Library

Chhatrapatisan'bhaajii Mahaaraaja

Rangand-ekara Keshavaman'gesha · 2005-12-01

PDF Proofread

Front matter

THE BOOK WAS DRENCHED

UNIVERSAL
LIBRARY
OU_184485
LIBRARY
UNIVERSAL

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

श्रीसयाजी बालज्ञानमाला-पुष्प ४७ घे.
चरित्र-गुच्छ.
छत्रपति
संभाजी महाराज.
लेखकः
केशव मंगेश रांगणेकर, बी. ए.
रेफरन्स लायबेरियन, सेंट्रल लायब्ररी, बडोदें.
इंग्रज लोकांचा संक्षिप्त इतिहास ' या पुस्तकाचा कर्ता.
प्रकाशकः
एम्. सी. कोठारी,
कापडीपोळ, रावपुरा-बडोदें.
बडोदे येथे 'जागृति ' छापखान्यांत रा. भ. ब. पाळेकर यांनी
प्रकाशकाकरिता छापिलें ता. २५-७-२४.
किंमत
रू..-६-०
प्रथमावति.
संवत् १९८०.
प्रति ५००

जाहीरात आपल्या देशी भाषेच्या साहित्यापा जानाद्ध कर- ण्याच्या सद्धेतूने श्रीमंत सरकार महाराजसाहेब श्रीसयाजी- राव गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादुर, जी. सी. एस. आय., जी. सी. आय. ई., एल. एल. डी., यांनी कृपा- वैत होऊन दोन लक्ष रुपयांची जी रक्कम अनामत ठेविली आहे, तिच्या व्याजांतून प्रथमिक शिक्षण संपादन करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना बोधप्रद होईल असें सरळ आणि सोप्या भाषेत विविधविषयावरील लोकसाहित्य तयार करून ते " श्रीसयाजीबालज्ञानमाले * प्रसिद्ध करण्याची योजना केरी आहे. या योजनेस अनुसरून रा. रा. केशव मंगेश रांगणे- कर बी. ए. याजकडून छत्रपति संभाजी महाराज यांचे चरित्र तय.र. करवून सदरहु मालेच्या चरित्र--गुच्छाचें सत्तचाळीसावें पुष्प विद्याधिकारी कचेरीतील भाषांतर शाखेच्या ठरलेल्या धोरणाने संशोधित करून प्रसिद्ध करण्यांत येत आहे. भाषांतर शाखा, ज.पु. जोषीपुरा. नं.के. दीक्षित. विद्याधिकारी कचेरी, विद्याधिकारी बडोदे. बडोदें राज्य. भा.म. ता.२८.७.१९२४ प्रस्तावना. हल्लीच्या महर्गतेच्या काळी मध्यम स्थितींतील लोकांस नोकरी करून मिळणाऱ्या अल्प वेतनांत संसारशकट चालविणे किती कठीण झाले आहे हे सर्वांस विदित आहेच. विशेषतः मला ते अत्यंत कठीण झाले असल्याने, वाङ्मय- सेवेच्या उच्च हेतूने नव्हे परंतु केवळ अधिक द्रव्य मिळ- विण्याच्याच लोभाने मी लेखक बनण्याचा विचार केला. प्रस्तुत पुस्तक हे त्याचेच फल होय. लेखक बनण्याच्या माझ्या हेतूस प्रोत्साहन दिल्या- बद्दल प्रथमतः बडादें राज्यांतील विद्याधिकारी कचेरीतील भाषांतर शाखेच्या अधिकाऱ्यांचे मदतनीस रा. रा. भानु- सुखराम निर्गुणराम मेहेता यांचा मी अत्यंत आभारी आहे. प्रस्तुत चरित्र लिहितांना रा. रा. गो. स. सरदेसाई, मॅट डफ, किंकेड वगैरे वगैरे इतिहासकारांच्या कृतींचा मी लाभ घेतला याबद्दल त्यांचाही मी ऋगी आहे. शिवाय बडोया- तील सेंट्रल लायब्ररी खात्याच्या सरस्वती मंदिरांतच माझी नोकरी असल्याने त्यांत असलेल्या व उत्तरोत्तर नवीन येत असलेल्या ग्रंथांच्या केवळ दर्शनाने लेखक बनण्याची मला स्फूर्ति झाली याबद्दल त्या सरस्वतीमंदिराचा मी तित- काच किंबहुना जास्त ऋणी आहे. वरील हकीगतीवरून ध्यानात येईल की, पुस्तक लिहिण्याचा माझा हा अगदी प्रथम प्रयत्न आहे. यामुळे पुस्तकाच्या भाषेत अगर वर लिहिलेल्या इतिहासकाराच्या पुस्तकांतून मिळविलेली माहिती व्यवस्थित रीतीनें प्रथित करण्यांत वगैरे माझ्या पुष्कळ चुका होण्याचा संभव आहे. तरी त्याबद्दल वाचकांनी मला क्षमा करावी, अशी त्यांस नन्न विनंति आहे. सिद्धनाथ, बडोदें. ता. २१-७-१९२४. केशव मंगेश रांगणेकर ग्रंथकर्ता.

श्री.
छत्रपति संभाजी.
मुलांनों, महाराष्ट्रामध्ये गोब्राह्मणांस मुसलमानांच्या
बासापासून सोडवून मराठी राज्याची स्थापना करणारे
छत्रपति शिवाजी राजे यांचे नांव तुम्हांस ठाऊक असेलच.
तसेच त्यांनी निरनिराळी साहसाची व अचाट कामे करून
केवढी कीर्ति मिळविली हेही तुम्हांस माहीत असेलच.
यास्तव शिवाजीराजासंबंधी काही विशेष हकीकत न
सांगतां त्यांचे वडील चिरंजीव संभाजी महाराज यांचे अल्पसे
चरित्र तुमच्या माहितीसाठी खाली देतो.
शिवाजी राजे यांस पुष्कळ स्त्रिया होत्या. त्यांपैकी
सर्वात मोठी ही निंबाळकरांची कन्या होय. तिचे नाव
सईबाई असे होते. शिवाजी राजांस जरी दुसन्या स्त्रिया
होत्या, तरी सईबाईवर त्यांचे अत्यंत प्रेम होते व तिच्या-
.

२ छत्रपति संभाजी. विषयीं राजांच्या मनांत फार आदर असे. तीही त्या प्रेमास व आदरास पात्र होती. या सईबाईच्या पोटी ज्येष्ठ शु. १२ शके १५७९ म्हणजे इ. स. १६५७ च्या जून मन्यांत संभाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजास मातृसुख फार दिवस लाधले नाही. कारण, सईबाई या इ. स. १६५९ म्हणजे महाराज अवधे दोन वर्षचे असतां- नाच वारल्या. संभाजी महाराजांशिवाय शिवाजी राजे यांस सोयरा- बाई नांवाच्या स्त्रीपासून राजाराम महाराज या नांवाचा आणखी एक पुत्र होता. आपण स्थापन केलेल्या राज्याची दिवसेंदिवस वाढ करून त्याचा नीट रीतीने सामाळ करता यावा यासाठी शिवाजी राजानी दोवाहि राजपुत्रांस उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यास लिहिणे वाचणे थोडे. बहु । शिकवून, घोड्यावर बसणे, तिरंदाजी, तालीम, शस्त्र- विद्या वारे गोष्टी उत्तम तन्हने शिकविल्या. त्यांस चागल्या लोकांची संगत लागावी व नीच, दुराचारी लोकांचा संपर्कही लागू नये म्हणून त्यांचे जवळ नेहमी उत्तम व वृद्ध नोकर छत्रपति संभाजी. ३ . लोक ठेविले होते. वाईट लोकांची संगत धरल्याने पुराणां- तील रावण, दुर्योधन वगैरे राजांचा ज्याप्रमाणे समूळ नाश झाला, त्याचप्रमाणे आपलाही व्हावयाचा हे निरनिराळी उदाहरणे सांगून त्यांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांनी प्रयत्न राज्यकारभाराची त्यांस थाडी थोडी माहिती व्हावी म्हणून शिवाजी राजे त्यांस आपले बरोबर दरबारांन घेऊन बसत असत. त्यांस रामदासस्वामींचे दर्शनास व त्याच- कडे राहण्यासही वरचेवर पाठवीत असत. केला. स्वभावतःच भिवाजी राजांच्या वरील सुशिक्षणाचा परिणाम संभाजी महाराजांच्या बाबतीत काहीच झाला नाही. ते कर व होते शिवाय त्यांच्या मातुश्रा लहानपणीच वारल्यामुळे आईकडून मिळणा-या शिक्षणाचा जो काही चांगला परिणाम मुलाच्या मनावर व्हावयाचा, तो संभाजी महाराजांच्या मनावर मुळीच झाला नाही. यामुळे ते हळुहळू स्वच्छंदी होऊन वयांत आल्यावर आपल्या वडिलांच्या फारसे कह्यांत राहीनातसे झाले.

छत्रपति संभाजी. संभाजी महाराजांच्या लहानपणाचा इतिहास उप. लब्ध नाही. यामुळे ते गादीवर बसण्यापूर्वीच्या आयुष्या- तील गोष्टी फारशा कोणास माहीत नाहीत. एवढे मात्र खरे की, लहानपणासून ते शूर व धाडसी होते चवताळ- लेल्या वाघाच्या अंगावर ते एकटेच धांधून जात, असे सांगतात. अशाप्रकारच्या कित्येक धाडसांच्या प्रसंगी ते स्वतः- वर प्राणसंकटही आणीत व अशा वेळी त्यांचा नांवाज- लेला अत्यंत विश्वासू सेवक जोत्याजी केसरकर हा त्यांस त्या संकटातून सोडवी असे सांगतात. असो इ. स. १६६६ त शिवाजी राजे यांनी मोंगलांशी तह केला व या तहाचे वेळी औरंगजेब बादशहाने संभाजी सहाराज, जे त्यावेळेस अवघे नऊ वर्षे वयाचे होते, त्यांस पांच हजार स्वारांची मनसबदारी देण्याचे कबूल केले होते. या तहानंतर लवकरच शिवाजी राजे औरंगजेबाने बोला- विल्यावरून त्यास भेटण्यास दिल्लीस गेले. जातेवेळी त्यांनी संभाजी महाराजांस बरोबर नेले होते. औरंगजेबाने शिवाजी राजांशी कपट करून त्यांस कबूल केल्याप्रमाणे त्यांचा योग्य

छत्रपति संभाजी.
मानमरातब न ठेवितां त्यांस संमाजी महाराजांसह नजर
कैदेत ठेविलें. औरंगजेबाचे कपट लक्षात येतांच शिवाजी
राजांनी निरनिराळी निमितें सांगून आपल्याबरोबर नेलेल्या
लोकांची दिल्लीतून कशी सुटका केली व त्यानंतर स्पतः
अतिशय आजारी पडल्याचे मिष करून त्या आजारातून
बरे झाल्याबद्दलच्या आनंदाप्रीत्यर्थ तेथील अमीर उवरावास
पेटान्यांतून मेवामिटाई पाठविण्य चा परिपाठ पाडून एके
दिवशी एका पेटा-यात स्वतः व दुसन्यांत संभाजी महारा-
जांस बसवून औरंगजेब बादशहाच्या हातावर मोठ्या
अलौकिक युक्तीने तुरी देऊन संभाजी महाराजांसह शिवाजी
राजांनी दिल्लीतून प्रयाण कसे केले, ही मनोरंजक हकीकत
सर्वांस माहीत असेलच.
दिल्लो शहराच्या बाहेर पडतांच पूर्वी व्यवस्था केल्या
प्रमाणे तयार असलेल्या घोड्यांवर स्वार होऊन शिवाजी
राजांनी संभाजा महाराजांसह अतिशय जलद पळ काढून
मथुरा गाठली. मथुरेस गोसावी, बैरागी वोरे लोकांचा
भरणा बराच असल्याने शिवाजीराजे यांनी तेथेच स्वतः

w छत्रपति संभाजी. वैराग्याचा वेष धारण केला व संभाजी महाराजांसही तो यष दिला. मथुरस शिवाजी राजांच पेशवे मोरोपंत पिंगळे यांचे मेहुणे, तिघे बंधु रहात असत. त्यांनी या बैराग्यांस पुढे पळून जाण्याचे सोईवार होईपर्यंत स्वतःच्या घरी टेवून घेतले. इतक्या गोष्टी होईपर्यंत शिवाजी राजांच्या पलाय- यनाची हकीकत औगजेबाच्या कानी गेली. त्या हकी- गतीने त्यास अत्यंत वेष येऊन शिवाजी राजांचा तपास करून त्यांस पकडून आणण्यास गांवोगांवच्या अधिकाऱ्यांस न्यांने तांतडीच हुकून तत्काळ सोडले परंतु कोटी त्यांचा पत्ता लागाण्याचा संभव त्यांस न दिसल्याने मथुरेच्या बैरागी मोस वी वातच त्यांचा कसून तपास करावा, असा मथु- रेच्या अधिका-यांस हुकूम झाला. वरील हुकूम होण्याचे संवीसच शिवाजीराजे मथुरेत पकरले जाण्याच्या अगदी बेतात होते. एका प्रसंगी यमुना नदीचे कांटी बसून दक्षिणेत जावयाच्या रस्त्यांविष्यी व जाण्यास लागणान्या खर्चाविषयी शिवाजीराजे आपल्या- छत्रपति संभाजी. बरोबरच्या मंडळीशी वाटाघाट करीत होते. हे त्यांचे संभा. षण जवळच असलेल्या एका ब्राह्मणाच्या कानी पडतांच, मंडळीच्या पेहेरावास अनुसरून नसलेलें तें संभाषण ध्यानांत येऊन त्याने मंडळीस त्याबद्दल प्रश्न केला. सुदै- वाने जव एक कृष्णाजी विश्वनाथ नांवाचा ब्राह्मण होता. या ब्राह्मणास मोरोपंत पिंगळ्यांच्या त्रिवर्गबंधूंनी पूर्वीच आपलासा करून घेतलेला असल्याने त्याने त्या प्रश्न कर- णान्या ब्राह्मणाची समजूत करून देऊन त्यास गप्प कलें व मागाहून त्यास बक्षिस वगैरे देववून त्यास शिवाजीराजांचा एक भक बनवून सोडले. हा प्रसंग येऊन गेल्यावर व वर सांगितलेला औ- रंगजेबाचा हुकुम समजल्यावर यापुढे मथुरेत रहाणे फार धोक्याचे आहे हे शिवाजीराजांच्या लक्षात आले. परंतु संभाजी महाराज फार लहान असल्याने त्यांप प्रवासाची दगदग सोसवणार नाही व ते बरोबर असल्याने दोधेहि पकडले जाण्याची भीति असल्याने त्यांस तेथेच कृष्णाजी विश्वनाथाच्या आईकडे ठेवून स्वतः कृष्णाजीस रस्ता दाख-

