Library
Raasabihaarii Basuun'che Kraan'tijiivana
Front matter
सु र स ग्रं थ मा ला पुष्प ११८
रासबिहारी बसूंचें
क्रांतिजीवन
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
प्रथमावृत्ति १९५२]
[किंमत १॥ रुपया
सुरस ग्रंथ माला-पंढ र पूर.
UNIVERSAL
LIBRARY
OU_184507
LIBRARY
UNIVERSAL
गृ हि णी ( टॉल्स्टॉयच्या ' क्रूझेर सोनाटा'चा अनुवाद ) लेखकाचा मुख्य रोख समाजां- तील एका विशिष्ट सुखलोलुप वर्गाची विलासप्रियता, व्यभि- चाराची प्रवृत्ति, तथाकथित सुधारणांमागील सर्वस्वी शरीर- निष्ठ बीभत्स कामुक दृष्टि, विवाहसस्थेचा बोजवारा व या सा-या गोष्टीमुळे स्त्री-पुर.पाचें वाहचतः डामडौला, पण वस्तुतः कवडीमोल होत अस- लेलें जीवन यांवरच आहे. हा सारा दिखाऊपणा बाजूला सारून साध्या, शांत, सयत व निर्मल जीवनाचा पुरस्कार या कादम्बरीत पाच डिनिचेफ यांच्या आत्मवृत्ताच्या रूपाने कर प्यांत आला आहे. आधुनिक सामाजिक सुधारणावरं,ल या कादम्बरीतील टीका विलक्षण तिखट पण तेवढीच तळमळ.चा आहे, यात का नाही. सुरसग्रंथमाला-पंढरपूर
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
सु र स ग्रं थ मा ला पुष्प ११८
रासबिहारी बसंचें
क्रांतिजीवन
साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास
प्रथमावृत्ति १९५२ ]
[किंमत १॥ रुपया
Trmirmला_iary
प्रकाशक:
सुरसग्रंथमाला, पंढरपूर
: मालक:
राजेंद्र रावजी शहा
महाद्वार-पंढरपूर
: संचालक :
नवजीवन गौतमचंद व्होरा
केमिस्ट, सोलापूर
मुखपृष्ठावरील चित्र
केसरी संस्थेच्या सौजन्याने
मुद्रक :
बाळकृष्ण भाऊ जोशी,
ज्ञानविलास प्रेस,
२७ बुधवार, पुणे २.
नि वे द न माझे मित्र श्री. हिरालाल व्होरा यांनी वारंवार आग्रह केल्यामुळे त्यांचा शब्द लेखनाच्या बाबतीत मला टाळतां येईना. म्हणून भारतीय क्रांतिकारकांचे सर्वश्रेष्ठ पुढारी व विख्यात आझाद हिंद सैन्याचे संस्थापक कै. रासबिहारी बसू यांचे हे राष्ट्रभक्तीच्या भावनेने रसरसलेलें चरित्र मी लिहून हातावेगळे करीत आहे. स्वतंत्र भारताला विधायक स्वरूपांत नवें राष्ट्रजीवन घडविण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य रासबिहारीच्या चरित्रांत निश्चितपणे आहे. मराठी वाचकांना त्यांच्या जीवनाची असावी तशी माहिती नाही. महाराष्ट्र-शारदेच्या मंगलायतनांत ही सेवा ऋजू होईल अशी आशा आहे. दि. १ जुलै १९५२ श्री दक्षिणामूर्ति मंदिर, 10 महाल. नागपर. -A- बाळशास्त्री हरदास साहित्याचार्य स
No text on this page.
ज्याचे त्याला निवेदन !
No text on this page.
आद्यप्रवर्तक
कै. मोतीचंद व्होरा
रासबिहारी बसूंचें
क्रांतिजीवन
No text on this page.
रासबिहारी बसूचें क्रांतिजीवन १. प्रास्ताविक भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासांत आझाद हिंद सेनेचे विख्यात संस्थापक श्री. रासबिहारी बसू' यांचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतीय क्रांतिकारकांचे आंदोलन हे जर एक सुवर्ण- मंदिर आहे अशी कल्पना केली तर रासबिहारी बसू हे त्याचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ होत, क्रांतिकारकांच्याहि इतिहासांत रासबिहारींच्या योग्यतेचा पुरुष सहसा आढळत नाही. भारत- मातेचे ते एक तेजस्वी कंठमाण होते. कठोर तपश्चर्या आणि उग्र हतनिश्चय यांचे मूर्त स्वरूप म्हणजे रासबिहारी बसूंचें जीवन होय. त्यांच्या व्यवसायात्मिका बुद्धीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपवाद सोडून दुसरी तोड आढळावयाची नाही. त्यांच्या व्यक्तित्वाच्या विद्युद्गर्भ आकर्पणाला व कुशल सेनासंचालनाला तुलना नाही. त्यांच्या अभिजात आनंकुवादित्याला त्यांच्यावांचून दुसऱ्या कुणाचंच नाव तुलने- साठी म्हणून सुद्धा देतां यावयाचे नाही. रासबिहारी बसू हे जीवनभर संग्राम करीत व अपयशामागून अपयशाचे हलाहल पचवीत राहिले. आंदोलनाचें मेरुमांदार अनेकवार त्यांनी उभा- रावें; व या ना त्या कारणास्तव ते भुईसपाट व्हावें; असे वारंवार घडलेले आहे. पण जणूं कांही सर्व विकारांच्या वर त्यांचे व्यक्तिमत्व उभे राहिलेले आहे. यशाने ते हुरळले नाहीत. अप- यशाने खचले नाहीत. त्यांच्या अखंड कर्मयोगांत कधी खंड २ रासबिहारी बसूंचें गेले नाहीत. त्यांचे जीवन म्हणजे स्थितप्रज्ञ कर्मयोग्याचंच जीवन होय व तेंहि जीवन असे घडलेलें आहे की भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष कारणीभूत असणाऱ्या या महापुरुषाच्या स्मृतिसमाधीवर कधी फुले उधळली गेली नाहीत की स्मरणाची निरांजने कधी पाजळण्यांत आली नाहीत. त्यांचे उत्तरायुष्यांतील सहकारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रचंड जयघोषांत रासबिहारींचें नांवहि लोपून गेलें. अर्थातच स्वतः निर्माण केलेलें सारे साधनयंत्र सुभाषांच्या समर्थ हाती ज्या निश्चल स्थित- प्रज्ञतेने रासबिहारींनी सोपविलें त्याच मनोवृत्तीने शेवटीहि सुभाषांच्या व्यक्तित्वात विलीन होउन जाण्यांत त्यांच्या आत्म्याने समाधानच अनुभविलें असेल. राष्ट्राच्या बलिवेदीवर आत्मसमर्पण करावयास उद्युक्त झालेली व्यक्ति तें आत्मसमर्पण अवंचकतेने झाले आहे की नाही यांतच खरी संतुष्ट असते. कोणी त्यांची नोंद करतो की नाही हे पाहण्याची क्षुद्रता तिच्या ठिकाणी नसतेच. परंतु राष्ट्रीय पितरांचे स्मरण करून त्यांचे ऋण फेडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्यामुळे कर्तव्यपूर्तीच्या समाधानासाठी मी त्यांच हे चरित्र महाराष्ट्रशारदेच्या चरणीं समर्पण करतो. २ कौटुंबिक माहिती व पूर्वायुष्य. रासबिहारी बसू बंगाली भद्रसमाजांतील गृहस्थ असून त्यांच्या वडिलांचे नांव विनोदबिहारी बसू असें होतें. विनोदबिहारींचा जन्म व शिक्षण बंगालमध्ये झालें असलं तरी उदरनिर्वाहाच्या व्यवसाया- साठी त्यांना बिहारप्रांतांत स्थायिक व्हावे लागले. ते पाटण्याच्या गव्हर्नमेंट प्रेसमध्ये कारकून होते. वडिलांच्या व्यवसायामुळे जन्मानें बंगाली असलेले रासबिहारी लहानपणीं बिहारमध्येच साहिले; व त्यांचे सारें बालपण आणि शिक्षण बिहारच्याच वाता- क्रांतिजीवन वरणांत झाले. इ. स. १९०२ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. बालपणापासूनच त्यांची प्रवृत्ति लढाऊ असल्यामुळे आ कोर्सचे ठरीव ठशाचे शिक्षण घेण्याऐवजी आपण सैन्यांत भरती व्हावें असें त्यांच्या मनाने घेतले. पण विविध प्रकारची खटपट करून देखील त्यांना ब्रिटिश सरकारकडून सैन्यांत भरती करून घेण्यांत आले नाही. शेवटी नाही ब्रिटिशांच्या, तर फ्रेंचांच्या तरी सैन्यांत आपण भरती व्हावे म्हणून ते पांदेचरी येथे गेले. पण तेथेोहे त्यांना नकारच मिळाला. इ. स. १८५७ नंतर ब्रिटिशांच्या लष्करी कमिशनने सैन्यभरतीच्या संबंधांत मार्शल व नॉनमार्शल रेसेस अथवा लढाऊ व बिनलढाऊ जातीचा कृत्रिम भेद उत्पन्न करून एक सूक्ष्म धोरण आखले होते. त्या धोरणाचे स्वरूप असे होते की ज्या ज्या जमातीतून वा प्रांतांतून देशभक्तीची बीजें रुजण्याचा अथवा वाढीस लागण्याचा संभव असेल, त्या सर्व बिनलढाऊ जाती म्हणून सैन्यांतून सदाच्या बाजूस ठेवावयाच्या व ज्यांच्यांत ही बीजे रुजण्याचा मुळीच संभव नाही त्यांना लढाऊ जमाती म्हणून सैन्यांत जागा द्यावयाची. १८५७ सालचें स्वातंत्र्ययुद्ध हे मुख्यतः भारतीय सैन्य लढले होते. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धांत ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आपले खड्ग चालविलें होतें त्यांना बिनलढाऊ म्हणून ठरविण्यांत आले व भारतमातेच्या पायांत दास्याच्या शृंखला टिकून धरण्यासाठी या युद्धांत ज्यांनी आपल्याच देशबांधवांचे गळे घोटले होते, त्यांना मात्र लढाऊ जमाती म्हणून ठरविण्यात आले. दुर्दैवाने रासबिहारी ज्या जातीत जन्म पावले होते ती या बिनलढाऊ वर्गातील होती. इतकेच नव्हे तर मायदेशाच्या स्वातंत्र्यासाठी १८५७ साली तात्या टोप्यांनी जें संघर्षाचे सूत्र आपल्या देशबांधवांच्या हाती ४ रासबिहारी बसंचे दिलें तें स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या हाती राखून व खुदिरामा- पासून तों सुभाषचंद्र बोसापर्यंत अनेक तेजस्वी झुंजार उत्पन्न करून प्रस्थापित सत्तेशी सतत युद्धमान राहण्याचेंच धोरण तिने पत्करिलें होतें. ब्रिटिश सरकार व त्यांचे मित्र असलेलें फ्रेंच सर- कार यांनी रासबिहारींना सैन्यांत भरती करून न घेण्याचे खरें कारण या गोष्टींत दडलेले आहे. असो. यानंतर निराश अंत:-. करणाने रासबिहारीनी डेहराडून येथे फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट- मध्ये कारकुनीची नोकरी पत्करली व लवकरच ते तिथे हेडक्लार्क झाले. पण ब्रिटिश सरकारच्या ऑफिसांतले एक कर्तृत्वसंपन्न कारकून म्हणून लाजिरवाणा जन्म घालविण्यासाठी रासबिहारी जन्मालाच आले नव्हते. प्रलयानलाचे उत्पत्तिस्थान असलेल्या ठिणगीवर आलेली ही एक तात्पुरत्या परिस्थतीची राख होती. कुणी तरी येऊन व कुंकून ही बाजूस सारणे अवश्य होते. लवकरच तशी संधि आली व डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इस्टिटयूट- मधला हा साधासुधा दिसणारा हेडक्लार्क भारतीय क्रांतिकारकांच्या सेनापतित्वाची सूत्रे हलवू लागला. ३ विप्लववाद्यांचा सूत्रधार उत्तर हिंदुस्थानांत क्रांतिकारक विचारसरणीचा प्रसार व संघ- टना यांचा योजनाबद्ध प्रारंभ लाला हरदयाळ यांच्या १९०७ मधील पंजाब प्रांतांतल्या वास्तव्यानंतर झाला. हरदयाळ १९०८ नंतर हिंदुस्थान सोडून ज्या वेळी इंग्लंडमध्ये गेले त्या वेळी त्यांनी आपल्यामागें मास्टर अमीरचंद या नांवाच्या आपल्या विश्वासू सह- काऱ्याच्या हाती चळवळीशी सूत्रे सोपविली होती. मास्टर अमीरचंद व त्यांचे विश्वासू सहकारी लाला हनुमंतसहाय यांनी हरदयाळाच्या मागें या चळवळीची , व्याप्ति दिल्लीपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न कांतिजविन चालविला होता. अमीरचंद हे शिक्षकाचा व्यवसाय करीत असत. तर हनुमंतसहाय हे दिल्लीचे एक मोठे श्रीमान व्यापारी होते. हनुमंतसहाय हे मोठे समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध असून दिल्लीमध्ये स्त्रियांची पडदापद्धति बंद करून त्यांनी मोठा सामाजिक विरोध सहन केला होता. हरदयाळांच्या सहवासाने प्रभावित होऊन हनुमंतसहाय यांनी इ. स. १९०८ साली आपल्या व्यापारांतून विलायती माल विकावयाचं पूर्णपणे बंद करून अतिशय तोटा सहन केला होता. इ. स. १९०९ साली त्यांनी दिल्ली येथे एक राष्ट्रीय शाला काढली. मास्टर अमीरचंद प्रथम मिशन स्कूलमध्ये व नंतर एका संस्कृत महाविद्यालयांत अध्यापकाचे काम करीत असत. लवकरच ते या राष्ट्रीय शाळेला येऊन मिळाले. काही दिव. सानंतर त्यांनी एक राष्ट्रीय वाचनालय काढले. हनुमंतसहाय यांच्या राष्ट्रीय शाळेत अवधविहारी, गणेशलाल खिस्ती, वगैरे लोकहि अमीरचंदांच्या बरोबर शिक्षकाचे काम करीत असत. ही राष्ट्रीय शाळा वरून दिसण्यांत शाळा असली तरी क्रांतिकारकांच्या विचार- प्रणालीचे शिक्षणकेंद्र व क्रांतिकारक दल संघटित करण्याचे साधन म्हणूनच तिचा मुरव्यतः उपयोग करून घेण्यांत येत होता. मास्टर अमीरचंद यांनी या आपल्या संघट- नेचा बंगाली क्रांतिकारक संघटनेशी विशेषतः अनुशीलन समितीशी संबंध प्रस्थापित केला होता. पण अलीपूर बॉम्ब केसचे प्रकरण उद्भवून बंगाली दलाची वाताहत झाल्यानंतर बंगालचा व अमीरचंदांचा संबंध तात्पुरता तुटला. अमीरचंद २४ तास विद्यार्थ्यांना आपल्या सहवासांत ठेवीत. पुढे राष्ट्रीय शाळेत व त्यानंतर क्रांतीच्या उठावणीत त्यांचे उजवे हात अस- लेले इतकेच नव्हे तर राजद्वारे स्मशाने च यस्तिष्ठति स .६ रासबिहारी पहुंचे बांधकः। या न्यायानुरूप वधस्तंभाच्या पायऱ्याही अमीर- चंदांच्या बरोबरीनेच चढून गेलेले अवध-विहारी हे प्रथम सदैव अमीरचंदांच्या सहवासांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकीच एक होते. सहवासांतील विद्यार्थी तेजस्वी व कर्तृत्ववान् वाटला की, अमीरचंद त्याला आपल्या घरीच ठेवीत. त्याचे खाणे-पिणे ते स्वतःच करीत. अवधविहारी प्रथमपासूनच अतिशय उत्साही व साहसी असत. कठीण परिस्थितीशी झगडत त्यांनी बी. ए. ची पदवी पदरांत पाडून घेतली. लाहोरच्या ट्रेनिंग कॉलेजमधून ते बी. टी. झाले. बी. टी. च्या परीक्षेमध्ये त्यांना सुवर्ण-पदक मिळाले. मास्टर अमीरचंदांच्या सहवासांत आल्यापासून देशभक्तीचे विचार त्यांच्या मनांत अंकुरले. १९०९ सालापासूनच त्यांनी राष्ट्रीय आंदोलनांत भाग घ्यावयास प्रारंभ केला; व अलीपूर क्रांतिकट फसल्या- नंतर १९११ साली ते अमीरचंदांच्या क्रांतिकारक चळ- वळीत समाविष्ट झाले. अवधविहारी हे पक्के वेदांती होते व क्रांतिकारक चळवळींत निधड्या छातीने दिलेला भाग पार पाडीत असतां दिसून येणारी त्यांची निर्भयता त्यांच्या सहकाऱ्यांना मुग्ध करून टाकीत असे. विख्यात महात्मा हंसराज यांचा मुलगा बलराज, भाई परमानंद यांचे चुलत बंधु बालमुकुंद हेहि अमीरचंदांच्या दलांतीलच होत. रासबिहारींच्या आंदोलनांत या सर्वांचे संबंध असल्यामुळे थोडक्यांत त्यांची माहिती येथे दिली आहे. डेहराडूनच्या फारेस्ट रिसर्च इन्स्टिटयट- मध्ये हेडक्लार्कचे काम करीत असतां रासबिहारींचा संबंध बंगालच्या मिदनापूर अनुशीलन समितीच्या सदस्यांशी आला. लवकरच ते या संस्थेच्या महान ध्येयाशी एकरूप झाले व लगेच त्यांनी क्रांतिजीवन डेहराडून व कसौली येथील गुरखा सैन्यांत स्वतःचे संबंध प्रस्था- पित करून तेथें ब्रिटिशांविषयीं द्रोह पसरावयास प्रारंभ केला. अनुशलिन समितीच्या सूत्रचालकांना रासबिहारींची योग्यता कळून आली व या नवीन सभासदाला काही सांगण्याऐवजी आपणासच शेवटपर्यंत मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्याच्याच ठिकाणी असल्याचे आढळून येउन त्यांनी त्यांच्या तंत्राने वागा- वयास प्रारंभ केला. रासबिहारीच्या ठिकाणी एक अद्भुत सामर्थ होते; ते हे की, ते जेथे जात तेथे त्यांच्या भोवती अल्पाव- काशांत माणसें गोळा होत व जो प्रांत रासबिहारीच्या पदन्यासा- पूर्वी मृतवत् असावयाचा तो त्यांच्या आगमनानंतर थोड्याच अवकाशांत व्हेसुवियस ज्वालामुखीसारखा दाहक तप्तरसांचे लोटचे लोट वमन करूं लागत असे. १८५७ च्या स्वातंत्र्य- युद्धाचे सेनानायक तात्या टोपे यांना ग्वाल्हेरजवळील शिवपुरी येथे फासावर चढावण्यांत आल्यानंतर जी अपूर्व आकर्षण-शक्ति त्यांच्या व्यक्तित्वाबरोबरच लुप्त झाली, ती जणूं रासबिहारीच्या आश्रयानेच पुनश्च प्रगट झाली होती! क्रांतिकारकांच्या खासगी बैठकीतून रासबिहारीला यानंतर रासूदादा अथवा रासूदा या घरगुती नांवाने संबोधण्यांत येऊ लागले. १९११ च्या प्रारंभी रासबिहारीच्या नेतृत्वाखाली डाका येथें अनुशीलन समितीची एक बैठक झाली. त्या बैठकीत अलीपूर षड्-यंत्राच्या परिस्फोटा- नंतर क्रांतिकारकांच्या कार्याच्या झालेल्या विचक्याची गंभीर चर्चा करण्यांत आली. यतींद्रनाथ मुखोपाध्याय अथवा प्रख्यात जतीन भुकर्जी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सारा बंगाल संघटित होत असल्यामुळे तेथे रासबिहारींची आवश्यकता नव्हती. म्हणून या महत्वपूर्ण बैठकीत बंगालखेरीज सारा उत्तर भारत रासबिहा- , ८ रासबिहारी वसुंचें रींचे कर्तव्यक्षेत्र म्हणून ह्यांच्याकडे सोपविण्यांत आला. ठिक- ठिकाणी विखुरलेली अन योग्य नेतृत्वाच्या व मार्गदर्शनाच्या अभावी विस्कळित झालेली क्रांतिकारक दलें संघटित करण्याचे व त्या सर्वांना एकसूत्रतेत आणण्याचं महत्वपूर्ण काम या वेळी रासबिहारी यांनी स्वतःच्या शिरावर घेतले. प्रख्यात वसंत- कुमार विश्वास हे या कामांत रासबिहारींचे सहचर म्हणून राहिले. वसंत-कुमार विश्वास व शचीन्द्रनाथ संन्याल हे रासबिहारीचे डावे-उजवे हात होते. वसंत-कुमार यापुढे डहराडून येथे बाह्यतः रासबिहारींचे नोकर म्हणून ह्यांच्या घरी राहूं लागले. या छद्मी नोकराला हरिदास या नांवाने लोक ओळखीत असत. काम पतकरल्यानंतर अमीरचंदांच्या दलापैकी प्रथम दीनानाथ व चतर्जी या दोघांशी रासबिहारींनी परिचय करून घेतला, व त्यानंतर बालमुकुंद, अवधविहारी व मास्टर अमीरचंद यांच्याशी आळख करून घेऊन आपल्या व्यक्तित्वाचा दिल्लीच्या क्रांतिकारक दलावर त्यांनी पूर्णपणे प्रभाव बसविला. रासबिहारींनी आपला नोकर हरिदास अथवा खरे म्हणजे सहकारी वसंतकुमार विश्वास यांच्या साहाय्याने मास्टर अमरिचंद, अवध बिहारी, भाई बालमुकुंद व दीनानाथ यांना बाँबचें शिक्षण दिले व Liberty नांवाच्या राजद्रोह पसरविणाऱ्या पत्रकांचा त्याच्या द्वारें खूप प्रचार करविला, या पत्रकांतून ब्रिटिशांची जशी नालस्ती केली जाई, तसेच आपल्या देशबांधवांना भरपूर उत्तेजित करण्यात येत असे. एकदां त्या पत्राकांत असे प्रतिपादन करण्यांत आले होते की, “ देशाचे शत्रु मग-ते कोणत्याही पंथाचे, वर्णाच वा जातीचे असोत- त्यांचा नाश केलाच पाहिजे अशी गीता, वेद व कुराण यांची शिकवण आहे. इंग्रजांच्या यंत्रसिद्ध शस्त्रसंभाराना भिण्याचे क्रांतिजीवन आपणांस काही कारण नाही. कारण आपण संख्येने त्यांच्या. पेक्षां इतके बलिष्ठ आहोत की, त्यांच्याजवळून त्यांच्या तोफा व इतर शस्त्रास्त्रे आपण हिसकावून घेऊ शकतो. " ४ पंजाबमध्ये रासबिहारी यानंतर रासबिहारी मास्टर अमीरचंदांशी पुढच्या कार्या- संबंधी बोलून स्वतः पंजाबमध्ये गेले. तेथील कार्यकर्त्यांच्या- मध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांनी गुप्त संस्थांची स्थापना केली व भाई बालमुकुंद यांच्या हाती तेथील कार्याची सूत्र सोपविली. रासबिहारीच्या या आगमनाचा पंजाब प्रांतावर झालेला परिणाम इतका विलक्षण होता की, १९१२ साली सर मायकेल ओडवायर यांची पंजाबचे गव्हर्नर म्हणून नेमणूक करीत असतांना त्यांना सरकारतर्फे असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले होते की, " पंजाबमध्ये ज्वालामुखी स्फोट होण्याच्या बेतांत आला असून त्याचा स्फोट केव्हां होईल याचा कांही एक नियम नाही. तरी तो स्फोट सहन करण्याची पूर्ण तयारी ठेवूनच पंजाबचा कारभार हाती घ्यावा. " बाँब व पिस्तुलांचा उपयोग करून घेउन इंग्रजी रक्ताने भारताची भूमि ओली चिंब करणे व पवित्र सप्तनद्यांचे पाणी लालभडक करणे हाच खरा युगधर्म आहे असे मानणारी एक चमत्कारिक मनो- वृत्तीची युवक-साष्ट नव्या जोमाने उत्पन्न होऊ लागली असून इंग्रजी सत्तेने केलेले हिंदुस्थानचे शांततापूर्ण नंदनवन जाळून पोळून बेचिराख करण्याचा व रुद्राच्या प्रलयकर तांडवाचें नृत्यपीठ ठर- णारे तें भयानक स्मशान बनविण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे, ही गोष्ट भारत सरकारला केव्हांच कळली होती. त्यांना कळले नव्हते ते हे की, या अभिनव युवक सृष्टीचा खरा सूत्रधार रासबिहारी वसंचे कोण आहे? म्हणून सरकार खरें बेचैन होते. सरकारने सर माय- केल ओडवायर यांना यांना पंजाबच्या परिस्थितीची नीट कल्पना आणून दिल्यानंतर मायकेल हे पंजाबकडे अतिशय सावधगिरीने लक्ष पुरवीत होते. पण रासबिहारी कांहीं कच्च्या गुरूचे चेले नव्हते. क्रांतिशास्त्रांतला नेहमीचाच नियम प्रस्थापित सत्तेचा अपेक्षा. भंग हा आहे. गनिमी काव्याच्या पद्धतीत या नियमाला अतिशय मानाचे अन् महत्वाचे स्थान आहे. रामबिहारींनी हे ओळखलें की पंजाबवर सरकारचे अधिक लक्ष आहे. म्हणून त्यांनी दिल्ली हे आपल्या अंगीकृत कार्याच्या पहिल्या धडाकेबाज सलामीचे क्षेत्र निवडले आणि त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली निर्वेधपणे सुरु झाल्या. सरकार या सुमाराला अशी संधी पहात होते की, जिच्यामुळे हिंदुस्थानांतील प्रक्षोभक असंतोषाचे जे मूळ — बंगालची फाळणी' तेच नष्ट करून टाकून हा असंतोष कायमचा गाडून टाकतां येईल. अर्थातच बंगालची फाळणी रद्द करतां आली तरी तिच्यामुळे क्रांतिकारक चळवळ नष्ट करता येईल ही सरकारची अपेक्षा मात्र फोल ठरली. सन १९१० साली इंग्लंडचे राजे व हिंदुस्थानचे बाद- शहा सप्तम एडवर्ड हे रिवस्तवासी होऊन त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव राजे पंचम जॉर्ज हे गादीवर बसले, पूर्व योजनेनुसार नूतन बादशहा पंचम जॉर्ज हे हिंदुस्थानांत आपली पवित्र, वैभव- शाली व भाग्यशाली पायधूळ झाडावयास निघाले ! दिल्ली येथे १२ डिसेंबर १९११ रोजी सम्राट पंचम जॉर्जच्या उपस्थितीत इतका सभव्य दरबार. करण्यांत आला की, त्याच्या गाजावाजाने नुसत्या हिंदुस्थान देशांतलेच नव्हे तर द्वीपद्वीपांतरांतले देखील दिकोन टमटमन उठले । बादशहांनी आपल्या प्रजेवर स्वतःच्या क्रांतिजीवन औदार्याची, श्रेष्ठतेची व अभिजात भूपतित्वाची छाप पाडीत अशी घोषणा केली की, बंगाली प्रजेच्या आंतरिक असंतोषाकडे व दुःखा- कडे लक्ष पुरवून, लॉर्ड कर्झन यांच्या अमदानीत झालेली फाळणी खास बादशाही आज्ञेनुसार रद्द करण्यांत येत आहे. पूर्व व पश्चिम बंगाल पुनश्च एकत्र जोडण्यांत येत असून एकसंधी बंगालचे आधिपत्य यापुढे एकाच लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातांत राहील. याप्रमाणे बादशहांची घोषणा होउन हिंदी प्रजेने केलेल्या स्वाग. ताचा आणि अभिवादनाचा स्वीकार करीत बादशहा निघून गेले. पण हा प्रसंग झाला तरी त्याचे कवित्व शिल्लक राहिले होते. नूतन बादशहांचे नूतन व्हाइसरॉय लॉर्ड हॉर्डिज यांची या कवित्वाच्या समारोहांत राजप्रतिनिधि म्हणून नियुक्ति झाली होती. नव्या राजवटीची नवी राजधानी म्हणून जुन्या मोंगली राजवटीतील दिल्ली- च्या बाहेर नवी दिल्ली या नांवाचे एक उपनगर बसवावयाचे ठर- विण्यांत आले. तदनुसार या नव्या वैभवशाली उपनगराचा कोन- शिला-समारंभही मोठ्या उत्साहाने व वैभवाने उरकण्यांत आला. व्हाइसरॉय व भारत सरकार यांच्यासाठी म्हणून या उपनगरांत स्वतंत्र गगनचुंबी इमारतींची योजना झाली. संस्थानिकांचे वैभवशाली व मांडलिकत्वाचे निदर्शक असणारे वाडे राजप्रातनिधीच्या प्रासादा- भोंवताली बांधण्याच्या योजना झाल्या व बादशहांच्या दिल्ली दरबारानंतर बरोबर एक वर्षाने दि. २३ डिसेंबर १९१२ रोजी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिज यांचा थाटाचा नगरप्रवेशसमारंभ ठरला. राजसत्तेच्या वैभवाचें, दरायचे व थाटाचे या समारंभांत अपूर्व प्रदर्शन करण्याच्या योजना आखण्यांत आल्या होत्या. पण सरकारची कल्पना, भारतीय विप्लववाद व बंगालची फाळणी या दोन गोष्टींत जन्यजनक भाव ठरवितांना चुकली होती.
