Library
Maanavii San'skrxtiicha Itiihaasa
Front matter
UNIVERSAL
LIBRARY
OU_184523
LIBRARY
UNIVERSAL
महाराष्ट्र विध ज्ञानमाला-पुष्प पहिले
मानकी संस्कृतीचा इतिहास
लेखक
चितामण गणेश कर्वे, बी. ए.
सहसंपादक, महाराष्ट्रीय ज्ञानकोश
महाराष्ट्र शब्दकोश
१९३१
OUP-861-5-8-74-15,000
OSMANIA UNIVERSITY LIBRARY
Call No.
Author
M54
Accession No. M349
kigM
करें,
वि.ग.
मालवी सीMus.
Title
This book should be returned on or be
No text on this page.
महाराष्ट्र विविध ज्ञानमाला-पुष्प पहिले
मानवी संस्कृतीचा इतिहास
लेखक
चिंतामण गणेश कर्वे, बी. ए.
सहसंपादक, महाराष्ट्रीय ज्ञानकोश
व
महाराष्ट्र शब्दकोश
१९३१
किं. 745.
प्रकाशकः-महाराष्ट्र विविध ज्ञानमाला तर्फ य रा. दाते, बी. ए., एलएल. बी ,
८४१, सदाशिव पेठ, पुणे २.
मुद्रकः-सदाशिव रामचंद्र सरदेसाई, बी. ए., एलएल्. बी.,
नवीन समर्थ विद्यालयाचा 'समर्थ भारत' छापखाना,
९४७, सदाशिव पेठ, पुणे २
.
महाराष्ट्र विविध ज्ञानमाला-पुष्प पहिले प्रकाशकाची प्रस्तावना महाराष्ट्र विविध ज्ञानमालेचे हे पहिले पुष्प महाराष्ट्रीय जनतेच्या हाती देतांना आज चालकांस मोठा आनंद होत आहे. महाराष्ट्रीय ज्ञानकोश तयार झाल्यानंतर ज्या वाङ्मयसेवकांनी महाराष्ट्र भाषेच्या सेवेस आपणांस वाहून घेतले होते, त्यांनी जी कार्ये आपणांपुढे ठेविली होती, त्यांतील प्रमुख व विशेष महत्त्वाचे म्हणजे 'महा- राष्ट्र शब्दकोश' हे होय. ज्ञानकोश पूर्ण होऊन त्या कार्यांतून मोकळे झाल्याबरोबर मंडळाची जी पुनर्घटना झाली, तीत डॉ. केतकरखेरीज बाकीचा सर्व संपादकवर्ग (स्वतंत्र रीतीने महाराष्ट्र-कोश मंडळ, लिमिटेड, या कंपनीची स्थापना करून) महाराष्ट्र शब्दकोशाच्या कार्यास उत्साहाने लागला व ते कार्य प्रचार, शब्दसंग्रह, द्रव्य- साधन, संपादन इत्यादि मार्गानी अव्याहत व नेटाने चालू आहे. त्याच वेळी मनांत योजिलेले व कंपनीच्या उद्देशांत नमूद केलेले दुसरें कार्य म्हणजे प्रस्तुत महाराष्ट्र विविध शानभाला हे होय. या कार्याची रूपरेषा मागेंच छापून अनेक वाय- सेवकांकडे अभिप्रायार्थ व साहाय्य मागण्याकरितां म्हणून पाठविण्यात आली होती व अनेकांकडून चांगले अभिप्राय येऊन लेखनसाहाय्य देण्याबद्दल अभिवचनेंहि मिळाली होती. अशा प्रकारची माला प्रसिद्ध व्हावी अशा प्रकारचा एक ठराव बडोदें येथे भरलेल्या साहित्य संमेलनात १९२१ सालीच करण्यांत आला होता. परंतु प्रत्यक्ष कार्य अद्यापि कोणी केल्याचे दिसत नाही. तेव्हां असा प्रयत्न आपण करावा असे ज्ञानकोशाच्या संपादकवर्गातील काही व्यक्तीस वाटणे साहजिक असून ते कार्य आम्ही डोळ्यांपुढे ठेविले होते व त्या मालेतील प्रथम पुष्प आज विकास पावत आहे. वास्तविक यापूर्वीच या मालेतील एखादे पुष्प प्रकाशांत यावयाचे. परंतु शब्द- कोशाचेच अनेकविध काम करीत असतां संपादकवर्गास या मालेकडे यापेक्षा जास्त लक्ष द्यावयास, तसे पूर्वी उद्देशपत्रिकेत छापलें असताहि, झाले नाही. असो. आज या पुष्पाच्या प्रकाशनाने मालेच्या प्रत्यक्ष कार्यास आरंभ होत आहे.
[ २ ] प्रस्तुत पुस्तकहि मालेचा जो मुख्य उद्देश की, सामान्य वाचकासहि सहजगत्या विविध शास्त्रीय, वाङ्मयीन, कलाकौशल्यादि विषयांचे ज्ञान व्हावे असे आटोपशीर व सोप्या भाषेत लिहिलेले ग्रंथ प्रकाशित करावयाचे, त्यास अगदी अनुसरून असून जणूं काय पुढे होणाऱ्या ग्रंथांस प्रस्तावनेदाखलच आहे आज जगामध्ये जो विविध ज्ञानाचा विकास झाला आहे, त्याची मानववंशोत्पतीपासून पायऱ्यापायऱ्यांनी कस- कशी प्रगति होत गेली व पाषाण-युगांतील मानवाच्या ज्ञानाची अल्प पुंजी आज केवढी वृद्धिंगत व सर्वव्यापी आली आहे व मानववंशाचा जगावर विस्तार कस- कसा व कोणकोणत्या सांस्कृतिक अवस्थांतून होत गेला व त्याचा वैयक्तिक व सामु- दायिक आयुष्यक्रमांवर व एकंदर जगाच्या प्रगतीवर कसकसा परिणाम होत गेला हे थोडक्यात, सरळ पण अनेकांगी विवेचन करून विशद केले आहे व त्यामुळे पुढे ज्ञानाच्या निरनिराळ्या अंगांवर स्वतंत्रपणे लिहिल्या जाणाऱ्या ग्रंथांना हा उपोदघात- वजा ग्रंथ प्रसिद्ध करण्यांत वाचकांची जिज्ञासाहि जागृत करण्याचे कार्य होणार आहे. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक जरी ज्ञानकोश व शब्दकोश यांच्या संपादकवर्गापैकीच असले तरी या मालेत आमच्या संपादकवर्गाच्या बाहेरच्याहि विद्वान व अनेक विष. यातील तज्ज्ञ लेखकांचे ग्रंथ प्रसिद्ध करावयाचा उद्देश आहे व या कार्यात महाराष्ट्रा- तील वाड्मयभक्त आम्हांस पूर्ण साहाय्य करतील अशी आशा आहे. महाराष्ट्रीय जनता या पुष्पाचा आदराने स्वीकार करून पुढील पुष्पं गुंफण्यास चालकांस उत्तेजन देईल अशी आशा प्रदर्शित करून व या मालेस परमेश्वराने नेहमी प्रफुल्ल व चिरंजीवि करून तिचा परिमल महाराष्ट्रात पसरविण्याच्या कामी आम्हास यश द्यावे अशी प्रार्थना करून ही अल्प प्रस्तावना पुरी कारतों महाराष्ट्र शब्दकोश कचेरी, ८४१ सदाशिव, पुणे व्यवस्थापक, महाराष्ट्र विविध जानमाला.
लेखकाचा खुलासा अगोदर संस्कृति म्हणजेच मोठा व्यापक विषय, व त्यातून ता अखिल मानव जातीची द्यावयाची म्हणजे तर केवढा जगडच्याळ पसारा आवरावयाचा! जगाच्या आरंभापासून आजतागायत जगाच्या अफाट पाठीवरील सर्व मान- व्याचा सर्वच बाबतीतला इतिहास म्हणजेच मानवी संस्कृतीचा इतिहास म्हगता येईल कारण संस्कृतीमध्ये काय येत नाही ? धर्म, राजकारण, भाषा, वाङ्मय, व्यवहार इत्यादि अनेक गोष्टीवरून संस्कृति अजमावयाची असते; नेव्हा सामान्य प्रौढ साक्षर मागमाला समजेल असे छोटे पुस्तक या विषया- वर लिहिणे किती अवघड होऊन बसते याची कल्पना महज येणार आहे. आपल्या मराठी भाषेत या विषयावर स्वतंत्र वाड्मय अद्याप तयार झाले नाही महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या २२ खंडातून आणि इतर अनेक ऐतिहासिक पुस्तकातून विखुरलेली माहिती जमा केली तरच सर्व मानवी संस्कृतीचा इतिहास कळगार आहे. एकच एक ग्रंथ घेऊन हा इतिहास पाहूं म्हटल्यास साधणार नाही तेव्हा प्रथम जिजामा उत्पन्न होण्यासाठी लघुग्रंथ ( Hand-book) लिहून तयार ठेवल्याम, या विषयास वाहिलला मोठा ग्रंथ तयार होणे आवश्यक वाटेल व तो लवकर निघेलहि; अशी आशा धरून हा लहान संक्षिप्त इतिहास संपादिला आहे सर्व विषयाचे सर्वसाधारण ज्ञान प्रत्येक प्रौढ माणसाला हवें व त्यासाठी अशी निरनिराळ्या विषयांवरची माहिती सुबोध पण त्रोटक रीतीने देणारी पुस्तके तयार ठेवावी, हा सरकारचा विचार आणि त्यासाठी सरकार करीत असलेले प्रयत्न स्तुत्य नाहीत असे कोण म्हणेल? जसे बालासाठी तमे प्रौढासाठीहि योग्य वाङ्मय मर्व देशी भाषातून पाहिजे व या कामी सरकारनेच हात घातल्याशिवाय इष्ट हेतु माध्य होणार नाही याची जाणीव प्रत्येक मुशिक्षितास आहे. तेव्हा या पुस्तकाप्रमाणेच इतर शास्त्रीय व मामान्य विषयावरील पुस्तके लेखकास योग्य मदत देऊन सरकार प्रसिद्ध करवील, अशी आता लोकाना खात्री वाढू लागली आहे, असो.
[ २ ] या लहान पुस्तकांत संस्कृतिसाहाय्यक असे आणखी किती तरी विषय विस्तृत विवेचिण्याचे राहून गेले आहेत. पण सर्वच पात्रे एकदम रंगभूमीवर आणिल्याने नाट्यकवीला जसा सर्वाचा सारखा परामर्श घेतां न येऊन उलट नाटकात गोंधळ माजविल्याचा दोष मात्र पदरी घ्यावा लागतो, तसा गोधळ येथे संस्कृतीच्या भिन्न भिन्न अशा सर्वच अंगाविषयी विचार करताना होणार आहे. शिवाय मानवी संस्कृतीच्या इतिहासात सुसंबद्धता कशी सापडणार? साराच इतिहास बदलत चालला आहे, पुढील शोध मागील सिद्धांताना खोटे पाडीत आहेत व जगाच्या प्रगतीची भरधाव दृष्टीत ठरण्यासारखी नाहीं; तेव्हां हा छोटा इतिहास तरी मानवी संस्कृतीचा पूर्ण आदर्श कसा राहणार ?
अनुक्रमाणका ... . उपोद्घात-संस्कृति म्हणजे काय ? ... संस्कृतीची व्याख्या, १; संस्कृतीची तुलना, १; आजची संस्कृति, २. प्रकरण पहिले-संस्कृतीचा उदयकाल ३-१० पृथ्वीची कल्पना, ३; सजीव पृथ्वी व उत्पत्तीचा इतिहास, ३: आद्यसंस्कृति व सुधारणेची युगे, ४; पाषाणयुगः पुरातन व नूतन, ४; नूतन पाषाणयुग व त्या वेळचा भूगोल, ५; मनु- ध्याचा व्यवसाय आणि रहाणी यांत कालमानाने बदल, ६; सामाजिक जीवनाची आवश्यकता उत्पन्न झाली, ८, सामाजिक बंधने, ९, राजकीय बंधनें, राजे व राज्यक्रात्या, ९. प्रकरण २ रें-प्राचीन संस्कृतीची राष्ट्र १०-२० प्राचीनतम राष्ट्र, १०; मिसर ऊर्फ ईजिप्त, १०; मिसरी राज- घराणी, ११; सुमेरिया, १२; बाबिलोनी संस्कृति, १३; बाबि- लोनी राष्ट्र व समेटिक वंश, १३; बाबिलोनी साम्राज्य-खम्मु- रब्बीचे कोड, १४; ईजियन संस्कृति, १५; आर्यवंश व मूळची आर्याची रहाणी, १६; आर्याचा विस्तार, १७; पारशी आर्य व त्यांचा धर्म, १७; प्राचीन पशु किवा इराण देश, १८; हिदु- स्थानांत आर्याची वसाहत, प्राचीन भारतीय संस्कृति, १८. प्रकरण ३ रें---आणखी सांस्कृतिक राष्ट्र २०-२३ चीन व त्याची संस्कृति, २९; मयसंस्कृति, २१; युरोपांतले आर्य, २१; कि साम्राज्य, २१; रोमन साम्राज्य, २२; तत्कालीन इतर राष्ट्रः हिराईट आणि मिटनी, २३. प्रकरण ४ थे-सेमेटिक संस्कृति व तिचा जगभर विस्तार २४-२८ हीब्रू राष्ट्र, २४; ज्यू लोक व ख्रिस्ती धर्माचा उदय, २४;
[ २ ] . ख्रिस्ती धर्माचे साम्राज्य, २५; इस्लामी संस्कृति, २६; व्याव- हारिक धर्म, २७; सेमेटिक धर्माची जगाला शिकवण २८. प्रकरण ५ वे-मध्ययुगीन संस्कृति ( पूर्वार्ध व उत्तरार्ध )... २८-४३ पूर्वार्ध-मांडियाचे साम्राज्य व इराणचा पुढील इतिहास, २८; दरायमची ग्रीसवर स्वारी, ३० ग्रीक साम्राज्यातील अंतःकलह अथेन्स आणि स्पार्टा, ३१, मॅसिडोनियन साम्राज्य, अले- क्झाटर, ३२. हेलेनिझम किवा कि संस्कृतीचा दिगंतरी प्रसार ३२: ग्रीक साम्राज्याचा नाश, ३३ ग्रीक आणि रोमन संस्कृ- तांची तुलना, ३३. कार्थेजशी रोमचा जिवापाड झगडा, ३४. रोमन साम्राज्यातील राज्यकारभार, ३५: रोमन बादशाही व न्हासाम आरंभ, ३५. युरोपात रानटी लोकाचा धुमाकूळ, ३६; रोमन संस्कृतीचा आधुनिक जगावर ठसा, ३६, रोमन साम्राज्य गुलामानी चालविले ! ३७. उत्तरार्ध-तातरी लोकाचे युरोपात वर्चस्व व फ्रेच साम्राज्याचा उदय, ३७, नॉर्थमेन ऊर्फ चाच्याची सर्वत्र सत्ता, ३८, ख्रिस्ती आणि मुसलमान यामध्ये धर्मयुद्धे, ३८, विद्यापुनरुर्जावन व उच्च शिक्षणसंस्थाची स्थापना ३९, शास्त्रीय संशोधनाला आरंभ, ४०, धर्मसुधारणेची लाट व पापाच्या सत्तेला ओहोटी, ४१; सरंजामी पद्धत व तिचे गुण- दोष, ४२; सुधारलेले जुलूम, ४३. प्रकरण ६ वे-भारतीय संस्कृतीचा अखंड विकास भारतीयांची अव्याहत चाललेली परंपरा, ४३, बुद्ध व बौद्ध धर्माचा आशिया खंडभर प्रसार, ४४; जैन धर्म,४५; जैनधर्माचा संकोच, ४६: अहिसा तत्त्व व भक्तिमार्ग, ४६; बुद्धकालीन हिदु संस्कृति, ४७, अशोकाचे साम्राज्य, ४७, परकीयांच्या हिदु- स्थानवर स्वान्या : कुशान साम्राज्य, ४८, सस्सन व आंध्र, ४८; गुप्त साम्राज्य व हर्षाचे साम्राज्य, ४९, दक्षिण हिदुस्थानातील राज्ये : पांड्य आणि चोळ साम्राज्य, ५०, दख्खन : चालुक्य आणि राष्ट्रकूट, ५१; होयसळ राजे, ५१; यादव राजे, ५२; मुसलमानी आणि युरोपियन संस्कृतीचे हिदुस्थानवर साम्राज्य, .
[ ३ ] .. ५२; विजयनगर व वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन, ५२; भार- तीय संस्कृतीर्चा सर्वसंग्राहकता, ५३; जगात पसरलेली हिदुसंस्कृति ओळखण्याच्या खुणा, ५३. प्रकरण ७ वै-शास्त्रीय आणि प्रादेशिक संशोधन व जगावर युरोपियन सत्तेचा प्रादुर्भाव भौतिक शास्त्राचे महत्त्व, ५५; शास्त्रीय शोध, ५६; मुद्रणकला, ५६, बंदुकीची दारू, ५५, भौगोलिक शोध · अमेरिकाखंड आणि हिदुस्थानचा जलमार्ग, ५७, पृर्वाप्रदक्षिणा, ५९ ; जगात युरोपियन वसाहतीना आरंभ, ५९; पोर्तुगीज वसाहती, ५९; अमेरिकेत स्पॅनिश वसाहती, ६०, इंग्रज आणि फ्रेच वसाहती, ६१, आशियांत रशियन वसाहत, ६१. प्रकरण ८ वे-औद्योगिक क्रांतीचे युग ६२-६७ मुधारणेर्चा झपाट्याने प्रगति, ६२, वाफेची शाक्ति, ६२; आग- गाड्या, ६३, आगबोटी, ६४, विद्युत्शक्ति, तारायंत्र, ६४, टेलिफोन, ६५, लोखंड आणि कोळसा, ६५, विमान, ६६, जास्त अन्नाचा पुरवठा, ६६, व्यापारी चढाओढ, ६७ प्रकरण ९ वे-राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय. ६७-७७ लोकसत्ताक राज्य, ६७, अमेरिकेत राज्यक्रांति, ६८, फ्रेंच राज्यक्रांति, ६९, फ्रेंच राज्यक्रांताची कारण, फ्रेंच लोक- शाही, ७१; नेपोलियन, ७२; राष्ट्रसंघाचा अवतार, ७३; पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतीचा लढा, ७४; जपानचा अभ्युदय, ७५; आफ्रिकेत युरोपियन वसाहती, ७५; ऑस्ट्रेलिया खंडांत वसाहती, ७६; परदेशगमनाची आवश्यकता, ७७. प्रकरण १० वे-नवविचारप्रवर्तक युग विश्वबंधुत्व, ७८; हिदुस्थानांतील एकराष्ट्रीय भावना, ७९, समाजसत्तावाद, ८०; रशियन कम्युनिस्ट व समाजसत्ता, ८०, स्त्रांस्वातंत्र्य, ८१; स्वावलंबी वांशिक्षण, ८२, बौद्धिक सुधारणा, सक्तीचे शिक्षण, ८२, शिक्षणवाढीचा परिणाम, ८३; वर्तमानपत्र व लोकजागृति, ८३, मानवी खातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य, ८४. , ..
[४] ... ... कोर्ट, ८५, प्रकरण ११ वे-जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ राष्ट्राराष्ट्रांतील चुरस व ती थांबविण्यासाठी उपाय : सार्वराष्ट्रीय गेले महायुद्ध, कारणे, , ८७, यांत्रिक युद्ध : शास्त्र- ज्ञानाचा दुरुपयोग, ८७; महायुद्धाचे परिणाम, ८८; राष्ट्रसंघाचा उदय, ८९; जागतिक शांततेच्या कामी राष्ट्रसंघाचा उपयोग,९०. उपसंहार-मानवी संस्कृतीचे भवितव्य मनुष्याची सुधारणाप्रवृत्ति, ९१, भविष्य कालीन जगाचा विकास, ९२. परिशिष्ट १-मानववंश परिशिष्ट २-भाषावंश ९५-९७ परिशिष्ट ३-जगांतील धर्म... ... ९८ ...
मानवी संस्कृतीचा इतिहास
No text on this page.
उपोद्धात संस्कृति म्हणजे काय? संस्कृति हा शब्द अलीकडे इंग्रजी 'सिव्हिलिझेशन ' याला प्रति- शब्द म्हणून वापरण्यात येतो. सिव्हिलिझेशन याचा संस्कृतीची व्याख्या व्यापक अर्थ धर्म, आचार, विचार, नीति, बुद्धि इत्यादि सर्व बाबतीत सुधारणा किंवा प्रगति. तेव्हां संस्कृति म्हणजेहि हीच सर्वांगीण प्रगति होय. अखिल मानव जातीची संस्कृति लक्षांत घेणे झाल्यास, जगांतील सर्व लोकराष्ट्र आणि जाती यांची सामाजिक, धार्मिक, नैतिक, बौद्धिक आणि राजकीय सुधारणा अगदी आरंभा- पासून आतापर्यंत कसकशी होत गेली आहे व तिच्या अनुरोधानें सृष्टीच्या उत्पत्तिकालापासून आजतागायत मानव समाज कसा बनत आला आहे हे पाहिले पाहिजे. वस्तूंवर अंतर्बाह्य जो संस्कार घडतो ती त्याची संस्कृति होय. या दृष्टीने पहातां, प्रत्येक प्राणिमात्राची व तसेच समा- संस्कृतींची तुलना जाची संस्कृति भिन्न भिन्न असणार यांत संशय नाही. तथापि एक सबंध जात, समाज किंवा राष्ट्र घेऊन त्याची संस्कृति शोधावयाची व ती दुसऱ्या राष्ट्राच्या संस्कृतीशी ताडून पहा- वयाची असा प्रकार नेहमी करण्यात येतो. याचे कारण असे करणे सुलभ व फायद्याचे असते. संस्कृतिसंशोधनाचे घटक लोकराष्ट्र असून या राष्ट्रांच्या स्वतंत्रपणे बनलेल्या संस्कृती संशोधक पंडित फार बारका- ईने पहातात व त्यांवरून एकमेकांशी तुलना करून कोणत्या राष्ट्राची संस्कृति हलकी व कोणती श्रेष्ठ हे ठरवितात.
