Library
Dura~daivii Mohare
Front matter
UNIVERSAL
LIBRARY
OU_184293
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
S
(देवी माहो
( सर्जेराव घाडगा व त्रिंबकजी डेंगळा यांची चरित्रे )
विनाय , माघर लेले
प्रस्तावना लेखक
तिहाससंशोधक दत्तोपंत आपटे
प्रथमावृत्तिः जानेवारी १९३५
किंमत १ रुपया
ময়ক
यशवंत गोपाळ जोशी,
८५४ सदाशिव, पुणे नं.२.
( सर्व हक प्रकाशकाचे स्वाधीन.),
मुद्रक:
श्रीपाद रघुनाथ राजगुरु,
'राजगुरु आणि कंपनीज प्रेस',
५१३ शनवार पेठ, पुणे २.
तिसरे पुस्तक 'वळवांचे पाऊस' व 'पुनर्भेट भाग २ रा' ही दोन पुस्तके काढल्या- नंतर 'दुर्दैवी मोहरे'–सर्जेराव घाडगा व त्रिंबकजी डेंगळा यांची ऐतिहासिक चरित्रे-आज प्रसिद्ध करीत आहे. चरित्रांचे लेखक, व माझे स्नेही श्री. विनायक गंगाधर लेले यांनी हे पुस्तक मला प्रकाशनाला दिल्यामुळे चालू जीवनांतून कांहीं काल बाजूला होण्याकरितां आपण जसे सिंहगड, रायगड वगैरे जुने किल्ले पाहून येतो त्याप्रमाणे ही ऐतिहासिक चरित्रे मला व वाचकांना रुचिपालट व हवापालट यांस उपयोगी पडतील असे वाटते. हे झाले श्री. लेले यांबद्दल. ते माझे स्नेहीच असल्यामुळे अशी संधि ते मला नेहमीच देतील. पण सदर पुस्तकास प्रस्तावना लिहून देऊन सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक श्री. दत्तोपंत आपटे यांनी या पुस्तकाला जें व आणले आहे त्याचा येथे प्रामुख्याने उल्लेख करतो. नम्र साहित्यसेवक यशवंत गोपाळ जोशी अनुक्रमणिका -00800- सर्जेराव घाडगा पृष्ट १ ... १ नानास कैद व पुण्याचा छळ २ बायांवर हत्यार व शेणवी सरदारांची समाप्ति ३ जिवावरचा प्रसंग व इतर हालचाली ४ सबळगडचा बनाव ५ अखेर १३ २७ ४१ ४९ ... त्रिंबकजी डेंगळा ७४ ... १ तोंडओळरव व भूमिका २ बडोद्याचे राजकारणांत टोपीकराचे वर्चस्व ३ गायकवाडाचे दरबारी गंगाधरशास्त्र्याचे महत्त्व ४ शास्त्र्याचा खून ५ जबरदस्ताचा न्याय ६ सुटका, बंदिवास व अखेर ... ८२ ९४ १०५ १२१ ... ...
दोन शब्द शिवशाहीचा अस्त' लिहीत असतांना पेशवाईचा शेवट कसा झाला याचा तपास करूं लागलों तेव्हां खरेशास्त्र्यांचे नाना फडणिसांचे चरित्र वाचण्यांत आले. त्यांत सर्जेराव घाडग्याने केलेला पुण्याचा छळ वाचून मी चकित झालों व त्याचे साद्यंत चरित्र लिहावे असें मनाने घेतले व ते लिहून क्रमशः 'यशवंत'मध्ये प्रसिद्ध केले. सदर चरित्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याबद्दल माझ्या बऱ्याच स्नेह्यांनी सुचविल्यामुळे त्याच्या जोडीस त्रिंबकजी डेंगळ्याचे चरित्र लिहून तें आज वाचकांच्या हाती देतांना मनाला आनंद वाटत आहे. माझे स्नेही रा. यशवंत गोपाळ जोशी यांनी या कामी बरीच चिकाटी व निकड लाविल्यामुळे माझ्या हातून हे लिखाण झाले, याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे. तसेच माझे स्नेही रा. रा. शंकरराव जोशी (वाई. कर ) यांनी या कामी मला आपुलकीने मदत केली व वेळोवेळी मार्मिक सूचना केल्या त्यांबद्दल त्यांचाहि मी फार आभारी आहे. याशिवाय माझे स्नेही रा. रा. माधवराव बापट, रा. रा. माधवराव सावरकर, रा. रा. बाबासाहेब काळे व माझे मावस बंधु रा. रा. सदाशिवराव बापट (शिक्षक गोखले एजुकेशन सोसायटी ) यांनी मला जी मदत केली तिचा साभार उल्लेख करणे जरूर आहे. वि. गं. लेले. .
आधार-ग्रंथ १. नाना फडणिसाचे चरित्र, (खरेशास्त्री) २. बायजाबाई शिंदे-चरित्र. ३. ऐतिहासिक लेखसंग्रह, भाग १०. ४. मराठी दप्तर, रुमाल २. ५. लेखनालंकार. ६. बडोद्याचे राज्यकर्ते. ७. ज्ञानकोश, १३ व १५. ८.Jट डफचा इतिहास. ९. मराठे व इंग्रज. १०. त्रैमासिक भा. इ. मं. (स. १९२५ ते १९२६.) ११. पेशवे दतर, भाग ४१. १२. रियासत ( उत्तर-विभाग ३). १३. फलटणकरांचे दप्तरांतील अखबारांचे सारांश, (शंकरराव जोशी) भा. इ. मं. सं. संग्रह. ( रियासत उत्तर वि. ३ चा मला विशेष उपयोग झाला त्याबद्दल रियासतकार रावसाहेब सरदेसाई यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो.) वा. म. जोशी-चरित्र खंड १ ला लेखक:-रा.प्र. कानिटकर, एम्. ए. लेखक:-ना. वि. कुलकर्णी किं.१ रुपया किं. १२ आणे १ माझ्या गोष्टी साहित्य-गुदाम लेखकः-वि. मा. दी. पटवर्धन, एम्. एस्सी. विनोदी-लेखसंग्रह किं.१॥ रु. २६३ पृष्ठे प्रस्तावना सर्जेराव घाडगा व त्रिंबकजी डेंगळे या दोन पुरुषांची गणना इतिहास- कार खलपुरुषांत किंवा कलिपुरुषांत करतात व यांच्या खटाटोपाने मराठी राज्याची घडी सावरण्याऐवजी एकसारखी बिघडतच गेली त्या अर्थी मराठी राज्य बुडविण्याच्या जबाबदारीत बाजीरावाबरोबर या दोघांनाहि वाटेकरी समजले पाहिजे असा त्यांनी निर्णय दिला आहे. रा. लेले यांना देखील वरील निर्णय मान्य आहे. पण ही मान्यता देतांना त्यांनी या दोघांचा उल्लेख “ दुर्दैवी मोहरे" या शब्दांनी केला असून या शब्दांतच त्यांच्या पुस्तकांतील वैशिष्टय सांठविलेले आहे. हे वैशिष्टय सांगण्यापूर्वी दोघांच्या चरित्राची रूपरेषा नमूद केली पाहिजे. सर्जेराव हा मूळचा कागलचा राहणारा. तेथून एका घोड्यानिशीं घर सोडून तो निघाला आणि परशुराम- भाऊच्या पदरी शिलेदारी पत्करून त्याने भाऊंचा चांगला विश्वास संपादन केला. पुढे इ. स. १७७६ मध्ये नाना फडणिसाने भाऊंकडून जी विश्वासूक मंडळी मागून घेतली त्यांत सर्जेराव होता. तेव्हांपासून नानाजवळ तो १८ वर्षे राहिला. इ. स. १७९६ मध्ये नाना पुण्याहून साताऱ्यास गेला तेव्हां सर्जेराव हा दौलतराव शिंद्याच्या नोकरीत गेला. येथून सर्जेरावाला स्वतंत्र- पणे राजकारणांत डोके घालावे लागले. बाजीराव व दौलतराव या दोघां- नाहि नाना फडणिसाचं महत्त्व कमी करण्याची इच्छा असल्यामुळे सर्जेरावाने नानाविरुद्ध गुप्त कारस्थाने केली. त्यांत यश मिळून त्याने नानास कैद केले व पुण्यांत अनन्वित जुलूम करून पैसे उकळले शेवटी सर्जेरावाच्या वागणुकीचा बाजीरावालाहि वीट आला. पण सर्जेरावाने आपली मुलगी दौलतरावास दिलेली असल्यामुळे दौलतराव शिंद्याच्या जबरदस्त लष्कराचें पाठबळ त्याला होते. तेव्हां त्याच्याविरुद्ध कारस्थान लढविण्याचा धीर कोणास होईना. पण सर्जेरावाने आपले हत्यार महादजी शिंद्याच्या बायकांवर धरल्यामुळे लष्कर उलटले. या सुमारास नानाची कैदेतून सुटका होऊन पुढें तो लौकरच मरण पावला. तेव्हां दौलतरावाची पुणे दरबारांत राहण्याची आवश्यकता संपली; आणि तो उत्तरेस निघून गेला व पुढे सर्जे- रावहि गेला. पण या सर्व गुंतागुंतीच्या राजकारणामुळे जी चाळवाचाळव झाली तिचे पर्यवसान होळकराने पुण्यावर चाल करण्यांत होऊन शेवर्टी बाजीराव पळून इंग्रजाच्या आश्रयास गेला; आणि नंतर वसईचा तह करून (२) त्याला पुण्यांत येणे भाग पडले. सर्जेराव उत्तरेस गेल्यानंतर शिंदे होळ- करांची जूट करून इंग्रजास शह देण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्यांतहि त्याला यश आले नाही. एवढेच नव्हे तर अधिकारभ्रष्ट व्हावे लागले. शेवटी दौलतराव व सर्जेराव यांच्यांत वितुष्ट येऊन सर्जेराव इ. स. १८०९ मध्ये मारला गेला. या हकीकतीवरून सर्जेराव हा हस्तक या नात्याने उपयोगी पडण्याजोगा माणूस होता; पण एका पक्षाचा पुढारी म्हणून त्याला राजकारणांत वावरावें लागले तेव्हां त्याला सर्वत्र अपयश आले. हीच गोष्ट उपमेने सांगावयाची झाल्यास असें म्हणता येईल की, सर्जेराव हे एक मोहरें होतें व या मोहन्या- चा उपयोग करणारा योजक खेळाडू अस्तित्वात असता तर या मोहऱ्याच्या हातून नांव घेण्याजोगे काम झाले असते. पण तसा योग. नव्हता हे त्या मोहन्याचे दुर्दैव त्रिंबकजी डेंगळा हा निमगांव-जावळीचा पाटील म्हणजे खेड्यांतलाच राहणारा, तो बाजीरावाजवळ प्रथम हुजऱ्याचे काम करीत असे. पुढे होळ- कर पुण्यावर चालून आला तेव्हां बाजीरावास महाडास पळून जावे लागले त्या प्रसंगी त्रिंबकजीने बाजीरावाची काही महत्त्वाची कामें मोठ्या शिताफी- ने पार पाडली. यानंतरच्या अनेक व्यवहारांत बाजीरावाच्या मनांतला हेतु ओळखून तो सिद्धीस नेण्यासाठी मनोभावाने झटण्याचा गुण त्रिंबक- जीच्या ठिकाणी होता; पण बाजीरावाचे बेत सिद्धीस जाणे शक्य आहे की नाही आणि या प्रयत्नामुळे डाव उलट अंगलट येईल की काय हे ठरविण्या- ची ऐपत त्रिंयकजीच्या बुद्धीत नव्हती. यामुळे कारभारी या नात्याने त्याने टाकलेले सर्व डाव बाजीरावाभोंवतीं इंग्रजी सत्तेचे पाश आवळून बसण्यासच कारणीभूत झाले. अर्थात् मोहन्याची योग्यता असलेल्या माणसा- वर सर्व राज्याच्या कारभाराची जबाबदारी उचलण्याचा प्रसंग आला व त्यांत त्याला अपयश आले. कित्येकांनी या प्रकरणाच्या विवेचनांत 'दुर्दैव हा शब्द न घालतां आपसांतली यादवी व हुजऱ्याने कारभारी बनणे वगैरे प्रकारांमुळे राज्य गेले असे म्हटले आहे; पण या शब्दांनी मनाचे समाधान होत नाही. कारण ज्या वेळी मराठी राज्याची चढती कमान होती त्या वेळी देखील प्रतिनिधि-पेशवे यांतील चुरस अस्तित्वात होतीच; आणि राणोजी शिंद्यासारख्या हुजऱ्यास सरदारी देण्यांत आलीच होती. त्याच- (३) प्रमाणे ज्या इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वेळी मराठी मुत्सद्दयांवर मात केली त्या इंग्रजाच्या देशांत या वेळी पक्षभेदाच्या पद्धतीवर राज्ययंत्र चाल- विण्याचा प्रघात रूढ होता व तेथे कोणाहि गोरगरिबाचा मुलगा गुणाच्या जोरावर मुख्य प्रधानाच्या हुद्दयावर पोचू शकत होता. यावरून राजकारणात पक्षभेद असणे व प्यादाचा फर्जी होण्यास अवसर मिळणे हे राजकीय दुर्देवा- चे लक्षण समजतां येणार नाही. पण पक्षभेदाच्या भावनेचा अतिरेक होऊन शत्रूला राज्य गिळंकृत करण्यास अवसर मिळणे ही अनिष्ट गोष्ट रावबाजीच्या वेळी घडली. पहिल्या बाजीरावाच्या वेळी तसा प्रकार झाला नाहीं; याचे कारण शाहू हा मराठी राज्याचा मालक, पेशवे व प्रतिनिधि या पक्षांना आवरून धरण्यास समर्थ होता; आणि राज्यांतील कर्तबगार लोकांचा उपयोग आपसांतल्या भांडणांत न करतां दूरवरच्या शत्रूवर चढाई करण्याच्या कामी करण्यास बाजीराव समर्थ होता. यामुळे एकदोन अपवाद सोडल्यास पक्षभेद त्या वेळी विकोपास गेला नाहीं; आणि मराठी साम्राज्य वाढत्या स्थितीत राहिले, रावबाजीच्या वेळी परिस्थिति निराळी होती. शाहूची आवरशक्ति रावबाजीच्या ठिकाणी नव्हती यामुळे नाना व दौलत- राव यांच्यामधील चुरशीला प्राणघातक स्वरूप देण्यास सर्जेरावास सवड मिळाली; पण इंग्रजांविरुद्ध एकी करण्याचे विचार सर्जेरावाने व डेंगळ्याने केले तेव्हां इंग्रज इतके जबरदस्त बनले होते की, अशी एकी करूं पाहणा- यालाच रावबाजीच्या हातून इंग्रजांनी कैद करविले. असा हा जबरदस्ताचा न्याय होता. तात्पर्य शाहू व बाजीराव हे दोधेहि आपापली कामें करण्यास समर्थ होत आणि निजाम किंवा दिल्लीकर हे शत्रु दूर अंतरावर असून त्यांच्यावर शह बसविणे शक्य झाले. रावबाजी व त्रिंबकजी यांना इंग्रजाशी झगडतांना यांतलें कांहींच आनुकूल्य नव्हते. रावबाजीच्या नाकर्तेपणाचे साम्य इंग्लंडांतील चौथ्या जॉर्जशी दाखवितां येईल. आणि इंग्लंडांतील राजकारण पक्षभेदाच्या पद्धतीवर या वेळी चाललें होते असेंहि म्हणता येईल. पण या पक्षभेदाची चुरस पार्लमेंटमध्ये शाब्दिक खल करण्यांत दिसून येत असे; मतभेद होतांच एका पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या पुढाऱ्यास कैद करणे अगर जिवानिशी मारणे हा प्रघात तेथे चालू नव्हता. राज्याची मालकी राजाची नसून राजकीय धोरणाचा निर्णय लोक- मताने करावयाचा ही प्रथा सुरू झाल्यामुळे व्यापक राजकारणाची तत्त्वे व (४) राजकीय स्वार्थ साधण्यास लागणारी मुत्सद्देगिरीची भाषा इंग्लंडांतील बहु. जनसमाजाच्या परिचयाची झाली होती. यामुळे कॉर्नवॉलिस जाऊन वेल्स्ली आला आणि क्लोज जाऊन एल्फिन्टस्टन आला तरी इंग्लंडचा स्वार्थ साध. ण्यासाठी त्यांनी योजलेल्या भाषेत राजकारणाची एकसूत्रता राहू शकत होती. पार्लमेंटांतील वादविवाद हे राजकीय शिक्षण देणारे आखाडे असल्या- मुळे इंग्रजांना मुत्सद्देगिरीच्या व्यापक स्वार्थाची तालीम मिळत होती. तसा मुत्सद्देगिरीचा आरवाडा मराठी राज्यांत नव्हता. लष्करी शिक्षणासाठी प्रत्यक्ष युद्धाचे प्रप्तंग हे आग्वाड्यासारखे उपयोगी पडत. पण राजकीय तत्त्वांचे प्रतिपादन करणारा आवाडा मराठी राज्यांत नसल्यामुळे मुत्सद्दे- गिरीची परंपरा चालणे केवळ योगायोगाची गोष्ट होऊन बसली. तात्पर्य राज्याची सूत्रे भलत्या माणसाच्या हातीं जाऊं नयेत व शेकडों लोकांच्या पारखीस उतरलेल्या मुत्सद्दयांच्या हातीच ती आलटूनपालटून यावीं अशी योजना इंग्लंडांत होती. यामुळे राजाचे नाकर्तेपण राजकीय परिस्थिति विघडण्यास कारणीभूत झाले नाही. किंवा लोकांना न पटणारा कारभारी सूत्रचालक झाला नाही. पण मराठी राज्यांत राज्य हे राजाच्या मालकीचे ही समजूत बद्धमूल असल्यामुळे बाजीरावाचें नाकर्तेपण एकंदर राज्यास बाधक होऊ शकले आणि त्यानेच या राज्याच्या मालकीचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले तेव्हां देखील होत असलेला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आपल्या वाट्यास असा राजा आल्याबद्दल दैवास दोष देण्यापलीकडे कोणत्याहि प्रकारचा प्रतिकार करण्याची कल्पना त्या वेळच्या मराठी राज्यांतल्या लोकांना सुचली नाही! राज्ययंत्र हे समाजाच्या मालकीचे असते हे इंग्रजांना माहीत असल्यामुळे एलफिन्स्टचा स्वार्थीपणा व हेस्टिंग्ज- चा जुलूम क्षम्य ठरला, आणि हे तत्त्व मराठी समाजास माहीत नसल्यामुळे त्याने त्रिंबकरावाच्या प्रयत्नांस अपयश येतांच त्याची गणना कलिपुरुषांत केली. असो रा. लेले यांनी हा विषय लोकांपुढे चटकदार रीतीने मांडला असल्यामुळे मराठी वाचकांना तो लक्षात येण्यास चांगली मदत होईल असा भरंवसा वाटतो. दत्तात्रय विष्णु आपटे माझे ज्येष्ठ बंधु ती. रा. रा. नाना यांस- -विनायक
माझे पुढील प्रकाशन
जीवनपथ
सुप्रसिद्ध आर्टिस्ट एन. एम्. केळकर यांच्या प्रकाशित व अप्रका-
शित कथांचा संग्रह-मार्च १९३५ मध्ये.
आवडत्या गोष्टी
गोष्टी :
:
समारें ५० लघुकथा-लेखकांच्या गोष्टींचा एकत्र संग्रह. पृष्ठसंख्या
सुमारे ५००, फेब्रुवारी १९३५ मध्ये
पांढरे ढग
स्वतंत्र सामाजिक कादंबरी, (लेखक-वि. स. खांडेकर)
हृदय आणि बटाटे :
स्वतंत्र सामाजिक कादंबरी. (लेखक-यशवंत गोपाळ जोशी)
शिवशाहीचा अस्त :
(लेखक-विनायक गंगाधर लेले)
( शिवशाहीचा शेवट कसा झाला याची हृदयभेदक कहाणी)
प्रकाशक
यशवंत गोपाळ जोशी, ८५४ सदाशिव, पुणे नं. २.
इवी मोर सर्जेराव घाडगा :: नानास कैद व पुण्याचा छळ प्रेमाने दूध पाजणाऱ्या हातास झदिशी वळून विषारी डंख मार- णारा इरसाल खुनशीपणा, मानेवर समशेरीचा वार होत असतां तिच्या तडाक्यांतून निसटण्याची अपूर्व समयसूचकता, आपणास पाहिजे तें तडीस नेण्यासाठी करावा लागणारा सर्व त-हेचा युक्तायुक्त खटाटोप ज्या महापुरुषाजवळ सामावला होता; ज्याने दुसन्यावर व दुसऱ्यांनी ज्याच्यावर मारेकरी घातले; हाणा, मारा, तोडा, जाळा व पोळा याखेरीज ज्याने उभ्या हयातीत दुसरा हुकूम फर्माविला नाहीं; 'खल-पुरुष, खल-पुरुष ' म्हणून ज्याच्या नांवाने एकसारखा यथार्थ डांगोरा पिटला जात आहे-असा सर्जेराव घाडगा' वाचकांच्या पुढे उभा करण्याचा मानस आहे.
२ दुर्दैवी मोहरे सर्जेराव घाडग्यास लोकांनी कितीहि नांवें ठेविली तरी त्याची स्वतःची अशी तीन नांवें होती; तुळोजी, सखाराम व सर्जेराव. हा कागलचा राह- णारा. कागलसारखें भिकार गांव व त्याचें तें छोटेखानी घर हे त्याच्या कर्तबगारीस पुरेसें ठिकाण नव्हते; म्हणूनच जणु काय आप्तेष्टांशी तंटामस्ती करून ही स्वारी एका घोड्यानिशी बाहेर पडली व परशुरामभाऊजवळ शिलेदार म्हणून राहिली. लवकरच त्याने भाऊंचा चांगलाच विश्वास संपादन केला. पुढे इ. स. १७७६ साली मोरोबादादांचे बंड मोडण्यासाठी म्हणून नाना फडणिसाने भाऊंपासून चारपांचशे विश्वासू माणसे आपल्या पदरी ठेविली, त्या वेळी सर्जेराव नानांच्या पदरीं राहिला. यानंतर अठरा वर्षे सर्जेराव नानांजवळ होता. या अवधीत त्याने नानांची लहानमोठी पुष्कळच कामें केली, त्यामुळे पुणे-दरबारच्या सर्व खाचाखोंचा त्यास माहीत झाल्या व त्यांचा उपयोग त्याने पुढे पूर्णपणे करून घेतला. इ. स. १७९६ साली नानावर जेव्हां कठीण प्रसंग आला त्या वेळी तो पुणे सोडून साताऱ्यास गेला; व त्याच वेळी सर्जेराव शिंद्यांच्या नोकरीत दाखल झाला. अठरा वर्षे नानांच्या नोकरीत काढल्यानंतर त्या वेळच्या राजकारणाची आणि नाना फडणिसांच्या कमकुवत परिस्थितीची कल्पना सर्जेरावास सोळा आणे आली आणि त्याने ताबडतोब नानाची नोकरी सोडून शिंद्याची धरली. येथे मात्र त्याच्या कर्तबगारीस पूर्ण वाव मिळाला. या गरुडाने झेपी मारण्यासाठी आपले पंख फडफडावले. मात्र दुर्दैव इतकेंच की, या गरुडाच्या पराक्रमास मराठी साम्राज्याची घडी नीट बसविण्यासारखें मंगल कल्पनेचे अधिष्ठान नसल्यामुळे देशाचे अतोनात नुकसान झालें! सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाची माळ नाना फडणिसाच्या मुत्सद्देगिरीस दाद न देतां रावबाजीच्या गळ्यांत पडली; आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, जो नाना रावबाजीस पेशवेपद मिळू नये म्हणून जिवापाड मेहनत करीत होता व राजकारणी खेळ खेळत होता त्याच नानाच्या प्रयत्नाने व मदतीने बाजीरावास पेशवेपद प्राप्त झालें! दौलतराव शिंद्याचाहि या कामांत हात होता. किंबहुना नाना व दौलतराव या उभयतांचा या प्राप्तीत अर्धा वाटा होता व तो नानास चांगला खरपूस मिळालाहि. विषाचे अमृत व अमृताचे विष करण्याची अद्भुत जादु राजकारणांत आहे; म्हणूनच सर्जेराव घाडगा ३ असले लोकोत्तर चमत्कार नेहमी पाहावयास मिळतात; पण हा बनाव फार काळ टिकला नाही, आणि या विषाचा दाह नानास लवकरच जाणवू लागला, असली विष पचविण्याची अचाट शक्ति आतां त्याच्याजवळ नसल्यामुळे बिचाऱ्याचा त्यांतच अंत झाला! बाजीराव गादीवर आला व नानाच्या हातांत कारभार गेला; पण नानाचे मन उदास होते. त्यास बाजीरावाचा विश्वास येईना; आणि याचा प्रत्यय त्यास लवकरच आला. आरंभी शिंदे व नाना यांचे एकचित्त होते; तेव्हां शिंद्याने नानांच्यासमक्ष बाजीरावास कळविले की, आम्हां दोघांच्या खटपटीने तुम्हांस पेशवेपद मिळाले; तेव्हां आतां नानाच्या विचारें चालावे. आम्ही हिंदुस्थानांत जातो.' या शिंद्याच्या सांगीस बाजीरावाने नुसते शाब्दिक अनुमोदन दिले; पण ज्या वेळी शिंदा आपली फौज काढून नेऊ लागला त्या वेळी तो या गोष्टीस कबूल होईना. शिंद्याने फौजेची जास्त निकड लावतांच "तुम्ही पलटणे उठवून न्याल तर आम्हीच वाडा सोडून तुमचे लष्करांत राहावयास येतो. कारण तुम्ही गेल्यावर नाना आमची काय वाट करील याचा भरंवसा आम्हांस मुळीच येत नाही.” असें रावबाजीने शिंद्यास स्पष्टच कळविलें. सर्जेराव घाडग्याच्यामार्फत बाजीरावाने शिंद्याशी असा गुप्त करार केला की, " नाना जिवंत असेतोपर्यंत शिंद्याने बाजीरावाचे रक्षणाकरितां दक्षिणेत राहावें आणि शिंद्याच्या फौजेचा खर्ज बाजीरावाने चालवावा. आणखी बाजीरावाने याच कारणास्तव शिंद्यास दोन कोट रुपये देण्याचे कबूल केले होते.' अशा त-हेने नानापासून आपला बचाव करण्या- साठी बाजीरावाने तरतूद करून ठेविली. इकडे शिंद्याने हिंदुस्थानांत निघून जावें म्हणून नानानेंहि काही रक्कम त्यास देऊ केली होती. नाना, बाजीराव व शिंदे या तिघांवर आपला शह बसावा आणि मनाला मानेल तशी सुलतानी सत्ता आपल्या हातांत यावी म्हणून सर्जेराव तिसरेंच कारस्थान रचीत होता! ते असे की, आपली मुलगी दौलतरावास देऊन त्यास बगलेत मारावयाचा व मग शिंद्याच्या समशेरीने पेशवा रेशमासारखा नरम करून कोणाच्याहि मिशांस कांदे बांधण्याची आसुरी सत्ता आपल्या मनगटांत आणावयाची. पण सर्जेरावाचे हे कारस्थान तडीस जावयास नानाच काय तो भारी होता, म्हणून त्याचाच कांटा काढण्याच्या उद्योगास तो लागला. या वेळी नाना फडणिसाचे दुर्दैव ओढवले होते; कारण गादीचा मुख्य " दुर्दैवी मोहरे धनी-बाजीराव नानास पाण्यांत पाहात होता. शिंदा बाजीरावाच्या गुप्ता कराराने जवळजवळ बाजीरावास सामील झाला होता. याशिवाय सर्जेराव घाडगा दौलतरावाचें मन नानाविषयी कलुपित करण्याचे काम एकसारखें करीत होताच; आणि कामिनीच्या जादूने त्याने त्यास पूर्णपणे भारून टाकण्याचा घाट घातला होता. या भरत भर म्हणून नानास या वेळी आणखी एक नवीनच विघ्न उत्पन्न झाले होते ते असे की, बाजीरावाचा दत्तक भाऊ अमृतराव, पेशव्यांचा कारभार मी करणार असें म्हणूं लागला. ही त्याची मागणी बाजीरावाकडे पहिल्यापासून होती. हे त्याचे म्हणणे अगदी न्याय्य व रास्त होते; कारण पेशवे घराण्यांत भावाने कारभार पाह- ण्याची वहिवाट पूर्वकालीन होती. अमृतरावाचे म्हणणे असे की, 'सवाई माधवरावाच्या वेळी नानांनी कारभार केला हे ठीकच झाले; पण आतां आम्ही सज्ञान झालों, तेव्हां नानांनी कारभार आमचे स्वाधीन करून फक्त आपली फडणिशी संभाळून असावे; आणि सरकारचा पैसा दाबून ठेवला आहे तो शिंद्यास देऊन त्याची रवानगी हिंदुस्थानांत करावी. 'शिंद्याच्या राहण्याने प्रांत ओस जाला, रयत नागवली, दरबारचा उपमर्द झाला, बंडखोर लोकांचे तंटे तोडण्याच्या नादाने लोकांकडून मन मानेल तसा पैसा उकळला गेला.' हे त्याचे म्हणणे अक्षरशः स्वरें होतें. अमृतराव तसा शहाणा होता. बाजीरावाचे व नानाचे पटणे शक्य नाही हे त्याने जाणले होते व तदनुसार त्याने आपला पक्ष बळकटहि करून ठेवला होता. अशा त-हेने नानास सर्व त-हेनें प्रतिकूल व सर्जेरावास सर्वतोपरी अनुकूल अशी परिस्थिति निर्माण झाली. अमें जरी होते तरी नानास पकडणे मात्र तितके सोपे नव्हते. सध्या व सरळ मार्गाने नाना हाती लागणे अशक्यप्राय. तो नेहमी बंदोबस्ताने राही. तेव्हां त्यास पकडण्यासाठी सर्जेरावाने विश्वास- घाताचा अवलंब केला. नानाच्या भोवती कपटकारभाराचे जाळे पसरण्यास सुरुवात झाली. वास्तविक सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नानाच्या कारभाराची घडी जी बिघडली ती कायमचीच. बाजीराव ता. ५-१२-१७९६ रोजी गादीवर आला, व नंतर अवघ्या सव्वीस दिवसांनीच नानांनी आपल्या दत्तक पुत्रा- बद्दल बाजीरावाकडून लेखी करार करून घेतला; तो श्रीमंतांनी मोठया मिनतवारीने जवळजवळ जुटुमाचा रामराम म्हणूनच करून दिला. सन सर्जेराव घाडगा १७९७ अखेरपर्यंतचा काल नानांनी डोळ्यांत तेल घालून काढला. दिवसा- नुदिवस उभयतांमधील वैमनस्य वाढत चाललें. ३० सप्टेंबर १७९७चा नानांचा उल्लेव असा सांपडतो की आपला कारभार आपण मांभाळा; मी वृद्ध झालों, स्नानसंध्या करीन.” त्यानंतर दसऱ्याचे मंगलदिनी उभयतांतील बेगडी प्रेमाने सीमोल्लंघन करून त्या ठिकाणी उघड शत्रुत्वाने कायमचें ठाण मांडलं. विजयादशमीचे दिवशी प्रातःकाळी नानास श्रीमंतांकडून बोलावणे गेले, पुन्हा सीमोल्लंघनास स्वारी निघतांना नानास पाचारण्यांत आले; तरी नाना आले नाहीत. शमीपूजन उरकून स्वारी माघारी फिरली, तेव्हां नानांची व श्रीमंतांची गांठ घाशीरामाचे बागेनजीक पडली. नानांबरोबर फडके, शेलूकर, शिरवळकर व दादा गद्रे आणि तीन हजार फौज होती. नाना अंबारीतच होते, म्हणून अंबारीजवळ अंबारी लावून सोने, नजराणा वगैरे देण्याचा दरबारी प्रकार अंचारीतल्या अंबारीतच उभयतांनी केला; आणि नंतर नाना दोन घटका रात्रीस माघारी आले; स्वारीबरोबर वाड्यांत गेले नाहींत. शिंदा मात्र सरकारवाड्यांत गेला होता. अशा त-हेने श्रीमंत व नाना यांच्यांत तिरपी चाल दिसू लागली. शिंद्यास शिकारीचा नाद भारी; तेव्हां तो शिकारीस नेहमी जाई. नानांच्या राहत्या गजूस शिंदा शिकारीस चालला म्हणजे नाना गोट तयार करून फार बंदोबस्ताने राहात असे. दसऱ्यानंतर पंधरा दिवसांनी शिंदे पांच-सात हजार फौजेनिशी वाड्यांत आले. नंतर नानाहि वाड्यांत गेले, व मग चार तास खलबतें व पुष्कळ भवति न भवति झाली. शेवटी नानांनी सर्व कारभार पाहावा व शिंद्याने हिंदुस्थानांत जावे असे ठरले. पण हे नुसते ठरलेच; घडलें मात्र अगदी निराळे. कारण बाजीरावास या चार घटकांच्या वाटाघाटींतून बाहेर पडलेला निर्णय बिलकुल पसंत नव्हता. त्याने नानास कारभारावरून दूर करण्याचे निश्चित केले. पुढे १८ नोव्हेंबर रोजी पर्वतीवर आतषबाजी झाली त्या समयी त्रिवर्ग श्रीमंत व बाईसाहेब वगैरे मंडळी गेली होती, नानाहि गेले होते. आतषबाजीचा तमाशा शिरा जाहला, अर्धरात्रीस स्वारी माघारी आली, पण वाड्यांत पहारे व बंदोबस्त जास्त कडक झाला. चौकाचौकावरून पहारेकरी तोडे शिलगावून होते. नानांनी पहारे उठवा म्हणून निकड लावली असतां श्रीमंतांनी बंदोबस्त जास्तच कडक ठेवला. लक्षण ठीक दिसत ६ दुर्दैवी मोहरे नाही. केव्हां काय होईल याचा नेम नाही. हे पाहून नानाहि जास्तच बंदोबस्ताने राहूं लागला. हे प्रकार पाहून लोक हवालादिल झाले. 'नानास शिंदा चार-आठ रोजांत कैद करणार' अशी कुजबूज सुरू झाली. अशा तन्हेने नाना व बाजीराव यांचे प्रकरण हातघाईवर आले. शिंदे व नाना म्हणजेच पर्यायाने सर्जेराव व नाना. यांचे परस्पर संबंध आतां इतके चांगले नव्हते. त्यांच्यांत कुरबुर सुरू झाली होती. शिंद्यास नानांनी ऐवज द्यावयाचा करार झाला होता त्यांपैकी काही त्यास पोहोचला होता, बाकी छप्पन्न लक्ष राहिले होते त्याबद्दल शिंद्यांनी निकड लाविली. तेव्हां नानांनी कळविले की, 'कूच झाल्याशिवाय ऐवज मिळत नाही. जांबगांवास गेल्यानंतर निम्मे व गंगापार झाल्यानंतर निम्मे याप्रमाणे ऐवज चुकता करूं.' यास शिंद्यांनी उत्तर केले की, 'ओढघस्तीमुळे ऐवज हाती आल्याशिवाय लोक कूच करीत नाहीत. आणखी असे की, श्रीमंतांस तुम्हांकडून काही इजा पोचूं नये म्हणून गद्रे, शेलूकर, पिंगळे व बजाबा शिरोळकर यांपैकी दोघांस ओलीस द्यावें. एक संवत्सरपावेतो सर्व यथास्थित व सुरळीतपणे चालल म्हणजे त्यांस सोडूं. ऐवज हाती आल्या- बरोबर आम्ही कूच करितो.' पण नानास दौलतरावाचा भरंवसा बिलकुल नव्हता, म्हणून कांहींच निकाल न लागतां प्रकरण चिघळावयास लागले. तरीसुद्धां प्रकरण जास्त चिरडीस जाऊ नये म्हणून नाना आपल्याकडून खटपट करीत होता. फिलोज ( Michael Philose) नांवाचा इटालियन युरोपियन शिंद्याच्या कंपूचा अंमलदार होता; त्यास नानांनी मध्यस्थी घालून शिंद्याची समजूत घालण्याचा पांचसात वेळां प्रयत्न केला, पण सर्व खटाटोप व्यर्थ गेला. शिंद्याच्या त्रासाने लोक इतके त्रस्त झाले होते की, शिंदे जातील तेव्हां देशाचा भोग संपेल' असे लोक बोलू लागले. अशा त-हेने नाना, बाजीराव व दौलतराव यांची मने एकमेकांविषयी कलुषित झाली. कोणी कोणाकडे जाईना. ऐवज टाकावा म्हणून शिंद्याने नानाशी एकसारखी रोहिलेगिरी चालू केली; तेव्हां वैरभावाचा स्फुलिंग केव्हां पेट घेईल आणि आगीचा डोंब उसळेल याचा नेम लागेना. नानाने अत्यंत बंदोबस्ताने राहण्यास सुरुवात केली. पेशव्यांच्या वाड्याभोंवतीं शिंद्यांचा पहारा कडक झाला. लोकांत गडबड उडाली. क्षणाचा भरंवसा लागेना. मातबर सरदारमंडळी व खुद्द नाना फडणीस आपआपल्या सर्जेराव घाडगा फौजा सज्ज ठेवून दिवस अत्यंत शिस्तीने व काळजीने लोढू लागले. 'नाना फौजेनिशी बाहेर पडणार, व त्याने एकदां का पुणे सोडिले म्हणजे मग त्यास पकडणे फार कठीण जाईल. ठिकठिकाणची सरदारमंडळी व दरबार त्यास साहाय्य करतील, व मग तो आपली चटणी उडविण्यास कमी करणार नाही.' अशी साधार भीति शिंदे व सर्जेराव या उभयतांस वाढू लागली. तेव्हां नानास शह देण्यास धाकदपटशा व दरबारी राजकारणे यांचा काहीएक उपयोग होत नाहीसे पाहून सर्जेरावाने नानाचा विश्वासघात केला. तो प्रकार असा- ऐवज द्या म्हणजे मग कूच करतो, ओढघस्तीमुळे लोक माझे ऐकत नाहीत' वगैरे भाषा शिंद्याने सोडून दिली व नरमाईचे धोरण स्वीकारले. शिंद्याने हा पालटलेला रंग नानाच्या लक्षात आला नाही असें नाहीं, कारण नानासुद्धां कांहीं कच्च्या गुरूचा चेला नव्हता; पण एकदां का माणसास विपरीत काल आला म्हणजे मग त्याची बुद्धि चलित होते हेच खरे. त्या वेळी युरोपियनांची वागणूक साधारणपणे रीतसर व प्रामाणिक- पणाची असे. त्या वेळपर्यंत तरी त्यांनी कोणाचा उघड उघड विश्वासात केल्याचं उदाहरण नसल्याने नानांचा युरोपियनांवर विश्वास असे; पण य भरंवशाच्या म्हशीसच पुढे टोणगा झाला. शिंद्यानेसुद्धा हा घाट मोठ्या शहाणपणाने घातला. प्रथम त्याने बाणाजी शेटे प्रभृति आपली सरदारमंडळी नानाकडे मध्यस्थीस धाडली. आतां आम्ही कूच करतो, तेव्हां एकवार तुम्ही आमच्या येथे भोजनास यावे, या गोष्टीस नाना लवकर तयार होईना. कारण शिंदा व सर्जेराव आपला कांही घातपात करतील अशी नानास शंका होतीच. अशा स्थितीत नानाच्या भरंवशांतील कोणी मनुष्य हाती लागल्या- शिवाय नाना आपल्या कबजांत येणार नाही हे सर्जेरावाने ताडले, व नानाच्या साधारणपणे विश्वासांतील मनुष्य मोकिल फिरोज हा होता त्यास त्याने या कार्यासाठी तयार केलें व नानाकडे पाठविले. मोकीलने बायबलवर हात ठेवून शपथ घेतली की, शिंद्यांनी आपला करार मोडल्यास मी आपल्या कंपूनिशी तुम्हांस येऊन मिळेन, अशा त-हेने मोकीलने जामिनकी घेतल्यानंतर शिंद्याने कूच करण्याची तयारी केली, आणि त्यास निरोप देण्याकरितां शिंद्याकडे नानांनी ३१-१२-१७९७ ला रविवारी जाण्याचे ठरले. मोकिलने हे काम इतके रेटले. सर्जेराव येथेच थांबला नाही, तर त्याने ८ दुर्दैवी मोहरे नानाच्या भरंवशांतील दुसरा सरदार यशवंतराव घोरपडे यासहि काही लांचलुचपतीने आपल्याकडे वश करून घेतले. त्यानेहि शिंद्याच्या मनांत कांहीं कपट नाही अशी नानाची खातरजमा करून दिली; तेव्हां त्या दिवशी आपला अरबांचा रिसाला व कांही साथीदार घेऊन नाना शिंद्या- च्या भेटीस गेला. प्रथम कांहीं कुशल. प्रश्न झाले. नंतर नाना, मोकील व शिंदे कांहीं खलबतासाठी निराळ्या जागेत गेले. तेथें जातांच बायबलवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या हातांनी नानास चकडचंद केले ! मोकीलचे हे कृत्य पाहून नाना थंडच पडला ! अशा त-हेने सर्जेरावाने आपला डाव साधला, व ज्या पायरीच्या आधाराने त्याने शिंद्याकडे प्रवेश केला तीच सपशेल मोडून टाकली. हा सर्जेरावाचा पहिला पराक्रम होय! ह्या बनावाने पुण्यांत मोटा हाहाःकार उडाला. लोकांची तोंडे काळी- ठिक्कर पडली. सर्व पुण्यावर प्रेतकळा पसरली. नानाच्या अरबांनी खूप दंगा केला, बरेच लोक कामास आले, पण शिंद्याच्या फौजेने त्यांस उधळून लावले. याच वेळी पेशवाई नष्ट झाल्याचा भास झाला. नानाच्या कैदेविषयी त्या वेळचे उद्गार असे आहेत, 'नानास कैदेत घालण्याचा विधि समाप्तीस गेला; याउपरी श्रीमंतांचे राज्याचा आळा गेला. आतां जो जबरदस्त त्याचेच पागोटें वांचल.' सर्जेरावाने फेकलेल्या विश्वासघाताच्या सरकफांसांत नानासारखा मुरब्बी मुत्सद्दी अडकला. अशा त-हेने नानाचे विघ्न निर्वेध झाल्यावर सर्जेरावाच्या पाशवी वृत्तीस माहोर आला; आणि त्याच्या डोक्यांतून प्रत्यक्ष यमराजा- लाहि लाजवतील अशा सूडाच्या व छळाच्या कल्पना निर्माण झाल्या. त्या सर्वांचे प्रयोग या महाभागाने पेशव्याच्या राजधानीत केले; व कांहीं काल ही पुण्यपुरी नसून यमपुरी आहे की काय असा देखावा त्याने निर्माण केला ! कोणाच्या पाठीची चाबकाने चामड़ी लोळव, कोणास तोफेच्या तोंडी दे, कोणाचे नाक-कान कापून त्याची धिंड काढ, कोणाच्या हातापायांस याण यांध व ते पेटवून त्याची अंतरिक्षांत रवानगी कर, कोणाच्या गुह्य ठिकाणास चाप लाव व ताडण कर असे अनंत प्रकार सर्जेरावाने सुरू केले! नाना फडणिसांच्याबरोबर दादा गद्रे, आबा शेलूकर, बजाबा शिरोळकर व राघोपंत गोडबोले वगैरे मंडळींस अटक करण्यांत आली. महिना-पंधरा दिवस त्यांस केंदेंत डांबून नाना त-हेचा धाकदपटशा करण्यांत आला, व सर्जेराव घाडगा ९ ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे दहावीस लक्ष रुपये दंड उकळण्यांत येऊन सोडून देण्यात आले. नानांचे दुसरे साथीदार त्रिंबकराव परचुरे, नारोपंत चक्रदेव, नारायण बापूराव वैद्य, गोविंदराव पिंगळे, बाबा फडके, अप्पा बळवंत, राघोपंत निजसुरे वगैरे मंडळीससुद्धां ठाणबंद करण्यांत आले. त्यांच्याजवळ जो काही द्रव्यसंचय असेल नसेल तो सर्व लुबाडण्याचा उद्योग अत्यंत क्रूरपणाने सुरू झाला. या कामांत बाजीरावास अमृतराव व बाळाजी कुंजीर यांचे साह्य होते; पण या सर्वांचा सूत्रचालक सर्जेराव घाडगा होता. त्र्यंबकराव परचुरे याने आपणाजवळील सर्व ऐवज सरकारांत देऊन तीन लक्ष रुपये शिंद्यास दिले व काशीयात्रेस कायन जाण्यासाठी निरोप घेतला. त्याने हे सर्व बाळाजी कुंजिरामात केले; पण काही अंतरावर त्रिंबकराव पर- चुरे जातो न जातो तोच त्यास पकडून बाजीरावाने माघारी आणिलें. लगेच सर्जेरावबापूची स्वारी वाड्यांत आली. परचुरे याजवर अनेक त-हेचा निकर्ष करण्यांत आला, नाराणगव वैद्य यास चायकाच्या फटकाऱ्यांनी मरे- मरेतों मारण्यांत आले. तीच अवस्था अनेकांची झाली. अशा त-हेने सर्वा- वर प्रसंग कठीणच. प्रत्येकाच्या प्राणावर बेतलेली. कोणाप्त नागडेउघडे करून तोफेवर बसविलें, कोणास छड्यांनी नखशिरवान्त फोडून काढलें, कोणास पाण्यावाचन ठार केले. असल्या राक्षसी उपायांनी लोक हैराण करून ह्या प्रत्येकापासून जास्तीत जास्त पैसा उकळण्यांत आला. बापूराव केशवाचा पुत्र चिंतोपंत देशमुख यास मारिलें. याप्रमाणे पुणे शहरांत हा कहर सतत सहा महिने चालू होता. नानाचा चुलत-पुतण्या गंगाधर गोविंद भानू याजपाशी जबरदस्त पैका सर्जेराव मागू लागला. तो गंगाधरपंत देईना, तेव्हां अंगाला चाप लाविले; तारीख १०-४-१७९८ रोजी त्यास तापलेल्या तोफेवर बसविले; पायांस धोंडे बांधिले विस्तव करून दोनप्रहरी उष्ण तोफेवर बसविले; नाजुक जाग्यास झळ लावून ताडणहि झाले. असल्या सैतानी हालअपेष्टा पाहून सर्जेरावास गंगा- धरपंताची दया आली नाही, पण काळास आली व त्यांतच त्याचा अंत झाला! त्याचा छळ येथेच संपला नाही. त्याच्या दोघी स्त्रिया सती जाऊं लागल्या, तेव्हां घाडगा इतका क्रूर की त्या नराधमाने ५ लक्ष रुपये मागि- शेवटी पुण्याहून परवानगी आणून त्यांनी वाई येथे सहगमन केले. गंगाधर भानूचा वध होण्यापूर्वी अवघे दोनच दिवस त्याचा बाप वारला, तले.
१० दुर्दैवी मोहरे ~~~ म्हणूनच त्याचा पुत्रशोकाचा प्रसंग टळला! अशा त-हेनें नानाचे चुलत- घराणे सर्जेरावाच्या क्रोधानलांत खाक झाले. आतां खुद्द नानाची जिंदगी लोहगडावर होती व तो किल्ला धोंडोपंत निजसुरे याच्या ताब्यात होता. ही सर्जेरावाची धोंड आतां आपणावर येणार हे जाणून त्याने ता. ९-४-१७९८ रोजी सरकारांत लिहून कळविलें की, येथे काय जिंदगी असेल ती सर्व पाहून घ्या व माझे अब्रूस धक्का न लागेल असा बंदोबस्त करा. पण धोंडोपंताच्या लिखाणास विचारतो कोण व दाद लागते कशी! सर्जेरावाचे लोक तेथे गेले असतां धोंडोपंताने किल्ला तर हवाली केला नाहीच, उलट निजसुरे यांनी मोठ्या हिकमतीने वागून हल्ला करणाऱ्या लोकांस दाद दिली नाही. चिमाजीअप्पास गादीवर आणला म्हणून परशुरामभाऊवर बाजीरावाची अत्यंत वक्रदृष्टि. त्याने सर्जेरावास सांगून भाऊची मालमत्ता जप्त केली. हे प्रकरण एकट्या भाऊवरच थांबले नाही, तर बाजीरावाने इतर पटवर्धनांचाहि छळ केला. पांचपन्नास लाख रुपये उपटण्याचें तें एक साधन झाले. त्यानंतर हरि विष्णु सहस्रबुद्धे याने चिमाजीअप्पास जबरदस्तीने पालखीत बसविलें म्हणून त्यास सरकारवाड्यांत नेऊन पन्नास कोरडा मारला. पाठींतून रक्त फार गेलें. हाताचे बोटांस व कानांस चाप लाविले. एक कान तुटला. मार दिल्यानंतर बाजारांतून गल्लोगल्लों फिरविले. चिमाजीच्या आग्रहावरून हा प्रकार झाला असे म्हणतात. चिमाजीअप्पाने असा आग्रह धरावाच, कारण तसें न करील तर एखादे वेळेस त्याच्याहि जिवास धोकाच. अशा त-हेनें सर्जेराव, बाजीराव व दौलतराव या त्रयीने आपल्या सैतानी लीला पुण्यांत अव्याहत चालू ठेवलेल्या पाहून लोक गांगरले व घाबरले. त्या वेळच्या सर्जेरावाच्या राक्षसी लीलांबद्दल कांही उद्गार आतां नमूद करूं. एक द्रव्याचे कूळ नाना, त्यांचे हातींच आहे. त्यास खाणार. नाना- कडील सर्व माहीतगार मंडळी लष्करांत नेऊन धाकदपटशा दाखवून ऐवज काढिला. गांवांतील सावकारांचे घरीं सरकारी माणसें बसली.' खुद्द सर्जेराव बायजाबाईच्या लग्नानंतर दहावे दिवशीं नानाच्या वाड्यांत राहिला. नानाच्या देवघरांत नित्य अजापुत्राचा वध चालला आहे. पुण्यातील गृहस्थांस दक्षिण दिशेच्या स्वामीप्रमाणे घाडग्याचे भय झाले आहे. श्रीमंतांसमक्ष सर्जेराव शिवीगाळ करतात. याळाजी कुंजीर त्यांचे मसलतींत. श्रीमंतांचे चित्तांत काही गैर येत नाही. नाना शिंषाचे सर्जेराव घाडगा " गोटांत होते त्यांत ता. ६-४-१७९८ रोजी रात्री चंद्रोदयानंतर दोन घटकांनी अहमदनगरास कैदेस नेले. ईश्वराचे चित्तीं याउपरी ब्राह्मणांचा हुकूम चालं. नयेसें झालें. श्रीमंतांपाशी मुखत्यार नारोपंत चक्रदेव, पिंगळे व कुंजीर हे आहेत. काळ फार कठीण आला आहे. राज्य बिघडतेसे दिसते. ता. १५-४-१७९८ रोजी चाळीस वर्षे मराठी राज्याच्या सर्व घडामोडी पाहिलेला पुरुष अप्पा बळवंत मेहेंदळे हा एकाएकी आत्महत्या करून मरण पावला. अप्पासारखा पुरुष होणे नाही. त्याजपाशीं पैका मागू लागले; तेव्हां अब्रूसाठी अमृत प्राशन केले आणि देवाधीन झाले ! अशा त-हेनें मर्जेरावाने पेटविलेल्या या यज्ञकुंडाची झळ बाजीरावास पोंचू लागली. त्यामुळे शिंदे व बाजीराव यांत तेढ उत्पन्न झाली व ती विको- पास गेली. बाजीरावाचे हाती काडीइतकाहि अधिकार राहिला नाही. तेव्हां बाजीरावाने सर्जेरावापासून आपल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी मोरोबा- दादा व फडके वगैरे आप्तमंडळीस पुणे सोडून जाण्याबद्दल सल्ला दिली. त्याबरोबर बाजीरावाजवळ आपला पहारा जास्त कडक त-हेनें बसविण्याची खटपट शिंदा करूं लागला, त्यासरशी बाजीरावाने स्वतः पुणे सोडून जाण्याचा बेत केला. मे महिन्याच्या आरंभी एक दिवस दौलतराव बाजी- रावाचे भेटीसाठी वाड्यांत आला असतां बाजीरावाने त्याची खूप कान- उघाडणी केली. सर्जेरावाचा बंदोबस्त करा म्हणून निक्षून सांगितले. दोन घटका खूप खलबतें झाली. शिंद्यांनी घातलेल्या अटी बाजीरावाने साफ नाकारिल्या. चिमाजीअप्पाने तर शिंद्यास ताड्कन् सांगितले की, “ आम्ही धनी नाही, तुम्हीच सर्व मालक, कराल ती पूर्वदिशा! " लोकांस धीर उरला नाही. शहरांत सगळीकडे हाहाःकार उडाला. क्षणाचा भरंवसा येईना, कोणाचा जीव केव्हां जाईल, कोणाची बेअब्रू कशी होईल याचा काहीच नेम धरवेना. सर्व लोक हवालदिल झाले. जो तो आपआपला प्राण घेऊन पळू लागला. लोकवस्ती कोंकणाकडे हलली. उभयतां श्रीमंतांच्या स्वाऱ्या पळाल्या अशीहि आवई उठली. ही पळापळ पाहतांच सर्जेरावाने शहराची नाकेबंदी केली; त्यामुळे लोकांची कुचंबणा व हलाल झाले. सुटण्यास मार्ग उरला नाही. बाजीरावाच्या हातांत काडीइतकीहि सत्ता राहिली नाही. खुद्द त्याचे तरी पागोटें ठिकाणी राहते की नाही याची त्याची त्यासहि शंका वाढू लागली. त्यामुळे याजीरावाची चोहोकडे छीःथः झाली. पूर्वी कधीं न १२ दुर्दैवी मोहरे -- घडलेले व ऐकलेले निंद्य प्रकार आपल्यासमक्ष व आपल्या संमतीने होतात, ही गोष्ट बाजीरावाच्या मनास फार झोंबू लागली. निदान दोन कोट रुपये तरी सर्जेरावाने पुण्यांतून उकळले. हा सर्व प्रचंड पैसा त्याने नानाकडील लोकांकडे खणत्या लावून उभा केला. बाजीरावाच्या लोभांतील लोकांसहि त्याची आंच पोहोचली, त्यामुळे बाजीराव फारच चिडला; पण ही पेटलेली आग विझविणे आतां त्याच्या हातांत नव्हते. सर्जेराव पलिते पेटवून एकसारख्या घरांना आगी लावीत होता. त्यामुळे शिंदे व बाजीराव यांच्या मनांतील तेढ वाढली. शिंदा बाजीरावाच्या मनांतून उतरला. पुढे शिंदा बाजीरावास भेटण्यासाठी आला असतां बाजीरावाने फार कडक वृत्ति धारण केली. शिंद्याची फौज बाहेर ठेवून त्यास एकट्यासच आंत घेतले व त्याची अप्रतिष्ठा करून चांगली खरडपट्टीहि काढिली, तेव्हां "शिंद्याने सर्जेरावाचा थोडा निग्रह केला. बाजीराव इतके करूनच थांबला नाही, तर त्याने मालोजी घोरपडे व मानाजी फाकडे वगैरे सरदारांस सर्जेरावास पकडण्यासाठी धाडले. त्यांनी ताबडतोब जाऊन नानाच्या वाडयास गराडा घातला व तोफा रोखल्या; तेव्हां फकीरजी गाढवे व सर्जेराव घाडगे भयभीत झाले आणि बाजीरावाच्या भेटीस वाडयांत आले. त्यांची पालवी व फौज बाहेर ठेवून त्यांस पायउतार बाजीरावाने रुबरु बोलाविलें आणि त्यांस अनेक प्रकारे फजीत केले. गोष्टी इतक्या थरास आल्या तेव्हां सर्जेरावाने लोकांच्या घरी बसवि- लेल्या चौक्या उठविल्या. सर्जेरावास नरम व सर्द करण्यासाठी म्हणून नारायणराव बक्षी व देवजी गौळी या उभयतांस याच संधीस दौलतरावाने मोकळे केले व त्यांचा बहुमान केला. नारायणराव बक्षीने दौलतरावाची खूपच हजेरी घेतली व चांगलीच कानउघाडणी केली. तेव्हां दौलतरावास सर्जेरावायद्दल फारच चीड आली. प्रकरण असे हातघाईवर आलेले पाहून सर्जेरावाने जावयाची समजूत घालण्यासाठी नेहमींच्या ठेवणीच्या हत्याराचा उपयोग केला. " त्याने आपली स्त्री, कन्या व कलावन्तीण अशा तिघींस एका खोलीत घालून तेथें दौलतरावास नेले. चार प्रहर त्रिवर्ग स्त्रिया व शिंदे एकत्र होते." याचा अर्थ काय असेल तो असो; 'पण या उपायाचा फारसा उपयोग झाला नाही. कारण यानंतर सर्जेरावास पुढे लवकरच कैद झाली.
