Library
Kai Govin'dasuta Ura~fa Parushuraama Govin'da Chin'chaalakara
Front matter
UNIVERSAL
LIBRARY
OU_184505
LIBRARY
UNIVERSAL
गोविंदसुत
184505
।
द. प. चिंचाळकर,
वकील, अमळनेर
किंमत १ रुपया
*
No text on this page.
8450ssestol
कै. गोविंदसुत
ऊर्फ
परशुराम गोविंद निकाळकर
यांचे चरित्र.
( त्यांच्या ग्रंथांतील सद्बोधसूक्तींसह )
Se+
लेखक:-दत्तात्रय परशुराम चिंचाळकर
बी. ए. एल एल. बी. वकील, अमळनेर
हे पुस्तक विश्वनाथ गणेश जावडेकर, बी. ए. एल एल. बी.
वकील, धुळे, संपादक प्रबोध, यांनी धुळे येथे
गल्ली नंबर २ घर नंबर १२ येथें आत्माराम छापखान्यांत
छापून
दत्तात्रय परशुराम चिंचाळकर, वकील, अमळनेर, यांनी
तेथेंच प्रसिद्ध केले.
१९३५
किंमत १ रुपया
Checked 1963 Checked 1969
No text on this page.
* गोविंदसुत संध्यावन्दन करीत आहेत.
* अर्पण-पत्रिका *
मातृ देवो भव !
पितृ देवो भव !
ज्या परमपूज्य मातापितरांनी आपल्या उदरीं जन्म देऊन आम्हांस
लहानाचे मोठे केलें, ज्यांनी आपल्या गोड वाणीने व सदाचरणाने
आमच्या व जगाच्या कल्याणाचा अमोलिक उपदेश केला,
मामच्या हातून घडणान्या असंख्य चुका, दोष व
पातकें यावद्दल गंभीरपणाने व पुत्रवात्सल्याने क्षमा
करून ज्यांनी आपल्या कृपाछत्राखाली आम्हांस
सुखरूप ठेवलें,
ज्यांचे
पुण्यस्मरण अद्यापही
आमचे दौर्बल्य नाहींसें करून आमचे
सर्व प्रकारे संरक्षण करण्यास समर्थ
आहे अशी आमची आध्यात्मिक
निष्ठा आहे त्या प्रेमळ
मातापितरांच्या स्मरणस्फूर्तीने
लिहिलेले हे पुस्तक गोविंदसुतांचा
शेवटचा लेख ज्या तत्त्वज्ञानमंदिराच्या
त्रैमासिकात प्रसिद्ध झाला त्या तत्त्वज्ञानसंस्थेचे
अध्यक्ष व तत्त्वज्ञानाबद्दल विशेष
आवड
बाळगणारे व गोविंदसुताबद्दल प्रेम व आदर असणारे
अमळनेरचे सुप्रसिद्ध नागरिक श्री. मोतीलाल माणकचंद
ऊर्फ प्रतापशेट यांस त्यांच्या अंगी असलेल्या अनेक
सद्गुणांमुळे त्यांची परवानगी घेऊन आदर
दरपूर्वक अर्पण केले असे.
गुरुवर्य बापट यांची चार अक्षरे गोविंदसुतांच्या चरित्रांत माझी अशी चार अक्षरे पाहिजेत असें चरित्रकारांनी आपले मनोगत आग्रहपूर्वक समक्ष व पत्रद्वारा कळविल्यामुळे जे काही सुचले व आठवले ते लिहून पाठवीत आहे. गोविंदसुत ही एवढी थोर विभूती होऊन गेली की तिचे सेवाधारी म्हणून मिरविण्यासही मला संकोच वाटतो. स्थितप्रज्ञ गोविंदसुतांची मूर्ती माझ्या नजरेसमोर सारखी उभी आहे. आध्यात्मिक विचाराने त्यांची योग्यता किती मोठी हे त्यांची परंपरा ध्यानात आणली म्हणजे समजून येते." श्री नारायण विधि अत्रि नाथ दत्त जनार्दन एकनाथ नरहरि निंबराज नागनाथ उद्धव चिद्घन शामराज दिनानाथ विश्वनाथ गोविंद" याप्रमाणे ती गुरुपरंपरा आहे. शेवटचे गोविंद हेच श्री गोविंदराव वेल्हणकर होत व त्यांचे आध्यात्मिक सुत परशुरामपंत. ४० वर्षांच्या सहवासांत त्यांनी आध्यात्मिक बैठक कशी स्थिर केली होती आणि " पदीहून चळू नये" ही शिकवण त्यांनी स्वतः व माझे ठिकाणी कशी एकरूप बिंबविली हे अनुभवीयांस माहीतच आहे. आपले जड कलेवर जिचा अंश त्या भूवर ठेवते वेळी त्यांना आतुर संन्यास देण्याचा विचार चालू असतां त्यांनी स्वमुखाने आज्ञा केली की " हा विचार तुम्ही मनांत आणूं नका." ही त्यांची भाज्ञा ऐकतांच मी त्यांना विचारले की “ आपण आपल्या स्वपदी स्थिर आहां ना ?' तेव्हां त्यांनी 'होय' असं सांगून तत्काल चिरंजीवाच्या मांडीवर उसे ठेवून निजानंदी निमग्न जाहले, तो समय मनांत आला म्हणजे त्या दिव्य प्रकाशाचे स्मरण करून श्रीसमर्थांच्या उक्तीनेच त्यांची प्रार्थना करणे हेच जीवांचे कर्तव्य. आम्ही अन्यायी अपराधी । आम्हां कैची दृढ बुद्धी ॥ माझे अन्याय अगणित । कोण करील गणीत ॥ मज सर्वस्वे पाळिलें । प्रतिदिनी सांभाळिलें ॥ माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं ॥ शुभंभवतु. शिवोऽहम् । शिवोऽहम् । शिवोऽहम् मु. आवास २४|१२|३४ दत्तात्रेय यशवंत बापट दोन शब्द । . ठेविलियां दिसे रंगा ऐशी शिळा । उपाधीवेगळा स्फटिकमणी॥ (श्री तुकाराम) ' श्री गोविंदसुत ' यांचा देह जाऊन आज वर्ष झाले. 'आह्मांला जन्म नाही, मरण नाही, आह्मी कोठे जात नाही व कोठून येत नाही, आह्मी अखंड आहों तैसोचि आहों ' असें गोविंदसुत नेहमी म्हणत असत व ज्या बैठकीवरून ते हे बोलत ती त्यांची बैठक स्थिर होती है आह्मी पाहिले आहे. व्यतिरेकाने ते संसारांत असून सर्वांहून वेगळेच होते व अन्वयाने ते आपले आईबाप, चुलतेपुतणे, स्त्रीपुत्र, इष्टमित्र व गुरुजन यांशी किती प्रेमाने वागले हे त्यांचे चिरंजीवांनी त्यांचे परम मित्र आवासचे बापट मास्तर यांच्या मदतीने लिहिलेल्या प्रस्तुत चरित्रावरून स्पष्टच होत आहे. हे चरित्र संक्षिप्त असून अगदी यथार्थ आहे. गोविंदसुत जसे होते तसेच यांत दाखविले आहेत. यांतील एकही गोष्ट मिथ्या नाही किंवा अतिशयोक्तीची नाही. अन्वय आणि व्यतिरेक आमच्या स्वरूपी पोंचतच नाहीत असं आह्मी शुद्धबुद्ध सचिदानंदस्वरूप आहोत अथवा कोणतेच शब्द आमच्या ठिकाणी पोचत नाहीत असे ते म्हणत त्यांत अहंकाराचा लेशही नसून केवळ अनुभव होता. त्यांच्यापाशी अहंकार कसलाच नव्हता. त्यांची आमची जेव्हा भेट होई तेव्हां त्यांचा आम्हांस पहिला प्रश्न असे : 'कांबळवंतराव ! कसे काय आहे ?' आमचेही उत्तर एकच असे ' आनंद आहे.' यावर ते लगेच विचारीत : ' आनंद वृत्तिसहित आहे कां वृत्तिरहित आहे ? वृत्तिसहित असेल तर तो प्रपंचांतला अतएव मिथ्या आहे आणि वृत्तिरहित असेल तर त्याचा साक्षी कोण ?' येथून मग जो ' उगमाचा सुखसंवाद ' होई तो दोन दोन तास टिकत असे ! अध्यामसुखसंवादाला त्यांच्यासारखा अधिकारी पुरुप आम्हांला दुसरा कोणी भेटला नाही. त्यांच्या पत्रव्यहारांतही सारा अध्यात्मविषयच भरपूर असे. त्यांच्या मित्रांस गेलेली त्यांची सारी पत्रे एकत्र करून छापण्यांत आली तर तोही एक आदरणीय स्वतंत्र ग्रंथच होईल. ' भातां ऐसे कोणी होणें नाहीं' हे मनांत येऊन प्रवृत्ति- निवृत्तींच्या आंदोलनांत खेळणाऱ्या आमच्यासारख्या त्यांच्या सुहृजनांना प्रत्यही चुकल्याचुकल्यासारखे होऊन त्यांचा विरह जाणवल्याशिवाय रहात नाही. २ दत्तोपंतांनी लिहिलेले त्यांचे प्रस्तुत चरित्र व बापट मास्तरांनी निवडलेल्या त्यांच्या उक्ति एवढ्या जरी कोणी वाचल्या तरी त्यांची धुळभेट झाल्याचे त्यास समाधान वाटेल. प्रस्तुत छोटा ग्रंथ आटपशीर आहे. यांत पाहिजे ते सर्व आहे. पाल्हाळ नाही, वर्म सुटले नाही. गोविंदसुतांचे विस्तृत चरित्र कोणीतरी लिहिले पाहिजे. लोकांना ते मार्गदर्शक होईल. त्यांची सोज्वल कुलपरंपरा, त्यांचे वडिलधाच्या व धाकट्या मंडळीवरील प्रेम, प्रपंच व परमार्थ-दोहींकडील सावधानता, त्याचा सततोद्योग व दीर्घव्यासंग, त्यांची निरलसता, त्यांची निर्मळ व शोधक तीव्र बुद्धि, त्यांचे शुद्ध व बाळबोध आचरण, त्यांची निःस्वार्थता, राष्ट्रकल्याणाची अंतरीं वसत असलेली जाज्वल्यता, सर्वत्र असून असंगता हे त्यांचे गुण खरोखरीच मोठे मनोवेधक होते. ३ ग्रंथलेखनाची इच्छा किंवा संकल्प नसून ते ग्रंथकर्तृत्वाकडे कसे ओढले गेले हे प्रस्तुत चरित्राने बरोबर दाखविले आहे. त्यांचे सर्व लिखाण प्रथम माझ्या नजरेखालून गेले आहे. अगदी शेवटचा श्रीज्ञानेश्वरदर्शनांत' त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला लेखही त्यांनी लिहिणे संपतांच प्रथम माझ्याकडे भवलोकनार्थ पाठविला होता व नंतर तो छापण्यास गेला. त्यांचे तीन मुख्य अंथ-१ परमार्थ विचारमाला २ आत्मानुसंधान व ३ आधिभौतिक सुधारणा भाणि आध्यात्मिक धारणा हे मराठी गद्यांतील अव्वल दांचे ग्रंथ पुढे मार्ग आदरिले जातील अशी मला उमेद आहे. त्यांच्या ग्रंथांची बूज करणारा प्रस्तुतचा काळ नाही. नाटके, कादंबच्या, लघुकथा, भाषांतरें, अर्वाचीन काव्य इत्यादिकांच्या वावटळीत अध्यात्माच्या गंभीर वाङ्मयाचा योग्य तो परामर्ष घेतला जात नाही. कोल्हटकरांचा ' भागवतादर्श, ' फडक्यांचे 'नवयुगधर्म- माला' व इतर ग्रंथ, गो. म. जोशी यांचें । हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ह्या ग्रंथांसारखेच गोविंदसुतांचे ग्रंथ महाराष्ट्र वाचकांत सर्वमान्य झाले पाहिजेत. यांचाही काळ येईल. माझेही ३० ग्रंथ याच वर्गात मोडतात, तथापि त्यांतले काही ग्रंथ युनिव्हर्सिटीने मान्य केल्यामुळे तरुणपिढीच्या परिचयाचे झाले आहेत. ह्या सर्व ग्रंथांचे मुख्य धोरण आपल्या आर्यसंस्कृतीचे व संस्कारांचे संरक्षण करणे हे आहे. सांप्रतचा काळ पाश्चात्यांच्या आचारविचारांच्या अंधानुकरणाचा व मार्यसंस्कृतीच्या विनाशाचा आहे. गोपाळराव देशमुख व गोपाळराव आगरकर यांच्या वेळेपासून हा काळ सुरू झाला असून आता त्याचा कळस झाला आहे. वरेरकर, ठाकरे, ना. सी. फडके, अत्रे, किलोस्कर, कर्वे इ. नवयुगाचे अभिमानी लोक आपल्या नाटकांनी, लेखांनी व भापणांनी तरुणांची मनें वहकवीत आहेत व त्यांना भलतीच दिशा दाखवीत आहेत! असो. हाही काळ जाईल. नव्यांतील जे काही चांगले असेल तेवढेच घेऊन आपल्या शुद्ध संस्कृतीचे जतन करणे व ती जोरदार करणे हे अत्यवश्य आहे. अशी तरुणपिढी लौकरच उदयास येईल. नवयुगमतापासून समाज परतवला पाहिजे असे कित्येकांच्या मनांत येत आहे हे सुचिन्ह आहे. धर्म, राजकारण व समाजसंस्था यांचा सांप्रत संपूर्ण हास झाला आहे तथापि हा लौकरच थांबेल. काळोखी रात्र उलटू पहात आहे, प्रभात काळ सुरू होण्याच्या समयीं गोविंदसुतांसारखे ‘कोकिळ ' सुस्वर गायन करूं लागले आहेत. दिवस उगवेल, नाथ समर्थ तुकोबांसारखे राष्ट्राचे खरे पुढारी संत पुन्हा अवतरतील, ते राष्ट्राचे डोळे उघडतील व धर्ममूर्ति शिवरायासारखे हिंदु क्षत्रिय राजे जन्माला येऊन महाराष्ट्रमहोदयाचा सूर्य माध्यान्हीं येईल. शुभं भवतु ! नाशीक, १०/१२१३४] टक्ष्मण रामचंद्र पांगारकर * अनुक्रमणिका * विषय पृष्ठ ... ... ... ... ... ... ... ... २२ २६ ... ... ... २८ . सदरहू पुस्तकाचा उपक्रम कसा झाला? २ चरित्राचे वैशिष्ट्य ३ जन्म व घराण्याचे मूळ गांव ४ जन्म कुंडलीचे त्रोटक निरीक्षण ५ वंशवृक्ष ६ कुलवृत्तांत ... ७ गोविंदसुतांचे आईबाप व चुलते ८ गोविंदसुतांचे बंधु ९ गोविंदसुतांचे बालपण व शिक्षण १० विवाह ११ सत्समागम व सग्रंथ वाचन ... १२ नोकरीपूर्वीची उमेदवारी ... १३ अहमदनगर जिल्ह्यांत नोकरी १४ पुण्यास जाण्याची जबर इच्छा १५ पुण्यांतील वास्तव्य १६ नोकरीतील दिनचर्या १७ पारमार्थिक ध्येयाची सिद्धि १८ फलज्योतिषाचा व्यासंग १९ पत्नीवियोग २० लेखनव्यवसायाला सुरवात २१ गोविंदसुत कोण? २२ परमार्थविचारमालेची प्रसिद्धी २३ रहस्यनिरीक्षणाचे प्रकाशन ... २४ सेवानिवृत्तीनंतर २९ ... ३० ... ... ३२ ... ३८ ... ४२ ... ... ... ... ४४ ... ४६ ...
[२]
२५ वाचन व्यवसाय
...
६१
...
६५
...
२६ लेखनव्यवसाय
२७ प्रवासाची आवड...
... ...
२८ गोविंदसुतांची राहाणी
२९ गोविंदसुतांची काही स्नेहीमंडळी
३० अखेरचे दिवस
३. परशुरामाष्टकम्
...
३२ सद्बोधसूक्तींची प्रस्तावना
...
३३ परमार्थविचारमालेतील सद्बोधसूक्ति
३४ आत्मानुसंधानांतील सद्बोधसूक्ति
३५ काही निवडक पत्रांचे उतारे
३६ गोविंदसुत परशुरामस्मृतिहार (ले० गणेश रामकृष्ण शहाणे )
३७ कैवल्यवासी श्रीगोविंदसुत (लेखक- रा, ल. घरत )
३८ कै. गोविंदसुतांचे अल्प स्मरण ( लेखक-व्यं. ग. जावडेकर )
३९ आठवणींचे रजःकण
...
...
...
...
१२०
कै० ० परशुराम गोविंद चिंचाळकर ऊर्फ गोविंदसुत यांचे चरित्र क्रमी वेळ जो तत्वचिंतानुषा । न लिंगे कदा दंभ वादें विवादें ॥ करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५२॥ श्रीसमर्थ रामदास स्वामी-मनाचे श्लोक . सदरहू पुस्तकाचा उपक्रम कसा झाला माझे परमपूज्य वडील ती. परशुगम गोविंद चिंचाळकर (ऊर्फ गोविंदसुत ) यांस अमळनेर येथे त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षी शके १८५५ पौष व॥ ७ सोमवार ता ८।११३४ रोजी सायंकाळी ७ वाजता देवाज्ञा झाली. त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी आप्त व सुहृजनांत ताबडतोब पसरली व गोविंदसुत हे आता सगुणमूर्तिरूपाने यापुढे आपणांस दिसणार नाहीत याबद्दल सर्वांस फार हळहळ वाटली. नव्या काळांतील दे. भ. कृष्णाजीपंत खाडिलकर व श्री. नरहरपंत फाटक यांचा व वडिलांचा विशेष परिचय असल्यामुळे त्यांस मुंबईच्या मित्रांकडून ही शोचनीय वार्ता समजतांच ता. १२।११३४ च्या नव्याकाळांत संपादकांनी २१३ स्तंभांचा मृत्युलेख लिहून अग्रभागी प्रसिद्ध केला व त्याबरोबरच गोविंदसुतांची दोन छायाचित्रेही प्रसिद्ध केली. प्रसिद्ध केली. ता. १२।१।३४ च्याच केसरीत ॥ दोन " या शीर्षकाखाली प्रो. पानसे व गोविंदसुत यांचे मृत्युलेख संपादकांनी प्रमुख भागी प्रसिद्ध केले व पुढील अंकांत गोविंद सुतांचे छायाचित्रही दिले. गोविंदसुत निजानंदी निमग्न झाल्याची वाता महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य परिचित व प्रेमी सजनांस विदित व्हावी म्हणून "गृह्यसंस्कार" या सदराखाली प्रसिद्ध करण्यासाठी केसरीकडे मी चार भोळी पाठविल्या होत्या. परंतु या वार्तेला संपादकीय स्फुट लेखांतच स्थान देणे केसरीस उचित वाटून गृह्यसंस्कार या मामुली सदरांत केसरीने ही बातमी घेतली नाही. प्रो. पानसे व गोविंदसुत यांचा एकमेकांशी ३०३२ वर्षांचा परिचय होता व एकमेकांस एकमेकांबद्दल शोचनीय मृत्यु २ पुस्तकाचा उपक्रम कसा झाला भ. चांगला भादर असे. या दोन स्नेही व विनोदी वाड्मयभक्तांचे एकाच दिवशी व एकाच पूर्वखानदेश जिल्ह्यांत निधन व्हावे व महाराष्ट्राच्या मुखपत्रांत एकसमयावच्छे देंकरून त्यांचे मृत्युलेख यावे हाही एक अकल्पित योगच म्हणावयाचा ! केसरी व नवाकाळ यांतील मृत्युलेख वाचून ८1१५ दिवसांत मजकडे शेंदोनशे सहानुभूतीपर पत्रे आली. मराठांतील बहुतेक वृत्तपत्रांत व कित्येक मासिक पुस्तकांत गुणगौरवपर लेख आले. गोविंदसुतांशी सतत ४० वर्षे दृढस्नेह असलेले व त्यांच्याशी संवादसुखांत हजारों प्रसंग घालविलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विठ्ठलभक्त लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी केवळ स्वयंप्रेरणेने चित्रमयजगत्च्या फेब्रुवारी १९३४ च्या अंकांत कै. गोविंदसुतांचे नोटक चरित्र दिले. तसेंच प्रो. पोतदार यांनीही जानेवारी १९३४ च्या महाराष्ट्रसाहित्यपत्रिकेत गोविंदसुतांच्या गुणांचा गौरव करणारा मृत्युलेख लिहिला आहे. या सर्व लेखांमुळे गोविंदसुतांबद्दल आणखी जास्त माहितीने भरलेले असें समग्र चरित्राचे पुस्तक प्रसिद्ध व्हावे अशी उत्सुकता बऱ्याच लोकांस घाढू लागली. ह. प. पांगारकर यांच्या लेखांत शेवटचे वाक्य असें आहे की " गोविसुतांच्या अंतरंगाचे, वर्तनाचें व ग्रंथकर्तृत्वाचे समग्र विवरण करण्यास स्वतंत्र ग्रंथच लिहिला पाहिजे, तितकी मला सवड नाही म्हणून त्यांच्या पवित्र आरम्यास वंदन करून हा धांवता लेख येथेंच संपवितो. या वाक्यांत सूचित केलेल्या स्वतंत्र ग्रंथाची मागणी प्रेमी जनतेकडून मजकडे विशेष आग्रहाने होऊ लागली. सासवने जि. कुलाबा येथील वयोवृद्ध देशभक्त व पुढारी श्री. रा. ल. घरत यांनी ४।३।३४ च्या आपल्या पत्रांत " आपल्या वडिलांचे समग्र चरित्र प्रसिद्ध झाल्यास त्याचा मुमुक्षूस फार उपयोग होईल म्हणून आपण ते अवश्य प्रसिद्ध करावे" अशी प्रेमळपणाने सूचना केली व वडिलांच्या वर्षश्राद्धास त्यांचे स्मरण म्हणून काही तरी प्रसिद्ध करीन असें मी त्यांस ताबडतोब आश्वासन देऊन चुकलों ! श्री. घरत यांच्या सूचनेला वाडेलांचे जिव्हाळ्याचे स्नेही व आमच्या घराण्याशी सुमारे ४० वर्षांवर अत्यंत घरोब्याचा व विश्वासाचा संबंध असलेले आवास येथील गुरुवर्य श्री. दत्तात्रेय यशवंत बापट पेन्शनर हेडमास्तर यांनी विशेष जोराचा दुजोरा दिला व दररोज थोडथोडे लेखन सुरू ठेवा म्हणजे वर्षश्राद्धापर्यंत काम पुरें होईल, अशी आज्ञा केली. किंबहुना १९३२ च्या जुलैमध्ये माझे कनिष्ठ बंधु कै. श्रीरामपंत निवर्तल्या वेळी बापट मास्तर आमच्या भेटीस भाले त्याच वेळी वडिलांची क्षीण प्रकृति पाहून दररोज त्यांच्या सन्निध बसून त्यांच्या तोंडून थोडथोडी माहिती घेऊन ती टिपून ठेऊन चरित्रलेखनाची कै. गोविंदसुत ३ सामग्री तयार करून ठेवा असा इषारा गुरुवर्य बापट यांनी मला दिला होता. तथापि नित्याच्या परिपाठास अनुसरून यानंतरही वडिलांनी बराच प्रवास केला व पुनः अमळनेरास शेवटच्या दुखण्यांत भांथरुणासच खिळून असतांही त्यांचे सर्व बौद्धिक उद्योग नेहमीप्रमाणेच चालू असत. त्या मुदतीत त्यांच्या तोंडून माहिती घेऊन टांचणे करण्यास २।३ वेळांच काय तो अवसर मिळाला. आतां असा पश्चात्ताप वाटतो की बापट यांचा उपदेश जर तंतोतंत पाळला असता तर हे चरित्रलेखनाचे काम फारच सोपे झाले असते. परंतु भातां त्याचा उपयोग काय ? गोविंदसुतांच्या चरित्रलेखनाची अवश्यकता खरोखरच उत्पन्न होईल व ती उणीव पूर्ण करावी लागेल अशी त्या वेळी तादृश कल्पना नव्हती. गोविंदसुत हे " मरावे परी कीर्तिरूपें उरावें" या कोटींतील पुरुष होऊन गेले यांत शंकाच नाही. एखादा सामान्य मनुष्य मयत झाला तर त्याच्या पश्चात् त्याचे सुतकी भाऊबंद व जवळचे नातेवाईक यांच्याशिवाय दुसरे कोणीही त्याच्याबद्दल पूसतपास करीत नाहीत व त्याची आठवण त्याची मुलेबाळे अगर गांवांतील काही लोक यांच्या पलीकडे कोणी काढीत नाहीत. त्याने सावकारांचे कर्ज करून ठेवले असेल तर मात्र ते सावकार लोक तें कर्ज फिटेपर्यंत अगर फिटण्याची आशा नष्ट होईपर्यंत त्याच्या दाराशी खेपा घालीत राहतील इतकेंच. परंतु एखादी अलौकिक व्यक्ति दिवंगत झाली तर तिच्याशी परिचय असलेले लोकच तिच्याबद्दल पूसतपास करतात व आठवण ठेवतात असे नसून अनेक अपरिचित लोकांसही त्या व्यक्तीचे चारित्र्य समजून घेण्याविषयीं जिज्ञासा उत्पन्न होते. सामान्य लोक हे जगांत जिवंत असतांनाही मेल्याप्रमाणे असतात व असामान्य लोक हे मेल्यानंतरही लोकांच्या अंतःकरणांत स्मृतिरूपाने जिवंत राहातात हा दोघांमध्ये महत्त्वाचा फरक आहे. गोविंदसुत हे अगदी अलौकिक अगर असामान्य कोटींतील पुरुष होते असे जरी म्हणता येणार नाहीं तथापि त्यांच्या अंगी काही तरी वैशिष्ट्य होते व त्यामुळे आपल्या हयातीतच नव्हे तर आपल्या पश्चातही शेकडो परिचित व अपरिचित लोकांचे प्रेम व जिज्ञासा त्यांनी आपल्या भोवती आकर्षित केल्या आहेत याचा अनुभव आम्हांस पदोपदी आलेला आहे व येत आहे. त्यांच्या निधनानंतर अखिल महाराष्ट्रांतून असंख्य लोकांकडून आम्हांस दुखवट्याची पत्रे आली याचा उलेख वर केलाच आहे. यांपैकी काही लोक त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचित होते, परंतु कित्येक लोक फक्त त्यांच्या ग्रंथांचे वाचक होते व प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ आतां अशक्य म्हणून त्या सर्वांनी फार हळहळ व्यक्त पुस्तकाचा उपक्रम कसा झाला केली आहे. दुःखाचा आवेग ओसरल्यानंतरही अनेक सुहृदांकडून अनेक प्रकारच्या सूचना व जिज्ञासापूर्वक पृच्छा होत आहेत. कित्येक फलज्योतिषज्ञांनी त्यांच्या जन्मवेळेची व कुंडलीची आमचेकडे मागणी केली तर काही फलज्योतिषाचे अभ्यासी लोक त्यांच्या आयुष्यातील ठळक गोष्टींची आमच्याकडे समक्ष येऊन चौकशी करून त्यांची कुंडली घेऊन गेले, कित्येक सन्मित्रांनी सूचना केल्या की गोविंदसुतांचे काही अप्रसिद्ध लेख असल्यास ते सर्व प्रसिद्ध करावे म्हणजे मराठी भाषेत एका चांगल्या पुस्तकाची भर पडेल तर कित्येकांनी गोविंदसुतांचा नित्यवाचनाचा ग्रंथसंग्रह काय आहे व श्री. विश्वनाथदादा पाटणकर यांच्या अप्रसिद्ध ग्रंथांपैकी काही पुस्तकांची हस्तलिसिने त्यांत आहेत काय वगैरे पृच्छा केली आहे. जमखंडीकडील एक प्रेमळ भक्त लिहितात की गोविंदसुतांच्या प्रत्यक्ष भेटीचे भाग्य आपणांस लाभले नाही तरी ग्रंथद्वारा आपण त्यांस आद्य गुरूचा मान देत असल्यामुळे व या ग्रंथांनीच आपणांस प्रथम मुमुक्षुत्व प्राप्त होऊन नंतर एका सदुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला असल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिति बरी नसली तरी गोविंदसुतांची समाधि, मंदिर अगर अन्य काही स्मारक होत असेल तर फुलाची पाकळी म्हणून रु. ५० आपण पाठविण्यास तयार आहो. अर्थात् गोबिंदसुतांस यांपैकी कोणतीच गोष्ट प्रिय नसल्यामुळे स्मारकासाठी रक्कम पाठविण्याची जरूरी नाही असे आम्ही त्यांस कळविले. गोविंदसुतांच्याच विचारांचे व बैठकीचे दुसरे कोणी पुरुप त्यांचे शिष्य अगर त्यांच्या गुरुपरंपरेतील मम विमान आहेत काय व गोविंद- सुतांप्रमाणेच प्रेमळपणे परमार्थमार्गातील शंकाच ते निरसन करतील काय अशी चौकशी कित्येकांनी केली तर कित्येकांनी गोविंदसुतांच्या पश्चात् आम्हांलाच त्यांच्या ठिकाणी कल्पून आमच्या ठिकाणी नसलेली पात्रता व थोरवी आम्हांस आणून दिली आहे. परंतु वाचकांस प्रथमतःच आम्ही प्रांजळपणे निवेदन करतों की जनतेच्या अपेक्षेप्रमाणे " गोविंदसुतांच्या अंतरंगाचे, वर्तनाचे व ग्रंथकर्तृत्वाचे समग्र विवरण" करता येईल अशी यत्किंचितही लायकी आमच्यापाशी नाही, तथापि गोविंदसुतांसंबंधाने ज्या ज्या गोष्टी आम्हांस आठवत गेल्या घ जी जी माहिती मिळत गेली ती ती क्रमशः लिहून काढून जिज्ञासू जनतेपुढे सादर केली असता आपण आपल्या कर्तण्याच्या ऋणांतून अंशतः तरी मोकळे होऊ व दुधाची तहान ताकावर तरी भागविण्याचे साधन करून ठेऊ या नम्र भावनेने प्रस्तुत चरित्रलेखनाचा उपक्रम झाला आहे.
चरित्राचे वैशिष्ट्य चरित्राचे वैशिष्ट्य हल्लीच्या काळांत ज्या प्रकारची चरित्रे बहुजन समाजास विशेष वाचनीय व संग्राह्य वाटतात त्या प्रकारचे गोविंदसुतांचे चरित्र नाही हे प्रथमतःच सांगितले पाहिजे. गोविंदसुतांच्या नावापुढे अगर नांवापाठीमागे कोणत्याही प्रकारच्या विद्वत्ताप्रदर्शक पदव्या अगर सरकारने किंवा जनतेने दिलेली उपपदें नाहीत. यामुळे आधुनिकांच्या कसोटीने पाहतां त्यांच्या चरित्राला शंभरापैकी पन्नास टक्के मार्क कमी पडतात. त्यांनी जे लेख लिहिले आहेत तेच एखाचा भाधुनिक पदवीधराने लिहिले असते तर कदाचित् जनतेचे तिकडे जास्त सहानुभूतीने लक्ष गेले असते व ते जास्त लोकादराला पात्र झाले असते असे एखाद्या वेळी वाटते.परंतु त्याबरोबरच आम्ही असेंही निश्चयात्मक सांगू शकतों की गोविंदसुतांच्या विशिष्ट विचारपद्धतीशी सहानुभूति असल्यामुळे अथवा त्यांच्या विविधप्रकारच्या कार्यव्यापामुळे शेंकडों आधुनिक विद्वानांचे त्यांस साहचर्य लाभत असे, परंतु गोविंदसुत हे बिनपदवीवाले म्हणून त्यांची कोणीही कधीही अवहेलना केलेली नाही. उलट आपल्याबरोबर विचारविनिमय करण्याची बौद्धिक पात्रता त्यांच्यांत आहे व चार अनुभवाच्या गोष्टी आपणांस सांगण्याचा त्यांस अधिकार आहे हे पाहून त्यांच्याबद्दल त्यांस कौतुक व आदर वाटत असे. सरकारी नोकरीत असतांना त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले व पदवीधर लोक त्यांच्या अनुभविक कामकाजपद्धतीचे त्यांच्यापासून धडे घेण्याचे दृष्टीने त्यांचेकडे पाहात असत. मराठी भाषेवरील प्रभुत्वाच्या बाबतीत तर अनेक पदवीधरांस त्यांचा हेवा वाटत असे. रहस्यनिरीक्षणाचे परीक्षण करतांना साहित्यसम्राट् श्री. न. चिं. केळकर जून १९१८ च्या लोकशिक्षणांत लिहितात " गोविंदसुत हे एखादे उपपदधारी ग्रेजुएट नाहीत; तरी पण त्यांचे भाषाप्रभुत्व, टीकाचातुर्य, विनोद व कुशाग्र बुद्धि ही अनेक ग्रॅजएट म्हणविणारांनाही दुर्लभ आहेत असे आम्हांस वाटते. " अलीकडे किर्लोस्कर वगैरे मासिकांतून "भिक्षाधीशाचा लक्षाधीश कसा झाला?" वगैरे स्वरूपाची बरीच चरित्रे येतात व व्यावहारिक दृष्ट्या उत्कर्षेच्छु लोकांस ती बोधप्रदहि असतात. परंतु त्या दृष्टीनेहि गोविंदसुतांच्या चरित्रावर लुब्ध होण्यासारखें माधुनिकांस कांहींच आढळणार नाही, यामुळे आणखी २५ मार्क कमी पडतील. द्रव्यप्राप्ति व द्रव्यसंग्रह हे गोविंदसुतांनी आपल्या आयुष्याचे ध्येय कधीच ठेवले नाही. निर्वाहापुरते अन्न व आच्छादन स्वत:च्या प्रयत्नाने मिळविले म्हणजे त्यांत ते पूर्ण संतुष्ट असत व त्यांतूनही शिल्लक राहिल्यास ते दुसज्यांस देण्यांत ते धन्यता मानीत व यामुळे कित्येक व्यावहारिक लोक त्यांस अव्यावहारिकही म्हणतील. त्यांनी कधी भापली ६ गोविंदसुत जाणे अशक्य १ शिष्यशाखा म्हणून वाढविली नाही किंवा कोणावर अनुग्रह करण्याचा आव भाणून गुरुदक्षिणाही कधी घेतली नाही. बुवाबाजीच्या मार्गात गोविंदसुत शिरले असते तर शेकडों पृष्ठांची त्यांची चरित्रे त्यांच्या हयातीतच लिहिली व्हते. हल्लीच्या व्यावहारिक म्हणविणा-या जगाला अवश्य वाटणान्या असंख्य गोष्टींचा गोविंदसुतांच्या ठिकाणी अभाव असूनही त्यांची 'साधी राहाणी व उच्च विचारसरणी' असंख्य विद्वान् व सामान्य लोकांना आपल्याकडे आकर्पण करूं शकली. आपण प्रसिद्धीला यावे अशी त्यांची मुळीच इच्छा नसे व एवढे हजारों पानांचे ग्रंथ त्यांच्याकडून लिहिले गेले हे कार्य केवळ यदृच्छेनेच झाले असे म्हणावे लागते. गोविंदसुतांना लहानपणापासून विचार करण्याचा नाद असे व दासबोध, ज्ञानेश्वरी व इतर संतवाङ्मय वाचण्याची फार आवड असे. प्रचलित विषयांवरील वर्तमानपत्रे व मासिके वाचल्याशिवाय ते राहात नसत हे खरे, परंतु त्यांत त्यांचे अंतरंग रंगत नसे. स्वदेशांतील व परदेशांतील सर्व चळवळी व उलाढाली समजून घेण्याचा त्यांस जबर हव्यास असे, परंतु स्यांतून मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण करून संतवचनांच्या आधारें तत्वशोधन करून आत्मोन्नति करून घेणे हे त्यांच्या आयुष्याचे खरें ध्येय होते. हे ध्येय गांठीत असतां प्रापंचिक कर्तव्यांत त्यांनी कधीही हेळसांड केली नाही व वाटेतील मुक्कामांत सहज लीलेने कांहीं पारमार्थिक ग्रंथ त्यांच्या हातून लिहिले गेले तरी ते कार्य त्यांचे ध्येयसर्वस्त्र होते असे म्हणता येत नाही. गोविंदसुत हे एक तत्त्वज्ञानी, स्थितप्रज्ञ व आत्मवेत्ते पुरुष होऊन गेले. त्यांचे ग्रंथ वाचण्यापेक्षा ज्यांना त्यांच्या सहवासाचा व त्यांच्याशी सुखसंवाद करण्याचा चिरकाल लाभ घडला त्यांनाच त्यांच्या विचारांच्या उच्चभूमिकेची साक्ष पटण्याजोगी आहे. गोविंदसुतांचे व्यावहारिक अगर पारमार्थिक चरित्र यथार्थपणे लिहितां येणे किती अवघड, दुरापास्त किंबहुना अशक्य कार्य आहे हे श्री. के. भि. बापट यांच्या आम्हांस आलेल्या एका पत्रावरून दिसून येईल सबब त्यांच्याच शब्दांत निवेदन करतो. रा. बापट लिहितात " व्यवहारदृष्टीने दादांकडे पाहिले तर ते व्यवहारापलीकडे केव्हांच गेलेले होते. केवळ व्यावहारिक लोकांस वाचण्यासारखी दुसरी चरित्रे हवीं तितकी आहेत. पारमार्थिक पदाकरता ज्यांना भूक लागली असेल त्यांचा खरा मार्ग पुस्तकांकडे नसून 'तद्विज्ञानार्थ सद्गुरुमेवाभिगच्छेत् ' असाच असतो. दादांनी पुस्तकांतून काय थोडे रहस्य सांगितले आहे ? परंतु रहस्य तें रहस्यच, ते पुस्तकांत कितीसें येणार ? दादांची भूमिका इतकी उच्च होती की साधकांना व चरित्राचे वैशिष्ट्य ७ मुमुक्षूना प्रथमतः त्यांचे बोलणे आकलन करण्यासही कठीण वाटून चमत्कारिकपणा उत्पन्न होई. दादांचे पारमार्थिक स्वरूप सांगावयाचे म्हणजे ' गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः' अशी स्थिति. यामुळे त्यांचे यथार्थ चरित्र कोण व कसे लिहिणार व त्यापासून कोणास लाभ घेता येईल ? तथापि एखादी अलौकिक व्यक्ति दिवंगत झाली म्हणजे निधनोत्तर त्या व्यक्तीबद्दल शक्य तितके ज्ञान करून घ्यावें असें जनतेस वाटणे स्वाभाविक आहे. या बाजूने विचार करतां बहिरंग दृष्टीने त्यांच्याबद्दल चरित्रकारास माहिती लिहिता येईल व जगाची जिज्ञासा अंशतः तृप्त करतां येईल. दादांच्या अंतरंगांचे चित्र व चरित्र त्यांच्या ग्रंथांत जितकें व जसे सांपडते तितकें दुसरा कोणीही लिहिण्यास समर्थ नाही. त्या ग्रंथांतून " सद्बोधसूक्ति " निवडून काढल्यास त्या अभ्यासकांस उपयोगी पडण्याचा संभव आहे." या पत्रानंतर गोविंदसुतांच्या बाह्य व व्यावहारिक चरित्राची रूपरेषा वाचकांस दाखवून देण्याचे काम आम्ही आमच्या शिरावर घेतले व ग्रंथातील सद्बोधसूक्ति निवडून काढून पारमार्थिक अगर अंतरंगाचे चरित्र दिग्दर्शित करण्याबद्दल आम्ही श्री. के. भि. बापट यांसच विनंति केली व मोठ्या तत्परतेने ८।१० दिवसांतच त्यांनी ३६५ सूक्ति निवडून व लिहून आमचेकडे पाठविल्या व या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणून त्या पुढें प्रसिद्ध केल्याच आहेत. तिसऱ्या भागांत निरनिराळ्या लोकांनी गोविंदसुतांबद्दल आठवणीदाखल लिहिलेला मजकूर प्रसिद्ध केलेला आहे. या तिन्ही भागांचा मिळून विचार करता हे पुस्तक गोविंदसुतांचे यथार्थ चरित्र अशा स्वरूपाचे नसून त्यांच्या आप्तेष्टांनी व सुहृजनांनी त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांचे केलेले पुण्यस्मरणच आहे असे म्हटले तरी चालेल. ज्याला त्याला आपआपल्या भूमिकेपासून गोविंदसुतांचें जशा प्रकारचे दर्शन घडलें तशाच प्रकारचे यथामतिवर्णन ज्याने त्याने केले आहे. यामुळे या पुस्तकांत काही दोष अगर चुका भाढळल्यास अथवा उणीवा राहिल्यास त्याबद्दलची जबाबदारी सर्वस्वी आमच्या आकुंचित दृष्टीवर व दुर्बलतेवर आहे, गोविंदसुतांच्या चारित्र्याला त्यामुळे वैगुण्य येण्याचा मुळीच संभव नाही. एखाद्या वस्तूचे स्मरण करणाज्याच्या अंतःकरणांतील अनेकविध दोषांमुळे त्या वस्तूच्या यथार्थ स्वरूपांत ज्याप्रमाणे कधीच बदल होत नाही त्याप्रमाणेच या पुस्तकांत आमचेकडून काही प्रमाद घडल्यास त्याचा दोष सर्वस्वी आमचेवरच राहील इतका इषारा देऊन मुख्य विषयाकडे वळतो.
कै. गोविंदसुत जन्म व घराण्याचे मूळ गांव गोविंदसुत हे वासिष्ठ गोत्री क-हाडे ब्राम्हण. त्यांचा जन्म मुक्काम साव तालुके चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे चिंचाळकर घराण्यांत शके १७८४ मार्गशीर्ष शुद्ध ११ (गीताजयंति ) ता. १।१२।१८६२ सोमवार या दिवशी रात्री ४ घटकेच्या सुमारास झाला. सांबर्डे येथील चिंचाळकर घराण्याचा मूळ गांव कशेळी तालुके राजापूर हा आहे. तेथून हे घराणे करंबेळ तालुके संगमेश्वर येथे आले. तेथून आग तालुके चिपळूण येथे स्थलांतर झाले. आगवे येथे आगवेकर आडनांवाचें देशस्थ घराणे आहे त्यांच्याकडे गोविंदसुतांचे आजोबा गणेशपंत हे अगदी गरीब स्थितीत नोकरी करीत होते. आगवे हा गांव सांवडापासून २।३ मैलांवर आहे. पुढे गणेशपंतांनी सांव येथे येऊन लहानसें घर बांधले व नजीकच्या डेरवण गांवी थोडीशी शेतीही घेतली. या शेतीच्या ठिकाणाला मडग' असें नांव आहे व हे ठिकाण आमचे प्राचीन वडिलार्जित ठिकाण म्हणून सर्व वंशज विशिष्ट अभिमानाने सांगतात. गणेशपंत सांवास रहावयास आले तरी तेथून आगपास जाऊन नोकरी करीतच असत. गोपाळ गणेश व इतर वंशज यांनी पुढे कुडप, डेरवण, मांडकी वगैरे नजीकच्या गांवीं मिळकत संपादन केली. खुद्द सांव. येथे राहाते घर व त्या भोंवतींचे परसू याखेरीज या घराण्याची दुसरी मिळकत नाही. मांडकी गांवांत नानल व चिंचाळकर यांनी मिळून समाइक्रींत संपादन केलेली खोती तक्षीम आहे. जन्मकुंडलीचे त्रोटक निरीक्षण ३ २ के. ६ ૧ ૨ हर्शल चं.म.नेप- च्यून ११ श. र.शु.बु.रा, १० भाम्हांला स्वतःला फलज्योतिषाचे मुळीच ज्ञान नाही. परंतु या शास्त्रावर आमचा विश्वास आहे. ग्रहांचे मनुष्यांवर सुखकारक अथवा दुःखकारक परिणाम होत असतात ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. गोविंदसुत स्वतः जन्मकुंडलीचे त्रोटक निरीक्षण . - फलज्योतिषज्ञ होते. फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा अभ्यास करणारे जे वाचक असतील त्यांची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी गोविंदसुतांची जन्मकुंडली त्यांना स्वतःला मान्य असलेली आम्ही वर दिली भाहे व भामच्या विनंतीवरून श्री. केशव भिकाजी बापट मास्तर यांनी या कुंडलीचे नोटक निरीक्षण केले आहे ते त्यांच्याच शब्दांत खाली दिले आहे. (.) या कुंडलीत लग्नस्थानी मिथुन ही बौद्धिक व शास्त्रीय राशी असून त्या ठिकाणी हर्शल हा गूढ व अद्भुत ग्रह आहे म्हणून गोविंदसुतांची विचार- शक्ति व संशोधनशक्ति फार सूक्ष्म व गहनांतील गहन अशा अध्यात्म शास्त्राकडे वळली. (२) द्विस्वभावराशि के द्रांत असून त्यांस हर्शल, शनि, चंद्र, नेपच्यून, मंगळ इतके एकंदर ग्रह आहेत म्हणून गोविंदसुत हे हुषार, चलाख, कर्तृत्व वान् व बहुप्रिय असे होऊन प्रसिद्धीस आले. (३) तृतीयेश रवि हा लग्नेश बुध व पंचमेश शुक्र यांसह षष्ठस्थानांत म्हणजे उपचयस्थानांत असल्यामुळे व हे तीनही ग्रह राशीवरून नवमस्थानी येत असल्यामुळे व पंचमांत गुरूही असल्यामुळे पूर्वी कारकुनीच्या रूपाने व नंतर ग्रंथकर्तृत्वरूपाने लेखनकर्माचाच व्यवसाय झाला. यांचे लिहिणेही कोटिबाज, विनोदी, सुबोध पण मार्मिक असे होते. पत्रव्यवहारही तसाच जबर होता. (४) लग्नी हर्शल असल्यामुळे कित्येकांस गोविंदसुतांचे विचार, मते किंवा वर्तन हे चमत्कारिक वाटे. (५) पुणे शहराची राशी कन्या असून त्याच राशीत या कुंडलीच्या भाग्यस्थानाचा अधिपति शनि हा चतुर्थांत असल्यामुळे मुख्य प्रसिद्धीचे व भाग्योदयाचे स्थान पुणेच झाले. (६) पितृकारक रवि पष्टांत, पितृस्थानाचा अधिपति गुरु हा शत्रुराशींत नुकताच आलेला व पितृस्थानी पष्ठाधिपति मंगळ व नेपच्यून हे पापग्रह शिवाय दशम स्थान शनीच्या पूर्ण दृष्टींत या सर्व योगांमुळे पितृसुख फारच थोडे मिळाले. यांच्या नवव्या वर्षी वडील वारले. (७) मातृकारकग्रह चंद्र गुरूच्या राशीत असून त्याची चतुर्थ स्थानावर पूर्ण दृष्टि आहे म्हणून पितृसुखापेक्षा मातृसुख अधिक पण चंद्राजवळ मंगळ, चंद्रासमोर शनि, चतुर्थेश षष्ठांत, चंद्राच्या चतुर्थात हर्शल यामुळे यांच्या २७ व्या वर्षी मातेचाही मृत्यु झाला. (८) चतुर्थं स्थानांत शनि व दशमांत मंगळ यामुळे एकंदर शरीरकष्ट फार व एकदां वाहनांतून पडून अपघातही झाला होता. ( अष्टमेला शनि चतुर्थात आहे.) गो. २ १० गोविंदसुत (९) पंचमेश शुक्र असून पंचमांत गुरु आहे म्हणून बुद्धिमान् व हुषार पण गुरु हा शत्रुराशीत अल्पबली असून शुक्रही षष्ठांत अस्तंगत म्हणून विद्वान् म्हणण्याइतका अभ्यासाचा योग आला नाही. (१०) पंचमांत गुरु व पंचमेश शुक्र रवियुक्त यामुळे मुलगे हुषार, पण अल्पषलीगुरु व पंचमेश षष्टांत अस्तंगत व मंगळाची पंचमावर दृष्टी यामुळे सुतशोकाचाही प्रसंग आला. आणखीही काही मुले अल्पवयी असतांच गेली. (११) समांतील हर्शल, पंचमांतील गुरु व चंद्राच्या नवमांतील रवि, शुक्र, बुध यामुळे वेदांत व तत्वज्ञान या विषयांकडे प्रवृत्ति झाली. स्वभाव परोपकारी झाला. (१२) नवमावर गुरूची दृष्टी, दशमांत जलराशीत चंद्र, तृतीयेश शुक्रयुक्त (चंद्राच्या नवमांत ) व्ययस्थानावर रवि, शुक्र, बुध, राहू यांची दृष्टी व व्ययस्थानांत केतु यामुळे एकंदरीत यांना हिंडण्याफिरण्याचा नाद फार होता. तीर्थयात्रेचेही योग आले. गंगास्नान झाले. (१३) लाभेश मंगळ व धनेश चंद्र दोघेही दशमांत यामुळे मोठ. मोठ्या अधिका-यांशी व पुढान्यांशी यांच्या ओळखी होत्या व त्यांचा उपयोगही होत असे. त्याचप्रमाणे मंगळ हा षष्ठेश असून दशमस्थानावर शनिदृष्टीही आहे म्हणून कधी भधिकान्यांकडून थोडासा त्रासही झाला. (१४) सप्तमेश गुरु शत्रुगृही व त्याच्या पाठीशी अष्टमेश शनि, तसेंच शुक्र रवीचा षष्ठांत योग व तोही शनीच्या दृष्टींत यामुळे यांना कचित् वातपीडा होती व मूत्रपिंडाचीही विकृति होती. (१५) १९०८ साली दसन्याचे दिवशी यांची पत्नी वारली. त्या वेळी सप्तमेश गुरूच्या द्वादशांत रविमंगळ होते. अष्टमेश शनि नवमांत वक्र झाला होता व राहू लग्नांतून सप्तमावर पाहात होता. केतु तर अर्थात्च सप्तमांत होता. हे सर्व योग पत्नीच्या मृत्यूस कारण झाले. सहजाधिपति शनीच्या दृष्टींत, पण शुभप्रहयुक्त आहे यामुळे बंधु असूनही विशेष बंधुसौख्य नाही. शिवाय सहजाधिपतीस जागा मिळाली तीही षष्ठांत, त्यामुळेही बंधुसौख्य मिळाले नाही. (१६) चंद्राच्या अष्टमांत गुरु, अष्टमेश व नवमेश एकच शनि घ त्याच्या नवमांत व्ययस्थानी केतु, रवीच्या पंचमांत चंद्र यामुळे दीर्घायुष्य काभूम अंतकाळ शांतपणे हरिचिंतनात स्वात्मबोधाच्या जागृतींत झाला.
