Library

Svabhaava Chitren' Prathamaavrxtti

Divekara Dinakaravaasudeva · 2005-11-30

PDF Proofread

Front matter

UNIVERSAL
LIBRARY
OU_184420
LIBRARY
UNIVERSAL

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

स्वभाव - चित्रे
Mithicial
लेखक
दिनकर वासुदेव दिवेकर
प्रथमावृत्ति १९३४.
किंमत १ रुपया.

130 प्रकाशक व मुद्रक गोपाळ वळवंत जोशी, आनंद मुद्रणमंदिर, १९६/४६ सदाशिव पेठ, पुणे. BR- -Maonete आत्मानवेदन विजयादशमीच्या सुमुहूर्तावर या ' स्वभाव-चित्रांचे' पुस्तक वाच- कांच्या हाती देण्यास फार आनंद वाटतो. ही स्वभाव-चित्रे पूर्वांच निरनिराळ्या मासिकांत व वर्तमानपत्रांत त्या त्या प्रसंगाने प्रसिद्ध झालेली आहेत. ती एकत्र करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावी अशी पुष्कळ दिवसांपासून मित्रमंडळींनी आग्रहाची सूचनाहि केली होती. त्याप्रमाणे मी 'आनंद' छापखान्याचे व्यवस्थापक श्री. गोपाळ बळवंत जोशी यांस विनंति केली व त्यांनी ती एकदम उत्साहाने मान्य केली. हे पुस्तक मुख्यतः त्यांच्या उत्साहाचेच फळ होय. सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक ए. जी. गार्डिनर यांनी लिहिलेली स्वभाव- चित्रांची पुस्तकें वाचल्यापासून मराठी भाषेत अशी महनीय व्यक्तींची स्वभाव-चित्रे लिहावी असे वाटत होते. येथील विजय-छापखान्याचे व रत्नाकर' मासिकाचे व्यवस्थापक श्री. अ. स. गोखले यांनी 'रत्नाकर काढल्यावर त्यासाठी फार आग्रह केला व यापैकी बरीच स्वभाव- चित्रे त्याच मासिकांत प्रसिद्ध झाली आहेतः ज्या ज्या प्रसंगी हीं स्वभाव-चित्रं लिहिली आहेत त्या त्या प्रसंगी त्या व्यक्तीचे कार्य विशेष ठळकपणे जनतेच्या डोळ्यांपुढे होते हे वाचकांच्या ध्यानीं येई- लच. महात्मा गांधींचा दांडीचा दौरा संपल्यानंतर त्यांचे स्वभाव-चित्र लिहिले. कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षस्थानी पं. मोतीलाल नेहरू यांची निवड झाल्यावर त्यांचे स्वभाव-चित्र लिहिलेले आहे. अशा रीतीने त्या त्या व्यक्तींच्या आयुष्यातील काही महत्त्वाचा प्रसंग साधून (२) ही सर्व स्वभाव-चित्रं लिहिलेली आहेत. लो. टिळकांचे स्वभाव-चित्र म्हणून जे छापले आहे ते मूळ स्वभाव-चित्र या दृष्टीने लिहिलेले नाही. परंतु एवढ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या स्वभाव-चित्रांच्या पुस्तकांत लोकमान्यांच्या नांवाचा उल्लेखहि नसला तर पुस्तक ओके वाटेल, म्हणून त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखांतील कांहीं भाग या पुस्तकांत ग्रथित केला आहे. स्वभाव-चित्रे लिहिणे हे अर्थात् प्रत्यक्ष अनुभवाचे काम आहे. आणि प्रत्येकाचे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयींचे अनुभव भिन्न भिन्न असणे अगदी स्वाभा- विक आहे. या दृष्टीने स्वभाव-चित्रांच्या रेखाटनांत मतभेदास फार जागा असते. अशा स्थितीत ही स्वभाव-चित्रे रंगविण्यांत कोणास कांहीं चूक झाली असे वाटेल किंवा कोणा चरित्र-विषयाच्या बाबतींत अन्याय झाला असे वाटेल तर ते सर्वस्वी असमर्थनीय होय असे मानणे अयोग्य होईल याची जाणीव मला आहे. 'आनंद' छापखान्याचे व्यवस्थापक व इतर मंडळी यांचा तर या पुस्तकाच्या बाबतींत मी ऋणी आहेच. त्यांच्याशिवाय, ज्या मासिकांत व वर्तमानपत्रांत ही स्वभाव-चित्रे प्रथमतः प्रसिद्ध झाली त्यांच्या चालकांनी ती या पुस्तकांत प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली याबद्दल मी त्यांचेहि आभार मानतो. पुस्तकांत चित्रं घातली आहेत त्यांचे ब्लॉक्स व फोटो केसरी-मराठा संस्था, साहित्य-सेवक छापखाना, व चित्रशाळा प्रेस, यांनी दिले यासाठी त्यांच्या व्यवस्थापकांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. तसेच माझे मित्र श्री. काशिनाथ गंगाधर काळे यांनी पुस्तकाच्या पानांची शेवटची मुद्रिते काळजीपूर्वक तपासली या गोष्टीचाहि साभार उल्लेख करणे अवश्य आहे.

(३)
शेवटीं प्रो. वामन मल्हार जोशी यांनी माझ्या आग्रहाच्या, किंबहुना
हट्टाच्या, विनंतीस मान देऊन रसिक मनाने पण मार्मिक दृष्टीने
प्रस्तावना लिहिली याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने देखील सोन्याप्रमाणे
लोक मानतात, त्याप्रमाणेच ही वाङ्मयसेवा वाचकांनी गोड करून
घ्यावी, एवढी नम्र विनंति करून हे 'सोने' मी त्यांना देतो.
विजयादशमी,
ता. १७ आक्टोबर १९३४. दिनकर वासुदेव दिवेकर,
३७३ नारायण पेठ, पुणे नं. २
}
mMSICummiemar,

प्रस्तावना 'केसरी-मराठा' ऑफिसमधील माझे मित्र रा. दिवेकर यांनी वेळोवेळी लिहिलेली ' स्वभाव-चित्रे' पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहेत, हे पाहून मला आनंद होत आहे. मराठीमध्ये मुंबईच्या 'विविध- वृत्ता'मध्ये व 'प्रतिभे'मध्ये, नागपूरकडील ' वागीश्वरी ' मध्ये, साता- ऱ्याच्या ( ऐक्या'मध्ये व इतरत्र काही सुंदर स्वभाव-चित्रे प्रसिद्ध झाली आहेत, पण ती पुस्तकरूपाने बाहेर पडलेली नाहीत. इंग्लिशमध्ये ए. जी. गार्डिनर यांनी लिहिलेली Pillars of Society व Prophets, Priests and Kings अशी दोन पुस्तकें; जी. डब्ल्यू. ई. रसेल यांनी लिहिलेल Collections and Recollections; एक 'कॉन्झर्व्हेटिव्ह ' यांनी लिहिलेलें Mirrors of Downing Street; तसेंच Portraits of 'Sixties, Portraits of 'Seventies, Portraits of 'righties, - अशी पुस्तके आहेत. याच धर्तीवर पण लहान प्रमाणांत, रा. दिवेकर यांचे पुस्तक असून मराठीतले तें कालक्रमाने पहिले व गुणाने सुंदर असें आहे. यांत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, न. चिं. केळकर, जवाहर- लाल नेहरू, मुकुंदराव जयकर, शिवराम महादेव परांजपे वगैरे बारा व्यक्तींची गुणग्राहक दृष्टीने अवलोकिलेली, चटकदार भाषेत लिहि- लेली, अलंकारांनी व सुभाषितांनी भूषविलेली, मनोवेधक दंतकथांनी व अनुभव-वर्णनांनी मधूनमधून प्रत्यक्षाभास उत्पन्न करणारी, अप्रत्यक्ष पणे सद्बोध करणारी, मधुर व मार्मिक स्वभावचित्रे असून ती लेख. काच्या लेखन-कीर्तीमध्ये भर घालतील अशी मला खात्री आहे. कोठलेंहि चरित्र किंवा स्वभावचित्र हाती घेतले म्हणजे मला अली- कडे प्रथमच अशी शंका येऊ लागते की, एखाद्याचा खरा स्वभाव, (२) ? कळणं शक्य आहे काय ? खरा स्वभाव कळण्याला पुरेशी माहिती व साधन-सामुग्री सामान्यतः नसते; जी काय असते ती भक्तांच्या अदोषदर्शी अतिस्नेहामुळे व शत्रूच्या अकारण पापशंकेमुळे दूषित झालेली असते. शिवाय मनुष्याचे मन त्याच्या भाषणांवरून व कृतीं- वरून अजमाविणे धोक्याचे आहे. आणखी मुख्य गोष्ट अशी की, मनुष्याचा खरा स्वभाव त्याचा त्यालाच कळत नसतो; मग इतरांना तो कसा कळणार ? मनुष्याचे मन इतकें गूढ व गुंतागुंतीचे आहे की, तें योग्यांना देखील अगम्य आहे असे मला वाटते व अलीकडील मनोगाहनशास्त्राने ( Psycho-analysis ने ) तर मनाचे अगम्यत्व फारच बळावलेले आहे. सामान्य मनुष्याच्या मनांत काय किंवा थोर मनुष्याच्या मनांत काय, पापुद्यांच्या आंत पापुद्रे, कोशांच्या आंत कोश असतात. त्यांतील विकसित विचार-विकार-पुष्पांशेजारी कीड पडलेल्या व गळू लागलेल्या विचार-विकार--कलिका असतात. थोर- पणाच्या दिव्याखाली क्षुद्रपणाचा अंधार असतो व क्षुद्रपणाच्या पडद्या- आड थोरपणा लपलेला असतो. उदारवृत्तीच्या माणसांमध्येहि क्वचित्- प्रसंगी अहंभाव असतो. Vanity is the last infirmity of noble minds असे म्हटलेलेच आहे. तसेच ग्रीस देशांतील तत्त्वज्ञ- तपस्वी डाओजेनीस हा शिकंदर बादशहाला भेटण्यास गेला, तेव्हां नेहमींचे फाटकें जाकीट त्याने काही बदललेले नव्हते. तेव्हां शिकंदर- बादशहा मार्मिकपणे म्हणाला, डाओजेनीस, , तुझ्या जाकिटाच्या भोकांतून अहंकार डोकावत आहे. ' ( Pride is peeping through the holes of your jacket.) आणि या म्हणण्यांत पुष्कळ तथ्यांश आहे. उलटपक्षी टिळक-आगरकर किंवा टिळक-गोखले यांच्या आपाततः क्षुद्र दिसणाऱ्या भांडणांच्या पाठीमागें उदारतत्त्वे नव्हती असे कोण म्हणेल ? घरगुती उदाहरणे द्यावयाची म्हणजे बायकांच्या क्षुद्र कंजूषपणांत व अप्पलपोटेपणांत स्वार्थत्यागी अपत्यप्रेम (३) नसते असे नाही. अलीकडील मनोगाहनी ( Phycho-analysts) धर्म, नीति, कला, ज्ञानलालसा, इत्यादि संस्कृति-कमलांची उत्पत्ति कामवासनेच्या चिखलांत शोधू पाहतात हे जरी चुकीचे असले तरी मनोपुष्पांची मूळे, नद्यांच्या व ऋषींच्या मूळांप्रमाणेच, गूढ व भाविकां- च्या भक्तीला धक्का देणारी असतात हे काही खोटें नव्हे. उलटपक्षी महंमदीयांच्या 'कुराण अगर तलवार' या धोरणांत काही चांगलें नव्हते, किंवा सुयोधनाच्या ( दुर्योधन हे नांव मागाहूनचे आहे ) धोरणांत कांहींच अर्थ नव्हता, असेंहि म्हणतां यावयाचे नाही. हॅम्ले. टच्या वेडेपणांत जशी एकप्रकारची सुसंगति होती, त्याचप्रमाणे न्याय- निष्ठुर लोकांच्या कठोरपणांतहि कित्येक वेळां प्रेमळपणा गूढ असतो. मनुष्याच्या मनांतील अशा प्रकारच्या उभयविध विरोधाभासाचा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता या पुस्तकांतील नरवीरांची उदाहरणे घेतां येतील. महात्मा गांधींच्या प्रमाद-हिमालयांतून एखाद्या तत्त्वगंगेचा उगम होत असेल हे जितकें संभवनीय आहे, तितकेंच त्यांच्या सत्याग्रह- गंगेत दुराग्रहाचा ओढा मिळणेहि संभवनीय आहे. जवाहरलाल नेह- रूंच्या पराक्रमांत आदरणीय स्वार्थत्याग असणे जितकें संभवनीय आहे, तितकेंच त्यामध्ये अविचारी साहस लपून असण्याचा संभव आहे. थोर लोकांच्या बाबतीत ही स्वभावविषयक दुर्गमता विशेषेकरूनच भासते. मोठेपणा म्हटला की गैरसमज त्याच्याबरोबर आलाच. To be great is to be misunderstood असे म्हणतात ते खोटें नाही. मोठेपणा समजण्यास स्वतःच्या अंगी तेवढा मोठेपणा बीज- रूपाने तरी असावा लागतो. वीर -पुरुषाच्या हुजन्याला त्याचा मोठे- पणा दिसत नाही. हिमालयावरील मानससरोवराचे ज्ञान पायथ्यापाशी घोटाळणाऱ्या कावळ्याला काय होणार ? कांहीं मोठया लोकांच्या स्वभावांत परस्पराविरुद्ध इतक्या प्रवृत्ति, वासना, आशा, आकांक्षा, वगैरे असतात की अंशतः पाहणाऱ्यांना त्यांत कांहीं संगति असेल (४) असे वाटत नाही. त्यांत त्यांना विसंगति दिसते. भाषणांतील किंवा वर्तनांतील दर्शनी सुसंगति हे काही खऱ्या थोरपणाचे लक्षण नाही. Consistancy is the virtue of an ass हे तत्त्व पुष्कळांच्या ध्यानांत नसते, आणि मग ते 'सुसंगती' चे शंख-वाद्य वाजवीत थोरां- मोठ्यांवर तुटून पडतात आणि स्वतःस हास्यास्पद करून घेतात. विभूतींचे विभूतिमत्त्व कळण्यास सुलभ असते तर आपल्या इकडील साधुसंतांचा, किंवा युरोपमधील साक्रेटिसाचा किंवा ख्रिस्ताचा छळ कशाला होता ? बौद्धिक क्षेत्रांत, की जेथे भावनांचा फारसा संबंध येत नाही, तेथे शंकराचार्यांसारख्यांचा अद्वैतसिद्धान्त किंवा आइनस्टाईन- सारख्यांचा 'सापेक्ष' वाद कितीकांना समजण्यासारखा आहे ? थोर विभूतींचा स्वभाव तर समजण्यास याहूनहि कठिण आहे. कारण त्यांपैकी काहींचा स्वभाव दिसण्यांत जितका साधा तितका संमिश्र असतो, त्यांत सरलतेबरोबर वक्रताहि असते, उच्चत्वाप्रमाणे खोल- पणाहि असतो! कित्येक थोर लोकांचे मन जितकें कोमल तितकें प्रसंगी कठोर होते, ते कुसुमापेक्षां कोमल व वज्रापेक्षां कठिण असें असते. तें गंगाप्रवाहाप्रमाणे स्वच्छ असते, पण एखाद्या मौल्यवान् रसायनाप्रमाणे मृत्तिकेचाहि रंग धारण करते. त्यांचा स्वभाव जितका गोड तितकाच वेळेनुसार कडू. त्यांत आंत-बाहेर असें कांहीं नसते व असतेंहि ! दुसरे काही थोर लोक मनांत दुःखी-कष्टी असतांना सुद्धा बाहेर आनंदी चेहरा ठेवतात, उजव्या हाताने केलेला परोपकार डाव्या हाताला कळू देत नाहीत, इतरांच्या गुणपरमाणूंना ते पर्वताचे रूप देतात व स्वतःचे गुण दोषस्वरूप आहेत असे दाखवितात ! कित्येक विभूति अशा असतात की, लोकांना भोग मिळावा म्हणून ते स्वतः त्यागी व लोकांना प्रवृत्तिपर करतांना त्यांच्या मनांत निवृत्ति! अशा या अनेकविध अलौकिक विभूतींचे मन ओळखावयाचे कसे व कोणी ? त्यांत पुनः मनोगाहनी ( Psycho-analysts ) म्हणतात त्याप्रमाणे (५) अबुद्धिपुरःसर प्रवृत्तींची व वासनांची भानगड. आणि मने जाणण्याची आपली साधने काय, तर बाह्य कृति, मित्रांची स्तुति, शबूंची निन्दा, आणि तटस्थांच्या कर्णकथा व दंत-कथा ! म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की, आपण थोर लोकांची चरित्रे लिहिण्याचा प्रयत्न करूं नये किंवा ती वाचूं नयेत. ती लिहितांना किंवा वाचतांना सावधगिरी किती ठेवली पाहिजे हे दर्शविण्याकरिता वर जे लिहिले ते लिहिले आहे. पूर्णपणे यथार्थ ज्ञान होणे शक्य नाही हे जरी ठाऊक असले तरी मनुष्यमात्रांत जोपर्यंत जिज्ञासा आहे तों- पर्यंत तो इतरांच्या विषयीं चौकस बुद्धि धारण करणारच व थोर विभूतींविषयीं तर तो विशेषच चौकस असणार. त्यांच्याविषयी पूर्ण जरी नाही तरी जेवढी मिळेल तेवढी माहिती मिळाली म्हणजे त्याचे तेवढं समाधान होते व यांत वावगं असें कांहीं नाहीं. पण सहानुभूति, सत्यप्रीति, कल्पनाशक्ति व मार्मिकपणा असल्या- शिवाय स्वभाव-ज्ञान यथार्थ होणे अशक्यप्राय आहे आणि म्हणूनच चरित्रलेखकामध्ये हे गुण असून सत्यकथनाचे धैर्यहि त्यांच्या जोडीला असावे लागते. प्रस्तुत स्वभावचित्रे लिहिणाऱ्या रा. दिवेकरांमध्ये हे गुण असल्यामुळे त्यांची ही शब्दचित्रे वाचनीय व मननीय झाली आहेत. रा. दिवेकरांनी चरित्रनायकांचे सबंध चरित्र विस्तरशः दिलेले नाही व त्यांच्या गुणदोपांची साधकबाधक सांगोपांग चर्चा केलेली नाही, तर जणू काही त्या चरित्रनायकाचा एखादा चांगल्या ओळखीचा मनुष्य आपणांला भेटला आहे व त्याविषयी सहानुभूतीने आपणांशी बोलत आहे आणि ही माहिती सांगण्यांत तो रंगला आहे अशा पद्धतीने ही शब्दचित्रे काढलेली आहेत. अर्थात् प्रत्यक्ष अनुभवाच्या कांही गोष्टी, वाचनाने मिळविलेली माहिती, कांहीं कर्णकथा, इत्यादि- कांचा सुंदर मिलाफ झाला आहे. रा. दिवेकरांना वर्ण्य विषयाशी तादात्म्य पावून पुनः स्वतःचे स्वत्व कायम ठेवण्याची कला चांगली साधली आहे आणि त्यांची वर्णनशक्ति व भाषाप्रभुत्व ही घेतलेल्या भूमिकेला साजेशी आहेत.

(६) ललित वाङ्मयांत कादंबरी आणि लघुकथा यांची ध्येये, व यांच्या रचना पद्धति, ही जशी निराळी त्याप्रमाणेच चरित्रे आणि स्वभावचित्रे यांमध्ये फरक मानावा लागणार आहे. चरित्रामध्ये सर्व माहिती संकलित करून विस्ताराने दिलेली असते; स्वभावचित्रामध्ये मनांत भरेल अशी महत्त्वाचीच माहिती थोडक्यांत दिलेली असते. चरित्रामध्यं तार्किक सत्यप्रीतीचा पगडा असते व जेथे तेवढा पुरावा असेल तेथे तेवढेच विधान करावयाचे अशी वृत्ति असावी लागते. स्वभा वाचत्रे लिहिणाऱ्याला सत्यप्रीति अवश्य पाहिजेच, पण त्याला जे सत्य दिसेल तें तो सांगतो व पुराव्यांच्या भानगडींत तो सहसा पडत नाही, व पडलाच तर तो स्वतःच्या अभिरुचीला व भावनांना पटलेला पुरावा इतरांना पटेल अशा रीतीने मांडतो. चरित्रलेखकाचे लक्ष चित्राच्या जिवंत- पणापेक्षां साधारतेकडे अधिक असते; स्वभावचित्रकाराचे लक्ष साधा- रतेपेक्षां जिवंतपणाकडे अधिक असते. चरित्र वाचीत असतां रानांत शिरल्यासारखे होऊन विशिष्ट तरूंकडेच अधिक लक्ष जात व सबंद रान कसे दिसत असेल याची कल्पना चांगलीशी होत नाही. स्वभाव- चित्र वाचलें म्हणजे टेकडीवर बसलेल्या एखाद्या रसिकाला तें रान कसे दिसले याची कल्पना होते. चरित्रलेखक अधिक वस्तुनिष्ठ असतो; स्वभावचित्रकार चरित्रनायकाची स्वभावसृष्टि स्वतःच्या दृष्टीने दिद्दर्शित करतो. चरित्रे चांगली लिहावयाची म्हणजे ती माहितीची पोतडी असून उपयोगी नाहीत, तर त्यांत प्रमाणबद्ध व कलायुक्त मांडणी पाहिजेच; पण त्यांत कलात्मकतेपेक्षां कांटेतोल खरेपणाला विशेष महत्त्व आहे. स्वभाव-चित्रांमध्ये वारेमाप विधानांना वाव नाही, पण वयाक्तक कल्पनांना व भावनांना मज्जाव नसतो, कारण या चित्रांमध्ये चित्रविषयाच्या भाव-भावनांप्रमाणेच चित्रलेखकाच्या भाव-भावनाहि जाणण्याची व त्यांची गोडी चाखण्याची वाचकांची इच्छा असते. चरित्र वाचीत असतां चरित्रलेखकाचेहि विचार-विकार वाचकांना प्रतीत होत असतातच व त्यांचाहि आस्वाद तो घेतच असतो, पण विशेष भर चरित्र- विषयीभूत व्यक्तीच्या विचार-विकारांवरच सामान्यतः असतो.

(७) आतां कांहीं चरित्रलेखकहि असे असतात की, ते वर्ण्य नायकाचे चरित्र चिकित्सापूर्वक विस्ताराने देतात, गुणावगुणांविषयीं साधक- बाधक चर्चाहि करतात व त्यांचे चित्र कलात्मक व जिवंतहि असते ! उदाहरणार्थ, महाराणी व्हिक्टोरिआचें चरित्र लिहिणारा स्ट्रेची; तसेच डिझेली व शेली यांची चरित्रे लिहिणारा आंद्रे मारवाँ ( Andre Maurois ) यांची चरित्रे इतकी चांगली आहेत की, त्यांतील नायकां- इतकेंच लेखकांचेंहि कौतुक वाटते ! तसेंच कार्लाइलसारखे लेखक French Revolution सारख्या व्यापक विषयावर विस्ताराने लिहितांना जिवंत स्वभावचित्रे उभी करूं शकतात व चरित्रविषयी- भूत व्यक्तीचे ज्ञान होत आहे या आनंदाबरोबरच कार्लाइलच्या लेखन- कलेच्या रसास्वादाचा वाचकाला आनंद होत असतो. हे जरी खरें असले तरी सामान्यतः चरित्रे व स्वभाव-चित्रे यांमध्ये वर दर्शविल्या- प्रमाणे फरक करता येईल, व प्राधान्येन व्यपदेशाः भवन्ति या न्यायाने तो मान्य करण्यासहि हरकत येणार नाही. रा. दिवेकरांच्या स्वभाव-चित्रांकडे या दृष्टीने पाहतां ती बरीच यशस्वी आहेत असे म्हटले पाहिजे. पण त्यांत वैगुण्ये नाहीत असे नाही. स्वभावचित्रांमध्ये वैयक्तिक आवडी-निवडीला जागा आहे हे खरे, पण या आवडी-निवडीलाहि मर्यादा आहेतच. रा. दिवेकरांना बहुतेक चरित्र. नायकांविषयी इतका आदर वाटतो की, ते जणू काही त्यांच्या भक्त- गणांपैकी आहेत असे वाटते. ते चरित्र-नायकाचा एखाद-दुसरा दोष दाखवितात, पण स्वभावचित्राला उठाव देण्याकरितांच तो दाखवितात की काय असा भास होतो. असें एकवेळ कबूल करता येईल की लोक- मान्य टिळक किंवा महात्मा गांधी यांमध्ये काहीहि दोष नाहीत; निदान तसे एखाद्याचे मत तें रसयुक्त भाषेत रंगविण्यास काहीच हरकत नाही. पण काही समंजस लोकांना त्यांमध्ये दोष दिस- तात याची दखलगिरी लेखकाला पाहिजेच, आणि साधकबाधक चर्चा जरी केली नाही तरी कोणत्या दृष्टीने त्या आरोपित दोषांचे निरा- असले तर (८) करण करता येईल याचे भावनेच्या भाषेत का होईना दिग्दर्शन पाहि- अच. असें दिग्दर्शन या पुस्तकांत कित्येक ठिकाणी दिसत नाही. दुसरे वैगुण्य असें की कांहीं कांहीं स्वभावचित्रांच्या दृष्टीनेंहि मह- त्त्वाचे म्हटले पाहिजेत अशा प्रसंगांचा किंवा प्रकरणांचा कित्येक चित्रांत उल्लेख नाही. अनेकांपैकी एकच उदाहरण घ्यावयाचे म्हणजे लो. टिळक यांचे चरित्रांत टिळक-आगरकर-संबंध, किंवा टिळक- गोखले-संबंध यांचा फारसा उल्लेख केलेला आढळत नाही, हे नजरेस आणून दिले म्हणजे झाले. पण माझी कदाचित् अशी चूक होत आहे की, ५-६ पानांच्या स्वभाव- चित्रांत ज्या गोष्टी आणण्याने चित्राचा आटोपशीरपणा व जिवंतपणा जाईल त्या गोष्टी मी दिवेकरांनी आणल्या पाहिजे होत्या असे म्हणत आहे. शिवाय काही स्वभावचित्रे बोलून चालून वर्ण्य नायकांच्या " पुण्यप्रद स्मृतिपादांवर समर्पण केलेली स्तवन-सुमनें" आहेत, तेव्हां इतकी विचिकित्सा करणे हेहि योग्य नव्हे. अर्थात् वर दाखविलेलें वैगुण्य हे वैगुण्य नव्हे. पण उणीव भासली ती लिहिली एवढेच. ही उणीव नजरेला आली तरी स्वभावचित्रांचा आकर्षकपणा कमी होईल असें मला वाटत नाही, म्हणूनच ती येथे दर्शविली. आकर्षकपणा जो आहे तो आधी वर्ण्य विषयांच्या थोरपणाचा. यांत दिवेकरांना अर्थात् कांहीं श्रेय नाही. पण थोरांचा थोरपणा जाणण्याची योग्यता असणे, त्यांबद्दल आदर, किंबहुना भाक्ति असणे, तद्विषयक वर्णन करण्याची हौस व शक्तिहि असणे, व सगळ्यांत अधिक गोष्ट म्हणजे या वर्णनांत आपण रंगणे व वाचकांना रंगविणे ही काही लहानसहान गोष्ट नव्हे. दिवेकरांच्या उत्साहयुक्त विभूति- पूजेला अलंकारयुक्त भाषेची जोड आहे म्हणून ही अलंकारिक भाषा रसयुक्त झालेली आहे, या रसयुक्त भाषेत सुभाषितांची खडीसाखर टाकल्यामुळे ती आधिकच मधुर झाली आहे, व या माधुर्यात सदु- पदेशाच्या सुवासाची भर पडली आहे ! पुणे ४ ११1१०1३४ वा. म. जोशी

“Whyl I have tyme and space,
Me thinketh it acordaunt to resoun,
To telle yow al the condicioun
Of ech of hem, so as it semed me,
And whiche they weren, and of what
degree;
And eek in what array that they were
inne.
Chaucer's
"The Prologue to the Canterbury
Tales.'