vMAANA noNNIA An". hd मानवी संस्कृतीचा इतिहास MA- AMMAM" आतां अखिल मनुष्यजातीची संस्कृति ठरवितांना जे लोकराष्ट्र अत्यंत पुढारलेले असेल त्याचीच संस्कृति मानवी आजची संस्कृति संस्कृतीची आजची परिणति किंवा शेवटची अवस्था घरावी लागेल. मध्य आफ्रिकेतील काही लोकसमाज अगदी रानटी स्थितीत आहेत म्हणून आजकालचा सर्व मानवसमाज रानटी आहे असे म्हणतां यावयाचे नाही. जगांतील सर्वच लोकसमाज एकाच चालीने चालत नसतात. काही समाज संस्कृतीच्या बाल्या- वस्थेत तर काही प्रौढावस्थेत असतात. तेव्हां मानवी संस्कृतीचा इति- हास देतांना, जगदुत्पत्तीपासून चालू शतकापर्यंत निरनिराळ्या काळांत जी राष्ट्रं पुढारली व जे नवीन शोध निघाले व त्यामुळे सुधारणेत भर पडली त्यांचीच माहिती प्रामुख्याने लिहावी लागेल. २ प्रकरण १ लें संस्कृतीचा उदयकाल ज्या या पृथ्वीच्या पाठीवर मनुष्याची हालचाल चालली आहे ती आहे तरी केवढी याचा काही अंदाज आपणांला पृथ्वीची कल्पना असणे जरूर आहे. एकंदर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अदमासे वीस कोटी चौरस मैल भरेल. तथापि एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाचा पाव हिस्साच काय तो जमिनीच्या वाट्याला आला आहे. तेव्हां सुमारे ५ कोटी चौरस मैल जागेवर मनुष्यप्राणी नांदत आहे व बाकीचा पृष्ठभाग पाण्यात बुडालेला आहे. पृथ्वीवर सर्व प्राणी आणि वनस्पती एकदम एकाच वेळी निर्माण झालेल्या नाहीत. प्रथम समुद्रांत माशांसारखे प्राणी सजीव पृथ्वी व उत्प त्तीचा इतिहास उत्पन्न झाले, मग जमिनीवर वृक्षवनस्पती आणि सरपटणारे प्राणी उत्पन्न झाले, व शेवटी पक्षी आणि सस्तन प्राणी उत्पन्न झाले असे शास्त्रज्ञ सांगतात. सस्तन प्राण्यांत सुद्धां मनुष्यप्राणी प्रथम निर्माण झालेला नव्हे तर बहुधा शेवटी झाला असावा असें म्हणतात. हा मनुष्योत्पत्तीचा काल दहा लाख वर्षांपूर्वीचा तरी आहे खास. हे व यासारखींच पृथ्वीवरील अति प्राचीन जीवजंतूंच्या अस्ति- त्वाची अनुमाने काढण्याला खरेखुरे आधार सांपडले आहेत. हे आधार म्हणजे खडकांवरील प्राचीन प्राण्यांचे अवशेष व खुणा होत. यांखेरीज शिंपा, तंतू, फळे, पावलांचे ठसे, ओरखडे वगैरे अनेक ३ Aman-~~- मानवी संस्कृतीचा इतिहास ~~~~~ साधनांवरून संशोधक पृथ्वीवरील प्राचीन घटनांची कल्पना बांधीत असतात. असो. आज उपलब्ध असणाऱ्या अवशेषांवरून सुमारे चाळीस पन्नास आद्य संस्कृति व सुधार- हजार वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीची काही जेची युगे कल्पना येते. इतक्या प्राचीन काळीहि सर्व माणसें एकाच वंशाची किंवा वर्णाची नसावीसे वाटते. आज ज्या- प्रमाणे पांढरे (आर्य), काळे ( नीग्रो), पिवळे ( मंगोली ) इत्यादि वर्णभेद आपण पाडतों त्याचप्रमाणे त्या वेळी कांहीं दोनतीन तरी वर्ण- (वंश )भेद असावेत. त्या वेळचे लोक शिंपांच्या माळा करून गळ्यांत घालीत, हाडांदगडांच्या मूर्ती करीत व रंगीत चित्रेहि काढीत. यालाच संकृतीचा उदयकाल म्हणता येईल. या वेळी मनुष्य दगड तासून केलेली हत्यारे वापरीत असे, म्हणून या युगाला पाषाणयुग म्हणतात. या युगांतील माणसें पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली आढळतात व सर्व मानवजातीची हीच एक आद्य संस्कृति सर्वसामान्य आहे; पुढे वेगवेगळे मानवसमाज वेगवेगळ्या काळी सुधारत गेले व त्यामुळे सर्वांची संस्कृति केव्हांहि एक राहिली नाही. पाषाणयुग किंवा अश्मायुधयुग हे मानवी संस्कृतीचे आधयुग आहे. या युगाचे पुन्हां त्यांतील सुधारणांच्या अवस्थानुरूप दोन भाग पडतात : पुरातन पाषाणयुग व नूतन पाषाणयुग. पहिल्या युगांत मनुष्य शिकार करून रहात असे. त्याच्या शिकारीची हत्यारे म्हणजे दगड, धनुष्यबाण अद्याप त्याला करितां येत नव्हता; तसेच जनावरें पाळण्याचे व त्यांचा उपयोग करण्याचे पाषाणयुगः पुरातन व नूतन ४ ...... संस्कृतीचा उदयकाल त्याला माहीत नसावेसे दिसते. त्या काळी गवे व तट्टे असत पण कुत्रे मात्र नव्हते. शेतकी करणे किंवा घरे बांधणे ही कला त्याला अव- गत नव्हती, एवढेच नव्हे तर स्वयंपाकाची भांडीसुद्धा त्याला करितां येत नसत; मग टोपल्या किंवा कापड विणणे कोठून येणार ? तो कधीं पांघरावयास कांतडी घेई; एव्हवीं नागवाच फिरे. पुढे पुढे नद्या- सरोवरें अस्तित्वात आल्यावर तो मासे मारून खाई. त्याला इतर कला- कसुरींची कामेंहि थोडथोडी येऊ लागली. त्याने केलेल्या हाडाच्या सुया बऱ्याच पुढच्या कालांतील रोमन लोक करीत असलेल्या सुयां- पेक्षां चांगल्या ठरतात. या पुरातन पाषाणयुगीन लोकांप्रमाणेच संस्कृतीच्या अगदी बाल्यावस्थेत असलेले लोक परवांपर्यंत टॅस्मा- नियांत दिसत असत. इतर सुधारत चाललेल्या जगापासून अनेक शतके ते तुटकल्यामुळे गेल्या शतकापावेतों अगदी रानटी अवस्थेत तसेच राहून गेले होते. मागे पृथ्वीवर चार हिमयुगे होऊन गेली म्हणतात. त्यांपैकी चवथ्या हिमयुगांत पुरातन पाषाणयुगाचा काल त्या वेळचा भूगोल पडतो. यानंतर हिमयुग संपून नूतन पाषाणयुगाला आरंभ होतो. या युगांत मनुष्य बराच सुधारून शेतकी करावयास लागतो व जनावरेंहि पाळतो असे दिसते. त्याची हत्यारे पूर्ववत् तासीव दगडाची असली तरी ते दगड घासून सुंदर व एकसारखे गुळगुळीत केलेले असत. टोपल्या विणणे, झाडांचे दोर काढून भरड का होईना पण कापड तयार करणे, ओबडधोबड भांडी बनविणे या- सारख्या कला त्याला अवगत झाल्या. पाषाणयुगांत, मनुष्यवस्ती नूतन पाषाणयुग व MAAAAmarn.sar मानवी संस्कृतीचा इतिहास VAR आरंभी युरोपखंडाच्या आग्नेयभागांत असून हवामानांत इष्ट फरक जस- जसा होत गेला तसतशी वस्ती पूर्वेकडे आणि उत्तरेकडे पांगत गेली. येथे असें एक लक्षात घेणे जरूर आहे की, मागें पृथ्वीच्या पाठीवरील जमीन आणि पाणी यांची विभागणी व स्थाने नेहेमी एकसारखींच होती असे नसून, ज्या ठिकाणी आज जमीन दिसते त्या ठिकाणी पूर्वी समुद्र होता किंवा उलट ज्या ठिकाणी आज समुद्र आहे त्या भागांत पूर्वी एकदां जमीन होती, अशी अनेकदां अनेक स्थित्यंतरें झाली आहेत. उदाहरणार्थ, पुरातन पाषाणयुगांत भूमध्यसमुद्राच्या ठिकाणी एक मोठी दरी होती ती नूतन पाषाणयुगांत (सुमारे इ. स. पूर्वी १०,००० वर्षे ) पाण्याने भरून आजच्या समुद्राच्या स्थितीला पोहोचलो. कॅस्पियन समुद्र आजच्या इतका लहान नसून काळ्या समु- द्राला जोडला गेला असला पाहिजे. म्हणजे त्या काळी मध्य आशिया- खंडांत एक मोठा समुद्र असून त्याच्या भोवतालचा प्रदेश अत्यंत सुपीक असल्याने मनुष्यवस्ती या क्षेत्रांत विशेष असावी. आशिया व अमेरिका ही खंडें बेहरिंगच्या सामुद्रधुनीपाशी जोडलेली असून या दोन्ही खंडांचे एकमेकांशी दळणवळण होत असावे यांत शंका नाही. मनुष्याचा व्यवसाय जसजसा बदलत चालला तसतशी त्याची रहाणीहि बदलू लागली. ज्या वेळी प्राण्यांची माणि रहाणी यांत शिकार करून तो उदरनिर्वाह करी त्या वेळी ज्या कालमानानें बदल ठिकाणी पुष्कळ प्राणी आढळतील अशाच रानावनां- तून तो रहात असे व प्रत्येकाच्या वाट्याला भरपूर शिकार यावी म्हणून त्या वेळची माणसे एकमेकांपासून अतिशय दूरदूर रहात असली - मनुष्याचा व्यवसाय ६ 7 संस्कृतीचा उदयकाल पाहिजेत. पुढे प्राणी मारून दिवस कंठण्याचे सोडून देऊन मनुष्य गवत खाणारे प्राणी बाळगू लागला व या पाळलेल्या प्राण्यांपासून तो आपल्या अडचणी दूर करून घेई. त्याच्या ग्रामपशुंना खाण्यास गवत लागे म्हणून तो माळरानावरच राहूं लागला. यानंतर त्याची प्रगति होऊन तो शेतकी करू लागला. खाण्यापिण्यासाठी व वस्त्रप्रावरणासाठीं तो जान आणि हवापाणी पाहून निरनिराळ्या वृक्षवनस्पती वाढवू लागला. पुढे या धंद्यात सुधारणा करून तो कांहीं जातींच्या गवतांपासून तांदूळ, गहूं, बाजरी वगैरे धान्य पिकवू लागला. त्याचप्रमाणे फळझाडांवरहि प्रयोग करून मधुर रसाळ फळे तयार करूं लागला. बऱ्याच वर्षांच्या व बऱ्याच जणांच्या अनुभवांनी कोणकोणत्या वृक्षवनस्पती मनुष्याच्या उपयोगी आहेत हे ज्ञान मनुष्यप्राण्याला प्राप्त झाले. यापुढची सुधार- णेची पायरी म्हणजे जमिनीच्या पोटांतून धातू काढून त्यांच्या वस्तू बन- विणे व त्यांची देवघेव करणे ही होय. त्याला या पायरीवर येण्यास किती- तरी शतकांचा काळ लोटला असला पाहिजे. मनुष्येतर प्राण्यांसारख्या जंगली अवस्थेतून सुटून एकमेकांत व्यापारव्यवहार करण्यालायक संस्कृतीपर्यंत, म्हणजे आद्य पाषाणयुगाच्या प्रारंभापासून लोहयुगापर्यंत पोहोचण्यास मनुष्याला कितीतरी प्रयास पडले असले पाहिजेत व त्याच्या कितीतरी पिढया या सर्व प्रयोगांत गारद झाल्या असतील याची आज बरोबर कल्पनाहि येणे कठीण आहे. तथापि इतकें तरी उघड होईल की, मनुष्यप्राणी आपल्या सुखासाठी सुधारणेचा अवलंब करीत होता व तसे करतांना त्याला मूळची नैसर्गिक रहाणी कष्टाने बदलावी लागत असे. US मानवी संस्कृतीचा इतिहास मनुष्याचे सामाजिक जीवन कसे बनत गेलें हेहि पहाणे आवश्यक व मनोरंजक आहे. ज्या वेळी जनावरांसारखें रहाण्याचे सामाजिक जीवनाची आवश्यकता उत्पन्न सोडून मनुष्य झोपडी बांधून राहूं लागला, त्या वेळे- झाली पासून कौटुंबिक जीवनास व मालमत्तेच्या कल्पनेस सुरुवात झाली. कुटुंबांत स्त्रियांनी कोणती कामें करावीत व पुरुषांनी कोणती उरकावीत यांसंबंधी आपआपसांत सहकारितेच्या तत्त्वावरच वाटण्या झाल्या. प्रत्येकास कुटुंबाचा अभिमान या वेळी जाणवू लागला असला पाहिजे. कौटुंबिक रहाणीमुळे माणसाच्या शरिरावर व मनावर सुखदायी परिणाम होऊ लागला व सुखाची आवश्यकता उत्पन्न झाली. पण हीच सुखलालसा भांडणतंट्याला मुख्य कारण होऊन बसली ! तसेंच रहाणी आणि वस्ती एकच असल्यामुळे सर्वांच्या चालीरीती आणि स्वभाव एकाच धर्तीचे बनून गेले. त्या वेळच्या समाजाच्या करमणुकीच्या गोष्टी म्हणजे गाणे आणि नाचणे होत. या बाबतीत लोकांकडून जास्त शाबासकी कोण मिळवितो, यासंबंधी चढाओढ साहजिकच सुरू झाली. सर्वांनाच या कलांमध्ये सारखें नैपुण्य मिळवितां येणें शक्य नसल्याने समाजांत विषमता उत्पन्न झाली व तिच्या मागोमागच गर्व, तिरस्कार, असुया यांसारखे दुष्ट विकार माणसाच्या मनांत शिरले. स्वतःची किंमत कळण्याइतका अहंकार उद्भूत झाला तेव्हां सभ्य वर्तणुकीची अपेक्षाहि आली. या सर्वांचा परिणाम म्हणजे भांडणे आणि सूड यांची अव्याहत परंपरा. अशी परिस्थिति असतांहि या वेळचे हे साधे सामाजिक जीवनच मानववंशाच्या आज- तागायतच्या जीवनश्रेणीत अत्यंत सुखाचें म्हणता येईल. कारण कोणी ८ संस्कृतीचा उदयकाल ज्या कोणावर अवलंबून नसे, प्रत्येक माणूस आपआपला धनी. पण हे स्वातंत्र्य संस्कृतीची वाढ होत गेली तसे कमीकमी होत चाललें. वेळी दुसऱ्याची मदत घेणे श्रेयस्कर वाटलें व तसेंच दोन माणसांना पोसणे हे फायद्याचे दिसलें त्या वेळींच माणसामाणसांत कमजास्त दर्जा उत्पन्न झाला, मालमत्ता होऊ लागली व मजूरवर्ग निघाला. तथापि पूर्वी ज्या जागी रान दिसत असे त्या जागी आतां शेतें डुलू लागली. पण या शेतांच्या पिकांबरोबर दास्याचेंहि पक होऊ लागले व माणसाच्या हीन दशेला प्रारंभ झाला! कारण, मनुष्याला धातू शोधून उपयुक्त जिन्नसा तयार करितां येऊं लागल्या व शेतकींतहि तो तरबेज झाला खरा, पण सामाजिक बंधने त्याच्या प्रगतीचा परिणाम मात्र अहितकर दिसू लागला. तरी ही अहितता नाहीशी करण्यासाठी सामाजिक बंधने ऊर्फ कायदे निघाले. या सामाजिक कायद्यांमुळे नैसर्गिक स्वातंत्र्य पार गेलें व माणसामाणसांमधील विषमता जास्त जास्त वाढण्याला मदत झाली खरी; पण त्यास इलाज नव्हता. असो. अशा रीतीने सर्व जमातीतून सामाजिक बंधनें हळू हळू निर्माण राजकीय बंधने, राजे झाल्यावर राजकीय बंधनांची आवश्यकता साहजि- व राज्यक्रांत्या कच भासू लागली. कारण एरव्ही जमातीचे रक्षण करावयाचे कसे ? तेव्हां जे जमातीचे पुढारी तेच राजे होऊन बसले व माणसांतील विषमतेचा कळस झाला! पुढे राजे जेव्हां अति जुलुमी होऊन त्यांना ज्यांनी राजे केले त्या माणसांनाच छळू लागले, तेव्हां पुन्हां सामान्य माणसामाणसांत समता उत्पन्न होऊ लागली. पण ही समता ९
मानवी संस्कृतीचा इतिहास
~~~~~
~~~~~
~~
केवळ त्यांची क्षुद्रता आणि दुर्बलता या बाबतीतच! तेव्हां साहजिकच
माणसांनीच केलेले सामाजिक, राजकीय कायदे माणसें मोडूं लागली.
बळी तो कान पिळी असे होऊ लागले व जुलुमी राजांना गादीवरून
खाली ओढण्यांत माणसांची एक जूट दिसू लागली. पुढील इतिहासांत
भशा त-हेचे प्रकार अनेक वेळां झालेले दिसतील. स्वातंत्र्य संपादणे
आणि गमावणे या बाबतीत माणसामाणसांत झालेल्या चुरशी, लढाया व
क्रांत्या यांनीच एकंदर जगाचा इतिहास भरून गेलेला आढळणार आहे.
में
प्रकरण २
प्राचीन संस्कृतीची राप्टें
या पृथ्वीच्या पाठीवर आतापावेतों होऊन गेलेल्या राष्ट्रात ज्यांची
संस्कृति अतिप्राचीन अशी आढळते ती राष्ट्र दोनचः
प्राचीनतम राष्ट्र
मिसरी आणि बाबिलोनी. या दोन प्राचीनतम
राष्ट्रांपैकी पुन्हां जास्त प्राचीन कोणते हे निश्चितपणे सांगता येत नाही.
कारण दोघांचेहि प्राचीन अवशेष समकालीन सांपडले असून त्यांपासून
निघणारा इतिहासहि सारखाच प्राचीन आहे. तेव्हां प्रथम मिसर ऊर्फ
ईजिप्त राष्ट्राकडे वळू.
अलीकडे इतिहास-संशोधनार्थ ज्या विलक्षण खटपटी चालतात,
त्यांमुळे जगाचा इतिहास बराच मागेमागे जाऊं
मिसर ऊर्फ ईजिप्त
लागला आहे. ईजिप्तचा इतिहास असाच मागे जाऊन
आज खि. पू. पांचसहा हजार वर्षांपर्यंत भिडला आहे. इतक्या प्राचीन
१०
प्राचीन संस्कृतीची राष्ट्र काळीहि ईजिप्त बरेंच सुधारलेले होते असे दिसते. शिल्पकलांमध्ये मिसरी लोक फार निष्णात होते, असे म्हणण्याला प्रत्यक्ष पुरावे सांप- डले आहेत. मिसरी चित्रकला, मूर्तिकला आणि बांधकाम ही विशेष सुबक व उठावदार होती असें उपलब्ध अवशेषांवरून ठरते. कारागिरांची हत्यारें, लढाईची शस्त्रास्त्रे व शेतकी आणि इतर धंद्यांची आयुधे साधारणतः हल्लींच्या धर्तीवरच असलेली आढळतात. या कलांचा विकास हळू हळू कसा होत गेला, हेहि संशोधलेल्या वस्तूंवरून कळून येते व त्यांचा कालहि लावतां येतो. हिंदुस्थानवर स्वारी करणाऱ्या शिकंदर बादशहाच्या वेळेपर्यंत इजिप्तमध्ये ३१ राजघराणी होऊन गेली व त्यांचा मिसरीराजघराणीं इतिहास साधारण संगतवार सांपडला आहे. पहिल्या राजघराण्याचा संस्थापक मेनीस होता; यानेच मिसर देशचे एकीकरण केलें. अॅबिडॉस या गावी या पहिल्या राजघराण्याचे अवशेष सांपडले आहेत. पुढील राजघराण्याच्या कारकीर्दीत सुप्रसिद्ध मनोरे बांधण्यांत येऊ लागले. हे मनोरे म्हणजे राजांची कबरस्थानेच होत. ईजिप्त- मधील आज पहाण्यालायक पुतळा म्हणजे “ स्फिक्स " ( स्त्रीमुखी सिंह ) होय; पण हे स्फिक्सचे देवालय वरील काही मनोऱ्यांच्या वेशीवर महाद्वारासारखें बांधलेले आहे. खि. पू. १५०० पर्यंत एकंदर सतरा राजघराणी होऊन गेली. प्रत्येक राजघराण्याच्या अमदानींत विशिष्ट शिल्पकामें होत व त्यांवरून त्या घराण्याचे आज स्मारक राहिले आहे. अठराव्या घराण्यापासून ईजिप्तच्या नवीन साम्राज्यास आरंभ होतो; कारण या वेळी देशांत मोठ्या जोराची ११ मानवी संस्कृतीचा इतिहास ....- देशाभिमानाची लाट उसळून परकीय सत्तेविरुद्ध झगडण्याची पात्रता लोकांत आली व हिक्सॉस नांवाच्या सेमिटिक धनगर राजांना त्यांनी हांकून लावलें ( सुमारें खि. पू. १६०० ). यापुढे अत्यंत वैभवशाली अठरावें राजघराणे आलें. जगाच्या इतिहासांत प्रथमच ज्या देशांत रानटी खेडवळ रहाणी टाकून शहरासारख्या सुधारलेल्या परिस्थितीत सुमोरिया रहाणारे लोक आढळतात असा ईजिप्तखेरीज दुसरा देश म्हणजे सुमेरिया किंवा दक्षिण मेसापोटेमिया होय. त्या प्राचीन काळी टायग्रीस आणी युफ्रेटीस या प्रसिद्ध नद्या एकमुखाने इराणी आखातांत पडत नव्हत्या. या नद्यांमधील दुआबांत सुमेरियन लोक शहरे वसवून रहात होते. हे सुमेरियन लोक चांगले साक्षर आणि कलासंपन्न होते. त्यांनी उच्च दर्जाचे वाङ्मय संपादिले व भौतिक शास्त्रांतहि बरीच प्रगति केली. त्यांचे ग्रंथ हल्लींप्रमाणे कागदांवर लिहिलेले नसून ( कारण त्या वेळी आजच्या कागदाचा शोध नव्हता), चिकणमातीच्या विटांवर खिळ्यांनी खोदलेले होते. मिसरी लोकांप्रमाणे पापीरसनामक लव्हाळ्याच्या पत्रांवरहि ते लिहीत. त्या काळची लिपि म्हणजे वस्तूंची चित्रे काढणे. लेखनकला जरी नूतन पाषाण- युगापूर्वीची असली तरी लोकांत अक्षरलिपि रूढ होण्यास फार काळ लोटावा लागलेला दिसतो. सुमेरियांत ईजिप्त देशांतल्याप्रमाणे प्रत्यक्ष चित्रलिपि नव्हती तरी लिहिण्याच्या खुणा पाचरीच्या आकाराप्रमाणे दिसत; याचे कारण लिहिण्याची लेखणी विशिष्ट त-हेची असल्याने अशा पाचरी खुणा वठत. तेव्हां बाबिलोनी लिपीला कीलाकृति किंवा प्राचीन संस्कृतीची राष्ट्र ~~~~~ •~ ~~ NANA vive. पाचरीलिपि म्हणतात व मिसरी लिपीला चित्रलिपि किंवा भिक्षुकी- लिपि म्हणतात. पुढील सुधारलेल्या राष्ट्रातील लिपी या दोन लिपींच्या संयोगासून तयार झालेल्या आहेत यांत शंका नाही. चीन जपान- सारख्या राष्ट्रांत अद्यापिहि चित्रलिपि जीव धरून आहे. गणित आणि ज्योतिषशास्त्रांत बाबिलोन फार पुढे गेले होते हैं, तेथील ग्रहांचे वेध, ग्रहणें वर्तविणे, वार्षिक पंचांग बाबिलोनी संस्कृति तयार करणे, द्वादशमानपद्धति, यंत्रे वगैरे गोष्टींवरून सहज सिद्ध होते. सोने, रुपें, तांबे, कांसें, रत्नें ही बाबिलोन्यांना माहीत होतीं, एवढेच नव्हे तर या वस्तू त्यांच्या अप्रतिम कलाकौशल्याचे विषयच होत. तेथे पारदर्शक कांचहि तयार होत असे. विणकाम आणि भरत- काम यामध्ये येथील लोकांचा हातखंडा होता. सारांश, या बाबिलोनी लोकांस अठरा एकोणीसाव्या शतकांतल्या सुधारलेल्या लोकांइतकें सर्व गोष्टींचे ज्ञान होते असे म्हणावयास दिक्कत वाटत नाही. लि. पू. ५००० वर्षांपूर्वी बाबिलोनियांत एकच साम्राज्य नसून अनेक नगरराज्ये होती. प्रत्येक नगराचें स्वतंत्र बाविलोनी राष्ट्रे व राज्य असून त्यावर राजकीय आणि धार्मिक सत्ता त्या नगरांतील देवतेच्या पुजाऱ्याची असे. केंगी, किश, गिश्वन, शिर्पल, ऊर वगैरे नगरराज्ये इतिहासप्रसिद्ध आहेत. बाबिलोनियांत सुमेर आणि अक्कड ही दोन अनुक्रमें दक्षिण आणि उत्तर प्रांतांतील मोठी राजधानीची शहरे होती. या शहरांवरूनच त्या वेळच्या बाबिलोनी लोकांना सुमेरियन किंवा अक्कडियन म्हणण्यात येते. हे लोक सेमेटिक मात्र नव्हते. पण पुढे खि. पू. ५०००-४००० या १३ सेमेटिक वंश मानवी संस्कृतीचा इतिहास काळामध्ये केव्हां तरी अरबस्तानातील सेमेटिक वीरांनी बाबिलोनिया पादाक्रांत करून आपली राज्य स्थापिली. तेव्हां यापुढचे बाबिलोनी लोक मात्र सेमेटिकवंशीय होत यांत शंका नाही. या सेमेटिक बाबिलोनी लोकांमध्ये सार्गन नांवाचा एक सुप्रसिद्ध योद्धा होऊन गेला (सुमार खि. पू. २७५०). चाबिलोनी साम्राज्य- खम्भुरम्बीचे कोड त्याने इराणी आखातापासून तो भूमध्यसमुद्रापर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून एक मोठे साम्राज्य स्थापिलें. त्याने आपल्या राज्यांत सुमेरी लिपि आणि भाषा सुरू केली व मूळच्या सुमेरी लोकांची संस्कृति जशीच्या तशी उचलण्याचा प्रयत्न केला. पण हे सार्गनचें साम्राज्य त्याच्यामागून सुमारे दोनशे वर्षांतच नष्ट होऊन एका नवीन सेमेटिक लोकांचे वर्चस्व सुमेरिया प्रांतावर बसलें. हे नवीन लोक अमोराईट होत. त्यांनी बाबिलोन या त्या वेळी अगदी लहान असलेल्या गांवीं आपली राजधानी नेली. तेव्हां या वेळेपासूनच बाबिलोनी साम्राज्याचा खरा प्रारंभ झाला म्हणावयाचा. याच अमोराईट घराण्यांत जगप्रसिद्ध खम्मुरब्बी ( किंवा हम्मुरबी ) नांवाचा पहिला ऐतिहासिक स्मृतिकार ( कायदे करणारा ) होऊन गेला (सुमारे खि. पू. २०००). त्याचे 'कोड' हे तत्कालीन बाबिलोनियाची एकंदर समाजरचना उत्तम रीतीने दाखविते. आधुनिक कायदेपद्धतीबरहुकूम न्यायदानाच्या आणि समाजसुव्यवस्थेच्या सर्व गोष्टी या कोडांत आढळतात. जमिनीची नीट विभागणी, कालवे, व्यापारास उत्तेजन, टपालखातें, धनी आणि नोकर यांमधील संबंध, कुटुंबांतील माणसांचे हक्क, मालमत्तेची विल्हेवाट या सर्वाविषयी कायद्याची कलमें खम्मुरब्बीच्या ~~ प्राचीन संस्कृतीची राष्ट्र कोडांत मोठ्या मुत्सद्दीपणाने घातलेली आहेत व त्यांचेच अनुकरण पुढील स्मृतिकारानी केलेले दिसते. खम्मुरब्बीनंतर खि. पू. १५०० पर्यंत बाबिलोनियांत तीन राजवंश होऊन गेले. असुरिया प्रांत प्रथम बाबिलोनी साम्राज्याच्या कक्षेत होता. असुरचे मुख्य उपाध्यायच असुरियाचे राजे असत. निनेव्हे हे असुरियाचे राजधानीचे शहर लि. पू. ३००० सुमारासहि नावाजलेले आढळून येते. तथापि खि. पू. १५०० पर्यंत असुरियाचा इतिहास फारसा अवगत नाही. मिसरी आणि बाबिलोनी संस्कृतीइतकीच महत्त्वाची ईजियन संस्कृति होय. युरोपियन संस्कृतीच्या मुळाशी हीच संस्कृति इजियन संस्कृति असून क्रीट बेट हे या संस्कृतीचे केंद्र गणले जाते. क्रीटमधील कोसस गांवीं सांपडलेल्या अवशेषांवरून या ईजियन संस्कृतीविषयीं अशी माहिती मिळते की, या भागांत कांहीं सुधारलेली स्वतंत्र राष्ट्र होती. त्यांत सर्व कलांची पूर्ण वाढ झालेली होती. इतर लोकांचा फारसा उपद्रव नसल्याने ईजियन लोक लवकरच रानटी अवस्थेतून वर निघून मिसरी, असुरी वगैरे राष्ट्रांशी दळणवळण ठेवू लागले. खि, पू.२५०० सुमारास क्रीट हे सुधारणेच्या कळसास पोहोंचलेले दिसते. क्रीटच्या सम्राटाला मायनास म्हणत. त्याच्या राजवाड्यांत पाणी खेळ. वलेले असून स्नानगृहे, मेजें, आसनें, नृत्यागारे वगैरे तत्कालीन कोणत्याहि राष्ट्रांत न सांपडणाऱ्या सुखसोयी होत्या. खेळांचे सामने, बैलांच्या झुंझा, मुष्टियुद्धे, द्वंद्वयुद्धे, नाच वगैरे करमणुकीचे प्रकार चालू होते. भाजलेल्या मातींची चित्रे करणे, भांड्यांवर चित्रे रंगविणे, जडावाचे काम सुबक उठविणे, पूल बांधणे, सुंदर कपडे बनविणे वगैरे गोष्टीत इंजियनांचा १५ मानवी संस्कृतीचा इतिहास हातखंडा असे. यांची लिहिण्याची लिपिहि अगदी वेगळीच होती. लोक सृष्ट वस्तूंची उपासना करीत. राजा हाच त्यांचा धर्मगुरु असे. शहरांना तटबंदी आढळत नसल्याने त्या वेळी या राष्ट्रांत बरीच शांतता होतीसें दिसते. पुढे फोनिशियन आणि ग्रीक लोकांची सत्ता भूमध्यसमुद्रावर बसत चालल्यावर कोसस शहराला तटबंदी करण्यांत आली. खि. पू. १५०० च्या सुमारास क्रीटवर रानटी लोकांनी स्वारी करून ईजियन संस्कृतीचा हास करण्यास प्रारंभ केला. मिसरी, असुरी आणि ईजियन संस्कृतींचा नाश घडवून आणणारे लोक म्हणजे प्रमुखत्वाने आर्य होत. हे आर्य लोक आर्यवंश व मूळची आयांची रहाणी मूळ जगाच्या कोणत्या भागांतून आले, यासंबंधी अद्याप एकमत नाही. मध्य आणि आग्नेय युरोप, मध्य आशिया, आणि उत्तर ध्रुव अशा तीन भागांपैकी कोठल्यातरी एकावर आर्य लोक मूळ रहात होते. हे मूळचे आर्य स्थायिक वृत्तीचे नसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत जात. त्यांच्या बरोबर गुरेढोरे असून हल्लीच्या वड्डार लोकांप्रमाणे त्यांची रहाणी असे. ते शेती करीत तरी एकाच शेतवाडीवर फार दिवस रहात नसत. पीक काढलें की चालले पुढे. त्यांचे पुढारी भिक्षुकवर्गातील नसत तर धाडसी योद्धयांपैकी असत. कांही कुटुंबांकडे वंशपरंपरा पुढारीपण चाले. पुढाऱ्यांच्या दारी त्यांचे अनुयायी रात्रंदिवस पडलेले असत. मेजवान्या, गाणे, करमणुकीचे खेळ, विचारविनियम इत्यादि सर्व गोष्टी पुढाऱ्यांच्या घरी बसून होत. या आर्य लोकांच्या बऱ्याच शाखा होत्या व प्रत्येक शाखेचा वेदां- प्रमाणे परंपरागत इतिहास सांपडतो. १६
No text on this page.