८
छत्रपति संभाजी.
विण्यासाठी बरोबर घेऊन शिवाजीराजे मार्गस्थ झाले, व
पूर्वसंकल्पाप्रमाणे काशी, प्रयाग वगैरे तीर्थे पहात पहात
सर्व तीर्थयात्रा निर्विघ्नपणे करून दक्षिण सोडल्यापासून
नऊ महिन्यांनी परत रायगडास दाखल झाले. शिवाजी
राजे दिल्लीहून सुखरूपपणे परत आले म्हणून जिजाबाईनी
मोठा उत्सव केला. जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला.
फक्त संभाजी महाराज अद्याप संकटांत होते, ही एकच
गोष्ट शिवाजीराजे व जिजाबाई या दोघांच्या मनास
त्यावेळी दुःख देणारी होती.
शिवाजी राजांस दक्षिणेत सुरक्षितपणे पोचवून
कृष्णाजी विश्वनाथ परत मथुरेस गेला. स्वतःची आई,
काशीजी त्रिमल नांवाचा मोरोपंत पिंगळ्यांचा एक मेहुणा
व संभाजी महाराज यांस बरोबर घेऊन तो परत पुण्या-
च्या मार्गास लागला. उजनीपर्यंत या मंडळीचा प्रवास
निर्विघ्नपणे पार पडला. उजनीस या सुंदर व उच्च स्थिती-
तील मुलास पाहून हे संभाजी महाराज असावेत अशी एका
मुसलमान अंमलदारास शंका आली व त्याप्रमाणे त्याने या

छत्राति संभाजी. मंडळीस प्रभ केला. या प्रश्नाने काशीजीने बिलकुल न डगमगतां शांतपणे त्यास उत्तर केले की, हा मुलगा माझा आहे. माझी बायको, आई, मुलगा व मी असे चौघेजण थोड्या दिवसांपूर्वी प्रयागच्या यात्रेस जाण्याकरतां निघालों परंतु दुर्दैवाने माझी आई रस्त्यांतच मरण पावली व माझी बायको प्रयाग येथे आजारी होऊन मरण पावली. आत मी माझ्या या पोरक्या मुलास पुन्हा माझ्या गांवी येऊन जात आहे. " काशीजीच्या शांतपणाने त्या मुसलमान अंम• लदारास उगीच एखाद्या मनुष्याबद्दल भलताच संशय घेत- ल्याबद्दल आधीच वाईट वाटत हाते, त्यांत त्याच्यावरील सयुक्तिक उत्तराने त्यांत भर टाकिली. तरीपण तसे काही चर्येवर दिसू न देता तो मुसलमान मगाला, असें असेल तर तुला तुझ्या मुलासह एका ताटांत जेवावयास हरकत असता नये. तरी त्याप्रमाणे मला तसें जेऊन दाखव. आतां हिंदुधर्मशास्त्राच्या परंपरेप्रमाणे ब्राम्हणाने मराठ्या- बरोबर एका ताटांत जेवणे सनीविरुद्ध असतांही काशीजी मुळीच न डगमगतां संभाजी महाराजांबरोबर १० छत्रपति संभाजी. एका ताटत जवला. ते पाहून तो मुसलमान अंलदार खूष झाला व त्यास काही एक प्रश्न न करितां सदाश्चर्य करीत चालता झाल. वरील प्रसंगांतून ईश्वरकृपने सुखरूपपणे सुटल्यानंतर, आमची प्रवासी मडळी गोदावरी नदीच काठावरील राक्षस- भवन नांवाच्या गांवापर्यंत पायीच चालत गेलो व तेथे भाड्याने घोडे टरबून शक्य तितक्या त्वरने प्रवास करून त्यांना लवकरच रायगड गांठला. संभाजी महाराज राक्षतपणे दक्षिणेत येऊन आपणांस भेटल्याबद्दल शिवाजीराजांस अतिशय आनद झाला. त्यांनी मारापंत पिंगळे यांच्या तिघाहो मेहुण्यांस विश्वासराव असा किताब दिला. शिवाय काशोजा व कृष्णाजी विश्वनाथ यांची आई या दोघांस प्रत्येकी पंचवीस हजार रुपये बक्षाम दिले. असो. अशा प्रकारे स्भाजी महाराजांबद्दलच्या काळजीतून मुक्त होतांच शिवाजीराजांम मोंगरांचा सूड घेण्यास मोक- ळीक झाली. मागे सांगितलेच आहे की, संभाजी महारजांस सुशि- छत्रपति संभाजी. ११ . क्षण देण्या। शिवाजीराजांनी बराच प्रयत्न केला. परंतु त्यांत त्यांस यश आले नाही. महाराज अत्यंत दुराचारी व कर वृत्तीचे झाले. एके समयी, म्हणजे शिवाजीराजांनी म्वतःस राज्याभिषेक करून घेतल्यानंतर, राजवाड्यांत हळदी. कुंकवाचा समारंभ होता. त्यावेळी सभाजी महाराजांनी एका ब्राह्मणाच्या स्त्रीवर बलात्कार केला. ही हकोगत ऐकून शिवाजी राजांस फार वाईट वाटले. परस्त्रीबद्दल शिराजा राजांच्या मनांत किती आदरभाव वसत असे ते त्यांस एके काळी त्यांच्या सरदारांनी पळवून आणलेल्या एका सुम्वरूप मुसलमान स्त्रीस नजर कलें त्यावेळच्या त्यांच्या उद्दारांबद्दल- च्या हकीकतीवरून तुह्मांस माहीत असेलच. मुसलमान स्त्री. बद्दल ज्यांचे मनांत इतका पूज्यभाव त्या शिवाजी राजांस ब्राह्मण स्त्रीवरील बलात्काराची हकीगत ऐकून काय वाटले असेल याची कल्पना तुझांस सहज होईल. ते अत्यंन तिर- स्कागने बोलले, " हे आगचे पुत्र !! पूर्वजन्मीं केोणतें पापाचरण केले ह्मणून हे आमचेच पोटी जन्मास आले ! आमचे मागे हे सर्व राज्याचे अधिकारी होणार !

१२ छत्रपति संभाजी. प्रजा ही राजाची अपत्ये आणि यांची तर ही नक्षसी वाग- णूक ! पुत्र झाला अगून काय झाले ? शिक्षाच करीन ". वडिलांचे वरील उद्गार ऐकून संभाजी महाराजांस एक प्रकारें भीति वाटली वडिलांचा स्वभाव त्यांस माहित होता. ते बोलल्याप्रमाणे शिक्षा केल्याशिवाय कधीही रहावयाचे नाहीत अशी संभाजी महाराजांस दहशत बसून त्या दिवसापासून ते उदासपणे वागू लागले. वरील प्रसंगाचे सुमारास, औरंगजेबाने दक्षिणेतील विजापूर व गोवळकोंड्याची राज्य मिळविण्यासाठी तसेच शिवाजीराजांचे पारिपत्य करण्यासाठी ज्या दिलेरखान नामक सरदाराची नेमणूक केली होती त्या सरदाराने विजा- पूरकरांस फार सतावून सोडल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी मसाउदखान याने शिवाजीराजांस स्वतःच्या मदतीस येण्याविषयी पाचारण केले व त्याप्रमाणे ते लप्करानिशी तिकडे जावयास निघाले असतां वाटेतच त्यांस एक अनिष्ट बातमी केळल्यामुळे त्यांनी आपले सेनापति हंबीरराव मोहिते यांस विजापूरकरांच्या मदतीस पाठवून आपण छत्रपति संभाजी. १३ स्वतःवर आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी पन्हा. व्यास आले. वर लिहिल्याप्रमाणे वडिलांच्या भीतीमुळे संभाजी महाराजांची उदासवृत्ति पाहून त्यांचे बालमित्र उमाजीपंत- ने समवयी असून समंजस गणले जात असत, त्यांनी महाराजांस एकांती गांठून सांगितले की, " आपण काळजी करू नये. दिलेरखान जवळ आमचे हितसंबंधी लोक आहेत. आपली मर्जी असल्यास आपण तिकडे चलावे म्हणजे बंदोबस्त करून देईन." हे भाषण ऐकून महाराजांस आनंद झाला. काही दिवसांनी त्यांनी उमाजीपंतास दिलेरखाना- कडे पाठवून त्याच्याशी सल्लामसलत केली व एके दिवशी कांहीं बहाणा करुन स्वतःची बायको येसुबाई यांस बरो- घर घेऊन से दिलेरखानास भेटले. दिलेरखानास भेटले. शिवाजीराजांस विजापुरास जातेवेळी रस्त्यांत जी अनिष्ट बातमी कळली असें वर म्हटले आहे ती हीच संभाजी महाराजांच्या फितुरीबद्दलची होय, १४ छत्रपति संभाजी. संभाजी महाराज दिलेरखानच्या लष्करापाशी येतांच खान त्यांस सामोरा जाऊन मोठ्या समारंभाने भेटला. खानास शिवाजीराजांविषयी माहिती होतीच व त्यामुळे संभाजी महाराज आपणांकडे फितुर होऊन आले असतील या गोष्टीवर त्याचा एकदम विश्वास बसेना. त्याप वाटे की, शिवाजीराजांनीच त्यांस दुस-या काहीतरी अंतःस्थ हेतूनें पाठविले असावे. परंतु शेवटी त्याने संभाजी महाराजांस खोदखोदून प्रश्न विचारून त्यांचा त्यांच्याकडे येण्याचा आशय जाणून घेतला. शिवाजी राजांचा पुत्र त्यांच्यावर रागावून आपणाकडे आला हे समजून खानास फार आनंद झाला. त्याने ही आनंदाची बातमी औरंगजेबास त्वरने कळविली. औरंगजेबाने संभाजी महाराजांस ७००० घोडे- स्वारांची मनसब दिली व एक हत्ती नजर केला. दिलेर- खानानेही त्यांस मौल्यवान् वस्त्रं वगैरे देऊन त्यांचा योग्य सत्कार केला. मराठे लोक सध्यां फार बळावले आहेत व म्हणून त्यांच्यांत फूट पाडण्यास संसाजी महाराज हे आपले हाती

छत्रपति संभाजी.
आयतेच चांगले साधन आहे यासाठी त्यांस राजा ही
पदवी देऊन एका पक्षाचे मुख्य केल्यास व त्यास आग
मदत केल्यास त्यांचे मार्फत मरठ्याचे एका मागून एक
सर्व किल्ले सहज सर करता येतील वगैरे आपले मत दिलेर.
खानाने औरगजेबास कळविले. औरंगजेबाच्या कारस्थानी
म्वभावावरून आपल्या ह्मणण्यास तो सहज रुकार देईल
अशी खानाची पक्की खात्री असल्यामुळे औरंगजेबाकडून
उत्तर येण्याची वाट न पाहतां त्याने संभाजी महाराजास
'राजा' हा किताब देऊन त्यांच्या हाताखाली सैन्य देऊन
त्यांस भूपाळगड घेण्यासाठी रवाना केलें.
भूपाळगडचा किल्लेदार या वेळी फिरंगोजी नरसाळा
हा होता. या फिरंगोजीनेच इ. स. १६१४ त चाकण किल्ला
शाहिस्तेखानाबरोबर लहविला होता. किल्लयास मोर्चे
लावून संभाजी महाराज स्वतः किल्लयासमोर उभे राहिले.
फिरंगोजीची पंचाईत झाली. वरून गोळा टाकावा तर
शिवाजीराजांचे पुत्र समोर उभे. न टाकावा तर काय करावें
अशा विचारांत तो पडला. शेवटी त्याने मधला मार्ग स्वीका-

१६
छत्रपति संभाजी.
रण्याचे ठरवून आपल्या पदरचा एक मनुष्य प ठवून संभाजी
महाराजांस विमंति केली की किल्ला घेऊ नये. महाराजांस
या विनंतीचा राग येऊन त्यांनी स्या आलेल्या मनुष्यास
तत्काळ मारून टाकिलें व बच्या बोलाने किल्ला आमचे
स्वाधीन करा नाही तर सर्वांचा शिरच्छेद करीन"
असा धमकीचा निरोप फिरंगोजीस पाठविला.
त्यावरून फिरंगोजी व किल्लयावरील इतर मंडळी यांनी
बिल्ला सोडून जाणे बरे असा विचार केला व शिवाजी
राजांच्या कानी सर्व हकीगत घालण्यासाठी त्यांनी रातोरात
पळ काढला. जे थोडे लोक किल्ला धरून राहिले होते त्यांस
संभाजी महाराजांनी पकडून आणून
कोणाचे
हात,
कोणाचे
पाय असे तोडून व अशा रीतीने किल्ला हस्तगत करून
घेऊन महाराज दिलेरखानाच्या छावर्णाकडे परतले.
मागे सांगितल्याप्रमाणे आपणावर आलेले संकर
निवारण करण्यासाठी शिवाजीराजे पन्हाळयास आल्या.
नंतर, त्यांनी पुत्राची समजूत पाडण्यासाठी संभाजी महा-
राजांकडे काही चतुर माणसे पाठविली, त्यांनी त्यांजबरोबर