ही स्वभाव-चित्रे प्रथम ज्या मासिकांत किंवा पत्रांत प्रसिद्ध झाली त्यांची नांवें व प्रसिद्ध झाल्याच्या तारखा खाली दिल्या आहेत. डिसेंबर १९२८ १९२९ जानेवारी १९३१ १ लो. टिळक केसरी २ ऑगस्ट १९२७ २ महात्मा गांधी यशवंत जून १९३० ३ मोतीलाल नेहरू रत्नाकर ४ वल्लभभाई पटेल रत्नाकर जुलै ५ विठ्ठलभाई पटेल रत्नाकर एप्रिल १९२९ ६ न. चिं. केळकर रत्नाकर ७ न. चिं. केळकर श्री लोकमान्य (खास अंक) २२ ऑगस्ट १९३२ ८ एम्. आर. जयकर रत्नाकर जानेवारी १९३३ ९ शि. म. परांजपे रत्नाकर १० कृ. प्र. खाडिलकर सकाळ २५ डिसेंबर १९३३ (काही भाग) (जादा साहित्य अंक) ११ मा. श्री. अणे १२ जवाहरलाल नेहरू रत्नाकर १३ सुभाषचंद्र बोस केसरी २२ डिसेंबर १९३१ आक्टोबर १९२९ चित्रमयजगत् सप्टेंबर १९३३ डिसेंबर १९२९ अनुक्रमणिका पृष्ठ .... १ नांव १ लोकमान्य टिळक २ महात्मा गांधी ३ पंडित मोतीलाल नेहरू ४ सरदार वल्लभभाई पटेल ५ नामदार विठ्ठलभाई पटेल ६ श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर .... २१ ३२ ४७ ६१ .... : ... .... " .... .... .... .... ९२ .... ८ श्रीयुत मुकुंदराव जयकर ९ प्रो. शिवराम महादेव परांजपे १० श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ११ श्री. माधव श्रीहरि अणे १२ पंडित जवाहरलाल नेहरू १३ बाबू सुभाषचंद्र बोस .... .... १२८ १४० .... --- स्वभाव-चित्रं लोकमान्य टिळक " वाटे चरित्र त्यांचे काही आपण तरावया गावें." -मोरोपंत. कालरोजी लोकमान्य टिळकांस इहलोक सोडून गेल्यास इंग्रजी तिथीप्रमाणे बरोबर सात वर्षे पुरी झाली. या सात वर्षांच्या अवधीत लोकमान्यांची स्मृति नाहीशी झाली नाही इतकेच नव्हे, तर ती प्रतिदिवशी सकाळी फुलणाऱ्या फुलाप्रमाणे किंवा समुद्राच्या सपाटी. वर हरघडी उठणाऱ्या नवनवीन लाटेप्रमाणे अगदी ताजीतवानी आहे असें आजहि वाटते व चालू चिन्हांवरून असें अनुमानदेखील करण्यास हरकत नाही की, ही स्मृति भावी कालांतहि कोमेजणार नाही. एका निराशावादी लेखकाने म्हटले आहे की, कोणाहि माण. साने, आपलें नांव मरणानंतर सहा महिन्यांवर टिकलें तर स्वतःस दैववान् समजावे. पण अर्थात् हे विधान खरे असेलच तर सामान्य मनुष्यासंबंधी आहे. कारण असे कित्येक महापुरुष आहेत की, त्यांची नांवें शतकेंच्या शतकें लोटली तरी अद्यापि अजरामर आहेत. महात्मे कालाच्या पोटांत नष्ट होऊ शकत नाहीत आणि ते कालवश होऊन स्मृतिशेष होतात याचा भावार्थ असाच की, त्यांची आठ- वणच यावच्चंद्रदिवाकरौ सतेज अवस्थेत कायम टिकून राहते; शिवाय कांहीं तत्त्वज्ञानी म्हणतात त्याप्रमाणे अगत्याचे प्रसंगी लोकोत्तर पुरुष परिस्थितीच्या उदरांतून, शमी वृक्षांतून ज्वालायुक्त अग्नि बाहेर or स्वभाव-चित्रे यावा अथवा कमलांतून सावयव-सालंकृत लक्ष्मी उद्भव पावावी तसे, एकदम सज-सायुध स्थितीत निर्माण होवोत; किंवा दुसरे कित्येक विचारी लेखक प्रतिपादितात त्याप्रमाणे, एकाद्या कुशल कारागिराने आपणास इष्ट अशी मूर्ति घडवावी अथवा चतुर चिताऱ्याने आपल्या हौशीप्रमाणे काढलेल्या चित्रांत रंगाची खुलावट करावी, तसे भोव- तालच्या परिस्थितीवर आपलें खोगीर चढवून तीवर स्वार होऊन आपल्या ध्येयसिद्धीस पोषक अशी तिची स्थिति करून व तिला गति देऊन असामान्य व्यक्ति आपलें ईश्वरी असामान्यत्व जगाच्या निदर्शनास आणोत; एवढी गोष्ट खास की, त्यांच्या अलौकिक गुणांचा व दीप्तिमान् कार्याचा ठसा मात्र परिस्थितीच्या फलकावर अक्षय असा उमटलेला दिसतो. लोकमान्य टिळक हे अशा विभूतिवंत, महानुभावी, चिरपरिणामी व अवतारतुल्य थोर पुरुषांपैकी एक होते हे सांगणे म्हणजे इंद्र- धनुष्यावर कुंचला फिरवण्यासारखें किंवा सोन्याला मुलामा देण्या- सारखे होय. कोणीहि थोर पुरुष घेतला तरी तो सव्यसाची, किंबहुना चतुरस्र असतो; निदान हे त्याचे बहुविध व सर्वकष थोरपण व्यक्त स्वरूपांत नसले तरी विजेच्या अवगुंठित तारेंतील गूढ शक्ती- प्रमाणे गरजेबरहुकुम उघडपणे सेवेस सादर होणारे असते हे सर्व- मान्य आहे. प्रसिद्ध इंग्रजी लेखक कार्लाईल याचे जे म्हणणे की, एका गोष्टींत वीर, तो सर्व गोष्टींत वीर" याचेहि रहस्य हेच होय. कोणी शास्त्रवेत्ता म्हणून तर कोणी संशोधक म्हणून, कोणी राज. कारणी मुत्सद्दी म्हणून तर कोणी सेनानायक म्हणून, कोणी गद्य- लेखक म्हणून तर कोणी कवि म्हणून, कोणी धर्मसंस्थापक म्हणून तर कोणी क्रांतिकारक म्हणून, सर्व लोकोत्तर पुरुष प्रसिद्ध होऊन जातात. आणि या गत महापुरुषांच्या स्मृतीचे मर्म यथार्थत्वाने जाणावयाचे म्हणजे विवक्षित क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक गुणांचे लोकमान्य टिळक व कार्याचे सूक्ष्म निरीक्षण करावयास पाहिजे. म्हणूनच इंद्रधनुष्य अधिक मनोहर करूं पाहाणे किंवा सुवर्णास जास्त चकाकी देऊ पाहाणे हे अनुचितपणाचे असले तरी, त्या धनुष्यांतील रंगांचे पृथ. करण करणे अभ्यासकास जरूर पडतेंच व सोनेंहि, त्याचे दागिने करून ते लोकोपयोगी करणारास, विस्तवांत आटवावे लागतेच, हे निर्विवाद आहे. एकाच महापुरुपाने अनेक रीतींनी दोन-चार क्षेत्रांत आपलें महानुभावित्व, बुद्धिमत्त्व व कार्य कौशल्य उत्कटत्वाने प्रगट केलेले असले म्हणजे मग तर अशा त-हेची निवड करणे अत्यंत आवश्यक होते हे सांगावयास नकोच. लोकमान्य टिळक हे अनेक दृष्टींनी लोकोत्तर होते हे प्रसिद्ध आहे. त्यांचे संस्कृत व गणित हे दोन विषय विद्यार्थिदशेपासूनच तज्ज्ञांस देखील तोंडांत बोट घालण्यास लावण्याइतके तयार होते. त्यांची बुद्धि जशी अत्यंत विशाल तशी कुशाग्रहि होती. या देणगीच्या जोरावर त्यांनी जे शोध लावले व ग्रंथ लिहिले ते जवळ जवळ प्रमाणभूत गणले जातात. कोणत्याहि विषयांत त्यांनी आपले पाऊल टाकलें की वनगजाप्रमाणे तो ' विषय' आपल्या बुद्धिप्रतापाने ते हस्तगत करून घेत असत हे विश्रुत आहे. ज्याला ज्याला म्हणून हात घालावा तें तें कृत्य उच्च दर्जाचे, आदर्शभूत, क्रांतिकारक व अप्रतिम व्हावे असा त्यांचा गुण होता. त्यांनी गतिचे आजन्म परिशीलन केलें व असा ग्रंथ त्यांच्या मेंदूतुन निपजला की, दुसरे हजार ग्रंथ टाकावेत आणि हाच घ्यावा असे प्रत्येकास वाटावे इतका त्याचा महिमा. पंचांगशोधन ध्या किंवा इतिहास-संशोधन घ्या, यांत सुद्धा लोकमान्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. तथापि यासंबंधात लोकमान्यांचे कार्य कितीहि महत्त्वाचे व विचारांत महापरिवर्तन करणारे असले तरी त्यांनी राजकीय क्षेत्रांत जी कामगिरी केली ती इतिहासांत वरील कोणत्याहि किंवा सर्व ४ स्वभाव-चित्रे त्यांचा उत्साह, प्रकारच्या कामांपेक्षा जास्त तेजस्वी, संस्मरणीय, जनतेची प्रत्यक्ष सेवा करणारी, जनतेच्या आदरास व कृतज्ञताबुद्धीस पात्र होणारी अशी उल्लेखिली जाईल यांत संशय नाही. कारण इतिहासांत राष्ट्रांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यांच्या विभागास में मूर्धाभिाषक्त स्थान आहे तें प्रायः दुसऱ्या विभागास मिळण्यासारखें नाहीं, व मिळतां उपयोगीहि नाही. राष्ट्राला स्वातंत्र्य असेल तर सर्व काही आहे; त्याचे स्वातंत्र्य हिरावलेले असेल तर सर्व काही असून नसून सार- खेंच. जॉर्ज वॉशिंग्टन, जोसेफ मॅझिनी, गॅरीबाल्डी, पार्नेल, रेडमंड, डी व्हॅलेरा, लेनिन, केमालपाशा, कोसूथ इत्यादि स्वातंत्र्य-संस्था- पकांचा अथवा स्वातंत्र्याकरितां शिरकमल हातांत घेऊन उभ्या असलेल्या धीरोदात्त, पराक्रमशाली वीरांचा, अंतःकरण उचंबळून येऊन, शरीर उत्साहाने थरारून त्या त्या राष्ट्रांतील लोक सन्मान करतात, त्यांची जयंती-पुण्यतिथि साजरी करतात, धडाडी व स्वार्थत्याग आपल्या अंगांत अंशतः तरी संचरावा म्हणून प्रार्थना करतात; पण त्या त्या देशांतून गॅलीलियो, न्यूटन, कोपर- निकस, अरिस्टॉटल, एडिसन, झेपेलिन, वगैरे शास्त्रीय संशोधक किंवा यंत्रकार किंवा तत्त्वकुशल विवेचक यांचा इतक्या मोठ्या प्रमाणांत सत्कार तर होत नाहीच, पण सामान्य जनाला त्यांची फारशी माहितीहि नसते हे आपण उघड पाहतो. तेव्हां अशा स्थितीत लोकमान्यांच्या राजकीय तत्त्वावर व कार्यावर विशेष भर दिला तर त्यांत आश्चर्य करण्यासारखं काही नाही. उलट छायाचित्र काढणारा वस्तुस्थितिनिदर्शक प्रतिमा निघावी म्हणून समोर बसलेल्या मंडळीस बरोबर रोखून आपलें यंत्र उभारतो, तद्वत् लोकमान्यांच्या राष्ट्रव्यापी यशोगानाचे अंतर्गत रहस्य यथातथ्य समजून घ्यावयाचे असेल, त्यांच्या कार्याची मातब्बरी ओळखा. वयाची असेल आणि त्यांची स्मृति भरीवपणाने व गांभीर्याने उज्ज्वल लोकमान्य टिळक राखावयाची असेल तर त्यांच्या राजकीय योगसिद्धीचे त्यांच्या अनुयायांपैकी प्रत्येकाने आपल्या हृत्पटलावर प्रतिबिंब पाडून, तत्प्रीत्यर्थ त्यांनी उपयोगात आणलेल्या साधनांचा पुनः स्वीकार करणे याखेरीज दुसरा उपाय नाही. टिळकांना त्यांच्या ईश्वरी प्रेरणेमुळे जे यश प्राप्त झालें तें कदाचित् आपणांस प्राप्त होणार नाही, किंवा आतां टिळक नाहीत म्हणून कदाचित् थोडी निराशा देखील वाटण्याचा संभव आहे. पण टिळक वारंवार जन्माला येत नसतात. इमर्सनने म्हटल्याप्रमाणे, एक अद्वि. तीय महापुरुष अवतरला म्हणजे ज्या मुशीत निसर्गदेवतेने त्याला ओतले ती फोडून टाकण्यात येते असे दिसते. कारण त्याच्याचसारखा दुसरा निर्माण होऊ शकत नाही. त्याचा पूर्वज तोच व त्याचे वंशज तोच. त्याच्याबरोबर त्याचा वर्ग संपतो. त्याच्या कार्याचे बी या भूमीवर पडून ते रुजावे, त्यापासून धष्टपुष्ट रोप तयार व्हावे व अखेरीस योग्य हंगाम प्राप्त होतांच त्याच्या समृद्ध फलपुष्पसंभाराने पृथ्वी सुशोभित होण्यास अवकाश मिळावा या, हेतूने हा दैवी नेमा- नेम असल्यास न कळे. त्याच्यामागून लोक उत्पन्न होतातच. ' रवि- रुचिच्या' मागे तिचे कार्य दीपकावर पडतें, नाहीं असें नाही. पण कवीने विचारल्याप्रमाणे 'विसरविल काय तेज प्रगट करुनि अल्प काजवा तीस' हेच खरे. तथापि टिळकांचे अनुयायी व अभिमानी म्हणविणारांनी एकदिलाने उपरिनिर्दिष्ट पद्धतीने त्यांचे कार्ययुक्त स्मरण करावयाचे तर संघटित प्रयत्न केल्यास कांहींच यश येणार नाहीं असें कदापि होणार नाही. मात्र अंतःकरणांतून उसळून बाहेर पडणारी इच्छा पाहिजे. अशी अंतःस्फूर्त इच्छा असेल तर काहीहि अशक्य नाही. टिळक जिवंतपणे आपणांमध्ये वावरत नसले तरी त्यांचा आत्मा या राजकीय चळवळींत अंतर्धान पावलेला आहे आणि त्या चळवळींचा पुनः एकदां पुरस्कार होऊ लागला म्हणजे aur स्वभाव-चित्रे ते व्यष्टिरूपाने नव्हे तरी समष्टिरूपाने या राजकीय जागृतीस हातभार लावतील याविषयी संदेह नाही. महान् विभूति जिवंतपणा- पेक्षां मरणोत्तर सूक्ष्मावस्थेतच अधिक स्फूर्तिदायक व उत्साहवर्धक होतात असे म्हणतात. त्यांतील सत्याची प्रतीति आम्हांसहि हल्लीच्या प्रसंगी यावी अशी जगत्सूत्रचालकाची मनःपूर्वक प्रार्थना करून पुण्यश्लोक लोकमान्य टिळकांच्या पुण्यप्रद स्मृतिपादांवर हे स्तवन- सुमन समर्पण करतो.

२ महात्मा गांधी परार्थव्यासंगादुपजहदथ स्वार्थपरता- मभेदैकत्वं यो वहति गुणभूतेषु सततम् । खभावाद्यस्यांतः स्फुरति ललितोदात्तमहिमा समर्थो यो नित्यं स जयतितरां कोऽपि पुरुषः ।। -जगन्नाथ पंडित जंबूसर येथील गोष्ट. सायंकाळची वेळ होती. दोघा-दोघांच्या रांगा करून स्वयंसेवक-मंडळी कापसाच्या गिरणीच्या आवारांतील छावणीच्या बाहेर, पुढील मुक्कामास जाण्याकरितां, सज्ज होती. आजूबाजूस हजारों स्त्री-पुरुषांचा समुदाय तटस्थ राहून त्याच जागेतील एका लहानशा इमारतीच्या खोलीच्या दाराकडे टक लावून बघत होता. बरोबर सहा वाजतां वीज चमकल्यासारखी एक व्यक्ति चटकन् बाहेर पडली व आपल्या वयोमानास न शोभणाऱ्या अशा उत्साहाने लांब ठेंगा टाकीत सर्व सेवकांच्या अग्रभागी उभी राहिली. शरीर म्हणजे अक्षरशः यष्टीसारखें, गाल बसलेले, डोळे खोल गेलेले, जवळजवळ सगळ्या डोक्यास टक्कल पडलेलें, कंबरेपासून जेमतेम गुडध्यापर्यंतचा भाग एका खादीच्या पंचानें झांकलेला, उन्हाळा फार म्हणून भिजलेले एक फडके डोईस गुंडाळलेले, हातात काठी घेतलेली व पायांत चपला असलेली अशी ती नग्नप्राय जरत्कारु वामनमूर्ति मार्ग आक्रमण करूं लागली. साठी उलटून गेलेली; प्रकृति म्हणजे लवंगेनें उष्णता व वेलदोड्याने थंडी होणारी; खेडा, भडोच व सुरत जिल्ह्यांतील मार्च महिन्यांतील प्रखर सूर्यताप; परंतु ८ स्वभाव-चित्रे महात्माजी जे एकदां साबरमतीहून, नंदकुलाचा निःपात करणाऱ्या चाणक्याप्रमाणे किंवा अन्यायी पेशवे दरबारच्या आश्रयाचा संन्यास करणाऱ्या रामशास्त्याप्रमाणे, प्रतिज्ञा करून निघाले ते निघालेच. शंभर मैलांच्या उन्हातान्हांतील प्रवासानेही न थकलेल्या या देशा- भिमानी महात्म्याला म्हणावे तरी काय ? हा मानवप्राणी आहे, की मातृसेवेची साकार प्रतिमा आहे, की राष्ट्रभक्तीची जागती ज्योत आहे, की निश्चयाने नरदेह धारण केला आहे, की सत्याचा अवतार आहे, की अहिंसेचा चालता-बोलता पुतळा आहे, की कष्टाची मूर्ति घडलेली आहे, की आत्मिक बल रूपास आलेले आहे, की आहे तरी काय? पण मन असें विकल्पांत पडतें हाच तर मोठ्यांचा मोठेपणा. तो संपतच नाही. जणुं काय आवर्त दशांशच. श्री. तात्यासाहेब केळ. करांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे तीन भाग लिहिले, श्री. अण्णासाहेब बापटांनी त्यांच्या आठवणींचेही तितकेच खंड प्रसिद्ध केले; पण टिळकांच्या महनीयत्वाचा पुरा थांग कोठे लागला आहे ? म. गांधींचे तर विचारूच नये. स्वतःच त्यांनी आत्मचरित्राचे दोन बडे ग्रंथ निर्माण केले व याशिवाय कृष्णदासांचे 'सात महिन्यांचा महात्माजींचा सहवास, ' महादेवभाईची ' महात्माजींसह लंकेंत,' 'महात्माजींसह खेड्यांत' ही पुस्तकें वगैरे वगैरे गांधी-वाङ्मय जमेस धरले तर एक स्वतंत्र वाचनालयच व्हावयाचे. तथापि महा- त्माजींच्या महानुभावित्वाचा अद्यापि कोणास पत्ता लागत नाही. आणि म्हणून कोणी त्यांचे The little great man " असे वर्णन करतो, कोणी " The terrible meek " ही पदवी त्यांस अर्पण करतो, कोणी त्यांस । व्यवहारी ध्येयवादी' म्हणतो, कोणी 'राजकारणी साधु' असे त्यांस संबोधितो, कोणी त्यांस ' किंचित् पंख तुटलेला देवदूत' असे समजतो, कोणी त्यांस खिस्ताची उपमा महात्मा गांधी ९ - देतो, कोणी त्यांस ' हिंदुस्थानचे टॉलस्टॉय ' असें मानतो, कोणी हा आमचा नव्हे ' असे म्हणून त्याचा धिक्कार करतात, कोणी 'दरिद्री-नारायणाचा परमेश्वर' म्हणून त्यांच्यापुढे धूप जाळतात. म्हणून तर मॅथ्यू आर्नाल्ड कवीने शेक्स्पीयरविषयी लिहिलें तें प्रायः सर्व महाशयचक्रवर्ती पुरुषांना लागू पडते. Others abide our question. Thou art free. We ask and ask--Thou smilest and art still. Out--topping knowledge........... And thou who didst the stars and sun-beams know, Self-schooled, self-scanned, self-honoured, selfsecure, Didst tread on earth unguessed at.- Better sol" खरोखर म्हटले म्हणजे एवढी ही जगद्वंद्य विभूति अखिल विश्वाच्या गुरुस्थानी असावयाची; व बिशप होम्ससारखे कांहीं धर्मश्रद्ध गृहस्थ तसे मानतातही. तथापि प्राधान्येंकरून म. गांधी भारताला स्वातंत्र्य- युद्धांत अग्रणी लाभले ही केवढी पूर्वपुण्याई म्हणावयाची ! गमतीने रोमेन रोलंड विचारतात, " लालाजी म्हणतात की, 'हिंदुस्थान दुःखी' पण ज्या भूमीतून म. गांधींसारखी विशुद्ध व तेजस्वी वीर- रत्ने उद्भव पावतात ती तर सुतराम् सुखी व दैववान् कां नव्हे !" जनतेचे अस्सल पुढारी म्हणजे म. गांधी. असें आहे म्हणूनच त्यांची सत्याग्रहाची चळवळ थेट खेडोपाडी पोंचली आहे. म. गांधींचें नांव ठाऊक नाही असा खेडवळ माणूस विरळा, व त्यांच्या मोहिमेची लाट पसरली नाही असा गांव कचितच एकादा आढळ- णार. त्यांच्या अंगच्या उत्कट गुणांचा व त्यांच्या स्वप्रणीत तत्त्वांचा विचार केला तर गोल्डस्मिथने बर्कच्या बाबतींत जे म्हटले आहे १० स्वभाव-चित्रे त्याचे अनुकरण करून, साऱ्या जगताकरितां त्यांचा अवतार, पण मन संकोचित करून में मानवजातीकरितां होतें तें स्वदेशासाठी वेंचून टाकलें' असे विधान करावे लागेल. यांत स्वार्थत्याग तर आहेच; पण आंतरराष्ट्रीय शान्तता किंवा मनुष्यमात्राची उन्नति झाली तरी एखाद्या राष्ट्रांतूनच प्रस्थापित होणार की नाही ? देशा- भिमानाच्या नद्या मिळून मिळूनच भूतदयेचा महोदाधि अधिक सुसंपन्न दिसू लागतो म्हटले तर ते योग्यच होय. महात्माजींच्या या देशभक्तीचे वर्णन किती करावें ? दिवसाचा एक क्षण नाहीं की जो स्वदेशहितचिंतनाविणे जातो. स्वार्थत्याग करण्यासच कांही उरले नाही. केवळ जगण्यास अत्यंत जरूर इत: क्याच त्यांच्या गरजा. सरासरीने हिंदी मनुष्यास प्रतिवर्षी अकरा वार कापड लागते म्हणतात, तर यांचा निर्वाह बहुतेक एक-दोन वारांतच होतो. थंडीचा कडाकाच असला तर एखादी घोंगडी पांघरावयाची. खाण्याच्या संबंधांत देखील To live to eat नव्हे, तर To eat to live हा यांचा कायमचा दंडक. व ते देखील इतकें तोलून मापून खावयाचें की रेसभरही इकडे-तिकडे होऊ नये. शेळीचे दूध, मनुका, मुसंबी इत्यादि व्यतिरिक्त खाणेपिणे मानवत नाही म्हणूनच तें प्यावयाचें, चैन म्हणून नाही. फार कशाला, त्यांच्या स्वातंत्र्याच्या दौऱ्यांत सुरतेस लोकांनी प्रेमाने त्यांचे व स्वयंसेवकांचे मेवामिठाईने आदरातिथ्य केले, तेव्हां त्यांनी लोकांचे कान उपटण्यास कमी केले नाही. निजावयास म्हटलें म्हणजे एखादी मोकळ्यावर टाकलेली चारपायी पुरे, मग ते खुद्द साबरमतीच्या आश्रमांत असले तरी तेंच व कराडीच्या शिबिरांत असले तरी तेच. लिहिण्याची उपकरणे देखील अशीच साधी. आश्रमांतील निवास- स्थानांत' देखील उतरतें मेज असले तरी वाहवा नसले तरी वाहवा. लकडी पेन्सिल व कागद असले की मांडी मोडून तीवर यांचे काम महात्मा गांधी ११ सुरू व्हावयाचे. टिळक देखील वळकटीचे टेबल करून अगर रॉकेलच्या दोन डब्यांवर एक फळी टाकून लिहावयास बसतच की नाहीं! महात्माजींच्या या लोकोत्तर साधेपणाचे व स्वार्थत्यागाचें कौतुक अधिक वाटते. याचे कारण त्यांचे नशीब असें शिकंदर आहे की म्हणतील तर लक्ष्मी त्यांचे चरणों लोटांगण घालीत येईल. मिडास राजाप्रमाणे ते स्पर्श करतील त्याचे सोने होईल, अशी त्यांची स्थिति. काय सांगावें ? परवां स्वातंत्र्यं-संपादनाच्या स्वारीवर मजल दरमजल निघाले. तेव्हां आठवड्या-आठवड्यास म्हणतील तेव्हां हजारों रुपये मिळण्याची अहमदाबादच्या व्यापाऱ्यांनी व्यवस्था करून ठेविली होती म्हणतात. मुक्कामाच्या गांवीं सभा केली म्हणजे नोटांची पुडकी पायांपाशी येऊन पडावयाची. एखाद्या जिनसेचा लिलाव पुकारला तर चार आण्यांच्या कचकड्याच्या बांगड्यांचे सव्वाशे रुपये व्हावयाचे! गुजराथ-विद्यापीठाला स्वतःची इमारत पाहिजे होती. महात्माजींना थोडी चिंता वाटली. रंगूनच्या एका स्नेह्याकडून लाख रुपयांचे कर्ज भीतभीत मागितले. पण हे कळतांच कर्ज नव्हेच, देणगी म्हणून तेवढी रक्कम त्यांच्याकडे वाट चालत आली. व आजचें साबरमतीच्या तीरावरचे भव्य विद्यापीठ व त्याची जागा प्राप्त झाली. इमारत तर अशी विशाल व वैभवशाली उठली आहे की सर परशुरामभाऊ कॉलेजच्या इमारतीनेही खाली पहावें, मग फर्ग्युसन कॉलेजच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या छोट्याछोट्या घरांची तर गोष्टच नको. रोल्स- रॉईस मोटारगाडी कुठे व फोर्ड खटारा कुठे ! इंद्राचा ऐरावत व शाम- भटाची तट्टाणी या दोहोंमधील में अंतर तेच द्रव्यसंपादनाच्या बाब- तीत गुजराथ-महाराष्ट्रात अंतर हेच खरें. कालिदासाने म्हटल्याप्रमाणे, लभेत वा प्रार्थयिता न वा श्रियम् श्रिया दुरापः कथमीप्सितो भवेत् ।

