पण ती येथे देतां येत नाही. ग्यारीबाल्डीसंबंधाचे सांगावयाचें तें एवढेच की, फ्रेंच देशभक्तांची विपन्नस्थिति पाहून त्याचे मनांत त्यांजविषयी सहानुभूति उत्पन्न झाली, व त्याने एक दिवस उठून परेंच प्रेसिडेंटास पत्र लिहून फ्रान्सच्या वतीने लढावयास आपण तयार माहों असें कळविले. परंतु त्याचे उत्तर येण्यापूर्वीच तो मार्सेलिस येथे जाउन सारला.
१३८ ग्यारीबाल्डी पॅरिसमध्ये नवीन स्थापित झालेल्या अधिकारीवर्गास मनांतून ग्यारीबाल्डी हा नको होता. परंतु काही अगदी एककल्ली प्रजापक्षीय लोकांस तो प्रिय होता यामुळे, व तो पुढे येऊन दत्त म्हणून उभा राहिल्यावर त्याचा अव्हेर करणे उचित नव्हते. यामुळे प्रेसिडेंट एम्. गॅबेटा याने त्याचे स्वाधीन दोन- तीनशें स्वयंसेवक करून त्यास एक क्षुल्लक कामगिरी सांगितली. त्याचा त्यास व त्याचे पक्षपाती लोकांस फार राग आला; तेव्हां गॅबेटा याने भिऊन 'ग्रेड पेट्रिओटे ' नांवाच्या स्वयंसेवकाचा त्यास अधिपति करून स्ट्रेसबर्गल व पॅरिस यांचे दरम्यानच्या मुलुखांत जर्मन सैन्याशी लढाई करण्याचा त्यास अधिकार दिला. त्याचे हाताखाली १२-१३ हजार सैन्य तयार झालें.. परंतु नेहमीप्रमाणे या सैन्यास हि पोषाख किंवा हत्यारेंपात्यारे यांची सामग्री बेताचीच मिळाल्यामुळे प्रथम बरेच दिवस त्यांचे हातून म्हणण्यासारखें कांही झाले नाही. परंतु लवकरच त्याचा मुलगा रिसिऑटी याने जर्मन सैन्याच्या एका तुकडीवर छापा घालून यश संपादन केलें. खुद्द ग्यारीबाल्डीनेंहि डिजॉन नांवाच्या ठिकाणी सुमारे १५ हजार जर्मन सैन्याचा पराभव केला. फ्रेंच व जर्मन यांच्या लढाईत फक्त एकच जर्मन निशाण काबीज करण्यांत आले, तेंहि ग्यारीबाल्डीच्याच सैन्याने केलें असें म्हणतात. तथापि एकंदरीने त्याने केलेल्या कार्यभागाचे फ्रेंच सेनापतींनी कौतुक न करतां उलट आपल्या रिपोर्टातून त्यास दोषच दिला आहे. जेथें मनास मन मिळत नाही, तेथे निःस्पृहतेने जरी कार्य केलेले असले तरी त्याचे चीज होत नाही. परंतु हे आगाऊच कळण्यास लागणारी व्यवहारचतुरता ग्यारीबाल्डीचे अंगी नव्हती. असो. तथापि नाईस, डिजॉन व पॅरिस या तीन शहरांच्या लोकांनी मात्र त्याची परीक्षा केली व त्याजबद्दल कृतज्ञताबुद्धि वागवून त्यास आपल्या वतीने पार्लमेंटचा सभासद निवडून दिले. तसेंच बोर्डी येथील प्रधानमंडळाने त्यास फ्रान्सच्या वतीने कृतज्ञतादर्शक पत्र पाठविले. काही दिवसांनी पार्लमेंट भरले तेव्हां एम्. लॉकरॉय या मुत्सद्दयाने असें बोलून दाखविलें की, “ रणां- गणावरच ग्यारीबाल्डीला फ्रेंच प्रजाजनाचे हक्क मिळून चुकले आहेत; आम्ही त्याला नवीन काय देणार? " व्हिक्टर हयूगो तर याहि पलीकडे गेला. तो म्हणाला, “फ्रान्सवर आलेल्या बिकट प्रसंगांत युरोपांतील कोणीहि राजा किंवा कोणतेंहि संस्थान आमच्या मदतीला आले नाही. फक्त एकाच मनुष्याला आम्हांविषयीं खरें प्रेम वाटले. पण हा एकटा मनुष्यच एका राजा.