रासबिहारी बसुंचें बंगालच्या फाळणीने विप्लववाद उत्पन्न झाला नाही, तर त्याला जनतेंत पसरायला एक संधि लाभली इतकेच काय तें. बंगालची फाळणी होणें अगर झालेली फाळणी रद्द होणे या दोनहि गोष्टी क्रांतिकारकांच्या दृष्टीने इंग्रजी राज्य हिंदुस्थानांत कायम राहणार आहे या वस्तुस्थितीच्या जाणिवेमुळे फारशा किंमतीच्या नव्हत्या. क्रांतिकारकांना या देशांतलें इंग्रजी राज्यतंत्र उलथून पाडावयाचे होते. चाळीस कोटी लोकसंख्येचा व जीवनाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने सर्व जगताचें गुरुपीठ म्हणून गाजलेला हा देश मूठभर लोकसंख्येच्या इंग्लिशांच्या ताब्यांत राहून कुत्र्याहूनहि लाजिर- वाणे जीवन जगत आहे, या गोष्टीची क्रांतिकारकांना मनापासून चीड आली होती. ब्रिटिश सरकारला त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यावयाची होती की, १८५७ साली सेनापति तात्या टोपे यांनी या देशांत प्रस्थापित होत असलेले परकीय राज्यतंत्र उल- थून पाडण्यासाठी समशेर जी निष्कोषित केली, ती अनेक हात बद- लत गेले व जातील तरी, इंग्रजी राज्य जोपर्यंत या देशांत टिकून होतें तोवर म्यानांत जाणे केवळ अशक्य होते.बंगालची फाळणी रद्द झाल्याने त्या प्रांताचा सांस्कृतिक एकसंधीपणा राखला गेला हे खरे आहे; पण बंगाल हा परक्या राज्यसत्तेने नेमलेल्या एका लेफ्टनंट गव्हर्नराच्या हाताखाली नांदणार आहे, ही जाणीव काही फाळणीच्या जाणिवपेक्षा कमी दुःखप्रद नाही. हिंदुस्थानांत या व अशा अनेक विषबीजांवर तात्पुरते उपचार करून भागणारे नसून ही सारी विषबीजे पेरुन स्वतःच्या स्वार्थासाठी चाळीस कोटी भारतीय प्रजेचे रूपांतर श्वासोच्छ्वास करणाऱ्या प्रेतसंभारांत करावयाचें ज्या सत्तेने ठरविले आहे, ती इंग्रजी राज्यसत्ता आम्हांला या देशांत नको असून तो उखडून टाकण्यासाठीच मुख्यतः क्रांतिजीवन आम्ही शस्त्र उपसलें आहे, हे क्रांतिकारकांना नुसत्या सरकारच्याच' नव्हे तर जगाच्या अन् जगत्सूत्रचालकाच्याहि नजरेस आणून द्यायचे होते. हे व्याख्यानांनी साधणारे नव्हतें, व वर्तमान-पत्रां- तील लेखांनी भागणारे नव्हते. प्रत्यक्ष रणात्मक कृतीची या गोष्टीसाठी अतिशय आवश्यकता होती. शांततेने दिल्ली दरबार हिंदुस्थानांत पार पडूं शकला याचा अर्थ, हिंदुस्थानांतील लोक गुलाम व्हावयासाठीच जन्माला आले आहेत, असा जगांतील स्वातंत्र्यवाद्यांनी केला असणे अत्यंत स्वाभाविक होते आणि तसा अर्थ होऊ देणे यांत भारताच्या यशोगारैवाचाच नुसता नव्हे, तर साऱ्या विशाल मानवतेचाहि अत्यंत अपमान होता. क्रांतिकारकांचे सेनापति रासबिहारी बसू यांनी ही परिस्थिति नटिपणाने ओळखली व भारताच्या यशोगौरवाला लागलेले हे लांछन धुवून काढण्याचा त्यांनी दृढनिश्चय केला. त्यांना साऱ्या जगताच्या कानाचे पडदे फाडून स्वातंत्र्यवाद्यांच्या हृदयाला जाणीव होईल इतक्या जोराने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकांक्षची उच्च घोषणा उच्चारावयाची होती. ज्यांनी दशदिशांचे दिक्कोन दणाणून उठतील, दिग्गजांची मस्तकें भणाणून जातील, ब्रह्म- देवाचें कडासन तडकून जाईल अन् आदिनारायणाची अखंड समाधि भंग पावेल, इतकी गोठी गर्जना रासबिहारींना करावयाची होती. भारताच्या यशोगौरवाला लागलेले कृष्ण लांछन धुवून काढण्यासाठी ब्रिटिश राज्यसत्तेलाच रक्तलांछन लावावयाचे रास- बिहारीनी ठरविले व त्या दृष्टीने राजप्रतिनिधि लॉर्ड हार्डिज यांचा हा नगरप्रवेशसमारंभ म्हणजे एक पर्वणीच आहे असे ते समजले. ५ स्फोट, सहकाऱ्यांना फाशी, काळे पाणी ठरल्याप्रमाणे दि.. २३ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हॉर्डिज रासबिहारी बसुंचे , यांचा नगरप्रवेशसमारंभ मोठ्या दर्पानें अन् दिमाखाने सुरू झाला. छिन्नमुंडा चंडिकेच्या काल्पनिक रुधिरप्रियतेला वास्तवतंत लाजविणाऱ्या त्या रुधिरप्रिया दिल्लीच्या सुभव्य राजरस्त्यावरून तोयाने मिरवीत लॉर्ड हार्डिज यांची स्वारी दिल्लीच्या चांदणी- चौकांत आली मात्र, तोच धाड्दिशी बाँबचा भयानक स्फोट होऊन सारे अंतराळ धुराने अन् वायुमंडळ त्या स्फोटाच्या दणक्याने भरून गेलें. गुरु तेगबहादूर अन् भाई मातदास यांच्या पवित्र रक्ताने अवघ्या दीड-दोन शतकांपूर्वी माखून निघालेल्या त्या चांदणी चौकाची चिडलेली वास्तुदेवताच जणू या स्फोटाच्या रूपाने मिरवीत येणाऱ्या ब्रिटिश राजसत्तेच्या त्या प्रतिनिधीकडे पाहून विकट अट्टहास्य करीत होती. पण ज्या अज्ञात शक्तीनें तो भयानक बाँब व्हाइसरॉयच्या रोखाने फेकला होता, तिच्या दुर्दैवाने अन् हॉर्डिंज यांच्या आयुष्याचे सूत्र बळकट असल्यामुळे बाँब त्यांना न लागतां तो हत्तीवर मागे बसलेल्या त्यांच्या अंग- रक्षकाला लागला. अंगरक्षक तर जागच्या जागीच ठार झाला; व व्हॉइसरॉयांच्या मानेजवळ थोडीशी जखम झाली. पण झालेला प्रकार इतका अनपेक्षित व धक्का देणारा होता की, व्हाइसरॉय- साहेब जागच्या जागी मूर्छत पडले, जनता सैरावैरा धावू लागली, तमासगीर पळू लागले व लष्कर आणि त्यावरील अधिकारी स्तिमित होऊन गेले. काही वेळ गेल्यानंतर पोलिसांनी व लष्क- रान साऱ्या चांदणी चौकाला वेढा दिला. आसमंतांतली प्रत्येक वस्तु अन् व्यक्ति यांची कसोशीने तपासणी झाली. पण व्यर्थ । त्या दिवशीच काय पण कित्येक महिने गेले तरी बाँब फेक- णाऱ्यांचा मागमूस देखील लागेना । त्यानंतर बरोबर पांच महिन्यांनी मे १९१३ मध्ये लाहोरच्या क्रांतिजीवन लॉरेन्स गार्डनमध्ये सिव्हिालयन पदाधिकारी पार्टीच्या निमित्ताने एकत्र जमले असता तेथे एक बाँबचा स्फोट झाला. आणखीही कित्येक ठिकाणी या घटनांची पुनरावृत्ति झाली. पण सरकारने पुष्कळ डोके आपटले तरी ह्या घटनेचा सूत्रधार तर दूरच राहिला, पण लहान-सहान गोष्टीचाही मागमूस लागू शकला नाही आणि पत्ता तरी कसा लागणार ? कारण या घटनेचे रुद्रकाव्य ज्यांच्या प्रतिभेतून जन्म पावले होते व ज्यांच्या क्रियाशक्तीने तें पूर्ण केलें होते ते रासबिहारीच या वेळी सरकारच्या गुप्तचर खात्याचे जबाबदार अधिकारी म्हणून काम करीत होते. वरून दिसायला ते डेहराडूनच्या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये हेडक्लार्क होते. सरकारच्या मते ते त्यांच्या गुप्तचर खात्यांतील महत्वाचे अधि- कारी होते, व खरे म्हणजे या देशांतील ब्रिटिश राज्यतंत्र मुळा- पासून उखडून फेकून द्यावयाच्या प्रतिज्ञनें हिंदुस्थानांतली स्मशान- शांतता जाळून टाकावयास हातांत पेटती मशाल घेउन संबद्ध झालेले ते महान क्रांतिकारक होते ! कित्येक दिवस याप्रमाणे शोधांत गेल्यानंतर एके दिवशी कलकत्ता येथे राजा बझारस्टीट- वरील एका घराची झडती घेत असतांना प्रथम अवधबिहारीच्या नांवाचा व त्यानंतर मास्टर अमरिचंदांच्या नांवाचा पत्ता लागला. दिल्ली येथे अवधाबहारी, मास्टर अमीरचंद यांच्या घरच्या झडत्या घेण्यांत आल्या. त्या वेळी तेथे सिमल्याहून आलेले एक एम.एस. अशी सही असलेले पत्र मिळाले. लगेच मास्टर अमीरचंद, अवध- बिहारी व अमीरचंदांचा मुलगा सुलतानचंद यांना अटक करण्यांत भाली. या एम. एस. ची चौकशी केल्यानंतर त्यांचे खरें नांव दीनानाथ असल्याचे आढळून आले. तात्काळ लाहोर शहरां- तल्या साऱ्या दीनानाथांच्या घराला कल ठोकण्यांत येऊन रासबिहारी वसुंचे त्यांना तुरुंगांत बंद करण्यांत आले. त्यांतला एक दीनानाथ तोंडाने राजकीय स्वरूपाची फार बडबड करीत असून रिकाम- टेकडा असे. त्याला पोलीस कस्टडीत आणतांच त्याने मोठ- मोठ्याने रडावयास व ओरडावयास प्रारंभ केला. असे सांगतात की, डेप्युटी सुपरिटेंडेंट सरदार सुक्खासिंह यांचे तापलेल्या निखान्यासारखे लाल व वटारलेले डोळे पहातांच घाबरून जाऊन थरथर कापत तो म्हणूं लागला की, 'मी हवें तर सगळे कार- स्थान सांगतो; परंतु कृपापूर्वक हे भयंकर डोळे मला दाखवू नका. ' दीनानाथ माफीचा साक्षीदार बनला. त्याने सांगितले की, १९०८ साली हरदयाळ हिंदुस्थानांत आले असता त्यांनी राजकीय शिक्षणाचे वर्ग सुरू केले होते. त्या वेळी त्यांच्या शिष्य- वर्गात मि. जे. एन. चटर्जी व दीनानाथ होते. हरदयाळ हिंदुस्थान सोडून जात असतां त्यांनी आपल्या जागी मास्टर अमीरचंद यांची योजना केल्यामुळे दीनानाथही यानंतर दिल्ली येथे येऊन अभीरचंदांच्या जवळ राहूं लागला. १९११ च्या सुमारास दीना- नाथाचा परिचय रासबिहारी बसू यांच्याशी झाला. रासबिहारींनी दीनानाथ, अवधाबहारी, अमीरचंद इत्यादि मंडळींचा परिचय वसंत-कुमार विश्वास, जे रासबिहारीच्या जवळ हरिदास या छद्मी नांवाने नोकर म्हणून होते, त्यांच्याशी करून दिला. रासबिहारींनीच या सगळ्या मंडळींना हाताशी धरून क्रांतिकारक संघटना तयार केली. दीनानाथनें या नांवाव्यतिरिक्त लाला हंसराज यांचे चिरंजीव बलराज, भाई परमानंदांचे चुलतबंधू व जोधपूरच्या राजकुमारांचे शिक्षक भाई बालमुकुंद, चरनदास इत्यादि लोकांचीही नांवें सांगितली. दीनानाथने लाहोर,दिल्ली,येथील साऱ्या क्रांतिकारक घटना या रासबिहारींच्याच मेंदूतून तयार क्रांतिजीवन झाल्या असून उपयुक्त गुप्तदलानेच त्या पार पाडल्या असल्याचे सांगितले. दीनानाथानें लॉरेन्स बागेमधील घटनेचें जरी व्यवस्थित वर्णन केले तरी त्याला दिल्लीच्या घटनेचे काही नीट वर्णन करतां आले नाही. पण दीनानाथाने आपल्या साक्षीत रासबिहारींचें क्रांतिकार्यातलें महत्व व त्यांचे राहण्याचे ठिकाण यांचा परिस्फोट केल्यामुळे यापुढे रासबिहारींना आपला आयुष्यक्रम बदलणें प्राप्त झालें. कारण सरकारने त्यांच्यावर वारंट काढले. या वेळी दिल्लीला जखमी झालेले व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंज हे डेहराडून येथे आले असतां रासबिहारी हे गुप्तचर विभागातर्फे त्यांच्या स्वागताच्या योजनेंत काम करीत होते. पण ही कुणकुण कळतांच ते एकदम गुप्त झाले. रासबिहारींना पकडण्याचा सरकारने पुष्कळ प्रयत्न केला; पण अखेरीस ते सांपडत नाहीत असे पाहून १९१४ सालच्या मार्च महिन्यांत तेरा अभियुक्तांवर खटला भरण्यांत आला. ते अभियुक्त हे होते-दीनानाथ, सुलतानचंद, मास्टर अमीरचंद, अवधविहारी, भाई बालमुकुंद, वसंत कुमार, विश्वास ऊर्फ हरिदास, बलराज, लाला हनुमंतसहाय, चरनदास, मन्नूलाल, रघूवर शर्मा, रामलाल व खुशीराम. यांपैकी दीनानाथ हा एका पोलिस अधिकाऱ्याचे डोळे पाहून घाबरून माफीचा साक्षीदार बनलाच होता. मास्टर अमीरचंदाचा मानीव मुलगा कुलकलंक सुलतानचंद हा दंडाबेडीच्या तडाख्याने माफीचा साक्षीदार बनला. सुलतानचंदाच्या या खाल्ल्या घरचे वासे मोजण्याचे कृत्याने धैर्यमेरू मास्टर अमीरचंद यांना इतकें परमावधीचे दुःख झाले की, तो साक्ष द्यावयास उभा राहिला त्या वेळी मास्टरजी भर कोर्टात अश्रुपात करूं लागले. ५ ऑक्टो- बर १९१४ रोजी सेशन्स जज्जाने निकाल देतांना अवधबिहारी, २ रासबिहारी बसंचे मास्टर अमीरचंद व भाई बालमुकुंद यांना फांशी; बलराज, लाला हनुमंतसहाय व वसंतकुमार विश्वास यांना आजन्म काळे पाणी, अशा शिक्षा ठोठावून बाकीच्या आरोपितांना सोडून दिले. नंतर सरकारतर्फे खटला हायकोर्टामध्ये नेण्यांत आला. हायकोर्टाने आपल्या निर्णयांत मास्टर अमीरचंद, अवधबिहारी, भाई बालमुकुंद व वसंत कुमार विश्वास यांना फाशी, चरणदासाला आजन्म काळे पाणी, व बलराज आणि लाला हनुमंतसहाय यांना सात वर्षे सक्त मजुरी अशा शिक्षा ठोठावल्या. वास्तविक पहातां या खट- ल्यांतील एकाहि साक्षीदारानें लॉर्ड हार्डिंजवर दिल्ली येथें फेकण्यांत आलेल्या बाँबच्या खटल्यांत गोवण्यांत आलेल्या व्यक्तीशी संबंध असल्याचे सिद्ध केले नाही. पण कायद्याच्या दृष्टीने त्यांच्यावरील आरोप. सबळ पुराव्यानिशी सिद्ध व्हावयास हवा. असा सिद्ध होत नसतांना देखील आकसाने सरकारने या चार लोकांना फाशी दिले व प्रीव्ही कौन्सिलने त्यांचे अपील ठोकरून देऊन कायद्याच्या जगांत स्वतःवर असलेल्या जबाबदारीची ही बजावणी केली ! याचें नांव इंग्रजी न्याय ! या आरोपितांपैकीं, वसंतकुमार विश्वास हे हरि- दास या नांवानें रासबिहारीच्या जवळ नोकर म्हणून राहात होते हे मागें सांगितलेच आहे. वसंत कुमार हे बंगालमधील नदिया जिल्ह्याचे रहिवासी होते. काही दिवस आपल्या लाडक्या रास्दा- जवळ डेहराडून येथे वास करून नंतर १९१२मध्ये ते लाहोर येथे एका दवाखान्यामध्ये कंपाउंडरची नोकरी पतकरून राहू लागले. दिल्लीच्या बाँबची अद्भुत घटना ज्या वेळी घडून आली त्या वेळी वसंत कुमार हे लाहोरमधून एकाएकी गुप्त झाले होते असे सांगतात. १९१३ सालच्या डिसेंबर महिन्यांत ते बंगालमध्ये गेले व १९१४ साली तेथेच अटक करून त्यांना लाहोर येथे कोतिजविन आणण्यांत आले. प्रथम वास्तविक त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. पण लॉर्ड हार्डिंजवर बाँब फेकण्याचें साहस कर- णा-या व्यक्तीचा कांही एक पत्ता न लागू शकल्यामुळे पंजाब 'प्रांताचे प्रख्यात रक्तपिपासू गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर यांचा क्रोधवन्हि इतका भडकला होता की, त्यांनी बुद्धया अपील करून रासबिहारींच्या या निष्ठावंत अनुचराला वधस्तंभावर लटक- विलें.फाशीच्या वेळी वसंत कुमारांचे वय केवळ २१ वर्षांचे होतें ! ६ अद्भुत साहस आणि अपूर्व ध्येयवाद हायकोर्टाच्या न्यायमूर्तीनी ' फाशीची शिक्षा' ही अक्षरे उच्चारतांच हे चारहि वीरश्रेष्ठ अतिशय प्रमुदित झाले. शांतपणे निद्रादेवीच्या निर्भर आलिंगनांत मग्न झालेल्या अवध बिहारीना वधस्तंभाकडे नेण्यास्तव म्हणून जेव्हा उठविण्यांत आले त्या वेळी त्यांचा इंग्रज पर्यवेक्षक त्यांना म्हणाला की, “ आपली अंतिम इच्छा काय आहे ? " त्यावर अवध बिहारी आपली तेजस्वी नि नि तीक्ष्ण दृष्टि त्यांच्यावर रोखोत किंचित् स्मितपूर्वक म्हणाले, " अंतिम इच्छ। ? अरे, जी इच्छा जन्मभर हृदयाशी बाळगली ती या अंतिम वेळी सांडून देण्यासाठी का आम्ही बाळगली ? जी इच्छा आरंभी तीच अंतीही तशीच कायम आहे. तुला तो ऐकावयाची आहे काय ? ऐक तर माझी अंतिम इच्छा, नीट कान देऊन ऐक. इंग्रजी साम्राज्य नष्ट व्हावे, ही माझी अंतिम इच्छा आहे !" तो पर्यवेक्षक त्यावर त्यांना म्हणाला, “शांत व्हा, शांत व्हा. आज आतां प्राण दतांना तरी शांतपणाने तो द्यायला काय हरकत आहे ? आतां या असल्या गोष्टींपासून काय बरे लाभ आहे ? अवधबिहारी यावर म्हणाले, अन् शांति ? आज कसली शांति आली आहे ? माझी तर अशी उत्कट तर अशी उत्कट इच्छा आहे आज रासबिहारी वसुंचे की, आजपासून आग भडकावी. भयंकर आग ! अगदी चारी बाजूंनी पेट घेऊन साऱ्या विश्वाला भाजून काढणारी महाभयंकर आग ! अशी आग भडकावी की जिच्या धडाडून उफाळणाऱ्या 'ज्वालांमध्ये तुम्ही, आम्ही, तुमचें सारे साम्राज्य आणि आमची लाजिरवाणी दासता या साऱ्यांचे भस्म होऊन भारतवर्षाचे काही काळ पेटतें अरण्य होऊन जाईल. कारण या महान् यज्ञांतूनच भारताचे वैभवशाली अन् दीप्तिमान स्वरूप उदयाला यायचे आहे ! " फाशीं जातांना या साऱ्या वीरांनी वधस्तंभावर आनंदाने उड्या घेतल्या, फासाची तात स्वतःच्या हातांनी ओढून आपल्या गळ्याभोवती आवळन घेतली अन् एकवार वंदे मातरमच्या जय- निनादांनी आसमंतांतील वातावरण मुखरित करून आपली सेवा निवेदन करण्यासाठी ते अशाश्वत जगाचा शेवटचा निरोप घेउन देवलोकी निघून गेले. ७ धैर्याच्या महामेरूला करुणेचा पाझर हसतखेळत वधस्तंभावर लटकलेल्या या महाभागांच्या मध्ये वसंतकुमार विश्वास व भाई बालमुकुंद हे तारुण्याच्या दारवंठ्यावर नुकतेच प्रवेश केलेले होते. भाई बालमुकुंद हे वधस्तंभावर लटकल्या- नंतर त्यांची पत्नी रामरक्षिता ही सती गेली. बालमुकुंद हे पंजाबकेसरी लाला लजपतराय यांचे निष्ठावंत व प्रमुख विश्वस्त होते. इ. स. १९११ च्या सुमारास रामरख्खी नांवाच्या सुंदर व सद्गुणी मुलीशी त्यांनी प्रेमविवाह केला होता. पण अल्पवयांतच त्यांच्या सोन्याच्या संसारांतील स्वर्गीय आंनदाच्या उन्मेषावर हा कुठाराघात झाला. सरोवराच्या काठी प्रफुल्ल कमलिनी वायूच्या मंद झुळकीबरोबर डुलत असतात.भ्रमराच्या खुळ्या मनाला असे वाटतें की, त्यांचा हा विभ्रम नेहमी असाच रहावा. पण त्या कमलिनींना - क्रांतिजीवन गजेंद्राच्या विकराल शुंडादंडाचा विळखा पडून त्या मुळासकट उपटून फेंकल्या जातात. पुष्पें ही खुडली जायचीच. ती देवाच्या चरणी पडली तर जीवनाची इतिकर्तव्यता त्यांनी मिळविली. 'परी जे गजेंद्रशुंडेने उपटिलें । श्रीरामचरणीं समापियलें। कमलफूल तें अमर ठरलें । मोक्षदायी पावन । अनेक फुले फुलती । फुलोनिया सुकोनि जाती। कोणी तयांची महती गणती । ठेविली असे।' बालमुकुंदांचा सोन्याचा संसार उधळला. पण त्यांचे जविन- पुष्प मात्र श्रीहरीच्या चरणी समर्पण झालें. फाशीची शिक्षा झाल्यावर ते उद्गारले, “ ज्या लाहोरांत माझे पूज्य पूर्वज भाई मतिदास ह्यांनी स्वधर्म व स्वातंत्र्य याकरिता बलिदान केले तेथेच मीहि मातृभूच्या चरणी आत्मसमर्पण करीत आहे. यांत 'मला समाधान आहे. " फाशीचा दिवस निश्चित झाल्यावर बालमुकुंदांची पत्नी मधूनमधून त्यांना भेटावयास जात असे. फांशीच्या शिक्षेची वार्ता ऐकतांच ती दुःखाने वेडी झाली! कदलीच्या कोमल गाभ्या- वर झालेला हा एक दारुण कुठाराघातच होता. आणि तोहि किती अवचितंपणे ! किती अवेळी ! ज्या दिवशी बालमुकुंद धीरोदात्ततेने वधस्तंभावर चढून गेले त्या दिवसापासून तिने अन्न- पाणी वर्ण्य केलें व शेवटी तिनेंहि पतीला भेटण्यासाठी स्वर्गाला प्रयाण करून वधस्तंभावर प्रणयसंगीताचे अमरनाद उमटविले. भारतीय सतींच्या मालिकेत ती मेरुमण्याच्या जागी विराजमान झाली. पतीनंतर ती सती तीन आठवडेसुद्धां मृत्युलोकांत राई शकली नाही. पाण्यावांचून नदी व प्राणावांचून काया कशी राह शकेल ? बालमुकुंद म्हणजे त्या सतीचे काय नव्हतें ? तिचें वृर तिच्याच तोंडून वदवून तिचे वडील दीर व भारताचे महान नेते २२ रासबिहारी बसूंचे - कै. श्री. भाई परमानंद यांनी आपल्या आत्मचरित्रांत हृदयस्पर्शी रीतीने चित्रित केले आहे. त्यांत कारुण्य इतकें साठलें आहे की, वाचून हृदय असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूसरी ओघळ- तील. भाईजी लिहितात- (१) फल उमलले होते. फुलाच्या पाकळ्यांची मृदुता आणि त्याचे सौन्दर्य यावर मोहित होउन कोकिला कूजन करीत होती. इतक्यांत माळी आला व फुलाभोंवती पिंगा घालणारी कोकिला भीतीने उडून पळून गेली. परंतु माळ्याने निर्दयतेने फूल खुडून त्याच्या पाकळ्या पाकळ्या तोडून आपल्या टोपलीत भिर- कावून दिल्या. कोकिला ! तिने किंचाळून आक्रंदन केलें; पण, सारें ब्यर्थ ! ती देखील खाली चक्कर येऊन पडली व आपल्या आवडत्या फुलाबरोबर परलोकी चालती झाली. (२) " तो वसंत ऋतु होता. बालमुकुंद तुरुंगांत आणि मी घरी होते. सहा महिनेपर्यंत मी त्यांची वाट पहात होते. सारे लोक म्हणत, ' असं वेड्यासारखं करूं नकोस. ते लवकरच सुटून परत येतील.' यावर मी म्हण, ' तो दिवस केव्हां उगवणार ? ही दुःखाची काळी कभिन्न रात्र केव्हां संपणार? येईल का तो सुखाचा क्षण ? ' मला दिल्लीला जाण्याचा केव्हां योग आला असता ? पण त्यांना दिल्लीला ठेवले होते. खटल्याची चौकशी देखील तेथेच चालू होती. म्हणूनच मी दिल्लीला गेलो. त्या तुरुंगांतील बराकी फार भयंकर होत्या व येवढ्या कडक उन्हाळ्याच्या दिवसांत देखील त्यांना रात्रंदिवस त्या चिंचोळ्या बराकीतूनच ठेवण्यांत येत होतें. मी त्यांना विचारले, ' तुम्हांला