१२ स्वभाव-चित्रे अशी महात्माजींची गत. साबरमतीच्या आश्रमाची झाली तरी हीच कथा. 'नांव सोनूबाई पण हाती कथलाचा वाळा' ही म्हण खोटी पडली. विजेच्या प्रकाशाने 'दिव्याखाली अंधेर' हे म्हणणे असत्य ठरून 'दिव्यावर अंधेर' हे आज खरे ठरूं पहातच आहे. उन्हाळ्यांत ज्याप्रमाणे आश्रमाखाली नदी असून नदी नाही अशी अवस्था दृष्टीस पडते, तद्वत् समग्र आश्रम पाहून आल्यावर 'नांव आश्रमाचे पण स्वरूप श्रीमंताच्या गृहस्थाश्रमी सुखोपभोगाचे' असें वाढू लागते. तेथे कशाची कमतरता आहे ? विस्तीर्ण छात्रालय' आहे; उत्तम बांध- लेलें भोजनगृह आहे; आश्रमवासी जनांसाठी लागणारी पाव- बिस्किट करण्याची स्वतःची भट्टी आहे; विहिरीवर लोखंडी रहाट आहेत; तेल गाळण्यासाठी घाणा आहे; गोशाळा आहे; लोखंडी नांगर आहेत; 'हृदय कुंज' नांवाचा बंगला आहे; ' चक्रीवीथि' आहे; 'मेहेंदी-वीथि' आहे; काय नाही ? हे सर्व महात्माजींचे इच्छासंपत्तीचे महत् सौभाग्य पाहिले म्हणजे मारीचाश्रमांतील तपोवनभूमीचें अव- लोकन केल्यानंतर दुष्यंताने 'यत्कांक्षति तपोभिरन्यमुनयस्त- मिस्तपस्यंत्यमी' असे विस्मयोद्गार काढले, त्यांची आठवण सहृदय व सदभिरुचिसंपन्न प्रेक्षकांस व्हावी ह्यांत काय आश्चर्य ! किंवा भर्तृहरीने 'वैराग्यशतकां' त मुनीचे ‘अतनुभूतिर्नृप इब' असें जें रम्य वर्णन केले आहे तें एकाद्याने म. गांधींस लावले तर त्यांत वावगें तें काय!! आश्रमाचें बहिरंग जरी अशा त-हेचे आश्रमाच्या कल्पनेशी विसं- गत भासले तरी आंतील शिस्त मात्र फार कडक, लष्करी थाटाची असते. महात्माजी स्वतः तर ती तंतोतंत पाळतात हे सांगावयास नको. पहाटे प्रार्थनेची वेळ झाली म्हणजे ते स्वतः प्रार्थनेच्या पटां- गणांत सगळ्यांच्या अगोदर हजर. इतकेच काय पण कूच चालू असतांना देखील सायंकाळी चालतां चालतां कडोसरीस अडक- महात्मा गांधी १३ विलेल्या घड्याळांत सात वाजले रे वाजले, की एकदम महात्माजी रस्त्यावरून खाली शेतांत उतरावयाचे व प्रार्थनेच्या पदास प्रारंभ व्हावयाचा. उष्टी भांडी स्वतः घांसावयाची हे ठरलेले, मग त्याला मिस स्लेडही अपवाद नाही किंवा मि. रेनॉल्ड्स्ही नाही. स्वयं- पाकाप्रमाणे हलालखोराचे कामही आळीपाळीने सर्वांनी करावयाचें. कोणताही मनोविकार उत्पन्न होऊ नये म्हणून तिखट-मीठ खावयाचें नाही हा निबंध अंमलांत. साऱ्या दिवसाचे उद्योग पार पाडलेच पाहिजेत. स्वतः महात्माजीच जर हे सर्व नियम व ही सर्व व्रतें पाळ- तात तर इतरांचा काय पाड ? इतक्याउपरही आश्रमांत कित्येक न घडाव्या अशा गोष्टी घडतात, नाही असे नाही. तथापि मनुष्य या इहलोकच्या जमिनीवरचा प्राणी आहे याचे स्मरण करून देण्या- पलीकडे त्या विशेष कांहीं दर्शवीत नाहीत. गौरवपूर्ण कौतुक वाटते तें महात्माजींच्या निर्भीडपणाचे व सत्याप्रियतेचें. तिथे आंत-बाहेर कांही नाही. आश्रमाच्या नियमांचे उल्लंघन करून चोरून पैसे जवळ ठेवले म्हणून प्रत्यक्ष सौभाग्यवतीला देखील ते फांसावर चढ- विण्यास मागेपुढे पहात नाहीत. जसा घरच्या व्यवहारांत निर्भीड स्पष्टवक्तेपणा, तसाच सार्वजनिक आचरणांत. एकदां स्वतःच्या अंत:- करणास एखादी गोष्ट पटली म्हणजे ब्रह्मदेव समोर उभा राहिला तरी तीत बदल म्हणून व्हावयाचा नाही. दिल्लीस लॉर्ड आयर्विन- साहेबांची मुलाखत झाली. त्यांच्या अटी पाळीत नाही, म्हणून व्हाईसरॉयसाहेबांनी सांगितल्यावर ताड्कन् उठून आले. मागे लॉर्ड रोडिंगसाहेबांच्या भेटीनंतर अल्लीबंधूंकडून माफी मागणे त्यांना योग्य वाटले तेव्हां तसेंही घडवून आणले. व मुंबईचे माजी गव्हर्नर जॉर्ज लॉइड यांच्याशी संभाषण झालें त्यांत सत्याग्रह तेव्हांच सुरू केल्यास अत्याचार होण्याचा संभव आहे असे त्यांस वाटले, म्हणून सत्याग्रह तहकूब करण्याचे ठरवून परत आले व तो निश्चय सर्व्हट्स् ऑफ १ १४ स्वभाव-चित्रे इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यांत गव्हर्नरसाहेबांच्या भेटीचा निकाल ऐकण्यास जमलेल्या मंडळीस परत येतांच बिनदिक्कत सांगून टाकला. मग तेथून भेटीस जाण्याचे पूर्वी आपला काय बेत होता याचा बिलकूल विचार नाही. टीका सोसूनही चौरीचौऱ्याच्या दंग्या. नंतर बार्डोलीयेथील चळवळ नाही का त्यांनी बेलाशक थांबविली ? उलट, मागील खटल्यांत अहमदाबादच्या कोटीत त्यांनी कैफियत सादर केली तीत खुद्द जज्जसाहेबांनादेखील असे आव्हान की, ज्या राज्यपद्धतींत तुम्ही काम करतां ती सदोष वाटत असेल तर तुम्ही न्यायासन सोडून खाली या, नाही तर मला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावा.' वर्षानुवर्ष विचार करून, अनुभव घेऊन, हाताने सूत काढण्याचे तत्त्व मनास पटले. व जवळजवळ 'सवकू सोनामुखी' या न्यायाने हिंदुस्थानच्या सर्व रोगांवर चरखा हाच उपाय त्यांना वाटू लागला. व त्याच्यासाठी आतापर्यंत एवढी प्रचंड व अविश्रांत चळवळ केली की, ती भारतवर्षाच्या इतिहासांत नमूद झाल्याखेरीज रहाणे शक्य नाही. कोणी 'काय करूं' हा प्रश्न विचारला की, मोठमोठ्या रेल्वे- स्टेशनांतील तिकिटांच्या खांबांत एक आणेली टाकली की प्लॅटफॉर्म- तिकिट यावे त्याप्रमाणे, ठराविक त-हेचे एकच उत्तर यावयाचे. मग प्रश्न विचारणारी व्यक्ति नवऱ्याने टाकलेली बायको असो, मुलगा मेलेली आई असो, बाप स्वर्गवासी झालेला पुत्र असो. सुट्टीत काय करावे, म्हणून विचारण्यास काही विद्यार्थी त्यांचेकडे गेले. सोमवार होता. मौन मोडावयाचे नव्हते. कागदावर संदेश लिहून दाखविला तो हा- Card, spin, weave; Spin, weave, card; Weave, card, spin;

महात्मा गांधी १५ मनाला वाटतें तें स्पष्ट शब्दांत बोलावयाचें. कोणाचा मुलाहिजा ठेवावयाचा नाही. कोणी काही म्हणो. आपण पक्के मांसाहारी कसे कस होत होतो हे सांगावयाचे, पत्नीला लहानपणी किती छळले तें सांगावयाचे, वडील मृत्युशय्येवर असूनही खोलीत आपण कसे जाऊन निजलों हेही लपवून ठेवावयाचे नाही. त्याचप्रमाणे 'लोक- संग्रह ' येथे चालू असतांना त्याचे संपादक श्री. अण्णासाहेब भोप- टकर यांची १९२१-२२ सालीं श्री. तात्यासाहेब केळकरांच्या घरी प्रथमच ओळख झाल्यानंतर स्वाभाविक पण वैशिष्टयदर्शक हास्य करून Mr. Bhopatkar, I have heard libellous things about you,' असें तोंडावर सांगून त्यांच्याशी निर्विकार मनाने चर्चा करण्यासही कचरावयांचे नाही. बोलण्या-चालण्यांत व वादविवाद-लेखनांत थोडाबहुत तर्ककर्कश- पणा व तत्त्वकाठिण्य असले तरी महात्माजींचे मन बरीक मृणाल- तंतूसारखें आहे हे निःसंशय. कमळाचा गाभा कोठूनही धरला तरी मृदु; लोणी म्हणजे अंतर्बाह्य मऊमऊ; खडीसाखरेचा खडा सगळाच गोड, असे त्यांचे अंतःकरण. भूतदया ओतप्रोत भरलेली. हिंद- वासीयांचे दारिद्य पाहिले म्हणून तर बॅरिस्टरी सुरू केलेली टाकून जनतेची अहर्निश वकिली अंगीकारिली. दक्षिण आफ्रिकेंतील हिंदी लोकांची दुःखद स्थिति कानी आली, तिकडे गेले, कित्येक वर्षे वास्तव्य करून राहिले, नाहीं नाहीं ते अपमान गोऱ्या लोकांकडून सोसले, कडोविकडीचे कष्ट केले व अखेरीस 'जंटलमन्स अॅग्रीमेंट' यशस्वितेने प्राप्त केले तेव्हांच मायदेशी परत आले. चंपारण्यांतील चहाच्या मळ्यांतील मजुरांची करुण कहाणी ऐकली. झालें. मनाचा धडा केला व त्यांची गा-हाणी दूर करण्यासाठी मळ्यांत राहून जिवाचे रान केले. १९२८ साली सिलोनांत गेले, तेव्हाही तेथील कामकऱ्यांची परिस्थिति पाहून त्यांचे मन कसे द्रवले ते त्यांच्या स्वभाव-चित्रे दयाई व्याख्यानांवरून व लेखांवरून उघड होते. खाजगी आप्तसंबं- धांत व चाल-चालणुकींतही असेंच. 'विष्णुदास' मेणाहून मऊ व वज्राहून कठोर म्हणतात तें अशाच कारणाकरितां. एकदां अहमदाबाद येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची सभा भरली होती. तपस्वी बाबासाहेब परांजपे बोलण्याच्या कामांत अंमळ निसुग. भर सभेत ते महात्माजींना वर्मी लागण्यासारखे काही बोलले. महात्माजींना भडभडून आले व त्यांच्या डोळ्यांतून खेदाश्रु टपाटप गळले. लहान मुलांबाळांशी वागतांना तर त्यांच्या मनाचा हा हळुवार कोवळेपणा चांगलाच दृग्गोचर होतो. सौभाग्यवती कस्तुरबा, चिरंजीव रामदास व देवीदास यांच्यासाठी नाही इतका त्यांचा जीव आश्रमांतील अस्पृश्य कृतकपुत्री लक्ष्मीसाठी तिळतिळ तुटत असतो. परवा परवां तुरुंगांतून मिराबाईस पाहलेच पत्र धाडले त्यांत बालकांना 'चिमण्या पांखरांनो' अशी वात्सल्यपूर्ण हांक भारून जो निरोप सांगितला आहे तो अपत्यप्रेमाच्या पान्ह्याने किती बरे ओथंबलेला आहे! उद्यमशीलता व निरालस्य यांची तर शिकस्तच. सकाळींच उठल्यापासून एक सेकंद देखील वांया जावयाचा नाही. जे घरी आश्रमांत तेच दारी परप्रान्तांतील दौऱ्यांत. बाया-बापड्या 'बापूजींच्या' दर्शनासाठी येत असोत, मधेच कोणी राजकीय चर्चा करण्यासाठी येवोत, यांचा धंदा सतत चालू. तोंडाची टकळी, हाताची 'टकळी' व हातांतील सुताची टकळी, या अव्याहत सुरू असावाच्या. सोमवारीच काय ती अगदी अळीमिळी असेल तेवढी. पण तो 'यंग इंडिया, ' 'नवजीवन' वगैरे पत्रांत लिहिण्याचा दिवस. एकवीस दिवसांचा उपास असो, आगगाडींत असोत, स्वातंत्र्याच्या मोहिमे- वर असोत, आपल्या वर्तमानपत्रांत ते लिहिण्यास कदापि चुकत नाहींत. लोकांनी तोंडात बोटे घालावीं की, महात्माजी काहीही उद्योगांत कितीही व्याप्त असले तरी दर आठवड्यास 'यंग इंडियां-' महात्मा गांधी १७ त M. K. G. ही अक्षरे असावयाचीच. सूर्य पश्चिमेस उगवेल पण हे नाही असे होणार नाहीं ! रोजचे टपाल म्हटले तरी हेनरी फोर्डसारखें आगगाडीच्या डबाभर नव्हे पण पिशवीभर खास याव- याचे. महात्माजींचा नियम असा की, होता होईल तो सर्वांस उत्तरें जावी. व ती साधल्यास स्वतःच्या किडकिडीत हस्ताक्षरांत. बरें, इतक्या जंजाळांत रिकामपण सांपडले तर एकंदर जगांत खर्च कमी कसा करता येईल याचा विचार करावयाचा. एकदां पुष्कळ तारा आल्या. या तारेच्या फॉर्मचे काय करावें? किंचित् हातकाम करून एका कागदाचा एक लिफाफा तयार केला व जवळच बसलेल्या कृष्णदासांना सांगितले, ' ही ध्या माझी पेटंट एन्व्हेलप्स्.' पंजाबच्या अत्याचारांच्या चौकशीचे काम काँग्रेसच्या कमिटीने केले तेव्हां तर साक्षी-पुरावा घेत असतांनाच काय फराळ करावयाचा असेल तो करावयाचा. पण कार्यात खंड पडू दिला नाही. 'अवि- श्रमोऽयं लोकतंत्राधिकारः' असे म्हणतात तें कांही खोटें नाहीं. १९२८ साली कलकत्त्यास राष्ट्रीय सभा झाली. मुसलमानांशी नेहरू रिपोर्टाच्या मान्यतेविषयी तडजोड घाटत होती. तेव्हां वाटाघाटींत एका रात्री तर महात्माजींनी अलोचन जागरण केले व दिवसाही एका पाठोपाठ एक अशी इतकी कामें केली की महाराष्ट्रांत राष्ट्रीय सभा बोलावण्याविषयी काही चर्चा करावयाची होती त्यासाठी आमच्या वासुकाका जोशांशी भेटण्याची वेळ ठरविली ती पहांटे चार वाजता. लोकांनी म्हणावें शरीर आहे का यंत्र आहे ! कोणत्याही महत्कार्यात ते गुंतले असले तरी आपला मनःप्रसाद कधी ढळू देत नाहीत. आर्जवाला व सौजन्याला कधीं फांटा देत नाहींत. ऑल इंडिया काँग्रेस कमिटींत अगदी कत्तलची रात्र असली तरी कोणी महाराष्ट्रीय पुढारी सभेत प्रथमच प्रवेश करतांना दिसला म्हणजे 'Ob, here comes Maharashtra' असे अधिक्षेपगर्भित स्वभाव-चित्रे वा, विनोदाचे उद्गार मुखावाटे बाहेर यावयाचे. घाईगर्दीची वेळ असताहि एकदा एक मुलगी वंदन करण्यास भर सभेत व्यासपीठावर चढली%3B तिने नमस्कार केला. "मुली, तुझें नांव काय ? " " चंदा!" " वा, फार छान; मग तूं किती चंदा (वर्गणी) राष्ट्रकार्याला देणार?" असें संभाषण करून सदस्यांची मने रिझविण्याइतकी त्यांच्या मनाची शान्ति कायम. शत्रु युद्ध संकटांत सांपडला असतां रंगरूटांची भरती करून त्याच्या मदतीस धांवले, शुश्रूषा-पथके काढून त्याचेही कार्य हलकें केलें. मग आपले परमप्रिय मित्र पंडित मोतीलाल नेहरू यांच्यासाठी नाभाच्या महाराजांकरवी आपले वजन खर्चुन त्यांच्या खटल्याचे घबाड पंडितजींच्या मौल्यवान् काश्मिरी शालीत टाकलें; किंवा राष्ट्रीय सभेच्या वर्किंग कमिटीकडून आग्र्याचा खटला विद्य- मान परिस्थितीतही कोटीत लढविण्यास खास परवानगी देवविली; किंवा बडाभाई-छोटाभाई म्हणून लडिवाळपणानें कौतुक करता करतां स्वतः महात्माजींसच शिंगावर घेणाऱ्या या नतद्रष्ट व नाठाळ अल्लीबंधूंना जवळ करण्याची आशा त्यांनी मनांत बाळगली, हे त्यांच्या सरळ स्वभावास व विशुद्धमनस्कतेस साजेसेंच आहे असे कोण म्हणणार नाही ? बाहेरून दिसावयास पाश्चात्य सुधारणेच्या प्रतिक्रियेची जणुं मूर्ति दिसली तरी, पाश्चात्यांच्या शिष्टाचाराचा इतका सुपरिणाम त्यांच्यावर झालेला आहे की, पकडून येरवड्यास आणल्यावर अगदी पहिले काम कोणचे केले असेल तर सरकारी अधिकाऱ्यांनी आपणांस फार दक्षतेने व दाक्षिण्याने वागविलें याबद्दल त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानण्याचे. राजकीय अथवा इतर वाद- विवाद निकराचा होवो, पण दुसऱ्यास खुपण्यासारखा एक शब्दही ते उच्चारीत नाहीत. विचार रेखीव व बांधेसूद. उच्चार ठांशीव व आत्मविश्वास-पूर्ण. लेखनाचीही हीच पद्धति. शब्दयोजना अत्यंत मार्मिक व समर्पक. फालतूक शब्द औषधालाहि नसावयाचा.

महात्मा गांधी १९ लिहिण्या-बोलण्यांत अलंकार वगैरे नसावयाचे. तथापि भाषण व लिखाण इतके नैसर्गिक व मधुर असावयाचें की, त्यांच्यापुढे नाणाव- लेल्या पीक व शोभेच्या लेखकांनी व व्याख्यात्यांनी खरोखरच तोंड लपवावे. त्यांच्या गुजराथी, हिंदी व इंग्रजी व्याख्यानांचे व लेखांचे जाडे जाडे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अभावितपणाने ते कोण- त्याही पानावर उघडून पाहिले तरी त्यांची भाषाशैली पाहून, शुद्धान्तदुर्लभमिदं वपुराश्रमवासिनो यदि जनस्य दूरीकृताः खलु गुणैरुद्यानलता वनलताभिः । असें म्हणून जो तो आश्चर्य करूं लागतो. आज परमार्थतः अभूतपूर्व अशा चळवळीचे प्रवर्तक असे महात्माजी कारागृहांत आहेत. ज्या पुण्यश्लोक पुरुषाचे आपण गुणस्मरण व चिंतन करतो तो सदैव आपल्यांत असल्यासारखाच असतो.टिळक गेले हे जितकें सत्यपूर्ण, तितकेंच टिळक आहेत हेही. त्यांचे राजकीय कार्य निदान सांप्रत तरी त्यांच्यामागून म. गांधींनी पुढे चालविलेंच आहे. टिळकांची जशी प्रान्तानिहाय सहकारी-मंडळी तयार झाली होती, त्याप्रमाणे महात्माजींची प्रभावळही दीप्तिमान् झालेली आहे. साबर• मती आश्रमासारखे आश्रम हिंदुस्थानांत पांचदहा ठिकाणी सुरळीत चाललेच आहेत. बंगाल्यांत सेनगुप्त, संयुक्तप्रान्तांत पंडित नेहरू- पितापुत्र, बिहारांत बाबू राजेंद्रप्रसाद, आंध्रप्रांतांत कोंडा व्यंकटप्पय्या, मद्रासेंत राजगोपाळाचार्य, कर्नाटकांत गंगाधरराव देशपांडे, गुज- राथेत सरदार वल्लभभाई इत्यादिप्रभृति त्यांची शिष्यपरंपरा खंबीर रीतीने प्रस्थापित झाली आहे. जसे रामदासांचे मठ व ख्रिस्ताचे अपॉसल्स, तसे यांचे हे आश्रम व तसा सहकाऱ्यांचा हा संघ. साहजिकच या मित्रांवर महात्माजींचा अमोघ विश्वास. केव्हाही राजकीय धोरण किंवा कार्यक्रम ठरवावयाचा म्हणजे यांचा सल्ला घ्यावयाचा. गेल्या १२ मार्च रोजी आश्रमांतून बाहेर पडण्यापूर्वी २० स्वभाव-चित्रे सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे पुण्याहवाचन करण्यासाठी या सर्व स्नेहीमंडळीस मुद्दाम विचारविनिमयाच्या उद्देशाने पाचारण कर- ण्यांत आले होते. असा धीर, वीर, हीर राजकारणी महंत गुरुस्थानी व असे मातबर व कर्तबगार जिगर दोस्त मदतनीस ज्या देशांत नांदत आहेत व स्वातंत्र्य-संपादनाचें स्वीकृत कार्य, अडचणींस व आपत्तींस न जुमानता, धडाडीने करीत आहेत त्याच्या नशिबाची रेषा लवकरच उमटणार यांत काय शंका ? आणि अशा सुदैवी स्थितीत 'इटालीला जसा मॅझिनी, आयर्लंडला जसा पार्नेल व अमे- रिकेला जसा वॉशिंग्टन, तसे भातरवर्षाला महात्मा गांधी आहेत !' ही डॉ. रदरफर्ड यांची अंतःस्फूर्त वाणी तरी अविलंबाने सफल क यशवंत कां होणार नाही! महात्माजी, महिमानं यदुत्कीर्त्य तव संव्हियते वचः श्रमेण तदशक्त्या वा न गुणानामियत्तया। असें अखेरीस म्हणून, आपल्या नाम-संकीर्तनाने पुनीत व प्रमुदित झालेल्या या लेखणीस आपली चरणसेवा करण्यास काही काळ विश्रान्ति देतो.'