छत्रपति संभाजी. १७ ? त्यांस असा निरोप पाठविला की, " आज जन्मभर इतकी खटपट करून आम्ही जे राज्य संपादन केले ते केवळ तुम्हांसाठीच नव्हे काय ? आमचं वय दिवसंदिवस उतार होत चालले आहे, तेव्हां आमची इच्छा आहे की, तुम्ही सर्व राज्यकारभार संभाळून असावे. तें न करितां तुम्ही यवनास मिळून आपले राज्य पुन्हा त्यांचेच घरांत घाल- तां याला काय हणावें? आमचें आता काय ? दहा गले आणि पांच उरले ! आम्ही काठे तरी पुण्यक्षेत्री जाऊन सुद्धां वास करण्यास राजी आहोत. परंतु तुम्ही आपलेच हाताने आपलेच नुकसान करून घेत आहां, हे तुम्हांस कसे समजत नाही ! मागील गोष्टी झाल्या त्या झाल्या. यापुढे तरी तुम्हीं में गलाचे नादी न लागतां माघारे आपले मुलखांत या. पाहिजे तथं तुमचे खाजगी खर्चास तालुका लावून देतो." याप्रमाणे काही ममतेच्या व कां । समजु- तीच्या गोष्टी पुत्रास शिवाजी राजांनी सांगून पाठविल्या. इकडे दिलेरखानाने संभाजी महाराजांस 'राजा' ही पदवी देण्याविषयी वगैरे और जेबाकडे जी शिफारस कली १८ छत्रपति संभाजी. होती ती त्यास पहिल्याने बरी वाटली; परंतु त्यास ती मागाहून अगदी नापसंत पडली. कारण त्यास वाटले संभाजी महाराज यांनी सत्ता हाती येतांच मदत करण्याचे राडून देऊन मोंगलांच्या हिंदू सरदारांस फितविल्यास आपण आयतीच मराठ्यांस मदत केल्यासारखे होईल. मणून त्याने संभाजी महाराजांस कैद करून त्यांस दिल्लीस रवाना करण्याचा दिलेरखानास हुकुम केला. दिलेरखानास बादर हाचा हा हुकुम आवडला नाही. तसेंच संभाजी महा- राजांस त्याने अभयवचन दिले असल्यामुळे आता त्यांचा विश्वासघात करणे त्यास बरोबर वाटले नाही. यासाठी त्याने वादशहाचा हुकूम संभाजी महाराजाचे कानी घातला व त्यांस मोंगलांची छावणी सोडून जाण्यांत मदत केली. आपण हातची शिवार मुद्दाम साडली अशी कोणास शंका येऊ नये ह्मणून खानाने संभाजी महाराजाचा उघडपणे अप- मन करन त्यांची मनसब कमी केली व त्यांच्या असामीची रक्कमही दिली नाही. महाराजांनीही आपला असा अपनान झाल्याबद्दल आपणास फार वाईट वाटले आहे असे दर्शविले. याच संधीस वर लिहिल्याप्रमाणे संभाजी महा-

छत्रपति संभाजी.
१९
राजांची समजूत पाडण्यासाठी शिवाजी राजांनी पाठविलेली
माणसे खानाच्या छावणीकडे येऊन पोचली होती. या
सुसंधीचा फायदा घेऊन खानाने महाराजांची त्या माणसाशी
भेट करवून देऊन त्यांजबरोबर त्यांची रवानगी करून
दिली. संभाजी महाराजांनीही असा विचार केला की,
'दिल्लीपतीच गज्यांत जो आपला निभाव लागला नाही तो
विजापूर वगैरे ठिकाणी कसा लागेल ? शिवाय वडिलाकडू-
नहीं सामोपचाराने बोलावणे आले आहे, त्या अर्थी आता
जास्त न भटकतां परत आपल्या मुलखात जावे हे बरें.'
असा विचार करून येसूबाईस बरोबर घेऊन शिवाजी
राजांनी पाटविलेल्या माणसाबरोबर निघून संभाजी महाराज
पन्हाव्यास-थ वडील होते तेथे पोचले. शिवाजीराजाम
या गोष्टीने आनंद होऊन ते पुत्रास समाजाने सामोरे
जाऊन भेटले. नंतर यापुढे असा प्रसंग येऊ नये मगन
राजांनी चिरंजीवास उपदेश करून त्याचा पूर्ण बंदोबस्त
केला. खर्चवेच पहाणे वगैरे व्यवस्था व्यबाजी बाजी प्रभु
यांस सांगितली, लोकांची बरदास्त हवालदारांनी टेवावा
असें ठरविलें व संभाजी महाराजांनी त्या दोघांचा नल्यान

२० छत्रपति संभाजी. वागावे असे त्यांस सांगितले. या प्रमाणे बंदोबस्त करून शिवाजी राजे आपले पुढील कार्यास गेले व इकडील बातमी आपणास वरचेवर मिळावी अशी त्यांनी व्यवस्था केली. यापुढे शिवाजी राजांच्या मरणकालापर्यंत संभाजी महाराज पन्हा- व्यासच होते. मुलांनो, तुझांस माहीत आहेच की, शिवाजी राजे हे इ. स. १६८० च्या एमिलच्या ५ व्या तारखेस गुड- धीच्या रोगाने मरण पावले. मरण समयीं त्यांचे वय अव ५३ वर्षांचें, झणजे त्या काळच्या मानाने फार नसल्याने व शिवाय त्यांचे देहावसान केवळ सात दिवसांच्या अल्ला- वधींत झाल्याने त्यांस आपल्या मागे राज्याची व्यवस्था कशी असावी त्याबद्दल विचार करून योग्य तजर्वाज करता आली नाही. अगदी ऐन वेळेस मात्र त्यांस स्वतःचा बेभरंवसा वाढू लागला व त्यावेळी त्यांनी सभोवतालच्या मंडळाकडे काही दुःखोद्गार काढून त्यांस सुचविले की, सभाजी महाराज जरी दुर्वृत्त असले तरी राजाराम महाराज वयान फार लहान असल्याने त्यांवर राज्यभार टाकता येत छत्रपति संभाजी. २१ माही; यासाठी सर्वानी एकदिलाने वागून संभाजी महा. राजांकरवी उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवून प्रजेसं सुख होईल असे करावें, वगैरे अनेक गोष्ठी सांगितल्या. शिवाजीराजांची पत्नी सोयराबाई हिच्या मनांतून राजांच्या पश्चात् राज्याचा मालक आपला मुलगा राजाराम हा व्हावा, असे होते. शिवाय राजानी अनेक वेळां व विशेषतः अंतसमयीं संभाजी महाराजांच्या दुराचरणाविषयी उद्गार काढून त्यांच्या कारकीर्दीत राज्याची काय दशा होईल अशी काळजी दर्शविल्याने ती गोष्ट सोयराबाईच्या पथ्यावरच पडली. राजांच्या उद्गारांचा फायदा घेऊन तिने काही प्रधानमंडळीशी मसलत करून असें ठविले की, संभाजी महाराजांस शिवाजीराजाच्या मृत्यूची बातमी इत- क्यांत न कळवितां त्यांस पन्हाळ्यासच बंदोबस्ताने ठेवावें व राजाराम महाराजांच्या नावे द्वाही फिरवून प्रधानमंड- ळाने राज्यकारभार चालवावा. येणेप्रमाणे बेत ठरून त्याप्रमाणे ठिकठिकाणी पत्र लिहून पाठविली. त्यांतच एक पत्र संभाजी महाराजांवर देखरेख ठेवण्याबद्दलचे २२ छत्रपति संभाजी. हिरोजी फरजंद यास पाठविले. खुद्द संभाजी महाराजांसही एक पत्र पाठविले होते; परंतु त्यांत शिवा नीराजांच्या मर- णाची हकीगत न लिहितां फक्त राजे आजारी असल्याबद्दलच लिहिले होते. संभाजी मह र जांस वडिलांच्या आजारावीषयी हकीकत समजली तेव्हां त्यांस अतोनात वाईट वाटले, व केव्हां एकदां वडिलाचे दर्शन घेईन असे त्यांस होऊन गेले. अतिशय त्वरा करून व रात्रंदिवस उंटावरून प्रवास यरून त्यांनी रायगड गाठला. परंतु दुर्दैवाने त्यांस पित्याचे अंतकाळचे दर्शन घडले नाही. कारण संभाजी महाराज रायगडच्या पायथ्याशी येऊन पोचप्यापूर्वीच शिवाजीराजांचे प्राणोत्करण झाले होते. अशा त-हेने निराश झाल्याने व इतकी धावपळ करून येऊन देखोल वडिलांची भेट न होतां त्यांच्या मरणाची दुःखकारक बातमी समजताच संभाजी महारांजास अत्यंत त्वेष आला व त्याचा परिणाम असा झाला की, ज्या उंटावरून आपण प्रवास केला ते उत्तम गती न चालल्यानुच आपली व वहिलाची भेट झाली

छत्रपति संभाजी.
२३
नाही असें मनांत आणून संभाजी महाराजांनी तरवारीच्या
एका घावांतच उंटाचे शीर त्याच्या धडापासून वेगळे कले.
इतके करूनही त्यांचा राग शांत झाला नाही. दुमन्या
उंटांसही योग्य दहशत बसावी झणून किल्याच्या बाहेरील
दरवाजाजवळ शिगशिवायचे असें एक उंट तयार करून
तेथे उभे करण्याबद्दल त्यांनी तत्काळ हुकुम सोडला.
संभाजी महाराजांच्या या बालिश मूर्खपणाचं जणू काय
स्मरणच असें तें उंट अद्याप तेथे आहे असे सागतात.
वरील हकीगतीच्या सत्यतेविषयी खात्री देता येत
नाही. कारण ती हकीगत एके ठिकाणीच सापडते. दुसरे
इतिहासकार वगैरे निराळीच हकीगत देतात, ती अशाः-
संभाजी महाराज पन्हाळ्यास घोड्यावरून फिरत असतं
मागे सांगितलेली पत्रे घेऊन जासूद ज्या ठिकाणी पोचला.
जासुदाने महाराजांचे पत्र त्यांस दिले, परंतु त्याजकडे
दुसरी अनेक पत्रे पाहून त्यांस संशय येऊन त्यांनी जानु-
दास दरडावून ती पत्रे पहाण्यास मागितली. पत्रे पहातांच
सर्व हकीगत महाराजांच्या लक्ष्यात आली. आपल्या

२४ छत्रपति संभाजी. सापत्न मातोश्रीचे सर्व कारस्थान त्यांच्या ध्यानात येतांच त्यांनी पहिल्या प्रथम आपणावर देखरेख करणारे सामाजी नाईक यकी व सूर्याजी कंक यांस एकदम ठार मारले. हा प्रकार पाहून हिरोजी फरजद तेथून पळून गेला व झणूनच तो वांचला. अशा प्रकारे तीन अंमलदारांची वासलात लाग. तांच महाराजांनी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. किल्ल्याच्या पायथ्याशी जनार्दनपंत सुमंत फौजेनिशी होता. त्याच्या फो नेत महाराजांनी फितूरी आरंभिली व एके रात्री त्याच्या फौजेवर अचानक हल्ला करून त्यास कंन केले व किल्ल्यावर आणि ही हकीगत ऐकून व महाराजांचा पराक्रम पाहून अनुक्रमें मोरोपंत पेशवे व सेनापती हबीरराव मोहिते त्यांस जाऊन मिळाले. या- प्रमाणे महाराजांचा पक्ष बळावत जाऊन त्यांनी रायगडावर स्वारी करण्याचे ठरवून ते सोयराबाईच्या च्या पक्षांतील मंड- लीचा ठिकठिकाणी पाडाव करीत इ. स. १६८० च्या जून महिन्यांत विजयी असे रायगडास पोचले. संभाजी महाराजांनी वरील प्रकारचा पराक्रम करून छत्रपति संभाजी. २५ दाखविल्यामुळे त्यांचेविषयी पुष्कळ लोकांचे मनांत आदर- भाव उत्पन्न झाला व पुष्कळांस असे वाटले की, शिवाजी राने जरी पुत्राविषयी निराश झाले तरी पण पुत्राचे अंगी पित्याचे धैर्यशार्यादि गुण असल्यामुळे त्यांचेसंबंधी निराश होण्याचे कारण नाही. परंतु लोकांचा हा प्रम फार दिवस टिकला नाही. कारण शिवाजी राजे जितके दयालु, त्याच्या उलट संभाजी महाराज तितकेच निर्दय असल्याचे लोकांच्या नजरेस आले. एखाया सत्ताधारी परंतु अविचारी व चिडखोर मनुष्या- कडून कोणतीहि गोष्ट करून घ्यावयाची असल्यास जरा स्याच्याच कलाने घे.ल्यास तो मनुष्य ती गोष्ट सुरळीत- पणे करितो. पण जर त्या पूर्वी त्या मनुष्यास चिडविले तर ती गोष्ट नीटपणे न होता तो मनुष्य रागाच्या भरांत अवि. चाराने भलतीच गोष्ट करतो. असाच काहीसा प्रकार संभाजी महाराजांच्या बाबतीत झाला. प्रथमतःच जर शिवाजी महा- राजांच्या आजाराची माहिती संभाजी महाराजांस वेळीच दिली असती व त्यांस कैदेत ठेवण्याचा घाट करून राजा-