ww मानवी संस्कृतीचा इतिहास " A.MAMANA 40. 14A 1.MAMAn.. इराण देश खि. पू. १५०० च्या पूर्वीचा इराणचा इतिहास उपलब्ध नाही. प्राचीन पशु किंवा इराणांतील पशु आणि हिंदुस्थानांतील भारतीय याचे संबंध बरेच दृढ होते, याचे पुरावे या काळांत सांपडतील. या वेळी पृथू, पशु, मग आणि मीड या जाती इराणांत असून पश्चिमेकडे इराण्यांनी आक्रमण चालविलेले दिसून येते. साधारणत: खि. पू. ९ व्या शतकापासून इराणच्या प्रत्यक्ष इतिहासास आरंभ होतो. या कालापूर्वीचा इतिहास अज्ञात आहे. हिंदुस्थानांत आर्य शिरण्यापूर्वी तेथे मूळ वस्ती करून राहिलेले बरेच निरनिराळे लोक होते. त्यांपैकी प्रमुख म्हणजे हिंदुस्थानांत आर्यांची वसाहत, प्राचीन द्रवीड लोक होत. हे द्रवीड बरेच सुधारलेले भारतीय संस्कृति असून त्यांनी बहुतेक हिंदुस्थान व्यापला होता. पण आर्य लोक जास्त कणखर व हुषार असल्याने त्यांनी थोड्याच काळांत द्रवीड लोकांना मागे मागे हटवीत आपण उत्तर हिंदुस्थानचे मालक बनले. या काळच्या आर्यांचे प्रत्यक्ष अवशेष कांही नसले तरी त्यांच्या अवशिष्ट वेदादि वाङ्मयावरून त्यांच्या संस्कृतीची बरीच कल्पना येते. आर्यांच्या वैदिक ग्रंथांपैकी प्रमुख ऋग्वेदःहोय. याचा काल खि. पू. ४०००-५००० वर्षांइतका असावा. वेदकालीन भारतीय आर्य सर्व विद्या आणि कला यांत प्रवीण होते. ते चांगलेच लढवय्ये असून जिंकलेल्या प्रदेशांवर राज्य करण्याची पात्रताहि त्यांच्या ठिकाणी होती. त्यांच्यांत मोठे गणिती, ज्योतिषी, वेदांती आणि कवीहि अनेक होऊन गेले. व्यापार, उद्योगधदे आणि आंतरराष्ट्रीय दळण- वळण या गोष्टींतहि ते मुळीच मागे नव्हते. त्यांचा पहिला आदर्शभूत १८ varan-~. प्राचीन संस्कृतीची राष्ट्र -~-~~ hd आणि परमपूज्य राजा म्हणजे रामचंद्र होय. त्याचा काल सि. पू. २५०० धरतात. या रामचंद्राचे चरित्र ज्यांत गोंविलें आहे तो रामा- यण ग्रंथ आपणां हिंदूंना फार पूज्य वाटत असून थोर धर्मग्रंथांमध्ये ह्या महाकाव्याला उच्च स्थान दिले जाते. दुसरें हिंदूंचे धार्मिक महाकाव्य महाभारत होय. याच्या सुमारे पन्नास हजार ओळी (चरणे) आहेत. यांत कौरव आणि पांडव यांच्यामधील घडलेल्या प्रचंड युद्धाचा हृदयं- गम इतिहास दिला आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचे सार जी भगवद्गीता तीहि या भारत ग्रंथांतीलच एक लहान भाग आहे. भारतीय युद्धाचा काल खि. पू. १५०० इतका मानण्यात येतो. तेव्हां या काळची भारतीय आर्याची उच्च संस्कृति या महाभारत काव्यावरून प्रतीत होते. भारत काली शेतकी आणि व्यापार वाढून इतर तदनुषंगिक धंद्यांना चांगले उत्तेजन मिळाले. खनिज पदार्थांचा बराच उपयोग मनुष्याच्या सुखसोयींकडे होऊ लागला. शरीरमंडनाकडे समाजाची बरीच दृष्टि वळलेली दिसते; कारण अलंकार आणि मौल्यवान वस्त्रे याचे उल्लेख भारतांत जागजागी आढळतात. स्त्रियांचा दर्जा मात्र वैदिक कालाहून खाली उतरलेला आहे. पुरुपापेक्षा स्त्रीला कमी मानण्यात येऊ लागून पुरुषांच्या सौख्यासाठी स्त्रियांचे जीवित आहे असा सार्वत्रिक उपदेश होऊ लागला. धर्माच्या क्षेत्रांत मात्र मोठीच भर पडली. नवीन देव व त्यांचे अवतार शिरले, आणि सोपा धर्माचार जाऊन त्या ठिकाणी यज्ञा- सारखे मोठे अवडंबर माजलें. तथापि पांडित्यांत भरच पडत गेली यांत शंका नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण्य मात्र कायम झाले आणि त्यावेळेपासून वर्णावांत कलह होण्यास प्रारंभ झाला मानवी संस्कृतीचा इतिहास तो आजतागायत कायम व वाढता आहे. तथापि हे निःसंशय की, या चातुर्वर्ण्याने हिंदुसमाजाची त्या वेळी जी उत्कृष्ट घडी बसविली ती इतक्या शतकांनंतरहि फारशी बिघडलेली नाही. . प्रकरण ३ रें आणखी सांस्कृतिक राष्टे जगांतील आणखी एक अत्यंत जुनें राष्ट्र म्हणजे चीनचे होय. पशूच्या अवस्थेतून चिनी लोकांना बाहेर काढणारा चीन व त्याची संस्कृति चीनचा बादशहा फुही नांवाचा असून तो खि. पू. २८५२-२७३८ या काळांत होऊन गेला असे म्हणतात. या फुहीने लोकांना शिकार करण्यास, मासे धरण्यास व शेळ्यामेंढया राखण्या- सहि शिकविले. त्याने घालून दिलेली चित्रलिपि अद्याप चालू आहे. फुहीप्रमाणे शान-मुंग बादशहाने लोकांना मानवी संस्कृतीचे पुढील घडे दिले. शेतकी व वैद्यकी या दोन उपयुक्त गोष्टी त्याने शिकविल्या. तिसरा संस्कृतिशिक्षक बादशहा हुआंगती होय. याने चीनचे साम्राज्य वाढविलें. वाहनें सर्वत्र सुरू केली. संगीत कलेस पावा वाघाच्या शोध लावून चांगले उत्तेजन दिले. त्याने तयार करविलेल्या पंचांगांत अधिक महिना आहे. रेशमाच्या किड्यांची जोपासना करण्याचा उद्योग त्याच्याच कारकीर्दीत निघाला. यापुढे चीनच्या प्रत्यक्ष इतिहा- सास सुरुवात होते. खि. पू. १५०० च्या सुमारास चीनवर शांग ऊर्फ यिन घराण्याचा अंमल होता. इ. स. १९११ मध्ये प्रजासत्ताक २०
आणखी सांस्कृतिक राष्ट्र
राज्यपद्धति निर्माण होईपर्यंत चीनवर अनेक राजघराणी राज्य
करून गेली. तथापि सांस्कृतिक दृष्टीने चीन अद्यापि फारसें सुधारलेले
दिसत नाही.
अमेरिकेंतहि मेक्सिको संस्थानांत मय नांवाची एक जुनी संस्कृति
सांपडते. पण ती मिसरी, असुरी, किंवा भारतीय
मयसंस्कृति
संस्कृतीइतकी सुधारलेली मुळीच नव्हती. शिवाय
तिचा समग्र सुसंगत इतिहास आढळत नाही.
आतां आर्य लोकांची एक शाखा पश्चिमेकडे युरोपांत जी पसरली
तिची हकीकत पाहूं. पश्चिममार्गी आर्यलोक फ्रान्स,
युरोपांतले आर्य
स्पेन आणि ब्रिटनपर्यंत जाऊन राहिले. हेच लोक
केल्ट किंवा ब्रिटन या नावाने ओळखिले जातात. इटालियन टोळीहि
आर्यच होय. आसुरी, बाबिलोनी साम्राज्याला मोठा धक्का देऊन ईजि-
यन शहरे उध्वस्त करणारे फ्रिजिअन आणि ग्रीक लोक पश्चिमेकडे
गेलेल्या या आर्यकुळांतीलच होते. आता यापुढील जगाचा इतिहास
आर्य लोकांच्या दिग्विजयांनी भरलेला आढळून येईल.
या दिग्विजयी आर्यात ग्रीक आणि रोमन ही दोनच राष्ट्र फार
प्रामुख्याने पुढे आली व आजच्या युरोपियन राष्ट्रांत
ग्रीक साम्राज्य
ग्रीक-रोमन रक्तांचा आनुवंशिक संबंध उघड दिसून
येईल. ग्रीसचा-ग्रीक राष्ट्राचा इतिहास हा एकट्यादुकटया देशाचा
लहान इतिहास नसून १५० हून अधिक संस्थानांचा तो राजकीय
इतिहास आहे. पूर्वपश्चिम कॉकेशस ते पिरनीज, आणि उत्तरदक्षिण
दक्षिण रशिया ते आफ्रिकेच्या मध्यापर्यंत ग्रीक वसाहती नांदत होत्या.
२१
मानवी संस्कृतीचा इतिहास प्राचीन काळी म्हणजे सुमारे खि. पू. ३ व्या शतकांत ग्रीक लोक साधारण रानटी अवस्थेतच होते. त्यांना लोखंड माहीत नव्हते की लिहिणेवाचणे येत नव्हते. त्यांनी ईजियन शहरांवरून नांगर फिर- विल्यानंतर त्याच शहरांभोवती खोपटयांतून ते राहूं लागले. नंतर त्यांच्या डोक्यात तटबंदी शहरे बांधण्याची कल्पना आली. नंतर ते व्यापारहि करूं लागले. अथेन्स, स्पार्टा, कॉरिंथ, थेबीज वगेरे ग्रीक शहरसंस्थाने सुप्रसिद्ध आहेत. लोकसत्तात्मक राज्यपद्धतीचा पाया याच संस्थानांनी प्रथम घालन दिला असे म्हणण्यास हरकत नाही. ईलियड आणि ओडिसे ही दोन ग्रीक महाकाव्ये आपल्याकडील रामायणमहाभारतां- प्रमाणे जगद्वंद्य ठरली आहेत. ही होमरनें रचिलेली महाकाव्ये आशिया- मायनरवर ग्रीकांचे वर्चस्व कसे बसले याचा गोष्टीरूप इतिहासच होत. प्रीक लोक विद्यंत बरेच पुढे होते. यूरोपखंडांतील पहिले तत्त्वज्ञानी ग्रीक राष्ट्रातच होऊन गेले. ही तत्त्वज्ञान्यांची परंपरा ग्रीक राष्ट्र नष्ट होईपर्यंत अव्याहत चालू होती. आयांची दुसरी एक शाखा जी इटलीत जाऊन राहिली, तिने रोम शहरावरून आपणांला रोमन म्हणवून घेतले व रोमन साम्राज्य आपल्या संस्कृतीचे केंद्र रोम शहर केलें. रोमन संस्कृति बहंशी ग्रीक संस्कृतीचे भावंड म्हणता येईल व रोमचा प्राथमिक इतिहास हालोकशाहीच्या झगड्याचा इतिहास म्हणता येईल. एकीकडे सरदार-दरकदारांचा आणि दुसरीकडे सामान्य लोकांचा वर्ग असे दोन तट असुन जुन्या सरदार घराण्यांकडे असलेली राजसत्ता काढून घेण्याचा सामान्य जनतेचा दीर्घ प्रयत्न शेवटी यशस्वी होऊन २२ AAN Arn.10... आणखी सांस्कृतिक राष्ट्र -~~ - NAPAArunnnn लोकशाहीची स्थापना झाली. पुढें रोमची सत्ता बरीच वाढत जाऊन एक मोठे साम्राज्य बनण्याइतका त्याचा अंमल वाढला. या रोमन राष्ट्रांत मोठे योद्धे, तत्त्वज्ञानी आणि पंडित होऊन गेले. या काळची आणखी संस्मरणीय प्राचीन राष्ट्र म्हणजे आशियाखंडाच्या तत्कालीन इतर राजें: अगदी पश्चिमेकडील हिटाईट, मिटनी, हीब्रू, हिटाईट आणि मिटनी फिनिशिअन वगैरे होत. हिटाईट लोकांनी स्त्रि. पू. १६ व्या शतकांत आशियामायनरमध्ये एक मोठे बलिष्ठ राज्य स्थापन केले. त्यांचा पहिला प्रसिद्ध राजा खत्तुशील नांवाचा होता. हिटाईट साम्राज्य पुढे वाढत गेले. ईजिप्त आणि असुरो साम्राज्यांशी ते टकरा खाऊ लागले व खि. पू. सातव्या शतकांत तें नामशेषहि होऊन गेले. मिटनी आणि हीब्रू राष्ट्र ही हिटाईटची दोस्त राष्ट्र होती. हिटाईटप्रमाणेच मिटनी लोकांनीहि बरे दिवस पाहिले होते. त्यांनी देखील मिसरी आणि असुरी साम्राज्यांशी दीर्घ वैर पत्करून वीराचे मरण संपादिले. तिसऱ्या असुर-नझिर-पालनें मिटनी देश असुरी साम्राज्यास जोडला. हीब्रू राष्ट्राची जन्मभूमि पॅलेस्टाईन होय. या पॅले- स्टाईन प्रांतांत यहुदी, ख्रिस्ती आणि महंमदी या तीन सेमेटिक धर्माचा उदय झाला व त्यांनी आज सर्व जग व्यापिलें आहे. २३ प्रकरण ४ थे ही राष्ट्र सेमेटिक संस्कृति व तिचा जगभर विस्तार जगाच्या इतिहासांत मागील आर्य लोकांप्रमाणेच सेमेटिक लोकांनी मोठी कर्तबगारी दाखविलेली आहे. ज्यू किंवा हीब्रू हे सेमेटिक राष्ट्र ज्यूडियामध्ये खि. पू. १००० सालांपूर्वीच स्थायिक झाले होते. ज्यू लोकांचा मूळ पुरुष जो आब्राहाम तो बाबिलोनचा सुप्रसिद्ध राजा खम्मुरब्बी याचा समकालीन असावा. आब्राहाम व त्याचे वंशज मिसर देशांतून भटकून येऊन खनान प्रांतांत पुन्हां कसे येऊन राहिले, याचा गोष्टीरूप इतिहास जुन्या करारांत सविस्तर दिला आहे. खनान देशांत सुद्धा त्यांना फिलिस्टाईन लोकांशी बराच काळ स्वामित्वासाठी झगडावे लागले. त्यांच्यातील सॉलोमन राजा फार शूर व शहाणा होऊन गेला. त्याने हीब्रू साम्राज्याचा विस्तार करून व्यापारहि वाढविला. सॉलोमननंतर हीब्रू राष्ट्र खंगत चालले. वरून असुरी व खालून ज्यू लोक व ख्रिस्ती मिसरी साम्राज्यांचे जोराने तडाके बसू लागले. पुढे इराणने असुरी-बाबिलोनी साम्राज्ये बुडविल्यानंतरहि खि. पू. ८०० ते खि. पू. ३०० या पांच शतकांत ज्यू लोकांना फारसे डोके वर काढता आले नाही. इतर सेमाईट लोकांप्रमाणे ते नामशेष झाले नाहीत इतकेंच. या ज्यूंनी जेव्हां बायबल रचून जगाला नैतिक आणि धार्मिक उपदेश करण्याचे काम हाती घेतले तेव्हां- पासूनच त्यांचा लौकिक वाढला. युरोपियनांचा बायबल हा जो सर्वमान्य धमचिा उदय २४ v AMAR १.4AAAI . सेमेटिक संस्कृति व तिचा जगभर विस्तार - धार्मिक ग्रंथ आहे त्याचे मोठाले दोन भाग पडतात: एक हीब्रू लोकांचा जुना करार व दुसरा येशू ख्रिस्ताचा नवा करार. येशू हा ज्यू लोकांतीलच एक साधु पुरुष असून त्याने जो नवीन धर्म स्थापिला त्याला खिस्ती धर्म म्हणतात. ज्यू लोकांचा मूळचा धर्म इतर सेमाईट- प्रमाणेच अगदी देवघेवीचा व्यावहारिक स्वरूपाचा होता. पुढे त्यांच्यांत थोर थोर प्रवक्ते-उपदेशक निघून त्यांनी त्यांत उच्च प्रकारच्या भावना आणि नैतिक कल्पना घातल्या. ईश्वर नुसता नवसांनी किंवा स्तवनांनी वश होत नसतो; आपले शुद्ध आचार- विचार व सत्यनिष्ठा त्याला पाहिजे असते. दया, क्षमा, प्रेम आणि स्वार्थत्याग या गुणांना तो विशेष चाहतो. या उपदेशांचा यहुदी- लोकांवर चांगला परिणाम होऊन त्यांची धर्मश्रद्धा पुढील अनरत संकटपरंपरेत सुद्धां टिकून राहिली. यहुद्यांचे धर्मग्रंथ हे श्रेष्ठ वाङ्मय म्हणूनहि गणले जातात. अशा रीतीनें यहुद्यांनी जगाच्या इतिहासांत बरीच सांस्कृतिक भर टाकली आहे. जगावर मोठा प्रभाव गाजविणारा सेमेटिक संस्कृतीचा दुसरा घटक म्हणजे ख्रिस्ती धर्म. आज एकंदर सर्व ख्रिस्ती धर्माचे धर्मीयांत ख्रिस्ती धर्मीयांची संख्या जवळजवळ एक तृतीयांश आहे. इतकी मोठी संख्या दुसऱ्या कोणत्याहि धर्मात नाही. अशा जगद्व्यापक धर्माचा संस्थापक जो येशू तो अगदी साधा माणूस होता. त्याचे घराणे मोठे नव्हते किंवा त्याचे शिक्षणहि फार नव्हते. पण हीब्रू प्रवक्त्यांनी अंतर्बाह्य शुद्धीचा जो उपदेश अविश्रांत चालवून लोकांत उच्च धार्मिक कल्पना रूढ केल्या तोच पवित्रता साम्राज्य २५ Ah मानवी संस्कृतीचा इतिहास विश्वावर राज्य राखण्याचा उपदेश येशनें पुढे चालविला होता. तो वेदांतासारख्या गहन विषयांत शिरत नसे तर अगदी अडाणी माणसालाहि कळेल व पटेल अशा रीतीने शिकवीत असे. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे, त्याचे प्रेम सर्वांवर सारखेच आहे, तो दयाशील व न्यायी आहे, अशा- सारखा त्याचा साधा उपदेश असे. मनुष्याला आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप झाला की, तो शुद्ध झाला असे सांगण्याने पापी लोकांना आपण पुन्हां चांगले होऊ शकू अशी आशा वाटू लागते. येशूनें केले नसून लोकांच्या अंत:करणावर राज्य केलें असें जे ख्रिस्ती धर्मीय म्हणतात त्यांत बरेंच तथ्य आहे. असो. येशूने १८ महिनेच उपदेश करून जुन्या धर्माचे बरेच अनुयायी आपल्या बाजूला ओढल्यामुळे भिक्षुकवर्ग त्याच्यावर संतापला व रोमन राज्यकर्त्यांकडे त्याच्या विरुद्ध गा-हाणी नेऊन त्याने त्याला देहांत शिक्षा देवविली. पण ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर सबंध रोमन साम्राज्यांत ख्रिस्ती धर्मच सुरूं झाला व पुढे फार झपाट्याने सबंध युरोपखंडहि ख्रिस्ती बनले. सेमेटिक महावंशांतील तिसरा मोठा घटक म्हणजे इस्लामी संस्कृति. ख्रिस्ती धर्म-संस्कृतीप्रमाणे इस्लामी धर्म-संस्कृतीनेंहि इस्लामी संस्कृति जगांत मोठे परिवर्तन घडवून आणिलें. या धर्माचा संस्थापक महंमद पैगंबर हा बेदोइन या अरब जातीत जन्मला (इ. स. ५७० ). त्याचे लोक इतर तत्कालीन सर्व लोकांप्रमाणेच सृष्टीतील पदार्थांची देव म्हणून पूजा करीत. महंमदानें खिस्ती धर्मा- तील उच्च प्रकार पाहून आपल्या धर्मातहि सुधारणा करावी असा बेत केला. खिस्ताच्या देशबांधवांप्रमाणेच महंमदाचे महंमदाचे देश- - २६ सेमेटिक संस्कृति व तिचा जगभर विस्तार बांधवहि त्याला पाखंडी असे समजून त्याचा छळ करीत असत. तो मेदिना येथे रहात असे. तेथून तो मक्केला जाऊन एकाच खऱ्या देवा "विषयी लोकांना शिकवण देऊ लागला. मूर्तिपूजेविरुद्ध असलेले बरेच लोक त्याचे शिष्य बनले व त्याचा एक संप्रदाय तयार झाला. आपण देवदूत असून धर्माला इष्ट वळण लावण्यासाठी परमे- श्वराने आपणांला पाठविले आहे असें तो सांगत असे. आपला धर्म तरवारीच्या बळावर पसरवावा असेंहि तो अनुयायांना प्रोत्साहन देई. त्यामुळे लवकरच बदोइन अरब धर्मप्रसारासाठी बाहेर पडले. स्पेन- पासून पूर्वेस चीनपर्यंत त्यांनी आपले राज्य, धर्म आणि संस्कृति रुजविण्याचे कार्य केले. महंमदी धर्माने जगांत मोठी क्रांति घडवून आणली यांत संशय नाही. आशिया आणि आफ्रिका खंडांत तर या धर्माचे विशेष वर्चस्व आहे. महंमदाचा धर्म मुसलमानांना राजकीय दृष्टया फार उपयोगी पडला. धैर्याला तो फार महत्त्व देत असे. विरक्तवृत्ति किंवा व्यावहारिक धर्म संन्यासधर्म त्याने मुळीच उपदोशला नाही. पर- धर्मीयांशी नुसती स्नेहाचीच वृत्ति ठेवू नये तर त्यांना स्वधर्मात घेण्याची खटपट करावी अशी महंमदी आज्ञा कुराणांतून कोठेकोटें जी आढळते तीसुद्धां महंमदी साम्राज्याच्या वाढीला कारणीभूत झाली असेल. खिस्ती संप्रदाय ज्याप्रमाणे रोमन साम्राज्याने आपल्या प्रगती. करितां अंगीकारून प्रतिष्ठेस चढविला त्याचप्रमाणे महंमदी धर्माती खलीफतींनी इस्लामी धर्माची ध्वजा सर्व जुन्या जगावर फडकविली होती. खलीफ म्हणजे धार्मिक आणि व्यावहारिक बाबींतला प्रमाणपुरुष- मानवी संस्कृतीचा इतिहास सर्वसत्ताधारी व सर्वश्रेष्ठ व्यक्ति, खलीफाच्या राज्याला खलीफत म्हणतात. अशा खलीफती अरबस्तान, स्पेन, ईजिप्त आणि तुर्कस्तान या देशांत होऊन गेल्या. आज तुर्कस्तानांतून खलीफाची गादी फेंकून देऊन नामशेष करण्यांत आली आहे. तथापि मागें खलीफांनी बरेच दिग्विजय गाजवून इस्लामी धर्म जगांत पूर्ण रुजविला व त्याला राज्य- सत्ता प्राप्त करून दिली. याप्रमाणे सेमेटिक संस्कृतीचा जगज्जेता इतिहास आहे. या संस्कृ- समोटक धमीची तीने जगाला व्यावहारिक उपासनापद्धतीचा लाभ जगाला शिकवण करून देऊन लोकांचा एकत्र कार्यशील होईल असा संग्रह करण्याचा धडा घालून दिला यांत संशय नाही. तसेच राजकीय ध्येय ठरविण्याच्या कामींहि तिने मोठी कामगिरी केली आहे. प्रकरण ५ वें मध्ययुगीन संस्कृति पूर्वार्ध मागील प्रकरणांतील सेमेटिक संस्कृतीच्या अनुरोधाने आपण काल दृष्टया फार पुढे गेलो. तेव्हां पुन्हां मागे जाऊन मीडियाचे साम्राज्य व इराणचा पुढील इराणी, ग्रीक, रोमन वगैरे साम्राज्यांची स्थिति इतिहास पहावी लागेल. इराणवर झरथुष्ट्री धर्माचा पगडा बसल्यानंतरचा इतिहास म्हणजे मीड लोकांचे त्यावर वर्चस्व (लि. पू. ६०० च्या पूर्वी). पशु किंवा पारशी लोक याच मीड लोकांचे दास म्हणून राहिले. मीडिया साम्राज्याचा संस्थापक डायोसीस याने २८ मध्ययुगीन संस्कृति . व याच्या मुलांनातवांनी देश जिंकण्याचे कार्य उरकलें आणि पश्चिम आशियाखंडांत एक बलिष्ठ सत्ता निर्माण केली. पण पुढे अकिमेनीड घराण्याचे प्राबल्य होऊन मीडिया परतंत्र झाला. या अकिमेनीड घराण्याचा पहिला राजा सायरस याने इराणी साम्राज्याचे वर्चस्व भूमध्यसमुद्रापर्यंत नेऊन बाबिलोन, खाल्डियन राज्य, सीरिया, पॅले- स्टाईन इत्यादि सर्व राज्ये अंकित करून सोडिली. पूर्वेकडे आजचा अफगाणिस्तान देशहि त्याच्या हातांत होता. सायरस हा मोठा उदार व सद्गुणी म्हणून प्रसिद्ध आहे. सायरसनंतर सुमारे तीनशे वर्षे त्याचे साम्राज्य टिकलें. त्याच्या घराण्यांत डरायस ( पहिला ) हाहि मोठा राजा होऊन गेला. डरायस हा धार्मिक असे. अहूरमझ्द ( पारशांचा मुख्य देव ) याने आपणांस जगावर राज्य करण्यास पाठविले असून आपल्या अधिकारांतील सर्व राष्ट्रांवर न्यायाने राज्य केले पाहिजे असें तो समजे व वागेहि. डरायसनेच प्रथम हिंदुस्थानवर हल्ला करून पंजाब हा आपल्या राज्याचा सुभा केला. त्याची राज्यव्यवस्था फार उत्कृष्ट असे. आपल्या राज्याचे त्याने पंचवीस 'क्षत्रपी' (प्रांत ) करून त्यांवर एकेक गव्हर्नर 'क्षत्रप ' नेमला होता. आजच्या प्रांता- धिकाऱ्याप्रमाणे क्षत्रपाला सर्व अधिकार असत. लष्करी बंदोबस्ताचा अधिकार मात्र राजाकडे असे. राज्यकारभार चालविण्यासाठी एक मंत्रिमंडळहि बनविलेलें होतें. सम्राट्, क्षत्रप व अंकित राजे हे आप- आपली सोन्यारुप्यांची नाणी पाडीत. कर किंवा खंडणी भरणे झाल्यास तो पैशाखेरीज घोडे, गुरे, धान्य वगैरे रूपांनीहि भरल्यास चालत असे. सरकारी डाकेची देखील सोयिस्कर तजवीज केली होती. २९ मानवी संस्कृतीचा इतिहास डरायसच्या अमदानींत युरोपांत ग्रीक साम्राज्य भरभराटलें होतें. डरायसनें फिनिशिअन आरमाराच्या मदतीने एका- डरायसची ग्रीसवर स्वारी मागून एक ग्रीक बेटे काबीज करून अथेन्सला शह दिला. पण अथेन्सच्या लोकांनी स्पार्टाच्या मदतीने मॅरेथॉन येथे इराणी सैन्याचा मोठा पराभव करून त्याला परत हांकून लाविलें ( सि. पू. ४९० ). ही इराण्यांची प्रीसवर पहिली स्वारी होय. स्पार्टाला मदतीकरितां बोलावण्यास निघालेला जासूद दोन दिवसांच्या आंतच शंभरांवर मैलांचा मोठा अवघड रस्ता चालून गेला. म्हणून हल्ली जी पळण्याची शर्यत यूरोपांत दरसाल होते तिला ' मरथान रेस' म्हणतात. या पराभवानंतर लवकरच डरायस हाय घेऊन मृत्यु पावला. पण प्रीस जिंकण्याची मोहीम मात्र पुढे बंद पडली नाही. त्याचा मुलगा झर्कझीज याने सबंध चार वर्षे अहोरात्र तयारी करून प्रचंड सैन्य आणि आरमार सिद्ध केलें. थर्मापिलीच्या खिंडीत थोड्याशा स्पार्टन सैन्याने अतुल पराक्रम दाखविला असतांनाहि त्याचा उपयोग न होऊन इराण्यांचा जय झाला व ग्रीस इराणी साम्राज्याखाली आल्या- सारखें थोडे दिवस वाटले. पण लवकरच एका लहानशा ग्रीक आर- माराने इराणी सैन्याचा कोंडमारा करून त्याला शरण येण्यास भाग पाडिलें व आशियांतील ग्रीक राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून दिले. यापुढे पराक्रमांत इराणचें नांव ऐकू येणार नाही. युरोपांतील नेपोलियनप्रमाणे डरायसची कारकीर्द होती. त्याचे ऐश्वर्य फार थोड्या सम्राटांना -लाभले असेल. ३० -arma A-AAnn. मध्ययुगीन संस्कृति ग्रीक संस्थानांतून नेहेमी भांडणे असत. कोणते तरी एक संस्थान प्रमुख होऊन बाकीच्या संस्थानांना ताब्यात ठेवू ग्रीक साम्राज्यांतील अंत:कलह : अयेन्स पाही. अथेन्स संस्थानच सर्वांत श्रेष्ठ गणले जात आणि स्पार्टा असून त्याची संस्कृति ती सर्व प्रीसची संस्कृति म्हणण्यास हरकत नाही. अथेन्सच्या खालोखाल स्पार्टा असून या दोघांत मोठी चुरस असे. तथापि काही वेळां ही दोन्ही राज्ये एक होऊन परकीय शत्रूचा पाडाव करीत. याचे मोठे उदाहरण म्हणजे डरायस व त्याचा मुलगा यांच्या वाऱ्यांच्या वेळचा पराभव. तथापि अशी उदाहरणे फार कमी. एकदा तर स्पार्टानें इराणची मदत घेऊन अये- न्सच्या साम्राज्याला नामोहरम करून आपण इराणचे मांडलिकत्व पत्करिलें होतें! वर सांगितल्याप्रमाणे इराणी वर्चस्व झुगारून दिल्या- नंतर सर्व ग्रीक संस्थाने संघटित-अमेरिकेतील संयुक्त संस्थानांप्रमाणे -करण्याचा प्रयत्न झाला. पण उलट एखाद्या संस्थानचेंच साम्राज्य होऊ लागले. अथेनिअन साम्राज्याचा ग्रीसवर अंमल असतांना लोक- शाहीत साम्राज्यशाही घुसविण्याचा डाव पेरिक्लीजसारखा राजकार्य- धुरंधर खेळत असलेला दिसतो. म्हणजे अथेनियन लोकांपुरते निराळे सवलतांचे कायदे व बाकीच्या प्रजाजनांना बिगरहक्काचे कायदे; जसें: मतदानाचा हक्क फक्त अथेनिअन कुळांत जन्मलेल्या लोकांनाच असा- वयाचा, शिक्षणाच्या बाबतीतहि असाच फरक. अथेन्सच्या साम्राज्या- नंतर स्पार्टाचे साम्राज्य झाले. ते बरेच विस्तृत असून सर्व प्रीसभर पसरले होते; पण त्याची समुद्रावर विशेष सत्ता नव्हती. स्पार्टाच्या मागून थांबी व शेवटी मॅसिडोनियन साम्राज्य आले.