३ पंडित मोतीलाल नेहरू लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधील सर्वात भव्य, प्रतापशाली व प्रभुत्व. संपन्न असा सभासद कोणता ? वरिष्ठ कायदेमंडळांत एक दिवस तरी जाऊन आलेल्या कोणाही सामान्य प्रेक्षकास हा प्रश्न विचारला तर तो 'पंडित मोतीलाल नेहरू' असे एकदम उत्तर देईल. आणि या उत्तरास कोणी किंचिदपि विरोध करणेदेखील अशक्यप्राय होय. कारण, दिवसा प्रकाश कोण देतो याचे उत्तर जसें अचूक मिळा- वयाचे तसेच वरील प्रश्नाचेही होय. पंडितजींची ती रुबाबदार मूर्ति कायदे-मंडळाच्या दिवाणखान्यांत प्रविष्ट झाली म्हणजे बिन- सरकारी सभासद व प्रेक्षक आकृष्ट केले जावे हे तर साहजिकच पण सरकारी बाकांवरील बडेबडे कार्यकारी अधिकारीही इकडे- तिकडे डोळे फिरवून जरा सांवरून बसतात व समोरच्या टेबला- वरील कागदांकडे जास्त कसोशीने लक्ष देतात. पंडितजी म्हणजे उपजत उमरावच. जणुं काय आजूबाजूच्या परिस्थितीवर व समाजा- वर आधिपत्य गाजविण्याकरितांच या भूमीवर अवतीर्ण झालेले, असा यांचा मातबरपणा. आधी सोन्याचे त्यांत जडावाचें' न्यायाने त्यांच्या या नैसर्गिक स्वभावास शारीरिक व बौद्धिक गुणांची असामान्य जोड, स्वदेशीच पण अत्यंत मौल्यवान् असा पांढरा शुभ्र उत्तर हिंदुस्थानी पद्धतीचा पोषाख, कांखेखालून लपेटलेली ती लख- लखीत काश्मिरी शाल, देशभक्तीच्या पाण्याने चमकणारे ते डोळे, दृढनिश्चयाची द्योतक अशी ती हनुवटी, करारीपणाचे दर्शक असे घट्ट दाबून धरलेले ते ओंठ, सर्व अवयवांवर ताबा चालविणारें असें या २२ स्वभाव-चित्रे रुंद कपाळ, आणि भालपट्टावरही अंमलदारी करीत असलेलें, विविध अनुभवाचे आगर, राजकारणी चातुर्याची खाण व ज्ञानाची पेठ या वर्णनास साजणारे असे त्यांचे उत्तमांग, या ईश्वरदत्त लवाजम्यानिशी एखादा महापुरुष केवळ हिंदुस्थानांतील वरिष्ठ कायदे मंडळांतच काय, पण जगाच्या पाठीवरील दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रसमितींत दाखल झाला तरी तिला आपल्या दीप्तिमान् अस्तित्वाने शोभा आणणारच. तथापि हंसाचे यथार्थ सौंदर्य ज्याप्रमाणे मानस-सरोवरांत, त्याप्रमाणे पंडित मोतीलालजींचा खराखुरा गुणोत्कर्ष जनतेच्या मानस-सरोवरामध्ये प्रकाशमान् व्हावा व तेथेच त्यांचे विशुद्ध तेज प्रगट व्हावे यांत काय नवल ? मग तें मानस-सरोवर पारतंत्र्याच्या कर्दमाने बरेंच गढूळ झालेले असले तरी चिंता नाही. सुभाषितांत म्हटलेच आहे, 'गिरिशिखरगताऽपि काकपंक्तिः पुलिनगतैर्न समत्व- मेति हंसैः।' एकाद्या साहेबानें अगर त्याच्याशी लांगूलचालन कर- ण्यांत स्वर्गसुखाचा लाभ मानणाऱ्या दुसऱ्या एखाद्याने पंडितजींकडे तुच्छतादर्शक तिरक्या नजरेने पाहिले तरी पंडितजींची योग्यता त्यामुळे काडीमात्र कमी होऊ शकत नाही, हे न लिहितांच जाणण्या- सारखे आहे. अशा कर्तबगार पुरुषाला हिंदी राष्ट्रीय सभेसारख्या मोठ्या प्रातिनिधिक संस्थेने दोनदां अध्यक्षपद द्यावे हे सर्वथैव यथायोग्य होय. १९१९ साली अमृतसर येथील काँग्रेसचे पंडितजी अध्यक्ष होते व आतां कलकत्त्याच्या अधिवेशनाच्या अधिपतित्वाची सुपारी त्यांनाच प्रांतिक काँग्रेस कमिट्या व स्वागत-कमिटी यांच्या वतीने देण्यांत आली आहे. इतकेच नाही तर तिच्यावर रंगाक्षता टाकून ती पुनर्मुद्रांकितही केली आहे. अमृतसरच्या काँग्रेसपूर्वी त्यांच्या हातून पंजाबमधील सरकारी अत्याचारांच्या चौकशीबाबतीत महनीय राष्ट्रीय कामगिरी झाली. कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेच्या आधी स्वरा- पंडित मोतीलाल नेहरू २३ तें ज्याची जवळ जवळ एकमुखी अशी मागणी प्राधान्येंकरून त्यांच्याच पुरस्कर्तृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे व कौशल्याने तयार झाली. हिंदु- स्थानच्या अभागी इतिहासांत या प्रकारची राज्यघटना मूर्त स्वरू- पांत आणण्याचे कार्य इतकें दुर्घट होऊन बसले होते की, घडवून आणणाराचा जेवढा गौरव करावा तितका थोडाच होणार; आणि राष्ट्रीय सभेने मोतीलालजींस द्विवार अध्यक्षत्वाची माळ घालावी हा कांहीं लहानसहान मान नव्हे. अमेरिकेंत जॉर्ज वॉशिं- ग्टन दोनदा लोकनियुक्त अध्यक्ष झाले आणि इंग्लंडसारख्या देशांत तर एका पक्षाचा पुढारी अनेकशः मुख्य मंत्री होऊ शकतो. तथापि राष्ट्रीय सभेने एकाच थोर पुरुषाची नऊ वर्षांनी फिरून आपला कर्णधार म्हणून योजना करावी हे अत्यंत कौतुकास्पद व स्पृहणीय नाही असे कोण म्हणेल ? यापूर्वी पंडितजींच्या राष्ट्रीय सेवेचा परामर्ष घेतला गेला नाही असें नाही. काँग्रेसच्या जिल्हा व प्रांतीय संस्थांची सूत्रे त्यांच्या हातांत होतीच. १९२२ साली स्वराज्य पक्ष स्थापन झाला तेव्हां त्याची चिटणिशी त्यांच्याकडेच होती. देशबंधु दास हे अध्यक्ष नांवाला होते तरी पंडितजींची बहादुरी अशी की, चिटाणशीच्या वस्त्रांवर अध्यक्षांचा पोषाख ते चढवीत व त्यांच्या कर्तेपणाने तो दुहेरी पेहराव त्यांना उठून देखील दिसे. खुद्द असें- ब्लीत तर ते स्वराज्यपक्षाचे अध्वर्यु स्वतःच्या लोकोत्तरत्वामुळे झालेच व आजतागायत आहेतही. पुण्यातील लो. टिळकांच्या पुतळ्याचा अनावरणसमारंभ त्यांच्या हस्ते करविण्यांत एका दृष्टीने महाराष्ट्राने पंडितजींच्या सार्वजनिक मानसन्मानाची शीग भरली म्हटले तरी वावगे होणार नाही. हे सर्व सन्मान जमेस भरले तरी राजकारणातील पंडितजींची सांप्रत स्थिति अलौकिक आहे यात शंका नाही. आखिल भारतवर्ष एक पिरॅमिड अशी कल्पना केली तर पंडितजी त्याचा परमोच्च बिंदु.

२२ स्वभाव-चित्रे पावटळीच्या चौफेर उधळणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन त्याला नियंत्रित करणाऱ्या शक्तिमान् मनुष्याचे वर्णन इंग्रजी काव्यांत प्रसिद्ध आहे ते त्यांना चांगले लागू पडण्यासारखे आहे. असेंब्लीचे अभिषिक्त अग्रणी मुडिमन असोत अगर क्रेरर असोत; अनभिषिक्त पुढारीपण मात्र आपोआप पंडितजींकडे यावयाचेंच आणि तेसुद्धा एकाच विशिष्ट पक्षाचे नव्हे, तर प्रायः सर्व पक्षांचें; मग औप- चारिक रीत्या निरनिराळ्या छोट्या गटांचे वेगळे नेते कितीही असोत. बदक पाण्यांत जाणारे व जमिनीवर चालणारे असले काय, किंवा शहामृग म्हटले तर पक्षी व म्हटले तर पशु अशा उभयसंचारी अव- स्थेत असला काय, पक्षिराज ही पदवी जशी एकट्या गरुडाची, तद्वत् सर्वमान्य व प्रस्थापित असे धुरंधर म्हटले म्हणजे पंडित मोतीलाल नेहरू हेच. म्हणून तर सरकारला त्यांचा दरारा वाटतो; व सर मालकम् हेले यांच्यासारखा ताठर मुत्सद्दी देखील त्यांच्या शिलशिलाटाला कंटाळून असेंब्ली सोडून गेला. जिनांसारख्या दुर्दम्य, स्वयंभू व मिजासखोर सभासदाला त्यांच्यापुढे आपली मान वांकवावी लागते. इतरेजनांना तर खाली मान घालून मुकाट्याने पंडितजी नेतील तिकडे जावे लागावें यांत आश्चर्य काय ? १९२४ साली सरकारचे अंदाजपत्रकच्या पत्रक कोलमडून टाकण्याच्या प्रसंगी बिचाऱ्या 'टाईम्स' च्या दिल्लीच्या बातमीदाराने ओरडून ओरडून विचारावें, ' अरे बेट्यांनो, या अलाहाबादच्या पंडिताच्या हातपेटीत डोके खुपसून चाललां कोणीकडे ?' पण पंडितजींच्या वजनापुढे व वर्चस्वापुढे कोण टिकाव धरूं शकणार ! १९१८ सालापूर्वी तें अमळ नेमस्त मताकडे झुकलेले होते. तेव्हां ते साहजिकच फक्त मवाळांना प्रिय असत. पुढे म. गांधींच्या साह- चर्यामुळे महात्माजींच्या तेजस्वितेच्या ज्वालेत त्यांचा नेमस्तपणा दग्ध झाला व ते असहकारितेचे पक्के आधारस्तंभ झाले. अर्थातच पंडित मोतीलाल नेहरू २५ तेव्हां असहकारितावाल्यांकडून त्यांचा खूप बडेजाव झाला. पंडितजी काश्मिरी ब्राह्मण म्हणून हिंदुवृंदाला पूज्य; लहानपणापासून मुसल- मानी स्नेहसंबंध अधिक व परिचयही त्यांचाच विशेष, म्हणून त्यांचा ओढा मुसलमानांकडे असल्यामुळे त्यांनाही ते हवेसे वाटावे. एकेका वेळी ते वरील पक्षांपैकी प्रत्येकाला अत्यंत प्रिय होते व आतां जरी त्यांची लोकप्रियता व्यक्तिशः प्रत्येक पक्षांत पूर्वीच्याच प्रमाणांत कायम राहिली नसली तरी सामुदायिक विचार करतां, पूर्ण स्वातंत्र्य- चादी नवीन पक्ष ध्यानात घेऊनही, त्यांच्या लोकप्रियतेचा लघुतम साधारण विभाज्य राष्ट्रांतील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीपेक्षा आधिक भरेल हे निःसंशय आहे. १९१८ पूर्वी ते नेमस्त होते; परंतु स्वतःच्या डोळ्यांनी पंजाबमधील सरकारी अत्याचारांची स्थिति व त्याविषयी सरकारचे बेगुमानपणाचे धोरण पाहिल्यावर ते जहाल झाले. या पक्षांतराबद्दल जन्मतः जहाल असलेल्यांस विषाद तर नाहीच वाटत. उलट त्यांच्याविषयी अभिमान जागृत होतो. किंबहुना, डायरशाही व ओड्वायरशाही यांच्यानंतरदेखील ज्यांनी नेमस्तपणा सोडला नाही, त्यांच्याबद्दलची तिरस्काराची भावना दाबून ठेवणे एखाद्या जहालास कठिण वाटले तरी तें क्षम्य ठरेल. रौलॅट या गोऱ्या साहे- बाच्या नांवाशी संलग्न असलेल्या 'काळ्या' बिलानंतरच्या पंजाबमधील घनघोर परिस्थितीच्या समक्ष अवलोकनाने ज्याची मतें बदलली तोच खऱ्या कळकळीच्या देशभक्तीचा अवतार व जो आपले विचारपरि- वर्तन उघड निःशंकपणाने व धैर्याने बोलून दाखवितो तोच खरा अद्वितीय स्पष्टवक्ता. बाकी, सायमन कमिशनवरील बहिष्कार मान्य आहे, पण बहिष्कारदर्शक मिरवणुकी मान्य नाहीत व स्वदेशी पसंत आहे पण परदेशी नापसंत नाही, असें वडिलोपार्जित मत प्रातपादन करणाऱ्या पक्षाभिनिविष्टांची संख्या अधिक भरणार हे उघड आहे. माझ्या बापाची विहीर आहे' अशा दुराग्रहास बळी पडून, कित्येक स्वभाव-चित्रे ? महान् स्थित्यंतरे झाली तरी, जो शेजारच्या गोड्या व आरोग्यकारक पाण्याचा फायदा करून घेत नाही आणि त्यांतच मोठे भूषण मानतो त्याला कोण काय करू शकणार ? इतकी क्रांति व एवढा परिवर्त मुख्यतः महात्मा गांधींच्या परिचयाने व तत्त्वज्ञानाने केला. विचारांतर झालें तें इतकें संपूर्ण की, १९१८ चे नेमस्त १९२८ साली निर्भेळ स्वातंत्र्याची भाषा बोलू लागले. आचारां- तील चैनबाजी व अत्तरांच्या दिव्यांची रोपनाई कमी झाली व त्यांची जागा साधेपणाने-पण तो देखील श्रीमंती साधेपणा-घेतली. दर आठवड्यास पॅरिसहून येणारे धुतलेल्या कपड्यांचे पार्सल थांबलें; शिकारीस जातांना इंग्रजी व हिंदी असे दोन मुदपाकखाने बरोबर जय्यत असावयाचे ते गेले; दिल्लीस विकत घेतलेल्या पितळी कुकरने बनविलेल्या सामान्य भोजनावर भागू लागले. पण मूळ स्वभावांत म. गांधी झाले म्हणून काय फरक पाडणार ? असा बदल होत असता तर ' स्वभावो दुरतिक्रमः' असें वाक्य जगाच्या व्यवहारांतील शाश्वत सत्य कसे होऊन राहिले असते ? पंडितजींची एकंदर राहणी पाहिली की, कोणी रोमन सेनेटर, विलायतेंतील लॉर्ड किंवा हिंदु. स्थानांतील राजा किंवा नबाब यांची आठवण व्हावी; त्यांचे आनंदभुवन' डोळ्यांनी देखले तर खरोखरच त्याने 'लक्ष्मीविलास' राजवाड्याशी अथवा एखाद्या 'गव्हर्मेट हाऊस' शी देखील स्पर्धा करावी! अशा गजान्त लक्ष्मीबरोबर तिचे पाठचे भाऊ म्हणजे लहरीपणा व अरेरावीपणा हे आले, तर अचंबा करण्याचे बिलकुल कारण नाही. सर्वांनी यांची धुंकी झेलावी व यांच्या ताटाखालींच ठाण देऊन रहावे अशी यांची अपेक्षा स्वभावतः असणार हे क्रमप्राप्त ठरते. जशी पैशाची दरकार नाही तशी माणसांचीही नाही. १९२३ साली एके दिवशी पंडितजींच्या बंगल्यांत चोरी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी चार लोकांनी मोठ्या सहानुभूतीने व खेदजड पंडित मोतीलाल नेहरू २७. अंतःकरणाने 'कितपत नुकसान झाले ?' असे विचारले. पंडित- जींनी अगदी त्या गांवचे आपण नव्हे असे दाखवून उत्तर केलें। 'असेल तीन-चार हजारांचे किडूकमिडूक.' आणि इतकें उत्तर देऊन त्यांनी आपले मजलेदार खानदानी हास्य केले व त्या हास्य- समुद्राच्या लाटांत घरांतील चोरी विरून गेली. हा अलिजाही बेफिकीरपणा द्रव्याच्या बाबतींत कौतुक करण्यासारखा भासला तरी, जेव्हां तो निर्जीव द्रव्यापासून सजीव मनुष्यांपर्यंत पोचतो तेव्हां तो निःसंशय दूषणीय वाटणे स्वाभाविक होय. ज्या मापाने आपल्या शागीर्दाला किंवा पान देणाऱ्या नोकराला मोजावयाचे त्याच मापाने राजकारणांतील स्नेही किंवा इतर सद्गृहस्थ यांना देखील माणू म्हटले तर ते चालणे शक्य नाही, ही गोष्ट उमरावी उद्दामपणांत विसरून जाते. एकाच शहरचे पंडित मालवीय व पंडित मोतीलाल यांच्यामधून फारसा विस्तव जात नाही हे महशूर आहे. पण पंडित- जींच्या तीक्ष्ण जिव्हास्त्राने लालाजींचे हृदयही विद्ध झालेले होते, हे स्वतः त्यांनीच निधनापूर्वी लिहून ठेविले आहे. महाराष्ट्र व पंडितजी यांचे जसे काय विळ्या-भोंपळ्याइतकें सूत. याचे कारण काय असेल तें पंडितजी जाणे किंवा परमेश्वर जाणे. वस्तुस्थिति तशी होती व व अजूनही नाही असे म्हणणे बरेंच धाडसाचे होईल. एकदां महाराष्ट्र हे भारतवर्षरूपी विराटपुरुषाचे एक 'रोगट व नासलेले इंद्रिय' म्हणून ते तोडून टाकण्याचा पंडितजींनी जाहीर रीतीने चंग बांधला होता. वाफेच्या जंगी रुळाखाली त्याचे पीठ करून टाकू, अशी त्यांनी घोषणा केली होती. असे सांगतात की, प. वा. फेरोजशहा मेथांनी देखील, महाराष्ट्रामधून चौचाकी चार घोड्यांची गाडी भरधाव चालवून त्याचा धुव्वा उडवून देऊ, अशी तंबी महाराष्ट्रीय पुढाऱ्यांस दिली होती. तथापि मेथांची गाडी जशी बोरघाटांतून वर येऊ शकली नाही म्हणून म्हणा, किंवा मुंबईच्या.

२८ स्वभाव-चित्रे सिंहाला अश्वरथ हांकण्याचा धीर होईना म्हणून म्हणा, महाराष्ट्र अखंड राहिला, तसा तो याही वेळी राहिला. पंडितजींचे अस्त्र बोथट झालें व वाफेचा रूळ मसूरी-नैनितालच्या सर्द हवेत थंड पडला! तें कसेंही असले तरी, पंडितजींना प्रतिस्पर्धी सहन होत नाही हे खरें. १९२३ साली दासबाबूंनी असेंब्लींत जाण्याचे टाळलें आणि ते बंगालच्या प्रांतिक मंडळांतच राहिले, या दर्शनी चमत्कारिक गोष्टीचे कारण झाले तरी हेच की, पंडितजींच्या सार्वभौमत्वांत त्यांस अंशभागी खपत नाही. परंतु पिढीजात संस्कारामुळे व प्रचलित संवयीमुळे हा दोष उत्पन्न झाला असला तरी पंडिजींना त्याची जाणीव नाहीं असें मात्र नव्हे, हे ध्यानांत धरले पाहिजे. असे अव- गुण ज्ञात होतांच चुटकीसरसे लुप्त होते तर प्रकृतीचे प्रमाथित्व तें काय राहिले असते ? दिल्ली येथे काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय परि- षद् भरली तेव्हां लाला लजपतराय दिल्लीत उपस्थित असूनही सभेस आले नाहीत असें पंडितजींच्या दृष्टोत्पत्तीस येतांच, मागील भांडणे कोटीतील पक्षपातित्वाप्रमाणे विसरून जाऊन, ते लाला- जींच्या बंगल्यावर गेले व आपला हात पुढे करून म्हणाले की, " लालाजी, हा मी मित्रत्वाचा हात पुढे करीत आहे, तुमचाही पुढे करा व आपण हस्तांदोलन करूं या. या स्वभावज्ञानांत, उदयो. न्मुख परमतसहिष्णुतेंत व कार्यकदृष्टित्वांतच पंडितजींच्या भावि यशाचे प्रभावी बीज आहे. कीर्तिध्वजाच्या अशा वाढत्या उज्ज्वलते- वरून टेनिसनें ... Men may rise on stepping-stones Of their dead selves to higher things.' असा सिद्धान्त केला नसेल तर दुसऱ्या कोणत्या उदाहरणांवरून ! आज मोतीलालजींना सदुसष्टावें वर्ष आहे; परंतु त्यांचा उत्साह अणुमात्र कमी झालेला नाही. उलट, वयोमानाबरोबर तो वाढतो पंडित मोतीलाल नेहरू २९. की काय असेंच मनांत येते. चळवळीकरितां हिंदुस्थानांतल्या हिंदु- स्थानांत हिंडण्यांत तर त्यांच्या पायाला जसें चाक बांधलेलें; वकिली काम घेऊन विलायतेंतही काही महिने राहण्यास मागेपुढे अगदी अलीकडेसुद्धा पाहिले नाही. त्यांत पैशाचें घबाड लाभलें हें खरें असले तरी उत्साह, निरलसता व कार्योत्सुकता यांची किंमत कमी नाहीं हे कबूल केले पाहिजे. वृद्धावस्थेत देखील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभेत बसल्या बसल्या त्यांचे ठरावांचे, उपसूचनांचे वगैरे मसुदे करण्याचे काम चाललेले असावयाचें. १९२१ च्या डिसें- बर महिन्यांत सरकारने त्यांस तुरुंग दाखविला; पण बंदिखान्याने त्यांची देशभाक्त थिजली तर नाहीच, उलट पक्षी तिला उकळ्या फुटल्या व त्यांच्या उष्णतेने त्यांच्या सर्व कुटुंबांत राष्ट्रप्रेमाची ऊब निर्माण झाली. त्यांचे इंग्रजी शिक्षण बी. ए च्यापर्यंत झाले होते तरी, वाङ्मयज्ञानाची उणीव त्यांच्या कायद्याच्या व्यापक व गाढ ज्ञानाने भरून काढली असल्यामुळे स्वराज्य पक्षाचा १९२३ सालचा त्यांनी कौन्सिल निवडणुकीचा जाहीरनामा, काँग्रेसच्या कायदेभंग- चौकशी-कभिटीचा रिपोर्ट व आतांचा नेहरू रिपोर्ट इत्यादि गंभीर व मार्मिक लिखाणांवरून लेखनांत त्यांचा कसा हातखंडा आहे हे प्रत्ययास येते. कुशल कारागिराने दगडावर दगड कोरीव रीतीने व ठाकठिकीने बसवावा त्याप्रमाणे त्यांची वाक्यरचना व शब्द- योजना रेखीव, ठसकेबाज व जोरदार असते. लेखनशैलीप्रमाणे भाषा- पद्धतिही सरळ व निघोट असते. दोहोंत विद्वत्तचे फवारे प्रायः नसावयाचे, पण एक प्रकारचा स्पष्टवक्तेपणा व जोश असावयाचाच. पंडित मदन मोहन मालवीय जाहीर व्याख्यान देतांना ऐकणारांच्या डोक्यावर त्यांच्या मुखांतून गंगेचा पवित्र प्रवाह सारखा पडत अस- ल्याचा भास होतो; लाला लजपतराय बोलण्याच्या आवेशांत आले म्हणजे श्रोत्यांना भावनोद्रेकाचे अखंड धारास्नान घडल्यासारखें स्वभाव-चित्रे ~ घाटावें; देशबंधु दासांचे वक्तृत्व-श्रवण म्हणजे तुफान समुद्राच्या उंच उडणाऱ्या लाटांवर तरंगण्याप्रमाणे बैरिस्टर जयकरांचे व्याख्यान म्हणजे नाजूक व सुवासिक जाईजुईच्या फुलांचा व गुलाबांचा वर्षाव; मोतीलालजींच्या भाषणपद्धतींत वरीलपैकी एकही गुण उत्कटत्वानें नाहीं; तथापि त्यांचे भाषण तीरासारखें सरळ व थेट लक्ष्यवेधक अशा स्वरूपाचे असावयाचे, मग तें असेंब्लींत स्वराज्याची संयुक्त मागणी पुढे मांडण्याच्या वेळचे असो, नाही तर राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठा- वरून केलेले असो. १८८३ पासून ज्या पेशाची गिरणी सतत पंडितजींनी चालविली त्याचा परिणाम इतका कायमचा व सर्व- व्यापी झालेला दिसतो की, कोठेही गेले तरी त्यांचे बोलणें-चालणे वकिली बाण्याचे व्हावयाचे. मात्र फरक एवढाच की, अदालतींत ते पक्षकाराचे वकील व असेंब्लींत व बाहेर देशांत ते जनतेचे वकील. कार्लाईलने म्हटले आहे की, महापुरुष म्हणजे परमेश्वराने आकाशांतून भूमीवर फेकलेली जळती ज्योत. पंडित मोतीलालजींच्या देशभक्तीची स्फूर्ति नैसर्गिक नसून म. गांधींपासून प्राप्त झालेली असे विधान केले तर त्यांत पंडितजींना गौणपणा आणला असे होत नाही. लोकमान्य टिळक, देशबंधु दास, लाला लजपतराय यांची प्रणालिका अजीबात वेगळीच. महात्माजींच्या गुरुत्वाकर्षणाने पंडितजी राजकारणात प्रामुख्याने पडले, त्यांच्याच प्रोत्साहनाने पंडितजींनी केला तो अभिनंदनीय स्वार्थत्याग केला व उभयतांचा गुरुशिष्यसंबंध पुढे पुढे नष्ट होऊन भावाभावांच्या प्रेमांत रूपांतर पावला. म. गांधींनीही कित्येकवेळां आपले कडक नियम मोडून तो संबंध सदैव ताजा व स्वच्छ असा राखला आहे. स्वराज्यपक्षांत पुढारपण पंडितजींचे म्हणून तर असहकारितावाद्यांचा व त्या पक्षाचा झाला तो समेट घडून आला व तो देखील साबरमतीस. फार कशाला, अजून देखील महत्त्वाचा असा धोरणाचा अगर पंडित मोतीलाल नेहरू ३१ कार्यक्रमाचा कांहीं प्रश्न उद्भवला म्हणजे कौल घ्यावयास पंडितजी अलाहाबादेहून साबरमतीस जातात व हवा तसा फांसाही त्यांना पडतो. इतर कोणी विनंति केली की, 'महात्माजी, आपण नेहरू रिपोर्टाविषयींच्या सर्वपक्षीय परिषदेचे अध्यक्ष व्हा' म्हणजे 'माझ्या- मुळेच परिषद् यशस्वी होणारी असली तरी मी येणार नाही' असें महात्माजींचे सडेतोड उत्तर यावयाचे. पण पंडितजींच्या प्रेमाखातर व मोहबतीखातर 'जो या रिपोर्टास विरोध करील तो देशद्रोही' असें निर्भीडपणे लिहिण्यांत त्यांनी कमी केले नाही ! कोणाच्याही स्फूर्तीने पंडितजी राजकारणांत पडले असोत, त्यांची कर्तबगारी हिंदी राष्ट्राला ललामभूत झाली यांत तिलप्राय शंका नाही. त्यांनी कलकत्त्याच्या काँग्रेसचे अध्यक्षपद ग्रहण करण्याचे समयीं प्रत्येक हिंदपुत्राने त्यांस दीर्घायुष्य चिंतावें हें 'काले वृष्टिरिव' मव्हे का ? पं. मोतीलाल नेहरूंचे सर्व कुटुंब हा एक हिंदमातेच्या गळ्यांतील दैदीप्यमान व मनोहर असा मुक्ताहारच होय; आणि त्यांत पंडित मोतीलाल हे एक तिव्या विशाल व तेजस्वी हृत्प्रदेशावर रुळणारे, जवा- हिराच्या कोंदणांत बसविलेलें, मौक्तिकरत्न अशी कल्पना केली तर ती प्रत्येकास सत्य व म्हणूनच रम्य वाटल्याशिवाय राहणार नाही. धन्य त्या मायभूमीची कूस, की जिच्यांतून अशी माणिकमोती बाहेर पडतात व तिला आपल्या दैवी प्रभेने भूपावतात !