कुलवृत्तांत वंशवृक्ष चिंचाळकर घराण्याचा वंशवृक्ष जरूरीपुरता खाली दिलेला आहे. सदरहू वंशवृक्ष गोविंदसुतांनी माहिती दिल्याप्रमाणे लिहून घेतला आहे, शिवाय नागपूर येथील चिंचाळकरांच्या माहितीशीही तो जुळत आहे. रघुनाथ महादेव नारायण बहिरव सदाशिव हरी बाळाजी ऊर्फ बल्लाळ विष्णु गणेश रघुनाथ दिनकर शिवराम. रामचंद्र रामकृष्ण । गोविंद गोपाळ महादेव लक्ष्मण अंताजी सदाशिव नरसो परशुराम वासुदेव कृष्णा बाबू गणेश वामन रामचंद्र विष्णु दत्तात्रय धीराम गोविंद भीपाद प्रभाकर विष्णु सुधाकर शंकर मधुकर शशिशेखर Dire कुलवृत्तांत था वंशवेलींतील मूळ पुरुष रघुनाथ. याचा वडील मुलगा महादेव. याच्या घराण्याचा ५/६ वर्षापूर्वी निवंश झाला आहे. शिवराम हरी व त्याचे नंतरचे वंशज आम्ही स्वतः पाहिले आहेत. त्यांची स्थिति अत्यंत हलाखीची होती. महादेव शिवराम ऊर्फ माधवदादा मरणापूर्वी बरेच दिवस अंध झालेले होते. ते ८.१० वर्षापूर्वी निवर्तले व त्यांचे कुटुंब १९२९ ध्या मेमध्ये निवर्त व त्यांचे मुलगे त्यांच्या हयातीतच निवर्तले होते. ही वडील शाखा ७५ १२ गोविंदसुत वर्षापासून जरी आमच्यापासून विभक्त होती तरी ही आपल्या घराण्याची वडील शाखा म्हणून तिचा मान ठेवण्याच्या सद्बुद्धीने व त्यांची हलाखीची स्थिति जाणून गोविंदसुत हे दरसाल १०/१२ रुपये १९२९ सालपावेतो त्यांस पाठवून मदत करीत असत. आमच्या मौंजीबंधनाचे कार्यातच बाबू महादेव याची धर्मार्थ मुंज म्हणून गोविंदसुतांनी लावली व गणेश महादेव हा मुलगा पुण्यास आला असतां आपल्या वशिल्याने वासुकाकांच्या चित्रशाळेत त्यास नोकरी लावून दिली व नेहमी त्याचा परामपं घेत. या वडील शाखेविषयी या ठिकाणी अशा रीतीने उल्लेख करण्याचे कारण इतकेच की हल्लीच्या काळांत कायद्याप्रमाणे ज्या इसमांचे पालनपोषण करण्याची व परामर्ष घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशा इसमांकडे सुद्धा दुर्लक्ष करणारे पुष्कळ लोक आपण समाजांत पाहातो. आर्थिक दारिद्याबरोबर सजावनांचेही दारिद्य झाल्यामुळे लांयच्या अगर जवळच्या नातेवाईकांचीही कोणी विचारपूस करीत नाही. पूर्वीच्या जुन्या पिढीत आपल्या घराण्याविषयी अभिमान व आपल्या घराण्यांतील दुबळ्या लोकांस सहाय्य करण्याची बुद्धि अधिक प्रमाणांत जागृत असे. निदान गोविंदसुतांची तरी आपल्या सर्व भायुष्यांत अशा प्रकारची निरंतर प्रवृत्ति होती याबद्दल पुढेही आणखी उदाहरणे दिसून येतील. रघुनाथचा दुसरा मुलगा नारायण. यांचे चिरंजीव बाळाजी ऊर्फ बल्लाळ हे इ. स. १८३५ चे सुमारास नागपूरला गेले. सावर्डे डेरवण येथील राजे शिर्के यांची कन्या श्री. काशीबाईसाहेब यांचा विवाह त्या वेळचे नागपूरचे संस्थानिक राजे रघुजीराव (तिसरे ) यांच्याशी ठरल्यामुळे व बाळाजीपंत हे शिर्केराजे यांचे खास कारभारी असल्यामुळे त्यांच्याबरोबर तेही नागपूरला लग्नासाठी गेले. श्री. काशीबाईसाहेबांचा व बाळाजीपंतांचे घराण्याचा फारच घरोब्याचा संबंध. श्री. काशीबाईनी विशेष गळ घातल्यावरून राजे रघूजीराव यांचे खासगी कारभारी व निकट स्नेही रा. भारमारामपंत ऊर्फ नरसोबा तात्या बखले यांस पुढे बाळाजीपंतांची मुलगी देण्यांत आली. राजेशाहीत बखले घराण्याकडे जामदार " ची तैनात असे. है जामदार घराणे नागपुरास प्रसिद्ध आहे. चिंचाळकर घराण्याची ही शाखा वरील निमित्ताने नागपुरास गेली ती तिकडेच वास्तव्य करून राहिली. सुमारे ८० वर्षे कोंकणप्रांतांत अगर पुण्याकडे या शाखेबद्दल आम्हांस विशेष माहिती मिळत नसे. परंतु १९१२ साली भाम्ही खानदेशांत वकिलीसाठी भाल्यानंतर व आमचे बंधू कै. श्रीरामपंत बहाडांत हायस्कूल शिक्षक म्हणून गेल्यानंतर गोविंदसुतांचे वन्हात व मध्यप्रांतांत नेहमी जाणे येणे होऊ लागळे गोविंदसुतांचे आईबाप व चुलते १३ व आपल्या चौकसबुद्धीमुळे वामन लक्ष्मण व रामचंद्र लक्ष्मण यांचा त्यांस नागपूर येथे सहजगत्या शोध काढता आला व त्यांची भेट घेतां आली व उभयतांसही फार वर्षांनी परस्परांची इत्थंभूत माहिती समजल्यामुळे विशेष भानंद झाला. रा. वामन लक्ष्मण यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले असून मुलकीखात्यांत अधिकारी, सहकारी बँकेचे मॅनेजर व कांहीं जमीनदारीचे मॅनेजर असे व्यवसाय करून हल्ली नागपुरास सुखवस्तु आहेत. त्यांचे वडील चिरंजीव रा. श्रीपाद वामन यांनी अनेक स्कॉलरशिपा व पदके मिळविली असून ते नागपूर विश्वविद्यालयाचे M. Sc. आहेत व नागपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये काही वर्षे ते असिस्टंट प्रोफेसर होते. हल्ली कलकत्ता येथे ते शास्त्रीय संशोधनाकरता त्यांस स्कॉलर्शिप असलेमुळे तिकडे राहातात व नागपूर विश्वविद्यालयाने त्यांच्या संशोधनकार्याचा गुणगौरव करण्यासाठी म्हणून त्यांस नुकतीच D. Sc. ची पदवी दिली आहे. यांचे इतर बंधूही सुविद्य आहेत. रा. रामचंद्र लक्ष्मण हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. गोविंदसुतांच्या ठिकाणी आपल्या घराण्याविषयी जी स्वाभिमान बुद्धि व चौकसपणा असे त्यामुळेच आमच्या घराण्याच्या या शाखेचे व आमच्या शाखेचे पुष्कळ वर्षे बंद झालेले दळणवळण पुनः सुरू झाले असे म्हणण्यास हरकत नाही. रघुनाथाचा तिसरा मुलगा बहिरव. यास कोणीच वंशज नाहीत. चवथा मुलगा सदाशिव. सदाशिवच्या चार मुलांपैकी विष्णूचे वंशज बढोधाकडे गेलेले होते व अंताजीच्या नंतर तो वंश खुंटला आहे. सदाशिवचे दुसरे चिरंजीव गणेश यांच्यापासूनच गोविंदसुतांच्या प्रत्यक्ष पूर्वजांची माहिती मिळते. गणेश सदाशिव हे गोविंदसुतांचे आजे. हे गणपतीचे फार मोठे भक्त होते व त्यांच्या पोटी जन्मास आलेले गोविंदसुतांचे वडील हेही भगवतीकडे प्रवृत्ती असलेले निपजावे यांत नवल नाही. गोविंदमुतांचे आईबाप व चुलते गोविंदसुतांना परमेश्वरभक्तीचे आनुवंशिक संस्कार भाईचे घराणे व वडिलांचे घराणे अशा दोन्ही बाजूंनी प्राप्त झालेले होते. गोविंदसुतांच्या मातोश्री राधाबाई या मु. भोवळी तालुके चिपळूण येथील रामचंद्र केशव पत्की यांच्या वढील कन्या होत. गोविंदसुत हे अतीशय मातृभक्त होते. षयाच्या २७ व्या वर्षापर्यंत त्यांस मातेचे छत्र लाभले होते. आपल्या मातेच्या थोरवीविषयी जेव्हा जेव्हां ते आम्हांस व इतर कोकास गोष्टी वाटत असे याबद्दल १४ गोविंदभुत सांगत तेव्हां तेव्हा त्यांस फारच गहिवर येत असे. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत " हरेराम हरेराम राम राम हरे हरे" या मंत्राचा जप राधाबाईच्या तोंडी एकसारखा चालू असे. हा जप तोंडाने चालू असतानाच घरांतील प्रपंचाची सर्व कामें यथायोग्य चालू असत. कधी कधी जपाची संख्या मोजून ठेवण्यासाठी सहस्र जप झाला म्हणजे भिंतीवर गंधाचा एक ठिपका लावावयाचा अशा पद्धतीने मोजून जप करीत. गोविंदसुतांना त्यांच्या पारमार्थिक संपत्तीचे बरेचसे भांडवल त्यांच्या मातोश्रीकडून मिळालेले आहे भसे ते सांगत व प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही दृष्टींनी अशा नमुनेदार वर्णनाची माउली हल्लीच्या काळी सांपडणे दुर्मिळ आहे याबद्दल चालू समाजस्थितीचा त्यांस खेद वाटत असे. आपल्या मातोश्रींबद्दल गोविंदसुतांस किती प्रेम व धन्यता परमार्थ विचारमाला भावृत्ति पहिली पृष्ठ ४७ व आवृत्ती दुसरी पृष्ठ ४३ यांतील एकच उतारा पुरे माहे. ते लिहितात ." विषयांत असतांनाच विषयांतर होऊन अंतरांतील आस्मारामाकडे लक्ष वेधेल तर रामरूपच आपण होऊं. रामाचे हे वेड लागणे फार दुर्लभ आहे....जनक राजा म्हणतात प्रपंच व परमार्थ दोन्ही एकदमच चालवीत होता आणि पुनः भापला विदेही तो विदेही, करून भकर्ता ! आमची मातोश्री असे ती पहाटे ४ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यत 'हरे राम हरे राम......कृष्ण कृष्ण हरे हरे " अशा प्रेमोगारांच्या टकळीने सारखी लाखोली वाहून घरचे प्रपंचकृत्य व्यवस्थित रीतीने चालवीत असे ! भशा मातोश्रीध्या उदरीं नारायणाने जन्म दिला ही धन्यताच होय, पण स्या जन्माचे आपण सार्थक करूं तर उपयोग ! तथापि सार्थक केले तरी स्यांत धन्यता ती कसली?......ही आपली अवश्य कर्तव्येच आहेत. राधाबाई स्वभावाने फार करारी व बाणेदार होत्या. गोविंदसुत व त्यांचे बंधु यांस वडिलांचे छत्र फार दिवस लाभले नाही. गोविंदसुतांच्या ९ व्या वर्षी त्यांचे वडील वारले. मातोश्रीने १८ वर्षे वैधव्य दशेत काढली. या मुदतीत ती आपले घर सोडून दुसऱ्या कोणाच्याहि घरी कधी गेली नाही. घरामध्ये नेहमी कामकाजांत व ईशचिंतनांत निमम असे. १८ वर्षात फक्त तीनच वेळा शेजारी रामभाऊ नानल यांच्या घरी गेली व अत्यवस्थ माणसांच्या समाचाराला वगैरे भशा विशेष प्रसंगानेच त्या वेळी गेली. वडील रामचंद्र पत्की यांनी आपल्या भाजारीपणांत व वार्धक्यदशेत शुश्रूषेसाठी स्यांस ओंबळीस बोलावले असता तेथे न जातां स्यांनी वडिलांसच सांव येथे बोलावले व ३ वर्षे त्यांची सेवा केली. पा मुदतीत राधाबाई एकदा भस्यवस्थ आजारी पडल्या होत्या व सास वाटले की हे त्यांचे शेवटचे दुखणे आहे. " गोविंदसुतांचे आईबाप व चुलते परंतु त्यांनी भात्मविश्वासाने सर्वास सांगितले की माझ्या वडिलांची योग्य व्यवस्था माझ्या हातून लावल्याखेरीज मी काही मरणार नाही व अखेर तसेच झाले. याला म्हणतात " वुइल्-पॉवर " अगर निश्चयाचे बळ. राधाबाई त्या दुखण्यांतून खरोखरच उठल्या. रामचंद्र पत्की यांनी मरणापूर्वी काही दिवस अगोदर संन्यास घेतलेला होता. भामच्या वडील घराण्यांतील हरी महादेव यांनीही संन्यास घेतलेला होता, त्यांच्या समाधीजवळ व रामचंद्र पत्की यांचीही समाधि सांव. येथे आमच्या वास्तूंतील एका जुनाट पिंपळाच्या वृक्षाखाली आहे. भापल्या वडिलांच्या पश्चात् राधाबाई लवकरच निवर्तल्या. गोविंदरावांच्या पश्चात् गोपाळ गणेश हे जरी आपल्या मुलांवर वडिलाप्रमाणेच प्रेम करून त्यांचे संगोपन, शिक्षण वगैरे उत्तम तन्हेने करीत होते तरी " मुलांनो, तुम्ही आपल्या स्वतःच्या पराक्रमावर उभे राहा, चुलत्याचे भोशाळे होऊन राहूं नका असा बाणेदार उपदेश त्या आपल्या मुलांस नेहमी करीत असत. गोविंदपंत हे त्या काळच्या मानाने व त्या वेळच्या कौटुंबिक परिस्थितीत एक मोठेच पराक्रमी व तेजस्वी पुरुष होऊन गेले. वर मातोश्रींबद्दल व आतां वडिलांबद्दल जी माहिती दिली जात आहे ती माहिती गोविंदसुतांच्या तोंडूनच आम्ही भक्षरशः मिळविलेली आहे व आमचे चुलते ती. नरसूबाबा यांच्याकडूनहि या माहितीला दुजोरा मिळालेला आहे. गोविंदपंत हे एक स्नानसंध्याशील व तेजस्वी ब्राह्मण होते. ते दररोज एकादष्गी ( रुद्राची अकरा आवर्तने ) करीत व दररोज विष्णुसहस्रनाम म्हणत, त्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. ते मुलकी खात्यांत नोकर होते. रत्नागिरी जिल्ह्यांत एल्फिन्स्टन नांवाचे साहेब प्रांताचे हुद्यावर होते त्या वेळी गोविंदपंत बरेच दिवस या साहेबांच्या हाताखाली शिरस्तेदाराचे काम करीत होते. गोविंदपंतांची हुषारी, बुद्धिमत्ता व चोखपणे काम करण्याची हातोटी पाहून एल्फिन्स्टन साहेबाची गोविंदपंतांवर विशेष भक्ति बसली होती. या साहेबांचा पुढे गोविंदसुतांच्या चरित्राशीही निकट संबंध येणार आहे हे वाचकांनी लक्षांत ठेवावें गोविंदपंत दापोली तालुक्याच्या मामलेदार कचेरीत बरेच दिवस हेडकारकून होते व त्या वेळी मुंबई हायकोटांतील सुप्रसिद्ध वकील कै. दाजी भाबाजी खरे यांचे वडील आबाजी धोंडदेव हे मामलेदार असत. डाव्या डोळ्यांत वडस असलेले, हातांत फार लांब लेखणी नेहमीं धरून लिहिणारे व उत्तम प्रकारचे वळणदार अक्षर असलेले असे दापोलीचे गोविंदपंत चिंचाळकर कित्येक वर्षे जुन्या लोकांच्या स्मरणांत राहिलेले होते. भामच्या लहानपणी दापोलीकडील वृद्ध रहिवाशांनी त्यांच्या प्रत्यक्ष माहितीचे हेडकारकून गोषिदसुत असे वर्णन गोविंदपंतांबद्दल दिलेले आहे व ते ऐकतांना आम्हांस आनंद वाटे. ते दिसण्यांत उंच व भव्य पुरुष होते. स्वभावाने फार कनवाळू व लोकांच्या उपयोगी परण्यांत धन्यता मानणारे होते असे त्यांच्याबद्दल लोक भाम्हास सांगत असत. गोविंदसुत सांगत असत की लहानपणी आम्हां सर्व भावंडांना वडिलांचा फार धाक वाटत असे. त्यांची शिस्त कोणी मोडीत नसे व त्यांची अवज्ञा करण्याचेंहि कोणाचे धाडस होत नसे. राजापूर येथे हेडकारकून असतांना जलोदराने आजारी पडून गोविंदपंत सांवड्यास रजा घेऊन भाले वस्था दुखण्यांतच १८७१।७२ साली गोविंदपंत वारले. त्यावेळी त्यांचे वय ४७/४८ वर्षांचे होते. गोविंदपंतांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा मोठाच डोंगर येऊन कोसळला. पांच भज्ञान मुलगे व त्यांची मातोश्री यांनी पुढे काय करावे हा बिकट प्रश्न उभा राहिला. गोविंदपंतांचा नोकरीत काही वर्षांपासूनच जम बसला होता, परंतु त्यांनी मागें शिल्लक अशी काहींच टाकली नव्हती अथवा काही स्थावर इष्टेटही मिळविली नव्हती. त्यांस शेवटी पगार दरमहा रु. ५० होता. धाकटे बंधु गोपाळ यांचे धैर्य अगदीच खचून गेले व डोक्यावर हात ठेवून ते रई लागले, कारण एवढ्या कुटुंबाच्या चरितार्थाची काहीच सोय नव्हती. या बिकट प्रसंगांत कै. रामभाऊ नानल हे गृहस्थ गोपाळरावांस धीर देणारे निघाले. "तूं पुरुष असून रडतोस काय ? मला तूं भावाच्या ठिकाणी समज. असे बोलून त्यांनी समजूत घातली. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध जुने वकील श्री. भास्करबाबा नानल यांचे रामभाऊ हे वडील होत. या हकीगतीनंतर रामभाऊ नानल व गोपाळ चिंचाळकर या दोघांनीही दीर्घ परिश्रम करून समाइकीत सर्व मिळकत मिळविली. या दोन व्यक्ती शरीराने भिन्न परंतु अंतःकरणाने एक होत्या. यापूर्वी सावर्डे येथे घराखेरीज चिंचाळकरांची इष्टेट कांहींच नव्हती म्हटले तरी चालेल. या दोन व्यक्तींनी भासपासच्या २।३ गांवांत खाजगी शेती संपादन केली व नजीकच्या मांडकी गांवांत ४.५ भाणे खोती तक्षीमही संपादन केली. या दोन कर्तबगार पुरुषांच्या हयातीतील भरभराटीच्या स्थितीचे बोवटचे काही दिवस आम्हीही पाहिले आहेत. वडील वारल्यानंतर ७१८ वर्षात या पांचही भावंडांची लग्नकाय झाली. रामचंद्र नानल यांनी आपली वडील मुलगी नरसो चिंचाळकर यांल देऊन भागीदारीतील इष्टेटसंपादनाला नात्याच्या दुव्याचाही संबंध जुळवून दृढीकरण आणले. रामभाऊ नानल १८९९ च्या सुमारास वारले व गोपाळपंत चिंचाळकर १९०५ साली वारले. तोपर्यंत दोघांच्या मिळकती समाईकच होत्या. त्यानंतर खाजगी इष्टेटींत वाटण्या पडल्या, परंतु खोती तक्षीम मांडकीची १९२२ सालपर्यत समाईकच्च . " गोविंदसुतांचे आईबाप व चुलते होती. गोपाळपंतांच्या तोंडून आम्ही एकदा असे उद्गार ऐकले होते की माझे बंधू हयात असते तर ते मामलेदारीच्या हुद्यापर्यंत चढले असते, मीही मामलेदाराच्या पगाराइतकें उत्पन्न येणारी इष्टेट कमावली आहे व माझ्याही हाताखाली चार दोन गडी माणसे असतातच, तेव्हा माझ्यांत व मामलेदाराच्या हुद्यांत मला फरक वाटत नाही. गोपाळपंतांचे पहिले कुटुंब निवर्तल्यानंतर पांच पुतण्यांच्या भवितव्यतेची त्यांच्यावर जबाबदारी आली यामुळे दुसरे लग्न करण्याच्या खटाटोपांत ते पडले नाहीत व पांचापैकीच शेवटचा मुलगा दत्तक घेऊन आएली इष्टेट पांच इसमांत सारखी वाटण्याचे ठरवून गेले व जन्मभर या पांच बंधूंकरतांच सर्व काबाडकष्ट करून त्यांचे कल्याणार्थ झटले; यामुळे या सर्व बंधूंना आपले पालन करणारे खरे पिते गोपाळकाकाच आहेत असे वाटल्यास नवल काय? गोपाळकाकांच्या शेवटच्या दुखण्यांत परमेश्वराचे त्यांस चिंतन घडावे म्हणून गोविंदसुतांनी रामनाम- स्मरणाचे काही अभंग त्यांस वाचून दाखविण्यासाठी म्हणून लिहून पाठविले होते. गोपाळकाकांनी ते अभंग वाचून पाहून गोविंदसुतांस विनोदानेच उत्तर लिहिले " रामभाऊंची आठवण तुम्ही त्यांच्या पश्चात् चांगलीच जागृत ठेवली आहे असे रामनामाच्या पाठविलेल्या अभंगांवरून दिसते, माझ्या पश्चात् माझे नांवाचीही आठवण अशीच जतन करा !" १९०५ साली गोपाळ काका निवर्तले त्या वेळी पुण्याच्या प्लेगमुळे चिंचवड- नजीक आकुर्डी गांवी आम्ही राहात होतों व गोविंदसुत दररोज रेलवेने पुण्यास ऑफिसला जाऊन येत. आजारीपणांत गोविंदसुत त्यांची शेवटची भेट घेऊन आलेच होते. परंतु निवर्तल्याचे पत्र ऑफिसमध्ये मिळतांच त्यांस शोक आवरेना. ही दुःखद बातमी लवकरच येणार असल्याचे ऑफिसच्या मंडळींस त्यांनी अगोदर सांगून ठेवलेच होते. तथापि प्रत्यक्ष बातमी येऊन पोचल्यावर त्यांस र. दाबतां येईना व घरी आल्यावर तर आम्हांप्त बराच वेळ त्यांच्या दुःखाचा उलगडा होईना. आपले जनक भाईबाप व पितृतुल्य पालक गोपाळ काका यांच्यावर गोविंदसुतांची किती निःसीम भक्ति होती याचा एकच दाखला देऊन हा भाग संपवितो. परमार्थ-विचार-मालेची पहिली व दुसरी आवृत्ति, तसेच आत्मानुसंधान ग्रंथ यांतील पहिलेच अर्पण- पत्रिकेचे पान काढून पाहिल्यास सर्व ठिकाणी गोविंदसुतांनी आपल्या मायबापांस व चुलत्यांस परमेश्वराइतकाच मान दिला आहे. " जगचालकाने राधागोविंदरूपाने मायबाप होऊन मानवदेहत्व दिले, गोपाळरूपाने पितृव्य होऊन संगोपन करून लहानाचे मोठे केलें " ही व अशाच अर्थाचीं गौरवयुक्त वचनें भर्पणपत्रिकेत आहेत. धन्य ते भाग्यशाली धर्मनिष्ठ पूर्वज व धन्य ते कृतज्ञ आर्यपुत्र ! त्या सर्वांस वंदन करून पुढील भागाकडे वळू या. गो.३ गोविंदसुत गोविंदसुतांचे बंधु गोविंदसुतांच्या सद्गुणांचे स्मरण करीत असतां त्यांस बंधु किती व कोण आहेत व त्यांच्यांत व गोविंदसुतांत कांहीं समान गुण आढळतात किंवा नाही याविषयी वाचकांस जिज्ञासा वाटणे साहजिक आहे, सबब त्याबद्दल माहिती निवेदन करतो. गोविंदसुतांचे सर्वात वडील बंधु सदाशिवराव ऊर्फ सदूबाबा हे ५ वर्षापूर्वी सांव येथे निवर्तले. त्या वेळी त्यांचे वय ७२।७३ वर्षांचे असेल. त्यांचे सर्व आयुष्य सांव. येथेच खेडेगांवच्या राहाणीत गेले. ते लहानपणी चिपळूग येथे शिक्षणासाठी राहिले होते व पुढील वयांत १५।२० वर्षे शेजारच्या डेरवण गांवचे पोलीसपाटीलकीचे काम करीत होते त्या कामानिमित्त कधी कधी चिपळूणच्या मामलेदार अगर फौजदार कचेरीत त्यांस जावें लागत असे. याशिवाय शहराच्या राहणीचा त्यांप्स संपर्क नव्हता. सर्व आयुष्यात ते एकदोनदाच आगगाडीत बसले असतील. एकदा आम्ही कोंकणांतून पुण्याकडे जात असतां क-हाडपर्यंत ते आम्हांस पोचविण्यास आले होते. त्या वेळी कन्हाड ते मसूर पावेतों मुद्दाम आम्ही त्यांस आगगाडीत बसविलें व एकदां पंढरपूरच्या यात्रेस गेल्यावेळी. त्यांना गायनकलेचा विशेष नाद असे. परंतु संगीत नाटकांतील शृंगारिक पदें, वगैरे प्रकार चुकून सुद्धा त्यांच्या तोंडी कधी येत नसत. कै. बाबा गर्दै यांच्या गीतामृतशतपदीतील काही विशेष पदें किंवा कीर्तनकारांच्या आख्यानांतील ईशभक्तिपर पद्ये हीच दिवसांतून २।३ वेळा तरी मुक्तकंठाने म्हटल्याशिवाय ते राहात नसत. गांवांत अगर आसपास कोणी कीर्तनकार आला की त्यास साथ धरण्याचे काम हटकून सदूवाबांकडेच यावयाचे. यांचा स्वभाव नेहमी आनंदी, निगर्वी व उद्योगशीलतेचा होता व राहणी अत्यंत साधी व नियमितपणाची असे. तरुणपणांत शेतीची व प्रपंचाची काबाडकष्टाची कामें व पोलीसपाटीलकीचे काम यांनी केले व उतारवयांत जरूर सेवढी विश्रांति घेऊन बाकीच्या वेळांत हाताने काही तरी उपयुक्त काम केल्याखेरीज त्यांस चैन पडत नसे. वडाची पाने आणून चोया तयार करून द्रोण पत्रावळी लावीत बसतील किंवा चाती फिरवून कापसाचे सूत काढून त्याची जानवी करीत बसतील किंवा लहान मुलांस तोंडाने पर्वचा भगर देवाचे श्लोक शिकवीत बसतील; परंतु अगदी रिकामे चकाट्या पिटीत किंवा आळसलेले कधीही सांपडावयाचे नाहीत. मानवी स्वभावास व कोंकणप्रांतांतील पीठिकेस अनुसरून घरांत व गांवांत भाऊबंदकीचे तंटे नेहमी चालावयाचेच, परंतु आसपास कितीही खवळलेले वातावरण असले तरी सदूबाबांची निसर्गदत्त शांत वृत्ति कधीही ढळत नसे व या एका गुणामुळे सुद्धा ते सर्व लहानथोरांस गोविंदसुतांचे बंधु सारखेच आदरणीय वाटत. सर्व कनिष्ठ बंधू सदूबाबांपुढे आदराने मान लववीत असत व त्यांच्या हयातीपावेतो त्यांची शुश्रूषा उत्तम प्रकारे करून त्यांस काही कमी पडू देत नसत. गोविंदसुत यांनी कोंकणांतील आपल्या वडिलार्जित इष्टेटीचे उत्पन आपल्या स्वतःसाठी कधीही घेतले नाही. आपल्या पांचव्या हिश्श्याचे जे उत्पन्न त्यांस यावयाचे त्यापैकी निम्में उत्पन्न वडील बंधू सदूबाबा यांस त्यांच्या हयातीपावेतो ते देत होते व निम्में उत्पन्न आपले कनिष्ठ बंधू वासुअण्णा यांस ते देत असत. इतकेच नव्हे तर आपल्या पेन्शनांतून वेळोवेळी रकमा पाठवून मूळ ठिकाणी राहाणान्या आपल्या गरजू बंधूंस गोविंदसुत मदत करीत असत. सदूधाबांच्या मुलाने सावकाराचे कर्ज करून त्याबद्दल मुलावर हुकुमनामे झाले असे समजताच आपल्या वडील बंधूंस त्यांच्या हयातीत उपसर्ग पोचूं नये म्हणून गोविंदसुतांनी सुमारे ५०० रुपये स्वत:च्या पेन्शनांतून ३।४ वर्षे एकसारखे वेळोवेळी मिळून भरूम मोने आडनांवाच्या एका सावकाराची भरपाई केली. गोविंदसुतांच्या परिस्थितीच्या दृष्टीने हा स्वार्थत्याग व ही झीज फारच मोठी म्हणावी लागते. याचे श्रेय बहुतेक अंशी गोविंदसुतांच्या लोकोत्तर बंधुप्रेमाला आहेच. परंतु ती. सदूबाबांचे वर्तमही तितकेंच आदरणीय व सहानुभूति उत्पन्न करण्याजोगें होते हे विसरतां कामा नये. दुसरे बंधू तीर्थरूप नरसूबाबा. यांचं वय हल्ली ७५ चे वर असून रत्नागिरी जिल्ह्यांत मुलकी खात्यांत यांनी ३०।३२ वर्षे कारकुनाची नोकरी उत्तम प्रकारे केली असून सुमारे २२।२३ वर्षे पेन्शन घेऊन सांव येथेंच राहात आहेत. आमचे चुलत आजोबा कै. गोपाळ गणेश यांनी आपल्या पांचही पुतण्यांचा लहानपणीं पोटच्या मुलांप्रमाणे प्रतिपाळ केला, त्यांस शिक्षण दिले, त्यांची लग्नकार्य केली व जगांत स्वतंत्रपणे आपल्या पायांवर उभे राहण्यास समर्थ केले व त्यांचा पराक्रम पाहाण्यास काही वर्षे जगलेही. ते नेहमी म्हणत असत की हे माझे पांच पुतण्ये म्हणजे मला पांच पांडवांप्रमाणे पाटतात. याच दृष्टांताच्या अनुरोधाने सदूबाबा हे धर्मराज शोभतात, नरसूबाबा हे भीमसेनाप्रमाणे भासतात व तिसरे परशुरामभाऊ हे अर्जुनाची उपमा देण्यास योग्य ठरतात असे उद्गार ते अभिमानाने काढीत. ती. नरसूबाबा हे फार बुद्धिमान, विद्याव्यासंगी व अविश्रांत मेहनत करणारे आहेत. नियमित आहारविहार व वैद्यशास्त्राची तत्वें स्वतः समजावून घेऊन तदनुसार वर्तन यामुळे या वयांतही त्यांची शरीरप्रकृति सुदृढ असून तरुण लोकांसही लाजविणारी अशी त्यांची उद्योगप्रियता आहे. ती. नरसूबाबा इ. स. १८९५ ते १८९७ साली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे मामलेदारकचेरीत कारकून असतांना २० गोविंदसुत प्रस्तुत लेखकाचे मराठी चार इयत्तांचे शिक्षण नरसूबाबांकडे राहून झालेले आहे व त्या वेळी त्यांनी अत्यंत प्रेमाने व कळकळीच्या हितबुद्धीने आम्हांस शाळेबाहेरही जे घरगुती शिक्षण दिले व शिस्त लावली त्याबद्दल त्यांच्याबद्दल अद्यापही आम्हांस आदर व कृतज्ञता वाटते. ती. नरसूबाबांवर भनेक प्रकारचे प्रापंचिक आघात येऊन गेले व अनेक दैवी व मानवी आपत्तींशी त्यांस झगडावे लागले आहे, परंतु अलौकिक मानसिक धैर्य व स्वार्थत्याग यांमुळे त्यांनी दुःखांची व संकटांची कधीच पर्वा केली नाही. स्वभाव फार कडक व बोलणे स्पष्टोक्तीचे व सडेतोड असल्यामुळे जरी व्यावहारिक दृष्ट्या सर्वांशी सारखीच लोकप्रियता त्यांस संपादन करता भाली नाही, तरी गोविंदसुत हे त्यांची योग्यता व कर्तृत्वशक्ति पूर्णपणे जाणत असत व त्यांच्याबद्दल नेहमी वडिलांप्रमाणे पूज्यधुद्धि बाळगत असत व त्यांस नावे ठेवणारांस गोविंदसुत सांगत असत की त्यांच्या चांगल्या गुणांचे तुम्ही अनुकरण करा व त्यांच्या शतांश तरी पराक्रम स्वतः करून दाखवा. सी. नरसूबाबाही गोविंदसुतांची योग्यता व अधिकार जाणून असत, गोविंदसुतांच्या मृत्यूनंतर अकराव्या दिवशी सांवाहून त्यांनी पाठविलेल्या दुखवठ्याच्या पत्रांत ते लिहितात " मुंबईहून बर्वे बंधूंनी नवाकाळ मुद्दाम माझ्याकडे अगत्याने पाठविला. त्यांतील लेख व वर्णन वाचून मला फार गहिंवर आला व त्यांतील परशुरामभाऊंचे फोटो पाहून ते प्रत्यक्ष समोर असल्याप्रमाणे वाटले व त्या फोटोवर मी मनमुराद प्रेमाश्रु ढाळले. इकडील प्रांतांतील आम्हां सर्वांस त्यांच्या नांवलौकिकामुळे भूपण वाटत होते. आपणांस अत्यंत प्रिय अशा माणसास मृत्यू येऊन जो वियोग होतो त्याचे दुःख फार असह्य आहे. गेल्या वर्षी चि. श्रीरामाचे निधन झाले, त्यानंतर आतां परशुरामभाऊंची वाता आली. अशी कर्तबगारीची माणसे घराण्यांत आतां राहिली नाहीत. पुढे होतील. नाही होणार असे का म्हणावें ? परंतु आज नाहीशी झाली व जी राहिली त्या सर्वांचेच भूपण व आधार नाहीसा झाला. माझ्या मनाच्या खंबीरपणाचाच मला जो काही आधार मिळेल त्यावरच मला काळ दवरणे भाग भाहे." ती. नरसूबाबांस परमेश्वराचे भजन, पूजन व कीर्तन यांचा नाद विशेष आहे. कधी कधी स्वतः कीर्तन व निरूपण करतांनाही त्यांस भाम्ही ऐकलें भाहे. त्यांस वक्तृत्वशक्ति व लेखनशक्ति यांची चांगली देणगी आहे. तिसरे व मधले बंधू परशुरामपंत. हे आपल्या ग्रंथलेखनाने विशेष प्रसिद्धीस आल्यामुळे अनेक लोकांच्या जिज्ञासेस्तव त्यांचे हे अल्प चरित्र जनताजनार्दनाला सादर होतच आहे. चवथें बंधु वासुअण्णा. यांचे वय हल्ली ७० वर्षांचे आहे. यांचे सर्व आयुष्य सांव. येथेच शेतीवाडीच्या व्यवस्थेत व गोविंदसुतांचे बंधु २१ खोतीगांवच्या वहिवाटीत गेले. वयोमानामुळे अलीकडे ८११० वर्षांपासून यांच्याकडून कोणतेंहि दगदगीचे काम होत नाही. तथापि वडील बंधूंची शुश्रुषा व घराण्यांतील मिळकतीचे मूळ संपादक चुलते गोपाळ गणेश यांचीही अत्यंत आस्थेने शुश्रषा केल्याचे श्रेय त्यांनी मिळविले आहे. गोपाळ गणेश १९०५ साली निवर्तले. त्यापूर्वी बरेच दिवस ते पराधीन स्थितीत होते. त्या दुखण्यांत अहोरात्र चुलत्यांच्या सन्निध बसून सर्व प्रकारची खडतर शुश्रुषा वासुअण्णांनी केली व ज्या गोपाळ गणेश यांस वासुअण्णा हे आपले खरे अन्नदाते समजत असत त्यांचा अखेरचा आशीर्वाद व धन्यवाद वासुअण्णांनी मिळविला आहे व हीच ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई समजतात. त्यांनी आपल्या एका मुलाचे नांव गोपाळ असेंच ठेवून त्यास लहानपणापासून पालन-पोषण-शिक्षणासाठी गोविंदसुतांकडे पाठवून दिले. चि. गोपाळचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण होऊन अमळनेर येथें तो शिवणकामाचे दुकान चालवीत आहे. गोविंदसुतांच्या अखेरच्या दुखण्यांत चि. गोपाळ याने त्यांची फारच सेवाशुश्रुषा केली व दूर अंतरामुळे आपण स्वतः जरी काही करू शकलो नाहीं तरी आपला मुलगा गोदिवसुतांच्या उपयोगी पडला याबद्दल वासुअण्णा यांस दुःखांत सुद्धा थोडे समाधान वाटले. आपल्या हिश्श्यापैकी निम्में उत्पन्न गोविंदसुत हे वासुअण्णांस देत असत हे पूर्वी सांगितलेच आहे. गोविंदसुतांच्या निधनोत्तर ती. वासुअण्णांनी आपल्या पत्रांत उद्गार काढले आहेत ते:-" आमचे मायबाप राधा गोविंद यांच्या पवित्र उदरीं जन्मून सूर्याप्रमाणे प्रकाशत असलेला दीप ता.८॥१॥३४ रोजी मालवला. सर्व लहानथोरांवर आईप्रमाणे सारखे प्रेम त्यांनी केले. माझ्यावर तर त्यांची कृपादृष्टि त्यांच्या अंतकालापर्यंत होती. ता. ३१।१२१३३ चे त्यांच्या हातचे मला शेवटचे पत्र आले त्यांत माझ्या निर्वाहाकरतां १० मण भात देण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने आम्हांस किती हळहळ लागली ते लिहिता येत नाही. आमची आईच आज आम्हांस सोडून कायमची निजधामास गेली. ईश इच्छा. शेवटचे बंधु जनार्दनपंत ऊर्फ कृष्णाजीपंत. यांच्या लहानपणींच यांस घुलते गोपाळ गणेश यांनी दत्तक घेतले होते म्हणून वंशवृक्षांत गोपाळ गणेशचे चिरंजीव म्हणून यांचे नांव दाखल आहे. कोंकणप्रांतांत आमची जी बडिलार्जित इष्टेट आहे ती सर्व गोपाळ गणेश यांनी स्वकष्टाने मिळविलेली भाहे. त्यांनी कृष्णाजीपंतांस दत्तक घेतल्यामुळे त्या इष्टेटीची कायद्याप्रमाणे सर्व मालकी कृष्णाजीपंत व त्यांचे वंशज यांच्याकडेच जावयाची. परंतु गोपाळ गणेश यांचे सर्व पुतण्यांवर सारखेंच प्रेम असल्यामुळे आपण १२ गोविंदसुत मिळविलेल्या इष्टेटींत पांच भावांनी सारखे हिस्से वाटून घ्यावे असे व्यवस्थापन गोपाळ गणेश यांनी करून ठेवले. कृष्णाजीपंतांनी यत्किचित्ही भाढेवेढे न घेता त्या मृत्युपत्रावर आपली संमतिदर्शक साक्ष टाकली. या एकाच गोष्टीवरून कृष्णाजीपंतांची निःस्वार्थबुद्धि, बंधुप्रीति व वडिलांच्या आज्ञेस मान देण्याची तत्परता हे गुण दिसून येतात. हल्लीच्या तीव्र जीवन- कलहांत हे गुण फारच दुर्मिळ आहेत. ती. नरसूबाबा व गोविंदसुत यांनी जनार्दनपंतांच्या शिक्षणास बरीच मदत केली व त्या वेळची इंग्रजी पब्लिक सहिसची परिक्षा ते पास झाले होते. रत्नागिरी व कुलाबा जिल्ह्यांत सुमारे १७१८ वर्षे पनिळक वर्क्स खात्यांत त्यांनी कारकुनाची नोकरी केली व वयाच्या ४७ व्या वर्षी प्लेगनें पनवेल येथे त्यांस अकाली देवाज्ञा झाली ( इ. स. १९१५). केसरीवर व लोकमान्यांवर त्यांची विशेष भक्ति होती. त्यांच्या पश्चात् त्यांच्या एकुलत्या एक चिरंजीवांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण गोविंद. सुतांनी केले व चि. गोविंद कृष्ण हा सुमारे १० वर्षांपासून धुळे म्युनिसिपालिटींत अकौंटंटचे जागेवर नोकरी करीत आहे. गोविंदसुतांचे बालपण व शिक्षण गोविंदसुत यांस लहानपणी वयाच्या तिसन्या चौथ्या वर्षांनंतर आई. बापांचा विशेष मोढा नव्हता म्हटले तरी चालेल. वडील दापोली, राजापूर वगैरे तालुक्याच्या ठिकाणी नोकरीवर असत व तेथेच त्यांच्या मातोश्रीही असत व गोविंदसुत हे घरीच सांवडे येथे आपले चुलते गोपाळ गणेश व चुलत आजी यांच्याबरोबर राहत. ७ व्या वर्षाच्या सुमारास मौंजीबंधन झाले तोपर्यंत सांव येथेंच गांवठी पंतोजींच्या हाताखाली गोविंदसुतांनी १२ वर्षे शिक्षण घेतले. मौजीबंधनानंतर शाळेचे शिक्षण पाहिजे म्हणून पडिलांनी गोविंदसुतांस राजापूर येथे आपल्या बरोबर नेले व तेथील मराठी शाळेत गोविंदसुतांचें नांव घालण्यात आले. परंतु दुर्दैवाने वडिलांचे छत्र त्यांस फार दिवस लाभले नाही. गोविंदसुतांच्या ९ व्या वर्षीच त्यांचे वडील जलोदराने सांप येथे निवर्तले व वडिलांचा आधार तुटल्यावर चुलते गोपाळ गणेश यांनी आपल्या शिरावर सर्व जबाबदारी घेतली हा वृत्तांत पूर्वी दिलाच आहे. सदाशिव, नरसो व परशुराम या तिघांची शिक्षणाकरतां चिपळूण येथे राहा. ण्याची सोय गोपाळरावांनी करून दिली व या तिघां मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी व त्यांस जेवण करून घालण्यासाठी आपली चुलती आनंदीकाकू म्हणजे दिनकर सदाशिव यांचे कुटुंब या पोक्त बाईची त्यांनी योजना केली. या आनंदीकाकुंनी आपणांस फारच ममताळूपणाने वागविलें असें गोविंदसुत गोविंदसुतांचे बालपण व शिक्षण २३ नेहमी सांगत असत. भाई सांवास राहिली, परंतु आईपेक्षाही ही चुलत भाजी आम्हां भावांचे अधिक कोडकौतुक करीत असे व आमचे बाळपणचे हट्ट पुरवीत असे अशाबद्दल गोविंदसुत अनेक प्रकारची उदाहरणे देऊन सांगत असता त्यांच्या डोळ्यांत प्रेमाश्रू येत असत व अशी प्रेमळ माणसें हल्लीच्या नव्या युगांत कोठेही दृष्टीस पडत नाहीत असे ते म्हणत असत. चिपळूणला राहिलेल्या तिघां भावांत गोविंदसुतच सर्वात लहान म्हणून या माउलीपाशी त्यांचाच हह सर्वात जास्त चालत असे. सदाशिव व नरसो हे दोन इयत्ता पुढे होते. या आनंदीकाकूना एकच मुलगी होती व सप्रे नांवाच्या गरीब भिक्षुक घराण्यांत ती दिलेली होती. गोविंदसुतांना नोकरी लागल्यानंतर या आजीच्या उपकारांचे अंशतः तरी उतराई व्हावे म्हणून तिच्या मुलीचा तिच्या हयातीपावेतों गोविंदसुत परामर्ष घेत असत व वर्षातून २०१५ रुपये तरी पाठवून तिला मदत करीत असत. कधी कधी आमच्या हातून ही मदत गोविंदसुतांनी पोचविलेली आहे त्या वेळी ही मदत काय म्हणून अशी चौकशी आम्ही केली असता आपल्या लहानपणची सर्व हकीगत गोविंदसुत सांगत असत. यांत गोविंदसुतांचाही पूर्वी वर्णन केलेला प्रेमळ व कृतज्ञ स्वभाव दिसून येतो. मुलांच्या हिताविषयी आत्यंतिक कळकळ असल्यामुळे आनंदीकाकूची मुलांवर शिस्तही कडक असे. मुलांनी सकाळी लवकर उठले पाहिजे, स्नान संध्या लवकर केली पाहिजे, अभ्यास नियमितपणे केला पाहिजे, उनाडक्या करूं नये अगर कोणत्याही वाईट संवयी लावून घेऊ नये याबद्दल आनंदीकाकू फार सावधगिरी ठेवीत. इकडे गोपाळराव जरी सांवांस होते तरी त्यांचे सर्व लक्ष चिपळुणास ठेवलेल्या मुलांकडे असे. शहरांतून आपण हल्ली असे पाहतों की आपल्या घरांतच राहून भापली मुले अभ्यास करीत असली तरी त्यांच्या अभ्यासाकडे व वर्तनाकडे फारच थोड्या पालकांचे योग्य रीतीने लक्ष असतें. गोपाळराव हे आंतून अत्यंत प्रेमळ हृदयाचे परंतु बाह्यतः फार कडक शिस्तीची नजर ठेवणारे असे पालक होते. आपल्या गांवचा कोणीही इसम गांवचा कोणीही इसम चिपळुणास जाऊन आला म्हणजे गोपाळराव त्यास भेटून सहज विचारावयाचे की आमच्या मुलांपैकी तुम्हांस कोणी कोठे दिसले होते काय ? त्या इसमाने अमुक मुलगा बंदरावर दिसला होता असे सांगितले की दुसरे दिवशी कोणाबरोबर तरी मुलांस चिठी यावयाची की तुम्ही काल रोजी बंदरावर जाण्याचे कारण काय व यावरून तुम्ही अभ्यास न करतां उनाडक्या करता असे दिसते, तरी पुनः असें करूं नये. सांवड्यांचा कोणी इसम दिसला की त्याचा डोळा चुकवून जावयाचे असें मुले करूं लागली. तरीही .
