The Asiatic Society, Kolkata
Sukh Ani Santi
Front matter
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
This Book forms part of the
C. B. N. Cama Collection of
Oriental Literature.
Presented to the
ASTIC SOCIETY OF BENGAL
in memory of
C.B.N.CAMA, Esg. 3. A LL.M. (Cantab.) Bar-at-Law, I.C.S.,
by his wife
No text on this page.
सुख आणि शांति
हा ग्रंथ,
लॉर्ड एव्हबरी, पी. सी.
एफ्. आर. एम., डी. सी. एल., एलएल. डी.
ह्यांच्या
.
" पीसन्ड इपिनेस"
या ग्रंथाधारें
महादेव हरि मोडक, बी. ए.
ह्यांनी लिहिला.
।
मुद्रक व प्रकाशक.
अच्युत चिंतामण भट, ' यशवंत ' प्रेस, कसबा पेठ, पुण,
आवृत्ति दुसरी, सन १९१५.
सर्व हक प्रकाशकांचे स्वाधीन.
किंमत अडीच रुपये.
सुख
एको वशी सर्वभूतांतरात्मा ।
एक रूमं बहुधा यः करोति ।
तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरा-।
स्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम् ।।
-कठोपनिषद्.
शान्ति
'नित्यो नित्यानां चेतनश्चेतनाना-।
मेको बहूनां यो विदधाति कामान् ।
तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरा-1
स्तेषां शांतिः शाश्वती नेतरेषाम् ।।
-कठोपनिषदं.
प्रस्तावना. लॉडे एठहबरी ही महनीय पदवी पावलेले सुप्रसिद्ध लेखक व राजकारणी गृहस्थ मरहूम सर जॉन लबक यांच्या ऑन पीस अॅन्ड हँपिनेस नामक. ग्रंथाच्या आधाराने प्रस्तुतचा ग्रंथ लिहिला आहे. सदर साहेबांचे लेख सुविचारपरिप्लुत व सुभाषित- मय आहेत, हे वाचकांस विज्ञातच आहे. ह्यांच्या ग्रंथांत परक्यांचे उतारे इतके आहेत की, या उसनवारीबद्दल पुष्कळांनी त्यांचे तोंडावर त्यांना उघड नांवें ठेविली आहेत. तथापि, त्यांना मीपण स्थापित करण्यापेक्षां कुठून तरी जगतांत सुविचार वाढविणे हीच गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, त्यांनी आक्षेपकांची परवा न करितां, आपला परकीय सूक्ति-संग्रहाचा क्रम याही ग्रंथांत कायम ठेविला आहे. आणि प्रस्तुतचा हा मराठी ग्रंथ वरील ग्रंथाचे धोरणानेच लिहिला असल्यामुळे यांतही परसूक्तिसंग्रह मोकळे मनाने केला आहे. या कामी जी गद्यपद्यात्मक अनेक अवतरणे घेतली आहेत, त्यांतील कित्येक, मूळच्या इंग्रजी अवतरणांची भाषांतरें करून घातली आहेत; व इतर बरीचशी, संस्कृत व मराठी वाङ्- मयांतून आयती घेतलेली आहेत. अवतरणांचे आधार देतांना, पुष्कळदां, मूळ ग्रंथ किंवा कर्ता देत न बसतां हितोपदेशासारख्या तसंग्राहक ग्रंथांचाच निर्देश केला आहे. गद्यपद्यांची भाषांतर २ अक्षरशः नसून भावार्थ घेऊन केलेली आहेत. अवतरणांखेरीज बाकीचे स्थळी पदरचा असा मजकूर पुष्कळच घातला आहे; आणि धर्म व ब्रह्मविद्या ही दोन प्रकरणे तर केवळ स्वतंत्र लिहिली आहेत. तथापि मूळ ग्रंथाच्या हेतूकडे दुर्लक्ष न होईल, अशी शक्य तितकी तजवीज ठेविली आहे. मात्र या ग्रंथांत दोष असतील ते माझे आहेत; व गुण असतील ते इतरांचे आहेत. मूळ ग्रंथांत एकंदर अठरा प्रकरणे आहेत. तितकींच्या तितकीच मराठीतही घेतली आहेत. पण त्यांतील अठरावें प्रकरण राष्ट्रांची शांति हे आमचे लिहिण्यांत पंधरावें घातले आहे. याचा हेतु हा की, मूळ ग्रंथ प्रथमपासून लक्षपूर्वक वाचून पहातां राष्ट्रांची शांति नामक जें अठरावें प्रकरण तें बाकीच्या प्रकरणांशी तितकें सुश्लिष्ट आहेसें दिसत नाही. कारण, बाकीची सतरा प्रकरणे वैयक्तिक सुख-शांतीचे मीमांसेंत गुंतली असतां, एवढेच काय तें प्रकरण राष्ट्रीय शांतीचा विचार करीत आहे; असा प्रकार आहे. तथापि तें अजी वगळावे इतके परकें नाही. दहा दिवसांचे नसले तरी तीन दिवसांचे तरी त्याचे मुख्य विषयाशी नाते आहे; ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की, स्वतंत्र दृष्टीने पाहतां त्यांतील विषयही फारच महत्त्वाचा आहे. " युरोपांतील आजकालची प्रमुख राष्टें सांप्रत स्वार्थलोलुप होऊन परोत्सादनार्थ जनतेला सैन्याचे खर्चाखाली चिरडून टाकीत आहेत व परस्परांची मनें साशंक ठेवून सर्वत्र अस्वस्थता उत्पन्न करीत आहेत, ही गोष्ट सर्वथा सुखशांतीला घातक आहे, अवाढव्य सैन्ये वाढवून ३ - , असा राजकारणपटु व विवेकी अशा लबक साहेबांचा स्पष्ट अभि- प्राय आहे, व तो त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीस अनुसरून जगापुढें बिनभाडपणे मांडिला आहे. आतां, हिंदुस्थानाला आजचे स्थितीत युरोपचे प्रबल राष्ट्रांनी कसे वागावे आणि कसे नाही याचा विचार म्हणजे ' कुंकवाचे उठाठेवी ' पैकीच खरा. आणि यामुळे, या कामी उपदेशाची अपेक्षा एतद्देशीय वाचकांस नाही, असे कित्येकांस वाटेल. पण, दूरस्थ आकाशांतील शनि, मंगळ, धूमकेतु इत्यादिकांचे प्रवर्तन किंवा नियमन करणे जरी आपणां मानवांचे हाती नसले, तरी, त्यांच्या चलनवलनांचा परिणाम आपणांस भोगावा लागतो, असा अनुभव असल्यामुळे, .:' मंगळ वक्री आहे की मार्गी आहे ? शनि उदरी आहे की लत्तेला आहे ? '' इत्यादि गोष्टी आपणांस समजून घेणे अवश्य पडते. त्यांचप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी, अमेरिका इत्यादि प्रबल राष्ट्रांनी किती सैन्य ठेवावें, किती डेडनॉट्स (बेडर जहाजें ) बांधावी, वगैरे कामी आम्हां भारतवासीयांना जरी दमडीचेही उधारीने कोणी पुसत नसले, तरी सदर युद्धदुर्मद राष्ट्रांच्या सुविचाराचा किंवा कुविचाराचा बरा किंवा वाईट परिणाम आमचेपर्यंत येऊन पोचणारच पोचणार, असे निश्चित असल्याने त्याची वार्ता आपले कानी असणे जरूर आहे. याशिवाय तिसरी गोष्ट अशी की, इंग्लंड व हिंदुस्थान ही राजकीय दृष्टया तरी परकीय समजणे घातक आहे, नव्हे असे समजून चालावयाचेच नाही. त्यांचे नातें पोट आणि अवयव,' इतकें सन्निकट आहे. तेव्हां पोटाचे हालचालीची दाद ४ व . अवयवांना असणे अत्यंत न्याय्य आहे. कारण त्यांचेही स्वास्थ्य- अस्वास्थ त्यावर अवलंबून आहे. म्हणून सर्व गोष्टी मनांत आणून मराठी पुस्तकांतही भारतीय वाचकांसाठी या महत्त्वाचे प्रकरणाचा संग्रह केला आहे. शिवाय युरोपीय राष्ट्रांचे वैभव पाहून आम्हांपैकी कित्येक दिपून गेले आहेत आपणांस अधन्य मानीत आहेत. पण, त्यांचे असे लक्षांत येईल की, त्या वैभवांत घोळलेला व राजकारणी असा लेखक लार्ड एव्हवरी हा या घटोत्कची वैभवाने मुळीच संतुष्ट नसून, ही केवळ आसुरी संपत्ति असून परिणामी सत्यनाश करील ' असे घंटारवाने दुनियेला सांगत आहे. एतावता, हे प्रकरण मूळ विषयाशी पूर्ण संबद्ध नसले, तरी महत्त्वाचे व विचारणीय आहे, असे पाहून मराठी वाचकांकरिता कायम राखिलें आहे. मात्र तें 'चित्तस्वास्थ्या' पूर्वी घातले आहे. कारण, व्यक्ति हा राष्ट्राचा घटक असल्याने, राष्ट्रांतच शांति नसेल तर व्यक्तीला शांति मिळणे कठिण आहे. अर्थात् वैय्यक्तिक शांतीला राष्ट्रीय शांति ही पूर्वगामिनी पाहिजे हे उघड आहे. याखेरीज, · चित्तस्वास्थ्य हे प्रकरण मूळ ग्रंथांत सतरावे आहे, ते येथे सोळावे घातले आहे. याचाही न्याय ग्रंथ वाचल्यावर समजेल. यापलीकडे विषययोजनेंत महत्त्वाचा असा फरक केला नाही. मनुष्य पूर्व वयांत कसाही रगदार असो किंवा कितीही साहसी असो, तो या, जगांत काही दिवस लोटून बरेचसे टक्के.
नामक टोणपे व धक्के-बुक्के खाऊन नरम आला, म्हणजे त्याची ती रगदारी नाहीशी होते, व शांति " सारखें सुख कशांतही नाही, असे त्याला आआपच वाटू लागते. केंट नामक ग्रंथकाराने आपल्या " इन्टरनॅशनल लॉ" किंवा " व्यतिराष्ट्रीय करार ग्रंथांत म्हटले आहे की, "युद्धाचेही पर्यवसान शांति हेच आहे." आमचे वेदांत तर सर्वत्र, आरंभी अंती, "शांतिः शांतिः शांतिः" असा त्रिवार शांतिघोषच असतो. कारण, शांतीतच खरे सुख आहे. व ही गोष्ट लबकसारख्यालाही सिद्धान्तरूप वाटून त्याने ती मोट्या जोराने सर्वांपुढे ठेविली आहे. व चारी खंडांत "शांतीचे साम्राज्य" स्थापण्याचा अग्रमान इंग्लंडनेच घ्यावा, अशी लबकसाहेबांची शिफारस आहे. ही गोष्ट आम्हांस तरी सर्वथा श्लाघ्य वाटते. हिचा विचार पाश्चात्यांनीच करावा, असे नव्हे, तर युरोपचा अर्धा- मुर्धा इतिहास वाचून किंवा ऐकून ज्यांच्या डोक्यांत अशांततेचे वेडे विचार वावरूं लागले असतील, अशांनीही अवश्य करावा. म्हणूनच हा ग्रंथ मुद्दाम प्रसिद्ध केला आहे. लबक साहेबांचे ग्रंथांत फ्रेंच-ग्रंथकारांची पुष्कळशी अवतरणें आहेत. त्यांचा बोध माझे विद्वान् मित्र राजमान्य राजश्री हरि नारायण आपटे वं डॉक्टर वुइस्यमसन यांनी करून दिला, याबद्दल मा त्यांचा. आभारी आहे. त्याचप्रमाणं ज्या अनेक कविवर्यांचे सूक्तींचा फायदा या ग्रंथांत मी घेतला आहे त्यांचा, व ज्यांनी आप- ल्या शिक्षेने हा ग्रंथ लिहिण्याचे सामर्थ्य माझे ठायीं उत्पन्न केले ६ ती माझी परमपूज्य मातापितरें व अनेक विद्यालयीन शिक्षक यांचा मी फार फार ऋणी आहे. अखेर, ज्याने माझे बुद्धिस्थानी वसति करून हा ग्रंथ मजक- डून बोलविला त्या विश्वंभराला अनन्यभावानें शरण जाऊन ही प्रस्तावना पुरी करितों. काय म्यां पामरे बोलावीं उत्तरें। परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥ ग्रंथकर्ता.
विषयानुक्रमणिका. १ सुख. १ .... .... ४५ .... .... .... .... .... .... .... २ शरीर ३ मन ४ आरुरुक्षा ५ संतोष ६ आपत्ति ७ सदयता ८ शिक्षण ९ शत्रुमित्र १० श्रीमंती ११ सृष्टीची भषिणता १२ सृष्टिप्रेम १३ सद्यःकाल .... .... .... .... १०५ १३१ १५५ १७३ १९९ २१९ २४७ २६३ २७७ ३०७ ३१९ ३३७ ३५३ ३७१ ३९९ .... .... .... .... .... .... .... १४ वैदग्ध्य .... .... .... १५ राष्ट्रांची शांति १६ चित्तस्वास्थ्य .... १७ धर्म १८ ब्रह्मविद्या ....
No text on this page.
tattuttitatut.tt.tt.t.tt.t.tt.tt.ttttttar
प्रकरण पहिलें.
सुख.
betetetet, tatatatatatatatatatetetettetet (श्लोक) नास्ति बुद्धिरयुक्तस्य । न चायुक्तस्य भावना ॥ न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥१॥ -श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ: :---ज्याचे मन स्थिर नाही, त्याला ज्ञान नाहीं किंवा भक्तिही नाही; भात नाही त्याला शांति नाही; आणि ज्याला शांति नाही त्याला सुख कोठून असणार ? ( अमंग) नुका म्हणे सुख पराचिया सुखें । अमृत हे मुखे स्रवतसे ॥ -तुकाराम. (श्लोक-चरण) यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतोः । -शंकराचार्य-शतश्लोकी. भावार्थ:--जगत्रयांत कोणीही झाला तरी सुखप्राप्त्यर्थ यत्न करीत असतो, दुःखप्राप्त्यर्थ करीत नाही. (श्लोक-चरण) सुखाय कर्माणि करोति लोकः । -श्रीमदागवत. भावार्थ:-लोक मुखार्थच क्रिया करितात.
॥ श्री.॥ सुख आणि शांति. प्रकरण १. सुख. सुखार्थाभुवि जन्तूनां । प्रायः सर्वाः प्रवृत्तयः ॥ भावार्थ:-या भूतलावर प्राण्यांच्या सर्व खटपटी प्रायः मुखप्राप्ती- स्तवच असतात. सुख आणि शांति ही प्राप्त व्हावी म्हणून सर्व मनुष्यांची अह- निश तळमळ चालू असते; आणि असे असणे म्वाभाविकच आहे. कारण, या दोहावांचून जीवित हे मनुष्यास असह्य-नव्हे, अशक्यच होईल. बरें, एवढी दोन सुदैवाने हाती लागल्यास मनुप्याची हांवच बुटली. तिच्यापलीकडे जाण्यास जागाच नाही. अर्थात् ही दोन्ही जीविताचे क्षेमचर्येला आवश्यक असून, जीवितांतील आन्तिम साध्येच होत. आतां, “ या दोहोंवांचून ' असें जें आम्ही वरील वाक्यांत म्हटले आहे, याचे कारण असे की, शांतिविरहित मुख किंवा सुखाविरहित शांति अशी पृथक् कल्पना बहुतेक असं- भाव्यच आहे.. ही परस्परसहचारीच आहेत; किंवा या संसाररूप वृक्षाची जुळी किंवा जोडफळे आहेत, असे म्हटले तरी शोभेल. आतां, ही प्राप्त व्हावी कशी ? , २ सुख आणि शांति. [प्रकरण वरील प्रश्नाचे उत्तर मिळण्यास, ही कशावर अवलंबून राहतात, याचा शोध आपण केला पाहिजे. बहुतांचा समज असा आहे की, द्रव्य असले म्हणजे सुख-शांतीला तोटाच नाही. परंतु, हे. खरें नाहीं. एक कवि म्हणतोः (श्लोक) पइ पइ करूनीयां जोडिल्या द्रव्यराशी। धन बहु सुख देतं वांदुनी अंतराशीं ॥ परि धन असूनीही दुःख डंखी उराला । म्हणुनि शरण आला सद्गुरो त्वत्पदाला ॥१॥ विजयप्राप्तीनेही ही प्राप्त होतातच असे नाही. मैत्रीने ही मिळतात असेंही नव्हे. शरीरबल किंवा आरोग्य असल्याने तरी. यांची जोड निश्चित होईलसें म्हणवत नाही. एवढी गोष्ट खरी की, ह्या वरील सर्व गोष्टी सुखाला व शांतीला साधक आहेत; परंतु ह्यांपैकी एक किंवा अनेक जेथे जेथे आहेत तेथे तेथें सुख व शांति ही अबाधित सिद्ध आहेतच असें म्हणवत नाही. आपल्याला जन्मतःच नांवलौकिक, आरोग्य, द्रव्य, दीर्घायुता ही प्राप्त असतील; तथापि, त्यायोगाने आपण सुखी असूच असा नियम नाही. कारण, सुख हे परावलंबी किंवा वस्नुतंत्र नाही. तें म्वतंत्र म्हणजे ज्याचे त्याचेच म्वाधीन आहे. ते स्वत:च निर्माण केले पाहिजे; तरच मिळते. पुष्कळशी. वणवण करून किंवा यातायात करून मिळत नाही व मिळणे शक्यही नाही. कारण, तें आत्मनिष्ठ आहे. म्हणजे स्वतःच ठिकाणी .
१ लें.] सुख. ३ रहात असते. श्रीनृसिंहसरस्वतींनी आपले ' स्वात्मसौख्य ' ग्रंथांत म्हटले आहे: (आंवी) आत्मानिष्टावेगळा पाहीं। सौख्यभोग कोणास नाहीं।। एक कवि ह्मणतोः (श्लोक) मा धाव सुखहेतोस्त्वं । धावतां नु कुतः सुग्वं ॥ सुखरूपे निजे रूपे। सुखं तिष्ठ मुखी भव ॥ १॥ भावार्थ:-बावारे, तुला सुग्व पाहिजे असेल तर तत्प्राप्त्यर्थं इतस्ततः धांव धांव करीत सुटूं नको. कारण, तूंच पहा का, कुत्र्याप्रमाणे लस लस करीत धांवत सुटल्याने मुख कोन होईल ? तोंडाला पेंसमात्र येईल. खया सुखप्राप्तीची जागा वेगळी आहे. ती तुझेच टिकाणी [निजरूपी ] आहे; याकरितां तेथे स्थिर हो, म्हणजे सुखी होशील. कवीचें.हे म्हणणे सर्वथा निरपवाद आहे. आपलें सुख आप- लच हाता आहे. आणि त इश्वरान तसे ठेविल आह, यातच त्याचें बिनतोड शहाणपण व जीवांवर असणारे निरुपम प्रेम दिसून येते. कारण, सोन्यारुप्याचे तुकडे, ज्यांना आपण द्रव्य म्हणून म्हणतो, त्यांची किल्ली स्वतःशिवाय इतराचे (प्रत्यक्ष पुत्राचेही ) हाती गेल्याने जर आपण दुःखी होतो, तर द्रव्यादि साधनें खर्ची घालूनही जी मिळेलच अशी खातरी नाही, इतकी बहुमोल व दुर्लभ जी जिन्नस-सुख-तिची किल्ली जर परमेश्वराने इतरांचे हाती ठेविली असती, तर आपले जीवित गुलामापेक्षाही अधिक कष्टमय झाले असते. परंतु, त्या परमकारुणिक प्रभूनें या ४ सुख आणि शांति. [प्रकरण सर्वोत्तम व अखंड स्पृहणीय वस्तूची पेटी प्रत्येकाचे जवळ ठेवून, तिची किल्लीही ज्याची त्याचेच हाती दिली आहे. संसारांत प्रत्येकाची परिस्थिति, वय, व्यवसाय, अधिकार, साधनें, ही इतकी भिन्न भिन्न असतात की, सुखसंपादनाचे कामी सर्वांना सारखेच लागू पडतील, असे सामान्य नियम घालतां येणे शक्य नाही. इतकेच नव्हे, तर या कामीं धोपट वाट सांगू जाणेदेखील वेडेपणाचेच होईल. व्हरॉ म्हणून एक गृहस्थ होऊन गेला. त्याने सुख कशाला म्हणतात, याविषयी निरनिराळ्या विद्वानांचे अभिप्राय गोळा केले होते. त्या वेळी एकमेकांशी भिन्न असे २८८ अभि- प्राय त्याला मिळाले; आणि ते सर्वही शहाण्यांचेच. सारांश, मुखाचे स्वरूपाविषयी इतकें आनकान्त्य आहे. बाकी असे जरी आहे, तरी कोणाही पोक्त वयाचे मनुष्यास विचारूं गेलें असतां तो मोकळे मनाने बोलल्यास, आपणांस असें सांगेल की, काय सांगू? हरहर ! माझ्या हातून अमुक वेळी मोठी चूक झाली; ती न होती तर माझ्यासारखा आज राजा नसता. खरेंच त्या वेळी मला विनाकारण की हो भूल पडली ! तेवढी न पडती, तर आज काय पंढरी झाली असती. वास्तविक कांही मोठी गोष्ट नव्हती; पण मला आज जो जगाचा अनुभव आहे, तो जर असता तर आजला माझें जीवित किती तरी पटीने उपयुक्त, सोत्साह व सुखपूर्ण झाले असते." थिओडोर पार्कर हा मोठा गाढा विद्वान् होता; तथापि, आपल्याला अल्पवयांतच मृत्यु येत १ लें.] सुख. आहेसे पाहून तो मृत्युशय्येवर पडल्या पडल्या उद्गारला की, 'अरेरे, मला जर जीविताचे रहस्य वेळीच अनुभवाने समजले असते; किंवा एखाद्या ग्रंथावरून किंवा कोणा अनुभवी मनुष्याचे तोंडून जगांत जगावे कसे, शिकावें कसें, व्यायाम करावा कसा, इत्यादि गोष्टी मला कळत्या, तर आजला केवढी बहार झाली असती; व मी सुखी झालो असतो." - प्लूतार्क नामक ग्रंथकार आपले ग्रंथांत एके स्थळी निर्मळ मनाने असे लिहितो की, “मी आरंभी दुसऱ्याचे फायद्यासाठी म्हणून सत्पुरुषांची चरित्रे लिहिण्याचे सुरू केले. परंतु, लवकरच असे झाले की, मला स्वतःला त्यांचे चरित्रांची गोडी लागून, मी स्वकल्याणासाठी त्या चरित्रांचे मनन व अभ्यास करूं लागलो. व पुढे पुढे त्या थोर पुरुषांचा कित्ता मजपुढे ठेवून त्याप्रमाणे माझा स्वतःचा आयुप्यक्रम बनविण्याचे खटपटीस लागलो." एवंच, इतिहासाचे सतत अध्ययन व लेखन करण्याचा नाद असला, म्हणजे सहजच उदार व सच्छील अशा थोर पुरुषांचे चरित्र आप- णांस परिचित होऊन त्याचा ठसा आपले मनांवर आपोआप उम- टतो, व तेणेकरून जर कुसंगतीमुळे आपले ठिकाणी दुर्गुण किंवा नीचवृत्ति दृढ झाल्या असतील, तर या उदारचरितांचा कित्ता शांत व स्वस्थपणे मनापुढे उभा राहून आपणांमधील दोष दूर करितो. अर्थात् आयुष्यांत सुख-शांति पाहिजे असेल तर सत्संग अवश्य आहे.
६ सुख आणि शांति. [प्रकरण आपण नुसता शास्त्रार्थ बोलं लागलों, म्हणजे सुख-शांतीपरतें उच्चतम साध्य काहीही नाही असे उघड बोलून दाखवितो; परंतु, व्यवहारांत पहातां कितीक जण सत्ता, संपत्ति, किंवा कीर्ति यांना मुखशांतीपेक्षा अधिक महत्त्व देतात ? व याचमुळे सुख-शांतीचा मार्ग सुलभ असला तरी तो सोडून, सत्ता, संपत्ति किंवा कीर्ति मिळविण्यासाठी दीर्घायासही पत्करतात? अशांची स्थिति पाहिली म्हणजे, जरूसिलेमचे लोकांना उद्देशून येशूखिम्त म्हणाला होता की " हे संसारी जीव हो, शांतिसुखाचे मोल किती आहे, हे जर अजून तरी तुमचे ध्यानी वागेल, तर तुमचे किती तरी बरे होईल !" त्या वाक्याची आठवण होते. आपल- कडेही एका कवीने म्हटले आहे: (श्लोक) आशापाशविमुकानां यन्सुखं शनिचेतसा । कुतस्तद्वनलुब्धानामिनश्च तश्वधावताम् ॥ १॥ भावार्थः आशाबंधनापासन सुटलेल्या शांततीच्या पुरुषास सुख मिळते, तें द्रव्यलोभामुळे सरावैरा धावणान्या जीवाच्या वाट्याम कुट्टन येणार ! शांतीच्या गोष्टी बोलावयाच्या सोप्या आहेत; करून दाख- विणे मुस्किलीचे आहे. मनुष्याची इहलोकची संसारयात्रा म्हणजे एक मोठाच विकट प्रश्न आहे. कारण त्यांत दुरंत वैचित्र्य भर- लेले आहे. प्रत्येकाची कृति, आकृति, प्रकृति ही सर्वच भिन्न. अशा परिस्थितीत संगतीची माणसें आपणास अनुकूल करून घेणे हे सुखाला अंशतः तरी साधनीभूत असते. परंतु तसे करणे तर १ लें.] सुख. प्रथम त्या माणसांच्या स्वभावांचे यथार्थ ज्ञान झाले पाहिजे; व मग त्यांची मने वळविली पाहिजेत. आणि ही गोष्ट जबरदस्तीने साधत नाही. कारण, जबरीने माणसें अधिकच प्रतिकार कारतात. उपदेश किंवा आज्ञा हीही फारसे काम देत नाहीत. तेव्हां संवयीने परम्परांचे वर्तनाचा सांधा जुळवून घेतला पाहिजे; दुसरा मार्ग नाहीं. ऐहिक जीवित हैं एखादे उघडे चित्र किंवा ग्रंथाचे पत्र नसून, अनेक पृष्ठांचा किंवा अध्यायांचा तो एक सबंध ग्रंथच आहे, व त्याचा अर्थ उकलणे हे फार अवघड काम आहे. आपण हे अखिल विश्व मिळून एकच ब्रह्मांड समजतो. परंतु, एकपरी, अशी अनेक ब्रह्मांडे आहेत. किंबहुना जितके पिंड तितकों ब्रह्मांडे आहेत. व प्रत्येक व्यक्ति आपापले वेगळे ब्रह्मांड आपणाभोवती उभे करीत असते. सुखप्राप्तीची इच्छा नाही असा एकही मनुप्य आढळणें नाहीं परंतु मुखप्राप्तीचे खरे साधन कोणते हे थोड्यांसच माहीत असते. पुष्कळ लोक क्षणिक मौजेकरितां कायम सुखाला आंचवतात. आयुप्यांतील पूर्व कालांचे खरे महत्त्व ध्यानीं न घेतां जे त्याचा क्षणिक मौज करण्यांत व्यय करितात, त्यांना वृद्धापकालीं अश्रु ढाळण्याची पाळी येते. परंतु जे प्रथम कष्टाला न जुमानितां ऊन, वारा, पाऊस सोसन पेरणी करितात, ते मग आनंदाने पीक घेतात. म्हणच आहे; " चणे खावे लोखंडाचे, तेव्हां ब्रह्मपदी नाचे." सालोमन म्हणतो की, " ज्यांनी इंद्रियांचे लालन चालविलें त्यांचे कपाळी आपत्ति बांधलेली आहे. ज्यांचे चमचमीत फोडणी- .. , ८ सुख आणि शांति. [प्रकरण - १ वांचून व घळघळीत दारूवांचून भागत नाही त्यांचे हाती अखेर करवंटी यावयास चुकणार नाही". थामस ए. केम्पिस याचे म्हणणे तर याहीपलीकडचे आहे. तो म्हणतो, तुम्हांला मी एक सत्य सांगतों तें ध्यानांत वागवा. तें सत्य हेच की, या लोकी चैनचानही करावयाची आणि परलोकी ईश्वराशी सरूपताही संपा- दावयाची, या दोन्ही गोष्टी एकत्र तुम्हांस कधीही साधणार नाहीत. इंद्रियांचे लालन कराल तर परलोकाला मुकाल. इंद्रियांचे दमन कराल तर परलोकी सुखी व्हाल." श्रीमद्भागवतांत म्हटले आहे:- (श्लोक) कृच्छाय तपसे चेह । प्रेत्यानंत सुखायच ॥ भावार्थः......इहलोकी कठिण तप करावें, व परत्र अनंत सुग्व भोगावे. मोक्षमुल्लर म्हणतो, ज्याला मुखी कसे व्हावें हें साधत नाही, त्याच्यासारखा पापी कोणी नाही. सुखी होण्याची पहिली खुबी म्हटली म्हणजे अल्पाने संतुष्ट असणे ही होय." पास्कल नामक ज्ञाता म्हणतो, " प्रत्येक कामांत मर्यादा पाहिजे. आपल्या तृप्णेला किंवा आकांक्षेलाही सीमा ही हवीच; नाही तर सुख होणार नाही. असली म्हणजे सुखाची महागाई नाही. कारण, थोडीबहुत अनुकूलता आपणां सर्वांस असतेच. . आणि सर्वसंपन्नता को मासच मिळणार नाही, हे उघड आहे.". मुखी होण्याला दुसरी अवश्य गोष्ट म्हणजे अगोदर हे जग कशा प्रकारचे आहे याची पुरापुर ओळख पटवून घेणे ही होय.
१ लें.] सुख. . संसार म्हटला की, त्यांत अनेक धक्केवुक्के, अनेक उलथापालथी, दशाविपर्यय हे येणारच, हे लक्षांत वागवून प्रत्येक संसारी जीवाने आयुप्यांत प्राप्त होणारे जयापजय, उत्कर्षापकर्ष, आशा-निराशा, साफल्य वैफल्य, आरोग्य अनारोग्य, सुख-दुःखे, हर्ष-शोक इत्यादि द्वंद्वांशी लढण्यास व त्यांपुढे हार न खाण्यास घट्ट होऊन बसलें पाहिजे. भगवंतांनी तरी प्रिय शिप्य अर्जुनाला गीतेत युद्धारंभी हाच उपदेश केला. भगवान् म्हणतातः (श्लोक) सुखदुःखे समे कृत्वा । लामालामी जयाजयो। ततो युद्धाय युज्यस्व । नैवं पापमवाप्स्यसि ॥ १ ॥ भावार्थ:--वाबारे, प्रथमच गुखदुःख, लाभहानि, जयापजय हे तुल्य लेखण्यास शिकून मग युद्धांत पड, म्हणजे तुला पाप ( तदनुवंधि दुःस्त्र) बाधणार नाही. भगवंतांचे म्हणणे हिशोबीच आहे. अगोदरच विषारी दांत पाडून टाकिल्यावर, सापाचे जाभाड्यांत हात घालावा लागला म्हणून भय कशाला सेल्डन म्हणतो, “तुम्ही जंबवर भूलोकी आहां तंववर तेथें ज्या मिळून चांगल्या गोष्टी लाभतील त्यांचा उपयोग करून घ्या ( कारण, सृष्टिकर्त्याने त्यासाठीच त्या निर्माण केल्या आहेत); कधीही उद्विग्न किंवा खिन्नवृत्तीने राहूं नका, व अखेर आपणांस ईश्वरसा. न्निध्य प्राप्त करून घ्यावयाचे आहे या गोष्टीकडे ओढा असू द्या." लबक म्हणतो, ' ज्यांना नरदेह ही अमोल देणगी आहे असे वाटत १० सुख आणि शांति. [प्रकरण नसेल, ते त्या देणगीस सर्वथा पात्रच नाहीत, असे समजावें. येशूख्रिस्त म्हणतो, " सुख हे कर्तव्यापासून प्राप्त होणारे फल आहे असे समजू नका; तर सुख (मानणे) हेव कर्तव्य आहे, असे समजा.'' सुखाच सात्तम साधन म्हणजे इंद्रियजय किंवा आत्मसंयमन हे होय. टेनिसन म्हणतो:- आत्मरति, आत्मज्ञान व आत्मसंयमन ही तीन ज्यापाशी आहेत त्याने जगजय केला असे समजावे.'' 'आत्मजयी तो विश्व- जयी' ही गोष्ट खोटी नव्हे. या समर्याद जगांत कोणाची तरी दुस-या कोणावर सत्ता किंवा ताबा असणारच. मग अन्य कोणाचा ताबा पत्करण्याऐवजी, आपला आपल्यावर ताबा ठेवितां आला तर काय वाईट? आप- ल्यावर आपणच देखरेख ठेवण्याचे मनांत आणिलें. तर सुधारणा हां हां म्हणतां होईल. कारण, दुस-याने कितीही सख्त नजर राखिली, तरी पुष्कळ गैर गोष्टी आपण त्यापासून लपवू शकतो. परंतु, आपल्या गैर गोष्टी आपल्या नजरेतून चुकणे शक्यच नाही. अथातच आपले अपराध आपण पावलो पावली ध्यानी घेऊन खोडूं शकू. व अशा रीतीने स्वस्वामित्व संपादून दुसम्याच्या ताव्यांची जरूरी उरूं न देणे हे दुसन्यावर स्वामित्व चालविण्यापेक्षाही अधिक चांगले आहे. साधेल तितक्या उत्तम प्रकारे आत्मसार्थक्य करणे हैं प्रत्यक मनुप्याचं आद्य कर्तव्य आहे; मग त्यापायीं कोणी आपणांस आपम्बाथा म्हटल तरी हरकत नाही. शेक्स्पिअर म्हणतो:
. सुख. ११ आत्मोपेक्षेहून आत्मरति शतपट आदरणीय." विद्वानांचे असे म्हणणे आहे की, मनुष्यांत कोणी विचारवश असतात व कोणी विकारवश असतात. याहून तिसरा वर्ग नाही. परंतु, विकारवश असणे मोठे दुर्दैव आहे. कारण, विकार हा मोठा लहरी मालक असल्याने तो आपल्या बसांत वागणान्या सेवकांना क्षणक्षणीं दुरंत विपत्तीत ढकलतो. आणि जो आत्म- संयमाचे असामर्थ्यामुळे विकारांचा गुलाम बनतो, त्याचे हातून पराक्रम तो कसला होणार ? परंतु ज्याने विचार- बलाने आत्मजय केला, तो मनांत आणिल्यास विश्वजयही करूं शकेल. बरें, ज्याला स्वतांवर दाब ठेवितां येत नाही, अशावर दुसरा सहजच आपला दाब बसवितो. विकारांत क्रोध हा अग्रणी आहे. क्रोधिष्ट भनुप्याचे शांत मनुष्याशी कधीही पटावयाचें नाहीं. क्रोधासारखा आत्मघाती कोणी नाही. सेनेका म्हणतो, पर्यन्यबिंदु दगडावर वेगाने आदळू जातात, पण त्यायोगाने त्यांच्या स्वतांच्याच चिंध्या होतात; त्याप्रमाणे, क्रोधिष्ट मनुष्य दुसन्यावर उसळून जातो, पण उलट आपलाच घात करून घेतो. यासाठी शहाण्याने आपली वृत्ति केव्हाही बेताल होऊ देऊ नये व आपला क्रोध आपले ताब्यांत ठेवावा." बरें, खरे पाहील त्याला ही गोष्ट मोठी अवघडही नाही. कारण, एकादे वादांत आपले म्हणणे खरेच आहे, अशी जर आपली खातरी असेल, तर आपणांस रागावण्याचे प्रयोजनच नाही. बरें, आपले म्हणणे जर चुकीचंच असेल तर भापणांस रागवण्याचा , १२ सुख आणि शांति. [प्रकरण अधिकारच नाही. सेनेका म्हणतो, मनुष्यजातीचें मूर्खपण पाहून डेनाक्रिटस हंसला; व हेराक्लिटस नामक दुसरा ज्ञाता रडला. परतुं, जे खरे ज्ञाते झाले, ते मनुष्यजातीवर तिचे मूर्खत्वा. बद्दल कधी रागावलेले म्हणून ऐकिवात नाहीत." भगवंतांनी गीतेत या क्रोधाला फार शिव्या दिल्या आहेत. ते म्हणतात:---- (श्लोक) ( काम एप) क्रोध एप । रजोगुणसमुद्भवः ॥ महाशनो महापामा । विदयेनमिह वैरिणम् ॥ १ ॥ भावार्थः---हा क्रोध रजोगुणापासन उत्पन्न झाला असून मोटा खादाड व पापिष्ट आहे; बाबारे, हा तुझा कट्टा दुस्मान आहे, असे समजून चाल. जीवन्मुक्तिविवेकांत विद्यारण्य लिहितात:- (श्लोक) अपकारिणि कोपश्चेत् । कोपे कोपं न किं कृथाः ॥ धर्मार्थकाममोक्षाणासेकत्र परिपंथिनि ॥ १ ॥ भावार्थ:----दुसरा कोणी तुझ्या मुखाआड आला म्हणून तुं त्याज- वर संतापतोस, हे खरे ना ? मग मी तुला असे विचारतो की, ज्यान तुझे अंगाची होळी करून सोडिली अशा या पाजी क्रोधावरच कां संता- पत नाहींस ? कारण या क्रोधासारखा दुसरा अपकता कोणीही नाही. अरे हा एकटाच तुझे धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चारो पुस्पार्थांना खाड्यांत घालण्यास बस्स आहे. याकरितां, याला टाळ. ' लौकिकी म्हण आहे, ही की " रागा रागा भीक मागा." याकरितां प्रत्येकाने आपला राग स्वाधीन ठेविला पाहिजे, च हे
१ लें.]
सुख.
१३
पण,
ए
केवळ अशक्य नाही. ज्याने मूळाक्षरे आपलीशी केली,
तो सारस्वत आपलेसे करूं शकेल; व ज्याने आत्मजय
केला, विश्वजय करील. आतां आत्मजय करणे हे
काम मूळाक्षरें 'आपलींशी करण्याहून किती तरी अवघड
आहे. मूळाक्षरे एकदां स्वाधीन झाली की, जन्माची झालींच;
आत्म्यावर अहर्निश पाहारा ठेवावा लागतो. कारण
इंद्रिये त्याला पदोपदी फसवून अमार्गाला नेत असतात. म्हणून
अखंड दक्षता लागते. साधु शीलनाथ म्हणत असतातः
चवीस घंटेकी लढाई है. बाकी, ही असाध्य नाही. यत्न
पाहिजे, म्हणजे हीत प्रत्येकास यश येईल. आपणां सर्वांसच मोठे
राजकार्यधुरीण, किंवा ललितकलाविशारद, किंवा तत्त्वकोविद
होता येणे शक्य नाही; परंतु आपणां सर्वांस भले मनुष्य
होतां येणें सर्वथा शक्य आहे. आणि भले होणे ही कांहीं
अल्प महत्त्वाची गोष्ट नव्हे. एक फ्रेंच विद्वान् म्हणतो, “ सद्गुणी
किंवा दुर्गुणी होणे, हे प्रत्येकाचे स्वाधीन आहे, इतर गोष्टी
ईश्चराधीन आहेत." जगांत पहावें तो पुष्कळ लोक इतरांच्या
नांवानें खडे फोडीत असतात. ते म्हणतात,
काय करावे ?
दुष्टांशीं गांठ पडली; त्याने नाश झाला.'
पण अशांनी असें
समजावे की, बाहेरील लोकांचे दुष्टपणानें मनुष्याचा इतका नाश
होत नाही; परंतु अंतर्वृत्तीच्या दुष्टत्वामुळे किंवा पापीपणामुळे-
मात्र अनेकांचा समूळ नाश झाला आहे. श्रीकृष्ण गीतेत
सांगतातः-
१४ सुख आणि शांति. [प्रकरण (श्लोक) आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ १॥ बंधुरात्मात्मनस्तस्य । येनात्मैवात्मना जितः ॥ अनात्मनस्तु शत्रुन्चे । वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥ २ ॥ भावार्थ:---बाबारे, तुझा तूंच मित्र व तुझा तूंच शत्रु. ज्याने स्वबलाने मन स्वाधीन ठेविले, त्याचा आत्मा त्याला बंधुवत माह्य करितो; परंतु ज्याने मनोजय किंवा आत्मजय केला नाही, त्याजवर त्याचा आत्माच शत्रुवत उलटून पडतो. आपण देवापुढे प्रार्थनेला बसलों, म्हणजे म्हणतो, 'देवा, मला मोहांत किंवा अमार्गात पाडूं नको'. परंतु व्यवहारकाली, खरे बोलूं जातां शेकडा नव्याण्णव ठिकाणी, हृदयस्थ देव आप- णांस सावध करीत असतांही त्याचे सूचनेकडे दुर्लक्ष करून आपण आपखुषीनेच स्वतःस मोहात पाडून घेतो. कॅल्डेरान नामक गृहस्थाने एक कादंबरी लिहिली आहे, तींतील नायक प्रथम एका विचित्र पिशाचाला पाहून क्षणक्षणी भितो व बावरतो, असे दाख- विले आहे; परंतु, पुढे जेव्हां तें गूढ दूर झाले, तेव्हां त्या नायकाला आढळून आले की, आपण ज्या पिशाचाला भीत होतो ते पिशाच म्हणजे आपले देहाची छायाच आहे, दुसरे काही नाही. समर्थ रामदासांनी म्हटले आहे:- (अभंग) वाजे पाऊल आपुलें । म्हणे मागे कोण आले ॥ सारांश, आपलें तारण किंवा मारण, सुख किंवा दुःख आप. लेच हाती आहे. , १ लें.] सुख. १५ एका कवीने मिसेस ब्रौनिंग ही बाई म्हणते की, आपण उगवला दिवस कसाबसा लोटींत असतो; परंतु, लोखंड जसे ऐरणीवर घणांनी ठोक- ठोकून इष्ट आकाराला आणावे लागते, त्याप्रमाणे आपले मना- लाही ठोक ठोकून प्रथम योग्य आकार दिला पाहिजे व मग इतर गोष्टी केल्या पाहिजेत, हे आम्ही जाणत नाही. म्हटले आहे:- (पद) आधी मन मुंडा बा, मन मुंडा ॥ मग तुम्ही स्वहितचि धुंडा ॥ तें सर्वथा खरे आहे. आतां हे खरे की, मन हे अति द्वाड किंवा अति कठिण आहे व सुखाने ते आकारास येत नाही. परंतु, मिसेस ब्रोनिंग म्हणते, " लोखंड किंवा दगड हे कठिणच आहेत, तरी तेही दृढ आघाताने आकारास आणितां येतात; त्या अर्थी मना- पेक्षा दृढतर अशी जी निश्चयात्मिका बुद्धि हिच्या सतत व्यापाराने मनालाही वळणावर आणितां येणे अशक्य नाही.” श्रीभगवान् म्हणतात: (श्लोक) असंशयं महाबाहो । सनो दुनिग्रहं चलम् ।। अभ्यासेन तु कौंतेय । वैराग्येण च गृह्यते ॥ १ ॥ शनैःशनैरुपरमेत् । बुढ्या वृतिगृहीतया ।। । श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ:--- हे महाबाहो पार्था, मन हे तूं म्हणतोस तसेंच मोठे चंचल व द्वाड आहे. तथापि, वैराग्य व दृढाभ्यास यांचे योगानें आस्ते आस्ते तें आपले कह्यांत आणितां येत. बुद्धिपुरःसर धैर्याने या मनोवारूचा लगाम हळूहळू खेचित गेले म्हणजे इष्टसिद्धि होते.
१६ सुख आणि शांति. [प्रकरण साधु तुकारामही म्हणतातः- (अभंग) असाध्य ते साध्य करितां सायास ॥ कारण अभ्यास तुका म्हणे ॥ मोठमोठ्या ज्ञात्यांपैकीही कोणी कोणी म्हणतात, बऱ्या-वाइटाचे माणसाचे हाती काय आहे? कर्ताकरविता सर्व परमेश्वर आहे. चोरही त्यानेच केला, सावही त्यानेच केला. परंतु, हे म्हणणे एकदृष्टि आहे. अनुभव पहातां, ज्याचा तोच आपणास बऱ्या-वाईट मार्गाने वागवितो. चोर चोरी करूं निघाला असतां आपण पापकृत्य करीत आहों' असे त्याचे मन त्याला सांगण्यास कधी चुकत नाहीं; तथापि, तो मनाला गुरफाटून ठेवून, उन्मार्ग- गामी होतो; मग देवाकडे काय दोष उरला ? श्रीकृष्णांनी गीतेत या कामी खुला खुला अभिप्राय दिला आहे. ते म्हणतात:--- (श्लोक) नादत्ते कस्यचित् पापं । न चैव सुकृतं विभुः ।। अज्ञानेनावृतं ज्ञानं । नेन मुह्यंति जंतवः ॥ १ ॥ भावार्थः - परमेश्वराचा कोणाचे दुष्कृताशी संबंध नाही आणि सुक ताशीही नाही. हा सगळा जीवांचे अज्ञानाचा खेळ आहे. लबक म्हणतो, इंग्रजलोकांना आपल्या अप्रतिहत स्वातंत्र्याचा मोठा अभिमान वाटतो. पण, स्वातंत्र्य दोन प्रकारचे आहे:- खोटें व खरे. मनसोक्त वागण्यास मोकळीक असणे, हे स्वातंत्र्य १ लें.] सुख. १७ . खरे नव्हे. तर शास्त्रविहित में कर्तव्य म्हणून आहे तें अनियंत्रि- तपणे पूर्णतेस नेण्याची मोकळीक असणे हेच खरे स्वातंत्र्य. कोणी म्हणेल, मी उघड्या दिवसा शेजान्याचे घरांत घुसतो, तरी मला कोणी आड येऊ पावत नाहीं; आहे की नाही मी स्वतंत्र?-तर त्याला उत्तर हेच की, बाबारे, ह्याला सुज्ञलोक स्वातंत्र्य म्हणत नाहींत. स्वातंत्र्य ही जर उंची वस्तु मानिली आहे, तर ती दुसऱ्याला अपकारक असणें हें संभवत नाहीं; करितां हे स्वातंत्र्य नव्हे. आगगाडी चालली असतां तिला कोणी आड येऊ पावत नाही; परंतु तीही रूळ सोडून जात नाही. व यामुळे तिची गति उपकारक होते. त्याचप्रमाणे, यथानीति चालण्याला अटकाव नसणे, हेच खरे स्वातंत्र्य; व हेच हितकारक होय. कांहींकांचा समज आहे की, कसेंही करून विपुल संपत्ति मिळवावी. कारण, संपत्तीपोटी स्वास्थ्य मिळतें, व स्वास्थ्याअंगी सौख्य प्राप्त होते. पण हे सौख्य कसल्या प्रकारचे हे ते पहात नाहीत. जगांत जी घोड्याएवढी चूक होत आहे ती ह्या सौख्याच्या सत्य- मिथ्या स्वरूपांविषयी आहे. दोघांनाही 'सौख्य' हा एकच शब्द लावितात; परंतु, सत्यसुख किंवा सात्त्विकसुख आणि मिथ्या किंवा असात्त्विक सुख यांत अंतर केवढे आहे, हे कोणी तपाशीत नाहीत. नुसत्या शब्दसाधारण्याला काय करावें? ‘खद्योत' शब्द काजव्या- लाही लावितात व सूर्यालाही लावितात; तथापि काजवा व सूर्य यांचे योग्यतेत जमीन-अस्मानचे अंतर. तसाच प्रकार सत्य व मिथ्या सौख्यांत आहे. मिथ्या-सौख्ये आपातरमणीरा परंत परिणामविरस २ सुख आणि शांति. [प्रकरण असतात; सत्य किंवा सात्त्विक सौख्ये आरंभी नीरस परंतु परिणाम- रमणीय असतात. भगवंत गीतेच्या अठराव्या अध्यायांत म्हणतात:- (श्लोक) अभ्यासादमने यत्र । दुःखांतं च निगच्छति ॥ १ ॥ यत्तदने विपमिव । परिणामेऽमृतोपमम् ॥ तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ २ ॥ विपयेंद्रियसंयोगाद्यत्तदनेऽमृतोपमम् ॥ परिणामे विषमिव । तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३॥ यदग्रे चानुबंधे च । सुखं मोहनमात्मनः ॥ निद्रालस्यप्रमादोत्थं । तत्तामसमुदाहृतम् ॥ ४ ॥ भावार्थ:----जे मुख तोंडी विधाप्रमाणे कड़ लागते, पण शेवटी अमृततुल्य मधुर लागते; ज्याची गोडी आस्ते आस्ते लागते, परंतु एकदा गोडो लागून जे पचनी पडले म्हणजे दुःखाचा शेवटच कारते, त्या मुलाला सात्त्विक मुख म्हणतात. हे अंतःप्रसन्नतेपासून प्राप्त होत असते. जे मुग्व अमृततुल्य, परंतु अखेर विपतुल्य घातक होते, व जे इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यापासून उत्पन्न होते, त्याला राजस सुख म्हण- तात. या दोहोंहूनही तिसरे तामस म्हणून एक मुख आहे. हे आदिअंती सारखंच असते; व आत्म्याला भुरळ घालते. आणि हें निद्रा, आलस्य, किंवा प्रमाद यांपामन उद्भवते. भगवंतांचे म्हणणे ठीकच आहे. त्रिफळ्याचे चूर्ण प्रथम तुरट, कडवट असें लागते; पण अभ्यासाने तोंडी पडले . म्हणजे देह अजर करून सोडिते. हाच स्वभाव सात्त्विक-सुखाचा आहे. गाजूम, याकुती, श्रीखंड हे पदार्थ पहिले तोंडींच गोड लागतात. पण N १ लें.] सुख. १९ . अखेर अकालमृत्यु आणितात. कंडू येऊन मनुष्य बोटांत बोटें घालून मर्दू लागला म्हणजे प्रथम गोड गोड वाटून सुख होते, परंतु अखेर भगभग सुटून खरूज उठते. हाच प्रकार असात्त्विक सुखाचा जाणावा. म्हणून शहाण्याने या सत्य मिथ्या कसोटीने सुखांची पारख करून मग त्यांचा संग्रह करावा. अल्फेड आस्टिन याचे मत असें आहे की, शांतता व एकांत यांचे सौख्य केवळ अनिर्वचनीय आहे. शेक्सपिअर म्हणतो, “निःश- ब्दशांति ही सुखाची जननी आहे." एपिक्यूरसच्या मते " सभ्य- तेने, न्यायानें व शहाणपणाने वागणे हेच सौख्य आहे, व अशा प्रकारें जो वागेल तो सुखी झालाच पाहिजे.' असे सौख्याचे स्वरूपाविषयी विद्वानांचे भिन्न अभिप्राय आहेत. याचविषयी ख्रिस्ती देशांत एक मौजेची पौराणिक दंतकथा आहे. ती अशी की:-- एकदां देवांनी मनुप्यांना एक दिवस नेमून दिला व सांगितले की, या दिवशी आम्ही सर्व पार्थिव किंवा भूलोकींच्या सुखांची तुम्हांस वाटणी करून देणार आहों. याक- रितां सर्वांनी या दिवशी हजर राहून ज्याला जो मानेल तो भाग उचलावा. याप्रमाणे जाहीर केल्यावर लवकरच नेमलेला दिवस आला. येतांच मनुप्यांच्या उड्या पडल्या. कित्येकांनी विपुल धान्य देणारी शेती घेतली. ज्यांना व्यापारउदीमाची आवड होती, त्यांनी खुष्कीचे मार्ग व समुद्र यांचे स्वामित्व मागून घेतले. जे कंदमूलप्रिय असे साधुवृत्तीचे होते त्यांनी द्राक्षादि वल्ली लावण्या. च्या सोईच्या उतरणीच्या जमिनी मागितल्या. सरदार वगैरे जे २० सुख आणि शांति. [प्रकरण मृगयाप्रिय होते, त्यांनी श्वापदे मिळावी म्हणून निबिड अरण्ये व वनराजी पत्करिल्या. राजेलोकांनी कर घेण्याकरिता नाकी बस- विण्याच्या सोईचे पूल, घाट वगैरे घेतले. याप्रमाणे 'सगळी वाटणी उरकली. तो नंतर कविराज तेथे आले. हे इतका वेळ- पर्यंत एकांत मननांत गुंतले असल्यामुळे त्यांना देवतांच्या जाहिरा- तीची आठवणच नव्हती. ती झाली तेव्हां ते आले. परंतु, आतां येऊन काय फळ ? वांटणी खलास झाली. ते पाहून त्यांनी कपा- ळावर हात मारून शोक मांडिला. पण, द्यायला शिल्लकच कांहीं' उरले नव्हते, तिथे देवांनी तरी काय करावें? तेव्हां देव कवि- राजांना म्हणाले, आमचेजवळ आता आपणांस देण्याला तर काही उरले नाही, हे तुम्ही पाहतांच. पण, आम्ही तुमचेसाठी एवढे करतो:-" आम्ही या नीलवर्ण आकाशांत रहात असतो. . येथे तुमची केव्हाही लहर लागेल तेव्हां तुम्ही खुशाल येऊन आम्हां- समेत वाटेल तितका वेळ रहात जा. तुम्हांला मुभा आहे. आमचे दरवाजावर तुम्हांला केव्हाही मज्जाव होणार नाही.” कविराजांनी मान डोलवून, देवांचे देणगीचा स्वीकार केला. उपयोग करून घेण्याचे त्यांना केव्हाही प्रयोजनच पडले नाही. कारण, ते जेव्हा जेव्हां सांसारिक चिंता सोडून एकांतांत व आत्मानंदांत बसत, त्या वेळी ते संकल्पाबरोबर स्वर्गसुख आपल्या- भोंवतीं खडे करीत. मग ते इतक्या दूर अंतरावर कशाला जातील? म्हणच आहे, “जे न देखे रवि, तें देखे कवि.” प्रतिसृष्टिकर्तेच ते, त्यांना उसन्या स्वर्गाची काय चाड ? जगन्नाथराय म्हणतात:- परंतु, तिचा - १ लें.] सुख. २१ -- (श्लोक) किं सेव्यते सुमनसां मनसाऽपि गंधः । कस्तूरिकाजननशक्तिभृता मृगेण ॥ -रसगंगाधर. भावार्थः-ज्याला स्वतःच कस्तूरी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे, असा कस्तुरीमृग पुष्पादिकांचे सुवासाची स्वप्नांत तरी कशाला इच्छा करील ? आतां ही गोष्ट खरी की, आपणां सर्वांसच कविराज होतां येणार नाही. तथापि, आजकाल ज्ञानाचा उत्कर्ष इतका झाला आहे की, देवतांनी कवीला ज्या नील अंतरिक्षांत अप्रतिबंध संचार करण्याची परवानगी दिली, तें प्रशांत रमणीय अंतरिक्ष, आम्हांसही विहारास अगम्य नाहीं; मात्र, यत्न पाहिजे. आपण सर्वच मोठे, अधिकारी, सत्ताधीश, समृद्ध किंवा बृहस्पति होऊ शकणार नाही, हे खरे; तथापि आपण सर्वही सुखी व भले होऊ शकू यांत संशय नाही. आपले मनांत पाहिजे म्हणजे जीवित दिव्य व रमणीय असे आपणांस करितां येईल. मात्र त्या कामी बिनकसूर यत्न झाला पाहिजे. कारण, आपण काही जन्मतःच सर्वगुणपूर्ण उपजत नाही. आप- णांत पुष्कळ उणीवा असतात. लहान मुलें नुसती अश्राप असतात; पण सद्गुण कशाला म्हणतात ते त्यांना ठाऊकही नसते. सद्गुणांचा संग्रह बुद्धिपुरःसरच करावा लागतो. बाकी, कोणाला दुर्गुणाचें आनुवंशिक वळण असले तरी, तो जर इमानाने दृढयत्न करील, तर तोही तें वळण खोडून टाकून सद्गुणी व सुखी होऊ शकेल. कारण, याला काही अलौकक बुद्धिमत्ता लागते असे नाहीं; , २२ सुख आणि शांति. [प्रकरण सच्छीलाची प्रीति असली म्हणजे झाले. आणि शील नसेल तर नुसती बुद्धिमत्ता फुकट आहे. रूसो हा अलौकिक बुद्धिमान् होता; परंतु तो आयुष्यांत मुखी म्हणून झाला नाही. बरें, . याचे कारण शोधूं जातां असें आढळते की, त्याचा अहंकार व आत्म- श्लाघा ही त्याच्या सुखाआड आली. आपण कितीही कलें तरी आयुष्यांत आधि व व्याधि, शोक व दुःख यांचे प्रसंग हे येणारच, हे खरे. तथापि, लोक त्यांचे नांवानें जितकी ओरड करितात. तितकी केवळ खरी नाही. शिवाय पुष्कळ लोक क्षुल्लक गोष्टीवरून नसते दुःख करून घेतात. गोल्डस्मिथने म्हटले आहे की, एकाद्या श्रीमंत स्त्रीचा हातरुमाल किंवा उत्संगवान नाहीसा झाला की, वेडा कवि घरी जाऊन त्या श्रीमतीवर ओढवलेल्या दुर्धर प्रसंगावर काव्यरचना करितो ! लग्नांत विहिणीचे इवलेतिवल्याने कमी पडले की, रडून रोवून ती सगळ्यांना बेजार करिते. खरोखर पाहतां, मनुष्य जर सुखदुःखांचें तुलनापूर्वक मनन करतील तर त्यांना दुःखाबद्दल एवढी हाकाटी करवणार नाही. परंतु दुनियेची चाल उलटी आहे. एकाद्याला वर्षांतून एक दिवस ताप, कपाळदुखी, पोटदुखी किंवा इतर काही व्याधि येऊ द्या, की तो लागलाच देवाचे नांवाने दगड घालायला! पण, तो असा विचार करीत नाही की, तीनशे चौसष्ट दिवस देवाने सुखाचे दिले होते त्याबद्दल उपकार म्मरावयाचे ते आपण कधी केले नाही; पण एक दिवस ताप येतांच त्यावर बेअब्रूची फिर्याद घेऊन उठलों, हा अन्याय नव्हे काय ? परंतु माणसांचा समजच १ लें.] सुख. my असा दिसतो की, सुख असणे यांत विशेष ते काय ? तो आपला हक्कच आहे. दुःख येणे हामात्र अन्याय किंवा दैवी जुलूम आहे ! वास्तविक हा समजच अन्यायाचा आहे. शिवाय, आपण ज्याचे नांवाने दुःख दुःख म्हणून रडतो, तें सर्वदाच अनर्थावह असते असें नाहीं. पुष्कळदां दुःख आपल्याला चिमटा घेऊन सावध करिते. जगांत जर दुःख मुळीच नसते, तर आम्ही गाफील राहून अल्पवयांतच प्राणास मुकलो असतो. पण आपण बेहोषपणाने भलतीच गोष्ट केल्यास तत्काळ दुःखाचा फटकारा बसतो म्हणून आपण शुद्धीवर येतो, आणि मग जपून चालं, लागतो. हे दुःखाचे उपकार नव्हत काय ? लहानपणी ज्यांच्या डोळ्यांत दारिद्यांजन पडलेले असते अशांपैकी पुढे बरेच लोक उदयास येतात व गर्भ- श्रीमंतांतले बहुतेक तथातथाच निवटतात, असा अनुभव येतो; यांतील रहस्य तरी हेच आहे. शारीरिक व्याधींप्रमाणेच मानसिक आविही पुष्कळदां मानसिक उपकार कच होतात. काही लोक आगामी दुःखाबद्दलच्या कल्पनेनेच आगाऊ हैराण होतात. पण हे वेडेपण आहे. सावध रहावे पण हैराण पडूं नये. आता, दुःख येऊन आदळले तरीही मन गडबडूं न देता येणे हे अवघड आहे खरे; पण गडबडू देणे हे तरी वेडेपणच आहे. तशानें परिहार न होतां उलटें दुःखास अधिक साह्य मात्र होते. त्यापेक्षां मन शांत ठेवून आलेले संकट परिहारक्षम आहे की नाही, याचा पूर्ण विचार करावा. परिहार्य असेल तर गडबडण्याच कार- णच नाही; म्हणून न गडबड तां त्याचे परिहारासच लागावें. परि- २४ सुख आणि शांति. [प्रकरण हार्य नसेलच, तर गडबडूनही फायदा नाही हे जाणून ईश्वरावर हवाला टाकून स्वस्थ तरी रहावें. आयुष्यातील पुष्कळ प्रसंग हे, खरे पाहतां आपल्या परीक्षेसाठी असतात. यासाठी न डगमगतां त्यांत टिकाव धरणे हाच पुरुषार्थ आहे. दुःखशोकाचे प्रधान कारण पाप हे होय. कित्येकांचा समज आहे की, पश्चात्तापाने पापाची शुद्धि होते. परंतु ही चूक आहे. अनुतापाने निवृत्ति होईल, पण हातून घडून गेलेल्या पातकाचा परिणाम नुसत्या पश्चात्तापाने कधीही दूर होणार नाही. कर्माचा कायदा मोठा बेमुरवत आहे. तो काही रदबदली ऐकत नाही. बन्या कर्माचे बरें व वाईट कर्माचे वाईट फल, हे कर्ता भोगील तेव्हांच सुटेल. प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः' हा शास्त्राचा सिद्धांत आहे. भारतांत म्हटले आहे: (श्लोक) यथा धेनु सहस्रेषु । वत्सो विंदति मातरम् ॥ तथा पूर्वकृतं कर्म । कर्तारमभिगच्छनि ॥ १ ॥ भावार्थः-----ज्याप्रमाणे हजारों हजार गाईंच्या कळपांतन वासरूं आपले आईला नेमके जाऊन भिडत, त्याप्रमाणे पूर्वकर्म (बरें वा वाईट) आपल्या कर्त्याला नेमके हुडकून काढते. शंकराचार्य म्हणतात की, धनुष्याचा सुटलेला बाण लक्ष्यवेध करील तेव्हांच थांबतो, तोच प्रकार कर्माचा आहे. आतां, पुण्यपा- पाबद्दल फिच म्हणतो की, सुखावह होईल तच पुण्य, असे लोक समजतात; परंतु माझे मते जें पुण्य सुखावह हा सिद्धांत खरा आहे. म्हणून आचरणसमयीं क्रियेच्या स्वरू- । जें तें होणारच १ लें.] सुख. २५ पाकडे लक्ष द्यावें, केवळ फलाकडे पाहूं नये." पण जग बहुधा फलावर दृष्टि देते. इतकेच नव्हे, तर क्रिया वाईट करून फलमात्र बरें व्हावे अशी लोक इच्छा करितात. विद्यारण्य म्हणतातः (श्लोक) पुण्यस्य फलमिच्छति । पुण्यं नेच्छंति मानवाः ॥ न पापफलमिच्छति । पापं कुर्वति यत्नतः ॥ १॥ -जोवन्मुक्तिविवेक. भावार्थ:-लोक पुण्य न करितां पुण्याचे फलमात्र इच्छितात. 'बरें, पापाचे फल तेवढे मिळू नये असे इच्छितात आणि पापाचरणमात्र हटकून करीत असतात ! पण, कुचल्याने झाड लावून बदामफळे मिळावी कशी, हे पहात नाहीत. कांही लोक म्हणतात, सुख आणि शांति ही दैवांत असली तरच मिळतील. यत्नाने मिळणार नाहीत. परंतु, सर फ्रेडरीक म्हणतो, “जे कच्च्या दिलाचे लोक असतात, ते दैवाची सबब सांगत असतात. मी देवांचे तोंडाकडे कधीही पहात नाही. कारण, दैव हात देईल म्हणून जो प्रतीक्षा करीत बसला, त्याला हाताऐवजी घातमात्र प्राप्त होईल. " टिमाथिस नांवाचा एक अॅथीनिअन होता त्याला यश हे कशांत नसे; कारण अंगी कर्तबगारीच तेवढी. परंतुं तो जेव्हां आपले कारकीर्दीचा लोकांना हिशोब देऊ लागला, तेव्हां पदोपदी म्हणे की, 'हे काम फसलें, कारण दैवच प्रतिकूल होते.' हितोपदेशांत म्हटले आहे: 'देवमिति कार्याक्षमाणां केषांचिदालस्यवचनं किंवा
२६
सुख आणि शांति.
[प्रकरण
:
(श्लोकचरण)
देवेन देयमिति का पुरुषा वदंति ।
भावार्थ:----दैवाने द्यावे असें रड्ये पुरुष म्हणत असतात.
परंतु वाग्भट म्हणतो:-
(श्लोक)
" बली पुरुषकारोहि । देवमत्रातिरिच्यते ॥
भावार्थ: :-पुरुषयत्न दांडगा असला म्हणजे तो दैवाचेही छाती
वर पाय देतो.
लवक म्हणतो, दैवावर विश्वास असला म्हणूनही काही चुकलें
नाहीं; उलट, ती एक मोठी मदत आहे. नेपोलिअन बोनापार्ट
म्हणेः 'सुदैवावरील विश्वास ही मोठीच शक्ति आहे. ती
उत्साहवर्धन करिते." देव आपणांस साह्य आहे, असा मनाला
भरवंसा असला म्हणजे विलक्षण धैर्य येते. परंतु केवळ दैवाचे
तोंडाकडे पहात बसून कोणत्याही कामांत छाती न करणे अशाने
काही होणार नाही. दैव हे आपणांस अलबत साथी होणारच,
असें मानून दांडगा यत्न करावा, म्हणजे कदाचित् दैव जरी काही
वेळ अंग चोरीत असले, तरी लौकरच निमूट सेवेस सादर होते.
आमच्या या भरतखंडांत तर देववादाचे पक्षपाती फारच
आहेत. व या वादाने यत्नपरतेला बरेंच शैथिल्यही आणिलें आहे.
परंतु, या सर्वाला हेतु दैववाद नसून, दैव शंब्दाच्या परमार्थज्ञानाचा
अभाव हाच होय. दैव म्हणजे काय हे जर लोक खरे खरे समजून
घेतील, तर केवळ यत्नवादी अशी जी पाश्चात्य राष्ट्रं आहेत त्यांपे-
१ लें.] ] सुख. २७ क्षाही उद्योगपरतेला जोर चढेल. परंतु डोळे उघडून पहातो कोण, आणि शोध करितो कोण ? शास्त्राने दैवाची लख्ख व्याख्या दिली आहे की- (श्लोक) पूर्वजन्मकृतं कर्म । तदेवमिति कथ्यते ॥ भावार्थः- बाबारे, तूंच में पूर्वी केलेले कर्म त्यालाच दैव म्हणतात. किती खरी व निर्मळ व्याख्या ही! आणि ही व्याख्या पत्करील त्याला श्लथप्रयत्न कसे होतां येईल, हेच आम्हांस कळत नाही. 'भरले कोठार आयतें उपसून खातो ' असे जरी म्हटले तरी, मूळ यत्न केला तेव्हांच ते भरले गेले, हे उघड नाहीं काय ? कोणी म्हणतात, ' नानासाहेबांचे ठीकच आहे. महिन्याचे महिन्यास पेनशन येते आहे, मजा मारिताहेत.' परंतु हे बोलणारे असा विचार करीत नाहीत की, हे पेनशन आले कुठून? नानासाहेबांनी पूर्वी तीस वर्षे हाडे झिजविली, तेव्हांच ना पेनशन दिसलें ? मग दैववादाने आयतोजीपणाला सवड ती कुठे आहे ? कोणी म्हणेल, दैववानाला आयतेच मिळतें, निदान दुस-याने यत्न करून त्यास मिळते; तर हे म्हणणें साफ चुकीचे आहे. कारण दैवाचा कायदा फारच दुरुस्त व कडक आहे. तेथे लडथड नाही, वशिला नाही. म्हणच आहे, ज्याचें कुडे, त्याचेच पुढे !' बरें, दैववादी- देखील ' काय करावें, मांझें दैव!' असेच म्हणतो, पण आपले शब्दांचा अर्थमात्र करून पहात नाही. तुझें दैव ना? मग तुझें या षष्ठीचा अर्थ काय ? व्याकरणांत पहा बरें, षष्ठीचा मुख्य अर्थ २८ सुख आणि शांति. [प्रकरण स्वस्वामिभाव किंवा जन्यजनकभाव असा आहे खरा ना? मग तुझें दैव म्हणजे तूं ज्याचा स्वामी किंवा जनक आहेस तें (तुझें) पूर्वकर्म असा स्पष्टार्थ झाला नाही काय? मग स्वामी होऊन सेव- काला डरणे, या पौरुषाला काय म्हणावे ? अर्थात् खरा दैववाद यत्नाला शैथिल्य आणीत नाही; तर उलट, तूं करशील त्याचे फळ अचूक तुला प्राप्त होईलच होईल असे आश्वासन देतो. आणि हे रहस्य जे ज्ञाते जाणतील ते दैववादाने आळशी न बनतां उलट दृढोद्योगी बनलेच पाहिजेत. आपण मोठ्या समृद्ध व मनोरम सृष्टीत रहात आहों खरे; परंतु दृढ प्रयत्नावांचून या जगांतील एकही चांगली वस्तु हाती येणे शक्य नाही. कोणी एक कवि म्हणतो:- (श्लोक) अनुद्योगेन तैलानि । तिलेभ्यो नाप्तुमर्हति ॥ भावार्थः--उद्योगावांचून तिळांतले तैलही निघत नाही. हे जग रत्नपूर्ण आहे, परंतु ती रत्ने तरी खाणीतून खणून काढावी तेव्हां. आयतें जांबूळ तोंडांत पडावे अशी योजना येथे नाही. उद्योग, दृढोद्योग,-अखंड, अप्रतिहत, अजिंक्य प्रयत्न हाच या जगांत यशदायी आहे. विप्नं ही यावयाचीच; पण, त्यांचे नरडीवर पाय देऊन उद्योग चालविला • पाहिजे, तेव्हांच सुखसमृद्धि माळ घालतील. आमचे योगशास्त्रांत राजयोग, हठयोग, लययोग इत्यादि अनेक प्रकारचे योग सांगितले आहेत; परंतु प्रस्तुत लेखकाचे मते 'उद्योग' हा या सर्व योगांहून श्रेष्ठ आहे. हा केवळ चिंतामणिच आहे. कारण उत्+योग, अर्थात् उत् म्हणजे .
सुख. २९ . वर किंवा उत्कर्षास नेणारा जो योग तो, असे जर स्पष्ट आहे, तर याहून आणखी काय हवें? बरें, हा चिंतामणि अमक्यास प्राप्त आहे आणि अमक्यास नाही, असा पंक्तिप्रपंच येथे नाही. राजा- पासून रंकापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकास हा साध्य आहे-नव्हे, प्रत्येकाचे हातांत आहे. असे असतांही जे दीन रहातील त्यांस करंटे म्हटले पाहिजे; दुसरे काय म्हणावें ? ज्या परमचतुराने ही विचित्र सृष्टि निर्माण केली, त्याने उद्यो- गावांचून कांही मिळू नये अशी बुद्धिपुरःसर योजनाच केलेली आहे. साधी गोष्ट, शेती घ्या ना. शेती सोने पिकवील; पण अंग- मेहनत केल्यास. म्हणच आहे, 'जातशेती नाही तर माती.' हाच न्याय यावत् स्थळी. परंतु कोणतेही वस्तूच्या प्राप्त्यर्थ कष्ट करावे लागणे हे जरी अवश्य ठेविलें आहे, तरी ईश्वरी योजना ती-ती कधीही दोषावह असायचीच नाही. अर्थातच त्या सदय व चतुर जगांत्पत्यान अशा काहाँ खुबी केला आहे की, कष्टातच सुख ठेविलें आहे. तेंही गुळवेलीचे वरकांती कडूपणांत जसे अंतर्यामी अमृत ठेविलें आहे, तशांतले नव्हे; तर गोदुग्ध जसे पितानांही गोड व परिणामीही गोड, तसेंच कष्ट, श्रम, व्यायाम किंवा अंगमहेनतः कांहीं नांव द्या-ही स्वतःही गोड व फलरूपानेही गोडच गोड. वाग्भट व्यायामासंबंधाने म्हणतोः (श्लोक) लाघवं कर्मसामर्थ्यं । दीप्तोग्निर्मेदसः क्षयः ॥ विभक्तधनगात्रत्वं । व्यायामादपजायते ॥ १ ॥ - अष्टांगहृदय.
३० सुख आणि शांति. [प्रकरण अशा पर- भावार्थः---व्यायामाचे योगाने अंग फुलासारखे हलके होऊन कोण- तेही काम करण्यास शक्ति व चलाखो येते. अग्नि प्रदीप्त होऊन, मेद झडून जातो व सर्व गात्रै सप्रमाण विभागली जाऊन ठेचून भरल्यासारखी दणगट होतात. केवढा फायदा हा! बरें, व्यायामाने किंवा उद्योगाने शरीरच साफ रहातें असे नव्हे, तर मनही साफ रहाते. इंग्रजीत एक म्हण आहे की, “निरुद्योग्याचे मन हे सैतानाचे ( नासक्या, कुजक्या विचारांचे ) क्रीडास्थान आहे." हे म्हणणे सर्वथा खरे आहे. सारांश, प्रत्येक वस्तु श्रमसाध्य ठेवण्यांत त्या करुणामूर्तीने जीव- मात्रास दुहेरी सुखी करण्याची योजना ठेविली आहे. मेश्वराचे आभार तरी किती मानावे ! एक ब्राह्मण आम्रवृक्षाचे आळ्यांत पितृतर्पण करीत बसला असतां दुसऱ्याने विचारिलें, ही जागा काय पाहिलीत ! ब्राह्मणाने उत्तर केलें: (श्लोक) आम्राश्च सिक्ताः पितरश्च तृप्ताः ॥ एका क्रिया व्यर्थकरा प्रवृत्ता ॥ भावार्थः----आंब्यालाही पाणी मिळाले; पितरही तृप्त झाले. एकाच क्रियेन दोन फायदे साधले. वरील प्रकार ईशकृतींत सर्वत्र आहे. नाक हा मुद्रेचा प्रधान अलंकार असून शरीरांतील मलसफाईचंही एक द्वार आहे. निद्रा जिला आपण 'सुखाची सोयरी' असें म्हणतो, तीदेखील श्रम- साध्य आहे. श्रमांनी तिला गोडी चढते. दिवसभर कष्ट करणारे लोकांना सदैव गाढ व मधुर निद्रा येते. परंतु दिवसभर लोडाशी १ लें.] सुख. ३१ -- - . रुळणाऱ्या दोंदिलाचा ती बहुतेक कंटाळाच करिते. बरे, निद्रा ही अमृततुल्य खरी, पण या समर्याद जगांतील प्रत्येक वस्तूप्रमाणे तिलाही मर्यादा असलीच पाहिजे. झोपच झोप घेत राहिले, तर तिचे अमृतमयत्व नासून तीच विषमय होते. इंग्रजीत पुढील अर्थाचे एक म्हणणे आहे: 'अजून थोडीशी-उगाच एक चुटका--सरती सरती गुलाबी-फार नाही अखेरचा गोड घांस- थोडीशी साखरझोंप, असें म्हणत जे सुस्तावत पडतात, अशा गोडाजींना आकाबाई लौकरच माळ घालतात." वेदांतही म्हटले आहे:- (श्लोक) आस्ते भग आसनिस्य । ऊर्ध्वं तिष्ठति तिष्टतः ॥ शेते निपद्यमानस्य । चराति चरतो भगः ॥ १॥ भावार्थ:----जो बसून राहतो त्याचे भाग्यही बसते. जो खडा राहतो, त्याचे नशीबही खडे. राहते. जो चालत राहतो त्याचे भाग्यही चाल राहते व जो आडवा पडतो त्याचे भाग्यही झोपी जाते. अर्थात् निद्रा गोड व अवश्य झाली, तरी तिलाही मर्यादा पाहिजेच. शिवाय निद्रा वेगळी आणि सुस्ती व आळसेपणा ही वेगळी. सुस्तीने व आळसाने मनुष्य फुकट जातो. माफक निद्रेनें उलट ताजातवाना होऊन नवीन उद्योगास तयार व निरोगी असा होतो. अपघाताने किंवा अन्य योगाने एकाद्याचें शरीर विकल होऊन तो शारीरिक श्रमास असमर्थ होईल; तथापि, असला मनुष्य निरु- ३२ सुख आणि शांति. [प्रकरण पयोगी झाला किंवा सर्व सुखाला आंचवला असें नाही. अशा स्थितीत मानसिक धैर्य व ईशनिष्ठा ह्या गोष्टी त्याला संभाळतां येतील. व्यावहारिक विघ्नांना तोडून काढणे हे जितपत पुरुषार्थाचे आहे त्याहूनही विपत्काली अढळ धैर्य व नीतिमत्ता राखणे हे अधिक पुरुषार्थाचे आहे. आयुष्यातली कोणतीही स्थिति विजयी व आनंदमय करितां येईल. सिसिरो म्हणे:-" आपला अपराध नसताही कदाचित् आपले शरीर विकल होईल; पण आपले मन विकल होऊ देणे न देणे हे केवळ आपले स्वाधीन आहे." अर्थात्, आपण ते होऊ देता कामा नये. विपत्काली दोन गोष्टी जरूर पाहिजेतः-गतसुखाबद्दल कृतज्ञता व भावी सुखाबद्दल आशा. परंतु, त्या गोष्टी ईशश्रद्धा व संतोषवृत्ति यांवांचून साधत नाहींत. आशा करणे ती आपल्या हिमतीवर करणे वेडेपणा आहे; ही आशा ईशकृपेवर व ईशनिष्ठेवर उभी असली पाहिजे. म्हणजे ती विश्रामदायक होते. मिल्टन कवि नेत्रहीन झाला तरीही त्याने हतधैर्य न होतां दिव्य काव्ये निमून जगतावर उपकार केले व इशेच्छेवर हवाला ठेवून मनाचे समाधान राखिलें. आपले इकडे कै. वे० शा० सं० रघुनाथशास्त्री पर्वते या गृहस्थांनी कारागृ- हांत असताही " शंकरपादभूषण " म्हणून एक अद्वैतग्रंथ लिहून लोकसेवा केली. उद्योगाची व कष्टाची महती केवढी आहे हे मागे दाखविलेंच आहे. तथापि कांहीं मूढ लोक असे समजतात की, निरुद्योगी बसावयास सांपडणे ही ईशकृपा व उद्योग करावयास लागणे ही १ लें.] सुख. ३३ देवाचे घरची शिक्षा आहे. परंतु, हिसिआड म्हणून एक ग्रीक म्हणे की, " निरुद्योगिता हीच शिक्षा व लज्जा आहे, व उद्योग करावा लागणे हेच भूषण व कृपा आहे." लबक म्हणतो, "हिसि- आडचे हे बोल त्याच्या देशबंधूनी हृदयांत वागविले नाहीत, म्हणू- नच असले विलक्षण चतुर लोक असूनही अखेर अवनति पावले. एरव्हीं ग्रीसचे लोकांनी कलाकौशल्याची परिसीमा केली होती, व तालमीचा नाद व अखंड युद्धप्रसंग यांमुळे ते वज्रदेही झाले होते. सर्व कांहीं होते; परंतु उद्योग, अविश्रांत उद्योग करण्याचे वळण त्यांना नव्हते. दृढनिश्चय, आत्मसंयमन व चिरसहिष्णुता हे गुण त्यांचे अंगी नव्हते, त्यामुळे ते बुडाले. कारण, सततोद्योग ही तरी एक मानसिक शक्तिच आहे. ती तेथे नव्हती. शिवाय, गर्वाने चढून ते ऐदी झाले, व इतर जातींना रानटी म्हणून तुच्छ मानूं लागले. लबक म्हणतो, सांप्रतकाळी आमचे गोरेलोकही अन्य जातींना तुच्छ लेखितात; पण हे त्यांचे अज्ञान आहे. यापेक्षा इतर जाती- पासून आपणांस अजून शिकण्याजोगें पुष्कळ आहे, असें जर त्यांना वाटेल, तर मी त्यांना अक्कलवाले समजेन. ब्रह्मी लोकांना युद्धाचा (कलहाचा) फार तिरस्कार आहे. ही गोष्ट आम्ही घेण्याजोगी आहे. त्याचप्रमाणे जपानी लोकात " बुशिडो" ला बुशिडो हा जपानीच शब्द आहे. याचा अर्थ थोडक्यांत देतां येणे शक्य नाही. तथापि साधी रहाणी, संतुष्ट वृत्ति, निर्दोष नीति. मत्ता, स्वामिहितार्थ प्राणव्ययाची परवा न करगे व अपमानापेक्षा मरण बरें मानणे या गोष्टींचा त्यांत अंतर्भाव होतो. १ ३४ सुख आणि शांति. [प्रकरण , फार मान आहे. हीही गोष्ट शिकण्याजोगी आहे. पाश्चात्य सभा- जांत दिसून येणान्या द्रव्यतृप्णा, दिमाखखोरी, परापहरण, स्वार्थ- साधुत्व, व्यक्तिहित-परायणता या गोष्टींचे जागी जपानी लोकांत अनुक्रमें अल्प संतोष, विनयशीलता, स्वसंरक्षण, स्वार्थत्याग व लोकहितपरता हे स्पृहणीय गुण दिसून येतात. जपानी लोकांचे धैर्य केवळ अभंग असून, ते मरतील पण शत्रूला पाठ दाखविणार नाहीत, इतके ते अपकीर्तीला भितात. मरणाचे तर त्यांना काहींच वाटत नाही. ते राजाज्ञा शिरसा वंद्य मानितात व जनहितासाठी स्वहिताची किंवा स्वकुटुंबाचीही हानि आनंदाने स्वीकारितात. त्यांचे शारीरिक व मानसिक शिक्षणही मोठे कडक व सक्तीचे असते व त्यायोगे रणशूरता, एकनिष्ठा, धैर्य, उत्साह, विश्वासूपणा, साहस व आत्मसंयमन इत्यादि उदात्त सद्गुण, शांततेच्या किंवा युद्धाच्या प्रसंगी जपानी पुरुषांत तसेच स्त्रियांतही सारखेच वस- तात. त्यांची तितिक्षा व अविपादिता ही तर बिनतोडच आहेत. जपानांतून शिकून आलेले डायमण्ड सोप कंपनीचे चालक रा० परांजपे यांनी जपानींच्या या गुणांची स्वानुभूत गोष्ट सांगितली. ते म्हणाले, एकदां अग्निपळयामध्ये एक लक्ष जपानी लोक उघडे पडले. परंतु एकाची कंवर खचतांना किंवा डोळ्यास पाणी येतांना मला दिसले नाही. अशा लोकांपुढे विपत्ति काय करणार ? लबक म्हणतो, जपानी लोकांना जे आज एवढे महत्त्व आले आहे, केवळ या सद्गणांचे फळ आहे; व ह्या सर्व गुणांत गोया लोका- नींही त्यांचे महत्व घेणे जरुर आहे.
१ लें.] सुख. ३५ एमिल असे विधान कारतो की, कोणत्याही राष्ट्राचा उत्कर्ष शास्त्रीय ज्ञानावर फारसा अवलंबून नसतो; सदसद्विवेकावर असतो. लबकचे मते तो या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतो. कारण, शास्त्रीय विज्ञानावांचून व्यवहार अवघड होईल; त्याचप्रमाणे विवेकावांचून इहलोकींचे मानवी जीवितच व्यर्थ होईल. पहिली गोष्ट शरीररक्षणाला जरूर आहे; व दुसरी आत्मोद्धारणार्थ आवश्यक आहे. जादूगारापेक्षाही अद्भुत गोप्टी शास्त्रीय विज्ञानाने निर्माण करून व्यवहार सुखावह केला आहे. चटोबिअंड हा शास्त्रीय विज्ञानाला विशेष मान देत नाही; पण हा त्याचा अन्याय आहे. तो वनस्पतिशास्त्राची थट्टा करिता; परंतु, यावरून असल्या मोहक व आनंददायक शास्त्राबद्दल त्याचे अज्ञानमात्र व्यक्त होते. सृष्टप- दार्थविज्ञान हे मानवी प्रगतीला मोठेच साह्यकारी आहे. व आत्मो- न्नतीला सदसद्विवेक व पापाचे भय ही मोठीच कारके आहेत. सत्याची पायरी विवेकाच्याही वरची आहे. विवेकाने आपण सत्याची निवड करितो. अर्थात्, विवेक हे साधन व सत्य हे साध्य किंवा फल, अतएव वरिष्ठ होय. म्हणून आपण सत्यार्थ झटले पाहिजे, व प्रसंग पडल्यास, सत्याकरितां मरण्यासही तयार झाले पाहिजे. हक्सले म्हणतो की, सदाचार हेच मनुष्याचे शास्त्रविहित कर्त- व्यांतील रहस्य आहे; व सदाचारास सत्य अवश्य आहे, म्हणून मनुष्याने प्रथम सत्याची ओळख पटवून घ्यावी. पण, सत्याची निवड विवेकबुद्धीचे स्वाधीन आहे. कोणी म्हणेल, कधी कधी विवेकबुद्धिही चुकते. कबूल. पण, तिची चूक तरी कोण उमगून , .
३६ सुख आणि शांति. [प्रकरण " काढिते? तिची तीच. फलतः, विवेकबुद्धि अवश्य आहे. मात्र, तिचें- ही फाजील स्तोत्र करण्याचे कारण नाही. कारण, पास्कल म्हणतो, ईशप्राप्तीचे कामी केवळ विवेकानें काम होत नाही. तेथे सद्भावच पाहिजे. एकाद्याला पुष्कळ विवेकबल असून जर हृदयांत सद्भाव नसेल, तर असल्या खोट्या मनाच्या मनुष्याला ईश्वर भेटणार नाही.' आपलेकडे “भावेन देवं," 'देव भावाचा भुकेला," "भावेहि विद्यते देवस्तस्माद्भावोहि कारणं ॥ ही वचनें सर्वश्रुतच आहेत. शांतस्थिति सर्वथा स्पृहणीय आहे; तरीही कर्तव्याला रजा देऊन ती मिळवू पहाणे योग्य नाही व शक्यही नाही. लबक म्हणतो, पुरातन काळी काही ख्रिस्तधर्मी लोक शांतिप्राप्तयर्थ वान- प्रस्थ होत. परंतु, अशाने त्यांस कितपत शांतिलाभ होत असेल तें त्यांनाच माहीत! नुसते माणसांतून उठल्याने किंवा संसारांतून दूर बसल्याने शांति प्राप्त होते असे नाही. भगवंतांनी म्हटले आहे: (श्लोक) कमेंद्रियाणि संयम्य । य आस्ते मनसा स्मरम् ॥ इंद्रियार्थान् विमूढात्मा। मिथ्याचारः स उच्यते ॥१॥ --श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ:-बाहेरून इंद्रिये आंवरून घेतली, पण मनाने तर विषयचिंतन चालू आहे, अशाला मिथ्याचारी किंवा ढोंगी म्हणतात: एक संन्यासी आमच्या एका लह्याकडे येऊन तक्रार करूं लागला, "अलीकडे आमचे घराकडली माणसे आम्हांला पत्र- देखील पाठवीत नाहीत; ही का आम्ही संपलों असे समजतात का हो?" आतां अशा संन्यासाला काय म्हणावें ? ही विटंबनाच नव्हे .
१ लें.] सुख. . काय ? युरोपांतीलही महंत किंवा जोगी व जोगिणी यांचे मठांचे इतिहास वाचून पहातां, त्या स्थितीतही सांसारिकांची सर्व कुलंगडी असून शिवाय परस्परांत कलह, मत्सर, अदेखाई चालू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे कसलें वैराग्य आणि ही कसली शांति! त्या- पेक्षां घसघशीत व्यवहारांत राहून विहित धर्माचरणाने आयुष्य घाल- विणे, दयेची, परोपकाराची कृत्ये करणे, व परमात्म्यावर अगाध विश्वास ठेवून अढळ नीतीने चालणे, हा पंथ शतपट बरा. आतां, या महंतांचे आश्रमांपासून एक फायदा झाला, तो कबूल केला पाहिजे. हे आश्रम म्हणजे मध्ययुगांतील विद्यापीठे होती. तेथें राहून गरीब विद्यार्थी शास्त्र, कला, विज्ञान, धर्म, सारस्वत इत्यादि- कांचे ज्ञान संपादन करीत व ज्ञानाची जागृति कायम ठेवू शकत. हे या आश्रमांचे समाजावर उपकार झाले खरे. पण, वनवास पत्करणारांचा जो मुख्य हेतु-शांतिसुखप्राप्ति-तो साध्य झाला नाही. भगवंतांनी, मानवी जीवांचे दौर्बल्य ध्यानात घेऊन हा कर्तव्याचा व शांतीचा प्रश्न आपल्या गीतेत अलौकिक चतुराईने सोडविला आहे. स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी अर्जुनाला सांगितले की, कर्तव्य- (श्लोक) न मे पार्थास्ति कर्तव्यं । त्रिपु लोकेपु किंचन ॥ नानवाप्तमवाप्तव्यं । वर्त एव च कर्मणि ॥१॥ उत्सीदेयुरिमे लोका । न कुर्यां कर्म चेदहम् ॥ ॥२॥ तस्मादसक्तः सततं । कार्य कर्म समाचर ॥ असक्तो ह्याचरन्कर्म । परमाप्नोति पूरुषः ॥३॥ -.श्रीमद्भगवद्गीता. , ३८ सुख आणि शांति. [प्रकरण विमुख होऊन म्वस्थ बसल्याने शांति प्राप्त होत नाही. व कर्तव्य सोडून कोणाचेही चालावयाचे नाही. स्वतः मलाच म्हणशील तर त्रिभुवनांत कर्तव्य म्हणून कांहींच नाही, किंवा प्राप्त करून घेण्या लायक वस्तुही नाही, असे असतां मी केव्हाही रिकामा बसत नाही. कारण, मी तसे केले, तर सारेच संपेल. यासाठी तूंही सतत कर्तव्यपर रहा. काम करीत राहिल्याने काही हानि होत नाही व व्यवहारांत राहन भोग भोगूनही शांति राखितां येते. पण गुरुकिल्ली वेगळी आहे. ती अशी:- (श्लोक) ज्ञेयः स नित्यसंन्यासी । यो न दृष्टि न कांक्षति ॥ ... युक्तः कर्म फलं त्यक्त्वा। शांतिमाप्नोति नैष्ठिकीम् ॥ ... ... ... आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं । समुद्रमापः प्रविशन्ति यत् ॥ तत्कामा यं प्रविशति सर्वे । स शांतिमामोति न कामकामी ॥३॥ --श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ:-....जो कोणाचा द्वेष करीत नाही व कशाही विषयी लसलम करीत नाहीं, तो सदाचा संन्यासीच समजावा. कर्मफलाचा त्याग करून जो कर्तव्यपर राहतो त्याला नैष्ठिक शांति प्राप्त होते. वाबारे, समुद्रा- कडे पहा, कसला खादाड. आहे. सहस्रावधि नद्या सतत पाणी ओतीत १लें.] सुख. ३९ , आहेत तरीही बापडा आ वासूनच आहे. पण, असे असून त्याची महतांत गणना आहे. याचे कारण, कितीही नद्या आल्या तरी तो अमर्याद होत नाही. जागचा ढळत नाही. बरे बाहेरून पाणी नाही आले म्हणून रोडत नाही. ज्ञानदेव म्हणतात; (ऑवी) वर्षावावीण सागर । जैसा जळं निर्भर ।। अर्थात् प्राप्तीचा हर्ष नाही व हानीबद्दल शोक नाही. याच हिशोबाने जो भोग्यविपयाचे सेवन करील त्याला भोग भोगूनही अढळशांति लाभेल. शांतीची हानि भोग भोगण्याने होत नाही. तर भोगांविषयी किंवा कामाविषयी जी कामिता म्हणजे आसक्ति किंवा लसलस ती शांतीची घाण करिते. थालीपीठ मिळाले तरी आनंद; जिलबी मिळाली तरी आनंद; एक दिवस फांका पडला तरी आनंद; अशी ज्याची वृत्ति झाली त्याचे शांतीला ढळ नाही. विषयभोगाला शास्त्राची तादृश हरकत नाही; परंतु, अनध्याय झाला तर आठवणही होता कामा नये, म्हणजे बाध नाही. सारांश, कर्मफलाचा त्याग करून अनासक्तीने कर्मे ईश्वरार्पण करून कर्तव्य करीत संसारांत राहणे हेच, प्रवृत्ति व निवृत्ति या दोहोंना साधून शाश्वतसुख मिळविण्याचे साधन आहे. इँटे कवीने सेलेस्टीन नामक धर्मगुरूला मठांतील एकांतवास पत्करण्याबद्दल फार दोष दिला आहे. तो म्हणतो. " असले लोक मी ईश्वराचे अपराधी व द्वेष्य समजतो. कारण, ईश्वराचे प्राण्यांस ४० सुख आणि शांति. [प्रकरण . साह्य करण्याचे सोडून हे आपलपोट्यासारखे एकटे एकटे राहतात, हे ईश्वराला प्रिय कसे व्हावें ? यापेक्षां शेती, दुकानदारी, किंवा अन्य काही व्यवसाय करून परोपकार व आत्मशांति साधतां येईल; व असें करितील तेच धन्य." जगांत रहावे कसे हे रहस्य ज्यांना कळले त्यांना, . आले तें वर्ष, या जगाचे अधिकच कौतुक वाटून ते तत्कार्यार्थ अधिकच श्रम करीत जातील. एतावता, माणसांतून उठून जाण्यापेक्षा त्यांत राहून त्यांचे कल्याणार्थ मेहनत करणे, हेच आपले कर्तव्य व हेच आपले सार्थक्य आहे. आतां मेहनत करणे तीही माफक असावी; अश्रांत परिश्रम कांहीं सुखावह होणार नाहीत. शिलरचे म्हणणे की, " जो खेळाडू तोच खरा मनुष्य. हे विधान थोडेंसें फाजील आहे. तथापि, कामाचे माणसाला विश्रांति ही पाहिजेच. वर्षांतून एक महिना, आठवड्यांतून एक दिवस, दरदिवशी एक-दोन तास याप्रमाणे मनुष्याने कामाविरहित राहून त्या वेळांत आपले वर्त- नाची तपासणी, किंवा मेंदूस विश्रांति, किंवा आल्हादकारक व्यायाम, ईशध्यान, अथवा कांहीं करमणूक, ह्या गोष्टी कराव्या. शिवाय, प्रत्येकानें रोज निजण्याचे पूर्वी आज आपण काय काय केले, त्यांत चुकले काय, केले पाहिजे होते काय आणि केलें नाहीं काय इत्यादि गोष्टींचा तपास करून आपले वर्तनाचा जमाखर्च पांच पळे खर्चुन पहावाच पहावा. असें करीत गेल्याने लौकरच १ लें.] सुख. ४१ वर्तन निर्मळ होत जाऊन त्या मनुष्याला शांत निद्रा, क्षुबोध व पवित्राचरण ही लाभतील. लबक म्हणतो, हल्लीच्या हुतुतूच्या काळांत आम्ही निवांतपण व ईशचिंतन यांचे महत्त्व विसरल्यासारखे आहों. फार काय, पण आम्ही जे चेंडूफळी वगैरे खेळ म्हणून खेळतो त्यांचे देखील कायदे असल्याने त्यांतही मन दंग ठेवावे लागते. उद्योगपरता हे मनु- प्याचे कर्तव्यच खरें, तथापि, अखंड घाण्याला जुंपलें राहणे हा कांहीं कर्तव्यपरतेचा अर्थ नव्हे. वैतालिकानें दुष्यंताला म्हटले आहे: (श्लोकचरण) पष्ठे भागे त्वमपि दिवसस्यात्म -शाकुंतलम् । भावार्थ:-दिवसाचा सहावा भाग करमणुकीत घालवीत जा. त्याप्रमाणे प्रत्येकाला रोज काही वेळ तरी निवळ आत्मच्छंदा- नुवर्तित्वांत घालविलाच पाहिजे. त्याने मनःप्रसाद व शांति ही प्राप्त होतात. इंग्रजलोक सप्ताहांतील सहा दिवस म्हणजे कामाचे दिवस व्यवस्थितरीतीने घालवितात; परंतु सातवा म्हणजे विश्रां. तीचा किंवा ईशचिंतनाचा जो रविवारचा दिवस तो नीट घाल- गीत नाहीत. हा दिवस ख्रिस्ती शास्त्रांत पवित्र धरला आहे. त्या अर्थी या दिवशी मन अध्यात्म व पारमार्थिक विचारांत मग्न ठेविलें पाहिजे. या दिवशी चित्तवृत्ति प्रशांत, गंभीर, पवित्र व ईश- ४२ सुख आणि शांति. [प्रकरण परायण अशी असली पाहिजे. परंतु याबद्दल वानवाच दिसतो; हे ठीक नाही. अशा प्रकारे सप्तयांतून एक दिवस खर्चण्याने हानि कधीही होणार नाही. आज इंग्लंडांत अनेक शतकें सहाच दिवस काम करीत आले, पण त्याने इंग्लंड दरिद्री न होतां उलटें श्रीमंतच झाले आहे. रविवारचे दिवशीं व्यापार थंड पडतो, नांगर शेतांत पडून असतो, सराफ्यांत नाण्याची छणछण बंद असते, कारखा- न्यांतील वाफेचे यंत्रांतून धुराचे लोळ दिसत नाहीत; असा जरी बाह्यात्कारी देखावा दिसतो, तरी अखिल यंत्रांचेही जनक में मनुप्यरूपी यंत्र त्याची बिघडलेली आंतली मळसूत्रं वगैरे दुरुस्त होऊन या वेळांत सफाई होत असते व तीमुळे ते पुनरपि सोम- वारी अधिकच वेगानें काम करण्यास तयार होते. म्हणजे, त्या पवित्र दिवशींच्या विश्रांतीने व मनःशुद्धीने मनुप्याची बुद्धि विशद होते, उत्साह वृद्धिंगत होतो, व शारीरशक्तिही उत्तंभित होते. अर्थात् , विश्रांतीपासून राष्ट्राला हा काही लहानसान फायदा नव्हे. कधी कधी काही लोक म्हणतात, 'उद्योग तरी कोणता करावा हेच आम्हांस सुचत नाही. ' हे त्यांचे म्हणणे ऐकून मोठे नवल वाटते. लबक म्हणतो, इतरतितर पोटाचा वगैरे धंदा कदाचित् एकाद्याला जरूर नसला किंवा सुचत नसला तरी, एक धंदा तर प्रत्येक मनुष्य म्हणविणाराला असलाच पाहिजे. तो धंदा म्हणजे आत्मोन्नति किंवा आत्म्याचे शिक्षण हा होय. एकाद्या १ लें.] सुख. ४३ राजपुत्राचे शिक्षकत्व किंवा पालकत्व मिळाले असतां आपणांस मोठा अधिकार प्राप्त झाला असे आपण मानितों; परंतु, खरें पाहता, असल्या मालकीपेक्षा किंवा शिक्षकपणापेक्षां आत्म्याची मालकी किंवा शिक्षकपण संपादणे ही अधिक मानाची, मह- त्त्वाची व अधिकाराची गोष्ट आहे. या दृष्टीने पाहता, आपणांस आत्मोन्नतिसाधनार्थ जितकें रिकामपण मिळेल तितकें इष्टच आहे. निर्वाहाच्या वस्तु पैदा करण्याकरितां करावे लागणारे उदीम-व्यापार, नोकरी-चाकरी, उद्योग-धंदे, यांचेही महत्त्व आहेच. कारण, त्यांवांचून शरीर- पोषणच शक्य नाही. शरीरपोषणाचे महत्त्व कितीही मोठे असले तरी, पुष्ट शरीरावरून आमची किंमत करणे म्हणजे आम्हीही एका जातीचे पशुच ठरूं. परंतु आम्हांला जें यावत् सृष्टप्राण्यांत श्रेष्ठत्व आले आहे, ते आमच्या आत्म्यामुळे आले आहे. या आपल्या मानवी शरीरांत या आत्मारूपी देवाची वस्ती आहे, म्हणूनच याचे एवढे महत्त्व आहे. म्हणून शरीरपोषणापेक्षा आत्मोन्नतीचे महत्त्व अधिक मानिलेच पाहिजे. सेंट आगम्टिन म्हणेः " रिकामपणची कामगिरी तर बहुत मोठी आहे." या ठिकाणी एक वेळ, ती अत्यंत किंवा निरतिशय मोठी आहे असे तो म्हणता तरीही शोभते. कारण, त्रिभुवन मिळाले आणि आत्मघात झाला तर काय मिळविलें ? अर्थात्, आत्मोत्कर्ष करणे हे फारच मोठे काम प्रत्येकाला आहे. असे असतां जगांत पहावें ४४ सुख आणि शांति. [प्रकरण स्वस्थ तों सुस्थितीमुळे मध्यवयांत किंवा पूर्ववयांतच उद्योगधंदा सोडून बसण्याची सवड झाल्यामुळे जे घरी बसले आहेत, असे बरेच लोक कुरकुरतात की ' करावे तरी काय, वेळ जातां जात नाहीं!' या अज्ञानाला काय करावें ! पोटाचा उद्योग नसला तरी सर्वोत्तम असे दोन व्यवसाय त्यांना मोकळे व अग- त्याचे आहेत. ते व्यवसाय म्हणजे, अहर्निश परोपकार करणे व आपल्या आत्म्याचे शोधन करणे, हे होत. हे केल्याने त्यांस सुख- शांतीचा अवर्णनीय लाभ होईल.
Getti
etetett tetettstettetetett
प्रकरण दुसरें.
शरीर.
Petretoritetieteet te teretetet e tretet teretetetotortoetuste tretetett. (श्लोक) यावत्स्वस्थमिदं शरीरमरुज यावजरादूरतः । यावच्चंद्रियशक्तिरप्रतिहता यावत्क्षयो नायुपः ॥ आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यः प्रयत्नो महान् । प्रोद्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः : कीदृशः ॥ १ ॥ भर्तृहरि. भावार्थ:-जोपर्यंत हें शरीर निरोगी असून जरा दूर आहे, जोपर्यंत इंद्रिये आपापली कामगिरी नीट बजावीत आहेत व आयुष्य संपत आले नाही, तोच शहाण्याने शाश्वतमुखासाटी यत्न करावा. कारण, घर पेटल्यावर विहीर खणू लागणे हा कोणते प्रकारचा उद्योग म्हणावा ?
प्रकरण दुसरें. शरीर. न शरीरं पुनःपुनः। -सुभाषित. (आय) के सौख्यमगिता जराति जंतोः ॥ १ ॥ -माचार्यकृन प्रोत्तरमालिका. भावार्थः --आरोग्य हच जगतान प्राण्यांचं मुख होय. , बायबलांत वर्णन आहे की, येशनिस्ताने एकदां पांच पाच आणि दोनच मासे एवढ्यावर पांच हजार लोक जेवू घातले. या कृत्याला अद्भुत कौतुक किंवा अलौकिक चमत्कार म्हणून नांव पडले आहे. परंतु, सृष्टीच्या नित्यक्रमांत ज्या अनेक गोष्टी आढळतात, त्यांहून कांहीं हा चमत्कार अद्भुत नव्हे. एक दाणा पेरून त्याचे पायलीभर होणे; एका माशापासून लाखों माशांची वीण होणे; खाल्लेलें दुग्ध किंवा मांस ह्याचे रूपांतर होऊन रक्त, मांस व मेंदु बनणे, हे काय हलके चमत्कार आहेत? वनस्पतीचें अन्न खावे, त्याचे रसरक्तादि सप्तधातु बनून ते देहांत चैतन्य व क्रियासामर्थ्य उत्पन्न करितात हें तरी केवढें नवल आहे बरें?
