Central Archaeological Library_asi_new Delhi
Shree Changdev Vateswer Krit Tavatsar
Front matter
s.k.katha
॥ श्री॥
चांगदेव वटेश्वर कृत तत्वसार.
संपादक
डॉ. ह. रा. दिवेकर,
साहित्याचार्य, एम. ए., डी. लिट.
रा. व. लक्ष्मण मास्कर मुळे
ARCHA
यांच्या
2 प्राक्कथनासह.
REOLE
(New Delhi
FACEHITRAL
प्रकाशक
LIBRARY
| -
प्राच्य ग्रंथसंग्रहालय--उज्जयिनी.
891.461
12.4
आलीजाह दरबार प्रेस,--ग्वाल्हेर. Vor Die
tees
किंमत रु० १.
# # #
CENTRAL ARCHAEOLOGIGAL
LIBRARY, NEW DELHI.
Aoc, No. 2420
Dato...29...... 55.
al Ne...
891.461/Vot pire
منھ
TRICT ॥श्री॥ प्राक्कथन. " ग्वाल्हेर संस्थानांतील प्रजाजनांचे अनेक प्रकारे हित करणान्या व आपल्या 4 राज्यांत भिन्न भिन्न प्रकारच्या जनहितकारक संस्था स्थापन करणान्या आमच्या + कै० माधवराव महाराजांच्या मनांत प्राचीन ग्रंथांचा संग्रह करण्याची कल्पना बरीच वर्षे घोळत होती. परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या हयातीत या कल्पनेस मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. निघृण काळाने त्यांना या लोकांतून अकालींच उचलून नेल्याने त्यांच्या अशा कित्येक कल्पना अमूर्तावस्थेतच राहिल्या असतील. प्रस्तुत "प्राच्य ग्रंथसंग्रहा" ची योजनाही, त्यांच्या पश्चात् त्यांच्या • ज्या कांहीं अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा कौन्सिलने यथामति व यथाशक्ति पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांपैकी एक होय. हा संग्रह कोठे करावा याविषयों बरेच दिवस विचार चालला होता. त्यांत या संग्रहास, अत्यंत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेली, एका काळी सर्व विद्यांचे व विशेषतः ज्योतिष विधेचे आद्यपीठ म्हणून नावाजलेली, सप्त पुरीत अग्रगण्य असलेली, पवित्र उज्जयिनी नगरी योग्य वाटली व त्याप्रमाणे हे ग्रंथ संग्रहालय उज्जयिनीस स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आणि सन १९३१ या वर्षी बडोदे संस्थानचे अधिपति श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी उज्जयिनीस भेट दिली तेव्हां त्यांनीहि पण, या कार्यास हेच स्थल योग्य अशी आपली संमति दर्शविली. वरील ठरावाप्रमाणे उज्जयिनीस या संग्रहालयाची स्थापना आरंभी शह- रांत एका मध्यस्तीच्या ठिकाणों करून त्यासाठी सोळा सभासदांचे एक व्यव- मंडळ नेमण्यांत आले. "अल्पारंभः क्षेमकरः" या न्यायाने पहिली दान वर्षे त्याचे कार्य बहुतेक सावकाशच चालले होते. पुढे सन १९३३ साली या संस्थेचे चालकत्व श्रीयुत केशवराव डोंगरे यांचे हाती आले व त्यांनी आपल्या धडाडीच्या स्वभावास अनुसरून या कार्यास जोराची चालना दिली. सभासद, । प्रसिर २ ग्रंथ-निरीक्षक व संरक्षक, यांची निवड वगैरे सर्वच बाबतीत त्यांनी सुधारणा घडवून आणली असून हल्ली संग्रहालय स्थानीय माधव कॉलेजच्या दिवाणखान्यांतील प्रशस्त ग्यालरीत नेलें आहे आणि संग्रहांतील ग्रंथांचे संरक्षणाचे काम ओघानेच कॉलेजचे प्रिंसिपॉल श्रीयुत ताटके यांच्या कडे सोप- विण्यांत आले असून तेव्हापासून या संस्थेची सारखी भरभराटच होत आहे. आज या संग्रहालयांत ग्रंथांची संख्या सुमारे पांच हजारांवर गेली आहे. या संग्रहालयाच्या स्थापनेचे मुख्य उद्देश तीन आहेत: (१) शंभर वर्षा पूर्वीचे संस्कृत, मराठी, पारशी व अरबी हस्तलिखित ग्रंथ एकत्र करावे, (२) जिज्ञासु अभ्यासकांना हवा तेव्हां त्यांचा उपयोग करून घेता यावा, आणि (३) अप्रसिद्ध पण महत्वपूर्ण अशा ग्रंथांचे प्रकाशन व्हावे, हे ते उद्देश होत. ज्ञानाभिवृद्धीच्या दृष्टीने हे तिन्ही उद्देश अत्यंत लोको- पकारक आहेत हे सांगावयास नकोच. ग्रंथांचा संग्रह करण्यास सुरुवात केली तेव्हां छापवून प्रसिद्ध करण्यास योग्य असे कितीसे ग्रंथ सांपडतोल याविषयी शंकाच होती. परंतु जसजसे ग्रंथ हस्तगत होत गेले तसतशी ही शंका निवृत्त होऊन अशा प्रकारचे ग्रंथ बरेच दिसू लागले. ज्या ग्रंथाविषयीं हैं "प्राक्कथन" आम्ही लिहीत आहोत तो ग्रंथ याच मालिकेतला होय. तो नुसता अप्रकाशितच नव्हे तर अलभ्यहि पण आहे. मराठी भाषेतील सुप्रसिद्ध संत--कवी श्रीज्ञानेश्वर महाराज यांचे किंवा (श्रीयुत पांगारकरांच्या लेखाप्रमाणे) त्यांच्या कनिष्ठ भगिनी श्रीमुक्ताबाई यांचे उपदेशित योगिराज वटेश्वर चांगदेव (चांगा वटेश्वर) हे या ग्रंथाचे कर्ते होत. मराठी वाङमयांत या ग्रंथाचें नांवदेखील कोणास माहित नव्हते, व त्यामुळे उपोद्घातांत लिहिल्याप्रमाणे सरस्वतीच्या महाराष्ट्रीय भक्तांतून या ग्रंथकाराची बहुतेक उचलबांगडीच झालेली होती. परंतु हा ग्रंथ उपलब्ध झाल्यावर त्या संबंधाने येथील उत्साही साहित्यसेवक डॉ. दिवेकर यांनी एक त्रोटक के केला व त्यावरून श्रीयुत पांगारकरांनी आपल्या "मराठी वाङमयाच्या इतिहासात या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख करून ग्रंथकाराचा गौरवहि केला आहे. हल्लों सांपडलेला हा ग्रंथ त्रुटित आहे, पण तो प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण ग्रंथ मिळण्या- चाहि संभव आहे.
- या संग्रहालयाची आतां कायमची व्यवस्था सरकारांतून झाली असून राज्यांतील लोकांकडे गाबाळांत पडल्यामुळे मागे पुढे नष्ट होणारे व तसेच मालकांस तादृश उपयोग नसूनहि नुसते जतन करून ठेविलेले प्राचीन दुर्मिळ ग्रंथ, मालकाच्या इच्छेप्रमाणे बिनामूल्य किंवा योग्य मोबदला देऊन हस्तगत की केले आहेत. तसेंच राज्याबाहेर जालवण, गुलसराय, मीरट, बनारस, पुणे, त्रावणकोर, या ठिकाणांहूनही असे अनेक ग्रंथ मिळविले आहेत व पुढेही मिळवि- ण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरी पण ग्रंथ संग्रहालय म्हटले की त्याला असे ग्रंथ मिळतील तितके मिळविण्याची इच्छाही नेहमीच असावयाची, ही गोष्ट उघड होय. यास्तव ज्यांच्या संग्रहीं अशा प्रकारचे प्राचीन ग्रंथ असतील त्यांनी ते वर सांगितल्याप्रमाणे फकट अथवा योग्य किंमत घेऊन देण्याची कृपा केल्यास त्यांचा संग्रहालयांत साभार स्वीकार केला जाईल. तूर्त संग्रहालयांतील संग्रहीत. ग्रंथांपैकी प्रस्तुत "तत्वसार" हा पहिलाच ग्रंथ प्रकाशित होत आहे, व त्यासंबंधानें आवश्यक असलेली सर्व माहिती संपादकानें उपोद्घातांत व टीपांत दिलेलीहि आहे तेव्हां त्याविषयी येथे विशेष लिहिण्याचे अर्थातच काही प्रयोजन नाही. साहित्यप्रेमी लोकांकडून त्याचे अवश्य स्वागत होईल असा भरवसा वाटतो. सरते शेवटी, ज्या कौन्सिलने या संग्रहालयाची सर्व व्यवस्था करून हा ग्रंथ प्रसिद्धीस आणण्याची संधि दिली त्यांचे आभार मानणे उचित होय. वस्तुतः या ग्रंथाच्या प्रकाशनाचे श्रेय लवकरच आपल्या राज्याची सूत्रे हाती घेणाऱ्या आमच्या महाराजांकडे आहे. त्यांनी दिलेल्या उत्तेजनामुळे हे काम अगोदर हाती घेऊन तें शेवटास नेतां आले आहे, हे सांगण्यास आनंद वाटतो, व म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत या संग्रहालयाचे कार्य चांगले वाढीस लागेल व अधिक चांगले .... होईल अशी दृढ आशा आहे. प्रसि मुक्काम लष्कर, ग्वाल्हेर, मंगळवार, ज्येष्ठ वद्य १२, शके १८५८, ता.१६ जून सन १९३६. ल. भा. मुळे, शिक्षण मंत्री.
No text on this page.
चांगदेव वटेश्वराचा “ तत्वसार. उपोद्घात सन १९३३ च्या आक्टोबरमधील गोष्ट. ग्वाल्हेर सरकारने सुरू केलेल्या प्राच्यवाङमय ग्रंथसंग्रहालयाचे काम चालविणाऱ्या श्री. के. ब. डोंगरे यांचे घरी काही जुन्या पोथ्या पहात असतांना एका वाण्याकडून रद्दी म्हणून विकत आणलेल्या एका गट्ठयांतली दोन पाने माझ्या दृष्टीस पडली. त्यांतील मजकूर ओवीबद्ध असून त्यांची भाषा जुन्या वळणाची वाटल्याने मी कारकुनास त्याच प्रकारची सगळी पाने गोळा करावयास सांगितली. शेवटले पान पहातां पहातां 'श्रीवटेश्वरार्पणमस्तु' हा शेवट पाहून थोडें आश्चर्य वाटले. “ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ । बोविया दसाउशत रत्नमाळ । वाइली वटेश्वर चरणयुगळा। चांगा म्हणे" ही शेवटली ओंवी पाहून उत्सुकता वाटली व "शके चौतिसें बारा। परिवावी संवत्सरा। मार्गशिर शुद्ध तीज रविवार। नाम संख्य।" ही ओंवी वाचून ज्ञानेश्वर समकालीन चांगदेवाचाच हा ग्रंथ असावा ही खात्री वाटून विल- क्षण आनंद झाला. हा ग्रंथ पुरा मिळावा म्हणून पुष्कळ खटपट केली पण ती सिद्धीस गेली नाही. नागपूर येथे सन १९३३च्या अखेरीस जे मराठी साहित्य संमेलन झाले त्यांतील प्रदर्शनांत या ग्रंथाची जितकी पाने मिळालीं तितकी ठेवली व प्रो. पोतदारांसारख्या इतिहास संशोधकांची ग्रंथाच्या प्राचीनत्वाबद्दल खात्री झाल्यावर प्राच्य ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथमालेत प्रथम पुष्प म्हणून या त्रुटित ग्रंथाचे प्रकाशन व्हावयाचे ठरले. त्याप्रमाणे हे खंडित का होईना पण दुर्मिळ पुष्प आज महाराष्ट्र रसिकांपुढे सादर केले जात आहे. जुन्या ग्रंथांचा कोठे, केव्हां व कसा शोध लागेल, हे सांगता येत नाही. आतांच पहाना, तापी तीरी राहणारा चांगदेव कोठे व महाराष्ट्रापासून दूर अंतरावर २ . असलेल्या ग्वाल्हेरीतील एक वाणी कोठे ? आजपर्यंत अशा वाण्यांकडे आलेल्या किती तरी पोथ्या तुकडे होऊन पुड्या बांधण्याचे कामी आल्या असतील किंवा भिजवून कुटल्या जाऊन त्या रांध्याच्या टोपल्या होण्याचे कामी लागल्या अस- तील? 'भग्न पृष्ट कटि ग्रीव' होऊन लेखकानें पोथी लिहावी, पण तिची किंमत नसणान्यांच्या हाती पडून तिची अशी दुरावस्था व्हावी, याहून दुसरें दुर्दैव तें कोणते? पण आनंदाची गोष्ट आहे की उशीराने का होईना आम्हां लोकांचे डोळे उघडत आहेत व दिवसेंदिवस असे ग्रंथ नष्ट होण्याची भीति कमी होऊन ते संशोधकांचे हाती पडण्याचा संभव अधिकाधिक होत आहे. या तत्वसाराची पोथी १०"X५” आकाराच्या जाड दुपदरी कागदावर काजळी शाईने लिहिली आहे. प्रत्येक पृष्ठावर अकरापासून चौदापर्यंत ओळी आहेत, म्हणजे सामान्यतः प्रत्येक पृष्ठावर बारापासून पंध्रापर्यंत ओंव्या आहेत. दोन्ही पृष्ठे मिळून एका पत्रावरील ओंवीसंख्या पंचवीस ते बत्तीस आहे. मूळ लेखकानें या पोथीची अशी छत्तीस पत्रे लिहिली. पण त्यांपैकी फक्त पंधरा उप- लब्ध झाली. उपलब्ध पत्रे पुढीलप्रमाणे पत्रांक. पृष्ठे. ओंवी संख्या. १ १ २० २१ ते ३० ३२ व ३३ ५९०--- ८८१ ९१२-- ९६५ - ९९२-१०३६ = २९२ ५४ - - ४५ २९ ४०४ लेखकानें ही पोथी १४८३ शकांत दुर्मति संवत्सरी आषाढ शुद्ध १ शुक्रवारी पाथरी मुक्कामी लिहिली आहे. लेखकाचे नांव बोप्प पाठक असें पत्र नं. ३६ वर मूळ लेखकानें आपलें नांव, गांव व लेखनकाल सांगितला आहे. वटेश्वराचा शिष्य चांगदेव हा या तत्वसाराचा लेखक असून ग्रंथाचा लेखन- काल शालिवाहन शक १२३४ परिधावी संवत्सर आहे. हरिश्चंद्र नांवाच्या पर्वतावर जेथून मंगळगंगा नांवाची नदी निघते व जेथील महादेवाची केदारे- श्वराशी तुलना केली जाते त्या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध ३ रविवारी ग्रंथ समाप्त झाला आहे. श्रीयुत ल. रा. पांगारकर यांच्या मतानें 'नगर जिल्ह्यांत आकोले तालुक्यांत एक हरिश्चंद्राचा डोंगर आहे, तेच हे स्थान असावे'. पण याबद्दलचा कायम निश्चय अजून झालेला नाही. ग्रंथाचा रचणारा चांगदेव बटेश्वर याबद्दल महाराष्ट्र सारस्वत लेखक कै. भावे यांनी असे म्हटले होते की "याच (ज्ञानेश्वर) काळाच्या ग्रंथकारांपैकी ज्याचें नांव मात्र सर्वत्र प्रसिद्ध आहे पण ज्याचे ग्रंथ फार उपलब्ध नाहीत असा चांगदेव हा ग्रंथकार होय." व "उत्तर पंचविशी या नांवाचें एक प्रकरण, एक आरती व सुमारे पांच पंचवीस अभंग इतकीच याची कृति हल्ली उपलब्ध आहे.” ही कृति अत्यंत थोडी व तीही पूर्णविश्वासार्ह अशी नसल्यामुळे महाराष्ट्र सारस्वताच्या नवीन आवृत्तींतून या ग्रंथकाराची उचलबांगडी झाली. चांगदेवाचे ग्रंथ एकनाथांस चांगलेच माहीत असावेत असे त्याने आपल्या भागवताचे आरंभींच लिहिलेल्या "वंदूं प्राकृत कवीश्वर। निवृत्ति प्रमुख ज्ञानेश्वर। नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचे भाग्य थोर गुरु कृपा ॥ जयांचे ग्रंथ पाहता। ज्ञान होय प्राकृतां । तयांचे चरणीं माथा। निजात्मता निजभावें॥" या ओंव्यावरून स्पष्ट दिसत आहे. पण हा ग्रंथ जर मिळाला नसता तर चांगदेवाचें नांव महाराष्ट्र सारस्वतांतून हळू हळू लुप्त झाले असते. पण हा मिळाल्यावर आतां तसे होण्याची भीति राहिली नाही. श्री. पांगारकर यांनी आपल्या मराठी वाङमयाचा इतिहास, खंड १ ला--ज्ञानेश्वर नामदेवांचा काल' या ग्रंथांत जरी चांगदेवाचें वर्णन ग्रंथकार म्हणून केलेले नसले, तरी बडोद्याच्या सहविचार त्रैमासिकांत वर्ष १२, अंक ४ यांत यावर एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या 'एकनाथ तुकारामांचा काल' या दुसऱ्या खंडांत ६ पाने चांगदेव वटेश्वराच्या तत्वसारावर प्रसिद्ध करून चांग- देवास मराठी वाङमयाच्या इतिहासांत पुन्हा स्थान दिले आहे. याच खंडांत केलेल्या एका विधानाबद्दल मात्र थोडे लिहिले पाहिजे. पृष्ठ ३ वर श्री. पांगारकरांनी लिहिले आहे की चांगदेव याचेच चक्रपाणि हे दुसरे नांव असावें. पण ते बरोबर वाटत नाही. सिद्धपंथ सांगतांना चांगदेव वर्णन करितात--'श्रीमुक्तादेवी योगिनी। जे समस्त सिद्ध शिरोमणि। तिये प्रसादें चक्रपाणि। ज्ञान सिद्ध।" आपल्या स्वतःचा उल्लेख चांगदेवाने या प्रकारे केला असेलसें वाटत नाही. शिवाय चक्रपाणि हे नांव वटेश्वराचे शिष्य म्हणजे मुक्ताबाई- चे प्रशिष्य म्हणून शिवकल्याणस्वामींनी आपल्या गुरुपरंपरेत स्वतंत्र दिले आहे. व तेथे चांगदेवाचा उल्लेख नाही. शिवकल्याणस्वामी म्हणतात-"तो तैसाचि रस वोसंडला। तव मुक्ताबाई प्रकाशला। प्राशुनि तैसाचि उरला। श्री वटेश्वरा दिधला तो॥ वटेश्वराहुनी चक्रपाणी। लाधले हे अमृतसंजीवनी। विमलानंदी तेथुनी। लाधते झाले ॥" आणि या परंपरेचा उल्लेख करतांना श्री. पांगारकर यांनी पृष्ठ ५२० वर मुक्ताबाई-वटेश्वर चांगा-चक्रपाणि-असा उल्लेख करून चांगा वटेश्वरास चक्रपाणिचे गुरु म्हणून नमूद केले आहे. म्हणजे एकदां चक्रपाणि म्हणजे चांगदेव व नंतर चक्रपाणि म्हणजे चांगदेवाचे शिष्य असे दोन्ही परस्पर विरुद्ध उल्लेख श्री. पांगारकरांनी केले आहेत. हा ग्रंथ लिहिणारा चांगदेव याबद्दलही बराच गोंधळ आहे. चांगदेव नांवाचे पांच चार पुरुष होऊन गेले. त्यांपैकी या ग्रंथकाराचें नांव चांगावटेश्वर आहे. महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी म्हटल्याप्रमाणे “या चांगदेवाची चरित्रे अनेकां- नीं गाइली आहेत; पण त्या सर्वांत इतका घोंटाळा आहे की आज त्यापासून फारसें निष्पन्न कांहींच होत नाही. फक्त एवढंच म्हणण्यासारखे आहे की हा पुरुष प्रथम योगमार्गी असून पुढे भक्ति मार्गात शिरला असावा. हा वयाने वृद्ध असून दीर्घायुषी असावा. हा प्रथम वटेश्वर या नांवाच्या गुरूचा शिष्य असावा व म्हणूनच यास चांगदेव वटेश्वर नांव पडले असावें." परंतु तत्वसार ग्रंथाचा उपलब्ध भाग वाचून चांगदेवाने दोन गुरु केले असावेत असे वाटत नाही. एक गुरु सोडून दुसरा गुरु करणाऱ्यावर चांगदेवाने जे सणसणीत कोरडे ओढले आहेत (पहा ओं. ९३०-९५६) त्यांवरून स्वतः चांगदेवाने तसे केले असेल असें म्हणवत नाही. गुरुत्याग व गुरुवध चांगदेवाने सारखेच मानले आहेत. निर्देव माणसें स्वतः शुद्ध नसतात व मग गुरूवर गुरु करितात. एकलव्यासारखी किंवा सावित्रीसारखी माणसें स्वतःवरच विश्वास ठेवतात व स्वतःच्या विश्वासाच्या सामर्थ्यावरच तरून जातात. असे उद्गार काढणारा चांगदेव स्वतःच दोन गुरु करणारा असेल असें संभवत नाही व असें म्हणावयास यत्किचित् हरकत वाटत नाहीं की चांगदेवाचा गरु एक वटेश्वरच. मग तो वटेश्वर कोणी असो! आतां या वटेश्वराची तत्वसारांत काय माहिती सांपडते ते पाहूं. प्रारंभीचें गणेश शारदा वंदनानंतरचे गुरुवंदन सांपडले असते, तर या प्रश्नावर बराच प्रकाश पडला असता. पण तें जरी सांपडलें नाहीं तरी वटेश्वराचा उल्लेख बरेच ठिकाणी आला आहे. चांगदेवानें निर्गुण भक्तीचा अनुवाद वटेश्वर प्रसादानें केला आहे. जे जाणल्याने जाणीवेचा शेवट होतो तें वटेश्वराचे रूप वटेश्वर होऊनच चांगदेव सांगत आहे. त्रिगुण गोप्य गव्हर वटेश्वरस्वामीच्या प्रसादाने चांगदेवाचा संसार नाहीसा झाला व वटेश्वरानेच आत्मब्रह्म दाऊन चांगदेवास चांगदेवाचें स्वरूप सांगितले. गुरुशिष्य एक झाले, ही एक होण्याची भावना नाहींशी झाली व ती नाहींची भावना वटेश्वराचे ठिकाणी राहिली. चांगदेवाने ही ग्रंथरूपी पूजा गुरुवटेश्वरास वाहिली. या प्रकारचे अवधूत चांगदेवाने किंवा वटेश्वराच्या सुताने वर्णन केले आहे. या मर्व उल्लेखावरून चांगदेवाचे ज्ञानमार्गातील व योग- मार्गांतील गुरु वटेश्वर एकच आहेत असे वाटते. वटेश्वर जर नुसते योगसिद्धच असते तर वरील ज्ञान त्यांचे कृपाप्रसादाने झाले, असें म्हणून वटेश्वराची मिथ्या स्तुति व ज्ञानगुरुविषयी अकृतज्ञता चांगदेवाने केव्हांहि नसती दर्शविली शिवाय योगी वटेश्वराचा उल्लेख योगसिद्धांच्या नामावळीत न येणें आश्चर्यकारक नव्हे काय ? त्या मालिकेत मत्स्येंद्र चौरंगी, गोरक्ष व मुक्तादेवी एवढ्यांचा उल्लेख चांगदेव करितात यावरून वटेश्वर त्या मार्गातील असतील असा संभव कमी वाटतो. चांगदेवांचे अभंग पाहतांही वटेश्वर नांवाचा त्याचा योगमार्गी कोणी गुरु होता असे वाटत नाही. रा. गोंधळेकरांनी प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदेवाच्या गाथेत चांगदेवाचे म्हणून ४६ अभंग दिले आहेत. त्यांतही वटेश्वराचा योगाशी कोठेच संबंध लावलेला नाही. उलट जेथे जेथें वटेश्वराचा संबंध आहे तेथें तेथें तो ज्ञानाशींच आहे. उदाहरणार्थ अभंग ८ मध्ये चांगदेव म्हणतात. 