सरदार वल्लभभाई पटेल केनोत्तुंगशिखाकलापकपिलो बद्धः पटांते शिखी। पाशैः केन सदागतरगतिता सद्यः समासादिता ।। केनानेकपदानवासितसटः सिंहोऽर्पितः पंजरे । भीमः केन च नैकनक्रमकरो दोभ्या प्रतीर्णोऽर्णवः॥ मुद्राराक्षसम्. दिल्ली येथे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची गेल्या हिवाळ्यांतील बैठक चालू होती. एक दिवस सकाळच्या वेळी असेंब्लीचे अध्यक्ष ना. विठ्ठलभाई पटेल यांच्या बंगल्यावर घरगुती मंडळी चहा पीत बसली होती. यजमान म्हणून विठ्ठलभाई होते. बार्डोलीचा अद्वितीय विजय संपादन करून विश्रांतीसाठी थोरल्या भावाकडे आलेले वल्लभभाई होते. जिवलग स्नेही म्हणून मधून मधून बड्या मित्राच्या घरचा पाहुणचार घेणारे जमनादास था असेंब्लीच्या कामाकरितां त्यांच्या- कडे राहातच असत. वडिलांची अत्यंत मनोभावाने शुश्रूषा करण्यांत दक्ष असणारी वल्लभभाईची लाडकी कन्या मणीबेन पण तेथे होती. चहा-चिवडा, शेव-गांठ्या वगैरे चालले आहे, गप्पा अगदी रंगांत आल्या आहेत, अशा वेळीच पंजाबचे लाला हंसराज आपली प्रभात- समयींची सहल संपवून बंगल्यांत शिरले. या दोन बंधूंची जोडी एकत्र पाहून त्यांनी एकदम आश्चर्याचे उद्गार काढले: “हे दोनच भाऊ आहेत तरी सरकारला काय 'दे माय धरणी ठाय' झाले आहे ! मग पांच असते तर सरकारची खरोखरच पांचावर धारण बसली असती!" विठ्ठलभाईची करणी लोकांना माहीत होतीच. वल्लभ- सरदार वल्लभभाई पटेल भाईनी बार्डोलीस यशःसिद्धि मिळविली ती तर अक्षरशः अभूतपूर्व कोणी नाही म्हणावें ? कदाचित् सागराला उपमा जशी सागराचीच किंवा राम-रावणांच्या युद्धाला जशी दुसरी तुलना नाही, त्याप्रमाणे बाडैलीचा पराक्रमही इतिहासांत अनन्योपमालंकाराचे उदाहरण होऊन राहील. असे हे दीप्तिमान् कार्य व ते घडवून आणणाऱ्या कर्मवीर वल्लभभाईचे नांव साऱ्या भारतवर्षासमोर अगदी ताजे असतां, लाला हंसराजांच्या तोंडांतून जी भावनामय वाक्ये बाहेर पडली ती सर्व हिंदी जनतेच्या अंतःकरणांत अश्रुतावस्थेत वास करीत होती असें अनुमान केले तर ते शंभर टक्के यथार्थ होय, हे प्रत्येकजण कबूल करील. कीट्स कवीने मोठ्या बहारीने म्हटले आहे की- Heard melodies are sweet, but those unheard Are sweeter; या न्यायाने लोकांनी केलेले वल्लभभाईचे मानसिक व निःशब्द यशोगान मधुरतर असेल आणि लोकांच्या हृत्कासारांत अदृष्ट भाव- तरंग जास्त जोराने व सौंदर्याने खळाळलेही असतील. ते कसेही असले तरी लालाजींच्या हृदयांतून जे विचार उचंबळून प्रगट झाले, तीच अखिल भरतखंडाची आकाशवाणी म्हटली तरी चालेल. बार्डोलीच्या पराक्रमाचे वर्णन कोठवर करावें ? या वीरकृत्याचे मुख्य श्रेय कोणाकडे हे एका शब्दांत सांगावयाचे म्हटले तर सरदार वल्लभभाईंकडे' असे म्हणणे सर्वथैव योग्य होय. नभ- प्रांगणांत नक्षत्रे पुष्कळ नसतात असे नाहीं; त्यांचा प्रकाश अगदी कांहींच नसतो असेंही नव्हे. तथापि चंद्रिका ही चंद्राचीच; इतर तारकांचा धवलिमा असला तरी बेताचाच व तो चांदण्यास पोषक होण्यापेक्षा उलट त्यानेच अधिक शोभा पावलेला. बार्डोलीस सदैव पांढरी स्वच्छ खादी वापरणारे स्वामी आनंद, महादेवभाई देसाई इत्यादि गृहस्थ होते; पण सर्वांडून श्रेष्ठ असे सूत्रधार सरदार वल्लभ- स्वभाव-चित्रे भाई तेथे होते, म्हणून अंगीकृत कार्याला लाभलें तें अप्रतिम यश प्राप्त झाले व त्यांनाही मोठेपणा मिळाला. काय ती बार्डोलीची संघटना ! काय ती स्वयंसेवकांची व तेथील शेतकऱ्यांची लष्करी शिस्त! काय ती कार्याची व्यवस्था! असे होते म्हणून तर एवढे सर्वशक्तिमान् सरकार हादरले, त्याच्या यंत्राला खीळ पडली व 'टाइम्स' कार तावातावाने जाहीर रीतीने विचारूं लागले की, 'बार्डोलीत स्वराज्य कोणाचें, बादशहांचे का वल्लभभाईचे' आणि आपल्या कौन्सिलमधील भाषणांत देखील माजी गव्हर्नरसाहेब सर लेस्ली विल्सन यांनी सवाल टाकला, ‘बार्डोलीत हुकमत बादशहांच्या राज्यकर्त्यांची किंवा एका विवक्षित व्यक्तीची ?' पण असल्या वर्तमानपत्राच्या रकान्यांतून अगर कौन्सिलच्या दिवाणखान्यांतून मारलेल्या तीरांनी प्रत्यक्ष परिस्थिति थोडीच बदलणार होती! तोंडाची किंवा लेखणीची वाफ दवडली तरी सरकारी यंत्र थंड पडले त्यांत ऊब निर्माण कोठून होणार ? आणि म्हणून तर मुंबई इला- ख्याच्या गव्हर्नरसाहेबांना एकदम सिमल्यास धूम ठोकावी लागली. बिचाऱ्या स्थानिक कलेक्टर-कमिशनरांची दैना तर पुसूच नये. हिंदुस्थानाचे डोळे बाडैलीकडे वळले; ज्याच्या त्याच्या तोंडी एकच एक विषय. या जबरदस्त नोकरशाहीच्या नाड्या कशा आंखडल्या; हा सर्वभक्षक अग्नि कोणी दाबून ठेवला; वाऱ्यासारखी हिची गति अगदी अप्रतिहत, पण ती सुद्धां कुंठित झाली की हो; इतका सिंह बळकट, परंतु पिंजऱ्यांत कुत्र्या-माकडासारखा कोंडला गेला; सुसरी- मगरी वगैरे माणसाचे पाय ओढणारे व त्याला गिळंकृत करणारे क्रूर प्राणी समुद्रांत असंख्य खरे, तथापि केवळ बाहूंच्या सामर्थ्याने तो उल्लंधिला गेला !! अमात्य राक्षसाला पकडल्यानंतर आर्य चाण- क्यांनी जे विस्मित होऊन शिरोभागीं उद्धृत केलेले उद्गार काढले तेच येथे लागू पडतात. इतकंच काय, 'विनैव युद्धादार्येण जितं सरदार वल्लभभाई पटेल ३५ दुर्जयं परबलामिति लज्जित एवास्मि' असें जें राक्षसाचे स्वगत भाषण त्याचाच प्रतिध्वनि गव्हर्नरसाहेबांच्या किंवा खुद्द व्हाइरॉयसाहे- बांच्याही अंतःकरणांत उमटला असेल म्हटले तरी वस्तुस्थितीस सोडून होणार नाही. सरदार वल्लभभाईंची कार्य अंगावर घेण्याची व ते पार पाडण्याची पद्धतिच मुळी अशी विलक्षण व लोकोत्तर आहे की, तींत यश येणे हे सुईमागून दोरा जावा तशासारखें अपरिहार्य होऊन बसते. उत्कृष्ट प्रसंगाची टपून वाट पहात बसावयाचे व आपल्या कल्पनेप्रमाणे व योजनेप्रमाणे जुळणी झाली अशी स्वतःची खात्री पटली की, एकदम झडप टाकून कार्याचे पुण्याहवाचन व्हावयाचे व संकल्पाप्रमाणे तें तडीस जावयाचेच. परवां ते मुंबईस सहज बोलतांना म्हणाले देखील, की या बार्डोलीकरितां मी किती तरी दिवस गणपति पाण्यांत बुडवून ठेविला होता. आणि तें खरेंच; कारण पहा, बा?- लीच्या पूर्वी, इ. सन १९२० सालाच्या अगोदरपासून सरदार वल्लभ- भाई महात्मा गांधींच्या शिष्यवर्गात आहेत, तरी त्यांचे नांव असे कोठे झळकत होतें ? अर्थात् त्या वेळच्या त्यांच्या कार्याच्या जमा- खर्चाच्या चोपड्या कोऱ्या करकरीत आहेत किंवा त्यांच्या कीर्तीची तिजोरी मॅडम हबर्टच्या तिजोरीसारखी अगदी रिकामी आहे असे मात्र नव्हे. गोठ्याच्या परिषदेनंतर वल्लभभाई तिचे चिटणीस झाले व परिषदेपुढील वेठबिगार बंद करण्याचे काम त्यांनी शिरावर घेऊन अशा जोराने चालविलें की, सत्याग्रहापर्यंत मजल येणार असे पाह- तांच कमिशनर पॅटसाहेबांनी त्यांचे म्हणणे ताबडतोब मान्य केले. याच्यानंतर आला बोरसदचा लढा. बोरसदच्या रयतेवर सरकारने निष्कारण जादा पोलिसांच्या खर्चासाठी दोन-अडीच लाख रुपये दंड लादला. जनतेची सेवा करण्याची सुसंधि आली असें वल्लभ भाईनी हेरलें; व अशी सुयंत्रित चळवळ केली की, स्वतः गृह- ३६ स्वभाव-चित्रे मंत्र्यांना ठिकाणावर जाऊन दंड माफ केल्याचे जाहीर करावे लागले, तेव्हांच सरकारचा जीवही भांड्यांत पडल्यासारखा झाला. अशा आंदोलनाचा परिणाम दूरवर पोहोचत असतो. बोरसदची चळवळ जिंकल्यानंतर आनंद तालुक्यांतील कित्येक गांवांवर असाच जुलूम चालला होता तो, त्या लोकांनी नांवाला अर्ज गुजरण्याचा अवकाश, तत्क्षणीं थांबला. या सर्व विजयांवर बार्डोलीने सोनेरी कळस चढविला. ते त्यांचे रामदासस्वामींच्या मठांसारखे अकरा आश्रम, प्रत्येक आश्रमाचा नायक, ती त्यांची स्वयंसेवकांची सेना, तें अत्यंत शीघ्र-कार्यकारी असे प्रसिद्धिखातें वगैरे बार्डोलीचा सर्व सरंजाम पाहिला म्हणजे मन आश्चर्याने थक्क होतें ! बा?लीच्या नंतर 'मिस्टर' किंवा ' श्रीयुत वल्लभभाई होते ते 'सरदार' वल्लभभाई झाले. असे असता त्यांना तरी आत्मविश्वास कां न वाटावा ? वांद्याच्या महाराष्ट्र प्रांतिक परि- पदेची विषय-नियामक कमिटी बसली होती. नामदार विठ्ठलभाई पटेल यांनी पब्लिक सेफ्टी बिलावरचें आपलें रूलिंग नुकतेच दिलेलें होते व शिवाय ते पडले महाराष्ट्र प्रांतिक कमिटीचे एकवेळचे उपा. व्यक्ष. तेव्हां त्यांच्या अभिनंदनाचा ठराव कमिटीपुढे आला. सुच. विणाराने आपल्या हातांतील कागदावरून "This Conference congratulates the Honourable Mr. Vithalbhai Patel' वगैरे शब्द वाचले. छोटे भाई परिषदेचे अध्यक्ष व बड्या भाई, अभिनंदन. 'ऑनरेबल' हा शब्द येतांच मंडळींत हा योग पाहून हास्यलहरी उठल्या. वल्लभभाई गंभीरपणाने चटकन् उद्गारले, ' Allright, let us go on, my honour was never in doubt. ' वडील बंधु झाला म्हणून काय झाले ! त्याचे कार्यक्षेत्र किती म्हटले तरी अगदी मर्यादित. मग धाकट्या भावाला आपल्या सुयशस्वी कर्तबगारीबद्दल आत्मविश्वास वाटावा व तो त्याने अशा सरदार वल्लभभाई पटेल - अंमळ चमत्कारिकशा भासणाऱ्या रीतीने व्यक्त करावा हे साहाजक नाही का ? फार काय, इतरांच्या बाबतींत वल्लभभाईच्या संबंधी, जगन्नाथ पंडिताने एका अन्योक्तींत म्हटल्याप्रमाणे- येन भिन्नकरिकुंभविस्खल- न्मौक्तिकावलिभिरंचिता मही। अद्य तेन हरिणांतिके कथं कथ्यतां नु हरिणा पराक्रमः॥ असे विधान केले तर तें किंचित् अत्युक्तिपूर्ण वाटले तरी, आजच्या राजकारणाच्या पोरोस्थतीत अगदीच असमर्थनीय ठरेल असें मात्र नव्हे. बार्डोलीस फिका पाडणारा आणखी एखादा सवाई विजय वल्लभभाईनें संपादन केला, तर तो कोणास नको आहे ? वल्लभभाईना म्हटले म्हणजे सत्याग्रहाचे जसें कांहीं बाळकडूंच पाजलेले. मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात म्हणतात. ववर्थ कवी- लाही जो विचार एका काव्यमय प्रसंगी अत्यंत रम्य व शाश्वत्सत्या- सारखा स्फुरला तो, ' Child is the father of the man. प्रभातकालावरून सबंध दिवसाचे हवामान वर्तवावें व बालपणांत भावि कर्तबगारीची कल्पना करावी, असें मिल्टन लोकांना सांगतो. सरदार वल्लभभाईनी हीं सुभाषितें सर्वस्वी खरी ठरविली आहेत असे म्हणावयास हरकत नाही. अक्षरशः पाळण्यांत जरी नसले तरी यांचे पाय लहानपणी वर्गात मात्र चांगलेच दिसले. नडीयादच्या प्राथमिक शाळेत एक शिक्षक पुस्तकें, कागद, पेन्सिली वगैरे शालोपयोगी सामान जोडधंदा म्हणून विकीत असे. या मास्तरापासून कांहीं घ्यावयाचे नाही, असा वल्लभभाईनी आग्रह धरला व चळवळ सुरू केली. अखेरीस इतक्या थराला गोष्टी गेल्या की, सात दिवस शाळा बंद पडली. मास्तरला नमते घ्यावे लागले व तंटा मिटला. बडोद्याच्या हायस्कुलांतही मॅट्रिकच्या वर्गात असलाच प्रकार झाला.

स्वभाव-चित्रे www ऐच्छिक भाषा म्हणून त्यांनी संस्कृत न घेतां गुजराथी घेतली, गुजराथीचे शिक्षक जरा शिष्ट होते. त्यांनी या 'महापुरुषां' ना टोमणा दिला की, संस्कृत सोडून गुजराथी घेतली खरी; पण संस्कृता. शिवाय तुम्ही गुजराथी काय रडणार ? बोलण्याच्या कामांत पटेल. बंधु अगदी निर्भीड व सडेतोड ! उत्तरास सव्याज प्रत्युत्तर. वल्लभ- भाईनी उलट विचारले, 'मी जर गुजराथी भाषा घेतली नसती तर, सर, तुम्ही तरी कोणापुढे आपलें पांडित्य करणार होता ? ' शिक्षक खजिल झाला, त्याची प्रकृति गरम झाली. एकी एकी एकपासून दहापर्यंत पाढे दहा वेळां लिहून आणण्याबद्दल त्यांनी सजा सुनावली. शिष्य ऐकत नाहींसें पाहून दररोज शिक्षेचे प्रमाण भूमितिश्रेढीनें वाढत गेले. शेवटी तेच पाढे दोनशे वेळां लिहून आणण्यापर्यंत मजल गेली. जिकीरीला येऊन शिष्याने पाटीवर ' बसें पाडा' (दोनशे रेडे) असें एकदांचे लिहून आणलें व पाटी मास्तरसमोर धरली. आपली कांहीं डाळ शिजत नाही, असे पाहून छोटालाल मास्तरने या नाठाळ छोकऱ्याला हेडमास्तरसाहेबांकडे पाठविलें. वल्लभभाईंनी सांगितले की, 'शिक्षा केली ती माझ्या फायद्याची असती तर मी मान्य केली असती. हे पाढे काढीत बसलो तर मला लोक मूर्खत काढतील.' हे प्रकरण काही वेगळे आहे असें जाणून प्रमुखमहाशयांनी वल्लभ- भाईंना सोडून दिले. वयोमानाबरोबर हीच उपजत मनोरचना बळावत गेली व बार्डो- लींत तिची सायसंगीन व वैभवशाली अशी अभिव्यक्ति झाली. इतर दृष्टीने वल्लभभाईचे चरित्र महानुभावि व तेजस्वि आहे असें नाहीं. १८५७ सालाच्या बंडांत झांशीच्या राणीच्या प्रदेशांत ज्याने दोनतीन वर्षे घालविली, अशा बापाच्या पोटी जन्म इतकेच काय ते. बाकी घरची गरिबी फार, स्वतःची बुद्धिमत्ता सुमार, आजु- बाजूची परिस्थिति फारशी अनुकूल नाही, असे त्यांचे दिवस गेले.