गोविंदसुत गोपाळरावांच्या कानावर सर्व गोष्टी जातच असत असें भाढळून येत असे. त्यावरून आपला चुलता जरी ६ कोसांवर राहातो तरी आपल्या वर्तनावर त्याची पूर्ण पाळत असते अशी मुलांची खात्री होऊन त्या धाकाने ते फारच जपून धागत. जुन्या रोमन साम्राज्याच्या काळी घरांतील कर्त्या पुरुषाचा इतर सर्व इसमांवर अतीशय करडा एकतंत्री अंमल चालत असे व समाजहिताच्या दृष्टीने तीच पद्धति चांगली असें म्हणून कायद्यानेही ती सत्ता मान्य केली जात असे असे आपण वाचतो. तशाच पद्धतीने चुलत्यांचा धाक व दरारा आपण अखेरपर्यंत बाळगून चाललों व त्यांची कधीही शिस्त मोडली नाही व त्यापासूनच आपले जन्माचे कल्याण झाले असें गोविंदसुत सांगत असत व पूर्वीची ती समाजबंधने आजच्या युगांत फारच शिथिल झालेली आढळतात म्हणून त्यांस फार वाईट वाटे. चिपळूणच्या शाळेत शिकत असतांना गोविंदसुत हे वर्गात चांगले हुपार विद्यार्थी म्हणून नावाजलेले होते. विशेकरून भाषाविषय गणित यांत त्यांचा हातखंडा असे. शुद्धलेखन विषयांत त्यांची कधीच चूक निघत नसे असें ते सांगत. त्या वेळच्या त्यांच्या वर्गबंधूंपैकी माधवराव दाबके व भिकाजीपंत देशपांडे अशी दोन नांवे ते प्रामुख्याने सांगत असत. पैकी रा. भिकाजीपंत देशपांडे हे त्यांचेबरोबर पुण्यास मुलकी खात्यांतच नोकर होते घ डेप्युटी कलेक्टरच्या हुद्यापर्यंत जाऊन नंतर वारले. परशुरामपंत मराठी चवथ्या इयत्तेत होते व सदाशिवराव व नरसूबाबा सहावे इयत्तेत शिकत होते, अशा वेळी पूर्वी वर्णन केलेला गोविंदपंतांचा धरिष्ठ एलल्फिन्स्टन साहेब हा रत्नागिरी जिल्ह्याचा कलेक्टर झालेला होता व त्याचा मुक्काम चिपळूण येथें असतां तो तेथील मराठी शाळा पाहाण्यास भाला. हा साहेब मिशनरी होता, त्यास मराठी भाषा चांगली येत असे व मुलांची परीक्षा घेण्याचा त्यास मोठा नाद असे. चवथ्या इयत्तेत येऊन त्याने सप्तराशिकाचे एक उदाहरण घातले व जो मुलगा हे उदाहरण तोंडी करील व प्रथम पाटी टाकील व बिनचूक उत्तर मांडील त्यास एक पुस्तक बक्षीस देऊ केले; ते उदाहरण परशुरामाने सर्वांच्या अगोदर सोडविलें व पाटी टाकली व उत्तर बरोबर आले. आपले पूर्वीचे शिरस्तेदार गोविंदपंत यांचा हा मुलगा आहे असे साहेबांस समजून येतांच त्यास फारच गहिवर आला. गोविंदपंतांस आणखी मुले किती, ती कोठे असतात, त्यांच्या विद्याभ्यासाची काय तरतूद आहे वगैरे सर्व चौकशी साहेबाने केली. तीन मुलगे याच शाळेत शिकत आहेत व घरची सांपत्तिक स्थिति फारच हलाखीची माहे असे साहेबास समजतांच शाळेचे हेडमास्तर मोरो विश्वनाथ लोवलेकर गोविंदसुतांचे बालपण व शिक्षण यांस साहेबाने हुकुम दिला की या मुलांना फी पुस्तकें वगैरेसाठी जो दरमहा खर्च लागेल तो मला कळवीत जा, मी पाठवून देत जाईन व या मुलांची सहावी इयत्ता पास झाली म्हणजे मला कळवा, मी त्यांस मुलकी खात्यांत नोकरीस लावीन असे बजावून गेला. या मिशनरी साहेबाने या मुलांना अशा रीतीने २५ रुपये मदत शिक्षणाकरता केली. पुढे नरसोपंतांची सहावीची परीक्षा पास होतांच त्या वेळी एल्फिन्स्टन हा धारवाड येथे कलेक्टर होता, तेथे ते त्यास भेटले. त्याने त्या वेळच्या रत्नागिरीच्या क्रॉफर्ड कलेक्टरास शिफारसपत्र देऊन नरसोपंतांस रवाना केले. ते पत्र पाहून क्रॉफर्ड साहेबाने ताबडतोब नरसोपंतांची नेमणूक एका तालुक्यास केली. येथपासून वाईट ग्रहदशा संपून या कुटुंबास थोडथोडी अर्जितावस्था येऊ लागली. हल्ली- प्रमाणे रेलवे वगैरेची प्रवासास साधने त्या काळांत नव्हती हे लक्षात घेता नरसोपंतांस नोकरी मिळण्यास किती प्रयास पडले, परंतु वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांचे काम खात्रीशीर कसे साधले हे दिसून येईल. त्या काळीही गरीबीच्या स्थितीत अभ्यास करावा लागणान्या विद्याथ्यांचा वर्ग होता व केवळ मराठी शिक्षण असलेल्या लोकांस नोकरी मिळण्याची अडचण असे हे विसरून चालणार नाही. हल्ली इंग्रजी पदवीधरांची नोकरी मिळण्याबाबत जी परिस्थिति आहे तीच त्या वेळी निव्वळ मराठी शिक्षण असलेल्या लोकांची होती. गोविंदसुतांच्या मराठी शाळेतील शिक्षणक्रमाबद्दल आणखी विशेष असे लिहिण्याजोगें कांहीं नाही. १८७९ च्या सुमारास रत्नागिरी येथें ते मराठी स्कूल फायनलचे परीक्षेस बसले व पहिले खेपेसच पास झाले. इंग्रजी अगर संस्कृत पाठशाळेत ते कधीच गेले नाहीत. इंग्रजी शिक्षण मिळविण्याला बौद्धिक अनुकूलता पुष्कळ असली तरी सांपत्तिक स्थिति सर्वथैव प्रतिकूल होती, यामुळे इंग्रजी शाळेत जाण्याचे ध्येय मनांत सुद्धा आणण्याची सोय नव्हती. इंग्रजी वर्तमानपत्रांतील ठळक मथळे व तारा वाचतां येण्याइतके अथवा मुलकी खात्यांतील इंग्रजी प्रकरणे समजण्याइतके इंग्रजी भाषेचे ज्ञान त्यांनी मिळविले होते ही गोष्ट खरी. परंतु ते ज्ञान त्यांनी पुढे स्वतःच्या प्रयत्नाने खाजगी रीतीने मिळविलेले होते. मुलकी प्रकरणांतील इंग्रजी भाषेची त्यांच्या कानांना इतकी संवय झालेली होती की आम्ही वकील झाल्यानंतर सुद्धा एखाद्या मुलकी स्वरूपाच्या अजांत अपरिचितपणामुळे आम्ही एखादा चुकीचा शब्द घातला तर ते लगेच त्याऐवजी अमुक पारिभाषिक शब्द पाहिजे असें बिनचुक सांगत असत. ती. नरसूबाबानंतर दोन वर्षांनी परशुरामपंतांची मराठी सहावी इयत्ता पास झाली व त्या वेळी त्यांचे वय भजमासे १७ वर्षांचे असेल. गो.४ २६ गोविंदसुत परमार्थविचारमाला पृष्ठ ३७ वर दृष्टांतादाखल म्हणून गोविंदसुतांनी एक चुटका दिला आहे त्याचा उल्लेख करून हा भाग संपवितो. " लहानपणी शाळेत असतांना आम्हा लहान मुलांच्या मनांतून मास्तरांना काही लेखी विनंति करावयाची होती. पण पहिल्याने सही करावी कोणी हा पडला प्रश्न ! तेव्हां युक्ति निघाली की वाटोळ्या सह्यांचे चक्र काढावे. त्याप्रमाणे करून पत्र लिहिले तेव्हां मास्तरांना पत्र लिहिण्यांत म्होरप्या कोण हैं कांही उमगेना ! उघडच आहे, सर्वांच्या संघाने मिळून जे चक्र बनले, त्याचा म्होरप्या म्हणजे सर्व चक्रच होय." विवाह गोविंदसुतांचे लग्न त्यांच्या वयाच्या १५/१६ व्या वर्षी म्हणजे शिक्षण पुरे होण्यापूर्वीच झाले. आमच्या मातोश्री ती. सौ. सावित्रीबाई या खेर्डी तालुके चिपळूण येथील रा. गणेश बापूजी शेंबेकर यांच्या कन्या होत. गणेशपंत शेंबेकर यांनी अतिशय गरीब स्थितीतून स्वतःच्या मेहेनतीने व कर्तबगारीने वर डोके काढले होते व शेती, सावकारी व परोपकारार्थ वैद्यकीही ते करीत असत. पुढे त्यांच्या चिरंजीवांनीही घडिलांचा धंदा दक्षतेने व सचोटीने वाढवून आज चिपळूण तालुक्यांत तरी पांढरपेशा वर्गात अशा प्रकारचे धनधान्यसंपन्न घराणे दुसरें आढळगार नाही अशी ख्याति मिळविलेली आहे. आमचे सर्वात वडील मामा रा. धोंडोपंत हे २॥ वर्षापूर्वी निवर्तले. ते घरची शेती व सावकारी सांभाळून असत. त्यांच्या पेक्षा धाकटे बंधू रा. पांडुरंग गणेश यांनी ३० वर्षे मुलकी खात्यांत महाल. कन्याच्या दर्जापर्यंत नोकरी करून हल्ली रत्नागिरीस सुखवस्तु पेन्शनर म्हणून असतात व सर्वात धाकटे बंधु रा. सखाराम गणेश हे चिपळूण तालुक्यांत नामांकित वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. सौ. सावित्रीबाईंचा जन्म शके १७८९ भाद्रपद शु॥१० चा आहे, म्हणजे लग्नाचे वेळी त्यांचे वय १०।११ वर्षांचे होते व त्यांच्या व गोविंदसुतांच्या वयांत ५ वर्षांचे अंतर होते. त्या काळांत भापल्या समाजांत बालविवाहाचीच चाल सर्वत्र रूढ होती व त्या रूढीला अनुसरूनच हा विवाह झाला. सत्समागम व सद्ग्रंथवाचन गोविंदसुतांना परमेश्वरभक्तीचे आनुवंशिक संस्कार आईचे घराणे व वडिलांचे घराणे अशा दोन्ही बाजूंनी प्राप्त झालेले होते याचा उल्लेख मार्गे सरसमागम व सद्ग्रंथवाचन २७ भालाच आहे. गोविंदसुतांचे भाजे गणेशभक्त, वडील व मातोश्री दोघेही ईश्वरसेवेत काळ घालविणारी व भाईचे वडीलही देवभक्तच व अखेर संन्यास घेतलेले. " बीज तसा अंकुर " हा न्याय सृष्टीत अबाधित आहे. भगवद्भक्त- कोटींत ज्यांची गणना झाली आहे असे गोविंदसुत अशा पुण्यपुरुषांच्या उदरी यावे व लहानपणापासूनच भक्तिमार्गाकडे त्यांचा ओढा वळावा यांत नवल नाही. वयाच्या ८ व्या वर्षापासून समर्थांचा दासबोध ग्रंथ वाचण्याची गोविंदसुतांस आवड लागली. दररोज एक अगर निदान अर्धा दशक नियमाने वाचावयाचाच, त्याशिवाय झोपी जावयाचे नाही असा क्रम अव्याहत सुरू झाला. अशा रीतीने दासबोधग्रंथाची गोविंदसुतांकडून १०/१२ वर्षात किती पारायणे झाली असतील याचा वाचकांनीच हिशोब करावा. १८८२ च्या मार्चमध्ये म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षों गोविंदसुत आपला जिल्हा सोडून नगर जिल्ह्यांत नोकरीसाठी गेले त्या वेळी दासबोधाचे सर्व समास त्यांस मुखोद्गत झालेले होते व ज्ञानेश्वरीचेही त्यांचं वाचन नित्य नियमाने चालू झाले होते. कथा, कीर्तने, पुराणे असतील तेथे श्रवणाचा लाभ घेण्यास लहानपणापासूनच गोविंदसुत उत्सुकतेने जात असत. चिपळूण येथे भक्कल- कोटकर स्वामीचे एक शिष्य ह. भ. प. गोपाळबुवा केळकर हे माकंडीवर शके १७९६ च्या ज्येष्ठ महिन्यापासून एक मठ स्थापन करून राहात असत. तेथें रामनामसप्ताह, दत्तजयंती वगैरे अनेक उत्सव होत, त्या प्रसंगी गोपाळ. बुवांची व इतर सद्भक्तांचीही प्रेमळ भजनें, कीर्तने, निरूपणे वगैरे होत. या मठांत गोविसुतांचे नेहमी जाणे येणे असे व येथे येणा-या सजनांच्या सहवासाचा लाभ घेतल्यावांचून गोविंदसुत राहात नसत. गोपाळबुवांच्या सहवासांत श्रीमद्भगद्गीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथांतील विचारही भास्मसात् करून घेण्याची गोविंदसुतांस गोडी लागली. गोपाळबुवा १४१५ वर्षांपूर्वी निवर्तले. या मठाबद्दल गोविंदसुतांस त्यांच्या हयातीपावेतों आदर असे. गोविंदसुत कोंकणप्रांती फिरतीवर गेले की प्रथम या मठांत पाऊल टाकून मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व विचारपूस केल्याशिवाय राहात नसत. कित्येक प्रसंगी तर अनेक दिवस मठांत मुक्काम करीत व तेथे राहून सर्व मित्रांस व आप्त मंडळींस भेटत असत. गोपाळबुवांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव दत्तुबुवा ( यांचा मठ अलीकडे रत्नागिरीस आहे) व हरीबुवा हे मठाची सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे चालवितात. कै. गोपाळबुवा केळकर यांचे नमुनेदार चरित्र या मथळ्याखाली गोविंदसुतांनी मुमुक्षु साप्ताहिकांत चार विस्तृत लेखांक लिहिलेले आहेत. पहिला लेख ८।१०।२० च्या मुमुक्षूत आहे व शेवटचा लेख ५।११।२० च्या मुमुक्षूत आहे. त्या लेखांवरून अगदी लहानपणापासून तों अखेरपावेतों गोपाळबुवांविषयी गोविंदसुतांच्या २८ गोविंदसुत अंतःकरणांत किती पूज्यबुद्धि असे ते स्पष्ट दिसून येते. गोविंदसुत लिहितात, " गोपाळबुवांच्या सत्संगतींत ज्या ज्या वेळी मी असे त्या त्या वेळी वेदांत- चर्चेच्या किंवा सिद्ध पुरुषांच्या वर्तनाबाबतीत त्यांच्या माझ्या बोलण्यांत पुष्कळ मतविरोध असत, तथापि त्यांच्याबद्दल माझ्या अंत:करणांत जी लहानपणापासून पूज्यबुद्धि वास करीत होती व अद्यापही आहे तिला त्या विरोधाने यत्किंचितही धक्का लागलेला नाही. त्यांच्या माझ्यामध्ये एका काळी चर्चात्मक सुखसंवादाचा गमतीदार पत्रव्यवहार पुष्कळ झालेला आहे !" गोपाळबुवा हे पुण्यासही १२ वेळां गोविंदसुतांस भेटण्यास आलेले होते. गोविंदसुतांच्या पूर्ववयांत ज्या अधिकारी सत्पुरुषांचा त्यांस सहवास घडला होता व ज्यांच्या वृत्तीचा व वर्तनाचा त्यांच्या अंतःकरणावर कायमचा ठसा उमटलेला होता अशा आणखी दोन सत्पुरुषांचा उल्लेख करून हा भाग संपवितो. पहिले सत्पुरुष मुरडुवे येथील ह. भ. प. धोंडोपंत भांबेकर हे होत. यांनी क्षेत्रसंन्यास घेतलेला होता असे सांगतात म्हणजे ते आपला गांव सोडून कोठेही कधी जात नसत. परंतु त्यांचे वाचन व मनन जबर असे व संतांच्या ग्रंथांतील गूढ प्रमेये स्वात्मानुभवाने मुमुक्षूस सुबोधपणे उकलून दाखविण्याची त्यांची शैली चांगली असे. कित्येक आधुनिक विद्वानांना ज्या संतवचनांचा बरोबर अर्थ लागलेला नाही अथवा ज्या वचनांचा अर्थ अगदी चुकीच्या पद्धतीने आधुनिक विद्वान् लावतात त्या वचनांचा यथार्थ व निःसंदेह बोध धोंडोपंत यांच्या तोंडून मिळत असे असे त्यांचे दर्शनाचा व सहवासाचा लाभ घडलेले लोक सांगतात. दुसरे सत्पुरुष म्हणजे ताम्हनमळें तालुके चिपळूण येथील ह. भ. प. यदुबाबा गोखले. यांनी १३ कोटी रामनामाचा जप केलेला होता व हे एक ईश्वरी साक्षात्कार मिळविलेले पुरुष आहेत अशी कोंकणप्रांतात प्रख्याति होती. सावर्डे येथे वर्षांतून २१३ खेपा तरी त्यांच्या होत असत व त्यांची रसभरित कीर्तने व निरूपणे आम्ही भामच्या लहानपणी ऐकलेली आहेत. सांवडे येथे दत्तजयंतीचे उत्सवास ते बहुधा दरसाल येत व त्या वेळी त्यांची कीर्तने होत. पारमार्थिक विषयांत या पुरुषाचा फार मोठा अधिकार होता यांत शंका नाही. नोकरीपूर्वीची उमेदवारी परशुरामपंतांची मराठी सहाव्या इयत्तेची परीक्षा पास झाल्यावर ते कोठे तरी नोकरी पाहाण्याच्या उद्योगास लागले. घरच्या खालावलेल्या परिस्थितीत नोकरीशिवाय त्यांस दुसरा मार्गच नव्हता. निव्वळ मराठी शिकलेल्या मनुष्यास त्या काळांतही काही तरी वशिल्याशिवाय नोकरी अहमदनगर जिल्ह्यांत नोकरी मिळणे दुरापास्त असे. एल्फिन्स्टन साहेब हा त्या वेळी कुलाबा जिल्ह्याचा कलेक्टर झालेला होता, सबब त्यास अलीबाग येथे जाऊन भेटण्याचे परशुराम पंतांनी ठरविले. परंतु साहेबाची भेट अलीबागेस झाली नाही. तेथून माणगांव येथे दादांस जावे लागले. साहेबाने सांगितले की माझी बदली अहमदनगर येथे झालेली आहे व तेथे जाण्याचे तयारीत मी आहे. वाटल्यास मी अलीबाग जिल्ह्यांत दरमहा रु. २० ची जागा तुम्हांस देतो, परंतु मी हा जिल्हा सोडून गेल्यानंतर तुम्हांस प्रेमाने वागवून घेईल असा येथे कोणी नाहीं, करतां रत्नागिरी जिल्ह्याचा कलेक्टर वुइल्सन यास मी पत्र देतो व तो रत्नागिरी जिल्ह्यांत तुमची कोठे तरी सोय करून देईल. त्याप्रमाणे एल्फिन्स्टन साहेबाचें वुइल्सन साहेबास शिफारसपत्र घेऊन परशुरामपंत परत घरी आले. एल्फिन्स्टन साहेबाने या वेळी परशुरामपंतांस घरी परत जाण्याचे वाटखास म्हणून स्वतःचे पदरचे १० रुपये दिले. वुइल्सन साहेबाची भेट दापोली येथे झाली. परंतु त्यास दिलेल्या शिफारसपत्राचा फारसा उपयोग झाला नाही, कारण त्याने परशुरामपंतांचे नांव चिपळूण कचेरीत उमेदवार म्हणून दाखल करण्यास परवानगी दिली इतकेंच. मुलकी कामाची माहिती तरी होईल व पुढे मागे पगारी नोकरी मिळेल या आशेने परशुरामपंतांनी चिपळूण कचेरीत उमेदवार म्हणून काम करण्यास सुरवात केली. १-१॥ वर्षपर्यंत उमेदवार म्हणून काम केल्यावर जप्तीदार तलाठी म्हणूनही काही दिवस त्यांनी काम केले. परंतु या जिल्ह्यांत कायम नोकरी मिळण्याचा संभव दिसेना म्हणून हा जिल्हा सोडून दुसरीकडे कोठे तरी खटपट करावी असें परशुरामपंतांच्या मनांत भालें व एल्फिन्स्टनसाहेब हा त्या वेळी अहमदनगर येथे कलेक्टर होता सबब प्रथम त्यास भेटावे असे त्यांनी ठरविले. अहमदनगर जिल्ह्यांत नोकरी परशुरामपंत व रा. कमळाकर बल्लाळ जठार हल्ली पेन्शनर सबरजिष्ट्रार मु.कान्हें तालुके चिपळूण असे दोघे इसम १८८२ च्या मार्चमध्ये चिपळूणहून बरोबर च निघून अहमदनगर येथे नोकरीच्या शोधार्थ आले. दोघेही चिपळूणच्या शाळेत वर्गबंधु होते व या वेळी दोघेही विशीच्या आतबाहेर होते. या घेळेपावेतों दोघांनीही कोकण प्रांताबाहेर पाऊल टाकलेले नव्हते व देशावरील भाषा, राहणी, रीतरिवाज वगैरे गोष्टीस उभयताही अनभिज्ञ होते. या वेळची एक गमतीची आठवण गोविंदसुत सांगत असत. कोंकणांत पाऊस जास्त मामुळे सर्व घर कौलारू मगर भन्य त-हेनें भच्छादित असतात. परंतु वेशावर गोविंदसुत पाऊस थोडा यामुळे धाब्यांची घरे बऱ्याच ठिकाणी असतात. अहमदनगरकडे भाल्यावर या इसमांना धाब्यांची घरें जिकडे तिकडे पाहून मोठा अचंबा वाटला व या बाजूला नुकतीच एखादी वावटळ येऊन घरांचे वरचे मजले सगळे कोसळून पडले की काय अशी कल्पना मनांत आली ! अहमदनगर येथे आल्यावर दोघेही इसम कलेक्टर एल्फिन्स्टन यास भेटले व त्याने दोघांसही आपल्या कचेरीत उमेदवारांच्या जागा दिल्या. रा. कमळाकरपंत हे रत्नागिरीच्या नानल वकीलांचे मेहुणे म्हणजे रा. नानल यांची वडील बहीण ती. नरसूबाबा चिंचाळकर यांस दिलेली होती व धाकटी बहीण रा. कमळाकरपंत यांस दिलेली आहे. रा. कमळाकरपंत यांस पुढे गांव रजिष्ट्रारची नोकरी मिळाली व त्याच खात्यांत पुढे ते कारकून झाले व जरी ते निव्वळ मराठीच शिकलेले होते तरी त्यांच्या हुषारीमुळे कालांतराने त्यांस सबरजिष्ट्रारची जागा कायमची मिळाली व त्या जागेवरच त्यांनी बरीच वर्षे नोकरी केल्यावर पेन्शन घेतले. रा. परशुरामपंत यांस बायजाबाईचे जेऊर तालुके नगर येथे दरमहा रुपये ५ वर व्हिलेज रजिष्ट्रार नेमण्यांत आले. त्यानंतर ७८ महिन्यांनी त्यांची बदली मिरजगांव तालुके कर्जत येथे गांव- रजिष्ट्रारचे जागेवर झाली. येथे काही महिने काम केल्यानंतर १८८४ सालचे सुमारास परशुरामपंतांची मुलकी खात्यांत कायमची नेमणूक दरमहा रु. १२ पगारावर झाली. १८८५ चे मार्च महिन्यांत त्यांची बदली राहुरी येथे मामलेदार कचेरीत कारकुनीच्या जागेवर झाली. याप्रमाणे नगर जिल्ह्यांत निरनिराळ्या मामलेदारकचेरीत नोकरी झाल्यानंतर परशुरामपंत यांनी १८९१।९२ सालचे सुमारास भापली बदली पुणे जिल्ह्यांत करून घेतली. याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यांतील नोकरीची हकीगत आम्हांस रा. कमळाकरपंत जठार यांचेकडून लिहून आली त्याप्रमाणे दिली आहे. रा. कमळाकरपंत व गोविंदसुत यांचा परस्पर प्रेमाचा संबंध सख्ख्या भावांप्रमाणे होता. दोघेही अहमदनगर येथे मोकरीनिमित्त बरोबर आले; परंतु पुढे दोघांच्याही बदल्या निरनिराळ्या ठिकाणी होत गेल्याने त्यांच्यांत दूरपणा येत गेला तरी दर पंधरा दिवसांनी एकमेकांचे पत्र एकमेकांस आलेच पाहिजे व प्रत्यक्ष भेटीची संधि आल्यास ती एकमेकांनी कधीही घालवावयाची नाही याप्रमाणे उभयतांचेही वर्तन गोविंदसुतांच्या हयातीपर्यंत चालले होते. पुण्यास जाण्याची जबर इच्छा अहमदनगर जिल्ह्यांतील नोकरीच्या मुदतीत वर्तमानपत्रे व मासिक वाचण्याची गोविंदसुतांस विशेष आवड लागली. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या पुण्यास जाण्याची जबर इच्छा ३१ ठिकाणी नोकरविर असतांना मिळतील तेवढी वृत्तपत्रे व मासिके गोळा करून वेळात वेळ काढून ती ते वाचीत असत. तसेंच दासबोध, ज्ञानेश्वरी, संतांच्या अभंगांच्या गाथा यांचेही वाचन दररोज चालूच असे. आयुष्यातील पहिले दिवस कोकणप्रातांत गेलेले, यामुळे रत्नागिरी जिल्ह्यां- तील वृत्तपत्रे हटकून मिळविल्यावांचून ते राहात नसत, परंतु त्या वेळी पुण्यास विशेष नावाजलेले बुद्धिमान् पुढारी बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, माधवरावजी रानडे वगैरेचे विचार समजून घेण्याची गोविंद. सुतांच्या ठिकाणी वाढती जिज्ञासा उत्पन्न झाली. पुण्यातील व्याख्यानांचे अहवाल केवळ वर्तमानपत्रांत वाचून त्यांस समाधान वाटत नसे. पारमार्थिक वाङ्मय व प्रचलित विषयांवर वर्तमानपत्रीय लेख यांच्या वाचनांत जरी ते आवडीने काही वेळ घालवीत तरी त्यामुळे कचेरीतील मुलकी कामकाजांत त्यांच्याकडून कधीही कसुरी होत नसे व कोणी कसाही वरिष्ठ अधिकारी आला तरी काम करण्याच्या चोख व नियमित पद्धतीमुळे परशुरामपंतांवर प्रत्येक अधिकान्याची ताबडतोब स्वाभाविक मर्जी बसत असे. अहमदनगर जिल्ह्यांत असतांना ज्या अनेक अधिकाऱ्यांच्या हाताखाली गोविंदसुतांनी काम केले त्यांपैकी पुष्कळांची नांवे ते आम्हांस सांगत असत व त्यांपैकी कित्येक अधिकान्यांच्या हाताखाली पुनः पुणे जिल्ह्यांतही काम करण्याचा त्यांस प्रसंग आला असता ते अधिकारी आपल्याबद्दल भरंवसा व अभिमान कसा बाळगीत असत याबद्दल गोविंदसुतांच्या तोंडून आम्ही ऐकत होतों एवढेच नव्हे तर आम्ही वकील झाल्यानंतर त्यांपैकी काही जुन्या मुलकी अधिकान्यांसमोर वकील या नात्याने काम करण्याचे प्रसंग आले असतां त्यांच्या तोंडून गोविंदसुतांविषयी प्रेमाचे उद्गार आम्हांस ऐकण्यास मिळत. अहमदनगर जिल्ह्यांत असतांना परशुरामपंतांस नेहमी वाटत असे की जर पुणे जिल्ह्यांत व विशेषतः पुणे शहरांत आपली बदली होण्याचा योग आला तर आपल्या अत्यंत आवडीच्या वाचनव्यवसायाला चांगलाच अवसर मिळेल व त्यापासून आपकी बौद्धिक व मानसिक व आध्यात्मिक उन्नति होण्यासही मदत मिळेल. पुण्यांत ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीवाचनाचे अड्डे आहेत तेथे आपला प्रवेश करून घेता येईल व मोठमोठ्या पुढान्यांची व्याख्याने ऐकण्यास मिळून आपणांस देशस्थितीचे चांगल्या त-हेने ज्ञान करून घेता येईल असे त्यांस वाटे. " कोणत्याही गोष्टीबद्दल दृढ निश्चय असला म्हणजे ती साध्य करण्यास मार्गही निघतोच " अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे त्याप्रमाणे थोड्याशा खटपटीने हा हेतु साध्य करण्यांत गोविंदसुतांस यश आले. नोकरीत गोविंद. सुतांच्याच दर्जावर असलेला पुणे जिल्ह्यांतील एक कारकून त्याचे घर गोविंदसुत नगर जिल्ह्यांत असल्यामुळे पुण्याहून नगरास येण्यास तयार होता, त्याच्याशी पत्रव्यवहार करून वरिष्ठ अधिका-यांच्या संमतीने संमतीने गोविंदसुर्तानी आपसांत एकमेकांच्या जागी एकमेकांच्या बदल्या करून घेतल्या व अशा रीतीने आपल्या अंतःकरणांतील अत्यंत आवडीच्या पुण्यपत्तनांत १८९११९२ ध्या सुमारास गोविंदसुत येऊन दाखल झाले व या शहरांत आल्या. नंतर त्यांस आपल्या आयुष्यातील उच्चतम ध्येये कशी साध्य करून घेता आली याचे भापणांस पुढे दिग्दर्शन होईल. पुण्यातील वास्तव्य गोविंदसुत प्रथम पुण्यास येतांच हवेली तालुक्याच्या मामलेदार कचेरीत कारकुनाच्या जागेवर रुजू झाले. १८८४ सालापूर्वीची त्यांची सर्व नोकरी ही कायम स्वरूपाची नसल्यामुळे सरकारी नोकरीच्या नियमाप्रमाणे पेन्शनसाठी ती जमेस धरता येत नाही. ३० वर्षे ही नोकरीची पुरी मुदत गणली जाते व त्या नियमाप्रमाणे १९१३।१४ सालींच त्यांस पेन्शन मिळावयास पाहिजे होते. परंतु त्यांच्यासारख्या मुलकी कामांतील वाकबगार इसमाने आणखी शक्य तितके दिवस नोकरीत असणे इष्ट आहे असें वरिष्ठ अधिकान्यांस वाटून ३।४ वर्षे नोकरीच्या मुदतीत त्यांस वाढ मिळून १९१६ साली म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षांपर्यंत नोकरी करून मग त्यांस पेन्शन मिळाले. या नोकरीच्या मुदतींतील विशेष मौजेची गोष्ट ही आहे की एवढ्या २४।२५ वर्षांच्या अवधीत गोविंदसुतास पुणे शहर सोडण्याचा व पुण्यातील बि-हाड मोडण्याचा कधीच प्रसंग आला नाही व ही गोष्ट त्यांच्या इच्छेस अनुसरून अशीच झाली. प्रथम काही वर्षे हवेली कचेरीत, नंतर काही वर्षे प्रांत भऑफिसांत व शेवटी १५।१६ वर्षे कलेक्टर ऑफिसांत याप्रमाणे गोविंदसुतांची सर्व नोकरी पुण्यांतच झाली. १।२ वेळां जुन्नर वगैरे तालुक्यांतील मामलेदार कचेरीत त्यांच्या बदल्या झाल्या होत्या. परंतु तेथे रुजू होऊन महिना पंधरा दिवस होतात न होतात तोच त्यांस पुण्यास आणण्याबद्दल वरिष्ठ अधिकारी शिफारस करीत व त्यांस ताबडतोब पुण्यास परत यावे लागे, यामुळे पुण्याखेरीज बाहेर तालुक्याच्या ठिकाणी त्यांस बिहाड करून राहण्याचा कधीच प्रसंग आला नाही. प्रस्तुत लेखक व स्याचे धाकटे बंधु कै. श्रीरामपंत या उभयतांसही आपले हायस्कूलचे व कॉलेजचे शिक्षण पुण्यास बिहाडी राहून पुरे करतां आलें हीही संधि या योगायोगामुळेच मिळाली. नाही तर बाहेर तालुक्याच्या ठिकाणी राहून
No text on this page.
गोमिंदसत बाहेर फिरण्यास नावांना (१९३२) नोकरीतील दिनचर्या शिक्षणाचा व कॉलेजवसतिगृहाचा खर्च तेथून पुण्यास पाठवीत जाणे गोविंदसुतांस शक्यच नव्हते. पेन्शन घेतल्यानंतरही १६ वर्षे म्हणजे १९३२ च्या जुलैपर्यंत गोविंदसुतांनी पुण्यास आपल्या बिहाडाची जागा कायमच ठेविली होती व वर्षांतून जास्त दिवस ते पुण्यासच लेखनवाचनांत व पुण्याच्या उच्च बौद्धिक वातावरणांत संचार करण्यांत घालवीत. वडील चिरंजीव (प्रस्तुतचे चरित्रलेखक ) १९१२ सालींच खानदेशांत वकिलीच्या धंद्यानिमित्त कायमचे जाऊन राहिले होते व धाकटे चिरंजीव कै. श्रीरामपंत हेही गोविंदसुतांनी पेन्शन घेण्यापूर्वीच वहाडांत शिक्षणखात्यांत कायम नोकरीवर गेले होते. अशा स्थितीत १९१६ सालानंतर व्यावहारिक दृष्ट्या गोविंदसुतांस पुण्यास राहाण्याची काहीच अवश्यकता उरली नव्हती. परंतु ज्या पुणे शहरांत नोकरीची २५ वर्षे घालविली त्याच पुणे शहरांत सेवानिवृत्त झाल्यानंतरही शक्य तितकी वर्षे घालवावी असा पुणे शहरांतील वास्तव्याचा त्यांस लोभ जडला, यामुळे शक्य तोवर त्यांनी पुणे सोडले नाही व पुणे शहरानेही म्हणजे तेथील त्यांच्या मित्रमंडळींनीही त्यांस पुणे सोडू दिले नाही. वर्षांतून काही दिवस ते कोंकणप्रांत, मुंबई, खानदेश, वन्हाड वगैरेकडे फिरतीवर जात, अथवा तीर्थयात्रा वगैरे करण्यास जात, परंतु पुनः कायम मुक्काम पुण्यासच ठेवीत. तेथील बिहाडांत नेहमी कोणीना कोणी तरी आप्तवर्गापैकी विद्यार्थी शिक्षणाप्रीत्यर्थ त्यांच्यापाशी राहात असत. नोकरीतील दिनचर्या सुमारे १८९९ सालापासून गोविंदसुतांच्या चरित्राबद्दल आम्हांस आमच्या प्रत्यक्ष माहितीवरून व आठवणीवरून लिहिता येण्याजोगे आहे. पहाटे ५-५॥ वाजण्याचे सुमारास ते उठत असत. सकाळी उशीरा उठणे त्यांस कधीच माहीत नव्हते. नोकरीवर असतांना ऑफिसांतील कामकाजाचे बरेच मोठे दप्तर शिपायाबरोबर दररोज घरी येत असे. पहाटे तास दीड तास बसून एकाग्र चित्ताने त्यापैकी बरेचसे काम ते आटोपीत असत. नंतर प्रात. विधि, स्नान, संध्या, देवपूजा वगैरेमध्ये सुमारे एक तास जाई. नंतर सवड असल्यास राहिलेले दप्तरचे काम पुरे करून ८॥ अगर ९ चे सुमारास ते घरांतून जे बाहेर पडत ते ११ वाजण्याच्या सुमारास परत येत. सकाळी स्नान केल्याशिवाय घरांतून कधीही बाहेर पडत नसत. या दोन अडीच ताप्तांच्या फेरफटक्यांत ते पुणे शहराच्या किती पेठा ओलांडून जात असत व या मुदतीत किती निरनिराळ्या कामांचे व्याप त्यांच्यामागे असत व ते सर्व कशा रीतीने पुरे पाडीत असत, याचा कितीही तपशील दिला तरी अपुराच गो.५ गोविंदसुत पडेल व कित्येकांस तो खराही वाटणार नाही. दररोज तीन चार कोस फिरणे सहज व्हावयाचे व ते अगदी निरलसपणे. या दररोजच्या फेरफटक्याचा गोविंदसुतांच्या शरीरप्रकृतीवर फार चांगला परिणाम झाला हे निर्विवाद आहे. या सकाळच्या फिरण्यांत तुळशीबाग, रामेश्वर, बेलबाग, कसब्याचा गणपती, जोगेश्वरी, ओंकारेश्वर वगैरे प्रसिद्ध देवालयांपैकी सर्व अगर बरीचशी वाटेत लागावयाचीच व त्या वेळी देवळांत जाऊन दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालून मग पुढील रस्त्याचे आक्रमण होत असे. कधी केसरी. कचेरीत अगर शिवरामपंतांच्या काळऑफिसांत जाऊन आठवड्यांतील सर्व वृत्तपत्रांचे निरीक्षण करीत व शिवरामपंतांकडून काही मासिके अगर अभिप्रायार्थ आलेली पुस्तकें घरीं वाचावयास आणीत, कधी वासुकाकांच्या चित्रशाळेत जात तर कधी मुमुक्षुकचेरीत जाऊन पारमार्थिक वाङ्मयाचे लोडन करीत, कधी महर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांच्या दर्शनास जात तर कधी विठ्ठलभक्त पांगारकर, ह. भ. प. विष्णुबुवा जोग अगर केशवराव महाराज देशमुख किंवा केशवशास्त्री दामले व अशा प्रकारची परमार्थ विचार- मार्गातील जी जी मंडळी पुण्यास असल्याचे माहीत पडे त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या बैठकीत थोडाफार सुखसंवाद करून घरी परत येत. नंतर दुपारचे जेवण आटोपून फार उशीर होतो असें दिसले तरच तांग्यांतून ऑफिसला जात, नाही तर पायींच कचेरीचा रस्ता धरीत. घरापासून ऑफिस १-१॥ मैल लांब असे. हल्लीच्या तरुण पिढीतील फारच थोडे लोक गोविंदसुतांच्या दररोजच्या पायीं चालण्याच्या मजलेची बरोबरी करू शकतील. शारिरिक श्रमाप्रमाणे बौद्धिक श्रमही ते अतोनात करीत व त्यांत त्यांस थकवा कधीही वाटत नसे. त्यांच्या बाबतींत विश्रांति म्हणजे कामाची अदलाबदल असा अर्थ असे. लँड रेव्हेन्यू कोड व वतन अॅक्ट हे दोन कायदे त्यांस मुखोद्गत होते व या बाबतीत सरकार ठरावांची आजतागायत माहिती त्यांस असे. अत्यंत भानगडीची व गुंतागुंतीची प्रकरणे नेहमीं परशुरामपंतांकडेच अभिप्रायार्थ अगर तजविजीस यावयाची. इंग्रजी प्रकरणे सुद्धा जरूर तर कोणाच्या मदतीने वाचून यांनीच अभिप्राय तयार करून ठेवावयाचा. कनिष्ठ ऑफिसांतील कारकून लोक सुद्धा महत्त्वाच्या कामीं परशुरामपंतांचा सल्ला घेत असत व त्यांचा निर्णय म्हणजे बिनचूक असलाच पाहिजे अप्ता सर्वांचा भरंवसा असे. जिल्ह्याच्या जमाबंदीचे आंकडेमोडीचें किचकट काम यांच्याकडेच यावयाचे. परंतु कोणत्याही कामाची थोड्या वेळांत बरोबर मुद्देसूद समजूत करून घेऊन बिनचूकपणे ते पार पाडण्यांत गोविंदसुतांचा हातखंडा असे. यामुळे सबंध पुणे जिल्ह्यांत मुलकी नोकरीतील दिनचर्या ३६ कामाचा पूर्ण माहितगार व हुशार कारकून परशुरामपंतांइतका दुसरा कोणीही नाही अशी कित्येक वर्षे आम्ही ख्याती ऐकत होतो. पुणे जिल्ह्यांतील ८ तालुके व ३ पेटे येथील मुलकी कचेरीत परशुरामपंतांचे हातचे काही लिखाण आले की " हा परशुरामाचा बाण आहे " असे सर्व कारकून लोक म्हणत व त्याचा अर्थ अर्थ इतकाच असे की या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष दिल्याखेरीज गत्यंतर नाही. इतक्या वर्षांच्या नोकरीत गोविंदसुत द्रव्याच्या मोहांत कधीच सांपडले नाहीत, त्यामुळे अगदी न्यायाने व सरळपणानें काम करणारे म्हणून मुलकी खात्यांतील वरिष्ठ अधिकान्यांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वास त्यांच्याबद्दल सारखाच आदर व वचक वाटत असे. ऑफिसांत काम करण्याची तडफ फार व कामाचा उरक चांगला, यामुळे माळसाने अगर कुचराईनें कोणतेही काम दप्तरांत कधी शिल्लक राहावयाचे नाही. सायंकाळी कचेरीतून परत येतांना सार्वजनिक सभेत अगर दुसरीकडे कोठे जाहीर व्याख्यान असेल तर थोडा वेळ तरी तेथे उभे राहून त्यांतील तात्पर्यार्थ ग्रहण करून घरी यावयाचे. सायंसंध्या करून भोजनोत्तर एक तासभर तरी दासबोध, ज्ञानेश्वरी, संतांचे अभंगांचे गाथे यांचे वाचन नित्य चालत असे. या वेळी कोणी श्रोते जिज्ञासेने येत तेव्हा आमचेकडून ग्रंथ वाचून घेत व स्वतः सोप्या भाषेत अनेक दृष्टांत देऊन विषय चटकदारपणे समजावून देत. बहुधा कोणीना कोणी तरी आवडीचा श्रोता नेहमी असावयाचाच. रात्री एखाद्या चांगल्या कीर्तनकाराचे कीर्तन अगर धार्मिक प्रवचन असल्याचे समजल्यास तेथें गोविंदसुत हटकून जावयाचे व वेदांताची अगर अध्यात्म विषयाची पद्धतशीर मांडणी असेल तर त्यांत रंगून जात भसत, परंतु केवळ भाकड कथा चालू आहे असे आढळल्यास वेळ वृथा न दवडता परत येत. नाटक सिनेमादि प्रकारांना ते चुकून सुद्धा कधीं जात नसत. पुण्यास मुक्काम असतांना साधारणपणे वरीलप्रमाणे कार्यक्रम असे. कलेक्टर ऑफिसबरोबर फिरतीवर जाणान्या मंडळीत परशुरामपंतांची निवड नेहमीच व्हावयाची, कारण त्यांच्याशिवाय ऑफिसचें महत्वाचे काम कधीच व्हावयाचे नाही. तालुक्यांतील कारकुनांच्या कामांची कसून तपासणी परशुरामपंतांकडूनच व्हावयाची व त्यांच्या कसोटीला उतरून त्यांचे प्रशस्तिपत्र मिळाले म्हणजे प्रत्येकाला बरे वाटे. फिरतीवर असतांना पोथीचा कार्यक्रम चालूच असे; परंतु प्रत्येक ठिकाणी संतवाङ्मयाचे व परमार्थांचे भोक्ते कोण कोण आहेत याची बारीक छाननी होऊन त्यांच्या सहवासाचा लाभ घेतल्याशिवाय गोविंदसुत कधीही राहात नसत, मग त्या लाभासाठी २।४ कोस पायीं जावे लागले तरी त्याची त्यांस पर्वा नसे.
१६ गोविंदसुत यासंबंधाने श्रीवासुदेवस्वामी धामणीकर यांच्या चरित्रांत गोविंदसुतांनी एक प्रकारे भात्मचरित्रच लिहून ठेविले आहे त्यापैकी काही मजकूर त्यांच्याच शब्दांत येथे देऊन हा भाग पुरा करतो. गोविंदसुत लिहितात, १८९६१९७ साली फिरत्या नोकरीवर असतांना माझा जुन्नर रस्त्यावरील मंचर गांवीं काही दिवस मुकाम पडला. त्याच वेळी सुदैवेंकरून वासुदेवबुवांचा मुक्काम दीड दोन मैलांवर अवसरी खुर्द गांवी होता. यामुळे दररोज रात्री मंचरहून भवसरीला जावें, तीन तीन तास बुवांच्या कीर्तनश्रवणाचा लाभ घ्यावा भाणि मंचरला परत यावे असा योग अनायासें जुळून आला. त्यानंतर मी सुमारे चोवीस वर्षे फिरत्या नोकरीवर असतांना दरसाल ज्या ज्या वेळी खेड, शिरूर, जुन्नर या प्रांतांत फिरण्याचा मला प्रंसग येई त्या त्या वेळी धुवांच्या दर्शनाचा, त्यांच्या कीर्तनाचा व संभाषणसुखाचा मनमुराद लाभ घेता येत असे." m पारमार्थिक ध्येयाची सिद्धि पुण्यास येण्यांत गोविंदसुतांच्या अंतरंगांतील एक मुख्य हेतु असा होता की येथे आल्यावर पारमार्थिक दृष्टीने आपणांस सत्संगतीचा लाभ होईल व आध्यात्मिक प्रश्नांसंबंधाने आपल्या अंत:करणांतील सर्व शंका व तळमळी नाहीशा होतील. ज्ञानेश्वरी आणि दासबोध या ग्रंथांच्या खया रह- स्याचे आकलन आपणांस चांगल्या रतिीने झालेले आहे असें गोविंदसुतांस धाटत असे, परंतु पुण्यास येईपर्यंत अध्यात्म विचारांची त्यांची बैठक असावी तशी स्थिर झालेली नव्हती. सद्गुरुमुखाने च यथार्थ बोधाचे श्रवण झाल्याखेरीज व सहुरूकडून उपासना प्राप्त करून घेतल्याखेरीज अंतःकरणांत आत्मज्ञानाचा ठसा कायमपणाने उमटणार नाही असा त्यांच्या मनाने निश्चय केला या दृष्टीने पुण्यांत त्या वेळी वेळी असलेले अध्यात्मचर्चा करणारे २५/३० आखाडे त्यांनी धुंडाळून पाहिले, परंतु त्यांच्या अंतकरणाचे आत्यंतिक समाधान त्यांपैकी कोणत्याही ठिकाणी होऊ शकले नाही. (तीस वर्षांपूर्वी अध्यात्मचर्चा करणारे २५/३० आखाडे पुण्यांत असत, परंतु आतां वावदूक मतभेदाच्या वितंडवादांचा व मताभिमानाचा आणि संस्थांचा सुळसुळाट झाल्यामुळे १२ ठिकाणांखेरीज सर्व शुकशुकाट आहे, भशी माहिती धामणीकर बुवांच्या चरित्रांत गोविंदसुतांनी दिलेली आहे.) परंतु " सर्व वेदांताचें आलोढन करून शुद्ध भूमिकेवर निःसंदेहपणानें स्थित असलेल्या अध्यात्मज्ञानसंपन्न" अशा काही सत्पुरुषांचा सहवास त्यांस पुण्यपत्तनांत घडत गेला. अशा पुरुषांपैकी एक पुरुष कै. वासुदेवगव ब पारमार्थिक ध्येयाची सिद्धि वैशंपायन हे होत. हे गृहस्थ प्रथम कलेक्टरकचेरीत कारकून होते त्या वेळी गोविंदसुतांची व त्यांची ओखळ झाली होती. नंतर आपल्या वडिलांच्या पश्चात् ते पुरंदन्यांचे कारभारी झाले. त्यांना वेदांताचा फारच नाद होता. ते पुण्यांतील कीर्तन पुराण एकही सोडीत नसत. शास्त्री, पंडित, वेदांती, धादांती, हल्लींचे आधुनिक तत्ववेत्ते या सर्वांच्या बुद्धिवादाचा ठावठिकाण, खोली, उंची त्यांनी पूर्णपणे जाणलेली होती. त्यांच्याकडे गोविंदसुत काही दिवस रात्री दासबोध वाचण्यास जात असत. सदरहू वैशंपायन यांस आम्ही लहानपणी पाहिलेले आहे व त्यांचे एक कीर्तन व निरूपणही आम्ही ऐकलेले आहे. १९०० सालच्या सुमारास अल्पवयांत म्हणजे ३०।३२ वपांचे असतांनाच वैशंपायन निवर्तले. धामणीकर बुवांच्या चरित्रांतच ओघाने वासुदेवराव वैशंपायन यांच्याबद्दलही सर्व माहिती गोविंदसुतांनी दिली आहे व त्यांत त्यांचा व आपला पारमार्थिक दृष्टया कशा प्रकारचा जिव्हाळ्याचा संबंध होता याचेही वर्णन त्यांनी केले आहे. सदरहू वैशंपायन यांच्याकडे दासबोध वाचण्याच्या वेळी त्यांचे लहानपणाचे स्नेही पुण्यास हल्ली पेन्शन घेऊन सुखवस्तु राहिलेले श्री. श्रीधर वामन ऊर्फ दिगंबरराव जोशी वकील पोलिस प्रॉसिक्यूटर हे येत असत. वैशंपायन व दिगंबरराव जोशी दोघांनाही पारमार्थिक शुद्ध विचारांची मनापासून अत्यंत आवड. दोघांचीही बुद्धिमत्ता दांडगी. उभयतांची विचार- भूमिका एक असे. पुण्यास आल्यामुळेच ज्यांच्या सद्विचारांचा गोविंदसुतांस लाभ झाला असे हे दुसरे गृहस्थ होत. तिसरे सत्पुरुष म्हणजे वर वर्णन केलेले धामणीकर बुवा. हे " आचारशुद्ध व विचारशुद्ध असल्यामुळे दर्शनीय व संभाषणीय सत्पुरुष होते. गोविंदसुतांचा व त्यांचा कशा प्रकारचा जिव्हाळ्याचा संबंध होता हे सर्व वर्णन बुवांच्या चरित्रांत गोविंदसुतांनी केलेले आहे. वासुदेवबुवांची माहिती श्री. दिगंबरराव जोशी व वैशंपायन यांस गोविंदसुतांनी सांगतांच त्यांनी बुवांस धामणीहून पुण्यास आणविलें व त्यांची पुण्यांत पुष्कळ कीर्तने करविली. ही गोष्ट १८९७१९८ सालची आहे. त्यानंतर १०११२ वर्षांत बुवांच्या ५।७ खेपा पुण्यास झाल्या. " शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति व आस्मप्रचीति यांच्या एकवाक्यतेने आपलाच स्वानंद, निजानंद, आत्मानंद आपणच सद्गुरुकृपेनें प्रगट करून भोगावयाचा आहे हे वासुदेवबुवा उत्कृष्ट रीतीने प्रतिपादन करीत असत. " बुवांच्या विचारांची उच्च भूमिका व परमार्थाचें सुलभतेचे बालबोध प्रतिपादन याचें वर्णन बुवांच्या चरित्रांत गोविंदसुतांनी विस्ताराने केलेले आहे. वासुदेव- बुवांचा व गोविंदसुतांचा प्रथम परिचय इ. स. १८९५ साली झाला व त्यांच्या मार्फतीनेच धोमवासी परमपूज्य विश्वनाथदादा पाटणकर ( ज्यांचे निवर्तले. गोविंदसुत चरित्र गोविंदसुतांनी आत्मानुसंधान पुस्तकांत प्रारंभी दिले आहे ) यांचे उपासक ह. भ. प. दत्तात्रेय यशवंत बापट, पेन्शनर हेडमास्तर, हल्ली मु. भावास जि. कुलाबा यांचा व गोविंदसुतांचा परिचय झाला. श्री. बापट व गोविंदसुत यांचे नाते गुरुबंधूंचे आहे. दोघेही वासुदेवउपासक. ही उपासना गोविंदसुतांस श्री. विश्वनाथदादा पाटणकर यांचे लेखक व सच्छिष्य रा. गोविंदबुवा वेल्हाणकर यांच्याकडून पुणे येथे इ. स. १८९५/९६ सालच्या सुमारास मिळालेली होती व गुरुवर्य बापट यांस ही उपासना पाटणकर यांध्या परंपरेतील दुसन्या एका सच्छिष्याकडून मिळालेली होती. गोविंद सुतांचे नगर जिल्ह्यांतील नोकरीच्या वेळचे एक स्नेही कै. वामनराव गोरे यांच्या मार्फत सदरहू गोविंदराव वेलणकर यांचा गोविंदसुतांस शोध लागला. त्यांची प्रवचने ऐकून गोविंदसुतांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले व या अप्रसिद्ध परंतु आत्मसाक्षात्कारी पुरुषाच्या उपदेशापासून गोविंदसुतांची अध्या. रमाची बैठक स्थिर झाली. सदरहू गोविंदबुवा वेलणकर हे १८९८०९९ चे सुमारास परशुरामपंतांनी " गोविंदसुत" असें जें टोपण नांव आपल्या लेखनाकरतां धारण केले त्यांत आपल्या पित्याचा व गुरूचाही एकदमच उल्लेख व्हावा असा उद्देश होता. आम्ही स्वतः अध्यात्मविषयांत सर्वस्वी अननुभवी आहों ही गोष्ट गोविंदसुतांचे प्रत्येक पुस्तक प्रकाशित करतांना प्रत्येक प्रस्तावनेत नमूद करून ठेवलेली आहे. तथापि धामणीकर बुवांच्या चरित्रांत गोविंदसुतांच्या लेखांतून व अशाच इतर प्रेमी अधिकारी पुरुषांकडून जी माहिती मिळाली त्यावरून हा भाग आम्ही लिहिला आहे व या भागांत उल्लेख आलेल्या सर्व सजनांच्या सहवासाने व कृपेने आपण निःसंदेह होऊन आपल्या आयुष्याचे आपणांस पारमार्थिक दृष्ट्या सार्थक करता भालें असें गोविंदसुत मानीत असत हे निश्चित आहे. SAR फलज्योतिषाचा व्यासंग गोविंदसुतांच्या स्नेही मंडळींत अनेकविध व्यवसायांतील लोकांचा भरणा होता. पुणे शहर म्युनिसिपालिटींत रा. दामुअण्णा ढेरे हे कारकून होते व त्यांचा फलज्योतिषावरील जबर व्यासंग पुण्यांत प्रसिद्ध आहे. १९०३२४ सालापासून रा. ढेरे यांचा व गोविंदसुतांचा विशेष परिचय झालेला होता. रा. ढेरे यांचे घर कसब्याचे गणपतीपाशी आहे. वेळ फावेल तेव्हां गोविंदसुत हे रात्री रा. ढेरे यांजकडे दोन दोन तास बसत व अनेक कुंडल्यांची चर्चा करून फलज्योतिषाची माहिती घेत. धामणीकर खुवांच्या चरित्रांत गोविंदसुत फलज्योतिषाचा व्यासंग एके ठिकाणी भोघाने लिहितात, “ मला काही ज्योतिष येत नाही व मी त्याचा अभ्यासही केलेला नाही. परंतु त्या वेळी पुण्यांत प्रसिद्ध असलेले ज्योतिषी कै. ० दामुअण्णा ढेरे यांच्या संगतींत माझे काही दिवस गेल्याने बरेचसे भाडाखे त्या वेळी लक्षात होते. दामुअण्णा निवर्तल्यावर संगति सुटली आणि ज्योतिषाचा नादही सुटला. या लिहिण्यांत गोविंदसुतांच्या विनयाचाच बराचसा भाग आहे. वस्तुस्थिति अशी आहे की फलज्योतिषाचा व्यासंग सुरू झाल्यापासून ६०/७० वर्षांपासूनची सर्व जुनी पंचांगें त्यांनी गोळा केली होती व जन्मवेळेवरून शेंकडों लोकांच्या पत्रिका त्यांनी तयार करून दिल्या आहेत व पत्रिका चुकीच्या अाढळल्यास त्या दुरुस्त करून दिल्या आहेत. गोविंदसुत चार मंडळीत बसले की पांच पंचवीस पत्रिका त्यांच्यासमोर येऊन पडत असत व आपआपल्या ग्रहांची फळे लोक कुतूहलपूर्वक ऐकत असत. कित्येक वेळां पत्रिकांवरून गतगोष्टींचे ठोकताळे आश्चर्यकारक रीतीने पटलेले आढळून येत. गोविंदसुतांनी ज्योतिषविषया- वरील बरेचसे ग्रंथ स्वतः विकत घेऊन त्यांचा अभ्यास करून संग्रहीं ठेवलेले आहेत व त्यांच्या ज्योतिषाच्या बाडांत श्रीकृष्ण, श्रीरामचंद्र, युधिष्ठिर, अर्जुन, धर्मराज अशा पौराणिक पुरुषांपासून तो पेशव्यांच्या घराण्यातील सर्व प्रसिद्ध पुरुष व हल्लीचे स्वदेशांतील व परदेशांतील सर्व राजकारणी पुरुष अशा सर्वांच्या कुंडल्या संग्रही ठेवलेल्या आढळतात. वेदांतविषयाच्या खालोखाल ज्योतिषविषयाबद्दल गोविंदसुतांचा जबर पत्रव्यवहार भनेक लोकांशी चालत असे. लग्नसराईच्या दिवसांत अनेक मित्रमंडळी वधूवरांच्या पत्रिका त्यांच्या अभिप्रायासाठी घेऊन येत व तेही निरलसपणे वेळ मोडून अभिप्राय देत असत. गोविंदसुतांनी पैसे मिळविण्याचा धंदा म्हणून ज्योतिषाच्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे मनांत भाणले असते तर या धंद्यावर त्यांस शेंकडों रुपये मिळविता आले असते. परंतु त्यांनी कधीही फलज्योतिषाच्या ज्ञानाचा असा विक्रय केला नाही. कित्येक वेळां हे धंदेवाईक ज्योतिषी असतील असे समजून त्यांच्यासमोर लोक द्रव्य ठेवीत, परंतु ते द्रव्य ते साभार परत करीत. परमार्थविषयक लेखांत गोविंद- सुतांनी ठिकठिकाणी फलज्योतिषांतील आडाख्यांचे दृष्टांत देऊन विषय. प्रतिपादनाला चटकदारपणा आणला आहे. प्रपंचांत भनेक आधिव्याधींनी ग्रस्त होऊन निराश झालेले कित्येक लोक चार समाधानपर विचार ऐकण्या- साठी गोविंदसुतां कडे धाव घेत त्या वेळी ते त्यांस समयोचित पारमार्थिक विचार सांगत अथवा तेवढ्याने काम न झाल्यास फलज्योतिषदृष्ट्या एखाद्या वेळी त्यांच्याशी संभाषण करून त्यांस हुरूप भाणीत. एकंदरीत गोविंदसुत फलज्योतिषाचा व्यासंग गोविंदसुतांच्या आध्यात्मिक विचारसरणीला पोषक असाच झाला असे म्हणण्यास हरकत नाहीं. गोविंदसुतांनी अनेक ठिकाणी भापल्या ग्रंथांत ज्योतिषशास्त्रांतील आडाख्यांचा उल्लेख केला आहे त्यांपैकी नमुन्यादाखल २।३ उदाहरणे देऊन हा भाग संपवितो. भाधिभौतिक सुधारणा, प्रस्तावना पान ४० मध्ये गोविंदसुत लिहितात, " लेखकाच्या पचंमस्थानी गुरु असल्यामुळे जिकडेतिकडे ईश्वरपरायण मनुष्ये दिसावी अशी त्याची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक आहे. दशम म्हणजे राजकीय स्थानी चंद्रयुक्त मंगळ असल्यामुळे लेखक हा न जहाल, न मवाळ, या कोटींतील असला तरी त्याला लोक स्वातंत्र्यसुख भोगीत असतांना पाहावे, असे मनापासून वाटणे, हा त्या मंगळाचा गुण असल्याने स्वाभाविक आहे. अर्थात् हरिभजन आणि राजकारण व तदनुषंगाने चाललेल्या सर्व सुधारणा यासंबंधाने त्याला अंतःकरणापासून जे वाटत आहे, ते त्याच्या षष्ठस्थानी बुध. शुक्राचा योग असल्यामुळे ग्रंथद्वारा सहज बाहेर पडत आहे. सर्व कर्माच्या दोया ग्रहाधीन असल्यामुळे ग्रंथकाराचे यांत कर्तृत्व कांहींच नाहीं !" रहस्यनिरीक्षण, प्रस्तावना पृष्ठ ८ मध्ये गोविंदसुत लिहितात, " ज्योतिष. शास्त्रदृष्ट्या पाहिले तर रास ही चंद्रावर अवलंबून असते. चंद्र ही मनाची देवता आहे. अर्थात् लोकमान्यांची व आमची रास ऊर्फ मनोदेवता एकच आणि तीही मीन असल्यामुळे आमच्या मनांत लोकमान्यांबद्दल विरोध असणे शक्यच नाही. शिवाय राशीस्वामी गुरु लोकमान्यांच्या भाग्यस्थानी असून आमच्या बुद्धीत आहे. ते उभयतां नवपंचमदृष्टीने पाहात असल्यामुळे आमच्या बुद्धीत लोकमान्यांसंबंधाने विकल्प येणे शक्य नसून उलट त्यांच्याबद्दल पूज्यबुद्धि, आस्था व प्रेम इकडेच कांटा झुकणे स्वाभाविक आहे." परमार्थविचारमाला आवृत्ति २ री पृष्ठ ४९ येथे गोविंदसुत लिहितात " ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा काल ग्रहरूपाने आमच्या हाडामांसांत, सुखदुःखांत, लाभहानीत, पापपुण्यांत, धमकात, आप्तेष्टांत, संपत्तिसंततीत, जन्ममृत्यूंत इत्यादिकांत घुसून जखडून बसला आहे व आमच्या कर्माच्या दोया हलवीत आहे. हाडांचा मालक रवि हा कुंडलीत सुधारला असेल तर मनुष्य हाडस असतो; स्नायु व शिर यांचा मालक शनि यांचा संबंध, सप्तम स्थान हे गुह्यांग आहे त्याच्याशी असला की अंतर्गळाची व्यथा असते. अष्टमस्थान हे पश्चिमद्वार आहे, तेथें रवि, मंगळ, शनि, राहू यांचा संबंध असेल तर मूळव्याध असते. पंचमस्थानी गुरूचा संबंध असेल तर बुद्धि घेदांताकडे धाव घेते. कर्मस्थानी म्हणजे नवमस्थानी शनि, राहु अगर केतु एकटा असल्यास योगाकडे, ब्रह्मचर्याकडे, तीर्थयात्रेकडे प्रवृत्ति असते.
पत्नीवियोग ४१ पितृस्थानचा मालक अगर कारक रवि नीचीचा असल्यास दत्तकाचा योग येतो. असे अनुभव घेतलेले ठोकताळे किती तरी सांगता येतील. यावरून एवढा सिद्धांत बसतो की आपल्या देहाची व देहापासून घडणा-या कमांची सर्व सूत्रे ग्रहरूपाने म्हणा, कालरूपाने म्हणा विश्वंभराच्या हाती आहेत भाणि ती नियमबद्ध आहेत." इ. इ. पत्नीवियोग आमच्या मातोश्रींस शके १८३० आश्विन शु. १० ( इ. स. १९०८) रोजी पुणे मुक्कामी वयाच्या ४१ व्या वर्षी देवाज्ञा झाली त्या वेळी आम्ही मुंबईस सेकंड एल्. एल् बी. चा अभ्यास करीत होतो व आमचे धाकटे बंधु कै. श्रीरामपंत इंग्रजी पांचवे सहावे इयत्तेत असतील. आम्हां दोन बंधूंपेक्षा दोन लहान बहिणी अविवाहित होत्या. आमच्यापेक्षा एक वडील बहीण व आणखी २३ लहान भावंडे मातोश्रीच्या हयातीतच निवर्तली होती. २१३ महिन्यांपासून मातोश्री अत्यवस्थ आजारी असल्यामुळे दर ८१० दिवसांनी आम्ही मुंबईहून पुण्यास येत होतो व दसयाच्या सुट्टीनिमित्त आम्ही पुण्यास आल्यावर काही तासांनी पूर्ण शुद्धीत असतांना त्यांचे प्राणोत्क्रमण झाले, यामुळे मातोश्रींच्या अंत्य दर्शनाचे भाग्य आम्हांस लाभले. सौ. सावित्रीबाई प्रपंचांत अतीशय दक्ष असत. त्यांच्या माहेरची मंडळी श्रीमंत असली तरी त्यांच्या मदतीची व आधाराची मुळीच अपेक्षा न धरतां भापला प्रपंच अगदी गरिबींत काटकसरीने कसा करावा या बाबतीत त्यांचे उदाहरण कित्ता घेण्यासारखे आहे. कायम नोकरीच्या सुरवातीस गोविंदसुतांस प्रथम १२ रुपये दरमहा पगार होता व १९०८ साली प्रपंच वाढल्या वेळी दरमहा ४५ रुपयांपर्यंतच त्यांस पगारवाढ झाली होती. महिन्याचा पगार हाती येतांच गोविंदसुत तो पत्नीच्या हवाली करीत व आदा पाहून तिने काटकसरीने महिन्याचा खर्च चालवावा व जरूरीच्या वेळप्रसंगासाठी त्यांतूनच दोन पैसे राखून ठेवावे. अशा रीतीने प्रपंचाची बाजू तिने उत्तम रीतीने सांभाळलेली होती व यामुळे आपल्या पत्नीच्या हयातीत गोविंदसुतास प्रापंचिक व्यवस्थेची काळजी कधीच करावी लागली नाही. आम्हांला समजू लागल्यापासून सर्व बाजारहाट मातोश्री आमच्याकडूनच करून घेत असे व हिशोब वगैरे सर्व आम्हीच ठेवीत होते. गोविंदसुतांनी फक्त ऑफिसचें काम करावे व बाकी सर्व वेळ आपल्या आवडीप्रमाणे परमार्थचिंतनांत व इतर व्यवसायांत घालवावा असा क्रम चालू असे. पत्नीवियोगापासून गोविंदसुतांच्या पुढील भायुष्यक्रमांत एक प्रकारचा महत्वाचा फरक पडलेला गो.