झोपायला इथे खाट मिळते का ? त्यावर ते म्हणाले, 'तुं किती भोळी आहेस ? इथे खाट, कशी ' क्रांतिजीवन २३ मिळणार ? ' मी विचारले, ' मग आपण कशावर झोपतां ?' ते उत्तरले, 'जमिनीवर कांबळे टाकून त्यावरच झोपतों. ( ३ )" मी घरी परत आले. घरची इतर मंडळी मोकळ्या गच्चीवर खाटा टाकून निजली होती. पण मी तळमजल्यावरील खोलीत एक घोंगडी टाकली व त्यावर पडलो. डासांनी माझ्या कानाभोवती गुणगुणायला सुरवात केली. ते जणू मला म्हणत होते, खुळी ! येवढ्या कडक उन्हाळ्यांत ह्या खोलीत आणि तेंहि घोंगडीवर कोणाला तरी झोप येणे शक्य आहे काय ? मी एकदम उठून बसलें. चंद्राचे किरण खिडकीतून माझ्या खोलीत आले होते. मी सहाजिकच चंद्राकडे पाहिले व त्याला म्हणाले, 'तूं इतका तेज:पुंज आहेस, तर त्यांच्या बराकीला प्रकाशित कर ना ! काय तुला कळत नाही, की ते सारे रात्र ह्या कडावरून त्या कडावर तळमळत अस्वस्थपणे घालकति असतील? ' मी पुन्हापुन्हा चंद्राकडे पाहिले. पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळू शकले नाही. मी झोपी जाण्याचा प्रयत्न केला. पण डास फार कडकडून चावं लागले. मी त्यानंतर त्याच खोलीत झोपत असें. दोन दिवसांनी वन्सं एकदम खोलीत येऊन म्हणाल्या, ' हे काय हो वहिनी, असं जिवावर कां उदार होता ?' मी म्हणाले, 'छे हो ! मी कांहीं मरत नाही.' वन्सं म्हणाल्या, ' काय तर ! ही सारी मरणा- चींच लक्षणं ! '' मी विचारले, ' म्हणजे जे कोणी असें झोपते....' वन्सं उत्तरल्या, 'हो, हो तर ते सारे मरतात. माझ्या डोळ्यांत एकदम अश्रू आले. वन्संना फारच वाईट वाटलें. आपण कुठून बोललों असें त्यांना झालें. कशाला कुणाला दोष द्यायचा ? माझें नशीबच फुटके आहे. त्यांना तुरुंगांत जर अशाच परिस्थतीत झोप घ्यावी लागते तर मी तरी दुसरे काय करणार ? " ' २४ रासबिहारी वसुंचे (४) " पुन्हा एकदा मी परवानगी मिळवून तुरुंगांत त्यांची भेट घेतली. विचारले असता ते म्हणाले की, 'मी फक्त एकदांच जेवत असतो. त्यांना खाव्या लागणाऱ्या भाकरीचा एक तुकडा मी आपल्याबरोबर घरी आणला व त्या दिवसापासून तसली भाकरी तयार करून मीहि एकदांच जेवीत असे. असे कितीतरी दिवस निघून गेले. खटला रोज सुनावणीला निघत असे. शेवटी एक दिवस खोलीत मी त्यांच्याविषयी विचार करीत बसलें असतां बाहेर रडण्याचा आवाज मला ऐकायला आला. माझें हृदय धड- धडत होते. सर्वांगाला घाम सुटला होता. तरी पण मोठ्या धैर्याने मी बाहेर आले. वन्सं म्हणाल्या, 'दादाला फाशीची शिक्षा!......' (५) " मी त्यांची शेवटची भेट म्हणून घ्यावयास पुन्हा एकदा दिल्लीच्या तुरुंगांत गेले. तिथे कितीतरी तरुणांचे टवटवीत व उदात्त जीवन कुस्करले जात होते. मी माझ्या प्रभूला-हृदये- श्वराला भेटले. माझें हृदय दोनचार शब्द भेटण्याची इच्छा करीत होते; पण माझ्या ओठामध्ये मुळीच शक्ती नव्हती. इतक्यांत ते गंभीर आवाजांत म्हणाले, 'जिवलगे, सारे विश्व मायेने भरलें आहे. जन्माला येणारा प्राणी मरणार हे ठरलेले आहे. इथे कोणी कोणाचा साथी नाही व कोणी कोणाच्या मदतीची आशा करूं नये. मी मातृभूच्या पवित्र वेदीवर आत्मबलिदान करीत आहे, याबद्दल तूं स्वतःला धन्य समज.' माझ्या कानांनी पतिदेवांचा संदेश ऐकला आणि डोळ्यांनी अणूंना मोकळीक करून दिली. अश्रुप्रवाह थांबवून एकदा त्यांना डोळे भरून पहावें ही एकच माझी इच्छा होती. पण डोळ्यांतील आसवांनी ती देखील पूर्ण होऊ दिली नाही. दुसरे दिवशीं फांशीची पूर्ण तयारी झाली. लोक म्हणत होते, 'बालमुकुंदांचा आत्मा त्यांना सदाचा सोडून क्रांतिजीवन २५ जाणार !' त्याअगोदर त्यांना भेटावे अशी माझी फार इच्छा होती. पण त्यांचे मृत शरीर देखील आम्हांला मिळू शकले नाहीं ! मग प्रत्यक्ष भेट कुठची ? यानंतर काय घडले हे मला सांगतां येत नाही. गेल्या पंधरा दिवसापासून मी उपवास करीत असून ईश्वराची प्रार्थना करीत आहे. पण माझी अंतरींची इच्छा तृप्त होण्याची वेळ आली आहे असे मला वाटू लागले आहे." भाईजी पुढे लिहितात, “ इतकें बोलून रामरख्खी स्तब्ध राहिली. माझ्या डोळ्यांत अश्रू व अंगावर रोमांच उभे राहिले. यानंतर तिनें अन्नाचा एक कण व पाण्याचा एक थेंबसुद्धा तोंडांत घेतला नाही. बालमुकुंदांचा विचार करीत एकाच ठिकाणी सतत अठरा दिवस ती शांतपणे जणू योगसमाधि लावून बसली होती. शेवटी एक दिवस निरभ्र आकाशांत सूर्य तळपत असतां व सारी जनता आपआपल्या उद्योगांत निमग्न असतां ती आपल्या एकतान समाधीतून उठली. थंड पाण्याने स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान केल्यावर ती परत आपल्या जागी जाऊन बसली. काही वेळाने ती आपल्या स्वर्गस्थ पतिदेवाला उद्देशून म्हणाली, 'हे प्रभो ! आपण माझी फार दिवस वंचना केलीत. परंतु आज मात्र मी आपणाला सोडणार नाही. आपणापासून मी आतां एक क्षण- भरहि दूर राहू शकत नाही.' इतकें बोलून तिचाहि आत्मा इहलोक सोडून निघून गेला. लोक म्हणतात, बालमुकुंदांची पत्नी इहलोक सोडून निघून गेली. मी म्हणतो, 'बहरलेल्या गुलाबा- साठी कोकिलेने आत्मसमर्पण केलें. ही सत्य घटना आहे; कल्प- ने. चेटूक नव्हे. सत्य आहे; सत्याभास नव्हे.'' या खटल्यांत हरदयाळ व रासबिहारी या दोघांचींहि नांवें गुंतविली रासबिहारी वसुंचें - होती. पैकी हरदयाळ हे अमेरिकेत असल्यामुळे ते ब्रिटिश सर- कारचा हात पोहचण्याच्या कक्षेच्या बाहेर होते. रासबिहारींच्यावर वॉरंट सुटले. त्यांना पकडून देण्यासाठी साडेसात सहस्र रुपयांचें, लोभी लोकांची दृष्टी फाडून टाकणारे बक्षिस लागले. पण मृत्यु- दंडाची ही नग्न तलवार सतत डोक्यावर लटकत ठेऊनहि रास- बिहारी इ. स. १९१५ पर्यंत हिंदुस्थानांतच पाय गाडून काम करीत होते. त्यांच मित्र व प्रख्यात क्रांतिकारक शचीन्द्रनाथ संन्याल यांच्याबरोबर ते काशी येथे होते व काशी येथे असल्या- मुळेच रासबिहारी सरकारच्या हाती लागू शकले नाहीत. एकदां तर त्यांच्यावर मोठाच प्रसंग आला होता. बनारसला बंगाली टोल्यांत राहत असतां आपल्या रासबिहारी बाँबचें शिक्षण देत असत. बाँबचा प्रयोग करून पहात असतांना दि १८ नोव्हें- बर १९१४ रोजी त्याचा स्फोट झाला. त्यामुळे शचींद्र व बसू ह्या दोघांनाहि चांगल्याच जखमा झाल्या. या ठिकाणाहून पोलीस ठाणे केवळ पांच मिनिटांच्या रस्त्यावर आहे. पण केवळ त्यांच्या कौशल्यामुळे या निकटच्या घटनेचा पोलिसांना पत्ता लागू शकला नाही. या बाबतींतील सरकारी समर्थन असें आहे की, बनारस हे अलेक्झांड्रियासारखें बकाली शहर असून त्या निरुंद पदमार्गाच्या शहरांत विविध जाती स्वतंत्र वास्तव्य करतात. बंगाली टोला ही स्वयंपूर्ण वसाहत असून बंगाली भाषा न जाणणाऱ्या उत्तरीय पोलिसांना बंगाली क्रांतिकारकांचा व त्यांच्या कार्याचा सुगावा सहसा लागू शकत नाही. त्यामुळेच सरकारला रासबिहारीचा पत्ता शेवटपर्यंत लागू शकला नाही. रासबिहारींच्या समोर प्रयत्नाच्या मंदराचलाचे अपार घुसळण करूनहि हाती यशाच्या अमृताऐवजी अपयशाचे हलाहलच पडण्याचे प्रसंग अनेकवार आले;
तांतिजीवन ण त्यांच्या मुखावर नैराश्य, दुःख अथवा भग्नमनस्कतेची आधी विकृतासुद्धां उमटलेली कधी कोणी पाहिली नाही. पण चीन्द्र संन्यालांनी आपल्या 'बंदिजीवन' नांवाच्या ग्रंथांत असे उहिले आहे की, सदा प्रसन्नच राहणाऱ्या रासबिहारीनाहि गों एक दिवस एकांतामध्ये मूक अश्रूपात करतांना पाहिलेले आहे. या दिवशी दिल्ली बाँब कटाच्या खटल्याचा निकाल हाऊन मीरचंद वगैरेंना वधस्तंभावर लटकवण्यांत आले त्या दिवशी रात्र मी त्यांना एकांतामध्ये मूक अश्रुपात करतांना पाहिलें !" ८ पजाब ते बंगाल या घटनेनंतर रासबिहारी बंगालची अनुशीलन समिति संघ- 'त करून बंगाल ते पंजाबपर्यंत संघटनेची एक सुसूत्र साखळी त्पन्न करण्याच्या प्रयत्नास लागले. युरोपमध्ये या वेळी महा- दाची सुरवात झालेली होती व समर्थ ब्रिटिश राज्यतंत्र उलथून डण्याच्या प्रयत्नाला जणू ईश्वरानेच ही सुवर्णसंधि आणून ली असें रासबिहारी समजत होते. ज्या प्रस्थापित सरकारच्या रुद्ध दंड थोपटून ते उभे होते, त्या सरकारच्या यंत्रसिद्ध लष्करी मर्थ्याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती, व निःशस्त्र हिंदुस्थान | सामर्थ्यासमोर उठावणी करण्यांत यशस्वी ठरणार नाही याची त्री असल्यामुळे तुल्यबल अशा दोन शाक्तिकेंद्रांचा आपसांत हान् संघर्ष उत्पन्न झाल्यास इंग्लंडच्या शत्रूपक्षाकडून हिंदु- थानला नव्या यंत्रमय शस्त्रसामर्थ्याचे सहाय्य घेतां येऊन ब्रिटिश 'ज्यतंत्र उखडून टाकता येणे शक्य आहे, याची त्यांना जाणीव ती. जर्मनीने ब्रिटिशाविरुद्धं शस्त्र उपसल्यामुळे या सुवर्ण- धीचा कसा फायदा घेता येईल याचा ते विचार करू लागले. रोपमध्ये हरदयाळांनी जर्मन कौन्सलशी संधान बांधलें व , रासबिहारी बसंचें अमेरिकेंतून पैसे, शस्त्रास्त्रसंपत्ति व लढाऊ माणसें भरभरून अनेक प्रचंड जलयानें हरदयाळांच्या प्रेरणेने हिंदुस्थानचा किनारा जवळ करू लागली. शचीन्द्रनाथ संन्याल हे रासबिहारीचे उजवे हात होते. शचींद्रनाथांचा जन्म ५ जून १८९३ मध्ये कलकत्ता येथे झाला. १९०८ मध्ये वडील वारल्यानंतर १९०९ मध्ये तें बनारसला येऊन बंगालीटोला हायस्कूलमध्ये मॅट्रिकच्या वर्गात नांव दाखल करून शिक्षण घेऊ लागले. शचींद्र १९०८ सालींच बंगालच्या सुविख्यात अनुशीलन समितीचे सदस्य झाले होते. काशीला येतांच त्यांनी १९०९ मध्ये तेथें अनुशीलन समितीची शाखा स्थापन केली. प्रथम या शाखेचें नांव अनुशीलन समिती असेच होते; पण पुढे लवकरच बंगालमध्ये सरकारने दमननीतीचा अंगिकार करून अनुशीलन समिति बेकायदा म्हणून घोषित केल्यानंतर बनारसच्या शाखेवर सरकारच्या वक्रदृष्टीची साडेसाती फिरूं नये म्हणून शचींद्रांनी 'युवक संमेलन, काशी' असे तिचे नामांतर केले. यानंतर समितीच्या आणखी शाखा वाढवाव्या व बंगालच्या कार्यक्षम समितिकेंद्राशी आधिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे म्हणून शचींद्रनाथ प्रयत्नशील बनले. याच उद्देशाने १९११सालच्या जून महिन्यांत पांडेचरी येथे जाऊन त्यांनी योगींद्र श्री अरविंद घोष यांची भेट घेतली. पांडेचरीहून बनारसला परत भाल्यानंतर अमेरिकेमध्ये प्रस्थान करावें असें शचींद्रांच्या मनाने घेतले. त्यासाठी ते मुंबईस गेले देखील; पण मुंबईला असतांना बारिसाल षड्यंत्राचे वृत्त कानावर येऊन हिंदुस्थानांतच आपली अधिक गरज आहे असे त्यांना आढळून आले; व ते पुनश्च बंगाल- कांतिजीवन २९ मध्ये परत आले. बंगालमध्ये १९१२ साली मातीलालराय या नांवाच्या एका गृहस्थाच्या द्वारां शचीन्द्राचा रासबिहारींशी परिचय झाला. रासबिहारींनी अत्यंत कुशलतेनें शचींद्रनाथांचा उपयोग करून घेउन आपल्या या अज्ञातवासाच्या काळांत सरकारी क्रोधाची व गुप्तचरांची नंगी समशेर डोक्यावर लटकत असतांनाही बंगाल ते पंजाबपर्यंत संघटनेचें मजबूत जाळे अत्यंत कुशलतेने विणले. रासबिहारींच्या कल्पनेप्रमाणे महायुद्ध १९१४ मध्ये सुरवात होऊन, अमेरिकेकडून ज्या वेळी हरदयाळांच्या प्रेरणेनुसार शीखांची तारवेंच्या तारखें येऊं लागली, त्या वेळी रासबिहारी त्यांना या विशाल विप्लववादी संघटनेत ओवण्याचा प्रयत्न करूं लागले. कोमागोटामारूवरील संपत्ति व माणसे मिळवण्याचा रास- बिहारींनी शचींद्रनाथांच्या गारां पुष्कळ प्रयत्न केला. पण सरकार या तारवाच्या बाबतींत पूर्वीपासूनच सचेत असल्याकारणाने हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. उत्तर अमेरिका व कॅनडा येथून निरनिराळ्या टोळ्यांनिशी या वेळी कमीत कमी सात हजार शीख तरी हिंदुस्थानांत येऊन पोहोंचलेले होते. त्यांत पुष्कळ लोक १९१४ च्या Ingress ordinance Act च्या अनुसार तुरुंगाच्या कालकोठडीत कोंबण्यांत आले. ज्यांना प्रत्यक्ष तुरुंगांत न घालतां नजरबंद करण्यांत आलेले होते, त्यांना परवानगीवांचून घराबाहेर पाऊल टाकण्याचीहि चोरी होती. त्यामुळे त्यांतले अनेक लोक आपल्या संसारांत फसले व उर्वरित विप्लवाच्या कार्यास लागले. नुसते उत्साही तरुणच यांत समाविष्ट होते असे नव्हे; तर भाई निधानसिंह, बाबा सोहनसिंह, कालसिंह, सरदार केसरसिंह, यांच्यासारखी पन्नाशी उलटून गेलेली माणसेंही सरदार रासबिहारी बसुंचें भगवानसिंह यांच्या नेतृत्वाखाली या देशस्वातंत्र्याच्या महनीय कार्यात भाग घ्यावयास अग्रेसर म्हणून उभी राहिली होती. झांशीचे पंडित परमानंद (अंदमानमध्ये 'छोटे परमानंद' या नावाने विख्यात असलेले गृहस्थ ) हेही जपानमधून येउन या टोळीला मिळाले. ही सर्व मंडळी पूर्वीपासून लष्करांत काम करीत आलेली असल्यामुळे अस्त्र-शस्त्रांचा त्यांचा अभ्यास अतिशय उत्तम होता. खरेंच सांगावयाचे तर या पंजाबी लोकांना ही जी सुविद्या होती ती जर बंगाली क्रांतिकारकांना असती तर त्यांनी काय प्रलयंकर तांडव गाजविलें असतें तें सांगतां यत नाही. अमेरिकेतून आलेल्या या लोकांपैकी कर्तारसिंह व पंडित जगतराम हे अमरिकेमधील हरदयाळांच्या प्रख्यात गदर पत्राच्या संपादक विभागांत होते. पुढे पंडित जगतराम यांना खटल्याच्या वेळी न्यायमूर्तीनी जेव्हां असे विचारले की, “तुम्ही या देशांत काय म्हणून आलांत ?" त्यावर त्यांनी ताडकन् उत्तर दिले की, काय पण प्रश्न ! अहो, हा आमचाच तर देश आहे ! इथे का यायला कुणाच्या परवान- गीची आम्हांला गरज लागायची आहे ? आईच्या कुशीत आम्ही केव्हां अन् कसें शिरायचे हे आमचे आम्ही ठरवायचं आहे. तुम्ही आम्हांला हे विचारणार कोण ? " बागी कर्तारसिंह हे या वेळी केवळ १८१९ वर्षांचे पोरसवदा तरुण होते. कर्तारसिंह सन १९१२ मध्ये ज्या वेळी सॅनफ्रान्सिस्को येथे होते त्या वेळी हिंदी कामकऱ्यांचा होत असलेला अपमान पाहून व त्यामुळे चीड येउन ते गदर पक्षांत समाविष्ट झाले. गदर पत्राचे काही अंक त्यांनी हँड प्रेसवर स्वतःच काढले होते. त्यानंतर न्यूयॉर्क येथील विमा- नांच्या एका कारखान्यांत नोकरी पतकरून त्यांनी विमानविद्येचें शिक्षण घेतले. १९१४ च्या सप्टेंबरमध्ये त्यांनी जपानच्या क्रांतिजीवन किनाऱ्याकडे प्रख्यात क्रोमागाटामारूचे नायक बाबा गुरुदितसिंग हे जात असतांना, मुद्दाम जहाजावर जाऊन त्यांची भेट घेतली. बागी कर्तारसिंग अखरीसं १९१४ च्या सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेस सायंकाळी निप्पोन मारू जहाजाच्या द्वारें कालंबो येथे येऊन पोहोंचले, व तेथून निर्विघ्नपणे पंजाब प्रांतांत येऊन दाखल झाले. कर्तारसिंहांच्या हृदयांत बंडाचे विचार अतिशय प्रदीप्तपणं उसळी घेत होते. येतांच त्यांनी प्रथम बंगालमध्ये कलकत्ता येथे जाऊन तेथील अनुशीलन समितीचे मुख्याधिकारी यतींद्रनाथ मुखोपाध्याय यांची भेट घेतली. त्यांनी कर्ताराना, रासबिहारींना भेटावयास सांगून भारतीय क्रांतिकारकांचे केंद्रस्थान दाखविले. यतीन्द्रनाथांचे मार्गदर्शन व एकंदर परिस्थिति यांचा विचार कर्तार- सिंहानी करून रासबिहारीनींच स्वतः पंजाबमध्ये यावं अशी योजना आखली. त्यांनी रासबिहारींना आणायला म्हणून काही विश्वसनीय माणसें बनारसला पाठविली. पण कर्तारसिंहाचा उत्साह रासबिहारींना कौतुकास्पद वाटत असला तरी त्यांचे पोरपण व क्रांतीच्या महान् कार्याच्या नेतृत्वाचा त्यांना असलेला तोटका अनुभव लक्षात घेऊन त्यांनी एकदम स्वतः न जातां एकंदर परि- स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी म्हणून प्रथम शचींद्रनाथ संन्या- लांना तेथे पाठवावयाचे ठरविलें. ९ शचीन्द्रांची पंजाबयात्रा रासबिहारींच्या आज्ञेनुसार १९१४ च्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस शचींद्रनाथ पंजाबमध्ये गेले. लुधियाना येथे त्यांचा कारासिंह यांच्याशी परिचय झाला. शचीन्द्र जालंदरच्या स्टेशना- वर उतरून संकेतस्थळ म्हणून ठरलेल्या एका जवळच्याच बगी. च्यांत शिरले. तेथे कर्तारसिंह, पृथ्वीसिंह, रामसरनदास तलवार, ३२ रासबिहारी वसुंचे अमरसिंह इत्यादि व्यक्ती रासबिहारींची मार्गप्रतीक्षा करीत होत्या. पण रासबिहारी न येतां त्यांच्याऐवजी शचीन्द्रांना आलेलें पाहून ही मंडळी किंचित् निराश झाली. अखेरीस त्यांनी शची- न्द्रांना सारी परिस्थिति निवेदन केली. शीख लष्कराच्या बाब- तीत स्वतःला विशेष आशा असल्याचे या बैठकीत कर्तारसिंहाने त्यांना बोलून दाखविलें. शचींद्रांनी या मंडळींना क्रांतिकारक संघटनेच्या बाबतीत काही विशेष गोष्टी व घटना यांच्याकडे बारकाईने लक्ष पुरवावयास सांगून काही रिव्हाल्व्हर्स व काड- तुसें कर्तारसिंहाच्या स्वाधीन केली. शचीन्द्रांनी या सुमारास काशीला बाँब बनविण्याचा अतिशय सुंदर व व्यापक प्रमाणावर प्रबंध केलेला होता. कर्तारसिंहांनी बाँबच्या बाबतीत पृच्छा कर- तांच शचन्द्रिांनी सांगितले की,"एक बाँब तयार करावयास सोळा रुपये खर्च येतो. खर्चाची व्यवस्था होत असल्यास हवे तितके बाँब्स पाठविता येणे शक्य आहे, त्याची काळजी नको. " बैठकीनंतर शचींद्र लाहोर येथे गेले. पंजाबांतील एकंदर संतप्त वातावरण व गदरपक्षाची सन्नद्धता पाहून त्यांच्या मनावर अति- शय प्रभाव पडला. पंजाबच्या एकंदर परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करून आपल्या या संचाराचा वृत्तांत निवेदन करण्यासाठी म्हणून ते लवकरच बनारसला त्यांचे आवडते नेते रासूदा अथवा रासबिहारी यांच्या- कडे आले, शचींद्रांनी रासबिहारींना पंजाबची सारी परिस्थति निवेदन करून असे सांगितले की, " पंजाबमध्ये उत्पन्न झालेल्या या नव्या शक्तीला शीघ्रातिशीघ्र संयत, संयमित व संघटित न केले तर भावनाशील शीख लोक भलत्याच वेळी बंडाचे निशाण उभारून सारी योजना धुळीस मिळवितील व सारी शक्ति भन या क्रांतिजीवन सारे प्रयत्न फुकट जातील. कारण की, त्यांच्याजवळ शक्तिसंचय नि उत्साह हवा तितका असला तरी नेतृत्व, स्थानप्रयत्नविवेक व संघटन यांचे कल्पनातीत दारिद्य आहे." शचींद्रांची खरी इच्छा या वेळी रासबिहारींना पंजाबांत पाठवून देऊन स्वतः बंगालमध्ये जाण्याची जाण्याची होती. पण रासबिहारींनी त्यांना बंगालच्या रोखानें मुळीच वळू दिले नाही. वास्तविक या वेळी शचींद्रावर चोवीस तास गुप्तचरांची तीक्ष्ण दृष्टि खिळलेली होती आणि तरीही ते त्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून आपलें काम निर्वेधपणे करीत होते. पंजाबचा सारा समाचार ऐकल्यानंतर रासबिहारी काही वेळ स्तब्ध बसून राहिले व नंतर त्यांनी शचींद्राना सांगितले की, " आतां पंजाबमधील लष्करांत प्रवेश करून घेऊन सैनिकांना उठावणीचे पाठ देण्याची आवश्यक वेळ आलेली आहे. तसेंच बंगालचे नेते यतींद्र यांनाही पंजाबच्या या तयारीचे वृत्त कळविणे अत्यंत अवश्य आहे. इकडे पंजाबमध्ये या वेळी अमेरिकेहून जगतसिंह व रंगासिंह आणि कॅनडामधून वीरसिंह व बंतासिंह हे गदरपक्षाचे नेते येऊन दाखल झाले. त्यांच्या मागोमाग केहरसिंह, जीवनसिंह व शांघायहून डॉ. मथुरासिंह हेही येऊन पोहोचले. डॉ. मथुरासिंह झेलम येथील रहिवासी असून १९१३ साली शांघायमध्ये प्रक्टिस करीत असत. डॉक्टर मथुरासिंह प्रथम प्रैक्टिसच्या निमित्ताने कॅनडा येथे जावयास निघाले होते. पण इमिग्रेशन अॅक्टाच्या तडाख्याने तेथील गोऱ्या वसाहतवाल्यांनी त्यांची रवानगी परत. शांघायला केली. पुढे या इमिग्रेशन अॅक्टवरूनच में कोमागाटा- मारूचे प्रकरण गाजलें त्याचे खर उत्पादक डॉ. मथुरासिंह हेच होते. त्यांनीच बाबा गुरुदितसिंगांना या प्रकरणाची स्फूर्ति दिली.