२ : बायांवर हत्यार व शेणवी सरदारांची समाप्ति पाठीवर मारलेल्या आसुडांच्या तडाख्यांनी उडणाऱ्या रक्ताच्या चिळ- कांड्या, अन्नपाण्यावांचून प्राण सोडणान्या जात्या जिवांच्या करुण किंकाळ्या, समशेरीने व तोफेच्या धडाक्याने गगनांत गिरक्या घेत गेलेली शिरकमले, व भूमीवर नाचणारी कबंधे ह्या साहित्यांनी पुण्यास मसणवटींतील अमावास्येची मध्यान्हीची अवकळा आणिली होती. पण ह्या खाईस सुरुवात झाली ती घायजाबाईच्या लमांतील मंगलाष्टकांनी! कारण ह्या लगाने सर्जेरावाच्या हाती सर्व सत्ता गेली आणि त्या सत्तेचा दुरुपयोग करून सर्जेरावाने अवघ्या पुण्याची होळी केली. बायजाबाई ही सर्जेरावाची मुलगी. हिचा जन्म सन १७८४ त झाला. हिच्या आईचे नांव सुंदराबाई ऊर्फ नानीसाहेब. ही सातारजवळच्या बाजीराव पाटणकराची मुलगी. बायजाबाई त्या वेळच्या स्त्रियांत अत्यंत रूपवान होती. तिच्या सौंदर्याविषयींची कीर्ति सर्व महाराष्ट्रांत पसरली होती. त्या वेळच्या इतिहासकारांनी व लेखकांनी 'दक्षिणेची सौंदर्यलतिका' असा तिचा गौरवपर उल्लेख केलेला आहे. ती गोरीपान, सशक्त व नाकी- डोळी नीटस होती. तिचे सर्व अवयव बांधेसूद, घोंसदार आणि रेखीव होते. ती घोड्यावर बसण्यांत पटाईत व धाडसी होती. ह्या गुणां. यद्दल तिची ख्याति सरदारांत पसरली होती. तेव्हां दौलतरावासारखा ऐश्वर्यसंपन्न व रंगेल तरुण तिला वरण्यास एका पायावर तयार होता.
दुर्दैवी मोहरे किंबहुना त्याकडून तसे प्रयत्नहि चालले होते. पण शिंधाची जातकुळी हीन असल्यामुळे आपण दौलतगवास आपली मुलगी देणार नाही असे सर्जेराव गर्जत होता. पण हे त्याचें गर्जणे म्हणजे 'गर्जेल ते पडेल काय' यापैकींच. हे सर्व ओढून ताणून आणलेले चंद्रबळ होते. पोटांत हेतु अगदी निराळा. दौलतरावाकडून पुष्कळशी दौलत व अधिकार मिळाल्यास तो ही पोटची दौलत बहाल करावयास तयार होता. आता हे लम सर्जेरावाच्या मुलीचे, व तें दौलतरावाशी व्हावयाचें; तेव्हां मध्यस्थ बाजीरावच असावयाचा व तसा तो होताहि. कारण या लयाच्या निमित्तानेच या तिघांमध्ये असा एक गुप्त करार झाला की, शिंद्याची दिवाणगिरी सर्जेरावास द्यावयाची; आणि बाजीरावाने सर्जे- रावाचे हस्ते दोन कोट रुपये शिंद्यास द्यावयाचे; व या देणगीबद्दल शिंद्यांनी बाजीरावास गादीवर आणण्यासाठी नानास मदत करावयाची; इतकेंच नव्हे तर पुढे श्रीमंत नानाच्या तडाख्यांत न सांपडतील व नानापासून त्यांचे संरक्षण होईल असा बंदोबस्त ठेवावयाचा. या कराराप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या. असा हा करार ठरल्यानंतर लमाच्या वाटाघाटीस जरा मूर्त स्वरूप येऊ लागले. सन १७९७ च्या पावसाळ्यापासून ह्या लमाची वाटाघाट जोरांत सुरू झाली. घाडग्याची मुलेमाणसें कागलास राहात असत त्यांस आणण्या- साठी दोनशे स्वार व इतर लवाजमा शिंद्यांनी धाडला. घाडग्याची पोर पेशव्यांचा सरदार शिंदा यांस देऊ केली, तिला नेण्यासाठी हे लष्कर आले आहे, ही वार्ता लोकांत पसरली. कोल्हापूरचे महाराजांसहि कळली, तेव्हां महाराजांचे कारभारी रत्नाकरपंत यांनी महाराजांस सल्ला दिला की, घाडग्याची मुलगी देऊ नये. तेव्हां तिला सामानगडाकडे पळविली. हे पाहून दौलतरावाने धाकदपटशा दाखविला आणि निकडीची माणसें धाडिली. त्याबरोबर महाराज नरम पडले व पोर पुण्यास आणिली. नानाला पकडण्याचे कारस्थान सिद्धीस गेल्यानंतर दोनतीन महिन्यांनी हे लम ता. १६-३-१७९८ रोजी मोठ्या थाटाने पार पडले. या लमा, योहले रुप्याचे, त्यास सोन्याचा चांदवा व मोत्यांच्या झालरी लाविल्या होत्या. याप्रमाणे हे काम फार भारी झाले. जणुं इंद्राचे वैभव दोन घटका वस्तीस पुण्यपुरीस आले. हा संबंध घडून येतांच सर्जेरावाच्या स्थितीत सर्जेराव घाडगा १५ एकदम जमीन-अस्मानाचे अंतर पडले. साध्या शिलेदाराचे एका मोठ्या व बलाढ्य सरदाराच्या दिवाणांत रूपान्तर झाले. सखाराम घाडग्याचा सर्जेराव घाडगा झाला! मानकरी मुजरे करूं लागले व भालदार ललकारूं लागले!! अशा त-हेने सर्जेराव दौलतरावांचे मामासाहेब झाले. अशी इतमामाची प्रभावळ मिळतांच सर्जेरावाच्या कर्तबगारीस तेज चढून ती चमकू लागली. मात्र हे लम करवीरकर महाराजांस निखालस मान्य नव्हतें; कारण कुंकोत्री देऊन एका कारकुनास सर्जेरावाने धाडले होते, त्या कार- कुनास महाराज उणेअधिक बोलले. त्यावरून छत्रपतींचे वकील पुण्यांत होते त्यांस २३-३-१७९८ रोजी शिंद्याकडून कैद झाली व त्यास लष्करांत नेले. असो. येणेप्रमाणे फारशी विघ्नं न येतां हे लग्न एकदांचे पार पडले. सर्जेराव दौलतरावाचा सासरा झाला, त्याच्या हातांत सत्ता आली; आणि या वेळेपासून सहासात वर्षे त्याने धरपकड, खून, कत्तली, जाळपोळ, लूट व मारामाऱ्या यांचा कहर उडवून दिला. या रणधुमाळीत प्रान्तच्या प्रान्त बेचिराख झाले. या त्याच्या कृत्यांवरून तो एक आगलाव्या, पाषाण- हृदयी, आडमुठा शिलेदार होता असें मात्र समजू नये; त्याच्या हाती सत्ता होती, मोठे लष्करी सामर्थ्य होते, म्हणूनच तो या गोष्टी करूं शकला असें मात्र नाही. त्याचे बुद्धिसामर्थ्य अलोट होते. त्याच्या धूर्तपणापुढे मोटमोठ्या मुत्सद्दयांनी हात टेकले. त्याच्या चाणाक्षपणापुढे मोठमोठाली कारस्थाने लटपटली. त्याच्या साहसी वृत्तीपुढे मी मी म्हणणारे पराक्रमी वीर हतप्रभ झाले. कोणाहि मोठ्या माणसावर वार करतांना त्याचा हात चांचरला नाही की वृत्ति बावरली नाही. त्याचे मन वज्रासारखें कणखर होते. त्याने शेकडों कारस्थाने रचलीं व हिकमतीने ती तडीस नेली. त्याने टाकलेला एकहि डाव त्याचे अंगावर आला नाही. असा असामान्य पुरुष मराठी राज्याच्या अंतकाळी दौलतरावाच्या हाती लागला असतां, त्याचा उपयोग राज्ययंत्र सुव्यवस्थित करण्याकडे न होता केवळ आत्म- नाशाकडेच झाला! याची कारणे फक्त दोनच; एक म्हणजे आमचे व्यक्तिप्रधान राजकारण, आणि दुसरें, आपसांतील हेवेदावे उगवून घेण्याची खुनशी वृत्ति! सर्जेरावाने महादजी शिंद्याच्या बायकांच्यावर हात टाकला तो प्रकार आतां सांगावयाचा. महादजीच्या पश्चात् त्याच्या तीन यायका लक्ष्मीबाई, दुर्दैवी मोहरे भागीरथीबाई व यमुनाबाई आणि रक्षा केशरी अशा होत्या. त्यांचे व दौलतरावाचे कधींच फारसे सख्य नव्हते. त्याचे दत्तविधानाचे वेळी लक्ष्मीबाईने हरकत घेतली; पण या वेळी बाकीच्यांनी या दत्तविधानास संमति दिल्याने आणि दौलतरावाने त्या सर्वांचा बंदोबस्त व व्यवस्था नीट त-हेने ठेवण्याचे अभिवचन दिल्याने त्याचे दत्तविधान झाले. पुढे शिंद्यास पैशाची अडचण भासू लागली, तेव्हां त्याचे बायांच्याकडे दुर्लक्ष झाले व त्यांची उज्जनीस आबाळ होऊ लागली. यामुळे उभयतांत कटकट सुरू झाली; तेव्हां आपली व्यवस्था नीट लावून घेण्याकरितां त्या सन १७९७ त पुण्यांत आल्या. येथपर्यंत सर्व ठीक होते; पण पुढे एक मोठी चम- त्कारिक गोष्ट घडून आली, ती अशी की, बाया पुण्यास आल्यानंतर भागीरथीबाई व दौलतराव यांची सलगी जमली ती इतरांस खपेना. तव्हां त्या अद्वातद्वा बोलू लागल्या. लक्ष्मीबाई पहिल्यापासूनच दौलतरावाच्या विरुद्ध होती. तिने विशेष पुढाकार घेतला. तीस नानाचा पाठिंबा होता. सर्जेरावाने त्यांस समक्ष भेटून त्यांची समजूत घालून त्यांस जांबगांवास नेण्याचा प्रयत्न केला; पण बाया सर्जेरावावर जास्तच उसळल्या. सर्जे- रावाचे तोंडसुद्धा पाहावयाचे नाही असे त्यांनी ठरविले व त्याप्रमाणे वर्तन करण्यास सुरुवात केली. आडवें आले की कापून काढावयाचे, हाच ज्याचा दंडक अशा सर्जेरावाशी आपली गांठ पडली आहे हे त्या बायांस काय माहीत! तेथे कोणाची भीड नाही, कोणाची मुर्वत नाही. सर्जेरावाने प्रथम गोडीगुलाबी- में समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांत यश येत नाही असे पाहतांच, एक दिवस त्याने बायांस तंबाहेर जबरदस्तीने ओढून चाबकाने बेदम फोडून काढले. दिल्लीची बादशाही खिशांत घालणाऱ्या महादजी शिंद्याचे वैभव ज्या जुन्या सरदारांनी पाहिले होते त्यांस या बायांची ही दैन्यावस्था पाहून फारच वाईट वाटले ! त्यांतून सर्जेरावा- सारख्या सामान्य माणसाने त्यांच्या अंगावर हात टाकलेला पाहून तर त्यांच्या तळव्याची आग मस्तकास गेली. विशेषतः पाटीलबावाच्या लोभांतील शेणवी सरदारांस तर हा प्रकार बिलकुल आवडला नाही व त्यांनी बायांच्या वतीने दौलतरावाशी बोलणे चालविलें. दौलतरावाने जरा नरमाईचे धोरण ठेवन, त्यांची समजूत काढण्याचे इराद्याने, बायांनी तूर्त ब-हाणपुरास सर्जेराव घाडगा मुक्काम करावा असे बोलणे चालविले. पण ह्या सर्व गोष्टी तडीस जाण्यास शेणवी सरदारांचा मोठा अडथळा होईल व प्रकरण चिघळून तडीस जाणार नाही अशी सर्जेरावाची खात्री झाली; म्हणून सर्जेराव शेणवी सरदारांच्या मागे लागला. त्याने बायजाबाईचे लग्न होतांच मार्च महिन्याच्या पहिल्याच आंठवड्यांत नारायण जिवाजी बक्षी व देवजी गौळी यांस नगरच्या तुरुंगांत पाठविले. बायांस नानाचे पाठबळ होते म्हणून त्यांस लग्नाच्या आर्धीच अटक करण्यांत आली होती. अशा त-हेनें लमाच्या आधी एक व नंतर एक, मिळून नाना व बक्षी यांचे कांटे सर्जेरावाने काढून टाकले व आपला मार्ग मोकळा केला. यानंतर लवकरच रायाजी व रामजी पाटील हे दोन मातबर सरदार आपोआपच दौलतरावापासून दूर झाले; व अशा तन्हेने सर्जेरावाच्या हातांत मराठ्यांची सर्व शक्ति एकवटली आणि दौलतरावास सर्जेरावाने पूर्णपणे ग्रासले. सर्जेराव व दौलतराव या उभयतांचें बायांविषयींचे धोरण सरळ नसून कपटी होतें. बायांना ब-हाणपुरास नेण्याची हूल दाखवून त्यांस नगरांत कैदेत ठेवण्याचा त्यांचा बेत होता. बायांची चीजवस्तु व जडजवाहीर दौलतरावाजवळ होते, ते परत देण्याबद्दल त्यांनी दौलतरावाकडे तगादा लावला व ते हाती आल्याशिवाय त्या कूच करण्यास तयार होत ना. दादा- बाबा करून पाहिले, पण समज पडेना. तेव्हां वैशाख वद्य ३० चे दिवशी सर्जेरावाने बायांस पुन्हां बेजरव मारहाण करून जबरदस्तीने पालख्यांत बसविले. बिचाऱ्यांनी पुन्हां रडून आकान्त केला. हा सर्व अत्यंत खेदजनक व करुण प्रकार पाहून सर्वांची अंत:करणे विदीर्ण झाली; व त्यांच्याबद्दल साहजिकच सहानुभूति उत्पन्न झाली. ब-हाणपुरास नेण्याचे नुसतें ढोंग असून, आपणांस नगरांत कैद करणार आहेत हा दौलतरावाचा गुप्त येत बायांस कळला. बायांना मारहाण केल्याची बातमी मर्वत्र पसरली; त्यामुळे दौलतरावाची जिकडे तिकडे नाचक्की झाली; आणि यायांस अनुकूल असें वातावरण सर्वत्र निर्माण झाले. हे प्रकरण दौलतरावास चांगलेच जाणवलें. चायांना मारपीट केल्यामुळे दौलतरावाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले; लोक तोंड बाहेर काढू देईनात. तेव्हां लोकांची मने शान्त करण्याकरितां दौलत- रावाने नगराहून नारायणराव बक्षी व देवजी गौळी या उभयतां जुन्या २ दुर्दैवी मोहरे वजनदार कारभाऱ्यांस माघारी आणून पुन्हां कारभार पाहण्याविषयी सांगितले; तेव्हां नारायणराव म्हणाला, मला तुमचा कारभार नको. मर्जीस असेल तर पोटास द्या.” हे उत्तर ऐकून वास्तविक दौलतराव चिडून जावयाचा, पण तसे न होता त्याने कारभार पुन्हां हातांत घेण्या- विषयी आर्जवें केली, तेव्हां बक्षी पुन्हां कारभार करू लागला. नारायण- रावाने कारभार हाती घेतांच त्याचे सर्व तैन्य त्याच्याभोवती जमा झालें. उत्तर-हिंदुस्थानांत लवबा दादा व जगोबा बापू ह्यांची इंग्रजांशी लढाई जुंपली. नारायणराव बक्षीचा नीट जम बसलेला पाहून व त्याची सेना एकत्र जमा झालेली पाहून आगलाव्या सर्जेरावास स्वस्थ बसवेना. त्याने दौलत- रावास बक्षीचे डोके मारावयास सांगितले. ही बातमी बक्षीस कळतांच तो उघडपणे फौजेसह बायांकडे निघून गेला. त्याबरोबर त्याचे स्नेही देवजी गौळी व मुजफरखान पठाण हेहि जाऊन बायांस मिळाले. या वेळी बायांचा मुक्काम कोरेगांवाजवळ होता (ता. ७-६-१७९७). सर्जेराव व दौलतराव या द्वयीने बायांस छेडल्यामुळे त्या या दोघांवर एक- सारख्या जळत होत्या. त्यांस बक्षी, गौळी व मुजफरग्वान या तीन मातबर सरदारांची जोड मिळतांच त्यांची वीरवृत्ति जागी झाली. उत्तरेचा दिक्- पाल म्हणून ज्याचे यथार्थ वर्णन करावे अशा महाप्रतापी महादजीच्या त्या बायका होत्या. प्राणावर बेतल्यावर मांजरसुद्धां शत्रूवर झांप टाकतें; मग पाटीलवावांच्या बायकांची गोष्ट तर असामान्यच. इतकी तयारी झाल्यावर बायांनी दौलतरावावर चालून घ्यावयाचे ठरविले. त्यांनी थेउरावर चाल केली, आणि घाडग्याचे पारिपत्य करण्याचा कृतनिश्चय केला. याच वेळी बायांस साह्य करणारी अशी एक मोठी व्यक्ति त्यांस मिळाली, ती म्हणजे अमृतराव. बाजीरावास सर्जेराव व शिंदे यांचा बंदोबस्त करता येत नाही असे पाहून हताश झालेला अमृतराव बाजीरावास सोडून बाहेर पडला व त्याने स्वतःच्या सामर्थ्यावर जे काय होईल तें करावें असें ठरविलें; आणि तो बायांस साह्य करूं लागला. 'दौलतराव कसा तुम्हांस पकडतो, आपण त्यास आतां नरम पाडूं' अशी घोषणा अमृतरावाने चालविली व बायांस सर्वतोपरी साह्य केले. या वेळी खुद्द लक्ष्मीबाई हत्तीवर बसून लढाईत पुढाकार घेत होती, व वीरांना प्रोत्साहन देत रणधुमाळीत बेधडकपणे वावरत होती. आपण यायांचा निग्रह करावयाचा तें सर्व बाजूलाच राहून त्यांनीच सर्जेराव घाडगा -~- आपल्यावर चाल केली या गोष्टीने दौलतरावास नामुष्की आली. बायांनी आपणांवर हल्ला केला तेव्हां आतां आपणहि उलट लगट करून त्यांचा पाडाव करावा असे दौलतरावाने ठरविले; पण कंपूचे अधिकारी या गोष्टीस तयार होईनात. कारण हे युद्ध शत्रूशी नव्हते, प्रत्यक्ष मालकिणीशी होतें. कोणाशी युद्ध करता ! मातुःश्रींची समजूत काढा' असे ते म्हणूं लागले. इकडे याच वेळी पुण्यांत चिमाजी अप्पाचे लग्न होते. वरातीदिवशी रात्री शहरांत वरातीची गडबड, पण तिकडे वानवडीस बायांच्या फौजेची व शिंद्याच्या फौजेची जुंपली. मध्यरात्रीपासून एकसारखा तोफांचा धूमधडाका चालू होता. .उजाडते तो बायांच्या पलटणांनी शिंद्याच्या फौजेस वेढा घातला. तेव्हां वेढा उठवून लावण्यासाठी म्हणून शिंद्याने डू-पॅट साहेबास पलटणे व तोफा देऊन पाठविलें; पण बायांच्या पलटणांनी अशी जोराची लगट केली की प्रंटसाहेबास छावणी गांठतां गांठतां पुरे झाले. तेव्हां मात्र दौलतरावाची गाळण उडाली. काय करावे हे त्यास सुचेना. दौलतरावास काढून आम्ही दुसरा इसम दौलतीवर आणणार, अशी त्यांनी घोषणा केली; आणि दौलतरावाच्या सैन्यांत फितुर केला. यामुळे त्याची जास्तच धांदल उडाली. तो सर्व बाजूंनी जेर झाला तेव्हां त्याने लगेच आपली चाल बदलली व रायाजी, रामजी पाटील आणि आबा चिटणीत यांस बायांकडे शिष्टाईसाठी पाठविले. 'तुम्ही सांगाल तसे मी करीन, मी आपल्या- बाहेर नाही.' असें नरमाईचे बोलणे सुरू केले. असें अत्यंत नम्रपणाचें धोरण चालविले. हे सर्व प्रकार बायांना भूल पाडून कबजांत आणण्यासाठी सर्जेरावाच्या सांगण्यावरून दौलतराव करीत होता. 'मातुश्रींचा आग्रह की हल्ली सर्जेराव वगैरे पांच असामी कारभारांत आहेत, त्यांस आमचे हवाली करा, महादजीच्या वेळच्या लोकांस पुन्हां कामावर घ्या, नाही तर काय घडेल ते घडो.' सर्जेरावास बायांचे हाती देण्याचे दौलतरावाने नाकारलें, त्याबरोबर हा समेट फिसकटला. आणि उभय पक्षांत पुन्हां चकमक सुरू झाली. अमृतराव व बाया आतां कूच करून खडकीच्या बाजूला राहिल्या. तेथे त्या बेसावध आहेत असे पाहून दौलतरावाच्या पलटणीने त्यांवर अचानक छापा घातला. ताबूत थंडे करण्याच्या निमित्ताने पलटणे खडकीच्या पुलानजीक गेली व त्यांनी · एकदम अमृतरावाच्या गोटावर तोफांचा मारा सुरू केला. या चकमकीत अमृतरावाची वाताहत २० दुर्दैवी मोहरे ANNNN NRNnnr झाली. त्याचे डेरे, जामदारखाना, भांडी वगैरे किरकोळ सामानसुद्धा शिल्लक राहिले नाही. अमृतरावाची स्त्री व मुलगा विनायकराव पळून पाषाणास आली. खुद्द अमृतराव मागे हटून विठ्ठलवाडीस आला. हे सर्व खेळ याजीराव मुग्धतेने पाहात होता. हा सर्व प्रकार ता. २५.६-१७९८ ला झाला. विठ्ठलवाडीस बायांची फौज, शेणवी सरदार आणि इतर मराठे-सैन्य अमृतरावास मिळाले. दुसऱ्या दिवशी लढाईचें अनुसंधान साधलें नाहीं. ता. २७ रोजी रात्री बायांच्या सैन्याची व पलटणांची अंधारांत एकसारखी कापाकापी सुरू झाली; पण यानंतर लढाईचा सर्व नूर पालटला. शिंद्याची बरीच फौज यायांस सामील झाली; शिक्केकट्यार, जरीपटकादेखील बायां- कडे गेला, तेव्हा मात्र दौलतरावाचे डोळे खाडकन् उघडले. हे प्रकरण आतां चेतत कोठवर जाणार याचा नेम लागेना. लोकांत तोंड दाखविण्यास जागा राहिली नाही. जो तो 'छीःथः' करूं लागला. कारण हे युद्ध म्हणजे जगाविरहितच, मुलाने आईशी व चाकराने धन्याशी असले विलक्षण, हिडीस आणि निमकहरामी स्वरूप या युद्धास आले होते. बाया म्हणजे त्याच्या सापत्न माताच व अमृतराव म्हणजे पर्यायाने धनीच. तेव्हां हें प्रकरण आतां आटोपतें ध्यावे असेंच त्याने ठरविले. आतां बायांकडे बाजीरावांमार्फत शिष्टाई करण्याचे दौलतरावाने योजिलें, प्रथम रायाजी व रामजी पाटलांस बायांकडे धाडून त्यांची त्याने झाल्या गुन्ह्या- बद्दल माफी मागितली; आणि अमृतरावाची व बायांची समजूत घालण्याबद्दल याजीरावाची काकुळतीने अर्जी केली. आतापर्यंत अडकवून.टेवलेले सर्व जड- जवाहिर व बायांस देण्यासाठी पोषाख दौलतरावाने बाजीरावाकडे धाडिला. इतके झाल्यावर बाजीराव बायांकडे गेला, आणि त्याने त्यांची भेट घेतली. यायांनी पोषाख व जडजवाहिर तर घेतले नाहीच, पण बाजीरावच जातीने गेला होता म्हणून जरा भीड पडून उत्तर केले की, 'आपण धनी आहां, सांगतां ते प्रमाण; पण प्रथम सर्जेराव घाडगा व सहा असामी आमच्या स्वाधीन करा व मग बोला.' पण हे मागणें दौलतरावाने अमान्य केलें. तेव्हां वाया जास्तच चिडल्या व मारूं किंवा मरूं या निश्चयाने त्यांनी युद्धास पुन्हा कंबर बांधिली. याजीरावाकडून आपली तडजोड होत नाही असे पाहून याया व अमृत- सर्जेराव घाडगा २१ . मुक्काम केला. अमृतरावाच्या फौजेने आसपासचा प्रदेश उध्वस्त करण्याचा एकसारखा सपाटा चालविला, हे पाहून बाजीराव व दौलतराव यांस मोठी काळजी लागली. याला तोड काय करावी तें कांही त्यांस सुचेना. या सर्व अनर्थाचें आदिकारण सर्जेराव अशी उभयतांची बालंबाल खात्री झाली. पण आतां याला उपाय काय, हा दोघांत मोठा प्रश्न पडला. 'संशयात्मा विनश्यति' हे वचन बाजीराव व दौलतराव या दोन व्यक्तींकडे पाहिले की सत्य वाटते. आतां दौलतरावाच्या डोक्यांतील विचारचक्रास जोराची गति मिळाली व संशयाचे पिशाच्च त्याच्यापुढे नाचूं लागले. बायांस व अमृतरावास आंतून साहाय्य बाजीरावाचे असावे असा त्यास शक आला. तेव्हां लहान मुलांस चूप करण्यासाठी जसा बागुलबोवा, त्याप्रमाणे बाजीरावाचा बागुलबोवा नाना, आणि दौलतरावाचा शेणवी सरदार असे हे परस्परांनी परस्परांवर उपयोगांत आणण्याचे तोडगे होते. तेव्हां त्याचा उपयोग दौलतरावाने केला, आणि नानास नगराहून आणण्या- चे ठरविले. नानास सोडवून बाजीरावास नरम करावें, नानाजवळून पैसा उपटावा व त्याच्याकडून बायांची समजूत काढावी; इतक्या गोष्टी नानास बंधमुक्त करून तो साधणार होता. तेव्हां फकीरजी गाढव्यास नगरास नानाकडे धाडले. दोन कोट रुपये द्या म्हणजे तुम्हांस सोडितों' असे बोलणे फकीरजीने नानाशी चालविले. या बोलण्यास नाना रुकार देईना. तो म्हणाला की, आता आम्ही कोठेहि असलो तरी सारखेच, तरी तो दहा लाख देण्यास तयार झाला. त्यावरच संतुष्ट राहणे शिंद्यास भाग पडले, नानास पुण्यास नेऊन त्याचे हाती कारभार आला म्हणजे आणखी पंधरा लाख देण्याचे ठरले. नानाची मुक्तता झाली. त्या वेळी लोक असे म्हणत होते की, पुण्यांतील प्रकार म्हणावा तर कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही. कोणांत कोणी मिळत नाही. दौलतरावाचा पाय कंपूतून बाहेर पडत नाही. इंग्रज बळावले. इंग्रजमय होते यांत संशय नाही." नाना मोकळा झाला त्याचा उपयोग दौलतरावास कांहींच होईना. 'बाजीराव द्विमुख आहे. कोणीकडे कल देतील न कळे.' नानावर शह म्हणून मोरोयादादास सोडून शिवनेरीस आणले, असे दौलतराधाने शहाला शह दिले, पण त्यांचाहि उपयोग होईना. दुर्जन ( Drugen ) वगैरे कंपूंचे २२ दुर्दैवी मोहरे Vh अधिकारी फितले होते. तेव्हां कोणाचाच काही भरंवसा देता येईना. तेव्हां या सर्व कलहाचें आदिकारण जो सर्जेराव त्यास दूर करण्याचे दौलतरावाने ठरविले. सर्जेरावाचे दुर्दै ओढवले व लगेच एक कारणहि झाले. फकीरजी गाढव्याच्या पलटणांतील पाहरेकऱ्यास सर्जेरावाने जखमी केले; त्यावरून ता. २५ जुलै १७९८ रोजी " घाडगे, गाढवे, यादो भास्कर व त्यांचा बंधु असे चौघे कैद केले. मूकेल फिरंग्याच्या मुलाने धरिलें. सर्जेरावाच्या मुसक्या बांधून बाजारांतून बंदुकीच्या कुपणाने मारीत पलटणांत घेऊन गेले. तेथे एक दिवस शेतवान्यांत कोंडून ठेविले होते. दुसऱ्या दिवशी बाहेर काढून पहाऱ्यांत ठेविले. त्याचा गोट लुटला. घाडग्यास जखम झाली." सर्जेरावाने लाविलेली ही आग फार भडकली. सर्जेरावास कैद करून- सुद्धां आतां भागेना. लक्ष्मीबाई व यमुनाबाई या महादजी शिंद्याच्या दोन्ही स्त्रिया मोठ्या धीट आणि घोड्यावर बसण्यांत पटाईत होत्या. त्या आतां पुण्याहून जांबगांवास गेल्या. त्या दोघी केव्हां एकत्र तर केव्हां वेगळ्या राहून मुलूखगिरी करीत. त्यांचा त्यांचा दौलतरावावर काडीइतकाहि विश्वास नव्हता. त्यांनी त्याचे मुखावलोकनहि केले नाही. असो. आतां आपणांस बायांच्या बंडाशी फारसे कर्तव्य नाहीं; कारण तो आपला प्रस्तुतचा विषय नाही, बायांच्या बंडाचे आदिकारण सर्जेराव असल्यामुळे तेवढ्यापुरता विस्तार केला. आतां सर्जेरावास अटक झाली, व पुढे दौलतरावाने बाळोबा तात्या पागनिसास बंधमुक्त केले. त्याने आपले वजन व बुद्धिसर्वस्व खर्च करून बाया आणि दौलतराव यांचा समेट केला, पण तोसुद्धां क्षणभंगुरच ठरला; आणि त्याला कारणहि सर्जेरावच! त्याने बायांच्यावर मारेकरी घातले. तो कथाभाग असा:- मोठ्या कष्टाने व मिनतवारीने बायांशी समेट होऊन त्या भीमेच्या कांठी तुळापुरास येऊन राहिल्या. सुमारे दोन महिने दौलतराव व याया यांच्यामध्ये काहीएक कुरबुर न होता कसेबसे पार पडले; पण नंतर पुन्हां या भांडणाने चेत घेतली. दौलतराव व बाजीराव ही दोन नादान माणसे मराठी राज्याच्या मुख्य ठिकाणी सर्वसत्ताधीश असल्यामुळे मराठी राज्याचे वाटोळे झालें ! स्वतःस उरक नाही व दुसरा करतो तें साहत नाही, असली मत्सरी व आत्मघातकी वृत्ति दोघांची असल्यामुळेच यापुढील बनाव झाला. शहाण्या माणसांमध्ये आलेली वितष्टे नाहीशी होण्यास व त्यांची - सर्जेराव घाडगा २३ चित्तशुद्धि होण्यास फारसा वेळ लागत नाही. नाना फडणीस, परशुरामभाऊ, बाळोबा तात्या पागनीस हे तीन पराक्रमी व कर्तयगार पुरुष एकत्र होऊन त्यांनी मराठी राज्यास आळा घालण्याचे ठरविले व एकेक प्रकरणाचा फडशा पाडण्यास सुरुवात केली. बाळोबाने बायांचे प्रकरण निकालांत काढलें तो करवीरकरांशी चाललेल्या पट्टणकुडीच्या लढाईत भाऊ पडल्या- ची वार्ता आली. ती बाळोबास कळतांच त्याने बाजीरावाकडे जाऊन चौघडा बंद करविला आणि करवीरकरांचे पारिपत्य करण्यासाठी फौज रवाना केली. पैसा नव्हता, तर तोहि स्वतःचे पदरचा देवविला. अशा तहेने बाळोबा व नाना यांनी एकेक गोष्ट निकालांत काढण्याचा तडाखा चालविला. बायांची समजूत काढून शिंद्याच्या घरचा तंटा मिट- विला व करवीरची मोहीम स्वतःच्या हिमतीवर सुरू केली. या गोष्टी पाहून बाजीराव व दौलतराव या दोघांस समाधान वाटेना; उलट त्यांची त्यांस भीति वाढू लागली. कारण हे मुत्सद्दी जर अकलेच्या बळावर एक एक काम असे उरकू लागले तर मग आपण धनी निर्माल्यवत् होणार! भाऊ मेल्याने नाना आतां कमजोर झाला होता व तो राज्यकारभाराविषयी उदास होता; पण शिंद्याचे पदरची शेणवीमंडळी फार जोरदार व एकजुटीने कामें करण्यांत पटाईत; तेव्हां त्यांस नरम करावयाचे म्हणजे त्यावर तोड फक्त सव घाडगाच काय तो होता, की जो शेणवी सरदारांचेमागे शनीसारखा लागेल. तेव्हां त्यास सोडण्याची सल्ला बाजीरावाने शिंद्यास दिली व शिंद्यासहि. ते हवेच होते. बाळोबाशी तंटा वगैरे न होता हे काम दौलतरावाने मोठ्या युक्तीने पार पाडले. सर्जेरावास सोडण्याबद्दल बायजा- बाईने दौलतरावाजवळ हट्ट धरिला व उपासतापास करून त्रागा चालविला. तिच्याबरोबर दौलतरावानेंहि उपोषणे सुरू केली. कारभारी घाडग्यास सोडीत नाहीत म्हणून यजमान-यजमानीण उपोषणे करतात, अशी लोकांत चर्चा सुरू झाली. तेव्हां कारभारी भ्याले व आपणांवर अपवाद नको म्हणून सर्जेरावाने कारभारांत कोणताहि भाग घेऊं नये, स्वस्थ असावें, या अटीवर त्याची मुक्तता करण्यास बाळोबाने परवानगी दिली. त्याबरोबर दौलतरावाने ता. ४.१.१८०० रोजी सर्जेरावास नगरास बंधमुक्त करून आपल्या डेऱ्यास आणिलें आणि वस्त्रे व खर्चास रोख रक्कम देऊन त्याचा बहुमान केला. अशा त-हेने सर्जेराव एकदांचे बंधमुक्त झाले. घाडग्यासारखा महापरा- २४ दुर्दैवी मोहरे क्रमी पुरुष, कोणतेंहि आणि कितीहि वाईट कृत्य करण्यास केव्हांहि न डरणारा असा हा आग्यावेताळ बाहेर पडतांच पुन्हां जिकडे तिकडे अमीचे डोंब उसळू लागले. घाडग्याच्या सुटकेची वार्ता करवीरकर छत्रपतींस कळ- तांच त्यांस फार आनंद झाला; व आतां आपणावरील मोहीम थंड पडणार, नच पडली तर आपण ती माघारी परतवू अशी त्यांस उमेद उत्पन्न झाली. सर्जेरावानें कैदेतून बाहेर येतांच दहाच दिवसांनी पहिला पराक्रम केला; तो म्हणजे त्याने बायावर मारेकरी घातले हा होय, ता. १४.१-१८०० रोजी प्रहर रात्रीस धाकटी यमुनाबाई ही निजली असतां तिजवर कोणी हत्यार चालविलें. पाठीवर तरवारीचा एक वार भारी लागला. गडबड उडाली. तेव्हां एक मारेकरी ठार झाला व एक जखमी झाला, व एक अजात सांपडला; त्यास मारपीट व धाकदपटशा दाखवून चौकशी करता त्याने सर्जे- रावाचें नांव लिहून दिले; आणि बायांस जिवे मारावे असा बेत सांगितला. त्यावरून जामीन राहिलेले बाळोबा, आया चिटणीस व पलटणवाले सर्वच फजीत व लाचार झाले. यावरून वाया बिथरून पुन्हां त्यांनी पूर्वीप्रमाणे धुमाकूळ सुरू केला. सर्जेरावाच्या या साहसाने पुन्हां सर्व घडी विस्कटली. त्याबरोबर बाळोबा या साफच सांगितले की, 'मला हा कारभार नको; खुशाल बिड्या घालून कैदेत टाका, किंवा काशीयात्रेस जावयास कायमचा निरोप द्या.' सर्जेरावा- च्या सुटकेची दहशत त्यास चांगलीच बसली. बाळोबाने वाड्यांत जाण्याचे सोडलें. तो दरबारास हजर राहीना. सर्व कारभार ठिकच्या ठिकाणी थंड झाला. यशवंतराव शिवाजीने धरणेच धरिलें आहे असे निमित्त करून बाळोबाने त्यास आपल्याजवळ कायमचें ठेवून घेतले. असा हा घोळ आठ दिवस पडून होता. हा एकंदर गोंधळ पाहून दौलतरावासहि पंचाईत पडली, तेव्हां त्याने बाळोबाकडे पुन्हां मध्यस्थी घालून त्यास बोलावून आणिलें; आणि तात्या, धोंडीया, आया चिटणीस, यशवंतराव शिवाजी, बाजीया मोदी, यादो भास्कर, नारायणराव बक्षी, बाणाजी शेटे व तिधे कंपूवाले या सर्वांच्या समक्ष प्रहरपर्यंत दौलतरावाशी सर्व गोष्टींची चर्चा झाली व असें ठरले की, सखाराम घाडगे यास पोटापुरतें देऊन कायमचे बाहेर काढावें, निदान चांगल्या नजरबंदीत ठेवावें; आणि सर्वांनी तात्यांच्या तंत्राने चालावें. त्यांस चाटतील ती माणसे त्यांनी कारभारांत घ्यावी व नको असतील त्यांस दूर सर्जेराव घाडगा २५ . करावें, असा ठराव सर्वांच्या समक्ष झाला, पण तो ठराव कागदावरच राहिला. त्याचा काहीएक उपयोग न होतां बाळोया तात्या पागनिसांचे बस्तान सर्जेरावाच्या सुटकेपासून जे बिघडलें तें कायमचेच. एवढा मोठा कर्तबगार पुरुष, पण त्याचा शेवट शेवटी तुरुंगांतच झाला. अशा त-हेनें शिंद्यांच्या गादीची केलेली सेवा उलट्या अर्थाने फळास आली. बिचाऱ्या- च्या आत्म्याने तळतळाट दिले असतील!! बाजीरावाने नानाच्या पायधरणीचे नाटक एकदां केले होते; बरोबर त्याचीच पुनरावृत्ति दौलतरावाने केली. ता. २२-५-१८०० रोजी बाळोवा- च्या घरास दौलतरावाची सडी स्वारी जातीने गेली व त्याच्या पायांवर अक्षरशः डोके ठेवून कारभार सांवरण्याविषयी अर्जी केली. या वेळी बाळोबा, दौलतरावाचे थेर पाहून व सर्जेरावाने बायांवर घातलेले मारेकरी पाहून चिडून गेला होता. त्याने उत्तर केलें, “तुझें तूं आटोपून घेऊन बंदोबस्त करावा. मला अगत्य नाही. माझा वृद्धापकाळ झाला. महायात्रेस मार्गस्थ करावें; किंवा तुम्हांजवळच आहे.” या नाटकानंतर अवघ्या पांचव्याच दिवशी दौलतरावाने बाळोबा, त्याची स्त्री व धोंडीबा यांस चकडबंद करून त्यांची नगरास रवानगी केली आणि सर्जेराव पुन्हां सत्ताधीश झाला, सर्जेरावाच्या सत्तेचे आगमन मानवी रक्ताच्या लाल तुषारांनी व चिळ- कांडयांनीच व्हावयाचे. तिच्यावर पुष्पवृष्टि व्हावयाची ती शिरकमलांची! भालदार ललकारावयाचे ते मारपीट असह्य झाल्यामुळे फोडलेल्या टाहोंचे ! अशी ही अमंगल सत्ता शिंद्यांच्या दरबारी पुन्हां सुप्रतिष्ठित झाली. नाना फडणिसास पकडल्याबरोबर सर्जेरावाने पेशव्यांचा दरबार जसा होता नव्हतासा करून टाकला-एके दिवशी (ता. २५-८-१७९८) नाना- च्या पक्षाचे चार प्रमुख सरदार तोफेच्या तोंडी दिले-तीच गत त्याने शिंदे- दरबारची केली. ता. ३१-५-१८०० रोजी तुळाजी शिंदे, मानाजी वायळे, व सुभानजी मोरे याचा लेक धुळोजी या तीन असामीस अस्तमान झाल्यावर डेऱ्यास बोलावून कैद केलें व लगेच त्यांस तोफेच्या तोंडी दिले! त्यांजवर आरोप ते बायांस सामील होते, असा होता. तो कितपत खरा-खोटा हे कोण पाहतो व वेळ कोणास ? याच वेळी नारायण जिवाजी बक्षी वगैरे वीस सरदार कैद केले व बक्षीशिवाय बाकीच्यांस तोफेच्या तोंडी दिले. पुढे ता. ८-७-१८०० रोजी यशवंतराव, जिवाजी वागळे व कालु यहिरू लेका- २६ दुर्दैवी मोहरे maa वळा यांस पांच पाट काढून, डोक्यांत शेंदूर घालून, नाक-कान छेदून लष्करांतून फिरवून त्यांस रात्रीस मेख रखाली मारून टाकले. धोंडीबा दादा पूर्वीच तेथें होता, त्यांनी फितुर केला. त्याचा दस्तऐवजहि सांपडला. त्यास तेथेच तोफेच्या तोंडी दिले. ईश्वर कृपा करून अब्रू राखीत तो निभावला. तूर्त सर्जेरावाची फत्ते झाली आहे. बाण अंगास बांधून बक्षीस उडवून मारिलें. बाण अंगास बांधून माणसे उडविण्याची ही शक्कल अगदी सर्जेरावाच्या खास डोक्यांतील. बाणांनी उडवून नारायणराव बक्षीचा प्राण गेला नाही, सबब त्याचे डोचकै मारिलें. सर्जेरावाच्या प्रस्तुत कारभाराविषयीं एक चार ओळींचा उतारा देऊ व आतां हा लेख संपवू-" या गोष्टी अतिरिक्त होतात असें जग बोलतें. परिणाम काय होतो पहावें. पुण्यांत घाडगे हत्या पाडावयास ईश्वरें निर्माण केला. ब्राह्मण मारावयास ईश्वरे प्रारंभ केला. बाळोबा तात्या व सदाशिव मल्हार जिवंत आहेत असे कळते. आयुष्यमर्यादा असल्यास ईश्वर बुद्धि देईल तरी देऊ. बाळोबा तात्या नगरास होते ते १४ जमादिलावर मंदवारी अकस्मात् मरण पावले. अगोदर ५-६ दिवस त्यांचे स्त्रीस जांबगांवास बला- त्कार करून आणिली. नंतर बाळोबाचा काळ जाहला. जवळ कोणी नाही, या त-हेचा समय ईश्वरे दाखविला. त्या आधी सदाशिव मल्हार याप्रमाणे पंधरा दिवसांचे अंतरानें कैलासवास केला, शेणव्यांचा ग्रंथ समाप्तींत गेला."
३:: जिवावरचा प्रसंग व इतर हालचाली सूर्यनारायणाच्या तेजाची दाहकता माध्यान्हीइतकी सदासर्वदा भासत नाहीं; त्याचे तेज मंदावत जाते. त्याप्रमाणेच आतां सर्जेरावाच्या सत्तेचा सूर्य कलला. त्यांतील तेज कमजोर झाले; पण टवकारून पाहणाराचे डोळे दिपून जावयाचे व त्यांस कायमचा आयब व्हावयाचा, आणि स्पर्श करतांच हातास टरारून फोड यावयाचे, इतपत तेज त्यांत होतेच. दौलतराव सर्जेरावाला पेशव्यांचे दरबारी ठेवून उत्तरेत कसा निघून गेला येथपासून चरित्रसूत्रास आतां आरंभ करावयाचा. तत्पूर्वी आतापर्यंत घडलेल्या गोष्टींचे एकदां स्मरण करूं. सर्जेरावाने नाना त-हेच्या हिकमती करून विश्वासघाताने नाना फडणिसास कैद केले, त्याच्या पक्षाच्या लोकांचा अमानुष छळ केला व पुण्याची होळी केली. यानंतर महादजी शिंद्याच्या बायकांच्या अंगावर हात टाकून त्यांना नखशिखान्त फोडून काढिले. त्या- बद्दल कैद भोगिली. बंधमुक्त होतांच बायांवर मारेकरी घातले. शेणवी. सरदारांचा छळ केला. शिंदे-दरबारांतील मातबर सरदारांस आपला इंगा दाखवून यमसदनास धाडले व आतां सर्जेरावाची ब्याद खुद्द बाजीरावाच्याच मागे लागली. नाना फडणीस जिवंत असेतोपर्यंत दौलतरावास उत्तरेस जाता आले नाही. कारण याजीराव त्यास जाऊं देईना; पण आतां नाना दिवंगत २८ दुर्दैवी मोहरे झाल्याने बाजीरावाचे भय नाहीसे झाले व त्याने दौलतरावास उत्तरेस जाण्याची परवानगी दिली. बाजीराव आणि दौलतराव हे तर एकमेकांचे जिगरदोस्त ना! पण त्यांची तरी एकमेकांबद्दल मनें कोठें साफ होती ? आपल्या तडाक्यांतून बाजीराव सुटल्यास तो आपणास दगा ईल असा धाक दौलतरावास होताच; म्हणून त्याने हिंदुस्थानांत जातांना सर्जेरावाच्या हाताखाली एक पलटण देऊन त्यात बाजीरावाच्या संरक्षणार्थ ठेविलें. दौलतरावाने सर्जेरावास ठेवू नये म्हणून बाजीरावाने पुष्कळ खटपट केली पण ती व्यर्थ गेली; कारण बाजीरावानें कबूल केलेली सत्तेचाळीस लाख रुपयांची रक्कम अद्याप शिंद्यास मिळाली नव्हती. तेव्हां ती वसूल करण्यासाठी म्हणून त्याने सर्जेरावास ठेविले, हे पाहून बाजीरावाने खूप त्रागा केला; मी आपला एकटाच वाटेल तिकडे निघून जाईन असा धाक घातला; प्रस्थाने ठेविली आणि शनिवारवाड्यांतून कोथरूडचा वाडा, तेथून फडके- वाडा, नंतर पेठे, नंतर रास्ते अशा त-हेने या वाड्यांतून त्या वाडयांत व त्या वाड्यांतून या वाड्यांत त्रिरात्र राहण्याचा फार्स केला. हा त्याचा त्रागा पाहून ता. २३-११-१८०० रोजी शिंद्याने त्याची पुन्हां भेट घेतली. त्या वेळी बाजीरावाने घाडग्यास काढण्याबद्दल अत्यंत गळ घातली. तेव्हां ' असे काय करतां ? मी त्यास हळूहळू बोलावून घेऊन जाईन, आपण निर्धास्त असा' असे सांगितले व वेळ मारून नेली, आणि दौलतराव उत्तरेत निघून गेला. होळकरांच्या गादीचा वारस काशीराव हा जरा भोळा होता; त्यास बगलेत मारून व पेशवेदरबारी आपल्या हातांत असलेल्या सत्तेचा उपयोग करून होळकरांची दौलत खिशांत टाकण्याचा डाव दौलतरावाने टाकला होता. पण महापराक्रमी यशवन्तराव होळकरापुढे त्याचा हा सर्व खटाटोप वायां जाऊन त्यास त्या डावाची कटु फळे चांगलीच भोगावी लागली. दौलतरावाचे घर आतां चोहों वाजूंनी पेटले होते. बायांच्या बंडाचा उपशम झाला नव्हता. हंडयाच्या घाटाची लढाई, उज्जेनची लढाई व महेश्वर अगर इंदूरची लढाई या तीन लढायांत यशवन्तराव होळकराने शिंद्यास चांगलाच मारून काढला. त्यामुळे दौलतराव अगदी जेर आला व त्याने सर्जेरावास आपल्याकडे ताबडतोब बोलाविलें. सर्जेरावास आपल्या जावया- 'च्या बातम्या कळतच होत्या, व त्याच्या मदतीस जाण्याची इच्छा त्यास सजेराव घाडगा अनेकवार होत होती; पण बाजीरावापासून सत्तेचाळीस लक्ष रुपये वसूल करण्याचे काम अजून संपले नव्हते. आपण प्रत्यक्ष उरावर असतांना पैसा निघत नाही, मग दूर गेल्यावर काय होणार, हे त्याचे त्यास चांगले समजत होते. तेव्हां बाजीरावास धाक दाखवून, कांहीं पेंचांत टाकून पैसे उकळण्याची सर्जेरावाने शिकस्त केली; पण म्हणावा तसा उपयोग होईना. उलट दौलत- रावाच्या पराजयाच्या बातम्या ऐकून व सर्जेरावास तिकडे जाण्याची निकड पाहून बाजीराव जास्त निगरगट्ट बनला. बरें, पैशाशिवाय दौलतरावा- कडे जावें तर त्याचा काहीएक उपयोग नव्हता. पैशाच्या योगे त्याच्या पुष्कळशा अडचणी दूर होणार होत्या; तेव्हां सर्जेरावास आतां मोठा पेंच पडला होता. असे जरी होते तरी बाजीरावास सर्जेरावाचा जाच आतां असह्य झाला. त्यास मारेकरी घालून ठार मारण्याचा बेत बाजीरावाने बाळाजी कुंजिराच्या मार्फत रचला, व तो बनाव इतक्या शिताफीने तडीस नेला की, सर्जेराव एवढा जहांबाज व चाणाक्ष पण तोसुद्धां फशी पडला. आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच त्या फांसांतून तो निसटला! दौलतरावाची निकडीची बोलावणी येत होती म्हणून घाडग्याने परत जाण्यासाठी आपली फौज जमा केली. चतुरसिंग भोसले व आप्पा देसाई निपाणकर यांस जवळ बोलावून घेतले, आणि ता. २१-६-१८०१ रोजी दोनशे लोकांनिशी पुण्यांत येऊन पाटणकरांच्या वाड्यांत तळ दिला व बाजीरावाशी पैशाच्या बाबत बोलणे सुरू केलें, या वेळी वाजीरावाचे धोरण अत्यंत मवाळीचे व आर्जवाचे होते. बाजीराव व कुंजीर यांनी घाडग्याचे प्रत्येक मागणे कबूल करावें व केविलवाणी तोंड करून दरयार साजरा करावा, अशा त-हेनें एकेक प्रश्न निकालांत निघालासे दाखवावें. बोलण्यांत मधुरता इतकी, की साखरेची गोडी फिकी वाटावी, असा कुंजीर व बाजीराव यांनी आपल्या वागणुकीचा थाट ठेवला. कुंजिराने सर्जेरावास आपल्या घरी मोठ्या प्रेमाने भोजनास बोलाविलें. ता. २६ जूनला घाडगा कुंजिराचे घरी भोजनास गेला; पण तेथे जातो तो त्यास हुजरातीच्या लोकांनी धरणे धरलेले दिसलें; भोजनाचा विधि मोठ्या प्रेमाने तडीस गेला. भोजनोत्तर घाडग्याने पैशाचे बोलणे काढतांच कुंजीर त्यास म्हणाला, आपण या गोष्टीचा खल या सर्व लोकांसमक्ष करणे बरे नाही, तेव्हां जरा बाजूस जाऊन बोलू. त्यानंतर चार निवडक माणसे बरोबर घेऊन दोघेहि आंतल्या दिवाणखान्यांत गेले.
