Library
Naathamaadhava Trot'aka Charitra Va Aat'havand-ii
Front matter
THE BOOK WAS DRENCHED
नाथमाधव
त्रोटक चरित्र व आठवणी
संपादक
पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी
प्रस्तावना
श्री. वि. स. खांडेकर
किंमत २ रुपये
UNIVERSAL
LIBRARY
OU_184476
LIBRARY
UNIVERSAL
OUP-391-29-4-72-10,000. OSMANIA UNIVERSITY LIBRARY M928 Call No. KAN Accession No. M2313 Author कुकी, पु. बा. माथायव त्रोटक चार- Title This book should be turned on or before the date last marked below.
No text on this page.
Exaoxxaa XXCOOD Comeo Comeo cm.nyonxxam.XXKXXCODX5I : स्थापना १८९४: वीरकर आहार भवन गिरगांव म्हणजेच पूर्वीचे श्री. वीरकर यांचे वेलणकर्स रेस्टॉरंट xcmXXXXCOIDXXCa... SCXXXXXXXXXxxxanixnxx..mamxx..mx xcxxcarxxai.sxxcai.mmxxamXxc..mXCL) स्वच्छता, सुव्यवस्था, रुचकर व स्वादिष्ट उपहाराचे पदार्थ, तसेच सुग्रास भोजन, यामुळे येथे येणारें गिहाईक नेहमी खूष असते. मालक श्री. एन्. जी. वीरकर हे युरोप-अमेरिकेंत मिळविलेल्या अनुभवांचा संपूर्ण फायदा या आहारभवनास आदर्श बनविण्यासाठी करून देत आहेत. त्यांची व्यक्तिगत देखरेख हे एक वैशिष्ट्य आहे. भोजनाची वेळ सकाळी ९ ते १॥ व सायंकाळी ६ ते ९॥. रिफ्रेशमेंट सर्विहस सकाळी ७ पासून रात्रौ १० पर्यंत. स्त्रियांसाठी स्वतंत्र व खास व्यवस्था. दुकान कायद्याप्रमाणे दर रविवारी संपूर्ण बंद. ग्राहकांनी एक वेळ भेट देऊन येथील चोख व्यवस्थेबद्दल खात्री करून घ्यावी. COXXX..) amanxxra.000 SKOOXXXo ...... DXXa... DXXC ...... 00.00 C00 C00000 ...... Dx2
टे. नं.
sasdrasdrasedato
HONESTY IS THE BEST POLICY
६०३५१
तारेचा पत्ता : जुवेल किंग
॥ श्री सोमेश्वर प्रसन्न ॥
अनेक वर्षे लोकादरास पात्र झालेली
-
-
हरी महादेव वैद्य
SEASORSepSORSP
SasurasRGRSeasedrasdase
( रत्नागिरीकर यांची)
सोने-चांदीच्या दागिन्यांची लोकप्रिय पेढी
[ स्थापना १९२५]]
कोहिनूर सिनेमा बिल्डिंग, दुकान नं. ३-४ दादर,
मुंबई नं. २८
आमच्या येथे आधुनिक पद्धतीचे सोने-चांदीचे सुंदर व
सुबक दागिने तयार मिळतील. तसेंच नमुन्याप्रमाणे अनेक
डिझाईनचे दागिने वक्तशीर व योग्य भावाने तयार करून
मिळतील. खऱ्या कल्चर्ड मोत्यांचे तयार दागिन्यांचा भरपूर
स्टॉक नेहमी तयार असतो. बाहेरगांवीं माल व्ही. पी. में
पाठविला जातो व बाहेरगांवचे ऑर्डर्सकडे विशेष लक्ष पुरविलें
जाते.
ॐ गि-हाइकांचा संतोष हेच आमचे ध्येय
ssasaseascaseascas
SERSURSERS
नाथमाधव
घोटक चरित्र व आठवणी
संपादक
पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी
प्रस्तावना
श्री. वि. स. खांडेकर
किंमत २ रुपये
-प्रकाशक- - पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी बरोज लेन, टोपीवाला बिल्डिंग, मुंबई नं. २ सुधारून वाढविलेली नवीन आवृत्तिः १ जुलै १९५३ (सर्व हक्क प्रकाशकाधीन) - - मुद्रक- लक्ष्मीबाई नारायण चौधरी निर्णयसागर प्रेस, २६।२८ कोलभाट स्ट्रीट, मुंबई २ दोन शब्द श्री. पु. बा. कुळकर्णी हे चरित्रकार या नात्याने मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. 'नाथमाधव-चरित्र व आठवणी' हे छोटे पुस्तक संपादित करून आज ते त्याच प्रकारचे एक आवश्यक साहित्यविषयक कार्य करीत आहेत. केशवसुत विद्यार्थी असतांना दुर्मुखलेला म्हणून कुणीतरी त्यांचा उपहास केला. त्यावेळी त्यांनी त्याला अभिमानाने उत्तर दिले, 'माझ्या प्रतिभेतून अमृततुल्य काव्याचा ओघ वाहणार आहे. त्या अमृताचा आस्वाद घेतांना कवीचा चेहरा कसा होता हे कुणींहि विचारणार नाही.' केशवसुतांचे हे उत्तर स्वाभिमानाच्या दृष्टीने बरोबर असेल. पण अनुभवाच्या कसोटीवर मात्र ते तितकेंसें खरे ठरणार नाही. आपला प्रिय लेखक कसा होता, याविषयींचें पाश्चात्य देशांतील कुतूहल पाहिले की मोठमोठ्या मुत्सद्यांना आणि बड्या बड्या कारखानदारांना सुद्धा साहित्यिकाच्या भाग्याचा हेवा वाटेल. आपला आवडता लेखक कोणत्या प्रकारच्या खुर्चीत बसत असे, त्याची लिहिण्याची वेळ कोणती, त्याला चहा आवडे की कॉफी आवडे, त्याला स्फूर्ति कशी येई, तो कोणत्या रंगाच्या शाईने लिहीत असे, असल्या थोड्या फार बालिश वाटणाऱ्या प्रश्नांपासून त्याच्या आयुष्यात किती प्रेयसी आल्या, त्याचे खरें प्रेम कुणावर होते, त्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान काय होते, विशिष्ट परिस्थि- तीत तो अशाच रीतीने का वागला, त्याचे जीवन त्याच्या वाङ्मयांत कुठे कुठे प्रतिबिंबित झाले आहे, अशा गंभीर प्रश्नांपर्यंत तिकडील वाचक आणि टीकाकार चर्चा करीत असतात. स्टेंडाल (Stendhal) हा फ्रेंच कादंबरी- कार आपल्याकडे फारसा माहीत नाही. पण 'स्टेंडाल अर्थात् सुखाचा शोध' या नावाने मॅथ्यू जोसेफसनने लिहिलेले त्याचे चरित्र मी नुक्तंच वाचलें. साडेचारशे पानांचा ग्रंथ आहे हा. त्यांत स्टेंडालचे बालपणापासूनचे चरित्र इतक्या बारकाईने चित्रित केले आहे की, ग्रंथकार जणुं काही त्याचा " बालमित्रच असला पाहिजे, त्याशिवाय त्याला आपल्या नायकाच्या स्वभा- वांतले आणि आयुष्यातले इतके बारकावे दिग्दर्शित करतां आलेच नसते असे वाचकाला वाटते. जीवन आणि वाश्मय यांचे धागेदोरे किती सूक्ष्मतेने गुंफले गेलेले असतात, लेखकाच्या भावभावनांची आणि विचारा-विकारांची छाया त्याच्या वाड्मयावर अदृश्य रीतीने कशी पसरलेली दिसते, हे या पुस्तकांत स्पष्टपणाने दृष्टोत्पत्तीला येते. इवाइगची 'Adepts in selfportraiture' व 'Three Masters' ही याच प्रकारची पण अधिक अभिजात व प्रतिभायुक्त पुस्तकें. लेखकाविषयींचे हे कुतूहल पहिल्यापासूनच आपल्याकडे कमी आहे. आम्ही 'मेघदूत' मिटक्या मारीत वाचूं. पण यक्षानें मेघाला जिथे आपला संदेश सांगितला, तो हा कालिदासाच्या आयुष्यांतला पर्वत म्हणून त्याचे दर्शन घ्यायला कांहीं आम्ही धावणार नाही. संशोधन हे भारतीय मनो- वृत्तीला जणुं कांहीं आपलें सावत्र मूलच वाटते. अशा स्थितीत आधुनिक लेखक व कवी यांच्यासंबंधाने जेवढे विविध व चिकित्सक साहित्य उपलब्ध असावे तेवढे नाही, यांत अस्वाभाविक असें काय आहे ? सर्व दृष्टींनी विचार केला तर गेल्या पाऊणशे वर्षांतील ललित लेखकांत अग्रपूजेचा मान हरिभाऊ आपट्यांना द्यावा लागेल. अशा प्रतिभा- शाली ग्रंथकारावर त्याच्या मातृभाषेत काय काय लिहिले गेले आहे याचा आढावा आपण घेऊ लागलो तर तीन चार पुस्तकें मिळतील. नाही असे नाही. पण ती मुख्यतः माहितीवजा आहेत. रसिकता व चिकित्सकता, तत्कालीनता आणि चिरंतनता, प्रतिभाविलास आणि जीवनविकास या सर्वांची सांगड घालून त्यांतून निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षांच्या अनुरोधानें हरिभाऊंचे मूल्यमापन अद्यापि व्हावयाचे आहे. म्हणूनच नाथमाधवांच्या बाबतींतला हा उपक्रम मला अभिनंदनीय वाटतो. या पुस्तकांत प्रारंभी संपादकांनी नाथमाधवांचे में छोटे चरित्र दिले आहे ते मोठे हृदयस्पर्शी आहे. प्रत्येकाने आपले जीवन प्रामाणिकपणे चित्रित - केले तर त्यांतून एक चांगली कादंबरी निर्माण होईल असे म्हणण्याचा प्रघात आहे. पण मला वाटते, कित्येकांच्या आयुष्यांचे कादंबरीपेक्षां नाट- काशींच अधिक साम्य असते. नाथमाधवांचे आयुष्य अशा नाट्यपूर्ण घट- नांनी भरलेले आहे. एका शूर, धाडसी तरुणाचा प्रेमविवाह ठरतो, सुखी संसाराची स्वप्ने पाहत तो लग्नाकरितां रजा मागतो, रजा मंजूर होते, पण त्याच दिवशी वरिष्ठाला सिंहगडासारख्या ठिकाणी शिकारीकरितां जायची लहर येते. तो या साहसी तरुणाला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह करतो, पण शिकारीला गेलेल्या या तरुणाची दैवच शिकार करते. शिकार करतांना मागें तोल जाऊन त्याचा कडेलोट होतो. या अपघातामुळे तो तरुण जन्माचा पंगु बनतो आणि सर्व सुखांना मुकतो; पण शेवटीं दैवाचा डाव तो त्याच्या- वर उलटवितो. पंगुत्वांतून त्याची प्रतिभा विकसित होते. एका जागी खिळून राहिलेल्या त्याच्या शरीरांतले मन सर्वकाळी, सर्वस्थळी स्वच्छंदाने संचार करूं लागते. दुर्बल देहाची भरपाई आत्म्याच्या सामर्थ्याने केली जाते. किती रोमहर्षक जीवनकथा आहे ही! आणि नवल हे की तिच्यांतला एकहि दुवा कल्पित नाही. पाश्चात्य देशांत असा ग्रंथकार जन्माला आला असता तर त्याचा हा विलक्षण जीवनसंग्राम रुपेरी पडद्यावर केव्हांच चित्रित झाला असता! नाथमाधवांनी आयुष्याच्या आरंभी लष्करी खात्याकडे धाव घेतली ती कांहीं उगीच नाही. ते जन्मतःच सैनिक होते. शेवटपर्यंत ते सैनिकच राहिले. आमरण त्यांनी दुर्दैवाशी झगडा केला, आणि या विषम संघर्षांत शेवटी ते यशस्वी ठरले. त्यांनी कादंबरीकार म्हणून मराठी वाङ्मयांत आपलें नांव अमर केले. स्वातंत्र्यशाहीर गोविंदाची जीवनकथा अशीच आहे. शरीराने पंगु अस- लेल्या माणसांत वास करणाऱ्या या तेजस्वी आत्म्यांचे दर्शन घेतांना माझ्या मनांत येते-त्यांतल्या तेजाचा लहानसा कण जरी सर्वसामान्य माणसांनी संपादन केला तरी मानवी जीवनावर पसरलेली अवकळा अंशतः नाहीशी होईल.
६ व्यक्ति व वाय या दोन्ही नात्यांनी नाथमाधवांच्या एकवीस स्नेह्यांनी व चाहत्यांनी या पुस्तकांत लिहिले आहे. त्यांच्या लेखनाचे स्वरूप त्रोटक असले तरी या पद्धतीमुळे नाथमाधवांविषयींच्या अनेक हृदयंगम आठवणी वाचून वाचकाचे मन हेलावल्यावांचून राहत नाही. प्रत्येकाच्या लेखनांत त्याच्या त्याच्या व्यक्तित्वाचे प्रतिबिंब पडले असल्यामुळे हे लेख अधिकच मनोरंजक वठले आहेत. उदाहरणच द्यायचे तर ते ठाकऱ्यांच्या आठवणींचे देता येईल. गौरवपर व माहितीपूर्ण असे दोन्ही प्रकारचे लेख या छोट्या पुस्तकांत आहेत. त्या सर्वांचे रसिक व चिकित्सक बुद्धीने सार काढले की नाथमाधवांची मूर्ति डोळ्यांपुढे उभी रहायला अडचण पडूं नये. अशा प्रका- रच्या लेखांत त्याच त्याच गोष्टींची आवृत्ति होणे अपरिहार्य असते. सिंह- गडावरला अपघात किंवा अशाच दुसऱ्या काही गोष्टी वाचकाला पुनः- पुन्हां वाचाव्या लागतात याचे कारण हेच आहे. कादंबरीकार नाथमाधवांसंबंधाने या आठवणींत सर्वांकडून थोडे थोडे लिहिले गेले असले तरी विवेचन या दृष्टीने ते फार अपुरे ठरेल. केवळ आपल्या हयातीतच नव्हे तर मृत्यूनंतरहि ज्यांची लोकप्रियता दीर्घकाळ कायम टिकते अशा विरळ लेखकांत नाथमाधवांची गणना होते. साधी व सुबोध भाषा, कथालोलुप वाचकाला रंजविणारी रचना, सात्त्विक व तेजस्वी अशा भावनांचा आविष्कार, इत्यादि गुणांमुळे त्यांचे आकर्षण आजतागायत सर्वसामान्य वाचकाला वाटत आले आहे. हरिभाऊंची प्रतिभा, वामनराव जोश्यांची वैचारिकता, फडक्यांची कला, इत्यादिकांनी मराठी कादंबरीच्या विकासाला जसे मोलाचे साहाय्य केले आहे, तसा नाथमाधवांनींहि तिच्या लोकप्रियतेला मोठ्या प्रमाणांत हातभार लावला आहे. काळ, कला, व्यक्तित्व, वैशिष्टये इत्यादि दृष्टींनी त्यांच्या या विपुल कादंबरीवाड्मयाची चिकित्सा विद्वान रसिकांनी यापूर्वीच करायला हवी होती. या छोट्या पुस्तकाने तरुण पिढीतील एकाद्या अभ्यासकाला तशी प्रेरणा दिली तर श्री. कुलकर्णी यांचे परिश्रम पूर्णपणे सार्थकी लागतील. राजारामपुरी, कोल्हापूर. ता. १-६-१९५३ वि. स. खांडेकर
कै. सौ. अलका वीरेंद्र पितळे
AM
याच्या पुण्यस्मृतास
सादर समर्पण
No text on this page.
संपादकीय निवेदन व आभारप्रदर्शन जनमनाचें सात्त्विक मनोरंजन करून पारतंत्र्याच्या काळांत जनतेला कर्तव्याची जाणीव करून देणारे वीर कादंबरीकार कै. नाथमाधव यांच्या निधनास पंचवीस वर्षांचा काळ लोटला, तरी वाचकांच्या मनावरील त्यांच्या कादंबऱ्यांची पकड अद्यापिही कायम आहे. अजूनही त्यांच्या कादंब-या आबालवृद्धांकडून आवडीनें वाचल्या जात आहेत. विपरीत परिस्थितीशी टक्कर देऊन त्यांनी विपुल, त्याचप्रमाणे वाचकांच्या विचारांस चालना देणाऱ्या वाङ्मयाची निर्मिती केली. कितीही बिकट व असहाय्य परिस्थिती वांट्यास आली तरी निराश न होतां मनुष्याने आपले कर्तव्यपालन अत्यंत कसोशीनें करावें व जो मनावर घेईल त्याला तसे करता येते, हाच त्यांचा जीवनसंदेश आहे. पडत्या काळांतही घनघोर जीवनसंग्रामांत यश कसे मिळवावें हे त्यांनी स्वतःच्या उदात्त उदाहरणाने सर्वांना दाखवून दिले. अशा या थोर व झुंझार कादंबरीकाराचे जीवन नाट्यपूर्ण व रोमहर्षणकारक असल्यास नवल नाही; परंतु त्यांचे जीवनचरित्र किंवा त्यांच्या जीवनविष- यक आठवणी फारशा उपलब्ध नाहीत. श्री. वि. द. चिंदरकर यांनी लिहिलेल्या छोटेखानी चरित्राचा या ठिकाणी साभार उल्लेख करणे जरूर आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी (१९३६) नाथमाधवांच्या काही लेखक मित्रांकडून व चहात्यांकडून महत् प्रयासांनी मिळविलेल्या आठवणींचे एफ छोटें पुस्तक आम्ही प्रसिद्ध केले होते; परंतु त्याच्या प्रती फार थोड्या काढण्यांत आल्यामुळे त्याचा फारसा प्रचार होऊ शकला नाही व आज तें पुस्तकही दुर्मिळ झाले आहे. त्यानंतर नाथमाधवांच्या आठवणी मिळविण्याचा आमचा उद्योग सतत चालूच होता. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत या उद्योगांत सहाय्य केले त्यांचे आम्ही आभारी आहोत.नाथमाधवांच्या डायऱ्या, तसेच अन्य मार्गानी मिळवितां आली तेवढी माहिती मिळवून तिच्या आधारे लिहिलेले नाथमाधवांचें एक त्रोटक चरित्र या आठवणीं- बरोबर प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे चरित्र व आठवणी वाचणाऱ्या वाचकापुढे नाथमाधव कसे होते व कोणत्या परिस्थितींत त्यांनी कादंबरीलेखन केले व आपले असहाय्य परंतु स्फूर्तिदायक जीवन त्यांनी कशा रीतीने घालविलें याचे चित्र उभे करावें, हाच यांत उद्देश आहे. तो अंशतः तरी साध्य व्हावा एवढीच आमची आकांक्षा आहे. या छोट्याशा पुस्तकास महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार श्री. वि. स. खांडेकर यांनी प्रस्तावनेदाखल 'दोन शब्द' लिहावे अशी मनापासून इच्छा होती. तिला अनुसरून आम्ही व आमचे परम स्नेही प्रा. का. धों. पेडणेकर एम्. ए. यांनी त्यांस विनंति केली व ती मान्य करून त्यांनी वेळांत वेळ काढून 'दोन शब्द' लिहून पाठविले, याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच होतील. लेखकानें ग्रंथप्रकाशनाच्या क्षेत्रांत सहसा पाऊल टाकू नये. कारण तो त्याचा प्रांत नव्हे. असे असतांही आम्ही जाणूनबुजून तें धाडस केलें; परंतु आमच्या अनेक नाथमाधवप्रेमी मित्रांच्या व चहात्यांच्या प्रेमळ व उदार सहकार्यामुळे पाय फारसा न भाजतां त्यांतून पार पडतां आलें, हे लिहिण्यास समाधान वाटतें. नाथमाधवांचे निस्सीम अभिमानी, चहाते व त्यांचे निकटवर्ती नातलग श्री. वीरेंद्र वसंतराव पितळे यांनी ग्रंथप्रकाशनासाठी उदारहस्ते सहाय्य करून या कार्यांत जे उत्तेजन दिलें तें चिरस्मरणीय तसेंच अभिनंदनीय आहे. नाथमाधव स्मारक समीतीनें स्मारकाच्या दृष्टीने अशा प्रकाशनाचे महत्त्व ओळखून परत- फेडीच्या रूपाने में आर्थिक सहकार्य केले त्याबद्दल आम्ही कितीही कृतज्ञताभाव प्रगट केला तरी तो थोडाच होईल. तसेंच आमचे सन्मित्र, चहाते व नाथमाधव- प्रेमी श्रीमान् भालचंद्र रावजी शंकरशेट बी. ए. म्यु. कौन्सिलर, श्री. दत्ताराम गणपतराव ऊर्फ भाईजी शेटे जे. पी. ऑ. प्रे. मॅजिस्ट्रेट, सौ. आनंदीबाई लक्ष्मणराव कवळे, श्री. गजाननस्वामी बोरकर, श्री. दत्ताराम धोंडो ऊर्फ भाई- साहेब देवरूखकर जे. पी. ऑ.प्रे. म. व म्यु. कौन्सिलर, वैद्यराज रामचंद्र सदाशिव वेदपाठक, वैद्यभूषण विष्णुपंत पागनाथ, विठ्ठल जामसंडेकर, श्री. वामन लक्ष्मण डेरे व श्री काशीनाय बांबोजा तार यांनी याच वेळी नव्हे तर वेळोवेळी आमच्या वाड्मयकार्यस हातभार लावून आम्हांला कायमचें ऋणी करून ठेविले आहे. त्याचप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन ज्यांनी ९ ज्यांनी जाहिरातींच्या रूपानें ग्रंथप्रकाशनास हातभार लाविला त्यांचे आम्ही आभारी आहोत. या पुस्तकाचा सुंदर कव्हर-डिझाईन अत्यंत थोड्या वेळांत व विनामूल्य करून देणारे नाणावलेले रेखाचित्रकार श्री. दि. ल. धारगळकर यांनी, त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट ब्लॉक्स बनविण्यांत कुशल असे श्री. एच्. एस्. धारगळकर, मालक-प्रेस प्रोसेस स्टुडिओ यांनीही अल्पावधीत व आपुलकीनें जरूर ते ब्लॉक्स तयार करून दिले, याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक ऋणनिर्देश करणे अत्यंत जरूर आहे. कै. नाथमाधव यांचे पुतणे व आमचे मित्र श्री. विश्वासराव खं. पितळे यांनी आम्हांला जरूर असलेली माहिती तसेंच दुर्मिळ असे फोटो पुरवून या पुस्तकाच्या उपयुक्ततेत व सौंदर्यात भर घातल्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. शेवटचे परंतु महत्त्वाचे आभार मानावयाचे राहिले ते निर्णयसागर प्रेसचे मालक, मॅनेजर व प्रेसमधील उत्साही कामगार मंडळी यांचे. या सर्वांनी आम्हाला अनंत सवलती देऊन व वेळप्रसंगी त्रास सोसून ग्रंथप्रकाशनाच्या बाबतींत में सहकार्य केलें, त्याचे स्मरण आम्हांला चिरंतन काळपर्यंत राहील. या मंडळीचें सहकार्य आम्हांला नेहमींचेंच लाभले आहे. याप्रमाणे अनेकांचे प्रेमळ सहकार्य लाभल्यामुळे ही अल्पशी वाङ्मयसेवा आमच्या हातून घडत आहे. तिचे श्रेय आमच्या उपरोक्त सर्व सहकाऱ्यांस देऊन व पुन्हां एकवार त्यांचे आभार मानून आम्ही वाचकांची रजा घेतों. सर्वांचा नम्र, बरोज लेन, टोपीवाला बिल्डिंग, मुंबई नं. २ पु. बा. कुळकर्णी
No text on this page.
अनुक्रमणिका
दोन शब्द-ले. वि. स. खांडेकर
भाभार प्रदर्शन
विषयानुक्रमणिका
विषय
पृष्ठ
त्रोटक चरित्र
१
१ रम्य ते बालपण!
२ सिंहगडावरील शिकार !
३ साहित्यसेवेचा ओनामा
४ ऐतिहासिक कादंबऱ्यांची पार्श्वभूमि
५ नाथमाधवांचा कर्मयोग
आठवणी-लेखक
३३
४९
५४
१ श्री. ना. वि. कुळकर्णी
२ प्रा. ना. के. बेहरे, एम् . ए. बी. एस्. सी.
३ रा. सा. गोविंद सखाराम सरदेसाई, बी. ए.
४ म. भा. भू. ज. र. आजगांवकर
५ श्री. धोंडो रघुनाथ तेंडूलकर
६ श्री. भार्गवराम विठ्ठल वरेरकर
७ श्री. यशवंत नारायण टिपणीस
८ श्री. केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार
९ श्री. पी. आर. लेले, बी. ए. एलएल. बी.
६३
७०
१२
९९
१०१
१०२
१० श्री. विठ्ठल वामन हडप
११ श्री. गणेश महादेव वीरकर
१२ श्री. श्रीपाद केशव नाईक
१३ शेठ दामोदर सांवळाराम यंदे
१४ महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बी. ए.
१५ श्री. गजानन व्यंबक माडखोलकर
१६ प्रा. श्रीकृष्ण स. भावे, एम्. ए. एलएल. बी., पी. एच्. डी.
१७ प्रा. कृ. र. पोतदार एम्. ए.
१८ डॉ. मि. भ. परब, एम्. ए.,
डी.
१९ श्री. अग्युत बळवंत कोल्हटकर
२० प्रा. विश्वनाथ गोपाळ शेट्ये, बी. ए. एलएल. बी.
२. प्रा. सौ. चारुशीला गुप्ते, एम्. ए.
१०३
पी. एच.
११४
१२५
कै. नाथमाधव
जन्म-४ एप्रिल १८८२]
[ मृत्यु-२१ जून १९२८
No text on this page.
नाथमाधव चरित्रक आठवणी. त्रोटक चरित्र प्रकरण पहिले रम्य तें बालपण! नाथमाधव यांचा जन्म मुंबईतील सुसंपन्न अशा पितळे घराण्यात सोमवार ता. ३ एप्रील इ. स. १८८२ रोजी झाला. व्यवहाराच्या दृष्टीने सोइस्कर व सुट- सुटीत असें नाथमाधव हे नांव त्यांनी वाड्मयक्षेत्रांत पदार्पण केल्यानंतर घेतले असले तरी त्यांचे पाळण्यांतील नांव होतें द्वारकानाथ माधवराव पितळे. सर्वसाधारणपणे पहातां त्यांच्या आयुष्याचे तेवीस तेवीस वर्षांचे असे दोन भाग पडतात. अपघात- पूर्व जीवन व अपघातोत्तर जीवन यांमध्ये केवढी तरी क्रांतिकारक तफावत झालेली दिसून येते. सर्वच बाबतींत थारेपालट झाला मग नांवांत तरी थारेपालट का होऊ नये ? तो क्रांतिकारक बदल होण्याचा, त्यांच्या जीवनातील काळ येईपर्यंत, आपण त्यांना तूर्त द्वारकानाथ याच नावाने संबोधू या. द्वारकानाथ बालपणीं अत्यंत व्रात्य व खेळाडू होते. अभ्यासापेक्षा त्यांचे लक्ष खेळांकडे फार असे; आणि पुढे वयोमानाबरोबर या खेळकर वृत्तीची वाढ होत गेली. मराठी शिक्षण संपवून इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईतील आर्यन एज्युकेशन सोसा- यटीच्या हायस्कूलमध्ये काही वर्षे घालविल्यानंतर ते बोरीबंदरजवळील न्यू हाय- स्कूलमध्ये दाखल झाले. अभ्यासापेक्षा क्रिकेटकडे त्यांचे विशेष लक्ष्य असे. येथे त्यांच्या या वृत्तीस उत्तेजन मिळू लागले.
२ ६०।६५ वर्षांपूर्वीच्या त्या काळांत सारें विद्यार्थी-जग क्रिकेटनें भारले गेले होते. आजही त्या खेळाचे महत्त्व काही कमी झालेले नाही. त्या खेळात प्रावीण्य दाखविणाऱ्याचे नांव हां हां म्हणतां सर्वतोमुखी होत असे. हायस्कूलच्या शील्ड सामन्यांत पितळे हटकून निवडून यावयाचेच. टोलवाटोलवी असो, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण असो; सर्वत्र त्यांची चमक दिसून येत असे. एकाद्या सामन्यांत पितळे खेळणार हे समजताच त्यांचा नेत्रदीपक खेळ पाहाण्यासाठी सारे क्रिकेटप्रेमी विद्यार्थीजग क्रीडांगणावर लोटत असे. या खेळांत वेळोवेळी प्रगट केलेल्या प्रावीण्या- मुळे त्यांनी पदकें, पोषाख व नाना प्रकारची बहुमोल बक्षिसे मिळविली होती. क्रीडांगणावर आपल्या यशस्वी बॅटीच्या बळावर द्वारकानाथ पितळे यांनी असंख्य लहानथोर प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवाव्या. सर्वांकडून वाहवा मिळविणे व सर्वांच्या कौतुकाचा विषय होऊन रहाणे ही जीवनांतील लहानसहान घटना नव्हे. त्यामुळे आपले आयुष्य हे पराक्रमाच्या गोष्टी करून दाखवून सर्वांच्या कौतुकाचा विषय होऊन रहाण्यासाठी आहे, असें द्वारकानाथ यांस त्या वयांतही वाटणे खाभाविक होते. द्वारकानाथ यांस विनायक, खंडेराव, वसंतराव व यशवंतराव हे चार बंधु व अहिल्याबाई व सुंदराबाई त्या दोन बहिणी होत्या. द्वारकानाथ हे सर्व बंधूंत वयाने लहान असल्यामुळे सर्वांचे लाडके होते. त्यांच्या इच्छेआड सहसा कोणी जात नसे. ते करतील ते करू द्यावयाचें; यामुळे त्यांचा स्वच्छंदीपणा उत्तरोत्तर वाढत गेला. सारे लक्ष खेळांकडे; त्यामुळे १८९९ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेस बसले व त्यांत अपयश मिळाल्यानंतर क्रिकेटचे क्रीडांगण गाजवायला सर्वस्वी मोकळे झाले। याच काळात त्यांना आणखी एक छंद जडला. जुन्या तरवारी, बंदुका, बर्ची, भाले वगैरे प्राचीन हत्यारांचा एक संग्रह त्यांच्या पहाण्यांत आला व तो दीर्घकाळ- पर्यंत त्यांच्या कुतूहलाचा विषय होऊन राहिला. शिवकालीन व शिवपूर्वकालीन हत्यारांनी ज्याप्रमाणे त्यांचे लक्ष वेधून घेतले त्याचप्रमाणे थोर पुरुषांच्या पराक्रमाचे पोवाडे त्यांच्या वाचण्यांत येऊन मनावर पूर्वी न घडलेले असे नवसंस्कार छान आले.
३ या घटनेला तसेंच एक कारण घडले. श्री. पांडुरंग लिगाडे या नांवाच्या गृहस्थाशी त्यांची या काळांत मैत्री जडली. त्यांनी वीरवृत्तीला पोषक अशा या नवीन दालनात त्यांचा प्रवेश घडवून आणिला. एवढेच नव्हे तर बंदुकीचा नेम अचूक कसा साधावा, निरनिराळी हत्यारे कशी वापरावी, याचीही त्यांना माहिती करून दिली. या जगांत बौद्धिक क्षेत्रांत नांव घेण्यासारखे काही घडण्याची आशा नसली तरी पराक्रमाच्या क्षेत्रांत आपल्या हातून काहींना काही महत्त्वाचे कार्य घडले पाहिजे, ही भावना या काळांत त्यांच्या अंतःकरणांत कुठे तरी दबा धरून बसली असणे सहाजिक आहे. त्यामुळे नोकरी पत्करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तत्कालीन सर्वसाधारण जनांचा धोपट मार्ग न स्वीकारतां लष्करी खात्याकडे धाव घेतली! १९०१ च्या नोव्हेंबरमध्ये कुलाबा येथील गन करेज फॅक्टरीत एक लष्करी नोकर या नात्याने त्यांनी प्रवेश केला; यापूर्वीच त्यांनी नोकरीत प्रवेश करावयाचा; परंतु घरांत वडील अर्धांगाने आजारी होते. त्यांना आक्टोबर १९०१ मध्ये शेवटचा झटका येऊन त्यांतच त्यांचा अंत झाला. नोकरीवर रुजू झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी परदेशी जाण्याची संधी चालून आली होती; परंतु बंधूंची परवानगी नसल्यामुळे त्या संधीचा त्यांना फायदा घेता आला नाही. लष्करी खात्यांतील ही नोकरी त्यांच्या वीरवृत्तीस पोषक ठरली. क्रिकेटच्या खेळांत नांव मिळविलेला एक उमदा व धडाडीचा तरुण या नात्याने त्या खात्यांतील युरोपीयन अंमलदारांशी परिचित व्हायला त्यांना फारसा कालावधि लागला नाही. त्यांच्या सहवासांत शिकारीत व नेमबाजीतही ते पटाईत होऊ लागले. आस्ते आस्ते द्वारकानाथाच्या ठायीं आढळून आलेल्या मर्दानी गुणांमुळे लष्करातील गोरे अधिकारी त्यांच्याशी विशेष प्रेमभावाने वागू लागले. लष्करी जीवनक्रम द्वारकानाथच्या पथ्यावर पडला हे खरे असले, तरी त्यामुळे त्यांच्यावर मोठमोठाले दुर्धर प्रसंग ओढवू लागले ! त्यांचा स्वभाव जबरदस्त धाडसी व बेफिकीर ! त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक असे किती तरी प्रसंग ओढवले. १९०४ च्या डिसेंबर महिन्यांतील एक प्रसंग! ज्या लष्करी तुकडीत द्वारकानाथ होते त्या तुकडीचा तळ माळवा प्रांतांत होता. त्या प्रांतांतील एका जंगलात ते ४ शिकारीसाठी गेले असतां बरोबरीच्या शिकारी मित्राने उडविलेला बंदुकीचा बार त्यांना चाटून गेला ! कांहीं छरे लागले व छातीवर त्यांच्या जन्मखुणा झालेल्या होत्या. तदनंतर याच प्रांतांत घोड्यावरून दौड घेत असतां उज्जैन गेटजवळ त्यांच्या घोड्याला अपघात झाला. त्या वेळी समयसूचकता संभाळून द्वारकानाथजींनी घोड्यावरून उडी मारली व त्यामुळे ते बचावले; परंतु घोड्याचा पाय घसरून तो कायमचा पंगू झाला. १९०५ साली तर अपघातांनीं कहर केला. त्या वर्षाच्या आरंभी त्यांच्या लष्करी तुकडीचा तळ मद्रास प्रांतांत पडलेला होता. टिमलगिरी येथील जंगलांत ते शिकारीसाठी गेले असतां एका रात्रीत त्यांच्यावर दोन प्रसंग ओढवले व त्या दोन्ही प्रसंगांतून ते बचावले. दरोडेखोरांच्या हल्यांतून ते आपली सुटका करून घेतात न घेतात तोंच त्यांना रानटी जनावरांच्या हत्यांस तोंड द्यावे लागले. त्यांतूनही आपल्या सहकाऱ्यांसह ते सहीसलामत बाहेर पडले. अशा रीतीने अद्दल घडली असतां द्वारकानाथजींनी त्या जंगलांत पुन्हां पाऊल टाकण्याची काही जरुरी होती का? परंतु नाही; संकटांची फिकीर करायची कोणी ? जे भ्याड असतील त्यांनी ! १३ दिवस लोटतांच पुन्हां त्याच निबिड व भयाण जंगलांत ही स्वारी शिकारीसाठी प्रवेश करती झाली. परिणाम काय झाला? जंगलांत वाट चुकून एक दिवस व एकरात्र ते सारखे भटकत होते. शिकारीप्रमाणे द्वारकानाथजींना पोहोण्याची भारी हौस. याच दौऱ्यांतील गोष्ट ! एका नदीत ते पोहोण्यासाठी उतरले असतां भोंवांत सांपडले व शेवटी त्या चक्रव्यूहांतून मोठ्या शिकस्तीच्या प्रयत्नांनी बाहेर आले. धाडसी व बेफिकीर वृत्तीमुळे त्यांच्यावर ओढवलेल्या अशा या दुर्धर व प्राणघातक प्रसंगांचे वर्णन कुठवर करावें ? आलेल्या अनुभवांनी शहाणे होऊन पुन्हां त्या बाजूला वळावयाचे नाही, असा पोक्तपणाचा विचार त्यांना कधी शिवला नाही! संकटां- पासून दूर पळणे हे आपलें ब्रीद नव्हे, तर संकटांस सामोरे जाणे व संकटांशी झुंज खेळणे यांतच पुरुषार्थ आहे अशी द्वारकानाथजींची अनन्यसाधारण विचारसरणी होती आणि त्यामुळेच तर गोऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर विशेष लोभ जडला होता.
ही खोड म्हणा वा हा गुण म्हणा, त्यांच्या 'पडत्या' काळांत त्यांना सांवरून धरण्याच्या दृष्टीने अत्यंत सहाय्यकारी झाला. द्वारकानाथांपाशी काय नव्हतें ? वरिष्ठ गोऱ्या अधिकाऱ्यांची मर्जी संभाळ- ण्यासाठी त्यांना 'जी साब' किंवा 'हांजी हांजी' करण्याची जरुरी नव्हती. ज्या मर्दानी व खेळकर वृत्तीची गोऱ्या अधिकाऱ्यांना अत्यंत आवड, ते सारे गुण त्यांच्याठायीं होते. जसजसा एकेका गुणाचा प्रकाश पडू लागला, तसतसे ते गोऱ्या अधिका- यांच्या अधिकाधिक निकट येऊ लागले. नोकरीवर रुजू झाल्यापासून अवघ्या १२ वर्षांच्या कालावधीत द्वारकानाथ यांनी सर्वांवर आपली छाप बसविली. नोकरीत प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या बाब- तीत बढती व्हावी म्हणून नाना प्रकारच्या धडपडी व लटपटी करणे क्रमप्राप्त असते; परंतु द्वारकानाथांच्या बाबतीत तो हातचा मळ होऊन राहिला होता. सारे बडे अधिकारी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असावयाचे! नोकरी पेशांतील वर्ग म्हणतात तो सुदैवाने त्यांच्या वाट्यास आला होता! अल्पावधीतील आपल्या कर्तबगारीने त्यांनी तो जवळ आणिला होता. द्वारकानाथजींच्या जीवनांत आतां आनंदाची फुलबाग फुलू लागली होती. आधीच खेळकर, उल्हासी व उमदा स्वभाव; त्यांतच चारी बाजूंनी वरिष्ठ अधिका- यऱ्यांकडून होणारा कृपादृष्टीचा वर्षाव ! कोणाला नाही आनंद होणार ? द्वारकानाथजींच्या ह्या दैनंदिन जीवनानंदांत महत्त्वाची भर घालणारी आणखी एक घटना कारण झालेली होती. त्यांच्या वयास आतां तेवीस वर्षे होत आली होती. ऐन तारुण्यांत त्यांचे पदार्पण होत होते. यापूर्वीच मुंबईत असतां त्यांचा एका तरुणीशी प्रेमविवाह ठरलेला होता. प्रेमविवाह ठरलेला असला तरी त्या विवाहाची तिथी निश्चित झाली व तो दिवस जवळ येऊ लागला म्हणजे मन आनंदातिशयाने कसे फुलून जातें, नाही ? खरोखर त्याची प्रचीति प्रत्यक्ष त्या अवस्थेतून गेलेल्यांनाच येईल ! कितीही मुमधुर भाषा. प्रयोग केले तरी त्या आनंदी अवस्थेची बरोबर कल्पना पटवून देणे अशक्य आहे. द्वारकानाथजींची लगतिथी अवघ्या १५/२० दिवसांवर येऊन ठेपली होती. ज्या पलटणीत ते होते तिचा तळ त्या वेळी पुण्यापासून जवळच खडकी येथे पडलेला ६ होता. आपल्या लग्नसमारंभानिमित्त त्यांनी वरिष्ठांकडे दोन आठवड्यांची रजा मागि- तली व ती मंजूरही झाली. द्वारकानाथसारख्या मर्जीतल्या माणसाचे लग्न ! त्या बातमीमुळे सारे अंमलदार मापापल्या परीने आनंदात होते! जणू काय आपल्याच घरी लग्न आहे असे प्रत्येकास वाटत होतें ! दुसऱ्या दिवशी निघायचे म्हणून सर्वांचा प्रेमळ निरोप घेण्यासाठी द्वारकानाथ आपल्या निवासाबाहेर पडले तेव्हां सारी दुनिया आपल्या स्वागतासाठी सुसज्ज होऊन राहिली असल्याचे त्यांना आढळून आले. आणि अशा या आनंदाच्या कोलाहलात एक क्रांतिकारक घटना घडून आली ! पलटणीतील एका वरिष्ठ साहेबाचा निरोप घेण्यासाठी द्वारकानाथ गेले असतां त्या साहेबानेही शिकारीस जाण्यासाठी चार दिवसांची रजा काढली असल्याचे आढळून आले. हे साहेबमहाशय शिकारीस निघाले म्हणजे द्वारकानाथ त्यांच्या- बरोबर नेहमीं असायचेच. द्वारकानाथ मुंबईस जायला निघाल्याचे समजतांच साहेब म्हणाले, "शिकार सोडून मुंबईस कुठं चाललास. तुझं लम अजून दूर आहे. इतक्या लौकर जाऊन काय करणार ? चल माझ्याबरोबर सिंहगडावर शिकार खेळायला. दोन दिवस मजा करूं आणि परत येऊ. आहे काय त्यांत ?" द्वारकानाथजीपुढे मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. मुंबई गांठण्यासाठी ते अत्यंत आतुर झालेले होते. भावी विवाहाच्या विचारांनी ते भारावले गेलेले होते; तरीही साहेबांचा शब्द त्यांच्याने मोडवेना. "बरं तर ! जशी आपली मर्जी !" साहेबाचा आग्रह मोडणे अशक्य होऊन द्वारकानाथ एवढेच म्हणाले. साहेबाच्या मर्जीखातर शिकारीसाठी सिंहगडावर आरोहण करण्याचें द्वारकानाथ- मीनी ठरविले खरे, परंतु त्यांना त्या गडावर खेचून नेण्यांत विधिसंकेत काही वेगळाच होता.
प्रकरण दुसरें सिंहगडावरील शिकार ! सिंहगडावर शिकारीसाठी जाण्याचा बेत ठरल्याप्रमाणे द्वारकानाथजी हे आपल्या साहेब मित्रासह सिंहगडावर गेले. त्यांच्याबरोबर आणखीही काही हौशी मंडळी होती. गडावर आल्यानंतर लोकमान्य टिळक यांच्या बंगल्यांत त्यांचा मुक्काम होता. बरोबर नोकर चाकर होतेच. तेथे गेल्यानंतर एक वाघ आसपासच्या भागांत रहाणाऱ्या लोकांस मधूनमधून फार त्रास देत असल्याचे समजले. १९०५ सालचा तो मे महिना होता. दुपारी जेवणखाण आटोपल्यानंतर द्वारकानाथ स्वस्थ विश्रांति घेत पडले होते. तिकडे शिकारीसाठी जरूर ती तयारी व उठावणी करण्यांत नोकरमंडळी व स्थानिक गडकरी गुंतले होते. सायंकाळ होत आली. शिकारीसाठी निघण्याची तयारी करण्याबद्दल द्वारकानाथजींना वर्दी आली; परंतु का कुणास ठाऊक ! शिकारीच्या विचाराने नेहमीं प्रफुल्लित होणारे त्यांचे मन बाहेर पाय काढण्यास तयार होईना! पहिल्या निरोप्याला बिछान्यावर आळसांत पडलेल्या स्थितीतच त्यांनी "जा रे या वेळी.” म्हणून घालवून दिला. तिकडे साहेबाची तयारी पूर्ण होत आली होती. पुन्हां दुसरा निरोप्या आला. "चला, लौकर चला ! साहेब तयार झाले ! त्यांनी आत्तांच्या आत्ता बोलावलें आहे !" म्हणून तो ओरडून सांगू लागला. आता मात्र निरुपाय झाला ! साहेबाबरोबर आपण शिकारीसाठी आलो आहोत तेव्हां आतां बाहेर पडलेच पाहिजे असा विचार करून त्यांनी शिकारीचा पोषाख चढविला, बंदुक घेतली, खिशांत काडतुसे कोंबली आणि ते बंगल्याबाहेर पडले ! साहेब दुसऱ्या बंगल्यात द्वारकानाथाची वाट पहात सज्ज होऊन राहिले होते. द्वारकानाथजींना पहाताच त्यांना आनंद झाला. शिकारी व कुत्रे वाघाच्या डरकाळ्या मधून मधून येत असत त्या भागांत रान उधळण्यासाठी पुढे गेलेले होते. हातांत भरलेल्या बंदुका घेऊन साहेब व द्वारकानाथजी त्यांच्या मागोमाग निघाले. तिन्हीसांजची वेळ झालेली होती. गडावर किंचित् किंचित् धुके पई लागले होते.
८ हवेतील गारठा जाणवू लागला होता. अशा वेळी तानाजीच्या समाधीच्या उत्तर बाजूस ज्या ठिकाणी खोल कडा असल्यामुळे बुरूज बांधलेला नाही अशा त्या अवघड ठिकाणाकडे हे दोघेही वीर शिकारी चालले होते. काही वेळाने दोघांनी आपापल्या माऱ्याच्या जागा पकडल्या व आपापल्या ठिकाणी ते शिकारीसाठी सुसज्ज होऊन राहत होते; इतक्यांत बाजूस जंगलझुडपांनी व्यापलेल्या दरीतून वाघाच्या डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या. ! डरकाळ्या कानी पडतांच द्वारकानाथजींच्या रक्तातील शिकारी खडबडून जागा झाला ! आतां बार उडविण्याची वेळ नजीक येऊन ठेपली होती. ज्या झुडपांच्या बाजूने डरकाळ्यांचा आवाज ऐकू येत होता, त्याच्या जवळपास जाऊन बंदुकीचा बार उडवितांच वाघ बाहेर पडेल असे वाटून धुक्याने व अंधकाराने व्यापलेल्या त्या भागांतून एक एक पाऊल आस्ते कदम टाकीत द्वारकानाथ आपली बंदूक सांवरून बार उडविण्यासाठी पुढे सरसावणार, तोंच पाय घसरून सुमारें ऐशी फूट उंच कड्यावरून ते धाडकन् खाली कोसळले। ते जे कड्याच्या दगडी भिंताडाला आदळत आपटत घसरत घसरत पडले ते नेमके तानाजीच्या समाधीपाशी ! वाघाची शिकार राहिली बाजूला ! शिकाऱ्याचीच शिकार होण्याचा समय प्राप्त झाला ! द्वारकानाथजी कड्याखाली कोसळून पडल्याचे वृत्त सर्वांना हां हां म्हणतां समजलें. धावाधाव करून काही गडकरी गडाखाली गेले. साहेबही तेथे आले. द्वारकानाथ शुद्धीवर होते; परंतु कंबरेखालील भाग लुळा पडलेला होता. तो भाग सोलून काढल्यासारखा दिसत होता. आदळ आपट फार झाल्यामुळे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कंबरडे मोडून गेले होते. अशा स्थितीत द्वारकानाथजींना डोळीत घालून गडकऱ्यांनी गडावर आणिलें. शक्य ते प्रथमोचार करण्यात आले. कंबरेखालील शरीर साफ लुले पडले होते. गडावरून त्यांना औषधोपचारासाठी पुणे येथील सासून इस्पितळांत आणून ठेवण्यात आले. त्यांच्या पायांतील रक्ताभिसरण बंद पडलें होतें तें सुरू होऊन त्यांना हालचाल करता यावी यासाठी या इस्पितळांत नानाप्रकारचे इलाज करण्यांत आले; परंतु त्या उपायांचा इष्ट परिणाम घडून येण्याची काहीच आशा दिसेना. परंतु मनुष्य आशेवर जगत असतो. त्या स्थितीत कण्हतकुंथत द्वारकानाथजींनी इस्पितळांत अकरा महिने काढले. त्यांचे नातलग व मित्र मेटायला यावयाचे तेवढ्या ९ केळांत दुःखाचा विसर पडावयाचा. मनांत योजले होते काय आणि घडलें काय, हा विचार द्वारकानाथजींच्या मनांत एकसारखा यावयाचा. भराऱ्या मारणारे मन कुठे तरी गुंतविले पाहिजे; परंतु ते गुंतवायचे कुठे आणि कसें ? इस्पितळांत नाना- प्रकारचे ग्रंथ होते. ते मिळवून त्यांच्या वाचनांत द्वारकानाथ आपला वेळ घालवि- ण्याचा प्रयत्न करू लागले. या प्रसंगामुळे वाचनाची गोडी लागली. ग्रंथवाचन व इस्पितळांतील सभोवारच्या परिस्थितीचे व तेथे चालू असलेल्या हालचालींचें निरीक्षण ! या पलीकडे त्या काळांत त्यांना दुसरे जग नव्हतें! याच कठीण अवस्थेत असतां इस्पितळांतील व्यवस्थेसंबंधाने आपण काही तरी लिहावें असें त्यांना वाढू लागले. बिछान्यावर पडल्या पडल्या त्यांनी ५।६ इंग्रजी लेख लिहिले. त्यांपैकी बहुतेक लेख त्या काळी पुणे येथे प्रसिद्ध होणाऱ्या 'डेक्कन हेराल्ड' या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. कंबरेत जोर यावा व पायांत रक्त भरून त्यांनी पूर्ववत् चालू लागावे यासाठी सासून इस्पितळांतील डॉक्टरांनी नाना इलाज केले; परंतु त्यांचा काही उपयोग न होतां शेवटी त्यांच्या बंधूंनी त्यांना मुंबईत आणिलें. सुमारे अकरा महिन्यांपूर्वी दोन आठवड्यांची रजा घेऊन आपल्या विवाहानिमित्त द्वारकानाथजी मुंबईत यायचे होते; आणि आतां ते मुंबईत आले ते किती विपरीत स्थितींत ? भावी वैवाहिक जीवनाच्या कल्पनेने त्या वेळी ते खुलून गेले होते? आणि आतां ? विवाहासंबंधींच्याच काय, परंतु त्यांच्या साऱ्या मनोरथांचा चक्काचूर झालेला होता! कंबर खचली खरी; परंतु मन खचले नव्हते. मनाचे सारे व्यापार पूर्ववत् चालू होते. आतां येथून नव्या आयुष्याला आरंभ व्हायचा होता. दुर्धर अशा अपघातांतून आपण बचावलों खरे; परंतु आता यापुढील जीवन कसे घालवायचे ? हे विचार द्वारकानाथजींना एकसारखे सतावू लागले. आतापर्यंत त्यांचे जीवन स्वच्छंदी होते. त्यांच्या मानी खभावाचा स्वावलंबना- कडे फार ओढा होता. दुसऱ्यांना भारभूत होऊन रहाण्याची कल्पना त्यांना सहन होण्यासारखी नव्हती; परंतु आतां त्यांच्या वाट्याला नेमकें नको तेंच आले होतें. द्वारकानाथजींचे भाऊ व निकटवर्ती नातलग सुस्थितीत होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांना कमी पडू दिले नसते; परंतु त्यांना मात्र परावलंबी जिण्याचा मनापासून तिटकारा होता.