२६
छत्रपति संभाजी.
राम महाराजांच्या नांवें राज्यकामार चालविण्याची मसलत
न करता संभाजी महाराजांच्या कलाच जर सर्व गोष्टी
..ल्या असत्या तर पुढे त्यांच्या हातून जी अत्यंत क्रूर करें
घडली ती मुळीच घडली नसती असें म्हाणावयास कांहीं
हरकत नाही. रायगड किल्ला हस्तगत करून घेतल्यावर
महागजांनी प्रथम अण्णाजी दत्तो यास कैद केले व त्याची
मालमत्ता जप्त केली. तसंच राजाराम महाराज यांसही केद
कलें व सोयराबाईस कैद करवून आपणासमोर आगविली
स्वतःच्या मुलास राज्य मिळावे म्णून तू महाराजांस
(शिवाजीराजांस) विषप्रयोग करून ठार मारलेंस काय !"
असे विचारून व तिची आणखी अनेक प्रकारे निभर्सना
करून तिला भिंतीत कोनाड्यांत बसवून चिणून टाकण्याचा
हुकूम केला. तीन दिवसपर्यंत ती जिवंत होतो. नंतर तिची
क्रिया राजाराम महाराजांचे हस्ते करविली. सोमाजी नाईक
बंकी याचे मुलास कड्यावरून खाली लोटून दिले. पंधरा
मालसावंतांस एकदम टार मारले. याप्रमाणे एकंदर दोनशे
रहान मोठ्या अंमलदारांस महाराजांनी देहान्त शिक्षा
व

छत्रपति संभाजी.
देण्याचे अत्यंत राक्षसी काम केलें. सोयराबाईचे आप्त शिरके
सरदार सर्वजण महाराजांचे शत्रू बनले. तिचा पक्ष मोडून
आपला हक प्रस्थापित करण्यांत महाराजांनी पहिल्याने जे
शौर्य व धोरण दाखविले होते त्यामुळे लोकाचे मनांत
त्यांचेविषयी उद्धरलेला आदरभाव वर सांगितलेल्या
त्यांच्या अमानुष कृत्यामुळे पार लयास जाऊन त्याचे ऐवजी
त्यांचे मनांत भीति व काळजी यांनी ठाणे दिले. असो.
धेऊन झाल्या-
याप्रमाणे विरुद्ध पक्षाचा चांगला सूह
नंतर नागपंचमीच्या दिवशी महाराज राज्यारूढ झाले व
इ. स. १६८१ च्या फेब्रुवारीत त्यांनी स्वतःस यथाविधि
राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकाचे वेळी पुष्कळ
दुश्चिन्हें झाली असे सांगतात प्रथम त्या दिवशी दगामुळे
सूर्यदर्शनच झाले नाही. सिंहासनारूढ झाल्यावर महाराज
रथावर वसून काळपुरुष मारण्याचा विधि करावयास चालले
भसतां वाटेंत रथच मोडला. असो चालीप्रमाणे यज्ञ,
बामगभोजनें, दक्षणा वगैरे सर्व झाले. महाराजांनी पूर्वीचेच
प्रधान नूते राहू दिले, परंतु त्याचे हातून कामें न घेता

२८
छत्रपति संभाजी.
त्यांचे गुमास्ते, उद्धव पुंगदेव व बहिरोपंत, यांजकडून ते
कामें घेऊ लागले.
राज्यारोहणानंतर लवकरच संभाजी महाराज परळी
येथे रामदासस्वामींच्या दर्शनास गेले. स्वामींस महारा-
जांच्या अमानुषपणाची माहिती अगोदरच लागली होती.
असल्या मनुष्याचे मुखावलोकन करणे म्हणजे महत्पाप होय
असें वाटूनच की काय, स्वामींनी महाराजांची भेट घेतली
नाही व त्यांस दर्शनही दिले नाही. मात्र त्यांनी त्यांस
अदेशपर असें लांबलचक पत्र पाठविले. हे पत्र दासबोधांत
प्रसिद्ध आहे. महाराजांच्या मनावर या पत्राचा काहीच
परिणाम झाला नाही. यानंतर लवकरच रामदासस्वामी
समाधिस्थ झाले. स्वामींचा अंत्यविधि परळीसच झाला.
त्यांच्या देहाची रक्षा पहिल्याने चाफळ येथे नेली व ती
तेथून काही दिवसांनी संभाजी महाराजांनी उत्तरेस नेववून
गंगोदकांत टाकविली.
संभाजी महाराज कितीही दुष्ट असले तरी सज्जना-
विषयी त्यांचे मनांत किती आदरभाव असे हे वरील एप
गोष्टीवरून सहज ध्यानी येण्याजोगे आहे.

छत्रपति संभाजी.
२९
यानंतर नहागज काही राजकारणासाठी पन्हाळ्यास
असतां औरंगजेबाचा चवथा मुलगा सुलतान अकबर
आपणाकडे आश्रय मागण्यासाठी रायगडावर आला
ल्याची हकीगत त्यास समजली. अकबरावर बापाची
पंत मर्जी होती. इ. स. १६८० चे सुमारास 'जिझीया'
क करावरून औरंगजेबाविरूद्ध रजपूत लोकांनी जे
केले ते मोडण्यासाठी त्याने इतर मुलांबरोबर अकरा-
| पाटविले होते. परंतु रजपुतांचा मुख्य सरदार दुर्गादास
अकबराचे मन वळवून त्यास आपलासा करून घेतला.
फितुरीची बातमी औरंगजेबास कळतांच त्याने मोठ्या
कीने ही फितुरी मोडून अकबराच्या लोकांस परत आपणा-
डे वळविले. त्यामुळे आता बादशहापुढे आपला निभाव
गावयाचा नाही असें जाणून तो संभाजी महाराजांच्या
श्रियास तेथून पळून आला.
आपण रायगडावर आल्याची खबर महाराजांस अक.
पने पत्रे वो वगैरे देऊन एका वकिलास पाठवून
कपिली. ही बातमी समजतांच महाराजांनी आपला एक

३०
छत्रपति संभाजी.
कारभारी त्यास सामोरा पाठवून रायगडाजवळ घोंडसें
अणून गांव होतें तें त्याच्या उतारास नेमून दिले व त्यास
योग्य नेमणूक करून दिली. काही कालानंतर याच धोंडसें
गांवास अकबराच्या उताराचे स्मारक झणून बादशहापूर असें
नांव दिले. असा.
इकडे महाराज पन्हाळ्यास बरेच दिवस राहिले,
या गोष्टीचा फायदा घेऊन सोयराबाईच्या पक्षाचे
अण्णाजी दत्तो यांनी राजाराम महाराज यांचे तर्फे
अकबराकडे बोलणे लाविलें. हो हकीगत कर्णोपकर्णी
महाराजांस कळली प्रथम त्यांस अकबराचाच संशय
आला. परंतु त्याने स्वतः होऊनच सर्व हीमत महाराजांचे
कानी घालून त्यांची संशयनिवृति केली. यानंतर त्या
दोषांचे बरेच सख्य झाले. या पुढे लवकरच औरंगजेबाने
गोवळकोंड्याचे राज्य घेतले व आतां विजापूरचे राज्य
घेऊन मग मराठ्यांचाही समाचार घेण्याचा औरंगजेबाचा
विचार आहे वगैरे हकीगती ऐकून अकबराने महाराजांस
सांगितले की, आपण दोघेही मिळून मोठी फौज गोळा

छत्रपति संभाजी. AY करून औरंगजेबास सामोरे जावे. परंतु महाराजांनी अकब- राच्या या मसलतीकडे दुर्लक्ष्य केले. यावरून अकबराची खात्री झाली की, महाराजांचा आपणास काही उपयोग व्हावयाचा नाही, व तिकडे तर आपण बापाचा द्वेष संपा- दन केला. अतां आपला निभाव लागणे कठीण असे जाणून त्याने संभाजी महाराजांस सांगिले, की " आमांस सुरतेस जावयाचे. तेथून मक्केस जाऊं. याजकरिता आमांस सुरतेपर्यंत पोचवावें. " त्यावरून महाराजांनी त्यास निरोप देऊन त्याजबरोबर योग्य माणसे देऊन त्याची सुरतेस रवा- नगी केली. तेथून तो मकेस निघून गेला. महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या सुरवातीस जरी अत्यंत करपणे शिवाजी राजांच्या वेळच्या जुन्या व विश्वासू सरदारांस मारून टाफिले, तरी पण ते वडिलां: प्रमाणेच शूर असल्याने त्यांचे नांव राखतील अशी बरीच आशा होती. परंतु ही आशा समूळ नष्ट करण्यास जी अनेक कारणे झाली त्यांपैकी मुख्य कारण मटले भणजे महाराजांचा मुख्य प्रधान कलुषा फबजी हा होय हे मुलांनों तुझांस देखील माहीत असेल.

३२ छत्रपति संभाजी. कबजी हा कनोजा ब्राह्मण होता. तो विद्वान् असून शाक्तपंथी होता. त्यास पुष्कळ मंत्रविद्या येत होत्या. त्याने महाराजांवर काही प्रयोग केला की काय समजत नाही. परंतु एवढे मात्र खरे की, महाराज यास चांगलेच वश झाले. इतके की तो सांगेल ती पूर्वदिशा अशी स्थिति झाली. शाक्तमार्गे अनुष्ठाने करून प्रयोग केल्यास त्या योगाने धनधान्यसमृद्धि होऊन राज्यवृद्धिही होते व दरेक गोष्टीत यश येते इत्यादि महाराजाचे मनांत भरवून कलुपाने त्यांज- कडून अनुष्ठाने करविली. पुढे पुढे त्याने त्यांचे बुद्धीस अंश पडेल असे करविलें. रेडे मारून त्यांच्या ओल्या कातड्यावर बसून त्यांचेकंडून अनुष्ठाने करविली. तसेच त्यांजकडून मद्यमांसादि खावून पुष्कळ पशुवध करविले कलुषाच्या या सर्व कृत्यांत महाराजांचें मन पूर्ण रमलं. जर कोणो हे करणे योग्य नव्हे असें महाराजांस सांगण्याचा धीर केला तर कलुषाच्या सांगण्यावरून महाराज स्यासच दरवारांत येण्याची बंदी करीत व कैदही करीत. इतक्या थरावर गोष्टी गेल्यानंतर महाराज जे करतील तें मुकाट्याने पहाणे व सहन करणे याखेरीज कोणाचा कांच इलाज उरला नव्हता.

२
छत्रपति संभाजी.
३३
कलुषा हा औरंजेबाकडून संभाजी महाराजांस भ्रष्ट
करण्याकरतां विडा उचलून आला होता, अमें सागतात.
कित्येक भाविक लोकांची अशी समजूत होती की, तो
कलीचा अवतार असून शिवाजीराजानी सुरू केलेल्या राज्य
व धर्मसंस्थापनेचे उच्छेदन करण्याकरता तो प्रकट झाला
होता. एके ठिकाणी असा आधार सापडतो की, संभाजो
महाराज वडिलांबरोबर दिल्लीस जाऊन परत यते वेळी
मथुरेस राहिले होते, असे तुम्ही वर वाचलेंच. त्यावेळी मथु-
रेसच महाराजाची व कलुषाची चांगली ओळख झाली होती
व त्या ओळखीचा फायदा घेण्यासाठीच महाराज राज्यारूड
झाल्याची खबर लागतांच तो त्यांचे दरबारी आला होता.
असा.
महाराजांस दारूचे व्यसन लागण्यास कलुषाच कारण
झाला असे म्हटल्यास हरकत नाही. कारण तो त्यांजकडे
येण्यापूर्वी त्यांस हे व्यसन असल्याचा उल्लेख कोठे सांपडत
नाही. असो.
महाराज पन्हाळ्यास असतांना अण्णाजी दत्तो वगैरे
३

३४
छत्रपति संभाजी.
मंडळीनी फितुरी करण्याचा घाट घातला होता हे वर
सांगिलेच आहे. या फितुरीमध्ये शिवाजी महाराजांच्या
वेळा त्यांचा विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी हा
प्रमुख होता असा त्या जबर आरोप होता. शिवाय या कटांत
सर्व शिरके मंडळीही सामील होती. बाळाजी आवजी व
दादजी रघुनाथ देशपांडे यांचा पूर्वीपासूनच द्वेष होता
त्याबद्दल सूड उगविण्यास दादजी रघुनाथ हा महाराजांच्या
मर्जीतला असल्यामुळे त्यासही चांगलीच संधी मिळाली.
महाराजांस पन्हाळ्यात कैदेतच अडकवून ठेविण्याविषयी
वार मागे जी पत्रे लिहिली होती ती चिटणिसानी आपल्या
मुलाकडून लिहविली होती वारे हकीगत महाराजांस सांगून
त्याने त्याचेविषयी त्यांच्या मनांत स्वेष आणिला. आवींच
महाराजांची क्रूर वृत्ती, त्यात असा त्वेष चढलेला. मग
काय विचारावयाचे ? ताबडतोब महाराजांनी चिटणिसांस
बोलावून आणून त्यांस त्याच्या कृत्याचा जाब विचारला,
व त्या कृत्याबद्दल त्याच्या मुलास देहान्त शिक्षा देण्याची
धमकी दिली. चिटणिसांनी आधी आपणास मारावे व मग