३० दुर्दैवी मोहरे थोडे बोलणे झाल्यावर कुंजिराने काही कामानिमित्त बाहेर जाण्याचा बहाणा केला, त्याबरोबर चाणाक्ष सर्जेरावापुढे खाड्कन् सर्व प्रकाश पडला, व त्याने कुंजिराचें कपट ओळखिलें. तात्काळ घाडग्याने एका हाताने कुंजिराचा गळा दावून दुसरा समशेरीस घातला. कुंजीर त्या वेळी थोडी जरी गडबड करता तरी त्यास सर्जेरावानं ताबडतोब कंठस्नान घातले असते. कुंजीर बाहेर येतांच मारेकऱ्यांनी आंत जाऊन घाडग्याचे काम काढण्याचा विचार ठरला होता; पण घाडग्याच्या प्रसंगावधानामुळे तो बचावला. घाडग्याने कुंजिरास रस्त्यावर आणिलें आणि आपण घोड्यावर स्वार होऊन चालता झाला. अशा त-हेने बाजीरावाने सर्जेरावावर मात केली, पण घाडगा त्यांतून मोठ्या शिताफीने निसटला. सर्जेराव म्हणजे आधीच बेफाम वृत्तीचा; त्यांतून त्याच्या या आसुरी वृत्तींत बाजीरावाच्या कपटकारस्थानाने जास्तच भर पडली व त्या मोकाट सुटल्या. शनिवारवाडा घ पुणे शहर जाळून ग्वाक करतो अशा नाना त-हेच्या वल्गना करून त्याने दोन दिवस लढाईच्या तयारीने फौजा ठेवल्या; त्याबरोबर सर्व पुण्यांत हाहाकार उडाला. बाजीरावाची हबेलेंडी उडाली. त्याने घाडग्याची आर्जवें चालविली. त्या कामी रेसिडेन्ट पामरची शिफारस त्याने आणली; पण घाडग्याची समजूत पडण्याचा रंग दिसेना. मुन्हा एकदा पुण्याची होळी होणार आणि असंख्य लोकांचे घाडगा बळी घेणार असा रंग दिसू लागला; पण त्या दयाघन परमेश्वरास दया आली, व त्याने हा प्रसंग टाळला. कारण शिंद्याची उत्तरेत फारच हलाखी झाल्याचे वृत्त आले, त्यामुळे सर्जेरावास पुण्यास राहणे अशक्य झाले. तेव्हां आपला मुलगा हिंदुराव व आपा देसाई निपाणकरास बाजीरावाजवळ ऐवज उकळण्यासाठी ठेवून ता. १२-७-१८०१ रोजी त्याने पुण्याहून कूच केले. पण जातांना त्याने मुलूखचे मुलूख व प्रान्तचे प्रान्त बेचिराख केले, आणि नाना त-हेचे अत्याचार करीत तो चालला. त्याची वर्णने वाचली म्हणजे डोळ्याचे पाणी वळणार नाही-" दोन प्रहरी सर्जेरावाची स्वारी प्रवरा- संगमीं प्राप्त झाली. अगोदर कंपू पुढे आली. त्याची ग्वाही संगमांत गेली. त्यांनी लाकूडफाट्याकरितां पांचचार घरे झोंबडली, दो-चौ घरची पांघरुणें वस्तभाव हाती लागेल तें नेले, त्यावर खासा आल्यावर याळंभट आपाचे भेटीस गेले. भेट घेऊन हात जोडून उभा राहिला, की तुमची आज्ञा होईल सर्जेराव घाडगा ३ uuuN ........ ~~~~~~~~~~~ तर बसेन. मग आप्पा बसा म्हणाले तेव्हां बसला. गांवांत उपद्रव न करण्याचे कबूल केलें." अत्याचार करतांनासुद्धां सर्जेराव तरतमभाव जाणीत होता. अशा त-हेनें घाडगा ऑगस्टअखेर ब-हाणपूरला पोचला. तेथून लगोलग निघून सप्टेंचरांत नर्मदापार होऊन दौलतरावास मिळाला. सर्जेराव घाडगा येऊन मिळतांच दौलतरावास पुष्कळच धीर आला. या वेळी यशवंतराव उज्जनीअलीकडे चार मैलांवर होता. लखबादादाची कांहीं फौज होळकराच्या साह्यासाठी आली होती. शिंदा नर्मदेच्या उत्तर-तोंडी हंडिया येथे होता. होळकराने उजनीचा विध्वंस केला, त्याचा सव्याज वचपा आपण इंदूरवर काढावा असा सर्जेरावाचा मानस होता. दोन्ही फौजांच्या लहानसहान चकमकी एकसारख्या होऊ लागल्या. ता. ९-१०. १८०१ रोजी दोन्ही सैन्यांच्या आघाडीची गोळागोळी झाली. ता. ११ रोजी लढाई मातबर होऊन होळकराचे तीन हजार मनुष्य जाया होऊन त्यांच्या शंभर तोफा आणि इंदूर व उज्जनी दोन्ही ठाणी शिंद्यांनी हस्तगत केली. “ विजयादशमीस (१७ ऑक्टोबर ) खासा शिंदे रेवापार झाले. शिंद्याची छत्री तात्पुरती होळकरावर पडली. इंदूर शहरांत लूट, जाळपोळ व कत्तल करून सर्जेरावाने उज्जनीचा सूड पुरेपूर उगविला. इंदूरच्या लोकांनी १५ लक्ष रुपये देण्याचे कबूल केले, तरी तें न जुमानतां इंदूरची लूट करून वाडे जाळून खोदून काढिले; परंतु यशवंतराव बिलकुल डगमगला नाही. त्याचा सरदार शामराव महाडीक कंपू घेऊन बाहेर होता, त्यास यजमानांची पत्रे गेली की, 'प्रसंग अडचणीचा, तुम्ही रात्रीचा दिवस करून यावें. परंतु तो येण्यापूर्वीच लढाई शिकस्त झाली." असल्या पराभवांनी आणि कत्तलींनी घाबरून जाण्याइतका दिल्या तब्बेतीचा यशवंतराव नव्हता. त्याने आतां कपटनीतीचा अवलंब केला आणि शिंद्याच्या फौजेत फितुर केला. उलट पक्षी शिंद्यांनीहि दुद्रनेक या होळकराच्या अधिकाऱ्याला फितविलें; पण होळकराची सेना यशवंतरावावर प्रेम करणारी व प्रामाणिक होती. त्यांनी दुद्रनेक होळकरास सोडून शिंद्या- कडे येत असतां पोबारा केला व पुन्हां होळकराच्या झेंडयाखाली ते जमा झाले. ता. ३०.१०-१८०१ रोजी पुन्हां मोठी मातयर लढाई होऊन त्यांत सर्जेरावाचा पराभव होऊन तो मागे हटला. या चकमकींत शिंद्याचे एक ३२ दुर्दैवी मोहरे ........ ....... पलटण व दीड हजार स्वार ठार झाला. यानंतर त्यांनी आपला तळ उज्जनीकडे हालविला; पण येथेंसुद्धा सर्जेरावाचा होळकराने पिच्छा पुरविला व त्यास त्राहि भगवन् करून सोडले. यशवंतरावाने भोवताली घिरट्या घालून एकसारखे छापे घातले व शिंद्याच्या फौजेचा उच्छेद मांडिला. यानंतर कांहीं चकमकी झाल्या त्यांत दौलतरावाचा मोड झाला; आणि अगदी टेकीस येऊन त्याने समेटाचें बोलणे सुरू केले. 'पूर्वी तुकोजीरावाशी केलेले करारमदार मान्य करण्यास तुम्ही तयार असाल तर समेट होईल' असे उत्तर यशवंतरावाने दिले. तें दौलतरावास मान्य न होऊन पुन्हां चकमकीस सुरुवात झाली. या वेळी बाजीरावास धनीपणाची आठवण होऊन तो गाजविण्याची लहर आली आणि त्याने आपल्या दोन्ही सरदारांस फर्माने धाडिली की, 'शिंदे-होळ- करांनी एकदम असतील तेथे युद्धे थांबवावी. आपसांत विरुद्ध वागून महाल- निहाय उपद्रव करितात तो करूं नये. उभयतांचा समजुतीचा तह सरकारांतून ठरून आज्ञा होय तोपर्यंत शिंद्यांनी आपले सरदारांसह आशेरी ब-हाणपूरचे मैदानांत रहावे आणि होळकरांनी आपले सरदारसुद्धां तापी-उत्तरतीरीं थालनेरास रहावे. दरम्यान लढाई करूं नये.' हे हुकूम मान्य करण्याइतकी पुण्याई बाजीरावाजवळ आतां उरली नव्हती. अशाच अर्थाचे आणखी एक पत्र शिंद्यास गेले होते; ' यशवंतराव होळकर व सर्जेराव यांची लढाई होऊन इंदूर शहर तुम्हीं व उज्जन होळकरांनी लुटिलें हैं नीट नाही. सर्जे- रावांनी सौ. आनंदीबाई होळकर यांचा होळकर यांचा खाजगी तालुका लुटला; तरी सर्जेरावास निक्षून ताकीद करून घेतलेला वसूल माघारी देणे. बाजीरावाच्या फर्मानांस उभय पक्षांनी धाब्यावर बसविले हे सांगणे नलगे. अशा तन्हेने शिंदे-होळकरांच्या झटापटी चालल्या होत्या, एकमेक एकमेकांचे लचके तोडीत होते. शिंद्यास स्वार्थाने पछाडल्यामुळे तहाची भाषा होईना. इकडे पुण्यास पेशव्याने या पेटलेल्या खाईत कुंजिराच्या बदसल्ल्याने विठोजीच्या वधाचे तेल ओतल्याबरोबर ही आग जास्तच भडकली. विठोजीच्या वधाचा सूड घेण्यासाठी म्हणून यशवंतराव पुण्यावर चाल करून गेला व त्याने पुण्याचा कबजा घेतला. बाजीराव पळून कुंजिरा- च्याच सांगण्याने इंग्रजांच्या आश्रयास गेला. त्या वेळी अमृतराव व यशवंतराव यांनी मिळून पुण्यांत मराठमंडळाची जूट करण्याचा घाट घातला १ ह्या सर्जेराव घाडगा होता; पण त्यांत शिंद्यास न मिळू देण्याची पुण्याई सर्जेरावाने जोडली. त्या वेळी शिंदा होळकरास मिळता तर मराठ्यांचा इतिहास निराळ्या त-हेने लिहिण्याचे भाग्य लाभले असते; पण वसईच्या नादान तहावर सह्या झाल्या आणि इंग्रजांचे भाग्य बळावले. बाजीराव इंग्रजांच्या स्वाधीन झाला व यशवंतरावाने बेजरच तडाके दिले, त्याबरोबर दौलतरावाची दृष्टि खाकन् उघडली; आणि त्याची खात्री झाली की, बाजीराव नादान तर खराच, पण त्याच्या नादी लागणारे आपण महामूर्व; व त्यामुळे आपले वाटोळे झाले. त्यांतून आपणाजवळ असणारा सर्जेराव म्हणजे पदरांत बांधिलेला निखाराच, त्याच्यामुळे अवघ्या दौलतीचा खराबा होऊन नारळाची आई हाती येण्याचा वखत आला; तेव्हां या घर- बुडव्यास प्रथम दूर करावे असे त्याच्या मनांत आले व तसे त्याने केले. इ. सन १८०३ ला सर्जेराव दौलतरावास सोडून कोल्हापुरात आला. यानंतर त्याने बाजीरावाकडे पैगाम लावून पुण्याच्या कारभारांत येण्याचे ठरविले. घाडग्याबरोबर बाळाजी जनार्दन जांबगांवकरांचे बंधु बापू जनार्दन आहेत. घाडग्याकडून बंडवाल्यांची वगैरे पारिपत्ये करून राज्याचा बंदोबस्त करावा असा श्रीमंतांचा मानस आहे. काही दिवस त्या बाबतींत वाटाघाट होऊन ता. २४-९-१८०३ रोजी घाडग्याने ४०० लोकांनिशी पुण्यास येऊन श्रीमंतांचे दर्शन घेतले. श्रीमंत घाडग्यावर फार खूष. त्याची तारीफ करितात, घाडग्यासारखा मनुष्य नाही असे म्हणतात. नंतर घाडग्याने थोडीबहुत फौज जमा करून बाजीरावाच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची खोडकी मोडिली. पण घाडगा पुण्यास फार काळ राहू शकला नाही. पुढे इंग्रजांचे युद्ध संपून शिंद्याची वाताहात झाली तेव्हां सर्जेराव पुन्हां दौलतरावाकडे गेला. याच सुमारास दौलतराव ब-हाणपूर सोडून निघाला तो हलके हलके मजला मारीत नर्मदेवर आला. ब-हाणपुराहून निघतांना उज्जनीकडे जाण्या- चा शिंद्याचा मानस असावा असें रेसिडेन्टास वाटत होते; पण नर्मदेवर येतांच शिंद्याने आपली दिशा बदलली. उत्तरेकडे न जातां नर्मदेच्या काठाने पूर्वेकडे कूच चालविलें व हुशंगाबादेजवळ नदीपार होऊन बुंदेलखंडांत जाण्याचा विचार चालविला. शिंद्याने आपली चाल अशा विलक्षण त-हेनें बदललेली पाहून रेसिडेन्टास अचंबा वाटला. हुशंगाबाद व त्याजवळचे ३ ३४ दुर्दैवी मोहरे कांही परगणे भोपाळच्या नबाबाशी युद्ध करून नागपूरच्या रघूजी भोसल्याने इ.स. १७९५ च्या सुमाराला घेतले होते, ते इ.स. १८०३ मध्ये जेव्हां शिंदे-भोस- ल्यांचे इंग्रजांशी युद्ध सुरू झाले त्या वेळी संधि साधून भोपाळच्या नबाबाने आपले गेलेले परगणे पुन्हां घेतले. तेव्हां हे परगणे आपले आपणांस परत मिळवून द्यावेत म्हणून भोसले आणि शिंदे यांजमध्ये गुप्त करार झाला असावा असा सुगावा रेसिडेन्टास लागला. उज्जनीचा मार्ग सोडून शिंदा हुशंगाबादेकडे कां वळला याचा निकाल रेसिडेन्टाच्या मनास आतां लागला. शिंद्याची ही बदललेली चाल पाहून आधीच गांगरलेला रेसिडेन्ट, सर्जेराव घाडगा याच सुमारास तेथे प्रकट झालेला पाहून जास्तच गांगरला; त्याच्या मनांत आतां शिंद्याच्या धोरणाविषयी शंकाच राहिली नाही. दौलतराव- सर्जेराव या दोन ग्रहांची युति कुंपणीसरकारास भोवणार असे त्याप्त वाढू लागले. दक्षिणेत मराठे-सरदारांची जूट करून इंग्रजांचा पाडाव करण्याच्या हेतूनें सजेंगव दक्षिणेत गेला होता; व या आपल्या मानसाबद्दल त्याने बाजीरावादि मराठेमंडळींचा विचार घेऊन ही स्वारी आता पुन्हां दौलतरावाकडे दाखल झाली होती. जातांना दौलतरावाने जरी त्यास काढून लाविला होता, तरी आतां तो इंग्रजांचा पाडाव करावयाचा या भव्य व उदात्त हेतूने प्रेरित होऊन आला होता, म्हणून पुन्हां घाडगा शिंद्याजवळ येतांच त्याची चलती सुरू झाली खुद्द दौलतराव त्याच्याशी नमून वागत असल्यामुळे इतरांस तो सहज वाकवी. सर्जेरावाची कारस्थाने सुरू झालेली पाहून भोपाळच्या नवाबाचे वकील इंग्रज रेसिडेन्टकडे पत्रे घेऊन आले व म्हणूं लागले की, " शिंदे हुशंगाबादेवर चालून येतात; व ते हुशंगाबाद व त्याजवळील आमचे परगणे आमचेजवळून जिंकून नागपूरकर भोसल्यास देणार, व या कार्यानिमित्त त्यांनी भोसल्याजवळून भली मोठी रक्कम घेतली आहे. हे कारस्थान तडीस नेण्यासाठी इंग्रजांची फौजहि त्यास मदत करणार असा आमचा तर्फ आहे. तरी इंग्रजांनी कृपालु होऊन आमचा सांभाळ करावा, आणि आमचे परगणे आमचे हातून जाणार नाहीत असा बंदोबस्त करावा." वकिलाची ही पत्रे वाचून रेसिडेन्टाची खात्रीच झाली की, मराठ्यां- चे काही तरी फार मोठे कारस्थान शिजत आहे. शिंदे व भोसले यांचे संगनमत होऊन काही तरी करारमदार झाले असावेत; मग ते सर्व मराम्यांनी सर्जेराव घाडगा ३५ " मिळून इंग्रजांस मारून काढण्याचे असोत वा नुसते मुलुखगिरी करण्याचे असोत. या शंकाकुशंकांचे निरसन करून घेण्यासाठी म्हणून रेसिडेन्टाने शिंद्याची गांठ ता. ११-८-१८०४ ला घेतली व त्यास स्पष्टच विचारले की, “अलीकडे होळकरांची वकीलमंडळी आपणाकडे येतात. सर्जेरावाची व त्यांची खलबतें आपल्यासमक्ष चालतात, तेव्हां आपला काय विचार आहे? सर्जेराव घाडग्याचा दुष्ट स्वभाव आपणास चांगला माहीत आहे. तो स्वार्था- पलीकडे काही जाणत नाही. मानापमान, युक्तायुक्त, न्याय्यान्याय्य, सुकर्म- कुकर्म याची त्यास बिलकुल पर्वा नाही. साधी माणुसकीहि त्याच्याजवळ नाही. वाटेल ती अनन्वित कृत्ये करून स्वतःची तुंबडी भरण्यापलीकडे तो काहीएक जाणत नाही. त्याच्या दुष्ट कृत्यांमुळे व सैतानी लीलांमुळे आपणांस कायमचा काळिमा आला म्हणून त्यास आपण गेल्याच वर्षी दूर केले. असे असतां पुन्हां सर्जेराव आपल्या कारभारांत ढवळाढवळ करतो याचा अर्थ काय ? त्यास दूर करणे ही आपल्या हिताची गोष्ट आहे." या प्रभास दौलतरावाने उत्तर केले की, तुमचे आमचे जे करार ठरले आहेत त्यांत थोडासुद्धां फरक होणार नाही. आमचे व होळकरांचे जमणे कालत्रयींहि शक्य नाही. तुम्ही उगीच मनांत कुतर्क आणू नयेत; त्यापासून फायदा उभय पक्षी नाही. आमचा दिल साफ आहे, आपलाहि असावा. आतां सर्जेराव आमचे आप्तसंबंधी आहेत; तेव्हां त्यांना कायमचें दूर करणे केवळ अशक्य. त्यांना आपल्याप्रमाणे आम्हीहि पूर्ण ओळखतो. आम्ही त्यांची काही तोड काढावी म्हणून ते आले आहेत. तेव्हा त्यांच्या सांगीने आम्ही आमचे विचार बदलू असे होणे नाही. त्यासंबंधी आपण निःशंक असावें. आम्ही त्यास कारभारावर नेमीत नाही. कारभाराची अखत्यारी बापू विठ्ठलकडे आहे. त्यांच्यावर आमचा पूर्ण भरंवसा आहे; व ते कारभार नीट करीत आहेत." या भेटीनंतर पुढे एक महिन्यानेच यापू विठ्ठल मरण पावला. लगेच शिंद्याच्या दरबारी चलबिचल झाली व सरावाचा जोर झाला. सर्जेरावाने एकसारखें आपलें संधान होळकराशी चालू ठेविलें. हे पाहून रेसिडेन्टास पुन्हां दौलतरावाविषयी शंका आली; आणि त्याने पुन्हां ' होळकरांशी तुमचे वर्तन कसे ठेवणार ?' असा प्रश्न विचारला. या प्रभास समाधानकारक उत्तर न देतां शिंदा ब-हाणपूर सोडून उत्तरेकडे निघाला.
दुदवा माहर या वेळी आपण कोठं व कोणत्या मार्गाने जाणार याचीहि दाद दौलतरावाने रेसिडेन्टास दिली नाही. तेव्हां रेसिडेन्ट जास्तच घाबरला, व आतां शिंद्यास जाबजबाब न विचारतां यापुढे आपण काय धोरण ठेवावें याचा खुलासा गव्हर्नर जनरलकडून मागविला. या वेळी इंग्रज आणीबाणीच्या प्रसंगांत होते; त्यामुळे दौलतरावाशी चढाईचे धोरण न ठेवतां नरमाईनेंच घ्यावें असें ग.ज.ने रोसिडेन्टास कळविले. पण हे धोरण संभाळणे दिवसानु- दिवस रेसिडेन्टास जड जाऊ लागले. कूच चालू असतां रेसिडेन्टास काहीच वर्दी न देतां दौलतरावाने हुशंगाबादेचा मार्ग धरिला. या वेळी रेसिडेन्टाची प्रकृति नादुरुस्त होती म्हणून तो चार दिवस मागे राहिला व चार दिवसां- नी त्याने शिवनी येथे शिंद्यास गांठलें, तो शिंद्याची फौज हुशंगाबादेवर चाल करून जाण्याच्या तयारीत होती. या फौजेवर सर्जेरावाची देखरेख होती. तेव्हां रेसिडेन्ट वेब याने जेंकिन्स यास तांतडीने दौलतरावाकडे पाठविले व विचारले की, " इंग्रजांचा व तुमचा दोस्तीचा करार असतां त्यांना कळविल्यावांचून तुम्ही त्यांच्या दोस्तांशी युद्ध करतां हे रास्त नाही. त्यावर दौलतरावाने जयाय दिला की, "भोपाळचा नबाब आमचा मांड- लिक आहे, आणि त्याच्याशी कसे वर्तन ठेवावें हे आम्ही चांगले जाणतों, त्यांत इंग्रजांनी उगाच मध्यस्थी करूं नये. आम्हांस पैशाची तंगी असल्या- मुळे हुशंगाबादेच्या मार्गाने जावे लागत आहे, आणि शक्य तितक्या लौकर फौज जमवून आम्ही इंग्रजांस सामील होऊन होळकरावर चालून जाणार आहोत.” यापुढे रेसिडेन्ट वेयची प्रकृति जास्तच बिघडून तो हुशंगाबादे- नजीक ता. ९-११-१८०४ रोजी खिस्तवासी झाला. तेव्हां रेसिडेन्टाच्या हाताखाली काम करणारा जेंकिन्स याचीच रेसिडेन्टाच्या जागी नेमणूक झाली. सन १८०४ हे संबंध वर्ष शिंदे-होळकरांनी मिळून इंग्रजांस नरम करावें, यासाठी सर्जेरावाने शिंद्याजवळ राहून एकसारखी खटपट केली. त्यामुळे रेसिडेन्ट किन्सचे व सर्जेरावाचे वांकडे आले. या वेळी जीकन्स यास आणखी असे कळले की, सर्जेराव घाडग्याचा होळकर व त्याचे साथीदार मीरखान वगैरेंशी एकसारखा पत्रव्यवहार चालू आहे; तो इंग्रजांविरुद्ध मोठा उठाव करीत आहे. या वेळी यशवंतरावानेंहि असा पुकारा केला की, इंग्रजांविरुद्ध सर्व हिंदी दौलतदार उठले असून सर्वांनी एकदिल होऊन सर्जेराव घाडगा इंग्रजांचा पाडाव केला तरच त्यांचा निभाव आहे; नाही तर इंग्रज सर्व बळकावतील व मग हिंदी दौलतदारांवर मोठा कठीण प्रसंग येईल. या यशवंतरावाच्या म्हणण्यास नागपूरकर भोसल्याकडून पाठिंबा मिळाला. अशा त-हेनें जो तो आपआपले गेलेले प्रदेश परत मिळविण्याच्या उद्योगास लागला. या बातमीचा पुकारा फार जोरांत झाला, गव्हर्नर जनरलने पुण्याचा रेसिडेन्ट कर्नल क्लोज यास सर्जेरावाविषयी सावध राहण्याची सूचना केली; जेंकिन्स यास दौलतरावास ताबडतोब भेटण्याविषयी लिहिले व पुढील दोन गोष्टींचा खुलासा करण्यास सांगितले. पहिली, दौलतरावाने एकदम उज्जनीकडे निघून जावें; व दुसरी, सर्जेरावास कारभारांतून दूर करावें. असे दरडावणीचे पत्र किन्सला येतांच तो लगोलग दौलतरावाला भेटला व त्याने आपले सर्व संशय खुलासेवार विचारले; तेव्हां दौलतरावाने उत्तर केले की, “तुम्ही उगाच भलते तर्ककुतर्क करतां. माझी निष्ठा इंग्रजां- चे ठायीं अढळ आहे, ती केव्हांहि ढळणार नाही. मी मुद्दामच पूर्वेच्या मार्गाने जात आहे; कारण माळवा प्रान्त होळकराने उध्वस्त केला असल्या- मुळे त्या प्रान्ती फौजा उभ्या करणे शक्य नाही. बुंदेलखंडांत फौज ताबड- तोब उभी करता येईल. रघूजीविरुद्ध इंग्रजांनी उठविलेल्या गप्पा केवळ गप्पाच आहेत, त्यांत तथ्य काहीएक नाही. सर्जेराव भानगड्या आहे खरा, पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून एवढे मोठे साहस करण्याची छाती कोणाचीच नाही. या वेळी गव्हर्नर जनरल वेल्स्ली व रेसिडेन्ट जेन्किन्स यांच्या मनांत आलेली ही संशयाची अझै निष्कारण होती. याच्यांत तथ्य काहीच नव्हते. या वेळी इंग्रजांची मनःस्थिति अशी संशयग्रस्त असणे अगदी स्वाभाविक होते. कारण बळदांतून लक्ष्मीने 'येऊ का ? येऊ ? ' म्हणून विचारावें व 'ये' म्हणतांच एकदम मोहोरांनी भरलेले हंडेच्या हंडे बळदां- तून बाहेर यावे त्याप्रमाणे इंग्रजांची स्थिति झाली होती. कंपनीसरकारने हिंदुस्थानांत अलोट पैसा तर मिळविलाच, पण आतां टोपीकराची शिप्तर- वजा टोपी नाहीशी होऊन त्या ठिकाणी राजमुकुट शोभायमान होणार होता, व हातांतील तागडी जाऊन तिची जागा राजदंड घेणार होता. असा हा अपूर्व योगायोग जुळून येणार अशी स्पष्ट चिन्हें दिसत होती. तेव्हां हैं परमभाग्याचे लेणे लाभते का नाही या विचाराने टोपीकरांचे मन अधीर ३८ दुर्दैवी मोहरे -~- झाले होते, व त्याचा परिणाम वर नमूद केलेल्या संशयांत झाला होता, इतकेंच. आतां हे खरे की, सूर्याचे तेज जसें चराचर वस्तूंना जीवन देते व त्या तरारूं लागतात, त्याप्रमाणे यशवन्तरावाच्या तेजस्वी धोरणाने व त्यास मिळत चाललेल्या यशाने शिंद्याच्या मनावर परिणाम झाला होता, व त्या योगानें थोडीशी हालचाल त्यानेहि केली असती. पण दौलतराव शिंदा जात्या नेभळट व नाना त-हेचे सुखविलास उपभोगण्यास चटावलेला; त्याचे हातून शूराची करणी होणे कठीण. याशिवाय इंग्रज महाधोरणी, त्यांनी दौलतराव पैशाच्या तंगींत आहे असे पाहून त्यास सावकारी डावाने पार जखडून टाकिलें, तें असें-" धोलापूर वगैरे तुमचे कित्येक परगणे तारण घेऊन आम्ही तुम्हांस सहा लावपावेतों रक्कम कर्जाऊ देऊ.” हे बोलणे शिंद्याची स्वारी दक्षिणकांठाने चालली असतां झालें. ताखि ६-१२-१८०४ रोजी डीगच्या लढाईत यशवन्तरावाचा पाडाव होऊन इंग्रजांस जय मिळाला ही बातमी जेन्किन्स यास कळली, तेव्हां त्यास आनंद झाला. म्हणून त्याने कूच चालू असतांच दौलतरावाची गांट घेतली, व त्यास डीग येथे मिळालेल्या इंग्रजांच्या जयाची व कर्जाऊ रक्कम मंजूर झाल्याची बातमी सांगितली; आणि आता तुम्ही सर्जेरावास दूर करा, म्हणजे तुमचाआमचा कायमचा सलोखा राहील असेंहि तो सांगू लागला. तेव्हां थोडा विचार करून उत्तर देतो असे शिंद्यांनी उत्तर दिले. यानंतर एकाच महिन्याने ता.६-१-१८०५ ला शिंद्याचा तळ सागराजवळ पडला. या ठिकाणी कर्जाऊ रकमेची मागणी करण्यासाठी दौलतरावाने रामचंद्र भास्करास धाडिलें व रेसिडेन्टास असे कळविले की, तुमच्या इच्छेप्रमाणे सर्जेरावास दूर करण्याचे आम्ही ठरविले आहे व यापुढे तुम्ही सांगाल तसे आम्ही वागं. मात्र कर्जाऊ रक्कम लगोलग द्यावी. दौलतरावअप्पा मुठीत नाक धरून येतांच सिडेन्टाने त्यास कळविले की, "सर्जेराव निघून गेल्याशिवाय रक्कम मिळणार नाही." इंग्रजांनी आपल्याविरुद्ध इतकी हाकाटी चालविलेली पाहून सर्जेराव चिडून गेला व त्याने रेसिडेन्टाची खोडकी जिरविण्याचे मनांत आणिले. हा सर्जेराव पूर्वीचा असता तर त्याने रेसिडेन्टाचे डोके मारिलें असतें, वा त्याच्या अंगास बाण बांधून ते पेटवून त्याची रवानगी अंतरिक्षांत केली सर्जेराव घाडगा .... .... rvNranAnamvire असती; पण आतांचा सर्जेराव जरा नरम पडलेला व उतारवयाच्या उत- रणीस लागलेला; त्यांतून स्वतःचे आसन डळमळीत झालेले. तेव्हां त्याने शिंद्याचा मुक्काम सागराप्त होण्यापूर्वी वाटेंत ता. २७-१२-१८०४ रोजी रात्रीं चोरांच्या टोळीकडून रेसिडेन्टाच्या तंबूबर छापा घालविला व पहारे- कऱ्यास ठार मारून सुमारे बारा हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही गोष्ट वास्तविक सर्जेरावानेच केली, पण त्याचा पत्ता रेसिडेन्टास लागेना तेव्हां त्याने दौलतरावाकडे तक्रार केली. दौलतरावाने तपास करून कळविले की, चोरी पेंढाऱ्यांनी केली असून त्यांचा निग्रह करण्याचे साधन आमचेजवळ नाही. हे उत्तर ऐकून रेसिडेन्ट चिडला व त्याने दौलतरावास एकदम सांगितले की, " यासाठीच तुम्ही आतांच्या आतां उजनीकडे चला, न जाल तर आम्ही तुमची छावणी सोडून जातो.” रोसडेन्टाचा हा त्रागा पाहून दौलतरावाने उत्तर केले की, “ अबूजी इंगळे येथे लवकरच येणार आहेत, त्यांचा विचार घेऊन मग काय ते कळवितों. या उत्तराने रेसिडेन्टाचे समाधान न होता त्याने छावणी सोडून जाण्याची तयारी चालविली. तेव्हां दौलतरावाने रामचंद्र भास्करास रेसि- डेन्टाकडे धाडून शपथपूर्वक कळविले की, "आम्ही ता.१३-१-१८०५ पावेतों उजनीकडे कूच करितो.” दौलतरावाने हा निरोप धाडिला खरा पण रेसिडेन्टाच्या या चढेल धोरणाची त्यास चीड आली. इतक्यांत रेसिडेन्टाने अशी मागणी केली की, अबूजी इंगळ्याने आमची आगळीक केली आहे; तेव्हां त्याचा बंदोबस्त तुम्ही करावा. यामुळे दौलतराव जास्तच चिडला व त्याने रेसिडेन्टाशी भाषणच सोडिलें. यावरून ता. २३-१-१८०५ रोजी रेसिडेन्ट छावणी सोडून काही अंतरावर निघून गेला. तेव्हां त्यास आणण्यासाठी दौलतरावाने माणसांवर माणसें धाडिली, आणि पुन्हां छावणीत येण्याबद्दल नाकदुन्या काढिल्या व विनवण्या केल्या. त्यावरून रेसिडेन्ट माघारी आला व दुसरे दिवशी दौलतरावास भेटला. पण त्याच्या- मागे त्याच्या तंबूवर पुन्हां पेंढाऱ्यांनी छापा घातला व त्याचे सर्व सामान- सुमान लुटले. या धांदलीत दोन इंग्रज अंमलदार व नोकर आणि कांहीं फौजेच्या लोकांस किरकोळ जखमा झाल्या. ही बातमी दौलतरावास कळ- तांच त्याने वेद व्यक्त केला व नुकसान भरून देण्याचे कबूल केलें. पेंढाऱ्यांचे हे हल्ले बहुतकरून सर्जेरावाने मुद्दाम केले असावेत असा संशय दुर्दैवी मोहरे गव्हर्नर जनरल यास आला व त्याने रेसिडेन्टास समज दिली की, शिंद्याशी अतिप्रसंग करूं नये. शिंद्याशी धोरणाधोरणाने वागून आपला कार्यभाग साधण्याची धूर्तता किन्समध्ये नाही असा समज गव्हर्नर जनरलचा झाला व त्याने कर्नल क्लोजची बदली शिंद्याच दरबारी केली; आणि गुन्हेगारांचा तपास करून त्यांस शिक्षा करा व नुकसानभरपाई ताबडतोब करा, अशी जोराची मागणी शिंद्याकडे केली. अशा प्रकारे एक महिना बोलाचालीत निघून गेला. ता. २४-२-१८०५ रोजी दौलतरावाने सागराहून उज्जनीच्या रोखें कुच केलें रस्त्यांत ता. २ मार्च रोजी सर्जेरावास घेऊन दौलतरावाने रेसिडेन्टची गांठ घेतली आणि नरमाईने विनंति केली की, “ झालेले प्रकार सर्व आपण विसरून जावे आणि स्नेहभाव पूर्ववत् ठेवावा.' " ४ :: सबळगडचा बनाव रेसिडेन्टाने मर्जेरावास कारभारांतून 'दूर करा' म्हणून एकसारखं म्हणावें, दौलतरावाने त्याच्या ह्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नये; होतो मी संन्यासी' म्हणून धाक दाखवणाऱ्या नवऱ्याप्रमाणे रेसिडेन्टने जातों मी छावणी सोडून ' म्हणून त्रागा करावा, छावणी सोडूनहि जावें, पण या त्राग्याचाहि परिणाम कांहीएक होऊ नये; व सर्जेराव कारभारांत वावरतांना दिसावा. इतकेच काय, पण त्याने सर्व कारभार कुलमुखत्यारीने करावा, असा हा प्रकार चालला होता तो आपण पहिला. सर्जेरावास बरोबर घेऊन रेसिडेन्टाची गांठ दौलतरावाने घेतली व ' झालेले सर्व प्रकार आपण विसरून जा व स्नेहभाव पूर्ववत् ठेवा' अशी विनंति केली; आणि अशा त-हेनें तूर्तातूर्त हे प्रकरण मिटते घेतले. इंग्रज जात्याच शंकेखोर, व दौलतरावाच्या या चढाईच्या वागणुकीने रेसिडेन्टाचें मन जास्तच कांक्षेखोर झाले, आणि त्याने दौलतरावावर जास्त करडी नजर ठेवली. त्यामुळे उभय पक्षांत जास्तच घासाघाशीस सुरुवात झाली. दौलतरावास आपले स्वातंत्र्य आपण गमावले असे वाटले व ही स्थिति त्यास दुःसह होऊन त्याच्या मनाचें स्वास्थ्य गेले. तेव्हां त्याने आपल्या सर्व तक्रारी व आपणावर रेसिडेन्टाकडून होत असणाऱ्या अन्यायांची खुलासेवार चर्चा करून एक लखोटा गव्हर्नर जनरलकडे धाडिला. या पत्रांतील सर्व आरोप कसे फोल आहेत ते नीटपणे दाखविणारे उत्तर दौलत- ४२ दुर्दैवी मोहरे रावास गव्हर्नर जनरलकडून आले. लखोटा जाणे व त्याचे उत्तर गव्हर्नर जनरल- कडून येणे या गोष्टींस चारसहा महिने लागले. मात्र यानंतर गव्हर्नर जनरलने दौलतरावाशी सामोपचाराचे धोरण ठेविलें, 'दौलतरावाच्या तक्रारी आतां जास्त वायूँ न देतां त्या समंजसपणे मिटत्या ध्या; थोडेबहुत देवाण घेवाण करा. त्याच्याशी अतिप्रसंग करूं नका. असा हुकूम ग. ज. में रेसिडेन्टास धाडला. त्यामुळे सर्जेरावास कारभारांतून काढण्याचा हट्ट रेसिडेन्टाने सोडला आणि 'सर्जेरावास कारभारांतून काढणे हे तुमच्याच हिताचे आहे. न काढलात तरी त्यांत आमचे काहीएक जात नाही.' अशा अर्थाचें बोलणे त्याने आतां सुरू केलें. यानंतर सर्जेरावाने भरतपूरचे जाठांशी चाललेल्या होळकरांच्या युद्धांत शिष्टाई केली. प्रथम दोनतीन महिने हे युद्ध जोरांत होते; पण निकाल लागेना, तेव्हां दौलतरावाने मनांत आणलं की, आतां आपण जाऊन होळकराचा समेट करून द्यावा व लगेच तसे त्याने रेसिडेन्टास ता. २२- ३-१८०५ रोजी कळविले की, 'आम्ही येथून होळकराचा समेट करून देण्यासाठी भरतपुरास जाणार.' हा निरोप एकून रेसिडेन्टचे धाबेंच दणाणले. कारण त्याची अशी कल्पना झाली की, शिंदा भरतपुरास गेल्यावर होळकर, शिंदे व जाठ यांचे संगनमत होऊन ते तिघे इंग्रजांवर चढाई करणार व हा डाव टाकण्यास सर्जेराव कमी करणार नाही! या कल्पनेचे पिशाच रेसिडेंटाच्या डोक्यांत नाचूं लागतांच त्यास चैन पडेना. बरें दौलतराव-सर्जेराव या दुकलीस अडवून धरण्याचेहि धाडस त्यास करवेना. तेव्हां काय करावें हेच त्यास सुचेना. भरतपूरचा रोख धरून शिंदे ता. २९-३-१८०५ ला निघाला व चंबळा नदीवर सबळगड येथे दाखल झाला. मुख्य फौज मागेच होती. याच ठिकाणी अंबूजी इंगळे त्यांस येऊन मिळाला; आणि ही सर्व मंडळी आतां एकत्र होऊन चंबळापार होणार असे दिसतांच रेसिडेन्टास दम निघेना. त्याने सर्जेराव व दौलतराव या उभयतांच्या गांठी घेऊन त्यास कळविले की, "तुम्ही चंबळा सोडून जाण्यांत धोका आहे; तेव्हां जाणे राहत करावे. दौलतरावाने उत्तर केले की, "आम्ही भरत- पुरास गेल्याने युद्धास जास्त जोर चढेल अशी आपली कल्पना आहे ती साफ चूक आहे. आम्ही प्रत्यक्ष जातीने जाऊन यशवन्तरावाची समजूत घालतों व युद थांबवितों. पण ही गोष्ट रेसिडेन्टास पटली नाही. तेव्हां सर्जेराव घाडगा ..10 vvvv त्याच्या मर्जीविरुद्ध भरतपुरास जाण्याचे धाडस दौलतरावानेंहि केले नाही. अशा त-हेने या प्रसंगांतून रेसिडेन्ट निभावला, शिंदे, होळकर व जाठ या तिघांचे संगनमत झाल्यास आपणांवर फार कठीण प्रसंग येईल, ही कल्पना रेसिडेन्टास एकसारखी भेडसावीत होती त्यांत तथ्य होते. कारण भरतपुरास चाललेल्या युद्धांत जाठाने चांगलाच पराक्रम गाजविल्यामुळे इंग्रजांविरुद्ध मोठा बनाव होतो की काय अशी साधार भीति गव्हर्नर जनरलला वाटत होती. तेव्हां या भरतपूरच्या युद्धामुळे निर्माण झालेल्या वातचक्रांतून हिंदी दौलतदारांच्या मोठ्या बनावाचे भूत निर्माण होऊ नये म्हणून ग. ज. ने मद्रासचा गव्हर्नर व पुण्याचा रेसिडेन्ट यांस ताबडतोबीचे उपाय योजण्याची पूर्ण अखत्यारी दिली. असा हा इंग्रजांच्या पोटांत भीतीचा वायुगोळा निर्माण झाला होता. दौलतरावाने भरतपुराकडे जाण्याचे रहित केले व रेसिडेन्टाच्या सांगण्याचा मान राखिला; पण पुढे लवकरच भरतपुरास जाण्याचे मुळी कारणच उरलें नाही. कारण ता. ११-४-१८०५ ला जाठाने इंग्रजांशी तह करून युद्धांतून आपले अंगच काढून घेतले. ही वार्ता दौलतरावास कळतांच त्याने स्वतः भरतपुराकडे जाण्याचे रहित केले, पण सर्जेरावाबरोबर काही फौज देऊन यशवन्तराव होळकराची समजूत पाडण्यासाठी त्याने त्याची रवानगी केली. सर्जेरावहि लगोलग भरतपुराकडे निघाला. अक्कल बृहस्पतीची व समशेर शिकंदरची अशी एकी असतांना टोपीकराच्या साम्राज्यसिंहासनासमोर मांडलिक म्हणून कुर्निसात् करण्याचा प्रसंग आलेला पाहून यशवंतराव होळकराचा जीव अहोरात्र तिळतिळ तुटत होता. अशा असामान्य पराक्रमी पुरुषाचा इंग्रजांशी समेट करून देण्याची जोखीम सर्जेरावाने पत्करली होती. तेव्हां तो ठरल्याप्रमाणे भरतपुराकडे निघाला व भरतपुरापासून पंधरा मैलांवर असणाऱ्या वेरगांवीं मुक्काम करून राहिला. तेथून सर्जेरावाने सेनापति लेक यास खलिता पाठविला की, “आम्ही तुमचा व होळकराचा सभेट घडून आणावा म्हणून शिंद्याच्या सांगण्यावरून येथे आलो आहोत. खासा शिंदेच या कार्यासाठी येणार होता पण रेसिडेन्टाच्या सांगण्यावरून त्याने तो बेत रहित केला. आता मालकमसाहेब शिंद्याच्या भेटीला जात आहेत व शिंदेहि त्यांच्या भेटीची वाट पाहात आहेत. आम्ही आतां भरतपुरास होळकराची भेट घेऊन त्याचा तहाच्यासंबंधी काय मानस.