सरदार वल्लभभाई पटेल ३९ .. निरलसता व कार्यकदृष्टित्व हे गुण मात्र सत्याग्रहाच्या भावनेप्रमाणे शैशवापासून अंगी मुरलेले. शेते, खाचरें व गांवढळ लोक यांच्या अखंड सहवासांत प्रेमळ आईबापांची पाखर असतां कांहीं थोडा काळ लोटला. पेटलादला शिकावयास गेले तरी रविवारी आपल्या राहत्या गांवीं म्हणजे करमसदला जावयाचें; आठवड्याचा शिधा बांधून घेऊन यावयाचा व पांच-सात सहाध्यायांनी मिळून परमा- र्थतः स्वयंपाक करून अभ्यास साधावयाचा. कशीबशी मॅट्रिकची परीक्षा पदरात पडली. विलायतेस जाऊन बॅरिस्टर व्हावें ही मनीषा उत्पन्न झाली. पण जावयाचें कसें ? अगोदर डिस्ट्रिक्ट प्लीडर होऊन पैसा जमवून जावयाचे असा निर्धार केला. परीक्षा उतरली. बोर- सदला विठ्ठलभाई वकील होते, यांनी गोध्रयास वकिली थाटली. वल्लभभाई वकिलीत फार निष्णात ठरले. द्रव्यसंचय पुरेसा झाला. पासपोर्ट मिळविला. पण तो होता व्ही. जे. पटेल या नांवाचा. विठ्ठलभाईच्या कानी ही बातमी जातांच ते म्हणाले, 'मीही व्ही. जे. पटेल आहे व त्यांतल्यात्यांत मी वडील भाऊ, तेव्हां माझा हक्क विलायतला जाण्याचा अगोदर.' झाले; विठ्ठलभाई गेले, वल्लभभाई मागे राहिले व थोरले भाऊ परत आल्यावर त्यांच्या खांद्यावर कुटुंब- भार टाकून वल्लभभाईनीही प्रयाण केले. हिंदुस्थानांत जसा अभ्यास कष्टमय दशेत त्यांस करावा लागला, तसेंच तिकडे कायद्याचे परि- शीलन देखील. वसतीच्या ठिकाणापासून मिड्ल् टेंपल अकरा मैल लांब होते. परंतु इतकें अंतर रोज पायांनी तोडावयाचे, सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाचनालयांत बसून वाचावयाचे. असा दर दिवशी सतरा सतरा तास अभ्यास करून, कौतुकाची गोष्ट की परीक्षेत पहिल्या वर्गात पहिला नंबर मिळविला, पन्नास पौंडांची शिष्यवृत्ति खिशांत टाकली व चार टर्सची माफीही पण फायद्यांत पाडली. बॅरिस्टरीच्या परीक्षेत यांनी लिहिलेल्या उत्तराच्या वह्या एका परी- स्वभाव-चित्रे क्षकाच्या इतक्या पसंतीस आल्या की, त्याने न्यायमूर्ती स्कॉट यांस मुद्दाम पत्र लिहिले व या नूतन बॅरिस्टरास न्यायखात्यांत श्रेष्ठ पदवी- वर चढविण्याविषयी सांगितले. पण नशिबाची रेषा अशी की, हायकोर्टातल्या उच्चासनावर बसण्याऐवजी सरदार वल्लभभाई जन- तेच्या मनोमंदिरांत ध्रुवासारखें अढळपद प्राप्त करून बसले ! 'जित्याची खोड' सत्याग्रहाची, स्वभावजनित प्रकृति तशीच. मग न्यायदानाचें नाजूक काम यांच्याच्याने कसचे होणार होतें ? लोक मान्य टिळकांनी प्रोफेसरचे काम जन्मभर केले असते तर राष्ट्राचे जें नुकसान झाले असते तेंच वल्लभभाई हे न्यायाधीश होते तर झाले असते. छात्रावस्थेत जे सद्गुण त्यांच्या वर्तनांत दृष्टोत्पत्तीस येतात तेच आजतागायत त्यांच्या सार्वजनिक चारित्र्यांत आढळतात. बॅरिस्टर होऊन अहमदाबादेस वकिली सुरू केल्यावर 'गुजराथ क्लबांत' ब्रिज खेळण्यांत हे नेहमीं चूर असावयाचे. एकदां म. गांधी त्या क्लबांत गेले व काही उपदेशपर शब्द बोलले. त्याबद्दल तर वल्लभभाईनी त्यांची कुचेष्टाही केलेली. परंतु 'बापू' च्या प्रभावाने व संनिकर्षाने वल्लभभाई जे एकदां लोकसेवेत पडले ते कायमचेच पडले. जवळ जवळ अहर्निश लोकसेवेकरितां त्यांनी संन्यासग्रहण केले. आपल्या अंगच्या गुणांचा व कर्तृत्वाचा पुरेपुर फायदा त्यांनी तेव्हांपासूनच्या सर्व सार्वजनिक कार्यात जनतेस करून दिला. गुजराथेत जलप्रलय झाला. दुःखग्रस्त व हताश झालेल्या हजारों लोकांस वल्लभभाईनीं आशेचे किरण दाखविले. निराश्रितांस मदत द्यावयाची ती सरकारने यांच्यामार्फत दिली. एका रात्रीत दोन हजार स्वयंसेवक गोळा केले व त्यांच्या मदतीने पीडितांच्या मुलाबाळांच्या तोंडांत यांनी घांस घातला. बरें, स्वतः किती काम करावयाचे म्हणून सांगावें ? एक दिवस पहांटेच चहा व खारी सुरती बिस्किटें खाऊन गळाभर सरदार वल्लभभाई पटेल पाण्यातून हिंडता हिडतां व स्वयंसेवकांकरवीं काम करवून घेता घेतां मध्य रात्र झाली तरी स्वारीचा पत्ता कोठे आहे ! स्नेहमिंड- ळींच्या पोटांत गोळा उठला व चार दिशांनी चौकशी करणारी मंडळी गेली तों अहमदाबादेपासून दूर एका गिरणीच्या आवारांत कंबरभर पाण्यांत उभे राहून, दिवसभर अन्न नाहीं, कांहीं तरी खाल्ले तरच दुसऱ्या दिवशी काम होणार, म्हणून कोठे तरी मिळालेली शिळींपाकी भजी खात असलेली त्यांची मूर्ति सांपडली! बार्डोलीस झाले तरी कामाची तन्हा हीच. झुंजुमुंजू होतें न होते तो आश्रमां- तून निरनिराळ्या आश्रमांच्या मुख्यांना कामांची वाटणी करून देऊन निघावयाचें तें पंधरा-वीस खेडी घेऊन प्रत्येक ठिकाणी छोटी छोटी भाषणे करून व इतर कार्यावर देखरेख करून केव्हां तरी रात्री अपरात्री मुक्कामावर यावयाचें. बरें, इतके करून श्रमाने संतप्त होऊन ते चिडखोरपणाने वागले आहेत असें चुकून देखील नाही. सकाळी उठल्यावर रोजचा परि- पाठ चालू. स्वयंसेवकांशी व दुसऱ्या जवळच्या माणसांशी इतक्या गोडीगुलाबीने व मनमिळाऊपणाने बोला-चालावयाचें की, जो तो त्यांना आपसुखच शिरसावंद्य मानी व त्यांचा शब्द पाळी. स्वयं- सेवकांचा आज्ञाधारकपणा तर खरोखरच स्तुत्य. ठीकच आहे. * If you want to command, first learn to obey' या उपदेशाचा कित्ता त्यांनी फार चांगला गिरविला आहे. म. गांधी हे अग्रणी. महात्माजींनी सांगितले की, अमुक करावयाचे म्हणजे वल्लभभाईनी तें तंतोतंत केलेंच म्हणून समजावें. अगदी ताजी हकी- कत सांगावयाची तर, गेल्या महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारलें तें केवळ 'बापू' ची आज्ञार्थक तार आली म्हणून. स्वतः त्यांना या अध्यक्षपदाची तोपर्यंत कांहीं दखलगिरी होती नव्हती याची वानवाच. अगदी परवापरवांची गोष्ट घ्या ना. मुंबई ४२ स्वभाव-चित्रे इलाखा शेतकरी संघ स्थापून पुण्याहून ते मुंबईस गेले. रात्रीच्या गाडीने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सभेसाठी अलाहाबादेस जाव- याचे. हे तिकडे जाण्यासाठी कलकत्ता मेलमध्ये व करमसदला नरसीभाईचा खून झाल्याची तार त्यांच्या हातांत. अलाहाबादेस जावयाचें की गांवी जावयाचें ? प्रत्यक्ष भावाचाच खून झालेला म्हणून घरी जाणे अगदीं जरूर व व्यवहाराचे. पण 'बापू' नीं अलाहाबादेस बोलावलेले. तेव्हां मुलगी मणिबेनला करमसदला रवाना केले व आपण अलाहाबादला निघून गेले. खुद्द सेनापतीची शिस्त अशी कडक, मग अनुयायांची व शिपायांची असल्यास काय नवल ? परंतु ही सर्व शिस्त प्रेमाची असल्याकारणाने सर्वांनाच ती स्पृह- णीय वाटते. ऊरपूर म्हणून वल्लभभाईचा विनोद सदा सज्ज असतो. वल्लभभाईंना जात्या कमी बोलावयास हवे. त्यांची मौनवृत्ति पाहिली म्हणजे कार्लाईलने आपल्या Silent Hero चे में ग्रंथांत घोटून घोटून भडक चित्र रेखाटले आहे ते डोळ्यांसमोर उभे राहते. त्यांचा मूकभाव म्हणजे आढयतेचे किंवा कुर्रेबाजपणाचे लक्षण होय, अशांतला भाग बिलकूल नाही; तर स्वभावच मूलतः अबोलका. पण एकदां बोलू लागले म्हणजे मात्र नारिकेलफलन्यायाचा मासला मिळतो हे खरे. त्यांच्या स्वाभाविक वक्रोक्तीमुळे त्या माधुर्यात खारट- पणाचा अंश येतो; तथापि स्वतःच्या परिमलाने लोकांस मोहून सोडणाऱ्या केशराची कटुता देखील नितांत रम्य वाटते, हे कवीने लिहून ठेवलेंच आहे. तीच यांच्या बोलण्याची गत. स्वतःचे व कार्यकारी लोकांचे श्रमविनोदन यांच्या विनोदी स्वभा- वाने तेव्हांच होऊन जाते. बार्डोलीससुद्धां आदल्यादिवशी किती मेहनत घेतली असली तरी कामावर जाण्यापूर्वी दुसऱ्या सकाळी सर्व प्रचारक-गण व खेडूत एकत्र जमले व वल्लभभाईचे 'स्वामी आनंद चहा का पीत नाहीत याची तुम्हांस खबर आहे ! लिप्टनकडे सरदार वल्लभभाई पटेल ४३. AN ते नोकरीला होते. त्यांचे तेथे भांडण झाले. त्यांनी नोकरी सोडली व चहावर बहिष्कार घातला, ' असले रोजचे नवनवीन बोलणे त्यांनी ऐकलें म्हणजे ते सर्वजण हंसत हंसत दुप्पट जोराने कामाला जावयाचे. वल्लभभाईच्या संभाषणांत काय अगर व्याख्यानांत काया एका प्रकारच्या आनंददायक वक्रोक्तीची लकेर असते. अगोदर व्याख्यानबाजीचा अत्यंत तिटकारा; प्रसंगोपात्त ते जाहीर सभांत बोलतात; पण नाइलाज म्हणून. त्यांच्या व्याख्यानांत गाढ विद्वत्ता नसावयाची; वक्तृत्वाचा दिमाख शून्य असावयाचा; हातवारे नाहीत; किंबहुना 'वक्ता दशसहस्रेषु' या मानाला लायक होण्यास जे जे गुण लागतात त्या त्या सर्वांचे अभावाने अस्तित्व. तथापि स्फूर्ति हा त्यांच्या व्याख्यानांचा विशेष. नेपोलियन ज्याप्रमाणे आपल्या सैनिकांना पांच-दहा मिनिटांची परंतु त्वेष चढविणारी व बार भर. लेली भाषणे ऐकवीत असे, त्याप्रमाणे बार्डोलींत वल्लभभाई करीत. आणि त्या वेळी ते इतके तन्मय होत की, त्यांचे तेजस्वी शब्द म्हणजे जणुं काय दैवी संचाराने भारलेले मंत्रच होत असें जम. णाऱ्या दहा-दहा, वीस-वीस हजार स्त्रीपुरुष श्रोत्यांना वाटे. कित्ये. कदां जाहीर व्याख्यानाचे स्फूर्तीच्या आवेगाने आत्मगत भाषणांत रूपांतर होई. अलीकडे अलीकडे तर समर्थांची जशी 'जय जय रघुवीर समर्थ' ही घोषणा, तशी ' हूं तो खेडूत ठू' ही वल्लमभाईंची विजय-पताका होऊन बसली आहे. शेतकरी-बांधवांच्या हिताच्या कळ- कळीने इतके त्यांचे सारें अंतःकरण व्याप्त झाले आहे. पूर्वाश्रमींची बंगलोर कॅप, चायना-सिल्कचा कोट व कॉलर इत्यादि पोषाख गेला असून त्याची जागा एक साधा खादीचा सदरा, एक खादीचें धोतर व खांद्यावर अथवा हातांत खादीचा एक रुमाल एवढ्याच पेहेरावाने घेतली. याच वस्त्रांत ते उभे राहिले, आणि किंचित् मान कलती करून व खेडूतांच्या हिताविषयींच्या दक्षतेची द्योतक अशी . 'गामडी स्वभाव-चित्रे कपाळावर एक आठी चढवून मंदमंद असे ते बोलू लागले म्हणजे केवढा प्रचंड समाज त्यांच्या सभोवार असला तरी कसा जादूगाराने अभिमंत्रित केलेल्या सापासारखा अगदी स्तब्ध राहतो. वल्लभभाईच्या कथाप्रसंगांची व व्याख्यानांची खरी मौज त्यांच्या वक्रोक्तिपूर्ण विनोदांत असते. मेघांमधून चंचल चपलेची चमक विलसून जावी किंवा कोलारच्या खाणींत काळ्या फत्तरामधून सुवर्ण- रेषा दृग्गोचर होते, तद्वत् वल्लभभाईंच्या बोलण्यांतील उपरोधिक विनोदाची स्थिति आहे. पुष्करणींत रंगीबेरंगी मासे सोडलेले असले म्हणजे ते जसे आलटून पालटून वर येतात, तोंड बाहेर काढून श्वास घेऊन फवारे सोडतात, आणि जलपृष्ठावर रमणीय व लकलक- णारी शोभा उत्पन्न करून प्रेक्षकांचे डोळे आकृष्ट करतात, त्या- प्रमाणे वल्लभभाईच्या कोट्यांनी व चातुर्योक्तींनी ऐकणारांचे मन रिझविले जाते. रेशमी कपड्यावर स्त्रिया अत्यंत कौशल्याने जीग भरून मनोहर आकृति काढतात व त्या कपड्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात, त्याचप्रमाणे वल्लभभाईची ती लहानलहान वाक्ये अंतर्विलीन पण उदयोन्मुख अशा वक्रोक्तींनी उल्लसित होतात. बाडैलीचा लढा ऐन निकरावर आला असतां शेट वालचंद हिराचंद तेथे समक्ष परि- स्थिति अवलोकन करण्यास गेले. जप्ती वगैरेच्या भीतीने म्हशी गोठ्यांत दिवसच्या दिवस डांबून ठेवलेल्या असत. त्यामुळे त्यांची कातडी बुरसली. बोलता बोलतां वल्लभभाई म्हणाले 'पहा, कशी मडमांसारखी त्यांची कातडी पांढरी झाली आहे !' अशी क्रांति- कारक चळवळ केली; पण त्यांना काही तुरुंगवास नाही. ते म्हण- तात, 'माझ्या नशिबींच तो नाही, कारण मला गिरफदार करून सरकार काय मिळविणार ! म्हैस पकडून नेली तर लिलावात तिला किंमत तरी येईल.' वांद्याच्या परिषदेंत उपसंहाराचे भाषण कर- तांना नाहीं का लागून बोलले, 'गिरणीवाल्यांचा एवढा पुरस्कार ते सरदार वल्लभभाई पटेल करून महाराष्ट्रीयांना काय नफा! बहुतेक सारे गिरणी-मालक तर गुजराथीच आहेत.' परवां परवां मुंबईच्या सरदार-गृहाच्या टिळक- हॉलमधील सभेत त्यांनी आजच्या पुढाऱ्यांना दिलाच की नाहीं एक शालजोडीतला-खादींतला म्हणा हवा तर! 'सांप्रत लीडर्स अनुयायांच्या पुढे न चालतां त्यांच्या मागे येत असतात. बार्डोलीचे कार्य तर आतां सिद्धीप्रत गेले. 'क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते, ' या न्यायानें वल्लभभाईनी द्विगुणित उत्साहानें जास्त व्यापक कामगिरी अंगीकारली आहे. म्हणूनच ते 'बार्डोली हा माझ्या कार्याचा अंत नसून प्रारंभ आहे, असे सांगू लागले आहेत.' जमीनधाऱ्याचा प्रश्न धसास लावून रयतेच्या म्हणण्याप्रमाणे तो सोडवून ध्यावयाचा असा त्यांचा कृतनिश्चय झाला आहे. याच्याकरतां ' लँड लीग' नांवाची इलाख्याची संस्था स्थापून तिची सूत्रे त्यांनी आपल्या हातात घेतली आहेत. 'हूं तो खेडूत छू' हे त्यांचे ब्रीदवाक्य. यांतच त्यांच्या भावि कार्याची रूपरेषा अंतर्भूत आहे. जॉन ब्राइटने म्हटल्याप्रमाणे, राष्ट्र भव्य बंगल्यांत रहात नसून गरिबांच्या झोंपड्यांत वास करीत असते, अशी यांची दुर्दम्य भावना व तिला अनुसरून त्यांच्या इतउत्तरच्या चळवळी व्हाव- याच्या. जमीन-धाऱ्याबाबत सरकारचे धोरण बदलत आहे यांत शंका नाही. बार्डोलीच्या कार्यास फळे येऊं लागणार अशी मंगल चिन्हें आज स्पष्ट दिसू लागली आहेत. अशा स्थितीत बार्डोलीच्या या दृढव्रती, निरहंकार, मितभाषी, कार्यप्रेमी, सात्त्विक व सत्याग्रही कर्मवीराचा जयजयकार भारतवर्षांत झाला व उत्तरोत्तर अधिक होत जाईल यांत संशय नाही. सरदार वल्लभभाई, “ आपल्या स्वीकृत कार्यात 'शुभास्ते पंथानः सन्तु' अशी इच्छा हिंदुस्थानांतील प्रत्येक शेतकरी करीत आहे; आपल्या हाताला यश आहे अशी त्यांची पक्की खात्री झाली आहे. कार्य आणि कर्ता यांची अशी जोड मिळा- ४६ स्वभाव-चित्रे ल्यावर यशाविषयी चिंता बाळगण्याचें कोणास काय प्रयोजन !" अधिकाराच्या लोकनियुक्त किंवा लोकनियंत्रित जागा स्वीकारून राष्ट्रसेवा कशी करता येते याचे आदर्श नामदार विठ्ठलभाई होते. कौन्सिलाबाहेर राहून 'उस्सेबी जादा' राष्ट्रसेवा कशी करता येते, याचे प्रत्यंतर सरदार वल्लभभाईनी आणून दिले. 'नांदा व नांदू द्या या तत्त्वावर किंवा बंधुप्रेमानें कौन्सिलांतर्गत व कौन्सिलबाह्य अशी उभयविध परस्परपोषक व भ्रातृतुल्य कामें निर्वेध रीतीने व राष्ट्रीय दृष्टीने कशी पार पाडावीं तें या विठ्ठल-वल्लभांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. सूर्यानें अग्नीला तेज द्यावें व अग्नीने सूर्यास तोच परत अहेर करावा, अशा सलोख्याने हे विविध राष्ट्रकार्य संपादन केलें जावें ही हिंदुस्थानास एक प्रकारची शिकवणच या पटेलबंधूंपासून मिळाली. आणि आज तरी विक्रमोर्वशीय नाटकांत कालिदासाने, एका बाजूला महनीय व उन्नत पुरुषांच्या अग्रभागी असलेला पुरूरवा व अनाकंप्यधैर्य युवराज यांच्यामध्ये विभक्त झालेल्या राज्यलक्ष्मीचें में हृदयंगम वर्णन केले आहे तेंच पितृसमान ज्येष्ठ बंधु विठ्ठलभाई व कनिष्ठ बंधु सरदार वल्लभभाई यांच्या दरम्यान विभागलेल्या राष्ट्र- सेवेला लावण्यासारखे आहे. सिमला व साबरमती यांच्यामध्ये विस्फू- र्जत झालेली राष्ट्रसेवारूपी लक्ष्मी 'हिमवति जलधौ च व्यस्ततोया' गंगेप्रमाणे अधिकच शोभायमान होत नाही असे म्हणण्याचे कोण धाडस करील?