अखेरचे दिवस इतका. अगर संस्थानाइतका शक्तिमान् होता! व फ्रान्सच्या वतीने लढून ज्याचा एकवारहि जर्मन सैन्याचे हातून पराभव झाला नाही, असाहि तोच एक वीर होता!!" हा वीर म्हणजे ग्यारीबाल्डी होय हे निराळे सांगावयास नकोच. भाग २२ वा अखेरचे दिवस देह त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी। -रामदास सजेस प्रांतांत ग्यारीबाल्डीने केलेले शेवटचे होत. यानंतर त्याने हातांत शस्त्र धरलें नाहीं. तें धरण्याचे कारणच मुळी उरले नव्हतें. ज्याकरितां त्याचा सर्व खटाटोप होता तें रोम शहर यापूर्वीच इटलीचे राजाचे आपोआप स्वाधीन झाले होते; व रोम हाती आल्याने सर्व इटली देश संयुक्त व स्वदेशीय राजछत्राखाली स्वतंत्र झाला होता. अर्थात् यापलीकडे ग्यारीबाल्डीचे इतिकर्तव्य जगांत कोणतेंच नव्हते. लोकांच्या भांडणांत पडून खऱ्याची कड धरून का होईना, पण हवी म्हणून लढाईची कामगिरी उकरून काढण्यास यापुढे ग्यारीबाल्डीचे मनांत धमक असली, तरी अंगांत शक्ति उरली नव्हती. यामुळे मरेपर्यंत सुमारे दहा वर्षे त्याचे हातून झालेली देशकृत्ये सात्त्विक अशीच होती. इ. स. १८७४ साली रोमने त्यास आपला प्रतिनिधि म्हणून पार्लमेंटांत निवडून दिले. रोमचा प्रतिनिधि म्हणून पार्लमेंटांत जाण्यास त्याला फार हौस वाटली. तो येणार अशी बातमी पसरतांच रोमचे नजीक सिव्हिटा व्हेकिया नांवाच्या बंदरांत त्याला सामोरे जाण्याकरितां लोकांची खूप गर्दी जमली; प रोमला येऊन पोचेपर्यंत त्याच्या भोवतालची गर्दी म्हणून कमी होईना. घोडयावरील लोक आगगाडीच्या बाजूने चालले होते व कांहीं कांहीं खप्पी तर आगगाडीवर चढून दिव्याच्या झरोक्यांतून त्याच्या टोपीचा एकादा कोपरा १४० ग्यारीवाल्डी दिसला तरी तेवढा पाहून धन्यता मानून घेत होते. रोममध्ये पोंचल्यावर लोकांनी त्यास डोळे भरून पाहिले तेव्हां त्यांचे समाधान झालें. परंतु स्याची वार्धक्यामुळे झालेली दुर्दशा पाहून कोणाच्याहि डोळयांसून पाणी आल्याखेरीज राहिले नाही. संधिवाताने त्याचे शरीर ठिकठिकाणी दुखत होते. बोटें ताठली होतीं, चेह-यावर सुरकुत्या पडल्या होत्या, दाढीत पांढऱ्याकाळया केसांची सरमिसळ होऊन गेली होती; व एकाद्या आजारी मनुष्याप्रमाणे एका खाकेंत कुबडी धरून व एक हात आपला मुलगा मेनॉट्टी याचे खांद्यावर ठेवून तो चालत असे. तथापि, अंगावरील नेहमींचा तो तांबडा सदरा व काळा लांब झगा कायमच होता; पूर्वीचें तें लोकांच्या ओळखीचें स्मित हास्य ओठावर अद्यापि तसेंच खेळत होते. आहार नियमित व जठराग्नि प्रदीप्त असल्यामुळे त्याचे शिंपाप्रमाणे पांढरे दांत ओंठांतून झळकत. लोकांनी त्यास कॉस्टॉझी नांवाच्या सरदारगृहापर्यंत आणून पोंचविले. नेहमीच्या क्रमाप्रमाणे गच्चीवर उभे राहून लोकांना उद्देशून त्याने भाषण करावे असा