रासबिहारी वसंचे पुढें दिनांक चुकल्यामुळे डॉ. मथुरासिंह ठरल्याप्रमाणे सिंगापूरला येऊन दाखल न होऊ शकल्याकारणाने प्रत्यक्ष कोमागाटामारू प्रकरणांत ते गोवले गेले नाहीत. तरी पण त्यांनी शांघायला राहूनच गदरच्या प्रसारास प्रारंभ केला. गदरचीच नक्कल असलेले पण वेगळ्या नावाचे एक वृत्तपत्र काढून ते शांघायला प्रचार करीत असत. कोमागाटामारू ज्या वेळी हिंदुस्थानाकड परतलें, त्याच सुमारास डॉ. मथुरासिंह हेही पंजाबमध्ये आले. पं. जगतराम यांनी अमेरिकेहून आल्यानंतर स्वतःजवळचे डॉलर्स भाई परमा- नंदांस देऊन त्यांच्या जवळूनच रुपये घेतले. यानंतर · पंडित- जींना बरेचसे रुपये बरोबर देऊन काबूलच्या मार्गाने शस्त्रास्त्रे खरेदी करून आणण्यासाठी म्हणून पाठविण्यांत आले. पण दुर्दैवाने त्यांना पेशावरलाच अटक झाली. फरासखान्यांत नेल्यावर त्यांच्या जवळ डॉलर्सच्या ऐवजी रुपये कसे आले म्हणून पोलिस आधिका-यांनी चौकशी केली असतां पंडितजींनी सरळ भावाने भाई परमानंदांचें नांव सांगितले. मायकेल ओड्वायर यांना या रिपोर्टानंतर विश्वास वाढू लागला की, भाई परमानंद कसल्या तरी महान गुप्त कटाच्या योजनेंत आहेत. लगेच गुप्तचरांचे तीक्ष्ण नेत्र त्यांच्यावर चोवीस तास पाळत ठेवू लागले. या सुमारास रासबिहारींच्या सूचनेनुरूप शचींद्रांनी बनारस येथील सेनेमध्ये शिरकाव करून घेऊन संबंध प्रस्थापित केले. या वेळी पूर्वबंगाल्यांतील क्रांतिकारक संघटनांचे जाळे अतिशय व्यापक प्रमाणावर विणले गेले होते. या बंगाली क्रांतिकारक समित्यांना व त्यांच्या नेत्यांना पंजाबांतील तयारीची नीट कल्पना चावी म्हणून रासबिहारींनी शचीन्द्रांची बंगालमध्ये पाठवणी केली. बंगालमध्ये जाऊन पोहोंचतांच शचीद्रांनी तेथील क्रांतिकारकांचे क्रांतिजीवन ३५ A . नेते यतींद्रनाथ मुखोपाध्याय ( प्रख्यात जतीन् मुकर्जी) व इतर नेते यांची भेट घेऊन त्यांना पंजाबमधील सर्व वृत्त सांगितलें.प्रथम वंगीय क्रांतिकारकांना शचींद्रांचे हे म्हणणे खरेंच वाटेना. त्यांना वाटे, जर हे सारे खरे असले तर हिंदुस्थान स्वतंत्र व्हावयास फक्त काही दिवसांचाच काय तो अवधि आहे, असे समजायला हरकत नाही. अखेरीस शचींद्रांनी त्यांची या बाबतीत खात्री पटवून दिल्यानंतर, बाँबगोळे अधिक प्रमाणावर तयार करून त्यांची शाखाशाखांमधून व्यवस्थित पेरणी करण्याबद्दल यतींद्रांनी त्यांना सुचविलें, व इतर काही बाबीसंबंधी बोलणे करून यतींद्र परत बनारसला आले. आतां शचींद्रांच्या सेनेमधील परिचयाची वाढ इथपर्यंत निश्चितपणे झाली होती की, ते हवे तेव्हां हव्या त्या बराकीत जाऊं येऊ शकत असत. दिल्लासिंह या नांवाचा एक हवालदार त्यांच्याची विशेष लगट करण्याचा प्रयत्न करी. पण शचींद्रांना हा गृहस्थ पसंत न आल्याकारणाने त्यांनी एका विशिष्ट अंतराच्या पलीकडे त्याच्याशी संबंध येऊ दिले नाहीत. त्याला टाळून त्यांनी सेनेत पत्रकें व खासगी संभाषणे यांच्या द्वारें रासबिहारीच्या इच्छेला मूर्त स्वरूप द्यावयास प्रारंभ केला. १० विष्णु गणेश पिंगळे. अमेरिकेहून जे अनेक लोक हिंदुस्थानांत आले त्या सर्वांत विष्णु गणेश पिंगळे यांचे आगमन ही कार्यदृष्ट्या अतिशय मह- त्वाची गोष्ट होती. एस. एस. सलामिस नांवाच्या बोटीने १९१४ च्या नोव्हेंबर महिन्यांत पिंगळे निर्विन्नपणे हिंदुस्थानांत येऊन पोहोंचले. पिंगळे यांच्या शरीराचा वर्ण सुवर्णासारखा, कातडी नितळ, बांधा सामान्य माणसापेक्षा उंच, पण अतिशय बलिष्ठ, डोळे किंचित् पिंगट व दोन समोरचे दांत किंचित् समोर आलेले रासबिहारी बसंचे an असें त्यांना पाहिलेली माणसे त्यांचे वर्णन करतात. त्यांच्या चेह-यावरून, विशेषतः तीक्ष्ण नि अंतर्भेदी दृष्टीवरूनच त्यांच्या सूक्ष्म बुध्दीचा परिचय होत असे. कोणतीही व्यक्ती परिचय होतांच जणू काही अंत:प्रेरणेनेंच भारली जावी अशी अपूर्व आक- र्षणशक्ति त्यांच्या व्यक्तित्वांत होती. प्रख्यात क्लीव्हलँड साहेब एकदां सहज बोलतांना धर्मवीर डॉ. मुंजे यांना असे म्हणाले होते की, " मी पुष्कळ भारतीय क्रांतिकारक पाहिलेले आहेत. पण विष्णु गणेश पिंगळे यांची स्मृति माझ्या हृदयपटलावरून कधीही पुसली जाणे शक्य नाही. त्यांच्याइतकी दुर्लभ मानवी गुण- समुच्चयाचें, चारित्र्याचे अन् उदात्ततेचे निधान असलेली व्यक्ति मी दुसरी पाहिली नाही. मी त्यांना वाचविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण मी सांगितल्यापैकी एकही गोष्ट मान्य करावयास ते तयार होईनात. मोडून जाईन पण वांकणार नाही अशी त्यांची ताठर वृत्ति होती.स्वतःचा प्राण वाचविण्यापेक्षा सहकाऱ्यांबरोबरचें मरण मला अधिक पसंत आहे, असे ते म्हणाले. ज्या दिवशी ते फांसावर चढले त्या दिवशी माझ्या डोळ्याचे पाणी खळलें नाही. " डॉक्टरसाहेबांना हे सारे सांगत असतानाही क्लीव्हलँड साहेबांचा कंठ भरून आला होता. असो. पिंगळे जे आले ते आपली मातृभूमि महाराष्ट्र व तेथील आपले कुटुंबीय यांची भेटही न घेतां सरळ पंजाबकडे रवाना झाले. (पिगळे यांचे वृध्द वडील बंधु श्री. केशव गणेश पिंगळे हे अजून हयात असून ते तळेगांव-ढमढेरे येथे फळांचा व्यापार करीत अस. तात.) पंजाबच्या एकंदर परिस्थितीचे निरीक्षण करून बाँबगोळे आणण्यासाठी म्हणून त्यांनी आपला मोर्चा बंगालकडे वळविला. बंगालमध्ये येतांच तेथील अनुशीलन समितीच्या सर्व शाखा,त्यांचा कांतिजविन नेते व विशेषतः यतींद्रनाथ मुखोपाध्याय यांची भेट घेऊन त्यांनी बंगाली नेत्यांना पंजाबच्या परिस्थितीची नीटशी कल्पना दिली व गदरच्या संभूय समुत्थानासाठी म्हणून पंजाब ते बंगालपर्यंत संघटनेची एक सुसूत्र व एकाच दिवशी नि एकाच क्षणीं उठावणी करणारी सांखळी निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादिली. पिंगळे यांनी अमेरिकेस जाण्यापूर्वी यात्रेच्या निमित्ताने 'सारें भारतवर्ष साधुवेषांत पायाखाली तुडविले असल्यामुळे त्यांना हिंदुस्थानचा कोपरान् कोपरा माहीत होता.वंगीय नेत्यांनी त्यांना सांगितले की, त्यांची सुसूत्र संघटनेची कल्पना प्रत्यक्षात आलेली असून क्रांतियुध्दाचे खरे नेते रासबिहारी बसू हे आहेत. हवे तर त्यांची भेट घेऊन पिंगळे यांनी पुढचे बेत ठरवावेत. पिंगळ्यांनी बंगाली क्रांतिकारकांना बाँबगोळ्याची मागणी केली. त्यावर त्यांना असें उत्तर मिळाले की, बंगालमध्येच बाँबगोळ्यांचा पुरवठा रासबिहारींच्या निवासस्थानाहून म्हणजे बनारसहून होत अस- ल्याकारणाने पिंगळे हे तेथे गेल्यास त्यांची कटाच्या मुख्य नेत्या- चीही भेट होईल व त्यांना हवे तितके बाँब गोळेही मिळतील. या बाबतींत प्रथम त्यांनी शचींद्रनाथ संन्याल यांची भेट घ्यावी म्हणजे त्यांचा पुढील कार्यभाग सुकर होईल. बंगाली क्रांतिकारकांच्या सूचनेनुसार पिंगळे यांनी आपल्या कांही पंजाबी मित्रांसमवेत शचींद्रांची भेट घेतली. पिंगळ्यांना बंगाली व पंजाबी भाषा सफाईने बोलण्याचा अभ्यास असल्या- कारणाने दोन्ही प्रांतांतील लोकांना ते परके असे वाटतच नसत. शचीद्रांनी बनारस येथील आपल्या सर्व सहकाऱ्यांशी त्यांचा 'परिचय करून देऊन रासबिहारींची व त्यांची गांठ घालून दिली. पिंगळ्यांचा परिचय होतांच रासबिहारींना अतिशय आनंद वाटला, रासबिहारी वसं आपल्याला हवा होता तसा सहकारी लाभला असें पाहून रास- बिहारींनी त्यांना एक दोन दिवस स्वतःजवळ ठेवून घेतले.पंजाबची तयारी जरी व्यापक प्रमाणावर असली तरी कर्तारसिंह, पृथ्वी- सिंह, यांच्या अल्लड नि पोरसवदा उत्साहामुळे व पंजाबमधील समर्थ नेतृत्वाच्या अभावामुळे अवेळीच उठावणी होऊन क्रांति फसण्याचा संभव आहे, हे स्वतःला वाटत असलेलें भय रास- बिहारींनी त्यांना बोलून दाखविलें. पिंगळ्यांनी स्वतः या दृष्टीने एकदां पंजाबचें निरीक्षण करावे अशी इच्छा रासबिहारींनी व्यक्त करतांच पिंगळ्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. एक आठवडाभर पंजाबांत संचार करून पिंगळे परत बनारसला आले. त्यांनी आपला अहवाल रासबिहारींना सादर केल्यानंतर एक नक्की योजना घेऊन रासबिहारींनी पुनश्च पिंगळे व शचींद्र यांना जोडीने पंजाबांत जावयास सांगितले. शचीन्द्र व पिंगळे दोघेही उत्तर हिंदुस्थानी व्यापाऱ्यांचा पोशाख करून सफरीच्या बतावणीने पंजाबांत आले.प्रथम ते अमृ- तसर येथील गुरुद्वारांत आले. तेथे पिंगळ्यांनी शचीन्द्रांचा परि - चय मूलासिंह नावाच्या एका व्यक्तीशी करून दिला. मूलासिंह हा काही दिवस शांघाय येथील पोलीस विभागांत नोकरीत असतांना त्याने त्या ठिकाणी दोनदां यशस्वीपणे हरताळ पार पाडले होते. शचीन्द्रांनीं पंजाबांतील चळवळीच्या सुसूत्रतेसाठी. एक केन्द्र स्थापन करण्याची आवश्यकता प्रतिपादन करतांच मूला- सिंहानें केन्द्राचा भार स्वतःच्या शिरावर घेण्याची तयारी दर्शविली. त्याने असेंही सांगितले की, बंडाचे निशाण उभारले जातांच पंजाबी सेनांनी राजसत्तेविरुद्ध हत्यार उपसण्याचे वचन दिलेलें आहे.पण मूलासिंहाच्या अघळपघळ गप्पावर विश्वास ठेवून त्याच्या- क्रांतिजीवन वर केन्द्राचा भार सोपविण्यांत अतिशय मोठी चूक झालेली आहे हे शचीन्द्रांच्या लवकरच ध्यानात आले. यानंतर पिंगळ्यांना घेऊन ते मुक्तेश्वरच्या मेळ्यांत काही लोकांना भेटावयास्तव म्हणून गेले. तेथून ते गुरुद्वारांत परत आले. त्या वेळी कर्तारसिंह, अमरसिंह इत्यादि मंडळी त्यांची वाटच पहात होती. शचींद्रांना आलेले पाहून प्रसन्न अंतःकरणाने स्मित करीत बागीकर्ता त्यांना म्हणाले, “बोला महाशय, रास- बिहारी स्वतः कधी येणार आहेत? " शचीन्द्र उत्तरले, " बस्स, आतां त्यांचीच तर पाळी आहे. आपल्या कामाला थोडें अधिक व्यवस्थित, संयत नि उग्र स्वरूप येऊ द्या व त्यांच्या गुप्ततेने राहाण्याच्या जागेचा खात्री पटविण्याजोगा बंदोबस्त करा, की त्यांना यायला वेळ लागणार नाही." केन्द्रस्थानाची आवश्यकता प्रतिपादन करीत असतां मूलासिंहाशी झालेले सारे बोलणे, त्याने पतकरलेली जबाबदारी व स्वतःला त्याच्याविषयी वाटत असलेला अविश्वास शचीन्द्रांनी कर्तारांना बोलून दाखविला. रासबिहारीच्या साठी म्हणून लाहार व अमृतसर अशा दोन्ही ठिकाणी दोन दोन घरे घेण्यांत आली. याच सुमारास अमेरिकेहून आणखी एक शीखांचे दल अमृतसर येथे येऊन पोहोचले. या दलाने बाँब गोळ्यासाठी म्हणून पहिल्या भेटीतच ५०० रु. शचीन्द्राच्या ताब्यात दिले. या दिवसांत कर्तारसिंह अद्भुत परिश्रम करीत होते. रोज प्रातः काळी सायकलस्वार होऊन ते ४०५० मैलाचा फेरफटका करीत गावोगांव जात असतां खेड्यापाड्यांतून पुरेसा प्रचार केल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट ध्यानांत आली की, अजून सैनिकांमध्ये विद्रोहाचा अवश्य तो प्रचार व्हावयाचा आहे. त्यांनी युक्तीने सैन्यांत प्रवेश मिळवून तेथे धडाक्याने आपले काम प्रारम रासबिहारी बसूंचे केले. आज ' मोगा ' येथे गुप्त समितीची सभा आहे, तर तेथे कर्तारसिंह उपस्थित आहेतच. उद्यां लाहोर येथील कॉलेजांत विद्यार्थ्यांची प्रमुख टोळकी गांठून तेथे त्यांचा धडाक्याने प्रचार सुरू असेच; परवां फिरोजपूर येथील लष्करी छावणीत शिरून तेथें विद्रोहाचा ज्वालाग्राही प्रचार करीत आहेतच, केव्हां बाब गोळे आणण्यासाठी ते काशीस रवाना झाले आहेत, तर केव्हां हत्यारे आणण्यासाठी कलकत्त्याची यात्रा करीत आहेत. असा त्यांचा तुफानी संचार सारखा सुरू होता. शचीन्द्र व पिंगळे या वेळी एक आठवडाभर पंजाबांत राहून नंतर काशीला परत आले. ११ कर्तारसिंहांची अद्भुत कृत्यें वस्तुतः पंजाबांतील लोकांची कार्य करण्याची पद्धति गुप्ततेच्या दृष्टीने इतकी कच्ची होती की, लवकरच त्यांच्यापैकी पुष्क- ळांच्या नांवाने वॉरंटें निघाली. एक दिवस कतारसिंहांच्यावर चमत्कारिक प्रसंग ओढवला होता. एका गांवाला ते आहेत असें कळतांच पोलिसांनी वेढा दिला. कार गांवाच्या जवळच उपस्थित होते. पोलीसांनी गांवाला वेढा देऊन आपला शोध चालविला आहे असे कळतांच ते तडक सायकलस्वार होउन गांवांत आले व पालिसांच्या समोरूनच वावरू लागले. पोलिसचे अधिकारी त्यांना ओळखत नव्हते याची त्यांना पूर्ण जाणीव होती; व म्हणूनच या साहसाने ते संकटांतून पार वांचले; पण जर याऐवजी गांवांत न येतां त्यांनी बाहेरूनच पळून जाण्याचा प्रयत्न केला असतां तर ते पोलिसांनी सारे रस्ते रोखले असल्याकारणाने निश्चितपणानेच पकडले गेले असते. एकंदर कार्याचा व्याप इतका वाढला होता की, अमेरिकेहून आणलेले अन् देणग्यांच्या द्वारे मिळालेले पैसे अपुरे पडू लागले.
क्रांतिजीवन व आपण उघडपणाने या कामासाठी अधिक देणग्या मागणे अथवा वर्ग- णीच्या द्वाराने पैसा वसूल करणे अशक्यच होते. अशा स्थितीत काय करावे म्हणून विचार करण्यासाठी गुप्त समितीची एक सभा भरविण्यांत आली असतां त्यांत कर्तारसिंहांनी दरवडे पाडून पैसे गोळा करण्याची सूचना केली. ही सूचना ऐकतांच सारी सभा काही वेळ तटस्थ होउन गेली. एक मनुष्य कार- सिंहांना म्हणूं लागला की, “आपण दरवड्यासारखीं अनीतीची कृत्ये केली तर लोकांची आपणांविषयी सहानुभूतीची भावना नष्ट होईल आपल्या कार्यासाठी जर या अनीतीच्या मार्गाने पैसा मिळविला तर आपल्या कार्याचे नैतिक अधिष्ठानहि नष्ट होईल. भरतभूमीच्या उद्घा- राच्या हेतूने का होईना, पण तिच्याच पुत्रांना लुटणे काही चांगले नव्हे.' हा आक्षेप ऐकतांच कर्तारसिंहाचा संताप उफाळून वर आला नि निखाऱ्यासारख्या आपल्या पिंगट नेत्रांतून ठिण- ग्यांचा वर्षाव करीत ते म्हणाले, “ तुम्हांला इतकेंहि कळू नये काय की, गुलामगिरीचे पाश भोंवतीं आवळलेल्या राष्ट्रातल्या लोकांचे एकच खरें कर्तव्य असते व ते म्हणजे परसत्तेची बंधनें तोडून स्वतंत्र होणे. गुलामांना स्वातंत्र्याकडे नेणारे प्रत्येक साधन नीतिमानच असते. ज्यांना देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुळींच आस्था नाही त्यांचा पैसा चैनीच्या पापांतच खर्च होणार आहे. त्यांतला थोडासा आपण या कार्यात खर्च केला तर त्यांना उलटें पुण्यच लागणार आहे.” कर्तारांच्या या युक्तिवादानें क्रांतिकारक दरवडे पाडावयास सिद्ध झाले. त्यांतल्या काही वयोवृद्ध व्यक्तींनी यासंबंधांत भाई परमानंदांचाहि विचार घेणे अवश्य आहे असे त्यांना सुचविले. त्याबरोबर त्यांनी स्वतःच भाईजींना विचार- ४२ रासबिहारी बसु ण्याची कामगिरी पत्करली. ते हे निश्चित ओळखून होते की, भाईजी जसे या प्रकाराला उघड उघड संमति देणार नाहीत, त्याचप्रमाणे दुसरे काही सुचहि शकणार नाहीत. अशा स्थितीत त्यांना विचारून अकारण अपशकुन करून घेण्यापेक्षां कांहीं न विचारणे काय वाईट ? भाईजींना कांहींच न विचारतां दुसऱ्या दिवशीं कर्तारसिंहानी आपल्या त्या विचारमग्न सहकाऱ्यांना स्वच्छ असे सांगितले की, " मी भाई परमानंदांना काय विचारावयाचें तें विचारून आलेलों आहे. त्यांची या गोष्टीला पूर्ण संमति असून त्यांचेहि मत 'माझ्याचसारखे आहे. मात्र पन्नास लोक एकच गोष्ट विचारावयास गेले तर भाईजींना असे वाटेल की, या लोकांना प्रत्यक्ष कांहींच करावयाचे नसून नुसती बडबड मात्र करावयाची आहे. या बडबडीने व्यर्थ कार्यनाश होईल; म्हणून भाईजी स्वच्छ नकार देतील." भाईजींच हे मत व कर्तारांचे त्यावरील भाष्य ऐक- तांच सर्वांचीच तोंडे गप्प झाली. अंबाला जिल्ह्यांतील लारू गांवचे निवासी व या मंडळींचे एक नेते प्रख्यात सरदार पृथ्वीसिंह यांच्यावर या वेळी वॉरंट निघालें होतें. ८ डिसेंबर १९१४ रोजी त्यांची रस्त्यांत एका ओळ. खीच्या पोलिस ऑफिसरशी गांठ पडली. पण पृथ्वीसिंह, तो जवळ येऊ लागतांच, त्याला एक जोराची गचांडी देऊन पहातां पहातां अदृश्य झाले. असो. कर्तारसिंहांनी ठरविलेल्या या बेतानुरूप १७ डिसेंबर रोजी हिसार जिल्ह्यांतील पिपी या गांवीं एका ब्राह्मण सावकाराच्या घरी दरवडा घालण्यात आला. या दरवड्यांत बावीस हजार रुपये एक हाती रक्कम क्रांतिकारकांच्या हातांत पडली. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पंजाब सरकारने पंजाबची एकंदर परिस्थिति मध्यवर्ती कांतिजीवन ४३. सरकारला कळविली. १९ डिसेंबर रोजी पंजाब सरकारने मध्य- वर्ती सरकारकडे कायद्याचा एक विशिष्ट मसुदा पाठविला. पंजाब सरकारची अशी कल्पना होती की, जर मध्यवर्ती सरकार या मसु- द्याला संमति देईल तर तो कायदा लागू करून क्रांतिकारक चळ- वळीचे दमन करणे सुलभ होईल. मध्यवर्ती सरकारला हेही कळ- विण्यांत आले की, शीखांच्या द्वारे सेनेमध्ये विद्रोहाचा भयानक प्रचार करण्यांत आलेला असून मागच्या महिन्यांत गाड्या रुळा- वरून उलटविण्याचे व डाकगाड्या लुटून फस्त करण्याचे प्रकार घडलेले आहेत. खटला न चालवितांच संशयित व्यक्तींना बेमुदत अटकेत ठेवण्याचा अधिकार पंजाब सरकारला हवा होता. सरद्दद प्रांतांतील दंगेखोरांच्या बंदोबस्तासाठी ज्या प्रकारच्या कायद्याची गरज आहे, त्या प्रकारचे कायदे पंजाबसाठी उपयोगांत आण- ण्याचा पंजाब सरकारचा विचार होता. याप्रमाणे पंजाब सरकार व भारत सरकार यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू होता; तर इकडे. कर्तारसिंहाच्या आधिपत्याखाली दरवड्याचे सत्र सुरूच होते. दि. २४ व २५ डिसेंबर रोजी जालंदर जिल्ह्यांतील फरला व करनाम या गांवी दरवडे घातले गेले. याच तारखेस फिरोजपूर जिल्ह्यांतहि दोन ठिकाणी दरवडे पडले. २७ डिसेंबर रोजी गुरुदास जिल्ह्यां- तील चौरीआन या गांवी, १ जानेवारीला हुशियारपूर जिल्ह्यांत व ४ जानेवारी रोजी जालंदर जिल्ह्यांत दरवडे पडले. यांपैकी एका गांवी एका चौकीदाराला ठार मारण्यांत आले, व मारगुमरी जिल्ह्यांत ऐका गांवी आठ शीखांनी एका मोहल्ल्यावर आक्रमण केले असतां तेथील एक सब्ओव्हरसिभर बंदुकीची गोळी दंडाला. लागून जखमी झाला. दि. १६ जानेवारी रोजी गुरुदासपूर जिल्ह्यां- तील श्रीगोविंदपूर या गांवों एक दरवडा पडला. दि. २१ जाने- रासबिहारी बसंखें - वारी रोजी कपूरथला संस्थानांतील एका गांवी काही दुकानांची लूट करण्यांत आली. या लुटीनंतर कांही शिखांना अटक करण्यांत आली असता त्यांच्याजवळ १ रिव्हॉल्व्हर व २४५ काडतुसें सांपडली. या दरवड्यांना राजनैतिक म्हणून सिद्ध करतां आलें नाही. पण जे दरवडे व जी कृत्ये न्यायमंदिरांत राजनैतिक म्हणून सिद्ध करण्यांत आली ती येणेप्रमाणे:- दि. २३ जानेवारी रोजी लुधियाना जिल्हयातील एका दुकान- दाराला त्याच्या परिवारासहित चोप देण्यांत येऊन त्याच्या पत्नीच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेण्यांत आले. दुकानदाराला दिलेल्या मारामुळे पुढे तो मेला. पण या ठिकाणी संपत्ति अतिशय थोडी मिळाली. दि. २७ जानेवारी रोजी · १५ क्रांतिकारकांनी, याच जिल्ह्यांतील मनसूरन् नांवाच्या गांवीं एका धनाढ्य गृहस्थाच्या घरावर हल्ला चढवून पुष्कळशी संपत्ति हस्त- गत केली. या हल्लयांत एका मुलाला व स्त्रीला बराच मार बसला. या दरवड्यांत लुधियानाचे काही विद्यार्थीहि समाविष्ट होते. गांवां- तले लोक लाठीबंद होउन क्रांतिकारकांवर चालून आले असतां त्यांच्या पुढान्याने समोर होउन सांगितले की, “ या लुटीतील पै न पै इंग्रजांना या देशांतून हाकून लावण्याच्या कामी उपयोगी पडावयाची असल्याकारणाने आपणांपैकी कोणीहि या कृत्याच्या आड येउन अकारण स्वतःच्याच देशबांधवांच्या रक्ताने हात माखण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नये. पण गांवकरी या तोंडी धमकावणीला बधत नाहीत असे आढळून आल्यावर मात्र क्रांतिकारकांनी रिव्हाल्व्हर्स व बाँबसचा मोकळ्या हाताने उपयोग करून त्यांना परास्त केले. दि. २९ जानेवारी रोजी मालेरकोटला संस्थानांतील झानीर नावाच्या गांवीं एका सावकाराच्या घरी " क्रांतिजीवन ni दरवडा घालण्यांत येऊन आणखीहि कित्येक धनिकांची घरे दाख- वून देण्याविषयी त्याला विवश करण्यांत आले. फेब्रुवारी १९१५. मध्ये अमृतसरजवळ असलेल्या चब्बा नांवाच्या गांवीं एका ब्राह्मण सावकाराच्या घरावर हल्ला चढवून त्याला ठार मारण्यांत आलें. गांवकरी चालून आले असतां बाँब व पिस्तुलांचा मुक्तहस्ताने उप- योग करून त्यांना परास्त करण्यांत आले. या हातघाईत एका लोहाराला पकडण्यांत आले असता त्याने स्वतःच्या नेत्याचे नांव मूलासिंह " असें सांगितले. लवकरच क्रांतिकारकांना असें आढळून आले की, हा मूलासिंह बदमाष मनुष्य असून त्याने पैशाच्या बाबतीत पुष्कळच: अफरातफर केलेली आहे. पोलिसांनी लवकरच या.मूलासिंहाला पकडले व तो माफीचा साक्षीदार बनून, शचीन्द्रांनी पहिल्या नजरफेकीत त्याच्यासंबंधी मागें सांगितलेले अनुमान केले होते, तें खरे असल्याचे कर्तारासह प्रभृतींच्या त्याने प्रत्ययास आणून दिलें ! या ठिकाणी कर्तारसिंहांच्या श्रेष्ठ चारित्र्यशीलतेची एक गोष्ट मी सांगण्याचा मोह आवरूं शकत नाही. दि. ३ फे. १९१५ ची ही गोष्ट आहे. या दिवशी लुधियाना जिल्ह्यांतील रब्बो नांवाच्या गांवी दरवडा घालण्यांत आला. टोळीचे नायक बागी कर्तारसिंह हे होते. ज्या घरावर दरवडा घालण्यांत आला तेथे एक. अति- शय सुंदर व. वयांत आलेली मुलगी उभी होती. तिला पहातांच या टोळीतल्या एका चंचल मनोवृत्तीच्या तरुणाचें चित्त विचलित होऊन त्याने कामार्ततेने तिचा हात पकडला, मुलीने एक आर्त किंकाळी फोडली. ती ऐकताच कर्तारांचे लक्ष त्या प्रकाराकडे वेधले. त्यांनी दुसरे तिसरें कांहीं एक न करतां भरलेले रिव्हाल्व्हर त्या पापात्म्याच्या मस्तकांशी जुड़वीत त्याला 'ही मुलगी माझी रासबिहारी वसंचे बहीण आह. ' असें वदवायला लावून चरणस्पर्श करून तिची माफी मागावयास भाग पाडले. हा अद्भुत प्रकार पहातांच ती मुलगी व तिची वृद्ध माता या दोघींचेहि डोळे कृतज्ञतेने भरून आले. सद्गदित होऊन ती माता कर्तारांना म्हणाली, " बाळ, असा धर्मात्मा अन् शीलसंपन्न असतांना तूं या भीषण कार्याला कसा प्रवृत्त झालास बाबा ?” कर्तार उत्तरले, “ आई, या भरत- भूमीच्या कुशीत जन्म घेणारा प्रत्येक तरुण असाच शीलचारित्र्य- संपन्न होता. पण ज्या चांडाळांनी आमच्या श्रेष्ठतम भूमातेचे स्वातंत्र्यधन लुटून नेले त्यांनी या देशांत अशी परिस्थिति निर्माण केली आहे की, आमच्यांतलें शील संपलें, आमच्यांतल्या चारि- त्र्याचे दिवाळे वाजलें, माणुसकी विलायास गेली, व आम्ही आज पशू हुन पशु बनलो आहोत. ही परिस्थिति आमूलाग्र बदलवून आमचे पूर्वीचे स्थान परत मिळवायला भूमातेचे विगत स्वातंत्र्य परत मिळविणे अन् इंग्रजी राज्य उलथून पाडणे हा एकच काय तो मार्ग आहे. म्हणून इच्छा नसतांना देखील मला या भीषण कार्याला प्रवृत्त व्हावे लागले. तूंच सांग ! दुसरा काही मार्ग आहे का ?" तिचे सारें घर धुवून काढण्यांत येत असतां कर्तारांना ती म्हणाली, " बेटा, या आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नासाठी तुं कांहींच का देणार नाहींस ?" कर्तारांनी सारा लुटीचा ढीग तिच्या समोर ओतला. डोळ्यांत पाणी आणून तो परत त्यांच्या स्वाधीन करीत ती म्हणाली, " बेटा, ईश्वराने प्रेरणा दिल्यावांचून का तुझ्यासारखे धर्मात्मे अशा कार्यात भाग घेत असतात ? जा, बाबा जा, ईश्वर तुझं रक्षण करून तुझें उद्दिष्ट सफळ करो ! " असो. याशिवाय दि. ३, ६, ७, १५, १८, २१, जानेवारी रोजी रेलगाडी रुळावरून पाडण्याचेहि प्रयत्न झाले. मविख्यात' 'क्रांतिजीवन कोमागाटामारू प्रकरणाचे काही अभियुक्त याच सुमारास सुटले होते. कर्तारांनी त्यांना परत आपल्या कार्यात समाविष्ट करून घेतले. या सुमारास डॉ. मथुरासिंहानी स्वतंत्रपणे बाँब गोळे तयार करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना कधीच जमले नाही. १२ यतीन्द्रनाथ रासबिहारींना भेटतात शचीन्द्रनाथ संन्याल पंजाबची पाहाणी करून परत आल्या- नंतर प्रख्यात यतीन्द्रनाथ मुखोपाध्याय हे बनारस येथे रास- बिहारींची भेट घेण्यास्तव आले. . यतीन्द्रनाथ मुखोपाध्यायांना जतीन मुकजी या नांवाने सारे ओळखत. भारतीय आंतकवादाच्या चार आधारस्तंभांपैकी हे एक होत, हे मी प्रथमच सांगितले असल्यामुळे त्यांच्या योग्यतेसंबंधी अधिक सांगण्याची गरज नाही. त्यांच्या विशुद्ध चारित्र्यामुळे व श्रेष्ठ आत्मिक बळामुळे क्रांति- कारकांच्या मध्ये त्यांचे अतिशय वजन असे. यतींद्रांना रास- बिहारीनींच मुद्दाम बोलाविले होते. त्यांना बोलावण्याचा उद्देश असा होता की, समस्त उत्तर भारत एकाच सूत्रांत गावले जाऊन पंजाबच्या सीमान्त प्रदेशापासून तर पूर्व आसामच्या सीमान्त प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी एकाच सुसूत्र संघटनेकडून एकाच दिवशी नि एकाच क्षणी सशस्त्र उठावणी करण्याची योजना नक्की करावी. पंजाबचे शीख या वेळी उठावणीचा दिवसाची अतिशय घाई करीत होते.रासबिहारींनी स्वतःला वाटत असलेला उठावणीचा क्षण व दिवस याची कल्पना देतांच यतींद्र मुकर्जी परिस्थितीचे एकदर आलोचन करून त्यांना म्हणाले की, “रासूदा,उठावणीचा दिवस नि क्षण तुम्ही म्हणतां त्यापेक्षाही दोन महिने पुढे ढकलावा असें माझें मत आहे. क्रांति जर पूर्णपणाने यशस्वी करायची असली तर चुसते उत्साह, संघटना अन् देशभक्तीची उदात्त भावना यांनी रासबिहारी वसंचे काम भागणार नसून व्यावहारिक दृष्टीचा अंगिकार केला पाहिजे. पुरेशी शस्त्रसंपत्ति अन् धनसंचय यावांचून आपलें नडल्याखेरीज रहणार नाही. त्या दृष्टीने आणखी दोन महिन्यांचा अवधि लांबविणेच मला श्रेयस्कर वाटते." पण रासबिहारींनी त्यांना सांगितले की, "अधिक विलंबाने पंजाबांतले भावनाप्रधान शीख सारेच काम नासवून टाकण्याचा संभव आहे. म्हणून तुम्ही शक्य तितका लवकर बंगालमध्ये धनसंचय अन् शस्त्रसंचय करा. मी स्वतः पंजाबमध्ये जाऊन परिस्थितीचं एकदां नीट निरीक्षण करतों अन् तुम्हाला उठावणीचा दिनांक कळवितों. मात्र तारीख फारशी लांब असणार नाही." रासबिहारींचा निरोप घेऊन जतीन मुकर्जी बंगालमध्ये गले. त्यांनी बंगाल्यांत पाऊल घातले मात्र तोंच बंगालमध्ये सुवि- ख्यात मोटार-दरवडयांना प्रारंभ होऊन शस्त्रास्त्रे व धन यांच्या राशी त्यांच्या पायाशी येऊ लागल्या. रोडा कंपनीच्याच एकट्या दुकानावर हल्ला करून वंगीय क्रांतिकारकांनी या वेळी ५० मौजेर पिस्तुले व पन्नास हजार काडतुसे हस्तगत केली होती. असो. भाई परमानंद यांनी या सुमारास रासबिहारींना एक पत्रा लिहून त्यांत अशी विनंती केली होती की, आपण आपले बहुमोल जीवन अज्ञातवासांत संपविण्यापेक्षा काहीतरी भरीव देशकार्यात खर्च करावें." प्रत्यक्ष गदरच्या पंजावांतील तयारीच्या भक्कमपणा- विषयी भाईजीना जबरदस्त शंका असल्यामुळे ते या आंदोलनांत प्रत्यक्ष भाग घेत नव्हते. तरी पण त्यांच्या संमतीची अथवा भावी परिणामांची मुळींच पर्वा न बाळगतां बागी कर्तारसिंह मोकळे- पणाने अवश्य तेथे त्यांच्या नांवाचा उपयोग करीत असल्यामुळे पंजाब सरकार व पंजाबांतले उतावळे सीख भाईजींनाच या गदर .