छत्रपति संभाजी. ३५ . पुत्रास काय करणे ते करावे असे सांगितले. त्यावर हट्ट धरल्यास दोघांसही मरावे लागेल असें महाराजांनी मटले. महाराजांचा हा हुकुमच समजून बाळाजी आवजी चिट- णीस, त्यांचा भाऊ शामजी आवजी व वडील मुलगा आवजी बल्लाळ या तिघांसहा हत्तीखाली घालून मारण्यांत आले. नंतर अण्णाजी दत्तो व शिरके कुळांतील जेवढी मंडळी हाती लागली त्यांस द बहिरोजी फरजंद यांसही महाराजांनी जिवे मारिलें. मोरोपंत पेशवे व अण्णाजी दत्तो पंतपदीव यांची पहिल्यापासूनच चुरस होती. तरी पण आपल्या प्रतिस्प- ाचा अशा रीतीने अंत झालेला समजून त्यास फार वाईट वाटले. हतकेच नव्हे तर आपण पंतसचिवाचा वध केला हे फार वेडेपणाचे व अधर्माचे काम केले, याचा परिणाम चांगला व्हावयाचा नाहीं " असे त्याने महाराजांरा निभडिपणे सांगितले. या नंतर काही दिवसांनी कलुषाने मोरोपंताविषयी महाराजांच्या मनांत वाईट गोष्टी भरवून " जुना चाकर झोला खणून काय झाले ? त्याने ३६ छत्रपति संभाजी. तोंडावर अमर्याद भाषण करणे बरोबर नव्हे" वगैरे आणून त्यास कैदेत टाकविले व त्याचे काम त्याचा मुलगा निळ- कंठ मोरेश्वर यास सोपविले. परंतु तो नुसता नांवाचाच मुख्य प्रधान झाला. सर्व कारभार महाराज व कलुषा हेच पहात असत, महाराजांच्या सुदैवाने त्यांस बायको फार उत्तम मिळाली होती. ती शहाणी असून समजूतदार होती. तिचे नांव येसुबाई असे होते. ही पिलाजी शिरक्याची मुलगी. महाराजांचे इच्याशी इ. स. १६६७ च्या सुमारास लग्न झाले. महाराजांस तिच्यापासूनच इ. स. १६८० च्या डिसेंबरांत म्हणजे शके १६०२ मार्गशीर्ष शु. १० रोजी शिवाजी नांवाचा मुलगा झाला. हाच मुलगा पुढे शाहू महा- राज या नांवाने प्रसिद्ध झाला. बाळाजी आवजी चिटणीस यांचा पुत्र व बंधुसह वध करण्याची महाराजांची इच्छा नव्हती. त्यांचा वध झाल्याची हकीगत समजतांच " त्यांस मारावयाचे कारण नव्हते" असे उद्गार महाराजांचे तोंडून निघाले. या वधा- छत्रपति संभाजी. ३७ नंतर महाराजांची पत्नीशी गांठ पडतांच चिटणिसांसंबंधाने येसुबाई साहेब त्यांस म्हणाल्या, बाळाजी आवजीस मारिलें हे योग्य केले नाही. ते फार दिवसाचे जुने व पोक्त नोकर असून महाराजांच्या (शिवाजी राजांच्या ) कृग- दृष्टांतील होते. चिटणीस आपले व राज्याचे प्राण आहेत असे ते म्हणत अशत. वंशपरंपरेने त्यांस त्यांनी चिटणिशी करून दिलेली हे आपणास माहीत असून, शिवाय त्यांचा अपराधही काही नसतां, केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्यांस एवढी घोर शिक्षा करावयाची नव्हती. अशी उपयुक्त मनुष्ये एकामागून एक मारून टाकिली तर पुढे राज्य कसे चालावें?" इत्यादि बोलली. तेव्हां, " आम- चेही मनांत ही गोष्ट नव्हती, परंतु रागाचे समयीं जे बो. ललों तीच परवानगी समजून त्यांचा वध करण्यांत आला. मागाइन चौकशीकरता त्यांचा वध अगोदरच होऊन गेला होता असे समजले. गोष्ट वाईट झाली खरी," असे तिला महाराजांनी उत्तर दिले. त्यानंतर येसुबाईने चिटणिसांचे धाकटे दोघे मुलगे-खंडो बल्लाळ व निळो बल्लाळ यांजकडे.

छत्रपति संभाजी.
च वडिलोपार्जीत चिटणिशी रहावी अशाबद्दल महाराजांचा
कूम घेतला, व अशा त-हेने तिने त्या लहान मुलांचे रक्षण
रून त्यांची वंशपरंपरेची चिटणिशी त्यांस देवविली.
वरील गोष्टीनंतर ज्याप्रमाणे शिवाजी राजे शिक्के
[जाबाईकडे ठेवून करवीत असत, त्याप्रमाणेच संभाजी महा.
नांनीही शिके येसुबाईचे स्वाधीन करून कागद पत्रांवर
चे समक्ष शिक्के व्हावे असे ठरविले. त्यावरून ये सुबाई ही
हो बल्लाळ यांजकडून चिठ्ठीचपाटी लिहून घेई व स्वतः
क्ष शिके करवी.
शिवाजी राजांच्या वेळेपासून कर्नाटक प्रांतांत रघुनाथ
यण हा मुख्यं होता. शिवाजी राजांचा अंत होऊन
च्या पश्चात् संभाजी महाराज गादीवर बसल्याचे ऐकून
प्रांताचा बंदोबस्त हरजी राजे महाडीक यास सोपवून
बरोबर बरेचसे सैन्य व बरीच संपत्ति घेऊन नवीन महा.
ांचे भेटीसाठी मणून कर्नाटक प्रांतांतून निघून रायडा-
येऊन दाखल झाला. आपल्या वडिलांच्या वेळचा अत्यंत
सू व हुशार सरदार मोठी संपत्ती घेऊन आपल्या

छत्रपति संभाजी. ३९ भेटीस येत असल्याचे ऐकून महारजानी बिवाडीस मोठा दरबार भरवून त्याची भेट घेतली व त्याचा मोठा मानस- न्मान केला. रघुनाथपतानेही महाराजास मेजवानी दिन व इतरांचाही बहुमान केला. असें करण्यांत त्याचा हेतू होता, तो हा की आपल्याबद्दल महाराजांच्या मनांत आदर उप्तन्न करावा ह्मणजे आपण त्यास जो उपदेश करू त्याचा त्यांच्या मनावर चांगला परिणाम व्हावा हा होय. त्याने बेत केल्याप्रमाणे संधी साधून भरदरबारांत महाराजास झटले, दिवसेंदिवस आपले राज्य वृद्धि न पावतां कमी कमीच होत चालले आहे; चहोंकडे पाळेनार बळावत चालले असून प्रजा हवालदील हे.त चालली आहे; प्रांत उजाड होत आहेत; महाराज ( शिवाजी राजे ) फैलास- वासी होऊन पुरतों दोन वर्षे मुद्धा झाली नाहीत, इतक्यां- तच असा प्रकार झाला याचे कारण काय ? ब्राह्मण सरदार यांस किल्लयावर कैदेत ठेवण्याचे सोडून त्यांचा शिरच्छेद करून ब्रह्महत्येचे पातक लावून घेतले यास काय ह्मणावे ? औरंगजेब बादशहा दक्षिणेत येऊन स्वारी करतो, याबद्दल छत्रपति संभाजी. काय विचार केला आहे ? " अशा त-हेचे रघुनाथपंताचें निभाँडगाचे भाषण ऐकून महाराजांस त्याचा मनांतून राग तर आलाच. परंतु त्यास दुरुतरे देण्यास महाराजांस धीर होईना. त्यांनी ती वेळ कशीतरी निभावून नेली, व आपला राग गिळला. मात्र त्यानी मोरोपंत पेशवे व जनार्दनपंत सुमंत यांस कैतुन सोडून पुन्हा कामावर घेतों से कबूल केले व त्याप्रमाणे मागाहून केलें. रायगडास येण्यापूर्वी ग्घुनाथपंतानें, औरंगजेब बाद- शहा दक्षिणेत स्वारी करून विजापूर व गोवळकोंडे ही राज्ये जिंकू पाहील तर महागजांनी दोन्ही राज्यांस मदत करून तिघांनी मिळून औरंगजेबाचा समाचार घ्यावा अशी मसलत दोन्ही सुलतानाशी त्याने केली होती. परंतु ही मसलन महाराजांस पसंत नाही व त्यांचे जबळ कबजीचे व दुसऱ्या हलक्या माणसांचे प्राबल्य या गोष्टी जेव्हां त्याने पाहिल्या तेव्हां अशा स्थितीत येथे रहाण्यांत आपली शोभा नाही असा त्याने विचार केला व आपल्या पश्चात् जिंजी प्रांताची व्यवस्था बरोबर रहाणार नाही व मोंगल लोक UAN समाजा. ४५ तिकडेही फौजा पाठवितील अशा त-हेची काही निमित्त सांगून महाराजांची परवानगी घेऊन लौकरच त्याने कर्ना- टकाकडे प्रयाण केले. परंतु तो तिकडे जाऊन पोचण्यापूर्वी दुर्दैवाने रस्त्यांतच त्यास काही दुखणे होऊन तो मरण पावला. रघुनाथपंताच्या मरणाने मराठी राज्याचे फार नुक- सान झाले. महाराजांचा जो अव्यवस्थित राज्यकारभार चालला होता त्यास--निदान पुढे जो अव्यवस्थितपणा जास्त गढला त्यास--रघुनाथपंतामुळे खरोखरच कांहीं आळा बसला असता असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच त्याने केलेली मसलत महाराजांस पसंत पडून ते जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागले असते तर मराठी राज्याचा बराच फायदा झाला असता अशीही अशा करण्यास हरकत नव्हती. असो. जनार्दनपंतास करतून सोडल्यानंतर लौकरच रघुनाथ- पंत मरण पावल्याने कर्नाटक प्रांती जनार्दनपंतास मुख्य कारभारी म्हणून महाराजांनी पाठविलें. जिंजो प्रांजाचा सर्व ४२ छत्रपति संभाजी. अधिकार हरजीराजे महाडीक यांस सोपवून मोरोपंत पेशव्याच्या मुलास त्याच्या हाताखाली दुतालीक नमून रवाना केलें. मुलांनो! आतापर्यंतच्या हकीगतीवरून तुमच्या सहज ध्यात येईल की, शिवाजी राजांच्या मरणानंतरची पहिली सुमारे दोन वर्षे, संभाजी महाराजांनी स्वतःस गादी मिळ- विणे व तो निळू नये म्हणून ज्या लोकांचे त्यांच्या दृष्टीने प्रयत्न होते त्याचे पारिपत्य करण्यांत वगैरे खर्च केली. अशा त-हेने आपल्या शत्रू वा नायटाच केल्यानंतरच त्यांची दृष्टी राज्याच्या शत्रूकडे वळली. पहिल्याने त्यांचे लक्ष्य जंजिन्याच्या शिद्दीकडे वळले शिदी लोक वारंवार आपल्या प्रांतांत येऊन लुटालूट करतात, लोकांस धरून नेतात, त्यांचा सूड घेण्याचा महाराजानी बेत केला. या वेळी याकुब. खान हा शिद्दी लोकांचा मुख्य होता. त्या लोकांत फितुर करण्यासाठी महाराजांनी खंडूजी फरजंद यास आपग म राज्यांतून फितुर होऊन आल्याचा बहाणा करून जाऊन याकुबखानाचे चाकरीस रहाण्यास पाठविले. मराठ्यांनी जाळपोळ करतात वगैरे गोष्टी बद्दल छत्रपति संभाजी. जंजिन्यावर बाहेरून हल्ला केला म्हणजे खंडूजीने आंतील लोकांस फितुर करून आतील दारू गोळ्यास बत्ती लावून द्यावी अशी महाराजांनी मसलत ठरविली व त्याप्रमाणे जंजिन्यावर बाहेरून हल्ला करण्यासाठी दादजी रघुनाथ देश- पाडे यास बरोबर पुष्कळ सैन्य देऊन पाठविण्यात आले व तो त्या हल्लयांत यशस्वी झाल्यास अमात्यपद देण्याचे महा- राजांनी त्यास वचन दिले. जंजिऱ्यास आंतील लोकांस फितुर करण्यास गेलेल्या खंडूजी फरजंदाचे कारस्थान दुर्दैवाने उघडकीस आल्याने त्यास व त्याच्या साथीदारास शिद्दी लोकानी ठार मारिलें. तरीपण या गोष्टीने संभाजी महाराज नाउमेद न होता स्वतः दादजी रघुनाथच्या मदतीस गेले व जंजिन्याची खाडी वुज- वून मग किल्लयावर हल्ला करावा अशा बेताने त्यांनी तें काम सुरू केले; परंतु इतक्यांत मोंगलांच्या फौजेने पनवेलकडील भाग लुटून कल्याण प्रांत लुटण्यासाठी ती तिकडे जात असल्याची हकीगत महाराजांस समजताच त्यांनी आपला