लोकांचा फार आग्रह पडला. परंतु भाषण करण्याची त्याचे अंगांत शक्ति उरली नव्हती. तेव्हां " मी भाषण करूं म्हणतां काय ? ठीक आहे. तुम्हाला भेटल्याने मला परमावधीचा आनंद झाला आहे. तर आतां घरोघर जा कसे? पूर्वीच्या प्रख्यात रोमन लोकांच्या वंशजांस सर्वांशी साजेल अशा रीतीने वागा" येवढेच चटकदार चार शब्द बोलून त्याने त्यांस निरोप दिला. रोममध्ये त्याचे काही दिवस सुखाचे गेले. त्याचे स्नेही प्रधानमंडळांत होते ते त्यास समाधानांत ठेवण्याचा प्रयत्न करीत. खुद्द राजाहि त्याची वरचेवर गांठ घेत असे. राजाला पाहतांच ग्यारीबाल्डीच्या मनांत जन्मभर अंगांत खिळलेल्या मामिभक्तीचा उमाळा येत असे. ज्या दिवशी नवीन पार्लमेंट उघडलें तो दिवस रोममध्ये मोठ्या उत्सवाचा होता. सभा भरल्यावर काही वेळाने ग्यारीबाल्डीने सभागृहांत प्रवेश केला. उजवे हाताकडे राज- पक्षीय व डाव्या हाताकडे प्रजापक्षीय अशी सभासद मंडळी दुतर्फा थादून बसली होती. ग्यारीबाल्डीनें प्रवेश करतांच प्रथम प्रजापक्षीय मंडळीने त्यास खडी ताजीम दिली व टाळचांचा एकच गजर केला. राजपक्षीय मंडळीला अशी भीति वाटत होती की, ग्यारीबाल्डी हा शिरस्त्याप्रमाणे कदाचित् शपथ घेण्याचंच नाकारील. परंतु जेव्हां त्याने शपथ घेतली व इटलीचे कायदे व इटलीचा राजा यांबद्दल बादरभाव प्रकट केला, तेव्हा राजपक्षीय मरणेचे अखेरचे दिवस १४१ आढयतेची आढी मोडून तेहि उठून उभे राहिले. तेव्हां सर्व सभागृहाने एकदिलाने टाळ्यांचा कडकडाट करून त्याच्या नांवाचा जयघोष केला. रोममध्ये ग्यारीबाल्डीचा मुक्काम पडला होता, तेवढ्या अवधीत त्याची करमणूक होण्यास बरीच कामें निघाली. त्यांतील मुख्य म्हटलें म्हणजे, टायबर नदीचा कालवा हे होय. हा कालवा सुवेझचे कालव्याचे धर्तीवर योजिला असून त्यास खर्च सुमारे ८ लक्ष रुपये व्हावयाचा होता. या कामास खुद्द व्हिक्टर-ए-मॅन्युएल, ग्यारीबाल्डी व राजघराण्यातील एक श्रीमान् पेढीवाला अशा त्रिवर्गाची एक कमिटी नेमली होती, व केवळ ग्यारीबाल्डीस ती गोष्ट प्रिय आहे एवढयाचकरितां पार्लमेंट सभेने पुरेसे पैसे मिळतील तेव्हां कालव्याचे काम हाती घ्यावे असा ठराव पास करून ठेविला होता. या कामांत त्याचे मनहि बरेंच गढून गेले होते. प्रतिदिवशी इंजिनीअर लोक बरोबर घेऊन तो टायबर नदीच्या किनान्याची पाहणी करण्यास जात असे; राज्यकारभारांत त्याचे मन फारसें शिरूं नये या हेतूनें प्रधानमंडळी त्यास होईल त्या रीतीने या रिकामटेकड्या कामी प्रोत्साहन देत असे. कालव्या- शिवाय इतर कामेहि त्यास हळुहळू सुचविण्यात आली. रोमच्या आसपासच्या दलदलींतून पाणी काढून द्यावयाचे होते. टायबर नदीला पूर येऊन असा- पासचे मुलुखाची नासाडी होत असे. याकरितां एके ठिकाणी बांध घालणे अवश्य होते. नदीचे पात्रहि कोठे कोठे