AAAAAAAAA -orn मानवी संस्कृतीचा इतिहास मॅसिडोनिया संस्थान ग्रीसच्या उत्तर भागांत असून हळू हळू त्याने मेसिडोनियन साम्राज्य आपली उन्नति करून घेतली होती. फिलिफ राजा अलेक्झांडर हा योद्धा आणि मुत्सद्दी पण होता. त्यानेच मॅसि- डोनियाचे राज्य वाढविलें व ग्रीस आपल्या ताब्यांत ठेविले. त्याचा मुलगा अलेक्झांडर हा जगविख्यात पुरुष होऊन गेला. त्याने ईजिप्त आणि हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील आशियाखंडाचा सर्व भाग पादाक्रांत करून प्रीक संस्कृति पूर्वेकडे आणिली. काबूलच्या खिंडीतून तो हिंदुस्तानात उतरला व पंजाब प्रांत जिंकल्यावर आणखी पूर्वेकडे जाण्याचा त्याचा इरादा होता. पण त्याच्या सैन्याने नाखुषी दर्शविल्यावरून तो परत फिरला (त्रि. पू. ३२४ ) व नंतर एका मार्गाने खायबर वर्षांतच वारला. जगाच्या सांस्कृतिक इतिहासांत अलेक्झांडरचा दर्जा फार मोठा आहे. 'पूर्व आणि पश्चिम ' खंडांचा संयोग करून हेलेनिझम किंवा पीक संस्कृतीचा सर्वत्र एक साम्राज्य आणि एक संस्कृति करून दिगंतरीं प्रसार सोडावी असा त्याचा विचार होता व त्याला काही यशहि आले होते. अलेक्झांडरच्या दिग्विजयामुळे ग्रीक संस्कृति जी सर्व पूर्वपश्चिम राष्ट्रांवर पसरली तिला ' हेलेनिझम ' असें विशिष्ट नांव आहे. हिंदुस्थान ते इटलीपर्यंत ग्रीक भाषा आणि विद्या ही सव राज्यांतून सुरू झाली व बरीच शतकें टिकली. व्यापारी दळणवळण इतकें सुरू झाले की, चीनचे रेशीम युरोपखंडांत येऊ लागले. आणि कला या बाबतीत तर कडेलोट झाला होता म्हणण्यास हरकत नाही. या काळांतील साक्रेटीस, प्लेटो, अरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञानी वाङ्मय ३२ AAAAAAAAA MAA1A मध्ययुगीन संस्कृति त्याच्या पंडित जगाला अद्याप ललामभूत होऊन राहिलेले आहेत. अलेक्- सांडरच्या वंशजांनी ईजिप्तमध्ये अलेक्झांडिया येथे एक शास्त्रीय विश्व- वेद्यालय में चालविलें त्याची कीर्ति त्रिखंड गाजली आहे. पाश्चात्य नामितीचा जनक युक्लिड, ज्योतिषी हिपार्कस, पहिले वाफेचे इंजिन शोधून काढणारा इंजिनियर हेरो यांसारखे शास्त्रज्ञ अलेक्झांड्रिया विश्व- वेद्यालयांतीलच होत. अलेक्झांडिया येथील ग्रंथसंग्रहालयहि फार मोठे असे. त्यांत लाखों पुस्तकें असत. त्या वेळी प्रीक साम्राज्यभर खेड्यांतूनहि ग्रंथालये असत. नवीन ग्रंथ काढणे, जुने नक्कलणे, त्यांचा प्रसार करणे वगैरे वाड्मयसंवर्धनाचे आजचे विविध प्रयत्न त्या वेळीहि चाललेले असत. अलेक्झांडरनंतर मात्र ग्रीक साम्राज्य डबघाईस आले. निरनिराळ्या प्रांतांवरील सुभेदारांत चुरशीची पीकसाम्राज्याचा नाश भांडणे लागली व हळू हळू एकेक प्रांत साम्रा- ग्याच्या कक्षेतून जाऊ लागला. शेवटी सि. पू. दुसऱ्या शतकाच्या मध्यांत रोमन साम्राज्याचा सर्व ग्रीक प्रदेशावर पगडा बसला व पीक संस्कृतीचा लय रोमन संस्कृतीत झाला. प्रीक संस्कृतीच्या पायावर पाय ठेवून रोमन संस्कृति पुढे आली. पीक आणि रोमन ग्रीक आणि रोमन या दोन लोकांत बरेचसे साम्य संस्कृतींची तुलना दिसत असले तरी, बरेच फरकहि आहेत. दोघेहि स्वतंत्रताप्रिय, पण रोमन लोक या गुणांत ज्यास्त होते. हे मात्र खरें की, ग्रीक लोक ज्यास्त बुद्धिमान् आणि कोवळ्या अंत:करणाचे असत. पण कोवळे मन चंचल असते म्हणून ग्रीक राष्ट्रांत राज्य टिकविण्या- मा. सं. इ.३ ३३ मानवी संस्कृतीचा इतिहास जोगे गुण आले नाहीत. कलाकौशल्यादि शास्त्रांत ग्रीकांचा श्रेष्ठपणा, तर कायदेकानू आणि व्यवहार यांत रोमन लोकांचा हातखंडा ! व्यक्तिखातंत्र्याचे स्तोम माजवून ग्रीकांनी आपल्या स्वातंत्र्यावरच गदा आणली, तर रोमन लोकांनी राष्ट्राभिमान लोकांत जागृत करून स्वदेशाचे कल्याण करण्याकडे लक्ष ठेविलें. याप्रमाणे ग्रीक आणि रोमन यांच्यांत निरनिराळ्या गुणांचे आधिक्य होते; व या एकंदर गुणांचा युरोपखंडांतील पुढील राष्ट्रांस फार उपयोग झाला. ग्रीक साम्राज्य बुडवून आपण त्या जागी आल्यानंतर रोमन कार्थेजशी रोमचा साम्राज्याला शांततेनें रहातां आले नाही. आफ्रिकेच्या जिवापाड प्रगडा उत्तर किनाऱ्यावरील कार्थेज राष्ट्राने युरोपच्या दक्षिण किनाऱ्यावर स्वाऱ्या करून बहुतेक भाग ताब्यात ठेवला होता. तेव्हां साहजिकच रोमला आपले राज्य कायम राखण्याकरितां या कार्थे- जियन म्हणजेच सेमेटिक कुळांतील आर्येतर लोकांशी जिवापाड झगडावे लागले. कार्थेजियन लोकांचे आरमार फार मोठे व बलिष्ठ होते. त्यांचा विख्यात सेनापति हानिबाल याने रोमन लोकांना कित्येकदां धूळ चारली होती. पण अखेरीस रोमन लोकांचाच जय होऊन कार्थेज साम्राज्य धुळीस मिळाले; व रोमन साम्राज्य स्पेन- पासून आशियामायनरपर्यंत भूमध्यसमुद्राच्या दोन्ही किनाऱ्यांनी पसरलें ( खि. पू. १४६). हानिबाल हा जगांतील श्रेष्ठ योद्धयांपैकी गणला जातो व त्याने चालविलेले दुसरे प्युनिक युद्ध सबंध मानवी इतिहासांत घडून आलेल्या प्रचंड युद्धांपैकी एक म्हणता येईल. ३४ ~~~~~~ मध्ययुगीन संस्कृति राज्यकारभार शेतकी आणि सदाचरण यांनी राहणारे रोमन लोक श्रीमंत आणि रोमन साम्राज्यांतील सत्ताधारी होत चालल्यावर त्याच्यांत दुर्गुण शिरूं लागले, स्वार्थ डोकावू लागला आणि त्यामुळे पुढाऱ्यापुढाऱ्यांत भांडणे सुरू झाली. रोमन लोकांत मोठमोठे योद्धे होऊन गेले. या योद्धयांनी, आपली छाप राज्यकारभारावर असावी म्हणून युद्धे उकरून काढली. जो सर्वांत शूर तो राज्याचा नेता अशी स्थिति प्राप्त झाली. मेरिअस, सल्ला, पापी, सीझर वगैरे सेना- पती एकामागून एक राज्याधिकारी झाले. सीझरला तर बादशहा- प्रमाणे सर्व अधिकार होते व त्याला राजमुकूटहि अर्पण करण्यात होता. म्हणजे लोकशाहीचे रूपांतर पुन्हां राजशाहीत झाले. तेव्हां पुन्हां स्वतंत्रवृत्तीच्या काही रोमन पुढाऱ्यांना हे न आवडून सीझरचा खून करण्यांत आला. सीझरचा पुतण्या ऑक्टेव्हिअन सीझर हा जेव्हां पुढारी झाला, तेव्हा त्याने राजा होण्याचा घातुक अभिलाष गेमन बादशाही व हासास आरंभ धरला नव्हता, तरी त्याला राजाच्या वरची पदवी ' ऑगस्टस ' ही देण्यांत आली व त्याच्यापासून रोमन बादशाहीस सुरुवात झाली ( खि. पू. २७ ). सर्व रोमन बादशहा सैन्याच्या बलावरच सत्ता गाजवीत, साम्राज्यांत सीनेटचा म्हणजे लोकप्रतिनिधिमंडळाचा बोज मुळींच राहिला नाही. मात्र साम्राज्य अतोनात वाढले. ब्रिटनवर रोमन राज्य आले व हिंदुस्थानच्या सरहद्दीपर्यंत रोमन सैन्य येऊन थडकले. पण लवकरच त्याची वाढ खुंटली व उतरती कळा लागली. रानटी लोकांचे एकसारखे हल्ले सुरूं
" NANA
मानवी संस्कृतीचा इतिहास
होऊन रोम पडलें (इ. स. ४१० ). इ. स. ४ थ्या शतकांत
कान्स्टंटाईन बादशहानें पूर्वेस कान्स्टॅटिनोपल राजधानी करून में
बिझान्टिअम साम्राज्य स्थापिलें होतें तें मात्र पुढे एक हजार वर्षेपर्यंत
टिकून राहिले. नंतर ते तुकांच्या ताब्यात गेले.
ज्या रानटी लोकांच्या हल्ल्यांनी रोमन साम्राज्य नष्ट झाले ते रानटी
लोक म्हणजे गॉथ आणि हूण हे होत. गॉथ
युरोपांत रानटी
लोकांचा धुमाकूळ
लोक स्वीडनमधील व हूण हे आशियाखंडांतले
होते. फँक आणि जर्मन टोळ्याहि लुटालुटीच्या शोधांत रोमन साम्राज्या-
वर तुटून पडल्या होत्या. पण या सर्व रानटी लोकांनाहि रोमन
सुधारणा
ध्याव्या लागल्या.
आजच्या जगावर रोमन संस्कृतीचा ठसा अगदी दिसून येण्यासारखा
पडला आहे. रोमन कायदेकानू आणि राजनीति या
रोमन संस्कृतीचा
भाधुनिक जगावर
तर आज पाश्चात्य संस्कृतीने स्वीकारल्या आहेत.
रोमन पद्धतीवर बांधल्या गेलेल्या व जाणाऱ्या
इमारती जिकडेतिकडे दिसतात. सर्वच रहदारीचे उत्तम रस्ते करणे व
माऱ्याच्या जागी लष्करी वसाहती ठेवणे या गोष्टी आजची सुधारलेली
राष्ट्र करीत आहेतच. ग्रीक अमदानीत जी सर्वत्र अशांतता व बखेडा
माजला होता तो सीझर, ऑगस्टस वगैरे बादशहांच्या राज्यसुधारणां-
मुळे नाहीसा होऊन 'रोमन शांतता' असा वाक्प्रचारच पडला.
लॅटिन भाषा आणि चालीरीती ह्या इटली, गॉल, स्पेन आणि इतर
देशांतून रुजल्या. इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांना
'रोमान्स' भाषा म्हणतात. बिस्ती धर्माचा रोमन साम्राज्याने अंगि-
३६
मध्ययुगीन संस्कृति कार केल्यामुळे रोम येथेच त्या धर्माचे आधपीठ स्थापन होऊन मुख्य शंकराचार्य जे पोप त्यांची सर्व खिस्ती लोकांना ताकीदपत्रे रोमहूनच सुटू लागली. आजहि कॅथॉलिक खिस्ती लोकांचे धर्मपीठ रोम येथे आहे. रोमन साम्राज्य हे गुलामांचे साम्राज्य म्हणता येईल. कारण त्यांत रोमन लोकांनी जिंकून आणलेले गुलामच जास्त रोमन साम्राज्य गुलामांनी चालविलें! होते. स्वातंत्र्य फार थोड्या लोकांना असे. त्यामुळे साम्राज्य आंतून पोखरले गेले. रोमन लोक चांगले शिकलेले असत, पण त्यांना शिकविण्याचे काम त्यांचे ग्रीक गुलाम करीत ! नाटकें, खेळ, सामने या करमणुकींना तर ऊत आला होता. व्यापारी दळण- वळण तर सबंध जगभर होतें. रोमची सोन्याची नाणी यामुळे सर्व देशांतून आढळत असत. उत्तरार्ध रोमन साम्राज्य मोडल्यानंतर दोन शतकांपर्यंत युरोपभर रानटी लोकांचा धुमाकूळ चालला होता. शहरांतून मात्र तातरी लोकांचे युरोपांत वर्चस्व व सुधारणा नाहीशी झाली नव्हती. पण इतरत्र वित्त फ्रेंच साम्राज्याचा आणि जीवित यांची सुरक्षितता नव्हती. कांहीं रानटी राजे मात्र रोमन राजांचे अनुकरण करून त्यांच्या सुधारणा चालू मोंगली हूण किंवा तातर हे पांचव्या शतकांत फार प्रबळ झाले होते. त्यांचा प्रसिद्ध पुढारी अट्टिल हा गॉलपर्यंत चढ़ाई करून गेला होता, तेव्हां इतर रानटी टोळ्यांनी एकत्र होऊन त्याचा चेलान्स येथे पराभव केला ( इ. स. ४५१). पण पुढील वर्षी तो इटलीवर चालून गेला. याच वेळेस कांहीं इटालियन लोकांनी पळून जाऊन व्हेनिस उदय ठेवीत. ३७ ~~~~~~~~~~ मानवी संस्कृतीचा इतिहास येथे नवी वस्ती केली व पुढील इतिहासातील सुप्रसिद्ध व्हेनिस राज्याचा पाया घातला. सहाव्या शतकांत पश्चिम युरोपांत सर्व सुधा- रणांचा लोप होऊन अंधःकार पसरला होता; त्याच सुमारास फ्रैंक लोकांनी एक नवें साम्राज्य उदयास आणले. साम्राज्य उदयास आणले. या फ्रेंच साम्राज्याने मुसलमानांना थोपवून धरले, इतकेच नव्हे तर सर्वत्र माजलेली बंडाळी मोडून पुनः युरोप एकसूत्री केले. या फ्रेच साम्राज्यांत शर्लेमान नांवाचा जगविख्यात बादशहा होऊन गेला ( आठव्या शतकाच्या उत्तरार्धात). हा मोठा योद्धा व मुत्सद्दीहि होता. त्याने जर्मनी आणि इटली काबीज करून रोम येथे आपल्याला पोपकडून राज्याभिषेक करवून घेतला. या वेळेपासून पोप आणि इटलीचा बादशहा यांनी 'पवित्र रोमन साम्राज्य' पुन्हां चालू करून जगाच्या इतिहासाचे केंद्रस्थान रोम शहरी ठेविलें. बादशहाकडे लोकांचे ऐहिक संरक्षण व पोपकडे पारलौकिक कल्याण असल्यामुळे पुन्हां युरोपखंडाची उन्नति होऊ लागली. शर्लेमानच्या मृत्यूनंतर जर्मनी आणि फ्रान्स विभक्त झाले. बाल्टिक आणि उत्तर समुद्रावरील चांच्या लोकांनी रशिया- नॉर्थमेन ऊर्फचांच्यांची सर्वत्र सत्ता वर राज्य चालविले. याच नॉर्थमेननी नवव्या शतकांत इंग्लंड घेऊन तेथील अल्फ्रेड राजाला हांकून लाविलें. नंतर यांनी पुढे अमेरिकेंत पाऊल टाकले. अकराव्या शतकांत नॉर्मन लोकांनी इंग्लंड जिंकून इंग्लंडचा आणि फ्रान्सचा आजतागायत टिकणारा संबंध खिती आणि मुसल- मान यांमध्ये धर्मपुढे जोडून दिला. इकडे पूर्वेस अरब लोकांचे सामाज्य चांगल्या स्थितीत नांदत होते. पश्चिमेपेक्षां पूर्वेकडेसच विद्या आणि ३८ ANMhar मध्ययुगीन संस्कृति कला यांचे माहेरघर दिसत होते. ज्यू आणि अरब लोकांना अरि- स्टॉटलचे तत्वज्ञान जास्त अवगत असून इतर शास्त्रांतहि त्यांनी प्राविण्य संपादले होते. अरबांचे भाऊबंद जे तुर्की लोक त्यांनी पुन्हां मुसलमानी अंमल वाढविण्याची खटपट केली. खिस्ती धर्मानुयायांचें मुख्य धर्मक्षेत्र में येरुशलेम तें तुर्काच्या हाती असल्याने त्याची मुक्तता करण्यासाठी युरोपांतून बऱ्याच मोहिमा गेल्या. पण १९१८ पावेतों येरुशलेम तुर्काच्याचकडे होते. तथापि अकराव्या बाराव्या शतकांतील खिस्तीधर्मयुद्धांमुळे सबंध युरोपखंडांत ख्रिस्ती धर्माबद्दल फार जागृति होऊन धर्मरक्षणाकरितां का होईना पण सर्व ख्रिस्ती राष्ट्र मुसलमानांविरुद्ध एक झाली. आजच्या काळच्या मानाने पाहिल्यास मध्ययुगांत विद्येची प्रगति फारशी झाली नव्हती. रोमन संस्कृति नष्ट झाल्या- विद्यापुनरुज्जीवन व उच्च शिक्षणसंस्थांची पासून शर्लेमानचे साम्राज्य होईपर्यंत तर युरोप अज्ञानांधःकारांत होते असे म्हणावे लागेल. शर्ले- मान राजाने देवळे आणि मठ यांतून शाळा सुरू केल्या. त्या शाळांतून भिक्षुक लोक लॅटिन भाषेतून धार्मिक ज्ञान देत. अॅरिस्टॉटल आदि तत्त्वज्ञान्यांचे ग्रंयहि अभ्यासिले जाऊन त्यांवर वादविवाद आणि टीका होत. तथापि बहुजनसमाज अगदी निरक्षर होता व त्यामुळे उपाध्याय- वर्गाचा त्याच्यावर सहज पगडा बसे. पुढे पुढे जेव्हां युरोपखंडांत शांतता येऊं लागून व्यापार आणि दळणवळण वाढलें व शहरांतून सुखसोई आणि स्वास्थ्य ही लोकांना मिळू लागली तेव्हां विद्याहि वाढू लागली. हा विधेच्या उदयाचा काळ मोठा संस्मरणीय धरला जातो. स्थापना ३२ मानवी संस्कृतीचा इतिहास आरंभ मुख्यतः इटलीत स्वतंत्र शहरांतून ही विद्यावृद्धीची लाट उसळून लिसबन, पॅरिस, ब्रुजेस, लंडन, अॅन्टवर्प, हॅम्बर्ग वगैरे इतर राज- धान्यांतूनहि पसरत चालली. बाराव्या शतकांत रोमन कायदेकानूंचा अभ्यास पुन्हा सुरू झाला. बोलोना विश्वविद्यालयांत या कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी बाहेरून विद्यार्थी येऊ लागले व इतर शहरांतूनहि साधारणतः चर्चला जोडूनच कॉलेजें आणि विद्यापीठे निघू लागली, सॅलामांका ( स्पेन ) व पॅरिस विद्यापीठांचा लौकिक त्या वेळी फार मोठा होता. या वेळी ग्रीक विद्याहि ऊर्जितावस्थेस आली. कारण इटालियन पंडित आणि कारागीर प्राचीन ग्रीक संस्कृतीला शास्त्रीय संशोधनाला उचलून धरूं लागले. तथापि । जुनें तें सोने असें न मानतां जुन्या विद्येला कसाला लावून त्यांतला बरावाईटपणा बाहेर काढण्यात येत असे. म्हणजे विद्वान् लोकांत चिकित्साबुद्धि वाढली व एकंदरीने सर्वत्र जिज्ञासा उत्पन्न झाली. यामुळे सर्वच बाजूंनी सुधारणा आणि संशोधन ही होऊ लागली. ऑक्सफोर्डाचा एक भिक्षुक रॉजर बेकन म्हणून जो होता त्याने लोकांत शास्त्रीय बुद्धि जागृत केली. 'प्रयोग करा' 'प्रयोग करा' असें तो वारंवार बजावीत असे. वल्ह्यांखेरीज समुद्रांतून नावा जातील, जनावरांनी ओढल्याखेरीज गाड्या चालतील व पक्ष्यांप्रमाणे माणसाला हवेतून उडतां येईल असें याने में सहाशे वर्षांपूर्वी भविष्य केलें होतें तें तंतोतंत खरे ठरले आहे. अशा रीतीने सर्व युरोपभर वाङ्मय आणि कला या शाखांत सर्वा- गीण प्रगति होऊन शास्त्रीय संशोधनाचाहि पाया घातला गेला.
NAVAR. vNANN. " मध्ययुगीन संस्कृति वर सांगितल्याप्रमाणे लोक जसजसे सुशिक्षित आणि चिकित्सक धर्मसुधारणेची लाट बनत चालले तसतशी त्यांच्यांत धर्मसुधारणेबद्दल व पोपाच्या सत्तेला आस्थाहि उत्पन्न होऊ लागली. आपल्या धर्मातील भोहोटी उपदेश तरी काय आहेत, ते बरोबर आहेत की नाहीत, आपले गुरुजी सांगतात त्यावर विश्वास ठेवावा की नाही, भिक्षु- कांचे वर्तन नीतीला धरून आहे की नाही, यांसारख्या शंका सुधार- कांना येऊं लागून त्यानी धार्मिक व्यवहारासंबंधी जाहीर चर्चा सुरूं केल्या. तेव्हा मात्र पोपचे आसन डळमळू लागले. कारण चर्चचे साम्राज्य लोकांच्या अंतःकरणावरच असणार व तें अंत:करण जर धर्माधिकाऱ्यां विरुद्ध बनूं लागले तर साम्राज्य टिकणार कोठून ? पोप किंवा धार्मिक सत्ता याचे सैन्य म्हणजे ' मंक ' किंवा भिक्ष. या सैन्या- मार्फत धर्माधिकार चालत असे. पण जेव्हां हे भिक्षु अगदी अनाचारी व धार्मिक कामाला नालायक असे आढळून येऊ लागले, तसेच पोपसकट सर्व धर्माधिकाऱ्यांमध्ये मानाच्या जागांबद्दल मोठी भांडणे होऊ लागली, तेव्हां साहजिकच त्यांच्याविषयींची श्रद्धा लोकांतून उडाली व वाइक्लिफ, लूथरसारखे धर्मसुधारक निघाले. छापण्याची कला निघाल्या- पासून तर बायवल पुष्कळांच्या घरी मिळू लागले व त्यामुळे प्रत्यक्ष पुरावे दाखवून पोप व त्यांचे अनुयायी यांच्याशी भांडतां येऊ लागले. इंग्लंड, स्कॉटलंड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी ( उत्तर ) वगैरे राष्ट्रांनी पोपची सत्ता झुगारून देऊन सर्व धार्मिक सत्ता आपल्याकडे ठेवली. या धर्मसुधारणेला आणखी बरेच फाटे फुटले, व नवीन नवीन धर्मपंथ निघाले. याप्रमाणे एके वेळी संबंध युरोपखंडावर गाजत असलेले ४१ मानवी संस्कृतीचा इतिहास पोपचे वर्चस्व अगदी संकुचित होऊन ते आतां जवळजवळ नामशेष झाले आहे. हल्ली फक्त रोमन कॅथॉलिक ख्रिस्ती लोक पोपला आपला धर्मगुरु असें मानतात. मध्ययुगांत आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडून आली, ती म्हणजे सरंजामी पद्धतीचा उदय. पहिल्या प्रकरणांत सरंजामी पडत व तिचे गुणदोष समाजाची घडण कशी बनत जाते हे सांगत अस- तांना मनुष्य आत्मसंरक्षणासाठी आपले काही हक्क दुसऱ्याच्या स्वाधीन करून त्याचा गुलाम कसा बनतो हे दाखविले आहे. हीच गोष्ट अशां- ततेच्या काळांत घडते. आपलें जीवित आणि वित्त यांचे रक्षण होण्या- करितां असहाय मनुष्य आपल्याहून बलिष्ठ माणसाला काही खंडणी देऊन त्याचा नोकर बनतो. हा बलिष्ठ मनुष्य आपल्याहून वरचढ अशा तिसऱ्याच मनुष्याची मदत घेत असतो. तिसरा चवथ्याची घेतो. याप्रमाणे पायरीपायरीने ही गुलामगिरीची सांखळी खालपासून वर- पर्यंत पोहोंचलेली असते; एक शहर दुसऱ्याच्या अंकित, एक राजा किंवा धर्माधिकारी आपल्यापेक्षां बलवान् माणसाचा नोकर अशा पद्धतीनेच ही बने. ही सरंजामी पद्धत इतकी रूढ होऊन बसली की, सरंजामी सरदार पुढे स्वतंत्र राजे बनून बेजबाबदार झाले. त्यांनी रोमन साम्रा- ज्याच्या नाशानंतर रानटी टोळ्यांचा धुव्वा उडवून युरोपियन राष्ट्रांना सुरक्षितता आणली असली तरी हेच सरदार पुढे वरचढ झाले व त्यांना निर्बल करण्यासाठी राज्यकर्त्यांना मोठमोठे उपाय करावे लागले. सरंजामी पद्धत इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या मोठमोठया राष्ट्रांना पोखरू लागली. तेव्हां राजे लोक सरंजामी सरदारांशी युद्ध करूं भारतीय संस्कृतीचा अखंड विकास vv लागले व हळू हळू तिला दडपू लागले. तथापि अद्याप ती अजिबात नाहीशी झाली नाही. तरी पण ती आज फारशी जाचक नाहीं. पण सरंजामी पद्धत मोडत चालल्यापासून राजसत्तेला जोर चढला व राजे जुलमी होत चालले. त्यांच्या जुलमाचे सुधारलेले जुलूम प्रकार सुधारलेल्या काळाप्रमाणे सुधारलेलेच असत. तेव्हां लोकांमध्ये राजसत्तेला आळा घालण्याची चळवळ सुरू झाली. तिचे पर्यवसान लोकशाही किंवा पार्लमेंटरी राज्यपद्धति यांत झाले. प्रकरण ६ वें भारतीय संस्कृतीचा अखंड विकास या प्रकरणांत खि. पू. १५०० पासून मध्ययुगाच्या अखेरपर्यंत भारतीयांची अव्याहत ( सुमारे इ. स. १५०० ) तीन हजार वर्षांचा चाललेली परंपरा हिंदुस्थानचा इतिहास व भारतवर्षाची संस्कृति या काळात काय होती या दृष्टीने पहावयाचा आहे. या देशाच्या विशिष्ट रचनेमुळे याची संस्कृति इतर राष्ट्रांपेक्षां अगदी निराळी व सतत टिकणारी अशी आहे. ज्याची भाषा, वाङ्मय आणि सामाजिक- धार्मिक संस्था ही गेली तीनचार हजार वर्षे कांहीहि प्रतिबंधांना न जुमानतां टिकून आहेत असे दुसरे उदाहरण चीनखेरीज सबंध जगांत आढळणार नाही. वैदिक कालापासून अकराव्या शतकांत मुसलमानी वर्चस्व जाणवू लागेपर्यंत भारतीय संस्कृति सर्वांगांनी विकास पावत होती. केवळ वेदांत, तत्त्वज्ञान किंवा ईश्वरविषयक ४३ -^^hhhhrAmAra Ann. Nnnnn.mh- मानवी संस्कृतीचा इतिहास झान यांतच भारताने अद्वितीय प्राविण्य संपादिले होते असे नसून सर्व विद्या आणि कला यांत सुद्धा आघाडी मारली होती. आजपर्यंत भारतीय संस्कृतीला मारक अशा अनेक गोष्टी होऊन गेल्या आहेत. पण त्या संस्कृतीच्या अंगींच इतका जीवटपणा किंवा चिवटपणा आहे की, ती वैदिक काळी होती तशीच जवळजवळ आजहि आहे. शक, हूण इत्यादि बारीकसारीक परकीय संस्कृती मागेंच तिने आपल्या विशाल उदरांत गडप केल्या व इस्लामी आणि सिस्ती या मोठया संस्कृतींशी ती आज अनेक शतकें टक्करा देत आहे. पण तिच्यांतील सत्त्व गेले नाही. असो. आतां पौराणिक कालानंतर हिंदु संस्कृति कशी विकसत गेली ते पाहूं. वैदिक, पौराणिक कालानंतर हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वांत बुद्ध व बौद्ध धर्माचा पहिली थोर व्यक्ति म्हणजे गौतम बुद्ध होय. त्याचा माशियाखंडभर प्रसार जन्म एका राजकुळांत झाला ( खि. पू. ५६० चा सुमार ). पुढे संसाराविषयी त्याला वीट येऊन तो आत्म्याच्या खऱ्या उन्नतीकरितां बाहेर पडला व घोर तपश्चर्या करून त्याने निर्वाणाचा ( अक्षय्य सुखाचा ) मार्ग शोधून काढला. तो मार्ग म्हणजेच बौद्ध धर्म. बुद्धाने सामान्य जनाला समजेल व पटेल अशी नीतितत्त्वें उप- देशिली आहेत. जन्म हीच मुळी मनुष्यावरची मोठी आपत्ति आहे व ती चुकविण्यासाठी त्याने सत्कर्म जोडले पाहिजे; व हे सत्कर्म जोडण्यासाठी त्याने चोरी, शिंदळकी, खून, खोटेपणा, निंदा, अश्लील- लोभीपणा, द्वेष व अज्ञान ही टाळली पाहिजेत. भाषण, आच- रण, विचार, आठवणी, श्रद्धा, कर्म व उपजीविकेचे साधन ही शुद्ध पणा, भारतीय संस्कृतीचा अखंड विकास ~~ आणि सात्त्विक ठेविली पाहिजेत. तसेंच मनःशांतीसाठी माणसाने बौद्ध संघांत दाखल होऊन वैराग्याने काळ कंठिला पाहिजे. ही धर्म- तत्वे पुढील भक्तिमार्गातील तत्त्वांप्रमाणे सामान्य अशिक्षित बहुजन- समाजाला पटून लगेच थोड्याच वर्षांत बौद्ध धर्माचा हिंदुस्थानांत आणि बाहेरहि प्रसार झाला. चीन, जपान, तिबेट, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान, सुमात्रा, जावा, सीलोन, सयाम वगैरे आशियाखंडां- तील मोठमोठ्या देशांतून बौद्ध धर्माला बरेच अनुयायी मिळाले. खुद्द हिंदुस्थानांत अशोक सम्राटाने धर्मप्रचारक चोहोंकडे पाठवून या धर्माचा सर्वत्र फैलाव केला. पुढेंहि तीनचार शतकें याचा उत्कर्ष होत होता. पण इ. सनाच्या आठव्या शतकापासून हास होऊं लागून लवकरच तो हिंदुस्थानांतच नामशेष होऊन गेला. सिलोन, ब्रह्मदेश, जपान या देशांतून मात्र तो अद्याप टिकून आहे. बौद्धधर्माच्या उदयाच्या सुमारासच महावीराने जैनधर्माचा पुरस्कार जोराने केला. तोहि बुद्धाप्रमाणेच विरक्त होऊन जैनधर्म खरा मोक्ष मार्ग शोधण्याच्या खटपटीस लागला होता. अखेरीस त्याने आपला जैन धर्म स्थापन केला. याहि धर्मात लोकांनी भिक्षु आणि भिक्षुणी होऊन सर्वसंगपरित्याग करून मठांतून रहावे अशी आज्ञा आहे. परमात्मा म्हणून कोणी नाही; मनुष्य आणि इतर प्राणी यांच्याप्रमाणेच झाडे, वायु, अग्नि यांना जीव आहे; हिंसा अगदी निषिद्ध आहे; स्वतःच्या वासना मारून मनुष्याने कर्मातून मुक्त व्हावयाचे आहे. यांसारखी जैनतत्त्वे अगदी साधी पण वैदिक धर्माच्या जरा विरुद्ध अशी आहेत.