छत्रपति संभाजा.
मोची तिकडे वळविला. दोन्ही सैन्याची लवकरच भेट होऊन
महराजांनी मोंगल फौजेवर जोराचा हल्ला करून तिला अह.
मदनगरास पळून लाविलें.
इकहे जंजिन्यावर हल्ला करण्याचे काम दादजी रघु-
नाथाने चालू ठेविलेच होते. त्याने किल्ल्यावर एकदम चारी
बाजूने हल्ला केला. परंतु खडकांवर निसरडे असल्यामुळे
त्याच्या लोकांचे पाय त्यांवर ठरेनात व आंतून शिद्दी
जोराचा मारा करीत असल्यामुळे दादजी रघुनाथचा ना-
इलाज होऊन त्यास मागे हटावे लागले. जंजि-याचया या
मोहिमेंत मराठ्यांकडील बरेच लोक ठार झाले.
वरील लढाईत जय मिळल्यामुळे शिद्दी लोकांनी
मराठ्यांच्या राज्यांत स्वान्या करून गांव जाळणे, गाई
मारणे, बायका धरून नेणे वगैरे क्रम सुरू केले. एके वेळी
तर त्यांनी खुद्द दादजी रघुनाथ याच्या बायकोसच धरान
नेले महाराज या गोष्टीवरून फार चिडले व "तुम्ही शिद्दी
लोकांविरुद्ध न उठता, त्यांच्याशी सलोखा ठेवितां याबद्दल
तुम्हासच शासन करूं " अशी महाराजांनी इंग्लिश व

छत्रपति संभाजी. ४५ पोर्तुगीज लोकांस धमकी दिली. शिवाय शिद्धी मिसरी नांवाचा याकुबखानाचा एक नातलग महाराजांस येऊन मिळाला होता. त्याजबरोबर महाराजांनी आपले आरमार देऊन त्यास याकुबखानावर पाठविले. दोन्ही आर- मारांची भेट ठाण्याजवळ होऊन त्यांचे निकराचे युद्ध झाले. या लढाईतही मराठ्यांचाच पराभव झाला. शिद्दी मिसरी यास जखमा होऊन तो जहाजांसुद्धा याकुबखानाच्या हाती पडला. याशिवाय मराठ्यांची तीन जहाजे शत्रूच्या हाती लागली व कित्येक त्याच्या हाती लागू नये म्हणून मरा- ट्यांनी स्वतः होऊन बुडवून टाकिली. येणेप्रमाणे या वेळीही पराभव झाल्यामुळे महारा- जांस इंग्लिशांचा बराच राग आला व म्हणून त्यांचा सूड घेण्याचा त्यांनी विचार केला. परंतु इतक्यांत औरंगजेब बादशाहा दक्षिणेत स्वारी करण्याकरितां मोठी तयारी करीत असून त्याने आपला मुलगा सुलताम मोआझिन यास पुढे रवाना केला असल्याची बातमी त्यांस लागली. त्यामुळे इंग्लिशांचा सूड घेण्याचा विचार तहकूब करून उलट ४६ छत्रपति संभाजी. मोगलांच्या विरुद्ध महाराजांनी त्यांच्याशी तहाचे बोलणे लाव. या बोलण्याचा शेवट निकाल काही झाला नाही. सुलतान मोआझीम याने इकडे कल्याण प्रांतावर स्वारी करून तो लुटण्यासाठी आपला सरदार रणमस्तखान यास पाठविले. परंतु महाराजांनी रण स्तखानाचे काही चालू न देतां त्यास अहमदनगराकडे पिटाळून लावेलें. पोर्तुगीज लोकांनी मात्र मराठ्यांस फार त्रास दिला. त्यांनी मराठ्याची गांवें लुटावी, जाळून टाकावी व जिवंत हाती सांपडतील त्या लोकांस बळजबरीने बाटवून ख्रिस्ती करण्याचा क्रम टेविला होता. संभाजी महाराजांनी पोर्तुगीज लोकांच्या चौल येथील ठाण्यावर हल्ला केला, परंतु त्या लोकांनी त्याचे काही चालू दिले नाही. इकडे गोव्याच्या गव्हर्नराने समुद्रावर बंदोबस्त करून त्याने फोंडा येथोस मराठ्यां या किल्लास वेढा देऊन तो घेण्यासाठी तो स्वतः गेला. महाराजांस ही बातमी समज- तांच ते ताबडतोब मोठे सैन्य घेऊन किल्ल्याचे रक्षणास धांवले. पोर्तुगीज लोकांच्या मानाने मराठ्यांचे सैन्य पुष्कळ छत्रपति संभाजी. कमी होते. परंतु मराठ्यांनी फोंडा दिसू लागतांच पोर्तुगीज लोकांच्या पिछाडीवरील सैन्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. गव्हर्नर मोठा धोरणी होता. यावेळी किल्लयाचा वेढा तसाच राहूं दिल्यास मराठे लोक आपला गोव्यास जाण्याचा रस्ता अडवितील व कदाचित् ते गोवाही घेतील अशी त्यास भीती वाटून त्यागें वेढा उठवून मागे तिर- ण्याचा बेत केला व त्याप्रमाणे तो गोंव्यास जाऊन कसा. बसा पाँचला. परतु फोंडा येथे त्याचा बराच दारुगोळा, दाणागोटा वगैरे सामान राहिलें तें मराठ्यांच्या हाती लागलें. शिवाय त्याचे बरेच लोकही ठार झाले. वरप्रमाणे जय मिळताच पोर्तुगीज लोकांचा पाठलाग करून व त्यांच्यापूर्वी गोव्यास पोंचून त्यावर हल्ला करून ते हस्तगत करून घ्यावे असा महाराजानी विचार केला व त्याप्रमाणे ते गोव्याच्या खाडीपर्यंत जाऊन पोचले. परंतु याच सुमारास खाडीस भरती येऊ लागल्यामुळे ते थोडे विचारांत पडले. तथापि शेवटी त्यांनी आपला घोडा धीराने तसाच खाडीत सोडला. त्यांच्या मागोमाग सरदार शिपायांनीही आपली

४८
छत्रपति संभाजी.
घोडी खाडीत ढकलली. परंतु पाणी जास्त जास्त चर्चा
लागतांच महाराजांस माघार घेणे भाग पडले.
यावेळी खंडो बल्लाळ चिटणीस महाराजांबरोबर
खाडीत होता. खाडीचे पाणी चढून महाराजांच्या घोड्याच्या
जिनास लागलेले पहातांच खंडो बल्लाळाने आपल्या जिवाकडे
न पहातां पाण्यात उडी टाकून महाराजास घोड्यासह
सुखरूपपणे पोहून बाहेर काहिले. त्यावेळी महाराज
त्याच्यावर फार खूष झाले व " उगीच लोकांच्या सांगण्या-
वर विश्वास ठेवून तुझ्या वडिलांस ठार केलें असे असतां
देखील आज तूं इमानास जागलास" अशा अर्थाचे
महाराजांनी उद्गार काढले. व आणखी " महाराज
( शिवाजीराजे ) तुझ्या वडिलांवर ज्याप्रमाणे विश्वास
ठेवीत होते त्यापेक्षाही मी तुजवर जास्त विश्वास ठेवीन "
असें महाराजांनी त्यास आश्वासन दिले व घोडा व पोषाक
त्यास बक्षीस दिला. दुसऱ्या ज्या लोकांनी यावेळी असे
साहस दर्शविले होते त्यांसही महाराजांनी योग्य बक्षीस
देऊन सर्वांस संतुष्ट केले.

छत्रपति संभाजी. ऐन वेळी खाडांस भरती येऊन मागे फिरावे लागले म्हणून संभाजी महाराजांचा एक प्रकारे हिरमोड झाला खरा; तरी पण त्यांनी अगदी नाउमेद न होतां गोवे हस्तगत करून घेण्याचा बेत तहकूब केला नाही. त्यांनी नावा आणवून दोनशे लोक त्यांत बसवून त्या खाडीत ढकलल्या व आण- खीही नावा ढकलण्याच्या ते तजविजीत होते. परंतु पातु. गीज लोकांनी समोरच्या किनाऱ्यावरून नावा पाठवून पुढे आलेल्या दोनशे लोकांसच गांठून त्यांजवर हल्ला करून त्यांचा नाश केला. त्यामुळे संभाजी महाराजांस नाइलाजा- स्तव आपला हेका सोडून देणे भाग पडले. यानंतर महाराजांनी पोर्तुगीज लोकांच्या वसई व दमण यांमधील कित्येक ठाण्यांवर हल्ला करून त्यांचा नाश केला. त्यामुळे पोर्तुगीज लोकांनी कंटाळून जाऊन महा- राजांशी तहाचे बोलणे लाविलें. परंतु " तहाचे बोलणे लाव- ण्यापूर्वी तुमी आम्हांस पांच कोट होन द्यावे," अशी महाराजांनी त्यांस अट घातली. यापुढे तहाचे बोलणे झाले नाही. महाराजांनीही पोर्तुगीज लोकांस त्रास देण्याचे सोडून दिले.

५० छत्रपति संभाजी. मागें लिहिल्याप्रमाणे औरंगजेबाने दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी खरोखरच मोठी तयारी केली व आपल्या मागें आपल्या राज्याची दुर्दशा होऊ नये मणन व आपण असू तथं आपणास लढाईच्या खर्चास लागणारा पैसा वेळो- वेळी मिळत जावा झणून त्याने ठिकठिकाणी योग्य बंदो- बस्त करून ब-हाणपुरास येऊन दाखल झाला. त्याच्या या दक्षिण व्या स्वारीचा थाट फार अपूर्व होता असे सांगतात. दक्षिणेत आल्यावर औरंगजेबाने आपले मुलगे मुआझीम व अजीम यांस संभाजी महाराजांचा मुलूख घेण्यासाठी पुढे पाठविले. महाराजांनी मुआझमचा पराभव करून त्यास पिटाळून लावल्याची हकीगत वर आलीच आहे. इकडे अजीम यास विशेष प्रयास न करतां सुरते- जवळील साल्हेरचा किल्ला फितुरीच्या योगाने मिळाला. त्यानंतर त्याने रामजेसचा किल्ला घेण्यासाठी तिकडे मोर्चा वळविला. ही हकीगत सेनापति हंबीरराव मोहिते यास समज- तांच तो आपल्या फौजेनिशी तिकडे पोचला. दोन्ही सैन्याची लौकरच गांठ पडून त्यांत पराभव पावल्यामुळे हंबीरराव .

छत्रपति संभाजी.
५१
मार्ग परतला. मोंगल त्याचा पाठलाग करूं लागल्यामुळे
शेवटी तोच अडचणीत सांपडला व त्याचे पुष्कळ लोक
मारले गेले. यामुळे औरंगजेबाने त्यास परत बोलावून घेतले.
नंतर रामजेसचा किल्ला घेण्यासाठी औरंगजेबानें, पुढे
प्रसिद्धीस आहेच्या निजामउल्मुल्कचा बाप, शहाबुद्दीन
यास पाठविले. रामजेसच्या किल्लेदराने या वेळी अोनात
पराक्रम दाखवून शहाबुद्दीन याचा पुरा मोड केला. यानंतर
औरंगजेबाने दुसऱ्या एक दोन सरदारांच्या हाताखाली
सैन्य देऊन त्यांजकडून रामजेसच्या किल्लयावर पुष्कळ
वेळां जोराचे हल्ले करविले; परतु मोंगलांस एकही वेळ यश
मिळाले नाही.
मागे लिहिल्याप्रमाणे मुआजीमच्या फौजेचा कल्याण
प्रांतांत पराभव झाल्यानंतर तो दक्षिण कोकणांत शिरून
वेगुल्यापर्यंत सर्व प्रांत उध्वस्त करून, मराठे गोवें काबीज
करतील तर त्यांस अडथळा करण्यासाठी तो गोव्याजवळ
छावणी देऊन राहिला. परंतु येथे त्याच्या सैन्याचे फार

५२
छत्रपति संभाजी.
हाल झाले. त्यांस दाणागोटा न मिळाल्यामुळे त्यांची उपा-
समार होऊ लागली. औरंगजेबाने त्यांच्यासाठी सुरतेहून
जहाजातून अन्नसामुग्री पाठविली. परंतु संभाजी महारा-
जाच्या लोकांनी त्यांतील बरीच जहाजें लुटली. एकीकडून
उपासमार व त्यांतच रोगाची सांथ उद्भवल्यामुळे मुआझीम
बगच हैराण होऊन मार्ग परतला व कसाबसा कृष्णा
नदीचे कांठी वाळवे येथे येऊन पोचला.
मुलांनों, वरील एकंदर हकीगतीवरून तुमच्या सहज
ध्यानांत येईल की, संभाजी महाराजांस यावेळी ठिकठि-
काणी शत्रूस तोंड दाखवावे लागत होते व त्यामुळे त्यांस
स्वतंत्रपणे कोणतीहि स्वारी करण्यास सवड नव्हती. तरीपण
त्यांनी इ. स. १६८५ च्या आक्टोबर महिन्यांत मोठे
धाडस करून अचानक भडोच शहरावर स्वारी करून
तेथील अलोट संपत्ति लुटून नेली. भडोचइन परत
फिरतांना नाशकाजवळ आल्यावर संभाजी महाराजांच्या
फौजेतील एक टोळी गंगास्नानाच्या निमित्ताने दूर गेली व
थूिन ती मोंगलांस मिळणार होती. ही हकीगत महारा-