'चांगा वटेश्वरी सोहं झाला। अवघाचि बुडाला ज्ञान डोही.' अभंग २० मध्ये 'डोळां लावुनि निजी निजेला ६ निवांत। स्वप्नी वटेश्वर देखिला निवांत.' जिवींचे हितगुजज्ञान कोणी सांगि- तलें तर चांगदेव वर्णन करितात 'चांगा म्हणे जिवींचे गुज, बटेश्वरें मज सांगितले'. (अभंग ३४) शेवटी शेवटी अभंग ४५ मध्ये तर स्पष्टच उल्लेख आहे की 'चांगा सोय धरी ज्ञान-वटेश्वरी। मुक्ताई जिव्हारी बोध करी।' या सर्व अभंगांतून वटेश्वराचा योगमार्गाशों कोठेही संबंध चांगदेवाने सांगितलेला नाही. तेव्हां चांगदेवांच्या या प्रत्यक्ष उल्लेखाविरुद्ध नुसत्या दंतकथांवर उभारलेले वटेश्वराचे योगमार्ग-संबंध प्रमाणभूत मानतां येत नाहीत. मग हा वटेश्वर होता तरी कोण? ज्ञानदेवांची भेट होईपर्यंत चांगदेव कोराच होता. अनेक सिद्धोंनी युक्त असून चांगदेवाचें कोरेपण, ईश्वराशी प्रत्यक्ष भेट होत असतांही नामदेवाच्या कच्चेपणासारखेच होते. हे कोरेंपण घालविण्या- साठी ज्ञानराजांनी चांगदेवास चांगदेव पासष्टी लिहून पाठविली. पण तिचा अर्थ त्यास कळेना. तेव्हां श्री. मुक्ताबाईंनी चांगदेवास विश्रांति-वटाखाली त्या चांगदेव पासष्टीचा अर्थ सांगितला व चांगदेवास ईश्वरस्वरूप करून दिले. या दंतकथेवरून वटाखाली दाखविलेल्या स्वतःचे ईश्वरस्वरूपाशी एकजीव झाले- ला चांगदेव तर पुढे वट +ईश्वर-वटेश्वर या नांवाने ओळखिला जात नसेल ना? म्हणजे मूळचा चांगदेव वटाखाली ईश्वर झाल्यामुळे चांगावटेश्वर झाला असावा. वटेश्वर म्हणजे दुसरे कोणी नसून चांगदेवाच्या अंतर्यामी प्रकाशणारें ईश्वर स्वरूप. या कल्पनेस मान्यता दिली म्हणजे सारी कोडी उलगडतात. 'गुरूनुं शिष्याचा घोंटु भरूनु', 'तंव शिष्य मुखों प्रवेशला', 'गुरु शिष्य एक झाले तें झाले पणहि गेले, गेले पण राहिलें, वटेश्वरि' इत्यादि तत्वसारांतील बाक्यांचा, बोध स्पष्ट होतो. अभंगांतली अनेक स्थळे उलगडतात. उदाहरणार्थ मागे उल्लेखिलेला चरण आतां अधिक स्पष्ट समजतो. 'चांगया सोय धरी ज्ञान वटे- श्वरी' ही मुक्ताबाईची भाषा ज्ञानरूप वटेश्वर मानला तर अधिक समर्पक होईल. अभंग २२ मध्ये 'मुक्ताई म्हणे नांव पैं ठेवीन, सुता बोलवीन वटेश्वरा,' याचा अर्थ या कल्पनेनुरूप जास्त चांगला लागतो. शिवाय ४६ अभंगांपैकी ५ अभंगांत चांगदेव हे नांव मुळीच नसून नुसतें वटेश्वर हेच नांव आहे. तत्कालीन कवींच्या आपल्या प्रत्येक अभंगांत आपल्या नांवावो छाप घालण्याच्या पद्धतीकडे लक्ष्य दिले तर बटेश्वर हे स्वतःचें नांव नसतांना चांगदेवाने घातले असेल असें संभवत नाही. चांगदेवासारख्या वयोवृद्ध व सिद्ध पुरुषाचे गुरु होण्यापेक्षा त्यास स्व- स्वरूपाचाच शिष्य करणे मुक्तादेवीस अधिक योग्य वाटले असेल. वटेश्वराचें कोडे दुसऱ्या एखाद्या अधिक बळकट पुराव्याने सुटेपावेतों वटेश्वर म्हणजे चांगदेवांचे शुद्ध आत्मस्वरूप असेंच मानिले पाहिजे. हे स्वरूप समजल्यावर चांगदेव, चांगावटेश्वर, किंवा वटेश्वर या तीन्ही नांवाने एकच व्यक्ति ओळखिली जाण्यास हरकत नाही, या उपपत्तीमुळे योगसिद्धांचे मालिकेंत वटेश्वराचें नांव न येण्याचेही कारण स्पष्ट समजते. आतां ग्रंथगर्भी काय सांगितले आहे हे पाहूं. पहिल्या पांच ओव्यांत गणेश- स्तवन असून पुढे १३ पावेतों शारदास्तवन आहे. यापुढे गुरुस्तवन असावेसें वाटते. यानंतरच्या ज्या ओंव्या सांपडल्या नाहीत त्यांत स्थूल व सूक्ष्म भक्तीचे ज्ञान वैराग्य-संमतीने वर्णन केलेले असावे असें ५९५व्या ओंवीवरून वाटते. याप्रमाणे स्थल व सूक्ष्म भक्ती सांगून चांगदेव निर्गुणभक्तीकडे वळले आहेत. या निर्गुणभक्तीचे विवरण करण्यापूर्वी चांगदेवाने पद, पिंड, रूप व रूपातीत या चार गोष्टींचा विचार केला आहे. पद म्हणजे श्वासोश्वासाबरोबर होणारे सोऽहं, अहंसः हे शब्द. पिंड म्हणजे शरीरास आधारभूत असलेली कुंडलिनी. रूप म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार व लय व या संकोच विकासाहून पर, द्वैता- द्वैतापलीकडील जो, तो रूपातीत. या रूपातीताची भक्ति तीच निर्गुणभक्ति. ६४१ ओंवीपर्यंत हाच विषय विस्ताराने प्रतिपादन केला आहे. ओंवी ६४३ पासून ६६४ पावेतों हठयोग सांगितला आहे. पण यांत मुख्य सांगितलेली गोष्ट म्हणजे शरीर-साधना न करणे. गुरुपरंपरागत व स्वानुभूत वर्गन कसे असते याचा वरील ओंव्या उत्तम मासला आहेत. समाधीच्या या ओंव्या व ज्ञानेश्वरीतील या विषयाच्या ओंव्या परस्पर ताडून पाहण्या सारख्या आहेत. समाधि लाऊन मन निविषय करणे व निर्गुणभक्ति करणे एकच आहे. येथे चांगदेवाने नुसती 'शब्दाची चावटी' केली नसून 'आधीं केलें मग सांगितलें' या न्यायाने स्वानुभवच शब्दरूपानें ओतला आहे. पुढे निर्वाण व सिद्ध योग ८ सांगून ब्रह्मविवरणास आरंभ केला आहे. मग प्रत्येक साकार वस्तु ब्रह्म कशी असते हे सांगून तिचा त्याग कसा करावा याचे विवरण ओंबी ७३० पर्यंत आहे. निरनिराळ्या क्रिया, निरनिराळे योग, निरनिराळी शास्त्रे, एवढेच नव्हे तर पितृगोत्र, जीवभाव यांच्याही ममतेचा त्याग केला पाहिजे. नुसत्या शरीरसिद्धी- चीच नव्हे तर तिज बरोबरच पापपुण्य, वर्णभेद, निंदास्तुति, मानापमान, सुख- दुःख, आस्तिक नास्तिक वाद, रिद्धि सिद्धि, कर्म निष्कर्म इत्यादिकांची आस सोडतां सोडतां पंच भूतांचाहि त्याग झाला म्हणजे जें अप्रमेय, अक्षय, अविनाश, अच्युत, सदाशिव, सानंदपूर्ण, सर्वज्ञ, शांत, मंगल, वेदवेद्य, ॐकाराक्षर ब्रह्म राहतें तें तूंच आहेस' अशी तत्वमसि वाक्याची फोड केलेली आहे. हा तत्वमसि उपदेश समजला व मनाचा पूर्णपणे लोप होऊन संकल्प विकल्प मावळले म्हणजे सर्व प्रकारच्या प्रवृत्ति आपोआप मावळतात. मग उचितानुचित कर्माचे बंधन रहात नाही. ब्रह्मवल्ल्युपनिषदांत सांगितल्याप्रमाणे 'एतह वाव न तपति। किमहं साधु नाकरवम् । किमहं पापमकरवमिति'--मी कोणतें पाप केले किंवा मी कोणते सत्कृत्य केलें नाहीं इत्यादिकांचा ताप त्यामागे रहात नाही. मग त्याच्या हातून कुकर्म जरी झाले तरी त्याचे बंधन त्यास होत नाही. पण अकर्म करून बंधन होत नाही हा विषय स्पष्टपणे समजला नसेल म्हणून दोन उदाहरणे देऊन शंका घेतल्या आहेत व त्याच समाधान मोठया मार्मिक- पणे केले आहे. संकल्प असो की नसो, कोणाचे ऋण काढिले किंवा विधवा ब्राह्मणस्त्रीने पुरुषसंग केला तर तें ऋण द्यावे लागेल की नाही किंवा त्या विधवेस गर्भ राहील की नाही या शंका, आणि मेल्यावर ऋण द्यावे लागत नाही किंवा क्षारादिक औषधींनी गर्भ धारणाच होत नाही हे समाधान, मूळांतच ओंवी ८०३ ते ८२७ पर्यंत वाचले पाहिजे. हे ज्ञान अत्यंत कठिण आहे, थोडा वेळ पटले तरी पुनः पुन्हा अज्ञानाचे पटल मनावर येतच असते, आणि म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे क्रिया कर्मांचा लोप करणारे ज्ञान भलत्यास सांगणे साहसाचे आहे. तो लोप आपोआप स्वाभाविकपणे झाला पाहिजे. मुद्दाम करून चालत नाही. हटाने केल्यास उपयोग नाही. या साठीच वेदान्त ज्ञान 'अशिष्याय न देयं' असा प्रतिषेध आहे. चांगदेवानेही या निषेधाचाच अनुवाद केला आहे. अज्ञान पटल मनावर न येऊ देणे फार कठिण आहे व या कार्यात थोडें यश येऊन पूर्ण सिद्धि प्राप्त न झाली तर काय होईल या प्रश्नाचे उत्तर भगवद्गीतेस अनुसरूनच 'असा अपभ्रष्ट पुरुष चांगल्या कुळांत जन्मून विधियुक्त भक्ति आचरितो व सिद्ध होतो' असें ८४७ ओंवीत दिले आहे. योग्याच्या सिद्धि मंशाचे कारण मात्र चांगदेवानें भिन्न दिले आहे. योगमार्गात सिद्धि मिळू लागली की आपले स्थान जाईल ही देवांस भीति वाटू लागते व म्हणून ते या योग्याच्या मार्गात विघ्नं आणीत असतात अशी चांगदेवांची उप- पत्ति आहे. पण ही विघ्नांची भीति सिद्धदशा आंगी बाणण्यापूर्वीच आहे. सिद्ध झाल्यावर मग विघ्ने कोठली? यापुढे ओंवी ८६७ पासून योगमार्गातील सिद्धांची नांवें दिली आहेत. आजपावेतों हठयोग प्रदीपिकाकार स्वात्माराम योगीश्वराने सांगितलेली या मागांतील " श्री आदिनाथ मत्स्येंद्र शाबरानंद भैरवा । चौरंगी-मीन-गोरक्ष-विरूपाक्ष-बिलेशयाः ॥ मंथानो भैरवो योगी शुद्धबुद्धश्च कंथडिः । कोरंटकः सुरानंदः सिद्धनाथश्च चर्पटिः ॥ कानेरी पूज्यपादश्च नित्यनाथो निरंजनः । कपाली बिंदुनाथश्च काकचण्डीश्वरावयाः ॥ अल्लमप्रभुदेवश्च घोडा चोलीच टिटिणिः । भालुको नागदेवश्च खण्डकापालिकस्तथा ॥ एवढ्याच लोकांची नांवे माहीत होती. पण चांगदेवानें याहूनहि विस्तृत नामावलि दिली आहे. ८८१ ओंवींत ही मालिका संपली नाही व पुढील ओंव्या उपलब्ध नसल्याने ही यादी आणखी किती लांब होती हे सांगता येत नाही. या यादीवरून चांगदेवाच्या काळी हा पंथ किती पसरला होता व यांत सर्व जातींच्या स्त्री पुरुषांचा कसा समावेश होता एवढे मात्र ठळकपणे नजरेस पडते.
१० पुढील उपलब्ध ओंव्यांत गुरुभक्तीचें माहात्म्य व गुरुद्रोहाचे दोष वर्णन केले आहेत. चांगदेवाने सांगितलेली गुरुसेवा सामान्य नसून पूर्णपणे स्वत्वास विसरणाऱ्या अनन्यपणाची आहे. गुरु दिसल्या बरोबर तर लोटांगण घातलेंच पाहिजे पण गुरु ज्या दिशेस असेल तिकडेही नमस्कार केला पाहिजे. गुरूचे वृथा अनुकरण तर करूंच नये पण गुरू ज्या आसनावर बसत असतील त्या वरही बसू नये. उलट गुरूच्या घराची किंवा आसनाचीही चित्तशुद्धिसाठी पूजा केली पाहिजे . गुरुत्याग किंवा गुरुद्रोहाच्या पातकास तर सीमाच नाही. एक गुरू सोडून दुसरा करणारास तर चांगदेवानें 'पुंश्चली' ची उपमा दिली आहे. जसें कन्या वरावयापूर्वीच कुळाचा विचार केला पाहिजे तसेंच येथेही आहे. शिवाय चांगदेवाच्या मताने गुरुपासून मिळणारी सिद्धि पुष्कळशी स्वतःवरच अवलंबून आहे. मातीच्या केलेल्या द्रोणाचार्यापासूनहि जर एक लव्यास सिद्धि मिळवितां आली तर मग असिद्ध कोण राहूं शकतो? गुरुद्रोह चुकून घडल्यास त्याचा निस्तार कसा करावा हा भाग पुन्हा गहाळ झाला आहे. सरते शेवटी संवादात्मक ग्रंथाच्या अंती असणारा 'पूर्णपणे समजले ना?' असा प्रश्न असावासे वाटते. श्रीमद्भगवद्गीतेंत कच्चिंदज्ञानसंमोहः प्रणष्टस्ते धनंजय' असा प्रश्न विचारून 'स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव' असें उत्तर आहे. पण येथील उत्तर फारच बहारीचे आहे. येथे शिष्य गुरूसच असें उत्तर देतो की 'आतां समजावयाचें कोणी व काय? समजणारा, जे समजावयाचें तें व समजण्याची क्रिया ही त्रिपुटीच नाहींशी झाल्यावर मौनाशिवाय उत्तरच काय? गुरूनेही पण शिष्य इतका तयार झाल्यावर आपणापेक्षां निराळा ठेवण्याचे कारण नाही असे समजून त्यास स्वस्वरूपी मेळविलें. ही मिळणी चांगदेवाने फारच मौजेची वर्णिली आहे. गुरूने आ पसरिला व शिष्याने गुरूचे मुखांत प्रवेश केला व याप्रमाणे गुरु शिष्य एकस्वरूप झाले. तत्वसाराचा शेवट याहून चांगला कसा असू शकणार? सद्गुरूनें जें आपलें निजस्वरूप शिष्यास समजाविलें, तें पूर्णपणे समजून शिष्य व गुरु हा द्वैतभाव सुटून दोघेहि एकच ब्रह्मस्वरूप झाले की सर्व तत्वांचे सार प्राप्तच झाले. हाच खरा तत्वसाराचा गर्भितार्थ.
and % 3D ग्रंथाचे अंतर्याम पाहिल्यावर थोडेसें बहिरंगाकडेही लक्ष्य दिले पाहिजे. ग्रंथाचा छंद ओंवी असल्याबद्दल स्वतः चांगदेवानेच अंतिम ओंवींत सांगितले आहे. हा मराठी भाषेतील आद्य छंद होय. सोमेश्वराचा असा स्पष्ट उल्लेख आहे की 'महाराष्ट्रेषु योषिभ्दिरों को गेषा तु कण्डने' म्हणजे महाराष्ट्रांतील बायका कांडतांना ओंव्या गात असतात. अभंग हे नांव जरी जुन्या ग्रंथांत सांपडत नसले तरी ओंत्री हे नांव ससि सांपडते. ओंवीबद्ध ग्रंथ लिहिणाऱ्या सर्वांनी बहुतेक आपल्या ग्रंथाच्या शेवटी या छंदाचें नांव घातले आहे. ज्ञानेश्वरांनी तर 'तैसी गाणीवेते मिरवी, गीतेवीण ही रंगु दावी, तो लोभाचा बंधु वोवी, केली मियां' असें कारण दाखवून ओंबी छंदाचा अंगीकार केला आहे. ओंवी शब्दाची व्युत्पत्ति राजवाडे यांनी आपल्या मराठी छंदावरील लेखांत पुढील प्रमाणे दिली आहे. “ऊङ=सूत्र ओंवणे ह्या धातूपासून ओवी हा शब्द निघाला आहे. आ+ऊयन=ओयन-ओयनिका ओवणिकाओवइआ =ओवीआ, ओविया. अथवा वे (ओवणे, ग्रंथ रचना करणे) या धातूपासून नाम ऊति. आ+ऊति=ओति=ओइबोबी=ओंवी. अशीहि सिद्धि होऊ शकेल. परंतु ओवणिका हा शब्द ज्या अर्थी शके १५६०तील महारिमल्लबास नामें करून मानभाव ग्रंथकाराच्या दर्शनप्रकाश ग्रंथांत आला आहे, त्या अर्थी 'पहिलीच युत्पत्ति ग्राह्य दिसते." पण या दोन्ही व्युत्पत्ति समाधानकारक वाटत नाहीत. कारण आ उपसर्गपूर्वक ऊड धातु कोठे वापरलेला आढळत नाही. आ+वे धातु जरी उपयोगांत असला तरी ऊति या शब्दाबरोबर आ लागून ओति हा शब्द अप्रयुक्तच आहे. सबब ओंवी शब्दाची व्युत्पत्ति निराळयाच प्रकाराने केली पाहिजे. शिवाय वरील व्युत्पत्तींत घेतलेल्या ओंवणे या अर्था- वरूनही ओंवीच्या प्राचीन प्रकाराची उपपत्ति लागत नाही. ओंवी शब्दाची वर दिलेल्या दोन प्रकारांहून निराळी अशी सिद्धि करतां येण्यासारखी आहे. ती म्हणजे आ+वप् धातूपासून. आवप्-वांटा काढून ठेवणे. यज्ञांत प्रत्येक देवतेस अनुलक्षून जो हविर्भाग निराळा काढून द्यावयाचा असतो त्याचें नांव आवपन. आवपनी, आवपनिका ही यज्ञांतील लहान पात्रांची नांवे आहेत. मापांप्रमाणे या पात्रांनी वांटे काढावयाचे असतात. आवपनी, आवपनिका यांची ओपणी, ओपणिका ही रूपं सहज सिद्ध होतील व पोव:' या प्राकृत सूत्राप्रमाणे 'प' चा 'व' करून ओवणिका शब्द होणे सुलभ आहे. शिवाय भाग काढून ठेवण्याचे अर्थांत आणखीहि एक अर्थ सुचविला जातो, जो या शब्दाच्या सिद्धिचे खरे स्वरूप सुचवितो. कांडतांना किंवा दळतांना कांहीं विवक्षित काला- नंतर नवीन भरण उखळांत किंवा जात्यांत टाकावयाचे असते. हा काल ठरविण्यास अशा गीताचा उपयोग करीत असावेत. म्हणजे एक गीत झाले की एक ओपणी संपली व या अर्थाने ओपणी, ओपी त्या धान्याच्या मापास व तें माप कांडले जात असतांना किंवा दळले जात असतांना म्हटल्या जाणाऱ्या गीतास लावला गेला असावा. या व्युत्पत्तीप्रमाणे ओंवी या शब्दास विशेष अर्थ येतो व हा छंद निर्माण होण्याचे कारणही ध्यानी येतें. आरंभी आरंभी ओंवीचे चरण निश्चित अक्षर संख्येने युक्त असतील, कारण त्याशिवाय कालमापन बरोबर करता येणार नाही. पण संस्कृत अनुष्टुपा- प्रमाणे मराठी ग्रंथकार जेव्हां ओंवीचा ज्योतिष, वेदांत, वैद्यक, इत्यादि शास्त्र ग्रंथ लिहितांनाहि उपयोग करूं लागले, तेव्हां हा अक्षर नियम शिथिल होऊन ओंवीस सयमक गद्याचे स्वरूप आले. याच कारणाकरितां अनुष्टुप् छंदाला ज्याप्रमाणे 'एक नेम नसे गणी' चे रूप राहिले, तसेंच ओंवीचे रूप राहन शिवाय अक्षर संख्यंचेही बंधन राहिले नाही. म्हणूनच ओंवीचें लक्षण बांधतांना भीष्मा- चार्यास “गायत्री छंदापासौनि धृतिपर्यंत, ग्रंथवोवियांचे तीन चरण जाणावे मिश्रित, प्रतिष्ठेपासौनि जगतीपर्यंत, चौथा चरण" असे सांगावे लागले. ज्ञाने- श्वरीतल्या ओंवी चरणाची संख्या मोजून पाहिल्यामुळे राजवाड्यांस असे लक्षण बांधावे लागले की “ओंवीचे पहिले तीन चरण 'सुप्रतिष्ठा' पासून 'धृति' पर्यंत- च्या कोणत्याही छंदाचे असतात आणि चौथा चरण 'मध्यमा' पासून 'जगती' "छंदापर्यंतच्या कोणत्याहि छंदाचा असतो." सारांश काय की भीष्माचार्यांनी ओंवीच्या प्रथम तीन चरणांत कमीतकमी ६ अक्षरें तरी असावीत असा नियम केला. व राजवाड्यांनी ही ६ अक्षरांची संख्या ५ वर आणली. चांगदेवाच्या , ओंव्यावरून ही संख्या आणखीही खाली आणावी लागेल. तत्वसारांतील सर्वांत लहान ओंवी ६६६वी आहे. इच्यांत तीनच अक्षरांचा एक चरण पडतो. हे नोबलें, पाहिले, तेंवीचि कैसें केलें, जाणनेण' ही ती ओंवी. यावरून आपणांस एवढेच म्हणता येईल की अर्थानुरोधाने प्रसंग पडेल तसे ओंवीचे चरण मराठी ग्रंथकार लहान मोठे करीत असत. येथपर्यंत हा तत्वसार ग्रंथ कसा मिळाला, तो कोठे, केव्हां व कोणी लिहिला आणि त्याचे अंतरंग तथा बहिरंग कसें आहे, याचा विचार केला. आतां ज्यांचे कृपाप्रसादाने हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे त्यांचे आभार मानून हा बराच लांबलेला उपोद्घात पुरा करावयाचा आहे. सर्वांत प्रथम प्राच्य ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम करणारे ग्वाल्हेर सरकारच्या शिक्षा विभागाचे अधिकारी रा. ब. लक्ष्मण भास्कर मुळे यांचे व ग्वाल्हेर मुक्कामी त्या कार्यास इतकें व्यवस्थित रूप आणून देणारे रा. केशव बळवंत डोंगरे यांचे आभार मानले पाहिजेत. रा. डोंगरे यांनी ग्रंथ प्रका- शित करावयाचे ठरवून उपोद्घात व टीपा लिहिण्याचे काम मजवर सोपविलें. दुसऱ्या एकाद्या लेखकाकडे हे काम दिले गेले असते तर हे याहून पूर्वीच पुरें झालें असते. पण माझे इतर व्यवसाय सांभाळून मला हे कार्य करावे लागल्यामुळे या प्रकाशनास कल्पनेबाहेर विलंब लागला याबद्दल खेद प्रदर्शित करणेही माझें कर्तव्यच आहे. हा सारा विलंब सोसून अलीजाह दरबार प्रेसने हे पुस्तक इतक्या चांगल्या रीतीने छापून दिले याबद्दल प्रेसचे व्यवस्थापक श्री. मानगांवकर यांचे आभार मानल्याशिवाय हे आभार प्रदर्शनाचे कार्य पुरेंच होणार नाही. सबब या सर्वांचे आभार मानून व ज्यांच्या कृपाछत्राखाली हे सर्व सुव्यवस्थित होत आहे ते आमचे श्रीमंत महाराज जिवाजीराव साहेब शिंदे दीर्घायु होऊन अशा प्रकारची वाङमयात्मक कामें त्यांच्या राजवटींत अनेक होवोत अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून हा उपोद्घात पुरा करितों. लश्कर ग्वाल्हेर. ताः १० मे १९३६. है. रा. दिवेकर.