दुर्दैवी मोहरे -~... आहे तो आपणास कळवू." सर्जेरावाच्या या खलित्याने सेनापति लेकचा गैर- समज झाला व त्याच्या मनाने धांव भलतीकडेच घेतली. त्यास असे वाटले की, जाठाने इंग्रजांशी तहाची वाटाघाट चालविली आहे तेव्हां त्यास त्यापासून परावृत्त करून पुन्हां शिंदे, होळकर व जाठ या तिघांनी रणसन्मुख होऊन इंग्रजांस चांगलेच मारून काढावे असा व्यूह रचण्याचे सर्जेरावाच्या मनांत असावें. या कल्पनेने सेनापति लेक जास्तच घाबरला व त्याने सर्जेरावास जाव पाठविला की, “तुम्ही भरतपुरांत जाऊ नये. तेथूनच माघारी जावें. सर्जेरावाने लेकचे हे सांगणे धाब्यावर बसविले व तो तडक भरतपुरास गेला; पण इंग्रजांच्या कारवाईमुळे जाठाची व त्याची भेट झाली नाही. तेव्हां तो टाकोटाक वेर येथे परत आला. या ठिकाणी यशवंतराव, त्याचे साथीदार मीरखान वगैरे मंडळींची व त्याची गांठभेट झाली. ता. १२-४-१८०५ ला म्हणजे जाठांच्या व इंग्रजांच्या तहाचे दुसऱ्याच दिवशी बापूजी शिंदे हा दौलतरावाचा सरदार होळकराकडे होता तो सबळ- गडास दौलतरावाच्या छावणीत दाखल झाला. ही गोष्टसुद्धा इंग्रजांच्या दृष्टीने अनिष्टच झाली; कारण इंग्रज त्यास पाण्यांत पहात होते. पुढे सर्जेरावाकडून दौलतरावास पत्रे आली. त्या पत्रांच्या अनुसंधानाने शिंद्याने ता. १५-४-१८०५ रोजी रेसिडेन्टास खालील आशयाचा खलिता धाडिला. "जाठांशी तह झाल्यावर होळकर इंग्रजांचे मुलुखावर गंगापार जात होता. त्याची सर्जेरावाने गांठ घेऊन समजूत घातली की, आतां इंग्रजांशी युद्ध करणे इष्ट नाही, तह करावा हेच चांगले, असे बोलणे आम्ही होळकराशी चालू ठेविले असून, हा समेट घडवून आणण्याचे काम आम्ही आमच्या (दौलतरावाच्या) शिरावर घेतले आहे. आणि या कार्यासाठी सर्जेराव घाडगे होळकरास घेऊन आमच्या भेटीस येत आहेत. तसेंच नागपूरचे रघूजी भोसलेहि या कामासाठी येथे येत आहेत." हा खलिता रेसिडेन्टास पोचतो न पोचतो तोंच यशवंतराव होळकर दौलतरावाच्या भेटीसाठी फौजेसह सबळगडास डेरेदाखल झाला. या वेळी दौलतरावाने छावणीतून त्यास सामोरे जाऊन मोठया मानाने मुक्कामास आणिले. हा मोठा भाग्याचा योग होता; कारण या वेळी चतुरसिंग भोसले व अनेक मराठे मातबर सरदार पुढे काय करावे याचा विचारविनिमय करण्यासाठी एक ठिकाणी जमा झाले होते. सर्वांचा मानस इंग्रजांशी सख्य सजेराव घाडगा करूं नये, त्यास बाहेर काढावा. तर या सर्वांच्या उलट दौलतरावाचा विचार इंग्रजांशी समेट करावा असा होता. ही वाटाघाट होणार होती त्या प्रसंगी शिंद्याने रेसिडेन्टास बोलविले. ता. १७-४-१८०५ रोजी शिंद्याच्या छावणीत दरबार होऊन रेसिडेन्ट व होळकर यांची बोलणी झाली. होळकराचे बाबतींत दौलतरावाची मध्यस्थी ऐकू नये ही गव्हर्नर जनरलची आज्ञा रेसिडेन्टास पाळतां आली नाही. सबळगडास झालेल्या शिंदे-होळकरांच्या या भेटीचे वर्णन होळकर- कैफियतीत खालीलप्रमाणे केले आहे. "चर्मण्वती उतरून चैत्र वद्य पक्षी भेटीचा बेत ठरला. शिंदे यांनी जागा मैदान पाहून बिछायत करून पांच हजार खासा उंची पोषाखांत येऊन बसले. नंतर होळकरांची स्वारी आली. बरोबर साठ हजार स्वार अंगांत दहाशेर रुईचा डगला, सफेत दुपट्टा, ढालतरवार, खांद्यावर वासडा, गांठची गांठ आली. त्यांस यशवंतराव कोणते हे ओळखू येईना. येतांच गराडा फिरवून देऊन दोन हजार खासा उतरला. इकडल्या तिकडल्या तोफा चालल्या. चार घटकांपर्यंत कोणाचा शब्द कोणाचे कानी पडेना. दौलतरावाचे तोंड सुकून गेले. एकदोन रोज बोलणी होऊन सफाईची बोलणी झाली. उभयतांचा विचार एक होऊन होळकर कूच करून कोट्या. कडे गेले. चर्मण्वती उतरून पाटणजवळ मुक्काम केला.' तोफांच्या गडगडाटांत शिंदे-होळकरांची भेट झाली. पण या सबळगडच्या जमावाने मेनापति लेक व गव्हर्नर जनरल शिंद्याच्या धोरणाविषयी साशंक झाले; आणि होळकर शिंद्याच्या छावणीत आल्याचे कळतांच सेनापति लेक त्याच्यावर नजर ठेवण्याकरितां चंबळा उतरला व ठासून उभा राहिला. आणि ही मंडळी कांहीं तेढा डाव टाकतील तर त्याचा प्रतिकार करण्याची जय्यत तयारी करून त्याने रेसिडेन्टास कळविले की, “होळकरांचा व आमचा समेट करून देण्याचे भानगडींत तुम्ही पडू नका; ते आमचे आम्ही पाहून घेऊ. होळकरास सोडून तुम्ही दूर निघून जावे. न जाल तर तुम्ही तह मोडला असे आम्ही समजू व त्यापासून होणारे सर्व परिणाम तुम्हांस भोगावे लागतील." सेनापति लेकनें धाडलेला हा निरोप रेसिडेंटाने शिंद्यांस कळविला; पण शिंद्याने सिडेंटाच्या या मागणीकडे कानाडोळा केला व सबळगडची छावणी सोडली नाही. हे प्रकरण नुसत्या निरोपावर भागत नाही असें पाहून सेनापति दुर्दैवी मोहरे NAA // लेकनें आपली फौज ता. २९-४-१८०५ ला चंबळच्या पश्चिमकांठी शिंधाच्या समोर आणिली. ते पाहतांच मराठी फौजांत एकदम धांदल उडून गेली होळकरांच्या साथीदारास दम निघेना. त्यांत इंग्रजांनी फितुर चालविल होताच. होळकरांचे दोन सरदार अनुक्रमें लाला भवानीशंकर आणि मूर्तजा. खान यांनी इंग्रजांकडून आपली व्यवस्था लावून घेतली व होळकरास सोडले. त्यामुळे शिंदे-होळकरांचा थोडा धीर खचला व त्यांनी थोडें मारें सरून शिवपूर येथे मुक्काम केला. वेळीच सबळगड सोडल्याने युद्धाच प्रसंग टळला. बाकी उभय पक्षांत युद्ध करण्याचे अवसान नव्हतेच. असो या सबळगडच्या बनावांत सर्जेराव प्रमुख सूत्रधार असल्यामुळे त्याच एवढा विस्तार केला. सबळगडच्या या भेटीचा पहिला तडाका अंबूजी इंगळ्यास बसला कारण तो आदले दिवशी इंग्रजांस फितुर झाला होता म्हणून शिंद्याच त्याच्यावर रोष फार; पण बलाढ्य सरदार असल्यामुळे यास कृत अपराधा बद्दल नतिजा पोचविण्याची धमक दौलतरावांत नव्हती. शिंदे-होळकर एव होतांच व दौलतरावाचें इंगळ्यास नरम करण्याविषयी अनुमोदन मिळनार यशवंतरावाने त्यास ता. १८-४-१८०५ ला पकडले आणि त्याचे थोडे हाल करून त्यापासून ५० लाख रुपये दंडादाखल घेण्याचा ठराव झाला ही रक्कम अंबूजी इंगळ्याने कबूल करून स्वतःची सुटका करून घेतली. सर्जेरावाने अंबूजी इंगळ्यास फार त्रास दिला. अंधूजीजवळ द्रव्यसंचर मोठा असावा अशी कल्पना सर्वांची होती. तो उपटण्यासाटीं सर्जेरावा त्यास फार छळले. सर्जेरावाचे छळणे म्हणजे असे तसे नसावयाचेंच त्याच्या बोटांवर तेलाचे बोळे ठेवून ते पेटवून दिले होते. अशा त-हे। सर्जेरावाने आपला इंगा त्यासहि दाखविला होता. अंबूजी इंगळ्याने कबूल केलेली रक्कम कोट्यास पदरांत टाकण्याचे ठर होते. तेव्हां ती वसूल करण्याकरितां सर्जेराव घाडगा तीन हजार स्वारां निशी कोट्यास गेला. दंडाची रक्कम हाती येतांच पंचवीस लाख शिंद्यांन व एकतीस लारव होळकरांनी वांटून घेतले. कमी पैका मिळाल्याबद्दर शिंद्यास थोडा विषाद वाटला. अलीकडे शिंद्याचा कारभार यशवंतराव सर्जेराव हे दोन्ही कर्ते पुरुष पाहात असल्यामुळे कोणतेहि काम ते नेटा ज्या गोषी छायाम को त्या गोषीटों मानात सर्जेराव घाडगा .. N/ हातोहात सिद्धीस नेत. अंबूजी इंगळ्याप्रमाणे हा अनुभव कित्येकांच्या प्रत्ययास आला. सर्जेरावास कारभारांतून काढा ही रेसिडेन्टाची मागणी कायमचीच होती. आतां तिच्या जोडीला 'यशवंतरावास छावणीतून दूर काढा' ही दुसरी मागणी सुरू झाली. एकटा असतांना दौलतराव रेसिडेंटाच्या मागणीची वासलात कशी लावी ते आपण या वेळपर्यंत पाहिलेच. आतां तर होळकरांचा पाठिंबा मिळतांच त्यास जास्त जोर चढला. यशवंतराव शिंद्याची छावणी सोडून जाईना; तेव्हां 'मी तुमची छावणी सोडून जातो, असा नेहमींचा धाक रेसिडेन्टाने घालतांच दौलतरावाने त्यास अटक केली. दोन महिने रेसिडेन्ट अटकेत होता. इंग्रजांचा हा मोठा अपमान झाला व त्याचा गवगवाहि मोठा करण्यांत आला; पण त्याकरितां विझत चाललेले युद्धाचे निखारे पुनः पेटविण्याचे धाडस लॉर्ड वेलस्लीने केले नाही. लवकरच वेलस्लीची बदली होऊन कॉर्नवॉलिसचें समेटाचे धोरण सुरू झाल्याने सर्वच वातावरण पालटले. सर्जेराव, यशवंतराव यांनी कारभार हाती घेतल्यामुळे दौलतरावाच्या धोरणास थोडे तेज चढलें खरें, पण हा बनावहि फार काळ टिकला नाही. कॉर्नवॉलिसच्या समेटाच्या धोरणाने शान्ततेचे वारे जिकडे तिकडे वाहूं लागले. हिंदी दौलतदारांस स्वतंत्र होण्याची आशा फारशी न दिसल्यामुळे जो तो आपापली व्यवस्था लावून घेऊ लागला. शिंद्याने आपली व्यवस्था लावून घेतली. अंबूजी इंगळ्याकडून ऐवज हाती येतांच त्याच्यावरील राग दौलतरावाने सोडून त्यास सन्मानाने भेटीस आणिला आणि त्याचा गौरव केला; व सर्जेरावाकडील कारभार काढून तो अंबूजींचे हवाली केला. अशा त-हेने सर्जेराव एकदांचा कारभारांतून निघाला व इंग्रजांची तक्रार नाहीशी झाली. (२२-११-१८०५) सर्जेरावास कारभारांतून काढल्यामुळे तो रागावला व होळकराकडे गेला. होळकराच्या भानगडर्डीत पडण्यांत काही तथ्य नाही असे शिंद्यास वाटू लागले होते; त्याप्रमाणेच शिंद्यापासून आपला कोणताच फायदा शोत नाही असे पाहून होळकरानेहि शिंद्याचा नाद सोडिला. तसेच सर्जेरावाच्या नादी लागल्यापासून फायदा तर काडीचा नाही, नुकसान व त्रास मात्र फार होतो
४८
दुर्दैवी मोहरे
Annu
असे होळकराच्या लक्षात येताच त्याने सर्जेरावास आपल्याजवळ थारा दिला
नाही. त्यामुळे सर्जेरावाची दारुण निराशा झाली.
इंग्रजांच्या लकड्यामुळे सर्जेरावास कारभारांतून शिंद्याने काढिले. या
वेळेपासून सर्जेरावाचे कर्तबगार आयुष्य संपून त्याच्या उत्तरार्धास सुरुवात
झाली!
५ :: अखेर अशा सरावास कारभारांतून दूर करण्याचे कलम इंग्रजांनी तहांत मुद्दाम घातल्यामुळे दौलतरावाचा नाइलाज झाला व त्यास सर्जेरावास कारभारांतून दूर करण्यावांचून गत्यंतरच उरले नाही. पण या एका गोष्टी- मुळे सर्जेराव एकदम निस्तेज झाला. जवळजवळ उभे आयुष्य ज्याने सत्तेच्या दिमास्वांत काढिलें, सर्जेराव म्हणतांच ज्याच्या त्याच्या अंगावर काटा उभा राहावा अशी बेजरब सत्ता ज्याने गाजविली अशा पुरुषास सत्तेवांचून जिणे म्हणजे लाजिरवाणे! तरीसुद्धां दौलतराव त्यास दूरदूरच्या खंडणी वसूल करण्याच्या कामावर धाडी, पण त्यांत त्याला समाधान वाटेना. केविलवाण्या स्थितीत त्यास चार वर्षे रखडावे लागलें; पण हे दिवस संप- ण्याचा काल लवकरच आला. दौलतरावाने बायजाबाईच्या आग्रहावरून इंग्रजांजवळ सर्जेरावाबद्दलचे कलम दूर करण्याचा अत्यंत आग्रह धरिला, तेव्हां इंग्रजांनी तहांतील ते कलम काढून घेतले. सन १८०९ च्या सुमारास दौलतरावाच्या डोक्यांत असा विचार चमकून गेला की, आपल्या राज्यकारभारास लागलेली घसरगुंडी कशी तरी थांब- वावी. या त्याच्या विचारांत यायजाबाईच्या सांगण्याची भर पडली व त्याने सर्जेरावास जवळ बोलावून कारभार करण्यास सांगितले. उभयतांची प्रथम भेट दौलतराव अजमीरच्या आसपास असतां झाली. ही भेट मोम्या दुर्दैवी मोहरे थाटाने आणि समारंभाने झाली. पण हा गोडवा फार दिवस टिकला नाहीं; कारण पुढे चारदोन महिन्यांतच कागाळ्या येण्यास सुरुवात झाली. सर्जेरावाच्या जुलूम-जबरदस्तीस लोक कंटाळून गेले. तक्रारी इतक्या बेसुमार येऊ लागल्या की, त्या कता ऐकतां दौलतराव त्रासून गेला. भीक नको पण कुत्रा आवर अशी याची स्थिति झाली. दौलतराव-सर्जेरावाचे खटके घटकोघटकी उडू लागले. तो सर्जेरावाचा वाटेल तसा पाणउतारा सर्वासमक्ष करूं लागला. यजमानाजवळ सर्जेरावाचे वजन नाही, ही गोष्ट लोकांत होतांच सर्जेराव सर्वांच्या थट्टेचा विषय झाला. सरदार, सावकार व दरबारची सामान्य मंडळीमुद्धा त्याची टर उडवू लागली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांत दौलतरावसुद्धां भाग घेऊ लागला. अशा तन्हेनें सर्जेरावाचे भांडे हलकें झालें; आणि त्याने आयुष्यभर केलेल्या पापांचा निचरा होऊ लागला ! तुम्ही उगीच अवाच्या सवा खर्च करता, त्यामुळे खजिन्यास ताण घसतो." असें दौलतराव बोलू लागला, व सर्जेरावास नाना परींनी नांवें ठेवू लागला. त्याबरोबर तो संतापला, व त्याने एक दिवस रागाच्या भरांत आपल्या डोक्याची ती मळकी टोपी काढून जमिनीवर दाणकन् आपटली व म्हणाला, खर्च तुमच्या डोळ्यांत सलतो, पण मी किती काट- कसरीने राहतो याची साक्ष माझी टोपीच देईल." पण त्या टोपीने दौलत- रावाच्या उभ्या दौलतीस टोपी घातली होती हे आतां जगजाहीर झालें होते! टोपी आपटण्याचे नाटक करून सर्जेराव तरातरा आपल्या तंबूंत निघून गेला. यजमानाची पुन्हां मर्जी बसावी म्हणून त्याने एक कांबळी, उंट व तीन तोळे चांदी एका फकीरास दान केली. पण आतां असल्या तोडग्याने दौलतरावाचें मन प्रसन्न होणे शक्य नव्हते. सर्जेरावाने उभ्या हयातीत मित्रांपेक्षां शत्रूच जास्त निर्माण केले होते. प्रत्येकाचा एक एक दिवस असतोच. या न्यायाने आतां त्याच्या शत्रूचे दिवस आले होते. गोकुळ पारख नांवाचा एक सावकार होता; त्याने या संधीचा फायदा घेतला व दौलतरावास जाऊन बोलला की, “ सर्जेराव पांढऱ्या पायाचा आहे. तो आल्यापासून तुमच्या दौलतीचे वाटोळे होत आहे; तेव्हां त्यास तुम्हीं दूर करा म्हणजे तुमचे गाडे नीट मार्गाला लागेल." सर्जेरावाने हा टोपी आपटण्याचा तमाशा केला त्या वेळी दौलतराव इतका संतापला होता माझा सर्जेराव घाडगा काय की, सबंध हयातीत तो इतका रागावलेला कोणीहि पाहिला नव्हता. असे हे रुसवेफुगवे नेहमीचेच होते. देवबा काळ्या नांवाचा एक हुजऱ्या दौलत- रावाच्या बहाल मर्जीतला होता. त्याने आपला व दौलतरावाचा सलूख करून द्यावा म्हणून सर्जेरावाने त्याची अक्षरशः पायधरणी केली; पण त्याचा काहीएक उपयोग न होतां प्रकरण में चिघळत चाललें त्याचा शेवट शेवटी सर्जेरावाच्या शेवटांत झाला. दौलतरावाची मुख्य अडचण म्हणजे पैक्याची. फौज कमी करावी तर तिचा मुशाहिरा चुकता केला पाहिजे. पण पैशाशिवाय पगार कसा चुकता करणार ? बरें, फौज कमी न करावी तर स्वर्च फुगत जाणार; असे हे त्रांगडे होते. दौलतरावाची अशी तंगी असतांना त्याचा मेहुणा-बायकोचा भाऊ सरदार पाटणकर याने दौलतरावाच्या खाजगींतून काही रक्कम उसनी घेतली व ती ठरलेल्या मुदतीत माघारी दिली नाही, म्हणून दौलतरावाने पाटण- कराचे घरी धरणे धरलें; त्यामुळे घाडगा अगदीच बिथरून गेला. करावें, आपले हे घसरलेलें गाडें कसें ताळ्यावर आणावें हेच त्यास उमजेना. दुसऱ्या दिवशी त्याने मोठा दानधर्म केला. पांच हजार रुपये ब्राह्मणांस वाटले; दोन हजार गोरगरिबांस अन्नदान केले. सर्जेरावाने असले 'अन्न- दान वस्तरदान' कलें ग्वरें, पण या दानाने त्याच्या भाग्य-भानूस लागलेलें ग्रहण कांहीं सुटले नाहीं; ते दिवसानुदिवस त्यास जास्तच ग्रासू लागले व शेवटीं खग्रास झाले! दौलतरावाचे व सर्जेरावाचे उत्तरोत्तर जास्तजास्तच फाटत चाललें; तेव्हां नाइलाज होऊन घाडगे आपलें चंगवाळे आवरून स्वारीतून चालता झाला. त्याबरोबर त्याची समजूत घालून त्यास माघारी आणावे म्हणून बायजाबाईने नवऱ्याजवळ हट धरिला, पण दौलतराव आतां इतका बिथरला होता की तो तिचेंहि ऐकेना. पण दौलतरावाने सर्जेरावाची नस आपल्या तान्यांत ठेविली होती. ती म्हणजे त्याची रक्षा जवाहीर ही होय. दौलतरावाने जवाहीरला अडकवून ठेविले होते. दौलत- रावाची खात्री होती की, सर्जेरावाची रक्षा आपण अडकवून ठेविली आहे, तेव्हां तो झकत माघारी येईल. हा त्याचा होरा खरा ठरला. सर्जेरावास जवाहीरला अडकवून ठेवल्याची बातमी लागतांच तो अत्यंत दुःखीकष्टी झाला व त्याने दौलतरावमहाराजांस निरोप पाठविला की, परत न आल्यास मी प्राण देईन. तिने आपला कोणताच गुन्हा केला नाही, "जवाहीर ५२ दुर्दैवी मोहरे सवय तिला मजकडे धाडावें." असल्या निरोपांची जा-ये होता होता प्रकरण समेटास आले. अंबूजी इंगळ्याने मध्यस्थी करून सर्जेरावाची सम- जूत घालून त्यास माघारी आणिले. पण ही गोडीसुद्धा फार दिवस टिकली नाही. या समेटासाठी म्हणून म्हणा किंवा आपल्या जावयाचा दिल आपणा- विषयी साफ व्हावा म्हणून म्हणा, सर्जेरावाने दौलतरावास ता. १५ जुलै १८०९ ला एक मेजवानी दिली. त्या दिवशी दोघांनी यथेच्छ हात मारला, व आकंठ सुरापान करून सबंध रात्र नाच-तमाशांत घालविली. रात्र संपली व दिवस उजाडला; त्याबरोबर दोघांच्याहि भांडणास नवा जोम येऊन तें पूर्ववत् चालू झाले. दरबारची कामें चालली असतां दौलतरावाने सर्जेरावाचा असा काही पाणउतारा केला की, तो त्यास जहरी झोयला व ताड्कन् दरबार सोडून तो चालता झाला. आतां शिंद्याच्या दरबारी एक क्षणभरहि थांबण्यांत अर्थ नाही, असें ठरवून त्याने आपली रखेली जवाहीर हिची पुढे रवानगी केली, व अशा त-हेने मागे झालेली चूक सुधारली. आतां त्याने आपली आवराआवरहि मोठ्या जारीने सुरू केली. ही त्याची बांधाबांध शेवटचीच होती; पण हे त्या बिचाऱ्यास माहीत नव्हतें.. अशा गडबडीत चारदोन दिवस निघून गेले. ता. २६ जुलै १८०९ ला सर्जेराव पुन्हां दौलतरावास जाऊन भेटला व त्याने आपल्या मागण्या मोठ्या जोरांत त्याच्यापुढे मांडल्या, आणि त्यांचा फडशा पाडण्याविषयीं हह धरला. पण त्या दैनपातक्यास माहीत नव्हते की, आज आपल्या माग- ण्यांचा फडशा उडावयाचा नसून आपला स्वतःचा फडशा उडावयाचा आहे! इतके दिवस दुसऱ्यावर रोखलेल्या समशेरी आज त्याच्या अंगावर उलटणार होत्या. त्याची निजधामास जाण्याची वेळ नजीक आली होती. सर्जे- रावाने मागण्या पुढे करतांच त्या कस्पटासमान लेखून एखाद्या मस्त हत्ती- सारखा दौलतराव तावातावाने हत्तींच्या टकरी पाहण्यासाठी निघून गेला. हे त्याचे वर्तन पाहून सर्जेराव जास्तच भडकला, आणि त्याने संतापाच्या भरांत दौलतरावाचा अंगरखा धरिला व 'माझा निकाल काय तो लावा आणि कोठे जातां ते जा' असे म्हणून त्याप्त त्याने थांबविले. त्याबरोबर दौलतरावाचे काही नोकर सर्जेरावास दूर करूं लागले. सर्जेरावाने कमरेची समशेर काढून नोकरलोकांच्यावर उगारली. त्याबरोबर गडबड उडाली.
सर्जेराव घाडगा ५३ सर्जेरावाने तलवार चालविली. काही लोक मारले गेले. घाडगा जीव बचावून आपल्या तंबूंत निघून गेला. पण आज घाडग्याची घडी भरली होती! मानाजी फाकड्याचा मुलगा आनंदराव फाकडे दौलतरावाच्या देवडी- वरील पाहरेकऱ्यांचा अंमलदार होता. तो कांहीं नोकरलोकांनिशी नागव्या समशेरी घेऊन घाडग्याच्या तंबूवर चाल करून गेला. त्यांनी तंबूच्या दोया तोडल्या. जणुं याच वेळी सर्जेरावाच्या आयुष्याचीहि दोरी तुटली! दोऱ्या तुटल्याबरोबर तंबू खाली पडला. त्यांत घाडगा सांपडला. त्यास आनंदरावाने रस्त्यावर आणून त्याची तलवारीने खांडोळी उडविली. झालें, सर्जेरावाचा ग्रंथ आटोपला! त्याचा नश्वर देह मातीस मिळाला !! हा सर्व प्रकार हमरस्त्यांत झाला, पण त्याबद्दल कोणासहि वाईट वाटले नाही. सर्जेरावासारख्या असामान्य व्यक्तीची भर रस्त्यांत खांडोळी उडालेली पाहून फारच मोठी दंगल उडेल असा समज होता, म्हणून पलटणे लढण्याचे तयारीने सज्ज होती; पण काहीएक झाले नाही. घाडग्याच्या वतीने कोणीहि उभा राहिला नाहीं. कसा राहणार? घाडग्याशी स्नेह म्हणजे प्रत्यक्ष अमीशी संबंध, उष्णता सहन करण्याची ताकद असेतोपर्यंत तग धरावा नाही तर जळून जावें, अशांतलाच प्रकार. घाडग्याचा एकहि स्नेही उभा राहिला नाही. सगळीकडे शान्त होते. असो, अशा त-हेने मराठी राज्यांतला एक अब्बल दर्जाचा खलपुरुष नाहीसा झाला! मराठी राज्यांत त्याच्याइतका दुष्ट पुरुष झाला नाही. त्याच्यावर हा जो शेवटचा वार झाला त्या वेळी मात्र त्याच्याकडून कोणताहि फार मोठा अपराध झाला नव्हता. गेले सहासात महिने तो कारभार पाहात होता, याचा अर्थ इतकाच की, दौलतरावास दडण्यास कोणी तरी मनुष्य हवा होता म्हणूनच त्याने सर्जेरावास बोलावून कारभार सांगितला. आपला कारभार नीट चालावा, राज्याची घडी नीट बसावी व प्रजेने आपणास दुवा बावा, असें मनापासून दौलतरावास वाटत असते तर त्याने स्वतः कारभार सरळ मार्गावर यावा म्हणून खटपट केली असती व त्यांत सर्जेरावाचें साह्य घेतले असते. पण असे काहीहि झाले नाही. एवढे मात्र खरे की, शेषटची धांदल चालू झाली तेव्हां 'सर्जेरावास दगा करूं नका' असा हुकूम दौलतरावाने सोडला होता. नारायणराव पेशव्याच्या यावीत 'ध' चा दुर्दैवी मोहरे krnhin..... मा' झाला होता असा लोकप्रवाद आहे; पण सर्जेरावाच्या वेळी 'मा चा 'ध' झाला असतांनासुद्धा त्याचा उपयोग झाला नाही. त्याने इतके शत्रु निर्माण केले होते की, घाडगा केव्हां एकदां दुनियेपार होतो असें त्यांना झाले होते. मराठी राज्यांत सर्जेरावाच्या तोडीस लागेल असा मनुष्य झाला नाही. त्यास दया, माया, वात्सल्य व प्रेम यांपैकी कोणत्याहि गुणांचा वाससुद्धा नव्हता. त्याने कोणतीहि परंपरा पाळली नाही. अमका माझा अन्नदाता, तमका माझा उपकारकर्ता, तेव्हां त्याच्यावर हात कसा टाकू हा विचार त्यास शिवला नाही. पुढे आलेला प्रसंग अमुक आहे आणि तो निभावून नेण्यास अमका कांटा निघाला पाहिजे, असा निर्धार होतांच तो त्यास तल. वारीने दूर करण्यास कमी करीत नसे. पुढे आलेल्या प्रसंगांतून निभावून घेणे हे एकच तो चांगले जाणत होता. त्याची दृष्टि सर्व बाजूंनी विचार करणारी नव्हती; म्हणून त्याची हैवानी वृत्ति मराठी राज्याच्या नाशास पुष्कळशी कारणीभूत झाली. " सर्जेरावाची शरीरयष्टि ठेंगू व जाड, उंची पांच फुटांहून जास्त नाही. सर्व अवयव बटबटीत. डोळे घारे, दृष्टि कावळ्यासारखी भेदक आहे. रंग गोस व डोकीचे केस पांढरे सफेद आहेत. मूर्ति पाहतांच त्याच्या स्वभावाची कल्पना सोळा आणे येते. कपट, क्रौर्य व खुनशीपणा यांचा त्रिवेणीसंगम त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. तो बोलू लागतांच त्याच्या बुद्धिमत्तेची झांक त्यांत चमकते. पायघोळ धोतर नेसून अंगांत एक बन्यान, खांद्यावर घेतलेला एक शेला, डोकीस दांभणकांठ जरी-किनारीची एक टोपी. टोपी- च्या किनारीचे दोन गोंडे डाव्या खांद्यावर लोंबतात. असा हा बाळसंतूस पाहिला म्हणजे तो वेडा आहे की काय असें घटकाभर वाटते. हातांत चंदनी मण्यांची माळ असून तिच्यांतील मणी तो बोटांनी झराझर ओढतो. अलीकडे धन्याची मर्जी त्याच्यावरून उडाली आहे. नाही तर लहान-थोर त्यास चळचळां कांपत असत. जरा कोणी मर्जीविरुद्ध वागला की मेलाच म्हणून समजावा. आणि तो मृत्यसुद्धा असा तसा नाहीं-गळफांस, विषप्राशन .हे तर नेहमींचेंच पण अंगास बाण अगर नळे बांधून ते. पेटवून दिले की त्या दुर्दैवी प्राण्याचे तुकडे तुकडे होऊन ते हवेत वर - उडून जातात!"
सर्जेराव घाडगा शिंदेदरबारची सर्व सत्ताधारी राणी बायजाबाई जिवंत असतां तिच्या बापाचा खून भर रस्त्यांत होतो! ह्या गोष्टीने तिला फार नामुष्की आली; अत्यंत दुःख झाले. दौलतरावाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो तिचे अश्रु पुशीत व मनधरणी करीत अहोरात्र जागला, पण तिची सम- जूत पडेना. बायजाबाई या वेळी सहा महिन्यांची गरोदर होती. बापाचा खून करणाऱ्या आनंदराव फाकड्यास शिक्षा करा असा तिने हट्ट धरला, तेव्हां दौलतरावाने आनंदराव फाकड्यास बराच ऐवज गुप्तपणे पोंचवून पळून जाण्यास सांगितले. तेव्हां आनंदराव शिंद्याचे राज्य सोडून गायकवाडा- च्या आश्रयास गेला. हल्ली त्याचा वंश बडोद्यास नांदतो. मेल्यावरसुद्धा सर्जेरावाने लोकांस त्रास दिला. त्याचे भूत दौलतरावाच्या देवडीवर बसत असे व लोकांस पछाडून त्रास देई ! त्यामुळे त्याची लोकांस धास्ती बसली होती. सर्जेरावास शोभेशीच त्याची मुलगी बायजाबाई होती. ती मोठी चाणाक्ष व धूर्त होती. नवऱ्यास तर तिनें पूर्णपणे आपल्या मुठीत ठेविलें होते. बायजाबाईंचा थाट व बडेजाव फार मोठा होता. तिच्याजवळ बटकींचा-भानशिनींचा मेळा फार मोठा होता. त्यांत हिंदुस्थानांतील अठरापगड जातींच्या बायकांचा भरणा असे. त्यांस साली दोन धडोती व पोटास गोळाभर अन्न मिळाले की त्या नोकरी करण्यास तयार असत. बाईजवळ थाटाने राहावयास मिळे, व असत् मार्गाने त्या लागेल तितका पैसा मिळवीत. रात्री फक्त चौघींनी आळीपाळीने नोकरी करावयाची3; व बाकीच्या वेळांत वाटेल तिकडे भटकण्यास त्यांस मुभा असे. प्रत्येकीच्या पाशांत कोणी तरी लहानमोठा गृहस्थ अडकलेला असे. त्या त्याजजवळून पैका लुबाडीत. आश्चर्याची गोष्ट अशी की, अशा लांडीलबाडीने मिळवि- लेला पैसा आपण कसा पराक्रम करून मिळविला, कोणास कसे फशी पाडलें हैं मालकिणीजवळ सांगण्याची मोठी चुरस लागे, इतर लहानमोम्या सरदारांजवळ अशा बटकी असत. त्यांची जिंदगी शेवटी त्यांच्या पश्चात् मालकिणीस मिळे. त्यांना काही मुलें असली तर त्यांच्या निर्वाहापुरता कांही पैसा ठेवून याकीचा होतकरू बटकींस वांटून टाकण्याची चाल होती. दौलतरावास रूपवती भार्या, अलोट धनसंपदा व सत्ता या सर्व गोष्टींची जोड मिळाली होती. पण पोटीं संतान नसल्यामळे तो फार कष्टी झाला दुर्दैवी मोहरे होता. बायजाबाईच्या लगानंतर दोन वर्षांनी ती गरोदर राहिली. नाना फडणिसाच्या मृत्यूनंतर दौलतराव स. १८०० च्या दिवाळीत बाजीरावाच्या परवानगीने जेव्हां उत्तरेत जावयास निघाला त्या वेळी त्याने बायजाबाईच्या प्रसूतिनिमित्त जांचगांवास मुक्काम केल्याचे वाचकांच्या लक्षात असेलच. पण हे मूल मोठे झाल्याचा उल्लेख नाही. पण आतां १८०९ साली, म्हणजे आपल्या चरित्रनायकाचा खून झाला त्या साली, बायजाबाई सहा महिन्यांची गरोदर होती. तिला पुत्र व्हावा म्हणून देवास अनुष्ठाने, अभिषेक, पिंपळास प्रदक्षिणा, मारुतिरायास नवस, तसेंच अंगारेधुपारे वगैरे अनेक प्रयत्न चालू होते. 'आपणास पुत्ररत्न होणार' म्हणून ग्वाही देऊन कित्येक ज्योतिशांनी दौलतरावापासून यक्षिसें उपटली. पुढे ता. २०-१०- १८०९ रोजी बायजाबाई प्रसूत होऊन तिला मुलगी झाल्याचे कळले, तेव्हां सर्वत्र निराशा झाली. काही काळ लोकांची समजूत अशी होती की, खरो- खर मुलगाच झाला आहे, पण त्यास भुताखेताची बाधा होईल किंवा दृष्ट लागेल म्हणून खोटीच बातमी बाहेर पसरविली आहे! पण २९-१०-१८०९ रोजी बारशाचा समारंभ झाला व मुलीचे नांव कृष्णाबाई ऊर्फ सोनूबाई ठेवण्यांत आले त्या वेळी या सर्व भ्रमाचा भोपळा फुटला. यायजाबाई दीर्घायुषी होती. ती ऐशी वर्षे जगली. दत्तकपुत्र जनकोजी याच्यागी तिचे कधीच पटले नाही, म्हणून तिने थोडासा बंडावा केला. तेव्हां इंग्रजांनी तिला ग्वाल्हेर राज्यांतून काढून लाविले (ता. ८-७-१८३४). तेव्हां ती तिची मुलगी आग्यास होती तिच्याजवळ राहिली. यापुढे तिने फारशी हालचाल केली नाही. पण दुर्दैवाने चिमणाबाई ता. १४-१०-१८३३ रोजी मरण पावली. यानंतर तिने आग्रा सोडला व पुढची इ. स. १८३५ ते १८४० पर्यंतची पांच वर्षे ती प्रयाग व काशी येथे राहिली. नंतर नाशिक येथे स. १८४० ते १८४५ पांच वर्षे राहून स. १८४५ त ती पुन्हां इंग्र- जांच्या परवानगीने ग्वाल्हेरास येऊन राहिली. यानंतर शेवटपर्यंत ती येथेच होती. तिचें देहावसान ता. २७-६-१८६३ रोजी झाले. मरणसमयीं तिचे वय ८० वर्षांचे होते. आतां फक्त सर्जेरावाची रक्षा जवाहीर इची माहिति बावयाची. सर्जे- रावाचें जवाहीरवर अत्यंत प्रेम होते. त्याच्या एका चाकराने तिच्याशी एकदां चावटपणा केला. हे सर्जेरावास कळतांच त्याने त्या चाकराचे नाक- सर्जेराव घाडगा कान छेदून टाकिले. सर्जेरावाची तिच्यावर बहाल मर्जी असल्यामुळे तिने पुष्कळच द्रव्यसंचय केला होता. सर्जेरावाचा खून होतांच बायजाबाईनें तिला व तिची मैत्रीण रत्नकुंवर नांवाची एक वेश्या होती तिला पकडून कैद केले, व आपल्यासमक्ष आणून स्वतः आपल्या हातांनी वेताच्या छडीने व चाबकाने बेदम फोडून काढिले. दौलतरावाने तर तिचे नाककान कापण्याचाच हुकूम फर्माविला होता; पण तिने आपल्याजवळील सर्व द्रव्यसंचय देऊन टाकून कशीबशी जिवंत सुटका करून घेतली. जवाहीरची जी दशा तीच रत्नकुंवरची. रत्नकुंवर ही चांगल्यापैकी गाणारीण होती; व सर्जेरावाचा मेहुणा पाटणकर याची ती राख होती. तिचे जवाहीरप्रमाणेच हाल करण्यांत आले; पण तिनेंहि जवळील सर्व ऐवज देऊन टाकून स्वतःची सुटका करून घेतली. तिची एक लाख रुपयांची मालमत्ता दौलतरावाने हस्तगत केली तरीसुद्धा तिचा द्रव्यसंचय ठिकठिकाणी विखुरलेला होता. असो. अशा त-हेनें सर्जेराव स्वतः व त्याचा परिवार सद्दीचा जोर संपतांच कसा हतप्रभ झाला हे आपण पाहिलें, कृत पापांचा झाडा याच देही याच डोळ्यांसमक्ष द्यावा लागतो, असे दुबळ्या मनाच्या समाधानासाठी वाट- ल्यास म्हणावें, पण ज्या माणसाने हातांत असणाऱ्या सत्तेचा वाटेल तसा उपयोग करून यमाला लाजविणारी सुलतानी गाजविली, नीतिशास्त्रांचे ग्रंथराज जुत्याच्या ठोकरीने सद्गुणांचे नंदादीप समशेरीच्या वारांनी मालवून जिकडे वाट फुटेल तिकडे तो गेला, अशा व्यक्तीस मरण अत्यंत हालअपेष्टांचे यावयास पाहिजे होते; पण समशेरीच्या वाराने मुंडी उडाली! होत्याचा नव्हता झाला, संपलें ! विनादैन्येन जीवनम् -मिळा- लेच होते; अनायासेन मरणम्-तेंहि आले. अशा दृष्टीने सर्जेराव मृत्यु-लोकावर कृतार्थ झाला. आता फक्त सर्जेरावाबद्दल खरेशास्त्री यांनी लिहिलेलें एक मार्मिक वाक्य उतरून त्याच्या चरित्रावर व चारित्र्यावर पडदा टाकू......! " याजी-दौलत-सर्जेराव या त्रिकुटापैकी पहिल्याला नुसते डोके तर दुस- याला नुसते हातच होते; पण तिसरा (सर्जेराव) दोहोंनीहि संपन्न होता!" उडवून दिले, .
No text on this page.
इवी मोटो त्रिंबकजी डेंगळा
No text on this page.
त्रिंबकजी डेंगळा १ :: तोंडओळख व भूमिका तो काल स्वराज्याचा होता. ज्याच्या मनगटांत जोर व खांद्यावर मस्तक 'शाबूत अशा कोणाहि कर्तबगार माणसास राजसिंहासनाच्या पायऱ्या रिकाम्या होत्या. त्या चढून शिंदे-होळकरांसाररवी कर्तबगार माणसे राजराजे- श्वर झाली आणि मराठी साम्राज्याचे दिक्पाल म्हणून त्यांनी आपले नांव अजरामर केले; त्या भाग्यकाली हुजऱ्याच्या हुजूर होण्यास फारसा वेळ लागत नसे. उलटयाची सुलटी अंबारी करणे ज्याच्या त्याच्या कर्तबगारीवर अशाच एका कर्तबगार पण दुर्दैवी-दुर्दैवी म्हणण्याचे कारण इतकेंच की त्यास राज्य मिळाले नाही-अशा एका व्यक्तीचा परिचय करून द्यावयाचा आहे. ती व्यक्ति म्हणजे त्रिंबकजी डेंगळा ही होय. हा निवगांव-जावळीचा पाटील, तो याजीरावाजवळ हुजन्याचे काम करीत होता. बाजीरावाजवळ असणाऱ्या हुजऱ्यांत त्रिंबकजी जरा चणचणीत व हुशार असल्यामुळे याजीरावाचे त्याच्यावर लक्ष होते. पुढे तो जासूद म्हणून काम करूं लागला. पुढे सन १८०२ च्या मार्चमध्ये यशवंतराव होळकराने दौलतरावाच्या फौजेचा पराभव करून पुण्याचा ताबा घेतला त्या वेळी बाजीराव महाडास पळाला. या पलायनाचे वेळी त्रिंबकजी डेंगळा त्याच्या- ६२ दुर्दैवी मोहरे ~~~- हे बरोबर होता. श्रीमंतांची स्वारी महाडास पोंचल्यानंतर एक अत्यंत जरूरीचा लखोटा पुण्यास पोंचवून त्याचे उत्तर ताबडतोब आणावयाचे होते. हे काम त्रियकजीने कल्पनेबाहेर शिस्तीने व जलद केलें. पाहून बाजीराव खूष झाला, व त्याने आपल्या मनाशी खूणगांठ बांधली की त्रिंबकजी रड्या नसून हरहुन्नरी व कोणतेंहि काम फत्ते करणारा आहे. हा त्याचा होरा पुष्कळ अंशी खरा ठरला, आणि या वेळेपासून त्याची चलती सुरू झाली. त्रिवकजी डेंगळा हा हजरजबाबी, साहसी व शूर होता. कोणत्याहि संकटांत उडी टाकील व त्यांतून शिरसलामत बाहेर पडेल असा त्याच्या बुद्धीचा उरक होता. बाजीरावाविषयी त्याच्या मनांत निस्सीम प्रेम होते; व पेशव्यांचे जेणेकरून कल्याण होईल तें तें सर्व करण्यास तो तयार होता. पेशव्यांची झालेली हलाखी व त्यांची सर्व बाजूंनी होत असलेली घसरण ही त्यास पाहवत नव्हती. बाजीरावाची अशी केविलवाणी स्थिति होण्या- चें आदिकारण एकीएक इंग्रज आहेत अशी त्याची बालंबाल खात्री होती; तेव्हां इंग्रजांचा पांढरा पाय पेशव्यांच्या राज्यांतून काढून त्यांस पुन्हां पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे असे त्याने ठाम ठरविले होते, व त्या दिशेने त्याने प्रयत्नहि केले, पूर्वी म्हणजे सनं १८०२ च्या मार्च-ऑगस्टमध्ये वसईचा तह होण्याआधी शिंदे-होळकरांनी मराठेशाही इंग्रजांच्या पाशांतून सोडवून तिला स्वतंत्र करण्याची महत्त्वाकांक्षा धरली होती, तशांतलाच प्रकार त्रिंबकजीचा होता; पण त्रिंबकजीला स्वतःचे राज्य नसल्याने मोठे नांव नव्हते म्हणून त्याच्या प्रयत्नांस म्हणावे तसे तेज चढेना. तथापि त्याच्या मनाचा आटोप मात्र शिंदे-होळकरांच्याइतका होता. पण त्रिंबकजी डेंगळ्याच्या वाट्यास आलेला काल त्याच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यास अत्यंत प्रतिकूल होता. कारण वसईच्या तहाच्या पूर्वीच्या परिस्थितीत व आतांच्या परिस्थितीत जमीनअस्मानाचा फरक ! त्या वेळी शिंदे-होळकर हे पेशव्यांचे पराक्रमी सरदार रिकामे होते त्यांच्या मानेवर इंग्रज-सरकारच्या तहाचें जूं चढलें नव्हते. ते मनांत आणते तर त्यांनी कंपनीसरकारच्या राज्यास पायबंद घातला असता; पण त्या वेळी ती गोष्ट झाली नाही. आतां तर शिंदे-होळ- करांनी इंग्रजांस पायबंद घालण्याचे दूरच राहून त्याऐवजी इंग्रजांनीच त्या उभयतांना ठाणबंद केले होते. शिवाय त्यांच्या मनांत आतां पेशव्यांच्या- त्रिंबकजी डेंगळा यद्दलहि फारसा आदर राहिला नव्हता. याशिवाय वसईच्या तहाने खुद्द पेशवा हासुद्धा पुरेपूर इंग्रजांच्या घशांत उतरला होता. अशा स्थितीत मगरीने गिळलेले हे मराठी साम्राज्याचे माणिक तिचे पोट फाडून बाहेर काढणे फार कठीण होते. त्याला शिव-समर्थासारख्या नरनारायणाच्या जोडीचा अवतार व्हावयास पाहिजे होता, किंवा पहिल्या बाजीरावसाहेबाची शिकंदर समशेर रणांगणावर चमकावयास पाहिजे होती. पण या सर्व गोष्टी आतां अगदी अशक्यप्राय असल्यामुळे त्रिंबकजी डेंगळ्याच्या प्रयत्नांस यश येणे शक्य नव्हते. तरीहि त्रिंबकजीने प्रयत्नांत कोणत्याहि तन्हेची कसूर केली नाही. किंबहुना त्याने आपल्या आटोक्याबाहेर खटपट केली. एवढा वेळपर्यंत सामान्यतः मराठ्यांची सत्ता कशी ठिसूळ आणि भुस- मुशीत झाली होती याची कल्पना दिली. आता त्यांच्या सत्तेचे मुख्य अधिष्ठान जो पेशवा तो स्वतः आपला खड्डा आपल्या हातांनीच कसा तयार करीत होता ते पाहूं. बाजीरावाचे वसईच्या तहाने आयतेच काम झाले. राज्य- रक्षणाची जबाबदारी इंग्रजाने शिरावर घेतली, त्याबरोबर त्याच्या खैरवृत्ति मोकाट सुटल्या. त्याने शत्रुपक्षीय सरदारांचे सरंजाम व जहागिऱ्या जप्त केल्या. इतकेच काय, पण जी सरदारघराणी त्याच्यावर लोम करणारी व वेळी-अवेळी त्यास मदत करणारी होती त्यांनासुद्धा त्याने सुरवाने नांदूं दिले नाही. त्यांच्या कारभारात व गृहकलहांत उगीच ढवळाढवळ करावी, एकास हाताशी धरावें तर दुसऱ्यास चांगला हात दाखवावा; एकास यू व दुसऱ्याप्त छू करावें, आणि मग उभयपक्ष झुंजू लागले म्हणजे स्वतः गंमत पाहावी. इंग्रजांच्या कृपेमुळे लाभलेल्या या दिवाळीत आपण उडविलेले हे फटाके व आपटबार शेवटी आपणासच आपटी देणार आहेत याची त्यास कल्पनाहि नव्हती. या फटाक्यांतून धुमसत राहिलेल्या ठिणग्यांतूनच अमीचा डोंब उसळून त्यांतच आपली उभी दौलत बेचिगव होणार आहे याचे पुसट स्वप्नसुद्धां बाजीरावास कधी पडले नव्हते. बाजीरावाचे हे चाळे दृष्टीस पडतांच त्यास इंग्रजांनी प्रतिबंध केला असता तर यदाकदाचित् बाजीरावाचे राज्य जास्त दिवस टिकले असते. पण इंग्रज बाजीरावाचे राज्य जास्त दिवस टिकवण्याकरितां आले नव्हते; हिंदुस्थानच्या शिरावर तुऱ्याप्रमाणे शोभून दिसणारा भगवा झेंडा काढून टाकून त्यांस तेथे स्वताचा बावटा लावावयाचा होता. पण फळ पिकल्याशिवाय तोडूं नये, व गळू दुर्दैवी मोहरे पिकल्याशिवाय फोडूं नये' या राजकारणांतील नीतीचा अवलंब त्यांनी प्रथमपासूनच केला होता. इकडे बाजीराव सरदारांचे मनाला मानेल तसे वाटोळे करीत होता, पण त्याच वेळेला त्याचे इंग्रज रेसिडेन्टाशी वर्तन अत्यंत गोड होते. बाजी- रावाची रसना फारच मधुर! तो आपल्या मिठास भाषणाने मोठमोठ्या मुत्सद्दयांम सहज चकवीत असे. त्याच्या कारकीर्दीत कर्नल क्लोज, हेन्री रसेल, अलपिष्टन असे तीन रेसिडेन्ट झाले. या तिघांसहि त्याने आपल्या गोड योलण्याने वश करून घेतले होते. रेसिडेन्टाचे जितके हेर पेशव्यांच्या दर. वारी असत तितकेच बाजीरावाचे हेर रेसिडेन्सीत असत. हे जरी खरें, तरी इंग्रजास याजीरावाच्या सर्व बातम्या कळत. याच्या उलट बाजीरावास इंग्र. जांचे कारस्थान कळण्याचा संभव फारच कमी. कारण इंग्रज परका व परकी भाषा बोलणारा.. तेव्हां बचरजीसारख्या सामान्य माणसास कळणारें राजकारण वाजीरावास कळे. अशी स्थिति होती. इंग्रजांचा लष्करी यडगा दाखवून त्याने स्वतःच्या जहागिरदारांवर वचक बसविला खरा, पण राज्यरक्षणाच्या उपयोगी पडतील असे आपले जहागिरदार त्याने कायमचे दुखविले. एवढेच नव्हे तर यापुढे आपल्या पदरी एकहि सरंजाम ठेवा- बयाचा नाही, स्वतंत्र पगारी पायदळ ठेवावयाचे व त्याचा अधिकारी इंग्रज नेमावयाचा असे ठरविले. या त्याच्या नवीन धोरणाने तर इंग्रजांचें आयतेंच फावलें. बाजीरावाने आपल्या या नव्या फौजेवर कॅप्टन जॉन फोर्डची नेमणूक केली. फौजेंत लोक भरले तेहि परदेशी. हा इंग्रज सरदार व त्याची ही परदेशी फौज पलटणीत शिरतांना राजनिष्ठेची शपथ घेई, पण ती शपथ जगा. वेगळी औरच. ती अशी "आम्ही बाजीरावाशी इमानाने राहूं, पण बाजीराव इंग्रजांशी इमानाने राहील तोपर्यंत." जणुं त्यांना महिन्याच्या महिन्याला ' चरिंदा इंग्रजच देत होता. पण असल्या फुसक्या शपथेच्या इमानावर विश्वास ठेवून पगारी फौज ठेवणाऱ्या शहाण्या राज्यकर्त्यांचे उदाहरण मात्र जगांत इतरत्र कोहि आढळणार नाही. आपलाच दाम खोटा, दुसरे काय! अशा त-हेनें रावबाजीने आपल्या हातांतील समशेर स्वखुशीने इंग्रजांच्या तान्यांत दिली. याच्या उलट इंग्रजांनी मात्र आपला पाय मराठी राज्यांत शाबूत व कायमचा रोवला. सरदारांचे सरंजाम जप्त करण्याचे सत्र चालू त्रिंबकजी डेंगळा ६५ करून बाजीरावाने प्रत्येक सरदारागणिक शत्रु निर्माण केला, व इंग्रजांनी या त्याच्या कृतीस वेळोवेळी आडकाठी करून तेच सरदार स्वतःचे स्नेही बनविले. येणेप्रमाणे बाजीरावाने स्वतःच्या नाशाची तयारी जारीने चाल- विली व इंग्रजांच्या कराल जबड्यांत अजात उतरण्याच्या मार्गास तो लागला. अशा त-हेने मराठ्यांच्या स्वराज्यमंदिराचा कळस कललेला व पाया खचलेला स्पष्ट दिसत होता, व असल्या आणीबाणीच्या प्रसंगांतून त्यास सोडवून पुन्हां सुप्रतिष्ठित करण्याची असामान्य महत्त्वाकांक्षा त्रिंबकजी डेंगळ्याची होती. त्रिंबकजीच्या महत्त्वाकांक्षेचा पला फार मोठा होता; पण ती पूर्णपणे तडीस नेण्यास मात्र तो तितका लायक नव्हता. जन्मतः दरिद्री असल्यामुळे त्याच्याजवळ तितकीशी शीलसंपन्नता नव्हती; सूक्तासूक्त विचार नव्हता. अंगांत दरबारी हलकटपणा पुरेपूर भरलेला. अशा या दुर्गुणांमुळे त्याची कोणावरहि छाप बसली नाही. उलट त्याच्या नादानें राव- बाजीच्या नादानपणांत जास्तच भर पडली; व त्यामुळे श्रीशिवरायांनी संस्थापिलेल्या व पेशव्यांनी विस्तारिलेल्या मराठी साम्राज्याचा अंत झाला. प्रथम हुजऱ्या, नंतर निरोप व लरवोट्यांची ने-आण करणारा जासूद या पायऱ्या त्रिंबकजी झटाझट चढला; आणि छोटेखानी सरदार होण्यापर्यंतची मजल त्याने जरी उघडाउघड मारली नाही तरी सरदारी सत्ता गाजविण्याचे भाग्य त्यास इ. स. १८०४ नंतर केव्हां तरी लाभलें, बाजीरावाने त्यास सातारकर छत्रपतीवर नजर ठेवण्यासाठी नेमिले. यापुढील पांच-सात वर्षे त्याने अशीतशीच काढली. त्रिंबकजी आपल्या मालकाप्रमाणेच कपट- नीतिनिपुण होता. इ. स. १८११ पासून त्याच्या कर्तबगारीस प्रारंभ झाला. तो कसाहि असो पण एवढे मात्र खरें, की तो बाजीरावाशी शेवटपर्यंत एक- निष्ठ होता. त्याने आपल्या कपटनीतीचा पहिला हिसका चतुरसिंग भोसल्यास चांगलाच दाखविला. मराठी राज्याच्या अंतकाळी मराठ्यांच्या स्वातंत्र्या- साठी अहोरात्र तळमळणारी जी काही बोटांवर मोजण्याइतकी मंडळी होती त्यांच्यांत चतुरसिंग भोसल्याची गणना प्रामुख्याने करावयास पाहिजे. चतुर- सिंग हा सातारच्या गादीवर या वेळी राज्य करणाऱ्या शाहूचा पहिल्या घरचा धाकटा भाऊ. त्या वेळी शक्यतेपलीकडे असणारे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विचारा उभ्या भारतवर्षांत भटकत