१० त्यांना मुंबईत आणण्यात आल्यानंतर मुंबईतील डॉक्टर, वैद्य, मालिशवाले, यांच्या उपाययोजना सुरू झाल्या. त्यांनी पूर्वस्थितीप्रत यावे यासाठी जें जें कांहीं करता येण्यासारखे होतें तें करण्यात त्यांच्या आप्तसंबंधीयांनी कोणत्याही प्रकारची कसूर केली नाही. कंबरेखालील शरीर दुबळे झाले असले तरी कंबरेवरील शरीराचा भाग चांगला शाबूत होता. मनाचा खंबीरपणा व कणखरपणा वृद्धिंगत होऊ लागला होता. एवढेच नव्हे तर निरुद्योगी मनांत नानात-हेचे विचार घोळू लागले होते; परंतु तशा स्थितीतही द्वारकानाथजींनी आपल्या मनास सैतानाचा कारखाना होऊ दिले नाही. ईश्वरचिंतन व सद्विचार यांच्या सहाय्याने मनोमालिन्य घालविण्याचा ते सतत प्रयत्न करीत होते. मनाचे सामर्थ्य त्यांनी ओळखले होते. मनोविश्लेषण, मानसशास्त्र व मनोव्यापारांसंबंधी मिळविता येतील ते ग्रंथ मिळवून त्यांचा त्यांनी व्यासंग चालू केला. काही झाले तरी पंगूपणा आला म्हणून भागूबाईप्रमाणे रडत न बसतां किंवा दुसऱ्यांस भारभूत होऊन न रहातां जेणेकरून मानाने जगतां येईल असा जीवन- मार्ग आखवायाचा हेच विचार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या मनांत प्रामुख्याने वावरू लागले. प्रकरण तिसरें साहित्यसेवेचा ओनामा ज्या दिवशी द्वारकानाथजी हे सिंहगडाच्या कड्यावरून कोसळले त्याच दिवशी त्यांचे पुर्वायुष्य संपून ते नव्या जन्माने जगांत वावरूं लागले असें म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या जीवनांत, विचारांत व रहाणीत क्रांतिकारक थोरपालट घडून आला. नव्या दृष्टीने ते अपघातामुळे जर्जर झालेल्या आपल्या जीवनाकडे पाहू लागले. त्यांनी 'नाथमाधव' हे नांव केव्हां धारण केलें हे ओघाने येईलच. परंतु यापुढे बदललेल्या परिस्थितीत आपण त्यांना नाथमाधव या नावाने ओळखू या.
११ १ मनुष्य कितीही वयंभू वा प्रयत्नवादी असला तरी मार्गदर्शन करणारा गुरु मेटावा लागतो. गुरूशिवाय खरी ज्ञानप्राप्ति होत नाही. तो गुरु मात्र जातिवंत हवा. नामधारी असून उपयोगाचा नाही. जातिवंत गुरूचा लाभ होणे ही एक पूर्वपुण्याईच म्हटली पाहिजे. नाथमाधव प्राप्त परिस्थितीशी निकराने झगडत होते. पंगु स्थितीत पडल्या पडल्या वेळ घालविण्यासाठी म्हणा वा मनोरंजनासाठी म्हणा, त्यांना आपला बहुतेक वेळ निरनिराळ्या विषयांवरील ग्रंथ व मासिके वाचण्यांत दवडावा लागत होता. कुठे जातां येत नव्हते किंवा वेळेचा सदुपयोग एकाद्या व्यवसायाकडेही करता येत नव्हता. रात्रंदिवस वाचन आणि वाचन ! पुढे पुढे जे काही वाचावयाचे त्यावर लक्ष केंद्रीभूत करून विचारांस चालना देण्याचा नाथमाधव प्रयत्न करूं लागले. विचार करता करतां ते कल्पनासृष्टीत वावरू लागले; आणि त्यांत त्यांना आनंद वाढू लागला. आपण जे काही वाचलें व पचविलें तें कागदावर उतरवितां आल्यास पहावें असें वाटून नाथमाधव मधून मधून लिहूं लागले. आरंभी लहान लहान चुटके व छोट्या कथा ते लिहीत असत व त्याची बाडे बांधून ठेवीत असत. लिहिण्याचा सराव झाला, आपल्याकडून पुष्कळसें लेखन झालें, म्हणजे आपणास लिहिता येईल, असे त्यांच्या मनाने घेतले होतें. नाथमाधवांच्या घराण्यांत लेखनकला होती. त्यांचे वडीलबंधु विनायकराव लेखक होते; परंतु आपल्यावर 'लेखक' बनण्याची पाळी कधीकाळी येईल असें नाथमाध- वांच्या स्वप्नांतही कधी आले नसेल. परंतु मानवी आयुष्यात कल्पनातीत गोष्टी कधीकधी घडून येत असतात. दैवाचा कांटा कोणत्या बाजूला वळेल व कोणत्या व्यवसायाची कास धरावी लागेल हे अनेकांच्या बाबतींत अनिश्चित असते. नाथमाधवांच्या आयुष्याला वळण लागत होते. त्यांच्यांत धडाडी, हडपणा बालपणापासूनच भरपूर प्रमाणांत होता. 'लाथ मारीन तेथे पाणी काढीन' अशा तडफदार प्रवृत्तीचे नाथमाधव होते; परंतु ज्या पायांवर उभे राहून कर्तबगारी गाजवावयाची व जगाशी टक्कर द्यावयाची, त्या पायांनींच दगा दिल्यामुळे ते हतबल झाले होते.
१२ पनवेल येथे औषधोपचारासाठी नाथमाधवांचे वास्तव्य दीर्घकाळ झालें. अपघाता- मुळे असहाय्य स्थिति वाट्यास आल्यापासून वाचन हाच जरी त्यांचा एकमेव व नित्याचा मित्र होऊन राहिला असला तरी त्यांचा पद्धतशीर लेखनारंभ पनवेलींत झाला. श्री. ओटवणे शेटजींच्या ज्या बंगल्यांत कै. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी रामराज्यवियोगादि नाटके लिहिली, त्याच बंगल्यांत व त्या बंगल्याच्या बगीच्यात नाथमाधवास लेखनाची स्फूर्ति झाली. लेखन ही इतर नानाप्रकारच्या कलांप्रमाणे एक कला आहे. या कलेत पारंगत होण्यासाठीही मार्गदर्शकाची व गुरुकृपेची आवश्यकता असते. आपण लेखनव्यवसायाकडे वळावयाचे असें नाथमाधवांनी दीर्घ विचारांती ठरविलें; कारण त्याशिवाय दुसरा कोणताच सन्माननीय मार्ग त्यांना आचरतां येण्याची शक्यता नव्हती. कोणत्या मार्गाने जावयाचे हे ठरल्यानंतर नाथमाधव त्या मार्गाला लागले. त्यासाठी आपल्या परीने शक्य ती साधना त्यांनी सुरू केली. आपलें सारें लक्ष त्या साधनेवर ते केंद्रीभूत करूं लागले. परंतु त्यांच्या मनाचें कांहीं समाधान होत नव्हतें. जो आपुलकीने आपल्या चुका दाखवील व आपणास योग्य मार्गावर आणून सोडील अशा मार्गदर्शकाची नाथमाधव मोठ्या आतुरतेने मार्गप्रतीक्षा करीत होते. त्यांना गुरुकृपेच्या सांवलीची तहान लागलेली होती. इच्छा तसे फळ. कोणत्याही गोष्टीची मनाला तळमळ लागून राहिली म्हणजे इच्छापूर्तीचा काळ समीप येत असतो. नाथमाधवांचे तसेंच झाले. सुप्रसिद्ध केरळकोकिळकर्ते व महाराष्ट्रभाषाचित्रमयूर श्री. कृष्णाजी नारायण ऊर्फ दादा आठल्ये यांचे कर्मधर्मसंयोगाने याच सुमारास पनवेलीस वास्तव्य होण्याचा योग जुळून आला. त्यांचे मराठी भाषेवर दांडगे प्रभुत्व. केरळकोकिळ मासिकाचे अंक ज्यांनी वाचले असतील त्यांनाच त्याची कल्पना होईल. श्री. दादा आठल्ये यांचा नाथमाधवांच्या पितळे घराण्याशी दाट परिचय होता. त्यामुळे नाथमाधवांच्या असहाय्य स्थितीबद्दल त्यांना सहाजिकच अनुकंपा वाटत असे. फार कशाला ? नाथमाधव यांच्या संबंधी लिहितांना श्री. दादा आठल्ये एके ठिकाणी म्हणतात, “नाथमाधवांच्या घराण्याशी विशेषेरून त्यांचे वडील बंधु १३ रसिक व गुणग्राही रा. रा. विनायकराव यांचा व माझा फार पुरातनचा प्रेमसंबंध आहे. नंतर नाथमाधव व आम्ही तर काय, कित्येक वर्षांपासून एकजीवच आहोत. त्यांची पंगु स्थिति पाहून आम्हांस अत्यंत खेद वाटतो. तथापि त्यांनी दीर्घोद्योगाने व मनमिळाऊपणाने मलाच नव्हे, तर अखिल महाराष्ट्राला आपलेसें करून टाकिलें आहे." दादांच्याठायीं नाथमाधवांबद्दल आपपरभाव नव्हता. त्यांनी आपले दु:ख विसरावें व परावलंबीपणांतही स्वावलंबी बनावें असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यामुळे लेखनकलेकडे नाथमाधवांचे लक्ष लागू लागले आहे हे पाहून त्यांना समाधान वाटले व त्या बाबतींत त्यांना शक्य तेवढे उत्तेजन देण्याचे व वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन करण्याचे त्यांनी मनावर घेतले. गुरुकृपा उगाच होत नाही. शिष्यही निष्ठावान् असावा लागतो; आणि जेव्हां असा मणिकांचन योग जुळून येतो तेव्हांच तेजाचे किरण फांकत असलेले दिसू लागतात. नाथमाधवांनी लेखनासाठी हाती लेखणी घेतली तो काळ आजच्यासारखा सुलभ प्रसिद्धीचा व वाटेल तें लिहावें आणि तें छापून यावे अशा प्रकारचा नव्हता. केरळकोकिळ, मनोरंजन, विविधज्ञानविस्तार, करमणूक, नवयुग, यांसारखी निवडक व उच्च दर्जाची मासिकें चालविणारे संपादक प्रत्येक लेख योग्य ती छाननी करून तो कसोटीस उतरला तरच छापीत असत. नवीन लेखकास तेथे सहजासहजी प्रवेश मिळत नसे. हाती येईल तें छापावयाचे व आपल्या मासिकाची पाने एकदां कशीबशी भरून काढावयाची ही प्रथा त्या काळी रूढ झालेली नव्हती. आजकाल पूर्वीच्या मानाने लेखक किंवा साहित्यिक होणे बरेंच सुलभ झालेले आहे. लेखकाला लेखनतपश्चर्येची किंवा गुरूच्या मार्गदर्शनाची जरुरीच भासत नाही! आजच्या जमान्यांत वाटेल त्याने वाटेल तें लिहावें व लेखक म्हणून खुशाल मिरवावें! लेखनकलेशी कोणत्याही प्रकारे संबंध नसतां श्री. दादा आठल्ये यांच्या मार्ग. दर्शनामुळे नाथमाधव सरस्वतीदेवीच्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून एकाद्या निष्ठावान् भक्ताप्रमाणे तिची आराधना करूं लागले. मराठी वाङ्मयाचा अभ्यास पद्धतशीर रीतीने कसा करावा, काय वाचावें, काय अभ्यासावें, याची माहिती दादा त्यांना अत्यंत आस्थापूर्वक देऊ लागले. परिस्थितीमुळे नाथमाधवांचे लेखनाकडे लक्ष वळू लागले होते; परंतु ठाम निर्णय घेता येत नव्हता. दादा आठल्ये यांनी एकंदर परिस्थितीचा विचार करून त्यांना निर्णय घ्यायला लाविलें; त्यांना धीर दिला व जरूर असलेला दिलासाही दिला. हा दिलासा केवळ शाब्दिक व वरकरणी नव्हता. आपल्या नजरेखाली दादांनी नाथमाधवांचा वाङ्मयाभ्यास सुरू केला व विविध विषय सुचवून त्यांना लेखनकलेचे धडे द्यायला आरंभ केला ! नाथमाधवांच्या लेखनतपश्चर्येच्या आरंभकाळांत एकदां मोठी गंमत घडून आली. त्यावरून हा गुरुशिष्यसंबंध कोणत्या प्रकारचा होता याची वाचकांस कल्पना होईल. 'चणे खावे लोखंडाचे तेव्हां ब्रह्मपदी नाचे,' असे म्हणतात ते खोटें नाही. श्री. दादा आठल्ये यांनी एकदां नाथमाधवांस लेख लिहायला सांगितले. विषयाची निवड त्यांच्यावरच सोपविली. गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून व त्यांना वंदन करून नाथमाधव लेख लिहायला बसले. लेख पूर्ण होतांच त्यांनी तो गुरुजीपुढे सादर केला. डोळ्यांवर चष्मा चढवून व हातांत पेन्सिल घेऊन गुरुजी लेख वाचायला बसले. प्रथम तो लेख त्यांनी १०।१२ मिनिटांतच वाचून संपविला. परंतु नंतर त्यांत जरूर त्या दुरुस्त्या करायला त्यांनी चांगले तीन साडेतीन तास घेतले. रेघोट्या ओढलेल्या व दर ओळीओळीगणीक सुधारणा सुचविलेल्या स्वरूपांत नाथमाधवांपुढे तो लेख आला तेव्हां त्यांच्या छातींत धस्स झालें। श्री. दादा आठल्ये यांनी किती कठोरपणानें तो लेख छिन्नविच्छिन्न करून टाकिला होता! परंतु नाहीं; कठोरपणाची ती जात वेगळी होती. आपल्या बाळाच्या शाश्वत कल्याणासाठी कधी कधी आई नाही का कठोरपणाचा आव आणीत? त्या प्रकारांत मोडणारा दादांचा तो मायाळू कठोरपणा होता. नाथमाधवांच्या चेहऱ्या- वरील चलबिचल त्यांनी तात्काळ ओळखिली. नाथमाधवांच्या जवळ जाऊन दादा त्यांना वात्सल्याने म्हणाले, "निराश होऊ नका. तुम्हांला नामोहरम करण्या- साठी हे कठोरकृत्य मी केले नाही. तुम्हीं सुधरावें, जगांत थोर लेखक म्हणून नांव काढावें, तुमच्या लेखनांत वैगुण्य राहूं नये, तसेच तुमचे लेखन निर्दोष, चौफेर व सकस व्हावें, याच हेतूने तुमच्या या लेखाची मी ही एवढी मनसोक्त चीरफाड केली. वाक्ये कशी लिहावी, शब्दयोजना कशी करावी, परिच्छेद कुठे व कां पाडावे, लेखाचें आदि-मध्य-अवसान ही एकसूत्री, मिळती जुळती कशी ठेवावी; या सर्व गोष्टींकडे लेखकाने अव्वलपासून अखेरपर्यंत अवधान कसे व कां द्यावें, हे सर्व सप्रमाण समजावून देण्यासाठी नाथमाधवांच्या गुरुजींनी त्यांच्या त्या लेखाची कठोरपणे चीरफाड केलेली होती. नाथमाधव क्षणकाल निराश झाले खरे, परंतु लौकरच निराशेची जागा नव्या उमेदीने भरून काढिली. त्या दिवशी आपला नवा जन्म झाला व सभोवार पसरलेल्या वैराण वाळवंटांत नवआशांकुर जन्माला आला असें नाथमाधवांस त्या क्षणी वाटलें. अपघातामुळे जरी त्यांची कंबर मोडून चक्काचूर होऊन गेली होती तरी ती मोडली नसून तिच्यांत नवचैतन्य निर्माण होत असल्याचा त्यांना क्षणकाल का होईना, भास होऊ लागला. श्री. दादा आठल्ये यांचा शब्द प्रमाण मानून नाथमाधव त्याबरहुकूम वागू लागले. दादांच्या ठायीं त्यांची अनन्य निष्ठा होती. दादांनीही आडपडदा न ठेवतां आपल्यापाशी सांगण्यासारखे व देण्यासारखें जें जें म्हणून काही होतें तें तें सैल हाताने व निःसंकोचपणे त्यांना देऊन टाकिलें. नाथमाधवांच्या लेखनांत डौलदारपणा व इतर अनेक आवश्यक गुण आढळून येतात याचे कारण त्यांना शिकण्याची व नामवंत लेखक होण्याची इच्छा व हौसही होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना योग्य वेळी मार्गदर्शक मिळाला व त्यांनी दाखविलेला मार्ग नाथमाधवांनी निष्ठापूर्वक चोखाळला. नंतर पुढे काही वर्षांनी या गुरुशिष्यजोडीनें “केरळकोकिळ व नवें मन्वंतर" या जोड नांवाचे एक उत्कृष्ट मासिक सुमारे दोन अडीच वर्षे चालविलें. गुरूला आपल्या या शिष्यवरास बरोबरीचें स्थान द्यायला जरासुद्धा दिक्कत वाटली नाही. एका दिव्याने दुसरा दिवा चेतविला म्हणजे दोन्ही दिवे प्रकाश सारखाच देतात. आधी कोणचा व नंतर कोणचा दिवा प्रकाश देता झाला, हा प्रश्नच उरत नाही. तसाच प्रकार या गुरुशिष्यांच्या बाबतींत घडून आलेला होता.
१६ या लेखनतपश्चर्येच्या आरंभकाळांत नाथमाधवांनी जसे वाचन विपुल केले त्याचप्रमाणे लेखनही विपुल केलें. 'गातां गळा आणि शिंपितां मळा' असे म्हणतात. त्याचप्रमाणे लेखन करतां करतां त्यांतील खांचखळगे आपणास समजत जातील या भावनेने लिहावयाचे आणि बांधून ठेवावयाचे, हा त्यांचा क्रम कित्येक दिवस अव्याहत चालू होता. त्यांच्या भेटीस येणारे त्यांचे मित्र सहाजिकपणे त्यांच्या लेखनावरून नजर फिरवीत असत; व कोणत्या ना कोणत्या मासिकाकडे ते लेखन पाठवून देण्याचा त्यांना सल्ला देत असत. आपलें लेखन प्रसिद्ध व्हावें असें कोणाला वाटत नाही ? नाथमाधवांच्या ठायींही ती भावना होती. त्यांनी या आरंभकाळांत द्वारकानाथ माधवराव पितळे या नांवाने काही ठिकाणी आपलें लेखन, विशेषतः लघुकथा पाठविल्या, परंतु त्या साभार परत आल्या. तेवढ्याने नाथमाधव निराश झाले नाहीत. ज्या लेखनांत प्रभावीपणा आला म्हणजे आपले लेखन प्रकाशांत आल्याशिवाय निःसंशय रहाणार नाही अशी त्यांची खात्री होती. अशा वेळी त्यांनी आपली लेखनतपस्या दुप्पट जोमाने सुरू करावी. त्याचबरोबर पितळे हे आपलें जातिबोधक नांव तर प्रसिद्धीआड येत नसेल ना? अशी शंका त्यांना त्यांच्या काही मित्रांच्या सूचनेमुळे येऊ लागली होती. नाथमाधव एकदां विचार करीत बसले असतां आपलें में लांबलचक नांव आहे त्याचा संकोच करून 'नाथमाधव' हे टोपण नांव धारण करावे व त्याच नांवाने जगापुढे येतां आल्यास पहावें असें त्यांनी ठरविलें. ही १९०७ सालची गोष्ट. 'नाथमाधव' हे नवें नांव धारण केल्यानंतर त्या नांवाने त्यांनी एक लघुकथा उमरावती येथे प्रसिद्ध होणाऱ्या 'महाराष्ट्र वाग्विलास' या मासिकाकडे पाठविली. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर व श्री. बाळकृष्ण संतुराम गडकरी हे या मासिकाचे संपादक होते. त्या काळी या मासिकांत श्री. विद्याधर वामन भिडे, कवि गोविंदाग्रज, श्री. यशवंतराव गुप्ते, श्री. ज. स. कुडाळकर, श्री. ह. आ. तालचेरकर, श्री. कृ. म. चिपळूणकर वगैरे लेखकांचे लेखन प्रसिद्ध होत होतें. या मासिकाच्या सप्टेंबर १९०७ च्या अंकांत नाथमाधवांची 'चोराची शिफारस' ही लघुकथा प्रसिद्ध झाली, व तीच प्रसिद्धीस आलेली त्यांची पहिली लघुकथा होय.
नंतर त्या मासिकाच्या नोवेंबर १९०७ च्या अंकी त्यांची 'बिनवशिल्याची नोकरी ही दुसरी लघुकथा प्रसिद्ध झाली. अशा रीतीने 'महाराष्ट्र-वाग्विलास' या मासिकानें नाथमाधवांस प्रसिद्धीचा मार्ग मोकळा करून दिल्यानंतर तत्कालीन निरनिराळ्या मासिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर हिंद एजन्सी एक आणा भालेंतून त्यांच्या छोट्या मोठ्या कथा सतत प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे नाथमाधवांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत गेली. 'रायक्लब अथवा सोनेरी टोळी' यासारख्या त्यांच्या प्रदीर्घ कथेने तर तत्कालीन वाचकांच्या मनांची चांगलीच पकड घेतली व माथमाधव हे नांव सर्वतोमुखी झाले. खतंत्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली नाथमाधवांची पहिलीवहिली कादंबरी 'प्रेमवेडा' ही होय. ती १९०८ साली प्रसिद्ध झाली. ही ग्रंथरूपाने प्रसिद्ध होणारी आपली पहिली वाङ्मयकृती त्यांनी आपले परमपूज्य वडील कै. माधवराव मोरोबा पितळे यांस आदरपूर्वक अर्पण केली असून अर्पणपत्रिकेंत नाथमाधव म्हणतात, "माझ्या हातून महाराष्ट्र भाषेची सेवा अधिकाधिक घडावी असा त्यांचा (वडिलांचा) पुण्याशीर्वाद मी मागत आहे.” या कादंबरीच्या प्रस्तावनेत नाथमाधवांनी, अविचाराने प्रेमपाशांत सांपडून शेवटी आपल्या आयुष्याचे मातेरें करून घेणाऱ्या तरुणतरुणींनीं भावनेच्या आहारी न जातां संयमपूर्वक वागणे कसें जरूर आहे व जे भावनेच्या आहारी जातात त्यांची जीवनांत फसगत कशी होते याचे विवेचन केले आहे. मासिक मनोरंजनांत प्रसिद्ध झालेले पुढील काव्यही आपल्या प्रस्तावनेत त्यांनी उद्धृत केले आहे:- "प्रीति मजवरी तुझी जडाया रूपचि कारण जरि होई प्रीति करुं नको एक दिनी हे सुरूप विलया जाई मूर्तिमती चारुता करितसे वास जयाच्या ठायीं प्रलयकालही नष्ट कराया जीतें शक्त न होई उदयें ज्याच्या रक्तपंकजें हर्षे प्रफुल्ल होती पृथ्वीतलिंच्या चराचरांचे जीवन ज्याच्या हाती ऐशा सुंदर रविवरती असूं दे अमुप तुझी प्रीती" - नाथमाधवांच्या या पहिल्या वाड्मयअपत्याला तत्कालीन नामांकित चित्रकार श्री. एस्. पी. आगासकर यांनी प्रसंगोचित व सुंदर कलाकृतींनी सजविलें आहे. १९२१ सालापासून नाथमाधवांच्या स्वराज्यावरील ऐतिहासिक कादंबऱ्या प्रसिद्ध होऊ लागल्या; परंतु तत्पूर्वी १९०८ ते १९२० या एका तपाच्या काळांत त्यांच्या सुमारे वीस सामाजिक कादंबऱ्यांचे प्रकाशन झाले. त्यांत वीरधवल, विहंगबुंद, देशमुखवाडी, श्रीनिवासराव, डॉक्टर कादंबरी, विमलेची ग्रहदशा, दैवाचे खेळ, वगैरे कादंबऱ्यांनी नाथमाधवांस कादंबरीक्षेत्रांत बहुमानाचे स्थान मिळवून दिले. सांवळ्या तांडेल ही आरमारविषयक अजोड कादंबरी त्यांनी याच काळांत लिहिली. नाथमाधवांच्या या कादंबऱ्यांनी वाचकांस इतकी काही गोडी लाविली होती की, वाचक त्यांच्या प्रत्येक नवीन कादंबरीसाठी टपून राहिलेला असे. ३०।३५ वर्षांचा काळ लोटला तरी अजूनही त्यांच्या कादंबऱ्या आवडीने वाचल्या जात आहेत. नाथमाधवांनी हे जे यश मिळविलें त्याची कारणे काय होती व असे कोणते विशिष्ट गुण त्यांच्या लेखनांत होते याची मीमांसा एकाद्या अधिकारी समीक्षकाकडून होणे अत्यंत जरूर आहे, असे आम्हांला वाटते. प्रकरण चौथे ऐतिहासिक कादंबऱ्यांची पार्श्वभूमि प्रत्येक मनुष्याने आपल्या समाजाच्या व आपल्या राष्ट्राच्या उपयोगी आप- णास कसे पडतां येईल हे पाहून त्याप्रमाणे आपल्या जीवनक्रमाची आखणी केली पाहिजे; तरच जन्मा आलियाचे सार्थक; त्याचप्रमाणे केवळ आपलें व आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी ईश्वराने हा मनुष्यजन्म दिलेला नाही असें नाथ- माधवांस निश्चितपणे वाटत असे. लहानपणापासून पराक्रमाची कृत्ये करण्याकडे त्यांचे लक्ष असे. लष्करांत पराक्रमाची कृत्ये करून दाखवायला सवड असते. लष्करी नोकरीत प्रवेश केल्यानंतर आपणास कधी ना कधी पराक्रम गाजविण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगणे चुकीचे ठरले नसते; परंतु तशी संधी मिळण्यापूर्वीच त्यांच्या या आशेचा चक्काचूर करून टाकणारा व पराक्रमाला पोषक असें जें कंबरडे तेंच मोडून टाकणारा दुर्धर असा अपघात त्यांच्या वाट्यास आला. त्या नामोहरम स्थितीत त्यांना काही काळ किंकर्तव्यमूढ स्थितींत दवडावा लागला.
जे हात तरवार गाजविण्यासाठी आतुर झालेले होते, त्या हातांत लेखणी घ्यावी लागली! तरवार आणि लेखणी। यांत श्रेष्ठ कोण ? दोन्ही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत; परंतु सध्यांच्या अनत्याचारी वातावरणांत तरी तरवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार अधिक तिखट व प्रभावी असते असे म्हणण्याचा मोह आवरतां येत नाही. प्राप्त परिस्थितीत काहींना काही उद्योग केलाच पाहिजे, या भावनेने नाथमाधवांनी लेखणी हाती घेतली. ज्या गोष्टीत मन घालावयाचे तिचा पिच्छा पुरवावयाचा; त्यांत जास्तीत जास्त प्रावीण्य संपादन करावयाचे व सर्वांकडून शाबासकी मिळवाव- याची, ही त्यांची जन्मजात खोड होती ! पराक्रमी पायांनी दगा दिला तरी ती खोड कायमच होती. आपली लेखणी बलदायिनी व सर्वांना डोलवायला लावणारी डौलदार कशी होईल, यासाठी त्यांनी झटून प्रयत्न केले व आपल्या लेखणीला त्यांनी प्रयने करून प्रभावी बनविलें. जनमनाचे मनोरंजन करणाऱ्या व एकाहून एक सरस अशा कादंबऱ्या त्यांची लेखणी प्रसवू लागली. त्यांच्या कादंबऱ्या मोठ्या आतुरतेने वाचल्या जाऊ लागल्या. या कादंबरीलेखनावर त्यांना पैसेही मिळू लागले; परंतु नाथमाधव तेवढ्यावर राजी नव्हते. कुठेतरी आपलें चुकते आहे असे त्यांना वाटत असे. आपण कादंबरी- लेखक झालों, आपणास दोन पैसे मिळू लागले, आता आपणास काय करायचे आहे ? असे त्यांना कधी वाटले नाही. दुसरे लोक काय म्हणतात, दुसऱ्यांकडून आपणास काय शिकता येईल, व अंगीकृत कार्यात आपली अधिकाधिक प्रगति कशी होईल, याकडे त्यांचे नेहमी लक्ष असे. नाथमाधव एकदां पुण्यास गेले असतां ज्ञानमहर्षि गुरुवर्य रामकृष्णपंत भांडारकर यांच्या भेटीस जाण्याची इच्छा त्यांना झाली. त्या वेळी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आपल्या १।२ प्रेमविषयक कादंबऱ्याही ते मेटीदाखल बरोबर घेऊन गेले. गुरुवर्य भांडारकर यांच्या भेटीचा हा प्रसंग १९२५ साली गोमंतकांतील मडगांव या शहरी श्री. दत्ता पै यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या आपल्या भाषणांत त्यांनी सांगितला होता. ते म्हणाले होते, "माझी कादंबरी हातात घेऊन व ती चाळून त्या वयोवृद्ध व विद्वान अशा विभूतीने मला असा प्रश्न केला की, तूं हे पुस्तक कोणतें ध्येय पुढे ठेऊन लिहिले आहेस ? त्याबरोबर मी निरुत्तर झालों; व त्या वेळेपासून माझ्या लेखनास नवीन वळण लागले."
२० गुरुवर्य भांडारकर यांच्या प्रश्नानें नाथमाधव खडबडून जागे झाले. त्यांचा मूळ खभाव शौर्यशाली व पराक्रमी बाण्याचा होता. परिस्थितीच्या चक्रांत सांपडल्यामुळे त्यावर दडपण पडले होते. परंतु तें दडपण कायमचे नव्हते. यानंतर नाथमाधव अंतर्मुख होऊन नवीन मार्गाने आपल्या लेखनसंसाराची आंखणी व मांडणी करूं लागले. याच मनःस्थितीत असता त्यांनी यापुढे "देशा वैभव आणतील असली गाईन गाणी नवीं" असा निर्धार केला. देश दीर्घकाळ पारतंत्र्यांत खितपत पडलेला आहे. परकीयांच्या राजवटीमुळे जनता स्वाभिमानशून्य झाली आहे. नाहीं स्वभाषेचा अभिमान, नाही आपल्या संस्कृतीचा अभिमान व नाही आपल्या पोषाखाचा किंवा धर्माचा अभिमान ! ही का जिवंतपणाची लक्षणे ! जनता स्वाभिमानी व पुरुषार्थी बनली पाहिजे. जनतेंत नवचैतन्य उत्पन्न झाले पाहिजे. आपण पूर्वी होतों कोण व आज आपण आहोत कोणत्या स्थितीत, याची कोणाला जाणीव किंवा खत तरी वाटत आहे का ? ती जाणीव आणून देणे व जनतेला स्वातंत्र्याची आस लावणे ही कामगिरी फार महत्त्वाची आहे. आपल्या हाती लेखणी आली आहे तिचा उपयोग या कार्या- साठी करावयाचा तर, आहे या परिस्थितीत आपणास आपल्या वैभवशाली अशा गतेतिहासाकडे वळले पाहिजे याची खूणगांठ नाथमाधवांनी स्वतःच्या मनाशी बांधली व ते उद्योगास लागले. विनायक कवीने गायिलेल्या “पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना दिव्य भावी काळ" या कडव्याची महती त्यांना पटू लागली होती. ज्यांचा भूतकाळ दिव्य, ओजस्वी व पराक्रमाच्या गोष्टींनी व्यापलेला आहे, त्यांच्या वांठ्यास त्या दिव्यत्वाची पेरणी व जोपासना केल्यास तो उज्वल काळ कधी ना कधीं आल्याशिवाय रहाणार नाही, या विचारसरणीवर त्यांची श्रद्धा होती. त्या भूतकालीन दिव्यत्वाची जाणीव करून देऊन राष्ट्रांत नवचैतन्य खेळविण्याच्या उदात्त कामगिरीकडे यापुढे आपण आपलें सारे लक्ष वळवावयाचे, असा निर्धार करून नाथमाधवांनी आपला नवा दीर्घोद्योग मोठ्या जोमाने सुरू केला. त्यांना मराठी वाड्मयाकडे व जनताजनार्दनाकडे पहाण्याची नवदृष्टि प्राप्त झाली होती. नाथमाधवांना तीनशे वर्षांपूर्वीच्या काळांतील शिवशाहीचा उज्वल इतिहास महाराष्ट्रीय जनतेपुढे परिणामकारक रीतीने उभा करावयाचा होता. त्याद्वारे त्यांना जनतेला स्वकर्तव्याचे व पराक्रमाचे धडे द्यावयाचे होते. ही गोष्ट वरकरणी वाटते तेवढी सहजसुलभ नव्हती. त्यासाठी दीर्घकालीन तपस्येची जरुरी होती. 'पी हळद आणि हो गोरी' असा तडकाफडकी कारभार त्यांना करावयाचा नव्हता. नाथमाधवांनी मनाशी ठरविले की, कितीही वर्षांचा कालावधि लागो. मराठ्यांच्या इतिहासाचा सांगोपांग रीतीने अभ्यास करावयाचा. त्यांत कसूर म्हणून बिलकूल करावयाची नाही. शिवकालीन इतिहासावर नवा प्रकाश पाडणारी साधनें विपुल प्रमाणांत उपलब्ध होऊ लागली होती, ती सर्व साधनें त्यांनी महत् प्रयासांनी जवळ केली. इतिहाससंशोधक राजवाडे, खरे व विशेषतः रियासतकार रा. सा. गोविंदराव सरदेसाई यांच्यासारख्यांशी निकट संबंध जोडले व या विषयाशी ते तद्रूप झाले. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळांत अत्यंत बिकट परिस्थितीत श्रीशिवछत्रपतींनी खराज्यस्थापनेची मुहूर्तमेढ कशी रोविली, लोकसंग्रह करून विपरीत व धोकेबाज परिस्थितीत त्यांनी स्वराज्यस्थापना कशी केली, त्या काळांतील शत्रूशी युक्ती- प्रयुक्तीने त्यांनी टक्कर कशी दिली, या साऱ्या गोष्टींशी एकरूप होऊन त्या नाथ- 'माधवांस वाचकांपुढें परिणामकारक पद्धतीने ठेवावयाच्या होत्या. अशा या मार्गाचा अवलंब करून त्यांना काहीतरी महत्त्वाचे उद्दिष्ट साधावयाचे होते. हे महत् कार्य परिणामकारक रीतीने पार पाडावयाचे तर गेल्या तीनशे वर्षा- पूर्वीच्या काळांत प्रवेश करून त्या काळांतील रूढी व समजुती, त्या काळांतील स्त्री-पुरुषांचे स्वभावविशेष, चालीरीती, वगैरे सर्व गोष्टींचा यथासांग अभ्यास करणे जरूर होते. आपली जबाबदारी नाथमाधव बरोबर ओळखून होते. श्रीशिवछत्र. पतींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या ज्या भागांत नाना कारस्थाने केली, लढाया मारल्या व ज्या ज्या प्रदेशांशी त्यांचा संबंध आला, ते विभाग, ती स्थळे, ते डोंगरपठार, ती मंदिरें, ते कोट-किल्ले वगैरे सर्व प्रत्यक्ष पहाण्याची जरुरीही नाथ- माधव ओळखून होते. आपण पायांनी पंगू; मग ही स्थळे प्रत्यक्ष पहावयाची कशी? याचा विचार करीत ते निराश होऊन स्वस्थ बसले नाहीत. पुणे, मावळ- प्रांत, सातारा, सांगली, कोल्हापूर, हैद्राबाद, गोमंतक वगैरे सर्व विभागांचे व त्या विभागांतील सर्व ऐतिहासिक स्थळांचे त्यांनी कधी मेण्यांतून तर कधीं एकाद्या सहकाऱ्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष निरीक्षण केले. प्रत्येक प्रसंगाशी व स्थळाशी ते तदाकार झाले आणि म्हणूनच नाथमाधवांच्या स्वराज्यावरील कादंबऱ्यांतील विविध प्रसंग वाचीत असतां वाचक तल्लीन होऊन जातात.
२२ प्रत्येक कादंबरीतून मनाची पकड घेणाऱ्या व वाचकांची उत्कंठा वाढविणाऱ्या विविध प्रसंगांची पखरण घातलेली दिसून येते. खामिभक्तीने प्रेरित होऊन शत्रूच्या गोटांतून गुप्त वेषाने फिरणारे शिवाजी महाराजांचे गुप्त हेर, पुरुष वेषांत जीव मुठीत घेऊन देशाच्या खातंत्र्यासाठी रानावनांतून फिरणाऱ्या शूर तरुण स्त्रिया, त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग, स्वातंत्र्यासाठी प्राणांची पर्वा न करणारे स्वामिभक्त इमानी सेवक व त्यांची उज्ज्वल देशभक्ति वगैरे स्फूर्तिदायक प्रसंग वाचीत असतां त्या त्या प्रसंगाशी वाचक क्षणार्धात तल्लीन होऊन जातो व त्याच शूर वीर पूर्वजांचे आम्ही वंशज आहोत काय ? असा प्रश्न तो सहाजिकपणे स्वतःस विचारू लागतो. वाचकांपुढे अशा प्रकारचे प्रश्नचिन्ह उभे करून, त्यांच्या अंतरंगांत खळबळ उडवून व त्यांना अंतर्मुख बनवून राष्ट्रजागृतीचे कार्य नाथमाधवांस पारतंत्र्याच्या काळांत पार पाडावयाचें होतें. खराज्यावरील कादंबऱ्या लिहून आपल्या देशबांधवांत खातंत्र्यप्रेम, त्यासंबं- धींची तळमळ व तें प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे जरूर ते आत्मविश्वास, त्याग आदि गुण उत्पन्न करण्याची अभिलाषा नाथमाधवांनी बाळगिली होती. 'स्वराज्याचा श्रीगणेशा' ही त्यांची शिवकालीन इतिहासावरील पहिली कादंबरी १९२१ साली प्रसिद्ध झाली. त्या कादंबरीची प्रस्तावना मोठी सूचक आहे. प्रकाशकांचे आभार मानताना शेवटी नाथमाधव म्हणतात, 'आपल्या पूर्वजांच्या मार्गदर्शक व फूर्तिदायक इतिहासाची ही कादंबरीरूप अल्पखल्प सेवा माझ्या हातून घडवून आणल्याबद्दल मी प्रकाशकांचा आभारी आहे." ज्या पारतंत्र्याच्या काळांत स्वराज्यावरील कादंबऱ्यांचे प्रकाशन झाले त्या काळांत यापेक्षा अधिक सूचक आत्मकथन हानिकारक ठरलें असतें. नाथमाधवांच्या या कादंबऱ्यांचे महत्त्व ओळखून ते उघडपणे कथन करणारे वाचक आजच्या स्वातंत्र्यकाळांत घरोघर मेटतील; परंतु त्या काळांतील मर्मज्ञही हे महत्त्व ओळखून होते. १९२८ साली नाथमाधवांचे निधन झाले. त्या निधनानिमित्त दुःख प्रदर्शित करण्यासाठी पुणे येथे काळकर्ते प्रो. शिवराम महादेव परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा भरविण्यात आली होती. त्या प्रसंगी भाषण करतांना प्रो. शिवरामपंत म्हणाले होते की, "नाथमाधवांच्या कादंबऱ्यांचा विशेष हा की, त्यांच्या कादंबऱ्यांतून २३ आमचा ओजखी इतिहास सांठविलेला आहे. केवळ प्रेम सांठविलेले नाही. मनोरंजना- पेक्षा किंवा प्रेमापेक्षां देशाचे स्वातंत्र्य या राष्ट्राला आवश्यक आहे; आणि त्या खातंत्र्याची जाणीव करून देणारा लेखक नाहीसा व्हावा ही अत्यंत खेदाची गोष्ट होय. ते खतः जरी पंगू होते तरी आपल्या देशबांधवांना पंगू करून ठेवण्याची त्यांची इच्छा नव्हती. आपण जरी दुर्दैवाने पंगू झालों तरी आपल्या देशबांधवांनी खतःच्या पायांवर उभे रहावें व पराक्रमी व्हावें याच सदिच्छेनें नाथमाधवांनी कादंबऱ्या लिहिल्या. ते सिंहगडावर शिकार करीत असतां खाली कोसळले असतील; परंतु त्यांची इच्छा अशी नव्हती की, माझ्या सर्व देशबांधवांनी सिंहगडावरून खाली कोसळा ! त्यांनी सिंहगड चढावा अशाच उदात्त भावनेने त्यांनी कादंबरी- लेखन केले. त्यांची इच्छा ग्रंथकार होण्यापेक्षां लष्करांत शिरून पराक्रम गाजवावा अशी होती व म्हणून तर त्यांनी सिंहगडावर दौड केली; परंतु नशिबाने त्यांना दगा दिला व ते पंगू झाले. अशा रीतीने पंगू झालेला मनुष्य पंगू नाहीं, तर ज्याचें मन पंगू तोच पंगू, ही अगदी सत्य गोष्ट नाथमाधवांनी आपल्या चारित्र्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व हिंदुस्थानाला व जगाला दाखवून दिली आहे. नाथमाधवांना दैवाने पंगू केले असले तरी आपल्या देशबांधवांच्या पंगुत्वाच्या निराकरणार्थ ते झटून प्रयत्न करीत होते. त्या हेतूनें देशभक्तियुक्त अशाच कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या." सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी प्रो. शिवरामपंत परांजपे यांनी नाथमाधवांसंबंधानें बोलतांना काढलेल्या वरील उद्गारांतील उपरोध व खोंच कोणालाही सहज समज- ण्यासारखी आहे. आपल्या ऐतिहासिक कादंबरीलेखनांत जरूर असलेली काही माहिती मिळ- विण्यासाठी नाथमाधव हे १९२५ साली गोमंतकांत गेले होते. ते मडगांव येथे असतां गोमंतकाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे व झगडणारे, व त्यापायीं परागंदा झालेले 'हिंदु' पत्राचे संपादक श्री. दत्ता पै यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे एक भाषण झाले. त्या वेळी नाथमाधवांच्या कार्याचा परिचय करून देतांना त्या काळांत श्री. दत्ता पै यांनी काढलेल्या उद्गारांचा येथे उल्लेख करण्याचा मोह आम्हांला अनावर होत आहे. श्री. दत्ता पै म्हणाले होते, “फ्रान्स देशांत रुसो, वाल्टेयर, वगैरे लोकांनी फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी आपल्या लेखनकौशल्याने आपल्या देशाची जी परिस्थिति घडवून आणिली व सर्व प्रजेंत जो जोम उत्पन्न केला, तीच परिस्थिति २४ व तोच जोम श्री. नाथमाधव हे आपल्या स्वराज्यावरील कादंबऱ्यांनी घडवून आणीत आहेत. जे ध्येय पुढे ठेवून ते स्वराज्यावरील कादंबऱ्या लिहीत आहेत तें उच्च असून सध्यांच्या स्वराज्याच्या चळवळीस अत्यंत पोषक असेंच आहे; कारण वर्तमानपत्रे, मासिकें व इतर पुस्तकें यांच्याद्वारे जरी स्वराज्याचा उहापोह होत असला, तरी त्यांचा प्रसार कादंबऱ्यांसारखा समाजाच्या खालच्या थरापर्यंत होत नाही. यावरून कादंबरीकार या नात्याने नाथमाधवांचा दर्जा किती श्रेष्ठ प्रतीचा आहे हे समजून येईल." गोमंतकाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांचा आत्मा अखेरपर्यंत तळमळत होता व त्याच ध्यासांत ज्यांनी अखेर आपला देह ठेविला अशा कै. दत्ता पै यांच्या वरील उद्गारांत नाथमाधवांचे स्वराज्यविषयक कादंबऱ्या लिहिण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट होत आहे; त्याचबरोबर श्री. दत्ता पै यांची मर्मज्ञताही व्यक्त होत आहे. आपल्या हातून पंगू स्थितींतही काहीतरी भरीव स्वरूपाची व उपयुक्त अशी राष्ट्र- सेवा घडावी व अशा रीतीनें जन्मा आलियाचे सार्थक घडावें, याच टोचणीने त्यांनी खराज्यावरील कादंबऱ्या लिहिण्यासाठी आपल्या जिवाचे रान केले. ज्या दिवशी त्यांना ही जाणीव झाली त्या वेळेपासून त्यांनी त्या कार्याच्या उभारणीसाठी व जरूर असलेली साधनसामुग्री हरप्रयत्नांनी जमविण्यासाठी आपली खचलेली कंबर कसली ! कारण त्यांना जनतेंत स्वातंत्र्याची तीव्र तळमळ व त्याच्या प्राप्तीसाठी लागणारी त्यागवृत्ती निर्माण करावयाची होती. स्वराज्यावरील कादंबऱ्यांच्या रूपाने आपण जे बी पेरीत आहोत, तें आज ना उद्या सत्कारणी लागल्याशिवाय रहाणार नाही अशी त्यांची पक्की खात्री होती. त्या बीजाची फळे कदाचित् आपणास नाहीं चाखायला मिळणार; परंतु आपल्या नंतरच्या पिढीला तरी स्वातंत्र्याची गोड फळे चाखायला मिळतीलच मिळतील, असे स्पष्ट उद्गार त्यांनी 'कर्मयोगी' या आपल्या निबंधांत काढले आहेत. एक वर्षापूर्वी ( जून १९५२) मुंबईत नाथमाधव स्मारक समितीतर्फे त्यांच्या पुण्यस्मरणार्थ मुंबई सरकारचे अन्नमंत्री ना. यशवंतराव चव्हाण बी. ए. एलएल्. बी. यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा भरविण्यात आली होती. त्या प्रसंगी ना. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण या दृष्टीने अत्यंत सूचक व अर्थबोधक होते. ते म्हणाले होते की, “मी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग २५ घेऊन जो काहीं यथाशक्ति त्याग करण्यास तयार झालों, त्याच्यामागे माझी विशिष्ट मनोभूमिका होती. ही भूमिका नाथमाधवांच्या कादंबऱ्यांनी तयार केली. मला खराज्याच्या चळवळीत भाग घेण्याची स्फूर्ति नाथमाधवांच्या स्वराज्यावरील कादंबऱ्यांमुळे झाली. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांचे महत्त्व मला भारी वाटते. त्या दृष्टीने मी त्यांचा एक ऋणाईत आहे; व तें ऋण फेडण्यासाठी मी येथे आलो आहे." नाथमाधवांच्या स्वराज्यावरील कादंबऱ्यांनी कोणतें कार्य घडवून आणिलें ? या प्रश्नास यापेक्षा दुसरें समर्पक उत्तर कोणतें असणार ? आपल्या लेखणीचा उपयोग राष्ट्रकल्याणासाठी शक्य त्या प्रमाणांत झाला पाहिजे ही जाणीव झाल्यापासून नाथमाधवांनी अहर्निश तोच ध्यास घेतला होता. त्यांनी मराठी वाङ्मयाचा त्याचप्रमाणे ऐतिहासिक साधनांचा अत्यंत काळजीपूर्वक व सखोल अभ्यास केला. 'मराठी वाङ्मय' या विषयावर त्यांनी लिहिलेला निबंध वाचला असतां याची सत्यता बरोबर पटते. त्या निबंधांत एके ठिकाणी ते म्हणतात, "राष्ट्राच्या हिताच्या आणि त्याच्या भावी उत्कर्षाच्या दृष्टीने वाङ्मय कसे असले पाहिजे, आजपर्यंतच्या वाङ्मयांत गुणदोष कोणते आहेत, त्यांत समाजामध्ये तेज व जीवन उत्पन्न करण्यासारखें सामर्थ्य आहे किंवा नाही, याचा विचार करून आमचे वाङ्मय कसे वाढेल हे आपण पाहिले पाहिजे." यावरून व त्यांनी आपल्या हयातीत अत्यंत विपरीत परिस्थितींत में कार्य पार पाडिलें, त्यावरून लेखक या दृष्टीने नाथमाधवांस स्वकर्तव्याची जाणीव व तत्संबंधी तळमळ किती तीव्रतेनें होती हे दिसून येते. खराज्यावरील ऐतिहासिक कादंबऱ्या ही नाथमाधवांची चिरस्मरणीय कामगिरी होय. या कार्याची त्यांनी जी भव्य व टोलेजंग आंखणी केली होती, तसेच त्यासाठी खतःच्या पंगू स्थितींतही त्यांनी आत्यंतिक कष्ट घेऊन जी पूर्वतयारी केली होती, ती पाहिली म्हणजे मन थक्क होऊन जातें व राष्ट्राला उपकारक होऊन रहाणाऱ्या या भव्य कामगिरीचा जेमतेम चौथा हिस्साच त्यांच्या हातून पार पडू शकला, व या कामगिरीवर असतां त्यांचे आयुष्य मध्येच खुंटले, याबद्दल मनाला विषण्णता आल्याशिवाय रहात नाही. खराज्यमालेत स्वराज्याच्या श्रीगणेशापासून तों स्वराज्याच्या समाप्तीपर्यंत एकंदर तीस कादंबऱ्या लिहिण्याचा त्यांचा मानस होता; परंतु नंतर त्यांनी सव्वीस हा आंकडा कायम केला. त्या कादंबऱ्यांची एकंदर आंखणीही त्यांनी करून ठेविली होती. पेशवाईचा अस्त १८१८ मध्ये झाला. तेथपर्यंतच्या काळाची व हालचालींची आंखणी त्यांनी केली होती. या कादंबरीमालेत स्वराज्याच्या श्रीगणेशापासून खराज्याच्या दुफळीपर्यंत म्हणजे राजाराम महाराजांच्या अखेरपर्यंतचा कादंबरीरूप इतिहास त्यांनी पुढीलप्रमाणे सात पुष्पें गुंफून महाराष्ट्रास सादर केलाः-(१) स्वराज्याचा श्रीगणेशा, (२) स्वराज्याची घटना, (३) स्वराज्याची स्थापना, (४) स्वराज्याचा कारभार. (५) खराज्यावरील संकट,(६) स्वराज्याचे परिवर्तन, (७) स्वराज्यांतील दुफळी. नाथमाधवांच्या हातून या नियोजित कार्याची पूर्तता झाली नसली तरी त्याकडे सर्वस्वी दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी आपल्या सर्व कादंबऱ्यांची नांवें व प्रत्येक कादंबरीसाठी जरूर ती मार्गदर्शक टांचणेही महत् प्रयासपूर्वक करून ठेविली होती. त्यांच्या नियोजित कादंबऱ्यांची नांवे पुढीलप्रमाणे होती-(८) खराज्याचे संरक्षण, (९) स्वराज्याचे संवर्धन, (१०) स्वराज्याचे एकीकरण, (११) स्वरा- ज्याची मीमांसा, (१२ ) स्वराज्याचा दरारा, (१३) खराज्याचे सौंदर्य, (१४) स्वराज्याची प्रतिष्ठा, (१५) खराज्याची समृद्धी, (१६) स्वराज्याचा विस्तार, (१७) खराज्यांतील गंडांतरें, (१८) स्वराज्याचा घात, (१९) खराज्याची दुर्दशा, (२०) खराज्यांतील मालिन्य, (२१) खराज्यांतील यादवी, (२२) स्वराज्यांतील फाटाफूट, (२३) स्वराज्यावरील विपत्ति, (२४) स्वरा- ज्यावरील आघात, (२५) स्वराज्याचा विध्वंस व (२६) स्वराज्याची समाप्ति. ही कादंबरीमाला नाथमाधवांच्या हातून पूर्णत्वास आली असती तर काय बहार झाली असती! परंतु मनोवांच्छित साऱ्याच योजना पूर्णत्वास आणण्याचे भाग्य या जगांत किती जणांच्या वांव्यास येत असतें ? जनतेत जागृति घडवून आणण्याचे नाटक हे एक प्रभावी साधन आहे हे जाणून त्यांनी 'मराठ्यांचा आत्मयज्ञ,' 'जातिवंत मराठा वीर,' 'लोकसंग्रह' यासारखी स्वराज्यकाळावरील स्फूर्तिदायक नाटकें लिहून त्या मार्गानेही त्यांनी जनतेत जागृति घडवून आणण्याचे प्रयत्न केले; परंतु त्यांची नाटके कांदबा- प्रमाणे लोकप्रिय झाली नाहीत.