सुख आणि शांति. [प्रकरण - याही चमत्कारापेक्षां पुरुषवीयाच्या एका बिंदूपासून हा दशें- द्रिययुक्त नरदेह व त्याचे अनंत व्यापार हे सर्वच मोठे अद्भुत गौडबंगाल नाही काय? पंचदशीत विद्यारण्यांनी म्हटले आहे:- (श्लोक) एतस्मात्किमिवेंद्रजालमपरं यद्गर्भवासस्थितं । रेतश्चेतति हस्त-मस्तक-पद-प्रोद्भुत रोमांकुरं ॥ पर्यायेण शिशुत्व-यौवन-जरा-वेषैरनेकैर्युतं । पश्यत्यत्ति शृणोति जिघ्रति रसान् गच्छत्यथागच्छति ॥ १ ॥ भावार्थ:--गर्भाशयांत पडलेला एक वीर्यबिंदु हस्तमस्तकादि इंद्रियांनी युक्त होऊन व अनेक विषय व व्यापार करून बाल्यतारुण्य- वार्धक्यादि अनेक अवस्था भोगून पुनः नाहीसा होतो, हे केवढे मोठे इंद्रजाल आहे बरें ? शिवाय, अशा या अजब शरीरांत रहाणारे मन व आत्मा यांचे व्यापार तर केवळ अचिंत्यच आहेत. बरे या शरीराला तरी धातुक अशा गोष्टी पदोपदी आहेत. आगगाडीची थडक झाली, घोडाच उधळला, पाण्यांतच पाय घसरला, घरच कोसळलें, या आगंतुक व शिवाय, तापजाळ, नाना व्याधि या प्रत्यक्ष, शरीरांत वसणाऱ्या गोष्टी प्रतिपदी शरीरनाशाला टपलेल्या असतात. तथापि, परमेश्वराची इच्छा आहे तोपर्यंत इतक्याही विघ्नांना दाद न देतां हे शरीर चालते आणि ईश्वरी इच्छा फिरली की, जे काही क्षणांपूर्वी हालत, बोलत, उड्या मारीत व त्रिभुवनाच्या उलाढाली करीत होते, तें जड मातीचा ढेपसा होऊन जाते. हे तरी केवढें नवल ? साधु कबीर म्हणतोः- , २ रें.] शरीर. ४९ (पद) कची मटीका बंगला तेरा । पाव पलखमो गिरता है। हे मानवी शरीर इतके अद्भुत व कुशलतेचे असून पुनः क्षण- भंगुर असावें हे तरी काय ? शिवाय शरीरघटनेत सहस्रावधि गोष्टी आहेत. त्यांचा आम्हांस पत्ताही नाही. स्पिनोझा म्हणतो, स्वतःच्या शरीराचे आपणांस पूर्णज्ञान असणे ही सहज गोष्ट आहे. परंतु, खरे पहातां आपल्यातील मोठमोठ्या शरीरवेत्त्याना- देखील या शरीराचे ज्ञान फारच अल्प आहे. आपण बोलतों, वाचतों, विचार करितो त्या वेळी मेंदूंत काही तरी व्यापार होत असलाच पाहिजे, हे खास; पण हा व्यापार कसा व काय हे आप- णांस कळले आहे काय ? मोठ्या इंद्रियविज्ञान-युक्तालादेखील या कामी काळोखच आहे. कोणत्याही विषयाचा इंद्रियद्वारा आपणांस बोध होतो, म्हणजे तरी काय होते ? कोण सांगू शकेल ?" सारांश, ज्याला आपण आपला-नव्हे आत्मरूपच-समजतों, त्या या देहाबद्दल आपले ठिकाणी इतकें गडद अज्ञान भरले आहे. इंद्रियांची घटना व व्यापारच पहा ना! त्वगिंद्रिय घ्या. हे विशे- षतः हस्ताग्र व जिव्हाग्र या ठिकाणींच अधिक तीक्ष्ण कां ? शिवाय, एकाच त्वचेचे ठायीं शीत व उष्ण हे उलट संस्कार कसे होतात; व त्वचेला झालेले संस्कार मेंदूशी कसे पोंचतात; आणि तेथे जाऊन तरी त्यांना बोधरूपत्व कसे येतें ? जिव्हेचाही तोच प्रकार. एकाच रसनेला षड़िध रसांचे ग्रहण कसें करितां येते व त्यांचे सुख आणि शांति. [प्रकरण सप्रमाण बोध मेंदूपर्यंत कसे पोंचतात; एकाच मेंदूत प्रत्येक पृथक् इंद्रियाचे व्यापारांचा भिन्न बोध कसा प्रतीत होतो? इंद्रियव्यापा- रांत व विषयबोधांत पार्थक्य असतांना त्या सर्वांचे आनंदमय किंवा सुखमय असें एकच पर्यवसान कसे होते ? नाकास उत्तम सुवास आला; कानांत सुंदर ध्वनि पडला; जिव्हेस रुचकर खाद्य मिळाले व नेत्रांस रमणीय रूप दिसले, तरी अखेर ' हां हां' म्हणून मनुष्य जी गोडशी मिटकी मारितो, तिचे रूप एकच म्हणजे सुख- मयच असते, हे तरी काय ? कर्णाची तरी रचना किती चतुराईची, त्याचे ध्वनिवाहकत्व किती गमतीचे व त्याला तीव्र, कोमल, हस्व व दीर्घ इत्यादि असंख्य ध्वनिभेदांचे पृथक् ज्ञान कसे होते ? नेत्रांची रचना व व्यापार ही तर चातुर्याची पराकाष्ठाच आहे. फार राहिले, पण नेत्र तरी त्वचा-मांसच, असे असून तो सूर्यकां- तासारखा लकाकतो व कवडासा पाडतो, हे काय ? एवढे तेज शरी- रांतील तेवढ्याच त्वचेला कोठून आले ? बरें विबग्रहणाचे सामर्थ्य तरी कसलें अद्भुत ! फोटोग्राफर किंवा छायालेखक कार्डसाईज घेऊ की कॅबिनेट घेऊ ( कारण, त्याप्रमाणे लहान किंवा मोठे प्रतिबिंब येईल ) म्हणून पंचाईत करीत असतो. परंतु या ईश्वर- निर्मित कनीनिकारूपी तुरीच्या डाळकणाएवढ्या कमेन्यांत मुंगी- पासून ब्रह्मांडापर्यंत वाटेल तेवढ्या पदार्थाचे अचूक व सप्रमाण प्रतिबिंब पडूं शकते, हे तरी कौतुक अनिर्वचनीय नव्हे काय ? एका कवीने म्हटले.आहे:- २.] शरीर. ५१ (श्लोक) नेत्री पुत्तलिका मसूरदलशी अत्यल्प जी नांदते । वर्जू शक्ति तिची अचाट किति मी ब्रह्मांडही ग्रासिते ॥ जातां सूचिमधून वारण कमी आश्चर्य तें याहुनी । देवा कौतुक हे तुझ्याविण दुजा कोणा न साधे जनीं ॥ १ ॥ -अद्भुतकिमियागार. म्हणजे, नेत्रांत जी मसुरेच्या दालकणाएवढी क्षुद्र बाहुली आहे, तिचा पराक्रम काय वर्णावा ? ती सर्व ब्रह्मांडही कवळू शकते. 'या तिचे कृतीपुढे सुईचे नेड्यांतून हत्ती जाणे हे देखील मोठे आश्चर्य नव्हे. कवि म्हणतो, की हे देवा, हा अद्भुत चमत्कार तुझ्या- वांचून अन्य कोणालाही येणारा नाही. जठराचा व्यापार तरी किती अचिंत्य आहे ! जठर हे काय आहे ? तर चामड्याची पिशवी आहे. पण, तींत भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोप्य असे नैकविध पदार्थ टाकावे, तो त्यांचे रस होऊन सप्त धातु कसे बनतात व कां बनतात, हे कोणास समजतें? तुम्ही एक चामड्याची पिशवी घेऊन तींत एक शेरभर अन्न कोंबा आणि एका पेटीत ठेवा व दुसरे तिसरे दिवशी पहा. काय दिसेल ? तेंच. अन्न सडून घाणतांना मात्र दिसेल, दुसरे काही नाही. मग जटराचे पिशवीतच त्याचे असें अद्भुत रूपांतर कसें होतें ? अशी. एक नी दोन, या शरीरासंबंधी किती कौतुकें सांगावी या नऊ दरवाजांनी युक्त अशा घरांत प्राणरूप वायूची स्थिति, हे तरी नवल नव्हे काय ? एका दोहन्यांत म्हटले आहे:-या .
५२ सुख आणि शांति. [प्रकरण - शरीररूपी पिंज-याचे नऊ दरवाजे खुले असतांही हा प्राणरूपी पक्षी त्यांतून उडून जात नाही हे नवल आहे. उडून गेल्यास नवलच नाही! अशा या कौतुकमय अद्भुत शरीरांत आपली सर्वदा वसति असून आपणांला त्याचे ज्ञान किती तरी कोते आहे ? आणि असे असून आम्ही सर्वज्ञ, आम्ही भूदेव, इत्यादि प्रकारे आम्ही घमेंड मारतों, हे मूर्खपण नव्हे काय ? दुसऱ्या एका दृष्टीने पहातां, मनुष्याला तरी असंख्य गोष्टींचें. ज्ञान आहे, नव्हे का ? त्याची स्मृतिच तपासून पहा. हाही एक अजबखानाच आहे. यांत किती तरी गोष्टींचा समावेश आहे बरें ? अगदी मठ्ठ मनुष्याची स्मृति धरिली तरीही तीत किती तरी गोष्टी सांठविल्या असतात ! सामान्य बुद्धीच्या मनुष्याच्या स्मृतींत लक्षावधि वस्तु, पशु, पक्षी, मनुष्ये यांची रूपें; त्यांचे शब्द, स्पर्श, गंध, व्यापार; मित्र-शत्रु, आप्त स्वकीय यांचे व स्वतःचे बाल्यापासून चालू मितीपर्यंत घडलेले वृत्तांत; नाना क्षेत्रं, तीर्थे, पूल, नद्या, किल्ले इत्यादि इत्यादींची चित्रे; अनेक गाणी, गा- पये अनेक राजे, वीर, राजपुरुष, मुत्सद्दी, कवि, इतिहासकार इत्यादिकांची चरित्रे; शेंकडों ठळक गोष्टींच्या तारखा, लढाया, राजक्रांत्या, यांत्रिक शोध, ही सर्व सांठविलेली आढळतील. कोणी परिचितांपैकी आडून बोलतांना कानी आले, किंवा ओळखीचें भांडे वाजले, तरीदेखील आपणांस नेमकी ओळख पटते, हे तरी अजब ज्ञान नव्हे काय? भांड्यावर बाहेरून हात ठेवावा तर, तें २ रें.] शरीर. my .. आंतून भरलें की रिते, हे समजते. हे तरी बोध स्मृतीतच राह- तात. अर्थात् मनुष्याचे ज्ञान तरी मोठेच आहे हे खरे. परंतु, त्या स्मृतींत हा अनंत वस्तूंचा पृथक् बोध प्रथम उमटतो कसा, तेथे तो स्थिरावतो कसा, अपेक्षा नसेल त्या वेळी गुप्त किंवा लीन राहतो कसा, व आपली इच्छा होतांच पुन्हा प्रकट होतो कसा, हे परम गूढ उकलीसा शहाणा कोण आहे ? भगवंतांनी गीतेमध्ये- (श्लोकचरण) मत्तः स्मृति नमपोहनं च । भावार्थः----मजपासूनच स्मृति, ज्ञान आणि तर्क ही उत्पन्न होतात. म्हणून जे म्हटले आहे, त्यावर हवाला देण्यापलीकडे कोणा- चीही अक्कल या ठिकाणी चालेलसें आम्हांस तरी वाटत नाही. जीवात्म्याचे क्रीडामंदिररूपी हे मानवी शरीर एक अप्रतिम कौतु- कच खरे; व परिणामवादाप्रमाणे पहाता हे चिदचिदात्मक शरीर आकारास येण्याला प्रथम अनंत काळ लागला असला पाहिजे. कारण उपनिषदांत म्हटले आहे: तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः । आकाशा- द्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्भयः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन् । अन्नात्पुरुषः । -ब्रम्हानन्दवल्ली. भावार्थः--या आत्म्यापासून आकाश झाले. आकाशापासून अमि. अनीपासून जल झाले. जलापासून पृथ्वी. पृथ्वीपासून ओषधी. ओपधी- पासून अन्न व अन्नापासून पुरुषशरीर निर्माण झाले. .. -- सुख आणि शांति. [प्रकरण इतकेंच या परंपरेनें अव्याकृतांतून पुरुषाकारास येऊन पोंचेतों किती अवस्थांत किती काळ लोटला असला पाहिजे ? हा काळ अनंत म्हटला तरी शोभेल. बरें, पण इतक्या श्रमानें, इतक्या दीर्घ कालाने निर्माण झालेला हा निखिल कौतुकमयं पुतळा क्षणभंगुर आहे, असे दृष्टीस पडले म्हणजे आश्चर्याने व दुःखानेही जीव व्याकुळ होतो व गोंधळून जातो. जिवंत असतां जो स्वर्गाला गव- सणी घालण्यास किंवा परमेश्वराचे मांडीशी मांडी भिडविण्यास समर्थसा भासत होता, तो देह एका क्षणांत पालथा होऊन सर्व तेज मावळून जाते व मृतकाष्ठाची त्याला उपमा येते. नव्हे, तर, माझा माझा म्हणून जिवंतपणी त्याला कवळणारे आप्त. इष्ट स्वहस्तानें तो काष्ठभूत देह उचलून सरणावर घालन पेटवून देतात व त्याची तीन चिमट्या राख होऊन पडते! हा सर्व प्रकार पाहिला म्हणजे प्रत्येक विवेकी मनुष्याचे हृदय शोकग्रस्त व शतधा विदीर्ण होते. कार्लाइल म्हणतो, याहून आधिक हृदयद्रावक किंवा मर्मतक प्रकार अलं ब्रह्मांडांतदेखील दुसरा कोठे नसेल." भर्तृहरि तर हा प्रकार पाहून उद्वेगाचे भरांत विधात्याला अप- ण्डित म्हणण्याला कमी करीत नाहीत! ते म्हणतात: (श्लोक) सृजति तावदशेष गुणाकारं । पुरुषरत्नमलंकरणं भुवः ॥ तदपि तत्क्षणभंगि करोति चेदहह कष्टममंडितता विधेः ॥ १ ॥ भावार्थ:-हा ब्रह्मदेव पृथ्वीचे केवळ भूषण असे हे सर्वगुणसंपन्न पुरुषरूपी रत्न ( इतक्या यत्नाने ) निर्माण करून ते पुनः क्षणभंगुर करितो, तेव्हां या काची मूर्खता पाहून वाईट वाटते.
५५ , २ रें.] शरीर. बरें, दुसऱ्या बाजूने पहातां, भर्तृहरीने बेअकली म्हणून निव- डलेल्या या विधात्याची या नरदेहांतच बेहद्द अक्कल दिसून येते. कारण, लबक म्हणतो, या अद्भत नरदेहाची रचना तपासून पहातां त्यांतील अनेक शिरा, स्नायु, पेशी, तंतु, धमन्या, वाहिन्या, आशय, रस, मल इत्यादिकांचे परस्परसंबंध व व्यापार इतक्या गुंतागुंतीचे आहेत की, असले हे भानगडीचे यंत्र, कधी- मधीं बिघडते याचे नवलच नाही, पण ते क्षणभर तरी सुरळीत कसें राहूं शकते याचेच आश्चर्य वाटते. सुश्रुतामध्ये आपले मनुप्य- देहांत १०७ मर्मे आहेत म्हणून सांगितले आहे. 'मर्म' या शब्दाचा अर्थ ज्या जागी आघात झाला असतां तत्काळ प्राण जातो तें स्थान ( मारयन्तीति मर्माणि ) असा आहे. अशी स्थाने अर्थात् एक हात जागेत ३१ आहेत. असे असतां कसरत कर- णारे गोपाळ कोल्हाटी वगैरे लोक अंगाची वाटेल तशा घडी करितात; पोरेबाळे खेळ खेळतांना, उड्या मारतांना अंगाचा आळापिळा करितात; सामान्य व्यवहारांत वाटेल तशा आपल्या शरीराच्या हालचाली होत असतात; आणि आपणांस या मर्मांची दादही नसो. तरीही ही सर्व म, अभंग राहूं शकतात ही तरी हे शरीररूपी यंत्र बनविणाऱ्या कारागिराची अतयं चतुराई नव्हे काय ? हे मर्मरक्षण कसे होत असेल याचे उत्तर कोण देईल ? हे जडशरीराविषयींचे कौतुक झाले. आता त्यांत वास करणारा जो चिदात्मा त्याचा या शरीराशी कशा प्रकारे संबंध आहे. ती दोन्ही अभिन्न होऊन मिसळली आहेत, किंवा पृथक्च आहेत,- सुख आणि शांति. [प्रकरण याबद्दल मतभेद होऊनच चार्वाकादिकांचा देहात्मवाद व इतर अनेक वाद उत्पन्न झाले आहेत. दोन्ही एक म्हणावी तर, मृताचा देह अखंड असून, त्याला चिमटा घेतल्यास तो हायहूय कांहींच करीत नाही. अर्थात् हायहूय करणारा, आजपर्यंत कोणी तरी शरािहून वेगळाच होता व तो आतां सोडून गेला असे म्हणावे लागेल. आचार्य म्हणतात:--- (श्लोक) अत्यंत मलिनो देहो । देही चात्यंत निर्मलः ॥ तयोरक्यं प्रपश्यति । किमज्ञानमतः परम् ॥ १ ॥ भावार्थ:-देह हा अत्यंत घाणेरडा, व देही हा अत्यंत निर्मळ, असे असतां, त्या दोघांस एक समजणे याहून दुसरे अज्ञान ते कोणते ? बरें, या प्रतीतीवरून हे दोन्ही पृथक् मानणाराला चिमटा घेऊन आपण सांगितले की, आम्ही या जड शरीरास चिमटा घेतो, तुम्हांला त्याचे काय? तर तो गप्प बसत नाही. सारांश. ही चिज्जडाची ग्रंथी उकलणे मोठे दुर्घट काम आहे. देहांतर. प्राप्तीचा प्रश्नही असाच मोठा अवघड आहे. अनायांना तर त्याची कल्पनाच नाही. आमच्या वेदशास्त्रांनीमात्र तो सप्रमाण उल- गडला आहे खरा. तथापि, सामान्य समजुतीच्या माणसांना तें एक कोडेच आहे. शिवाय, देहांतर मानून चाललें तरीही प्रकृत देहाचे महत्त्व तिळपाय कमी होत नाही. कारण, देहांतरप्राप्तीवर विश्वास ठेव. णारे आमचे साधुसंतदेखील--- ,
२.]
शरीर.
(पद)
असा काय नरदेह मिळेल पुन्हा । सिताराम सिताराम,
भज रे मना बा भज रे मना ।।
“ बारबार नहि आनेका."
इत्यादि वचनांनी त्याचे अनन्यसाधारण महत्त्वच गात असतात.
शास्त्र त या नरशरीराचे लक्षण " आत्मनो भोगायतनं शरीरं
म्हणजे शरीर में आत्म्याचे विषयभोग घेण्याचे स्थान, असे दिले
आहे. अर्थात् , आत्म्याला जर सुखशांतीचे अनुभव घेणे इष्ट आहे,
तर प्रथमतः त्या उपभोगांस आधारभूत जें हे शरीररूपी स्थान
स्वच्छ ठेविले पाहिजे, आणि तसे होण्यास आपण ते मोठ्या विचा-
राने व काळजीने वापरलेच पाहिजे. पण, असें
असून आपण या कामी
किती बरें बेफिकीर वागतों ? पानावर बसलों, भजी चुरचुरीत
झाली आहेत, मारा हात! मट राची उसळ बहुत गुलगुलीत
शिजली आहे, एक ओगराळे आणखी ! उद्यांचा विचार उद्यां.
याप्रमाणे बेसुमार अन्न खचतो. खीर आटीव झाली आहे, द्रोण द्रोण
जादा! सांभारें फक्कड बनले आहे, झोका! भरितास फोडणी
नीट वठली आहे, ओरपा! असा प्रकार चालतो. पण असले
खाणेपिणे म्हणजे शरीरपोषण नव्हे. म्हणच आहे, आचरट
खाणे आणि मप्णांत जाणे." पण तिकडे पहातो कोण ! खाण्या-
पिण्याचा हा प्रकार. उद्योगविश्रांतीतही हाच मासला. काही लोक
काम करणारे आहेत ते मरमर काम करितात, काही आळसडे
आहेत ते अंगावर उवा पडततोदेखील शरीर हालवीत नाहीत.
-
५८ सुख आणि शांति. [प्रकरण शिवाय स्त्री, मृगया, अंमल इत्यादि व्यसनांत पडलेले जीव तर हैं शरीर पोतेयाप्रमाणे निष्काळजीने वापरतात. व्यसनाचे भरांत त्यांना डोळां भुई दिसत नाही. आणि मग अखेर दारुण, आधि- व्याधींनी आक्रांत होऊन तिडका देत तडफडत दांत वासून पड. तात-मरतात !! शिव शिव ! मूर्ख, मदांध, विषयलोलुप जीव या अमोल नर- तनूची स्वहस्ते अशी रांगोळी करितात आणि स्वतः अपराध करून विधात्याला दोष देतात. भीष्मद्रोणादिकांची शरीरे आपल्या सार- खींच रक्तमांसाची होती, पण त्यांनी ती वज्रतुल्य अभेद्य व अजर केली होती; ती कशाने ? तर स्वतःचे कमावानें-नियमित वर्त- नाने. लबक म्हणतो, शरीर निर्मळ व सुयंत्र ठेवण्याची विद्या फार सोपी आहे. माफक खावें, तमाखू, दारू वगैरेला अजीबात फांटा द्यावा, शुद्ध मोकळ्या हवेत पुरेसा व्यायाम घ्यावा, अंतरी शांति ठेवावी व उद्योगधंदा नियमित करावा, म्हणजे आरोग्य महाग नाही. वाग्भटांनी म्हटले आहे: हितभुक् मितभुक् सोऽरुक् । भावार्थ:-जो हितकर व मोजके खातो, पितो तो निरोगी राहतो. भगवंतांनी तर अमोलच नियम दिला आहे: (श्लोक) युक्ताहारविहारस्य । युक्तचेष्टस्य कर्मसु ॥ युक्तस्वप्नावबोधस्य । योगो भवति दुःखहा ॥ १ ॥ । -श्रीमद्भगवद्गीता.
२ रें.] शरीर. ५९ भावार्थ:-आहार, विहार, उद्योग, निद्रा व जागृति ही जो माफक ठेवितो त्याला दुःखाचा नाश करणारा असा योग साधतो. अर्थातू असला मनुष्य सुखी असतो. सारावली नामक ज्योतिषग्रंथांतील आयुर्दायाध्यायांत म्हटले आहे: (श्लोक) पथ्याशिनां शीलवतां नराणां । सद्वृत्तभाजां विजितेंद्रियाणाम् ।। एवं विधानामिदमायुरेव । सत्यं भवेत् वृद्धमुनिप्रणीतम् ॥ १ ॥ भावार्थ:-----येथे ग्रहमानाने ठरलेले आयुष्य जे कोणी शीलवान् , सद्वर्तनी, पथ्यभोजी व जितद्रिय असतील अशांनामात्र भोगेल; इतरांस नाही. अर्थात् , . नियमित आयुष्यदेखील दुराचरणाने तुटते हे स्पष्ट आहे व हिशोबीही आहे. सरकारने रेल्वेकंपनीला शंभर वर्षांची मुदत दिली; परंतु तींत पोट-कलम असें घातले की, अपघात झाल्यास अपघाताबद्दल अमुक मुदत तोडिली जाईल. व त्या- प्रमाणे शंभर वर्षांपूर्वीच रेल्वेचे स्वामित्व सरकाराकडे गेले. तोच न्याय आयुष्यासही लागू समजावा. शीर्षसामुद्रिक, हस्तसामुद्रिक वगैरे शास्त्रांचाही हाच अनुभव आहे. हे शरीररूपी यंत्र साफ ठेवण्यास वर सांगितलेले विषयांत मितपणा तर पाहिजेच पाहिजे, पण त्याशिवाय, स्वच्छता हाही मोठा मुद्दा आहे. म्हणूनच आमचेकडे प्रात:स्नानादि शौचे सांगि- ६० सुख आणि शांति. [प्रकरण तली आहेत. लबक म्हणतो, स्वच्छपणा किंवा पवित्रपणा हे आजकाल इंग्रजांत दैवी (देवांस साजणारें ) लक्षण मानिले आहे. परंतु पुरातनकाली ख्रिस्ती धर्मातील काही पंथांत चमत्कारिक समजुतीमुळे गलिच्छ, अस्वच्छ राहणें हें साधुत्वाचे लक्षण मानीत असत. एदेल्ड्रेडा म्हणून एक मोठी संतीण होती; परंतु, ती मोठ्या धार्मिक उत्सवाचे दिवशीमात्र स्नान करी. थामस आ बेकेट म्हणून जो परमवंद्य मानलेला साधु, तो जेव्हां मेला तेव्हां त्याचे डोचक्यांतून कपड्यांतून किळसवाण्या उवालिखांची पागोळी लागली. डीन स्टॅनले म्हणतो की,-" तथापि येथे असलेले प्रेक्षक भक्त असले डोके आपणांस अंतरले म्हणून अश्रु ढाळू लागले !" असो. मिताहारविहार, स्वच्छता इत्यादि गोष्टी शरी- आहेत व प्रत्येकानें त्या सक्तीने पाळिल्याच पाहिजेत. तथापि, अनुभवी वैद्य डाक्तरांना कित्येकदा तरी असा प्रत्यय येतो की, शरीरस्वास्थ्य हे चित्तस्वाथ्यावर अव- लंबून आहे. आम्हांस एकाने ताजे उदाहरण सांगितले की, 'जोशी' नामक गृहस्थांची सर्कस कर्जत गांवांत उतरली होती. तींत वाघ होते ते आरोळ्या देत, त्यामुळे त्या आठवड्यांत कर्जत गांवांतील गायगुरें दूध देतना; व कांहीं गाई तर गांवांतच येतनाशा झाल्या. भयाचा किंवा चित्तास्वास्थ्याचा पशूचे शरीरांवरदेखील जर हा परिणाम, तर मनुष्याचे किती असेल बरें ? गर्भारशीचे मनाला धक्का पोंचल्यास आंतील गर्भाचा पात होणे, किंवा गर्भस्थ अर्भक व्यंग निपजणे, हेही अनुभव शेंकडों ग्रंथांत आहेत. व ररक्षणास अवश्यच २.] शरीर. ६१ ह्याकरितां गर्भारशीला फार लाडांनी पाळावी, तिचे डोहळे संभाळावे अशी शास्त्राज्ञा आहे. मागील खानेसुमारीवरून पहातां, हिंदुस्थानांत प्रजावृद्धीची आंत-सवाई होत आहे; व इंग्लंड, जर्मनी या देशांत बाहेर-सवाई होत आहे. याचेही अंशतः हेच कारण आहे. चिंता ही शरीरशोषण करिते. खुनी मॅकबेथ राजा बेचैन झाला असता आपल्या वैद्याला म्हणाला:- (अंजनी गीत) व्यथा मन्मनी दुर्वह होते । बाणाने ही स्मृती टोचिते ॥ मस्तिष्का पाप चावतें । औषध त्या योजी ॥१॥ कोमलशा या हृत्कमलातें । घोर राक्षसी चिरडं पहाते ॥ कुशल उपायें तेथुनि तीतें । कादुनिया लावीं ॥ १ ॥ -शेक्सपिअर. असो. चित्तास्वास्थ्य, मनोदौर्बल्य व दुर्व्यसनें ही तर शरीर- नाशाला कारणे आहेतच; पण, अज्ञान हे याहीपेक्षां प्रबळ कारण आहे. लबक म्हणतो, गुरे, मेंढरें, घोडे यांची सरशी अवलाद निपजावी म्हणून आम्ही किती तरी श्रम घेतों; आणि पशुंपेक्षा ज्याचे वर्चस्व निस्तुल आहे अशा मनुष्याची संतति शरीराने, मनाने व अध्यात्मदृष्टीनेही आधिकाधिक जोमदार निपजविण्याची मुळीच फिकीर बाळंगीत नाहीं; या अज्ञानाला काय म्हणावें ? . १ लबकसारखा जर या बाबतीत स्वजातीबद्दल एवढा विलाप करतो, तर, आम्ही, आजच्या भारतवासीयांनी केवढा केला पाहिजे बरें ? पण आमचे मनांला याचा विटाळही नाही.
६२ सुख आणि शांति. [प्रकरण श्रीमंतीने संतति सुधारेलसें नाही. कारण, श्रीमंत मनुष्य तित- काच सुज्ञ असला तर गोष्ट वेगळी, बाकी बहुधा श्रीमंतीने अनेक व्यसनें लागून, संततीचा अधिकच बिघाड होतो. हिंदुस्थानांत तर बहुतेक गाद्यांवर दत्तमूर्ति आहेत, हे या गोष्टीचें स्पष्ट निदर्शन आहे. हवामान सौम्य व सुखकर असले तर शरीराला ढिलाई येऊन बुद्धिव्यापार मंदावतो. त्यापेक्षा, जेथे हवामान इंग्लंडासारखें कडक व अति थंड असेल, तेथेच शिरास्नायु जोरकस राहून प्रगु- णन ठीक चालते. यासाठी, साधेल तो चांगले हवापाणीही पहाते, म्हणजे संतति निरोगी व जोरदार होऊन स्वतःचे शरीर सुधारेल. शरीरस्वास्थ्याला मनःस्वास्थ्याची विशेष अपेक्षा आहे म्हणून वरती सांगितले; परंतु, खरें पहातां, हा विषय अन्योन्यापेक्ष आहे. म्हणजे उलट पक्षी, मनःम्वास्थ्यालाही शरीरस्वास्थ्य हे पुष्कळ अंशी कारण आहे. आपणां सर्वांस हा अनुभव आहे की, शरीर निरोगी व सुदृढ असले म्हणजे चित्तवृत्तिही आनंदी व दमदार असते; परंतु शरीरी अस्वास्थ्य आले म्हणजे नेहमींची सुस्वभाव व शांत माणसेही रागीट व तिडतिडी बनतात. अशा स्थितीत मनुष्याची सहिष्णुता नाहीशी होऊन, तो एवढ्यातेवढ्यावरून दुःख व संताप करितो. अर्थात् मनःशांतीलाही शारीरिक आरोग्य अवश्य आहे. सत्ता व संपत्ति ही जेथे असतात, तेथे दुर्व्यसनो- तेजक अनेक मोह असल्याने, चित्तवास्थ्य व तदनुषंगी शारीर. स्वास्थ्य या दोहोंचा वानवाच आढळतो. असे म्हणतात की, डाक्तर रॅडक्लिफ याने तिसरा विलियम राजा यास सांगितले की, २ रें.] शरीर. 'तुझी तीन राज्ये बदला देऊन माझ्या ह्या दोन खंबीर तंगड्या तूं मागशील तर मला देण्यास परवडणार नाही.' दुसऱ्या एका राजाबद्दल शेक्सपिअर कवीने असेच म्हटले आहे की, “ तूं या गरीब व घट्टमुट्ट नोकरांचे गुडघ हुकुमानें वांकवशील; परंतु, त्यांचे आरोग्य किंवा बल स्वतःकडे तुलाओढून घेता येणार नाही. कांहीं मनुप्यांची शरीरप्रकृति जन्मतःच रडकी असते हे खरें; पण, असे लोक थोडे. व यत्नाने अशी प्रकृतिही सुधारतां येईल खास. शरीरस्वास्थ्यावांचून चित्तस्वास्थ्य लाभत नाहीं; इतकेंच नव्हे, तर नाना प्रकारच्या विद्या, कला कौशल्ये,--फार काय पण खेळ देखील, निर्मळ प्रकृतीवांचून नीट साधत नाहीत. टेलर म्हणतो, " चेंडूफळीच्या खेळांत वर्चस्व मिळविणे तरी त्याला योग्यासारखा इंद्रियजय व शरीराच स्वास्थ्य लागते. विद्यार्जन तर पुष्कळसें शरीराधीन आहेच आहे. नाटक्ये, सर्कसवाले, गवई यांनादेखील शरीराची जोपा अवश्य लागते. एतावता, आयुष्यातील कोणत्याही अवस्थेत सुख प्राप्त होणे किंवा कोणताही सदुद्योग धडपणे तडीस जाणे तर शरीरस्वास्थ्य अत्यावश्य आहे. त्यावांचून सुखही दुःख- मय होतें. तुकारामाने म्हटले आहे: ( अभंगचरण) रोगियासि विषतुल्य ते मिष्टान्न । अर्थात् इतके अगत्याचे जे आरोग्य तें बिघडविण्यास क्षणाचा वेळ लागत नाही हा आपणां सर्वांचा अनुभव आहे. पण त्याचेच -- ६४ सुख आणि शांति. [प्रकरण , उलट, आपण कायद्याने वागल्यास, हेच शरीर अजर होऊ शकेल, व यंत्राप्रमाणे आमरणांत सुरळीत चालू राहील ही गोष्ट शेंकडों- च्या लक्षांत नाहीं; बरें, हा कायदा म्हणजे कांहीं अवघड नाही; खाणे, पिणे, उद्योग, व्यायाम इत्यादि हरएक गोष्टींत 'नेमस्तपणा राखणे हाच काय तो कायदा. परंतु शेकडा नव्वद लोक हा कायदा मोडून, आहारविहारांत फाजीलपणा करीत असतात. कधी काळी मेजवानीचे प्रसंगी दोन घांस जाफा खाल्ले तर ती गोष्ट वेगळी. परंतु बहुतेक लोक आला तो दिवस खाण्यापिण्यांत आच- रटपणा चालवितात, पण त्या योगानें अमृताचे विष होते हे त्या मूढांना कळत नाही. अधिक खाण्यापिण्याने शेंकडों बिघडून प्राणांस मुकले आहेत. परंतु, अल्पाहारामुळे कोणी विपन्न झाल्याचे उदाहरणच नाही. म्हणच आहे, भुकी तो सुखी.' भुके राखे चौथा कोन, तेरा रोग घर घर रोवे. " ही वाक्ये लाख रुप- यांची आहेत. अल्पाहारानें शरीर हलकें राहून इंद्रियपटुत्व अधिक राहते, हा अनुभव उपोषणाचे पहाटेस येतो. शरीर आहारले १ व म्हणूनच धर्मग्रंथांत प्रार्थनेचे दिवशी उपवास सांगितले. आहेत. 'सुखात्मे ' म्हणून अष्टावधानी गृहस्थ शेकडोंनी पाहिले असतील. त्यांनी आम्हांस स्वतः असे सांगितले की, ज्या दिवशी माझ्या अवधानांचा खेळ असेल, त्या दिवशी खेळ होऊन जाईतों मी जेवीत नाही. जेवल्यास, यावत् इंद्रियांना मांद्य येऊन अवधान वठत नाही, असा अनुभव आहे. विष्णुबोवा ब्रह्मचारी यांनी आपले वेदोक्तधर्मप्रकाशांत लिहिले आहे की, क्षुधेनें किंचित् ग्लानि येई इतपत रान तापलें असतां ईश्वराकडे लय किंवा. समाधि त्वरित लागते.
२.] शरीर. ६५ म्हणजे इंद्रिये जडावतात व कार्याक्षम होतात, हाही अनुभव अचूक आहे. इंग्रजी व संस्कृत वैद्यकग्रंथकारांचे असे म्हणणे आहे की, मानवी शरीराला प्राप्त होणारे जे कांहीं रोग आहेत त्यांपैकी निम्मे संख्या अजीर्णामुळे उद्भवते; व अजीर्णाला हेतु अध्यशन किंवा अत्यशन हेच होय. सरदेसाई म्हणून आमचे स्नेही आहेत. त्यांचे बंधु, अनेक पौष्टिकें व औषधे घेऊन दमले व पुण्याचे अण्णासाहेब पटवर्धनांकडे आले. त्यांनी त्यांचे अन्न अजिबात तोडले व त्यांस एक कषाय व दूध यांवर ठेविलें. दूध त्यांस फार जात नसे. तथापि चमत्कार हा की, सतरावे दिव. साला रोग्याचे वजन पक्के पांच पौंड वाढलें ! परंतु, हे आमचे विधान त्रिवार सत्य असूनही हे पत्करण्यास किती वाचक तयार होतील नकळे. कारण, जगांत जिव्हालौल्य फार जबरदस्त आहे. कांहीं आया तर इतक्या नादान असतात की, आपल्या लाडक्यांना अक्षयी कोंबीत असतात, व हेच सारें मातृत्व असें मानितात. रंगीबेरंगी खाऊचे प्रस्थ तर अनर्थच माजले आहे. अमेरिकन डॉक्टर एफ्. व्ही. फूट हे ओरडून म्हणतात, “बायांनो, पोरांना हे विषप्रयोग केल्यावांचून तुम्हांला चैनच पडत नाही काय?" १ (श्लोक) अनात्मवंतः पशुवर्द्धजते येऽप्रमाणतः ॥ रोगानीकस्य ते मूलमजीर्ण प्राप्नुवन्ति हि ॥ १॥ -योगरत्नाकर. या श्लोकांत 'अजीर्णाला' रोगचमूचें मूळ म्हटले आहे, हे लक्षात ठेवावे. - ६६ सुख आणि शांति. [प्रकरण चहाने तर हिंदुस्थान ठार होत आहे; पण हा शब्द उच्चारणारांस चहाभक्त हे हितशत्रूत काढतील, इतका चहाचा पक्षपात बळा- वला आहे; याकरितां मौनच बरें. आहारव्यवहाराचे नेमस्तपणाइतकीच आरोग्याला महत्त्वाची गोष्ट, मोकळ्या हवेत व्यायाम करणे ही होय. हवा खाण्यांत गेलेले तास आयुष्यांतून वजा झाले किंवा फुकट गेले असे समजू नये. ते वजा न जातां आयुष्याला दुपटीने मिळविले जाऊन तुमचे आयुष्य दीर्घतर करतील ह्यांत संदेह नाही. व्यायाम शब्दाचा यौगिक अर्थच 'विशिष्ट दीर्घता' असा आहे. अर्थात् व्याया आयुप्यास दीर्घता आलीच पाहिजे. मात्र येथेही माफकपणा पाहि- जेच. तो अर्धशक्तीने घ्यावा असे वाग्भटाचे म्हणणे आहे. नाकांतून १ (श्लोक) अर्धशक्त्या निषेव्यस्तु । बलिभिः स्निग्धभोजिभिः । -वाग्भट. भावार्थ:-बलवान् व स्निग्ध आहार करणारे लोकांनी व्यायाम घ्यावा, पण तो आपली अर्धशक्ति खर्च होईपर्यंतच घ्यावा. त्या अर्धशक्तीचे माप असें आहे:- (श्लोक) हृदयस्थो यदा वायुर्वक्त्रं शीघ्रं प्रपद्यते ॥ मुखं च शोषं लभते । तद्धलार्धस्य लक्षणम् ॥१॥-योगरत्न. भावार्थ:-जेव्हां हृदयस्थ वायु (नेहमीप्रमाणे नाकावाटे न जातां) सपझप मुखावाटे जाऊ पाहतो व तोंडाला कोरड पडू लागते, तेव्हां आपली अर्धी शक्ति खर्ची पडली असे समजावे.
शरीर. वाहणारा श्वास तोंड उघडून टाकण्याची पाळी आली म्हणजे व्यायाम पुरे करावा, असें योगरत्नांत लिहिले आहे, तें समंजस आहे. मोकळ्या हवेचे महत्त्व इंग्रेजी ग्रंथांत मोठी स्तोत्रं करून गाइलें आहे, आणि ते यथार्थही आहे. लबक म्हणतो, याशिवाय, शारीरिक किंवा विषयजन्य सौख्ये कितीही गोड वाटली, तरी ती विद्युल्लतेसारखीं क्षणिक आहेत; एवढेच नव्हे, तर पुष्कळदां विजेप्रमाणे कायमचा धक्का देऊन चालती होतात, हे सुज्ञाने ध्यानांत वागवूनच त्यांचे ग्रहण करावें. परंतु, इतिहास पहावा तों आडाम आणि ईव्ह ह्यांचे वेळेपासून आजपर्यंत अनंत जीव लंपटपणामुळे, प्रमुखतः जिव्हालौल्याने अकाल मृत्यु पावले आहेत व पावत आहेत. लॅटिन भाषेत एक म्हण आहे की, " तरवारीपेक्षां जिव्हेने अधिक लोकांचे गळे कापले आहेत." बेकन म्हणतो, “ सर्व बंडांपेक्षा, जिव्हेचे बंड अधिक भयंकर जीभ थांबवा आणि आयुष्य लांबवा." सहज मरणाने मरणारे थोडे; बहुतेक लोक आपले मरण आपलेच हातें ओढ- वितात. दीर्घायुष्याला आदिकारण सर्व गोष्टींत नेमस्तपणा राखणे हेच होय. म्हणच आहेः " अति सर्वत्र वर्जयेत्." ह्या नेमस्त- पणाची खुणा कल्याण येथील रा० किरकिरे बी. ए., एल्. एल्. बी. यांनी स्वानुभवाने सांगितली, ती ध्यानात धरण्याजोगीच आहे. हे गृहस्थ फारच नियामितपणाने वागतात. त्यांनी सांगि- तले की, करमाळे येथे माझा शौचकूप वेगळा आहे, व मी असे पाहिले आहे की, माझा मळ डुकरेंसुद्धा खात नाहीत. याचे कारण, आहे." -- ६८ सुख आणि शांति. [प्रकरण माझ्या मिताशनामुळे अन्नाचा पाक इतका पूर्ण होतो की, त्यांतील जेवढा मिळून पोषक अंश आहे तेवढा अशेष शरीरांत शोषला जाऊन, मल म्हणजे अत्यंत निःसार असा अवशेष असतो, व त्याचे स्वरूप बकरीच्या मळाप्रमाणे शुष्क व घट्ट असते." ही गोष्ट डॉक्टर कुन्हे यांनाही कबूल आहे. किरकिन्यांचा हा कायदा सर्व लोक पाळतील तर अन्न कमी पुरून लोक दीर्घायु व अधिक उद्यमशील होतील. कारण राजश्री किरकिरे नित्य पांच तास मुन्स- फीचे काम करून शिवाय इतके धंदे करितात की, त्यांचे तिपटीने खादाड मनुष्यास तितके होणार नाहीत. 'हंस' या सहीने केस- रीत जे कैलासयात्रेचे वर्णन देत, त्यांनी लिहिले आहे की, मी हिमालय उतरून कैलासाकडे जातांना नित्य आठ किंवा नऊ बिस्किटें खाऊन दहा दहा मैल प्रवास करीत असे. हे सांगणे अनृत नव्हे. आता हे पाळण्याने म्युनिसिपालिट्यांचे सोनखत तुटेल खरें; परंतु, हल्ली अनेक शरीरांचे खत होत आहे ते बंद होऊन सोने होईल हे खास. लवक म्हणतो की, अतिपानाचे (मद्यपानाचे) परिणाम तर अत्यशनापेक्षाही भयंकर होतात. शेक्सपिअर म्हणतो:- देवा ! मनुष्ये आपले मनुष्यत्व हरण करणारा हा मद्यरूप शत्रु आपले हाताने आपले घांटीखाली उतरतात, या मूर्खत्वाला काय म्हणावें? " कीचकाख्यानांत मयूर कवीने " न करील कां पित्या- ची दुर्गतिची माउली सुरा माती" या ओळीत सुरेला 'नर- काची आई' म्हटले आहे, तें सर्वथा यथार्थ म्हटले आहे. लबक "देवा!
२ रें.] शरीर. ६९ म्हणतो:-आधि, व्याधि, कलह, अकारण घाय, ताम्र नेत्र, वाचा- ळपणा, या सर्व गोष्टी एकत्र कोठे दिसतात, म्हणून कोणी विचा- रिल्यास त्याचे उत्तर 'जे गुत्ताक्षेत्री जाऊन ताम्रवर्णी पेयाचा आस्वाद करितात त्यांचे ठिकाणी' हे होय. परंतु हे सर्वानर्थमूल व्यसन युरोपांतील राष्ट्रांना व्यापून सांप्रत भारतालाही घेरतें आहे. नुकताच झालेला मद्यपाननिषेधक प्रयत्न याची साक्ष देत आहे. या मदिरारूपी बयाचे एका ग्रंथकाराने पुढीलप्रमाणे अलंकारिक वर्णन केले आहे. तो म्हणतो:- "या बाईचे वर्णन मोठे ऐकण्याजोगे आहे. हिचे माहेर पर- द्वीपांत. हिचे पाणिग्रहणाबरोबर पित्याची मुद्रा सानंद होतीसे सांगतात. हिला पतीने सोडल्यामुळे, ती देशाटन करीत असते. तिला मोठमोठाली विद्यापीठे, क्षेत्रे, धुंडण्याचा फार नाद. ती व्हावे तसलें रूप घेते; ही मोठी सुस्वरूप आहे. तिचा वर्ण गुलाबासारखा मनोहर आहे. तिचे तोंडाला नेहमी वास येत असतो, यामुळे अखंड सुवासिनी' ही संज्ञा तिला फार शोभते. ती देवाप्रमाणे स्वतः बहुतेक अबोल आहे; पण तिची ज्यावर मेहरबानी झाली तो मुका असला तरी बृहस्पति- तुल्य वाचाळ होतो. ही बहुगुणी आहे; लोळण-फुगडी, पिंगा वगैरे पोरींचे खेळही तिला येतात. तसेच, नर्तन-अभिनयनादि- कांतही ती फारच कुशल आहे. ती पात्रे पाहून आपली वृत्ति १. लग; पक्षी, हाती धरणे. २ बाप; पिणारा. ३ नवरा; अब्रू . ४. योग्य पुरुष; प्याला, भांडे.
७० सुख आणि शांति. [प्रकरण बदलते; वैष्णवाप्रमाणे ती मस्तकी मुद्रा धारण करिते; ती एका- दाच शब्द बोलते; पण तेवढ्याने श्रोत्यांस अगदी वेडावून सोडिते; ही महापंचाक्षरी आहे. हिचे कृपेनें सेर्वक वृद्ध असला तरी तरुण होतो ही स्वतः फार जलाल व तापट आहे; पण हिचे अनन्यभजनी लागेल त्यास त्वरितच गार करते. ही दर्शनकाली हसतमुख असते. हिला मोठमोठाले पुरुष मान देतात, व यामुळे हिचे आग- मनाबरोबर लज्जा, शुद्धि, अब्रू , शक्ति वगैरे भिडस्त स्त्रिया दूर जातात. हिचा उपदेश ज्यांनी घेतला त्यांचं भेदज्ञान तत्काळ नष्ट होते. तसेच त्यांचा झोंक, ताठा जाऊन ते इतके नम्र होतात की, भर रस्त्यांतदेखील लोकांपुढे दंडवत घालितात. ही इतकी मायावी आहे की, मनुष्याचे पोटांत शिरून तत्काळ त्याचेकडून असेल तें ओकविते. ही इतकी घट्ट आहे की, चारचौघांसमक्ष देखील एकान्त गोष्टी करिते. हिचा नेत्रपात होतांच भक्तांची समाधि लागते. सद्गुरूप्रमाणेच 'आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यांशीं ॥' असें हिचे सामर्थ्य आहे. माहितगार लोक हिचे समागमाने होणारा आनंद थेट ब्रह्मानंदापेक्षाही कांहीं ज्यास्त असे सांगतात; व हे खरेही असावे. कारण, 'कोण देहाते सांभाळी' या उत्तरार्धाचा प्रत्यय इतरांचेही दृष्टीस येतो खरा. ही गरीबगुरी- बांनाही ओळखते, तरी ही सुवर्णाक्षरांनी मंडित असल्यामुळे शिक्ष- १. बाटलीवरील सील, २. बुचाचा फट आवाज. ३. मांत्रिक; पांच अक्षरांनी युक्त. ४. नोकर; मद्य सेवन करणारा. ५. वरील शुभ्र फेंसामुळे. ६. विद्वत्ता; बाटलीवरील सोनेरी अक्षरें.
२ रें.]
शरीर.
७१
,
णाचे भोक्ते हे तिचा फारच मनःपूर्वक आदर करितात. 'मी मी'
म्हणणारे बडे मिया, पण या बाईने त्यांना गुलाम करून सोडले
आहे. इतर कामी कशीही हयगय होवो, हिचे भेटीचे नेमिलें
मिनीट चुकता कामा नाही, असा कांहीं हिचा कडक अंमल आहे.
मोठमोठाले लोक हिला हात जोडून उभे आहेत.
ही मोठी रंगेल असून अवर्णनीय शक्तिरूप आहे. अशी ही
बाई कोण हे वाचकांचे लक्षात आलेच असेल. या बाईच्या
संगतीने आज हजारों घरांची धुळधाण चालली आहे. हिच्या
नादाने हजारों गाजीचे पाजी बनले आहेत. पण आला तो दिवस
या बाईची वळणे अधिक अधिक वाढत आहेत, अशी तिजपाशी
काय मोहिनी आहे न कळे !
लबक म्हणतो, मद्यपानाने मनुष्य भिक्षादेहीस लागतो, याचेही
कांहीं नाहीं; परंतु, तो मनुष्याचा पशु-नव्हे, पशूहून नीच-होतो,
हे मला शक्यवत् टोचते. त्याला विपत्ति आली हे दुःख नव्हे. पण
त्याने ती स्वहस्ताने आणली, हे पाहणे असह्य होते. मद्य हे परि-
णामी विषोपम आहे हे वेगळे; पण आरंभीही विषोपमच आहे.
परंतु, मनुष्याला ते तसे वाटत नाही, उलट वाटते; आणि मग तें
छातीवर बसते. कारण, जो कोणी स्नेह्याखातर म्हणून प्रथम
एकादा घोंट घेतो, त्याची उदासीनता, आळस, थकवा ही
तत्काळ जाऊन त्याला तरतरी येते. वाणी जलद चालू लागते; व
प्रेमालाही रंग चढतो; चिंता मावळते; स्मृति जागृत होते; बुद्धि
७२ सुख आणि शांति. [प्रकरण चा उपयोग -- + त्वरित स्फुरते; आशा अंकुरित होते; उमेद वाढते; दिल खुष होतो; इ० इ०. असे झाले म्हणजे तो । प्रमाणगणिता' करावासा वाटून दुसरें माप घशांत ओततो. त्याला वाटते, आतां तर मी शतगुणित आनंदांत राहीन; वाचस्पति होईन; केवळ दिव्यच होईन; परंतु, तें दिव्यत्व लोपून कालिदासाने म्हटले तसें- (श्लोक) नयनान्धरणानि पूर्णयन् । वचनानि स्खलयन् पदे पदे ॥ + वारुणी-मदः । प्रमदानामधुना विडंबना ॥१॥ -कभारसंभव. सर्व विटंबनेला कारण होते. रावांचा झोंकदारपणा नाहीसा होऊन गटाराकडे मात्र झोंक जाऊं लागतात. वाचस्पतित्वाचे जागी वाचा. लपण येते; स्नेहाचे जागी कलहप्रियत्व येते; तरतरी जाऊन तरत. राट येतो; व सगळ्या अकलेचा, प्रकृतीचा, शेणखळा होतो. मर्टिनो म्हणतो, “आळसाने मंदगति झालेले रक्तांत रंगीत पेयाने तरतरी आणूं, या भ्रमाला बळी पडून कितीकांचा तरी सत्यनाश झाला आहे बरें? जन्ममरणाच्या नोंदी पाहिल्या असतां, नेमस्त मद्यप्यांपेक्षाही साधे लोक अधिक जगतात असे स्पष्ट दिसते; व तें हिशोबीच आहे. कारण, मद्य केवळ शरीराचाच खराबा करून राहत नाही; तर मनाचाही तसाच करिते. प्रसिद्ध साधु कबीर म्हणतात:- " - २ रें.] शरीर. ७ (पद) बंदे हुषार रहनाबे । साहेब राजी रखनाबे ॥ ध्रु० गांजा दारू मत् पी यारो । आकल गुंग हो जाती। आपने पल्लोके दाम खरचकर मूमे मखिया जाती ॥ १ ॥ मद्याने शांत असतील ते कज्जेदलाल होतात. मनोवृत्ति क्षुब्ध होऊन धिमा मनुष्यही अनावर होतो; व पवित्रपणाची आवड सर्व प्रकारेच कमी होत जाते. जेरेमी टेलर म्हणे, “ आपल्या सर्व दुःखाला आपणच कारण आहों. रानचे कंदमूल आणि झन्याचे पाणी यांनी माझ्या गरजा भागून सर्व ताप शांत होतो. आशा, तृष्णा, मत्सर, अहंकार, या सर्व रिपूंपासून मी मुक्त असल्याने स्वस्थ आणि शांत निद्रेत घोरत पडतो." भर्तृहरि म्हणतात:- (श्लोक) फलमलमशनाय स्वादु पानाय तोयं । शयनमवनिपृष्ठे वल्कले वाससीव ॥ नवधनमधुपानभ्रांतसद्रियाणा--- मविनयमनुमंतुं नोत्सहे दुर्जनानाम् ॥ १ ॥ भावार्थ:---- मला निर्वाहाला झाडांची फळे व पानार्थ झयाचं गोड पाणी पुरेसे आहे. शयनास भूतल व वस्त्राऐवजी वल्कलें पुरे आहेत. यामुळे, नवीन संपत्तिरूपी मद्यपानाने किंवा नवीन संपत्ति व मद्यपान यांचे योगाने ज्यांची सर्वेद्रियं भ्रांत झाली आहेत, अशा दुर्जनांचे दारी जाऊन त्यांनी केलेले उद्दाम वर्तन माझ्याने सोसवणार नाही. आपलें मानवी शरीर हे अतिशयच करामतीने जुळविलेले व अति रमणीय असे एक नाजूक यंत्र देवाने आपल्या हवाली केले ७४ सुख आणि शांति. [प्रकरण आहे. अर्थात् , शेजान्याच्या मागून आणलेल्या घड्याळाप्रमाणे आपण हे फारच जपून वागविले पाहिजे. लबक म्हणतो, या यत्राची पूर्णता व सौंदर्य केवळ अलौकिक आहेत. म्हणूनच अशाचा नाश करण्याची आपणांस शरम वाटली पाहिजे. कोणतीही वस्तु तिचे योग्यतेप्रमाणे वापरली पाहिजे. भवभूति म्हणतोः- (श्लोकार्ध) नैसर्गिकी सुरभिणः कुसुमस्य सिद्धा। मूर्ध्नि स्थितिर्न चरणैरवताडनानि ॥ १ ॥ -उत्तररामचरितम. भावार्थ:-कोमल व सुगंधी पुष्प म्हणजे मस्तकींच ठेवावयाचें. ते पायांनी तुडविणे मूर्खत्व आहे. या शरीराचे दिव्य मंदिर बनविणे किंवा कच-याची पेटी बनविणे हे आपल्या स्वाधीन आहे. रोमन लोकांत दोन मोठ्या महत्त्वाच्या म्हणी असत. ते म्हणतः १) उद्योगाला अजिंक्य कांहींच नाहीं; व (२) उद्योग हा स्वतः सुखकर आहे. या म्हणी सर्वथा सत्य आहेत. कोणी मनुष्य कोणतेही काम करो, तें मनःपूर्वक करीत असला म्हणजे त्यांतच त्याला सुख होते. देह व मन ही वापरती ठेविली पाहिजेत, हा ईश्वरी संकल्पच आहे. आणि याप्रमाणे ती वापरली नाहीत तर गप्पही बसत नाहीतच, व आळसाने त्यांस गंज चढतो. बरें, उद्योगाने आपला व्यवहार साधून रात्रौ आपणांला शांत व अमृत- मय निद्रा येते. या निद्रेची सचिंत व वैभवशाली जीवांना फारशी गांठही पडत नाही. हेन्री राजा म्हणतोः - २.] शरीर. ७५ (श्लोक) हे निद्रे मधुरे, प्रजाजन तुवां सप्रेम आलिंगिले । घेती झोंप सुखें, करूनि दिवसां उद्योग जे भागले ॥ भीशी कां न कळे, मला न शिवशी पक्ष्मांतिंही कोमले । दुःखा विस्मृति ना पडे, मम जिणे दुःसह्य हे जाहलें ॥१॥ -शेक्सपिअर. या निद्रेची इंग्रजी कवींनी निरनिराळी रूपके केली आहेत. कोणी तिला निसर्गाची कोमल धात्री म्हणतात; कोणी विचाराचे आवरण, क्षुच्छामक अन्न, तृट्शामक पेय, हिमनिवारक उष्णता, उष्णतानियामक शीतता,-राजा, रंक, बालिश व पण्डित यांस सारखेच मोजणारें माप, इत्यादि संज्ञा देतात. बरें, असली ही अमोल वस्तु मिळण्यास कुठे देशांतरी जावयास नको. दिवस योग्य व्यवसायांत घालविला म्हणजे रात्रौ निद्रा ठेवलेली. आतां, कधी कधी आयुष्यांत निद्रा उडविणारे असे आकस्मिक प्रसंग येतात, व त्या वेळी वरील नियम काम देत नाही; तथापि अशा वेळी ब्रोमाइड, सल्फोनेल, द्रायोनेल इत्यादि औषधांनी कृत्रिम झोप आणणे फार अपायकारक होय. व्यवस्थित आचरण ठेवावें म्हणजे लवकरच पूर्ववत् निद्रा येऊ लागेल. मन शांत ठेवण्याची आणखी एक किल्ली स्वप्नस्थितीत सांप- डते. ती अशीः स्वप्नांत जागृतींतील विशिष्ट दशेची आपणांस विस्मृति असते; त्यामुळे खप्पड म्हाताराही स्वप्नांत तरुणाचे भोग भोगू शकतो. शरीरावरील व मनावरील जागृतीतील दडपण नाहीसे झाल्याने मन स्वच्छंद क्रीडा करिते. देशकालादि परिच्छेद सुख आणि शांति. [प्रकरण दूर झाल्याने कल्पनाशक्ति अप्रतिबंध भराऱ्या मारीत असते. आपणांस गतमित्र भेटतात. मन तितकें पवित्र व शुद्ध असल्यास, दिव्य गोष्टींचेही आपणांस दर्शन होते. यावरून पाहतां बाह्य चिंता झाडून टाकून जागृतींतही मन जर स्वस्थ व शांत ठेव- ण्याचे साधेल, तर पुष्कळ सुख होईल हे निश्चित. पण, मन निश्चित व शांत ठेवितां येणें ही विद्या केवळ सोपी नाही. बरें, विश्रांतीचे वेळांतही जर संसाराचे घोर मनाला त्रास देतील, तर मग विश्रांति आणि व्यापृति यांत अंतर काय राहिले ? असल्या विश्रांतीपेक्षां उद्योग बरा. याकरितां असले त्रासदायक विचार आपण यत्नाने व हट्टानें मनाबाहेर घालविले पाहिजेत. बाकी हैं सांगणे सोपे आहे, साधणे अवघड आहे. शिवाय, मन केवळ रितें राहणे बहुतेक अशक्यच आहे. याकरितां त्रासदायक विचार टाळून शुद्ध व आनंददायक विचार मनांत घ्यावे. आपले वेदांत याविषयीं " तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु म्हणजे “ असलें हैं माझें मन पुण्य विचारांनी पूर्ण होवो अशा अर्थाचे अनेक मंत्र आहेत, त्यांप्रमाणे मन सद्विचारपूरित करावे. म्हणतो त्याप्रमाणे, वर्तमानकाळाशी ज्यांचा संबंध नाही अशा अतिपुरातन काळच्या कथा, भूगर्भशास्त्र, खस्थज्योतीचे चमत्कार, कोणाच्या शौर्याच्या किंवा प्रवासाच्या गोष्टी इत्यादिकांचे श्रव- णांत मन गुंतवावे, म्हणजे नित्याचे कर्मकहाणीची विस्मृति पडून तितकेंच मन हलकावते. कारण, अशा वेळी मन चालू दिवसाच्या कटकटी विसरून कल्पनेच्या पंखांवर बसून अनाद्यनंत देशकालांचे अथवा लबक २.] शरीर. ७७ कारण अशाचे प्रदेशांत मौजेने उडत राहते व त्या आनंदाने प्रसन्न व ताजें- तवाने होते. परंतु ज्याने काही दुष्कृत्य केलेले असेल अशाला असले उपाय उपयोगी पडणार नाहीत. मन त्याला पोळीत राहते. हमलेटचा चुलता क्लाडिअस याचे डोळ्यांपुढे मुंदर नाटक चालले असता त्याचे मन त्याला अधिकच छळू लागले, हे सुप्रसिद्धच आहे. अर्थात् , कृत्रिम शांति मिळण्यासदेखील मन निर्दोष पाहिजे, व तसे होण्यास सदाचरण पाहिजे. लबक म्हणतो, मोठमोठे ऋषि व भविष्यज्ञ साधु अशांना जे दिव्य साक्षात्कार झाले आहेत, ते रात्रीचे वेळी मन प्रशांत व विश्रांत असतांनाच झालेले आहेत. ही गोष्ट दिवसाचे भकास उजेडांत साधत नाही. दिवसा सूर्यप्रकाशाने आपणांस असंख्य वस्तु दिसतात हे खरे; तथापि सूर्य अस्तमित होऊन रात्र पडली आणि लाखों, कोटों ग्रह-नक्षत्र-तारकादि दिव्य रत्नांनी आकाश भरून गेले म्हणजे आपणांस असे वाटते की, सूर्याने आपणांस दिवसा. स्वप्रकाशाने अनेक सुंदर वस्तु जरी दाखविल्या तरी त्याहीपेक्षां अनंत पटीने रमणीय अशा असंख्य वस्तु त्याने त्याच प्रकाशाने आपल्या दृष्टीपासून अंतरित केल्या होत्या. सारांश, निशासमय दिवसापेक्षाही रमणीय व विश्रांतिदायक असल्याने दिव्य विचारांना पोषक आहे, आणि आजच्यासारख्या स्वार्थसाधु काळां- तही कोणाला जर काही दिव्य दृष्टान्त होत असतील तर ते ढवळ्या दिवसास न होतां ज्योत्स्नाभिराम अशा गंभीर निशीथसमयींच सुख आणि शांति. [प्रकरण होतात. व यासाठीच योगीलोकांचे घडयाळ उलट चालते. गीतेत भगवंतांनी म्हटले आहे:- (श्लोक) या निशा सर्वभूतानां । तस्यां जागर्ति संयमी ।। यस्यां जाग्रति भूतानि । सा निशा पश्यतो मुनेः ॥ १ ॥ भावार्थ:--इतर प्राणी जेव्हां घोरत पडतात तेव्हां योगी जागा असतो; आणि इतर जेव्हां जागे असतात तेव्हां हा निजून असतो. * या श्लोकाचा गूढार्थ वेगळा आहे; या गूढार्थाचे येथे प्रयोजन नाही.
*****************
प्रकरण तिसरें.
.
Latitet
Jeetstatuttitute tttt.ct.ct testetstesterets भावार्थः , सुपारथिरश्वानिव यन्मनुष्यान्नेनीयतेऽभीशुभिर्वाजिन इव । हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्टं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु । -यजुवेंद. -जसा सारथि घोड्याला आपले मार्गाने घेऊन जातो, त्याप्रमाणे, जेथें मन आसक्त असते तेथे ते प्राण्यांना बळजबरीने घेऊन जाते. तसेच, तें मन, सारथि ज्याप्रमाणे लगामांनी घोड्यांना आपले कह्यांत ठेवितो त्याप्रमाणे सर्व प्राण्यांचे नियमन करितं. सर्व प्राणिमात्र मनाच्या आधीन असल्यासारखे झाले आहेत. या मनाला विचारी महात्मे आपल्या ताब्यात ठेवतात व मूर्खलोक त्याच्या ताब्यांत राह- तात. मन जेव्हां पवित्र असते तेव्हां तें सुखदायक होते व जेव्हां अपवित्र असते तेव्हां तें दुःखदायक बनते. जे मनुष्य याला जिंकतात त्यांना सिद्धि मिळते व जे याच्या ताब्यांत राहतात त्यांना अवनतीला जावे लागते. म्हणून पूर्वीच्या उपायांनी याला वश करावें.
प्रकरण तिसरें, मन. कामः संकल्पो विचिकित्सा श्रद्धाऽश्रद्धा धृतिरधृतिहीं-/-भी-रित्येतत्सर्वं मन एव । -श्रुति. भावार्थः :-काम, संकल्प, संशय, श्रद्धा-अश्रद्धा, धैर्य-अधैर्य, लज्जा, बुद्धि, भीति, ही सर्वही मनाचींच स्वरूपे आहेत. आपले हे मानवी शरीर तर आश्चर्यकारक व अमोलच खरें; परंतु त्यांत वसति करणारा जो आत्मा म्हणून आहे, तो या शरी- रापेक्षां अनंतपटीने तसा आहे. देह हे मंदिर व आत्मा हा त्यांतील देव असे म्हटलें म्हणजे या दोहोंतील योग्यतेचे तारतम्य ध्यानात येईल. आत्म्याचे मोल केवळ देहाहूनच अधिक नव्हे, तर निखिल ब्रह्मांडाहून वरिष्ठ आहे. सेंट मार्क म्हणतो, पृथ्वीचे राज्य दिले आणि माझा आत्मा हिरावून नेला, तर मला काय प्राप्ति ?" एडेसा येथील राजा होता त्याने ख्रिस्ताचे चम- कार ऐकून त्याला गांठून 'माझें शरीर निर्मळ कर' असें मागणे मागितले; परंतु 'माझें मर्न निर्मळ कर' असें तो बोलला नाहीं; याबद्दल लोक त्याला हंसले. बाकी शरीर तुच्छ मानावें असेंमात्र नाही. कारण आत्मा जरी मुख्य असला तरी त्याला देहाश्रय मला ८२ सुख आणि शांति. [प्रकरण अवश्य आहे; अर्थात् आत्म्याचें घर' या नात्याने तरी देहाचें महत्त्व कांहीं हलकें नव्हे. शिवाय, हा नरदेह तरी एक अलौ. किक करणी आहे ! त्यांतील विवेकशक्ति केवढी उदार! ज्ञान- कला किती अगाध ! आकार व चलनवलन किती मोहक व अजब ! त्याचे क्रियासामर्थ्य केवळ देवदतांसारखें व बुद्धि तर देवतुल्य; असा हा चमत्कारमय आहे. तेव्हां तोही आदर- णीय आहेच. अशा या देहांत दिव्य तेजाची ठिणगी कमी-ज्यास्त प्रमाणाने आहे. भगवंतांनी गीतेत स्पष्टच सांगितले की, (श्लोकार्ध) ममैवांशो जीवलोके । जीवभूतः सनातनः ॥ म्हणजे, मृत्युलोकांत जीव संज्ञेनें अवतीर्ण झालेला हा मांझाच सनातन अंश आहे. व ( श्लोक) यद्यद्विभूतिमत्सत्वं । श्रीमदृजितमेव वा ॥ तत्तदेवावगच्छ न्वं । मम तेजोऽशसंभवम् ॥ १॥ भावार्थ:-तुला जो कोणी वैभवयन, श्रीमान किंवा ऊर्जस्वल प्राणी आढळेल, त्याचे ठिकाणी माझे तेजाचा विशेष अंश आहे असे तूं समज. अर्थात् जो कोणी शांतपणे विचार करील त्याला ह्या मानवी जीवि- ताची महती कबूल करावीच लागेल. सर थामस ब्रौन आपल्या निबंधांत म्हणतो:--- मनुष्य हा केवढा दिव्य प्राणी आहे ? त्याला ३.] मन. ८३ मातीत पुरा किंवा त्याची राख करा, तरी देखील त्याचे थोरपण झांकत नाही." मनुष्ययोनीत जन्म मिळणे ही देणगी देवापासून मिळणाऱ्या सर्व देणग्यांतील श्रेष्ठतम आहे. म्हटले आहे-“दुर्लभं मानुषं जन्म"-'धन्यधन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पहा हो ॥' तें यथार्थच आहे. केवळ भौतिकदृष्टीनेच पाहिले तर मनुष्य म्हणजे काही रासायनिक द्रव्याचा मिलाफ आहे, व त्याचे नित्याचे कामाचे मान म्हणजे दोन शेर कोळशांचे उष्णतेपासून होणान्या उप्णतेइतकें आहे ! प्रसिद्ध शास्त्रज हक्स्ले गमतीने एकदा म्हणाला, मनुष्य मनुष्य तो काय ?-अमोनिआ कॅर्बोनेटिस, सोडीफॉसफे- टिस, कलोरिस (९८.४), व्हक्युइ पर्फेक्टिसिमि, पेशन्शी व अक्की डिस्टिलॅटी यांचे मिसळण, म्हणजे झाला मनुष्य! हक्स्ले हे विनोदाने म्हणाला. परंतु कित्येक लेखक या नरदेहाबद्दल मोठे तिरस्कारयुक्त उद्गार काढितात. या देहाचे क्षणभंगुरत्वाविषयीं तर जागोजाग ओरड आहे. स्कॉट म्हणतो:- (साकी) तृणायवर्ती बिंदू हिमाचे । फेनोद्गम की तरंगिणीचे ॥ अथवा बुद्बुद पर्जन्याचे । लोल तसा देहो ॥ १ ॥ बायबलांत मानवी जीविताला स्वप्न, निद्रा, छाया, वाफ. जलतुषार, गतगोष्ट अशा प्रकारच्या असारत्वबोधक अनेक उपमा दिल्या आहेत. बरें, जीविताचे नुसते इस्वत्वच गाऊन भागले सुख आणि शांति. [प्रकरण नाही. शेकडोंचा त्याचे तुच्छत्वावर विशेष कटाक्ष आहे. गौतम- बुद्धाचे तर हे आदिसूत्रच होते. त्याला सर्व जीवित दुःखमयच दिसत होते. बुद्ध म्हणे-“जन्म म्हणजे उदरांतून बाहेर येणे, तें दुःखच; पुढे जराग्रस्त होणे, तें दुःखच; आयुप्यांत प्राप्त होणाऱ्या आधिव्याधि ह्या तर मूर्तिमंतच दुःख; शत्रूचे दर्शन हेही दुःख; मित्राचा वियोग हेही दुःखच; सारांश, यावत् पंचेंद्रियांचे संबंध हे दुःखहेतु, यास्तव सर्व जीवितच कष्टमय आहे." होमरनें आपोलोकडून वदविले आहे की:- (गीति) हे मर्त्य दुःखभागी, पार्थिवजनि, अल्पजीवि तरुदलसे । विलसुनि गळती सत्वर, सुर हो त्यां साह्यदान योग्य नसे ॥१॥ यास्तव तत्कृत-समरा मानुनिया तुच्छ सर्व अमरगण । दूर असा; घालू द्या गोंधळ मूर्खास त्या करूनि रण.॥२॥ व्हिक्टर ह्यूगोलाही हे जीवित रणरणकदायी वाटत असे. पण गंमत ही आहे की, लोक या जीविताविषयी इतकी कुरकूर करितात, तरी या जीविताचा विरह व्हावा असे इच्छित नाहीत. कारण, असलेही लोक मृत्यूची गोष्ट काढतांच दचकतात व म्हणतात: (गीति) हर ! हर! वैभव, सत्ता, परिजन, चंद्रानना सपरिवार । होणार मृत्युकवलित ! देई चित्तास दुःख हे फार ॥ १ ॥ पण, अशांना जर विचारिले की, कां? जीवित कष्टमय ना ? मग आतां मृत्यूबद्दल विलाप का? तर म्हणतात- .
३ रें.] मन. (गीति) भीत नसों मृत्यूत; भीतों आम्ही तदुत्तर स्थितितें। नकळे जाऊ कोठे, पावू अन्यत्र कोणत्या गतिते ॥ १॥ -डायडन. मरणोत्तर काय गति होत असावी, हे गूढ सर्वत्र सर्व लोकांना आहे. व त्याबद्दल प्रत्येक धर्मात निरनिराळे तर्क व समजुती आहेत. आमचे अतींद्रियद्रष्टया ऋषींनीमात्र याचा उलगडा सप्रमाण व समाधानकारक केला आहे. या कामी पुराणग्रंथांत अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गरुड पुराणांत तर त्याचा विशेषच खल आहे, आणि यम व नाचिकेत यांचा उपनिषदांत दिलेला हृद- यंगम संवाद या प्रकरणी सर्वांस वाचनीय आहे. थिआसफीवा- त्यांनीही आपले शास्त्राधारे याविषयीं "डेथ आणि आफ्टर" वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. सिनेका म्हणतो, एकाच मृत्यूचे स्वरूप निरनिराळ्या लोकांस निरनिराळे भासते. कोणास तो प्रिय वाटतो; कोणास तो दुःखहर्ता भासतो; व तोच आपली चरमगति हे तर सर्वांसच वाटते. कित्येकांचा मृत्यूचे नांवाबरोबर थरकांप होतो; कारण, मृत्यु म्हणजे क्लेशांची परमावधि अशी त्यांची कल्पना असते.” म्हणच आहे- "नास्ति मृत्योः परं भयं.” परंतु, खरे पाहतां मृत्यु सर्वांसच क्लेश- दायी नसतो. जराजी)चा प्राण पुटदिशी केव्हां जातो ते कळत- देखील नाही. कित्येकांचे प्राण शिंक किंवा उचकी येतांच गेले आहेत. प्रसिद्ध न्यायमूर्ति रानडे नित्याप्रमाणे रपेट करून आले सुख आणि शांति. [प्रकरण आणि एखाद्या इच्छामरणी मुनीप्रमाणे नाहीसे झाले. यहुदी लोकांतील ज्ञाते त्यांच्यापैकी मोझेस, एरॉन व मिरिआम यांचा मृत्यु म्हणजे केवळ प्रियेच्या चुंबनाप्रमाने सुलभ व गोड होता, असे मानितात. काही लोक तर मृत्यु म्हणून काही निराळा आहे, असें मानीतच नाहीत. एक अमेरिकन कवि म्हणतोः (साकी) मृत्यु नव्हे हा स्वर्गद्वारप्रवेश मजला वाटे । नामश्रवणे इतर जनांचें न कळे कां मन फाटे ॥ १॥ -लांगफेलो. आमचे गीतेने तर मृत्यूचा बागुलबोवा मुळीच हाकलून लाविला आहे. भगवान् म्हणतातः (श्लोक) देहिनोऽस्मिन् यथा देहे । कौमारं यौवनं जरा ॥ तथा देहांतरप्राप्तिर्षीरस्तत्र न मुह्यति ॥ १॥ वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृह्णाति नरोऽपराणि ॥ तथा शरीराणि विहाय जीर्णा। न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२॥ भावार्थ:-... पहिले वस्त्र जीण झाले असतां · नवें घेणे, हाच मासला जुना देह टाकून नवा देह घेण्याचा आहे; हे जाणून ज्ञात्यांचा मृत्यूविषयी गैरसमज होत नाही. प्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटीस यानें, दहा सेनाधीशांना अन्यायाने ठार करण्याचे कामी तीस झोटिंगांनी केलेल्या हुकुमाला आपली संमति दिली नाही, व त्यामुळे तो सार्वजनिक रोषास पात्र होऊन त्याजपुढे जेव्हां विष ठेविलें, तेव्हां तो शांत व गंभीर मुद्रेने म्हणाला, .
३ रें.] मन. "न्यायार्थ मरणे हा मी जयजयकारच समजतो." मेकॉले म्हणतो, सॉक्रेटिसाच्या या अखेरच्या भाषणाइतके मनोहर व आश्चर्यकारक भाषण किंवा वाक्य मी अन्यत्र केव्हांच वाचलें किंवा ऐकिलें नाही. मिल्टन कवीला सॉक्रेटिसाचे हे मृत्यूबद्दलचे उद्गार रुचले नाहीत. तो म्हणालाः (साकी) अनंतकालावगाहनक्षमसंविद्गत्नप्रपूर्ण । नरजीवित हैं कष्टप्रदही सोडवे न मज तूर्ण ॥ मृत्यू मज न रुचे । दुःखद, दुःख हरी कैच ॥ १ ॥ मेकॉले म्हणतो, प्रथम प्रथम माझंही मत मिल्टनप्रमाणेच होते; परंतु आतां आयुष्याचा एक एक दिवस अधिक लोटतो, तो तों साक्रेटिसाच्या मताकडेच माझा कल वळत चालला. मृत्यु इष्ट वाटो की अनिष्ट वाटो, तो प्राप्त झाला असतां साक्रेटिसाने ज्याप्र- माणे निर्भयपणे व आनंदाने त्याचा अंगीकार केला, तसाच प्रत्ये- काने केला पाहिजे. साक्रेटिसाची अखेरची विनंती वाचली म्हणजे साक्रेटिस हा मृत्यूचे विक्राळ दाढेत सांपडलेला कोणी अपराधी नसून मौजेने स्वर्गारोहण करणारा कोणी महात्मा असावा, असा भास होतो. आमचे तुकारामबोवा तर टाळांचे गजरांत लोकांना रामराम करीत म्हणतात:- (अभंग) आम्ही जातो आधुल्या गांवा । आमचा रामराम घ्यावा ।। तरति शोकमात्मविद् " म्हटले आहे, ते खोटें नव्हे. कालिदास म्हणतो:- यौं रे बहादर!
८८ सुख आणि शांति. [प्रकरण (श्लोकार्ध) मरणं प्रकृतिः शरीरिणां । विकृति वितमुच्यते बुधैः ॥ -रघुवंश. भावार्थ:-मत्यु हा देहधारी जीवांचा स्वभावच ठरला; व जगणे हाच विकार होय, असे ज्ञाते म्हणतात. तथ्य हे आहे की, मृत्यूची डर पाप्याला किंवा अज्ञानाला; ज्ञात्याला व पुण्यवंताला तो मंगळ सोहळाच वाटतो. मनुष्याला कोणी कोणों देवाची प्रतिमा म्हटले आहे; कोणी पशु म्हटले आहे. दोन्ही उपमा खऱ्याच आहेत. यांपैकी पहिले उपमेस पात्र होणे, किंवा दुसरीस होणे, हे प्रत्येकाचे स्वाधीन आहे. मनुष्याची रचना व त्याची कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये यांच्या शक्ति यांचा विचार केला असतां, मनुष्य हा दैवी प्रकृति व पाशव प्रकृति या उभयांचा मिलाफ आहे असें व्यक्त दिसते. आमचे शास्त्रात मनुष्यजन्म हा तिर्यगयोनि व देवयोनि या दोहींचेमध्ये ठेविला आहे, तें रास्तच आहे. दुसऱ्या मजल्यावर राहणारास ज्याप्रमाणे एक जिना चालतांच तळमजला दिसतो, किंवा वरमज- लाही दिसतो, त्याचप्रमाणे, मनुष्ययोनीतून वरील देवयोनीस चढण्यासही सोपानमार्ग आहे, व पशुयोनीत उतरण्यासही आहे. कोणता जिना चालावा हे ज्याचे त्याचे पाहणे आहे. आहार, निद्रा, मैथुन इत्यादि पशुकर्मांचाच दृढाभ्यास करीत राहिल्यास, पशुतुल्यताही सुसाध्य आहे. सत्य, शौच, अहिंसा, आर्जव, इंद्रियदम, शांति, भक्ति, ज्ञान, विरक्ति इत्यादि दैवी गुणांचा ३ रें.] मनं. “ अभ्यास करीत गेल्यास, नराचा नारायणही होणे सुसाध्यच आहे; व दोन्हीही गोष्टी केवळ त्याच्या हाती आहेत. हे दोन्हीही मासले दुनियेत आढळतात, व दोन्ही स्वकृतीचेच परिणाम आहेत. कवि म्हणतो, दोन्ही मार्ग तुजपुढे खुले आहेत, 'येनेष्टं तेन गम्यताम्.' आरंभी मनुष्य देवप्रकृतीला निकटच असतो असा सर्वत्र सर्व देशांत समज आहे. कारण, बाळाजवळ देव असतो, त्याला साप चावत नाही, ढोर तुडवीत नाही,' असे पुष्कळ लोक मानि- तात. देवाला चिठ्या टाकिल्या तरी लहान मुलांकडून आपण उचलवितों; याचे तरी इंगित हेच. सर थामस ब्रौन म्हणतो, खरोखरच, पंचभूते व चंद्रसूर्य हे निर्माण होण्याचेही पूर्वी में दिव्यतेज विद्यमान असेल, त्याचा काही तरी अंश आम्हांत ( मनुप्यांत ) असलाच पाहिजे.” कित्येक सत्पुरुषदेखील बाल- वृत्तीने राहतात. कारण बालपणीं वृत्ति निप्पाप व निष्कपट असते. बालक कोणाचा द्वेष, किंवा मत्सर, किंवा अपमान करीत नसून सर्वांशी प्रेमळ असते. हेच निर्मळ धर्म जर उत्तरोत्तर वाढत जातील, तर देवपणा खचीत लांब नाही. पण हे घडावे कसे ? व्यवहारपटु लोक मुलांना नादान म्हणतात. आणि लबाडी, आपमतलब वगैरे ज्याला कळू लागली अशाला दाणा' किंवा 'शहाणा' म्हणतात ! इंग्रजी मात कनिंग' या शब्दाचा मूळार्थ 'ज्ञान' किंवा शहाणपण' असतां हल्ली त्याचा अर्थ 'लुच्चगिरी' असा झाला आहे, यांतील वर्म तरी हेच आहे. . .
सुख आणि शांति. [प्रकरण बाळपणी मुलांना वळण देणे हे त्यांचे संगतांचे मनुष्यांचे स्वाधीन आहे. विशेषतः आईबापें व शिक्षक यांवर ही जबाब- दारी आहे. मुलाचें मन कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर आपणांस वाटेल तें आपण लिहूं शकू. पण एकदां भलतें कांहीं लिहिले म्हणजे तें वज्रलेप होणार, म्हणून वेळीच लिहिणे ते जपून लिहावें. हितोपदेशांत म्हटले आहे:- (श्लोक) यन्नवे भाजने लग्नः । संस्कारो नान्यथा भवेत् ॥ कथाछलेन बालानां । नीतिस्तदिह कथ्यते ॥ १॥ भावार्थ:---ओल्या मडक्यावर करावा तो संस्कार कायम होतो. यावरून, कोमळ बाळांना कथामिपाने आम्ही नीति सांगतो. लौकिकांतही म्हण आहे की ' बाळा तें जन्मकाळा.' ती खरी आहे. कोमळपणी शिक्षणाचा जसा परिणाम होतो, तसाच परिणाम उदाहरणाचाही होतो. बाप चिलीम ओढीत असतांना दिसला, म्हणजे पोरगा निदान विडीचा तरी झुरका घेईलच. म्हणच आहे-'देख्या गुरु की शिक्या गुरु.' व म्हणून आईबाप होणारांनी आपली जबाबदारी ओळखून आपले वर्तन ठेवावें, असें जे करीत नसतील, ते समाज- शत्रु समजावे. कै० प्रो० आगरकर आम्हांस वर्गात ही गोष्ट विशेष कटाक्षाने व निर्भीडपणे सांगत. परंतु खेदाची गोष्ट ही की, समाजांत शेकडों जोडपी या कामी बेफिकीर राहतात व विपत्ति वाढवितात. आईबा व शिक्षक यांचे जसे आपण ऋणी आहों, तसेच गतकालांत जे सुप्रसिद्ध व उदाहरणीय सत्पुरुष ३ रें.] मन. ९१ होऊन गेले, त्यांचही आपण ऋणी आहोंच. कारण, अशांची बोध- वचनें व चरित्रे यांचा परिणाम आपले वर्तनावर किती तरी होत असतो. मनु, याज्ञवल्क्य, ख्रिस्त, बुद्ध, महंमद, झोरास्तर, श्रीकृष्ण, व्यास, वाल्मीक, रामचंद्र, हरिश्चंद्र, एकनाथ, तुका- राम, ज्ञानेश्वर इत्यादि पुरुषांची वचनें व चरित्रे आपणांस अंशतः बोधक झाली आहेत. व अर्थात् आपण त्यांचे ऋणी आहों. आमचे शास्त्रांत तर प्रत्येक जन्मलेला पुरुष, देव, ऋषि व पितर यांचा ऋणी असतो, असे म्हटले आहे; इतकेच नव्हे, तर या तिघांचेही त्याने अनृणी झालेच पाहिजे अशी प्रत्येकावर सक्ती आहे. व ही न्याय्य नाही, असे कोण म्हणेल ? मनुष्य हा खरोखरच देवत्व व पशुत्व यांचे मजेदार मिसळण आहे. नुसते शरीरावरून पाहिले तर पशु आहे ( पश्यत्यसौ पशु:- केवळ चर्मचडूंचा व्यापार करितो म्हणून त्यास पशु म्हणावें), व सच्चिदानंदलक्षण जो दिव्य आत्मा त्याचा त्यांत वास आहे, म्हणून तो देवही आहे. परंतु, लबक म्हणतो, शेकडों हजारों लोक आपलें देवत्व विसरतात; इतकेच नव्हे, तर पशुत्वांतदेखील पशूच्या- वर ताण करितात. पशूचे ठायीं अज्ञानच असते. परंतु, मनुष्य ज्ञानी असतांही पाजी असतो, व यामुळे नीच जंतूंपेक्षाही अधिक अनर्थावह होतो. एका कवीने म्हटले आहेः सापेक्षाही खल भयं- कर. सर्प ज्याला दंश करितो त्यालाच मारितो; परंतु खल हा एकाचे कानाशी लागतो आणि तिसन्याचेच प्राण-हरण करितो! कांहीं सुबुद्ध व सदाचरणी स्त्रियांचे वांट्यास कुठे कुठे असे पुरुष .
९२ सुख आणि शांति. [प्रकरण -भावप्रकाश. आलेले आढळतात की, त्या बिचान्यांनी आपल्या ह्या मालकांसंबंधी बोलतांना " वागविती नरे पशुसमै आम्हां या ओळीचा अन्वय, ३, २, ४, १ अशा अनुक्रमाने लावल्यास अन्याय होणार नाही. मनुष्यांत असलेले देवत्व नावारूपास आणणे तर मनुष्याने अंतस्थ आत्म्याची ओळख करून घेऊन आपले वर्तन शुद्ध ठेविलें पाहिजे. आत्मशोधन करण्यालादेखील शरीरबल लागते. (श्लोकार्ध) धर्मार्थकाममोक्षाणां । मूलमुक्तं कलेवरम् ।। भावार्थः---( मुदृढ ) शरीर हैं धर्म अर्थ-काम व मोक्ष या चारही पुरुषार्थाचे मूळ म्हटले आहे. अर्थात् आत्मसाधनाला शरीरदाय अत्यवश्य आहे. परंतु केवळ वज्रदेही झाले म्हणजे पुरुषार्थ झाला असेंमात्र नव्हे. कारण, हर्युलीस मोठा भीम होता; पण त्याच्या बलाचे काय चीज झाले? त्याला वैभव किंवा स्वातंत्र्य कांहींच नव्हते. एका दुष्ट जुलमी राजाची गुलामगिरी करण्यांत त्याचे आयुष्य गेलें. माथेफिरूपणाचे तडाक्यांत त्याने स्वतःचीच पोरें ठार मारिली व अखेर एका मत्सरी स्त्रियेपायीं हालहाल होऊन तो मेला ! सॅमसन हा दुसरा एक नवनागसहस्रबली होऊन गेला. त्याचे तरी कपाळ अशाच प्रकारचे. तेव्हां नुसते रेड्याचे बळ असल्याने सार्थक झालें असें नाहीं. शरीर या शब्दाचा अर्थ "शीर्यते तत् " म्हणजे " नासतें तें;" अर्थात् तें नासकें असेंच आहे. परंतु आंत बांध- लेल्या हिरकणीसाठी जसें वरील चिंधीस जपावयाचे, त्याप्रमाणे
३ रें.]
तदंतर्गत में आत्मरूप रत्न आहे त्यासाठी शरीराला जपावयाचे.
खोबन्यासाठी करवंटीची पर्वा, खोबरें नसेल तर नरोटी ती काय,
जाळावयाचे कामी ! सारांश, शरीर हे साधन आहे, आत्मा हैं
साध्य आहे. त्याचे ज्ञान न संपादिल्यास, आचार्य म्हणतातः
आत्मज्ञानविहीना मूढाः । ते पच्यते नरकनिगूढाः ॥
-शंकराचायकृत मोहमुद्गर.
भावार्थः-जे मूढजन आत्मज्ञानाने हीन राहतात, ते अखेर
नरककुंडांत बुडून कुजत पडतात.
असो; वर मनुष्य या शब्दाने ज्या गोष्टी सांगितल्या, त्या स्त्री
व पुरुष यांना सारख्याच लागू समजाव्या. कायद्याचे भाषेत
मनुष्य' या शब्दांत 'स्त्री' व 'पुरुष' या दोहोंचाही अंतर्भाव
होतो... तथापि लबक म्हणतो, स्त्रीविषयीं स्वतंत्र असे चार शब्द
सांगितले पाहिजेत. स्त्री आणि पुरुष यांत मुख्य भेद असा दिसतो
की, पुरुषांत मनाची दृढता अधिक व स्त्रियांत सद्भावनेची दृढता
अधिक; आणि सद्भावना ही सुखास अवश्य आहे. आदम हा
प्रत्यक्ष नंदनवनांत होता, तरीही त्याची अर्धांगी ईव्ह हिच्या
संगतीवांचून त्याला सुख लागेना. उघडच आहे:
(श्लोक-चरण)
विना सीतादेव्या किमिव न हि दुःखं रघुपतेः ।
-भवभूति.
भावार्थ:--सीतादेवीवांचून रघुपतीला सर्व दुःखमय आहे.
एका कवीने म्हटले आहे की:
२४ सुख आणि शांति. [प्रकरण ॥ तें . शिवाय एक (श्लोक) वृक्षमूलेऽपि दयिता । यत्र तिष्ठति तद्गृहम् गृहं तु गृहिणीहीनं । कांतारादतिरिच्यते ॥ १ ॥ भावार्थः--तुम्ही झाडाखाली उभे असा; स्त्री जर सन्निध आहे, तर तेथेच घर आहे. आणि तुम्ही बांधल्या घरांत असून स्त्री जर जवळ नाही, तर अरण्याहून वाईट. दुसरा कवि म्हणतो, " असारे खलु संसारे । सारं सारंग- लोचना ॥" म्हणजे या निःसार संसारांत हरिणाक्षी हीच काय तें सार आहे. तिसरा म्हणतोः भोगाः के रमणीं विना?" म्हणजे रमणी नाही, तर भोगांना रुचि कसली? पण लबक म्हणतो, हीच रमणी जर वाह्यात गुलचैनी मिळाली, तर नवऱ्याचे टप्पल शेक- ल्यावांचून राहणार नाही. वेळ दुष्ट पुरुष पुरवेल, पण दुष्ट स्त्री पुरवणार नाही. एक कवि एक कवि म्हणतो- नारी प्रत्यक्ष राक्षसी.” दुसरा म्हणतो-" रामा पामेव राजते,” ही रामा नव्हे, आली खरूज आहे. तिसरा दुहेरी निकाल देतो- "नामृतं न विषं किंचिदेकां मुक्त्वा नितंबिनीं" म्हणजे स्त्रीला सोडून दुसरें अमृतही नाही व विषही नाही. म्हणणे खरे आहे. पुरुषाला जसें शरीरबल, तसें स्त्रियांना सौंदर्य. परंतु, सौंदर्य हे सर्वथाच सुखहेतु असते असे नव्हे. पुष्कळदां तेंच भयहेतु होते. "रूपाद्भयं योषितः ." द्रौपदी, सीता, कृष्णाकुमारी, नूरजहान इत्यादिक मोहिनींच्या दिव्य रूपलक्ष्मीपायीं जगांत केवढे दुर्धर अनर्थ उद्भवले हे महशूरच आहे. एक कवि म्हणतोः सौंदर्य ही दिव्य अमोघ शक्ति । -सता ठाकुराणी. . - " ल मन. ९५ (श्लोकार्ध) पक्वान्नासम सुंदरी जगभरी आस्वाद्य सर्वां गमे । ऐसा कोण शुकावतार ? रमणी पाहूनि जो ना रमे ॥ हा रूपमेवा नको असा कोणाला ? कोठे जा, त्यावर बोके टप- लेलेच आहेत. यामुळे स्त्रियांना रूप हे भूषणही आहे व मरणही आहे. शिवाय, तारुण्याची झुळूक ही केवळ क्षणिक आहे. (श्लोक) अभ्रच्छाया, खलप्रीतिर्नवसस्यानि योषितः॥ किंचिकालोऽपभोग्यानि । यौवनानि धनानि च ॥ १ ॥ -मुभाषित. भावार्थः --ढगांची सांवली, खलाचे प्रेम, नवे धान्य, स्त्रिया, यौवन व धन, ही अल्पकालच उपभोगण्यास सांपडतात. कोणी स्त्री कशीही सुंदर असो, सौंदर्याची झांक तेरड्याचे रंगाप्रमाणे तीन दिवसांपलीकडे टिकत नाही. म्हण आहे: " नदी, नारी, व्यापारी । गर्जना करिती दिवस चारी ॥. ज्या काव्यामुळे होमर कवीचें नांव अजरामर झाले त्या काव्याला आदि- हेतुभूत जी दिव्य सुंदरी हेलेना ती एकदां उत्तरवयांत आपले मुख सहज आरशांत पाहात असतां, मुखाभोंवतीं वार्धक्याच्या झुरळ्या पडलेल्या पाहून दुःखाने रडली; व स्वतःशीच म्हणाली, “ मला मेल्यांनी दोन वेळा कशाकरितां हिरावून नेलें ? तसें नेले नसते तर माझ्या अप्रतिम रूपाची घडी बिघडली नसती.” लबक म्हणतो, हैं तिचे म्हणणे सर्वथा खरे नव्हे. काही केले तरी रूप हे टिक- सुख आणि शांति. [प्रकरण णारे नव्हेच. परंतु एक गोष्ट खरी की, ही हेलेना दोन वेळा दुर्ज- नांचे तावडीत न सांपडती व तिला वागविणारे बदफैली न मिळते, तर तिचे ज्वानींतील सौंदर्याची चमक पोक्तपणाच्या प्रशांत व उदार अशा तेजांत परिणत झाली असती. आणि पाजी लोकांनी जर तिला फसवून तिच्या रूपाचा पूर्ववयांत खराबा केला नसता, तर तेच लोक असल्या त्रिभुवनैक सुंदरीच्या चरणाचे सेवक तिच्या पोक्त वयांत आनंदाने झाले असते. ज्ञात्यांचे असे म्हणणे आहे की, विशीत प्रत्येक स्त्री सुंदर ( रूपाने ) बनूं शकेलच असे नाही; पण ती जर सद्वर्तनी असेल, तर पन्नाशीत तिच्या सौंदर्याचें (वर्तनाचे) तेज फांकल्याशिवाय राहणार नाही. म्हटले आहे-"नारीरूपं पतिव्रतम् ' म्हणजे साध्वीत्व हे स्त्रीचे खरे सौंदर्य आहे. अर्थात् हे सौंदर्य संपादणे प्रत्येकीचे हातचे आहे. रूपसौंदर्य हे तसे स्वाधीन नाहीं, व शाश्वत तर नाहीच नाही. कितीही उमदा गुलाब झाला तरी तो कोमेजणारच. तीच दशा सौंदर्याची समजावी. तथापि, स्त्रियांचे सौंदर्य रसपूर्ण व सहृदय अशा कविगणाचीच वाणी पल्लवित करून राहिले नाही; तर शांत व गंभीर अशा गद्य- लेखकांनादेखील त्याने वाचाळ केले आहे. प्लूतार्क म्हणतो, स्पार्टीतील स्त्रियांची महत्त्वाकांक्षा आपण वीरमाता व्हावे अशी असे; व या त्यांच्या गुणामुळे लेखकांनी त्यांची स्तोत्रं लिहिली." एकंदरीत स्त्रियांचे स्तोत्र गाण्यांत कवींनी तर पराकाष्ठाच केली आहे. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो की, या कविमंडळीने या स्त्रीजनाला ३ रें.] मन. ९० -- हरभन्याच्या झाडावर चढवून त्यांचा नाशमात्र केला आहे. आमचे विरक्त भर्तृहरि म्हणतातः- (श्लोकचरण) अहो, निंद्यं रूपं कविजनविशेषैर्गुरुकृतम् । भावार्थ:-या निंद्य स्त्रीरूपाला या प्रतिष्ठित कविमंडळीने महत्त्वास चढविले, दुसरे काय ? लबक म्हणतो, स्पेन्सरचे म्हणणे मलाही खरे दिसते. कारण, या जातीचे स्तोत्र करण्यांत कवींची जशी कांहीं चढाओढ दिसते. एक कवि म्हणतोः- (श्लोक) किर्मिदुः किं पनं किमुमुकुरबिंबं किमुमुखं । किमब्जे किं मीनौ किमुमदनबाणौ किमुदृशौ । खगौ वा गुच्छौ वा कनककलशौ वा किमुकुचौ। तडिद्वा तारा वा कनकलतिका वा किमबला ॥१॥ -सुभाषित. भावार्थ:--हा चंद्र आहे, की कमल आहे, की आरसा आहे, की मुख आहे !-हीं कमले आहेत, की मासे आहेत, कां मदनाचे बाण आहेत, की डोळे आहेत ! तसेंच हे कोण ? हे चक्रवाक, की फुलांचे गेंद, की सुवर्णाचे कलश ?-तशीच ही कोण ? ही वीज आहे, की चांदणी आहे, की सोन्याची वल्ली, किंवा स्त्री आहे ? इंग्रजी कवि चॉसर म्हणतो:- (श्लोक) निखिलगुणनिधान-सीजनादर्शभूता । विपुल हचिरकीर्ती शोभते सुंदरी ही। .. - ९८ सुख आणि शांति. [प्रकरण : - इलिझाबेथ राणीचे थडग्यावर बेन जान्सनने लिहिले:- (चाल-क्षमातळी.) शिलातली या निद्रित राहे लोकत्रयसुंदरी । उदारा, गुणिजनपिकमंजरी" ॥ १ ॥ 'रंगेल' भर्तृहरि म्हणतोः- (श्लोक) द्रष्टव्येपु किमुत्तमं ? मृगदृशः प्रेमप्रसन्नं मुखं । घातव्येषु च किं ? तदास्यपवनः; श्राव्येषु किं ? तद्वचः ॥ किं स्वाधेपु ? तदोष्टपल्लवरसः; म्पृश्येषु किं ? तद्वपुः । ध्ययं किं ? नवयौवनं सहृदयः, सर्वत्र तद्विभ्रमः ॥ १॥ भावार्थः जगांतील सर्व दर्शनीय वस्तूंत श्रेष्ठतम वस्तु कोणती ? उ.- हरिणाक्षीचे प्रेमाने पुललेलं मुखकमल. सुवासिकांत अग्न्य काय ?--तिच मुखकमलांतील उच्छासगंध. श्राव्यांत मनोहर काय ?- तिची वाणी. सर्व आस्वाद्यांत अत्यंत रुचिकर काय ? ..तिचे अधगमत. स्पृश्य वस्तूंत मुखावह काय ?- तिचा गावस्पर्श*. सहृदयजनांना उत्तम ध्येय कोणते ? तिच नवतीचा बहार. आणि, जिकडे तिकडे आपल्याभोवती असावेचसे काय ? तिच्या विलासाची झुळूक ! ख्रिन्तधयांची आदिमाता ईव्ह हिजबद्दल मिल्टन म्हणतो:-- (साकी) चरणन्यासी विभ्रम भरला । दिव्य तेज ते नयनीं । अभिनय जीचा प्रतिपदि दावी । प्रेम, सभ्यता, दोन्ही ॥ १ ॥ प्रभू रामचंद्र देखील म्हणतात:-" तव स्पर्शे स्पर्श मम हि परि- मूढेंद्रियगणी ।" ( अर्थात् एवढी जबर मोहिनी सीतेचे स्पर्शात होती.)
३ रें.]
मन.
९९
सर हेन्री टेलर आपल्या नायिकेचे वर्तनकौशल्याबद्दल म्हणतो
व तसेंच कालिदासही मालविकाग्निमित्रांत म्हणतोः-
(श्लोकचरण)
पादन्यासो लयमुपगतस्तन्मयत्वं रसेषु ।
भावार्थ:-मालविकेचे पाऊल टाकणे केवळ ठोक्याला जुळून आहे.
आणि शृंगारादिक रसांशी तर ती एकजीवच होऊन गेली आहे.
वॉलर कवि एका स्त्रीच्या मेखलेचे वर्णन करितांना म्हणतोः
(साक्या)
कटिगत कांचीवलय प्रियेचें, अल्पवर्तुलाकार ।
निखिल सुखाचें, सौंदर्याचे, भासे मज आगार ॥ १ ॥
नाहीं मागत दुसरें कांहीं, द्या मज इतका प्रांत ।
हीन भासतें मजसि यापुढें, जें जें या लोकांत ॥ २ ॥
ब्लेक हाही एका सुंदरीचे असेंच महिम्न गातोः
(श्लोक)
दिव्यस्वने लाजवि किन्नरीते।
पदार्पणे पूत करी धरेतें ।
क्षेत्री, वनी, वा विजनी असो ते ।
तत्संगी नंदन तुच्छ मातें ॥१॥
लबक म्हणतो, या सर्व वर्णनांपेक्षां महाभारतातील साध्वी
द्रौपदीचे सौंदर्य, वर्तन व सत्त्वशीलता ही तर निरुपमच होत.
वस्त्रहरणसमयीं तिच्या तेजाची पूर्ण कसोटी प्रत्ययास आली. प्रत्यक्ष
धर्मराजांनी तिचे केलेले वर्णनही स्मरणीयच आहे.