वळण देऊन फिरवावयास पाहिजे होतें. पूर्वी ज्यूलियस सीझर याने रोम शहराकरितां जेथे बंदर बांधण्याचे योजिलें होते त्याच जागी बंदर बांधण्याचे काम सुरू करावयाचे होते. ही सर्व कामें सकृद्दर्शनी रोमच्या हितांची व भावी वैभवास कारणीभूत होण्यासारखी असल्यामुळे रोमच्या या भक्ताचें मन यांत अर्थातच गढून गेले. परंतु ही सर्व कामें कालावधीची व पैशाची असल्यामुळे त्यांचा नाद त्यास लवकरच सोडावा लागला. पुढे रोमची हवाच मानबेना म्हणून त्यास कॅप्रेरा येथे परत जावे लागले. यानंतरहि एक दोन वेळां तो आपलें बेट सोडून इटलीस गेला होता. परंतु या खेपा केवळ विशेष निमित्ताने असल्यामुळे तो फिरून लागलाच परतून घरी येत असे. यापुढे त्याच्या आयुष्यक्रमांत म्हणण्यासारख्या फारशा गोष्टी घडून माल्या नाहीत. १८७८ साली राजा व्हिक्टर-ए-मॅन्युएल मरण पावला. सर्व इटली देश एकछत्राखाली आणून राजाचें ऐश्वर्य वाढविण्याकरिता १४२ ग्यारीबाल्डी ग्यारीबाल्डीने सर्व आयुष्यभर कष्ट केले, अर्थात् त्याच्या मरणाचें वर्तमान ऐकून ग्यारीबाल्डीस अत्यंत दुःख झाले असेल यांत आश्चर्य नाही. व्हिक्टर- ए-मॅन्युएलवर त्याची अतिशय भक्ति होती व पुढे जरी एकादे वेळी एकंदरीने राजकीय अंमलाविरुद्ध तो कडकपणाने उद्गार काढीत असे, तरी पण त्याची स्वामिभक्ति कधीहि ढळली नाही. मॅझिनीचे लेख वाचून ग्यारीबाल्डीच्या मनाचा कल बरेच वेळां प्रजासत्ताक राज्य स्थापित करण्याकडे वळला होता. फ्रान्स व जर्मनी यांचे लढाईत परान्सला जी त्याने मदत केली ती केवळ प्रजासत्ताक संस्थानाला म्हणून केली हे खरे आहे. तरी पण मॅझिनीइतका तो राजाधिकारद्वेष्टा कधीच नव्हता. इटली स्वतंत्र करावयाचा तो प्रथम राजछत्राखाली आणून करा. वयाचा हे त्याचे मत नेहमी कायम होते, हे मागे सांगण्यांत आलेच आहे. 'एवढेच नव्हे तर, सिसिली जिंकून त्याने राजाचे स्वाधीन केली व रोम हस्तगत झाल्यावर तेथें पार्लमेंटची स्थापना झाली. या दोनहि प्रसंगी ग्यारीबाल्डी हा लोकांस खुद्द राजापेक्षां शतपट अधिक प्रिय झाला होता. त्याने आपली नुसती संमति दर्शविली असती तरी देखील राजसत्तेला धक्का बसून प्रजासत्ता प्रचलित होण्याचा संभव होता. परंतु केवळ त्याचे स्वामि- भक्तीमुळे हे प्रसंग टळले व इटली संयुक्त व स्वतंत्र होण्याचे काम सुकर झालें. इ. स. १८८२ चे एप्रिल महिन्यांत ग्यारीबाल्डी हा इटली सोडून घरी परत आला तो फिरून इटलीस गेला नाही. वार्धक्याचा अंमल त्याचे शरीरावर होऊन अखेरीस ता. २ जून १८८२ रोजी त्याला सुखाने मृत्यु आला. त्या दिवशी सर्व युरोपखंडांतील तारायंत्रांवर बहुधा एकच विषय खेळत होता व तो ग्यारीबाल्डीचा मृत्यु हा होय. ज्याने जिवंतपणी आपल्या पराक्रमाने जग हलविलें त्याच्या मृत्यूनेंहि जग हलावें हे योग्यच आहे !