२७ प्रकरण पांचवें नाथमाधवांचा कर्मयोग नाथमाधव हे एकनिष्ठ व खरखुरे कर्मयोगी होते. सतत विपरीत परि- स्थितीशी झगडत व आलेल्या संकटांशी हंसतमुखाने तोंड देत त्यांनी निष्कामवृत्तीने कर्माचरण केले. त्यांनी संकटांकडे केव्हाही पाठ फिरविली नाही अथवा विपन्नावस्था वांट्यास आली म्हणून ते,कधीं मुळूमुळू रडतही बसले नाहीत. लोकमान्य टिळकांचे 'गीतारहस्य' हा त्यांचा अत्यंत आवडता ग्रंथ होता. त्या ग्रंथाची अनेक पारायणे करून त्यांतील कर्मयोगाचे तत्त्वज्ञान पचविण्याचा व तदनुरूप आचरण करण्याचा त्यांनी अहर्निश प्रयत्न केला. गीतारहस्याचे मानवी जीवनांत फार मोल आहे हे त्यांनी ओळखिले; परंतु एवढा मोठा ग्रंथ वाचून काढणे व पचविणे सर्वसाधारण स्थितींतील माणसांस अशक्य आहे हे जाणून गीतारहस्याचे रहस्य साररूपाने गोड व साध्या भाषेत कथन करणारे व अवघ्या चार आण्यांत उपलब्ध होणारे 'गीतारहस्याचे रहस्य' त्यांनी लिहून काढले होते. त्यावरून गीतारहस्यावर व त्यांतील कर्मयोगी तत्त्वज्ञानावर त्यांची किती अढळ श्रद्धा होती हे स्पष्ट होत आहे. आपल्या वाट्यास आलेली नित्यनैमित्तिक कामें, फलाशा न बाळगितां उत्तम प्रकारे पार पाडणे व इतरेजनांसाठी नेहमी काहींना काही त्याग करणे, यांतच मनुष्यजन्माचे सार्थक आहे याची जाणीव नेहमी बाळगून ते वागत असत. 'कर्मयोगी' या आपल्या एका निबंधांत नाथमाधव म्हणतात, “खरें सौख्य मिळू लागण्याला विचाराच्या भराऱ्या सोडून कर्तबगारी करून दाखविली पाहिजे. निष्कर्म होऊन जगांत कसे रहावें, संसार करून त्याच्यांत कसें गुंतूं नये, हे कर्म- योग्याशिवाय इतरांस समजणार नाही.” कर्मयोग्याचे हे तत्त्वज्ञान नाथमाधवांनी प्रत्यक्षपणे आपल्या आचरणांत आणून दाखविलें. खरें पहातां, त्यांच्या वांव्यास असहाय्य अशी पंगू स्थिति आलेली! दुसऱ्यास भारभूत होऊन रहाणारी अशीच ती स्थिति होती; परंतु आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी स्वतःचा भार कोणावरही न टाकतां इतरांचे भार मात्र आपण शिरोधार्य करून ते आपल्या पंगू जीवनाशी अखेरपर्यंत हंसतखेळत राहिले! ..
२८ विवाहासाठी निघण्याच्या तयारीत असतांच त्यांना सिंहगडावर आरोहण करून वाघाच्या शिकारीत सामील व्हावे लागले व त्यांत शेवटी त्यांचीच शिकार झाली ! अशा रीतीने वैवाहिक किंवा सुखी संसारी जीवनाला ते आंचवले. त्यांचा संसार म्हणजे त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे झाल्यास 'संन्याशाचा संसार होता. त्यांना आपल्या बंधूच्या संसाराची सर्व जबाबदारी शिरावर घेऊन ती पार पाडावी लागली, आणि त्यांनी ती अत्यंत कसोशीनें व उत्तम प्रकारे पार पाडिली, एकाद्या संसारी व कुटुंबधारी माणसाला ज्या चिंता बाळगाव्या लागतात व व्याप हाताळावे लागतात ते सर्व त्यांनी हंसतखेळत संभाळले व हाताळले; एवढेच नव्हे तर इतर अनेकांचे संसार सुखासमाधानाचे व आनंदाचे व्हावे म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारें कुरकुर न करतां आयुष्यभर नाना प्रकारें झीजही सोसली. आजच्या सुधारलेल्या व वाचनाभिरुची वाढलेल्या काळांतही एकाद्या लेखकानें लेखनव्यवसायावर मला जगावयाचे आहे म्हटल्यास त्याचे ते म्हणणे हास्या- स्पद ठरेल; मग ३०-४० वर्षांपूर्वीच्या काळांत केवळ लेखनव्यवसायावर मान- मरातबाने जगणे नाथमाधवांस किती कठीण गेलें असेल याची कल्पना आपण करू शकतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे जरूर आहे. कादंबरीकार या नात्याने त्यांनी एवढी लोकप्रियता संपादन केली होती की, त्यांना एकाच वेळी एका रकमेनें हजार दोन हजार रुपये मोजणारे प्रकाशक सुदैवाने लाभत असत. कधी कधी आर्थिकदृष्ट्या त्यांना त्रासही सोसावा लागत असे; परंतु त्यांनी त्याबद्दल कधी खंत बाळगली नाही; याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी आपल्या अंतरीचा ज्ञानदिवा सतत पेटता व दैदीप्यमान करून ठेविला होता. त्या दिव्य प्रकाशांत वावरणाऱ्याला संकटांची किंवा चिंतेची बाधा कोठून होणार ? आपल्या वाट्यास विपरीत परिस्थिति आलेली आहे. ती आनंदाने सोसणे व त्यांतून विचारेंकरून पार जाणे हे आपलें एकमेव कर्तव्य आहे, याची खूणगांठ बांधून त्यांनी आपले लक्ष कर्मयोगाचरणावर केंद्रीभूत केले. तसेच सांगोपांग रीतीने त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ते आचरणांत आणिलें. मानसशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्वप्नरंजनशास्त्र, मंत्रतंत्रशास्त्र वगैरे सर्व शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केला. इतरांच्या समाधानासाठी व कल्याणासाठी त्या शास्त्रांचा त्यांनी प्रसंगोपात स्वतः झीज सोसून उपयोगही केला. परंतु आपल्या ध्येयावर त्यांनी अढळ निष्ठा ठेविली. एक कर्मयोगी या नात्याने त्यांनी जे आपले जीवनकार्य म्हणून एकदां ठरविले, त्याला ते अखेरपर्यंत चिकटून राहिले. रियासतकार रा. सा. गो. स. सरदेसाई यांचे कर्तबगार चिरंजीव निधन पावल्यानंतर त्यांच्या समाधानासाठी नाथमाधव त्यांच्या घरी गेले. या प्रसंगास अनुलक्षून रियासतकार आपल्या आठवणींत म्हणतात, "दोन तासपर्यंत इहलोकच्या कष्टमय संसारयात्रेवर त्यांचे व आम्हां उभयतां नवराबायकों में प्रेमळ व हृदय- स्पर्शी संभाषण झालें, तेणेकरून आमच्या मनास फार हलके वाटले आणि नाथमाधवांचा मधुर उपदेश आम्हांस उपयोगी पडला. त्या प्रसंगावरून त्यांच्या तपस्वी वृत्तीची योग्यता मला विशेष कळून आली; आणि प्रत्येक प्राणी काही तरी विशिष्ट कामगिरीकरितां जन्मास येतो, ती कामगिरी करण्यांतच त्याने आपला देह झिजवावा, यापलीकडे जास्त फलाची आकांक्षा मनांत धारण करूं नये, आणि अखेरचे पाचारण येतांच संतुष्ट अंतःकरणाने प्रयाणास सदैव तयार असावें, अशा प्रकारचा अल्प प्रबोध नाथमाधवांच्या भेटीपासून मला मिळाला, तोच मी अद्यापही पाळीत आहे." किती बहुमोलाचे शब्द आहेत हे ! यावरून नाथमाधवांच्या जीवनरहस्याचा उलगडा होईल. जन्मभर कर्तव्यपालन करीत व संधी मिळेल तेव्हां लोकोपकार करीत नाथमाधवांनी आपल्या आयुष्याचा सत्कारणी व्यय केला. ज्याच्यावर आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळांत कंबरडे मोडून पांगळा होण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला, त्या माणसाची केवढी ही कर्तबगारी! रियासतकार सरदेसाई यांनी त्यांच्यापासून जो सुबोध संपादिला व जो आपल्या जीवनांत ते इमानेइतबारें आजही अक्षरशः अंमलांत आणीत आहेत, त्यापासून आम्हांलाही काही शिकतां येणार नाही काय? लेखन, वाचन व संशोधन हा तर नाथमाधवांचा निदिध्यास होता; परंतु त्या- विरहित कितीतरी व विविध प्रकारच्या छंदांशी ते संलग्न झालेले होते. स्वप्ने पडताळून पहाणे, त्यांची टिपणे करून ठेवणे व त्यांचे संशोधन करणे हा एक दीर्घकाळपर्यंत त्यांना जडलेला छंद होता. ज्योतिषशास्त्राचा व मंत्रतंत्रादि उपचा- रांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला होता. स्वतःला आर्थिकदृष्ट्या फायदा व्हावा यासाठी त्यांनी ही शास्त्रे अभ्यासिली नाहीत व तसा त्यांनी कधी त्यांचा उपयोगही ३० करून घेतला नाही; परंतु इतरेजनांस त्यांपासून समाधान लाभतें ना ? ते आपण त्यांस सुकरतेने मिळवून द्यावे हीच त्यांची दृष्टी होती. ज्योतिष व हस्तसामुद्रिक यांचा व्यासंग करीत असतां लहानापासून थोरांपर्यंत हजारों स्त्रीपुरुषांच्या कुंडल्या मिळ- वून त्यांचा त्यांनी अभ्यास केला व त्यांच्या आधारे ज्योतिषशास्त्रासंबंधी काही ठोकताळे त्यांनी बसविले होते. या त्यांच्या व्यासंगामुळे त्यांच्याकडे सल्लामसलतीसाठी रोज निरनिराळ्या पेशाचे कितीतरी लोक येत असत व त्यांचा बहुमोल वेळ घेत असत; परंतु त्यामुळे ते कधी त्रासले नाहीत. “माझ्याकडे आल्याने त्यांना समाधान मिळते, मग तें देण्यास मी का कचरावें ? तें आनंदाने देऊन त्यांचे जीवन सुखी करणे हेच माझें जीवन- कार्य” असे ते म्हणत असत. त्यामुळे दिवसभरांत त्यांना आपला लेखनव्यवसाय करण्यास सवड मिळत नसे. मग काय करावयाचें ? रात्री अकरा वाजतां ते लिहायला बसत असत व पहांटे- पर्यंत जेवढे होईल तेवढे लेखन उरकीत असत. जडजवाहिराच्या परीक्षेत व अश्वपरीक्षेतही ते वाकबगार होते. संगीत व नाट्य या कलांचे ते भोक्ते होते; व या कलांचा आस्वाद घेण्याची आलेली संधी ते सहसा दवडीत अच्युतराव कोल्हटकर यांच्या 'नारिंगी निशाण' या ऐतिहासिक नाट- कांत त्यांनी बसकी व महत्त्वाची भूमिकाही केली होती. नाना प्रकारच्या दुर्धर प्रसंगांतून त्यांना जावें लागले, परंतु मनाचा समतोलपणा त्यांनी कधी गमावला नाही. त्यांच्या चिर आनंदी स्वभावाचे वर्णन कुठवर करावें? ते शरीराने दुबळे असले तरी मनानें पूर्ण खंबीर होते. मनाचें अचाट सामर्थ्य त्यांनी ओळखले होते. मनाच्या खंबीरतेमुळे त्यांनी अखंड अशा जीवनसंग्रामांत यश संपादन केले. त्यांनी आपल्या मनाला सैतानाचा कारखाना बनूं दिले नाही. त्याला पूर्णपणे ताब्यात ठेवून आपला जीवनोद्देश साध्य करण्यासाठी व लोक- कल्याणासाठी त्याचा जितका म्हणून उपयोग करून घेता येईल तितका त्यांनी करून घेतला. दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे, दुसऱ्यांचा दुःखभार शक्य तेवढा हलका करणे व खतः कळ सोसून व वेळप्रसंगी पैशांचा व बहुमोल वेळेचा त्याग करूनही दुस- यांच्या भल्यासाठी झटणे हे ध्येय त्यांनी आपल्या दृष्टीसमोर सतत ठेविलें होतें. तोच त्यांचा जीवनानंद होता. आपला संन्याशाचा संसार चालविण्यासाठी त्यांना नसत. कै लेखनव्यवसाय करणे प्राप्त होते; त्यासाठी दिवसभरात कधी सवड मिळाली नाहीं तरी न दगदगतां त्यांनी रात्रीचा दिवस करावा, परंतु कधीही कोणाला दुखवू नये. दुर्दैवाने वाट्यास पंगूपणा आल्यामुळे त्यांचे जिणें परावलंबी व असहाय्य झाले; परंतु त्यावरही त्यांनी मात केली. खतः स्वावलंबी बनून त्यांनी अनेकांस खावलंबनाचा मार्ग दाखविला. त्यांच्याकडे शिकण्याच्या दृष्टीने कोणी आल्यास त्याची त्यांनी कधी निराशा केली नाही. आपणास में कांहीं अवगत असेल तें त्याला सांगून त्याचा मार्ग ते सुकर करून देत असत. परिस्थिति कितीही बिकट असेना कां, तिच्यापुढे आपण न वांकतां तिच्यावर खार होऊन कामास लागावयाचे व आपलें इच्छित ध्येय गांठावयाचे, हा धडा नाथमाधवांच्या जीवनापासून प्रत्येकाने शिकण्यासारखा आहे. जीवन म्हणजे एक संग्राम आहे असे म्हणतात; आणि ते खरेही आहे; परंतु या जीवनसंग्रामांत अखेरपर्यंत टिकाव धरून त्यांत यश मिळविणारे लोक फारच थोडे आढळून येतात. नाथमाधवांच्या वाट्यास सर्वसाधारण माणसांचे जीवन आले नाही. ऐन तारुण्यांत त्यांच्या देहाचा कडेलोट झाला. कंबरेखाली देह निर्जीव व निःसत्त्व झाला. जीवनाचा पाया डळमळीत झाला, मग त्यावरील इमारत कशी शाबूत रहावी ? परंतु तरीही न डगमगतां त्यांनी मन खंबीर बनवून देहाचा डोलारा सांवरून धरला व त्याच्याकरवी अशी आश्चर्यकारक करामत घडवून आणिली की, कोणीही ती कर्तबगारी पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालावीं ! साध्या- सुध्या नव्हे, तर विपरीत जीवनसंग्रामांत टिकाव धरून व स्वतःसाठी एक नवीन कार्यक्षेत्र निर्माण करून ते यशस्वी कर्मवीर ठरले! त्यांनी स्वतःसाठी जे कार्यक्षेत्र निर्माण केलें तें सर्वस्वी अभिनव स्वरूपाचे होतें. आपलें कंबरडे मोडलें ! आतां आपल्या हातून काय होणार ? अशा निराशजनक विचाराच्या पकडीत न सांपडतां त्यांतूनच आपल्या खडकाळ जीवनांत नंदनवन फुलविण्याचा त्यांनी निर्धार केला व तें फुलवून दाखविलें ! कोणत्याही रूपाने असेना कां; आपला देह सत्कारणी लागावा, आपल्याकडून स्वदेश, स्वभाषा व वसंस्कृती यांची सेवा घडावी, ही ईर्षा त्यांनी बाळगिली व तिच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यासाठी त्यांनी सरस्वतीची उपासना निष्ठापूर्वक केली व ती फळास आल्यानंतर तिचा शक्य तेवढा सदुपयोग त्यांनी लोकजागृतीसाठी केला.
या त्यांच्या उपासनेसंबंधान कै. अच्युतराव कोल्हटकर एके ठिकाणी म्हणतात, "जेथें सरस्वतीची सेवा हे कुलवतच होते, तेथे एकादा वंशज सरस्वतीच्या विशेष कृतला निघाला तर त्यात काही नवल नाही; पण कै. नाथमाधव यांचा आणि सरस्वतीचा असा कोणताही पिढीजात संबंध नव्हता. त्यांची ओळख नवीन होती- त्यांचा परिचय याच आयुष्यातील होता; आणि तोही स्वतःच्या स्फूर्तीने नव्हे तर आवश्यकतेमुळे ! ज्याप्रमाणे एकादा प्रवासी वाट चालता चालतां संध्याकाळ झाली म्हणजे जेथें निवारा मिळेल तेथे वस्ती करतो, त्याप्रमाणे शरीरास भयंकर अपघात होऊन ज्या वेळी नाथमाधवांच्या आयुष्यावर एकाएकी संध्याकाळचा अंधार दिसायला लागला त्या वेळी त्यांनी निवाऱ्यासाठी सरस्वतीचा प्रांत धुंडाळला! नाथमाधव व सरस्वती देवी यांची गांठ ह्याप्रमाणे आकस्मिकपणे पडली- -नाइलाज म्हणून पडली! पण त्याच सरस्वतीचे ते इतके प्यारे बनले की तिनं आपल्या मधुमधुर स्तन्यांचा अपूर्व अमृतप्रसाद ह्या आपल्या नवबालकासाठी सहस्रधारांनी अपेण केला." नाथमाधवांच्या वाङ्मयाचे परीक्षण वा समालोचन करतांना त्यांच्या वाङ्मय- सेवेची ही पार्श्वभूमि नेहमी लक्षांत बाळगणे जरूर आहे असे आम्हाला वाटते. त्या दृष्टीने त्यांच्या वाड्मयाचे समालोचन व्हावें व या वीर कादंबरीकाराच्या वाड्मयसेवेचे योग्य तें मूल्यमापन व्हावे हीच आमची आकांक्षा आहे. आमची तेवढी योग्यता नाही याची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्यासाठी जी काही थोडीबहुत साधनसामुग्री जमवितां येईल ती जमवून आम्ही वाचकांपुढे ठेवीत आहोत. वाचकांनी ही आमची अल्पशी व तुटपुंजी सेवा गोड करून घ्यावी एवढी नम्रभावें विनती आहे. नाथमाधव आपली अत्यंत आवडती अशी ऐतिहासिक कादंबरीमाला गुंफण्याच्या उद्योगांत असतां न्यूमोनियाने आजारी पडून ता. २१ जून १९२८ रोजी कालवश झाले; परंतु विपरीत परिस्थितीशी झगडून त्यांनी राष्ट्रोद्धाराला पोषक अशी जी वाङ्मयनिर्मिती केली तिचा विसर कोणाही मराठ्याला सहसा पडणार नाही.
.. डावीकड़न :-श्री. मोरोपंत जोग, महाराष्ट्रभाषाचित्रमयूर श्री. कृ. ना. ऊर्फ दादा आठल्ये, हिंद एजन्सीचे मालक श्री. ना. न. केतकर व श्री. नाथमाधव.
No text on this page.
नाथमाधव यांच्या आठवणी नाथमाधवांच्या स्वभावांतील विविध पैलू [१] (लेखकः- श्री. ना. वि. कुळकर्णी) नाथमाधव यांची जांभळी शाई नाथमाधव लेखनाकरितां नेहमी जांभळी शाई वापरीत असत. टांकाचे 'ओ'चें नऊ किंवा दहा नंबरचे टोंक हे बहुधा त्यांचे ठरलेले असे. त्यांना त्याविषयी कुतूहलाने मी विचारले असता, त्यांनी आपल्या वतीने खुलासा केला.- "धांवत्या हातांनी लिहावयाला सर्व टोंकांत 'ओ'चे नऊ नंबरचें-दहा नंबरचें टोंक फार उपयुक्त आहे असे मला तरी वाटते. जांभळी शाई ही माझी आवडती शाई आहे. ती आवडती असावयाला कारणेही आहेत. "जांभळी शाई लिहितां लिहितांच वाळते. तिला टिपकागदाची आवश्यकता जवळजवळ लागतच नाही. दुसरे, दुसऱ्या कोणत्याही शाईपेक्षा डोळ्यांना जांभळी शाई अधिक आकर्षक, मनोल्हादक असून आपण लिहीत असलेला मजकूर, शब्द- सौष्ठव, वाक्यांची मजेदार रचना व मजकुराची अर्थपूर्ण जुळणी लिहीत असतां जसजशी सुचत जाते, तसतसा त्यामुळे जसा मनाला उल्हास वाटतो, त्याखालोखाल जांभळी शाई आपण लिहितांना आपल्या मनाची प्रसन्नता वाढवीत असते. "ज्याला पुष्कळसें व कंटाळा न येऊ देतां लिहावयाचे असते, त्याने असल्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडे लक्ष पुरविणे यांत एक प्रकारचा अर्थ आहे. तुम्ही जांभळ्या शाईचा आणि नऊ-दहा नंबरच्या 'ओ' टोकाचा आपल्या लेखनाकरिता प्रयोग करून पहा, म्हणजे तुम्हांला माझे म्हणणे पटेल. सबंध बंद जांभळ्या शाईने तुम्ही लिहून काढा, व त्याकडे टक लावून पाहा; खात्रीने तुमचा तुम्हांलाच आनंद होईल. पुढील पानावर मजकूर लिहिण्यास हुरूप येईल.'
नाथमाधव यांच्या वरील विवेचनाचे मला कौतुक वाटले. त्यांत तथ्यांशही आहे, असें अनुभवाने पटले. मी लेखनाकरितां जांभळी शाई व 'ओ' चे नऊ-दहा नंबरचें टोंक वापरू लागलो. (आतां तें मी नेहमीच वापरतों.) जांभळी शाई व सदर टोंक वापरताना मला आनंद होतो, म्हणून तर मी वापरतोंच; पण नाथमाधवांची आठवण कायम करणाऱ्या या दोन वस्तु म्हणून त्या वापरतांना मला जास्तच आनंद वाटत असतो. नाथमाधव यांचा बोधशत-रत्नहार नाथमाधवांची सर्वांत मोठी पुतणी गिरजाबाई इच्या लग्नाच्या वेळची ही बोधशत-रत्नहारासंबंधीची आठवण आहे. गिरजाबाईचे लग्न ठरले, त्या वेळी मी मुंबईस नाथमाधवांकडे उतरलो होतो. लग्नास या म्हणून त्यांनी मला अत्याग्रहानें सांगितले व त्याच वेळी अहेरादाखल 'तुम्ही कविता करा' म्हणजे झाले, असें सांगितले. मी लमाला जाऊ शकलों नाही. परंतु त्यांच्या आज्ञेप्रमाणे उपदेशपर एकशेएक कविता करून त्यांच्याकडे पाठविल्या. शंभर साक्या व अकरा आर्या केल्या. त्या कविता नाथमाधवांनीच रचल्या आहेत, अशा धर्तीने मी तयार केल्या. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या नांवावरच "बोधशत-रत्नहार" नांव देऊन त्या पुस्तकरूपानें छापल्या. त्या पुस्तकास त्यांना गुरुस्थानी असणारे महाराष्ट्रभाषाचित्रमयूर कै. कृष्णाजी नारायण आठल्ये, यांजकडून छोटेखानी प्रस्तावना लिहविली. (नाथमाधव कविता रचण्याच्या भानगडीत कधी पडत नसत.) कै. आठल्ये यांनी त्या कवितांना सुंदर प्रस्तावना लिहिली. गिरजाबाईंच्या लग्नानंतर नाथमाधवांनी त्या पुस्तकाची एक प्रत व त्याबरोबर खदस्तुरचे एक पत्र मजकडे पाठवून दिले. तें पत्र व तें पुस्तक मी अजून जपून ठेवलेले आहे. त्या पत्रांत त्यांनी माझ्या कवितांची तर स्तुति केली होतीच; पण त्याबरोबर प्रस्तावनेंतील आठल्ये यांच्या स्तुतीकडे अंगुलिनिर्देश करून म्हटले होतें, 'आठल्ये यांनी तुमच्या कवितांची ही स्तुति केली आहे पाहा. पण हे स्तुतीचें श्रेय केवळ तुमच्या कवितेलाच आहे, असे समजू नका. त्या कविता तुमच्या आहेत हे आठल्ये यांना माहीत नाही. त्या कविता माझ्या आहेत व माझ्या नाणावलेल्या नांवाने आठल्ये यांना भारले, म्हणून त्यांनी जास्त स्तुति केली आहे. अप्रसिद्ध (त्या वेळी खराच बराच अप्रसिद्धही होतों) व सुप्रसिद्ध लेखक यांच्या लिखाणाकडे पाहण्याची आठल्ये यांच्यासारख्यांची सुद्धां दृष्टि अशी असते. तर मग सामान्य जनतेसंबंधी बोलावयालाच नको! म्हणून लक्षात ठेवा, चांगली प्रसिद्धी मिळेपर्यंत तुमच्या चांगल्या लेखनालाही जनतेने चांगले म्हटले नाही, तर त्याबद्दल विषाद मानू नका. सतत कार्य करीत राहा, म्हणजे तुम्हांला दीर्घ तपश्चर्येनंतर प्रसिद्धीही मिळेल व तुमच्या चांगल्या लिखाणावर पसंतीचा छापही पडेल.' नाथमाधवांचे त्या वेळचे बोल उशीरा का होईना, माझ्या प्रत्ययाला आले, ही गोष्ट अगदी खरी आहे. ब्रह्मद्वेष्टे नाथमाधव ? नाथमाधव ब्रह्मद्वेष्टे म्हणून त्यांना त्यांच्या हयातीत पुष्कळ लोक समजत. माझ्या अनुभवाने त्यांत सत्याचा लवलेशही नव्हता. शाहुनगरवासी नाटक मंडळीने नाथमाधव यांचें “जातिवंत मराठा वीर" या नांवाचें नाटक बसविले होते. त्यांत ब्राह्मण पात्र घालून त्यावर बरेच ताशेरे झाडले आहेत, म्हणून कै. गणपतराव जोशी यांनी तें नाटक करण्याचे सोडून दिले, असा त्या वेळी गवगवा झाला होता. त्यासंबंधी मी नाथमाधवांना एकदां मुद्दाम विचारले. त्या वेळी त्यांनी मज- जवळ त्याबद्दल खुलासा केला. ते मला म्हणाले, “वास्तविक तसा प्रकार मुळीच नाही. ब्राह्मणांची निंदानालस्ती करण्याचे मला कारण नाही व तशी माझी बुद्धीही नाही. ब्राह्मणाच्या जन्माला आलेले सर्वच ब्राह्मण जसे वाईट नसतात, तसे चांग- लेही नसतात, हे तुम्हीच कबूल कराल. एकादा सच्छील, सत्प्रवृत्त, लौकिकवान्, सन्मान्य आदर्श ब्राह्मण वेठीला धरून त्यावर निंदेचे, उपहासाचे, कठोर तडाखे मारले आहेत काय ? हे मला माझ्या कुठल्याही लिखाणांत दाखवून द्या. मला नेहमी ब्राह्मणांनी ब्राह्मणासारखे वागावें, त्यांनी आपला धर्म, नीतिनियम पाळावेत असेंच वाटत असते. "नाटक कंपनीतील एक ब्राह्मण जातींतील गृहस्थ (त्यांनी त्या गृहस्थाचें नांवही मला सांगितले) मजकडे पाहुणा म्हणून राहावयास आला. जेवणाची वेळ झाली, तेव्हां शेजारच्या एका ब्राह्मणाच्या खाणावळींत त्याची जेवणाचीही व्यवस्था मी केली. जेवावयास जातांना तिकडे जा, म्हणून मी त्याला सुचविलें. तेव्हा त्याने ३६ खाणावळीत कशाला? मी आपल्याच येथे निःशंक जेवतों; त्याला काय हरकत आहे?' असे उत्तर दिले. अर्थात् माझ्याकडेच त्याला नाइलाजाने मला जेवावयाला घालावे लागले. पण त्याच्याबद्दल माझा आदर तर राहिला नाहीच, पण उलट मला चीड आली. ब्राह्मणांनाच आपलें ब्राह्मण्य नकोसे झाले आहे, तर त्याच्याबद्दल आम्ही नाक मुरडलेलेंही लोकांना खपूं नये याचे मला आश्चर्य वाटते." असे सांगून ते पुढेही म्हणाले, “असे असले तरीही मी माझ्या लेखनांत ब्राह्मण- वर्गावर शस्त्र उगारलेले नाही. जी ब्राह्मण पात्र माझ्या लेखनांत आली असतील, व प्रसंगविशेषीं त्याबद्दल प्रतिकूल दिसेल असे लिहिले असेल, त्याकडे पाहाल, तर त्यासारखीच तुम्हांला ब्राह्मण लेखकांनीही आपल्या लेखनात माझ्याहीपेक्षां वरचढ केलेली आढळून येईल. श्री. न. चिं. केळकर यांच्या 'तोतयाच्या बंडां'तील बगंभट, श्री. कृ. प्र. खाडिलकर यांच्या 'भाऊबंदकी'तील चमकशास्त्री- नमकशास्त्री, 'सत्त्वपरीक्षेतील चित्रगुप्त, त्याची बायको, मुलगा गंपू, श्री. श्री. कृ. कोल्हटकर यांच्या 'मतिविकारा'तील हरिहरशास्त्री, श्री. हरीभाऊ आपटे यांच्या 'यशवंतराव खरे' मधील रावबहादूर-रावबहादुरीणबाई यांच्या घरचा होयबा भटजी ही पात्रे रेखाटलेली आहेत. ती ब्राह्मण लेखकांनींच रेखाटलेली आहेत ना ? त्यावरून त्या ब्राह्मण लेखकांना तुम्ही ब्रह्मद्वेष्टे म्हणू शकाल काय ? ह्यांना जर म्हणणार नाही, तर तो आरोप मजवरच काय म्हणून ? गणपतराव जोशी यांना तसे वाटले असते, तर त्यांनी माझें 'जातिवंत मराठा वीर' नाटक बसविलेंच नसते." नाथमाधवांचे म्हणणे मला साधार वाटले, पटले. माझ्याशी वागण्यांत तर मला त्यांची वृत्ति नेहमीच समजून येत असे. नाथमाधवांचा भिडस्तपणा नं. १ नाथमाधव मनाचे फार भिडस्त होते. त्यांचा मित्रपरिवार फार दांडगा होता. सदैव त्यांच्याकडे अनेक लोकांची रहदारी असावयाचीच. त्यांचे मुख्य जीवन लेखनावर असल्यामुळे जितका दिवसांतला जास्त वेळ वाचनलेखनाकडे देतां येईल, तेवढा देणे भागच होते. आपल्या व्यवसायांत अडथळा येऊ नये म्हणून, "कामाशिवाय येथे कोणी बसू नये" अशी त्यांनी आपल्या खोलीत ठळक अक्षरांची प्राटीही लावली होती, परंतु तिचा फारसा उपयोग त्यांना होत नसे.
२७ कित्येक लोक खोलीत पाऊल टाकतांच जेठा मारून बसण्यापूर्वी हसत हसत ती पाटी उलटी करून ठेवीत. नाथमाधवही हंसून म्हणत, "बसा हो. ती पाटी तुमच्याकरितां नाहीच.” मंडळी असतां ते लिहिणे-वाचणे बाजूला ठेवीत. मंडळीशी बोलण्यांतच वेळ व्यतीत करीत. येणाऱ्या मंडळींना नाखूष करणे त्यांच्या जिवावर येई. त्रास झाला, तरी भिडस्तपणानें तो खतःच सहन करीत. दिवसा त्यांचे वाचन-लेखन होतच नसे. मग रात्रीच्या रात्री जागून त्यांचे लेखन-वाचन चाले. भिडस्तपणा नं. २ कोणाला त्यांनी एक पुस्तक लिहून दिले. त्याचा मोबदला म्हणून त्यांच्या हाती दीड हजारांचा एक चेक आला. त्या वेळी मी तेथेच होतो. दीड हजार रुपये आपल्या लेखनावर एकदम मिळाल्यामुळे त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मोठ्या अभिमानाने मला म्हटले, “नारायणराव, तुम्हां नाटककारांना नाटक मंडळीकडून तरी एका रकमेने अशी रक्कम मिळणे शक्य आहे कधी ? मला मिळाली की नाही, पाहा." दुसऱ्या दिवशी त्यांचा खिस्ती या नांवाचा फारा दिवसांचा स्नेही त्यांच्याकडे आला. त्याच्यावर त्यांचा फार विश्वास. नाथमाधवांनीं तो चेक त्याच्याजवळ बँकेतून वटवून आणण्यास दिला. त्याने तो आणला. पण त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने नाथमाधवांच्या जवळ त्यांतील पांचशे रुपये संध्याकाळपर्यंत हातउसने मागितले, नव्हे, ते जवळजवळ उचलूनच घेतले. नाथमाधवांना नाही म्हणण्याची छातीच झाली नाही ! बरें, संध्याकाळपर्यंतचीच मागणी. त्या दिवशी शनिवार- मुंबईची महालक्ष्मीची रेस. ते पांचशे रुपये घोड्यावर लावण्यांत येणार हे नाथ- माधवांना माहीत. परत येण्याची शाश्वती काय, हे ते जाणत होते. पण भीड तोडवेना. त्या गृहस्थाने ते पांचशे रुपये नेले आणि ते घोड्यावर गमावले. रात्री वाईट तोंड करून तो परत आला. नाथमाधवांनी ते ओळखलें, पण करणार काय? आपण तुमचे रुपये हरत-हेनें फेडू असें तो सांगू लागला. नाथमाधवांच्याने त्याला उलट बोलवलें तर नाहीच, पण “जाऊ दे, माझ्या पुस्तकावर मी एक हजारच रुपये मिळविले, १५०० मिळालेच नाहीत, असे समजतों, म्हणजे झाले. मींच रेसमध्ये पांचशे रुपये गमावले असते तर काय झाले असते? मग तुम्ही हरवले काय आणि मी हरवले काय ?" पहिल्याइतक्याच प्रफुल्लपणाने ते म्हणाले व त्या गृहस्थाचेच उलट समाधान करूं लागले.
त्या गृहस्थाने ते रुपये परत केले की नाही हे मात्र मला माहीत नाही.) भिडस्तपणाचे प्रायश्चित्त तुम्हांला मिळाले आहे, असे मी अनेकदा त्यांना म्हणे. ते नुसते हंसत असत. भिडस्तपणा नं. ३ नाथमाधवांच्याकडे एक प्रकाशक आला व प्रकाशनाकरितां त्यांच्याजवळ कादंबरी मागू लागला. त्यांना इतर लेखनामुळे वेळ नव्हता. प्रकाशकाला होय म्हणवेना, नाही म्हणवेना. प्रकाशक त्यांना त्यांच्या प्रसिद्धीमुळे भरपूर मोबदला द्यावयाला तयार होता. त्या वेळी नाथमाधवांचे एक लेखक स्नेही कै. कृ. ना. अस्नोडकर त्यांच्याकडे बसत असत. त्यांना पैशांची अत्यंत जरूरी होती. त्यांनी नाथमाधवांना आपण तुमच्या नांवावर कादंबरी लिहितों, तुम्ही प्रकाशकाला होय म्हणा, त्याचे काम होईल, माझेही होईल. माझ्या नांवावर तुमच्याइतका मोबदला मिळणार नाही; तुमच्या नांवाची प्रकाशकाला गरज आहे. लेखनाचीच आहे असें नाहीं, असे सांगितले. नाथमाधवांनीं तें मित्राच्या भल्याकरितां कबूल केले. प्रकाशकालाही तसें अगोदर स्पष्ट सांगितले. मी त्या कादंबरीवरून सफाईचा हात फिरवीन असेंही सांगितले. प्रकाशकानें तें कबूल अस्नोडकरांनी “नटसम्राट' ही कादंबरी नाथमाधवांच्या नावावर लिहिली. ती प्रसिद्ध झाली. नाथमाधवांना म्हणजे अस्नोडकरांनाच त्या कादंबरीचा भरपूर मोबदला मिळाला. प्रकाशकाचा कार्यभाग झाला. अस्नोडकरांची गरज भागली. परंतु नाथमाधवांचें नांव मात्र त्या कादंबरीने उगाचच बद्दू केलें. अनेकांनी नाथमाधवांना त्याबद्दल दोष दिला. दोष देणाऱ्यांपैकींच मी एक होतो. नाथमाधवांनी त्यावर मला सांगितले, "झालें आहे खरें हे असें, पण काय करणार ? मित्राच्या चांगल्याकरितां मला भीड मोडवली नाही. त्याबद्दल आता जे कोणी काय म्हणेल तें मला निमूटपणे ऐकून घेतलेच पाहिजे.” यावर मी किंवा आणखी दुसरा कोणी झाला तरी काय म्हणणार ! प्रोत्साहक नाथमाधव कै. महाराष्ट्रभाषाचित्रमयूर कृष्णाजी नारायण आठल्ये हे आपले लेखनगुरु म्हणून नाथमाधव सांगत. लेखनाचा ओनामा त्यांनी घालून दिला. एक गोष्ट केलें.
३९ लिहावयाला सांगितली. आपण कशीबशी ती लिहिली. ती आठल्ये यांनी वाचून, शब्द, वाक्य, प्यारे, हेतु या सर्वांचे यथास्थित वाभाडे काढून तिचा पुरा सत्यानाश करून दाखवून, ती चुकली आहे कशी, पाहिजे होती कशी, हे निर्दयपणाने सांगितले. पण लिहिण्यास प्रोत्साहन दिले. आणि तोच कित्ता आपण नवीन, हौशी, होतकरू लेखकांच्या बाबतींत गिरवीत असतो, असे ते सांगत. ते आठल्ये यांना लेखनगुरु म्हणण्यांत भूषण मानीत, पण आपणांस कोणी गुरु म्हणावें असें इच्छीत नसत. त्यांच्याकडे येऊन अनेक नवथर लेखकांनी लेखनाचे पहिले धडे गिरविले व पुढे ते लेखक चांगले नावारूपाला आले. त्यांच्याबद्दल नाथमाधवांना फार अभिमान वाटे. त्यांच्या प्रोत्साहनाचा उपयोग (अंगी गुण असूनही) करून घेतला नाही असे मुंबईचे एक श्री. धोंडो रघुनाथ तेंडुलकर या नांवाचे गृहस्थ मला माहीत आहेत. ज्यांना त्यांच्या प्रोत्साहनाचा चांगलाच उपयोग झाला, ज्यांना नाथमाधवांनी लेखनाचा श्रीगणेशा घालून दिला व ज्यांनी पुढील आयुष्यांत त्याचा चांगलाच उपयोग करून दाखविला, ते म्हणजे आजचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. विठ्ठल वामन हडप हे होत. त्यांच्याविषयी बोलणे निघालें, म्हणजे त्यांच्या कल्पकतेचा, हौशीचा, चिकाटीचा व लेखनाचा गौरवाने उल्लेख केल्याशिवाय नाथमाधव राहत नसत. कोणाही लेखकाला उत्तेजन देणे, त्याच्याशी चर्चा करणे, विषयाची सर्वां- गीण तयारी कशी करावी, वाचन, लेखन, मनन, निरीक्षण, प्रवास का व कसा करावा, पुष्कळ तयारी करून थोडे लिहावे म्हणजे त्यांत भरीवपणा कसा येतो, तें लेखन लोकादरास कसें पात्र होते, हे ते मोठ्या कळकळीने व हौसेनें सांगत असत. मलाही त्याचा थोडाफार पण चांगलाच अनुभव आहे. ज्योतिषी नाथमाधव कुंडल्या पाहणे, भविष्य सांगणे, वगैरेंचा नाथमाधवांना चांगलाच नाद होता. गरीब, अडाणी, बायका, मुलें नेहमी त्यांच्याकडे येत. भविष्य विचारीत, तोडगे मागत. नाथमाधवही सर्वांची मनीषा त्यांची भावभक्ति, अंतःकरणाची स्थिति पाहून पुरी करीत. भविष्य विचारण्यास येणारांना ते चांगले असेल तेवढेच सांगत. बायकामुलें, गोरगरीब त्यांजकडे नेहमी येत व ते त्यांना मंत्रतंत्र वगैरे सांगत; म्हणून कित्येक मंडळी नाथमाधवांना ढोंगी म्हणून त्यांची कुचेष्टाही करीत. पण ते त्याकडे दुर्लक्ष करीत. 'होरा' ज्योतिषावर तुमचा विश्वास खरोखरच ४० आहे काय ? म्हणून मी त्यांना विचारले असतां ते म्हणाले, "माझा त्यावर विश्वास नाही. शास्त्र म्हणून ते कदाचित् खरेही असेल; पण माझा तसा त्या शास्त्राचा दांडगा अभ्यासही नाही. मला त्याचा नाद आहे. त्याचे ठोकताळे कांही ठरलेले असतात व त्यावर अनुमानानें आंवतीभवतीची परि- स्थिति जाणून घेऊन व्यवहार्यबुद्धीने त्यासंबंधाने काही विधाने केल्यास त्याचा पडताळाही पटण्यास फारसा प्रत्यवाय नसतो. शिवाय मजकडे विचारण्यास येणारी मंडळी अन्य कारणाने मजवर विशेष भक्तीने-मी कोणी तरी एक भला माणूस भाहे अशा भावनेने येतात; मी त्यांच्याबद्दल बरे होईल असे सांगितले म्हणजे त्यावर त्यांचा विश्वासही बसतो; म्हणून मी चांगले होईल - होणार आहे, असेंच शक्य तो सांगत असतो. भविष्य थोडेंच, पण सद्बुद्धीने एकाद्याचे चांगले व्हावें म्हणून अंतःकरणपूर्वक सांगितल्यास त्याला अदृश्य ईश्वरी शक्तीचा पाठिंबा- वाचासिद्धि म्हणून मिळावयाला हरकत काय ? अशी माझी समजूत आहे. सद्भा- वनायुक्त कोणाचेही चांगले व्हावें, असें चिंतीत गेल्यास, म्हणत गेल्यास, सांगत गेल्यास, त्याचा प्रभाव अल्पांशाने दिसल्याशिवाय राहात नाही, असा पुष्कळ वेळां मला अनुभव आहे. भक्तिभावाने विचारणारास भक्तिभावानेच पण दूरदर्शीपणाचा पोंच ठेवून सांगण्याने चांगले झाले नाही, तरी वाईटही काही होत नाही; मग तसें सांगावयास कोणती हरकत नाही. भविष्य ठाम म्हणून कोणी सांगूही नये, व सांगितल्यास सर्वस्वी त्यावर अवलंबूनही राहू नये." भविष्यकथनाविषयी चर्चा निघाली असतां माझ्यासारख्याने आपली कुंडली त्यांच्यापुढे टाकली असता ते म्हणत, "अहो, कुंडली कसली विचारतां ? तुमची कुंडली तुमच्या हातांत आहे. नशिबाच्या रेषेपेक्षा हातावर, कर्तबगारीवर, मनग- राच्या शक्तीवर विश्वास ठेवा; कार्याला लागा; म्हणजे ज्योतिष्यांनी तयार केलेल्या कुंडल्या तुम्ही स्वपराक्रमाने लटक्या करून टाकाल. ज्योतिष पाहणें हें निरुद्योग्यांचे, आळशांचें, कामचुकारांचे काम आहे.' यावरून नाथमाधवांची होराज्योतिषाबद्दलची मते कळण्यासारखी आहेत. तरी पण त्यांना नाद होता. अज्ञानी मंडळीच्या समाधानासाठी ते ज्योतिष पाहात व चांगले तेवढे धीर व उत्साह देण्याच्या बुद्धीने सांगत असत.
माथमाधव व स्वप्नसृष्टि पुण्यास एक दिवस नाथमाधवांकडून मला दहा रुपयांची मनीऑर्डर व त्याबरोबरच एक पत्र अचानक आले. पत्रांत त्यांनी लिहिले होतें, "मला परवां एक खप्न पडले, त्यांत दिसले की, तुम्ही पैशांच्या अत्यंत अडचणींत असून अगतिक झाला आहात. तुमच्या मनाच्या वेदना मला कळल्या. तुमचे बऱ्याच दिवसांत पत्रही नाही. मी जागा झालों, बेचैन झालों, म्हणून मी तुम्हांस दहा रुपये आज पाठ- विले आहेत. तुमच्याकडील खरी वस्तुस्थिति कळवाल तर मला त्याचा माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने फार उपयोग होईल. स्वप्नांत तुमची अडचण मला कळली. तुम्हीं मजकडे स्वप्नांत पैशांची मागणी केली. यापैकी खरे काय आहे ?" वस्तुस्थिति त्या पत्रांतल्याप्रमाणे खरीच खरी होती. मी आजारी होतो. पैशांची टंचाई होती. नाथमाधवांच्याकडे एका नाटकवाल्याकडून मजकरितां कांहीं पैसे जमा झालेले होते. त्यांच्याकडे मागणी करावी काय, अशा विचारांत होतो; पण मागणी केली नव्हती. माझ्या अडचणींचा दादपत्ता मी त्यांस मुळीच कळविला नव्हता. तेव्हां त्यांच्या स्वप्नांत हे खरें 'सत्य' कसे आले, याबद्दल अचंबाही वाटला. मी पत्राने त्यांना वस्तुस्थिति कळविलीच, पण त्यानंतर मुंबईस त्यांच्याकडे गेलों असतां त्यांना स्वप्नाची आठवण दिली व त्याचा तुम्हांला जास्त काय उपयोग झाला, म्हणून चौकशी केली. तेव्हां त्यांनी मला सांगितले "वप्नसृष्टि हा काय चमत्कार आहे ? स्वप्ने कां पडतात ? कशी पडतात ? सत्यसृष्टि व स्वप्नसृष्टि यांच्यांत कांहीं निकटचा संबंध असेल काय ? अपचनानें, अजीर्णानें, अति त्रासाने, अति शोकानें, अति आनंदाने स्वप्ने पडतात म्हणतात, 'मनी वसे, तें स्वप्नी दिसे' असेही म्हणतात. त्यांत काही तथ्यांश आहे, की त्याखेरीज स्वप्नसृष्टीला स्वतंत्र अस्तित्व-अर्थ आहे ? त्याचा प्रभाव कांही आहे की काय १ खप्नांची संगति कांही लागेल काय ? स्वप्नसृष्टीला आपल्या सत्यसृष्टीप्रमाणे एकसूत्रता, बंधनें, कांहीं असेल काय ? असल्यास कां, कशी, हे पाहण्याचा मला अलीकडे नाद लागला आहे. मला जी अनेक वेळां, अनेक प्रकारची सुष्टदुष्ट खप्ने पडतात, कधी न ऐकलेली, न पाहिलेली स्थळे, व्यक्ति, प्रसंग, परिस्थिति, घटना, विघटना दिसतात, त्यांत सूचकत्व काही खरोखर असते काय, हे पाहण्याकरिता गेले कित्येक दिवस मी माझी स्वप्ने टिपून ठेवण्याचा क्रम ठेविला आहे. अशी खप्ने जवळजवळ दोनअडीच हजार मी आतापर्यंत टिपून ठेवली आहेत. स्वप्ने टिपून ठेवतांना, मला झोंप केव्हां लागली, झोपतांना कोणत्या दिशेला डोके होते, हात, पाय, यांची पोझिशन काय होती, पालथा, उताणा कुशीवर होतों की काय, खप्नांतून जागा झालों त्या वेळी कोणत्या परिस्थितीत होतो, किती वेळ झोंपेंत होतो, स्वप्रसृष्टीत किती काळ वावरत होतों, या सर्वांसह पडलेले स्वप्न टिपावयाचे, असा क्रम मी ठेविला आहे. (अशी अनेक स्वप्ने टिपलेले कागद त्यांनी मला दाखविले) त्याच स्वप्नांच्या सांखळींत तुमच्याविषयी पडलेले स्वप्न गोंवले गेले आहे. असें एकाद-दुसरे स्वप्न सत्यसृष्टीशी संगनमत करते, असे मला दिसून आले; परंतु त्यापेक्षा स्वप्नसृष्टीचा सत्यसृष्टीशी विशेषसा ताळमेळ बसत नाही. संगति लागत नाही. सूचकपणा पटत नाही. असेंच मला इतक्या दिवसांच्या अनुभवाने वाटू लागले आहे. असा संगतीचा चमत्कारपूर्ण दुवा मला जर अनेक पुराव्यांनिशीं मिळता, तर त्यावर मला एकाद्या जंगी सुंदर कादंबरी-मंदिराची उभारणी करतां आली असती. त्यासाठी हा उद्योग करून पाहिला; पण तसे हाती काहीच लागले नाही." त्यानंतर नाथमाधवांनी स्वप्नांच्या चिंध्या चांचपणे सोडून दिले. नाथमाधवांची विनोदबुद्धि नाथमाधवांच्या नेहमीच्या बोलण्यात अनेकदां सुंदर विनोद असे. परंतु त्या मानाने त्यांच्या लेखनात मात्र विनोद बराच कमी असे. श्री. कृ. कोल्हटकर, अच्युतराव कोल्हटकर, वगैरेंचा विनोद त्यांना जसा आवडे, त्याप्रमाणेच तात्यासाहेब केळकर यांच्या विनोदाविषयीही त्यांना अत्यंत आनंद होई. वरेरकरांच्या 'हाच मुलाचा बाप' मधील विनोदाची जात नाथमाधवांना जास्त आवडे व त्याचा ते वारंवार उल्लेख करीत. प्रसंगनिष्ठ विनोद ते श्रेष्ठ प्रतीचा समजत. केवळ शाब्दिक कोव्यांचा विनोद कनिष्ठ प्रतीचा मानीत. आपल्याला जसें कवितेचे अंग नाही, तसाच प्रकार विनोदनिर्मितीच्या बाबतीतही आपला आहे, असे ते स्पष्ट सांगत. नित्याच्या व्यवहारांत ते विनोदाचा भरपूर उपयोग करीत असत. विनोद आणि थट्टा यांत ते फरक करीत असत. थट्टेने दुसऱ्याचे अंतःकरण दुखावले जाते. विनोदानें अंतःकरणाला आनंदाच्या गुदगुल्या पडतात ('गुदगुल्या पडतात' हा नाथमाधवांचाच आवडता वाक्यप्रयोग असे) असे ते म्हणतात. आणि असाच विनोद करण्याकडे त्यांची प्रवृत्ति असे.