(आर्या)
शरदुत्पलपत्राक्षी शरदुत्पलपुण्यगंधसमगंधा ॥
अस्खलित चालवी मज गृहधर्मी, यष्टि पथिं जशी अंधा ॥१॥
१०० सुख आणि शांति. [प्रकरण आधीं जिणे उठावें, पाहुनि निजलों असें, मग निजावें ॥ रागेजणे सुदुर्मिळ, तेंहि जिचे ज्वालसें गगनिं जावें ॥ २ ॥ धौम्यांपासुनि गोपांपर्यंत जिणें स्वयें समाचार ।। घ्यावा, श्रित-तापहर श्री-गंगेचा जिचा समाचार ॥३॥ -मोरोपंत. शहाण्या सालोमनने दिलेले कुलस्त्रीचे वर्णन याच तोडीचे आहे, म्हणून पुनरुक्ति करीत नाही. बृहत्संहितेत वराहमिहिर म्हणतो:- (श्लोक) श्रुतं, दृष्टं, स्पृष्टं, स्मृतमपि नृणामाल्हादजननं । न रत्नं स्त्रीभ्योऽन्यत्क्वचिदपि कृतं लोकपतिना ॥ तदर्थं धर्मार्थों विभववरसौख्यानि च ततो। गृहे लक्ष्यो मान्याः सततमबला मानविभवः ? ॥ भावार्थः-स्त्रीसारखे दुसरे रत्न विधात्याने केलेच नाही. कारण, या स्त्रीरत्नाचे नामश्रवण, दर्शन, स्पर्शन किंवा नुसते स्मरण देखील पुरुषांना आनंद देते. धर्म, अर्थ, वैभवांतील सौख्ये ही सर्व स्त्रीपायीं आहेत. याकरितां या अबलारूपी गृहलक्ष्म्यांचा प्रत्येक घरी मानवैभवदानाने सत्का- रच करावा. लबक म्हणतो, पुरुषजातीवर ज्यांचे इतकें वर्चस्व चालतें, त्यांना " अबला' म्हणण्यांत अर्थ काय ? भर्तृहरि म्हणतो:- (भोकार्ध) याभिर्विलोलतरतारकदृष्टिपातः । शक्रादयोऽपि विजिता अबलाः कथं ताः ॥ १ ॥ भावार्थ:--ज्यांनी नुसत्या चंचल नेत्रकरराक्षांनी इंद्रादिक जिंकले, त्या अबला कशाच्या !
३ रें.] मन. १०१ असो. लबक म्हणतो, जरी स्त्रीपुरुषे बऱ्याच गोष्टींत भिन्न असली, तरी मनुष्यत्व ह्या धर्मांत उभयतांचेही साधारण्य आहे. स्त्रियांना जरी कोणी "फुसकें भेंड" म्हणतात, तरी त्यांनी ध्यानात ठेवावे की, ह्या भेंडांत चित्कलेची वसति आहे. अर्थात् , स्त्रिया शरीराने नाजुक झाल्या तरी मनुष्यप्राणी या दृष्टीने विवे- कादि सामर्थ्य त्यांलाही आहेच, व यामुळेच पुरुषांप्रमाणेच आत्मो- नति स्त्रियांचेही हातची आहे. तसे म्हटले तर जात्या प्रत्येक मनुष्य (स्त्रीपुरुष ) उन्नतच आहे. मूर्ख लोक स्वकृतीने अवनतीस जातात इतकेंच. मनुष्यांत जर ईश्वरी अंश आहे, तर मनुष्य हा क्षुद्र प्राणी कसा होईल ? परंतु, ह्या गोष्टीचें त्याला स्मरण पाहिजे. नसले म्हणजे कोल्हीचे पोरांत वाढलेल्या सिंहाच्या बच्चाप्रमाणे त्याला आपल्या सत्यस्वरूपाबद्दल भ्रांति पडून तो हीन-दीन होतो. मनुष्य जर आपली किंमत ओळखून चालेल, तर त्याला मोलच नाही. तो दरिद्री असेना; तो जर आत्मगत मनुष्यत्वाचे तेज स्वकृतीने पूर्णपणे उदयास आणील, तर एकाद्या राजाचीही किंमत त्याहून कमी आहे. राजाजवळ बाह्यवैभव असते; परंतु आंतर किंवा आत्मवैभवाचा अभावच. दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा आत्मजय करणे यांत पुरुषार्थ अधिक आहे. कारण, आत्मजय करणारांना दुर्विकार, दुर्ग्रह व मोह इत्यादिकांपासून अलिप्त राहून अढळ नीतीने चालावे लागते. मनुष्याचे खरें मनुष्यत्व कशांत आहे ? उच्च पदवी, भव्य मंदिर, विपुल द्रव्य किंवा दिव्य वस्त्रे यांपैकी कशांतही ते नाही. तें १०२ सुख आणि शांति. [प्रकरण सर्व उत्तम शीलांत आहे. म्हटलेच आहे, "शीलं परं भूषणम् ।". आपले मनांतमात्र पाहिजे म्हणजे, आपणा प्रत्येकास आपला वर्तन- क्रम इतका चोख ठेवितां येईल की, शेक्सपिअरने जसें कॅसिओ- बद्दल म्हटले आहे, त्याप्रमाणेच " प्रतिदिवशी त्यांत नवीन नवीन मौज दिसत राहील." , ब्रह्मका मनुष्यजीवित हे एक मोठेच गूढ आहे, यांत संशय नाही. एक बयान आहे:-" आनेका वाट कोन, जानेका घाट कोन, कपाट कोन, कहांसे जीव आया है?" एक फ्रेंच लेखक म्हणतो:- 'मी जन्मास आलों खरा, पण कां व कसा ते मला कळत नाही. मी जगलों खरा; पण त्यांतील वर्मही मला माहीत नाही. आणि आतां मी मुमूर्षु झालो आहे, यांतीलही हेतु मला उमगत नाही." पॉस्कल नामक ग्रंथकार म्हणतो, यावत्सृष्टवस्तूंत मनुष्य हे मोठेच गूढ आहे. मनुष्याला आपले शरीर हे काय आहे, ह्याचेच पूर्ण ज्ञान नाही. तद्वत् चैतन्याचे तर त्याहूनही कमीच. आणि जड शरीर व चेतन आत्मा यांचा हा बेमालूम मिलाफ कसा बन- विला आहे, याबद्दल तर पूर्णच काळोख आहे." बर, ह्या गोष्टी दूरच्या म्हणाल्या तर त्याच्याच ठिकाणी त्या आहेत. असे असून त्याला त्यांचा बोध नाही. याहून मोठे कोडें तें कोणते ? उपनि- षदांत म्हटले आहे.:- पराञ्चिखानि व्यतृणरस्वयंभूस्तस्मात्स्वयं पश्यति नांतरात्मा। भावार्थ:--- ब्रह्मदेवाने ही इंद्रिये बाहेर तोंड करून कांतली, यामुळे :
३ रें.] मन. १०३ ह्यांनी आंतर ज्ञान होत नाही. डोळ्यांनी बाहेरील सर्व जगत् दिसते; परंतु आंतील कांहींच दिसत नाही. कार्लाइल म्हणतो, " प्रत्येक मनुष्य हे एक चालतें बोलतें आश्चर्य आहे. भोवती पहावे तो अनाद्यनंत काल व अपरिमित अंत- राल; अशांत मध्येच चेंडूसारखा हा कुठून उसळून आला असावा, याबद्दल तर्क काहीच काम करीत नाही. आतां, हे कोडे जरी उल- गडलें नाहीं, तरी मनुष्य हा दिव्य व पार्थिव या दोन्ही अंशांचा घडला आहे, त्या अर्थी त्याने आपल्या पार्थिवत्वाकडे पाहून नम्रतेने चालावे व दिव्यांशाकडे पाहून आचरण पवित्र व उदात्त ठेवावें, व आंत जी सद्बुद्धिरूप ईश्वरी ज्योत आहे तिच्या उजेडाने चालावें; इतकेमात्र निर्विवाद आहे." मनुष्य हा एका दृष्टीने दीन, दुर्बल व ज्ञानहीनही आहे. बरें, दुसन्या दृष्टीने त्याने अचाट करणी केली आहे. त्याने या भूगोलाचे वजन काढिले आहे ! हिमालयासारख्या गगनचुंबी महीधरांची उंची मापिली आहे ! अगाध महार्णवाचाही ठाव घेतला आहे! अनंत अंतरिक्षांतील चंद्र, सूर्य व इतर ग्रहोपग्रह यांची अंतरें मोजिली आहेत; खस्थ ज्योतींचीही क्षेत्रफळे व वजने ठरविली आहेत; त्यांच्या गतींचे काल, वेग व दिशा निर्णीत केल्या आहेत; आणि याहीपेक्षा नवलाची गोष्ट-ह्यांची घटकद्रव्ये कोणती तीही निवडली आहेत! व याहून अधिकाधिक गोष्टी पुढे पुढे करण्याची त्याची उमेद आहे. तेव्हां इतक्या पराक्रमी प्राण्याला क्षुद्र तरी कसे म्हणावें? आणि खरो- , १०४ सुख आणि शांति. [प्रकरण खरच तो क्षुद्र नव्हे. त्याच्यांत ईशकला वसत आहे. मात्र त्याने अहंकाराने ताठून न जातां नम्रपणे परमात्म्यास शरण राहून यत्न- पूर्वक आत्मशोधन करीत रहावे. म्हणचे आजमितीस 'प्रतिपच्चंद्र- रेखेप्रमाणे अंधुक दिसणारी ही त्यामधील ईशकला दिवसानुदिवस वृद्धिंगत होऊन पूर्णिमेच्या प्रभेला येईल, यांत संदेह नाही.
Mettettetettet,
etetett tittet
Cettet
Hit
प्रकरण चवथें.
आरुरुक्षा ( उदयेच्छा).
Ketat . estatatatatatatatatatatatatattetit acteta : (श्लोक) आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।। ईहते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ।। १ ॥ इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् । इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ २ ॥ असौ मया हतः शत्रुहनिप्ये चापरानपि । ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ ३ ॥ आढयोऽभिजनवानस्मि कोन्योऽस्ति सदृशो मया॥ यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानाविमोहिताः ॥ ४ ॥ -श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ:--जे शतशः आशापाशांनी बद्ध झालेले, कामक्रोध हेच ज्यांचे सर्वस्व, ते कामभोगासाठी अन्यायाने द्रव्यसं- चयाची इच्छा धरितात व आज मी हे मिळविले, आतां हा मनोरथ मी साध्य करीन, मजपाशी हे इतकें धन आहे, आतां आणखी है मला मिळेल, हल्लों मी हा शत्रु मारिला व आणखी दुसरे मारीन, मी मोठा समर्थ, भोगणारा काय तो मीच, मी सिद्ध, बलवान् व सुखी आहे, सर्व काही मीच, सारांश, ह्या जगांत मचि काय तो मुख्य आहे; मी धनवान् आहे : मी संभावित कुळांत जन्मलों आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे ? मी यज्ञ करीन; दाने देईन व आनंद करीन; ह्याप्रमाणे ते अज्ञानामुळे मोह पावून बडबडतात.
प्रकरण चवथें,
आरुरुक्षा (उदयेच्छा).
(श्लोकार्ध)
स जातो येन जातेन । याति [लोकः] समुन्नतिम् ॥
-हितोपदेश.
भावार्थ:- ज्याचे जन्मास येण्याने लोकांचा अभ्युदय होतो तोच
..
खरा जन्मला.
मरहूम सर जेम्स स्टीफन एकदा तरुण मंडळीला उपदेश
करीत असतां म्हणाला, "
माझ्या उपदेशाचे सार एका वाक्यांत
सांगणे म्हणजे तुम्ही 'आरुरुक्षु किंवा उदयेच्छु व्हा' एवढेच आहे."
हा उपदेश खचितच अमोल खरा. पण उदय म्हणजे कशाला
म्हणावें? जे दृष्टीस पडेल ते आपल्या घशांत उतरून आपणच
फुगून बसणे किंवा आपल्या भोवतालच्या इतरां सर्वांस खाली
पाडून आपण वरचढ होण्याची उमेद धरणे याला उदयेच्छा म्हणूं
नये. असली इच्छा मोठी गर्हणीय होय. ईशावास्योपनिषदांत
म्हटले आहे, " मा गृधः कस्यचिद्धनम् "-म्हणजे अपहारबुद्धि धरूं
नको. लबक म्हणतो, खरी उदयेच्छा म्हणजे इतरांसह आत्मोत्कर्ष
चिंतणे हीच होय.
(श्लोकार्थ)
यस्मिन्जीवति जीवन्ति । बहवः सोऽत्र जीवति ॥ -हितोपदेश.
भावार्थ:-ज्याचे जीवावर अनेक पोट भरतात तोच जगला म्हणावा.
१०८
सुख आणि शांति.
[प्रकरण
जो दुसऱ्यांना तुच्छ मानितो, तो स्वतःच तसा आहे असे
खास समजावें. आकांक्षा मोठी असावी. सिंहाचे शिकारीची तयारी
ठेवावी म्हणजे निदान कोल्हें तरी हाती लागते. उडी टाकील तो
प्रसंगी बुडेल, चढेल तो पडेलही; तथापि, बनेल तो जपून यत्न
करावा, म्हणजे यश येईलच. परंतु काही आळसडे लोक समजतात
की, यत्न कशाला पाहिजे ? असेल आमचा हरि, तर देईल
खाटल्यावरी." पण हे बोलणे नादानपणाचे आहे. ज्ञात्यांचे सांगणे
आहे:-" बळेंच करणी करावी; आणि ओढून लक्ष्मी आणावी.'
हे म्हणणे योग्य.
साधु आगस्टिन म्हणे:
:-" लोभ आणि आकांक्षा ही नुसती
पापमूल नव्हत तर स्वयं पापरूपच आहेत. " हे म्हणणे खरे आहे;
परंतु या दोन शब्दांचा अर्थ थोडासा मर्यादित धरला पाहिजे.
एरव्ही, सदुत्कर्षाची इच्छादेखील त्याज्य म्हणावी लागेल. व
कुटुंबभरणार्थ न्यायाने द्रव्यसंग्रह करणे हेही निषिद्ध मानावे लागेल.
पण तसे करणे संसारी मनुष्यांस शक्य नाही. आकांक्षा तर पाहि.
जेच, पण ती कशी असावी ? स्वतःची व इतरांचीही उन्नति
करण्याची इच्छा धरणे ही योग्य आकांक्षा आहे. तुकाराम
म्हणतोः-
(अभंग)
आपण तरला नव्हे हे नवल।
लोकांतें तारील तोचि ज्ञानी॥
ज्ञानाचा जो मार्ग तोच शरीरबलाचाः-
-
४ थे.] आरुरुक्षा. १०९ “ . (श्लोकार्ध) स्वसंरक्षण, त्राण वा दुर्बलाचें । तिजें याहुनी चीज नाहीं बलाचें ॥ -सती ठाकुराणी. अथेनियन शिपाई प्राचीन काळी युद्धास जातांना अशी शपथ घेई की, माझ्या या पवित्र ढालीला मी डाग लावणार नाही. रणां- गणी माझ्या योद्धया बंधूला एकटा सोडून मी पळणार नाही. माझ्या देशांतील संपन्न किंवा असंपन्न अशी देवस्थाने व कुटुंबे यांचे परक्यांपासून रक्षण व्हावे म्हणून मी लढेन व आपल्या जन्मदेशाला मजमुळे कमीपणा येऊ न देतां यथाशक्ति चढत्या कळेस आण- ण्यासाठी झटेन." ही शपथ साम्राज्यांतील प्रत्येक जणाने ध्यानांत ठेवण्याजोगी आहे. आपले समकालीन व राष्ट्रबंधु यांची मान्यता संपादणे ही आकांक्षा स्पृहणीय आहे. बाकी अनिवार लौकिकतृष्णा कांही बरी नव्हे; ती मोहक तितकीच घातुकही आहे. सिसिरो म्हणतो, "दुरंत तृष्णा चांगली नव्हे, कारण, ती आपले स्पृहणीय स्वातंत्र्य हिरावते." ( आर्याचरण) आशाया ये दासास्ते दासाः सर्वलोकस्य ।। -सुभाषित. (श्लोकचरण) जया आस तो दास सर्व जगाचा । -शलनाथ-गटोत्तरी.
११०
सुख आणि शांति.
[प्रकरण
।
,
(श्लोकार्ध)
अतितृष्णा न कर्तव्या । चक्रं भ्रमति मस्तके ॥
-पंचतंत्र.
सत्ता हीदेखील अतितृष्णेप्रमाणेच पुष्कळदा अनर्थावह होते.
कारण, ती उन्माद आणिते व अखेर अधःपातास नेते. त्याचप्रमाणे
अनेक मनोविकार, उच्छृखल वृत्ति, भीरुता, आलस्य, विषयलंपटता
व क्रोध ह्या गोष्टीचाही उदयेच्छूनी त्याग केला पाहिजे.
( आर्या)
आलस्यं, स्त्रीसेवा सरोगता, जन्मभूमिवात्सल्यम् ।।
संतोपो भीरुत्वं पव्याघाता महत्त्वस्य ।। १ ।।
-हितोपदेश.
भावार्थः- आळस, वायकोची गुलामगिरी, रोगीपण, जन्मभूमीला
धरून बसणे, वितृष्णता व भित्रेपणा हे सहा उदयाला आडफांटे आहेत.
पुष्कळ माणसें श्रीमंत व समर्थ लोकांचा हेवा कारतात. ती
म्हणतात, "श्रीमतस्तु किमापदः?'' म्हणजे श्रीमंताला काय कमी ?
वाटेल ती वस्तु प्राप्त आहे, लहर लागेल ते करण्याचे सामर्थ्य
आहे, मग तेथे सुखाला काय विचारावे ? पण ही चूक आहे.
संपत्ति असली म्हणजे सुख असतेच असे नाही. शिकारीला गेले
असतां प्रत्यक्ष सावज हाती सांपडण्यापेक्षां ते मिळविण्यासाठी
कराव्या लागणाऱ्या धावाधावांतच गोडी अधिक असते. पर्वतीवर
जाणारास, टेकडीचे माथ्यावर पोंचून स्वस्थ बसण्यापेक्षां चढा-
ओढीनें पाय-या चढत जाण्यांत मौज अधिक वाटते, हा आपला
अनुभव आहे. जगांत जर सर्व गोष्टी अयत्नसिद्ध प्राप्त असत्या
१ थे.] आरुरुक्षा. १११ तर आयुष्यांतील अर्धी अधिक गंमत नाहींशी झाली असती. मोल्डस्मिथ म्हणतो, आशापूर्तापूर्वी मनचे मांडे असतात यथेच्छ खातां येतात, पूर्ति झाली म्हणजे ते बंद पडतात; व जें बरे-वाईट ताट पदरी पडेल त्यावरच तृप्त राहावे लागते.” गर्भ- संभव झाल्यापासून स्त्रिया ह्या भावी स्नुषादर्शनाचे सुखांत मिट- क्या मारीत असतात, व प्रसूत्यादि उदंड कष्ट त्या आशेचे जोरा- वर निमूट आनंदानें सोशितात. बाकी प्रत्यक्ष सूनबाई कधी कधी लाथाच देते ! सारांश, आशेचे गुंगीत जेवढें सुख आहे तेवढें आशापूति नाही, व म्हणूनच सदय परमेश्वराने आपल्या लाडक्या मनुष्याला बहुतेक वस्तु यत्नप्राप्य ठेविल्या आहेत. तुपाच्या लाल- चीने जसें उष्टेही पवित्र वाटते, तसे भावी फलाकांक्षेमुळे पूर्वगामी श्रमही गोड लागतात. पण, हे श्रम ज्यांना पडत नाहीत, त्यांना त्या हिश्शाचें सुखही वजाच पडते. आणि ह्यास्तवच, गर्भश्रीमं- तांना जरी पुष्कळ गोष्टी अयत्नतः अनुकूल असतात, तरी ती अनु- कूलताच त्यांना घातक होते. लोक त्यांना तात व त्यांची अदेखाई कारतात. मत्सरी लोक त्यांचा घात कर- ण्यास टपलेले असतात. अर्थापायींच त्यांस अनेक अनर्थ सोसावे लागतात. प्रतारणाकुशल असे धूर्त तोंडपुज्ये लोक त्यांना स्तुतीने भुलवून तोंडघशी देतात. शिवाय, याचक, मागतेकरी लोक त्यांना पुरेपुरेसे करतात. . याखेरीज, अनेक शुष्क कामी-सभा, परिषदा, मेजवान्या, नाच, तमाशे, पार्ष्या, खाजगी भेटी इत्यादि इत्यादिकांत-त्यांचा अमोल वेळ फुकट जातो. आणि थोरपणोच आयतोजी' म्हण-
११२
सुख आणि शांति.
[प्रकरण
-
पण फल
पायीं त्यांस अनेक चिंता आणि काळज्या टोचीत असतात. लो-
कांनामात्र दुरून भासतें की श्रीमंत ते सुखी आहेत. पण तुका-
राम म्हणता:-
अभंग-चरण)
ऐरावती रत्न थोर । त्यासि अंकुशाचा मार ।
शेक्सपिअर म्हणतोः
श्लोकचरण)
"राजास विश्रम तसा तिळमात्र नाहीं ॥"
श्रीमंताला पुष्कळ भोग्य वस्तु अनुकूल असतात.
काय ? त्यांचा अस्वाद घेण्याला अवश्य चित्तस्वास्थ्य ते कोठे
असते ? * बेकन म्हणतो, " राजे वगैरे मोठे लोकांची स्थिति
आकाशांतील ग्रहांप्रमाणे आहे. ते कालनियंते
असून
सर्वत्र
पूज्य
असतात, परंतु, त्यांना विसांवा मिळून नसतो. चालू पिढीला
गणिताचे परात्पर गुरु कै० केरूनाना छत्रे पेनशन घेऊन घरी
बसले असतां एकदां म्हणाले:-" लोकांना वाटते माझी चैन
आहे, काम ना धाम; पण खरी स्थिति उलट आहे. अभिप्रायार्थ
मजकडे इतके ग्रंथ येतात की, ते वाचण्याइतकें मला बळ किंवा
वेळ नाही. बरे, अभिप्रायास उशीर झाल्यास लोक लख्ख शिव्या
देतात की, 'रिकामपणी एवढेही करवेना का ?' शिवाय म्युनि-
* कादंबरीत बाणभट्टांनी शुकनासमुखाने राजपुत्राला वैभवाच्या
अनर्थीचे जे वर्णन दिले आहे, ते केवळ बिनतोड आहे; ते जिज्ञासूंनी
अवश्य वाचावें,
४ थे.] आरुरुक्षा. ११३ तें सिपालिटीचे नळसफाईचे काम मजवर हवालले आहे. दिवसा काम करीन तर 'कोणा मेल्याने ओइरा धुण्याचे वेळीच पाणी बंद केलें, कोण जाणे ?' म्हणून घरोघरच्या माउल्या मला शिव्या- शाप देतील, सबब मी हल्ली चांदण्या रात्रीं कंदील लावून नळां- तला गाळ काढवीत असतो ". नानांची थोरवी नानांनाच. नानांचे चरित्र साधुसंतांइतके आवडीने लिहिण्याजोगे असून तितक्या पूर्णतेने कोणी लिहीत नाही हे दुर्दैव आहे ! असो. इतिहास वाचून पाहतां मोठे लोकांवरच प्राणघाताचे प्रसंग विशेष. किती तरी राजे पदच्युत केले, परागंदा झाले, मारेक-यांनी मारले, जनतेच्या रोषास बळी पडले, विषादिकांनी प्राणास मुकले असें आढळते. सामान्यांच्या वाट्यास हे अनर्थ नाहींत. ठीकच आहे: (श्लोकार्ध) वर्धते क्षीयते चंद्रः । न तु तारागणः क्वचित् ॥ वृद्धिक्षय चंद्राला; गि-हा गिळणार चंद्रसूर्याला; क्षुद्र चांद- ण्यांना कोण पुसतो ? सारांश, 'वैभव तेथे सौख्य ' हे फारसे " ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥" हेच सत्य आहे. प्रसिद्ध फ्रेंच ग्रंथकार रूसो हा राजपुत्र लडविग ह्याला म्हणालाः म्हणालाः---" मी जर राजपुत्र होण्याइतका दुर्दैवी असतों, इ० इ०." जो जुलमी राजा दुसऱ्यास बंदीत घालतो, त्याचा स्वतःचाही जीव पिंजऱ्यांतच असतो हे खास. किंबहुना, तो अधिकच धोक्यांत खरे नसून
११४
सुख आणि शांति.
[प्रकरण
लबक
असतो. शिवाय, बेकन म्हणतो की, "जो फाजील हावेमुळे
उडी घालून पुढे धावतो, त्याला एखादी आकस्मिक ठोकर
लागली, की तो स्वतःवरच रुष्ट होऊन तोंड फुटल्यासारखा मठ्ठ
बसतो.” म्हणून इतकी लसलस बरी नाही.
मन प्रशांत व निष्कलंक असून बंदिवास बरा; परंतु, मन
चिंताग्रस्त असून मोठे दिव्य सिंहासन मिळाले तरी बरे नव्हे.
तशांतही हे सिंहासन ठकबाजीने किंवा प्राणघातादि पापकर्मांनी
संपादिलेले असेल, तर तेथे सुखाचें नांवच नको. या कामी
शेक्स्पिअरकृत 'मॅकबेथ' 'हॅमलेट' ही नाटके वाचावी.
म्हणतो, ज्ञात्यांचे म्हणणे आहे की, दडपशाही हा काही स्वास्थ्याचा
सदुपाय नव्हे, ते सर्वथा खरे आहे. प्रसिद्ध कवि सादी म्हणतो,
बाहुबलाचे जोरावर इच्छेची परिसीमा गांठण्याचा विचार
निव्वळ चुकीचा आहे."
(श्लोकचरण)
मनोरथानामतटः प्रपातः ।
-कालिदास.
किंवा-
मनोरथानामगतिर्न विद्यते ।
मनोरथांची धांव केवळ अकुंठ आहे. शिवाय उच्चस्थली चढून
जाणे कष्टप्रद आहेच; पण तेथील स्थितिही सचिंतच आहे. कारण
उंचावरून घडाडायला वेळ लागत नाहीं; व म्हणूनच मिल्टन
म्हणतो की, " कित्येक जण या पतनभयास्तव चढण्याचेच खवदवीत
-
१३.] आरुरुक्षा. ११५ -- पडत नाहीत. अवघड कड्याच्या धारेवर आपण उभे असलों म्हणजे खाली पडण्याचा धाक क्षणक्षणी उभा असतो. आणि असल्या उंचीवरून जर कां झोंक गेला, तर ठिकऱ्याच ठिकन्या होण्यास अंतर होत नाही." समाजांत तरी इतर सर्वांच्यावर डोकी उचलून ज डौलाने चालत असतात अशांचा कधी कधी असाच मासला होतो. रामजोशी म्हणतात:-- (लावणी) घोडा जाऊन खोडा येईल, बसेल एखादा धरमधका! आणि असे झाले म्हणजे, एक कवि म्हणतो:- (श्लोकार्ध) दूरारोहपरिभ्रंशविनिपातोऽहि दारुणः ॥ म्हणजे अति उंचीवर चढून जर कां घसरले तर तो विनिपात फारच भयंकर होतो. याकरितां दूरारोही आशामृगाचे मागें धांवत न सुटतां अल्पांत तुष्ट असावें; त्यांत सुख आहे. (श्लोक) यजीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैः । विज्ञान-विक्रम-यशोभिरभज्यमानम् ॥ तनाम जीवितमिह प्रवदंति तज्ज्ञाः । काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुंक्ते ॥१॥ -हितोपदेश. भावार्थ:-मनुष्याचे जगणे क्षणभरच का होईना, पण तें विज्ञान, शौर्य व यश यांनी युक्त असावें; म्हणजे त्यालाच खरें जगणे असें ज्ञाते म्हणतात. एरव्हीं कावळाही उंख्या खात असतो आणि दीर्घकाळ जगतो.
११६
सुख आणि शांति.
[प्रकरण
?
हे म्हणणे केवळ टाकाऊ नव्हे. तथापि असले भाग्य मिळ-
विण्याचे नादांत जर सुख, शांति, स्वातंत्र्य या सर्वांची होळी होत
आहे, तर त्या भाग्याला काय करावें? महमूद गिझनवीने हिंदु-
स्थानावर सारख्या स्वाऱ्या करून अपार संपत्ति नेली, व मरतांना
रत्नांच्या राशीकडे पाहून उसासा टाकला. म्हणजे इतकी संपत्ति
असूनही तो असुखीच राहिला. अशाने संपत्ति मिळवून तरी चीज
काय ? कित्येकांना अन्न खावयाला स्वस्थपणा नसतो. एवढी तरी
द्रव्यतृष्णा काय चांगली ? द्रव्याचाच न्याय सत्तेला. दुसऱ्यावर.
सत्ता चालविणे म्हणजे स्वतःला बांधलें व्हावेच लागते; म्हणजे
क्षेत्रफळ एकच झाले. समजा, आपण दुसऱ्याला बंदींत घातले
तर पळून न जावा म्हणून रखवाली राखावी लागणार. म्हणजे
विकत श्राद्ध घेऊन नसते सव्यापसव्य करीत बसण्यांतलेच आहे !
मॅडेम डी.स्टेल म्हणते,
पुष्कळ वेळा जेथे नांवलौकिक असतो,
तेथें सुखाचे नावाने अळं असेंच समजावें" बाकी तिचे हे
उद्गार "परोपदेशे पाण्डित्यं"पैकीच होते. ती कर्तीिसाठी हापापली
होती. मॉटरोजचा मार्किसही आपल्या एका प्रिय हृदयवल्लभेला
म्हणतो
तो
.
(श्लोक)
भीरू असो की गुणहीन होवो।
स्वत्संगी जो न धजेल रावो ॥
पनि तूतें पसरीन कीर्ति ।
लेखें, कृपाणे, तव मी दिगंतीं ॥१॥
५ थे.] आरुरुक्षा. ११७ । - मी तुझी दिगंत कीर्ति पसरीन. अर्थात् कीर्तीची लालसा बहु- तांच्या हृदयांत आहे. उलटपक्षी शेक्सपिअरचे 'आठवा हेन्री' या नाटकांत वुल्से हा क्रॉमवेलला म्हणतो:- (साकी) सोड सोड ही वैभवतृष्णा । ही न लेशसुखदायी ॥ देवदूतही भ्रंश पावले । या पापाच्या पायीं ॥ आहे शपथ तुला । तृष्णा न भली; सोड हिला ॥१॥ शिवाय, वैभव, मान व सत्ता यांचेपायीं पुष्कळदां आयुष्यांतील खऱ्या सुखाला मनुष्य मुकतो. तोच वुल्से तृष्णची निंदा करून पुढे दुःखितस्वराने म्हणतोः- पद (चाल-भला जन्म हा तुला०) राम राम अजि शेवटचा हा करितों नृपवैभवा ॥ न सोसे मजला त्याची हवा ॥१॥ मानवजीवित क्षणभंगुर हैं, रंग तेरड्या जसा । धरावा तेथ कसा भरंवसा ॥२॥ आशांकुर जे कोमल सुंदर नयना दिसती अजी। होति ते पुष्पित अल्पावधि ॥३॥ पाहुनि त्यांतें दंग होउनी, डुलतो सौख्यामधीं । मानितो 'धन्य धन्य' मी जगीं ॥४॥ आकस्मिक तो दुर्दैवाचे वारे सोसावुनी । मत्सम पाडी त्या उमळुनी॥५॥ घेउनि चुकलों पूर्णपणे मी या देहीं अनुभवा ॥ दुरोनी वंदन त्या वैभवा ॥६॥.
११८ सुख आणि शांति. [प्रकरण हा त्याचा विलाप अयथार्थ नव्हे. ज्याने परक्यावर आपलें पगड़ें चढविण्याची हांव धरिली तो शांतीला मुकला. ठीकच आहे, व्याप तेथे संताप उभाच. यास्तव ज्यांना शांत व सुयंत्र असा जीवितक्रम प्रिय असेल त्यांनी व्याप फार माजवू नये. सिनेका म्हणतो, "धरणावरून आकाशात उडी मारणे सोपें काम नव्हे. लाब्रुअरी नामक फ्रेंच ग्रंथकार म्हणतो, " या भूतलावर लोकमान्य- ता संपादण्याइतकें बिकट काम दुसरे कोणतेच नाही. त्याची पुरी वाट गांठली नाही तोच हे टिचभर आयुष्य निघूनदेखील जाते." याकरितां या नादी फारसें पडूं नये. ज्यावर त्यावर आपली छाप बसविण्याची तळमळ तरी काही चांगली नव्हे. उडी मारणे तरी फाजील उशीनें फेंकल्यास टिपण चुकून कोलमंडी- मात्र खावी लागते. लबक म्हणतो, लौकिक सत्ताप्राप्तीचे कच्छपी लागत बसण्याचे कारण नाही. शहाणपणाने व भलाईनें चाललें म्हणजे ती न बोलावितां आपण होऊन मागे लागत येईल. श्लोक सहसा विदधीत न क्रियाभविवेकः परमापदां पदम् ॥ वृणुते हि विमृश्यकारिणं ॥ गुणलुब्धाः स्वयमेव संपदः ॥१॥ -भारवि. भवार्थ:-जो विचारपूर्वक चालतो अशाला गुणलुब्ध लक्ष्मी स्वतःच होऊन माळ घालिते. नशिबावर हवाला देऊन भलतीच उडी टाकण्यापेक्षां नीतीचे व सद्गुणांचे अढळ' पायावर उभे असावें हेच श्रेयस्कर होय.
४ थे.] आरुरुक्षा. ११९ कोणतेही काम करा, त्यांत यश येण्यास सक्त व सतत प्रयत्न हा पाहिजेच. ' करनकन्याचा वसा घेऊन किंवा साठा सहा- मासी एकदां लक्ष पोचवून कोणतीही महत्कार्यसिद्धि होत नाही. शांत, सुदृढ, आणि एकनिष्ठ अव्याहत प्रयत्न चालेल, तरच सिद्धि करगामिनी होईल. कैलासदर्शन करून आलेले, 'हंस' ही सही करणारे गृहस्थ आपले प्रवासवृत्त सांगत असतां, त्यांच्या वज्रनिभ दृढनिश्चयामुळेच ते बर्फाच्छादित हिमगिरि तीस दिवसांत पायीं चढून त्याचेपलीकडे तिबेटांत गेले, असे वाटते. कारण त्यांज- पाशी स्वेन हेडिन साहेबांप्रमाणे उपकरणसामुग्री कशी ती नव्हती. बर्फावरून पाय घसरून कितीदां ते खाली येत. एकदा तर बर्फाची डगळी सरल्यामुळे ते १००० फुटांवरून खाली पडले. तथापि पांचसहा तासांनी शुद्धीत आल्यावर गाजींनी पुन- रपि गिर्यारोहण सुरूच ठेवलें, व अखेर असल्या उंच उच्चैःशिर- साच्याही माथ्यावर पाय देऊन ते गेले. तसेच मुद्रणकलेत केवळ अद्भुत शोध लावणारे प्रो० शंकर आबाजी भिसे हे म्हणाले, हा शोध लावण्यापूर्वी सतत दहा वर्षेपर्यंत रात्रीचे नऊ वाजल्या- पासून पहाटेचे दोन वाजतपर्यंत नित्य नियमाने मी विजेचे दिव्याशी, ' असे केले तर कसे जमेल, तसे केले तर कसें जुळेल,' या- प्रकारे भावी यंत्रासंबंधी कल्पविकल्प करीत बसत असें; तेव्हां ही युक्ति सिद्ध झाली." हाय शूर ! सिद्धि अशा बहाद्दराच्या कशी गळां न पडावी? सारांश, अविरत व अनाश्रांत प्रयत्न हेच सर्व सिद्धीचें वर्म आहे. शेक्सपिअर म्हणतो, रे १२० सुख आणि शांति. [प्रकरण , श्लोक होयमें उज्ज्वलकीर्ति राहे । आलस्ययोगें वरि डाग लाहे ।। कृपाण की खुटिस टांगियेला । शूरास आणी उपहास्यतेला ॥१॥ आपल्या पश्चात् आपल्या मुलांबाळांना एकादी इनामजहागीर किंवा गजान्त संपत्ति करून ठेवणे हे कांहीं प्रत्येकास साधेलच असे नाही. परंतु कुलवानपणाबद्दलचा लौकिक आपले सद्वर्तनाने कमावून तो आपल्या मुलांबाळांस मागे ठेवणे हे प्रत्येकाचे हाती आहे. सिसरो म्हणतो, " एकाद्याला हजारों लोकांपुढे उभे राहून बृहस्पतितुल्य वक्तृत्व करण्याचे किंवा रणांगणी युद्ध करण्याचे सामर्थ्य जरी नसले, तरी चिंता नाही; त्याला देवाने जेवढी शक्ति व बुद्धिमत्ता दिली असेल, तिचाच त्याने सदुपयोग केल्यास पुष्कळ कार्य होणार आहे. यास्तव प्रत्येकानें न्याय, मान्यता, औदार्य, मर्यादशीलपणा व नेमस्तपणा या गुणांचा अवश्य संग्रह करावा; म्हणजे याहून उंची गुण नसले तरी देखील त्यांचे उणेपण झांकून जाईल. आणि आपल्या मुलांना सद्गुण व सत्कृति यांचे वळण आपलेमागे ठेवणे हे विपुल पितृधनापेक्षाही अधिक आहे. यासाठी प्रत्येकाने सद्गुण व सदाचार यांची हानि जेणेकरून होईल असल्या वर्तनास सदैव भीत असावे. कोणीही मनुष्य कितीही दीन परिस्थि- तीत जन्मो, तो जर इमाने इतबारे आपले कर्तव्य नेटाने करीत राहील, तर त्याचे हातून काही ना काही तरी जगाचे कल्याण झाल्यावांचून राहणारच नाही. कारण जगत्कल्याणाचे रहस्य सद्वर्तन व सदुद्योग यांतच आहे; अपार सत्ता किंवा संपत्ति यांत ४ थे.] आरुरुक्षा. १२१ नाही. पुष्कळदां सत्ता किंवा संपत्ति दुर्जनांचे हाती पडते व तिचे जोरावर जगतांत ते घोर अनर्थ माजवितात. इतिहास पहावा तों सत्ता व संपत्ति यांचे उन्मादाने दुर्जनांनी दुनियेला फार गांजणूक केली आहे, आणि गरीब परंतु नीतिमान् अशाच लोकांनी जग- ताची स्थिति सुधारली आहे, असे आढळून येते. सत्ता व संपत्ति यांपायीं सामान्य जनांवर होणारे जुलुमांना त्रा. सून युरोपांत आजकाल " समुदयस्वत्ववादी किंवा सोशिआलिस्ट, नांवाचा एक नवा पंथ निघाला आहे. त्याचे म्हणणे समाजांत हा नवकोट नारायण आणि हा भिकारी, हा भेदच नको. राष्ट्राचे एकंदर संपत्तीवर सामायिक सत्ता असावी; म्हणजे कोणी कोणावर अरेरावी करावयास नको. लबक म्हणतो, हा मार्ग शहाणपणाचा नाही अशाने व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिसाहस यांचे पाय मोडतात. त्यामुळे उद्योग शिथिल होऊन धान्यादि अवश्य पदार्थांची निपज मंदावेल. शिवाय या पंथांत, संस्थानचे अधिकारीमंडळाची आज्ञा निमूट ऐकणे भाग आहेच, मग फळ काय? या मंडळाने आपणांस अन्नवस्त्र, घरधंदा ही सर्व पुरवावयाची म्हणजे आम्ही अर्थातच सांगितल्या कामाचे आणि घातल्या अन्नाचे-म्हणजे गुलामांपेक्षाही * आपलेकडे विष्णुबोवा ब्रह्मचारी यांनी आपले वेदोक्तधर्मप्रकाशांतही असलाच प्रकार सुचविला आहे. त्यांचे म्हणणें गांवची जमीन सर्वानी मिळून कसावी. येईल तें उत्पन्न एकाच कोठारांत सांठवावें व प्रत्येक कुटुंबाचे गरजेप्रमाणे वांटणी द्यावी.
१२२ सुख आणि शांति. [प्रकरण गुलाम झालो. अशा स्थितीत आम्हांस किंवा आमचे मुलांबाळांस रुचेल तो धंदा करण्यास सवड नाहीं; संस्थानचे किंवा स्थानिक मंडळाचे कामगार दाखवितील तोच धंदा उचलला पाहिजे. पण, अशाने राष्ट्राची अर्थवृद्धि, प्रगति व स्वातंत्र्य यांना खो मात्र येईल; दुसरे काही होणार नाही. सबब या सामायिक स्वत्ववादी पंथांत काही हंशील नाहीं. त्यापेक्षां धनमत्त लोकांचे जुलुमाला अन्य काही मार्गाने आळा घालन राष्ट्राचा उत्कर्ष किंवा प्रगति खास करितां येईल. जुन्या लोकांना प्रगतीची कल्पनाच नव्हती. जे काही चांगले, जें कांही उत्कृष्ट, ते आपल्या फार पूर्वीच होऊन गेलें, व आतां दिवसें- दिवस जग निकृष्ट होत जाणार असा त्यांचा समज होता. भरत- खंडांत ही कल्पना अजूनही दृढरूप आहे. जे काय चांगले होतें तें मागील युगांत होते. कलि म्हणजे बुडता पाया. परंतु ही समजूत घातक आहे. युरोपखंडांत ही समजूत यावत्काल चालू होती तावत्काल युरोपाचे पाऊल शास्त्रीय ज्ञानांत किंवा प्रगतीचे मार्गात मुळीच पुढे पडेना. आपल्या इकडल्या न्यायशास्त्र्यांप्रमाणे तिकडील मोठाले विद्वान् केवळ शब्दवादांत दंग असत. मेकॉले म्हणतोः शब्द, शब्द आणि शब्द." तूस कांडून हाती काय यावें? घाण्याचा बैल संध्याकाळपर्यंत फिरला तरी खोलीचे बाहेर मजल जात नाही. त्याचप्रमाणे हजार वर्षे जरी शब्दवादांत चकरा मारीत बसले तरी पुढे पाऊल कसे पडावे? अनुभव किंवा प्रतीतीवांचून काही तरी एक तत्व गृहीत धरावे आणि मग त्याबद्दलचा शाब्दिक ४३.] आरुरुक्षा. १२३ वाद घालीत बसावें, अशाने काय होणार ? युरोपांत मध्ययुगांत हाच बखेडा चालू होता; व तोपर्यंत अर्थातच प्रगतीचे नांवाने इकडल्याप्रमाणेच तिकडेही शून्याकार होता. पण पुढे मनु पालटून सृष्ट वस्तूंचे अवलोकन व अनुभव यांवर जेव्हां विद्वानांनी भर दिला तेव्हांपासून युरोपाची शास्त्रीय प्रगति सुरू झाली. ठीकच आहे; श्रीनृसिंहसरस्वती स्वामींनी म्हटले आहे: (ओवी-अर्ध) अमोल मोल तो अनुभव । ययाव्यतिरिक्त सर्व वाव ॥ -स्वात्मसौख्य. अनुभवाने ठरेल तेच पकें. त्याविरहित नुसते तर्कजाल उदंड माजविलें, फळ काय ? हक्स्ले म्हणतो; “तुम्ही कितीही भक्कम व सुंदर तर्कजाल पसरा, प्रतिकूल अनुभकाचे एके फटक्यास त्याचे धुडाके उडतात." आणि मग आपणांस जरी दुःख वाटले की 'अरेरे, कसलें सुंदर जाळे विणलें होतें!' तरी तें निरुपयोगी म्हणून फेंकून देणे भाग पडते. परंतु, जी गोष्ट अनुभवाचे चियावर ठोकून ठाकून घेतली, तिचे धुडके उडण्याचे भयच नाही. यासाठी प्रत्येक नवीन कल्पना उद्भवली की, ती अनुभवाचे-साक्षात्काराचे कसो- १(श्लोकार्ध) बहुशास्त्रकथाकन्थारोमन्थन वृथैव किम् ॥ -विद्यारण्य. भावार्थ:-उगाच शास्त्रीय शब्दांचे गोधडे चघळीत बसून निष्पन्न काय? साक्षात्काराचे खटपटीस लागा.
१२४ सुख आणि शांति. [प्रकरण . टीवर टिकवून पहावी, आणि मग ती वापरण्यांत आणावी. युरो- पाने ही साक्षात्कारपद्धति जेव्हांपासून अंगीकारली, तेव्हांपासून- मात्र त्याची शास्त्रीय प्रगति, मेकॉले म्हणतो, "जो बिंदु काल दिस- तही नव्हता तो आज दृष्टीचे पुरापूर टप्प्यांत आला व उद्यां तर पायाखाली पडला," या प्रकारे सारखी झपाट्याने चालू झाली व तशीच चालू राहणारही. आम्ही भारतवासी लोक बुद्धीने कमी नाही; परंतु, जोपर्यंत आम्ही आपली रबरी स्थितिस्थाप- कता सोडीत नाही, तोपर्यंत आमचे 'पहिले पाढे पढो पंचावन हीच दशा राहणार. सुदैवाने या कामी युरोपाचे उदाहरण डोळ्यां- पुढे आहे. त्याचे अनुकरण सर्वांतर्यामाने आम्ही केल्यास आम्हांसही आनंदाचे दिवस दुरावणार नाहीत. गत शतकांत युरोप अमेरिका खंडांत झालेली शास्त्रीय ज्ञानाची वाढ खरोखर तोंडात बोट घालण्याइतकी आश्चर्यकारक औंहे. तिच्या पायीं आकाशांतील गोलांचें केवळ वजन व मापच नव्हे, तर अंतर्गत घटना देखील समजून आली आहे. भूगर्भशास्त्राने मोठमोठे पर्वत, दरेखोरी, नद्या का व कशा निर्माण होतात हे कळून आले आहे. महानददेखील सेतुबंधनाने सुतर झाले आहेत. महो- दधीवरून जशी काय पायवाटच पडली आहे. प्रवासांत असली असली शीघ्रगतिक यानें-वाहने अनुकूल झाली आहेत की, त्यांचे * ही पुढील शास्त्रीय प्रगतीची प्रशंसा हिंदुस्थानाला जरी लागू नाहीं तरी तिचा फायदा हिंदुस्थानास अंशतः तरी मिळत असल्याने तिचे वर्णन वाचकांपुढे ठेविले आहे. .
४ थे.] 'आरुरुक्षा. १२५ साधनाने दूरदूरचे प्रदेशदेखील ओसरी-अंगण होऊन राहिले आ- हेत. विद्युत्प्रकाशानें चांदोबाची शेखी उतरली आहे. व्याधिग्रस्तांचे दुःख हलके केले आहे. आयुर्मर्यादा वाढविली आहे व एकंदरीत जीवित अधिक विलोभनीय करून सोडिले आहे. या शास्त्रीय ज्ञाना- नेच आम्हांस प्राचीनतम अशाही काळाचे समक् ज्ञान प्राप्त झाले असून भविष्यत्कालीं अशीच प्रगति चालत राहील असा विश्वासही उत्पन्न झाला आहे. रेनान नामक ग्रंथकार म्हणतो की, गतशतक मोठे मौजेचें होते. लबक म्हणतो, नुसतें मौजेचे म्हणणे बरे नाहीं; अत्यंत चित्ताकर्षक व फायद्याचे होते असे माझे मत आहे. त्यांत कस- कसले गूढ शोध व दिव्य कल्पना निर्माण झाल्या आहेत! अमि- रथ आणि अग्निनौका; तारायंत्र; किरणलेखन; धुराचे--राकेलचे- विजेचे दिवे; सौरप्रकाशाचे पृथक्करण; अंतर्हितवस्तुलेखन (X-rais); रोडियम किंवा कांतधातूसारख्या अनेक मूलभूत शुद्ध पदार्थांचा शोध; ध्वनियंत्र (टेलिफोन); ध्वनिलेखक यंत्र (फोनोग्रॉफ) हवेचे-विशेषतः जलजनक वायूचें -द्रावण; डार्विन साहेबाने लाव- लेले अगाध शोध; भूगर्भशास्त्राचे स्थापन; वेदनापहारक बेशुद्धीची औषधे; आयोडोफार्मसारखी शरीराचे सडणे बंद करणारी औषधे इत्यादि इत्यादि अद्भुत व अभिनव शोधांकडे पाहिले म्हणजे डोळे दिपून जातात. आधिभौतिक ज्ञानाप्रमाणेच नीतीचेही पाऊल पुढे आहे. उदार शिक्षण व अप्रतिबंध व्यापारपद्धति ही या नीति- प्रियतेची उदाहरणे आहेत. धार्मिक कल्पनाही बऱ्याच निवळत ..
. १२६ सुख आणि शांति. [प्रकरण चालल्या आहेत. भुतेखतें, चेटके यांवरील विश्वास युरोपांत फार दृढ होता; तो बहुतेक नष्ट झाला आहे. तसेंच कलाकौशल्य व सामान्य वाङ्मय यांनाही उदंड भर पडली आहे. या भौतिक शास्त्रांवर कोणाकोणाचा आक्षेप असा आहे की, ह्यांचे व्यासंगाने बुद्धि अरसिक व मंदकुतूहल होते; परंतु हे खरे नव्हे. भूगर्भ- शास्त्राने विश्वकर्त्याचे कृतीतील जी अद्भुत कौतुकें निदर्शनास येत आहेत, त्यांपुढे मोठमोठ्या कवीचे कल्पनेचीही भरारी थंड पडेल. ज्वालामुखी पर्वताचा उद्भव कसा होतो तें आजकाल समजून आले आहे, तिकडे लक्ष दिले म्हणजे सृष्टिकौतुकाने मन वेडेच होऊन जाते. गतशतकाचीही कर्तबगारी पाहिली म्हणजे या चालू--विसाव्या- शतकांतही असाच उदय होईल, अशी उमेद आहे. लॉर्ड डर्बी, म्हणणे " झाली ही शिकस्त झाली आहे; आतां पुढें कोठे जाणार?" पण, लबक म्हणतो, मला हे रुचत नाही. कारण, आपल्याला जरी आपले ज्ञान अफाट वाटत असले तरी निरभिमानपणे बोलू गेल्यास या अनंत विश्वांत भरलेल्या ज्ञानापैकी 'खंडीत पाव रती' देखील हाती आले नाही. फार कशाला ? जगांतील कोणताही एकच पदार्थ घ्या; एकादी वनस्पति घ्या; तिचेच यावद्गुणधर्म कोणाला कळले आहेत ? आपलेसभोवार असल्या काही अतय॑ गूढशाक्ति भरलेल्या आहेत की, त्यांचे आपणांस स्वप्नदेखील नाही. आपण चमत्कृतिपूर्ण अशा विश्वांत उभे आहों. अजून आपण काय बोलतों याचादेखील पुरापूर अर्थ आपणांस समजत नाहीं; मग ईश्वराची ५ ..] भारुरुक्षा. १२७ . बोली दूरच राहिली. तथापि, आला तो दिवस अधिकाधिक समर्थ व तीव्र अशी यांत्रिक साधनसामुग्री आम्हांस प्राप्त होत आहे, व तीमुळे अधिकाधिक विद्वान् शोधांचेमागे लागत आहेत, व आज अंधुक असलेली गोष्ट उद्या अधिक व्यक्त होत चालली आहे, अर्थी ज्ञानाचा प्रकाश पसरत जाऊन आम्हांला पुढे पुढे वाट दिसत जाईल. एक डोंगर चढून गेले म्हणजे पूर्वी त्याने व्यवहित असलेला भूप्रदेश आपल्या डोळ्यांपुढे येऊन पुनः पलीकडील नवेच डोंगर दिसू लागतात, तसाच प्रकार या ज्ञानाचे यात्रेत होतो. अर्थात् , आमची गति एका डोंगराशी आल्याने कुंठित झाली नाही. तिचा अधिकाधिक प्रसार होणे शक्य आहे, हाच सिद्धांत. लबक म्हणतो, आजकाल आमचे मुलांचे शिक्षण मोठमोठ्या समर्थ व शास्त्रीयज्ञाननिष्णात अशा अध्यापकांचे हातून होत आहे. शिवाय दिवसानुदिवस हरप्रकारे सोई व साधनें ह्यांची वाढ होत आहे. प्रवास सुलभ व सुखकर झाल्याने ज्ञानाला व चातुर्याला भर घालणान्या गोष्टींतील प्रमुख में पर्यटण तें सुसाध्य झाले आहे; त्यामुळे दूरदूर देशी जाऊन तेथेही शिक्षण घेता येते. या सर्व गोष्टींचा विचार करितां शास्त्रीय विज्ञानाचा याहूनही अद्भुत उत्कर्ष होणार आहे असा माझा खास अंदाज आहे. आणि हा खरा झालेला, पुढील पिढीचे अनुभवास खचित येईल. शास्त्रीय ज्ञानाने आम्हांस दीर्घायुषी केले आहे. वेदना कमी करून रोग- राईही बहुतेक नष्टप्राय केली आहे. जमिनीचा सुपीकपणा वाढवि. ला; दर्यावर्दी लोकांचे धोके कमी झाले; शूर शिपायांस नवीनच १२८ सुख आणि शांति. [प्रकरण शस्त्रास्त्रे मिळाली आहेत; मोठमोठ्या खाड्या, नद्या, नद, यांवर सेतु बांधले आहेत; आकाशांतील उल्का निमूटपणे भूमीत दवडली आहे; काळोख्या रात्रीला पौर्णिमेचे ऐश्वर्य दिले आहे. चर्मचडूंची (दुर्बिणीचे साह्याने ) अनंत अंतराळांत धांव पोचविली आहे. मनुष्याचे शारीरबलही प्रगुणित केले आहे. गतीची त्वरा फार वाढली आहे; अंतर जणूं नाहींसेंच झाले आहे. परस्परपत्रव्यवहार, व्यापार, दळणवळण फार सुलभ झाले आहे. अगाध समुद्राचे तळी जाणे, किंवा अनंत आकाशांत पक्ष्याप्रमाणे उडणे, खोलखोल भूविवरांत निर्बाध प्रवेश करणे, अश्वरहित रथांतून वायुवेगाने भूपर्यटन करणे, व तासांत दशयोजन गतीने वायूचे उलट दिशेनेही समुद्रांतून हिंडणे, ह्या गोष्टी केवळ करतलामलकवत् स्वाधीन झाल्या आहेत. शास्त्रांत ज्ञानाला निर्झराची उपमा दिली आहे; ती योग्यही आहे. तीवरून पाहता असे दिसते की, निर्झराप्रमाणेच ज्ञानप्रवाह पुढे पुढे वाहत राहील तितका तो स्वच्छ व निर्मल होत जाईल. आणि तोच कोंडून पडेल तर नासून जाईल. याकरितां आपले शा- स्त्रीय ज्ञानाचा प्रवाह अखंड अधिकाधिक वाढता राहणे इष्ट आहे; शास्त्रीय ज्ञानाचा अद्भुतपणा यक्षिणीचे कृत्याहूनही अधिक आहे, व कादंबरीपेक्षाही मोहक आहे. जो जो हा प्रवाह पुढे पुढे जाईल तो तो त्याचे तळी दिव्य दिव्य रत्ने निपजू लागतात; व ज्यांची कधी कल्पनाही नव्हती असल्या अपूर्व मौजा दृष्टीस येतात. आयुष्य हे एकाद्या बगीच्याइनही आरामशीर वाढू लागते व त्या-
४ थे.]
आरुरुक्षा.
१२९
मुळे जिवाला हुशारी येऊन अधिकाधिक उद्योग करण्यास हौस
येते. असे अनेक फायदे ज्ञानवृद्धीपायीं होत असूनही जे कोणी
ज्ञानाची उपेक्षा करीत असतील ते परमकारुणिक व उदार परमा-
स्म्याने मनु यास दिलेली एक अद्भुत देणगी उकिरड्यावर फंकन
देत आहेत. असें दुःखान म्हणावे लागते.
शास्त्री ज्ञानाचे आम्ही इतके कौतुक गातो खरे; परंतु, या
जाना ना झावास माती एका कवीने म् टलें आरे
या। सतन पंजरशुकालापेन कोतहलम् ।
मा. ल्या कोलकपणाचे माजराला कौतुक नही, त्याची
मतया मनुप्याने दूर अंतराल जवळ आणण
न्य सुविणी ! शोध लाविला. त्याला कारागृह वा सा
अक्षि ने सूक्ष्मदशकयंत्रद्वारे भूगाचे निरीक्षण
कले. तो दहमा केला जाऊन अन्नअन्न करून मेला ! ही तर
या नई जाति ज्ञानासारख्या सद्रस्तची दशा आहे. तथापि
आपले पोटांत अपार संपत्ति व माल घेऊन
समुद्रातून परतीराला गांटणारे समुद्रयानाबद्दल जर जगास कौतुक
वाटते, तर या सनातन कालसमुद्रावरून, पोटांत अनंत विचित्र
रत्न घेऊन अखंड चालत राहणारी व गत आणि आगामे अशा
अति दूर कालांची भेट करविणारी ही ज्ञानरूपी नौका निखिल
जनांस प्रेमास्पद व कौतुकाधानहेतु व्हावयास नको काय ?"
.
१३० सुख आणि शांति. [प्रकरण लबक म्हणतोः शास्त्रीय विज्ञानाचे हे महत्त्व ध्यानांत वागवून आपण त्याचा पुरस्कार अगत्य केला पाहिजे. तेणेकरून ज्ञानाची प्रगति होऊन आपले सुखांत भर पडेल. तथापि, मानवी जातीची जी खरी खरी उन्नति ती केवळ शास्त्रीय प्रगति ही नव्हे. व्यापा- राची आयात-निर्यात पुष्कळ वाढली; धंदा-उदीम, यांत्रिकशक्ति बळावली; आगगाड्या, तारायंत्रे देशभर पसरली; देश पादाक्रांत करून आमचे राज्याला जोडिले, तरीही त्याने आमची खरी खरी उन्नति झाली असे म्हणता येत नाही. कोणत्याही राष्ट्राची खरी उन्नति म्हणजे त्यांतील प्रत्येक व्याक्त सत्त्वशील, आनंदी, थोर मनाची व परहितनिरत होणे यांत आहे. तुकारामाने म्हटले आहे:--" भूतदया ठेवा, मग काय उणें । प्रथम साधन हेचि असो ॥" अर्थात् , आपल्या राष्ट्रांत वरील गोष्टी व्यक्तीचे अंगीं उदाहरणाने व उपदेशाने आणण्याविषयीं झटून यत्न करणे, याहून श्लाघ्य व पवित्र कार्य कोणतेही नाही. हे जो कोणी महात्मा करीत असेल, त्याला याहून अधिक स्पृहणीय अशी दुसरी वस्तुच या जगांत उरली नाही.
entetettetett titetet
प्रकरण पांचवें.
संतोष.
PPPPPR
tetit etett tut. इंदवच्छंद-सवाईच्या चालीवर.) जो दश वीश पचास भये शत, होइ हजार तु लाख मगैगी। कोटि अरब्ब खरब्ब असंख्य, धरापति होनकी चाह जगैगी। स्वर्गपतालकु राज करौ तृसना अधिकी अति आग लगेगी। सुंदर एक संतोषबिना सठ, तेरि तूं भूख कधी न भंगैगी॥१॥ सुंदरदास. भावार्थ:--पदरी जेव्हां दहा रुपये झाले तेव्हां विसांची आशा करूं लागला. वीस झाले तेव्हां पत्रासांची. याप्रमाणे शंभर, हजार, लाख, कोटि, अब, खर्व,-अगणित पैशाची इच्छा होऊ लागली. पुढे भूलोकचा राजा व्हावेसे वाटले. भूपतित्व मिळाल्यावर स्वर्ग व पाताळ यांचंही राज्य मागू लागला; तरी तृप्ति नाहींच. मुंदरदास म्हणतात, आग लागो या तुझ्या तृष्णेला! अर मूर्खा, असें करशील तर तुसी ही भूक कधीच पुरी होणार नाही. याकरितां संतोष ठेव म्हणजे सर्व हांव मिटेल.
प्रकरण पांचवें. संतोष. (श्लोक) संतोषामृततृप्तानां । यत्सुखं शांतचेतसाम् ॥ कुतस्तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम् ॥ १ ॥ -हितोपदेश. भावार्थ:-~-संतोपरूपी अमृताचे पानानें तृप्त झालेल्या शांतवृत्तीचे लोकांस में सुख आहे, ते द्रव्यामागे लसलस करीत भटकणाऱ्या हांव- यांना कुठून बरे मिळणार ? (श्लोकार्ध) जरी तूजला इष्ट तें प्राप्त नोहे। तरी प्राप्त ते इष्ट मानोनि राहें । ---बुशी राबटिन. या गोलार्धात या वेळी चंडरश्मी सूर्य कितीही प्रखर तपत असला तरी दुसन्या अधात याच वेळी निबिड तम असणे नवल नव्हे. नवल नव्हे इतकेच नव्हे, तर अवश्य प्राप्त आहे. कारण, या सापेक्ष व समर्याद जगताची घटनाच अशी आहे. प्रकाश म्हटला की काळोख आलाच; शीत म्हटले की उष्ण आलेच; रात्र म्हटली की दिवस ठेवलेलाच. अशी येथें जबरदस्त भाऊबंद- की आहे. या द्वंद्वांचे मिठीपुढे प्रत्यक्ष देवाचेदेखील काही चालत १३४ सुख आणि शांति. [प्रकरण नाही. सृष्टीचा हा केवळ स्वभावच आहे. तेथे बिचारा विधाता तरी काय करितो? म्हणच आहे, 'स्वभावो दुरतिक्रमः.' प्रभु रामचंद्र म्हणतात:-- (श्लोक) सुखमध्ये स्थितं दुःखं । दुःखमध्ये स्थितं सुखम् ॥ द्वयमन्योन्यसंपृक्तं । प्रोच्यते जलपंकवत् ॥ १ ॥ :-वा लक्ष्मणा, या जगांत सुखदुःखांचे साहचर्य चिखल आणि पाणी यांसारखे आहे. पिंडार म्हणतोः--सुख व दुःख यांच्या लाटा या मानवी शरि- रांत सारख्या मागे-पुढे हेलकावत असतात. पण असे आहे तरी समर्थांनी म्हटले आहे त्याप्रमाणे " सुखें राहतां सर्वही सूख आहे". लॅसिडेमॉन या गांवीं एकदां एक पाहुणा आलेला गृहस्थ मुद्दाम मोठी चट्टीपट्टी करीत बसलेला पाहून डायाजेनीज या प्रसिद्ध ज्ञात्याने त्याला विचारले, 'कां आज इतकी छानीशी? ' पाहुण्याने उत्तर केलें, आज आम्हांस मेजवानीला जावयाचे आहे'. तें ऐकून तत्त्ववेत्त्याने हटकलें, भल्या मनुष्याला प्रत्येक दिवस मेजवानीचाच नाही काय?' मोरोपंतांनी पुण्यश्लोक नळराजाचे वर्णन करितांना म्हटले आहे:- (आर्या-चरण) लोकां महोत्सवप्रद तोचि, तयां अन्य पाडवा नलगे । लबक म्हणतो, जगत् जरी द्वंद्वात्मक असले तरी ज्ञात्याला हे जगत् म्हणजे खरोखरच नित्य नवी चमचमीत मेजवानी आहे. .
५३.] संतोष. १३५ - कारण, हे जगत् म्हणजे एक अद्भुत व अत्यंत रमणीय असें मंदिर आहे, आणि मनुष्याने हाताने घडलेल्या दगडी मूर्ति पहात बसण्यापेक्षा जो कोणी या विश्वमंदिरांत त्या अजब कारागिराने स्वहस्ताने ठिकठिकाणी स्थापिलेल्या आत्मविभूतिरूप सूर्य, चंद्र, नक्षत्रे, नद्या, नद, भूतधात्री व रत्नगर्भा धरित्री, इत्यादि देवता पहात बसेल, त्याला सकल दुःखांची विस्मृति पडून त्याची तहान- भक नाहीशी होईल; व तो अखंड सुखांतच मग्न होऊन जाईल, बांत संशय नाही. योग्याबद्दल म्हटले आहे की, यत्र यत्र मनो याति । तत्र तत्र समाधयः , त्याचप्रमाणे ज्ञानी मनुप्य या विभूतिमय जगतांत दृष्टि लावील तेथेच त्याची समाधि लागेल, इतके हे रसपूर्ण आहे. परंतु, पहावें तो जगतांत शेकडों हजारों लोक देवाचे नांवाने धोंडा घालीत असतात, व जगत् हे कष्टमय आहे म्हणून कोकलत असतात! आणि सर्वदा हातपाय मोडल्या- सारखे निराश बसतात. याला काय म्हणावे ? या विश्वांत किती तरी आनंद भरला आहे, हा त्यांना होऊन कळत नाहींच; पण दुसरा कोणी त्यांची समजूत घालं लागेल तर त्याचाही ते कंटाळा करितात. तेव्हां मात्र अशांना पाहून " अंधस्य दीपो बधिरस्य गीतं । मूर्खस्य किं शास्त्रकथाप्रसंगः ॥' म्हणजे अंधाला दिव्याचे, बहिन्याला गायनाचे व मूर्खाला शास्त्रज्ञानाचे काय होय ? या म्हणीचे स्मरण होतें.. बरें, अशांना आम्ही विचारितों की, हे जगत् व हे तुमचे जीवित कष्टमय आहे ना? मग तुम्ही मरावयास तयार आहां का?
१३६ सुख आणि शांति. [प्रकरण , तेवढेमात्र त्यांना कबूल नाही. असें कां असावें? जगत् दुःखमय आहे हे त्यांचे म्हणणे जर खरे असेल, तर त्यांनी ते सोडण्यास उद्युक्त असलं पाहिजे. आणि ज्या अश्रा ते नाहीत, त्या अर्थी उन डच जीवितांत सुख आहे, गोडी आहे, रस आहे, हेच सिद्ध झालें, सबसे जीव प्यारा है " पण कथा-कादंबन्यांत, काव्य-नाटकांत वाचावें तो जीवित दुःखमय आहे म्हणून ठिकठिकाणी कुरकर आहे. तुकाराम म्हणता:-..' सुख पाहतां जवापा, दुःख पर्वता पवढे।" संस्कृतावरून के० किलम्किर गातात: 'निःसारा संसा- रो नच सुख, होय सुखाची भ्रांति ।। कोणी · जग है बामळीचे बन, विंचवांचे तळे, गडद अंधारी गुहा,' असे म्हणतात; व अशा अगांतील आयुष्याचा एक एक दिवस म्हणजे दु:खाची लांबण असे त्यांना वाटते. काहींचे म्हणणे- (माक्या) खाया, प्याया, छाया, ध्याया, । असल मुबला पसा। तरि मग सुंदर भामे जग है। आम्हां न दुजी आशा ।। ।। परि भिक्षाशन अथवा या चन । अथवा धन तुटपुंजी ।। नको नको नरि दुष्ट जगत हैं । जीव येतसे रंजी ॥ २ ॥ पर्कास म्हणतो, एक तर जन्मच नको; आलाच तर दीर्घा- युप्य नको." सालोमन हा नाणावलेला शहाणा व परमेश्वराचा इतका लाडका होता, पण तोदेखील म्हणतो, मला जीविताचा निटकारा आहे. कारण, हे सर्व मिथ्या असल्याने येथे केलेले श्रम केवळ दुःखरूपच आहेत. शिवाय आयुष्य अल्प असल्याने, । , ५ वें.] संतोष. १३७ .. : मी मर मर मरावं आणि माझ्या श्रमांचें फळ भलत्यांनी खावें ! काय फायदा? सारांश, मनुष्याला या मायामय संसारांत सुख मिळून नाही. निद्रेत देखील त्रास आहे.' लॉर्ड बेकन्सफील्ड म्हणतो, ' बापहो, ज्वानी हा फजिता आहे, मध्यवय ही लढाई आहे व वार्धक्य हा पावा आहे.' अंमळ सुखाचेसे दिवस म्हणजे बाळपणचे. ते को गले म्हणजे एक एक दिवस मुख अधि- काधिक दुरावत जाऊन नाक! तर मुग्नशून्यच होते. काहींचे म्हणणे तारुण्य हा वसंत व वाक्य हा मंतकाल आहे. शेक्सपिअर म्हणतो: (प) नरुग-थेरडा यांचा जोडा की सुखाने नांदनः । नारुण्याचा वार्धक्याचा तुल पभाव हा साधेना ॥ ध्रु० ॥ तरुण लढाऊ, कृपग थेरडा । नरण गुलाबी, खल्लड बुडा । तरुण खिलाडू, द लंगडा । गरम तरुण तो अणि रंगेला । वृद्ध तो आणी दुबळ । जाट शिथिल तर तरुण चळवळा कविवर बोल यांची तुलना । कशी करावी मज समजेना ॥१ याशिवाय अन्य स्थलीही शेकक्सपिअरचे उद्गार वार्धक्याची निंदा सुचविणारे आहेत. आमचे भतृहरिही म्हणतातः ( श्लोक) गालं संकुचितं, गतिर्विगलिता, भ्रष्टा च दंतावलिः । दृष्टिनश्यति, वर्धते बधिरता, वक्त्रं च लालायते ।। अर्थप्रार्थनशंकया न कुरुतेऽप्यालापमानं सुहृत् । हा कष्टं! पुरुषस्य जाणवयसः पुत्रोऽप्यमित्रायते ॥१॥ । थंड १३८ सुख आणि शांति. [प्रकरण , भावार्थः-शरीर आंखडलें, गति मंदावली, दांतांची कवळी कोसळली, दृष्टि गेली, बहिरेपणा वाढला, तोंडांतून लाळ चालली. अर्थयाचनेचे भयाने स्नेही बोलतनासे झाले. हर हर ! अधिक काय सांगावें, पण वृद्ध- वयांत पोटचा पोरदेखील पुरुषाचा तिटकारा करितो. कबीरसाहेब म्हणतात:- (पद) बुढपनमा कांपन लागा। निकल गया अवसान । अब तुम कब समरोगे राम । जिवडा दो दिनका जजमान. म्हटलें असतां बायरन कवि हा गुलजार; पण तोदेखील वार्धक्याचा कंटाळा करितो. माझा छत्तिसावा वाढदिवस' या नांवाच्या कवितेत तो म्हणतोः (साकी) झालों पिकलें पान अतां मी। बहर उलगला ज्वानीचा । प्रीतिपुष्प ते गळुनी गेलें । किडा लागला चिंतेचा ॥ १ ॥ अन्यत्रही तो या मनुष्यदेहाविषयी म्हणतो- (श्लोक) देहक्षेत्रा काल हा नांगरूनी। चिंताबीजें देतसे पाभरूनी ।। अंती मृत्यू सर्व जीवां नियंता । कापूनी ते क्षेत्र, दावी स्वसत्ता ॥ १ ॥ जोबर्टचे मतें आपले आयुष्यातील बाल्य व वार्धक्य हे दोन भागच अत्यंत श्रेष्ठ होत. पहिल्यांत व्याप आणि संताप हे नस. ल्याने सर्व आनंद असतो; व दुसन्यांत विवेकाचे सुख असते. ।
५३.] संतोष. १३९ - बाकी या दोन अवस्थांतील सुखांत एक भेद आहे. बाल्यांतलें सौख्य परायत्त असते; वार्धक्यांतले स्वायत्त असते. आईबापें खातींपिती व संगोपनदक्ष असली म्हणजे बाल्य विशेष सुखावह होते. प्रभु रामचंद्रही अशा बाल्याची आठवण करून म्हणतात- (श्लोक) जीवत्सु तातपादेषु । नवे दारपरिग्रहे । मातृभिश्चित्यमानानां । ते हि नो दिवसा गताः ॥ १॥ उत्तररामचरितम । भावार्थः-अरेरे, आमचे ते पोरपणाचे मौजेचे दिवस गेले ! त्या दिवसांची मौज काय वर्णावी ? बाबा जिवंत होते, नुकतेच लम झाले होते आणि आमची सगळी काळजी मातोश्री वहात असल्यामुळे आम्ही खुशालचेंडूप्रमाणे उड्या मारीत असू. पण ते दिवस आतां गेले, म्हणून खेद होतो. बाल्याच्या या सुखदायित्वावरून कोणी कवि त्याला आयुष्या- च्या कालांतील मधुमास असें म्हणतो. तें ठीकच आहे. लबकचे मते शैशव, तारुण्य, मध्यवय व वार्धक्य या चारही अवस्था आपआपल्यापरी सुखदच आहेत. मात्र त्या त्या अवस्थेला अनुरूप अशी स्थिति असली पाहिजे. ज्या घरांत कज्जेकफावती नाहीत, आईबापें प्रेमळ व दक्ष आहेत, मूल स्वतः प्रकृतीने निरोगी व सणसणीत असून त्याचा वाढता जोम आहे व आला तो दिवस त्याचे मन या अपरिचित सृष्टीतील मौजा पाहण्यांत रमत आहे, अशा स्थितीचे बाल्य खरोखरच स्पहणीय होय. नवीन कल्पने- .
१४० सुख आणि शांति. [ प्रकरण चा परिचय होणे हे एक अप्रतिम सुख आहे. व बाल्यांत सर्व जगच अपरिचित असल्याने नित्य नव्या कल्पना व मोजा यांचा सुकाळ असतो. यापरी बाल्य सुखावह झाले. आतां, तारुण्य अधिकच सुखमय आहे कारण, बाल्यांतील सुख मुग्ध किंवा मुक असते. पण तारुण्यांत समजत प्रगल्भ झाल्याने आपल्याला हे चमत्कारपूर्ण विश्व अधिकच मुख देते. पोराने ग्रहनक्षत्र कडे त्याला फक्त नेत्रानंदच होईल. परंतु प्रौढवयाने पाहिले, तर त्याला त्या अद्भुत तेजोगोलांची घटना, गति, कार्य वगैरे अवांतर गोष्टी कळल्याने त्याचे अंतरंगही आनंदाने उचंब- ळून येऊन त्याने नेत्र, पोगप्रमाणे त्या ज्योतींवरच स्थिर न राहता, ज्योतिषामपि यज्योतिः।' असे ज्याला म्हटले आह त्या दिव्य मृष्टिकयाकडे स्नेह व पूज्यभाव यांनी प्रेरित होऊन लागतील आणि असलं हैं विचित्र विश्व आपल्या उपभोगार्थ दयाळ देवानें निर्मिले आहे हे कळले म्हणजे तर गुदगुल्याच होतील; व असल्या लाभांचे आपण चीज करून दाखवू अशी त्याला उमेद चढेल. त्याचेपुढे मध्यावस्था आली समजा. या अवस्थेत शरीरबल पूर्ण असते. जगत् हे एक गमतीचे कोडें आहे, व त्यांत येणारे प्रसंग ह्या आपल्या किंमतीच्या कसोट्याच आहेत व संकटें ह्या सूचना आहेत असे मनुष्याला कळले अस- ल्यामुळे तो परमेश्वराचा संकटांतही सद्धेतु ओळखून विश्वस्त असतो. व शिवाय या अवस्थेत त्याला प्रभु रामचंद्रांचे म्हणण्या- प्रमाणे:-
५३.]
संतोष.
१४१
(श्लोकार्ध)
त्वं जीवितं, त्वमसि मे हृदयं द्वितीयम् ।
त्वं कौमुई। नयनयोरमृतं त्वमंगे।
...६ दशम
नं जाय, तृदय, → मजला विसांवः ।
मोदकाच नयना, सिरः सुधा का ॥
4 में मनायेच समागममुख प्राप्त असते,
या तर भागीदारी पर्ण असते. श्रापि, या
तीनही पक्षा सुखावह अवस्था मा पद्धा माया होय.
वयाचा जर आपण सद्या केली जमल, शादी अवस्था
कारन बहामनी असो, या साप मिटला
अन, कला, १ का प्रयोग असतातस्वत.
भीमन हात असतात.
म साह । स्वस्थ
आ. व...... माया गुरुपाय केला;
स्वाथ, पथ, १. साम दीनदुःग्वितांस
साह्य करून मन लानी में मुरमा अलप तरी भर घातली; असले
सद्विचार मनात यं भरतात. यामुळे मन म्वानंदपुष्ट असते.
स्वदोषाने कोणी घाण कगर र बंगपरहीं वार्धक्य सुखी
असणे अशक्य नाही.. आता, वार्धक्य म्हणजे मृत्यू! उपान्त्य
अवस्था असल्यामुळे पुष्कळांस त्याचा बाऊ वाटतो. परंतु अनंतर
मृत्यु असला म्हणून तेवढ्याने वार्धक्याचे सुखांत विरजण पडण्य
१४२ सुख आणि शांति. [प्रकरण ग , कारण नाही. आपण जर 'देवा, तुझें सान्निध्य आम्हांस मिळो' म्हणून नित्य देवाची प्रार्थना करितो तर मृत्यु ओंगळ व भयप्रद कसा वाटावा ? शिवाय, चारुदत्ताने म्हटले आहे: (श्लोकार्ध) विशुद्धस्य हि मे मृत्युः । पुत्रजन्मसमः किल ।। -मृच्छकटिकम् । भावार्थ:-मी निष्कलंक आहे तर मृत्यु हा मला पुत्रोत्सवच आहे. त्याप्रमाणे पुण्यवंताला मृत्यु हा बागुलबोवा नसून आनंदच असतो. तेव्हां तो वार्धक्यासन्निध असला म्हणून वार्धक्य नीरस मानण्यास जागा नाही. शरिरास जरा न येऊ देणे हे आपल्या स्वाधीन नाहीं; पण, मनाला जरा येऊ न देणे हे आपल्या हातचे आहे. असे अस- तांना, गेटी म्हणतो की, पुष्कळ लोक राजपुत्र हॅमलेटप्रमाणे खिन्न व चिंतातुर असतात. बाकी राजपुत्राप्रमाणे त्यांचेमागें कांहीं भूत लागलेले नसते, किंवा त्यांना पित्याचे मृत्यूबद्दल सूडही घ्यावयाचा नसतो. पण त्यांचा स्वभावच तसा. शंभर दुःखोद्वार काढण्याचे श्रम करण्यापेक्षा एकवार मधुस्मित करणे हे अधिक बरें.” शेक्सपिअरचे ऍझ यू लाइक इट नामक नाटकांत खेदी जेकीस रोझालिंडला म्हणाला, ' मी पुष्कळ फिरलों, त्या- वरून मी या जगताविषयी सर्वदा खिन्न असतो'. त्यावर रोझा- लिंडने खुबीने उत्तर केलें, 'हं! एकूण जग हे खेदमय आहे हाच आपला अनुभव ना? आणि हा पैदा करण्याकरिता आपणांस --
५३.]
संतोष.
१४३
4
इतकी तंगड्यातोड करावी लागली आँ ? धन्य आपली! असला
अनुभव संपादण्यास यत्न करण्यापेक्षा, मी आपली एकाद्या मूर्ख
नकल्याची संगत करून आनंदांत राहीन'.
लबक म्हणतो, मी एकंदरीत जरी सुखवादी आहे, तरी या
जगांत म्हणजे सर्वच ‘घी-शकर ' आहे, असे माझे म्हणणे नाही.
त्यांत खारट तुरटही आहेच. पोप कवि म्हणतोः
(गीति)
एक सुखाचा, दुसरा दुःखाचा कुंभ ठेवुनी जवळी॥
वाढी देव कुणातें सुखदुःखें शुद्ध पुष्कळां मिसळी ॥
असे जरी आहे, तरी दुःखांत हे आहे की, सुखदुःखें अस्थिर
स्वभावाची आहेत. गातेंत भगवान् म्हणतात:-
(श्लोकार्ध)
आगमापायिनो भावास्तांस्तितिक्षस्व भारत ।
भावार्थ:----बाबारे,
सुखदुःखदायक भाव येतेजाते आहेत
( कायम टिकणारे नाहीत ) हे ध्यानात घेऊन ते सहन कर, म्हणजे संपलें.
शिवाय, म्हण आहे:-चार महिन्यांचा उन्हा आणि घटके-
चा पावसाळा! त्याप्रमाणेच अल्प सुखही दुःखाचा विसर पाडिते.
कालिदास म्हणतो
(श्लोकचरण)
केशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते ।
-कुमारसंभवम्।
भावार्थः-श्रमाचे चीज झाले म्हणजे ताजेपणा येतो.
ther
१४४
सुख आणि शांति.
[प्रकरण
एतावता, दुःख झाले तरी कायम निराश होण्याचे कारण
नाहीं; व बनेल तों, सुखान दुखाची मिसळ होऊ देऊ नये.
दुसराही एक विचार आहे. तो दुख जर अपरिहार्यच
असेल, तर ते कुरकुने संसियामा अदानच सोसावे हे लारे,
सुखे आणि दुःखे यांची खिचडी न. गा तक्रारीत तरी
जीव काय ? पण, काही लेकर दो ना जी काही औरत
करितात ती काही मार से जानात, व
बाकी ओळली तर न१ मा १६ हिसार की
व ओरडतात, या मला ना ना ना नाहीत.
शिवाय, दुःखाना दिसतील. लोक न्याय विसर
देवाचे नांवा खडा
2. ! पहातील तर त्या
असं दिसबाईसारिका में नजर
दुःखान यातना : बाग, संतापी माना
अनेक वर्षमा २.नीय समय
पंपरा आ आ
मापस । कमानालिनि ।।
भावार्थः ---, शोक, ११, चंबा में अमनमर्ग मनव्यान
स्वतः लाविलेल्या अपराधरूपी वृक्षाच फलं होत.
हे म्हणणे सर्वथा वो आहे. हे आपण दुष्कर्म करितात आणि
देवाचे नांवाने ओरडतात. तुकोबाने म्हटले आहे:
५ ३.] संतोष. १४५ (अभंग) आपुला दुर्गुण लाविती पराला । नेणती आपुला दोष कांहीं ।। यांतलाच हा प्रकार आहे. याखेरीज दुसरी गोष्ट म्हणजे पुष्कळदां आधी जे दुःखसं दिसतें तें फलतः सुख असते. उदा- हरण, दारिद्याबद्दल मनुष्यं अति नाखुष असतात; पण, आपले कर्तबगारीने उदयाला आलेले लोकांचे इतिहास पाहूं जाता, त्यांतील बहुप्रमाण दारिद्यांत जन्मलेल्यांचे आहे. किंबहुना दारिद्याने त्यांना या रूपास आणिलें असें म्हणणे गैर होणार नाही. आणि हे जर खरे, तर दारिद्य हे अपकारक की उपकारक ? पण मनुष्ये हा विचार करितात कुठे? तिसरी गोष्ट, पुष्कळदां अविचारी मनुप्ये दोरीलाच साप समजून भ्यावें, तशा प्रकारें काल्पनिक दुःखांनीच हैराण असतात. (श्लोक) शोकस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च । दिवसे दिवसे मूढमाविशंति न पण्डितम् ॥ १ ॥ - महाभारत भावार्थ:-जो मूह आहे त्याला आला तो दिवस हजारों शोकाच्या व भयाच्या जागा दिसतात. ज्ञात्याचे तसें नाहीं, एक कवि म्हणतो, करनिहतकदुकसमाः पातोत्पाता मनु- ष्याणाम् । " अर्थात् , मनुष्याची चेंडूप्रमाणे खालवर स्थिति होत असते. लबक म्हणतो, आपले आयुष्यात नानाविध गोष्टी एकच वेळी होत असतात; कांहीं बया असतात व कांही वाईट अस- तात. म्हण आहे, " आजा मेला आणि नातू झाला ". त्याच-
१४६
सुख आणि शांति.
[प्रकरण
"तरति
--
प्रमाणे एक सुख, एक दुःख, असें मिसळण असते. निख्खळ
सुख किंवा निख्खळ दुःख असें विरळा. कवीने म्हटले आहे:
क्वचिद्वीणावादः क्वचिदपि च हाहेति रुदितम् ।'' के ठे मधुर वीणा.
नाद, तर कोठं विलापस्वर ! तसाच प्रकार असणार. तेव्हां खरा
सुखाचा मार्ग म्हणजे गीतेत भगवंतानी म्हटल्याप्रमाणे
(श्लोकार्ध)
सुखदुःखे समे कृत्वा । लाभालाभौ जयाजयौ ॥
मुखदुःखांचे समीकरण करून चालावें हाच आहे. पण, हे
समीकरण सिद्ध करण्याला थोडीशी तरी अक्कल लागते. ते बाव
ळ्यांचे काम नाही. सिसिरो म्हणतो, "सुखी मूर्ख व दुःखी
ज्ञाता हे मिळणेच नाही. " उपनिषदांत म्हटले आहे:
शोकमात्मविद् "-ज्ञाता शोकातीत असतो.
लबक म्हणतो, इकडे अशी म्हण आहे की, 'आयरिश मनुष्य
भांडत असला म्हणजे शांततेत (समाधानांत) असतो; स्कॉच
मनुष्य भोवंडत असला म्हणजे घरी असल्यासारखा ( सुखी)
असतो; व इंग्रज कुरकुरत असला म्हणजे सुखांत असतो !' पण
हा कुरकुरण्याचा आरोप केवळ आम्हां इंग्रजांवरच आहे असे
नाही. व्हाल्टेअरने एका पात्राचे तोंडून फ्रेंचांच्या असंतोषी वृत्ती-
बद्दल अशीच तक्रार केलेली आहे. दांतओंठ खात असतांना
त्यांचे खरे बुद्धिवैभव दिसून येते, असे त्याचे म्हणणे आहे.
कांही मनुष्यांचा स्वभावच असा दुष्ट असतो की, तुम्ही सात
सायास करा, त्यांना मिळून संतोष नाही. एक कवि म्हणतो:-
.-
५३.] संतोष. १४७ काय , (श्लोक) पतिरतीव धनी सुभगो युवा । परविलासवतीपु पराङ्मुखः ॥ शिशुरलंकुरुते भवनं सदा । तदपि सा सुदती रुदती कुतः ॥ १ ॥ भावार्थ:--विचारोचा नवरा अतिशय संपन्न, देखणा व तरुण असून परस्त्रीकडे बांकडा डोळादेखील करीत नाही, स्वस्त्रीनिष्ठ आहे. बरे, घरांत सोन्यासारखा बालक खेलतो आहे. तरी पण आमच्या ह्या सुंदरीला गोड मिळून लागत नाही. आपली मुळमुळ रडत असते. याला म्हणावं ?-- हा स्वभाव. एपिक्टेटस म्हणे, "मला एकान्त नको; कारण तो शून्यमय असतो. बरें, लोकान्तही नको; कारण तेथे गोंधळ असतो!" अशा बाव्याला खूप तरी कसं करावें? — वरमातेबद्दलची' हरदासी नक्कल प्रसिद्धच आहे. काही केल्या विहिणी खूप होतना. शेवटी व्याह्यांनी काळोखांत चौदावे रत्न अर्पण केले, तेव्हां विहिणीचें पित्त- शमन झाले. अशा मासल्याची दुराराध्य माणसें खरोखरच आढ- ळतात. अशी आख्यायिका सांगतात की, प्रसिद्ध बापू मेहेंदळे यांजकडे एक कानडा सावकार आपली लाडकी दुसरी बायको क्षयाचे पंथाला लागली म्हणून उपायासाठी आला. बापूंनी प्रकृति पाहून तिला लावून दिली व पश्चात् त्या सावकारास म्हणाले, हिचा रोग विलक्षण आहे. हिचे हाताखाली चाकरमनुष्य टिकत नसावेसे वाटते, खरे काय ? सावकार हसून म्हणाला, होय. बापू म्हणाले, तर मग सांगतों, उपाय हा कराः आपली मोहना राणी रुष्ट होऊन बसली म्हणजे हिला मुक्तहस्ताने चौदावें रत्न अर्पण करीत जा; म्हणजे ही षण्मासांचे आंत महिषीतुल्य १४८ सुख आणि शांति. [ प्रकरण होईल. सावकाराने तसे केलें व बापूंचे भविष्य खरे झाले. एपिक्टे- टस म्हणतो, " तुला सुख व्हावे म्हणून जग तुजसारखे होईल ही आशा व्यर्थ आहे. त्यापेक्षां तूंच जगासारखा हो, म्हणजे सुखा- ला वाण नाही". म्हटले आहे-'" उपानबूढपादस्य ननु चर्मा- वृतेव भू : " म्हणजे स्वतःचे पायांत चढाऊ असला म्हणजे कंटक- वनांतही रुजामाच आहे. तसे आपण सनाधानी वृत्ति ठेविली, म्हणजे सुखाला केव्हाही दुकाळ नाही. इरसाल आंबा झाला तरी साल तुरट असते; बरें, निवडुंगाचेही बोंड गोड असते. एतावता निर्भेळ सुख किंवा निर्मेळ दुःख असें वचित्. म्हणून काही असले तरी गोड करून घेण्याची करामत संपादावी म्हणजे सुखाची महा- गाई राहणार नाही. कदाचित् राहिली, तरी आक्रोश करण्यांत कोणता फायदा? त्यापेक्षा ती निमूट सोसल्यास अधिक सह्य व क्षेमकर होईल. ' गोड करून खावें व मऊ करून निजावें' हेच शहाणपण. लोकयात्रा ही एक मोठी अवघड गोष्ट आहे, हे जाणून सावध- गिरीने चालले पाहिजे हे खरे; परंतु अवघड झाली म्हणून दुःख- मय आहे असे मानण्यांत शहाणपण नाही. शिवाय, खरे बोलू जातां, तीतील पुष्कळशी दुःखें आपले कृतीची असतात, आणि बहुतेक सुखें ईशदत्त असतात. परंतु माणसाची बोली उपराटी असतेः 'चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी किंवा सुखें संपादिली ती मी; आणि दुःखे तेवढी देवाने धाडली. ही भाषा देवाला कशी खपावी ? अडाम आणि ईव्ह यांना आनंदवनांतून काढून दिले, , ५ ३.] संतोष. १४९ , तरी त्याचा दोष देवाकडे नव्हता हे सुप्रसिद्धच आहे. आणि हाच न्याय आपणां बहुतेकांस लागू आहे. पुष्कळांचा समज असा आहे की, सुखाचा काळ मागेंच गेला; हल्लींचा कलिकाळ हा काळ च दुःखाचा, तेथे काय उपाय ! पण ट्राहीं म्हणतो, " आदिपितरे दिव्योद्यानांत असतांना तारे जसे चमकत होते तसेच ते आजही आहेत; सूर्यही तसाच प्रका- शत आहे; व समुद्रही तसाच शुद्ध व परिपूर्ण आहे. मग आज बदल तो कोणता झाला ? सृष्टीचे स्वरूप पुराणकाली तेंच आज आहे, मनुष्याची नीतिमात्र बिघडली आहे. आणि यामुळेच हा काल फिरलासा भासतो. जर शांति, व्यवस्था, प्रेम ह्या गुणांचा उत्कर्ष असेल, तर आजचाही काळ आनंदमय च आहे. परंतु आज पहावें तो लोभ, मत्सर, परस्वापहार, जुलूम, चैन, हांवरपणा, अहंकार इत्यादि अनेक दुर्गुणांचा फैलाव झाल्यामुळे, जगांत तंटे- भांडणे, लढाया, रक्तपात, देशोद्वासन इत्यादि अनर्थ माजून जगत् हैं कंटकवनसें भासू लागले आहे. त्यांत नवल ते कोणतें? एक राजा पांच लक्ष शिपाई राखतो तर दुसरा दहा लक्ष. हे कशाला ? एकमेकांचे मानेस बसावयालाच ना? शिव, शिव ! मनुष्यांनो, तुमची करणी धड नाहीं; देवावर कां रुसतां?" पुष्कळदां वाइटांतून बरें निपजतांना आपण पहातो. कोणाही व्यक्तीची स्वातंत्र्यहानि हा मोठाच अनर्थ खरा; तथापि इतिहास पहावा, तो कांहीं कांही अलौकिक ग्रंथ, त्यांचे लेखक कारागृहांत असतांना, किंबहुना पडल्यामुळेच, लिहिले गेले. अर्थात्, येथे हा अनर्थच उपकारक झाला. ,
१५०
सुख आणि शांति.
[प्रकरण
•
कित्येक वेळा मुळावर काही नसतां मनुष्ये काल्पनिक
दुःखानंच गांगरून जातात. प्रत्येक वाचकाला अशा मासल्याचा
थोडा तरी अनुभव असेल. ' अमुक गोष्ट अशीच नसेलना ?' अशी
मनच उत्प्रेक्षा घेऊन आपल्याशीच खिन्न बसते; व अखेर
पहावें तो कशास काही ठिकाण नसते. कित्येक माणसांचा स्वभा.
वच असा असतो की, इवल्या तिवल्या गोष्टीला ती असे
बाळसे आणून दाखवितात की, राईचा केवळ डोंगर करून सो-
डितात, व दुस-याला घाबरवून टाकितात. शिवाय, एकादी वस्तु
न्याहाळीत जावे तो तो अधिकच भ्यासूर दिसू लागते. तसाच
दुःखांचा प्रकार होतो; त्यांचा विचार करावा तों तो ती अधि.
काधिकच भिववितात. याकरिता त्यांकडे ढळतीच नजर ठेवावी,
हैं बरें. नूरजहानसारखीचा गोंडस हात आपण जर दुर्बिणीने
पाहिला, तर कासवाचे पाठीसारखा खरबरीत व हिडिस दिसेल.
तेव्हा तो दुरून पाहून नेत्र निवविणे हेच शहाणपण.
मृत्यु म्हणजे दुःखाची कमाल बेरीज असें मानितात, पण
आपला प्रियकर देवासन्निध गेला असल्यास त्यांत खेदावह ते
काय? आमचे गांवी एका ऐशी वर्षांचे वृद्धांची अर्धांगी देवलोक
झाली, तेव्हां ते अत्यंत विलाप करूं लागले. आम्ही म्हटले, लख्नु-
दादा, काकूचे सोने झाले, मग रडतां कां? ते म्हणाले, तें खरें
रे, पण मला आपस्वार्थी जगांतल्याच माणसाचे उत्तर ते,
तसेंच असावयाचे. लवक म्हणतो, मी ज्याचे त्याचे जात - मृत्यू-
बद्दल बोलतों. इष्टमित्रांचे मृत्यूबद्दल बोलत नाही.
जीवित जर
५३.]
संतोष.
१५१
,
दुःखमय असेल, तर मृत्यु ही इष्टापत्तिच आहे. बरें, मृत्यु जर अनर्था-
वह असेल, तर जीवित बहुधा सुखावह म्हटले पाहिजे. आणि
माझे मते जीवित सुखावहच असते. आपणच नाश केला तर
गोष्ट निराळी.
मनुष्याचा स्वभाव असा आहे की, वस्तु जोपर्यंत प्राप्त
आहे तोपर्यंत तिची तो अवगणना करितो आणि ती नष्ट झाली
म्हणजे मग दीर्घ विलाप मांडितो. एकादा गृहस्थ आपल्या साध्वी
पत्नीला छळून घेतो; आणि ती मेल्यास अश्रु ढाळीत सुटतो.
असे मासले अश्रुत नाहीत. भर्तृहरि म्हणतातः
(श्लोकचरण)
कुस्याः स्युः कुपरीक्षका न मणयो यरर्यतः पातिताः।
भावार्थः -रत्नाला गारगोटी म्हणणारे कुत्सित, रत्न कुत्सित नव्हे.
जीवित वाईट नव्हे; त्याचे निंदक तेच अपात्र.
सेंट पॉल म्हणतो, “मला दारिद्याची खंतच नाही. कारण,
प्राप्त असेल त्यांत तृप्त राहण्याची ग्वुबी मला साधली आहे. पदा-
र्थाची प्रथम इच्छा धरून नंतर तिच्या पूर्तीने तृप्ति साधण्यापेक्षा
इच्छाच नसणे हे अधिक सुखावह नव्हे काय ? कारण, इच्छेची
पूर्ति त्रिभुवनाचे प्राप्तीनेदेखील होणारी नाही". त्यापेक्षा कवीने
म्हटले आहे की, "सर्वाः संपत्तयस्तस्य संतुष्टं यस्य मानसम् ॥"
म्हणजे ज्याचे मन संतुष्ट त्याला सर्वच संपत्ति आहे, तेच खरे. मनुष्य
संतोष न ठेवील तर जन्मपर्यंत त्याची ददात मिळून संपावयाची
-
१५२
सुख आणि शांति.
[प्रकरण
नाही. मेरिआ थेरिसा मरतां मरतां म्हणाली, " आज काय ती मी
सुखी आहे !"
उद्योगाची खरी रीत म्हणजे अशी की, कोणत्याही कामी आपले
यत्नाची शिकस्त करून सोडावी, आणि मग शांतपणे फलाची
प्रतीक्षा करीत रहावे. उतावीळ करूं नये; त्यापासून
काही फायदा नसतो. म्हण आहे, "बरे करावें आणि
वाटेवर ठेवावें. " त्याप्रमाणे आपले
कर्तव्य करून
स्वस्थ असावें, फल होणें तें यथाकाल आपेंआप होईलच.
भगवंतांनी जसे म्हटले आहे की, न हि कल्याणकृत् कश्चिद्दु-
गतिं तात गच्छति ॥" म्हणजे " बाबारे, बरें काम करणारा
कधी दुर्गतीला पोचणार नाही. " त्याचप्रमाणे जशी कृति तसें फल
होतेच होते. त्याची चिंता करणे वृथा आहे. प्रत्येक उद्योगी मनुष्य
लक्षाधीशच होईल असे जरी नाही, तरी उपाशी खास मरणार
नाही. सेंट पॉल म्हणतो:--"
अन्न आणि आच्छादन असले
म्हणजे आणखी काय पाहिजे !" संतोष असला म्हणजे त्यांतच
श्रीमंती आहे. भर्तृहरींनी म्हटले आहे:-
(श्लोकार्थ)
सनु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला।
मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ।।
भावार्थः-ज्याची धांव अनावर तो दरिद्री; गन संतुष्ट असल्यावर
दरिद्री आणि श्रीमंत सारखाच.
सिनेका म्हणतो, " निर्वाहाला अत्यवश्य म्हणून पाहातां फारच
थोड्या गोष्टी असतात. " शिकंदर बादशहाने एक साधु पाहिला,
५ वें.] संतोष. १५३ MY -- तो एका लाकडी टिपांत निजून होता. तेंच त्याचे घरदार. बादशहा त्याला काही देऊ लागला; पण तो म्हणाला, मला तुझे- सारख्याची जरूर नाही. मला सर्व अनुकूल आहे. मीही राज- विलासांत आहे. भर्तृहरि म्हणतातः (श्लोक) मही रम्या शय्या विपुलमुपधानं भुजलता। वितानं चाकाशं व्यजनमनुकूलोयमनिल: स्फुरदीपश्चंद्रो विरतिवनितासंगमुदितः । सुखं शांतः शेने मुनिरतनुभूतिर्नृप इव ॥ १ ॥ भावार्थ:-धरणी ही रम्य शव्या आहे. हात ही नरम उशी. आका- शाचे वर छत ताणले आहे. वायूचा पंग्या आयताच फिरतो आहे. चांदोबा हा विजेचा दिवा लखलखतो आहे. आणि उपरति हीच सुंदरी बरोबर घेऊन मुनि हा वैभवशाली राजाप्रमाणं चैनीत झोपी जातो. केवळ निर्वाह पाहिला, तर त्याला लागणा-या गोष्टी अन्न, पाणी व छाया एवढ्याच आहेत. व ह्या थोड्या श्रमाने सर्वत्र प्राप्त असतात. परंतु, मनुष्याच्या चवाढवा अतोनात वाढल्याने, ताप वाढला आहे. खाण्यात त्याला चुरचुरीत फुरफुरीत पाहिजे; अंगावर दागदागिना, तलम कपडा; बसण्याला गाडी पाहिजे, घोडा पाहिजे; छानछोक, हातरुमाल, सुरंगी अत्तर, एक नी दोन; पूर्ति मिळून नाही. आणि या कारणानेच ददात संपत नाहीं, थांबत नाहींत. आपले येथे गेले पिढीचा कपड्यांचा खर्च व चालू पिढीचा खर्च पाहिला म्हणजे आमचे म्हणण्याची सत्यता ध्यानात येईल. ज्या ठिकाणी पूर्वी एक शिंपी होता, तेथे आता एकवीस शिंपी आहेत, असे आम्ही वस्त्र, व तिडका १५४ सुख आणि शांति. [प्रकरण पाहतो. बरें, एवढे कपडे घालून राखलेलें शरीर पहावें तो दुघडी धोतर पांघरणा-या आमच्या आजोबांचे चतुर्थांशदेखील नाही. मग इतके खर्चाने कपडे करून केलें काय ? तर जिनगरी बाहुल्या सजविल्या, आणि आयुष्याची भगभगमात्र वाढविली ! याहून मूढत्व ते कोणते? पूर्व वयांत काटकसरीने राहून उत्तर वयासाठी द्रव्यसंग्रह करून ठेवणे हें मनुष्याचें उचित कर्तव्य आहे. म्हटलेच आहे:- पूर्व वयसि तत्कुर्यात् येन वृद्धः सुखं वसेत् ।" पण द्रव्यसंग्रहा- पक्षाही सुविचार संग्रह करणे हे अधिक अगत्याचे आहे. सुवि. चाराने शांति येते. व वृत्ति शांत व समाधानी असली म्हणजे आनंदाला तोटा नसतो. जॉन टॅब म्हणतो: (आर्या) संतोय मित्र माझा, भार्या शांती, उदंड सुखदाती ॥ आनंद पुत्र तैसा, मज वाटे स्वर्ग यापुढे कमती ॥ १ ॥ कसाही प्रसंग येवो, मनुष्याने खेद करूं नये; प्रसंगाशी कंबर बांधून झुंजावें. कंबर खचून बसलें की, तो अधिकच उरावर बसतो. प्रसंगाला भिऊन जाण्यांत काही फायदा नाही. म्हण आहे-'भित्या पाठी ब्रह्मराक्षस. म्हणून प्रसंगाला धैर्याने तोंड द्यावें; म्हणजे परमात्मा साह्य होऊन संकट दूर होते. "हिंमत मर्दा, तो मदत खुदा' ही म्हण लक्षांत वागवून धैर्याने वागावे म्हणजे संकटाचा परिहार होऊन शांति मिळेल. :
letet
kakakakakakakakakakakakakakakakakistakakakakakakakaki
stutituttitutu.
प्रकरण सहावें.
आपत्ति.