लते जमहिमानंगहनाव सावप्रसन्नाजलारेमणोनिवननाअनुवादग्नी। मालागा
पावविनाटनानादेतयाशिजयजयपरमेश्वशालविकलवरीसिंतश्यागम्बरीधरमय
Yealthletitunettialt=PLL HDKish
BBtILERVERuthletricitis LEHRAREILLER
SATELithi125zipl-Etioseline ||
HiteRATilabastiatelliAdhigiteiller ISTEESISATE1EE
satEALLELIEWithilitic-50ENDRI-RILE=
FUSIL DESCnsyule ak klasugunsusitta lite mouille IF
02120122 RUBBISNENIE SER sirlar tai batus : F3
Paniclestantseepikaritten btENER.14
2SHARMENIRDESERestauraisier RITE:
॥ ॐ नमः कुंजरेश्वराय ॥
गणेशवंदन.
म्यां नमिला गणेश्वर, जो कल्मक्षवनकुठारु,
सर्वशास्त्रविचारु, पूर्णदीप ॥ १ ॥
जो सौजन्याचा अंकुरु, शब्दब्रह्मविद्येचा उच्चारु,
उन्मेषाचा तरुवरु, कल्पवृक्षु जो ॥ २ ॥
जो आनंदें डुल्लत्तु,
प्रबोधे नाचतु,
तांडव
अभिनवितु, शंभुपुत्रु जो ॥ ३ ॥
जो विघ्नविध्वंसनु, अविद्यातृणदहनु, कुविद्याभरण
हुताशनु, ज्ञानाज्ञी जो ॥ ४ ॥
जो सगुणद्रुमु सहजु, गिरिजे शंभुचा आत्मजु,
तो नमिला मूषकध्वजु, एकदंतु ॥ ५ ॥
शारदावंदन.
वाचा प्रदक्षिणा करुनु, गणेशातें नमुनु, आतां
साष्टांगिं प्रणमुनु, शारदेतें ॥ ६ ॥
[२] जे शब्दब्रह्माची मूळिका, काश्मिरीची नायका, जे बुधीसि प्रेरका, वागेश्वरी ॥ ७ ॥ जे गोक्षीरधवळ, स्फटिक संकाश निर्मळ, विशुद्ध उभयकुळ, ब्रह्मपुत्री ॥ ८ ॥ जिये हंसाचे वाहन, पाशांकुशधरण, महिमाग्ने गहन, सरस्वती ते ॥ ९ ॥ जिये नवरसांचा अळंकारु, सप्त स्वरांचा शृंघारु, नादाचा अवतारु, नादमूर्ति ॥१०॥ जिया नादाचिया प्रीती, ईश्वर केला अती, तिं पावविला तृप्ती, नादें तेया ॥ ११ ॥ जय जय परमेश्वरी, लंबिके खेचरी, संतुष्ट वागेश्वरी, परम गुह्य ते ॥१२॥ जे महिमानें गहन, स्वभावें प्रसन्न, भला रे म्हणौनि वचन, अनुवादली ॥१३॥ वंदन. आतां ......... . ....... ...... 28..... ...."
[३] ... "वैराग्य तें ऐसें, जें देह अहंतसि रुसे, इछा क्रिया राहे आपैसें, योगसिद्धि ॥ ५९० ॥ जरि अष्टांग योगाभ्यासु, तरि स्वभावें होय स्वयं- प्रकाशु, देखिजे परमहंसु, परमात्मा ॥ ९१॥ शरीरसिद्धांत गोप्यगहर, ते केंवि करूं गोचर, परि सकळे निःशब्दाधार, कथन करीन ॥ ९२ ॥ जैसा गुरुद्रोहु न पडे, आणि सिद्धिद्वेषु न घडे, तैसा बोलों उजेडे, शरीरनाथु ॥ ९३ ॥ सोपाने बोलिजैल, शास्त्राज्ञा कथिजैल, अध्यात्मि किजैल, रूप चांग ॥ ९४॥ हे स्थूल सूक्ष्म भक्ति. बोलिलि ज्ञान वैराग्यसंमति । ते परियसा निर्गुणभक्ति, चांगा म्हणे ॥ ९५ ॥ निर्गुणभक्ति. जे वातिवरि गिवसिता, न दिसे संसारवार्ता, ते हि निर्गुण भक्ति सेवितां, प्रपंचु तुटे ॥ ९६ ॥ जे पापापुण्यापूर्वि, जन्म मरणातें हारवि, महा बोधु चेववि, आत्मस्वरूपें ॥९७ ॥ ७
[४]
जे दुसरेपणा हाणि, स्वर्गसंसारा धुणि, जे सेवितां
निर्वाणिं, स्वयं शिव ॥ ९८॥
हे निर्गुण भक्ति, आइकिजें स्वात्महीति, आहो इये
परौति, वस्तु असेचिना ॥ ९९ ॥
आतां वटेश्वराप्रसादें, मी निर्गुणभक्ति अनुवादें,
तरि आइकतु श्रोते विनोदें, चांगा म्हणे ॥ ६०० ॥
तरि सांगैन परमशारराचि स्थिति, ते परिसा
निर्गुण भक्ति, जिया कैवल्य प्राप्ति, मोक्षरूप ॥ १ ॥
तिचे विभाग,
ते निर्गुण भक्ति द्विधा, रूप रूपातित पदा,
गुरुप्रसादें सानंद, रहस्य कथीन ॥ २ ॥
पदा पिंडाची स्थिति, रूपरूपातीतप्राप्ति, सबीज
भेद वित्पित्ति, प्रथक् सधैन ॥ ३ ॥
पिंडु म्हणिजे कुंडलिणि शक्ति, पद परमहंसु म्हणी.
पति, रूप बिंदु कळा ज्योति, एर कळामय ॥ ४ ॥
पद.
आतां पदाचा विचारु, सांधिजैल नागरु, अवधाने
देया जि अवसरा, एकचित्तपणें ॥ ५ ॥
[५]
,
-
तरि पद तें परमात्मा म्हणिजे, ते वोंकार स्थान
बोलिजे, जेथे वाचा उपजे, चतुर्विध ॥ ६ ॥
अव्यक्तु
उपजे प्राणु, तस्य नादें मनु, मनव्योमा
पासोनु, बुद्धि झाली ॥ ७ ॥
मनबुद्धिचा गहरी, तेथें जालिया वाचा च्यारि,
परा पश्यंति मध्यमा वैखरि, बोलिजति ज्या ॥ ८ ॥
परा म्हणिजे ते मात्रावृता, तोचि घोषु परमात्मेया
साक्षभूता, हे अनुभव संकेत, जाणिजे जी॥ ९॥
तिये पासौनि पश्यति, तेचि ध्वनि म्हणिपति,
मध्यमा तिये परौति, ते नादस्वरूप जी॥ १० ॥
तिये पासौनि वैखीर, एवं वाचा जालिया च्याही,
ते प्रणवादिक गहरी, स्थूल बीज ॥ ११ ॥
तेचि अक्षर द्विधा, हकार सकार भेदा. शिव शक्ति
संबोधा, हंसवाक्य पैं ॥ १२ ॥
सकारु विसर्ग संयुक्तु, हकारु बिंदनादभरितु,
हे बीजद्वय म्हणीपत, शिउ शक्ति ऐसें ॥ १३ ॥
शक्ति रहस्य सकारु, सबीज शिउ हकारु, हे दोन्ही
आणि ॐकार, अजपा म्हणिजे ॥ १४ ॥
आतां प्रवेशी सकारु, बाह्य नीमि हकारु, तेचि
सृष्टि संहारु, पृथग्बीजें ॥ १५ ॥
अवरोहिं विरोहिं म्हणिपति, चंचळे निश्चळे दिसति,
संततें वतति, मन व्योमिं ॥ १६ ॥
हे गुरुमुखें पाविजे, छंद रुषि देवत जाणिजे, या
परि किजे, मंत्र सिध्दु ॥ १७ ॥
एवं पद बोलिलें, ते संकेतें काथलें, तव शिष्ये
पुसिलें, पिंडु कैप्ता ॥ १८ ॥
पिंड.
आतां पिंडव्याख्यान करीन, संकेते सांचैन,
उन्मेषं बोलैन, बालबोधे ॥ १९ ॥
पिंडु म्हणिपे शक्ति, कुंडलिणि विख्याति, देह
गोळकोत्पत्ति, जेथौनियां ॥ २०॥
जे भुजंगळणे सूतले, आधारि निक्षेपिलि, योगियां
जालि, मुक्तिवरदा ॥ २१ ॥
जौसि विद्यु तेजें झळकति, कां जळिं मच्छक तळ-
पति, तैसि आधारि मिरवति, तेज:पुंज ॥ २२ ॥
[७]
जे
जे रविसंख्या सहनु, महा तेज प्रकाशु, तेवि स्वयं
तंज बहुवसु, आधारिणी ॥ २३ ॥
कुळा अकुळा विचारु, पक्ष द्वय निर्धारु, षट
चक्रां आधारु, नाडित्रया ॥ २४ ॥
दशवायु गुणत्रया, रवि शशि बीज द्वया, पंचभूतिक
पीठत्रया, शरीर संख्या ॥ २५ ॥
हे सर्व कुंडलिगिचि सृष्टि, उत्पत्ति संहार स्थिति,
आतां गुरु विचारें बोलति, रूप कैसें ॥ २६ ॥
आतां रूप सांधैन आइका, जे दशविध परि एकि
अनेका, पद पिंड विभागका, परि एकीचि जे॥ २७ ॥
ते नाद बिंदु कळा ज्योति, एवंविध रूपाचि स्थिति,
तियेते जीउ म्हणिपति, गुणात्मकु पैं ॥ २८ ॥
मन बुद्धि चित्त अहंकारु, हा चतुष्टय आकारु,
पंचभूतिकिं अनेक विचारु, तोचि जाला ॥ २९ ॥
आतां पंचभूतिकोत्पत्ति, यांचि सांधैन वित्पत्ति,
एक एका प्रति, जन्मजाले ॥ ३० ॥
[८] शून्य ब्रह्मा पासोनि, आकाश जन्मले तेथौनि, सर्वा शेषा येउनि, व्यापुनि असे पैं ॥ ३१ ॥ तिये व्यामि जन्मला पवनु, तेज तया पासूनु, येकमेकांते प्रसउनु, भूतसृष्टि ॥ ३२ ॥ आप तेजिं जन्मले, पृथ्वि तत्व आपि जालें, क्षिति प्ररोहो पातलें । सर्व बीज ॥ ३३ ॥ ऐसें नाही पासून जालें, ब्रह्म कति विस्तारले, ईश्वर तेज विकरलें, मूलमंत्र ॥ ३४ ॥ ईशान म्हणिजे आकाश, वायु म्हणिजे तत्पुरुष, अघोर तेज प्रकाशु, वामदेव म्हणिजे ॥ ३५ ॥ पृथ्वि सद्योजाता पासौनि, ऐसें पंच ब्रह्मी होउनि, येणेचि अनुक्रेमें गगनिं, विलयो पावे ॥ ३६ ॥ हे नादबिंदव्याप, यांते म्हणीजे रूप, आतां सांधैन संक्षेप, रूपातीत ॥ ३७ ॥ रूपातीत. पृथ्वी आपिं विरमे, उपरमे, तेज पवनि चि समे, वायु निराळंबिं ॥ ३८ ॥ आप तेजिं
[९]
जैसी दीपकळिका गगनि, जाए तेथ हारपौनि,
तेवि भूतें भूत गिळूनि, शून्य ठाके ॥ ३९ ॥
ऐसा संकोच विकाशु, या वेगळा प्रकाशु,
द्वैताद्वैत आभासु, रूपातीतु पैं ॥४०॥
एवं पद पिंड जालें, रूप रूपातीत बोलिलें,
संकळौनि कथिले, भक्तियोग ॥ ४१ ॥
ऐसी भक्ति हे प्रधान, एवं गुरुभक्तीचें लक्षण,
आतां तूज सांघेन निर्वाण, शिष्यराया ॥ ४२ ॥
हठयोग,
आतां साधारण सांपिजैल, हठयोगु बोलिजैल,
राजयोगु दाबिजैल, तत्वसारें ॥ ४३ ॥
जरि हठयोगाची साधना, तरि न वचती देहाभिमान,
तेचि ते अज्ञान, निरसेचिना ॥१४॥
देहाचे स्थान मान देखौनि, उदास होआवे जाणौनि,
अहंभावापासौनि, तरिचि सुटिजे ॥ ४५ ॥
जरि शरीर साधना लागला, तरि अखंड पद चुकला,
वृथा अभिमान पडला, जन्ममूळिं ॥ ४६ ॥
हैं
[१०]
जहिं शरीरसाधना कीजल, परि देह नाशिवंत
जाईल, वरि जन्मांतें सुचिल, दुःखमूळ ॥ ४७ ॥
हे चौरंगीगोरक्षा साजे, आणि तैसि तिये युग म्हणिजे,
येथ आपण नेणिजे, काय होइल | ४८ ॥
आणि ते देवांचे अंश, केत द्वापर बहुवस,
कलियुग सक्लेश, कर्म शरीरें ॥ ४९ ॥
आपण आत्मतत्व जाणिजे, मोक्षु येकु पाविजे,
येथ विषई न लविजे, विलंबु पैं ॥
वीर देह साभिमान सांडौनि, शुन्य
ध्यानि विरमौनि,
तरि युगसख्या वांचौनि, तोच उरे ॥ ५१ ॥
देख पां चौरंगीनार्थि, कवग कर्म केले देहांति,
निर्गुण प्रवेशपथि, सिद्ध झाला ॥ ५२ ॥
जरि सर्व अशेष साधलें, तरि कार्यकारणिं लागले,
खभा देह उभारले, कल्प कोटी ॥ ५३ ॥
म्हणौनि शरीर जाणावें, परि अभिमाना न यावे,
मनोमळ तोडावे, शून्यघसणीं ॥ ५४ ॥
पवनाभ्यासु करुनि, बंधु भेद मुद्रा लंघौनि,
येणे जाणे सांडौने, ब्रह्मचि होइजे ॥ ५५ ॥
[११ पवन प्रथम वज्रासनी स्थीरुभूता, मूळद्वारे बंधु निरुता, निगतु पवनु मागुता, भरीतु कीजे ॥ ५६ ॥ अध अडिजें, ऊर्धे बंधु दजेि, मध्य अंकुविजे, उच्छाल शक्ती ॥ ५६ ॥ गुरुवचनवर्मभेदें, शक्ति सूतली प्रबोधे, अधो मुख ऊर्धे, कमळ होए ॥ ५८ ॥ पवनघायें हाली, शक्ति पुष्टि उकलली, ऊर्ध पंथें निघाली, ब्रह्मरंध्रा ॥ ५९॥ भारें चालती, ऊकपेलती, आविस म्हणौनि ग्रासिती, व्याधि रोगातें ॥६॥ पवनप्रबोधे मातली, जीव मुंकली, तवं सत्राविं श्रवली, शक्ति मुखिं ॥ ६१ ।। जन पवन संघानें, शक्ति उसळली गगनें, भेदली स्थाने, षट्चक्रांची ॥ ६२ ।। ग्रंथित्रय छेदुनि, षट्चक्रे भेदुनि, त्रिकुटिं योगु संपौनि, निर्गुणोंसें ॥ ६३ ॥ जे जाणतां जागणे सरे, जेणें मनांचे मनत्व मुरे, तें सांचैन विचारें, चांगा म्हणे ॥ ६४ ॥ भावा
[१२]
निर्वाण,
आतां वटेश्वरु होउनु निगुतें, सांचैन मिं वटेश्वरातें,
मना करवि गिळवीन मागुते, संसारासि ॥६५॥
हैं नोबले, पाहिले, तेविंचि कैसें केलें,
जाण नेण ॥६६॥
जें सोने घडानि, अळंकारि होइजे आनानी, तैसें
आत्मा वांचौनि, बोलों नेणें ॥ ६७ ॥
आतां असो हे किति, उठउं संसाराची पांति,
येहविं संसार विस्मृति, आपुला नव्हे ॥ ६८ ॥
जैसें निद्रेच्येनि प्रसादें, भोगीजती स्वप्नींची प्रमा,
तेविं अज्ञानाचेनि मदें, संसारु हा ॥ ६९ ॥
येहावं आत्म प्रबोध दृष्टी, के मन के शृष्टि,
हे मनोमय उठी, मना पासोनि ॥ ७० ॥
आतां मनाचे कसण मोडिजैल, मन हा दोषु
फेडिजेल, महाटिया बोलिजैल, सिद्धयोगु ॥ ७१ ॥
सिद्धयोग
मन जिये ठायिं लाविजैल, तो तोचि बंधु पडैल,
म्हणौनि निराशी किंजल, तेणसिंचि ॥ ७२ ॥
[१३]
जेथ जेथ मन लागैल, तो तोचि संसारु होइल,
म्हणौनि पांगुळ किल, निराळंबिं ॥ ७३ ॥
निराकार प्रकाशैल, तेथ
साकार उछेदैल,
निर्गुण भक्ति उपदेसील, गुरु शिष्यासि ॥ ७४ ॥
ज्या भक्ती निरुतें, पातले हृषीकेशातें, ते न
येतीचि मागुते, गर्भवासा ॥ ७५ ॥
ते शक्ति शून्य प्रभा, नाभं फांकली व्योमगर्भा,
मनोमय सगर्भा, नाशु होए ॥ ७६ ॥
त्रिगुण गोप्य गहरु, तो स्वामि माझा वेटेश्वर,
तस्य प्रसादें संसार, उन्मळीला ॥ ७७ ॥
जेणें आत्म ब्रह्म दाविलें, माझें मज उपसिलें,
असत संसारीक नाहिं जालें, चांगा म्हणे ॥ ७८ ॥
N
साकार ब्रह्म
आतां येथूनु तत्वसार, सांधिजैल ब्रह्म साकार,
गुरु संवादे विचार, शिष्यासि पैं ॥ ७९ ॥
जें जें दावीतु जाईल, ते ते शिष्यु त्यजील,
बंधु पडों नेंदिल, कल्पनेचा ॥ ८ ॥
[१४]
जैसी करि जोति घेउनि. गृहवन्तु अबलोकुनि,
स्वयं ठेविलें देखौनि, त्यागु कीजै ॥ १ ॥
नां तरि ऐली थडीये नावेचा, किजे प्रयत्नु विकारु
तियेवा, पैलु पारु पावलेयां तिवा, पांगु फिटे ॥ ८२ ॥
तैसें देहस्थें देहातीत देखिले, गुरु प्रसादें जाणीतलें,
म्हणौनि त्यजी पुत्रा म्हणीतले, अशेष ही ॥ ८३ ॥
त्याजि क्रिया कर्म जंजाळ, आणि भ्रांति माया पटळ,
स्वप्नावस्था प्रबळ, जाणे पुत्रा ॥ ८४ ॥
जैसी कव्हणी येकि काळ वषां पतित, भुजंगाकार दोरी
दीसत, तेलटिकें जालेयां मनत्व, स्वस्थानां आलें ॥८५॥
तैसा अज्ञानकाळ संसारु, आभासु मायामय साकारु,
तत्वविचारें असंसारु, तोचि होए ॥ ८६ ॥
नांतरि स्वाप्नं संपत्ति लाहिजे, विद्वावो राज्य पाविजे,
चेइलेयां असिजे, आपणचि ॥ ८७ ॥
तैसी अज्ञान विस्मृति निद्रा, दृश्यादृश्य स्वप्नभेद,
स्वरूपिं चेइलेयां अभेद, स्वयं तोचि ॥ ८८ ॥
तेवि आभास मायामय सकळ, जैसे पाहातां मृग
जळ, म्हणोनि त्यजि पुत्रा पाल्हाळ, द्वैत बुद्धि है॥ ८९ ॥
[१५]
त्याग.