त्याचे एक लहानसे उदाहरण माझ्या आठवणींत आहे. ते असे की, एकदा माझे वडील बंधु श्री. गोविंदराव ऊर्फ बापू नाथमाधवांकडे मुंबईस गेले. त्या वेळी नाथमाधव घरी नव्हते. त्यांची पुतणी गिरजा विचारपूस करण्यासाठी पुढे आली. नाथ कुठे आहेत, या त्यांच्या प्रश्नाला तिने 'बाहेर गेले आहेत, तास-दीडतासाने परत येतील' म्हणून उत्तर दिले. नंतर माझे बंधु बाहेर गेले. नाथमाधव धरी आल्यावर तिने त्यांना "नारायणराव कुळकर्णी आले आहेत. येऊन बाहेर गेले आहेत. पण काकाजी, नारायणराव आजारांतून उठले आहेत असे मला वाटलें. ते खूपच खराब झालेले आहेत, आणि त्यांच्या मेंदूवरही परिणाम झाला आहे वाटतं आजाराचा; त्यांनी मला काही ओळखलें नाहीं."-इत्यादि सांगितले. नाथमाधवांना ते ऐकून थोडे चमत्कारिक झालें; ते विचारांत व मजविषयींच्या काळजीतच स्वस्थ राहिले. मी इतका आजारी झालों असतां त्यांना कसे कळविलें नाही, याचाच त्यांना अचंबा वाटला ! दीड-दोन तासांनी बापू परत आले. नाथ त्यांना भेटले. पाहतात तो माझ्याऐवजी माझे बंधु. मी शरीराने स्थूल, बापू कृश. मी गिरजाबाईस ओळखतों, बापूंची व तिची ओळख नाही. बाकी आम्हां दोघां बंधूंत साम्य बरेच. बापूंना पाहतांच नाथांना सारा उलगडा झाला. त्यांची काळजी दूर झाली. त्यांना हसू आले. त्यांनी बापूंना विचारले, “नारायणराव आले आहेत ना?" अर्थात् त्यांना नाही असेंच उत्तर मिळाले. बापूंनीं कारण विचारतो, 'गिरजा- बाईनें तुम्हांलाच नारायणराव समजून तुमचे वर्णन मजजवळ केलें' वगैरे खुलासा केला. गिरजाबाईला हाक मारली व तिला म्हणाले, "हेच ना ग नारायणराव ! आजारांतून उठलेले-तुला न ओळखणारे - मेंदू बिघडलेले नारायणराव ते हेच ना ?" असें म्हणून ते हसू लागले. तिला त्यांनी हंसतच म्हटले, "हे नारायणराव नव्हेत, त्यांचे बंधु हे-त्यांची प्रकृतीच अशी; नारायणराव खराब झालेले नाहीत, त्यांचा मेंदु बिघडला नाहीं-" गिरजाबाई काकाजींची पुढील वाक्य ऐकावयाला थांबलीच नाही. हसत हसत तेथून पळालीच. नाथमाधव हंसले. बापू हसले. नाथमाधवांनी बापूंना म्हटले, "नारायणरावांना सांगा, असे प्रसंग पाहून, निरीक्षण करून, लक्षात ठेवून, आपल्या नाटकांतून आणीत जा. असेच खरेखुरे प्रसंग विनोदनिर्मितीत जिवंतपणा आणीत असतात." नाथमाधव निर्भेळ, निर्मळ विनोदाचे फार भोक्ते होते.
लेखकाला संधि देण्याचा थोर गुण अनेक लेखकांत जो गुण दिसत नाही, असा गुण नाथमाधवांत वास करीत असे. बहुतेक खतः पुढे सरकण्याकरितां वेळी दुसऱ्या लेखकाला भल्या-बुऱ्या रीतीने बाजूला रेटून आपण पुढे व्हावयाचे, ही प्रवृत्ति सामान्यतः दिसून येते. नाथमाधव त्याला अपवाद होते, असे माझ्या अनुभवाला आलें. "लोकमान्य नाटक मंडळी'कडे माझ्या "माईसाहेब" नाटकाचे दोन अंक लिहिले जाऊन ते बसतही आले होते. पण तिसरा अंक लिहावयाचा होता. मला अतिशय त्रास झाला होता व तिसरा अंक चार सहा महिने तरी लिहून होईल, असे मला वाटत नव्हते. त्याच वेळी नाथमाधवांचे 'लोकसंग्रह' नांवाचे ऐतिहासिक नाटक "लोकमान्य नाटक मंडळी"कडे बसण्याचें घाटत होते. नानबा गोखले यासाठी नाथमाधवांकडे येऊनही गेले होते. मी तिसरा अंक लिहिला नाही, तर मग माझें माईसाहेब नाटक कायमचंच मागे पडणार हे सत्य होते व असें झालें तर कोणाही लेखकाला बरेंच वाटलें असतें. . नाथमाधवांनी तसे केले नाही. मला तांतडीने बोलावून घेतले. तीन दिवसांत तुमचा तिसरा अंक माझ्या टेबलावर बसून तुम्ही लिहिलाच पाहिजे, ही वेळ घालवाल, तर तुम्ही आपल्या हातची संधि घालवाल. माझं लोकसंग्रह नाटक कंपनीकडे बसावयाचे आहे. तुमचे नाटक रंगभूमीवर आल्याशिवाय मी नानबांना माझें लोकसंग्रह नाटक देणार नाही, असे म्हणून, मला प्रोत्साहन देऊन माझ्या- कडून तिसरा अंक त्यांनी खरोखरच लिहविला व लगेच स्वतःच्या खर्चानं 'लोक- मान्य कंपनी' कडे पाठविला. माझी संधि मला नाथमाधव यांनी मिळवून दिली. पण त्यांची संधि मात्र त्यांनी कायमची गमाविली । . त्यानंतर नाथमाधवांचे नाटक लोकमान्य मंडळीकडे बसलेच नाही. तसा योग आला नाही, हे खरे; पण त्याबद्दल नाथमाधवांना मुळीच वाईट वाटले नाही. आपण एका लेखकाला योग्य ती संधि दिली याचेच त्यांना समाधान वाटे. नाथमाधवांचा 'संन्याशाचा संसार' ललितकलादर्श मंडळीचे 'संन्याशाचा संसार' नाटक लागले होते. मला जाण्याची इच्छा होती. नाथमाधवांच्या आणि माझ्या गप्पागोष्टी रंगांत आल्या होत्या तरी माझी नाटकाला जाण्याची एकसारखी चुळबूळ चाललीच होती. नाथमाधवांनी मला विचारले, "इतकी तुमची चुळबूळ कसली चालू आहे ?" मी खरी गोष्ट त्यांना सांगितली. "संन्याशाचा संसार मला पहावयाचा आहे." त्यावर ते मला हसून म्हणाले, "अहो, त्या कृत्रिम नाटकांत तुम्हांला काय वाटतें ? माझा स्वतःचा संसार म्हणजे संन्याशाचा संसारच नाही काय ? तो तुम्ही नेहमीच पाहतां आहांत ना? या माझ्या खऱ्याखुऱ्या संन्याशाच्या संसारापेक्षा तुम्हांला त्या लटक्या संन्याशाच्या संसारांत अधिक स्वारस्य तें काय वाटतें ? जगांत तसली संन्याशाच्या संसारावरची नाटके जवळजवळ कल्पनागम्यच असतात. माझ्या संन्याशाच्या संसाराने तुमच्या हृदयाला चटका लागत नाही, तो तें कृत्रिम नाटक काय चटका लावणार ! अशी खरोखरीची नाटके पाहा, त्यांत रममाण व्हा, त्याची शब्दचित्रे चित्रित करा, म्हणजे पुष्कळ झालें." मी त्या दिवशी ललितकलेच्या नाटकाला जाऊ शकलो नाही. निमूट बसलों ! लेखनविषयाशी तादात्म्य - "ग्रंथकाराने किंवा लेखकाने आपल्या कार्यास लागणारी सामग्री मिळविण्यासाठी काही खतंत्र प्रयत्न केला आहे असे सांप्रतच्या प्रसिद्ध झालेल्या पद्य आणि गद्य ग्रंथांवरून दिसत नाही. याशिवाय दुसरे महत्त्वाचे कारण म्हटले म्हणजे ग्रंथकाराचे किंवा लेखकाचे आपल्या विषयाशी पाहिजे तसे तादात्म्य झालेले नसते. लेखकानें विषयाचे सूक्ष्मावलोकन केले असेल व त्या विषयाशी त्याचें तादात्म्य झाले असेल तर त्याचा ग्रंथ केव्हाही कमी दर्जाचा निपजणे शक्य नाही, हा माझा खतःचा अनुभव आहे." १९२० नाथमाधव यशस्वी कादंबरीकार [२] (लेखक :-प्रो. नारायण केशव बेहरे, एम्. ए., बी. एस्सी.) नाथमाधवांचा व माझा निकट परिचय होता व तो शेवटपर्यंत टिकला. नाथमाधवांचे मूळ नांव द्वारकानाथ माधव पितळे असे होते. परंतु त्या खऱ्या नांवाशी आपला कधीच संबंध आला नाही. नाथमाधव याच नांवानें आपण सर्व त्यांना ओळखतो. त्यांच्या आयुष्याकडे पाहिले असतां मोठा चमत्कार वाटतो. त्यांचे आयुष्य चमत्कृतिजनक आहे. अत्यंत पंगु स्थितीत ग्रंथवाचनाची पूर्वी आवड नसतांही त्यांनी वाङ्मयक्षेत्रांत विलक्षण क्रांति करून दाखविली. १९०६ पासून तों १९१० पर्यंतचा काळ हा त्यांच्या वाड्मयतपश्चर्येचा काळ होय. या काळांत त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले खरे, परंतु ते विद्यार्थ्याचे लिखाण होते. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून प्रभावशाली लिखाण बाहेर पडले. अनेक कादंबऱ्या, नाटके, स्फुट गोष्टी लिहून वाङ्मयाच्या अनेक दालनांतून ते खेळले व त्यांनी उत्कृष्ट प्रकारची वाङ्मयसेवा केली असली, तरी कादंबरीक्षेत्रांतील त्यांची कामगिरी अवर्णनीय अशीच आहे. लहानपणापासून वाङ्मयसेवा हेच ध्येय पुढे ठेवून वाङ्मयक्षेत्रांत यापेक्षा जास्त कामगिरी कोणी गाजवून दाखविली असेल, असे मला वाटत नाही. विद्वानांची दृष्टि मराठी भाषेत आजपर्यंत कै. हरीभाऊ आपटे यांच्यानंतर यशस्वी कादंबरीकार म्हणून जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे नाथमाधव यांचाच होय. हे स्थान माझ्या मते दुसऱ्या कोणासही देता येणार नाही. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या वाड्मयसेवेचा गौरव विद्वानांकडून झाला नाही, असें माझें म्हणणे आहे. समाजाकडून त्यांचा गौरव झाला नाही असे म्हणण्यास मात्र मी तयार नाही. विद्वानांनी मात्र त्यांचा योग्य परामर्ष घेतला नाही. त्यांचे लिखाण, त्यांच्या कादंबऱ्या, लोक अत्यंत आवडीने वाचीत असत. 'हिंद एजन्सी'मार्फत त्यांचे लिखाण प्रथम प्रसिद्ध होऊ लागले व त्या लिखाणाचा समाजाने चांगला ४७ सत्कार केला. 'हिंद एजन्सी'मुळेच त्यांचा व माझा प्रथम परिचय झाला. त्यांचे 'सांवळ्या तांडेल' व माझें 'सीतावनवास' ही पुस्तकें 'हिंद एजन्सी'मार्फत प्रारंभी प्रसिद्ध झाली. विद्वानांच्या दृष्टीने नाथमाधवांच्या लिखाणांत दोष होता; आणि तो हाच की, त्यांची भाषा साधी, सरळ व रसाळ होती. त्यांच्या भाषेत विद्वत्ताप्रचुर जाख्या शब्दांची किंवा कोट्यांची रेलचेल नसे. विद्वानांना नाथमाधवांचा हा कमीपणा वाटत असे. मराठी भाषा ही खास आपल्या घरची. ती साधी, सोपी व सरळ लिहिणे हे विद्वानांच्या मतें कमीपणाचे लक्षण ! कै. हरीभाऊ आपटे यांची भाषाही साधी, सोपी व रसाळ आहे. कोणी कोटीबाज लेखकांचा कितीही गौरव केला किंवा गाजावाजा केला तरी ज्याची भाषा साधी व सरळ, तोच खरा लेखक होय. भाषा ही काही विद्वान लोकांची मिरास नाही. ती सर्वांची जननी आहे. समाजाच्या सर्व थरांपर्यंत आपले विचार जाऊन पोहोंचावे हीच लेखकाची मनीषा असते व यासाठी साध्या, सोप्या व सरळ भाषेचे सहाय्य घेणे जरूर आहे. संस्कृतीबद्दल अभिमान नाथमाधवांच्या लिखाणांतून आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान व आदरभाव जागोजाग दिसून येतो. आपल्या समाजाचे पाऊल पुढे पडावें, लोकांत संस्कृति, इतिहास याबद्दल स्वाभिमानाची जागृति व्हावी, या दृष्टीनेच त्यांनी स्वराज्यविषयक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतूनही तीच भावना दिसून येते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांवरून शिवकालीन समाजस्थितीची आप- णांस बरोबर जाणीव होते. त्या काळांत महाराष्ट्रीय लोक कसे स्वाभिमानी व कर्तबगार होते, कोणत्या गुणांमुळे शिवाजीमहाराजांस मराठ्यांचे राज्य स्थापन करता आले व पुढे मराठ्यांना ते हिंदुस्थानभर पसरवितां आले, याचे फारच सुंदर वर्णन त्यांच्या कादंबऱ्यांतून वाचावयास मिळते. पूर्वजांचा उज्वल इतिहास, त्यांच्या उज्ज्वल भावना व धर्माभिमान वगैरे गुणांचे दर्शन त्यांच्या कादंबऱ्यांतून माले व त्यामुळे जनतेवर त्यांच्या लिखाणाचा फारच पगडा बसला.
तरुणांचा आदर्श नाथमाधवांची स्थिति सर्व परीने प्रतिकूल होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केवढे तरी कर्तृत्व गाजवून दाखविलें ! अनुकूल परिस्थिति असती, तर त्यांनी केवढा पराक्रम गाजवून दाखविला असता ? त्यांचे चरित्र आदर्श म्हणून प्रत्येकानें -विशेषतः तरुण विद्यार्थ्यांनी-दृष्टीसमोर ठेवण्यासारखे आहे. हा असा एक पुरुष होऊन गेला, की ज्याला पराक्रमी शिपाई व्हावयाचे होते; खेळाडू म्हणून पुढे याव- याचें होतें, वीर म्हणून जगापुढे यावयाचे होते; परंतु दैवाचा फांसा उलटा पडला आणि ज्याच्याशी संबंध नाही अशा वाङ्मयक्षेत्रांत त्याने प्रभुत्व मिळवून दाखविलें. काळाच्या प्रभावीपणावर माझा फार विश्वास आहे. एकाद्या कंपूर्ने मोठेपणाचा डांगोरा पिटला नाही, तर गुणवानाला पुढे येण्यास वाव मिळणार नाही, अशी भीति मला कधी वाटली नाही. भवभूतीच्या काळांत त्याचा अपमान झाला त्या वेळी त्याने काढलेले खाभिमानाचे उद्गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. "काळ अनंत आहे, व पृथ्वी विशाल आहे. माझ्या अंगी जर काही गुण असतील तर भवभूतीचें नांव पुढे आल्याशिवाय व त्याचा जयजयकार झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी कितीही पाय मागे ओढण्याचे प्रयत्न केले तरी गुण झांकून ठेवता येत नाहीत. म्हातारीने कोंबडा झांकून ठेविला, तरी सूर्योदय झाल्याशिवाय राहात नाही. नाथमाधवांच्या कादंबऱ्यांतून आपली संस्कृति, आपला धर्म व आपला इतिहास याबद्दलच्या उज्वल भावना दिसून येतात व या भावना प्रत्येक पानापानांतून आढळतात. त्यांचे लिखाण तेजवी व ओजस्वी आहे. तें लिखाण सहजसुंदर, साधे व सुलभ असून प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणारे आहे.
^ कादंबरीरूप इतिहासाचे महत्त्व [३] (लेखकः-रा. सा. गो. स. सरदेसाई, बी. ए., रियासतकार ) माझे मित्र नाथमाधव ता. २१ जून १९२८ रोजी मुंबई येथे दिवंगत झाले. त्यांच्या मित्रांच्या आठवणी प्रसिद्ध करण्याचे सत्कार्य श्री. पु. बा. कुळकर्णी यांनी योजिले असून त्यासंबंधाने त्यांनी मला पत्रद्वारे विनंति केली. त्यावरून पूर्वी जो लेख रा. वीरकर यांच्या मागणीवरून मी पाठविला होता व जो त्यांनी चार आणे माला पुस्तक ४३ वें यांत प्रसिद्ध केला, तो पुनः वाचून पाहतां त्यांत जास्त भर घालण्यासारखे काही दिसत नाही. तो लेख आतां पुष्कळांच्या स्मरणांतून गेलाही आहे. सबब तसाच तो पुनः मी प्रसिद्ध करू इच्छितों. त्या लेखांतील माझे विचार अद्यापि कायम आहेत. शेवटी मात्र मी एकदोन सूचना नवीन करीत आहे, त्यांजकडे वाचकांचे लक्ष जाईल अशी आशा आहे. स्वराष्ट्राचा कादंबरीरूप इतिहास श्रीयुत नाथमाधवांच्या मृत्यूने मराठी वाङ्मयाची फार मोठी हानि झाली आहे. ही हानि एका विशिष्ट प्रकाराची होय. खराष्ट्राचा इतिहास कादंबरीच्या रूपाने समाजांत फैलावणे ही बहुमोल कामगिरी त्यांनी खीकारून जवळजवळ अर्धी मजल गांठली, तोंच ते कालवश झाल्याने इतिहासाचीच ती हानि होय. इतिहासाच्या अंगभूत अनेक कार्य आपल्यासारख्या हीन स्थितीच्या राष्ट्रास करावयाची असतात. संशोधन, संग्रहण, प्रकाशन, संकलन ही चार आद्य कार्य सिद्ध झाल्यानंतर ऐतिहासिक ज्ञानाचा प्रसार आकर्षक रीतीने सर्व साक्षर समाजास पोंचविणे हे काम फलप्राप्तीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे म्हटले पाहिजे. तें अत्यंत व्यवस्थेनें व एकनिष्ठ अंतःकरणानें आज दोन तपें नाथमाधवांनी चालविलें होतें. नाथमाधवांचा व माझा परिचय बहुत दिवसांपूर्वी आकस्मिक रीतीने झाला. शिकारीतील अपघाताने ते आजारी असतांच माझे एक बडोद्याचे स्नेही आयुर्वेद जाणणारे त्यांस औषध देत होते. शरीरास पंगुत्व आल्यामुळे आतां आपणांस लेखनव्यवसायावांचून दुसरा उद्योग नाही, असे समजून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याचा उद्देश त्यांनी त्या समान मित्रामार्फत मला कळविला. त्या वेळी 'सांवळ्या तांडेल' हे त्यांचे पुस्तक नुकतेच बाहेर आले होते, ते त्यांनी मला वाचण्यास पाठविले आणि ऐतिहासिक कादंबरीचे काम आपल्या हातून कसे काय होईल व त्यांत मी त्यांना साह्य करूं शकेन की नाही अशी पृच्छा त्यांनी केली. मला पकें आठवते की, या वेळी बडोद्यास माझ्या मातुश्री कोंकणांतून मजकडे आल्या होत्या. त्यांस काही करमणूक करावी अशा उद्देशानें तें 'सांवळ्या तांडेल' पुस्तक मी त्यांस सवडीप्रमाणे दररोज थोडथोडे वाचून दाखविले. त्यावरून घरांत आम्हां सर्वांस ते पुस्तक फारच आवडले आणि अशाच धर्तीवर चित्ताकर्षक गोष्टी लिहिता येतील असे किती तरी पुंदर प्रसंग मराठ्यांच्या इतिहासांत असल्याचे मी नाथमाधवांस कळविलें. आरंभाचा हा पत्रव्यवहार त्या वैद्यमित्राच्या मार्फत चालविल्यावर मुंबईस माझें येणे होईल तेव्हां समक्ष गांठ घेण्याचा विचार ठरला आणि तदनुसार पुढे लवकरच त्यांची माझी भेट होऊन मराठ्यांच्या इतिहासावर काय सामुग्री उपलब्ध आहे, यांत विशेष घडामोडींचे, उदात्त व राष्ट्रीय दृष्टया उपयोगाचे कोणते प्रसंग आहेत, कालस्थलांच्या योग्य मांडणीने तत्कालीन परिस्थिति वाचकांच्या मनावर कशी ठसवितां येईल, वगैरे अनेक मुद्यांवर त्यांनी व मी एकत्र बसून पुष्कळच चर्चा केली. माझी पुस्तकें तर ते मुख्य आधार म्हणूनच वापरीत; आणि जरूरीच्या प्रसंगी पत्राने मला खुलासे विच रीत. आरंभीआरंभी असा पत्रव्यवहार व विचारविनिमय वारंवार चाले; आणि केव्हाही मी मुंबईस आलों असता त्यांची एकवार तरी गांठ घेतल्याशिवाय जाऊ नये असा उभयपक्षी संकेत होता, तो मी बहुतेक पाळला. अलीकडे चारपांच वर्षात माझ्या कामाचा व्याप वाढल्याने त्यांना स्वस्थपणे मेट- ण्यास मला फुरसत होत नसे; जरूरीच्या प्रसंगी पत्र लिहून कळवा, म्हणजे मी अवश्य भेटेन असें माझें त्यांना कायमचे सांगणे होते. पंगुत्वामुळे त्यांनी माझ्या मेटीस येणे शक्य नसल्यामुळे मुद्दाम मला भेटीस बोलावण्याचा ते अलीकडे बराच संकोच करीत, असे मला आढळून आले. त्यांची माझी शेवटची भेट १९२८ साली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत मी मुंबईस गेलो असतां झाली; त्या प्रसंगी राजवाड्यांच्या आठव्या खंडांतील पत्र ले. ६१ मध्ये रायभानजी काकाचा उल्लेख असून, त्या पत्रांतील अनुसंधान वादग्रस्त आहे, त्याची आम्ही चर्चा केली. तो प्रसंग शाहूच्या आगमनाचा असून रायभानजी, रामचंद्र नीलकंठ, परशुरामपंत प्रतिनिधि वगैरे पुरुषांचे उद्योग राष्ट्रापुढे विशेष कुशलतेने मांडता येण्याजोगे आहेत.
ऐतिहासिक चर्चेच्या बैठकी नाथमाधवांच्या व माझ्या या मेटी म्हणजे केवळ ऐतिहासिक चर्चेच्या बैठकी होत्या. त्यांत इतर विषयांना बिलकूल जागा नव्हती आणि इतर विषय चर्चेत येऊ शकतील इतकी त्यांची माझी घरगुती घसणही नव्हती. मात्र बोलतांबोलतां दोनदोन चारचार तास केव्हां निघून जात तें समजत नसे. मुख्य इतिहासाची हानि न करितां त्या त्या वेळचे विशिष्ट वातावरण व व्यक्तींचे खभाव हुबेहुब वठविणे हेच काम कादंबरीत बिकट असे. नाथमाधवांच्या कादंबऱ्या म्हणजे मुख्य इतिहासाचेंच विस्तृत व चटकदार विवरण होय, हे आता सर्वांस कळून चुकलेच आहे. मात्र ही विशिष्ट विचारसरणी त्यांच्या माझ्या चर्चेतून निष्पन्न झाली असें मी समजतो. अश्लीलतेचा मागमूससुद्धा त्यांच्या कृतींत सांपडावयाचा नाही. कोणत्याही जातीचा अगर धर्माचा दुराग्रह त्यांच्या लेखनांत नाही. त्यांचे डोकें सदैव नवीन नवीन प्रसंग कल्पिण्यांत गढून गेलेले असे. प्रथम ते आपल्या गोष्टीचा रेखापट थोडक्यांत कागदावर मांडीत. त्यांतली पात्रे व प्रसंग यांचें टांचण करीत, आणि केव्हां केव्हां ती त्यांची आंखणी व मांडणी मला समजावून देऊन त्यांत कमीजास्त काय ते मला विचारीत. दऱ्याखोऱ्यांतून हिंडण्याचा त्यांना आरंभी पुष्कळ नाद असल्यामुळे, नकाशांच्या व वर्णनाच्या साह्याने ते एकादें स्थळ इतकें हुबेहुब रंगवून देत की, प्रत्यक्ष पाहणारांना त्याबद्दल अचंबा वाटे. प्रसंगाची किंवा व्यवहाराची पुनरुक्ति सहसा त्यांच्या ग्रंथांत आढळावयाची नाही. इतकेंही करून त्यांच्या कादंबऱ्या सर्वथा सोंवळ्या, लहानापासून मोठ्यापर्यंत- सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत सर्वांना सारख्याच प्रिय वाटत. वाचकांची मनें आकषून घेण्यासाठी त्यांना बाह्य हिडीस उपायांची बिलकूल जरूर वाटत नसे. यामुळेच महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक मराठा कुटुंबांत घरोघरीं फैलावून देण्यांत जी त्यांनी इतिहासाची सेवा केली आहे, ती अत्यंत बहुमोल होय; आणि म्हणूनच व्यावहारिक दृष्टीने संशोधन, संकलन, प्रकाशन वगैरेपेक्षां प्रसारणाचे जे कार्य त्यांनी केलें, तेंच जास्त महत्त्वाचे होय असे मला वाटते. त्यांची सर्वच पुस्तकें मी वाचलेली नाहीत. आरंभी आरंभी मी ती नियमाने व उत्कंठेने वाचीत होतो. परंतु अलीकडे अशी पुस्तके वाचण्यास मला सवड फारच थोडी मिळते.
ताजी पालकर व शुद्धि १९२७ साली मुंबईत नामदार जयकरांचे अध्यक्षतेखाली शिवाजीचा त्रिशत- वित्सरिक जन्मोत्सव मोठ्या प्रमाणांत साजरा झाला; त्याप्रसंगाने शिवाजी मूव्हनीर' व 'शिवसंस्मृति' हे दोन ग्रंथ-पहिला इंग्रजी व दुसरा मराठी असे छापून सिद्ध केले. त्या ग्रंथांचे संपादनकार्य मी चार महिने अहोरात्र खपून सिद्धीस नेले. तल्या मराठी ग्रंथांत 'शुद्धिकार्य' या नांवाची एक गोष्ट नाथमाधवांनी लिहिलेली सिद्ध आहे. गोष्टीची पृष्ठे काऊन आकाराची ४८ असून तींत नेताजी पालकरांचे रित्र फार सुंदर वर्णिलेलें आहे. नेताजी शिवाजीचा उजवा हात कसा झाला, शिस्तीच्या क्षुल्लक कारणावरून शवाजीला सोडून तो औरंगजेबास कसा मिळाला, पुढें मुसलमानी धर्म स्वीकारून पानें अफगाणिस्तानातील बादशहाची सेवा दहा वर्षे कशी बजावली आणि शेवटी शवाजीकडे परत येऊन तो पुन्हां प्रायश्चित्ताने खधर्मात कसा आला, हा उत्कृष्ट स्थाभाग नाथमाधवांनी सरस रंगविला आहे. नाथमाधवांच्या समग्र ग्रंथांच्या यादीत या गोष्टीचे निदर्शन नाही म्हणून द्दाम मी हा प्रकार वाचकांचे नजरेस आणीत आहे. माझ्या विनंतीवरूनच त्यांनी प्रोच ही गोष्ट मला अल्पावधीत लिहून दिली. एक संस्मरणीय प्रसंग नाथमाधवांच्या भेटीचा एक प्रसंग माझ्या स्मरणांतून कधीही नाहीसा होणार नाही. तो प्रसंग म्हणजे सन १९२५ सालच्या अखेरीस माझ्या मुलाची निधनवार्ता ऐकून ते मुद्दाम मोठ्या कष्टाने आपल्या घरांतून मजकडे माझ्या समाधानासाठी मुंबईत माझ्या मुक्कामावर येऊन भेटले, त्या वेळचा होय. त्यांची असहाय्य शरीरस्थिति ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली असेल, त्यांना या मेटीत नाथमाधवांना किती कष्ट पडले असले पाहिजेत त्याची कल्पना होईल. दोन तासपावेतों इहलोकच्या काटमय संसारयात्रेवर त्यांचे व आम्हां उभयतां नवराबायकोचें में प्रेमळ व हृदयस्पर्शी संभाषण झाले, तेणेकरून आमच्या मनास फार हलके वाटले आणि नाथमाधवांचा मधुर उपदेश आम्हांस फारच उपयोगी पडला. त्या प्रसंगावरून त्यांच्या तपस्वी वृत्तीची योग्यता मला विशेष कळून आली; आणि प्रत्येक प्राणी कांहीं- तरी विशिष्ट कामगिरीकरितां जन्मास येतो, ती कामगिरी करण्यांतच त्याने आपला देह झिजवावा, यापलीकडे जास्त फलाची आकांक्षा मनांत धारण करू नये, आणि .
५३ अखेरचे पाचारण येतांच संतुष्ट अंतःकरणाने प्रयाणास सदैव तत्पर असावे, अशा प्रकारचा अल्पप्रबोध नाथमाधवांच्या भेटीपासून मला मिळाला, तोच मी अद्यापि पाळीत आहे. मात्र ते माझ्यापूर्वी गेले. वयोमानाने त्यांच्या अगोदर प्रयाण करण्याचा हक माझा होता, हे मनांत येऊन काय वाटतें तें कागदावर लिहिता येत नाही. श्री. ग. म. वीरकर मला मनापासून सहाय्य करणारे प्रकाशक रा. गणेश महादेव वीरकर यांची पहिली ओळख मला श्री. नाथमाधवांनी करून दिली. इ. स. १९२० साली पुस्तकप्रसिद्धीच्या कामांत मी हैराण झालों असतां, श्री. नाथमाधवांस मी बडोद्याहून पत्राने माझ्या अडचणी कळविल्या. त्या ऐकून त्यांनी लागोलाग गणेश महादेवांचे नांव मला सुचवून उभयतांचा परिचय करून दिला. ज्या कळकळीने लेखक आपले काम करतो तीच कळकळ मुद्रक व प्रकाशक नेहमीच बाळगतात असें नाहीं; आणि तशी कळकळ सर्वांची असल्याशिवाय लेखकाचा पाक वाचकांपुढे स्पृहणीय स्वरूपांत दाखल होत नाही. अर्थात् त्यामुळे लेखकाची केवढी निराशा होते, हे त्याचा तोच जाणे. परंतु माझ्याप्रमाणेच समानधर्म असे कष्टाळु प्रकाशक वीरकर मिळाल्यापासून उभयतां समसमां संयोग जाहला अशा या अनुपम संतोषांत आम्ही आपली जीवनयात्रा संपवीत आहों. ती किती फलप्रद होते, हे आम्ही दोघेही पाहात नाही. काम करणे आहे, चांगले आहे, केले पाहिजे, एवढेच आम्ही जाणतों. आणि अशीच भावना माझे मित्र नाथमाधव यांचीसुद्धा होती. अर्थात् असा समान भावनेचा एकाच विषयांतला सहकारी हरपल्यामुळे क्षणोक्षणी मन विचारशून्य होते. तथापि हाही एक या संसारयात्रेतलाच अनुभव आहे, असे म्हणून पुढील उद्योगास लागण्याशिवाय गत्यंतर नाही. नाथमाधवांचा उद्योग अपुरा राहिलेला आहे. समग्र मराठशाहीचा इतिहास कादंबरीच्या स्वरूपांत परंतु अधिकृत रीतीने जनतेस सादर करण्याचा त्यांचा संकल्प होता. तो अद्यापि कोणी पुढे चालविलेला आढळत नाही. या कार्याला सतत अभ्यास व अविश्रांत श्रमांची आवश्यकता आहे. साहित्य विपुल आहे. हे साहित्य लक्षात घेतल्यास त्यांत कितीतरी नवीन गोष्टी, प्रसंग व व्यक्ति दृग्गोचर होतील. माझी तरुण लेखकांना पुनः अशी विनंति आहे की, नाथमाधवांचा अपूर्ण संकल्प कोणीतरी अभ्यासकाने अवश्य पुरा करावा.
नाथमाधवांबद्दल मला काय वाटते? [४] (लेखक-म. भा. भू. श्री. ज. र. आजगांवकर.) निश्चयी खभाव प्रसिद्ध कादंबरीकार कै. नाथमाधव यांचा माझा बराच परिचय होता. कावसजी पाटलाच्या तलावाच्या बाजूस किंवा माधवबागेत जाण्याचा प्रसंग आला, म्हणजे येतेवेळी नाथमाधवांच्या बि-हाडी जाऊन त्यांना भेटल्याशिवाय मी बहुतकरून राहात नसें. नाथ हे चांगले सुसंस्कृत (Cultured) आणि फार गोड स्वभावाचे असल्यामुळे त्यांजबरोबर घटकाभर बोलत बसण्यांत मला मोठा आनंद वाटत असे. नाथमाधव यांचा बाणा लष्करी, पण दुर्दैवाने एका शिकारीच्या वेळी त्यांना भयंकर अपघात होऊन ते जे पंगु झाले ते कायमचे. आपले पंगुत्व नाहीसे करण्यासाठी त्यांनी आपल्या शक्तीच्या पलीकडे पैसा खर्च करून अनेक उपाय केले. पण त्यापासून म्हणण्यासारखी फलनिष्पत्ति झाली नाही. शेवटी 'आलिया भोगासी असावें सादर' हे तुकोबांचे वचन डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी आपला भावी कार्यक्रम आंखला आणि शेवटच्या घटकेपर्यंत तो अव्याहत चालविला. नाथमाधवांच्या मोठेपणाचें बीज ह्या त्यांच्या निश्चयी स्वभावांत होतें. त्यांच्या स्थितींतला दुसरा एकादा मनुष्य असता, तर तो सर्वस्वी असहाय्य होऊन आपल्या आप्तेष्टांना भारभूत होऊन राहिला असता. परंतु नाथांची करामत अशी की, ते तसल्या स्थितीत, खतःच्या कर्तबगारीच्या जोरावर, आपल्या अस- हाय्य आप्तेष्टांस सहाय्यक झाले ! कादंबरीलेखनाचा हेतु नाथमाधव हे जरी फारसे देखणे नव्हते, तरी ते रुबाबदार दिसत व त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज विलसत असे. त्यांची बसण्याची खोली लहानश्चीच होती; पण कादंबरीलेखनाला लागणारे सर्व साहित्य तीत अगदी सज असे..
ऐतिहासिक कादंबऱ्या लिहितांना, किल्ले वगैरे स्थलांची बरोबर कल्पना व्हावी म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नकाशे त्यांनी भिंतीस टांगून ठेवले होते. त्यांनी आपल्या काही कादंबऱ्या इंग्रजी कादंबऱ्यांच्या आधाराने लिहिल्या आहेत. ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यापूर्वी, इतिहासांतील ज्या प्रसंगावर ती लिहावयाची, त्या प्रसंगाची सगळी उपलब्ध माहिती मिळवून ती मननपूर्वक वाचल्याशिवाय ते रहात नसत. मुख्य ऐतिहासिक कथाभागाला बिलकुल धक्का न लावतां, त्या कथाभागाच्या अनुषंगाने अनेक काल्पनिक पात्र निर्माण करून, त्यांच्या वर्तनाने आणि भाषणाने तत्कालीन देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे वाचकाच्या मनास पटेल असे अगदी हुबेहुब चित्र रेखाटण्यांत नाथमाधवांचा हातखंडा होता. कै. हरीभाऊ आपटे यांच्या पश्चात् नाथांच्या तोडीचा ऐतिहासिक कादंबरी- कार झाला नाही, असे मला वाटते. त्यांची शुद्ध घरगुती मराठी भाषा वाचतांना मोठा आनंद होतो. हल्लींच्या कादंबऱ्यांतला चवचालपणा त्यांच्या कोणत्याही कादं- बरीत प्रायः सांपडणार नाही. वाचकांच्या अनिष्ट मनोविकारांचे उद्दीपन न होतां त्यांचे सात्त्विक मनोरंजन व्हावें, हा त्यांच्या कादंबरीलेखनाचा हेतु होता. नाटकाचे शोकी नाथमाधवांची आणि माझी जी शेवटची भेट झाली, त्या वेळी त्यांनी आपल्या एका नवीन सामाजिक कादंबरीची एक दोन प्रकरणे मला वाचून दाखविली होती. पुणे शहरांतील तत्कालीन सामाजिक स्थितीचे चित्र या कादंबरीत रेखाटण्याचा त्यांचा उद्देश होता. शेवटी ही कादंबरी बहुतकरून अपुरीच राहिली असावी, असे वाटते. नाथमाधव हे नाटकाचे फार शौकी होते. त्यांनी काही नाटके तर लिहिलींच आहेत, पण खतः रंगभूमीवर जाऊन प्रत्यक्ष भूमिकाही केली होती । प्रसिद्ध कादं- बरीकार हरीभाऊ आपटे हे दिवंगत झाले, त्या वेळी येथील प्रार्थनासमाजांत त्यांच्या दुखवट्याची जी सभा झाली होती, तिला मुद्दाम हजर राहून नाथमाधव यांनी हरीभाऊंच्या कादंबऱ्यांविषयीं सुंदर भाषण केलें होतें.
हेच ते नाथमाधव (लेखक:- श्री. धोंडो रघुनाथ तेंडुलकर) प्रथम-भेट रविवारचा दिवस. नाटक कोणतें बसवावें याची वाटाघाट आम्ही करीत होतो. क्लबला नवीन नाटक द्यायला नाटककार साहजिकच नाखूष. प्रसिद्ध ग्रंथकर्त्याचें जुने नाटक बसवावें तर परवानगीची पंचाईत. बिनवारशी नाटक बसविल्याशिवाय क्लबला गत्यंतर नव्हते. इतक्यांत "संभाजी"कर्ते कै. श्री. आत्माराम मोरेश्वर पाठारे आले. त्यांची-आमची ओळख, ठाण्याला “रावबहादुर पर्वत्या” या नाटकाचा प्रयोग भारतवासी नाट्यसमाजाने केला, त्या वेळी झाली होती. श्री. पाठारे येतांच आमचा विषय तेथेच थांबला. एका नाटकांत फोटो पाहिजे आहेत. क्लबला देण्याची इच्छा आहे का ?" वास्तपुस्त झाल्यावर श्री. पाठायांनी प्रश्न टाकला. आमच्या विचाराला निराळीच दिशा मिळाली. "हो, हो, आमची तयारी आहे." चारपांच जण एकदम उद्गारले. झाले. दिवस ठरला. वेळही ठरली. फोटो काढले. त्यांची एक एक प्रत क्लबला मिळाली. इतके झाल्यानंतर क्लबच्या तोंडाला जास्तच पाणी सुटले. आमच्या क्लबनें "गजेंद्रसिंग" नाटकावर हक्कच सांगायला सुरवात केली. श्री. पाठारे यांनी मध्यस्थी करून सर्व गोष्टी आपलेपणाने जुळवून आणल्या. "गजेंद्रसिंग” नाटकाच्या काना भेटावयास जाण्याचा दिवस मुकर झाला. क्लबची झाडून सर्व मंडळी उल्हासाने चर्नीरोडला बसून दादर स्टेशनवर उत- रली. वाटेत प्रत्येकजण आपापल्यापरीनें ग्रंथकर्त्यासंबंधान रूपरेखा आंखीत होता. स्टेशनवर श्री. पाठारे हजर होतेच. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेले.
- घरासमोर असलेल्या लहानशा मोकळ्या जागेतून पायऱ्या चढून व्हरांज्यांत गेलो. दक्षिणेच्या बाजूस एक कोच, एक बांक, व दोनतीन खुर्व्या टाकलेल्या होत्या; त्यावर आम्ही स्थानापन्न झालो. उत्तरेकडच्या बाजूला टोंकावर पूर्वपश्चिम टेबल, त्यावर काही पुस्तकें, लिहिण्याचे साहित्य व विखुरलेले कागद होते. टेबलासमोर पश्चिमाभिमुख खुर्ची होती. तीवर बसलेले गृहस्थ मध्यम पण कसदार बांध्याचे, काळसर वर्णाचे, भुंवयांच्या मध्यभागी "चंद्रमा” गोंदलेला, केसांचा बॉबकट, अशा स्वरूपाचे होते. आम्ही आपले तर्क चालवीतच होतों- "हेच ते नाथमाधव-” श्री. पाठाऱ्यांनी अंगुलिनिर्देश केला. पूर्वऋणानुबंध आम्ही बराच वेळ बोलत होतो. क्लबचा पूर्वेतिहास सांगितला. तेथे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती त्यांनी करून घेतली. नाटक करण्याची परवानगी त्यांनी क्लबला दिली. आमचे काम झाले. आम्ही जायला निघालो. पायऱ्या उतरतां उतरतां त्यांनी मला हांक मारून जवळ बोलावून घेतले. "पुन्हां केव्हां याल ?" "येईन केव्हां तरी." मी उत्तरलों. "घाईघाईने येऊ नका. स्वस्थपणाने बोलण्याकरितां या. रात्रीचे आलांत तरी चालेल." आम्ही पंधराएक जण होतो. बाकीच्यांना सोडून मलाच त्यांनी इतक्या आपले- पणाने का वागवावें याचे आश्चर्य करीत मी बाकीच्यांत येऊन मिसळलों. अचूक परीक्षा दुसऱ्या खेपेस रात्रीच्या वेळी गेलो. ८॥ पासून १॥ वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. दोन मनांची जुळणी इतकी झाली की, वैयक्तिक बाबतीही मोकळेपणाने एकमेकांजवळ आम्ही बोलून टाकल्या. बोलतांबोलतां त्यांनी एक डायरी दाखविली, कोणाही माणसाच्या प्रथम भेटीच्या वेळी ते त्याच्या चारित्र्याचे अनुमान बांधीत आणि जसजसा त्याचा परिचय होत जाई तसतसा त्याचा पडताळा पाहात असत. डायरी पाहिल्याबरोबर माझी जिज्ञासा जागृत झाली. आपल्या खतःसंबंधाने दुसऱ्याचे मत कसे आहे हे समजून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. डायरी पाहिल्याबरोबर मी श्री. नाथमाधवांना विचारलें:- "माझ्याबद्दल आपण काय लिहून ठेवलें तें दाखवाल का ?" ते थोडेसे कां कू करू लागले. बराच आग्रह केल्यावर डायरीतील एक विवक्षित पान काढून त्यांनी माझ्या हाती दिले. प्रथम मेटीच्या वेळी मला त्यांनी इतक्या आपुलकीने का वागविलें व आग्रहाने पुन्हां मेटण्यास का बोलावले या प्रश्नाचे उत्तर त्या डायरीत मला मिळाले. त्याच दिवशी "वीरधवल"ची हस्तलिखित प्रत मला त्यांनी वाचावयास दिली. - आत्मवृत्त एकदां बोलतांबोलतां 'मी लंगडा कसा झालों ?' याचा वृत्तांत त्यांनी सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत होता होईल तो देण्याचा प्रयत्न करीत आहे- "माझ्या खात्यांतील एका साहेबानं रजा काढली आणि शिकारीकरितां सिंह- गडावर यायला निघाला. मीही काही कारणाने रजा काढली आणि त्याच गाडीने मुंबईला यायला निघालों. साहेबाने सिंहगडावर कँप दिला. मी बरोबरच होतो. मला शिकारीचा भारी नाद. जेवणखाण झाल्यावर जरा लवंडलों. किंचित् डोळा लागला. इतक्यांत साहेबाकडून मला शिकारीला बोलावणे आले. त्या वेळी माझें मन उल्हसित नव्हते. कारण काय असेल तें असो; जावें असें मनांत येईना. मी उडवाउडवीचे उत्तर दिले, आणि निरोप्याला घालवून लावला; आणि लोळत पडलों. जरा वेळाने दुसरा माणूस आला आणि “साहेबाने आत्तांच्या आत्तां बोलावलें आहे" म्हणून सांगू लागला. जावें, की न जावे याचा विचार करीत होतों इतक्यांत तिसरे बोलावणे आले. मला शिकार खेळण्याची हौस फार. इतके असूनही मनाला उत्साह वाटेना. पण साहेबाचें मन मोडायचे कसे ? उठलों. ब्रीचिस चढविली. ब्रीचिसच्या खिशांत काडतुसे घातली; बंदुक घेतली आणि निघालो. वाघ पिसाळला आहे, लोकांना तो फार त्रास देतो, असें शिका- याने सांगितले. साहेबाच्या बंगल्याजवळ गेलों, तो साहेब आपल्या तयारीत होता. शिकारी व कुत्रे रान उधळण्याकरिता त्याने पाठवून दिले. मला गडावरून जायला सांगितले व आपण गडाखालून गेला. तिन्हीसांजची वेळ. वाघ दरीत डरकाळ्या फोडीत होता. त्या माझ्या कानी ऐकू येत होत्या. त्याने दरीतून बाहेर यावे म्हणून बंदुकीचा बार काढण्याकरितां एक पाय पुढे टाकला तोंच कड्यावरून खाली घसरत आलो. त्या वेळी विशेष लागल्यासारखे वाटले नाही. इतक्यांत शिकारी धावून आले; साहेबाला कळले तसा तोही आला. त्याने मला उठविलें, उचलून घरी आणले. रक्त बरेच गेलें व वेदनाही बऱ्याच होऊ लागल्या. साहेबाची लेडी जवळ होती. तिच्याने ते पाहवेना. तिने एक व्हिस्कीचा डोस दिला. मला झोप लागली. झोपतून जागा झाल्यावर मी उठून बसलों, तों धाडकन् मागे पडलो. माझे पाय जागचे हालेनात. रकाभिसरण कमरेपासून पायांपर्यंत बंद पडले. त्या वेळी त्या बाईला वाईट वाटले; आणि ती हातांतील सोन्याच्या बांगड्या मला देऊ लागली. मी घेतल्या नाहीत. शेवटी ती उद्गारली, “Dwarka I ruined your life !" मी लेखक कसा झालों? ...पुष्कळ उपाय केले पण पायांत रक्त कांहीं भरेना. झाले. जन्माचा पंगू झालो. बसेन ती जागा, आपण होऊन येतील ती माणसे, हेच माझें जग. मनाला करमेना; वेळ जाईना. विविध अंतरंगांनी नटलेल्या माणसांचा सहवास मिळेना. सत्यसृष्टीशी पारखा झालो. वेळ घालवायला काम तरी कोठून मिळणार ?-अशा असहाय्य स्थितीत पुस्तकांतील सृष्टी शोधू लागलो. मन रंगू लागले. "पुस्तकांतील सृष्टीशी समरस होतां होतां कल्पना जागृत झाली; व आपणाला कल्पनासृष्टीत स्थिर संचार करता येईल अशी आशा वाटू लागली. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. मनाला उमेद वाटली. त्यांत महाराष्ट्रभाषाचित्रमयूर श्री. आठल्ये यांनी उत्तेजन दिले. तेच माझे लेखनव्यवसायांतील गुरु...... क्षमा करणे म्हणजे चूक करण्यास उत्तेजन मुंबईत राहावयास आल्यानंतर आठवड्यातून एका ठराविक दिवशी येऊन भेटेन असे त्यांनी मजकडून कबूल करून घेतले. एकदां दोनतीन आठवडे त्यांच्या- कडे मला जातां आले नाही. त्यांनी पोष्टांतून पत्र पाठविलें; तरीही मला त्यांना मेटता आले नाही. तिसरे पत्र आले. नंतर मला भेटायला जायची लाज वाटू लागली. म्हणून पत्र पाठवून प्रथम माझ्या चुकीबद्दल क्षमा करा अशी विनंती केली. त्या पत्राच्या उत्तरांत खालील वाक्य होतें; "आपण चूक केली असें मला वाटत नाही. केली असे समजून चालले तरी त्याबद्दल क्षमा करणे म्हणजे तीच चूक पुन्हां करायला उत्तेजन देण्यासारखे आहे."