४२ गोविंदसुत दिसून येतो. पत्नी असतांना प्रापंचिक गोष्टीत त्यांचे चित्त विशेष गढलेले असे असें मुळीच नाही. परंतु पत्नीवियोगानंतर त्यांची प्रापंचिक बाबतीत विन्मुखता व उदासीनता विशेष दिसून येई एवढे मात्र खरे. मुलींच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे होईपर्यंत सरकारी नोकरी करावयाची व नंतर राहिलेले आयुष्य परमार्थचिंतनांत, परोपकारांत व आत्मोन्नतींत घालवावयाचे असा त्यांनी अंतःकरणांत निश्चय केल्याचे दिसते व त्या निश्चयाप्रमाणे त्यांनी आपला पुढील आयुष्यक्रम पार पाडला. लेखनव्यवसायाला सुरवात गोविंदसुतांच्या परमार्थविषयक लिखाणाला प्रारंभ १९११ सालापासून म्हणजे वयाच्या ४९ व्या वर्षापासून झाला व प्रथम मुमुझंतून त्यांचे लेख " गोविंदसुत" अशा नांवाने येऊ लागले. गोविंदसुतांच्या आयुष्याचे ४८ व्या वर्षअखेर एक व त्यापुढे ७२ व्या वर्षापर्यंत दुसरा असे स्थूलमानाने दोन स्वतंत्र विभाग करण्यास हरकत नाही. ४८ व्या वर्षापर्यंत आपली प्रापंचिक कर्तव्ये उत्तम त-हेने पार पाडून त्याबरोबरच तीन तपांच्या संत. वाङ्मयाच्या दृढ अभ्यासाने त्यांचं अंतरंग परमार्थविचारांतही चांगलेच रंगून गेले होते व मुरलेले होते. आपण लेख लिहून जगासमोर लेखक म्हणून पुढे यावे व प्रसिद्धी मिळवावी अशी त्यांची केव्हांच इच्छा नव्हती अथवा आपल्या लेखांनी आतां जगास आपण उपदेश करून जगाचा उद्धार होणार आहे किंवा जगाची काही सुधारणा करून आपण जगाचे कल्याण करणार आहो अशा अहंकाराची भावना त्यांच्या मनास कधीच शिवली नाही. त्यांच्या अंतरंगांतील विचारांचे तरंग लेखणीतून कागदावर उमटविण्यास ह. भ. प. पांगारकर हेच मुख्यतः कारण झाले हे निःसंशय आहे. तथापि मुखाने नामस्मरण करावयाचे त्याऐवजी लेखणीने भगवंताचे स्मरण करावयाचे व आपल्या मनाशी चाललेले विचार आपल्या स्वतःच्याच आवडीसाठी व स्वतःच्याच मननासाठी व उन्नतीसाठी लिहून काढावयाचे अशा भावनेनेच ही विचारमाला गुंफण्यास सुरवात झाली. परमार्थविचारमाला भावृत्ति पहिली पृष्ठ ३० वर गोविंदसुत " माला " शब्दावर कोटी करून विनोदाने लिहितात, " पण मी हे एवढे अकांडतांडव करून ही माला कोणाकरता म्हणून निर्माण केली याचा उलगडा ‘परमार्थविचारमाला ' या नांवांतूनच होत आहे ! हा परमार्थविचार कोणाकरता आहे ? तर 'माला' म्हणजे माझा मलाच! माझ्या अंत:करणांत जे अहं आणि ममत्व भरले आहे त्यालाच हे पारमार्थिक विचार वारंवार सांगावयाचे आहेत. कारण, हा सर्व संसार त्या गोविंदसुत कोण ४३ महंममत्वातच भरलेला आहे म्हणून त्यालाच जागृति द्यावयाची आहे. नाही तरी कोण कोणाला काय सांगणार आणि त्याचा कोणाला काय उपयोग होणार? आपल्या मनाशीच विचार करावयाचा आहे. समर्थांनी तरी आपल्या मनालाच उपदेश केला आहे." आपल्या लेखनव्यवसायाची मीमांसा खुइ गोविंदसुतांनीच आस्मानुसंधानांत पृष्ठ ३ वर दिली आहे ती फार सूचक व बोधप्रद आहे. ते लिहितात, "माझा लहानपणापासून काळ्याचे पांढरे होण्यापर्यंतचा जवळजवळ तीन त काळ केवळ लेखणीने पांढ-यावर काळे करून पोटाची खळगी भरण्यासाठी परवशतेच्या तिखट पाशांत जाऊन शेवटी पेन्शनीचा काळ आला भाणि आता फक्त शेवटचा काळ येण्याचा राहिला आहे ! पांढन्यावर काळे करण्याला जिने सतत आपले काळें तोंड करून घेऊन जन्मभर मदत करून शेवटी अंतकाळापर्यंत खुशाल हरिहरि म्हणून काळ कंठण्याला पेन्शन करून दिले त्या लेखणीला सोडून भजन पूजनात काळ घालविण्याकडे प्रवृत्ति होणार कशी ? शिवाय आपण लेखणी हरिचरणी वाहिली तरी ती थोडीच स्वस्थ बसणार ? तिला दुसराच कोणी हरीचा लाल भेटून लिहीतच बसणार ! भापल्याला तरी लहानपणापासून लवलव लिहिण्याची लागलेली लकब लागलीच लोपून लयाला जाणार कशी ? म्हणून ज्या लेखणीने आजपर्यंत पोटोबाची सेवा केली त्याच लेखणीने आतां विठोबाची सेवा यथामति करावी आणि लेखनाच्या लहरींत हरिगुणलीला लिहून हरीला लेखांतून मुखांत भाणून त्याच्या चिंतनाने सुखांत राहावे या हेतूने लेखणीने देवाचे चिंतन करीत आहे !" - गोविंदसुत कोण वर्ष दोन वर्षपावेतों गोविंदसुतांची लेखमाला मुमुक्षूतून चालूच होती. समर्थांचे शिष्य 'दिनकर' यांचा ' स्वानुभव दिनकर ' ग्रंथ गोविंदसुतांनी वाचला, त्यातील मतामतांच्या गलबल्याचा उतारा देऊन तात्पर्यार्थही गोविंद- सुतांनी मुमुक्षूत दिला; येथपासून पहिला लेख सुरू होऊन आत्मशोधन, ज्ञानोत्तर भक्ति, उपासना, वैराग्य वगैरे एकापेक्षा एक सरस असे अनेक लेख येऊ लागले व उपासनेच्या दृढतेमुळे आध्यात्मिक विषयांत त्यांची लेखणी जास्तच रंगत गेली, तेव्हां ' गोविंदसुत' कोण अशी जिज्ञासा पाचकांस होऊन पुष्कळ लोक त्यांच्या नांवाची चौकशी करूं लागले त्यांस १८७११९१२ च्या मुमुक्षूत गोविंदसुतांनी पारमार्थिक भात जे विनोदी व मार्मिक उत्तर दिले आहे ते पुनः थोड्या संक्षेपाने येथे देण्याचा मोह ५४ गोविंदसुत आम्हांस आवरत नाही. गोविंदसुत लिहितात, " माझ्या नांवाची कित्येक प्रेमळ वाचक पृच्छा करीत असल्याचे समजल्यावरून मी त्यांचा आभारी आहे, परंतु हे ऐकून अनेक विचार माझ्या मनांत येऊन मौज वाटली ! (१) समुद्रकांठी लांबून एक पदार्थ येत होता, ते गलबत असावे अशा आशेने व्यापारी वाट पाहात होता, जरा जवळ आल्यावर ती होडी आहे असे वाटले, परंतु अगदी जवळ आल्यावर तो लाकडाचा ठोकळा आहे भसें पाहून निराशा झाली. तद्वतच माझें नांव समजल्यावर निराशा होईल म्हणून अभावाचा भोपळा फोडण्यापेक्षा तो कायम ठेवण्यांतच मौज आहे. २) मी काही साधु, जपी, तपी, संन्याशी, विद्वान् , योगी नाही. एक प्रापंचिकच असल्यामुळे अशाच्या क्षणिक देहाच्या क्षणभुंगर नांवांत काय अर्थ आहे ? (३) मी जो विषय आपल्यापुढे ठविला त्यांत गोडी नाही. आपण आपलेपणाने त्या विषयाला गोडी आणीत असतो. या न्यायाने प्रिय वाचकांनी स्वस्वरूपाच्या गोडीने माझ्या लेखाला गोडी आणली आहे ! (४) पुरुष प्रकृतीच्या संयोगांत उत्पन्न झालेल्या पुरुषाने मी नुसताच पुरुष म्हणणे वेडेपणाचें नाहीं काय ? लेखकवाचकांच्या संयोगांतच उत्पन्न झालेल्या लेखकास स्वतंत्र नांव कोठून असणार ? लेखकवाचकांची इच्छा हेच त्याचे नांवरूप ! (५) स्वरूपाच्या अनुभवाने प्रियवाचक गोविंदसुतास भेटू इच्छित असल्यास समर्थ म्हणतातः- तुम्हां आम्हां मुळी झाली नाही तुटी । तुटीविण भेटी इच्छितसां ॥ ( ६ ) छत्तीस तत्व प्रकृतीकडून पाहिले तर " बांधली आहे तो गांठोडी । जो कोणी विचारे सोडी । विचार पाहातां गांठोडी। आढळेना ।। या न्यायाने कोणत्या तत्त्वांवर बोट टेवून नामधारी दाखवावा ? (७) विश्वरूप परिपूर्ण । अवघा एकचि नारायण । परिपूर्ण विश्वाहून गोविंदसुत वेगळा राहिला काय ? किंवा नारायणाच्या एका नामाचे वजन करण्याकरतां सर्व विश्वरूप दुसन्या ताजव्यांत घातल्यावर नामरूपातीत, विश्वातीत असे जे काही मग राहिले त्याहून तरी गोविंदसुत वेगळा राहूं शकेल काय ? नसेल तर वाचकांनी आपल्याच नांवाचा शोध करीत करीत आपला थांग लावला असतां गोविंदसुत व प्रिय वाचक यांत भेद आहे काय ? अनेक उद्भवलेल्या विचारांपैकी ही स्नेहसंवर्धक सप्तपदी भारमज्योत पेटवण्यासाठी वाचकांस अर्पण करून परमात्मपदी लीन होतो." स्या परमार्थविचारमालेची प्रसिद्धी मुमुक्षूतून दीड वर्ष चाललेली लेखमाला अनेक वाचकांच्या भाग्रहास्तव पुस्तकरूपाने छापण्याच्या दृष्टीने मजकुरांत थोडा फार फरक करून व कित्येक परमार्थविचारमालेची प्रसिद्धी ४५ ठिकाणी प्रकरणे मार्गे पुढे करून शके १८३५ (इ. स. १९१३ ) मध्ये "परमार्थविचारमाला " या नांवाने प्रसिद्ध करण्यांत आली. १५०० प्रतींची पहिली आवृत्ति ३१४ वर्षांत खलास होऊन कांही वाचकांच्या मागण्या चालूच राहिल्या यावरून जनतेने या पुस्तकाचे प्रेमाने स्वागत केले हे उघड दिसते. केसरी ( ११।११।१३), मुमुक्षु ( ६।११।१३), श्रुतिबोध, ज्ञानांजन, महाराष्ट्र इत्यादि वर्तमानपत्रे व मासिके यांच्या विद्वान् संपादकांनी व सुप्रसिद्ध विद्ववर्य प्रो. शि. म. परांजपे यांनी (चित्रमयजगत् दिसेंबर १९१३) अनुकूल अभिप्राय देऊन प्रेम व्यक्त केले. वेदांतरत्न सुप्रसिद्ध प्रो. रा. द. रानडे एम्. ए. यांना तर ही विचारमाला फार प्रिय होऊन ते आपल्या परमप्रिय मातोश्रींना ती नित्य वाचून दाखवीत असत. या पुस्तकावर अत्यंत प्रतिकूल अभिप्राय फक्त विविधज्ञानविस्ताराच्या १९१५ च्या ऑक्टोबरच्या अंकांत आला आहे व तो 'गच्चीवरील गप्पां'चे कर्ते विद्वद्वर्य ना. गो. चाफेकर यांनी लिहिला आहे व या लेखाला ज्ञानांजनच्या १९१५ डिसेंबरच्या अंकांत वेदांतप्रवीण कै. रामकृष्ण वासुदेव बर्वे, बी. ए. यांनी परभार उत्तरही दिले आहे. परमार्थाविचारमालेच्या काही प्रकरणांतील पृष्ठेच्या पृष्ठे तोंडपाठ करून त्यांच्या आधाराने आपल्या कीर्तनाचा पूर्वरंग उत्कृष्टपणे सजविणा-या कित्येक कीर्तनकारांची कीर्तने आम्ही ऐकली आहेत. त्याचप्रमाणे परमार्थविचारमालेची पहिली आवृत्ति खलास झाल्यावर महाराष्ट्रांतील कांहीं नामांकित कीर्तनकारांनी गोविंदसुतांकडे येऊन त्यांच्या खाजगी प्रतीवरून पृष्ठेच्या पृष्ठे मजकूर हाताने उतरून घेऊन आपल्या बाडांत संग्रहीं ठेवलेला असल्याची आम्हांस माहिती आहे. सुमारे ५०० पानांची ही लेखमाला मुमुक्षूत चालू असतांना व त्यानंतर ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत असतांना गोविंदसुत हे कलेक्टर कचेरीत खर्डेघांशीची नोकरी करीत होते व ती नोकरी सांभाळून मुमुक्षुच्या प्रत्येक आठवड्याच्या भंकांत नियमितपणे मजकूर लिहून देण्यांत कधीही खंड पडला नाही हे लक्षात घेण्याजोगे आहे. १९११ च्या डिसेंबर महिन्यांत आम्ही पुण्यास प्लेगर्ने अत्यवस्थ आजारी होतो. त्या वेळी ऑफिसचे काम, परांतील प्रापंचिक काम व आमची वेळच्या वेळी औषधपाण्याची व्यवस्था इतक्या सर्व गोष्टी सांभाळून आमच्या उशाशी बसून अत्यंत स्थिर बुद्धीने मुमुक्षूतील काही लेख गोविंदसुतांनी लिहिले आहेत याचा उल्लेख करणे भवश्य आहे. पुस्तकाचे काम चालू असतां व ते बाहेर पडल्यावर मुमुक्षूतील गोविंदसुतांच्या लेखांस काही दिवस खंड पडला होता. त्या वेळी अनेक वाचक मुमुक्षुकारास भाग्रहाने लिहीत की गोविंदसुतांना भाणखी लेख लिहिण्यास ४६ गोविंदसुत लावा. त्याप्रमाणे मधून मधून मुमुक्षूत लेख येतच असत. परंतु सेवानिवृत्त होईपर्यंत गोविंदसुतांनी आपले नांव कोणत्याच लेखांत प्रगट केले नाही. पेन्शन घेतल्यानंतर गोविंदसुतांनी १९१७ साली ' रहस्य-निरीक्षण' आपला दुसरा ग्रंथ प्रसिद्ध केला त्या वेळी यांनी आपले समग्र नांव या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरच प्रगट केले आहे. , रहस्यनिरीक्षणाचे प्रकाशन परमार्थविचारमालेप्रमाणेच रहस्यनिरीक्षण हा सुमारे ३०० पानांचा ग्रंथही क्रमशः मुमझुंतून प्रथमतः प्रसिद्ध होत गेला व बोलून चालून ही टीकात्मक व खंडणपर लेखमाला असल्यामुळे व वर्तमानपत्रांत आगाऊ प्रसिद्ध होऊन तिची वाफ अगोदरच निघून गेली असावी असे वाटल्यामुळे हे लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा मुळीच इरादा नव्हता. परंतु हे लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे अशा सूचना बन्याच वाचकांकडून आल्या व कित्ये. कांनी आगाऊ ग्राहक होऊन व इतर लोकांकडूनही आश्वासने मिळवून देऊन प्रकाशनास प्रोत्साहन दिले, तथापि भीतभीत १००० प्रतींचीच आवृत्ति काढली. परंतु अनपेक्षितपणे १२ वर्षांतच सर्व प्रती खलास होऊन त्यानंतर एकसारख्या चालू असणान्या असंख्य मागण्यांस नाइलाजाने नकार कळवून नाराज करावे लागले. या ग्रंथावरही वर्तमानपत्रांतून व मासिकांतून अनेक अनुकूल व प्रतिकूल अभिप्राय आले व कित्येक वादविवादात्मक सभांतून कोणी या पुस्तकाचा आधार घेत तर कोणी या पुस्तकावर तुटून पडत. गीतारहस्याचे खंडण अगर मंडण चालू आहे व त्यांत गोविंदसुतांच्या टीकाग्रंथाचाही उल्लेख होत आहे अशा कित्येक चचीत्मक वादळी सभांस गोविंदसुत हजर असण्याचाही योग येईप त्यांस भाषण करण्याबद्दल कधी आग्रहही होत असे. परंतु जाहीर सभांतून वक्तृत्व त्यांनी कधीच केले नाही. नोकरीत असतांनाही लेखक म्हणून त्यांची प्रसिद्धी पुष्कळ झाली होती, परंतु त्या वेळी त्यांस जाहीर सभांत भाग घेण्यास कोणी आग्रह करीत नसत हे स्वाभाविक आहे. परंतु आतां सेवानिवृत्त झाल्यावर व रहस्यनिरीक्षणांत स्वतःचे नांव प्रगट केल्यावर त्यांस वस्तुतः जाहीर सभांतून भाषण करण्यास हरकत नव्हती. वक्तृत्वकला त्यांस अगदीच पारखी होती असें नाहीं. १०५ लोकांच्या खाजगी बैठकीत अध्यात्मावर चर्चा करून निरूपण करणे ही गोष्ट तर त्यांच्या दररोजच्या व्यासंगापैकी होती. परंतु ज्या ठिकाणी विविध हेतूंचे व विविध प्रकारच्या अधिकाराचे कोक जमतात त्या ठिकाणी अध्यात्मचर्चा करणे भप्रशस्त अशा समजुतीने जाहीर .
रहस्यनिरीक्षणाचे प्रकाशन समातून भाषण करण्याचा व वादविवाद करण्याचा आपल्या सर्व आयुष्यात गोविंदसुतांनी कधीच प्रयत्न केला नाही. अमळनेर येथे ह. भ. प. पांगारकर यांच्या एका जाहीर व्याख्यानाचे वेळी त्यांस येथील रहिवाशांनी आग्रह. पूर्वक अध्यक्ष केले होते व नाशिक येथे एका प्रसंगी त्यांचे प्रवचन झाल्याचे वृत्तपत्रांत आम्ही वाचलें होतें याखेरीज जाहीर सभांत त्यांनी कधीच तोंड उघडल्याचे आम्हांस माहीत नाही. लेखनद्वारा विचार मांडण्याची गोष्ट थोडी भिन्न असते. ज्या जिज्ञासूला त्या विषयाची गोडी असेल तोच सहसा त्या विषयावरील लेख बारकाईने वाचणार. सभेला कित्येक लोक शुद्ध करमणुकीसाठी जमतात, त्याप्रमाणे केवळ करमणुकीसाठी कोणीही अध्यात्मासारख्या गंभीर विषयावरील लेखांकडे सहसा वळणार नाही. तथापि विनोदी गोष्टी व चटकदार दृष्टांत यांचा आश्रय करून वेदांतासारख्या गहन विषयाचेही प्रतिपादन गोविंदसुतांनी आपल्या लेखनशैलीने सामान्य वाचकांसही आकर्पक केले होते यांत शंका नाही. केसरीने आपल्या अभिप्रायांत एकदां लिहिले होते की गोविंदसुतांच्या पुस्तकांतील प्रसंगोपात आलेले दृष्टांत व चटकदार गोष्टी एवढ्याच निवडून एकत्रित केल्या तरी त्या वाचनीय होतील. नाटके व कादंबऱ्याच वाचण्याचा शोक असलेल्या एका वाचकाने एकदा रहस्यनिरीक्षण पुस्तक व्ही. पी. ने मागविले. पुस्तक उघडून पाहाताच त्याने गोविंदसुतांस पत्र लिहिले की रहस्यनिरीक्षण ही एक शृंगारिक कादंबरी असेल अशी पुस्तकाच्या नावावरून समजूत झाल्यामुळे आम्ही पुस्तक मागविले परंतु त्यांत निराळाच विषय निघाला व त्यांत भामची गति मुळीच नाही तरी पुस्तक परत घ्याल काय ? आम्ही त्यांस लिहिले की अशा प्रकारची दिशाभूल होण्याजोगी जाहिरात आम्ही कोठेच दिली नव्हती, तथापि आपण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा व आपणास त्यांत कांहींच गोडी वाटण्याजोगी नसेल तर आम्ही परत घेण्यास तयार आहों व किंमतही परत देऊ. यानंतर पुस्तक भामचेकडे परत आले नाही. लोकशिक्षण मासिकाच्या जून १९१८ च्या अंकांत विद्ववर्य श्री. न. चिं. केळकर यांनी 'रहस्य- निरीक्षणाचे निरीक्षण ' या शीर्षकाखाली या पुस्तकाच्या गुणदोषां- बद्दल विवेचनात्मक असा एक सुंदर लेख लिहिला आहे त्यांतील उतारा देऊन हा भाग संपवितो. श्री. तात्यासाहेब केळकर लिहितात," गीतारहस्यावर भाजवर अनेक टीकात्मक लेख लिहिले गेले आहेत, पैकी काही अंधभक्तांनी अतएव सर्वस्वी स्तुतिपर व कांहीं अंधविरोधीयांनी लिहिलेले अतएव केवळ निंदापर असे आहेत....गोविंदसुत यांचे रहस्यनिरीक्षण हा अंधभक्तीचा किंवा अंधविरोधाचा परिणाम नाही ही गोष्ट या टीका ग्रंथासंबंधाने प्रथमच लक्षांत गोविंदसुत येते....गोविंदसुत यांनी हा जो टीका ग्रंथ लिहिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणेच योग्य आहे ....स्तुति करण्यांत ते जितके मर्मपटु आहेत तितकेच प्रतिकूल टीकेचा हल्ला चढवितांना त्यांना निष्ठुर होता येते. इंग्रजी ग्रंथांच्या परिशीलनाने येणाऱ्या आगंतुक विद्वत्तेचा जरी त्यांच्या ठिकाणी कोठे मागमूसही दिसत नाही, तसेंच संस्कृत भांडाराशीही जरी त्यांचा विशेष परिचय दिसत नाही तरी वेदांतज्ञानांत ते पुरे मुरलेले असले पाहिजेत असे त्यांच्या कोण- स्याही ग्रंथवाचकांस कबूल करावे लागेल. समर्पक उपमा व दाखले देणे व मधून मधून हळूच लौकिक गोष्टी सांगून सिद्धांत पटविणे या कामी लेखकाची चतुराई विशेष दिसून येते....गीतारहस्यकारांशी दोन हात करण्याचे धैर्य व आत्मविश्वास रा. चिंचाळकर यांनी बाळगिला व दीर्घ परिश्रमाने हा टीकाग्रंथ निर्माण केला याबद्दल आम्ही त्यांचे फिरून एकवार अभिनंदन करतो. आदरयुक्त प्रेम आणि सत्यान्वेपणापुरती खरमरीत टीका व विरोध करण्याचे धैर्य यांचा समुच्चय जर कोठे कोणास पाहावयाचा असेल तर हा ग्रंथ त्याचा एक उत्तम नमुना आहे असे आम्ही म्हणतो." परमार्थ. विचारमाला व रहस्यनिरीक्षण या दोन ग्रंथांमुळे एक आध्यात्मिक वाङ्मय. लेखक म्हणून पुण्यांत व महाराष्ट्रांतही गोविंदसुतांची बरीच प्रसिद्धी झाली होती यांत शंका नाही. कै. हरी रघुनाथ भागवत यांनी पुणे शहराचे १९०१ ते १९२० सालचे वर्णन म्हणून एक पुस्तक १९२४ साली प्रसिद्ध केले आहे. त्यांत पुण्यातील बौद्धिक क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून या वीस वर्षांच्या मुदतीत पुण्यास वावरणाच्या सुमारे १२५ हयात व दिवंगत व्यक्तींची माहिती दिली आहे त्यांत वरील पुस्तकांचे कर्ते म्हणून गोविंदसुतांचा उल्लेख आलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर कित्येक पेन्शनर लोकांना सेवानिवृत्त झाल्याबरोबर वेळ कसा घालवावा याबद्दल मोठी पंचाईत पडते व ज्यांच्या डोक्यांत नोकरीतील कामकाजाशिवाय रात्रंदिवस दुसरा कांहींच विषय नसतो ते तर पेन्शन घेतल्यावर शून्यमनस्क होतात. यामुळे वेळ जाण्यास साधन या दृष्टीने अथवा सांपत्तिक नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने पुष्कळ पेन्शनर लोक खाजगी अगर निमसरकारी संस्थांव अगर संस्थानांतून पुनः नोकच्या धरतात व यावज्जीव नोकरीचे वातावरण त्यांस सोडवत नाही. गोविंदसुत सेवानिवृत्त झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रांतील एका संस्थानांत त्यांच्या विशेष स्नेहांतील असे एक पेन्शनर डेप्युटी कलेक्टर मोट्या हुद्यावर होते. त्या संस्थानांतील मुलकी खात्यातील एक वरिष्ठ दर्जाची जागा दरमहा रु. ७५ पगाराची त्यांनी गोविंदसुतांस देऊ केली होती. गोविंदसुतांची गोविंदसुतांना (खुर्चीवर डावीकडून नं. ३ ) सेवानिवृत्त झाल्यावेळी पानसुपारी झाली त्या समारंभाचा घेतलेला फोटो.
No text on this page.
पाचनव्यवसाय होकार दिला असता तर सहजगत्या ती जागा त्यांस मिळाली असती, कारण जरी त्या जागेसाठी पुष्कळ पदवीधरांची खटपट होती तरी गोविंदसुत हे मुलकी खात्यांतील मुरब्बी आहेत अशी त्यांची लायकी जाणूनच त्यांस स्या स्नेह्यांनी त्या जागेचा स्वीकार करण्यास सुचविले होते. परंतु गोविंदसुतांच्या भंत:करणांत द्रव्यतृष्णेचा अभाव व स्वातंत्र्याची लालसा असल्यामुळे " मला मीठभाकरीपुरतें पेन्शन मिळते त्यांतच मी संतुष्ट आहे" असे सांगून गोविंदसुतांनी ती नोकरी साभार नाकारली. त्यांनी मनांतच आणले असते तर पेन्शन घेतल्यानतर १०/१२ वर्षे त्यांस अशी नोकरी सहज करतां भाली असती. परंतु असे करण्याने त्यांच्या आयुष्यऋमांतील जे विशेषरख आज जनतेसमोर दिसत आहे ते दिसले नसते. ज्या पेन्शनर लोकांना भवांतर वाचनलेखनाचा अगर विचार करण्याचा नाद नसतो त्यांस पेन्शना. नंतर वेळ कसा जाईल याची पंचाईत पडते अथवा केवळ ख्यालीखुशालीत व रिकामटेकड्या गप्पागोष्टींत ते आपल्या वेळेचा अपव्यय करतात किंवा ते लवकरच मृत्युमुखी पडतात. परंतु गोविंदसुतांवर पेन्शन घेतल्यानंतर अशी कांहींच आपत्ति मोढवली नाही, उलट त्यांच्या कार्याचा व्याप इतका काही वाढला होता की दिवसाचे चोवीस तास त्यांस पुरत नसत. या कार्यव्यापाचे मुख्यत्वे करून तीन प्रकार सांगता येतील. (१) वाचन (२) लेखन. व्यवसाय व (३) प्रवास. . वाचनव्यवसाय वाचनाच्या प्रकारांत दररोजची वृत्तपत्रे हा विषय अवश्य असे. अमळनेरला गोविंदसुतांचा मुक्काम असला म्हणजे वर्तमानपत्राचे सर्व टपाल प्रथम त्यांचेकडेच यावयाचे व त्यांचे वाचन एक तासाच्या मांत होऊन मग वाचनालयाच्या जागेत सर्व वृत्तपत्रे जावयाची अशी मुद्दाम व्यवस्था येथील सार्वजनिक वाचनालयाचे चिटणीस श्री. भिडे वकील ठेवीत असत प वाचनालयाचा जास्तीत जास्त फायदा घेणारा गोविंदसुतासारखा वाचक कोणीच मिळावयाचा नाही असे चिटणीस मोठ्या कौतुकाने व अभिमानाने सांगत असतात. मराठी वृत्तपत्रे वाचून झाल्यावर इंग्रजी दैनिकांत जरा ताजी बातमी असते सबब त्यांतील ठळक मथळ्यावरून भापली सूक्ष्म नजर फिरविल्यावांचून ते राहात नसत. मासिकें ॥२ दिवस ठेवून सविस्तर वाचीत व आपल्या विचारसरणीला पोषक असा मजकूर जर कोठे भाला वर तो नेमका भापल्या स्मरणवहींत उतरून घेतल्याशिवाय राहात नसत. गो. ७ ५० गोविंदसुत "आधिभौतिक सुधारणा व आध्यात्मिक धारणा हा गोविंदसुतांचा ग्रंथ वरवर जरी वाचून पाहिला तरी गोविंदसुतांचे वाचन किती जबर होते ते दिसून येईल. प्रस्तावना पृष्ठ ४३।४४ वर आधारभूत ग्रंथ व ग्रंथकार वगैरेची यादी देण्यापूर्वी गोविंदसुत लिहितात, " प्रस्तुत ग्रंथांत अध्यात्मविचार जसे समर्थ, तुकाराम, ज्ञानोबा, नाथ इत्यादि संतांच्या अनुभवी वाणीद्वारा स्फुरले भआहेत तसे आधिभौतिक विचार प्रगट करण्याला पुष्कळ ग्रंथ, मासिके,वर्तमानपत्रे यांचे बहुमोलाचे सहाय्प झाले आहे त्यांची नांये ठिकठिकाणी ग्रंथांत दिली आहेत." नाटके, कांदबया व गोष्टी अशा वाङ्मयाची गोविंदसुतांस मुळीच आवड नसे, किंबहुना केवळ करमणुकीपलीकडे प्रायः अशा वाङ्मयाचे ध्येय नसते म्हणून या " रजोगुणात्मक रंजना" वर " संत आणि त्यांचे ग्रंथ " या प्रकरणांत व अन्यत्रही गोविंदसुतांनी पुष्कळच फाडक टीका केली आहे व अशा वाङ्मयाचे प्रायः जे नमुने पुढे येतात त्यांस अनुलक्षून ही टीका आहे व शेवटी कोणाच्याही अंतराला धक्का लावू नये म्हणून समारोप करतांना लिहिले आहे " जग हे अनंत असून ‘भिन्नरुचिहि लोकः ' हे असावयाचेच. म्हणून हल्लींची रंजने आणि करमणुकी पारमार्थिक दृष्टींनी त्याज्य असली तरी प्रापंचिकांच्या या करमणुकीच होत. म्हणून त्यावर बोलण्याचा आपल्याला अधिकार नसून उपयोगही नाही. यासाठी या करमणुकांचे चालक, मालक व वाचक यांच्या मार्गाच्या आड आपण न जातां 'चलती है सो चलना देव ' अशी त्यांना विनंति करून पारमार्थिक दृष्टीने ग्रंथ कसा असावा तें सांगतों" वगैरे. नवाकाळकर्ते लिहितात " गोविंदसुतांना जशी वाचनाची जबर हौस होती तसाच अतिशय होता. अलीकडे प्रकृति खालावली असतांही मिळतील तेवढी वृत्तपत्रे, मासिके आणि नवीं निघणारी पुस्तके मार्मिक दृष्टीने वाचण्याचे काम अखंड चालले होते. प्रवासांतही त्यांच्या व्यासंगाला खळ पडत नव्हता. मिळेल तेवढे वाङ्मय वाचावे आणि जुळेल तेथें चर्चा करावी हेच त्यांना जणूं काय व्यसन होतें. त्यांचे शिक्षण अवधे मराठी सहा इयत्तांपर्यंत झाले होते परंतु वाचनाची आवड जबर असल्याने त्यांनी आपले ज्ञान वाढविण्याचा क्रम अखेरच्या घटकेपर्यंत चालविला होता." एखाद्या वेळी प्रवासांत असतां कांहीं वृत्तपत्रे व मासिकें त्यांस मिळाली नाहीत तर ते मागील अंक जपून ठेवण्याबद्दल अमळनेर येथील वाचनालयाला मुद्दाम सूचना देऊन येथे आल्यावर त्यांचे अवलोकन करीत. वर्तमानपत्रासारख्या हलक्या वाङ्मयाकडे दिवसांतून २॥२॥ तास दिल्यानंतर गंभीर व भारदस्त वाङ्मयाचेही ते नित्यशः वाचन करीत. नेहमी एखाद दुसन्या नवीन पुस्तकाचे वाचन चालूच असे. अमळनेरला लेखनाचा नाद
No text on this page.
गोविंदसुत लिहीत बसले आहेत.
लेखनव्यवसाय मुक्काम असला म्हणजे सकाळची अगर सायंकाळची सहल ४२ दिवसांनी येथील तत्वज्ञानमंदिराकडे ठरलेली असे व तेथें नवीन आलेल्या पुस्तकांचा शोध करून काही पुस्तके तेथल्या तेथेच व काही घरी आणून वाचीत. येथील सार्वजनिक वाचनालयांतील जुन्या व नव्या पुस्तकांच्या याद्या ते दरसाल चाळीत व एकाच वेळी वाटेल तितकी पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जाण्यास त्यांस मुभा असे, कारण त्यांच्यापाशी पुस्तकें उगीच रिकामी कधीही पडावयाची नाहीत व वाचन झाल्याबरोबर ती ताबडतोब बिनचूक वाचनालयांत परत जावयाची अशी खात्री असे शिवाय त्यांच्या निवडीची पुस्तके म्हणजे बहुधा भारदस्त वाङ्मयाची असत व अशा पुस्तकांची मागणी नेहमीच्या वाचकांकडून फारशी नसावयाचीच. पाश्चिमात्य तत्त्ववेत्यांचे जेवढे विचार मराठीतून वाचावयास मिळतील तेवढे ते वाचीत असत. आधिभौतिक सुधारणेच्या प्रस्तावनेत गोविंदसुत लिहितात, “ मनुष्याचे अंतःकरण हे एक ज्ञानमधाचे पोळे आहे व कल्पना ही मधुमक्षिका आहे ज्ञानाचा मधुमेवा बाहेरच्या अनुभवाने अंतःकरण- पोळ्यांत ही कल्पना मधुमक्षिका सांठविते व त्याचा आस्वाद यथामति घेऊन पो थबथबू लागले म्हणजे ग्रंथाच्या किंवा वक्तृत्वाच्या रूगने ती बाहेर टाकून अंतःकरण मोकळे करीत असते. " गोविंदसुतांचा लेखनव्यवसाय हा त्यांच्या दीर्घवाचनाचा व मननाचा अगदी स्वाभाविक परिणाम आहे असे प्रत्ययास येते व वयाच्या ४८ व्या वर्षापर्यंत ज्ञान अंतःकरणांत पूर्ण मुरल्या. नंतर मग ते लेखनरूपाने प्रगट झाले आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. जाहीर सभांतून वक्तृत्वरूपाने गोविंदसुतांनी आपले ज्ञान कधीच प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला नाही याचा उल्लंख पूर्वी आलाच आहे. परंतु त्यांचा मुक्काम कोठेही असला तरी परमार्थ मार्गातील मुमुक्षु व साधक त्यांस नेमके हुडकून काढीत व सकाळ, सायंकाळ व रात्रीही पारमार्थिक विषयांवर मंथांच्या आधाराने बोधपर चर्चा, निरूपण व सुखसंवाद त्यांच्या समवेत नेहमी चालत असे. ART- लेखनव्यवसाय सेवानिवृत्त होण्यापूर्वी ५।६ वर्षांपासून गोविंदसुतांच्या लेखन. व्यवसायाला सुरवात झाली होती हे वर सांगितलेच आहे. रहस्यनिरीक्षणांत नांव प्रगट केले होते तरी त्यानंतर सुद्धा ' गोविंदसुत' अशा नांवानेच ते मुमुक्षून व इतर मासिक पुस्तकांतून व वर्तमानपत्रांतून लेख लिहीत असत व गोविंदसुत कोण हे वाङ्मयक्षेत्रांत संचार करणा-या विद्वान् लोकांस त्यांचे एक गोविंदसुत बहुधा जाहीर असल्यामुळे कित्येक मासिके आपल्या विशेष अंकांकरता अगर एरवीही चालू अंकांसाठी गोविंदसुतांकडे लेखांची मागणी करीत व सवडी. प्रमाणे मुमुक्षूखेरीज पुण्याचे ज्ञानसंग्रह, औंध येथील पुरुषार्थ, अमळनेर पेथीक तत्त्वज्ञानमंदिर, इंदूर येथील आत्मबोध वगैरे मासिक पुस्तकांतून व मवाकाळ वगैरे वर्तमानपत्रांतून गोविंदसुतांनी वेळोवेळी लेख लिहिलेले माहेत. मुमुक्षूत १९२० साली चिपळूण येथील ह. भ. प. गोपाळबुवा केळकर पा प्रेमळ हरिभक्तांचे चरित्र गोविंदसुतांनी लिहिले आहे तसेच जानेवारी ते एप्रिल १९३० च्या मुमुक्षु मासिकांत गोविंदसुतांची ज्यांच्यावर विशेष भक्ति होती त्या ब्रम्हीभूत श्री वासुदेवस्वामी धामणीकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. जानेफळ ( प्रांत वन्हाड ) येथील श्री अवधूतानंद स्वामी यांचे गोविंदसुतांवर व त्यांच्या ग्रंथांवर फार प्रेम असे. सदरहू स्वामी शके १८४३ साली समाधिस्थ झाले. स्वामींच्या हयातीतच गद्य चरित्र स्वामींच्या शिष्यांनी प्रसिद्ध केले होते तें गोविंदसुतांच्या नजरेखाली घालून व त्यांच्या चार प्रास्ताविक शब्दांसह प्रसिद्ध करण्यांत आले होते व स्वामींच्या पश्चात् शके १८५२ साली स्वामींच्या शिष्यांनी जें पद्यमय चरित्र प्रसिद्ध केले तेही गोविंदसुतांच्या खास देखरेखीखालीच अमळनेर येथे छापून प्रसिद्ध करण्यांत भाले होते. वन्हाडांत गोविंदसुत गेले म्हणजे जानेफळ संस्थानांतील काही प्रेमळ शिष्यवर्गाच्या आग्रहावरून ते कधीकधी जानेफळ येथे जात असत. सेवानिवृत्तीनंतर गोविंदसुतांचे महत्वाचे असे दोन ग्रंथ लिहून प्रकाशित झाले आहेत. आत्मानुसंधान हा ग्रंथ शके १८४२ इ. स. १९२० साली लिहून प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी पुष्कळ वर्षे अगोदर परमार्थविचारमालेची पहिली आवृत्ति संपून गेली होती व त्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ति काढण्याबद्दल वाचकांची एकसारखी मागणी चालू होती. परंतु परमार्थविचारमातील लेख हे बोलून चालून वर्तमानपत्रांत दर भाठवड्यांत प्रसिद्ध होण्याच्या दृष्टीने लिहिलेले होते व जरी ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करतांना मागे पुढे करून व थोडाफार बदल करून प्रसिद्ध केले होते तरी स्वतंत्र ग्रंथ या दृष्टीने विचार करतांना त्यांत अनेक दोष राहाणे स्वाभाविक होते. ते दोष दूर करून स्वतंत्र रीतीने प्रकरणे गुंफून मालेच्या ऐवजी मातील विचारसरणीस अनुसरूनच परंतु एक प्रकारे मालेची सुधारून काढलेली आवृत्ति अशा दृष्टीने आत्मानुसंधान नौवाचा ग्रंथगुच्छ प्रसिद्ध झालेला आहे. पेन्शन घेतल्यामुळे या वेळी गोविंदसुतांस वेळही भरपूर होता व पुष्कळ वाचकांच्या मते गोविंदसुतांचे खरे आध्यात्मिक अंतरंग याच लेखनव्यवसाय ग्रंथांत उत्कृष्ट रीतीने प्रगट झालेले आहे. या ग्रंथावर कोणी प्रतिकूल टीकेचे हल्ले चढविल्याचे आम्हांस माहीत नाही व कित्येक भाविक आणि प्रेमळ वाचक या ग्रंथाची पोथीप्रमाणे पूजा करतात व नित्यवाचनांत हा ग्रंथ ठेवून त्याची पारायणे करतात असे आम्हांस माहीत आहे. यानंतर १९२६ च्या प्रारंभी "मराठी साधुकवि वि. प्रो. शि. म. परांजपे" हे एक लहानसें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत आले, परंतु १९१४ साली या मथळ्याखाली मुमुक्षूत जे लेख गोविंदसुतांनी लिहिले होते त्यांचेच हे पुनर्मुद्रग होय व प्रो. परांजपे यांनी १९१३ साली एक लेख लिहिला होता तोच त्यांनी पुनः १९२५ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्यामुळे त्या निमित्ताने गोविंदसुतांनाही त्या लेखावरील आपले टीकात्मक लेख पुनः पुस्तकरूपाने छापले इतकेंच, १२ पृष्ठांच्या नवीन प्रस्तावनेखेरीज या पुस्तकांत बाकी सर्व मजकूर १९१४ साली मुमुझंतून भालेला जुनाच आहे शके १८४८ (सन १९२६ ) साली " आधिभौतिक सुधारणा व आध्यात्मिक धारणा' हा ५००।५५० पृष्टांचा ग्रंथ गोविंदसुतानी लिहून प्रसिद्ध केला. हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यावर त्याने २३ वर्षे तरी विचारी लोकांच्या अंतःकरणांत खळबळ उडवून दिली होती यांत शंका नाही. या ग्रंथावर अनेक विद्वानांच्या अनुकूल प्रतिकूल टीका पुष्फळ च प्रसिद्ध झाल्या व या पुस्तकाच्या पूर्वार्धातील अनेक विषयांवर कित्येक वर्षेपर्यंत अनेक लेखक व वक्ते आपल्या लेखातून व भाषणांतून साधक अगर बाधक विचार प्रगट करीत होते. मुमुक्षु ( डिसेंबर १९२६ ), नवाकाळ ( २६।८।२६ ) व केसरी (ता.२२।२।२७) यांत या पुस्तकावर आलेले सविस्तर अभिप्राय वाचनीय आहेत. या ग्रंथांच्या पूर्वार्धातील विवेचनाचा काही भाग जरी आधुनिकांस पटण्याजोगा नाही तरी प्रौढ व चित्तवेधक भाषेमुळे तो भाग आल्हादकारक व वाचनीय आहे व अनेक पक्षोपपक्षांना त्यांत उत्तम खाद्य आहे हा सर्व अभिप्रायांचा सारांश आहे. एकीकडे आधुनिक सुधारणावाद्यांनी या पुस्तकाच्या पूर्वार्धाला माके मुरडली, तर दुसरीकडे या पुस्तकांतील राजकारणासंबंधाने लिहिलेले काही विचार सरकारी अधिकान्यांस रुचले नाहीत. कायद्याच्या दृष्टीने भाक्षेप घेण्याजोगा मजकूर पुस्तकांत कोठेही आढळण्याजोगा नाही. परंतु कौन्सिल- बहिस्कार वगैरे त्या वेळच्या काँग्रेसच्या विचारसरणीस पुष्टि देणारे विचार काही ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत व ब्रिटिश राजनीतीच्या बाबतीत ठिकठिकाणच्या पुढान्यांचे उतारे दिले आहेत तशा प्रकारची विचारसरणी सरकारी पेन्शनरांची तरी असू नये व अशा विचारसरणीचे लेख पुनः लिहिल्यास सरकारी पेन्शन बंद करण्याचे बाबतींत विचार करावा लागेल अशी समज सरकारकडून पुण्याच्या डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेटमार्फत ५४ गोविंदसुत गोविंदसुतांस देण्यात आली होती. ही हकीकत १९२७/२८ सालांतील आहे. गोविंदसुतांस डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे बोलावणे आले त्या वेळी कदाचित् कांहीं खुलासा द्यावा लागेल व दुभाष्याचे काम पडेल म्हणून आम्हीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. परंतु वरून लिहून आलेला मजकूर साहेबांनी जशाचा तसाच वाचून दाखविला व पांच मिनिटांतच आम्हांस रजा दिली. तुमचा खुलासा वगैरे काही एक घ्यावयाचा नसून सरकारचे म्हणणे फक्त तुम्हांस कळवावयाचे आहे अशी समज साहेबांनी आम्हांस दिली. काही दिवसांनी आमच्या कानावर अशी एक वार्ता आली की साहेबांच्या ऑफिसांत हा हुकुम आल्यानंतर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याबद्दल साधारण चौकशी साहेबांनी केली होती व त्यांस समजून भाले होते की आपल्याच ऑफिसमध्ये १७११८ वर्षे कारकुनीचे काम केलेले हे गृहस्थ आहेत, तसेंच आपणांस मराठी शिकविणा-या पंडितापाशीही ग्रंथकाराच्या लायकीबद्दल साहेबांनी मोघम चौकशी केली होती व या ग्रंथकाराचं लेखन मराठी भाषेच्या व विचारांच्या दृष्टीने बरेच वरच्या दर्जाचे व लोकप्रिय आहे असे त्यांस सहज शोधांत समजले होते ! शके १८५० ( सन १९२९ ) साली परमार्थविचारमालेची सुधारलेली दुसरी आवृत्ति गोविंदसुतांनी प्रसिद्ध केली व त्यासाठी त्यांस पुण्यास सतत ८।१० महिने मुक्काम करावा लागला. पुस्तकाची दुसरी आवृत्ति असे जरी म्हटले असले तरी सुधारणेच्या व फेरफारांच्या दृष्टीने त्यांनी बऱ्याच ठिकाणी नवीन मजकूर लिहून काढला. पुस्तके व वर्तमानपत्रांतील व मासिकांतील लेख याखेरीज गोविंदसुतांचा खाजगी पत्रव्यवहाराचा लेखनव्यवसाय फारच जबर असे. दररोज १०१५ पत्रे लिहिणे ही गोष्ट त्यांच्या अगदी नित्यक्रमांतील असे. पत्रव्यवहारांत त्यांच्याइतकी तत्परता व नियमितपणा पाळणारे इसम सुशिक्षितांत शेकडा ५ तरी आढळतील किंवा नाही याची शंका आहे. त्यांच्याकडे दररोज येणारा पत्रव्यवहार तितकाच विपुल असे व त्याची यथायोग्य व्यवस्था लावण्यांत त्यांचे दररोज १२ तास खर्च होत असत. या पत्रव्यवहारांत विविध प्रकार असत. कोणी अगदी घरगुती व प्रापंचिक बाबतीत त्यांस सल्ला मसलत विचारीत, कोणी पत्रिका पाठवून ज्योतिषविषयक प्रश्न विचारीत, कोणी पारमार्थिक शंकांचे समाधान करण्या- साठी त्यांचेकडे धाव घेत तर कोणी अन्य तव्हेने त्यांच्या माहितीचा अगर भोळखीचा उपयोग करून घेण्याचे हेतूने त्यांस पत्रे लिहीत. या सर्वाची उत्तर भास्थापूर्वक व ताबडतोब जात असत व दररोजच्या भावक जावक
No text on this page.
ትና።
See
ሃሳዊ ት
ሕኡን/ሜላን ኣፍሪስናየዛኔ
አግግwሪዉ ጥንቃቁ ባግሃን
ዓጭካካune 283ካማኅuraኣላህ ማለት
ብተካሄrሃn
nnoyo4 ናeሳወቅት
ሃሞሎግ
በመመካን
ክትል ርገት ውሳ
በሓካኣርብዓንን
ጽ በን
ቀጭንጋፍ የሚል ነws
Meezoሳ0 ዝኣየሉጣን በመጣ
ሳረካዓብቅዕ ዝጽያንpte
ኣብ ጎደናቀፍ
የኣርነት ወ5ዓሣ /%
ae%ebebt
ተዋረዱን ኣዝዮምታ
s
ዝምታት
9ካታ
ዝሚንዓለም ብትግል
ሲ) በካሳተም
ስ!
गोविंदसुतांचे कार्डावरील मोडी अक्षर
अनेक सराचे स्थान पटवू = (የማን ገ ኮርያ ካብ ኣቶ ተንተነ ( लीनारा५६/475 पदे भारत नाम हो! श्रीपत कासारवाडीसकर टेसत्या स्थानी सही निस्तिस काहीही माशा, ify.त्या आरमारनार | सायात महा1ि74( स्मा पर मारपये की राजगारी सत्सनाटक चीपूतावल्याने भी उपशमन यारी वास पाचन निवास बहन पून वापर (यी,मरावती याहया पावसान। थित बेडमा मासुभातमी Ranभयासमनाने भावारी नहन भी गरीबनाऊतर कायरी सायनातीपरतानात तिर निर) भीरममताप मीरा चीरसायन परलवामी परमाया मारताने शतर्वरीत पित्यासरत्येपथावावर भारीरीका लागी मामाइन पर सेना 217- कीलन सिटी तुटीचर धम्पसापयाराम यादगारवारी सीation मामा कायम किरपाटीमावर पार प्रासावर पाहन का सरस्थानासन गोविंदसुतांचे कार्डावरील बाळबोध अक्षर
No text on this page.
लेखनव्यवसाय ते पत्रव्यवहाराची गोविंदसुत आपल्या खाजगी रोजनिशीत नोंदही ठेवीत असत. ते नेहमी मोडी लिपीत व फारच जलद गतीने लिहीत असत व त्यांचे अक्षरही वळणदार असे. एका काडाँत कधी कधी पत्याखेरीज ६०७० ओळी मजकूर लिहीत असत व त्यांचे अक्षर वाचण्याची ज्या वाचकास नेहमींची संवय असे त्यास इतका दाट लिहिलेला मजकूर सहज वाचता येत असे. ज्या इसमापाशी नवीनच पत्रव्यवहार सुरू असेल त्यास गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मात्र बाळबोधीत अगर दूर अंतगवर ओळी काढून मोडीत मजकूर लिहीत. छापण्यासाठी जाण्याचा सर्व मजकूर बाळबोधीत व मोकळे. पणाने लिहिणे अवश्यच असे. सेवानिवृत्त झाल्यापासून पुढील बहुतेक वर्षांच्या त्यांच्या रोजनिशा उपलब्ध आहेत, त्यांत दररोजचा पत्रव्यवहार, प्रवासांतील मुक्काम, महत्त्वाच्या कौटुंबिक गोष्टी या सर्वांच्या बिनचुक नोंदी आहेत व मधून मधून उपयुक्त वैद्यकीय माहिती, वाचनांत आलेल्या पुस्तकां. तील उतारे, प्रवासांत मिळालेल्या स्नेह्यांच्या कुंडल्या वगैरे विविध प्रकारच्या माहितीने रोजनिशीची पृष्ठं भरलेली आहेत. ता. ३।१।३४ अखेरपावेतों गोविंदसुतांनी आपल्या हाताने आपली रोजनिशी लिहिलेली आहे. ता. ४ व ता. ५ जानेवारी रोजी दुसरे इसमाकडून रोजनिशी लिहून घेतलेली आहे व त्यापुढील पाने कोरी आहेत. ता. ८1१।३४ रोजी गोविंदसुतांचे देहावसान झाले हैं प्रारंभी निवेदन केलेच आहे. शेवटच्या स्मरणार्थ टिपण या सदराच्या पानांत गोविंदसुतांनी आपल्या हाताने आपल्या विशेष जिव्हाळ्याच्या अशा सुमारे १०० गृहस्थांची नांवे व पत्ते १।१।३४ नंतर लिहून ठेवले आहेत. यांपैकी बहुतेक इसमांकडून गोविंदसुतांच्या निधनोत्तर आम्हांस सहानुभूतीची पत्रं आली आहेत यावरून या सर्व गृहस्थांसही गोविंदसुतांबद्दल जिव्हाळ्याचे प्रेम होते हे लक्षात घेण्याजोगे आहे. गोविंदसुतांच्या हयातीत त्यांनी आपल्या शेवटच्या भाजारीपणांत जे महत्याचे दोन लेख लिहिले त्यांचा उल्लेख करून हा भाग संपवितो. " श्री जीवन्मुक्त आणि आधुनिक तत्वज्ञ हा ग्रंथ पनवेलचे श्री. सदाशिव कृष्ण फडके वकील यांच्या कसलेल्या कुशल लेखणीतून नुकताच बाहेर पडलेला होता. अमळनेरच्या तत्त्वज्ञान मासिकाच्या संपादकांनी तो ग्रंथ मुद्दाम गोविंदसुतांस वाचण्यास दिला होता व त्या विषयांतील गोविंदसुन हे अधिकारी पुरुष असल्यामुळे पुस्तकावर अभिप्राय लिहिण्याबद्दलही त्यांस सूचना केली होती. गोविंदसुत आंथरुणास खिळून अत्यवस्थ भाजारी असतांना हा ग्रंथ व श्री. फडके यांचे इतर ग्रंथ वाचीत होते. आजारीपणामुळे स्वतः वाचण्याला भसमर्थता वाटली म्हणजे मधून मधून कांही पृष्ठे आमच्याकडूनही वाचून ५६ गोविंदसुत घेऊन ऐकत असत. तत्वज्ञान मंदिराच्या शके १८५५ घ्या आश्विन महिन्याच्या अंकांत सदरहू पुस्तकावरील १४ पृष्ठांचा गोविंदसुतांचा अभिप्राय प्रसिद्ध झालेला भाहे. मानसिक श्रम मुळीच करूं नये असा वैद्यकीय सल्ला असतांनाही " अशा प्रकारच्या आवडीच्या विषयाच्या वाचनाने व लेखनाने सर्व भाधिव्याधी विसरण्यास मदत होत असते असे सांगून अंतःकरणाची प्रसन्नता कायम ठेवून हा लेख त्यांनी लिहिला आहे व निधनापूर्वी ४५ दिवसच भगोदर सदरहू लेख प्रसिद्ध झालेला त्यांस पाहावयास मिळाला हे सुदैवच म्हटले पाहिजे. दुसरा महत्वाचा लेख म्हणजे गोविंदसुतांच्या निधनानंतर श्री ज्ञानेश्वरदर्शन हा ग्रंथ अहमदनगर येथील वाड्मयोपासक मंडळाने प्रसिद्ध केला आहे त्यांत दुसरे भागांत अध्यात्मखंडांत " ज्ञानेश्वरीतील अध्यात्मज्ञानाचे अंतरंग" अशा मथळ्याने जो २७ पृष्ठांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे तो होय. हा लेखही वरील लेखाच्या पूर्वी काही महिने आजारीपणांतच लिहिलेला भआहे. श्रीज्ञानेश्वरदर्शन हा ग्रंथ आपल्या हयातीतच प्रसिद्ध झालेला पाहावा अशी गोविंदसुतांची फार इच्छा होती. परंतु बलीयसी ईश्वरेच्छा तशी नव्हती. श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ प्रसिद्ध करण्याबद्दल नेवासे येथे जो मोठा समारंभ झाला त्या वेळच्या सभेत ग्रंथांतील एक प्रमुख लेखक गोविंदसुत यांच्या निधनाबद्दल दुःखवट्याचा ठराव पास करण्याची वेळ आली याबद्दल ग्रंथाचे प्रकाशक मंडळ व समारंभास जमलेले सर्व सज्जन यांस फार हळहळ वाटली. प्रवासाची आवड तीर्थक्षेत्रे व इतिहासप्रसिद्ध ठिकाणे पाहाणे व त्यासाठी प्रवास करणे याची गोविंदसुतांना विशेष आवड असे. नोकरीत असतांना वर्षातून ४१६ महिने स्यांस जिल्ह्यांत फिरावे लागे त्या वेळी प्रत्येक मुक्कामाच्या आसपास असलेली महत्त्वाची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे (किल्ले, देवालये वगैरे) यांचे मोठ्या हौसेने दर्शन घेतल्याशिवाय ते राहात नसत. त्यासाठी १०५ कोस पायीं मजल करावी लागली तरी त्यांची तयारी असे. त्यांचा पिंड मूळ कोकणप्रांतांत वाढलेला असल्यामुळे टेकड्या व डोंगर चढणे त्यांस सुसाध्य असे. नोकरीवर असतांना आजारीपणासाठी म्हणून त्यांनी कधी रजा घेतल्याचे आम्हांस आठवत नाही. काही वर्षे किडनीचे विकारापासून स्यांस बराच त्रास होत असे. परंतु काही पेटंट औषधांचे उपचार करून ते भागवीत असत. सेवानिवृत्तीच्या सुमारास त्यांस मधुमेहाचा विकार जडल्याचे आढळून आले, परंतु त्यावर विशेष औषधोपचार वगैरे करण्याच्या भरीस न पडता खाण्यापिण्याचे पथ्य सांभाळूनच त्या विकारास हटविण्याचा ते प्रवासाची आवड . प्रयत्न करीत असत व याप्रमाणे सुमारे २५ वर्षे ते या रोगाशी झगडत होते. खाण्यापिण्यांत, हवापाण्यांत व भोवतालच्या परिस्थितीत नेहमी फेरबदल करीत राहिले म्हणजे आपल्या प्रकृतीला बरे वाटते व भापणांस मधुमेहाचा विकार असल्याचे स्मरणही होत नाही अशी आपल्या अंतःकरणाची एक श्रद्धा असल्याचे ते नेहमी सांगत. यामुळे महिना दीड महिना एखाद्या ठिकाणी राहिले की अन्यत्र जाण्याची त्यांस आकांक्षा वाटत असे व अशा स्थलांतराने त्यांस कामकाज करण्यास जास्त हुरूप वाटत असे व नवीन तरतरी अंगी येत असे. यामुळे सेवानिवृत्तीनंतर पुणे हे आपल्या वास्तव्याचे मुख्य ठिकाण ठेवून तेथून दरसाल २।३ महिने कोंकणप्रांतात, १३ महिने खानदेशांत, १३ महिने व-हाड मध्यप्रांतांत व २।३ महिने हिंदुस्थानांतील तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक स्थळे यांचे दर्शन घेण्यांत अशा रीतीने त्यांची दरसालची कालक्रमणा असे. काही विशेष कारण उद्भवेल तरच त्यांत बदल होत असे. प्रवास करण्यांतही एकदम फार दूर ठिकाणी मुक्काम न करतां वाटेंत जेथे जेथे त्यांच्या विशेष प्रेमाची व सलोख्याची मंडळी असत तेथे तेथें आगाऊ सूचना देऊन ते मुक्काम करीत करीत लांबचा प्रवास पुरा होत असे. अशा क्रमाने १०।१२ वर्षांत भरतखंडाच्या सर्व प्रांतांतील सर्व धार्मिक क्षेत्रांचे त्यांनी दर्शन घेतले होते व काही ठिकाणी तर दोन तीनदां जाण्याचा त्यांस योग आला. हिंदुस्थानांतील चारी धाम व बारा ज्योतिलिंगें यांचे दर्शन त्यांनी घेतले होते. अशा क्षेत्रदर्शनार्थ प्रवासाच्या वेळी ५।४ मंडळी तरी त्यांच्याबरोबर नेहमी असत व वाचन, लेखन, निरूपण हे सर्व व्यवसाय प्रवासांतही नियमितपणे चालू असत. कोणत्या साली कोठे कोठे प्रवास केला ही माहिती त्यांच्या रोजनिशीवरून बिनचूक मिळण्याजोगी आहे. परंतु इतक्या उपशीलांत न जातां फक्त नमुन्यासाठी म्हणून १९२८ व १९२९ या दोन सालांत म्हणजे वयाच्या ६६ व ६७ व्या वर्षी त्यांनी किती प्रवास केला याचे थोडक्यांत दिग्दर्शन करतो. ता. ॥१॥२८ ते ४।१।२८ मु.चिपळूण, ता. ५।१।२८ ते १०१।२८ मु. सांव, ता. १११११२८ ते १५।२।२८ सावर्डे, चिपळुण व मांडकी या गांवांचे दरम्यान बरेच वेळा जाणेयेणे, ता. १६।२।२८ ते २२१२।२८ देवरूख व रत्नागिरीचे दरम्यान दोन वेळt जाणे येणे, ता. २२।२।२८ ते २०१२।२८ कोल्हापूर व कोरेगांव, ता. २८।२।२८ ते २।३।२८ पुणे, ता. ३।३।२८ ते १७।३।२८ मांडवणे, कल्याण व मुंबई यांचे दरम्यान जाणे येणे व मुक्काम, ता. १८ व ता. १९ मार्च मु॥ बडोदें, ता. २० मार्च ते २४ मार्च मु॥ द्वारका, २५।३।२८ ते १।५।२८ सुदामपुरी, प्रभासपट्टण सोमनाथ, राजकोट व कलोल, ता. २४।२८ ते ता. ३।५।२८ मुंबई, कल्याण गो.