छत्रपति संभाजी. ५३ आच्या कानी जाताच त्यांनी दुसरी एक टोळी गंगास्नाना- च्याच निमित्ताने पहिल्या टोळीचे पारिपत्य करण्यासाठी पाठविली. दोन्ही टोळ्यांची लौकरच गांठ पडली. प्रथमतः या दुस-या टोळीतील लोकांनी पहिल्या टोळीतील लोकांशी स्नेह दाखविला व मागाहून उग्ररूप धारण करून आपला हेतु त्यांच्या नजरेस आणून त्यांचा नायनाट केला. भडोचच्या स्वारीपूर्वी संभाजी महाराजांनी एक टोळी इतक्या जलद उत्तरेकडे पाठविली की, तिनें कोणासही आपला मागमूस लागू न देतां ब-हाणपुरापर्यंतचा मोंग- लांच्या ताब्यांतील मुलख जाळून पोळून फस्त केला. ही हकीकत औरंगजेबास कळताच त्याने आपला सरदार बहा- दुरखान याच्या हाताखाली सैन्य देऊन त्यास त्या टोळीचा पाठलाग करण्यास पाठविले. परंतु मराठ्यांची टोळी त्यांच्या हाती सांपडली नाही. मराठे इतक्या जरद प्रवास करीत की, ते व मोंगल यांच्यामध्ये कमीत कमी सहा दिवसांचें तरी अंतर पडे. असो. अशा त-हेने मराठ्यांचे राज्य बुडविण्याचा छत्रपति संभाजी. औरंगजेबास सहज साध्य होईल असा वाटणारा हेतू तडीस न गेल्यामुळे त्याचा बराच हिरमोड झाला; व युद्ध करून संभाजी महाराजांचा व त्यांच्या राज्याचा नाश करणे पूर्ण- पणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. अर्थात्च त्याने तूर्त मराठ्यांचा नाद सोडून आपला मोर्चा विजापूर ब गोवळकोंडे ही राज्ये घेण्याकडे वळविला. आतापर्यंतच्या सर्व हकीगतीवरून, मुलांनो, तुम्हांस कळले असेलर की, संभाजी महाराज हे अत्यंत शूर असून ते त्या गुणामध्ये शिवाजी राजांस पुत्र शोभत होते. परंतु वडिलांचे इतर गुण त्यांचे अंगी नव्हते. ज्यावेळी ते लढाईवर गुंतले नसंत त्यावेळी ते आळसांत व व्यसनांत आपली काळक्रमणा करीत असत. शिवाय मोहिमेवर असतां तिकडे मोहिमेची व इकडे राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था एकाच वेळी ठेवण्याची शिवाजी राजांची हातोटी संभाजी महाराजांच्या अंगी नव्हती. इतकेच नव्हे तर राज्यकार- भारामध्ये लक्ष्य घालण्याची त्यांस बिलकुल होस नहती. स्वामुळे त्यांत अत्यंत अव्यवस्था झाली. माधींच शिवाजी

छत्रपति संभाजी.
५५
राजांच्या वेळची विश्वासू व चांगली माणसें महाराजांनों
मारून टाकिली होती व सर्व कारभार कलशाचे हानी देऊन
त्यास अष्टप्रधानापैकी एक जागा दिली होती. तशांत इ.
स. १६८३ त मोरोपंत पेशवे मरण पावले. त्यामुळे तर
कलुपाचे हाती सर्व राज्यसत्ता आली व तो करील ती
पूर्वदिशा अशी स्थिती झाली. दिवसेंदिवस महाराज त्याचे
अधिकाधिक स्वाधीन होऊ लागले व त्याच्यावर त्यांची
इतकी बहाल मर्जी झाली की, त्यांनी त्यास "छदोगामात्य
कवि कलश पडितराव" असा मोठा किताब देऊन त्याचा
गौरव केला.
कलुषाचे वजन राज्यांत एव वाले की, महाराज
त्याचेशिवाय कोणाचीही भेट घेत नसत. सुदैवाने एका-
याचा त्यांच्याशी भेटीचा योग आल्यास महाराज त्याचं
म्हणणे ऐकून न घेता ते त्यास कलुषाकडे धारीत. यामुळे
महाराजांवर सर्व प्रजा देखील नाराज झाली.
संभाजी महाराजांची अशी समजूत होती की,
शिवाजी राजांनी इसका पैसा जमवून ठेविला आहे की तो

५६
छत्रपति संभाजी.
कधीच संपावयाचा नाही. परंतु हा त्यांचा अमाचा भोपळा
लवकरच फुटला. कारण त्यांनी जेवन्या लढाया मारल्या
त्यांतून फरशी संपत्ती न मिळतां उलट होती तीच खर्च
होत गेली. शिवाय कर्नाटक प्रांतांतून वसूल येण्याचे ही
बंद झाले. त्यामुळे राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी कलुषाने
जमिनीचा सारा वाढविला. प्रजेस नाखूष होण्यास हे एक
कारण विशेष झाले.
शिवाजी राजांच्या वेळी कडक शिस्त असे. कोठूनही
लूट मिळवून आणल्यास ती सर्व राजांच्या स्वाधीन केली
जात असे. राजांनीही सैन्यांतील लोकांचा पगार वेळचे वेळी
मिळत जावा अशी व्यवस्था ठेविली होती. लष्करात कोगीही
बायका माणसे घ नये असा त्यांनी नियम ठरवून दिला
होता. शिवाजी राजांच्या वेळचे हे कायदेकानू आता पार
झुगारून द्यावे लागले; कारण खजिन्यांत पैसा नसल्यामुळे
लोकांस नियमितपणे पगार मिळेनासा झाला. त्यामुळे
यास जी लूट मिळेल ती तो दाबून बसू लागला. शिवाय
शत्रूच्या मुल खांतील बायका धरून आणून त्या बटकी

छत्रपति संमाजी. मणून लोकांस विकून त्यावर हे लोक पैसा मिळवू लागले. अशी स्थिती झाल्यामुळे खजिन्यांत भर पडेनासी होऊन शेवटी मिळवून आणलेल्या लुटीतून काही भाग स्वतःस ठेवून घ्यावा असा नियम शिपाई लोकांस घालून देणे संभाजी महाराजांस भाग पडले. वास्तवीक खजिन्याची खरी स्थित महागजांस माहीत नव्हती व कलुषासही ती महाराजांच्या कानी घाल- ण्याचा धीर होत नसे. कारण त्यास असे वाटे की, महाराजांची आपल्यावर खप्पा मर्जी होऊन आपला घात व्हावयाचा. यासाठी आलेली अडचण कशी तरी निमावून नेण्यापलकिडे कलुषासही काही मार्ग राहिला नव्हता. शिवाजी राजांच्या राज्यविस्ताराविषयी कलषा असें झणत असे की, " एवढे मोठे राज्य काय करावयाचे आहे ? कारण त्याचा योग्य बंदोबस्त ठेवता येत नाही. कर्नाटकांतील एकाद्या किल्ल्यास शत्रूनी वेढा दिल्याची हकीगत समजून त्या किल्ल्याचे मदतीस इकडून सैन्य जाई.

छत्रपति संभाजी. पर्यंत तो शत्रूनी हस्तगत करून घ्यावा. त्यामुळे लोक मारले जाऊन नुकसान होते व दुलौकीकही होतो. राज्य झणजे लहान व जवळपास असावे. मगजे त्याचा सहज बंदोस्त ठेवता येतो व नाकेर लोकांवरही योग्य देखरेख ठविता येते." अशा त-हेचे आपले विचार कलुषा कधी कधी महाराजांस बोलून दाखवीत असे व महाराजही ते निमूट- पणे ऐकून घेत असत याबद्दल शिवाजी राजांच्या वेळच्या हयात असलेल्या लोकांस वाईट वाटत असे, व आपले जिणे व्यर्थ असेही त्यांस वाटत असे. महारजांचे आप्त पिलाजी शिरके, तानाजी व गणोजी शिरके वगैरे मंडळीने, राजा वेडा झाला व कलुषाच्या स्वाधीन झाला असून राज्यहानी होत असल्याचे पाइन महाराजांच्या मुलास गादीवर बसवून राजाराम महाराजांस मुक्त करून त्यांनकडून राज्यकारभार चालवावा अशी मस- लत केली. ही मसलत कशी तरी फुटन महारजांचे कानी गेली. आधीच महाराज करबुद्धीचे, मग त्यांस वरील हकी- गत समजताच काय विचारावयाचें ! ताबडतोब शिरक्यांच्या

छत्रपति संभाजी..
५९
घरांवर जप्ती पाठवून ती लुटून जाळून टाकविली. एक
दोन शिरके सांपडले ते मारून टाकिले ५ जितके शिरके
सांपडतील तितके मारून टाकावे असा हुकूम सोडला.
त्यामुळे कित्येक शिरके कुटुंबासह हसाणांत जाऊन राहिले
व काहींनी मोंगलांच्या चाकन्या पतकरल्या.
मागे सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाने संभाजी महारा-
जांचे राज्य घेण्याचा नाद सोडून विजापूर व गोळकोडे
ही राज्ये घेण्याकडे आपला मोर्चा फिरविला व त्याने इ.
स. १६८६ च्या आक्टोबर महिन्यांत विजापूरचे व इ.
स. १६८७ च्या सप्टेंबर महिन्यांत गोवळकोंड्या, अशी
दोन्ही राज्ये मिळविली. ही राज्ये हातात पडल्यावर औरं-
गजेबाचे लक्ष्य पुन्हा मराठ्यांच्या राज्याकडे वळले.
विजापूर दरबारचा नांवाजलेला सरदार सखान
हा ते राज्य औरंगजेबाच्या ताब्यात गेल्यानंतर त्याच्या
तैनातीस राहिला होता. या सर्जेखानाच्या हाताखाली
बरेच सैन्य देऊन व विजापूर दरवारातील जुन्या मराठे

६० छत्रपति संभाजी. सरदारांस त्यास मदत करावयाचा हुकूम करून, त्यास मराठी राज्याच्या दक्षिणेकडीस मुलूख काबीज करण्यास औरंगजेबाने पाठविले. मराठ्यांचा सेनापति हंबीरराव मोहिते वाईजवळ तळ देऊन राहिला होता. दोन्ही सैन्याची गांठ वाईजवळच पडून तेथे त्यांचे निकराचे युद्ध झाले व त्यांत मोंगलांचा पूर्ण पराभव झाला. परंतु लढाईचे गर्दीत खुद हंबीररावास जखम होऊन तो मरण पावला. सेनापति पडला तरी मराठ्यांच्या फौजेची हिंमत खचली नाही, व त्यांनी जय मिळविला हे खरे, तरी पण हंबीररावाच्या मृत्यूमुळे मराठ्यांच्या राज्याची मोठी हानी झाली. यानंतर औरंगजेबाने कर्नाटक प्रांत जिंकण्याचे ठर- वून तिकडे फौज रवाना केली. ही बातमी संभाजी महारा- जांस कळांच कर्नाटकातील आपल्या प्रांताच्या रक्षणासाठी मोरोपंत पेशव्यांचा भाऊ केसोपंत याच्या हाताखाली सैन्य देऊन त्याची त्यांनी तिकडे रवानगी केली. कर्नाटकचा कार- भारी रघुनाथपंत मरण पावल्यानंतर त्याचे काम हरजी राने महाडीक द मोरोपंत पेशव्याचा मुलगा विळोपंत यांज- छत्रपति संमाजी. ६१ कडे सोपविल्याचे मागे लिहिलेले, मुलांनों, तुझांस आरवत भमेलच. या हरजी राजे महाडिकानेंच यावेळी अतुल पराक्रम व स्वामिनिष्ठा दाखवून आपल्या ताब्यांतील मुलूख शाबूद राखला. नाही तर केसोपंत व निळोपंत यांचे तेथें में वैम- नस्य पडले त्यामुळे मराठ्यांचा कर्नाटकांतील मुलख सहज मोगलांच्या हाती लागला असता. असो. याप्रमाणे कर्ना- टकाच्या स्वारीतही मोंगलांस मराठ्यांविरुद्ध कांहीं करता आलें नाहीं. मुलांनो, तुझी मागे वाचल्याप्रमाणे औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य घेण्याचा नाद सोडून विजापूर व गोवळ. कोंड्याची राज्ये घेण्याकडे आपले लक्ष वळविल्यावर, संभाजी महाराजांस प्रत्यक्ष असें लढाईचे काम कांहीं न राहिल्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ दारू वगैरे व्यसनांत जाऊ लागला. औरंगजेबास जरी लढाई करून मराठ्यांचे राज्य घेता आले नाही तरी काही तरी कपट करूनच त्यांचे राज्य घ्यावे असा त्याने बेत केला होता. महाराजांस औरंगजेबाचा कपटी स्वभाव माहीत होता. यामुळे कर्नाटक प्रांत काबीज करण्या-

६२
छत्रपति संभाजी.
साठी जरी आपलें सैन्य औरंगजेबाने तिकडे पाठविले होते
तरी तो खुद्द आपणावर केव्हा झडप घालील याचा नेम
नाही हे महाराज पूर्णपणे जाणून होते व ह्मणूनच ते पन्हाळा
व विशाळगड या दोन किल्लयांत योग्य बंदोबस्त ठेवून
कवी या किल्लयांत तर कधी त्या व कधी कधी संगमेश्वरी
रहात असत.
महाराजांनी अंदाज केल्याप्रमाणे औरंगजेबाने खरो-
खरच एक वेळ पन्हाळ्यास वेदा देवविला. परंतु तो किल्ला
त्याच्या हाती लागला नाही. विजापूरच्या राज्यापैकी संभाजी
महाराजांनी मिळविलेली कित्येक ठाणी औरंगजेबाने परत
घेतली. परंतु किल्ल्यांपुढे त्याचा इलाज चालेना. शेवटी
त्याने आपल्या फौजेचे तीन मोठे भाग करून ते तीन
ठिकाणांहून मराठ्यांच्या मुलुखावर पाठविले. एक भाग
नाशिकाकडून, दुसरा कोंकणांतून व तिसरा कोल्हापू.
रच्या बाजूनें.
कोल्हापूरच्या बाजूने जाणान्या सैन्याचे आविपत्य
तकरीबखान नावाच्या एका हुषार सरदाराकडे होते. त्याने