Dhatutistitutituteketstatutistitutekrituti tatutitutritikritik (श्लोक) स एव धन्यो विपदि। स्वरूपं यो न मुञ्चति ॥ त्यजत्यर्ककरैस्तप्तं । हिमं देहं न शीततां ॥ १ ॥ -सुभाषित. भावार्थ:-जो आपत्कालीही आपलेपणा सोडीत नाही, तोच धन्य. पहा बरें, सूर्यकिरणांचा ताप झाला असतां बर्फ मुळीच देहत्याग करिते, पण आपला शीतपणा सोडून कधीही वेगळे राहात नाही. (आर्या) आपत्स्वेव हि महतां शक्तिरभिव्यज्यते न संपत्सु ॥ अगुरोस्तथा न गन्धः प्रागस्ति यथाग्निपतितस्य ॥१॥ -सुभाषित. भावार्थः-----महात्म्याचे खरे सामर्थ्य आपत्कालींच प्रकट होते संपत्काली तसे होत नाही. मलयागुरूचा विस्तवांत टाकिल्यावर जसा सुगंध उटतो, तसा एरवी उटत नाही. PPYTrrrrrror प्रकरण सहावें. , आपत्ति. (श्लोक) संपत्सु महतां चित्तं । भवत्युत्पलकोमलम् ।। आपत्सु च महाशैलशिलासंघातकर्कशम् ॥ ५ ॥ भावार्थः थोरांचे चित्त संपत्काली कमलाप्रमाणे कोमल असते. पण आपत्काली ते गिरिशिलेप्रमाणे कटिण होते. संसार हा असला काही विचित्र आहे, त्यांत हमेष नसत्या नसत्या भानगडी व उलाढाली इतक्या उत्पन्न होत असतात, की, त्यांत स्थित्यंतरें किंवा दुर्दैवाचे घाले आपण मुळीच येऊ देणार नाही, असे कोणी म्हणेल तर ते शक्यच नाही. संसार म्हटला म्हणजे संकटें ही ठरलेलीच. आतां सकटांतमात्र जाती आहेत: (१) कांहीं खरी असतात, (२) कांही तशी भासतातमात्र. या दुसरे प्रकारचे संकटांचे पुढीलप्रमाणे सहा पोटवर्ग आहेतः १ सूचनार्थक, २ परीक्षार्थक, काल्पनिक किंवा क्षुद्र, ४ स्वकृत अथवा आत्मनिर्मित, दंडार्थक, ६ आच्छन्न. १ सूचनार्थक संकटें. बहुधा जगांत दुःख येतें तें कृतकर्माचे दंडार्थ असते, किंवा आगामि संकटांचें परिहारसूचक असते. 'पुढल्यास ठेच, मागला : - ३ ५ १५८ सुख आणि शांति. [प्रकरण शहाणा;' अर्थात् एकाचे दुःख दुसऱ्याचे सुखाला कारण झाले. लबक म्हणतो, दुःखांनी व संकटांनीच आम्हांला इतकें शहाणे केले आहे. ही संकटें नसती तर, आम्ही मूढ व गैरसावध राहून केव्हांच नामशेष झालो असतो. पण ही संकटें आम्हांला टक्कर देऊन धट्टभट करितात. आणि त्यामुळेच आम्हांला असल्या अनर्थ- प्रचुर जगतांत टिक व धरून राहता येते. त्यांचे पायींच आम्ही आत्मरक्षणाचे अनंत उपाय शोधून काढतों च दक्ष राहतो. व्यापारांत अल्पस्वल्प फसगत झाली असता, व्यापारी म्हणतात, जाऊ द्या की, थोडक्यांतच अक्कल विकत घेतली. हे म्हणणे अक्ष- रश: खरे आहे. २ परीक्षार्थक संकटे. संकटांचा दुसरा वर्ग म्हणजे परीक्षार्थ आलेली संकटें होत. परमेश्वर पुष्कळ वेळा मनुष्याचे सत्त्व पाहण्यासाठीच संकटें पाठवीत असतो. प्रहाद, ध्रुव, हरिश्चंद्र, नळ वगैरे पुरुषांवर संकटें न येती तर त्यांची खरी किंमत दुनिये पुढे कधी न येती. अर्थात् सं- कटांनीच अशांना अब्रूस चढविले हे निर्विवाद. व अशी संकटें धाडण्यांत परमेश्वराचा हेतु सदयच असतो हे उघड आहे. 'दारियं परमांजनम् ' म्हणून एक म्हण आहे, ती खोटी नाही. सत्ता व वैभव मनुष्याला उन्मत्त व अंध करितात. लबक म्हणतो, १ इंग्लंड सर्वोत्कृष्ठ दर्यावर्दी झाले याचे कारण त्याचे दाराशींच आ पसरणारा महाकाळ-दर्या आहे, हेच होय.
६ वें. आपत्ति. १५९ , रोमचे गादीवर जे अतिदुष्ट राजे बसले, त्यांचे डोळ्यांत जर दारि- द्यांजन पडते तर ते खचित भले झाले असते. फ्रेंच भाषेत म्हण आहे की, “ आपत्ति ममनुप्य करिते व संपत्ति राक्षस करिते. आपत्तीचा दुसरा फायदा म्हणजे मित्राची परीक्षा. म्हटले आहे..... आपल्यु मित्रं जानीयात् भार्यां च विभवक्षये ॥' म्हणजे मित्राची खरी परीक्षा आपत्कालीं व स्त्रीची परीक्षा गरीबी आली असला होते. द म्हण आहे की, संपतः मित्र मिळवी । आपत्ती पाली तम!।' ती खरी आहे. आपतीने कधी कधी खरे खरे स्नेही असतील तच एकत्र राहातात; व ढोंगी झाडले जातात. ज्यांच्या अंगांत खरी लायकी असेल असे मित्र आपत्ति आपले निद- शास आणिते. आपत्तीचे मुशीत हीण कोणते व स्वर्ण कोणतें तें तेव्हाच वगळे दिसते. राष्ट्रीय कामांतदेखील आपत्तीने सजातीय प्र- तीचे लोक वेंचके पुढे येऊन एकदील होतात. हा आपत्तीचा उपकारच आहे. रात्रीचा अंधार जसा जसा अधिक गडद होत जातो, तसतशी नक्षत्रं ज्यास्तीच झळकू लागतात. घनपटलाने आकाशाला शोभा चढते. मोठमोठ्या उद्योगी शहरांत धुके व धूर यांनी दिवसभर वांबाळ पडते; आणि ज्यांना कोणत्याही स्थितीत वृत्ति आनंदित ठेव- ण्याची मख्खी साधली नसेल, अशांना उदासीनता येते. परंतु दिव- सास जेथें असे हवामान असते, तेथे सूर्यास्तसमय फारच रमणीय १ ही गोष्ट विलायतेसारख्या थंड प्रदेशांतली आहे.
१६०
सुख आणि शांति.
[प्रकरण
असतो; व जे अवलोकनशील आहेत अशांना तो पाहून फारच
सुख होते.
~
सैतानाने एकदां जॉबची छळणा मांडिली; व त्याचा परिवार व
संपत्ति ही हरण केली. जॉबला पुष्कळसे मुलगे व मुली होत्या.
त्याजपाशी सात हजार बकन्या,
तीन हजार उंट, पांचशे बैल-जोड्या,
पांचशे गद्धया, व अनेक नोकरचाकर असा परिवार होता. सैता-
नाने हा सर्व हरण केला. परंतु जॉबनें न डगमगतां, लंगोटी फाडून
व डोकें मुंडून, गुडघे टेंकून देवाची प्रार्थना केली की, “ देवा, मी
उघडा नागवा या जगात आलों; आणि आता तसाच परत जाणार,
त्यांत खेद तो काय ? आजपर्यंतचे वैभव तूंच दिले होतेंस, आतां
तुझें तूंच नेलेस. तुझी मर्जी ! माझी काही फिर्याद नाही. तुझा जय.
जयकार असो, एवढी माझी इच्छा आहे. " अखेर त्याचे वैभव
त्याला परत मिळाले. किंबहुना पहिल्याहूनही अधिकच मिळाले.
पण त्याचेही त्याला काय ?
( श्लोक)
उदये सविता रक्तो । रक्तश्चास्तमाने रविः ॥
संपत्तौ च विपत्तौ च । महतामेकरूपता ॥
-~~-सुभाषितसंग्रह.
भावार्थ:-सूर्य जसा उदयकाली तसाच अस्तसमयीही रक्तवर्णच
असतो. ठीकच; जे खरे थोर असतात, ते संपत्तीत व विपत्तींत एकरूपच
असतात.
हे जग असे आहे की, त्यांत एवढ्या तेवढया अपयशाने खट्ट
होऊन जो खाली बसला, तो साफ बुडाला. अत्यंत दिव्यवक्ता
६ वें.] आपत्ति. १६१ जो प्रो० हवाले याची आरंभी आरंभी कोण फजिती ! त्याचे रॉयल इन्स्टिट्यूशन ( राजभवन ) मध्ये पहिले व्याख्यान झाल्या- वर त्याला एक निनावी खासगी पत्र आले की, 'मेहेरबान, आपण विद्वान् असाल; पण व्याख्यानाचे साहस करूं नका. आपण त्या कामी फुकट आहां.' पुनः त्याने ' प्राणी व वनस्पती यांचा अन्योन्यसंबंध ' या विषयावर व्याख्यान दिले; तेव्हाही अशीच टर उडाली. परंतु गाजीने निश्चय सोडला नाही. त्यामुळेच तो अखेर सोज्वळ वक्ता झाला. डिझायली याने हौस आफ कामन्स- ( लोकसभे ) मध्ये जे पहिले भाषण केले त्याचा असाच बोन्या उडाला. परंतु अभ्यासाने तोच अमोघवक्ता झाला. म्हणच आहे:- अभ्यासः कर्मणां सम्यक् । उत्पादयति कौशलम् ॥"-म्हणजे अभ्यासाने कोणत्याही कामी कुशलता येते. यास्तव फजिती झाली तरी पाठ सोडूं नये. विन्ने आली तर त्यांना न भितां, त्यांचे डो- ईवरून वाट करीत राहिले पाहिजे; म्हणजे तीच भिऊ लागतात. ३ काल्पनिक किंवा क्षुद्रसंकटें. काही लोकांना सापसाप म्हणून दोरी धोपटण्याची संवयच असते. एवढ्या तेवढ्यावरून त्यांचा जीव जसा उडून जातो. पहावें तो ठिकाणी काही नसते. फुसक्या कारणाने ते बेजार होतात. नजरेस कोळी पडला असला तर पुरापूर न पाहतां 'विंचू! विंचू ! ' म्हणून घर दणाणवून सोडतात. असे बेवकूब काही लोक आहेत. मिसेस ब्रीनिंग म्हणते:- १६२ सुख आणि शांति. [प्रकरण (श्लोक) नसे कीर्तिहानी, नसे प्रेमभंग । फुका अश्रु कां गाळितोशी सवंग ॥ म्हणे चाललों बोललों आज फार । हवा सूटली झोंबते थंडगार ॥१॥ अशा नमुन्याचे शेंदाड शिपाई दुनियेत खरोखरच आढळतात. अशांनी काय करावें? मनुष्य रेंट्या पाहिजे ! संकटापायी कार्याची चिकाटी सोडणे वेडेपण आहे. लिओनार्डो डी. व्हिन्सी म्हणतो, " संकटाला भिऊन मनुष्ये आपणांस अधिकच विपतीत पाडितात.' एक इंग्रज कवि म्हणतो:- (श्लोक) सौख्याभावे न दुःखी; परि अवगणिती लोक गर्व सुखाला। ज्यातें संतोष संज्ञा असुनि, रुचतसे वेष साधा जयाला ॥ नो वाटे तुच्छ त्यांत; म्हणुनि त्यजुनि या, दीर्घ यन्ना करीनी। तेणे सौख्या मुकोनी उलट अबुध ते केशतापा वरीती ॥१॥ पुष्कळदां संकटाचे भयानेच संकट दुणावते. एक बाई साप पाहून जी पळत सुटली ती मागच्या मागे विहिरीत पडून मेली ! याचप्रमाणे आपली अर्धी अधिक दुःखें स्वकृतच असतात. काही लोकांना दमडीचे औषध सांगितले असतां तें अल्प किमतीचे एवढ्यास्तवच त्याचा ते अनादर करितात. मग अशा मूर्त्यांना जेव्हां एकादें बहुमोल नांव सांगावे तेव्हां त्यांचा संतोष होतो. हाच मासला सुखाचे निवडणुकीत आहे. सुख सुलभ आहे. एवढयाच- साठी कोणी कोणी त्याचा अव्हेर करितात. काशीत कोणी सहा सहा महिने गंगास्नान करीत नाहीत; आणि रामेश्वरापासूनचे लोक जीव टाकीत काशीला जातात. असा या जनाचा चमत्कार आहे.
६३.] आपत्ति. १६३ ४ स्वकृत संकटें. आपणांवर येणारी बरीचशी संकटे आपणच निर्माण कारतों. रूसो म्हणे, " मृगजळाचे मागें धांवत जातांना आपण खऱ्या डोहांत- मात्र पडून कधी कधी प्राणास मुकतो. " व्याधि, प्रियजनवियोग, अपघात, उत्पात इत्यादिक जे आयुष्यांतील अपरिहार्य संकटविषय आहेत, ते विरळागतच असतात. पण, आपण बहुधा स्वतःचा अयाचार, अधीरता किंवा अविचार यांच्या योगानेमात्र सदासर्वदा आपणांवर दुःखें ओढून आणीत असतो, याला कोण काय करील ? आपणांस परमात्म्याने जन्मास घातले ते केवळ खावें, प्यावें, व चैन करावी, एवढ्यासाठींच घातलें, असे पुष्कळ लोक मानितात, येथेच त्यांची चूक आहे. (श्लोकार्ध) परोपकारार्थ शरीर हैं दिलें । न सौख्यभोगार्थ सदैव योजिलें -~~टामस आ केपिस. म्हण आहे, 'कांट्याचा नायटा करणे, त्याचप्रमाणे मनुष्य स्वदोषाने पशाचे पायलीवर नेतात. डिसिआर्कस याने मागेंच एक स्वतंत्र ग्रंथ लिहून असे सिद्ध केले आहे की, जगतांत जळप्रलय, सांथी, जनपदविध्वंसन, ईती, इत्यादि अनर्थांनी जी काही प्राण- हानि झाली आहे, तिजपेक्षां बहुत पटीने अधिक प्राणहानि राज- द्रोह, लढाया, मारामाऱ्या इत्यादि मनुष्यकृत अनर्थांनी झाली आहे! संकटं वाढविण्याचा दुसरा एक प्रकार जगांत आहे. तो प्रकार म्हणजे ' नसत्या उठाठेवी,' किंवा ' अव्यापारेषु व्यापार' हा होय.
१६४
सुख आणि शांति.
[प्रकरण
आपण कोणाचे
बायका म्हणत असतात, ' कां बाई रोड ?-तिला गांवाची ओढ.'
तशांतलाच मासला पुष्कळांचा असतो. आपला धंदा सोडून ते
लष्करच्या भाकरी भाजीत बसतील आणि मग त्रास झाला म्हणून
शंख वाजवतील! बेगेहाट म्हणे: अमक्याचा धंदा बसला,
याचे कारण, तो आपलेच दुकानांत बसून राहिला नाही, हेच होय."
सालोमन म्हणे, “ कलहपराङ्मुख असणे हे मनुष्यास भूषण
आहे; पण मूर्खांना विकत श्राद्ध घेतल्याशिवाय चैनच पडत नाही.
पदरांत विस्तव घेऊन भांडणारी काही माणसे जगांत आहेत,
पाहून हंसूं येते. " थॉमस आ केपिस म्हणतो,
वाटेस गेले नाही, म्हणजे आपलेही वाटेस दुसरा कोणी जात
नाही." बाकी हे सर्वथाच खरे नव्हे. भल्यावरही अकारण
भुंकणारे नीच श्वान जगांत आहेत. तथापि, अशांचेही नादी न
लागल्यास तेही अखेर गप्प होतात.
५ दंडार्थक संकटें (प्रायश्चित्तें).
स्वकृत दोष किंवा पातकें यांबद्दल दंड म्हणून काही दुःखें
प्रत्येकास भोगावी लागतात
पण ही न्यायागत समजून आनंदाने
भोगणे हेच भलेपण आहे. त्यांबद्दल वाईट वाटून घेणे बरोबर
नाही. शिवाय, दारिद्य, अनारोग्य, विपत्ति यांनी आयुष्य इतकें
कष्टप्रद होत नाही; पण अहंकार, हावरेपणा, आपमतलब, दुराचार
यांनीमात्र ते दुःसह होते, हे खास. आणि हे सर्व स्वदोषच
आहेत, त्या अर्थी ते टाळणे आपले काम आहे.
,
६ वें.] आपत्ति. १६५ ६ आच्छन्न संकटें (मुखें). कांही गोष्टी वरकांती पहातां क्लेशावह भासतात; परंतु, वास्त- विकपणे अंतर्यामी त्या कल्याणकारक असतात. संकटांस धैर्याने तोंड दिल्याने व ती धिमेपणे सोसल्याने आपली तितिक्षा वाढते. हिमकालांतील थंडीचा कडाका जीवांना बाह्यात्कारी हूहू करावयास लावतो, व यामुळे दुःखद वाटतो, परंतु, उभ्या वर्षांत शक्तिसंच- याला अनुकूल असा काल हाच असतो. याच कालांत अग्नि सहज दीप्त असतो; व म्हणून च चमचमीत तृपखिचडी अंगी लागते. म्हटलेच आहे, " हिवाळा भोगी, पावसाळा रोगी आणि उन्हाळा जोगी." प्रथम ज्याला बेकन म्हणतो, " संपत्ति ही देवाची शिळी देणगी आहे; पण विपत्ति ही त्याची ताजी देणगी आहे ." संपत्तीने मनुष्य शिळा किंवा ढिला पडतो; विपत्तीने ताजा तरतरीत रहातो म्हणूनच धर्मराजाने ‘आम्हांस सदैव विपत्तिच असो (विपद: संन्तु नः शश्वत् ) ' हे मागणे मागितले. सिनेका म्हणतो, संपत्तीने नाजूक बनविलें नाहीं, तो मनुष्य विपत्तीला दाद देणार नाही." विपत्ति रूप हिमाच्या कडाक्याने अशा मनुष्याचे पाणी फार तर वरकांती थिजलेंसें दिसेल; परंतु अंतर्यामी ते अधिकच प्रसन्न व निर्मळ होऊन राहील, हे खास. समृद्धीने या जगांत जितका खराबा केला आहे, तितका विपत्तीने केला नाही. आणि म्हणूनच सदय परमेश्वर कधीकधी आमच्या इच्छा पूर्ण करीत नाही. ज्यांना खायला प्यायला नाही, अशी पारेकी पोरेंच, ल- १६६ सुख आणि शांति. [प्रकरण -- अल्ला क्ष्मीपुत्रांपेक्षा अधिक उदयास येतात. एक म्हण आहे : जो बूरा करता है वो भलेके वास्ते करता है. ' हिचे खरेपण पु- कळदा अनुभवास येते. यासाठी भाविकांनी परमेश्वराची नित्य प्रार्थना करितांना 'तुला रुचेल तें कर', असेच म्हणत रहावे, म्हणजे “ तोचि कृपानिधि वारील सांकडे." चीन वा तत्त्ववेत्ता लाझं म्हण प्रभजन झाला तरी सकाळा- पुढे बंद पडतो, शुंडाधार पर्जन्य असला तरी अम्तमानी खळतो. ही जर महाभूतांच्या करणीची अशाश्वती आहे, तर मनुप्यकृतीची किती तरी अधिक असेल हे उघडच आहे." म्हणूनच शहाण्याने कसेही संकट आले तरी निराश होण्याचे कारण नाही. (आर्या) छिन्नोऽपि रोहति तरुर्भूयः क्षीणोऽपि वर्धते चंद्रः ॥ इति विमृशंतः संतः संतप्यन्ते न लोकेऽस्मिन् ॥ १।। --भतृहरि. भावार्थ-तोडलेला वृक्ष पुनः वाढतो; क्षीण चंद्र पुनरपि पूर्ण होतो. हा जगतांतील प्रकार पाहून, शहाणे लोक संकटांत क्लेश मानीत नाहीत. (श्लोक) पातितोऽपि कराधातैरुत्पतत्येव कंदुकः ।। प्रायेण साधुवृत्तानामस्थायिन्यो विपत्नयः ॥ १ ॥ भावार्थ-चेंडू हाताने आपटावा तो अधिकच उशी घेऊन उठतो. एवंच गुंड मनुष्य संकटांत पडून रहावयाचा नाही. प्रसंगवशात् पाऊल पुढे पडतच नाही, असा प्रसंग आल्यास कालापेक्षा करून असावें, पण दुःख करूं नये; हतधैर्य होऊ नये. .
६ वें.] आपत्ति. १६७ जेरमी टेलर म्हणेः आशा आणि उपवास हे उपासनेचे दोन पंख आहेत. यांपैकी उपवास हा पंख साध्या पांखराचा आहे; परंतु आशा हा पंख देवदूताचा आहे. त्याची गति थेट परमेश्वरापर्यंत असल्याने आपली विनंति देवापर्यंत पोचते. ईश्व- राचे कृपालुतेचा विश्वास नसेल, तर त्याची उपासनाच शक्य नाही. तोच विश्वास असला म्हणजे आपली उपासना समंजस, उत्कट, व भाविक अशी होते. देवावर जसा विश्वास अधिक, तशी त्याची उपासना अधिक प्रेमळ व बळकट होते. याकरिता संकटकाली निराश न होता ईश्वराचे सदयतेवर विश्वास धरून आशापूर्वक त्याची उपासना करावी. तुकोबा म्हणतातः (अभंग) कांहीं पडतां जडभारी ।दास आठवावा हरी ।। आलिया भोगासि असावें सादर । देवावरि भार घालुनिया ॥ तोचि कृपानिधि वारील सांकडे । येर ते बापुढे काय रंकं ।। १ ।। तोच विघ्नकर्ता, तोच विघ्नहर्ता, अशा भावनेने त्यावर विश्वासून निघोर असावे म्हणजे तोच संकट निवारण करितो. आतां, ईशकृपेची आशा धरून निघोर असावे असे जरी म्हटले, तरी ती आशा हिशोबी पाहिजे. कारण, जे स्वावलंबी असतील अशांसच देव साह्य देतो' ही म्हण कोणी विसरून आशा करील तर ती विफल होईल. आशेलादेखील हिशोब पाहिजे. , १६८ सुख आणि शांति. [प्रकरण - आशा म्हणजे निवळ शेखमहंमदी-केवळ मनोराज्य-उपयोगी नाही. अशा त-हेची आशा करणारे सफई बुडतात, असें व्यापारी मंड. लीत तर हमेष दिसून येते. यासाठी आशादेखील आपल्या साध- नांच्या व पात्रतेच्या प्रमाणांत असावी; म्हणजे ती बहुधा पूर्ण होते. शिवाय, 'आज उपाशी, पण उद्या तुपाशी' अशी स्थिति ही ' आज चैन, पण उद्या दैन्य ' या स्थितीपेक्षा अधिक स्पृहणीय आहे ; व पहिलीला बहुतेक सुज्ञ मनुष्य राजी असतात. आतां, ज्याप्रमाणे फाजील आशा पस्तावीं पाडिते, त्याचप्रमाणे भीरुताही तोच परिणाम करिते. म्हणून संकटकाली भिऊही नये व अत्याशही असू नये. संकटकाल आला असतां कधीं छाती ठोकून उडी टाकणे इष्ट असते; कधी केवळ सावध राहणेच हितावह असते. यांपैकी कोणतें केव्हां हितकर होईल, हे जाणणे अकलेचे काम आहे. याचा उलगडा ज्याचे मतीत नसेल, अशाने नसते साहस करण्यापेक्षां गप्प बसावें हेच बरें. कारण, नसते साहस केलें असता त्याचे जे अनिष्ट परिणाम होतील, ते तरी गप्प बसण्याने प्राप्त होणार नाहीत. हा फायदा काही लहान नव्हे. सर टी. बोन म्हणतो, " लक्ष्मी आंधळी आहे, असा कविप्रवाद आहे; पण माझे मते, लक्ष्मी आंधळी नसून आपण आंधळे आहों. कारण, या चपलेचे चरित्र किती गहन आहे हे न पहातां आम्ही तिला दृढालिंगन देतो, हे आमचें आंधळेपण नव्हे काय ? संस्कृत कवीची कोटी निगळीच आहे: एका आपत्ति. १६९ . हैं स्पष्ट झाले." (श्लोक) लक्ष्मि ! क्षमस्व वचनीयमिदं दुरुक्तं । अंधीभवंति पुरुपास्त्वदुपासनेन ॥ नोचेत्कथं कमलपत्रविशालनेत्रो। नारायणः स्वपिति पन्नगभोगतल्पे ॥१॥ तो म्हणतोः लक्षुमीबाई, मी एक आपलेसंबंधी रोख बोली बोलणार आहे, याबद्दल माफी असावी. बोली एवढीच की, आपल्या सहवासाने पुरुष अंध होतात. कारण, असे नसते, तर कमलाइतके विशाळ डोळे असतांना समुद्राच्या खड्डयांत सर्पाच्या वळकटीवर आपले प्राणवल्लभ छपरपलंग सोडून लवंडते ना. पण हा आपल्या संगतीचा प्रभाव, रुशे- फोकल्ट म्हणतो, " लक्ष्मी प्राप्त झाली असतां, ती आपल्या शरीरप्रकृतीप्रमाणे युक्तीनेच वापरली पाहिजे. पूर्ण भरांत असेल, तेव्हां यथेच्छ भोगावी, मंद असेल तेव्हां शांतपणे बेताबाताने वापरावी. आणि खडतर अमल, निर्वाणीची वेळ येईपर्यंत के- उहांच करूं नये. " खरे पाहतां, विपत्तीपेक्षां संपत्ति संभाळणे अधिक अवघड. विपत्तींत सहिष्णुता किंवा तितिक्षा हा एकच सद्गुण अंगी असला म्हणजे काम होते; परंतु संपत्तींत दक्षता, दीर्घदृष्टि, नेमस्तपणा, परार्थपरता, सौजन्य इत्यादि अनेक गुण लागतात; तरच संपत्ति सुखावह होते व टिकते. हे नसल्यास, लक्ष्मी अत्यंत बाधक होते. संकटसमयीं वृत्ति कशा प्रकारची ठेवावी याचे उत्कृष्ट उदा- हरण मिल्टन कवीचे होय. या कविरत्नाचे जेव्हां नेत्र साफ १.७० सुख आणि शांति. [प्रकरण । जाऊन ज्ञान ग्रहणाचे एक मोठेच द्वार नष्ट झालें, व जीवित हैं भारभूत होण्याची वेळ आली, त्या वेळी त्याने उद्गार काढिले की, (अभंग) देवाजीच्या मना आलें । तेंचि माते मानवलें। नच होईन निराश । मार्ग चालें सावकाश ॥ १ ॥ देव मत्पिता दयाळू । शासनार्थ करी खेळू ॥ जाणोनि हैं, शांतचित्त । देवापायीं मी विश्वस्त ॥२॥ हे उद्गार प्रत्येक विचारी मनुष्याने संकटसमयीं ध्यानांत वाग- विण्याजोगे आहेत. हे भाविकपण कोणाचे अंगी नसेल, तर त्याने एवढे तरी लक्षात ठेवावें की, (श्लोक) विघ्नांशी झगडा करोनि उरणे, शूरत्व हे आगळे । लांगफलो. जॉब म्हणतोः (श्लोक) निराश व्हावें नच दुःख येतां । होईल सूर्योदय रात्र जातां ।। है सत्य ध्यानीं धरुनी विचारें । करूं नये साहस दुःखभारें ॥ १ ॥ आपल्यांत एक म्हण आहे शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे पिकलें." याप्रमाणे जगांत पहावे तो एकाची हानि तो दुसन्या लाभ, असाही प्रकार पुष्कळदा आढळतो. बाकी ज्याचें साक्षात् नुकसान होते त्याला हे तत्त्वज्ञान गोड वाटणार नाही हे उघडच आहे. तथापि एकंदरीत स्थूल दृष्टीने एकूण जगाचा - ६ वें] आपत्ति. १७१ विचार केला असता, ज्यांत कोणाचाच कसला फायदा नाही, असे निव्वळ अनर्थ या सृष्टीत फारच थोडे होतात. जलप्रलय हे मोठे अरिष्ट खरे; पण जलप्रलय होऊन गेल्यावर पुढील साली तो प्रांत सुपीक होतो असा अनुभव आहे. ज्वालामुखी पर्वत हे एक महत्संकटच; तथापि त्याचे परिणामाने आसपासचे प्रांतचे प्रांत समृद्ध झाल्याची उदाहरणे आहेत. लंडन शहरांत जो १६६६ साली भयंकर अग्निप्रलय झाला, त्यानेदेखील सर्वथा लोकांची हानिच केली असें म्हणवत नाही. तेव्हांपासून शहराची घाण नाहीशी होऊन आरोग्य वाढले. प्राचीन काळी सुप्रसिद्ध पाँपी शहराचा नाश झाला, त्याची हृदयद्रावक वर्णने आहेत. पण ल- बकचे म्हणणें, तो नाश नसून शहराचे समृद्धीचे लक्षणच असें मी समजतो. गेटी म्हणतो, " जगतांत आजपर्यंत अरिष्टें कोसळली; तथापि या पापी शहराच्या नाशासारखें मनोरंजक अरिष्ट दुसरे कोणतेंच नसेल; त्याचे वर्णन म्हणजे तरुण पिढीला एक मोठीच करमणूक आहे." तोच ग्रंथकार अन्यत्र म्हणतो की, “ मळणीचे दिवशी शेतकरी ज्याप्रमाणे धान्याची पेंढी आयंड्यावर झोडपति असतो, त्याप्रमाणे कधीकधी घरीदारी दुर्दैव आपणांस झोडपीत असते; पण, आपण हे ध्यानांत धरावें कीं, सारी झोडपणी पें- ढयाला किंवा सरमाडाला बसते, आणि पुढील दाणा तसाच अखंड राहतो." त्याप्रमाणेच जे निःसत्व असतील ते दुर्दैवाने चिडून जातात; पण, खरे सत्त्वसंपन्न असतील ते अभंग आनदांत असतात.
१७२ सुख आणि शांति. [प्रकरण (श्लोकार्थ) कदर्थितस्याऽपि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते सत्त्वगुणः प्रमा?म् ॥ -भर्तृहरि. भावार्थः जो खरा धैर्यशील आहे त्याला दुर्दैव कसंही छळो, त्याचा दमदारपणा हटत नाही. पुष्कळदां मनुष्य विपत्तीच्या आटणीत सांपडल्यामुळे त्यांतील हीण झाडले जाऊन शुद्ध बावनकशी असेल तें निदर्शनास येते. अर्थात् या दृष्टीने पहातां, विपत्ति त्याला किंमतीला चढविते, व म्हणून ती उपकारकच आहे. सेंट मॅथ्यू सांगतो, " उद्यां कसे होईल ही नसती चिंता सोडून चाल दिवसावर नजर दे; व सर्वांआधीं परमात्मप्राप्तीची खटपट कर, म्हणजे त्यांत सारे आले. तो सर्वज्ञ व सर्वांतर्यामी आहे, तो तुझे अन्नाच्छादनाची फिकीर ठेवील तूं म्वस्थ अस. भगवद्भक्त तुकाराम सांगतात:- (अभंग) अंतरीचे बीज जाणे कळवळा । व्यापक सकळा जगताचा ॥ पांडवगीतेतही म्हटले आहे: (श्लोक) भोजनाच्छादने चिंता । वृथा कुर्वंति वैष्णवाः ।। योऽसौ विश्वंभरो देवः । स भक्तान्किमुपेक्षते ॥१॥ .....शौनक. भावार्थः---'भगवद्भक्तांनी अन्नवस्त्राची चिंता करणे व्यर्थ आहे. त्यांचा वाली जर विश्वभर आहे, तर तो आपल्या भक्तांना उपाशी-उघडे कसे ठेवील, हे त्यांनी लक्षात घेऊन निश्चित असावें. -
Xxkakakakakakakakakakakakakakakakakisatarak
प्रकरण सातवें.
सदयता.
Htitutetetetettttttttetetetetetetet tetete सन्न (श्लोक) निर्गुणेष्वपि सत्त्वेषु । दयां कुर्वति साधवः ।। न हि संहग्ते ज्योत्स्ना । चंद्रश्चाण्डालवेश्मनि ॥१॥ --मुभाषित. भावार्थः --- सजन हे गुणहीनावर देखील दया करितात. चाण्डालाचे झोपडीवर आपली मुखदायक चंद्रिका पाडण्यास चंद्रमा आळस करीत नाही. (अभंग) दया करी जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगों किती। तोचि भगवंताची मूर्ति ॥१॥ भावार्थ:-जो स्वपुत्राप्रमाणेच दासदासींवर दया करितो, तो प्रत्यक्ष भगवानच समजावा. तुकाराम म्हणतो, याहून काय सांगू ? FIX प्रकरण सातवें, सदयता. (श्लोक) को धो ?-भूतदया । -शंकराचार्य. (अभंग) भूतदया ठेवा मग काय उणें । प्रथम साधन हेचि असो ॥ ----तुकाराम. आपण अर्भकांवर रागावत नाही, रोगपीडितांना त्रास देत नाही, आणि 'न हि सतामुचितं मृतमारणं' ( मेलेल्यास मारणे योग्य नव्हे, किंवा मृताची निंदा करूं नये ), या विहित वचनांची योग्यता मनांत वागवितों; मग याच उदार व सदय वृत्तीचा उप- योग व्यवहारांत आपण सर्वत्रच का करीत नाहीं बरें ? ज्या वेळी आपण एकाद्याचे हातून चूक झाली म्हणून त्यावर रागावतों, त्या वेळी आपण त्याचे कृतीपुरतेच लक्ष पोचवितों; पंरतु तशी कृति त्याने आपसुखे केली किंवा काही प्रसंगामुळे निरुपायास्तव केली, याचा विचार करीत नाही. गर्दीत रेटारेटी चालते तेव्हा आपल्या अंगाशी येणारावर कोणी लोक कातावतात; पण ते असा विचार करीत नाहीत की, त्यालाही दुसरे मागून रेटीत आहेत; त्या दडप्याने तो आपले अंगावर पडतो, यांत त्याचा अपराध नाही. आगगाडीत हा नित्य देखावा आहे. पण हा अविचाराचा प्रकार १७६ सुख आणि शांति. [प्रकरण समजावा. कोणत्याही विशिष्ट कृतीबद्दल कोणावर रागावणे तर तत्पूर्वी त्या कृतीला कारणे काय झाली असावी त्यांचा पूर्ण विचार करावा, म्हणजे बहुधा रागावण्याची पाळी येणार नाही. मॅडम डी. स्टील म्हणेः कोणाचेही कृतीचा सर्वांगी विचार झाला म्हणजे ती बहुधा क्षम्य वाटतेच." सेनेका म्हणेः " अर्भकें अज्ञान म्हणून त्यांची गय करणे उचित आहे, त्याचप्रमाणे स्त्रिया अबला म्हणून; राजेलोक बहुका- यसमाकुल म्हणून; सज्जन सद्धेतुप्रेरित म्हणून आणि दुर्जन हे परि- णामी ईश्वरास दण्ड्य अतएव आपणांस अनुकंप्य म्हणून त्यांच्या- ही अपराधाबद्दल क्षमा करणे हेच न्याय्य आहे." एतावता, विचारी माणसाला दुसन्यावर रागास येण्याला स्थले फार थोडी आहेत. थेल्सला एकाने विचारिलें की, सर्वांत अवघड गोष्ट कोणती व अत्यंत सोपी गोष्ट कोणती! तेव्हा त्याने उत्तर केले की, दुस- याचे कृतींतील दोष काढणे ही अत्यंत सोपी गोष्ट; व आत्म- दोषांचा विचार करणे ही सर्वांत अवघड गोष्ट आहे. (श्लोक) नरः सर्पपमात्राणि । परच्छिद्राणि पश्यति ।। आत्मनो बिल्वमात्राणि । पश्यन्नपि न पश्यति ॥१॥ -हितोपदेश. भावार्थ--मोहरीएवढा क्षुद्र दोष दुसन्यांत असला, बाहेर काढितो. आणि स्वतःचे ठिकाणी बेलफळाएवढा मोठा असला, तरी तिकडे पाहूनही दुर्लक्ष करितो. मनुष्य तो ..] सदयता. १७७ विद्यारण्यांनी म्हटले आहे की, मनुष्य परदोषान्वेषणीं जितका दक्ष असतो तितकाच जर स्वदोष दर्शनी असेल तर तो दुःखमुक्तच होईल. न्याय म्हटला म्हणजे प्रत्येकानें लक्षपूर्वक स्वकर्तव्य करीत रहावें; ; दुसन्याच्या चौकश्या करीत बसू नये. तसेंच, परदोष वि- षयीं सौम्य दृष्टि ठेवावी आणि म्वदोषांवर मात्र कडक नजर रा- खावी; यांत कल्याण आहे. आपल्या स्नेह्यांचे दोष काढीत बस- • ण्यापेक्षा एक वेळ आपल्या शत्रूचे गुण घेणे बरें. प्रत्येकानें मना- शी असा विचार करावा की, आपले मनाप्रमाणे आपले स्वतःचे हातूनच जर वर्तन होत नाही, तर इतरांचे हातून ते कसे व्हावें ? आणि आपल्या मनाप्रमाणे लोकांनी चालावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने स्वतःही लोकांचे मनाप्रमाणे चालण्यास तयार अस- ले पाहिजे; तरच जुळेल व समेट राहील. थामस ए. केम्पिस म्हणतोः- (श्लोकार्ध) त्वदिच्छानुरोधे असावें जनांहीं ॥ जरी वांछिसी, तूं तसा केविं नाहीं ? ॥ आपण ऊठपाय दुसन्याचे दोष काढीत असतो; पण स्वदो- षांनी आपली हाने किती तरी अधिक होते, इकडे लक्ष पुरवीत नाही. खरे पाहतां परदोषांपेक्षा स्वदोषच आमचा घात करितात; परंतु चमत्कार हा आहे, स्वदोषांचे ठायीं आमची दोषदृष्टि नसून उलट प्रेम असते. ते इतकें की, ते टाकण्याविषयीं जो जो कोणी १२ १७८ सुख आणि शांति. [प्रकरण उपदेश करील तो तों आम्ही ते अधिकाधिक उराशी परितों. व कोणी त्यांचा निषेध केला की, आम्ही त्यांचे मंडन करीत सुटतों. व्यसनी लोकांची या कामी भाषा पहावी. तमाखू खाणाराचा तुम्ही निषेध करावा; म्हणजे तो तत्काल म्हणेल, 'छे ! तमाखूवांचून शौचास साफ होत नाही.' हे म्हणणे कितपत खरे आहे ते दिसतेच आहे. लबक म्हणतो, इतर कारणे दूर राहोत, पण आपण स्वतःचें चित्त शांत व स्वस्थ रहावें एवढ्याखातरच परपैशन्यमनन व पराप- कारबुद्धि ही सोडून देऊन आपलेभोंवतालचे माणसांचे दोषांविषयी उपेक्षाबुद्धि ठेवावी. त्यांच्या कृतीचा व उक्तीचा, बनेल तो विप- रीतार्थ करूं नये. त्यांची संकटें काय आहेत इकडे ध्यान द्यावे. त्यांचे अपराधांना देववेल तितकें सौम्य स्वरूप देत असावे व त्यांचे गुणांचे कौतुक करावें. आपण असा विचार करावा की, या जगांत सर्वगुणसंपन्न कोण आहे ? आपण तरी आहों का? मग दु- सन्यांत दोष असले तर तेच आम्हांस का जाचावे ? दुसऱ्याचे दोष किंवा लहरीपणा याबद्दल रागें भरणे हे, वादळ कां उठले, किंवा हवा वाईट का पडली म्हणून आकाशावर डोळे फाडण्याइतकेंच अविचाराचे आहे. आकाशावर रागावून आकाश थोडेंच सुधारतें आहे ! त्यापेक्षा स्वस्थ राहणे बरे. एक वेळ आत्मापकार पुरवेल, पण परापकार बरा नव्हे. भांडखोराचे तोंडांत भडकावण्यापेक्षा आपले तोंड मिटणे अधिक शहाणपणाचे. शिवाय दुसऱ्याला शासन करण्यांत कधी कधी अशी फजिती होते की, आपला त्याच्या ७ ३.] सदयता. १७९ कृतीविषयीं मूळ गैरसमज झालेला असतो आणि आपणच विना- कारण नसती कुरापत काढिली असें अखेर निपजतें. आतां कधी कधी असेंही होते की, आपल्या संगतीची माणसें खरोखरच त्रास- दायक असतात; तथापि, अशांशी जपून वागणे आपले हाती अस- तें. वाऱ्याशी भांडणारी माणसे आढळतात, हे खरे; पण, खडका- वर आमि काय जाळील त्याप्रमाणे आपण उत्तरच केले नाही तर तो काय भांडेल ? ' मौनिनः कलहो नास्ति.' प्रसिद्ध साधु तुका- राम व सॉक्रेटिस यांना संगतीला जातीवंत कृत्या मिळाल्या होत्या. दुसरीने तर एक दिवस प्रथम नवऱ्यावर यथेच्छ तोंड सोडून अखेर त्याचे डोक्यावर शेणखळ्याचे गाडगें ओतले. तथापि त्या शांतिब्रह्माला ढळ आला नाही. ठीकच आहे, ' महावात सूटला म्हणुनि का कंप येत भूधरा ? ' प्रसंगी दुसरा मनुष्य खराखुराच अपराधी, अतएव शासनार्ह आहे, असे असूनही आपण क्षमा केली म्हणून काही वावगे नाही. त्यांत आपला फायदाच आहे. आपल्या मनःसंयमाची ती एक कसोटीच आहे. कालिदा- साने म्हटले आहे: (श्लोकार्ध) विकारहेतौ सति विक्रियते। येषां न चेतांसि त एव धीराः ।। -~-कुमारसंभव. भावार्थः-मन विकृत होण्याला प्रत्यक्ष कारण असाही ते शांत ठेवू शकतील तेच खरे धीर. त्यास
सुख आणि शांति.
[प्रकरण
तो
खेरीज, अपराध्याला क्षमा केली असतां,
कृतज्ञतापूर्वक
आपला स्नेही झाल्याची उदाहरणे जगांत आहेत. त्या अर्थी
शासन करून शत्रुत्व वाढविण्यापेक्षां क्षमा करून मित्रत्व जोडणे
हैं अधिक बरें.
दुसऱ्याची ज्याला वेदना नाही , त्याची दुसन्याला तरी कशी
असावी? देवच बोलला आहे की,
(श्लोकार्ध)
ये यथा मां प्रपद्यते । तांस्तथैव भजाम्यहम् ॥
-~-श्रीमद्भगवद्गीता.
'जशाशी तसें,' हा लौकिकी न्यायच आहे. जो दुसन्यांवर प्रेम
करीत नाही, त्यावर दुसरही करणार नाहीत हे उघडच आहे;
व त्यांनी एक वेळ केले, तरी ते व्यर्थ आहे. कारण, प्रेमाचा
स्वभाव असा आहे की, ते सदा परस्परनिबद्ध लागते; एकतर्फी
प्रेम सुखावह होत नाही. म्हणच आहे, ‘प्रेम द्यावे आणि प्रेम
घ्यावे. ' जो अरासिक किंवा प्रेमहीन मनुष्य असतो अशाला कोणी
प्रेम केल्यास सुख न होता, त्रास होतो. दुसऱ्याच्या प्रेमाचे
कौतुक करण्यास स्वतः प्रेमी असावे लागते. पण जगांत कधी कधी
असे अरसिक जीव आढळतात की, त्यांचे ठिकाणी प्रेमाचा कसा
तो ओलावा नसतो. ते केवळ माणूसघाण्ये असतात. अर्थात्च
लोकांनाही अशांची घाणच वाटते. असले एकलकोंडये प्राणी
धरणीला क्लेशावहच म्हणावयाचे, कारण, त्यांना दुसऱ्याचा वागारा
मिळून सोसत नाही. ' मी आणि माझें' एवढेच त्यांचे पाहणे.
,
७ वें.] सदयता. १८१ - .. आगगाडीत पहावें तो इतर माणसें खेचून उभी असतात ; पण एकादा पाय पसरून निजलेला असतो. तो हालावयाचा नाही की पाय आंवरावयाचा नाही. कोण अनौदार्य हे ! कोण माणूस- तोडेपणा हा! म्हटले आहे: -'पंचभिः सह भोक्तव्यं - तीळ सात जणांनी वांटून खावा. याला म्हणतात माणुसकी. कवि म्हणतोः " काकोऽपि किं न कुरुते चंच्वा स्वोदरपूरणं ।' स्वतःचे पोट कावळाही भरतो. तेव्हां ' स्वतःपुरतें' हा क्षुद्र विचार सोडून परार्थ देह झिजविणे हेच जीविताचे सार्थक आहे. ( श्लोकार्ध) क्षुद्राः सन्ति सहस्रशः स्वभरणव्यापारमात्रोद्यताः । स्वार्थो यस्य परार्थ एव स पुमानेकः सतामग्रणीः ।। -भर्तृहरि. भावार्थ:-स्वतःचे पोटासाठी खपणारे क्षुद्र जीव हजारों आहेत; पण परालाच स्वार्थ समजून झटेल तो सत्युरूप खरा. परार्थ झटणे हे केवळ चांगले किंवा स्तुत्य आहे; एवढेच नव्हे, तर, हे मनुष्यमात्राचे कर्तव्यच आहे. कारण, असा कोण आहे की जो दुसन्याचा ऋणी नाहीं ! आपला देहदेखील पंचमहा- भूतांचे कृपेचें फल आहे. याच दृष्टीने पहातां, प्रत्येक मनुष्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने तरी कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, जगताचा ऋणी आहे; व त्या ऋणाचे यथाशक्ति निर्यातन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण या जगांतूनच ज्ञान मिळविलें; त्या अर्थी ते याच जगाचे कल्याणासाठी खर्ची घालणे आपले कर्तव्य नव्हे काय ? जो ज्ञानाला दृष्टान्त, तोच सर्वत्र. यासाठी १८२ सुख आणि शांति. [प्रकरण .. प्रत्येकानें यथाशक्ति परोपकार करीत असावें. परोपकाराला सदा द्रव्यच लागते असे नाही. ' तुका म्हणे उपकार, एका वचनाचा फार.' इतका तो सुखसाध्य आहे; मात्र इच्छा पाहिजे. थोरांकडे पहावें तो ते स्वार्थ विसरून परार्थच करीत असतात, 'परोपकाराय फलात वृक्षाः'-वृक्ष स्वतः फळ खात नाहीत; परंतु, परार्थ फळ- भार वाहतात. हाच सजनांचा पंथ आहे. क्षुद्र जीवांना वाटते की, परार्थच करीत सुटावे तर स्वार्थाची काय वाट ? पण त्यांना समजत नाही की, “ साधितसे परकीय हिता, परि साधन आत्म- हितीच करी तो." अशी ही उलटी खूण आहे. परोपकारासारखें मुख नहीं; असला विशुद्ध आनंद दुसरा नाही; हे अनुभवी जाण- तात. एकदा तानेला मनुष्य ऐन दुपारी पाणी बाहो' म्हणून दारी यावा आणि अशा वेळी त्याला आपण थंडगार पाणी पाजावें; तर जसजसा त्वचा तृपोपशम होतो तसतसा त्याचे मुखाने आपला अंतरात्मा थंडगार होत जातो, असा अनुभव कोणा सहृदयाला नाहीं बरें ? आणि याहून अधिक सुखावह तें सुख ते सर्वदा परार्थोद्यत असतात. रणां- गणी स्वतः तृषाक्रांत असतांही सर सिड्ने स्मिथ हा शेजारचे शिपायाला म्हणाला, 'हे तूंच पी; तुला जरूर अधिक आहे. धन्य त्या महात्म्याची (श्लोक) व्यग्रा ये च परोपकारकरणे हृप्यन्ति ये याचिताः। तःस्तंभरिव सुस्थिरैश्विरभरक्लांता धरा धार्यते ॥ -भर्तहरि, काय ? हे जे जाणतात ७ वें.] सदयता. १८३ . भावार्थः ...जे परोपकारांत सर्वदा गुंतले असून, मागण्याने ज्यांना आनंद होतो, असले पुरुष या भारवलेले पृथ्वीचे आधारस्तंभच होत. परोपकार या शब्दांतील खेर रहस्य जर मनुष्यांना कळेल, तर त्यांना त्याची गोडी अधिक लागेल. पण ते नीटसे कुठे सांगितलेले नाही. परोपकार या शब्दांतील नाजूक अर्थ, 'पर' म्हणजे दुस-याला, 'उप' म्हणजे जवळ, 'कार' म्हणजे करणे, असा आहे. अर्थात् , परोपकार म्हणजे दुसन्याला आपलेजवळ करणे किंवा ओढणे, म्हणजे आपलेसे करणे किंवा आपल्यांत मिळ- वून घेणे, असा प्रकार आहे. या अर्थाहूनही खोल अर्थ या शब्दांत आहे. पर म्हणजे परमात्मा, याला जवळ करणे; आणि परमा. त्माला आपलासा करण्याचा सर्वांत मुलभ उपाय म्हणजे परोपकार किंवा भूतदया हाच होय. म्हटले आहे: " नम्र झाला भूतां । तेणें कोंडिले अनंता॥' पण, हे वर्म समजले पाहिजे. आतां, परोपकार करणे, दयाधर्म करणे, दीनास साह्य करणे, हे जरी श्लाघ्य असले, तरी त्यांतदेखील विचार पाहिजे. साह्य करणे किंवा दान देणे ते अपात्री झाल्यास सर्पास दूध पाजण्या- सारखें अपकारक होईल; याकरितां दान देणे तेंदेखील पात्रापात्र पाहूनच दिले पाहिजे. म्हणूनच, दान देणें तें देश, काल व पात्र पाहून द्यावे, व त्यालाच सात्त्विक दान म्हणतात " असें भगवंतांनी अर्जुनाला बजावले आहे. लबक म्हणतो, दरिद्यांना जे साह्य करणे ते, त्या योगाने ते स्वावलंबी बनावे म्हणून केले पाहिजे. आपले साह्याने आळस - १८४ सुख आणि शांति. [प्रकरण वाढून ते जर अधिक परावलंबी होतील तर अशांना साह्य करूं नये. आचार्यांनी गीताभाष्यांत ' मूर्खास दान देऊ नये, ते तामस होय' असे स्पष्ट सांगितले आहे. विद्यार्थ्याला मधुकरी घालणे ती लवकरच त्याची मधुकरी सुटावी म्हणून घालावयाची. पोराला आपण पांगुळगाडा देतो तो त्याचे पांगळेपण दूर व्हावे म्हणून देतो; कायम रहावे म्हणून देत नाही. आपले साह्याने दुसरा केवळ सुखांत राहिला म्हणजे सार्थक झाले नाही; तर तो सन्मार्गी बन- ला पाहिजे, तरच त्या साह्याचे चीज. अपात्री साह्य करणे म्हणजे समाजाला अपकार करणेच आहे. गांवावर जेवून गांजातमाखू फु. कणारे टोळ शहरांत आढळतात. अशांना अन्न घालणे म्हणजे स- माजांत दुर्गुण वाढविणे नव्हे काय ? याकरितां दान देणे हे जरी स्तुत्य असले तरी सत्पात्री दान देतां येणे हे अवघड आहे. लबक म्हणतो. दुसन्यास साह्य करणे तर त्याची प्रथम आपणास लायकी समजली पाहिजे. व दान देणे तेमात्र प्रेमाने व कळवळ्याने दिले पाहिजे जुलुमाच्या रामरामांत कांही हंशील नाही. एकादा मनुष्य स्वभावतःच हाताचा सढळ असतो आणि मागत्याला तत्काळ देतो. पण वेकन म्हणतो, साह्य करण्यांत आपला हेतु दुसन्याची केवळ गरज भागविण्यापुरता नसून त्याला स्वावलंबी बनविण्याचा असला पाहिजे.” तो सोडून आपण जर आपले साह्यामुळे दुसन्यास अधिक ऐदी बनवू, तर आपण उपकर्ते नसून अपकर्तच होऊ. आम्ही अशा कृतीने समाजाची अवनति करितो, असे समजावें. म्हणून द्रव्यादि दान विचारपूर्वक करावें.
७ वें.] सदयता. १८५ कोरडे प्रेमदानच असेल तरमात्र टंचाईचे कारण नाही. कारण त्याका दुकाळ कधीच नाही, व त्यापासून इतका तीव्र अपकारही होत नाही. द्रव्याची गोष्ट निराळी आहे. कोणापाशी झाले तरी ते मर्यादितच असणार. अर्थातच ते अविचाराने अपात्रांना दिले गेल्यास सत्पात्र उघडे पडतील. भलाईच्या पोटी आपण नालायक मनुष्य अन्नाला लाविल्यास लायक मनुष्य उपाशी मरेल. छाकट्याला साह्य केल्याने दुर्गुण चेतविण्याचे पापमात्र जोडेल. यासाठी द्रव्य- दान तरी सावधपणानेच केले पाहिजे. नुसतें सरस्वतीदान वाटेल तसे करावें. बाकी उपदेश किंवा ज्ञानदानदेखील पात्रींच करणे आधिक बरें. एकानें काटकसरीने पैसा सांठवावा आणि दुस-या आयतोजीने तो उधळावा, हा प्रकार जपा डोळ्यांत सलणारा आहे, तपाच, सत्तात्र उघडे टाकून असत्पात्रांना झांकणे हा आहे. या करणीने लायक तेवढा उघडा पडला, आणि नालायक तो नालायक ठरलेलाच आहे. स्पिनोझाचे या कामी असे म्हणणे आहे की, आपले समा- जाचा यापुढे उत्कर्ष व्हावा असा जर आपला हेतु असेल, तर आपणही ईश्वराचाच कायदा पाळला पाहिजे. तो कायदा म्हणजे 'कृति तसे फळ.' अर्थात् जो वर्तनाने अपात्र आहे तो दयेलाही अपात्र आहे. अशाची कीव न करावी हेच न्याय्य. तुकाराम अपात्र लोकांविषयी म्हणतातः- (अभंग) भिक्षापात्र अवलंबणें । जळो जिणे लाजिरवाणे ॥ ऐशियासि भगवाने । उपक्षिजे सर्वथा ॥१॥ .
१८६ सुख आणि शांति. [प्रकरण लबक . एक गृहस्थ आपल्या पुत्रास म्हणतो, दया करण्याचे फळ पुष्कळदां — कृतघ्नता ' हेच जरी अनुभवास येते, तरीदेखील तूं दया करण्याचे सोडूं नको. जे तुजशी कृतघ्न होतील, त्यांचा न्याय देव करील, असें मानून तूं आपला दया करीत जा. म्हणतो, हे म्हणणे थोरपणाचे आहे व आम्हीं तें स्वीकारलेही असते; परंतु अपात्री उपकार करण्याचा परिणाम उपकाशी कृतघ्नता ए- वढाच न होतां उपकृतांचे ठिकाणी दुर्गुणांची वाढ हा होतो, व हा परिणाम अनिष्ट आहे, म्हणून वरील गृहस्थांचा उपदेश अंमळ जपू- नच ऐकिला पाहिजे. मनुष्य हा स्वभावतः सुखलोलुप असतो. पडल्या ठिकाणी कोणी तोंडांत जांभूळ ढकलील तर बापड्याला कबूल च आहे. किंचित साह्य मिळाले की तो लगेच सुखावतो. याकरिता, जेणेकरून मनु प्याचे स्वावलंबित्व व उद्यमपरत्व वाढेल अशा खुबीने त्यास साह्य केले पाहिजे. म्हणून द्रव्यसाह्य करण ते नीट पाहूनच करीत जावें. बाकी, सल्लामसलत देणे, वेळ खर्चणे, कळवळा बाळगणे ह्या गोष्टीत इतकी बारकाई न केली तरी चालेल. द्रव्यदानाला विशेष विचार पाहिजे, पण क्षमादानाला नको; सर्वत्र करावें. क्षमादानापेक्षाही उपकाराची स्मृतिच न धरणे हे अधि. क थोरपणाचे होय. अल्फेड दि ग्रेट राजाचा अखेरचा उपदेश असा आहे की, "दुःखितांस सुखी करा, निराश्रितांस आश्रय द्या; उघड्यांवर पांघ- रूण घाला. आणि जे काही चुकीचे दिसेल तें यत्नपूर्वक दुरुस्त सदयता. १८७ करा. अशा कृतीने देव तुम्हांवर प्रसन्न होईल-नव्हे,-देव तुम्हांस प्राप्त होईल." तुकोबाही म्हणतात: (अभंग) जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥ १ ॥ सारांश, कोणाचेही मते पाहिले तरी परोपकारासारखी उंची गोष्ट नाही. उलट पक्षी स्वार्थासारखी वाईट गोष्टही कोणची नाही. कारण, स्र्थाची पूर्तता ही कधी होतच नाही व यामुळे मनुष्याला त्या बाबतीत सुख असे वाटतच नाही. पण मनुष्याने स्वस्थितीचा विचार करणे तो नेहमी आपल्याहून हीन स्थितीत असतील त्यांजकडे पाहून करावा. म्हणजे त्याला आपलीच स्थिति बरी आहेसे वाटून तींतच सुख होत जाईल. म्हणच आहे...' जोडा घालणाराने अनवाणी चालणाराकडे पहावें; घोड्यावर बसणाराकडे पाहूं नये.' दयेच्या सदरांत प्रेम याचाही अंतर्भाव करणे जरूर आहे. शिलरला ही गोष्ट मान्य नाही. तो म्हणतो, प्रेम हे मनुष्याला उप- कारक नाही; ते त्याला नेभळे करते. पण लबकचे म्हणणे की, प्रेमाचा प्रसंगविशेषीं दुरुपयोग झालेला आढळला म्हणून तेवढ्या- वरून प्रेम हा विकार त्याज्य किंवा तुच्छ समजणे न्याय्य नाही. आता एवढें खरें की, मुग्ध प्रेमाचा फारसा उपयोग होत नाही. तें व्यक्त झाले पाहिजे. मग मात्र त्यासारखें बिनमोल कांहीं नाही. आपल्या मातेची काळजी, उत्तेजन, व सर्वांत अधिक तिचे प्रेम, यांपासून आपले किती तरी कल्याण झाले आहे, याची ओळख , , १८८ सुख आणि शांति. [प्रकरण . प्रत्येकास आहेच. रॉयल अकॅडेमीचा अध्यक्ष सर बेंजामिन वेस्ट याला एकदां कोणी विचारिलें की, आपण इतके निपुण चित्रकार कशाने झालां? त्यावर त्याने उत्तर दिले, 'माझ्या मातेचे सप्रेम. चुंबनामुळे. रुबेन्स नामक चित्रकाराने आपल्या तूलिकेच्या एका फटका. न्याने हंसरा चेहरा रडका करून दाखविला, अशी आख्यायिका आहे. पण लबक म्हणतो, हंसत्या माणसाला रडू लावण्यास किंवा रडत्यास हलविण्यास कुशल कारागिराची किंवा त्याच्या कलमाच्या फटकान्याची जरूर नाही. तो सारा एका शब्दाचा खेळ आहे. ममतेचा, कळवळ्याचा एक शब्द रडत्याला प्रसन्न करून हंस- वील. त्याचेच उलट मर्मतक, निष्ठुर असा एक शब्द हंसत्यास रडविण्यास पुरे. कारण, मानवी हृदय पाषाणाचें नाहीं; आणि नसावें हेच ठीक. ते फार कोमल आहे, व यामुळे ते प्रसन्न किंवा अप्रसन्न करणे हे थोड्या युक्तीचे काम आहे. मागेंच म्हटले आहे, तुका म्हणे उपकार । एका वचनाचा फार ॥" त्याप्रमाणे प्रेमाच्या एका शब्दाने जन्माचा मित्र होतो. आणि हा इतका स्वल्प उपाय जर आहे, तर त्याची दुर्लभता कां ठेवावी ? एका कवीने म्हटले आहे: (श्लोक) वाङ्माधुर्यात्सर्वलोकप्रियत्वं । वाक्पारुष्यात्सर्वलोकाऽप्रियत्वम् ।। ?
७ वें] सदयता. १८९ , किं वा लोके कोकिलेनोपनीतं । किं वा लोके गर्दभस्यापराधः ॥ १।। भावार्थ:-मधुरवाणीने सर्व आपलेसे होतात. कठोर वाणीने सर्व आपला कंटाळा करितात. यास दृष्टान्त कोकिल व गर्दभ. वडिलांचे सांगणे आहे: ' गूळ नाही, पण गुळासारखी वाचा तरी असावी.' ते घेण्यासारखे आहे. प्रेमाचे, कळवळ्याचे शब्दांनी देखील दुःखिताचे दुःख हलकें होतें. स्निग्धजनसंविभक्तं हि दुःखं सह्य वेदनं भवति । -कालिदास. व दुसऱ्याचे दुःख हलकावणे ही कांहीं हलकी गोष्ट नाही. परदुःखहरणाहून अधिक पुण्य कोणते ? वडिलांची एक म्हण आहे, ' शुभ बोलत असावें.' अॅनी बेझांट बाईंनी आपल्या एका ग्रंथांत सांगितले आहे की, “ विचार- पूर्वक उच्चारलेला प्रत्येक शब्द सजीव व मूर्तिमान् असून त्याचे बरे- वाईट प्रकृतीप्रमाणे दुनियेत कामगिरी करितो. ही अतिशयोक्ति नव्हे. बरेच मंडळीने एकदिलाने जर विचार केला की, शेजारच्या एका खेड्यांत कलह माजवावयाचा, तर त्यांनी केवळ या कामी दृढेच्छा केली तर समक्ष न जाताही तेथें कलि माजेल." अर्थात् केवळ अशुभचिंतनानेदेखील दुसन्याचे अकल्याण होऊ शकतें, आणि त्याचेच उलट पक्षी, शुभचिंतनाने दुसऱ्याचे शुभ होऊ शकते. हाही शास्त्रमान्य सिद्धान्त आहे. याचकरितां प्राणिमात्राचे कल्या- णाची इच्छा करावी, सर्वदा शुभचिंतन करावे व शुभच बोलावे.
१९० सुख आणि शांति. [प्रकरण समर्थांनी म्हटले आहे, " सर्वांमुखीं मंगल बोलवावें" तें उगीच नव्हे. ख्रिस्ती लोकांत अशी एक आख्यायिका आहे की, ग्रेगरी नामक धर्मगुरूने ईश्वरापाशी प्रार्थना करून ट्रेजन नामक बादशहाला नरकांतून उद्धरिलें. लबक म्हणतो, हे कसेही असो, तरी सर्वांनी शुभ चिंता करावी व शुभ व प्रेमळ बोलावें. अशाने मानवी सुखाची निःसंशय वृद्धि होते. अंगी बळ असल्यास त्याचा विनियोग दुर्बलांचे परित्राणाकडे करणे हाही, मानवी सुखवृद्धीचाच उपाय आहे. (दिंडी) दुर्बलांशी वागुनी स्नेहभावें । तद्गुणांसी कौतुकें आदरावें । जरी दिसती तत्कृतीमाजीं दोप । उपेक्षावे ते सांडुनिया रोष ॥ १ ॥ -प्रायर. प्रेमपात्र होण्यापेक्षां प्रेमकर्ते होणे अधिक चांगले आहे. प्रेमा- चें सामर्थ्य अगाध आहे. मुलेंलेंकरें तर प्रेमाने जेवढी स्वाधीन होतात तेवढी कडक शिक्षेने होत नाहीत. पोरांचे राहो, एवढा सर्वशक्ति परमेश्वर, पण प्रेमापुढे तो देखील हार खातो. मोरोपंत म्हणतातः (आर्याचरण) सत्यप्रेमा दावुनि तैसा तो विश्वपाळ कवळावा ॥ प्रेमाने विश्वचालक जर मुठीत येतो, तर पामरांची काय कथा ? यासाठी प्रेमानेंच जगत् जिंकावे व सुखीही करावें. एक वेळ आपला अपकार कोणी केला तरी सोसावा; पण आपण कोणाचा अपकार करू नये. आणि काम खासगी असो वा सार्व- ७.] सदयता. १९१ जनिक असो, त्यांत सर्वदा भलाईनें वागावें. आपले कोणी वैर करीत असेल, तर प्रायः त्याचे कारण आपले वर्तनांतच आहे, असे समजावें. धर्मराजाला 'अजात-शत्रु ' नांव होतें तें त्याने आपल्या वर्तनाने मिळविले होते. स्वभाव संशयी नसावा. संशयी मनुष्याला चांगला कोणीच दिसत नाही व यामुळे त्याला सहजच मित्र जोडत नाहीत; शत्रुमात्र सुकाळाचे होतात. म्हणून दक्ष असावें, पण संशयी नसावें. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे: "संशयात्मा विनश्यति." अकारण शत्रु जगतांत आढळतात; पण असें क्वचित्. बहुधा 'कारणेन हि जायंते । मित्राणि रिपव- ॥ हेच म्हणणे खरे आहे. स्तथा येशु ख्रिस्त म्हणे की, " देवाने मला जे अनेक अधिकार दिले आहेत त्या सर्वांत पृथ्वीवरील लोकांचे 'पापांची किंवा अपराधांची क्षमा करण्याचा ' जा अधिकार दिला आहे तो अत्यंत दिव्य आहे. हा क्षमा करण्याचा दिव्य अधिकार आपल्या शक्तीप्रमाणे आप- णाही प्रत्येकास आहे. क्षमा करण्याची शक्ति आपणा सर्वांस आहे. इच्छामात्र पाहिजे. आपणाशी एकादा मनुष्य कठोरपणाने किंवा निर्दयपणाने वागून आपले एका बाजूने मन दुखवितो, हे खरे; पण दुसऱ्या बाजूनें तो आपला अपराधी होऊन त्याच्या अपरा- धाची थोर मनानें क्षमा करण्याची अमूल्य संधी आयतीच आप- णास आणून देतो; आणि यासाठी आपण त्याचा अपकार न मा- नितां उपकारच मानावा.
१९२ सुख आणि शांति. [प्रकरण कृतापराधाबद्दल सूड उगविणे हे पामरांचे लक्षण आहे. क्षमा करणे हे साधुत्व, किंबहुना देवत्व आहे. “ अपकारिषु यः साधुः । स साधुः सद्भिरुच्यते."- उतम पुरुष म्हणावा, जो करितो शत्रुवरिहि उपकार ।। आपण जर नित्य परमात्म्यापाशी स्वापराधांची क्षमा मागतो, तर मग त्य च न्यायाने पहातां, आपणही दुसन्यास क्षमा करण्यास तयार असणे उचित नव्हे काय? (श्लोकार्ध) आत्मौपम्येन भूतेषु । दयां कुर्वति साधवः । -हितोपदेश. भावार्थ:--भले लोक आपल्याप्रमाणेच भूतमात्रावर दया करितात. आम्ही जर इतरांस क्षमा न करूं, तर देवाने तरी आम्हांस का करावी? हा विचार प्रत्येकानें मनांत बाळगावा. कोणी आप- णावर रागावला असतां नम्रपणाने व मृदुशब्दाने उत्तर द्यावे म्हणजे त्याचे रागाची तीव्रता तेव्हांच बोथटते; तेच उलट त्वेषाने किंवा कुभावाने उत्तर दिले म्हणजे तीच अधिक जोरावते, व कायमचा प्रेमभंग करिते. यासाठी क्रुद्धास हात जोडून उत्तर द्यावे. फ्लॉरे. न्सचा ड्यूक कास्मो म्हणे की, “ईश्वराने 'वैयाला क्षमा कर' (मित्राला नव्हे ) अशी आज्ञा केली आहे, यांत त्याची विशेष खुबी आहे. ती अशी आहे की, वैन्याचा आपण सूड घेतला किंवा त्याच्या हडक्या मोडल्या तर, फार झाले तर तो बाह्यतः नरम येईल, परंतु क्षमा केल्याने बहुधा तो द्वेषभाव अजीबात सोडून कायमचा मित्र होईल. अर्थात् ही गोष्ट अधिक किंमतीची आहे.
७ ३.] सदयता. दुसरी गोष्ट, सूड घेण्याचा विचार आपले मनांत धुमसत ठेविला म्हणजे तो वैन्याचे पूर्वी प्रथम आपणासच जाळतो; आपल्यास सुखस्वास्थ्य कसें तें उरूं देत नाही. त्यापेक्षा, क्षमा केल्याने वैरीही लज्जेने तरी द्वेषभाव सोडतो व आपल्याला रुखरुखीचें कारणच न उरल्याने आपलाही अंतरात्मा शांत असतो. पण कित्येक माणसे अपकाराची स्मृति सदैव आपले उराशी बाळगितात." क्षमेने शत्रु वाटेवर आणणे हे शूरत्व खड्गधारेने त्याची मान तोडण्यापेक्षाही अधिक धन्यतेचे आहे. क्षमेने शत्रूला शरमवि- ल्याने तो मनचे मनांतच मरून जातो व अनुतापानें शुद्ध होऊन आपला मित्र बनतो. शक्तीचे जोरावर आपण खोड जिरविली, तर तो असामर्थ्यास्तव जरी बाह्यतः गप्प बसला, तरी मनांतला डंक सोडीत नाही, व संधी आली असतां पुनः उरफाटून छातीवर बसतो. एकादा पक्का लुच्च्या असतो, तो पराभून होतांच अनु. ताप दाखवून वरपांगी सरळ झाल्याचे भासवितो, परंतु डाव सोडीत नाही. यापेक्षां भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे- (श्लोकचरण) क्षान्त्यैवाक्षेपरूक्षान् खरमुखरमुखान्दुर्मुखान् दूषयन्तः । ही पद्धत चांगली. लबक म्हणतो, शत्रूवर दया करण्याइतकें औदार्य तुमचे अंगी नसले तरी निदान स्वतःविषयीं तरी निर्दय होऊ नका. आणि शत्रूचा सूड घेण्याची बुद्धि मनांत बाळगणे म्हणजे स्वतःला एक जबरदस्त हृद्रोग आपण होऊन लावून घेणे आहे. सूड घेण्याचा ससेमिरा एकदां पाठी लागला की, त्या पुरु. पाला खाल्ले अन्न अंगी लागत नाही, निद्रा नाही, विश्रांति नाहीं; - १३ १९१ सुख आणि शांति. [प्रकरण ळून त्याला शरशय्येवर निजल्यासारखें किंवा विंचवांचे तळ्यांत पडल्या- सारखे होते व सुखशांतीला तो मुळीच अंतरतो. एवढा अनर्थ या सूड घेण्याच्या बुद्धीने जर होत आहे, तर तिजपेक्षां उभयपक्षांना सुखदात्री जी 'क्षमा' तिचा अवलंब करणे शहाणपण नव्हे काय ? आधी मुळी आपण दुसऱ्याचे दोष न्याहाळावेच कां ? व न्याहा- ते उगाळीत बसावे का? किंवा त्यांचा राईचा पर्वत करण्याची खटपट करावी का? त्यांत काय प्राप्ति ? त्यापेक्षा त्याचे दोष टाकून गुणच कां न शोधले ? कारण, प्रत्येक मनुष्यांत जसे दोष आहेत तसे गुणही असणारच. शोधलेमात्र पाहिजेत. दोष टाकून गुण घेणे हे भल्याचे लक्षण. गुण टाकून दोष घेणे हे दुर्जनाचे लक्षण. (श्लोक) त्यजन्ति शूर्पवदोषान् । गुणान् गृह्णन्ति साधवः ॥ दोषग्राही गुणत्यागी । पल्लोलीव हि दुर्जनः ।। १ ।। -सुभाषित. :---- सजन हे सुपाप्रमाणे दोपरूपी खडे टाकुन गुणरूपी धान्यकण घेतात; दुर्जन चाळणीप्रमाणे गुणकण गाळून दोषपापाण संगृहीत करितात. भावार्थः दुसरा कवि म्हणतो:- (आर्या) त्यजति च गुणान् सुदूरं तनुमपि दोषं निरीक्ष्य गृहाति ॥ मुक्तालंकृतकेशान्यूकामिव वानरः पिशुनः ॥ १॥ भावार्थ:-दुर्जन हा ढोबळ गुण सोडून सूक्ष्म दोष तेवढा घेईल. सुंदरीच्या केशांत मौक्तिक गुंफले असले तरी माकड ते सोडून उवा तेवढ्या टिपीत बसेल. गोचीड दूध टाकून गाईच्या कासेतून रक्त ओढतो, हाच मासला दुर्जनांचा आहे. याकरितां आपण दोषदृष्टि सोडून गुण- ७ ३.] सदयता. १९५ ग्राही बनावें. या गुणग्राहितेमुळे पुष्कळदा दुसऱ्याचे दोषदेखील गुणरूप वाटतात व प्रेमास्पद होतात. म्हटलेच आहे:-' जसें खारें पाणी पिउनि घन तें गोड करिती'. आपल्या अपराधांची दुसऱ्याने गय केली नाही म्हणजे आपणांस अणकर वाटते; हे जर खरे आहे, तर आपले वर्तनानेही इतरांस तसेंच वाईट वाटेल हे ध्यानीं वागवून क्षमाशील असावें. पेस्टा- लोजी हा म्हणे की, परकार्यरत मनुष्य विरळा. हे म्हणणे सर्वथाच खरे नाही. विनास्वार्थ परोपकार करणारेही थोर पृथ्वीवर आहेत व म्हणूनच पृथ्वी चालली आहे. शिवाय, दुसऱ्याचे लक्ष ओढून घेणे ही हिकमत पुष्कळशी आपले हाती आहे. आपण दुसऱ्याचें बरे करीत गेले म्हणजे तोही करितोच करितो. शेक्सपियरने म्हटले आहे:- (श्लोकार्ध) बरे कृत्य संगेंचि मातीत जाई। बुरे तेवढे मृत्युलोकांत राही । हे जरी कधी कधी अनुभवास येत असले, तरी बहुधा बन्याची बरी आणि वाईटाची वाईट कीर्ति मागे रहातेच रहाते. तैत्तिरीय उपनिषदांत म्हटले आहे: “ यथा वृक्षस्य संपुष्पितस्य दूराद्धो वाति एवं पुण्यस्य कर्मणो दूराद्धो वाति ।” म्हणजे पुष्पित वृक्षाप्रमाणे सत्कृत्यांचा सुगंध दूर जातो. सोनेरु जवळ असल्यास जीविताला अवश्य असें अन्नपाणी, कपडालत्ता, घरदार, वगैरे त्याचे साह्याने संपादितां येईल; परंतु, प्रियजनाच्या सस्नेह प्रेमकटाक्षापासून होणारे जे काही अनिर्वाच्य सुख आहे, ते काही सोन्यारुप्याला देता येणार नाही. त्याचप्रमाणे १९६ सुख आणि शांति. [प्रकरण दग्ध दारिद्य जरी जहराप्रमाणे दुःखद असले तरीही कठोर शब्दाइतकें ते मर्मतक असू शकणार नाही. विदुरनीतीत म्हटले आहे:- (श्लोक) माण्यस्थीनि हृदयं तथासून् । रूक्षा वाचो निर्दहन्तीह पुंसां ॥ तस्नाद्वाचं रूपती रूक्षरूपां । धारामो नित्यशो वर्जयीत ॥ १ ॥ अरुंतुदं परुषं रूक्षवाचं । वाक्कण्टकैवितुदन्तं मनुष्यान् ॥ विद्यादलक्ष्मीकतमं जनानां । मुखे निबद्धां नितिं वैविहन्तम् ॥ २ ॥ --महाभारत, उद्योगपर्व. भावार्थ:--कठोर भाषणे पुरुषांची ममें, अस्थि, हृदय व प्राण करीत असतात. तस्मात् धर्माचे अवलंबन करणान्या पुरुषाने कधीही दाह करण रे कटोर भाषण उच्चारूं नये. मर्मावर प्रहार करणारा, कर, कठोर भाषण करणारा, आणि शब्दरूप कांट्यांनी मनुष्यांना टोचणारा जो पुरुष तो सर्व लोकांमध्ये अत्यंत दुर्दैवी असन मुखामध्ये जखडलेल्या मृत्यूलाच तो एकसारखा आपलेबरोबर वागवात असतो, असे समजावें. याचेच उलट सामर्थ्य मधुर शब्दाचे आहे. एका मधुर शब्दानें एकादें हताश हृदय तत्काळ संजीवित होते. म्हणून सदैव मधुर बोलत असावें. बाकी हे केवळ सोपे नाही. तथापि यत्न ठेवावा. निदान कठोर तरी न बोलावे. द्रव्यदानानेही दुःखित हृदये सुखी होतात. तरी त्याचे सामर्थ्य मधुर शब्दाहून कमीच. शिवाय, द्रव्यसाह्याने प्रसंगी अपकारही होतो. मधुर शब्दाचे तसे नाही. अभ्यागताचे मधुर वाणीने स्वागत केले असता त्याला जे सुख होते, ते केवळ अवर्णनीय आहे. धर्मातं न तथा सुशीतजलैः स्नानं न मुक्तावलि-। न श्रीखंडावलेपनं सुखयति प्रत्यंगमभ्यर्पितम् ॥ प्रीत्या सज्जनभाषितं प्रभवति प्रायो यथा चेतसि । सयुक्त्या ट पुरस्कृतं सुकृतिनामाकृष्टिमंतोपमम् ॥१॥ हितोपदेश.
७ ३.] सदयता. १९७ भावार्थ: -सजनांच्या सप्रेम स्वागताने जे सुख व चित्ताकर्षण होतें तें धर्माला थंडगार पाण्याचे स्नान, चंदनलेप किंवा मुक्ताहार घातल्यानेही होत नाही. अर्थात् मधुर शब्दाची योग्यता अगाध आहे. परंतु पुष्कळांचे मुखांत त्याची वाण असते. कित्येक माणसे सहज बोलणे तेदेखील उप- रोधिक बोलतात; आणि कधी कधी मग पस्तावतात. पण त्यांना असें कळले पाहिजे की, शब्द हा एकदां मुखाबाहेर गेला की कायमचा गेला. काही केल्या तो परतणार नाही. तुम्ही वाटेल तितका पश्चात्ताप करा, क्षमा मागा, ' बुंदसे गई वो है।दसे नही आती' असा तो प्रकार आहे. म्हणून मुखावाटे दुर्वचन कधीच काढू नये. एका मुज्ञ मनुष्याने स्वर्ग व नरक यांचे लक्षण दिले आहे, तें असेंः जेथे प्रत्येक मनुष्य परोपकाररत असेल तें स्थानच स्वर्ग; व जेथें मनुष्य परापहारनिरत असेल तोच नरक. हे म्हणणे बरेचसे सार्थ आहे. तुम्ही कितीही संपन्न व समर्थ असा, प्रेम, दया, व समाधान ही जर नाहीत, तर तुम्हांला सुख मिळणार नाही. लबक म्हणतो, या तीन गोष्टींवांचून स्वर्गदेखील क्लेशावह होईल; आणि या तीन नांदल्यास, चंद्रमौळी झोपडीत स्वर्गाचा आराम मिळेल. सेंट सेल्स हा प्रेमाच्या ठळक मोठ्या गोष्टींना साखरेची, किरकोळ गोष्टींना मिठाची उपमा देतो. त्याचे म्हणणे, साखर अधिक मधुर खरी, पण तिचा वापर कमी. परंतु मीठ, ज्याला 'सबरस' हे यथार्थ नांव आहे, ते प्रत्येक पदार्थांत पडते व प्रत्ये- कास ते रुचीस चढविते; इतकेच नव्हे, पण एक वेळ साखरेची रुचि- देखील मिठानें सुधारते. असो. सारांश गरीबगुरिबाला जरी साखर नसली तरी मिठाची तर वाणं नाही. त्याचप्रमाणे दयेची महत्कृत्ये जरी सर्वांस शक्य नसली, तरी लहानसहान तरी खचीत साधतील. आणि तेवढी करीत गेलें तरी जगत् किती तरी सुखी होईल. व १९८ सुख आणि शांति. [प्रकरण आपले सत्तेचे घर म्हणजे 'सुखनिवास' अशी भावना असते; व म्हणूनच पांचशे कोसांवरून उड्या टाकीत मनुष्य घरी जातो. पण घराला 'सुखनिवासत्व ' कशाने बरे येतें ? संपत्तीने किंवा कडेकोट बंदोबस्ताने येत नाही. आपले घर झोपडे असेना, पण तेथें जर शुद्धप्रेम व शांति ही नांदत आहेत, तर स्वर्गही त्यापुढे ठेंगणा होतो हे त्यांतील रहस्य आहे. नुसती आमटीभाकरीच, पण ती जिवाच्या माणसाने वाढली असतां अमृततुल्य लागते; नावडत्या माणसाने जिलबी वाढू द्या, तरी ती कडू लागते. सारांश, प्रेम गोड आहे; प्रेम हेच सुखनिधान आहे प्रेम हाच स्वर्ग आहे. प्रेमाचा अस्त होऊन जेथे अशांति, अप्रेम, मत्सर, अदेखाई, ही सुरू झाली, तेथील माणसें एका छपराखाली असलीं- नव्हे, एका बिछा- न्यांत निजत असली, तरी तेथून सुखाचा मुक्काम उठला असे स- मजावें. यासाठी मनुष्यांनी असे वागू नये. अशाने सर्वांनाच सु. खाचा उन्हाळा होतो. मत्सरी मनुष्य तर लहरी सापाहून वाईट. अशा संगतींत कोणालाच सुख होत नाही. सुख पाहिजे असेल- आणि ते नको असणार कोणाला ? तर आपण सर्वांनी परस्प. रांचे दोषांविषयी उपेक्षा करून, अन्योन्यसाह्यास तत्पर असावे; परस्परांशी सस्नेह व सादरबुद्धीने वागावे, आणि एकमेकांविषयी जीव तोडावा, म्हणजे हे जगत् किती तरी सुखी होईल. येश ख्रिस्ताने आपल्या शिष्यांस सांगितले की, “शत्रूवर प्रेम करा, शाप देईल त्याला परत आशीर्वाद द्या, अपकर्त्यांवर उपकार करा, आणि तुमचे द्वेष्टे असतील त्यांचे तारणार्थ ईश्वराची प्रार्थना करीत जा, म्हणजे जगतांत सुखसमृद्धि अक्षय नांदेल." --
te
प्रकरण आठवें.
शिक्षण (विनयन).
atatet tittetet tetetztetett tetetet, (श्लोक) न हि ज्ञानेन सदृश । पवित्रमिह विद्यते । । श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेंद्रियः ।। ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति ॥२॥ -श्रीमद्भगवद्गीता. भावार्थ:-इहलोकी ज्ञानासारखें शुद्धिकर अन्य काही नाही. हे ज्ञान जो श्रद्धालु, तत्पर, व जितेंद्रिय असेल अशालाच मिळते. एकदां ज्ञान मिळाले की लौकरच उत्कृष्ट शांति प्राप्त होते. (श्लोक) न पण्डिताः साहसिका भवंति श्रुत्त्वाऽपि ते संतुलयंति तत्त्वम् । तत्वं समादाय समाचरंति । स्वार्थ प्रकुर्वति परस्य चार्थम् ॥ १ ॥ -सुभाषित. भावार्थः-शिकलेसंवरलेले लोक कोणतीही गोष्ट एकदम करीत नाहीत. एकादी गोष्ट कानी येतांच ते पूर्ण विचार करून तींतील तत्त्व काय तें हुडकून काढितात, आणि मग त्या तत्त्वावर दृष्टि ठेवून वागतात, व तेणेकरून स्वार्थ साधून परार्थही साधितात. (श्लोकार्ध) गाढं गुणवती विद्या । न मुदे विनयं विना॥ -सुभाषित. भावार्थ:-कितीही गाढ गुणयुक्त विद्या असली तरी अंगी विनय नसेल तर ती आनंदायक होत नाहीं प्रकरण आठवें. शिक्षण (विनयन ). द्वे विद्ये वेदितव्ये । परा चैपवारा चेति । -- मुण्डकोपनिषद्. (पद) चित्ता शांती ना दे ऐशी विद्या काशाला? -हरिकवि. (श्लोक) विद्या ददाति विनयं । विनयाद्याति पात्रताम् ।। पात्रत्वाद्धनमाप्नोति । धनाद्धर्म ततः सुखम् ॥१॥ हितोपदंश. भावार्थ:-विद्येने विनय येतो; विनयाने अंगी पात्रता येते; पात्रतेने धनप्राप्ति होते; धनान धर्मसंग्रह होतो व धर्माने सुख होते. मनुष्य हा उपजतांच केवळ पशु असतो, आणि ज्या संस्का- रांनी त्याला पशूचा मनुष्य करितां येतो, त्या संस्कारांस 'शिक्षण' किंवा — विनयन ' असे म्हणतात. पशु शब्दाचा मूळ अर्थ- 'सर्व अविशेषेण पश्यति असौ ।' म्हणजे जो सामान्यतः पाहतो, किंवा केवळ चर्मचडूंचा व्यापार करण्यास समर्थ असतो, तो; आणि मनुष्य शब्दाचा अर्थ-' मननाद् मनुष्यः' म्हणजे विचार करण्याचे सामर्थ्य किंवा सारासारज्ञान ज्याला उत्पन्न झालें तो, असा होतो. अर्थात् उपजतांच केवळ चक्षुरादींद्रियांचे मुग्ध व्यापार सृष्टीवर चालू असतात, ती स्थिति जाऊन त्या व्यापारांपासून बोध , २०२ सुख आणि शांति. [प्रकरण घेण्याचे व भिन्नसंवेदनांची तुलना करून त्यांपासून सामान्यसिद्धांत करण्याचे सामर्थ्य अंगी येणे म्हणजे पशुस्थितींतून मनुष्यस्थितीत येणे, असे ढोबळ मानाने म्हणता येईल. हे स्थित्यंतर करणारे जे अनेक संस्कार त्यांचे समुच्चयास शिक्षण हे सामान्य नांव आहे. ही सृष्टि विचित्र व अनन्त असल्याने तिचे ज्ञानही अनन्त व मनोहर आहे; आणि तें प्राप्त करून घेण्यास संस्कारही असंख्य लागतात. म्हणूनच, खरे पाहतां, आमरण शिकले तरी शिक्षण पुरे होतच नाही. परंतु शिक्षणाचा हा व्यापक अर्थ फारच थो- ड्यांचे लक्षांत वागतो. आजकाल तर शिक्षण शब्दाचा अर्थ शा- ळांत काय पढविले जाते तें, इतका संकुचित झाल्यासारखा आहे. आणि हा प्रकार मोठा घातक आहे. कारण प्राथमिक शाळांत पहावें तो लेखन, वाचन, हिशोब-ठिशोब, थोडें भाषाज्ञान, व व्या- करण; म्हणजे झाले. ज्या अफाट व चमत्कृतिपूर्ण सृष्टीत मनुष्याला सर्व आयुष्य कंठावयाचे, तिच्या धर्मांचे व तद्गत विविध कुतूहलांचे ज्ञान यांकडे मुळीच पाठ केलेली असते. वरिष्ठ प्रतीची किंवा उदार शिक्षणाची जी विद्यापीठे आहेत त्यांत तरी बहुतेक हाच मासला. काव्य, इतिहास, पुराण, भाषा, एकाद्या विशिष्ट शास्त्राचा ओनामा; म्हणजे आटपली कथा. आमचे शिक्षणपद्धतींत जबर दोष हा आहे की, तिच्या योगाने विद्यार्थ्याची जिज्ञासा, शोधकबुद्धि किंवा ज्ञानतृष्णा ही उत्तरोत्तर वृद्धिंगत होत न जातां उलटी मंदावत जाते. विद्यालयीन क्रम केव्हां संपतो व ८३.] शिक्षण. २०३ आणि या ग्रंथांना केव्हां रामराम ठोकू, असे विद्यार्थ्याला होऊन जाते. क्षुधादीप्तीचे चूर्ण घेऊन त्याने जर अच्छेराचे अन्न पावशेरा- वर आले, तर काय म्हणावें ? अमीवर तूप ओतावें तों तों तो अधिक चेततो, त्याप्रमाणे शिक्षण वाढेल तो तो ज्ञानलिप्सा अधिकाधिक विजृम्भित होत जावी, तर ते शिक्षण, लबक म्हणतो, विश्वविद्यालयाचा शिक्का मिरविणारांत मला असे विद्वान् आढळले आहेत की, त्यांना चंद्राला क्षयवृद्धि का असते, हे माहीत नाहीं; व पोवळी हे किडे आहेत, व्हेल हा मासा आहे, आणि वाघुळ हा पक्षी आहे, असे ते समजतात. इंग्लंड हे आज- पर्यंत अनेक वेळा जलमग्न झाले आहे, हे त्यांना खरे वाटत नाही. आणि हे जग होऊन काय ती ६००० वर्षेच झाली, असे ते मान- तात. असल्या खुळ्यांना विद्वान् कोणी म्हणावें ? बरें, व्यवहारज्ञान तेही भोंपळ्याएवढे ! मंडईत भाजीवाली माळीण चर्दिशी गंडे जुळवील, यांना पाटी-लेखणी पाहिजे, लबकचे म्हणणे की, हा दोष आमचे शिक्षणपद्धतीचा होय. ती पद्धति फारच संकुचित व नीरस आहे. ठरीव पुस्तकें व घोकं- पट्टी यापायीं विद्यार्थ्याचे ठिकाणी हरभासपणा येत नाहीं; त्याचा दील खुलत नाही. यामुळे शाळा संपण्यापूर्वीच मुलाला विद्येचें अव- ढणे पडत येतें, व ती संपली की तो तिकडे पुनः तोंडच करीत नाही.. इंग्लंडसारख्या स्वतंत्र, साधनसमृद्ध व प्रगतिपर देशांत ही रड; मग आमच्या दरिद्री, परतंत्र, व निकृष्टदशापन्न देशाचे तर पुसूच २०४ सुख आणि शांति. [प्रकरण नका. एक तर उंची शिक्षण पडलें आहे नियंत्यांच्या भाषेत. हे भाषेचे साधन प्रथम तयार होईल, नंतर तद्गत ज्ञान हाती लाग- वयाचे. परंतु ही भाषा स्वभाषेशी अत्यंत विसदृश असल्याने तिचे समर्पक ज्ञान संपादण्यांतच अर्धी ज्वानी उतरते. इतके करून चार ओळी इंग्रजीच्या खरडतां आल्या म्हणजे विद्यार्थ्याला वाटते की आपण झालों विद्वान् ; पण खरे पहातां विद्या किंवा ज्ञान आहे ते पुढेच आहे. एवढा वेळ ते न्याहाळण्याचा चष्मा संपा- दण्यांतच गेला. परंतु हा चष्माच काय ते दृश्यसर्वस्व असें भ्रमाने समजून बिचारा त्याच्याच झोकांत असतो. हरहर ! ही स्थिति मोठी शोचनीय आहे. त्याला हे कळले पाहिजे की, ह्या चष्म्याचे साह्याने जे पारखून घ्यावयाचें तें रत्न वेगळेच आहे; पण हे त्याला कळत नाही. प्रसंगी कळूनही उपयोग नसतो. कारण हा उंची चप्मा खरेदी करण्यांतच बहुतेक भांडवल उडालें असते, पुढे रत्ने कसली नी काय कसले ? दुसरा दोष, मेकालेने त्याच्या देशबांधवांसंबंधे म्हटले आहे की, त्यांना स्पेनने अमेरिकेंत केलेले पराक्रम मुखोद्गत आहेत, परंतु ज्या युद्धामुळे हिंदुस्तानासारखा कोहिनूर इंग्लंडला मिळाला त्याचे नावही श्रुत नाही. तोच मासला इकडे आहे. शेफील्ड किंवा मँचे- स्टर येथे काय वस्तु होतात, ते आमचे मुलांना मुखपाठ आहे; परंतु या शहरांत खडकावर लुगडी निघतात याची वार्ताही नाही. तिसरा दोष, मर्यादित धांव. म्हण आहे, ' देणावळ तशी धु- णावळ. ' बी. ए. झालेला आणि न झालेला मामलेदारीला ए. .
८३.] शिक्षण. २०५ काच रस्त्याने जाणार, मग एवढे उरी डोंगर तरी कशाला घ्या. व 'अर्थकरी च विद्या' की ' जीपासून दोन दिडक्या मिळतील, तीच विद्या' असे विद्येचे व्यावहारिक लक्षण ठरल्यामुळे, जी विद्या पोटाला देईल, तीच व तितक्याच दर्जाची विद्या कमविण्याकडे लक्ष असते या कारणाने ज्ञानाचे लालन कोणासच सुचत नाही. तें ईश्वरी योजनेनेच लहान मुलांचे ठिकाणी चौकसपणा फार भसतो. ती अक्षयों ' हे काय, काय' म्हणून विचारून पुरेसे करितात. त्यांचे प्रश्नही पुष्कळदां इतके बिकट असतात की, मी मी म्हणणान्या शहाण्यांना गुंग करतील. आमचे पुतण्याने मा- रुतीचे देवळांत घांट वाजवितांना विचारिले की, घरांत भांड्याला धक्का लागून नाद उठला तर तो धरावयास सांगतां, आणि येथे घंटा मुद्दाम जोराने वाजवितां हे कसे ? त्याला उत्तर मिळाले ही गोष्ट वेगळी; परंतु प्रश्न मख्खीदारच. लबक म्हणतो, याप्रमाणेच क बालकांची बुद्धि सहजच तेजस्वी, उत्कट, चौकस, व ज्ञा- नविषयीं सतृष्ण असते. आणि अशा अवस्थेत आम्ही त्यांना शाळांत पाठवितो. पण तेथे गेल्याने होते काय म्हणाल, तर त्यांची बुद्धि मठ्ठ होते; जिज्ञासा मंदावते; इतकेच नव्हे, तर ज्ञानार्जना- ची कधी कधी त्यांना कायमची शिसारी बसते. एतावता, मुलांची सहजबुद्धि अधिक उद्दीप्त किंवा पल्लवित व्हावी, या हेतूने त्यांस शाळांत पाठवावें तों, समयीं ती कायमचीच खुंटते. आणि सर्व तरतरी मावळून त्यांची जिज्ञासा दरिद्याचे मनोरथाप्रमाणे ठिका- . , २०६ सुख आणि शांति. [प्रकरण व णींच जिरते. म्हणजे कधी कधी आमची विद्यामंदिरे ही मुलांची नैसर्गिक स्फूर्ति वाढवण्याचे ऐवजी ती गाडण्याची स्थाने होत. असें म्हणावे लागते. शाळांतून किंवा कालेजांतून जे शिक्षण दिले जाते, तें पुष्कळसें निरुपयोगी असते, असें विद्या संपवून पुढे मनुष्य व्यवहारांत आला म्हणजे त्याला कळू लागते. व शाळांतून किंवा कालेजांतून जे शिक्षक आहेत त्यांस ही गोष्ट विचारिली असतां तेही प्रांजलपणे कबूल करितात. परंतु ते म्हणतात, ' येथे आमचा उपाय नाही. युनिव्हर्सिटी ज्या प्रकारचे विद्यार्थी मागते, तसे आम्ही तयार करितो. आम्ही काय करावें ? ' अर्थात् तरुणांच्या कालाचा, द्रव्याचा हा अपव्यय करण्याचे अपयश युनिव्हर्सिट्यांचे माथीं आहे. यास्तव त्यांनीच याचा सदयतेने विचार करावा; व मुलाला पुढे या विचित्र सृष्टीत आपली लोकयात्रा ज्या ज्ञानाचे योगाने सुखकर करितां येईल, असें ज्ञान त्यांस शिकवावें. अर्थात् या ज्ञानांत सृष्टिज्ञानाचा अंतर्भाव प्रामुख्याने केला पाहिजे; आणि बहुतेक भौतिकशास्त्रांची मूलतत्त्वे तरी विद्यार्थ्यांस समजली पाहि- जेत. ज्योतिष, सृष्टपदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, प्राणिजीवनशास्त्र, इत्यादि शास्त्रे परस्परविभिन्न आहेत, असे पुष्कळ पण ही चूक आहे. ही सर्व एका सृष्टिशास्त्राचीच अंगे आहेत. आणि याचमुळे, आपले शरीरांतील एका अवयवाचें स्वास्थ्य जसे लोक समजतात; I'The School is Sometimes the grave of originality.' Lord Avebury, On Peace & Happiness Page 171, ८३.] शिक्षण. २०७ ? इतरांचे अनामयत्वास अवश्य आहे, तसेच यांपैकी एकाचे ज्ञान इतरांचे ज्ञानास पोषक, अतएव आवश्यक, आहे. लॉर्ड ब्रूमचें म्हणणे असे की, आपण मुलांस प्रथम सर्व विषयांचे सामान्य ज्ञान देऊन, नंतर कोणत्या तरी विशिष्ट विषयाचे समग्र ज्ञान द्यावे. या विशिष्ट ज्ञानाचा आरंभ वयाचे सोळावे वर्षापूर्वी नसावा. काहींचे म्हणणे एकच विषय सांगोपाग शिकावा. उगाच, यांतले थोडें, त्यांतले थोडें, असें हजार ठिकाणी तोंड बाटविण्यांत काय चव? एक कवि म्हणतो: (श्लोक) बहूनामिह विद्यानां । मुख कैर्न चुंबितम् ॥ हृदयग्राहिणस्तासां । द्विवाः संति न संति वा ॥ १॥ भावार्थ: ...निरनिराळ्या विद्यांचे केवळ चुंबन करून येणारे शेकडों; परतु त्यांचे हृदय गांठणारा एकाददुसराच. हे खरे दिसते; व आहेही ! परंतु आम्ही जे हरविषयाची चव घेण्याचे सांगतो, हे सांगणे निराळ्या दृष्टीचे आहे. सापेक्ष जगतांत असा एकही विषय नाहीं की, ज्याचे पूर्ण ज्ञान अन्य विषयांचे सा- ह्यावांचून होऊ शकेल. आमचे जुनें यज्ञयागप्रकरण वाचूं लागले तर भूमिति, ज्योतिःशास्त्र इत्यादि शास्त्रे यासाठीच निर्माण करावी लागली असे दिसते. अर्थात् बाह्यदृष्टया जरी शास्त्रे भिन्न दिसली, तरी खरे पाहतां ती याज्ञिकाची उपांगेंच, अतएव अवश्य संग्राह्य आहेत, अशी खातरी होते. पूजेत आपण शिवपंचायतन, विष्णु- पंचायतन इत्यादि स्वस्तिकें मांडतो, त्यांत मुख्य नांवाचा देव मध्ये २०८ सुख आणि शांति. [ प्रकरण मांडतों आणि बाकीचे बाजूला, इतकेच; बाकी पांचांशिवाय स्व- स्तिक पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे जे विशिष्ट म्हणून अभ्यासू त्या शास्त्राचे नांव पुढे करून त्याला साह्यकारी म्हणून उपशास्त्रांचे अध्ययन करावेच लागते. आमचा वेद म्हटला तरी नुसती संहिता घोकल्याने वेदाध्ययन झाले नाही. शिक्षा, कल्प, व्याकरण, नि- रुक्त, छंद व ज्योतिष हे सहा विषय जेव्हां पढावे, तेव्हां त्याची सामग्री होते. देवळांत देवाची मूर्ति कितीही सुंदर असली तरी तिच्यामागे प्रभावळ असल्याशिवाय तिच्या रूपास खुलावट येत नाही. स्त्रियांचे कुंकू हेच मुख्य सौभाग्यचिन्ह खरे; तरी नथ, बु- गड्या, केशपाश इत्यादिकांवांचून सौभाग्याचा सुभगपणा डोळ्यांत भरत नाही. रानावनांत अरडीदरडी एकादा महावृक्ष दिसतो, परंतु त्याच्या मुळ्या शोधीत जावें तो किती दूरवर पोचल्या अ- सतात; कारण तशावांचून त्या वृक्षाचे जीवन किंवा पोषणच अ- शक्य आहे. हाच न्याय कोणत्याही एका विशिष्ट शास्त्राचे अभ्या- साला लागू आहे. आपण मुलाला भूगोल शिकवायला निघालों, आणि फक्त स्वदेशाचे वर्णन दिले आणि इतर देश व भूखंडे टाळली, तर तें भूगोल शिकविणे म्हणावे काय ? इतिहास शिक- वितांना केवळ चालू शतक शिकवून गत शतकें गाळली, तर कसे होईल ? याचप्राणे इतर उपकारक शास्त्रे सोडून कोणतेही एकच विशिष्ट शास्त्र शिकवण्याचा प्रकार हास्यास्पद होणार आहे. म्ह- णून एक शास्त्र पूर्ण व इतर अनेक संबंधी शास्त्रांची सामान्य ओ- ळख तरी देणे अत्यवश्य-नव्हे, न्याय्य आहे.