त्यजिं आधार स्वाधिष्ठान, मणिपुर अनुहात ज्ञान,
विशुद्धाज्ञा साधन, षटुचक्रांचें ॥ ९ ॥
त्यजि मूळबंधु वायु साधन, खंडज्ञान लंबिकाकरण,
अनहात श्रवण, नको भावें ॥ ९१ ॥
त्यजि अधोवं मध्यस्थान, आसन मुद्रा लक्ष ध्यान,
अजपामंत्र साधन, अवस्था त्रय ॥ ९२ ॥
त्यजिं वादु दंडि दारुण, विज्ञान विद्या सर्वज्ञपण,
कळा कौशळ पांडित्यपण, सांडौनि घाली ॥ ९३ ॥
त्यजिं धातु धातुर्वादु, रस रसायण उपाधि, विवर मुख्य
करुनि समस्त विषयबुद्धि, झणें सेविं ॥ ५४ ॥
त्यजी तिर्थदेशभ्रमण, गिार गहर कर्दळीवन,
निरोपद्रव स्थानी रहण, प्रारंभी तुं ॥ ९५ ॥
त्या पितृगोत्र समस्त, जीव भाव सांडौनि होये
निभ्रांत, देहसिद्धि न लगे सर्वथा, नाशिवंत हे ॥१६॥
ऐसे ही देह साध्य कीजेल, तरि आरिख एक बोलि-
जैल, ब्रह्मादिकी देह त्याजिजैल, गणना अंती ॥९७॥
[१६] रजी शून्य, , ऐसे म ते स्वरूप जैसी उरे तें प्रा भरि आपणों TTA जैस्ति - विरमति, ब्रह्मरूपी इंद्र हारपति, लया जाति, आपुलीया यता ॥९८॥ रखस्ते, रुद्र शिवि मागुते, शिव बुद्ध ॥ ९९ ॥ थति, तये काए राहाति, म्हणौनु तांडि बापा ॥ ७०० ॥ । सांडिजाणे, ऐसें अभेद अंत:करणे, महाबोधे ॥ १॥ य कुळकथा, होए पद पिंडि मुक्ता, तैसा शून तां, निःसंशय ॥ २॥ म।ि दु, शुचि शंका बंधु, विश्वरूपि पावले, स्तुाते कडवसा, मानाभिमानु काइसा, शा, होइ पुत्रा ॥४॥ नेति बा नास्तिक वादु, भ्रमु वोषधीचा बंधु, प्रबंधु, ज्ञान भ्रंशु ॥ ५॥ सिद्धिचि आवडि, स्वर्ग भोगादि फळे वंचि तत्वापासुनि बापुडि, हीणे देखों ॥ ६ ॥ चिन
[१७]
त्यजिं कर्म निष्कर्म भावना, व्याप्य व्यापक कल्पना,
भेदबुद्धि विवंचना, करिसि झणें ॥ ७ ॥
त्यजिं पृथ्वि मागौति, आपें आप तेथिं, तेजिं तेज
निरुति, निरोपिं पा ॥ ८ ॥
आत्मरूप.
पवनी पवनु त्यजि, आकाशी आकाश यजिं, शेषि
उरेल त्या भजि, आत्मरूपा ॥ ९ ॥
त्यजिं बुद्धि चित्त अहंकारु, आणि शून्य मानी
विकारु, तेथ उरैल तो विचारु, लाभू विशेषि ॥१०॥
कदालिस्तंभू उकलिता, शून्यगर्भु फळितां, तेणें
आकारें वर्ततां, कैवल्य तुं ॥ ११ ॥
कदलिगभु दिसे, तैसें रूप तुझें असे, स्वयं गुरु
तुसे, तरिचि जाणिजे ॥ १२ ॥
नातरि तया मना संहारु, वेदविद्येचा विचारु, तेंचि
तत्वसार साचारु, जाण पुत्रा ॥ १३ ॥
मन पवन शून्नी हारपति, तल्लीन मन तेचि गति,
तया परौतें कांहिं आथि, तुं वांचौनि ॥ १४ ॥
[१८]
AV
-
रजी वेवस्ते तमः, रज सत्विं अभिन्न, सत्व शून्नी
शून्य, विलयो पावे ॥ १५ ॥
ऐसे गुणी गुण विरमले मग स्वयं शून्य उरलें,
तें स्वरूप आपुलें, फुडे जाणा ॥ १६
जैसी कर्पूरदीपति, राणिवी लोपावे ज्योति, शेषि
उरे ते प्रति, स्वयं जाण ॥ १७ ॥
भरितें घटु भरितु, माहा शून्य पुरीतु, तद्भावे बिंबतु,
आपणचि ॥ १८ ॥
जैसि उदकामध्ये घागरि, तरत सबाह्यभ्यंतरी,
तैसा शून्य निरंतरी, सुखें असे ॥ १५ ॥
मनि मन विरालें, महा शून्य उरलें, तत्वसार
पावले, तेंचि तु जाण ॥ २० ॥
चित्त चेतना मुराली, निराळंभ झाली, शृति नेति
नेति बोलिली, रहस्य हे ॥ २१॥
श्रुतिरहस्य.
जे अप्रमेय अपार, सर्वज्ञचि सार, सर्वभूतिं अंतर,
तुंचि असमी ॥ २२ ॥
[१९]
,
अक्षय अविनाश, सारासार सर्वस्व, ब्रह्मादिकां
उपास्य, कैवल्य जें ॥ २३ ॥
जें अच्युत अनुगत, सदाशिव साक्षात, सानंद मूर्त,
अनामय ।। २४ ।।
जें युगांत शेष, घनाधन एक, अनुपम्य सुख,
सागर जें॥ २५ ॥
जें निरंतर उदीत, बहुतांसि बहुत, सर्वज्ञ शांत,
मंगळ जें ॥ २६ ॥
जे त्रिपदा गायत्री सार, अकाराक्षर, वेद वेध
गहर, पावन जें ॥ २७॥
जेथ सृष्टि होए जाए, महासुख विसंवलें राहे, ते तुं
प्रत्यक्ष पाहे, परीस पुत्रा ॥ २८ ॥
हे अचळ मूळ तुंचि, जे आदि अंतिं येकचि,
द्वैताद्वैत आपणचि, येथ भेदु नाहिं ॥ २९ ॥
जैसें भांगार आदि अंति, तेचि मध्ये भाव भजति,
परि वस्तु विचारेंचिं ति, तैसेंचि हे तुं ॥ ३० ॥
कांहिं चित्तिं नस्मर, तुंचि असमि निरंतर, तुंचि ये
तुझे उपचार, अर्पलोंच असे ॥ ३१ ॥
[२०]
मनोलय.
तुवां तुंचि मानले, तरि तुंचि अवघे झाले,
मनाचे गेले, मनपण गा ॥ ३२
पाहे पां विचारिं, तुचि अससी निरंतरिं, मनांचा
गहरिं, रिंगौनियां ॥ ३३ ॥
मनां माजि रिघ पां, ते रिघालेपण नव्ह पां,
नव्हलेपण सांडिं पां, सांडित्ये नसिं ॥ ३४ ॥
तेथ आणीक काय उरैल, आपणपांचि आपण असैल,
जेथ शब्दु हा खुंटैल, आपें आपु ॥ ३५ ॥
जें बोलतां न बोलवें, मनांसि न कळवे, तें
होउनि अघवें, असताच असे ।। ३६ ॥
पाहे पां तुंचि नाही, तेथ पाविजैल ते काइ, मग
ध्यानां कवणिं ठाइ, सामावणी ॥ ३७ ॥
आधी मनें उरावें, मग ध्यानातें धरावें, आता
असो हे आघवें, आणपांचि ॥ ३८ ॥
अगा हे अघवेंचि उकललें, कांहिंचि नाहीं गुंतलें,
मज प्रतीति आले, म्हणौनि बोलिलां ॥ ३९ ॥
[२१]
,
पाहें पां तुचि विचारिं, हे मन नाहीं ऐसें करि,
तरि तुजावां चौ निरंतरि, परिपूर्ण तुं॥ ४० ॥
जेविं उदकिं उदकबिंदु उठिती, विरालयां उदकचि
होति, तेविं आत्मस्वरूपिं होति जाती, भौतिकीयें ॥४१॥
तैसें चैतन्ये विकरलें, उंच नीच जालें, मध्ये
पदर पडत गेले, कल्पनेचे ॥ ४२ ॥
ते कल्पना तुझी वितुळली, चित्तवृत्ति नाशली,
भेदबुद्धी बुडाली, स्वरूपिंचि ॥ ४३ ॥
तें स्वरूपचि आपण, हे फुडें तुं जाण, वेदांत गुह्य
प्रमाण, परिस पुत्रा ॥ ४४ ॥
आधि रितें होआवे, मग धांउनि भरावें, भरीताच
असे स्वभावे, तरि भरावें काए ॥ ४५ ॥
स्वात्मविचार.
आपण आपणपेयां वोळगिजे, आपण आपणपेयां
न्हवण पूजा कीजे, आपण आपणेयां प्रसन्न होइजे,
तेथ भागतें कवण ॥ ४५ ॥
आपण आपणेयां ध्याइजे, सेव्य सेवकां होइजे,
पत्र पुष्प वाइजे, आपणपेयां ॥ १७ ॥
[२२]
मुंगियेचां ठाउनु ब्रह्मवरि, सभराभरीत बाह्यांतरि,
हैं आपण विचारिं, तुं शिष्य राजा ॥ ४८ ॥
येथ मि आणि तुंचि नाही, तेथ हा प्रपंच रिगेल
काइ, आपण आपणेयां पाहि, तुच अससी ॥ ४९ ॥
प्रकृति पुरुषां परौतें, जें नीच जंतुमात्रा खालौतें,
हे आपणचि निरुतें, तु फुडें जाण ॥ ५० ॥
जो मध्य ना सेवटु, भरितु ना वोहटु, जे अवघे
तुंचि निघोटू, तत्वसार पैं ॥ ५१ ॥
आतां हठमात्रा नलग, प्रवृत्तिका उमग, खात्म-
सिद्धि लाग, जेथे मी दिसे ॥ ५२ ॥
काहिं प्रवृत्ति निवृत्ति मानसिं, तर आपणपेयांनि मळ
तुजसि, आणि मि चुकसि, तरि गिवसिसि कोठे ॥५३॥
भने साध्यु म्हणिजे, तरि साध्यासि दुराविजे, नाहि
तरि मनाहिं ऐसे किजे, तरि साध्य सिद्धे ॥ ५४ ॥
कापुसु उगउं जाइजे, नातरि उगवलें असे, ते सहजें,
आपल्याचि ॥ ५५ ॥
पाहे पां पश्चिम दिशे जातां, आणि पूर्व दिशे
चालतां, तो पावे दूरवार्ता, पदापदा ॥ ५६ ॥
[२३]
,
ऐसें कांहिं प्रवृत्ति करौनि पावों म्हणिजे, तरि न
पौनि सिणीजे, नातरि निवृत्ति होइजे, तरि होणे
तेंचि तुं ॥ ५७ ॥
मन सरौनि मावले, तेथ उरे तेंहि निमाले, तरि माहा-
शन्य उघडले, तेंचि तुं पैं ॥ ५८ ॥
जे न मंधतां सांधणे, न पाहातां देखणे, न बोलतां
बोलणे, शुद्ध बुद्ध ॥ ५९ ॥
जे सकलगुण निधिवंत, सर्व प्रपंचातित, द्वैताद्वैत
व्यक्तिरिक्त, साक्षिभूत जें ॥ ६ ॥
जिवाचें जिव्हार, परमात्मा माहेर, आणि गुढांसि
गुढांतर, चैतन्य तें ॥६॥
जेथें शब्दशास्त्र हारपे, पुण्यपापें न सिंपे, नेति
नेति म्हणौनि वासिपे, वेदश्रुति ।। ६२ ।।
जेयासि सुशब्दाचा कळंकु, अनुवादाचा द्वेषु,
अद्वैतसि रोषु, स्वयं गुह्य ॥ ६३ ॥
जेथ जीव परमात्मेयांचि भांगारें हारपति, वेदांति
विचाराचे पाए न व्हाति, अद्वैताचिया अहंमति,
न लिंपोचि जे ॥ ६४॥
[२४]
,
जे रवमेव एकचि, तयासि तोंच, आपणयां आप.
णचि, होउनि असे ॥ ६५ ॥
जे अतीतासि अतीत सर्वा सर्व भरीत, ते हे तुंचि
अखंडित, जाण पुत्रा ॥ ६६ ॥
आतां बहुत काइ बोलावें, अवधैं तुंचि जाणावें,
एवं गुणी आपुलें बरवें, रूप जाण ॥ ६७ ॥
ऐसें बैर ग्य उपजलें, तुज तुचि प्रकाशले, तर
संसार हारपलें, स्वरूपिंचि ॥ ६८ ॥
एवं उपजले ज्ञान, ते तुंचि तुं आपण, तरि सुष्ट
गति गहन, पातलासि ॥ ६९ ॥
ऐसा आत्मबोधे बोधला, सुखशयनी सूतला,
असे गगनी निमाला, आपुलांचि ॥ ७० ॥
अवकाश शून्यातति, स्वयं शन्नी रतु, मन शेषि
तृप्तु, होउनियां ॥ ७१ ॥
कर्मलीला.
सहज शून्य भरितु, असे पुत्रा संततु, भुवनत्रयीं
विचरतु, स्वयं लीला ॥ ७२ ॥
[२५]
मत्तु, अनुचित्तें
अनाश्रय वर्ततु, निर्गुणातीत
कर्म करि तु, न बंधिजसि ॥ ७३ ॥
परि तेंचि अनुचित्त कर्म ऐसें, जें साक्षात परमानंद-
वशे, नेणौनि पाविजे आपसें, जाणोनियां ॥ ७४ ॥
जब ऐसें बोलिलें, तब शिष्याचे ध्वनित जाणितलें,
उचितानुचित उरलें, कैरयेनि किजे ॥ ७५ ॥
तैसा केवळ शुद्ध बुद्ध, जेथे मावळला लोकत्रय
संमधु, तरि अनुचित्त कर्न निषेधु, एथें कैचा ॥ ७६ ॥
ऐसें शिष्यचि, जाणितलें मनिंचे, तरि संतोषौनि
गुरुचें, हेचि वाक्य ॥ ७७ ॥
एहावं भोगु कां भोक्ता, कर्म का कर्ता, हें नाहि
चि तत्वता, ज्ञानियांसि ॥ ७८ ॥
जरि रात्रि दिवसाचिये घरोपरि, असति काय सूर्याचा
घरि, तरी शुभाशुभे दुसरि, होति तेयां ॥ ७९ ॥
येणे जाणे ऐसे, नेणतेयाप्रति दिसे, जरि कांहीं
जाणतया ऐसें, जाणीतले ॥ ८० ॥
जरि जाणीतले, तरि शुभाशुभ निमाले, पाप.
पुण्य गेलें, जळौनियां ॥ ८१ ॥
[२६]
पापपुण्यलय.
म्हणौनु आत्मबोधां पाहाले, तेयां पापपुण्य आंधारें
सरले, शुभाशुभ गेले, नाशौनियां ॥ ८२ ॥
ज्ञानियांच्या दृष्टी, पडलें भलें तैसेंहि कर्म नुठी,
तोकरूपां दोषशृष्टी, परि बाधिजे ना ॥ ८३ ॥
अथवा अभक्ष भाक्षलें, अपेया पान जाल, अहं कतै
केले, तेया बाधेना ॥ ८४ ॥
येहविं ब्रह्माहमस्मि बोधु, जया जाला निशुद्ध, तो
त्या पापपुण्य सन्मंधु, कदाचि नाहीं ॥ ८५ ॥
जन्हि महायज्ञ केले, कां माहापाप घडलें, केले
कर्म मनिहुनि सुनिटले, तरि कवण भोगी ॥ ८६ ॥
मन पाप पुण्य कर, उन्मनी भोगे जरी, पाप पुण्य
तरी, बाधिजे ना ॥ ८७ ॥
जैसा निरंजनी जळतु, सर्व तृणबीज जाळितु, तो
अग्नि का भोगितु, जळिनल्यातें ॥ ८८ ॥
तैसा अग्नीसादृश्य मुक्त, जो तत्वबोधरतु, विधि-
निषेधरहितु, बाधिजे ना ॥ ८९ ॥
[२७]
अगम्य घडले, अवध्यहि वधले, जरि मन प्रवर्तलें,
ऐसेयासि ॥ ९० ॥
तहिं तो न बंधिजे, पुण्यपापें न घेपिजे, लिपिजे
ना भुजिजे, भनमुक्त जो ॥ ९१ ॥
ऐसें केवढे अगाध, आत्मतत्व महाबोध, पुण्यपाप
फळउछेद, अविनाशु जो ॥ ९२ ॥
ऐसा गुरु तत्वोपदेशु केला, तव शिष्यु संतोषला,
आणि कृताकृत्य जाला, परिपूर्ण तो ॥ ९३ ॥
जिवभावां मुंकला, स्वयं
बोधे बोधला, गुह्य सुखें ॥ ९४ ॥
ध्येय ध्याता विसरला, अखंडितु जाला, समदृष्टी
मुक्तु मिसळला, तेया परी ॥ ५५ ॥
किंबहुना शिष्यु उपदेसिला, गुरुरहस्य पातला,
परि आक्षेपु केला, तो आइका ॥ ९६ ॥
अतःकरणिं सुटला,
,
आक्षेप.
तंव शिष्यु म्हणे जी ताता, मज कृपा केली आतां,
तुमच्येनि प्रसादे तत्वता, कृतार्थं जालां ॥ ९७ ॥
[२८]
तापत्रये होतां तापलां, तुमचेया कृपा निवाला,
परब्रह्म पातलां, अवाच्य जें ॥ ९८ ।।
गर्भवासु चुकलां, जन्ममरणां मुकला, जीव मुक्त
जाला, तुमच्येनि जी ॥ ९९ ॥
तुम्ही सर्वकळासपूर्ण, केला मिं परिपूर्ण, पण विन-
उनि पुसैन, तें सांधिजो जी ।।८००॥
मुक्तामुक्त कर्म केलें, करून मन उदास जालें तें
न बंधे ऐसें बोलिलें, तें कैस्येनि जी ॥१॥
असंभाव्य कीजे, आणि तेणें न बंधिजे, ऐसी मज
नुपजे, प्रतीति हे ॥ २ ॥
देखा पा समर्थाचें रीण काढिजे, परि मर्यादांति
घेइजे, काटुन न काढिल म्हणिजे, धरूनियां ॥ ३ ॥
तैसें केलेयां न केले म्हणजे, मनें उदास होइजे,
पण तेणीच बाधिजे, जेया परी ॥४॥
समाधान.
तंव गुरु म्हणती सांधैन, आंगावरि काढिलें रिण,
तो पातला मरण, तरि कवण मागे ॥ ५ ॥
[२९] तैसा मनें मनि मेला, तरि कर्म भोगु चुकला, येरा प्रतिग्रहो ठाकला, अप्रचेया ॥ ६ ॥ आक्षेप, तंव शिष्यु म्हणे अवधारां, हे प्रतीती आले उत्तर, पण संशयो माघारा, वर्ततु असे ॥ ७ ॥ तोही परियेसा सांधैन, विषयांवरि दावीन, दृष्टांतु बोलैन, आणिकु येकु ॥ ८॥ ब्राह्मणाची विधवा नारी, साशंकित पुरुषसंगु करी, ते गर्भाभिळाषु न करी, परि गर्भसंभवु होयेचि किं ॥९॥ जरि उदास वर्तली, आणि चोरिया प्रवर्तला, गुर्विणी झाली, जेयापरी ॥ १० ॥ तरी तो काय तिया मनोरथु धरिला, मग तियेप्रति फळला, तार इछेविण जाला, गर्भु केवि ॥ ११ ॥ ते गर्भविर्षि उदास, हा कीर भर्वसा, तरि संभवला आपैसा, गर्भु वाढे ॥ १२ ॥ एवं शिष्यु बोलिला, तंव गुरुनु दृष्टांतु दाविला, उपपत्ती आणिला, त्याचिये पैं ॥ १३ ॥ A.
[३०]
समाधान.
,
गुरु म्हणे उपाओ नेणती, तयां गर्भक, बांधती,
येरी क्षारादिकें गाळिती, जाळीनियां ॥ १४ ॥
जैसा बिंदुप्ररोहो न पवे, तैसे उपाय जाणावे, वोषधि
जाळावे, गर्भग्थान ॥ १५॥
कां गर्भ संभवला जीर, आइकै सल होतें परि, तिक्त
क्षारिं, नास्ति कीजे ॥ १६ ॥
ते क्षार पथ्यकरी, तरि गहुँ जिरे जठरि, सवेंचि बाहिरी,
गळौनु पडे ॥ १७ ॥
तैसें नांव क्षार, सर्व कल्मष संहार, कर्म फळ थार,
होंच नंदी ॥ १८ ॥
अंतरि तत्वावलोकन वर्ते, मना प्रतीती परौतें, तत
क्षणींचि निवर्ते, कर्म गर्भु ॥ १९ ॥
अवळोकन ऐसे, जे शुद्ध जाणणे असे, समस्त
दोष दृष्टि से, रुसणे नसिं ॥ २० ॥
भिं जाणणे किं रुसणे, तेंहि गीळिजे जेणे, आणि
केवळ उरे जे असणे, तोंच ते जाण ॥ २१ ॥
[३१] ऐसा जो बोधु, तो समस्तां दोषां करि वधु, आणिकु येकु येकु बाळबोधु, बोलु परिस ॥ २२ ॥ तो दृष्टांतें तुं परीयार्स, लोह लागले परिसेंसि, तें सोनें होय अन्यासि, सूवर्ण ते ॥ २३ ॥ तरि तें काळेपण ते गेलें, परि तेंचि उजळ जालें, तेविं पशुपाश किटले, प्रबोधतां ॥२४॥ कां ज्योति तमी प्रवेशे, आणि अंधकारु जातु न दिसे, तोचि प्रकाशे अनायासें, तेजगुणे ॥ २५ ॥ तैसे तत्वतेज निर्मळ, तेणें अज्ञान होय उजळ, निवर्ते अवलिला, कर्मतम ॥२६॥ कामना न धरीतु, कर्म करी तो मुक्तु, अवलोकितु, प्राप्तु तो गा ॥ २७ ॥ शिष्योहार. एवं विधिं दृष्टांति, शिष्यासिं आलें प्रतित, म्हणे फिटली जि भ्रांति, तात्कालाचे पैं ॥२८ ।। संशय सल फिटले, मन निशल्य जालें, मग म्हणे जी उद्धरीलें, कृपा करूनि ॥२९॥ मुक्तु, तत्वदृष्टि
[३२]
शिष्यू म्हणे ताता, निःसंशय जालां सर्वथा, परब्रह्मे-
आ तृप्तां, केलें मातें ॥३०॥
मानसें मनोरथु पुरला, आणि स्वात्मबोधार्यु बाणला,
दुस्तरु तरला, भवसिंधु हा ॥ ३१ ॥
जि तुम्हां देवांचि उपमा देतां, न्यून हे सर्वथां,
कैवल्य ज्ञान मज पाहाता, तुम्हिचि जी ॥ ३२ ॥
अंतष्करणी बोधला, मग स्तुति करू लागला, तव
गुरु निवारिला, संकेते तो ॥ ३३ ॥
म्हणे रक्षिलां जि ताता, म्हणौनि चरणावरि ठेविला
माथा, हे तत्व पाहाता, त्रुप्ति नाहीं ॥ ३४ ॥
हे मनचि नाहीं सर्वथा, ते अनुपम्य साधतां, या
आत्मसुखा आहेता, तुम्ही केलि ॥ ३५ ॥
गुरुचें सांगणे.