होता. मराठेशाहीत एके काळी दिक्पाल ५ दुर्दैवी मोहरे म्हणून गाजलेले रथी-महारथी एकामागून एक टोपीकरांच्या कराल जबड्यांत नाहीसे होत होते; त्यांची राज्ये गडाडत होती, त्यांची सिंहासनें उध्वस्त होत होती, आणि त्यांचे राजमुकुट आणि किरिटकुंडलें इंग्रजांच्या राजदंडाने अव- मानिली जात होती. अशा स्थितीत त्याच्या महत्त्वाकांक्षेचा पल्ला ओळखून तिच्याशी समरस होणारा असा फक्त एकच रणधुरंधर महापुरुष शिल्लक होता तो म्हणजे यशवंतराव होळकर; त्यास भेटण्यासाठी तो गेला. त्या वेळी त्याच्या मनाची स्थिति सर्व बाजूनी फार भयंकर होती. निराशेचे तडाके तो खात होता. अशा स्थितीत त्याच्या मनास जबरदस्त धक्का देणारी गोष्ट घडून आली ती म्हणजे सातारच्या गादीवर राज्य करणारा त्याचा वडील भाऊ शाहू हा इ. स. १८०८ मध्ये निवर्तला. त्याबरोबर बाजीरावाने त्याची स्त्री व मुलगा बाळासाहेब यांस कैदेत टाकले. या दोन्ही बातम्या त्यास कळतांच त्याचा सर्व धीर खचला. त्याचे सर्व प्रयत्न ज्या एका गोष्टीकरितां चालले होते तिचा मुख्य आधार म्हणजे मराठ्यांचा राजा, सातारच्या सिंहा- सनाचा मालक, शाहू, हा निवर्तल्याने त्याची तीन निराशा झाली. अशा स्थितीत जिवाला थोडा विरंगुळा वाटावा म्हणून तो यशवंतरावाच्या भेटीस इ. स. १८०९ च्या जानेवारीत गेला, तो तेथे त्यास यशवंतरावास वेड लागल्याचे आढळून आले. मग तर त्याची फारच निराशा झाली. अशा अगदी व्याकुल परिस्थितीत त्यास आणखी जास्त विव्हल करणारी बातमी कळली ती अशी की, प्रतापसिंहास गादीवर बसवून बाजीरावाने केले आहे. या बातमीने तर त्याची जास्तच कुचंबणा झाली. कारण पेशव्यांचे व सातारकरांचे फारसें बरे नव्हते, आणि चतुरसिंग सातारकरांचा पक्षपाती म्हणून बाजीराव त्याला पाण्यात पाहात होता. अशा स्थितीत आपण साताऱ्यास गेलो तर आपली काय शोभा होईल ! कोणते दुर्दैव आपणापुढे वाढून ठेविलें असेल याचा त्यास अंदाज येईना! यशवंतराव होळकगची ती केविलवाणी स्थिति पाहून तो व्याकुळ अंतःकरणाने व साश्रु नयनांनी. इ. स. १८०९ च्या जुलईत उज्जनी सोडून धारेस आला. या वेळी धारेससुद्धा मोठी धामधूम चालू होती, त्यामुळे चतुरासिंगाची दोन वर्षे तेथेच गेली. यानंतर त्रिंबकजीने चतुरसिंगास माणसें पाठवून साता-यास मोठ्या अगत्याने बोलाविले आणि अभिवचन दिले की, बाजीरावाच्या मनांव आपल्याविषयी कोणत्याहि तन्हेचे किल्मिष नाही. उलट आपला चांगला त्रिंबकजी डेंगळा बंदोबस्त करून द्यावा असेंच आहे, तरी आपण या प्रान्तीं येण्याचे करावे. अत्यादरः शंकनीयः' या न्यायाने चतुरसिंगास त्रिंबकजीच्या या निरोपाची शंका यावयास पाहिजे होती; पण त्याच्या दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याने या विनंतीस मान देऊन सातारी येण्याचे ठरविलें. चतुरसिंग धारेहून गुजराथेत आला, व इ. स. १८१० च्या श्रावणांत बडोद्यांत आला. तेथे गंगाधरशास्त्र्याची गांठ घेऊन त्याने त्यास विचारले की, मराठी राज्यसंरक्षणाचे बाबतींत बडोदकर कितपत मदत करू शकतील? या त्याच्या विचारण्यास शास्त्र्याने सांगितले की, येथे गायकवाडी इंग्रजाच्या हुकमाशिवाय झाडाचे पानसुद्धां हालत नाही. अशा स्थितीत तुम्हांस तुमच्या कामी मदत मिळणे कालत्रयींहि शक्य नाही. बडोदें-दरबारचा मन- सबा एकंदरीने चतुरसिंगाच्या लक्षात आला. याच सुमारास त्रिंबकजी डेंगळा खानदेशांत आला होता. त्याजकडून पुन्हां अगत्याची बोलावणी आली, तेव्हां चतुरसिंग बडोद्याहून निघाला तो सोनगडचे वाटेने खान- देशांत आला. या वेळी त्रिंबकजीचा मुक्काम मालेगांवास होता. या ठिकाणी बेलभंडार इमान होऊन ता. १०-२-१८११ चा दिवस भेटीसाठी ठरला. गिरणेच्या काठी उत्तरेस चतुरसिंगाचा मुक्काम असून दक्षिणेस त्रिंबकजीचा तळ होता. मेजवानीचा बेत ठरला. त्याच्या खर्चाचा ऐवज, शाकभाजी व फर्मास त्रिंबकजीने पाठविला. सहा घटका रात्री गोटाबाहेर खलबताची बैठक झाली. या ठिकाणी चतुरसिंगराजे, रघुनाथराव गुजर, बापू फडणीस व अप्पाजीराव इंगळे हे चार असामी, यांशिवाय गोपाळराव न्यायाधीश, अप्पाभट पुणतांबेकर व त्याचे दोन बंधु, बाबाजी केशव पाडलीकर, लाडेखान जामदार व हवालदार, खिजमतगार इत्यादि मिळून एकंदर अकरा असामींस एकाएकी वेढा घालून दगा केला. या प्रसंगी स्वतः त्रिंबकजी तर आलाच नाही. त्याने या सर्व मंडळीस मालेगांवच्या किल्ल्यांत बंदो- बस्ताने ठेविले व त्यांचा गोट लुटून साफ केला. पुढे वैशाखांत म्हणजे १८११ च्या मे महिन्यांत बाजीराव नाशकास आला असता तेथे या सर्व राजकैद्यांस त्रिंबकजीने बंदोबस्ताने नेले. बाजीरावास आपला शत्रु हाती लागला म्हणून मोठा आनंद झाला, व त्याने लगेच त्यास बेड्या घालून रायगडावर रवाना केलें; आणि त्याच्याबरोबरच्या दहावीस मंडळीस निरनिराळ्या किल्ल्यांवर कैदेत टाकिलें. रायगडनजीकच्या कांगोरी किल्ल्या- दुर्दैवी मोहरे वर कैदेत असतांनाच ता. १५-४-१८१८ रोजी चतुरसिंगाचा अंत झाला. अशा अत्यंत करुणाजनक स्थितीत मराठ्यांचे राज्य नीट सुव्यवस्थित व्हावें म्हणून अहोरात्र तळमळणाऱ्या या पुरुषाचा अंत झाला. चतुरसिंगाच्या अस्थि इंग्रज सरकारच्या राजवटींत बाळाजीपंत नातूच्यामार्फत वाईस आल्या व तेथून त्या साताऱ्यास पाठविण्यांत आल्या, आणि तेथे त्याचे उत्तरकार्य करण्यांत आले. बाजीरावाच्या मार्गातील चतुरसिंगाचा कांटा त्रिंबकजीने काढिला. या वेळपासून म्हणजे, इ. स. १८११ पासून, तों तहत् दुसऱ्यांदा इंग्रजां- च्या कैदेत पडेपर्यंत त्याच्या उलाढाल्या एकसारख्या चालू होत्या. बाजीरावाचा मार्ग ज्या त-हेने सुकर होईल व इंग्रजांविरुद्ध जेवढे काही साहित्य जमा करता येईल तेवढे जमविण्याचा त्याने एकसारखा सपाटा चालविला होता. इ. स. १८११ त शिंदे व रघुजी भोसले यांना मुद्दाम पत्रं पाठवून पेशवे यांच्याबद्दल आदर व प्रेमभाव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. कारण इ. स. १८०२ पासून म्हणजे वसईच्या तहानंतर शिंदे, नाग- पूरकर भोसले वगैरे मंडळीत व बाजीरावांत फारसा घरोबा राहिला नव्हता. या नाही त्या त-हेने त्याने सर्व सूत्रे पुन्हां गुंफण्याचा प्रयत्न चालविला होता, पण पेशवाईचा मुख्य सूत्रधार नादान असल्यामुळे त्याचा सर्व खटा- टोप मराठ्यांच्या नाशास कारणीभूत झाला. त्रिंबकजी डेंगळा नाना फड- णिसासारख्या योजक माणसाचे हाती लागता तर त्याचे चरित्र फारच निराळ्या त-हेने लिहिण्याचा सुप्रसंग आला असता. आतां पेशवे व इंग्रज यांचे परस्परसंबंध कसे होते, ते प्रेमाचे केव्हां व कोठपर्यंत होते, त्यांत वितुष्ट येण्यास केव्हां सुरुवात झाली, ते कसकसे येत गेले व त्यास त्रिंबकजी कसा कारणीभूत झाला हे पाहावयाचे म्हणजेच त्रिंबकजीचे चरित्र साकल्येंकरून सांगावयाचे. तेव्हां आतां तिकडे वळू. इ. स. १८०२ मध्ये वसईचा तह होऊन बाजीराव इंग्रजांच्या ताब्यांत गेला. १८०२ ते १८०५ अखेर शिंदे-होळकरादि मराठी दौलतीच्या परा- क्रमी सरदारांचे पंख खुडून इंग्रजांनी त्यांस हतवीर्य केले. त्यामुळे लढाईचे वातावरण नाहीसे होऊन हिंदुस्तानांत पूर्णपणे शांततेचे वारे वाहू लागले. सर्व रियासती गुण्यागोविंदाने कालक्रमणा करूं लागल्या. तेव्हां इंग्रजां- विरुद्ध कांहीं कारस्थाने रचण्याचे कारण उरलें नाहीं. त्यांच्या सत्तेच्या त्रिंबकजी डेंगळा सावलीखालीं सुखाने दिवस काढावे. शत्रूची ना धास्ती ना भय. प्रधान- जी राज्याचा बंदोबस्त कसा काय आहे ? असा प्रश्न राजाने विचारावा रामराज्य आहे हुजूर असा लघळपणे जाब प्रधानजीने द्यावा, असें हिडीस स्वरूप राजकारणास आले होते. असा हा काल इ. स. १८१. पर्यंत गेला. इ. स. १८०५ ते १८१० पर्यंतच्या कालाचा उल्लेख असा सांपडतो. "वसईस तहनामा झाल्यावर राज्याचा बंदोबस्त कंपनी सरकार- च्या दोस्तीमुळे बंडावा वगैरे मोडून मुलूख आबाद झाला. सालोसाल यसुलीची पैदास वाढत गेली. सारे सरदार हुकूम मानूं लागले. त्यावरून श्रीमंतांची मर्जी मुप्रन्न होती, सदाशिव माणकेश्वराने रेसिडेन्टाशी रहस्य ठेवून श्रीमंतांचे हित साधलें.” यानंतर एक मोठी घटना घडून आली ती म्हणजे एल्फिन्स्टन हा पुण्यास रोसिडेन्ट म्हणून आला; आणि याची कारकीर्दच बाजीरावास भोवली व त्यास पेशवाईवर उदक सोडण्याचा अत्यंत दुर्धर प्रसंग आला. एल्फिन्- स्टन् इ. स. १८०२ मध्ये एकदां पुण्यास आला होता. त्या वेळी वर्ष दोन वर्षे येथे मुक्काम करून पेशवाईचा झोफनोक त्याने पाहिला होता. त्याला हिंदी भाषा चांगल्या अवगत असल्यामुळे दुभाष्या दलालाची त्याला जरूर नसे. पूर्वी क्लोज व बाजीराव यांच्यामध्ये खुरशेटजी मोदी दुभाष्याचे काम करीत असे. त्याचे व बाजीरावाचा कारभारी सदाशिव माणकेश्वर यांचे रहस्य असल्यामुळे तो मध्यस्थाचे काम सर्व धोरणे संभाळून नीट करी व बाजीरावाचे हित साधी. पण एल्फिन्स्टन्च्या नेमणुकीमुळे खुरशेटजी मोदीचे काही कामच उरले नाही. त्यामुळे बाजीराव व रोसडेन्ट यांच्या- मधील एक आडपडदा नाहीसा झाला व ही दोन्ही चाकें एकमेकांवर घासू लागली; त्यांमध्ये मोवारीचे वंगण घालणारा मध्यस्थ नाहीसा झाला. याच सुमारास आणखी एक अनिष्ट गोष्ट झाली ती म्हणजे रावबाजी व त्रिंयकजी डेंगळा यांचे जास्त रहस्य जमले. याचे कारण असे झाले की, सदाशिव माणकेश्वर हा इंग्रजांस सामील आहे हे त्रिंबकजीने पुराव्यानिशी चवाव्यावर आणिल्यामुळे तो बाजीरावाच्या मर्जीतून उतरला व डेंगळ्याचे प्रस्थ पेशवे- दरबारी माजू लागले. त्याची जरा चढती कमान सुरू झाली. तो राज्य- कारभारात जास्त लुडबुडू लागला. इतकेच काय, पण रेसिडेन्टाशी बोला- चाली करण्याचे कामसुद्धां तो करूं लागला आणि हीच गोष्ट अत्यंत अनिष्ट दुर्दैवी मोहरे अशी झाली. कारण त्रिंबकजी रेसिडेन्टाशी चढेल वृत्तीने वागू लागला. याचा साहजिकच परिमाण असा झाला की, इंग्रज व पेशवे यांच्यामध्ये वितुष्ट येण्यास सुरुवात झाली व त्याचा शेवट पेशवाईच्या नाशांत झाला. दरबार झुलविणे, शत्रूच्या गोटांत जाऊन त्याच्या अंतःकरणाचा भेद घेणे, जाबजबाब अशा त-हेने करणे, की आपला मतलब तर सोळा आणे साधावा व शत्रूस तर तोंडावर प्रश्नोत्तर करतांच येऊ नये अशा प्रकारची मुत्सद्देगिरीनं ओथंबलेली रसवंती ज्याच्या वैखरीवर अवतीर्ण झाली असेल अशी मधुभाषणी माणसें, एखादे वेळेस समशेरीस न लाभणारे सुयश, आपल्या वाक्सुमनाने मिळवितात. निदान आजची संकटें उद्यांवर तर खासच ढकलतात. असा हा सांगोपचारी धोरणाचा महिमा आहे; पण त्याचा गंध- सुद्धां त्रिंबकजीस नव्हता. दौलतीच्या कामाचा त्यास अनुभव नव्हता त्यामुळे त्यास कामाचे धोरण साधेना. पहिले सांप्रदाय सोडून त्याने नवीन नवीन रिवाज सुरू केले; आणि रेसिडेन्टाशी अत्यंत उन्मत्तपणाची भाषा बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे एल्फिन्स्टन त्याच्यावर नाखूष झाला. जसजसा बाजीरावाचा त्याच्यावर लोभ वाढत गेला तसतसा त्याच प्रमाणांत एल्फिन्स्टनच्या मनांतून तो उतरूं लागला. अशा त-हेने टोपीकर व पेशवे यांचे प्रकरण चिघळू लागले. इंग्रजांच्या मनांत पेशव्यांविषयीं शत्रुत्वाचा अमि चेतविण्यास त्रिंबकजी कारणीभूत झाला. येथेच त्याच्या कर्तबगारी- ची मर्यादा संपली नाही. तिने इतर ठिकाणींहि धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे जुने व खानदानी सरदार, पानसे, पटवर्धन, रास्ते, निपाणकर यांचे सरंजाम जप्त करण्याचा त्याने तडाका चालविला. हे त्यास सहज करतां आलें. बाजीराव व त्रिंबकजी यांची मोहतृष्णा येथेच संपली असती तर फार चांगले झाले असते पण बाजीराव आतां कोल्हापूरकर व सावंतवाडीकर यांच्यावरहि आपले अधिराज्य सांगू लागला, तेव्हां त्या मंडळींनी आपली तक्रार रोसिडेन्टापुढें जोराने मांडली. हा अन्याय रेसि- डेन्टास पाहवेना म्हणून त्याने त्यांत हात घातला व तसे त्याने करतांच बाजीरावाचे व त्याचे वैमनस्य वाढीस लागले. बाजीरावाच्या दटावणीस भीक न घालतां एल्फिन्स्टनने मध्यस्थी करून सरदारांचे सरंजाम वांचविले. अशा त-हेनें सरदारांच्यावरील मोठे संकट नाहीसे करून त्याने पेशव्यांच्या सरदारांचा जो दुवा घेतला, तो त्यास पुढे चांगलाच उपयोगी पडला त्रिंबकजी डेंगळा ७१ गणपत- ता. ७-७-१८१२ रोजी बाजीराव पंढरपुरास असतां एल्फिन्स्टनने जहागीर- दारांची नवी व्यवस्था करून घेतली. या नवीन करारामुळे बाजीरावाचा सरदारांवरील वचक नाहीसा झाला व सरदारमंडळीच्या मनांतील त्याच्या. विषयींचे प्रेम व आदर पार रसातळास गेला. इतकेच काय, पण त्या वेळी बाजीरावाचे संरक्षण करण्यास इंग्रजांची तैनाती फौज नसती तर त्यांनी बाजीरावास पदच्युतसुद्धा केले असते; याबद्दलची वाटाघाट त्यांच्यामध्ये चालली होती; पण एल्फिन्स्टनच्या मध्यस्थीने हा बनाव व्हावयाचा टळला इतकेंच. याच सुमारास म्हणजे ता. १-८-१८१२ रोजी बाजीरावाने " राव पानसे याजकडील तोफरखान्याचे काम दूर करून ते त्रिंबकजी डेंगळे यास सांगितले. भांबुर्थ्यास नवीन दारूवान्याचे काम चालविलें व जुन्या तोफरवान्यांत बाणांची नवी तयारी सुरू केली. या वेळी बाजीराव सर्वस्वी त्रिंबकजीच्या तंत्राने वागत होता. तो सांगील ती पूर्व अशी स्थिति असल्यामुळे शाहण्यासुर्त्या माणसांचें कांहींच चालत नव्हते. या वेळी बाजीरावाचा खर्चहि पण वाढला होता. आज ना उद्यां आपणांस इंग्रजा- शी युद्ध करावे लागणार म्हणून त्या दृष्टीने त्याची तयारी चालू होती. तेव्हां पैसा जास्त जमा करण्यासाठी म्हणून तो चढावाने मामलती विकू लागला. जो जास्त वरचढ बोलेल त्यास मामलत मिळे. मग त्याच्या लायकी-नालायकीचा प्रश्नच उरत नसे. “कामास लायक नसला तरी चढ बोलला की त्यास मामलत सांगावी, अशी पैदास सालोसाल वाढत गेली. देवस्थाने, धर्मादाय, इनामें यांवर चढ किती कबूल करावयाचा त्याचे मान राहिलेच नाही. पांच हजार मामलतीवर पन्नास हजार बोलला की, त्याजकडे मामलत सांगावी असा प्रकार होऊ लागला. अखेरीस बाक्या खूप थकल्या. त्याबद्दल कित्येक मामलतदारांस अटकेत घातले तरी बाकी वसूल झाली नाही. बाजीरावाच्या मुलुखाचा वसूल १ कोट रुपयांचा होता. त्यापैकी दरसाल तो पन्नास लक्ष रुपये शिल्लक टाकी. सन १८१५ त त्याच्याजवळ नगदी शिल्लक पांच कोट रुपये होते. अशा त-हेने त्याने पैशाची भरपूर तरतूद ठेविली व इंग्रजांशी सामना देण्याची वेळ आल्यास भरपूर फौजफांटा व दारूगोळा लागणार म्हणून त्याच्याहि व्यवस्थेत तो होता. अशा त-हेने दुर्दैवी मोहरे त्रिंबकजीच्या सांगण्यावरून बाजीरावाची उठावणी चालू होती. सन १८१४ त कार्तिकस्वामीच्या यात्रेस दुसऱ्यांदा जाण्याचा वाहणा करून, बरोबर बंदोबस्ता- साठी म्हणून त्याने आणखी फौज ठेविली. श्रीमंतांची स्वारी यात्रेसाठी म्हणून कर्नाटकांत निघाली, तेव्हां धारवाडचा सुभेदार बापू शिंदे बाजीरावास भेटण्यासाठी आला. हाच जणुं त्याने मोठा गुन्हा केला असा अनुभव त्यास आला. कारण बाजीरावाची त्याने गांठ घेतांच किल्ला त्रिंबक- जीच्या स्वाधीन करण्याबद्दल त्यास त्याने फर्माविलें. या हुकुमाची तामिली त्याने केली नाही. त्याने साफच उत्तर केले की, मी किल्ला त्रिंबकजीचे स्वाधीन करीत नाही. सरकारनी दुसरा कोणताहि कारकून द्यावा त्याचे स्वाधीन करतो. या उत्तराने त्रिंबकजी चिडून गेला व त्याने लगेच बापूजी शिंद्याच्या तोंडांत मारून त्यास कैद केले आणि दमदाटी करून किल्लयाची सोडचिठी लिहून घेतली. यानंतर शिंद्याचा फडणीस गंगाधरपंत यास बरोबर घेऊन किल्ला ताब्यात घेण्यासाठी म्हणून गेला. किल्लयांत बापूजी शिंद्याचे बंधु सहकुटुंब राहात होते, तेव्हां डेंगळ्यास बाहेर बसावयास सांगून गंगाधरपंत किल्लयांत पुढील सर्व व्यवस्था करण्यासाठी म्हणून गेला, आणि किल्लयांत जातांच गंगाधरपंताने असे सांगून पाठविले की, किल्ला ताब्यांत देत नाही. या निरोपाने गळा फजीत झाला व त्यास परत फिरावे लागले त्रिंबकजी परत आला व बाजीरावाबरोबर कार्तिकस्वामीचे यात्रेस निघून गेला. या गोष्टीवरून बाजीराव व त्रिंबकजी या उभयतांस त्यांचे सरदार- मंडळ काय त-हेने मानीत होते हे चांगलेच लक्षात येते. पिढीजात सरदारांचे सरंजाम जप्त कर, मामलती अवाच्या सवा चढाने वीक व खजिना संपन्न कर, या नाही त्या निमित्ताने सैन्य वाढीव अशा सर्व तन्हांनी बाजीरावाने इंग्रजांस तोड देण्याची तयारी चालविली; पण त्यांत मोठेच वैगुण्य होते. शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले असे मोठमोठाले महापराक्रमी सरदार या महत् कार्यासाठी वश करून घ्यावे, पानसे, पटवर्धन, फडके वगैरे बरकंदाज लढवय्यांची सहानुभूति मिळवावी आणि प्रजेचा दूवा घ्यावा बाजीरावमहाराजांचा जयजयकार असो बाजीराव महाराजांचा जयजयकार अमो" अशी आनंति भराने प्रजेने ललकारी मारून युद्धास तोंड लागतांना आपलें अभीष्ट चिंतावे, ही गोष्ट कर- ग्यास बाजीराव चुकला; आणि त्रिंबकजीस हा पोंच नव्हताच. तेव्हा ही जी त्रिंबकजी डेंगळा ७३ तयारी झाली ती म्हणजे एखाद्या पक्षघात झालेल्या माणसासारखी. अधैं शरीर जिवंत असून भागत नाही. ज्याला स्वतःचे शरीरधर्म नीटपणे उरकतां येत नाहीत असा मनुष्य आखाड्यांत उतरून काय कुस्ती जिंकणार ! आणि कसे यश संपादणार ? त्यास गोटीबंद शरीर लागते ही मुख्य गोष्ट बाजीराव व त्रिंबकजी यांच्या लक्षात येत नव्हती व त्यामुळेच त्यांचा घात होणार हे निश्चित झाले होते, २:: बडोद्याचे राजकारणांत टोपीकराचे वर्चस्व . पेशवे व टोपीकर यांच्या मनाची परिस्थिति या वेळी इतकी काहीं नाजुक व चमत्कारिक झाली होती, की बोलायची सोय नाही. केव्हां कोणाचें कोठें बिनसेल आणि प्रकरण हातघाईवर येईल याचा नेमच नव्हता. अंतःकरण सर्व बाजूंनी सुन्न झालेलें, मनाच्या आकाशांत काळ्याकभिन्न ढगांची खेचाखेच उडालेली, सोसाट्याचा वारा सुटून विजेच्या कडकडाटानें आकाश केण्हां धरणीवर कोसळेल याचा नेमच नव्हता. उभय- पक्ष आपणांस पाहिजे तेव्हां तो प्रसंग यावा म्हणून आटोकाट प्रयत्न करीत होते. अशा त-हेने दोन्ही पक्षांची प्यादी पुढेमागे सरकत असतां, गंगाधर- शास्त्र्याचे मोहरें पंढरपुरी इरेस पडले व इंग्रज-मराठ्यांच्या शेवटल्या संग्रा- मास तोंड लागले व त्यांत मराठ्यांची उभी दौलत बेचिराख होऊन त्यांस स्वातंत्र्यास आंचविण्याचा दुर्धर प्रसंग आला. गंगाधरशास्त्र्याच्या खुनामुळेच आपल्या चरित्रनायकाचे नांव इतिहासांत गाजले तेव्हां हा बनाव कसा झाला ते पाहूं. इंग्रज-मराठ्यांच्या संग्रामास कारणीभूत झालेली कटकट, बडोद्याच्या गायकवाडांची मराठी साम्राज्याच्या अंतकाळी प्रत्येक राजघराण्यांत कांहीं ना कांहीं तंटेबखेडे चालू होते व त्यास गायकवाडघराणेहि अपवाद नव्हते. मुख्यतः हे तंटे दौलती- मंबंधी चालावयाचे. मुख्य गादीचा खास वारस हा अर्धवट व नादान असा- वयाचा व त्याचे भाईबंद ( औरस व अनौरस) हे त्यापेक्षां बुद्धिवान्, क त्रिंबकजी डेंगळा पराक्रमी असावयाचे; आणि मग त्या भाऊबंदकीच्या भांडणास जोर चढून त्याचा निकाल इंग्रजांच्या मदतीने लागावयाचा, हा जणुं त्या वेळचा शिरस्ताच. त्याप्रमाणे येथेहि झाले. पेशव्यांकडून सेनाखासखेलीची वस्त्रे घेऊन आलेला शेवटचा पुरुष गोविंदराव गायकवाड, यास ही वस्त्रे ता. १९-१२-१७९३ रोजी मिळाली. या गृहस्थास औरस पुत्र चार व त्याची रक्षा गजराबाई इच्यापासून झालेले दोन-कान्होजी व भगवंतराव. या दोहोंपैकी कान्होजी हा फार पराक्रमी व शूर होता. त्याने आपल्या आईच्या मदतीने व प्रोत्साहनाने बापाविरुद्ध पुंडावा सुरू केला व त्यास जेर केले. या संकटांतून गोविंदराव मोठ्या शिकस्तीने पार पडला व त्याने सन१७९४ मध्ये बडोद्यास कारभार सुरू केला. या वेळी गोविंदराव गायकवाडा, गाडे नीट मार्गास लागावे म्हणून नाना फडणिसाने रावजी अप्पाजी फणसे नांवाच्या गृहस्थास कारभारो म्हणून बडोद्यास धाडले आणि याच वेळी अहमदाबादेची सुभेदारी अबा कृष्ण शेलूरकर यास दिली व त्यास पेशव्यांची अर्धी भागी वहिवाटण्यास सांगितले; पण पुढे लवकरच दुर्दैवाने नाना निवर्तल्यामुळे शेलूरकराचा आधार तुटला.त्याबरोबर गोविंदरावाने अबा शेलूरकराशी लढून अहमदाबाद हस्तगत केले आणि अबास कैद करून बलसाडच्या किल्लयांत ठेविलें. यानंतर बाजीरावाने अहमदाबादेची वहिवाट गोविंदरावाचा राखीपुत्र भगवंतराव याच्या नांवाने लिहून दिली. दरसाल पांच लाख रुपये देण्याच्या करार झाला. यानंतर मात्र गोविंदराव गायकवाडास फारच अडचणी आल्या पण त्यांतून त्याचा निभाव त्याचा शूर व पराक्रमी भाऊ बाबाजी आणि कारभारी रावजी अप्पाजी यांच्यामुळे लागला. या संकटांचा परिणाम त्याच्या मनावर जास्तच झाल्यामुळे त्याची प्रकृति खालावली व त्यांतच त्याचा अंत ता.१९-९-१८००रोजी झाला. गोविंदरावा- च्या मरणाने गायकवाडांच्या घराण्यांत भलत्याच भानगडी निर्माण झाल्या. गोविंदराव जिवंत असतां त्याच्या बंदोबस्तासाठी म्हणून रावजीने आरयांचा मोठा रिसाला ठेवला होता. या आरबांनी त्याच्या मृत्यूनंतर एवढा बंडावा केला की, त्याचे निराकरण कसे करावे याचा मोठा प्रश्न पडला. शेवटी हे बंड शांत करण्यासाठी गायकवाडास इंग्रजी पलटणांची मदत घेण्याचा दुर्धर प्रसंग आला व अशा त-हेने इंग्रजांचे योट बडोद्याच्या राजकारणांत कायमचे शिरले.
७६ दुर्दैवी मोहरे गोविंदरावाच्या मृत्यूने दौलतीच्या वारसाहक्कासंबंधी झोंबाझोंबीस सुरुवात झाली. 'बळी तो कान पिळी' हा निसर्गाचा न्याय नेहमीच प्रभावी असल्यामुळे कान्होजीने औरस भावंडांस धाब्यावर बसवून दौलतीवर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. या वेळी गोविंदरावाची बायको गहिनाबाई इने मोठी चतुराई केली. तिला स्वतःचे संतान नव्हते म्हणून अडून न बसतां गोविंदरावाचा ज्येष्ठ व औरस पुत्र आनंदराव यास गादीवर बसवून रावजी अप्पाजीस पुढे करून तिने कारभार चालू केला. आनंदराव स्थानापन्न झाला खरा; पण तो भोळा व अर्धवट असल्यामुळे घोटाळे माजले. कान्होजी हा हुशार व पराक्रमी होता. त्याने गहिनाबाईच्या या डावा- वर तोड काढिली ती अशी, की त्याने आनंदरावाच्या भोळ्याभाबडया स्वभावाचा फायदा घेतला व त्याचे मन गोड गोड थापांनी वश केलें व आरबांच्या रिसाल्याचा दंडुका दाखवून कारभार हाती घेतला. येथपर्यंत त्याचे करणे ठीक होते; पण सत्ता हाती येतांच तो मदांध झाला व त्याने भलभलते चाळे करण्यास सुरुवात केली. गोविंदरावाच्या बायकोस व इतर महत्त्वाच्या आप्तांस कैदेत टाकिलें; व खर्च भागविण्याच्या निमित्ताने जड- जवाहिर नाहींसें केलें. या त्याच्या कृत्यांनी राजघराण्यातील सर्व मंडळी चिडली व हा डाव त्याच्याच अंगावर. उलटला. ज्या आरबांच्या जोरावर त्याने बडोद्याची सूत्रे आपल्या हाती घेतली त्याच आरबांस फितुर करून व रावजी अप्पाजीस पुढारीपण देऊन कान्होजीच्या नातेवाईकांनी त्यास ता. २९-१-१८०१ रोजी पकडून रणपूर येथे कैद केले. कान्होजीच्या कारभारासंबंधी खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो:- "आनंदराव गायकवाडानी दौलत करावी, त्यांत कान्होजी गायकवाड दुसरे पुत्र रजपुताणीचे यांनी पांच सहा महिने दौलत केली. त्यास कोणा- चेंच भान नाही. खुद्द आनंदरावास कैद करून परम अमर्यादा केली. ती ईश्वरास न मानली. पौषमासी कान्होजीस सर्वांनी कैद केले. त्या दिवसा- पासून रावजींनी कारभार करावा त्यास शिबंदीचा गवगवा मोठा त्यामुळे चैन नाही." अशा तहेने कान्होजीचे प्रकरण निकालांत निघाले; पण आरयांचे प्रस्थ गायकवाडी फारच माजले. त्यांच्या जाचणुकीतून सुटका होईना, तेव्हां हा जाच कायमचाच नाहीसा करण्याकरितां म्हणून रावजी त्रिंबकजी डेंगळा अप्पाजीने इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले व खंयायतेहून कुमक आण- विण्याची तजवीज केली. या वेळी इंग्रजांचे दैव असें कांही जोरांत होते, की त्यांनी इच्छा करावी व ती लगेच फलित व्हावी. अमुक एका राजघराण्यांत आपले प्रस्थ माजा- वयास पाहिजे असा विचार इंग्रजांच्या डोक्यांत येण्याचाच अवकाश, की लगेच त्या घराण्यांतील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडावयाचा. गादीसंबंधी तंटेबखेडे माजून प्रकरण इतके चिघळावयाचे, की त्याचा शेवट कांहीं भयंकर होतो की काय अशी भीति वाटावयाची, व मग या एकमेकांशी कडकडून कळवंडणाऱ्या मांजरांनी टोपीकरांकडे न्याय-इन्साफ मागावयास जावयाचे, आणि टोपीकरांनी लोण्याचा गोळा गट्ट करून इन्साफ द्यावया- चा असा सपाटा एकसारखा चालू होता. तोच प्रकार बडोद्यासहि झाला. खंबायतेस जाऊन रावजी अप्पाजीने इंग्रजांची पायधरणी सुरू केल्या- बरोबर दुसऱ्या बाजूनीहि पण इंग्रजांच्या मनधरणीस सुरुवात झाली. लिला- वांत माल तेजीने जावा म्हणून लिलाववाला ज्याप्रमाणे चढाने बोलणारे आपले बगलबच्चे निर्माण करतो त्याप्रमाणे आपली दौलत व सत्ता सुखरूपपणे इंग्रजांच्या हाती जावी म्हणून गायकवाडांच्या घराण्यांतील आत्मघातकी भाईबंदांनी इंग्रजांची दाढी खाजविण्यास सुरुवात केली व इंग्रजांच्यावांचून आपणास गति नाही असा देखावा निर्माण केला. गोविंदराव गायकवाडाचा चुलतभाऊ, कडीचा जहागीरदार मल्हारराव गायकवाड म्हणून होता त्यास, जणुं उपभोगीत असलेली जहागिरी न पुरून जास्तीची हाव सुटली व त्याने फौज जमा करून आपल्या पितृघराण्याची व दौलतीची लांडगेतोड करण्यास सुरुवात केली. या त्याच्या बंडाव्यांत गोविंदरावाचा दासीपुत्र मुकुंदराव गायकवाड हाहि मोठ्या ईर्षेनें सामील झाला. या दोघांस लढण्याची रग जिरवावयाची होती व आणखी दौलत कमावावयाचीच होती तर त्यांचा हात कोण धरणार होता. उलट शेराचे बच्चे म्हणून त्यांची पाठच थोपटली गेली असती; पण आतां तें तेज आणि ती बहाद्दरी राहिली होती कोठे ? त्यांस बापजाद्यांनी कमाविलेली दौलत साहेबाच्या हातास हात लावून युडास्वाली घालावयाची होती, इतकेंच! काय साहेब, आपणांस सुरत चौथायशी परगणा पाहिजे. त्याच्यावर आज दुर्दैवी मोहरे बरेच दिवस आपले लक्ष आहे, तर तो हा घ्या व आम्हांस आमच्या भाई- यंदांची गर्दन मारण्याकरितां मदत करा.” अशी मागणी मल्हाररावाने इंग्रजां- कडे केली. अशा त-हेने दोन्हीहि पक्ष इंग्रजांकडे मदतीची याचना करीत होते. या वेळी जरा झपाटा मारल्यास आपण भारतवर्षाचे सर्वसत्ताधारी सम्राट् होऊ असें कंपनीसरकारचे मुख्य अधिकारी वेल्ली यास यथार्थतेने वाटत होते व त्याप्रमाणे चढाईचे धोरण सर्वत्र चालू होते. या वेळी मुंबईचा गव्हर्नर डंकन याजकडे दोन्ही पक्षांच्या मागण्या व खटपटी चालू झाल्या. तेव्हां बडोदें प्रकरणी काय धोरण ठेवावें याचा नीट कयास येण्यासाठी मुंबई- च्या गव्हर्नरने मेजर वॉकर नांवाच्या एका इसमास खंबायतेहून दोन हजार फौज बरोबर देऊन बडोयस धाडलें, वॉकर बडोद्यास दाखल होण्यापूर्वीच मल्हारराव व रावजी अप्पाजी यांचा सामना चालू झाला. रावजी अप्पाजीचे सुद्धां इंग्रजांशी पूर्वीपासूनच सूत्र असल्यामुळे व त्यानेहि सुरत परगणा लिहून देण्याचे कबूल केल्यामुळे हा इंग्रजांस घरात आणतो म्हणून त्याच्यावर पेशवे व गायकवाडांच्या पदरी असणाऱ्या आरबांचा राग होता; आणि साहजिकच त्याच्या नांवाने हे लोक एकसारखे जळत होते. अशा स्थितीत मल्हाररावाने रावजीवर चालून घेतले व रावजीची दाणादाण उडविली; आणि त्याच्या कुटुंबावर सक्त पाहरा ठेविला. अशा पेंचांत सांपडल्यामुळे त्याने शिंद्या- कडून कुमक मिळविण्याची जोराची खटपट केली. पण त्या वेळी शिंदे-होळ- करांच्या आपआपसांत तुफान लढाया नर्मदेवर चालू असल्यामुळे शिंद्यास रावजीस मदत करणे अशक्य झाले. शिंद्यांच्या हाताने बडोद्याचा तंटा मिटल्यास शिंदे-गायकवाडांचा मिलाफ होऊन बडोद्याचे राजकारण डोई- जड होईल ही भीति इंग्रजांस होतीच. तेव्हां वॉकरने लगोलग बडोद्यास जाऊन तेथील बंदोबस्त केला. कोणास हाताशी धरावयाचे व कोणास डावलावयाचे याचा हिशेब अगदी ठरलेला. इंग्रज कधीहि या बाबतीत चुकावयाचा नाही. त्यांनी रावजी अप्पाजीची म्हणजेच आनंदरावाची बाजू घेतली. वॉकरची व आनंदरावाची भेट झाली. भेटींत आनंदरावाचा धांदरट स्वभाव चाणाक्ष वॉकरच्या झट्- कम लक्षात आला. या मुलाखतीत आनंदरानाने रावजी अप्पाजीबद्दल धन्योद्गार काढून त्याच्या नेकदारीची स्तुति केली व मल्हाररावाबद्दल द्वेष व्यक्त केला. त्याबरोबर वॉकरनें आपलें धोरण ठराविलें तें असें की. रावजीस त्रिंबकजी डेंगळा ७९ उचलून धरून मल्हाररावास नरम करावयाचे. त्याप्रमाणे तोता.२३-२-१८०२ रोजी कडीवर (मल्हाररावाच्या जहागिरीचा गांव) चालून गेला; पण मल्हारराव चांगला बंदोबस्ताने असल्यामुळे वॉकरला त्याने दोन महिने वंगविले. त्यानंतर इंग्रजांच्या फौजा चौबाजूंनी जमा झाल्या त्यामुळे त्याचा इलाज खुंटला व तो ता. ३-५-१८०२ रोजी इंग्रजांस शरण आला. तेव्हा वॉकरने त्याची समजूत करून त्याची सर्व व्यवस्था नडियाद येथे करून दिली. अशा त-हेने जास्ती जिंदगी व दौलत मिळविण्यासाठी निघालेला मल्हारराव फजित झाला. शिकंदर नशिबाचा टोपीकर गायकवाडीत घुसला, इतकेच नव्हे तर त्याने तेथील राजा व अधिराज्य आपल्या लगामी लावले. वॉकरने सहा महिन्यां- च्या आंत सर्व कारस्थाने आणि बखेडे पार निकालांत काढले, आणि आनंदरावाचा व आनंदरावाजवळ रावजी अप्पाजीचा चांगला जम बसवून दिला. त्याचा मोबदलाहि भरभक्कम लाटण्यास त्याने कसूर केली नाही. रावजी अप्पाजीने इंग्रजांस पाहिजे असलेले सुरत परगणे लिहून दिले. येथ- वर दिलेल्या बडोद्याच्या राजकारणासंबंधी खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो. गायकवाड बंधूंचा कलह लागला आहे. मल्हाररावाने फौजा जमा करून तमाम मुलखांत दंगा करून रावजीशी लढाई सुरू आहे. रावजींनी गायकवाडांचे अठावीस महाल सुरतेनजीकचे इंग्रजास देऊन त्यांची पलटणे कुमकेस आणिली. म्हणोन गायकवाडावर पेशव्यांची बहुत बेमर्जी झाली. सुरतकर इंग्रजांनी मदतीच्या निमित्तै गायकवाडीत प्रवेश करून स्वराज्यांत मोठाच कलह उत्पन्न केला." सुरत परगण्याचे महादान ता. ६-६-१८०२ रोजी हाती पडतांच व गायकवाडाचे सावज पूर्णपणे हाती लागतांच वॉकरने मुंबईची वाट धरली आणि तेथे गायकवाडाशी कसें धोरण ठेवावयाचे याची गव्हर्नराशी वाटा- घाट करून तो ता. ११-७-१८०२ रोजी बडोद्यास परत आला व लगेच त्याने ता. २९-७-१८०२ रोजी तहाच्या अटीवजा एक पत्र आनंदरावा- च्या स्वदस्तूरचे लिहून घेतले, ते असें:- आग्बांनी आमचा उच्छेद करून प्राण घेण्यापर्यंत प्रसंग आणिला म्हणून आमची सर्व लोकांस अशी ताकीद आहे की, मेजर वॉकर सांगतील तो प्रकार अवश्य मान्य करावा, त्याविरुद्ध खुद्द आमचे हाताचा जरी लेख असला तरी " दुर्दैवी मोहरे " तो कोणी मानूं नये. आमचे दिवाण रावजी अप्पाजी, त्यांची मुलें, यंधू अगर दुसरे कोणतेहि नातेवाईक, तसेंच माधवराव तात्या मुजुमदार या सर्वांविरुद्ध जर कोणी कांहीं गैरशिस्त प्रकार अथवा दुष्टावा केला तर त्याचा बंदोबस्त इंग्रजांनी करावा. बडोदकरांचे हातपाय बांधून टाकणाऱ्या या सर्व कलमावर ताण करणारे कलम येणेप्रमाणे आहे. "बडोदकर गायकवाड असें लिहून देतात की, खुद्द आम्ही किंवा आमचे कोणी वंशज काही गैरशिस्त वर्तणूक करूं तर इंग्रज सरकारने मध्ये पडून त्याचा टाकोटाक बंदोबस्त करावा. टोपीकराच्या अजब कृतीचा प्रत्यय बडोदकरास अशा त-हेने आला. राजाजींची अशी विल्हेवाट लावल्यानंतर प्रधानजींचा प्रश्न शिल्लक राहिला. त्याचाहि फडशा त्यांनी अशाच प्रकारे पाडला. इंग्रजानें राजाकडून करारमदार लिहून घेतले काय व प्रधानजीस लिहून दिले काय, दोहोंचा अर्थ एकच आणि तो म्हणजे इंग्रजांचे हित आणि राजा-प्रधानजींचें अहित. इतके करूनसुद्धां इंग्रज पुन्हां नामानिराळाच, आणि पुन्हां तो टिळेमाळा घालणाऱ्या पायघोळ संताप्रमाणे असें म्हणणारच की, येथे कोणाचे काय बागेले ज्याचें त्यानेच अनहित केले." वर कंपनी सरकारने राजा- कडून करार लिहून घेतला तर प्रधानजीस खलिता लिहून.देण्याचा फार्सहि पण त्यांनी केला, त्याचा आशय असा:- कंपनीचे तर्फेनें मेजर वॉकर असें कबूल करितात की, राजे रावजी अप्पाजी दिवाण व त्यांचे पुत्र, पौत्र व भाई, आणि सगेसोयरे, दोस्त व पुस्त दरपुस्त यांची दिवाणगिरी व कारभार गायकवाडांची दौलत तोवरी चालेल. दरम्यान बहाद्दरी कंपनीची असे. तुमचे पुत्र, बंधू, नातेवाईक व स्नेही यांस कोणतेंहि संकट आल्यास त्यांचा संभाळ इंग्रज सरकार करील, इतकेच काय, पण खुद्द बडोद्याचे महाराजांपासून सुद्धा जर तुम्हांस उपद्रव होऊ लागला, तर त्याचा बंदोबस्त इंग्रज करून देतील. तुमच्याकडे इनामी गांवें चालू आहेत ती तशीच चालू राहून त्या शिवाय सालिना साठ हजार रुपये तनखा इंग्रजांकडून तुम्हांस मिळेल. अशा त-हेने कंपनी सरकारच्या धोरणाचा कांटेरी लगाम बडोद्याचे राजे व प्रधानजी यांस घालण्यात आला. या कार्यकुशलतेबद्दल मेजर वॉकरची सगळीकडे चहा झाली. आरबांच्या जाचांतून आपली मुक्तता झाली म्हणन आनंदराव आनंदांत दंग होता. आपली कायमची व्यवस्था. १ त्रिंबकजी डेंगळा लागली व दिवाणगिरी वंशपरंपरागत पदरांत पडली म्हणून रावजी अप्पाजी खुषीत होता व गायकवाड पूर्णपणे आपल्या गळास लागला व आतां त्याने कितीहि प्राणान्तिक आदळआपट केली तरी त्याची सुटका होणे अशक्य म्हणून टोपीकर सुरवाचे निःश्वास टाकीत होता. एवंच, तिघेहि आनंदांत दंग होते; पण त्या आनंदांत परी होत्या, पर्याय होते. आनंद- रावाचा आनंद व रावजी अप्पाजीचे समाधान म्हणजे ते त्यांच्या सत्तेचे व मत्तेचे जात्या वेळचे विकट हास्य होते. यानंतर गायकवाडाच्या राजचिन्हांची प्रभा टोपीकराच्या राजदंडापुढे हतप्रभ होणार होती. जणुं त्या अमंगळ प्रसंगाची हा करार म्हणजे नांदी होती. ६ ३:: गायकवाडाच्या दरबारी गंगाधरशास्त्र्याचे महत्त्व बडोदें दरबारचा एकंदर पट कसा होता; इंग्रज, गायकवाड व पेशवे यांची सोंगटी कोठकोठे व कसकशी होती, कोण कुणाला शह देऊन बुर्जी करणार हा मोठा कौतुकाचा विषय होता. डावास रंग चांगला भरला होता हा डाव इंग्रज जिंकणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते, कारण वॉकरने आनंदरावाकडून आपणास पाहिजे तसा करार लिहून घेतला, आणि दरबारच्या दरबार घशांत टाकला. साहेबाची हुकमत जिकडे तिकडे चालू लागली. दिवाणास कोणी विचारीना, तर खुद्द खाशास्वारीकडे कोणी बघेना. असें झाल्याबरोबर जो तो पस्तावला व आपण हे काय केले म्हणून मनांतल्या मनांत चरफडूं लागला, आणि थेट देवघरापर्यंत गेलेले हे उंटाचे पिलूं कसें बाहेर काढावे याचा विचार आतां हे उंटावरचे शहाणे करूं लागले; पण त्याना कांही एक उपयोग झाला नाही. त्यांचा प्रत्येक बेत त्यांच्याच अंगा- वर बेतला जाऊन इंग्रज कायमचा बळावला. पहिल्यांदा रावजी अप्पाजीस ता. ८-६-१८०२ रोजी कंपनी सरकारने करार लिहून दिला व यानंतर सुमारे एक दीड महिन्याने म्हणजे तारीख २९-७-१८०२ रोजी आनंदराव गायकवाडाकडून कंपनी सरकारने करार लिहून घेतला आणि या दोन्ही करारांस वसईच्या तहांत बाजीरावाने मान्यता दिली. अशा त-हेने हे काम वज्रलेप झाले, पण पुढे लवकरच रावजी अप्पाजी मरण पावला; त्या योगें गायकवाड-दरबारांतील एक बऱ्यापैकी त्रिंबकजी डेंगळा ८३ मुत्सद्दी नाहीसा झाला व बडोदकरांच्या दौलतीत अत्यंत घोटाळे माजले. रावजीस औरस पुत्र नव्हता पण त्याचा वडील बंधु चिमाजी यास दोन पुत्र होते. त्यांची नांवें अनुक्रमें सखाराम व सीताराम अशी होती. मरणापूर्वी अवघे दोनच महिने ता. २२-५-१८०३ रोजी रावजी अप्पाजीने सीतारामास दत्तक घेतले. हा सीताराम व गंगाधरशास्त्री हे सम- वयस्क असल्यामुळे लहानपणचे खेळीमेळीचे दोस्त होते, पण पुढे राजकारणापायी परस्परांचे प्रतिस्पर्धी ठरले. सेनाखासखेलीची वस्त्रे घेऊन गोविंदराव गायकवाड बडोद्यास आला, त्याच वेळी रावजी अप्पाजी हा कारभारी म्हणून गुजराथेत आला आणि या रावजीचे आश्रित म्हणून गंगाधरशास्त्री पटवर्धनाचे वडील आले. रावजीच्या खटपटीने व शिफा- रशीने भेजर वॉकरने शास्त्र्यास दरमहा शंभर रुपयांवर गायकवाडांचा दरबार- वकील म्हणून ता. २-२-१८०३ ला नेमिलें, हाच गायकवाडातर्फे रेसिडेन्टाशी बोलणें-चालणे करीत असे. या वेळेपासून याची भरभराट सुरू झाली. शास्त्री तल्लख बुद्धीचा खटपटी आणि साहसी होता. त्याचा उपयोग टोपीकरांनी चांगलाच करून घेतला. असें जरी होते तरी हा केव्हां काय प्रसंग निर्माण करून आपणास गोत्यांत आणील याची धास्ती इंग्रजांस एकसारखी होती. अमीचा उपयोग घरे जाळण्याकरितां व अचाट शक्तीने जगाला चकित करणारी वाफ निर्माण करण्याकरितां सारखाच होतो. फक्त योजक डोक्याची काय ती जरूरी असते. ते टोपीकराजवळ असल्याने त्याने गंगाधरशास्त्र्याचा शंभर टक्के उपयोग करून घेतला. इंग्रजांशी बडोदेकरात बोलणारा हा वकील १८०३ पासून १८१२ पर्यंत- च्या अवघ्या नऊ वर्षांत मुतालिक झाला. बाराशे रुपये साल मिळविणारा हा सामान्य मनुष्य साठ हजारीचा सरदार झाला, व त्यास मुतालिकीसारखी बहुमानाची व अत्यंत विश्वासाची जागा मिळाली. शास्त्र्याची ही धनरेषा कशी उमटली ते पाहावयाचे. गोविंदरावानंतर आरबांचा दंगा मोड़न बडोद्यांत मेजर वॉकरच्या मदतीने शांतता प्रस्थापित करणारा रावजी अप्पाजी ता.