८ वें.] शिक्षण. २०९ . लबक म्हणतो, मुलाला कोणत्याही विशिष्ट विषयांत अधिष्ठित करण्यापूर्वी त्याला या सृष्टीसंबंधे सामान्यतः पुढील गोष्टी तरी कळविल्या पाहिजेत:--पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणा-या ग्रहमाले- तील एक ग्रह आहे; सूर्य हा स्वतः एक तारा आहे; ह्या ग्रहमाले- सारख्या ग्रहमाला या अनंत आकाशांत शेंकडों, हजारों तरी आहेत, इ० इ०. या ज्ञानाने ईश्वराचे कर्तृत्व किती अगाध आहे, सृष्टि किती अनंत आहे, व मनुष्य तींत किती किंमतीचा आहे, हे त्याला समज- स्याने त्याचे ठिकाणीं विनय, सृष्टिप्रेम, ईश्वरभक्ति, इत्यादि कल्याण- कारक सद्गुण आरूढ होतील. त्याचप्रमाणे त्याला या पृथ्वीवरील जल- स्थल विभाग, स्वतःच्या देशाचे व प्रांताचे ज्ञान, रसायनशास्त्र, सृष्ट- पदार्थविज्ञान, भूगर्भ, प्राणिजीवन, गणित, व्याकरण, लेखन, रेखन आणि साधल्यास गायन, या शास्त्रांचे देखील थोडथोडें ज्ञान दिले पाहिजे. म्हणजे एक तर मुलाचे मतीला चतुरस्रता येऊन त्याचे ज्ञानाला चवदारपणा येतो. एरव्ही एकच एक विषय मुलाला केव्हाही कंटाळवाणा होतो. शिवाय, या अवांतर विषयांचे ज्ञानाने त्याचे विशिष्टविषयज्ञानही दृढमूल होते. याकरितां शिक्षणांत अशी योजना असावी. विशिष्ट विषयाची निवडमात्र होतां हाईल तों मुलाच्या सहजप्रवृत्तीचा रोख पाहून करावी. कारण, कारण, पूर्वजन्म- संस्कारांमुळे म्हणा किंवा अन्य कारणांनी म्हणा, बहुतेक मुलांची उपजतच कोणत्या तरी विशिष्ट विषयाकडे प्रवणता असते. आणि त्या विषयाचा अभ्यास त्यांकडून करविल्यास, त्यांत ती स्वल्पाया- साने तरबेज होतात. एक कवि म्हणतो:- २१० सुख आणि शांति. [प्रकरण (श्लोक) कस्यापि कोऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके । ख्याति प्रयाति न हि सर्वविदस्तु सर्वे ॥ किं मलिका फलति, किं पनसः सपुष्पः । किं नागवल्यपि च पुष्पफलैरुपेता ॥ ६ ॥ भावार्थ:----कोणाची कोणत्या तरी एका विशिष्ट विषयांत अधिक मति चालते व त्यानेच तो प्रसिद्धीस येतो, कारण सर्वीस सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही. मोगरीला फळ नाही, पण तिचे फुलाचीच तारीफ. फणसाला फूल नाही, त्याचे फळाचीच वाहवा. नागवेलीला फळ ना फूल, पण तिचे पानांवरच खाणारांच्या उड्या. लॅटीन, ग्रीक वगैरे पुराणभाषांच्या अभ्यासाला इंग्लंडांत फारच मान दिला जातो; व त्यांत मुलांचा फार वेळ जातो. ही गोष्ट लबकला पसंत नाही. शिवाय तो म्हणतो, ह्या भाषांचा अभ्यास केला तरी चालेल; पण तो केवळ भाषा या दृष्टीने केला गेल्यामुळे मुलांस फार तर शब्दच्छल करण्याची अकल येते, त्यापासून विचाराला उदात्तत्व यावें तें येत नाही. म्हणून असल्या श्रमांत फायदा नाही. शिकंदर बादशहा होमरचें । इलियड' काव्य उशाखाली ठेवून त्यावर निजे, एवढा त्याला त्याचा नाद असे. आमचा विद्यार्थिगणही आज पिढयानपिढ्या, दुसऱ्या अर्था- ने होमरवर निजतच आला म्हणावयाचा; कारण, त्याचे अभ्यासाने जे ज्ञान होणे इष्ट, ते त्यास केव्हांच झाले नाही. चित्ररेखन घ्या. यांत तरी नमुना पाहून रेघोट्या ओढल्याने सार्थक होत नाही. प्रत्यक्ष सृष्टीचे अत्यंत सूक्ष्म व वारंवार निरीक्षण , ८ वें] शिक्षण. २११ , पाहिजे. पण आजकाल ते नसल्याने, रेखनविद्या इतकी पसरली असून व पद्धतवार शिकविली जात असूनही, पुरातन काळचे लोकांनी कोरीव लेणी वगैरे ठिकाणी जे काही चित्ररेखननैपुण्य दाखविले आहे, त्याची बरोबरी होत नाही. लबक म्हणतो, याचे कारण, त्या लोकांनी जे सिंहाचे चित्र काढिलें तें रानांत मृगराजा- शी प्रत्यक्ष परिचित होऊन काढिले, त्यामुळे ते इतकें हुबेहूब आले. आम्ही वनाचा सीमान्त ओलांडून केसरीचा शब्दही ऐकला नसून खोलीत बसून त्याची प्रतिमा काढणार; ती कशी उतरावी ? अर्थात् चित्रकला म्हटली तरी सृष्टीचे सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. कोणाही प्राण्याचे अवयव सप्रमाण काढणे म्हणजे शारीरशास्त्राचीदेखील माहिती पाहिजेच. , पुराणकाळी युरोपांत विद्या मुख्यतः धर्मगुरूंचे हातींच असे. मोठमोठे श्रीमान् किंवा सभ्य गृहस्थ हे अक्षरशून्यच असत. इक- डेही विद्या विशेषतः ब्राह्मणांचे हाती असे. परंतु प्रस्तुत हा बंध सुटून तिचा उभयत्र अप्रतिबंध प्रचार सुरू झाला आहे. हल्ली गरीबगुरिबांचे मुलांनादेखील विद्यार्जनाची जी साधने आहेत ती पूर्वी मोठ्या धनाढ्यांनाही नव्हती. लबक म्हणतो, या प्रकारे शिक्षण सर्वगामी करणे हे मोठे खर्चाचे काम आहे, यांत संशय नाही. परंतु ज्ञानप्रसाराचे कामी कितीही खर्च लागला तरी कोणत्याही शहा- ण्या राज्यकर्त्यानं कुरकुरूं नये. कारण, त्याने असें खूप समजावें की, लोक अज्ञान राहिल्याने त्याची जी हानि कहे, तिजपुढे, ते २१२ सुख आणि शांति. [प्रकरण सज्ञान करण्यांत होणारी द्रव्यहानि (बाकी ती हानि नव्हेच; तो केवळ व्यय आहे.) काहीच नव्हे. यासाठी त्याने लोक सज्ञान करण्यांत शक्य तेवढा द्रव्यव्यय करावाच करावा. लोकांनीही शरीर शृंगार- ण्यांत पैसे नासण्यापेक्षा आपले मन विद्यालंकृत करण्यांत ते घालणे फार फायदेशीर. कारण, ते अनेक रूपांनी घसघशीत सव्याज परत येतील. शिवाय, शारीरिक शृंगाराने होणान्या निवळ नेत्रा- नंदापेक्षां मनःसंस्कृतीने होणान्या ज्ञानानंदाची योग्यता कांही वेग- ळीच आहे. ज्ञानी मनुष्य हा आनंदरूपच असतो. सांप्रत जरी शिक्षणाचा प्रसार, व त्याबरोबर आपली प्रगति जारी चालू आहे, असे पुष्कळदां आपल्यास ऐकविण्यांत येते, तरी खरी स्थिति उलट आहे. लंडनच। बिशप डॉ० क्रेटन ह्याचे शब्द शिक्षणविषयांत प्रमाण मानितात. तो म्हणतो, आज १८७० सालापासून, आमचे शिक्षण प्रगतिपर चालले आहे अशा घमेंडींत आम्ही आहों. परंतु, एवढ्या काळांत आमची खरी प्रगति तर तिळमात्र झालीच नाही; पण उलट काहींशी पीछेहाटच झालीसें मला तरी वाटते! " आजकाल आम्हांला गुरुस्थानभूत देशाबद्दल हा शेरा आहे; यावरून हिंदुस्थानचे प्रगतीचे घमेंडीत किती हंशील असेल, याचा शिक्षणाच्या फुशारक्या मारणारांनीच विचार करावा. याच विद्वद्वर्य डॉ० क्रेटनचे अन्यत्र असे म्हणणे आहे की, व्यावहारिक शिक्षणांत तुम्हांला जर खरी खरी प्रगति पाहिजे असेल, तर मूळारंभी तुम्ही मुलांस धार्मिक शिक्षण दिले पाहिजे. तरच , ८ वें.] शिक्षण. २१३ पुढली कामगिरी सुयंत्र होईल. " डॉक्टरसाहेबांचे हे म्हणणे सर्वथा खरे आहे. परंतु खेदाची गोष्ट ही की, याला अंतःकरणा- पासून मान देणारी माणसे उभय देशांत थोडीच आहेत. आमचे देशांत तर धर्माचे नांव काढिले की, मनापासून हंसणारे आंग्ल- विद्यालंकृतांत किती तरी आहेत. धर्म म्हणजे एक खूळ आहे असे ते समजतात व त्याची विटंबना करितात. व्यक्तिस्वातंत्र्य ' व मतस्वातंत्र्य ' ह्या गुलजार शब्दांनी आज- काल तरुणांची डोकी अशी कांहीं भरून गेली आहेत, की त्यांपुढे त्यांचे बहुतेक भान सुटले आहे. पण त्यांना हे समजले पाहिजे की, स्वातंत्र्य याचा मोघम शब्दार्थ ‘मोकळीक' असा वाटला तरी त्याचा शास्त्रीय अर्थ समर्यादच आहे. आणि आपल्या घरकुसाचे आंत ज्याप्रमाणे आपण राजे, त्याचप्रमाणे म्वातंत्र्याचा अंमलही नियमित हद्दीतच पाहिजे. आगगाडीस वेळ पडल्यास ताशी ६० मैल धावण्याचे सामर्थ्य असते, तरी ते अमलांत आणण्याची पर- वानगी नाही, आणि तीही मिळाली तरी रूळ सोडून कसभरही जाऊन उपयोग नाही. त्याचप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्य वापरणे झाले, तरी धर्म व नीति यांचे रुळांबाहेर जाईलसे ते वापरणे धोक्याचे आहे, हे या तरुणांचे ध्यानात वागेल तर बरे होईल. कोणी काही म्हणो, आमचे असें ठाम मत आहे की, आपण काया, वाचा किंवा मन यांचे द्वारे में में बरें किंवा वाईट कृत्य उघड किंवा गुप्तपणे कोणत्याही काली किंवा कोणत्याही स्थली करूं, त्या कृत्याचें बिनचूक साक्षित्व ठेवून त्या कृत्याच्या बरेवाईटपणा- २१४ सुख आणि शांति. [ प्रकरण - प्रमाणे आपल्याला पारितोषिक किंवा शासन देणारा सर्वज्ञ, सर्व- गामी, व सर्वशक्ति परमात्मा सर्वत्र, व सर्वदा आपले शिरावर जागा आहे; आणि त्याचे प्रेम आपण आपल्या सक्रियेने संपादि- त्याशिवाय आपली अखेर धडगत नाही, अशी दृढभावना मनुप्याचे मनांत अखंड उभी असल्याखेरीज तो सद्वृत्त निपजणे दुरापास्त आहे. किंबहुना ही भावना असल्याशिवाय मनुष्याचे अंगी मनुष्य- पणाच येणे कठिण आहे. आणि ती एक असली म्हणजे मनुष्य- वाला कारक जे सत्य, सौहार्द, विनय, दया, गुरुपूजा, सदाचरण इत्यादि गुण ते अयलेंच मनुष्याचे अंगी बाणतात आणि त्याच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते. यासाठी इतर सर्व प्रकारचे शिक्ष- णांच्या पायाला धार्मिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे. धर्म- भयाचा दडपा किंवा ईशप्रीणनाचा ओढा मनुष्याचे ठायी असल्या- शिवाय तो सद्वृत्त होणे कठिण आहे. याकरितां या दोन गोष्टी ज्या शिक्षणाने त्याचे ठिकाणी प्राप्त होतील ते शिक्षण त्याला सर्वां- आधी दिले पाहिजे. मग तुम्ही त्याला कोणतेही नांव द्या, आणि से कोणत्याही प्रणालीने शिकवा. शिक्षणासंबंधी बोलणे म्हणजे त्यांत शिक्षकासंबंधी दोन शब्द तरी सांगणे भाग आहे. लबक म्हणतो, खरोखर शिक्षकाचा धंदा फारच महत्त्वाचा आहे. एक विद्वान् इंग्रज गृहस्थ म्हणाले,- एकादी शाळा वीस वर्षेपर्यंत माझे हवाली करा, म्हणजे मी तेव- स्याने वीस पिढ्यांचे कल्याण करून दाखवीन'. या शब्दांची उंची खोली जर प्रत्येक शिक्षक म्हणवून घेणाराचे ध्यानी वागेल, - ८३.] शिक्षण. २१५ तर शिक्षणाचा उदय किती तरी झपाट्याने होईल. परंतु वस्तु- स्थिति इतपत नाही. असो. शिक्षकाचे ज्ञान जितकें पोक्त असेल तितकें शिष्याचे पथ्यावर अधिक पडेल, हे लक्षात ठेवून शिक्ष. काचा धंदा करणारांनी स्वतःचे ज्ञानाला अक्षयीं भर घालीत राहिले पाहिजे. शिवाय, शिक्षक ज्ञानानें वरिष्ठ असला तरीही त्याला, 'बालादपि सुभाषितं ग्राह्यं' हा न्याय मान्य असावा. कारण, ज्यां- नीं अंगी शिक्षकाचा धंदा केला असेल, ते अशी साक्ष देतील की, कधी कधी एकाद्या विद्यार्थ्याची कल्पना विशिष्ट विषयांत शिक्षका- पेक्षाही सरशी चालते. अशा वेळी अभिमानी शिक्षक अपमान. भयास्तव त्या कल्पनेचा अंकुर चिरडूं पाहतात, परंतु हे अक्षम्य अनौदार्य आहे. लवक म्हणतो, कधी कधी आपण आपली अकल दुसन्यावर लादणे मूर्खपणाचे असते; म्हणून रास्त असेल तें विद्या- र्थ्यांचेही ऐकावे. निदान आपल्याला येत नसेल तें शिकविण्याचा आव आणूं नये; व संधी आल्यास ते कोणापासूनही उचलण्यास लाजू नये. दुसरी गोष्ट, मुलांना शिकविणे म्हणजे शिक्षकाने आपले ज्ञान विद्यार्थ्याचे घशांत सारखे ओतीत राहणे हे नसून त्याचे अंगों असलेल्या नैसर्गिक धीशक्तीस पाणी घालून त्या विकसित करणे व विद्यार्थ्याचे ज्ञानाचा त्याचे वर्तनावर परिणाम होईल असा यत्न करणे, याचे नांव शिकविणे. बेकन म्हणतो, “शिक्षणाचा उद्देश मनुष्याचे अंगी भांडखोरपणा, आळशीपणा किंवा वाचाळपणा आणणे हा नसून, प्रत्येक गोष्टीबद्दल सारासारविचारशक्ति उत्पन्न करणे, हा असावा. , २१६ सुख आणि शांति. [प्रकरण एकदा एका बड्या शालागुरूने आपल्या विद्यार्थ्यांस सक्ती. ची ताकीद दिली की, तुम्ही परस्परांवर प्रेम न केल्यास फटके मिळतील! लबक म्हणतो, असल्या गोष्टी धाकदपटशाने कशा व्हाव्या ? अशा कामी शिक्षकाने स्वतःचे वर्तन सर्वथा उदाहरणीय व अनुकरणीय ठेविले पाहिजे. त्याची स्वतःची प्रेमळ वाणी, उदार विचार, व सदय वर्तन यांनी जो सुपरिणाम विद्यार्थ्यांचे मनांवर होईल, तो चवदावे रत्नाचा होणार नाही. कोणत्याही रोपड्याची वाढ उफाड्याने होण्यास ज्याप्रमाणे त्याचे बुडाशी पाण्याचा थंडावा व डोईवर सूर्याचा कडाका, ही दोन्ही पाहिजेत, त्याच- प्रमाणे विद्यार्थ्यांची योग्य निपज होणे तर शिक्षकाचे अंगी दया- द्रता व न्यायकार्कश्य हे दोन्ही गुण यथाप्रमाण पाहिजेत. केवळ झोड्या माम्तरही उपयोगी नाही आणि मेण्याही फुकटच समजावा. कालिदासान जसे म्हटले आहे: न खरो न च भूयसा मृदुः कठोरही नव्हे किंवा नरमही नव्हे, असा प्रकार पाहिजे. लहान मुलांच्या शिक्षणाचे काम त्यांना शाळांत घालून शिक्षकांचे राखणेस घातल्याने झाले, असे कित्येक आईबा तोंडाने कबूल करीत नसली तरी वर्तनाने दाखवितात. पण ही त्यांची मोठी चूक आहे, विद्यालयीन शिक्षक मुलाचे पुष्कळसें कल्याण करूं शकतात, ही गोष्ट जरी निर्विवाद आहे, तरी माता- पितरांचे शिकवणीचा परिणाम शिक्षकाचे शिक्षकाचे शब्दापेक्षाही अधिक होतो. फेनेलॉनला एका मित्राने विचारले की, मी आपली मुलगी एका धार्मिक विद्यागृहाचे अध्यापिकेचे ८ वें.] शिक्षण. २१७ केलें, स्वाधीन करणार आहे, हे तुला पसंत आहे ना ? फेनेलॉननें उत्तर त्यापेक्षा तूं माझं ऐकशील तर मुलीचे आईलाच ही कामगिरी सांग." हे त्या विद्वानाचे म्हणणे आईबापांनी विचार करण्याजोगे आहे. आमचा एक पदवीधर मित्र आम्हांस ह्या लेखाचा पूर्वभाग वाचीत असतां म्हणाला, जी सहिष्णुता व संतोषवृत्ति माझे सहचारिणीचे अंगी आढळते, ती मी इतका थोरला विद्वान होऊनही माझे अंगी नाही. आणि मनाशी शोध करितां मला असे दिसते की, आमचे बायकोचे मनावर हा परिणाम आमचे सासू- बाईंचे गृहशिक्षणानेच झाला आहे. या उदाहरणाचे महत्त्व प्रत्येक आईबापाने मनांत वागवून चालले असतां मुलाचे अधिक कल्याण होईल. बहुधा मनुष्ये प्रत्येक गोष्टीचा न्याय स्वतःचे प्रियाप्रियतेप्रमाणे करीत असतात. जो मद्यद्वेष्टा असतो तो मद्याचे नांवाबरोबर रोमा- चित होऊन मागें सरतो; जो मद्यपी असतो, तो म्हणतो की, खिशांत पैसे आहेत तर अगोदर डोज चढविलाच पाहिजे. जो भळसडा किंवा सूर्यवंशी असतो त्याला उद्योगी किंवा लौकर उठ- णारी माणसे मूर्ख वाटतात. जो उद्योगी असतो त्याला रिकामटेकडा मनुष्य दिसल्याने क्लेश होतात. ज्या मनुष्याचा एकदां असा समज भरला की, समरसाहस करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, तो आपले शीर रणभूमीवर निःशंक अर्पण करील. एतावता, प्रत्येक मनुष्य कोणत्याही कामी आपल्या भावने. प्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे पाऊल टाकीत असतो. यासाठी बाळ.
२१८ सुख आणि शांति. [प्रकरण- . पणींच मुलांचे मनांत उदात्त विचार पेरून दिले पाहिजेत. आपणां पैकी प्रत्येकाला थोड्याने, बहुताने मानवी ज्ञानाला व सुखाला भर घालतां येणें सुस ध्य आहे, हा विचार मोठा उत्साहवर्धक आहे. मनुष्याचे शिक्षणाचा आरंभ मातेचे अंकावर होऊन त्याचा क्रम देहपातापर्यंत चाललाच पाहिजे; तरच ते शिक्षण. म्हणून शाळां. तून किंवा विश्वविद्यालयांतून सुटलों म्हणजे शिक्षण संपले, असे कोणीही समजणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाचे योगानें मनु- प्याचे ठिकाणी सच्छील, सदभिरुचि,महात्मता, भूतदया, इत्यादि गुण जर बाणले नाहीत आणि ज्या ह्या निरतिशय सुंदर व चमत्कृ- तिपूर्ण जगतांत मनुष्य रहातो त्या जगताबद्दल कौतुक व त्याचे- कर्त्याबद्दल प्रेम व आदरबुद्धि ही जर त्याचे हृदयांत उत्पन्न झाली नाहीत, तर ते शिकणे आणि शिकविणे, “ बोलणे फोल झाले, डोलणें वायां गेलें" या म्हणीप्रमाणे व्यर्थ होय !
Ketutetetet,
प्रकरण नववें.
शत्रु-मित्र.
tetitetett tet tetettettetett. (श्लोकार्ध) समोऽहं सर्वभूतेषु । न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ॥ -श्रीमद्भगवद्गीता. भावार्थः -भगवान म्हणतातः मी सर्वांशीच सारखा. मला कोणी द्वेष्यही नाही आणि प्रियही नाही. (श्लोक) हिरण्यभूमिलाभेभ्यो । मित्रलब्धिर्वरा यतः ।। अतो यतेत तत्प्राप्त्य । रक्षेन्सत्यं समाहितः॥ १ ॥ -याज्ञवल्क्य स्मृति. भावार्थ:-ज्या अर्थी मित्रप्राप्तीचे महत्त्व सुवर्णलाभ किंवा भूमिलाभ यांपेक्षाही अधिक आहे, त्या अर्थी सन्मित्र संपादनार्थ यत्न करावा; व स्वस्थचित्तें सत्य रक्षण करावे. (श्लोक) क्षीरेणान्मगतोदकाय हि गुणा इत्ताः पुरा तेऽखिलाः । क्षीरे तापमवेक्ष्य तेन पयसा ह्यात्मा कृशानी हुतः ॥ गंतुं पावकमुन्मनस्तदभवदृष्ट्वा तु मित्रापदं । यक्तं तेन जलेन शाम्यति, सतां मैत्री पुनस्त्वीदृशी ॥१॥ ~~~भर्तृहरि. भावार्थ-- - दुधांत पाणी मिसळून चुलीवर ठेविले तेव्हां दुधाने पाण्याशी दोस्ती केली. हे पाहून पुढे दुधाला जेव्हां ताप (आंच) होऊ लागला तेव्हां पाण्याचा जीव (त्याजसाठी) उडून चालला. पाण्याची ही दशा पाहतांच त्यासाठी दूध पुनः आगीत उडी घेऊ लागले. इतक्यांत पुनः जेव्हां त्याला पाणी भेटविले तेव्हां ते ठिकाणी बसले.(दूध तापतांना उतास जात त्यावर हे रूपक आहे). सजनाची मैत्री या प्रकारची आहे.
प्रकरण नववें.
--
शत्रु-मित्र.
(श्लोक)
न कश्चित्कस्याचन्मित्रं । न कश्चित्कस्यचिद्रिपुः ।।
कारणेन हि जायंते । मित्राणि रिपवस्तथा ॥
-हितोपदेश.
गोव्याघ्र, अहिनकुल इत्यादि शाश्वतिक विरोधांची गोष्ट वेगळी.
एरव्ही मानवी व्यवहारांत उपजत कोणाचा कोणाशी मित्रभाव
किंवा शत्रुत्व यांतील ठरीव कांहींच नाही. शत्रु किंवा मित्र आपण
आपल्या कृतीने निर्माण करितो. काही लोक यत्नपूर्वक लोकशत्रुत्व
संपादतात; आणि शत्रुत्व संपादणे ही गोष्ट उघडच अल्पायासाची
आहे. एका गैरशब्दाने जन्माचा मित्र वैरी झाल्याची उदाहरणे
आहेत, बाकी, शत्रु तरी उदार आणि न्यायप्रिय असेल तर तो
मूर्ख मित्रापेक्षा एका अर्थी बरा. कारण मित्र पुष्कळदां मुरवतीस्तव
आपले दोषांवर पांघरूण घालतो; परंतु वैरी आपले दोष बिनभाड
आपले नजरेस आणून देतो. म्हणूनच तुकोबा म्हणतातः
" निंदका-
चे घर असावें शेजारी." आतां, हा एक शत्रूचा गुण जरी घेण्या-
जोगा
असला, तरी
গ্রন্থ
तो
नाही. कारण, ' यत्रास्ते विषसंसर्गोऽमृतं तदपि मृत्यवे' -जेथे
विषाचा संपर्क आहे, तेथील अमृतही मृत्युकारक समजावें. याच.
तो शत्रुच;
सुखदायक कधी होणार
२२२ सुख आणि शांति. [प्रकरण -- प्रमाणे गुणही झाला तरी शत्रूचा तो, आपल्या पथ्यावर कितीसा पडणार ? तेव्हां, शत्रुत्व हे एकंदरीत अनिष्टच आहे. पण, उलट पक्षी सन्मित्राचीही जगतांत महागाईच आहे, व निवड फार कठिण आहे. पुष्कळदा आपणांस मित्र म्हणविणारे अंतर्यामी आपले हित- शत्रु असतात, असा अनुभव येतो. फ्रेंच राजा चौदावा लुई याची आज्ञा घेऊन मार्शल व्हिलर्स जेव्हां ससैन्य रणभूमीवर निघाला, तेव्हां त्याने लुईला म्हटले, “ खाविंद, आपल्याला शत्रूची फिकीर नको, त्यांना मी पाहून घेईन; पण आपण माझे मित्र म्हण- विणारांवरमात्र सक्त नजर राखा; कारण, ते केव्हां फशी पा. डतील याचा नेम नाही." ठीकच आहे (श्लोक) परोक्षे कार्यहंतारं । प्रत्यक्षे प्रियवादिनम् ॥ वर्जयेत् तादृशं मित्रं । विषकुंभं पयोमुखम् ॥ १॥ भावार्थ:-मानकापृ तोंडपुज्या मित्राचा, तोंडी दूध आणि खाली विष भरलेल्या घड्याप्रमाणे, अव्हेर करावा. वैद्यशास्त्रांत कांही रसायने व आस तयार करण्यास सांगि- तली आहेत. या औषधांची खुबी अशी आहे की, ती जुनी होत जातील तों तो रुचीस व गुणास चढत जातात. मित्राचीही गोष्ट अशीच आहे. स्नेह जितका अधिक जुना, तितका अधिक हिता- वह. जगतांत चिरंतन सौहार्द हैं पुरातन रसायणाप्रमाणेच दुर्मिळ व बहुमोल आहे. म्हणून सुज्ञाने त्याचा अवश्य संग्रह करावा. पण मैत्री प्रथमच पुराणी कशी व्हावी ? एकदां केव्हां तरी ती नवी .
९३.] शत्रुमित्र. २२३ असणारच. तथापि आपले कर्तव्य इतकेंच कों, जोडलेला स्नेह कामापुरता मामा' या न्यायाचा नसून तो शाश्वत राहील असे करावें. स्नेह वापरण्यालादेखील अक्कल लागते. पुष्कळ लोक, पाहावें तो, काही काळ अगदी एका तोंडाने पाणी पीत असतात, आणि पुढे फाटतात. त्यांस विचारावें । कां हो, ते फलाणे आतांशा आपलेकडे येत नाहीत?' ते उत्तर करितात, 'आमचे त्यांचे बिन- सले आहे. ' हे एकदां जुळतें कसें, आणि मग बिनसते कसे ? अर्थात् त्या दोन मित्रांपैकी कोणी तरी एक मूर्ख अथवा दुर्जन असला पाहिजे. दांघ सज्जन असताल तर त्यांचा प्रणय एकदा जडला की आमरणान्त राहिलाच पाहिजे. दुर्जनांचा स्नेह मृद्घटा- सारखा सुखभेद्य असतो, परंतु सजनांचा स्वर्णपात्रासारखा दुर्भेद्य असतो. ज्यांना मित्र राखता येत नाहीत ते मनाचे खोटे असें सम- जावे. कारण, दृढसोहर्द हीच मनाचे चांगुलपणाची निशाणी आहे. लबक म्हणतो, आयुष्यात एकलकोंडेपणासारखी शिक्षा नाही; आणि मित्रसंगमासारखा दुसरा आनंद नाही. कवि म्हणतोः (श्लोक) यस्य मित्रेण संभाषा यस्य मित्रेण संस्थितिः ॥ यस्य मित्रेण संलापस्ततो नास्तीह पुण्यवान् ॥ १॥ हितोपदेश. सन्मित्राचे एवढे माहात्म्य आहे. आणि खरेंच, (श्लोक) न मातरि न दारेषु । न सोदर्ये न चात्मजे ॥ विश्वासस्तादृशः पुंसां । यावन्मित्रे स्वभावने ॥१॥-कित्ता.
२२४ सुख आणि शांति. [प्रकरण १ म्हणजे मनुष्याचा सहज मित्रावर जो विश्वास असतो तो प्रत्यक्ष माता, स्त्री, बंधु किंवा पुत्र यांवरही नसतो. नसतो. अम्सल स्नेहाची फारच हृदयद्रावक उदाहरणे इतिहासांत आढळतात. जोनथन याचे जे डेव्हिडविषयी प्रेम होतें तें स्त्रीचे प्रेमाहूनही आगळे होते, असे वर्णन आहे. (श्लोक) अकिंचिदपि कुर्वाणः । सौख्यैर्दुःखान्यपोहति ॥ तत्तस्य किमपि द्रव्यं । यो हि यस्य प्रियो जनः ॥१ -उत्तररामचरितम्. भावार्थः--प्रिय मित्र म्हटला म्हणजे तो काही न करीना, तरीही सुख देऊन दुःख हरण करितो. कारण ज्याला जे प्रिय ते लाखमोल वाटते. भवभूतीने सीता व रामचंद्र यांच्या स्नेहाचे वर्णन रामचंद्राचे मुखानेच केले आहे, त्यांत म्हटले आहे: (ऑव्या) जे हृदयाचे विश्रांतिस्थान । जेथें प्रेमरसाचें मान ।। कधीही होईना न्यून । वयोभेद झाला तरी ॥१॥ मध्ये आलिया आवरण । कालेंकरुनि त्याचे निवारण || होतां पहिल्यापरी पूर्ण । स्नेहसत्त्वीं राहिजे ॥२ -परशुरामपंत तात्या. परंतु, याच गोड वर्णनाचे शेवटी एक खेदकारक शेरा आहे की, “ कथमप्यकं हि तत्प्राप्यते--असला स्नेह मोठ्या कष्टानें लाभतो." खरेंच, अस्सल स्नेही विरळागत आढळतो. आणि ज्याला सुदैवाने आढळेल, त्याने तो सर्वात्मना राखावा. शेक्सिपियर. म्हणतो:- ९३.] शत्रु-मित्र. २२५ (साकी) सुपरीक्षित जो असे मित्र त्या, घट्टप्रेमरशनांहीं॥ आंवळुनीयां हृदयीं ठेवीं; रत्न तयासम नाहीं ॥१॥ लबक म्हणतो, अशा मित्राला साता काळजांपलीकडे वागवा. असल्या मित्राचे योगानें समृद्धीला सौभाग्य चढते, व आपत्ति सुसह्य होते. व असे त्यापासून उभयावस्थेत हित आहे, म्हणून सन्मित्राचे अभिनंदन करा; त्याला साह्य करा; त्यासाठी श्रम करा; संकटी त्याचा बचाव करा; त्यावर कोणी हल्ला केल्यास त्याचे खांद्याशी खांदा देऊन उभे रहा; त्याचे सुखाने सुखी व दुःखाने दुःखी होत जा; आणि तो विपद्ग्रस्त दिसल्यास त्याचे सांत्वन करीत जा; तरच तुम्ही आपले कर्तव्य केलेंसे होईल. अरब लोकांत असा समज आहे की, ज्याचे आपण एकवार मीठ खालें त्याशी दगलबाजी करणे हा अक्षम्य विश्वासघात आहे. आपल्याकडेही रामोशी लोक जरी एवढे कठोर हृदयाचे व घातुक आहेत, तरी त्यांनी ज्याचा एकदां दूधभात खाल्ला, त्याचे वाटेस ते स्वतः जात नाहीत, किंवा आपले जातभाईंसही जाऊ देत नाहीत, असा लौकिक आहे. रोमन लोकांचे म्हणणे वेगळे होते. ते म्हणत, एकवार मीठ खाल्ल्याने दोस्ती धरणें ठीक नाहीं; दहापांच मण मीठ खावे तेव्हां पक्का दोस्ताना करावा. ह्या म्हणण्यात कावेबाजी. अधिक आहे, आणि सहृदयता कमी आहे; स्.बब हे म्हणणे सजनांना पटणारे नव्हे.
२२६ सुख आणि शांति. [प्रकरण एक वेळ स्नेह्याचे ठिकाणी नसते सद्गुण कल्पणे बरे, पण त्याचे असते गुणांची पायमल्ली करणे किंवा त्याचे दोष फुगवून दाखविणे हे सर्वथा अनुचित आहे. जोबट ह्याने बोमंटबाईला लिहिले, 'तूं आजारी होतीस, तें प्रकृतिमान आता बदलले असेल अशी मला आशा आहे. इतर गोष्टींत तुझे ठिकाणी कधीच बदल होणारा नाही, अशी माझी खात्री आहे. कारण तूं स्थिरप्रेमी आहेस. तेव्हां त्याबद्दल कांहींच लिहिण्याचे कारण नाही.' याचें नांव स्नेह; याचे नांव विश्वास. आतां स्नेही झाला म्हणून त्याला भलतेच गैर काम करावयास सांगू नये; व त्यानेही दुष्कृत्यांत आपले साह्य मागू नये. कारण, स्नेह हा सद्गुणांचा आधार असावा, दुर्गुणांचा उत्तेजक नसावा. आपण अत्यंत हीन स्थितीत असलो तरीही सद्भावप्रेरित अस- ल्यास दुसन्याला किती तरी सुखी करता येणे शक्य आहे. (श्लोकार्ध) दीपाचे किरण जसे सुदृर जाती। सत्कृत्ये अधमजनीही सार्थ होती ॥१॥ -~~-शेक्सपिअर. स्पष्टवक्त्या स्नेह्याला काही लोक अंमळ नाके मुरडतात. पण ज्याचे स्पष्टवक्तृत्व असें अप्रिय होते, त्याचे ठिकाणी कळकळीचा भाग अधिक आहे, असे समजावें. खरा स्नेही आहे तो प्रसंग दिसल्यास आपली कानउघाडणी करण्यास चुकणार नाही, हे खरे; पण तो आपला फजिता किंवा बाजार करणार नाही. ग्लॅडस्टन ९ ३.] शत्रु-मित्र. २२७ - मन घालून म्हणे, “शत्रूला कोणीही पुरा पडेल, पण मित्राला पुरा पडणारा बहाद्दर विरळा." बाकी, स्पष्टोक्तीखाली मित्राचा बाजार करणारांचा वर्ग सुदैवाने अल्प आहे, हे ठीक आहे. आपल्याला अकस्मात् एकादी अजब नवीन कल्पना सुचली असतां चित्तात विलक्षण सुख होते, असा अनुभव येतो. तथापि प्रेमरसायनाची गोडी त्याहूनही विलक्षण आहे. स्नेह्यास्नेह्यांचे मनांत जें सप्रेम संभाषण चालते, त्यासारखी दुसरी मिठाई नाही. पति-पत्नी-भाव घटकाभर एकीकडे ठेवून केवळ प्रेमी या दृष्टीने रामचंद्रांनी सीतेच्या भाषणाचे जे वर्णन केले आहे, तें ज्याला अनुभवावयास सांपडेल त्याला स्वर्गदेखील ठेंगणा आहे, असे आम्हांस वाटते. रामचंद्र म्हणतात:- (श्लोक) जी म्लान जीवकुसुमास विकासवीती। सर्वेद्रियांस सुख देउनि मोहवीती॥ सस्नेह ती सुवचने कमलेक्षणेची । कर्णामृतेंचि हृदयासि रसायनेंचि ॥१॥ -भवभूति. प्रियमित्राशीं संभाषणाचे हे वर्णन केलें खरें; पण येथेच एक गोष्ट सांगितली पाहिजे. ती ही की, हे संभाषणच असावें, विवाद किंवा वितण्डा असू नये. पुष्कळदां असे होते की, स्नेहीस्नेही प्रथम एकादे गोष्टीवरून सहजगत्या बोलू लागतात. बोलतां बोलतां मजल विवादावर येते. तसे झाले म्हणजे मनुष्य इरेस चढून नेटाने बोलू लागतो. तो आग्रहाने बोलू लागला म्हणजे २२८ सुख आणि शांति. [प्रकरण प्रसंगी त्याचे मित्रास तें विषम लागते. मग तोही अभिमानास पेटून उलट बिनकसूर हल्ला करूं लागतो. अखेर प्रकरण चिरडीवर जाऊन कायमची फाटाफाट होते. वादच आरंभला आणि त्यांत आपला पक्ष निर्बाध आहे अशी आपली खातरी असली, म्हणजे हिशोबीच आपण प्रतिपक्ष्याच्या मताचा निषेध करितो. परंतु, तो मताचा निषेध स्वतःचा तिरस्कारसा त्यास भासून तो अपमानित होतो, आणि मित्रभावाचे भान सुटून एकेरीवर येतो; आणि शेवटी गोष्ट विकोपास जाऊन स्नेहच्छेद होतो, असे जगांत अनुभव आहेत. यःकश्चित् सोंगट्यागंजिफांच्या खेळावरून वाद जुंपून प्रेम- भंग झाल्याची उदाहरणे आहेत. याकरिता ज्यांना आपली मैत्री अखंड नांदावी अशी इच्छा असेल, अशांनी वादाचे भरीस पडूं नये, कवि म्हणतोः (श्लोक) इच्छेच्चेद्विपुलां मैत्रीं । त्रीणि तख न कारयेत् । वाग्वादमर्थसंबंध । तत्पत्नीपरिभाषणम् ॥ १॥ :-अखंड मैत्रीची इच्छा असल्यास स्नेह्याशी वाद, पैशाचा व्यवहार व त्याचे स्त्रीशी गप्पा मारीत बसणे, ही वर्ण्य करावी. वरील उपदेश सर्वथा घेण्यासारखा आहे. वाद न करण्यांत दुसरा हेतु असा आहे की, एक तर मनुष्यस्वभावच असा आहे की, वादानें पराजित झाला, तरी मनुष्य आपला अंतर्यामचा ग्रह " Short reckonings make long friends " अशी इंग्रजीतही म्हण आहे.
९ वें.] शत्रु-मित्र. २२९ . सोडीत नाही. फार झाले तर निरुत्तर होऊन तो तोंड मिटील; पण कृतीला चुकणार नाही. एतावता वाद विफलच. तिसरी गोष्ट, पुष्कळदां वाद म्हणजे शब्दार्थाची विप्रतिपत्ति असते. लॉक म्हणतो, " तत्त्वज्ञानांतील पुष्कळ वाद पहावे तो एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ केल्याने उद्भवले आहेत. एकाने म्हणावें 'कर्त्याने' हा शब्द याच अर्थी योजिला आहे, दुसऱ्याने म्हणावें, नाही, अमक्या अर्थी योजिला आहे, की झाले भांडण सुरू. पण अखेर बघावें तो त्यांत अर्थ कांहीं नसतो." हा प्रकार केवळ तात्त्विक विषयांवरील वादांतच असतो असे नाही. जगतांतील बहुतेक वादांचे रहस्य हेच असते. कोणत्या तरी मुद्याच्या शब्दाबद्दल एका पक्षाचा गैरसमज झालेला असतो. किंवा एकाने बोललेलें असावें एक, मधल्याने सांगावें भलतेंच, आणि तिसन्याने तेंच जमेस धरून पहिल्याशी भांडावयास उठावे आणि रणे पडावी. किंवा, एकानें जावें विनोदानें बोलायला, तें दुसऱ्याने धरावें खरें- खुरे, आणि म्हणतात तशी मस्करीची कुस्करी होऊन अंती विपट पडावें; असा चमत्कार होतो. अथवा आपण सद्भावाने एकाद्याला बरी गोष्ट सागू जावें, आणि त्याने मर्मोद्धाटन केलेसें मानून उल- टून पडावें; म्हणजे 'धर्म करावयास जावें, तो कर्म उभे राहते, किंवा 'निमाज पढावयास जावें तो मशीद गळ्यांत यावी,' असा प्रकार होऊन कायमचे वैमनस्य पडतें, व उभयतांचे जिवाला जन्माचा रोग जडतो. असे मासले दुनियेत हमेष होतात. यासाठी शहाण्याने स्नेह्याशी वाद मांडूं नये.
२३० सुख आणि शांति. [प्रकरण गेटीच्या नाटकांतील एका पात्राने आपल्या बहिणीसंबंधे म्हटले आहे की, " माझा मेहुणा आणि माझी बहीण ही दोघेही म्हटले तर योग्य माणसें होती, पण त्यांच्यांत एक गोम असे. केव्हाही नवरा-बायको स्वस्थ एकत्र बसली म्हणजे दोघांनी हशीखुशीत प्रेमळ गोष्टी कराव्या, तें टाकून ती दोघेही शाहाणी असल्याने, एकमेक आपले मत दुसऱ्यावर लादूं पाहत; नवऱ्याला वाटे की, बायकोला आपल्या मताची करून घेतली म्हणजे उभयतांचे मेथ- कूट चांगले जमेल. तिला वाटे की, नवन्याचा ग्रह आपल्या- प्रमाणे झाला म्हणजे दूधसाखरेचा मिलाफ होईल. परंतु, उभय- तांचा सदुद्देश असूनही परिणाम विपरीत होई, आणि अधिक गट्टी जमावयाचें बाजूस राहून तुट्टीची पाळी येई". म्हणून वादा- पासून दूर असावें. ही सूचना खासगी भाषणासंबंधे झाली. चारचौघांत किंवा समाजांत भाषण करण्यास तर अंगी याहूनही अधिक धूर्तता व सावधपणा पाहिजे. समाज म्हणजे भिन्नरूचि ठरलेलाच. एकाला इतिहास रुचला, तर दुसऱ्याला ललितकला प्रिय असतील; तिस- च्याला रसायनशास्त्र आवडेल. यास्तव, समाजांत बोलणे तर सर्वांस करमणूक होईल अशा सामान्य विषयावर बोलावें. या विचित्र जगांत प्रत्येकाची रुचि निराळी. मनुष्य हा संगति- प्रिय प्राणी खराच, पण त्यांतही पुष्कळांना भरवस्तीत शहरांत राहणे आवडते. म्हणच पडली आहे: “ एकदां खावें, पण शहरांत , ९ वें.] शत्रु मित्र. २३१ राहावे." अशांना प्रत्यही नव्या नव्या चेहन्यांमोहन्यांची स्त्रीपुरुषे पाहण्यांतच सुख वाटते. लग्नकार्यात रस्त्यांनी स्त्रीपुरुषांचा रंगीबेरंगी ताफा चालला असता हातचे काम टाकून खिडक्यांत उभी राहून नेत्रनिर्वाण साधणारी शोकी माणसे किती तरी आढळतात. अशांना खेड्यापाड्यांत राहून पशुपक्ष्यांची व वनस्पतींची संगति रुचत नाही. कदाचित् कोणाचे आग्रहावरून असले लोक खेड्यापा- ड्यांत गेलेच, तर पुष्कळ जण जमून जातात, आणि तेही आड. वाटेला जात नाहीत. पण त्यांना हे समजत नाही की, सृष्टीचे खरें सौंदर्य अनुभवणे तर एका बाजूलाच गेले पाहिजे, आणि बरोबर घोळका उपयोग नाही. फार तर जिवाचे एक दोन सोबती असले म्हणजे बस. नाही तर घोळक्याने वनपशु, पक्षी भयभीत होऊन पळून जातात; फलपुष्पांचाही उपमर्द होतो, आणि खरी मौज नाहीशी होते. स्पष्ट बोलणे म्हणजे, असल्या लोकांना जानपदलक्ष्मीचे सौंदर्य कळतच नसते. मॅडम डी. स्टेल म्हणे, "माझे गांवचे नदीसारखी दुसरी नदीच मला दिसत नाही." दुसरी काही माणसे एकांतप्रिय असतात. अशांना भरवस्तीत आल्याने कण्वाशप्य शाङ्गरवाप्रमाणे " हे गृह सर्वहि कां पेटे" असे होऊन जाते. अशांचा भर आमचे मुग्ध मुनिकन्येप्रमाणे हरिणबालकें, सहकार, वनज्योत्स्ना, कोकिलकृजित इत्यादिकांत असतो. आमच्या सीतामाईलाही बागबगीच्याचा फार नाद असे. भवभूति म्हणतो, " -सर्वथा प्रियारामा हि वैदेह्यासीत् " -मधुगन्धि वनांत रामचंद्रासह राहणे हे तिला अयोध्यावासाहून २३२ सुख आणि शांति. [प्रकरण प्रियतर वाटे. जे तत्त्वजिज्ञासु असतात अशांना सद्ग्रंथांचा परिचय प्रिय असतो. यांतील बहुतेकजणांना ग्रंथभांडारे, वस्तुसंग्रहालये व तात्त्विक विषयांवर संभाषण यांतच गोडी वाटते. आणि लबक म्हणतो, या तीनही गोष्टी निर्मल व उदात्त सौख्य देणाऱ्या आहेत, यांत शंकाच नाही. सिसिरो म्हणतो, यांतच समानविद्वत्तेच्या एकाद्या मित्राचे संगतीची भर असावी, म्हणजे मग हे सुख केवळ अवर्णनीय आहे. संपत्तीची सुखें यापुढे मूग गिळतील. आणि आ- जपर्यंत जे नामांकित ज्ञाते होऊन गेले, त्यांनी असल्या निर्मळ संगतीची ज्या अर्थी प्रशंसाच केली, त्या अर्थी तिचा महिमा तसाच मसला पाहिजे. आपल्यांत एक म्हण आहे-दोन्ही डोळे शेजारी, भेट नाहीं संसारी; अशांतलाच प्रकार या जगांत कधी कधी आढळतो. दोन मनुष्यं आजन्म एकत्र असूनही परक्यासारखी असतात. एकाचे हृदयांतील सुखदुःखांचा ठाव त्याच्या सोबतीच्याला कसा तो नसतो. बरें, हा प्रकार केवळ तिन्हाइतांचाच नव्हे; ज्यांना जग एकजीव समजते अशांतही तो असतो, हे पाहून विस्मय वाटतो. लॉर्ड हूटन म्हणतोः (श्लोक) विपत्संपत्काली बहु दिवस एकत्र वसलीं। तरी ना अन्योन्यां वळख हृदयांतील दिसली ॥ कळेना, का केली सहवसति त्यांनी बहुदिन । जरी नाही केले उभय मिळुनी प्रेमभरण ॥१॥ AN ९३.] शत्रु-मित्र. २३३ -- केबल म्हणतोः (साकी) निज सुखदुःखीं मग्न एकला राहुनि कोणी जीव । अन्याज्ञातचि जाय निघूनी, बघुनि येतसे कीव ॥१॥ बुल्वर लिटनचे हेच म्हणणे पडते. तो म्हणतोः (श्लोकार्ध) एकस्थानी उभय, परि ते भिन्न सारे विचार । प्रेमें गोष्टी वरुनि करिती, अंतरी पूर्ण वैर ।। ब्रौनिंगने तर आजन्म एका घरांत राहिलेल्या जोडप्याचा मासला दिला आहे: (श्लोकाध) मी धांवतों घरभरी मिळण्या प्रियते । ती ऐकतांचि मम पाउल, दूर जाते ।। या चमत्कारांचे कारण असे आहे की, दोन माणसें केवळ एका घरांत कोंबल्याने प्रेमी होत नसतात. सख्याला समानशीलत्व लागते. पहा बरें, एका प्याल्यांत पाणी आणि खोबरेल टाका, आणि दुसन्यांत पाणी आणि दूध टाका. दुसऱ्यांतले दोन पदार्थ केव्हांच एकजीव होतात, आणि पहिल्यांतले तसेच्या तसेच अलग राहतात. हाच न्याय प्रेमाचा किंवा स्नेहाचा आहे. कवि म्हणतो, बेडूक कमळाचे खालीच असतो, आणि भुंगा दुरून उड्या घेत येतो. लबक म्हणतो, स्थलाचे एकलेपण पत्करते; पण मनाचे पत्करत नाही. तेव्हां, ज्याला दुर्दैवाने समान दिलाचा स्नेही भेटत नसेल, २३४ सुख आणि शांति. [प्रकरण त्याने वनश्रीशी तरी प्रेम धरावें; म्हणजे त्याला उदास होण्याचे केव्हांच कारण नाही. वनश्री ही सुंदर व आवडत्या जिवलग- पेक्षाही अधिक पित्तशामक व सुखदायक आहे. आणि तिच्या लीलेत ज्याचे मन रंगले, त्याला आनंदाचा सुकाळच झाला. बुलि- अन मॉरिस म्हणतो, " जिवाला कोणी तरी जोड पाहिजे, तरच तें जगणे; एकटें एकटें जगणं तें मरणतुल्यच. कादंबऱ्यांत वाचावें तो शब्दाचे सामर्थ्य अद्भुत वर्णिले आहे. हीन नामक कवि म्हणतोः-- (श्लोक) स्वर्णाची रग्य हम्र्ये, परिज नहि बहू, गीतवादित्र जेथें । पुष्पांचा नित्य चाले परिमल, नटती अप्सरा दिव्य जेथें ॥ मंत्र्याच्या एक शब्द सकलहि परि तो थाट जाई लयाला । जैशी की स्वमसृष्टी; उरत मग तिथे एकली भमशाला ॥१॥ पण शब्दाचे अद्भुत सामर्थ्य शोधण्यास आपणांला जुन्या जादूच्या किंवा यक्षिणींच्या गोष्टींचे कारण नाही. त्याचा आपणां- ला व्यवहारांत नित्य अनुभव येतो. आपण एकाद्याला एकादे वेळ आनंदाचे भरांत आपली एकादी गोष्ट मोठ्या प्रेमाने व जिवाचे ओढीने सांगावयास जावे आणि तो उत्कर्षासहिष्णु किंवा दुर्जन असला, म्हणजे आपले अभिनंदन न करितां एकादाच कुजका शब्द बोलतो. त्या वेळी आपल्याला जहर झोंबल्यासारखे होऊन, आपला उचंबळलेला सर्व आनंद थिजून विंचवाचे दंशासारख्या आपले शिराशिरांतून वेदना चालतात; सौख्याला विरजण पडते, व अशाचे तोंड पाहणे नको असें होतें. उलट पक्षी, आपण अवचट दुःख, ९३.] शत्रु-मित्र. ३३५ , चिंता, किंवा शोक यांचे तावडीत सांपडलों असतां एकादा सजन किंवा सुमित्र जिव्हाळ्याचा एकादाच शब्द बोलला, तरी तेवढ्याने दुःखभार हलकावतो, चिंतातिमिर दूर होतो, व शोकशंकू उद्धृत झालासे वाटते. हा आपणां सर्वांचा अनुभव आहे. हे शब्दसामर्थ्या- चंच उदाहरण होय. यासाठी सुज्ञाने प्रत्येक शब्द मुखांतून काढणे तो भगवंताचे आज्ञेप्रमाणे “ अनुद्वेगकर, सत्य, प्रिय आणि हित- कर" असाच काढावा. गुळाची महागाई असो, पण गोड शब्दाची कां असावी? दारूबाज लोक सबब सांगतात की, संसाराच्या कर्मकटकटीची अल्पकाल तरी विस्मृति होऊन विसांवा पडावा, म्हणून आम्ही द्राक्षारस सेवितो. परंतु त्यांना कळत नाही की, सुभाषित-रसाचे सामर्थ्य द्राक्षारसाचेही पलीकडचे आहे. (श्लोक) द्राक्षा म्लानमुखी जाता। शर्करा चाश्मतां गता। सुभाषितरसस्याग्रे । सुधा भीता दिवं गता ॥१॥ भावार्थः---या सुभाषितरसा पुढे द्राक्षा सुकून गेली ( सुकी द्राक्षे, बेदाणा झाला), शर्करा दगड ( खडीसाखर ) होऊन पडली; आणि सुधा तर पळून स्वर्गास गेली. ही जरी कव्युक्ति असली, तरी ही गोष्ट खरी की, बोलणारा तितका रसिक, बहुश्रुत आणि विनोदी असला, तर ऐकणाराला चटकाच लावून सोडतो. लबक म्हणतो, आपले अंगी तितपत विनोदीपणा नसलाच, तर दुसरा कोणी स्नेहीं गांठावा. पण दारूचा २३६ सुख आणि शांति. [प्रकरण घुटका, तमाखूचा तोबरा किंवा चिरुटांचा झुरका यापेक्षा असल्या चटकदार भाषणाची करमणूक शरीराला तशीच मनालाही हिता- वह समजावी. ते कशाला ? तसा जर नकल्या बोलणारा मिळाला, तर त्याचे बोलण्याने सारा दिवसभर हंशाच्या उकळ्या येऊन मौज वाटत राहते, असा अनुभव आहे. स्नेही म्हटले म्हणजे त्यांना परस्परांची रहस्ये माहीत असा- वयाचीच. आपल्या स्वतःच्या गुप्त गोष्टी वाटल्यास गूढ ठेवाव्या, नाही तर प्रगट कराव्या; ही ज्याच्या त्याच्या खुषीची गोष्ट आहे. परंतु स्नेह्याचे रहस्य म्हटले म्हणजे त्याचें गोपनच केले पाहिजे. त्याचा स्फोट करण्याचा आपणांस काही हक्क नाही. बरें, एरव्हीं व्यवहारांत मनुष्यानें-विशेषतः स्नेह्याशी - खुलास आणि मनमो- कळं वागावें. पण काही लोकांना क्षुद्र गोष्टींना नसते बाळसे आणून दाखविण्याची लकब असते; हा त्यांचा दोष आहे. स्नेही म्हटला की त्याशी पडदा कामाचा नाही. पण, दुसऱ्या पक्षी, केवळ स्नेही झाला, तरी त्याच्या विश्वासावर गुह्य गोष्ट सांगणें निर्भय नसते. कारण, कधी कधी आपले स्नेही, त्यांचे मनांत दुर्भावना किंवा कापट्य नसतांही गाफीलपणाने आपली सातां काळजांपलीकडे ठेवण्यासारखी गुप्त गोष्ट फटकर चौघांत ओकतात. एरव्ही पाहिले तर ते मोठे सज्जन, प्रेमळ व जिव्हाळ्याचे स्नेही असतात; स्वभावदेषाने त्यांचे तोंडांत तीळ भिजत नाही. त्यांचे कानीं कांहीं पडो, ते त्यांनी नगाऱ्यावर घातलेच. फ्रेंच भाषेत एक म्हण आहे की, रहस्यरक्षणाइतकी अवजड कामगिरी दुसरी नाही. ती म्हण पण ९३.] शत्रु-मित्र. २३७ : असल्या उतावळ्यांना अक्षरशः लागू पडते. यासाठी कवि म्हणतोः (श्लोक) दारेषु किंचित्स्वजनेषु किंचित् । किंचिंद्वयस्येषु सुतेषु किंचित् ॥ युक्तं न वा युक्तमिदं विचिंत्य । वदेद्विपश्चिन्महतोऽनुरोधात् ॥१॥ भावार्थः-शहाण्याने थोग्यायोग्यतेचा पूर्ण विचार करून मोठ्या धोरणाने काही गोष्टी स्वस्त्रीला, काही स्वजनांला, काही मित्रांला आणि काही पुत्रांना (ज्याचे त्याचे मानाने ) सांगाव्या. स्नेही झाला तरी तो रहस्य- रक्षण-क्षम असेल तरच त्याला गुह्य सांगांव. या रहस्यभेदाशिवाय आणखी एक गोष्ट स्नेहभंगाला कारण होत असते. आपला स्नेही बोलला असतो एक, आणि मधले रिकामटेकडे किवा चोंबडे आपल्याला सांगतात दुसरेंच; की आलीच मनांत तेढ. मग स्नेह्याने जरी म्हटले की, मी असें बोललों नाही, तरी आपणांस ते खरे वाटत नाही, आणि अढी उकलत नाही. पण ही चूक आहे. कारण, आपल्या समक्ष अशा अनेकदा गोष्टी घडतात की, मधले निरोप्ये, दुष्टपणानें-नसल्यास मूर्ख- पणाने तरी--'ध' चा 'मा' सांगून अनर्थ उत्पन्न करितात. एकत्र कुटुंबांत बहुधा अखेर वैमनस्य येतात ती अशाच रीतीने. सई- बाईने झोंक पाहून हळूच कानाशी लागावे की, ' आज भावोजी अस्से म्हणत होते, हे त्यांना शोभलें ना ? ' म्हणजे रावांनी बांध- लाच पीळ. पण यापेक्षा राव जर हंसतच सांगून टाकतील की, तूं .
२३८ सुख आणि शांति. [प्रकरण माझी लाडकी खरी, परंतु ज्या अर्थी ब्रह्मदेवाने माझे कानडोळे तुला चिकटविले नाहीत, त्या अर्थी हा उद्योग तूं सोडून दे; तर एवढ्या मात्रेच्या एका वळशाने जन्माचा रोग जाईल. स्नेह्यांतही हाच प्रकार पाहिजे. मध्यस्थाचे सांगण्यावर विश्वास मिळून ठेवू नये, म्हणजे नसता कलह आणि स्नेहभंग मिटला. स्नेह्यास्नेह्यांत नजरभेटी देण्याच्या चाली आहेत. पण त्यांचे मोल त्या वस्तूंचे बाजारभावावरून न करितां देणाराच्या प्रेम- सद्भावाकडे पाहूनच केले पाहिजे. सुदामाने मागून आणलेले मूठभर पोहेच आपल्या लक्ष्मीपति मित्राला दिले. श्रीकृष्णाने उलट भेट स्वर्णनगरी दिली. म्हणून काय ? दोन्ही भेटींची किंमत एकच. कारण, मोल प्रेमाचे, वस्तूचे नव्हे. एक गृहस्थ आपल्या दूरस्थ स्नेह्याला उद्देशून म्हणतोः (श्लोक) सूर्यकिरणे पाहुनी अब्धिपृष्ठीं । चंद्रिका ही बिंबतां निर्झरान्तीं ॥ समुद्रोर्मी उसळतां अद्रिपादीं। सख्या, होते मज स्मरण तुझं आधीं ॥ १ ॥ ह्या प्रकारचा अनुभव प्रत्येक सहृदय मनुष्यास असेलच. जिवाचा स्नेही हा एक अजब मेवा आहे. तो एक मोठा विसांवा आहे. विशेषतः ह्या मृत्युलोकची स्थिति क्षणभंगुर आहे, हे ध्यानांत आणिलें म्हणजे आपणावर प्रेम करणारा आणि आपणास प्रिय असा स्नेही पाहिजेच असे म्हणावे लागते. कारण, मूर म्हणतोः- ९३.] शत्रु-मित्र. २३९ (गडे अक्रुर हा नेतो श्रीकृष्णाला--या चालीवर) या शून्यजगी कोण करिल रे वसती। जरि स्नेही सगळे जाती ॥ जरि प्रीतीची हृदयें नष्टचि होती। तरि काय असे या जगतीं ॥१॥ स्नेहसंपादनाला किंवा प्रेमसंवर्धनाला विशेष अनुकूल असे वर्षाचे काही विशिष्ट कालही असतात. इंग्लंडांत हिमकालांतील संध्यासमय प्रेमपोषक असतो. कौपर कवि म्हणतोः (श्लोक) आली हे रम्य संध्या, मिटवुनि झडपा चेतवा अग्निधानी । ओढोनी कोंच भांती खुलवुनि पडदे बैसुं या सन्निधानी । उन्मादातें न दे जे रुचिर कढत ते, पेय घेऊ चहाचें । तेणे अंगी हुषारी भरुनि प्रतिमुखीं दिव्य आनंद नाचे ॥१॥ आपले देशांत म्हटले म्हणजे ' जाईजुईचे बहाराचा वसंत' किंवा शीत--उदी आंघोळ । करुं होइ उतावीळ ॥ वृक्षछाया सोज्वळ । फार वेळ झोंप दे ॥ अस्तमानी आनंद । वायु सुटत मंद मंद ॥ कुसुमि-पाटल-सौगंध । घमघमाट सूटति ॥१॥ -संगीत शाकुंतल. या प्रकारचा ग्रीष्म हाही प्रणयिजनसहाय आहे. आतां स्नेही एकच असावा अशी कांहीं कैद नाही. कारण, प्रेमाला काही मर्यादा नाही. प्लेटो म्हणतो की, तें त्रैलोक्याला कवळूनही शिल्लक राही, इतकें विस्तीर्ण असू शकेल. यासाठी, ज्याचे प्रेमाला जितके सोसतील तितके स्नेही त्याने करावे; पण करावे.
२४० सुख आणि शांति. [प्रकरण कारण, प्रेमावांचून हे विचित्र जग म्हणजे निवळ उकिरडा आहे. आणि प्रेम आहे, तर ते जगच एक अजबखाना आहे. प्रेमाने सर्व सृष्टि वाढते-नव्हे काय ? प्रेम सगळ्याला गोड करिते. लाडक्या पोराचा द्वाडपणा देखील आईबापांना स्वादिष्ट लागतो, तो कशा- पायीं ? दुष्यंत राजा खोड्याळ सर्वदमनाला पाहून म्हणालाः स्पृहयामि खलु दुर्ललितायास्मै। -हा खोडकर पोर मला फार आव डतो." सारांश, या जगांत काय आणि पुढे काय, प्रेम आहे तर सारे आहे. परमेश्वर तरी प्रेमाचाच बंदा आहे. म्हणून मनुष्याने प्रेमळ असावे. लबक म्हणतो, स्त्रीप्रेम हे जरी हक्काने मैत्रीचे सदरांत येत नसले, तरी ते मला गाळवत नाही. कारण त्यावांचून जगत् केवल जीर्णारण्य होईल. सर टी. ब्रॉन म्हणतो, " संगीताचा आनंद दिव्यच खरा; परंतु सुंदरीच्या मुग्धविलासांत जे काही एक संगीत भरले असते, त्याचा ध्वनि कोणच्याही वाद्यध्वनीपेक्षा अधिक मधुर व चित्ताकर्षक आहे." रंभेने शुकांना सांगितले की: (श्लोक) समस्तशृंगारविनोदशीला । लीलावती कोमलकंठनाला ॥ विलासिता नो नवयौवनेन। वृथा गतं तस्य नरस्य जीवितम् ॥ १॥ -शुकरंभासंवाद. ते संसारी जीवांपुरते तरी खोटें नव्हे..बचकरभर भाजी आणि चट- णीचें एक बोट; त्याप्रमाणेच इतर हजारों प्रकारची सुखें आणि या सुखाचा एक घुटका; बरोबरी नाही. म्हणूनच उपनिषदांत ब्रह्मानंदाचा ९ वें. ] शत्रु-मित्र. २४१ हिशोब या आनंदाचेच कोष्टकाने ठरविला आहे. प्रभु रामंचद्रा- सारखे मनोविजयी, पण तेदेखील सीतादेवीवांचून वन्यवल्ली कवटाळू लागले. यावरून स्त्रीप्रेमाचे माहात्म्य किती तें ध्यानात येईल; व हे प्रेम कसे असावे ही ज्यांना जिज्ञासा असेल, त्यांनी भवभूतीचें उत्तरराम' कंठगत करावें. आतां, बेकन म्हणतो, 'स्त्रैण प्रेम हे निर्दय तरी असते, नाही तर कपटी तरी असते. ' यावर लबक म्हणतो,ही गोष्ट खरी की, समरांगणांतील लोहमय बाणांपेक्षा मदनाचे मुदु पुष्पबाण हे मनुष्याला पुष्कळदां शतपट हैराण कारतात; तथापि त्यांचा कंटाळा करण्याची सोय नाही. कारण, त्यांच्या तीव्रतेत जो गुलगुलीतपणा आहे, तो इतर वस्तूंच्या मार्दवांतही नाही. ओमार- ख्याम म्हणतो:- (श्लोक) वृक्षाखाली बसुनि दयिते, तूझिया सन्निधानी । प्रेमालापां कारत, गिळितां भाकरी आणि पाणी॥ मध्य गीती श्रुतिसुखकरा ऐकतां त्वन्मुखींची। वाटे स्वर्गी कचितचि सुरां जोड ऐशा सुखाची ॥१॥ हे वर्णन सर्वथा खरे आहे. मात्र प्रेमाचे माणूस ते तसे सर्वांगीं मनाजोगें मिळालेलें हवें. "खाई चोरुनि फांकडी करकरां कांदे, मुळे, कांकडी।" असली संगत असल्यास त्या सुखाला रामराम. लबक म्हणतो, अपात्र प्रेमाने पुष्कळ जीव उद्विम होऊन संसारांतून उठल्याचीही उदाहरणे आहेत. यासाठी तितकें कसोटीला टिकणारें मनुष्य सुदैवाने ज्याला प्राप्त असेल त्याच्या गोष्टी आहेत, एवढेच. मग मात्र स्वस्त्रीसारखा अमोल दुसरा दोस्तच नाही.
२४२ सुख आणि शांति. [प्रकरण -- आता, आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की, तेव्हां एकलेपणच आधिक सुखावह असते. परंतु एकान्त हा जसा उप- कारक आहे, तसा तो अपकारकही आहे. लबक म्हणतो, एकान्त हा कोणाला देव्हारा भासेल, कोणाला तुरुंग वाटेल; कोणाला विश्रामस्थान वाटेल, कोणाला शिक्षाच वाटेल; एकाला स्वर्ग, तर दुसऱ्याला तोच नरक. सारांश, हे ज्याच्या त्याच्या वृत्तीवर अवलंबून आहे. कधी कधी या खलकंटकमय जगाला त्रासलेल्या सरळवृत्तीच्या लोकांना एकान्त फारच प्यार वाटतो. लबक म्हणतोः- (श्लोकार्ध) जिथे शाव्य, अन्याय ना युद्धवार्ता । भनी त्या वनीं वास एकान्त आतां ॥ थॉमस आ. पिस म्हणतो: श्लोकार्ध) जो जो वाढे परिचय मशी या जगी दुर्जनांचा । तो तो बाटे अधिक वरवा वास एकान्त साचा । लिस्ट म्हणतो, "या जगांत सच्चा मनुष्यास एकान्तच ठीक." हे मत शिलरलाही पसंत आहे. लबक म्हणतो, "रित्या एकान्तापेक्षा एकादा तरी जिवाभावाचा तेथे सोबती असणे हे अधिक सुखावह; मात्र घोळका नसावा. बाकी, घोळका झाला तरी आपले मन स्वाधीन असल्यावर तेथेही एकान्त साधेल. केबल म्हणतो:- ९.] शत्रु-मित्र. २४३ (श्लोक) जो अंतरी होउनि गर्क गेला । हाटी वनीं भेद उरे न त्याला ॥ करी स्वकर्तव्य विशेष नेटें । की अंतरी प्रेम पवित्र दाटे ॥१॥ इमर्सन म्हणतो, “जनसंमदर्दीत उभा असतांही जो सुखाने विविक्तांतील मधुर शांतता अनुभवू शकतो, तोच खरा आत्मजयी असे समजावें." संभाषण हेही सुखविश्रांतीचे एक साधन आहे. परंतु, असलें भाषण-सहज, साधे, प्रेमळ व मनमोकळे असावे लागते. आणि आपले भाषण चित्ताकर्षक करणे तर थोडी मेहनत-मशागतही लागते व ती घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. शिवाय, मनु म्हणतो, भाषण सत्य असून प्रिय असावे." एका कवीने भाषणाचे सर्व गुण एका श्लोकांत दिले आहेतः (श्लोक) तथ्यं पथ्यं सहेतु प्रियमितमृदुलं सारवडैन्यहीनं । साभिप्रायं दुरापं सविनयमशठं चित्रमल्पाक्षरं च ॥ बव्हर्थ कोपशून्यं स्मितयुतघनदाक्षिण्यसंदेहहीनं । वाक्यं ब्रूयाद्रसज्ञः परिषदि समये सप्रमेयाप्रमत्तम् ॥१॥ भावार्थ:-रसज्ञाने सभेत समय पाहून भाषण करावे, व ते-सत्य, हितकर, सप्रमाण, प्रिय, मित, मृदु, सार्थ, धीट, साभिप्राय, दुर्लभ, विनीत, प्रांजल, मनोहर, स्वल्प, प्रौढ, शांत, सस्मित, दाक्षिण्ययुक्त, निःसंदेह, सप्रमेय व प्रमादरहित असावें. - २४४ सुख आणि शांति. [प्रकरण अर्थात् भाषण म्हणजे 'मुखमस्तीति व्यक्तव्यं,' अशांतला प्रकार नसून, एक स्वतंत्र कलाच आहे. व ती यत्नाने संपादन करावी लागते. असो. काही जाडे विद्वानांना आपण होऊन बोलणे सुचत नाहीं; अशांची गांठ पडल्यास आपणच कशीबशी सुरुवात करावी. कारण, जसें भांडण दोघांवांचून नाही, तसेंच संभा- पणही नाही. एकदां सुरुवात केली म्हणजे मग त्यांचा ज्ञानौघ वाहू लागतो; त्यांत यथेच्छ अवगाह करावा. काही माणसें अतिच वाचाळ किंवा बहुभाष असतात; अशी माणसे थोडे कमी बोलतील तर अधिक मान्यतेस चढतील. अर्थात् भाषण तरी सारखी फटावळ नसावी. अस्खलितपणा हा भाषणां- तील श्रेष्ठ गुण धरिला आहे खरा, परंतु अस्खलित भाषण म्हणजे नुसता तोफखाना किंवा भडिमार नव्हे. ओघ अखंड असावा, तथापि श्रोत्यांचे कानांत घुसलेली अक्षरे त्यांचे हृदयांत निविष्ट होण्यास अवकाश मिळेल, इतका तो धिमा असावा. नाही तर, नुसती झोड -बोलण्याची केवळ वावटळ-उठवल्याने इष्टकार्य कांहींच होत नाही. निदान, ही परिपाठी संभाषणाचे उपयोगी नाही. बहुसमाजांत सर्वांनाच एकदम बोलता येणे शक्य नाही. यासाठी आपण बोलण्याची उत्कंठा न ठेवितां, दुसरे बोलतांना ऐकण्याची तयारी असावी. लबक म्हणतो, असे करण्यांत वक्त्यापेक्षां शुश्रुषुचाच फायदा अधिक असतो. आणि श्रद्धावान् श्रोता वक्त्यालाही प्रियच होतो. म्हणून लोक बोलतील ते शांत व प्रांजलमनाने ऐकण्यासच ९३.] शत्रु-मित्र. २४५ हुट मोठी. तत्पर रहाणे बरे. परंतु कित्येक माणसे अशी आढळतात की, त्यां- जवळ बोलण्यासारखा मतलब नसतो कांहीं, पण बोलण्याचीच हुट- फायदा काय? तर कालच्या सभेत "अमुक राव बोलले." इतकाच! शेक्सपिअरसारखा व्यवहारचतुर विरळा; त्याने जगांत कसे वागावं, हे थोडक्यांत पुढे सांगितले आहे :- (अंजनीगीत) सर्वा भूती प्रेम करावें । पात्र पाहुनी विश्वासावें ।। उपद्रवाते न कुणा द्यावें । निजकार्यासाठी ॥१॥ सामर्थ्याने शत्रु जिणावे । मित्रा संरक्षावें जीवें ॥ मखिर्याहुन मौनचि बरवें । कोणि म्हणो कांहीं ॥ २ ॥ मैत्रीचे बाबतींत आणखी एक गोष्ट सांगावयाची राहिली. ती गोष्ट म्हणजे काही मनुष्यांचा मत्सरी आणि संशयी स्वभाव. असल्या स्वभावाचे माणसांशी मैत्री करूं नये. कारण, कारण, शेक्सपिअर- ने आपल्या 'अथेल्लो' संज्ञक सर्वोत्कृष्ट कृतींत असे म्हटले आहे की, “संशयी लोक जे असती । त्यां राई पर्वत दिसती॥" म्हणून मित्र करणें तो निर्मल मनाचा व विश्वासयोग्य आहे अशी खात्री पटवून मगच करावा. मात्र एकदां त्याला आपलासा म्हटल्यावर गैरविश्वास करूं नये. येथपर्यंत, शत्रु हा अहितकर्ता म्हणून त्याज्य, व स्नेही हा सुखदाता म्हणून संग्राह्य, असे सांगितले, ही गोष्ट खरी; तथापि १ वाचाळपणापेक्षा.
सुख आणि शांति. [प्रकरण निर्वाणचे वाक्य हेच आहे की, “आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।। (आपणच आपले मित्र व आपणच आपले वैरी)". कारण, सन्मित्र हा एक चिंतामणि आहे, आणि तो अवश्य जोडावा. पण सर्वांसच तो मिळतो कुठे ? गोरखनाथ म्हणतात: (साकी) भावसरीखा भाई न मिले । चित्तसरीखा चेला। ग्यानसरीखा गुरु न मिले । गोरख फिरे अकेला ॥१॥ ।
tate
attituttet
प्रकरण दहावें.
श्रीमंती.
Cettitititit tetett titetettettetet sekxterator (सवई) वैभव शाश्वत नाहिंच यास्तव कांहिं तरी उपकार करा । धर्मचि हा परलोकसखा निजतारणिं हाचि उपाय बरा ॥ दुर्जनसंगति सोडुनि दुर्मति सज्जनसंगति नित्य धरा । श्रीहरिचे मनिं पायधरा निजतारणिं हाचि उपाय बरा॥१॥ (श्लोक) मा तात साहसं कार्षीवैभवगर्वमागतः ॥ स्वगात्राण्यपि भाराय भवन्ति हि विपर्यये ॥१॥ -सुभाषित. भावार्थः -~~~-बाबा रे, वैभवाचे योगानें गर्वास चढून भलतें सलतेच कांहीं करूं नको. कारण, एकदां गाडे उलटले म्हणजे आपली गात्रेच आपल्याला भारभूत होतात. (श्लोक) लक्ष्मीवंता न जानन्ति । प्रायेण परवेदनाम् ॥ शेपे धराभराक्रान्ते । शेते नारायणः सुखम् ॥१॥ सुभाषित. भावार्थः :..-बहुधा श्रीमंताला परदुःखाची वेदना नसते. पहा बरे, बिचारा शेष पृथ्वीचे भाराने व्याकुळ झाला असून, 'श्रीपति त्याचे अंगावर चैनीत निजले आहेत. .. त प्रकरण दहावें. । श्रीमंती. (विषम वृक्ष. अर्थमनर्थ भावय नित्यं । नास्ति ततः सुखलेशः सत्यम् ।। पुत्रादपि धनभाजां भीतिः । सर्वत्रैषा विहिता रीतिः ॥ १ ॥ शंकराचार्य. (श्लोकार्थ) आये दुखं व्यये दुःखं । कथमर्थाः सुखावहाः ॥ सुभाषित. भावार्थ:---द्रव्य मिळविण्यांतही कष्ट, खर्चतांनाही कष्टः मग अर्था- पासून सुख ते कसे? मनुष्यलोकांतील जे कांही श्रेष्ठ व निर्लेप आनंद आहेत, त्यांतच शास्त्र, कला, वाङ्मय, आणि संगीत यांपासून होणाऱ्या आनंदाची गणती करणे इष्ट आहे. बरें, यांपकी एकाही आनंदाला श्रीमं- तीची काही अपेक्षा दिसत नाही. एकादे श्रीमंताचे अजबखान्यांत बहुमोल चित्रे व पुतळे असतात; परंतु त्यांचे दर्शनाने एकाद्या मार्मिक कारागिराला जो आनंद होतो, तो त्यांचे श्रीमंत परंतु कलानभिज्ञ मालकाला होत नाही. सालोमन म्हणतो, 'असल्या श्रीमं- ताला त्या वस्तूंकडे डोळा टाकण्यापलीकडे काय उपयोग? ' ही गोष्ट केवळ कलाकौशल्यालाच लागू आहे असे नव्हे. आजकाल भौतिक शास्त्रे काय अद्भुत चमत्कार करून राहिली आहेत, तें अनुभवण्याला २५० सुख आणि शांति. [प्रकरण . अवश्य ती फुरसूद आणि मनःस्वास्थ्य द्रव्याच्या मागे लागलेल्या नव- कोटनारायणांना कुठे आहे ? शास्त्रांची गूढें राहोत; साध्या वाङ्मयाचा तरी आनंद त्यांच्या कुठून वांट्यास यावा ? वास्तविक, या आनंदाला श्रीमंतीचे कारणच नाही. कारण जे सर्वोत्कृष्ट ग्रंथ ते तर आजकाल अति स्वस्त मिळतात. एका आठवड्याचे प्राप्तीने जी पुस्तकें विकत घेता येतील, ती वर्षांत वाचून होणे मुष्किल. भव्य ग्रंथसंग्रहालय ही एक संपत्तिच खरी; परंतु तिचा खरा उपभोक्ता तिच्या श्रीमंत मालकापेक्षा तीवरील कारकून असतो, हेच खरे. मालक साठा. सहामाशी येणार, आणखी पुस्तकें कपाटातून ओळीने व्यवस्थित ठेविली आहेत की नाहीत, एवढे पाहणार; म्हणजे संपले. कारण, तो जर मुत्सद्दीमंडळांत किंवा इतरतः राजकारणांत गुंतलेला किंवा राज्यांतला मोठा हुद्देदार असला, अथवा त्याला आपल्या अफाट संपत्तीची व्यवस्था पाहाणे प्राप्त असेल, तर मग त्याला पुस्तक वाचण्याला वेळ कुठचा ? नांवच नको. अर्थात् हे आनंद पैसेवाल्यांच्या कपाळी नाहीत. असे असतां, आपण द्रव्याला इतके काही महत्त्व देतों की, एकाद्याची जबर द्रव्य- हानि झाली असतां आपण म्हणतो की, ' गेला हो गेला, ठार गेला!' पण खरे पाहता, त्याचा पैसा त्याला कोणतें सुख देत होता आणि त्याच्या जीविताचे कसले सार्थक करीत होता ? मग तो गेल्याचा शोक व्यर्थ नव्हे काय ? आतां हे खरे की, होरेस या जगांत पैसा हा खरा चक्रवर्ती आहे. मान, सत्ता, सर्व त्याचे पायीं आहे." फ्रेंच लोकांतही एक म्हण आहे म्हणतो की, १०३.] श्रीमंती. २५१ की, “ इतर वस्तु कितीही मोहक झाल्या, तरी पैशाइतके मोहक काही नाही." आपल्याइकडेही म्हणतात, "अजब ख्याल पैसेका." पण ही सगळी वाक्यें प्राकृत जीवांचे दृष्टीपुरतीच आहेत. ज्ञात्यांना द्रव्यापेक्षा उच्च शीलाची महती केवढी तरी वाटते. भर्तृ हरि म्हणतातः- (श्लोक) वरं वन्हौ पातस्तदपि न कृतः शीलविलयः। भावार्थः--आगीत पडून प्राणहानि बरी, पण शीलहानि बरी नव्हे. लोभी जीव काही म्हणोत, पण विचारी माणसांना उघड असें दिसते की, द्रव्यसंग्रह व द्रव्यलालसा ही उभय असुखदायी आहेत. त्यांतही कदाचित् संग्रहापेक्षां लालसा अधिक दुःखावह म्हणणे रास्त होईल. नव्याण्णवाचे फेयांत सांपडलेले लोभी जीव पुरें पोटालादेखील खात नाहीत; त्यांना वाटते तेवढाच पैसा कमी पडेल. आणि शास्त्रांत तरी द्रव्यनिंदा जी केली आहे, ती फारशी द्रव्यसंग्रहाची नसून द्रव्यतृष्णेची केली आहे. आचार्य म्हणतात:- (विषम वृत्त) मूढ जहीहि धनागमतृष्णां । कुरु तनुबुद्धे मनसि वितृष्णाम् । यल्लभसे निजकर्मोपात्तं । वित्तं तेन विनोदय चित्तम् ॥ १ ॥ भावार्थ:--हे मूढा, हे अल्पमते, द्रव्यप्राप्तीची ही लसलस सोड आणि तृप्ति बाळग. तुझ्या मेहनतीने जे काही द्रव्य मिळेल तेवढयांत मजा कर. अर्थात् स्वकर्माने द्रव्य मिळालेच तर टाकावें असें कांहीं आचा- यांचे म्हणणे नाही. पण लसलस, लोभ, तत्प्राप्त्यर्थ तळमळ ही
२५२
सुख आणि शांति.
[प्रकरण
नसावी; इतकेंच. आतां द्रव्यसंग्रहाचे ठायींही काही दोष आहेत.
एक तर, तें जो जो मिळत जाते, तो तो तृष्णा अधिक वाढते;
आणि अंगांत मस्ती चढून अमार्गप्रवृत्ति होऊ लागते. म्हणून
तुकोबा म्हणतातः-
(पद)
पोटापुरते देईं । मागणे लयि नाहीं, लयि नाहीं॥धृ० ॥
कळणा अथवा कोंडा । देवा देइं भुकेच्या तोंडा।
बाकी, ही विवेकदृष्टि थोड्यांना. बहुजन म्हणजे द्रव्याभिला:
पीच आढळतो. मोलिअर नामक प्रहसनकाराचे हगान नांवाचें
पात्र द्रव्याबद्दल शोक करितांना म्हणतें:-" हाय रे हाय ! माझ्या
प्रियमित्रा द्रव्या, तूं मजपासून दूर गेलास ना ? आतां मी काय
करूं ? आता मी कशावर जगू ? बाबा, तूं गेल्याने माझा सर्व
आधार तुटला, विश्राम नाहीसा झाला व आनंद मावळला;
सर्व संसारच आटपला आतां मला जगून तरी या जगतांत काय
कर्तव्य ?"
असो; वेळेचे महत्त्वही द्रव्यासारखेच मानिले जाते;
जाते; पण
आम्हांला वाटते की, तें द्रव्याहून वरिष्ठ आहे. आणि असे असून
वेळेची मालकी सर्वांस सारखीच आहे. राजाला आणि रंकाला
दिवसाचे तास चोवीसच. किंबहुना, रंकाला एके दृष्टीने अधिकच.
कारण, त्याचा काळ राजाइतका चिंतेने ग्रासला नसल्याने त्याचे
अधिक कामास येतो. राजा अंथरुणावर आठ तास लोळून त्याला
दोन तासही निद्रा नसेल. आणि रंक धरणीवर पडतांच घोरूं
-नव्हे
१०वे.] श्रीमंती. २५३ लागल्याने निम्मे वेळांत ताजातवाना होऊन उठेल. ही झोपेचे वेळेची व्यवस्था. आतां भोजनाचे, तेथेही तोच मासला. गरीब केव्हांच हातावर चटणीभाकर चावून चालता होतो. आणि राजे- साहेब अडणीवर सोन्याचे ताट ठेवूनही प्रहरभर शितेंच ओवीत बसतात. याशिवाय माणसाचे तास दोन तास पोरांबायकांचे संग- तीत-हास्यविनोदांत जातात. तो फायदा राजारंकाला सारखाच. आणखी दोन तास-व्यायाम, पोषाख चढवणे, उतरणे इत्यादिकांत. पण या कामी गरिबाला वेळाची बचत अधिक सांपडते. खाली उरेले तास आठ किंवा दहा. हे पोटाचा उद्योग करण्यांत दोघांचे जावयाचेच. पैकी गरिबांची कामें बहुधा अंगमेहनतीची असतात. वरिष्ठांची मानसिक श्रमाची असतात. यांत अनुभव असा की, अंगमेहतीपेक्षां मानसिक मेहनतीने थकवा आधिक आणि आनंदही कमीच. कारण, जरी मानसिक काम प्रसंगी आनंददायक असते, तरी एकंदरीत तें करणान्यांच्या मागें जी जबाबदारी आणि ज्या काळज्या असतात, त्यांपायीं त्यांच्या तो अंगीं लागत नाही. म्हणच आहे: "ज्यांचे अंगी मोठेपण । तया यातना कठिण ॥ ती खोटी नव्हे. लबक म्हणतो, अमेरिकेंतली वर्तमानपत्रे घेऊन त्यांत तेथील प्रेसिडेंटला नित्य किती काम असतें तें वाचावें, म्हणजे वाटेल की, सुतारपाथरवटांची लांकूडफोड बरी; पण ही उच्चस्थानची माथेफोड नको. एतावता, असे सिद्ध होते की, श्रीमंताला धनद्रव्याच्या बाजूने २५४ सुख आणि शांति. [प्रकरण अधिक सुख नाही. आणि कालरूपी द्रव्याच्या बाजूनेही त्याची स्थिति गरिबापेक्षा कमीच सुखावह ठरते. आतां, या दोन बाजू जरी कदाचित् हुकल्या, तरी श्रीमंतीची तरफदारी करणारे एक गोष्ट पुढे आणतात. ते म्हणतात की, घसघशीत द्रव्य असले म्हणजे गरीबगुरीबाचा परामर्श घ्यावयास सांपडतो-दीनांचे दुःखहरण करितां येते. आणि दीनदुःखहरणा- सारखें उंची सौख्य आणखी कोणते आहे ? हे त्यांचे म्हणणे खरें आहे. परंतु परदुःखहरणास द्रव्याखेरीज इतरही अनेक साधने आहेत. शिवाय, एकादे गरीब म्हातारीने भिकाऱ्याला चार पैसे देणे आणि धनाढ्याने मोहोर देणे यांचे श्रेय सारखेच आहे. शेक्सपिअर किंवा व्यास-वाल्मीक यांजपाशी पैसे नव्हते, पण त्यांचे शब्दांवर जितक्या लोकांचे दुःखहरण आणि उदरभरण होत आहे, तितक्या लोकांचे कोणाही पृथ्वीपतीचे हातून होत नसेल. एवंच, परोपकाराचे कामी धनिकाची प्रतिष्ठा अधिक मान- ण्याचे कारण नाही. निकोल म्हणतो, तरी काय ? या अफाट विश्वाचा एक कोपराही त्याचे ताब्यांत असणे शक्य नाही; त्या धनिकपणाचे एवढें स्तोम कशाला ?" आमचे हरींची कोटी याहून बिनतोड आहे. ते म्हणतात: (श्लोकचरण) मृत्पिण्डो जलरेखया वलयितः सर्वोप्यय नन्वणुः । म्हणजे जलरेषेनें वेढलेला हा मृत्पिड (पृथ्वी) इवलासा तर " धनिक झाला,
१० ३.]
श्रीमंती.
२५५
ते
मला
.
आहे. मग त्याचे स्वामित्वाचा एवढा दिमाख कशाला ? अन्यत्र
म्हणतात:-
(श्लोकचरण)
कतिपयपुरस्वाम्ये पुंसां क एष मदज्वरः ।
म्हणजे, कुठे दोन-पांच गांवांवर मालकी झाली तर मनुष्याला
इतकी मस्ती चढते, याला काय म्हणावे ? अन्फिअन नांवाचा एक
ज्ञानी पुरुष अथेन्स शहरच्या बाजारपेठेतून जातांना म्हणाला,
ज्यांचे जन्मांत कारण नाही, अशा किती तरी वस्तु येथे
भरल्या आहेत ह्या !"
खेरीज, परदुःखहरणास द्रव्यापेक्षाही दया आणि दुसऱ्याची
जाण यांची अपेक्षा अधिक असते, आणि ती गरीबालाही सुसाध्य
असणारच. बरें, सोन्यारुप्याचे तुकडे किंवा मालमत्ता ही काही
खरी संपत्ति नव्हे. बायबलांत म्हटले आहे:- "हे मनुष्या, तुला
वाटते की मजजवळ वित्तविषय पुष्कळ असल्याने मला आतां
कशाची गरज नाही. परंतु तुला कळत नाही, की तूं हीन, दुःखी,
दरिद्री, अंध व नागवा आहेस. " कोटीबाज विठोबाअण्णा
म्हणतातः
(श्लोकचरण)
लभेत नियुतं धनं निधनमेव तज्जायते ।
भावार्थ-बाबा रे, तूं नियुत [ लक्ष ] द्रव्य मिळविलेस, तरी ते नि.
युत-धन म्हणून निधन म्हणजे मृत्युमूळच होणार.
हीच द्रव्याची मातब्बरी. द्राहर्न म्हणतो, " सोने आणि संपत्ति
२५६ सुख आणि शांति. [प्रकरण , हा बेगडेचा रंग आहे; व पदव्या आणि प्रतिष्ठा वान्याचे फुगारे आहेत." लबक म्हणतो, धनिक लोक ज्यांना तुच्छ समजतात, अशांत खरे श्रीमंत ( तेजस्वी, वर्चस्वी ) उदारबुद्धि व सच्छील किती तरी असतील. मनुष्यजन्मांत खऱ्या किंमतीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या मुळीच द्रव्यसाध्य नाहीत. अरब लोकांत म्हण आहे की, “ सत्कृत्ये ही मनुष्याची खरी संपत्ति आहे. कारण मनुष्य मेला, म्हणजे मागचे मर्त्य जीव जरी त्याने मागें सोने नाणे काय ठेविलें आहे म्हणून धुंडू लागतात, तरी देवदूत केवळ त्याच्या सत्कृत्यांचीच चौकशी करितात." आपल्याइकडे धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे" हा श्लोक सुप्रसिद्धच आहे. यावरून द्रव्याचे खरे महत्त्व लक्षात येईलच. खेरीज, सुख- साधन म्हणून जर द्रव्याकडे पहावें, तर पुष्कळदां तें संपादण्याचे कामी इतके कष्ट, इतका त्रास, व एवढा कालव्यय होतो, की, हाती लागल्यावर भोगण्याचे पुरे त्राणही अंगांत उरत नाही. बरें, खया सुखाला द्रव्याची विशेष जरूर नसते. खरे सौख्य ही बाजार-सवद्याची जिन्नस नव्हे. सामान्यतः सुखाला अवश्य गोष्टी म्हणजे " स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, ओजवलेले अन्न, आरोग्य आणि स्वस्थ वृत्ति. " ह्या गोष्टी लक्षाधीशाला आणि एकाद्या लोहाराला सारख्याच सुलभ असतात. उलट पक्षी या जगतांत असुखकारक गोष्टी म्हटल्या म्हणजे दुखणेबाहणे, मनस्ताप आणि दुष्कृत्ये ह्या होत. पण द्रव्याने यांचा परिहार न होतां समयीं अधिक प्राप्तिमात्र होते. बेकन म्हणतो, दयाघन प्रभु पर्जन्य, तें १०.] श्रीमंती. २५७ सूर्यप्रकाश इत्यादि सामान्य गोष्टी सुष्ट-दुष्टांस सारख्याच देतो. पण, संपत्ति, सन्मान व सद्गुण हे काही निवडक माणसांसच देतो." सिसिरोंचे म्हणणे, “थोर मनुष्य भव्य मंदिरांत असावा हे अनुरूप आहे. पण भव्य मंदिरांत जेवढा कोणी असेल तेवढा थोरच असतो, हा समज चुकीचा आहे." आपल्यांत म्हटले आहे: "प्रासादशिखरारूढः काकः किंगरुडायते"-कावळा राजवाड्यावर बसला म्हणून गरुड होत नाही. जो न्याय व्यक्तीला लागू तो राष्ट्राला. लक्ष्मीचा धूर निघत असला म्हणून ते राष्ट्र खरे श्रीमंत नव्हे. तर ज्यांतील रहिवासी मनाने व शरिराने निरोगी, सच्छील व भले असतील तेंच राष्ट्र संपन्न. द्रव्यमदाने जसा व्यक्तीचा नाश होतो, तसा राष्ट्रांचाही होतो. आजकाल इंग्लंडला अशी घमेंड झाली आहे की, आपली संपत्ति दुरंत आहे. लबक म्हणतो, ती विपुल आहे खरी; तथापि विपुल म्हणजे अपार नव्हे, तिला मर्यादा ही आहेच. पण इंग्लंडला ह्या गोष्टीचे भान नाही. विपत्तींत काटकसर सगळ्यांनाच सुचते. परंतु संपत्तीत मितव्ययी तोच शहाणा. परंतु इंग्लंडला तमाच वाटत नाही. डॅनियल डिफो म्हणे, काटकसर करण्याची अक्कल इंग्रजाला अजूनही आली नाही. आणि उधळ्याचे हाती द्रव्य असून व्यर्थच आहे. मूर्खाला लक्ष्मी कंटाळते, असें अल्फ्रेडचे म्हणणे असे. इस्त्रायल लोक कट्टे मूर्तिपूजक होते, तरीही स्वर्णवत्साची म्हणजे द्रव्याची पूजा करणारांस ते निंद्य मानीत.
२५८ सुख आणि शांति. [प्रकरण काहींचे मते, द्रव्यवानाचे मागे गरिबासारखा ‘कसे करूं, काय करूं ' ह्या अष्टाक्षरीचा भुंगा नसतो; यामुळे धनिक सुखांत, आरामात असतात; आणि म्हणूनच धनवत्ता स्पृहणीय आहे. परंतु या लोकांना हा अनुभव नाही की, श्रीमंताला द्रव्याची तळमळ अधिक असते. लाखाचे दोन लाख कधी होतील, दोहोंचे पांच कसे होतील, याच भ्रमणांत तो अखंड असतो. दुसरी गोष्ट, हाती पैसे खुळखुळू लागले की, नसते ढंग व इप्क-आराम सुचतात आणि डोळ्यांवर धूरही चढतो. लबक म्हणतो, कांहीं धनवंतांना. तर गरीबगुरिबें म्हणजे आपली पायपुसणी किंवा पोतेरीशी वाटतात; इतका त्यांस उन्माद चढतो. गरीबाचे अंगी उद्योगीपणा व सोशि- कपणा हे दोन गुण असले म्हणजे गरीबी सुखदायक होऊ शकते. कठिण आहे श्रीमंतीच. श्रीमंत असून त्याचे अंगी दानशूरता, उप- भोगांत नेमस्तपणा, दीर्घदृष्टि, इंद्रियदमन व आणखी बरेच सद्गुण असतील तर त्याला श्रीमंती सुखावह होईल; एरव्ही ती त्याचा अधःपात करील. अधिकार आणि द्रव्य ही किती घातुक आहेत, यांपायीं जगतांत केवढाले अनर्थ गुदरले आहेत, याची साक्ष प्रत्येक देशाचा इतिहास देतच आहे. काही रोमचे राजपुत्र अल्पवयांत मोट्या नीतीने चालत होते; पण पुढे तक्तारूढ होतांच डोळे फिरून नीतीचा मार्ग सुटला व अखेर त्यांची दैना दैना झाली. नेपोलियनला तर इतका अहंकार झाला की, स्वर्ग अर्ध बोट राहिला. आणि त्यामुळेच तो अखेर हापटला. यावरून श्रीमंती व सत्ता ही किती अनर्थावह आहेत, हे समजेल, १.३.] श्रीमंती. २५९ फेनेलान म्हणतो की, " द्रव्य व प्रतिष्ठा यांचे मागे लागलेले जे लोक आहेत, ते मुवर्णमय रथांत बसले आहेत खरे; परंतु तुटक्या कड्याचे धारेवरून ते आपला रथ हांकीत आहेत. अर्थात् त्यांच्या दांतकुड्या पडणार, असें मी खास समजतो." आतां द्रव्यतृष्णा जरी निंद्य असली, तरी न्यायार्जित द्रव्यांत काटकसरीने राहून आगामी काळासाठी संग्रह करणे हे काही निंद्य नव्हे. कारण, लबक म्हणतो, चर्मदृष्टीचें सार्थक अंतर्दृष्टि येणे हे आहे; आणि अंतर्दृष्टि आल्याचे रूप दूर दृष्टि पाँचणे यांत आहे. पूर्ववयांत जर कारण नाहीं असल्या वस्तु खरेदी केल्या असल्या, तर वार्धक्यांत ज्यांचे कारण आहे अशा वस्तु विकून टाकण्याचा प्रसंग येईल; म्हणून पूर्ववयांत इतक्या बेताने रहावें की, उत्तरवयांत कोणाचें दमडीसाठी फट म्हणून घेण्याचे कारण पडूं नये. सेवकान्ने पुरातने -कालचे शिल- कीतून खावें; आजच्या कमाईतून खाणे चांगले नव्हे. आणि उद्यां आपण मिळवू या भरावर आज ऋण काढून सण करणे हा तर केवळ मूर्खपणा आहे. रेबेलास याने मरतांना आपले मृत्युपत्र म्हणून एक कागद बंद करून ठेविला होता. तो उघडून पाहता त्यावर लिहिले होते की, मी कर्जबाजारी आहे, माझेजवळ छदाम शिल्लक नाही. बाकी उरेल ते मी गरिबांस दिले आहे." नुकतेच आत्महत्या करून घेतलेले धरमसी यांचे उदाहरण उधळ्यांनी ध्यानांत धरण्याजोगे आहे. कोणत्याही उदीमधंद्यांत पडलों असतां एकदम लाट मारून म्हण आहे:
२६० सुख आणि शांति. [प्रकरण •• आपण गबर होऊ. असली इच्छा केव्हाही धरूं नये; निदान तवकलीचा धंदा तरी करू नये. कारण, असला धंदा म्हणजे जुगारच; आणि तिचे रूप कितीही संभावित असले, तरी जुगार ही घातुकच हे निश्चित समजावे. दुसरे हेही तत्व ध्यानांत ठेवावें की, अल्प फायद्याने गजवे भरचक भरतात. कवि म्हणतोः (श्लोक) जलबिंदुनिपातेन । क्रमशः पूर्यते घटः ॥ स हेतुः सर्वविद्यानां । धर्मस्य च धनस्य च ॥ १ ॥ भावार्थः-..थेंब थेंब सतत पडल्याने घट भरतो. हीच गोष्ट विद्या, द्रव्य व धर्म या तिन्हीस लाग समजावी. तिसरें तत्त्व-चलतीचे दिवसांत विपत्ति जवळ ठेपल्याप्रमाणे भिऊन चालावें. विपत्काली उदयकाल सन्निकृष्ट असल्याप्रमाणे उमेदीने रहावे; म्हणजे विपत्तिही सह्य व सुखावह होईल. द्रव्याप्रमाणेच, केवळ जमीनीचे आधिपत्यही सुखाला आवश्यक आहे, हा समज चुकीचा आहे. एकाद्याचे ताब्यांत पुष्कळशी शेती व बागाईत असली, तर त्याला वर्षास भरभक्कम खंड मिळेल; पण मालक जर अरसिक असला तर बागबगीच्यामुळे होणारे सृष्टिसौंदर्याचे सुख त्याला कधी होणार नाही. आणि मनुष्य जर रसज्ञ आणि मार्मिक असला तर त्याचे सुखाला जमीनीचे माल. कीचीच कांहीं जरूर आहे, असे नाही. समुद्राच्या लाटा व गर्जना, सुगंध शीतळ वायु, सूर्योदय-सूर्यास्तांचे बहुरंगी देखावे व रात्री चंद्र-तारकादिकांच्या मौजा, ह्या गरिबालाही मोफत मिळणाऱ्या १० ३.] श्रीमंती. २६१ आहेत. आणि रसिकाला ह्या गोष्टी जें सुख देतात, तें अरसिकाला जमीनीचे मालकीनेही कधी मिळणारे नाही. आतां भोजनाचे सुख. तेथेही हाच मासला. श्रीमंती-गरिबीचें त्यांत कांहीं नाहीं. अक्षयी भुकेनें वखवखलेल्या कामकन्याला कांदा- भाकरी जे सुख व समाधान देते, तें, सर्वदा अग्निमांद्याने पीडलेल्या श्रीमंताला पंचपक्वानांनीही होणे शक्य नाही. तेव्हां गरीबीनें या बाबतींत सुखाची हानि मुळीच नाही. स्त्रियांची म्हण आहे, " गळां नाहीं सरी, आणि सुखें निद्रा करी, " ती अक्षरशः खरी. द्रव्यवानांना रात्री झोप नाही. कोणी चोर येईल काय, दरवडा पडेल काय, ही धाकधूक. गरीबाला तें कांहीं नाही. तो उघडया दारी राज्य करीत असतो. येथपर्यंतचे एकंदर विवेचनांत द्रव्याची सुखहेतुता जरी आम्ही नाशाबीद केली आहे, तरी द्रव्यापासून सुख होत नाही, असे नाही. सुख होते, पण ते शहाण्याला होते. कारण, लक्ष्मी ही शहाण्याशी आज्ञांकित किंकरीप्रमाणे वागते, आणि मूर्खाशी उद्धट स्वैरिणी- प्रमाणे वागते. आणि स्वैरिणी अत्यंत सुंदर झाली तरी तें सौंदर्य परास्वाद्य असल्याने तिच्या पतीला उलटें केशकारक होते. मूर्खाचें धनही स्वैरिणीप्रमाणे बहुधा परोपभोग्यच असते. म्हणच आहे: “ गद्धोंका माल अकलमंदोंका खुराक !"-मूर्खाची दौलत म्हणजे अक्कलवाल्यांची चमन. अर्थात् सुखाला हेतु मुख्यतः द्रव्य नसून शहाणपणा आहे, हेच येथेही सिद्ध झाले. कृपणाला तरी द्रव्यापासून कोणतें सुख ? कारण तो निव्वळ ओझ्याचा गाढव.
२६२ सुख आणि शांति. [प्रकरण संपत्ति हे एका अर्थी एक लचांडच आहे. आपल्या लग्नकार्या- तून एकादे वेळी कांहीं शुष्कंप्रतिष्ठित व-हाडी मिळतात. त्यांचा उपयोग नसतो काडीचा; पण त्यांवाचून पानमात्र हलायचे नाही. पाऊल पुढे टाकतां येत नाही. अशांना आमचा एक विनोदी स्नेही म्हणेः " असून अडचण आणि नसून खोळंबा. लढाईवर लष्कर निघालें म्हणजे त्याचे सामानसुमान मागून रख- डत चालत असते. ते टाकून जावें तरी सोय नाहीं; त्याबरोबर रखडावें तर मोहिमेची वेळ हुकते. एवंच दुहेरी बखेडा. हाच न्याय, बेकन म्हणतो, पुष्कळदां द्रव्याला लागू पडतो. अपार संपत्तीचा वितरण हा एकच उपयोग आहे. बाकीचे उपयोग ही नुसती कल्पना. कवि म्हणतो:- (श्लोक) यद्ददासि विशिष्टेभ्यो । यच्चानासि दिने दिने । तत्ते वित्तमहं मन्ये । शेषं कस्यापि रक्षसि ॥१॥ भावार्थ:-..तूं स्वतः जितकें कांहीं खाशील आणि सत्पात्रीं देशील, तेवढें वित्तमात्र तुझे, बाकी कोणाचे तरी. सर्व गुणाः कांचनमाश्रयंते' असें एक सुभाषित आहे; परंतु ही लौकिकी भाषा. परमार्थतः नुसत्या द्रव्यसंभाराने दुर्जनाचा सज्जन होणार नाहीं; निर्गुणाचा सद्गुणी होणार नाही. थेमिस्टा- क्लिसला एकाने विचारिलें, माझे मुलीला दोन वर मागत आहेत. एक सुशील, परंतु दरिद्री आहे; दुसरा गबर, परंतु शीलहीन आहे. तर मी मुलगी कोणत्याला देऊ ? थेमिस्टाक्लिसनें उत्तर केलें, “ पहिल्याला. तेथे तिला सुख होईल.''
Get tet tett itt tatatatatatatatatatatatatatatattet
प्रकरण अकरावें.
सृष्टीची भीषणता.
FTTTTP
ক্ষ
tetet tett tetett tattetett tittatutetit - ketetattet घौः शांतिरन्तरिक्षं शांतिः पृथिवी शांतिरापः शांतिराषे धयः शांतिवनस्पतयः शांतिर्विश्वेदेवाः शांतिब्रह्म शांतिः सर्व शांतिः शांतिरेव शांतिः सा मा शांतिरोधि । -यजुर्वेद. भावार्थ:-हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने, आम्हांस हे अफाट भासणारे (अतएव भयप्रद ) अंतरिक्ष, हे आकाश, हो पृथ्वी, हा जलसमूह, ह्या ओषधि, या वनस्पति, ह्या सर्वही सृष्टीतील देवता इत्यादि सर्व निरुपद्रवी व सुखकारक होऊ दे. आणि आम्हांस सर्वत्र शांतिच शांति असूं दे. (श्लोक) महावनेऽपि चरतो । मुनिवेषस्य धीमतः ॥ तथा देवाश्च दैत्याश्च । भवन्तु सुखदाः सदा ॥ १ ॥ राक्षसानां पिशाचानां । रौद्राणां क्रूरकर्मणाम् ।। क्रव्यादानां च सर्वेषां । माभूत्पुत्रक ते भयम् ॥२॥ -वाल्मीकिरामायण. भावार्थ:-कौसल्येने रामचंद्र वनास जातांना आशीर्वाद दिला की, बुद्विमंत। पुत्रा, तूं मुनिवेषाने घोर वनांत फिरत असतां देव, दैत्य, राक्षस, पिशाच, तसेच मांसाहारी इत्यादिकां- पासून तुला भय प्राप्त न होवो. . मल T प्रकरण अकरावें. सृष्टीची भीषणता. एतानि तानि नाम कांताराणि । किमतःपरं भयानकं स्यात् । -भवति. भावार्थ:-तींच ही जंगले; यांहून भयंकर कांहीं नसेल. (अभंग) काही दिसे अकस्मात । तेथें वाटे आलं भूत वायां पडावें संदेहीं । मुळी तेथे काही नाहीं।। झाड झुडूप देखिलें । जिवी वाटे कोणी आलें ।। रामदास सांगे खूण । भितो आपणा आपण ॥ १ ॥ सृष्टीचें वौचित्र्य व रमणीयता पाहून पुष्कळांना तिजबद्दल प्रेम, आदर व कौतुक वाटते. कित्येकांना आदरही नाही आणि अना- दरही नाहीं; त्यांची वृत्ति केवळ तटस्थ असते. पण पूर्वकाली तिसराही एक वर्ग होता. आणि प्रस्तुतही अशिक्षित व अडाणी लोकांत असली माणसे आढळतात की, ज्यांना सृष्टीचे व्यापारांत एकादा असाधारण प्रकार दिसला म्हणजे त्याबद्दल कौतुक न वाटतां भयमात्र वाटते. आकाशांत धूमकेतु उगवला, किंवा एकादे वर्षों पंचांगांत फार ग्रहणें असली, म्हणजे आपणांवर विधा- त्याचा कोप झाला, असे समजून ती घाबरून जातात. वर्षाकाली मेघांचा विशेष कडाक्याचा गडगडाट कानी पडला आणि विजांचा चमचमाट डोळे दिपवू लागला, म्हणजे मुरकुंडी वळून, 'भार्गव-
२६६
सुख आणि शांति.
[प्रकरण
.
राम ! भार्गवराम !"
म्हणून
मंत्र जपणारीही माणसे अद्याप आहेत.
जितकें अज्ञान ज्यास्त, तितकें भय अधिक. अडाणी लोकांना
जिथे तिथे भुते-खेतें दिसत असतात.
एकादे झाडाचे मुळावर,
दगडावर, शेंदूर टाकलेला आढळला की त्यांनी बांच खाल्लाच.
हा कोण ? गोटोबा, त्याचे वाटेस जातां कमा नये, म्हणून
लागलेच कापावयाला. स्पोट नामक ग्रंथकार म्हणतो की,
व्हँ कुअर नामक बेटांत एक पर्वत आहे, त्याचे नांवदेखील तेथील
लोक तोंडास आणीत नाहीत. कारण त्यांचा असा समज आहे
की, त्याचे नांव घेतल्यास तो आपणांस समुद्रात बुडवील !