मानवी संस्कृतीचा इतिहास v-on- हा जैन धर्म हिंदुस्थानाच्या बाहेर न जातां हिंदुस्थानांतच काही ठिकाणी पसरला. मुख्यतः दक्षिण हिंदुस्थानांत हा जैनधर्माचा संकोच रुजला होता. पण शैवपंथाने त्याची हकालपट्टी चाल- विली व तामिळ प्रांतांतून तर त्याला थारा मिळेनासा झाला. पुढे म्हैसूर प्रांतांत लिंगायतधर्म येईपावेतों ( १२ वें शतक ) त्याची चहा होती. तीहि नंतर रामानुजी पंथानें नाहींशी केली. आज जैन लोक संख्येने फार थोडे असून सर्व हिंदुस्थानभर विखुरले आहेत. वरील बौद्ध आणि जैन ही हिंदु धर्माचीच फळे असून त्यांनी अहिंसा तत्त्व व मूळच्या हिंदु संस्कृतीत अहिंसा-प्राण्यांची हत्या भक्तिमार्ग न करणें-हे मोठे उदात्त तत्त्व दृढमूल करून टाकले. या तत्वामुळे हिंदु धर्माचा जसा काही फायदा तसा तोटाहि झाला आहे, हे कबूल केले पाहिजे. जैन आणि बौद्ध संप्रदायांना अनुसरून बहुजनसमाजाला मानवेल असा जो दुसरा एक सोपा पंथ हिंदु धर्माच्या पोटांतून निघाला तो भक्तिमार्ग. ईश्वर हा आपला जिवलग व अगदी बापासारखा असून तो प्रत्यक्ष आपली काळजी घेतो, त्याच्या व आपल्या- मध्ये रदबदली करण्यास कोणी मध्यस्थ लागत नाही ही जाणीव भक्ताला दिली गेल्यामुळे व केवळ ईश्वराचे नामस्मरण केल्याने मोक्ष मिळतो अशी ज्याची दृढ भावना झाल्यामुळे या भक्तिपंथाला लाखों अनुयायी मिळाले; व आज तो अनेक नावांनी हिंदु समाजांत जोमानें वाढत आहे व हिंदु धर्माला चिरंजीव करीत आहे. कारण कोठल्याहि धर्मातले सार यांत आहे व आचरण्यास याच्याइतका दुसरा सोपा धर्म नाही.
भारतीय संस्कृतीचा अखंड विकास पण गौतम बुद्धाच्या काळची भारताची संस्कृति बौद्ध ग्रंथांवरून अज- मावता येते. त्या वेळी ग्रामपंचायती असून गांवांतून बुद्धकालीन हिंदु संस्कृति सभागृहे बांधलेली असत. जमिनीवर मालकी व्यक्तीची नसे. लोक राजा निवडीत. त्या काळांत धंदे चांगले चालत असून धंद्यांचे संघहि असत. नाणी व हुंडया चालत व वहातुकीला जलमार्ग आणि खुष्कीचे मार्ग दोन्ही मोकळे होते. यावरून सुमारें २५०० वर्षांपूर्वीचा हिंदुसमाज किती सुधारला होता हे दिसून येते. आतां हिंदुस्थानचा मागचा राजकीय इतिहास पहावयाचा म्हणजे अनेक राजघराण्यांची माहिती द्यावी लागेल. अशोकाचे साम्राज्य सांस्कृतिक इतिहासाला त्याची फारशी गरज नाही. प्राचीन काळचे पहिले प्रख्यात राजघराणे म्हणजे मौर्यांचें. या घरा- ण्यांत अशोक चक्रवर्ती होऊन गेला. त्याने उत्तम प्रकारे राज्य चाल- विलें व वाढविलेहि. त्याने दगडांवर व खांबांवर आपल्या आज्ञा लिहून ठेवलेल्या अद्याप पहावयास मिळतात. त्याने बौद्धधर्माचा उपदेश करण्यासाठी काश्मीर, इराण, सिलोन व अलेक्झांडियापर्यंत दूरवरहि प्रचारक पाठविले होते. अशोकाच्या पूर्वी सरासरी अर्धे शतक अलेक्- झांडरने हिंदुस्थानावर स्वारी करून पंजाब आपला सुभा बनविला होता. पण अशोकानें अफगाणिस्तानहि आपल्या साम्राज्यात घेतला; व परकीयांचा हात हिंदुस्थानांत मुळींच शिरकू दिला नाही. पण अशोकानंतर पांच शतकेंपर्यंत कोणीहि बलाढय सम्राट झाला नाही व जिकडेतिकडे बेबंदशाही माजली. तेव्हां पुन्हां परकीयांच्या स्वाया हिंदुस्थानावर सुरू झाल्या. १७ मानवी संस्कृतीचा इतिहास an वर स्वान्याः इशान साम्राज्य हिंदुस्थानच्या पश्चिमेस बॅक्ट्रिया आणि पार्थिया ही दोन राज्ये परकीयांच्या हिंदुस्थान-अशोकाच्या काळांत भरभराटीत होती. ही ग्रीक साम्राज्य दुर्बल झाल्यानंतर फुटून स्वतंत्र झालेली होती. बॅक्ट्रियन लोक प्रकि संस्कृतीचे होते; पण पार्थियन आजच्या अफगाण लोकांप्रमाणे डोंगरी असत. पुढे शक आणि कुशान या मध्य- पाशियांतील रानटी टोळ्यांनी ही राज्ये बुडवून हिंदुस्थानांत प्रवेश केला. कुशान लोकांचे राज्य काशीपासून इराणापर्यंत पसरले असून पेशावर ही त्यांची राजधानी होती. त्यांचा सुप्रसिद्ध राजा कनिष्क ( इ. स. १२० ) याने अशोकाप्रमाणे बौद्धधर्माला बरीच चालना दिली. नागार्जुन, अश्वघोष व वसुमित्र यांसारखे बौद्ध ग्रंथकार याच्या अम- दानींतच उदयास आले. वास्तुशिल्प आणि मूर्तिशिल्प व इतर कलाहि कनिष्काने आश्रय देऊन वाढविल्या. सारानाथ, अमरावती व मथुरा येथील प्रेक्षणीय शिल्प याच्याच वेळचे आहे. कुशान घराण्याच्या अमदानीत इराणांत सस्सन घराण्याचा अंमल होता. या सस्सन राजांनी हिंदुस्थान काबीज कर- ण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केलेला दिसतो. याच काळांत दक्षिण हिंदुस्थानावर आंध्र राजांची सत्ता होती. हे घराणे खि. पू. २२० ते इ. स. २२५ पर्यंत अव्याहत राजैश्वर्य भोगीत होते. यांतील गोतमीपुत्र यज्ञश्री हा राजा अत्यंत बलिष्ठ होऊन गेला. आंध्र राजांनी विशेषतः हालाने प्रचलित प्राकृत भाषेत उत्कृष्ट वाङमय तयार करविले. महाराष्ट्री भाषेतील सप्तशती हा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ हालाच्याच नांवावर मोडतो. सस्सन व आंध्र ~~~ ~~~~ur भारतीय संस्कृतीचा अखंड विकास गुप्त साम्राज्य हर्षांचे साम्राज्य इ. स. चवथ्यापांचव्या शतकांत उत्तर हिंदुस्थानांत गुप्त साम्राज्याचा मोठा दरारा होता. चंद्रगुप्तविक्रमादित्य (राज्यारोहण इ. स. ३७५) याचे राज्य नर्मदेच्या उत्तरेस हिमालयापर्यंत व आरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत व्यापून राहिले होते. राज्यव्यवस्था किती उत्कृष्ट होती, याबद्दल पुरावा म्हणजे फा-हिन या चिनी प्रवाशाने प्रत्यक्ष पाहून लिहिलेली हकीगत होय. पाटलीपुत्र ही गुप्तांची राजधानी फार श्रीमंत व सुखी असून तेथे ज्यांत सहासातशे विद्यार्थी शिकत आहेत अशी दोन छात्रगृहें नामांकित ती. लोक अहिंसापर असून दारू, कांदा किंवा लसूणहि निषिद्ध मानीत. प्रजाजन सुखाने कालक्रमणा करीत होते. पण शंभर वर्षांतच पुन्हां हूण या परकीयांची स्वारी होऊन गुप्तसाम्राज्य लयास गेले व त्याची शकले पडली. त्यांपैकी एक मोठे राज्य म्हणजे कनोजचे. इ. स. ६०६त हर्षानें आजूबाजची बंडाळी मोडून आपले राज्य विस्तृत केले. त्याच्याजवळ ६०, हत्तीचें दळ व एक लाख पायदळ होतें. गुप्तसाम्राज्याएवढें सामाज्य हर्षाने संपादन केले होते. याच्या अम- दानीत दुसरा एक चिनी प्रवासी (हुएनत्संग) हिंदुस्थानांत आला होता. त्याने सर्व हिंदुस्थान पाहून बारीकसारीक हकीकतसुद्धां जी लिहून ठेविली आहे, ती वाचण्यासारखी आहे. हर्षाने विद्येस बरेंच उत्तेजन दिल्यामुळे त्याच्या काळी उत्कृष्ट ग्रंथ लिहिले गेले. मगध देशांत नालंदा येथे जो बौद्ध भिक्षूचा मोठा मठ होता तो आधुनिक विद्यापीठा- प्रमाणे सर्व देशाला विद्यादान देण्याचे कार्य करीत होता. हर्षानंतर पुन्हां भरतखंडांत अंदाधुंदी माजली व मुसलमानी साम्राज्य होईपावेतों मा. सं. इ.४ मानवी संस्कृतीचा इतिहास देशांत एकतंत्री आणि सुव्यवस्थित कारभार करणारे कोणतेंहि राज्य नव्हते. हिंदुस्थानचे दोन वेगवेगळाले भाग म्हणजे उत्तर हिंदुस्थान दक्षिण हिंदुस्थानांतील आणि दक्षिण हिंदुस्थान. युरोपियनांच्या स्वाऱ्या राज्य: पांच आणि चोळ साम्राज्य दक्षिण हिंदुस्थानावर होईपावेतों इतिहासकारांना या भागाची माहिती नव्हती. त्यामुळे १६ व्या शतकापर्यंतचा हिंदु- स्थानचा इतिहास म्हणजे केवळ उत्तर हिंदुस्थानचाच इतिहास देण्यांत येतो. पण दक्षिण हिंदुस्थान उत्तर हिंदुस्थानच्याहि पूर्वीपासून सुधार- लेला असून उत्तरेकडील अशोक साम्राज्याप्रमाणे तामिळ प्रांतांत पांड्य साम्राज्य नांदत होते. एका पांडय राजाने खि. पू. २० मध्ये रोमन बादशहा ऑगस्टस सीझर याकडे वकिलात पाठविली होती. पांडया- प्रमाणे पल्लव, चोल व चेर ही राज्येहि फार प्राचीन आहेत. अशो- काच्या लेखांतून त्यांचा स्वतंत्र राज्ये म्हणून उल्लेख येतो. राजराज चोल (९८५-१०३५) याची सत्ता बहुतेक सबंध दक्षिण हिंदुस्थान आणि सिंहलद्वीप यांवर होती. त्याचे आरमार बलिष्ठ असून समुद्रावर त्याला दुसरा प्रतिस्पर्धी नव्हता. राजेंद्र चौलाने तर ब्रह्मदेश आणि बंगाल पादाक्रांत केला होता. चोलांची राज्यव्यवस्थाहि फार नमुने- दार होती. ग्रामपंचायती असून कांहीं गांवांमिळून एक 'कुर्रम'संघ असे. या संघांना सर्व सत्ता असे. देशांत पाटबंधारे व रस्ते केलेले असत. प्रजेच्या सुखसोयींकडे विशेष लक्ष देण्यात येत असे.चोल साम्राज्यांत प्रमेवर करांचा बोजा मोठा होता असे दिसते. चोल राजे स्वतः धर्माने शैव असत तचापि त्यांनी विधर्मीयांना त्रास दिला नाही.
. भारतीय संस्कृतीचा अखंड विकास H दख्खन: चालक्य आणि राष्ट्रकूट दक्षिण हिंदुस्थानांत दख्खन आणि तामिळ प्रांत असे पुन्हां दोन विभाग पडतात. दख्खनमध्ये आंध्रानंतर चालुक्य सत्ताधीश झाले. बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत या घराण्यानी राज्य केले. दुसरा पुलकेशी (६०८-६४२) हा कनोजच्या हर्षाचा समकालीन असून त्याच्याप्रमाणेच बलाढय होता. मध्यंतरी ७५७ ते ९७३ पर्यंत चालुक्यांना बाजूला सारून राष्ट्रकूट राज्य करीत होते. चालुक्य हे परकी व राष्ट्रकूट हे स्थानिक असा भेद असल्यामुळे काही काळ राष्ट्रकूट लोकप्रिय झाले होते. अमोघ. वर्ष राष्ट्रकूट ( ८१५-८७७ ) हा सर्वांत मोठा राजा होऊन गेला. तो जैनधर्मानुयायी असल्यामुळे त्याच्या अमदानीत दख्खनमध्ये जैन- धर्म जोराने पसरला. चालुक्यांनंतर यादव आणि होयसळ ही राजघराणी नावारूपास आली. होयसळ राजे ११९० मध्ये स्वतंत्र्य झाले. होयसळ राजे बिटिंग किंवा विष्णुवर्धन हा त्यांच्यातील प्रसिद्ध राजा. त्याने कला व धर्म ( जैन आणि वैष्णव ) यांना बरेच उत्तेजन दिल्याकारणाने त्याच्या अमदानीत बरीच जैन आणि वैष्णवांची सुंदर आणि मोठी देवस्थाने झाली. रामानुजाचार्य या वेळी त्याच्या राज्यांत येऊन राहिले होते व त्यांनी आपल्या वैष्णव पंथाचा म्हैसूर प्रांतांत चांगलाच प्रचार केला. चवदाव्या शतकांत होयसळचे राज्य मुसल- मानांनी बुडविलें. होयसळांची राजधानी द्वारसमुद्र, ही सांप्रत म्हैसूर संस्थानांतील हळेबीड गांव आहे त्या जागी होती. अद्याप प्राचीन अवशेष तेथे बाहेत.
AAAAAAAnnnnn NAAAAAAAAA मानवी संस्कृतीचा इतिहास ManushA यादव राजे साम्राज्य यादव राजे मूळ चालुक्यांचे सरदार. त्यांनी देवगिरीस गादी स्थापून दौलताबाद व नासिक टापूंत अंमल सुरू केला. सिंघण ( १२१० ) राजाने बराच मोठा प्रदेश जिंकून यादव राज्य वाढविलें. इ. स. १२९४ त अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराजाचा पराभव केल्यानंतर थोड्याच वर्षांनी येथे मुसलमानी अमदानी झाली. सबध हिंदुस्थानवर पहिल्याने वर्चस्व गाजविणारे मुसलमानच मुसलमानी आणि होत. यापूर्वी या देशावर परकीयांच्या स्वाया युरोपियन संस्कृतीचे होऊन काही भागांवर त्यांची सत्ता प्रस्थापित झाली हिंदुस्थानवर खरी, पण सबंध हिंदुस्थान केव्हांच परकीयांच्या ताब्यांत नव्हता. पण अकराव्या शतकापासून ही स्थिति पालटून गेली. कारण १८ व्या शतकापावेतों मुसलमान आणि त्यापुढे आज- तागायत युरोपियन यांचा पूर्ण अंमल हिंदुस्थानवर बसला. मध्यंतरी दक्षिणेत विजयानगरचे राजे आणि मराठे यांनी, व उत्तरेस रजपुत आणि शीख यांनी हा अंमल आपापल्या प्रांतांपुरता तरी झुगारून देण्याचा प्रयत्न केला होता व कांही काळ यशहि मिळविले होते. विजयानगराचें राज्य १३३६ त स्थापन झाले व १५६५ त विजयानगर व वैदिक लयाला गेले. संपत्ति, कलाकौशल्य आणि विद्या या संस्कृतीचे पुनरुज्जीवन बाबतींत हे शेवटचेच मोठे हिंदु राज्य होऊन गेलें, असें यथार्थाने म्हणता येईल. हिंदूंची प्राचीन वैदिक संस्कृति पुन्हां लोकांत सूत करण्यासाठी विजयनगरचे प्रमुख मंत्री आणि त्या वेळचे शृंगेरीचे शंकराचार्य विद्यारण्यस्वामी ( माधवाचार्य ) यांनी वेद आणि वेदांगें AAMNAL भारतीय संस्कृतीचा अखंड विकास r यांवर स्वतः भाष्य लिहिली व विद्वान् पंडितांकडून लिहविली. वेदविद्येची अखेरची मोठी जागृति याच वेळी झाली. पुढे मराठ्यांच्या अमदानीत शिवाजी राजे व पेशवे यांनी हिंदु संस्कृति जिवंत ठेवून पुन्हां ती फैला- वण्याचा दीर्घ प्रयत्न केला व काही काळ या कामगिरीत यशहि मिळ- विले. पण पुढे पाश्चात्य संस्कृतीचे तडाखे बसू लागले असता संस्कृति- संवर्धनाचे काम थांबलें व उलट संस्कृतिरक्षणाची जरुरी भासू लागली. भारतीय संस्कृति सर्वसंग्राहक असल्याने परकीय संस्कृतींशी तिची भारतीय संस्कृतीची गाठ पडतांच त्यातील चागले व आकर्षक अंश सर्वसंग्राहकता ती आपल्यांत घेते. त्यामुळे इतर संस्कृतींना आपण भारतीय संस्कृतीपेक्षा अधिक चांगल्या आहों हे दाखवितांच येत नाही. तसेंच परकीय संस्कृति पचविण्याची क्रिया इतकी सावकाश आणि जुन्या शास्त्रांना धरून असते की, हिंदु समाज पूर्वीपेक्षांहि कांहीं बदलला असेल अशी कोणाला फारशी कल्पनाहि येत नाही. अलेक्- झांडरने जसा हिंदुस्थान पाहिला असेल तसाच आज कोणीहि पाश्चात्य मनुष्य पाहील. म्हणजे सांस्कृतिक दृष्टया त्या वेळचा आणि आजचा समाज यांत मोठासा फरक दिसून येणार नाही. यामुळे भारतीय संस्कृति अखंडित चालली आहे. हिंदूंची संस्कृति जगांत जी बऱ्याच ठिकाणी पसरली आहे तिची ओळख आपणाला पुढील गोष्टींवरून होते:(१) संस्कृत जगांत पसरलेली हिंदु संस्कृति ओळख- भाषेचा पगडा सीलोन, मालदीव, ब्रह्मदेश, मलाया, सुमात्रा, जावादि बेटें, चीन आणि जपान, द्राविड, प्रांत वगैरे भागांतील भाषांवर बसला असून त्या भाषांतून संस्कृत ग्रंथांची ण्याच्या खुणा ५३ मानवी संस्कृतीचा इतिहास भाषांतरे आणि रूपांतरे झालेली आहेत. या भाषा आर्यन (म्हणजे ज्या कुलांत संस्कृत उत्पन्न झाली त्या) कुलांतील नाहीत म्हणून हा आपल्या भाषेचा त्यांवर असलेला पगडा सहज बसलेला नव्हे, तर लादलेला आहे. (२) हिंदुस्थानांतल्याप्रमाणे जाती आणि आचार पेगूतील तलैंग लोकांत, काचिन लोकांत, आराकानांतील माघ लोकांत, ब्रह्मी लोकांत, काफरी लोकांत, बलुचिस्तानांतील गिचकी लोकांत, इराणांतील लुरी आणि गुदाद लोकांत, आफ्रिकेंतील जुबालंडमधील काही जातींत व सुमात्रा, कांबोज इत्यादि कांही हिंदुस्थानाबाहेरील देशांत आढळून येतात. काही देशांतून आपल्याकडल्याप्रमाणे ब्राह्मण वर्ण आहे. उदाहरणार्थ ब्रह्मदेशांत पावन ब्राह्मण, कांबोजांत बकु किंवा प्राम ब्राह्मण, मलायांत इदान जात, जावाबलिद्वीपांत पादंड. बौद्ध धर्मामुळे सिंहली, जपानी, चिनी, ब्रह्मी इत्यादि लोकांवर सर्वांशीच हिंदु- संस्कृतीचा जबर परिणाम झाला आहे. ( ३ ) हिंदुस्थानाबाहेर पुढील देशांतून बरेच हिंदु लोक वसाहती करून राहिले आहेत:-सिलोन, लखदीव मालदीव बेटें, अंदमाननिकोबार बेटें, ब्रह्मदेश, मलाया, सयाम, लाँबाक, सेलिबस, फिजी बेटें, मादागास्कर, पूर्व आणि दक्षिण आफ्रिका, ब्रिटिश गियाना, डच गियाना वगैरे देश. या वरील देशांत हिंदु लोकांनी आपली पूर्वपरंपरागत हिंदु संस्कृति नेऊन रुजविली आहे. याप्रमाणे भारतीय संस्कृतीचा विकास झाला आहे व होत आहे. या विकासाची स्वरूपे विविध आहेत, पण त्यांचा येथे ऊहापोह करण्याचे कारण नाही. . ५४ महत्त्व प्रकरण ७ वें शास्त्रीय आणि प्रादेशिक संशोधन व जगावर युरोपियन सत्तेचा प्रादुर्भाव मनुष्याला सुख लागण्यासाठी ज्या सुखसोयी लागत असतात, त्या भौतिक शास्त्रांचे बहुतेक शास्त्रीय शोधांवरच अवलंबून आहेत. पदार्थ- विज्ञान आणि रसायन ही दोन शास्त्रेच बहुधा सर्व शोधांना कारणीभूत आहेत. आगगाड्या व इतर कारखान्यांची यंत्रे आणि साधने यांच्या शोधांना में ज्ञान लागलें तें वरील शास्त्रांनीच मुख्यत्वेकरून पुरविलें असें म्हटल्यास फारशी चक होणार नाही. मानव प्राण्याचे आरोग्य तर सर्वांत महत्त्वाचे आहे. कारण ते जर नसेल तर इतर सुखाची साधने काय कामाची ? तेव्हां हे आरोग्य देणारे जे वैद्यकशास्त्र त्यांतील बहुतेक सर्व शोध जीवनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र यांच्या अध्ययनांचे फल होत. तेव्हां ही व इतर भौतिक शास्त्रे कशी निघाली, प्रथम कोणी शोधून काढिली हे जाणणे अगत्याचे आहे. प्राचीन काळी भारतीय, चिनी, अरब आणि ग्रीक लोकांनी गणित, ज्योतिष, वैद्यक यांसारख्या काही शास्त्रांत प्रगति करून घेतली असली तरी आज जी भौतिक शास्त्रे प्रचलित आहेत त्यांना या मागील शास्त्रांचा फारसा उपयोग झाला नाही. ही आधुनिक शास्त्रे पंधराव्या शतकापासून पुढे येऊ लागली.