छत्रपति संभाजी.
प्रथमतः पन्हाळा किल्लयाखालचा सर्व मुलुख जिंकून नंतर
तो किल्ला घेण्याच्या तयारीस लागला. शिवाय त्याने स्वतः
संभाजी महाराज, त्यांचे सरदार, त्यांच्या फौजा वगरे कोठे
असतात, काय करतात याचा बारकाईने तपास चालविला.
असा तपास करतां करता त्यास सहाजीकच बातमी लागली
की, संभाजी महाराज संगमेश्वरी पुष्कळ वेळ रहातात व
तेथे ते फारस बंदोबस्ताने रहात नाहीत. या बातमीमुळे
त्यास आनंद होऊन गुप्तपणे संगमेश्वरी जाऊन महाराजांस
अचानक पकडण्याचा त्यानं बेत केला.
वरप्रमाणे बेत करून तकरीबखानाने जरूरी पुरतें
सैन्य घेऊन व डोंगरांतील रस्त्यांचे माहीतगार असे वाटाडे
बरोबर घेऊन कोल्हापूर सोडले. त्याच्याबरोबर त्याचा
हुशार व शूर मुलगा इकलासखान हा होता. तकरीबखानाने
आपण महाराजांकडे वकिलीस जात आहों असा बहाणा
करून गुपचूप रीतीने एकदम संगमेश्वर गाठले.
मोंगल लोक लबाडी करून गढीपर्यंत येऊन पोचल्याची
बातमी जाप्सुदांनी घाबय धावन्या संभाजी महाराजांस

६४ छत्रपति संभाजी. भलत्याच कळविली. महाराज त्यावेळी दारूच्या धुंदीत असल्याने ते जासुदांवरच रागावले व त्यांस शिव्या देऊन, काही तरी खोट्या बातम्या आणतां ? मोंगल येथे कोठून येगल ? पुन्हा असे बोलाल तर तुमची नाकेंच कापीन" असे मणाले. इतक्यांत तकरीबखानाचे लोक गढीच्या दर- वाजाशी येऊन पोंचलें ते आलेसे पाहून आंतील लोक दर- वाजे लावून घेऊ लागले. तोच इकलासखान हा थोड्याशा लोकांसह दरवाजांत घुसला व तो बंद करणाऱ्या लोकांस ठार मारून आंत घुसला. पाहून संभाजी महाराजांने बहुतेक लोक पळून गेले. कलुषाने मोंगलांस अडथळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु जखमी झाल्यामुळे तो त्याच्या हाती सांपडला. स्वतः महाराजांनी वेष पालटला होता व ते पळून जाण्याचा बेतात होते. परंतु त्यांच्या अंगावरील दागिने तसेच राहिल्यामुळे शनी त्यास ओळखिले व अशा रीतीने शेवटी संभाजी महाराज मोगलांच्या हाती लागले. तें तकरीबखानाने महाराजांस कलुषामह प्रथम कोल्हा- पुरास नेलें व औरंगजेबाच्या हुकमाप्रमाणे तेथून त्याने

छत्रपति संभाजी.
६५
•.
तेथून त्याने त्यांस तुळापुर येथे नेले. तुळापुरास पोंचतांच
महाराज, कलुषा व त्यांचेबरोबर
पकडले गेलेले इतर
:लोक यास, मुसक्या बाधून व उघडे बोडके करून, उच
अशा उंटावर बसवून पुढे तासे वगैरेसारखी कर्कश वायें
वाजवीत त्यांस बादशहाच्या छावणीकडे नेण्यांत आले.
औरंगजेबासमोर त्यास उभे करतांच त्याने तूर्त त्यांस कैदेत
ठेवा असा हुकूम केला. नंतर आपल्या सरदारांच्या सल्लया-
प्रमाणे संभाजी महाराजां+ जिवंतच ठेवावे म्हणजे त्यांच्यामुळे
त्याचे पुष्कळसे मजबूत किल्ले आपल्या सहज हाती लागतील
असा बंगजेबाने विचार केला. परंतु, मुलांनो, तुम्हांस
माहीत असेलच की, औरंगजेबाच्या डोक्यांत धर्मवेड फार
होते. हिंदु लोकांस बाटवून जुलमाने मुसलमान केल्यास
धर्मप्रसार केल्याच आपणांस पुण्य लागेल अशी त्याची
समजूत होती. या त्यांच्या समजुतीप्रमाणे संभाजी महाराजांस
बाटविण्याचा त्याने विचार केला.
इकडे महाराजांची स्थिति फार चमत्कारिक झाली
होती. त्यांस शत्रंनी केलेला अपमान सहन न होऊन अशा
स्थितीत रहाण्यापेक्षा मरण येईल तर बरे असे त्यांस वाटत
५

६६ छत्रपति संभाजी. होते. त्यांस औरंगजेबाच्या छावणीकडे नेत असतां ते शिपायांस उघड उघड शिव्या देत होते. कारण त्यामुळे तरी एखाद्या शिपायाने चिडून आपणास ठार मारावें असा त्यांचा हेतू होता. महाराजांच्या मनाची अशी स्थिति झाली असतां " तुम्ही मुसलमान झाल्यास आम्ही तुम्हास जीवदान देऊ" असा औरंगजेबाने त्यांस निरोप पाठविला. महाराज अगोदरच जीवास कंटाळले होते, त्यांतच त्यांस असा निरोप पोंचतांच त्यांनी पैगंबरास शिव्या, दिल्या व " तुमची मुलगी तुम्ही आम्हांस दिल्यास आम्ही मुस- असा जबाब पाठविला. महाराजांचे अशा प्रकारचे उद्धटपणाचे उत्तर ऐकून औरंगजेबाच्या अंगाचा तिळपापड झाला. त्याने लगेच लोखंडाची सळी तापवून महाराजांच्या डोळ्यांत खुपसण्यास व नंतर त्यांची जीभ कापून त्यांचा शिरच्छेद करण्याचा हुकूम केला. त्यावरून हजारों लोकांच्या देखत अशा तन्हेनें महाराजांचा वध करण्यांत आला. इ. स. १६८९. त्याच वेळेस औरंगजेबाने कलुषाचाही वध करविला. लमान होतों छत्रपति संभाजी. ६७ १ संभाजी महाराजांचा वध झाल्याचे समजून औरंग- जेबाच्या बहिणीस फार वाईट वाटले व " त्यांचा प्राण माझे नावे करून गेला. याउपर आपण दुसरा भ्रतार करणार नाही" असा तिने निश्चय केला. नंतर तिने " महाराजांच्या पत्नीस व मुलास अभय देऊन त्यांस माझे स्वाधीन करावे असा औरंगजेबाकडे हट्ट घेतला व त्यानेही तिचा तो हट्ट पुरविला. असा. संभाजी महाराजांनी एकंदर नऊ वर्षे राज्य केले. या नऊ वर्षांत त्यांनी कसकशा लढाया मारल्या व जय मिळ. विले हैं, मुलांनो, तुम्ही आतापर्यंत वाचलेंच, त्यावरून तुमच्या लक्ष्यात आले असेलच की, महाराज म्हणजे एक विलक्षण धाडशी पुरुष होते. या धाडसाच्या जोडीस त्यांस जर राज्यकाभार चांगला व्यवस्थेशार चालविण्याचे धोरण असते तर त्यांची अशी स्थिति झाली नसती. राज्यकार- भारास सुरवात करतांनाच त्यांनी वडिलांच्या वेळच्या हुशार माणसांचा नायनाट करून टाकला, ही त्यांची मोठी चूफ होय, त्यानंतर ते जे कुलुषाच्या तावडीत सांपडले त्यामुळे त्यांनी आपण होऊनच मराठी राज्यावर संकट ओढून

६८
छत्रपति संभाजी.
आणल्यासारखे झाले. कलुषाचा त्यांच्या मनावर एवढा पगडा
कसा बसला ही आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे. महाराज
म्हणजे त्याच्या हातांतील एक बाहुले झाले होते. तो सांगेल
त्याप्रमाणे ते वागत. इतकेंही असून त्यांस जर दारूसारखें
घाणेरडे व्यसन जडले नसते तर त्यांचा असा अमानुष
रीतीने वध होईपर्यंत पाळी आली नसती. शेवटीं तरी काय ?
केवळ दारूच्या धुंदीत असल्यानेच ते शत्रूच्या हातांत
जिवंत सांपडले.
सर्व व्यसनांत दारूचें व्यसन म्हणजे अत्यंत वाईट
होय, कारण दारू पिऊन मनुष्य बेशुद्ध झाल्यानंतर तो
मूळचा कितीही शहाणा असला तरी वेड्यापेक्षा वेडा होतो,
व बेशुद्धीमध्ये अनेक तन्हने आपला हंशा करवून घेऊन
आपली अब्रू घालवून जन्माचे नुकसान करून घेतो. ही
गोष्ट साधारण स्थितीतल्या मनुष्याची झाली. ज्याच्या हाती
सत्ता असते अशा मनुष्यास वारूचे व्यसन असल्यास तो
आपल्याबरोबर आपल्या भेवतालच्या मनुष्यावरही संकटें
आणतो. त्यांतून राजन्नत्ताच हाती असल्यास मग त्यामुळे

छत्रपति संभाजी.
६९
काय अनर्थ ओढवतात हे संभाजी महाराजांच्या चस्त्रिावरून
सहज लक्ष्यांत येण्याजोगे आहे.
शिवाजी राजांनी संभाजी महाराजांस उत्तम शिक्षण
देण्याचा किती प्रयत्न केला होता हे तुम्ही मागे वाचलेच
आहे. त्या शिक्षणाचा जर महाराजांनी योग्य उपयोग करून
घेतला असता तर संभाजी महाराजांवर व मराठी राज्यावर
जो दुर्धर प्रसंग आला तो खाचत आला नसता.
शेवटी, मुलांनो, तुम्हांस सांगावयाचें की, आपले
वडील आपणांस लहानपणी में शिक्षण देतात ते केवळ
आपल्या बऱ्यासाठी असते हे लक्षात ठेवून आपल्या वडि-
लांचे आज्ञाधारक बना व व्यसनाधीन होऊ नका, म्हणजे
तुम्हांस इहलोकी सुख मिळाल्याशिवाय रहाणार नाही. संभाजी
महाराजांचे वरील लहानसे चारेत्र तुम्ही लक्ष्यांत आणिल्यास
या म्हणण्याचा खरेपणा तुमच्या सहज रुक्ष्यांत येईल.
समाप्त.
NEERI

श्रीसयाजी वालज्ञानमाला.
छापलेली पुस्तकें.
किंमत.
०-६-०
०-६-०
०-६-०
०-६-०
१ गिरनारनुं गौरव (बीजी आवृत्ति ) (सचित्र)
३ शरीरनो संचो (बीजी आवृत्ति) (सचित्र)
४ महाराणा प्रताप (बीजी आवृत्ति ) ( सचित्र)
५ कोषना कथा (बीजी आवत्ति) ( सचित्र)
६ पाटण सिद्धपुरनो प्रवास (बीजी आवृत्ति)
७ पावागढ (बीजी आवृत्ति)
८ औरंगजेब ( बीजी आवृत्ति ) ( सचित्र)
१ मधपुडो (कीजी आवृत्ति) (सचित्र)
१. रणजितसिंह (बीआ आवृत्ति)
११ मुखी घर (बीजी आवृत्ति)
१३ सूर्य कीरण (बीजी आवृत्ति ' (सचित्र)
१४ वातावरण (बीजो भावृत्त)
१५ प्रहण
(सचित्र)
१६ बाल नेपोलियन
१७ कोषको कथा (सचित्र) (हिन्दी)
१८ लोहानी नीला
.
०-६-०
०-६-०
०-८-०

(१) ०-६-० ०-६-० ०-६-० ०-६-० १९ धीहर्ष (हिन्दी) १० सिकंदरनी स्वारी २१ सुरत २२ एशियानी ओळखाण, भाग पहेलो २३ भूस्तरनी कथा १४ लॉर्ड विलियम बेन्टिक २५ नाना फडनविस २६ चंद्र २७ वडोदरानो वैभव २८ महादजी सिंधिया २९ घरधोणी ३० चांचड ३१ पाचनक्रिया अने दूध ३२ एशियानी ओळखण, भाग बीजो १३ गर्भनी कथा ३४ बाल बाबर ३५ नाहीतंत्र ३६ बौद्ध गुफाओ ३७ महाबळेश्वर ३८ हिंदुस्थाननुं वहाणवटुं ३९ जाति अने ज्ञाति, भाग पहेली ०-६-० 0-1-0 ०-६-० 2-1-9

(३)
०-६-१
४० जाति अने ज्ञाति, भाग बीजो
४१ विरि गम युबर्ट ग्लॅडस्टन
४२ शूरवीर शिवाजी (मचित्र)
४३ आरोग्यता
(न्हिा )
४४ दरियाकांठो
( सचित्र)
४५ बरफ अने पाणी
४६ अर्थशास्त्रनी ओळखाण
४७ छत्रपति सभाजी

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

Chhatrapatisan'bhaajii Mahaaraaja

Author
Rangand-ekara Keshavaman'gesha
Title
Chhatrapatisan'bhaajii Mahaaraaja
File name
Chhatrapatisan'bhaajii Mahaaraaja
Text
OCR done
Citation
1950
Published
2005-12-01
Publisher
Ema~ Sii Kot'haarii
Language
Sanskrit
Pages
86
Classification
Geography. Biography. History
DLI number
369586
Barcode
2030020016409.00
Scanning centre
RMSC, IIIT-H
Digital publisher
Digital Library Of India
Rights
IN_COPYRIGHT
VMLT id
7fgPysqMxCo
Download PDF

Chhatrapatisan'bhaajii Mahaaraaja