आमच्या देशांत चेटूक करणान्या व चेटुकाला भिणाऱ्या बाया-
बापड्या पुष्कळ आहेत. आस्ट्रेलिया, बेझिल, आफ्रिका व इतरही
कांही देशांत अडाणी लोक त्यांचा कोणी आप्तइष्ट मेला की, त्याला
कोणी तरी करणी करून मारिला असेंच समजतात; जणूं काय
सहज मृत्यु हा मनुष्याला नाहीच. न्यूहिब्रिडीजमध्ये कोणीही आजारी
पडला की, डाकिणीने भूत उठविले असे समजून तिचे शांतीकरिता
मोठ्याने शंख कुंकतात, आणि — उदईक तुला अमुक अमुक भाग
आम्ही देतो, शांत हो ' म्हणून तिच्या शंखध्वनिद्वारा विनंत्या
करितात. टर्नर नामक साहेब या लोकांत जाऊन राहिला होता.
तो म्हणतो, आली ती रात्र हे शंखध्वनि आणि डाकिनीच्या
प्रार्थना यांनी मला पिसाळाट आला !.
स्वतःची तसबीर किंवा प्रतिकृति चित्रकाराकडून काढविण्याचे
कामीही अडाणी जातींत काही विलक्षण समजुती आहेत. ते आपला
.
११ ३.] सृष्टीची भीषणता. २६७ चेहरा चित्रकाराला उतरू देत नाहीत. कारण, त्यांना वाटते की, आपले चित्र कोणाचे हाती लागले अथवा आपली मुद्रा चित्रलेख. काचे नजरेत भरली तर आपणांस तो अपाय करील. अमेरिकेतील तांबडे इंडियन लोकांनी एकदां केन नामक साहेबाला गराडा दिला, आणि काही केल्या ते दूर जातना. तेव्हां साहेबाने त्यांच्या तसबिरा उतरून घेण्याचा आव आणिला; त्याबरोबर ते सर्व पळाले. आमचे इकडे मध्यप्रांत-नागपूरकडे काही अडाणी जाती आहेत, त्यांचे अंगणांत भंगी उभा राहिला की त्यांचा थरकाप होतो. तेथील एका गृहस्थाने आम्हांस सांगितले की, मी एक भंगीच शिपाई ठेविला आहे. तो तगाद्याला दाराशी गेला, की ते लोक मजकडे धांवत येऊन माझें देणे पटापट देऊन टाकितात; व पुनः भंगी पाठवू नका म्हणून पायां पडून विनंती करितात. कॅटिलिन साहेब एका रानटी जातीचे मुख्याचा फोटो काढण्यास मागू लागला, पण तो कबूल होईना. तो म्हणे, तशाने माझा अर्धा चेहरा नाहीसा होईल आणि अर्धाच मला उरेल; मग मी काय करूं? याप्रमाणे आपले केसांची बट, आपली नखें, वस्त्राची चिंधी किंवा उष्टं अन्न, यांपैकी काहीही चेटकीचे हाती लागल्यास ती मंत्रप्रयोग करून आपणांस उलथील म्हणून थरक भिणारे लोक आहेत. ब्रिटिश कोलंबियांतील इंडियन लोक आहेत त्यांना आपले नांव दुसन्याला सांगण्याचे फार भय वाटते. अलगांकिन नांवाची एक रानटी जात आहे, तींतील लोक आपलें पाळण्यांतलें नांव फक्त आपल्या आप्तांस व मित्रांसच सांगतात, आणि व्यवहारासाठी २६८ सुख आणि शांति. [प्रकरण ) आपणांस ते काही तरी टोपण नांव ठेवून घेतात. हिंदुस्थानांतही नामप्रकाशनाचे कामी मनाई ची बरीच सदरे आहेत. (श्लोक) आत्मनाम गुरोर्नाम । नामातिकृपणस्य च ॥ आयुष्कामो न गृहीयात् । जेष्ठापत्यकलत्रयोः ॥ १ ॥ भावार्थः- T:-- ज्याला पुष्कळ जगण्याची इच्छा असेल, त्याने आपले स्वतःचे, आपल्या गुरूचे, कोणाही अत्यंत कृपणाचे, वडील मुलाचं आणि आपल्या सौभाग्यवतीचें नांव घेऊ नये. ( सौभाग्यवतीने पतीचे घेऊ नये हे अनुमेय समजावे. काफीर लोकांत व आफ्रिकेतील काही जातींतही अशाच प्रकारची समजूत आहे. त्यांतील बायका' तिकडचें नांव घ्यायच्या नाहीत. कांही देशांत मृत मनुष्याचे नांव घेण्यास लोक मितात. उत्तर- दक्षिण अमेरिकन, सैबीरिअन, पेपान लोक, आस्ट्रेलिअन, आणि शेटलंडांतील लोक, यांतील विधवा आपल्या मृत भर्त्याचे नांव उच्चारीत नाहीत. एवढे तेवढे काही गैर झाले की, भडाणी जातींना वाटते की, कोणी काही करणी केली, देव उठवला, किंवा भूत घातले. आणि मग या समजुतीने ते बिचारे व्याकूळ होऊन जातात. पूर्वीचे रोमन लोक आपणांस सुधारलेले व सुविद्य म्हणवीत, तथापि त्यांच्यांतही असले खूळ होतें. धडसें जिचे स्वरूप लक्षात येत नाही अशी कांहीं वस्तु दृष्टीस पडली की, त्यांना काही तरी विपरीत आहे म्हणून धास्ती वाटे. सृष्टीत जिथे तिथे त्यांना गूढ़े ११ वें.] सृष्टीची भीषणता. २६९ ते भरलेली दिसत व ती पाहून दहशत घेत व त्यांना देव समजून शरण जातं. त्याच वेळी ग्रीक लोकही सुधारलेलेच होते. पण त्यांची समजूत वेगळी असे. त्यांना अशी एकादी गूढ गोष्ट दृष्टीस पडली तर ते गोंधळून न जातां तिचा शोधक दृष्टीने विचार करून तीतलें गूढ उलगडीत; व तीही सृष्टिनियमाप्रमाणेच घडली आहे, असे लोकांस स्पष्ट करून दाखवीत. ग्रहनक्षत्रांवर विश्वास ठेवून वागणारे पुष्कळच आहेत. शनि लत्तेला आला, मंगळ वक्री आला, म्हणून व्याकूळ होऊन त्या त्या ग्रहाची आराधना, उपास करणारे कितीक तरी आढळतात. प्रसिद्ध महाडकर ज्योतिषी कै. बाबाजीराव यांनाही प्रतिकूल ग्रह बाधा करितात हे मान्य असे; परंतु, ती बाधा टाळणे तर अक्षांश- रेखांशानुरोधाने त्यांचा अंमल जेथे तसा पोचणार नाही, अशा अन्य स्थळी जावें, उपास आणि दाने करीत बसणे निरर्थक आहे, असे ते म्हणत. आमच्यांतला एक सिद्धांती तिसरेंच म्हणतोः (श्लोक) वैद्या वदंति कफ-पित्त-मरुद्विकारान् । ज्योतिर्विदो ग्रहगणं परिवर्तयंति ॥ भूताभिषंग इति भूतविदो वदन्ति । प्राचीनकर्म बलवन्मुनयो वदन्ति ॥ १ ॥ १ रोम शहरचे खरे नांव 'व्हॅलेन्शिआ' होते. पण तें शत्रूस कळल्यास तो त्यावर चेटूक करून रोमचा नाश करील, या भयाने तें गुप्त ठेविले होते. अखेर ते व्हॅलेरिअस सोरॅनस याने उघड केले, तेव्हां त्या अपराधाबद्दल लोकांनी त्याला देहान्त शासन दिले.
२७० सुख आणि शांति. [प्रकरण भावार्थ:-कोणाला काही दुखणेबाहणे आले असतां वैद्यलोक हा कफ- वात-पित्ताचा बिघाड आहे , असें म्हणतात; ज्योतिषी मंडळी ग्रह उलटे पालटे करीत सुटतात; देवऋषी पिशाचबाधा झाली म्हणून सांगतात; आणि विचारी मुनि रोग्याचे जबरदस्त पूर्वकर्मच त्याला नडते आहे, असा अभि. प्राय देतात. युरोपांत मध्ययुगांतील कालांत नद्या, पर्वत, तळी, विहिरी, दन्या, समुद्र, वनें, क्षेत्रे या सर्वांचे ठिकाणी भुतेखतें, पिशाच, वेताळ, खैस, जखिणी इत्यादि उपद्रवकारक भुतांची वस्ती अस- तेच असते, अशी समज असे. व या समजुतीने किती तरी गोंधळ उडवला असल्याची इतिहासांत साक्ष आहे. हा भुताटकीवरचा विश्वास केवळ अडाण्यांतच नसून सुशिक्षित राजकुलापर्यंत होता. पहिला जेम्स राजा असे समजे की, जर एकादे चेटकीनें कोणाही मनुप्यासारखे मेणाचें बाहुले करून त्याला त्या मनुष्याचें नांव देऊन जाळले, तर तत्काळ तो मनुष्य इकडे दग्ध होईल; निदान मरेल तरी. लबक म्हणतो, आजकाल शास्त्रीय ज्ञानाचा प्रकाश झाल्याने असल्या खुळ्या समजुती नष्ट झाल्या आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. आल्प्ससारखे, हिमालयासारखे विशाळ व गगनचुंबी पर्वतांना पाहून तर त्या काळचे लोकांची घाबरगुंडीच वळे. लिओनार्डो बर्ना म्हणून एक गृहस्थ अर्लबर्ग पर्वतांतील आपल्या प्रवासाचे वर्णन करीत असतां म्हणाला, बाबा, स्मरण देखील नको. त्या प्रचंड व विक्राळ पर्वताचे नांव ध्यानात येतांच भयाने आपली " नको रे तें ११ ३.] सृष्टीची भीषणता. २७१ अजून छाती धडधडू लागते ! कसला राक्षसी पर्वत तो!" बर्नर्ड नांवाचा एक मोठा साधु सन १९८८ साली आल्प्स पर्वताचे घाट चढत असतांना काळवंडून जाऊन परमेश्वराला शरण जाऊन म्हणाला, दयाघना, मला या प्रसंगांतून कसा तरी वांचक, म्हणजे मी दुनियेत जाऊन लोकांना सांगून टाकीन की, बापहो, तुम्हांला जीविताशा असेल तर या भ्यासुर पर्वताकडे तोंडदेखील करूं नका.” मॅडम डी. स्टील मोठी ग्रंथकर्ती होती, तरी ती मी एकाद्या दूरस्थ विद्वानाचे संभाषण ऐकण्यासाठी खुष्कीने पांचशे कोस रखडत जाईन, पण या मेल्या अफाट नेप- ल्सच्या उपसागराकडे डोळा उघडून देखील पहाणार नाही. म्हणेः - त्या काळीही या गिरि-अरण्यांचे देखाव्यांना न भिणार असे काही लोक होते; तथापि तेही तिचे सप्रेम उपभोक्तेमात्र खास नव्हते. निकोले हा आपले ग्रंथांत म्हणतो की, त्या काळी जर कोणी एकाद्याने घरापाशी बाग केलाच, तर तो स्वतःचे उपभोगा- साठी नसून केवळ शोभा म्हणून केलेला असे. गोल्डस्मिथसारख्या कवीला स्कॉटलंडांतील शैलसंघाचा राग येई. तो म्हणे, “शोभा कशाची, पांथांचे मार्गात नसत्या अडचणीमात्र, त्यापेक्षां हालंड देश चांगला! " गिल्पिनने सन १७८८ त कंबलँडमधील पर्वत व जलाशय यांवर एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत तो लिहितो की, " येथील अत्यंत विस्तीर्ण व उच्च पर्वत पाहून अॅव्हिसन नामक गृहस्थ म्हणे:-- ही ह्या देखाव्याची भीषणचारुता मला सुख देत २७२ सुख आणि शांति. [प्रकरण नाही. एकामागे एक उभे असलेले हे असंख्य शिलोच्चय तर दृष्टीचा निरोध करून अपायच करितात. असल्या ह्या कुरूप राक्ष. सांचे दूरादवलोकन बरें. कारण, 'दूरतः पर्वता रम्या' दुरून डोंगर साजरे, या म्हणीप्रमाणे अंतरामुळे त्यांचे कुरूपत्व नाहीसे होऊन ते आलोकनक्षम तरी होतील. वर्डस्वर्थ कवीने पिटर बेल नामक एका अरण्यवासी मनुष्याचे वर्णन दिले आहे. त्यांत तो म्हणतो:-बिचाय बेलचे सर्व आयुष्य गिरिकंदर, वृक्षराजी, नदीतीरें इत्यादिकांतच वेचलें. तथापि, वनश्री म्हणून कांही एक विश्रांतिविषय आहे, याची त्याला कल्पनादेखील आली नाही.” टेनिसन हा तर रसिकाग्रणी, पण त्याचीदेखील बहिःसृष्टीवर थोडीशी इतराजीच दिसते. तो म्हणतो, " बहिःसृष्टि ही रुधिराप्रिय आणि हिंस्रतापूर्ण आहे." पण सृष्टयुपासक लबकला हे बोलणे रुचत नाही. तो म्हणतो, टेनिसन- सारख्याने प्रकृतिरमणीवर असला आगेप करणे अयोग्य आहे. रानावनांत हिंस्र पशूचा संचार असेल; एक प्राणी दुसन्या प्राण्याला फाडून खात असेल; म्हणून तेवढ्याने प्रकृतीचे राज्यांत केवळ हिंसपण भरले आहे, आणि आरामकर असे काही नाही, हे म्हणणे पक्षपाती आहे. मनुष्ये रोगाने महिनोगणती आंथरुणांत खितपून मरतात, त्यापेक्षां पशुंचे तडकाफडकी मरणेच बरे. लबकचे मते सृष्टिदेवीचे साम्राज्यांत क्रीडत असतां हिंस्र पशूच्या दाटेंत सांपडून, गिरिशृंगावरून कोसळून, किंवा एकादे जलाशयांत ११ वें.] सृष्टीची भीषणता. २७३ बुडून आलेला मृत्यु, घरीं आंथरुणावर येणान्या मृत्यूहून अधिक सुखावह. लबकचे इतकें असीम सृष्टिप्रेम आहे. एका दृष्टीने ज्ञानी मनुष्यापेक्षां अज्ञानी श्वापदांची स्थिति सुख कर. कारण, मनुष्याचे मागें जशा अनंत प्रकारच्या चिंता व्यथा असतात, तशा पशूना मुळीच नसतात. उद्यां काय खावे म्हणून कोणी पशु फिकिरीत पडतांना पाहिलेला नाही. सहस्र उपाधींनी भरलेल्या मानवी चैनींपेक्षां ही पशूची साधी परंतु निश्चित स्थिति अधिक सुखावह नव्हे काय ? खरोखर, या बाबतीत पशूचें गुरुत्व मनुष्याने घेण्यासारखे आहे, असे विचारी माणसांना वाटल्यावांचून रहाणार नाही. सारांश, ज्याला खरी शास्त्रीय दृष्टि आली, त्याला पशुसृष्टि व बाह्यप्रकृतिही तिरस्कार्य न वाटतां प्रेमास्पदच वाटेल. आणि सृष्टिदेवीबद्दल खरे प्रेम उपजण्यास केवळ कविजनांची सहृदयता पुरेशी नसून तिचे जोडीला शास्त्रीय मार्मिकताही असली पाहिजे, अशी खात्री होईल. थिओबोल्ड नामक जर्मन गृहस्थ म्हणतो, “ आपणांला कोणत्याही पर्वताची अंतर्घटना ज्ञानचक्षूनें आरशासारखी स्वच्छ दिसेपर्यंत आपणांस त्याचे सत्यज्ञान झालेंसें म्हणता येणार नाही. " व सत्यज्ञान नाही तोपर्यंत तद्भव आनं- दही नाही, हे उघडच आहे. आमच्यांत. सृष्टिप्रेम व सृष्टिवर्णन यांचा जवळ जवळ अमावच आहे, अशा प्रकारचे आमच्यापैकी अलीकडील आंग्ल-सारस्वत- पटूंचे भामच्या लोकांवर आक्षेप आहेत. त्यांस उत्तर असें आहे २७४ सुख आणि शांति. [प्रकरण . की, अज्ञान म्हटले म्हणजे ते अनर्थावह ठरलेलेच. मग ते कृत- युगांत असो वा कलियुगांत असो, युरोपखंडांत असो, की भरत- खंडांत असो. या न्यायाने पहातां, चालू भागांत जे अज्ञानाचे परिणाम वर्णिले आहेत ते ज्यांत दिसून येतात, अशी माणसे आमच्या या भरतखंडांतही अडाणी वर्गात बहुत आहेत; व ती कुठेही असणारच, वाकी, ज्ञानी वर्गासंबंधे पहातां या भरतखंडांत सृष्टचमत्कारांचे मार्मिक प्राचीनतम काला- पासून आढळतात. ऋग्वेदाहून प्राचीनतर ग्रंथ ब्रह्मांडांत नाही, असें पाश्चात्य विद्वानांनीदेखील कबूल केले आहे. या ऋग्वेदांतच पर्जन्य, मेघ, सूर्योदय, संध्यासमय, रात्रि, उषःकाल याची वर्णनें इतकी मार्मिक व सहृदय आहेत की, त्यांच्या तोडीची वर्णनें कोण- त्याही कवीच्या किंवा सृष्टिशास्त्रज्ञाच्या लेखणीतून उतरणें दुर्घट आहे. आमचा आदिकवि वाल्मीकि याच्या सुप्रसिद्ध काव्यांतील वनश्रीची व जलाशयाची वर्णने वाचीत असतां आपण तडागारामांतच उभे असल्याप्रमाणे सुख होते. आमचे ऋषि-मुनि-यतींना तर सृष्टिदेवीचे उत्संगावर खेळण्याचा अतोनात नाद. आधुनिक वाण, शुद्रक, भवभूति, मुकुंदराजप्रभृति कविवर्य सृष्टिदेवीचे विलोभनीय स्वरूप पाहून अनेक ठिकाणी प्रेमोद्गार टाकितांना आढळतात. विद्वानांचे असो; पण आमची साधीभोळी लोकप्रिय शकुंतलाताई, इजवर तरी बनश्रीचे कोण प्रेम ? ती सासरी जाऊं लागली तर तिच्या बोळवणीच्या वेळी- .. -- ११ ३.] सृष्टीची भीषणता. २७५ (साकी) क्षीरतरूने शालु दिला (हो)। लाक्षारस दुसऱ्याने ॥ इतर लतांनी हात उभारुनि । दिधले (हो) दागीने ॥ १॥ --संगीत शाकुंतल. अशा अर्थाची साक्षात् कविकुलगुरूची साक्ष आहे. आणि बेटा हरिणपाडस तिचा ऑचा ओढू लागला. ठीकच आहे; प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे. कारण, तिने आपल्या दिव्यरूपाचा गर्व एकी- कडे ठेवून हरिणशावांपासून मुग्धविलोकिताचा उपदेश घेतला होता. आमची देवमंडळी तर सृष्टिदेवीच्या हृदयवल्लभांपैकींच दिसते. आमचे नंदजीके लालांना कुंजबिहार, वनमालाधारण, वंशीवादन, व गो-पालन यांसारखें प्रिय काहीच नाही. आमचे अयोध्याधिप जरी शहरी होते, तरी त्यानींही ऐन उमेदीची चौदा वर्षे वृक्षलता. सान्निध्यांतच काढली. आमचे भूतपति भोलानाथांचे सदैव राहाणेच गिरिशिखरी. सहवासाचे माणूस ते पर्वतराजाचेच अपत्य. परिधान गजचर्म. अलंकार पवनाशन आणि प्रियवस्तु म्हणजे " चावल, चंदन, बेलकी पतिया, व गंगा." एक चिरंजीव गजमुख, दुसरे शिखिवाहन. याहून सृष्टिप्रेमाचें अधिक प्रदर्शन दुसरे कोठे शोधावें? सारांश, सृष्टिप्रेमासंबंधे अनादिकालापासून या भरतभूमीची स्थिति युरोपखंडापेक्षा किती तरी सरशी आहे. इंग्रजी वगैरे कित्येक भाषांत चंद्र, सूर्य, पृथ्वी, जल, वायु इत्यादि सृष्टवस्तूंना एकएकच वाचक शब्द आहे; परंतु आमच्या संस्कृत भाषेत या प्रत्येकीस दहावीस, पंचवीस पर्याय शब्द आहेत.
सुख आणि शांति. [प्रकरण आणि हे पर्याय शब्द म्हणजे त्या त्या वस्तूमध्ये दिसून येणान्या गुणधर्मांचे बोधकच आहेत. निघंटांत व अमरांत पृथ्वीला · गौः असा शब्द आहे, व 'स्थिरा' असाही दुसरा शब्द आहे. अर्थात् हे शब्द घडणाऱ्या आमच्या पूर्वजांना तिचे शास्त्रीय दृष्टीने अस- णारे 'गतिमत्त्व-' ही ज्ञात होते व व्यवहारकाली असणारे 'स्थिरत्व-' ही ज्ञात होते. चंद्राला ' ओषधीश ' म्हटले आहे, 'कलानिधि' म्हटले आहे, 'चंद्र' ही म्हटले आहे. अर्थात्, त्याचे ठिकाणी राहणारा ओषधिपोषणाचा गुण, क्षयवृद्धिधर्म, व आल्हादकत्व ही सर्व ध्यानात घेऊनच ह्या संज्ञा दिल्या आहेत. आणि हे भिन्न गुण- धर्म दृढ अवलोकनाशिवाय ध्यानात येणार नाहीत व हृदयांत त्या वस्तूंबद्दल प्रेम असल्याशिवाय त्या वस्तूचे मुहुनिरीक्षणही कोणी करणार नाही. यावरून आमच्या पूर्वजांचें सृष्टयवलोकन व सृष्टि- प्रेम कसें होतें हैं कोणासही समजून येईल. आम्हीमात्र त्यांचा कित्ता ताजा ठेवावयाचे विसरत आहों, हे बरे नव्हे.
Tottttttttttttttttituttttttt
प्रकरण बारावें.
सृष्टिप्रेम.
Pr
kakakakakakakatokutattikot utitetet अन्यत्र उजाड ( श्लोक ) स्निग्धश्यामाः क्वचिदपरतो भीषणाभोगरूक्षाः । स्थाने स्थाने मुखरककुभो झाङ्कृतैर्निर्झराणाम् ॥ एते तीर्थाश्रमागरिसरिद्गतकांतारामिश्राः । संदृश्यते परिचितभुवो दण्डकारण्यभागाः ।। १ ॥ --उत्तररामचरितम् भावार्थ:-रामचंद्र म्हणतात, हे दण्डकारण्याचे भाग जे कांहीं वृक्षांचे दाटीमुळे स्निग्ध व श्याम असे दिसतात, मैदानामुळे रूक्ष भासतात, जागजागी झऱ्यांच्या वाहणीच्या झझर आवाजाने जेथील दिशा नादमय होऊन गेल्या आहेत, व ज्यांत अनेक तीर्थे, आ- श्रम, डोंगर, नद्या, खाडे, जंगले यांची खिचडी आहे, ते पूर्वपरिचितसे दिसतात. (श्लोक) यत्र द्रुमा अपि मृगा अपि बन्धवो मे। यानि प्रियासहचरश्चिरमध्यवात्सम् ॥ एतानि तानि बहुनिझरकंदराणि । गोदावरीपरिसरस्य गिरेस्तटानि ॥ २ ॥ ---उत्तररामचरितम् भावार्थ:---जेथील वृक्ष तसेच मृगही माझे बंधु होते, आणि जेथें प्रियेच्या समागमांत मी दीर्घकाल राहिलो होतो, तोच हा अनेक झरे व दया यांनी युक्त गोदावरी- तीरच्या गिरीचा कांट. .
प्रकरण बारावें. सृष्टिप्रेम. (श्लोकचरण) नादत्ते प्रियमण्डनाऽपि भवतां स्नेहेन या पल्लवम् । -शाकुंतलम् वसंतऋतु जर आयुष्यात एकवारच येता, दिनमणीचा उदय- अस्त नित्य न होतां वर्षाकाठी एकवेळच होता, बहुरंगी इंद्रधनुष्य शतवर्षांनी एकदांच दिसतें, सुंदर पुष्पें जर माणकांइतकी दुर्मिळ असती, आणि हिमबिंदु हिरकण्यांइतके दुष्प्राप्य असते, तर ह्या गोष्टी किती तरी आश्चर्यकारक वाटल्या असत्या; आणि त्यांच्या दर्शनाने आपणांस आनंदही किती तरी अनिर्वाच्य झाला असता. दयाळू परमेश्वराने या गोष्टी विपुल ठेविल्यामुळे आपले हातून त्यांची अवगणना होते. कारण, म्हणच आहे, ' अतिपरिचया- दवज्ञा.' गेटी म्हणतो, " इंद्रधनुष्य हे इतके चित्रविचित्र व चि. ताकर्षक आहेना ? तथापि तें सारखें घटकाभर राहू द्या, म्हणजे त्याकडे कोणीही पाहणार नाही." जनांची चालच ही. कवि म्हणतो, "नवनवगुणरागी प्रायशः सर्वलोकः।" "वस्तू वाटे नवी जो अवड बहु तिची, लोकरीती अशी हे। " मनुष्य म्हणते, अंः ! त्यांत काय पहावयाचे आहे.? तें नित्याचेच आहे. पण खरे पाहतां अर्थः-१ नटण्याची तिला हौस खरी; पण हे वृक्ष हो, तुमच्यावर तिचे प्रेम असल्यामुळे ती तुमचे पल्लवाला हात लावीत नाही.
२८० सुख आणि शांति. [प्रकरण जे या ज्या गोष्टी, त्याच अत्यंत मनोहर आणि अत्यंत अवश्यकही आहेत; आणि ज्याची दृष्टि शास्त्रपूत झाली असेल, त्याला ह्या गोष्टी प्रतिदिनी नवीन करमणूक दिल्यावांचून रहात नाहीत. आकाशांतील ताऱ्यांकडे रुचिहीन लोक वर मान करून देखील पुरेसें पहात नाहीत; पण ग्रहज्योतिषी दुर्बीण लावून रात्रीच्या रात्री डोळेफोड करीत असतो, आणि त्याला आनंदही नित्य नवा होत असतो. वॉल्टर स्कॉट म्हणे, या जगांत अत्यंतावश्यक आणि जिवाशी बाळगण्याइतक्या योग्य अशा ज्या वस्तु आहेत, त्याच नित्याच्या आहेत." ग्रे कवि म्हणतोः (श्लोक) क्षुद्र पुष्प फुलते गिरिकंदरांत । जे मंजुगीत पडते श्रवणीं वनांत ॥ हा सूर्य, हे गगन, हे क्षिति सर्व वाट। की स्वागची उघडिती मजला कपाटें ॥१॥ स्वतः विधात्याच्या कुशल हाताने निर्मिलेले पुष्पांचे अनंत नेत्रानंदकर वर्ण व आकृति आणि अनेक मार्गांनी त्यांचे हातून होणारी लोकसेवा यांकडे लक्ष जाऊन ज्याचे मन द्रवणार नाही, तो मनुष्यच नव्हे. मधुमालती, वनज्योत्स्ना, स्वर्णचंपक, मदन- बाण, अशोक, पुन्नाग इत्यादि अनेक पुप्प-वृक्ष-लतांची नुसती नांवेंच इतकी श्रुतिमनोहर आहेत की, त्यांच्या श्रवणाबरोबर मनुष्य मिटक्या मारूं लागतो. जाई, जुई, मोगरीचा बहर राहिला बागांतच; पण आमचा हौशी चंडोल " या जाई, जुई, मोगरिला .
१२ वें.] सृष्टिप्रेम. २८१ बहर तो आला।" ही नुसती नामावळी गाऊनच प्रत्यक्ष बहर भोगीत असल्याप्रमाणे खुषीत दिसतो. नामस्मरणांत ही जादू मग त्यांचे सन्निध जाऊन एकीकडे त्यांचा तो सकलेंद्रियमोहन, मृदु, मधुर सौरभ घेत, व एकीकडे त्यांच्या त्या सतेज व टवटवीत वर्णवैचित्र्यावर दृष्टि स्थिरावीत, मनुष्य उभा राहिला असतां खरो- खरच त्याला या मृत्युलोकाची क्षणैक विस्मृति पडून आपण गंधर्व, किन्नर, अप्सरा इत्यादि विलासी दिव्यजनांच्या समाग- मांतच आहाँ असे वाटते; व पुष्पोद्यानांतील वृक्षस्कंदांवरून बस- लेल्या पक्ष्यांचे सहजरमणीय कलमधुर ध्वनि ऐकतांना सांसा. रिक दुःखांची आठवणही करण्यास चित्तास सवड होत नाही, यांत नवल कोणते ? डोंगर, पर्वत, अरण्ये यांसंबंधाने सिसिरोचे म्हणणे असे असे की, आपणांस त्यांपासून जो आनंद होतो, त्याचे कारण आपली त्यांत वसति आहे; परंतु हे म्हणणे खरे नाही. विशाल व उत्तुंग पर्वतांचें गभीरोदात्त रूप दृष्टीस पडतांच कोणाही मनुष्यास करमणूक झाल्यावांचून रहाणार नाही. युगानुयुगें मस्तकावर शुंडा- धारेनें मेघ वर्षत असतांही जे जेरीस आले नाहीत, असले प्रोत्तुंग गिरिश्रपात आणि अखंड झंझावातालाही दाद न देणारी अद्रिशृंगें पाहून ज्याला म्हणून काही हृदय आहे तो सहजच कौतुकाविष्ट होतो. लबक म्हणतो, " तुम्ही गिरिशृंगांकडे पहात जा, तेथून तुम्हांस साह्य मिळेल," असा जो बैबलांत उपदेश आहे तो मोठे शहाणपणाचा आहे. सृष्टिसौंदर्याची रुचि उत्पन्न करण्याला जसे सृष्टिशास्त्रवेत्ते .
२८२ सुख आणि शांति. [प्रकरण कारण आहेत, तसेच प्रकृत्युपासक कविगणही आहेत. रस्किन म्हणतो, " नद्यानिर्झरांना जलपूरण करणे व वायूची शुद्धता करणे एवढीच कामगिरी हे गिरिराज करितात असे समजू नये. ही कामगिरी सामान्य आहे. त्यांची उंची कामगिरी म्हणजे आपल्या विशाळपणाने मानवी हृदयाला थक्क करून सोडून त्याचे दृष्टीवरील मोहपटल उडविणे व विधात्याच्या अजब करणीची मनुष्यास साक्ष पटवून ईश्वरी वैभवाविषयीं सतृष्ण असलेली हृदयें तृप्त करणे ही होय. त्यांचे घटनेत विधात्याची मोठीच शिल्पचातुरी दिसून येते. त्यांपासून एक तर मनुष्याला तत्काळ आश्रयस्थान, सुख व विश्रांति मिळते; आणि तो शोधक दृष्टीचा असल्यास, ते सृष्टयुत्पत्तीपासूनच्या कथा त्याला सांगतात व अनंत रमणीय देखावे दाखवितात." अंतरिक्षाचाही हाच प्रकार. जे प्रेक्षावान् असतील अशांना अंतरिक्ष म्हणजे विस्मय, कौतुक व आनंद यांचे एक अक्षय्य निधानच आहे. दिवसास चंडरश्मीचें तें सर्वातिशायी, भास्वर, शुक्ल तेज आणि वैभव पाहून डोळे थक्कच होतात. पुढे संध्यासमय येऊन दिणमाण अस्ताचलचूडावलम्मी झाले, म्हणजे तर ते दृष्टिक्षम होऊन त्यांस अधिकच रमणीयता येते. बरें, अल्पावकाशाने ते साफ दृष्टीआड होत आहेत, तों शीतरश्मि निशानाथ आपल्या असं- ख्य चमकदार सहचारिणींसह गगनांगणांत आविर्भूत होऊन आपल्या शरीरनिर्वापक ज्योत्स्नेने सर्व जगत् भरून काढितात ! तेव्हां तर असे वाटते की, दिनमणींच्या कारकीर्दीतली मौज हिज- पुढे कांहींच नाही. निखिलनेत्रानंदन, विश्वतापहरण अमृतांशु १२ ३.] सृष्टिप्रेम. २८३ नभोमंडलांत उदित झालेला पाहून कविगण आणि प्रेमी जन यांना तर काय होते तें होतें. आईला जसे नव्या नवसांच्या आपल्या लाडक्याला पाहून यावर काय शृंगार चढवू आणि को- णते अलंकार घालू असे वाटते, तसें कविगणांना या आनंद. कंदाला कोणती उपमा द्यावी आणि कोणती न द्यावी असे होऊन जाते. आणि मग त्या उल्हासभरांत कोणी हा दिग्वधूंचा क्रीडा- कंदुक, कोणी स्वर्गगेंतील राजहंस, कोणी ताराहारांतील मध्यमणि, कोणी शृङ्गाररक्षामणि इत्यादि रूपकें त्याजवर करितात. प्रेमी जनांना वाटते की, या सुधाकराचे राज्य आहे तो असेल नसेल ती चैन करून घेऊ. असा हा चंद्रोदय निरुपम सुखदायी आहे. रात्र ही तर, शांति आणि विश्रांति मिळावी म्हणूनच ईश्वराने निर्मिलीसे दिसते. एक प्रेमी म्हणतोः (श्लोक) ज्योत्स्ना किती मधुर हे विहरे तटान्तीं। येथे प्रिये ! बसुनि आपण एकचिनीं ॥ ऐकू मनोहर मृदु स्वन गायकांचे । जे होति रम्यतर शांतिभरें निशेचे ॥१॥ -शेक्सपिअर. सेंट बॅसिल म्हणतो की, “ तुम्ही जर एकाद्या निरभ्र रात्री आकाशांतील तारागणाचे सौंदर्याकडे काही वेळ सारखी टक लावून, मग आपल्या या कभी न कोमेजणान्या तारकारूपी पुष्पांनी या भव्य विश्वमंदिराचे विस्तीर्ण छत ज्याने चितारिलें असेल, त्या चतुर कारागिराविषयी विचार करूं लागाल, तर तुम्हांला या २८४ सुख आणि शांति. [प्रकरण कुशल जगत्काविषयी प्रेमानें गहिंवर आल्याशिवाय कधीही राह- णार नाही. त्याहूनही पुढे तुमच्या जेव्हा असे लक्षात येईल की, हे इतकें चित्रविचित्र नकासकाम नुसते मनोहरच नसून नियम- बद्ध आहे, तेव्हां तर तुम्हांला प्रेम केवळ अनावर होईल, आणि तुम्हांला असें खचित वाटेल की, ज्याची कृति इतकी मोहक आहे, त्याचे स्वतःचे रूप व सामर्थ्य किती तरी मनोवेधक असलेच पाहिजे." काहींचे असे म्हणणे आहे की, अंतरिक्षांतील चमत्कारां- वरून कर्त्याच्या अजब बुद्धिवैभवाची तेवढी साक्ष पटते; पण त्यापासून त्याचे चांगुलपणाचा निश्चय होत नाही. पण परमात्मा केवळ कौशल्यनिधिच नाही, तर दयासागरही आहे. तुकोबा म्हणतात: ( अभंग) कां रे नाठवीसि कृपाळू देवासी । पोषितो जगासि एकलाची ॥ तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयासि कोण घाली ॥ कोणे केली बाळा दुग्धाची उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ।। तेणे तुझी काय नाही केली चिंता। राहें त्या अनंता आठवूनि ॥ तुका म्हणे त्याचे नांव विश्वंभर । करा निरंतर ध्यान त्याचें ॥ १ ॥ शास्त्रीय प्रगतीने तर सृष्टीचे अगाधपण प्रतिक्षणी प्रतीयमान होत आहे. साध्या डोळ्यांना तळहाताएवढे दिसणारे सूर्यबिंब आपल्या चतुःखंड पृथ्वीच्या लक्षावधि पटीने मोठे आहे; आणि त्याचेभोंवतीं सप्तग्रह फिरत आहेत. तथापि असल्या ह्या अवा- ढव्य सूर्यमालेचा मध्यमाण जो सूर्य तो अनंत अंतरिक्षांत अस- १२ वें. सृष्टिप्रेम. २८५ णाया अमर्याद तेजोगोलांचे मानाने केवळ राईएवढा ठिपका आहे. हे सत्य ज्योतिःशास्त्राने प्रतीत होते. भूगर्भशास्त्रही आप. ल्या परीने कालाचें अनंतत्व दाखविते. शिवाय शास्त्राचे साह्याने एवढेही अफाट विश्व आज असंख्य युगें सुतांत ओंवल्यासारखें निमयबद्ध व सुयंत्र चालले आहे, असे आढळून येते. असे झाले म्हणजे या अखिल नाटकाचा चतुर सूत्रधार कोण असेल, तो शोधावा, म्हणून मनास सहजच वेड भरते; व चित्तांत भक्त्यादि सद्भावांचा उद्गम होऊन डोळे त्या आदिकारणाकडे लागून वाणीला त्याचे महिम्नःम्तोत्र करण्यास सहजच स्फूर्ति होते. आणि (आर्या) ही अद्भुत सृष्टि तुवां देवा केव्हां कधी कशी केली ॥ याविषयींची आम्हां जीवांची कल्पना विरुनि गेली ॥१॥ रविशशिनक्षत्रांहीं कैसे आकाशसदन शोभविलें ।। सौंदर्य हे पहाया जीवाचें नयनवृंद लोभविलें ॥ २ ॥ -परशुरामपंततात्या गोडबोले. इत्याकारक प्रेमोद्गार तिच्या वाटे स्वयंभूच बाहेर पडतात; व जीव आश्चर्य व आनंद यांत गढून जाऊन त्याला आधिव्याधींची विस्मृति पडते; आणि दृढाभ्यासाने या विश्वरूपी मंदिरांत परमात्म्याची मूर्ति सर्वत्र विराजमान आहे, असा भाव हृदयांत ठसून जन्माचें सार्थक होते. हे सर्व उपकार शास्त्राभ्यासाचे व सृष्टिप्रेमाचेच आहेत. असे असतां वर्डस्वर्थसारख्या कबीने, २८६ सुख आणि शांति. [प्रकरण शास्त्रे । (श्लोकार्ध) कशाला कला आणि ती शुष्क पुरे एक प्रेमाई सौहार्द मात्र । असे म्हणावें हे अंमळ तन्हेवाईक आहे. शोधक बुद्धीने सृष्टीचे सप्रेम अवलोकन केल्याने केवळ नेत्रानंद किंवा करमणूकच होत नसून मनुष्याला अनेक उपयुक्त गोष्टींचे ज्ञान होते. कौंट मॅटि नामक इतालियन गृहस्थाने जी " इलेक्ट्रो-होमिओपाथी" किंवा वैद्युत् अनुचिकित्सा-" पद्धति शोधून काढिली तिचे गुरुत्व एका कुच्याकडे आहे. तें असेंः-एक अंगास लूत भरलेला कुला रानांत जाऊन एका वनस्पतींत लोळून येई. प्रसंगी, त्या वनस्पतीची काही पाने त्याचे अंगास चिकटून येत. या गोष्टीकडे मॅटीचे लक्ष असे. पुढे तो कुत्रा निर्मळ झाला. तेव्हां मॅटीने ती वनस्पती कुत्र्याचे मार्गाने हुडकून, तिचे प्रयोग करून पाहिले, तो त्या वनस्पतीने लुतीसारखे अन्यही लशीचे रोग बरे होतातसें दिसले. मग शोधा- वरून शोध वाढत त्याने ही अद्भुत चिकित्सापद्धति निर्माण केली, याचप्रमाणे वानरापासून, मुंगुसापासून व अन्य अनेक प्राण्यांपासून रोगहारक उपायांचे मनुष्यास ज्ञान झालेले आहे. डुकराचे तेल, सशाचे रक्त, गोरोचन, पलिस्तराची लस, कॉडलिव्हर ऑईल, कस्तुरी, इत्यादि किती तरी औषधि जलस्थलचर प्राण्यांपासून प्राप्त झाल्या आहेत. एवंच, सृष्ट्यवलोकनापासून आनंद व करमणूक होऊन, शिवाय असल्या अनेक उपयुक्त गोष्टींचे ज्ञान होते हे सिद्ध आहे. असे १२ ३.] सृष्टिप्रेम. २८७ असतां मनुष्ये संसारांतील व शारीरिक दुःखांचा विसर व्हावा म्हणून पत्ते, सोंगट्या, बिलिअर्ड किंवा जुगार खेळत बसतात, अथवा गुत्त्यांत जाऊन मादक पेयांचे चषक झोंकीत राहतात, याला काय म्हणावे ? सृष्टिनिरीक्षणांत किती आनंद, ज्ञान व दुःखमोक्ष आहे, प्रत्येक वनराजि, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक उपवन, प्रत्येक जलप्रवाह किंवा जलाशय, किती सुख व कौतुक देतो, ते सांगता येत नाही. डोळे मात्र पाहिजेत. बरें; शास्त्रीय ज्ञानाने वरील व्यसनांप्रमाणे कोणाचा घात केल्याचे ऐकिवात नाही. उलट, कल्पवृक्षाप्रमाणे त्याने आप- ल्या भक्तांना आभर करून सोडल्याची उदाहरणे विपुल आहेत. सृष्टि ही केवळ सौंदर्याचंच प्रदर्शन नसून ते शिक्षणगृहही आहे. खरें ज्ञानगुरुत्व सृष्टीसारखे कोणाचेही अंगी नाही. म्हणूनच गौतम- बुद्ध तत्त्वोपदेशार्थ मनुष्यांना सोडून वनांत सृष्टिदेवीचे निकट गेला, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवण्याजोगी आहे. रस्किनचे तर सृष्टि म्हणजे उपास्यदैवतच होते; व त्याने आपल्या उपदेशाने अनेकांस या उपासनेस लाविलें. शिलरने त्याला एकदा टोला मारला की, आपली उपास्यभूत सृष्टि नितरां रम- णीय असेल; पण सौंदर्यमूढांचे हातून कामगिरी काय उठणार? सौंदर्याचे वेडांत त्यांची कर्तव्याची बाजू ढिली पडते. त्यावर रस्कि- नने असा सणसणीत जबाब दिला की, शांत व समतोल मन ठेवून जो सहृदय मनुष्य वनसंचाराला निघेल, त्याला वनांतील, प्रत्येक पाषाण, पुष्प, पर्ण किंवा ध्वनि यांपासून उमेद व कर्तव्य- परता प्राप्त झाल्यावांचून रहाणार नाही. सारांश, सृष्टिसौंदर्याने २८८ सुख आणि शांति. [प्रकरण मनुष्य कर्तव्यविमुख न होता, उलट कर्तव्यपरच होतो. शेक्सपि- अर म्हणतोः ( आर्या ) शाखी सुबोधदाते मित्र, तसे ग्रंथ सजव निर्झरही । पापाण धर्मवक्ते, मातेसम हितकरा समस्त मही ॥१॥ सृष्टिदर्शनामुळे हृदय केवळ आनंद व आश्चर्य यांनी भरून जातें, एवढेच नव्हे, तर त्याचे ठिकाणी ईशप्रेमही दाटते. शिवाय, राजकारण, धर्मपंथ, शास्त्रीय वाद, स्वकर्तव्य यांमध्ये जरी आपले व्यक्तिशः मतभेद असले, तरी वनश्रीचे सौभाग्य व वसंताची बहार सर्वांना सारखींच विवश करितात. वसंत येतांच प्राणिमात्राला जणूं नवीन चैतन्य आलेंसें होतें. मधुकालांतील ती पुप्पश्री पाहून आपले मन तल्लीन होते व पवनांदोलित आम्रमंजरीबरोबर जणूं नाचूं लागते. कवि म्हणतो:- (श्लोक) विकसित-सहकार-भारहारी । परिमलपुंजित-गुंजित-द्विरेफः ॥ नवकिसलयचारुचामरश्री। हरति मुनरपि मानसं वसंतः ॥१॥ भावार्थ:--फुललेल्या आम्रमंजिरीचे हार धारण करणारा, सुगंधाकृष्ट भ्रमरपुंजांना गुंजारव करावयास लावणारा, व कोमल वृक्षपल्लवरूप चा- मरांनी राजासारखा शोभणारा हा वसन्त, मुनीचेदेखील मन हरण करितो. चार्लस लंबनें, दिव्योद्यानांतून अडाम आणि ईव्ह ही स्वतः होऊन दूर झाली यावरून एके ठिकाणी उद्यानवास म्हणजे कारा- १२ वें.] सृष्टिप्रेम. २८९ वासच समजावा, असे म्हटले आहे. पण, ते म्हणणे भावार्थाचे नसून विनोदाचे आहे. कीट्स तर, शहरांत कोंडून पडलेल्या लोकांना खेड्यापाड्यांतील खुल्या हवेत जाऊन स्वच्छंद फिरणे यासारखे अमृतच नाही, असे म्हणतो. परंतु लबक म्हणतो, आमच्या दुर्भाग्याने सृष्टिरमणीची निवांत गांठ पडण्याला वावटळ, धूळ, पाऊस वगैरे किती तरी अंतराय येतात. त्यांतून गांठ पड- लीच तर दृष्टिमांद्य, बुद्धिमांद्य, अरसिकता वगैरे आमचे दोष आड येऊन तिचे योग्यतेनुरूप तिचे कौतुक आमचे हातून होत नाही. तथापि अशाने तिचे वास्तव योग्यतेला कमीपणा येतो असे नाही. कुपरीक्षकामुळे रत्नाची किंमत कमी समजणे अन्याय्य होईल. सुदैवाने जे कोणी वरील अंतराय व दोष यांपासून मुक्त असून तिच्या नादी असतील, त्यांना असा अनुभव येतो की, जो जों तिचे रूपाशीं अधिक परिचय व्हावा, तो तो त्याचा मोहकपणा व सौंदर्य खुलत जाऊन, इतकें विचित्र असूनही अक्लिष्ट रूप विधा- त्याला घडवितां तरी कसे आले असेल, याचाच मनास अचंबा वाटून राहतो. असे असतां, रूसो नामक फ्रेंच लेखक म्हणतो की, “ सृष्टीतील सौंदर्याचा भाग केवळ काल्पनिक आहे; तिच्या प्रत्यक्ष रूपांत रमणीयता मुळीच नाही." हे म्हणणे खरोखर अरसिकालाच शोभेसे आहे. फार झाले तर इतके म्हणता येईल की, अमुक एक विशिष्ट भाग दुसन्याहून अधिक सुंदर आहे. परंतु तेवढयाने एकूण रूपाचे सौंदर्याला कमीपणा देता येणार नाही. खरे म्हटले तर, मनुष्य आपले मूर्खपणाने या रूपाला २९० सुख आणि शांति. [प्रकरण कमीपणा आणितो. मूळचा भाग निर्विवाद सुंदर असून मनुष्यच त्याचे प्रतिबिंब गचाळ उतरून त्याला कमीपणा आणितो. दुसरें तर काही नाही. रस्किन म्हणतो, अस्सल प्रकृतीचा जो नीरस म्हणून म्हटलेला भाग असेल तशाचे सौंदर्य में इष्टकार्य करील, त्याचे शतांशही मनुष्यकृत अतिनिपुण अनुकृतीने होणार नाही. अस्सल में अस्सल आणि नकल ती नक्कल." बाभळीच्या झाडाचे कांटे बोंचतात; पण छायेचे बोंचत नाहीत. म्हणून बाभळीचे झाडांत बसण्यापेक्षां तिचे छायेंत बसणे अधिक सुखकर असते. याचप्रमाणे, या रमणीय सृष्टीची छाया मनांत घेऊन तिचे अवलोकन करीत बसणे प्रत्यक्ष सृष्टिदर्शना- हूनही एके परी अधिक सुखावह असते; व निर्विघ्न असल्याने मना- वर अधिकच परिणाम करिते. या पद्धतीने ज्यांनी तिच्या दिव्य लावण्याचे परिशीलन केले आहे, त्यांचे म्हणणे की, या दिव्य रूपाइतकें. पुण्यपावन व चित्तशुद्धिकर दुसरें कोणतेंच रूप नाही. खरोखरच ईश्वराचे विशिष्ट प्रेमांतली ही सृष्टि असली पाहिजे. मानवी सुंदरीचे रूप पाहून प्रसंगी दुर्विकार जागृत होतात. पण ह्या रूपावलोकनाने कुविचार उलटे नष्ट होतात; आणि या सृष्टिसुंदरीची अगाधसत्त्वता, हृदयंगम प्रेम- ळता, व अखंड परकार्यतत्परता पाहिली म्हणजे तर असा कांहीं पूज्यभाव उत्पन्न होतो की, सत्त्वपरीक्षणार्थ आलेले त्रिमूर्ति जसे अनसूया सतीचे पायांशी लोळू लागले, त्याच- प्रमाणे ह्या दिव्य रमणीचे आपण बाल होऊन हिचे अंकावर बाळ होऊन १२ ३.] सृष्टिप्रेम. २९१ क्रीडत राहावे असेंच वाटते. अकबर बादशहा म्हणे, या सुंद- रीचे अंगावरील शालू किती तरी मनोहर आहे ! तो खुदानें अंगी विणला असून त्याच्यांतील मोहक रंग तर त्याने आपल्या खुद्द हातानेच भरले असले पाहिजेत. सृष्टीचा प्रियकर-काल-हाही तिजमुळे सदा चैनीत असतो. ती त्याला दरवेळी नवीन नवीन पुष्पांचे हार घालिते व नानाविध धान्या-फलांची मेजवानी देते." काही लोकांचा असा आक्षेप आहे की, सृष्टिरमणी सुंदर खरीच, तथापि तिचे भक्त तिचे रूपाचा फाजील बडेजाव करितात. पण हा आरोप मिथ्या आहे. एवढी गोष्ट खरी की, तिचा पेहराव सदा सारखाच भपकेदार नसतो. कधी तो फारच भडक असतो व कधीं सौम्य व पोक्तपणाचा असतो. पण, कसाही असला तरी त्याचा मोहकपणा अप्रतिम असतो, हेमात्र मिथ्या नव्हे. कसलाही नामांकित चित्रकार येऊ द्या; त्याला तिच्या रूपाची प्रतिकृति उठ- वितां नाहींच यावयाची. समग्र रूप तर राहोच. तिच्या केश- पाशांतील मेघमालारूपी गजरा किंवा क्रीडोद्यानांतील हंसाचे एका पिसाची हुबेहूब नक्कल रंगवून दाखविण्याचीही त्याची सोय नाही, त्याने पक्कें समजावें. कॉड्रिंगडन आणि नेपिअर नांवाचे दोघे गृहस्थ जलपर्यटन करीत असतां चित्रकारांच्या गोष्टी निघाल्या. तेव्हा पहिला म्हणाला, टर्नल या चित्रकाराची रंग भरण्याची कमाल आहे; असले भडक रंग आपण सृष्टीतदेखील पाहिले नाहीत. या वेळी अस्तमानसमय असून चंडकिरण सहस्रांशु पश्चिम-गिरीचा आश्रय २९२ सुख आणि शांति. [प्रकरण करण्याचे बेतांत होते. नभोमंडलांत वारुणी दिशा चित्रविचित्र अशा नेकविध उज्ज्वल रंगांनी भरून राहिली होती. व त्या रंगांची छबी खालील अभिमाली सरित्पतीचे देदीप्यमान् वक्षस्थलावर प्रतिबिंबित झाली होती. ते पाहून नेपिअर यानें गलबताचे पूर्वेस अस्तावलंबी आरक्त सूर्यबिंबाचे प्रभेनें रक्तमय होऊन गेलेल्या व एकीवर एक उसळ्या खाणाऱ्या त्या जलतरंगांकडे आपले बोट करून आपले स्नेह्यास म्हटले, " तो पहा, त्या उसळणाऱ्या लाटांचा रंग किती लालभडक, केवळ आगीचा लोळ दिसत आहे, नव्हे काय ? तुमच्या चितान्याचा लालरंग याहूनही भडक व तजेलदार आहे काय?" या प्रश्नापुढे कॉड्रिंगटनला हार खावी लागली. कारण, सूर्याच्या आरक्त प्रभाबिंबाने सर्व समुद्रच पेटून गेल्यासारखा भडक दिसत होता. आणि त्यांतही क्षणक्षणा एकमेकींशी मिसळून वेणी गुंफ- णान्या व प्रियमत्रिणींप्रमाणे स्वच्छंदक्रिया करणाऱ्या बहुरूपी सुंदर जलवीचि यांची छबी पाहून तर तो त्यांचे दिव्यतेपुढे व सौंदर्या- पुढे मूढच होऊन गेला आणि म्हणाला, "मित्रा, लाल रंगांत आमचा चित्रकार याची बरोबरी नाही पावणार, पण बोवा त्याचा पिवळा रंग तर खचितच बिनतोड आहे." हे शब्द कानी पडतांच नेपिअरनें गलबताचे पश्चिमेकडील समुद्राचा देखावा दाखवून प्रश्र केला, "का? हा पिवळा कसा काय ?" येथेही पहिल्याप्रमाणेच फजिता झाला. तेव्हां मग कॉड्रिंगटन आपल्या चुकीबद्दल हंसला आणि आदरबुद्धीने म्हणाला, "मित्रा, आमच्यावर बाजू लागली बोवा; उपाय नाही. आमचे बोलणे ܣܕܐ कबूल आहे.
१२ वें.] सृष्टिप्रेम. २९३ खुटले. खरेंच, मजपेक्षां तुला व आमचे चित्रकाराला सृष्टिसौंद- र्याची कल्पना अधिक व्यक्त आहे." (श्लोक) सौवर्णानि सरोजानि । निर्मातुं संति शिल्पिनः ।। तत्र सौरभनिर्माणे । चतुरश्चतुराननः ॥ १॥ -सुभाषित भावार्थः–मानवी शिल्पी सुवर्णकमळे घडू शकतील, परंतु त्यांचे ठायीं सुगंधोत्पत्ति करण्याचे चातुर्य एका सृष्टिकर्त्यांचेच. हे म्हणणे सर्वथा खरे आहे. मनुष्याची अक्कल किती ? सृष्टि- कर्त्याचे कृतीची नक्कल करण्यापुरतीच. पण तीही धडशी नाही. मॅडम सेविनी ही वसंतोत्सवार्थ एका जनपदोघानांत गेली असतां, तेथील रंगीबेरंगी नूतन पालवी पाहून इतकी मोहित झाली की, तिने आपल्या मुलीला पत्र लिहून म्हटले, " माझे प्रिय कन्ये, या कोमल किसलयांचे नैकविध तजेलदार रंग पाहून मला वाटते की, बालार्काचे किरणांतील सर्वही रंग यांवर ओतले असावे. उपवनाचे काही भागांत तर किनखाप पसरलासा वाटतो. खरेंच, या स्थळाचे निसर्गरमणीयत्व पाहून मी तर वेडी होत्यें. मी जात्ये आहे कोठे, पहात्ये आहे काय ? जागी आहे की निजलेली आहे, हे मला काहीच कळत नाहीसे होऊन जाते. " मॅडम सेविनी तर मार्मिकच बाई होती. तिला मोह पडण्यांत विशेष नाही. परंतु दुष्यन्ताची दासी ती काय ? पण तीदेखील म्हणते- सुखवि नयन किति ही आम्रकली । थोडी तांबुस हिरवी धवली ॥ -संगीत शाकुंतल. ?
२९४ सुख आणि शांति. [प्रकरण रमणीयतेची एका रसज्ञाने व्याख्या दिली आहे.-" क्षणे क्षणे यन्नवतामुपैति । तदेव रूपं कमनीयतायाः॥" म्हणजे प्रतिक्षणी नवी नवी मोहक झांक दाखविणे हे रमणीयतेचे स्वरूप समजावें. हे लक्षण सृष्टीला किती तरी पूर्णत्वाने लागू पडतें. प्रति ऋतूला पुष्पें, फळे वेगळी, हवामान वेगळे, देखावे वेगळे. बरें, प्रत्येकाची बहारही वेगळीच. हे दर ऋतूलाच नव्हे; पण, दर क्षणालाही म्हणणे अतिशयोक्ति होणार नाही. एक कवि म्हणतो:-" अहो नवनवाश्चर्यनिर्माणरसिको विधिः"-अहो ! दर वेळी नवी नवलाई करून दाखविण्याचे या सृष्टिकर्त्याला वेडच दिसते. हे म्हणणे मिथ्या नव्हे. काही काल तर विशेषच विलोभनीय व चेतोहर अस- तात. प्रशांत प्रभातकाल, संध्याकाल यांचे मोहकत्व सर्वसंमतच आहे. मुलांचे ठिकाणी सृष्टिप्रेम व नूतन वस्तूविषयी आदर ही सहज असतात व यामुळे कित्येक मुलें पक्षी, प्राणी, वनस्पति, पाषाण, किंवा दुसरी काहीही मौजेची वस्तु मिळाली म्हणजे ती संग्रहीं ठेवितात. विलायतेत काही लोकांचे घरी असले वस्तुसंग्रह चांग- लेच आहेत. हा संग्रहाचा नाद स्तुत्यच आहे. परंतु, हा संग्रह इष्टमित्रांना केवळ दाखविण्याकरितां किंवा शोभेकरितांच असतो, असा पुष्कळ ठिकाणी अनुभव येतो, हे बरे नव्हे. त्या संगृहीत वस्तूंचे लक्षपूर्वक अध्ययन करून बोध घेतला, तर त्या संग्रहाचें सार्थक. शिवाय लबकचे मते प्राणी • आणि वनस्पति हे घरांत आणून ठेवण्याने त्यांची निम्मे मौज जाते; ते वनांत स्वच्छंद विला- सांतच पाहिजेत; तेव्हां त्यांची खरी बहार व खरे स्वरूप कळते.
१२ वें.] सृष्टिप्रेम. २९५ यामुळे संग्रह करीत बसण्यापेक्षाही वनांत जाऊन त्यांचा अभ्यास करणे अधिक इष्ट आहे. आमचेकडे वस्तुसंग्रहाचा नाद युरोपाइतका नाहीं असें धरून चाललें तरी सृष्ट स्थावर जंगम पदार्थांचे निरीक्षण करून त्यां- पासून बोध घेण्याची हातोटीमात्र पाश्चात्यांहूनही अधिक आहे. सुभा- षितांतील अन्योक्तिप्रकरण म्हणजे या सृष्टपदार्थांपासून बोधग्रह- णच आहे. सूर्य, चंद्र, मेघ, वायु, समुद्र, पर्वत, नदी, तडाग, कूप, दावानल, व्योमचर, जलचर, स्थलचर, वृक्षवल्ली-यावद्वस्तूं- पासून अमोल बोध घेतलेले आहेत. वृद्धचाणक्यांत म्हटले आहे:- (श्लोक) सिंहादेकं बकादेकं । षट्शुनस्त्रीणि गर्दभात् ।। वायसात्पंच शिक्षेञ्च । चत्वारि कुक्कुटादपि ॥ १ ॥ भावार्थ:-सिंहापासून एक गुण शिकावा; बकापासून एक; कुत्र्यापासून सहा; गर्दभापासून तीन; वायसापासून पांच आणि कोंबड्यापासून चारे. दाराशी नुसत्या कुंड्या मांडणे किंवा पिंजरे टांगणे यापेक्षा ही सारग्रहणदृष्टि संपादणेच अधिक श्रेयस्कर आहे. सदरबाजारांतून जावें तो ' मौजेच्या जिनसा' विकणारांची १ विस्तारभयास्तव येथे फक्त कोंबड्यापासून घेण्याचे गुण देतो. (श्लोक) युद्धं च प्रातरुत्थान । भोजनं सहबंधुभिः ॥ स्त्रियमापद्गतां रक्षेचतुः शिक्षेत कुक्कुटात् ॥ १॥ भावार्थः-उजाडत उठणे, झुंज खेळणे, जातीसह भोजन करणे व विपत्काली स्त्रीचे रक्षण करणे हे चार गुण कोंबड्यापासून शिकावे. । .
२९६ सुख आणि शांति. [प्रकरण कांहीं दुकानें लागतात. या दुकानांतून नानाप्रकारचे मौजेचे मुलांचे खेळ असून त्यांतच कांही कोडी किंवा कूटांच्या रूपाचे खेळ असतात. पण सृष्टीमध्ये या खेळांचे शतपटीने मनोरंजक व सोड- विण्यास अवघड अशी अनंतावधि कोडी बिनपैशाने पाहावयास मिळतात. ती सोडविण्याचा यत्न करणे वरील खेळण्यांपेक्षा अधिक बरें. प्रत्येक शास्त्राची, प्रत्येक विषयाची कोडी वेगळालीच आहेत. लबक म्हणतो, फक्त ' भूगोल व प्राणिजीवन' या दोन विषयां- वरील कोडी मी येथे देतो, त्यांची उत्तरें कोणाही चतुराने द्यावी.. (१) वेल्स आणि लेक डिस्ट्रिक्ट या भागांतच पर्वतांची एवढी गर्दी कां ? ( २) इंग्लडांतील टेम्स नदी पूर्वगामिनीच कां ? ३ ) कॉट्स वोल्ड डोंगर हे आगेयी दिशेला कड्यासारखे तुटक कां आणि नैर्ऋत्येला क्रमाने उतरते का ? ( ४ ) टेम्सचे दक्षिणतटाकाला असणा-या नार्थ डौन्स आणि सौथ डौन्स यांचे परस्पर नाते काय ? ( ५ ) हा इंग्लिश चैनल कोणत्या साली मूळ निर्माण झाला ? त्याचे वय काय ? (६) स्कॉटलंडांतील डोंगरांच्या रांगा एकमेकींशी काटकोनच कां करितात? (७) स्काटलंडांतील काही सरोवरें इतकी अथाक खोल कां ? (८) 'बीच' वृक्षाच्या बिया तिकोनी का, सिकॅमूरच्या वाटोळ्या कां ? (९) 'बीच ' वृक्षाची पाने लांबट असून तीक्ष्णाग्र कां, आणि सिक- मूरची पाने हाताचे पंजासारखी फांकलेली व फताडी कां ?
१२ वें. सृष्टिप्रेम. २९७ (१०) 'बीच' वृक्षाची पाने अखंड कां, ओकवृक्षाचे पानांना कातर कां? (११) कांही वृक्षांची पाने पसरट कां, कांहींची चिंचोळी कां ? ( १२ ) काही पुष्पे चंद्रविकासी कां, काही सूर्यविकासी कां ? ( १३ ) पुष्पं मिटतात, ती मिटावींच कां ? ( १४ ) कित्येक पुष्पांना पांचच पाकळ्या कां ? काहींना नळ- कांड्या कां? ( १५) शुभ्र आणि फिका पिवळा या दोन रंगांचेच पुष्पांना बहुधा अधिक मधुर सुवास कां ? (१६) वाघाचे अंगावर पट्टेच कां ? चित्त्याचे अंगावर ठिपकेच का? सिंहाचा रंग पिंगट कां ? मेंढराचा उदी कां ? आणि काही सुरवंटांचा हिरवट कां ? ( १७) मासे पाठीकडून दाट काळे व पोटाला फिके काळे कां ? (१८) 'सोल' जातीचे माशाचे दोन्ही डोळे एकाच अंगाला का ? ( १९) कोंबड्याचे अंडे लांबट कां ? दिवाभीताचे वाटोळे कां ? (२०) पशु हा मनुष्याहून सुदृढ असतां त्याचं आयुष्य २०३० वर्षेच कां ? मनुष्याचे १००1१२५ च कां ? वृक्षाचे सहस्रावधि कां ? हे प्रश्न वाचून सामान्यांना हसू येईल. ते म्हणतील, की रिकाम- टेकड्यांचे हे उद्योग आहेत; या प्रश्नांना कसली उत्तरे आणि त्यांपासून फायदा तरी काय ? पण ज्यांची बुद्धि शास्त्रपरिष्कृत झाल्याने या अफाट पद्मभवांडांत सूर्यमालेपासून तो अणु-त्रसरेणू- पर्यंत प्रत्येक पदार्थाची स्थिति, गति, आकृति कायद्याने बनलेली असून प्रत्येक गोष्ट सहेतुकच आहे,-अमुकच माणसाचे गालावर तीळ कां, दुसन्याच्या मानेवर का, हेदेखील सप्रमाण सांगतां - २९८ सुख आणि शांति. [प्रकरण येतें,-अशी ज्यांची अनुभवाने खात्री झाली आहे, त्यांना हे प्रश्न वेडगळ वाटणार नाहीत. व शोध करीत राहिल्यास यांची उत्तरें कालांतराने तरी मिळतील. आणि ती मिळाल्यावर त्यांचा फायदाही दिसून येईल असे समजावें. पुष्कळ लोक शौकास्तव जनावरे पाळतात; पण त्यांच्या स्वभावाचा लक्षपूर्वक अभ्यास करीत नाहीत. कांहीं शास्त्रज्ञांचे मतें पशु ही केवळ चालती बोलती यंत्रे आहेत. काहींचे म्हणणे त्यांना थोडीशी तरी मेधा, विचारशक्ति व बऱ्यावाईटाचे ज्ञान आहे. पण ही विचार शक्ति किती किंमतीची आहे ? दोन आणि दोन मिळून चार होतात, हे हत्ती, कुत्रा, माकड वगैरे विशेष सुबुद्ध मानिलेल्या प्राण्यांस कळू शकेल की काय ? तसेंच एकादी सुंदर वस्तु पाहिल्याने मनुष्या. प्रमाणेच त्यांना हर्ष होतो की काय ? वगैरे गोष्टी तपासण्यालायक आहेत, व कळल्यास फायदाही आहे. कुत्रा परिचित माणसाचा माग, त्याची पावले उमटलेल्या धुळीचा किंवा गवताचा वास घेऊन त्यावरून काढितो, ह्या गोष्टीचा फायदा कित्येक राजकारणी पुरुषांनी घेतला आहे. कबूतरे शत्रूचे छावणीत हेरांचे काम करूं शकतात. इत्यादि शोध उपयुक्त नाहीतसे कोण म्हणेल ? . . १ आपलेकडील प्रसिद्ध गणिती कै. केरूनाना छत्रे यांनी आपली ही पृथ्वी कशी बनली, तीवरील नद्या, पर्वत, समुद्र यांच्या जागा अमुकच का, हे निर्णीत केले आहे. परंतु ही त्यांची कल्पना अजून पुस्तकरूपाने जगापुढे आली नाही.
१२ ३.] सृष्टिप्रेम. २९९ नुसत्या झाडांच्या पानांच्या व फुलांच्या म्हटल्या तरी हजारों हजार प्रकारच्या भिन्न भिन्न आकृति, तशाच फळांच्या भिन्न भिन्न रुचि ह्यांना काही तरी कारणे असलीच पाहिजेत. पपनसही लिंबू, संत्रेही लिंबू, ईडही लिंबूं, महाछंगही लिंबू, कौलाही लिंबू आणि लिंबूंही लिंबूंच; पण एकाचा मेळ दुसन्याला नाही. साखर गोड, आंबाही गोड, अंजीरही गोड, सिताफळही गोड, द्राक्षही गोड आणि खारीकही गोड; पण याची गोडी त्याला नाही; आणि .गोड तर सारीच आहेत ! हे, 'काही तरी केले, आणि कसे तरी झाले, ' अशांतलें खास नव्हे. हे भेद कर्त्याने जाणून बुजून व हेतु- पुरःसरच केले असले पाहिजेत. आणि हे हेतु कळणें मौजेचे नव्हे काय ? आहेच आहे. शिवाय, या नादाने या रमणीय वस्तूंचा परिचय झाल्यास, ज्ञानाखेरीज अन्य बहुत फायदे आहेत. नुसत्या पुष्पांचेच सौंदर्य म्हटले तरी ते आपल्या दृष्टीला व मनाला एक पौष्टिक औषधच आहे. नित्यांतल्या गोष्टी, पण त्या लक्षांत धरणारे थोडे. अष्टभुजा देवी अनेकांनी अनेकदा पहिली असेल. परंतु तिचे हातांतील आयुधांचा क्रम कसा म्हणून विचारिता, सांगेलसा शंभरांत एकादा. रस्किननें खारीचे वर्णन दिले आहे, ते वाचलें म्हणजे मग आपले डोळे उघडतात आणि वाटते की, हा लिहितो हे सर्व खरे आहे, पण आपण लक्षात घेतलें बव्हतें. रस्किन म्हणतो, या खारी- सारखा सुबक, आनंदी आणि गमतीचा दुसरा प्राणीच नसेल. अति हृड असून अत्यंत निरुपद्रव. खाण्यापिण्यांतही कोणा जीवाची - सुख आणि शांति. [प्रकरण प्राणहानि नाही. मांजराचे पिलासारखी खेळकर, परंतु निर्दय नाहीं, शाखामृगाहूनही ( वानराहूनही ) अधिक चलाख, पांखरा- पेक्षा मनोहर आणि तजेलदार, आणि वनदेवतेचे आवडते खेळणेच. असली ही लुकलुक डोळ्यांची गोजिरवाणी मूर्ति एका वृक्षशाखे- वरून दुसरीवर जाते, तेव्हां विजेची चपळाई कमी असा भास होतो. तिच्या गति तरी किती विचित्र ! क्षणांत टुणकन् उडी मारील, क्षणांत तीरासारखी धांवत जाईल, क्षणांत मध्येच मुरडेल. त्याचा काही नेमच नाही. सारी लहर आहे! हरिणाहून चपळ,. वाघाहून अधिक टिपण झोंकणार. देहांत सरळपणा पहाल तर मुळीच नाही, पण जिनगरी बाहुलीपेक्षा अधिक मोहक आणि सावरीचे कापसापेक्षाही गुलगुलीत. अंगीं ऐट किती, मुरड किती, नखरा किती, आणि वात्रटपणा तरी किती ? पळांत तुमचेमागे धांवेल, पळांत दृष्टिआड लपेल, पळांत वर डुकली उचलून तुम्हांला हेरील. क्षणांत प्रियसखीप्रमाणे हळूच कान देऊन चोरून ऐकत बसेल. कोण खेळाडू, कोण धूर्त, कोण दिमाखदार, किती रंगाढंगाची! छे, छे, मला वाटतें खींची अप्सराच हे मुरकेदार, छोटें, छबेलें रूप घेऊन बाळगोपाळांच्या मौजेकरितां भूलोकी अवतीर्ण झाली आहे. विषमूर्ति भुजंगाचेही याच कुशल लेखकाने असेंच मौजदार चित्र रेखाटले आहे. रस्किन म्हणतो:-“ओहो! तो पहा, वितळ- लेल्या रुप्याचा छोटासा ओघळ जमिनीवरून चालला आहे.
१२ वें. सृष्टिप्रेम. ३०१ चालला आहे कशाचा? वाहतो आहे. कारण, त्या चालण्यांत यत्न किंवा कष्ट कसे ते नाहीत. गति किती गमतीची? चपळ असून शांत. पाण्याची लाट की वायाची झुळूक! पुनः लाट म्हणावी तर गर्जत नाहीं; ओघ म्हणावा तर धबधबा नाही. सर्व शरीर एका वेळी गतीत असूनही काही भाग या कलावर झुकलेला, काही उलट कलावर, निमे सरळ पुढल्या झोंकावर व निमे मागें मुरडलेला. तथापि कोणत्याही भागाला फाजील संकोच नाहीं, फाजील ताण नाही. सर्व शरीर सारखें एक तोलांत चाललेले. गोंगाट नाही, बोभाट नाही. टिकल्यांच्या चंद्रहाराचा सर घसरतो आहे, की सुबक बुंदक्यांचा गळपट्टा पडला आहे, कांही ओळखत नाही. रेशमाहून मृदु, कदलीगर्भाहून शीतळ, पुष्पहाराहून सुखतरस्पर्श. पण या सौम्यपणाला फसू नका. दाढेत जिवंत मृत्यु उभा आहे. थोडे वाटेस जा, म्हणजे समजेल चंद्रहार की कटयार, आणि गळपट्टा की गळा उतरणारा पट्टा आहे तो! रुपेरी पाण्याचा ओघळ आतां नव्हे. आता झाली विषाची लाट. गवताचे गर्दीतून हा विषारी बाण सणाणतो आहे. क्रोधाने इतका दुमडला आहे की, श्वास घ्यायला फुरसूद नाही. नुसता फणकारा चालला आहे. आतां त्याला शीत नाही, उष्ण नाही. पुष्पाचे मृदुत्व जाऊन पाषाणाचे कठोरपण उभे राहिले आहे. अखिल ब्रह्मांडांतील क्रूरता, दुष्टपणा, हिंस्रता एकवटून तुमचे पुढे स्वारी खडी आहे. तिचे आटोक्यांत या, की स्वर्गद्वाराचीच भेट! बरें, देहांत वळवळ तरी किती! वानरापेक्षा ३०२ सुख आणि शांति. [प्रकरण वृक्षारोहणांत तलख, माशापेक्षां जलरतणांत सराईत, रोहीपेक्षा टिपण टाकण्यांत तरबेज, जेठीपेक्षां पिळदार आणि वाघोबांनाही पाणी पाजण्याला समर्थ, असले हे प्रकरण आहे. अशाला माझा दुरून नमस्कार असो." वरील वर्णनांतील प्रत्येक शब्द खरा आहे, असे आपणांस वाटते; परंतु, हे रस्किनने पुढे मांडिल्यावर ! म्हणूनच मामिकाला या सृष्टीत पदोपदी मौजा आहेत; मूढांना काही नाही. लुई कार्नेरो म्हणून एक गृहस्थ शंभरांहून अधिक वर्षे वांचला. त्याने आपल्या वयाच्या एक्याण्णवावे वर्षी एक ग्रंथ लिहिला. त्यांत तो म्हणतो की, “ सृष्टि सुंदर आहे, हे आतां माझे ध्यानात येत चालले आहे." ग्रीक लोक इतके कलाकुशल व शिल्पपटु होते, तथापि सृष्टिसौंदर्याचे बाबतीत ते बहुतेक मूढच होते, म्हटले तरी शोभेल. मोक्षमुल्लरप्रभृति ग्रंथकार म्हणतात, आर्यांच्या ऋग्वेदादि पुराण- ग्रंथांत नुसत्या उषेचे जें अलंकृतिपूर्ण व मार्मिक वर्णन दिले आहे, त्या तोडीचे वर्णन इतर कोणत्याही राष्ट्राच्या पुरातन ग्रंथांत आढ- ळत नाही. या उषेचे वर्णनांतून किती तरी बहारीच्या कथा निर्माण झाल्या आहेत. सूर्यास्तसमयींचा देखावाही असाच दिव्य व अनिर्वाच्य आहे. पण, दृष्टि असेल त्याला. कित्येकांना वाटेल की दृष्टि ती काय ? आम्हीही पहातो. आम्हांलाही डोळे आहेत. पण, डोळे वेगळे आणि दृष्टि वेगळी. ती थोड्यांनाच असते. लबक म्हणतो, ही दृष्टि जर असेल, तर त्या पुरुषाला या जगतांत १२ वें.] सृष्टिप्रेम. ३०३ दुःख विरळच भेटेल. असला पुरुष निर्मळ आकाशाचे नलिवर्णा- कडे किंवा तद्गत तारकापुंजाकडे, किंवा तरंगमाली सागराकडे, अथवा जलाशयाकडे किंवा एकादे अद्रिशृंगाकडे क्षणभर दृष्टि करील, तर सर्व सांसारिक दुःखाची त्याला तत्काल विस्मृतिच पडेल. इतका या वस्तूंत प्रभाव आहे. स्वच्छ व निरभ्र दिवशी, शांत वेळी खुल्या मैदानांत किंवा उपवनांत बसले असतांही ज्या चिंतेला विराम पडणार नाही, ती अत्यंत घोरच म्हणावयाची. अशी चिंता आयुष्यांत विरळाच असणार. कांहीं गूढ किंवा अद्भुत गोष्टींना · अलौकिक ' किंवा अतिसृष्ट ( super-natural) असें काही लोक म्हणतात; पण लबक म्हणतो, सृष्टीचा जर अंतपार कळलेला नाही, तर अमुक गोष्ट तिचे पलीकडची किंवा बाहेरची या म्हणण्यांत काय अर्थ आहे ? गूढ म्हणा, अज्ञात म्हणा, अज्ञेय म्हणा; पण अतिसृष्ट म्हणूं नका. सृष्टि ही रूपाने अत्यंत दिव्य आहे, तरी ती कुलस्त्रीप्रमाणे साधीभोळी व मनाची निर्मळ आहे. पुष्कळ लोक अपरिचिताशी बहुधा मोजकेंच बोलतात; पण चिरपरिचिताशी मन मोकळे करून सर्व गुह्य प्रकाशित करितात; हीच रीति या सृष्टिदेवीची आहे. आमच्या ऋषिवर्गाशी हिची फारच सलगी असल्याने तिचे अंतरंग त्यांना खुले झाले होते. या काळांतही ती श्रद्धावंताचे कानांत आपले गुज बोलते. गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढणारे न्यूटनला तिने हालवून जागा करून विचारले की, “बेटा, तूं शहाणा खरा. पण हे जड परमाणु एकमेकांना ओढतात, हे तुझें म्हणणे ३०४ सुख आणि शांति. प्रकरण गोड दिसते का? याचा नीट विचार केलास काय ?" त्याबरोबर न्यूटननें खाली मान घालून चुकी पदरांत घेतली व सांगितले, " आतां खरा उजेड पडला. जड हा केवळ दृग्भ्रम असून, प्रत्येक जड परमाणूंत चैतन्य अंतर्हित आहे-नव्हे, तो आ-नखान चैत- न्याचेच विशिष्ट रूप आहे. हे रहस्य तुझ्या कृपाप्रसादाने मला पूर्ण कळलें.” नुकते अलीकडे हेच सत्य तिनें जगदीशचंद्र बोस या आपल्या लाडक्या भक्ताचे मुखाने लॉर्ड केल्व्हिनसारख्या निष्णात शास्त्रज्ञाचे पदरी घातले. सारांश, निःसीम भक्तांना या- प्रमाणे ती पुष्कळदां स्वरूपबोध देते. आपले परिणतप्रज्ञ गुरुवर्य डॉ. भांडारकर म्हणतातः- ह्या विश्वांतील वृक्ष, पाषाण, पर्वत, नदी, विस्तीर्ण क्षेत्र, महासागर, आकाशमंडल, चंद्र, सूर्य, आणि असंख्य तारे ह्यांचा हा सर्व पसारा पाहून प्रत्येक पदार्थाच्या स्वरूपाचेच मात्र ज्ञान आपणांस होऊन राहते. आपली बुद्धि इतकेंच ज्ञान होऊन क्षीण होते. पुढे तिची गति कुंठित होते, असे नाही. हे सर्व पदार्थ पाहून अंतःकरणामध्ये विस्मय उत्पन्न होतो; पूज्यबुद्धि उदित होते. परंतु, ते पदार्थ जड आहेत; आणि आम्ही मनुष्य चेतन आहों. चेतनापेक्षा जडपदार्थ हलका, कमी प्रतीचा. त्याजविषयी विस्मय व पूज्यबुद्धि आपल्या अंतःकरणांत उत्पन्न व्हावयाची नाही. पूज्य- बुद्धि आणि विस्मय ह्यांचा विषय चेतन असलाच पाहिजे. तेव्हां पूज्यबुद्धि आणि विस्मय मनुष्यांच्या अंतःकरणांत जर उत्पन्न होतात, तर अवश्यमेव विश्व पाहतांच ही चेतन आल्याची कृति, १२ वें. सृष्टिप्रेम. ३०५ असा प्रत्यय साहजिक रीतीने मनामध्ये उदित झाला पाहिजे; आणि तो उदित होऊन, मग त्या आत्म्याविषयीं पूज्य बुद्धि उत्पन्न होते, असे असलेच पाहिजे. आणि अशा चेतन परमात्म्याची पुष्कळ चिन्हें आपला आत्मा या विश्वामध्ये ओळखून काढितो. यद्यपि पर्वत, दरी, नदी, महासागर, वृक्ष, पाषाण, चंद्र, सूर्य हे अचेतन आहेत, तथापि, त्यांच्या ठायीं जो व्यापार घडत आहे तो एकाच धोरणाने चालला आहे; हे व्यवस्थित आहे आणि त्याज- मध्ये घोंटाळा कांहीं नाहीं; हे एक चैतन्याचे चिन्ह. आणि हे व्यापार चालून नेहमी त्या वस्तूंची स्थिति पालटत आहे आणि अशा क्रमाने कालांतरेकरून पृथ्वीची आणि सर्व विश्वाची अवस्था विलक्षण होऊन जाते. याप्रमाणे सर्वांचे रूपान्तर होते. परंतु, रूपान्तरे घडवून आणण्याकरितां एकसारखा सतत हे व्यापार चालविणारा जो तो एकरूप, तो निश्चल, तो शाश्वत, तो अव्यय, तो अनादि आणि अनंत असाही प्रत्यय अंतःकरणांत सहज उत्पन्न होतो. तसेच हा अपार अवकाश पाहून त्यास जशी सीमा कल्पिता येत नाही, त्याचप्रमाणे त्याचे सामर्थ्य जे सूर्य, चंद्र आणि तारे एथपर्यंत पोहोंचते, त्याजला सीमा कल्पितां येत नाहीं; यास्तव तो देशतः अनादि आणि अनंत आहे. हे विश्व सुंदर, यांतील निरनिराळे पदार्थ अशाप्रमाणे योजिले आहेत की, ते सर्व मिळून एक सुंदर देखावा होतो. कोणत्याही चित्रामध्ये कांहीं एक सौंदर्य आणणे झाले, म्हणजे त्या सौंदर्याची प्रथमतः मनामध्ये आणली पाहिजे, आणि त्या कल्पनेस बाह्यरूप कल्पना २.
३०६ सुख आणि शांति. [प्रकरण देण्याकरितां निरनिराळे अवयव व तन्हे तन्हेचे रंग योग्य रीतीने योजिले पाहिजेत. अशाप्रमाणे मनांत जर प्रथमतः एक कल्पना आणली नाही, आणि त्या चित्राचे अवयव व रंग एकंदरीत त्याचा होणारा जो देखावा त्याकडे लक्ष न देतां कल्पिले, तर अंती तो सर्व मिळून एक सुंदर वस्तु होणार नाही. त्याचप्रमाणे विश्वामध्ये सौंदर्य जर आहे, तर त्या सौंदर्याविषयी कोणाला तरी प्रथमतः कल्पना असली पाहिजे, आणि त्या कल्पनेस बाह्यरूप प्राप्त व्हावे म्हणून निरनिराळ्या पदार्थांची त्याने योग्य रचना केली, असे असले पाहिजे. असा प्रकार नसतां, जर अचेतन शक्तीच्याच व्यापाराने हे विश्व निर्माण झाले असते, तर सर्व पदार्थांची परस्परांच्या संबंधाने अशी योजना झालीच नसती की, त्या सर्वांपासून एकंदरीत विलक्षण सौंदर्य आणि शोभा उत्पन्न व्हावी. आणि कोणत्याही पदार्थाच्या ठायीं शोभा आणि सौंदर्य आहे असे में आपणांस वाटते त्याचे कारण हे की, तो पदार्थ काही तरी शुभ आध्यात्मिक धर्माचें सूचन अथवा प्रकाशन करितो. याप्रमाणे हे विश्व अगाध सामर्थ्य, अनंत शांति, अनंत प्रेम, विलक्षण गांभीर्य, परम आनंद, परम बुद्धि, असीम उन्नति, भनाघनन्तता, इत्यादि आध्यात्मिक धर्माचा प्रकाश करिते. मनुष्याच्या मुखचर्येवर जसे त्याचे आध्यात्मिक धर्म प्रति- बिंबित होतात, त्याप्रमाणे विश्वावर विश्वात्म्याचे धर्म प्रतिबिंबित झाले आहेत. अशा रीतीनें जो विश्वाचे अवलोकन करितो, त्यास परमेश्वराचा साक्षात्कार होतो.
titutitutitutit tatatatatatatat
atatatet takit
प्रकरण तेरावें.
सद्यःकाल.
पु.kaituteketestitutteketaketitutitutiktakat (फटका) असार जीवित, केवळ माया, रडगाणे हे गाउं नका। घेई झोपा तो नर मेला, संशय ह्याचा धरूं नका ॥ध्रु.॥ वस्तुस्थिति ही असार भासे, अंतरि परि बहुसार असे । जाणुनिया हे निजकर्तव्ये मन लावुनिया करा कसे ॥ मेलो म्हणजे मिळविलि, झाले सार्थक, न धरा मनी असें। 'माती अससी, मातित मिळसी,' आत्म्याला हे लागु नसे ।। सुखदुःखाचे भोग भोगणे, हा मुलिं जीवितहेतु नसे । उद्या आजच्यापेक्षा काही पुढेचि जाऊं, करा असें ॥ (चाल) मुकी बिचारी कोणि हका। जशी मेंढरें बनू नका। गेल्या गोष्टी स्मरूं नका। गतकाळाचा शोक फुका ॥ पुढचा भासो कितिहि सुखाचा काळ, भरंवसा धरूं नका। असार जीवित०॥१॥ जाते घडि ही अपुली साधा, काय कार्य ते अतां करा । चित्तामध्ये धैर्य धरा हो, हरिवर ठेवा भाव पुरा ॥ थोर महात्मे होउनि गेले, चरित्र त्यांचे पहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावें, हाच सांपडे बोध खरा ॥ चाल) उठा उठा, तर, निजू नका। "होइल कैसे" म्हणू नका। कशाहि विघ्ना भिऊ नका। दीर्घोद्योगा सोडु नका ॥ 'धीर धरी तो गंभीर,' असे शिका शिका रे विसरूं नका। असार जीवित० ॥२॥ -(लाँगफेलो) ह. ना. आपटे.
प्रकरण तेरावें. सद्यःकाल. (श्लोक). वर्तमानेन वर्तन्ते । नराः पण्डितबुद्धयः ॥ श्वः कार्यमद्य कुर्वीत । पूर्वाण्हे चापराह्निकम् ॥ १ ॥ -महाभारत. । - (श्लोक) न कश्चिदपि जानाति । किं कस्य श्वो भविष्यति ।। अतः श्वः करणीयानि । कुर्यादथैव बुद्धिमान् ॥ १ ॥ -सुभाषित. भावार्थ: -उद्यां कोणाचे काय होईल हे कोणासच कळत नाही. यासाठी शहाण्याने उद्यांचे कर्तव्य आजच करून घ्यावे. (श्लोक) ये एकदांचि उदया अनुकूल वेळा । ती साधिल्या करि अखंड समुन्नतीला ॥ जो मंदबुद्धि परि ती दवडील वायां । आजन्म दुःखचि तया, शिणवृनि काया । ---शेक्सपिअर. कालाचे तीन भाग:-भूत, भविष्यत् , वर्तमान. किंवा अतीत, अनांगत आणि सद्यःकाल. यांपैकी जो भूत किंवा अतीत तो आपले हातून कायमचाच निसटला, पुनः हाती लागणारच नाही. अनागत किंवा भविष्यत् तो आला तर आपला; पण या क्षणिक जीवि- तांत तो येईलच असा नियम नाही. राहतां राहिला वर्तमान किंवा चालू काळ. तोमात्र आपले हाती असतो. याकरितां शहाण्याने ३१० सुख आणि शांति. [प्रकरण - काय करणें तें या चालू प्रवाहांत साधून घ्यावे. उद्यांवर विश्वसू नये. केपिस म्हणतोः (श्लोक) कार्य कराया, युद्धा जाया । किंवा स्वाभ्युनती कराया ॥ सद्यःकालचि साधक जाणा । उद्या करूं हा व्यर्थ बहाणा ॥१॥ आपण शतायु आहों, ही भावना घातक होय. शहाण्याने चालू क्षण तेवढा आपला असे समजून त्याचे सार्थक सर्वात्मना करीत असावे; पुढल्यावर हवालू नये. कारण, " दीर्घसूत्री विन- श्यति " असा ज्ञात्यांचा अभिप्राय आहे. चालू क्षण साधून इष्ट तेमात्र नेटाने आरंभावे, म्हणजे ते सिद्धप्रायच समजावे. आणि तेंच कां दिरंगाईवर टाकिलें म्हणजे ते रेंगाळलेच; त्याचे कपाळच तें. मोठे मार्कण्डेयाचे आयुष्य झाले, तरी देखील त्याला अंत हा आहेच. यासाठी या ओले मातीचा भरंवसा धरूं नये. साधेल तेवढे स्वहित साधीत असावे. कारण, "कोण दिवस येईल कैसा । नाहीं देहाचा भरंवसा ॥" म्हणून काही धावाधांव करीं । जंववरि मृत्यु आहे दुरी ॥” हा उपदेश आवर्जून पाळावा. आपलेकडे जसे साडेतीन शहाणे होऊन गेले, तसे ग्रीस देशांत पूर्वी सात शहाणे प्रसिद्ध होते. त्यांपैकी पिटॅकस नांवाचा एक होता. याचें नांव शहाण्यांचे यादीत पडण्यास मुख्य कारण हेच की, तो मोठा कालनेमी होता. तो ज्याला त्याला “ वेळ साधा, वेळ म्हणून उपदेश करी. शेक्सपिअर म्हणतो, "ठिणगी आहे तो हाताने विझविता येईल. पण, उपेक्षेने तीच साधा" १३ वें.] सद्यःकाल. ३११ एकदां भडकली म्हणजे मग विहीर कोरडी करूनही विझण्याची शंकाच." तसेच, कार्य एकदां हाताबाहेर गेलें म्हणजे सुधारणे कठिण. द्रव्यापेक्षाही वेळेला तिळ तिळ जपणे अगत्याचे आहे. गेलेला पैसा प्रसंगाने पुनरपि मिळेल, परंतु वेळ मिळणे शक्यच नाही. तो अनावर्ती आहे; आणि म्हणूनच शास्त्रापुराणांतून सर्वत्र ज्ञात्यांनी आयुष्याच्या क्षणिकत्वाचे मूल्चे कानांशी डंके पिटले आहेत. बरें, मनुष्येही तोंडाने आयुष्य क्षणिक क्षणिक म्हणून घोकीत असतात; पण वागतांना मात्र अशी निसूर वागतात की, जसे काही त्यांना कल्पाचे आयुष्य आहे. पढतमूर्खपणा तो आणखी कसा असतो ? सत्पुरुष कानी कपाळी ओरडतातः ॥ घटका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा । आयुष्याचा क्षय होतो, राम कारे म्हणाना ॥' हे शब्द कथाकीर्तनांत ऐकू आले म्हणजे तेवढे लोक माना डोलवितात, आणि घरी आले की बेहोष चालतात. अशांकडे पाहून वामनपण्डित म्हणतात, "कशी या लोकांला बहुत चढली मोहमदिरा!" आमच्या पूर्वजांनी भाषेत जे शब्द घडले आहेत, तेच इतके खुबीदार आहेत की, त्यांचा जो सम्यक् अर्थ ध्यानांत घेईल त्याला निराळे बोधक व्याख्यानच नको. कालाचे लघुतम मान सुच- विणारे आमच्या भाषेत 'पळ, विपळ' हे शब्द आहेत. हे स्वतःच काळाचा पळपुटेपणा क्षणक्षणी दाखवीत नाहीत काय ? , ३१२ सुख आणि शांति. [ प्रकरण आयुष्य टीचभर आहे. क्षण' हा शब्द देखील कालाचें क्षयशीलत्वच दाखवितो आहे. परंतु आम्ही डोळे असून आंधळे, कान असून बहिरे बनल्यावर, शब्दांनी काय करावें? बेकन म्हणतो, आणि जगत् हा बुडबुडा आहे. एक कवि म्हणतो (श्लोक) पळ, पळ, पळ ऐसे काळ आयुष्य नेतो जननि म्हणत माझा बाळ हा थोर होतो ॥ मरण जवळ येतें थोर होणे कशाचें । हर हर ! किति वणू मौर्य हे मानवाचें ॥ १ ॥ पण हा प्रकार मूढांचा झाला. शहाणे लोक काळाचे ठकबाजीला भीक घालीत नाहीत. ते तो येतांच त्याचा कान धरून आपले काम साधून घेतात, आणि मग तो पळाला, तरी अर्थातच त्यांची काही हानि करूं शकत नाही. असे सांगतात की, वाईचे रास्त्यांना . आपण आतां जाणार, ' म्हणून राज्यलक्ष्मीने स्वप्नांत दृष्टान्त दिला. तो ऐकून विचक्षणांनी त्यांना अशी सल्ला दिली की, 'ठीक आहे; तिला धर्माने बांधून टाकावी आणि म्हणावें आतां खुशाल जा. रास्त्यांनीही त्याप्रमाणे कृष्णातीरचे विस्तीर्ण घाट व देवालयादि धर्मकृत्ये करून तिला बांधूनच टाकिरी. याचप्रमाणे ज्ञाते काळा- लाही ठकवितात. तुकाराम म्हणतात, "गांठी पडली ठकाठका, त्याचे वर्म जाणे तुका ॥"..-तशांतली ही मौज आहे. बिशप फुलर म्हणे: एकादा सद्वर्तनी मनुष्य अल्पवयांत मेला, तरी तो मी दीर्घायुच समजतो. कारण, नुसते शंभर वर्षे जगण्यांत काय मतलब? " श्रीमच्छंकराचार्य अवघे बत्तसि वर्षेच १३ ३.] सद्यःकाल. ३१३ जगले. पण त्यांनी जी कामगिरी केली ती दुसन्याच्या हातून बत्तीस पिढ्यांतही झाली नाही. विष्णुशर्मा म्हणतो- (श्लोक) यजीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्य । विज्ञान-विक्रम-यशोभिरभज्यमानम् ।। तन्नाम जीवितमिह प्रवदन्ति सन्तः । काकोऽपि जीवति चिराय बलिं च भुंक्ते ॥ ७ ॥ भावार्थ:-ज्ञान, पराक्रम, सद्यश यांच्या अर्जनांत घालविलेले जीवित अल्पच का होईना, सार्थ आहे. नाही तर कावळाही उष्टी चिवडीत हजार वर्ष जगतो! काय चीज? मनुप्ये तरी त-हेवाईक असतात. मृत्यु कोणासही नको. अर्थात् आयुष्य त्यांस महत्त्वाचे वाटते. पण, वागणूक पहावी तों आयुप्य जणूं त्यांना भारभूत झाले आहे, अशी असते. असो. ज्यांना आयुष्याची किंमत कळत असेल त्यांनी तरी त्याला कृपणापेक्षा अधिक जपावें; आणि त्याचा व्यय करणे तोही फार तजविजीने करावा. पुढे काय करणे त्याचा आगाऊ बेत बसवून ठेवावा, म्हणजे धांदल होऊन काम न बिघडतां सुयंत्रपणे होते. आज जें करितां येणे शक्य आहे, ते तर उद्यांवर कधीच ढकलू नये. थीम्स प्रांताचा गव्हर्नर अर्चिआस याला 'सावध रहा' म्हणून एक पत्र आले होते; परंतु त्याने या पत्राचा विचार उद्या' असे म्हणून तें एकीकडे ठेविलें, आणि तेवढ्या दीर्घाईमुळे तो प्राणास मुकला. न्यूकॅसलचा ड्यूक सकाळचा एक तास व्यर्थ दवडून मग सारा दिवस हळहळत बसला. याकरितां प्रत्येक क्रिया यथाकालच ३१४ सुख आणि शांति. [प्रकरण . करावी; व ती सुरळीत व्हावी, म्हणून उदयीक काय काय कामें करणे त्याचा क्रम आदले रात्री जुळवून ठेवावा; म्हणजे वेळ फुकट जात नाही, आणि त्रासही होत नाही. मुंबईसारख्या शह- रांत जेथें अल्पप्राप्तीचे कुटुंबांस नाकपुडीएवढे खोलीत संसार करावा लागतो, तेथे जे टापटिपीचे लोक असतात त्यांच्या खोल्या तेवढ्याच असून प्रशस्त वाटतात, आणि जे अव्यवस्थित असतात, त्यांच्या खोल्यांत बसायलादेखील धड जागा सांपडत नाही. हाच भेद व्यवस्थित आणि अव्यवस्थित यांच्या कार्ययोजनेंत आढळतो. बेंजामिन काम्टंट म्हणे:-" काय करावे ? माझा वेळ किती तरी व्यर्थ जातो. काही केल्या कामाचा मेळच बसत नाही." आप- ल्यांत म्हणच आहे " आळशाला दुप्पट काम. " तेच खरे. जे टिपदार लोक आहेत ते गचाळांचे चौपट काम करूनदेखील अधिक रिकामे असतात. यांतील रहस्य म्हणजे व्यवस्थितपणा. पुढे काय करणे त्याचे धोरण आगाऊ बांधणारा कधीं फसत नाही; आणि वेळ येईल तेव्हां पाहूं म्हणणारा अवसानी हुकतो. हितो- पदेशांत म्हटले आहे: (श्लोक) अनागतविधाता च । प्रत्युत्पन्नमतिस्तथा ॥ द्वावतौ सुखमेधेते । यद्भविष्यो विनश्यति ॥ १ ॥ भावार्थ:---पूर्वीच तरतूद करणारा, किंवा ताबडतोब काम बजावणारा हे दोघे सुख पावतात. होईल तसे होईल म्हणणारा नाश पावतो. आयुष्य हे अत्यल्प आहे, इतकेच नव्हे; पण, आणखी तें अनि- श्चितही आहे. शंभरांचे ऐवजी पाउणशे वर्षे पत्करतीं, परंतु ती .
१३ ३.] सद्यःकाल. ३१५ तरी ठरीव पाहिजे होती. ते काहीच नाही. पुढल्या क्षणाचा भरं- वसा नाही, मग मासवर्षांचे तर बोलणेच नको. तोंडांत घात- लेला घांस पोटांत उतरण्यापूर्वी, किंवा नुसत्या शिंकेबरोबर, धड्या- खड्या माणसांचा प्राण गेल्याची शेंकडों उदाहरणे आहेत. म्हणून शहाण्याने प्रत्येक क्षण हा शेवटचा समजून त्याचा अत्युत्तम व्यय करीत असावें. विष्णुशर्मा म्हणतो: (श्लोकार्ध) गृहीत इव केशेषु । मृत्युना धर्ममाचरेत् ।। भावार्थ:--मृत्यून शेंडीला हात घातलासे समजून धर्मकृत्य नेटाने करीत जावें. कधी कधी मनुष्याला अनेक कार्ये असली म्हणजे प्रथम कोणते करावे हा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांना तर हमेष हा अनुभव आहे. अभ्यासांत सरस, नीरस अनेक विषय असतात, पैकी प्रथम कोणता हाती घ्यावा, हे त्यांना गूढ पडते. अशा वेळी जो नीरस असेल तोच पहिल्या तोंडी घेणे बरें. ताज्या दमांत तो रेटून जातो, आणि मग थकल्यावर सरस असेल तो स्वभाव- सरसतेनेच प्रिय होतो; मिळून सारे ठीक होतात. हीच गोष्ट व्यवहारालाही लागू आहे. अवघड कामें तारुण्यांतच करावी. तीर्थाटन वगैरे वृद्धावस्थेवर ढकलण्याचा पुष्कळांचा परि- पाठ आहे; परंतु, अंगांत रंग आहे तोच ते उरकले पाहिजे. पण कांहींचा समज तारुण्याचा काळ म्हणजे फुलाच्या झेल्यासारखा, तो हळुवार सुखांत गेला पाहिजे; वार्धक्य म्हणजे मुदतीबाहेर सुख आणि शांति. [प्रकरण गेलेल्या खतापैकींच, त्यांत काही हाती लागले वाहवा, न लागले वाहवा, असे आहे. पण ही चूक आहे. तारुण्य हाच कष्टाचा काळ समजून मेहनतींत दवडिला पाहिजे. मात्र तारुण्यांत अनुभव कमी असल्यामुळे अविचार होतो, याकरितां अनुभवी वृद्धांच्या बुद्धीने चालावे. म्हण आहे: वृद्धस्य वचनं ग्राह्यं । आपत्काले ह्युपस्थिते ॥" संकटसमयीं बुढ्याचे ऐकावे. याप्रमाणे वृद्धांचा अनुभव व तरुणांची उमेद या दोहींचा जोड जमला म्हणजे कस- लेही अवघड काम उलथून टाकितां येते. याकरिता तसे वागून उमेदीत वाटेंतला खडागुंडा काढून वाट चोखळून ठेवावी आणि मग वृद्धपणीं सुखाने डोळे मिटून चालावें. काल हा निर्दयही आहे आणि दयाही आहे. शेकडोंची त्यानें- च धुळधाण केली आहे, शेकडोंना त्यानेच सौख्यशिखरावर नेले आहे. जोबर्ट म्हणतो, काल हा कोणाला गोंजारतो, कोणाला पोखरतो, कोणाला चिरडतो, कोणाला वर ओढतो, कोणाला जोडतो, कोणाला वेगळे काढतो. ” सारांश, तो जशास तसा असतो. कित्येकांचे पहावें तों पूर्ववय भरल्या घोसांत असतां उत्तर वय विपत्तीत पडते. कित्येक पूर्वी कोरान्न मागणारे उत्तरकाली स्वतः धर्मार्थ अन्नसत्रे घालण्याइतके समर्थ होतात. ज्याने काळाचा जसा व्यय केला, तसे तो फळ पावतो. उघडच आहे: (श्लोकार्ध) लोके गुरुत्वं विपरीततां वा । स्वचेष्टितान्येव नरं नयंति॥ हितोपदेश. भावार्थः-स्वकृतीनेच उच्च-नीचावस्था प्राप्त होत असते. .
१३ वें.] सद्यःकाल. ३१७ आयुष्य क्षणिक आहे. जातो आहे क्षण तो आपला. पुढचा कोणी पाहिला आहे, करितां हाच साधून घ्या." इत्यादि जे सत्पु- रुषांचे उपदेश आहेत, ते आयुष्याचे महत्त्व ओळखून जनांनी त्यांतील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा, एवढ्याच मतलबाचे आहेत. परंतु काही लोक कधी कधी या शब्दांचा भलताच भाव काढितात. ते म्हणतात, आज चैन करा, भोगून घ्या. आपल्या- मागें बसेना सावकार कोकलत ! आप मेला, जग डुबाला. आज तो कर्ज देतो आहे तो 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ' हे चालू द्या. पण, हे निव्वळ मूर्खत्व आहे. सदुक्तीचा हा विपरीतार्थ करणे आहे. 'पुढले कोणी पाहिले आहे ?' हे सांगणान्या सज्जनांचा भाव कृतीचा परिणाम न पाहतां चालावें, हा नव्हे. चालू क्षण पुन्हा येणार नाही, तथापि प्रत्येक क्षणाचा परिणाम चिरस्थायी होणार आहे; आणि म्हणूनच तो निरंतर सत्कारी लावीत जा, या अर्थाचें हे त्यांचे सांगणे आहे. सारांश, आयुष्य हे दुर्मिळ आहे हे अखंड ध्यानांत वागवून दूरदृष्टीने व दृढनिश्चयाने चालावे; व जी गोष्ट करणे ती अशी करावी की, तिजबद्दल पस्तावण्याचा प्रसंग येणार नाही. युरोपांत पुष्कळ उल्लू तरुणलोक गुलाबी गालांना भुलून सदिशी लग्नाचा सवदा करून जातात; पण, अल्पकाळांतच त्यांना असा अनुभव येतो की, तो गुलाब कृत्रिम होता, आणि कांटे मात्र कायम अंगचे आहेत. आणि मग ते हात चोळीत बसतात. लबक म्हणतो, हा अविचाराचा प्रकार केवळ लमाचेच बाबतींत आहे असे नव्हे, ३१८ सुख आणि शांति. [प्रकरण अविवेक्यांच्या प्रत्येक कृतीचे हेच कपाळ आहे. आयुष्य क्षणिक झाले म्हणून ते घाईघाईनें कसें तरी खर्चावें, असे नव्हे. प्रत्येक क्षण विचारपूर्वकच कामी लाविला पाहिजे. कारण- (श्लोक) गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यमादौ । परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन ॥ अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्ते । भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः॥१॥ -----भर्तृहरि. भावार्थ:-बरें, वाईट काही करणे तरी पल्ला पाहून करावे. भसकन काही तरी करून गेल्यास आजन्म हळहळत बसावे लागते. शहाणे शहाणे लोकांतदेखील असे म्हणणारे आहेत की, पूर्वीचा काळ चांगला, चालू काळच खोटा. परंतु, हा निव्वळ भ्रम आहे. भारतात जसे म्हटले आहे की, राजा कालस्य कारणम् त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य आपल्या पुरता राजा व आपल्या काळाचा कर्ता आहे आणि तोच आपला काळ बरा किंवा वाईट करूं शकतो. आज कलियुगही आहे आणि सत्ययुगही आहे. आपण ज्या भावनेचे असूं त्या भावनेचा काल होतो, हे समजून सर्वांनी त्याला सत्ययुगाचे रूप देण्यास झटावे व त्याचे अमूल्यत्व आणि अनावर्तित्व ही डोळ्यांपुढे सारखींच ठेवून वागावें.
vasaras saules statistics
Geretettettstedet
प्रकरण चौदावें.