१८-७-१८०३रोजी मरण पावला. त्याबरोबर त्याची दिवाणगिरी त्याचा दत्तक पुत्र सीताराम याजकडे गेली; पण सीताराम नामधारी दिवाण झाला. त्याच्या हातांत दुर्दैवी मोहरे या सर्व काडीइतकीहि सत्ता राहिली नाही. जिकडे तिकडे टोपीकराचा 'बीचमें मेरा चांदभाई सुरू झाला.' ही परिस्थिति सीतारामास असह्य झाली. याला कांहीं तोड काढावी म्हणून त्याच्या डोक्यांतील चाफें त्या दिशेने फिरूं लागली. याच वेळी म्हणजे स. १८०४ त होळकरांशी इंग्रजांचा सामना चालू होता, तेव्हां होळकरांची ग गर्दन मारण्याकरितां म्हणून इंग्रजांतर्फे गायकवाडी सैन्य गेले होते. त्या सैन्याचे सेनापतित्व सीताराम याचा थोरला भाऊ सखाराम व त्याचा आजा काकाजी फणसे याजकडे होते. त्यांनी इंग्रजांच्या हुकमाची तामिली न करता त्यांविरुद्ध वागण्यास सुरुवात केली. याच वेळी आडदांड कान्होजीनेंहि पण बंडावा सुरू केला. त्याबरोबर काठेवाडांत इंग्रजांविरुद्ध बराच मोठा उटाव झाला. पुंडगिरी, आदिकरण सीताराम दिवाण असावा असा वॉकरचा ग्रह झाला व त्याने त्याप्त कारभारांतून काढून टाकण्याचे ठाम ठरविले व तो त्याच्या राशीस लागला. गेल्याच वर्षी आपण त्यास दिवाणगिरी वंशपरंपरागत लिहून दिली काय, त्याच्या वालीद-वारसांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली काय, आणि आज आपले काम होतांच त्यास दिवाणपदावरून अर्धचंद्र देण्यास आपण सिद्ध होतों काय याचा सूक्तासूत विचार इंग्रजांजवळ नाही. मग हे करार तोंडी असोत वा कागदी असोत त्यांची पर्वा त्यांस नाही. प्रत्यक्ष लेखी पुरावा असतांनासुद्धा आम्ही असले करार केलेच नव्हते असें धादान्त खोटे बोलण्यापर्यंत सुद्धा त्यांची मजल जाईल; पण फिरंगा स्वार्थास सोडणार नाही. म्हणूनच भोळ्याभाबड्या सत्यासत्याच्या कल्पना उराशी धरणाऱ्या आम्हां हिंदूंवर त्यांनी मात केली व भारतवर्षात आपले अधि- राज्य केले. या यशाचे श्रेय बहुतांशी त्यांच्या या विचित्र नीतिमत्तेस आहे असे म्हणण्यास कोणत्याहि त-हेचा प्रत्यवाय नाही. बडोदेकरांचे वंशपरंपरागत दिवाण व टोपीकर यांचे बिनसले आणि त्यास पदभ्रष्ट करण्याच्या उद्योगास तो लागला. दिवाणाशी बिघडले तर बिघडले, राजाशी तरी त्याचे सूत असेल असं म्हणावे तर तसेंहि नाही. त्यांचे त्यांचेहि पार फाटले. अहमदाबादेची वहिवाट गोविंदरावाने पेशव्यांच्याकडून सालिना ५ लाखांच्या कराराने घेतली होती. पुढे १८०४ मध्ये हा करार बदलण्यांत आला व सालिना साडेचार लाख रुपये घेण्याचे ठरले आणि अहमदायादेची वहिवाट गोविंदरावाचा ज्येष्ठ राखीपुत्र भगवानराव याच्या त्रिंबकजी डंगळा नांव ठेवण्यांत आली. हा करार दहा वर्षांचा झाला. हा करार १८१४ त संपत होता, त्यामुळेच त्या वेळी पुढील भानगडी झाल्या. सीतारामास कारभारांतून काढावयाचे नक्की ठरले होते तेव्हां तें साध्य करण्यासाठी काहीतरी नवी क्लुप्ति केली पाहिजे त्याखेरीज आपले करणे साजून दिसावयाचें नाहीं असें वॉकरने ठरविले व त्या दृष्टीने त्याने आपली चाल चालविली. तख्तनशीन आनंदराव हा बिचारा गरीब आणि भोळा असल्यामुळे राजकारणाचे धक्के-चपेटे सोसण्याची ताकद त्याच्यांत नव्हती. तेव्हां नको ते राज्य आणि त्या भानगडी असे त्यास झाले होते. त्याचा वडील पुत्र भगवानराव हा हुशार व चणचणीत होता, त्यावर आनंदरावाची मर्जी होती. तो त्याचा लाडका होता म्हणून त्यास गादीवर बसवून आपण या जबाबदारीतून मुक्त व्हावे असे आनंदरावाच्या मनाने घेतले. आनंद- रावाच्या मनाने खूप घेतले, पण त्यास साहेबाची संमति नव्हती; कारण भगवानराव हा बाणेदार असल्यामुळे इंग्रजांच्या ओंजळीने पाणी पिणारा नव्हता. तेव्हां त्यावर वॉकर नाखूप होता. त्याच्या राजयोगाच्या मार्गात हा साहेब तर आडवा आला होताच; पण दुसरीहि एक अडचण होती. ती म्हणजे भगवानराव हा आनंदरावाचा दासीपुत्र होता. आनंदरावाच्या पहिल्या भेटीत त्याच्या मर्जीनुरूप आपली सर्व सूत्रे हलविणाऱ्या वॉकरने, आतां कार्यभाग होतांच, आपला रंग पालटला व धोरण बदलले. आनंद- रावाचा नाद सोडून गायकवाडाच्या घराण्यात फूट पाडण्याच्या उद्योगास तो लागला. आनंदरावाने भगवानरावास गादीवर बसविण्याचे मनांत आणतांच वॉकरने त्याचा भाऊ फत्तेसिंग यास हार्ती धरण्याचे ठरविले. वॉकरनेसुद्धां पुष्कळ ठरविले; पण त्यास आतां निराळेच स्वरूप येण्याचा घाट दिसू लागला. फत्तेसिंग ज्या त-हेने आपल्या हाती लागावा अशी वॉकरची इच्छा होती त्याच्या अगदी विरुद्ध गोष्टी होऊ लागल्या. फत्ते- सिंगास सुद्धां राज्यावर प्रस्थापित करण्यास एक अडचण होतीच, फत्ते- सिंगास गोविंदराव गायकवाडाने जेजुरीच्या खंडोबास वाहिले होते, त्यामुळे फत्तेसिंग व त्याची आई हे उभयतां जेजुरीस राहात असत; पण स. १८०२ मध्ये यशवंतराव होळकराने जेव्हां पुण्यास वेढा घातला त्या वेळी या माय- लेकरास त्याने आपल्या ताब्यात घेतले. इंग्रजांचे गायकवाडदरबारी वाढ- णारे वजन यशवंतराव होळकरास नको होते म्हणून इंग्रजांस तेथे हलके दुर्दैवी मोहरे करण्यासाठी त्याने या मायलेकरांची रवानगी गुजराथेत केली. तो स. १८०३ त सोनगडाजवळ आला, आणि तेथून हळू हळू जम बसवीत ता. २०-१०-१८०३ रोजी त्याने बडोद्यात प्रवेश केला व गहिनाबाईजवळ राहण्यास सुरुवात केली. गादीचा अस्सल वारस जवळ येतांच दरबारांतील मुत्सद्दी लोकांस एक तन्हेचा हुरूप आला. नादान आनंदरावाच्या खुळचट- पणाने गायकवाडांच्या दौलतीस लागलेले खग्रास ग्रहण आतां आपण नाहीसे करूं असें त्यांस वाढू लागले व दरबारास एक त-हेचें तेज चढले. दिवाण सीताराम, गहिनाबाई व अरब यांनी फत्तेसिंगास पुढारीपण देऊन बडोदे-दरबारास चांगलाच रंग आणिला. हे पाहून वॉकरचे धाबे दणाणले व आतां टोपीकराचे वर्चस्व नाहीसे होणार असें त्यास वाढू लागले. साध्या मार्गाने हा डाव जिंकला जाणार नाही अशी खात्री होतांच वॉकरने भेदनीतीचा अवलंब केला आणि आनंदरावाची आवडती बायको तख्ताबाई इला वश करून तिच्यामार्फत हा बनाव जागच्या जागी हाणून पाडला आणि आपणच फत्तेसिंगाच्या पठडीत शिरून सीतारामास दूर करण्याचा घाट त्याने घातला. या कामांत त्याच्या हातास यश आलें, फत्तेसिंग देवास वाहिला असल्याने त्यास गादीवर बसविण्यास धर्माची अडचण आली. तेव्हां शास्त्रार्थ काढून त्याची तुला ता. ३-४-१८०६ ला करण्यात आली. त्याचे साडेचार हजार रुपये ब्राह्मणांस वांटून फत्तेसिंगास शुद्ध करण्यांत आले आणि अशा त-हेने त्याच्या हाती मुखत्यारी देण्यात आली. या सर्व खटाटोपाने वॉकर बळावला व सीताराम नामधारी झाला याच साली वॉकरनें एक रीजन्सी कौन्सिल निर्माण केले. त्यांत मुख्यसत्ताधारी स्वतः इंग्रज म्हणजेच आतां वॉकर, रीजंट फत्तेसिंग, नेटिव्ह असिस्टंट गंगाधर शास्त्री, आणि दिवाणाच्या जागी सीतारामाच्या ऐवजी त्याचा चुलता बायाजी यास नेमले. बाबाजी हा मोठा शूर आणि पराक्रमी होता. त्याने तलवारीच्या बळावर काठेवाडांत माजलेले सर्व पुडावे जागच्याजागी जिरवून टाकिले होते. हा त्याचा पराक्रम वॉकरच्या नजरेसमोर होता. तेव्हां असला शूर योद्धा, दिवाण सीतारामाचा जवळचा नातेवाईक असल्याने, तो त्याच्या हाती लागू नये म्हणून त्यासच दिवाण करून सीतारामाचा पक्ष त्याने हलका केला. या नव्या रिजन्सी कौन्सिलमध्ये गंगाधरशास्त्री हा वकिलाचा नेटिव्ह त्रिंबकजी डेंगळा असिस्टंट झाला. बडोद्याचे राजकारण वॉकरने आपल्या लगामी लावले खरे; पण अजून एक आडदांड शक्ति त्याच्या हाती लागली नव्हती. या शक्तीस योग्य मार्गदर्शक लाभला असता, तर बडोद्याचा इतिहास उलटया- चा पालटा झाला असता. ही चित्शक्ति म्हणजे कान्होजी गायकवाड होय. इंग्रजांचे सामर्थ्य फोडून काढण्याकरितां म्हणून भीमबलाने धडका घेणारा कान्होजी निराश होऊन गायकवाडीबाहेर भटकत होता. त्याचा कोठे निभाव लागेना, तेव्हा त्याने सन १८०६ त वॉकरकडे तडजोडीचें बोलणे लावले. या बोलाचालींत दोन वर्षे निघून गेली व सन १८०८ त सालिना चाळीस हजार रुपये तनखा घेऊन पादरा येथे वास्तव्य केले. या स्थितीत त्याने जेमजेम दोन तीन वर्षे काढली. त्याच्या मानी प्रकृतीस है गुलामगिरीचे जिणे परवडेना. स. १८११ त त्याने बडोदे हस्तगत करण्याचा पुन्हा एकदां जोराचा प्रयत्न केला. त्यास राणी तख्ताबाईने माणसें व पैसा पुरविला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याच्या सर्व हालचालींवर पाळत ठेवून इंग्रजांनी ता. २-४-१८१२ ला पादरा येथे एकदम छापा घालून त्यास पकडले आणि त्याच्या पायीं बेड्या ठोकून प्रथम सुरतेस, नंतर मुंबईस व शेवटी मद्रासेस त्याची रवानगी केली. या शूर पुरुषाचा अंत तिकडेच झाला. त्याच्या निधनाने फत्तेसिंग वगैरे मंडळीस मोठी हळहळ वाटली; पण जबरदस्त इंग्रजांपुढे त्यांचे काही चालेना. आपल्या मृत माणसांबद्दल अश्रुमोचन करण्याची सुद्धा त्यांस चोरी झाली. कान्होजीस साह्य करणाऱ्या राणी तख्ताबाईस इंग्रजांनी सक्त बंदीत ठेविले. या सर्व भानगडींत इंग्रजांस गंगाधरशास्त्र्याचा चांगलाच उपयोग झाला. तेव्हां त्याजवर कंपनी सरकार खूष झाले व त्यांनी त्यास सालिना साठ हजारांचा तनखा व मुतालकी दिली. अशा प्रकारें गंगाधरशास्त्र्याचे महत्त्व गायक- वाडी माजलें. बडोद्यास हे रीजन्सी कौन्सिलचे नवें खूळ उत्पन्न झाल्यानंतर कारभारांत कोणत्याहि प्रकारची सुधारणा झाली नाही, इंग्रजांचे वर्चस्व मात्र वाढले. त्यांचा जाच दरबारास असह्य आला. उघडाउघड विरोध करण्याचे त्राण कोणांतच नव्हते. जो कोणी तसे करी त्याचा मुळापासूनच कांटा निघू लागला. तेव्हां अशा परिस्थितीत आपणांस त्राता आतां पेशव्यांशिवाय कोणी नाहीं असे त्यांच्या मनाने घेतले, व बडोदेदरबार मोठया आशेने पेशव्यांच्याकडे दुर्दैवी मोहरे . पाहूं लागला. याच सुमारास म्हणजे स. १८१३ ते १८१४ या सालांत हिंदुस्थानांत इंग्रजांविरुद्ध मोटें आंदोलन सुरू होऊन त्याचे वारे येथेहि वाहूं लागले होते. पण या वेळी बडोदेदरबारची स्थिति मात्र फारच केंविल- वाणी झाली होती. कारण सर्व कर्तबगार व पराक्रमी माणसे इंग्रजाने आपल्या दाव्यास बांधिली होती. गादीचा वुद्द मालक आनंदराव अगदीच नादान होता. फत्तसिंगास इंग्रजांविरुद्ध ब्र काढण्याची छाती नव्हती; शिवाय बडोद्यांतील या प्रमुरव मंडळींच्या हालचालींवर शास्त्र्याची बारीक नजर असे आणि त्यांच्यामार्फत त्या सर्व साहेबास कळत; तेव्हां ही पीडा येथून नाहीशी होईल तर फार चांगले होईल असें सर्वांस वाढू लागले व त्याप्रमाणे प्रयत्नांस सुरुवात झाली. मीताराम व राणी तख्ताबाई यांनी या कामी पुढाकार घेतला, व जोराने कामास सुरुवात केली. गोविंद बंधुजी गायकवाड नांवाचा आपला एक हस्तक पुणेदरबारी स्वटपटीम धाडला. त्याने खुरशेठजी मोदीची व त्रिंबकजी डेंगळ्याची गांट घेतली. त्यांची बडोद्याच्या राजकारणी कारस्थाने व खलबतें सुरू झाली, मुंबईकर इंग्रजांत फितुर माजवावा म्हणून गोविंदराव बंधुजीचा मेहुणा महिपतराव व दुसरा महंमददाऊद नांवाचा एक मुसलमान गृहस्थ हे दोघे मुंबईस ठाण देऊन बसले. या वेळी सर्व ठिकाणी हरिभक्त सावकाराच्या पेढ्या होत्या, त्यांच्यामार्फत या कारस्थानाची पंत्र येऊ-जाऊ लागली. मुंबईकर गव्हर्नराचे हाताखालील मुख्य मुख्य अधिकाऱ्यांस पैसे चारून बातम्या काढण्या- चा उद्योग सुरू झाला. राणी तख्ताबाई व सीताराम यांची रात्ररात्र खलबतें चालू लागली. त्यांनी आनंदरावाकडून गव्हर्नरास व पेशव्यांस खुद्द स्वदस्तु- रची पत्रं लिहून घेतली, की सीतारामाचे हवाली कारभार करावा व पेशवा हाच मराठी राज्याचा मुख्य चालक असल्यामुळे त्याने आपली सत्ता गायकवाडावर सांगून इंग्रजांचा जोर कमी करावा. अशा त-हेचा डाव खेळावा असा या मंडळींनी घाट घातला; पण या सर्व कारभारांत विघ्ने निर्माण करणारा शास्त्री हा होता. तेव्हां त्यास बडोद्यांतून हाकलावा असे त्यांनी ठरविले. शास्त्री हा आपल्या चुगलखोर स्वभावाने बडोद्यांत कसा सलूं लागला होता, तें यावरून चांगलेच स्पष्ट होते. गंगाधरशास्त्र्यास बडोद्यांतून काढावा व इंग्रजांस वित्तंबातमी देणारे हे एक अमोघ साधन नाहीसे करावे व पेशव्यांच्या सहायाने इंग्रजांस गायक- त्रिंबकजी डेंगळा ८९ वाडीतून हुसकावा असें राजकारण बडोद्यांत जोरांत शिजू लागले. इतकेच नव्हे तर त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू झाले. या वेळी पेशव्यांनी गायक- वाडाकडे दहा वर्षांच्या कराराने दिलेल्या अहमदाबादेच्या वहिवाटीची मुदत आतां संपत आली होती; तेव्हां ती वहिवाट पुढेहि गायकवाडांकडेच राहावी असे इंग्रजांस वाटत होते, व तसे प्रयत्न एल्फिन्स्टनच्यामार्फत बाजी- रावाकडे चालले होते. गुजराथची सुभेदारी गायकवाडाकडे चालू राहण्यांत इंग्रजांचा फायदा होता; कारण या ठिकाणी त्यांचे वर्चस्व आतां चांगले प्रस्थापित झाले होते, आणि गुजराथेंत त्यांचा मुलूरव ठिकठिकाणी पसरला होता. पण याच्या अगदी उलट बाजीरावाची स्थिति होती. त्यास अशी धास्ती वाटे की, यापुढे जर गायकवाडांकडे सुभेदारी चालू ठेविली तर तो एक कायमचा दाग्वला होऊन आपला हक्क शाबूत राहणार नाही. तेव्हां कांही झाले तरी गायकवाडाकडून ही वहिवाट काढावीच असें त्याने निश्चित ठरविले. ही गुजराथची सुभेदारो आपणांप्त मिळावी म्हणून पुष्कळांच्या खटपटी सुरू झाल्या. त्यांत खुरशेटजी मोदी व त्रिंबकजी डेंगळे हे मुख्य होते. खुरशेटजी मोदीने बाजीरावास इंग्रजांविरुद्ध चिथावण्यास सुरुवात केली, त्याचा बोभाटा इतका झाला की, बडोद्याहून शास्त्र्यानं करनॅक रेसि- डेन्टाच्या मार्फत एल्फिन्स्टनला असे कळविले की, बाजीरावास आपल्या- विरुद्ध चिथावणा-या मोदीस नोकरीतून एकदम कमी करा. गोविंदराव बंधुजीने पुण्यास येऊन गायकवाडामार्फत राजकारण असें कांहीं जोरांत चालविले की, पुण्याचा रेसिडेन्ट सतावून गेला व त्याने बडोदा रेसिडेन्टास खडखडीत लिहिले की, गोविंदराव बंधुजी पुण्यास राहून भलताच आगलावे- पणा करीत आहे तरी त्याम माघारी बोलवावें. अशा त-हेने या राज- कारणास मोठा जोर चढला होता; इतका की, उभयदरबारांतून तक्रारी सुरू झाल्या. तेव्हां त्यास पायबंद घालण्याचा इंग्रजांनी कसून प्रयत्न चालविला; पण दिवसानुदिवस हे राजकारण चिघळत गेले. या वेळी म्हणजे स. १८१५ गहिनाबाईने आनंदरावाचा वडील मुलगा भगवंतराव गायकवाड यास स्वतःचे पैसे देऊन गोविंदराव बंधुजीचे मदतीस पुण्याम धाडिलें. याच वेळी आनंदरावाची चौथी बायको गयाबाई म्हणून होती तिने आपला आपला मुलगा सयाजीराव यास कारभार द्यावा म्हणून पेशव्यांकडे खटपट चालू केली. याच वेळी आनंदरावाची शिष्टाईची पत्रे घेऊन येणाऱ्या भगवंत- दुर्दैवी मोहरे VAAN रावाचा दरबार भरवून बाजीरावाने मोठा सत्कार केला. या गोष्टीनेच साहेब चिडला, त्याच्या नाकाला मिरच्या झोंबल्या, लगेच बडोद्याच्या रेसिडेन्टाने रीजन्सी कौन्सिलचा रीजंट फत्तेसिंग याकडे त्याबद्दल जोराची तक्रार केली. तेव्हां फत्तेसिंग म्हणाला की, या प्रकरणी मला काहीहि करता येत नाही; फार झाले तर भगवंतरावाचा तनखा बंद करता येईल. यानंतर आनंदरावा- कडून इंग्रजांनी भगवंतरावास पत्रे पाठविली की, तुम्हीं ताबडतोब निघून बडोद्यास यावे. इंग्रजाने खूप लिहिले पण त्याप्रमाणे वागण्यास गोविंदराव बंधुजी व भगवंतराव थोडेच बांधले होते. ते पुण्यास ठाणे देऊन बसले होते ते निघता निघेनात. तेव्हां त्या उभयतांस आपल्या हवाली करण्या- बद्दल एल्फिन्स्टननें जंग जंग पछाडले पण त्याचा कांहीं एक उपयोग झाला नाही. आनंदरावाची लाडकी राणी तख्ताबाई इनें त्याच्या मनांत असे भरविले की, आपणच उठून पुण्यास पेशव्यांकडे जावे व हिशेबाचा घोळ मिटवून बडोद्याची व्यवस्था नीट लावून घ्यावी. या बातमीनें रेसिडेन्ट घाबरला. कारण पेशवे व गायकवाड हे एकमेकांस भेटल्यास नीट मजबुतीने आपआपली व्यवस्था लावून घेतील तेव्हां हा कुयोग न यावा म्हणून त्याने आनंदरावावर स्वतः पाहरा बसविला व त्यास बडोदा सोडून जाण्याची मनाई केली व अशा त-हेने हा बनाव टाळला. इंग्रजांच्या करामतीने आणि पकडापकडीच्या सैतानी धोरणाने वरील बनाव टाळला. पेशवे व गायकवाड यांचा मिलाफ होऊन त्यांनी इंग्रजांवर मात करण्याची शक्यता संपली; पण गुजराथच्या सुभेदारीची व मागील हिशेबाची भानगड तशीच राहिली. बाजीरावाने पैशाची मागणी जोरांत चालू केली व ते प्रकरण अत्यंत जिकीरीवर आले आणि त्यांतून काही तरी तड काढणे उभयपक्षास अत्यंत जरूरीचे वाटू लागले. गुजराथेंत पेशव्यांचा निम्मा हिस्सा होता, त्याची ठरलेली रक्कम वर्षाच्या वर्षास गायकवाडाकडून बहुधा चुकती होत होती, त्यांत कोणत्याहि त-हेचा वांधा निर्माण झाला नव्हता. नाही म्हणावयास मागील काही देणे होते त्यासंबंधी मात्र कुरबुर चालू होती; पण हे प्रकरण हातघाईवर येण्यास कारण झाले ते असे की, अहमदाबादेच्या वहिवाटीची मुदत स. १८१४ मध्ये संपत होती. तेव्हां ती वहिवाट गायकवाडाकडून काढून आपण स्वतः करणार असें पेशवे म्हणत होते. पेशव्यांनी गायकवाडाकडून वहिवाट काढण्यांत इंग्रजांचा तोटा होता;
त्रिंबकजी डेंगळा तेव्हां अहमदाबादेची वहिवाट पेशव्यांनी त्याकडेच ठेवावी असे त्यांस वाटत होते; त्याप्रमाणे त्यांची खटपटहि चालू होती. एल्फिन्स्टन बाजी- रावाकडे तशी भाषा बोलत होता. गायकवाडाकडे वहिवाट चालू ठेविल्यास तो कायमचा दाखला होऊन आपणास त्या हक्कास कायमचें मुकावे लागेल अशी साधार भीति बाजीरावास वाटत असल्यामुळे त्याने ही वहिवाट गायकवाडाकडून काढण्याचा निश्चय केला. अहमदाबादेची वहिवाट आपणाकडे असावी म्हणून अनेक लोकांच्या खटपटी चालू होत्या, त्यांत खुरशेटर्जा मोदी हाहि एक होताच. मोदी व एल्फिन्स्टन यांचे बरे नव्हते. स. १८०१ ते २ पर्यंत क्लोजच्या हाताखाली काम करीत असतां एलफिन्स्टनला मोदीच्या स्वभावाची पारख चांगलीच झाली होती. त्यामुळे आतां तो सर्व कारभार मोदीला बाजूला सारून आपण अखत्यारीतें करी. त्यामुळे एलफिस्टन व मोदी या उभय- तांत वितुष्ट आले होते. तेव्हां मोदीने बाजीरावाचें मन एल्फिन्स्टनविषयी कलुषित करण्याचा एकसारखा प्रयत्न चालविला होता आणि या कामा- साठी त्याने त्रिंबकजीस हाताशी धरला होता. त्याने त्याच्यामार्फत बाजी- रावास असा इषारा दिला की, आजपावेतों साहेबाची चाल होती तशी एल्फिन्स्टनची नाही. त्याच्याशी जाबसाल करणे तो संभाळून करीत जावा. त्यांनी आपले धोरण वेलस्लीसारखें ठेविले आहे. आपले ठिकाणी मजबुतीने राहावे म्हणजे त्याचा इलाज चालणार नाही. आपला माझा अन्तःकरणा- पासून लोभ आहे म्हणून हे सुचवितो.” हा उपदेश बाजीरावास रुचला आणि यापुढे त्रिंबकजी व शेटजी या उभयतांच्या सांगण्यावर बाजीरावाचा विश्वास जास्तजास्तच बसूं लागला; आणि ते सांगतील तसे तो वागू लागला. आंतून आंतून कामकाजास त्रिंबकजीस यापूर्वीच घेतले होते पण आतां त्यास उघड उघड सरदार करून त्याच्या ताब्यांत फौजफांटा देऊन त्यास कामगिरीवर धाडण्यास श्रीमंतांनी प्रारंभ केला. अशा त-हेनें त्रिंबकजी व मोदी यांची गट्टी जमून दोघेहि एल्फिन्स्टनविरुद्ध राजकारणे करूं लागले. आणि हे त्या उभयतांचे धोरण बडोद्याच्या प्रकरणी नडूं लागले. साहेयास वंगवण्यासाठी म्हणून मोदीने असे चालविले की, साहेब आपल्याशी बाकून वागतो तर वागेना! श्रीमंत आपल्या हातांत आहेत तेव्हां त्यांच्याकडून साहे- बाचे कामास वाटाण्याच्या अक्षता देण्यास सुरुवात केली की, लगेच साहेब ९२ दुर्दैवी मोहरे वंगेल व आपल्या कच्छपी लागेल. म्हणून त्याने बाजीरावास बदसल्ला देण्यास सुरुवात केली आणि या त्याच्या सांगण्यास त्रिंबकजीनेंहि पण भर दिली. हातांत बडगा असला, की साहेब नरम पडतो असे श्रीमंतांस त्या उभयतांनी सांगावे, की बाजीरावानें सैन्याची भरती कगवी. पेंढारी फौज टोपीकरास भारी आहे, ती परभार निजाम व इंग्रज यांच्या मुलुखांत लांडगेतोड करून पोट भरील व आपणास लागेल तेव्हां ती आपल्या उपयोगी पडेल. फक्त श्रीमंतांनी त्यांच्यावर आपला लोभ आहे असा थाट दाखवावा, ही त्रिंबक- जीची सल्ला श्रीमंतांस मानवली. श्रीमंत खूप झाले. त्याबरोबर शेठजी व त्रिंबकजी यांची चलती सुरू झाली. त्यांचा भरंवसा बाजीरावास जास्त जास्त वाढू लागला. स. १८१४त श्रीमंतांचा मुक्काम कोरेगांव येथे असतां पेंडायांचे सरदार त्रिंबकजीने आणवून श्रीमंतांस भेटविले. मोठी गोडीची भाषणे झाली. आमच्या मुलरवास उपद्रव न देतां परभारं पोट भरून असावे व प्रसंगी आमच्या उपयोगी पडावे, सरकारकडे तुमची चाकरी रुजू होईल काळजी नसावी. असा करार होऊन कृष्णाजी गायकवाड नांवाचा आपला हस्तक श्रीमंतांनी त्यांच्याकडे कायमचा ठेवून दिला व सरदारांस वस्त्रे देऊन निरोप दिला. बडोद्याचे रखेंकटें ज्या वेळी पुण्यास चालू होते त्या वेळी पेशव्यांच्या दरबारावर त्रिंबकजी व खुरशेटजी मोदी या उभयतांची पक्कड कशी बसली होती याची येथवर कल्पना दिली. खुरशेठजी मोदी व त्रिंबकजी यांची जोडी फोडल्याशिवाय पेशव्यांच्या दरबारांतील घोळ नाहींसा व्हावयाचा नाही असा निश्चय एलफिन्स्टनने केला व लगेच तसे करण्याचे ठरविले. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लिहून कळविले की, खुरशेटजी हा बाजीरावास आपल्याविरुद्ध चिथावीत असून उगीच नसत्या भानगडी उपस्थित करतो, तेव्हां त्यास कामावरून दूर करावें. याचे उत्तर वरून होकारार्थी येतांच त्यास रु. ५०० सेवानिवृत्त वेतन देऊन देशी जाण्यास सांगितले. यामुळे मोदीस अपमान झालासे वाटून त्याने अमृत प्राशन केले. अशा त-हेनें एल्फिन्स्टनच्या मार्गातील एक कांटा नाहीसा झाला हे जसे खरे, तसेंच त्रिंबकजीचा एक दोस्त नाहीसा झाला व त्याचा मार्ग तितकाच कठीण झाला हेहि खरें, आतां त्रिंबकजी व एलफिन्स्टन यांचा सामना सुरू झाला आणि वास्त- विक यापुढे ज्या घटना घडून आल्या त्यामुळे त्रिंबकजीचें नांव महशूर झालें.
त्रिंबकजी डेंगळा ९३. अहमदाबादच्या निम्या वसुलाची वहिवाट स. १८१४ त संपतांच ती बाजीरावाने गायकवाडाकडून काढून तिच्यावर त्रिंबकजीची नेमणूक ता. २३-१०-१८१४ ला केली. त्याप्रमाणे त्रिंबकजीने आपल्यातर्फेने काम करण्या- साठी म्हणून विठ्ठल नरसिंह नांवाच्या दुसऱ्या एका गृहस्थात रवानासुद्धा केला. अशा त-हेनें वहिवाटीचा मुद्दा निकालांत निघाला; पण अजून घोळ पुष्कळच बाबतीत शिल्लक राहिला होता. आनंदगव गायकवाडाकडे नजराण्याची रक्कम रु. ५६ लक्ष निघत होती, याशिवाय अहमदाबाद स. १७५३ पेशव्यांनी जिंकला त्या वेळेपासूनचे काही देणे तुंचत तुंबत ३ कोटी रुपयांपर्यंत गेले होते व या सर्व पैशाची मागणी बाजीरावाने एकटांकी गायकवाडाकडे केली. एकदम तीन कोट रुपये देण्याची गायकवाडाची ऐपत नव्हती. याशिवाय हा सर्व हिशेब गायकवाडास मान्य नव्हता. हिशेबाचा प्रश्न महत्त्वाचा होताच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे व गुंतागुंतीचे अनेक प्रश्न होते त्यांचा निकाल एकदांच लावून घ्यावयास पाहिजे होता. इतर कर्ज जसे सांचलें होतें तसेंच नजराण्याची रक्कमहि फारा दिवसांची साचलेली होती. गायकवाड हा पेशव्यांचा माडालिक तेव्हां त्याच्यावर हुकमत पेशव्यांची आहे किंवा नाही हा भोटा वादाचा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्न होता. नवीन वारस नेमतांना बाजीरावाने नजराणा घेण्याचा हक्क सोडणे म्हणजे आपले अधिराज्य गमावण्यासारखे होते. त्याचप्रमाणे कर्जाच्या वजावार्टीतसुद्धा इंग्रजांच्या हिताचे व बाजीरावाच्या मूलभूत महत्त्वाच्या हक्कांसंबंधीचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित होणार होते. तेव्हां पत्रोपत्री व वलित्याने हे काम भागणारे नव्हते म्हणून बाजीरावाने समक्ष वाटाघाटीसाठी गायकवाडाचे वकील पुण्याम बोलाविले. तेव्हां इंग्रजांस साहजिक वाटले की, या गुंता- गुंतीच्या जंजाळांत आपली बाजू बरोबर सांभाळील असा एकच पुरुष आहे व तो म्हणजे शास्त्री होय. स. १८१२ त एकदां फत्तेसिंगाने रेसिडेन्टास पत्र धाडून असे सुचविले होते की, शास्त्र्यास पुग्यास धाडावे म्हणजे तो आपल्या अकलेच्या जोरावर आपली बाजू बरोबर साभाळील आणि पेशवे दफ्तरांतील घोळ मिटवील. बडोद्यांत शास्त्री कोणासच नको होता तेव्हां ही ब्याद कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकदां पुण्यास जाईल तर फार चांगले असे प्रत्येकास वाटे. तेव्हां त्यास पुण्याला नेणारी ही एक संधि आयतीच चालून आली व इंग्रजांनी त्याच्या जिवाची जामीनकी घेतल्यावरून शास्त्री पुण्यास स. १८१४च्या फेब्रुवारीत दाखल झाला.
४ :: शास्त्र्याचा खून गंगाधरशास्त्री स. १८१४च्या फेब्रुवारीत पुण्यास येऊन दाखल झाला. शास्त्री काही सामान्य मनुष्य नव्हता, की तो वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे येईल व जाईल. ते एक बडे प्रस्थ होते. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी टोपीकर इंग्रजाने घेतली होती. त्याच्यामागें तीन सत्ताधाऱ्यांच्या तीन समशेरी खड्या होत्या. त्यांनी त्याचे संरक्षण करावयाचे, की त्याचा शिर- च्छेद करावयाचा हे शास्त्र्याच्या कर्तबगारीवर अवलंबून होते. बडोदेकरांच्या दरबारी इंग्रजांचे प्रस्थ माजवावयाचें व पेशवा हलका करावयाचा आणि हे शास्याच्या करामतीने तडीस गेले, की बडोद्याची दिवाणगिरी त्यास मिळावयाची हे निश्चित; पण हा डाव हुकला, की ज्या बडोद्यांत शास्त्र्याने फुले वेचली त्याच बडोद्यांत त्यास हिरमुसल्या चेहऱ्याने वागण्याचा दुर्धर प्रसंग येणार होता. हे कळले म्हगजे शास्त्र्याच्या महत्त्वाकांक्षेचा पल्ला केवढा मोठा होता याची स्पष्ट कल्पना येते. मुंबईच्या गव्हर्नरची गांठ घेऊन शास्त्री पुण्यास आला व त्याने पेशवे- दरबारचा ठाव घेण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानांत सर्व राजेरजवाड्यांच्या दरबारी बळावत चाललेल्या इंग्रजांचा हस्तक गंगाधरशास्त्री असल्यामुळे त्यालाहि थोडी 'ग'ची बाधा साहजिकच झालेली. पेशवा तर बोलून चालून गायकवाडांचा मालक; तेव्हां तोहि ताठच. अशामुळे दोन्ही बाजूंनी ताठ झालेली ही दोन टोके कशी मिळावयाची व त्यांत समेट कसा व्हावयाचा! तरी त्रिंबकजी डेंगळा सुद्धां उभयपक्ष आपल्या मगदुराप्रमाणे आपला डाव साधण्याचा तयारीत होते. शास्त्री पुण्यास आला; पण रेसिडेन्टाच्या मध्यस्थीशिवाय तो बाजी- रावाची गांठ घेईना. पेशव्यास देण्यासाठी गायकवाडाकडून आणलेला नजराणा रेसिडेन्टासमक्ष बाजीरावाने स्वीकारावा असा शास्त्र्याने हट्ट धरला. शास्त्र्याचे हे धोरण बाजीरावास बिलकुलच पसंत पडले नाही. अशा त-हेने पहिल्यापासूनच बैद्यास सुरुवात झाली. शास्त्र्याने प्रारंभीच दाखविलेली रगेली त्याच्या चांगलीच अंगाशी येण्याचा रंग दिसू लागला. कारण बाजीराव त्याची दादच घेईना मग हिशेबाठिशेबाची बात तर दूरच. बाजीरावाने असें चढाईचे धोरण स्वीकारल्याबरोबर त्याच्या कारभाऱ्यांनी शास्त्र्यास नादास लावून त्याच्याकडून पैसा उकळण्याच्या उद्योग सुरू केला. पण शास्त्री पक्का लुक्का असल्याने कारभारी मंडळींचे हे धोरण त्याच्या तात्काळ लक्षात आले; व हिशेबाच्या कामांत आपणास यश मिळत नाहीं असें त्यास पुरतेपणी वाटले. तेव्हां आतां येथे राहण्यांत कांहीं एक तथ्य नसून आपण बडोद्याचा मार्ग सुधारावा असेंहि त्याच्या मनाने घेतले. पण काम फत्ते न करितां बडोद्यास जाणे म्हणजे नामुष्कीचे जिणे, तेव्हां तेंहि करणे त्याच्या जिवावर आले. हिशेबाच्या कामाचा फडशा पाडून शास्त्री माघारी जाता तर सीतारामाची दिवाणगिरी त्याचीच होती, व मग दिवाण या नात्याने गायकवाडाचे हित पाहणे हे त्याचे कर्तव्य होते; पण त्याने हात हालवीत माघारी जाणे धोक्याचे होते. कारण मग तो इंग्रजांशी मिळून बडोदें व पुणे या दोन्ही दौलतीस धोका करणार हे ठरलेलें. तेव्हां या पेचास काय तोड काढावी हा मोठा प्रश्न बाजीरावास पडला. प्रथम बाजीरावानें बडोद्यास आनंदराव व फत्तेसिंग यांची स्थिति काय आहे याचा तलास काढिला, तो त्यास त्याच्या हेरामार्फत असे खात्रीपूर्वक कळले की, त्या दोघांसहि इंग्रजांचा तगादा आहे, ते त्यांच्या कैदेत असल्या- सारखे आहेत. इंग्रजांचा जाच त्यांस सहज होईना. या संकटांतून आपली मुक्तता पेशव्यांनी करावी. कारण पेशवे आपले धनी. ही त्यांची अपेक्षा अगदी रास्त होती. बाजीरावाने त्रिंबकजीमार्फत एल्फिन्स्टनला या बाबतींत सांगून पाहिले पण त्याने ह्या प्रकरणी हालचाल करण्याचे साफ नाकारले. दोघांची बोलणी पुष्कळच झाली. शेवटी एलफिन्स्टनने असें लख्ख दुर्दैवी मोहरे सांगितले की, "गायकवाड तहाने आमचा मांडलिक बनला." या उत्तराने बाजीराव उसळला व "गायकवाड पूर्वापार आमचा नोकर आहे, आमच्या परवानगीशिवाय तुमचा ताबा स्वीकारण्यास त्यास काय अधिकार ? तसेंच आमचा चाकर सुखांत आहे किंवा नाही हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. बडोदा रेसिडेन्टाच्या मध्यस्थीशिवाय त्यांची गांठ घेऊन आमची माणसें आली आहेत त्यांच्या सांगण्यावरून आनंदराव व फत्तेसिंग हे दोधेहि कैदेत असल्यासारखे आहेत असे आम्हांस कळते तरी या सर्व प्रश्नांचा खुलासा व्हावा." या सर्व प्रश्नांस एल्फिन्स्टन फक्त एकच उत्तर देई तें म्हणजे "तुमचा आतां गायकवाडावर हक्क नाही.” या उत्तराने बाजी- राव चिडून जाई व म्हणे, " आमचा हक्क गायकवाडावर नाही म्हणतां तर मग त्यास वस्त्रे कोण देणार, वस्त्रे देण्याचा हक्क आमचा आहे की नाही ? नसल्यास तो केव्हां नाहीसा झाला व इंग्रजांनी केव्हां घेतला ? वस्त्रे घेण्या- साठी गायकवाडांनी पुण्यास आले पाहिजे का नाही.” अशा त-हेचे अनेक प्रश्न विचारून बाजीरावाने एल्फिन्स्टनला निरुत्तर केलें. असा आणीबाणीचा प्रसंग आला की, इंग्रजांचा सनातन ठरलेला शिरस्ता म्हणजे कालहरणाचा; त्याचाच अवलंब एल्फिन्स्टननें केला, “आपण उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचा खुलासा गव्हर्नर जनरलकडे विचारून करतो" असे उत्तर देऊन ही वेळ तर एल्फिन्स्टनने मारून नेली. या वेळी इंग्रज पेचांत होता. नेपाळांत त्यास अपयशांचे रट्टे बसत होते व भोपाळच्या नबाबावर शिंदा चालून गेला होता. तेव्हां पेशव्यांची कुरापत काढणे आतां तितकेसें श्रेयस्कर नसल्या- मुळे एल्फिन्स्टनने वेळ मारून नेली. शास्त्री १८१४ च्या फेब्रुवारीत पुण्यास आला व पांचसहा महिने त्याने इकडे तिकडे खटपट करून पाहिली पण कोठेच कांहीं डाळ शिजेना. एल- फिन्स्टनलाहि पण बाजीरावाने निरुत्तर केले, तेव्हां दसऱ्याच्या सुमारास एल्फिन्स्टनने शास्त्र्यास कळविलें की, आतां तुमच्याने हे खेकटें नेटेलसें दिसत नाही; तरी तुम्ही माघारी जावें. साहेबाच्या या सांगीने शास्त्री सर्द साला. कदाचित् या वेळी तो माघारी जाता तर त्याच्या जिवास अपाय झाला नसता; पण शास्त्री काम न करता माघारी जाण्यास नाखूष होता. त्याच्या- सारख्या महत्त्वाकांक्षी माणसास असें हात हालवीत माघारी जाणे म्हणजे केवळ मरण! हिशेबाचे काम फत्ते करून जाण्यांत त्यास एक त-हेचा मान त्रिंबकजी डेंगळा होता, भूषण होते. याशिवाय गायकवाडाची दिवाणगिरी त्यास मिळणार होती. पण काम न करतां जाणे म्हणजे बडोद्यांत कोण फजीतवाडा व नाचक्की! शास्त्री हिशेबाचे काम न करतां गेला तर तो कमजोर होऊन त्याचे सर्व बेत ढांसळणार होते व सीतारामास जोर चढणार होता हे ठरलेले तेव्हां ही आपत्ति टाळण्याकरितां म्हणून शास्त्र्याने एल्फिन्स्टनजवळून आणखी थोडे दिवस खटपट करण्याची संधि मिळविली. गायकवाडावर अधिराज्य कोणाचें-पेशव्यांचे का इंग्रजांचे-याबद्दल गव्हर्नर जनरलकडून कांहीं खुलासा आला का नाही कोणास ठाऊक; पण एल्फिन्स्टनने मात्र इ. सन १८१५ च्या फेब्रुवारीत बाजीरावास पुढील- प्रमाणे रोखठोक कळविलें. "गायकवाडावरील ताबेदारी तुम्ही सोडावी. तसेंच सीताराम रावजीचे दोन वकील गोविंदराव बंधुजी व भगवंतराव हे आमच्याविरुद्ध तुमच्या दरबारी भलत्याच भानगडी करीत आहेत तरी त्यांस आमच्या हवाली करावें. या दोन गोष्टी तुम्ही कराल तरच आम्ही गायकवाडाकडील तुमचे येणे येण्यासाठी मध्यस्थी करूं नसल्यास या कामा- साठी आलेल्या शास्त्र्यास माघारी पाठवून आम्ही हे काम येथेच सोडूं." एल्फिन्स्टनच्या या म्हणण्यास बाजीरावानें कांहींच भीक घातली नाही. त्याने त्यास तितक्याच जोरांत कळविले की, गायकवाडाच्या बाबतीत आम्हांस तुमच्या मध्यस्थीची बिलकुल गरज नाही." बाजीरावाकडून हे उत्तर येतांच एल्फिन्स्टनने शास्त्र्यास बडोद्यास परत जाण्याबद्दल पुन्हां सुचविले; पण शास्त्र्याने ते ऐकले नाही व त्यावर अशी तोड काढली की, मी आतां स्वतंत्रपणे पाजीरावाशी बोलणे करून काही मार्ग निघाला तर पाहतों व त्यांत अपयश आल्यास मी माघारी जाण्यास तयार आहेच, एल्फिन्स्टन व शास्त्री यांच्यामध्ये गायकवाडाच्या राजकारणासंबंधी चाललेली ही भाषा बाजीरावास कळतांच त्यास मोठा पेंच पडला. कारण इंग्रजांनी मध्यस्थी सोडल्यास गायकवाडाकडील कर्जास कायमचाच खार लागणार होता. या बाबतीत सीताराम रावजीने पेशव्यांस असें आमिष दाखविले की, 'तुम्ही शास्त्र्याचा नाद मोडा. गायकवाडाकडील सर्व देणे आम्ही वसूल करून देऊ." सीता- राम रावजीचे हे बोलणे शक्य होण्यास एक मोठी अडचण होती ती म्हणजे इंग्रजांचे पडोदें दरयारांतील वजन ही होय. इंग्रजांचे प्रस्थ कमी झाल्या- दुर्दैवी मोहरे शिवाय शास्त्री नामशेष होणे शक्य नव्हते व अशी स्थिति झाल्याशिवाय सीताराम रावजीच्या बोलण्यांत राम नव्हता. बरे शास्त्री रागावून माघारी गेला तर इंग्रज बिथरेल व मग गायकवाडावरील आपला हक्क व पैसा या दोन्हींसही मुकण्याचा आपणांवर प्रसंग येईल, असे त्रांगडे होते; तेव्हां या गंडांतरांतून सुटण्याकरितां बाजीराव व त्रिंबकजी या दोघांनी निराळाच घाट घातला. आजपर्यंत शास्त्र्याशी त्यांची वागणूक अत्यंत तुसडेपणाची होती ती सोडून त्यांनी त्याच्याशी प्रेमाची वागणूक सुरू केली व गायकवाडाकडील देण्याघेण्यासंबंधी सामोपचाराची भाषा सुरू झाली. बाजीरावाने शास्त्र्यास असे सुचविले की, गुजराथेत सात लाखांचा मुलूरव गायकवाडाने आम्हांस तोडून द्यावा म्हणजे गायकवाडाचे सर्व देणे आम्ही त्यास सोडून देतो. बाजीरावाचे हे म्हणणे शास्त्र्यास पसंत पडले. वास्तविक पाहतां या योजनेंत दोन्ही पक्षांचा फायदा होता. गायकवाडास आज एवढी मोठी रक्कम देण्याचे टळत होते व पेशव्यांच्या ताबेदारीतून त्याची कायमची मुक्तता होत होती. तसेंच पेशव्यांची राज्य वाढविण्याची इच्छा सिद्धीस जात होती. अशा त-हेनें हिशेबाचा घोळ काही तरी पर्यायाने मिटणार अशी आशा दिसतांच उभयपक्षांतील प्रेम वाढीस लागले. एक ठिकाणी बैठकी व मेत- कुठे होऊ लागली. शास्त्री आणि बाजीराव यांच्यामधील ही खलबतें सन १८१५ चा मार्च आणि एप्रिल अशी तब्बल दोन महिने चालू होती. या दोन महिन्यांत त्रिंबकजी व बाजीराव यांनी शास्त्र्यावर आपल्या वाग- गुकीची मोहिनी टाकून त्यास जवळ जवळ आत्मसात् केले. शास्त्रीहि एक- दर पेशव्यांच्या वागणुकीवर खूष झाला. कारण बाजीराव व त्रिंबकजी यांनी त्याच्याभोवती टाकलेले गळहि पण तसेच सामर्थ्यवान होते. आता बडोद्यास कशास जातां, येथेच राहा व आमचा कारभार पाहा. माणकेश्वरा- च्याने ते काम नीट रेटत नाही. आम्हांस तुमच्यासारखा बाका मुत्सद्दी लाभेल तर मराठी राज्याची विसकटलेली घडी आम्ही नीट बसवू." त्रिंयकजी व बाजीराव यांच्या असल्या गोड भाषणांनी शास्त्र्याच्या अंतः- करणाचा ठाव घेतला. बडोद्याचा दिवाण होण्याची शास्त्र्याची सामान्य महत्त्वाकांक्षा; पण त्यास खुद्द पेशव्यांचे दिवाणपद घरी चालून आले त्या- मुळे तो बेहद खूष झाला. शास्त्री पुण्यास मोठ्या थाटाने राहात असे. तो त्रिंबकजी डेंगळा पहिल्यांदा एलफिन्स्टनच्या भेटीला गेला त्या वेळच्या त्याच्या दिमाखावरून शास्त्र्याच्या थाटाची आणि डामडौलाची कल्पना येते. शास्त्री आला तो चिंचवडास उतरला आणि तेथून त्याची स्वारी एल्फिन्स्टन्च्या भेटीस निघाली. त्या वेळच्या त्याच्या स्वारीचा थाट म्हणजे गायकवाडाच्या वकिलास शोभण्यासारखा. गायकवाडाचे शे-दोनशे स्वार पुढेमागे चालत आहेत, मध्ये एक अंबारीचा हत्ती झुलत आहे, तर त्याच्या पुढे दुसरा नुसताच डुलत चाललेला अशा थाटाने चाललेली ही वकिलाची स्वारी रेसिडेन्टाच्या बंगल्यावर येऊन, नंतर या वकिलाची व रेसिडेन्टाची भेट मोठ्या थाटाने झाली. त्याने आपल्या मुलाची मुंज ता. १९-४-१८१५ रोजी पुण्यांत मोठया थाटाने केली. मुंजीस खुद्द पेशव्यांची स्वारी आली होती. मुंजीचा थाट मोठाच झाला. शास्त्र्याने ब्राह्मणांस शालजोड्या देऊन त्यांचा मोठा सन्मान केला. यानंतर गंगाधरशास्त्र्यास पेशव्यांचा व्याही होण्याचा सुप्रसंग आला. बाजी- रावाची मेहुणी (बायकोची बहीण) लमाची होती ती शास्त्र्याच्या मुलास देण्याचे घाटू लागले. ही सर्व बोलाचाल त्रिंबकजीमार्फत चाले. त्यामुळे शास्त्री व त्रिंबकजी यांचा स्नेह चांगलाच जमला. पुढे शास्त्र्यासमवेत ठिक- ठिकाणच्या यात्रा करण्याचे ठरले व लगेच नाशीक, त्र्यंबक येथे जाण्याचा बेत ठरून स्वाऱ्या निघाल्या. बाजीरावाने लम नाशकास करण्याचे ठरवून त्या बेताने सामान, माणसे व कुटुंब बरोबर घेतलें, शास्त्री कोणत्या मुहूर्तावर पुण्यास आला देव जाणे पण आता त्याचे भाग्य शिगेला पोंचलें. प्रथम स्नेही, नंतर दिवाण व नंतर व्याही अशा एकापेक्षा एक सरस अशा परम भाग्याच्या पायऱ्या त्याचें देव चढले; पण आता मात्र त्याच्या भाग्यश्रीस दृष्ट लागली, ती भंगली व कोलमडून खाली पडण्याच्या पंथास लागली. लग्नांत विघ्न निर्माण झालें तें असें. शास्त्र्याने सात लाखांचा मुलरव पेश- व्यांस तोडून देऊन कर्जातून मुक्त होण्याबद्दल बडोदे दरबारची मंजुरी मागि- तली होती, त्याचे उत्तर फत्तेसिंगाकडून नकारात्मक आले आणि या एका गोष्टीने पुढील सर्व गोंधळ माजविला व त्यांत विचाऱ्या शास्त्र्याचा अंत झाला. असे हे कथानक सुखान्त दिसतां दिसतां त्यास भलतेच वळण लागून त्याचे पर्यवसान दुःखान्त झाले. एखादें सुंदर चित्र पूर्णपणे तयार होण्याच्या बेतात असावें, तो त्यावर एखादा सुरा फेकला जाऊन ते टर्कन फाटले जावे. कळस चढविण्याच्या ' दुर्दैवी मोहरे मंगल प्रसंगी दुर्दैवाने मंदिराचा सभामंडप कोसळून पडावा, तशांतलाच प्रकार प्रस्तुत वेळी झाला. शास्त्र्याने सुचविलेली तडजोड फत्तेसिंगाने फेटाळली, त्याबरोबर शास्त्री घावरला. त्यास काय करावे हेच सुचेना. बाजीरावास ही गोष्ट ताबडतोब सांगण्याचा त्यास धीर होईना आणि खरो- खरीच त्याच्या परिस्थितीचा विचार करितां तें कठीणहि होते. ज्या एका गोष्टीवर पेशव्यांच्या दरयारी शास्त्र्याची चहा चालू होती त्याच गोष्टीवर कुन्हाड असली. त्याबरोबर शास्त्र्याची बैठक ढळली व ती त्यास सावरता येईना व काय करावें ते सुचेना. बाजीरावाच्या कचाट्यांतून आपली कशी सुटका होईल या एकाच गोष्टीचा तो आतां विचार करू लागला. मुलाचे लम आतां नको, पुढे पाहूं असें शास्त्र्याने बाजीरावास कळविलें. तेव्हां आतां इतक्या नांवारूपास आलेले हे लग्न मोडण्याचे त्रिचकजीच्या जिवावर आले, कारण या लग्नाने फार पुढचा पल्ला गांठला होता. लग्नाची मोठी तयारी झाली होती, जिकडे तिकडे थाट उडाला होता व भंडळी जमा झाली होती. तेव्हां अशा स्थितीत लम मोडणे मोठे कठीण झाले होते, त्याचे पदरी मोठी नामुष्की येत होती. मराठी साम्राज्याच्या मालकाचा हा मोठा अपमान होत होता व याचा सूड आपण पुरेपूर घेतला पाहिजे असे विचार त्रिंबकजीचे मनांत येऊ लागले. या भरीत भर म्हणून बाजीरावाची आणखी एक आगळीक शास्थ्याकडून झाली, ती म्हणजे बाजीरावाच्या बायकोने शास्त्र्याच्या बायकोस भेटीस बोलाविलें, पण बाजीरावाचा या बाबतींतील लौकिक जाणून शास्त्र्याने आपल्या बायकोस वाड्यांत धाडण्याचें नाकारले. या वर्तना- ने आपला अत्यंत अपमान झाला असें बाजीरावाच्या मनाने घेतले आणि शास्थ्याचे ग्रह फिरले. आम्ही इतके नमते घेत असतां व लांगूलचालन करीत असतां शास्त्री उद्धटासारखा वागतो, त्याला आमची कांहींच पर्वा नाही, तेव्हां त्यास या गोष्टीबद्दल चांगला धडा शिकविला पाहिजे असे उभयतांच्या मनाने घेतले. ही धनीचाकराची जोडी एकमेकांस अगदी योग्य व अनुरूप अशीच होती. बाजीराव वहिमी व भित्रा, तर त्रिंबकजी काळीज नसणारा कर्दनकाळ. तेव्हां उभयतांची वक्रदृष्टि शास्त्र्याकडे पळली व त्यास लंबे करण्याचा बेत झाला. आतां शाज्याच्या मनांत आपणांबद्दल काहीएक किंतु राहूं नये म्हणून त्रिंयकजीने जास्तच लघळ- त्रिंबकजी डेंगळा 'पणा चालवला. नाशिकच्या यात्रेला स्वारी चालली असतां त्रिंबकजीने शास्त्र्यास असे सांगितले की, तुमचा आमचा स्नेह जमला नसता तर तुमचा कांटा काढावा असासुद्धा आमचा विचार झाला होता. ही थातमी शास्त्र्याने एलफिन्स्टनला सांगितली. त्याबरोबर तुम्ही असल्या घातक माणसावर विश्वासून राहणे गैर आहे असे तो म्हणाला. या वेळी शास्त्री आणि पेशवे यांच्यामधील स्नेहभाव इतक्या थराला पोचला होता की, अशी वेडीवांकडी शंका घेणे शास्त्र्याच्या बुद्धीच्या बाहेरचे होते. किंबहुना शास्त्र्याचे म्हणणे फत्तेसिंगाकडून फेटाळले गेले नसते तर उभयतांच्या स्नेहास उत्तम फळेंहि आली असती. आतां वातावरण सर्वच बाजूंनी बिथरल्यामुलें लम राहिले, नाशिकची यात्रा संपली व आषाढ आला. तेव्हां आषाढी एकादशी- निमित्त सर्वोसह पुन्हा पंढरपुरच्या यात्रेस जाण्याचा बेत बाजीरावाने केला. या यात्रेस मोठ्या लवाजम्यानिशी न जातां थोडेच लोक घेऊन जावें असें बाजीरावाने ठरविले. शास्त्र्याच्याबरोबर त्याचा मदतनीस बापू भैराळ म्हणून होता त्याने पंढरपूरच्या यात्रेस येऊ नये असे त्रिंबकजीने सुचविलें. बापू भैराळ हा मोठा धूर्त व चाणाक्ष होता. अंतस्थ बातम्या काढण्यांत त्याचा हातखंडा होता. तो बरोबर असल्यास शास्त्र्यास जागा करील म्हणून त्यास बरोबर घेतले नाही. पेशव्यांनी मैराळाला पुष्कळ बरोबर घेतले नाही पण तो राहिला कसा व आपल्या जिवास धोका आहे ही कल्पना शास्त्र्यास असता त्याने त्यास राहू दिले कसे याचा मोठा अचंबा वाटतो. खुद्द एल्- फिन्स्टनसुद्धा आपल्याबरोबर नसावा असे वाटल्यावरून बाजीरावाने त्यास सुचविले की, आम्ही थोडेच लोक घेऊन पंढरपुरास जात आहों दर्शन घेऊन लगेच माघारी येऊं, तरी आपण येण्याची तसदी घेऊ नये. बाजीरावाची ही सूचना एलफिन्स्टनला पटली व त्याने त्या अवधीत वेरूळची लेणी पाहून येण्याचे ठरविले. अशा त-हेची व्यवस्था होऊन बाजीरावसाहेबांची स्वारी ज्येष्ठ वद्यांत नाशकाहून पंढरपुरास जाण्यास निघाली. पंढरपुरचा मार्ग आक्रमीत असतां बाजीरावाने अशी कंडी पिकविली, की नागपुराहून कांहीं मारेकरी आपला जीव घेण्याकरितां आले आहेत. तसेच हैदराबादेहून काही पठाण त्याच उद्देशाने निघाले आहेत. या हुलीमुळे रस्त्यांत बाजीरावाच्या संरक्षणार्थ मोठा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.