क्रांतिजीवन प्रकरणाचे पंजाबांतील मुख्य सूत्रधार समजत असत. रासबिहारींनी भाईजींचें तें पत्र पाहिले व एकवार शचीन्द्रांकडे पाहून एक भाव- गर्भ स्मित केले. भारतीय विप्लवाच्या त्या महान् अधिनायकाच्या त्या भावगर्भ स्मितांत कोणतें ब्रह्मांड सांठविलेले नव्हतें ? १३ रासबिहारींचा पंचनदांतील पदन्यास ज्या वेळी जतीन मुकर्जी बंगाल्यांत जावयास निघाले त्याच वेळी रासबिहारीही पंजाबमध्ये जावयास निघाले. या दिवसांत रास- बिहारींच्या बरोबर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून कुणी ना कुणी क्रांतिकारक असेच. कारण त्यांना पकडून देणाऱ्यास सरकार- तर्फे साडेसात हजारांचे बक्षिस जाहीर झालेले असून गुप्तचरांचे नेत्र त्यांच्यावर घारीसारखे टपले होते. रात्रीच्या गाडीने ते दिल्लीच्या मार्गाने पंजाबांत जावयास निघाले. त्यांनी समोर पाहिलें तो त्यांच्यावरचे संकट जणूं कांहीं आ वासून त्यांचा ग्रास करावयास उभे असलेले त्यांना आढळून आले. ज्या छोट्याशा डब्यांत ते बसले होते त्याच डब्यांत त्यांच्या चांगल्या परिच- याचा एक सी. आय. डी. इन्स्पेक्टर मजेनें धूम्रपान करीत बसला होता. पण त्याने रासबिहारींना शुद्ध बंगाली वेषांत व अनावृत मस्तकाने पाहिले होते. या वेळी त्यांच्या डोक्यावर टोपी व पोषा- खाची त-हा अपरिचित असल्यामुळे तो त्यांना ओळखू शकला नाही. रासबिहारींनी आपल्या डोक्यावरची टोपी अधिकच कपा- ळावर ओढून घेतली व ते स्वच्छ झोपेनें घेरल्यासारखे गुडघ्यांत मान घालून बसले. स्टेशन येतांच त्यांनी आपला डबा बदलून घेतला व ठरल्या वेळी ते अधिक काही अडचण उपस्थित न होतां अमृतसर येथे येऊन पोहोचले. पंजाबमध्ये येतांना उत्तरभारतांतील संघटनेची सूत्रे शचीन्द्रांचे रासबिहारी बसुंचे हातांत सोपवून रासबिहारी निघाले होते व वेळोवेळी कार्याची प्रतिवृत्ते कळविण्याबद्दल त्यांनी शचीन्द्रांना बजाविलें होतें. शची. न्द्रांनी आपल्या सहकाऱ्यांसह बंगाल, बिहार व युक्तप्रांत येथील छावण्यांमधून बारकाईने शोध केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की, देशांत गारी सेना फार थोडी असून जे आहेत तेहि नवशिके, पोरसवदा व अननुभवी लोकच आहेत.या लोकांनी प्रत्येक छावणीतील अस्त्रशस्त्रांचे, गोऱ्या व काळ्या सैनिकांचे व एकंदर साधनसामुग्रीचेहि आकडे मोठ्या शिकस्तीने मिळवून एक अतिशय उपयुक्त असें कोष्टकच तयार केले होते. लष्करी छावण्यांतील लोक क्रांतिकारकांचा आपल्या छावण्यामधून गो-या अधिका-यांच्या लक्षांत न येईल अशा पद्धतीने मोठा आदरसत्कार करीत असत, इतका त्यांच्यांत क्रांतिकारकांनी विप्लवाच्या विचारसरणीचा प्रसार केलेला होता. आतां शचीन्द्र व त्यांचे साथीदार रोज या छावण्यामधून जाणे येणे करूं लागले. सेनेप्रमाणेच खेड्यापाड्यां- तूनहि यांचा प्रसार सुरूच असे. विशेषतः युक्त प्रांतांतल्या ठाकूर लोकांपैकी पुष्कळ लोक या वेळी शचीन्द्रांना अनुकूल झाले. शची- न्द्रांनी रासबिहारींच्या सूचनेनुरूप या लष्करांतील लोकांना अशी स्पष्ट सूचना दिली होती की, त्यांनी कसलाहि बभ्रा न करतां अगर आपसांतहि कांही एक न बोलतां साऱ्या उत्तरभारतांतील छावण्यां- तील भारतीय सैनिकांनी,ज्यांना जो दिवस कळविण्यात येईल, त्या दिवशी एकदम, अचानकपणे, एकाच क्षणी, गोऱ्या आधिकाऱ्यांवर व गोऱ्या सैनिकांवर हल्ला चढवावा. दंगा रात्रीच्या वेळी प्रारंभ करावा. त्याच वेळी तार वगैरे संदेशवाहक साधनें तोडून व नष्ट करून एकजात सगळ्या गोऱ्या लोकांना पकडून वा मारून नंतर खजिना लुटावा. त्यानंतर तुरुंग फोडून कैद्यांना बंधमुक्त करावें.
कांतिजीवन नंतर त्या स्वतंत्र केलेल्या जागेच्या व आसपासच्या टापूच्या संरक्षणासाठी कुण्यातरी योग्य पुरुषाची नियुक्ति करून इतर सर्व क्रांतिकारकांनी तडक पंजाबच्या रोखाने चालू लागावें. पंजाब हो रासबिहारींनी क्रांतिकारकांची केन्द्रभूमि व स्वातंत्र्याच्या निर्णायक सामन्याची मुख्य युद्धभूमि ठरविली होती. सर्व विद्रोह्यांनी पंजाब- मध्ये एकत्रित होऊन कमीत कमी एक वर्षपर्यंत तरी पंजाब व्यव- स्थितपणे लढवला पाहिजे असे त्यांचे मत होते. १८५७ सालच्या प्रख्यात स्वातंत्र्य-संग्रामांतील संकेतासारखेच या संग्रामांतील संकेतांचेंहि स्वरूप होते. त्या संग्रामांत ज्याप्रमाणे प्रत्येक छावणीतील भारतीय सैनिकांनी आपापल्या छावणीतील गोऱ्या अधिका-यांना मारून, खजिना लूटून, भोवतालचा टापू स्वतंत्र करून, कैदो मोकळे करून व प्रांताचा बंदोबस्त करून दिल्लीला येऊन तेथील केन्द्रस्थानी एकत्रित मिळावे, असा संकेत होता तसाच तो या वेळी हे होता. फक्त त्या वेळच्या अन् या वेळच्या समरकेन्द्रांच्या स्थानांत फरक होता. काही दिवसानंतर रासबिहारीनों पंचनदांतील विप्लववाद्यांचे आधि. नायक बागी कर्तारसिंह यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांसह शची. न्द्रांच्या सहवासांत क्रांतीचे एकंदर स्वरूप लक्षांत भरण्यासाठी मुद्दाम बनारसला जावयास सांगितले. त्याप्रमाणं कर्तार आपल्या काही साथिदारांसह बनारसला येउन व कांही दिवस तेथे राहून पुनश्च पंजाबमध्ये परत गेले. पंजाबांतील लष्करी छावण्यांत शिरून लष्कर फितविण्याचे काम अन् तेंहि पंजाबी लोकांच्या घायकुत्या, भडभड्या व म्हणून क्रांतीच्या उठावणीच्या बाबतीत अवश्य त्या गुप्ततेच्या धोरणाला सर्वस्वी विराधक अशा स्वभावाला गृहीत धरून करावयाचे. हे अत्यंत कठीण कार्य रासबिहारींनी स्वतः- रासबिहारी वसूचे च्याच शिरावर घेतले; व अवघ्या एकदोन आठवड्याच्या आंतच तें अत्यंत कुशलतेने पार पाडले. पकडवॉरंटींची तरवार अन वध- स्तंभावरची तात डोक्यावर सतत टांगती असल्यामुळे त्यांना अति- शयच सावधगिरीने वागावें लागे. शचीन्द्रांच्यासारखें त्यांना उघड- पणे वावरतां येणें तर केवळ अशक्य कोटीतलें होतेंच! पण पृथ्वी- सिंह अथवा कर्तारसिंह यांच्याप्रमाणे त्यांना सहजासहजी पोलि- सांच्या हातावर तुरी देऊन निसटून जातां येणेहि कठीण होते. या साऱ्या कारस्थानांना कुणाच्या कर्तृत्वशक्तींतून जीवनरसाचा अव्याहत पुरवठा होतो आहे व कुणाच्या प्रतिभेतून क्रांतीचे हे रक्तरंजित चित्र रेखाटले जात आहे याची ब्रिटिश सरकारला पूर्णपणे जाणीव होती. रासबिहारींना जिवंतच नव्हे तर मेलेलेही आणून कुणी दाखविले असते, तर साडेसात हजार रुपयांचे बक्षिस देउन वर एकाद्या पदवीच्या शाबासकीचा मनपसंत आहेर द्यावयास न चुकण्याइतकें सरकार या बाबतींत आतुर झाले होते. हिंदु- स्थानच्या भूमीतून आपल्या उद्धारकालाच सुळावर चढविणा-या मात्रागमनी बेइमानांचे पीक कांहीं कमी पिकत नाही, हेहि रास- बिहारींना नव्याने कुणी सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे अवश्य तितक्या सावधगिरीने राहाणे त्यांना भागच होते. त्यांनी आपल्या मूळ वसतिस्थानाखेरीज त्या वसतिस्थानापासून अगदी विरुद्ध दिशेला लांब अंतरावर दोनतीन घरे घेतली होती. या घरांमध्ये भेटीगाठी घेणे व सर्व प्रकारचे लोकांशी संबंध येणारे व्यवहार करणे इत्यादि गोष्टी रासबिहारी करीत.. त्यामुळे त्यांच्या खऱ्या निवासस्थानाचा पत्ता अखेरपर्यंत कुणालाच लागू शकला नाही. हवालदार लक्ष्मणसिंह, व एक मुसलमान हवालदार या दोघांचे, सैन्यामध्ये विप्लववादाचे लोण पोहोचविण्याच्या बाबतीत त्यांना कांतिजविन अतिशय महत्वाचे सहाय्य झाले. पुढे या दोन्ही हवालदारांना बरोबरच फाशी देण्यात आले. १९१५ सालच्या जानेवारी महि- न्याच्या शेवटी जे रासबिहारी पंजाबमध्ये आले ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यत तेथेच होते. त्यांनी कर्तारांना हाताशी धरून एक विशाल संघटन निर्माण केलें. शेवटी सर्वांच्या विचारें त्यांनी २१ फेब्रुवारी १९१५ ही उठावणीची तारखि निश्चित केली. सर्व ठिकाणी एकाच दिवशी एकाच क्षणीं उठावणी होणे अवश्य असल्यामुळे बनारसला असलेल्या शचीन्द्रनाथ संन्यालांना व त्यांच्या द्वारे युक्त प्रांत, बिहार, आसाम व बंगाल येथील विप्लवाच्या नेत्यांना हा दिनांक कळविण्यांत आला. ठिकठिकाणी शस्त्रसंचय व धनसंचय व्यापक प्रमाणावर करण्यांत आला. विप्लववाद्यांचा गणवेष व ध्वज ठराविण्यांत आला. हा ध्वज चतुरंगी असून हे चारहि रंग हिंदुस्थानांतील हिंदू, शीख, मुसलमान व तदितर सर्व जनतेच्या एकमुखी एकसंधीपणाचें प्रातिनिधिक मानण्यांत आले होते. पुष्कळसें धान्य एकत्रित करण्यांत आले होते. ठिकठिकाणची वाहतुकीची साधने व त्यांच्या द्वारे प्रवास करणारे प्रवासी यांची अवश्य ती नोंद व्यवस्थितपणे ठेवण्यांत येऊ लागली. रेल्वे लाइन्स व संदेशवाहक तारा तोडून टाकण्याची सारी अवजारें ठिकठिकाणी एकत्रित करण्यांत आली. रासबिहा- रींनी युद्धघोषणापत्र व स्वातंत्र्ययुद्धाचा जाहीरनामाही तयार केला. इतकी सर्व तयारी झाल्यानंतर साऱ्या उत्तर भारतांतले क्रांति- कारक आगामी फेब्रुवारी २१ या रासबिहारींनी कळविलेल्या तारखेकडे अतिशय उत्सुकतेने पाहू लागले. पंजाबमध्ये ठिणगीचे लाल तोंड दिसू लागतांच साऱ्या उत्तर भारताचा ज्वालामुखी विप्लवाचा तप्तरस ओतणार होता... पण !
५४ रासबिहारी वसू १४ 'बुद्धिनाशात्प्रणश्यति ! पण पंजाबी क्रांतिकारकांच्या कृतघ्न फितुऱ्यावर दया दाखवि- ण्याच्या मूर्खपणा णाच्या रणनीतीमुळे व भोंगळ्या नि बावळट- पणाच्या सैल कारभारामुळे रासबिहारींची ही इतकी प्रचंड, सिद्ध व सन्नध्द योजना पार धुळीला मिळाली. शत्रू-राष्ट्राचे कूसही वाकडे न होतां क्रांतिकारक मात्र मृत्यूच्या पाशांत अडकले. रणांत ते अयशस्वी ठरले असते तर गोष्ट वेगळी होती. धारातीर्थी ते पतन पावले असते तर ती गोष्ट अभिमानाची होती. साऱ्या जगाचा तो कौतुकाचा विषय झाला असता. स्वातंत्र्याच्या वैतालिकांच्या हातीं तें एक महाकाव्य लाभले असते; पण तसे कांहीं एक न घडतां बंडखोर, गुन्हेगार म्हणून स्वातंत्र्यदेवतेच्या या महान् उपासकांना काळी टोपी डोक्यावर चढवून फासावर चढावे लागले. त्यांना मरण देखील शस्त्रपूत लाभलें नाहीं; तें लळत लोंबकळ- तच लाभलें. अमृतसरजवळील चब्बा नांवाच्या गांवीं मूलासिंहाच्या नेतृत्वाखाली दि. २ फेब्रुवारी रोजी एक दरवडा घालण्यात आला होता, ही गोष्ट मागें सांगितलीच आहे. या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारस्थानाच्या स्वरूपाचा छडा लावावा म्हणून पंजाबी गुप्तचरांच्या एका मुसलमान मुख्याधिकाऱ्याने मूलासिंहाला एकदम अटक न करता त्याच्या एकंदर हालचालीवर नजर ठेवावी म्हणून कृपालसिंग नांवाच्या एका गुप्तचराची योजना केली. या कृपाल- सिंहाचा एक दूरचा नातलग इंग्रजी सैन्यविभागांत नोकरीवर असून क्रांतिकारकांच्या संघटनेचा सभासद होता. त्याच्या द्वारें फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी या कृपालसिंगाचा क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेत प्रवेश झाला. रासबिहारीना माणसाचा ताबडतोब संशय आला. त्यांनी त्याच्यावर पाळतीसाठी तर या क्रांतिजीवन माणसें ठेवली; तो त्यांना असे आढळून आले की, कृपालसिंग रोज एका नियत वेळी नियत अशा संशयास्पद ठिकाणी जात असतो. ज्या वेळी कृपालसिंगाच्या बाबतींतलें आपलें मत रासबिहारींनी निश्चित बनविले होते त्या वेळी फेब्रुवारीच्या त्या नियत एकवीस तारखेला पूर्णपणे एक आठवडाहि उरलेला नव्हता. रासबिहारींनी पंजाबी क्रांतिकारकांना या गोष्टीची कल्पना दिली. त्यांची अपेक्षा अशी होती की, पंजाबी क्रांतिकारक या फितु-या इसमाला ताबड- तोब गोळी घालून ठार मारतील व अशा निमकहरामांची ठरलेली जागा जे रौरव कुंभीपाकासारखे नरक त्यांतल्या एकाद्या ठिकाणी त्याला कायमचा पाठवून देतील, पंजाबच्या ऐवजी बंगाल असता तर या इसमाची योग्य ती वासलात प्रत्यक्ष नेत्याकडून सूचना मिळायच्या आतच लागली असती व पुढचा दारुण प्रसंग टळला असता. पण आतेला मिशा असत्या तर काका म्हणून म्हटलें नसतें कोणी ? असो. पंजाबी क्रांतिकारक या कृपालसिंगाला कायमचा संपवून टाकण्याऐवजी, त्याला मारण्याने अधिक नुकसान होईल, का न मारण्याने होईल, याच्यावर आपसांत वादविवाद करीत बसले अन् त्याचा व्हायचा तोच परिणाम होऊन, २१ फेब्रु- वारी हा दिनांक ठरला असल्याचे सरकारला कळले. सरकार एकवीस फेब्रुवारीच्या बाबतीत सचेत झाले असल्याची बातमी ज्या वेळी कर्तारसिंह प्रभृतींना कळली, त्या वेळी तरी त्यांनी कृपालसिंगाला प्रथम यमलोकचा रस्ता दाखवून नंतर इतर बेत' ठरविण्याच्या भानगडीत पडायचे असते. पण मरणघडी जवळ आली म्हणजे बुद्धिचक्राचीही गति उलट दिशेने चालू लागते असे म्हणतात. कृपालसिंगाला ठार मारण्याऐवजी त्यांनी त्याला नजर- कैदेत ठेवून त्याच्यावर काही माणसें पहाऱ्यावर ठेवून दि. २१ ५६ रासबिहारी वसंचे फेब्रुवारीच्या ऐवजी दि. १९ फेब्रुवारी ही उठावणीची तारीख म्हणून ठरविली. लष्करांत ही सूचना देण्यासाठी म्हणून ज्या गृहस्थाला पाठविले होते त्याने या तारखेच्या आदल्याच दिवशी म्हणजे दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी, कृपालासंग बसला असतांनाच येऊन, मोठ्याने रासबिहारींना सांगितले की,“२१च्या ऐवजी १९ दिनांक ठरली असल्याचे मी लष्करांत कळवून आलों आहे." रासबिहारींनी हे ऐकतांच कपाळावर हात मारून घेतला. कृपालसिंगाला सांभाळण्याबद्दल शेवटचा इषारा देऊन ते तेथून बाहेर पडले. ते आतां पूर्णपणे पंजाबी क्रांतीचे अन् एकंदर भार- ताच्या क्रांतीचे काळे कभिन्न भविष्य समजून चुकले होते. रास- बिहारींची पाठ फिरतांच त्यांच्या इषाऱ्याचे मर्म ध्यानांत नीट- पणाने न घेता त्या ठिकाणी असलेली सारी मंडळी जेवायला म्हणून घरोघर निघून गेली. त्या घरांत आतां कुणीच नाही असे पाहून हळूच पाहाऱ्यावर ठेवलेला चौकीदारही जेवायला निसटला. कृपालसिंगाला तरी हेच हवे होते.त्याने हळूच बाहेर पडून,रस्त्या- वर येउन, एका सायकलीवरून जाणाऱ्या गुप्तचराला अडविले, अन् १९ तारखेचा नवा बदल सरकारी गोटांत कळविला. तो पुनश्च कुणाच्या लक्षात येण्यापूर्वीच परत स्वस्थानी येऊन बसला ! अवघ्या काही तासानंतरच पोलिसांनी हत्यारबंद होऊन त्या घराला वेढा दिला. पोलिसांना कृपालसिंगाच्या सूचनेनुरूप अशी आशा होती की, या अचानक टाकलेल्या जाळ्यांत रासबिहारी निश्चित अडकतील. पण ते सरकारच्या बारशाला जेवलेले होते ! त्यांच्या राहण्याचा पत्ता कुणालाच माहित नसल्यामुळे ते सरका- रच्या हाती लागू शकले नाहीत. या घरांत अमरसिंग इत्यादि सात क्रांतिकारकांना अटक झाली. झडतीत एक रिव्हाव्हर,चार ध्वज, क्रांतिजीवन कित्येक तयार असलेले बाँन्स व बाँब गोळे बनविण्याची सामग्री सरकारच्या हाती लागली. सरकार आतां पूर्णपणे. सावध झालेले होते. त्यामुळे त्यांनी मँगनीज व शस्त्रागार यांच्यावर जो काळ्या शिपायांचा पहारा होता तो अजिबात बदलून त्या जागी गोऱ्या शिपायांचा पहारा ठेवला. शहरांतील गोया लोकांना एकत्रित करून त्यांना सन्नद्ध राहाण्याची सूचना देण्यांत आली. हत्यारबंद गो-या शिपायांच्या टोळ्या मशीनगन्स बरोबर घेऊन व रायफली खांद्यावर टाकून रस्त्यारस्त्यांतून व बोळाबोळांतून नागरिकांच्या मनांत दहशत उत्पन्न करीत फिरूं लागल्या. लाहोर, दिल्ली, फिरोजपूर इत्यादि सर्वच ठिकाणी हा देखावा अचानकपणे उत्पन्न झालेला पाहून देशी शिपाई घाबरून गेले व त्यांच्या उठावणीचे बेत मनांतल्या मनांतच जिरले. ठरल्याप्रमाणे फौज उठली नाही म्हणून खेड्यापाड्यातले छोटे मोठे ठाकूर, जमीनदार व त्यांच्या मागे असलेली ग्रामीण जनता प्रथम गोंधळून गेली. नंतर सारे कारस्थान फसल्याचें ध्यानांत येतांच ज्यांनी त्यांना उठावणीची सूचना दिली होती त्यांना दोष देत ते आपआपल्या जागी स्वस्थ बसले. बागी कर्तारसिंग मात्र त्या तशा परिस्थितीतही शेवटचा प्रयत्न म्हणून स्वतः बरोबर ८० निवडक माणसें घेउन फिरोज- पूरच्या छावणीत गेले व छावणीजवळ फिरणाऱ्यांची कसून तपासणी होत असतांनाहि युक्तीने आंत प्रवेश करून, काळ्या पलटणीच्या हवालदाराला जाऊन भेटले. पण त्याने लाचारीच्या स्वरांत कर्ता रांना सांगितले की, " आपला सारा कट उघडकीस आला असून सरकारने सर्व प्रकारचा बंदोबस्त केलेला आहे. आमच्या हातांत एक देखील हत्यार नाही व कुणाच्या कानांत दोन शब्द कुज- बुजण्याची देखील सोय नाही. अशा स्थितीत थोडीशीही हालचाल रासबिहारी वसंखें केल्याने फळ तर काहींच हाती गवसण्याचा संभव नसून हजारों माणसांना फुकट मरावें मात्र लागेल. त्यामुळे मी या वेळी काहीही करावयास पूर्णपणें असमर्थ आहे. तुमचा उत्साह, तुमचे शौर्य, तुमची तडफ, नेतृत्व अन् ज्वलंत देशभक्ति, सारें, सारें कांहीं मला मान्य आहे; पण क्षमा करा. इथें अधिक वेळ थांबून तुम्हीही आपला जीव अकारण धोक्यांत घालण्याचे वेडे साहस करावें असें मला वाटत नाही. " कर्तार यावर काय बोलणार होते ? त्यांचे म्हणणे खरेच होते. लाचारीने व दुःखाने जागच्या जागी हात चोळीत अन् दांत ओठ खात कर्तारासिंह आपल्या मंडळीसह तसेच परत फिरले. वर्तमान भारताच्या स्वातंत्र्य-प्रयत्नांच्या इतिहासांत १९ फेब्रुवारी १९१५ या दिवसाचे अतिशय महत्व आहे. १८५७ सालचे स्वातंत्र्ययुद्ध व १८७३ सालची पंडित रामसिंह कुका यांची पंजाबांतील क्रांतिकारक उठावणा या दोन प्रसंगी जी सशस्त्र युद्धाची तयारी करण्यांत आलेली होती, तेवढ्याच व्यापक प्रमाणावर याही वेळी प्रथमच वर्तमान भारताच्या इतिहासांत सन्नद्धता व सिद्धता करण्यांत आली होती. पण सत्तावन सालची सिद्धता कामी आली. कुका विग्रहांत भलत्याच वेळी उठावणीची घाई करण्यांत आल्यामुळे जरी अपयश आले असले तरी सिद्धता अगदीच व्यर्थ जाऊं शकली नाही. या वेळी मात्र पंजाबी क्रांति- कारकांच्या जबाबदारी ओळखून काम न करण्याच्या वृत्तीमुळे व कुपात्री प्राणदानासारखें महत्वपूर्ण दान दण्याच्या आंधळ्या औदार्यामुळे येवढी सारी सिद्धता व तयारी निव्वळ व्यर्थ गेली ! धृतराष्ट्राने एका दुर्योधनाची गय केली; त्याला सर्वनाशाचें दारुण दुःख सहन करून जन्मभर अश्रु-मोचन करीत बसावें क्रांतिजीवन लागलें. शिंदे-होळकरांनी एका नजीबखानाला वांचविलें अन् पानपतच्या युद्धांत हिंदुराष्ट्राच्या पाठीचा कणाच मोडून पडला ! पृथ्वीराजाने एका महंमद घोरोवर दया दाखविली अन् सारें राष्ट्र पारतंत्र्याच्या घाणेरड्या खातेयांत खितपत पडले. पंजाबी क्रांतिकारकांनी रासबिहारींच्या इषाऱ्याकडे दुर्लक्ष करून एका कृपालसिंगाला जिवंत सोडले अन् त्याचा परिणाम क्रांतिकारकांनी उभारलेली सारी विप्लवाची इमारत धुळीत मिसळण्यांत झाला ! ! असो. निराश झालेल्या अंतःकरणाने बागी कतारसिंह लाहोरला रास- बिहारीच्या घरी आले. त्यांनी पाहिले तो त्यांना काय आढळलें ? भारतीय क्रांतिवादाचा तो महान् हिरण्यगर्भ, भारतमातेच्या कंठां- तला तो दैदीप्यमान् कौस्तुभमाण रासबिहारी बोस डोक्यावरून चादर घेउन एकाद्या संज्ञाहीन प्रेताप्रमाणे निश्चल व बधिर होउन डोळे मिटून पडला होता. त्यांच्याकडे पाहून खिन्नमनस्क व भग्नमनो- रथ कर्तारांनीही दुसऱ्या एका खाटेवर असहायपणे अंग टाकून दिले. १५ रासबिहारींचा पंजाबत्याग दि. २० फेब्रुवारी रोजी सरदार जगासिंह बरोबर आपल्या दोन मित्रांना घेऊन एका टांग्यांतून जात असतां पोलिसांनी पाहिलें. एका टांग्यांतून तीन शीख एकत्र जातांना पाहातांच येथे काही तरी दगा असावा अशी समजूत होऊन, पोलिसांनी त्या टांग्याला वेढा दिला व त्यांतील उतारूंना पोलिस ठाण्यांत चलण्यास फर्मा- विले; पण त्या तिन्हीही उतारूंनी आपली पिस्तुले सावरून गोळ्या झाडावयास प्रारंभ केला. बराच वेळ दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळ्यांचा वर्षाव केल्यानंतर त्यांतील एक शीख निसटला व दुसरा रासबिहारी वसंचे जखमी होऊन पोलिसांच्या हाती सांपडला. जगतसिंह ह्या गोळा. गोळीत पोलिसांच्या हातून निसटून गेले. पुढे जात असतां अतिशय तहान लागली म्हणून ते एका नळाजवळ थांबले. नळावर पोटभर पाणी पिउन ते तोंड व हात पुशीत उभे होते तोच मागाहून एका मुसलमानाने येऊन त्यांच्या पायाला घट्ट विळखा घातला. बराच वेळ झटापट चालल्यानंतर अखेरीस जगत्सिंह जमिनीवर कोसळले. ते जमिनीवर पडतांच हातांत हातकड्या घालून त्यांना गिरफदार करण्यांत आले. या झटापटींत एक ठाणेदार जखमी झाला, व एक हेड्कॉन्स्टेबल मारला गेला. साऱ्या पंजाबांत झटापटींचे व अटकांचे सत्रच सुरू झाले. दि. २२ फेब्रुवारीपर्यंत नुसत्या लाहोर शहरां- तच तेरा व्यक्तींना अटक झाली व चार घरांच्या कसून झडत्या झाल्या. या झडत्यांत एकंदर बारा बाँब्स् पोलिसांच्या हाती लागले. त्यांतील पांच बाँब बंगाली नमुन्याचे व इतके भयंकर होते की, त्यांतला एक बाँब देखील एका सबंध रोजमेंटचा धुव्वा उडवावयास पूर्णपणे समर्थ होता. अर्थात् हे बाँन्स् बनारस येथील शचीन्द्रांच्या केंद्रांतून पंजाबमध्ये आलेले असून, रासबिहारीच्या हातून निर्माण झालेले होते हैं कांहीं कोणास सांगावयास नको. अमृतसर येथील झडत्यामधून बाँबचें पुष्कळच सामान हाती लागलें. लुधियाना जिल्ह्यांतील झाबेवाला नांवाच्या गांवीं बाँबगोळे तयार करण्याची एक फॅक्टरी असल्याचाही मुगावा पोलिसांना लागला. ती फॅक्टरी हस्तगत करून पोलिस परततात न परततात तोंच लोहतावादी येथेही एक असाच कारखाना आढळून आला. रावळपिंडी येथील एक सबंध काळ्या शिपायांची पलटणची पलट- णच बरखास्त करण्यांत आली. गोरे शिपाई या दिवसांत केव्हां केव्हां एकाद्या सबंध गांवालाच वेढा देत व पकडून नेऊन लोकांचा क्रांतिजीवन ६१ नाना प्रकाराने छळ करीत. मूलासिंह, अमरसिंह व अमेरिकेहून आलेला एक नवाब या नांवाचा मुसलमान असे तिघेजण माफीचे साक्षीदार बनले होते. ते ज्यांची ज्यांची नावे सांगत, त्यांना त्यांना पकडण्यांत येऊन पोलिस ठाण्यांत माहिती मिळविण्याच्या निमित्ताने त्यांचा नाना प्रकारे छळ करण्यांत येई. कोणत्याही शीखाविषयीं यत्किंचितही संशय आला की, त्याला ताबडतोब पोलिस ठाण्यांत खेचण्यांत येत असे. रासबिहारींनी आपल्या भव्य उभारणीचा हा सारा विचका उघड्या डोळ्यांनी पाहिला. दुसरी कोणतीही व्यक्ती त्यांच्या जागी असती तर तिचें मन मोडून जाऊन तिने भावनावेगांत एक तर आत्महत्या तरी केली असती किंवा हाय खाऊन पुनश्च या असल्या कामांत पडायचे नाही म्हणून निवृत्तीचा मार्ग तरी स्वीकारला असता! अथवा निदान — हिंदुस्थानचे लोकच नादान. त्यांच्यांत कांही अर्थ नाही' असें म्हणून स्वतःच्याच देश- बांधवांच्या नांवानें आजन्म खडे फोडीत शिष्टपणाचा जीवनमार्ग तरी पत्करला असता. कधी काळी परिस्थतीच्या तडाख्यांत सांपडून, या प्रकारचे आयुष्य व्यतीत करीत असलेले अनेक लोक मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. त्यांपैकी कुणी स्वस्थ चित्ताने आपा- पले व्यवसाय करीत, सुखासीन आयुष्य घालवीत, क्रांतीच्या लांब लांब बाता झोकण्यांत आयुष्य व्यतीत करीत आहेत; तर कुणी साऱ्यांना शिव्या देत भावी परमेश्वरी अवताराची आराधना करण्याचा मार्ग पत्करून बसले आहेत. पण रासबिहारी हे या कोणत्याच वर्गात समाविष्ट होण्यासारखे नव्हते. त्यांचे मन हे पोलादाच्या कांबीसारखे कणखर होते. निराशेच्या कसल्याही धक्क्यांनी ते कधीच वाकू शकले नाही. 'चलन्तु गिरयः कामं .