६० तुम्ही काही तरी लिहा श्री. नाथमाधवांनी कादंबरी लिहावी आणि ती मला वाचावयास द्यावी, असा साधारणतः प्रघात होता. वाचून झाल्यावर त्यांचा-माझा तिच्यावर विचारविनिमय होत असे. त्यावरून त्यांच्या मनाची अशी समजूत झाली होती की, प्रयत्न केल्यास मी लेखक होऊ शकेन. त्यामुळे ते नेहमी माझ्या पाठीमागे लागत आणि म्हणत, "काही तरी लिहा तुम्ही.” पण आपलें तें काम नव्हे, ही माझी ठाम समजूत. कोणत्याही कार्याला किंवा कलेला सर्वस्वी वाहिल्यावांचून सुखासुखी ती हस्तगत होणे अशक्य! तरी पण त्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. 'हिंद एजन्सीची 'आणा माला' भर जोमांत होती. तिच्या संक्रांतीच्या अंकाकरितां गोष्ट लिहावयास त्यांनी मला सांगितले. प्लॉट दिला; जुळणी करून दिली. गोष्ट दोन दिवसांत प्रेसमध्ये गेली पाहिजे होती. फक्त मी लिहायचे. बांधलेली शिदोरी घेऊन, लेखनाचे साहित्य घेऊन, लिहावयास बसलो. एक ओळ लिहिली; खोडून टाकली. वाक्यच नीट जुळेना. प्रयत्न करून करून थकलों. एक दिवस गेला, दोन गेले. आता मात्र धीर सुटला. रात्रौ खोलीचा दरवाजा बंद करून एकटाच बसलों आणि वेडीवांकही आली तशी गोष्ट लिहून तर पुरी केली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री. नाथमाधवांच्या हवाली केली. "पसंत असेल तर छापा, नाही तर फाडून टाका" असे सांगितले. संक्रांतीच्या दिवशी माझ्या एका मित्राने 'आणा माले'चा अंक दाखवून मी लेखक झाल्याबद्दल माझें अभिनंदन केले. ज्योतिषशास्त्राचा नाद पुढे पुढे तर श्री. नाथमाधवांना ज्योतिषशास्त्र, हस्तसामुद्रिक इत्यादि विषयांचा नाद बराच लागला. या निमित्तानं बरीच मंडळी त्यांच्याकडे येत असत. या शास्त्रावर माझा विश्वास मुळीच नव्हता. या बाबतींत आमचा बराच वादविवाद होत असे. एकदां सहजी माझा हात मी त्यांना दाखविला. हात पाहून एकच गोष्ट त्यांनी सांगितली, "तीन वर्षांनंतर एक काळ असा येणार आहे की केवढाही मोठा पगार तुम्ही मिळवीत असा, एक वर्षपर्यंत तुमच्या हातात दिडकीही असणार नाही."
६१ मी हसण्यावारी घालविलें. पण खरोखरीच तीन वर्षांनी अकल्पित रीतीने तो काळ आला. सबंध एक वर्ष माझ्या हातांत एक दिडकीही नव्हती. मी माझे कर्तव्य केलें श्री. नाथमाधवांना एकदा भेटण्याकरितां गेलो असतां तेथें एक गृहस्थ बसलेले ते. मी त्या गृहस्थांना पूर्णपणे ओळखीत होतो. श्री. नाथमाधवांनीं चटकन् एक पया काढून त्यांच्या हाती दिला. मला त्यांचें तें करणे पसंत पडले नाही. "नाथ, आपण कुपात्री दान केलेत-' "असं कसं म्हणतां तुम्ही ?" "तुमच्याकडून घेतलेला हा रुपया कुठे जाणार माहीत आहे तुम्हांला ?" "खाणावळींत. गृहस्थ दोन दिवस जेवला नाही." "खाणावळीत नव्हे-दारूच्या गुत्त्यांत." "जाऊं द्या. माझे कर्तव्य मी केले. त्याचे कर्म त्याच्याबरोबर." वप्नांची टिपणे नाथमाधवांना स्वप्नांची टिपणे ठेवण्याची दांडगी संवय असे. त्या टिपणांच्या हा-सात चोपड्या होत्या. त्यांचे एक बंधु कालवश झाले. त्यांच्याबद्दल एकदां गोष्टी नेघाल्या असता, त्यांनी त्यांतील एक चोपडी काढून उघडून मजजवळ दिली. धूंच्या मरणापूर्वी नऊ महिने पडलेलें तें स्वप्न इतके तंतोतंत खरे ठरलेले पाहून पला आश्चर्य वाटलें. 'स्वयंसेवक' कादंबरीचे प्रकाशन प्रकाशक या नात्याने माझा संबंध श्री. नाथमाधव यांच्याशी बराच आला. 'वीरधवल', 'सांवळ्या तांडेल', 'रायक्लब भाग २ रा' ही त्यांची पुस्तकें मी प्रसिद्ध केली. नंतर मजजवळचे भांडवल संपलें. प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या विक्रीतून पुढच्या पुस्तकाच्या प्रकाशनाची तरतूद झाल्याविना नवीन पुस्तक हाती घ्यावयाचे नाही, असा मनाशी निश्चय केला. नंतर मुंबईतील दुसरे एक प्रकाशक मला मेटले. "श्री. नाथमाधवांच्याकडे कादंबरीकरितां जाणार आहे." ते म्हणाले. "खुशाल जा. मला सध्या काहीही करता येत नाही.'
६२ ते प्रकाशक श्री. नाथमाधवांना भेटले. "स्वयंसेवक" या कादंबरीची हस्तलिखित प्रत त्यांच्या स्वाधीन केली. वाचल्यानंतर प्रकाशकांना पसंत पडली. मोबदल्याचे विचारता नाथमाधवांनी हजार रुपये मागितले. प्रकाशक साडेसातशें द्यायला तयार झाले. श्री. नाथमाधवांनी ते नाकारले आणि लगेच मला बोलावणे पाठविलें. गेल्याबरोबर ती हस्तलिखित प्रत माझ्या हातांत टाकली. मी पुष्कळ आढेवेढे घेतले. माझ्याकडून आपले पैसे वेळेवर मिळणार नाहीत, असेही निक्षून सांगितले, तरीही ते ऐकेनात. "मी ती कादंबरी दुसऱ्या कोणालाही देणार नाही-तुम्हांलाच देणार ! तुम्ही तिचें वाटेल ते करा.” भांडवल गुंतल्यामुळे अडचणीची परिस्थिति उत्पन्न झाली; हे मी श्री. नाथ- माधवांच्याजवळ बोललो नव्हतो. एके दिवशी त्यांनी मला बोलावून घेतले आणि एका नवीन नाटकाचे लिखाण माझ्या स्वाधीन केले. त्या वेळी मी माझी परिस्थिति त्यांच्यापुढे मांडली. "छपाईची व्यवस्था मी करतो. या पुस्तकाच्या बाबतींत एक पैही तुम्ही खर्च करू नका. पुस्तकावर प्रकाशक म्हणून तुमचें नांव घालण्याची परवानगी द्या." 'काय बोलण्यासारखे होतें ?' बऱ्याच अडचणींमुळे श्री. नाथमाधवांकडे एक महिनाभर मला जातां आलें नाही. एके दिवशी त्यांच्या-माझ्या ओळखीच्या एका इसमाने त्यांच्या निधनाची बातमी सांगितली. मी स्तभितच झालो. पंधरा वर्षांचा परिचय असतां शेवटी भेट झाली नाही. दोन शब्द बोलावयास मिळाले नाहीत, याबद्दल बरीच हळहळ वाटली. सबंध दिवस मन अस्वस्थ होते. रात्री झोपही लागेना. पहाटे चारानंतर जरासा डोळा लागला. माझ्या राहत्या खोलीच्या दरवाजांतून कोणी डोकावून पाहिले असा भास झाला; इतक्यांत काठीवर भार देऊन हळूहळू पाय ओढीत श्री. नाथमाधव खुर्चीवर येऊन बसले. त्यांना पाहिल्याबरोबर मला गहिवर आला ! "दोन शब्दही बोलायला मिळाले नाहीत-" "काय बोलण्यासारखे होतें ?-" मी चटकन् जागा झालों.
नाथमाधव आणि माझी वाङ्मयसेवा [६] (लेखक:-श्री. भार्गवराम विठ्ठल वरेरकर) शिपाईगडी लेखक झाला ! कोणत्याही नवीन लेखकाचे नांव प्रसिद्ध झालेले दिसले, की त्याच्याबद्दलची जिज्ञासा साहजिकच जागृत होते. 'प्रेमवेडा' या नावाची एक छोटी कथावजा कादंबरी ज्या वेळी प्रसिद्ध झाली त्या वेळी अशीच माझी जिज्ञासा जागृत झाली. ती कथा फारशी आकर्षक होती असें नाही; परंतु उदीयमान लेखकाच्या दिव्यत्वाची लहानशी ठिणगी त्या कथेत दिसून येत होती. 'हिंद एजन्सी एक आणा'माले मधून नाथमाधव यांच्या आणखी काही किरकोळ गोष्टी व 'रायक्लब अथवा सोनेरी टोळी' ही कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. "हिंद एजन्सी'चे एक मालक, नाना केतकर हे माझे लहाणपणापासूनचे स्नेही. त्यांची भेट झाली त्या वेळी या लेखकाची चवकशी केली. नोकरीमुळे रजा मिळेल त्याच वेळी कोंकणच्या बाहेर पडण्याची सवड मला मिळत असे; आणि म्हणूनच इच्छा असूनही पुष्कळ दिवसपर्यंत मला नाथमाधव यांची भेट घेता आली नाही. केतकर यांनी जी हकीकत सांगितली, ती मोठी हृदयद्रावक होती. पलटणीत शिरण्याची इच्छा असलेला शिपाईगडी सिंहगडावरून पडल्यामुळे जन्माचा पंगु बनला आणि म्हणूनच लेखक झाला! अद्वितीय उदाहरण बुद्धिपुरस्सर-किंबहुना सक्तीनें, लेखकाचा पेशा नाथमाधव यांना पत्करावा लागला. जन्मतः लेखनाची प्रवृत्ति त्यांना नव्हती. केवळ पंगु झाल्यामुळे उदर- निर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी लेखकाचा पेशा पत्करला, या गोष्टीचे मला मोठे कौतुक वाटलें. चालताबोलता, हिंडताफिरता असला तरी लेखक व्यावहारिक ६४ दृष्टया 'पंगूच' असतो. प्रकाशकाने प्रकाशन केले पाहिजे; बुकसेलरनें पुस्तकें विकली पाहिजेत; ग्राहकांनी ती विकत घेतली पाहिजेत; आणि वाचकांनी ती वाचली पाहिजेत; तेव्हांच लेखकाच्या खिशांत दमडी-दुगाणी येऊन पडणार. लेखणी चाल- विणारा माणूस अशा रीतीने पंगू असतो; पण पंगु झाल्यामुळे लेखणी उचलणे भाग पडल्याचें नाथमाधव यांचे उदाहरण भारतीय लेखकवर्गात तरी अद्वितीय होय. झाली भेट एकदांची! किरकोळ रजा घेऊन एकदोन वेळां मुंबईला आल्यावेळी त्यांची गांठ घेण्याचा मी प्रयत्न केला; पण ते त्या वेळी मुंबईत नसल्यामुळे भेट झाली नाही. ते पंगु नसते तर त्यांना मुद्दाम कोंकणांत घेऊन जाण्याची तजवीज करतां आली असती. अशा प्रकारे बरेचसे लेखक कोंकग पाहाण्यासाठी म्हणून का होईना, येऊन गेले होते. पण नाथमाधव यांचा पंगूपणा कशा प्रकारचा आहे, आणि आगबोटीचा प्रवास त्यांना होणे शक्य आहे की नाही याची कल्पना नसल्यामुळे त्यांना कोंकणच्या प्रवासाचे आमंत्रण देणे मला अशक्य होते. अशीच काही वर्षे गेली. पण एकदा माझे मित्र, श्री. विश्वनाथ गोपाळ शेट्ये यांनी त्यांची माझी गांठ घालून दिली. मी ज्या वेळी त्यांच्या घरी गेलो त्या वेळी ते एकटेच होते. त्यांनी नमस्कार केला आणि उठून स्वागत करण्यास आपण असमर्थ असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. काही वेळपर्यंत मी त्यांच्याकडे पाहात बसलो होतो. ते एका खुर्चीवर बसले होते. साधारणपक्षी दिसून येणारी लेखकाची मुद्रा त्यांच्या चेहेऱ्यावर नव्हती. दुःख व आनंद मला पटले. हा माणून शिपाईगडी होण्यासाठीच जन्माला आलेला होता. दृष्टि शिपाईबाण्याची, रुबाब शिपाईबाण्याचा क्षणभर मनाला जितकें दुःख वाटलें तितकाच आनंद झाला. आजच्या काळांत शिपाई होऊन या गृहस्थाने काय केलें असतें ? कुठल्या तरी पलटणीत जमादार, सुमेदार याच्या पलीकडे मजल गांठण्याची पलटणीतील नोकरांची परिस्थिति नव्हती. तो लढाईपूर्वीचा काळ होता. मला वाटलें, झालें तें बरें झालें. तलवारीपेक्षां देखील तिखट असलेली लेखणी या शिपाईगड्याच्या हातून मराठी वाङ्मयाला भरगच्च स्वरूप आणणार, या अपेक्षेनें मला आनंद झाला.
६५ ऐतिहासिक कथानकें लिहिण्याची कल्पना नाथमाधव यांच्या मनांत त्यावेळी घोळत होती; ती मूर्त स्वरूपांत आली नव्हती. शिवाजीचें चरित्र आणि मराठ्यांचा इतिहास याजवर एक धारावाहिक कथामाला लिहिण्याचा आपला मनोदय त्याच वेळी त्यांनी मला सांगितला. नाटक लिहिण्याचीही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. आणि तें शिवचरित्रावरच लिहून नाट्यलेखनाला सुरवात करावी, असा त्यांचा मनोदय होता. लिहिण्याची पद्धति दुसऱ्या वेळी जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो त्या वेळी ते लिहीत बसले होते. त्यांची लिहिण्याची पद्धति कशी आहे, हे पाहण्यासाठी मी त्यांचे हस्तलिखित मुद्दाम मागून घेतले. बहुधा ते जांभळ्या शाईने लिहीत असत. त्यांचे अक्षर अत्यंत सुवाच्य होते. ते पाहून मला फार आनंद झाला. ते लिहीत असतांना पाहिले, त्या वेळी असें दिसून आले की, सुवाच्य अक्षर काढण्यासाठी त्यांना मुद्दाम परिश्रम करावे लागत नसतं. त्यांचा लिहिण्याचा वेग जितका जलदीचा असे तितकेच त्यांचे अक्षरही सुवाच्य असे. बऱ्याचशा लेखकांची अक्षरें बहुतेक सुवाच्य नसतात. कित्येकांना आपले अक्षर सुवाच्य नाही याचाच मोठा अभिमान वाटत असतो. कित्येक फार फराटे ओढतात. कित्येकांना अनुस्वारांची आणि विरामचिन्हांची खिजगणती नसते. पण नाथमाधव आपल्या लेखनांत आणि प्रत्येक गोष्टींत बुद्धिपुरस्सर काळजी घेत असल्याचे दिसून आल्यामुळे मला त्यांच्याबद्दल मोठा अभिमान वाटला. लेखकांबद्दल चर्चा नंतर काही लेखकांबद्दल त्यांचे-माझें बरेंच बोलणे झाले. निरनिराळ्या लेखकां- बद्दल त्यांनी मला मतें विचारली. कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगतां मी प्रांजलपणे माझी मते त्यांच्यासमोर मांडली. मा देतांना मी कठोरपणा करीत होतो हे माझं मला कळत होते. पण इतक्या खुल्या दिलाने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीसमोर दांभिकपणाने 'शांतिरस्तु पुष्टिरस्तु' करून वेळ मारून नेणे बरें वाटले नाही. त्यामुळे त्यांनाही प्रश्न विचारण्यास उल्हास वाटू लागला. आज नाथमाधवांच्या नांवाची आठवण क्वचितच केली जाते. त्या वेळचे सर्वसाधारण वाचक नाथमाधवांचे कायमचे गि-हाईक होते. विक्रीच्या दृष्टीने त्यांच्याइतकी कुणाचीच जास्त पुस्तकें ६६ खपत नव्हती. तरीही त्या वेळचे विद्वान लेखक त्यांना त्यांचे योग्य स्थान द्यायला तयार नव्हते. ही तक्रार आज वाटते आहे; त्या वेळी नाथमाधवांनासुद्धा या तक्रारीची जाणीव नव्हती. पदवीधर लोकांच्या झळाळीमुळे आम्ही तात्कालिक लेखक आपली पायरी तुलनेने खालच्या दर्जाची आहे, असे समजून वागत होतो. एकाद्या मोठ्या लेखकाने आमच्या लेखनाबद्दल चार शिफारशीचे शब्द काढले, की आम्हाला मूठभर मास चढल्यासारखे होत असे. नाथमाधव याच परिस्थितीत होते. आत्मवंचना त्या दिवशी आमचे जे बोलणे झाले ते याच विषयावर झाले. कुणीकुणी आपल्या लेखनाची तारीफ केली; आणि कुणाकुणाचे आशीर्वाद आपल्याला मिळाले, याचाच इतिहास त्या दिवशी नाथमाधव यांनी मला सांगितला. ही आमची आत्मवंचना होत आहे ही जाणीव त्या वेळी मला झालेली नव्हती. जगाच्या बाजारांत स्वतःचा डांगोरा जो मोठ्याने पिटतो, त्याचेच नांव लोकांत होत असते. हे व्यावहारिक तत्त्व त्या वेळी माझ्याप्रमाणेच नाथमाधवांनाही कळलेले नव्हते. म्हणूनच मनाच्या तुलनेने नाथमाधवांपेक्षा कमी दर्जाचे असणाऱ्या किंवा तुल्य दर्जाचे असणाऱ्या लेखकांच्या आशीर्वादांवर खूष झाल्याचा वृत्तांत सांगतांना नाथमाधवांना विशिष्ट प्रकारचा आनंद वाटत होता. सदोदित गुणांवर नजर आप्पा टिपणीस यांचे 'चंद्रग्रहण' नाटक त्या वेळी अतिशय लोकप्रिय झाले असून, त्याचे सारखे प्रयोग होत होते. या प्रयोगांना नाथमाधव बहुतेक सदोदित हजर असत. त्यांच्याइतका सहृदय प्रेक्षक क्वचितच आढळून येईल. दोषैकदृष्टि त्यांच्याठायी नव्हती. गुणांवर त्यांची सदोदित नजर असे; आणि त्या गुणांच्या तुलनेने आपल्यांत वैगुण्य कोठे आहे, याचा पडताळा पाहण्याचा मोह त्यांना आवरता येत नसे. अशा वेळी मत्सराचे वारे त्यांच्यांत केव्हाही शिरले नाही. 'चंद्रग्रहण' या नाटकानंतर आप्पांचे ‘राज्यारोहण' हे नाटक बसत होते. (हेच नाटक आतां 'शिक्काकट्यार' या नावाने संगीत स्वरूपांत रंगभूमीवर आहे.) त्या नाटकाच्या रंगी तालमीला अप्पांनी नाथमाधवांस मुद्दाम बोलाविले होते. ते गाडीत बसून थिएटराच्या दाराशी आले आणि त्यांना उतरण्यासाठी मी आणि विश्वनाथ- पंत शेट्ये यांनी ज्यावेळी हात दिला त्या वेळी त्यांना फारच संकोच वाटला. आम्ही दोघांनी उचलून त्यांना थिएटरांत आणून बसविले. त्या वेळी ते गहिवरून आले. आपल्या पंगूपगाबद्दल त्यांना फार वाईट वाटलें।
६७. संस्मरणीय रंगी तालीम ती रंगी तालीम आजवर आठवण राहण्याइतकी सुंदर झाली होती. प्रत्येक अंक संपला, की नाथमाधव तोंड भरभरून नाटकाची स्तुति करीत होते. तालीम संपली आणि रंग उतरून अप्पा ज्या वेळी त्यांना भेटण्यासाठी आले, त्या वेळी त्यांनी अप्पांची स्तुति करण्यांत इतकी सुंदरसुंदर विशेषणे योजिली की, त्या वेळी अप्पांना देखील लाजल्यासारखे वाटले असावें. ते अंतःकरणापासूनचे उद्गार होते. अप्पांना खूष करण्याची यत्किंचितही वृत्ति त्या उद्गारांत नव्हती. 'राज्यारोहण' नाटकाची झळाळी नाथमाधव यांना त्या वेळी इतकी वाटली की त्यांनी लिहिलेल्या 'लोकसंग्रह' नाटकांत त्याची कमीजास्त पडछाया पडलेली दिसून आल्यावांचून राहिली नाही. नोकरीच्या मगरमिठीतून सुटका त्यानंतरची जी भेट झाली, त्या वेळी नोकरी सोडण्याच्या विचाराने मी निघून आलो होतो. ती भेट मुद्दाम घेतली होती. सहजगत्या भेटण्यासाठी म्हणून गेलों नव्हतो. मला त्यांचा अनुभव विचारावयाचा होता. नोकरी पत्करल्यापासून नोकरी सोडावी आणि स्वतंत्र रीतीने लेखनव्यवसाय करावा असे वाटत असतांही बढती व पेन्शनच्या लोभाच्या मगरमिठीतून मला सुटतां येत नव्हते. प्रामाणिकपणे नोकरी करण्यापायीं अर्धांगवायु झाला असतांही वरिछाने रजा न दिल्यामुळे आणि तशा अपंग स्थितीत नोकरी करावी लागल्यामुळे, मला नोकरीचा तिटकारा आला होता. नाथमाधवांचे दोन्ही पाय लुले झाले होते. माझी डावी बाजू आतां सारीच लुली पडली होती. मदतीशिवाय मला रस्यांतून कोठेच फिरतां येत नव्हते. नाथमाधवांच्या अपंग परिस्थितीची मला त्या वेळी खरी जाणीव झाली. मला निदान चालतां तरी येत होते; पण त्यांना ते देखील शक्य नव्हते. नाथमाधवांचा सल्ला मी नोकरी सोडूं नये, अशी माझ्या बऱ्याच मित्रांची इच्छा होती. पेन्शन घ्यावें असे कित्येक जण म्हणत होते. त्या परिस्थितीत मला डॉक्टरचे सर्टिफिकेट मिळाले असते, तर मला पेन्शनही घेता आले असते. पग मनाचा निश्चय मला त्या वेळी करता येत नव्हता म्हणूनच मी नाथमाधवांना असा प्रश्न स्पष्टपणे विचारला. त्या.
६८ वेळी ते म्हणाले, "नाइलाजाने-सक्तीने मला लेखनव्यवसायांत पडावे लागले. चरितार्थासाठी मी लेखक बनलों; पण पहिल्यापासून लेखनाची आवड असलेल्या तुमच्यासारख्या लेखकाला इतके दिवस नोकरीत कसे राहतां आले याचेच मला आश्चर्य वाटते. "सरस्वतीच्या कृपेनें कोणी कधी श्रीमंत होत नाही. अन्नवस्त्र मिळविण्यापुरती,- साधारणपणे योगक्षेम होण्यापुरती मिळकत लेखनाने होणे मुळीच अशक्य नाही. त्यांतून तुम्ही नाटके लिहिता, आणि लेखनाच्या सर्वसाधारण धंद्यांत इतर लोकां- पेक्षा नाटककारांना जास्त पैसा मिळण्याचा अधिक संभव आहे. अशा वेळी तुम्ही नोकरीचा लोभ जितका लवकर सोडाल तितकें बरे होईल. खरे पाहिले, तर तुम्ही यापूर्वीच नोकरी सोडून कुठे तरी आपले बस्तान बसवायला पाहिजे होते. पण आता यापेक्षा जर वेळ लावाल, तर लेखनाचा धंदा पुढे सोडून द्यावा लागेल, असें माझ्या अल्प बुद्धीला वाटते." विनयाने उल्लेखिलेली ही त्यांची अल्प बुद्धि मला इतर कोणाच्याही प्रगल्भ बुद्धी- पेक्षा जास्त महत्त्वाची वाटली. पेन्शन घेतल्याने सरकारी नोकरीचा संबंध राहील आणि त्यामुळे पदोपदी लेखणी म्यान करावी लागेल, म्हणून एकदम नोकरीचा राजीनामा देणे योग्य होईल, असा स्पष्ट सल्ला त्यांनी मला दिला. तरीही त्या वेळी नोकरी सोडण्याची माझी तयारी झाली नाही. नाथांचे भविष्य खरे ठरलें! दीड वर्ष मी रजेवर काढले आणि शेवटी एकदां मनाचा निश्चय करून ज्या वेळी राजिनामा दिला त्या वेळी नाथमाधव यांना मुद्दाम भेटून तसे केल्याचे कळविले. ते म्हणाले, "आता तुम्ही मार्गावर आला. नोकरी सोडल्याने तुमचे हाल होतील. उपासमारीचेही प्रसंग येतील. पण लेखनकार्य मनाजोगें होईल.” त्यांचे हे सर्व भविष्य खरें झालें. आज माझ्या हातून जर काही अल्पवल्प लेखनकार्य झाले असेल, तर ते नाथमाधवांनी पाठिंबा देऊन मला नोकरी सोडायला भाग पाडल्यामुळेच.
६९ नाथमाधवांची ग्रंथसंपत्ति पुष्कळ आहे. मराठी भाषेतील इतर कोणत्याही लेखका- पेक्षा त्यांनी जास्त ग्रंथनिर्मिति केलेली आहे. महाराष्ट्र त्यांना विसरला नाही, हे कोणीही बुकसेलर सांगू शकेल. बऱ्याच नामजाद्या लेखकांच्या ग्रंथांचे समालोचन करून स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाले आहेत; पण नाथमाधवांच्या ग्रंथांचे समालोचन करण्याची बुद्धि पदवीधरांच्या झळाळीने दिपून गेलेल्या लोकांना होत नाही, हे मराठी भाषेचे दुर्दैव होय! कर्मवीराचें कर्तव्य आपण आपली दृष्टि राष्ट्रहिताकडे वळविली पाहिजे. त्या धोरणानें कार्य करूं लागल्यावर त्या सगळ्यांचे परिणाम एकदम दिसावयाचे नाहीत हे खरे आहे. पण ती पेरणी आहे. त्या पेरणीची बीजे काही लवकर उगवतील तर काहींना उगवाव- यास उशीर लागेल; परंतु ती मरावयाची मात्र खास नाहीत, हे प्रत्येक कर्मवीराने लक्षात ठेविले पाहिजे. ती केव्हाही उगवोत आणि त्यांस फळे केव्हाही येवोत, त्याची पर्वा करावयाची नाही. ती बीजे आपल्या जन्मभूमीत रहावयाची आहेत; आणि त्याची फळे येतील तेव्हां ती आपल्याच राष्ट्राला मिळावयाची आहेत, इतकी गोष्ट मात्र खरी मध्यकालीन कर्मवीरांनी जी बीजे पेरून ठेविली होती, त्यांची फळे कालेंकरून आपल्या राष्ट्रास मिळाली आहेत व हल्लीही मिळत आहेत; त्याच- प्रमाणे आपण आज जे बी पेरुं त्याची फळे आपल्या पश्चात् आपल्या वंशजांस खचीत मिळावयाची आहेत, हे दृढतर अंतःकरणांत वागवून एकसारखा सदुद्योग करीत रहाणे हेच प्रत्येक कर्मवीराचे मुख्य व आद्य कर्तव्य आहे. -नाथमाधव नाथांचा परिचय [७] (लेखकः-रा. रा. यशवंत नारायण टिपणीस) एका नाटकाची कहाणी नाथांचा-माझा परिचय होता. 'अति' नव्हता. 'अतिपरिचयादवज्ञा' म्हणतात पण तसे नाही. त्यांचा परिचय होण्यापूर्वीच एका आगंतुक कारणामुळे माझ्याबद्दल त्यांचा गैरसमज झाला होता. 'हिंद एजन्सी'चे केतकर यांनी नाथांचें एक सामाजिर नाटक मला वाचायला दिले. नाटक देतांनाच केतकरांनी मला सांगितले की, बसविण्यासाठी देत नाही, तर ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावे की नाही, याबद्दन तुमचे मत मला हवें आहे. त्यांनी मला तेव्हांच हस्तलिखित दिले व आमच्र कंपनीतील कोल्हटकरांनी ते, 'मी प्रथम वाचतों' म्हणून तसेच उचलून नेलें. त्या वेळी मामें 'राधामाधव' बसत होते व त्याच्या तयारीच्या व्यापामु नाथांच्या नाटकाचे मला स्मरणच झाले नाही. 'राधामाधव' रंगभूमीवर आल्याव केतकरांनी मला आठवण दिली, तेव्हा मी तें नाटक शोधू लागलों; पण तें कार सापडेना. माझा निरुपाय झाला व केतकर यांना मी हस्तलिखित हरवल्या सांगितले. त्यांनी ते नाथांना सांगितल्यावर नाथांच्या अंगाचा भडका झाला. ही हकीकत पुण्याच्या सरदार बाळासाहेब घोरपड्यांच्या कानांवर नाथांन घातली. नाथांच्या नुकसानीबद्दल आपण नाथांना काही तरी पैसे द्यावे व हे प्रकर मिटवावें, असा बाळासाहेबांचा व माझा विचार ठरला. नाथमाधव त्या वेळी पुण्यां असल्यामुळे बाळासाहेबांनी मला पुण्यास बोलाविलें. मी पुण्यास जाऊन नाथांच भेट घेतली. नाथ एकदम माझ्यावर उसळले. त्यांचे नाटक हरवले, त्यांना रा येणे साहजिकच होते. 'तुमच्याजवळ नाटकाची रफ कॉपी असेल' असें : म्हणतांच नाथांनी 'मी एकदाच लिहितों, कॉपी वगैरे करीत नाही' असे सांगितले मी 'तुमच्या नुकसानीबद्दल पाचशे रुपये देतो' म्हटले, तेव्हा तर ते फार चिडले ! 'मला पैसे नको आहेत, माझे नुकसान पैशांनी भरून येणार नाही. तुम ते नाटक मुद्दाम दडपून ठेवले आहे. उद्या यांत इकडेतिकडे फरक करून खतः नाटक म्हणून स्टेजवर आणाल ! तुमचा कावा मला कळला!" असे निर्दयतेचे शब्द नाथांच्या मुखांतून आले। मला अत्यंत राग आला; कारण मी तें नाटक वाचलें देखील नव्हते. पण माझ्या हातून प्रत हरवल्याचा गुन्हा झाला असल्यामुळे मला मेल्याहून मेल्यासारखें झाले. हा गृहस्थ पैसेही घेत नाही आणि उलट माझ्या चारित्र्यावर भयंकर ठिणग्या टाकतो आहे, हे पाहून माझे मतही नार्थाबद्दल कलुषित झाले. नाटकाचे हस्तलिखित कसें सांपडलें ? श्री भारत मंडळीचा मुक्काम मुंबईहून पुण्यास गेला. आमच्या पहिल्या खेळा- पूर्वीच आमचा कपडेपट मास्तर दुसऱ्या कंपनीत पळून गेला. तेव्हा दुसऱ्या माणसाकडे कपडेपटाचा चार्ज देणे भाग पडले. दुसरा कपडेपट मास्तर कपज्यांची तपासणी करीत असतां एका पेटीत त्याला एका नाटकाचे हस्तलिखित सापडले. त्याने ते माझे बंधु माधवराव उर्फ भाऊ यांच्याकडे आणून देतांच त्यांनी तें उघडून पाहिले. त्यावर 'नाथमाधव' नांव पाहताच त्यांनी धांवत येऊन ते मला दिले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला! मी तडक बाळासाहेब घोरपड्यांकडे गेलों व तें हस्तलिखित त्यांच्या स्वाधीन करून नाथांच्याकडे हमखास पावतें करण्यास सांगितले. नाथांचा आनंद नाथांच्या हाती प्रत पडतांच हरवलेले मूल आईला मेटण्याइतका त्यांना आनंद झाला व त्याबरोबरच माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊन माझ्यावर केलेल्या आरोपाबद्दल त्यांना वाईट वाटलें । त्यांनी मला भेटण्याबद्दल प्रेमाचा निरोप पाठविला व त्याबरोबरच त्यांचा गैरसमज करून देण्याला कोणकोण व्यक्ती कारण झाल्या त्यांची नांवेंही त्यांनी मला कळवली. पण पुढे दोनतीन वर्षे त्यांच्या माझ्या मेटीचा योग आला नाही. मी 'चंद्रग्रहण' का लिहिले ? मोडकळीस आलेला श्री भारत मंडळीचा डोल्हारा सावरण्यासाठी मला काही दिवस संगीताचा आश्रय घ्यावा लागला. पण संगीताचा परावलंबीपणा मला सहन होईना. मुंबईच्या मुक्कामी माझे नाटककार मित्र प्रो. शेव्ये यांच्याबरोबर मी नाथांच्या भेटीला जाऊ लागलो. पहिल्या भेटीलाच नाथांनी मला त्यांचें 'जातिवंत ७२ मराठा वीर' नाटक वाचायला दिले व तें यशस्वी का झाले नाही तेवढे कळावें, अशी इच्छा दर्शविली. मी ते वाचल्यावर दुसऱ्या वेळी त्यांच्या समक्ष त्याची छाननी केली. ती त्यांना पटली. तेव्हापासून त्यांना माझ्याबद्दल सहानुभूति वाढू लागली व कंपनीच्या बाबतीत शक्य ती मदत करण्याचे त्यानी कबूल केलें. त्यांनी माझ्याकडे 'शाहु नगरवासी'तील आठवलेबंधूंना ठेवण्यासाठी पाठवून दिले. ती मंडळी चारपांच दिवस आमच्याकडे होती. परंतु एक दिवस त्या बंधूंनी आम्हांला न सांगतां कंपनीतून प्रयाण केलें. ही हकीकत नाथांना कळविल्यावर ते म्हणाले, “आठवले बंधू म्हणतात अप्पांची नाटके पौराणिक आणि सामाजिक; आम्हांला ऐतिहासिक नाटकाशिवाय मजा वाटत नाही व अप्पा कांही ती लिहूं शकणार नाहीत." यापुढे ऐतिहासिकच नाटक लिहावयाचे असा माझा निश्चय ठरला व मी 'चंद्रग्रहण' लिहिले. मुंबईवर 'चंद्रग्रहणा'चा मारा कल्याण येथे 'चंद्रग्रहण' बसवून पुण्यास त्याचा धूमधडाका सुरू होईपर्यंत तीनचार महिन्यांत नाथांची-माझी भेट झाली नव्हती. पुण्यास अच्युतरावांचे 'नारिंगी निशाण' बसत होते, त्या वेळी आमची गांठ पडली. पुण्याला चंद्रग्रहणाची एकवीस-नव्हे बावीस तोफांची सलामी दिल्यावर आम्ही मुंबईवर चंद्रग्रहणाचा मारा सुरू केला. मुंबईस नाथांनी चंद्रग्रहण पाहण्याची इच्छा दर्शविली. मी पुढच्या खेळाला तुम्हाला नेण्याची व्यवस्था करीन म्हटले, पण मला त्याचे विस्मरण झाले. पण नाथ शारीरिक त्रासाला न जुमानतां खेळाला आलेच ! त्याच वेळी त्यांनी 'लोकसंग्रह' नाटक लिहिले. ते त्यांनी नानबा गोखल्यांस वाचून दाखविले. दुसऱ्या दिवशी नानबा आमच्या शेव्यांजवळ म्हणाले, 'काय अप्पा पाजी आहे हो ! त्याने नाथांचे नाटक चोरलें.' शेव्ये माझे मित्र असल्यामुळे त्यांनी नानांना बराच दम दिला. नानबा म्हणाले, 'नाथांनी खतः मला सांगितले.' शेव्ये म्हणाले, 'चला नाथांकडे.' दोघेही नाथांकडे गेले. नाथ म्हणाले, "हा नानबांचा गैरसमज आहे." मी म्हणालों की, 'लोक- संग्रहाँ त मी तुरुंगाचा सीन लिहिला होता; पण अप्पांनी 'चंद्रग्रहणा' त तोच सीन ७३ लिहिल्याकारणाने माझा सीन फुकट गेला. या 'तोच'चा अर्थ 'तसाच' आहे; पण नानबांनी निराळा अर्थ घेतला व पराचा कावळा करून अर्थाचा अनर्थ केला ! मला ही हकीकत कळल्यावर फारच मजा वाटली. पुढे तर चंद्रग्रहणाचे कर्तृत्व तीनचार नाटककारांकडे गेलें! आणि त्याचा उलगडा करण्याकरिता माझे मित्र श्री. पी. आर्. लेले यांना त्या नाटकाची प्रस्तावना लिहिणे भाग पडले. नाथांचे निर्मळ मन नाथांच्या 'आत्मयज्ञ' नाटकाचे प्रयोग वहाडांत चालू होते. चंद्रग्रहणाचे प्रयोगावर प्रयोग मुंबईस चालू असतां नाथांच्या एका व-हाडी वकील मित्राने नाथांना एका पत्रांत लिहिले की, 'आत्मयज्ञ' करणारी कंपनी लवकरच मुंबईस येणार आहे. 'आत्मयज्ञ' नाटकापुढे आपलें तेज पडणार नाही; म्हणून चंद्रग्रहणाचे शक्य तितके प्रयोग लावून घेण्याची घिसाडघाई टिपणीसांनी चालविलेली दिसते. हा मजकूर वाचून नाथांना वाईट वाटले व मला त्यांनी तें पत्र दाखविलें. नाथ म्हणाले, "अशा खुशामतीने मी चढून जात नाही. या लोकांना तुमचा उत्कर्ष सहन होत नाही, याबद्दल मात्र मला चीड येते.” त्यांनी ताबडतोब पत्र लिहून आपल्या मित्राची चांगलीच चपी केली! नाथांचे निर्मळ मन आणि त्यांचा प्रेमळ- पणा यांचे वर्णन करावे तेवढे थोडेंच. हरीभाऊ आपटे व नाथमाधव कै. हरीभाऊ आपटे वारले त्या दिवशीं नाथांची-माझी गांठ पडली, हरीभाऊंच्या निधनाबद्दल सारेच हळहळत होते, इतक्यांत 'पण नाथ हरीभाऊ वारले; आतां कादंबरीकारांत तुम्हीच पहिले !' असे उद्गार तेथे बसलेल्या एका व्यक्तीने काढले. नाथांचा चेहरा उग्र दिसू लागला. "दुसरे मरून मला मोठेपणा नको; स्वतःच्या हिमतीवर मला मोठेपणा हवा.” नाथांच्या तोंडून हे उद्गार निघतांच त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासारखा झाला! नाथांच्या मनाची थोरवी वेळोवेळी प्रत्ययाला येत असे. नाथांसाठी नियम मोडला मी चहा घेत नसे, यामुळे मी जेव्हा जेव्हां जाई तेव्हां तेव्हां इतरांच्या चहा- बरोबर माझ्याकरितां ते हॉटेलमधून दूध मागवीत. एकदोन वेळा मला त्याचे काही वाटले नाही; पण आपल्याकरितां दरखेपेस नाथांना तीनचार आणे दुधाचा खर्च पडावा, हे मला बरे वाटेना. मी दुसऱ्या खेपेला त्यांना 'मी हल्ली चहा घेऊ लागलों' आहे म्हणून खोटेंच सांगितले व चहाच घेतला. पण त्यामुळे मला सगळीकडेच चहा प्यावा लागे; कारण 'मी चहा घेत नाही म्हटले तर लोक म्हणत, 'आम्हीं नाथांकडे तुम्हांला चहा घेतांना पाहिले आहे.' पुढे खरी हकीकत नाथांना कळली, तेव्हां ते मला म्हणाले, “माझ्यासाठी तुम्ही आपला नियम मोडावा हे बरे नाही; पण यावरून तुमचे माझ्यावरचे प्रेम मात्र दिसन आले वायाची प्रगती झपाट्याने का होत नाही ? भामच्या वाड्यांत एक विशिष्ट प्रकारचे वाय तयार होण्याला राजकीय परिस्थिति अनुकूल नसेल; परंतु नवीन कल्पना, नवीन सुधारणा, नवीन विचार, यांचा परिचय व त्या योगानें उत्पन्न होणारे विकार या गोष्टी वाण्याच्या वृद्धीस कारणीभूत होत असतात, याबद्दल एकमत होईल अशी माझी खात्री आहे. एका प्रकारच्या राजकीय स्थितीत विशिष्ट प्रकारचें वाय होणार नाही हे खरे; तरी पण दुसऱ्या पुष्कळ प्रकारच्या वाबायास अनुकूल परिस्थिति असतां वाच्याची वाढ व प्रगति जितक्या जोराने व्हावयास पाहिजे, तितकी वी का होत नाही, याचा विचार केल्यास आमच्या विद्वान् लोकांचा आळस आणि अनास्था असेंच म्हणावे लागेल. १९२० -नाथमाधव
।
श्री. नाथमाधव हे पनवेल यथं औषधोपचारासाठी
गहिले असता.
No text on this page.
नाथमाधवांच्या समाधीवर आठवणींची पुष्पांजली [८] (लेखकः-श्री. के. सी. ठाकरे, प्रबोधनकार) मेटीचा पहिला प्रसंग नकी साल आठवत नाही, पण तें १९०५ किंवा १९०६ असावें. मी काही कामानिमित्त उलव्याला बोटीच्या धक्यावर आलो होतो. वेळ सकाळची १० वाजण्याची. मुंबईची बोट धधयाला लागली. 'फासिन्दारां'ची चढण्याउतरण्याची एकच लगबग उडाली. सगळे उतारू उतरल्यावर, बोटीचे खलाशी नि धक्यावरचे हमाल यांची गडबड उडाली. या गडबडीत काही मुंबईचे 'सोकाजी' दिसत होते. बोटीचा कप्तानही या गडबडीत ‘ऐसा करो-वैसा पकडो' ऑर्डर सोरीत होता. जड मालाची काही पार्सलें उतरायची आहेत, का बोटीवर कोणी मयत झाला, त्याला बाहेर काढायची ही धडपड आहे, काही कळेना. मी जरा पुढे झालो. काय भानगड आहे म्हणून एका खलाशाला विचारले, तेव्हां तो म्हणाला, "बीमार आदमीको बहार निकालना है." एका लाकडी आमचेअरमध्ये स्वच्छ अभयाच्या गावी उशा घातलेल्या. त्यावर, नेकटाय कॉलरचा इस्तारीचा शर्ट, ब्रेस्ट, कोट घातलेला, डोक्यावर फॅन्सी गोण्डेदार टोपी असा एक दांडगा गुबगुबीत गुलाबी गालांचा तरुण, मारे ऐटीत बसून सगळीकडे हसत हसत पाहत आहे. आजूबाजूला एक वृद्ध बाई, एक तरुणी आणि २-३ 'जण्टलमेन' उमे आहेत. 'बीमार माणूस कोण ?' म्हणून चौकशी करता, 'खुर्चीत बसलाय तो' असे कळलें. मनांत मी म्हटलें, या टग्याला काय पार झाली बुवा? चांगला घट्टाकट्टा दिसतो आहे. बेट्याचे दण्ड-छाती तर चांगली पिळदार दिसतात. थट्टामस्करी करतोय, हसतोय, खिदळतोय, हा कसला 'बीमार भादमी? आणि याच्यासाठी कप्तानाने बोट सोडायला १५ मिनिटे उशीर केला, असा हा कोण बडा प्राणी बुवा ? धक्ष्याच्या दोन विज्या जवळजवळ बांधल्या आणि १०-१२ खलाशी हमालांनी ती मोठी थोरली खुर्ची ताबुतासारखी अलगद उचलून 'हाय लोम् धुम्श्या'च्या गर्जनेच्या ठेक्यावर उचलून बोटीतून धक्यावर आणली आणि एका वडाच्या सावलीत ठेवली. इतक्या अवधीत पनवेलचे सगळे टांगे पॅसिंजर घेऊन निघूनही गेले होते. दोनतीनच काय ते या मुंबईकर पैसिंजरांच्या अडचणीची अटकळ बांधून ताट- कळत उभे होते. पैसे मिळण्याचा हाच मोका असतो. भोंगा वाजवून बोटही परत मुंबईला रवाना झाली. ते दोघेतिघे इसम टांगेवाल्यांशी ठरवाठरव करीत होते. “१५ रुपये-१२ च्या खाली नाही” असे त्रोटक शब्द माझ्या कानी आले, म्हणून मी पुढे झालों, मला स्थानिक माणसाला पाहतांच, ते इसम माझ्याशी बोलू लागले. टांगेवाल्यांनी अडवून धरले आहे, अशी तक्रार त्यांनी केली आणि बोलत- बोलत आम्ही त्या वडाच्या झाडाखाली खुर्चीत बसलेल्या त्या धडधाकट बीमार आदमी जवळ आलो. त्याने हात जोडून अशा हास्याने मला नमस्कार केला, की जणू काय आम्ही अगदी जुनेपुराणे दोस्त. त्याच्याशी मी बोलत होतो तरीसुद्धा हा इसम आजारी असावा, अशी पुसटसुद्धा शंका मला येईना. याच पहिल्या मेटीत मला जी हकीकत कळली, ती मी स्वतंत्र देतच आहे. "माझं नांव द्वारकानाथ माधवराव पितळे. सिंहगडावर मला अपघात झाल्यामुळे कमरेपासून खालचा भाग आदळून जायबन्दी झाला आहे. पुष्कळ उपचार केले. पनवेलच्या धूतपापेश्वर आरोग्यमन्दिराचें नांव नि किर्ती ऐकून .तिकडे उपचारासाठी जात आहे. आपण पनवेलचेच का?" तो. "होय, मी पनवेलकरच आहे.”-मी. "वा! तर मग या ओसाड धक्यावर आपण आम्हांला देवच मेटलांत. आमची कोणाशी तिथे ओळख नाही."-तो. आपण काही काळजी करू नका मी सर्व व्यवस्था करतो."-मी. टांगेवाला इब्ला माझ्या ओळखीचा होता. त्याला मी चांगला ठाकरी दम भरून ठरवणीवर आणला. टांग्याचे टप (Top) काढल्याशिवाय हे 'पितळी' सिंहासन टांगारूढ होणे शक्यच नव्हते. स्क्रू नाही की पाना नाही. काही तरी ठोकाठोक केली नि टपाला पदच्युत करून मुद्देमालासह खुर्ची वर चढवून टांग्याला बांधली, आणि तीन टांग्यांची ही मिरवणूक १२ च्या सुमाराला पनवेलकडे रवाना झाली. मला उलव्यास काम असल्यामुळे, माझे मित्र श्रीमंत आत्मारामशेट आटवणे आणि । गुरुवर्य दादा आठल्ये ( 'केरळकोकिळ' चे एडिटर) यांना, या नवख्या पाहुण्यांची व्यवस्था लावण्याबद्दल मी पत्रे दिली. एक चमत्कारिक मिरवणूक संध्याकाळी मी पनवेलला गेलो. तेव्हां तर गांवकऱ्यांत कौतुकाचे मोठे तुफान माजलेले दिसले. टांग्यावर आमचेअर बांधलेली, त्यावर एक फॅशनेबल गुटगुटीत तरुण ऐटीत बसलेला, मागे उभे राहून एका इसमाने त्याच्या डोकीवर छत्री धरलेली. पुढे एक टांगा, मागें एक टांगा. फक्त ताशेवाजंत्रीच कमती. अशी ही चमत्कारिक वरात गांवाच्या नाक्यावर येतांच, ती पाह्यला गावकऱ्यांचे थवेच्याथवे जमले आणि या घोळक्यासह नाथमाधव अॅण्ड कंपनीचें प्रोसेशन धूतपापेश्वर कार- खान्याच्या दरवाज्याशी येऊन धडकले. तेथे या पाहुण्यांची काही सोय लागणार नाही, ही माझी अटकळ खरी ठरली. अखेर माझ्या पत्राप्रमाणे श्री. अत्मारामशेटने यांच्या बि-हाडाची व्यवस्था ताबडतोब श्रीमंत शंकरशेटच्या नव्या कोऱ्या चार मजली बंगल्यात केली आणि नाथमाधवांची खास व्यवस्था चौथ्या कळशी मजल्याच्या उंच नि हवेशीर हवेलींत केली. अपघात कसा झाला? याविषयी लोकांत बरेच गैरसमज आहेत. हवा तो हव्या त्या गप्पा ठोकीत असतो. त्याचे अखेर निराकरण मला केले पाहिजे. नाथ जबलपूर आर्टिलरीत नोकरीला होता. लष्करी पेशा; शिकारीचा मनखी नाद. बन्दुकीच्या नेमदारीत पक्का नामदार (Correct shot). काही गोऱ्या इपिसरांबरोबर रजेमध्ये शिकार करायला सिंहगडावर गेला. बारीकसारीक शिकार पुष्कळ झाली; आणि एका वाघाच्या सुगाव्याने सगळी पार्टी जागोजाग पांगली. टेहळ्यांच्या नि हाक्यांच्या सावज-हुसकावणीच्या आरोळ्या जसजशा कानी पडत, त्या धोरणाने प्रलेक शिकारी आपापल्या रोखाने हालचाल. करीत होता. इतक्यांत नाथांच्या समोरून वाघाची डुरकावणी आली. नाथाने दोन कदम पीछे घेऊन एक वाघमार गोळी ठोकली. दुसऱ्या नेमाचे अवसान साधण्यासाठी आणखी दोन पावले मागें सरतो तोच तेथे ६० फूट खोलीचा कडा तुटलेला! अजागतेपणीं झोंक जाऊन नाथाचा तडाह कडेलोट झाला ! बेगुमान आदळतआपटत नाथ कत्र्याच्या नळाशी जाऊन बेशुद्ध पडला. बार ऐकतांव सगळे शिकारी त्या रोखानें धांवतच आले. वास्तविक तो वाघ एका गोळीने मरण्याइतका नव्हता. आणि बार तर एकच झाला ! मग शिकार निसटली, का शिकारी व शिकान्याची शिकार केली? अशा प्रसंगी हीच विवंचना विशेष असते; म्हणून सगळे तत्काळ धावून आले. पाहतात तो नाथ बेपत्ता! वाघ ठार ! “द्वारकानाथ, द्वारकानाथ, व्हेअर आर यू?" च्या आरोळ्या हपिसर मारू लागले. हाके नि टहाळे शोधासाठी भराभर सैरावैरा धावले. सुमारे अर्धा तास हीच धावाधाव झाली. अखेर एका हपिसराचे लक्ष सहज कड्याखाली गेलें, तो नाथ तेथें बेशुद्धावस्थेत पडलेला. त्या हपिसराने शिव्या वाजवून सगळ्यांना कड्याखाली जायची सिमले दिली. बेण्डी पाजण्याचा प्रयत्न केला तरी दातखिळी काही केल्या उघडेच ना. कपडे सगळे रक्तानं चिंब मिजलेले. गडाखाली मागसे पाठवून डोली आणवली. तसाच बेशुद्ध स्थितीत नाथाला डोलींत घालून, चार तासांच्या पाय- चालीने पुण्याच्या ससून इस्पितळांत आणले. इतक्या मुदतींत ठेचाळणीनें नाथाचे शरीर इतके तट्ट सुजले, की अंगावरील खाकी ब्रीच सूट, ठिकठिकाणी बारक्या कात्रीचे छाट घेऊन, चिन्ध्या फाडूनच काढावा लागला. सुमारे ११ तासांनंतर नाथ थोडासा शुद्धीवर आला. तेव्हां सर्वाना थोडे हायसे वाटले. या अपघातानें नाथाचा स्पायनल कॉर्ड (पाठकगा) जन्माचा अधु झाला आणि त्यामुळे कमरेच्या खालच्या भागाला कसलेच चैतन्य अगर संवेदना मुळीच राहिली नाही. मरगापूर्वी काही वर्षे काठी टेकून किंवा को गाला तरी धरून तो चालत असलेला दिसला, तरी तें चालणे केवळ ढकलणीचे असे. गरजवंताच्या गोमाशा या वर्षादीडवर्षाच्या पनवेलच्या मुक्कामात नाथाने या दुखण्यापायीं हजारों रुपये खर्च केले. जात्या स्वभावानें कमालीचा सहनशील, उदार आणि मनमोकळा असल्यामुळे, २४ घंव्यांत रोग बरा करणारे ज्योतिषी, मात्रिक, देवखेळवे, हिप्नॉटिस्ट, ग्रहदशावाले, एकादशणी-रुद्रमहारुद्रवाले, मारे सगळ्या देवदूतांची सेना पनवेलची यात्रा करू लागले. मद्रासचे दोन यण्डुगुण्डु मात्रिक तर नाथाचा ७९ नांवपत्ता विचारीतच आले. या लोकांना कसा त्याच्या दुखण्याचा वास आला कोण जाणे ! "ब-ब्ब-बब्ब-बारा दिवसांत हिप्प-हिप्प-हिप्नॉटीनें र-र रोग क-क-काय- मचा बब्ब-बब्ब-बरा" करणारे मुंबईचे एक त-त-त-तोत्रे स-स-सायकोलॉजिस्ट (Psychologist) दीड रुपयांत मिळालेल्या अमेरिकन डिप्लोम्याच्या दिमा- खाने नाथांच्या खिशांतून शंभर रुपये काढून गेल्याचे मला माहीत आहे. दररोज कोणी ना कोणी तरी जेठा मारून बसलेलाच. सारांश नाथांचा बंगला म्हणजे भोजराजाचा दरबारच बनला होता. हवें त्याने यावें, छांछू करावे आणि भरपूर दक्षिणा हबकून पसार व्हावें. याबाबत मी नाथाला फार बोलायचा, कित्येक वेळां त्या मात्रिकाची किंवा जोतिष्याचीही खरपूस हजेरी घ्यायचा. पण नाथ उलट म्हणायचा, "अरे मला हे सगळं कळतं. पण आईचा विश्वास आहेना ! तिला कशाला बरं आपण दुखवावी ? कोणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने उजाडलं तरी हवंच आहे ना आपल्याला ? मग या मात्रिकतात्रिकांच्या होमहवनांत, तूं का आपल्या म्हसोबाला विनाकारण घुमवतोस ?" लेखनोपक्रमाचा ओनामा तसे म्हटले तर नाथाचे घराणे साहित्यसेवेंत पूर्वीपासूनच मुरलेलें. वडील बन्धु दादा पितळे यांच्या इतका व्युत्पन्न, व्यासंगी, मार्मिक आणि चिकित्सक साहित्यिक मला आजवर दुसरा मेटलाच नाही. नाथाला वाचनाचा विलक्षण नाद. पण तें सारे इंग्रजी. दर आठवड्याला खण्डेरावजी (नं. २ बन्धू) मुंबईहुन पनवेलला येतांना, इंग्रजी मासिकांचे गठेच्यागठे बरोबर आणायचे. नाचणींत गाडून पडल्या- वर तरी त्या बिचाने काय करायचे ? जवळ कोणी असले, तर गप्पागोष्टी विनोद चालायचा. पण कोणीच नसल्यावर मग काय? वाचनांतच वेळ घालवायचा. दवाखान्याच्या दूरपणामुळे, लवकरच आत्मारामशेटनी नाथांच्या बि-हाडाची सोय गावाबाहेर वडाळा तळ्यावरील आपल्या राजविलासी बंगल्यांत केली. सभोवार अत्यंत रम्य बगीचा आणि मध्ये बंगला. या ठिकाणी नाथ वाचनाबरोबर कांहीं सुंदर चुटके, छोट्या गोष्टी मराठीत भाषान्तर करीत असल्याचे एक दिवस मला आढळले. त्या वाचून मला कौतुक वाटले. मी म्हटले, “नाथा, अरे या गोष्टी मोठ्या छान आहेत रे. कुठं तरी दे की, छापायला पाठवून." त्याने मला ट्रंकेतून एक पुडकें काढायला सांगितले. पाहिलें तो सगळ्या नाकारून साभार परत आलेल्या गोष्टी । “असें रे कां ?"