वैदग्ध्य.
MP FE
tutter
tettet
testeritiedotteetettete
(आर्याचरण)
किं वैदग्ध्यमशोकः ।
-आचार्यकृत रत्नमाला.
भावार्थः-खरें चातुर्य कोणते ?-कोणत्याही गोष्टीबद्दल
शोक करीत न बसणे.
( आर्याचरण)
ज्ञानलव-दुर्विदग्धं ब्रह्मापि नरं न रंजयति ॥
-भर्तृहरि.
भावार्थ:--ज्याला पुरे वैदग्ध्य आले नाही-जो चुटमुटत्या
ज्ञानाने केवळ अर्धवट संस्कृत झाला आहे-अपल्या
अर्धवटाची समजूत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालादेखील घालतां येणें
मुष्किलीचे आहे.
प्रकरण चौदावें. वैदग्ध्य. (आर्या) कैसें वैदग्ध्य असे । कोठे बुद्धीस सांग आधार ।। वैदग्ध्य, ईशभक्ती । सद्बुद्धी जाणिजे सदाचार ॥ १ ॥-जाब (श्लोकचरण) या लोकद्वय-साधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी । -सुभाषित. भावार्थ:-जिचे योगाने मनुष्यांना उभय लोक साधितां येतील त्या चतुराईलाच खरी चातुरी म्हणतात. आमचे एका स्नेह्याची आई म्हणे, “ सर्वस्व द्यावे आणि शहा- णपण ध्यावे.' उत्तरेकडील सागास नामक एका ग्रंथांत लिहिले आहे की, शहाणपणाच्या झन्याचे एक घोट पाणी पिण्यास मि- ळावे म्हणून वोटन याने त्या झऱ्याचे तिमिर नामक रखवालदार राक्षसाला आपला एक डोळा काढून दिला. आजकाल शहाण- पणाचा असला अवचट मोबदला आपणांस द्यावा लागत नाही, हे सुदैव आहे. आपण सारेच जरी बृहस्पति किंवा शुक्राचार्य झालों नाही, तरी अभ्यासाने आपणांस आपली विवेकदृष्टि वाढवितां येईल; व 'पुढल्यास ठेच, मागला शहाणा' या न्यायाने दुस- न्यांचे अनुभवाने शहाणे होता येईल. सिसिरो म्हणतो की, वैदग्ध्य किंवा चातुर्य ऊर्फ शहाणपणा याची व्याख्या पुराण तत्त्वज्ञांनी ३२२ सुख आणि शांति. [प्रकरण .. ~ केली आहे ती अशी: "देवी व मानुषी गोष्टींचें, अथवा व्यव- हार व परमार्थ यांचे जे सोपपत्तिक ज्ञान तेच वैदग्ध्य अथवा चातुर्य म्हणावें. आणि हे ज्याचे ठिकाणी नाही किंवा असल्या ज्ञानाविषयी ज्याचे ठिकाणी आदरबुद्धि नाहीं, तो आदरास पात्रच नाहीं; तो मनुष्यच नव्हे." पर्कास म्हणतो, " विवेक आणि स्फुटवाचा ह्या दोनच गोष्टी पशूहून निराळेपणाच्या मनुष्याजवळ निशाण्या आहेत. या दोहों- तही वाचाशक्तीपेक्षां विवेकशक्ति हीच अधिक महत्त्वाची निशाणी आहे. हिच्यांत कमीपणा असेल तर मोठेच अनर्थ होतात. एका- द्याची नुसती वाचाशक्ति बळकट आहे, पण तिला जर विवेक- शक्तीचे पाठबळ नसेल, तर तीमुळे अनेक संकटें उत्पन्न होतील. वक्ता सभेत उभा राहिला असतां श्रोत्यांचे मनोगत काय असावे, हे त्याला प्रथम विवेकानें ताडता आले पाहिजे आणि तदनुसार त्याने आपले वक्तृत्व केले पाहिजे; नाही तर तो वायफळ वक्ता समजला जाऊन उपहासासमात्र पात्र होईल. जे आपणांस खरे राजकारणी म्हणवितात त्यांचे अंगी बोलक्यापेक्षा मुक्याचे इंगित ओळखण्याची चातुरी अधिक पाहिजे. वक्तेमंडळींत, प्रत्येकाला अमुक एक प्रसंगी आपण वाजवीपेक्षा काही तरी फाजील बोलून गेलों अशाबद्दल पस्ताव्याची पाळी आलीच असणार; परंतु, मितभाषणाबद्दल अनुतापाचा प्रसंग विरळाच. म्हण आहे “ सबसे चूप भली" त्याप्रमाणे मौन हे तर बावनकशी सोनेच आहे. पण, भाषणाला कधी कधी रुप्याची.
वैदग्न्य. . ३२३ देखील उपमा देता येत नाही. शहाण्याने साधेल तो कान, डोळे उघडे ठेवावे आणि तोंडमात्र बंद ठेवावें. सेंट बर्नर्ड म्हणे, भाषण करणाराने खाली, वर, पुढे, मागें व सभोवार पाहून म्हणजे सर्वांगी विचार करून मग बोलावे." फ्रेंच भाषेत म्हण आहे की " विचाराची तूट तेथें भाषणाला ऊत." ही पुष्कळदां प्रत्ययास येते. पूर्ण विचारी बहुधा मितभाषीच असतो. कारण, अस्थानी व अप्रासंगिक भाषण व्यर्थ जाते. श्रोता जर नादान असेल तर वक्त्याचे चातुर्याची माती होते. यासाठी मूल्स उपदेश करीत बसू नये. मूर्ख लोक शहाण्यांपासून जितका बोध घेतात, त्यापेक्षां शहाणेमात्र मूखींपासून अधिक बोध घेऊ शकतात. दीर्घसूत्रता हा दोष खरा; पण जनहिताचे कायदेकानूसारख्या महत्त्वाच्या विषयांत पुष्कळदां त्वरेपेक्षांदीर्घताच बरी पडते. अशा कामी तडकाफडकी कायदे करून सोडणे अतिशय मूर्खपणाचे आहे. सृष्टींचा क्रम पाहिला तर सावकाशीचाच दिसतो. मॅडम डी. सेविनी म्हणे, थोडयाशा धिमाईने पुष्कळसा पस्तावा वांचतो." हे सांगणे मुत्सद्दीपणाचंच खरे, पण ते अमलांत आणण्याचे मात्र सदाच साधत नाही. ब्रीनिंग म्हणे, तर असह्य झालेले असते आणि निर्णय तर लवकर होत नाही.' अशी कधी कधी पंचाईत पडते. एकादे वेळी आकस्मिक अशी गळचेप येऊन बसते की, बसल्या बैठकीस एक घाव दोन तुकडे करणेच प्राप्त येते. तसे न करावें तर सोय नाहीं; करावें तर कायमचा विघाड होण्याचे भय असते. अशा वेळी त्वरित योग्य दुःख ३२४ सुख आणि शांति. [प्रकरण मार्ग निवडणे फारच चतुराईचे काम आहे. लॉर्ड मेलबूनचा नेहमींचा प्रश्न असे की "हे काम असेंच पडू दिले तर काय होईल ?" लबक म्हणतो, आमचे कायदेकारी मंडळीची निमे कामगिरी मागे घाईघाईने किंवा अविचाराने करून सोडलेले कायदे रद्द किंवा दुरुस्त करण्यांत असते ! ठिकाणी काही नसतां पुया चौकशीवांचून काही तरी गैर गोष्ट आहेसे गृहीत धरून लगेच तिचे परिहारार्थ कायदा खरडून हे बहादर पार होतात, आणि मग फजीत पावतात. या करण्यांत काय हशील ? घड्याळ जलद चालण्यांत मातब्बरी नाही; तें सारखें आणि सुयंत्र चालण्यांत आहे. हाच न्याय कायदे करण्यास लागू समजावा. कोणतीच गोष्ट घाईघाईने करून जाण्यांत शहाणपण नसतें. आणि त्यांतले त्यांत एकादें गूढ काम आले म्हणजे तर पडून रहावें हेच बरे. रात्रीचे शांत समयीं झोंपी जातांना आपले मनाला तो गूढ प्रश्न घालून ठेवावा, म्हणजे मन झोपेत आपल्या न कळत त्याचा विचार करून सकाळला समर्पक उत्तर तयार ठेविते; आणि हे उत्तर बहुधा मोठे सयुक्तिकही असते व त्यास अनुसरून चालले असतां सहसा पश्चात्तापाची पाळी येत नाही. प्राप्तकार्याबद्दल थोडा वेळ झोपी गेलेले बरें; पण तें अविचाराने कसे तरी सारून . मग अंथरुणावर तळमळत पडणे बरे नव्हे. ग्रेशन म्हणतो, " मनुष्याची स्मृति कधी कधी असा दुष्टपणा करते की, ती त्याला ऐन अवसानी आपणच फसविते आणि पुनः त्याला त्याचे हानीबद्दल वारंवार टोचीत राहून तळमळविते. " स्वस्थ बसणे सो; परंतु हातून एकदां भलतेच भळतेच होऊन गेल्यावर तें निस्तरणे फार कठिण.
१४ ३.] वैदग्ध्य. ३२५ यासाठी कोणतेही करणें तें सावकाश व विचारपूर्वक करीत जावें, म्हणजे आजन्म तळमळण्याची पाळी येत नाही. एकादे कामांत मनुष्य हुकला असतां, आपणास स्मृतीने फसविलें' म्हणून ओरडतो; पण आपणास ज्ञान नव्हतें हें कांहीं तो कबूल करीत नाही. कारण आपण ज्ञानहीन आहों, असें कोणासच वाटत नाही. असे जरी आहे तरी जगांत ज्ञान ही इतकी सवंग जिन्नस नाही; ती मोठी दुर्मिळ आहे. मोठमोठ्या राजांना द्रव्य- राशी खर्चिल्याने किंवा अधिकारसामर्थ्याने प्राप्त होणारी ती नाही. ही ज्ञानाची गोष्ट; आणि शहाणपणा किंवा चतुराई ही तर ज्ञाना- चेही पलीकडील पायरी आहे. बाकी, ज्ञान ही अशी काही मोहक वस्तु आहे की, एकदां तिची गोडी लागली की ती पुरेशीच होत नाही. ती अधिकाधिक असावीसेंच वाटते. पितर दि ग्रेट राजा हा मोठा ज्ञानेच्छु होता. त्याने असा निश्चय केला होता की, या आयुष्यांत जेवढ्या म्हणून गोष्टी पहाता येतील तेवढ्या पहावया- च्या, ऐकू येतील तेवढ्या ऐकावयाच्या आणि शिकण्यायोग्य असतील तितक्या शिकावयाच्याच. सारांश, मिळेल ज्ञान तितकें संगृहीत करावयाचे अशी त्याला ज्ञानाची अत्यंत आवड होती. मार्टिनोचे असे म्हणणे आहे की, आपण सर्वज्ञ झाल्यास आपणांस ज्ञानाचे महत्त्वच वाटेनासे होईल. " पण हे म्हणणे चुकीचे आहे. ज्ञानाचे कौतुक ज्ञानी जितकें करील तितकें अज्ञा- न्याचे हातून होणार नाही: गुणाचे मोल गुणज्ञच करूं शकतो. पंडितांपेक्षां अज्ञानी लोकांत भक्ति किंवा देवाविषयी आदरबुद्धि दृढ असते असे जरी कधी कधीं आढळून येते, तरी खुद्द भगवंतांनी ३२६ सुख आणि शांति. [प्रकरण भगवद्गीतेत चार प्रतींचे भक्तांतून ज्ञानी भक्ताचीच पायरी श्रेष्ठ गणिली आहे. अर्थात् सज्ज्ञानाने आदरबुद्धि कमी होते हे म्हणणे मृषा आहे. ज्ञान्याला या चमत्कृतीबद्दल विश्वाची जों जो अधिक माहिती होते तो तो त्याच्या कर्त्याविषयी त्याची प्रेमबुद्धि अधिका- धिक ठसावत जाते. आणि ही गोष्ट अन्यत्र मार्टिनोनेंच कबूल केल्यासारखी आहे. कारण, एके स्थळी, ज्या अनंताचे साम्रा- ज्याचे आपण प्रजाजन आहों त्याचेकडे डोळे लावावयाचे सोडून आपण क्षुद्र मानवी कृतीचेच कौतुक करण्यांत दंग असतो, या करणीला मार्टिनो दोष देतो. सालोमन हा ज्ञान व चातुर्य यांचे साहचर्य मानीत असे; व तो म्हणे, “ईश्वराविषयी आदरभाव हाच ज्ञानाचा उगम होय; पण मूर्खाना चातुर्याचा, तसाच उपदेशाचाही कंटाळा असतो. अन्यस्थळी तो म्हणतो, " चातुर्यदाता प्रभुच आहे. आणि ज्ञान व बुद्धिशक्ति ही त्याचेच कृपेनें मनुष्याला मिळतात." गीतेतही भगवान् म्हणतातः मत्तः स्मृतिनिमपोहनं च"-बा अर्जुना, प्राण्यांचे ठिकाणी असलेली स्मरणशक्ति, ज्ञानशक्ति व तर्कशक्ति यांचा उगम मीच आहे." सालोमन म्हणतोः (श्लोक) चातुर्ये रचिली धरा विपुल ही त्या विश्वशिल्पाकरें। तैसें बुद्धिबलें अनंत उपरी आकाश हे निर्मिले। त्याच्या ज्ञानबले अधोतरं नभी मेघवजीतें स्थिति । तच्छब्दंच तुषार, वार, करको पाथीदे हे वर्षति ॥३॥ १ मेघसमुदायांस. २ गारा. ३ मेघ.
१४ ३.] वैदम्ध्य. ३२७ ज्ञान हे कच्चा माल पुरविते; चातुर्य त्याचा योग्य विनियोग करितें. चातुर्यावांचून ज्ञान निरुपयोगी आहे. हिंदुस्थानांत कच्चा माल विपुल आहे, परंतु त्याचा सदुपयोग कसा करावा ही चातुरी आजकाल हिंदुस्थानांत नाही. यामुळे " झाड सत्यभामेचे घरी आणि फुलें रुक्मिणीचे दारी' असे झाले आहे. अर्थात् वैद- ग्ध्याची किंवा चातुर्याची पायरी ज्ञानाचे वरची आहे. ज्ञान म्हणजे एकादे विषयाची कच्ची माहिती, आणि चातुर्य म्हणजे त्या माहि- तीचा इष्टार्थसाधनाकडे विनियोग कसा करावा ही हिकमत. म्ह- णून ज्ञानाहून चातुर्य विशिष्ट. पण चातुर्याहूनही सदाचरणाची महती विशिष्ट. कारण, अंगी ज्ञान आहे, चातुर्यही आहे; परंतु तदनुरूप आचरण नाही, तर काय फल ? श्रुतीत सांगितले आहे की, आचारवान् पुरुषो वेद। म्हणजे ज्याचें ज्ञान आचरणांत उम- टलें तोच खरा ज्ञानी." यः क्रियावान् स पण्डितः " "क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।" ही सर्व वाक्ये हेच सत्य सांगतात. सालो- मननें चातुर्य व सदाचार यांची प्रशंसा पुढीलप्रमाणे केली आहे:- (श्लोक) सदाचार, चातुर्य ही दोन रत्ने । जगी धन्य जे मेळवीती प्रयत्नें ।। उणे त्यांपुढे राज्य लोकत्रयाचें। मणी-हेम-रौप्यादि तेथे कशाचें ॥ १ ॥ दीर्घायुता धनिकता बहुमान्यताही । चातुर्ययुक्त मनुजास अलभ्य नाहीं ॥ आनंद-शांति-सुख-सौहृद सर्वदाही । स्वर्वल्लरी करगताच विदग्धता ही॥२॥ शहाणे दुसंन्याला ठेच लागलेली पाहतांच सावध होतात; मूर्ख स्वतःला ठेच लागूनही डोळे उघडीत नाहीत. सदुपदेशाने ।
३२८ सुख आणि शांति. [प्रकरण सुधारणे हा उत्तम पक्ष. हे खऱ्या शहाण्याचे लक्षण. ठोकर लाग. त्याने सुधारणे हा मतिमंदांचा पक्ष. हा ठेच खाऊनही शहाणे न होणारांपेक्षां बरा. शहाणा नुसत्या शब्दाचे इशान्याने जागा होतो. मूर्खाला टोणपे घालावे लागतात. 'शब्दांनी शहाणे होण्या- पेक्षा ठेच खाऊन शहाणे होणे अधिक क्लेशावह असते; पण मूर्खाना तेच आवडते. ते दुसऱ्याने सांगून ऐकावयाचे नाहीत. बरें, अनुभवापासून उपदेश घेण्यालाही अक्कल लागतेच. एक फ्रेंच म्हण आहे की, "पाळलेले मांजर थंड पाण्यालाही मितें." किंवा आपल्यांत म्हण आहे की, " बाल: पायसदग्धो दध्यपि फूत्कृत्य भुंक्ते। (दुधाने तोंड पोळले म्हणजे पोर दही, ताक देखील कुंकून खालें)" त्याप्रमाणे अनुभवावरूनही मूर्ख भलताच धडा घेतात. पुष्कळांना 'मी शहाणा, मी व्यवहारचतुर' अशी घमेंड असते. त्यांना वाटते की, आजपर्यंत होऊन गेलेल्या नामांकित शहाण्यांचे सर्व सार आपणांत उतरले आहे. आणि याची निशाणी काय ? तर बड्या बड्या शहाण्यांचे काही सिद्धान्त त्यांना मुखपाठ असतात. पृथ्वी फिरते आहे हे यांना माहीत असल्यामुळे हे झाले आर्यभट्ट ! यांचे ठिकाणी आचाराचा विधिनिषेध नाही, की हे झाले शुकाचार्य ! सुखदुःख सारखेच मानावे हे यांना समजते, म्हणून हेच विदेह. जनक ! किंवा " यदृष्टं तन्नष्टम् हा सिद्धान्त यांनी ऐकला आहे; हे झाले शंकराचार्य ! अॅडिसन अबोल 'असे, हेही मुखस्तंभ बस- तात. हे झाले अडिसन ! पण, खरें शोधितां हा सर्व अहंमन्यतेचा प्रकार असतो. अशांचे ठिकाणी खरें चातुर्य यथातथाच असते.
१४ वें.] वैदग्ध्य. ३२९ . आपणच आपल्याशी पुष्कळदा अमुक एक आपली समजूत बरोबर आहे असे मानितो. परंतु, ती कशी म्हणून प्रश्न केल्यास, हेन्री सिजविक नामक नैय्यायिकाला स्वप्नांत जी विचारसरणी ऐकू आली, तिचाच मासला आढळतो. सिजविकला ऐकू आलें: आम्ही असे मानितों, कारण इतर लोक असेंच मनितात." "किंवा किंवा किंवा पूर्ण विचाराअंती अस्मादिकांस असे वाटते म्हणून. "किंवा आम्हांला कोणी असे सांगितले म्हणून आणि आम्हाला असेंच मानावेसे वाटते म्हणून. किंवा पूर्वी एकदा आमचे असें मत असून, अजूनही तसेच आहे म्हणून. " किंवा पूर्वी असा समज अमन, इतउत्तर तसा ठेवण्यास हरकत नाहींसें वाटतं म्हणून. कां? किती कडीबंद, किती आटोकाट, किती शास्त्रबद्ध विचारसरणी ही! पण पुष्कळांचे सिद्धान्त असल्या गचाळ पद्धतीनेच ठरविलेले असून त्यांना ते बिनचूक वाटतात; व आपण ज्ञाते, चतुर, सिद्धांती आहों, असा त्यांस गर्व वाटतो! मोठमोठ्या विद्वानांचे एकाद्या विषयांत एवढ्या तेवढ्या कारणानें, किंवा एकदेशी विचाराने एकादें मत झाले असतां तें सिद्धांताच्या दाढऱ्याने ते जगापुढे मांडतात. पण सिद्धान्त ठरविण्याला जो सर्वांगी पूर्ण विचार तो खरोखर त्यांनी केलेला नसतो. मोक्षमुल्लर म्हणे:-'. आक्सफोर्डच्या विद्यालयांना जर कायमची सुट्टी मिळेल, तर मग आक्सफोर्ड नंदनक्नाची बरोबरी करील. कारण, एकान्त व गंभीर विचाराला तें सर्वथा योग्य व रम्य असें स्थळ होईल.' हे मत मननांत गढलेल्या मोक्षमुल्लरभट्टांपुरतें ठीक आहे. पण, - ३३० सुख आणि शांति. प्रकरण तो सामान्य सिद्धान्त म्हणून ठोकून देणे, अंमळ साहसच. कामाचे दिवसांत शिक्षकवर्गाची माथीं पोरांशी डोकेफोड करण्याने त्रासून गेलेली असल्यामुळे त्यांना शांत विचारासाठी मधून सुट्टीचे दिवस पाहिजेत हे खरे; पण, कायमची सुट्टी म्हणजे सगळेच आटोपलें. विचारासारखा शीण कशांत नाही. विचारांत मेंदू खची पडतो, त्या मानाने पहातां शारीरिक श्रमाने कांहींच झीज लागत नाही. पोरें वाटेल तेवढे शारीरश्रम करितात; म्हणून काय ? उलटी वाढत जातात. पण, विचार मेंदू खातो. अंगमेहनत करणारा खाल्लयाप्याल्याने तत्काळ ताजा होतो; विचाराने मेंदू शिणवि. णाराचा भागवटा त्वरित दूर होत नाही. शिवाय, विचाराची गति कुंठित झाली म्हणजे मनुष्याला खेद होतो. त्याला वाटते आम्हांला परमेश्वराने या संशयावर्तीत कांटाकिलें आहे ? आम्हांला सृष्टीचे गूढ कां उकलू नये ? आता काय करावे? बाकी, हमालमंडळीला या खेदाचा गंधच नाही. सृष्टिकर्त्याने अनेक गोष्टी गूढ ठेविल्या आहेत हे पाहून मनु. प्याला पुष्कळदा वाईट वाटते; परंतु त्याने खास समजावे की, असें करण्यांत सृष्टि करणाराचा काही तरी स्तुत्यच हेतु आहे. एक तर त्या आपणांस पूर्ण समजणेच शक्य नसेल, किंवा समजूनही त्यांचा आमचे हातून दुरुपयोग होण्याचे भय असेल, किंवा त्या पाहतांच आपण आश्चर्याने दंग होऊन जागचे जागीच स्तब्ध बसू अथवा दिपूनच जाऊं. या म्हणण्याचा प्रत्यय दूर नाही. आपल्या लाडक्या अर्जुनाला परमात्म्यांनी जेव्हां मनुष्यांना चर्म- १४ वें.] वैदग्ध्य. ३३१ चढूंनी कधीही न दिसणारें, आपले विश्वव्यापी विराट स्वरूप दाखविले, तेव्हां ते दृष्टीस पडतांच तो प्रथम 'विस्मयाविष्ट' व ' हृष्टरोमा ' झाला; परंतु लौकरच त्या अद्भुतरूपाने दिपून जाऊन त्याची बोबडीही वळली. आणि तोच अर्जुन आपण होऊन परमेश्वराला हात जोडून म्हणूं लागला, की:- (श्लोक) अदृष्टपूर्व हृषितोऽस्मि दृष्ट्वा । भयेन च प्रव्यथितं मनो मे॥ तदेव मे दर्शय देव रूपं । प्रसाद देवेश जगनिवास ॥ १ ॥ -श्रीमद्भगवदगोता. भावार्थ:--- तुझे हे अपूर्व रूप पाहतांच मला आनंद झाला खरा; पण त्याचे विशालत्वाने मला भेदरी बसून माझे काळजाने ठाव सोडिला आहे. याकरितां, हे जगन्निवासा, मजवर कृपा कर आणि तुझें आपलें नित्याचे सौम्यरूपच मजपुढे असू दे. हे रूप मला आवडते, परंतु सहन होत नाही. पस्कल म्हणतो, " सर्व सत्य आपले कानी एकदम पडल्यास आपली कानटाळी बसून आपण बहिरे सुण्ण होऊन जाऊं. भर दुपारचा प्रकाश अतिभास्वर खरा, पण त्यांत दृष्टि मुळींच दिपून जाते; त्यापेक्षां शांत व मंद प्रकाशात दृष्टीचा प्रसर दूरवर होतो. ज्ञानाचे प्रगतीचा इतिहास पहातां, आस्तेआस्ते मनुष्याचे दृष्टीला सृष्टिरहस्य अधिकाधिक कळत आहेत. कालच्या या एको- णिसाव्या शतकांतच किती तरी शोध लागले व सृष्ट शक्तीचे अद्भुत खेळ दृग्गोचर होऊ लागले. बाकी, ईश्वराचे विश्व हा अनंत गूढांचा महोदधि आहे. त्याचे मानाने पहातां, "सिंधूतील एकादा ३३२ सुख आणि शांति. [प्रकरण बिंदु, किंवा खंडीमध्ये पाव रति " देखील मनुष्याचे हाती अजून लागला नाही. विश्वरूपिणी सृष्टिदेवी शास्त्रीय ज्ञानाने फुगून गे- लेल्या मनुष्यास अजूनही हंसून म्हणेल की, बाळ, इतक्यांतच धन्य मानूं नको. तूं नुसता अंगठाच चोखीत आहेस. सृष्टीची गूढे आपल्याला समजावी अशी इच्छा पुष्कळांना असेल. परंतु, ती उकलून पाहण्याची खटपट म्हणाल तर कोटीं- तून एकाददुसऱ्याचे हातूनदेखील होण्याची मारामार. ही पोटाची खळी भरण्यासाठीच बहुतेकांना इतके श्रम करावे लागतात की, त्यांना असल्या कामांत पडण्यास फुरसूदच होत नाही. ते उदर- भरणानेच व्याकुळ होऊन असल्या गृढ विचारांचे काम आनंदाने वेडे रांवर सापवितात. ते म्हणतात, " जाऊं द्या की, कोणी व्यर्थ डोके चोलीत बसावें ? त्यापेक्षा आपल्या पोटासाठी कोणा- च्याही दोन पाट्य टाकाव्या आणि निघोर असावे. कादूं या त्यांना युक्त्या, आपण आयताच फायदा घेऊ !'' आमचे हिंदु- स्थानची तरी आजकाल सर्वथा हीच स्थिति आहे. बुद्धिमत्तेची किंवा कल्पकतेची वाण नाही; परंतु माध्याह्नकाळाची सोय लाव. ण्यापुढे सगळे आटले आहे. सिसिरो म्हणतो, " डेमोक्रिटसला पांढऱ्या काळ्यांतला भेद ओळखत नव्हता, इतका तो डोळ्यांनी अंधळा होता. परंतु त्याचे ज्ञानचक्षु इतके सतेज होते की, चांगले आणि वाईट, न्याय्य वाणि अन्याय्य, सन्मान्य आणि द्वेप्य, उपयुक्त आणि त्याज्य, थोर आणि नीच यांमधील भेद त्याला फारच स्पष्टपणे दिसत असे."
१४ ३.] वैदग्ध्य. ३३३ सर्वांचेच अंगी तितकी चतुराई नसेल; परंतु अमुक वर्तन रास्त आणि अमुक गैर हे ज्ञान स्वभावतःच प्रत्येक मनुष्याला असते. आपल्यापुढे शंभर चेहरे असले तरी त्यांतून जो अत्यंत सुंदर असेल त्यावर जशी नेमकीच दृष्टि जडते, त्याचप्रमाणे रास्त गोष्ट कोणती हे आपणांस अंतःप्रेरणेनेच कळत असते; आणि इतकें कळले म्हणजे आपणांस सुखी होण्याचा उपाय सांपडलाच. केवळ सुखी होण्याचाच नव्हे, पण ' नराचा नारायण ' होण्याचादेखील सांपडला म्हटले तरी शोभेल. जगांत काय करावे किंवा कसे वागावें हे कळणे फारसे कठिण नाही; पण कळल्याप्रमाणे करणे किंवा वागणे ह्याचीच सारी मारामार आहे. नुसत्या कळण्याने सिद्धि होत नाही. अमुक एक वनस्पति हिमालयावर आहे असे आपणांस कळून भागत नाही. ती तेथून आणण्याचा किंवा आणविण्याचा यत्नच झाला पाहिजे, तेव्हांच त्या कळण्याचे सार्थक होईल. पण यत्न करणे तोंडच्या गोष्टी नव्हत. एक गृहस्थ मानससरोवरास जाऊन आले, तें ऐकिलें म्हणजे ऐकणारासही फुरफुरी येते; परंतु, त्यांचे मार्गा- तील हाल अपेष्टांचे वर्णन त्यांचे मुखांतून ऐकू आले म्हणजे हौस जागचे जागींच जिरते. सेंट पाल म्हणतो, " सिद्धि फुकटची नाही. हातावर शीर ध्यावे त्याने आत्मसिद्धीचे नादों पडावें. कोणतेही गोष्टींत मर्यादितपणा राखणे हे तरी चातुर्याचेच एक अंग आहे. कारण, अतिरेकानें सद्गुणच दुर्गुण होतो. अति- दानप्रियत्वानेच बलि पाताली गेला. अति धाडस हे अविचाराचेंच भावंड समजावें. वाईटाचे फळ वाईट आणि चांगल्याचे चांगलें, ३३४ सुख आणि शांति. [प्रकरण हा नियम अभंग आहे. सत्कर्म हेच बक्षीस व दुष्कर्म हीच शिक्षा समजावी. सदाचार आहे तेथे सौख्य आहे; दुराचारापाशी दुःख उभे आहे. म्हणून मनुष्याने बरें चालावे आणि निर्भय असावे. बऱ्याचा जय व्हावयाचाच. दुर्जनाशी आपण बरेच वागावें. धर्मराजा दुर्यो- धनालादेखील 'सुयोधन' म्हणे. एक अरब भक्त म्हणतो, "हे देवा, अभक्तांवर दया कर. कारण, भक्तकनवाळू तूं आहेसच आहेस. टेनिसन म्हणतो, " मनुष्यास जर ईश्वर साक्षात् भेटला तर मनुष्याचे मन त्याचे प्रेमांत चूर राहील." परंतु लबक म्हणतो, हे म्हणणे ज्याला या दुष्ट जगाचे वारें पुरे झोंबले नाही अशा बाळ- पणच्या कोवळ्या मनासच लागू पडेल. जे कां व्यसनाचे, दुर्गुणाचे, दुष्कर्माचे शाळेत एकदां निर्दवले, अशांना देव भेटो की महादेव भेटो, त्यांचा दुर्गुणच त्यांना प्रिय वाटेल. कृष्णशिष्टाईचे वेळी श्रीकृष्णाने दुर्योधनपक्षाला सर्वांसमक्ष आपला ऐश्वरयोग दाखविला, म्हणून काय ? उपड्या घड्यावरच पाणी. अमुक गोष्ट गैर आहे, एवढे समजल्याने ती दूर होत नाही. तिचा तिटकारा आला पाहिजे; थरक भय वाटले पाहिजे. पण तसे बहुधा होत नाही. कारण दुर्गुणाची गोष्ट अशी आहे की: (आर्या) दुर्गुण भेसुर राक्षस, दर्शनमात्रेचि द्वेष्य भासतसे ॥ परि चिरपरिचय होतां, सह्य, प्रिय, श्लिष्ट मित्र वाटतसे ॥१॥-पोप. शेक्सपिअर म्हणतो, देव तरी आपल्यावर काही घेत नाही. दुर्जनांना त्यांच्या दुर्गुणांच्या द्वारेंच तो शासन करितो. दुर्गुणांनी, १४ वें.] वैदग्ध्य. ३३५ दुर्व्यसनांनी जगाचा नाश होत आहे. पण जगत् डोळे उघडीत नाही. नोहा हा एवढ्या जलप्रळयांतून शिल्लक राहिला, परंतु अखेर दारचे द्राक्षीचे रसापायीं (दारूपायीं) मेला. आणि या रसापायीं आजकाल हजारों मृत्युमुखी पडत आहेत, तरी या रसा- वरचे प्रेम उडत नाही, ही तर व्यसनाची जबरदस्ती आहे. दुर्गुणाइतकेंच कधी कधी मूर्खत्वही घातक असते. एक मूर्ख पोर हातचे दिव्याने घर पेटलेले पाहूनही गुपचुप बसली आणि त्यामुळे अर्धगांवची होळी झाली. एकाद्या दुर्जनाने मुद्दाम आग लाविली असता त्याचे दौर्जन्यापासून होणारी जी नुकसानी तीच हिचे मूर्खत्वाने झाली; म्हणजे फलतः तरी दोहोंची किंमत एकच झाली. म्हणून समाजांत दुर्जनांइतकाच मूर्खाचाही निषेध करणे प्राप्त आहे. देवानें स्वर्ग व नरक या दोहोंचे मार्ग सारखेच खुले ठेविले आहेत; व सदाचाराने पहिला गांठेल आणि दुराचाराने दुसरा, अशी प्रसिद्ध जाहिरात लावून, तिचे खाली “येनेष्टं तेन गम्यताम्।" म्हणून लिहून ठेविले आहे. यांत काय ते माणसाने समजावे. जगांत काही माणसें दुसऱ्याला दुःख व त्रास धावयाला नि. र्माण झाली असतात; व कांहीं दुसांचा त्रास सोसण्यासाठी झाली असतात. पराला दुःख देणारे हे एकंदरीत स्वतः दुःखी असून दुसन्यालाही दुःखी करितात. परदुःख घेणारे सज्जन हे दुसऱ्याला सुखी करून स्वतःही सुखांतच असतात. योगबलाने काही लोक दुसन्याचा रोगभोग आपले अंगीं उतरून घेतात; पण तशान दोघेही बचतात. सज्जनांचा हाच मार्ग.
३३६ सुख आणि शांति. [प्रकरण सालोमनला ईश्वर प्रसन्न होऊन 'माग म्हणाला. तेव्हां त्याने मला 'ज्ञान आणि चातुर्य' ही दोन द्या म्हणून मागितले. ईश्वराने त्याला ती दोन्ही देऊन त्यांचे जोडीला लोकमान्यता व राजवैभव ही दिली. परंतु या मिलाफाचा परिणाम असा झाला की, सत्ता आणि संपत्ति यांचे मदापुढे ज्ञान व चातुर्य ही लटकी पडली. आणि सालोमनचे चातुर्याचे बोल जरी अमोल आहेत, तरी त्याचे चरित्र वाचलें म्हणजे " लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण " असेंच म्हणणे भाग येते. कारण, सर्व सुख- साधनें, ज्ञान, चातुर्य ही पूर्ण अनुकूल असतांही त्याने मरतां मरतां एकाद्या दुःखी माणसासारखे असमाधानाचे उद्गार काढिले, याहून अधिक खेदावह ते काय ? आतां किती झाले तरी तो मोठा सत्ता- धीश व भलाच माणूस होता म्हणून तो ' मी हुकलों' एवढेच म्हणाला; 'सर्वांची हीच गति ' असा अभिप्राय त्याने दिला नाही. सन्मार्ग कोणता हे प्रत्येकाने आपल्या आत्मारामाला पुसत जावें. तो कधीं फसावयाचा नाही व दुसन्याचे ऐकावयाचा नाही. चोराचा आत्माराम चोरी हे दुष्कृत्य आहे असेंच बेमुर्वत त्याला सांगतो, इतका स्पष्टवक्ता आहे. लबाड मनुष्य आपली जिव्हा, मुद्रा, मनोविकार सर्व बदलील, परंतु या हृदयस्थ आत्मारामावर त्याचा काही अंमल चालत नाही. तो गैरकर्म करूं लागला की आत्माराम त्याला आतून ठोठावणारच.. याकरितां मनुष्याने त्याचे आशंत चालावे, म्हणजे पाऊल गैरमार्गी पडणार नाही.
った丸太志太たたたたたた。
st
प्रकरण पंधरावें.
राष्ट्रांची शांति.
tet.tttttttttttttttttt
-
संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथापूर्वं संजानाना उपासते ।
करवेद.
भावार्थ:--हे लोकहो, तुम्ही सर्वही एकमेकांत मिळून
मिसळून चाला, व भांडणतंटे सोडून देऊन मिळूनमिसळून
वोला व आपली मनें सुसंस्कृत करा आणि पूर्वीचे ज्ञानी पुरुष
जसे ईश्वराची उपासना करीत आले, तशीच तुम्हीही करा.
समानो मंत्रः समितिः समानी समानं मनः सहचित्तमेषाम् ।
समानं मन्यमभिनय वः समानेन वो हविपा जुहोमि ।।
---ऋग्वेद.
भावार्थ:-तुम्ही विषम विचार करूं नका, तुमची
सामाजिक व्यवस्था समानतेचे तत्त्वावर चालवा. तुमचे
संकल्पविकल्प व ध्येये एकजात असूद्या. ( ईश्वर म्हणतो ,)
मी तुम्हां सर्वोस समतेनेच उपदेश करितों व तुम्ही माझे
उपदेशाप्रमाणे चालल्यास मी तुम्हांस सारखेंच फल देईन.
Htttttttttttt.ttt.tt.tt.ttttttt.ttttt
..
Try
न
प्रकरण पंधरावें. राष्ट्रांची शांति. अपार संपत्ति किंवा उदंड शस्त्रसंभार यांनी कोणतेही राष्ट्र निर्भय होत नाही, तर परराष्ट्रांशी स्नेहभाव ठेविल्याने होते. -------संलस्ट. लबक म्हणतो, सांप्रतची युरोपीय राष्ट्रांची स्थिति आम्हां सर्वांसच भयप्रद व लज्जाकर आहे. रानी लोकांनी शस्त्रबळावर वादाचा निर्णय करणे एक वेळ शोभेल; पण असल्या सुधारलेल्या राष्ट्रांनी तोच मार्ग स्वीकारावा हे नीतिदृष्टया व व्यवहारदृष्ट्याही उद्वेगजनक आहे. आजकाल नुसती अंतःशांति राखण्याकडे युरो- पीय राष्ट्रांत एकंदर ४०,००,००० शिपाई आहेत. आणि लढाऊ लोक ते यांहून निराळेच. ते आहेत १,००,००,००० ही संख्याही अजून वाढविणेच आहे. तसे झाले म्हणजे तो आंकडा २,००,००,००० वर जाईल. या सैन्याचे खर्चाचे खरे आंकडे पुरापूर प्रसिद्ध नाहीतच; पण जे काही अंशतः आहेत, त्यांची बेरीज केल्यास सालीना ४५,००,००,००० पौंड होते. प्रत्येक राष्ट्राच्या हिशोबाच्या पद्धति वेगळ्या व अर्धमोलीं, बिनमोली, किंवा पूर्ण मोलाने नोकरी घेण्याचेही परिपाठ कमज्यास्त प्रमाणांत आहेत, यामुळे अचुक आंकडा मिळणे अशक्य आहे. तरी आजकाल, युरोपीय राष्ट्र व अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ० हून अधिकच. , ३४० सुख आणि शांति. [प्रकरण संयुक्त राष्ट्र ... . .. ... , यांचे गोडे व कडवे मिळून शिपाई लोकांची संख्या आणि त्यांच्या वार्षिक खर्चाचे आंकडे याप्रमाणे आहेत:- राष्ट्राचें नांव. शिपाई. वार्षिक खर्च पौंड. ४,२०,००० ६,५०,००,००० रशिया ११,५०,००० ४,६०,००,००० जर्मनी ६,६१,००० ४,३८,००,० फ्रान्स ६,२०,००० ४,१०,००,००० आस्टिआ-हंगेरी ३,८४,००० १,९४,० इताली ३,०५,९०० १,७०,००,००० स्पेन ६७,०० नावं आणि स्वीडन ७३,००० ५५,००,००० टर्की ३,७०,००० ४८,००,००० हालंड ३५,००० ३६,५०,००० बेलजम २५,००,००० पोर्तुगाल ३४,००० २६,००,००० खित्झलंड १,४८,००० १३,००,००० ग्रीस २३,००० १२,००,००० देनमार्क... १४,००० १२,००,००० बलगरिया ४३,००० १८,००,००० संयुक्त संस्थाने (अमेरिका) १,०७,००० ४,००,००,००० एवढा जगव्याळ द्रव्यव्यय होत आहे, इतके मानवी प्राण्यांचे जीव आणि श्रम फुकट खर्ची पडत आहेत, तरीही आमची मह- त्वाकांक्षा मिटत नाही. अधिक आरमार पाहिने, अधिक फौज . , . ... ... , ... ... .
१५.] राष्ट्रांची शांति. ३४१ पाहिजे म्हणून ओरड सुरूच आहे ! रयतेनें कष्टाने मिळविलेले द्रव्य कररूपाने ओढून घेऊन त्यावर हे एवढे पोळ पोसावयाचे, हे कुठले शहाणपण ! शिवाय आबदाबामुळे राष्ट्रांत युद्ध नच झाले, तरी यांच्या खर्चानेच अखेर प्रत्येक राष्ट्राची कंबर मोडून जाऊन दिवाळंही वाजणारच. युरोपांतील प्रत्येक प्रमुख राष्ट्र आले ते वर्ष अधिकाधिक कर्जात बुडत आहे. सन १८७० साली या राष्ट्रांचे कर्जाचा आंकडा ४,००,००,००,००० पौंड होता. हा तेव्हांच छाती दडपेसा होता. आणि हल्ली तर याचे दीडपट झाला असून सालोसाल फुगतच आहे! आम्हां शहाणे राष्ट्रांची सुधारलेपणाची कल्पनाही किती अश्लाघ्य आहे पहा ! एक जपानी मुत्सद्दी म्हणाला, "आम्ही जो- पर्यंत युरोपांत केवळ आमचे कळाकुसरीचीच कामें पाठवीत असूं, तोपर्यंत युरोपचे लोक आम्हांस अर्धेरानटी म्हणत. पण आम्ही जेव्हां रशियाचे हजारों शिपाई यमसदनी पाठविले, तेव्हांमात्र 'आतां जपान खरें सुधारले ' म्हणून आम्हांस शाबासकी मिळू लागली! आहे की नाही न्याय ?" यंग नामक कवि म्हणतो, एका मनुष्याचा प्राण घेणारास खुनी म्हणून गळफांस देतात व हजारोंचे बळी घेणारास शूर वीर म्हणून त्याला पुष्पहार घालि- तात; म्हणजे उत्कट दुष्कृत्याला सत्कृत्याची पदवी मिळते, असला हा जगताचा. न्याय आहे. लढाई म्हटली म्हणजे पुष्कळांचे डोळ्यांपुढे, तो फौजेचा थाट- माट, स्फूर्तिजनक रणवाद्यांचा गजर, शिपायांचे एकजात भडक ३४२ सुख आणि शांति. [प्रकरण , पोषाख, व समशेरांचा डोळे दिपविणारा चमचमाट ही उभी रहा- तात; पण नुसत्या स्मरणानेच अंगावर रोमांच आणणारा तो रक्त- पात, व प्राणिवध याची त्यांना कल्पनाही येत नाही. परंतु, पर- वांच्या रुसोजपान युद्धाची किंवा कोणत्याही युद्धाची हकीकत वाचली म्हणजे वाचणाराचे हृदय भीति आणि करुणा यांनी व्याप्त होऊन जाते. दुसरी गोष्टः हानि, विपत्ति, क्लेश यांचे दृष्टीने युद्ध हे उभयपक्षांस सारखेच अनर्थावह असते; फक्त विजयी पक्षाला वर मिशा करून चालायला येते, हाच काय तो फायदा. श्रीकृ- ष्णास युधिष्ठिर म्हणतोः (श्लोक) पराजयश्च मरणान्मन्ये नैव विशिष्यते ॥ यस्य स्याद्विजयः कृष्ण । तस्याप्यपचयो ध्रुवम् ॥ १ ॥ जयो वैरं प्रसृजति । दुःखमास्ते पराजितः ॥ सुख प्रशान्तः स्वपिति । हित्वा जयपराजयौ ॥ २॥ भावार्थ:--पराजय तर मरणतुल्यच. पण विजयांतदेखील हानि पुष्क ळच होते. शिवाय जय मिळाल्याने वैर वाढते व पराभूत पक्ष दुःख क- रीत राहतो. पण शांतीला ह्यांतील कांहींच नाही. तिथे सुखाची झोप मिळते. काहींचे म्हणणे की, हे सर्व खरे; पण स्वहितरक्षणार्थ हे सारें आम्हांस पत्करावे लागते. परंतु या म्हणणारांना हे समजले पाहिजे की, कोणत्याही राष्ट्राचे खरे हित अंतःशांतता व परराष्ट्रांशी सहभाव यांत आहे, युद्धांत नाही. व्हिकार कझिन म्हणतो की, " रणभूमि व मुत्सद्याची खोली हे सुधारणेचे दोनच आश्रय आहेत." पण याला हे कळत नाही की, युद्धाच्या नुसत्या वार्तेनें- १५ वें.] राष्ट्रांची शांति. ३४३ देखील शांतिसुखाचा भंग होऊन सुविचाराचा बिघाड होतो. शिलर म्हणतो, " शत्रु आज पादाक्रांत केला तरी आपला डूक सोडीत नाही, वेळ पाहून उलटतो; त्यापेक्षा त्याला स्नेहाने आपलासा केल्यास भय कायमचे गेले." जोवर्टचे म्हणणे की, 'हपापाचा माल गपापा गेला' असाच मासला युद्धांत मिळविलेल्या द्रव्यादिकांचा होतो.” इतिहास हीच साक्ष देतो, अखिल जगताला त्राहि त्राहि करून उंटोगणती खजिने भरणारे जे राजे तेही पालथे पडले आणि ते खजिनेही रिते पडले; पण दुनियेला क्लेशमात्र कायमचे झाले. बरे, नित्यक्रमांत मनुष्याला इतकी दुःखें संकटें आहेत की, तीच निवारतांना तो व्याकुळ होतो. असे असतां मनुष्ये युद्धरूपाने मुद्दाम आपणांवर नसती संकटें ओढवून घेतात, या प्रकाराला काय म्हणावें? जोवर्ट म्हणतो, पुष्कळ राष्ट्रांना संकटांवांचून चैनच पडत नाहीसे दिसते; कारण, एरव्हीं ती ही युद्धरूप संकटें स्वकृतीने निर्माण करती ना. सुदैवाने अलीकडे परराष्ट्रांशी सलोखा असावा असे पुष्कळांस वाटू लागले अहि. पण नुसते वाढू लागौं आहे; कृति नाही. याचे कारणं, अजून स्वराष्ट्राचे हित व परराष्ट्राचे हित हे भेद- सूचक शब्द कायम आहेत. पण हे चुकीचे आहेत. आजकाल सर्व राष्ट्रांचे हितसंबंध इतके अन्योन्यावलंबी आहेत की, एकाचे हिताला धोका तोच इतरांच्या, अशी स्थिति आहे. पण ह्या गोष्टीचा व्हावा तितका विचार मुत्सद्दी लोक अजून करीत नाहीत. युरो. पाचे भांडवलं चारी खंडांत पेरले आहे. या रुसोजपानी युद्धानें ३४४ सुख आणि शांति. [प्रकरण बाकीचे युरोपाचे केवढे तरी नुकसान झाले. सॅनफ्रेन्सिस्कोंत अमि- प्रळय झाला, तर त्याने इंग्लिश विमाकंपन्यांना १,४०,०० पौंड नुकसानी बसली. असा एकाचा ताण दुसऱ्याला पोचतो आहे. परदेशांत सुखसमृद्धि असल्यांत युरोपचा केवढा तरी फायदा आहे. कारण युरोपचा सर्व देशांशी व्यापार आहे. तेथील लोकांपाशी दोन पैसे झाल्यास, यूरोपचा माल खपतो. बरें, आस्ट्रेलेशियांत पाऊस चांगला झाल्यास युरोपाला लोकरी कपडा स्वस्तांत पडतो. हिंदुस्थानांत धान्य पिकल्यास युरोपला पावरोटी स्वस्त मिळते.. एवंच, माझे तुझं ह्या म्हणण्यांत आतां अर्थ उरला नाही. एकाचे हित तेच दुसन्याचे हित असा निकट संबंध येऊन पोचला आहे. क्रिमियन युद्धाचे वेळी इंग्रजी गलबतांनी रशियांतला म्हणून पुष्कळ माल जाळला. पण ह्या मालाची मालकी होती इंग्रजी व्यापायांचीच ! अलाबामांत इंग्रजांनी पेंढार नेले, पण फळ काय झालें ? तर अमेरिकेच्या निशाणाखाली गलबत नेल्याबद्दल इंग्लं- डला ३०,००,००० पौंड अमेरिकेची नुकसानी भरून द्यावी लागली. शिवाय, अमेरिकेच्या ज्या गलबतांना अपाय झाला त्यां तील पुष्कळांचे विमे इंग्रजी मंडळ्यांकडे उतरले असल्यामुळे विम्याच्या रकमा इंग्रजांवरच पडल्या. एवंच दोहोंकडून साल गेलें. लॉर्ड डी म्हणे की, इंग्लडाने सर्व राष्ट्रांशी साम ठेवण्यांत त्याचे कल्याण आहे. पण, युरोपचे राष्ट्रांना परस्परांस हळूच चिमटे घेण्या- ची संवय आहे, तेथें इग्लंडने काय करावे ? असे पारीस येथील १ अलाबामा हे अमेरिकेतील संयुक्त संस्थानांपैकी एक आहे.
१५ वें.] राष्ट्रांची शांति. ३४५ इंग्रजांचा वकील म्हणतो. तरीही लबक म्हणतो, अलीकडे इंग्लंडनें फ्रान्साशी भावार्थाने नेहाचे बोलणे केल्यामुळे या दोन देशांतील आजपर्यंतची विरोधबुद्धि बहुतेक मावळून कायम गट्टी होण्याची खास चिन्हे आहेत. जर्मनीचीही हीच हवाल आहे. कारण, जर्मन शहाणे आहेत. ते जाणतात की, इंग्लंडवर जरी युद्धांत प्रसंगी आपणांस सरशी मिळाली, तरी युद्धामुळे उभय पक्षांची खराबी होऊन दोन्ही राष्ट्रांचे प्रगतीची एक शंभर वर्षे खास पिच्छेहाट होईल. यास्तव उभयतांत सख्यच सुखावह; व या गोष्टीला बर्लिन, कोलोन, फ्रंकफूट, हमबर्ग, म्यूनिच व इतरही व्यापारी जर्मन शहरांनी आपली संमति दिली आहे. लॉर्ड एव्हस्ले यांनी इंग्लंड, फ्रान्स व जर्मनी यांचे आजचे लढाऊ गलबतांच्या सामर्थ्याचे पुढील कोष्टक दिले आहे. इंग्लंड जर्मनी १ लढाऊ मलबतें २ सशस्त्र फिरती गलबतें. फ्रान्स २४९५०० २८.६०० १४८१०० - १०५०५०० ३९७६०० २८५७०० हे सामर्थ्य पुढीलप्रमाणे वाढविण्याचे संकल्प ठरले आहेतः इग्लंड फ्रान्स जर्मनी , लढाऊ गलबतें १११९००० ३८४००० ५२३००० २ सशस्त्र फिरती ३९५००० २२१००० गलबतें (इसर्स) * १९२८००० ७७९००० ७४४००. *हे आंकडे गलबतांचे टनेज (भरीत) दाखविणारे समजावे.
३४६ सुख आणि शांति. [प्रकरण लवक म्हणतो, या संकल्पाप्रमाणे वाढ केल्यास खर्चाचा बोजा- मात्र अतोनात वाढून, परस्परप्रमाण कायमच राहाणार. मग असें करण्यांत फायदा काय आणि शहाणपण तरी कोणतें ? एकमेकांचे छातीवर दडपणे वाढवीत बसण्यापेक्षा सर्वांनीच स्नेहभाव जोडून सर्वांचीच दडपणे उतरण्यांत अधिक सुख व मौज नाही काय? कोणी आपला हक्क किंवा हितसंबंध गमावू नये. परंतु प्रस्तुत जी युरोपीय राष्ट्र परस्परांशी पुंडाप्रमाणे किंवा लुटारू चांच्यांप्रमाणे वागतात, तसे न वागतां सर्वांनीच दोस्त व्हावे, व लढण्याचा प्रश्न उद्भवल्यास लढाई न करितां इतर राष्ट्रांना पंच नेमून लवादी निकाल करून घ्यावा, म्हणजे झाले, आणि हे छातीवरचे दडपे उतरून टाकावे. आजकाल या कामाला संधीही बरी आहे. पण काहींचे म्हणणे, प्रथम कंडूशमन तेव्हां शांतीची बात. एरव्ही ती कोणी ऐकणार नाही. हे एका अर्थी खरे आहे. पण सर्वांनीच शांतिपक्ष स्वीकारल्यावर युद्धांवांचूनहीं शांति अशक्य नाही. शांतीपासूनचा फायदा व वैरापासून तोटा याचा निवाडा अटलांटिक महासागराचे उभय तीरांकडे लक्ष पोचविल्याने होतो. एका तीराला युरोपांतील विभक्त राष्ट्रे व दुसऱ्यावर अमेरिकेतील संयुक्त राप्टें. संयुक्त राष्ट्रांची लोकसंख्या ९ कोटी, त्यांचे भूमि व समुद्र मिळून सैन्य १,०७,००० व सैन्याचा खर्च ४ कोटि पौंड. युरोपीय विभक्त राष्ट्रांची लोकसंख्या ३५ कोटि, उभयविध मिळून सर्व सैन्य चाळीस लक्ष, व त्याचा खर्च २५ कोटि पौंड. म्हणजे विभक्त युरोपची लोकसंख्या संयुक्त अमेरिकेच्या केवळ चौपट असून युरोपचे लढाऊ लोक अमेरिकेच्या ४० पट आहेत. याचे . १५ ३.] राष्ट्रांची शांति. ३४७ कारण विभाक्त-वैरभाव-हेच होय. कारण अमेरिकेंत सर्व एकविचार आहे. युरोपांत राष्ट्राराष्ट्रात द्वेषभाव, मत्सर, अविश्वास,अहितबुद्धि, व बद्धवैरता यांचे साम्राज्य असल्याने स्वरक्षणार्थ एवढा डोंगर प्रत्ये- कास उरावर घ्यावा लागतो. पण त्यानंच एकाद दिवशी सर्वांस रसा- तास जावे लागेल हे खास. स्वदेशहिताबद्दल दक्ष असणे हा सद्गुण आहे,पण तें हित वैरभावापेक्षां स्नेहभावाने साधणे हा वरिष्ठ सद्गुण आहे. अमेरिकेंत सैन्याचा खर्च फार कमी आहे, त्यामुळे अमेरिकेला युरोपापेक्षा व्यापारांत भांडवल घालावयास अतोनात सवड राहते, व यामुळे अमेरिकेशी व्यापारांत युरोपाच्याने टक्कर देववत नाही. बाकी, अमेरिकन लोक व्यापाराचे नादाने एक मोठी चूक करीत आहेत, ती ही की, शेतकीकडे समूळ दुर्लक्ष करून हजारों लाखों एकर जमिनीत केवळ यांत्रिक कारखाने सुरू करून, खेडीपाडी ओस पाडून शहरे भरीत आहेत. पण ही चूक त्यांना परिणामी भोवेल असे लबकचे मत आहे. आतां युरोपची स्थिति धेऊ. युरोपांत अजून पड जमीन आहे. कोळसाही आजच खलास होणारा नाहीं; तथापि खाणी अति खोल खोल चालल्यामुळे तो महाग होत आहे. जस्त तर संपलेच. तांबें त्याच पंथाला आहे. लोखंडही फार तग काढणार नाही. तेव्हां अशांतच डोळे उघडून, फाजील खर्च तोडून, बेताने राहिल्यास ठीक आहे. नाहीपेक्षां या खाणी संपल्या की सगळेच उरकले. पण, आज पहावें तो सैन्ये वाढविण्यावर प्रत्येक युरोपी राष्ट्राचा भर आहे. लढाई कोठे नाही, तरी शांतता आहे असे नव्हे, केवळ तहकुबी आहे. तेवढ्यामुळ रक्तपात नाही. पण ३४८ सुख आणि शांति. [प्रकरण सैन्यांचे वाढते खर्च चालू असल्याने पुढल्या पिढीला दोन पैसे ठेवण्याचे ऐवजी कर्जाची ओझी तयार होत आहेत,मग पोरांबाळांचे डोके वर कसे निघावें? एवंच चालू प्रकार नुकसानीचाच आहे. दुसरी गोष्ट, सैन्याचे खर्चानें व कर्जानें भारवून गेल्याने अमेरिकेशी व्यापारांत युरोपाला टिकाव धरवत नाही. व शिवाय मजूरवर्ग सर्वथा असंतुष्ट असल्याने अराजक पंथ, समुदय- स्वत्वपंथ इत्यादि अनेक पंथ देशांतल्या देशांत उद्भवून, अंतःशांति विध्वस्त होत आहे. धान्याचे भाव सारखे चढत राहि. ल्याने गरीब लोक श्रीमंतांवर बोटे मोडूं लागले आहेत. शेजारी केव्हां उठेल न जाणों, अशी अखंड धास्ती असल्याने एक तर व्यापारी लोकांचेही धंद्याकडे लक्ष लागत नाहीं; दुसरें संयुक्त संस्थाने व वसा- हती ( कॉलनी) यांत सरकारदेणे हलके असून शांति असल्याने शंकडों व्यापारी युरोप सोडून तिकडेच जात आहेत. यामुळे युरोप रिता पडत चालला आहे. एवंच एकही सुचिन्ह नाही.लबकचे म्हणणे की, जोपर्यंत युरोप हा, सैन्याचा खर्च तोडणार नाही, तोपर्यंत तो ज्वालामुखी पर्वताचे शिखरावर वारा खातो आहे असे समजावें. एकदम मध्यरात्री ‘ओं फट घे घे स्वाहा' असे होऊन जाईल. असल्या स्थितीत डोळेझांक करणे शहाणपण नव्हे, केल्यास, आज नाही लवकरच, पूर्वी कधी झाला नाही असा युरोपमर कल्पांतप्रळय माजेल. युरोपचे राजांची सिंहासने त्यांचे बुडाखाली रहावी अशी जर इच्छा असेल, तर मंत्रीमंडळांनी परस्परराष्ट्रांत नेहभाव व शांति वाढवून, आजकाल उद्योगधंद्यांचे नरडीला नख देणारे जे अनिष्ट मार्ग देशांत उद्भवले आहेत, ते बंद पाडले पाहिजेत; एरव्ही धड चिन्ह नाही. .
१५३.] राष्ट्रांची शांति. ३४९ सर्वांनी मनांत आणल्यास नेहभाव होणे अशक्य नाहीं; कारण ईश्वराने सर्व पृथ्वी एक म्हणून निर्माण केली. पण स्वार्थी मनु- प्यांनी ही विभक्ति निर्माण केली. कौपर कवि म्हणतोः- (श्लोक) जे (देश) वारिबिंदुसम भेटुनि एक व्हावे । ते पर्वते म्हणति वैर उभे असावें ।। पण या पर्वतांच्या आडकाठीपेक्षां मनुष्यांनी परस्परांविषयी मनांत धरलेले अविश्वास, मत्सर, असद्भाव इत्यादि विकार हेच वैराला मुख्य कारण आहेत. इंग्लंड, हालंड, व स्वित्झर्लंड हे देश सोडून बाकी सर्व युरोपीय राष्ट्रांनी परकीय मालावर संरक्षक जकाती बसविल्या आहेत. अमेरिकेंत संयुक्त संस्थानांचा आपसांत अनियंत्रित व्यापार आहे, पण परदेशांशी संरक्षक जकाती आहेत. त्यांतही ब्रिटिश-कानडा व इंग्लंड येथील मालावर जबर जकाती आहेत हा तरी न्याय काय ? जर्मनीचा हाच मासला. जर्मनमहाराष्ट्रापुरतें स्वातंत्र्य, बाहेर बंदी. बरें, यांत कांहीं उत्पन्नाचा हेतु नाहीं; कारण, स्वतंत्र व्यापार राखून चालीच्या जकातींनी या राष्ट्राची तुंबडी भरणे शक्य आहे.पण ही केवळ दुस्मानगिरी, खंवटपणा. युरोपांतील राष्ट्रात तर कोणीच कोणाला अनियंत्रित आयात देत नाही. साधेल तों पर. क्याच्या मालाला हाणून पाडण्याच्या युक्त्या अखंड चालू असतात. सांप्रत स्थिति तर ही आहे. मार्किस ऑफ सलिसबरी १८९७ साली म्हणाले-ही सुधारलेली राष्ट्रं अहमहमिकेनं एकमेकांचे १ पर्वत मध्ये आल्याने.
खास ३५० सुख आणि शांति. [प्रकरण उरावर बसून लौकरच सर्व खंड बेचिराख होण्याचा रंग दिसतो आहे. कारण, तुम्हीच पहा, जो तो जादाजादा शस्त्रसंभार गोळा करून प्राणनाशाची कडेकोट तयारी करीत आहे. शक्तीचे केंद्रीकरण झपाट्याने होत आहे. दरसाल अधिकाधिक जाज्वल्य व सद्यःप्राणहारक शस्त्रास्त्रे तयार होत आहेत, व आत्मरक्षणार्थ म्हणून तरी प्रत्येकास या चढाओढीत पडणे भाग आहे. अर्थात् हा अनर्थ वाढत जाणार व अखेर यादवी होऊन सर्वांचीच निपोताशांति होणार हे खास. तर हा भावी अनर्थ टाळण्याचा एकच मार्ग हा आहे की, सर्व राष्ट्रांनी द्वेषभाव व अविश्वास सोडून स्नेहभावाने व विश्वासाने वागावें; व तंटा पडलाच तरी इतर राष्ट्रांचे मध्यस्थीने उलगडा पाडून एकंदरीत सर्व राष्ट्रांत अखंड शांति राहून सर्वत्र अनियंत्रित व्यापार नांदेल अशी योजना करावी; तरच तरणो. पाय आहे. सर हेनरी कॅबेल बनरमन हेही १९०५ साली याच अर्थाचे विचार बोलले. व राष्ट्रांचे मेनहभावाने एकीकरण करण्याचे पुढारीपण इंग्लंडने घ्यावे, असेही त्यांनी सुचविलें. लबक म्हणतो, येथपर्यंतही युद्धलालसा राष्ट्रांना समृद्धिदृष्टया व व्यापारदृष्ट्या कशी घातक अतएव अप्रशस्त आहे, तें मी दाख- विले. पण हेही विचार एकीकडे ठविले तरी युरोपीय राष्ट्र आपणांस ख्रिश्चन म्हणवितात, त्या अर्थी त्यांच्या धार्मिक बाण्याला कलहप्रियता ही सर्वथा लज्जाकर आहे. कारण, ख्रिश्चन धर्माची खूण विजारटोपी नसून अहिंसा ऊर्फ भूतदया ही आहे. आणि ती जर ती विसरतील तर त्यांनी आपले धर्माला .
३५१ १५ वें.] राष्ट्रांची शांति. काळिमा आणिला असें बेधडक म्हणावें. परंतु दुर्दैवाने युद्धाचा ढोल बजावणारे किती तरी लोक पार्लमेंटांत व ग्रंथकारांतही आहेत.ते अक्षयी आगीत तेल ओतीत असतात; याला काय करावे? अशाने अखेर सर्वांचीच राख होईल. तर यांनी डोळे उघडावे,वैरभाव टाकून द्यावे. सर्वांचे हितसंबंध एकत्र कसे गुंतले आहेत हे नीट ध्यानात घ्यावे. एकाचा उत्कर्ष तोच सर्वांचा, व एकाचा अपकर्ष तोच इतरांचा, हे तत्त्व अनुभवाने तपासून पहावें व खात्री झाली- आणि ती झालीच पाहिजे-म्हणजे तरी हातात हात घालून वागावे. यूरोपांत पूर्वकाली ज्याचा कायदा त्याचे हातात असे. म्हणजे अने कची खोडी काढल्यास कच परस्पर अचें पारिपत्य करीत असे. परंतु, हल्ली कोणालाही खासगी पारिपत्याची परवानगी नाही. प्रत्येकाने वरिष्ठसत्तेकडेच न्याय मागितला पाहिजे. व या पद्धतीस आम्ही सुधारलेली पद्धति म्हणतो. हे जर खरें, तर हाच न्याय व्यक्तिशः राष्ट्रांकडेही कां न लावावा ? म्हणजे अ राष्ट्राने क राष्ट्राची खोड काढिल्यास उभयतांनी परस्पर हाणा- मारीवर न येतां ' सार्वराष्ट्रीय समिती'कडे न्याय मागावा. कारण, व्यक्तीला जर खासगी पारिपत्याचा हक्क नाही, तर राष्ट्रांस तरी व्यक्तिशः हा हक्क असण अन्यायच म्हटला पाहिजे. म्हणून इत- उत्तर सुधारलेले राष्ट्रांनी रानटी लोकांप्रमाणे एकमेकांचे घराला आग न लाविता ' सार्वराष्ट्रीय समिती'पुढे आपली तक्रार मांडून न्याय घ्यावा हे योग्य आहे. एतावता सर्व बाजूंनी विचार करितां इतःपर सर्व राष्ट्रांनी परस्पर गैरसमज उत्पन्न होऊ न देणे व स्नेहभाव वाढविणे या ३५२ सुख आणि शांति. [प्रकरण गोष्टी आपले आद्य कर्तव्य म्हणून केल्या पाहिजेत. सैन्याचा खर्च कमी करणे हे तर सर्व जगतास आणि विशेषतः युरोपखंडास फारच उपकारक होणार आहे. कारण, त्यायोगाने युरोपचे लोक विपत्ति व दशाविपर्यय यांचे तडाक्यांतून बचतील. त्याने करा, ओझें हलकावेल, मजुरांना कमी तास कष्ट करून भागेल व मजुरी अधिक मिळेल आणि अन्नाची महागाई कमी होईल. याकरिता कोणाही राष्ट्रानें सैन्य कमी करण्याची संधी दवडू नये. काही राष्टें या गोष्टीस प्रथमच कबूल नसली तरी सडकून यत्न करावा. हा प्रथम इंग्लंडनेच करावा. अपयश आले तरीदेखील करावा, असा लबकचा आग्रह आहे. कारण, यत्न केल्यास आज नाही उद्या युरोपची राष्ट्र ही गोष्ट ऐकतील. आणि इंग्लंडचे यत्नाला यश येऊन आजकाल प्रत्येक राष्ट्रांत उधळेपणा, मत्सर व अविश्वास दिसत आहेत, त्यांचे जागी मितव्यय, शान्ति व स्नेहभाव ही दिसू लागली, तर युद्धाने मिळविलेल्या विजयापेक्षां हा जयजयकार अधिक भूषणावह होईल; ब या गोष्टीने केवळ युरोपाचेच कल्याण नव्हे, तर अलम दुनियेला सुख होईल. परंतु, ही गोष्ट जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत तुम्ही किती दक्षता ठेवा, अखेर हें सर्व घडाडून-" सर्व यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः।" अशांतला प्रकार खचीत खचीत होईल. याकरितां वेळीच परिणा- मावर दृष्टि देऊन सर्व राष्ट्रांनी परस्परविरोध सोडून स्नेहमाव धरावा. व आपण स्वतः सुखशान्तीचा लाभ घेऊन आखल जगता- सही द्यावा. इतकीच त्यांस सविनय सूचना आहे. ती अंगीकार- रण्यास परमेश्वर त्यांस बुद्धि देवो.
大大大大大大大大大大大大大大大大大大大大大大切
प्रकरण सोळावें.
चित्तस्वास्थ्य.
२३
Jyot.tituatitutetatutetatutatuttitutetstutatuttiti teti (श्लोक) चित्ताऽक्रान्तं धातुबद्धं शरीरम् । नष्टे चित्ते धातवो यान्ति नाशम् ॥ तस्माञ्चित्तं सर्वदा रक्षणीयम् । स्वस्थे चित्ते बुद्धयः संभवन्ति ॥ १॥ -अवधूतगीता भावार्थः :-ह्या रसरक्तादि सप्तधातूंनी बनलेल्या शरीरावर जोपर्यंत चित्ताचा ताबा आहे, तोपर्यंत तें अबाध राहते. परंतु, चित्तच बिघडले, की शरीरस्थ रसरक्तादिकही नासतात. याकरितां सर्वदा चित्त हे यत्नपूर्वक स्थिर राखावें. कारण, चित्त स्थिर असेल तरच बुद्धि रफुरते.
प्रकरण सोळावें. । चित्तस्वास्थ्य. मतिः स्फुरति हि स्वस्थे नृणां चेतसि । भावार्थ:-मनुष्याचे चित्त स्वस्थ असेल तेव्हांच सुविचार सुचतात. राष्ट्राराष्ट्रांची शांति तशीच माणसामाणसांची, असे पुष्कळांचे म्हणणे आहे. परंतु हे साम्य ठीक नाही. राष्ट्राचे कामी, शेजारी जर भांडखोर, अधाशी व अनीतिमान् मिळाला तर या राष्ट्राने केवळ गम खाणे इष्ट किंवा न्याय्यही होणार नाहीं; परंतु, व्यक्तीचे तसे नाही. स्वतःची मनःशांति न बिघडू देणे हे कोणाही व्यक्तीच्या स्वाधीनचे आहे. राष्ट्राप्रमाणेच व्यक्तीलाही दुर्जनांशी संबंध आल्यास शांति राखणे अवघड तर खरेंच, पण केवळ अशक्य नाही. सॉलोमन म्हणतो:-" जेथे नित्य कलह चालू आहे अशा भव्य मंदिरांतील मेजवान्यांपेक्षां शांत झोपडीतील मीठभाकर बरी." मोरोपंत म्हणतातः- (आर्याचरण) क्षीर न खाय खळाची, हरि विदुराच्याहि भक्षितोचि कण्या । हपापाच्या लुटीपेक्षां न्यायाची दमडी बरी. प्रेमाची भाजी आणि द्वेषाची सोजी बरोबर. नाही, ही शांतीची किंमत आहे. संसारांत मनुष्याला बारीकसारीक त्रास हे येणारच. पण, कांहीं लोक अशांचे मुद्दाम एक गांठोडें आंवळून उरावर घेतात, आणि सुख आणि शांति. प्रकरण भाराने मरतों म्हणून रडू लागतात; हे वेडेपण आहे. आली अडचण वेगळे वाटेस लावून द्यावी आणि मोकळे व्हावें. काठ्यांचे जुडीची गोष्ट ध्यानात ठेवावी. एकदम जुडी मोडणे शक्य नाही, पण वेगळी वेगळी काठी तेव्हांच मोडता येते; याचप्रमाणे बारीक- सारीक दुःखांची विल्हेवाट लावून टाकावी. ती गांठीं बांधीत बसूं नये; म्हणजे चित्तस्वास्थ्य एकंदरीत कायम रहाते. जगताला सुखी करणे आपले हाती नाही. पण स्वतःला सुखी करणे केवळ आपल्या हातचे आहे. व त्याला काही कष्ट नाहींत. कसाही प्रसंग आला तरी स्वतःची वृत्ति शान्त, तृप्त आणि प्रसन्न ठेवण्याची खुबी साधली म्हणजे सुखाला तोटा नाही. परंतु ही ज्याची त्यानेच साधली पाहिजे. आणि यत्न करील त्याला ही वृत्ति साधणे अशक्य नाही. रूशिफूका म्हणतो, "तुला जर स्वतःचे हृदयांत शान्ति सांपडत नसेल तर ती त्रिभुवनांतही सांपडणार नाही." शांतीला श्रीमंती लागत नाही. अकिंचनालाही ती प्राप्त होते. भर्तृहरि म्हणतातः (श्लोक) अकिंचनस्य दांतस्य । शांतस्य समचेतसः॥ सदासंतुष्टमनसः। सर्वाः सुखमया दिशः ॥ १॥ भावार्थ:-निर्द्रव्य असूनही जितेंद्रिय, शांत, समबुद्धि व नित्यसंतुष्ट असेल त्याला दशदिशा सुखमयच आहेत. परंतु, पुष्कळ लोक रात्रौ केवळ एकटे असले म्हणजे शान्त व स्वस्थ न राहतां उलट नसत्या काल्पनिक अडचणी उभ्या कर- १६ ३.] चित्तस्वास्थ्य. ३५७ तात. मनचे बिकट प्रश्र पुढे घेऊन घोटाळ्यांत पडतात. कोणाचे ध्यानी मनी नाही तसली भुतेंखेतें मनांत आणितात. किंवा असेंच कांहीं खेंगटें मनाचे मागे लावून घेऊन चिंताग्रस्त बसतात. त्यांना धड झोप येत नाही, खाल्लं अन्न अंगी लागत नाही. आणि ते माशासारखे उलथे पालथे पडतात. अशा लोकांना पाहून कीव येते. कारण, खरोखरीचा त्रास नस- तांना, हे कल्पनेचेच त्रास उद्भवून घेतात. समर्थ म्हणतात, " वायां पडावें संदेही, मुळी तेथे काही नाही." त्यांतला प्रकार हे लोक करितात. ते उकरून उकरून दुःखें काढितात. अशांना काय म्हणावे ? यापेक्षा हे लोक जर परदुःखाची कीव करून ते दूर करण्यास झटतील, तर दुसन्यांस सुखी करून आपणही सुखी होतील. शर्बुल म्हणतो, आत्मविस्मृतीशिवाय आत्माविश्रांति नाही.' परंतु, हे रहस्य न समजतां पुष्कळ लोक अनागत चिंता- नींच व्याकुळ होतात. अशाने अवश्यंभावि दुःख तर टळत नाहींच, पण, हेमात्र दुहेरी दुःखी होतात. लोनों व्हिन्सी म्हणतो, सा- क्षात् मृत्यूपेक्षां मृत्यूची चिंताच अधिक क्लेशावह असते. पशूना मृत्यु येतो, पण, त्यांना भावी गोष्टींची चिंता माहीत नसल्यामुळे मनुष्याप्रमाणे ते आगाऊ हैराण होत नाहीत." यासाठी शहाण्याने अनागत चिंता करीत न बसतां में ज्या वेळी प्राप्त असेल त्याला धरून चालावे, म्हणजे त्याला सुख होईल. जो मनुष्य संपत्काली बेफाम वागतो तो अखेर विपन्मुखांत पडतो. दुर्व्यसनासारखी वाईट गुलामगिरी दुसरी नाही. तिचे यो.
३५८ सुख आणि शांति. [प्रकरण गाने मनुष्याचे सत्त्वाचा ध्वंस होतो. व मनुष्ये इतकी नीच व अप्रयोजक बनतात की, आत्मतारणाचे त्यांचे अंगी सामर्थ्य उरत नाहीं; इतकेच नव्हे, तर नुसता विचारही रहात नाही. आपण सन्मार्गाने चालत असावें; मग लोक खुशाल नांवे ठेवोत, त्याची फिकीर करूं नये. कारण, आपला अंतरात्मा जर आपण करितों तें तें योग्य करीत आहों अशी साक्ष देत आहे, तर लोकै. षणेला भिण्याचे कारण नाही. लोकांचे नादी लागला तो बुडाला. तुकाराम म्हणतात:-" लोक जैसा ओक हाती धरवेना।" स्वातंत्र्य ही मोठी ज्ञानाची खूण आहे. यामुळे जो खरा श- हाणा आहे तो परतंत्र राहत नाही. पण जगतात पहावें तो शेकडो लोक आपल्या मनोविकारांचे केवळ ताबेदार बनलेले असतात. अर्थात्, हीच त्यांचे ज्ञानहीनत्वाची साक्ष आहे. प्रथम गैर गोष्ट करून जावें व मग शरमावें, प्रथम रागवावे आणि मग पस्ता- वावे, यांत कोणतें शहाणपण ? याकरितां विकारवशही होऊ नये. डॉक्टर जॉन्सन म्हणतो, " तुमचा कोणीही मनुष्य कोणत्याही हेतूस्तव अवमान करो, शहाण्यानें अपकर्त्याची उपेक्षा करावी हेच ठीक. कारण, अपकर्ता जर मूर्ख असला तर त्यावर राग करणे फुकटच आहे. बरें, मत्सरी असला तर त्याचे तोंडी लागले नाहीं म्हणजे आ–आपच त्याचे तोंडावर माशा पडल्या. भर्तृहरि म्हणतो:-"क्षात्यैवाक्षेपरूक्षाक्षरमुखरमुखान्दुर्मुखान् दूषयन्तः । ।" म्हणजे ( सजन ) शिवराळ लोकांना क्षमेनेंच फिके १६ ३.] चित्तस्वास्थ्य. ३५९ पाडितात. आपण अपमानित झालों, असें दाखविणे म्हणजे दु. ष्टांचा उत्कर्ष सुचविणे आहे. त्यापेक्षा आपण तिकडे कानाडोळा केला म्हणजे दुर्जन आपोआपच फजित होतो. कुत्रे भुंकू लागले म्हणजे तसेंच घट्ट उभे रहावें, की ग्रामसिंहाचे अवसान खचलेंच समजावें. डरले की ते पुढे सरलेंच. हाच न्याय दुर्जनाशी. थॉमस ए. केपिस म्हणतो, आपण जर लोकांच्या नसत्या उचापती करण्याचे सोडिलें तर चित्तम्वास्थाला तोटा नाही. परंतु जगांत पुष्कळ लोक दुसऱ्याच्या उठाठेवी करीत सुटतात, आणि मग तिडका देतात." कर्तव्यासंबंधे मात्र प्रत्येकाने त्याचे स्वरूपाची चिकित्सा न क- रितां तें अवश्यकरणीय असे समजून सर्वात्मना करावें. म्हणजे एक तर ते कार्यही धडपणे पार पडते व त्याचे नादांत आपणही दुःख विसरतो. काम कसले का असेना, ते योग्य मार्गाने करावें म्हणजे झाले. टर्नर नामक चित्रकाराला कोणी विचारिले की, आपण इतके कुशल चित्रकार कशाने झालां ? त्याने उत्तर केले, "शिकस्त मेहनतीने. " स्वकर्तव्याचरण हे जसें सुखाचें साधन आहे तसें परोपकार हेही आहे. पण, परोपकरण निराळे आणि अव्यापारेषु व्यापार' निराळा; हे लक्षात ठेवावें. ईश्वरी योजनाच अशी आहे की, श्रमावांचून काही प्राप्त होऊ नये. मात्र या श्रमाचे अंगींच त्याने गोडी व सुख ठेविलें आहे. आयता रस पिण्यापेक्षां ऊंस चावून खाण्यांत अधिक गोडी ३६० सुख आणि शांति. [प्रकरण लागते, हा सर्वांचा अनुभव आहे. नुसते बक्षीस मिळविण्यापेक्षा शर्यत धावून बक्षीस मिळविण्यांत सुख अधिक होते. त्यांतही जितकी चढाओढ अधिक तितकी शर्यतीला गोडी विशेष. प्रति- स्पर्धाही तोडीस तोड असून त्यावर जय मिळाला म्हणजे त्याहू- नही तो अधिकच भूषणावह होतो. सारांश, श्रमांनी शीण न होतां सुखाला रुचि चढावी अशीच त्या परमात्म्याची योजना आहे. कोणी कांहीं मानो, परंतु, संसार ही एक सतत चढाओढीची परीक्षा आहे. या परीक्षेत जेव्हा जेव्हां अपयश येते, तेव्हां तेव्हां मनुष्य जर शहाणा असेल, तर पुढील वेळी अधिक दक्ष राहून सुधारतो. प्रसंगीं चूकही झाली तरी प्रत्येक चुकी अनर्थावहच होते असें नाही. मनुष्याच्या चुक्याच मनुष्यास शिक्षक होऊन शहाणे करि- तात. शास्त्रीय शोध करितांना पुष्कळदा प्रयोग फसतात, तरी त्यांपासून काही ना काही फायदा होतोच. देश शोधण्यासाठी म्हणून कोलंबस निघाला, त्याला हवा तोच देश यद्यपि सांपडला नाहीं तथापि अमेरिका तरी सांपडली. किमया सिद्ध करण्यासाठी म्हणून लोकांनी हजारों प्रयोग केले, व त्यांनी जरी किमया सिद्ध झाली नाही, तरी तिच्याच किमतीचे रसायनशास्त्र तयार झाले; हा काही कमी फायदा नव्हे. . उद्योगधंद्यांत लाखों रुपये घालणान्या श्रीमंतांचे मनाला कधही शान्ति नसते असे आढळते. परंतु, अशांतीचे कारण धंदा नसून, ज्याचा त्याचा मनोधर्मच आहे. समर्थांचा शिष्य जेव्हां मला
१६ वें.]
चित्तस्वास्थ्य.
३६१
संसार सुटत नाही, काय करूं? ' म्हणून म्हणाला, तेव्हां त्याला
विहिरीवर लोंबणान्या एका वृक्षावर चढवून ‘फांदीचे हात सोड'
म्हणून समर्थांनी सांगितले, व तो सोडीना तेव्हां 'फांदी तुला
सोडीत नाही, की तूं फांदीला सोडीत नाहीस?' म्हणून विचारिलें,
तशांतलाच हा प्रकार आहे. धंदा चिंता उत्पन्न करीत नाही;
अशांची मनेच काळजीखोर असतात. शिवाय ज्यापासून चिंता
उभी राहील असल्या कामाला धंदाउदीम असें नांवच शोभत
नाहीं; ती सोडत किंवा तवकल समजावी. धंद्यांतही 'व्यापार
करतां सोळा बारा' हा अनुभव येईलच, पण तो निराळा; आणि
केवळ 'लागो भागो दिवाळी' ही स्थिति निराळी. कसलेल्या
धंदेवाल्यालाही एखादे वेळी ठोकर लागणारच. कारण, या जगतांत
स्वेच्छा, परेच्छा आणि यदृच्छा अशा तीन इच्छा असतात. यांपैकी
यदृच्छा कोणाचेच हाती नसते. शेतकरी आपलेकडून जमिनीची
यथेच्छ मेहनतमशागत करून राहिला आणि ऐनवेळी पावसाने
दगा दिला तर बापडा काय करील ? हे खरे; तथापि, असे प्रसंग
बहुधा सत्यसंकल्पाला व सदुद्योगाला परमात्मा
.
फार थोडे.
साह्य असतो.
.
-
दुसरी गोष्ट, व्यवसायाचे अनेक ओढे मागे असूनही चित्तवृत्ति
स्थिर राखता येणे शक्य आहे. लबक म्हणतो, हे ज्याला साधत
नसेल अशाने धंद्यांत पडूंच नये. कारण द्रव्यार्जनार्थ आत्मघात
करून घेण्यांत कांहीं शहाणपण नाही. अशांनी स्वस्थ 'हरि हरि '
म्हणत बसावें, हेच ठीक. बाकी, पुष्कळ लोक असे आहेत की,
३६२ सुख आणि शांति. [प्रकरण कोंपन्यांत एकटे बसूनही सर्व जगाच्या उलाढाली करीत बसतील. उलट पक्षी, कित्येक असेही दिलदार असतात की, शेंकडों उल- थापालथींत असून स्वतःचे वृत्तीला कधीही ढळ होऊ देत नाहीत. सारा मुद्दा ज्याचे त्याचे वृत्तीवर आहे, धंद्यावर नाही, आणि एकां- तावर नाही. केवळ बाह्यतः संसाराचे भानगडीतून दूर सरल्याने किंवा वनांत झोपडी बांधल्याने चित्तस्वास्थ्य लाभेल असे नाही. ज्याची वृत्ति बनली नाही त्याचे चित्त विक्षिप्त होण्यास मोठेसें राजकारण किंवा व्यापारधंद्यांतील संकटच लागते असे नाहीं; क्षुद्र गोष्टी- वरूनही अशाचें मन चंचल व क्षुब्ध होते. व चित्त जोपर्यंत प्रशांत नाही तोपर्यंत नुसते प्रशांत स्थळी बसल्याने काय होणार? आणि चित्त जर संयत आहे तर भरबाजारांत बसल्यानेही त्याला कोण विक्षेप करणार ? शुकमुनि हे डोक्यावर भरलेली परात घेऊन एक थेंब न सांडतां चित्रविचित्र शृंगारलेल्या व माणसांनी · गजबज- लेल्या विदेहनगरीतून फिरून आले! इंग्लंडचे माजी प्रधान ग्लडस्टन यांचे भोंवतीं कामाकाजाची किती गर्दी व तसदी असेल याची कल्पना कोणासही सहज होणारी आहे. परंतु, या गृहस्थाचा चित्तसंयम असा विलक्षण होता की, त्याने राजसभेतून पाऊल बाहेर टाकिले की, राजकारणाचे कसें तें स्मरणही नाही. ती सर्व कारणे राजसभेचे तिजोरीचे बांकावर ठेवून स्वारी मोकळ्या मनाने घरी परते. घरी त्याचे पुस्तकालय असे, त्याला त्याने 'शांतिसदन' असे नांव दिले होते. आणि त्या सदनांत तो बसला म्हणजे १६ ३. ] चित्तस्वास्थ्य. ३६३ दुनिया कोठे आहे याचे त्याला स्मरणही नसे. इतका मनोजय त्याचे अंगी होता. ग्लॅडस्टनसारख्या विविध-राजकार्य-समा कुल मनुष्यालाही जर चित्तस्वाथ्य संपादितां येत होते, तर सामान्य जनांस ते अप्राप्य असण्याचे काही कारण नाही. कोणत्याही गृहांत शांति असणे हे त्यांत रहाणारांचे वृत्तीवर अवलंबून आहे. व्यक्तीची शांति तिच्या मनःस्थितीवर अवलंबून आहे. रोम येथे ख्रिस्ती-विवाहाचे समयीं नूतन विवाहित दंपत्यांत परस्पर शांतता नांदावी म्हणून उपाध्याय परमेश्वराची प्रार्थना करीत असतो. कारण, शांततेचा अभाव झाल्यावर दंपत्यसुख संपलेंच समजावें. हिंदुविवाहपद्धतींत शांतिसूचक किती तरी मंत्र लग्नसमयी म्हटले जातात. खेड्यापाड्यांतून ज्यांचा सारा दिवस रानावनांत एकटें दुकटें काम करण्यांत जातो, अशांना शान्तीची वाण कधीच नसते; व प्रसंगी घरांत आल्यावर शांततेचा भंग झालाच तरी तो चालेलही. परंतु, मोठमोठ्या शहरांत उभा दिवस ज्यांची माथीं व्यवहाराच्या उलाढाली आणि रुपये, आणे, पै यांची गणती करण्यांत व व्याज- बट्टा, नफा-तोटा वगैरे आकारण्यांत सारखी गुंतल्यामुळे भणाणून गेली असतात, अशांना घरी आल्यावर तरी अवश्य शांतता मिळा. लीच पाहिजे. ती न मिळाली आणि घरी व दारी शांततेचा सार- खाच अभाव असला म्हणजे असल्याचे जिणे कष्टमयच होणार. आणि मग अशांचे धंद्यांतही पुढे पाऊल पडणे कठिणच. कारण, ३६४ सुख आणि शांति. [प्रकरण चित्त शांत नसेल तर त्यांना धंद्यांत तरी युक्तिप्रयुक्ति कशी सुचणार व दुसरे दिवसाला उमेद किंवा ताजेपणा कसा यावा ? बिळाचे आंत सर्प व बिळाचे बाहेर बोका, अशा पेंचांत सांपडलेल्या उंदराची जी अवस्था तीच अशांची. मनुष्य म्हणते की, पैशाने सर्व काही मिळते; पण ही चूक आहे. आरोग्य, शांतता व सौख्य या तिन्ही अमोल गोष्टी पैशाने मिळत नाहीत. मिळत नाहीत इतकेच नव्हे, परंतु त्यांपैकी आरोग्य आणि शांति या दोन्ही तर सहज असल्या तरी पैशामुळे नाहींतशा मात्र होतात. रोज 'घृतकुल्या मधुकुल्या मिळाल्याने आरोग्य नाहींसें होतें, व द्रव्यहानि होईल की काय, या धास्तीने शांति नष्ट होते. पण पैशाने मिळत नाहीत, म्हणून त्या अप्राप्य आहेत असेंमात्र समजू नये. त्या कोणालाही प्राप्य आहेत. परंतु त्याला अंगांत करामत लागते. भाजी-भाकरी खाऊन टामटुमींत असणारी आनंदी गरीब कुटुंबे शेकडों आहेत. कांहींचे म्हणणे की, इहलोकी सुख-शांति ही मुळीच नाहीत. मार्कस अरेलिअस म्हणतो, "सुख-शांति पाहिजे तर.ईश्वरासन्निस रहा." कवि म्हणतो (श्लोकचरण) सर्व वस्तु भयान्वितं भुवि नृणां विष्णोः पदं निर्भयम् । हे म्हणणे खरे आहे. तथापि, निर्मळ वृत्ति असली म्हणजे ईश्वराचे सान्निध्यच आहे असे समजावें. आणि मग सुखशांतिही दूर जाणार नाही.
१६ वें.] चित्तस्वास्थ्य. ३६५ सुखशांति संपादणे कोणालाही अशक्य नाही, तथापि, श्रम- साध्य आहे. परंतु, सुखशांतीची हानि करणेमात्र सर्वांस सुलभ आहे. खाण्यापिण्यांत अत्याचार करावा, व्यायाम किंवा खुली हवा मुळीच घेऊ नये म्हणजे कोणासही अग्निमांद्यादि रोग ठेवलेलेच. रोग आला की स्वतःला क्लेश आणि संगतीच्या माणसांनाही क्लेश. फाजील तळकट खाल्ल्याने याला खोकला उसळून हा ठो-ठो-ठो करणार; घरांतल्यांनाही झोप नाही. असा एकाचा आचरटपणा दुहेरी त्रासदायक होतो. आपण उधळपट्टी करावी, सावकाराला ओरडत बसवावें. स्वतःची वृत्ति संशयी ठेवावी म्हणजे आपल्या- लाही सुख नाहीं, दुसन्यालाही नाही. एका गृहस्थाची काहीशी मुंदर व तरुण स्त्री होती. हा गृहस्थ रोज कचेरीत जातांना स्त्रीला बि-हाडांत कोंडून ठेवून मुख्य दाराला कुलूप घाली व माडांचे खिडक्यांस नित्य आपले सहीच्या मोहोरा करी. यापेक्षां तो जर आपल्या सहचारीचे प्रेम व विश्वास संपादिता, तर दारे उघडी टाकूनही तो खचित याहून निश्चित झाला असता. रामचंद्राची सीता लंकापतीचे ताब्यात दिवसरात्र होती म्हणून रावणाला कितीसें यश आले? जे कोणी स्वहितार्थच झटत असतात अशांचे यत्न विफल झाले असता त्यांना फारच वाईट वाटते. परंतु परहितार्थ जे झट- तात, त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना यश आले, तर दुहेरी सुख होते; व प्रसंगी न आले तरी आपस्वार्थ्याइतका खेद होत नाही. , ३६६ सुख आणि शांति. [प्रकरण कारण, आपण सत्कार्यां यत्न करीत होतो, ही गोष्टच त्याचा खेद दूर करिते. परोपकार करण्याला मोठेसें शरीरबळ किंवा द्रव्यबळही लागतेच असे नाही. सदिच्छामात्र पाहिजे, म्हणजे क्षुद्र मनुष्य- देखील महदुपकार करू शकतो. याविषयी इसापनीतीतील, सिंहाला जाळ्यांतून सोडविणान्या उंदराची गोष्ट सर्वश्रुतन आहे. पुष्कळांचे आयुष्य दुःखमय व कष्टमय दिसते खरे; पण, त्याला कारण तेच आहेत; सृष्टि नव्हे. तेच आत्मदोषाने दुःख उत्पन्न करितात. दुःखें, संकटें ही संसारांत यावयाचीच. परंतु, त्यांना पुरून आपण उरले पाहिजे. ईश्वराने जी जी गोष्ट आम्हांला कर्तव्य म्हणून भाग ठेविली आहे, ती आमचे कल्याणाचीच आहे. दुःख में उद्भवते ते आमचे चुक्यांपासून उद्भवतें. जो कुढ्या स्वभा- वाचा मनुष्य असतो तो सर्वदा असंतुष्टच असतो. कृपण अनुकू- लता असूनही उपास काढितो; अधाशी व मद्यपी हे लोक खाद्यपेयांसारख्या सुखकर पदार्थांच्या सेवनानेच नाश पावतात. शक्तीबाहेर श्रम करणारा मनुष्य श्रमांपासून बळकट न होतां क्षीण होतो; असले रमणीय जगत् असूनही आळशी व अज्ञानी लोकांस ते कंटाळवाणे वाटते. आप्पलपोट्या व एकलकोंड्या मनुष्याला स्नेह, विश्वास व प्रेम यांचे सुख अनुभवण्यास सांपडत नाही. यांत परमेश्वराकडे किंवा सृष्टीकडे काय दोष ? दुर्व्यसनी मनुष्य दिवसें- दिवस अधोगतीला जातो. त्याचे शरीर व मन दुर्बल होत जाते. एकामागून एक सुखसाधनें विलयास जातात; व भ्रममूलक जी १६ वें.] चित्तस्वास्थ्य. ३६७ व्यसनापासून होणारी सुखें तीही त्याला त्रासदायक होऊ लाग- तात; आणि आपले भोवती सर्वत्र हितशत्रु भरले आहेत असा भास होऊन तो अक्षयी अस्वस्थ होतो. या गोष्टीचा बोल कोणा- कडे ? आपण स्वहस्तेच आपला नाश केला असे त्याचे डोळे उघ- डून त्याला दिसू लागले म्हणजे तर त्याचे मन त्याला अधिकच खाऊ लागते; व अखेर हळहळींतच त्याचा अंत होतो. ही त्याचे दुप्कृतीचीच फळे होत. याचेच उलट, सन्मार्गी मनुष्याला आयुष्य अधिकाधिक सुखकर व रमणीय भासू लागते. त्याचे चित्त शांत शांत होत जाते. मुविचाराचे त्याचे मनांत भांडार जमतें; व घरी दारी स्नेह, प्रेम, कृतज्ञता यांचाच लाभ होऊन, तो अखेरपर्यंत सुखी होतो. मनुष्याने स्वतःला तरवारीचे धारेवर वागवावें, पण दुस-याशी त्याचे वर्तन प्रेमळपणाचें व सदयतेचेच असावें. ते इतके की, मृत्युसमय आला असतां आपले हातून कोणास दुःख झाले होते, ही क्लेशदायक स्मृति त्याला टोंचीत राहूं नये. जबरदस्तीपेक्षा प्रेमळपणानेच जग अधिक वश होते. तितकेंच सबळ कारण असेल तर गोष्ट वेगळी; एरव्ही घे म्हटल्या दुस-याविषयीं अविश्वास धरूं नये व विनाकारण तो वाईट आहे असे मानून चालू नये. कारण, तसे करण्याने आपलेच चित्तस्वास्थ्याची हानि होते, आणि पुष्कळ वेळा आपला अंदाज चुकीचा ठरून आपणांसच फजित होण्याची पाळी येते. यापेक्षा आपण विश्वास टाकिला असतां दुस- राही इमानाने वागतो.
३६८ सुख आणि शांति. [प्रकरण धर्माचरण हेही सुखशांतीचे मोठेच साधन आहे. धर्म जरी भिन्न भिन्न आहेत, तरी प्रत्येकांत ग्राह्यांश पुष्कळ आहे. लबक म्हणतो, महंमदी धर्म साधा असून मद्यपाननिषेधक आहे; हिंदु- धर्म निवृत्तिपर आहे; यहुदी धर्म कडक एकेश्वरी आहे; बौद्धधर्म शांत, दयाप्रधान, व परोपकारनिरत आहे. एवंच, सर्वधर्म आपा- पले परी चांगलेच आहेत. तुम्ही कोणच्याही धर्माचे असा, फिकीर नाही. आपले धर्माप्रमाणे आचरण ठेवीत चला, म्हणजे त्यानेच तुम्हांला सुखशांति प्राप्त होईल. आपण कोण आहों, आलों कोठून, जाणार कोठे, वगैरे गोष्टी जरी आपणां सर्वांस नीट कळत नसल्या, तरी या जगांत आपले उचित कर्तव्य काय हे प्रत्येकास स्पष्ट कळते; आणि तेवढे कळून त्याप्रमाणे चाललें म्हणजे आयुष्य सुखावह होण्याला अडचण नाही. कित्येक विद्वान् लोक परमेश्वराचे अस्तित्वाविषयीं तर्कवितर्क काढीत बसून मोठी रणे माजवितात. परमेश्वर सत्यस्वरूप आहे. त्याला तर्काने प्रतिष्ठित करूं पहाणे हेच मूर्खत्व आहे, व तर्क- जालाने तो कधी आकळलाही जाणार नाही. त्याला आकळण्याची युक्ति एकच आहे. ती युक्ति म्हणजे भाक्त. भक्तीचा मात्र तो दास आहे. भक्ताचे दारांत तो राबत असतो, असा साधुसंतांचा अनुभव आहे. याकरितां त्याला सद्भावाने आपलासा करून त्यावर सर्व भार टाकून निश्चित रहावें.
१६ ३. ] चित्तस्वास्थ्य. ३६९ क्लेश प्राप्त झाला असता त्याचे उन्मूलन करण्याचे नादी पड- ण्यापेक्षा आपले चित्त अन्य गोष्टीकडे लावून त्याची विस्मृति पाडणे हे अधिक श्रेयस्कर आहे. किंवा तुकाराम सांगतात, त्या- प्रमाणे वागून सुखी व्हावें. ( अभंग) कांहीं पडतां जडभारी। दासें आठवावा हरी ।। मग तो होऊ नेदी शीग । आड घाली सुदर्शन ॥ हरिनामाचे चिंतने । बारा वाटे पळती विघ्ने । तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरीं ॥ १ ॥ सुखशांत्यर्थ मनुष्य कितीही इतर तजविजी किंवा हिकमती करो, ईश्वरभक्तीवांचून खरी सुखशांति त्याला प्राप्त होणें नाहीं; हा सर्व धर्मांचा सिद्धान्त आहे. तो मनांत आणून परमात्म्याचे ठिकाणी भावबळाने जे एकरूप होऊन रहातील, त्यांना मग अंतःशांति, बहिःशांति, शाश्वत शांति, अशी सर्वत्र शांतिच शांति प्राप्त होईल. शांति प्राप्त झाली की, मुख तिचेपाशी ठेवलेलेच आहे. भग. वंतांनीही सांगितले आहे की- (श्लोक) तमेव शरणं गच्छ । सर्वभावेन भारत ।। तत्प्रसादात्परां शांति । स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥१॥ भावार्थ:-हे अर्जुना, सर्व भूतांना स्वमायेनें रहाटावरील गाडग्या- प्रमाणे फिरविणारा जो हृदयस्थ परमेश्वर आहे, त्यालाच तूं सर्वात्मना शरष .
३७० सुख आणि शांति. [प्रकरण जाऊन प्रसन्न करून घे. म्हणजे त्याचे प्रसादाने तुला सर्वोच्चशांति प्राप्त होऊन अढळपद मिळेल. व तूं सर्व बंधांपासून मुक्त होशील. * * मुळांत या ठिकाणी लबक साहेबांनी असे म्हटले आहे की, मन मेहनताने कमाविलें असतां फार तर कामादि विकार व अपवित्र विचार यांपासून ते मुक्त होईल. तथापि, त्याच्याने पार्थिव-बंध-विनिर्मुक्त होता यावयाचे नाही. साहे- वांचे हे म्हणणे जडवादाचे प्रस्थ असलेल्या इंग्ल डांतील विद्वानालाच शोभणारें आहे. आमचे उपनिषदांचा सिद्धान्त याहून वेगळा आहे. “ ज्ञात्वा देवं सर्वपाशा- पहानिः " म्हणेज, देवाचे किंवा आत्मरूपाचे ज्ञान झाल्याने यावद्धंधांपासून सुटका होते, असा तेथे अभिप्राय आहे. आणि तोच खरा आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी लबक साहेबांचा अनुवाद करीत न बसता आपले शास्त्राचाच अभि- प्राय दिला आहे.
म
ett tetetatt titetetett tittatet.
प्रकरण सतरावें.
धर्म.