परिशिष्ट तरुण इटली'च्या सभासदांची शपथ "मी 'अमक अमुक इसम, ईश्वर व स्वदेश यांना स्मरून, स्वदेशाच्या पवित्र कार्यामध्ये ज्या देशभक्तांनी परकीय जुलमास आपले प्राण बळी दिले त्यांचे स्मरण करून, ईश्वराने ज्या भूमीत मला निर्माण केले आहे तिच्याशी ज्या कर्तव्याने मी बांधला गेलो आहे, व ईश्वराने जे देशबांधव मला दिले आहेत त्यांना स्मरून, ज्या देशामध्ये मला जन्म देणारी माझी आई जन्मास आली व जिच्यामध्ये माझी मुलेबाळे घरांतल्याप्रमाणे पुढे सुखाने नांदतील, त्या देशावर जन्मसिद्ध अशी जी प्रीति माझ्या हृदयांत आहे तिला स्मरून, अन्याय, जुलूम वगैरे सर्व वाईट गोष्टीविषयी माझ्या मनामध्ये जो द्वेषभाव आहे त्याला स्मरून, परदेशांतील स्वतंत्र प्रजाजनां- पुढे उभा राहिलों असतां मला स्वतःला स्वतंत्र प्रजेचे हक्क नाहीत, मला नांव घ्यावयाला स्वदेश नाहीं, व मी जें माझें म्हणूं शकेन असें राष्ट्रीय निशाण नाही, हे पाहून व त्यामुळे शरम वाटून, तसेंच माझा आत्मा ईश्वराने स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याकरितां निर्माण केला असून स्वातंत्र्य व जनपद हित साधण्याविषयीं, परदास्य व असहायता यामुळे आपण दुबळे आहोत असें मनांत भासत असतांहि, ती स्वतंत्रता व तें जनपदहित साधण्यास सदाशेच्या प्रेरणेमुळे मनांत जी उल्हासाची ऊर्मि येते ती ध्यानात आणून, स्वदेशाचें पूर्वीचे वैभव व हल्लींची स्थिति मनांत आणून, तसेंच फांशी जाऊन, तुरुंगवासाच्या यातनेने किंवा हद्दपारीचे शिक्षेने होणाऱ्या दुःखामुळे आजपर्यंत जे इटलीचे सुपुत्र मरण पावले, त्यांच्या प्रेमळ आयांनी जे दुःखाश्रू ढाळले ते दृष्टीसमोर वागवून, आणि आजमितीस लाखों लोक जी यातना भोगीत आहेत तिचे स्मरण करून, मी शपथ घेतों की, 'इटली देशाकडे ईश्वराने एक महत्कार्य सोपविले आहे, ते साध्य करणे प्रत्येक इटालियन मनुष्याचे कर्तव्यकर्म आहे असा माझा दृढ विश्वास आहे. ईश्वराने माझें राष्ट्र पुन्हा अस्तित्वात येईल असा ज्या अर्थी हुकूम दिला आहे त्या अर्थी तें राष्ट्र उत्पन्न करण्यास अवश्य अशी जी शक्ति तीहि त्याने आम्हां लोकांस दिली .
१४ ग्यारीबाल्डी माहे. त्या शक्तीचा समाजाकरितां योग्य उपयोग करणे हीच आमच्या कार्य सिद्धीची गुरुकिल्ली आहे. मनःपूत कृत्य करणे व ते करण्यास लागणारा स्वार्थत्यागहि करणे हाच काय तो श्रेष्ठ सद्गुण. एकी व दृढनिश्चय यांमध्येच सर्व शक्तीचें मूळ बीज आहे, इत्यादि गोष्टींबद्दल माझ्या मनाची पक्की खात्री झाल्यामुळे, माझ्याप्रमाणेच विश्वास असणाऱ्या या 'तरुण इटली' नांवाच्या मंडळीमध्ये मी आपलें नांव दाखल करीत आहे. मी भाजपासून अशी शपथ घेतों की, या मंडळीचे साहाय्याने इटली देशाचे स्वतंत्र व लोकसत्ताक राष्ट्र करण्याकरिता मी जिवाभावाने अक्षय्य खटपट करीन. या मंडळीचे हेतु लोकांस समजण्यासाठी मी कायावाचामनेंकरून त्यांना शिक्षण देईन. सद्गुणाशिवाय कोणतीहि वस्तु मिळाली तरी टिकत नाही! याकरितां मी नेहमीं सद्गुणानेच वागेन. यापुढे मी दुसऱ्या कोणत्याहि मंडळीचा सभासद होणार नाही. या मंडळीचे सर्व हुकूम मी शब्दशः पाळीन व प्राण गेला तरी ते बाहेर फोडणार नाही. या मंडळींतील इतर बांधवांना सल्लामसलत व साहाय्य देऊन मंदत करीन. ही सर्व शपथ किवा त्यांतील अंशहि जर मी मोडला तर ईश्वराचा पुरा क्षोभ मजवर होईल व मनुष्यमात्र मला निंद्य मानूं लागेल, आणि असत्यवादी म्हणून माझ्या तोंडाला काळोखी लागेल.' . समाप्त
No text on this page.