तव गुरुमूर्ति म्हणे पुत्रा, येथ तुजचि आहेता, हे
आणिकासि सर्वथा, सांघो नये ॥ ३६ ॥
हे तुवांचि जाणावें, आणिकांसि न सघावे, सृष्टि-
घातकां न व्हावें, आइक पुत्रा ॥ ३७ ॥
[३३]
जो संसार सुखातीतु, आणि वैराग्य युक्तु, तो
करावा तृप्तु, येरां सांघावें नां ॥ ३८ ॥
जेया विषयसुख न सरे, वैराग्य नाहिं पुरे, सांघितले-
यांहि न पुरे, कांहिं केलें ॥ ३९ ॥
म्हणौनि तें सर्व गोप्य करावें, तुवांचि जाणावें, गुरु
म्हणे न सांघावे, कव्हणा प्रति ॥ ४० ॥
ऐसेंहि जरि सांधितले, तरि तुवां काये जाणितलें,
मूर्खासि येइल वहिले, प्रतीति कां ॥ ११ ॥
जे विषयसुषे भुलति, ते ब्रह्म केवि जाणति, बापुडे
ठाकति, चोचावले ॥४२॥
म्हणौनु सांघितले नेणति, विचंबले ठाकति, भ्रष्टा-
भ्रष्टिं सिणति, गर्भवासिं ते ॥ ४३ ॥
आतां जाणावें निगुते, नेणणें रिगों नेदावें तेथें,
एहावें गर्भवासि बहुतें, दु:खें असति ॥४४॥
प्रश्न
गुरु ब्रह्मोपदेशु करिति, एर ते सवेंचि विसरति,
तयां कवणि गति, शिष्यु पुसे ॥ ४५ ॥
[३४]
उत्तर.
,
तंव गुरु म्हणे महामति, आतां परिस ते गति,
इच्छेच्या पावति, योगातें ते ॥ ४६॥
ते उत्तम कुळिं जन्मति, शुचि प्राज्ञ होति, आणि
विधियुक्त भक्ति, करिति ते ॥४७॥
मग तोषे अनुक्रम पावने, पावे देवत्रय चिन्हें,
तेयांचेनि माने, आयुष्य भोगा ॥४८॥
मग तो मर्त्यलोकी उपजे, माया मोहें न घेपिजे,
आणि स्वयं ज्ञान सहजे, योगु पावे ॥ ४९ ॥
शंका.
तव शिष्य म्हणे परियसा, तया तत्वज्ञा विधि
काइसा, जो उतकर्षु स्वेच्छा, सर्व कर्मि ॥ ५० ॥
निरसन
तंव श्रीगुरु म्हणति, तेया देवांचि विघ्ने पडति,
त्ये तेया करिति, उपसर्ग ॥ ५१ ॥
कव्हणी येकु ज्ञानाचिया चाडा, रिगाला वैराग्या
फुढा, तव देवाचा धाडा, पडला तेया ॥ ५२ ॥
[३५]
,
ज्ञान जाणावे या लागि, लागला गुरुचा संगि, तरि
देवाचा आंगि, अग्नि जळे ॥ ५३ ।।
कव्हणा एकाचा विचारिं, देखिलि ज्ञानाचि उजिरि,
तरि कुदळिधात वरि, आरोढिले ॥ ५४॥
देखा पां शुकदेवो चालविले, रंभेचे पोट चिरबिलें,
ऐसें अकृत्य केलें, केसणे पैं ॥ ५५ ॥
संन्यासि कां तापस, ज्ञानहनि बहुवस, ते घडिये
खापर सादृश्य, करून फेडी ॥ ५६ ॥
जरि म्हणसि कवण, तरि सान ते जाण, लोष्ट
कपालि सहितु आपण, इदृ देखे ॥ ५७ ॥
हे बलि अविद्या करिति, उपसर्ग चितिति, आमचे
पद इछिति, म्हणोनियां ॥ ५८ ॥
एहविं ज्ञानें जो सरिसा, तयासि विघ्नलेशु काइसा,
हे साधकाचि दशा, सांघितली ॥ ५९ ॥
प्रसादप्राप्ति.
तव शिष्ये विस्मयो केला, अंतष्करणी संतोषला,
मग चरणा लागला, श्रिगुरुचेया ॥ ६ ॥
[३६]
,
,
चरणावरौनु उठविला, समीप बैसविला, मग म्हणे
देवाहुनि आगळा, केला तुम्ही ।। ६१ ॥
हर्षविनादें फुडा, नाचतु गुरुपुढां, तविचि म्हणे
मज गोड, दिधलें खामि ॥ ६२ ॥
गुरुचरण मस्तकी ठेविले, आणि पोटसि धरिले, मग
हात पसरिले, प्रसादासि ॥ ६३ ॥
गुरूनि मूखिचा उगाळु दिधला, महाप्रसादु म्हणौनि
येरें घेतला, मग शिष्ये पुसिला, सिद्धपंथु ॥ ६४ ॥
,
सिद्धपंथ,
शिष्यु म्हणे ताता, कवण कवणा प्राप्ता, या वस्तू
तृप्ता, अनंत सिद्ध ॥ ६५ ॥
आदिनाथा प्रसादें, उमास्वामिसवादें, मछिंद्र प्रबोधे,
प्रकट जाले ॥६६॥
जो पद पिंड ज्ञाता, निगाले करचरण दृष्टांता, तो
जाण चौरंगी सिद्धांता, कुळ दिपकु ॥ ६७ ॥
श्रीगोरक्षनाथु, देह सिद्धि सिद्धांत, परमतत्व
विख्यात, आचार्य जाण ॥ ६८ ॥
| ३७]
श्रीमुक्तादेवी योगीनि, जे समस्त सिद्ध शिरोमाणि,
तिये प्रसादें चक्रपाणि, ज्ञानसिध्दु ॥ ६९ ॥
जळांधरु मेडकि कंथडि, धुंधडी, कापडि, विरू-
पाक्षु ॥ ७० ॥
सर्व सुसावेरी, नागार्जुन कणेरी, लुइलाला कुकरि,
रत्नघोषु ॥ ७१ ॥
कान्हु कुदाळि, दारिपु कलालि, भुसकु कांबळि,
कोरंटकु ॥ ७२॥
चर्पटि कर्पटि कांसारि, चाटु भाटु कुंभारि, कनखळु
मेखळ चमारि, साति तांति ॥ ७३ ॥
घटामहिषु चोखली, सर्व भक्षकु सिद्ध वरली, काश्यपु
चिहाळी, घटु मनाक्षु ॥ ७४ ॥
पंकजु दुखंडि, लिचका परखडि, जळांधरु कवडि,
निर्गुण भंगी ॥ ७५ ॥
कुमुदु गुडरी, वोडिका कावेरी, पाहाणु सागरी,
अजपा बोधि ॥ ७६ ।।
अवधुतु गुंड मराउळ शबरी, मनु अजगीरि,
जिराबाई खेचरी, देमादेवी ॥ ७७ ॥
[३८]
भादु माहिळु चिंचणी, धामु धूम्र टिटिणि, अतिबलु
महाबळु माथणी, गोविचंदु ॥ ७८ ॥
बोधि जनंदु, कपाळि सामचंदु, भर्तुरि बिजयचंदु,
ताल्हा तेलि ॥ ७९ ॥
चंडाळि हाडि, डोंकि घोडा चुळि, गोदाइ थाकडि,
विमळनाथु ॥ ८० ॥
वणकाकळि, षडगु कोकावळि, मेदडि सुतली,
सर्व भक्षु ॥ ८१॥
हरिध-
BPIDHINDI
2...
देव, पर
शिवा परौती धांव, महिमसि गा ॥ १२ ॥
गुरुभक्ति.
ईश्वर वाचा एसीचि, सर्व शारे सिद्धांत तैसेचि,
तरि तुं गुरुद्रोहो कहिंचि, पडों नेदिं ॥ १३ ॥
गुरु जेथौनि देखिजे, तेचि लोटांगण घालिजे,
कां जिये दर्शि आइकोजे, नमस्कारिजे तया देशा ॥१४॥
[३१]
गुरुस्थानिहुनि आले, कां गुरुकथन केलें, येर
व्यापार राहाले, आइकावे या ॥ १५ ॥
ऐसी अनन्य भक्ति, तेचि उत्तम पुरुष असति,
आणि गुरुभक्ती परौति, सिद्धि नाहीं ॥ १६ ॥
देहे मनें वाचा, गुरुसेवे आदरु जेयाचा, तरि
शिवोस्मि हो तेयाचा, बोधु वाढे ॥ १७ ॥
अज्ञान निःशेष जाये, केवळ ज्ञान राहे, आपण
आपण पाहे, गुरुसेवा पैं ॥ १८ ॥
ऐसे आपणप्यनि फलले, जें अटक गुरुसेवाबळे,
परि गुरुवचन केवळे, उलंघावें ना ॥१९॥
गुरु करिती ते न करावे, गुरु बोलती ते न बोलावें,
आणि गुरुचें न चोरावें, कांहिंच गा ॥ २० ॥
गुरु सांघती तें कीजे, गीत कां शास्त्र नोचरीजे,
गुरुसिं पाठांतर न कीजे, गीत शास्त्रिं ॥ २१ ॥
गुरु जिये आसनी बैसति, कां भुवनी जिये वसती,
तिये सेवाबुद्धि पूजीजति, चित्तशुद्धि ॥ २२ ॥
गुरुचे गुरु तेही मनी धरीजती, गुरु तत्विं पूजी-
जति, गुरुनाममाळा वाइजती, वैखरीसि ॥ २३ ॥
[४०] गुरुद्रोह ऐसें जो न करी, तो आपणपेयां वैरी, आणि निरययोनि माझारि, पडे तो पैं ॥ २४ ॥ जे गुरुसि वादु करिती, आणि वेद निंदा करिती, ते ब्रह्मघातक होती, महापातकी ॥ २५ गुरु वचन मनिं न धरिती, गुरुसिं अहंकार करीती, तो जाचिजे अघोरिं, गभवासि ।। २६ ॥ गुरुवचनांचेनि अहंकारें, कुकर्मे पतितु आचरे, आण गुरुचें विसुरे, नाहि करी ॥ २७ ॥ ज्ञानी जो विविधु, ऐसा जो असे समंधु, तो लोपौनि अपवादु, आचरे जो ॥ २८ ॥ तो कल्प संख्या वर्षे, असे तो अवगती मुखें, भोगौ- नियां निभिषे, रोगिया होए ॥ २९ ॥ जन्हीं जाला त्रिकाळवेत्ता, सिद्ध लक्षणी पूरता, परि गुरुत्यागें सर्वथा, नरक भोगी ॥ ३० ॥ जेणें गुरुसेवा लोपिली, प्रमाणक्रिया लंघिली, तेणें अधोगती आपुली, वृत्ति केली ॥ ३१
४ि१]
,
जो गुरुतें त्यजूनु जाए, निंदा पैशुन्य खाए, तो
पापिया योगी नव्हे, वस्तु करूनु ॥ ३२ ॥
ऐसिया अभक्ती, आपुले गुरु लंघिती, मगआणिकर्सि
करिति, पुश्वळीकें ॥ ३३ ॥
पहिले येकुरुकरीती. एकुचि दिसु मानिती, मग
नावडे तरि करीती, आणिकु येकु ॥ ३४ ॥
ऐसे गुरु सांडोवे करिती, तैसेचि गुरुद्रोहिं पडती,
तयाचि परी भोगीती, गर्भवातु ते ॥ ३५ ॥
गुरु करावेया करिती, मग करुनियां सांडिती, हीण
ते त्यजीती, पापबुद्धी ।। ३६ ।।
तेयां गुरुवधाचे पाप धडे, आणिक शिवद्रोहो पडे,
ते अधोगती रोकडे, घालीजती ॥ ३७ ॥
प्रश्न.
तंव शिष्यु म्हणे स्वामी, कांहि येक पुसैन जी मि,
तें प्रसन्न होउनि तुम्ही, सांघावे मज ॥ ३८ ॥
एक खंडज्ञानी लागले, येक मंत्रयत्रिं जडले,
अधमोपदेशि पडले, अघोरे पैं ॥ ३९ ॥
[४२]
,
तंव गुरु म्हणती, ते आधिंचि कां नेणती. मग
करूनियां करिती, विचारु कां ॥ ४० ॥
ते साच किं लटिकें, हे आधिचि जाणावें निके.
नाहिं तरि साशंके, पात्र होइजे ॥ ४१ ॥
आधीं धडफुडें विचारिजे, मग गुरु कांजे, जेवि
कुळकन्या वरिजे, जाणौनियां ॥ ४२ ॥
मग केलेयावरि ऐसी, हे चिखिमिखी काइसी,
पीर आणिकु परियोस, उपाओ असे, ॥ ४३ ॥
तरि जयाचा अनुग्रहो आधि, तयातें पुसावें त्रिशुद्धी,
ते आणिकी ठाई बुद्धि, करूं लाहे ॥ ४४ ॥
कां आधिला गुरुचनि अभावं, आणिका गुरूतें भजावें,
तै दोषातें न पवे, साधकु तो ॥ ४५ ॥
गुरु देवंगत होती, कां दिपांतरा जाती, तेया
वांचूनु आणिके ठाइं संगती, करूंचि नये ॥ ४६ ॥
जो योगु पहिलिये ठाइ सांघती, तोचि संवादु
आणिकी ठाई देखती, तरि आधील गुरु मानिजती,
त्रिशुद्धि गा॥ ४७ ॥
[४३]
येहवि कपाळी जडे, नाथिला दोषु घडे, जै आंधळे
पडे, कराडिसि ॥ ४८॥
निर्देवें मानें शुद्ध नव्हति, मग गुरूवार गुरु करिति,
ते तैसेचि लोटिजति, अधोगति ॥ ४९ ॥
सदेव तो कोलि भला, जेणे मातियेचा द्रोणु केला,
तेयाचा ऐसा विश्वासु जाला, तरि आसिद्ध कवणु॥५०॥
कां सति सावित्रि होउनि, लग्न लागतांचि निधान,
भर्ताराचें आइकोनि मन, दृढ चित्त केले ॥ ५१ ॥
ऐसा विश्वासु जेथें, ते तत्पुरुषु निगुते, जे लोटतेयां
जुगां भागुते, स्थिर करिती ॥ ५२ ॥
जो पहिला संकल्पु उठिला, तो तेणें साच केला,
तरि शिष्यधM चालता केला, सदैवे तेणें ॥ ५३ ॥
एव्हावं गुरू काजे, तो मना नये तरि आणिका भजि-
जे, तरि गुरुद्रोही कोठे ठेविजे, अधर्मेसि ॥ ५४ ॥
ऐसा अप्रमादु न घडे, तेयाचें ज्याले वाढे, आणि
जिवे ते पुढे, तेया ठाके ॥ ५५ ॥
म्हणौनि प्रयत्ने सेवा कांजे, मनोवृत्ति भंगो नेदिजे,
अवज्ञाने देखिजे, गुरुदेवासि ॥ ५६ ॥
[४४
,
ईश्वरादिक कोपति, ते श्रीगुरूनि राखिजति,
आणि श्रीगुरु कोपति, तरि कवणु राखे ॥ ५७ ॥
जो गुरूचा मनी नुरोच, तो असतां बोधु न पवेचि,
कर्मिरूप बसेचि, अर्धकृपी ॥ ५८ ॥
गुरु येणे आकारें, उमासहितु हरिहरें, बसिजे
चराचरें, श्रीगुरू मुर्ति ॥ ५९ ॥
ब्रम्हाकोटि मध्यस्तु, जितुके काहिं वर्तत, तें
श्रीगुरु चरणीं वसत, नितिवंत पैं ॥ ६ ॥
गुरुचरण सेवौनि, आगि हात लावौनि, जिये जळें
येति स्पॉनि, तिये तिर्थरूपें ॥ ६१ ॥
गूरु तिर्थरूप जाणिजे, अवज्ञाभेदे न देखिजे,
द्रोहो पडो नेंदिजे, दोषदृष्टि ॥ ६२ ॥
हे सिद्ध धर्म साधिति, जे ईश्वर बोलिजति, ते
आम्हि तुजप्रति, सांघितले ॥ ६३ ॥
प्रश्न.
तव शिष्यु म्हणे ताता, गुरु सेविजति आत्महिता,
पीर प्रमादवशे अवचिता, द्रोहो घडे ॥ ६४ ॥
तरि जे याचेया उत्तर, गुरुद्रोहो घोष निस्तर,
ऐसेयाच्या उपसारा, सांघिजो जि ॥६५॥
उत्तर.
तव संतोषोनि गुरुनाथे, म्हणितलें शिष्यातें, आगा
गुरुद्रोहो निवर्ते, गुरुकृपा वि
....
" से शिष्यु म्हणे, आतां जाणिजैल कवणे, मज
बोलतांचि अवघडवाणे, बोलणें जें ॥ ९२ ॥
जें हालऊनि न हालणे, नेदखौनि देखणे, सघण-
वट असणे, व्योम जैसें ॥ ९३ ॥
जे जाणणेंचि केवळ, स्वरूपचि निश्चळ, ते म्यांचि
मि निष्फळ, जाणितलें जी ॥ ९४ ॥
ऐसें जाणणे निवडलें, जैसें पाहलाच पाहालें, तेंचि
तें लाधलें, भ्यांचि मातें ॥ ९५ ॥
ऐसा बोधाचा केवल, केला मज सुकाळु, की जाणावें
या अळुमाळ, उरेचि ना ॥ ९६ ॥
[४६]
,
"
,
,
किं जाणणेचि जालें, किं जाणावें या मूळ आले,
आतां द्वैतभाव गेले, नाशौनियां जी । ९७ ॥
आतां जैसें असें तैसें, असतचि असे, असणेंचि
असे, अदृश्या शिउ ॥ ९ ॥
ऐकांतासि येकांतपण, परिपूर्णी परिपूर्ण, चतुष्टयासि
कारण, निर्गुण जे ॥ ९९ ॥
जे येकलेचि येक, आणि शषासि शेष, सुखासि सुख,
सुखचि जें ॥१००० ॥
ॐ सदा तृप्त नृप्तवंत, आपणांपांचि निवडत, आपण-
पेंचि आपण असत, आपणपेंसिं ॥१॥
तुम्ही कृपादृष्टी पाहिलां, मग आपणपेंचि उठिला,
किं उठिलेपणे जालां, आपणपेंचि ॥ २ ॥
आणि आपणपेंविण कांहिं, विश्विं दुजेंचि नाहि,
अंतिं बोलणेयांचि लिहि, पुसिली जी ॥३॥
आतां बोलणेयांचा मागु मोडिला, चतुष्टयाचा
ठाओ फेडिला, तो पैलुपारु पातला, तत्वकृपा ॥४॥
तुमचिया कृपेच्या भरोवरी, प्रपंचा केली बोहरी,
की दुसरेपण निदसुरी, सांडोनि गेलें ॥५॥
[४]
आतां संसारशंका फीटली, पंचमहद्भूतिं भूतें
विरमलिं, ऐल पैला मिळालिं, भवबीजेंसिं ॥६॥
जिवाची जिवदशा गेली, आणि शिवाची विवंचना
ठेली, स्वमेव प्रतीति जाली, अबोलणें जें ॥ ७ ॥
जी म्यां आपण देखिल ऐसे, न देखणेयां सारिखे
जैसे, नेगणेयां सारिखें असे, एकचि जें ॥ ८ ॥
ऐसें जे ब्रह्म अमित, अंतर्बाह्य भरीत, संपूर्ण दावित,
जालेपणें ॥ ९॥
भिंचि तें हा जाला,
शिष्यु बोलावें तें बोलिला, मग निवांतु बोल
नुठेला, अवळोकुं लागला, गुरुमूर्ती ॥ १० ॥
ऐसा श्रीगुरूचि जाला जाणीतला, प्राप्ती हा पातला,
आतां स्वरूपि आपुला, घालुं यासि ॥ ११ ॥
गुरु म्हणती शिष्यु मुक्तु भला,
आतां करुं आपुलां, निजभक्तु ॥ १२ ॥
तंव श्रीगुरु जाले प्रसन्न, पसरौनि विशाळ वदन,
जैसें उजळलें गगन, चंद्र बिंबिं ॥ १३ ॥
मग श्रीगुरु म्हणती शिष्यातें, आतां तुं प्रवेश गा येथें,
पावलासि मातें, अभेदरूपें ॥ १४ ॥
[४]
ऐसा ध्वनि आइकिला, तंव शिष्यु मुखिं प्रवेशला,
जैसा प्रकाशु मीनला, प्रकाशासि ॥ १५ ॥
कां समुद्रिं समुद्रु मिसळला, कां आकाशिं आकाशा-
लयो जाला, हरिहरां जाला, ऐक्यवादु ॥ १६ ॥
तैसे उभयतां मीनले, ब्रह्मतेज येकवाटले, गुरु
राशि वाढीनले, असंख्यात ॥ १७ ॥
गुरुनु शिष्याचा घोंटु भरूनु, आपणयांहिं मिठी
देउनु, प्रतीतिमागु सांडौनु, राहिला पैं ॥ १८ ॥
आतां मागां पुढां एकुचि, घनदाट गुरुचि, तया
सुखा न येचि, रूप करूं ॥ १९ ॥
गुरु शिष्य येक जाले, तें जालेपणहि गेले, गेले-
पण राहिले, वटेश्वरि ॥ २०
ऐसा शिष्यु गुरुभक्ति बोधला, वेदगुह्य पातला,
कविता धर्मे संपला, प्रबंधु हा ॥ २१ ॥
हे चतुर्विध भक्ति, हा पांचवां पुरुषार्थ जाणती,
ते कष्टिं समाप्ति, पावविली ॥ २२ ॥
महाटी बोलिलां आरज,
बाळबोधपणे विरज,
गुरुवटेश्वरि वाइली पुजा, चांगा म्हणे ॥ २३ ॥
pare protecteelaie andpavesh Aleyafone testafter
ANNEL HENBE
LEELPEKC
ETELLStrinyurl-1E
e belle des normes bagustibiphishbipet
ARELela14E
AiLalth! 2 milareills
HTonsilam.balvanthete
sh TENAL-HELL
RELATEMBER
MERAEILLL
1011 (11302:12
一
-
[४९]
सर्व तीर्थ यज्ञ फळ, पाविजे अवलिळ, हे कथा
परिसतु निर्मळ, श्रोते वक्ते ॥ २४ ॥
वटेश्वराचा सुतु, चांगा म्हणे अवधुतु, सिद्धसंकैतें
मातु प्रगट केली ॥ २५ ॥
हा ग्रंथु पावला समाप्ति, तै शााळवाहनु शकु
किती, कवण संवत्सरु मासु तिथी, वारु कवणु ॥२६॥
कवण क्षेत्र स्थान देवता, कवण गंगा तीर्था, कैसी
महिमा कवणु सेवित, पृथज्ञ सांघों ॥ २७ ॥
शकें चौतिसें बारा, परिधावी संवत्सरा, मार्गशिर
शुद्ध तीज रविवार, नामसंख्य ॥ २८ ॥
हरिश्चंद्र नान पर्वतु, तेथ महादेओ भक्तु, सुर
सिद्धगणी विख्यातु, सेविजे जो ॥ २९ ॥
हरिश्चंद्र देवता, मंगळ गंगा सरित', सर्व तीर्थ
पुरविता, सप्तस्थान ॥ ३० ॥
ब्रह्मस्थळें ब्रह्म न संडितु, चंचल वृक्षु अनंतु, लिंगिं
जगन्नाथु, महादेओ ॥ ३१ ।
ऐसा सर्वांचा समाओ, कळी संसारु दुःखाचा प्रवाहो,
ता देओ मोक्षाचा उत्साओ, शनैः शनैः ॥ ३२ ॥
[५०] क जो तीर्थासि तर्थि, केदारोंसिं तुकिताति, आणि क्षेत्रिं निर्भाती, प्रबंधु हा ॥ ३३ ॥ आतां गणनाथ सरस्वती नमस्कार दिनप्रती, जिहिं योगनिर्वाणसमाप्ति ग्रंथु नेला ॥ ३४ ॥ इति गुरुशिष्य संवादे, तत्वसार प्रबंधे, कथिलें वटेश्वरप्रसादे, योगरहस्य हें ॥ ३५ ॥ ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ, वोविया दसाडशत रत्न- माळ, वाइली वटेश्वरचरणयुगळ, चांगा म्हणे ॥३६॥ ॥ इति श्री गुरुशिष्य संवाद तत्वकार पूर्णामिति ॥ ॥ शुभं भवतु । श्री वटेश्वरार्पणमस्तु ॥ शके १४८३ दुर्मतिनाम संवत्सरे अषाढ शुद्ध १ शुक्र तहिने पाथर्ग स्थाने केदारलिंग समीपे बोप पाठकन इद पुस्तकं लिखितं ॥ शुभं भवतु ॥ लेखकपाठकयोर्विजयी रस्तु ॥ शिवार्पणमस्तु
टीपा.