रासबिहारी वसुंचे तांनीं । युगान्तपवनाहताः । कृच्छेऽपि न चलत्येव धीराणां निश्चलं मनः॥' युगान्तकालीं झंझावाताने मुळापासून उपटून निघालेले संकटाचे केवढालेही मोठमोठे कडे अंगावर कोसळोत; पण अगदी जीवन मरणाच्या सीमारेषेच्या मध्यावर उभे राहाण्याचा प्रसंग जरी येऊन ठेपला तरीही धोरांचं मन कधी विचलित होऊ शकत नाही. ' असें संस्कृत सुभाषितकारांचे वचन आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपवाद सोडला तर रासबिहारी बोस हे भारताच्या वर्तमान इतिहासांत अशा अलौकिक धैर्याचे महापुरुष म्हणून उल्लखितां येतील. श्रीमद् भगवतगीतेंत भगवं- दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभय- क्रोधः स्थितधीमुनिरुच्यते ॥' हैं में स्थितप्रज्ञाचे वर्णन केलेले आहे त्याचा रासबिहारींच्या रूपाने जणू वर्तमान युगांत मर्त आविष्कारच झाला होता. त्यांच्या चपल प्रतिभेने अनेक मोठमोठे क्रांतिकट उभारले. कठोर नियतीने, फळ ऐन हातांत पडण्याच्या वेळीच प्रत्येकदां नशिबाचे फांसे उलटे टाकून, त्यांचा प्रत्येक विशाल प्रयत्न धुळीस मिळविला. पण एकाद्या महान् शाक्तपंथीय साधकाप्रमाणे त्यांचा उत्साह कधी मावळला नाही, त्यांची कर्तृत्व- शक्ति कधीं मंदावली नाहीं अन् त्यांचा जोम कधी ओसरला नाही. नियतीने प्रत्येक वेळी त्यांच्या जुन्या कल्पनेची चिता पेट- वावी अन् ती जळून पुरती राख होण्याच्या आंतच रासबिहारींनी नव्या बाळसेदार कल्पनेचे बारसें धूमधडाक्याने साजरे करण्याच्या कार्यक्रमास पहिल्या इतक्याच उत्साहाने अन धडाडीने लागावें. क्रांतीवर इतका नितांत विश्वास असणारा महापुरुष विरळा. हजा- रदां अपयश आले अन् फसवणूक झाली तरी भारताच्या मुक्त- तेचा यावांचून दुसरा साधनमार्ग नाही, असणे शक्यच नाही या- कांतिजीवन ६३ बद्दल त्यांची निश्चिति होउन चुकली होती आणि म्हणून झालेल्या चुका सुधारून पुनश्च त्याच मार्गाने जाणे इतकेच काय तें ते आपले कर्तव्य समजत होते. पंजाबांतील क्रांतीच्या उभारणीची ही अशी दुर्दशा झाल्यानंतर ते एकंदर वातावरणाचा विचार करूं लागले. त्यांना असे आढळन आले की, हिंदुस्थानच्या लगत असलेल्या मुसलमानी राष्ट्रांनी हिंदुस्थानवर स्वारी करावी म्हणून जर्मन सरकार कारस्थान करीत असून हरदयाळांच्या प्रेरणेने राजा महेन्द्रप्रताप व बरकत उल्ला हे इराण, तुर्कस्थान इत्यादि देशांतून कारस्थानांची उभारणी करीत करीत अफगाणिस्थानांत येऊन दाखल झालेले आहेत. हिंदु- स्थानांतूनही अफगाणिस्थानच्या अमीराला त्या वेळी, हिंदु- स्थानांत स्वारी करावयास या, तुम्ही येऊन पंजाबांत पदप्रक्षेप केलात की, आम्ही हिंदुस्थानांतले मुसलमान बंडाचा बावटा उभारतों' अशा अर्थाची पत्र वारंवार जात होती. पुढे हा साराच कट उघडकीस येउन " रेशमी पत्राचे षड्यंत्र " या नांवानें तो बराच गाजला हे सर्वांस माहीत आहेच. वास्तविक क्रांतिकारक ज्या आकांक्षेने प्रेरित होऊन हिंदुस्थानाबाहेरील राष्ट्राची हिंदु- स्थानवर स्वारी व्हावी ही इच्छा करीत होते त्या आकांक्षनें प्रेरित होऊन काही हिंदुस्थानांतल मसलमान अफगाणिस्थानच्या अभी- राला निमंत्रण पाठवीत नव्हते. त्यांना या देशांत स्वराज्य नको असून पाकिस्तान हवे होते. जुन्या अवरंगजेबीची सुवर्ण स्वप्ने त्यांना पडत होती. अन् त्यासाठी त्यांची सारी यातायात चालू होती. निव्वळ हिंदुस्थानच्या सर्वप्रातिनिधिक स्वराज्यासाठी या देशांतले मुसलमान कधी लढले आहेत असे झालेच नाही. माझें आव्हान आहे इतिहासकारांना, कुणीहि तसे दाखवून यावें !
रासबिहारी वसुंचे नाहींच दाखवता यायचे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धांत असें झाल्याचा देखावा दिसला होता. पण तो निव्वळ देखावा होता. तें कांहीं सत्य नव्हते. ५७ च्या व्यापक राज्यक्रांतीत दिल्लीच्या राज्यासिंहासनावर .९० वर्षाच्या वृद्ध बहादूरशहाला, मोंगल- शाहीच्या त्या अत्यंत नाकर्त्या अवशेषाला, बसवितांना कृतकृत्य झाल्याचे समाधान ज्या लोकांच्या चेहेऱ्यांवर झळकलें त्याच मुसलमानांना ज्याच्या प्रतिभेतून सत्तावनची क्रांति जन्म पावली, ज्याच्या योजकतेने सारे राष्ट्र · मारो फिरंगी को' या महा- मंत्राने भारून उठले अन ज्याच्या भरवशावर अवघ्या तीन महिन्यांत आटोपणारी क्रांति दोन वर्षांच्या घनघोर व अटीतटीच्या स्वातंत्र्ययुद्धांत परिणत पावली त्या नानासाहेब पेशव्यांना मात्र कानपूरच्या परिसरांत पंतप्रधानकीचा अभिषेक झाला, त्या वेळी तळमळीची पोटतिडिक उठली होती. असो. रास- बिहारींना हे सारें माहीत होते. तरीपण त्यांनी असा विचार केला की, कोणत्याही हेतूने हिंदुस्थानांतील सारा मुसलमान समाज जर क्रांतिच्या संभूय समुत्थानांत सामील व्हावयाचा संभव आहे, तर त्यासाठी बाहरच्या मुसलमानी राष्ट्रांची स्वारी घडवून आणून क्रांतिचा देशव्यापी भडका उडविण परिणामतः हिंदुस्थानच्या फायद्याचेंच आहे. दृढमूल इंग्रजी राज्ययंत्राला त्याशिवाय जबर- दस्त शह मिळणे केवळ दुरापास्त आहे. लगेच त्यांनी आपला विचार नक्की केला व कर्तारसिंग प्रभृतींना काबूलला स्वतःबरोबर येण्याची तयारी करण्याची सूचना दिली. . काबूलला जावयाचें तर तें पक्का मुसलमान होऊनच जाणे भाग होतें. हिंदु म्हणून तेथे जावयास निघणे हे एक प्राणसंकटच ! मुसलमानाचे सोंग घ्यावयाचें तर नुसता मुसलमानी परिवेष क क्रांतिजीवन ६५ भाषा यांनी प्रत्यक्ष काबूल येथे तर भागले नसतेच. पण काबूलच्या वाटेवरही अवश्य ती सुरक्षितता लाभणे शक्य नव्हते. त्या- साठी कुराणांतील कलमें व निमाज पढतां येणे अत्यावश्य होते. रासबिहारींनी त्या तयारीकरितां एक मौलवी जवळ बाळगला, व त्याच्याजवळून कलमा पढण्याच्या संथा घेणे सुरू झाले. सर्व प्रकारची सिद्धता झाल्यावर जाण्याचा दिवसही नक्की ठरला. पण इतक्यांत जाण्याच्या आदल्याच दिवशी रासबिहारींचें अंतर्मन यांना सांगू लागले की, 'काबूलच्या मार्गाने जाण्यांत तुझ्या जीविताला व अंगीकृत कार्याला निःसंशय धोका आहे. मागें फीर. परत बना- रसला जा.' आपल्या अंतर्मनाचा हा निर्वाळा रासबिहारींनी परि- स्थितीशी ताडून पाहिला, अन् — सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाण- मन्तःकरणप्रवृत्तयः । ' या न्यायानुरूप त्यांनी काबूलला जाण्याचा विचार रहित करून परत बनारसलाच जावयाचे ठरविले. त्यांनी कर्तारसिंहालाही काबूलला जाण्यामध्ये धोका असल्याची स्पष्ट जाणीव करून दिली. पण उत्साहातिरेकाच्या भरांत कर्तारसिंहांनी आपल्या या महान नेत्याचा सल्ला न ऐकतां जगत्सिंह व हरिनाम- सिंह टुण्डा या आपल्या सहकाऱ्यांसहित काबूलला प्रस्थान केलेंच. पण रस्त्यांतच त्यांचा विचार बदलून ते परत पंजाबांत आले व ओळखले जाऊन त्यांना अटक झाली. लोहशृंखलांनी जखडलेल्या स्थितीत कर्तारांना पोलिसचौकीत आणतांच त्यांनी कॅपटन टास- किनला हसून म्हटले,“मि. टास्किन,और बातें बाद में होगी, पहले कुछ खाने को तो ला दो।" इकडे एके दिवशीं विनायकराव कपिले नांवाच्या आपल्या एका महाराष्ट्रीय सहकाऱ्याला बरोबर घेउन रासबिहारी लाहोरहून रात्री ८ वाजतां बनारसकडे जाणाऱ्या गाडी- तून बनारसला यावयास निघाले.
६६ रासबिहारी वसंचे त्यांनी ज्या दिवशी पंजाबांतून प्रयाण केले, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मणीलाल या नावाचा एक सहकारी त्यांना भेटाव- यास म्हणून चुकून त्यांच्या ताब्यात असलेल्या अनेक घरांपैकी ज्या घरावर पोलिसांची सक्त नजर होती त्याच घरांत शिरला. त्याला अटक करून पोलिस स्टेशनवर आणण्यांत आल्यानंतर पुढच्या छळाची साधारण कल्पना येतांच घाबरून जाऊन त्याने सारा भेद सांगितला. या मणिलालच्या जबानीनंतर सरकारला एक- दर कटाच्या भयानकतेची व रासबिहारींच्या संयोजकतेची खरी कल्पना आली आणि चिल्लर खुर्दा जरी पुष्कळ हाती आला, तरी विप्लवाचा उत्पादक नि संयोजकच जर हाती न लागला तर असे छपन्न कट तो पुनश्च उभारू शकेल, या जाणीवेने सरकारकडून चंद्र- नगर व बंगालमधील इतर ठिकाणांहून रासबिहारींना ओळखणारे चलाख, नि गृध्रदृष्टी गुप्तचर आणून त्यांची पंजाब ते बनारस व बनारसच्या भिन्न भिन्न विभागांतून मुबलक पेरणी करण्यांत आली. विशेषत: स्थानिक बंगाल्यांवर पोलिसांची सक्त नजर होती. बाहे- सन येणारा कोणीही बंगाली, प्रथम पोलिस चौकीवर यथेच्छ छळ झाल्याखेरीज शहरांत जाऊं शकत नसे आणि तरीही रासबिहारी सुरक्षितपणे बनारसला येऊन पोहोचले. निव्वळ स्वतःचेच नव्हे, तर बनारस येथे त्यांच्या आज्ञेप्रमाणे येऊन राहिलेल्या साऱ्याच क्रांतिकारकांचं ते स्वतःच्या नि क्रांतिकारक पक्षाच्या मर्मस्थानी सुरी खुपसावयास टपलेल्या सरकारपासून संरक्षण करीत होते. पंजाबांतील क्रांतिकारकांपैकी डॉ. मथुरासिंह आपल्या दोन तीन सहकाऱ्यांसह काबूलला गेले. विष्णु गणेश पिंगळे अजून सुरक्षित होते. रासबिहारींच्या सूचनेनुसार ते यानंतर बनारस- कडे यावयास निघाले. पण सरळ न येतां रस्त्यांत मेरठच्या कांतिजीवन छावणीजवळ उतरून तेथे त्यांनी सैनिकांच्यामध्ये विप्लवाच्या प्रचारास प्रारंभ केला. या छावणीत असतांना त्यांची एका सामान्य मुसलमान लष्करी अधिकाऱ्याशी ओळख झाली. हा गृहस्थ बोलण्यांत फार अघळ पघळ होता. त्याने पिंगळ्यांना बंड उभारण्याच्या कामांत अतिशय उत्साह दाखविला व मेरठची सारी छावणी विद्रोहांत सामील करून देण्याचे काम स्वतः होऊन पत्करलें; पिंगळ्यांना त्याच्याविषयी अतिशय विश्वास वाटला व ते त्याला घेउन बनारसला रासूदादांच्याकडे आले. रासबिहारीना पिंगळ्यांनी सारी हकिकत सांगून मेरठच्या छावणीत पुनश्च जाण्याचा आपला मनोदय त्यांना कळविला. अतिशय भयानक स्वरूपाच्या काही बाँबसची त्यांनी रासबिहारींच्याजवळ मागणी केली व मेरठच्या छावणींतून बरोबर आणलेल्या त्या मुसलमान गृहस्थाचा त्यांनी रासबिहारीशी परिचय करून दिला. रासबिहा- रींनी या गृहस्थाकडे एकदां आपादमस्तक निरखून पाहिले व मनाशी निश्चय करीत पिंगळ्यांना सांगितले की, “ तुम्ही बनारस सोडून तूर्त कुठेच जाऊ नये, अमें माझें तुम्हाला निक्षून सांगणे आहे.तुम्ही अकारण फसणार आहांत.तुमचा हा नवा साथीदार मला अतिशय बदमाष दिसतो." पण पिंगळे भावनाविवशतेने काहीच ऐकून घ्यावयास तयार होईनात. शेवटी रासबिहारींनी “ देव तुमचे अन् राष्ट्राचे ! त्याला मी तरी काय करणार ?” असे म्हणून पिंगळ्यांना अतिशय भयंकर स्वरूपाचे दहा बाँस देऊन निरोप दिला. हे बाँब्स इतके भयानक होते की, त्यांतला एक एक बाँब एक एक रेजिमेंट समाप्त करूं शकत होता. अखेरीस रासबिहा- रींचाच अंदाज खरा ठरला. त्या गृहस्थाने पिंगळ्यांना मेरठच्या छावणति नेऊन त्यांना बाँब्ससहित पकडून सरकारच्या स्वाधीन रासबिहारी बसंचे केलें. पुढें मेरठच्या छावणीत दहा पंधरा सैनिकांनाही पिंगळ्यांशी संबंध ठेवण्याच्या. अपराधावरून फांसावर चढावण्यांत आले. अंबाला, बनारस, फिरोजपूर येथील लष्करी छावणीतल्या कित्येक शिपायांनाही याच सुमारास रासबिहारीच्या कटांत सामील अस- ल्याच्या अपराधावरून गोळी घालून ठार मारण्यांत आले होतें.. भाई परमानंदांनाही याच सुमारास अटक करण्यांत येऊन लाहोर कटाचा प्रख्यात खटला उभारण्यांत आला. या खटल्यांत ६१ अभियुक्त होते. सरकारतर्फेच्या साक्षीदारांची संख्या ४०४ असन, आरोपींच्यातर्फे २२८ साक्षीदार होते. आरोपींपैकी २४ जणाना फाशीची शिक्षा होऊन बाकीच्यांना काळ्यापाण्यावर पाठावण्यांत आले. फांसावर चढतांना बागी कर्तारसिंहांचे वजन १० पौडांनी वाढले होते. पुढे या खटल्यांत कर्तारसिंह व पिंगळे सोडून बाकीच्यांनी अपील केले. १६ नोव्हेंबर १९१५ रोजी या अपीलाचा निकाल लागून २४ पैकी ७ जणांच्या फांशीच्या शिक्षा कायम होउन बाकीच्यांच्या शिक्षेचे काळ्या पाण्यांत रूपांतर करण्यांत आले. १६. शचींद्रनाथ संन्याल व बनारस षड्-यंत्र पंजाबमध्ये ज्या वेळी विप्लवाच्या वार्ता पसरूं लागल्या होत्या, त्याच वेळी बनारस हे केंद्र करून रासबिहारींनी बंगाल, बिहार- पासून मध्यप्रांतापर्यंतचा विभाग संघटित करावयास प्रारंभ केला होता. १९१५ च्या जानेवारी महिन्यांत दामोदरस्वरूप सेठ यांची नियुक्ति प्रयाग येथे करून त्यांच्याकडे युक्त प्रांतांतल्या क्रांति- कारक संघटना सोपविण्यांत आल्या. विनायकराव कपिले यांना एका सहकाऱ्याबरोबर पंजाबांत पाठविण्यांत आले होते, तर आणखी दोन व्यक्तींना बाँब्सची पेरणी करण्यासाठी बंगालमध्ये : कांतिजीवन ६९ 'पाठविण्यात आले. विभूति व प्रियानाथ यांना बनारस येथील लष्करी छावण्यामधून विप्लवाचा प्रसार करण्याचे काम देण्यांत आले; नलिनी मोहन मुकर्जी यांच्यावर मध्यप्रांतांतील काम सोप- वून विशेषतः जबलपूर विभागांतील लष्करी छावण्यांतून विद्रो- हाचा प्रचार करण्यासाठी त्यांना आज्ञापिण्यांत आले. शचींद्र संन्यालांनी बाकीपूर ( पाटणा) येथे याच सुमारास एक समिति स्थापन केली. मागें सांगितल्याप्रमाणे शचींद्रनाथ पंजाबांतून परत आल्यानंतर रासबिहारीनों बनारसच्या केंद्राची सारी सूत्रे त्यांच्या ताब्यांत देऊन स्वतः पंजाबांत प्रयाण केले होते. शचींद्रांनी १४ फेब्रुवारी १९१५ रोजी विनायकराव कपिले व मणिलाल यांच्या स्वाधीन अठरा बॉब्सचे एक पार्सल करून त्यांना पंजाब- मध्ये पाठविले. त्यांना पाहातांच रासबिहारींनी त्यांना सांगितले की सशस्त्र उठावणीची तारीख २१ फेब्रु.१९१५ ही ठरली असून तसे शचीन्द्राला व त्याच्या करवीं विप्लववाद्यांच्या सर्व केंद्रांना कळ- विण्याची व्यवस्था करावी. उठावणी सर्व ठिकाणी एकाच दिवशी एकाच क्षणी झाली पाहिजे. विनायक कपिले यांनी आपल्या नेत्याच्या आज्ञेनुरूप बनारसला शचींद्रांना ही तारीख कळविली व शचींद्रांनीही सान्या केंद्रांना ती कळविण्याची व्यवस्था केली. योजना अशी होती की, तारा तुटल्याच्या व रेल्वेलाईन्स उध्वस्त झाल्याच्या बातम्या पंजाबमधून आल्या की, बनारसला उठावणी करावी व बनारसमधून याच त-हेच्या वार्ता आल्या की, साऱ्या मध्य व उत्तर भारताने पेट घ्यावा. पण कृपालसिंगाचे प्रकरण व पंजाबी क्रांतिकारकांचा गैशिस्त गलथानपणा यामुळे पंजाबातील साऱ्याच योजनांची कशी वाताहत झाली हे मागे सांगितलेंच आहे. मध्यंतसं २१ तारखेची जी १९ तारीख करण्यांत आली होती रासबिहारी बसंच ती मात्र रासबिहारींना अनेक कारणास्तव शचींद्रांना कळवितां येणे शक्य झाले नाही. इकडे ठरल्याप्रमाणे दि. २१ फेब्रुवारी १९१५ रोजी दुपारपर्यंत पंजाबातील विप्लवाची कांहींच वार्ता न समजल्यामुळे अस्वस्थ होउन शचींद्रनाथ बनारस येथील स्टेशन- वर गेले. त्यांची अशी अपेक्षा होती की, स्टेशनवर तार तुटल्याचे प्रमाण मिळेल व उठावणीचा रासबिहारींचा संदेश प्रत्यक्ष अंमलांत आणता येईल. पण स्टेशनवर सर्व काही ठाकठीक होते. आशंकेनें शचींद्र तसेच तार ऑफिसमध्ये गेले. पण तेथेही धांदलीचें यात्किंचितही चिन्ह दिसून आले नाही. ठरलेल्या योजनेंत एका- एकी इतका बदल होऊंच कसा शकतो हे शचींद्रांच्या पुष्कळ वेळ ध्यानांतच येईना. उदास व खिन्न मनाने परतत असतांना रस्त्यांत त्यांनी 'पायोनियर ' नांवाचें वर्तमानपत्र विकत घेतलें.. तेव्हा कुठे त्यांना कृपालसिंहाचे प्रकरण, अचानक झालेल्या धर- पकडी अन् एकंदर साऱ्याच प्रकरणाचा झालेला विचका, या साऱ्या गोष्टी समजून आल्या. 'पायोनिअर' मधील तो सारा वृत्तांत वाचून त्यांनी एक प्रदीर्घ अन् खेदमिश्रित उसासा सोडला. स्वातंत्र्यप्राप्तीचा हा महान प्रयत्न फुकट व्यर्थ गेल्याचे पाहून त्यांना अतिशय दुःख झालें ! जी हानी झाली होती ती भरून काढतां येणें केवळ अशक्यच होते; पण झाली याहून अधिक हानी होऊ देऊं नये अशी निदान स्वतःच्या केंद्रापुरती तरी खबरदारी घेणे त्यांना अत्यावश्यक होते. म्हणून सारा खेद अन् विमनस्कता एका क्षणांत जिवून ते ह्या उद्योगास लागले. पंजांबांतील धरपकडीचें वर्तमान वाचून बनार- सलाही याच प्रकारची पुनरावृत्ति होईल असे त्यांनी आपल्या मनाशी ठरविलें व पहिल्या प्रथम आपल्या साऱ्या सहकाऱ्यांच्या क्रांतिजीवन गांठी घेऊन त्या साऱ्यांचे एकदम स्थलांतर करविलें. स्वतःचा अंदाज किती बरोबर होता याचे प्रत्यंतर त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळच्या अगदी ब्राह्म-मुहूर्तावर मिळाले. स्वतः त्यांच्या व सहकाऱ्यांच्या निवासस्थानावर पोलिसांनी छापा घातला. पण आधीच घेण्यांत आलेल्या विषेश प्रकारच्या सावधगिरीने व्यक्ती व साधने यांपैकी काहीच सरकारच्या हाती न लागतां शचीन्द्र साफ बचावले. बंगाली टोल्यांतील एका गुप्त जागी या लोकांच्या नेहमी गांठीभेटी होत अन् रासबिहारींच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना आखण्यांत येत. या वेळी बंगाल, बिहार व संयुक्तप्रांत येथील बहुतेक क्रांतिकारक बनारसला रासबिहारींच्या सभोवती एकत्र आले होते. असा योग पुनश्च आला नाही. रासबिहारी या वेळी एक महिन्याहून अधिक काळ बनारसला राहिले.त्यानंतर मात्र सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्याची योजना त्यांनी आंखली. पहिल्या प्रथम शचींद्रनाथ संन्यालांना बंगाली क्रांतिकार- कांसहित बंगालमध्ये पाठविण्यांत आले. एकंदर सर्वच लोकांची रासबिहारींनी हेतुपूर्वक पांगापांग केली. प्रथम त्यांच्या सहका- न्यांच्या ध्यानांत त्यांच हेतु न आल्यामुळे ते बुचकळ्यांत पडले. पण ही मंडळी बनारस सोडून गेल्यानंतर अवघ्या एक आठवड्या- नंतरच त्यांच्या नवीन स्थानावर पोलिसांचे छापे पडूं लागल्यानंतर मात्र त्यांना या नवीन धोरणाची कल्पना आली. विनायकराव कपिले या सुमारास बनासरलाच होते. एके दिवशी ते गंगेवर स्नानासाठी गेले असतांना त्यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला. स्नान करून व ओल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकून हा वरून साळसूद दिसणारा ब्राह्मण शंकराचार्यांची स्तोत्रं म्हणत येत अस- तांना त्याच्या कानावर ही बातमी पडली मान; तोच तो एकदम ७२ रासबिहारी बसंचे अंतर्धान पावला! असो! १७. दिल्ली येथे शचीन्द्रनाथ नुकतेच सांगितल्याप्रमाणे शचीन्द्रनाथ संन्याल हे बंगालमध्ये येऊन कलकत्ता येथे राहू लागल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांना रासबिहारींची आज्ञा आली की, ' तुम्ही ताबडतोब दिल्लीला जाऊन तेथील परिस्थितीचा वृत्तांत कळवावा. ' या आज्ञेनुसार शचींद्र कलकत्ता सोडून दिल्ली येथे जावयास निघणार तोच सर- कारी गुप्तचरांना त्यांच्या निवासस्थानाचा पत्ता व प्रयाणाची सिद्धता यांचं वृत्त कळलें. ताबडतोब त्यांच्या घरावर पोलिसांची धाड आली व आजूबाजूचे सारे रस्ते रोखले गेले. पण असे सांग- तात की, 'पुलिस शचीन्द्र को पकडने आई तो वह पुलिसके देखते देखते ही छतों छतों भागता हुआ गायब हो गया ।' तात्पर्य, पोलिसांच्या अन् सरकारी नियंत्रणाच्या साऱ्या पाशांना वंचित करून शचीन्द्र सुखरूपपणें दिल्ली येथे येऊन पोहोचले. या वेळी त्यांच्या बरोबर प्रतापसिंह या नांवाचा एक उमदा राजपूत चारण नवयुवक सहकारी होता. दिल्लीच्या राजनगरीत पदन्यास करतांच शचीन्द्रांना मेरठच्या छावणीत विष्णु गणेश पिंगळे पकडले गेल्याची वार्ता प्रथम कळली. पिंगळ्यांचे भवितव्य त्यांच्या नजरे- समोर दिसू लागले. त्यांच्या डोळ्यांत अश्रृंची गर्दी झाली व पावलें जड पडू लागली. पण जो स्वातंत्र्यसाधनेचा महान् क्रांति- योग त्यांनी होऊन पतकरला होता, त्यांत या साऱ्या गोष्टींना स्थानच कुठे होते ? किंबहुना · पांडवा, हा अग्निप्रवेशशुचि नित्य नवा। भ्रतारेवीण करावा। तो हा योगु ॥' या श्रीज्ञानराजांनी वर्णन केलेल्या हटयोगाच्या दुर्दात साधनेंत अन् शचीन्द्रांच्या साधनेंत फरक असा नव्हताच. मन पाषाणासारखे करून, त्यांनी .