मानवी संस्कृतीचा इतिहास m ~~~~ सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते व ग्रह- मालेच्या केंद्रस्थानी सूर्य असून तो सर्वांचा चालक शास्त्रीय शोध आहे हा शोध प्रथम जर्मन ज्योतिषी कोपर्निकस (१४७३-१५४३) यानेच लाविला; तेव्हां तोच अर्वाचीन ज्योतिष- शास्त्राचा जनक ठरतो. वरील कोपर्निकसचा शोध प्रत्यक्ष डोळ्यानी पटवून देण्याकरितां ज्याने पहिली दुर्बीण तयार केली तो इटालियन गणिती गॅलिलिओ ( १५६४-१६४२ ) पदार्थविज्ञानशास्त्राचा संस्थापक म्हणता येईल. पण त्या बिचाऱ्याला आपल्या शोधाबद्दल पुराणमतवाद्यांचा छळ सोसावा लागला, पण यापेक्षा जास्त महत्त्वा शोध म्हणजे छापण्याची कला व होकायंत्र. कागद करण्याची कला मूळ अरबांची, ती पुढे युरोपांत जाऊन तिने विद्यावृद्धीला बरेच चालन दिले. तरी पण १४ व्या शतकापावेतों चांगला कागद तयार होत नसे. या शतकांत इटलीने आघाडी मारून जर्मनीला उत्तम कागद करण्याचा धडा घालून दिला. यानंतर लगेच छापण्याची कलाहि निघाली. ही कलाहि मूळ पौर्वात्यांचीच पण टाईप पाडून छापणे ही अर्वाचीन कला मात्र पाश्चात्त्यांची. जर्मनींत जॉन गटनबर्ग नांवाच्या माणसाने १४३८ च्या सुमारास उचलता ठेवता येणारे टाईप तयार करून जगांत एक मोठी क्रांति घडवून आणली. पुस्तकें बरीच तयार होऊ लागल्याने ती स्वस्त मिळू लागली व बरेच लोक वाचूं लागले. यामुळे ज्ञानाचा प्रसार फार झपाट्याने होऊ लागला व तरवारी पेक्षांहि लेखणीची कदर लोकांना व सरकाराला जास्त वाढू लागली. मुद्रणकला शास्त्रीय आणि प्रादेशिक संशोधन M होकायंत्राच्या शोधामुळे खलाशांना समुद्रावर कोठेहि जाण्याची धास्ती वाढू लागेनाशी झाली. यामुळे जगांतील दूर- बंदुकीची दारू दूरचे लोक एकमेकांना भेटूं लागले व साहजिकच व्यापार आणि दळणवळण वाढले. याच सुमारास बंदुकीची दारू निघाली. हा शोध मोंगल लोकांनी चीनमधून पश्चिमेकडे नेला असें म्हणतात. छापण्याची कला आणि होकायंत्र हे शोधहि मूळ चिनी लोकांचेच असें सागतात. पण खरे काय ते आज नक्की समजत नाही. बंदुकीच्या दारूमुळे तर युद्धशास्त्रांत मोठी क्राति घडून आली व बंदुकांचा उपयोग सर्वत्र सर्रहा होऊ लागला. या बंदुकांपुढे मोठया तटबंदी किल्लयांत सुद्धां जावित सुरक्षित राहू शकेना. बंदुकांचा प्रभाव पाहून हजारों रानटी लोक मूठभर गोऱ्या लोकांना शरण येऊ लागले. सरंजामी सरदारांची सत्ता बंदुकांमुळे पार मोडली. याप्रमाणे हे नवीन शोध मोठे महत्वाचे व परिणामकारक झाले यांत शंका नाही. प्रादेशिक किंवा भौगोलिक शोध शास्त्रीय शोधांपूर्वीचे असले तरी भौगोलिक शोधः मध्ययुगानंतर नवीन नवीन भूप्रदेश शोधण्याच्या कामी अमेरिकाखंड आणि शास्त्रीय शोधांचा बराच उपयोग झाला. व्यापार आणि हिंदुस्थानचा जलमार्ग राज्यविस्तार या हेतूने प्राचीन काळी लोकांचे एका खंडांतून दुसऱ्या खंडांत जाणेयेणे होत असे. यात्रेनिमित्त चिनी मिथू जसे अनेक संकटें सोसून हिंदुस्थानांत येत तसेंच ख्रिस्ती आणि मुसलमानहि अरबस्तानाला दूरदूरच्या ठिकाणांहून जात. भूमध्यसमुद्रा- भोवती जी मिसरी, फिनिशिअन, ग्रीक आणि रोमन ही राष्ट्र होऊन गेली, त्यांनी आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडांचा बहुतेक भाग मानवी संस्कृतीचा इतिहास व्यापारी लुटारू परिचित करून घेतला होता. लि. पू. ३३० त पिथिअस नावाचा एक प्रीक खलाशी उत्तर ध्रुवापर्यंत जाऊन आला होता. अरब व मोंगल आणि मोठे धाडशी असत. नॉर्थ-मेन या चांच्यांनी तर अमेरिकेपर्यंत वसाहती केल्या होत्या. याप्रमाणे भौगोलिक शोधांचा मागचा इतिहास आढळेल. या शोधांची मोठी चटकदार वर्णनेहि काही प्रवाशांनी लिहून ठेविली आहेत. ती वाचून नवीन शोधक उत्पन्न होत. कोलंबसाची गोष्ट अशाच आहे. मार्को पोलो याचे चीनचे प्रवास वाचून त्यालाहि पश्चिम दिशेनें गलबत हांकारून पूर्वेस असलेल्या चीनला पोचतां येईल असा विश्वास वाटू लागला. त्याच्या वेळच्या सुशिक्षितांप्रमाणे पृथ्वी वाटोळी आहे असे त्याचे ठाम मत झाले होते. तेव्हां मोठ्या खटपटीने तो स्पेनहून पश्चिमेकडे निघाला तो वेस्ट इंडीज बेटांत जाऊन उतरला (१४९२). हाच अमेरिकाखंडाचा युरोपियन लोकांना लागलेला प्रथम शोध होय. याच सुमारास वास्को डि गामा या पोर्तुगीज व्यापाऱ्याने हिंदुस्थानला जाण्याचा जलमार्ग शोधून काढला. आफ्रिकाखंडाला वळसा घालूनच त्याला हिंदुस्थानचा किनारा गांठतां आला. सुवेझची सामुद्रधुनी पुढे १९ व्या शतकांत तयार झाली. तोपर्यंत युरोपहून आशियाखंडास जलमार्गाने यावयाचें म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिणेकडूनच यावे लागत असे. हा जलमार्गफार लांबचा असला तरी त्या वेळी ईश्वराची मोठीच खैर झाली असें युरोपियन व्यापाऱ्यांना वाटे. कारण खुष्कीचा मार्ग तुर्की लोकांच्या हाती असून ते फार त्रास देत. तेव्हां नवीन खतंत्र मार्ग शोधण्याची फार जरूरी वाटू लागली होती.
शास्त्रीय आणि प्रादेशिक संशोधन AARMA त्या काळची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे पृथ्वीप्रदक्षिणा. या धाडसासाठी मॅगेनल नांवाचा एक पोर्तुगीज खलाशी पृथ्वीप्रदक्षिणा पांच गलबतें घेऊन निघाला (१५१९). तो अमेरिकेला वळसा घालून गेला. त्याच्या नशिबी जरी परत स्वदेशी येण्याचे नव्हते तरी त्याचे एक गलबत अखेरीस पृथ्ांप्रदाक्षिणा करून आले (१५२२ ). दोनशेऐशी लोक मॅगेलनबरोबर निघाले होते, पण सारे एकतीसच परत आले. यानंतर ड्रेक नावाच्या इंग्रजानें पृथ्वीप्रदक्षिणेचा प्रयत्न करून पाहिला. या युरोपियनांच्या धाडसी वृत्तीमुळे आणि समुद्रावर सुरक्षित जगांत पुरोपियन चालणाऱ्या नवीन गलबतांच्या वाढीमुळे जगाच्या वमाहतींना आरंभ पाठीवर कोठेहि वसाहत करण्याची बुद्धि साह- जिकच त्या लोकांना होऊ लागली. छापील प्रवासवर्णनांची आणि परदेशाच्या भूगोलाची पुस्तकें व नकाशे मिळू लागल्यामुळे तर मोठोच चालना मिळाली. नवीन संशोधिलेलें अमेरिका खंड तर त्यांना पादाक्रांत करण्यास मोकळे होते. आशियाखंडाशी व्यापार कसा किफायतशीर असतो याचा प्रत्यक्ष अनुभव होताच. पोर्तुगाल देश हा पूर्वेस स्पेन आणि पश्चिमेस समुद्र असल्या- कारणाने खुंटला होता. त्याला तर वाढीची अति- पातुंगीज वसाहनी शय इच्छा होती. तेव्हां बाहेरच्या जगावर चाल करून आपल्या राज्याला वसाहती जोडण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. त्यांतून पोर्तुगीज लोक अति धाडसी व दर्यावर्दीपणांत कुशल. तेव्हां पास्को डी गामाने हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढल्यावर पोर्तुगालच्या मानवी संस्कृतीचा इतिहास . राजाने साम्राज्य स्थापण्याची तयारी केली. गोव्याहून पोर्तुगीज व्यापारी आणखी पूर्वेकडे सरकत चीनपर्यंत गेले. मॅलाक्का त्यांनी काबीज केलें व कॅन्टनजवळील मकाव भागांत वसाहत स्थापली.. हिंदीमहा- सागराच्या किनाऱ्यावर त्यांनी जागजागी आपली ठाणी ठेवली व स्पेनने अमेरिकेंत आपले साम्राज्य सुरू केलेले पहातांच पोर्तुगीजहि तिकडे धांवत गेले व हिश्शासाठी भांडूं लागले. तेव्हां पोपनें या भावंडांत अमेरिका वाटून दिली ! पण पोपचा हा निकाल इतर राष्ट्र थोडाच मानणार ? इंग्रज, डेन्स, स्वीडीज, डच व फ्रेंच देखील अमे. रिकेवर आपला हक्क सांगू लागले व एकमेकांशी भांडू लागले. स्पॅनियर्ड लोकांनी मेक्सिको आणि पेरू येथील प्राचीन राष्ट्र व अमेरिकेत स्पॉनिश त्यांच्या संस्कृती, त्यांची संपत्ति लुबाडण्यासाठीठार वसाहती केल्या. मेक्सिकोंतील मय संस्कृति बरीच सुधारलेली व फार प्राचीन होती. हिच्यासबंधी माहिती मागें थोडक्यात दिलीच आहे. पण युरोपियनांच्या बंदुका, चिलखतें आणि कवाइती सैन्य यांपुढे कोठली पुराणसंस्कृति टिकणार ? अमेरिकेत सोने, रुपें विपुल व त्यामुळेच त्यावर परकीयाचा घाला. स्पॅनियर्डनी सोनेरुपे काढण्या- साठी वसाहती करून खाणी खोदल्या व मूळच्या रानटी लोकांनाच मजूर बनविले. ते जेव्हां बिचारे कष्टाने मरत चालले तेव्हा त्याच्या जागी आफ्रिकेतील नीमोंना गुलाम करून आणले. उत्तर अमेरिकेचा बराच भाग, बहुतेक दक्षिण आणि मध्य अमेरिका व वेस्ट इंडीज बेटे ही स्पेनच्या अंमलाखाली त्या वेळी होती, व त्यांचा राज्यकारभार वसाहतीच्या पद्धतीवर चालला होता. ६० muN शास्त्रीय आणि प्रादेशिक संशोधन ~~~ सतराव्या अठराव्या शतकांत इंग्रज आणि फ्रेंच यांनीहि वसाहती इंग्रज आणि फ्रेंच करण्यास आरंभ करून सर्व राष्ट्रांपेक्षां या कामांत वसाहती जास्त प्रगति केली. पण युरोपांत या दोन राष्ट्रांमध्ये जी भयंकर तेढ होती तीच सर्वत्र कायम राहून एकमेकांत युद्धे होऊ लागली. या वेळी ब्रिटिशांचे आरमार बलिष्ठ असल्याने त्यांनी फ्रेंच वसाहती काबीज केल्या व अमेरिका आणि हिंदुस्थान यांतून फ्रेंचांना हाकलून दिले. वसाहत इकडे उत्तरेस रशिया रुंदावत चालला व पूर्वेकडे वाढू लागला. आशियांत रशियन रशियाच्या या वाढीचे सर्व श्रेय त्यांतील कोसॅक लोकांना आहे. कोसॅक लोकांची वृत्ति हिंदुस्था- नच्या वायव्य सरहद्दीवरील अफगाण टोळ्यांसारखी असे. चोर, दरोडे- खोर, खुनी, पाखंडी वगैरे गुन्हेगार या राष्ट्रजातींत असत. पण यांच्या अंगच्या शौर्यामुळे रशियन सरकारने त्यांना लष्करांत घेतले व त्यांना आशियाखंड पादाक्रांत करून स्वतः त्याचे मालक बनण्यास परवानगी दिली. तेव्हां कोसॅक लोक पूर्वेस देश काबीज करीत करीत पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. हा त्यांनी जिंकलेला प्रदेश सैबेरिया होय.
प्रकरण ८ वें औद्योगिक क्रांतीचे युग आग- सुधारणेची मजा अशी आहे की, प्रथम सुधारणा उचलण्यास जितका काळ लागतो त्याच्या शतांशानेंहि पुढे सुधारणेची पाव्याने प्रगति सुधारणेची प्रगति होण्यास लागत नाही. प्राचीन पाषाण युगापासून जमीन कसण्याला माणूस लागेपावेतों जितका काळ लोटला, त्यापेक्षा कितीतरी कमी वेळ माणसाला सुधारणेच्या शिखरास पोचण्यासाठी लागला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून यांत्रिक शोधांचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारांत होऊ लागला. आगगाड्या, बोटी, तारायंत्रे, टेलेफोन, बिनतारी, विद्युत्शक्ति, कोळसा, लोखंड या सर्व सावनांमुळे उद्योगधंद्यांत मोठी क्रांति घडून आली. या क्रांतीची जाणीव समाजांतील अगदी वरच्या पायरीवरील माणसापासून अगदी शेवटच्या पायरीवरील माणसापर्यंत सर्वांनाच होऊ लागली. शिवाय या क्रांतीमुळे सर्व जग या टोकापासून त्या टोकापर्यंत एकजीव होऊन गेले. ते इतके की, एका भागांत कांहीं खळबळ उडाली न उडाली की पुरे तिचा परिणाम अगदी दूरच्या भागावरहि होऊ लागला. आतापर्यंत जे शास्त्रीय शोध लागले, त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारांत उपयोग होण्याची वेळ येऊन ठेपली. १७६९ त वाफेची शक्ति जेम्स वॉट या इंग्रज शास्त्रज्ञाने वाफेने चालणारें इंजिन तयार केले. विश्वांत ज्या ज्या शक्ति आहेत त्यांना माणसांची काम करण्यास लावणे हा माणसाचा निसर्गावर विजयच नव्हे काय ? ६२ AAAAAAI AnnMAMA औद्योगिक क्रांतीचे युग MAMNA" आगगाव्या उष्णतेचे गतीत रूपांतर करून ही गति वाहने ओढण्यासाठी खर्च करण्याची वॉटची कल्पना नंतरच्या संशोधकांनी उचलून सूत कातणे व विणणे व आणखी कित्येक कष्टाची कामें सहज कमी खर्चात करणे यांसंबंधीं धडे घालून दिले. रस्त्यावर लांकडी रूळ टाकून त्यांवरून गाड्या चालविण्याचा प्रकार बराच जुना आहे. त्यानंतर खाणीतून बंदरावर कोळसा नेणाऱ्या घोड्यांच्या ट्रॅमगाड्या लोखंडी रुळा- वरून चालू लागल्या. पण पहिली आगगाडी इ. स. १८०४ मध्ये झाली. नंतर दहा वर्षांनी स्टीफन्सननें जरा जास्त सुधारलेली आगगाडी काढली व हळू हळू तिचा वेग ताशी . ४ मेलापावेतों वाढविला. तेव्हां मात्र लोकांना मोठा आचंबा वाटून या शोधाबद्दल ते नवयुगाचे धन्यवाद गाऊ लागले. ही आगगाडीची युक्ति जगांत सर्व ठिकाणी पटून जिकडे- तिकडे आगगाड्या सुरू झाल्या. यामुळे जगांत भयंकर उलथापालथ झाली. इकडला माल तिकडे जाऊ लागला. तिकडले कधीं न येणारे लोक इकडे येऊ लागले. एका ठिकाणी जास्त होणारा जिन्नस अनेक ठिकाणी वांटला जाऊन त्याबद्दल दुसरे जिन्नस येऊ लागले व सर्व ठिकाणी सर्व जिन्नसा मिळू लागल्या. याचा मोठा परिणाम व्यापार व उद्योगधंद्यांवर झाला. कोठेहि दुष्काळाची भीति राहिली नाही. ज्ञानाचा फैलाव सर्वत्र सारखा झपाटयाने होऊ लागला. भिन्न भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येऊं लागून राष्ट्रीय जीवन सुलभ झाले. विशेषतः राज्य- कांना राज्य कितीहि अफाट असो त्याचा कारभार व्यवस्थित करणे सोयीस्कर झाले. याप्रमाणे आगगाडीनें मानवी संस्कृतीत आणि सुधा-
~~~~
~~..
~~~
~~~~~~~
मानवी संस्कृतीचा इतिहास
रणेत केवढी अवर्णनीय भर टाकली याची सविस्तर माहिती देऊ
गेल्यास एक मोठा ग्रंथच होईल.
यासारखीच महती आगबोटीची. तीसुद्धा १९ व्या शतकाच्या
पहिल्या दशकांत सुरू झाली. आतां जलप्रवास
भागबोटी
सुलभ व ठराविक मुदतीचा झाला, नाहीतर पूर्वी
इष्ट स्थळी पोहोचण्यास किती दिवस लागतील हे सांगता येत नसे.
चीनजपानादि पूर्वेकडील राष्ट्रांचा युरोपशी फार क्वचित् संबंध येई व
त्यामुळे आतांप्रमाणे आशियांतील कच्चा माल तिकडे जात नसे व
उलट युरोपमधील भौतिक शास्त्रांचे ज्ञान आणि नवविचार यांचा
कल्याणप्रद लाभ आशियाला होत नसे. आगबोटीने आतां चीन व
जपान ही युरोपपासून एका महिन्याच्या अंतरावर आली. हिंदुस्थान तर
त्याहून जवळ. सुवेझ कालवा १८६९ त उघडला गेल्यापासून
आणखी अंतर कमी झाले.
वाफेच्या शक्तीने जमीन आणि पाणी यांवर वेगाने आक्रमण होऊ
लागल्याबरोबर आणखीहि एक शक्ति मनुष्याच्या
विद्युत् शक्तिः तारा-
सुखसोयीसाठी पुढे आली. ती म्हणजे विद्युत्,
व्होल्टा, गॅलव्हानी, फॅरेडेप्रभृति शास्त्रज्ञांनी या शक्तीला संदेशवाहनाचे
काम दिले. तारायंत्राचा उपयोग इ. स. १८३५ पासून होऊ लागला
व थोड्याच तासांत दोन दूरदूरच्या खंडांना एकमेकांना बातम्या
देतांघेता येऊ लागल्या. इ. स. १८९६ त मार्कोनी या इटालियन
शास्त्रज्ञाने बिनतारी संदेशाची वृत्ति काढली. यामुळे समुद्रांतून वीज
नेण्याकरितां तारा घालण्याचे अवघड व खर्चाचे काम वाचूं लागले.
६४
~~~~~~~-~~-~-
औद्योगिक क्रांतीचें
युग
तारायंत्राने किंवा बिनतारीने मनुष्याला दुसऱ्याने दिलेला संदेश
त्याच्याच आवाजांत ऐकू येत नसे. फक्त त्याचे
टेलेफोन
म्हणणे काय तें खुणांच्या द्वारा पत्राप्रमाणे कळत
असे. टेलेफोनचा जेव्हां शोध निघाला तेव्हां तर प्रत्यक्ष दुसऱ्याशी
बोलतां येऊ लागले व दुसऱ्याचे बोलणे ऐकू येऊ लागले. पुढे पुढे
तर तारायंत्राने लांबचे फोटोहि घेता येऊ लागले. या सर्व शोधांनी
जग हे एक विश्वकुटुंब करून सोडलें यांत संशय नाही. कारण एका
शतकापूर्वी लंडनपासून एडिंबरो जितके लांब वाटत होते, त्यापेक्षा
या शोधांनी लंडनपासून मुंबई जवळ आणली.
माणसाने या अचाट कर्तृत्वाबरोबरच आणखीहि बरेच विजय
मिळविले. ते म्हणजे भूमीवरच्या व भूमीतील द्रव्यांचा
लोखंड आणि कोळसा
आपल्याला पाहिजे तसा उपयोग करून घेणे.
१८ व्या शतकापूर्वी लोखड फारसें मिळत नसून त्याच्या हव्या त्या
जिन्नसा करता येत नसत. पण दगडी कोळशाचा शोध लागून तो
वाटेल तितका बाहेर काढता येऊ लागल्यावर लोखंड वितळवून त्याचे
पाहिजे तसे पत्रे बनवितां आले. विजेच्या भट्ट्यातून लोखंड वितळविणे
सोपें झाल्याकारणाने त्याची इंजिनासारखी यंत्रे चांगली होऊ लागली.
मोठमोठ्या बोटी, पूल, इमारती सामान यांना लागणारे लोखंड व
पोलाद थोड्या वेळांत व कमी श्रमांत माणसाला मिळण्याची केवढी
तरी मोठी सोय झाली व त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांत कल्पनातीत
क्रांति झाली. आज जिकडे पहावे तिकडे लाकडाची जागा लोखंडाने
पटकावल्याचे दिसून येईल.
मा.सं.इ. ५
६५
मानवी संस्कृतीचा इतिहास m समुद्रावरून किंवा पाण्यावरून यंत्रशक्तीच्या साहाय्याने मनुष्य कितीहि जलद गेला तरी त्याचा वेग हवेतून जाण्या- विमाने पेक्षा कमीच असणार. शिवाय पृथ्वीच्या पृष्ठभागा- वर जसे मागाँत फार अडथळे असतात तसे हवेत नसणार. तेव्हां पक्ष्यांप्रमाणे हवेतून उडत जाणे ही कल्पना शास्त्रज्ञांच्या डोक्यांत येऊन त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले व इतर प्रयत्नांत जसें यश त्यांना लाभून अखिल मानवजातीवर त्यांचे उपकार झाले तसेंच याहि बाबीत झाले. प्रथम प्रयोगावस्थेत विमान होते. पण १९०९ पासून माणसें वाहून नेण्याच्या कामी त्याचा उपयोग होऊ लागला. आता तर एका खंडांतून दुसऱ्या खंडांत जाण्यास आगगाडया, आगबोटी- प्रमाणे विमानांचीहि सोय होत आहे. वरील सुखसोयींच्या सुधारणा बाहेरच्या झाल्या. पण मनुष्याचे शरीरपोषण होण्याकरितां जें अन्न लागते, त्याच्या समृद्धीसाठी काही नवीन तजवीज झाली होती की नाही हे पाहिले पाहिजे. शास्त्रीय शोधांचा ओघ शेतकीकडेहि त्या शतकांत वळला होता व शेतकीचे रसायनशास्त्र ही नवीन शास्त्रीय शाखा देखील निघाली होती. माणसांची संख्या जशी वाढते तशी जमीन कांही वाढत नसते. तेव्हां तेवढयाच जमिनीत जास्त माण- सांना पुरेल असे पीक काढण्याची कला हस्तगत करण्याची खटपट झाली व पूर्वी ज्या ठिकाणी एकपट पीक निघे त्याच ठिकाणी चार- पांच पट पीक काढण्यात येऊ लागले. माणसांच्या आरोग्याकडेहि या काळांत जास्त लक्ष पुरविण्यात येऊ लागल्याचे दिसून येते. जास्त अनाचा पुरवठा राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय Mon. याप्रमाणे अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकांत शास्त्रीय शोध व तदनुषंगिक औद्योगिक सुधारणा फार झपाटयाने व्यापारी चदाओढ झाल्या. युरोपांत औद्योगिक क्रांति प्रथम इंग्लंडमध्ये झाली व सर्व जगाला यांत्रिक साधनें पुरविण्याचा मक्ता काही दिवस इंग्लंडकडेच होता. पुढे अमेरिका आणि जर्मनी यांनी इंग्लंडशी स्पर्धा सुरू केली व आपापल्या राष्ट्रांत जंगी उद्योगधंदे चालविले. प्रकरण ९३ राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय सतराव्या अठराव्या शतकांत जगांत सर्व क्षेत्रांतून जशा क्रांत्या झाल्या तशाच राजकीय क्षेत्रांतहि झाल्या. लोक लोकसत्ताक राज्य ज्या वेळी सुधारत चालले त्या वेळी त्यांना साह- जिकच राज्यकारभारांतील गुणदोष दिसून येऊ लागले. सर्व माणसे एकाच दर्जाची असून ईश्वराने त्यांना जे काही जन्मसिद्ध हक्क दिले आहेत त्यांपैकी प्रमुख म्हणजे जीव जगविणे, स्वतंत्रता राखणे आणि सुखाच्या पाठीमागे लागणे. हे हक्क राजाने सांभाळले पाहिजेत व तो जर सांभाळीत नसेल तर लोकांनी त्याला दूर सारून जो दुसरा कोणी लोकमताप्रमाणे राज्य करील त्याला राजा करावे, अशा त-हेचे विचार सुशिक्षितांत उद्भूत झाले. इंग्लंडमध्ये चवदाव्या शतकांतच लोकसत्ताक पद्धति अस्तित्वात आली. पण पुढे सरंजामी पद्धत येऊन तिचें जुलमी राजसत्तेत रूपांतर झाले, तेव्हां पुन्हां राज्याचा गाडा आपल्या ६७ मानवी संस्कृतीचा इतिहास RANA हाती ठेवण्याचा इंग्रजांनी जिवावर उदार होऊन प्रयत्न केला. टयूडर राजघराणे फार बलिष्ठ व अरेराव होते; तसेंच किंबहुना जास्त जेव्हां त्यामागून आलेले स्टुअर्ट घराणे बनूं लागले तेव्हां लोकांनी राजाशी युद्ध करून त्याचा शिरच्छेद केला व कांहीं वर्षे प्रजासत्ताक राज्य चालविलें. १६८८ मध्ये पुन्हां राज्यक्रांति होऊन दुसऱ्या एका स्टुअर्ट राजाला लोकांनी पदच्युत केलें व आपल्याकडे बरेच राजकीय हक्क घेतले. पहिला जॉर्ज हा परकीय राजा जेव्हां गादीवर बसला तेव्हां तर त्याचे मंत्रिमंडळ पार्लमेंटलाच जबाबदार राहिले व खरे राज्यकर्ते लोकप्रतिनिधीच होते. हीच, राजाचे अधिकार अगदी निय- मित करून सर्व राज्ययंत्र लोकप्रतिनिधींकडे ठेवणारी राजशासन- पद्धति सर्वत्र अंमलांत येऊ लागली व ज्या ठिकाणी तिला विरोध होऊ लागला त्या ठिकाणी बंडे आणि युद्धे होऊन अशी लोकसत्ताक राज्यपद्धति स्थापन करण्यांत आली. अठराव्या शतकांत एक युरोपांत आणि दुसरी अमेरिकेंत अशा दोन मोठया राज्यक्रांत्या झाल्या व सर्व जुलुमी अमेरिकेंत राज्यक्रांति राष्ट्रांना मोठी दहशत बसली. अमेरिका खंड शोधून काढल्यापासून त्यांत निरनिराळ्या भागांतून निरनिराळ्या राष्ट्रांच्या वसाहती होऊ लागल्या. वसाहती करण्यासाठी येणारे लोक अगो- दरच धाडसी, स्वतंत्र बाण्याचे आणि स्वतः कष्ट करून जमीन- जुमला करणारे असत. तेव्हा त्यांच्यावर एखादें युरोपियन राष्ट्र जुलुमी अंमल करूं पाहील तर उलट त्यालाच थप्पड बसल्यावांचन रहाव- याची नाही. ६८ word राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय उत्तर अमेरिकेंत सतराव्या शतकापासून इंग्रज लोक वसाहती करून व मुकाटयाने इंग्लंडची राज्यसत्ता मानून राहिले होते. पण जेव्हां इंग्लंडचा राजा आपल्या पार्लमेंटांत अमेरिकेचे प्रतिनिधी न घेतां उलट तिच्यावर जुलुमी कर बसवू लागला, तेव्हां मात्र अमेरिकन लोक चिडले व त्यांनी इंग्लंडची सत्ता युद्ध करून पार झुगारून देण्यासाठी कंबर बांधली (१७७५). पुढे दहा वर्षे इंग्लंड व अमेरिकेमध्ये युद्ध चालले होते व शेवटी इंग्लंडनें अमेरिकन वसाहताचे निर्भेळ स्वातंत्र्य कबूल केले. याच वसाहती पुढे एकत्र होऊन त्यांनी संयुक्त लोक- सत्ताक राज्यपद्धति स्थापन केली. आजची सर्वशक्तिमान् अमेरिका ती हीच होय. दक्षिण अमेरिकेतहि स्पॅनिश वसाहतवाल्यांनी युरोपची सत्ता फेंकृन देऊन स्वतंत्र लोकसत्ताक राज्य स्थापिली; पण अनेक अडचणींमुळे उत्तर अमेरिकेंतील संस्थानांप्रमाणे त्यांच्यात एकी राहिली नाही. यापेक्षा मोठी व जगाला कायमचे उदाहरण घालून देणारी क्रांति खुद्द युरोपमध्ये वैभवाच्या शिखरास थोड्याच काळा- फ्रेंच राज्यक्रांति पूर्वी पोहोंचलेल्या फ्रान्स देशांत झाली. चवदावा लुई बादशहा म्हणजे जुलुमी राजांचा राजा व त्यांचा नमुनेदार कित्ता; पुढे झालेल्या नेपोलियनप्रमाणे ती त्याची साम्राज्यतृष्णा व अधि- काराची हांव ! आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्यास तो पैशांचा पाऊस पाडी व नीतिमत्तेला कोळून पीत असे. त्याच्या दरबारचे ऐश्वर्य म्हणजे इंद्राच्या नंदनवनाप्रमाणे. मुखोपभोगाची अत्युच्च साधनें निर्माण करून तो भोवतालच्या राजांना आपल्या- ६९ मानवी संस्कृतीचा इतिहास प्रमाणे वागण्यास शिकवी व याप्रमाणे प्रजेला पिळून तिच्या रक्ताने ऐषआराम भोगण्याची इच्छा साहजिकच त्या वेळच्या युरोपियन राजे- रजवाड्यांत उत्पन्न झाली. या वेळी ( अठराव्या शतकाचा पूर्वार्ध ) युरोपांत बेबंदशाही माजली होती. पवित्र रोमन साम्राज्याचा दाब कमी होत जाऊन त्याचा संकोच होत होता. उत्तरेस रशियाचा मार पीटर हा आपली सत्ता फैलावत चालला व लुईप्रमाणे त्याने सर्व थाट उडवून दिला. युरोपच्या राजकारणात रशियाला मोठे महत्त्व याच पीटरने आणून दिले. त्याच्या शेजारी प्रशियाचे साम्राज्य उदयास येत होते व आपल्या विजयांमुळे त्याने युरोपियन राष्ट्रांत बराच मोठा दर्जा मिळविला होता. लुई आणि पीटर यांप्रमाणेच प्रशियाचा बादशहा फ्रेडरिक (१७४०.८६) हे त्या काळी मोठे प्रस्थ होते. त्याचा डोळा ऑस्ट्रियाला बुडवून आपण पवित्र रोमन सम्राट होण्याकडे होता. तेव्हां त्यासाठी युरोपांत युद्धे सुरू होऊन इंग्लंडग्खेरीज बाकीच्या कोणाहि राष्ट्राला बाहेर साम्राज्य वाढविण्यास व तें राखण्यास फुरसत मिळाली नाही. चवदाव्या लुईच्या अरेरावीमुळे फ्रान्समध्ये सरंजामपद्धति मोडल्या- फ्रेंच राज्यक्रांतीची सारखी झाली, तरी सरदार लोक लोकांकडून कर व बलुती घेतच. शिवाय सर्व सरंजामी सरदार राजाच्या दरबारांत मोठमोठया जागांवर असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कागाळी ऐकलीच जात नसे. फ्रान्समध्ये श्रीमंतांची व सरदारांची एक स्वतंत्र जातच बनल्यासारखी झाली होती. कारण जो जन्माने उच्च घराण्यांतला नाहीं तो कधीहि सरकार दरबारांत जाऊ शकत नसे. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील सामाजिक आणि co राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय Pune राजकीय अंतर वाढत चालले होते. फ्रान्समधील जनता अगदी अडाणी व दरिद्री स्थितीत ठेवण्यात आली असून तशांतून त्यांच्यावर एकसारखे जुलम होत. तेव्हां लोक राजदरबार आणि सरदार यांना अगदी पाण्यात पाहात व त्यांचा नायनाट करण्याची संधि ईश्वराने आणावी असें इच्छीत. त्यांच्यांतील विद्वान् पुढारी त्यांना आतून बंड करण्यासहि प्रोत्साहन देत. तेव्हां फ्रान्समधील अत्यंत जुलुमी राजसत्ता कधी एकदम उलथून पडेल याचा नेम राहिला नव्हता. सोळावा लुई जेव्हां पैशांच्या पेचांत आला तेव्हा त्याने लोकप्रतिनिधींचे राज्य- कारभारांत साहाय्य घेण्याचे ठरविले. पण लोक इतके खवळले होते की, त्यांनी संबंधच राज्यसत्ता हातांत घेण्याचा बंड करून प्रयत्न केला व तो साधलाहि. हातांत सता आल्याबरोबर त्यांनी राजेरजवाडे, सरदारदरकदार, वतनदार वगैरे सर्वांचा निःपात करण्याचा सपाटा चालविला. खुद्द राजा आणि राणी यांना फासावर लटकाविलें व समतेचे निशाण उभारले. जगांत जर कोणाला जुलुमी सत्ता झुगारून घावयाची असेल तर आम्ही सर्वस्वी त्याला मदत करूं, असा फ्रेंच लोकशाहीने जाहीरनामा लावला. युरोपांत ऑस्ट्रिया आणि प्रशिया ही राष्ट्र फ्रेंच लोकशाहीला दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत होती म्हणून त्यांच्यावर तिने मोहीम काढली. या क्रांतीच्या अमदानीत लोकप्रतिनिधींनी फान्समधील लोकांना जाचक व गरिबांच्या उन्नतिमागांत आड येणाऱ्या फ्रेंच लोकशाही सर्व गोष्टी बंद केल्या. नवीन कायदेकानू केले व राज्यकारभार लोकमतानुवर्ती चालेल अशी सुधारणा केली. लोक- AAVNAA 16. AANANA NARuhRMAnn मानवी संस्कृतीचा इतिहास शाहीचा हा प्रयोग अगदी नवीन असल्यामुळे काही काळपर्यंत बऱ्याच चुका होत गेल्या व पुढे अनुभवाने जी एकदां घडी बसली ती अद्याप कायम आहे. फ्रान्समधील बहुतेक तरुण पिढी आपल्या कर्तबगारीला वाव मिळाला म्हणून आनंदली व तिने लष्करी शिक्षण घेऊन फान्सचा दिग्विजय करण्याचा विडा उचलला. इंग्लंडखेरीज युरोपांतील सर्व राष्ट्र या नवीन सत्तेपुढे नमलीं व केवळ समुद्रावरच्या अद्वितीय साम्राज्यामुळे इंग्लंडला या बेफाम झालेल्या फान्सशी टक्कर देऊन स्याला नामोहरम करतां आलें. रोमन लोकशाहीतील सीझरप्रमाणे फ्रेंच लोकशाहीत नेपोलि- यन वीर पुढे आला व त्याने काही काळ जगाला मेपोलियन दिपवून सोडले. रोमनें सीझरला ज्याप्रमाणे राज- मुकूट अर्पण केला होता त्याचप्रमाणे फान्सनेहि नेपोलियनला तो अर्पण केला व यानेहि सीझरप्रमाणे न नाकारतां तो दहा वर्षे मोठ्या दिमाखाने आणि ऐश्वर्याने धारण केला. यावरून असे सिद्ध झाले की, फान्स हे लोकशाहीला पात्र नव्हते किंवा त्याला तिची फारशी आवडहि नव्हती. फान्सला फक्त ऐश्वर्य आणि दिमाख पाहिजे होता व तो जो देईल त्याच्या अंकित रहाण्यास फान्स कबूल होता, तथापि फ्रान्सने युरोपांत लोकशाहीचे बीज में खोल रुजविलें त्याला एका शतकाने पुन्हां चांगले जोमदार अंकुर फुटून गत महायुद्धांत जिक तिकडे लोकशाथा निर्माण झाल्या व आजहि स्पेन देशांतल्याप्रमाणे उरलेल्या राजशाह्या विराम पावण्याच्या पंयांत आहेत. ५२ -~- -~~ राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय नेपोलियन ही जगांतील एक संस्मरणीय विभूति होय. अचाट लष्करी बुद्धिसामर्थ्याबरोबरच त्याच्या ठिकाणी मुत्सद्दीपणाहि होता. त्याने जे पीनल कोड केले आहे ते एकटें देखील त्याचे नांव अजरामर करील. तथापि त्याने आपली दैवी प्रतिभा आणि पराक्रम ही स्वार्था- साठी खर्च केल्यामुळे त्याच्या कीर्तीला काळिमा लागला आहे; व हाच कमालीचा स्वार्थ त्याच्या व त्याच्या राष्ट्राच्या नाशास कारणीभूत झाला. वाइटांतूनहि चांगले जसें निघते तसे त्याच्या कृतींपासून युरोपखंडांत कांहीं हितकारक सुधारणाचें बीज पडून रुजले गेले. लोकसमाजाला न्यायाने वागविणे आणि उदारबुद्धानें राज्य चालविणे हा धडा युरोपियन राष्ट्रांनी यापुढे उचलला. नेपोलियनचा सर्व युरोपियन राष्ट्रांनी एकत्र होऊन पाडाव केल्यानंतर या राष्ट्रसंघाने युरोपची जेव्हां पुनर्रचना केली तेव्हां त्यांनी जुनी जुलुमी राज्यतंत्रे पुन्हां ठेविली नाहीत, तर नेपोलियनच्या अमदानींत लोकांच्या मनांत उदार राजकार- णाची जी कल्पना ठसली होती, तिलाच अनुसरून राज्य चालविण्याचे धोरण आंखलें. जर्मनी आणि इटली या देशांतील लहान लहान संस्थानी राज्ये मोडून त्यांचे एक राष्ट्र करण्याला नेपोलियनने मदत केली. म्हणजे आजची जर्मनी आणि इटली नेपोलियनने रचली. सर्व जगाची शांति मुद्दाम आपल्या एकटयाच्या हितासाठी मोड- ण्यास जेव्हां नेपोलियन उठला, तेव्हां सर्व राष्ट्रांनी राष्ट्रसंघाचा अवतार जगाच्या शांतीप्रीत्यर्थ एकजूट केली. राष्ट्रसंघाचाच हा लहानसा अवतार म्हणता येईल. याने त्या वेळी युरोपांत शांतता प्रस्थापित करण्यांत चांगले यश मिळविलें. आजच्या ७३ Ahhhh मानवी संस्कृतीचा इतिहास आतां नेपोलियनच्या पाडावानंतर एकोणिसाव्या शतकांत युरोपियन पौर्वात्य आणि पाश्चात्य राष्ट्रांनी सर्व खंडांतून आपल्या वसाहती करून बहु- संस्कृतीचा लढा तेक जग युरोपियन सत्तेखाली कसे आणले ते पाहूं. हिंदुस्थानांतील इतर वसाहती बुडवून इंग्रज व्यापाऱ्यांनी आपली व्यापारी दृष्टि बाजला ठेवली व राज्यकमाईला सुरुवात केली. त्या कामांत त्यांना इतकें यश आले की, अर्ध्या शतकाच्या आंतच बहुतेक हिंदुस्थान त्यांच्या ताब्यात आले. फक्त मराठे आणि शीख या दोन राष्ट्रांशी झुंजण्यास इंग्रजांना बरीच शक्ति खर्च करावी लागली. वास्तविक युरोपियन लोकांनी युरोपियनेतर लोकांवर जे विजय मिळविले त्यांचे मुख्य कारण असे की, युरोपियनांना भौतिक शास्त्रीय साधनांचा चांगलाच पाठिंबा असून ही साधनें युरोपच्या बाहेर फारशी अवगत नव्हती. युरोपियन किंवा पाश्चात्य संस्कृतीचा लढा हिंदुस्थानच्या रणभूमीवर भारतीय संस्कृतीशी जेव्हां लागला तेव्हां भौतिक शास्त्रांत अगदी अज्ञानी अशा भारतीयांचा शास्त्रज्ञ युरोपियनांनी सहजासहजी पाडाव केला. चीन, जपान व आशियाखंडाच्या पश्चिमेकडील मुसलमानी राष्टे यांच्यावरहि युरोपियनांनी जें वर्चस्व गाजविलें त्यांतील रहस्यहि यांतच आहे. असो. इ. स. १८५८ पासून हिंदुस्थान हा ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनला व तेव्हांपासून इंग्लंड यावर प्रत्यक्ष राज्य करते. ब्रिटिश अमदानीपासून सर्व शास्त्रीय शोधांचे फायदे या देशाला मिळत आहेत. लोक अधिक साक्षर होत चालले आहेत व त्यांच्यात राष्ट्रीय भावनाहि जागृत झाली आहे.
Arvn राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय जपानचा अभ्युदय सर्व पूर्वेकडील राष्ट्रात जपानने मात्र आपली स्वत:ची प्रगति गेल्या पाऊणशे वर्षांत करून घेतली. सोळाव्या शतकापासून युरोपियन मिशनरी व व्यापारी चीन- जपानवर हल्ले करूं लागले. तेव्हां जपान जागा होऊन त्याने दोनशे वर्षेपर्यंत परकीयांना आपल्या भूमीवर पाय ठेवू दिला नाही. पण पुढे १८५७ पासून पुन्हां अमेरिकन, रशियन, डच, ब्रिटन इत्यादि लोकांचा उपसर्ग पोहोचूं लागल्याकारणाने जपाननें युरोपांतील सर्व सुधारणा अंगिकारून मोठया झपाट्याने युरोपियन राष्ट्रांच्या बरोबरीने आपली प्रगति करून घेतली व आशियाखंडाचे नांव राखिलें. शेजारच्या अडाणी चीनचा त्याने पराभव केला यांत नवल नाही, पण चालू शतकाच्या आरंभी अरेराव रशियालाहि आपल्या थोड्या सैन्यानिशी नामोहरम केलें. आज आशियातील इतर राष्ट्र हे जपानचे उदाहरण पाहून आपलीहि तशीच प्रगति करून घेत आहेत. आफ्रिका खंड युरोपच्या अगदी शेजारी आहे व प्राचीन काळी भाफ्रिकेंत युरोपियन भूमध्यकिनाऱ्यावरील प्रदेश पलीकडल्या किनाऱ्या- वरील युरोपियन राष्ट्रांशी अगदी संबद्ध होते. पण १८५० पर्यंत मध्य व दक्षिण आफ्रिका ही कोणालाच परिचित नव्हती. तींतील लोक अगदी रानटी व सुधारणेच्या अगदी प्राथमिक अवस्थेत म्हणजे पशूप्रमाणे होते. नंतर धाडसी प्रवासी, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांचे तांडे तिकडे जाऊन त्यांनी हा अंधारी प्रदेश उजेडांत आणिला. तेव्हां मात्र सर्व सुधारलेल्या जगाचे याकडे डोळे लागले. आफ्रिकेतील सर्वच गोष्टी विलक्षण व आकर्षक वाटू वसाहती AAPLA -~~~~ ~~~~~~~~~~~~~~~ मानवी संस्कृतीचा इतिहास लागल्या. लगेंच युरोपियन राष्ट्रांचे यावर हल्ले सुरू झाले व पन्नास वर्षांच्या आंतच बहुतेक आफ्रिका युरोपियनांची वसाहत झाली. त्यापूर्वी आफ्रिकें- तील नीग्रो लोकांना अरब व्यापारी गुलाम म्हणून विकीत. अमेरिकेंत हे नीग्रो गुलाम म्हणूनच गेले व आज युरोपिनांशी स्पर्धा करूं लागले आहेत. ऑस्ट्रेलिया खंडाचा इतिहास असाच आहे. इ. स. १७६८ ते ऑस्ट्रेलिया खंडांत १७७९ पर्यंत कॅप्टन् कुकनें ऑस्ट्रेलिया आणि वसाहती न्यू झीलंड शोधून काढून ब्रिटिशांचे त्यांवर निशाण रोविलें. प्रथम काही दिवस गुन्हेगार लोक या ठिकाणी काळ्या पाण्या- वर म्हणून पाठवीत; पण पुढे जेव्हां येथील कुरणे फार चांगली आहेत असें कळले, तेव्हां युरोपियन धनगर-शेतकरी येथे वसाहती करूं लागले व त्यांनी गुन्हेगार येण्याचे बंद करविले. लवकरच इ. स. १८५१ त सोन्याच्या खाणींचा जेव्हां शोध लागला तेव्हां तर इंग्रज लोकांच्या झुंडीच्या झुंडी लोटू लागल्या व १८६० च्या सुमारास या वसाहत- वाल्यांच्या टासमानिया आणि न्यू झीलंड धरून सात स्वतंत्र वसाहती पडल्या. १९०१ मध्ये या सर्वांचे एकीकरण होऊन एक ऑस्ट्रेलियन प्रजासत्ताक राष्ट्र बनले. यावर इंग्लंडची सत्ता नांवाला आहे, ब्रिटिश साम्राज्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून त्याला मोठा मान आहे ! ऑस्टेलियाप्रमाणे कानडाहि साम्राज्याचा एक मोठा भाग आहे. बाकीची अमेरिका कांही स्वतंत्र व कांहीं युरोपियन राष्ट्रांची मांडलिक आहे. याप्रमाणे बहुतेक सर्व जगावर युरोपियन सत्ता पसरली असून, ब्रिटिश साम्राज्यावर तर सूर्य कधीहि मावळत नाही, हे विधान पण ७६ anAmARMA राजकीय क्रांत्या व लोकशाहीचा उदय -~~~~ ~~~~~~~~ ~~~~~~~~ आवश्यकता चुकीचे नाही. कारण सर्वच खंडांतून या साम्राज्याची अंगें विखुरली आहेत. आतां युरोपियन लोकांनाच दूरवर जाऊन वसाहती करण्याची व राज्ये जिंकण्याची कां आवश्यकता वाटली परदेशगमनाची असा प्रश्न पुढे येतो. १९व्या शतकांत युरोपची लोकसंख्या वाढून लोकांना खावयास हवें तसें स्वदेशांत मिळणे मुष्किलीचे पडे. शिवाय पौर्वात्य लोकांपेक्षा हे लोक ऐहिक सुखाचा लाभ करून घेण्यास धाडसहि करीत व परदेशांतहि मजेनें रहात. आणि युरोपला कच्च्या मालाचीहि फार जरूरी होती. त्याविना कार- खाने बंद पडून एकंदर आर्थिक अवनति होण्याचा प्रसंग आला होता. नवीन संशोधलेल्या खंडांतून सोन्यारुप्यांच्या खाणी त्यांची वाट पहात होत्या. तेव्हां स्वदेशांत सर्वांनी हाल भोगण्यापेक्षा काहींनी दूरवर जाऊन वसाहती कराव्या व स्वजनांना मदत करावी. हे धोरण निःसंशय प्रशंसनीय होतें. इंग्लंड गेल्या शतकांत समुद्राची स्वामिनीहि होती. तेव्हां आपल्या पुत्रांना सुखरूप परदेशच्या किनाऱ्यावर सोडण्यास व परत आणण्यास तिला कांहींच त्रास नव्हता. तशांतून वाफेच्या बोटी व आगगाड्या सुरू झालेल्या. मग युरोपची लोकसंख्या पातळ करण्यास काय उशीर होता ?
प्रकरण १०३ नवविचारप्रवर्तक युग मागील एका प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे नवीन शास्त्रीय शोध व त्यांचा मनुष्याच्या आयुष्यक्रमांत दरघडी होणारा विश्वबंधुत्व उपयोग यांमुळे सर्व जगांतील माणसांची रहाणी सामान्यतः एकसारखी होत चालली आहे. याचा मोठा परिणाम म्हणजे एवढे अफाट जग पण ते एक होत चालले आहे; आगगाड्या, आगबोटी, तारा, विमाने, वृत्तपत्रे वगैरे दळणवळणांची साधने अतिशय वाढली असल्याने कोठल्याहि जगांतील कोपऱ्याचा माणूस अगदी विरुद्ध कोपऱ्याच्या माणसाशी व्यवहार करू शकतो. जपानमध्ये मोठा भूकंप होऊन लोकांचे हाल होऊ लागले तर युरोपांतून लगेच त्यांना मदत जाते. लढाईतून शत्रुपक्षाकडील जखमी सैनिकांची सुद्धा आपल्या माणसांप्रमाणे शुश्रूषा करण्यात येते. पूर्वी आफ्रिकन नांगो किंवा अमे- रिकन रेड इंडियन यांच्या जिवाची युरोपियन वसाहतवाल्यांना मुळीच फिकीर नसे. गुलामगिरी दुसऱ्यावर लादण्यांत त्यांना काहीहि वाटत नसे. पण याच गोऱ्या लोकांच्या उदारमतवादी बांधवांनी मोठी चळ- वळ करून व पाण्यासारखा पैसा ओतून गुलामगिरीचे पूर्ण उच्चाटण केलें. म्हणजे फक्त आपल्याच राष्ट्रातील जे रहिवासी ते आपले बांधव व इतर राष्ट्रांतील लोक हे परके हा भेदभाव सुशिक्षित लोकांत कमी कमी होत चालला, जगांत कोठें कां अन्याय होईना त्याचा निषेध करून तो दूर करण्यासाठी उदारमतवादी राष्ट्रांची निरपेक्ष खटपट ७८ नवविचारप्रवर्तक युग चालू असलेली दिसून येते. त्यामुळे कोणतेंहि सरकार विनाकारण अन्याय किंवा जुलूम करण्यास धजावत नाही. विश्वबंधुत्वाच्या दृष्टीने हा आजच्या सुसंस्कृत व्यक्तींमध्ये पडलेला फरक एखादेंच राष्ट्र केऊन पाहिले असतां चदिशीं नजरेत भरतो. आपल्याच भरतखंडाकडे नजर टाकल्यास, इंग्रजी अमदानीपूर्वी हिंदुस्थानांत एक- प्रांताप्रांतांतून सलोखा मुळीच नव्हता. उलट एका राष्ट्रीय भावना प्रांतांतील लोक दुसऱ्या प्रांतांतील लोकांचे कट्टे शत्रू असें कटु सत्य अनुभवास येई. तसेंच देशाभिमानाची वृत्ति किंवा राष्ट्रीय भावना ही पूर्वी कमी किंवा मुळी नव्हती असें म्हण- ल्यास फारसे चुकीचे होणार नाही. आपल्या स्वार्थासाठी राष्ट्राला गुलामगिरीत ढकलण्याचीहि काही लोकांची तयारी असे. तेव्हां अशा काळांत संबंध हिंदुस्थानाकरितां आपण काही हातपाय हल- वावे किंवा परप्रांतांतील लोकांना त्यांच्या संकटाच्या प्रसंगी मदत करावी अशी बुद्धि काही बोटांवर मोजण्याइतक्या महात्म्यांखेरीज इतरांना होणे शक्य नव्हते. पण आज तो मनु पालटला आहे. सर्वच प्रांतांवर एकच ब्रिटिश अंमल गाजत असल्याने जरी हा फरक पडला आहे, तथापि नवीन क्रांतिकारक विचारांचा पगडा सुशिक्षित हिंदी लोकांवर बसल्यामुळे ही एकराष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यात उत्पन्न झाली हे म्हणणे बहंशी खरे आहे. माझा हिंदुस्थान, बंगाली किंवा पंजाबी लोकांवरची संकटें ती माझीच संकटें, माझ्या उत्कृष्ट मराठी भाषेप्रमाणेच बंगाली किंवा हिंदी भाषा उत्कृष्ट आहे, मी जसा माझ्या मराठे लोकांकरितां खपेन मानवी संस्कृतीचा इतिहास ~~~~~~ ~~~~ . समाजसत्तावाद तसाच हिंदी लोकांकरितांहि खपेन; यांसारखे विचार आधुनिक महाराष्ट्रीय सुशिक्षित तरुणांच्या मनात घोळत असतात. प्रथम आपलें कुटुंब, नंतर आपला समाज, नंतर स्वदेश व शेवटी सर्व जग अशा एकराष्ट्रीयत्वाच्या विचारांतील पायऱ्या आहेत; अगदी वरच्या पायरी- वर पोहोचला की, तो विश्वकुटुंबांतील एक भागीदार झालाच. अशा विश्वकुटुंबाची स्थापना करूं पहाणारा एक वर्ग आज जगांत वर डोके काढीत आहे. विश्वकुटुंब बन- विण्यासाठी समाजांतील उच्चनीच भाव नाहीसा केला पाहिजे. म्हणजे प्रत्येकजण फक्त समाजाचा सेवक, त्याने आपल्या मगदुराप्रमाणे नेमलेले काम करावें व समाज देईल तें वेतन घ्यावे. स्वत:च्या मालकीची अशी इस्टेट करितां कामा नये. कोणाला कष्ट केल्याशिवाय पोटाला व चैनीकरितां पैसा मिळू नये. सर्व धंदे, जमिनी व उत्पन्न सबंध समाजाचें. अशा समाजाने कुटुंबांतल्या का पुरुषांप्रमाणे लहान मुले, वृद्ध माणसें, दुर्बल आणि व्यंगें असणाऱ्या व्यक्तींची नीट जोपासना करावी व एकंदर समाजाच्या सुखाकडे व उन्नतीकडे पूर्णपणे लक्ष द्यावे. याप्रमाणे समाजसत्तावाद्यांची तत्त्वे बाहेत व आज रशियांत याच तत्त्वांची अंमलबजावणी करणारें सरकार आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस फ्रान्सची राज्यसत्ता उलथून पाडून स्वातंत्र्याचे आणि समतेचे निशाण उभारणाऱ्या रशियन कम्युनिस्ट फ्रेंच क्रांतिकारकांनी ज्याप्रमाणे विश्वबंधुत्वाचे ध्येय पुढे ठेवले होते, त्याप्रमाणे रशियन कम्युनिस्टांनी सर्व जगाला वसमाजसत्ता ८० नवविचारप्रवर्तक युग भांडवलशाही आणि साम्राज्यशाही यांतून मुक्त करण्याचे ध्येय ठेविलें आहे व त्या दिशेने त्यांनी प्रयत्नहि चालविले आहेत. या समाजसत्ता- वादामुळे राज्ययंत्राच्या घटनेत मोठी क्रांत होऊ पहात आहे. ज्यांना जिंकलें त्या लोकांवर कितीहि जुलूम केला तरी त्याबद्दल जेत्यांना पूर्वी कोणी विचारणारा नसे. पण गेल्या महायुद्धापासून स्वयंनिर्णयाचें अत्यंत उदार तत्त्व पुढे आले असून जित लोकांच्या संमतीनेच राज्यकारभार चालला पाहिजे अशी विचारसरणी सुसंस्कृत राष्ट्रात बळावली आहे. स्त्रीस्वातंत्र्यासंबंधी अशीच सुधारलेली विचारसरणी आहे. आतां- पावेतों स्त्रियांना बाजूला ठेवून सर्व महत्त्वाचे स्त्रीस्वातंत्र्य व्यवहार चालत असत. स्त्रीचे अस्तित्व फक्त उंब- याच्या आंत भासे, व समाजकारण किंवा राजकारण यांत स्त्रियांची सल्ला घेण्याची कल्पनाहि पुरुषांच्या मनांत येत नसे. पण आज युरोपांत तरी स्त्रिया आणि पुरुष यांत फारसा भेद राहिला नाही. स्त्रियांना अमुक एक काम करितां यावयाचे नाही असे नाही. तिकडे स्त्रिया पार्लमेंटांत सभासद म्हणून बसतात, मोठमोठ्या हुद्यांची जबा- बदारीची कामें पार पाडतात, शास्त्रीय संशोधनासारखे नीरस आणि किचकट विषयहि हस्तगत करतात, विद्वन्मान्य ग्रंथ रचतात, मर्दानी खेळ खेळतात, विमाने सुद्धां चालवितात. गेल्या शतकापासून युरोपांत जो उदारमतवाद प्रचलित झाला त्यानेच मुख्यतः स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिले. राष्ट्राची उन्नति करण्यास प्रत्येक व्यक्तिमात्राची उन्नति प्रथम हवी असते; व व्यक्तीस मोकळे ठेवून जबाबदारीने काम कर. मा.सं.इ.६ मानवी संस्कृतीचा इतिहास ण्यास वाव ठेवला तरच तिची उन्नति शक्य आहे. तेव्हां स्त्रियांना पुरुषांबरोबरीने राष्ट्रहिताची कामे करता येण्यास त्यांची उन्नति घडवून आणली पाहिजे व त्यासाठी प्रथम त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. उदारमतवाद्यांची ही तत्त्वे सर्व सुधारलेल्या जगास पटली आहेत व युरोपाबाहेरच्या स्त्रियाहि हळू हळू सुधारणेच्या मार्गात येत आहेत. हे स्त्रियांचे स्वातंत्र्य टिकून रहाण्यासाठी त्यांना स्वावलंबनी बन- विणे अवश्य आहे. तेव्हां त्यांना में शिक्षण द्याव- स्वावलंबी स्त्रीशिक्षण याचें तें पोषाखी असता कामा नये, तर त्यापासून त्यांना पोटाला-वेळ पडल्यास, मिळविता आले पाहिजे. अशी दृष्टि सर्व युरोपियन राष्ट्रांनी ठेविलेली दिसून येते. कामगार स्त्रियांना बाल- संगोपन नीट करता येणार नाही म्हणून लेकुरवाळ्या स्त्रियांना कार- खान्यांतून बऱ्याच सवलती देण्यात येत असतात. स्त्री ही पुरुषाची दासी नसून ती समाजाची सेविका आहे व पुरुषाप्रमाणेच सर्व बाबतींत स्वतंत्र आहे ही पुरुषवर्गाला शिकवण आधुनिक संस्कृतीने दिलेली आहे. सर्व सुधारणांची गुरुकिल्ली बौद्धिक सुधारणेच्या हाती असते. शिक्षणानेच मनुष्याची दृष्टि फांकून त्याला नवीन सक्तीचे शिक्षण नवीन समाजहितकारक विचार सुचतात. ज्या राष्ट्रांत बहुजनसमाज निरक्षर आहे, तें राष्ट्र काही केले तरी दुर्बलच रहाणार. हा विचार अठराव्या शतकाच्या उत्तराधांत प्रशियाचा बाद- शहा फ्रेडरिक दि ग्रेट याच्या डोक्यात येऊन त्याने देशांत सक्तीचे शिक्षण सुरू केले. याचा परिणाम असा झाला की, आज जर्मनीत बौद्धिक मुधारणा. ८२ ~~ नवविचारप्रवर्तक युग कोणताहि पुरुष किंवा स्त्री निरक्षर आढळणार नाही. जर्मनांचे बल या अखिल साक्षरतेंतच आहे. जर्मनीचे हे उदाहरण बाकीच्या युरो- पियन राष्ट्रांनी गिरवून, युरोपखंडाला सुधारणेचा पहिला मान प्राप्त करून दिला आहे. लोकांत शिक्षणाचा प्रसार होत चालल्यामुळे स्वतंत्र विचारांची व शोधांची मालिका सुरू झाली. पोपची धार्मिक शिक्षणवाढीचा परिणाम सत्ता संपुष्टांत आणण्यास शिक्षणाची वाढच कारणीभूत झाली. शुद्ध तर्काला न पटणाऱ्या व भौतिक शास्त्रांच्या ऐरणीवर न ठरणाऱ्या जुन्या भोळ्या कल्पनांना आणि वागणुकीला सुशिक्षितांत थारा मिळेनासा झाला व नवीन सुधारक समाज तयार झाला. उदारमतवाद आणि सदनशीर व्यवहार यांकडे पूर्ण दृष्टि वळून राज्यकारभाराचे धोरणच पार बदलून गेलें. अशिक्षित मजुरापेक्षा साक्षर मजूर जास्त चलाख आणि उपयोगी असतो, असा अनुभव येऊ लागला. या कारणाने बहुजनसमाजाला साक्षर कर- ण्याला लागणारा पैसा वाया जात नसून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतींत त्याची भरपाई मिळते ही खात्री सर्व जगास पटली. जगांत शिक्षणाची वाढ करण्याच्या कामी वर्तमानपत्रांचा फार उपयोग झाला. अठराव्या शतकाच्या प्रथम दशकांत वर्तमानपत्रे व लोकजागृति लंडन येथे एक वर्तमानपत्र निघाले. पुढे लवकरच वर्तमानपत्रांची साथ युरोप अमेरिकेंत पसरली. ती इतकी की, दोनशे वर्षात नुसत्या अमेरिकेंतच वास हजारांवर पत्रे निघू लागली. लोक- जागृति हेच वर्तमानपत्राचे मुख्य ध्येय असते. आपले विचार उघड मानवी संस्कृतीचा इतिहास -~- आणि स्पष्टपणे सरकारपुढे मांडण्याला साधन आज एकच आहे व ते म्हणजे वर्तमानपत्र, या साधनाचा सरकारालाहि दरारा वाटतो व सरकार उदार आहे की जुलुमी आहे हे ठरविण्याचे सुधारलेलें गमक म्हणजे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य किंवा मुस्कटदाबी. या वृत्तपत्रांमुळे जगांतील एकूण एक भाग एकमेकांना जोडले जातात व यामुळे एक- मेकांत स्नेहभाव वाढतो. विश्वकुटुंब बनविण्याचा कामी वृत्तपत्रांचा अतिशयच उपयोग होतो. मागील सर्व विचारक्रांतीवरून असे दिसून येईल की, मानवी स्वातंत्र्याचीच एकंदरीने फार प्रगति झालेली आहे. मानवी स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य एकीकडे मनुष्य निसर्गावर ताबा चालवू पहातो व दुसरीकडे तो सामाजिक आणि राजकीय पारतंत्र्यापासून मुक्त होऊ चहातो. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांवर मनुष्याची सत्ता चालत नाही असा आजवर समज होता; पण आग- गाड्या, आगबोटी, विमाने, विद्युद्यत्रे वगैरे साधनांनी या निसर्गदेवतां- वर सुद्धा मनुष्य हुकुमत गाजवितांना दिसतो. तसेंच व्यक्तिस्वातंत्र्य हेच समाजोन्नतीचे ध्येय ठरविण्यात आले असून ते ध्येय गाठण्यासाठी समाजाचे नियमन होत आहे. मनुष्य रानटी अवस्थेतून बाहेर पडून समाज करून जेव्हां राहूं लागला तेव्हां त्याने जे स्वातंत्र्य गमावलें तें हळू हळू परत मिळविण्याचा प्रयत्न आज अनेक शतकें चालला आहे. पण व्यक्तिस्वातंत्र्य फार वाढले की समाजाची घडी बिघडेल, व उलट समाजबंधने व्यक्तीवर फार लादली तर त्याचे स्वातंत्र्य कोठे राहिले ? तेव्हां समाजाच्या योग्य व्यवहारांत कोणाहि व्यक्तीची ८४ जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ आडकाठी येऊं नये एवढी खबरदारी घेऊन व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य चावे असें आज सुसंस्कृत माणसांचे मत बनले आहे व त्याप्रमाणे व्यक्तीला बरेंच खातंत्र्यहि लाभले आहे. प्रकरण ११ वें जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे जग हे विश्वकुटुंब बनून मनु- राष्ट्राराष्ट्रांतील चुरस वष्याला शास्त्रीय सुधारणांपासून मिळत असलेल्या परम ती थांबविण्यासाठी उपाय : सार्वराष्ट्रीय सुखाची अखंड प्राप्ति होण्यास जगांत अक्षय्य शांतता कोर्ट नांदली पाहिजे; कोणी कोणाच्या उगाच वाटेस जाऊं नये, दुसऱ्याच्या मत्तेचा अपहार करूं नये म्हणून कडक निबंध पाहिजेत. हे निबंध एकटी दुकटी माणसें पाळतील पण प्रबळ आणि महत्त्वाकांक्षी राष्ट्रे कशी पाळणार ? एक राष्ट्र शेजारच्या राष्ट्रांहून जरा जोरकस झाले की, लगेंच वरचढपणा करावयास लागते. त्यामुळे सबंध खंडांत शांततेचा भंग होतो. यासाठी राष्ट्राराष्ट्रांत बलसमता राखण्याचे तत्त्व पुढे आले. गेल्या शतकांत युरोपमध्ये या तत्त्वाची फ्रान्स, जर्मनी आणि रशिया या राष्ट्रांपैकी, कोणालाच जास्त वर डोके काढू न देण्यासाठी अंमलबजवणी चालली होती. यांपैकी एक राष्ट्र बलिष्ठ होत चाललें असे दिसताच दुसरी राष्ट्र त्याविरुद्ध एक होत. तथापि गेल्या शतकाच्या उत्तरार्धात प्रत्येक युरोपियन राष्ट्र आपले लष्करी सामर्थ्य वाढवीत ?