५ नामदार विठ्ठलभाई पटेल गांगमंबु सितमंबु यामुनम् कज्जलाभमुभयत्र मज्जतः। राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न च न चापचीयते ॥ सुभाषित साल १९२५. ऑगस्ट महिन्याच्या २४ तारखेचा दिवस. ऐन मध्यान्हींच्या मुहूर्तावर सिमला येथील लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या दिवाणखान्यांतील व्यासपीठाच्या पाठीमागील दरवाज्यांतून, लष्करी पोषाखांतील एका पोक्त कनकवेत्रधाऱ्याने पुढे येऊन ‘धि ऑन. रेबल मिस्टर प्रेसिडेंट' अशी ललकारी दिल्यानंतर, पायांत पांढऱ्या चपल्या, डोक्यावर राखाड्या रंगाची केसाळ कानटोपी, अंगावर जाडेभरडें खादीचे अंगवस्त्र व त्याला शोभणारे नेसू असलेलें धोतर आणि या सर्वांच्या वरून पायघोळ असा काळसर पातळासारख्या कापडाचा मागेपुढे शेपट्या लोंबत असलेला झगा, अशा पेहेरावांत एक विचित्र व्यक्ति मंदगतीने प्रवेश करती झाली. पिंगट रंगाची लांब दाढी, डोळे पिचक्यांतलेच, शरीरकांतिहि पं. मोतीलाल नेहेरूं- च्या अगदी उलट आणि एकंदर स्वरूप पाहिले तर पत्त्यांच्या डावांतील जोकरसारखें किंवा सर्कशीतील विदूषकासारखें; तथापि ही टेंगणी व बावळीशी मूर्ति दिवाणखान्यांत दाखल होतांच सर्व सभासदांनी एकदम, विजेचे बटन दाबल्याप्रमाणे, उभे राहून तिला सन्मानपूर्वक खडी ताजीम दिली. त्या व्यक्तीनेही आदरपूर्वक उभ्याने किंचित् मान खाली लववून आपले सौजन्य व्यक्त केले व राजकीय दृष्टीने पवित्र मानलेल्या शेजारच्या उच्चासनास अनुलथून तसाच ४८ स्वभाव-चित्रे कुर्निसात केल्यासारखे करून ती त्यावर अधिष्ठित झाली. एकदांचा आपला मनुष्य असेंब्लीच्या अध्यक्षाच्या जागी जाऊन बसला, हे पाहून लोकनियुक्त सभासदांची अंतःकरणे प्रफुल्ल झाली. दिवाण बहादुर रंगाचार्य स्वयंवरांत हरले, आतां 'पदरी पडले आणि पवित्र झालें' असा विचार करून सरकारपक्षीय मंडळींची तोंडे साह. जिकच थोडी उतरली म्हणावयास हरकत नाही. आपल्या आगमनाने अशी क्रांति करणारी ही व्यक्ति तरी कोण असावी बरें ? ही व्यक्ति म्हणजेच हिंदुस्थानचे पहिले लोकनियुक्त 'मिस्टर स्पीकर' नाम- दार विठ्ठलभाई जव्हेरभाई पटेल ! ध्यान अंमळ वेंधळे तर खरेच; पण कर्तबगारी पहावी ती मात्र भारतवर्षाच्या सगळ्या राजकारणाच्या समुद्रांत विलक्षण खळबळ उडवून देणारी. कांहीं कांही प्रसंगी त्या प्रक्षोभाच्या लाटा विलायतेच्या व युरोपखंडाच्या किनाऱ्यावर देखील आदळून फुटल्या व त्यांचे तुषार तिकडे पसरले. विठ्ठलभाईच्या करणीची आठवण झाली, की कुंट्यांच्या 'राजा शिवाजी' काव्यांतील बहिर्जी नाइकाचे वर्णन मनांत उभे राहतें:- दिसे ठेंगणी मूर्ति ही बावळीशी; * जरी मानिती लोक हे रूप भोळे, तरी न्ह्याळती शत्रु ते तीव्र डोळे. हुशारीत ऐसा नसे अन्य कोणी, * कळे सर्व ज्याला कुठे काय चाले, कुठे बैसला, कोण तो काय बोले. घडे शत्रुलोकांत ज्याचा प्रवेश, करी रोज जो पाहिजे तोहि वेष. एखाद्या परीक्षकाने वरील उतारा प्रश्नपत्रिकेंत लिहून त्या वर्ण- , तथापि नामदार विठ्ठलभाई पटेल ४९ नास साजेल अशा एखाद्या विद्यमान पुरुषाचें नांव शिरोभागी लिहा असे सांगितले तर 'पटेलसाहेब' असे उत्तर कोणी दिले असता ते बहुतांशी अनुरूप होय, यांत संशय नाही. 'वेष असावा बावळा । परी अंतरीं नाना कळा' हे चरण देखील जसे कांहीं विठ्ठलभाईना उद्देशूनच स्फुरण पावलेले. संस्कृत सुभाषितकाराने लोकांस शिक- विले की, 'वासः प्रधानं खलु योग्यतायाः'। आणि शेक्सपीयरनें आपल्या एका प्रख्यात पात्राच्या मुखांतून व्यवहारज्ञान व अनुभव वदविला तो Apparel oft proclaims the man. विठ्ठलभाईनी ही सुभाषितें सर्वथैव खोटी पाडली, मग राजकारणां- तील इतरांची व स्वतःचीही काही सुभाषितें त्यांनी आपल्या काम- गिरीने व प्रत्यक्ष वर्तनाने धुडकावून दिली असल्यास काय नवल! कस्तूरीचे बाह्य रंगरूपही काळेबेंद्रेच नसते का ? लांबून पाहिली तर चिखलासारखी भासते; परंतु तिच्या परिमलगुणांपुढे सर्व सुगंधी द्रव्ये मात्र रद्द होत. नारदाची वस्त्रेप्रावणे अगदीं शक्य तितकी कमी साहित्यसामुग्री म्हटली तर एकुलता एक वीणा व फारच म्हटले तर त्याची जगत्प्रसिद्ध थोटकी शेंडी; पण त्याच्या कार्याचा प्रभाव तिन्ही लोकांत प्रसृत झालेला, त्याची वसति खास इंद्राच्या लोकांत जाईल तेथें तो सर्वांना सारखा पूज्य. विठ्ठलभाईची गोणपाटी खादी म्हणजे नारदमुनींची वस्त्रे, त्यांची दाढी म्हणजे यांची शेंडी, नारायण, नारायण' हे गूढार्थवाचक अहर्निश ऐकू येणारे आलाप म्हणजेच यांच्या वीण्याचा झंकार; आणि लोकपक्ष, निमसरकारपक्ष व सरकारपक्ष हे त्यांचे स्वर्ग, मृत्यु, पाताळ. नारद जसे मुनि तसे दाढीदीक्षित विठ्ठलभाईसुद्धां व्यवहारांत व राजकारणांत संन्यास- वृत्तीनेच कालक्रमण करणारे. इतकें साम्य असल्यावर, आमच्या विठ्ठलभाईची दोनदां असेंब्लीचे ते अध्यक्ष झाले तसे पुनःपुन्हा होण्यासाठी व भारतवर्षाच्या बाणेदार सेवेसाठी, राजकीय भुता- सभेत व ज्या . , ५० स्वभाव-चित्रे खेतांची व आल्यागेल्याची इडापीडा टळावी म्हणून भारतमाता मीठमोहऱ्यांनी दृष्ट का काढणार नाही व आपल्या या 'गुंड्या' पुत्राला 'शतौक्ष' लाभावें असें दिवसरात्र कां चिंतणार नाही ? खेडवळ पाटीदार जातीत जन्म; अत्यंत काबाडकष्ट करून बॅरि- स्टर पदवी प्राप्त केली; पण वकिलीच्या नात्याने पाहिले तर जवळ- जवळ आंवळ्याएवढें, किंवा कोहोळ्याएवढे म्हटले तरी आतिशयोक्ति नाही. पण शिक्षणक्रम संपल्यापासून त्यांच्या काळच्या राजकार- णाच्या आखाड्यांत फेरोजशहा मेथा, गोखले वगैरे वस्तादांच्या देख- रेखीखाली मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या इमारतींत पटेलसाहेब वाढलेले. उपजत आवडसुद्धा सार्वजनिक कामगिरीची विशेष आणि ती देखील सनदशीर सुसंघटित संस्थामार्फत. ले. अॅसेंब्लीचे अध्यक्ष निवडून आल्यावर पूर्वाध्यक्ष सर फ्रेडरिक व्हाईट यांच्या आभिनंदनपर भाषणाला त्यांनी आपल्या मोडक्यातोडक्या भाषेत व खडबडीत आवाजांत उत्तर दिले. त्यांत ते म्हणाले की, 'आपली उदारपणाची अधिकारवचने (रूलिंग्ज् ) वाचून असहकारितेचे कुंपण तोडून असेंब्लीत येऊन बसावे असे कित्येकदा माझ्या मनांत येई.' विठ्ठलभाई वस्तुतः या प्रकारच्या कामालाच जन्मतः अतिशय लायक. ते अध्यक्षाच्या महान् खुर्चीवर अध्यारूढ झाले त्यावेळी बहुतेकांच्या ओठांवरून योग्य मनुष्य योग्य स्थळी बसला, पाचूचा खडा सोन्याच्या अंगठींत शोभायमान झाला' असे तारीफवजा उद्गार आले ते फारच रास्त होत, हे काय लिहावयास पाहिजे ! पूर्वा- श्रमींच्या मुंबई कौन्सिलचे सभासद व ले. अॅसेंब्लीचे सभासद म्हणून त्यांनी जनतेची इतकी अलौकिक सेवा केली की, तिची बेरीज कोणाही एका आमदार-खासदाराच्या जमेपेक्षा अधिक भरेल. मुंबई कॉर्पोरेशनचे अध्यक्ष या दृष्टीने तर त्यांची काकदृष्टि युरो- पियनांकडून व अँग्लो-इंडियन लोकांकडून आणि वर्तमानपत्रांकडून नामदार विठ्ठलभाई पटेल देखील वाहवा झाली. एके काळी ते राष्ट्रीय सभेचे सर चिटणीस होते व सन १९१९ साली विलायतेत गेल्यावर काँग्रेसच्या शिष्ट- मंडळीचेही मंत्री होते; पण कोणत्याही नात्याने काम केले तरी तें असें चोख व निर्दोष असावयाचें की, डोळ्यांत तेल घालून पाहणारास सुद्धां फजीत व्हावें लागावें. स्वभाव निरलस व अंगेजणीने सतत उद्दिष्ट कार्य करण्याचा. मग सिद्धि त्यांस हमखास मिळावी हे योग्यच आहे. घरचा व्याप कांहीं नाहीं, मग संताप तरी कोठचा येणार ? मुंबईचे लॉर्ड मेयॉर होते तेव्हां देखील यांचा सरंजाम म्हणजे वांद्यास एका बंगल्यांत बेताबाताची जागा व एक बबी. लॉर्ड मेयॉरचे मग रूपांतर झाले 'मिस्टर स्पीकर' यांत. त्यांच्या मागोमाग भालदार-चोपदार, टंकयंत्रवाला, लघुलेखक, खाजगी चिट- णीस वगैरेंचा लवाजमा लागला. जेथे जावें तेथे हा आहेच. पटेल- साहेबांना हे सारे शुक्लकाष्ठासारखे वाटले व ते प्रथम विनोदानें उद्गारलेसुद्धा की, 'हे काय लचांड आहे बोवा !' आतांच असेंब्लीचें अध्यक्षपद प्राप्त झाल्यापासून स्वतंत्र सरकारी बंगला मिळाला म्हणून त्यांच्याकडे, कोठेही गेल्या तरी अगदी घरच्यासारख्या वागणाऱ्या सौ. सरोजिनी नायडू अगर म. गांधी किंवा बार्डोलीच्या चळवळीनंतर- प्रमाणे विश्रांतीसाठी त्यांचे भाऊ वल्लभभाई, व महादेवभाई देसाई यांच्यासारखे काय पाव्हणेरावळे येतील ते. एरवी त्यांचा बहुतेक परमार्थतः संन्याशाचा संसार. विठ्ठलभाईचे बाहेरचे रूप जितकें साधे व धोपटपणाचे दिसते तितकें त्यांचे अंतरंग नाही असे म्हणणे वावगे नाही. त्यांचे मन हे एक अलीकडच्या राजकारणातील कोडें आहे असे त्यांच्या चारित्र्याचे सूक्ष्म अवलोकन करणारास वाटते. मांजरपाठी कापड उभेआडवें पांढऱ्या सुताचें एकजिनसी एकरंगी असते तसें ज्ञान. सुलभ त्यांचे मन नाही. कापडाचीच उपमा द्यावयाची तर, ताप- , ५२. स्वभाव-चित्रे त्याची किंवा बुट्टीदार गर्भरेशमी कापडाची देणे युक्त होईल. एखाद्या कापडावर वरून नकशीचे छाप ठोकले तर ते उघड दिसतात व पाहणारास ओळखतांही येतात. पण एक सुती, एक रेशमी अशा धाग्यांचे सणंग असले म्हणजे ते विविध रंगाचे, मनोहर व स्पृह- णीय दिसते खरे; तथापि त्याचा रंग निश्चित सांगता येत नाही, त्याची विणकर दुर्बोध वाटते. घड्याळावरच्या तबकडीवरील काट्यांनी काळवेळ सांगतां येते, पोटांतील चक्रांची भानगड कांहीं उकलतां येत नाही. विठ्ठलभाईचे खरे व पक्के विचार काय आहेत, याचा थांग त्यांच्या वरकरणी बोलण्यावरून केव्हांच लागणे शक्य नसते. विचारांचे कृतीत पर्यवसान झाले म्हणजे मग त्यांच्या मागील विचा- रांचा ग्रंथ लावावयाचा. 'फलानुमेयाः प्रारंभाः' अशी त्यांच्या कार्याची पद्धति. पुष्कळ वेळां तर कृति व उक्ति यांत दोन ध्रुवां- इतका विरोध असल्याचा भास होतो. 'चित्ते वाचि क्रियायां च' एकरूपता हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. विठ्ठलभाईचे कौतुका. स्पद महनीयत्व त्यांची भाषा व कृति यांच्या विसंवादित्वांत सांठ- विलेले आहे. फारच कठिण प्रसंग आला म्हणजे 'नारायण, नारायण' या परमेश्वराच्या नांवाचा जप करून तो वारून न्यावयाचा. असहकारितेविषयी त्यांची मते काय होती व प्रस्तुत काय आहेत यांचा अद्यापि कोणास पत्ता लागला असेल तर शपथ. नागपूर सत्याग्रहाची परिस्थिति समक्ष अवलोकन करण्यास व शक्य तर त्याला पाठिंबा देण्यास ते आपले बंधु वल्लभभाई यांच्यासमवेत नाग- पुरास गेते. ते असहकारितेच्या वाढीचे दिवस. सर्व राष्ट्राचे डोळे त्यांच्याकडे लागलेले. अत्यंत अचंबा वाटणारी गोष्ट की, त्या राज- श्रींनी खुशाल गव्हर्नरसाहेबांच्या गांठीभेटी घेऊन सत्याग्रह थांबविला! राष्ट्रीय सभेच्या कायदेभंग-चौकशी-कमिटींत ते शिरले. तोंडांत असहकारिता व अंगावर खादी यांच्या साहाय्याने इतर सभासदांची nam नामदार विठ्ठलभाई पटेल मने पोखरून पोखरून कौन्सिल-प्रवेशास अनुकूल करून घेतली. स्वतः स्वारी कौन्सिलांत बसून 'सतत, सुसंगत व एकजात' सर- कारची अडवणूक करण्याच्या धोरणाचा पुरस्कार करणारी, किंब. हुना या शब्दयोजनेची जन्मदात्री; परंतु ले. असेंब्लीच्या अध्यक्ष- पदाकरितां निवडणूक होण्याची चिरापेक्षित संधि प्राप्त होतांच विठ्ठलभाई स्वतः उभे राहिले, सरकारी उमेदवार दि. ब. रंगाचार्य यांचा रंग त्यांनी फिका पाडला व अखेरीस दोन मतें अधिक मिळवून ते विजयी झाले; इतकेच नव्हे तर दिवाणगिय वगैरे सरकारी नोकऱ्या स्वराज्य-पक्षाने टाकून देण्याचा काँग्रेसमध्ये बूट निघाला तेव्हांदेखील 'तुम्ही वाटेल तो ठराव पास करा, मी अध्यक्ष- पदाचा राजीनामा देणार नाही.' असे त्यांनी साफ राष्ट्रीय समेच्या विषय-नियामक कमिटींत बजाविलें. ज्या जिभेने त्यांनी ' Uniform, continuous and consistent obstruction' 3r FaT/541- पक्षाचे कौन्सिलांतील धोरण बोलून दाखविलें त्याच जिभेने त्यांनी अध्यक्षाच्या खुर्चीवरून 'if my duty requirs me to do so, I will see the Viceroy ten times a day,' अशी ग्वाही बिन- धोकपणाने दिली. विठ्ठलभाईचे सारे जीवितच मुळी, श्रीधरकवीने हरिविजयांत कृष्णचरित्राचे वर्णन करतांना वारंवार जे मार्मिक शब्द योजले आहेत ते वापरावायचे म्हणजे, 'अघटित विंदानानें' ओत- प्रोत भरलेले. तेथे निवडानिवड कसली करावयाची ? त्यांच्या अंगी असा एक दुर्दम्य गुण आहे की, त्या योगाने विठ्ठलभाई कांहीही बोलले, कसेही वागले, तरी त्यांचे सर्वांस कौतु- कच वाटावे. त्यांची ओंगळ मुद्रा पाहिली तर हसू येते; पण तें दुष्ट नसते. त्यांचा धांद्रटपणा इतका की, अध्यक्षस्थानी निवड झाल्यावर असेंब्लीचे आभार मानण्यासाठी उभे राहिले व बोलण्याच्या ओघांत आपल्या उमेदवारीच्या पत्रकातील भावी धोरणाविषयींची काहीं स्वभाव-चित्रे वाक्य वाचून दाखवितों म्हणून खिसे चापसूं लागले तो तो कागद बंगल्यांतील टेबलावरच निघतांना विसरलेला! पण त्यांच्या या अव्यवस्थितपणाचे देखील कौतुकच वाटते. जरूर लागेल तर दहांदा व्हाइसरॉयसाहेबांकडे जाईन, असे त्यांनी स्पष्ट जाहीर केले तरी स्वराज्य-पक्षीयांनाच काय, कौन्सिल-बहिष्कारवादी लोकांनाही त्याचा राग येत नाही. त्यांच्या चारित्र्याला सर्वच गोष्टी शोभून दिसतात. कारण त्यांच्या शत्रूची देखील मनोमन अशी खात्री असते की, पटेलसाहेब जगाच्या पाठीवर कोठेही गेले तरी आपल्या राष्ट्री- यत्वाच्या व्रतास किंचिदपि बाध आणीत नाहीत. राजहंस गंगेच्या शुभ्र प्रवाहांत पडला काय, किंवा यमुनेच्या काळ्या पाण्यांत पोहला काय, त्याच्या मूळ स्वरूपांत फरक घडून येत नाहीं; त्याप्रमाणे विठ्ठलभाई पांढऱ्या लोकगंगेतच रममाण झाले काय अथवा सरकार- पक्षाच्या काळ्या पाण्यांत चिरकाल आंघोळ करीत बसले काय, हिंदुस्थानचे देशभक्त विठ्ठलभाई पटेल ते देशभक्त पटेलच ! एका अर्थाने अॅसेंब्लीचे अध्यक्षपद म्हणजे पक्षाभिनिवेशाच्या जलधींतील निर्लेप बेट; 'मी आतां कोणत्याच पक्षाचा नाही, मी आतां सर्व पक्षांचा आहे' असे विधान त्यांनी स्वतः केले. कबूळ, पण अॅसें. ब्लींतून ' वॉक आऊट' करून स्वराज्य पक्ष बाहेर निघून गेल्यावर 'बैठक तहकूब करीन' असे त्यांनी ठासून सांगितलें; व्हाइसरॉय- साहेबांस गुजराथच्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिति पाहण्या- करितां आणलें; मासिक उत्पन्नापैकी खर्चवेंच वजा जातां बाकी त्यांनी म. गांधींकडे पाठविली; गृहमंत्री मि. क्रेरर यांस नाक घांसा. वयास लावलें; उद्दाम 'टाइम्सच्या ' फाजील शहाण्या प्रतिनिधीला सपशेल पदर पसरावयास लावले; परवां पब्लिक अकाउंट्स् कमिटी' चा रिपोर्ट असेंब्लीपुढे चर्चेस येण्याचे बाबतीत त्यांनी लोक-पक्षाचा पुरस्कार करणारा निर्णय दिला; अगदी ताजी गोष्ट नामदार विठ्ठलभाई पटेल ५५ म्हणजे त्यांनी व्हाइसरॉयसाहेब, म. गांधी व पं. नेहरू यांना चहा पानाच्या निमित्ताने एकत्र आणले, आणि पब्लिक सेफ्टी बिलाचे बाबतींत सर्व जगास थक्क करून सोडणारें व क्षणभर सरकारचे डोळे पांढरे करणारें रूलिंग दिले. ही सारी कृत्ये देशभक्तीने व राष्ट्रीयत्वाच्या अभिमानाने रसरसलेली नाहीत असे कोण सुज्ञ मनुष्य म्हणावयाचे धाडस करील ? कोणी म्हणतात की, गनिमी काव्याने सरकारशी लढणारा हा युक्तिबाज वीर गेल्यामुळे लोक- पक्षाचे नुकसान झाले. स्वराज्य-पक्षाचे अध्वर्यु पं. मोतीलाल नेहरू व इतर मंडळी यांना विठ्ठलभाई ही एकाप्रकारें ब्यादच वाटे; सर- कारलाही यांच्या राजकारणी डाव-पेंचांची अंमळ भीतिच. दोन्ही पक्षांना ती एक खट. १९२६ सालच्या पहिल्या निवडणुकीचे वेळी सरकारने त्यांना विरोध केला, व पंडितजींनी देखील श्री. तात्यासाहेब केळकरांना उभे राहण्याबद्दल आग्रह गेला होता. अखेरीस दिवाण- बहादुर हरले, केळकर पहिल्यापासून उभेच राहिले नाहीत, विठ्ठल- भाई यशस्वी झाले व त्यांनी काम इतके सुंदर रीतीने केले की, सन १९२७ च्या जानेवारीत पुन्हा ते बिनविरोध अध्यक्ष झाले. स्वराज्य- पक्षांत राहून पं. मोतीलाल नेहरू व श्रीनिवास आयंगार यांच्या- मधील लाजिरवाण्या यादवीप्रमाणे परस्परांविरुद्ध कारवाई करीत बसण्याऐवजी अध्यक्षपदावर विराजमान होत्साते विठ्ठलभाई राष्ट्र- कार्याला जास्त उपकारक झाले खास. बायबलांत म्हटल्याप्रमाणे “ The stone which the builders refused is become the head-stone of the corner असा विचार उभयपक्षांच्या मनांत विठ्ठलभाईच्याविषयी एखा देवेळी देखील उत्स्फूर्त होत नसेल असें समजणे मानवी स्वभावाच्या अज्ञानाचे दर्शक होय. ही त्याग केलेल्या दगडाची उपमा विठ्ठलभाईना त्यांच्या बाहेरील अवतारामुळे समर्पकहि आहे. त्यांच्या स्वभावांत दगडासारखें काठिण्य ५१ स्वभाव-चित्रे व सडेतोडपणा आहे. कोणत्याही हत्याराची दगडाला पर्वा नाही, तद्वत् पटेलांपुढे कोणाचीही मातबरी नाही. बॅरिस्टर जयकर असोत, पं. मोतीलालजी असोत, व्हाइसरॉयसाहेब असोत, फार काय, खुद्द बादशहा असोत, त्यांचा निर्भीडपणा आपला कायम ! पटेल विला- यतेंत गेले तेव्हां मि. स्पीकर म्हणून ते शिरस्त्याप्रमाणे खाविंदांना मुजरा करावयास गेले. संभाषणप्रसंगांत बादशहा म्हणाले, 'तुमचें राजकारणबिजकारण माझें प्रधानमंडळ पाहून घेईल. मी तुम्हांला माझ्यापुरते विचारतों. राजपुत्र हिंदुस्थानांत गेले तेव्हां तुम्ही त्यांज- वर बहिष्कार घालण्यांत सिंहासनाचा उपमर्द नाही का केला ?' विठ्ठलभाईनी तत्क्षणी उत्तर दिले, 'बादशहा म्हणतात ते खरे; पण युवराजांना हिंदी जनतेने कोठे निमंत्रण दिले होते?' बादशहा कुंठित झाले. बाकी विठ्ठलभाईना देखील असलें शेरास सव्वाशेर उत्तर मिळण्याचा अनुभव पं. मोतीलालजींनी आणून दिला आहे. स्वराज्य-पक्षाच्या प्रारंभास थट्टेने पटेल नेहरूंना 'तुम्ही कौन्सिलांत जाऊन बसावयास भारी उल्लू (उतावीळ) झाला आहां' असें थोडे खिजविण्याकरितां बोलले होते. पंडितजी काही कमी नाहीत. पटेल अध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्यावर त्यांनी सर्व सभासदांस आपल्याशी हस्तांदोलन करण्यास पाचारण केले तेव्हां पंडितजींच्या पाळीच्या वेळी त्यांनी एकीकडे हातभेट करता करतां पटेलांच्या कर्णरंध्रांत आतां कसें आपण बडे उल्लू झालां बरें का' हे सूडाचे जळजळीत उद्गार ओतले. विनोदानें विनोदाचा संक्षेप उडाला. पं. मोतीलाल जसे थट्टेबाज तसे विठ्ठलभाई म्हणजे त्या गोष्टींत शंभर टक्के कोरडे पाषाण आहेत असे मात्र बिलकुल नाही. त्यांचा विनोद वागण्यांत व बोलण्यांत दृग्गोचर होतो. कोणाकडे जेवणास ते गेले की, पानांत पडेल तें उचलून लहान मुलासारखें तोंडांत टाकावयाचें; बाईमाणूस वाढण्यास आले-मग ती बाई दक्षिणी कां नामदार विठ्ठलभाई पटेल ६७ असेना-व पंक्तीत वाढूं लागले की विठ्ठलभाईनी 'एमने ना आपो' मने आपजो' असें फुस्कारून वाढणारीस भांबावून सोडलेंच व हशा पिकविलाच म्हणून समजावें. दुसऱ्यास नांवाने हाक मारतांना तत्सदृश दुसऱ्या एखाद्या चमत्कारिक नांवाने त्याला संबोधावयाचे अशी यांना जबरदस्त खोड. या संवयींत नेहमीच शुद्ध विनोद भरला असतो, खोंचदारपणा तिळमात्र नसतो असे नव्हे. 'अंतुकाका' म्हणण्याऐवजी विठ्ठलभाई उभ्या हयातीत चुकूनही 'अंत्यजकाका' म्हटल्याखेरीज राहिले नाहीत. 'बाबूराव गोखले' या अभिधानाला त्यांच्या विकृत नामकोशांत 'बबन गोखले' हा पर्याय शब्द सांप- डावयाचा. मद्रास इलाख्यांतील 'राजगोपाळाचार्य' वाजवर्वापेक्षा जास्त कृष्णवर्णी; म्हणून विठ्ठलभाई राष्ट्रीय सभेत देखील बेधडक 'कालीदास' या पदवीने त्यांचा उल्लेख करीत. असले 'ऑनर्स लिस्ट' एकट्या पटेलांचंच आहे असे नाही. लोकमान्य टिळक तर विठ्ठलभाईना 'पाटील ' म्हणावयाचे. कांहीं धोरण ठरविलें म्हणजे टिळकांनी विचारावें 'आमचा पाटील काय म्हणतो!' शंकाखोर व्यक्तीसंबंधी इंग्लिश भाषेत म्हण आहेच की, ' What will Mrs. Grundy say ?' टिळक नेहमी याच अर्थाने साभिप्राय असा प्रश्न करीत नसत; पण तो हेतु अजीबात नसेल असेंही नाही. वर्मवाक्य म्हणून आमच्या बापूजी अण्यांच्याही 'कर्नल सर हेन्री स्टॅनियन,' यांच्या भव्याकृतीवरून 'कर्नल सर हेन्री स्टॅलियन,' 'मौलवी महमद याकूब' यांच्या अपरिपक्क विचारपद्धतीवरून * मौलवी महंमद बेवकूब' वगैरे जीभ चावून केलेल्या कोट्या असेंब्लीच्या वातावरणांत कचित् फडफडतात. सुभाषित-विनोदांच्या क्षेत्रांत 'परिहासविजल्पितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः' अशी क्षमायुक्त विनंति करण्याची थोडीच गरज असते ! भ्रमराप्रमाणे, कांटेरी गुलाब असला तरी, रसास्वाद तेवढा घ्यावयाचा इतकेंच.

५८ स्वभाव-चित्रे - विठ्ठलभाईंच्या मनांत देखील क्षणभर हास्योत्पादन करावे, याच्या- पलीकडे कांहीं अनिर्मल उद्देश असेल असें अनुमान करणे प्रायः अन्यायाचे होय. अमृतांजनासारखा शीतल परिणाम करणारे विनोदाचे तुषार यांच्यापासून विरळ लाभणारे. कारण स्वभावाचे वास्तविक स्वरूप बहुतेक बाजूंनी बोचणारे एवढे निःसंशय. सिमल्याच्या डोंगरावर 'बींचूकाटी' या नावाची एक वनस्पति पुष्कळ उगवलेली असते. सहज चालतांना ती पायाला लागली म्हणजे विंचू डसल्यासारख्या सर्वांगाला वेदना व्हावयाच्या. विठ्ठलभाई, ज्याच्याशी संघर्षण झाले त्याला असें सळो का पळो व्हावयाचे. खालमाने पण विलक्षण पाताळयंत्री, मूकस्तंभ पण पक्के आंतल्या गांठीचे, असे विठ्ठलभाई असल्याकारणानें कोणाशी त्यांचे बनत नाहींसें झालें म्हणजे त्यांनी आपली घटका भरली असें निखालस मानावें. बाहेरून कांहीं दिसा- वयाचें नाहीं, भडभड कधी बोलणार नाहीत; परंतु आंतील पीळ मात्र कधी न सुटणारा व डंख न विस्मरण पावणारा. निवडणुकी लढविण्यांत किंवा अन्य कोणतें कार्य घडवून आणण्यांत त्यांचे मन व मेंदू गिरमिटाप्रमाणे चालतात. या गुणावगुणांमुळे पक्षसंघटनेंत, नेतृत्वांत, किंवा दुसऱ्या कसल्या मोठ्या सांघिक कार्यात ते फारसे उपयोगी पडत नाहीत. भिन्नभिन्न कर्तबगारीची व गुणांची माणसे एकत्र जमवून त्यांना आपल्या अंगच्या शक्तीने, आपल्या तेजस्वितेने, आपल्या मनौदार्याने व आपल्या अजिंक्य युक्तिबाजपणाने राष्ट्र- कार्यास जुंपण्याचे सामर्थ्य त्यांना नाही. उलट बिब्बा अंगावर उतेल म्हणून जो तो त्याच्यापासून दूरच सरतो; औषधाकरितां म्हणून जेव्हां जरूर पडेल तेव्हांच त्याच्याजवळ जावयाचे. विठ्ठलभाईचे वैशिष्टय हे की, त्यांच्या गुणदोषसमुच्चयाचा मारा आपल्या लोकांवर होतो त्याच्यापेक्षा दसपट अधिक जोराने सरकार-पक्षावर होतो.

नामदार विठ्ठलभाई पटेल ५९ . आणि तो समुच्चय त्यांच्या स्वप्नांत देखील राष्ट्रहितास विघातक होईल अशा रीतीने आपला प्रभाव गाजवीत नाहीत. एवंगुणविशिष्ट गृहस्थाला देशकार्य करण्यास असेंब्लीच्या अध्यक्षपदाखेरीज दुसरी नाक्याची जागा मिळणे शक्य नव्हते. चित्रकाराला जसा फलक, लेखकाला जशी लेखणी, व्यापाऱ्याला जसा तराजू , त्याप्रमाणे विठ्ठलभाईना 'मिस्टर स्पीकर' त्व आवडते. आणि मग 'नक्रः स्वस्थानमासाद्य गजेंद्रमपि कर्षति' असा यांचा पराक्रम बादशहांना निर्भयपणे निरुत्तर करूं शकतो व गृहमंत्र्यांना आपल्या खुर्चीसमोर क्षमस्व' म्हणून साष्टांग प्रणिपात घालावयास लावतो. हे स्थान म्हणजे यांचे जणु काय ईश्वरदत्त कार्यक्षेत्र. आजकाल पंडित मोतीलाल व पंडित जवाहरलाल या पिता- पुत्रांची अद्वितीय जोडी भारतवर्षाच्या राजकारणाच्या नभोरूपी चांदव्याला रविचंद्राप्रमाणे लटकत आहे, त्याप्रमाणे नामदार विठ्ठल- भाई व सरदार वल्लभभाई हे बंधुद्वय त्याच सुरेख छताला गुरु- शुक्रांच्या ताऱ्यांप्रमाणे आपल्या तेजोवलयांनी शोभिवंत करीत आहे. इंग्लंडमधील कॉमन्स सभेत एकेक गृहस्थ दहा-दहा वर्षे अध्यक्ष. स्थानी नियुक्त झालेले आहेत. १८५७ सालापासून आतापर्यंत फक्त चार पुरुष 'मिस्टर स्पीकर' झाले आहेत. व्हायकाउंट अल्सवॉटर यांनी तर सोळा वर्षे गादी सांभाळिली. विठ्ठलभाईना देखील असें सुदैव लाभावे व त्यांच्या नैसर्गिक कार्यक्षमतेचा आणि बाणेदार लोकसेवेचा हिंदुस्थानाला पुरेपुर फायदा मिळावा अशी परमेशाची प्रार्थना करणे, नवीन निवडणुकी जवळ येऊ लागल्याकारणानें, समुचित नाही असे कोण म्हणेल ? भ्रातृयुगुल असावें तर पटेलबंधूं- सारखें, रामायणांतील रामलक्ष्मणासारखें, पेशवाईतील बाजीराव- चिमणाजीआप्पांसारखें. लोकनियुक्त कायदे-मंडळाचा अध्यक्ष कसा असावा ? नामदार व्ही. जे. पटेल यांच्यासारखा. बाकी सगळे अध्य ?

स्वभाव-चित्रे क्षच. मासा बारा महिने तेरा काळ पाण्यांत राहतो, साप वारा खातो, मेंढा पाल्यावर जगतो, चातक नुसत्या पाण्यावर उदरनिर्वाह करतो, उंदीर सदैव गुहेत राहतो, गर्दभाच्या अंगाला नेहमी राख फांसलेली असते, बगळा ध्यानस्थ बसतो, म्हणून या सर्वांना कांहीं तपश्चर्येचें फळ प्राप्त होत नाहीं; तसें केवळ स्वतांच्या नशिबाने व हिंदुस्थानाच्या कमनशीबानें अगर सरकारच्या कारवाईमुळे व लोक- प्रतिनिधींच्या अपस्वार्थी लाळघोटेपणामुळे ज्यांना इतर छोट्या-मोठ्या कायदे-मंडळांचे अध्यक्षपद मिळाले आहे ते जवळजवळ खुर्चीचे मालक. विठ्ठलभाईंची सर इतरांना येणे म्हणजे फारच मुष्कील. विठ्ठलभाई, आपणांस उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य असो. नारायण, नारायण नारायण'!!

श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर
कस्याऽस्ति कोऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके।
ख्याति प्रयाति न हि सर्वविदस्तु सर्वे ।।
कि केतकी फलति किं पनसः सपुष्पः।
किं नागवल्लयऽपिच पुष्पफलैरुपेता॥
सुभाषित
फार कशाला, मी तुम्हांला खरे सांगू का, शहाण्णव साली
मी जो 'केसरी-मराठ्या' ला येऊन मिळालों तो देखील खूप
लिहावयाची हौस
म्हणून !" एकदां सहज चार स्नेही-मंडळी
गप्पा-गोष्टी सांगत असतांना तात्यासाहेब केळकरांनी हे आपले
हृद्गत बोलून दाखविलें; आणि खरोखरीच ते वस्तुस्थितीस सर्वस्वी
धरूनही आहे. त्यांची लिहावयाची हौस किती म्हणून वर्णन
करावी ? त्यांच्यासारखे जबरदस्त लेखक तेच. मध्यरात्री झोपेतून
उठवून अग्रलेख लिहून पाहिजे म्हणून मागणी केली तरी सुद्धां
देतील ! किंबहुना, दादाभाई नौरोजी वारले तेव्हां असाच प्रसंग
आला देखील होता म्हणतात. त्यांना स्वप्ने पडत असतील ती
बहुधा लेखनाचींच असतील! त्यांचा एकंदर लेखन-प्रपंच पाहिला
म्हणजे अनभिज्ञांस काय, पण खुद्द त्यांच्या समव्यवसायी बंधूंसही
वाटावे की, त्यांच्या शरीरांत मानवी रक्त अभिसरण पावत आहे
किंवा निळी काळी शाई सळसळत आहे ! हाताची बोटें नसून
टांक आहेत की काय ? डोके नसून विचारवैभव व शब्दसंपत्ति
उत्पादन करण्याचा अखंड चालू असणारा कारखाना आहे की