गोविवसुत वडाणे यांच्या दरम्यान ५/७ वेळा येणे जाणे, ता. भ५२८ ते १४५२८ मु. पुणे, १५।५।२८ ते २७।७।२८ कोंकणप्रांतांत चिपळूण, सावर्डे, रत्नागिरी व इतर ठिकाणी जाणे येणे, ता. २८ ते ३० जुलै कराड, सातारा, कोरेगांव, ता. ३१ जुलै ते १४ भागष्ट पुण्यास मुकाम, ता. १५ ते २० भागष्ट मुंबई, ता. २११८।२८ ते १२।१।२९ खानदेशांत अमळनेरास मुक्काम, परंतु दरम्यान बरेच वेळा धुळे, चाळीसगांव, जळगांव, भुसावळ वगैरे ठिकाणी जाणे येणे, ता. १३१२९ ते १९११२९ मुंबई, ता. २०११।२९ ते ८।२।२९ मु. पुणे परंतु मध्यंतरी खेड, भाळंदी वगरे ठिकाणी जाणे येणे, पुनः मुंबई व अमळनेर २०१२।२९पर्यंत, २१।२।२९ ते ९३१२९ व-हाड व मध्यप्रांत (वणी, यवतमाळ, खामगांव, वर्धा, नागपूर, हिंगणघाट वगैरे ठिकाणी मु०) यानंतर १०।२९ पावेतो मु० अमळनेर, १३।४१२९ ते १२।५।२९ मु० मुंबई, त्यानंतर २४।५।२९ मु० पुणे, ता. २५।२६।२७ मे १९२९ कै. शिवरामपंत परांजपे यांच्या आग्रहा- वरून बेळगांवास साहित्यसंमेलनास गेले, ता. २८ मे पुणे, ता. २९।३०३१ मे औरंगाबाद, ता. १ ते ७ जून पुणे, ता. ८ ते २३ जून मुंबई, पुन: पुण्यास थोडे दिवस राहून २।३ महिने खानदेशांत निरनिराळ्या ठिकाणी व २।३ महिने वहाड नागपूर प्रांतांत व १५ डिसेंबर १९२९ पासून पुढे पुणे व मुंबई . येथे मुक्काम. गोविंदसुतांची राहाणी गोविंदसुतांची राहाणी अतीशय साध्या प्रकारची असे याचा उल्लेख प्रारंभी आलाच आहे. घरचे कपडे वेगळे, ऑफिसचे कपडे वेगळे किंवा लग्नकार्य वगैरे समारंभासाठी वेगळा पोषाख असा प्रकार त्यांच्यापाशी कधीच नव्हता. भांगांत बंडी अगर सदरा, त्यावर कोट, नेसण्याचे एक धोतर व आंगावर उपरणे भाणि डोक्यास रुमाल यापेक्षा अधिक कपडे त्यांस की लागत नसत. १९२० सालापासून त्यांनी खादीचा अंगिकार केला व वरील सर्व कपडे गरेपावेतों शुद्ध खादीचेच वापरले. प्राप्तीच्यावर कधीही खर्च करावयाचा नाही व कर्ज कधीही काढावयाचे नाही अशा निश्चयाने प्रथमपासून अखेरपर्यंत ते वागले. मुलांच्या कॉलेजच्या शिक्षणक्रमांत एकदम फी भरण्याचे वेळी अगर परीक्षेचे वेळी त्यांस थोडीफार रकमेची गरज लागत असे त्यावेळी पुण्यातील त्यांचे दोन स्नेही सहानुभूतिपूर्वक तत्परतेने उसमवार रक्कम देऊन मदत करीत असत व ती रक्कम लवकरच परत होत असे. आपल्या सर्व आयुष्यात म्हणण्यासारखी शिल्लक रक्कम कधी आपल्यापाशी राहिली नाही व जेव्हां खर्चाच्या बाबी उपस्थित होत तेव्हा त्या खर्चाची काय गोविंदसुत ( १९२९)
No text on this page.
गोविंदसुताची स्नेही मंडळी योजना करावी अशी विवंचना वाटण्यासारखी स्थितीही कधी उत्सन झाली नाही असे गोविंदसुत नेहमी म्हणत असत. त्यांनी बँकबुक कधी बाळगले नाहीं अगर विम्याची पॉलिसी कधी उतरली नाही. भोजनोत्तर सुपारीचे खांड मिळाल्यास लागत असे याखेरीज त्यांस कशाचेही व्यसन असे मुळीच नव्हते. भामची विद्यार्थीदशा संपेपर्यंत घरांत दररोज चहा करण्याचा परिपाठ भसा भआम्हांस मुळीच माहीत नव्हता. कोणी पाहुणा वगैरे आला अगर विशेष प्रसंग असेल तरच घरांत चहा व्हावयाचा. अलीकडे १५/२० वर्षातच चहाचे व्यसन आपल्या समाजांत विशेष बोकाळले आहे. लेखनव्यवसायासाठी व प्रवासांत गोविंदसुतांस पुष्कळ वेळां जाग्रणे करावी लागत, तेव्हापासून चहा घेण्याचा परिपाठ त्यांनी सुरू केला, परंतु दिवसांतून वाटेल तितक्या वेळा चहा घेणे असा अतिरेक त्यांनी कधीच केला नाही किंवा एवढ्या प्रवासांत हॉटेलांतील चहा अगर कोणताही पदार्थ त्यांनी घेतला नाही. कित्येक वर्षापासून ते एकभुक्त राहात असत. अखेरची काही वर्षे सोडून दिल्यास नेहमी नियमित आहार व संवयी व भरपूर व्यायाम होईल इतके हिंडणे फिरणे ठेवल्यामुळे डॉक्टर वैद्यांची औषधे घेण्याची त्यांस सहसा कधीच जरूरी पडत नसे. स्वतः साध्या व निर्व्यसनी राहणीने ते वागत असल्यामुळे तशाच प्रकारच्या वागणुकीच्या लोकांशी त्यांचे तात्काळ सख्य जमत असे. गोविंदसुतांची काही स्नेही मंडळी आतापर्यंत लिहिलेल्या गोविंदसुतांच्या चरित्रांत त्यांच्या काही ठळक भशा ऋणानुबंधी स्नेह्यांचा नामनिर्देश भालाच आहे. गोविंदसुतांच्या हयातीत निरनिराळ्या निमित्तांनी शेकडो लोकांचा व त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा असा स्नेहसंबंध जडलेला होता त्या सर्व सद्गृहस्थांचा नामनिर्देश करता येणे अशक्यच आहे. गोविंदसुतांनी आपल्या प्रत्येक ग्रंथाच्या प्रस्तावनेत काही सन्मित्रांचा उल्लेख केलाच भाहे. या पुस्तकाच्या तिसया भागांत आठवणींच्या रजःकरणांत गोविंदसुतांच्या निधनोत्तर आलेल्या त्यांच्या काही स्नेह्यांच्या पत्रांचा उल्लेख आलाच आहे. गोविंदसुतांचे पुष्कळ स्नेही यांच्या हयातीतच कालवश झालेले त्यांनी पाहिले, यामुळे कित्येक वेळा तुलनात्मक दृष्टीने से म्हणत की मला परमेश्वराने त्या मानाने बरेंच भायुष्य दिले आहे व दीर्घायुष्य याचा अर्थ अनेक प्रिय जनांचा दुःसह वियोग पाहाणे. १८९९ सालापासून १९१० पर्यंत गोविंदसुतांचे विहार पुण्यास गोंधणीचे बोळांत संगमेश्वरकरांचे वाड्यांत असे. (हल्ली हा वाडा गोखल्यांचा आहे.) त्या वेळी या वाड्यांत बरीच बिहाडे मुलकी खात्यांतील ६० गोविवसुत कारकुनांचीच मुख्यत्वे असत. त्यांपैकी बरेच लोक आज कालवश झालेले आहेत, त्यांत गोविंदसुतांच्या बरोबरीचे गृहस्थ म्हणजे रा. गणेश सखाराम लोणकर ऊर्फ नाना बारामतीकर हे होत. पेन्शननंतर काही दिवस हे बारामतीस मुखत्यार वकिली करीत असत. यांचा व गोविंदसुतांचा घरोबा अखेरपावेतों कायम होता व गोविंदसुतांनंतर लवकरच नाना बारामतीकरही निवर्तले. कै. लोकमान्य टिळक व त्यांचे पुण्यातील प्रमुख अनुयायी या सर्वाची व गोविंदसुतांची चांगली ओळख असे. याचे एक कारण सेवानिवृत्तीनंतर गोविंदसुत हे वैद्यपंचानन कृष्णशास्त्री कवडे बी. ए. यांचा दवाखाना मोरोबा दादा फडणीसांचे वाड्यांत असतांना दररोज सायंकाळी पुण्यातील बरेच सार्वजनिक कार्यकर्ते तेथे बहुधा बसत असत त्या ठिकाणीं गोविंदसुतही कधी कधी जात असत. गोविंदसुतांस " महाराज" या नावाने सर्व लोक संबोधीत असत व त्यांच्याबद्दल सर्वांचा आदर असे. पुण्यातील राष्ट्रीय पुढान्यांच्या राजकारणात दोन तट पडल्यानंतर कै. शिवरामपंत परांजपे, श्री. वासुकाका जोशी, दे. भ. तुळपुळे, श्री. चिंतामणराव वैद्य वगैरे मंडळींची बैठक श्री. गणेशशास्त्री जोशी वैद्य यांचेकडे होत असे, त्या ठिकाणीही गोविंदसुतांचे जाणे असे, तथापि त्यामुळे दुसन्या तटांतील मंडळींबद्दलही त्यांचे प्रेम व भादर कमी झाला असे मात्र कधी झाले नाही. कारण वारंवार बदलणान्या प्रचलित राजकारणापेक्षा गोविंदसुतांच्या अंत:करणाची आवड फार उच्च वातावरणांत संचार करणारी होती हे सर्वांस माहीत असे. यामुळे पुण्यांत शिवरामपंतांची स्वराज्यकचेरी, लोकमान्यांची केसरीकचेरीव पांगारकरांची मुमुक्षुकचेरी या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी त्यांस प्रेमादरपूर्वक जाता येत भसे. त्यांतल्यात्यांत पारमार्थिक विषयांबद्दल त्यांचा विशेष विचारविनिमय पांगारकर यांच्यापाशी होत असे. “ आधिभौतिक सुधारणा व आध्यात्मिक धारणा" हे समर्पक नांव ग्रंथास देण्याची सूचना पांगारकर यांचीच होती. या ठिकाणी मननामोदकर्ते श्री. माधव गोविंद उर्फ बाबूराव भिडे या विद्वान प बहुश्रुत गृहस्थांचा प्रामुख्याने उल्लेख करणे जरूर आहे. यांची व गोविंदसुतांची नेहमी बैठक असे व गोविंदसुतांच्या ग्रंथांतील कित्येक प्रकरणांचा उपसंहार वगैरे उभयतांच्या चर्चेतून निष्पक्ष होणाच्या धोरणाप्रमाणे झालेला आहे. लोकमान्यांस आपले वडील बंधु मानणारे कै. दत्तोपंत दादा बेहेरे, नातूबंधूंपैकी कै. सरदार बाळासाहेब नातू , कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे विशेष भभिमानी कै. भिकाजीपंत हर्डीकर (प्रो० हर्डीकर यांचे वडील ), शेतकी खात्यांतील पेन्शनर कै. दत्तोपंत दादा गोखले, पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोटांतील उपक्रम व १ अखेरचे दिवस ६१ शिरस्तेदार कै. विष्णुअण्णा किर्लोस्कर वगैरे अनेक लोकांचा उल्लेख गोविंदसुतांचे पुण्यातील निरपेक्ष जुने स्नेही म्हणून करता येईल. वयाने गोविंदसुतांच्या बरोबरीची अगर काही वर्षांनी लहान मोठी अशी दहापांच स्नेही मंडळी पुण्यांत असतील त्यांत प्रामुख्याने श्री. वासुकाका जोशी, श्री. वामन मोरेश्वर पोतदार, श्री. चिंतामणराव वैद्य, श्री. दिगंबरपंत जोशी, श्री. बाबा जोगळेकर, श्री. शंकरराव लवाटे वगैरे गृहस्थ आहेत व मुलकी खात्यांतील पेन्शनर असेही बरेच गृहस्थ आहेत. पुण्याच्या बाहेरही गोविंदसुतांचे ठिकठिकाणी स्नेही व चाहते आहेत. त्यांपैकी बऱ्याच गृहस्थांचा स्नेह त्यांच्या ग्रंथलेखनावरून उत्पन्न झालेला आहे आणि वारंवार समक्ष व पत्रद्वारे पारमार्थिक बाबतीत विचारविनिमय होऊन तो स्नेह दृढ झालेला आहे. अशा स्नेहीमंडळींत वृद्ध पेन्शनरांपासून तो तरुण विद्यार्थीवर्गापर्यंत भिन्न भिन्न वयाचे व व्यवसायाचे लोक आहेत त्या सर्वांचा निर्देश करतां येणे शक्य नाही. गोविंदसुतांचे विशेष परिचित व स्नेही असतांही स्थल. संकोचास्तव कित्येक सजनांचा येथे उल्लेख करता आला नाही, तसेच पुनरुक्तीच्या भीतीमुळे कित्येक लोकांच्या पत्रांतील मजकुरांचा व पाठविलेल्या भाठवणींचा उल्लेखही करता आला नाही याबद्दल आम्हांस सर्वांनी क्षमा करावी. KER अखेरचे दिवस ता. २७।१९३२ रोजी आमचे धाकटे बंधु यवतमाळ येथे हायस्कूलचे हेडमास्तरचे जागेचा चार्ज घेतल्यानंतर दुसरे दिवशी एकाएकी हृदयक्रिया बंद पडून निवर्तले. गोविंदसुत त्या वेळी मुंबईस होते. आम्हांस अमळनेर येथे तारेनें ही दुःखद वार्ता समजतांच आम्ही ताबडतोब यवतमाळला गेलों व गोविंदसुतांच्या मनाला एकदम धक्का बसूं नये म्हणून त्यांस हे वृत्त न कळवितां अमळनेरास ताबडतोब येण्याबद्दल कळविलें. बंधूचे मुलास व कुटुंबास घेऊन आम्ही यवतमाळहून जळगांव येथे आलों व गोविंदसुतही मुंबईहून त्याच वेळी जळगांव स्टेशनवर उतरले. जळगांव ते अमळनेर आम्ही दोघे बरोबरच भालों व मुंबईहून ताबडतोब त्यांस इकडे बोलावण्याचे कारण समक्षच सर्व वृत्तांतासह त्यांस कळविले. आपल्यावर मृत्यूचे वॉरंट बजावण्याऐवजी ते चुकीने आपल्या मुलावर बजावण्यांत भालें आहे अशी ईश्वराचे दरबारांत चूक झाली आहे असे त्यांनी उद्गार काढले व त्यांस धीर देण्यास येणाच्या लोकांची उलट तेच भनेक रीतीनी समजूत घालीत असत. पुण्याचे बिहाड मात्र या वेळी त्यांनी ताबडतोब मोडण्याची तजवीज केली. ९।७।३२ रोजी बंधूचे मुलास घेऊन गोविंदसुत नाशीक येथे उत्तरक्रियेकरतांगेले ६२ गोविंदसुत व १६७३२ रोजी अमळनेर येथे परत आले. यानंतर सतत ३ महिने म्हणजे १६।१०।३२ पावेतों गोविंदसुत अमळनेर येथेच राहिले. परंतु गोकर्ण महाबळेश्वर हे एकच क्षेत्राचे ठिकाण आतां पाहावयाचे राहिले आहे, त्या ठिकाणी जाण्याची जुळवाजुळव वर्ष सहा महिन्यांपासून सुरू होती ती पुरी करण्याचे उद्देशाने व प्रकृतीसही प्रवासाने बरे वाटेल अशा उद्देशाने गोविंदसुत हे यानंतर सुमारे ३ महिने मुंबईस जाऊन राहिले. गोविंदसुत मुंबईस असले म्हणजे त्यांचा मुक्काम तेथें मोहन बिल्डिगमध्ये चिपळूणच्या बर्वेबंधूंकडे असे. बर्वबंधु हे सर्व आपल्या आडनावाप्रमाणेच 'बरवे' असून गोविंदसुतां. घर त्यांचे व त्यांच्यावर गोविंदसुतांच अलोट व अकृत्रिम प्रेम असे. या ३ महिन्यांचे मुदतीत गोविंदसुत २।३ वेळां पुण्यास जाऊन आले व प्रत्येक वेळी ५।६ दिवस तेथे मुक्कामही त्यांनी केला होता. गोकर्ण महाबळेश्वराचे प्रवासा. साठी १०१५ मंडळीसह एप्रिल महिन्यांत मुंबईहून निघावयाचे असा बेत कायम करून १११११३३ रोजी गोविंदसुत अमळनेर येथे परत आले. सुमारे २ महिने खानदेशांत निरनिराळ्या ठिकाणी घालवून ६।३।३३ रोजी गोविंदसुत मुंबईस गेले व तेथून १९।४।३३ रोजी बन्याच मित्रमंडळींसह ते पुणे, मिरज, सांगली, बेळगांव अशा मार्गाने मुक्काम करीत करीत परत पुण्यास येईपर्यत हा प्रवास सुमारे एक महिन्याचा झाला. खुद्द गोकर्णास २।३ दिवसच मुक्काम झाला. परत येतांना कारवार, सदाशिव. गड, मडगांव, म्हापसे, सांवतवाडी, मालवण, खारेपाटण, राजापूर, देवरूख, चिपळूण वगैरे ठिकाणी मुक्काम करीत गोविंदसुत पुण्यास आले. या प्रवासांत स्यांच्या बरोबर बर्वेबंधूंपैकी रा. लक्ष्मण महादेव बर्वे, चिपळूणचे श्री. केशव भिकाजी बापट, बालामृतवाले श्री. जनार्दन सदाशिव जोशी, रामतीर्थ संस्थान भक्कलकोट येथील भीमदास विश्वंभरदास रामदासी वगैरे बरीच मंडळी होती. आपल्या जन्मभूमीला व कोंकगप्रांताला गोविंदसुतांची ही भखेरचीच भेट आहे असे निष्ठुर काळाने पुढे सिद्ध केले. राजापूर येथे आपण लहानपणी शाळेत शिकत असतां ज्या घरांत राहात होतो ते घर व आसपासची जागा व शाळा ही सर्व ठिकाणे गोविंदसुतांनी बरोबरीच्या मंडळीस मुद्दाम दाखविली व लहानपणच्या राजापूरच्या सर्व आठवणी सांगितल्या. चिपळूण येथे ८1१० दिवस मुक्काम करून या प्रांतांतील आपल्या मित्रमंडळीस व आप्तेष्टांस त्यांनी आपले अखेरचे दर्शन या वेळी दिले. श्रीक्षेत्र परशुरामाचेही त्यांनी अखेरचे दर्शन घेतले. या प्रवासांतून परत येतांना गोविंदसुतांना श्वास (दम) लागण्याचा विकार जडला. १० पावले चाललें की दम लागावयाचा भशा स्थितीतच सातायावरून ता. १८५४३३ रोजी ते पुण्यास भाले. तेथे अखेरचे दिवस ६३ असा ५।६ दिवस राहून बरे वाटेना म्हणून मुंबईचे त्यांचे स्नेही सुप्रसिद्ध श्री. भाप्पा शास्त्री साठे वैद्य यांच्याकडून औषधोपचार मिळावा म्हणून २४।५।३३ रोजी ते मुंबईस आले. २६।५।३३ रोजी " प्राणांतिक अवस्था झाली होती, काळ आला होता, परंतु वेळ भाली नव्हती " मजकूर गोविंदसुतांनी भापल्या रोजनिशींत लिहिलेला आहे. यापुढे प्रकृर्ताच्या अस्वास्थ्याचा मजकूर वेळोवेळी रोजनिशीत आलेला आहे. मुंबईहून १८।६।३३ रोजी गोविंदसुत अमळनेर येथे आले. या वेळी श्वासाचा विकार कमी झाला होता, परंतु पायांत कळ यावयाची व ती विकोपाला जावयाची असा वातविकार नवीनच उद्भवला. या विकाराका संस्कृतमध्ये गृध्रसी व इंग्रजीत 'सायटिका' असे म्हणतात असे तज्ज्ञांनी निदान केले. मधुमेहाचा विकार बळावलेलाच होता. डॉक्टरांचे व वैद्यांचे अनेक उपाय करून पाहिले परंतु या वेळी गोविंदसुतांची प्रकृति एकदम जी खालावत गेली ती पुनः सुधारलीच नाही. पायांतील कळांमुळे हिंडणे फिरणे बंदच झाले. दिवसांतून विवक्षित वेळां हा वातविकार फारच विकोपास जात असे. आठवड्यांतून एखाद्या दिवशी कोणाचा तरी हात धरून मंदगतीने अमळनेरच्या वाचनालयाच्या बागेपर्यंत त्यांस कसे बसें तरी जातां येत असे. पुढे अन्नपचनही होईनासे झाले व दुधावर अगर मुसंब्याचा रस वगैरे पेयावरच २।३ महिने त्यांनी काढले; अशा स्थितीतही आंथरुणावर बसून पत्रव्यवहार करणे, वाचन, लेखन, ग्रंथावरून निरूपण वगैरे सर्व बौद्धिक व्यवहार चालूच होते. या दुखण्यांत आतां आपण फार दिवस वाचत नाही हे त्यांनी पूर्णपणे भोळ- खले होते व तसे पुष्कळ स्नेह्यांस पत्रव्यवहारांत ते लिहीतही असत. गोविंदसुत अत्यवस्थ आजारी आहेत असे समजल्यावरून बर्वेबंधूंपैकी रामचंद्र महादेव बर्वे (ऊर्फ रामभाऊ) हे मुंबईहून व श्री. केशव भिकाजी बापट हे चिपळूणहून त्यांच्या भेटीस अमळनेर येथे २१।११।३३ रोजी आले. त्यांना पाहिल्याबरोबर गोविंदसुतांचे अंतःकरण प्रफुलित झाले व दोन दिवस आपले सर्व शारिरिक दुःख ते विसरून गेले व प्रकृती अतीशय क्षीण झालेली असतांही या मंडळी. बरोबर मुंबईस जाण्याचा त्यांनी ध्यास घेतला. मुंबईस एक महिनाभर राहून प्रकृति सुधारण्याचा एकदां शेवटचा इलाज करून पाहावयाचा व त्या मुदतीत मुंबई, पुणे, वगैरे बाजूचे आपले पारमार्थिक दृष्ट्या ऋणानुबंधी सर्व स्नेही यांस एकदां अखेर भेटून यावयाचे असा आपला हेतु त्यांनी सांगितला. या विचारापासून त्यांचे मन परावृत्त करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला, परंतु गोविंदसुतांच्या निश्चयाचे बळ अधिक श्रेष्ठ ठरले व २४॥१॥३३ रोजी वरील मंडळीसह ते मुंबईस पोंचले. प्रथम १५।२० दिवस प्रकृतीला जरा हुषादी गोविंदसुत . वाटली, अर्थात् बर्वेबंधूंच्या खोलीबाहेर कोठेही जाण्यासारखी त्यांच्या प्रकृतीची स्थिति नव्हतीच. तशा स्थितीतही दररोज सकाळ सायंकाळ अनेक मित्रमंडळी. समवेत अध्यात्मचर्चा चालतच असे. या मुदतीत त्यांस अनेक स्नेहीमंडळी भेटून गेली त्यात प्रामुख्याने श्री. हरिश्चंद्रराव शिरोडकर, श्री. रामराव, श्री. दिगंवरपंत जोशी व त्यांचे चिरंजीव श्री. दत्तोपंत जोशी आय . सी. एस्. (असिस्टंट कलेक्टर भडोच ), किहीमचे भिषग्रस्न जगन्नाथ विश्वेश्वर कर्वे, श्री. चिंतामणराव वैद्य, श्री. कृष्णाजीपंत खाडिलकर, श्री. न. र. फाटक, श्री. वासुकाका जोशी, कीर्तनकार कराडकर, गुरुवर्य दत्तोपंत बापट, विठ्ठलभक्त पांगारकर व त्यांचे स्नेही श्री. सोनोपंत अफजुल पूरकर वगैरेंचा निर्देश केला पाहिजे. श्री. आप्पाशास्त्री साठे व श्री. माधव कृष्ण मराठे वैद्य यांचे उपचार चालूच होते. परंतु रोग असाध्य होता व मुंबईच्या वास्तव्याची ठरलेली एक महिन्याची मुदतही निघून गेली होती. गुरुवर्य बापट यांनी प्रकृतीची एकंदर स्थिति पाहून अमळनेर येथें ताबडतोब जाण्याचा सल्ला दिला व आपण स्वत्तः अमळनेर येथे येण्याचे कबूल केले. अमळनेराहून गोविंदसुतांचा पुतण्या चि. गोपाळ हा मुंबईस गेलाच होता व नातू (मुलीचा मुलगा) चि. नारायण श्रीधर पुरोहित हाही बर्वे बंधूंबरोबर त्यांच्या सेवेसाठी हजर असेच. ता. ७॥३४ रोजी रात्री मुंबईहून गुरुवर्य बापट, रामभाऊ बर्वे, चि. गोपाळ व चि. नारायण पुरोहित अशी मंडळी गोविंदसुतांस घेऊन रेलवेनें सेकंड क्लासांतून ८/१३४ रोजी सकाळी जळगांव स्टेशनवर आली. तेथे पूर्व खानदेशांतील डेप्युटी कलेक्टर श्री. तात्यासाहेब भागवत यांस गोविंदसुतांनी भेटीस बोलावले होते त्याप्रमाणे ते भाले होते व आपल्या मोटारीतून जळगांव ते अमळनेर गोविंद. सुतांस पोचविण्याची त्यांनी व्यवस्था केली. गोविंदसुत हे इच्छामरणी होते असे म्हणावे लागते, कारण अत्यवस्थ दुखण्यांतही ते अमळनेरहून मुंबईस गेले व आपल्या घरी येऊन देहविसर्जन करावयाचा असा विचार मनात येतांच मुंबईहून ते अमळनेर येथे आले. मुंबईहून अमळनेरपर्यंत त्यांस सांभाळून आणण्याचे व आपल्या सर्व मुलांबाळांच्या व आप्तेष्टांच्या सान्निध देहविसर्जन करून त्या सर्वांस अंत्यदर्श- नाचा लाभ देण्याचे सर्व श्रेय गुरुवर्य बापट व रामभाऊ बर्वे यांसच आहे या गोष्टीचा येथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्यावांचून राहावत नाही. ८।१।३४ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथे आल्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोविंदसुतांचे प्राणोत्क्रमण पूर्ण शुद्धीत असतांना झाले. शेवटच्या देह विसर्जनाच्या वेळी त्यांच्या स्वकीयांपैकी काहींचा सल्ला असा पडला की त्यांस भातुर संन्यास ग्रावा. वस्तुतः त्यांचे वर्तन होतें तें संन्याशाप्रमाणेच होते. परंतु .
परशुरामाष्टकम् धार्मिक समजुतींचे संरक्षण होण्यासाठी हा विचार निघाला. याबद्दलचे उद्वार गोविंदसुतांच्या कानी जाऊन शेवटी त्यांनी स्पष्ट सांगितले की " हा विचार तुम्ही मनांत मुळीच आणूं नका, मला मान्य नाही. " तेव्हां गुरुबंधु बापट यांनी त्यांना अंतकाळी जागृति देण्यासाठी विचारो की " आपण आपल्या स्वरूपी जागृत आहां ना?" तेव्हां त्यांनी " होय " असे उत्तर दिले व भामच्या मांडीवर डोके ठेवून देहविसर्जन केला व भारमस्वरूपी लीन होऊन अंतर्धान पावले ! परशुरामाष्टकम् राजते यो महेंद्रस्य मूर्तिं कृत्वा निजे पदे । करुणाशालिने तस्मै नमः परशुधारिणे ॥ १॥ मुमुक्षूणां बोधहेतो!विंदसुतशब्दभाग् । मालामात्मानुसंधानमितिग्रंथद्वयं व्यधात् ॥ २ ॥ सदात्मनिरतेनापि प्रणीतोत्पथगामिनाम् । आध्यात्मिकी धारणाच सत्पथप्रतिपत्तये ॥३॥ येनामृतांशुगौरेण वचसोत्सादितं तमः । भवकूपनि मन्नानां हृदये यदवस्थितम् ॥ ४ ॥ येन संचरता नूनं विश्वतो देशमंडले । तीर्थयात्रामिषेणैव दिगन्ता: पावनीकृताः ॥ ५॥ विनोदमधुरैर्वाक्यैादयन् शृण्वतोऽनिशम् । सत्वरं कश्मलं दूरमुदसारयताखिलम् ॥ ६ ॥ देहस्थोपि न देहस्थो जनस्थोपिच नो जने । प्रायः पुण्यपुरेऽवात्सीत् पुण्यापुण्यविवर्जितः ॥ ७ ॥ यद्वक्त्राद्वासुदेवस्य नामामृतमधुस्रवत् । भकरोदनिशं लोकं वासुदेवपरायणम् ॥ ८ ॥ इति चिपळूण नगरनिवासिना परशुरामान्तेवासिना विरचितं परशुरामाष्टकं संपूर्णम् ॥ गो. ९ गोविंदसुतांच्या ग्रंथांतील सद्बोधसूक्ति ( संग्राहकः-श्री. केशव भिकाजी बापट, चिपळूण ) प्रास्ताविक सुचना सन्तः सदैव गन्तव्या यद्यप्युपदिशन्ति न । याहि स्वैर-कथास्तेपामुपदेशा भवन्ति ताः ॥ १ ॥ अर्थ:-- संतांकडे नेहमी जावें. त्यांनी मुद्दाम उपदेश केला नाही तरी त्यांच्या सहजोदारांतही उपदेश असतो. परमपूज्य कै. गोविंदसुत ही एक एका दृष्टीने अपूर्व व्यक्ति होऊन गेली. स्वास्मनिष्ठ पुरुप अगोदरच जगामध्ये दुर्मिळ. तशांत तो सर्वजनसुलभ असा फारच विरळा. संप्रदायशुद्ध अशा अध्यात्मविद्युत पारंगत असलेल्या दुर्मिळ पुरुषांत गोविंद-सुतांची अवश्य गणना केली पाहिजे. त्यांची गौर व अकृश काया, प्रशांत व गंभीर चेहरा, सौम्य व ब्रह्मतेजस्वी डोळे, प्रासादिक पाणी व विनोदी भाषण, बोलण्याच्या ओघांत सहज सुचणारे समर्पक दृष्टांत व चटकदार चुटके, एकंदर साधी राहाणी व उच्च विचारसरणी या सर्व गोष्टी त्यांच्या सहवासांत असणान्यास किंबहुना त्यांना पहाणान्यांसही त्यांच्याविषयी आदर व आनंद दिल्यावांचून राहात नसत. समर्थांनी सांगितलेले सत्पुरुषाचे अवश्य लक्षण जे “प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान त्यांच्या रोमरोमांतून व बोलबोलांतून भिनलेले दिसून येई. स्वल्प बोलणे परंतु ते सिद्धांताने भरलेलें, स्थितप्रज्ञाचे साधेसुधे बोल पण भाविक जिज्ञासू श्रोत्यांच्या मनांत स्वात्मानंदाची छटा उठविण्यास मात्र पूर्ण समर्थ, दिसण्यांत साधी परंतु सुगंधाने चित्तवेध करणारी जणूं स्वर्गीय पारिजाताची सुमनेंच, स्वभाव पूर्णपणे अव्याजमनोहर व परोपकार म्हणजे नित्यकर्म, अशी प्रेममय गोड सुगुण सुंदर मूर्ति गोविंदसुतांची होती. संस्कृत ग्रंथ मुळांतून वाचण्याइतके त्यांना संस्कृताचें ज्ञान नव्हते व इंग्रजीतील तत्त्वज्ञानाचे ग्रंथ वाचणेही त्यांच्या इंग्रजी ज्ञानाच्या अभावामुळे त्यांना शक्य नव्हते. पण त्यांचा वाचनाचा हव्यास दांडगा असल्यामुळे कोणी काय कोठे म्हटले आहे एवढे मात्र त्यांच्या बहुश्रुतपणांतून बहुतकरून सुटत नसे. तसे म्हटले तर नुसती पटिक विद्वत्ता तरी काय कामाची ? " अविज्ञाते परे तस्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला" (परतत्व कळले नाही तर शास्त्राध्ययनाचा गोविंदसुताच्या सद्बोधसूक्ति ३७ काय उपयोग?) असें आचार्य म्हणतातच. अशा दृष्टीने पाहिले असता गोविंदसुतांनी आपल्या सूक्ष्म बुद्धीने पर-तत्वाला हात घालून समर्थांनी म्हटल्याप्रमाणे 'जन्मासि येउनी अध्यात्म साधावें' ही गोष्ट केलेली असल्यामुळे भाराभर ग्रंथ वाचून पोपटी विद्वान् बनलेल्या पण अध्यात्मविद्येत जात्यंधाप्रमाणे असलेल्या कोरड्या विद्वानापेक्षा त्यांची विद्वत्ता व बुद्धिमत्ता अधिक सरस होती असेंच म्हटले पाहिजे. विद्वानाचे खरें ध्येय किंवा अपेक्षा म्हटली तर वास्तविक दिसो परतश्व डोळा' हीच असली पाहिजे. पण तशी ती क्वचितच असलेली दिसते. शिवाय बाह्य अगाकडे अखंड वळलेले डोळे मिटल्याशिवाय ज्या डोळ्याला परतत्व दिसावयाचें तो अंतर्गत तृतीय नेत्र उघडावा कसा ? विश्वाच्या मौजा व चमत्कार पाहून घटकाभर रंजन होईल, पण तें घटकाभरच. भूत सृष्टी ही विकारी असल्यामुळे त्या विकारी भूत सृष्टीच्या अलीकडे किंवा पलीकडे राहिलेले परतत्त्व किंवा स्वात्मतत्त्व हाती लागल्यावांचून अक्षय समाधान होणे शक्य नाही. रूपरूपांतरांनी परिणत होत जाणारी भासमान भूत सृष्टी कोणीकडे व निर्विकार निश्चल अशी आत्मवस्तु कोणीकडे ? अशी आत्मवस्तु जाणणाराच खरा विद्वान् होय. प्रसंगाप्रसंगाने गोविंदसुतांच्या हातून एकंदर पांच ग्रंथ निर्माण झाले. या त्यांच्या ग्रंथांमधून त्यांचा दासबोध, ज्ञानेश्वरीवरील मार्मिक व्यासंग व संप्रदायशुद्ध विचारसरणी ही दिसून येतात. आध्यात्मिक भूमिकेवर बसून लीलेने जगांतील सामान्य लोकांच्या चाललेल्या चळवळी व विद्वानांच्या वळवळी यांचे त्यांनी बिनचूक चित्र काढले असून अध्यात्माच्या अभंग पायावांचून उभारलेले वाङ्मयाचे उंच उंच मजले कसे निराधार व सुखसोयीच्या दृष्टीने अपुरे पडतात हे त्यांनी उत्तम रीतीने दाखविले आहे. मुमुक्षु व बुभुक्षु कोणीही असो, त्याला परिणामी हितकर काय हे संतवचनांनी स्वानुभवाच्या बळाने त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या पुस्तकांतून दाखविलें आहे. स्वात्मबोधाचा रवि जिकडे अस्तंगत होतो अशा दिशेकडून मलिन संगतीच्या साथी येऊन कशा सगळीकडे पसरतात याचे विवेचन त्यांनी केलें असून स्वकीय संस्कृतीचा व सनातनधर्माचा परंपराशुद्ध अभ्यास ज्यांनी केला नाही अशांना तोंडघशी पाडून त्यांच्यांत 'तूट व फूट' उत्पन्न करण्यास ही सूर्य मावळविणारी संस्कृति कशी कारण होते हे मोठ्या कळकळीने व सडेतोडपणाने त्यांनी सांगितले आहे. भोगलंपट व रजस्तमोगुणी लोकांस तर त्यांचे ग्रंथ वाचनीय आहेतच पण मुमुक्षुलोकांस तर मननीय व अभ्यासनीय. ही आहेत.
गोविंदसुत तत्वज्ञानाच्या प्रांतांत गोविंदसुतांची भूमिका अत्यंत श्रेष्ठ दर्जाची व स्वानुभूतीची असल्यामुळे त्यांच्या सहजासनावरून काढलेल्या सहजोदारांत जिकडे तिकडे निश्चितपणा व स्वप्रीती ही दिसून येतात. निराधार तर्क, पोकळ कल्पना, अबोधांतील अनुमाने, अर्धवट हाताळून अर्धवट सोडलेले ताविक प्रभ, चाचपडत लिहिलेले नीतिशास्त्र असा गोंधळ त्यांच्या लेखनांत दिसून येत नाही. स्वात्मसुखाचे शिखर गाठीपर्यंत जिज्ञासू मुमुक्षुपुढे जे भनेक गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होतात व ज्यांचे नीट निरीक्षण करणे त्याला भवश्यक असते अशा प्रश्नांना अगदी सुटसुटीत निश्चित उत्तरे त्यांनी दिली भआहेत. प्रचलित परिस्थितीसंबंधाने त्यांनी सडेतोड उद्गार काढले असले तरी त्यांचे खरे अंतरंग अध्यात्मांतच रंगलेले दिसून येते व त्यांच्या या सहजोदारां. तच त्यांच्या दीर्घकालीन आध्यात्मिक तपश्चर्येचें तेज सर्वत्र फांकलेले दिसते. पुढे दिलेल्या त्यांच्या परमार्थविचारमाला व आत्मानुसंधान या ग्रंथांतील निवडक वचनांमध्ये खालील प्रश्नांवर चांगला प्रकाश पडलेला पाचकांस दिसून येईल. भारतीयांचे ध्येय कोणते, खरा पुढारी कोण, छोकसंग्रह कशाला म्हणतात, परमार्थ म्हणजे काय, चिदचिग्रंथि ती काय, गुरु, शिष्य, उपदेश यांचे लक्षण काय, उपासना कशी करावी, अभ्युदय- निःश्रेयस कशाला म्हणावें, प्रारब्ध-प्रयत्नांत विसंवाद आहे काय, माया- माया ती काय आहे, पंढरी व पंढरीची वारी कोणती, कर्म-अकर्म-निष्कर्म पा काय चिजा आहेत, योगाचे स्वरूप काय, नामस्मरणाचे मर्म कशांत भसते, - महंचे स्वरूप काय व तो सत्य, का मिथ्या आहे, विचार भाचारांचा मेळ कसा घालावा, विश्वाचे स्वरूप काय, साक्षात्कार हा काय पदार्थ आहे, संतांच्या ग्रंथांत खरोखरी विसंगति असते काय? हे ते प्रश्न होत. भारम-शास्त्र-गुरुप्रचीतीच्या बोलांनी गोविंदसुतांनी या व इतर काही प्रभांना जी उत्तरे दिलेली आहेत त्यांची केवळ स्मरणी करून ती हस्तगत केल्याने काम भागणार नाही. ॐ कार तंतूने गुंफलेला हा हार 'कंठगत करून मुमुक्षूने जर परेपरत्या परमात्म्याची ओळख करून घेतली तरच या सूक्तींचे किंवा सूक्तांचे सार्थक ! परमार्थविचारमाला व आस्मानुसंधान या दोन ग्रंथांतूम अगदी छाटाछाट करून ३६५ वचने निवडून काढली भाहेत. दररोज एक एक सूक्तीचे मनन करावयाचे म्हटले तरी एक वर्षांची बेगमी होईल। केशव भिकाजी बापट, चिपळूण गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति परमार्थविचारमाला' -- . (१)ग्रंथादिकांत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या चित्तांत अनेक विषयांनी भाधींच प्रवेश केला आहे व चित्तांत विषय आणि विषयांत चित्त, अशा एकरसतेने बनलेली चिदचिद्ग्रंथि ही अंतःकरणांत वासनारूपाने बसून विषयांच्या नादाने आपणास नादान करीत आहे. ती चित्तांतील विषयग्रंथि सुटून चित्ताने आपल्या चित्स्वरूपाला ओळखावे आणि सर्व विषयांचाही विषय परंतु निर्विषय अशा त्या सच्चिदानंद श्रीहरीच्या पदी लीन व्हावें. (२) कालचक्रांतील अनंत जन्मांच्या भ्रमणाने ज्या संस्मरणीय सद्वस्तूची आपल्यास विस्मृति झाली आहे, परंतु दुर्लभ अशा भरतभूमीतील मानवदेहांत भापण आल्याने जिच्या स्मरणाची सुसंधि आलेली आहे ती सद्वस्तु म्हणजे रमारमण हरिगोविंदाचे रमणीय चरणकमल होत. (३) बद्धांना स्वयंस्फूर्तीने कृतकर्माचा पश्चाताप होईल तेव्हांच देवाच्या दयेने ते परमार्थाकडे वळतील. (४) जेथे शब्दाचा किंवा ग्रंथाचा, चिदचिग्रंथीचा निषेध, तेथेच सत्यवस्तूंचा बोध असतो. (५) बोधभूमिका ही कुणाच्या लेखांत नाही, मुखांत नाही, तर ती निजहृदयसंपुष्टांत आहे. (६) नरदेहाला येऊन शाश्वत, सुखमय, निरंतर, सदा-उदित, साक्षात् अशा आत्मस्वरूपाची अध्यात्मविचाराने ओळख करून घेऊन तद्रूपतेने जन्ममरणाच्या फेन्यांतून मुक्त म्हावें हे ध्येय फक्त भारतीयांपुढेच आहे. (७) चातुर्वर्ण्य, दैवी संपत्तीची सव्वीस लक्षणे व सत्वांश ही जन्मजात गुणकर्मविभागशः वंशपरंपरागत प्रत्येक व्यक्तींत, तशी समाजांत, राष्ट्रांत स्वे स्वे कर्मण्यभिरत राहून जिवंत ठेविली की या कामधेनूच्या आश्रयावर नुसते स्वराज्यच काय, पण ब्रह्मीचे राज्य हाती येते. (८) भारंभी धर्म आणि शेवटी मोक्ष, यांच्यामध्ये अर्थ माणि कामेच्छा ठेवून, धर्मअर्थकाममोक्ष हा पुरुषार्थ साधण्याचे उच्च ध्येय पूर्वजांनी भापल्यापुढे ठेविले आहे; यालाच अभ्युदय व निश्रेयस् म्हणतात.
गोविंदसुत (९) भारतीयांचा प्रपंच विश्वकुटुंबी असून परमार्थाकरता आहे. (१०) आत्मा बोधरूप आहे, म्हणून तो मनाचा, तर्काचा, विद्वत्तेचा विषय नसून केवळ निश्चयात्मिका बुद्धीचा विषय आहे. (११) बौद्धिक-आध्यात्मिक धारणा व तिची परंपरा समाजांत जेणे करून जागृत राहील, त्याच्या (समाजाच्या ) मार्गात संकटे आल्यास त्याच्या निवारणार्थ चातुर्वर्ण्य व्यवस्था स्वे स्वे कर्मण्यभिरत ' जय्यत राहील, दैवी संपत्तीचे दैविक तेज राष्ट्रात प्रज्वलित होईल अशी व्यवस्था ठेवणे, हा सनातनधर्मातर्गत खरा लोकसंग्रह होय. (१२) लोकशाहीचे विलायती खूळ राजकारणांत, तसें धर्मातही या पुढान्यांच्या फुसलावणीने शिरले आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ति धर्ममार्तड, शंकराचार्य बनून आपल्या मिरवणुकी काढून घेत आहे ! (१३) मनाला स्वातंत्र्य दिले की, बुद्धीचं स्वातंत्र्य लोपलेंच, म्हणून बुद्धि शुद्ध राहाण्यासाठी मनाला शास्त्रोक्त बंधनांत ठेवण्याकडे आर्य परंपरेचा कल आहे. (१४) निर्भेळ किंवा वसाहतीचे स्वराज्य मिळण्याला जो पराक्रम लागतो तो अंगांत कधी येईल तो येवो, पण तूर्त ही तरुणांची लोकशाही घरच्या म्हातारीचा काळ होऊन, ज्या महात्म्यांनी दूरदृष्टीने ही धर्मबंधनें घातली त्या स्वर्गस्थ पवित्र पूर्वजांना मात्र 'झक मारली आणि ही बंधने घातली,' असा पश्चात्ताप होऊन त्यांना सळो का पळो करण्याला लावणार ! (१५) अनायांच्या धारणेत ही शाश्वत बौद्धिक सनातन धारणा नसल्यामुळे देहाभिमान आणि देशाभिमान याच्या पलीकडे त्यांची धारणा जातच नाही. ( १६) सनातन धर्माभिमान हा सनातन, तसा व्यापक, विश्वकुटुंबी भाहे, म्हणून देशासाठी नव्हे तर धर्मासाठी मरावें. (१७) हरिभजन, राजकारण, सावधपण व साक्षेप (दास. ११-५) ही समर्थाची चतुःसुत्री होय. (१८) ज्या आर्यमातेच्या उदरांतून जगदुद्धारार्थ वेदोपनिषदादि आध्यात्मिक संपत्ति निर्माण झाली, रामकृष्णादि अवतार, वसिष्ठ, वामदेव, व्यास, भीष्मद्रोणादि हजारों सुपुत्रांनी आपल्या सच्चरित्र्याने सर्व जगाला थक्क करून सोडणा-या भारत, भागवत, रामायणादि सद्ग्रंथांना सुशोभित केलें; ज्या भरतभूमीने रामराज्याप्रमाणे हजारों वर्षे स्वराज्य उपभोगिलें; भखिल ज्ञान, कला, विद्या, ऐश्वर्य यांचे जी आर्यमाता माहेरघर व सर्व . गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति जगाला गुरुस्थान, चातुर्वर्ण्य, दैवी संपत्ति सत्वांश ही ज्या आर्यमातेची सर्वोत्कृष्ट संपत्ति, निर्गुण सायुज्यमुक्ति हे जिचे त्रिकालाबाधित ध्येय, त्या भार्यमातेला जिवंत ठेवणे हीच आपली इतिकर्तव्यता होय. (१९) ज्या राष्ट्राने परंपरा, शिस्त आणि शास्त्रमर्यादा सोडली, तें राष्ट्र मृत होय. (२०) मी आर्य आहे ही स्फूर्ति एकदां अंतरांतून बाहेर आली की, देहाने आर्यस्वाच्या आचारविचाराचा पोषाख अंगावर चढवलाच समजा ! मग विजयश्री हंसत तुमच्या गळ्यांत माळ घालील ! ( २१) आध्यात्मिक ज्ञानाला आधिभौतिकाची किंमत कळते. पण आधिभौतिक ज्ञानाला अध्यात्म्याची महती कळत नाही. म्हणून त्याला सद्गुरुबोधच पाहिजे व तो गुह्याद्गुह्यच राहाणार. ( २२) उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, हा न्याय जसा व्यवहारांत तसाच परमार्थातही लागू आहे. कर्म-उपासनाज्ञानाने कसून मेहनत करून परमात्म तत्वसार संपादन करणे ती उत्तम शेती; नुसतीच देवाची करुणा भाकून त्याच्याजवळ प्रापंचिक सुख मागणे, म्हणजे देवाणघेवाण करणे हा मध्यम व्यापार; आणि उठला सुटला आपली देवाची सेवा करायची, मग होईल ते होवो, ती कनिष्ठ नोकरी होय. ( २३ ) आत्म्याला लागलेल्या घोरनिद्रेच्या पंचीकृत प्रपंचाध्या रात्रीतील मानवदेह हा पंच पंच उषःकाल होय ! ( २४ ) या पिंडब्रह्मांडात्मक उपाधीचा प्रत्यग्बोधाने निपटून निरास करून, त्याचे निर्बीज करून, मते आणि मतांतरें चटसारी घालवून तत्वांती उरलेल्या तत्त्ववस्तूंशी तादात्म्य करणे, तद्रूप, तल्लीन होणे, किंबहुना मूळचेच तादात्म्य, तद्रूपता, तल्लीनता आहे, ती मानवदेहांत ओळखून घेऊन परमात्म्याला प्राणाहूनही प्रिय असा ' तत्वतः वेत्ति' ( ७-३) भक्त होणे याचंच नांव परमार्थ. ( २५) गोड वाणांचे, बुद्धिमान् , शास्त्री, पंडित, विद्वान् , पदवीधर, धनिक, व्यवहारज्ञ, तार्किक इ. बहुत आहेत; परंतु अध्यात्मविचाराने भास्म- प्राप्ती करून घेणारा पारमार्थिक फारच दुर्लभ होय. ( २६ ) ' कोऽहम् ' चा प्रश्न सोडवण्याच्या मार्गात जो असेल, स्यालाच सगुरु भेटतील. ( २७ ) आपण परमात्मरूप आहोत हा बोध होणे याचेच नांव सद्गुरु- (गीता ७- कृपा होय.
७२ गोविंदसुत (२८) भाधिभौतिक दृष्ट्या आपण कितीही सुधारलो तरी आध्या. स्मिक दृष्ट्या आपण नि:संशय अधःपाताला जात आहोत हे आजकाल कोणाच्या ध्यानी मनीही येत नाही, हे आश्चर्य होय! ( २९) आत्मप्राप्तीला स्वयंमन्यता, तर्कप्रतिष्ठा, व्युत्पत्ति यांचे घाव आहे. (३०) हरि हृदयांत प्रगट होईपर्यंत सर्व ठकाठकी व भ्रांतीची भुताटकीच होय. (३१) दुर्लभ काय आहे ? आत्मलाभाची इच्छा होणे दुर्लभ आहे. ३२) प्रकृतिभ्रम नाहीसा होणे म्हणजेच हरीचा उदय होय. (३३) जड, चंचल निश्चलरूपाने प्रकृती एकच आहे. ती जडामुळे कर्मरूप, चंचळामुळे उपासनारूप व निश्चलामुळे ज्ञानरूप बनली आहे म्हणून कर्म, उपासना, ज्ञानरूपाने कर्तृत्ववान् बनलेली एकच प्रकृती ज्यांत पडेल, तप ती बनते, हा या मानवी प्रकृतींत मोठा गुण आहे. (३४) अध्यात्मज्ञानाने अंतर्बाह्य मोकळा होऊन लोकसंग्रहार्थ पुढे येईल, तोच खरा पुढारी होय. (३५) कर्म, उपासना, ज्ञान या त्रिवेणीवर सद्गुरु बोधाने आपले पिंडदान भापल्या हाताने झाले पाहिजे, ( ३६) बोधस्वरूप परमात्म्यायोग्य जर वधू असेल, तर ती मानवी मतिच होय. (३७) मकारांतून इंद्रियद्वारा जे कर्तृत्वाला आले ते कर्म होय. (३८) 'अ' म्हणजे काही नाही असे जे निरामय, शून्य आकाश, त्यांतून 'हम् ' ही भाकाशतन्मात्रा किंबहुना आकाशवाणी स्फूर्तिरूपाने ती अहम् बनली. (३९) ॐ मधून व्योम निघाले. व्योम मधून " अहम् स्फूर्ति निघाली तीच माया होय. ) आपला पिंड हे एक शीत चांचपले की, सर्व ब्रह्मांडाचा निवाडा त्यावरून देता येतो. (४१) साक्षात् मीच ॐ असल्यामुळे मला कोणी माझ्या पालन. पोषणार्थ पाळण्यांत ठेवलेल्या नांवाने हाक मारली, तरी मी माझ्या मूळच्या ॐ च्या रूपाने ओ म्हणून पुढे सरसावतो. अर्थात् माझ्यामध्ये ॐ भरला भाहे आणि मध्ये सर्व मीच भरलो आहे. निघाली, गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति ७३ (४२) अहम् आणि इदम् एकाच महत् ब्रह्मांतून आली. (४३) प्रपंचरूप अश्वत्थवृक्षाच्या अधऊर्ध्व शाखांचे मूळ मानवदेहांत भआहे, म्हणून या देहाची योग्यता मोठी आहे. (४४) आत्मबोधाने होणारे सुख भोगण्याचा अधिकार त्या महम्चा नसून शुद्ध बुद्धीचा आहे. (४५) कल्पनेपासूनच अष्टधा प्रकृती झाली, म्हणून ती नुसतीच सौभाग्यवती नसून अष्टपुत्रा सौभाग्यवती आहे ! ४६ ) जो कल्पनेत आला तो मुळी आत्माच नव्हे. (४७) आध्यामिकदृष्ट्या कल्पनेबरोबर जग उत्पन्न होते आणि कल्पने- बरोबर लयाला जाते. (४८) आपण हे जे वर डोके खाली पाय असे दिसतो ते प्रथम आकाश डोक्यांत, वायु नाकांत, तेज मुखांत, जल पोटांत आणि धरित्री पायांत घेऊन बसलो आहोत, (४९) आंधळे धड व डोळस डोके यांच्या अन्योन्याश्रयाने भामचे कर्म चालले आहे. (५० ) सर्वांचे मूळ वाटोळे आहे. आमचे कर्माचे चक्रही वाटोळेंच. कारण कोण व कार्य कोण, हे या चक्रांतून काढतांच येत नाही. (५१) कल्पनेत असून कल्पनातीत, कर्मात असून कर्मातीत, विश्वांत असून विश्वातीत जे आपण, ते क्षणभर कल्पना टाकून स्वस्थ म्हणजे स्वरूपों स्थित होण्याचा नित्य अभ्यास करूं तर किती मौज होईल बरें ? (५२) भात्म्याला ब्रह्मरूप, कल्पनारूप, गुणरूप, कर्मरूप कल्पिणे हीच माया होय. (५३) प्रत्येक ग्रहाला त्याच्या आंसाभोवती फिरण्याची एक व सूर्याभोवती फिरण्याची एक अशा दोन्ही गती सूर्याच्या गुरुत्वाकर्षणानेच मिळतात. त्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याला आपल्या प्रारब्ध कर्माभोवती फिरण्याची एक व सृष्टिक्रमाप्रमाणे फिरण्याची एक अशा दोन्ही गती सृष्टीच्या गतीच्या आकर्षणामुळेच मिळतात. ५४) पुत्राचे, धनाचें, बायकोचे इ० नाशवंत वेड तेव्हांच लागते पण शाश्वत अशा श्रीरामाचे वेड कांही लागत नाही, (५५) परमेश्वराच्या संकल्पाचे प्रतिबिंब आपल्यात उतरले आहे. एकोहम् बहुस्याम् ' हा परमेश्वराचा संकल्प, हा परमेश्वराचा संकल्प, त्याप्रमाणे आम्ही एक भसतांना अनेकाकार होतो. गो. १० गोविंदसुत वेगळा जर (५६) विश्व पाहून तुम्हांला परमेश्वर दिसतो काय ? नाही ! कारण, " जग निर्मिले जेणें । तो वेगळा पूर्णपणे " ( दास. ८-१-४० ). तेव्हां जग पाहून तुम्हाला जर ईश्वर दिसत नाही तर आमच्या शरीराकडे पाहून तरी आम्ही तुम्हांला दिसतों असें तुम्हांला म्हणवेल काय ? जगाहून परमेश्वर आहे तर आम्हीही देहाहून वेगळेच आहोत ! ( ५७ ) विश्वंभरासकट सर्व जीवांची चक्रे आपआपल्या आत्मत्वाच्या भोवती फिरून एका योनीत जन्मल्यापासून मरेपर्यत एक चक्राची गति, अशा रितीने चौयायशी लक्ष योनीतील आमचे गरके एका विश्वभराच्या भस्तित्वावर चालले आहेत. (५८) आत्मस्वरूपाचा यथार्थ बोध नसण्याच्या अवकाशांत, आकाशांत, शून्यांत, भ्रमांत विश्वंभरापासून तो आम्हां जीवांपर्यंत सर्व विश्व उत्पन्न होऊन त्यांत सुख, दुःख, ज्ञान, अज्ञान, काम, वासना, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, शांति, दया, जन्म, मृत्यू , स्थिति, गति इ० विकार उत्पन्न झाले भाहेत. (५९) सद्गुरुबोधाने कर्माहून आपण वेगळे होऊ, त्याच वेळी 'कर्ता करविता ईश्वर आहे,' असे म्हणण्याचा अधिकार आपल्यास येईल; नाही तर • भोगून अभोक्ता म्हणती । हे तो अवघीच फजिती !' (दास. १७-६-३१) (६०) कार्य तेच कारण होते व कारण तेच कार्य होते आणि कार्य. कारणात्मक कर्म होते. ( ६१ ) औट हाताच्या पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी या अर्ध मात्रेच्या चंद्रभागेत निःसंदेहाचें स्नान केले तरच पुढे अवीट अशा विटेवरील पंढरीरायाचें परमात्मस्वरूपांत खरे दर्शन होते. (६२) जन्मभूमि, कर्मभूमि, रंगभूमि आणि स्मशानभूमि असे चारही प्रकार कालमहात्म्याने होत असतात. ( ६३ ) · एकोहं बहु स्यां बहुरहं एकःस्याम् ' अशा विश्वंभराच्या संकल्पाप्रमाणे आपल्याही कल्पनेचा कारखाना चालला आहे ! (६४) परतत्वा अरौतें व स्थावरा आतौतें,' में कांहीं होतें जातें तें सर्व स्थळ व काल यांनी व्यापून टाकलें भाहे. पण परतत्वापरौतें जे आहे त्याला शिवण्याची कालस्थलाची कांहीं प्राज्ञा नाही. ६५ ) जड चंचलात्मक सृष्टीतील सूर्याचा प्रकाश हा जड चंचलाला प्रकाशित करतो, पण अध्यात्मवस्तूही प्रकाशित करण्याला ज्ञानसूर्यच पाहिजे.