क्रांतिजविन ७३ . तुटलेल्या मुक्ताहाराप्रमाणे गालावर ओघळणाऱ्या अश्रुसरी पुसून काढल्या. एका प्रदीर्घ निश्वसिताने हृदयांतली सारी दारुण वेदना बाहेर काढून लावली अन् दिल्ली येथील कार्याची सूत्रे स्वतःच्या हातांत घेतली. पहिल्या दिल्ली षड्यंत्राच्या खटल्यांत दिल्ली येथील विप्लववादी आन्दोलनाचे प्रणेते नि अधिनायक मास्टर अमीरचंद व अवध- बिहारी हे भाई बालमुकुंद व वसंत कुमार विश्वास या आपल्या सहकाऱ्यांसह वधस्तंभावर लटकल्याचे वृत्त मागे सांगितलेच आहे. त्यांच्यानंतर या आंदोलनाचे सूत्रधार लक्ष्मीनारायण व गणेशी- लाल खस्ता हे होते. लक्ष्मीनारायणजी हे निष्कलंकी संप्रदायाचे एक धार्मिक महंत असून गणेशीलाल खस्ताजी हे अत्यंत उत्कृष्ट कवि होते. त्यांच्या वीररसपूर्ण कवितांतले ओज इतकें उत्तेजक असे की, लाला हरदयाळ आपल्या गदर पत्रांत त्यांच्या कविता अग्रभागी छापीत असत. शचीन्द्र दिल्लीत येत असल्याची वार्ता या दोघांना बनारसच्या केन्द्रांतून पूर्वीच कळविण्यांत आलेली अस- ल्यामुळे त्यांनी घर वगैरे घेउन ठेवण्याची प्रथमपासूनच दक्षता घेतलेली होती. शचीन्द्र येतांच त्यांनी या दोघांशी पुढच्या योजने- संबंधी चर्चा करून त्यांच्या मदतीने नव्या जुन्या अशा सर्वच कार्याकर्त्यांत नीट परिचय करून घेतला. शचीन्द्र या वेळी पंधरा- वीस दिवस दिल्लीस होते. चार पांच दिवसानंतर कलकत्याहून बरोबर आणलेल्या प्रतापसिंह या चारण राजपूतला त्यांनी राजपुतान्यांतील विप्लववादी केन्द्रांची पाहणी करण्याच्या कामगिरीवर जयपूर येथे पाठविलें.प्रतापसिंह लवकरच तिथून परत आल्यानंतर नव्या सूचना व साधनसामुग्री देउन त्याला पुनश्च संघटनकार्यासाठी राजपुतान्यांत पाठविण्यात आले. शचींद्रांच्या आगमनानें खस्ताजी अतिशय रासबिहारी वसुंचे उत्साहित झाले होते. त्यांनी लवकरच दिल्ली येथील मुसलमान क्रांतिवाद्यांच्या संघटनेशी शचीन्द्रनाथांचा परिचय करून दिला. मुसलमान विप्लववाद्यांची ही संघटना बाहेरच्या आक्रमक वृत्तीच्या स्वतंत्र इस्लामी राष्ट्रांच्या सहानुभूतीच्या भरवशावरच स्वतःच्या कार्याचा प्रपंच थाटून बसलेली होती. इ. स. १९११ मध्ये इटाली व तुर्कस्थान यांच्यांत युद्ध जुंपल्यानंतर हिंदुस्थानांतील मुसलमानांनी स्वतःचे एक शुश्रूषापथक जखमी तुर्काच्या सेवा- शुश्रूषेसाठी म्हणून तुर्कस्थानला पाठावले होते. या पथकामध्ये पंजाब येथील 'जमीदार' नांवाच्या पत्राचे संपादक जाफरअल्लीखां या नांवाचे एक गृहस्थही होते. स्वतंत्र तुर्कराष्ट्रांत मिळालेल्या सन्मानाचा या गृहस्थाच्या अंतःकरणावर ज्वालाग्राही परिणाम होऊन मुस्लीम विश्वबंधुतेची ( Pan-Islamic ) कल्पना त्यांच्या हृदयांत थैमान घालू लागली. तुर्कस्थानच्या राष्ट्रघटकांशी त्यांनी या बाबतीत विचारविनिमय करून त्यांच्या जवळून बरेचसे आर्थिक साहाय्य घेतले व हिंदुस्थानांत येतांच मुसलमानांच्या गुप्त संघ. टनेस प्रारंभ केला. यानंतर या संघटनस तुर्कस्थानकडून गुप्त रूपाने पुष्कळच साहाय्य मिळत असे. हिंदुस्थानांतील साऱ्याच मुसलमान क्रांतिकारकांच्या संबंधाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्यांपैकी कुणीही भारतीय शुद्र स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता नव्हता. बाहेरच्या मुसलमानी राष्ट्रांच्या साहाय्याने या देशांत मुसलमानी सलतनतीची प्रतिष्ठापना करणे यावांचून त्यांचा दुसरा कोणताही हेतु नव्हता. हिंदुस्थानासुद्धां जगांतल्या सर्व मुसलमान राष्ट्रांचा एक महान् संघ निर्माण करून त्या संघटित इस्लामी विश्वाच्या टाचेखाली सारे ज्ञात जगत् आणावयाचें; व जुन्या तैमूरलंग आणि चेंगीजखानाचे दिवस पुनरुज्जीवित करावयाचे उद्दिष्ट त्यांच्या क्रांतिजीवन ७५. डोळ्यासमोर होते. दिल्लीच्या या मुसलमानी दलानें शचींद्रनाथांना आर्थिक सहाय्य दिले. दोनचारदां भेटी व चर्चा झाल्यानंतर त्यांच्यांत असा करार ठरला की, शचींद्रांनी त्यांना बनारसच्या केंद्रांतून त्यांच्या मागणीप्रमाणे भयानक स्वरूपाचे बाँबगोळे पुरवाव व त्याच्या मोबदल्यांत या दलाने शचीन्द्रांना त्यांच्या, मागणीच्या अनुरूप पिस्तुलें, रिव्हाल्हर्स, काडतुसे पुरवावी. याप्रमाणे दिल्लीच्या कार्याला स्वरूप येऊ लागले न लागले तोंच दैवानें शचीन्द्रांचा दावा साधून, त्यांना भयंकर स्वरूपांत आजारी पाडले. त्यांना वाटले, आज ना उद्या आपल्या प्रकृतीला आराम पडल व आरंभिलेल्या कार्याची सूत्रे पुनश्च आपण आपल्या हाती घेऊ. पण अपेक्षित उतार पडण्याऐवजी आजाराचे प्रमाण वाढतेच दिसू लागले. वास्तविक या वेळी शचीन्द्रांनी एकवार बना- रसला रासबिहारींच्याकडे जाऊन येणे अत्यावश्यक होते. पण, त्यांच्यावर संयुक्तप्रांत सरकारने वॉरंट सोडलेले असल्यामुळे त्यांना आजारी स्थितीत बनारसला जाण्याचा विचार रहित करणेच क्रम- प्राप्त होते. अखेरीस नाइलाजास्तव दिल्लीचे काम अर्धवट सोडून शचींद्रनाथ प्रतापसिंहाला बरोबर घेऊन बंगालमध्ये गेले. खास कलकत्याला जाणे धोक्याचे असल्यामुळे कलकत्त्याजवळील एका खेडेगांवांत, अनुशीलन समितीच्या एका उपकेंद्रांत त्यांनी आश्रय घेतला. पंधरा दिवस तेथे शचीन्द्र खाटेवर पडून होते. प्रतापसिंह त्यांचा निरोप घेऊन लवकरच राजपुतान्यांतील कामगिरीवर निघून गेला. बंगाल्यांतील क्रांतिकारकांचे एक नेते श्री. नगेंद्रनाथ दत्त उर्फ गिरिजाबाबू हे त्या ठिकाणी त्यांची सेवाशुश्रूषा करीत असत.. आजारांतून थोडे बरे झाल्यावर त्यांनी व शचीन्द्रांनी मिळून एकं- दर परिस्थितीचे समालोचन केले. त्यांत त्यांना असे आढळन रासबिहारी बसूंचें आले की, रासबिहारींच्या पाठीमागचे सरकारी पाश अधिकाधिक कुशलतेने फेकले जात असून त्यांनी यापुढे साहस पत्करून हिंदुस्थानांत राहाणे धोक्याचे आहे. कार्याच्या व त्यांच्या व्याक्त- त्वाच्याही सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी हिंदुस्थान सोडणेच श्रेय- स्कर आहे. लगेच शचींद्र नगेंद्रांना घेऊन बनारसला आले व त्या दोघांनाही रासबिहारींना भारताचा त्यांच्या हृदयांतील साऱ्या कोमल भावनांचे अन् अनेक अत्यद्भूत साहसी कृत्यांचे एकमात्र केंद्रस्थान अन् स्फूर्तिनिधान ठरलेल्या त्यांच्या पवित्र मातृभूमीचा- कार्यासाठीच पण परित्याग करण्याची विनंती केली.रासबिहारींनी प्रथम ती गोष्ट हसून टाळून दिली. पण ते दाघे ऐकेचनात, तेव्हां मात्र रासूदादा. त्यांच्यावर किंचित् रागावलेही. शेवटी शचींद्रांनी त्यांना असे सांगितले की, ' हिंदुस्थानांत सामुदायिक सशस्त्र उठावणी करण्याचे तुमचे सारे प्रयत्न विफल ठरलेले आहेत. तरी पण देशाच्या मुक्ततेचा हा एकच मार्ग असल्याकारणाने सतत त्याचीच कास धरणे अवश्य आहे, हे तुमचे तत्त्वज्ञान आम्हांला मान्य आहे. पण ब्रिटिश राज्यतंत्रासारख्या सुसंयत आणि यंत्र- सिद्ध साम्राज्याशी टक्कर देणे ही सामान्य गोष्ट नाही. निव्वळ हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत उठावणी करून आपले ईप्सित सफळ होणार नसून त्यासाठी आपल्याला बाहेरच्या स्वतंत्र राष्ट्रांतून शस्त्रास्त्र-सामुग्रीचा अवश्य त्या प्रमाणांत पुरवठा होणे व चार दोन प्रबळ राष्ट्रांचे नैतिक आणि प्रत्यक्ष असे या उठावणीला साह्य होणे ही गाष्ट आपलें ईप्सित साध्य होण्याच्या दृष्टीने अत्यंत अवश्य आहे. हरदयाळ हे कार्य करीत असत; पण आतां तुमच्यासारख्या खंबीर अधिनायकावांचून हे महत्वपूर्ण कार्य दुसरा कोणीही पार पाडू शकणार नाही. तुमचे हिंदुस्थानांतलें क्रांतिजीवन कार्य आम्ही पार पाडलों; पण हे महत्त्वाचे कार्य उचलायला तरी तुम्ही हिंदुस्थानाबाहेर जाणे अत्यावश्यच नाही का ? ?' रास-. बिहारींनाही हा युक्तिवाद पटला, अन् शचींद्र अन नगेंद्र या आपल्या सहकाऱ्यांसहित हिंदुस्थानच्या किनाऱ्याला कायमचा रामराम ठोकावयाच्या उद्दिष्टाने १९१५ सालच्या एप्रिल महिन्यांत ते कलकत्त्याला येऊन दाखल झाले. १८. रासबिहारींचा भारताला अखेरचा प्रणाम ! कलकत्त्याच्या अनुशीलन समितीच्या तर्फे यतींद्रनाथ चट्टो- पाध्याय (प्रख्यात जतीन मुकर्जी ) यांनी रासबिहारींना वाटखर्ची- साठी एक हजार रुपये दिले. इतर क्रांतिकारक संस्थांकडूनही त्यांना पुरेशी मदत मिळाली व एके दिवशी शचींद्र संन्याल व नगेंद्र यांनी रासबिहारींना दुपारी दोन प्रहराच्या वेळी एका जपानी आगबोटीवर छद्मवेषाने चढविलें. सजल नेत्रांनी या सस्य- शामला भारतमातेच्या शामल तनूवर, त्या वेळी तात्पुरती वाट- लेली, पण आतां अखेरचीच ठरलेली दृष्टि टाकून, भरल्या अंतःकरणाने तिला अखेरचा प्रणाम केला! ! शचींद्रांना अखेरचीच कडकडून घट्ट मिठी मारली. नगेंद्रांनी अखेरचे प्रेमभरित हस्तांदोलन केलें. यतींद्रांना अखेरचे न्याहाळले. जपानी जलयान आस्तें आस्तें मार्ग आक्रमण करूं लागलें. रासबिहारी हळूहळू भारतमातेच्या प्रेमळ अंकाश्रयापासून सुदूर लोटले जाऊ लागले. हिंदुस्थानचा किनारा सोडल्यानंतर सुखरूपपणे रासबिहारी जपानमध्ये येऊन पोहोचले. जपानमधील ब्लॅकड्रेगन या संस्थेचे प्रमुख व वरच्या दर्जाचे लष्करी अधिकारी टोयामा यांनी त्यांना लवकरच आश्रय व संरक्षण दिले. उघडपणाने ते. जपानमध्ये वावरूं लागतांच ते आपल्या हातावर तुरी देउन निसटल्याचे रासबिहारींनी रासबिहारी वसुंचे ब्रिटिश सरकारला कळून येउन त्या सरकारच्या अंगाचा अगदी तिळपापड उडाला. सिंह सांपळा लाथाडून बाहेर संचार करायला लागल्याचं कळतांच दस्यू दांतओठ चावू लागले. पण त्याने आता स्वतःच्या ओठावरची कातडी सोलून निघण्यापलीकडे दुसरे काय होणार होतें ? कारण की, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या नियमाप्रमाणे रासबिहारी फरारी कैदी असले तरी आतां त्यांच्यावर जपानची सत्ता होती; ब्रिटिशांची नव्हे. या अंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम कलंकित करून सावरकरांना जसें ब्रिटिशांनी बळजबरीने जखडून नेलें, तो शिरजोरपणा करणेही आतां ब्रिटि. शांच्या हाती उरले नव्हते. एक, मुळांतच फ्रान्सच्या भूमीवर पाऊल टाकणं अन् जपानच्या भूमीवर पाऊल टाकणे या दोन्ही गोष्टी एक नव्हत्या. दुसरें, सावरकर एकाकी व आश्रयहीन होते, तर रासबिहारी त्यांच्या अगदी उलट स्थितीत होते. फ्रेंच राष्ट्राला कळण्याच्या पूर्वीच सावरकर पुनश्च जखडले गेले असल्यामुळे इभ्रतीच्या प्रश्नावर वादविवाद करण्यापलीकडे त्या वेळी फ्रेंच राष्ट्राला त्यांच्या बाबतीत दुसरें कांहीं करतां येण्यासारखे नव्हते. तर रासबिहारींना बोट लावणं म्हणजे वस्तु आपल्या हाती नस- तांना श्वेतकाय, युरोपियनांचा ज्वलन्त द्वेष रक्तांत भिनलेल्या व प्रबल पाश्चात्य राष्ट्रांइतक्याच शस्त्रास्त्रसंनद्ध असलेल्या जपानशीं दंड थोपटून द्वंद्व युद्धालाच पर्यायाने तयार होण्यासारखे होतें. तात्पर्य, रासबिहारींचा जो प्रश्न बहादूर इंग्रज सरकार देशद्रोहाचें अमूप पीक पिकत असलेल्या या हिंदुस्थान देशांत अवघ्या साडेसात हजार रुपयांत सोडवू पहात होते, तो आतां कोट्यवधि रुपयांच्या युद्धखर्चाचा प्रश्न होऊन बसला होता.इंग्रजी रक्ताचा एक सूक्ष्माति- सूक्ष्म बिंदूही जमिनीवर न सांडूं देतां, ब्रिटिश सरकारला गुन्हे- .
क्रांतिजीवन ७९ min गारीची काळी टोपी डोक्यावर चढवून रासबिहारीना कुजलेल्या कुत्र्याच्या गतीने फांसाच्या दोरीला लटकावून देण्याची इच्छा होती. पण आतां परिस्थति अशी उत्पन्न झाली होती की, ज्या वेळी लक्षावधि इंग्रजांच्या रक्ताचे पाट वाहूनही रासबिहारीच्या नखाग्राला देखील धक्का लावणे संशयातीत नव्हते. अशा स्थितीत या धूर्त सरकारचे माथं ठणठणूं लागले असल्यास त्यांत नवले तें काय आहे ? सरळ रीतीने रासबिहारींना पंजरबद्ध करता येईना म्हणून तत्कालीन युद्धपरिस्थितीचा या बाबतींत उपयोग करून घ्याव- याचे इंग्रजांनी ठरविलें. १४ च्या महायुद्धांत जपान ब्रिटिशांच्या बाजूने जर्मनीविरुद्ध युद्ध करीत होता. या दोस्तीचा फायदा घेऊन या जगविख्यात फरारी कैद्याची मागणी ब्रिटिशांनी जपानकडे केली. या दोस्तीच्या मागणीला जपान सरकारने होकार भरला. कारण राजनीतीची दीक्षा कुटिल पाश्चात्यांच्याकडूनच जपाननें घेतली होती. असे सांगतात की, टोयामा यांचे वैयक्तिक वजन अन् त्यांचे संरक्षण यामुळे कोणीही जपानी अधिकारी जपानच्या होकारानुरूप राप्ताबहारींना त्यांच्या घरून काढून ब्रिटिश सरका- रच्या ताब्यांत देऊ शकला नाही. राजनीतिज्ञांना या विधानांतलें रहस्य स्पष्ट करून सांगण्याचीच आवश्यकता आहे काय ? जपान- मधील राष्ट्रभावना, राजाज्ञचें अनुल्लंघनीयत्व, लष्करी कायद्याचे कडक नियंत्रण अन् त्या लोकांची संस्कृति या गोष्टी ध्यानांत घेतल्या तर जपानी र ज्यतंत्राने पक्केपणाने एक विशिष्ट निर्णय घेतल्यानंतर तो फिरविण्याची एकट्या टोयामाची छाती होती असे मानणे अथवा टोयामांनी त्याविरुद्ध आपले मत राखणे अन त्यानंतरही राजदंड अथवा आत्महत्त्या यापैकी एकाही प्रकाराला रासबिहारी बसंचे बळी न पडतां मान ताठ करून जपानच्या राजरस्त्यावरून चालणे यापैकी प्रत्येक गोष्ट खरी मानणे माझ्या मतें धाडसी व मूर्खपणाचा उच्चांक गाठण्यासारखेच आहे. सर मायकेल ओड्- वायर यांचे शरीरसंरक्षक सुध्दा ज्याने फितावले, लाहोर ते सिंगा- पूर अन् जयपूर ते चंद्रनगरपर्यत ज्याने विणलेलें कटाचे जाळें केवळ 'दैवं चैवात्र पंचमम् ' मधेच उभे राहिले नसते तर साऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या तिळातिळाएवढ्या ठिकऱ्या उडवावयास पुरेसें होतें, साधनहीन अवस्थेत सुध्दा एका लहानशा बाँबनें एक संपूर्ण रोजिमेंट खलास व्हावे असे भयानक बाँब्स ज्याच्या प्रति- भेच्या शास्त्रीय उन्मेषणांतून बाहेर पडले, त्या महान क्रांतिकार- काला, तो आपण होउन आश्रयार्थ घरी चालून आला असतां, बृहत्आशियाच्या महत्त्वाकांक्षेनें प्रेरित होउन दलित कृष्ण- वर्णीयांच्याकडून उन्मत्त श्वेतद्वीपाधिपतींना ठेचून काढावयास सोत्सुक असलेला जपान, सोडून देण्याइतका अन् फुकट मरणी माराविण्याइतका निःसंशय वेडगळ नव्हता ! विस्ताराने भव्य पण मनाने जीवन्मृत असलेल्या तत्कालीन चीनमध्ये ही गोष्ट सहज शक्य झाली असती,पण विश्वविजयाच्या आकांक्षने प्रेरित झालेल्या तत्कालीन जपानमध्ये ही गोष्ट सर्वस्वी अशक्य होती. १९. क्रांतीच्या उभारणीचे विफल प्रयत्न. जपानमध्ये १९१५ च्या एप्रिलमध्ये पाउल ठेवतात न ठेव- तात तोंच रासबिहारींनी शचींद्रांशी झालेल्या बोलण्याप्रमाणे येत्या डिसेंबर महिन्यांत हिंदुस्थानांत सशस्त्र उठावणी करावयाचा निश्चय करून शस्त्रास्त्रांची प्रचंड प्रमाणावर निर्यात करावयाचें स्वतःकडे असलेले काम पार पाडावयास प्रारंभ केला. या वेळी जर्मन कौन्सलच्या अनुरोधाने थियोडोर हेल्फरिच हिंदुस्थानांत क्रांतिजीवन ८१ शस्त्रास्त्रांची प्रचंड प्रमाणावर पाठवणी करण्याच्या योजनेंत होते. रासबिहारींचा नि थिओडोर हेरफरिच (Theodor Helfferich ) यांचा चांगला परिचय होता. रासबिहारींनी या वेळी जी योजना आंखली ती अशी होती की, जर्मनीहून एका सुभव्य व लढाऊ रणतरीने येउन प्रथम अंदमान बेटाच्या पोर्ट ब्लेअरवर हल्ला करून तेथे काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगत असलेल्या साऱ्या कैद्यांची सुटका करावी व त्यांना घेऊन लगेच ब्रह्मदेशा- वर आक्रमण करावे. दुसऱ्या दोन शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा जहा- जांनी येऊन हिंदुस्थानच्या दुसऱ्या तटावर यावे. यापैकी एका जहाजानें १९१५ च्या डिसेंबरच्या शेवटी शांघायहून वळसा घालून हतिया येथे यावे; व दुसऱ्या जहाजाने बालासोर येथे शस्त्रास्त्रसंपत्ति पोहोचवावी. एका चिनी गृहस्थाच्या हातीं ६६ हजार गिल्डर्स ( हॉलंडचें चांदीचे नाणे ) देऊन पाठविण्यांत आले होते. या चिनी गृहस्थाला वाटेंत सिंगापूरला अटक झाली. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ रुपयांव्यतिरिक्त पिनांग येथील एका महत्त्वाच्या बंगाली क्रांतिकारकाचा पत्ता व कलकत्ता येथील क्रांतिकारक संस्थांच्या शाखांचे दोन पत्तेही मिळाले. या वेळी हिंदुस्थानांत मार्टिन् या नांवाने, त्या वेळचे नरेंद्रनाथ भट्टाचार्य व आजचे सुविख्यात मानवेंद्रनाथ रॉय, हे काम करीत असून बाहेरून रासबिहारी त्यांना मदत करीत होते. नरेंद्रनाथ भट्टाचार्य अथवा मार्टिन यांचे दोन वंगप्रांतीय दूत हतियाच्या रोखाने येत असलेल्या जर्मन रणतरीला काही विशिष्ट संदेश देण्यासाठी म्हणून शांघाय येथे पाठविण्यांत आले. त्यांना अटक झाली. महत्वाची ही दोन माणसें इंग्लिशांच्या हाती पडतांच स्वाभाविकपणेच हतियाच्या रोखाने शांघायहून निघ. पण तेथे रासबिहारी पसंचे णाऱ्या रणतरीला जबरदस्त धोका उत्पन्न झाला व महत्वाच्या शस्त्रास्त्रसंपत्तीचा अकारण नाश होण्यांत अर्थ नव्हता म्हणून जर्मन कौन्सल जनरलने रासबिहारोंच्या अनुमतीने ही रणतरी पाठविण्याची योजना रद्द केली. १९१५ च्या आक्टोबरमध्ये शांघाय येथील म्युनिसिपल पोलिसांनी संशयावरून दोन चिनी इसमांना अटक केली. त्यांच्या झडतीत १२९ ऑटोमेटिक पिस्तुले, २०८३० काडतुसें सांपडली. रासबिहारींच्या प्रेरणे- वरून हे सारे सामान हिदुस्थानांत येत होते. त्यांचा पोलिसांनी बराच छळ केल्यानंतर असे कळले की, त्यांना निएलसेन् नांवाच्या जर्मन गृहस्थाने हे सारे सामान दिलेले होते, व ते त्यांना गुप्त- पणे कलकत्ता येथील मजूर वस्तीच्या विभागांत राहणाऱ्या अमरेन्द्र चटर्जी या नांवाच्या गृहस्थाच्या स्वाधीन करण्याविषयी आज्ञा सुटली होती. लगेच अमरेन्द्रांच्या नावाने वॉरंट सुटून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. पण अमरेन्द्र केव्हांच त्यांच्या हातावर तुरी देऊन चंद्रनगरच्या रोखाने फरारी झाला होता. याच सुमारास अवनी मुकर्जी या नांवाचा एक बंगाली क्रांतिकारक जपानहून हिंदुस्थानांत येत असतां त्याला सिंगापूर येथे पकडण्यांत आले. झडतीत सापडलेल्या त्याच्या डायरीमध्ये उपयुक्त जर्मन सद्गृहस्थ निएलसेन ( Nielsen ) यांचा पत्ता मिळाला. आधिक बारकाईने शोध केल्यानंतर असे आढळून आले की, या निएलसेनच्या घरीच रासबिहारी कसू आपल्या अविनाश रॉय नांवाच्या एका सह- काऱ्यासह राहात आहेत. अवनी मुकर्जीच्या दैनंदिनीत शांघाय येथील दोन चिनी सद्गृहस्थांचे पत्ते, चंद्रनगर येथील मतिलाल रॉय यांचा पत्ता, कलकत्ता, डाका व कुमिल्ला येथील कांही क्रांति- शांतिजीवन ८३ कारकांच व क्रांतिकारक समित्यांचे पत्ते व सयाम येथील एक शीख इंजीनिअर सरदार अमरसिंह यांचा पत्ता इतक्या महत्वाच्या गोष्टी सांपडल्या. लगेच सर्वत्र व विशेषतः शांघायमध्ये झडत्यांचे सत्र सुरू झाले. ज्या दोन चिनी गृहस्थांचे पत्ते अवनी मुकजींच्या दैनंदिनीत सांपडले होते त्यांच्या घराच्या झडतीत शेकडों रिव्हा- लव्हर्स व कित्येक हजार काडतुसे पोलिसांच्या हाती लागली. योजना अशी होती की, हेनरी एस्. नांवाचे शस्त्रास्त्रांनी लदबदै- लेलें जहाज सयाम येथे यावे; त्या जहाजावरील साग शस्त्रास्त्र- संग्रह सरदार अमरसिंह यांच्या स्वाधीन करण्यांत यावा व त्यांनी तो हिंदुस्थानांतील क्रांतिकारक समित्यांच्या केंद्र शाखांच्या कडे पोहोंचता करावा; पण एकाएकी अमरसिंहांनाच अटक झाल्या- मुळे हाहि व्यूइ ढासळला. पुढे अमरसिंहाच्यावर खटला चालन गुलाम राष्ट्रांच्या जीवनांत भयानक अपराध ठरलेल्या, मातृभूमीला दास्यमुक्त करण्याच्या प्रयत्नांत सामील असल्याच्या अपराधा- वरून त्यांना प्राणदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षवर अपील केल्यानंतर जन्मठेप काळे पाण्यांत तिचे रूपांतर झालें. जी दोन जहाजें अंदमान द्वीपकल्पावर हल्ला करून तेथील राज- बंद्यांना सोडविणार होती व नंतर ब्रह्मदेशावर हल्ला करणार होती, त्यापैकी एकाला डच सरकारने आंतरराष्ट्रीय युद्धनिय- मांच्या अनुसार पकडले; व दुसरें अंदमानच्या आसपास येऊन पोहोचलें न पोहोचलें तोंच इंग्रजांचे जंगी लढाऊ जहाज जें एच. एम. एस्. कार्नवाल ( H. M. S. Cornwall ) त्याने समुद्राचा तळ दाखविला. याप्रमाणे मातेच्या दास्यमोचनाचा रासबिहारीनों उभारलेला तिसरा प्रयत्नही व्यर्थ गेला. .