" नांव का बदललें? "बाबा, हा आमचा जातिभेद नडतो आहे जिथे तिथे. लेखक कोण ? तर द्वारकानाथ माधव पितळे. त्याला काय लिहिता येतें? द्या फेकून कचरपट्टीत ! मनोरंजनाकडे सुद्धा माझ्या गोष्टींची दाद लागत नाही.' इतक्यांत टपालवाला आला. त्याला पाहतांच नाथ म्हणाला, " पाहूं बरं माझी युक्ती सक्सेसफुल झाली आहे का ?" इतर पत्रांबरोबर नागपुरच्या “महाराष्ट्र वाग्विलास" मासिकाचा अंक होता. तो पटकन् त्याने फोडून चाळला आणि मोठ्या उमेदीने म्हणाला, "जितं मया, जितं मया, गोळी बिनतोड लागली.” मी अंक चाळला, त्यांत एका गोष्टीवर लेखकः-नाथमाधव असें होतें. नाथ म्हणाला, "कां ? कशी आहे ही नांवाची युक्ति ? नांव बदलल्या- बरोबर सहा महिन्यापूर्वी नाकारलेली गोष्ट बिनचूक प्रसिद्ध होते !" जात दाखविणाऱ्या पितळे आडनांवाची अडगळ झुगारून, द्वारकानाथ माधवचा नुसता नाथमाधव बनल्यामुळे, नाथांच्या गोष्टी मासिकवाले कधींमधी खीकारूं लागले. त्यालाही उत्तेजन मिळाले. वाचनाबरोबरच त्याचा लेखनक्रमही त्याने वाढवला आणि पनवेलला असतानांच ‘सायंकाळची करमणूक' नांवाचें एक गोष्टी-संग्रहाचे पुस्तक त्याने प्रसिद्ध केले. या लेखनाच्या कामी नाथाला मी जांभळ्या ( Violet ) शाईची जी दीक्षा दिली ती त्याने आमरण चालविली. नाथमाधवनें लेखक म्हणून लोकप्रियतेच्या प्रांगणांत पाऊल टाकलें, तरी त्याच्या जातीची पृच्छा साहित्यिक कंपूत होतच असे. पुष्कळांना पुष्कळ वर्षे तो ब्राह्मण लेखक असावासें वाटे. पण नाथाने किंवा माझ्यासारख्या त्याच्या अनेक स्नेह्यांनी हे गुह्य फोडण्याचे पाप चुकून सुद्धा केल्याचे स्मरत नाही. नाथमाधवाला ब्राह्मण समजून त्याच्या पहिल्यापहिल्या कादम्बयांवर लांबलचक अभिप्राय देणाऱ्या काही पत्रकारांनी पुढे काही वर्षांनी त्याची जात उमगतांच, आपल्या अभिप्रायांची लाम्बी रुन्दी क्षयासारखी रोडावण्यास सुरुवात केली. एक गोष्ट मात्र सांगणे आवश्यक आहे की, आपल्या कादम्बऱ्या आपणच छापून प्रसिद्ध करण्याचा उपक्रम नाथाने केला नसता, तर मराठी साहित्याच्या द्वारपाळांनी नाथाची एक ओळसुद्धा प्रकाशात येऊ दिली नसती. नाथमाधवाचे प्रकाशक म्हणून जी मंडळी मागाहून पुढे आली, ती खुद्द नाथाने आपल्या खाच- लम्बी प्रकाशनाने लोकप्रियता मिळविल्यावर; आधी नव्हे. पब्लिशर्सनी नाथमाध- वाला उजेडात आणला नाही, नाथाने रेम्याडोक्या चोपड्याविक्यांना प्रकाशक म्हणून ढवळ्याचे पवळे केलें. साया पनवेलला एप्रिलफूल केलें ! इंग्लंडचा यूजिन सॅण्डो मुंबईला आला होता. त्याचे शकीचे प्रयोग आणि व्याख्याने मुंबईत धडाक्याने चालू होती. तो पुण्यास जाणार होता आणि तोही मोटरीने. त्या वेळी मोटर म्हणजे परब्रह्म । पाहण्यासाठी लोकांची केवढी आतुरता. तशांत मोटरीत बसून सॅण्डो पनवेलमार्गाने पुण्याला जाणार ! "येथे घटकाभर येण्याविषयी सॅण्डोला मी पत्र लिहिले आहे." असें नाथानी मला सांगितले होते. खऱ्याखोट्याची चौकशी मी केली नाही. एके दिवशी दुपारी ३ च्या सुमारास नाथाचा एक पोयनोकर (मोठा चलाख नि बेरकी होता) मला एक चिठ्ठी देऊन झटकन् निघून गेला. “आत्ताच स्पेशल स्टीम लाँचनें यूजिन सॅण्डो येथे बंगल्यांत आले आहेत. अर्धा तास फक्त मुकाम आहे. मित्रमंडळीसह ताबडतोब यावें." अशाच चिठ्ठया गावांतील आणखी ९।१० जणांकडे पाठविल्या होत्या. चिठ्ठी मिळतांच मी धावतच निघालो. वाटेंत शाळें- तल्या हेडमास्तरांना बातमी दिली. त्यांनी गजर वाजवून मुलांना सॅण्डो पहाण्या- साठी बागेकडे जाण्याची आज्ञा केली; आणि सगळ्या मास्तरांना बरोबर घेऊन तेही निघाले. जो वाटेंत मेटेल त्याला वर्दी देत मी बागेत पोहोंचलों; पाहतों तों तिथे कोणीच नाही. “काय रे नाथा, सॅण्डो कुठं आहे ?" -आज तारीख कोणती?-तो. -एप्रिल पहिली. मग?-मी. -मग तुम्ही सारे एप्रिलफूलच नव्हत का?-तो. अरे शहाण्या, मी साऱ्या गांवांत ही बोंब केली, सारा गांव इथं आता कोसळेल. त्याची काय वाट?-मी. -वाट धरावी घरची. आधीं तूं एका कागदावर "एप्रिलफूल आहांत तुम्ही" अशी ठळक अक्षरांची पाटी करून लाव या दरवाजावर. पुढचे पुढे-तो. ६ मी तसी पाटी करून लावली. झाले. शाळेतली मुलेमुली, गावांतले निमंत्रित पाहुणे, बरोबर आणखी १५०-२०० इतर-सगळा गांव आला बागेत ! कुठं आहे सॅण्डो? कुठं आहे सॅण्डो? अशा आरोळ्या चालू झाल्या. नाचणीच्या पेटीत गाडलेला नाथ प्रत्येकाला हसतहसत सांगे, "तो पहा दरवाजावर टांगला आहे! एप्रिलफूलची कल्पना पनवेलकरांसारख्या खेडवळांना कुठली ?-आणि मला तरी कुठली? पण ती आम्हां सगळ्यांना नाथांनी अशी कांहीं ठसठशीत शिकवली, की ती आमरण स्मरणांतून जाणार नाही. शेंकडों आठवणींपैकी या थोड्याशा आठवणी माझ्या दिवंगत दिल्दार नाथाच्या समाधीवर पुष्पांजली म्हणून मी वाहत आहे. नाथांचे समग्र चरित्र लिहिण्याचा योग आला, तर मला पुष्कळच लिहितां येईल; तथापि सध्या त्रोटक आठवणीच का होत ना, मधून मधून कोठे ना कोठें प्रकाशित करीन, एवढेच सांगून, या पुष्पांजलीचा आग्रह करणारे श्री. आप्पाराव कुळकर्णी या माझ्या सहकारी मित्राचे आभार मानून मी इतर कार्याकडे वळतो. तरुणांस स्वावलंबनाचा संदेश "नाथमाधव हे कादंबरीकार तर होतेच; परंतु इतिहासकार या नात्यानेही त्यानी उत्कृष्ट कामगिरी बजाविली यांत शंका नाही. मनरंजनाबरोबरच इतिहासाच्या खऱ्या ज्ञानाने महाराष्ट्रीयांची मनें सुसंस्कृत करणे हेच ध्येय त्यानी आपल्या पुढे ठेविलें होतें. ते स्वतः पंगू होते; परंतु अखिल राष्ट्रातील तरुणांनी आपापल्या पायांवर उमे राहून राष्ट्रोद्धाराचे कार्य करण्यास पुढे यावे, हीच त्यांची सदैव इच्छा होती." १९२८ -प्रो. शिवरामपंत परांजपे नाथांची लढाऊ वृत्ति [९] ( लेखकः-श्री. पी. आर. लेले, बी. ए., एल्एल्. बी.) कै. तात्यासाहेब कोल्हटकर व नाथमाधव सन १९५२ च्या नाताळमधली गोष्ट. कै. तात्यासाहेब कोल्हटकर खामगांवाहून 'वधूपरीक्षा' नाटक लिहिण्यासाठी मुंबईस आले होते. 'वधूपरीक्षा' नाटक कोल्हट- करांनी माझ्याच बि-हाडी राहून लिहिले. नाटक लिहून पुरे झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तात्यासाहेबांनी नाथमाधवांना भेटावयाचे ठरविले होते. त्याप्रमाणे स्नान वगैरे आटोपल्याबरोबर आम्ही माझ्या प्रिन्सेस स्ट्रीटवरील बि-हाडांतून बाहेर पडलों, आणि व्हिक्टोरियांत बसून नाथमाधवांच्या निवासस्थानापर्यंत गेलों. वेळ सकाळची साडेआठ आणि नऊच्या दरम्यानची होती. तोपर्यंत मी नाथ- माधवांना कधीही पाहिलेले नव्हते. त्यामुळे कोल्हटकरांच्या बरोबर मीही नाथ- माधवांच्या भेटीला गेलो. आम्हीं खोलीत पोहोचल्यावर नाथमाधव कोल्हटकरांना पाहतांच त्यांचे स्वागत करण्यासाठी जणू काय उठताहेत असेंच मला वाटले. नाथमाधवांच्या शारीरिक व्यंगाबद्दल मला तोपर्यंत माहिती नव्हती. तात्यासाहेबांना ती माहिती असली पाहिजे. त्यांनी झटकन पुढे जाऊन खुर्चीवर बसलेल्या नाथमाधवांचा हात धरला आणि नंतर एका खुर्चीत तात्यासाहेब बसले. खोलीत पसरलेल्या प्रशस्त बैठकीवर मी बसलो. या वेळी मला प्रथम समजलें, की नाथमाधव पायानें अधु झालेले होते. हे घर म्हणजे गिरगांव बॅकरोड आणि कांदेवाडी एकमेकांना ज्या ठिकाणी मिळतात, तेथे असलेला पितळ्यांचा बंगला होय. हा बंगला जुन्या पद्धतीचा असून, त्या बंगल्यासभोवती हल्ली दुर्मिळ झालेलें असें उद्यान आहे. नाथमाधन या घरांत पहिल्या मजल्यावर आपल्या लेखनाच्या खोलीत बसलेले होते. त्यांची खुर्ची डॉक्टरच्या खुर्चीसारखी फिरती (Revolving) होती. असली खुर्चीसुद्ध वापरण्याचे कारण त्यांच्या पायांचे व्यंगच असले पाहिजे.
त्यांच्या चेहऱ्यावर पाहता ते सुदृढ प्रकृतीचे दिसत होते. ते मोकळ्या वृत्तीने स्पष्ट आवाजात-जरा मोठ्याने म्हटले तरी चालेल, बोलत होते. त्यांचा बोलण्याचा त्या वेळचा विषय कोणत्याही विशिष्ट वरूपाचा नव्हता. आंत गेल्यापासूनच मला नाथमाधव कौतुकाने पाहण्याची एक व्यक्ति होऊन बसले होते. कोल्हटकर त्या कालांत मुंबईस आले म्हणजे आपल्या परिचित मित्रांना भेटण्याचा-अर्थात् सवडीप्रमाणे-प्रयत्न करीत असत. त्यांतून नाथमाधवांना बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे त्यांना भेटणे हे कोल्हटकरांना एक अगत्याचे कर्तव्य वाटणे साहजिक होते. दोघांमध्ये चाललेल्या गोष्टी सर्वसाधारण प्रतीच्याच होत्या. विषय मात्र बहुतेक वायासंबंधीचेच येत होते. नाथमाधवांस पाहून काय वाटलें ? नाथमाधवांना पाहून मला जे वाटलें तें या ठिकाणी मला सांगावयाचे आहे. मी प्रथमतः जरासा आश्चर्यचकितच झालो होतो, ही गोष्ट नमूद केली पाहिजे. हळूहळू माझ्या मनावरचा आश्चर्याचा पगडा दूर होऊ लागला. मला स्वतःला संभाषणांत मुळीच भाग घ्यावयाचा नसल्यामुळे श्रोता आणि द्रष्टा या भूमिका एकाप्रपणे करता येत होत्या. त्या वेळी नाथमाधवांच्या व्यंगाचे कारण मला समजले नव्हतें तें कारण कळल्यानंतर माझ्या मनांत थोड्या निराळ्या कल्पना आल्या; पण प्रथमच्याच मेटीत माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्यांच्या पायांतल्या व्यंगामुळे त्यांची कल्पनाशक्ति आणि लेखनशक्ति पुष्कळशी वाढली असली पाहिजे. साधारणपणे आपला असा अनुभव आहे की, ज्या व्यक्तीचें एखादें इंद्रिय विशेष अधु असते त्या व्यक्तीची दुसरी इंद्रिये जास्त तीक्ष्ण होतात. या नियमाचे प्रत्यंतर १०1१५ मिनिटांच्या निरीक्षणाने नाथमाधवांच्या रूपाने मला मिळाले. यानंतर मला 'वधूपरीक्षा' नाटकासंबंधी काही कामानिमित्त यशवंतराव टिपणी- सांच्याकडे जावयाचे असल्यामुळे मी निघून गेलो. तात्यासाहेब कोल्हटकर नाथमाधवांशी बोलत बसले. योद्धा व लेखक यानंतर जवळजवळ पांच वर्षांनी पुण्याच्या बाळासाहेब घोरपड्यांकडून मला माघमाधवांची हकीकत समजली. ज्या काही गोष्टींचा प्रथमदर्शनी मला उलगडा होऊ शकला नव्हता, अशा गोष्टींचा उलगडा या माहितीमुळे झाला. नाथमाधवांनी मराठ्यांच्या मर्दुमकीच्या विषयावर अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. आपल्या हृदयांत असलेली लढाऊ वृत्ति शारीरिक सामर्थ्यामुळे हृदयांतल्या हृदयांतच दाबून ठेवावी लागली. कृतीच्या वरूपांत जिचे आविष्करण करता आले नाही, ती लढाऊ वृत्ति त्यांच्या कादंबऱ्यांतून ऐतिहासिक योख्यांचे वर्णन करतांना जनतेच्या दृष्टो- त्पत्तीस आली. प्रत्येक योद्धा चांगला लेखक असतोच असे नाही. त्याचप्रमाणे लढाईचे उत्तम वर्णन करणारा लेखक प्रत्यक्ष लढाईची वेळ आली तर लढेल किंवा नाही, हे सांगणे फार कठीण आहे; पण जो जात्या लढवय्या तो जर काही कारणाने लेखक झाला तर मात्र लढाईबद्दल, मर्दुमकीच्या कृत्याबद्दल अधिकारी वाणीने अत्यंत परिणाम- कारक असेंच वर्णन करील, अशी खात्री बाळगायला हरकत नाही. ज्याला याबद्दल पुरावा पाहिजे असेल, त्याच्यापुढे नाथमाधवांचेच उदाहरण ठेवतों. लढाऊ वृत्तीचा साठा लेखणीला तरवारीची उपमा देतात. नाथमाधवांच्या पुरती ही उपमा असामान्य अशा त-हेनें सार्थ झाली. ज्या हातात शत्रूच्या हृदयांतलें रक्त सांडणारी तलवार तळपावयाची त्या हातात नाथमाधवाना हृदयाला आकर्षण करणारी लेखणी धरावी लागली. जी कृति आपल्या हाताखालच्या सैन्यासह त्यांनी केली असती, ती अथवा तसली शौर्याची कृति आपल्या पूर्वज मराठ्यानी कशी केली याचे वर्णन आपल्या लेखणीने त्यांनी केले. कृतीच्या स्वरूपात लढण्याचा उत्साह निघून गेला मसल्यामुळे उत्साहाचा साठा जणू त्यांच्या हृदयांत तुंबून राहिला होता. प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन युद्धाचे डावपेंच करण्याची संधि न मिळाल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनाचहूंपुढेच निरनिराळे युद्धप्रसंग खेळवून त्यात आपल्या पूर्वज वीरांनी केलेले डावपेंच कल्पनेनेच पाहावे लागत असत. अशा त-हेनें वृद्धिंगत झालेल्या त्यांच्या कल्पनाशक्तीचा प्रभाव आपल्याला त्यांच्या कादंषात पाहा- वयास मिळतो. नाथमाधवांची लढाऊ वृत्ति त्यांच्या आयुष्यात स्पष्ट दिसत होती. शरीर दुबळें झालेले असूनही, ते केव्हाही मनाने डगमगले नाहीत, इतकेच नव्हे, तर त्यांचे पाय अधु झाले होते हे लक्षात घेता त्यांची शरीरप्रकृतीसुद्धा त्यांनी अतिशय चांगली ठेवली होती, असेंच कबूल करावे लागते. पायांत असलेल्या कमीपणाचा वचपा ८६ वरच्या भागाच्या सुदृढतेने त्यांनी भरून काढल्यामुळे त्यांच्या कल्पनेची आणि त्यांच्या छेसनव्यवसायी हातांची शक्ति जणू काय दुणावली होती. त्यांची आनंदी वृत्ति ही तर त्यांच्या लढाऊ वृत्तीची सर्वात उत्तम साक्ष होती. अत्युच प्रतीचा आदर बाळासाहेब घोरपड्यांकडून नाथमाधवांच्या अपघाताची हकीकत कळल्यानंतर सरासरी सहा महिन्यांनी नाथमाधवांना आणखी एकदा पाहण्याचा मला योग भाला होता. मुंबईस बॉम्बे थिएटरमध्ये आर्यावर्त नाटक मंडळी आपले खेळ करीत होती. रविवारी त्यांचा एक प्रयोग चाललेला असतांना कोणा तरी एका मित्राच्या खांद्यावर हात टाकून नाथमाधव स्टेजच्या बाजूच्या रिकाम्या जागेत आले. त्यांचे येणे अनपेक्षित होते. परंतु तसेंच निकडीचे काम असल्यामुळे आप्पा टिपणीसांच्या मेटीला ते आले होते. त्यांना आलेले पाहातांच टिपणीसांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी सखेद माफी मागितल्यासारखें केले. या वेळी नाथमाधव ज्या मोकळेपणाने हसले आणि त्यानंतर ज्या उल्हसित वृत्तीने ते बोलत होते, त्यामुळे त्यांच्या शारीरिक क्लेशाबद्दल इतरांना खेद वाटण्याचे काहीच कारण नाही असे वाटू लागले. विपद्ग्रस्त मनुष्य पाहून निघृण माणसालासुद्धा कळवळा येतो. साधारण माणसाला कळवळा येतोच येतो आणि तो आपली सहानुभूति दर्शविण्याचा प्रयत्न करतो. या सहानुभूतींत-इंग्रजीत ज्याला (Pity) म्हणतात आणि ज्याचें मराठीत आपण कीव असे भाषांतर करतो तिचा भाग असतो. मानी. माणसाला ही कीव शल्यासारखी बोचते. ज्या वेळी विपद्धस्त मनुष्य असामान्य धैर्याने आपत्ति सहन करतो आणि आपल्या वृत्तीने त्या आपत्तीचे अस्तित्वच झांकून टाकतो, त्या वेळी पाहणाराला स्वतःचीच लाज वाटते आणि मनांत कीव यायच्या- ऐवजी परमादराची भावना उत्पन्न होते. बॉम्बे थिएटरमध्ये त्या वेळी हजर अस- णाऱ्या दरेकाच्या मनाची अशीच स्थिति झाली असली पाहिजे. निदान माझ्या मनात तरी त्यांच्याबद्दल अत्युच्च प्रतीचा आदर त्या वेळी उत्पन्न झाला आणि त्यांना मी पाहण्याची ती शेवटली वेळ असल्यामुळे माझ्या मनांत तीच भावना आज- तागायत वसत आहे. .
नाथांचे कादंबरीलेखन (लेखकः- श्री. विठ्ठल पामन हडप) मनुष्याच्या आयुष्यात काही काही वेळा अशा आणीबाणीच्या (Crisis) येतात की, त्या वेळचे अनुभव त्या मनुष्याच्या मनावर जो ठसा उमटवून ठेव- तात, तो काही केल्या पुसला जात नाही. अशीच एक आणीबाणीची वेळ माझ्या वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या आयुष्यात आली होती; व त्यावेळी नाथांची व माझी मेट होऊन त्यांनी मला धीर, प्रोत्साहन -फार काय, द्रव्यसाहाय्यही हस्ते परहस्ते मिळवून दिले. ती वेळ मुंबई येथे मिरज-संस्थानाधिपतींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महा- राष्ट्र साहित्यसंमेलनाच्या सुमाराची होती. मी तेव्हा नुकताच एका वर्षापासून 'लेखक' होऊ लागलो होतो. दारिद्यामुळे व इतर अनेक अडचणींमुळे घरी राहण्याची देखील सोय नाही, म्हणून 'जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा' या न्यायाने मी जो घरून निघालों, तो प्रथम नाांकडेच यावयाचें कारण-आता कारण काय व कसे सांगू? ज्या वेळी आपणाला कोणी ओळखीत व मानीत नसते त्या वेळी थोरांनी आपणाला ओळखावें व मानावें असें कोणा महत्त्वाकांक्षी माणसाला वाटत नाही ? पोरसवदा लेखक या नात्याने मलाही तेव्हा तसे वाटे. म्हणून मी 'लेखक' आहे या बळावर तेव्हां ज्या काही थोर लोकांशी ओळख करण्याचा प्रयत्न पत्रद्वारे केला, त्यांपैकी किती थोरांच्या थोरवीचे दिसावयाला ढबदार दिस- णारे ढब्बू, माणुसकीच्या नाणेबाजारांत चालवून पाहता शिवराई निघाले, ते कटुसत्य इथे कशाला बोलू ? सुवर्णाचे तुकडे असे तेव्हां दोनच हाती लागले. पैकी एक नाथ, आणि दुसरे 'खामी रामतीर्थ' कर्ते कै. भास्कर विष्णु फडके. हैं कौतुकाने येथे सांगण्याचे कारण, माझी आणि वरील दोघांही महाभागांची ओळख, मी एक मध्यम वयाचा व बायकोमुलांचा संसार हाकणारा लेखक आहे अची पत्राने मीच त्यांना करून दिली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी पत्रांतून ८८ एकदम एवढा मोठा संसारी माणूस बनण्याचे कारण, त्यापूर्वी मी आणखी काही जाच्या लेखकांकडून ओळखीची अपेक्षा केली असता, व त्यांनी माझ्या पोरसवदा लेखनकमालीचे कौतुक करावे अशी माझी अपेक्षा असता, माझा पोरपणा माझ्या हेटाळणीला कारण झाला होता. म्हणून मी नाथांशी परिचय करतांना पत्रद्वारा मध्यम वयाचा गृहस्थ बनलों आणि गृहस्थ संसाराशिवाय आहे असे समजताच लोक हंसतील या अंगच्याच भीतीने मी पत्रद्वारा बायकोमुलांचा संसार थाटला. पण पुढें प्रत्यक्ष भेट झाली, तेव्हा माझ्या पोरपणांतील लेखनजिज्ञासेचे पत्रांतल्या- पेक्षाही अधिक कौतुक करणारे व मला हात देणारे नाथ हेच पहिले महाभाग ! असे असूनही नाथांपासून मी वाङ्मयविषयक असा कोणताच गुण उचलला नाही, आणि माझ्या वाड्मयावर भलेबुरे जे काय असेल, त्यावर नाथांची छाया पडलेली नाही, याला कारणे माझी अनुकरणाविषयीं अप्रीति. आम्हा दोघांच्या खभाषांतील भिन्नता, आणि अगदी प्रथमच मला जगांत दुर्मिळ वाटणाऱ्या माणुस- कीचा नाथांच्या ठायीं झालेला नितान्तरम्य साक्षात्कार, ही होत. मौज पाहा ! ते जितके प्रेमळ तितकाच मी तुसडा. ते महासागराप्रमाणे शांत व मी धगधगणाऱ्या अमीप्रमाणे तामसी. वय पाहता पितापुत्राचे नातें शोभावें इतका आम्हा दोघांच्या वयांत फरक. मला तेव्हां गुरु नको होता, तर जिव्हा- ब्याचा आसरा पाहिजे होता. तो आसरा मला नाथांत इतका अमूप मिळाला की, या कुबेराचा आसरा मिळाल्यावर कोरान्नावर मी पोट का म्हणून भरावें ? माणुसकी हीच कुबेरसंपदा होय, व विद्वत्ता, कलानिपुणता वगैरे त्या कुबेराकडून इतरांना मिळणारें कोरान होय, असेंच मी समजतो. असले कुबेर घरोघर मेटत नसतात. नाथांच्या कोमल व हलुवार मनाची एक साक्ष म्हणजे त्यांची 'दैवाचे खेळ' कादंबरी होय. सदर कादंबरीला अनुसरून मी म्हणतों, नाथांचे पूर्वोक्त 'पात्रिक ऋण माझ्या कातच्याचे जोडे करून नाथांच्या पायांत घालण्याने देखील जरी फिटण्यासारखे नव्हते, आणि मीही जरी ते ऋण फेडण्याची धास्ती कधी बाळगली नाही, तरी मला नकळत तें ऋण निमित्तमात्र रूपाने अप्रत्यक्ष अत्यल्पांशाने तरी फिटलें, असा डौल तरी मी डौलाने मिरवतो. 'देवाचे खेळ' या कादंबरीची प्रेरणा नाथांना मुख्यतः माझी साहित्याच्या निबिड अरण्यांत तेव्हा 'प्रकाशक या जातीच्या हिंस प्राण्याकडून होत असलेली नानाविध छळणूक पाहूनच झाली..
खतःच्या अंतरींची दुःखें ओकून हायसें म्हणावयाला मला निदान १९२० साला- पावेतों तरी नाथांच्या घराखेरीज समव्यवसायित्त्वाच्या दृष्टीने दुसरी जागा नव्हती. तेव्हां मी नाथांपाशी गायिलेल्या रडकथांनी त्यांचे मन किती दुःखी होत असे, ते त्यांचे ते जाणोत. त्यांच्याइतका प्रेमळपणा माझ्याठायीं नसल्याने मला ती कल्पना करता येणार नाही. पण ते माझे अनुभव नाथांना 'दैवाचे खेळ' सांगताना उपयोगी पडले. अमेरिकेतल्या गोऱ्या लोकांना निग्रोचे हाल हाल करण्यांत मौज वाटते, तशी मौज आजवर माझ्याशी प्रत्यक्ष थोडाफार परिचय असणारांनी व नसणारांनीही खतःच्या जन्मजात दुष्ट बुद्धीच्या प्रेरणेने माझा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे नाटक-कादंबऱ्यांतून माझी मनसोक्त विकृत निंदा करतांना अनेकांना वाटली आहे. त्याला अपवाद नाथ हे एकच होत. नाथ हे खरे कर्मयोगी होते. गीतेचा व इतर अध्यात्मग्रंथांचा नाथांचा व्यासंग सखोल होता; व गीतेंतील लोकमान्यप्रणीत कर्मयोग त्यांना फार प्रिय होता. म्हणूनच मी स्वतः गीताबोधाचा खरा चाहता नसतांही गीतेतील उत्तम व यथार्थ विशेषणानेच इथें नाथांना संबोधीत आहे. संसार असें रूढार्थाने आपण ज्याला म्हणतो, तो वैवाहिक संसार व परिवार नाथांच्या मागें नव्हता. ते आजन्म अविवाहित होते. प्रामाणिकपणे ब्रह्मचर्य पालन करण्याला अनुकूल अशी नाथांची मनोवृत्ति नीरस-शुष्क • मुळीच नव्हती. पण अकाली अपघातामुळे त्यांना विवाह करणे अनुचित वाटले असावें. अशा अतृप्त वासनांच्या आचेने करपलेल्या मनोवृत्तीचा माणूस इतका आनंदी, कर्मनिरत व आशावादी-विकासक्षम असू शकतो, ही गोष्ट सामान्य नव्हे. नाथ खतः संसारी नसले तरी अनेकांचे संसार सुखाचे होण्यासाठी अनेकदा अनेक प्रकारे ते झीज सोशीत असत. त्यांच्या त्या बैठकीच्या लहानशाच पण टापटिपीच्या व स्वच्छ खोलीत ज्या कोचावर व लोखंडी पलंगावर मोठमोठे नाम- वंत व मानवंत साहित्यिक येऊन नाथांशी मनमोकळेपणाने निरनिराळ्या विषयांवर चर्चा करतांना दिसत, तेथेच माझ्यासारखे 'कोणी तरी' बसून त्यांच्याशी गप्पा- गोष्टी करीत, तेथेच विडी-पान-तंबाकूसारखे साहित्यिकांच्या दृष्टीने हलके वाटणारे व्यवसाय करणारे लोकही नाथांकडून काहींना काही हितबोध घेण्यासाठी येऊन बसळेळे व नाथांशी अगदी खेळीमेळीने वागत असलेले दिसत. आणि ज्या नाथांना ९० मी एकाद्या गंभीर विषयावरील लेखनवाचन करतांना पाहिले आहे, त्यांनाच अशा गोरगरीब अथवा गरजू धंदेवाल्यांचे हिशेबठिशेब लिहून अथवा तपासून देतांनाही पाहिले आहे. 'To be great is to be misunderstood' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. तिला अनुसरून नाथांच्या या थोर समवृत्तीचा विपर्यासही झालेला एकदोनदा माझ्या निदर्शनाला आलेला आहे. नेहमीं नाथांच्या बैठकीत बसणाऱ्या व त्यांच्या स्वभावाचा पूर्ण परिचय असलेल्या एकदोघी जबाबदार लोकांकडून मी मशाही शंका ऐकल्या आहेत की, ह्या धंद्यात नाथांची भागीदारी तर नसेल ना ? अर्थात् असल्या कुत्सित शंका नाथांसारख्या थोर साहित्यसेवकाविषयी साहित्यि- कांखेरीज दुसरे कोण घेणार ? याहीपेक्षा नाथांच्या कर्मयोगाचे उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या बंधूंच्या हयातीत व पश्चात् देखील त्याच्या परिवारासाठी सोसलेले कष्ट होत. नाथांच्या हयातीत त्यांचे बंधु कालवश झाले, व त्यांची पत्नी आणि चार पांच मुले यांच्या प्रतिपालनाचा भार नार्थावर पडला. शरीराने नाथ दुबळे, वस्ती मुंबईच्या खर्चिक मायानगरीतली, परिवार एवढा मोठा, आणि या सर्वांचा योगक्षेम केवळ लेखणीच्या जोरावर चालविण्याची पाळी जेव्हां नाथांवर आली, तेव्हां त्यांचे काय हाल झाले असतील व त्यांतही प्रकाश- कांनी आपल्या सर्वसामान्य शिरस्त्याला अनुसरून त्यांचे काय हाल केले असतील, याची कल्पनाच करावी. आणि अशा स्थितीत देखील स्वतःचे मन आनंदी राखून आपल्या चिंतेची सळ आपल्या परिवाराला व इष्टमित्रांना यत्किंचित् लागू द्यावयाची नाही, ही नाथांची वृत्ति पाहून काय वाटे, ते मी शब्दांनी कसे वर्णन करूं ? माझ्या जन्मजात स्वभावानुसार पुढे पुढे कादंबरी लेखनाविषयीं नार्थाशी माझे कधी कधी चांगलेच शब्दकलह होत. उदाहरणार्थ एकदा नाथांच्या टेबलावर मी त्यांच्या नवीन कादंबरीचा सांगाडा पाहिला. त्यांची कादंबरी लिहिण्याची पद्धत अशी असे की, ते प्रथम कथानकाचा प्रकरणवार सांगाडा लिहून काढीत. अर्थात् त्यासाठी त्यांना कथानकाचा स्थल-कालनिर्णय प्रथमच करावा लागे. प्रकरणांच्या सांगाड्या- बरोबरच त्यांचा त्याविषयींचा एक नकाशाही आगगाडीच्या मार्गाच्या नकाशासारखा रेखाटलेला समोर तयार असे. आणि गुलाबाच्या लगद्यात साखर वगैरे मिसळून व्यापारी मागाहून गुलकंद तयार करतात तशी वर्णने व संभाषणे यांची मुळच्या भाराखड्याला जोड देऊन ते कादंबरी लिहून काढीत. अशाने कादंबरी बांधेसूद तयार होते, असें नाथ म्हणत; व कादंबरीच्या तंत्राचे साचे करणारे साहित्त्यशास्त्रीहि बहुतेक असेंच म्हणतात. पण माझा या पद्धतीवर विश्वास नव्हता व नाही. म्हणून मी त्या दिवशी तो नाथांचा कादंबरीचा सांगाडा पाहून त्यांना विचारले, “नाथ,. आता यांत फक्त पेंढा भरावयाचा तेवढा शिल्लक आहे ना?" "म्हणजे?" त्यांनी मला हसून विचारले. रागावणे त्यांना सहसा माहीतच नव्हते; आणि माझ्या बाबतीत रागावून काही उपयोग होणार नाही, हेही त्यांना माहीत होते. मी नाथांना म्हणालों, “अशा सांगाडेवजा लेखनांत पेंढाच भरता येईल. जीवन कसे उत्पन्न करता येईल ?" यावर नाथ म्हणाले, "कादंबरी हा कल्पनेचाच खेळ असतो ना? कल्पनेने असे सुसंगत कथानक आपणाला सुलभपणे निश्चित करता येते.' पण मला ते पटले नाही. मी म्हणालों, “समजा, मी उद्या एखाद्या सभेत भाषण करावयाला निघालों. भाषणाची सर्व तयारी केली, आणि वर्तमानपत्राला देण्यासाठी त्याचा अहवालही लिहून बातमीदाराकडे आगाऊ दिला; पण मी सभागृहाकडे जाता जाता मला मोटारचा अपघात झाला तर ? अथवा माझें भाषण माझ्या सभत माझ्या विरोधकांनी होऊच दिले नाही तर ?" तो दिवस लोकमान्य टिळक वारल्यानंतर दोन तीन आठवड्यांनंतरचा होता. कै. अच्युतराव कोल्हटकरांनी लोकमान्यांच्या निधनानिमित्त शांतारामाच्या चाळीत भरलेल्या सभेत भक्तिभावाने भाषण करण्याची सदिच्छा दर्शविली असतां पूर्वग्रहदूषित अशा लोकमान्यांच्या काही अंधभक्तांनी कै. कोल्हटकरांविरुद्ध तेव्हा इतका गिल्ला केला की, अखेर मौ० शौकतअल्टींनी कोल्हटकरांना आपल्या गजदेहाने सांवरलें. व मोटारीत आणून बसविलें, म्हणून अपघात टळला. (तेव्हां त्या अंधभक्तांच्या विडखोर मूर्खपणांत माझाही वाटा होता. माझ्या 'लोकशाही' पत्राचा पहिला अंक त्याच दिवशी म्हणजे लोकमान्यांच्या निधनाच्या नवव्या दिवशी त्या समेच्या वेळीच प्रसिद्ध झाला होता, व त्यांत अच्युतरावांविरुद्ध लोकांना चिथावणी मिळेल, असा बराच जळजळीत मजकूर मी भावनावशतेच्या भरात लिहिला होता. ही माझी चूक म्हणून मी येथे ओघानें कबूल करीत आहे.) तें अच्युतरावांचे उदाहरण देऊन मी नाथांना विचारले, "अच्युतरावांची जाज्वल्य टिळकभक्ति व ओघवान् वक्तृत्त्व ध्यानी घेऊन आपण जर त्यांच्या त्या सभेतील भाषणाच्या परिणामाची कल्पना केली असती, तर ती प्रत्यक्ष अनुभवाने किती खोटी ठरली असती ?" "यावरून तुला सिद्ध तरी काय करावयाचे आहे ?" नाथांनी मला विचारले. मी लेखक झाल्यापासून माझ्याशी अरेतुरेच्या आपुलकीच्या भाषेने बोलणारे नाथ हेच माझे एकुलते एक गुरुतुल्य हितेच्छु होते. मी नाथांना म्हटले, "कथानकाची स्वाभाविक व परिणामकारक प्रगति जर व्हावयाची, तर एक प्रकरण पूर्ण लिहून झाल्यावर त्यांतील पात्रांची व प्रसंगांची जी काय रचना झाली असेल, त्या धोरणाने पुढील प्रकरण मगच आंखतां अथवा लिहिता येते. तेथवरचा टप्पा गांठल्याखेरीज पुढील मार्ग आपणाला कसा दिसणार ? कादंबरी हा कल्पनेचा खेळ खरा; पण कल्पना, आणि कल्पनाविकासांतून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष घटना यांत अंतर कधीच पडत नाही का ?" माझ्या संभाषणाचा रोख असा होता की, आपणाला आपल्या रोजच्या प्रत्यक्ष सायुष्यात देखील भविष्यकाळ जर निश्चित ओळखतां येत नाही, तर काल्पनिक कथानकांतील पात्रांचा भविष्यकाळ ती पात्रं कथानकाच्या ओघाने त्या प्रत्यक्ष स्थितीच्या जवळ जवळ जाऊन पोहोंचेपावेतों कसा ओळखता येईल ? असें म्हणून मी तेव्हा नाथांच्या लेखनशैलीला ठोकळेशाहीची लेखनशैली म्हणून समक्ष पुष्कळच नांवें ठेवली. कोणताही सात्त्विक वृत्तीचा व सहृदय मनुष्य सहसा वादविवादकुशल नसतो. नाथही वादविवादकुशल नव्हते. ते गुणप्रधान वृत्तीचे होते, व मी बुद्धिप्रधान मृत्तीचा आहे - असे तेही म्हणत. त्यामुळे त्यांनी तेव्हां माझें मन वादविवादाने दुखविले नाही. ते तेव्हां एवढेच म्हणाले, “माझी ही कादंबरी पुरी लिहून झाल्यावर तूं वाचून पाहा, आणि मग आपण या विषयावर बोलू." नाथांची ती कादंबरी कोणती हे मला आतां नकी आठवत नाही, व ती वाचून तिच्यावर वादविवाद करण्याची वेळही पुढे आली नाही; परंतु भावनावशतेच्या भरात आधी कटु सत्य बोलून जावयाचे व मागाहून पस्तावत बसावयाचें, या माझ्या नेहमीच्या वृत्तीनुसार मी बिहाडी गेल्यावर माझी आवडती अशी नाथांची “विहंगद' कादंबरी वाचून पाहिली, व विच्यांत जेव्हा मला ठोकळेबाजीचा मागमूसही सांपडला नाही, तेव्हा मी मनांतल्यामनांत कबूलही केले की, निर्विकार अशा विचारी वृत्तीने कुशल कल्पक कादंबरीकार जर कथानकांतील पात्रांचा व प्रसंगांचा अखेरपावेतों विचार करू लागला, तर तो आपल्या आंगच्या द्रष्टेपणाच्या जोरावर अचूक अनुमाने काढू शकतो. इतकेच काय, पण कल्पनाशक्तीचा व प्रति- मेचा खरा विलास तेथे हटकून प्रत्ययाला येतो. हे मी नाथांपाशी मग कबूल करून त्यांची क्षमा मागितली, तेव्हा ते हसून मला म्हणाले, “हे मला माहितच होते. म्हणूनच तुझ्या अभिनिवेशात्मक संभाषणाचे कोटे मला बोंचले नाहीत. कादंबरी व शास्त्रीय विषय समाज जर कादंबऱ्याच वाचतो तर ह्या कांदबांतून निरनिराळे शास्त्रीय विषय प्रतिपादन करून समाजाची करमणूक करता करता त्या कादंबऱ्यांतूनच त्यांच्याकडून शास्त्रीय विषय वाचवून घ्यावा. करमणुकी बरोबर ज्ञानलाभ करून देणारी कादंबरी वाड्मयांत केव्हाही उच्च समजली जाईल. आज जर समाजाचा कल कादंबऱ्या वाचण्याकडे आहे, तर जबाबदार लेखकांनी आपल्या आवडीचा विषय सुंदरशा कथानकांत गोवून कादंबरीच्या रूपाने जर तो समाजापुढे ठेविला तर किती तरी फायदा होणार आहे. समाज शास्त्रीय ग्रंथ वाचण्यास जर खुषी नाही, तर एकादा जाणता चाणाक्ष वैद्य ज्याप्रमाणे कडू औषधाला साखरेचें पूट देऊन हट्टी रोग्याला ते औषध खाववितो, त्याचप्रमाणे शास्त्रीय विषय कादंबरी- रूपाने समाजास वाचण्यास लाविले पाहिजेत. १९२० -नाथमाधव लेखक व प्रकाशक यांचे संबंध [११] (लेखकः- श्री. गणेश महादेव वीरकर) कै. नाथमाधव यांचा व माझा प्रत्यक्ष परिचय असा १९१८ साली झाला. त्या सुमारास नाट्यकलेची सेवा व कै. अच्युतराव कोल्हटकरांची भीड यामुळे नारिंगी निशाण या खेळाचे पुण्यामुंबईत जे प्रयोग झाले त्यांत त्यांनी थोरल्या बाजीरावांची भूमिका यशस्वी रीतीने करून दाखविली. त्यांचे पाय अधु होते, यास्तव त्यांना सोईचे असें बैठेच काम देण्यात आले होते. त्यांची अस्खलित वाणी व आवेश यामुळे प्रेक्षकांचे मन ते सहज आकषून घेत. उत्कृष्ट कादंबरीकार उत्कृष्ट नट हा त्यांचा विशेष नव्हता. नाथमाधवांचा विशेष म्हणजे ते उत्कृष्ट कादंबरीकार होते. हाच त्यांचा गुणविशेष मजसारख्या प्रकाशकास त्यांचा संबंध जोडण्यास व तो दृढ करण्यास कारणीभूत झाला. प्रथम मी कै. शि. म. परांजपे व कै. सी. के. दामले अशांसारख्या लेखकांची पुस्तकें मिळविण्याची खटपट केली. या मंडळीचे लिखाण मिळण्याचे काम रेंगाळत गेलें. व मला तर प्रकाशनाच्या धंद्यास सुरवात करण्याची अत्यंत जरूरी होती. अशा स्थितीत मी कै. नाथमाधवांपाशी विचारविनियम केला. ताज्या दमाचा आतुर प्रकाशक पाहून त्यांनी माझ्या गळ्यांत सहज एखादें चोपडे बांधलें असतें. परंतु त्यांना प्रकाशनाचा व त्यांतील मुक्या माराचा भरपूर अनुभव इतरत्र पूर्वीच आलेला असल्याने त्यांनी मला या व्यवसायांतील अडचणींची जाणीव करून देऊन उदाहरणादाखल एका प्रकाशकाचे मेसूर चित्र मजपुढे ठेवले. परंतु अडचणी पत्क- रूनही याच धंद्यांत पडण्याचा माझा निश्चय पाहून "स्वराज्याचा श्रीगणेशा" ही पहिली ऐतिहासिक कादंबरी त्यांनी मला लिहून देऊन माझ्या धंद्याचा श्रीगणेशा केला.
अधिकांत अधिक मोबदला नाथमाधवांनी सुरवातीस जागृत केल्याप्रमाणे आजतागायत माझ्या प्रकाश- नाचा क्रम खडतर असाच चालू आहे. अडचण एकाच स्वरूपाची नसते. खराज्यावरील ज्या त्यांच्या सात कादंबऱ्या मी प्रसिद्ध केल्या, त्या सुमारे तीसपर्यंत लिहिण्याचा त्यांचा संकल्प होता. ज्या सात कादंबऱ्या ते लिहूं शकले तेवढ्यानेही त्यांच्या लौकिकांत विशेष भर पडल्याचे आज दिसत आहे. त्यांपैकी सुरवातीचीच "श्रीगणेशा" कादंबरी निघाल्यावर माझ्यावरील त्या वेळच्या एका विशिष्ट अडचणीने ती खपते कशी व ही माला सुरळीत चालते कशी, हा प्रश्न उभा राहिला; परंतु पुस्तकाच्या गुणामुळे म्हणा, अगर त्यांच्या व माझ्या योगा- योगाने म्हणा, त्या अडचणींतून ही माला पार पडून यशस्वी ठरली. ज्ञानकोशांत नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रांतील आजवरच्या नामाकित कादंबरी- कारांत अधिकांत अधिक प्रथमच एक रकमी मोबदला मिळण्याचा योग नाथमाध- वांनाच लाभला. लेखक व प्रकाशक यांचे परस्पर संबंध ग्रंथनिर्मितीचे काम यशस्वीप्रकारें व वाढतें चालू राहण्यास लेखन व प्रकाशन दोनही अंगें स्वतंत्रपणे विभागली जावीत असे त्यांना सदैव वाटे. आपल्या प्रका- शकाने इतर लेखकांची पुस्तकें ठरविल्यास तसेच आपल्या लेखकानें इतरांस पुस्तकें प्रकाशित करण्यास दिली तर परस्परांत साहजिकच कुरबुर होण्याचे प्रसंग येतात. नाथमाधव हे यापासून सर्वस्वी अलिप्त होते. त्यांच्या मी प्रसिद्ध केलेल्या सात कादंबऱ्यांच्या प्रकाशनाचे काम चालू असलेल्या मुदतीत त्यांनी जी ४.५ इतर पुस्तकें लिहिली, त्यांची सोय, मला सवड नाहीसे पाहून त्यांनी इतरत्र केली. रियासतकार श्री. गो. स. सरदेसाईंच्या त्या सुमारास ज्या दोन रियासती तयार होत्या, त्यांच्या प्रकाशनाचे काम करण्यास त्यांना कोणी तरी योग्य प्रकाशक हवा होता व म्हणून श्री. गोविंदरावजी सरदेसाई यांनी नाथमाधवांस पत्र लिहून अशा एकाद्या इसमाची चौकशी केली. तेव्हां लागोलाग माझी मेट होण्याची वाट न पाहता पत्रोत्तरी माझी शिफारस करून रियासतकारांसारख्या एका सुप्रसिद्ध लेखकाचा संबंध जोडण्याच्या कामी खटपट करून त्यानी आपला थोरपणा व्यक्त केला.