मानवी संस्कृतीचा इतिहास चालले होते. १८७०-७१ साली फ्रान्स आणि जर्मनी यांच्यामध्ये मोठे युद्ध होऊन फ्रान्सचा जेव्हां कल्पनातीत पराभव झाला तेव्हां पासून जर्मन साम्राज्याची महत्त्वाकांक्षा बळावली व समुद्रावर इंग्लंडहून जास्त स्वामित्व मिळविण्यासाठी कायझर बादशहाने जर्मन आरमाराची वाढ व सुधारणा केली. फ्रान्स आणि रशिया ही राष्ट्रहि, जर्मनीशी यशस्वी टक्कार देतां यावी, म्हणून आपआपली लष्करी तयारी ठेवू लागली. इंग्लंडनेंहि जर्मनीचा डाव ओळखून आपलें आरमार वाढविले. या सर्व चिन्हांवरून लवकरच एक मोठे युद्ध होऊन भयंकर प्राणहानि होईल, असा दूरदर्शी युरोपियन मुत्सद्यांचा होरा वाहूं लागला. तेव्हां हा भावी अनर्थ थांबविण्यासाठी हेग येथे राष्ट्र-प्रतिनिधींच्या बैठकी झाल्या व ज्यावरून राष्ट्राराष्ट्रांत लढाया होण्याचा संभव असेल ते आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गानी सोडविण्यासाठी एक सार्वराष्ट्रीय न्यायकोर्ट स्थापन झाले. या कार्टामार्फत बरेच किरकोळ वादाचे प्रश्न सुटून गेल्या महायुद्धापर्यंत साधारणपणे युरोपला व त्याच्या अनुषंगाने सर्व जगाला शांतता लाभली असली तरी बराच काळ धुमसत असलेला ज्वालामुखी विझला नाही. आंतरराष्ट्रीय न्यायनिवाडयामुळे नॉर्वे आणि बल्गेरिया यांचे स्वतंत्र राज्य सर्वांनी मुकाटयाने मान्य केलें. उत्तरसमुद्र आणि भूमध्यसमुद्र यांवरील हक्कांचा लढा शांततेने मिटला. तसेंच राष्ट्रांच्या सरहद्दी ठरविण्याच्या प्रसंगी जे रक्तपात होतात ते टळले. याप्रमाणे शांतता नांदविण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांत सलोखा उत्पन्न करण्याचे महत्त्वाचे काम हेगच्या शांतता परिषदेने केले व तेच काम आज राष्ट्रसंघ मोठ्या प्रमाणावर करीत आहे. ८६ जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ ~~~~ याप्रमाणे आंतर्राष्ट्रीय वृत्ति ठेवून सर्व जगांत शांतता नांदूं देण्याचे धोरण जर्मनीच्या महत्त्वाकांक्षेच्या आड गेले महायुद्धः कारणे येऊ लागले. इंग्लंडशी चुरस धरून तिनें आपलें लष्करी बल अपरंपार वाढविले होते. तेव्हां लवकरच केव्हांना केव्हां तरी काही क्षुल्लक कारण काढून जर्मनी युद्धांत शिरणार व इंग्लंड आणि इतर त्याची दोस्त राष्ट्रे यांच्याशी टक्कर देणार अशी चिन्हें स्पष्ट दिसू लागली. ता. २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियाचा युवराज आर्च ड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड याचा जेव्हां बॉस्नियाची राजधानी सेराजेव्हो येथे भर रस्त्यांत खून पडला व सहिया आणि ऑस्ट्रिया यांच्यांत पुढे एका महिन्याने युद्ध सुरू झाले, तेव्हां युरोपांतील एकूण एक राष्ट्रं कोणच्याना कोणच्या तरी बाजूस मिळून महा- युद्धाचा भयंकर वणवा पेटला. चीन, जपान, अमेरिका, कानडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आदिकरून ब्रिटिश साम्राज्याचे भाग म्हणजे बहुतेक जगच या युरोपियन युद्धांत सामील झाले. शास्त्रीय शोधांचा उपयोग मनुष्याच्या कल्याणासाठी जसा करण्यांत येतो, तसाच तो फार मोठ्या प्रमाणांत यांत्रिक युद्धः शाब. ज्ञानाचा दुरुपयोग त्याच्या नाशासाठीहि करण्यात येतो. याचे अगदी उघड प्रत्यंतर आले. पूर्वीच्या अवजड बंदुका-तोफा जाऊन त्यांच्या जागी यंत्राच्या साहाय्याने उडविल्या जाणाऱ्या बंदुका-तोफा आल्या- कारणानें भयंकर प्राणहानि होऊ लागली. पूर्वी मोठया बळकट आणि उंच डोंगरी किल्ल्यात आश्रय करून राहिले म्हणजे भीति नसे; पण गेल्या महायुद्धांत दहा मैलांवर गोळा टाकून लोखंडी तटहि फोडणाऱ्या ८७ Mochonrn.IN MAnnr r-MANN hn" मानवी संस्कृतीचा इतिहास तोफा उपयोगात आणल्या होत्या. दर्यावर्दी युद्धांतहि अशाच भयंकर सुधारणा झाल्या आहेत. टॉपैडो, माइन (पाणसुरुंग ), सबमरीन या नौकाविनाशक जहाजांमुळे मोठया गलबतांनाहि धोका पोहोचतो. अशा धोक्यापासून आपली सुरक्षितता राखण्यासाठी व शत्रूच्या जहाजांचा संहार करण्यासाठी डिस्ट्रॉयर, ड्रेडनॉट, क्रूझर, मॉनिटॉर यांसारख्या बोटी तयार करण्यांत आल्या. यांखेरीज विषारी धूर, विमानांतून बाँब टाकणे, लांबून आगी लावणे वगैरे प्राणहारक शास्त्रीय साधनें दिमतीला होतीच. विमाने आणि वायरलेस यांचा दुरुपयोगच करण्यांत आला असे म्हटले पाहिजे. हे महायुद्ध चार वर्षे टिकलें व ही संकटाची चार वर्षे चार युगांप्रमाणे सर्व जगाला वाटली असतील, यांत महायुद्धाचे परिणाम आश्चर्य नाही. कारण सर्व खंडांतून महागाई व दुष्काळ सुरू झाले. युद्ध चालविण्यासाठी सर्वच ठिकाणांहून अनेक रूपांनी पैसा गोळा करण्यांत आला होता. त्यामुळे सर्वच युद्धयमान राष्ट्र दारिद्री झाली. लोक लढाईत गुंतल्यामुळे शेतांतून व कारखान्यां- तून राबावयास कोणी राहिले नाही. जे काही थोडें उत्पन्न येत असे तें शत्रूकडून लुबाडले जाई. तेव्हां साहजिकच युद्ध बंद पडल्यानंतर लोकांचे हाल वांचले नाहीत. उलट दुष्काळ आणि रोगराई जगांत सर्व भागांतून पसरली. इन्फ्लुएंझाच्या साथीने तर लाखों लोक किडया- मुंग्यांप्रमाणे पटापट मृत्युमुखी पडले. रोजचे खाण्याचे पदार्थ बेसुमार महाग झाले. कपडाहि अंगावर घ्यावयास पुरता मिळेना. रहावयाची घरे तरी स्वस्त भाड्यांत मिळावीत; पण तीसुद्धां अवाच्यासव्वा जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय वृत्तीची वाढ ~~~~~~~ ~~ ~~~~~ भाड्याने जाऊ लागली. अशा रीतीने जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत आपत्ति कोसळली व युद्धापासून काय अनर्थ ओढवतात याची प्रत्येकालाच प्रत्यक्ष जाणीव झाली. जग हे आतां पूर्वीसारखें विस्कळीत आणि तुटक तुटक राहिले नसून ते इतकें एकजीव बनले आहे की, एका भागांत कांही हालचाल झाली की, तिचे धक्के इतर सर्व भागांत बसतात. जगांत शांतता नांदवावयाची असल्यास सर्वच भागांत ती राखिली पाहिजे असें अनुभवांती कळून आले. तेव्हां जगांत शांतता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवहाराकडे एखाद्या सार्वराष्ट्रीय प्रातिनिधिक मंडळाने पूर्णपणे राष्ट्रसंघाचा उदय लक्ष पोहोचविले पाहिजे व राष्ट्राराष्ट्रांतील चुरस आणि भांडणे न्यायकोर्टाप्रमाणे निकाल करून मिटविली पाहिजेत, अशी तळमळ त्या वेळचे अमेरिकेतील संयुक्त संस्थानांचे अध्यक्ष डॉ. विल्सन यांना लागली, व त्यांनी लगेच राष्ट्रसंघाची कल्पना पुढे ठेविली. ज्या तत्त्वांवर हा राष्ट्रसंघ निर्माण करावयाचा त्या डॉ. विल्सन यांच्या सुप्रसिद्ध चौदा तत्त्वांपैकी पुढील काही महत्त्वाची अशी आहेतः समुद्र सर्वांना खुले असावेत; शस्त्रास्त्रांवर निर्बंध घालावेत; मुलुखगिरीचा हक्क कोणाहि राष्ट्राला नसावा; प्रादेशिक राज्यव्यवस्था मानववंशविचारानुसार करावी; व सर्व राष्ट्र स्वतंत्र आणि समान दर्जाची असावीत. याप्रमाणे ही राष्ट्रसंघाची कल्पना सर्व खंडांतील राष्ट्रांना पटून पंचविसांवर स्वतंत्र राष्ट्रांनी या शांततातहावर सह्या करून राष्ट्रसंघ स्थापन केला. या राष्ट्रसंघाची मुख्य कचेरी जिनेव्हा(स्वित्झर्लंड) येथे असून तेथे वारंवार सभासद राष्ट्रांच्या बैठकी होतात. ८९ ~~~MAN- मानवी संस्कृतीचा इतिहास NXX १ राष्ट्रसंघ निघाल्यापासून त्याचे प्रत्यक्ष फायदे बऱ्याच वेळां दिसून आले. त्याच्या स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाप्रमाणे पोलंड, जागतिक शांततेच्या कामी राष्ट्रसंघाचा युगोस्लाव्हिया, चेकोस्लोव्हाकिया इत्यादि पारतंत्र्यांत उपयोग बुडून राहिलेले काही देश स्वतंत्र झाले. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया यांसारखी जुनीं राजसत्ताक राष्ट्र लोकसत्ताक झाली. रशियांत तर पूर्ण समाजसत्ता नांदत आहे. राष्ट्राराष्ट्रांमध्ये मध्यस्थी करून भाजपर्यंत बऱ्याच वेळां राष्ट्रसंघानें युद्धे टाळली आहेत. जागतिक शांतता आणि स्वस्थता या दृष्टीनेंहि आर्थिक परिषद, मजूरपरिषद, शेतकीपरिषद, शिक्षण-परिषद, वैधक-परिषद वगैरे अखिल राष्ट्रातील प्रतिनिधींच्या परिषदा भरवून बरेच काम केले आहे. राष्ट्रसंघाच्या परिषदांना निर- निराळ्या आणि दूरदूरच्या देशांचे प्रतिनिधी जमावयास लागल्यापासून जिकडेतिकडे आंतरराष्ट्रीय वृत्ति दिसून येत आहे. कोणतीहि चळचळ जगांतील संघशक्तीने पार पाडली जात आहे. नुकतीच गुदस्तां इंग्लं- डांत बालवीरांची जी जांबोरी झाली, तिला जगांतील बेचाळीस राष्ट्रा- तून पन्नास हजार बालवीर गेले होते. म्हणजे लहानपणीच मुलांमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्ति आणि दृष्टि आणण्याचा हा प्रयत्न जगाच्या शांत- तेच्या कामी किती चांगला होणार हे स्पष्ट करावयास नकोच. ९० उपसंहार मानवी संस्कृतीचे भवितव्य जगांत मनुष्यप्राणी निर्माण झाल्यापासून एकाच ठिकाणी न रहाता तो सर्वत्र फिरला. एक शाखा डोंगरपर्वत ओलांडून मनुष्याची सुधारणा- प्रवृत्ति हिंदुस्थानांत शिरली व ती थेट खालपावेतों गेली. दुसरी एक मानववंशशाखा पश्चिमेकडे युरोपखंडांत पसरली व अटलैंटिक महासागर ओलांडून तिने अमेरिका वसविली. इतर प्राण्यांप्रमाणे माणूस निर्बुद्ध नसल्याने रोज काही नवीन शिकतो व शिकवितो. ज्या पृथ्वीच्या पाठीवर तो रहातो तीवर त्याला जें जें कांहीं जास्त जास्त आढळून येतें तें तें सर्व तो मोठया मेहनतीने आणि कौशल्याने आपल्या कामी लावतो व आपले आयुष्य अधिकाधिक सुखकर करून घतो. आपल्या सुखासाठींच तो शेजाऱ्याला मदत करतो व त्याचा शेजारीहि याला परत मदत देतो; याप्रमाणे एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चवथ्याला असे सर्व जग बांधले गेले आहे. एकाचा शोध किंवा कल्पना ती सर्वांच्याच मालकीची. एका देशचा पंडित किंवा कवि तो सर्व जगाचा पंडित. एका राष्ट्राची अडचण ती सर्वच राष्ट्रांची आपत्ति. व्यापार आणि दळणवळण ही तर माणसाच्या सुधारणेची मुख्य साधने आहेत; ही साधने आज अतिशय जोरदार आणि कार्यक्षम बनली आहेत. यामुळे मानवी संस्कृति आणि सुधारणा यांची सारखी वाढच होत जाणार आहे.
AAAAA AMAN मानवी संस्कृतीचा इतिहास जगाचा विकास भविष्य काळी जगांतील सर्व राष्ट्रांची संस्कृति साधारणपणे एक जातीची होईल असे वाटते. कारण कोणतेंहि सुधारलेले राष्ट्र भविष्यकालीन दुसऱ्या सुधारलेल्या राष्ट्रांप्रमाणेच वागत असते. मागसलेली राष्ट्र देखील सुधारलेल्या राष्ट्रांचा कित्ता सर्वच बाबतीत गिरवितात. यावरून पुढे सर्व जगाची संस्कृति एकच राहील अशी कल्पना होते. मानवी सुखाच्या दृष्टीने जगाचा विकास होईल कां अवनति येईल हा वाद विचारी लोकांत नेहेमी चालतो व कोणी जगाच्या उत्कर्षाकडे निराशेने पहातात तर दुसरे मोठे आशावादी दिसतात. ज्यांत मनुष्यसुखाची परमावधि असते तें सत्ययुग मागे होऊन गेले की, पुढे यावयाचे आहे ? मागील काळापेक्षा आज मनुष्याची रहाणी किती तरी सुधारलेली आहे व मनुष्याची बुद्धि किती तरी सर्वव्यापी झाली आहे ! विश्वव्यापारावर मनुष्याचा आज जितका ताबा आहे, तितका मागें केव्हांहि नव्हता. तसेंच एकंदर जगाची पूर्ण ओळख होऊन आपणांला निर्भयपणे आणि सहज जसें आज त्यांत वावरतां येते तसे मागे कधी येत होते काय ? — वसुधैव कुटुंब' ही वृत्ति आज जितकी माणसांत खिळली आहे तितकी गेल्या शतकांतहि दिसत नव्हती. अशा रीतीने शुद्ध मनाने विचार केल्यास जगाची संस्कृति विकसत आहे अशीच खात्री होईल. ९२ परिशिष्ट १ मानववंश जगांतील मनुष्यप्राण्याच्या जाती ठरवितांना वेगवेगळी साधनें वाप- रतात. सामान्यत: अंगाच्या रंगावरून (१) श्वेतवर्णी, (२) पीतवर्णी व (३) कृष्णवर्णी असे तीन ठोकळ विभाग करण्यात येतात. भाषाभेदांवरून श्वेतवर्णीयांत पुन्हा ( अ ) आर्य, ( आ ) हॅमिटिक असे पोटविभाग पडतात.हॅमिटिक वर्गातील प्रमुख लोक म्हणजे प्राचीन इजिप्शियन किंवा मिसरी. सेमिटिक लोकांनी आशिया खंडाचा नैऋत्य भाग व्यापिला होता. बाबिलोनी, असुरी, अरब, ज्यू आणि फिनिशियन हे लोक सेमिटिक कुळांतीलच होत. यांपैकी फक्त अरब आज शिल्लक आहेत. आर्य लोकांची एक शाखा इराणच्या मार्गाने हिंदुस्थानांत आली व दुसरी अरब- स्तानांतून युरोपकडे गेली. भारतीय आणि पशु ( इराणी ) हे जसे आर्य तसेच ग्रीक आणि रोमन हेहि आर्यच होते. आर्यमहा- वंशांतील जानिक वंशांत जर्मन, स्कॅन्डिनेव्हियन आणि इंग्रज मोडतात. तसेंच लॅटिन भाषेपासून निघालेल्या युरोपीय भाषा बोलणारे इटली, फ्रान्स आणि स्पेन देशांतील लोक आर्यवंशज आहेत. युरोपां- तील आणखी दोन आर्यशाखीय लोक म्हणजे केल्ट आणि स्लाव्ह. स्कॉच, आयरिश आणि वेल्श हे लोक केल्टकुळांतील व रशियन आणि पोल ( पोलंडमधील ) हे प्रमुख स्लाव्ह आहेत. (२) पीतवर्णी लोक आशिया खंडाच्या पूर्व, उत्तर आणि मध्य भागांतून आहेत. चिनी आणि जपानी हे प्रसिद्धच आहेत. इतर
~
मानवी संस्कृतीचा इतिहास
मोंगल महावंशांतील लोक म्हणजे कोरियन, मांच, तिबेटी, अनामी
आणि ब्रह्मी. अमेरिकेतील रेडइंडियन आणि पॉलिनेशियन (पॅसिफिक
समुद्रातील बेटांवरचे लोक ) याच मानववंशांतील पण मोंगल लोकां-
क्षा अगदी वेगळे वर्ग आहेत. युरोपमधील तुर्क, मग्यार ( हंगेरियन),
प, फिन, आणि बास्क हेहि मोंगल कुळांतीलच म्हणून धरण्यात येतात.
(३) या विभागांतील लोक म्हणजे नीग्रो होत. हे नीग्रो मूळचे
आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांतले असून त्यांना इतर दोन महा-
शांतील लोकांनी
गुलाम बनविले. अमेरिकेंत तर इतके नीग्रो गुलाम
ण्यांत आले की, पुढे त्यांची संख्या त्यांच्या युरोपियन मालकांना जाचूं
अगली. गुलामगिरीचे अजिबात उच्चाटण झाल्यापासून नीनो लोक
भमेरिकेंत स्वतंत्र नागरिक म्हणून रहात आहेत.
या तीन मानवमहावंशांची लोकसंख्या साधारणतः अशी देता येईल:
श्वेतवर्णी
७२६००० हजार
पीतवर्णी
७३०००० हजार
कृष्णवर्णी
१९०००० हजार
१६४००६० हजार
परिशिष्ट २ भाषावंश मानवसंस्कृतीच्या इतिहासांत भाषेला विसरून चालावयाचे नाही. भाषाशास्त्राची वाढ सुधारणेच्या प्रमाणांत बहुशः असते. मनुष्य जसा पृथ्वीच्या पाठीवर भटकतो तशी भाषाहि त्याच्या मागोमाग भटकत जाते. भाषांची देवघेव तर एकसारखी चाललेली असते. मनुष्याचे साम्राज्य व भाषचे साम्राज्य ही बरोबरीनेच सत्ता गाजवीत असतात. जेते लोक आपली भाषा जितांवर लादतात अशी अनेक उदाहरणे आढ- ळतील, मानववंशांप्रमाणे भाषावंशहि ठरविण्यांत आले आहेत. जगां- तील मोठमोठे भाषावंश पुढील होतः आर्यभाषावंश-यांत भारतीय, इराणी, जानिक, इटा- लिक, केल्टिक, स्लॅव्हॉनिक वगैरे भाषा मोडतात, ( २ ) द्राविडी वंश---हिंदुस्थानांतील तामिळ, तेलगू , कानडी, वगैरे दक्षिण हिंदुस्थानांतील भाषा. (३) सेमिटिक वंश--असुरियन, खनानी आणि अरबी भाषा. ४ ) हॅमिटिक वंश--इजिप्शियन, लिबियन आणि एथि- ओपियन भाषा. (५) अमेरिकन भापावंश-रेड इंडियन लोकांच्या शंभरांवर भाषा यांत येतात. ( ६ ) आफ्रिकन भाषावंश—नीग्रो लोकांच्याहि बऱ्याच भाषा असून त्यांचा एक स्वतंत्र संघ बनतो.
मानवी संकृतीचा इतिहास
NARAN
यांखेरीज जपानी, बास्क, कॉकेशस वगैरे दहांवर महाभाषासंघ
निघतील.
जगांतील प्रमुख संस्कृती आर्य लोकांच्याच असल्याने त्यांची
आर्य भाषा आज जगांत कशी पसरली आहे हे पुढील मांडणीवरून
स्पष्ट होईल.
आर्यन किंवा इंडो-जानिक भाषावंश
१. पूर्व आर्यन
किंवा
आशियाटिक
१. पश्चिम आर्यन
किंवा
युरोपियन
(१) पूर्व आर्यन किंवा आशियाटिक
T
इराणी
आर्मेनियन
झेंद
8
संस्कृत
Timimpet
पेहलवी
अर्वाचीन फारसी
अर्वाचीन भाषा
(सिंधी, पंजाबी, बंगाली, मराठी,
गुजराथी. वगैरे)
.
९६
V८
मानववंश
(२) पश्चिम आर्यन किंवा युरोपियन
ग्रीक
अल्बेनियन
बाल्टिक जमानिक
इटालिक केल्टिक स्लॅव्हॉनिक
|
।
आयरिश, वेल्स, गॉलिक | लिथुआनियन लेटिश
इटालियन फ्रेच स्पॅनिश पोर्तुगीज रुमानियन
रशियन पोलिग बोहोमियन सहियन बल्गेरियन
स्कन्डिनेव्हियन
पश्चिम जानिक
।
। ।
आइसलाडक नोवेजियन स्वीडिश डॅनिश सेक्सन डच फ्लेमिश इंग्लिश
( जुना)
जर्मन
९७
No text on this page.
No text on this page.