रासबिहारी बसुंचे। २०. विगत महायुद्धानंतर याप्रमाणे महायुद्धासारख्या गुलाम राष्ट्रांच्या सद्भाग्याने शत- कानुशतकांत क्वचितच प्राप्त होणाऱ्या संधींत रासबिहारींनी उभा- रलेलें सारें विप्लवाचें मेरूमांदार देवाच्या वज्राघाताने ठिकन्या ठिकन्या उडून पार धुळीस मिळाले. तरीही त्यांचे धैर्य भंग पावले नाही; तरीही त्यांच्या वज्रहृदयाचे पाणी झाले नाही. अपयशानें खचून गेलेल्या अन् पुढे एक तर अजीबात राजकारण सोडून देऊन तत्वचिंतनांत अगर इतर व्यवसायांत निमग्न झालेल्या क्रांति- कारकांची अनेक नांवे आपणास माहीतच आहेत; अन् जे काही त्यानंतर राजकारणांत पडलेच तेही कोलांटउडी घेऊन पराभूत मनो- वृत्तीत अहिंसेच्या अथवा सनदशीर व माघारघेऊ मवाळांच्याच होय. या तत्वभ्रष्टतेलाच तत्वनिष्ठतेचा रंग ते फासत असले तरी इति- हाससिद्ध मार्गावरून त्यांची झालेली घसरगुंडी कांहीं लपू शकत नाही. मी त्यांना दोष देत नाही. कारण त्यांनी आपल्या पूर्वायु- प्यांत जे कलें त्याबद्दल ते वंदनीयच आहेत. त्याविषयीं राष्ट्रानं त्यांचं ऋणीच राहिले पाहिजे. पण रासबिहारी हे अशा सर्व- मान्य व्यक्तींपैकी नव्हते. भीमसेनाचं असे सांगतात की, त्याची पाठ जमिनीला लागली की, त्याचे बळ वाढून तो दसपट अधिक आवेशाने शत्रूवर तुटून पडे. महापुरुषांचेही असेच असते. अपय- शाने त्यांचा धार खचत तर कधीं नाहींच; पण उलट अंगीकृत कार्या- बद्दलचे त्यांचे अवसान दुप्पट वेगाने उफाळून वर उसळत असते. असो. महायुद्धानंतर झालेल्या व्हर्सीयलच्या तहाच्या भानगडीत जपानचे आणि इंग्लंडचे संबंध कडवटपणाने दुरावले. कारण जपान जरी मित्रराष्ट्राच्या वतीने युद्धांत सामील झाले होते व जयाचा वाटा इतराइतकाच जपानच्या साहाय्यानेही जरी क्रांतिजीवन मित्रराष्ट्रांच्या पदरांत पडला होता तरी व्हर्सायलच्या तहामध्ये त्याच्या वाट्याला कांहींच आले नाही. त्यांतच We must save the world या वाक्यांत व्यक्त होणारी जगत्जेतृत्वाची भावना जपानच्या अंतःकरणांत स्फुरण पावत होती. आशिया खंडांत राहाणाऱ्या सर्व लोकांचा एक आशियावासी संघ स्थापन करून त्या द्वारे ती आकांक्षा पूर्ण करून घेण्याचे जपानने ठराविलें होतें. ईस्ट इंडीज बेटांच्या प्रश्नावरून अमेरिकेशी जपानचा संघर्ष सुरू झालाच होता. या घटनांचा अर्थ इतकाच होता की, भावी काळांत अँग्लो अमेरिकनांशी जपानचे युद्ध जुंपणे शक्य कोटीत आले होते. रासबिहारींनी या वातावरणाचा लाभ घेण्याचे ठरवून आपल्या जपानी मित्रांच्या व तेथील भारतीय सहकाऱ्यांच्या साहाय्याने 'भारतीय स्वातंत्र्य संघ' या नावाची एक संस्था तेथे स्थापन केली. ते स्वतःच या संस्थेचे अध्यक्ष होते. नुसतें भार- ताचेच नव्हे, तर जगांतील साऱ्याच दलितांचे दास्यमोचन हे या स्वातंत्र्यसंघाचे ध्येय होते. या संस्थेच्या द्वारे त्यांनी आपल्या कार्याला पुनश्च जोमानें प्रारंभ केला. हिंदुस्थानांतील क्रांतिकारक संस्थांच्या कार्यावर त्यांची दृष्टी होतीच अन् वेळोवेळी तेथील कार्याची प्रतिवृत्ते त्यांच्याकडे जातच असत. कधी कधी ही प्रति- वृत्ते सरकारच्या हातीहि लागत. इ. स. १९२५ सालीं शचींद्र- नाथ सन्यालांनी रासबिहारींना पाठविलेले असे प्रतिवृत्त सर- कारच्या हाती लागून शचींद्रांना त्याबद्दल दोन वर्षे सश्रम कारा- वासाची शिक्षाहि झाली होती. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे बॅरिस्टर जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांनी रत्ना- गिरीच्या स्थानबद्धतेतून सुटल्यावर त्यांचा आणि रासबिहारींचा 'पत्रव्यवहार सुरू झाला. सावरकरांनी हिंदुमहासभेचे नेतृत्व रासबिहारी वसंचे स्वीकारून हिंदुराष्ट्रवादाच्या गर्जनेने राष्ट्रीयत्वाच्या तत्वज्ञानांत शास्त्रशुद्ध प्रगतीचे नवें पाऊल टाकल्यानंतर रासबिहारींनी त्या वादाचा पुरस्कार केला. जपानमध्येही त्यांनी हिंदुमहासभेची स्थापना केली. १९४० साली नागपूर येथे भरलेल्या हिंदुमहा- सभेच्या सुभव्य अधिवेशनाला आपला आशीर्वाद पाठविला होता. जपानमध्ये रासबिहारींच्या जीवनाला थोडीशी सुस्थिरता उत्पन्न झाल्यानंतर हिंदुस्थानांत परत येणे कार्याच्या व जीवित- संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अशक्य आहे असे पाहून त्यांनी तो विचारच आपल्या मनांतून काढून टाकला. ते एका सुस्वरूप व सुसंस्कृत जपानी महिलेशी विवाहबद्ध झाले. तिच्यापासून त्यांना झालेल्या संततीची नांवें त्यांनी भारतीयच ठेवली. जे जे भारतीय विद्यार्थी व सद्गृहस्थ जपानमध्ये जात, त्यांचा रासबिहारी अग- त्याने व प्रेमळपणानें परामर्श घेत. एकदां कांहीं भारतीय विद्यार्थी जपानमध्ये गेले असतां तेथील भारतीयांनी त्यांना अल्पोपहार दिला. या विद्यार्थ्यांमध्ये माझे एक विद्वान मित्र होते. त्यांनी मला असा अनुभव सांगितला की, ज्या ज्या हिंदी लोकांनी आमच्या स्वागतपर अथवा आम्हांला उपदेशपर भाषणे केली त्या सर्वांनी ती भपकेदार इंग्रजीतूनच केली. पण रासबिहारींनी मात्र निव्वळ भारतीय समारंभांत इंग्रजीतून भाषण करणे हा दास्याच्या मनो- वृत्तीच्या आचरटपणाचाच एक प्रकार आहे असे सांगून स्वतःचे भाषण बुद्धया हिंदीतून केले. त्यांचा पोषाखहि शुद्ध भारतीयच होता. मी स्वतः कांही रासबिहारींना पाहिलेले नाही. पण माझ्या या मित्राने त्यांना नुसते पाहिलेलेच नसून त्यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन संवादही केलेला आहे. त्याने मला असें सांगितले की, रासबिहारींच्या नेत्रांत अपूर्व आकर्षण असून .
कांतिजविन त्यांच्या सहवासांत येतांच आपण एका महानुभावाच्या सान्नि- ध्यांत आल्याचा अंतःकरणाला साक्षात्कार होई व मस्तक त्यांच्या- समोर आपोआप विनम्र होत असे.नपानमध्ये असतांना चंद्रनगरच्या 'प्रवर्तक ' नावाच्या मासिकांत स्वतःच्या अद्भुत व रहस्यमय जीवनाच्या कांही दालनावर प्रकाश टाकणारे लेख त्यांनी मध्यं- तरी लिहिले होते. एकदा त्यांनी जपानमधील भूकंपाचे आपल्या लेखांतून केलेले वर्णन कलकत्त्याच्या · स्टेट्स्मन ' या सुविख्यात अग्लो-इंडियन पत्राने पुर्नमुद्रित केले होते. त्यांचे इंग्रजी लेखन अतिशय प्रभावी असे.एकदा त्यांनी जपानमधील भूकंपांचे आपल्या लेखांमधून केलेले वर्णन कलकत्त्याच्या स्टेटेस्मन या सुविख्यात अँग्लो-इंडियन पत्राने पुनर्मुद्रित केले होते. इतर अनेक प्रकारचे उद्योग करीत असतां ज्यासाठी आपल्या मातृभूमीचा त्यांनी परित्याग केला होता,तिचा त्यांना कधीहि विसर पडला नाही. त्यांनी आपल्या क्रांतिकार्याचे सूत्र भारतीय स्वातंत्र्य समिति Indian Independence League या नांवाची संस्था स्थापन करून कार्यान्वित केलें. इतक्यांत त्यांना इ.स. १९४१ चे सुमारास अपोक्षित सुवर्णसंधीची पूर्वचिन्हें स्पष्ट दिसू लागली.जर्मनीत हिटलरचा उदय झाला. सोशल डेमोक्रेटस् व कम्युनिस्ट या दोघांचाही पाडाव करून हिटलरने जर्मन राष्ट्राची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वतःचे बृहत जर्मनीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्या- साठों तो एकामागून एक दश पादाक्रान्त करूं लागला. जर्मनीच्या पोलंडवरील स्वारीनंतर इंग्लंडने त्याच्याविरुद्ध शस्त्र उपसलें व युरोपखंडांत भीषण महायुद्ध सुरू झाले. पहिल्या महायुद्धांत जपान दोस्तराष्ट्रांच्या बाजूने असल्यामुळे भारतीय क्रांतिकारकांचे सारे प्रयत्न विफल झाले होते. पण व्हायलच्या तहानंतर अमेरिका व ८८ रासबिहारी बसूंचे जपान यांचे संबंध बिघडले. त्यानंतर द्वितीय महायुद्धाच्या क्षणा- पर्यत इंग्लंडनें अमेरिकेला आंतून साह्य करून जपानची फसवणूक केल्यामुळे या महायुद्धांत जपान अक्षराष्ट्रांना मिळून इंग्लंडच्या हितशत्रूच्या पाठीशी उभे राहील, ही गोष्ट रासबिहारींना स्पष्ट दिसू लागली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जपानने अक्षराष्ट्रांच्या वतीनेच महायुद्धांत झप घेतली. रासबिहारीच्या दृष्टीने ही अतिशयच महत्त्वाची घटना होती. इ. स. १९४२ च्या जून महिन्यांत त्यांनी ठिकठिकाणच्या भारतीय क्रांतिकारकांना एकत्र करून त्यांची एक मोठी परिषद बँकॉक येथे बोलाविली. या परिषदेला जपानचे युद्धबंदी बनलेले अनेक भारतीय सेनाधिकारी उपस्थित होते. स्वतः रासबिहारी हेच या परिषदेचे अध्यक्ष होते. २१. बँकॉक परिषद या परिषदेंत अशी योजना ठरविण्यांत आली की, जपानचे युद्धबंदी बनलेल्या भारतीय सैनिकांनी आपले प्राण हिंदुस्थानला गुलाम करणाऱ्या व तसेंच चिरकाल ठेऊ इच्छिणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यसत्तेसाठी वेचण्याचे पाप करण्याऐवजी ब्रिटनशी लढून स्वतःच्या मातृभूमीला स्वतंत्र करण्याच्या पवित्र कार्यातच ते खर्ची घालावे. तदनुसार एक मोठे सैन्य उभारण्यांत येऊन त्याचे नांव Indian National Army असें ठेवण्यांत आले. सुप्रसिद्ध आझाद हिंद सैन्य ' तें हेंच होय. आझाद हिंद सैन्याचा इतिहास सर्वांनाच माहीत असून त्यावर निरनिराळी मोठी व अधिकृत पुस्त- केंच तयार होत असल्यामुळे त्यासंबंधाने येथे वर्णन करण्याचे कारण नाही. फक्त रासबिहारींचेच काय तें वृत्त येथे द्यावयाचें आहे. असो. रासबिहारी बसू हेच आझाद हिंद सैन्याचे व पुढे सुभाष चंद्रांचे महान नेतृत्व लाभलेल्या दुसऱ्या भारतीय स्वातंत्र्य- कांतिजीवन ८९ युद्धाचे खरे जनक होत हे यावरून ध्यानात येईल. याप्रमाणे Indian National Army अथवा सुप्रसिद्ध आय. एन. ए. ची स्थापना झाल्यानंतर Indian Independence League में सैन्यभरती, पैसे, धान्य, कपडे इत्यादिकांची सोय करण्याचे काम अंगावर घेऊन जपानच्या सरकारकडून शस्त्रास्त्रे व युद्धसामुग्री यांचा पुरवठा करून देण्याचा पतकर घेतला. आय्. एन्. ए. हे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे सैन्य व रासबिहारी त्याचे सुप्रीम कमां- डर अथवा नेते होते Indian National Armyच्या प्रतिष्ठापने- नंतर जपानांकित प्रदेशांतून व जपानचे युद्धबंदी बनलेल्या भार- तीय सैनिकांतून हजारों लोक या सैन्यांत भरती होऊ लागले. जे लोक या सैन्यांत भरती होत नसत त्यांचा युद्धंबदी या नात्याने जपान सरकार छळ करीत असे व त्यांतून रासबिहारींनी त्यांना वाचविलं नाही असा त्यांच्यावर एक आरोप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, रासबिहारी कांही एखादा रिलीफ कमिटीचा उद्योग करावयास जपानमध्ये स्थायिक झालेले नव्हते. भारतीय स्वातंत्र्यसेनेत समाविष्ट न होतां ब्रिटिश साम्राज्यशाहीचे हस्तक बनून स्वतःच्या मातृभूमीला दास्याच्या पंकांत राहूं दण्यांत ज्यांना खंत वाटत नव्हती, त्यांच्या शरीर- सुखाची काळजी वहात बसण्याचे रासबिहारींना काय कारण ? २२. सुभाष व रासबिहारी द्वितीय महायुध्द सुरू झाल्यानंतर नेहमींच्या राजकारणा- 'ऐवजी निर्णायक सशस्त्र लढा देण्याची हीच खरी वेळ आहे, असे ज्या भारतांत राहणाऱ्या भारत राष्ट्राच्या नेत्यांना समजलें होतें, त्यांत स्वातंत्र्यवीर सावरकर व देशगौरव सुभाषचंद्र बोस हे अग्रगण्य होत. सुभाषचंद्र, बोस यांनी देशाची सूत्रे ज्यांच्या रासबिहारी बसंचे . हातांत होती, त्यांच्याशी दोन वेळां टक्कर देऊन आपला बाणेदार- पणा दाखविला. पण हिंदुस्थानांतील जनता जशी त्यांच्या पाठीशी हवी होती, तशी ती नसल्याचे त्यांच्या प्रत्ययास आले. महा- युध्दाचे टिपरू डंक्यावर पडतांच त्यांचे आतंकवादी मन त्यांना स्वस्थ बसू देईना. भारताच्या स्वातंत्र्याचा निर्णायक लढा देण्याची हीच वेळ आहे हे त्यांनी ओळखले व स्वातंत्र्याचा शिरपेंच त्यांच्या हातूनच आपल्या मस्तकी धारण करण्याची देवी भारतीचीहि इच्छा असल्यामुळे त्याना तशीच प्रेरणा झाली. पुरोगामी पक्षाचे अध्वर्यु म्हणून या सुमारास त्यांनी एक अत्यंत सूचक भाषण केले होते. देशभर दौरा करून त्यांनी भारतांतील सर्व नेत्यांच्या भेटी घेतल्या. वीर सावरकरांची व त्यांची दोन दिवस अत्यंत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत हिंदुस्थानांत राहून सावरकरांनी सैन्यभरतीच्या कार्यक्रमाच्या द्वारें हिदुस्थाना- बाहेर भारतीय सैनिक पाठवावे व देशगौरव सुभाषांनी या सैनिकां- तून विशाल संघटण निर्माण करून अक्षराष्ट्रांच्या विशेषतः जपानच्या साहाय्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीशी युध्द करावें अस ठरले. हिंदुस्थानाबाहेर सुभाषांनी जावयाचें तें कसे ? डोळ्यांत तेल घालून बिटिश सरकार प्रत्येक पुढाऱ्यांच्या हालचालीकडे लक्ष लावून बसले होते. सुभाष हे अशा थोर नेत्यां- पैकी होते की, ज्यांच्या साध्या शिंकचासुध्दा भारताच्या काना- कोपऱ्यांतूनसुध्दा बभ्रा व्हावयाचा. पण त्यांनी एकाएकी आध्या- त्मिक उपासनेचा त्यांना झटका आल्याचे दाखविलें. एकांतांत एका खोलीत त्यांनी स्वतःला कांडून घेतले. अखंड जपजाप्य करीत ते त्या खोलीत राहत. कोणाचीही ते त्या दिवसांत भेट घेत नसत. त्यांची दाढी वाढलेली होती. केवळ त्यांच्या पुतण्याशिवाय दुसऱ्या क्रांतिजीवन . कोणालाह त्यांचे दर्शन होणे बंद झालें. एकदा लहानपणी असेंच ते तपश्चर्येप्रीत्यर्थ हिमाचलांत निघून गेल्याचा इतिहास त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांच्या या गूढ वर्तणुकीविषयी कोणालाही संशय येऊ शकला नाही. त्यांच्या शत्रंना व मित्रांनाहि वाटले की, भौतिक परिस्थितीत वारंवार येणा-या अपयशामुळे खचून जाऊन सुभाष पुन्हा अध्यात्मिक मार्गाकडे वळले असावे. काही दिवसांनी हा प्रकार संपेल व ते पुन्हा व्यवहारांत येतील. अशा भोंवतीच्या निगूढ वातावरणांतूनच एक दिवस ते गुप्त झाले. 'चले जाव ' ची घोषणा, कागदी ठराव व टाळ्यांचा गजर यापेक्षाही तोफांच्या धड- धडाटांतून करण्याचा त्यांचा कृतानश्चय होता. बंगालमधून गुप्तपणे सुभाष अफगाणिस्थानांत आले व अनक प्रकारच्या हालअपेष्टा सोशीत ते अक्ष राष्ट्राच्या सूत्रधारांना भेटले. वंगकेसरी सुभाषांना पाहतांच रासबिहारींचे अंतःकरण उचंबळून आले. या विशिष्ट क्षणी जे करावयास हवे ते करावयास हा एकटाच महापुरुष समार आला म्हणून त्यांना कृतकृत्यता वाटली. स्वार्थ असा त्यांना काही उरलाच नव्हता. सुभाषांचे व्यक्तिमत्व, त्यांची लोकप्रियता व त्यांचे सामाजिक अधिष्ठान आपल्यापेक्षा अधिक दैदीप्यमान आहे काय, पण अलीकडच्या हिंदी नेत्यांच्याहि जविनांत सर्वस्वी अशक्य असलेली एक अपूर्व गोष्ट रासबिहारींनी करून दाखविली. त्यांच्या थोर व्यक्ति- मत्वाचा तिच्यांतून अधिकच दैदीप्यमान प्रत्यय येतो.वस्तुतःआझाद हिंद सैन्य रासबिहारींनी स्थापन केले होते. त्या सैन्याच्या सुप्रीम कमांडरचे सर्व-श्रेष्ठ स्थान त्यांचे होय. पण सुभषांना पाहतांच या थोर पुरुषाने स्वतःचे सिंहासन मोकळे करून सुभाषांना आझाद हिंद सैन्याचे सुप्रीम कमांडर व स्वतंत्र भारत सरकारचे अध्यक्ष, असे पाहून जगाच्याच '१२ रासबिहारी बसुंचे होण्याची विनंति केली व आपण स्वतः सुभाषांच्या सल्लागार मंडळांत 'एक प्रमुख सल्लागार म्हणून ते राहिले.रासबिहारींनी आजवर केलेल्या सर्व प्रकारच्या त्यागांत हा त्याग सर्वश्रेष्ठ होय.नेतृपदाच्या रक्ताला जळवाप्रमाणे चिकटून राहण्याच्या आजच्या वातावरणांत रास- बिहारींचा हा महनीय त्याग विशुद्ध राष्ट्रभक्तीचें ज्वलन्त उदाहरणच होय. सुभाषांनी केलेली स्वतंत्र भारत सरकारची प्रतिष्ठापना व त्याला मिळालेली अकरा स्वतंत्र राष्ट्रांची मान्यता त्यांनी पाहिली. युद्ध जोरात सुरू होते. अशा स्थितीत सिंगापुराहून युद्ध समितीची एक महत्वाची बैठक आटोपून येत असतां वाटत विमानाला अपघात होऊन त्यांत रासबिहारींची झुंजार जीवनकथा संपली. कोणाला तें पुष्कळ दिवस खरेंच वाटेना. क्रांतिकारक जीवनांत ते इतकेदां मरून पुन्हा जिवंत झाले आहेत की वेड्या आशेला तसेंच पुन्हा घडेल असे वाटलें. इतका व्यक्तित्व राष्ट्राच्या सामु- दायिक जीवनांत विलीन करून टाकलेल्या इतका यशापयशाच्या व सुखदुःखाच्या द्वंद्वाच्या अतीत असलेला, इतका जीवनाच्या अंतिम विरामचिन्हापर्यंतचा प्रत्येक क्षण केवळ रणांत घालविलेला व इतका व्यवसायात्मिक बुद्धीचा पुरुष भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासांतहि दुसरा नाही. ज्यांच्याविषयीं यथार्थतेने व्यतिकरितदिगंताः श्वेतमानैर्यशभिः सुकृतविलसितानां स्थानमूर्जस्वलानाम् । अगणितमहिमानः चेतनं मंगलानाम् कथमिव भुवनेऽस्मिन् तादृशाः संभवान्त ॥ असें म्हणता येईल. अशा योग्यतेचे रासबिहारी हे पुरुष होऊन गेले यांत शंका नाही. -:समाप्त:- सुरसग्रंथमाला (पंढरपूर) जुनी प्रकाशने अ.नं. नांव रु. आ. २-१० .. :: २ . o । ... ३- ३-१२-० ३-१२-0. . . . -८ ३. ३. ... ९ जर्मन मोहीम, गहनगूढ, प्रेमपरीक्षण १० सत्यमेव जयते व शैशव सहचरी १९ पितृप्रेम ( नाटक )-परांजपे ४१ दैवदुर्विपाक व भयंकर भूल-सव्यसाची ४४ मृगेंद्रलीला-प्रभंजन ४५ ईश्वरी लीला व आशानिराशा-नरवणे ४६।४७ प्रेमाश्रम, भाग ११२-प्रभाकर... ४८।४९ वीरात्मा, भाग ११२-गणेशशास्त्री फाटक ५२ विजयनगरची साम्राज्यस्थापना-दातार ५३ कुमार अशोक-लिमये ५४।५५/५६ जगाचा बाजार, भाग १।२।३ एकत्र... ५७ ढोंगी गुरूच्या सैतानी लीला-गणेशशास्त्री फाटक... ५८ हा संशयाचा प्रताप-ग. वि. कुलकर्णी... ६. भाईबंद व नराचा नारायण दातार ६२ प्रेमबंधन-दातार ६३ प्रतापादित्य -वा. शि. हडकर ६४ देवी कल्याणी-अज्ञात ६५ भीषण सूड-अज्ञात ६६ अमृत की विष-हडकर ६७ रत्नगडची रंभा- -सहृदय ६९ रक्ताचे गालवोट-परांजपे ७१ देशभक्त-अनंतवार ७२ गृहदेवी--प. स. देसाई ७३ भावकला-ल. रा. पटवर्धन ७४ धरणीकंप-वि. वा. हडप ७५ कॉटनफिगर-अनंतवार ७७ उमाडलेल्या भावना-कवठेकर . - ३-८- ३-८-० ३ ३. ८- ३-८- ३-८- ३. -४. ३- ३-४-० ३-४--० १. ... : :: ... :: २. ... ... २. ... .. ... ०-१२-० २-०-० . - . . . . . .... .. . . .. नवीं प्रकाशने "अ. नं. नांव रु. आ. पै .८५ ओझरती नजर के. मा. नाईक ८७ छत्रसाल (संक्षिप्त)-वालचंद शहा, २ री आवृत्ति ८८ भिरभिरें-गंगाधर गाडगीळ .८९ तूं भेटायला नको होतास- -सरोजिनी बाबर ३ ९० मायेचा पाझर -शांता शेळके ३ ९१ मीलन-अरविंद गोखले ३- ९२ सम्राट अशोक वालचंद शहा, ३ री आवृत्ति... ६ ९३ सर्व हक्क स्वाधीन -बोकील ९४ भूकवळी-सुरेश शर्मा २ ९६ पाटणची प्रभात-कन्हैयालाल मुनशी, २ री आवृत्ति ९७ पूर्व आणि पश्चिम--शांतिलाल भंडारी ४--८-- ९८ वैरपूर्ती-कन्हैयालाल मुनशी, २ री आवृत्ति ९९ अमिनार-पद्माकर डावरे ३ १०० जीवननृत्य-मीनाक्षी साने ३-८ १०१ गुजराथचा नाथ-कन्हैयालाल मुनशी, २ री आवृत्ति ६ १०२ बजाजी निंबाळकर-वालचंद शहा १०३ नौका-डुवी-टागोर, २ री आवृत्ति १० ४ गोत्रांतील सुंदर स्त्रिया-कोठारी, ३ री आवृत्ति... १०५ गृहिणी (टॉलस्टॉय)-निरंतर, २ री आवृत्ति ३ १०६ जागरण-अरविंद गोखले १०७ पाटलाची लेक-चौगुले १०८ ओझरती नजर, २ री आवृत्ति १०९ छत्रसाल-वालचंद शहा ३ री आवृत्ति... ३ ११० मदिरा-मस्तानी-भांगरे २- १११ लंडन येथील बड्या लोकांची गुप्त कृत्ये भाग १ ला १-८ ११२ २ रा ३ रा . . . .... .. । । । । . .... . اسعد الله . . - . . ४ था " " ५ वा " ३ सैन्य चालले पुढे-बोकील २१७ कावळा व ढापी-न. चिं. केळकर :: ::
फूड
मलेरिया और अन्फ्ल्युअन्झा के लिये
पी
y
सुदर्शन
एग्युमिक्श्चर
मोती प्रॉडक्टस,सोलापूर
परेमाउंट लि.
R
卐
卐
कुलो
लोग अनेक
y
20
लेकिन पसंदगी अंक
हेअर
ऑईल
मोती प्रॉडक्रस
सोलापूर
परेमाउंट लि.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
रासबिहारी वसं ण्याची कामगिरी पत्करली. ते हे निश्चित ओळखून होते की, भाईजी जसे या प्रकाराला उघड उघड संमति देणार नाहीत, त्याचप्रमाणे दुसरे काही सुचहि शकणार नाहीत. अशा स्थितीत त्यांना विचारून अकारण अपशकुन करून घेण्यापेक्षां कांहीं न विचारणे काय वाईट ? भाईजींना कांहींच न विचारतां दुसऱ्या दिवशी कर्तारसिंहानी आपल्या त्या विचारमग्न सहकाऱ्यांना स्वच्छ असें सांगितले की, " मी भाई परमानंदांना काय विचारावयाचें तें विचारून आलेलों आहे. त्यांची या गोष्टीला पूर्ण संमति असून त्यां.हि मत माझ्याचसारखे आहे. मात्र पन्नास लोक एकच गोष्ट विचारावयास गेले तर भाईजींना असे वाटेल की, या लोकांना प्रत्यक्ष कांहींच करावयाचे नसून नुसती बडबड मात्र करावयाची आहे. या बडबडीने व्यर्थ कार्यनाश होईल; म्हणून भाईजी स्वच्छ नकार देतील." भाईजींचं हे मत व कर्तारांचे त्यावरील भाष्य ऐक- तांच सर्वांचीच तोंडे गप्प झाली. अंबाला जिल्ह्यांतील लारू गांवचे निवासी व या मंडळींचे एक नेते प्रख्यात सरदार पृथ्वीसिंह यांच्यावर या वेळी वॉरंट निघालें होतें. ८ डिसेंबर १९१४ रोजी त्यांची रस्त्यांत एका ओळ- खीच्या पोलिस ऑफिसरशीं गांठ पडली. पण पृथ्वीसिंह, तो जवळ येऊ लागतांच, त्याला एक जोराची गचांडी देऊन पहातां पहातां अदृश्य झाले. असो. कर्तारसिंहांनी ठरविलेल्या या बेतानुरूप १७ डिसेंबर रोजी हिसार जिल्ह्यांतील पिपी या गांवीं एका ब्राह्मण सावकाराच्या घरी दरवडा घालण्यात आला. या दरवड्यांत बावीस हजार रुपये एक हाती रक्कम क्रांतिकारकांच्या हातांत पडली. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पंजाब सरकारने पंजाबची एकंदर परिस्थिति मध्यवर्ती