प्रकाशकाच्या गरजांची जाणीव प्रकाशन भरपूर, वक्तशीर व अधिक किफायतशीर होण्यास या धंद्यास छापखाना, तसेच एखादें घरचे नियतकालिक असणे इष्ट आहे. प्रकाशकांच्या अशा गरजांची जाणीव व कदर नाथमाधव बाळगीत असत. १९२२ च्या सुमारास गणेश महादेव आणि कंपनीच्या वाढत्या प्रकाशनाच्या वेळी छापखाना सुरू करतांना सुरवातीचे हजार रुपये, नाथमाधवांनी आपल्या एका स्नेह्यास देण्यास भाग पाडले. पुढे १९२५ साली 'चार आणे माला' काढतांनाही त्यांनी आपलेपणाने प्रोत्साहनपर सल्ला व सूचना दिल्या. कै. नाथमाधवांच्या चार चाहत्यांनी त्यांच्या 'आठवणी' प्रसिद्ध करून महाराष्ट्र- वाचकांच्या मनांतील कै. नाथमाधवांची आठवण ताजी ठेवण्याची योजना मुक्रर केल्यावर माझे जुने स्नेही व व्यवसायबंधु श्री. पु. बा. कुलकर्णी यांनी इतरांबरोबर मलाही आग्रह केला व त्यामुळे नाथमाधवांबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधि मिळाली, म्हणून मी आज प्रकाशकाचा "लेखक" होत आहे. जे काही लिहिले त्या 'आठवणी' ठरतील अगर त्या वाचनीय होतील की नाही, हा विचार न करता चार ओळी आठवल्या तशा लिहिल्या आहेत. खराष्ट्राकरितां झटण्यांत खरें मनुष्यपण थोरांच्या चरित्रांवरून असे दिसून येते की, आपल्याच्याने में कांहीं करवेल तें इतरांकरितां-खजनांकरितां-खराष्ट्राकरितां-मनुष्यजातीकरितां करणे यांतच काय तें खरें मनुष्यपण आहे. ते ज्या ज्या दिशांनी आमच्या साधुसंतांना करावयाचे साधलें, त्या त्या दिशांनी त्यानीं तें केले आहे. त्यानी आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वदेशोन- तीच्या कामी केला. तेव्हा ज्या जन्मभूमीमध्ये त्यांस हे महाज्ञान मिळाले होते, तिच्या उपकारऋणांतून ते मुक्त झाले आणि म्हणूनच त्यांची नावें आज चोहीकडे सारखी गाजत आहेत. -नाथमाधव सिंहगडाने धडा शिकविला [१२] (लेखकः-श्री. श्रीपाद केशव नाईक) श्री. द्वारकानाथ माधवराव पितळे यांचा जन्म मुंबईस झालेला होता. आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेंत यांचे काही शिक्षण झाले. तेथेच त्यांचा-माझा प्रथम परिचय झाला. ते विनोदी, उत्साही, हौशी व प्रेमळ होते. त्यांना क्रिकेटचा फार नाद असे. इतकेच नव्हे, तर त्यांत त्यांनी आपले नाव कमावले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कुलाब्यास गनकॅरेज फॅक्टरीत नोकरी पत्करली. नंतर सिंहगडावर वाघाची शिकार करीत असतां त्यांना झालेल्या भयंकर अपघाताची हकीकत सर्वांना माहीत आहेच. ते नेहमी म्हणत की, मम्माच्या बाराखडीतले मरणारे लोक मोठे असतात. कारण लो. टिळक यांचा मधुमेह तर आपल्याला मूळव्याध. त्यांना या दुखण्यांतून बरे होण्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागले, तरी ते त्यांतून निखालस बरे झाले नाहीत. मानवजीवित काय आहे हे सिंहगडाने शिकविलें, असे ते सांगत. ओळख पटली पुढे काही वर्षांनी मला नाथमाधव या सहीनें दादरहून एक पत्र आले. त्यांत आपल्या भेटीस यावे म्हणून लिहिले होते. त्याप्रमाणे मी गेलो आणि पाहातों तों द्वारकानाथ यांनाच 'नाथमाधव' हा कोण ? म्हणून विचारले. तेव्हा त्यांनी "ती व्यक्ति आपणच" म्हणून सांगितले. तेव्हां हे नाथमाधव पूर्वाश्रमींचे पितळे होत, हे मला कळलें. ते १९१२ साली मुंबईतल्या आर्यन एक्सेलसिअर लीगचे सभासद झाले आणि शेवटपर्यंत टिकले. याच साली दादर येथे त्यांच्यासमोर राहात असलेले श्री. बाळकृष्ण नानाजी कोपर्डे यांच्याशी त्यांची मैत्री जमली, याचे कारण कोपर्डे यांना गाण्याचा नाद होता व त्यांना ते ऐकण्याची आवड होती. त्यांनी १९०७ व १९०८ सालात पुष्कळ वाचन केले आणि नंतर वाय- क्षेत्रांत पाऊल टाकले. अण्णा किलोस्कर यांनी पनवेलीस ज्या जागेत 'रामराज्य- वियोग' नाटक लिहिले आणि 'सुटला पितृदिशेचा वारा' हे पद रचलें, त्याच जागेत त्यांच्या लेखनास प्रारंभ झाला. १९१७ साली लीगच्या 'हिंदु मिशनरी सोसायटी' सप्ताहांत भाग घेऊन त्यांनी आपलें अनुकूल मत प्रगट केले आणि "मिशनरी' नाव न घेतां "हिंदु सनातनधर्म- प्रसारक मंडळ' असे नाव सुचविले. यावरून त्यांच्यांत स्वभाषेविषयी किती अभि- मान होता हे दिसून येते. नाथांचे इतर छंद त्यांच्या लिखाणाचा परिणाम कोणावर कसा झाला हे पाहावयाचे झाल्यास आपल्याला दिसून येईल की, श्री. वि. धों. कुळकर्णी यांनी शाळेत विद्यार्थी असतांना 'रायक्लब अथवा सोनेरी टोळी' ही कादंबरी वाचली. त्या वेळी तिचा लेखक पंगु असेल ही कल्पना नव्हती. जेव्हा त्यांना ही गोष्ट कळली, तेव्हां त्यांना त्यांच्या- बद्दल विशेष कौतुक वाटू लागले. नंतर त्यांनी त्यांच्या इतरही कादंबऱ्या वाचल्या. नाथांना ज्योतिषाचा नाद असे. त्याचप्रमाणे जपजाप्यही माहीत होते. एकदा मिसेस् भांडारे यांनी आपल्या मुलीची पत्रिका त्यांच्यापुढे टाकिली. त्यांनी ती पाहून तिला मृत्यु आहे तो टाळण्यासाठी घरी जाऊन जप करावयास सांगितले. 'हे माझ्या पतीला पसंत पडणार नाही; म्हणून मला तसे करता येणार नाही,' असे तिने त्यांना सांगितले. तेव्हां ते त्या दिवशी सायंकाळी आपल्या घरी ध्यानाला बसले ते दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून उठले. अशा रीतीने त्यांनी तिचा अपमृत्यु टाळला. त्यांची 'श्रीनिवास' कादंबरी सरकारजमा झालेली होती, पण पुढे त्यांत थोडा फेरफार करून निराळ्या नांवाने प्रसिद्ध करण्याची त्यांना परवानगी मिळाली. त्यांनी १९२३ साली उपासनी महाराज यांचे चरित्र लिहिले, तें पैसे घेऊन दिलेल्या सामुग्रीला धरून लिहिले. त्यांत त्यांनी आपले मत व्यक्त केलेले नाही. ही गोष्ट मला माहीत आहे. कारण त्याच सुमारास लीगतर्फे त्यांच्या शेजारी हिराबागेत 'भोंदु बुवांचा संसार' हा सप्ताह सुरू होता. परिस्थितीला तोंड देऊन स्वराज्याच्या प्रभातसमयीं भूतकालचा उज्वल इतिहास दाखविणारा हा महाराष्ट्रलेखक आपल्या ४६ व्या वर्षी इहलोकची यात्रा संपवून १९२८ साली जून महिन्यांत निघून गेला. त्यांनी आपल्या रोजनिशा लिहून ठेवि- लेल्या असाव्या. त्या कामी न लावतां जशाच्या तशा प्रसिद्ध झाल्यास त्यांचे आत्मचरित्र कळून येईल. तोपर्यंत त्यांचे प्रसिद्ध झालेले वाय एकत्र करून ठेविल्यास तो संग्रह एक प्रकारे त्यांचे स्मारकच होणार आहे.
नाथमाधव व ग्रंथकर्तृत्व [१३] (लेखक-शेठ दामोदर सांवळाराम यंदे) कै. नाथमाधवांची व माझी पहिली मेट सन १९०७-८ साली झाली. 'श्री सयाजी- विजय' पत्राच्या ग्राहकांस दरसाल एका सुंदरशा ग्रंथाची भेट देण्याची आमची वहिवाट होती; व वेगवेगळ्या लेखकांकडून भेटीस देण्याकरितां पुस्तकें येत असत. त्यांत जे उत्तम ठरेल, त्याचे प्रकाशन करण्यात येत असे. त्या साली आम्हां- कडे वेगवेगळ्या लेखकांकडून बरीच पुस्तकें परीक्षणाकरितां आली होती. त्यांत कै. नाथमाधव यांची 'तरुण रजपुत सरदार' ही ऐतिहासिक कादंबरी पसंत करण्यांत आली; आणि त्यांची समक्ष भेट घेण्याकरितां कै. श्रीयुत पितळे यांजबरोबर त्यांच्या घरी जाण्याचा प्रथमच योग आला. प्रेमळ स्वभाव त्या वेळी ते कोचावर पद्मासनासारखें आसन करून बसलेले होते. ते पायाने भधू आहेत, ही कल्पनाही मनाला शिवली नाही. त्यांच्या कल्लेदार मिशा, टपोरे डोळे व भव्य चेहरा पाहून हे कोणी तरी लष्करी अंमलदार असावे, अशी माझी भावना झाली. परंतु त्यांजबरोबर बोलणे सुरू होतांच ते एक मार्मिक संशोधक व लेखक असल्याचे माझ्या प्रत्ययास आले. आमचा विषय 'तरुण रजपुत सरदार' ही कादं- बरी कोणत्या प्रसंगावर व कोणत्या इतिहासास अनुसरून लिहिली याचा खुलासा करावयाचा हा होता; व तो खुलासा त्यांनी अत्यंत समाधानकारक रीतीने केला. तो ऐकून आम्हांस समाधान वाटले. श्री. नाथमाधव यांचा इतिहासग्रंथांवरील व्यासंग चांगला असल्याचे पाहून मराठ्यांच्या इतिहासाला धरून शिवचरित्रावर एकादी कादंबरी लिहिण्याविषयी आम्ही त्या वेळी त्यांस सूचना केली, ती त्यांस फार आवडली आणि त्यांनी शिवकालीन चरित्रावर कादंबरी लिहिण्याचे काम हाती घेतलें. शिवचरित्रावर लिहिलेल्या त्यांच्या कादंबऱ्या किती लोकप्रिय झाल्या हे सर्वश्रुत आहेच. सारांश, त्या पहिल्या भेटीतच त्यांचा प्रेमळ स्वभाव, बहुश्रुतपणा, दांडगे १०० वाचन व शीघ्र लेखन यांचा अनुभव आला आणि त्यांचा चेहरा जसा लष्करी पाण्याचा-भव्य दिसतो, तसेच ते साहित्यकार्यांतही उत्तम कम्पाउंडर आहेत, अशी आमची खात्री झाली व मोठे कौतुक वाटले. कै. नाथमाधव व वक्तृत्व उत्तम लेखक असला तरी तो उत्तम वक्ता असतोच, असें फार क्वचित् आढळून बेते. परंतु कै. नाथमाधव यांच्या ठायीं हे दोन्ही गुण एकसमयावच्छेदेंकरून सारखेच सामावलेले होते. पायांच्या अधूपणामुळे सर्वच सार्वजनिक सभांत त्यांस भाग घेता येत नसे. परंतु साहित्यकार्याची सभा असली म्हणजे ते हजर राहण्याचा व साहित्यचर्चेत भाग घेण्याचा प्रयत्न करीत असत. एकदा त्यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्या वेळी त्यांची अस्खलित वाणी, भव्य आवाज व विषयप्रतिपादनाची शेली पाहून श्रोतृसमुदाय तल्लीन झालेला दिसून आला. त्यांची भाषा सरळ, साधी व सोपी असल्यामुळे ऐकणारांवर त्यांच्या भाषणाची छाप चांगलीच पडत असे. नाथमाधव आदरणीय कां वाटतात? "त्यांनी केवळ साठसत्तर कादंबऱ्या लिहिल्या म्हणून आम्हांस त्यांचेविषयीं बादर वाटत नव्हता; तर ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याची त्यांनी आपल्यामध्ये जी पात्रता आणिली होती ती खरोखर अत्यंत स्पृहणीय होती. विशेषसे शिक्षण न झालेला तरुण पायांनी लुळा झाल्यामुळे लेखनव्यवसाय करूं लागतो काय, व एकाहून एक सरस अशी ऐतिहासिक कथानके आधारभूत घेऊन सुंदर कादंबऱ्या प्रसवतो काय! सुप्तावस्थेत असलेली त्यांची कल्पकता पाय लुळे होतांच वाढीस लागली व तिच्या सहाय्यास स्फूर्ति येऊन भराभर ग्रंथरचना होऊ लागली ! इतका त्यांचे हातून उद्योग झाला, इतकी ग्रंथरचना झाली, पण त्यामुळे त्यांच्यावर अहंतेची सांवलीही पडली नाही." ता. १-७.१९२८ -सुबोधपत्रिका वंदनीय वाङ्मयसेवा [१४] (लेखकः-महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बी. ए.) 'हिंद एजन्सी'चे चालक रा. केतकर यांच्यामुळे माझा व नाथमाधव यांचा कांहीसा परिचय ते पुण्यास असतां घडला. त्या दुकानीं, आप्पा बळवंत चौकाशेजारी, जोगे- श्वरी नाक्याजवळ, आमच्या मधून मधून भेटी होत. नाथमाधव हे पायाने अधू झाले ते शिकारीच्या नादांत अपघात झाल्यामुळे झाले होते; आणि अशाही स्थितीत ते जबरा लेखनव्यवसाय करीत, हे पाहून मला त्यांच्याविषयी फार कौतुक वाटे ! ऐतिहासिक कादंबऱ्या लिहाव्या आणि अशा रीतीने मराठ्यांचा उज्वल इतिहास रम्य स्वरूपांत लोकांस चाखवावा, ही त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती; कदाचित् या कामी माझा उपयोग करून घेता येईल किंवा घ्यावा असा त्यांचा हेतु असावा; तथापि नाथमाधव अपंग, आणि मला काल्पनिक कथावाचयाची अंतरींची आवड नाही, यामुळे आमचा संबंध या दृष्टीने काही दृढ झाला नाही. कै. नाथमाधव यांनी सतत निष्ठेने मराठी वाड्मयाची सेवा आपल्या शारीरिक आपत्ति न जुमानता केली, ती खरोखरीच वंदनीय समजली पाहिजे, असे मला वाटते. नाथमाधवांचे अमरत्व "संकटांतून वाट काढून जीवितसाफल्य करून दाखविण्यासंबंधी अंतःकरणाची तळमळ असली म्हणजे कोणालाही पुढील उपाय सुचतो. विधिघटनेने पंगुत्व आले असतां दुःख करीत न बसतां पहिल्याइतक्याच जोमाने व आनंदाने शक्य तें काम करून नाथमाधवांनी जी मराठीची वाङ्मयसेवा केली ती राष्ट्राच्या कारणी रुजू आहे. नाथमाधव गेले, पण त्यांच्या कृती हयात आहेत. या दृष्टीने त्यांनी आपल्याला अमरत्व प्राप्त करून घेतले आहे. या त्यांच्या जीवनांतही एक उत्तम धडा आपणां सर्वांस त्यांनी शिकविला आहे. माणसाने संकटे आली असतां धीर सोडूं नये; होईल तें कर्तव्य करीत रहावें यांतच व्यक्तीचें व राष्ट्राचे कर्तव्य सिद्धीस जातें." १९५२-रियासतकार गो. स. सरदेसाई नाथमाधवांबद्दल मला काय वाटते? [१५] (लेखकः-श्री. ग. त्र्यं. माडखोलकर, नागपूर) नितांत आदर वाटतो, हे लिहावयाला नकोच. मला त्यांच्या वापयाबद्दल दहशत अशी फक्त एकदांच वाटली. १९१४ साली त्यांची 'वीरधवल' ही कादंबरी मी अगदी अधाशीपणाने वाचून टाकली. ती वाचीत असतांना तर मनाचा आणि शरीराचा थरकाप सारखा होतच होता; परंतु त्या रात्री मी खप्रांतूनही दोनतीनदां दचकून उठल्याचे आठवतें. काही लोक मला मराठीतील 'पहिला राजकीय कादंबरीकार' समजतात; परंतु माझ्या मते मी राजकीय कादंबरीकार नाही; व पहिला तर नाहीच नाही. कै. हरी- भाऊ आपटे यांच्या 'मी', 'यशवंतराव खरे', 'कर्मयोग' या राजकीय चर्चेनें युक्त असलेल्या कादंबऱ्या सोडल्या, तरी नाथमाधवांची सरकारजमा झालेली कादंबरी 'श्रीनिवासराव' ही राजकीय कादंबरी आहे; व ती आज लोकांपुढे नसल्यामुळेच लोक 'राजकीय कादंबरी' हा अगदी नवा कथाप्रकार समजतात. नाथमाधवांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'सांवळ्या तांडेल' ही कादंबरी. मराठीतील ही पहिली आरमारी कादंबरी आहे, असे म्हटल्यास ते चूक ठरणार नाही. हरीभाऊंच्या 'उषःकाल' में प्रथम 'सांवळ्या' मराठी वाचकवर्गापुढे आणला आणि तो अत्यंत लोकप्रियही झाला; परंतु नाथमाधवांनी त्या 'सांवळ्या' ला तांडेल बनवून आरमारी कादंबरीचे अगदी नवें सदर मराठीत निर्माण केलें, ही गोष्ट विसरून चालणार नाही. 'विमलेची ग्रहदशा' ही कादंबरीही अशीच विशेष उल्लेखनीय आहे. धर्मातरित हिंदु मुलींच्या दुर्दशेचे चित्र, मला वाटते, याच कादंबरीत प्रथम रेखाटलेले दिसते. त्यांच्या कादंबऱ्यांविषयी किंवा कथनकौशल्याविषयी विस्ताराने लिहिण्याची ही जागा नव्हे; परंतु रसाळ वर्णनें, सुगम भाषा, मार्मिक समाजचित्रण आणि राष्ट्रीय प्रश्नांविषयींचा जिव्हाळा, या गुणांमुळे त्यांच्या कादंबऱ्या सदैव गोडीने वाचल्या जातील, याबद्दल मला शंका वाटत नाही.
नाथमाधवांचा 'विहंगवृंद' [१६] (लेखकः-प्राध्यापक श्रीकृष्ण स. भावे, एम्. ए., एलएल्. बी., पीएच्.डी.) कै. नाथमाधव यांच्यासंबंधाने मी काहीतरी लिहावे, अशी सूचना मला मिळाली, त्या वेळी माझ्या मनांत १९१५ साली नाथमाधव यांची 'विहंगबुंद' ही कादंबरी मी प्रथम वाचली त्यावेळचा प्रसंग एकदम उभा राहिला. मला मराठी वाण्याची गोडी नुकतीच लागली होती आणि एकाद्या अधाशाप्रमाणे हाती लागेल ती गोष्ट व कादंबरी मी वाचून काढीत होतो. या अद्भुतरम्य वातावरणांत वावरतांना इतर सर्व गोष्टींचा विसर पडून शाळेचा अभ्यास करण्याचे राहिल्यामुळे पुष्कळदा मारही खाण्याचा प्रसंग आला होता; परंतु मनोहर आणि कान्ता यांचे काय झाले ते आणण्याच्या उत्सुकतेनें तो मार सहन करूनही मी पुन्हां विहंगवृंदांतच गुंगून गेलों. खरोखरच रस्किन म्हणतो त्याप्रमाणे ललित वाङ्मयाच्या पहिल्या पेल्याची निशा दारूच्या पेल्याहूनही और आहे. या निशेचें सुख नाथमाधवांची पुस्तके वाच- तांना मला मिळाले. 'वाचक हो' अशा संबोधनाने सुरू केलेल्या कादंबऱ्या लिहिण्यास आज कदाचित् लेखक धजावणार नाहीत; वाचक तर निश्चित वाचणार नाहीतच, नाहीत; परंतु अशा त-हेच्या संबोधनाने नाथमाधव वाचकाला अगदी आपल्या कह्यांत ओढतात व त्याची भरपूर करमणूक करून त्याला बोधामृतही पाजतात आणि तें वाचक आनंदाने पिण्यास कबूल होतो, यांतच त्यांच्या यशाचे मर्म सांठविलेले आहे. वाचक हो ! तो पहा विहंगबंद ! आणि ती पहा कान्ता ! ती आतां पूर्वीची हट्टी आणि हेकेखोर कांता राहिली नाही.” अशांसारखी त्यांची वाक्ये अजूनही आव- डतात. नाथमाधवांचें गद्य जिवंत असून अतिशय तळमळीने लिहिलेले आहे. भाषा १०४ तर कित्येक ठिकाणी अतिशय रेखीव आहे; आणि आपल्याला पटेल तो बोध समा- जाला देण्याला त्यांनी बिलकुल मागेपुढे पाहिलेले नाही! 'खराज्याचा श्रीगणेशा' वगैरे त्यांच्या कादंबऱ्या तर उत्कृष्टच आहेत. तथापि माझ्या मनाला ऐतिहासिक कादंबरीत तितकेंसें समरस होता येत नाही, त्यामुळे नाथमाधव हे नांव उच्चारल्याबरोबर माझ्या मनांत एकदम 'विहंगवृंद' च उभा राहातो. मला अशी खात्री वाटते की, मराठी ललित वाङ्मयाच्या इतिहासांत 'नाथमाधव' यांना एक विशिष्ट स्थान आहे आणि आजच्या चौखंदळ वाचकांनाही त्यांच्या कादंबऱ्यांतून मनोरंजन आणि मनोबोधन या दोहोंचाही उत्तम लाभ होईल. गुरुजींची भविष्यवाणी बहुतेक लोकांना आपल्या पुस्तकांतील दोष कोणी दाखविले तर ते आवडत नाहीत. त्याबद्दल त्यांची मर्जी खप्पा होते; इतकेच नव्हे तर द्वेषबुद्धि उत्पन्न होऊन कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने सूड उगविण्याचाही प्रयत्न होतो; परंतु कित्येक पुरुष फार थोर मनाचे असतात. त्यांना आपल्या ग्रंथांतील दोष पाहून त्याबद्दल विचार करावयास साधन झाल्याने उलट आनंदच होतो. अशा प्रकारचे उदार अंतःकरणाचे जे थोडेबहुत महाभाग आमच्या नजरेस आले, त्यांपैकींच श्री. नाथ- माधव हे एक होत. त्यांचा आमचा अत्यंत नेह आहे, व त्यांच्या १।२ ग्रंथांतील आम्ही जसे गुण तसेच दोषही दाखविले आहेत. त्यावरून कदाचित् त्यांच्या आमच्या मैत्रीस धक्का बसतो की काय अशीही भीति वाटत होती; परंतु त्यांनी आपल्या पत्रांत त्याबद्दल तिरस्कार व्यक्त केला नाहीं; एवढेच नव्हे तर उलट 'आपल्याकडून मला असेंच शिक्षण मिळेल अशी आशा आहे,' असे उद्गार काढले! इतकेच नव्हे तर त्यासोबत लगेच 'सांवळ्या तांडेल' हे पुस्तक परीक्षणाकरितां प्रेमपूर्वक मेट पाठविले. यावरून त्यांचे अंतःकरण किती निर्मळ आहे याची उत्तम साक्ष पटते. भशा निर्मळ व पवित्र अंतःकरणाच्या पुरुषास आपल्या कृतींत परिपूर्ण यश येण्याला परमेश्वराचा आशीर्वाद आहे असें खास समजावें; आणि त्यावरूनच नाथ- माधव हे लौकरच ग्रंथकर्त्यांमध्ये उच्च प्रतीची आगा पटकावून सत्कीर्तिमंदिरांत विराजमान होतील तसे मी खात्रीने म्हणतों. १९१० -'महाराष्ट्रभाषाचित्रमयूर श्री. कृ. ना. आठल्ये नाथमाधव व ध्येयदृष्टि [१७] ( लेखकः–प्राध्यापक कृ. र. पोतदार, एम्. ए.) एका व्यापक प्रश्नाचा संकुचित स्वरूपांत विचार करावयाचे या लेखांत योजिलें आहे. 'नाथमाधवांनी 'सोनेरी टोळी' सारखी डिटेक्टिव्ह कथा व 'वीरधवल' सारखी अद्भुतरम्य रूपांतरात्मक कादंबरी लिहिली म्हणून, 'सामान्यतः त्यांचे लेखन सामान्य वाचकांचे मनोरंजन करण्याच्या स्वरूपाचे होते; त्यांत विचाराची सखोलता किंवा ध्येयवादात्मक लेखनदृष्टि यांचा अभाव आहे' असे वरपांगी विचार व्यक्त केलेले कित्येकदा आपणांस ऐकू येतात. विशेषतः हरीभाऊ आपट्यांच्या नंतर कादं- बरीच्या क्षेत्रांत पदार्पण केल्यामुळे पुष्कळ टीकाकारांना हरीभाऊंच्या 'मी' सारख्या ध्येयवादी सामाजिक व 'उषःकाल' सारख्या ऐतिहासिक कादंबऱ्यांबरोबर नाथ- माधवांच्या सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्यांची तुलना करण्याचा मोह होतो व नंतर उपरिनिर्दिष्ट स्वरूपाचें वरपांगी विधान केले जातें. हरीभाऊ व नाथमाधव यांनी 'लेखन हेतुपूर्व असावें' या विचारसरणीच्या कालांत आपले वाङ्मय निर्माण केले. 'कलेकरितां कला', 'मनोरंजनाकरितां कला', 'प्रचाराकरितां कला' वगैरे वाङ्मयाचे ध्येयदृष्टिविषयक वाद त्या वेळी निर्माण झाले नव्हते, यामुळे वाड्मय हेतुपूर्व असते व असावें, या तत्त्वाच्या निकषावरच त्यांच्या लेखनसुवर्णाची परीक्षा करावयास हवी. दुर्दम्य आशावाद या दृष्टीने आपण नाथमाधवांच्या वाड्मयसंसाराकडे दृष्टिक्षेप केला तर आपणांस असे दिसून येईल की, जरी नाथमाधवांच्या वाङ्मयाने शंभर टक्के मनोरंजन होत असले, तरी केवळ निर्भेळ मनोरंजनाकरिता त्यांनी लेखन केलें नाहीं खास ! त्यांचे लेखन एवढे हेतुशून्य असू शकेल का, या प्रश्नाच्या विचाराकरितां त्यांच्या जीवनाकडे एक दृष्टिक्षेप टाका ! आपणांस असे आढळून येईल की, त्यांचे जीवन जीविताशी झग- डण्यांत गेले. जीवितामध्ये निराशा-केवळ निराशा वाट्यास आली असतांही त्यांनी था निराशेची अंधुकशी कृष्णछायाही आपल्या लेखनावर पडू दिली नाही. यांतच सर्वखाने त्यांच्या जीवनाचें व लेखनाचे वैशिष्ट्य दिसून येते. जीवनामध्ये इतक्या दुर्दम्य आशावादाचा ज्याने अवलंब केला त्याचे लेखन हेतुशून्य असूच शकणार नाही. यांच्या पार्थिव देहाकडे एक कटाक्ष टाका ! अर्धशरीर पंगु झालेलें, पण जणू काय यामुळेच त्या शरीरार्धातील सामर्थ्य उर्वरित शरीरविभागांत दुणावले होते. त्यांची भव्य व प्रथमदर्शनी प्रेक्षकांवर छाप पाडणारी शरीरयष्टि, तारुण्यकालाचा अनुभव घेण्यापूर्वीच आलेल्या पंगुत्वामुळे जणूं अप्रतिहतपणे दृग्गोचर होणारा बाल्यसुलभ असा मुद्रेवरील निरागस भाव, या गोष्टी ध्यानात घेतल्यास वर निर्दिष्ट केल्यासारखा वरपांगी विचार व्यक्त करण्यापूर्वी कोणीही टीकाकार क्षणभर आपल्या लेखणीस विराम देईल. इतकेच नव्हे, तर नाथमाधवांच्या वाड्मयाचा आपण त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने विचार केला आहे का, असा प्रश्न स्वतःस विचारील, व नंतर उचित परि- शीलनाने असल्या अनिर्बध टीकेचा प्रसंगच उपस्थित होणार नाही. ध्येयवादाची नाजूक छटा त्यांच्या सामाजिक स्वरूपाच्या दोन कथा 'सोनेरी टोळी' व 'डॉक्टर कादंबरी' या च्या. पहिल्या कथेकडे पुष्कळसे लोक 'सर्वसामान्य वाचकांचें अव्वल दर्जाचे मनोरंजन करणारी एक कथा' या दृष्टीने पाहतात; परंतु या कादंबरीच्या नायकाच्या (रायाच्या) खभावाचे व जीवनाचे अधिक निरीक्षण केल्यास यांत सामान्य जनांच्या आटो- क्यांतील असा ध्येयवादी मनुष्य दिसेल. साधारणतः ध्येयवादी कादंबरीच्या नाय- काचे स्वभावचित्र वाचून सामान्य वाचकास आश्चर्ययुक्त आदर वाटतो. त्याला तो गुणमूर्ति, ध्येयमूर्ति समजून शतशः प्रणाम करील. परंतु त्याबरोबरच स्वतःचा वेचार करतां आपण त्यापेक्षा कितीतरी हीन श्रेणीचे आहोत असा न्यूनगंडयुक्त वेचार त्याच्या मनांत उद्भवल्याशिवाय राहणार नाही. 'राया'च्या बाबतींत तसे होण्याचा सुतराम् संभव नाही. समाजांतील दभाचा रायासारखा आपणांसही स्फोट करता येईल. बावळेपणापासून होणाऱ्या नुकसानीतून आपण काही व्यक्तींस खात्रीने पांचवू शकू. मिरासदारांची मिरास सामान्य बुद्धीनेही आपणांस स्तंभित किंवा नष्ट करता येईल, अशा त-हेचे विचार ती कथा वाचल्यानंतर कोणाही सामान्य वाच- १०७ मनोरंजकपणे आपल्या त्या प्रदीर्घ कथेत सूचित केल्या आहेत ! सामान्य जनांस आकलनीय अशा ध्येयवादाच्या छटा इतक्या नाजूकपणे ते चित्रित करूं शकले यांतच त्यांच्या लेखणीच्या कुंचल्याचे वैशिष्ट्य आहे. शाकुंतल व डॉक्टर कादंबरी 'डॉक्टर कादंबरी' या कथेची गोष्ट घ्या. पत्नी ही काही झाले तरी पतीपेक्षा हीन दर्जाची आहे, असा प्रतिगामी स्वरूपाचा विचार काही त्या कादंबरीने ध्वनित होत नाही. डॉक्टर कादंबरीने रघुनाथाच्या चरणावर मस्तक ठेवणे यांत तिच्या शिक्षणाचा, बुद्धीचा व पत्नीत्वाचा उपहास होतो अशी शंकाही कुणाच्या मनांत डोकावणार नाही. प्रत्येक व्यक्तीस तिच्या व्यक्तित्वाबरोबरच सामाजिक अस्तित्वही असते, व त्याकरिता प्रसंगी तीस आपल्या व्यक्तित्वालाही मुरड घालावी लागते, हे तत्त्व त्यांनी अत्यंत सहृदयपणे रंगविलें आहे; व कादंबरीच्या लीनतेत प्रक दिसणारा विजय हा रघुनाथाच्या पौरुषाचा नसून पश्चात्तापाच्या अमीत तावून सुलाखून निघालेल्या त्याच्या संस्कारयुक्त हृदयाचा होय. संस्कृति ही बौद्धिक विक्षणावरच आधारलेली नसते, बौद्धिक शिक्षणाने ती विचलित होऊ शकत नाही. बौद्धिक शिक्षणाबद्दलचे पूर्वग्रह व्यक्तिजीवनांतील सौख्याला प्रतिबंध करू शकतात, ही तत्त्वे किती मनोरंजकपणे त्यांनी या कथेत प्रथित केली आहेत ! रघुनाथाच्या मनावर संस्कार होते; परंतु त्या संस्कारांवर पूर्वग्रहाची पुटे चढली होती-चढविली गेली होती. व त्यामुळे त्याचे मन व जीवन कांहीं काल मलिन झाले. कादंबरी म्हणजे एक सरलतेची व विशुद्धतेची प्रतिमा ! अर्थातच मनोमालिन्यामुळे तो काही काल तिचा सहचर या दृष्टीने नालायक ठरला व तिचा सहवास त्याला दुरावला हे ठीकच झाले; परंतु जेव्हां मलिनतेची पुटें दूर झाली तेव्हां त्यांच्यांत बौद्धिकदृष्टया अंतर पडले असले तरी हृदयाची विशुद्धता, सरलता व निरागसता या गुणांचें समप्रमाण झाले व नंतर त्यांच्या मीलनांत अंतर राहण्याचे काही कारण नव्हतें व त्याप्रमाणे घडून आले. पतिपत्नीजीवन सुखमय होण्यास हृदयाची एकरूपताच आवश्यक असते. बुद्धीची समता नव्हे ! बुद्धीची विषमता संसारसुखांत तट उभारूं शकत नाही हे सत्यही या कथेमध्ये किती सुंदरपणे चितारले गेले आहे! नायक- नायिकांचे प्रथम मीलन, नंतर नायकाच्या गैरसमजामुळे होणारा विरह, नंतरच्या कालांत नायिकेने केलेली तपश्चर्या व तदनंतर संस्कारशुद्धतेमुळे अवश्यभावी असे स्यांचे पुनर्मीलन या प्रसंगक्रमावरून डॉक्टर कादंबरीची शाकुंतलाशी तुलना करण्याचा मोह मला उत्पन्न होतो व ज्या तत्त्वाच्या श्रेष्ठतेमुळे शाकुंतल हे अद्वितीय नाटक ठरले, त्यामुळेच डॉक्टर कादंबरीची श्रेष्ठताही प्रस्थापित होते. लोकप्रियतेचे शिखर त्या कादंबरीने अगोदरच गांठलेलें आहे; परंतु त्या कादंबरीचें तात्त्विक अधिष्ठान संक्षेपाने हे असे आहे. राष्ट्रसेवेच्या दृष्टीने महत्त्व त्यांच्या स्वराज्यावरील कादंबऱ्यांचा या दृष्टीने अभ्यास केल्यास जीवनांतील कितीतरी सुंदर तत्त्वे त्यांत ग्रथित केलेली दिसून येतील. या दृष्टीने नाथमाधवांच्या वाङ्मयाचा साकल्याने अजून विचार झाला नाही. त्यांच्या लेखनांत ध्येय-दृष्टि आहे व त्यांच्या लेखनप्रतिभेस तात्त्विक भूमिकेचे अधिष्ठान आहे. त्या दृष्टीने त्यांच्या वाड्मयाचा अभ्यास होणे जरूर आहे असे मला वाटते. व्यक्ति, समाज व राष्ट्र या सर्वांगीण उत्कर्षाच्या दृष्टीने त्यांनी विचार केला होता. व जरी 'मी' सारख्या कादंबरीतील आत्यंतिक ध्येयवादाचे चित्रण आवश्यक असले तरी नाथमाधवांच्या वाड्मयांत दृष्टोत्पत्तीस येणाया सामान्य जनांच्या ध्येयवादाला तत्कालीन समाज- सुधारणा व राष्ट्रसेवा या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे हे विसरून चालणार नाही. त्यांच्या कथांत सामान्यतः दिसून येणाऱ्या अद्भुतरम्यतेमुळे व नाट्यप्रसंगांमुळे सामान्य वाचकाला आपले मनोरंजन होते असे वाटते, हा त्यांच्या लेखनकलेचा विजय आहे. पण या मनोरंजनाने उल्लसित झालेल्या मनोवृत्तीत त्यांच्या सूचित ध्येयवादाचा प्रवेश वाचकाच्या नकळत होतो; व त्यामुळे वाचकाची वृत्ति अधिक विकसित होते. . या परिणामांचें सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करून त्यांच्या जीवनदृष्टीवर अधिक प्रकाश पाडण्यास कोणीतरी प्रवृत्त व्हावें, या इच्छेनें प्रेरित होऊन शलाकादृष्टीने हा लेख लिहिला आहे. नाथमाधवांच्या वाङ्मयावर या सूक्ष्म दृष्टीनें ग्रंथ लिहिला गेल्यास त्यांच्या जीवनाची व वाङ्मयाची श्रेष्ठता सर्वमान्य होईल यांत तिळमात्रही संदेह वाटत नाही.
करमणूक व ध्येय यांचा सुंदर मिलाफ [१८] (लेखकः डॉ. भि. अ, परब, एम्. ए. पीएच्. डी.) उत्तम कथावाड्मयाची कसोटी काय ? असे मला कोणी विचारले तर मी त्याला सांगतों; “जें कथावाङ्मय वाचू लागलें असतां वाचीत जावेसे वाटतें, वाचून संपविल्याशिवाय राहूं नये असें मनापासून वाटते, तें उत्तम कथावाड्मय." या वाायकसोटीत अनेक गुणांचा समावेश होतो. माणसें कथाकादंबऱ्या वाचतात ती करमणुकीसाठी, म्हणून वाचतांना मन गुंगून जाऊन वाचीत राहावे असे वाटल्या- खेरीज बहुधा वाचक पुस्तक हातांत घेत नाहीत. स्वतःच्या वाचनाची घमेंड मिरवि- णारे वाचक आपल्या या ना त्या खुळाचें ( फॅड) प्रदर्शन मांडतात. पण बहुसंख्य वाचक वाचतात ते करमणुकीसाठी व समाधानासाठी. येथील मुंबई ग्रंथसंग्रहालयांतील वाचावयास गेलेल्या पुस्तकांत कथाकादंबऱ्यांचे प्रमाण शेकडा सुमारे ऐशी टक्के पडते. हरीभाऊ आपटे, नाथमाधव, वि. स. खांडेकर, ना. ह. आपटे, प्रो. फडके, यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असतात ! नाथमाधवांच्या 'वीरधवल' कादंबरीची संक्षिप्त शालेय आवृत्ति तयार करतांना प्रस्तुत लेखकास या बाबतींत अनुभव आला तो सांगण्यासारखा आहे. 'वीरधवल' ची उपलब्ध प्रत दोनचार पानांतच खराब झालेली होती व अक्षरे दिसत नव्हती. म्हणून प्रकाशकानें ग्रंथालयांतून 'वीरधवल' आणवून जरूर तो भाग उतरून (कापून नव्हे ! ) घेण्याचा विचार केला. पण चौकशी करतां पुस्तक वाचावयाला गेलेलें ! पाहिजे असल्यास 'हक्क राख्न' ठेविल्यास महिनाभरांत मिळेल असे उत्तर मिळाले. वर उल्लेखिलेल्या कादंबरीकारांच्या काही काही कृतींसाठी वाचकाला अद्यापीही आठवडेच्या आठवडे हक्क ठेवून वाट पाहावी लागते. करमणुकीला उत्कट ध्येयाची जोड नाथमाधवांच्या कादंबऱ्या वाचकांना इतक्या आवडतात याचे कारण त्या प्रणय- कथा आहेत हे नव्हे. "कादंबरी लिहिणे म्हणजे नायक-नायिकेचें प्रेममीलन झालेले दाखविणे" अशी कल्पना त्यांच्या पहिल्या कृतीच्या वाचकांस येईल; परंतु पुढील कृतीत त्यांनी करमणुकीला उत्कट ध्येयाची जोड दिली आहे. विहंगद्वंद, 'विमलेची प्रहदशा' व 'डॉक्टर कादंबरी' या कादंबऱ्यांतील सामाजिक प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत व ते चटकदार कथानकाच्या रूपाने वाचकांपुढे मांडलेले आहेत. त्यांची दारूबंदीवरील कादंबरी (श्रीनिवासराव) सरकारजमा झाल्याचे त्यांच्या प्रकाशकां- कडून मला कळले. त्या कादंबरीतील प्रत्येक प्रकरणाच्या आरंभी विविध भाषांतील व विविध लिपीतील (उर्दू सुद्धा) अवतरणे दिली आहेत ! नाथमाधवांच्या स्वराज्याच्या इतिहासावरील कादंबऱ्या, सांवळ्या तांडेल व वीर- धवल या विद्यार्थ्यांना प्रिय आहेत. एके काळी या कादंबऱ्यांना फार लोकप्रियता लाभली होती; अजूनही ती बरीच कायम आहे. देशप्रेम व खातंत्र्य या गुणांचा वाच- कांच्या मनावर कायम ठसा उमटवून त्यांची करमणूक करणे हेच या कादंबऱ्यांचे ध्येय आहे व तें नाथमाधवांनी उत्तम रीतीने साधलें आहे. 'वीरधवल' ही इतकी उत्कृष्ट कादंबरी आहे की, ती रूपांतरित आहे हे वाचकाला सांगूनही पटावयाचें नाही. नाथमाधवांचे वाड्मय असे आहे. ते त्यांच्या हयातीत गाजलें व त्याने कीर्ति मिळविली; अजूनही तें खूप लोकप्रिय आहे. नाथमाधव सैनिक होते, ते सिंहगडाच्या कड्यावरून पडून लंगडे झाले. पण त्यांची अभिजात वीरवृत्ति लंगडी झाली नाही. ती कादंबरीतील त्यागी व स्वातंत्र्यार्थ प्राणाहुति देगाऱ्या वीरांच्या रूपाने प्रगट झाली. देशाची उन्नति "एका विद्वानाने म्हटले आहे की, आपल्या देशाची उन्नति ही एक मोठी इमारत आहे. ही बांधण्यास अनेक प्रकारचे कारागीर पाहिजे आहेत. ते तयार व्हा. कोणी कोलंबस व्हा. कोणी लूथर व्हा. कोणी रामशास्त्री व्हा. कोणी दादाभाई व्हा. कोणी कांहीं व्हा. आणि एकदांची ही इमारत बांधून शेवटास न्या. अशा प्रकारच्या इमारती ज्यांनी आजपर्यंत बांधल्या, त्यांना चार चार हात नव्हते की चार चार डोळेही नव्हते. ते तुमच्या-आमच्यासारखेच होते. त्यांनी जी कामें केली ती तुम्हा-आम्हांस का करता येऊ नयेत? अगदी खरे आहे; करता यावीत आणि करता येतील यांत तिळमात्र शंका नाही; परंतु ती करावयाचें मनावर घेतले पाहिजे. ती पार पाडावयास कांहीं वेदांती नकोत किंवा कोणी वैराग्य घ्यावयास नको. इष्ट कार्याकडे निरंतर दृष्टी ठेवून माणसांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे आपापले व्यवहार करीत रहावे म्हणजे झाले." १९२० -नाथमाधव नाथमाधवांचे वाअयक्षेत्रांतील वैशिष्ट्य [१९] (लेखकः-श्री. अच्युत बळवंत कोल्हटकर) नाथमाधवांनी वाङ्मयक्षेत्रांत एवढे यश मिळवावे अशी सृष्टिदेवतेने त्यांना कोणती अनुकूलता दिलेली होती ! कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर, हरी नारायण आपटे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर किंवा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यापैकी प्रत्येक जण असा होता की, त्यांच्या कुलपरंपरेंत सरखतीची उपासना होती. त्यांच्या पिढ्यान् पिढ्या सरस्वतीच्या उपासनेत गेलेल्या होत्या. जेथें सरखतीची सेवा हे कुलव्रतच होते, तेथे एकादा वंशज सरखतीच्या विशेष कृपेतला निघाला तर त्यांत कांहीं नवल नाही; परंतु नाथमाधव यांचा आणि सरखतीचा असा कोणताही पिढीजात संबंध नव्हता. त्यांची ओळख नवीन होती-त्यांचा परिचय ह्याच आयुष्यांतील होता; आणि तोही स्वतःच्या स्फूर्तीने नव्हे, तर आवश्यकतेमुळे ! ज्याप्रमाणे एकादा प्रवासी वाट चालतां चालतां संध्याकाळ झाली म्हणजे जेथें निवारा मिळेल तेथें वस्ती करतो, त्याप्रमाणे शरीरास भयंकर अपघात होऊन ज्या वेळी नाथमाधवांच्या आयुष्यावर एकाएकी संध्याकाळचा अंधार दिसायला लागला, त्या वेळी त्यांनी निवाऱ्यासाठी सरखतीचा प्रांत धुंडाळला! नाथमाधव व सरस्वतीदेवी यांची गांठ याप्रमाणे आकस्मिकपणे पडली-नाइलाज म्हणून पडली! पण त्याच सरखतीचे ते इतके प्यारे बनले की, तिने आपल्या मधुमधुर स्तन्यांचा अपूर्व अमृतप्रसाद या नवबालकासाठी सहस्र धारांनी अर्पण केला! खरोखर तिच्या खास अपत्यांवरही तिची एवढी कृपादृष्टि झाली नसेल-वंशपरंपरेने तिच्या प्रांगणांत बागडणाऱ्यांवरही तिची इतकी मेहरनजर कधी झाली नसेल ! हे तेज आगळे तेव्हां हरीभाऊ आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गडकरी किंवा विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी वाङमयांत प्रतिष्ठा मिळविणे आणि नाथमाधव यांनी वायांत प्रतिष्ठा मिळविणे यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे असे आम्ही ११२ समजतों. पिढ्यान् पिज्या ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे, त्यांच्यापैकी एकानें टेनिसनसारखें इंग्रजी काव्य लिहिले तर त्याचे आपण आश्चर्य मानीत नाही; पण देवी सरोजिनीसारखी एकादी बंगाली गुलाबकळी इंग्रजीत काव्य रचायला लागते त्या वेळी आपल्याला आश्चर्य वाटतें! हमजेखानाच्या वंशांतल्या एकाद्याने कुस्ती मारली म्हणजे आपणांस आश्चर्य वाटत नाही, पण ज्या वेळी डोळ्यांवर पिन्स नेशचा चष्मा लावणारा एकादा भोपटकर चही कसून दांडपट्टा खेळतो त्या वेळी आपण तोंडात बोट घालतों! एकादा बॅरिस्टर एकाद्या खटल्यांत आठ आठ दिवस बोलला म्हणून आपण नवल करीत नाही, पण ज्या वेळी कै. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांसारखा एकादा देशभक्त हायकोर्टातील जज्जासमोर एकसारखे सहा दिवस भाषण करितो त्या वेळी आपण आश्चर्याने निपचित होऊन जातों! कारण आपणास माहीत असते की, हे तेज कांहीं विलक्षण आहे । हे तेज काही विशेष सामर्थ्य घेऊन आलेलें आहे! नाथमाधव यांचा वापयप्रांतांतील प्रवेश ही अशीच आश्चर्यकारक गोष्ट होय । ते वाड्मयासाठी उपजलेले नव्हते ! किंवा वाड्यासाठी त्यांना शिक्षणही मिळाले नव्हते! त्यांनी आपला आयुष्यक्रम पलटणीतील पराक्रमी जीवितासाठी आंखलेला होता. आणि तो त्यांचा आयुष्यक्रम त्यांच्या मुद्रेवरूनही दिसून येण्यासारखा होता. त्यांना पाहिले की हा कोणी तरी वीर पुरुष आहे, अशी त्यांच्याविषयी भावना होऊन जात असे. तो त्यांचा तेजखी चेहरा, ती त्यांची उमदी मूर्ति, तो त्यांचा सहज दिसून येण्याजोगा आत्मविश्वास, तसेंच तो त्यांच्या सर्व शरीरभर दृश्यमान होणारा अदृश्य पराक्रम-ही सर्व चिन्हें वीरवृत्तीची-वीर पुरुषाची होती. तेथे वाङ्मयाचा वास मुळीच नव्हता. नाथमाधवांची थोरवी पण एके प्रसंगी ते सिंहगडावर वाघाची शिकार करायला गेले असता त्यांचा पाय घसरला-ते पडले त्यांना भयंकर जखमा झाल्या आणि त्यांचे पाय अजिबात लुले झाले अशा स्थितीत मनांत विक्रमाच्या भयंकर ऊर्मि असतांही त्यांना नाइ- लाजाने तरवार सोडून लेखणी पत्करावी लागली ! ह्याप्रमाणे त्यांचा वाड्मयाशी संबंध केवळ नाइलाजाने जडला! वरील अपघाताने ऐन पंचविशीच्या उमेदीत त्यांचे पाय जर अजिबात गेले नसते, तर ह्या वीराने रणांगणावर तरवार, बंदुका, गोळीबार चालविला असता! पण ऐन पंच- ११३ विशीतच पाय गेल्यामुळे आणि त्यानंतर अनेक धन्वंतांचे उपचार केले असतांही हे लुल्या पायांचे व्यंग कायमचंच राहिल्यामुळे नाथमाधवांना आपले वीर-आयुष्य वामयसेवेला वहावे लागले ! ह्याप्रमाणे ते जन्मजात लेखक नव्हते-दैवकृत लेखक होते. पण चमत्कार असा की, त्यांनी समरभूमीवर जितके पराक्रम केले असते, त्यापेक्षाही जास्त पराक्रम वाङ्मयभूमीवर केले ! किंबहुना ते अखेरपर्यंत लष्करी पेशांतच रहाते तर त्यांचे नाव जगास माहीतही झाले नसते; पण आज मराठी भाषेच्या शिवशाहीत नाथमाधवांचें नांव माहीत नाही असा एकही मनुष्य नाही! रा. रा. नाथमाधव यांचे आडनाव 'पितळे' असे होते; पण आपणांस असें अभि- मानानें म्हणता येईल की, जोपर्यंत ह्या पृथ्वीतलावर मराठी भाषा अस्तित्वात राहील, तोपर्यंत नाथमाधवांचे नाव पितळेच्या नव्हे, सोन्याच्या अक्षरात चमकत राहील ! -सन्देश, ता. २२-६-२८ मनुष्यजन्माचे सार्थक "मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्या एकव्याच्या पोटाची त्याला काळजी लागते. तेवढे मिळविणे फारसे कठीण नसते. आईबाप, बायकापोरे वगैरे संसाराची काळजी नसल्यास एका फटिंगाचे पोट वाटेल तसे भरूं शकते...परंतु त्याने काही साध्य होणार नाही. आपापले उदरपोषण सर्व प्राणिमात्र करतात. इतर योनीपेक्षा मनुष्ययोनीत आलेल्या जीवाला जास्त साधन करण्याची सोय आहे. ती त्याने व्यर्थ घालवू नये. शेक्सपीयरने म्हटले आहे की, खावें, प्यावे आणि निजावें, एवढे मात्र करून जर कोणी रहात असेल तर तो मनुष्य कशाचा? तो माणूस नव्हे तर पशु होय." नाथमाधव नाथमाधव यांचे व्यक्तिदर्शन [२०] ( लेखक-प्राध्यापक विश्वनाथ गोपाळ शेट्ये बी. ए. एलएल. बी.) मरणिं अमरता- या जगांत ज्यांना लाभते त्यांना आठवणींच्या रूपाने इतिहासांत अमर होण्याचे भाग्य लाभते. दृष्टीआड सृष्टि झाली की ती विस्मृतीचा विषय बनते. तरी पण कविवर्य तांबे यांच्या या शब्दांत 'भरणिं अमरता' राखून जे सृष्टींतून दृष्टिआड होतात, अर्थात् जगाच्या दृष्टीने मरूनही जे स्मृतिरूपाने मागे उरतात, त्यांच्याच आठवणी लिहिल्या जातात. असलें भाग्यशाली मरण आमच्या मराठी साहित्यसृष्टीत ज्या थोड्याफार साहित्यिकांना लाभले त्यांत माझे स्नेही नाथमाधव यांची प्रामुख्याने गणना करण्याइतकी त्यांची वाङ्मयीन पुण्याई थोर आहे; पण- नाथांची महनीयता- केवळ त्यांच्या वापयीन पुण्याईतच आहे असे मात्र मी मानीत नाही. त्यांचा मोठेपणा बहुविध आहे. ते जितके थोर साहित्यिक तितकेच ते थोर माणूस होते. जितके श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार तितकेच ते सच्चा दिलाचे स्नेही होते. नाथांच्या पहिल्या प्रभावळीत जी काही थोडीफार माणसे होती ती त्यांच्या बुद्धीपेक्षा त्यांच्या हृदयाने त्यांच्याकडे आकर्षिली गेली होती; हे मी स्वानुभवाने म्हणू शकतो. आजच्या नव्या पिढीला त्यांचे वामय वाचून त्यांच्या मोठेपणाची जी प्रचीति येईल, ती एकांगी ठरेल. नाय हे एक नामवंत कथालेखक आणि अव्वल दर्जाचे कादंबरीकार होऊन गेले, एवढेच फार तर त्यांना कळेल. पण त्यांच्या आजच्या कादंबरी-वाचकांना तेवव्याने त्यांची खरी थोरवी थोडीच कळणार आहे ? नाथांसारखा मोकळ्या मनाचा, निष्पाप दिलाचा, भोळा प्रेमळ जीव, तसेंच निष्कपटी आणि निर्मत्सरी सुहृद व दिलदार आणि उदार माणूस विरळा.