ॐ नमः कुंजरेश्वराय--हा प्रणाम ग्रंथलेखकाने केलेला आहे की ग्रंथका
चांगदेवाने, हे सांगणे कठिण आहे. कुंजरेश्वर नांव संस्कृत वाङमयांत उपलब्ध
नाही. याचा अर्थ गणपति होऊ शकेल किंवा हे एकाद्या कुलदेवतेचेही नांव
+
असू शकेल.
,
(१)
म्यां--जुन्या मराठीत म्यां, मियां व क्वचित् मेयां अशी रूपे आढळतात.
संस्कृत मया' वरून ही रूपं झाली आहेत.
गगेश्वर--गणपति. अकारांत नामें, विशेषणे व कांहीं धातुसाधितें जुन्या
मराठींत उकारांत वापरलेली आढळतात.
कल्मक्षवनकुठारु--वापरूपी वनाचा नाश करणारा. 'कल्मक्ष' हा शब्द
सं. 'कल्मष' याचा अपभ्रंश आहे. अशा प्रकारची रूप मराठी जुन्या वाङमयांत
हवी तेवढी सांपडतील. याच ग्रंथांत अशा रूपकांची रेलचेल कमी नाही. 'कल्मष
ध्वंसकारी' पद हितोपदेशांतही सांपडते.
(२)
सौजन्यांचा अंकुरु--चांगलेपणाचा कोंभ. प्रथम पदावरील अनुस्वार
लेखकप्रमादाने आला असावा. वरील प्रकारचेच हेही रूपक आहे पण येथें समास
न वापरतां विग्रहवाक्य वापरले आहे.
शब्दब्रम्हविद्या -वेदविद्या.
उन्मेष--या शब्दाचा मूळ अर्थ डोळे उघडणे असा आहे. यावरून पुढे
याचा अर्थ अज्ञानांधांचे डोळे उघडणारे ज्ञान असा झाला. येथे याच अर्थाने हा
शब्द आला आहे. ज्ञानाचा तरुवर हाच खरा कल्पवृक्ष म्हणजे ज्ञान हेच
खरोखर कामना पूर्ण करणारे आहे.
-
(३) डुल्लत्तु-डुलत असतो. या प्रकारच्या धातुसाधित विशेषणाचे रूप प्रायः उकारांत सांपडते. शेवटील तकाराचें द्वित्व मागील लकाराच्या द्वित्वामुळे आले आहे. अभिनवितु--अभिनय करितो. 'य' चा 'व' झाला आहे. (४) कुविद्याभरणहुताशनु--चांगदेवाने या ओंवींत अविद्या व कुविद्या यांतील भेद मोठ्या गमतीने दाखविला आहे. अविद्या म्हणजे विद्येचा अभाव हा स्वा. भाविक असतो. विद्या शिकण्यापूर्वी प्रत्येक मनुष्य अविद्यच असतो. म्हणून अविद्येस स्वाभाविकपणे वाढणाऱ्या गवताची उपमा दिली आहे. पण कुविद्या ही स्वाभाविक नसून स्वतः मिळविलेली असल्यामुळे कृत्रिम व म्हणूनच अलंकारा सारखी असते. अलंकारा प्रमाणेच कुविद्येचीही माणसास ऐट असते. चांगदेवास स्वतःच आपल्या कुविद्येची जाणीव असल्यामुळे त्याज कडून हा भेद दाखविला जाणे अपरिहार्यच होतें. ज्ञानाग्नीस अविद्या तृणास जाळणारा पण कुविद्या- भरणाची आहुति खाणारा मुद्दामच म्हटलेंसें वाततें. ज्ञानाज्ञी-ज्ञानाग्नि, असा पाठ हवा. गिरिजे शंभुचा-गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा व शंभु म्हणजे शंकराचा. चांगदेवाच्या भाषेतील हे प्रथम पदाचें सामान्यरूप ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हिंदीत हा प्रघात सरसहा चालू आहे. (६) वाचा प्रदक्षिणा करुनु-वाणीनें प्रदक्षिणा करून. वाचा हे संस्कृत तृतीयैक- वचनांत रूप मराठीत बरेच वेळ तसेंचे तसेंच सांपडते. उदाहरणार्थ कायावाचा- मनें. आणखीही काही संस्कृत रूपें मराठीत तशीच राहिली आहेत. जसें राजश्रिया विराजित. ऊन प्रत्ययांत धातुसाधित अव्ययाचे उकारांत रूप श्रीशिवाजी माहराजांच्या वेळच्या पत्रव्यवहारकालापर्यंतही सांपडते.
साष्टांगि प्रणमनु-साष्टांग नमस्कार. 'प्रणमनु' हे रूप 'प्रणमनु' असें पाहिजे. कारण येथे हे ऊन प्रत्ययांत धातुसाधित नसून नाम आहे. साष्टांग नमस्काराची प्रथा महाराष्ट्रांतील असून ती अजूनही 'सा. न. वि. वि.' यांत संक्षेपानें विद्यमान आहे. 'साष्टांगी नमन करूनि आठ वण' या आर्याचरणांत पंतांनीही साष्टांग नमस्कारांमुळे दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती व शिर या आठ अंगांस घट्टे पडण्याच्या प्रघाताचा उल्लेख केला आहे. (७) मूळिका--मूळ, मुळो. काश्मिरीची नायिका-विद्येची अधिदेवता. काश्मीर देश दहाव्या शतका पासून बाराव्या शतकापर्यंत विद्येचे माहेरघर झाल्यामुळे त्याकाळी काश्मीरी हा शब्द विद्या किंवा विद्वानांचा वाचक झालेला होता. बुधीसी-बुद्धीस. वागेश्वरी-संस्कृत वागीश्वरी' चे मराठी अपाष्ट रूप. (८) गोक्षीरधवळ-गाईच्या दुधाप्रमाणे शुन्न. उभयकुळ-सासरचे व माहेरचे अशी दोन्ही कुळे. सरस्वती, ब्रम्हपुत्री व शिवस्नुषा असल्यानें-तिची दोन्ही कुळे शुद्धच होती. जिये-जिला. पाशांकुशधरण-फांस व अंकुश यांचे धारण. चांगदेव याने शारदेचे 'वीणा पुस्तक धारिणी' असें वर्णन केले नसून 'पाशांकुशधारिणी' असें केलें आहे. यावरून त्याचे मताने विद्या ही केवळ विनोद व आनंद उत्पन्न करण्यापेक्षां चित्तास' बांधणारी व इष्टकार्याकडे प्रवृत्त करणारी आहे. 'योगश्चित्तवृत्ति निरोधः या तत्वाप्रमाणे वागणाऱ्या योगेश्वरास हे साजेसेंच आहे.
महिमाग्नें--लेखकाच्या प्रमादाने हा शब्द असा लिहिला गेला आहे. 'महिमा' ही तीन अक्षरे लिहिल्यावर पुढच्या 'गहन' शब्दांतील 'ग' लिहिला गेला. पण काना देऊन त्यास पुरा करण्यापूर्वीच लेखकाच्या लक्षांत आपली चूक आली व त्याने 'ने' हे अक्षर लिहिले. पण 'ग' चा अर्धभाग खोडावयाचा तसाच राहिला. येथील शब्द 'महिमानें' म्हणजे मोठेपणामुळे, असा आहे. १३व्या ओंवीचा प्रथम चरण 'जे महिमानें गहन' असाच आहे. (१०) नवरस-शृंगार, हास्य, वीर, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत, हे नऊ रस. सप्तस्वर-षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे सात स्त्र र (११) अती, ति-येथे काही लेखन दोष असावासे वाटते. अर्थ स्पष्ट लागत नाही. (१२) लंबिके, खेचरी-ही दोन्ही योग शास्त्रांतील देवतांची नावे आहेत. या नांवाच्या मुद्राही आहेत. (१३) अनुवादली-बोलली. सरस्वती प्रसन्न होऊन 'भलारे' असें म्हणाली. (१४) आतां येथे प्रथम पृष्ठ संपले. पुढची पत्रे न मिळाल्याने पुढे काय असेल हे सांगता येत नाही. पण गणेशशारदावंदना नंतर बहुधा गुरुवंदन असेलसें वाटते. हे सांपडतें तर चांगदेवाच्या गुरूबद्दल काही माहिती विशेष मिळण्याचा संभव होता. येथून पुढची १९ पत्रे म्हणजे ५९० ओंवी पर्यंतचा भाग गहाळला आहे. (५९०) देह अहंतेसि-देहाभिमानास. या ओंवींत वैराग्याची अत्यंत सुंदर व्याख्या दिली आहे. देहाचा अभिमान सोडणे याचंच नांव वैराग्य. 'रुसणे' या शब्दानें
-
फारच बहार केली आहे. समर्थांच्या 'प्रीतिविण रूसू नये' या सांगण्याप्रमाणे
देहाची प्रीति अगदी स्वाभाविक आहे. पण तरीही देह आपला आहे ही गोष्ट
ठाऊक असूनही त्याचा अभिमान न बाळगणे हेच खरे वैराग्य.
इछा-इच्छा.
आपेसें---आगे आप. याचे शुद्ध रूप आपैसें. हिंदी 'आपहीसे' पासून आपईसें.
आपैसें, आपेसें असें झाले असावें.
(५९१)
अष्टांग योग भ्यासु--अष्टांग योगाभ्यासु. यम, नियम, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधि ही योगाची आठ अंगें.
परमहंसु--योग्यांच्या कोटींतील श्रेष्ठ कोटीचा पुरुष.
(५९२)
गोप्य गव्हर-न सांगण्यासारखें गूढ.
सकळे-सकळही. 'ह' चा लोप होऊन सकळइ, 'सकळे' असें रूप झालें
आहे. आपैसे हा शब्द पहा.
निःशब्दाधार-शब्द रहित अनुभवाच्या आधारावर.
(५९३)
उजेडें-उघडपणानें, स्पष्टपणानें.
(५९४)
सोपानें-क्रमाक्रमाने, पायरी पायरीने.
बोलिजैल-बोलिलें जाईल. धातूस 'इजैल' हा प्रत्यय लाऊन जुन्या
मराठींत कर्मणि रूप होत असे.
चांग---चांगलेपणानें.
परियेसा-ऐका. हा धातु संस्कृत 'परी' पासून निघाला आहे. 'परीष्'
वें भाववाचक नाम पर्येषण होऊन परियेषणे, परियेसणे या क्रमाने हा मराठीत
उतरला.
निर्गुणभक्ति--चांगदेवाने येथून या भक्तीचे वर्गन केले आहे. स्थूलभक्ति व सूक्ष्म भक्ति या दोन प्रकारांचे वर्णन गहाळ झालेल्या ग्रंथभागांत असावें. चांगा-या नावाने चांगदेव स्वतःचा उल्लेख करितो. वातिवरी--बारा अंगुळावर. हा नाथ सांप्रदायांतील शब्द आहे. 'तो वातिवरी पवनु, गिवसिता न दिसे' असें ज्ञानेश्वरहि म्हणतात. दोन्ही नाक- पुड्यांतून जो वारा वाहत असतो त्याची मर्यादा बारा अंगुलांची आहे. त्याच्या आंत. गिवसितां--सांपडलें असतां. संस्कृत 'गवेषणा' या पासून हा धातु झालासें वाटते. (५९७) पापा पुण्यापूर्वी-पाप व पुण्य यांच्या कल्पनांचे आधी. प्रथम पदाच्या सामान्यरूपाकडे लक्ष दिले पाहिजे. चेववि-जागृत करी. (५९८) धुणी-नाश करी. (५९९) आहो--अहो. वाचकांचे किंवा श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी वापरलेलें संबोधन. इये परौति--इच्याहून पलीकडची म्हणजे श्रेष्ठ. (६००) वटेश्वराप्रसादें--वटेश्वराच्या कृपेनें. 'र' चा काना लेखक प्रमादानें पडलेला दिसतो. वटेश्वरा बद्दलची माहिती उपोद्घातांत पहावी. आइकतु-ऐकोत. आज्ञार्थी संस्कृत उकारांत धातुरूपावरून हे रूप प्रचारांत आले. पुढे शेवटचा 'उ' उपांत्य स्वराशी मिळून आइकोत-ऐकोत असें रूप झाले. आ+ईश् या संस्कृत धातूपासून ऐकणे हा धातु जन्मला आहे. अजूनही
-adsar
एकाद्याचें ध्यान आकर्षण करून त्यास ऐकावयास लावावयाचे असतां आपण
हे पहा' म्हणतो.
जिया--जीमुळे. संस्कृत 'यया' पासून.
(६०२)
रूपरूमातित पदा--रूप व रूपातीत या नांवाची.
सानंद-चांगदेव ओंबीच्या यमकाबद्दल बराच बेफिकीर दिसतो. येथेच
धा, दा, व द चे यमक आहे.
(६०३)
पाप्ति--प्राप्ति.
विसिति--'व्युत्पत्तिवें' अपभ्रष्ट रूप.
प्रया--पृथक्, वेगळेपणे.
(६०४)
कुडंलिणि शक्ति--कुंडलिनी नांवाची एक नाडी शरीरांत आहे. ही जागृत
करगें योगाचे एक मुख्य कार्य आहे. ज्ञानेश्वरी अ. ६, ओंव्या २२१ ते २९१
यांत कुंडलिनी, तिची जागृति व त्या पासून होणारा परिणाम फारच सुरस
रीतीने सांगितला आहे. या ग्रंयांतही पुढे थोडेसें कुंडलिनी-वर्णन आहेच.
म्हगोरतो--म्हगिपगें या धातूचा प्रयोग या ग्रंयांत बरेच वेळा केला आहे.
कर्तरि रूम म्हणिपणे व कर्मगि म्हणिजणे.
एर--इतर. याचे येर असेंहि रूप आढळतें.
(६०५)
सांधिजल--सांगणे याचे रूम वरेच वेळां सांघणें असें धकार युक्त सांपडते.
नागरु-चांगल्या रीतीचा. नगर पासून हा शब्द झाला आहे. नगरांत
शोभेसा.
अवधाने--अवधान, ध्यान. न वरील मात्रा पुढील दे मुळे लेखकप्रमादानें
पडली असावी.
(६०६) वोंकार--ॐकार. शब्दांच्या आरंभीच्या ओकारा बद्दल वोकार व एकारा- बद्दल येकार नेहमी येतो. (६०७) तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच आले आहे. मन व्योमा पासोनु--मनाच्या आकाशा पासून म्हणजे पोकळीतून. (६०८) मन बुद्धिचा गव्हरी--मनाच्या व बुद्धीच्या गूढ ठिकाणी. 'च' याच्या मराठीतल्या दुहेरी उच्चारामुळे पुष्कळ ठिकाणी 'च' च्या जागी 'च्य' व 'च्य' च्या जागी 'च' लिहिला जातो. उदाहरणार्थ येथेच 'च्या' चे ऐवजी 'चा' लिहिला गेला व पुढच्याच चरणांत 'चारि' च्या जागी 'च्यारि' लिहिले गेले. या चारी प्रकाराच्या वाणींचे वर्णन समर्थांनीही दासबोधांत दशक १७वा, समास ८वा, ओंव्या १ ते ३ मध्ये केले आहे. मात्रवृता--मात्रावृता. निवळ इंद्रियाने युक्त. भगवद्गीतेतहि ‘मात्रा' शब्द याच अर्थों 'मात्रास्पर्शाः' या पदांत आला आहे. परमात्मया-परमात्म्याचा. घोषु-घोष, ध्वनि, नाद, व शब्द या चार निरनिराळया एका पुढील एक पायऱ्या आहेत. अत्यंत सूक्ष्म तो घोष, नंतर ध्वनि, किंचित्स्थूल तो नाद व दुसऱ्याच्या श्रवणेंद्रियास गोचर तो शब्द. (६१०) पश्यंति--पश्यंती. परेच्या पुढील वाणीचे स्वरूप. परा ही पूर्णपणे अव्यक्त, दुसऱ्याच्या नजरेस येणारी ती पश्यंती, ओंठ हालावयास लागले की मध्यमा व स्पष्ट ऐकू येऊ लागली की वैखरी, असे वाणीचे चार भेद केले आहेत.
(६११) स्थूल बीज--स्पष्टपणे ध्यानांत आणून देणारे अक्षर. बीज किंवा मातृका ही तांत्रिक विधींतील विशिष्ट अक्षरे आहेत. निरनिराळया देवतांसाठी ही निरनिराळी मानली गेली आहेत. (६१२) हंस वाक्य--'हंसः' हे वाक्य. हे अहं सः झणजे मी तो (च आहे) या वाक्याचे संक्षिप्त रूप. प्रत्येक श्वासा बरोबर वायु आंत ओढला ह्मणजे 'सः' या सारखा व वायु बाहेर पडला ह्मणजे 'हं' या सारखा नाद होतो या प्रत्येक श्वासोच्छावासा बरोबर तो मी, तो मी, ही भावना जागृत ठेवणारे ते हंस वाक्य. (६१३) बिदनादभरितु--बिंदु ह्मगजे अनुस्वारासारख्या नादाने युक्त. बिजय--बीजद्वय. शिउशक्ति--शिव शक्ति. 'हं' हे आत्म सूचक अक्षर शिवाचें व 'सः' हे अन्य- सृष्टिसूचक अक्षर शक्तीचे द्योतक मानले गेले आहे. 'शिव' यांतील 'व' च्या जागी 'उ' आलेला दिसतो. याच प्रमाणे 'जीव' याचेंहि लेखन 'जीउ' असे आढळतें. (६१४) अजपा--जिचा जप करावा लागत नाहीं ती अजपा. 'ॐ हंसः' या अक्षरांच्या नादाची पुनरुक्ति ह्मणजे जप. तोंडाने जप न करितां प्रत्येक श्वासोच्छवासा बरोबर होतच असतो ह्मणून योगी लोक या मंत्रास 'अजपा गायत्री' असें ह्मणतात. (६१५) आतां--आंत च्या ऐवजी लेखकप्रमादानें आतां लिहिले गेले. पृथग्बीजें-निरनिराळी बीजाक्षरें. आंत प्रवेश केला की सृष्टि व बाहेर पडले की संहार. 'यदिदं किंच। तत्सृष्ट्वा । तदेवानुप्राविशत्।' या ब्रह्मोप- निषदांतहि हेच सांगितले आहे. ह्मणून मायेचे किंवा सृष्टीचें बीज सकार व ईश्वराचें आत्मप्रतीक बीज हकार अशी निरनिराळी बीजाक्षरें आहेत.
(६१६) अवरोहिं विरोहि-चढ उतारांत. श्वासाच्या आत बाहेर यण्यांत. मनव्योमि-चित्ताच्या चिदाकाशांत ही नादाक्षरें सततच वावरत असतात. (६१७) छंदरुषिदेवत--प्रत्येक मंत्राचा छंद, ऋषि व देव ठाउक असल्या शिवाय मंत्र सिद्ध होत नाही हा मंत्रशास्त्राचा सिद्धांत आहे व हे सारे गुरुमुखानेच कळले पाहिजे हा दंडक आहे. (६१९) उन्मे--उघडपणाने. मागे जसा उजे. शब्दाचा प्रयोग केला आहे तसाच येथे उन्मेष शब्द वापरला आहे. बालबोधे-स्पष्टपणे व लहान मुलास समजेल अशा त-हेनें. मराठीसही हा शब्द लावितात ह्मणून मराठीत असाही अर्थ येथे करितां येईल. त्यावेळचे सारेच ग्रंथकार मराठीत लिहीत असतांना या गोष्टीचा उल्लेख करीत असत. पुढेहि ओंवी १०२३ त ही गोष्ट चांगदेवानें- हि स्पष्ट केली आहे. (६२०) देहगोळकोत्पत्ति-देहाच्या गोळ्याची उपज. सर्व देहास ही नाडी मुख्य आधार मानिली गेल्यामुळे देहनिर्मितीसच ही कारण मानिली गेली आहे. ६०४ ओंवी मध्येही कुंडलिनी ह्मणजेच पिंड असें मटलें आहे. (६२१) भुजंगळणे-भुजंगपणे बद्दल चुकीने लिहिले असावें. सूतले--निजली असे. 'सूतना' या हिंदी धातूवरून 'सूतणें' या मराठी धातूचा प्रयोग केला आहे. पुढेहि ओंवी ६५८ मध्ये 'सूतली' ह्मणजे निजलेली या अर्थी या धातूचा प्रयोग सांपडतो. 'सूतले' हे रूप लेखकप्रमादाने झाले असावें व या लेखकप्रमादाचे कारण प्राचीन लिपीतील मात्रे प्रमाणे लिहिली जात असणारी वेलांटी असावी.