दुर्दैवी मोहरे थाजीराव कोणासहि भेटेना. जवळ हत्यारबंद पहारेकरी नेहमी सज्ज राहूं लागले. पंढरपुरास पोंचल्यानंतर हा बंदोबस्त जास्तच कडक राहूं लागला. गोविंदराव बंधुजी याच्याशी बाजीरावाचे सूत जमून तो त्रिंबकजीच्या माणसाबरोबर पंढरपुरास दाखल झाला. ही बातमी शास्त्र्यास कळतांच त्याने त्याबद्दल त्रिंबकजीकडे तक्रार केली. त्रिंबकजीने शास्त्र्यास या बाबतीत व्यवस्थित त-हेने सांगून त्याच्या मनांतील किंतु नाहीसा केला. आषाढ शुद्ध अष्टमीच्या दिवशी पेशव्यास मेजवानीचा बेत झाला, त्या प्रसंगी शास्त्री भोजनास गेला होता. त्या वेळी कमीजास्ती खाणे होऊन शास्त्र्याची प्रकृति बिघडली. पुढे काही दिवस त्यास बिलकुल चैन पडेना. शास्त्र्याने बाजीरावास कळविले की, माझी प्रकृति बरीच खालावली असून बाहेर येण्याची ताकद माझ्यांत उरली नाही. 'आतां शास्त्री बडोद्यास येत नाही' अशा अर्थाचे पत्र गोविंद रावाने राणी तख्ताबाईस लिहिलेले शास्त्र्यास मिळाले. म्हणून तोहि बंदोबस्ताने राहूं लागला. घरी कोणी भेटावयास आल्यास त्यास भेटूं नये असें त्याने ठरविलें. ता. १७ जुलै १८१५ रोजी आषाढी एकादशी होऊन गेली व पुढे दोनतीन दिवसांनी म्हणजे ता. २० जुलै १८१५ रोजी अस्तमानी लक्ष्मणपंत नांवाचा एक मनुष्य त्रिंबकजीकडून शास्त्र्याकडे आला व म्हणूं लागला की, 'उदईक पेशव्यांची स्वारी माघारी परतणार व आतां दाटी नाही तरी आपण आज या वेळी दर्शन करून परत जावें.' मला चालण्याची ताकद नाही. असा निरोप शास्त्र्याने त्रिंबकजीस धाडला. तरी सुद्धा पुन्हां तोच निरोप शान्याकडे आला, तेव्हां शास्त्र्याने रावजी मराठे नांवाचा आपला एक इसम त्याकडे धाडला व शास्त्र्यास चालवत नाही, असे त्याने त्यास सांगितले. तरी सुद्धा त्रिंबकजीने आपला हट्ट सोडला नाही. 'आज दर्शनाची सोय चांगली आहे' आपण एकवार येऊन जा' असा निरोप मराठ्यामार्फत त्रिंबकजीचा आला; तेव्हां मात्र वारंवार नाही म्हणणे बरे नव्हे, त्यांत हटवादीपणा दिसतो; व असें केल्यास त्रिंबकजीस वैषम्य वाटेल आणि हे गाडे जास्तच बिथरेल म्हणून जवळ सात्त बिनहत्यारी माणसे घेऊन शास्त्री देवदर्शनास निघाला. वाटेने जात असता 'योळांत शास्त्री कोणता ?' म्हणून कोणी विचारले, तेव्हा हे गळ्यांत कंठा असणारे शास्त्री म्हणून एकाने दाखविले. याकडे कोणी लक्ष दिले 'आज त्रिंबकजी डेंगळा नाही, मंडळी तशीच देवळांत गेली. दर्शन झाले. नंतर शास्त्रीबुवा त्रिंबकजी तात्याजवळ क्षणभर बसून बिन्हाडाकडे निघाले. शास्त्रीबुवा पुढे होते व त्यांचा हात रामचंद्र बडदे यांनी धरला होता. इतक्यांत देवळांत शास्त्र्यास त्याचा वृद्ध उपाध्याय भेटला. त्याच्यापाशी आपले तीन लोक प्रसादासाठी ठेवून बाकीच्या चार इसमांसह शास्त्री निघाला. बोळांतून वाट दाखविण्यास त्रिंबकजीचे शिपाई पुढे चालले होते, मंडळी भवानी- बाबा यांचे जाग्यापासून सुमारे दहा पंधरा हात पुढे गेली असतील नसतील तो बोळांत गलबल झाली. काहीजणांना तरवारीचा परज लागला, आणि एकदम पाठीमागून तीन इसम 'वाट द्या, वाट द्या' म्हणून मोठ्याने ओरडत गर्दी मोडत धावत आले. एकाने शास्त्रीयोवास पाठीमागून तलवारीने वार केला. आणि दुसऱ्या दोघांनी पुढून येऊन त्यांचे तुकडे केले. त्याबरोबर शास्त्रीबोवाचे मशालजी मशाली टाकून पळाले. शास्त्र्यांनी बरोबर घेतलेल्या चार इसमांस थोड्याबहुत जखमा झाल्या होत्या, पण त्यांनीसुद्धां पोबारा केला. इतक्यांत वृद्ध उपाध्याय व बाकीचे तीन इसम त्याच वाटेने आले आणि चुडी घेऊन न्याहाळतात तो शास्त्र्याची खांडोळी त्यांच्या नजरेस पडली आणि हातांत नागव्या समशेरी घेऊन देवळाकडे धावत येणारे पांच इसम दिसले. घडल्या प्रकारावरून हा खून त्रिंबकजीने स्वतःच्या खास देखरेखीखाली करविला अशी सर्वांची खात्री झाली. काही मंडळी व सरकारचे शिपाई शास्त्र्याचे प्रेत घेऊन नाकेबंदीतून आणि चौक्यांतून नदीवर गेली. पुंडलिकाचे उजवे बाजूस दहनविधि करून उजाडतांना माघारी आली. अशा त-हेने शास्त्र्याचा ग्रंथ आटोपला. या भयंकर प्रकाराची चौकशी होऊन खुनी कोण त्याचा तपास जारीने करून अपराध्यास या घोर कृत्याबद्दल शासन करा असे शास्त्र्याच्या मंडळींनी त्रिंबकजीस सांगितले. त्यावर तो म्हणाला- "शास्त्र्याची गत अशी झाली, होऊ नये गोष्ट होऊन गेली ! तरी पुढील चौकशी जारीने करून अपराध्यास या घोर कृत्याबद्दल शासन व्हावें. आपण व बाजीरावमहाराज झाल्या प्रकाराबद्दल फार दिलगीर आहोत. कालचा महापूजेचा बेत होता तो रहित झाला असे सांगितले. शास्त्र्याचा आमचा स्नेह जिव्हाळ्याचा, त्याच्या संरक्षणाची खबरदारी आम्ही घेतली, पण आकाशाच्या कु-हाडीस काय करावे, शिवाय शास्त्री- " बोवास पाण्यात पाहणारे लोक फार! कोणाचा म्हणून वहीम घ्यावा ? सीताराम रावजी कैदेत आहे तो तर शास्त्री दुनियेपार केव्हां होईल याची वाटच पाहतो. दुसरा, इंग्रजांच्या कैदेत दिवस ढकलणारा बंडखोर कान्होजी गायकवाड, तोहि शास्त्र्यावर समशेर उपसून आहे. तेव्हा हे कृत्य कोणाचें म्हणून सांगावे ? दगेकरी कर्नाटकी होते म्हणून शास्त्र्याची मंडळी म्हणू लागली. तेव्हां मारेक-यांनी भाषा कर्नाटकी वापरली म्हणून ते कानडी असावेत असा भास झाला, पण शास्त्रीबुवास मारून जाते समयीं 'पुरे झालें ही अक्षरे मराठी भाषेने बोलले. मग कर्नाटकी असोन मराठी बोलले, की मराठी असोन कर्नाटकी वेष न कळे ! दुसऱ्या दिवशी शास्त्र्याची मंडळी पुण्यास आली, तेव्हां त्यास बाजीराव व त्रिंबकजी यांचा निरोप पोंचला की, तुम्ही आतां आमचे भेटीस येऊ नये. यानंतर बाजीराव व त्रिंबकजी हे उभयतां मोठ्या कडक बंदोबस्ताने राहूं लागले. हे प्रकरण आपल्यावर शेकते की काय अशी त्यांस सारखी धास्ती वाटत होती. या खुनाचा तपास करावयाचा. अपराध्यास शासन करावयाचे. अशांतला प्रकार त्यांनी काही एक केला नाही. उलट या खुनाचा कोणी उच्चार सुद्धा करूं नये, कोणी केल्यास त्यांची नांवें त्रिंबकजीस कळवावी म्हणून हेरांचे जाळे विणण्यांत आले. गोविंद बंधुजी व भगवंतराव पुण्यांत निर्भयपणे वावरू लागले. अशा त-हेने जुलै महिना संपला. खुनानंतरचे दहापंधरा दिवस असेच गेले.
जबरदस्ताचा न्याय - पंढरपुरांत शास्त्र्याचा खून झाला. ' शास्त्री कोणता?' म्हणून विचारतां 'गळ्यांत कंठा आहे तो' तसेच 'पुरे झाले' म्हणून उच्चारले गेलले शब्द, कानड्याने मराठी उच्चारले का मराठ्याने कानडीची नक्कल केली का घाबरून कंपितपणे उच्चारले गेले याचा झालेला गोंधळ शास्त्र्याची झालेली खांडोळी, मशालीच्या प्रकाशांत झास्त्र्याच्या आश्रितांनी पाहिली. शास्त्र्याचे दहन झाले. एवढा मोठा शास्त्री पण त्याची राजकारणाच्या कचाट्यांत तीन चिमटी राख झाली. ही बातमी आगीसारखी सर्व देशभर पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय झाला. गायकवाडाचा वकील पंढरपुरी मारला गेला असें जो तो म्हणू लागला. पुढे काय होते याच्याबद्दल जो तो अत्यंत उत्सुकतेने विचार करू लागला. या खुनामुळे गायकवाड दूरबारी काय गोंधळ होतो. पेशव्यांच्यावर हे प्रकरण कितपत व कसे शेकते आणि कंपनी- सरकार काय धोरण आंखतें असा हा तीन पदरी तिढा होता. त्यांतून बऱ्याच भानगडी निर्माण होणाऱ्या होत्या. शास्त्र्याच्या खुनाची बातमी एल्फिन्स्टनला वेरुळास कळली. त्याबरोबर त्याच्या मनास आनंद झाला का धक्का बसला हे निश्चितपणे सांगतां येत नाही. पण आपले राजकारण तडीस गेले किंवा जाण्याच्या मार्गास लागले म्हणून त्याच्या मनास आनंदच होण्याचा संभव फार. कारण शास्त्याच्या दुर्दैवी मोहरे AN -~-~-~~-~- बायतीत त्याने माहीत असून सहेतुक टाळाटाळ केली होती. नाशिकच्या यात्रेस जातांना "आमचें व पेशव्यांचे हिशेबाच्या बाबतींत न जमते तर डेंगळा माझा खून करणार होता” असे शास्त्र्याने एल्फिन्स्टनला सांगितले, त्या वेळेपासून व त्याच्या आधीपासून शास्त्र्याचे महत्त्व त्याच्याभोवती खेळणारे राजकारण आणि गायकवाड व पेशवे यांच्या दरबारांत प्रमुखपणे वावरणारी उच्छृखल भंडळी पाहिली, म्हणजे शास्त्र्याच्यासंबंधी ही बातमी म्हणजे स्वप्नांतहि न होणारी गोष्ट झाली असें एल्फिन्स्टनला वाटण्याचे काहीच कारण नव्हते. पण ही बातमी कळतांच एलफिन्स्टनने मात्र फारच कडक धोरण आखले व या बाबतींत आपणावर कोणतीच जबाबदारी नाही; फक्त अपराध्यास कडक शासन करणे हेच काय ते आपण करावयाचे अशा बाण्याने तो शेवटपर्यंत वागला. खुनाची बातमी कळतांच त्याने बाजीरावास वेरुळाहून एक पत्र धाडले की, 'गुन्हेगारांचा तपास करून त्यांस ताबडतोब शिक्षा करा.' तसेच गव्हर्नर जनरलकडेहि सर्व हकीगत इत्थंभूत कळवून पुढील कामकाजासाठी जादा अधिकार त्याने मागविला व आपण वेरुळा- हून निघून ता. ६ ऑगस्ट रोजी पुण्यास पोचला. वाटेंत पंढरपुराहून निघालेली मंडळी त्यास भेटली. त्यांच्याजवळ खुनासंबंधी चौकशी करतां त्यांनी त्रिंबकजीचें नांव घेतले व जास्त तपासाअन्ती त्रिंबकजीचें नांव जास्त जास्तच त्याच्या नजरेस आले. ह्या खुनाची बातमी हां हां म्हणतां सर्व हिंदुस्थानभर पसरली व काही दिवस सर्वांच्या चर्चेचा हा एक विषय झाला. या प्रकरणी, एल्फिन्स्टननें, बाजीराव व नेहमी चढया आवाजाने बोलणारा त्रिंबकजी, हे दोधे कचाट्यांत सापडतांच त्यांच्यावर चांगलीच शिस्त धरली. ता.६ ऑगस्टला एल्फिन्स्टन पुण्यास आला व त्रिंबकजी ता. ७ ऑग- स्टला आला. त्याने या खुनाच्या प्रकरणी कांही तपास करावा, ते काही एक न करतां कालक्रमणा करण्यास सुरुवात केली. गोविंदराव बंधुजी व भगवान- राव उजळ माथ्याने वावरू लागले. नागपंचमीला म्हणजे ९ ऑगस्टला बाजीराव पुण्यास आला तो अगदी गुपचुप, बुरख्याच्या पालखीतून, नेहमीप्रमाणे सलामी किंवा कांहीं एक थाट झाला नाही. श्रावणांतील दक्षिणेस मोठ्या थाटाने व दिमाखाने प्रारंभ व्हावयाचा त्यांतील कोणताच प्रकार न.होतां एकदम सामसूम व उदास झाले. बाजीराव व त्रिंबकजी याखुनामुळे अंतर्यामी फार घायरले व या प्रकरणाचा शेवट काय होणार याची त्रिंबकजी डेंगळा Vvvv/v/JVM त्यांची त्यांनाच कल्पना येईना. भयंकर गोष्ट होऊन गेली आता काय करावें याचा त्यांस उमज पडेना. रेसिडेन्ट काहीतरी जबरदस्त प्रकार करणार अशी त्यांची खात्री होऊन चुकली व त्यांतून बचाव करण्यासाठी म्हणून त्यांनी फौजा जमविण्यास सुरुवात केली. एल्फिन्स्टनने जालन्याची तैनाती फौज घोडनदीस आणून ठेविली. अशा त-हेने फौजांची हालचाल झाली पुण्यांतील लोक हवालदिल झाले. बडोद्याच्या लोकांशी कोणीहि कांहीहि संबंध ठेवीना की नीटपणे बोलेना. बाजीराव व त्रिंबकजी यांचा संबंध खुनाशी येईल असे सर्व काही नाहीसे करण्याच्या खटपट्टी सुरू झाल्या. हे एल्फिन्स्टनला कळतांच ता. ११ ऑगस्ट रोजी एल्फिन्स्टनने याजी- रावास ताबडतोब आजच्या आज भेट पाहिजे म्हणून खलिता धाडिला. आज आमची प्रकृति बरी नसल्याने भेट होणार नाही.' लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हां ताबडतोब भेट पाहिजे म्हणून एल्फिन्स्टनने निरोप धाडिला. यावर 'आजच जन्मलेली आमची मुलगी वारली. तीन दिवस अशौच आहे. सबब भेट होणार नाही म्हणून जबाब धाडला. त्यावर एल्फिन्स्टनने एक खलिता लिहून तो सदाशिव माणकेश्वराजवळ दिला व त्यास तो बाजीरावास देण्यासाठी लिहिले. त्यास, माझ्याच्याने खलिता देणे होणार नाही, असें माणकेश्वराने कळविलें. तेव्हां एल्फिन्स्टननें तो खलिता आपल्या मुनशीबरोबर देऊन त्यास बाजीरावाकडे पाठविले. मुनशी- चीसुद्धां बाजीरावाने भेट घेतली नाही. मात्र त्याने एक पर्याय केला तो असा की, आपली दोन माणसें पत्रांत काय मजकूर आहे तो समजावून घेण्याकरितां रेसिडेन्सीत पाठविली. त्या मंडळीस साहेबाने असे सांगितले की, 'या गुन्ह्याच्या प्रकरणी खुद्द पेशव्यांच्यासंबंधी आमचे काहीएक म्हणणे नाही. अपराधी त्रिंबकजी आहे त्यास आमचे स्वाधीन करा म्हणजे झाले; पण त्याला वाचविण्याचा प्रयत्न जर पेशवे करतील तर मात्र त्यांवर जबाबदारी येईल." असा पत्रांतील मजकूर आगाऊ कळल्यानंतर बाजी- रावाने ते पत्र ता. १५ ऑगस्टला स्वीकारले. त्या पत्रांत मजकूर रखालील- प्रमाणे होता:- "तुम्ही स्वतः ब्राह्मण आहां तेव्हां ब्राह्मणी राज्यांत ब्राह्मणाचा खून होणे तुम्हांस सुद्धा प्रशस्त वाटणार नाही. खरा गोंधळ काय झाला व काय होत आहे याची तुम्हांस कल्पना नसावी. तेव्हा खरा प्रकार काय आहे तो तुमच्या - दुर्दैवी मोहरे कानांवर घालणे भाग आहे. खुनाची मुख्य जबाबदारी त्रिंयकजीवर येते, याविषयी आम्हांस काडीइतकीहि शंका नाही. सर्व जग या प्रकारा- संबंधी असेच बोलत आहे. खुनास इतके दिवस झाले असतां यासंरंधी तुम्ही किंवा त्रिंयकजी कोणत्याहि प्रकारचा तपास करीत नाही, वहिमी माणसास पकडीत नाही. तपास करण्याविषयी आम्ही आग्रह धरीत असतां त्रिंबकजी त्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. त्रिंबकजीविरुद्ध भरपूर पुरावा आहे. तोच या खुनाचा प्रेरक, तेव्हां त्यास गोविंदराव बंधुजी व भगवंत- राव या तिघांस पकडून एकदम कडेकोट बंदोबस्तांत ठेवा. या गृहस्थांच्या- संबंधी तुमची जरी खात्री नसली तरी त्यांस पकडण्यास भरपूर इतका पुरावा आहे. त्याचा पुढे काय निकाल द्यावयाचा तो गव्हर्नर ज. व तुम्ही मिळून देणे तो द्यावा; पण या लोकांस अटक करण्यांत एक क्षणाचाहि विलंब करूं नये एवढेच काय ते माझे म्हणणे आहे. परराष्ट्राचा वकील तुमच्या डोळ्यांदेखत मारला गेल्याने तुमची बाहेर बेअब्रू झाली ती धुऊन काढण्यासाठी म्हणून तुम्हांस या गोष्टी करणे भाग आहे. नाहीतर या एकट्या त्रिंबकजीमुळे तुमचे राज्य गोत्यांत आल्यावांचून राहणार नाही. कारण असल्या भयंकर माणसा. च्या हातांत फौज व सर्वाधिकार आहेत. निजाम, गायकवाड व इंग्रज यांच्या सरहद्दींस तुमची सरहद्द भिडलेली असल्याने त्या सर्वांस नुकसान पोचण्याचा संभव आहे.त्रिंबकजी जे काही अत्याचार करील त्या सर्वांची जबाबदारी तुम- च्यावर पोंचल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी तुम्हांस वेळेवर सावध करीत आहे. यापुढे परराष्ट्राचे कोणीहि वकील तुम्हांकडे येण्यास धजणार नाहीत. त्या योगें कंपनी सरकारशी तुमचा संबंध तुटेल. हे सर्व परिणाम लक्षात घेऊन तुम्हांस काय करणें तें करा व काय करता तें ताबडतोब कळवा. त्रिंबकजी- च्या जागी दुसऱ्या कोणास नेमावयाचे त्याचा विचार तुमचा तुम्ही पाहा. तुमच्या अंतर्व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याची आमची बिलकुल इच्छा नाही." या खालित्याने बाजीराव अगदी गोंधळून गेला. त्यास काय करावें तें सुचेना. तुम्ही आम्ही समक्ष भेटून काहीतरी निकाल करूं असा मोघम निरोप त्याने या खलित्याला धाडिला व भेटीचा दिवस नेमला, तोहि जरा दूरचा. त्यावर एल्फिन्स्टनने भेट ताबडतोब घ्यावयाची असेल तर घ्या आणि भेटीच्या वेळी त्रिंबकजी असता कामा नये असे कळविले. यावर सदाशिव -माणकेश्वराबरोयर याजीरावाने कळविले की, आमच्या मते खुनाशी . .
. त्रिंबकजी डेंगळा त्रिंबकजीचा काहीएक संबंध नाही, केवळ तुमच्या मोहबतीखातर आम्ही' त्यास बंदीत ठेवण्यास तयार आहोत." ही गोष्ट एल्फिन्स्टनला मान्य झाली, पण ही गोष्ट करण्याची बाजीराव पुन्हा टाळाटाळ करूं लागला. त्रिंबकर्जाने तरी स्वस्थ बसावे की नाही; पण त्याने तसे न करतां बापू भैराळ व इतर बडोदेकर माणसांचा छळ चालविला. त्यांस पुण्यास राहणे धोक्याचें वाटू लागले. तेव्हां ते इंग्रज हद्दीत रेसिडेन्टाच्या आश्रयास जाऊन राहिले.. त्यांची बरीच मंडळी त्रिंबकजीने फितुर केली. बापु भैराळ रेसिडेन्सींत जाऊ लागला; त्याबरोबर त्रिंबकजीस फितुर झालेल्या लोकांनी त्याला पगारासाठी अडवून धरले. तेव्हां लगेच एल्फिन्स्टनने सव्वा लाख रुपये भरून त्याची सुटका केली. त्रिंबकीने मोठ्या फौजा जमा केल्या, तेव्हां एल्फिन्स्टनने बाजीरावास कळविले की, तुम्ही फौजा पुण्यांतून काढून न्या नाहीतर आम्हांस घोडनदीची फौज येथे आणावी लागेल आणि त्याचा परिणाम भयंकर होईल, तेव्हां बाजीरावाने त्यांस कळविले की, इंग्रजांशी वैर करण्याची आमची इच्छा नाही; पण त्रिंबकसि हस्तगत करावयाचा तो दमादमानेच केला पाहिजे, कारण तो सामान्य सरदार नाही. त्याच्याजवळ दहा हजार स्वार व पांच हजार पायदळ इतकी मोठी फौज सज्ज आहे. याशिवाय ५०-६० किल आहेत. अशा इसमास पकडणे ही गोष्ट सोपी नाही. शिवाय त्याच्या अंगी गुन्हा लागू केल्याशिवाय कायद्याने त्यास पकडतां येत नाही. कारण ज्या इसमांनी खून केला त्यांचा व त्रिंबकजीचा काडी- इतकाहि संबंध नाही. तेव्हां या बाबतीत घिसाडघाई करूं नये असें आम्हांस वाटते." बाजीराव आणि एलफिन्स्टन यांच्यामध्ये ही पत्रापत्री व निरोपानिरोपी चालली होती, त्या अवधीत त्रिंबकजी स्वस्थ नव्हता. त्याच्या भानगडी चालू. होत्या. एल्फिन्स्टनने त्याच्याविरुद्ध पुरावा गोळा केला होता तो नाहीसा करण्यांत तो गुंतला होता आणि बाजीरावाचीहि त्याला फूस होती. त्रिंयक- जीस कोठे तरी बाहेर धाडावे, त्याने तेथे बंड उभारावे, त्यास पेशव्यांनी गुप्तपणे साह्य करावें व इंग्रजांचा समाचार घ्यावा असे बेत चालू होते. या बनावास तोंड देता यावे म्हणून एल्फिन्स्टनचेहि उद्योग चालू होते. त्याने हैदराबादची फौज जालन्यास योलावली आणि त्रिंबकजी याहेर सटकल्यास मंडावा करील म्हणून त्याच्या पाठीवर जाण्यासाठी कर्नल स्मिथची नेमणूक .
दुर्दैवी मोहरे केली. याशिवाय बाजीरावाच्याहि क्लप्त्या चालू होत्याच. याखाली ऑगस्ट गेला. म्हणजे खुनापासून महिना दीड माहना नुसता नमनावारी गेला. १ सप्टेंबरला गव्हर्नर जनरलचा रेसिडेन्टास हुकूम आला त्यांत त्याने बाजीरावा- संबंधी आंखलेल्या धोरणास पूर्ण संमति दिली व त्याबरोबर बाजी- रावास असे पत्र आले की, “ त्रिंबकजीस अटक करून चौकशीअंती त्याच्यावर जरी गुन्हा शाबीत झाला तरी त्यास फांसावर न चढवितां जन्म- ठेप कैद करण्यांत येईल; पण गुन्हयाचा तपास झालाच पाहिजे आणि त्या- साठी तुम्ही तुमच्या हाती असेल ती सर्व सत्ता उपयोगांत आणून आमच्या रोसिडेन्टास मदत केली पाहिजे. तुम्ही जर त्रिंबकजीचा बचाव कराल किंवा त्यास फरारी होण्यास संधि द्याल तर मात्र फार जड जाईल. हे प्रकरण येथेच न थांबतां फार विकोपास जाईल." याशिवाय एल्फिन्स्टनला असा हुकूम आला की, यापुढे बाजीरावाशी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिंबकजी पळून न जाईल असा कडेकोट बंदोबस्त ठेवा. ग. ज. चा असा हुकूम येतांच एल्फिन्स्ट- नला जोर चढला होता. इतका वेळ एल्फिन्स्टन त्रिंबकजीला अटक करा असें नुसते म्हणत होता; पण ग. ज. ने त्यापुढे जाऊन डेंगळ्याचा ताबा मागि- तला. ग. ज. चा हा हुकूम व त्यासोबत आपले पत्र बाजीरावास एल्फिन्- -स्टनने ता. ४ सप्टेंबरला धाडिलें तें पाहून बाजीरावाच्या मनाला काय करावें याचा निश्चय होईना. इंग्रजांशी दोन हात करावे की काय करावे याचा निकाल लागेना. आपण व डेंगळा उभयतांनी बाहेर जाऊन युद्ध करावे असा मनाचा निश्चय बाजीरावाने प्रथम केला पण त्यास बापू गोखल्याने हरकत घेतली. ४ सप्टेंबरच्या पत्रांत एलफिन्स्टनने बाजीरावास बजाविले होते की, 'डेंगळ्याचा ताबा न घाल तर इंग्रज फौजा पुण्यास वेढा देतील. या धमकीमुळे बाजीरावास काही तरी निर्णय देणे क्रमप्राप्त होते; तेव्हां ता. ४ सप्टेंबरला आपले सर्व मित्र व मुत्सद्दीमंडळ जमा करून त्याने बरीच भवति न भवति केली व दुसरे दिवशी सकाळी रेसिडेन्टास निरोप धाडला की, आम्ही त्रिंबकर्जास अटक करतों आपण ताबा मागू नये. यावर एलफि- न्स्टनने कळविले की, प्रथम त्यास अटक करा मगच भाषा बोला. त्यावरून ता.५ सप्टेंबर रोजी डेंगळ्यांस अटक करून त्याची वसंतगडावर रवानगी केली! डेंगळ्याची रवानगी वसंतगडास झाली, त्याबरोबर त्याच्या देण्याघेण्याच्या व्यवहारासंबंधी बरीच घालमेल उडाली. त्यासंबंधीचा उल्लेख पुढील त्रिंबकजी डेंगळा १११ आशयाचा आहे-'डेंगळ्यास अटक होण्याच्या आदल्या दिवशी' चवेचा- ळीस हजारएकशे पस्तीस होन घोड्यावर घालून निंबाजी जाधवाने ताथवड्यास नेले ' ताथवड्याच्या ताब्यासंबंधी चैदा झाला तेव्हां हा ऐवज फलटणास जानोजीराव नाईक निंबाळकराच्याकडे ठेवण्यात आला. डेंगळा बंडखोर ठरतांच त्याचा ऐवज वसूल करण्याचे काम विंचूरकराकडे आले. विंचूरकरा- चे धरणे फलटणी गेलें, निंबाळकराने विंचूरकराचे कारभाऱ्यास दरबारखर्च म्हणून तीन हजार रुपये दिले व आपल्या वाटेस न जाण्याबद्दल आणि चौकशी न करण्याबद्दल ठराव केला. या चौकशीच्या धांदलीत एका गृहस्था- कडे ( त्यांचे नांव नाही) चार हजार रुपये रोख व अडीच हजारांचे दागिने सांपडले ते घेऊन विंचूरकरांचा कारकून उठून आला. या ऐवजांत आणखी दीड हजारांच्या दागिन्यांची भर पडली ती निंबाजी जाधवाच्या घरांतील अशा त-हेनें डेंगळ्याकडील ऐवज थोडाबहुत वसूल करण्यांत आला. डेंगळ्यास टोपीकर इंग्रज मागू लागले तेव्हां तो आळंदीस गेला होता. आळंदीहून माघारी येतांच दुसऱ्या दिवशी त्याने हरीभगवंत व श्रीपति जामदार यांच्या साह्याने सोने, रु, रोकडा, व कपडा लांबविला. हो ना करतां करतां व बगल देतां देतां त्रिंबकजीची रवानगी शास्त्र्याच्या खुनामुळे वसंत- गडावर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी हरी भगवंताने खंडू शिंदा व गंगाजी खाटीक यांस किल्ले ताथवडे येथे अटकेत ठेविले. हे दोन्ही इसम शास्त्र्याच्या पाळतीवर होते. त्यांच्याकडे शास्त्र्यासंबंधीची बातमी पोचविण्याचे काम होते. शास्त्र्याच्या खुनास वाचा या लोकांच्यामुळे फुटेल म्हणून त्यांस कैद केले होते, पण शेवटी तसेच झाले. काही दिवसांनंतर या कैद्यांची रवानगी फलटण येथे झाली. तेथे त्यास जास्तच त्रास होऊ लागला. तेव्हां त्या जाचास व कटकटीस कंटाळून त्या लोकांनी 'शास्त्र्याचा प्रत्यक्ष खून करण्याचे काम 'दाजिबा डफळा' याने केले असे सांगितले, या दोन कैद्यांपैकी गंगाजी खाटीक हा पुढे राबीणसाहेबाकडे नोकरीस होता. त्रिंबकजीकडून शास्त्र्याच्या मारेकऱ्याचे नांव जरी कळले नव्हते तरी ते अशा त-हेने बाहेर पडले. गंगाजी खाटीक हा इंग्रजाचा नोकर होता. ता. ६ रोजी सकाळी रोसडेन्टास तसे केल्याचे कळविले; पण हे प्रकरण येथे थांबले नाही. रोसडेन्टाने त्यास कळविलें की, डेंगळा पळून जाऊन काही बंडावा जर करील त्याचा जाब तुम्हांस द्यावा लागेल व मग ११२ दुर्दैवी मोहरे ....V.. भलताच गोंधळ होईल. तेव्हां तो प्रसंग टाळण्यासाठी तुम्ही त्रिंबकजीस आमच्या ताब्यात द्या म्हणजे सर्व पैदा मिटेल व तुमचे आमचे व्यवहार पूर्वी- प्रमाणे सलोख्याने चालू होतील. तसे न कराल तर ग, ज. कडून काही कडक हुकूम आल्यास मला नाइलाजाने त्याची अमलबजावणी करावी लागेल. या गोष्टींचा नीट विचार करा व काय करणे असेल तें ताबडतोब करा. डेंगळ्यास बाजीरावाकडून झालेली अटक म्हणजे केवळ नाटक होते व ते रेसिडेन्टा- जवळ यशस्वी तन्हेने वठविण्याकरितां सदाशिव माणकेश्वराची रवानगी झाली होती. तो एलफिन्स्टनची मनधरणी करूं लागला, साहेब, आपण डेंगळ्यास ताब्यात घेण्याचा हट्ट सोडा त्यास पेशव्यांतर्फे अटक झालीच आहे, एवढ्याने आपलें समाधान होईल व न झाले तर तें मी हर प्रयत्नाने करतो असे आश्वासन श्रीमंतांस देऊन मी आलो आहे. तरी आपण माझे एवढे ऐका व मला यश द्या. नाहीतर माझी धडगत नाही. मला विषप्राशन करून जीव द्यावा लागेल. माणकेश्वराच्या या लघळपणास एलफिन्स्टननें दाद दिली नाही. या अवधींत बाजीरावाने वाईस जाऊन बंड उभारण्याचा घाट घातला. त्याबरोबर एल्फिन्स्टनने शिरूरची फौज पुण्यात बोलावून बाजीरावास असा शेवटचा व निर्वाणीचा निरोप धाडला की, "त्रिंबकजीस हवाली करा म्हणजे सर्व प्रकरण मिटेल. उगाच चिडाचिडी वाढू देऊ नका, त्यापासून तुम्हास धोका आहे. त्रिंबकजीस हवाली करा आणि शास्त्र्याच्या कुटुंबास थोडी नुकसानभरपाई द्या म्हणजे सर्व भागेल. यापेक्षां तुमचा हेकाच तुम्हांस तडीस न्यावयाचा असेल तर त्यास आमची तयारी आहे. पण त्यांत तुम्हांस धोका आहे हे लक्षात ठेवा." हा निरोप बाजीरावास कळला त्या वेळी मेजर फोडे हा बाजीरावाच्या बोलावण्यावरून भेटीस आला होता व तसेच या वेळी मोरो दीक्षित मराठे याची कारभारावर नेमणूक झाली होती त्यास चिमाजी अप्पाने व बाजीरावाने मिळून या डेंगळ्याच्या प्रकरणी काय काय करावे म्हणून विचारले, तेव्हां फोर्डने सांगितले की, डेंगळ्यास स्वाधीन करणे तुमच्या हिताचे आहे. ही साहेबाची सल्ला बाजीरावास मान- वली. लगेच फोर्डच्यामार्फत त्रिंयकजीस स्वाधीन करतो म्हणून एलफि- न्स्टनला त्यांनी निरोप पाठविला. त्यायरोयर लगेच ता. ११ सप्टेंबर रोजी के. हिक यास ८५० लोक बरोबर देऊन वसंतगडास धाडण्यांत आले. ता. १९ सप्टेंबरला त्रिंबकजी वसंतगडावर कॅ. हिकचे स्वाधीन झाला पुढे पांच- त्रिंबकजी डेंगळा सहा दिवसांनी म्हणजे ता. २५ ला गोविंद बंधुजी व भगवंतराव या दोघांस रोसिडेन्टाचे स्वाधीन करण्यांत आले. ता. २६ रोजी तिघांची रवानगी ठाण्याच्या किलयांत करण्यांत आली. शास्त्र्याचा खून झाला त्याबरोबर एलफिन्स्टनचे माथे खवळले व त्याने नरसिंह-अवतार धारण करून डेंगळ्यास व त्याचे साथीदार गोविंदराव बंधुजी व भगवंतराव यांस पकडले व त्याची ठाण्याच्या किल्ल्यांत रवानगी कली. अशा त-हेने बाजीरावाचा नक्षा उतरविला म्हणून त्याची सगळीकडे चहा होऊ लागली. इंग्रजांची बाजू संभाळली इतकेच काय पण इंग्रजांच्या सत्तेस पेशवे दरबारी नवें तेज चढले म्हणून ग. ज. ने एल्फिन्स्टनला शाबासकी दिली. बाजीरावास घडलेल्या कृत्याबद्दल आपला जिगरदोस्त आपल्या हाताने कंपनी सरकारच्या स्वाधीन करावा लागला! ह्या प्रसंगांतून निसटण्यासाठी म्हणून बाजीरावाने शक्य त्या सर्व पळवाटा काढल्या व हा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून शिकस्तीचे प्रयत्न केले. पण कंपनी सर- कारच्या अगस्थाळीपणामुळे त्यास हार खावी लागली; आणि कंपनी सर- कारचा कांगावखोरपणाच शेवर्टी यशस्वी ठरला! कारण शास्त्र्याचा खून झाला तो बाजीरावाभोंवतीं वावरणाऱ्या बेलगाम वृत्तीच्या आडमाप स्वभावाच्या लोकांनी केला आणि इंग्रजांस हवी असलेली संधि एलफिन्स्टन- च्या बुद्धीमत्तेमुळे चालून आली. कारण शास्त्री पुण्यास आला तो इंग्रजांनी त्याच्या जिवाची हमी घेतली म्हणून; पण टोपीकर इंग्रजाने त्याच्या जिवाचें रक्षण केले नाही, तर उलट तो मारला जावा म्हणून शत्रुपक्षाच्या लोकांना वाव दिला आणि त्याचा खून होतांच खुनी इसमांना शिक्षा करण्याचे व आपलें बडोद्याचे राजकारण तडीला नेण्याचे काम मात्र झपाट्याने केले, वास्तविक एखाद्याच्या जिवाची जामीनकी घ्यावयाची म्हणजे तो मारला गेल्यानंतर खुनी इसमांना दंड करावयाचा किंवा फाशी द्यावयाचे असे नसून खून न होईल अशीच दक्षता बाळगावयाची; पण त काम इंग्रजांनी केले नाही. शास्त्र्याचा खून झाल्याबरोबर आमच्या मायबाप कंपनी सरकाने क्षणा- चाहि विलंब व हलगरज न करतां खुनी इसमास शासन केले की नाही म्हणून कंपनी सरकारास दुवा द्यावयाचा असेल तर खुशाल द्या, पण ही रीत नाही व कर्तव्यनिष्ठ इंग्रजांबद्दल तरी अशी शेखी कोणी मिरवू नये, ८ दुर्दैवी मोहरे , आतां शास्त्र्याच्या खुनाचा व त्या वेळच्या घटनांचा विचार करावयाचा. शास्त्री पुण्यास येतो, तो बडोद्याच्या हिशेबासंबंधी उभयपक्षाला सामान्य- पणे मान्य होईल अशी तोड काढतो व येथपासून शास्त्र्याबद्दलचे पेशव्यांचे धोरण बदलू लागते. शास्त्री पेशव्यांचा स्नेही होणार अशी स्पष्ट चिन्हें दिसू लागतात, कारण शास्त्र्यास पेशवे आपला दिवाण होण्याबद्दल विचारतात हे येथेच न थांबतां बाजीराव आपली मेहुणी शास्त्र्याच्या मुलास देण्याची भाषा करतो; इतकेच नव्हे तर लग्नाची तयारीसुद्धा होते पण दरम्यान शास्त्र्याने सुचविलेली तडजोड फत्तेसिंग फेटाळून लावतो व तेथून हे सर्व गा. बिनस- ध्यास सुरुवात होते. फत्तेसिंगाने जर शास्त्र्याचे म्हणणे मान्य केले असते तर हा सर्व गुंता सुटला असतां व त्याचे परिणाम भावी राजकारणावर इंग्रजांस हवे तसे झाले नसते ! शास्त्री आपलासा करण्याकरितां बाजीरावाने ही सर्व मिठास भाषा केली. त्याच्या प्रत्येक बोलण्यांत आणि कृतींत राजकारण मुसमुसले होते. शास्त्र्याला पूर्णपणे बेसावध करण्याकरितां त्याला आपला व्याहीसुद्धा बाजीरावाने केलें. शास्त्री भेला तर मेला औषधावांचून खोकला गेला, आपला जांवई म्हणजे शास्त्र्याचा मुलगा जिवंत आहेच. असा दुष्ट व स्वार्थी विचार बाजीरावाच्या मनांत होता असे जरी धरून चालले तरी त्याला हरकत नाही. चंद्रराव मोऱ्याला मारून शिवाजीस जावळी मिळाली तशांतला प्रकार शास्त्र्याच्या बाबतीत होता का? शास्त्र्याला मारून बडोद्याचे राजकारण सिद्धीस जाणार होते का ? तर त्याचे उत्तर साफ नाही असेंच आहे. म्हणजे शास्त्री जगता तर त्यांत बाजीरावाचा फायदा वा तोटा कांहींच नन्हता. झाला असता तर फायदाच झाला असता ! कारण एखादे वेळेस बडोद्याचा घोळ मोठ्या उत्कृष्ट त-हेने मिटला असता. शास्त्र्याचे म्हणणे म्हणजे असे की, गायकवाडाने फक्त सात लाखांचा मुलूख पेशव्यांस तोडून द्यावा म्हणजे पेशवे तीन कोटींचे देणे सोडून देण्यास तयार होते. म्हणजे बाजी- रावाने मान्य केलेला हा समेट खरोखरच समंजसपणाचा होता. त्यास फत्तेसिंगाकडून होकारार्थी उत्तर आले असते; पण हे म्हणणे शास्त्र्यामार्फत आले म्हणूनच उधळले गेले. तेच म्हणणे जर गोविंदराव बंधुजी व भगवंत- राव यांच्यामार्फत जाते तर त्यास मान्यता मिळाली असती; पण शास्त्री हा बडोदे दरबारी सलत असल्यामुळे हे असें झालें, शास्च्याचा डोळा त्रिंबकजी डेंगळा सीताराम रावजीच्या दिवाणगिरीवर असल्याकारणानें, सीताराम रावजी त्यास पाण्यांत पाहात होता व तें खरेंहि होतें. कारण हिशेबाचा तंटा मिटवून शास्त्री माघारी जाता तर बडोद्याची दिवाणगिरी त्याचीच होती. शास्त्री आज ना उद्या आपल्या पोटावर पाय देणार म्हणून सीताराम रावजी त्याच्या नांवाने जळत होता. तसेच शास्त्री हा कंपनी सरकारचा बगल. बच्चा म्हणून आनंदराव, फत्तेसिंग वगैरे लोकांस तो नको होता; पण आतां या गोष्टीस तोड निघणे शक्य होते. शास्त्र्याशी प्रथम बाजीराव तुसडेपणाने वागला, त्याची कोठेच डाळ शिजेना; पण शास्त्र्याने दम रखाऊन त्यांतून मार्ग काढला तसाच प्रकार आतांहि होण्याचा संभव होता. कारण पेशव्यांनी शास्त्र्यास दिवाण होण्याबद्दल विचारले होतें. म्हणजे शास्त्री पेशव्यांचा दिवाण झाला असता तर सीताराम रावजीच्या मनांतील त्याच्याबद्दलचा द्वेप नाहीसा झाला असता, कारण गायकवाडाची दिवाणगिरी त्याची त्याच्याकडे राहिली असती. आपणांस दिवसेंदिवस जड होणारा हा इंग्रजांचा हस्तक पेशव्यांच्या पदरी कायमचा गेलेला पाहून आनंदराव व फत्तेसिंग यांस एक ब्याद टळली म्हणून समा- धान वाटले असते. हिशेबाचा घोळ भिटून पेशव्यांची दिवाणी मिळती तर शास्त्र्यास निरतिशय आनंद झाला असता कारण गायकवाडांचा दिवाण होण्या- ची महत्त्वाकांक्षा धरणाऱ्या शास्त्र्यास पेशव्यांचा दिवाण होण्याचे भाग्य म्हणजे अपूर्व होते. आता बाजीरावाने शास्त्र्यास देऊ केलेली दिवाणगिरी हे केवळ आमिष होते, त्यांत तथ्य नव्हते असे म्हणता येत नाही. कारण बाजीरावास चांगल्या, कर्तबगार व हुशार दिवाणाची जरूरी होती. सदाशिव माणकेश्वरा- कडून कारभार नीटपणे होत नाही. हे बाजीरावाचे म्हणणे खरे आहे. त्यास प्रत्यंतर म्हणजे त्याने शास्त्याच्या खुनानंतर मोरो दीक्षित मराठ्यास कारभारावर महिन्या दीड महिन्यांनीच ठेविलें हे होय. ह्या सर्व गोष्टी, हिशेबाचा घोळ भिटता तर तडीस जाणाऱ्या होत्या. आतां हे हिशेबाचे काम सुद्धां बोटचे झाले होते. कारण तीन कोटींचा हिशेब सालिना सात लाखांचा मुलूख सोडून देण्यावर संपणार होता. तीन कोटी व सालिना सात लाख या दोन आंकड्याचा विचार करता हैं तंत्र सुद्धां फारसे कठीण नव्हते. या वेळी एकोत्रा व्याजाचा दर म्हणजे अगदी कमी. पैकी या व्याजाच्या दराने सहा कोटींचे व्याज सालिना तीन दुर्दैवी मोहरे लाख होते म्हणजे मुद्दल सोडून देऊन पेशवे नुसत्या व्याजावर खूष होते या समेटाचा विचार केला म्हणजे 'तूं कर दिल्यासारखें-मी करतों घेतल्य सारखें' अशांतलाच हा प्रकार होता असे म्हणावयास हरकत नाहीं या वेळी बाजीरावाच्या मनाचा विचार करतां व त्याने इंग्रजांविरुद्ध मराठ्यांची जूट करण्यासाठी चालविलेले प्रयत्न पाहतां असेंच म्हणावे लागते की, शास्त्र्याच्या बुद्धिमत्तेस व कर्तबगारीस या गोष्टी घडवून आणणे अगदी शक्य होते. पण या सर्वास अडचण काय ती कंपन सरकारचीच होती. शास्त्री मूळ इंग्रजांचा हस्तक. गायकवाडीत इंग्रजांचे प्रस्थ वाढविणारा, इंग्रजांचा वकील म्हणून वावरणारा व गायक वाड दरबारास दमदाटी करणारा असा हा इरसाल गृहस्थ, दरमहा शंभर रुपये मिळविणारा सामान्य मनुष्य; पण सालिना साठ हजार रुपये तनख। कमविता झाला आणि मुतालीक म्हणून मान्यता पावला, तोहि कंपनी सरकारच्या कृपेमुळेच. शेवटी तर इंग्रजांचा हितचिंतक म्हणून त्यांच्या जामिनकीवर पेशवे व गायकवाड यांच्यामधील तीन कोटींचा तंटा तोडण्या साठी म्हणून तो आला; पण दुर्दैवाने इंग्रजांच्याच हलगर्जीपणामुळे तो स्वतः तोडला गेला. येथपर्यंत शास्त्री म्हणजे कंपनी सरकारच्या गळ्यां तील ताईत होता. त्यानें वजन व महत्त्व फार मोठे होते. बापू भैराळास म्हणजे शास्त्र्याच्या हस्तकास त्रिंबकजीने फितुर झालेल्या नोकरांच्या त्रासां. तून मुक्त करण्याकरिता म्हणून दिडकी दिडकीची किंमत जाणणाऱ्या कंपनी सरकारने-एल्फिन्स्टनने सव्वा लाख रुपये भरून त्याची मुक्तता केली. ही किंमत शास्त्र्याच्या हस्तकास कंपनी सरकारने दिली. या एकाच गोष्टीवरून शास्त्र्याची किंमत इंग्रजांस फार होती हे स्पष्ट दिसते. पण एवढा मोठ' बहुमोल हिरा कवडीमोल झाला याचे कारण कंपनी सरकारचा स्वार्थ. येथवर लिहिल्याप्रमाणे शास्त्री जर जगता व पेशव्यांचा दिवाण होता तर कंपनी सरकारचे फार नुकसान झाले असते. गायकवाड दरबारचे सर्व सूक्ष्म धागेदोरे जाणणारा शास्त्री पेशव्यांनी आत्मसात् केला असता, तर गायकवाडीत वाढत असलेले इंग्रजांचे प्रस्थ ताबडतोब हलके झाले असते व ज्या शास्त्याचे वर्णन खुद्द एल्फिन्स्टन असें करतों की:- “गंगाधरशास्त्री हा मोठा धूर्त व बुद्धिमान आहे. त्याने बडोदें संस्थान ची व्यवस्था उत्तम ठेवली आहे. येथें पुण्यास तो पुष्कळ खर्च करून ऐष. - त्रिंबकजी डेंगळा आरामांत राहतो. त्याची स्वारी मोठ्या दिमाखाने निघते, इतकी की, सबंध शहर त्याकडे मोठ्या कौतुकाने पाहते. तो जुन्या पद्धतीचा पढिक शास्त्री आहे; पण वागणूक मात्र थेट साहेबाची. तुरतुर चालतो. चुरचुर बोलतो. पेशवा व त्याचे कारभारी यांना मूर्ख म्हणतो, डॅम रासकल हा शब्द त्या- च्या तोंडी फार आहे. तो बोलतांना इंग्लिश शब्द फार घुसडतो.” वरील वर्णनांतील त्याचे महत्त्वाचे शब्द म्हणजे शास्त्री मोठा धूर्त व बुद्धिमान आहे. त्याने बडोदे संस्थानची व्यवस्था फार चांगली ठेविली. ही दोन वाक्ये फार महत्त्वाची आहेत. तेव्हां हा बुद्धिमान व व्यवस्थित मनुष्य पेशव्यांचा दिवाण झाला तर आपणांस पेशव्यांशी पुढील राजकारणाचे डाव खेळणे फार जड जाईल व गायकवाडीतून आपला पाय निघेल असे विचार एल्फिन्स्टनच्या डोक्यांत आले नसतील असें तरी कसे म्हणावें ? किंवा साहेबाने आपली चाल त्याप्रमाणेच चालविली असें तरी म्हणण्यास काय हरकत आहे ? कारण शास्त्री, पेशवे व एल्फिन्स्टन नाशिकच्या यात्रेस चालेल असतां शास्त्र्याने आपल्या जीवास धोका असणारी भाषा एल्फिन्स्टनला सांगितली होती व “तुम्ही त्यांच्यावर विश्वासून इतके गहाळ कसे राहतां ?” असे उत्तर साहेबाने त्यास दिले होते. म्हणजे शास्त्र्याच्या जिवास आज ना उद्यां धोका आहे हे एल्फिन्स्टनला माहीत होते. त्यां- तून आतांची वेळ तर शास्त्र्याचे म्हणणे फत्तेसिंगाने फेटाळले होते. तसेच शास्त्री आणि पेशवे यांच्यामध्ये होणारी सोयरीक शास्त्र्याने मोडली होती व त्याच्या बायकोस बाजीरावाच्या बायकोनें भेटण्यास बोलाविले होते; पण शास्त्र्याने बाजीरावाचा त्या बाबतीतील लौकिक मनांत आणून तिला वाड्यांत धाडले नव्हते म्हणजे शास्त्री व पेशवे यांचें बिनसलें होतें, व त्रिंबकजीच्या म्हणण्याप्रमाणे तो मरण्यास लायक झाला होता. या सर्व गोष्टी एल्फिन्स्टनला माहीत असल्याच पाहिजेत. कारण या सर्व गोष्टी लोक- चर्चेचा विषय झाल्या होत्या. असे असल्यामुळे एल्फिन्स्टनने शास्त्र्याच्या जिवाची काळजी जास्तच घ्यावयास पाहिजे होती; पण त्याने तसे न करता "हे पहा, आम्ही थोडेच लोक घेऊन येथून परभारे पंढरपुरास जाऊन दर्शन घेऊन लगेच पुण्यास येतो. तुम्ही तिकडे बरोबर येण्याचे काही कारण नाही हैं याजीगवाचे सांगणें धूर्त एलफिन्स्टनला पटावे व त्याने वेरूळची लेणी पाहण्यास निघून जावे याचे मोठे आश्चर्य वाटते. जसें कांही तिकडे मोठे दुर्दैवी मोहरे राजकारण गुंतले होते. अंतस्थ हालचाली जाणणारा शास्त्र्याचा सामान्य मदतनीस व पुढे ज्याच्याकरितां एल्फिन्स्टनने सव्वा लाख रुपये खर्च केले असा बापू मैराळ, त्रिंबकजीच्या शिताफीने पुण्यासच राहतो याचेसुद्धा मोठे आश्चर्य वाटते. याच्याहि पुढे म्हणजे शास्त्र्यावर प्रत्यक्ष वार करणाऱ्या इसमाचें नांव सांगणाऱ्या दोन कैद्यांपैकी गंगाजी खाटीक पुढे साहेबा- कडे नोकर असतो. हे सुद्धां खुनाशी संबंध नसल्याचंच लक्षण समजावयाचें की काय ? थोडक्यांत इत्यर्थ असा, की शास्त्र्याबरोबर पंढरपुरास जाऊन जें राजकारण त्यास साधावयाचे होते ते त्याने तेथे न जातां साधले. शास्त्री आज ना उद्यां मारला जाणार तोसुद्धा पेशव्यांच्या सान्निध्यांत आणि पेशवे किंवा गायकवाड यांच्या लोकांकडून हे त्यास निश्चितपणे माहीत होतें. फक्त अडचण काय ती आपलीच; तेव्हां ती आपण दूर केली, की कार्यभाग झाला अशी त्याची अटकळ होती आणि त्याने तसे करतांच अपेक्षेप्रमाणे शास्त्री मारला गेला व लगेच त्याच्या खुनाचे झोंबट साहेबाने आपण नामानिराळे राहून बाजीरावाच्या मागे लावून दिले. गंगाधरशास्त्र्याच्या खुनाशी बाजीरावाचा काहीएक सबंध नव्हता असे मानण्यास आणखी एक पुरावा आहे. तो म्हणजे प्रभाकर कवीचा. प्रभाकर कवि व पटवर्धनशास्त्री हे लहानपणचे सोबती आणि त्यांचा स्नेहभाव आजन्म होता. परस्परांचे परस्परांशी सबंध इतके प्रेमाचे व जिव्हाळ्याचे होते की, शास्त्र्याच्या मुलास-आबासाहेबास तर त्याची मुलगी केली होती. तेव्हां शास्त्र्याच्या खुनांत बाजीरावाचा संबंध असला तर या गोष्टीचा उल्लेख प्रभाकराने आपल्या पोवाड्यांत खास केला असता, कारण शास्त्री, त्याचा व्याही व स्नेही, त्याचा खून बाजीराव करता अगर करविता तर त्याचा उल्लेख तितक्याच निष्ठुरपणाने त्याने केला असता. बरें, पेशवा आतां हतबल व भाग्यहीन झाला होता. तेव्हां आतां तर त्याचेवर वाटेल तसे तोंडसुग्व घेण्यास हरकत नव्हती. त्याच्या कवनांत शास्त्याच्या खुनाचा उल्लेख आहे म्हणजे त्याने हा विषय हाता- ळला आहे, पण त्या ठिकाणी तो असे लिहितो- बाजीरावसाहेब पेशवे आपल्या राज्याला फार जपत होते. फार दिवस आधिं जपत होते या इंग्रज राज्याला । अनायासे निमित्त झालें पंढरपुरास कज्जाला । , त्रिंबकजी डेंगळा .... भंकट पडले काही सुचेना प्रधान पुज्याला। सद्दी फिरली सारांश मिळाले लोक अपुल्याला । परम कठीण वाटलें आठवलें त्रिभुवन रावबाजीला। थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला। निरुपाय जाणुनी केले हवाली मग त्रिंबकजीला। हा पोवाडा प्रभाकराने इंग्रजी राज्य झाल्याबरोबर लिहिला असल्यामुळे या म्हणण्याला जास्तच जोर येतो, व त्या वेळच्या लोकांना यासंबंधी काय वाटत होते याचे चांगलेच प्रत्यंतर येते. शास्त्र्याची मुलगी गं. भा. यमुना- बाई आपल्या बापाच्या खुनाचा आरोप बाजीरावावर करीत नाही. थोडक्यात म्हणजे गंगाधरशास्त्री पटवर्धनाचे वंशज, त्यांची कन्या, त्यांचे लहानपणापासूनचे मित्र, व्याही, सोयरे व इतर आतेष्ट व त्या वेळी सरदारांत वावरणारी कवि मंडळी, या खुनाचा आरोप बाजीरावावर करीत नाहीत. यानंतर बाजीरावाचा स्वभाव, त्याची भेकड वृत्ति व धार्मिक बुद्धि आणि त्यानंतरची त्याची अगदीच थिजलेली वागणूक या सर्वांवरून बाजीराव या खुनाच्या बाबतीत अगदीच निर्दोपी होता. या खुनामुळे तो इतका घाबरला त्याचे कारण एकतर खून त्याच्या सान्निध्यांत झाला म्हणून हे बालंट आपल्यावर येणार म्हणून तो धास्तावला असेल. तसेंच नारायणरावाच्या खुनाने वडिलांची माती झाली, या खुनाने आपली होते की काय, या चिंतेने त्याच्या अंतःकरणाचा ठाव घेतला असेल. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तसे झालेंहि. आतां या प्रकरणी फक्त एकच विचार शिल्लक राहतो, तो म्हणजे खुद्द शास्त्र्यासंबंधींचा. शास्त्री बडा अक्कलमंद. व हुषार पण त्याने स्वतःच्या जिवाची कशी काहीच काळजी घेतली नाही? कारण त्याला आपल्या जिवास दगाफटका आहे हे माहीत होते, मग तो गाफील कसा राहिला ? या प्रभास उत्तर असे की, शास्त्री बडा अक्कलमंद असेल. त्याने टोपीकराची नाजुकसाजुक कामें करून चांगले महत्त्व संपादन केले असेल, पण शास्त्री तो शास्त्री; कारण त्याच्या लक्षांत हा तेढा डाव यावयास पाहिजे होता. तो आला नाही म्हणजे तो या वेळेपुरता तरी नादान ठरला खास. कारण भैत्रीच्या पोटी भेटीस गेले असतां, 'कुठे आहे तुझा शिंदा आणि होळकर' म्हणून सवाल करतांच नेत्राच्या इषाययरोबर शिंदा, होळकर निजामापुढे १२० दुर्दैवी मोहरे खडा करून पहिला बाजीराव गाजी ठरला. तसेंच दोस्तीचे भेटींत कुस्ता करण्याचा घाट घालतांच हातांतील वाघनखांनी अफजुलखानाचा कोथळा- चा कोथळा बाहेर काढणारा शिवाजी शककर्ता झाला. या दोन उदाहरणां- चा विचार करतां शास्त्री नादान ठरतो. शास्त्र्याने आपल्या जिवाची थोडीबहुत काळजी घेतल्याचे दिसते, पण त्याने आपल्या रक्षणाकरितां सशस्त्र लोकांची चौकी ठेवावयास पाहिजे होती किंवा कंपनी सरकारने तशी काळजी घ्यावयास पाहिजे होती. चौकी मारून जर शास्त्र्याचा खून झाला असता, तर मग त्याची जबाबदारी कंपनी सरकारवर आली नसती. खून मुख्यतः त्रिंबकजीने करविला. त्यास भरपूर प्रोत्साहन बडोद्यां- तून मिळाले. मूळ कल्पना बडोदकर मंडळीची. त्याचे साहित्य सिद्ध केलें त्रिंबकजीने आणि माहिती असून दुर्लक्ष केले बाजीरावाने असा निर्णय पुराव्यावरून देता येईल." असा निर्णय सुप्रसिद्ध रियासतकार रावसाहेब सरदेसाई देतात. यावर माझें म्हणणे खालीलप्रमाणे आहे- खून मुख्यतः उल्लू त्रिंबकजीने करविला. त्यास प्रोत्साहन बडोद्यां- तून मिळालें, मूळ कल्पना कोणाची ते सांगता येत नाही. त्यांत साहित्य तयार केलें त्रिंबकजीने. या खुनाच्या बेताची कानगी बाजीरावास असेल; पण मध्यंतरी शास्त्री आणि बाजीराव यांचा स्नेह जमल्यानंतर शास्त्र्याला लंबे करण्याच्या कल्पना बाजीरावाच्या मनांतून नाहीशा झाल्या असाव्यात कारण शास्त्री जिवंत राहण्यांतच त्याचे हित होते. बडोद्याचा घोळ आतां तर त्याच्यामार्फतच मिटला असता. एल्फिन्स्टनने मात्र माहिती असून आपला स्वार्थ साधण्यासाठी सहेतुक दुर्लक्ष केलें असेंच म्हणावे लागते.