. गोविंदसुतांच्या सद्वोधसूक्ति (६६) देहाकरितां जगावें, आपला तळीराम गार करावा, त्याकरिता बाकीचे देश पादाक्रांत करून तुडवावे हे इतर देशांचे ध्येय, तर धर्माकरतां जगावें, धर्माकरतां मरावें, हे भारतीयांचं ध्येय, ( ६७ ) दैवी संपत्तीची २६ लक्षणे भगवंतांनी ( गीता, अ. १६) स्वमुखाने सांगितली आहेत. त्यांतील एकही लक्षण संपादन करण्याचा कोणीही पुढारी प्रयत्न करीत नाही. (६८) कल्पनेचा जगांत संचार नसून जगच कल्पनेत संचार करते. ( ६९ ) आपले अंतर हेच ब्रह्मपुर असून त्यांतच आत्मारामाचा शोध करावयाचा आहे. [ छांदो. २६-८] (७०) हरीलाच नामानिराळा करून आपण अहंपणाने मध्येच घुसल्यामुळे सुखदुःख इत्यादिकांचे आघात आपल्यास सोसावे लागतात. (७१) विश्वच मुळी चक्राकार, म्हणून विश्वाकार कर्मही चक्राकारच आहे. (७२) विश्वंभराच्या भवचक्राच्या अगिनगाडींत आपण बसलो म्हणजे ही गाडी कशी चालेल, इंजनांत कोळसा कोण घालील, वेग कसा मिळेल ही काळजी आपणास नको, त्याचा धनी वेगळाच आहे ! ( ७३ ) आकाशांत ज्याप्रमाणे दिवस व रात्र नांदतात, त्याप्रमाणे आपल्या देहांत किंबहुना एकंदर विश्वकुटुंबांत प्रारब्ध आणि प्रयत्न समसमान नांदतात. प्रारब्धाशिवाय प्रयत्न नाहीं, प्रयत्नावांचून प्रारब्ध नाही. (७४ ) प्रारब्ध आणि प्रयत्न हे शब्द भिन्न असले तरी मागून पुढून कर्मच आणि ते उभय वाद्यांच्या मागें, ज्ञानी असा अज्ञानी असो, लागलेलेच आहे; मात्र ज्ञानी हे त्यांत असून नसल्यासारखेच असतात. ( ७५ ) ज्या शरिराच्या अधिष्ठानावर आपण विषयांनी सुखी होऊ म्हणून मानतो, ते शरीरच मुळी आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक या तापत्रयांनी ग्रासलेलें आहे. (७६) सद्गुरुकृपेने चिदचिद्ग्रंथि सुटली नाही तेथपर्यंत कर्माच्या पोटीं हा प्रारब्धप्रयत्नाचा वाद व त्याचा अहंकार जगाच्या अंतापर्यंत कायम राहाणार. ( ७७ ) प्रारब्ध किंवा नशीब हा शुभाला आणि अशुभाला एक टेकूच आहे. बाकी, मागून पुढून चालला आहे तो प्रयत्नच आहे. मानतों नशीब आणि करतो प्रयत्न, अशीच आमच्या प्रारब्ध-प्रयत्नांची रचना आहे.
गोविंदसुत . (७८) भामचे आम्हीच स्वांगाने परमार्थ केला तर होणार आहे. पण त्याला सद्गुरुकृपाच पाहिजे. आम्ही स्वतः उभे राहिलों की, मग देह, कर्म, प्रारब्ध, प्रयत्न इत्यादि घट सगळे अनुकूल होतील. (७९) 'प्रयत्नांती परमेश्वर ' म्हणतात ते खोटें नाहीं ! भामचा प्रयत्न परमेश्वरासाठी मुळीच नसून विषयसुखार्थच असतो. तेव्हा प्रयत्नानंती परमेश्वर कसा भेटेल? (८०) आत्मशोधनाचा प्रयत्न केला की, सद्गुरुषोधाचे प्रारब्ध फळास आलेच समजा. (6.) या देहाच्या पूर्वीचे जे कर्म ते प्रारब्ध व देहाकडून जे कर्म होत आहे तो प्रयत्न अशी नांवें देहाच्या उपाधीनेच आली आहेत. वस्तुतः चालला आहे हा प्रकृतीचा स्वभावच होय. (८२) जन्माच्या पोटांतच जसा मृत्यु तसा प्रारब्धाच्या पोटांतच प्रयत्न. अशा रितीने प्रारब्धाचा व प्रयत्नाचा एकमेकांत संबंध आहे. पण त्यांचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध आहे का? (८३) या पूर्व प्रारब्धाने आपल्याशी जो अपूर्व संबंध जोडला आहे व भापल्याला पुढे करून आपण मागे राहिले आहे, त्याला विचाराच्या चवाट्यावर आणले तर झदिशी त्याचा निकाल लागतो. (८४ ) बोधरवीचा उदय आपल्या अंतरांत होऊन आपण "यो बुद्धेः परतस्तु सः ॥” (गी. ३-४२) अशा प्रकारचे बोधरूप झाल्या. शिवाय भापल्यास जग मिथ्या म्हणून चालावयाचे नाही. (८५) "ॐ तत्सदिति निर्देशा " ने अखिल कर्माचे अर्पण, तर्पण, समर्पण करून " नमम " म्हटल्यावाचून कातून सुटका नाही. (८६) आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मायोपाधि जगदंबर सत्य नाही, हे खरे, पण जेथपर्यंत भापले अंतःकरण आत्मबोधाने परिपक्क झाले नाही, तेथपर्यंत जग निर्माण करणान्या मूळ पुरुषाला सोडून काही चालावयाचें नाही. (८७) पाळण्यांत पालनपोषणार्थ ठेवलेल्या नांवाचा भहंकार न घेता 'मी'चे जे शुद्धबद्ध स्वरूप तोच देव, आदिपुरुष आरमाराम होय ! (८८) परमार्थासाठी अनेक साधने आपण अहोरात्र करीत असतो, पण त्या साधनांनी आत्मबोध होईल असे बौद्धिक तप त्यांत काय आहे ते पाहिले पाहिजे.
गोविंदसुतांच्या सबोधसूक्ति (८९) आत्मबोधाने निःसंदेह म्हणजे निःसंशय आणि देहातीत साधुमहाराज झाले आहेत का नाहीत याची काय तुम्ही खात्री करून घेतली आहे ? भाणि त्यांच्या त्या ज्ञानाचा आपल्यास उपयोग होईल याबद्दल आपण काय खात्री करून घेऊन दर्शनास जातां ? तत्वविचाराने आत्मबोधाचे माप पदरांत घेऊन निःसंदेह बस्तुरूप झालेले महात्मे फारसे मिळतच नाहीत. (९१) राष्ट्रात दैवी संपत्ती जागृत असेल तर स्वराज्यच काय, पण स्वर्गाचे राज्यही हाती येईल. ( ९२ ) परमात्मबोधरवीचा अंतःकरणांत स्वानुभूतीने उदय झाला नसेल तर मनुष्य पड्दर्शनादि शास्त्रांच्या पाशांत सांपडून नुसता शास्त्रसंपन्न होतो. ( ९३ ) आत्मारामाच्या आड आपल्या अंतर्यामी अज्ञानाचा पडदा आहे तो श्रीहरिगुरुकृपेनें दूर झाला पाहिजे; तरच आत्मबोध होईल. ९४ ) अनधिकाऱ्याच्या हाती ग्रंथ जाणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. आजकाल परंपरा सोडून केवळ विद्वत्तेच्या घमेंडीवर स्वयंमन्यतेने अध्यात्म ग्रंथ वाचून तर्ककर्कश चिकित्सक मंडळी फार झाली आहे. ( ९५) गीता, दासबोध इ० ग्रंथ ज्याला अध्यात्मदृष्ट्या पाहावयाचे असतील त्यांनी राजकारणी किंवा तर्ककर्कश विद्वानांच्या मुखाने न ऐकतां स्वात्मानुभवी सत्पुरुषाच्याच मुखाने ऐकले पाहिजे. ( ९६ ) ज्या कोणा भाग्यवानाच्या उदरी हरी प्रगट होईल, त्याच्या कर्मात, भक्तीत, योगांत, ध्यानांत, मनांत, तुर्येत, उन्मनींत, श्रवणांत, मनात, स्मरणांत, विस्मरणांत, साक्षात्कारांत, आंत, बाहेर, जिकडे तिकडे हरीच हरी सहज होऊन जाईल. ( ९७ ) नामस्मरण करावयाचे तर आपल्यास जें अवगत असते परंतु भाठवत नाही, त्याचे स्मरण होय. मग देव आपल्याला अवगत झाल्याशिवाय त्याचे स्मरण कसे होणार ? ( ९८ ) आत्मसाक्षात्काराची परीक्षा अंतर्मुखज्ञानीच करूं जाणतात. ( ९९ ) ज्याने जी जन्माची इतीश्री मानली असेल, तेच त्याचे ब्रह्म भसल्यामुळे खया ब्रह्माचा बोध त्याच्या अंत:करणांत होणे शक्य नाही. म्हणून आत्मबोध हा विषय सर्वांचा नसून केवळ मुमुक्षूचा आहे.
गोविंदसुत (१००) द्रष्टेपणाचाही अंत करून तूं आपल्या द्राष्टांतिक स्वरूपाकडे पाहाशील तर त्याला दृष्टीसृष्टीतील दृष्टीच्या भांतील दृष्टांत देऊन तुझें कोण वर्णन करणार? तुझ्या ओळखण्यांतच ब्रह्माचा बोध आहे. (१०१) अहं ब्रह्मास्मि या मंत्राने मंतरलेले सर्प बहुत आहेत, पण सहजसिद्ध जातीचा सर्प विरळा ! (१०२) बोधरूप परमात्म्याचा बोध बुद्धीलाच होणार आहे. म्हणून नरदेहाला आलेल्या ज्याला भात्मज्ञानाने मुक्त व्हावयाचे असेल त्याने आचार विचाराने बुद्धि स्वच्छ ठेविली पाहिजे, (१०३ ) दैवी संपत्तीची लक्षणे अंगी मुसमुसून तुम्ही दैववान व्हाल, तरच स्वराज्यप्राप्ती होईल. गुणकर्म विभागशः उत्पन्न झालेले त्रैगुण्य आणि चातुर्वण्र्य ब्रह्मदेवालाही आतां एका गुणांत आणणे शक्य नाही. (१०४ ) आपल्याला असे वाटते की, आपल्या डोळ्यांदेखत मायेने निघून जावें. पण आपला डोळा अर्थात् कल्पना हीच मुळी माया आहे. त्या मायेचे मूळ आपलेच अंतःकरण, हीच मूळ माया, ती कल्पनारूपाने आपल्या डोक्यावर बसून शिरजोर झाली आहे व आपल्याला नाचवीत आहे. (१०५) कल्पनामायेचे निर्मूळ कल्पनेनेच करावयाचे आहे. (१०६) मीचे निर्मूळ केल्याशिवाय आत्मबोध होणे शक्य नाही. (१०७ ) अध्यात्मामध्ये देव विचाराचा, मुक्ती विचाराची, साधन विचाराचे, मिळून सर्व विचाराचे साम्राज्य आहे. (१०८) ज्या ज्ञानावर आपण अहोरात्र सर्व व्यवहार करतो, ते ज्ञान कोठून येते याचा शोध लावण्याची कोणालाच इच्छा होत नाही, हाच मोह होय. (१०९) पंचभौतिक पिंडब्रह्मांडांतर्गत जो अहम् ब्रह्मांडांतून पिंडांत येतो व पिंड पडला की ब्रह्मांडांत लीन होतो, तो व्यक्ताव्यक्त किंवा क्षराक्षर प्रतिबिंबित महम् असून, क्षराक्षरातीत अहम् हा उत्तम पुरुष; तो बगळा आहे. (११०) 'मी जीव' हेच अज्ञान होय. (१११) मी किंवा अहम् हा नुसता भास असतांना त्याचा आपण विचार करीत नसल्यामुळे तो अहम्च येथे ब्रह्म होऊन बसला आहे. (११९) या महत् ब्रह्म होऊन बसलेल्या मीचा मुळांतच आस्मानात्म- विचाराने शोध केला, तर मी हाच मुळांत लटका ठरेल आणि त्या मीवर , . गोषिवसुतांच्या सद्बोधसूक्ति ७९ माझेपणाची जी पोकळ पण डौलदार उभारलेली सुखदुखाःस्मक इमारत, ती सपशेल आपोआप ढासळून पडेल. (११३ ) निवृत्तिमागांत आपण मीचा विचार न केल्यामुळे खया स्वरूपाला मुकलों, त्याप्रमाणे प्रवृत्तिमार्गात आपण आपलें चातुर्वयात्मक स्वरूप आणि तेज परंपरागत मार्गाने जागृत ठेवण्यास विसरलों, म्हणून स्वातंत्र्याला मुकलो. (११४) अंतर्मुख वृत्तीचे लोकच अध्यात्मशास्त्र जाणण्याचे अधिकारी असून बहिर्मुख वृत्तीच्या लोकांनी संतांच्या ग्रंथांतील नुसते वाक्चातुर्यच पाहात राहावे. ( ११५ ) शद्धार्थीच्या पलीकडे अर्थाचाही अर्थ, गूढार्थ किंवा रहस्यार्थ असतो, तो प्रगट झाल्याशिवाय अध्यात्मिक ग्रंथ लागला असे म्हणता येणार नाही. (११६ ) अध्यात्म हा विषय बद्धांचा किंवा सिद्धांचा नसून मुमुक्षूचा आहे. ( ११७ ) देवी संपत्ति, ब्राह्म व क्षात्रतेज हे आर्यभूमीचे पौरुष आहे. तें राष्ट्रांतून नष्ट झाल्यामुळे आपल्याला अवदशा आली आहे. (११८) संतांचे ग्रंथ हे ज्ञानमुद्रेचे ठसे आहेत. परमेश्वराचे सहज श्वासोच्छ्वास हे जसे वेद, तसे संतांचे ग्रंथ हे त्यांचे सहज श्वासोच्छ्वास होत. (११९) नकाशाशिवाय भूगोलाचे ज्ञान होत नाही, तद्वत् सांप्रदाय. पूर्वक हृदयांतील स्वात्मानुभूतीचा नकाशा सजनसंगतीत राहून घेतल्या. शिवाय आणि त्यांच्याच मुखाने अध्यात्मग्रंथश्रवण केल्याशिवाय सद्भत नाही. ( १२०) ज्ञानगंगेच्या शुद्धोदकांत मनाचे निमजन होऊन ते रामरंगांत रंगून जाईल, तरच ते खरें मनोरंजन होय. ( १२१ ) दैवी संपत्तीला प्रोत्साहन देणान्या संतचरित्रांची पुस्तकें काढावयाची टाकून जो उठतो सुटतो तो आपला आकाशांत भराज्या मारून प्रेमळा, सुमिला, विमला, दुर्मिळा, कमळा, इ. कांच्या चटणी कोशिंबिरीच्या अगर अशाच प्रकारच्या नर-मादीच्या, कावळा-चिमणीसारख्या गोष्टींनी भरलेल्या कादंबच्याच काढतो! नाटकांना तर काय हल्ली उतच आला आहे ! ( १२२) जो आत्मज्ञानाने स्वस्वरूपाशीं विभक्त राहिला नाही, तो भक्त. ( १२३ ) संतांचे ग्रंथ जितके आपल्यास सोपे दिसतात, तितके ते नाहीत. जागजागी त्यांनी सद्गुरूच्या मेखा ठोकल्या आहेत त्या गुरुभंजना. शिवाय उलगडता येणार नाहीत.
८० गोविंदसुत (१२४ ) ज्या एका भव्यक्त तत्वामध्ये ही सर्व दृश्य तत्वें लीन होतात, असे में एक अज्ञेयतत्व ते ज्या एका अधिष्ठानावरून भासते, ते अधिष्ठानच मुळी भ्रमात्मक असून त्या भ्रमाच्याही अलीकडे असें एक क्षराक्षरातीत तत्व आहे की त्याचा उदय झाला असता हे अज्ञेय तत्व, की ज्यापासून हे सर्व व्यक्तीला येते असे दिसते ते अध्यक्तच पार नाहीसे होते, हा भामच्या संतांचा स्वानुभवाचा सिद्धांत आहे ! (१२५) संतांच्या ग्रंथांतून जे नानाप्रकारचे चित्रविचित्र रंग दिसतात, असंबद्धता व विसंगतता दिसते, यांतील इंगित हे की, यांतील एकही रंग खरा नसून निश्चलत्वाचा रामरंग तेवढा मात्र खरा असतो! (१२६ ) त्याप्रमाणेच पंचकोशातीत अशा स्वात्मारामापाशी संतांचा जो सहजासनावर बसून सुखसंवाद होत असतो आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथांत उमटते, त्याचे अनुमान आम्ही शब्दांच्या कोशांतून अर्थ पाहून करूं लागली तर ते आपणास कसे समजणार ? (१२७ ) आपल्यांत जे दुर्गुण असतील ते नाटकरूपाने चव्हाट्यावर मांडून त्यांचा खेळखंडोबा करून ते घालवावयाचे हे दिले सोडून आणि ज्या साधुसंतांचे रोज प्रातःस्मरण करावयाचें, त्यांची करूं लागलों आपण नाटके ! ( १२८) आत्मप्रचीति, गुरुप्रचीति आणि शास्त्रप्रचीति यांची एकवाक्यता होऊन निःसंदेहता प्राप्त होते, अशा प्रकारचा सत्य उपदेश करणारा तोच खरा गुरु होय. ( १२९ ) परेपरत्या परमात्म्याचे ज्ञान प्राप्त झाले की, हे विद्वत्तापूर्ण आधिभौतिक ज्ञान लोपते. (१३०) कल्पना हा एक परमेश्वराने दिलेला कल्पतरूच भाहे ! या कल्पतरूच्या तळवटी बसून आपण जी जी कल्पना करावी ती ती खरीच आहे आणि कल्पनेहून पलीकडे गेलें म्हणजे काल्पनिक सब झूटही आहे. ( १३१) आधिभौतिक विद्या जर गुरूशिवाय प्राप्त होत नाही, तर भनन्त जन्मींचा भवभ्रम दूर करणारी अध्यात्मविद्या तरी गुरूशिवाय कशी प्राप्त होणार? (१३२) अहम् हा कामाचा अवतार, तो राम कसा होणार ? काम कधी राम होणार नाही आणि राम कधी काम होणार नाही. आपण एका बाजूने काममूर्ती आहोत तर दुसन्या बाजूने राममूर्ती आहोत. (१३३) भापण स्वांगाने रामरूप झालो तर अधांगीच काय पण सर्व त्रैलोक्य रामरूप होईल. .
. गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति (१३४ ) कोणत्याही वस्तूची जेव्हां खरी तळमळ लागते, तेव्हांच ती वस्तू उदयास येते आणि कार्य झाले की लोपून जाते. गीता उदयाला येण्याची अगदी जरुरीच लागली, तेव्हां ध्यानी मनी नसतां पुदिशी भगवंताच्या तोंडून ती बाहेर पडली. (१३५) उपदेशाबरोबर अंतःकरणांतील जन्मजन्मांतरीचा मोहांधःकार जाऊन त्याबरोबर चारही देहांचा निरास होऊन उपास्यदैवत उपासनेकरिता हृदयांत प्रकट झाले नाही तर तो गुरु, तो शिष्य आणि तो उपदेश ही कितीही चांगली असली तरी ' मरका गुरु, रडका चेला आणि सडका उपदेश' असेंच का म्हणूं नये बरें ? (१३६ ) गुरुमुखाने जो अध्यात्म उपदेश मिळेल तेच गुरूचे उच्छिष्ठ आणि तेच समाधीच्याही पलीकडील शुद्ध बुद्ध भूमिका प्राप्त करून देते. (१३७ ) आपण तरी नुसते बहुरुपीच नव्हेत, तर 'बहुरुपी, बहुगुणी, बहुता काळाचे' आहोत. क्षणांत कामी, क्रोधी, लोभी, रागी, त्यागी, भोगी इ. किती तरी रूपें धारण करतों, (१३८ ) अंतर्यामी कृष्णाची धास्ती व बाहेरून मिशीवर ताव, ही जशी कंसाची स्थिति तसे आतून संशयाने, कामाने ग्रासलेले आणि वर चालायची, "घडि एक विमल ब्रह्म। घडि एक सर्व ब्रह्म" अशी ब्रह्मचर्चा ! ( १३९) या भारतभूमीतील नरदेह मिळणे दुर्लभ, तोही मिळाला तरी भरतभूमीला शोभतील अशा त-हेच्या दैवी संपत्तीच्या गुणांनी युक्त असा भारत निपजणे दुर्लभ, त्या भारतांतील भात्मबोधाने तृप्त जहालेले महाभारत म्ह० संत म्हणणे फारच दुर्लभ आहे. ( १४० ) आपण सद्रूप आहोत हा बोध ज्या आचरणाने राहील (१४१) वर्णाश्रमधर्माप्रमाणे भागा आलेले नित्यनैमित्तिक कर्म ईश्वरार्पण करून " सदा सर्वदा मोकळ्या वृत्तीने " राहाणे यांत सर्व आचाराचे योगाचे, भक्तीचे, ज्ञानाचे सार आहे. ( १४२) परमार्थ हा एकदेशी नसून शुद्धसत्वगुणाने सर्व क्रियेत व्यापकपणाने वावरून अलिप्तता कायम ठेवतो; सर्व संतांचे आचरण असेंच असते. ( १४३ ) पहिल्याने डोक्यांतील ब्रह्मविचाराने स्वरूपाचे निश्चितत्व, नंतर मुखाने त्याचा नामोच्चार, म्हणजे ज्ञानदेव ही तृप्ति व नामदेव हा तृप्तीचा ढेकर दिल्यावर " भोजनं मम जीयताम् " कस्ता पोटावर हात फिरविणे हा सदाचार होय. तोच सदाचार. गो.११ - गोषिदसुत ( १४४ ) इंद्रियनिग्रह, मनोजय, वासनाक्षय, आत्मसंयमन यांची परमार्थात तशी व्यवहारातही अत्यंत अवश्यकता आहे. (१४५) नित्यनियमाने स्नानसंध्यादि सस्कम करीत असतां शारीरिक तेज वाढते, चित्तशुद्धि होते, मन प्रसन्न होते, कर्म पुरे झाले म्हणजे समाधान होते, संततीवर त्याचा चांगला परिणाम होतो, पुण्याई वाढते, इ. जे प्रत्यक्ष फायदे आहेत ते जे कर्मभ्रष्ट, ज्यांना कर्माचा संस्कारच नसेल त्यांना सांगून काय कळणार ? ( १४६ ) ज्ञानाशिवाय नाम नाही. ज्ञान व नाम ही एकाच देवाची अंगे असल्यामुळे देवापासून ती विभक्त होत नाहीत; म्हणून ज्ञानदेव व नामदेव ही भक्तीची अंगे ज्याच्या अंत:करणांत भिनली, तोच देवाचा भक्त होय. (१४७ ) परमात्मा व त्याचे ज्ञान जर हृदयांत आहे तर नामाचे मूळही हृदयांतच असले पाहिजे. तसेंच आत्मा स्वयंभ, म्हणून नामही स्वयंभच होय. (१४८ ) अंतर्यामी असणारा भगवान आपण पाहाण्याला अंतर्मुखच झाले पाहिजे. पण आपण पडलों बहिर्मुख म्हणून बाह्य साधनांनी, बाह्य ज्ञानाने, बाहेरच्या बाहेर जातो त्याला पाहायला, तो कसचा सांपडतो ! अंतर्यामींचे जाणायला अंतर्मुखच झाले पाहिजे. (१४९) चत्वारि वाचेचा मूळ जो ॐ कार तोच भगवन्नामाच्या भुळाशी असल्यामुळे हा परमार्थाचा 'ओनामाच ' होय. ( १५० ) प्रपंचांत पुरुपाला स्त्री जशी ' भोज्येपु माता, वचनेषु दासी, कार्येषु मंत्री ' इ० रीतींनी प्रेम, सुखभाग्यादि सर्व प्रकारे सुखावह होऊन प्रपंचाचा विस्तार करते, त्याप्रमाणेच परमार्थात आपल्यास अथपासून इतिपर्यत पापाचे क्षालन करण्याला, संसारदुःख विसरण्याला भगवंताचें ज्ञान देऊन प्रेम उत्पन्न करण्याला, देवाला आळविण्याला, विषयावर फांकलेली वृत्ति ताळ्यावर आणण्याला, पड्रिपूंच दमन करण्याला, ज्ञानोत्तर धन्यता गाण्याला, सर्व प्रकारांनी देवाची सेवाभक्ति करण्याला, देवरूप होण्याला व शेवटी 'अंतकालेच मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ' करण्याला भगवंताचें नामस्मरण हे किती उपयुक्त, प्रिय, गोड, स्वल्प व आनंददायक आहे ! (१५१ ) परमार्थ हा निवृत्तिपर व प्रपंच प्रवृत्तिपर आहे, पण विवेक हा परमार्थातील निवृत्तीच्या जोरावर प्रपंचाची निवृत्ति करीत असतो व प्रपंचांतील प्रवृत्ति ही परमार्थाकडे चळवीत असतो.
गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति (१५२ ) देवाच्या अंगाने सृष्टीकडे पाहावयाचे सोडून सृष्टीच्या अंगानें भापण देवाकडे पाहून तदनुसार देवाला कर्ता, हर्ता, भोक्ता, व्यापक, सगुण, निर्गुण, नामातीत इ. नांवे ठेवतो आणि रूप देतो. पण देवाच्या भंगाने जगाकडे पाहिलं तर देवाला नामरूप तर नाहीच, पण जगही विचाराला पुढे टिकत नाहीं । ( १५३ ) देवाची स्थापना सदसद्विवेकाने आपल्या हृदयमंदिरांतच करावयाची आहे. देव हृदयांतच आहे. 'हृदयस्थो जनार्दनः ' स्थूलाचे हृदय छातीत आहे; सूक्ष्माचे हृदय कल्पनेत आहे; तसे स्वस्वरूपाचे हृदय ज्याला निजहृदय म्हणतात ते ' मनसस्तु परा वुद्धिः ती आत्मबुद्धि होय, देहबुद्धि नव्हे. त्या निजहृदयमंदिरांत आरमाराम आहे. (१५४ ) करावयाची भक्ति पण मिळवायचा आत्मलाभ, पाहायचा आरसा पण ध्यायचे आत्मदर्शन, शोधायचा प्रपंच पण साधायचा परमार्थ, करायची गुरुसेवा पण साधायची गुरुकृपा, अशी ही सगुणनिर्गुणाची सांगड असल्यामुळे उभयतांची ताडातोड करतांच येत नाही. तुका पांडुरंग झाला तरी त्याचे भजन राहीना, यांतील रहस्य हेच. (१५५) परमात्मा साक्षात् असतां शून्यवत् वाटतो आणि मन, बुद्धि, इंद्रिये, शरीर यांची उत्पत्ति आकाशातून असल्यामुळे ती शून्यवत् भसतां प्रत्यक्ष वाटतात. हीच माया होय ! ( १५६ ) सगुणसाक्षात्काराला दृष्टांत असं म्हणतात. बाह्यदृष्टीच्या भांतील दृष्टांत तो स्वभवतच होय. दृष्टांत ही अनेक सिद्धीपैकी एक सिद्धि भआहे. द्रष्टेपणाचाही जेथे अंत आहे, अशा आत्मप्राप्ती पुढे दृष्टीच्या आतील दृष्टांताची किंमत नाही. (१५७ ) सगुण उपासनेने भक्तीचा कळस होतो, तर निर्गुण उपासनेने या कळसावर आत्मप्रभेचा शुभ्रध्वज लागतो ! (१५८ ) देव म्हणजे मायालाधवी मूळपुरुप, त्याच्याकडून आपल्याला भहमवृत्तीने मीपण मिळाले आहे. ते मायावी मीपण ज्याचे त्याला देऊन भापले स्वतःचे परमात्मपद प्राप्त करून घेणे, याचे नांव आत्मनिवेदन होय. (१५९ ) मन म्हणजे संशय व बुद्धि म्ह. निश्चय, या संशयनिश्चयांचे बोधाने ऐक्य होऊन निःसंदेहता येणे हे सर्व योगाचे सार आहे. इतर योगांनी शून्य स्थितीत राहाणे हा योग नव्हे. (१६० ) इंद्रियप्रवृत्ति निरोधून किंवा विषयाचा, घरादाराचा त्याग न करता उदासीन असणे हे खरे वैराग्य होय. विषयाहून उच्च जो परमार्थ त्याची गोली मनाला लागेल तेव्हा उच्वाभिलाषी उदासीनता (उत्+आसीन) येईल.
८४ गोविंदसुत १६१) पाणी वरून दिसायाला इतके उदास की, प्रवाह नेईल तिकडे जाते. पण आतून प्रखरता इतकी की, प्रसंगाला खडक सुद्धा फोडते. तद्वत् वैराग्य दिसायला उदासीन परंतु विवेकाचे तेज इतके की, कोणताही विकार पुढे भाला असतां विचाराने जाळून भस्म करते. अशा प्रकारचे धगधगीत वैराग्य पाहिजे. (१६२) अध्यात्मशास्त्र हे मनुष्याला पंगु करणारे, विध्वंसक एकदेशी अशी आधुनिक विद्वानांची झालेली समजूत मूर्खपणाची आहे. उलट आध्यात्मिक उन्नतीचा लोप होऊन आधिभौतिक सुखाला लोक चटावल्या- मुळेच उथळ विचाराचे, विषयाधीन, नाजूक, स्त्रैण होऊन राष्ट्रातील पौरुप नष्ट झाले. ( १६३) विषय जड असून त्यांत आम्ही चित्तरूपाने प्रतिबिंबित झाल्याशिवाय विषयांचा आम्हांस मुळी भोगच होत नाही. विषयांची गोडी विषयांत नसून ती चित्तांत आहे आणि चित्ताची खरी गोडी चित्तांत नसून ती चित्तालाही चेतविणारी जी आत्मरूप चित्प्रभा तीत आहे. (१६४) "कर्ताहमिति मन्यते " हे ज्या क्रियेच्या बुडाशी आहे सी क्रिया कितीही उत्तम असली तरी ती त्रिगुणात्मक अतएव दोषी, आणि आत्मबोधावर राहून झालेल्या क्रिया कितीही वाईट असल्या तरी त्या निदोष आहेत. ( १६५) आपण मूळचे निजानंद, सहज, स्वयंवेद्य, स्वरूप असतांना व वेदोपनिषदें, साधुसंत आपल्या कानींकपाळी ओरडत असतांना आमचा त्यावर विश्वासच बसत नाही आणि मुंबईस अमुक गोष्ट झाली असें सांगितल्याबरोबर त्यावर विश्वास बसतो हीच माया. १६६) आपण अज्ञानी राहून " ज्ञात्याने असेंच वागावे तसेच धागावें" अशी चर्चा करणे म्हणजे " बाजारांत तुरी, भट भटणीला मारी" अगर " कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे" अशासारखेच हास्यास्पद आहे ! (१६७ ) मुमुक्षुत्वाचे तिकिट काढा, अध्यात्माध्या आगगाडीत मजेनें बसा, सभोवतालचा देखावा ज्ञानदृष्टीने पाहात पाहात रस्ता सुलभ करणाच्या समर्थाचे भाभार माना, आणि आत्मबोधाच्या मुक्कामाला आरामशीर जाऊन पोंचा! (१६८) कर्मात कर्मी असूनही आत्मबोधाने ज्याचा भाम्याशी भसलेला योग ढळत नाही तोच खरा निष्काम कर्मयोगी होय.
गविवसुतांच्या सद्बोधसूक्ति ( १६९) अयोग्य वस्तूचा संन्यास झाला की, योग्य वस्तूचा योग रडलाच. असा हा गमतीचा योगायोग आहे. योगावांचून संन्यास आणि न्यासावांचून योगच नाही. योग्य वस्तूशी योग होण्याची बौद्धिक योग्यता मात्र पाहिजे, तरच संन्यासयोग घडतो. (१७०) अक्षरांतून प्रथम ब्रह्म ( आकाश ), त्यापासून कर्म (वायु), कर्मानें यज्ञ (अग्नि), त्यापासून पर्जन्य (जल) व त्यापासून अन्न (जमीन),ब्रह्म, कर्म, यज्ञ, पर्जन्य व अन्न ही पंचमहायज्ञमालिका पंचमहाभूतांच्या अंगभूत माहे. ( १७१ ) हा आपला औट हाताचा दिसण्याला फाटका तुटका देह, पण साक्षात् “ यज्ञकृत्, यज्ञभुक्, भोक्ता, यज्ञांग, यज्ञवाहन, यज्ञसाधन, होता, हव्य, हवन, हव्यवाहन " इत्यादिरूपाने यज्ञमूर्ति बनला आहे ! मूर्त छहान पण कीर्त मोठी! ( १७२ ) चातुर्वर्ण्य संस्थेचे विदारण केले तर राष्ट्राचा घात होतो; भाजकालचे फाजील विद्वान् ते विदारण करीत असल्यामुळेच राष्ट्रांत कलहाग्नि पेटला आहे. त्रिवर्णानी ब्राह्मणाचा द्वेष करणे म्हणजे आपणच आपल्या थोबाडीत मारून घेणे, तसेच ब्राह्मणाने शूद्राचा द्वेष करणे म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारून घेणे, वैश्याचा द्वेष करणे म्हणजे आपल्याच पोटावर आपण मारून घेणे, क्षत्रियांचा द्वेष करणे म्हणजे आपणच आपले बाहु उखडून टाकणे; अशा प्रकारचे हास्यास्पद आहे. ( १७३ ) बायकांमध्ये पुरुषांप्रमाणे आपण व्हावे अशा प्रकारचे वारे संचरलें कीं, सुप्रजाजनी, गृहिणी, आर्या या पदापासून स्त्रिया भ्रष्ट होऊन निरुपयोगी झाल्या म्हणून बेलाशक समजावें. ( १७४ ) भारतीयत्व सोडून जितके तुम्ही परकीय सुधारणांना भाळून यांच्याशी जास्त वळण ठेवाल, त्यांच्या चालीरीति घरांत ध्याल, तितके तुम्ही भार्यस्वाला व अध्यात्मपरंपरेला मुकाल आणि भाधिभौतिक सुखलालसेनें अधोगतीला जाल! (१७५) जग ज्ञानाकडे का अज्ञानाकडे झुकत आहे याची कसोटी भाधिभौतिक सुधारणेवर नसून ती आध्यात्मिक सुखावर आहे. (१७६ ) स्वराज्याचे स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वीच आमच्या भाधुनिक सुशिक्षितांच्या अंगांतच नव्हे तर सबंध कुटुंबांत स्वातंत्र्याचे बारें संचारून एकाच घरांत पुरुष स्वतंत्र, बायको स्वतंत्र, मुलगा स्वतंत्र, धाकर स्वतंत्र, सर्वच पर व्याक्तिशः स्वातंत्र्य बळकावून बसले, तर कुटुंबांत व राष्ट्रांत संघटना कशी होणार? .
गोविंदसुत ( १७७ ) स्वातंत्र्याचे वारे अंगांत शिरून आम्ही संघटना घटवली तसा सबगोलंकार, भ्रष्टाकार करून जातच जाग्यावर ठेविली नाही, मग जातिवंत पुरुष राष्ट्रात निर्माण होणार कसा ? (१७८) " बोलण्यांत बोलका व करण्यांत हलका " तो समाजाचा पुढारी नसून स्वधमैकरत आचारविचारशुद्ध तोच खरा श्रेष्ठ पुढारी होय. (१७९) संतांच्या घरची देवदर्शनाची रीत आधी आत्मदर्शन, मग देवदर्शम, आत्मदर्शनानंतर देवदर्शन घेतल्याने यथार्थ दर्शन घडते. त्याला तल्लीनतेचे दर्शन म्हणतात. आपण नेहमी दीन होऊन दर्शन घेतो. पण लीन होऊन घेतल्याने ते अनन्यदर्शन होते. (१८०) प्रपंचपरमार्थात विवेकासारखी दुसरी चीज नाही. (१८१) भापण भापल्याला दिसलों की देव आपल्यास दिसलाच समजा ! प्रत्येक प्राणी अहोरात्र देवाचीच उपासना करीत आहे. पण लक्षांत कोण घेतो?
गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति 'आत्मानुसंधान' (१) परमात्मा गोड असला तरी अति गूढ असून भापण पडलों अति मूठ म्हणून गूढ उकलण्याला परमात्म्याचीच कृपा पाहिजे. (२) अंतःस्फूर्तीतून अंतरात्म्याची कृपा उद्बोधित झाल्यावाचून अनन्यतेचें वंदन होणार नाही. (३) इंद्रियगणांचा पति, तो गणपती; तीच अहंस्फूर्ती. ( ४ ) ज्याचा विवेकशुंडादंड मोठा, तोच खरा सुखी होय. (५) सोळा स्वर आणि छत्तीस व्यंजनांच्या बावन कंगोज्यांत ज्ञान, विचार व विकारांचे सर्व संस्कार सांठवून ठेवून ही (सरस्वती) माता ते संस्कार दोन मोठांमधील चार बोटांच्या मुखावाटे बाहेर काढते ! ( ६ ) सर्वातर्यामी हा आत्माराम आहे, म्हणूनच सर्वात राम आहे व सर्वांना आराम भाहे ! ७) सत्संगतीवांचून भवभ्रांति जात नाही. (८) या जगांत जात व भजात असे दोन प्रकारचे पदार्थ भाहेत. अजात म्हणजे स्वयमेव असा एकच पदार्थ, तो आत्मा होय. (९) ऐकू येण्यापूर्वी जे नादाचें रूप, वासापूर्वी जे वासाचे रूप, सुरतेवीण में आनंदाचें रूप, ज्ञातृज्ञेयाविहीन जें ज्ञानाचे स्वरूप तेच आमच्या या आत्मारामाचे स्वयमेव रूप आहे. (१०) सर्व जीवांच्या अंतःकरणांत " मी आहे ' हा जो सहजभाव आहे तेच आत्मानुसंधान होय. (११) देहोहं स्फूर्तीतून देहाला पोषक जे विषय त्यांच्या चिंतनातच सर्व जीव चूर राहून चिंतातुर बनले. (१२) मरेपर्यंत मनुष्य विषयचिंतनांत चूर राहून आयुष्याचा चक्काचूर उडवून शेवटी चितेत जातो. (१३) जागृती आली की, स्पम जागच्या जागी मावळते, तद्वत् आत्मजागृतीने सर्व भास जागच्या जागी जिरतो. (१४) स्वास्मसुख विचारात्मक व विषयसुख विकारात्मक माहे.
गोविंदसुत (१५) डोळ्याचंच डोळ्यावर पडळ येते, तसें ज्ञानच ज्ञानाच्या भाड येते आणि आत्माराम साक्षात् असतांना तो गोचर होत नाही. (१६) धैर्य, वीर्य, शौर्य, भौदार्य, दया, दान, धर्म इत्यादि सात्विक गुणांच्या सुगुणमूर्ति बहुत आहेत. पण तात्विक विचाराने तत्ववस्तूशी तादात्म्य करून घेऊन स्वात्मसुखाची गोडी चाखणारी उपाधीवेगळी, सोवळी, साधी, साधुमूर्ति कोठे मिळत नाही. ( १७ ) दोन हातांनी सर्व कर्तृत्व आणि मस्तकानें भोक्तृत्व, या सर्वावर तिलांजली देऊन " न मम " ने हात झाडून मोकळे होणे महाकर्म कठीण आहे. (१८) अर्पण आणि तर्पण देखील करावयाचे नसून सहज आहे. ( १९) आपलें हैं छत्तिसतत्व प्रकृतीचें तन-मन-धनाचें गांठोडे आपल्याला अगदी चिकटल्यासारखे वाटते. परंतु यांत आपला असें म्हणण्यासारखा एकही पदार्थ नाही. फक्त आमचे आम्ही तेवढे अलग सलग आहोत. (२०) बाह्यांगाने विश्वंभराचे दास व अंतर्यामी आत्मारामाशी ऐक्य. (२१) स्वरूपाच्या उपप्रदेशापर्यंत नेऊन भिडवणारा, तोच उपदेश. ( २२ ) ज्या ज्ञानाने आत्मसाक्षात्कार होईल तेच आत्मज्ञान; तें देणारा तोच मोक्षगुरु होय. (२३) बगलेत काही तरी घेऊन परमार्थ करणे, म्हणजे " कांखे घेऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा' अशापैकी हास्यास्पद होय. (२४) प्रपंच व परमार्थ एकत्र नांदतात. पण प्रपंचांत परमार्थ नाहीं व परमार्थात प्रपंच नाही. " ऊर्ध्वायै दिशे ब्रह्मणे" हा उर्ध्वगामी विचाराचा परमार्थ, अधरायै दिशे अनंताय" हा अधोगामी प्रपंच होय. २५) ध्यानासाठी डोळे मिटले तरी ज्ञानासाठी पुन्हां उघडलेच पाहिजेत. डोळे उघडून पहाण्यालाच ज्ञान म्हणतात; शिवाय उघड्या डोळ्यांनीच प्राण गेला पाहिजे. (२६) ज्या ज्ञानाने आपण ज्ञाते म्हणून मिरवितों, ते सर्व ज्ञान परेच्या अलीकडील असून परमात्मा परेच्या पलीकडे अपरंपार आहे. (२७ ) इंद्रिये अंतर्मुख करून उफराट्या दृष्टीने पहाणाराला आत्मदर्शन होते. (२८) अंतरांतच सर्वभ्रांति व अंतरांतच दोरीचा बोध. जेथें भ्रांति तेथेंच निभ्रांत झाले पाहिजे. व . गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति ८९ (२९) प्रपंचांत साध्य वस्तु साधनांनी शोधून साधावी लागते. परमार्थात साध्य वस्तु स्वांगाने सिद्धच आहे, ती ओळखून नंतर साधनाच्या. मात्मानुसंधानाच्या संपुष्टांत ठेवावी लागते. (३०) माधी यथार्थ दर्शन, मग पूजन. (३) मनुष्याचे अर्ध्व डोके “ अर्ध्वगामी विचाराने मनुष्याला ऊर्ध्वगतीप्रत नेऊं शकते." (३२) विचारपूर्वक कर्म तेच पुण्य व विकारात्मक ते पाप होय. नरत्व हा विचार व देहत्व हा विकार. ( ३३) अर्ध्वगतीला स्वर्ग व अधोगतीला नरक म्हणतात. पण गति अवगतीचीही निपटून निर्गति करणारे आत्मज्ञान आहे. (३४) अहं देही' म्हणून ज्या क्रिया होतात, त्या मग वाईट वा चांगल्या असोत, अध्यात्मदृष्ट्या पातक व मुक्तसंगोनहंवादी म्हणून ज्या क्रिया, त्या कशाही असल्या तरी पुण्यात्मक होत. (३५) अहंकार, अज्ञान हेच पशुत्व होय. (३६) भरण्याचे मालक श्वापदें, समुद्राचे मालक जलचर, तसा निरंजन पदाचा मालक मानव होय. (३७) मानव हा तर पिंडाच्या बाजूने योनिसंभव आणि ज्ञानाच्या बाजूने अयोनिसंभव आहे. (३८) मनन हाच ज्याचा स्वभाव तोच खरा मानव होय. (३९ ) ज्ञान, शक्ति, व्यापार व सेवा, ही चार तत्वे शरीरांत चळवळ करणा-या चैतन्यांत असतात. त्यांच्यामुळे शरीराचे पोषण होत असते. भापल्या औट हात पिंढापोटी चार देह आहेत. ते या चार तत्वांचे आहेत. (४०) पंचभूतांवांचून जगाला, तशी चातुर्वर्ण्यावांचून समाजाला शोभाच नाही. (४१) शिश्नोदरपरायणता हेच ज्या सुधारणेचे ध्येय तिच्या मोहांत सांपडून आपण आपल्या आध्यात्मिक ध्येयाला विसरलो. (४१) जो भात्मोन्नति करील तोच देशोन्नति करील. जो स्वतः मुक्त होईल तोच देशाला मुक्त करील. जो स्वतःचा आत्मा आकलन करील, तोच देशाचा आत्मा आकलन करील. (४३) आचारांत, विचारांत, रोमरोमांतून ज्या वेळी आर्यत्वाचे रक्त सळसळेल, आध्यामिक ध्येयाच्या अटकेवर आर्यस्वाचा झेंडा लावावयाचा, हे गो. १२ गोविंदसुत उच्च ध्येय पुढे ठेऊन सर्व चळवळी होतील; तेव्हांच देश खडबडून जागा झाला असे म्हणता येईल. (४४ ) आधिभौतिक ऐश्वर्यासाठी त्याग तो राजसी व धर्मासाठी त्याग तो सत्त्वगुणी होय. साधुसंतांनी जो त्याग केला तो धर्मासाठी होता. (४५) जो आत्मतृप्त झाला त्यानेच सर्वस्वाचा त्याग केला. (४६ ) संकटकाळ हीच धर्मकृत्यांची पर्वणी असते. ( ४७ ) मनुष्याचे डोके ही ब्रह्मांडाची प्रतिमा आहे; म्हणूनच अखिल ब्रह्मांडाचे ज्ञान त्याच्या डोक्यांत सांठवते. (४८) जें कर्म ऊर्ध्वविचाराने 'ज्ञाने परिसमाप्यते' होते ते सत्कर्म ऊर्ध्वगतीला नेते. (४९) दिवा स्वतः दुसन्याला प्रकाशित करून स्वतःखाली अंधार ठेवितो; तसें मनुष्याला सर्व जगाचे ज्ञान होते पण स्वतः मी कोण ही भ्रांति त्याची तशीच राहाते. (५०) " पोट लागले पाठीशी । हिंडवीतें देशोदेशी" हे खरे, पण पोटोबा भरून उरलेले आयुप्य तरी विठोबाकडे का लावू नये ? (५१) आपली औट हाताची काया हीच ती माया. (५२) माया म्हणजे हा देहच नव्हे, तर त्याच्या नखशिखांत व्यापणारी चेतना, उर्वरीत राहिलेला साक्षी ज्ञाता, त्याचं ज्ञेय विषय, तत्संबंधी ज्ञान व आनंद, वाणीचा व मनाचा प्रवर्तक, बुद्धीचा बोधक, देहाचा चालक इत्यादि सर्व मायेचाच पसारा होय. (५३) आत्मप्रत्ययाने आपली छाप मायेवर बसली, की माया उडाली. 'मी आहे ' हा आरमप्रत्यय तर आपल्याला सर्व अवस्थांतून आहेच. ( ५४ ) मायेचे मूळ जगांत नसून आपलेच अंतरांत आहे. म्हणून प्रथम अंतःशुद्धि पाहिजे. (५५) अहं स्फूर्तीतील अहं ही जाणीव व स्फूर्ति ती शक्ति, जाणीव पुरूष आणि स्फूर्ति प्रकृति म्हणून अहंस्फूर्ति ही अर्धनारीनटेश्वर होय. (५६) कल्पना- दृष्टींत सर्व सृष्टि सांठवते, दृष्टीच मोठी. ( ५७ ) पंचभूतेंच पंचभूतानां विषय रूपाने खात आहेत. (५८) आपण पंचज्ञानेंद्रियांच्या पांच तोंडाचे व त्रिगुणात्मक तीन डोळ्यांचे शंकर होऊन पंचविषयांचे विष भक्षण करितो. , म्हणून सृष्टीपेक्षा गोविंदसुताच्या सद्बोधसूक्ति ९१ (५९) परेपासून स्थावरापर्यंत सर्व कल्पनेचे साम्राज्य आहे, आपण परेच्या पलीकडे परात्पर आहोत. (६०) ममत्वाचा शिक्का नसलेली कल्पना बाधत नाही. (६१) सूक्ष्म पंचमहाभूतें, पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेंद्रियें, अंतःकरण अशा कल्पनेच्या सोळा कळा आहेत. ( ६२ ) दोरीचा सर्प दिसणे हे ज्ञानच, पण दोरीच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावांत त्या सर्पत्वाच्या विपरीत ज्ञानाचा प्रभाव मनुष्याला सत्यत्व दाखवून भिववितो. ( ६३ ) परेपासून स्थूळापर्यंतच्या सर्व पसायांत पसरलेले ज्ञान, आत्मबोधाच्या अभावी सत्य भासले तरी अन्यथाच होय. (६४) हे कल्पनेचे अहंभूत स्वतः दिसत नाही; पण डोक्यावर बसून सर्वांना भ्रमवीत असल्याचे दिसते. (६५) कल्पना अखंड सौभाग्यवती आहे. (६६ ) आत्मज्ञानावांचून जीवाला मरण नाहीं, भात्मज्ञान झाल्यावर जीवाबरोबरच कल्पना सती जाते. (६७ ) कल्पनासमुद्रही अनंत असून कामक्रोधादिक विकारांनी ती कितीही खवळला, किंधा प्रेमाच्या पान्ह्याने उचंबळला, तरी मसुरप्रमाण जी त्याची मर्यादा, ती काही तो सोडीत नाही. (६८) जेथें आत्मा तेथेंच कल्पना, पण कल्पनेत आत्मा नाही, आरम्यांत कल्पना नाही. (६९) आमच्या ठिकाणी मुळी कल्पनाच नाही. (७०) आपण कल्पनातीत असतांना भ्रांतीने तिला आपली म्हणून बळेंच डोक्यावर घेऊन आपण नाचतों; पण ते डोके व ती कल्पना दोन्हीं आपली नव्हेत. (७१) महाकारण-देह ज्ञान, कारण-देह अज्ञान व लिंग-देह वासना मिळून ज्ञान, अशान व वासना या तिहींचे मिश्रण ती ही कल्पना. (७२) प्रतिक्षणी आपण मरत आहोत हे कधी स्मरणांतच येत नाही. ७१) ब्रह्मांड कल्पनेतूनच बाहेर आले तरी कल्पनेत सर्व ब्रह्मांडच भरले आहे. (७४ ) सर्व पदार्थ आंतून बाहेर आले तरी पूर्वी रूपांतराने ते बाहेरून आंत जातात.
गोविंदसुत (७५, जो कल्पनेत आला तो मुळी भास्माच नव्हे. (७६), एका कल्पनेच्या अतीत भापण आपल्याला ओळखले तर छत्तिसतस्व प्रकृतीच्या पाशांतून आपण मुक्त होऊ. (७७) साक्षात् अशी वस्तु एक आत्मा भाहे. या व्यतिरिक्त सर्व कल्पनात्मक भास होय. (७८) अहं अस्मान्, आणि इदं जमीन, यांच्या जबळ्यांत कल्पना रहाते. एवंच हरीच्या संकल्पांत ब्रह्मांड व ब्रह्मांडांत हरिसंकल्प भोतप्रोत भरला आहे; पण हरि मात्र संकल्पातीत आहे. (७९) जे हरिरूप झाले त्यांना संकल्प नाही पण जे प्रकृतिअधीन झाले, त्यांना कल्पनेची बाधा होते. (८०) कल्पना अंतःकरणांत अधांतरी आहे, तशी तिच्यावर उभारलेली ब्रह्मांडेही अधांतरीच आहेत. ( ८१ ) सर्वांना आश्रय पाय जमीन, तिच्यावर जल पोटांत, त्यावर भग्नि मुखांत, प्राण नाकांत, कल्पनाकाश डोक्यांत असें उलट सुलट चढत्या उतरत्या भांजणीचे पंचभूतात्मक शरीर हे एक अष्टधेचे भूत अव्यक्तांतून देहरूपाने व्यक्तीला आले आहे. (८२) अष्टधेचें सूक्ष्मरूप तीच कल्पना. गुणविशिष्ट रूप ती गुण-माया व स्थूळरूप ती अविद्यामाया होय, (८३) आपण संकल्पातीत कसे आहोत याचा कोणीच विचार करीत नाही. ( ८४ ) प्रपंचाचें मूळ अंतःकरणांत आहे. (८५) स्वरूपावबोधाने या मायाभ्रमापासून आपण निराळे कसे भाहोत, हे ओळखून स्वरूपी राहाणे हीच इतिकर्तव्यता होय. ( ८६) " जगाच्या जीवी आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हे होय जाय । तो शुद्धिही नेणे" (ज्ञाने.) हे जे परमेश्वराचे अकर्तेपणाचें रूप, तेंच आपलें रूप आहे. ( ८७ ) मेल्याशिवाय स्वर्ग नाही तसा आत्मज्ञानावांचून भास्मानुभव नाही. (८८) विश्वासाठी कर्म व कर्मासाठी विश्व, असा अन्योन्य संबंध आहे. पिंडाच्या व ब्रह्मांडाच्या कर्मचक्राचे दुवे एकमेकांत अडकलेले भाहेत. (८९) ज्यांत राम नाही अशीच चरित्रे हल्ली फार निघतात.
गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति (९०) काशीपासून रामेश्वरापर्यंत एकच रस्ता दोरीसूत चालला आहे तसे परतत्त्वाच्या अलिकडे व स्थावराच्या आंत, अखिल पिंडब्रह्मांडांतून एकच कर्म दोरीसूत चालले आहे. (९१) शुद्ध विचाराअंती तुमचे तुम्हालाच कळेल की, "कर्ता राम मी नव्हे आपण. (९२ ) नशीब हा समाधानाला एक टेंकू आहे. बाकी मागून पुढून चालला आहे प्रयत्नच. मानतो नशीब आणि करतो प्रयत्न. ( ९३ ) हा जो कर्मनदीचा सतत ओघ चालला आहे, त्याला कोणत्या ठिकाणी हात लावून हे प्रारब्ध आणि हा प्रयत्न म्हणणार ? (९४ ) आकाशाची वार्ता सूर्याला नाही, अविद्येची वार्ता आत्म्याला नाही. सूर्यानेच सूर्याला, तसे आत्म्यानेच आत्म्याला ओळखावयाचे आहे. (९५) सृष्टीचे मूळ कल्पना आणि सृष्टी सर्व कल्पनेवरच चालली आहे. (९६) कल्पनांचे गणित बसवावयाचे, तर जगदुत्पत्तीच्या काळापेक्षा आपण वास्तविक कल्पनातीत असतांना अकल्पित या कल्पनेत कधी व कसे येऊन पडलों हे कोडें अध्यात्मिक पद्धतीने सोडविणे अगत्याचें नाहीं काय ? ( ९७ ) जगाचे गूढ हुडकण्यापेक्षा परमात्मगूढ उकळणेच श्रेयस्कर आहे. पण मायेचा पगडा जबरदस्त ! यामुळे तिकडे बुद्धिच वळत नाही. ( ९८ ) परेपरता परमात्मा प्रत्यग्बोधाने हृदयांत प्रगट होण्याव्यतिरिक्त जे तर्क, अनुमाने, श्रद्धा, विचार हे परेच्या अलिकडील असल्याकारणाने युक्तिजुक्तीला ते पटले, तरी अबोधांतील बुद्धिवादच होत. साक्षात्कार नव्हे. ( ९९ ) निश्चल द्रष्टे होऊन 'शठं प्रति शाठ्यं ' सारख्या देखील 'फावल्या त्या चेष्टा ' साधूंना खुशाल करता येतात. (१००) प्रकृतिधर्मावरून ज्ञानी ओळखणे शक्य नाही. (१०१) अंतरांतील ती अर्धचंद्राकार चंद्रभागा, तो अविट विटेवरील विठोबा, आनंदाने नाचण्याला ते मनाच्या मुलुखमैदानाचे वाळवंट, या अंतरांतील साक्षात् देखाव्याशी बाहेरील पंढरीच्या दर्शनाने तादात्म्य होऊन, अंतरांतील बोधाला भरते येऊन नाचतां आलें नाही, तर त्या दर्शनाचा . काय उपयोग? (१०२) आत्मज्ञान मनुष्याला होणे शक्य नाही, अशी भ्रामक सम. जूत करून घेऊन आपहा अज्ञेयत्वाचा सगळा वाटा हे आधुनिक व अंधुक विज्ञेयवादी विद्वान् साधुसंतांच्या गळ्यांत बळंच बांधतात. पण स्त्रीला संतती गोषिदमुत होणे अशक्य, असा शिक्का वंध्येने पुत्रवतीवर ठोकून समाधान मानण्यासारखें हे हास्यास्पद होय. ( १०३ ) आत्मस्वरूप खुद्द आपलेच असल्यामुळे अज्ञेय नाही. ( १०४ ) हरिहरब्रह्मादिकांपासून परंपरेने आलेल्या आरमानात्मविचा- राध्या संतमार्गाविरहित अहंमन्यतेने निघालेले तर्कप्रतिष्ठित ग्रंथ आणि पंथ, सांप्रदाय आणि समाज, उद्धार आणि मिशने, संघ आणि मंडळे, मठ आणि तट इत्यादि प्राचीन आणि अर्वाचीन संस्था ह्या त्यांच्या त्यांच्या उद्देशाला उपयुक्त असल्या तरी अध्यात्मदृष्ट्या हे सर्व अबोधातील बुद्धिवादच होत. (१०५) शुद्ध सत्त्वगुणी अशा भरतभूमीतील सांप्रदाय परंपरेचे परमपवित्र ज्ञानच अध्यात्मशास्त्राला उपयोगी आहे. (१०६) मुमुक्षूचे चित्त आकर्पून घेऊन त्यांत आत्मप्रभा फांकविण्याची शक्ति ग्रंथात नसून ती अनुभवी संतांच्या वाणीतच खास आहे. (१०७) ग्रंथसागरांत मार्गदर्शक असल्यावांचून विचाराचे तारूं एकदम ढकलून स्वयंमन्यतेच्या सुकाणूने चालविणे धोक्याचे आहे. ( १०८) अखिल पिंडब्रह्मांडपसारा हे एक क्षीरनीरमिश्रणाचे पात्र व नरदेह हा सोहहंसस्वरूप राजहंसच आहे. (१०९) जागच्याजागी बसल्या बैठकीवरच विचाराने विरण्यांत मोक्ष आहे. (१०) कल्पना तरी शुद्ध व शबल, दोन प्रकारची आहे. शुद्धाने शवल कल्पना निर्बल करून आपल्यास कल्पनातीत व्हावयाचे आहे. (१११)" काशीस जावें नित्य वदावें" म्हणजे कधीतरी काशी घडेल. संतकृपा होईपर्यंत स्वरूपाची कल्पना करीत असल्याने, भलभलती विषयकल्पना तरी सुटेल. (१२) देवाला वाहिल्याशिवाय देव आपल्याला काहींच देत नाही. ( ११३ ) पारमार्थिक सर्व साधनांचे पर्यवसान डोळा उघडूम स्वरूप- दर्शन होण्यांत आहे. (११४) आपणही नररूपाने अर्जुनाचे अवतारच आहोत, एका हाताने प्रपंच व एका हाताने परमार्थ, अर्थात् विकार व विचार या डाव्या उजव्या दोन्ही हातांनी प्रपंच परमार्थ करण्याला अधिकारी सव्यसाची वीरच आपण भाहोत. प्रपंचरूप कुरुक्षेत्रांत कामक्रोधादि कौरवांशी युद्धाला तयार आहोत.
गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति (११५) आपल्या मनोरथाच्या धुरेवर गोविंद आहेच व रथाच्या देहतळी आपण अधोमुखी अहंपणाने उभे आहोत. भापल्या हृदेशाच्या धुरेवर हरि सारथ्य करीत आहे. (११६) आपली जडचंचलनिश्चलरूप नरतनु ही मूर्तिमंत त्रिकांडात्मक वेदरूपच आहे. (११७) परमात्मरूप ओळखून तद्रूपत्वाने राहाणे म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, या त्रिवेणीसंगमावर सद्गुरुबोधाने पिंडदान करणे किंवा या त्रिकुटाचलावर आत्मबोधाचा ध्वज फडकावणे हीच या वेदमूर्ति नरदेहाची इतिकर्तव्यता होय. ११८ ) साधनें ही वस्तूप्राप्तीसाठी नसून संदेह, देहाभिमान झाडण्यासाठी व तदंगभूत पड्विकार नाशासाठी आहेत. (११९ ) अभिमान गलित होण्यासाठी साधने व वस्तुप्राप्तीसाठी आत्मबोध, अशा जोड गोळीने परमार्थ जोडतो. ( १२०) अध्यात्मांत देव विचाराचा, मुक्ति विचाराची, साधन विचाराचे एवंच सर्व विचाराचे साम्राज्य आहे. (१२१) मी' देहांत नसून 'मीच्याच 'पोटांत या देहासारखे देह भाजपर्यत कैक होऊन गेले, असा हा मी महत् ब्रह्म गोसावी आहे. (१२२) कल्पनेला सर्व जगाचे ज्ञान झाले तरी 'मी ' केवढा व कसा आहे, याची कांहींच कल्पना नाही. (१२३) 'मी' ब्रह्म ओळखल्याशिवाय सर्व ब्रह्म म्हणणे व्यर्थ होय. (१२४) श्रीहरिगुरुकृपेने आत्मबोध झाल्यावांचून 'हा मी ' जाऊन 'तो मी 'होणे शक्य नाही. (१२५) देव मीच्या ठिकाणी प्रगट झाला, अगर मीच देव झाला तरच उपयोग. ( १९६ ) जेथे मी तेथेंच देव, किंबहुना मीच देव. (१२७) आत्मारामाच्या सानिध्याने अंतःकरणांतील अज्ञानमोह घालवून प्रत्यक् बोधाने " ओळखीसवें तद्रूपता" पावणे ती उपासना होय. (१२८) आत्मज्ञानाचा उपदेश हा आत्मारामउपासनेचा मूळ पाया आहे. (१२९ ) सांप्रदायाविरहित तर्कप्रतिष्ठित पोकळ ब्रह्मज्ञान हे वायावर वरातीप्रमाणे व्यर्थ होय.
गोविंदसुत १३.) पूज्यांची प्रतिमापूजा पूज्य बुद्धीने करणे हे कृतज्ञतेचें दर्शक भाहे. (१३) पूजाअर्चादि आचाराच्या भाटीव दुधांत भास्मानात्म- विचाराची साखर पडली पाहिजे. ( १३२ ) जसा देव तशी उपासना. आत्माराम सहज, उपासना सहज; आरमाराम ज्ञानस्वरूप, उपासना ज्ञानस्वरूप. (१३३) अंतरांतील देव टाकून आपण बाहेर रोज देवदर्शनाला जातो पण दर्शन घेतों अंतरांतील आत्म्याचे, हे आपल्या लक्षात येत नाही. ( १३४ ) अहंस्फूर्ति तोच अंतरात्मा होय, (१३५ ) पुरुष आणि प्रकृति किंवा देव आणि भक्तरूपाने एकच मायालाघवी परमात्मा नटला आहे. हे वर्म समजले की, द्वैत की अद्वैत हे भाषण संपले. ( १३६ ) भक्तिप्रेमाच्या ठिकाणी काही सगुण, निर्गुण ही भावनाच नसते. त्याच्यापुढे मूर्ति सगुण भाली तरी प्रेम निर्गुणच. ( १३७) प्रथम गुणमायादिकांचा धारक परमेश्वर सगुण याची उपासना, आणि मग त्याच्या कृपाप्रसादाने निर्गुणप्राप्ति. ( १३८ ) माशाचे जन्म कर्म सर्व जलमय असले तरी उलटी उडी मारून पाणी प्याल्यावांचून त्याला तृप्ती नाही, तद्वत् आपला जन्म " मम योनिमहत् ब्रह्म " पासून असल्याने आपण ममरूप व ब्रह्मरूप खरे, पण अंतर्मुख उफराटी दृष्टि फिरविल्यावांचून आत्मतृप्ती नाही. ( १३९ ) आपण देवासन्निध देवरूपच आहोत. देवाची स्वयंभु मूर्ति तशीच आपली आहे. देवाची भोगमूर्ति तशी आपली भोगमूर्ति बाहेर मिरविली जाते, ती खरी नव्हे. (१४०) कपाळाची कर्मरेषा टळून व कर्माचे वाटोळे होऊन कपाळ तेवढे श्रीहरिचरणी अखंड रहाण्याला निष्काम कर्मयोग हाच रामबाण उपाय आहे. (१४१) कर्मफलाहून श्रेष्ठफळ हाती येईल, तर कर्मफळत्याग सहज होईल; आणि सहज होण्यांतच सर्व मौज असते. जुलमाचा रामराम काय कामाचा ? " फळाचे फल कोणी एक । भापणचि आहो." (१४२) कांच्या भावनेनुरूप क्रियापद फिरते. (१४३ ) क्रियेत परमात्मा नाही, परमात्म्यांत क्रिया नाहीं; दिसण्याला सकर्मक, तरी पण वास्तवीक अकर्मक, अशा प्रकारचा हा कर्मकर्तरी प्रयोग आपल्या ठिकाणी आत्मबोधाने अनुभवणे याचे नांव निष्काम कर्म.
गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति ९८ (१४४) भात्मज्ञानी अंतरांत मोकळा सुटसुटीत प्रसन्न असतो, माणि बाह्य कर्माबद्दल उदासीन असतो. (१४५ ) मन आणि बुद्धि हाच साक्षात् नरनारायणाचा अवतार आहे. म्हणून बुद्धीमध्ये ब्रह्मतेज व मनामध्ये क्षात्रतेज तपोबलाने नेहमी जागृत राहील अशी क्रिया झाली पाहिजे. (१४६ ) देशाला, कुळाला, कुळाला, परंपरेला काळिमा लावणारे भाचरण सर्वथैव त्याज्य होय. ( १४७ ) अशक्तांना सशक्त करण्यासाठी वैद्यशास्त्र, त्याप्रमाणे लेंचेचे मानसिक धर्म बळकट करण्यासाठी धर्मशास्त्र आहे. (१४८) शास्त्राचे नियम मुक्तांना लागू नाहीत; तथापि मुक्त देखील शास्त्रोक्त वागतात. (१४९) श्रुतिमाउली आपल्या कल्याणार्थ आहे. “ न मातुः परदैवतम् . ( १५०) वंश-परंपरागत मिळालेल्या मालमत्तेचे आपल्या हाताने वाटोळे करण्याइतके ज्याचें मन तयार असेल, त्याने या संताळ्यांच्या नादाला लागून आपले वाटोळे करून ध्यावें. छत्तिसतस्वप्रकृतीचे आपलें गांठो. हीच आपली जन्मजन्मांतर्गत मालमत्ता असून हिनेच तर आपल्यामध्ये व देवामध्ये छत्तिसाचा आंकडा आणला. (१५१) ज्याला आपल्या देखत मालमत्तेचे वाटोळे करून घेऊन जगांतून आपले अहंममत्वाचे तोंड काळे करून उर्वरीत रहावयाचे असेल, त्यानेच या परमार्थाच्या व निष्काम कर्माच्या फंदात पडावे. ( १५२) जो स्वत: भगवत्स्वरूप आपण आहों हे यथार्थ बोधाने जाणतो आणि सर्वत्र तें आत्मरूप व आरमत्वांत सर्व पहातो, तो भागवतोत्तम होय. (१५३) पति देहाने पुरुष, पण अंतर स्त्रीरूप व पत्नी देहाने स्त्री पण अंतर पतिरूप, अशी उभयतांची तद्रूपतेची तंद्री लागलेली असते; तसा देवभक्तांचा एकांत आहे. ( १५४ ) देवाची सगुणलीला हा कडोसा आहे, कडोशावर लक्ष ठेवून मूळाकडे सहज नजर फिरविल्याने सूर्यदर्शन होते. (१५५) कोणतीही भक्ति आंतून देहावर उमटली पाहिजे. भापण बाह्यचिन्हें ठेवून बाहेरच्या बाहेर भक्तीचा थाटमाट करतो. पण आंत कोरडे. "हांका मारी ज्याच्या नांवें । त्याचें गांवही न ठावें" तर मग काय उपयोग? गो. १३ गोविंदसुत ( १५६) आपणही राम, कृष्ण, हरीप्रमाणेच नामानिराळे आहोत. हे स्मरणांत राहाण्यासाठीच वाडवडिलांनी आपली नांवें राम, कृष्ण, हरि अशी ठेविली भाहेत. पण भाम्ही किती खमंग ? या नांवानी नामांकित होण्याचे सोडून रामा पहावा तो आराम खुर्चीवर पडून रामेच्या चिंतनाने कामाकार झालेला, कृष्णाची कृष्ण कृत्ये तर विचारूच नका व हरीचें लक्ष परक्याचे सर्वस्व हरण करण्याकडे ! ( १५७ ) अंतरांतील वारीचा प्रेमोल्हास पंढरीपर्यंत व पंढरीचा देखावा अंतरांत उतरला पाहिजे. ( १५८ ) अंतःकरणरूप चंद्रभागेच्या वाळवंटांत मनासहित एकादश इंद्रियरूप एकादशीच्या दिवशी एकरसतेने साध्य, साधक व साधन यांची श्रीहरीकृपेनें समरसता होईल, तरच अंतःकरण मोकळे होऊन, खरे नामस्मरण मुखाने येईल. ( १५९ ) जगत् पालक विष्णु ( आकाश ), आदिशक्ति देवी (वायु), जगञ्चालक रवि ( तेज ), चिन्मय गणपति ( जळ ), जगशियंता शंकर (भूमि ) या पंचभूतात्मक पंचदेवतांचे पंचायतन, हे आत्मारामाचे वसति- स्थान जें हृरकमळ, त्याचे दर्शक म्हणून पुढे मांडावयाचे असते. ( १६० ) सोन्यासारखा देह यथेच्छ विषयोपचारांनी पुजून पुजूनच कुजवायचा नसून ज्याकरता नारायणानें तो दिला, तो आत्मलाभ करून घेणे हीच त्याच्या पूजेची सांगता होय. या पवित्र कार्याकरितां देहही पवित्र ठेवणे ही देखील पूजाच होय. (१६१) पाश्चात्य तत्त्ववेत्ते आपला शोध न करता जगाच्या खोल पाण्यांत तकांच्या हातांनी पोहावयाला जातात आणि शेवटीं अज्ञेय, अज्ञेय म्हणून गटंगळ्या खाऊन तोंडघशी पडतात. (१६२) पदाचा छंदच अगदी जात्या कितीतरी गोड ! मग पदप्राप्ति किती बरें गोड असेल? (१६३ ) घटापटाच्या शास्त्रीय पद्धतीने नुसत्या ज्ञानाचा सिद्धांत ठोकणारे वेदांती किंवा नुसत्या साकार मूर्तीच्या अहोरात्र ध्यानाने ध्यानी बनलेले मुनी, बहुत आहेत. पण ज्ञानाची व ध्यानाची एकतानता संत. वाणीतच दिसून येते. (१६४ ) प्रतिमा म्हणजे अस्सल बरहुकूम नक्कल. पांडुरंग मूर्ति ही मापल्या औट हात देहाची प्रतिमाच होय. ' नातुडे मुख्य परमात्मा । म्हणून गोविंदसुतांच्या सद्बोधसूक्ति ९९ करावी लागे प्रतिमा ' ( दा.). स्वतःचे मुख झाले तरी ते आरशावांचून दिसत नाही तसे परमात्मदर्शन प्रतिमेवांचून होत नाही. ( १६५) ज्ञान आणि ध्यान दोन नाहीत. ध्यान म्हणजे पहाणे, ज्ञान म्हणजे जाणणे. जाणल्याशिवाय पहातां व पाहिल्याशिवाय जाणतांच येत नाही. पहाणे व जाणणे ही एकाच ज्ञानाची अंगे आहेत. ( १६६ ) पांडुरंगाचे पाय ती तुकारामाची डोई व तुकारामाची डोई ते पांडुरंगाचे पाय. " तुझे पाय माझी डोई । ऐसें करि गे विठाबाई" हे अखंड ध्यान. (१६७) पांडुरंगाच्या साकार ध्यानाच्या सुतानेच निर्गुण ध्यानाच्या स्वर्गास जावयाचे असल्याने साकार ध्यान अवश्य पाहिजे. (१६८) देहाचे देऊळ करून सत्कर्माने अंतर, बाह्य स्वच्छ ठेवून विवेकप्रत्ययाने, गुरुखुणेने आणि नवविधाभक्तिराजपंथानें जो अंतरागी प्रवेश करील त्यालाच आत्मदर्शन होऊन त्याच्या ध्यानांत देवाचे रूप उतरेल. (१६९) स्फुरणामध्ये जाणीव व वायु अशी दोन तत्त्वे असतात. जाणीव ही जीवाला ज्ञान पुरवते व वायु हा शक्ति पुरवतो. त्यावर सर्व जीवांचा संसार चालतो. ( १७० ) स्वयंप्रकाश आत्मा बाहेर प्रकाशमान, इंद्रियगोचर होत नाही, हा त्या अज्ञानयुक्त अंतःकरणाचा दोष होय. अंतःकरणाच्या प्रसन्नते. शिवाय आत्मा प्रगट होणे शक्य नाही. (१७१) हृदयाची प्रसन्नता हीच नारायणाची कृपा. (१७२ ) आपण सर्वाकडे नेहमी पहातों, पण स्वतःकडे कधी ढुंकून सुद्धा पहात नाही, ते देवाकडे काय पहाणार ? (१७३) आपले मूळ स्वरूप खरोखर अगदी साधे आहे, पड्विकारांचे आणि पंचभूतांचे छक्के पंजे हे मागाहून आले. (१७४) साधेपणांत साधुत्व व सहजांत मौज आहे. (१७५) आपली आपल्याला ओळख पटली की जग आपल्याला तेव्हांच ओळखता येते. ज्याला आत्मोन्नति कशांत आहे ती माहीत नाही, तो राष्ट्राची, समाजाची, धर्माची, भबलांची, निर्बलांची उन्नति काय करणार ? (१७६) देहाहून आपल्याला वेगळे पहाणे, हे वैराग्याचे मुख्य वर्म आहे. ( १७७) थोडाबहुत स्वाभिमान व स्वधर्माभिमान राहिला होता, पण पाश्चिमात्य शिक्षण घुशीसारखें घरांत घुसल्यामुळे यथेष्टाचरण घरात शिरून १०० गोविंदसुत त्याचाही नायनाट होऊन, स्वत्व गेले, सत्त्व गेले, तत्व गेले, महत्व गेले, स्वार्थ गेला आणि त्याग मात्र पाठीस लागला आहे. (१७८ ) अध्यात्मांत तंत्रापेक्षा 'विवेक महामंत्रा' चेंच महात्म्य फार. ( १७९) ज्याने सोहं शोधलें, तो सोवळा व जो अहंपणाने राहातो, तो ओवळा होय. ( १८० ) परमार्थात बोधाशिवाय वेध नाही, वेधाशिवाय नेम नाही, नेमाशिवाय नाम नाही व नामाशिवाय तप नाही. (१८१) यज्ञमय ब्रह्मांडांतूनच आपली ही औट हाताची वामन किंवा विठ्ठलमूर्ति निपजली. ही आकाशांतील जाणीव रूपाने ब्रह्मरूप, वायुशक्तिर्ने कर्मरूप, जठराग्नीने यज्ञरूप, वीर्याने पर्जन्यरूप, स्थूलरूपाने अन्नरूप व संहाराने हननरूप बनली असल्याने आपण मूर्तिमंत यज्ञरूप व यज्ञकृत यज्ञपुरुषही आहोत. (१८२) अध्यात्मविचाराचे सर्व श्रेय विसर्जनांत आहे. ( १८३) चंद्रदर्शनाला शाखा, तशी परमात्मदर्शनाला प्रणवरूप वेद ही शाखा आहे. म्हणून वेदोक्तविचारांवांचून आत्मदर्शन नाही. ( १८४ ) चित्ताने चिद्रूपाला ओळखणे हीच खरी चित्तशुद्धी होय. चित्ताला काहीतरी विषय लागतोच; म्हणून निर्विषय परमात्माच चित्ताचा विषय करावा. (१८५) सदाचाराचे मूळ सद्विचारांत, सद्विचाराचे मूळ सद्वोधांत, सद्धोधाचें मूळ सद्गुरूकृत आणि सद्गुरूकृपेचे मूळ ईश्वरार्पण कर्म करण्यांत आहे. ( १८६ ) आचार हे कर्म, विचार ही उपासना व बोध हे ज्ञान एवंच कर्म उपासना आणि ज्ञान, या त्रिकांडात्मक वेदाच्या एकवाक्यतेचे साधन पाहिजे. इकडे आचार आचरटासारखा, विचार दुसयाचे पागोटें बगलेत मारण्याचा, आणि तोंडाने " महं-ब्रह्मास्मि !" ते काय उपयोगाचे ?
गोविंदसुतांच्या आठवणी काही निवडक पत्रांचे उतारे (१) श्री. आर. के. ( उर्फ तात्यासाहेब ) भागवत पूर्वखानदेशांत डि. डे. कलेक्टरचे हुधावर आहेत. गोविंदसुत कलेक्टर कचेरीत नोकरीवर असतांना तात्यासाहेब त्याच कचेरीत कारकून होते व तेव्हांपासून उभयतांचा स्नेहसंबंध व घरोबा विशेष असे. गोविंदसुतांचा पेन्शन घेतल्या वेळच्या पानसुपारी समारंभाचा जो फोटो या पुस्तकांत दिला आहे त्यांत चिटणीसांच्या एका बाजूस गोविंदसुत व दुसऱ्या बाजूस तात्यासाहेब भागवत आहेत. वडिलांच्या निधनानंतर ते आम्हांस लिहितात " आपले वडिलांस मी गुरुजी म्हणत असें व त्याच दृष्टीने त्यांच्या संबंधाने मला आदर असे. पूर्वी नोकरीत आपले वडील व आणखी १२ तशीच माणसे यांच्या सहवासाचा मला लाभ मिळाला म्हणूनच मी आहे या स्थितीस पोंचलों आहे ही जाणीव मनांतून कधीही नाहीशी झालेली नाही व त्या कारणाने त्यांच्या संबंधाने माझ्या मनांत अत्यंत आदर सदैव असे. ते वारले त्याच दिवशी सकाळी जळगांव स्टेशनवर मला त्यांचे शेवटचे दर्शन घडले हे मी माझं भाग्य समजतों." (२) श्री. गोविंद जगन्नाथ ऊर्फ आबासाहेब पाध्ये, पेन्शनर डेप्युटी कलेक्टर, पुणे लिहितात:-" तुमच्या दादांचा व माझा अगदी पहिला स्नेह नगर जिल्ह्यांत राहुरी तालुक्यांत झाला. तेथे ते कारकून व मी फडनवीस होतो. पुढे आम्ही दोघेही नगरजिल्ह्यांतून बदलून पुणे जिल्ह्यांत भालों व पुणे जिल्ह्यांत चिटणीस कचेरीत ते व मी पुनः एके ठिकाणी जुळलों. त्यांची काम करण्याची पद्धति अति उत्तम होती व ती मला फार आवडली होती. ग्रंथरूपाने त्यांनी आपले नांव मागे ठेवले आहे ते अजरामर राहील. (३) श्री. वामन मोरेश्वर ऊर्फ बाबा पोतदार, वकील, पुणे यांस गोविंदसुतांच्या निधनाची बातमी समजली तेव्हां ते अत्यवस्थ आजारी आंथरुणास खिळलेले होते. तशा स्थितीतही त्यांनी अनिवार्य कर्तव्य म्हणून आम्हांस लिहिले की, " तो प्रेमळ व विनोदी स्वभाव यांची आठवण झाली म्हणजे अंतःकरण भरून येते. इतके थकले होते तरी पुण्यास भाल्यावर बहुशः दररोज मला भेटल्याशिवाय राहत नसत. आम्ही त्यांस प्रेमाने "महाराज' म्हणत होतो." . .
१०२ गोविंदसुत (४)प्रो. द. वा. पोतदार, पुणे ता. १२।११३४ च्या पत्रांत लिहितात:- " भाज केसरी उघडला तो काय ? ' महाराजांच्या निधनाची वार्ता ! वाचून काय वाटले ? धका बसला ! एकदा तशी भेटही निवांतपणे झाली नाही. भाजारी तर होतेच. वयहि झाले होते ! बाबांना कळविले. बाबा रामेश्वराहून येतांना खाली पडून अंगास मार बसल्यामुळे अंथरूण धरून आहेत. चालणे, उठणे बंद आहे ! दोन महिने रुग्णालयांत होते. दोन दिवस झाले घरी आणले आहे. जुनी पिढी जात चालली ! प्रो. पानसे वारले ! तात्यासाहेब मेहेंदळे आंथरुण धरून बसले ! पुनः ही पिढी दिसणार नाही भाणि तिचा अनुभव व आधार लाभणार नाही याचे दुःख वाटल्या. शिवाय कसे राहील? मन आवरले म्हणून शोक आवरतो की काय ? परशरामपंत म्हणजे गोष्टी, विनोद, रस, प्रसाद यांचा नुसता वर्षाव ! दासबोध त्यांच्या तोंडून संपूर्ण ऐकावा ही मनीपा अतृप्तच राहिली | असा समर्थवाङमयाचा मांड पुनः पहावयास मिळणार नाही. (५) गोविंदसुतांचे ४० वपांचे दृढ स्नेही ह. भ. प. पांगारकर आम्हांस भालेल्या पत्रांत लिहितात " गोविंदसुतांची वृत्ति सदा आनंदी व प्रसन्न असे. " स्थितप्रज्ञमहर्षी " सारखी त्यांची अलिप्त असंगपणाची स्थिति होती. त्यांचे लेखन प्रथमपासून मुमुक्षूतच सुरू झाले व ते जसजसे लोकप्रिय होत चालले तसतसे ते स्वतंत्र ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्याची त्यांस स्फूर्ति झाली. त्यांचे अंतरंग निर्मळ व निःसंग असे. त्यांची अध्यात्माची बैठक कसल्याही प्रसंगी ढळत नसे. त्यांच्या अदर्शनामुळे यापुढे या जगांत आम्हांसही चुकल्यासारखें होणार आहे. ते जिवंत असतांनाच दृश्याच्या पैलपार गेलेले होते. (६) श्री. भास्कर रामचंद्र नानल, हायकोर्ट वकील, रत्नागिरी (माजी एम्. एल्. सी.)" Your father lived the purest life. I look upon his death as a great loss to Maharashtra. We are living in times of entire irreligion and if our nation is to achive its goal I firmly believe that religious thinkers of your father's type are an indispensible necessity " ( तुमच्या वडिलांची राहणी अत्यंत शुद्ध होती. त्यांचा मृत्यु म्हणजे महाराष्ट्राची एक मोठी हानि आहे असे मला वाटते. आपण भत्यंत भधार्मिक काळांत भाहों व जर आपल्या राष्ट्राला आपले ध्येय साध्य करून घेणे असेल तर माझा दृढ विश्वास आहे की तुमच्या वडिलांप्रमाणे धार्मिक विचारांच्या लोकांची अत्यंत जरूरी आहे.)
गोविंदसुतांच्या आठवणी (७) मध्यप्रांतातील एक सबजज्ज श्री. डी. बी. दंडे, बी. ए. एल्. एल्. बी. लिहितात:- " Since the time I came in contact with him which was probably in 1926, he had been very kind towards me. His association was of immense help to me in studying the Adwait philosophy " ( सुमारे १९२६ सालापासून त्यांचा माझा परिचय झालेला होता व तेव्हापासून माझ्याशी त्यांचे वर्तन फार प्रेमळपणाचे होते. अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास करतांना त्यांच्या सहवासाचा मला फारच उपयोग झाला.) (८) विद्याभूषण तांबे शास्त्री लिहितात:- " परशुरामपंत बोलके वेदांती नव्हते. त्यांच्या मनावर वेदांताचा परिणाम झालेला होता. त्यांच्या मनाची शांती वेदांती पुरुषास शोभण्यासारखी होती असें मी अनेक वेळा अनुभविले आहे. चिरंजीवांच्या निधनप्रसंगी जे लोक दु:खामुळे त्यांचे सांत्वन करण्यास आले त्यांचेच उलट सांत्वन परशुरामपंतांनी केले !" ९) श्री. रा. द. पंत पराडकर हे पूर्वी मुमुक्षुकडे होते व दादांचे लेख मुमुक्षूतून प्रथम प्रसिद्ध झाले व परमार्थविचारमालेच्या प्रसिद्धीला पराडकर यांनी मदत केली होती, 'मी तुमच्या लेखांचा पहिला प्रकाशक आहे ' म्हणून गोविंदसुतांस ते नेहमी अभिमानाने व विनोदाने म्हणत. ते आपल्या पत्रांत लिहितात:- " आमचे महाराज वयाने वृद्ध तरी मनाने ऐन तरुण भासावे अशीच त्यांच्या सहवासांत मनोहर मोहिनी होती. आयसंस्कृतिस्वाभिमानाचे ते जाणते पुतळेच होते." (१०) श्री. दामोदर बाळकृष्ण खांडेकर, रेलवेमेलसॉर्टर, मनमाड- हून लिहितातः- " दादांनी आपला काळ परमार्थात घालविला. त्यांचे वर्तन व स्वभाव लक्षात घेतां ते साधुमालिकेतच गणण्यासारखे होते." (१७) श्री. मु. ना. कागलकर ( बॉयस्काऊटच्या चळवळीसाठी यूरोपांत जाऊन भालेले ) शिक्षक, हायस्कूल, उमरावतीहून लिहितात:- दादा जेव्हा जेव्हां उमरावतीस येत तेव्हां तेव्हा त्यांचा भाविक सहवास मला घडत असे. माझ्या प्रमाणेच ज्याला ज्याला म्हणून त्यांचा अल्पही सहवास घडला असेल त्या प्रत्येकाला त्यांच्या निधनाबद्दल हळहळ वाटेल. प्रपंचांत राहून सर्व दगदगी सहन करून, उलाढाली करून पुनः अलिप्त अशी त्यांची सत्पुरुषास शोभेशी वागणूक होती, वेदांत पूर्ण बाणलेला होता. (१२) श्री. ग. ल. काणे, पोष्टमास्तर, दासगांव लिहितात:-"ती. दादामहाराजांनी देह ठेवला व स्वतः अंतर्धान पावले हे वर्तमान वाचून फार -- १०४ गोविंदसुत - खेद वाटला. त्यांचा व माझा ऋणानुबंध फार थोडे दिवसांचा, परंतु किती जिव्हाळ्याचा होता हे आपणांस माहीतच आहे. ते भामचे उपास्य दैवत होते !" (१३) श्री. शंभु भिकाजी जठार ऊर्फ कपिलबुवा रामदासी, सातारा, लिहितात:--" पुणे, चिपळूण, सातारा वगैरे सर्व ठिकाणी भापले वडील भेटत असत. त्यांनी आपली बरीच पुस्तके मला भेट दिली होती. त्यांचा सहवास आम्हांस पुष्कळ पाहिजे होता, परंतु योगायोगाप्रमाणे गोष्टी होतात. ते नेहमी सनातन वैदिक धर्माचे कट्टे अभिमानी असत अशी ३५ वर्षांपासून मला चांगली माहिती आहे." (१४ ) श्री. शं. श्री. धनेश्वर, मु. सोमठाणे नलवडे, जि. अहमद. नगर लिहितात:-" मजसारख्या अनधिका-यावरसुद्धा गोविंदसुतांचे अत्यंत प्रेम होते, हे त्यांच्या मला आलेल्या प्रत्येक पत्रावरून स्पष्ट होत आहे. त्यांची पुष्कळ पत्रं मजजवळ आहेत. त्या प्रत्येक पत्रांत कळकळीचा व अनुभवजन्य परमार्थोपदेश खेचून भरला आहे. ही सर्व पत्रे सद्ग्रंथाप्रमाणे मी जपून ठेवली आहेत. गोविंदसुतांच्या अमोघ लेखनामृताला महाराष्ट्र कायमचा अंतरला." (१५) श्री. कृ. ह. सहस्रबुद्धे, वकील, कोल्हापूर यांचा व गोविंद. सुतांचा अलीकडे ३।४ वर्षांतच परिचय झालेला होता. ते लिहितात की गोविंदसुतांच्या शेवटच्या आजारीपणांत ' तुमचे प्रकृतीस लवकरच भाराम पडो व तुम्हांस पूर्ववत् बरे वाटो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो' असें मी त्यांस लिहिले होते. त्यावर त्यांचे उत्तर आले की तुम्हांस म्हातारपणाचा अनुभव नाहीं यामुळे या वयांत किती शारिरिक यातना असतात याची तुम्हांस जाणीव नाहीं, ७१ वर्षे झाली, आणखी किती दिवस जगावे ? माझ्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना न करता ' अनायासेन मरणम् यावे अशी प्रार्थना करा!" ( १६) श्रीक्षेत्रकाशी येथील भामचे उपाध्ये भाऊ भय्या कात्रे लिहितातः- " महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील एक जाडा विद्वान् व प्राचीन परंपरेचा अभिमानी नाहीसा झाला याबद्दल विशेष हळहळ वाटते. त्यांचा व आमचा प्रथम परिचय १० वर्षापूर्वी ते येथे आले असता घडला व त्यावेळी आम्ही आपले व इतर कन्हाडे मंडळींचे काशीक्षेत्रांतील परंपरागत उपाध्याय असल्याचे त्यांस समजल्यापासून त्यांना भामच्या घराचा अभिमान वाटे. आम्हांवर त्यांचा फार लोभ असल्याचे प्रत्यंतर गेल्या १० वर्षांत आम्हांस पुष्कळदा मिळाले." , गोविंदसुतांच्या आठवणी १०५ (१७) गोविंदसुतांचे विशेष जिव्हाळ्याचे स्नेही श्री. श्रीधर वामन ऊर्फ दिगंबरराव जोशी, वकील, पेन्शनर पोलीस प्रॉसिक्यूटर, पुणे हे भाम्हांस ता. १११११३४ च्या पत्रांत लिहितात " होणार ते झाले! देह हा उसना आणिला पांचांचा । शेखीं ज्याचा त्यास द्यावा लागे" बाकी काहीं कोठेच बिघडले नाही. वस्तु आहे वस्तुपणे-तिला 'पण' लागलेले नाहींसें झाले इतकेच. बाकी होते तेच आहे. “ देह जावो अथवा राहो । आम्ही होतो तैसे आहो." मी तरी काय लिहूं ? परंतु लिहिणे जरूर. आपणांस दुःख होणे स्वाभाविक, परंतु आपण विचार करालच. सुमारे ३५।४० वर्षाचा माझा सहवास, त्यांत अंतर आला. कधी तरी कोणाकडून तरी तसा अंतर येणारच. मागील पुढे चालूच राहणार. याबद्दल खंती असली तरी विशेष नसावी. आपण लिहितां वडिलांचे जागी मी आहे. परंतु यावरून आपलीच जबाबदारी वाढते, कारण आमचा परामर्प घेणें आपलेकडेच आहे. अस्तु. कालाय तस्मै नमः (१८) श्री. वासुकाका जोशी, चित्रशाळा पुणे, ता. १११॥३४ च्या पत्रांत आम्हांस लिहितात " होणार ती गोष्ट चुकत नाही. आपल्या समक्ष त्यांचा अंत झाला ही गोष्ट फार चांगली झाली. नाहीतर आपल्या मनांत सारखी रुखरुख राहिली असती. मी त्यांस भेटण्यास अमळनेरास येणार असें पूर्वी लिहिलेच होते, परंतु तेच मुंबईस आले व तेथे भेटण्यास बोलावले, त्याप्रमाणे मी त्यांस मुंबईस भेटलो होतो. कै. परशुरामपंत यांचा स्वभाव नेहमी आनंदी व थट्टेखोर व मनमिळाऊ असलेमुळे त्यांच्या मृत्यूमुळे पुष्कळ लोकांस दुःख होईल यात शंका नाही. कै. टिळक, शिवरामपंत वगैरे आमची मंडळी गेली. आतां परशरामपंतजी असे एक एक चालले आहेत. हा सर्व विचार मी करूं लागलों म्हणजे दुःख नाहीसे होते व वेदांत सुचतो. " ( १९) ह. भ. प. रामचंद्रबुवा दांडेकर शास्त्री सुप्रसिद्ध कीर्तनकार मु॥ गुडघे पोष्ट दाभोळ येथून लिहितात " १२।।३४ चा केसरी वाचून हळहळ वाटली. गोविंदसुत आपले तीर्थरूपच होते, परंतु माझेहि ते कोणी तरी होतेच असे मला नेहमी वाटत असे. ते मला परमप्रिय व सन्मान्य होते व सप्रेमादराने मला ते मार्गदर्शक होते. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, सुप्रसन्न वृत्तीचे, वेदांत-व्यवहारांतील सूक्ष्म मर्मवेत्ते, प्राक्कर्म संस्कारानुकूल भोक्तृत्व भोगून प्रारब्धावशेषांत कालाची मार्गप्रतीक्षा करणारे, देहविकार. प्रकारास साक्षीभूत, निर्विकारी, आत्मानुभवी असे आदर्शभूत पुरुष एकाएकी आमच्या स्थूलदृष्टीच्या आड झाले ! ती॥ दादांची माझी भेट बरेच वेळां होत असे व प्रत्येक भेटीत त्यांच्या साहचर्याने फार समाधान वाटे. तें गो. १४ गोषिवसुत . . साहचर्य संपल्याबद्दल वाईट वाटते पण इलाज काय ? " मृत्युर्जन्मवतां वीर देहेनसह जायते ॥ अद्य वाऽद्वशतांतेवा मृत्यु प्राणिनां ध्रुवः ". (२०) श्री. हरिश्चंद्रराव भगवंतराव शिरोडकर व्हिलेपार्ले ( पेन्शनर स्ट्युअर्ड जे. जे. हॉस्पिटल) लिहितात " माझा व दादांचा १८ वर्षांचा परिचय. परमार्थचर्चेबद्दल त्यांना फार आवड. प्रपंच व परमार्थ पूर्णपणे साधून दादा केवळ स्वरूपी तद्रूप होते. दादांनी आपल्या जन्माचे सार्थक केले होते व "क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें या श्लोकांतील समर्थोक्तीप्रमाणे ते आपला काल कंठीत होते. वृद्धापकाळी दादांना पुत्रशोक सोसावा लागला, पण तो त्यांनी धैर्याने सोसला. माझ्या ऐवजी मुलावर समन्स बजावण्यांत आले ही देवाच्या दरबारांत बोलावण्यांत चूक झाली आहे असे ते एकदां शांतपणे म्हणाले. आमच्या घरांतील सर्व लहानथोर मंडळींबद्दल प्रत्येक पत्रांत ते कळकळीनं विचारपूस करीत असत. आमच्या मातोश्री ८३ वर्षांच्या आहेत. दादा आपल्या शेवटच्या दुखण्यांत मुंबईस असतां त्यास भेटावे अशी मातोश्रींची इच्छा होती. परंतु वार्धक्यांतील अशक्तपणामुळे त्यांस चालवत नव्हते व इकडे दादाही आंथरुणास खिळलेले. मातोश्रींची इच्छा दादांस कळवितांच पायांत कळा चालू असतांच ते मोठ्याने हंसले व आईस निरोप कळविण्यास सांगितला की जर माझें यापुढे आयुष्य वाढलेच तर येऊन भेटेन. दादांच्या संवादांतील काही शब्द अद्याप आमच्या हृदयांत आहेत ते, " देहाने भेट होणे म्हणजे देह कालाधीन व भेटही कालाधीन. आपल्या भाधीन फक्त आपले आपण अखंड आहोत. आपली आपल्याला तुटी केव्हां झालेलीच नाही. आपण अयोनिसंभव आहोत हे ज्या दिवशी आपणांस यथार्थ समजेल तोच धन्य दिवस होय. आपण तरी बोधरूप आहोत. बोधवस्तु स्वयमेव स्वतःसिद्ध आहे, जन्म मरणातीत आहे. भापण स्वांगाने बोधरूप असल्यावर निर्वाणीच्या विठ्ठलाला वाणीने वाटेल तसे बोलावे ! (२१) श्री. स. कृ. फडके वकील पनवेल १२॥१॥३४ च्या पत्रांत आम्हांस लिहितात " तत्वज्ञानमंदिरांतील आपल्या पुण्यवान् वडिलांचा लेख मी कालच वाचला व तो लेख वाचून संतोष झाला व आज त्यांच्या मृत्यूची बातमी समजली. फार फार वाईट वाटले. माझ्या या पुस्तकावर क्रॉनिकलमध्ये कडक टीका आली होती. परंतु आपल्या वडिलां इतके विस्तृत परीक्षण कोणी केले नव्हते. आपल्या वडिलांच्या हातचा हा शेवटचा लेख म्हणून त्यास विशेषच महत्व आले आहे. आपल्या वडिलांना मी फार वर्षांपासून ओळखत होतो. त्यांचे मुमुक्षूतील लेख मी फार आवडीने वाचीत असे, त्यांचे सर्व ग्रंथ मी घेतले आहेत.
गोविंदसुतांच्या आठवणी १०७ रा. पांगारकर व रा. बाबूराव भिडे या समान मित्रांचे द्वारा आपल्या वडिलांच्या लेखनाच्या हौशीबद्दल अनेक वेळा गोष्टी झाल्या आहेत. मुंबईस नव्या काळ पत्राचे उपसंपादक रा. फाटक यांचे बिहाडी त्यांची माझी समक्ष भेट झाली होती. आपले वडील वेदांतावरील एक मार्मिक लेखक होते. त्यांची भाषा कधी कोणाला बोचत नसे. फार गोड भाषा लिहीत. अशा स्वधर्माभिमानी लेखकाची उणीव या काळांत भरून निघणे कठीण आहे. ( २२ ) श्री. गणेश महादेव कुळकर्णी मु. कावनई जिल्हा नाशिक हे गोविंदसुतांच्या सहवासासाठी विशेष उत्सुक असत. मुंबई व नाशिक येथे बरेच वेळां त्यांस गोविंदसुतांचा सहवास घडला होता. त्यांनी बऱ्याच आठवणी पाठविल्या आहेत. स्थलाभावामुळे त्यांतील थोडीशीच माहिती देतो. ते लिहितात, " दादांबद्दल अत्यंत आदर असलेले हजारों इसम ज्ञात व अज्ञात आहेत. ते माझ्या व अनंत लोकांच्या अंतःकरणास चटका लावून गेले. नाशिकच्या त्यांच्या मुक्कामांत रात्रंदिवस सहवास त्यांचा लाभे व वेळ कसा जाई ते समजत नसे. दादांचा मुक्काम बापूसाहेब खंडकर ( यांस आचरणामुळे दादा ऋपि म्हणत ) यांचेकडे असे. तेथे ह. भ. प. पांगारकर व इतर विद्वान् जिज्ञासू जमत. ज्ञानेश्वरी, दासबोध यावरील संवादाला अत्यंत रंग येई. सगुण, निर्गुण हेहि विषय असत. पण ती॥ दादा हे मुख्य हेडमास्तर व इतर मंडळी शाळेतील विद्यार्थी असा देखावा दिसे. दादा हे सर्वांना साधार निरुत्तर करून नमवीत, शिवाय विशेष काही तरी सांगून रंजीत, आनंदवीत व त्यांतच विनोदी कोटिक्रमाने हंसवीत. दादांची आध्यात्मिक तपश्चर्या फार जबर होती. जपून वाद करणारा, वादकुशल व शंका काढण्यांत ज्याचा हात खंडा असा इसम समोर आला तरी दादा हे सहज लीलेले हसत हसंत प्रतिपक्षाचे गळ्यांत बाजू अडकवीत व उलट प्रश्न विचारून निरुत्तर करीत, कुंठित करीत व परत प्रेमळ पित्याप्रमाणे विषय समजूनही सांगत. मुंबईस दादा श्वासाने आजारी असतांना सुद्धा मंडळी जमल्यावर अध्यात्मविषयावर पुष्कळ वेळपर्यंत प्रेमाने बोलत. आपण आजारी आहां फार बोलू नका असे सांगितले तरी अध्यात्मविषय निघतांच त्यांस एक प्रकारचे स्फुरण चढे. मजपाशी तीन हजार रुपये किंमतीची स्वतःची लायब्री आहे तथापि त्यांत दादांची जी सर्व पुस्तके आहेत त्यांल मी वर नंबर देतो व ती नित्य वाचतो. त्यांचे द्वितीय चिरंजीव वारले तेव्हां नातवास घेऊन व मुलाच्या अस्थी घेऊन नाशीकला ते क्रियेसाठी आल्यावेळी मी त्यांच्या सेवेला होतो. या कठिण प्रसंगी सुद्धा जणूं काही झालेच नाही अशी त्यांची वृत्ति होती. अंतरंगांत अध्यात्म पूर्ण बाणल्यामुळेच अशी वृत्ति बनली होती व त्यामुळे सर्वांस आश्चर्य १०८ गोविंदसुत वाटले । ती॥ दादांची ती सगुण, साकार, भानंदी, विनोदी व हास्यमुख मूर्ति भातां पुनः कोठे दिसणार नाही याबद्दल वाईट वाटते. आतां वेदांत व मध्यात्म यांची समजूत कळकळीने व प्रेमानें कोण घालील ? ती॥ दादांचे ग्रंथ ते काम करतात, परंतु ते फारच अपूर्ण वाटतात." ( २३ ) रा. तुकाराम पुंडलीक शेटे बुकसेलर मुंबई लिहितात, "हरिभक्तिपरायण दादा यांच्या निधनाची हकीगत ऐकून मनाला अत्यंत वाईट वाटले. त्यांचे ते वेदांतासंबंधाने ऐकलेले विचार कर्णपथावर अजून भादळत आहेत. त्यांच्या स्वभावांतील सरळपणा व अभिमानशून्यता हे गुण आम्हांला केव्हाही विसरता येणे शक्य नाही." ( २४ ) एन्. डी. गर्द एल्. सी. ई. पेन्शनर मामलेदार पुणे ता. १२।११३४ च्या पत्रांत लिहितात " आपले वडील माझे फार जुने स्नेही होते. पुण्यास असले म्हणजे दररोज सकाळी आमचे घरी त्यांची फेरी असे. फार आजारी असल्याचे समजल्यावरून मुंबईस बर्वे बंधूंकडे मी त्यांस भेटण्यास गेलो. ते आदले दिवशीच अमळनेरास गेल्याचे समजले. भेट न झाल्यामुळे निराशा झाली व आज केसरीवरून निधनाची दुःखद वार्ता समजली. मी आपल्या दुःखांत वांटेकरी आहे याबद्दल आपणांस खात्रीच आहे." (२५) श्री. आ. पां. नवरे झावबाची वाडी मुंबई लिहितात " गोविंदसुत मुंबईस असले म्हणजे मला नेहमी भेटावयाचे, लायब्ररीत तर त्यांची हटकून गांठ पडावयाची व बोर्डावरील वृत्तपत्रे उत्कंठेने वाचीत असल्याची त्यांची उभी मूर्ति आतां दृष्टीस पडावयाची नाही, तरी त्यांची अमोलिक पारमार्थिक पुस्तकें हीच आतां प्रत्यक्ष मूर्ति समजून समाधान मानले पाहिजे." (२६) श्री. नारायण महादेव भिडे बी. ए. भोर लिहितात गोविंदसुत म्हणजे ज्ञानेश्वरी असे त्यांचा परिचय असणान्यांस म्हणतां येणारे भाहे. मराठीतील पूर्वपरंपरेच्या जुन्या वाङ्मयाचा व्यासंगी गेला याबद्दल हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. ज्ञानेश्वर-दर्शन ग्रंथांतील त्यांचा निबंध प्रसिद्ध झालेला पाहण्यास ते हयात असते तर किती चांगले झाले असते !" (२७) श्री. के. ल. टेंभुर्णीकर संगमनेरहून लिहितात " वय झाले होते तरी व्यवस्थित पागणुकीमुळे इतक्या लौकर दादांचे निधन होईल असे वाटत नव्हते. ज्ञानेश्वरदर्शन ग्रंथांत त्यांच्या नावाच्या मागें ॥ कैलास- पासी" असें विशेषण घालण्याचा दुःखद प्रसंग आमच्यावर आला आहे. पुस्तक पाहण्यास जरी ते नाहीत तरी ग्रंथांत ते आपल्या विचारांच्या रूपाने पुनः आपणांस व जगास दिसतील हे निश्चित."