आधारि--आधारचक्राचे ठिकाणी. योगशास्त्रांत आपल्या शरीराच्या ठिकाणों सहा चक्रे मानली आहेत. गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी (१) आधारचक्र, नाभिप्रदेशाजवळ (२) स्वाधिष्ठानचक्र, हृदयदेशाचे ठिकाणी (३) मणिपूरचक्र, नासामूली (४) अनाहतचक्र, कपाळाचे ठिकाणी (५) विशुद्धव क व शिरोभागों (६) आनावक अशों ही सहा चकें होत. चक्र मगजे शरोरांत खोलगट असलेली वाटोळी जागा. समाधि लावतांना वायु ऊर्ध्व करून ब्रह्मांडी नेऊ लागले ह्मणजे या सहा चक्रांच्या ठिकाणी तो भरून राहत असतो अशी योगाची माहिती आहे. (६२२) विद्यु-विद्युत्, वीज. मछक-भत्स्य, मासा. 'त्स' चा प्रायः 'छ' होतो. 'क' हा स्वार्थी प्रत्यय आहे. आधारि-आधारि. (६२३) आधारिगी--आधारिणी, आधार असलेली किंवा आधारस्थानी राहणारी. (६२४) कुळा अकुळा--कुल शब्द हा येथे शक्तिमार्ग संप्रदायांतील अर्थों वापरला आहे. शक्ति व तिचें पूजन कुल शब्द येथें वापरला आहे. या पासूनच कौल मगजे वाममार्गो शाक्त असा अर्थ होतो. या शक्तीचा ह्मणजे कुंडलिनीचा विचार शाक्त व अशाक्त दोघेहि करितात. पक्षद्वय---जीव आणि शिव या दोन्ही पक्षास. नाडिया-इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन्ही नाडींस. योगशास्त्रांत या तीन नाडया मुख्य मानिल्या आहेत. (६२५) दशवायु-प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच व चलन, वलन, प्रसारण, निरोधन व आकुंचन करणारे किंवा नाग, कूर्म, कृकश, देवदत्त व धनंजय या अर्थी १२ या पांच नांवांनी प्रसिद्ध असलेले पांच मिळन दहा. पहा दासबोध द. १६, स. ६, ओं. ३, ४. गुणत्रया-सत्व, रज व तम या तीन गुणांस. पीठत्रया--पीठचया असा पाठ हवा. शरीरसंख्या-सात. ही सातही पीठे पश्चिम मार्गाची ह्मणून ज्ञानदेवांनी आपल्या उत्तरगीतेंत पुढील प्रमाणे सांगितली आहेत. त्रिकुंभ किंवा त्रिकूट, श्रीहट, गोल्हाट, औट, भ्रमर, चैतन्य व ब्रह्मरंध ही ती सात पीठे होत. (६२७) दशविध-गुणात्मक जीव, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व पंचमहाभूतें मिळून दहा प्रकारचे. (६३०) जन्मजाले जन्मजले, जन्म दिले या अर्थी जन्मजणे या धातूचे रूप असावें. ओंवी ६३२ मध्ये 'प्रसउनु' असें झटले आहे. (६३१) सर्वां शेषां--सर्व इतर गोष्टींत. (६३३) क्षितिप्ररोहो--क्षिति प्ररोहें असा पाठ असावा. जमिनी पासून वाढल्याने. (६३४) केति--किति किंवा केंवि. विकरलें-विकारले. ईशान-या व पुढील ६३६ या ओंवीत पंचतत्वांवर स्थापिलेली पांच ईश्वर- स्वरूपं सांगितली आहेत. विभूति धारण मंत्रांत शिर, मुख, हृदय गुह्य व पाद या पांच ठिकाणी आकाश, वायु, तेज, आप व पृथ्वी या पांच भूतांचें भस्म करून चिचिण्याची कल्पना आहे. या पाच मंत्रांतील प्रथम शब्द प्रत्येक भूताचा प्रति मानला आहे. 'ईमानः स विद्याना' या मंत्रांतील ईशान, 'तत्पुरुषाय या मंत्रातील तन्दुराए, 'अयोरन्यो' यांतील अयोर, 'वामदेवाय नमो' पैकी देव व सद्योजातं प्रायानि यातील सद्योजात, ही ती पांच ईश्वर स्वरूपें होत. अनुक्रमें-अनुक्र में अना हवा. पुढील मात्रेमुळे 'ऋ'वर मात्रा लिहिली श्री. दीपकळिका-दिव्याची बोन. हा संकोच व विकास उपनिषद्ग्रंथांस प्रमाण- बत आहे. ब्रह्मवल्लीत हाच क्रम सांगितला आहे. (६४०) यावेगळा--पाहून निराळा. रूपातीत म्हणजे सर्व प्रकारच्या रूपांत राहणारा पण त्याहून निराळा. स्थिरचर यानि अवधा जो जगदात्मा दशांगुलें उरला'तो. (६४१) संकळौनि--संकलन करून, एकत्र करून. द्विमात्रक औकारांत रूप ध्यानांत केवण्या सारखे आहे. (६४३) हठयोगु-योगमार्गाचा एक प्रकार. या प्रकारांत देहास दंड देऊन चित्ताची चंचलता मोडावयाची असते. राजयोगु-योगमार्गाचा एक दुसरा प्रकार. हा सुलभ असल्यामुळे हठयोगा- विरुद्ध याचें नांव राजयोग आहे. यांत आसनावर बसून एकाग्र चित्ताने समाधि साधावयाची असते. (६४४) वचती-जातात. संस्कृत 'व्रज्' पासून 'वच' हा प्राचीन मराठीतील धातु झाला असावा.
(६४५)
स्थानमान--देह किती दिवस टिकणारा आहे व केवढासा आहे, हे स्थानमान.
मराठी तानमान शब्द याच पासून झाला आहे.
होआवे-व्हावें.
(६४७)
सुचिल-सुविल. प्रसवील, जन्मदेईल. च व व या दोन्ही अक्षरांच्या
तत्कालीन लेखन पद्धतिमुळे झालेला लेखक प्रमाद.
(६४९)
क्रेत द्वापर--कृत त्रेत द्वापर असे लिहितांना चुकून लिहिले गेले. ही तीन
युगें येथे सांगावयाची होती हे पुढील ओळीतील कलियुग शब्दावरून स्पष्टच आहे.
(६५१)
वरि-वरच्यावर, सर्वां आधी.
शून्यध्यानि-कशाचेंहि विशिष्ट ध्यान नसणे याचें नांव शून्यध्यान. म्हणजे
शून्याचें ध्यान असा विधायक अर्थ न घेतां निषेधक अर्थच येथे घ्यावयाचा आहे.
वांचौनि-जिवंत राहून.
(६५२)
चौरंगीनाथ---नाथ परंपरेतील एक पुरुष. याचे हातपाय तुटून पडला असतां
या भग्नावयवस्थितीत मत्स्येंद्रनाथाच्या दर्शनाने यास हातपाय फुटले अशी कथा
आहे. ज्ञानदेवानेही ज्ञानेश्वरीत “तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं। भग्नावयवा चौरंगी।
भेटला की तो सर्वांगीं। परिपूर्ण झाला॥" असा अ. १८, ओंवीं १७५४ मध्ये
उल्लेख केला आहे.
(६५४)
शून्य घसणी-शून्य घर्षणी. हे काही नाही, हे काही नाही, नेति, नेति असा
सारखा विचार करून.
(६५५)
पवनाभ्यासु-वायु निरोधाचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास.
बंधु -मूळबंध, जालंधरबंध व उडियानबंध हे तीन. यांच्या विषेश विवरणा
साठी ज्ञानेश्वरीतील अ. ६ मधील १२ व १३ व्या श्लोकांवरील ओंव्या पहाव्यात.
भेद-मागें सांगितलेल्या चक्रांचा भेद.
मुद्रा--योगशास्त्रांत ध्यान करीत असतांना बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या
ठेवणी सांगितल्या आहेत त्या.
वज्रासन-एकप्रकारची मांडी घालणे. ज्ञानेश्वरी अ. ६ ओंव्या १९२
ते १९९ मध्ये मूळबंध व वज्रासना ची माहिती देऊन 'अर्जुना हे जाण, मूळबंधाचें
लक्षण, वज्रासन गौण, नाम यासी' असे सांगितले आहे.
निगतु-निघणारा.
भरितु कीजे-भरावा. अपान द्वाराने बाहेर पडणारा वायु उलटा करून
शरीरांत भरावा.
(६५७)
अधे-खालून.
ऊर्धे-ऊर्वेचें अपभ्रष्ट रूप. खालून अडविला व वरून दाबला म्हणजे मध्ये
भरणारा वायु आकुंचन करावा लागतो व या प्रमाणे आकुंचित झाला की तो
उसळू लागतो.
अंकुचिजे-आकुंचिजे.
(६५८)
सूतली प्रबोधे-प्रबोधे असे निरनुस्वार क्रियापद रूप वाचावें. निजलेली
जागी होई.
(६६०)
आविस -आमिष, भक्ष्य.
ग्रासिती-खाऊं लागली. तीन्ही चरणांतील क्रियांचा चालू लागली,
पेलू लागली, व ग्रासू लागली असा अर्थ केला पाहिजे.
/ ६६१) मुंकली-मुकली. संस्कृत 'मुञ्च् वरून अनुस्वार आला. सत्रावि--सतरावी. चंद्राच्या कळा सोळा आहेत. यांहून निराळी हो सतरावी कला योगमार्गांतली एक संज्ञा आहे. योगशास्त्राची कल्पना आहे कों नासामूल व दृष्टीच्यावर एक अमृताने भरलेली नाडी आहे. कुंडलिनी जागृत होऊन तिने शरीरांतले सारे दोष जाळून टाकले व प्रबुद्ध होऊन ती ब्रह्मांडी जाऊं लागली झणजे तिच्या धक्क्याने ही ऊर्ध्वमुख नाडी अधोमुख होते व तिच्यांतून अमृत स्रवू लागते. ज्ञानेश्वरांनी इलाच 'चंद्रामृताचे तळे' ह्मटले आहे. श्रवलि----स्रवलि, स्रवू लागली. ग्रंथित्रय--इडा, पिंगला व सुषुम्ना यांच्या गांठी. नोबले-बोलत नाही. न बोले याचे रूप. जुन्या मराठीत निषेधार्थी धातु करावयाची ही तन्हा दिसते. 'न' हा निषेधार्थी शब्द घेऊन त्या पुढील धातूच्या आद्याक्षराचा स्वर 'न'स लावावयाचा व तें आद्याक्षर अकारांत ठेवावयाचे असा नियम दिसतो. न बोलणे, याचें नोबलणे, न देखणे, याचे नेदखणे, न घेणे चें नेघणे इत्यादि उदाहरणे ध्यानात ठेवण्यासारखी आहेत. पाहिलें-येथें तीनच अक्षराचा एक चरण आहे. ज्ञानेश्वरांनी ओंवीच्या प्रथम तीन चरणांत पांच अक्षरांहून कमी अक्षरे कधीच वापरली नाहीत, पण चांगदेवानें त्र्यक्षरी चरणही क्वचित् वापरला आहे. (६६७) आनानी--अन्यान्यीं, निरनिराळ्या. अन्य चे अन्न होऊन आन झाले आहे. (६६८) पांति--पंक्ति, ओळ.
१७
(६७०)
के-कोठे, कोठले.
भृष्टि-सृष्टि.
उठी-उठणे, उत्थान. ईकारांत भाववाचक नामें जुन्या मराठीत पुष्कळच
आढळतात. उजिरी, लिही, घडी (घडण) इत्यादि उदाहरणे दाखविता येतील.
(६७१)
कसण -आधार, कणा.
(६७३)
पांगुळ-निराधार.
(६७६)
सगर्भा-साऱ्याच्या साऱ्या, आतील भागा सहित.
(६७७)
वेटेश्वरू-वटेश्वर.
तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच. ओं. ६०७ पहा.
उन्मळीला-उन्मूलन केला, उपटून टाकिला, नाहींसा केला.
(६७८)
उपसिले--उपदेसिलें. लेहकप्रमादाने मधील 'दे' हे अक्षर लिहावयाचें
राहिले.
(६८०)
नेदिल- देईल. न देणे, 'नेदणे' चे रूप.
(६८२)
नांतरी-ना तरी.
ऐली थडीये-इकडील तीरावर.
"
प्रयत्नु-प्रयत्लें.
,
पैलु पारु-पलीकडील तीर. ज्ञानदेवाच्या उत्तर गीतेत हीच कल्पना
जवळ जवळ याच शब्दांत सांगितली आहे. 'तंवचि पांगु कीजे नावेचा, जंववरि
पारु न पाविजे महा नदीचा, तो पावलिया नावेचा, अनादरु की.
(६८५).
कव्हणी यकी काळवी पतित कोणी एक आकस्मिक पडलेली. हे पुढील
चरणांतील दोरीचे विशेषण.
जालेयां-झाल्यास, झाल्यावर.
(६८७)
विव्हावो-विवाह. 'ह'अंती असल्यामुळे ओकारांत रूप होऊन वर्णव्यत्यासाने
झालेलें रूप.
चेइलेयां--जागे झाल्यावर. चेतणे पासून चेइणे.
(६९०)
आधार--आधारचक्र व त्याचे ज्ञान. येथे साही चक्रांची नांवें सागितली
आहेत.
(६९१)
अनहातं श्रवर्ण-अनाहत श्रवण. समाधि लागल्यावर कर्णपथावर जो
एक प्रकारचा नाद ऐकू येत असतो तो ऎकणे. हा कशावरहि आघात न करितां
होत असल्यामुळे यासः अनाहत नाद असें ह्मणतात.
(६९२)
अवस्थात्रय जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन स्थिति.
धातुर्वाद-किमया. सोने करण्याची विद्या.
विवर-निरनिराळी काढ. या चरणांत १६ अक्षरे आहेत.
झणे-नको. 'चन' या संस्कृत शब्दां पासून हा मराठी शब्द झाला असल्याने
हा निषेधार्थी वापरलेला असतो.
१९ (६९५) नीरोपद्रवस्थानी रहण-निरुपद्रवस्थानी राहणे. (६९७) आरिख-संस्कृत 'आर्ष' पासून आर्ख, आरिख असें झाले आहे. जुनें व ह्मणूनच सोन्या सारखे असलेले सत्य. (६९८) यता--इयत्तेने, मर्यादेने. कल्पना अशी आहे की सर्वांचा काळ मर्यादित आहे. मागमें मेल्यावर देव होतील, देवांचे आयुष्य संपल्यावर इंद्रादि देव ब्रह्मरूप होतील, ब्रह्मा आपल्या मर्यादेचे शेवटों विष्णुमूर्तीत लीन होईल. (६९९) व्यरवस्ते--व्यवस्ते ऐवजों ही अक्षरे लिहिली गेली असावीत. 'व्य' नंतर 'स्ते' चा सकार भाग जो रकारा सारखा असतो तो काढला गेला. पण लगेच चूक लक्षात आल्याने व लिहिला पण मागील रकार खोडावयाचा राहिला. ओं. ९ तील महिमाग्ने वरील टीप पहा. व्यवस्ते' हा शब्द पुढेहि ७१५ व्या ओंवीत आला आहे. संस्कृत 'व्यवसित' यांतील धातूचे हे रूप आहे. लीन होई, शेवटी होई. (७००) सूरदेहस्थिति -सुरदेहस्थिति. (७०१) अंतःष्करण-अंतःकरण. जुन्या जिव्हामूलीय उच्चारामुळे लेखकप्रमाद, (७०२) होए-होई, होय. (७०४) कडवसा--लेप, बंध. (७०५) अविलिल-अशुद्ध. संस्कृत 'आविलं' पासून झाला असावा. MAAL-
२०
(७०६)
थोकडिं-थोडीशी, लहानशी. संस्कृत 'स्तोक' पासून हा शब्द झाला व
मग वर्णव्यत्यासाने थोडकी होऊन थोडी अशा रूपाने हाच शब्द आजच्या मराठीत
वावरत आहे.
(७०९)
उरैल-बाकी राहील. पंचतत्वें पंचतत्वांत मिसळल्यावर में शिल्लक उरेल.
(७११)
शून्यगर्भु-ज्याच्या आंत कांहीं नाहीं असा.
(७१२)
तुसे-तुज ऐसे, तुजसे.
(७१४)
मन पवन-वान्यासारखें चंचल असणारें मन. तुकारामानेही हा शब्द
'जेथ पांगुळले मन पवन' येथे असाचा असाच वापरला आहे.
शून्नी-शून्यी. उच्चारदोषामुळे लेखनदोष. 'न्य' चा उच्चार 'न' सारखा
बहुधा ऐकू येतो.
आथि-'अस्ति' चे रूप आहे. हे प्रश्नार्थक वाक्य समजले पाहिजे.
(७१६)
फुडें-स्फुटपणानें, स्पष्टपणाने.
(७१७)
राणीवीं-रहाणीवीं, अस्तित्वांत. रहाणे या पासून रहाणीव होऊन
राणीव शब्द होतो.
(७२१)
निराळंभ-निराधार, निरालंबन
शूति-श्रुति..
२१ (७२४) अनामय-कल्याण. (७२५) युगांत शेष-युगांतीही शिल्लक राहणारे, (७२८) विसवले-विसांवले. "विश्राम' पासून विसांवा व त्या पासून झालेला विसांवणे हा धातु. (७३०) भांगार-संस्कृत 'भृगार' ह्मणजें सोने या पासून हा शब्द झाला असावा. ज्ञानेश्वरकाली हा शब्द फार प्रचारांत होता. भाव भजति-निरनिराळी रूपें घेतें. ति-ती. (७३१) तुंचिये-तुझ्यांत. उपचार-सामग्री, सर्व गोष्टी. तुझ्या साऱ्या गोष्टी तुझ्यांतच सामाव- लेल्या आहेत. (७३३) मनांचां-मनाच्या. रिगौनियां-रिघून, प्रवेश करून. (७३४) सांडित्येनसि-सोडणाऱ्यासह. या ओंवींत चांमदेवानें वस्तुवर्णन करितांना शब्द कसे पांगुळतात हे सुरस रीतिने दाखविले आहे. मनांत शिरून विचार केलास तर तूंच तूं आहेसा दिसशील असे सांगितलें खरें. पण मनांत शिर ह्मणता बरोबर शिरणारा व शिरण्याची क्रिया आणि शिरण्याचे ठिकाण या तीन गोष्टी भिन्न वाटतात. ह्मणून पुढे सांगितले की रिघालेपण ह्मणजे आंत शिरण्याच्या २२ क्रियेस खरे समजू नको. तें रिघणे ह्मणजे रिघणे नव्हे. पण हा निषेधभाव कांहीं तरी अस्तित्व सुचवितो ह्मणून तो सोडावयास सांगावें तो पुन्हां सोडणारा, सोड- ण्याची क्रिया व सोडावयाची वस्तु ही त्रिपुटी कायमच रहाणार. ह्मणून तो निषेध सोडणाऱ्यासह सोडावयास सांगितला. सारांश पुढील ओंवींत सांगितल्या प्रमाणे या वर्णनांत शब्दच खुंटतात ह्मणजे कुंठित होतात. (७३७) सामावणी-ईकारांत भाववाचक नाम. लीनता, लय. (७३८) आणपांचि-आपणपांचि. 'प' लिहितांना चुकून राहिला. (७४०) तुजावांचौ निरंतरि-तुझ्या वांचोनि निरंतरी. (७४६) वोळगिजे-नमस्कार करावा. मूळ संस्कृतधातु 'अवलग.' अब चा झाला वो व ल चा झाला ळ. तुकारामही ह्मणतो 'ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे, इतर तुळणे काय पुरे. न्हवण--स्नपन पासून झालेले रूप. स्नान घालणे. आपणेयां-आपल्यास. तुकारामा पुढे 'मनें प्रतिमा स्थापिली, मनें मना पूजा केली, मनें इच्छा पुरविली, मन माउली सकळांची। मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेंचि दास्य, प्रसन्न आप आपणांस, गति अथवा अधोगति.॥' हे लिहितांना या ओंव्या असाव्यातसे वाटते. (७४७) वाइजे-वाहिजे. (७४८) मुंगियेच्यां ठाउनु ब्रह्मावरि-मुंगीच्या सूक्ष्म ठिकाणा पासून ब्रह्मा पावेतों.
(७५०)
परौतें-पलीकडील, श्रेष्ठ, उंच.
खालौतें-खालील, नीच.
(७५१)
निघोट-निर्भेळ.
तत्वसार-'तत्व' याचें सार. 'तत्वमसि' या महावाक्यांतील ग्राह्य अर्थ.
याच अर्थाने हा 'तत्वसार' ग्रंथ असावा असे वाटते. चांगदेवांस ज्ञानदेवांनी जें
पांसष्ट ओंव्यांचे पत्र लिहिले व जे चांगदेव पासष्टी या नांवाने प्रसिद्ध आहे, त्यांत
'तत्वमसि' या महावाक्याचाच बोध लिहिला आहे. तेव्हां हा बोध झाल्यानंतर
या 'तत्वमसि' महावाक्याचें सार चांगदेवाच्या ग्रंथांत येणे साहजिक आहे.
पै-पाही. याचे 'पाई' असे होऊन त्याचेच रूपांतर 'पे' असे झाले आहे.
(७५४)
मनाहि---मन नाहि. एक नकार लेखकदोषामुळे राहिला. ही ओंवी
वाचली की केनोपनिषदांतील 'यदि मन्यसे सुवेदेति' ह्मणजे 'समजले वाटणारांस
समजले नसते' या मंत्राची आठवण येते.
(७५५)
या ओंवीचा स्पष्ट अर्थ समजला नाही.
(७५८)
माहाशून्य-महाशून्य. मन विचार करतां करतां हारले आणि माझ्या..
शिवाय काही नाही हे समजले ह्मणजे शून्य ज्ञान झाले. पण हा बाकी उरलेला
मीपणाही नाहीसा झाला ह्मणजे जे काय उरलें तें महाशून्य. 'मी ब्रह्म आहे'
हे समजून माझ्या मी पणाचा लोप झाला ह्मणजेच खरें ज्ञान आले.
(७६२)
सिंपे-'लिपे असा पाठ हवा.
वासिपे-'वाश्' ओरडणे या पासून वास, वासिप हा धातु झाला. याचा
अर्थ ओरडणे, मोठ्याने सांगणे..
(७६४)
भांगारें--सुवर्णालंकार. या चरणांत १७ अक्षरे आहेत.
पाए न व्हाती---आधार होत नाहीत. पाया मगजे आधार व व्हातो
ह्मणजे होती.
(७७०)
सूतला-निजला. ओं. ६५८ पहा.
आपुलांचि-स्वतःच.
(७७३)
अनुचित्तें--अनुचितें. खरे पाहिले असतां बहुवचन 'कमें' असें पाहिजे.
पण येथें विशेषणाचें बहुवचन व विशेष्याचें एकवचन लेखणीच्या घसरण्याने
झाले असावें.
न बंधिजसि-बद्ध होणार नाहींस, बांधिला जाणार नाहीस.
(७७५)
ध्वनित-मनांतील गोष्ट.
(७७७)
शिष्योंचि--'शिष्याचे' असा पाठ हवा.
(७७९)
घरोपरि हा शब्द बहुधा 'परोपरी' असावा. परोपरी ह्मणजे प्रकार.
'प' च्या ऐवजी चुकून 'घ' झाला असावा.
(७८२)
पाहालें--पाहिले. जिहीं हा कर्ता अध्याहृत आहे.
आंधारें-दृष्टीचा संशय. स्पष्ट न दिसणे. आज हाच शब्द 'आंधारी'
या रूपांत वावरत आहे.