६ : मुटका, बंदिवास व अखेर शाध्याचा खून झाला त्याबरोबर एल्फिन्स्टननें आकांडतांडव करून डेंगळा, गोविंदराव बंधुजी व भगवंतराव या तिघांस कैद करून ठाण्याच्या किल्लयांत ठाणबंद केले, व आपले राजकारण तांतडीने तडीस नेण्याचा उद्योग चालविला. बडोद्यांत आपले आसन डळमळीत झाल्याचा भास इंग्रजांस झाला पण तो भासच होता. त्याचे कारण शास्त्र्याचा खून नसून, इंग्रज नेपाळांत गुंतला होता व दोन ठिकाणी युद्ध चालविणे त्यास शक्य नव्हते. म्हणून एकदोन वर्षे त्यांनी नुसत्या दमांत मारून नेलें व आपणांस योग्य अशी संधि येतांच मराठ्यांचा समाचार घेण्याचे ठरविले. बडोद्यांतून इंग्रजांचे प्रस्थ नाहीसे करण्याच्या उद्योगांत सीताराम रावजी प्रमुख होता, त्यास इंग्रजांनी कैद केलें. बडोद्याचा कारभार शास्त्र्याच्या टाकिला. शास्त्र्याच्या खुनाबद्दल पेशव्यांच्याकडून दंड म्हणून घेतला नव्हता तोहि पुढे त्यांनी दामदुप्पट घेतला. थोडक्यांत बडोद्याचे प्रकरण अशा त-हेनें निकालांत लागले. त्रिंबकजीला अटक झाल्याकारणाने बाजीरावाचे काम लंगडे झाले. त्याच्या अत्यंत विश्वासाचा स्नेही व नोकर नाहीसा झाला. तेव्हां एल्. फिन्स्टनकडे स्वतःच्या बुद्धीस प्रामाणिकपणे वाटेल तें सांगून पेशव्यांची याजू संभाळणारा त्याच्याजवळ दुसरा मनुष्य नव्हता. सदाशिव माणकेश्वर हा एल्फिन्स्टनकडे बोलाचाल करावयास जात असे, पण तो अंगचोर व मुलास देऊन १२२ दुर्दैवी मोहरे इंग्रजांस सामील होता. एका प्रसंगी त्रिंबकजीने ही गोष्ट बाजीरावाच्या नजरेस पुराव्यानिशी आणिली होती. त्या वेळेपासून त्रिंबकजीकडे मंत्रीपद आले आणि साहेबाशी जाबजबाब करण्याकरितां त्रिंबकजी जाऊ लागला. त्रिंबकजी डेंगळ्यास अटक केल्यानंतर एल्फिन्स्टनकडे बोलणे चालणे करण्यासाठी सदाशिव माणकेश्वर, मोरो दीक्षित, चिमणाजी नारायण वगैरे मंडळी जाऊ लागली; पण यांपैकी कोणावरहि बाजीरावाचा विश्वास नव्हता. ही सर्व मंडळी निखालसपणे जरी इंग्रजांस सामील नव्हती तरी त्यांचा बावनकशी भरंवसा बाजीरावास नव्हता. डेंगळ्यास अटक केल्यानंतर त्यांस कोठे ठेवावे याबद्दल तिघांची तीन मते पडली. त्यास काशीस ठेवावा अशी बाजीरावाची सूचना होती, अलाहाबादेस ठेवावा असें एलफिन्स्टनचे मत होते, पण गव्हर्नर जनरलने त्यास ठाण्यास ठेवावा असा हुकूम धाडला. त्याबरोबर बाजीराव व एल्फिन्स्टन यांचे हुकूम जागच्या- जागी राहून त्रिंबकजीस ठाण्यास ठेवण्यांत आले. २७ जुलै १८१५ला शास्त्र्याचा वध झाला. १९ सप्टेंबर रोजी त्रिंबकजी कॅ. हिकचे स्वाधीन झाला व वसंतगडावरून त्याची ठाण्याच्या तुरुंगांत रवानगी झाली. यानंतर बरोबर ५१ आठवड्यांनी म्हणजे १२ सप्टेंबर १८१६ ला तो इंग्रजांच्या हातांवर तुरी देऊन पळाला. त्रिंबकजीस फाशी देण्यासाठी म्हणून पंचवीस गारदीबरोबर देऊन मेण्यांत घालून वाडी- कांठी आणिला व आता त्याचा शिरच्छेद होणार तो त्याने मारेकऱ्यांस विनति केली की, 'आम्हांस मारूं नये पुण्यास जिवंत घेऊन चलावें, मी तुमचे उपकार फेडीन.' हे त्रिंबकजीचे बोलणे ऐकून मारेकरी म्हणाले की, आम्हांस सोळा हजारांचा ऐवज, रोख मोहरा पंधरा हजार आणि रोख रुपये एक हजार इतके पैसे देण्याचा हमीदार द्या म्हणजे पुण्यास येतो. खाडीच्या कांठी प्रत्यक्ष हमी घेण्यासाठी ऐपतदार मनुष्य कोठून आणावा अशी पंचा- ईत त्रिंबकजीला पडली. पण इतक्यांत आबा जोशी नांवाचे गृहस्थ तेथें आले, त्यास त्रिंबकजीने आपली वस्तुस्थिति नीट समजावून सांगितली; तेव्हां त्याने जातीने जोखीम घेतली व मारेकऱ्यांस सांगितले की, त्रिंबक- जीस जिवंत घेऊन तुम्ही पुण्यास चला, तेथे जातांच तुमची ठरलेली रक्कम मी स्वतः तुमच्या पदरांत टाकीन. असे सांगून आबा जोश्यांनी मारे- कऱ्यांची खात्री पटविल्यावर रात्रीचा दिवस करून एकसारख्या मजला त्रिंबकजी डेंगळा १२३ . मारीत ही सर्व मंडळी सहावे दिवशी पुण्यास आली. पुण्यास येतांच आपण गुप्त राहून डेंगळ्याने स्वहस्ताने एक *पत्र आपले स्नेही हरबा आबा यांस लिहिले व त्यांस पंधरा हजार होन व एक हजार रोख अशा ऐवजाची तरतूद ताबडतोब करून आबा जोश्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. ऐवज आजच्या आज हाती न येईल तर मारेकरी आमची गर्दन मारतील म्हणून ऐवजाची व्यवस्था करावी. तसेच आबा जोशी सांगतील त्याप्रमाणे वागावें, गोष्ट पट्कर्णी करूं नये. येथून सुटलों म्हणजे बापू गोखल्याच्या लष्करांत जाईन असे सर्व खुलासेवार लिहिले होते. त्या- प्रमाणे ऐवजाची वगैरे व्यवस्था होऊन त्रिंबकजी सुटला. त्रिंबकजी निसटला तो प्रथम खानदेशांत गेला. तेथे बागलाण- कडील डोंगरांत त्याने आपला जम बसविण्यास सुरुवात केली. प्रथम भिल्ल, रामोशी, मांग वगैरे लोकांस मिळवून घेतले. पुढे काही दिवसांनी उत्तरेकडचा प्रदेश सोडून तो दक्षिणेस आला व शंभोमहादेवाच्या डोंगरांत राहूं लागला. तेथे स्वागंची जमवाजमव केली. अशा त-हेनें तो आपल्या तयारीचे एकेक पाऊल पुढे टाकू लागला. टोपीकरांच्या कैदेतून त्रिंबकजी डेंगळा निसटला ही अचंब्याची गोष्ट हां हां म्हणतां सगळीकडे पसरली व लोकांस आश्चर्य वाटले. भोळ्याभाबड्या वृत्तीच्या बाजीरावास ही ईश्वरी कृपा असे वाढू लागले व आतां आपण जोर केल्यास आपली विसकटलेली घडी नीट बसण्याचा बराच संभव आहे. म्हणून त्याने त्रिंबक- *ही हकीगत नवीन आहे. पेशवे दप्तर भाग ४१ मध्ये पत्र नं. ९१ मध्ये आली आहे. सर्व पत्र त्रिंबकजीच्या हस्ताक्षराचे आहे. सदरहू पत्रांत सुरुवातीचा मजकूर असा आहे. राजश्री हरबा आबा यांसी प्रति त्रिंबकजी डेगले रामराम विनंती विशेष होळकराने इंग्रजांचा थोरला माणूस मारला सबब आम्हांस फाशी द्यावयाकर्ता भेण्यात घालून बरोबर पंचवीस गारदी देऊन खाडीचे काठी आणिले. " या पत्रांतील होळकराने इंग्रजांचा थोरला माणूस मारला याचा संदर्भ नीट लागत नाही. तरी कोणा तज्ज्ञास तो लागल्यास आम्हांस कळविण्या- ची कृपा करावी.
२२४ दुर्दैवी मोहरे . त्या जीस ऐवज पाठवून साह्य करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर त्रिंबकजीच्या हालचालीस जोर चढून हे प्रकरण न आवरले तर आपणांस जाचक होईल असें वाटून इंग्रजांनी पुन्हां त्रिंबकजीस पकडण्याचा उद्योग चालविला. १९ सप्टेंबर १८१५ रोजी त्रिंबकजी कॅ. हिकचे स्वाधीन झाला. वेळेपासून बरोबर एक वर्षपर्यंत त्यास आपला काल इंग्रजांच्या कडक शिस्तीत काढावा लागला. त्याच्यासारख्या उलाढाल्या माणसास हा काल कंठणे म्हणजे मरणप्राय दुःख झाले; पण त्याने आपली सुटका या नाही त्या मार्गाने केली व साहेबाच्या हातांवर तुरी दिल्या व तो ता. १२ नव्हेंबर १८१६ला इंग्रजांच्या कैदेतून निसटला. १८१६ पासून १८१७. पर्यंतच्या एका वर्षाच्या अवधीत त्याच्या उद्योगास चांगलेच तेज चढले.१८-३-१८१७ ला म्हणजे पाडव्याच्या मुहूर्ताने त्रिंबकजी उघड फौजा घेऊन बाहेर पडणार आणि सामन्यास सज्ज होणार अशी बातमी एलफिन्स्टनला कळली. या वेळी बाजीराव फुलगांवला आपल्या राजवाड्यांत तीन महिने राहिला होता. त्या वेळचा त्याच्यासंबंधीचा उल्लेख असा सांपडतो की, "श्रीमंत रथांत बसून फुलगांवाला जात होते. पांडुरंगपंत ढमढेरे यांची स्त्री रथांत होती मार्गी रथ लवंडला आणि श्रीमंतांचे अंग दुखावले सबब स्वारी फुलगांवास राहिली. तेथेच बाजीरावाने मोरो दीक्षित याचे कन्येचे लम केले. त्रिंबकजी येथे येऊन श्रीमंतांस चोरून भेटू लागला. त्याने पेंढारी स्वार बरोबर घेऊन कोंकणांतील गांव लुटले. बहुत खराबी केली." या वेळची बाजीरावाची वागणूक खरोखरीच मुत्सद्दयाला शोभण्यासारखी होती. त्रिंबकजी आपला दोस्त, शत्रूचा नक्षा उतरवण्याकरितां धडपड करतोय तर त्यास मदत करणे आपले आद्य कर्तव्य म्हणून ते केलेच पाहिजे आणि तसे करतांना आपल्या शत्रूस मात्र त्याचा ठावठिकाणाहि लागू नये; इतकेच काय पण, त्याचा वाससुद्धा येऊ नये अशी आपली वागणूक असावी हेच योग्य आणि न्याय्य ठरते आणि या प्रसंगी बाजीरावाची तशी ती होती. या वेळी त्रिंबकजी सुटल्याची वार्ताहि आपणांस नाही, तसेच त्याचा पाठपुरावा करण्याची आपली इच्छा नाही असा वागण्याचा ढंग बाजीरावाने ठेवला. इंग्रजांस खूष करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न बाजीरावाने चालविले. पेंढा- यांचे बंड मोडण्याच्या विचारांत इंग्रज होता, त्यास बाजीसवाने आपण होऊन चांगल्या उपयुक्त सूचना केल्या; तसेंच इंग्रज व आपण यांच्यामध्ये त्रिंबकजी डेंगळा कलहाचे म्हणून पुष्कळच प्रश्न होते त्यांचा निकाल इंग्रजांशी नमते घेऊन त्याने केला. त्याच्या वागणुकीची चहा इंग्रज करूं लागले. बाजीरावास असाच खूष राखा, त्याच्या कलानेच गोष्टी करा, उगाच कुरापत काढू नका असे गव्हर्नर जनरलने रेसिडेन्टास मुद्दाम लिहिले. इतकेंच काय, पण बाजीरावाने याच्याहि पुढे जाऊन म. १८१७च्या फेब्रुवारीत बापू गोखल्यास त्रिंबकजीवर धाडलें; कारण या वेळी त्रिंबकजीचा बंडावा नीरेच्या दक्षिणेस चालू होता. पण बंड वगैरे काही नाही सगळीकडे शांत आहे असे सांगत बापू गोखला माघारी आला. २४ फेब्रुवारीपर्यंत बाजीरावाची ही वागणूक म्हणजे केवळ वरपांगी आहे, आंतून त्रिंबकजीस त्याचे साह्य आहे असे इंग्रजांससुद्धा वाटले नाही. एवढा इंग्रज धूर्त पण त्यावरसुद्धां बाजीरावाने किंचित् काल मात केली. पण बाजीराव पुरा दुर्दैवी होता. त्याच्याभोवती फितुरांचा गराडा पडला होता. त्यामुळे त्याच्या यशाचा कलश नेहमीच भंगला जाई. तसेंच आतांहि झाले. २४ फेब्रुवारीस काही कागदपत्र रेसि- डेन्टाचे हातांत पडले व त्यावरून त्रिंबकजीस बाजीरावाचे साह्य आहे असे एल्फिन्स्टनच्या नजरेस आले. त्याबरोबर एल्फिन्स्टनची ब्याद बाजी- रावाच्या मागे लागली. मार्च महिन्यांत बाजीराव व एलफिन्स्टन यांच्यामध्ये पुन्हां कचका कचकीस सुरुवात झाली. “ त्रिंबकजीने उभारलेले बंड नेस्तनाबूद करण्या- करितां मी फौजा पाठवितों व त्याचा बंदोबस्त करतो." या बाजीरावाच्या म्हणण्यास एलफिन्स्टनने उत्तर दिले की, “ या कामी आम्हांस तुमच्या फौजेची बिलकूल नरज नाही, आम्ही आपल्या फौजा पाठवून त्याचा बंदो- बस्त करूं. त्याचे नातेवाईक व मित्रमंडळ उघडपणे वावरत आहेत त्यांचा बंदोबस्त तुम्ही करून त्यास कैद करा म्हणजे झाले, तसेंच तुम्ही तिबक- जीला गुप्तपणे साह्य करतां ते करूं नका व तुम्ही फौजांची जमवाजमव चालविली आहे ती बंद करा म्हणजे झालें.” एल्फिन्स्टनचे हे भाषण ऐकून बाजीरावाने उत्तर केले की, "मी इंग्रजाची मनधरणी करीत असतां माझ्यावर हे कुभांड उगाचच घेतले जात आहे." व या आपल्या म्हण- ण्याची सत्यता इंग्रजांस पटावी म्हणून त्याने त्रिंबकजीच्या कुटुंबास अट- काव केला. हे जरी केले तरी त्यामुळे एलफिन्स्टनचे समाधान झाले नाही. कारण खानदेशादि सर्व ठिकाणी फौजा जमविण्याचे काम जारीने चालू १२६ दुर्दैवी मोहरे होतें तें कांहीं बाजीरावाने थांबविले नाही. त्याबरोबर एल्फिन्स्टननेंहि पण आपल्या बाजूने तयारी चालविली. १५ मार्च १८१७ रोजी एल्फिन्स्टनने कर्नल स्मिथची फौज पुण्यास बोलाविली. २१ मार्चला गव्हर्नर जनरलला खलिता लिहून आतां बाजीरावाशी सलोरवा ठेवणे शक्य नाही व त्याच्या- संबंधी पुढील चढाईचे धोरण आखण्यासाठी म्हणून गव्हर्नर जनरलकडून विशिष्ट अधिकार मागविले. आपली अशी तयारी केली, त्याबरोबरच त्याने बाजीरावालाहि पण चांगली समज दिली. पण या त्याच्या धमकावणीस बाजीरावाने फारशी भीक घातली नाही. त्याने युद्धाची तयारी झपाट्याने चालविली. आपले सर्व जडजवाहिर रायगडास धाडिलें. पुण्याच्या कारखा- न्यांत तोफा ओतण्याकरितां बैल जमा केलें. अशी बाजीरावाची तयारी सर्व बाजूंनी चालली असतां एप्रिलला एल्फिन्स्टनकडून बाजीरावास झण- झणीत खलिता आला, त्यांत तुम्ही आपली फौजेची जमवाजमव व इतर युद्धाची तयारी ताबडतोब न थांबवाल तर आम्ही तुमच्याशी युद्ध पुकारूं असा धाक बाजीरावास घातला होता. या धाकालाहि बाजीराव जेव्हां जुमानीना तेव्हां कॅ. फोर्डच्यामार्फत बाजीरावाची समजूत घालण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला व त्रिंबकजीस आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली. इतके करून एलफिन्स्टन स्वस्थ न बसता त्याने जिकडे जिकडे म्हणून बंडावे ऐकू येत होते तिकडे तिकडे फौजा रवाना केल्या. फौजा रवाना झालेल्या पाहून बाजीरावाने ६ मे रोजी एल्फिन्स्टनला आपल्या वाडयांत भेटीस बोलाविले. या भेटींत बाजीरावाने आपले अन्तःकरण खुलें करून आपल्या सर्व तक्रारी व म्हणणे खुलासेवार मांडले त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे आहे:- बाजीरावाच्या बोलावण्यावरून साहेब आपली खासा भडळी बरोबर घेऊन भेटीस गेला. प्रारंभी औपचारिक प्रश्नोत्तरे झाल्यानंतर बाजीरावाने आपल्या पार्श्वगणांस. बाहेर जाण्यास सांगितले व मुख्य विषयास सुरुवात केली. “मी तुम्हांस आज मुद्दाम भेटीस बोलाविले आहे. कारण तुमचा व तुमच्या सरकारचा माझ्यासंबंधी उगाचच गैरसमज वाढत चालला आहे, तो दिल खुला करून बोलून टाकावा व तुमची माझी दिलसफाई व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी आज हे दिवस पाहिले व लहानाचा मोठा झालों तो केवळ तुमच्या आश्रयामुळे. १८०२ मध्ये मजवर पुण्याची - त्रिंबकजी डेंगळा १२७ गादी सोडण्याचा प्रसंग आला त्या वेळी मी निःशंकपणे तुमच्या आश्रयास आलो आणि तुमच्याच मदतीने मला ती गादी मिळाली. तेव्हां हे सर्व उपकार विसरून मी तुमच्याविरुद्ध जाईन हे तुम्हांस शक्य तरी कसे वाटते ? हा मुद्दा क्षणभर जरी बाजूला ठेविला तरी तुमची सत्ता येथे कशी स्थापन झाली, त्यानंतर तुम्ही कसे बळावलात हे मला माहीत आहे. तसेच कंपनी सरकारच्या प्रचंड सत्तेशी ज्यांनी ज्यांनी म्हणून झुंज घेतली ते सर्व मदांध ठरून धुळीस मिळाले हे मी प्रत्यक्ष पाहिले. एवडा मोठा प्रचंड पराक्रमी हैदर, मी मी म्हणणारा टिपू, पण या दोघां बापलेकांची तुमच्या- पुढे चटणी उडाली. गेली पन्नास वर्षे अवघा हिंदुस्थान गदगदा हलविणारे शिंदे-होळकर पण त्यांचा व तुमचा संग्राम होतांच त्यांची काय दशा उडाली हे कां मी पाहिले नाही? इतकेच काय, पण जेव्हा जेव्हा तुमची व एतद्देशीय फौजांची गांठ पडली तेव्हां तेव्हां त्यांचा पाडाव व भयंकर नुकसान झालेले मी पाहिले. असे असतां मी आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा कसा पाडून घेईन. आतां खुद्द माझी स्थिति म्हणाल तर मजजवळ व्यवस्थित फौज नाही. पाश्चात्य पद्धतीने मुद्दाम तयार केलेलें लष्कर मजकडे नाही. त्यांतून मला लढाईचा मोठा कंटाळा. तोफांनी माझ्या कानठळ्या बसतात व त्यांची मला भीति वाटते, म्हणून सलामीच्या तोफा सुद्धा मी दूर करावयास सांगतो. असे असतां तुम्ही व तुमच्या सरकारने मजविषयी उगाच गैरसमज करून घेतला आहे. अशा अर्थाचें बाजीरावाने पुष्कळच मिठास भाषण केलें; पण त्याचा परिणाम धूर्त एल्- फिन्स्टनच्या मनावर कांहींच झाला नाही. या भेटीतच एल्फिन्स्टनने बाजीरावास असें निक्षून सांगितले की, एक महिन्याच्या आंत त्रिंबकजीस स्वाधीन करा आणि तोपर्यंत जामीन म्हणून चोवीस तासांच्या आंत रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक हे चार किल्ले आमच्या ताब्यांत द्या. एल्फिन्स्टनची ही भाषा ऐकून बाजीरावास राग आला असेल व तसा तो येणे हे रास्तहि होते. कारण आतां त्रिंबकजी निसटला तो इंग्रजांच्या हलगर्जीपणामुळे; पण त्याबद्दल शासन मात्र बाजी- रावास, अशांतला हा जबरदस्ताचा न्याय होता. पण ता. ६ मे रोजी एल- फिस्टनची व याजीरावाची भेट झाली. भेटीत एल्फिस्टनने किल्लयांची मागणी केली, आणि मागणीप्रमाणे चोवीस तास होतांच ता. ८ मेला १२८ दुर्दैवी मोहरे पुण्यास इंग्रजांच्या फौजेने वेढले. त्यावरोघर बाजीरावाने पुन्हां धूर्तपणा केला कारण या वेळी त्याची तयारी त्याच्या मताने पूर्ण झाली नव्हती म्हणून । हातघाईवर आलेले प्रकरण किल्लयांच्या सोडचिव्या देऊन तात्पुरते मिटविलें बाजीरावाने सोडचिठ्या दिल्या खऱ्या पण पुन्हां तो त्रिंबकजीला पकड ण्याच्या बाबतींत थंडच राहिला. १३ मे रोजी पुणे सोडून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. पुन्हां १७ मेला बाजीरावाने आपल्या फौजा इंग्रजांशी युद्ध करण्या करितां सिद्ध केल्या; पण त्याचा त्यासच विश्वास येईना म्हणून त्याचे । तेजस्वी विचार जागच्या जागी नाहीसे झाले, व २० मेला त्याने इंग्रजांस शरणचिठी लिहून दिली; आणि त्रिंबकजीस पकडून देण्याबद्दल दोन लाखांचे बक्षिस व इनाम गांव देण्याचा जाहीरनामा काढला. "त्रिंबकजी डेंगळा कंपनी सरकारच्या कैदेतून फरारी झाला आहे व ते एकसारखे बंडावे करीत फिरत आहे. तरी त्याचा ठावठिकाणा लावून देणारास, तसेच त्यास मेला अगर जिवंत सरकारांत स्वाधीन करणारास, दोन लाख रुपये बक्षिस व एक हजाराचा गांव इंग्रज सरकारचे विद्यमाने दिल जाईल. तसेच त्रिंबकजीची पुरी चौकशी करून जो कोणी सरकारांत कळवील त्याजवर सरकारची सर्फराजी होईल. याविषयी जो कोणी अनमान करील त्याजवर सरकारची इतराजी होईल. समस्त गरीब रयत, ब्राह्मण मराठे, वाणी व उदमी; तसेंच परदेशी, मुसलमान, येरड, भिल्ल, मांग रामोशी व रहदार इत्यादि जे कोणी त्रिंबकजी डेंगळ्याचा पत्ता अमुव जाग्यावर आहे असे खात्रीलायक दाखवून देईल त्यास पांच हजार रुपये बक्षिस व एक चाहूर जमीन इनाम इंग्रजबहादुर यांचे विद्यमाने मिळेल डेंगळ्याचा पत्ता माहीत असून जो कोणी सरकारांत कळविणार नाही त्यारे पारिपत्य करण्यांत येईल. त्रिंबकजी डेंगळा याचे मिलाफी असामी खालील प्रमाणे आहेत. १ यापू गायकवाड शेटफळकर, २ नागोजी वालुंज, ३ रविराव शिंदे लोणीकर, ४ माहादाजीराव नातेपुतेकर, ५ तिमापा वडारी, ६ गोधार्ज डेंगळा, ७ सयाजी मुले, ८ आपाजी कु कुरडुवाडीकर, ९निबाजी जाधव फलटणकर, १० महिपतराव डेंगळा, ११ बापू बारडकर, १२ दाजी डफळे याप्रमाणे बारा असामी आहेत. त्यांच्या कुटुंबाची मुलेमाणसें बेड्य घालून बंदोबस्तानें हुजुर पोहोचती करणे. त्यांची घरे जमीनदोस्त करणे त्रिंबकजी डेंगळा -~- ~~~~~~ " या बारा असामींपैकी जे कोणी त्रिंबकजी डेंगळ्यास धरून आणून देतील त्यांस वरीलप्रमाणे इनाम मिळेल.' या वेळी याजीराव आपणाकडून हे आलेले गंडांतर दूर ढकलण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होता, त्याने त्रिंबकजीस पकडण्यासंबंधी जाहीर- नामा काढिला पण त्याला स्वतःहोऊन पकडण्याचा उद्योग मात्र तो करीना. त्याचे कारण आंतून आंतून त्याची तयारी चालूच होती. शिंद्याचा सरदार जॉन बॅपटिस्ट यास बाजीरावाने फौज घेऊन आपल्या मदतीस योलाविलें होते, त्या वेळी बाजीरावास शिंदे व भोसले यांनी निथून कळविले की, तुम्ही प्रथम पुढाकार घेऊन इंग्रजांशी झुंज द्या म्हणजे आम्ही तुम्हांस सामील होतो. पण आम्हांस तोंडघशी पाडून तुम्ही बाजूला राहणार असाल तर ते परवडणार नाही. मग तुमचा विचार तुम्ही पाहा; आमचा विचार आम्ही पाहूं. बाजीरावास हे पत्र त्याच्या सरदारांनी मुद्दाम सांकेतिक भाषेत लिहिले होते. इंग्रजांचे हाती पडल्यास त्यांस कोणताच बोध होऊ नये; अशी काळजी मुद्दाम घेतली होती. या कामावर विठोबा नाईक गायकवाड या नांवाच्या हुजऱ्याची नेमणूक झाली होती. त्यास भोसले व शिंदे यांजकडे धाडिले होते. त्या नाइकास उद्देशून पत्र लिहिले आहे. विठोबा नाईक यासच पेशवा समजण्यांत आले आहे. ते पत्र असें:-'ही पेढी खरें पाहिले तर विठोबा नाईकांचीच आहे, आणि जरूर लागेल तेव्हां ते ज्या हुंड्या करतील त्या आमच्याकडून स्वीकारण्यांत विलंब होणार नाही; पण तुमच्या पेढीत ऐवज (फौज) शिल्लकच नसेल तर तूर्त साव- कारांची (इंग्रजांची) कशीतरी समजूत काढावी. काही दिवस विठोया नायकाने तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर पडावें, आणि स्वहस्ताने हुंब्या पाठवाव्या म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ऐवजाची जरूर पडेल त्या त्या ठिकाणी तो बिनतकार इकडून पाठविण्यांत येईल." या पत्रावर तारीव ११-९-१८१५ अशी आहे. या वेळी बाजीरावाची राज्यरक्षणाची धडपड चालू होती. २० मे रोजी बाजीरावाने किल्लयाच्या सोडचिठया दिल्या व त्रिंबकजीस पकडण्याबद्दल जाहीरनामा काढला. बाजीरावाने एवढे केले पण त्यांत एल्फिन्स्टनला समाधान नव्हनें. बाजीरावास सर्वतोपरी त्याच्या भाग्यासुद्धा व सत्तेसुद्धा साफ करावयाचे एल्फिन्स्टच्या मनांत होते. पण दरम्यान काही ९ दुर्दैवी मोहरे दिवस तसेच गेले. याचे कारण असे की, गव्हर्नर जनरलकडून एलफिन्स्टनला हवे असणारे हुकूम स्पष्टपणे आले नव्हते, पण तसे ते येतांच त्याने २८ मे रोजी कॅ. फोर्डबरोबर तहाचा नवीन मसुदा धाडला आणि ता. १ जून रोजी स्वतः एल्फिन्स्टन बाजीरावाच्या भेटीस गेला व त्याने नवीन तहाच्या कलमांची वाटाघाट केली. या तहाने बाजीराव नामशेष झाला. महाराष्ट्राबाहेरील चौतीस लारवांचा मुलूख इंग्रजांनी घेतला. इतर सरदारांशी त्याचा संबंध त्यांनी कायमचा तोडून टाकिला. त्यामुळे पेशव्याचे महत्त्व व पुढारीपण नाहींसें झाले व पेशवे दरबारी जायसाल करण्याकरितां राहिलेले इतर दरबारचे वकील पुण्याहून ज्या त्या ठिकाणी परत गेले. येवढी मोठी सत्ता नाहीशी होतांना बाजीरावास फार वाईट परत गेले. त्याने हा तह मान्य करतांना नाना क्लुप्त्या व बतावण्या केल्या पण शेवटी त्याचा एलफिन्स्टन पुढे व त्या वेळच्या त्याच्या एकंदर परिस्थितीपुढें नाइलाज झाला व त्यास तो अपमानकारक तह मान्य करण्यावांचून गत्यंतरच उरले नाही. शेवटी १३ रोजी बाजीरावाने त्या तहावर सही करून मोठ्या जड अंतःकरणाने आपल्या सत्तेवर पाणी सोडिले आणि तो निर्माल्यवत् झाला. वसईच्या तहापासून अवघ्या पंधरा वर्षांच्या आंत इंग्रजांनी एवढा मोठा पेशवा पण पार पचविला व मराठ्यांचे राज्य फस्त केले. अत्यंत संतापाने बाजीरावाने या तहावर सही केली. खरेच आहे; कारण टोपीकराशी स्नेह केल्यापासून त्याच्या भाग्यास ओहटी लागली, ती इतकी की, शेवटी त्याचा भाग्यभानु खग्रास झाला. खरे पाहिले तर वसईचा तह झाल्यापासून आज ना उद्या इंग्रज आपणांस खाणार असें रावबाजीस एकसारखं वाटत होते. तेव्हां या पायघोळ कंपनी सरकारच्या कचाट्यांतून सुटण्याची त्याची आंतूनआंतून तयारी चालू होती. त्रिंबकजीने तर कारभार हाती घेतल्यापासून एकसारखी धडपड या एका गोष्टकरितांच चालू ठेविली होती. त्यामुळे व त्याच्या साहसी स्वभावामुळे तो बाजीरावाचा विश्वाससर्वस्व झाला होता. त्याचा ताबा इंग्रजांनी घेतल्यापासून बाजीरावाच्या मनांतून इंग्रज उतरला व आज ना उद्या इंग्रजांशी सामना द्यावयाचा असे त्याने ठरविले. व १३ जूनच्या नव्या व शेटवच्या तहाने तर ही गोष्ट अगदी जवळ आली. नंतर चार महिनेसुद्धां लोटले नाहीत तो इंग्रज आणि पेशवे एकमेकांस मिडले, व हा तेजस्वीपणा बाजीरावाने दाखविला याबद्दल बाजीरावा- त्रिंबकजी डेंगळा १३३ NA. N NAA... wth आपल्या पतीच्या रक्षणासाठी पंचप्राणांची कुरवंडी केली. अशा त-हेनें त्रियक- जीची बायको त्याच्या डोळ्यांदेखत शत्रूकडून मारली गेली. आपण पुरुष म्हणून मारलेला मराठा हा बाप्या नसून बाप्यास लाजविणारी स्त्री आहे आणि ती सुद्धा त्रिंबकजीची बायको आहे हे जेव्हां स्वान्स्टन यांस कळले त्या स्वास मोठा अचंबा वाटला. लिंबकजी भिंत फोडीत उभा होता त्याच्या पर जाण्याची कोणाची ताकद होईना; पण त्रिंबकजी स्वतः दैवावर न गेला होता. धनी राज्यास मुकून परांगदा झाला, जिवाची सोबतीण पळ्यांदेखत मारली गेली, तेव्हां आतां कोणाकरितां धडपडावयाचे हेच त्यास उमजेना ! शेवटी निराश होऊन तो इंग्रजांचे स्वाधीन झाला. त्याचा शिरच्छेद करावा अशी कंपनी सरकारची इच्छा होती, पण आपले हे कृत्य अत्यंत वाईट दिसेल व आपल्या इभ्रतीस धोका येईल म्हणून जन- लज्जेसाठी कंपनी सरकारने त्रिंबकजीचा शिरच्छेद करण्याचा आपला बेत रहित केला, व त्यास बंगालमध्ये चुनारगड येथे जन्मठेप कैदेत ठेविलें. त्याची ९० हजारांची मालमत्ता कंपनी सरकारने जप्त केली; व ती स्वान्स्टन यास बक्षिस दिली. याप्रमाणे या नररत्नाची ओवाळणी मराठी साम्राज्याच्या पायीं झाली! स. १८२४-२५ चे सुमारास बिशप हीवर नांवाचा एक विद्वान इंग्रज गृहस्थ हिंदुस्थानांत प्रवास करण्यासाठी आला होता. प्रवासांत फिरतां फिरतां त्याने ता. ११-९-१८२४ रोजी चुनारगडावर त्रिंबकजी डेंगळ्याची भेट घेतली. त्याने त्याचे वर्णन खालीलप्रमाणे केलें आहेः- "तुरुंगांत कैद्याच्या कोठडीत त्यास ठेविले असून त्याच्यावर देशी व युरो- पियन अशा दोन्ही लोकांचा कडक पाहरा आहे. त्याच्या निजण्याच्या खोलीस सुद्धा लोखंडी जाळीच्या खिडक्या आहेत. आतल्या बाजूस थोडीबहुत मोकळी जागा आहे. तेथे लहानशी बाग, एक पिंपळाचे झाड व टुमदार देऊळ आहे. त्याने चार झाडे लाविली आहेत, त्याच्याजवळ चार नोकर- चाकर आहेत. आंत-बाहेर जातांना त्यांचा अगदी कसून झाडा घेण्यांत येतो. त्रिंबकजी लहानसा ठेंगू असून चेहऱ्यावरून तो चिडखोर दिसतो. अंगावर एक रेशमी धोतर अर्धं सोडलेलें व अर्धे अंगावर टाकिलेलें असतें. माझी त्याच्याशी ओळख करून देण्यात आली, तेव्हां त्याने आंत नेऊन देऊळ, घाग दाखविली आणि. थोडी फुलें तोडून मला दिली. त्यावर - १३४ दुर्दैवी मोहरे मी त्यास म्हटले 'तुमच्यासारख्या सुप्रसिद्ध माणसाची भेट झाल्याबद्दल मला फार आनंद वाटतो.' तेव्हां तो किंचित् हसून म्हणाला, “ ही भेट दुसऱ्या ठिकाणी झाली असती तर मलासुद्धां आनंद झाला असता. आज पांच वर्षे तो चुनारगडास आहे आणि मरेपर्यंत आतां तो येथेच राहणार हे उघड आहे. कंपनी सरकारने फार मोठा दंड घेऊन मुक्तता करावी. मी त्यांची बाजीरावापेक्षा जास्त निष्ठेनें चाकरी क असें विनंति वजा अर्ज त्याने कंपनी सरकारास वारंवार केले; पण त्या, काहीएक उपयोग झाला नाही. त्याच्या मताप्रमाणे याचे कारण म्हणज एल्फिन्स्टन हा होय. तोच त्याचा परममित्र व हाडवैरी असें तो म्हणे. त्यांनीच माझा जीव वाचविला, तेच माझ्या घरादाराची अत्यंत काळजी घेतात; पण मला येथेच कायमचे डांबून ठेवणारे तेच आहेत, असें त्रिंबक- जी म्हणाला. एवढा शूर पुरुष असून त्यास लिहितां वाचतां येत नाहीं (पण हे म्हणणे खोटें आहे. त्यास लिहितां वाचतां येत होते.) हे आश्चर्य ! तो भजनपूजनांत व नोकरांशी गप्पा मारण्यांत आपला काळ घालवितो. नोकरांपासून पैन् पै हिशेब घेण्यांत तो दक्ष असतो. एकदा स्वयंपाक्याने नूप चोरले तर त्याने त्याचा फार गवगवा केला. चुनारगड येथे कैदेत असतांच त्रिंबकजी १६-१०-१८२९ रोजी मरण पावला. त्याची मुद्राः-श्रीमंत पंत प्रधान चरणी तत्पर । मल्हारजी सुत त्रिंबकजी डेंगळे निरंतर ॥ त्याच्या मुद्रेप्रमाणे त्रिंबकजी अक्षरशः वागला. " समाप्त.
त्रिंबकजी डेंगळा १३१ " विषयी आदर वाटतो. नाही तर छोटासा संस्थानिक म्हणून त्याला सुद्धा जगतां आले असते. बाजीरावाचो आणि एल्फिन्स्टनची शेवटली भेट ता. १७ ऑक्टोबरला झाली, त्या वेळी बाजीरावाने काढलेले उद्गार मोठे भिक आहेत. तो म्हणतो- तुमचे आमचे ऐक्यतेस किती संवत्सरे झाली, आगमनिगम भूत- न्य पाहून तुम्हांशी ऐक्यता केली. ते समयीं करारमदार, कित्येक भाच्या तजविजी करून रूपास आणावे याचा जिम्मा तुम्ही सर्व प्रकारे करता आजतागाईत काय झाले ह्याचे स्मरण करावें. असें बहुधा प्रकारचे बोलणे त्याचेपुढे ठेवून कुंठित करून बोलणे बंद झाले. इतकें तुम्ही करीत असतां तुमचे मनाप्त मी कदापि तोडिले नाही. येणेकरून ऐश्वर्य अथवा जो पदार्थ माझे अंगीं होता तो तेचहीन झाला. मी मूळ मंत्रावेगळा तुमचे करण्याने झालों जो मी होतो तो आज नाही. तुम्ही कशास पुसता! तुमचे स्नेहाची जोड मात्र केली की जी कला अंगी होती ती दवडून बसलों. यानंतर बाजीराव व इंग्रज यांचे युद्ध होऊन बाजीरावाचा सपशेल पराभव झाला व तो इग्रजांचे स्वाधीन झाला. बाजीरावाचा अत्यंत विश्वासु स्नेही डेंगळा हा शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होता; पण आतां आपला अन्नदाता, स्नेही व यजमान इंग्रजांचे स्वाधीन होणार व तसे केल्यावांचून त्यास आतां गति नाही असे पाहतांच त्रिंबकजी गैबच झाला (गुप्तच झाला). कोणीकडे गेला याचा कोणास पत्ता लागेना आणि पत्ता लागावा म्हणून तो गेला होता कोठे? त्याच्यासारख्या मानी पुरुषास हैं जीवित म्हणजे श्वानसूकराचे जिणे वाटले असेल. पण करतो काय बिचारा! दैव फिरले. पन्नास-साठ किल्लयांचा धनी व दहावीस हजार स्वारांचा सेनानी, नेहमी मनगटासारख्या मिशांस पीळ घालून हिंडणारा पेशवे दरबारचा मानाचा मानकरी पण त्याला दिवाभीतासारखें तोंड लपवून काळोखांत दिवस कंठण्याचा वखत आला. पण आल्या प्रसंगास तोंड देण्याचे त्याने ठरविले. पेशव्यांच्या लष्करांतून जी स्वारी नाहीशी झाली ती थेट त्याने सासूरवाडी गांठली. त्याची सासूर- वाडी म्हणजे अहिरगांव. हा नाशिक जिल्ह्यांत आहे. येथे तो गुप्तपणे राहूं लागला. ठाण्याच्या किल्लयांतून त्रिंयकजी निसटल्यापासून इंग्रजाने बाजीरावाकरवीं व स्वतः त्याला पकडण्यासाठी जाहीरनामे काढिले, बक्षिसें लाविली, पण दुर्दैवी मोहरे 4 त्रियकजी असा वस्ताद की तो त्यांच्या हाती लागेना. पण महाराष्ट्रास- किंबहुना अखिल भारतवर्षास लागलेल्या फितुरीचा महारोग या वेळी- हि नडला. एक स्त्री व त्रिंबकजीचा नोकर इंग्रजास फितुर झाले. मन ब्रिग्जला त्रिंबकजीच्या ठिकाणाची माहिती दिली. त्याबरोबर कॅ. पाक हा एक हजार स्वार बरोबर घेऊन अहिरगांवी आला. त्या वेळी ! त्रिंबकजी सडा होता व आपले अज्ञातवासाचे दिवस कसे ती .. होता. तेव्हां इंग्रजांस त्रिंबकजीला पकडण्याचे शूर कृत्य करम चढला. त्यांनी लगेच गांवाची नाकेबंदी केली आणि पहांटे त्रिंबकजी गाट' झोपी गेला असताना त्याच्या गळ्याभोवती गळफांस टाकला त्रिंबकजीच्या वाड्यास गराडा घातला. वाडा दोनदां तळघरे-बळदासुद्धां शोधला; पण त्रिंबकजीचा पत्ता लागेना. शेवटी तिसऱ्यांदा मात्र त्रिंबकर्जाचे दुर्दैव ओढ- बलें. तो एका बळदांत लोग्वंडी चोरदाराच्या पलीकडे एक जिना होता त्या ठिकाणी फरारी होण्यासाठी म्हणून भिंत फोडीत होता. त्यास धरण्यासाठी म्हणून इंग्रजांचे लोक जाऊ लागले, तो त्यांस एका वीर मालाइताने अडथळा केला व येणाऱ्या इसमास भाल्याने ठार करण्याचा त्याने सपाट चालविला. एकट्या माणसाने तीस असामी ठार केले, हे पाहून स्वान्स्टन घाबरला व या बेहोष माणसास कसे कह्यांत आणावें हेच त्यास सुचेना. तेव्हा शेवटी कंटाळून त्याने त्या पराक्रमी भालाइतावर गोळ्या झाडण्यास हुकूम दिला. आपला प्राण घेण्याकरितां आतां बंदुकीतून गोळ्या सू सू करत येणार हे त्याने पाहिले; पण त्याची स्वामिनिष्ठा इतकी जाज्वल्य, की झाचे त्यास काहीहि वाटले नाही. आपल्यावर सू सू करीत येणाऱ्या गोळ्या ह्या प्राणघातक नसून त्यांच्यांत अमृततुल्य संजीवन सांठविलेले आहे असे त्यास वाटत असल्यामुळे त्याचे आसन थोडे सुद्धा ढळले नाही. तो भिंताडासारखा ताठ होता. त्याला कशाचीहि कदर नव्हती. यजमानाचे रक्षण हेच आपले दिव्यनिधान वैकुंठ अशी त्याची भावना होती. टोपीकर इंग्रजांच्या लोकांनी सोडलेल्या गोळ्या त्याच्या अंत:- करणाचाभेद करून जातांच त्याचा वीर देह खाली पडला, तो मराठा शेराच्या मरणाने मेला, त्याचे सोने झाले! त्या पुरुषाला जवळ जाऊन पाहतात तों खरोखरीच आश्चर्य ! तो पुरुष नसून पुरुषवेष धारण करणारी स्त्री होती. ती त्या वीर त्रिंबकजीची वीर पत्नी होती! धन्य आहे त्या पतिव्रतेची की जिने
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.