गोविंदसुतांच्या आठवणी (२८) रा. परशुराम गोविंद ढोले पाटील मु॥ रोहण सुंदरमाई पोष्ट डिग्रस लिहितात " गोविंदसुतांच्या निधनाच्या वेळी मी प्रवासांत होतो, तेथून परततांना अमळनेरास येऊन त्यांचे एकदां दर्शन घ्यावे असे विचार मनांत होते, परंतु त्याप्रमाणे घडले नाही याबद्दल निधनवार्ता ऐकल्यावर फारच पश्चात्ताप झाला! महाराष्ट्रसंत व संतवाङ्मय यांवरील त्यांचे अलोट प्रेम, अनुपम शांति व परमेश्वरावर निष्ठा हे सद्गुण अवर्णनीय होते. पारमार्थिक ग्रंथनिर्मितीमुळे अखिल महाराष्ट्र जनतेचें मन त्यांनी आकर्षित केलें. ज्यांस त्यांचा मजप्रमाणे परिचय असेल अगर ज्यांनी त्यांचे ग्रंथ अवलोकन केले असतील त्या सर्वांना मजप्रमाणेच त्यांच्या निधनाने दुःख झाले असेल ! ते पंचत्वास गेल्याची वार्ता कळतांच त्यांच्या प्रीत्यर्थ " श्रीज्ञानेश्वर माउली " या मंत्राचा मी एक प्रहरभर जप करून त्यांच्या मात्म्यास शांती देण्याबद्दल ईशप्रार्थना केली. अशा हरिभक्तिपरायणास अखंड शांति व सद्गति मिळणारच." (२९) रा. गोपाळ नरहर मोघे बी. ए. (मुंबई म्युनिसिपालिटीत नोकर ) लिहितात " दादासाहेबांसारखी स्थितप्रज्ञ माणसे ज्या कुटुंबांत जन्मास येतात त्या कुटुंबाचे भाग्य तर मोठेच, पण अशी माणसें केवळ त्या कुटुंबांचीच नसून ज्या कार्याकरितां ती जन्म घेतात त्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व जनतेची ती असतात म्हणूनच त्यांच्या मृत्यूने फार मोठ्या जनतेची हानी झाली आहे !" (३०) रा. रघुनाथ गणेश खंडकर, सब ओव्हरसिअर देवरुख लिहितात, " ता. १२॥१॥३४ च्या नव्याकाळांत दादांचा फोटो पाहतांच मनाला चरका बसला. लगेच खालील मृत्युलेख वाचतांच सर्व हकीगत ध्यानी आली. ३१११२॥३३ रोजी मुंबईस काही कामासाठी मी गेल्या वेळी बबंधूंकडे त्यांस भेटलो होतो, त्यावेळी त्यांची प्रकृति अशक्त दिसली तरीही कॉटवर बसून लेखन, वाचन व आल्यागेल्याशी प्रेमळ संभाषण वगैरे व्यवहार पूर्ववत् सुरू होते. यावरून ते इतक्यांतच इहलोक सोडून जातील अशी शंकासुद्धा भाली नाही. परंतु ईश्वरीसूत्र कांही निराळे असते ही गोष्ट प्रत्ययास आली. मी ४ वर्षांत मुंबई पुण्याकडे गेलो नाही, यामुळे दादांची तिकडे भेट झाली नव्हती, परंतु आयत्यावेळी मुंबईस एक दिवसापुरते आण्याचे काम निघाले व कै. दादांच्या शेवटच्या भेटीचा सुयोग होता म्हणूनच काही तरी किरकोळ काम मुंबईस जाण्याचे निघालें असें आतां बाटते. शेवटच्या दिवसाकरितां ते अमळनेरास आले व घरच्या सर्व माणसांस दर्शन देऊन निजधामास गेले हाहि योगायोग बरा झाला असे वाटते. त्यांच्या सद्गुणांचे यथार्थ वर्णन करता येणे अशक्य आहे ।"
गोविंदसुत (३१) श्री. दत्तात्रय श्रीधर जोशी आय्. सी. एस्. बार ॲटला असिस्टंट कलेक्टर भडोच १२॥१॥३४ च्या पत्रांत लिहितात "ती॥ दादा परलोकवासी झाल्याची दुःखद वार्ता समजून फार वाईट वाटले. पुण्याकडे जातांना व पुण्याहून परत येतांना नुकतीच नाताळांत दोन वेळा मुंबईस मी त्यांची भेट घेतली. परंतु त्या भेटी अखेरच्याच ठरतील असें तेव्हां मुळीच वाटले नाही. परंतु ईश्वरी सत्तेपुढे इलाज काय ?" (३२) रा, सदाशिव दत्तात्रय भागवत शास्त्री हॉल मुंबई १४॥३४ च्या पत्रांत लिहितात " दादांची राहणी साधी असून त्यांचा स्वभाव फार विनोदी व परिचित लोकासंबंधाने फार आस्थेवाईक होता. त्यांना कंटाळा हा कधीच माहीत नव्हता. ते सतत विद्याव्यासंगी होते, त्यांच्या भक्तिमार्गातील व वेदांतावरील लेखांमुळे येथे व इतरत्रही त्यांचा शिष्यवर्ग फार मोठा आहे. पुस्तकरूपाने व प्रत्यक्ष उपदेशाने आपल्या शिष्यांना त्यांनी अमूल्य फायदा दिलाच आहे, परंतु आमच्या सारख्या अनधिकारी जनांना सुद्धा ते हितकारक उपदेश करीत असत. दासबोध वगैरे समर्थांचे ग्रंथ सतत नियमाने वाचण्यास शेवटी शेवटी त्यांनी मला कळकळीने सांगितले आहे. (३३) श्री. विष्णु रामचंद्र देव, देवास पाती २ हे कित्येक वर्षा- पासून गोविंदसुतांस पत्रव्यवहाराने सुपरिचित होते व त्यांच्या प्रत्यक्ष भेटीबद्दल पुष्कळ वेळा त्यांनी योग आणण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईहून गोविंदसुत नुकतेच दुसरीकडे गेलेले असे होऊन चुकामुक पडे. ते लिहितात वडिलांस मिळण्यासाठी दरसाल प्रमाणे संक्रांती निमित्त तिळगूळ पोष्टांत टाकल्यानंतर दुस-या दिवशी त्यांच्या निधनाचे शोचनीय वृत्त समजून फार हळहळ वाटली. त्यांची व माझी प्रत्यक्ष भेट होण्याचा कधीच योग आला नाही, परंतु माझ्यावर त्यांचे पूर्ण कृपाप्रेम होते व माझ्याबद्दल त्यांस फार कौतुक वाटत असे हे त्यांच्या लिहिण्यांत नेहमी व्यक्त होई. आमची त्यांच्या ठिकाणी असलेली परम पवित्र भादरबुद्धि पाहून एकवार इकडे येऊन दर्शन देण्याबद्दल सालोसाल आम्ही त्यांस लिहीत होतो व त्यांचाही हेतु होता, परंतु तो योग घडून येण्याची ईश्वरी योजना नव्हती!" (३४) श्री. जनार्दन गोविंद रायकर भवानीपूर कलकत्ता लिहितात, " केसरीवरून पूज्य दादांच्या निधनाची वार्ता समजली. ता. ४॥१॥३४ रोजी मी बर्वेबंधूंकडे मुंबईस त्यांस भेटलो होतो. त्यावेळी प्रकृति चांगली नव्हती तरी बरी होती. त्यांचा आणि बबंधूंचा पूर्व जन्मींचा , १११ गोविंदसुतांच्या आठवणी काहीतरी संबंध असला पाहिजे असे कोणालाही वाटले असते इतक्या आपुलकीच्या भावाने त्यांची सेवा चाकरी ते करीत असत त्यामुळे व श्री. आप्पाशास्त्री साठे यांच्या औषधानें उपयोग होईल असे वाटत होते. परंतु मी भेटल्यानंतर २।४ दिवसांत प्रकृतींत इतका फरक पडून हा प्रसंग एका एकीच ओढवला अ दिसते. जानेवारी अखेरपर्यंत मुंबईस राहण्याचा इगदा असल्याचे ४ जानेवारीस ते मला बोलले होते. ते आपले काम उत्कृष्ट रीतीने समाप्त करून मागे अजरामर कीर्ति ठेऊन गेले आहेत यांतच समाधान मानणे भाग आहे! (३५) श्री. विठ्ठलदास लालदास रोहेकर, ठाणे लिहितात, "गोविंदसुत हे वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध होते. ते नरदेहाचें सार्थक्य स्वतः करून गेले आहेत व परमार्थमागांतील निरनिराळ्या ग्रंथांनी जनतेच्या उद्धारार्थ अनंत उपकार करून नावलौकिक संपादला आहे." (३६) श्री. गंगाधर माधवराव देशपांडे फत्तेखेर्डा लिहितात " मुमुक्षुत लेख येऊ लागल्यापासूनच त्यांच्याबद्दल आम्हांस पूज्यबुद्धि उप्तन्न झाली होती. पुढे ते स्वतः या भागांत २।३ वेळा येऊन गेल्याने इकडील जनतेची व त्यांची चांगलीच ओळख झाली. ते गेल्याने आमचेही छत्र नाहींसें झाले यांत शंका नाही. आपल्या वडिलांस आम्ही गुरुस्थानी मानीत होतो. यामुळे आपल्या दुःखांत आम्ही इकडील सर्व मंडळी भागीदार आहों. त्यांच्या परलोकवासाचे वृत्त महाराष्ट्र पत्रावरून आम्हांस प्रथम समजलें" ( ३७ ) श्री. यशवंत खंडेराव कुळकर्णी मु. नंद स्वामींचे संस्थान ) जि. बुलढाणा लिहितात " परशुरामपंतबाबा कैलासवासी झाल्याचं वृत्तपत्रांत वाचून फार वाईट वाटते. सर्वांचा ज्ञानाधार नाहीसा झाला ! त्यांची कृपादृष्टि आमचेकडील जनतेवर होती. (३०) रा. शंकर गोविंद डिके, जुनें इंदूर लिहितात " उत्तरेकडील तीर्थयात्रेस जातांनां इंदुरास येऊन भेटूं असें गोविंदसुतांनी एकदा लिहिले होते, परंतु तो योग आला नाही. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या योगाने ते चिरस्मरणीय झाले आहेत. अशा सज्जनांचा सहवास चिरकाल असावासा वाटतो, पण तसा तो मिळतो कचित् . (३९) श्री. गोविंद भीमराव रापोळे मु॥ चिटगिड्डा पोष्ट विकाराबाद निजामस्टेट रेलवे हे पेन्शनर गृहस्थ गोविंदसुतांपेक्षाही वयोवृद्ध आहेत व वेदांत विषयांत चांगले अधिकारी आहेत व गोविंदसुतांचे ग्रंथ वाचल्यापासून ते त्यांच्यावर फारच प्रेम करीत असत. काही दिवस मुद्दाम • जानेफळ (अवधूता- " गोविंदसुत त्यांनी गोविंदसुतांस आपल्याकडे बोलावून भाग्रहाने राहून घेतले होते व अमळनेर येथे महिना दोन महिने पुनः त्यांच्या सहवासासाठी येण्याचा त्यांचा इरादा होता. गोविंदसुतांच्या आजारीपणांत दरपंधरवाड्यास त्यांच्याकडून कुशल समजण्यासाठी म्हणून जोडकार्ड यावयाचेंच, गोविंदसुतांच्या निधना. नंतर ते लिहितात " महाराजांचे परमपदास जाणे पाहून प्रपंचरीत्या अतीशय वाईट वाटले. महाराज महा अनुभवी होते. उपाधीमध्ये ते भलिप्त होते व उपाधी नाहीशी झाल्यावर जसेच्या तसेच भाहेत. उपाधी जाणारच. निजवस्तु अचल, अमर आहे. त्यांच्या आत्म्यास शांति मिळणारच. आमच्या सारख्या पामरांची प्रार्थना औपचारिकच होईल. आमचा मुख्य आधार आज गेला हे आमचे दुर्दैव च म्हणावयाचे." (४. ) श्री. म. ना. गोडसे ४८ शुक्रवार पुणे लिहितात " परशुराम पंतांचा व माझा परिचय १८९२।९३ सालापासून अखेरपर्यंत अगदी निकटचा होता. ते व मी काही वर्षे वे. शा.सं. साखरेबुवांचे मठांत अध्यात्मज्ञानश्रवणास जात होतो. परशुरामपंतांस ज्योतिष शास्त्राच्या ठळक गोष्टी समजत होत्या व मलाहि ज्योतिप व वेदांताचा नाद, यामुळे श्रवण आटोपल्यावर त्यांच्या अगर माझ्या बि-हाडी ऐकलेल्पा विषयांची चर्चा, वाटाघाट, मनन वगैरे आमच्या उभयतांमध्ये नेहमी होत असे. त्यांना दांभिक लोक बिलकूल आवडत नसत. त्यांचा पोषाख नेहमी साधा व राहणी साधी. त्यांचा स्वभाव प्रेमळ व आचार उत्तम असे. मुलकीखात्यांत त्यांच्यासारखा मार्मिक, बाणेदार, पूर्ण माहितीने काम करणारा असा विरळाच. व्यवहारांत ही विचारयुक्त वर्तन, फार दक्षता व अत्यंत चोखपणा असे" (४१) रा. नारायण अनंत शेवेकर सांव. लिहितात " दादांची आठवण झाली म्हणजे त्यांची ती प्रत्यक्ष मूर्तिच डोळ्यांपुढे उभी राहते. त्यांचे विनोदपर भाषण, चटकदार गोष्टी सांगण्याची शैली व दासबोध ज्ञानेश्वरी सांगतांना त्यांना येणारे प्रेमाचे स्फुरण या सर्व गोष्टी येथील आम्हां सर्वांनी अनुभविल्या आहेत. येथे भाले म्हणजे दररोज ज्ञानेश्वरी दासबोध चालत असे व आबालवृद्धांस हे ज्ञानामृत ते पाजीत असत. हा विषय निघाला म्हणजे त्यांचे व ऐकणारांचेहि श्रमपरिहार होत असत, कोकणांत पुनः केव्हां येणार असे विचारले म्हणजे थट्टेने म्हणत असत की या प्रांतांतील भूमीचा संसर्ग फार दुष्ट आहे. राम लक्ष्मण या प्रांतांत आल्यावेळी लक्ष्मणाची बुद्धि पालटली होती व रामाची सेवा न करता त्याच्याशी भांडून राज्याचा हिस्सा घ्यावा असे त्यास वाटे, रामाने देशावरील थोडीशी माती बरोबर आणली होती त्यावर लक्ष्मणास उभे राहण्यास सांगतांच लक्ष्मणाची बुद्धि ११३ गोविंदसुतांच्या आठवणी पूर्वीप्रमाणे साविक झाली, अशी आख्यायिका गमतीने सांगत. परंतु आपल्या जन्मभूमीचा व प्रांताचा त्यांस जाज्वल्य अभिमान असे व वारंवार ते इकडे येत. गेल्या वर्षी गोकर्णमहाबळेश्वराहून परत येतांना आम्ही सर्वांस मांडकी येथे बोलावून भेट दिली त्या वेळी बोलले की हा मर्त्य देह यापुढे फार दिवस टिकणार नाही व आता यापुढे माझें कोंकणप्रांतांत येणे अशक्य आहे, तीच भेट अखेरची ठरली ! ते येथे आले म्हणजे गांवांतील ग्रामदेवता वगैरे सर्व देवळांत जात व सर्व परिचित मंडळींस त्यांच्या घरी जाऊन मुद्दाम भेटत असा क्रम असे. लहान मोठ्यांशी सारखीच साधी वागणूक असे. त्यांची मूर्ति पाहिल्याबरोबर सर्वांच्या मनास आनंद होई व सदोदित त्यांच्या संगतीत असावे असे प्रत्येकास वाटत असे !" (४२) आवासचे गुरुवर्य बापट यांचे चिरंजीव रा, बाळकृष्ण दत्तात्रेय बापट ( सबपोस्टमास्तर माथेरान ) हे ता. १२।११३४ रोजी माथेरान हून अमळनेर मुक्कामी आपल्या वडिलांस लिहितात, " एकदा ऐकू येणारी गोष्ट इतक्या अनपेक्षित रीतीने ऐकू येईल असे वाटले नव्हते. आपण तीर्थरूप दादासाहेब चिंचाळकरांस रा. बापूसाहेब यांचेकडे अखेर घेऊन जाऊं शकला व आपल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे बापूसाहेब यांचे शेवटी हात लागले हा योगच म्हणावयाचा. आपला व दादांचा फार ऋणानुबंध. चिंचाळकर मंडळीबद्दल असणाच्या प्रेमामुळेच अखेर तरी आपला उपयोग झाला हा काही कमी योग नव्हे. ती॥ दादासाहेब दिवंगत झाले ते यथानुक्रमच जाहलें, तथापि आपणांस निरंतर स्वकीयांप्रमाणे मानणारा व निरलस कार्यकर्ता मनुष्य नाहीसा झाला ही उणीव लवकर भरून निघणारी नाही. धामणीकर बुवा, श्रीगुरुपरशुरामपंत व आपण यांचा ऋणानुबंध व प्रेम लक्षात घेता बापूसाहेबांइतक्या वेदना आपणांसही जाहल्या असणार हे मी जाणतों. फार दिवसांच्या योगामुळे स्वकीय हानीइतकेच मलाही वाईट वाटते. टीप:- वरील ४२ पत्रे केवळ नमुन्यासाठी म्हणून दिली आहेत. याखेरीज श्री. बापुसाहेब खंडकर पेन्शनर नाशीक, वैद्यराज जगन्नाथ विश्वेश्वर कर्वे किहीम, गणेश रघुनाथ फने वकील कोरेगांव, अंतुकाका फडणीस केसरी कचेरी पुणे, गोपाळ बळवंत जोशी पेन्शनर हेड कारकून पुणे, गोविंद बळवंत नाईक, मेकॅनिकल इंजिनिअर, अमळनेर ( चोपडे मुक्कामाहून), बाळकृष्ण महादेव राजदेरकर हायस्कूल शिक्षक अमळनेर, ( जळगांव मुक्कामाहून ), पैसाफंड प्रचारक अक्कलकोटकर यांचे मिरज मुक्कामाहून, स. ना. पाटणकर सिनेमा शामरावपंत नवरे स्वारी कारकून श्रीशंकराचार्य श्रीमज्जगहुरु मठ संकेश्वर गो. १५ आर्टिस्ट दादर, ११४ गोविंदसुत करवीर, पुरुषोत्तम गोपाळ जोशी, वकील, एरंडोल, दत्तात्रय नरहर मोघे दक्षिण हैद्राबाद, अनंत लक्ष्मण हळबे, शिक्षक मु॥ कान्हें, अनंत गोविंद तांबे वैद्य उमरावती, दत्तोपंत भांबर्डेकर कराड, गोविलकर बंधु पळस्पे, महादेव सिद्धेश्वर उकार, पुणे वगैरे असंख्य सज्जनांकडून व आप्तेष्टांकडून सहानुभूतीच्या प्रेमळ पत्रांचा वर्षाव झाला आहे. केवळ स्थलसंकोचास्तव कित्येकांचा नामनिर्देशही करता आला नाही व त्यांनी गोविंदसुतांबद्दल काढलेले आठवणींचे प्रेमळ उद्गार स्थलाभावामुळेच देता आले नाहीत अशा सर्व परिचित, अपरिचित सद्गृहस्थांचे, तसेच प्रबोध, प्रागतिक, नवाकाळ, केसरी, महाराष्ट्र, सकाळ, ज्ञानप्रकाश वगैरे वृत्तपत्रे व चित्रमय जगत् , महाराष्ट्र साहित्य पत्रिका, लोकमित्र वगैरे मासिक पुस्तकें यांच्या संपादकांनी गोविंदसुतांचे मृत्युलेख लिहून गुणगौरव करून सहानु- भूति व्यक्त केली याबद्दल सर्वांचे जाहीर रीत्या भाम्ही आभार मानतो. १ -
गोविंदसुत परशुराम-स्मृतिहार
(गुंफणार गणेश रामकृष्ण शहाणे, चाळीसगांव )
आर्या
गोपाल कृष्ण पावन धार्मिक तैसाचि धर्मनय मान्य ॥
विध्याचल धैर्याने चिंचाळकरप्रताप गुण धन्य ॥ १॥
दक्षिण हस्त जयाचा दक्ष सदा धर्म लेख कार्यात ॥
सुज्ञ करी स्वसनातनवैदिकधर्मप्रसार आर्यात ॥ २ ॥
तरती जन आध्यात्मिक परमार्थग्रंथ पाहतां ज्यांचे ॥
परपुण्य कार्य चालवि विद्येचे आणि जो समाजाचे ॥३॥
रमला न की प्रपंची रतला जो ग्रंथ वाङ्मयाभ्यासीं ॥
शुक्ल प्रभा विधूची निर्मलसी कीर्ति लाभली ज्यासी ॥ ४ ॥
रामस्मरण ज्याला पुत्राचा शोक बाधला नाहीं॥
मम निजानंदी हो संतसमागम करूनि जो राही ॥ ५ ॥
स्मृति मोरोपंतांची येई यद्ग्रंथलेख पाहून ॥
तिमिर हरो चित्ताचे कोमल हे प्रेमपुष्प वाहून ॥ ६ ॥
हा अमळनेरवासी विप्र कन्हाडे सदैव कोंकणचा ॥
रमणीय हार अपी दास शहाणे गणेश त्या स्मृतिचा ॥ ७ ॥
कैवल्यवासी श्रीगोविंदसुत (लेखकः-रा. ल. घरत.) कैवल्यवासी श्री. परशुराम गोविंद चिंचाळकर हे प्रथम गोविंदसुत या नांवाने मुमुक्षु साप्ताहिकांतील त्यांच्या पारमार्थिक लेखांवरून एक उत्तम वेदान्ती म्हणून माझ्या परिचयाचे झाले. त्यांच्याबद्दल मी विशेष चौकशी केल्यावर मला असे कळले की, ते सरकारी नोकर असून श्रीसमर्थ रामदास स्वामींनी श्रीदासबोधाच्या बाराव्या दशकाच्या पहिल्या समासांत म्हटल्या. प्रमाणे " आधी प्रपंच करावा नेटका । मग व्यावें परमार्थविवेका । येथे आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥ प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणे तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंचपरमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २॥ प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥ परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं यमयातना भोगिसी । अंती परम कष्टी होसी । यमयातना भोगितां ॥ ४ ॥ " या उच्चतम मुमुक्षु. कोटींतील एक थोर सज्जन होते. पण पुढे माझ्या असे चांगले अनुभवास आले की, साधक दशा आणि अंतर्यामांतील पूर्ण सिद्धावस्था त्यांस लाभली होती. त्यांनी चतुर्थाश्रम केला नव्हता, परंतु भगवान् श्रीकृष्णांनी म्हटल्या. प्रमाणे " काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः । हा संन्यास त्यांचा होताच. श्रीसमर्थांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची स्थिति ॥ साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेर गेला । निश्चय चळेना ऐसा जाला | या नांव सिद्ध ॥१॥ जो जनांमध्ये वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरी ज्ञान जागे। तोचि साधु ॥२॥ दिसतो तरी देहधारी । परी काहीच नाहीं अंतरीं । तयास पाहातां वरिवरि । कळेल कैसा ॥३॥......साधु आत्मज्ञानी । बोधे पूर्ण समाधानी । विवेके आत्मनिवेदनी । आत्मरूपी ॥ ४ ॥" अशा प्रकारचीच होती. लोकसंग्रहासाठी त्यांनी अनेक उद्बोधक लेख लिहून मुमुक्षूस उपकृत केले आहे. मुमुक्षु साप्ताहिक वृत्तपत्र होते तेव्हा त्याचे संपादक ह. भ. प. पांगारकरबुवा यांनी एका अंकांत श्रीदासबोधान्तर्गत दोन ओंव्या देऊन त्यांचा सांप्रदायिक पद्धतीचा अर्थ विचारला होता. मी त्या वेळी उरणास राहात होतो व तेथून एक सांप्रदायिक या सहीने मी त्या दोन भोव्यांचा विस्तृत अर्थ मुभुक्षुकडे पाठविला. तो प्रसिद्ध करतांना कैवल्यवासी श्रीगोविंदसुत मुमुक्षुकारांनी " उरणकर सांप्रदायिकांचे सुंदर पत्र असा त्याबद्दल उल्लेख केला होता. कै. गोविंदसुतांनी त्यानंतर त्याच ओंब्यांचा मुमुक्षूत अधिक विस्तृत अर्थ प्रसिद्ध करून त्यांत कारणपरत्वे उरणकर सांप्रदायिकाचाही उल्लेख केला होता. ते प्रथम सासवन्यास आले त्या वेळी त्यांबरोबर माझें या दोन ओव्यांबद्दल थोडें संभाषणही झाले होते. कै. गोविंदसुतांचं मुमुक्षु व साधक यांना अत्युपयुक्त असणारे आणि विद्वानांना आनंद देणारे बहुविध व बहुमोल वाङ्मय आहे. ते प्रायः सर्व प्रसिद्ध झाले आहे. मी अलिबाग तालुक्यांतील श्रीकनकेश्वर देवस्थानाचा एक विश्वस्त असून माझ्या शिफारशीवरून विश्वस्त मंडळाने गोविंदसुतांचे सर्व ग्रंथ देवस्थानच्या धार्मिक ग्रंथसंग्रहालयासाठी विकत घेतले, आणि साप्ताहिक व मासिक मुमुक्षुही चालू केला. ते ग्रंथ व मुमुक्षु अनेकांच्या वाचण्यांत आले आहेत व पुढेही वाचले जातील. कै० गोविंदसुतांचे स्नेही व त्याप्रमाणेच वेदान्ताचे व्यासंगी श्रीयुत द. य. बापट हे कायमचे आवासास राहावयास आल्यावर गोविंदसुत त्यांकडे आवासास अनेक वेळां आले. मी अलीकडे काही वर्षे सासवन्यास राहात आहे. तथापि श्रीयुत बापट यांच्या प्रेमामुळे मला कै. गोविंदसुतांच्या दर्शनाचा व अल्प सहवासाचा सासवन्यासच अनेकदा लाभ मिळाला. गोविंदसुत आवासास आल्यावर प्रत्येक वेळी सासवन्यास येत. एकदा तर श्रीयुत बापट काही कामासाठी इतरत्र गेल्यामुळे ते माझ्याकडे एकटेच आले होते. ही त्यांची मजवर शेवटचीच कृपा होती. ते कैवल्यधामास गेल्यावर त्यांच्या चिरंजीवांस मी लिहिलेल्या पत्रांत त्यांचे चरित्र प्रसिद्ध झाल्यास तें मुमुक्षु व साधक यांस चांगले मार्गदर्शक होईल असें मी त्यांस सुचविले होते. त्यांचे चिरंजीव चरित्र लिहून प्रसिद्ध करीत आहेत हे समजून मला फार संतोष वाटत आहे. ते चरित्र मननपूर्वक वाचून नवीन पिढीतील तरुण भापले जन्माचे सार्थक करून घेतील अशी आशा करून मी हे त्या सत्पुरुषाच्या ठिकाणी असलेल्या माझ्या भादर बुद्धीचे निदर्शक माझे दोन बेडेवांकडे शब्द त्यांच्याच चरणी अर्पण करून वाचकांची रजा घेतो. Re+ कै० गोविंदसुत यांचे अल्प स्मरण (ले. व्यं. ग. जावडेकर, धुळे ) AGROUP कै. गोविंदसुत हे त्यांच्या पुण्याच्या मित्रमंडळींत 'महाराज ' या नांवाने संबोधले जात व इतरत्र 'दादा' या नावाने संबोधले जात. त्यांचे व माझं विशेष संघटन त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच सुरू झाले. तत्पूर्वी तें फारसे नव्हते. प्राकृत अध्यात्मग्रंथवाचकांमध्ये मी नेहमी दोन वर्ग पाडीत असतो. हे दोन पुठेच जर कल्पिण्यांत आले, तर एकाचे नांव ' ज्ञानेश्वरी पुठा' व दुसऱ्याचे नांव 'दासबोधी पुठा' असें ह्मणण्याला मला काही प्रत्यवाय वाटत नाहीं. कै. दादांचा व्यासंग जरी ज्ञानेश्वरी व दासबोध अशा उभय ग्रंथांचा होता, तथापि प्रत्येक पंथाचे जे एक वैशिष्ट्य आहे ते लक्ष्यांत घेतां मी त्यांना ज्ञानेश्वरी गटांतले न समजतां दासबोध गटांतले समजत आलो आहे. शालेय शिक्षण केवळ अल्प असतांही त्यांनी आपला वाचनव्यासंग अगदी मरेपर्यंत कायम ठेऊन आपली ज्ञानवृद्धि कशी करून घेतली याची साक्ष त्यांचे ग्रंथच देत आहेत. सतत केवळ कादंबऱ्यांच्या वाचनाला चटावलेल्या आजकालच्या तरुणांनी यापासून एक उत्तम बोध घेण्यासारखा आहे. कै. दादांच्या चरित्रापासून तरुणांनी आणखी एक घेण्यासारखा गुण झणजे त्यांची निरलसता' हा होय. ते आपल्या वयाच्या ७२ व्या वर्षी वारले. पण त्यांच्या वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत मी असें पहात असे की ते पहाटे ३ वाजता उठून त्यांना जें लिखाण करावयाचे असेल त्याला ते सुरुवात करीत. सकाळी ८ वाजेपर्यंत भांथरुणांत लोळत पडणा-या सांप्रतच्या तरुणांनी ह्यापासून एक धडाच शिकावा असे आहे. त्यांचे वळणदार मोडी अक्षर यापुढे पाहण्यास मिळणे अशक्यच गोष्ट आहे. त्यांच्या हातची मोडी पत्रे जी आज कायम असतील तेवढीच काय ती पहावयास मिळावयाची. नव्या पिढीमध्ये मोडी लिहिण्याचा मुली सरावच राहिलेला नाही. कित्येकांना मोडी वाचतां सुद्धा येत नाही असे झाले आहे. मग लिहिता येणे तर लांबच राहिले. कै. दादा एका कार्डामध्ये ५०।६० ओळी मोडीच्या लिहीत असत. ह्यापासून सुद्धा तरुणांनी काही शिकण्यासारखें भाहे.
. के. गोविंदसुत यांचे अल्प स्मरण कै. दादा हे जरी मूळचे कै. लोकमान्यांचे मोठे चहाते होते तरी त्यांच्या पश्चात् म. गांधींच्या अंगी जे काही लोकोत्तर गुण त्यांना दिसून आले त्यामुळे ते त्यांचे नुसते चहाते झाले इतकेच नव्हे तर त्यांचे राजकारण सुद्धा त्यांना बन्याच अंशी पसंत होते. तथापि ते नेहमी असे म्हणत की हिंदुस्थानच्या लोकांत क्षात्रतेज निर्माण झाल्याशिवाय त्यांना पूर्ण स्वातं. ध्याची अपेक्षा करता येणार नाही. म. गांधींच्या खादीचा दादांनी एकदा जो अंगीकार केला तो त्यांनी आमरण कायम ठेवला. खादी ही गरीबांची तारणकी आहे अशी त्यांची खात्री पटलेली होती. खादीचा उपहास करणारांनी ही गोष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. महाराष्ट्रातल्या पेन्शनर लोकांनाही दादांच्या चरित्रापासून एक बोध घेण्यासारखा आहे. तो असा की एका नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही दुसरी कसली तरी नोकरी पत्करून आयुष्य कंठीत राहण्याचा मोह कित्येकांना केवळ अनावर झालेला असतो तसा तो मोह दादांना केव्हांच पडला नाही. त्यांचे वशीले इतके होते की त्यांना एकाद्या संस्थानांत पुनः नोकरी मिळणे अशक्य गोष्ट मुळीच नव्हती. असे असतांही त्यांनी आपला काळ पत्ते खेळून न घालवितां लेखन, वाचन, श्रवण व मनन यांतच केवळ घालविला ही गोष्ट त्यांना भूषणास्पद अशीच होती. आणि ती सेवानिवृत्तांनी द्रव्यलोभ बाजूस ठेऊन घेण्यासारखी नाही असे कुणाला तरी प्रामाणिकपणे म्हणता येईल काय? कै. दादांच्या पासून आणखी एक घेण्यासारखा गुण हणजे त्यांचा व्यवहारांतील अत्यंत चोखपणा. तरुण पिढीने तोही अनुकरण करण्यायोग्य आहे. आजकालच्या तरुण पिढीत नुसती छानछोकी मात्र मनमुराद घुसलेली आहे. पण तिचे व्यवहार जर पाहिले तर ते बहुतांशी · भोंगळ. सुतीच' असतात असे दिसून येते. तसे केव्हाही नसले पाहिजे. कै. दादांच्या अंगी दोष कोणतेही नव्हते असे मला म्हणावयाचें नाही. ते प्रत्येकांत असतातच, मग ते त्यांच्यांतही काही असल्यास त्याचे मोठेसें नवल नाही. माझी दृष्टि नेहमी कुणाच्याही अंगांत जे काही गुण म्हणून दिसत असतील तेवढेच पहात जावे अशी असल्यामुळे त्यांच्या अंगच्या काही गुणांचा मी उल्लेख केलेला आहे. तिकडे तरुण पिढी जर लक्ष्य देईल तर तिचेंच कल्याण होईल हे काही सांगावयास नकोच आहे. . न आठवणींचे रजःकण (.) लोकमान्यांच्या आठवणी व आख्यायिका भाग २ पृष्ठ २७७। २७८ यांत गोविंदसुत लिहितात:-" आम्ही लोकमान्यांच्या गीतारहस्यावर विनोदात्मक विरुद्ध टीका म्हणून रहस्यनिरीक्षण या नांवाचा ग्रंथ लिहिला होता. तो विनोदात्मक असल्यामुळे चित्रशाळेतील कंपोझिटर कंपोज करण्या- पूर्वी सर्व मजकूर आवडीने प्रथम वाचून मग कंपोज करीत असत. मजकूर वाचण्यांत तुमच्या पुस्तकामुळे आमच्या कंपॉझिटरांचा विनाकारण वेळ मोडतो हे चांगले नाही' असे चित्रशाळेचे मालक वासुकाका जोशी आम्हांस विनोदाने बोलले. ही हकीगत लोकमान्यांच्या कानावर गेली तेव्हां लोक. मान्यांनी वासुकाकांस निरोप धाडला की " परशुरामपंतांचे पुस्तक कंपोज करण्याला तुमच्या कंपॉझिटरांचा मजकूर वाचण्यांत विनाकारण वेळ जात असेल तर मजपाशी दोन मुसलमान कंपॉझिटर आहेत ते कंपोज करण्यास पाठवून देतो. !" (२) १९१४ च्या जूनमध्ये सरकारने लोकमान्यांस मंडालेच्या तुरुंगांतून सोडून आपल्या घरी मध्यरात्री आणून अवचित उभे केले. आपण सुटून आल्याबद्दलची आनंदाची खबर लोकमान्यांनी रातोरात पुण्यांतील सर्व मित्रमंडळींस कळविली. लोकमान्यांनी ज्या १०.२० मित्रमंडळींस बोलावण्यासाठी म्हणून प्रथम आठवण केली त्यांत गोविंदसुत होते. त्या वेळी केसरीकचेरीत असलेले श. विनायकराव भुस्कुटे रात्री २ वाजतां गोविंदसुतांच्या घरी आले व लोकमान्यांचा निरोप त्यांस सांगितला व लगेच गोविंदसुत लोकमान्यांस भेटण्यास गेले. ही हकीगत गोविंदसुतांच्या तोंडून आम्ही ऐकली आहे. (३) गोविंदसुतांचा फलज्योतिषशास्त्राचा व्यासंग दांडगा होता. १९१८ सालचे सुमारास लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यसंघाचे शिष्टमंडळ कोलंबो मार्गाने विलायतेस जाण्याचे मुक्रर झाले होते. " या वेळी तुमचे विलायतेस जाणे होत नाही असे माझे फलज्योतिषाच्या आधारे भविष्य " असें मुंबईस जाण्यापूर्वीच जाण्यापूर्वीच गोविंदसुतांनी लोकमान्यांस निक्षून सांगितले होते. पुढे कोलंबोपर्यंत जाऊन बोटीत पाय ठेवतांना विलायत सरकारकडून दिल्लीच्या व्हाइसरॉयमार्फत एक व मद्रासच्या गव्हर्नरमार्फत एक अशा तारा येऊन टिळक व केळकर यांचे पासपोर्ट रद्द करण्यांत आल्याचे हुकुम बजावण्यांत आले. त्या वेळी परत येतांना गोविंदसुतांच्या भविष्याची सर्वास गमतीने आठवण झाली ! आहे आठवणींचे रजःकण १२१ ( ४ ) देशभक्त शिवरामपंत परांजपे व गोविंदसुत दोघेही अतीशय विनोदी व समवयस्क जिवलग स्नेही. रस्नाकरांतील एका चित्रावरून शिवरामपंतांनी शृंगाररसात्मक लेख लिहिला होता व त्या लेखावर बरीच प्रतिकूल चर्चा वृत्तपत्रांत येत होती. गोविंदसुत थट्टेने शिवरामपंतांस म्हणाले " या वयांत असले शृंगारिक लेख लिहिणे तुम्हांस शोभते काय?" यावर शिवरामपंतांनी उत्तर दिले " एकूण तुम्हीही या वयांत असले लेख वाचतांच हैं ठीक आहे का ?" (५) पुण्याच्या प्लेगच्या वेळी दरसाल आम्ही चिंचवडला रहात होतो. एक दिवस सायंकाळी गोविंदसुत पुण्याहून ऑफिसांतून आल्यावर त्यांच्या कानावर वार्ता आली की गांवांत एक ब्राह्मणबाई बाळंत होत असतां वारली व तिच्या प्रेताची व्यवस्था करण्यास कोणी भाऊबंद येत नाहीत. लगेच गोविंदसुतांनी पुढाकार घेऊन ऑफिसातील चार कारकून मंडळींचीही मदत मिळून रातोरात सर्व व्यवस्था लावली. मग सर्व भाऊबंद खजील होऊन स्यांच्यापैकीही काही सजन मदतीस धावले ! (६) १९०९ साली आम्ही सेकंड एल्एल्. बी. च्या परीक्षेस बसलो. त्याच्या अगोदर ८१० दिवस प्रकृति जरा बिघडली होती व अभ्यासही अपुरा झाला होता, यामुळे परीक्षेस यामुळे परीक्षेस बसण्याचा विचार नाही असे आम्ही मुंबईहून पुण्यास वडिलांस कळविले. त्यांनी पत्रिका पाहून लगेच उत्तर दिले फी " यंदा परीक्षा हटकून पास होण्याचा योग आहे, परीक्षेस फक्त बस म्हणजे झाले. कोरे पेपर दिले तरी पास होशील." यामुळे मनास थोडा हुरूप येऊन परीक्षेला बसलों व ज्या प्रश्नांवर विशेष तयारी केली होती तेच प्रश्न येऊन परीक्षा उत्तम गेली व फर्स्ट क्लासाला १३ मार्कच कमी पडले इतक्या उत्तम रीतीने पास झालों ! (७) शेवटच्या दोन तीन वर्षांच्या आजारीपणांत गोविंदसुत हे एक दिवस सकाळी अमळनेर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर रामभाऊ म्हसकर यांचेकडे गेले व त्यांना म्हणाले " तुम्ही आजपर्यंत हजारों रोग्यांची परीक्षा करीत आला, परंतु मी असा रोगी आहे की तुमची परीक्षा करण्याकरता भालों आहे ! माझा रोग असाध्य आहे हे मी ठरविलेंच आहे, परंतु तुमच्या नावाप्रमाणे तुमच्यापाशी काही रामबाण इलाज आहे की नाही याची परीक्षा पाहाण्यासाठी आलो आहे !" डॉक्टरांनी उत्तर दिले की "हरकत नाही. तुमचेपुढे परीक्षा देऊन पास होण्याची माझी तयारी आहे !"डॉक्टरसाहेबांनी काही दिवस उपचार करून गोकर्णमहाबळेश्वरच्या प्रवासास जाण्यापुरती प्रकृती दुरुस्त करून दिली! गो. १६ १२२ गोविंदसुत (८) पुण्यातील एका नामांकित कायदेपंडितांनी नजर चुकीने एका शेतक-याची देशमुखी वतन इनाम जमीन गहाण घेऊन १०११२ हजार रुपयांचा मिळकतविक्रीचा हुकुमनामा मिळविला होता व धनकोच्या वारसांनी मिळकतविक्रीची दिवाणी कोटाँत दरखास्त दिली होती. त्या शेतकन्याला कोणी सांगितले की परशुरामपंतांकडे जा म्हणजे वतन अॅक्टाप्रमाणे ते कलेक्टरसाहेबांचा मनाई हुकुम देतील व तुझी मिळकत विकली जाणार नाही व जीव वांचेल. कलेक्टर साहेबांच्या फिरतीवर बारामती मुक्कामी तो इसम परशुरामपंतांस भेटला. त्या वेळी ( सन १९१० ) पुण्यास आम्ही नुकतीच वकिली सुरू केली होती. अमुक कलमाप्रमाणे या इसमाचा अर्ज लिहून पाठवावा असा पडिलांचा निरोप घेऊन तो आमचेकडे आला व कायद्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांकडे अर्ज पाठविला व दिवाणी कोटीतही हजर होऊन तक्रार केली. लवकरच कलेक्टरकडून कोर्टास मनाई हुकुम येऊन दरखास्त रद्द झाली. परशुरामपंतांनी आपले काम केले अशा भावनेने तो इसम १०० साये घेऊन पुनः फिरतीच्या मुक्कामावर जाऊन त्यांस भेटला व त्यांस रुपये देऊ लागला. परशुरामपंतांनी त्यास सांगितले की " कायद्याने जे काही योग्य व सरळ होते त्याप्रमाणे तुझे कामांत मी हुकुम घेऊन दिला आहे. त्याबद्दल तुम्ही आम्हांस पैसे देण्याचे काही कारण नाही. तुम्हांला वाटल्यास पुण्यास जाऊन आमचे चिरंजीव वकीलांस फी व इनाम म्हणून काही द्यावेसे वाटल्यास पुण्यास जाऊन द्या. पुण्यास आल्यावर त्या इसमाची बुद्धि बदलली व त्याने १०।१५ रुपयांतच आमची समजूत केली हे मानवी स्वभावास धरूनच आहे ! (९) एकदां एक मोठे पुढारी गोविंदसुतांस म्हणाले " दादा, तुम्ही खरोखर मोठे सिद्ध पुरुष आहां ! " त्यावर गोविंदसुत म्हणाले " पण तुम्ही माझ्याहीपेक्षा फार मोठे पुरुप आहां. सिद्ध शद्वामागे आणखी "प्र" हे विशेषण माझ्यापेक्षा तुम्हांस जास्त आहे म्हणजे तुम्ही " प्रसिद्ध पुरुष आहांत !" (१०) गोकर्ण महाबळेश्वराहून परत येतांना सांवतवाडीकडे एका मुकामाला एका धर्मशात उतरण्यासाठी मंडळींनी जागा पाहिली. परंतु त्या धर्मशाळेत एक संन्याशी अगोदरच उतरलेले होते. या मंडळींचा आपणांस उपसर्ग होऊ नये अशी त्यांची मनीपा दिसली व ते त्यांस तेथे उतरूं देईनात. त्या जागेवर त्या संन्याशांचा वास्तविक कांहींच मालकी हक्क नव्हता. जागा मिळत नाही असे पाहून दादा परतणार तोच ' तुम्ही कोणत्या गांवचे ' असा संन्याशांनी दादास प्रश्न केला. ' मी अमळनेरचा आहे ' असे दादांनी उत्तर आठवणींचे रजःकण १२३ देतांच “ अमळनेर येथील पूज्य गृहस्थ गोविंदसुत आपल्या परिचयाचे आहेत काय? " असा संन्याशांनी दादांल प्रश्न केला. "मीच गोविंदसुत आहे, " असें दादांनी विनयाने सांगतांच ते संन्याशी जरा ओशाळले व दादांचे पायावर डोके ठेवू लागले तोंच दादांनी त्यांच्या पायांवर अगोदर डोके ठेवले, म्हणजे संन्याशाला आपणांस नमस्कार करू दिला नाही. नंतर परस्परांचा बराच सुखसंवाद झाला व सर्व मंडळींची त्या जागी उतरण्याची उस्कृष्ट प्रकारे व्यवस्था लागली. (११) गोविंदसुतांचा अमळनेर येथे मुक्काम असे तेव्हां चांगल्या प्रकृतीच्या स्थितीत आपल्या घराखेरीज गांवांत इतर बऱ्याच ठिकाणी निरनिराळ्या वेळी दासबोध ज्ञानेश्वरी निरूपणाची त्यांची बैठक असे व प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे श्रोते असत. उदाहरण शुक्ल यांचे राममंदिरांत, कै. माधवराव मुठे यांचे घरी वगैरे. रा. नानासाहेब भिडे वकील यांनीही आपल्या घरी दादांकडून एकदां दासबोध समजावून घेतला आहे. घरी नेहमी पोथीवाचनास व श्रवणास येणाच्या मंडळींत रा. बाळकृष्ण रावजी डांगरीकर पेन्शनर हेडकारकून ( हे द्वारका व इतर ठिकाणच्या तीर्थाटणांत दादांबरोबर होते ), रा. रधुनाथ पंढरीनाथ कारेगांवकर, पेन्शनर हेडमास्तर, रा. गोविंद बाळाजी नाईक, मेकॅनिकल इंजिनिअर, रा. राजदेरकर ड्रॉइंग मास्तर वगैरे मंडळी असत. या व अमळनेरच्या इतर सर्व प्रेमी सज्जनांनी दादांचे चरित्र प्रसिद्ध झालेच पाहिजे म्हणून वेळोवेळी आम्हांस आग्रहाने सांगून प्रोत्साहन दिलेले आहे व चरित्रांत अवश्य आल्या पाहिजेत अशा अनेक गोष्टी वेळोवेळी सुचविल्या आहेत व लिहूनही पाठविल्या आहेत. त्यांपैकी काही गोष्टींचा आम्ही चरित्रांत समावेश केलेला आहे व श्री. कारेगांवकर व श्री. गोविंदराव नाईक यांनी दिलेल्या आठवणी स्थलसंकोचास्तव संक्षेपाने खाली दिल्या आहेत. गोविंदसुतांच्या रोजच्या बैठकीतील अमळनेरचे आणखी गृहस्थ म्हणजे कै. विनायक गोविंद ऊर्फ अण्णासाहेब भिडे वकील हे होत. गोविंदसुतांनंतर ५।६ महिन्यांनी अण्णासाहेबही निवर्तले. गोविंदसुतांनी आपल्या सकाळच्या फेरफटक्यांत अण्णासाहेबांच्या बंगल्यांत डोकावून ते रिकामे दिसल्यास त्यांच्याशी १०२० मिनिटें संभाषण करावयाचें व अण्णासाहेबांनीही सायंकाळी फिरावयास जातांना गोविंदसुतांकडे येऊन घटकाभर तरी वसावयाचे असा क्रम नेहमी चालू असे. या बैठकीत हरएक प्रचलित सार्वजनिक प्रश्नांवर उभयतांची मोकळेपणाने चर्ची चाले व जरी कित्येक प्रश्नांवर उभयतांचे मतैक्य होत नसे तरी दादांची विचारभूमिका उच्च दर्जाची असल्याबद्दल अण्णासाहेबांस भादर - गोविंदसुत असे. गोविंदसुतांचे निधन झाले त्या दिवशी ते मुंबईहून अमळनेरास आल्याचे समजतांच अण्णासाहेब फार आजारी होते तरी मुद्दाम गोविंदसुतांस भेटले व दोन तास त्यांच्या सन्निध बसले. गोविंदसुतही त्यांच्याशी प्रेमाने बोलत होते व मी भाजच जाईन असें नाहीं, थोडेसे दिवस काढीन ही असें म्हणत होते, परंतु दादांचा अंतकाळ अगदी समीप आहे असा डॉक्टर देशमाने यांनी जवळच्या लोकांस बाजूस बोलावून आपला वैद्यकीय अभिप्राय कळवितांच अण्णासाहेब खिन्न अंत:करणाने घरी गेले. अमळनेर येथे दादांची शेवटची वैद्यकीय शुश्रुषा करणारे गृहस्थ म्हणजे डॉ. भय्यासाहेब चितळे, डॉ. देशमाने व दादांचे परमस्नेही कै. नागोमास्तर वैद्य यांचे चिरंजीव रा. माधव नारायण पाठक वैद्य हे होत. (१२) श्री. कारेगांवकर मास्तर लिहितात:-श्रीदासबोध व समर्थांचे इतर ग्रंथ यांतील विषय दादांना करतलामलकवत् असत. दासबोधाची शंकडों पारायणे केलेले एक वृद्ध गृहस्थ दादांना एकदां प्रवासांत भेटले होते. परंतु काही ओंव्यांचा त्यांनी आपल्या बुद्धीप्रमाणे जो अर्थ लावला होता त्यापेक्षा वास्तविक अर्थ अगदी भिन्न स्वरूपाचा व भिन्न संदर्भाचा होता असे दादांनी प्रवासांतील आपल्या सहवासांत त्यांच्या मनावर बिंबविले. त्यावरून दादांच्या ठिकाणी त्या गृहस्थांची फार भक्ती अडली व वेळोवेळी त्यांचा बराच पत्रव्यवहार यासंबंधाने चालू असे, ती आलेली पत्रे व त्यांतील शंकांची दादांनी पाठविलेली उत्तरे आम्हाला ते वाचून दाखवून समजावून सांगत असत. अशा प्रकारे अनेक लोकांचा त्यांच्याशी नेहमी पत्रव्यवहार असे व त्यांत श्रीमंत, विद्वान् व सामान्य जनही अनेक असत. जिज्ञासूंना परमार्थ विषय समजाऊन देण्याची दादांना फार तळमळ असे हा अनुभव आम्हांला नेहमी येत असे. ज्ञानेश्वरीचे निरूपण करतांना प्रथम ओवीतील दुर्बोध शब्दाचा अर्थ सांगत, नंतर ओंवीतील शब्दांची रचना कशी मार्मिक रीतीने झालेली आहे याचे विवरण करीत, मंतर चालू विषयाची संगति लावीत. दृष्टांत कोणत्या हेतूने दिला आहे हैं सांगत. हे सांगत असतां निरनिराळ्या मतांचे दृष्टांत असल्यास त्यांची फोड करून त्या त्या मतांचे स्पष्टीकरण करीत. विषयाच्या सुबोधतेसाठी भालेल्या दृष्टांताची माहिती सांगत. पौराणिक कथाभागांतील दृष्टांत असल्यास तो कोणत्या पुराणांतील कथाभाग आहे हे चालू विषयापुरती माहिती देऊन सांगत. विशेष स्थळी अर्थ सांगतांना ते आपल्या गुरुपरंपरेच्या भीवर भर देत व रहस्यार्थ सांगत. श्रीज्ञानेश्वरीतील विशेष म्हणजे अध्यात्मा- घर जास्त भर असें त्यांचे मत असे. प्रथम नोकरीचा पेशा, नंतर तीर्थाटण ब ठिकठिकाणच्या पारमार्थिक जिज्ञासूंच्या भेटी यामुळे अनेक तन्हेच्या आठवणींचे रजःकण स्वभावांच्या मनुष्यांचा दादांस अनुभव आल्यामुळे त्यांचे व्यवहारज्ञान कित्ता घेण्यासारखे होते. त्यांच्या नित्यक्रमाचे काम चालू असले तरी पारमार्थिक विषयांबद्दल अगर प्रापंचिक अडचणींबद्दल त्यांस कोणी विचारण्यास भाल्यास त्याच्याशी अगोदर बोलत व नंतर आपले काम करीत. प्रत्येक वेळी प्रत्येक कामाचा अगर प्रवासाचा कार्यक्रम ते आगाऊ आंखून ठेवीत असत व अपरिहार्य अडचणींशिवाय त्यांत कधी बदल होत नसे. (१३) श्री. गोविंदराव नाईक लिहितात:- दादांच्या आयुष्यातील ध्येय म्हणजे धर्मजागृति करणे हेच होते व या ध्येयास कायावाचामनाने ते पाहिलेले दिसत. सकाळी ७ वाजले की ज्याप्रमाणे सूर्यनारायण अमुक ठिकाणी असावयाचा हे ठरलेले त्याप्रमाणे सात वाजले की दादा हे रा. राजदेरकर ड्रॉइंग मास्तर यांच्या समवेत बागेतून फुलें तुळशी घेण्याकरता जात असतांना दिसावयाचे. हे काम नोकर चाकरांकडून त्यांस करून घेता भाले असते, परंतु शारिरिक तपाने जातिनिशी फुले तुळशी आणून ती भगवंतास वाहिली असता तो प्रसन्न होऊन बुद्धियोग देतो ही दादांची नम्र भावना असल्यामुळे हे काम ते स्वतः करीत. दादांची स्नानसंध्यापूजा इतकी यथासांग व प्रेमळ वृत्तीची असे की सातव्या अध्यायांत वर्णन केलेल्या भगवंताच्या आत भक्तांपैकी हे असतील असें पहाणारास वाटे, परंतु वस्तुथिति मात्र अशी होती की यापेक्षा ते फारच उच्च अधिकाराचे पुरुष होते. दुपारच्या जेवणानंतर पुष्कळ पेन्शनर झोप घेतांना आढळतात, परंतु दुपारची वेळ ही वाचन, लेखन वगैरे रीतीने दादांची उद्योगाची वेळ असे. परमार्थाबद्दल ज्याप्रमाणे दादांना तीव्र तळमळ असे त्याप्रमाणेच स्वदेशोन्नतीबद्दलही निरतिशय प्रेम व कळकळ त्यांना असे व यामुळे देशांतील नेत्यांचे मतप्रवाह व चळवळी चालू आहेत या गोष्टींचेही पूर्ण ज्ञान ते करून घेत असत. त्यांच्या जवळ एखादा श्रद्धाळू व जिज्ञासू इसम क्षणभर बसला तरी संतांच्या प्राकृत शब्दांत धर्मातील उदात्त विचार ते इतक्या सुलभरीतीने समजून देत की कोणत्याही पंथाला धका न लावता, कोणत्याही प्रकारच्या प्रापंचिक उपाधीस असलेल्या मनुष्यास खरा विचार प्राप्त होऊन स्वकर्तव्याविषयी त्यास बोध मिळाल्याशिवाय राहात नसे. दादांच्या संभाषणाचा व सहवासाचा ज्याला ज्याला लाभ घडला असेल त्या प्रत्येकाला दिसून येई की दैवी गुणांची संपत्ति दादांच्या ठिकाणी किती अलोट व अपार आहे ! (१५) धोपेश्वरचे " शांता-रमण" ऊर्फ शामराव प. नवरे हल्ली श्रीमजगद्गुरु श्रीशंकराचार्य सं. मठ संकेश्वर-करवीर यांजकर स्वारी काय - गोविंदसुत कारकून आहेत यांनी ठळकवाडी बेळगांव येथून गोविंदसुतांच्या सहवासांतील बन्याच भाठवणी पाठविल्या आहेत त्यांतील सारांश:- गोविंदसुतांसारखा उत्तम लेखक, विनोदप्रिय, जबरदस्त स्मरणशक्तीचा, निगर्वी व कोणतेही काम आस्थेने करणारा असा मनुष्य कचितच दृष्टीस पडतो. फार वर्षांपूर्वी ते पुण्यास असतांना काही कामानिमित्त मी २१३ वेळां त्यांस भेटलों असेन. त्यानंतर दोन वर्षांनी मी अमळनेर येथे काही कामानिमित्त गेलो असता त्यांस सहज भेटण्यास गेलो. मी एक सामान्य मनुष्य, परंतु त्यांनी माझा फार भादरसत्कार केला व आपलेकडे एक दिवस आग्रहाने मला राहवून घेतलें. मागें पुण्यास भेटल्यावेळी फारसे त्यांचे माझे बोलणे झाले नव्हते तरी सुद्धा मजविषयीं ओळख त्यांनी चांगलीच ठेवली होती. सकाळी उठल्यावर आपल्या घरोबर मला ते फिरावयास गांवांत घेऊन गेले व देवालये वगैरे दाखवून गांवाची सर्व माहिती दिली. माझ्या परिचयाचे एक गृहस्थ ५।६ वर्षांपूर्वी अमळनेरास होते, हली कोठे आहेत माहीत नाही असे मी बोलतांच वाटेंत २।४ इसमांचे घरी ते वळले व त्या इसमाबद्दल पुरा तपास काढून सांगितले की हल्ली त्या इसमांची अमुक ठिकाणी बदली झाली आहे. दुपारी भोजनोत्तर वामकुक्षी करण्याचा माझा विचार होता, पण काय ? टपालची पत्रे वगैरे लिहून दादांची स्वारी पोषाख करून आली व " आतां तत्त्वज्ञान मंदिर व प्रताप मिल पाहण्यास चलता ना ?" असे दादांनी विचारले. ' आपण सकाळी फार फिरला आहां, विश्रांति घेऊन निघण्यास काय हरकत आहे ? ' असे मी म्हणतांच " भलतेच ! मी जर दमलोच नाही तर विश्रांतीची काय जरूर ? तुम्हांस विश्रांतीची जरूर वाटत असेल तर तासभर सवड देतो" असें दादा म्हणाले. मला जरी विश्रांति पाहिजे होती तरी वार्धक्यांतही दादांची इतकी तरतरी पाहून मी ओशाळलों व त्यांच्याबरोबर निघालोच. त्या दिवशी गीतामृतशतपदीकर्ते कै. बाबा गर्दे यांच्याशी त्यांनी माझा परिचय करून दिला व दादांच्या नवीन नवीन विनोदी बोधपर कोट्या ऐकून माझा आळस पार गेला व तो दिवस त्यांच्या सहवासात आनंदांत गेला. काही वर्षांनी मी मुंबईस असतो असें त्यांस समजले होते व एके दिवशी सायंकाळी माझे बिहाडी येऊन दत्त म्हणून माझे समोर उभे राहिले व मला आश्चर्यचकित केले. मी व माझे नातेवाईक यांस त्यांच्या सहवासाने या वेळी फार आनंद वाटला. माझी गांठ न पडल्याने दोन घेळां ते माझे बिहाडावरून फिरून गेले होते असें आसपासच्या लोकांकडून समजले. इतका गुणी व विद्वान् मनुष्य असून वागणी किती साधी व निगर्वीपणाची असे सर्वांचे उन्नार निघाले.
आठवणींचे रजःकण १२७ गोकर्ण महाबळेश्वराहून परत येतांना राजापूरला दादांचा एक दिवस मुक्काम होता. अशक्तपणामुळे व दगदगीने त्यांस धोपेश्वरी येता भालें नाहीं, पण तेवढ्या वेळांत त्यांनी धोपेश्वरला जाणान्या लोकांबरोबर भेटून जाण्या- विषयों मला निरोप दिला. कोणाचा निरोप आहे हे निरोप आणणाच्या लोकांकडून मला बरोबर समजले नाही, परंतु मी तसाच निघालों व इच्छित ठिकाणी जातांच 'गोविंदसुत तुमचीच मार्गप्रतीक्षा करति आहेत.' अशी हकीकत लोकांनी सांगितली. भेट होतांच " कां राजेश्री, हल्ली म्हणे तुम्ही एक कादंबरी प्रसवला आहा आणि आम्हांला तिची दादही दिली नाही?" असे गोविंदसुत म्हणाले. लगेच मी खिशांतून ' नाहीं' कादंबरी काढून त्यांस भेट म्हणून दिली. 'किंमत काय ठेवली आहे' असे विचारतांच • मला किंमत नको, भेट दिली आहे ' असें मी सांगितले, परंतु माझ्याकडून पुस्तक मोफत घेणे त्यांस आवडले नाही. पुस्तकावर १० आणे किंमत पाहून " दोन आणे कमिशन मी तुमचेकडून घेणारच " असे म्हणून भापल्या बरोबरच्या गृहस्थां- कडून मी नको म्हणत असतांही त्यांनी अधेली माझ्या खिशांत टाकलीच. " आतां या कादंबऱ्या सोडून काही अध्यात्मविषय ध्याना लिहायला ?" असे ते मला म्हणाले. " पण माझ्यासारख्या कादंबरीप्रिय माणसाला तो विषय कसा लिहिता यावा ? " असें मी विचारतांच प्रयत्न केला म्हणजे सर्व काही साध्य होते " असे त्यांनी उत्तर दिले. त्या रात्री प्रवासांतील अनेक गोष्टी आपल्या विनोदी भाषेत त्यांनी सांगितल्या व सर्वांचा बराच काळ आनंदात गेला. दुर्दैवाने हीच त्यांची व माझी शेवटची भेट ठरली.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.