म. कि. गृह प्रकाशन, पुणे २. --- -- प्रकाशित (२) तिरंगी नवमतवाद डॉ. ग. श्री. खैर, एम्.ए.पीएच्.डी. श्री. शं. दा. चितळे, एम्.ए. बी.टी इतिहास कसा शिकवावा (१) पाश्चिमात्य शिक्षणपद्धति (२) जपानची जीवनक्रांति सौ. सरोजिनीबाई देशपांडे (३) जगांतील समाजक्रांति व हिंदुस्थान (नवीन आवृत्ति तयार होत आहे) युरोपच्या अंतरंगांत स्वाध्याय माला प्रा, रा.वि. ओतुरकर, एम्.ए. ५२ पुस्तकें (१) हिंदुस्थानचा सोपपत्तिक इतिहास (२) मराठ्यांचे साम्राज्य आगामी (३) प्राचीन हिंदु साम्राज्य (४) मुसलमानाचे साम्राज्य स्वाध्याय माला (५) ब्रिटिशांचे साम्राज्य -पुढील १८ पुस्तके- (६) हिंदुस्थानचा राज्यकारभार प्रमिला (कादंबरी) (७) महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास महाभारत भाग १ व २ श्री. साने गुरुजी, एम्.ए. सुधारणा सुख व सदाचार (१) श्यामची आई ले. न. चि. केळकर. (२) श्याम कै. दत्तोपंत आपटे-स्मारक ग्रंथ (३) श्यामू की मां (हिंदी) के. द. आपटे स्मारक मंडळ. श्री. न. चिं. केळकर, रामजोशी (चरित्र व काव्य) बी.ए.,एलएल्.बी. श्री. द. रा. कानेगांवकर, एम ए गॅरीबाल्डी विज्ञानविलास (शास्त्रीय) (१) तरुण हिंदु नागरिक श्री. दि. दा. गांगल, एम् एस्सो. अ. वि. गृह प्रकाशन, ६२४, सदाशिव, पुणे २. .
SUZS seses25e52925252525252seses2525
आमचीं कांहीं पुस्तकें
१ हिंदुस्थानचा राज्यकारभार (ले. प्रो. ओतुरकर)
किं. रु. २
२ साधनपरिचय अर्थात् महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
(ले. द. वि. आपटे व प्रो.ओतुरकर) किं. रु. २॥
३ पाश्चिमात्य शिक्षणपद्धती (ले. डॉ. खैर) किं. रु. ३
४ जपानची जीवनक्रांति (ले. डॉ. ग्वैर)
५ इतिहास कसा शिकवावा (ले. शं. दा. चितळे)
किं. रु. २
22seS252525252seseseseseseseseseseseseseseseseseseseseseseseseseseses.
ses2525252sesesesesesesesessesesesesesesesesesesesesesesesesesesesses
किं. रु. १
किं. रु.१॥
६ तरुण हिंदू नागरिक (ले. न. चिं. केळकर) किं. ४८
७ श्यामची आई (ले. पां. स. साने)
८ उपनिषद्रहस्य (अनुवादक प्रो. गजेंद्रगडकर) किं. रु. ३
९ काळ पत्रांतल उतारे व कै. शि. म.
परांजपे यांचे अल्पचरित्र किं. ४१०
१० हिंदी मराठी व्यवहारकोश
किं.रु. २॥
लोकसंग्रह कारखाना, ६२४ सदाशिव, पुणे २
SRssesesesesasesesesesesesesesaseszse
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.