(७८३)
तोकरूपां-लहान मुलाच्या रूपाने वावरणाऱ्या जीवात्म्यास.
Hathwat २५ दोषशृष्टी-'दोषसृष्टि' हे शुद्ध रूप. लोकांस दोष ह्मणून दिसणाऱ्या गोष्टी. परि-हे येथे उपमावाचक अव्यय आहे. याचा संबंध मागील चरणांतील दोषसृष्टीशी आहे. ज्या प्रमाणे लहान मुलाच्या रूपाने वावरणाऱ्या जीवात्म्यास लोकांस वाईट दिसणाऱ्या गोष्टी बाधत नाहीत; ह्मणजे त्याचे हातून अशा गोष्टी झाल्या तरी त्यास दोष लागत नाही, त्याच प्रमाणे ज्ञान दृष्टि प्राप्त झालेल्या माणसासही उचितानुचित कर्माचे बंधन राहत नाही. (७८५) तो त्या पापपुण्यसन्मधु--'तो पापपुण्यसंबंध त्याला' असा अन्वय करून पुढील 'कदाचि नाहीं' शी जोडावयाचा. (७८६) सुनिटलें-'निसुटले' असा पाठ हवा. लेखकाच्या चुकीमुळे हा वर्णव्यत्यास झाला असावा. निसुटलें ह्मणजे निघून गेलें. (७९१) मनमुक्तु-मनाच्या तडाक्यांतून मुक्त झालेला. अमुक करावें व अमुक करूं नये अशी ज्याच्या मनांत प्रवृत्ति राहिली नाहीं तो. (७९३) कृताकृत्य--'कृतकृत्य' असा पाठ हवा. (७९७) जालां-झालो. हे उत्तमपुरुष वाचक एकवचनी रूप ध्यानात ठेवण्या सारखें आहे. या ग्रंथांत बरेच ठिकाणी अशा प्रकारचे रूप आले आहे. (८००) केलां-केलो. येथे पुढे 'मि' हे उत्तमपुरुषीं सर्वनाम असल्याने या रूपाबद्दल संशयच नाही. सांघिजो-सांगावें. जुन्या मराठीत द्वितीय पुरुषी बहुवचनीं असें रूप नेहमी येते. ज्ञानेश्वरीच्या आरंभीच 'म्हणे निवृत्ति दास, अवधारिजो जी' असे आहे.
२६
(८०५)
आंगावरि-निवळ स्वतःच्या जवाबदारीवर, कोणास जामीन न ठेवतां.
(८०६)
अप्रचेया-अप्रचेतया असा पाठ पाहिजे. प्रचेता ह्मणजे ज्ञानी व अप्रचेता
ह्मणजे अज्ञानी.
(८०९)
गुर्विणी-गर्भिणी.
(८१२)
कीर-निश्चित. 'संस्कृत 'किल' पासून हा शब्द 'ल' चा 'र' होऊन
झाला असावा.
(८१३)
गुरुनु-गुरूनें. तृतीयेच्या एकवचनाचे रूप.
(८१८)
कर्मफळथार-कर्मफळास थारा. थारा ह्मणजे राहण्यास जागा.
(८१९)
मना--'मन' असा पाठ हवा. मन अनुभवा पलीकडे आहे. आणि अंत:-
करणांत ज्ञानप्रकाश असेल तर कर्माचे फळ राहण्यासच असमर्थ होईल. कर्मफळेच्छाच
नसल्यास कर्मफळ कसे यावयाचे.
कर्मगर्भु-कर्माचें बीज.
(८२०)
रुसणेनसि--रुसणाऱ्यासह. मागें ओंवी ७३४ पहा.
(८२२)
येकु येकु–एकदांच ये पाहिजे. लेखक प्रमादामुळे द्विरुक्ति.
अन्यासि-'अनायासिं' असा पाठ पाहिजे. कांहीं श्रम न करितां. पुढे
ओंवी ८२५. मध्ये स्पष्टच 'अनायासें' असें पद आले आहे.
(८२४) पशुपाश-हा शब्द अत्यंत अप्रयुक्त पण फार महत्वाचा आहे. ज्या दोरीने पशु वधस्तंभास बांधला जातो तो पशुपाश. पण कृष्णमिश्राच्या प्रबोधचंद्रोदय नांवांच्या नाटकांत हा शब्द एका विशिष्ट अर्थी वापरला आहे. जीवात्म्यास जखडून टाकणाऱ्या बंधनांस हा शब्द कृष्णमिश्राने वापरला आहे. या अर्थी हा शब्द फक्त याच नाटकांत आला आहे. कृष्णमिश्राचा काल ई. स. च्या अकराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आहे. या नाटकांत प्रथमच वेदान्त व वैष्णव भक्तीची सुंदर सांगड घातली आहे. चांगदेवाने हा ग्रंथ वाचला असावा असे दिसते. पुढचा 'च' शब्द 'प्रबोधता' ही हेच सुचवितो. (८२६) अवलिला--लीलेनें, सहज. अवलीला हे शुद्ध रूप. (८३०) परब्रह्मेआ-परब्रह्माचे योगानें. तृतीयेचें एकवचन. (८३२) जि---जी, सन्मानार्थी संबोधन. हे संस्कृत 'अयि' चे रूप. य चा झाला ज व अ चा झाला लोप. अजी, जी, दोन्ही रूपें प्रचारांत आहेत व दोन्हींचा मिळून झालेला 'अजीजी' शब्दही मोठ्या माणसाचा कल पाहून बोलणें या अर्थी रूढ आहे. गुरुनिवारिला-'गुरुनि वारिला' असा पदच्छेद करावा. गुरूने निवारण केलें. (८३४) त्रुप्ति-शुद्ध रूप तृप्ति. (८३५) आर्हता-योग्यता. अर्हत या शब्दापासून झालेले भाववाचक नाम. पुढच्याच ओंवीत हेच रूप निरनुस्वार आले आहे. (८३७) संघावें-सांघावें बद्दल लेखक प्रमादाने लिहिले गेलेले रूप. अधिकार- हीन माणसास ज्ञान न सांगण्याचा योग्य प्रघात भारतवर्षांत फार प्राचीन काळा- २८ - पासून चालत आला आहे. 'इदमशिष्याय न देयं ही सूचना उपनिषदांत वेळोवेळी दिलेली आहे. मनूनेंहि असेंच सांगितले आहे की. विद्या ब्राह्मणमेत्याह शेवधिस्तेऽस्मि रक्ष माम् । असूयकाय मां मा दा यतः स्यां वीर्यवत्तमा । हव्या त्या माणसास हवें तें ज्ञान दिल्याने अर्था ऐवजी अनर्थच होतो. हा अनर्थ ह्मणजेच सृष्टिघात पुढील चरणांत सांगितला आहे. पुढील ओंव्यांतून हाच अर्थ अधिक स्पष्ट केला आहे. (८४२) विषयसुषे-विषय सुखें. ख बद्दल ष जुन्या ग्रंथांतून पुष्कळ ठिकाणी सांपडतो. याचे कारण ह्मणजे नर्मदेच्या उत्तरेस ष चा ख च उच्चार करितात. ष चा ख, य चा ज व ज्ञ' चा ग्य असा उच्चार शुक्ल यजुःशाखीय वैदिकलोकांत- ही प्रचलित आहे. चोचावले- हा शब्द चोंच या नामा पासून झाला आहे. पक्षी मुळांस चोंच मारून जशी भोंकें पाडतात तसे करणे ह्मणजे चोचावणे. मोरांबा, मोरावळा करितांना आंब्यांच्या फोडीस किंवा आंवळयांसही चोंचावीत असतात. याच प्रमाणे भिन्न भिन्न संशयांनी चोचावलेले ह्मणजे विद्ध झालेले. अशा प्रकारचे व्यंजक शब्द मराठीत किती तरी आहेत. (८४३) विचंबले-'विटंबले' असें असावेसे वाटते. (८४६) इछेच्या पावती, योगातें ते-ते इच्छेच्या योगातें पावती, असा अन्वय. जो योग पूर्वी इच्छित होते तो त्यांस मिळू लागतो. (८४८) देवत्रयचिन्हें-हा शब्द असाच घेतला तर त्याचा अर्थ तीन्ही देवांची ह्मणजे ब्रह्मा, विष्णु, महेश यांची लक्षणे असा अर्थ होईल. पण हा अर्थ समाधानकारक
...
२९
वाटत नाही. कदाचित् 'देवत्वचिन्हें' असा पाठ असेल व तसा असल्यास यश,
श्री, कीर्ति इत्यादि लक्षणे असा चांगला अर्थ होऊ शकेल.
(८४९)
घेपिजे-घेपणे ह्मणजे आपल्या ताब्यात घेतले जाणे. घेणे या धातू
पासून घेपणे हा शब्द झाला आहे.
(८५०)
विधि हा शब्द चुकीने पडलेला दिसतो. पुढील ओंवी वरून हा शब्द
विघ्न असावा असे वाटते. आज जरी मराठीत विघ्न शब्द नपुंसकलिंगी आहे
तरी स्वप्न शब्दा प्रमाणे पूर्वी तो पुंल्लिगी व नपुंसकलिंगी असा दोन्ही लिंगी
असणे शक्य आहे. किंवा चांगदेवाच्या यमक = निरंकुशत्वास अनुसरून
'तया तत्वज्ञा विघ्ने काइसी' असाही पाठ संभवनीय आहे.
(८५१)
त्येते.
(८५२)
चाडा-चाउनें, इच्छेनें.
धाडा पडला-घाला पडला. घाला या अर्थी धाडा हा शब्द अजूनही
रूढ आहे.
(८५३)
देवाच्या आंगि-देवांच्या आंगीं. देवांच्या देहास आग लागते झणजे
ते क्रोधाग्नीने जळू लागतात.
(८५४)
उजिरि-किरण, झांक, प्रभा. संस्कृत 'उज्ज्वल्' या धातू पासून हा शब्द
झाला आहे. हे इकारांत भाववाचक नाम.
कुदळिघात वरि आरोढिलें-वर कुन्हाडीचे घाव घालणे सुरू केले.
(८५५)
केसणे-कशाने. कैसेनि पासून हे रूप.
(८५६)
खापर सादृश्य--खापरासारिखें.
फेडी-फोडी' असा पाठ हवा.
(८५७)
लोष्टकपालि-अर्थ लागत नाही. ही सारीच ओंवी स्पष्ट कळत नाही.
इदृ--'इंद्र' असा पाठ असावासे वाटते.
(८६०)
श्रीगुरुचेया-श्रीगुरूच्या.
(८६४)
मूखिचा-मुखींचा.
उगाळू-घांस. संस्कृतः 'उद्गार' पासून झालेला शब्द.
(८६९)
आचार्ये--शेवटल्या य मुळे हे एकारांत रूप झाले. शेवटी व असता तर
ओकारांत रूप होतें जसें राव , रावो. पण रायचे होतें राये.
(८७०)
श्रीमुक्तादेवी योगिनी--या परंपरेंत निवृत्ति व ज्ञानदेव यांची नांवें नसून
गोरक्षनाथा नंतर मुक्ताबाईचाच योगिनी मगून उल्लेख केला आहे. शिवकल्याण
स्वामींनी आपल्या नित्यानंद दीपिकेच्या शेवटीही अशीच परंपरा दिली आहे.
गोरक्षनाथा पासून एक प्रवाह गैनीनाथ, निवृत्ति व ज्ञानदेव या मार्गे आला व
दुसरा मुक्ताबाई, वटेश्वर, चांगदेव या मार्गाने आला.
चक्रपाणि-हा वटेश्वराचा शिष्य ह्मणून चांगदेवाचा समकालीन 'वटेश्वरा-
हुनि चक्रपाणि, लाधले हे अमृतसंजीवनी' असें शिवकल्याणस्वामी ह्मणतात.
(८७१-८८१)
या ओंव्यांत या सिद्धयोगमार्गातील सिद्ध पुरुषांची व स्त्रियांची नांवें दिलेली
आहेत. या पैकी काही नांवें हठयोगप्रदीपिकेंतही सांपडतात. (उपोद्धात पहा)
या नांवावरून त्याकाळी हा मार्ग किती व कसा पसरला होता याची कल्पना
चांगली येते. यांत अनेक जातीच्या स्त्रीपुरुषांची नांवें आली आहेत. ८८१व्या
ओंवी नंतर ९१२ पावेतोंच्या ओंव्या असलेली दोन पत्रे किंवा ४ पृष्ठे गहाळली
आहेत.
(९१४)
दशी-'देशी' असा पाठ पाहिजे.
(९१७)
गुरुसेवो-गुरुसेवे असें असावेसे वाटते.
शिवोऽस्मि-'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याबद्दल 'शिवोहमस्मि' अशा वाक्याचा
उपयोग आचार्यांनी सुरू केला. मी शिव आहे हा बोध.
(९१९)
आपणप्येनि-आपलेपणानें. 'गुरुसेवाबळे, जें अटक ऐसें आपणप्येनि
फळले' हा अन्वय. अटक-अप्राप्य, न मिळण्या सारखें; तेंही गुरुसेवेच्या सामर्थ्या-
मुळे आपण होऊनच प्राप्त झालें, हा भावार्थ.
(९२२)
तियें-ती आसनें व भुवनें.
(९२३)
वाइजती-वाहाव्यात. खरा शब्दार्थ-वाहिल्या जाव्यात.
(९२४)
निरययोनिमाझारि-निरययोनि मध्यंतरी झणजे नरकयोनीत. मध्यांतरी
चें मज्झात्रीं असें रूप होऊन माझारिं असें रूप झाले आहे.
(९२६)
अघोरि-भयंकर अशा. या पदावरून मागील दोन चरण गुरुवचन मनि.
न धरी'; 'गुरुसिं अहंकार करी' असे एक वचनीं असावेतसे वाटते.
(९२७)
विसुरे--विसरे: विस्मरणें पा
पासून विसुरणे व मग विसरणे.
३२
(९२८)
विविधु-विधिरहित. ज्ञानी पुरुष विधिनिषेधरहित असतो हा संबंध.
समंधु-संबंध.
(९२९)
रोगिया--रोगी, रोगयुक्त.
(९३२)
खाए-हा खाणे या धातूचा प्रयोग सेवन करणे या अर्थी आहे. निंदा,
पैशून्य खाणे ह्मणजे निंदा व चहाडी ऐकणे. अजूनहि शिव्या खाणे या प्रयोगांत
खाणे या धातूचा उपयोग आहे.
वस्तु करुनु-ब्रह्म असूनहि, ब्रह्मप्राप्ति करूनहि.
(९३३)
पुश्चळीकें--पुंश्चली ह्मणजे शिनळ, जारिणी स्त्री. तिच्या त-हेनें ह्मणजे
एक सोडून दुसऱ्याचे सेवन करण्याच्या पद्धतीने. चांगदेवाच्या अभंगांतही हा
शब्द सांपडतो. 'पतिव्रते पुंश्चली सांगात झाला, दोहीतें भेटला एक देखा'.
चां. अ. सं. १९.
(९३४)
येकुरु-येकुगुरु या ऐवजी लेखकप्रमादानें 'गु' गळून राहिलेले रूप.
(९३५)
सांडोवे-त्याग. सांडणे या धातू पासून झालेले नाम.
(९४३)
चिखिमिखि-चोखांदळपणा. ओरडा आरड. 'चीखना' या हिन्दी धातू-
पासून हे रूप झाले असावें सें वाटतें.
उपाओ-उपाय. य चा झाला व व मग झालें हैं रूप.
(९४४)
त्रिशुद्धी--पूर्णपणानें, शुद्ध मनाने. या शब्दाची व्युत्पत्ति दोन प्रकाराने
होऊ शकेल. वैदिक भाषेतही तीन प्रकारचे म्हणजे मानसिक, वाचिक, व कायिक
असे तीन प्रकारचे सत्य सांगितले आहे. त्यासच अनुसरून मनाने, वाणीने व
कृतीने शुद्ध राहून असा अर्थ करता येईल किंवा कोणचीहि गोष्ट त्रिवार सांगितली
म्हणजे पक्की झाली असा प्राचीन प्रघात असल्यामुळे विशद्वी या रूपाचें त्रिशुद्धी
असें रूप झाले असावें.
(९४६)
देवंगत-'दिवंगत' असा पाठ असावा व प्राचीन लेखन पद्धतिमुळे तो
'देवंगत' असा लेखकानें वाचला असावा.
दिपांतरा--द्वीपांतरा असें पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी.
(९४८)
कराडिसी--कठिण जागेंत.
(९५०)
सदेउ--सदैव, दैववान. मागील ओंवीतल्याच 'निदेवे मनि शुद्ध नव्हती
याशी विरोध दाखविण्यासाठी वापरलेला शब्द. पुढेहि ओंवी ९५३ मध्ये सदैव
शब्द आलाच आहे.
कोलि--कोळी. एकलव्य नांवाचा निषाद. द्रोणाचार्याने व्याधपुत्र म्हणून
यास विद्या शिकविण्याचें नाकारल्यावर याने द्रोणाचार्यांची मृण्मयमूर्ति करून
तिच्या जवळ विद्या शिकल्याची कथा महाभारतांत प्रसिद्ध आहे. गुरु मातीचा
असतांनाहि शिष्य आपल्या भक्तीमुळेच आपला उद्धार करू शकतो हे दाखविण्या-
साठी हे ठरीव उदाहरण आहे.
मातियेचा द्रोणु--मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती.
(९५१)
निधान-निधन, मृत्यु. लेखकाकडून काना चुकीने जस लिहिला गेला
(९५२)
तत्पुरुषु-'सत्पुरुषु' असा गठ हवा.
जुगां--जगां किंवा युगां. जे जाणाऱ्या जगांस स्थिर करितात किंवा जाणान्या
युगांस स्थिर करितात. दुसरा अर्थ अधिक चांगला वाटतो. हिंदीत युगास 'जुग'
ह्मणतात 'जुगजुग जीओ' ह्मणजे युगेंची युगें जिवंत रहा. हा आशीर्वाद हिंदीत
प्रसिद्ध आहे. सत्पुरुष जाणाऱ्या कालासही स्थिर करतात हा अभिप्राय.
(९५५)
अप्रमादु--प्रमादु असा पाठ हवा.
तेयाचें ज्याले वाढे--त्याचे ठिकाणों उत्पन्न झालेल्या गोष्टी वृद्धिंगत होतात.
जिवे तें पुढे तया ठाके--वृद्धिंगत झालेले वा उत्पन्न झालेले त्या पुढे येऊन
उभे राहते. ज्याले व जिवे ही दोन्ही रूपं जिणे ह्मणजे उत्पन्न होणे वा जिवंत
राहणे या धातू पासून झाली आहेत.
(९५६)
अवज्ञानेदखिजे--अवज्ञाने न देखिजे किंवा अवज्ञा नेदखिजे असा पदच्छेद
करावा. पहिल्या अर्थात 'न' राहिला असे समजावे व दुसऱ्या अर्थांत अवज्ञा है
तृतीयेचे रूप व नेदखिजे हे न देखणे पासून झालेल्या नेदखणे क्रियापदाचे रूप.
(९५८)
अर्धकपी-विहिरीत अर्धा व अर्धा वाहेर असा लोंबकळत.
(९६०)
ब्रह्माकोटिमध्यस्तु–'ब्रह्माण्डकोटिमध्यस्थु' असा पाठ हवा.
(९६१)
आगि--आंगि, अंगास.
(९६५)
-उपसारा--'उपचारा' असा पाठ पाहिजे.
(९६६-९९२)
या ओंव्यांचे पत्र गहाळ झाले आहे.
women
अळुमाळ--एवढेसें, 'अडुमाडु' या कानडी रूपापासून ड चाळ होऊन हें
रूप झालें.
शिउ-शिव.
चतुष्टय--मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चार गोष्टी. पहा ओवं. ६२९.
(१०००)
शषासि--'शेषासि', असा पाठ हवा.
(१००३)
लिहि--इकारांत नाम. लिहिणे हा अर्थ.
(१००५)
बोहरी--निरास. अवहरणे याचे जागी वोहरणे रूप होऊन त्याचे इकारांत
नाम वोहरी. व व ब च्या अभेदानें बोहरी असें रूप होतें.
निदसुरी--पूर्णपणानें. न दुसरी याचेच बोलींत झालेले रूप. दुसरे काही
न राहतां या अर्थी हा शब्द वापरला जातो.
(१००९)
जालेपणे--स्वयं ब्रह्म झाल्याच्या योगानें. जाहलेपणे बद्दल जालेपणे
असा शब्द वापरला जातो.
(१०१३)
चंद्रबिंबि--चंद्राचें मंडल उगवलें असतां.
(१०१४)
मीनला-मिळाला, एकरूप झाला.
(१०१७)
येकवाटलें--एकवटले. एकवट ह्मणजे एकरूप. हा वट प्रत्यय घन, तिक्त,
क्षार इत्यादि शब्दांत लागूनच घणवट, तिखट, खारट इत्यादि शब्द झाले आहेत.
वट प्रत्ययही संस्कृत 'वत्' चाच अपभ्रंश आहे. कटवत्-कडुवट-कडवट-कटु-
स्वरूप.
जुगां-- युगांस स्थिर ह्मणतात 'जुर प्रसिद्ध आहे. अप्रमादु तेयाचे जिवे तें उभे राहते. राहणे या (१०१९) रूप करूं--वर्णन करतां. निरूपण या अर्थीच रूप. (१०२२) ते कष्टि समाप्ति पावबिली- त्यांनी कष्टांच्या ठिकाणी शेवट पोचविला असा प्रतिशब्दार्थ. त्यांनी 'पुनरपिजननं, पुनरपि मरण' या त्रासाचा शेवट केला, या आपत्तींतून मुक्त झाले असा भावार्थ. (१०२७) पृथज्ञ--'पृथक्' असा पाठ हवा. (१०२८) चौतिसें बारा-'अंकानां बामतो गति.' या न्यायाने १२३४ हा शक. एकोत्रींत अजूनही हीच पद्धति सांपडते. छत्तीस छत्तीस शहाण्णवबारा ह्मणजे ३६४३६-१२९६. (१०२९) हरिश्चद्र--हा पर्वत, त्याच प्रमाणे मंगळगंगा नांवाची नदी, सप्तस्थान, दक्षिणकेदार इत्यादि गोष्टींवरून या ग्रंथाचे लेखन स्थान निश्चित करता येण्या- सारखे आहे. पण अजून पावेतों या स्थानांच्या आधारे हे ठिकाण निश्चित झालेलें नाहीं. (१०३४) दिनप्रति-प्रतिदिन या ऐवजी दिनप्रति. (१०३६) दसाडशत-'दसाउडशत' असा पाठ असावासे वाटते. आउड झणजे औट किंवा साडेतीन. आउडशत ह्मणजे एकशे साडेतीन व त्याची दसपट ह्मणजे १०३५. या प्रमाणे रचलेल्या ज्या ओंव्या त्या १० RAEHAरलांची माळ वटेश्वरगुरु च्या चरणकमळी काहिली; असें रूपक अवज्ञाने करावा. पहि तृतीयेचे रूप अर्धकूपी ब्रह्माको आगि-- उपसार द (New Delhi या ओं TIROTRY