FT
Fett tatatatatatatatat tetatatatatatatatatatatatat यतोऽभ्युदयनिश्रेयससिद्धिः स धर्मः । -वैशेषिक दर्शन. भावार्थः :---ज्याच्या आचरणाने ऐहिक, सांसारिक सर्व सुखांची प्राप्ति होते व ज्याने पारमार्थिक मोक्षसुखही मिळते तो धर्म, धर्म चर । धर्मान्न प्रमदितव्यम् । ---तैत्तिरीयारण्यक. भावार्थ:---बाबा रे, धर्माचरण करा. धर्माचरणाची हय- गय केव्हाही करूं नये. धर्मो रक्षति रक्षितः । भावार्थः ....धर्माचे आपण आधी रक्षण करावे, तेव्हां तो आपले रक्षण करितो. (श्लोक) धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत । अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यंति कुलस्त्रियः ॥ १ ॥ स्त्रीपु दुष्टासु वाणय जायते वर्णसकरः । संकरो नरकायैव ।। २ ।। -श्रीमद्भा वहीता. भावार्थ:-...-'धर्म नाहीसा झाला म्हणजे सर्वच कुटुंबा- वर अधांचा पगडा बसतो. आणि अधर्माचा पगडा बसला म्हणजे कुलांतील स्त्रिया बिघडतात. स्त्रिया विध- डल्या की, वर्णसंकर माजतो. आणि वर्णसंकराने अखेर नरक प्राप्ति होते. ... T F प्रकरण सतरावें. धर्म. धौ विश्वस्य जगतः प्रतिष्टा । . लोके धर्मिष्ट प्रजा उपसर्पन्ति । धर्मेण पापमपनुदति । धर्म सर्वं प्रतिष्टितं । तस्माद्धर्म परमं वदंति ।। -नारायणोपनिषद् भावार्थ:-धर्म हा या अखिल विश्वाचा आधार आहे. लोकांत जो धर्मशील (राजा) असतो त्याच्या भोवती प्रजाजन प्रेमाने जमतात. धर्मयोगा- नेच पापापहार होतो. सर्व काहीं धर्माने आश्रयावर उभे आहे; आणि म्हणूनच धर्माला सर्व वस्तूंत परमश्रेष्ठ असें म्हणतात. जलपर्यटण करीत असतां अकस्मात् गलबत फुटून मध्येच एका अपरिचित रानटी प्रदेशांत जाऊन पडणारा प्रवासी व या अफाट विश्वरूप अज्ञात प्रांतांत जन्मद्वारा एकदम येऊन थडक- णारा मनुष्य प्राणी, या दोघांची अवस्था सारखीच. त्या उता- रूला जसे आपण कोठे आलों व आतां कोटें जावें, मार्ग कोणता व तो कसा क्रमावा, हे न कळल्याने तो गोधळांत पडून व्याकुळ होऊन जातो, त्याचप्रमाणे मनुष्यालाही आपण आलों कोठे व करावयाचे काय, हे न समजल्यामुळे भोव-यांत सांपडल्यासारखें व्हावे, हे स्वाभाविकच आहे. परंतु, तो उतारू जर जेथे शहाणे लोकांची सत्ता व व्यवस्था आहे अशा स्थळी लागला असेल, तर त्याला ठिकठिकाणी मार्ग सांगणारे उदार लोक आढळतात. निदान सुख आणि शांति. [प्रकरण -- तरी मनु- मार्गदर्शक स्तंभ दिसतात, व त्यांचे साह्याने तो आपण आलों कोठे, जावयाचें कोठें, या गोष्टींचा उलगडा पाडून घेऊन सुखी होतो. त्याच प्रकारे मनुष्यप्राणी हा ज्या देशांत सुशिक्षित लोक आहेत व शास्त्रादि व्यवस्था आहेत, अशा ठिकाणी जन्मास आला असतां त्याला वरील साधनांचे योगाने आपण आलों कोठें, आप- णास करावयाचे काय, व जावयाचे कोठे, ह्या गोष्टी नीट समजून येऊन तो संशयावतात पडत नाही. आणि उद्दिष्ट स्थल व तत्प्रा- पक मार्ग या दोहोंचे सम्यक ज्ञान असले, म्हणजे मग मार्ग जरी काहींसा बिकट असला, आणि प्रवासही दूरचा असला, प्याला त्याची विशेष क्षिति वाटत नाही; पण जावें कुठे व कसे हेच कळले नसले, म्हणजेमात्र त्याचे पुरे हाल होतात; याच रीतीने मनुष्याला इहलोकीं प्राप्य काय व त्याचे साधन कोणते, हे स्पष्ट समजले असता त्याचे बारा आणे काम झाले असें . समजावें. वाटसरू आपल्या पायांनी चालावयास कबूल असतो, पण त्याला सम्यगमार्गदर्शकच हवा असतो. कारण, तदभावी त्याचे अंगी गतिसामर्थ्य असूनही तें विफल होते, व म्हणूनच तो, मार्गदर्शक मिळाल्यास त्याचा फार आभारी होतो. याचप्रमाणे ज्या देशांतील मनुष्यांना असले प्रामाणिक मार्गदर्शक उपलब्ध असतील ते खरेच दैवाचे; आणि त्यांनी त्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार मानिले पाहिजेत; न मानिल्यास ते कृतघ्न होत इतर देशांचे आम्ही बोलत नाही; पण निदान आर्यभूमीत किंवा हिंदुसमाजांत जन्मास येणारा मनुष्य तरी या बाबतीत १७ ३.] धर्म. ३७५ निखालस विशेष भाग्यवान आहे. कारण, परम कारुणिक ऋषि व शास्त्रकार यांनी त्याचा रस्ता इतका साफ चोखाळून ठेविला आहे की, त्याने बेधडक चालू लागावे; विचारपूस करण्याचें- देखील त्याला कारण नाही. त्याचे मार्गावरच मोठाले खांब पुरून त्यांवर अंधळ्याने वाचावी इतकी ठळठळीत अक्षरें कोरून ठेविली आहेत. ह्या खांबांची नावें: १ धर्म, २ अर्थ, ३ काम, ४ मोक्ष ही होत. व ती यथाक्रमच लिहिली आहेत, त्यांत व्यत्यास मुळीच नाही. यांचे धोरणाने मनुष्य चालला म्हणजे आयताच त्याचें जें परमधाम" आहे तेथे जाऊन तो पोचावा अशी योजनाच केलेली आहे. इतकी बिनचूक रस्त्याची आंखणी किंवा इतकी निभ्रांत व्यवस्था अन्य देशांत किंवा अन्य लोकांत केलेली आढळत नाही. या आर्यभूमीत व विशेषतः हिंदुसमाजांत जन्मास येणे हे मोठ्याच पुण्याईचे फल आहे, असे आम्हांस तरी वाटते. आतां या व्यवस्थेचे महत्त्व किती व कसे व हिला काय म्हणतात, ते आपण पाहूं. ह्या व्यवस्थेला चतुर्विध -पुरुषार्थ- व्यवस्था " असे म्हणतात. पुरुषार्थ म्हणजे जन्मास आलेल्या पुरुषाने किंवा मनुष्याने (स्त्री वा पुरुष ) प्राप्त करून घेण्याच्या वस्तु. ह्या सर्व ज्ञात्यांच्या मतैक्याने चारच ठरल्या आहेत. पण या एकएक इतक्या व्यापक आहेत की, त्या चहूंनी सर्व ब्रह्मांड कवळले आहे. या चहूंपैकी धर्माचा ज्येष्ठमान आहे. आणि तो यथार्थच आहे. त्याची व्याप्ति किती आहे हे "धो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा" या उपनिषद्वाक्यावरून लक्षात येईल. अर्थाचें ३७६ सुख आणि शांति. [प्रकरण परम गति' असें महत्त्व व व्यापकता संसारी जीवांना विज्ञातच आहे. तिसरा पुरुषार्थ काम. हाही पशुपक्ष्यांपर्यंत कसा व्यापून आहे व सृष्टीच्या परंपरेला आधारभूत कसा आहे, हे अल्पविचाराने समजणारे आहे. या तिन्ही पुरुषार्थांना मिळून त्रिवर्ग ' असें एकवट नांव दिले आहे. आणि चौथा अर्थ जो ' मोक्ष' त्याला तदपेक्षेने * अपवर्ग' अशी संज्ञा आहे. या मोक्षालाच म्हणतात. अर्थत् हा गाठला म्हणजे गति किंवा प्रवासच खुंटतो, व मनुष्य शाश्वत विश्रांतीचे स्थळी पोचतो. मग प्रवासाचे लफडें त्याच्या मागचे सुटले व म्हणूनच याला 'मुक्ति । असेंही म्हणतात. 'हत्तीचे पायांत सान्यांचे पाय' अशी म्हण आहे; त्याचप्रमाणे चतुष्पाद धर्माचे पोटांत बाकीचे पुरुषार्थ. धर्माचें अग्रणीत्व वर सांगितलेच आहे व ते यथार्थही आहे. धर्मादर्थश्च कामश्च म्हणजे अर्थ व काम हे धर्मापासूनच प्राप्त होतात व तसे जर ते होत नसतील तर ते इष्ट नव्हत, असा आमचे शास्त्राचा स्पष्ट अभिप्राय आहे. जो अर्थ धर्मतः मिळविला नसेल तो अनर्थमूल समजावा. कामाची तीच व्यवस्था. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की- (श्लोकार्ध) धर्माऽविरुद्धो भूतेषु । कामोऽस्मि भरतर्षभ । भावार्थ:-हे अर्जुना, धर्माला प्रतिकूल नसणारा जो भूतांचे ठिकाणी कामविकार दिसेल तेवढामात्र मी. (तदितर विकार केवळ पशुवृत्ति होय.) १ चतुष्पात्सकलो धर्मः । ----मनुस्मृति.
१७ व.] धर्म. ३७७ यथाधर्म म्हणजे विहितकालीं स्वस्त्रीचेच ठिकाणी पुरविला जाणारा जो काम त्याची योग्यता ब्रह्मचर्याचे तोडीची गणली आहे. व म्हणूनच त्याची खुर्ची मोक्षाचे शेजारी आमचे धर्मकारांनी मांडिली आहे, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. उरला पुरुषार्थ 'मोक्ष.' हा त्रिवर्गापासून भिन्नवर्णी आहे, तथापि त्याची प्राप्ति धर्मानेच होणारी आहे. एतावता चतुर्विध पुरुषार्थात धर्मच ज्येष्ठ व श्रेष्ठही आहे. इतर अर्थ केवळ त्याचे उपजीवी आहेत. धर्म दोन प्रकारचा. प्रवृत्तिपर व निवृत्तिपर. आणि अभ्युदय म्हणजे ऐहिक उन्नति व निःश्रेयस म्हणजे पारलौकिक कल्याण, हे त्याचे फल होय. अर्थात् उभयलोकी सुखदाता एक धर्मच आहे. अर्थ कामांचा काबू परलोकावर चालत नाही. म्हणून मनुष्य- मात्राने प्रथम धर्मसंग्रह करावा अशी शास्त्राज्ञा आहे. मनू ने धर्माची व्याख्या (श्लोक) वेदः स्मृतिः सदाचारः । स्वस्य च प्रियमात्मनः ।। एतच्चतुर्विधं प्राहुः । साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥ १ ॥ भावार्थ:---.ईश्वराच्या निःश्वासभूत श्रुति, तदनुसारी मन्वादि स्मृति, शिष्टांचा आचार, व विकल्प असतां आपणास प्रिय असलेला पक्ष, चार प्रकारचे धर्माचे लक्षण आहे; म्हणजे चार गोष्टी मिळून धर्म होतो. गाप्रमाणे केली आहे. वेद ही प्रत्यक्ष परमेश्वराची वाणी, स्मृति ही वेदांला अविरोधी अशी पराशरादि ऋषींची वाणी, ह्या उभयांस धरून वेदकालानुसार ज्ञात्यांनी घातलेले परिपाठ, व वैकल्पिक , या .
३७८ सुख आणि शांति. [प्रकरण पक्ष असतां भापणांस हितकर असेल तो पक्ष, या चार गोष्टींचा धर्मात समावेश आहे. तथापि या सर्वांत श्रुति म्हणजे ईशवाणी हिलाच प्राधान्य आहे. इतर तीन गोष्टी तदनुसारी असल्यास ग्राह्य आहेत. अर्थात् धर्म म्हणजे ईश्वरी आज्ञा असा ढोबळ अर्थ धरण्यास हरकत नाही. " ईश्वर कशी आज्ञा देतो? त्याला नाम- रूपच नाही, मग तोंड कुठलें ?'' इत्यादि कुतकांना उत्तर देण्याचे हे स्थल नाही. शिवाय, भिन्नधर्मीय असले तथापि भूतलावरील तीनचतुर्थांश लोक ईश्वराचे अस्तित्व व सगुणत्व कबूल करून श्रीकृष्ण, झोरास्तर, मनु, बुद्ध, विस्त, महंमद, इत्यादि रूपांनी परमेश्वर साक्षात् आविर्भूत होऊन त्याने मनुष्यपाण्याच्या इहपरत्र सुखासाठी काही विशिष्ट नियम घालून दिले आहेत व तोच आपला धर्म असें धरून चालत आहेत; त्या अर्थी त्या वादांत पड. ण्याचेही तादृश कारण नाही. शिवाय धर्म हा ईश्वरप्रणीतच पाहिजे, मनुष्याचा तेथें अधिकारच नाही. कारण, मनुष्य हा क्षणजीवी, किञ्चिज्ज्ञ, आपम्वार्थी, व विकारवश असा प्राणी अस- ल्याने धर्मासारखीं अखिल लोकहितकर व त्रिकालाबाधित तत्त्वे स्थापन करणे त्याच्या आवाक्याबाहेरचे आहे. आणि म्हणूनच परमात्म्याने भिन्नभिन्न देशांत भिन्नभिन्न काली अपेक्षेनुरूप अव. तार घेऊन मनुष्यांत धर्मस्थापना केली आहे; हे मनुष्यजातीचे मोठेच भाग्य होय. नाही तरी धर्म हा ईश्वरोक्तच असणे न्याय्य आहे. कारण, मनुष्याच्या बऱ्यावाईट कर्माचे फल देणे जर ईश्व- राकडे आहे, तर मनुष्याच्या कृतीचे बरेवाईटपणही ईश्वराचेच १७ बैं.] धर्म. ३७९ कायद्याप्रमाणे ठरणे जरूर आहे. नाही तर 'कायदा करावा मोंग- लाने आणि शिक्षा द्यावी इंग्रजाने' असे वेडे गाणे होईल. राजा हा जर शास्ता आहे तर राजाच कायदेकर्ता पाहिजे, हे कोणीही समंजस मनुष्य कबूल करील. आणि म्हणूनच परमकारुणिक पर- मात्म्याने मनुष्यांचे तर्कवितकांची परवा न करितां वेळोवेळी स्वांगें धर्मसंस्थापन केले आहे. हिंदुस्थानांतील लोक इंग्लंडस्थांइतके सु. शिक्षित नाहीत, म्हणून इंग्लंडाप्रमाणे येथे ' कॉमन लॉ-( सामान्य न्यायतत्त्वें)' वर न विसंबतां 'कोडिफाइड लॉ' म्हणजे 'विशिष्ट कलमबंदी कायदा' करणे जर इंग्रजासारख्या मनुष्यप्राण्याला अवश्य वाटले, तर ईशतुलनेने शतमूर्ख अशा एकंदर मानव- जातीला स्वतःच व्यवस्थित नियम घालून देणे ईश्वरासही जरूर वाटावें यांत नवल नाहीं. एतावता 'धर्म' म्हणजे ईश्वराज्ञा हा अर्थ सिद्ध झाला. तोच पथ्यकर आहे. तथापि हा अर्थ कांहीसा कृत्रिम किंवा सांके- तिक आहे. 'धर्म' शब्दाचा साहजिक किंवा यौगिक अर्थ थोडा वेगळा आहे. पण, तोही मनुष्य ने ध्यानात वागविणे अत्यंत हितावह आहे. धर्म हा शब्द 'धृ' म्हणजे ' धारण करणे' या धातूपासून निघाला आहे. अर्थात् धर्म ही एक धारणा किंवा पकड आहे. म्हणजे प्रत्येकाचे मनाने ग्रहण करण्याची एक वस्तु आहे. जुलु- माचे रामरामाची ही गोष्ट नाही, आणि म्हणूनच अविधांप्रमाणे समशेरीचे जोराने किंवा जुलमाने इतरांस बाटवून आपल्यांत ओढणे हे सनातनधर्मात निंद्य मानिले आहे. व ३८० सुख आणि शांति. [प्रकरण धर्म हा जरी या प्रकारें जबरदस्तीचा विषय नसला तरी त्याची हेळसांड क्षम्य नाही. कारण, ' कायद्याचे अज्ञान ही सबब नाहीं ( Ignorance of law is n', excuse )' असें जर मनुष्यकृत कायद्यांतही एक बंधन आहे, तर ईश्वरकृत कायद्यांतही ते अस- लेंच पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येक शुभेच्छु मनुष्याने प्रेमाने व खुषीने धर्म संग्रह करणे इष्ट आहे. तसें तो न करील तर कष्ट पावे. लच पावेल. कारण, कायदा कोणाचाही मुलाजा करीत नाही. एका ज्ञात्याचे असे म्हणणे आहे की, मनुष्याला बरा-वाईट काही तरी धर्म पाहिजे, निवळ धर्मलंड मनुष्य समाजाला भयं. कर होय; हे म्हणणे खरे आहे. कारण, धर्म ही मर्यादा आहे. आणि मर्यादा वेडीवांकडी असली तरी अमर्यादेपेक्षां बरी. आग. गाडीची सडक नागमोडी असली तरी ती समर्याद असते, व या- मुळे आगगाडीपासून वितीवरही मनुष्य निर्भय उभा. राहतो; कारण ती रुळांची मर्यादा सोडून न जाण्याची खात्री असते. परंतु पायगाडी किवा माटार-गाडी दूर पहाताच मनुष्याचा मार्गात त्रेधा होते; कारण या बया कशा जातील त्य चा काही नियमच नाही. याचप्रमाणे धर्मलंडापेक्षां कुधर्मी मनुष्यदेखील पुरवतात; कारण, त्यांचे वर्तनाला काही तरी ठराविक मर्यादा असते. वरील विचारांवरून, समाजाच्या सुरक्षिततेलाही धर्माची अव- इसकता किती आहे, हे कोणाही सुज्ञ मनुष्याच्या लक्षात येईल. यासाठीच आमचे शास्त्रांत, पुराणांत सर्वत्र धर्म, धर्म, धर्म म्हणून ? Even a bad religijn is better then no religion.
कारण, १७ ३.] धर्म. ३८१ टाहो फोडिला आहे. आजकाल काही लोक म्हणतात की, 'नीति असली म्हणजे झाले. धर्मावांचून काय अडले आहे ?' परंतु हे त्यांचे म्हणणे विवेकविधुर आहे. ख्रिस्तीशास्त्रांतील आदिमाता ईव्ह ही जशी अडामचेच बरगडी- पासून निघून त्याची सहचारिणी झाली, तशीच नीतिही धर्माची सहचारिणी असून धर्मोद्भवच आहे. अर्थात्, स्त्री जशी पतिप्राणा असते तशीच नीतिही धपिजीविनीच असणार. पतीवांचून स्त्री जशी विकल आहे, तशीच धर्मावांचून नीतिही विकल आहे. आपल्यांत म्हण आहे ' दादा अंगें वहिनी सोयरी. ' पण, जिथे दादालाच कोणी विचारीना तेथें वहिनीचा बोज कसा रहावा ? आणि कोणी ठेवितों म्हणतील, तर ते चावट.समजावे. याप्रमाणे धर्मविरहित नीतीने समाज चालेल म्हणणारांचे निरा- करण झाले. आता दुसरा एक बारीकसा घमेंड्या वर्ग आहे. त्याची मेद अशी दिसते की, धर्मही नको आणि नीतिही नको. केवळ राजशासनाने-एक दंडशास्त्र प्रज्वलित उभे असले म्हणजे-प्रजातंत्र सुरळीत चालेल. पण, हेही म्हणणे भ्रममूलकच समजावें. आणि याचे कारणही उघडच आहे. कारण सार्वभौमही राजा झाला तरी मनुष्यच, आणि त्याचे राजपुरुषही मनुष्यच. अर्थात् ते नियतदेश- कालवर्ती व मर्यादितज्ञानवान् पडले. चोरी उघडकीस येईल तेव्हां ते शासन करणार. परंतु, जगांत हजारों कृये इतक्या गुप्तपणाने होतात की, कोणालाही त्यांचा पत्ता लागत नाही. शिवाय, राजा पुरुष ज्याला गुन्हेगार ठरवून शासन करितात तो निरपराधी ३८२ सुख आणि शांति. [प्रकरण असून खरा रामोशी निराळाच असतो, असेंही केव्हां केव्हां मागाहून उघडकीस येते. यावरून राजशासन किती अपुरे आहे है कोणालाही कळेल. पण धर्म किंवा ईशशासन यावर हा अपुरे- पणाचा दोष कोणालाही लादतां येगारा नाही. कारण, ईश्वर हा सर्वज्ञ, सर्वसाक्षी व सर्वव्यापी असल्यामुळे, त्याचा डोळा चुक. वून कोणी कोठेही व केव्हाही एकादें गैरकाम करीन म्हणेल तर ते शक्यच नाही. मनुष्याचे डोळ्यांला मनुष्य पट्टे बांधील; पण त्या सर्वचक्षुपुढे तो काय करणार ? अर्थात् “ देव मला पाहतो आहे " ही भावना ज्याचे हृदयाला एकदां दृढ डसली त्याचे वर्तनावर पहारेकरी नको, आणि गुप्त हेरही नको. ईश्वर हा सर्व- गामी असल्याने त्याच्या अस्तित्वाचे स्मरण, काला अखंड सावध ठेवून सहज कुवर्मापासून परावृत्त करीत असते. आणि म्हणूनच आमच्या मन्वादि स्मृति केवळ पीनलकोडें नसून " धर्मसंहिता " म्हणविल्या जातात. राजशासनांत दुसरही एक कमीपण आहे. त्याचे रूप वेळोवेळी बदलते. त्याचा कर्ता मनुष्य हा जसा क्षणिकबुद्धीचा, तसे तेही हमेष बदलणारे असते. मानवी कायद्यांत साठ वर्षांची आज मुदत आहे, तर काही काळाने ती बदलून तीस वर्षांची होते. असलें खूळ ईश्वरी कायद्यांत नाही. तो सनातन आहे; शाश्वत आहे; स्थिर आहे. जेथे घटकेंत एक आणि घटकेंत एक असा प्रकार, तेथे जीवांस खरे सुख कसे व्हावे ? समजा, हल्लीचा कर्जाचा कायदा तीन वर्षे झाली की ऋण बुडालें असें सांगतो. अने राजरोस कचे रुपये घेऊन खाल्ले .
१७ दें. धर्म. ३८३ ! असतात, पण अ हा कशीबशी तीन वर्षे चोरून मारून काढितो, आणि. चौथ्या वर्षी कला बेधडक सांगतो की तुझें मी काही लागत नाहीं ! ही रीति कशी सोईवार व्हावी ? परंतु ईश्वराचा कायदा मानणारे जे लोक आहेत, ते चिठ्ठीचपाटी काही नसतांही आपले बाप-आज्यांची ऋणे डोईवाटे भरून आपण कृतार्थ झालों' असें आनंदाने समजतील. यावरून राजशासन व ईशशासन यांत महदंतर आहे, हे स्पष्ट झाले. इत- केंच नव्हे, तर धर्मशासन नाहीसे झाल्यास सर्व गप्पाघोळ होऊन जनता दुःखावर्तीत पडेल; आणि हे सर्व जाणूनच धर्मरक्षणा- विषयी जगत्पिता फार काळजी घेत असतो. पृथ्वीवर धरणीकंप, अमिप्रलय, अवर्षण, घोरव्याधि, वगैरे महान् अनर्थ गुजरले तरी परमेश्वर तादृश फिकीर करीत नाही; परंतु धर्माची ग्लानि होऊन अधर्माचे अभ्युत्थान दिसू लागले म्हणजे खासा स्वारी अंगी तसदी घेऊन लोकांत येऊन धर्मसंस्थापना करीत जाईल, अशी खुद्दांनी सररहा कायमची जाहिरातच छापून टाकिली आहे. यावरून साक्षात् परमात्मा धर्माचे महत्त्व किती मानितात व ते कसे यथार्थ आहे, हे लक्षात येईल. (श्लोक) यदा यदा हि धर्मस्य । ग्लानिर्भवति भारत ॥ अभ्युत्थानमधर्मस्य । तदात्मानं सृजाम्यहम् ॥ १ ॥ परित्राणाय साधूनां । विनाशाय च दुष्कृताम् ॥ धर्मसंस्थापनार्थाय । संभवामि युगे युगे॥२॥ --श्रीमद्भगवद्गीता.
३८४ सुख आणि शांति. [ प्रकरण धर्माचे साहजिक व सांकेतिक असे दोन अर्थ वर सांगितले आहेत. साहजिक किंवा यौगिक अर्थ धारणा, व सांकेतिक अर्थ आज्ञा, चोदना किंवा प्रेरणा असा आहे. या दोहोंचा मिलाफ करून पहातां धर्माला दोन अंगें अवश्य असतात; एक अंतरंग आणि एक बहिरंग. धारणा म्हणजे श्रद्धा किंवा विश्वास. सर्वज्ञ, सर्वशक्ति, सर्वगामी असा ईश्वर म्हणून आपल्या प्रत्येक स्थूल. सूक्ष्म कर्माचा सनातन साक्षी, नियंता व फलदाता आहे व त्याचे आज्ञेप्रमाणे वागण्यांतच आपलें कल्याण आहे, इत्याकारक जो दृढ व अव्यभिचारी प्रत्यय किंवा विश्वास हे धर्माचे अंतरंग, व त्या विश्वासबलाने त्या नियंत्याचे आज्ञानुवर्तन करणे म्हणजे धर्माप्रमाणे आचरण करणे, हे धर्माचे बहिरंग. एता- वता, श्रद्धा आणि आचार ही दोन अंगे मिळून धर्म सांग होतो. यांतील एक अंग लटके असल्यास पक्षघात झाला म्हणून सम. जावे. यासाठी ही उभयांगें अविकल ठेवण्याविषयी प्रत्येक व्यक्तीचा यत्न पाहिजे, तरच इष्टसिद्धि होईल. धर्माचे प्रभुत्व ईश्वराकडे असण्यांत दोन फायदे मार्ग दर्शविले. तिसराही एक मोठाच फायदा या गोष्टीपासून आहे. तो फायदा म्हणजे समाजाचे किंबहुना मानवजातीचे एकीकरण. आजकाल हिंदुस्थानचे पांची इलाखे एकवट झालेसे आपण कां म्हणू लागलों ? तर ते एकाच नियंत्याचे सत्तेत आले म्हणून. याचप्रमाणे धर्म- शास्ता ईश्वर हा एकच असून सकल जगत्पिता असल्यामुळे सर्वच मनुष्ये त्याची लेकरें आहेत ही गोष्ट कबूल करणे कोणा मान- १७ ३.] धर्म. ३८५ धनासही शरमेचे वाटत नाही. अर्थात् एकपितृत्व आले तेथे बंधुत्व सहजच आले. हिंदुधर्मात जातिभेद आहे तो बरा की वाईट हा प्रश्न वेगळा; पण, एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की, एकजातीयता असल्यावर मोठा लक्ष्मीपतिही शतदरिद्याला पंक्तीस घेण्यांत अवमान मानीत नाही. युरोपांत जातिभेद नाहीत, पण व्यक्तिभेद कांही बाबतींत येथल्यापेक्षाही अधिक तीव्र आहेत. असो. मुद्दा हाच की, सर्व मानवजातीलाही मागे-पुढे सुखाने एक होता येणे शक्य असेल, तर तें ईश्वराचें जगत्पितृत्व व अखिल मनुजांचे बंधुत्व सांगणाऱ्या धर्मामुळेच आहे. आणि म्हणून धर्माची पायरी सामान्य नीति किंवा राजशासन या उभयतांचेही वरची आहे. येथवर धर्माची उत्पत्ति, धर्माचे महत्त्व, व धर्माचे मोघम स्वरूप यांचा विचार झाला. आतां धर्माचे विशिष्ट स्वरूपाचा विचार पाहूं. धर्माचे श्रद्धा म्हणून जें अंतरंग पूर्वी सांगितले ते अर्थात्च गुप्त व स्वसंवेद्य आहे. ते ज्याचे त्यानेच संभाळावें. मात्र एवढे सांगणे भाग आहे की, या अंतरंगावांचून आचाररूपी बहि- रंग निवळ दंभ किंवा थोतांड होय. दुसरे में बहिरंग म्हणजे आचार, तोमात्र लोकदृष्ट आहे; अतएव त्याचा सविस्तर विचार करणे शक्य आहे. आणि म्हणूनच धर्म हा विशेषतः " आचार- " मानिला आहे. आतां आजकाल भिन्नभिन्न देशांत भिन्नभिन्न लोकांत जे काही असंख्य आचार धर्माचे नांवाने चालू आहेत, ते कालगतीने इतके विसदृश झाले आहेत की, त्यांचे प्रभव - ३८६ सुख आणि शांति. [प्रकरण एकीकरण किंवा समर्थन करणे कोणाही माणसाच्या शक्तीबाहेरचे आहे. कारण, विशिष्ट व्यक्तींचे अहंकार, दुसन्या काहींचे स्वैरा- चार, कांहीचे अज्ञान, इत्यादि अनेक कारणसंकरांनी हे आचार मूळमर्यादेपासून इतके भटकले आहेत की, त्यांना पूर्वरूपास आणणे म्हणजे बंगालचे उपसागराजवळचे गंगेचे शतमुखी पात्र आपल्या पिण्याचे झारीत सांठवण्याचा यत्न करण्यासारखेच असाध्य आहे. याकरितां या असाध्य साधनाचे यातायातीत न षडतां, ज्या गोष्टी कोणत्याही धर्मातील, कोणत्याही पंथांतील, कोणाही समंजस मनुष्यास सहजवृत्त्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशा आमचे धर्मात सांगितल्या आहेत, त्यांचाच धर्माचे आचा- रांगांत आपण विचार करूं. भगवान् मनूंनी फार चतुराईनें या अमोल गोष्टी एका श्लोका- (तच संगृहीत केल्या आहेत. मनु म्हणतातः (श्लोक) अहिंसा सत्यमस्तेयं । शौचमिंद्रियनिग्रहः ॥ एतं सामासिक धर्म । चातुर्वण्र्येऽब्रवीन्मनुः ॥ १॥ भावार्थ:---अहिंसा किंवा दया, सत्य किंवा खरेपणा, अस्तेय म्हणजे अचौर्य, शौच म्हणजे अंतःशुद्धि व बहिःशुद्धि, व इंद्रियदमन एवढया गोष्टी चारही वर्णाना धर्म म्हणून सारख्याच लागू आहेत. मनूंनी आर्यावर्तासाठीच आपली संहिता लिहिली असल्यामुळे स्वाभाविकच त्यांनी हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्याचाच उल्लंख केला. परंतु, त्यांनी दिलेल्या गोष्टींकडे पाहिले म्हणजे त्या हिंदुधर्मातील ।
१७ वें.] धर्म. ३८७ पोटभेदांनाच सरसकट लागू पडणान्या नसून पृथ्वीवरील यावत् भिन्नभिन्न धर्मांनाही सारख्याच लागू पडणा-या आहेत, असें ठरतें. अशीच कांही चतुराईने त्यांची निवड केली आहे. यास्तव हेच सर्ववादिसंमत व निरपवाद असें मनूक्त धर्मलक्षण प्रमाण घेऊन त्याचे पालनाने जनतेला सुख को होईल हे आपण पाहूं. मानवधर्मातील पहिली आज्ञा अहिंसा ही होय. अहिंसा म्हणजे प्राणघातापासून निवृत्ति असा स्थूल अर्थ आहे. तथापि ज्ञानेश्वरादिकांनीं अहिंसेचे कायिक, वाचिक, मानसिक असे तीन भेद करून, पुनरपि कायिक अहिंसेचे पादेंद्रियसाध्य, हस्तेंद्रिय- साध्य व चक्षुरिंद्रियसाध्य असे तीन पोटभेद केले आहेत. या सर्व भेदांचे सोपपत्तिक विवरण ज्ञानेश्वरी, अध्याय १३, श्लोक ७ यांत पहावे. त्या सर्वांचा संकलित अर्थ घेतां कोणाही प्राण्याला आपली काया, वाणी किंवा मन यांपैकी एकाही. द्वाराने पीडा न देणे म्हणजे अहिंसा, असा होतो. कायेने होणारी अहिंसा त्रिविध दिली आहे; त्यांत पायाखाली कीडमुंगी न तुडवितां चालणे ही पादेंद्रियसाध्य, पशुपक्ष्यांना हातवारे करून न भेवडावणे ही हस्तेंद्रियसाध्य आतां चक्षुरिंद्रियसाध्य म्हणजे कोणाही जीवास क्रोधिष्ट मुद्रेनें न दटावणे किंवा कोणी परस्यादि मनुष्य एकांतांत असतां तिकडे डोळे घालून त्या मनुष्याच्या स्वच्छंदाला उपरोध न करणे. (ज्याला Outraging the modesty a intruding the privacy of a woman असें आजच्या कायद्यांत म्हणतात). यापुढे वाचिक अहिंसा म्हणजे ३८८ सुख आणि शांति. [प्रकरण कोणालाही दुरुत्तर न करणे, किंवा अपमानास्पद अथवा मर्मतक शब्द न बोलणे. आणि मानसिक अहिंसा म्हणजे दयालुता किंवा दया, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. या प्रकारच्या या पांचही अहिंसांचें या भूतलावरील प्रत्येक मनुष्य जर यथाशास्त्र अवलंबन करील तर आम्हांस वाटते, पृथ्वी- वरील निम्मे दुःखराशि नाहींसात्र होईल. पण खेदाची गोष्ट ही की, शंकडों माणसें इतकी निर्दय, परवेदनानभिज्ञ व अहंमन्य आढळतात की, ती वरील अहिंसांचे उलट आचरण करीत असून जगतांतील दुःखराशि वाढवीत असतात. कीडमुंगीचा तो पाड काय, पण थोडासा अधिकार येतांच सजातीय मनुष्यप्राण्यांना पायाखाली ती तुडवू लागतात ! साधल्यास आश्रितावर धावून जाणे, तोंडांत मारणे, यांतही आळस नाही. डोळ्यांचे खोडसाळ- पणाला तर मर्यादाच नाही. येथे अधिकार म्हणजे ' सरकारी खुर्ची' असा संकुचित अर्थ समजू नये. कौटुंबिक, सार्वजनिक, खासगी, सरकारी यांपैकी कोणत्याही संबंधांतील वरिष्ठपण हा त्याचा अर्थ आहे. वाचिक हिंसेचीही जगांत टंचाई नाही. वर्तमानपत्रकारां- सारखे सुशिक्षित लोकदेखील शिवीगाळीवर येणार, मग नवरा मेल्यामुळे निरुपायास्तव माहेरी भावाकडे आलेल्या अनन्यगतिक नणंदेचे एकादी ऐश्वर्यमत्त भावजय दर शब्दाला लचके तोडति असली, तर नवल कशाला वाटावें ? हरहर ! गीतेत आदेशिल्या- प्रमाणे नुसते अनुद्वेगकर वाक्य जर मनुष्य बोलत जातील, तर किती तरी दुःख हलकावेल. तुकोबा म्हणतात:- १७ वें.] धर्म. ३८९ (अभंग) देवापायीं झालें ब्रह्मांड सोइरें। कोवळया उत्तरें काय वेंचे ॥ या अभागी हिंदुस्थानावर अनेक रूपांनी दुःखाचा पाऊस कोसळला आहे, तरीही मनुष्य स्वकृतीने आणखी त्यांत भरच टाकीत आहेत; तेव्हां देवाकडे तरी काय बोल द्यावा ? हीच जर मनुष्ये परस्परांशी सानुकंप वर्तन करतील, तर वामनांनी म्हटल्या- प्रमाणे- (श्लोक) होई वन्हि जळापरी, जलधि हा की ओहळाचे परी । मेरू स्वल्पशिळेपरी, मृगपती तोही कुरंगापरी ॥ की तो सर्प फुलापरी, विषजले पयिषवृष्टीपरी । होते सर्वही वापरी, वसतसे सच्छील ज्याचे घरीं ॥ १ ॥ अशी सुस्थिति होईल. पण सच्छीलाचीच माणसांत फार वाण दिसते. पांचवा प्रकार मानसिक अहिंसा किंवा दया. हिचे महत्त्व काय वर्णावें ! “ नास्ति धर्मो दयापरः दया धरमका मूल है ही वचने सुप्रसिद्धच आहेत. सत्यापरता नाहीं धर्म" हेही वचन खरेच आहे. आणि सत्य हा धर्माचा केवळ प्राणच आहे, हे खरे; तथापि, धर्मकारांनी दयेला सत्याचेही वरचा मान दिला आहे. पित्याचे नाते वरिष्ठ खरे; तथापि श्रुतींत आधी " मातृदेवो भव आणि मग “पितृदेवो भव" असा क्रम सांगून, मातेला अग्रमान दिला आहे, आणि तो ठीकच आहे. लेंकराचे वाढीस बापाचे रक्ष- णापेक्षाही आईच्या वात्सल्याचे अधिक अगत्य आहे; तसाच प्र- ३९० सुख आणि शांति. [प्रकरण कार येथे समजावा. सत्य वरिष्ठ खरे; परंतु ते पुष्कळदां कर्कश किंवा निर्दय असते. सत्य हा सूर्यच आहे. परंतु चोवीस तास सूर्यप्रकाशच राहील तर प्राणिमात्र आहाळून जाईल. त्याला शरीर- निर्वाणयित्री चंद्रिका थोडी तरी मिळालीच पाहिजे. याचप्रमाणे सत्याला दयेची जोड पाहिजे, तरच जीवांचा निभाव लागेल; आणि म्हणूनच परमात्मा आपणांस ' सत्य ' म्हणवितो आणि दयाघनही म्हणवितो. किंबहुना दीनदयाळ म्हणवून घेण्यांत त्याला अधिक मौज वाटते. असो; या प्रकारे ' अहिंसा' ही पहिली धर्माज्ञा, हिचे पालन प्रत्येक मानवाने केल्यास सुखाची समृद्धि कशी होईल, हे दाखविलें. दुसरी आज्ञा 'सत्य.' आमचे श्रुतीत सत्याचे फारच मोठे स्तोत्र केले आहे. तैत्तिरीय श्रुति म्हणतेः- सत्येन वायुरावाति । सत्येनादित्यो रोचते दिवि । सत्यं वाचः प्रतिष्ठा । सत्ये सर्व प्रतिष्ठितं तस्मात्सत्यं परमं वदति ॥ भावार्थः-सत्यानेच वारा वाहतो. सत्यानेच आकाशांत सूर्य प्रकाशतो. सत्य हाच वाग्व्यवहाराला आधार आहे. किंबहुना सत्याचेच आश्रयावर सर्व काही स्थिर आहे. आणि म्हणूनच, सत्याला सर्वश्रेष्ठ असे म्हणतात. या स्तोत्रांत तिळमात्रही अतिशयोक्ति नाही. अमुक ऋतूंत अमुक दिशेनें वारा यावयाचाच, असें नियमाने अनुभवास येतें. लष्करांतली तोफ शहरांत ऐकू येते, हे वायूचे शब्दवाहनविषयक मत्यच नव्हे काय ? सूर्याचे अस्तोदयकाल किंवा आजपासून शंभर - १७३.] धर्म. ३९१ , वर्षांपुढील सूर्यग्रहणे ज्योतिषी देऊ शकतो, हे सूर्याचे ठिकाणचे सत्याचे आधाराने नव्हे, तर कशानें ? वायु-सूर्यांचाच दृष्टान्त म. नुष्यवर्ण्य इतर चराचर विश्वाला लागतो, असे प्रत्येक विचारी मनुष्यास आढळेल. चंद्राची क्षयवृद्धि, समुद्राची भरती-ओहोटी, ऋतूंचे पालट, इत्यादि गोष्टी नियमित काळी होतात, त्या अर्थी त्या सत्यप्रेरित कां म्हणूं नयेत ? चुलीवर तपेली ठेवून द्यावी, भात शिजून राहतो; खडकवासल्याचे पाणी कालव्याने बारा कोसांवर जाते; ही अमर्माचे अंगची पाचकता व जलाचे अंगची निम्नप्रव- णता-रूपी सत्याचीच उदाहरणे नव्हत तर काय ? चरकाने सांगि. तलेला काढा आजही गुण देतो, याचे कारण धने-सुंठीने आपापले सत्य सोडिले नाही, हेच होय. जो कुणबी चिमणीला चोंचभर दाणा घालीत नाही, तो मणावारी बियाणे काळे रानांत फेकून येतो, ह्या त्याचे औदार्याला उत्तेजक काय असावें ? आपल्या ठि- काणी विश्वासाने ठेविलेल्या एक दाण्याऐवजी मापटेंभर दाणे त्या कुणब्याला परत देण्याचे आमचे धरित्रीमातेचे सत्यवतच नव्हे काय ? कोणी कसाही पाखंडी असला तरी या सर्व प्रश्नांस अस्ति- पक्षीच उत्तर देणे त्याला भाग आहे. आतां मनुष्यांतील सत्य पहा. त्याला फार श्रम नकोत. न्या. याचे कोर्टात त्याचे प्रत्यही प्रदर्शन आहेच. प्रतिपक्षी वकील म्ह- णतो, 'होय, वादीचे म्हणणे खरे आहे; परंतु माझी मुदतीचे मुद्या- वर हरकत आहे. ' राम राम! व्यवहारांतही हाच प्रकार. बाप, भाऊ, गुरु, साधु म्हणून बायाबापड्यांनी विश्वासाने काळोख्या .
३९२
सुख आणि शांति.
[प्रकरण
रात्री एखादी वस्तु आणून ठेवावी, आणि पुढे मागावयास यावें
तो ' भोजनं मम जीयताम् ' हा उद्गार कानी येतो. हे उत्तर ऐकून
त्या दीन बाईचा काय बरें तळतळाट होत असेल ? पण तिकडे
लक्ष कोण देतो ! स्वार्थापुढे सत्य कशाचें ? मनुष्यमात्राचे ठिकाणी
अढळ सत्य असते, तर किल्लयाकुलुपांचे, चिरेबंदी भिंती घाल-
ण्याचे, लोखंडी तिजोन्या घेण्याचे, संत्री पहारे ठेवण्याचे, असे
हजारों खर्च वाचून तो पैसा सत्कार्यों लावावयास सांपडला असता;
व इतके बंदोबस्त करूनही द्रव्यवानाला स्वस्थ झोप येत नाही,
तसे झाले नसते. पण, सुधारणा होत आहे तो तों सत्यावर कु-
न्हाड बसते आहे ! एकाच कुळाने स्वदस्तुरचे दोन रोखे दोन
सावकारांना दिले आहेत, परंतु पहिल्याचा नोंदला नाही आणि
दुसन्याचा नोंदला आहे; एवढ्यासाठी पहिल्याने 'हरि हरि'
म्हणत बसावे. हे सत्याचे मासले आजकाल सुरू झाले आहेत. याचे
कारण धर्माविषयी अनास्था हेच होय.
आजकाल ब्राह्मणादि श्रेष्ठ म्हणविणान्या जातीही न्यायासना-
समोर निःशंक असत्य भाषण करितात. हे पाहिले आणि मनुस्मृ-
तीचा काल पाहिला म्हणजे सांप्रतचे अवनतीबद्दल फार फार
वाईट वाटते. न्यायासनासमोर आलेल्या चतुर्वर्णांना शपथ देण्याचे
प्रकार मनुस्मृतीत ( अ० ८ श्लो० ८८ ) दिले आहेतः
(श्लोक)
ब्रूहीनि ब्राह्मणं ब्रूयात् । सत्यं ब्रूहीति पार्थिवम् ।।
गोवीजकांचनैर्वैश्यं । शूद्रं सर्वैस्तु पातकैः ॥ १॥
१७ वें.] धर्म. ३९३ भावार्थ:-साक्षीदार जर ब्राह्मण असेल तर त्याला केवळ ' बोल ' ह्या शब्दानेच प्रश्न करावा. तो क्षत्रिय असेल तर 'सत्य बोल ' असे म्हणावें. तो वैश्य असल्यास तूं असत्य बोलल्यास गाय, बीज व सुवर्ण यांचा अपहार केल्याचे पाप तुला लागेल' अशी धमकी देऊन विचारावें; आणि तो शूद्र असल्यास खोटें बोलल्यास सर्व पापे तुझे माथीं बस- तील' असे त्यास बजावावे. यावरून पहातां, पूर्वी ब्राह्मणाला नुसते 'बोल ' म्हणणेच सत्य सांगण्यास पुरे होते. म्हणजे ब्राह्मण जे बोलेल तें सत्यच बोलेल, त्याला तूं “सत्य बोल" म्हणून निराळे सुचविण्याचेही कारण नव्हते. आणि आजचे ब्राह्मण “ मी देवाला स्मरून खरे बोलेन, खोटे बोलणार नाहीं " इत्यादि दिव्ये करूनही धडाधड खोट्या साक्षी देतात. ही जर श्रेष्ठ वर्णाची सत्यप्रियता, तर इतरांस काय बोलावें ? आणि इतपत ज्या समाजांत सत्याची ओळख बुजाली, त्या समा- जाला विपत्ति आल्यास देवाकडे काय बोल ? तिसरी आज्ञा " अस्तेय " म्हणजे चोरी न करणे; परद्रव्य, परदारा इत्यादिकांचे अपहरण न करणे. खरे पहातां यांचा अंत- व सत्यांतच होऊ शकेल. आपणांत जेव्हां कोणाही मुलामुलीचा विवाह होतो, त्या वेळी जातीतील चार शिष्ट बोलावून “ साक्षी विडे" देण्याची चाल आहे. यांतील रहस्य असे आहे की, " ही मुलगी याच मुलाची अनन्यसाधारण अशी मिळकत आजपासून झाली. " या करारावर प्रतिनिधिद्वारा सर्व जातीच्या सही-साक्षी या विधीने घेतल्या जातात. अर्थात्, अशा मुलीशी जर कोणी असव्यवहार करील तर तो सत्यापलापक किंवा खोट्या प्रतिज्ञे- ३९४ सुख आणि शांति. [प्रकरण बद्दल दोषी होईल; आणि सर्व जर सत्य पाळतील तर त्या मुलीला अमार्गगामी होतांच येणार नाही ; म्हणजे सत्यपालनांत अस्तेय आले. तथापि, व्यवहारदृष्ट्या तें पृथक् करून सांगितले आहे. स्वक- ष्टाने द्रव्य मिळवून त्यावर निर्वाह करणे हा धर्म होय. दुस- ज्याच्या श्रमाचे त्याचे असंमतीने घेणे म्हणजे मोठाच विश्वासघात आहे. आणि विश्वासघाताला शास्त्रांत यावच्चंद्रदिवाकरौ नरक सांगितला आहे. आपला कोणी विश्वासघात केला म्हणजे कसे काळीज तळतळते ? असेंच परक्याचेही होते, हे जाणून न्याया- र्जितानेच उदरभरण करावे अशी धर्माज्ञा आहे. व ही सर्व पाळ- तील तर सध्या काही हिंदुकुटुंबांत एकानें मरमर मरावें आणि बाकीच्यांनी त्याच्या जिवावर निःशंक चैन करावी हा जो अशास्त्र- संमत व समाजोत्कर्षाला घातक प्रकार पडला आहे, सोही बंद होईल. असो. चौथी आज्ञा “शौच " म्हणजे स्वच्छता, शुद्धता, पवित्रता. हिचे प्रकार दोनः-अंतःशौच किंवा मनःशुद्धि आणि बहिःशौच किंवा बाह्यशुद्धि. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सहा मनांचे मळच समजावे; आणि या साहीपासून मन अलिप्त असणे, त्याप्र- माणे अनृतापासून व कुविचारांपासून मन. अलग ठेवणे हे अंतःशौच होय. आणि वस्त्र, पात्र, अन्न, जल व आपल्या संसर्गाच्या यावत् वस्तु निर्मल राखणे हे बहिःशौच होय. इंग्रजीत एक म्हण आहे धर्म. ३९५ की, "स्वच्छता हा ईश्वरी गुण आहे" ती खरीच आहे. बाह्यवस्तूंत अंर्तवृत्ति बदलण्याचे सामर्थ्य आहे. फुलबागांतून चालतांना मन प्रफुल्ल होते व गटारदुंगधीतून जातांना मन जणूं कोंडतें किंवा संकोच पावतें; हा सर्वांचाच अनुभव आहे. तंबाखू खाणारा झाला तरी घाणीचा कोपरा पाहूनच पिचकारी मारतो; स्वच्छ जागी त्याच्याने थुकवत नाही. सुंदर व स्वच्छ वस्तूची सहसा पायमल्ली करवत नाही. याचा अर्थ वस्तुगत बाह्यस्वच्छतेचा अंतःकरणावर थोडा तरी परिणाम होतोच होतो; व म्हणूनच शास्त्रकारांनी बाह्य व आंतर असें उभयविध शौच सांगितले. स्वच्छतेमुळे आरोग्य व दीर्घायुता प्राप्त होते हे सर्वसंमतच आहे. शिवाय, पवित्र जागी विचारही बहुधा पवित्रच येतात, आणि पवित्रता आणि पुण्य ही एकच होत. कारण, जे पुनीत किंवा पवित्र करितें तें पुण्य, व जे अधःपतन किंवा हास करितें तेंच पातक होय. आणि यास्तवच, पुण्याने आयुष्य वाढते व पापाने घटते हे जुन्या माणसांचे म्हणणे काही तरी नव्हे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. स्वच्छस्थळी मनही प्रसन्न रहाते, हा सर्वांचा अनु- भव आहे; आणि मनःप्रसाद आहे तेथें सुख आहेच. किंबहुना, मनःप्रसाद म्हणजेच सुख. अंतःशौचाची योग्यता अर्थात्च बहिःशौचाहून अधिक आहे. तें नसेल तर बाह्य झळफळ म्हणजे ठकबाजीच समजावी. अंत:- शुद्धिकर गोष्टींत ज्ञान हे अग्रगण्य आहे. म्हणूनच " न हि ज्ञानेन सदृशं पवित्र-( पावन करणारें )-मिह विद्यते ।" असा भगवंतांचा ३९६ सुख आणि शांति. [प्रकरण शेरा आहे. या कामी सत्याची पायरीही शेजारीच आहे. भगवान् मनु म्हणतात: (श्लोक) अद्भिर्गात्राणि शुद्धधीत । मनः सत्येन शुद्ध्यति ।। विद्यातपोभ्यां भूतात्मा । बुद्धिर्ज्ञानेन शुध्यति ॥ १ ॥ भावार्थ:-जलाने अंगें शुद्ध होतात; सत्याने मन शुद्ध होते; विद्या व तप यांचे योगाने जिवात्मा शुद्धि पावतो व ज्ञानाने बुद्धि निर्मल होते. याशियाय अंतःशुद्धि करणान्या वस्तु मनूंनी दुसऱ्या एका श्लोकांत सांगितल्या आहेत, त्याही ध्यानात ठेवण्याजोग्या आहेत. (श्लोक) ज्ञानं तपोऽग्निराहारो । मृन्मनो वायुपाञ्जनम् ॥ वायुः कर्मार्ककालौ च । शुद्धः कर्तृणि देहिनाम् ॥ १ ॥ भावार्थः :-ज्ञान, तप, अग्नि, हार्वष्यान्न, मृत्तिका, मन, उदक, सडा- संमार्जन, वायु, यज्ञकर्म, सूर्यदर्शन व काल ही सर्व मनुष्याचे शुद्धीची साधने आहेत. याहीपलीकडे भगवद्भक्ति हे मोठेच शोधक आहे. भगवान् . . गीतेत म्हणतातः । (श्लोक) अपि चेत्सुदुराचारो। भजते मामनन्यभाक् ॥ साधुरेव स मंतव्यः । सम्यव्यवहितो हि सः ॥ १॥ क्षिप्रं भवति धर्मात्मा । शश्वच्छांतिं निगच्छति ॥ म्हणजे, भगवद्भक्तीने अधम पापीही शुद्ध होऊन शाश्वत शांति- सुखाला मिळतो. श्लोकक्रमांत शेवटली धर्माज्ञा म्हणजे इंद्रियनिग्रह. कोणी सूक्ष्म ३९७ - १७ वें.] धर्म. दृष्टीने अवलोकन करील तर त्यास असे आढळून येईल की, मानवी व्यवहारांतील हजारों हजार अनर्थ इंद्रियांच्या अनिग्रहा. मुळेच उद्भवतात. कारण, इंद्रिये ही मोठी दांडगी आहेत. ती किंचित् सैल सोडतांच मनाला खेचून नेऊन विषयांचे खड्डयांत पाडितात. यासाठी शहाण्याने ती स्वाधीन ठेवावी, म्हणजे त्याला विपत्ति येत नाही. शंकराचार्य विवेकचूडामणींत म्हणतात: (श्लोक) शब्दादिभिः पंचभिरेव पंच। पंचत्वमापुः स्वगुणेन बद्धाः ॥ कुरंग-मातंग-पतंग-मीन- । भुंगा; नरः पंचभिरंचितः किम् ॥ १॥ भावार्थः-श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा आणि घाण यांपैकी एकएक इंद्रियाचे अनावरपणामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या त्याच्या विषयांकडे आकृष्ट होऊन हरिण ( शब्दाने), हत्ती ( स्पर्शाने ), पतंग (रूपलोभाने ), मीन ( जिव्हालोल्याने ), व भंग (प्राणलौल्याने ) नाश पावले आहेत; आणि हे मनुष्या, तुझी तर ही पांचही इंद्रिये अनावर आहेत, तेव्हां तुझी दशा काय होईल, याचे त्रैराशिक तूंच मांडून पहा. सारांश, सुख-शांति पाहिजे तर इंद्रियनिग्रह अत्यवश्य आहे, हे जाणूनच स्मृतिकारांनी त्याचा धर्मातेंत संग्रह केला आहे. मनूक्तींत थोडीशी भर घालून याज्ञवल्क्यांनी धर्म सांगितला आहे. (श्लोक) सत्यमस्तेयमक्रोधो । हीः शौचं धीधृतिर्दमः ॥ संयतेंद्रियता विद्या । धर्मः सर्व उदाहृतः ॥ १ ॥ यांतही. ही ( मर्यादा.), धी (सद्बुद्धि), धैर्य, दम व विद्या ह्या गोष्टी अधिक आहेत, तरीही त्या देशांतील कोणत्याही धर्माला अग्राह्यशा नाहीत. तिस-या एकानें, .
सुख आणि शांति. (श्लोक) अहिंसा सत्यमस्तयमकामक्रोधलोभता ।। भूतप्रियाहतेहा च । धर्मोऽयं सार्ववार्णकः ॥१॥ यांत ' प्राणिमात्राचे कल्याणाची इच्छा' एवढी गोष्ट मनूपेक्षा अधिक घालून, हा सर्वही वर्णीना सारखाच लागू पडणारा धर्म आहे, असे म्हटले आहे. लोकप्रिय भर्तृहरींनीही मनूंची अनुवृत्ति थोड्या फरकाने केली आहे. तिचा वामनी तर्जुमा असा आहे: (श्लोक) वाणी खरी, दान बरें, अहिंसा । नसे परगव्यसतीपिपासा ।। दया अतृष्णा, नतिभाव जो कां । सन्मार्ग हा धोपट सर्व लोकां ॥१॥ या धोपट मार्गाने जर प्रत्येक मनुष्य चालेल, तर जगांत सुखाला आजच्याइतका खास तुटवा पडणार नाही. आणि धर्म- श्रद्धा प्रबळ झाली म्हणजे तिच्या अंगभूत असणाऱ्या गोष्टींचा प्रचार आपोआप वाढतो, त्याला निराळे श्रम नकोत; म्हणून प्रत्येक ज्ञात्याने सद्धर्मप्रचारार्थ झटावें.
ittittitetett tatatatatatatatatatatatatetet
प्रकरण अठरावें.
ब्रह्मविद्या.
न
tutitut atatattetettitutetattetetett परीत्य भूतानि परीत्य लोकान् पररीत्य सर्वाः प्रदिशो दिशश्च उपस्थाय प्रथमजामृतस्यात्मनात्मानमभिसंविवेश ॥ -यजुर्वेद. भावार्थ:-जें ब्रह्म आकाशादि महाभूतांस, तसेच सूर्यादि लोकांस व सर्व दिशा-उपदिशांस व्यापून राहिले असून जे सत्यस्वरूप आहे, व जें सर्वोआर्थीचे आहे, त्याची जो जीव अंत:करणपूर्वक उपासना करितो, त्याला त्याचे ज्ञान होते व ब्राप्राप्ति होऊन मोक्षसुखाचा अनुभव मिळतो. महद्यक्षं भुवनस्य मध्ये तपसि क्रांतं सलिलस्य पृष्ठे ॥ तस्मिञ्छ्यन्ते य उ के च देवा वृक्षस्य स्कंधः परीत इव शाखाः॥ -अथर्ववेद. :- सर्वांहून मोठे, सर्वांस पूज्य, सर्व भुवनांत भरून राहिलेले, ज्ञानांत पूर्ण व सर्व कार्यरूप जगताच पाटी वर राहणारे (पुरून उरणारे ) ते ब्रह्म होय. वृक्षाच्या बुंध्याच्या आधाराने जशा शाखा सर्वतः पसरतात, त्याप्रमाणे सर्वही या ब्रह्माचे आधाराने रहातात. (श्लोक) यल्लाभान्नापरो लाभो । यत्सुखान्नापरं सुखम् ॥ यज्ज्ञानान्नापरं ज्ञानं । तद्ब्रह्मेत्यवधारय ॥१॥ भावार्थः -ज्याच्या लाभाहून अधिक श्रेष्ठ असा दुसरा लाभ नाही, ज्याच्या सुखाहून अधिक उंची दुसरे सुख नाही, व ज्याचे ज्ञानाहून श्रेष्ठतर असें ज्ञान नाही, तेंच ब्रह्म असे समज. न प्रकरण अठरावे. ब्रह्मविद्या. निर्दोपं हि समं ब्रह्म । -श्रीमद्भगवनीता. भावार्थ: :---ब्रह्म हे दोपहित व वैषम्यराहित आहे. यो वै भूमा तत्सुखं नाल्प सुखमस्ति भूमैव सुखं भूमा त्वेव विजिज्ञासितव्य इति ।-छांदोग्य उपनिषद. भावार्थ:----सनत्कुमार नारदास म्हणतात: बाबा रे, खरं सुख म्हणशील तर जे भुमा म्हणजे अफाट असे वहा तेच आहे. अल्प ज विषय त्यांचे टिकाणी सुख नाही. ब्रहाच मुख आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान करून घ्यावे. पाण्याचे अंगी आपली मूळ उंची शोधण्याची प्रवृत्ति दिसते, त्याचप्रमाणे मनुष्याला कोणत्याही गोष्टीचे मूळ धुंडण्याचा नाद दिसतो. नाद म्हणण्यापेक्षा त्याला ही अंतःप्रेरणाच आहे, असे म्हणणे बरें. कारण त्याला अनिच्छया प्रवृत्त व्हावे लागते. बाहेर हवा खात असतां अंगावरून सुगंधी वारा गेला, तर मनुष्य विवश झाल्याप्रमाणे पटकन मान मुरडून तो सुगंध कोणत्या स्थळाहून व कोणत्या वृक्षापासून किंवा वस्तूपासून आला असावा, हे पाहूं लागतो. व त्याचा उगम समजला नाही तर त्याचे पाऊ- लंच पुढे पडत नाही, निदान तो खट्ट तरी होतो. महाश्वेतला पुंडरीक या प्रेरणेनेच दाखविला. महाबळेश्वरी कृष्णानदीचे देव- ळांत गोमुखांत वाहणारे पांच-सात झरे दिसले, की तेवढ्याने तृप्ति न होतां देवालयाचे भिंतीमागें घुमून डोंगराच्या खबदडींतून जेथून जेथून ते झरे उपटतात ते पहावे, तेव्हां मनुष्याचा जीव खाली २६ ४०२ सुख आणि शांति. [प्रकरण हे पडेल. कथेकल्याचे कीर्तन किंवा एकाद्या कलावतीचे गायन, तर केवळ श्राव्य विषय आहेत. वास्तविक हे कानी पडल्याने काम व्हावे. परंतु नुसत्या श्रवणाने मनुष्याला सुख होत नाही. ज्या हरदासाच्या किंवा गायिकेच्या मुखांतून तो ध्वनि निघत असेल तें मुख दृष्टीस पडून, डोळ्याशी डोळा जेव्हां भिडेल, तेव्हां त्याची तळमळ जिरेल; नाही तर नुसत्या रवश्रवणाने त्याचे पोट भरत नाही. त्याच्या उगमाशी जाऊन ठेपावें तेव्हां त्याला चैन पडते. असा काही चमत्कार आहे. मनुष्याच्या या नैसर्गिक अंतःप्रेरणेने त्याचे फारच मोठे काम केले आहे. शेकडों, हजारों गोष्टी, ज्या त्याला प्रारंभी गूढ किंवा अज्ञात होत्या, त्यांचा त्याने उलगडा केला आहे. गंगा, सिंधु, नील यांसारख्या महानद्यांचे उगम त्याने शोधून काढिले. युरे. नस, नेपच्यूनसारखे नवे ग्रहांचा पत्ता लाविला. गुरुत्वाकर्षणा- सारखे नियम उघडकीस आणिले. इतकेंच करून तो थांबला नाहीं; तर या अनंत चमत्कृतिपूर्ण विशाळ विश्वाचे आदिकारण, तेंही त्याने शोधून काढिले आहे. व यावरून असें खास दिसते की, ही मूलदर्शनोत्कंठा सृष्टिकर्त्याने संकेतपूर्वक त्याचे हृदयांत आरोपित केली आहे.. भागवतकार म्हणतातः (श्लोक) सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयात्मशक्त्या। वृक्षान् सरीसृप-यशून् खग-दंश-मत्स्यान् ॥ तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय । ब्रह्मावलोकधिपणं मुदमाप देवः ॥ १ ॥ - १८ वें. ] ब्रह्मविद्या. ४०३ कारण जें , भावार्थ:-देवाने आपल्या स्वयंसिद्ध निर्माणशक्तीने प्रथम नाना- प्रकारचे देह, वृक्ष, सर्प, पशु, पक्षी, मक्षिका, व मत्स्य इत्यादि विविध सृष्टि केली, परंतु त्यांचे समाधान कांही होईना. तेव्हां अखर त्याने मूल- ब्रहा, तें प्रत्यक्ष करण्याविषयी ज्याला बुद्धि आहे, अशा प्रकारचा हा मनुष्यप्राणी निर्माण केला, आणि मग देवाला आनंद झाला. म्हण आहे, 'लुटावा तर हतः लुटावा, किरकोळीत काय आहे ? ' त्याचप्रमाणे क्षुद्र गोष्टींची कारणे शोधीत बसण्यापेक्षा किंवा ज्ञान संपादित बसण्यापेक्षा सर्व कारणांचे जे कारण व आखल ज्ञानांचे जे ज्ञान ते उपलब्ध झाल्यास सर्व काही आले. गजगौरीव्रताचे वेळी गांधारीचे बलवैभवशाली एकशएक पुत्रांनी केलेला पराक्रम पाहून कुंती जेव्हा आपल्या मुलांना म्हणाली की, तुम्ही सारे पांच, तुम्ही कितीशी माती आणाल ? तेव्हां भीमदादा म्हणाले, 'मी एकटाच बस, पांच तरी कशाला?' त्याचप्रमाणे " एकेन खलु विज्ञ तेन सर्वमिदं विज्ञातं स्यात् '' म्हणजे, हे एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखे आहे, अशी जर गुरुकिल्ली हाती आली, तर कटकटच मिटली, हे उघड आहे. आणि इति. हास पाहतां, ही किल्ली या चतुःखंड पृथ्वीपैकी या भरतखंडालाच मिळाली. आज भारतीय आर्य ज्यांचे गोत्रज म्हणवितात, असे जे वाशिष्ठादि ऋषिवर्य त्यांचेच हाती ही लागली. आणि आमचे काम ती संभाळून ठेवणे व आपलें कल्याण करून घेणे, हेच आहे. तेवढेही जर आम्ही न करूं तर सर्वथा अपात्र ठरूं. आमचे पूर्वजांना- देखील ही वस्तु श्रमावांचून एकाएकी मिळाली नाही; त्यांना फार फार श्रम करावे लागले, असें उपनिषदादि ग्रंथांवरून स्पष्ट होते.
सुख आणि शांति. [प्रकरण -- , काय, प्रथम प्रथम तेही अनेक ठिकाणी चांचपडतच होते. हे अनंत व अफाट विश्व हे काय असावे, हे गृढ त्यांना पदोपदी अडवीत होते; व तें उकलण्याविषयी त्यांचे अश्रांत यत्न सुरू होते, अशाबद्दल उप- निषदांत पुष्कळ ठिकाणी पुरावा अहे. श्वेताश्वतरांत म्हटले आहे:- किं कारणं ब्रह्म कुतः स्म जाता जीवाम केन कच संप्रतिष्टा । अधिष्ठिताः केन सुखे तरेषु वर्तामहे ब्रह्मविदो व्यवस्थाम् । भावार्थः-...हे ब्रह्मवेत्त हो, ह्या सर्व विश्वाचे कारण काय, आम्ही झालों कशापासून, जिवंतदशेमध्ये आहो कशाच्या योगें, आमचा आधार आणि सुखदुःखसंबंधी जी व्यवस्था आहे ती कोणाच्या आज्ञेने आम्हांस प्राप्त होते ? या प्रश्नांस भिन्न उत्तर तेथेच दिली आहेत, तीः कालः स्वभावो नियतिर्यदृच्छा भूतानि योनिः पुरुष इति चिन्त्यम् । संयोग एषां नत्वात्मभावादात्माप्यनीशः सुखदुःखहेतोः । भावार्थ -कोणी म्हणतात, काल हेच कारण; कोणी म्हणतात, जें चालले आहे ते आपल्या स्वभावानेच चालले आहे; कोणी म्हणतात की, भवितव्यता म्हणून कांही एक आवश्यक नियमच आहे, तेणेकरून विश्व चालले आहे; कोणाच्या मते सर्व वस्तु आकस्मिक, तेव्हां आक- स्मिकता हेच कारण; कोणाच्या मते पृथ्वी, आप, तेज इत्यादि भूते ही कारणे आहेत; कोणी म्हणतात पुरुष म्हणजे जीवात्मा कारण आहे, तर ज्यांविषयी चिंतन करणे आहे त्यांतून जीवात्मा एकीकडे करून दुसन्यांपैकी एक एक स्वतंत्रपणे कारण होऊ शकत नाही. या सर्वांनी एकत्र मिळून विश्व निर्माण केले, असेही व्हावयाचें नाहीं; कां की, ज्या विश्वामध्ये जीवात्मा आहे त्याची उत्पत्ति ह्यांतून एका किंवा सर्व कारणांच्या योगे होणे शक्य नाही. ह्या विश्वांत कर्तृत्वशाक्त, ज्ञानशक्ति ह्या असल्या तर त्या जीवात्म्याचे ठायीं आहेत, इतर कारणांमध्ये नाहीत.
१८ वें.] ब्रह्मविद्या. -- बरें, जीवात्माच सर्वांचे कारण असे म्हणावे, तर तो दुर्बल आहे; कां की, त्यास कधी सुख प्राप्त होते, कधी दुःख; यास्तव तो स्वतंत्र नव्हे. तर मग विश्वाचे कारण काय? ह्याच उपनिषदामध्ये अध्याय ६ मध्ये म्हटले आहे: स्वभावमेके कवयो वदन्ति । कालं तथान्ये परिमुह्यमानाः । भावार्थः------मृढ होत्साते कांही पंडित स्वभाव हेच कारण असे म्हण- तात, दुसरे, काल हे कारण म्हणतात. अखेर या घोटाळ्याचा उलगडा त्या पृच्छकांना पडला तो असाः- ते ध्यान-योगानुगता अपश्यन्देवात्मशा स्वगुणनिगृढाम् याकारणानि निखिलानि तानि कालात्मयुनान्यधिष्टित्येकः भावार्थ:---ऋषि ध्यान करीत बसले असतां देवरूप जो आत्मा त्याची सर्व जी बाहेरून दिसणारी कार्य त्यांच्या आंत लपून राहिलेली अशी शक्ति त्यांच्या दृष्टीस पडली आणि काल व जीवात्मा यांसहित जी कारण आपापला व्यापार करीत आहेत, त्यांवरील अधिष्ठाता म्हणजे त्यांस व्यवस्थेत ठेवणारा तो आहे, असे त्यांनी पाहिले. याप्रमाणे ध्यानबलाने ऋषींनी विश्वाचे आदिकारण शोधून काढिले, अशी उपनिषदांचीच साक्ष आहे. ऋषिजनांची ही साक्ष आपणांपैकी पुष्कळांस आजकाल का पटत नाही, याचेसंबंधे डॉक्टर भांडारकरसाहेब म्हणतातः " आपले मन इतर गोष्टींमध्ये निमग्न झाले असता त्याचे मूळ सामर्थ्य नाहीसे होऊन त्या गोष्टींचे योगें भलतेच संस्कार त्याजवर उमटतात. क्षुद्र विषयांमध्ये लंपट झाल्याकारणाने अंतःकरण विषया- कार होऊन जाते. त्याच्या मूळस्वरूपावर कामक्रोधादि विकारांचा दाट लेप येऊन बसतो. यास्तव अनंत जो परमेश्वर त्याचे प्रतिबिंब ४०६ सुख आणि शांति. [प्रकरण मलिन झालेल्या अंतःकरणरूप आदर्शात उमटत नाहीं; ईश्वराचें ज्ञान होण्याचे जे स्वाभाविक सामर्थ्य ते लुप्त होऊन जाते. मग मनुष्य नानाप्रकारचे कुतर्क करावयास लागतो. हे सर्व आपोआप चालले आहे, हे आकस्मिक आहे, याचा शासिता कोणी नाही, इत्यादि कल्पना करितो. परंतु, विषय व कामक्रोधादि दुर्वृत्ति यांचा लेप धुऊन टाकून जर मनुष्य ह्या समग्र विश्वाकडे पाहील, तर अवश्यमेव परमेश्वराचे उन्नत स्वरूप त्याच्या अंतःकरणापुढे उभे राहीलं." वरील म्हणणे सर्वथा खरे आहे. मनुष्य जर शुद्धीने वागेल, तर त्याला ब्रह्मसाक्षात्कार खचित खचित होईल. कारण, भागवत- कारांचे म्हणण्याप्रमाणे " ब्रह्मावलोका" साठीच जर त्याला मुद्दाम देवाने निर्माण केले आहे, तर तीच गोष्टं त्याला अगम्य किंवा अप्राप्य कशी राहील? एकादे कोट्याधीशाने । नारायण- नागबळी' वगैरे नवससायास करून आपल्या संपत्तीला वारस पाहिजे म्हणून औरस पुत्र देवापासून मागून घेतला, तर तो ती संपत्ति त्या पुत्राला देणार नाही, असे कसे होईल ? पण एक- मात्र संभव आहे. म्हण आहे की, नवसाने मागितले आणि मुळावर आले ' तशी जर गति झाली तर काय ?" पोटचा पोर खरा, मुद्दाम मागून घेतला खरा, पण तो जर नादान, कुलक्षणी, किंवा वेडा निघाला, तर त्याचे हवाली असली संपत्ति करून बापाने तरी काय करावे ? बरे, इकडे मायापाश त्याला ओढीत असतो. अशा वेळी मग तो एक युक्ति करितो. कोणी तरी सुज्ञ, लायक, भारदस्त, सज्जन व विश्वासू असे इष्टमित्रांपैकी पांच-चार १ डॉक्टर भांडारकर यांचं "प्रपन्न-प्रलपित" पाने १-४.
१८ ३. ब्रह्मविद्या. ४०७ सद्गृहस्थ शोधून त्यांचे हवाली ती संपत्ति विश्वासभू (ट्रस्टी) म्हणून तो कारतो. व त्यांस सांगून ठेवितो की, तुम्ही हिची इमानाने वहिवाट करून, हिची व माझे मुलाची जतन करावी. व सुदैवाने मुलगा मागे-पुढे शुद्धीवर येऊन नीट वागू लागला, म्हणजे ही संपूर्ण त्याचे हवाली करावी. हीच तोड जगत्पिता पर- मात्म्यानेही त्याच्या मूर्ख व दुर्गुणी पोरांचे कामी केली आहे. त्यानं ही पोरांना देण्याची आपली 'दिव्य किंवा दैवी संपत्ति ' सुज्ञ व विश्वासू असे त्याचे आप्त जे तुकाराम-रामदासांसारखे साधुसंत, यांचे दिमतीस देऊन ठेविली आहे. ते तिची आस्थेने वहिवाट करून तिची अक्षय वाढ करीत असतात. आणि या दुर्वृत्त पोरांपैकी जेव्हां कोणी योगायोगाने आपले दुर्वर्तन सोडून शुद्धीवर येऊन त्यांचे पसंतीस येईसें वागू लागतो, तेव्हां ते निलभिपणे आपण होऊन ती संपत्ति त्याचे स्वाधीन करितात. या म्हणण्याला भक्तांच्या इतिहासांत बळकट पुरावा आहे. तुळशी- दासासारखे, वाल्या कोळ्यासारखे शेंकडेदुर्वृत्त पोर योगायोगार्ने ताळ्यावर येतांच• सत्पुरुषांनी ही संपत्ति त्यांचे हाती आपणच दिली, अशी साक्ष आहे. याकरितां कोणाही मनुष्याला हे पितृ- रिक्थ आपणांस मिळेल की नाही, असा संशय यावयाचे कारण उरले नाही. फक्त त्याने आपले वर्तन सुधारून चित्तशुद्धि केली पाहिजे; म्हणजे ही संपत्ति त्याची करगामी झालीच असे त्याने समजावें.. गढूळ पाणी निवळण्याचा अवकाश असतो, मग त्यांत प्रतिबिंबित होण्याला सूर्याकडून कधींच आळस किंवा विलंब झाल्याचे ऐकिवात नाही. त्याचप्रमाणे आजपर्यंत ज्यांची ज्यांची ४०८ सुख आणि शांति. [प्रकरण हृदये निष्कल्प झाली, त्यांचे त्यांचे हृदयांत ह्या आदिकारणाचा साक्षात्कार तत्काल झालाच झाली. ही इतिहासाची साक्ष ध्यानांत वागवून मनुष्याने शुद्धचित्त होण्याचा यत्न ठेवावा. कित्येकांचा देवावर असा रुसवा आहे की, देऊन द्यावयाचे, मग त्याला इतके डावपेंच आणि एवढे आढेवेढे कशाला ? इतर वैष- यिक सुखें नाहींत का उघड उघड आमचे स्वाधीन केली ? तसेच हे आत्ममुखही करावयाचे होते. या आक्षेपाला एक उत्तर वर दिलेच आहे. मुलाला वस्तु देणे तरी वस्तूची व मुलाची योग्यता यांचे समीकरण पाहूनच द्यावी लागते. अज्ञानपणी फार तर खाऊची जिन्नस मनुष्य मुलाचे हाती देतो; पण हिन्याची शेलकी अंगठी किंवा तिजोरीची बिल्ली देत नाही. याचप्रमाणे वैषयिक सुखें क्षुल्लक, ती हवाली करणे निराळे; आत्मसुख सर्वोच्च तें करणें तर योग्यता पाहूनच केले पाहिजे, हे उघड आहे. दुसरे उत्तर असे की, श्रुतिशास्त्रे धुंडून सृष्टि निर्माण करण्यांत परमात्म्याचा हेतु काय असावा, हे पहातां एकाकी न रमते । लोकवत्तु लीलाकैवल्यम्। म्हणजे त्याला एकट्याला करमेना, म्हणून त्याने ही सृष्टि केली. सृष्टि हा केवळ एक लौकिकी खेळा. प्रमाणे खेळ आहे, मौज आहे, असा उल्लेख सापडतो. लोकप्रिय संगीत- कार राजश्री किर्लोसकरांनीही म्हटले आहेः 'निजरूपी जगदाकृति भासा । कारण होउनी करित विलासा ॥' अर्थात् जगद्रूप भास निर्माण करून तो विलास करीत आहे. आणि मौज, खेळ, विलास म्हटला म्हणजे त्यांत काही तरी डाव, काही तरी पेंच, कोडें, गूढ, अट किंवा अडचण पाहिजेच. नाही तर तो खेळच नव्हे. मग १८ वें.] ब्रह्मविद्या. ४०९ त्यांत मौजच नाही. आट्यापाट्यांचा खेळ पहा ना ? त्यांत जर प्रत्येक पाटीवर. गडी अडवणार नाही, किंवा गडी व मुटुंग्या कोंडी करून लोण नेणारास कोंडणार नाहीत, त्याला यथेच्छ पाटींतून जाऊं देतील, तर मग खेळ तो काय राहिला ? मौज ती कोठे आहे ? मुळीच नाही.पोरपणी पत्ते खेळण्याला एकादे वेळी भिडू नसेल तर काही तरी करमणूक व्हावी म्हणून अगदी लहान मुले दोन डाव विभागून दोन्ही बाजूंची उतारी आपणच कारतात. पण अशा वेळी त्या खेळांतील मोज नाहीशी होते. कारण उभय बाजूंची पाने खेळ- णान्याला माहीत पडल्यामुळे त्यांत गूढ असें कांहींच उरत नाही. खेळ म्हटला म्हणजे त्यांत हारजीत पाहिजे, फसगत पाहिजे, कहीं तरी शर्त पाहिजे, तरच त्याला गाडी चढते. लग्नांत वधुवरें मुपारी लपवितात; ती जर काही वेळ सोधावी न लागतां पट्दिशी सांपडली, तर प्रेक्षकांचा व खेळणारांचादेखील विरस होतो. याप्रमाणे जगतात जर गूढ म्हणून कांहींच ठेविलें नसेल, तर तो खेळच नव्हे. त्यांत कांहीं रसच उरणार नाही. यास्तव परमा- स्याने जगतात अनेक गोष्टी गूढ किंवा अज्ञात ठेविल्या आहेत; अनेक गोष्टी कष्टसाध्य ठेविल्या आहेत; त्यांत त्याचे निर्दयपण नसून खरोखर लीलाप्रियत्व दिसून येते. निर्दवलेला सराईत पोहणारा असतो, तो एकादे वेळी नवशिक्या पाराला अचानक पाण्यांत ढकलून देतो, व पोर गटंगळ्या खाऊं लागला म्हणजे भोवतालची मंडळी हंसू लागतात. परंतु, ढकल. णाराचा उद्देश केवळ मौजेचा व शिक्षणाचा असतो; निर्दयतेचा नसतो. त्यामुळे तो पोर अगतिक झालासें दिसतांच तो पदिशी ४१० सुख आणि शांति. [प्रकरण उडी घेऊन त्याला वर झेलून धरितो व आपले हातावर सभाळून पोहावे कसे ते त्याला शिकवितो. आणि असें तो न करील तर तो पोराचा वैरी व प्राणहंताच म्हटला जाईल. पण असा अनुभव कधीही येत नाही. तोपोर अल्प कालांतच ती विद्या शिकतो; व ती त्यास अवगत झाली, म्हणजे जें जल त्याला आरंभी भयस्थानसें भासत होते, तेंच क्रीडास्थानसे वाटून परमप्रिय होते. मग त्याला कोणी निवारण केले, तरीदेखील तो डोळा चुकवून त्यांत उडी घेतो, असा अनुभव आहे. हाच प्रकार या सृष्टिरूपी खेळाचे गूढ जपला उलगडले, त्यांचे कृतीत दिसून येतो. तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावें आम्हांसी ।। ज्यांना ह्या संसारसमुद्रात तरण्याची युक्ति सांपडली नाही, ते त्याचे नामस्मरणाबरोबर भयभीत होऊन पळ काढितात. परंतु तुकाराम-रामदासांसारखे जे त्यांत पोहण्यांत तरबेज झाले, ते तर उलट अर्जी करितात की, आम्हांला जन्मास घाला. आम्हांला या संसारसमुद्रांत लोटून द्या, म्हणजे मौजेने दोन हात तरी टाका. वयास सांपडतील. सांराश, संसार हा अज्ञांना दु:खमय आहे; ज्ञात्यांना तो सर्व सुखमयच आहे. एतावता, खेळ म्हटला म्हणजे त्यांत काही तरी गूढ पाहिजेच, आणि म्हणून हा विश्वरूपी प्रचंड खेळ उभारणा-या अजब खेळा. डूने या जगतांत पदोपदी अनेक गृहें ठेविली असून सर्वांत आपले स्वतःविषयींचें ज्ञान तें परमगूढ ठेविले आहे. हा खेळ्या कोण आहे, याचा पत्ता लागणे मोठेच कठिण करून ठविलें आहे.श्रुति म्हणतेः न संदृशे तिष्ठति रूपमस्य । न चक्षुषा पश्यति कश्चनैनम् ।।
१८ वें.] ब्रह्मविद्या. ४११ याचे रूप दृग्गोचर होत नाही. कोणीही त्याला चर्मचमूंनी पाहूं शकत नाही. असे जरी आहे, तरी या आदिकारणाचा थांग कोणास कधीच लागला नाही, असेंमात्र समजू नये. शेंकडों समर्थांनी आजपर्यंत त्याचा थांग लाविला आहे व त्यासाठी रस्तेही आंखून ठेविले आहेत. आतां हे रस्ते आंखलेलेही असले तरी अवघड असणारच. सिमल्याचे टेंकडीला इंग्रजाने धोपट सडक जरी केली आहे, तरी चढाव चढून जाणे भागच आहे. त्याला इंग्रज काय करील ? सिमला जर सपाटीवर उतरला, तर सिमल्याचे हवाशीरपणच नाहीसे होईल. पण ते होणे इष्टही नाही, व शक्यही नाही. याचप्रमाणे, हे आदिकारण शोधण्याचे विचक्ष- णांनी अनेक मार्ग आंखून ठेविले आहेत, तरी ते चालून जाण्याला थोडा तरी श्रम करणे भाग आहे. परंतु, असले श्रम म्हणजेच मौज आहे. ' यामुळे त्याबद्दल शीण वाटण्याचे कारण नाही. या मार्गाविषयी पुष्पदंत म्हणतातः (श्लोक) त्रयी सांख्यं वदः पशुपतिमतं वैष्णवमिति । प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च । रुचीनां वैचिच्यादृजुकुटिलनानापथजुषाम् । नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव ॥ १ ॥ भावार्थ:-हे भगवन् , मनुष्यमात्रांत रुचिवीचव्य असल्यामुळे तुजकडे येण्याचे भिन्नभिन्न मार्ग त्यांनी यथारूचि काढिले आहेत. कोणी वैदिक मार्ग धरितात; कोणी सांख्य, कोणी आगम, कोणी पाशुपत, कोणी भागवत, असे काही सरळ, काही नागमोडी, मिळून अनेक पंथ आहेत. परंतु काही झाले तरी मला एक कळते की, ज्याप्रमाणे कोणत्याही नदीत . . . - ४१२ सुख आणि शांति. [प्रकरण , . पाणी पडले तरी अखेर समुद्रासच येऊन मिळाले पाहिजे, त्याप्रमाणे कोणी कोणत्या घाटाने किंवा सडकेने येवो, शेवटी तुझ्याचि येऊन धडकणार; दुसरी गतिंच नाही. अर्थात्, या अखिल ब्रह्मांडाचे आदिकारण केवळ ' एकमेवा- द्वितीयम् ' असेंच आहे. आणि ते शोधून काढणे हेच मनुष्य- जन्माचे सार्थक आहे. यांतच सर्व सुख आहे. यांतच अनंत कौतुक आहे. येथेच सर्व विद्वत्ता, बुद्धिमत्ता, व तत्त्वज्ञान यांची परिसीमा आहे. मणीभाई द्विवेदी यांनी आपल्या " शंकरानुकरण' नामक ग्रंथांत म्हटले आहे की, " अनेकांत असणारें में एक, ते शोधून काढण्यासाठी जो यत्न, त्यालाच प्राचीनकालापासून तत्त्वज्ञान अशी संज्ञा दिली आहे " रामदासही म्हणतातः अनेकी परी एक देवासि पाहें। गीतेंत याच ज्ञानाला सात्त्विक ज्ञान असे म्हटले आहे. भग- वान् म्हणतात: (श्लोक) सर्वभूतेषु येनैकं । भावमव्ययमीक्षते ।। अविभक्तं विभक्तेषु । तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ १ ॥ भावार्थः --ब्रह्मादि स्थावरान्त भृतांत जे निरनिराळे भाव आहेत, त्या सर्वात एकच अव्यय व अविभक्त असा भाव भरून राहिला आहे, असें ज्या ज्ञानाने कळते ते सात्त्विक ज्ञान होय, असे जाण. हे सात्त्विकज्ञान झाले म्हणजे जगताचे आदिकारण सांपडणे दूर नाही व सुखशांतीलाही तोटा नाही. भगवंतांनीच सांगितले 1 All philosopliy has from of old been defined as the search after the one in wany." Preface to Imitations of Shankar. By Prof. M. N. Dvivedi.
१८ वें.] ब्रह्मविद्या. ४१३ आहे की, “ ज्ञानं लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छति " म्हणजे हे ज्ञान झाले असतां सर्वोत्तम शान्ति लौकरच मिळते. बरे, हे ज्ञान अमुक जातीला किंवा अमुक वाला व्हावे, वैदिक धर्माचे लोकांना व्हावे, अवैदिकांना होऊ नये, असा काही भेदभाव किंवा निबंध नाहीं; ते सर्वांस खुले आहे. निरहंकारवृत्तीने जो कोणी परमात्म्यास सद्भावाने शरण जाऊन आपले चित्तांत शोध करीत राहील, त्याला हे तारक ज्ञान अवश्य मिळेल. परंतु पहावें तों, जीवांचे अहंकार या ज्ञानाचे आड येतात. या पुस्तकाचे १५ वे प्रकरणांत युरोपियन राष्ट्रांची जी सांप्रतची स्थिति वर्णन केली आहे व जिला पाहून लबकसारखे विचारी लोकांना सकल जगताचा संहारकाल जवळ येऊन ठेपला अशी दहशत पडली आहे, ती स्थिति तरी या दुर्दम्य अहंकाराचेंच विलसित होय. इंग्लंडने २०,००० टन वजनाचे इंडनाट जातीचे लढाऊ गलबत बांधिलें, की अमेरिका त्याहून 'सरसें व जर्मनी आणखीच प्रचंड असें आपलें गलबत बांधू लागणार. मग त्यापायीं कालाचा, द्रव्याचा, मानवी शक्तीचा कितीही अपव्यय झाला तरी हरकत नाही. हा प्रकार या अहं- काराचेच प्रेरणेचा आहे. खरोखरच, एवढी प्रचंड शक्ति व द्रव्य- सामुग्री ही अहंमन्य राष्ट्र परस्परांचा विध्वंस करण्याचे कामी खर्च करण्यास प्रवृत्त झाली आहेत, त्या जागी हीच जर शांततेचे व स्नेहाचे मार्ग स्वीकारून आपआपले ताब्यांतील मनुष्यांच्या आत्मोन्नत्यर्थ या अचाट शक्तीचा व संपत्तीचा विनियोग करितील, तर हे जगत आजच्यापेक्षा किती तरी पटीने सुखी होईल. परंतु, हे व्हावे कसे ? हा अहंकार सर्पासारखा अखंड धुसधुसतो आहे, तो ?
४१४
सुख आणि शांति.
[प्रकरण
थंड पडावा कसा ? अहंकार आला की आपस्वार्थिता त्याचे बग.
लेंत आलीच, व तिचे पायीं सर्व अनर्थपरंपरा ओढवलीच. या-
करितां सर्वानर्थमूल हा जो अहंकार-राष्ट्रांचा तसाच व्यक्तीचाही-
नाहीसा झाला पाहिजे किंवा जिरला पाहिजे. हा अहंकार खोड
मोडून जिरेल असा कित्येकांचा समज आहे; पण, तो चुकीचा
आहे. कारण, पराजित शत्रु अहंकार न टाकितां केवळ बाह्या-
स्कारी नमून वागतो, परंतु अंतर्यामी धुमसतच असतो. जपानने
राशियास पराभूत केले, म्हणून तशाने रशिया निरहंकार झाला,
असे कोणी म्हणूं शकेल काय ? त्याचे पोटांत वैराग्नि छन्नरूपाने
शिलकच आहे, व अहंकारही कायमच आहे. अर्थात् या मार्गाने
अहंकारनाश होत नाही. तेव्हा अहंकारनाशाचा खात्रीचा असा
एकच उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे विवेक. समर्थ म्हणतात:-
"विवेके अहंभाव हा पालटावा ।” मनुष्याने आपला अहंकार
विवेक करून हळुहळू नाहीसा करून टाकावा. हा एक अहंकार नष्ट
झाला म्हणजे त्याचेबरोबर आपस्वार्थ, क्रोध, लोभ,मत्सर, दर्प, दुराग्रह
इत्यादि शांतताविघातक सर्व दोष आपोआप नाहीतसे होऊन बुद्धि
सत्त्वपूर्ण म्हणजे सात्त्विक होते. आणि सत्त्वपूर्ण बुद्धि झाली म्हणजे
शुद्ध सात्त्विक ज्ञानाचा उदय होतो. त्याचा उदय झाला म्हणजे
सहजच सर्वेद्रियांचे ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश फांकतो आणि सत्त्व-
प्रकर्षामुळे असा सर्वत्र उजेड पडला म्हणजे मनुष्याला खरी दृष्टि
येते. ती दृष्टि आली म्हणजे गीतेत म्हटल्याप्रमाणे,
(श्लोक)
समं सर्वेषु भूतेषु । तिष्टंतं परमेश्वरम् ।।
विनश्यत्स्वविनश्यंतं । यः पश्यति स पश्यति ॥ १॥
१८ वें.] ब्रह्मविद्या. ४१५ सर्व भूतांचे ठिकाणी समत्वाने राहणारा व सर्व भूते नष्ट झाली तरी स्वतः नष्ट न होणारा जो आदिकारण परमेश्वर त्याचा साक्षात्कार त्याचे हृदयाचे ठिकाणी होतो. आणि याप्रमाणे सर्वही निरनिराळी भूते एकाच अधिष्ठानाचे ठिकाणी एकत्वाने आहेत, असा ज्याला प्रत्यय येतो त्याला परिपूर्ण ब्रह्मसंपत्ति प्राप्त होते. ती प्राप्त होऊन सर्वत्र एकत्व दिसू लागले, सर्व विविध जगत् केवळ एकाच कार- णाचा विकास किंवा विलास आहे अशी दृढबुद्धि बाणली, म्हणजे मग त्या पुरुषाला मोह-शोक बाधत नाहीतसे होतात; व तो सुख- शांतीचे समृद्धीत रहातो. सारांश, मनुष्याला शाश्वत सुख किंवा शाश्वत शांति पाहिजे असेल, तर अहंकाराचे भरी पडून संपत्ति वाढविल्याने ती प्राप्त होणार नाही. तर त्याने आपली बुद्धि सत्त्वगुणसंपन्न करून या विश्वाचे जे आदिकारण त्याची उपलब्धि करून घ्यावी, म्हणजे त्याला सुखशांति प्राप्त होईल. पार्थिव विजेचा प्रवाह ज्याप्रमाणे जेथून निघाला तेथपर्यंत येऊन मिळाल्याशिवाय त्याची गति थांबत नाही; किंवा वावटळीने भुईवरून वातावरणांत उडालेला खडा ज्याप्रमाणे धरणीवर पोहोंचेपर्यंत त्याला शांति लाभत नाही; अथवा पशु किंवा पक्षी सूर्योदयीं भक्ष्यशोधनार्थ रानेंवनें धुंडीत असतां मार्गात वृक्षाखाली किंवा नदीतीरी जरी तूर्तातूर्त विश्रांति पावले, तरी पुरापूर सुखशांति सायंकाळी ते आपले स्वगोष्ठास किंवा स्वनीडास परत आल्याशिवाय होत नाही; त्याचप्रमाणे ज्या १ तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ।
सुख आणि शांति. [प्रकरण आदिकारणांतून हे कार्यरूप सर्व प्राणी बाहेर पडले, त्या आदि. कारणाशी ध्यान व आत्मशोधन या साधनांनी संगत झाल्या- शिवाय त्याना कायमची शांति व कायमचे सुख प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्यमात्राने या आदिकारणाचा शोध करून त्याशी एकरूप होण्याचा सर्वात्मना यत्न करीत रहावे हेच त्याचे सर्वोच्च कर्तव्य आहेः हेच त्याच्या जन्माचे साफल्य आहे. उपनिषदांत म्हटल्याप्रमाणे : एको वशी सर्वभूतांतरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति । तमात्मस्थं येऽनुपश्यति धीरास्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम् ॥---कठोपनिषद् भावार्थ:---एकच, सर्वांवर सत्ता चालविणारा, सर्व भूतांचा अंतरात्मा व एकाच वस्तुस नानाप्रकारची रू देणारा, असा जो त्याजला, जे बुद्धि- शाली पुरुष आपल्या आत्म्याचे ठायीं तो जसा आहे तशा स्वरूपाने पहा- तात, त्यांना शाश्वत सुखाची प्राप्ति होते; इतरांस नाही. नित्योनित्यानां चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान् । तमात्मस्थं येऽनुपश्यति धीरास्तेषां शांतिः शाश्वती नेतरेपाम् ।-कठोपनिषद. भावार्थ:-नश्वर जे हे पदार्थ त्यांच्यामध्ये अनश्वर, चेतन जे आहेत त्यांस चेतना देणारा, आपण एकच असतां बहुतांच्या इच्छा तृप्त करणारा, जो त्यास जे बुद्धिशाली पुरुष आपल्या आत्म्याच्या ठायीं ह्या गुणांनी विशिष्ट अशा स्वरूपाने पहातात, त्यांनाच शाश्वत शांति प्राप्त होते. इतरांस नाही.* असा -- समाप्त. * डॉक्टर भांडारकर ह्यांचे "प्रपन्न-प्रलपित" पान ६४.
(हा ग्रंथ डे. व्ह. ट्रॅ. सोसायटीने पसंत करून त्याबद्दल ग्रंथकारास बक्षीस दिले आहे.) रामकृष्ण-वाक्सुधा. प्रथम दृष्टि. लेखक-कृष्णाजी गोविंद किनरे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना भाषणप्रसंगानुरोधाने जो अमृततुल्य धर्मोपदेश केला त्याचा यांत संग्रह आहे. यांत ज्याचे विवेचन आले नाही, असा एकही धार्मिक प्रश्न नाही. तत्वे गहन पण विवेचन अत्यंत सुशेध व मनोरम, दृष्टान्त व दाखले अगदी साधे, रोजच्या व्यवहारोतले, मौजेच व मनाला तेव्हांच पटणारे, या- मुळे ग्रंथ कादंबरीसारखा रसाळ आहे. इतका सोपा व सामान्य वाचकालाही मनोरम असा धार्मिक ग्रंथ हा मराठीत पहिलाच. चित्रमय जगताचे द्वारें महा- राष्ट्राने या सुधेची लजत पाहिलीच आहे, तेव्हां जास्त वर्णन नको. ग्रंथाचे आरंभी परमहंसांचे मनोरम व बोधप्रद चरित्र विस्तृतपणे दिले आहे. छपाई सुंदर, बांधणी मजबूत. चार सुबक चित्रे. पृष्ठे २८८. किंमत १। रुपाया. ट. ख. निराळा. अभिप्राय. केसरी-ल्पांतर गोड व कविता त्याहूनही गोड आहेत. भाविक लोकांना आनंदजनक व परमार्थविषयाकडे चिकित्सक दृष्टीने पाहणारांस वाच- नाय आहे. पुस्तकाचे बाह्यांग चांगले आहे. मुमुक्षु-ग्रंथांतील विषयाची तारीफ प्राकृत जनांनी काय करावी ? सिद्धाची स्वानुभवाची वाणी आहे. सगुणप्रेम व नामस्मरणाचा उपदेश फार मोलवान आहे. आनंद-पुस्तकात घातलेली पदें फारच सुरस व हृदयंगम झाली आहेत. ज्ञानप्रकाश-या पुस्त- काची भाषा सुबोध व अकृत्रिम आहे. बालबोध-पुस्तक अमृततुल्य आहे. संग्राह्य आहे. इंदुप्रकाश-रा. किनरे यांचे भाषांतर फार सरळ, आटप- शीर, उठावाचे आणि जोरदार भाहे. दीनमित्र-पुस्तकांत सुधेचे अठा- वीसच थेंब आहेत, परंतु ते गोड आहेत. खानदेशवैभव-वेदान्तातील गहनभाग सोप्या व मनोरंजक रीतीने कळण्यास हे फार उपयोगी आहे. मराठा- मित्र -हे अमृतबिंदु अमृततुल्यच आहेत. ज्ञानोदय-साधु रामकृष्ण यांची विषयप्रतिपादनाची शैली त्यांच्या सोप्या व वहिवाटीतल्या दाखल्यांनी सुगम झाली असून वाचतांना मनाला आनंद वाटतो. बकुल- ही सुधा जशी एखाद्या मोक्षभिक्षुला निःशंक करून तन्मय करील, त्याचप्रमाणे एखाद्या प्रणयलोलुप रंगेल वाचकालाही सात्विक आनंदांत पोहावयास लावील, विवेकविमूढ मनुष्यास त्याच्या इच्छेविरुद्ध पण त्याच्याच खुषीने भात्मनात्म- विवेकाच्या मार्गास लावील, इतकी हिची शक्ति आहे; इतको इच्यांत जादू आहे. शुभसूचक-धर्मासारख्या गहन विषयांतील तत्त्वांचे विवेचन व्यव- हारांतील दृष्टान्त व दाखले देऊन इतके सुबोध झाले भाहे की, न कंटाळा न येतो कोणालाही सहज समजल्याशिवाय राहणार नाही. सुबोधपत्रिका- रामकृष्णांची वचनें मननीय अशी वाटतात व त्यांच्याविषयी भादर वाढू लागतो. प्रभात-भाषा चांगली असून भाषांतर उत्तम साधले आहे. कविताही गोर आहेत. लोकशिक्षण-स्वामी विवेकानंद वगैरे अनेक शिष्य श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या दर्शनाला येत.तेव्हां अनेक विषयांवर संभाषणे होत. ती एका विद्वान् शिष्याने टिपून ठेवली व बंगालीत छापली, नंतर इंग्रजीत छापली, त्यांचे हे मराठीत रूपांतर आहे. बंगाल्यांतील हलींच्या जागृतीच्या मुळाशी श्रीरामकृष्ण परमहंस यांची व यांच्या शिष्यांची 'मगिरी हीच प्रमु- खत्वाने आहे. त्यांचे दृष्टान्त फार समर्पक असून अगदी साधे असतात, ठिक- ठिकाणी प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला आहे. एकंदरीत पुस्तक अंतर्बाह्य सुंदर माहे. याबद्दल भाषांतरकार व प्रकाशक या दोघांचेही अभिनंदन करणे जरूर आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मुलाखती व संभाषणे. महाराष्ट्र-समाज जागृत व कर्तव्योन्मुख व्हावा या हेतूने स्वामी विवे. कानंदांच्या सर्व व्याख्यानांचे व लेखांचे उत्तम लेखकाकडून सवीसनहीने मरा. ठीत रूपांतर करवून ते 'विवेकानंद पुस्तकामाला' या नावाने प्रसिद्ध करण्याचे ३ आम्ही योजले आहे. उपरिनिर्दिष्ट पुस्तक हे या मालेतील पहिले असून ते आता विक्रीस तयार झाले आहे. रामकृष्ण-वाक्सुधेचे लेखक रा. कृष्णाजी गोविंद किनरे यांच्याच हातून या पुस्तकाचे भाषांतर झाले असल्यामुळे तें कसें वठले असेल, हे निराळे लिहावयास नकोच. आरंभी स्वामी विवेकानंद यांचे चरित्र दिले असून 'श्रीरामकृष्ण 'व विवेकानंद' अशी दोन सुंदर चित्रेही घातली आहेत.. याचे दोन पोटभाग आहेत:--मुलाखती व संभाषणे. स्वामींची मते व कार्यक्षेत्र.समजावून घेण्याकरिता येथील व पाश्चात्य देशांतील वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मुद्दाम ' मुलाखती ' घेतल्या, त्या वेळी त्यांच्या प्रश्नो- त्तरांत अनेक विषय ओघाने आलेले आहेत, त्याचप्रमाणे त्यांचा मुकाम कल- कत्त्यास असतांना त्यांच्या भेटीकरितां आलेल्या हजारों लोकांनी त्यांना अनेक प्रचलित विषयांसंबंधाने जे अनेक प्रश्न विचारले व त्यांची स्वामींनी आपल्या अधिकारयुक्त वाणीने जी उत्तरे दिली त्यांचा समावेश संभाषणे ' या भागांत केला आहे. शिक्षण, स्त्रीशिक्षण, औद्योगिक शिक्षण, धार्मिक शिक्षण, ब्रह्मचर्य, विवाह, बालविवाद पुनर्विवाह, जातिभेद, वर्णनेद, गायनशास्त्र, कलाकौशल्य, धर्माची सर्व अंग उपांगें इत्यादि नानाविषयांवरची मार्मिक मते या एकाच पुस्तकांत पंडावयास सांपडतील. पृष्ठे ३००.किं. १ रु. ट. ख. निराळा. अभिप्राय. केसरी-'मुलाखती व संभाषणे' यांतील भाषा व विचार अत्यंत वाचनीय आहेत. या भाषांतराची भाषा सुबोध, मधुर व मुळांतील स्वारस्य कायम ठेवणारी आहे. आणि हिंदुधर्माची महती कशांत माहे; सद्वर्तन, स्वार्थत्याग, आत्मविश्वास व देशभक्ति यांत काय सामर्थ्य आहे; इंग्लंड व हिंदुस्थान यांनी एकमेकांपासून काय शिकावें ...... वगैरे महत्त्वाच्या विषयां- वरील उत्कृष्ट विचार या पुस्तकात आहेत. पुस्तकाचे बाह्यांग सुंदर आहे. मुमुक्षु-कागद, छपाई, वाईडिंग वगैरे उत्कृष्ट केल्याबद्दल जसें रा. भंट ब्रह्मचर्य, आणि मंडळीचे अभिनंदन करावेसे वाटते; तसेच भाषांतर सरळ, प्रेमळ व मुळांतील स्फूर्ति कायम ठेवून केल्याबद्दल रा. किनरे यांचे आम्ही सप्रेम अभि- नंदन कारतो. इंदुप्रकाश-रा. किनरे यांनी भाषांतराचे काम समाधानका- रक रीतीने केले आहे. त्यांची भाषा गोड, असंदिग्ध व प्रेमळ आहे. देशाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी अशा प्रकारच्या तजस्वी ग्रंथांची फार आवश्यकता भआहे. बालबोध-विषयाची निवड फार चांगली आहे. अत्यंत बोधपद व विचारणीय आहे. भाषा चांगली, शुद्ध, गोड व रसाळ आहे. पंचमजॉर्ज विजय-साध्या व मुळास सोडून नसलेल्या गोड भाषेत हे भाषातर केले असल्याने महाराष्ट्रवाचकांवर खरोखर मोठे उपकार झाले आहेत. पुस्तक अंत. बाह्य चांगले आहे. ज्ञानोदय--एकंदरीत धर्माचा शास्त्रीयरीत्या उलगडा करण्याची (स्वामींची ) रीत फार चांगली आहे व ती सर्वास मान्य करण्यास हरकत नाही. हिंदुधर्माचे ज्ञान मिळविण्यास हे पुस्तक साधनीभूत होईल. शुभसूचक-मुलाखतीत व संभाषणांत अनेक विषायांचा ऊहापोह झाला असून लोकांनी विचारलेल्या अनेक शंकांचे समाधान स्वामींनी फार मार्मि- कपणे केलेले आहे. विविधज्ञानविस्तार--पुस्तकाची भाषा विषयास अनुरूप अशी असून सुबोध आणि सरळ आहे. ज्ञानप्रकाशशांतर कार चांगले साधले आहे. लोकशिक्षण-सनातन धर्माची अंगे व उपांगें इ. तसेंच शिक्षण, ब्रह्मचर्य, विवाह, जातिभेद, स्वार्थत्याग, देशभाक्त ३:: अनेक विषयांवर स्वामींचे वक्तृत्वपूर्ण व जोमदार भाषेतले विपक्ष प्रस्तुत पुस्तकांत वाचण्यास सांपडतील. अशा तेजस्वी ग्रंथांची मराठीच्या वाङ्मयात भर पडेल तितकी हवी आहे. भिकार कादंबऱ्या व चटोर गोष्टी इ. च्या माला काढण्या- पेक्षा अशा बहुमुल्य व लोकांना मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे व्रत रा. भट आणि मंडळी यांनी चाकविले आहे, हे त्यांस अत्यंत भूषणावह आहे. अंतरंगाप्रमाणे पुस्तकाचे बायोगही चांगले साधले आहे. भट आणि मंडळी, पुणे शहर. .
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.