११५ केवळ बुद्धीचा प्रकर्ष साधून उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिणारे कथालेखक मानें झाले असतील आणि पुढेही होतील; पण त्याबरोबरच हृदयाच्या दैवी संपत्तीचा अमोल ठेवा बाळगणारे मराठी कवींत बालकवि ठोमरे आणि कथावाचयांत एक नाथमाधवच होऊन गेले असें मी मानतो. यांत कुणाला अतिशयोक्ति वाटेल; पण नाथांच्या सहवासांत जे माझे थोडेफार दिवस गेले, त्या वेळच्या अनुभवाने आणि निरीक्षणाने त्यांच्याविषयी बनलेले हे माझें प्रामाणिक मत आहे. माझी प्रथम भेट- सन १९१० साली झाली. ही भेट योगायोगाने घडून आली असे म्हणण्यापेक्षा मेटीचा योग मीच आपण होऊन घडवून आणिला. पुढे कालांतराने नाटककार मामा वरेरकर आणि आप्पा टिपणीस यांना नाथांच्या घरी नेऊन मीच त्यांची ओळख करून दिली होती; पण माझी ओळख त्या वेळी मलाच करून द्यावी लागली. मी त्या वेळी कॉलेजचा विद्यार्थी होतो. त्या काळी विद्यालयीन अगर महाविद्यालयीन शिक्षणक्रमांस मराठी भाषेला स्थान नव्हते. त्यामुळे घरी मराठीचा खाजगी व्यासंग करणारा मुलगा परीक्षेचा अभ्यास सोडून नादी बनला, बिघडला, असाच पालकां- चाही समज असे; आणि म्हणून त्यांचा रोष टाळण्यासाठी अभ्यासाच्या पुस्तकां- खाली मराठी कथावाङ्मयाची पुस्तकें ठेवून ती मुलांना चोरून वाचावी लागत असत. अशाचपैकी मीही मराठीचा चोरून व्यासंग करणारा एक विद्यार्थी होतो. आज मराठी मासिकांचा आणि नियतकालिकांचा सुळसुळाट झालेला आहे. त्या काळी मराठीत कथावाड्मयास वाहिलेले 'मासिक मनोरंजन' हे एकच मासिक होते. त्यांतील संपूर्ण गोष्टी वाचून आपणही एकादी गोष्ट लिहावी असे वाटून मी एक 'अभागी सुशीला' नांवाची गोष्ट लिहिली आणि ती प्रसिद्धीला देण्यापूर्वी कुणा तरी साहित्यिकाला दाखवावी असे ठरविले. त्या वेळी माधवबागेतील नाथांच्या एक आणा मालेतील कथा प्रकाशित करणारे केतकर यांचा 'वुड एनओव्हर' या नात्याने संबंध असलेले माझे स्नेही निळकंठ भाऊ गांधी यांनी मला नाथांचें नांव सुचविले आणि त्यांच्याकडूनच नाथांच्या घराचा पत्ता घेऊन मी त्यांना जाऊन भेटलों. माझ्याकडे कां आलांत ? माधवबागेच्या नाक्यावर पितळे यांचा एक मोठा बंगला आहे. त्यांत रस्त्याला लागून माडीवरील एका खोलीत मी गेलों; त्या वेळी नाथमाधव लेखन करीत बसले तें होते. कोणत्या तरी एका कादंबरीचे त्यांचे लेखन चालले होते असे स्मरतें. जांभळ्या शाईने आणि नऊ नंबरच्या 'ओ' च्या टांकानें गोल अक्षरांत मोठ्या टापटिपीनें लिहिलेला अर्धा बंद टेबलावर होता. हातांतील टांक तसाच खाली ठेवून त्यांनी माझी विचारपूस केली. माझ्या भेटीचा मूळ हेतु समजून येतांच ते विनोदबुद्धीनें म्हणाले, "अहो, तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी ! माझें शालेय शिक्षणही पुरे झालेले नाही असा सामान्य माणूस मी ! असे असतां तुम्ही माझ्याकडे आलात?" "होय," मीही उत्तरलो. "आमच्या कॉलेजांत आम्हांला में मिळत नाही, मिळण्याचे हे स्थळ आहे असे कळले, म्हणूनच मी इथे आलो आहे !" नाथ या वेळी अगदी मनमोकळेपणी हसले. या त्यांच्या हास्यांतच मला नाथांच्या स्वभावांतील मोकळेपणा आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचे प्रथम दर्शन घडलें। पुढे थोडा वेळ बोलणे झाल्यावर व त्यांनी उद्या पुन्हां या, तोवर मी तुमचे लिखाण वाचून ठेवतों, असे सांगितल्यावर टेबलावर माझं हस्तलिखित ठेवून "माझे काम झाले आहे, आतां मी येऊं?" असे म्हणून मी जाण्यासाठी उठलो. तोंच ते म्हणाले, “बसा हो !" इतक्यांत मी समोरच्या भिंतीवर टांगलेल्या पाटीकडे बोट दाखवून म्हटलें, "मी आपला अधिक वेळ घेतला तर आपल्या व्यवसायांत व्यत्यय येईल. तेव्हां मी भापला निरोप घेतों." त्या पाटीवर "कामाशिवाय येथे कोणी बसू नये" अशी ठळक अक्षरें होती. ते पुनश्च हसले आणि म्हणाले, "बसा हो! ही पाटी तुमच्याकरिता नाही. रिकामटेकड्या गप्पा मारण्यास येथे येऊन माझा फुकट वेळ घेणाऱ्यांसाठी ती पाटी भाहे. ज्या व्यवसायांत मी गुंतलों आहे, त्याच व्यवसायबुद्धीने तुम्ही येथे आला आहोत. शिवाय विद्वान् माणसांना त्यांच्या घरी जाऊन मेटावें असें माझ्या मनांत भालें तरी मला ते शक्य नाही. अशा स्थितीत तुमच्यासारखी विद्याव्यासंगी मंडळी आपण होऊन आली, तर त्यांत मलाही अलभ्य लाभ आहे असे मी मानतों. नार्थाच्या या शेवटच्या उद्गारांतील खींच मला त्या दिवशी तरी कळली नाही. मी पुन्हां दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलों तेव्हां त्यांच्या बोलण्यांतील इंगित मला समजले.
मनीषा एक आणि नियति अन्य! अशीच नाथांच्या जीवनाला कलाटणी मिळाली होती. ती त्यांना लेखक बनवि जारी विधिघटना मला दुसऱ्या दिवशी अगदी अजब अशा नाट्यप्रसंगाने कळली. मी जातांच माझ्या गोष्टीची व लेखनाची नाथांनी प्रशंसा केली; आणि हा माझा प्रथम प्रयत्न आहे तेव्हां मला उत्तेजन मिळावे म्हणून कुणीतरी प्रकाशक गांठून देण्या- चेही अभिवचन त्यांनी मला दिले. परंतु मला प्रकाशक नको होता. माझे त्या वेळचे तरुण व्यापारी मित्र श्री. दत्तात्रय गोविंद लुब्री यांनी ती वाचून पूर्वीच छापण्याचे ठरविले होते; पण ती छापली जाण्यापूर्वी कुणातरी अधिकारी लेखकाच्या नजरेखालून जावी एवढ्या एकाच मनीषेनें मी नाथांकडे आलो होतो, हे त्यांना समजून सांगून व त्यांचे आभार मानून निघतांना मी सहज म्हटले, "एकसारखें या खुर्चीवर बसून बसून कंटाळा येत नाही का ? चला आपण थोडा वेळ चौपाटीवर फिरायला जाऊ" इतके मी बोलतांच नाथ आपल्या नित्य सरावाप्रमाणे मुक्त कंठाने हसू लागले. त्या वेळी त्यांच्या अंगांत शर्ट आणि खाली पायजमा होता. हंसत हसतच त्यांनी खुर्ची फिरविली आणि पायजम्याकडे नजर टाकीत ते उद्गारले, "पहा! अहो! ही खुर्ची हेच माझें घर आणि ही चौपायी हीच माझी चौपाटी !" तरीही मला तितकासा उमज पडला नाही. नंतर ते बाजूला असलेली कुबडी घेऊन कुबडीच्या आधारें लंगडत लंगडत दाराशी जाऊन आणि आपल्या पुतणीला चहाची वर्दी देऊन तसेच लंगडत येऊन खुर्चीवर बसले. मला तर तो प्रकार पाहून धकाच बसला! अपघाताची हकीगत त्यानंतर त्यांनी आपल्या सिंहगडावरील अपघाताची आणि त्या अपघातांत जिवा- वरच बेतले होते, पण शेवटी पाय लुळे होण्यावरच कसे निभावलें, याची साद्यंत हकीगत सांगितली. अनेक स्नेह्यांनी ती हकीगत साद्यंत आपल्या आठवणींत दिली असल्यामुळे तिची पुनरुक्ति मी करीत नाही. ती साग्र हकीगत त्यांचेच तोंडून त्या वेळी ऐकून मी तर अगदी स्तंभित झालों, आणि कुणीही सहृदय माणूस रोमा चित होईल अशीच ती घटना होती.
आयुष्याच्या ऐन उमेदीत पराक्रम करून नावलौकिक मिळवावा या मनीषेनें हातांत बंदूक घेऊन त्यांनी लष्करी पेशा स्वीकारला; पण नियतीने त्यांच्या मनीषेला ठोकर देखन, त्यांच्या हाती लेखणी दिली आणि त्यांना लेखक बनविलें! नाथांचें खरें चरित्र आणि चारित्र्य ऐन उमेदीत अपघाताने त्यांचेवर आलेल्या या दैवी प्रसंगांतच आहे ! अपघात- पूर्वकालीन आणि तदनंतर घडलेला त्यांचा जीवन-चित्रपट ज्यांच्या नजरेसमोर आहे, असा कुणीही लेखक असेच म्हणेल की, त्यांच्या जीवनाला ऐन जवानींत कलाटणी देणाऱ्या या निघृण विधिघटनेतच नाथांचे खरें चरित्र आणि चारित्र्य आहे. त्यांच्या सुखभावाचे विविध पैलू याच प्रसंगाच्या दुर्बिणीतून स्पष्ट पहायला मिळतात. धीरगंभीर प्रवृत्ति आणि झुंजारवृत्ति मिळूनच नाथांचा असामान्य पिंड बनलेला होता. नाहीतर कुणीही लेचापेच्या मनोवृत्तीचा सामान्य माणूस या घोर आपत्तीने कोलमडून नामशेष झाला असता! प्राप्त परिस्थितीशी टक्कर द्यायला लागणारें धैर्य आणि झुंजारवृत्ति, तसेच प्राप्त परिस्थितीत समाधानवृत्ति, हे अजब गुण त्यांच्या ठायीं होते आणि यांतच त्यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. नियतीचा निर्णय जिवावरच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये याच गुणामुळे ते जगू शकले आणि बरे होऊन घरी आले ते अपंग ! परावलंबी जीवन कंठण्याचा अघोर प्रसंग गुदरलेला! त्यांच्या वडील बंधूंनी त्यांना आपल्या घरी आणले होते, आणि त्यांना जन्मभर पोसण्याची त्यांची तयारी व ताकत होती. बंधूच्या रूपाने देव त्यांचा पाठिराखा होता. पण नाथांच्या मानी मनाला हे पटेना. सांप्रतच्या आर्थिक परिस्थितीत आपल्या बंधूवर सर्वस्वी भार टाकून जीवन कंठ- ण्याचे त्यांना रुचेना ! 'ठेविलें अनन्तें तैसेंचि रहावें' या न्यायाने प्राप्त स्थितीत समाधानवृत्तीने रहावें, पण स्वाभिमानाने जगावें, हा त्यांचा बाणा ! या बाणेदार मानी स्वभावानुसार, आपल्या पोटापुरतें तरी कसे कमविता येईल या विचाराने त्यांनी काही रात्री जागून काढल्या. देहाच्या त्या अपंग स्थितीत, बसल्या जागी, पोटापुरता कोणता व्यवसाय करता येईल या विचारांत असतां, नियतीने त्यांना लेखनाचा मार्ग सुचविला. नियतीने त्यांना हा मार्ग सुचवला असें मी म्हणतो, कारण नियतीनेच तशी पूर्वयोजना केली होती. या अपघाताने कमरेखाली विशेषतः पायांना अधूपणा आला होता. पण डोके आणि उजवा हात देवदयेनें शाबूद राहिली होती ! तरीही एवढ्या सामुग्रीवर काय होणार ? नाथांचे शालेय शिक्षण जेमतेम मॅट्रिकपर्यंत झालेले होते आणि तेही पुढे लष्करीपेशा घेण्याच्या मनीषेनेंच. पण बुद्धि आणि परिश्रम हे काय कमी भांडवल आहे ? एकदां एक कल्पना सुचल्यावर ते त्या तयारीला लागले आणि आरंभींचे काही दिवस मराठी इंग्रजी कादंबऱ्यांचे वाचन आणि मराठी भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन वगैरेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून, आपल्या मतें अल्प सामुग्रीवर कथावाचय-लेखनाला त्यांनी सुरवात केली, आणि आमरण चिकाटीने आणि दीर्घ परिश्रमाने हरीभाऊ आपटे यांचे समकालीन श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार असा आपला लौकिक मराठी साहित्यसृष्टीत प्रस्थापित केला. देहाने अपंग अशा माणसाकडून झालेली ही काय थोडी अजब कामगिरी किंवा कमी मोलाची कर्तबगारी आहे ? लेखन हा व्यवसाय- आमच्या मराठीत आजही समाधानकारक होऊ शकत नाही. मधल्या काळांत मोठ्या नाटक मंडळींत ज्यांची नाटके रंगभूमीवर येऊ शकली असे नाटककार व आजचे मराठी पटकथालेखक यांनाच जो काही कथावाध्ययलेखनावर द्रव्यलाभ झाला अगर होत असेल तो सोडला तर इतर लेखकांची दैना आहे. माझी आणि नाथांची पहिली ओळख झाली त्या वेळी त्यांच्या एक दोन कादंबऱ्या लिहून झाल्या होत्या व कांही आणामालेचे उपन्यास त्यांनी लिहिले होते. त्या काळांत लेखनावर उपजीविका करण्याचा निर्धार में एक धार्य आहे असे मला वाटले आणि मी तसे त्यांना बोलूनही दाखविले; पण त्या बाबतींत त्यांचा आत्मविश्वास दांडगा ! परंतु त्यांचेही या दृष्टीने हाल झाले नाहीत असे नाही. प्रकाशकांकडून योग्य वेळी आणि योग्य त-हेने मोबदला पोहोंचू न शकल्याने त्यांना क्लेश झाले नाहीत असे नाही. असे असले तरी ज्या ध्येयबुद्धीने आणि ज्या परिस्थितीत नाथांनी हा व्यवसाय पत्करला होता तें त्यांचे ईप्सित त्यांच्यासारख्या समाधानी वृत्तीच्या माणसाच्या बाबतींत तरी पुरे झाले, असेच म्हणावे लागेल. परिस्थित्यनुरूप उपजीविकेसाठी त्यांनी लेखणी हाती घेतली असली तरी केवळ वाड्ययसेवेसाठी निघालेल्या मासिकांना त्यांनी निःस्वार्थपणे मदत केलेली आहे. हा अनुभव मला मी 'वैश्य मासिक' काढून चालविले तेव्हां आला. त्या वेळी गंगाराम शिरसाट या नांवाचे माझे एक स्नेही होते. त्यांनी 'उद्यान' मासिक काढण्याचे ठरवून ते पुढे काढलेही. शिरसाट मला घेऊन १२० , नाथांकडे मदतीसाठी गेले. त्यांना आम्हां दोघांचेही लेखनसहाय्य हवे होते. पण मालकीचा, नफ्याचा अगर मोबदल्याचा प्रश्न गुलदस्तात ठेवून ते बोलत होते. त्या वेळी नेही या नात्याने नाथांनी मला सुचविले की, दुसऱ्याच्या घरांत आपले बिहाड ठेवण्यापेक्षा आपला संसार आपल्या स्वतःच्या मालकीच्याच घरांत थाटावा हैं बरें. त्यानंतर उद्यानाचा नाद सोडून 'वैश्य मासिक' काढलें तें नाथांच्याच प्रोत्सा- हनाने आणि मदतीने. नाथांना मासिकाच्या प्राप्तीच्या मानाने मी मोबदला पोंच- विला. पण तो इतका अत्यल्प होता की, त्यांनी मासिकाला केलेली मदत मामा वरेरकर यांनी केलेल्या मदतीप्रमाणे केवळ वाङ्मयसेवेच्या बुद्धीने केली, असेंच मी मानतो. नाथांची दिनचर्या- अगदी आंखीव आणि रेखीव अशीच होती. लेखन, वाचन आणि आल्यागेल्यांच्या गांठीमेटी हाच त्यांचा नित्यक्रम. त्यांचे दैनंदिन वेळापत्रकही असे. पण मेटीस येणाऱ्या लोकांच्या वेळी-अवेळी येण्याने वेळेपुरतें गडकऱ्यांच्या कंकणच्या भाषेत 'काही इकडचे असामी जागा सोडून तिकडे झाले तरी आपलें लेखनाचे संकल्पित काम ते दुसरा दिवस उजाडण्यापूर्वीच पुरे करून ठेवीत. छापखान्याशी संबंध असल्यामुळे तसे त्यांना करावेच लागे. मार्थाना काही विशिष्ट संवया (Hobbis) होत्या. ते लेखन करीत तें केव्हां व कसे ? शाई कोणत्या रंगाची, टांक व कागद कसला वापरीत यासंबंधी, तसेच त्यांना ज्योतिषाचा व स्वप्नार्थ शोधण्याचा यासारखे काही नादही कसे होते यासंबंधी अगर त्यांची विशिष्ट मते आणि चर्चेचे विषय यासंबंधींच्या अनेक आठवणी सांगतां येतील. व त्या अनेकांनी सांगितल्याही असतील. पण नव्या पिढीला नाथांचे यथार्थ व्यक्ति दर्शन व्हावे या एकमेव हेतूने हा स्मृतिलेख मी लिहीत असल्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या भेटीच्या प्रसंगांचे वर्णन मी तपशिलाने केले आहे. या पहिल्याच मेटीच्या केळी नाथांच्या स्वभावांतील विविध अंगोपांगांचे आणि व्यक्तित्वाचे दर्शन मला पडले तेच अखेरपर्यंत टिकले. त्यांचा ध्येयवाद, व्यासंग, दीर्घ परिश्रम, सोशिकता, चिकाटी, स्वाभिमान आणि सर्वात अधिक म्हणजे मनाचा मोकळेपणा आणि प्रेमळ- पणा या अगर उपरिनिर्दिष्ट अशा अनेक गुणांत जसे नाथमाधव मला दिसले तसेच सुखदुःखाच्या अनेक प्रसंगांत 'संपूर्ण नाथमाधव' मलाच काय पण अनेकांना पहा- .
१२१ यला मिळाले असें मी समजतो. माझ्यापूर्वी अनेकांनी नाथांच्या आठवणी दिल्या आहेत आणि म्हणूनच स्थलाभावामुळे व पुनरुक्तीचा दोष टाळावा म्हणून यापुढे काही वेचक आणि माझ्यापुरते संस्मरणीय एवढेच प्रसंग निवडून हा लेख आटोपता घेणार आहे. कादंबरी की नाटक?- असें द्वंद्व नाथांच्या मनांत काही काळ चालू होते, हे सत्य आहे. कादंबरी- लेखनानें नाथांनी आपल्या वाड्मयसेवेला सुरवात केली आणि माझी ओळख झाली त्यावेळपर्यंत कादंबरीकार या नात्याने त्यांनी लौकीकही मिळविला; पण तदनंतरच्या काळांत त्यांचे हे लिखाण चालू असतां, नाटककारांना कादंबरीकारा- पेक्षां भारी मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळतो असे पाहून, कादंबरी-लेखनाकडून आपली लेखणी नाट्यलेखनाकडे वळवावी असें सहाजिकच त्यांना वाढू लागले. त्या काळांत नाथांच्या घरी माझी दर रविवारी नित्यनेमाने एक खेप असे. महाराष्ट्र नाटक मंडळीचे मालक श्री. आप्पासाहेब टिपणीस हे आपली भारत कंपनी मोडून नवीन आर्यावर्त नाटक मंडळी काढण्याच्या विचारांत होते. आप्पांचा व माझा स्नेहसंबंध होता. एक दिवस नाथांकडे बोलत बसलों असतां मी म्हणालों, "आप्पा आपल्या नव्या कंपनीच्या सुरवातीला शिवाजीची प्रमुख भूमिका आपल्यासाठी निव- डून शिवकालीन कथानकावर एक नाटक लिहिण्याच्या तयारीत आहेत." ऐतिहासिक कादंबरी-माला त्यानंतर पुढल्या रविवारी मी गेलों त्या वेळी नाथ आपल्या टेबलावर असलेले भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केलेले खंड व इतर ऐतिहासिक पुस्तकें दाखवून मला म्हणाले, "हे पहा, ऐतिहासिक एकच कादंबरी लिहावी असा माझा पूर्वसंकल्प होता, पण आतां ऐतिहासिक कादंबऱ्यांची खंडशः माला प्रसिद्ध करावी असें मी ठरविले आहे." हे ऐकून मला आनंद झाला आणि त्यांचा व्यासंग चालू झाला. पण याच्यापूर्वी आपण एकादें ऐतिहासिक नाटक लिहावें की कादंबरीमालाच चालू ठेवावी असे द्वंद्व त्यांच्या मनात काही काळ चालू झाले. मीही त्यांना नाटक लिहा, आपण आप्पांच्या कंपनीत तें आणण्याची खटपट करू असे म्हटले; आणि तसा प्रयत्नही केला; पण जमेना. आप्पांचे पहिले ऐतिहासिक १२२ नाटक 'चंद्रग्रहण' पुण्यास यशस्वी होऊन मंडळी मुंबईस आली होती; आणि आप्पा आपलें दुसरें ऐतिहासिक नाटक 'राज्यारोहण' बसवीत होते. तेव्हां त्यांना नव्या ऐतिहासिक नाटकाची जरुरी नव्हती. राज्यारोहणानंतर त्यांना सामाजिक अगर काल्पनिक कथानकाची जरुरी होती. आणि माझें 'लोकशासन' नाटक त्यांनी काढण्याचे ठरविले होते व पुढे ते काढलेही. डाव कसा हुकला? नाथांना मी स्वतः नेऊन चंद्रग्रहण व राज्यारोहण ही दोन्ही नाटके दाखविली होती. माझें 'लोकशासन' नाटक बसत असतां मी आप्पांकडे पुनश्च नाथांच्या नाटकाचा प्रश्न काढला, त्या वेळी आप्पांनी मला आपले हृद्गत व्यक्त केले. त्यांची दृष्टि धंदेवाईक होती; आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रामाणिक मत असे होते की, उत्तम नाटककार उत्तम कादंबरीकार होऊ शकेल, पण शब्दपाल्हाळ ( Verbosity) हा कादंबरीचा आत्मा तर शब्दसंक्षेप ( Brevity) हा नाटकाचा आत्मा असल्यामुळे उत्तम कादंबरीकार हा उत्तम नाटककार होऊ शकेलच असे सांगतां येणार नाही. ही त्यांची भीति अगदीच निराधार नव्हती, हे पुढील अनुभवाने सिद्ध झाले आहे. कादंबरी क्षेत्रांत असामान्य यश मिळविलेले. श्री. फडके अगर श्री. खांडेकर यशस्वी नाटककार होऊ शकले नाहीत, मात्र उलटपक्षी श्रेष्ठ दर्जाचे नाटककार श्री. मामा वरेरकर हे कादंबरीक्षेत्रांतही तितक्याच प्रभावाने चमकले... तेव्हां मी आप्पांना म्हटले की नाथांचे नाटक वाचून तर पहा; पण मानी मनाचे नाथ वाचून नापसंतीचा धोका घेण्यास तयार होईनात आणि तो योग काही जुळून येईना. तरीही नाथांनी 'लोकसंग्रह', 'जातिवंत मराठा वीर' यांसारखी नाटके लिहिलींच. नाथमाधव-युग लोकमान्य नाटक मंडळींत त्यांचे 'लोकसंग्रह' नाटक कसे येऊ शकले नाही याची आठवण श्री. ना. वि. कुलकर्णी यांनी दिलीच आहे. 'जातिवंत मराठा वीर' हे त्यांचे नाटक शाहुनगरवासीमध्ये आणि 'लोकसंग्रह' आनंदविलासमध्ये आले. पण 'विनोद' आणि 'म्युनिसीपालिटी'च्या धूमधडाक्यांत नाथांचे हे गंभीर प्रसंगाचे नाटक टिकाव धरू शकले नाही. कारणे काहीही असोत; नाथांनी कादंबरीचा आपला वैभवाचा आणि सन्मानाचा संसार मोडून या नकली, नाटकी, दिखाऊ वैभवाकडे वळणें आत्मघातकी होईल व त्यांच्या लेखणीतून निघणाऱ्या ओजस्वी, १२३ तेजस्वी कादंबऱ्यांना मराठी वाङ्मय मुकेल या दृष्टीने त्यांची कादंबरी की नाटक ? या द्वंद्वांतून लौकरच मुक्तता व्हावी असे त्यांना पटवून देण्याच्या माझ्यासारख्या स्नेह्याच्या प्रयत्नास यश आले आणि मनाचा विकल्प सोडून त्यांनी आपल्या पूर्व- संकल्पाला वाहून घेऊन एकापेक्षा एक अधिक तेजस्वी कादंबऱ्या लिहून हरी- भाऊंच्या आणि फडके-खांडेकरांच्या कालखंडांत “नाथमाधव-युग" निर्माण केलें, आणि त्याचबरोबर मराठी कादंबरी-वाङ्मयांत आपलें नांव अजरामर केलें. - नाथ अल्पायु- गेले आणि मराठी साहित्याची मोठीच हानी झाली. अल्पायु गेल्यामुळे तिघांच्या अकाली निधनाने अशी हानी झाली आहे. कवींमध्ये बालकवि ठोमरे, नाटककारां- मध्ये गडकरी आणि कादबरीकारांत नाथमाधव. गडकऱ्यांच्या अकाली निधनामुळे एकच प्याला नाटकांतील पदें, 'राजसंन्यास' नाटक अपुरे आणि कितीतरी संक- ल्पित नाटकांना महाराष्ट्र मुकला. तीच स्थिति नाथांच्या निधनाने कादंबरी क्षेत्रांत झाली. शिवकालीन कथानकें संपल्यावर संपूर्ण पेशवाई कादंबरीरूपाने पूर्ण करावी असा नाथांचा संकल्प होता; आणि तो पुढे त्यांचे तरूण मित्र श्री. हडप यांनी पूर्ण केला, ही गोष्ट वेगळी. पण नाथांची मनीषा अपुरी राहिली ती राहिलीच ! आणि म्हणून नाथांच्या त्या पुढील वाङ्मयाला महाराष्ट्र मुकला हे निर्विवाद आहे. नाना आणि नाथ- दैवज्ञ समाजाला भूषणभूत असे हे दोन थोर पुरुष होऊन गेले. एक ना. नाना शंकर शेट आणि दुसरे नाथ-माधव. दोघांचे कार्य वेगळे, परिस्थिति वेगळी व मिळविलेला लौकिकही वेगळा. पण या दोघांचे एकत्र नांव मला सुचण्याचे कारण असे की, हे दोघेही केवळ जातीसाठी झिजले नसून नाना महाराष्ट्रांतील आम जनतेसाठी आणि नाथ अखिल मराठी वाङ्मयासाठी झटले आणि नांवलौकिकास आले. दोघांमध्ये आणखी एक साम्य आहे. दोघांची थोरवी त्या दृष्टीने सारखीच आहे. ते दोघेही वंशाच्या उपनांवाने ओळखले जात नसून प्रत्येकाने आपल्या नांवाने एक नवी वंशशाखा निर्माण केली. नानांचे उपनांव मुकुटे व नाथांचे उपनांव पितळे; पण या मुर्कुटे वंशांत नानांमी नाना शंकर शेट ही वंशशाखा निर्माण केली आणि नाथांनी आरंभी कोणत्याही हेतूने का होईना, पण नाथमाधव या टोपण नांवाने दैवज्ञ समाजांतील पितळे वंशांत-फार काय पण मराठी कथा वाङ्मयांतील १२४ व्यक्ति आणि वाड्मय विभागांत एक स्वतंत्र उपशाखा स्थापून नवें नाथमाधव युग निर्माण केलें; ही काय कमी थोरवी ? व्यक्ति आणि वाङमय- अशी दुहेरी ओळख कुणाही साहित्यिकाची करून देण्यात येते. लेखकाच्या वाङ्मयाची ओळख समीक्षा-ग्रंथाने होते; आणि व्यक्तीची खरी ओळख अशा या आठवणी-ग्रंथाने होते. नाथांच्या कादंबऱ्यांचे वाङ्मयीन समीक्षण आज ना उद्या होईल अशी मी आशा बाळगतो. त्या दृष्टीने आजवर उपेक्षा झालेल्या माझ्या या कादंबरीकार मित्राकडे नाथांचे एक निस्सीम चहाते आणि या आठवणींचे संग्राहक श्री. पु. बा. कुळकर्णी यांच्या दीर्घ व चिकाटीच्या प्रयत्नाने का होईना पण विद्यमान विश्वविद्यालयीन विद्वान प्राध्यापकांचे लक्ष वेधले जात आहे, ही आशादायक घटना आहे. त्यांच्या शिफा- रशीनें नाथांची पुस्तकें जर विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमांत घेण्यात आली तर त्यांच्या वाङ्मयीन ग्रंथांचे समीक्षण होणे सुकर होईल. आणि नाथांच्या कादंबऱ्यांचे यथार्थ मूल्यमापन मराठी वाचकांस वाचायला मिळून नाथांची खरी वाङ्मयीन महनीयता जगापुढे येईल. स्नेही आणि सामान्य वाचक या दृष्टीने तरतमभावांत न शिरतां मी आज या लेखांत एवढेच म्हणूं शकेन की, हरीभाऊंच्या हयातीतही हरीभाऊंचा समकालीन म्हणून एक श्रेष्ठ व तितकाच लोकप्रिय कादंबरीकार असा नावलौकिक नाथांनी मिळविला, हीच त्यांची वाड्मयीन महनीयता ! व्यक्ती या दृष्टीने त्यांची थोरवी त्यांच्या वाङ्मयीन पुण्याईपेक्षा अधिक आहे हे मी या लेखाच्या प्रारंभीच सांगितले आहे. नाथमाधव या व्यक्तीची खरी ओळख नव्या पिढीला व्हावी या दृष्टीने त्यांच्या समकालीन निकटवर्ती स्नेह्यांच्या व परिचित अधिकारी लेखकांच्या आठवणी व लेख परिश्रमपूर्वक मिळवून ते या ग्रंथांत प्रकाशित करण्याने माझे मित्र श्री. पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी यांनी फारच थोर कामगिरी केली आहे, असें मी मानतो. आणि याच दृष्टीने मी त्यांचे अभिनंदन करून हा स्मृतिलेख संपवितो.
नाथमाधवांच्या सामाजिक कादंबऱ्यांतील कांहीं महत्त्वाचे विशेष [२१] (लेखिकाः-प्रा. सौ. चारुशीला गुप्ते, एम्. ए.) कै. नाथमाधवांनी आपल्या सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या द्वारे मराठी कादंबरीचे दालन भव्य आणि विस्तृत केलें; परंतु त्यांच्या वाड्मयसेवेचा सत्कार रसिकांकडून ज्या प्रमाणांत व्हावयास पाहिजे होता त्या प्रमाणांत झाला नाही असे खेदपूर्वक म्हणावे लागते. महाराष्ट्रशारदेच्या दरबारांत त्यांना उपेक्षित मानकऱ्या- चीच जागा देण्यात आली आहे. एकादी दुसरी कादंबरी लिहूनही ज्यांचा अपूर्व गौरव करण्यात आला आहे असे बरेच कादंबरीकार दाखवितां येतील ! परंतु केवळ संख्येनेंच नव्हे तर वाचयीन मूल्याच्या दृष्टीनेही ज्यांनी मराठी कादंबरीला नवबहार आणला, त्या नाथमाधवांना प्रत्येक जाणत्या रसिकाने अवश्य मुजरा करावयास हवा. एक श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार मराठी कादंबरी-क्षेत्रांतील वास्तववादी युगाला हरीभाऊंनी सुरवात केली. मध्यम वर्गातील महाराष्ट्रीय जीवनाची सत्य व यथायोग्य चित्रे त्यांनी आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून रेखाटून आपल्यापुढे मांडली आणि सामाजिक कादंबरीची एक परंपरा निर्माण केली. याच परंपरेतील एक अग्रेसर लेखक म्हणून कै. नाथमाधव यांचा गौरवाने उल्लेख करण्यात येतो. या युगपरंपरेचे बरे वाईट विशेष नाथमाधवा- च्याही कादंबऱ्यांतून दिसणे अपरिहार्य आहे. परंतु आपल्या युगाच्या प्रतिनिधित्वा- बरोबरच त्यांची सामाजिक कादंबरी स्वतंत्र व वैशिष्टयपूर्ण असें वाण आपल्या- बरोबर घेऊन आली. एक श्रेष्ठ दर्जाचे सामाजिक कादंबरीकार म्हणून नाथमाधवांचा जो उल्लेख करण्यात येतो, त्यांतील रहस्य हे आहे व त्याचाच उहापोह प्रस्तुतच्या संक्षिप्त लेखांत करावयाचा आहे. कुटुंबव्यवस्थेचा टीकाकार कै. नाथमाधव ज्या काळांत वावरले तो काळ सामाजिक सुधारणेचा होता. बालविवाह, प्रौढविवाह, जातिभेद, स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह वगैरेसारख्या त्या काळांतील अनेक जिव्हाळ्याच्या समस्या तत्कालीन जाणत्या समाजसेवकांपुढे उभ्या १२६ होत्या. स्त्रीपुरुषांच्या वैयक्तिक व सामाजिक परस्पर संबंधांसंबंधी खल होत होता. या सर्व सामाजिक चळवळींचे पडसाद तत्कालीन वाङ्मयांत उमटणे अटळ होतें. कादंबरीकार हा मानवी व त्याबरोबरच सामाजिक जीवनाचा भाष्यकार असतो. त्यामुळे ज्या काळांत तो वावरतो त्या काळांतील निरनिराळ्या आंदोलनाबरोबर त्याच्या लेखणीला उदासीन राहतां येणें सुतराम शक्य नसते. आणि म्हणूनच बसु बिलापासून ते अराजकतेपर्यंतचे सर्व प्रश्न नाथमाधवांनी आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून हाताळले आहेत; परंतु नाथमाधवांचे वैशिष्टय एका निराळ्या मुद्यामुळे आपल्या प्रत्ययास येते. आणि ते म्हणजे सामाजिक टीकाकाराच्या भूमिकेबरोबरच त्यांनी कुटुंबव्यवस्थेच्या टीकाकाराची भूमिका स्वीकारून आपल्या सर्व सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या काळांत सर्व समाजसुधारकांचे लक्ष सामाजिक वा पर्यायाने राष्ट्रीय प्रगतीच्या मार्गात धोंड म्हणून खड्या राहिलेल्या प्रश्नांकडे वैधले होते; परंतु ज्या कुटुंबसंस्थेच्या व्यवस्थापनेवर सबंध सामुदायिक जीवनाचें व्यवस्थापन अवलंबून असते त्याकडे कुणीही विशेष लक्ष दिले नव्हते. दुर्लक्षित झालेले असे कौटुंबिक प्रश्न नाथमाधवांनी आपल्या कादंबऱ्यांतून हाताळून, अशा प्रश्नांची उपेक्षा केल्यास कोणती हानी होते, हे आपल्या कादंबरीतील चित्रणाच्या- द्वारे स्पष्टपणे दाखविलें. गृहशिक्षणाचे महत्त्व नाथमाधवांच्या काळांत मध्यम वर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये 'सावत्रपणाचा' प्रश्न अतिशय प्रबल वरूपांत वावरत होता. हा प्रश्न अत्यंत कुशलतेने हाताळून सावत्र- पणाच्या भावनेमुळे किती घोर परिणाम होतात याची त्यांनी यथार्थ व वास्तविक चित्रे रेखाटली. 'सावत्र' हा शब्दच मत्सराचें व द्वेषाचे रण माजविणारा. त्याने कित्येक कुटुंबें व घराणी रसातळास पोचविली आहेत एवढेच नव्हे, तर खून आणि रक्तपात सुद्धा केले, असे त्यांनी स्वतःच उद्गारही काढले आहेत. 'सापत्नभाव' या कादंबरीत सावत्र आईचे-नंदिनीचें में व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटले आहे तें अत्यंत परिणामकारक व वस्तुस्थितिनिदर्शक आहे. सावत्रपणाचा प्रश्न इतक्या जिव्हाळ्याने दुसऱ्या कोणत्याही कादंबरीकाराने हाताळला नाही. कै. नाथमाधव गृहशिक्षणाचे भोक्ते होते असे त्यांच्या कादंबऱ्या वाचल्यानंतर तात्काळ लक्षात येते. योग्य त्या गृहशिक्षणाच्या अभावी लहान मुलांच्या मनावर कशा प्रकारे संस्कार घडतात व पुढे त्यांचा स्वभाव त-हेवाईक कसा बनतो, हे त्यांनी 'देशमुखवाडी' व 'डॉ. कादंबरी' या दोन कादंबऱ्यांतून दाखविले. यशवंत-शांता, कमलिनी आणि प्रभाकर या परस्परविरोधी जोड्या रेखाटून त्यांनी योग्य गृहशिक्ष- .
णाचा सुपरिणाम दाखविण्याचा प्रयत्न केला. ज्या कुटुंबामध्ये योग्य तें गृहशिक्षण नाही ते लवकर अधोगतीस जाते. गुणवान् व सुशील अशी गृहरने ज्यांच्या घरी आहेत तें कुटुंब व पर्यायाने तो समाज सामर्थ्यवान व चारित्र्यवान झाल्याशिवाय राहाणार नाही ही त्यांची आवडती तत्त्वे त्यांनी आपल्या अनेक सामाजिक कादंब- यांतून वाचकांना शिकविली. संयमशील लेखन नाथमाधवांच्या कालखंडांत सुशिक्षित समाजामध्ये दिखाऊपणा वाढल्या प्रमा- णावर दिसू लागला होता. उथळ वृत्तीचे सुशिक्षित स्त्री-पुरुष सामाजिक सुधारणेच्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत तत्त्वांचा विपर्यास करीत असलेले आढळून येत होते. मार्ग चुकलेल्यांना योग्य ती दिशा दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाथमाधवांनी केला आहे, असेंच त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या आपणांस दर्शवितात. नाथमाधव सुधार- णेच्या विरुद्ध नव्हते. तसे असते तर त्यांच्या मानसकन्यांचे त्यांनी प्रौढविवाह केले नसते. त्यांना सुशिक्षितच नव्हे तर परदेशप्रयाण करण्याएवढे अतिशिक्षितही रंग- विले नसते. परंतु सुधारणा जरी झाली तरी ती मानवेल तेवढीच असावी, नव्या- जुन्या पिढीला अनुमत एवढीच असावी असा बालबोध दृष्टिकोण नाथमाधवाचा भाहे. त्यामुळेच त्यांनी डॉक्टर कादंबरीला उच्च शिक्षण देऊनही अत्यंत शालीन किंबहुना पुराणांतील पंचकन्यांच्या तोडीची पतिनिष्ट रेखाटली आहे. या काहीशा बालबोध विचारसरणीमुळेच त्यांची लेखणी अत्यंत संयमशील राहिली आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून खलनायक आहेत, पण ते दुष्टपणाचे मूर्तिमंत पुतळे नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांतून शृंगाररसाचा मर्यादित आविर्भाव आहे. कोणत्याही भावनेला वा विकाराला एका विशिष्ट कक्षेच्या बाहेर जाऊ न देण्याची सावधानता घेतल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांतील कथासूत्र बांधेसूद व रेखीव उतरली आहेत. मानवी जीवनाकडे पहाण्याची सूक्ष्म दृष्टी नाथमाधवांच्या नंतरच्या युगांत मराठी कादंबरीनें मानसशास्त्राची दुशाल पांघरली. परंतु आपल्या आवडत्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी त्यापूर्वीच मनाचे शास्त्रीय दृष्टया पृथक्करण करण्याचा उपक्रम अभावितपणे का होईना, नाथमाधवांनी सुरू केला. डॉक्टर कादंबरीतील कमलिनीचा पति रघुनाथ किंवा शांता, 'सापनभाव' मधील नंदिनी, 'नटसम्राट' मधील नायक ही खभावचित्रे वरील विधानाची साक्ष देतात. बहुतेक सर्वच कादंबऱ्यांतील पात्रांच्या स्वभावाचा विकास मनोविश्लेषण पद्धतीने केला गेला आहे; त्यामुळे तें खभावचित्रण. अत्यंत उठावदार व स्वाभाविक १२८ झाले आहे, व त्यावरून कादंबरीकारांच्या मानवी जीवनाकडे पाहण्याच्या मार्मिक, सूक्ष्म व चिकित्सक दृष्टीचाही अनुभव येतो. जिवंत स्वभावलेखन बोधवादाची बैठक बहुधा कादंबरीच्या सहजसुंदर गुणांना मारक होत असते. इतकेच नव्हे, तर त्यामुळे स्वभावलेखनांतही विसंगती उत्पन्न होते. परंतु नाथमाध- वांच्या कादंबऱ्यांतून बोधवाद व कलात्मकता यांचा मनोहर मिलाफ झाला असल्या- खरणाने सर्वसाधारणपणे बोधवादामागें रेंगाळत येणारे हे दोष आपोआपच टळले आहेत. याला कारण म्हणजे मानवी मनाच्या नाजूक व संस्कारक्षम तंतूवरून अत्यंत अलवार हाताने गज फिरवून युक्त व इष्ट पडसाद उमटविले आहेत. शिवाय आपल्या विशिष्ट तत्त्वांशी त्याबरोबरच अत्यंत एकनिष्ठ राहिल्याने त्यांच्या कारवयतन अभिजात गुणांचा सहज उत्कर्ष झाला आहे व खभावलेख जिवंत उतरले आहेत. त्यांच्या लेखणीचा गुणगौरव याखेरीज, अत्यंत रसाळपणाने व खुलवून कथावस्तु वाचकांपुढे ठेवणे हाही एक महत्त्वाचा व ठळक विशेष त्यांच्या कादंबऱ्यांतून आढळून येतो. कथावस्तु कशी असावी यापेक्षा तिची मांडणी कशी केली आहे, यावर कादंबरीचे अर्धे यश अव- लंबून आहे, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. कै. नाथमाधवांनी ही खुबी चांगलीच आत्मसात् करून घेतली होती आणि म्हणूनच ज्या काळांत हरीभाऊंच्या युगाची मोहिनी मराठी वाचकांच्या मनावर पसरली होती, ज्या वेळी कै. वा. म. जोशांच्या रागिणीने मराठी रसिकांची मने भारून टाकली होती, अशा काळांतही नाथमाध- वांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या, एवढेच नव्हे तर नंतरच्या काळांत 'फडके-खांडेकर' यांच्या लालित्यपूर्ण लेखणीबरोबरही नाथमाधवांची लेखणी तगून राहिली, यांतच तिचा 'गुणगौरव' आहे. कालमानाप्रमाणे वाड्मयीन कसोटीमध्येही फरक पडत जातो. नाथमाधवांच्या कादंबरीला आजची कसोटी कदाचित् लागू पडणार नाही. उजवल प्रतिमेचा उत्कट उत्कर्ष कदाचित् त्यांच्या कादंबरीत आढळून येणार नाही; परंतु अव्याहतपणे जें मनाला भासमान झाले व पटलें तें प्रामाणिकपणाने मराठी वाचकांच्या पुढे ठेवण्याचा जो अमर्याद उत्साह कै. नाथमाधवांनी दाखविला, त्याबद्दल त्यांचे आदरयुक्त कौतुक प्रत्येक समंजस वाचकाने करावयास हवे असे मला वाटते.
सर्व प्रकारच्या औषधांकरितां खालील
ठिकाणी अवश्य चौकशी करा.
माफक दर
लोटलीकर ब्रदर्स
अॅण्ड कंपनी
केमिस्टस्, ड्रगिस्टसू अॅण्ड जनरल मचे
५०३, चिराबाजार, मुंबई नं. २
आर. एन्. शिंदे अॅण्ड सन्स्
चष्म्यांचे व्यापारी
- मुख्य दुकान:-
२०७, गिरगांव रोड, मुंबई ४.
-:शाखा:-
(१) चामारबाग रोड, (२) मुकुंद मॅनशन,
परळ
न. चिं. केळकर रोड,
दादर, मुंबई २८.
मुंबई १२
imammomrnmmmmm नाथमाधवांच्या लोकप्रिय कादंबऱ्या ८-०-० " नवभारत प्रकाशन नवभारत प्रकाशन संस्थेनें कै. नाथमाधव यांच्या पुढील लोकप्रिय कादंबऱ्या व नाटके सुंदर स्वरूपांत प्रसिद्ध करून नाथमाधवमाला गुंफिली आहे; व त्यांचे दुर्मिळ वाड्मय सर्वांच्या आटोक्यांत आणून सोडले आहे. वीरधवल सुहासिनी २-८-० ( शालेय) १-४-० हेमचंद्र रोहिणी २-०-० डॉक्टर कादंबरी ८-०-० दोन भावंडे २-०-० सोनेरी टोळी (शालेय) १-०-० देशमुखवाडी ५-०-० मराठ्यांचा आत्मयज्ञ १-८-० स्वयंसेवक ५-०-० जातिवंत मराठा वीर १-८-० विमलेची ग्रहदशा ३-०-० नेताजी पालकर २-०-० विहंगबंद ३-०-० सापत्न भाव ३-८-० सांवळ्या तांडेल २-०-० ग्रहदशेचा फेरा २-०-० ( शालेय) १-२-० । मालती माधव १-८-० पत्ता-नवभारत प्रकाशन संस्था, गिरगांव, मुंबई ४. MRITIRIRIT सर्वोत्कृष्ट ब्लॉक्स व कलर प्रिंटिंग या बाबतींत सर्वांनी वाखाणलेला प्रेसप्रोसेस स्टुडिओ वक्तशीर व मनपसंत कामाबद्दल ख्याति येथे सर्व कामें तज्ञांच्या देखरेखीखाली होतात. प्रो. एच. एस. धारगळकर व्हिक्टोरिया मिल्स कंपाऊंड, गांवदेवी, मुंबई नं. ७
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.