स्वभाव-चित्रे या काय ? कोणाला लेखनकार्यास एकांतवास लागतो, कोणी अगदी ठराविक वेळी स्फूर्ति येईल तेव्हांच लिहूं शकतो, कोणाला ओळ ओढण्यापूर्वी तासचे तास मुद्दे काढण्यांत, कच्चा खर्डा तयार कर- ण्यांत, त्याची 'फेअर कॉपी' करण्यांत घालवावे लागतात; परंतु कांहीही लिहावयाचे म्हटले म्हणजे, आगीच्या बंबाप्रमाणे, हे आपले सदैव सज्ज! मग तो 'केसरी' चा अगर 'मराठ्या' चा अग्रलेख असो, एखादी स्फुट सूचना असो, दिल्ली-सिमल्याचे बातमीपत्र असो, कविता असो, गोष्ट असो, नाटकांतील प्रवेश असो, प्रस्तावना असो, किंवा एखादें साधे पत्र असो. जवळ कोणी लिहिण्यास मनुष्य असो वा नसो. असला तर त्याला सांगावयाचे, नाही तर स्वतःच हाताने लिहावयाचे. तीन डझन वर्षांच्या सतत व्यासंगाने इतके सगळे बसून गेलें आहे की, त्यांनी तोंडाने काही सांगितले तरी तें उत्कृष्टच उतरावयाचे. 'यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवंति शास्त्राणि' न्यायाने त्यांनी जे बोलावे तोच अग्रलेख, अशी स्थिति सांप्रत प्राप्त झालेली आहे. सोमवारीच सकाळी एकदम 'टाईम्स' मध्ये अभावित. पणाने अग्रलेख लिहिण्यास योग्य असा विषय उपस्थित व्हावा; घारीच्या नजरेनें चटकन् आपणास काय मुद्दा पाहिजे तो त्यांतून हेरून, अग्रलेख सांगण्यास सुरवात व्हावयाची, खोलीत इकडून तिकडे फेऱ्या घालतां घालतां दोन तासांत काम संपून जावयाचे. जशी फोनोग्राफची प्लेट लावून द्यावी तशी रीत. मध्यंतरी कोणी काही विचारावयास आले तरी संगति तुटत नाही, प्रतिभा गारठत नाहीं, विचार-परंपरा नष्ट होत नाही, विनोदाचा रंग फिका पडत नाहीं, उपमा, दाखले, अवतरणे वगैरेंना खळ पडत नाही. बरें, आश्चर्य हे की, लेखन कसेही लिहिले तरी सर्व बाजूंनी नामांकित असावयाचे. सामान्य पत्राचे उत्तर धाडले तरी त्यांत देखील वाङ्मय-विलास असावयाचा; मग अधिक महत्वाच्या लिखा- श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर ६३ णांत तो असल्यास काय नवल ? त्यांच्याइतके सुंदर, मधुर व सर्वो- गीण वाड्मय मराठींत कोणीच निर्माण केले नाही असे म्हटले तरी त्यांत बिलकूल अतिशयोक्ति नाही. एखादा तज्ज्ञ आपल्या आवडीच्या विषयांत खेळत असतो तसे ते लेखनांत रमतात व रंगतात. उत्तर- हिंदुस्थानी गवयाने स्वर जसे कांहीं श्रोतृवृंदांत गळ्यांतून बाहेर काढून सोडून द्यावे, बड्या जवाहिल्याने श्रीमंत व गुलजार गिहा- इकापुढे आपल्या कपाटांतील सोन्या-मोत्यांचे, जडावाचे दागदागिने मांडावे, सुरतेच्या, काशीच्या अथवा मदुरा-कोइमतूरच्या जरीच्या व्यापाऱ्याने आपली जरतारी बुट्टीदार शालजोड्या, पैठण्या वगैरे सणंगें भराभर घड्या मोडून विकत घेणारासमोर पसरून ठेवावी, तद्वत् त्यांच्या लेखनांत वाचकांसाठी शृंगार-साज इत्यादि बहुमोल जिन्नसांची भरपूर पखरण केलेली असावयाची. भाषा परिपक्क, शब्द समर्पक, विवेचन सुश्लिष्ट, विनोद गंभीर, टीका प्रयोजक, आदि- अंत परिणामकारक, मथळा मार्मिक. त्यांचा लेख वाचूं लागले म्हणजे ऐश्वर्यशाली राजवाड्याच्या फलपुष्पसंभाराने सुशोभित केलेल्या नंदनवनांतील सुगंधित वायुलहरींनी आंदोलित होणाऱ्या उद्यानांत बसल्याचा भास व्हावा. वाक्यपद्धति अशी प्रगल्भ, प्रौढ व गंभीर की जणुं खानदानी कुळांतील टोपपदरी इरकली लुगडे परिधान केलेली, पायांत पुणेरी जोडा असणारी, समग्रभूषणा अशी पुरंध्रीच. सरदारी थाट आहे, पण आधुनिक सुशिक्षित तरुणींचा पोकळ व नटवा छचोरपणा नाहीं; सौंदर्य आहे, पण त्यांचे उत्तान प्रदर्शन नाहीं; विद्वत्ता आहे, पण अवडंबर नाही. त्यांच्या बरोबरीचे लेखक व संपादक महाराष्ट्रांत थोडे का होईना, होऊन गेले व कांहीं आहेतही. त्या लेखकांच्या लेखनांतील जोश व नाट्यावेग तात्या. साहेबांच्या लेखनांत सांपडणार नाही, वक्रोक्ति सांपडणार नाही हे खरे; तथापि जगन्नाथ पंडिताचें 'मृद्वीकामध्यनिर्यन्मसृणरझरीमाधुरी' स्वभाव-चित्रे हे विशेषण लावावयाचे त्यांच्याच वाणीला व लेखणीला. आणि- Who left scarcely any style of writing untouched, And touched nothing that he did not adorn,' हे जॉनसनने केलेलें गोल्डस्मिथचे गोड व कौतुकाचे वर्णन अक्षरशः कोणास लागू पडत असेल तर त्यांनाच. लिहिण्याप्रमाणे बोलणेही चित्ताकर्षक, सुलभ, व्यवहारज्ञ, ऐक- णारास पटण्यासारखें. नाटकी आविर्भाव, भावनांचा प्रकर्ष, हृत्प्रक्षोभ- कारक वक्तृत्व, असला कांही प्रकार त्यांच्या भाषणांत नसावयाचा. परंतु ते अत्यंत विचारपरिप्लुत असावयाचे. त्यांत प्रतिपाद्य विषयाचे पापुद्रे काढून काढून तो पूर्णपणे उघड व स्पष्ट केलेला असावयाचा. त्यांत उदाहरणे, अलंकार, इत्यादिकांचा मसाला घातलेला असा- वयाचा; जरूर तेथे टीकेची फोडणी दिलेली असावयाची; कचित्- प्रसंगी झणझणीत मोहरीही लावलेली असावयाची ! 'कांही असले तरी लोकांना ते आवडते व पसंत पडते. आतां पुष्कळ वेळी असें दिसते की, विचार पिंजतां पिंजतां खाली विशेष कांहींच उरत नाहीं; विषयाचे पृथक्करण इतकें परिपूर्ण व्हावयाचें कीं, ग्राह्य अव- शिष्ट भाग फारच थोडा राहावयाचा. परंतु लोकांपुढे विषयाचे उद्घाटन उत्तम व्हावयाचें व मोठमोठाल्या दुकानांत 'शो रूम' मध्ये माल जसा जनतेच्या आवडीनिवडीकरितां मांडलेला असतो, त्याप्रमाणे अनुभवी विवेकीपणाने विचार-वैजयंतीमधील मणि सुटे- सुटे करून दाखवावयाचे. ज्याने त्याने आपापली अभिरुचि चालवावी व त्याग-स्वीकार काय करावयाचा असेल तो स्वखुषीने करावा. ही त्यांची प्रथा. मात्र जे सांगावयाचें तें समयोचितपणाने व निर्भीडपणाने सांगावयाचें. अर्थात् वयोमानाप्रमाणे स्वभावांत नैसर्गिक क्रान्ति हावयाची ती झाली असल्याकारणाने किंचित् चिडखोरपणा उत्पन्न झाला आहे हे निःसंशय! व तो जसा लेखनांत तसा भाषणांत श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर अगदी अलीकडे प्रसंगोपात्त दृग्गोचर होतो. पण मूळ स्वभावांत तो नसल्याकारणानें कोणी त्याचा फारसा विषाद मानीत नाही. क्षुल्लक कारणावरून किंवा एकादे वेळेस कारण नसतांना देखील एकदम रागाने वरच्या मजल्याचे बोलावयाचें; फारशी जरूर नसली तरी सहज पंडित मोतीलाल नेहरू किंवा दुसरे कोणी केव्हांचे तरी विरोधी असतील त्यांस टोमणा द्यावयाचा, असे त्यांचे हातून घडतें. परंतु हे सर्व आगंतुक आहे हे जाणून क्षणिक वाईट वाटल्यावर तें मनांतून नाहींसें होतें. जात्या ते कल्याण प्रकृति आहेत यांत काडीमात्र शंका नाही. सहसा कोणाचे नुकसान करावें ही बुद्धिच अजिबात नाही. कोणीही केव्हाही भेटावयास आले तरी भेटावें, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावें व काय सल्ला द्यावयाचा असेल तो अत्यंत सद्बुद्धीने द्यावा. दुपारच्या अडीच वाजेपर्यंतच्या आवडीच्या वामकुक्षीच्या वेळी कोणी जागे केले तरी हरकत नसावयाची. असें आहे म्हणून हजार व्यव- साय त्यांच्या मागे नको नको म्हणतां चिकटतात. विमा कंपनी आहे, पैसाफंड आहे, सहकारी बँक आहे, शारदोपासक संमेलन आहे, शिक्षण प्रसारक मंडळी आहे, आतां आणखी डेक्कन एज्यु- केशन सोसायटी आहे, आयुर्वेदीय रुग्णालय आहे, संगीत परिषद् आहे, रायगड स्मारक आहे; काय नाही म्हणून लिहावें ? त्यांची कार्य पार पाडण्याची कुशलता अशी की, या सर्व संस्थांचा संसार चालू करून द्यावयाचा व तत्परतेने आपणांस जेवढी मदत करतां येईल तेवढी सदैव करीत रहावयाचें. कोणी खाजगी सल्ला घेण्यास आला तरी स्वतःस योग्य वाटेल तो सल्ला स्पष्टपणे द्यावयाचा. कोणी पत्राने काही मागणी केली तरी ती शक्य असेल तर द्यावयाची, नसेल तर नाही. परंतु त्याला ताबडतोब उत्तर हे जावयाचेच. मनाचा थोरपणा इतका की, एखादी चळवळ आपणास सर्वस्वीं स्वभाव-चित्रे मान्य नसली तरी तिलाही, ती केवळ राष्ट्रीयत्वास पोषक म्हणून, हातभार लावावयाचा. एक ना दोन. त्यांचे उद्योग बहुशाखी व अनंत. हल्ली 'केसरी' चे संपादकत्व सोडले व राजकारणातून वान- प्रस्थाश्रम घेतल्यासारखें केले असले तरी त्यांच्या व्यापाचें चक्र चालूच आहे. एवढ्या खटाटोपांत देखील गृहकृत्यांतील दक्षता आहेच. घरबांधणी पहाण्याची जिज्ञासा अति तीव्र व आपल्या घरांत दुरुस्ती करण्याची इच्छाही अनिवार. लॉइड जॉर्ज आपल्या क्रिसीथ गांवीं बटाटे लावतात म्हणतात. चर्चिल तर गवंड्याचे काम करतात. व्हायकाउंट ग्रे आपल्या वाड्याभोंवतीं बागबगीच्या लावीत. तात्यासाहेबांना घरदुरुस्तीचा, बसावयाची जागा इकडून तिकडे वारंवार बदलण्याचा हव्यास दांडगा. मधून मधून सर्वसंमत व सर्व. संमानित अशा रूढीच्या विरुद्ध मुद्दाम वागावयाचे. व हे अगदी साध्या बाबीपासून तो थेट धार्मिक व राजकीय बाबीपर्यंत. लोक वेळेस एक कप चहा पितात तर त्यांना दीड कप लागतोच व ही त्यांची संवय त्यांच्या मित्रांना आपापसांतील चेष्टेचा विषय होऊन बसली आहे. लोक वडिलांचे श्राद्ध करतात, तर ते वडिलांच्या तिथीस कथा करवितात. 'केसरी' गंभीर राजकीय मतप्रसारासाठी आहे ! मग त्यांत ते जाणूनबुजून ‘रजःकण' अथवा गोष्टी प्रसिद्ध करणारच. या प्रकारचा थोडा आग्रहीपणा आहे. आणि मन तर इतकें चंचल की, मनांत गोष्ट आली म्हणजे ती अविलंबाने झालीच पाहिजे. त्यांचे मन शारीरिक गतीप्रमाणे फार वेगाने काम करीत असलें पाहिजे असे दिसते. कारण जसें एका कल्पनेवरून दुसरीवर त्यांचे मन उडी मारतें तसें पुस्तकांचेही. ते इतक्या लवकर लवकर पुस्तकें वाचतात की, प्राकृत जनास अचंबा वाटतो. वाळलेल्या गवतांत जसा अग्नि, त्याचप्रमाणे ग्रंथालयांत त्यांचे मन. तेच सांगतात की, पूर्वीच्या काळी राजकारण थोडे स्थिर असतांना, दुपारी अकरा - श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर वाजतां हपीसांत यावें व पांच वाजेपर्यंत वाङमयक्षेत्रांत चरत बसावें. टिळकांच्या व जिनसीवाल्यांच्या लायब्ररीतील एखादें पुस्तक काढून पहावें तो त्यांच्या खाणाखुणा पानांवर हटकून सांपडावयाच्याच. अजूनही केव्हां मुंबईस गेले की, अनेक कामांपैकी 'रॉयल एशि- याटिक' मध्ये जावयाचे व 'तारापूरवाल्या' कडे जावयाचे ही दोन खास असावयाचीच. फार काय, कोठेही चांगले पुस्तक वा मासिक दिसलें म्हणजे त्यांनी आपल्या हँडबॅगमध्ये घालून, घरी नेऊन, वाचलेंच म्हणून खुशाल समजावे. कामाशिवाय दुसऱ्याच्या घराची पायरी चढावयाचे नाहीत; दुसरा आपणाकडे चालून आल्यास त्याचे काम झाल्यावर एक निमिष स्वस्थ न बसतां किंवा निवळ गप्पा न मारतां, बाहेर जावयाचे असेल तर कोट, पगडी घालून तयारी करतील; अगर घरीच दुसरें काम असेल तर तें करूं लागतील; पण वेळ वायां जाऊ देणार नाहीत. दिल्ली-सिमल्यास अॅसेंब्लीसाठी गेले असले तरी हीच तन्हा. आवश्यक झाल्याशिवाय आपली खोली सोडून दुसऱ्याच्या खोलीत कदापि पाऊल टाकावयाचे नाहीत. स्वतः वाचीत तरी असावयाचे, नाही तर कोणी आगाशे वगैरे चिटणीस नेला असेल त्याला कशावर तरी लेख सांगत असा- वयाचें; अथवा एखादें भाषण डिक्टेट करीत असावयाचे. हा सतत- चा देखावा पाहूनच दत्तोपंत वेळवींनी कंटाळावें व चेष्टेने विचा- काय तात्यासाहेब, रात्रंदिवस गणपतिबोवासारखे समोर उंदीर घेऊन बसतां बोवा!" त्यांचे सहाध्यायी कॉलेजांतल्या त्यांच्या वागणुकीचे असेंच वर्णन मजेने करतात. आज तरी काय, सटीसामाशी तात्यासाहेब मेहेंदळ्यां- कडे किंवा वाटेवर जातां येतां अण्णासाहेब भोपटकरांकडे वळतील तेवढेच. बाकी, आपलें घर व हपीस वरें आणि आपण बरे. त्यांच्या या स्वभावाचे निरीक्षण केलें म्हणजे बायरननें- रावें, .

६८ स्वभाव-चित्रे Exhausting thought, And hiving wisdom with each studious year, असें गिबनचे चित्र काढले आहे त्याची आठवण झाल्यावांचून रहात नाही. Puratar मनाच्या चंचलत्वाबरोबर मृदुलत्वही अतिशय आहे. बाह्य परि- स्थितीचा परिणाम तत्क्षणीं प्रतिबिंबित होतो. वाईट बातमी कानीं आली म्हणजे खेदाची छटा चेहेऱ्यावर दिसावी. वात्रट पत्रांतून गैरवाजघी टीका आल्याचे त्यांना कोणी सांगितले म्हणजे अंत:- करणाला वेदना झाल्यासारखें स्पष्ट दिसावें. मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणजे निराशेची भावना त्यांच्या तोंडावरून पाहाणाराने अनुमानित करावी. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद्वदंति कवयस्तदलीकम् । अन्यदेहविलसत्परितापात्सजनो द्रवति नो नवनीतम् ॥ असा कवीने व्यतिरेकालंकार केला आहे; परंतु तात्यासाहेबांचे मन असें नाजूक आहे की, स्वतःच्या तापाने विरघळते व दुसऱ्याच्या तापाने पण विरघळते. काही महिन्यांपूर्वी सदाशिवपेठेतील लिमयां- च्या टाईप-रायटिंग रूममध्ये लहानशी सभा त्यांच्याच सन्मानार्थ भरली होती. टिळकांचा व आपला दीर्घकालीन संबंध व नाना- त-हेच्या अडचणी वगैरे इतिहासाचे त्यांना कथाप्रसंगांत स्मरण झाले आणि कंठ एकदम इतका दाटून आला की, त्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रु उभे राहिले; दर्शन चिंताजड झाले व वाचा फुटेनाशी झाली ! परवां देशमुखांच्या वाड्यांत बालचरांचे खेळ झाले. समारंभ आटोपून मंडळी परत जातां जातां, उदईक सकाळी सोलापूरच्या चार लोकांना फाशी देणार, ही निश्चित बातमी येरवड्यास त्यांना भेटून आलेल्या एका गृहस्थाने सांगितली. बातमी कानी पडतांच त्यांनी कपाळाला हात लावून "नशीब' असे निराशेचे उद्गार श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर ६९ काढले व बाहेर पडले ते तडक घरीच गेले! व्यक्तीचे काय किंवा जनसमुदायाचे काय, नेहमी हित व्हावें ही त्यांच्या दया अंत:- करणाची मनीषा. म्हणून तर त्यांनी मुळशीच्या शेतकऱ्यांना बदला जमिनी मिळाव्या यासाठी हळहळून प्रयत्न केले. तुरुंगांत गेलेल्या अमक्या गृहस्थाला गाडीला जुंपले होते, तमक्याला तोंडावर पोतें घालून मारले, अशा हकीगती त्यांना सांगू लागलें म्हणजे त्यांना इतका गहिंवर यावा की त्यांनी, 'हे कांही मला सहन करवत नाही' असें म्हणून तो विषयच टाळावा. 'सर्वेऽपि सुखिनः संतु सर्वे संतु निरामयाः,' सगळीकडे शांतता अविच्छिन्नपणे वास करावी, सर्वानी स्वतंत्रपणे परंतु कर्तव्यनिष्ठेने आपली कामगिरी करीत रहावें, स्वयं- स्फूर्तीने होईल तेवढा स्वार्थत्याग ज्याने त्याने करावा, राष्ट्रकार्यरूपी नामदेवाच्या पालखीस स्वसामर्थ्यानुसार प्रत्येकाने हात लावावा, कोणी कोणास भरीस घालू नये, ज्याला जे रुचेल, पचेल व सुचेल तें तो करीतच असतो, या स्वरूपाची त्यांची व्यवहारज्ञतेची व अनुभवसिद्ध अशी मनोभूमिका. एका टोकांस राष्ट्रस्वातंत्र्य व दुसऱ्या टोंकास गृहव्यवस्था, एका टोकास परमार्थ व दुसऱ्या टोंकास स्वार्थ ही दोन्ही सांभाळावयाची हे त्यांचे ब्रीद. वर्थनें चंडोल पक्ष्याच्या काव्यांत त्याचा स्वभाव-विशेष या हृदयंगम शब्दांत वर्णिला आहे- “A privacy of glorious light is thine, Whence thou dost pour upon the world a flood Of harmony, with instinct more divine; Type of the wise, who soar, but never roam- True to the kindred points of Heaven and Home. जरूर त्या फरकाने तात्यासाहेबांचे धोरणही या धूर्त शब्दांत दिग्द- र्शित केल्याप्रमाणे असते असे म्हटले तर तें रास्तच होय. " स्वभाव-चित्रं हे धोरण त्यांच्या वर्तनांत व कृतींत प्रतिबिंबित होते. मनच आरशाप्रमाणे शुद्ध व स्वच्छ, मग त्यांतून आंतील क्रिया-प्रक्रिया उघड दिसावी हे साहजिकच होय. लहान मुलगा असला तरी तेंच किंवा अखिलभारतीय लोकाग्रणी असला तरी तेंच. आरशाचा धर्मच तो. स्वभावाचा व घरगुती राहणीचा साधेपणा कोणी बडा पाहुणा आला तरी बदलावयाचा नाही. विशेष समारंभ असला तरी पोपाख रोजचा साधा असेल तोच कायम. कडक उन्हाळा असला की, सदऱ्याशिवाय नुसताच बंद गळ्याचा कोट घालावयाचा; खिशांत घड्याळ असावयाचें तें किल्ली वेळेवर न दिल्याकारणाने बहुधा बंद असावयाचें; फाउंटन पेन असले तरी ते रिकामें असा- वयाचे व त्यांत शाई भरतां येत नसावयाची. हा जो एक जुन्या जमान्यांतील स्वाभाविक साधेपणा तोच सार्वजनिक बाबतींतही दृष्टोत्पत्तीस येतो. बोलण्या-चालण्यांत लपंडाव, कुटिलपणा अगर एक हात काकडी नऊ हात बी' असा प्रकार केव्हाही नसा- वयाचा. कोणत्याही प्रश्नाचा निकाल करावयाचा तो अगदी निःपक्ष- पातीपणानें, धारवाडी कांट्याने तोलून करावयाचा; व या न्यायी- पणाबद्दल इतकी सार्वत्रिक ख्याति की, खाजगी तंटे पंचायतीने तोडण्याचे त्यांच्याकडे येऊन पडावयाचे. येथील कॉसमॉस सोसा- यटीमध्ये मतभेद उत्पन्न झाले आहेत ? तात्यासाहेबांना अॅड्व्हायसरी कौन्सिलवर घ्या व तडजोड प्रस्थापित करून घ्या. व्यापारांतील भागीदारीत भांडण झाले आहे ? तात्यासाहेबांना, वादी-प्रतिवादींनी राजीनामा देऊन, लवाद नेमा. भावाभावांत वांटणी करावयाची आहे ? चला तात्यासाहेबांकडे कागदपत्र घेऊन. फार कशाला ? असे सांगतात की, त्यांच्या समतोलपणाबद्दल व निर्विकारीपणाबद्दल सरकार-दरबारी देखील इतका विश्वास वाटतो की, एकच उदाहरण द्यावयाचे म्हणजे १९२५ सालच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या पहिल्या श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर लोकनियुक्त अध्यक्षाच्या निवडणुकीच्या वेळचें. विठ्ठलभाई पटेल व टी. रंगाचार्य हे उमेदवार होते. सरकारची व सभासदांची इच्छा अशी की, कॉमन्स सभेप्रमाणे निवडणूक बिनविरोध व्हावी. पण 'नृपति-जनपदांना' प्रिय व मान्य होण्यासारखा असा अस्सल लोकप्रतिनिधि कोण ? सर्वांच्या तोंडी तात्यासाहेबांचे नांव. अर्थात् पुढे हे घडलें नाहीं हे वेगळे. त्यांचा या थोर गुणांचा टिळकांनी चांगलाच उपयोग करून घेतला व त्यांनीही तो फार प्रामाणिकपणाने, मनोभावाने व निष्ठेनें करून दिला. टिळकांच्या तुरुंगवासांत या त्यांच्या संबंधांत विने उपस्थित झाली, नाहीं असें नाहीं; पण तात्यासाहेबांची उदारमन- स्कता व टिळकांच्याविषयी त्यांचा अत्यंत आपलेपणा यांच्यामुळे त्या अडचणी नाहीशा झाल्या. टिळकांच्या राजकीय कामागरीत तात्यासाहेबांचा भाग किती व कोणत्या प्रकारचा हे काळ ठरवीलच. दैवयोग मात्र असा विचित्र की, १९२० सालानंतर हे सारे पालटले. 'वैयक्तिक गुण ते सार्वजनिक चारित्र्यांत दुर्गुण' ठरतात हे खरें असेल म्हणा, ड्रायडनने म्हटल्याप्रमाणे- · Art thou a statesman And canst not be a hypocrite ? हे विधान बरोबर असेल म्हणा, किंवा इमर्सनच्या सिद्धान्ताप्रमाणे To be great is to be misunderstood, हे यथार्थ असेल म्हणा, त्यांच्या गुणांचे चीज होईनासे झाले. त्यांच्या मतांविषयीं गैरसमज पसरूं लागला. परिस्थितीस कलाटणी देण्याच्या कार्यात दुटप्पीपणा पदरीं आला. त्यांचा अचूक दूरदर्शीपणा विश्वासघात ठरला. निर्भीडपणास व स्पष्टवक्तेपणास भित्रेपणाची पदवी मिळाली. कर्तव्यतत्परतेस स्वार्थीपणाचे रूप प्राप्त झाले. गंगालहरींतील श्लोका प्रमाणे 'गुणानामेवायं तवः जननि दोषः परिणतः' अशी स्थिति ७२ स्वभाव-चित्रे उत्पन्न झाली. विरोधाच्या व प्रच्छन्नशत्रुत्वाच्या वावटळीवर वावटळी उठल्या; पण त्यांनी आपली स्थितप्रज्ञता यत्किंचित् ढळू दिली नाही. विपारी टीकेने देखील त्यांस आपल्या मार्गापासून च्युत केले नाही. टिळकांच्या पाठीमागे दहा वर्षे 'केसरी-मराठा' संस्था, अनपेक्षित व नाजुक अडचणींस तोंड देऊन टिकविली, एवढेच नव्हे तर महा- राष्ट्रांत अनन्यसाधारण उत्कर्षाप्रत नेली. परंतु दुरतिक्रम स्वभाव व दुर्निवार परिस्थिति यांचा झगडा सुरू होण्याची आपत्ति आली म्हणजे परिणाम या तव्हेचा व्हावा हे नेसर्गिक होय. तथापि ज्याचा जो ईश्वरदत्त गुणधर्म तो अप्रतिहत रीतीने प्रतीत व्हावयाचा हे निश्चित. केवड्याला फळे येणार नाहीत; पण त्याचा मोहक सुगंध कोण हिरावून घेणार ? फणसाच्या वृक्षावर सुवासिक फुलें बहरणार नाहीत, पण त्याचे फळांचे पीक कोण कमी करणार ? नागवेलीला तर फळही नाही व फूलही नाही; पण ती निरुपयोगी थोडीच आहे ? साऱ्या हिंदुस्थानभर काय परंतु विलायतेतही 'एक धिम्मा व प्रशान्त मुत्सद्दी' म्हणून त्यांची ख्याति आहे. टेनिसनने आपल्या सुप्रसिद्ध खंडकाव्यांत- Who knew the seasons when to take Occasion by the hand and make The bounds of freedom wider yet,' अशा राजकारणी पुरुषांचे वर्णन केले आहे ते जसे कांहीं तात्या- साहेबांच्या मनोवृत्तीच्या मुत्सद्दयांचे. त्यांच्या अंगी टिळकांची लोको- त्तर धडाडी नाहीं, महात्मा गांधींचा पराकाष्ठेचा निग्रह नाहीं, पंडित मोतीलाल नेहरूंची युक्तिबाज मुत्सद्देगिरी नाहीं, पंडित मदनमोहन मालवीयांची दैवी संपद् नाहीं, श्री. विठ्ठलभाई पटेल यांचा अज्ञेय कावेबाजपणा नाहीं, श्री. वल्लभभाई पटेल यांचा एकमार्गीपणा नाहीं, श्री. गंगाधरराव देशपांडे यांची भावनावशता नाही, पंडित जवाहर- श्रीयुत नरसिंह चिंतामण केळकर ७३ लाल नेहरूंची युद्धप्रियता नाहीं, बाबू सुभाषचंद्र बोस यांचा ध्येय- वाद नाही. परंतु मौज अशी की, असे असूनही यांपैकी प्रत्येकास तात्यासाहेबांविषयी आदर वाटतो, व तात्यासाहेबांस या प्रत्येका- विषयी आदर वाटतो. याचे कारण तात्यासाहेबांपाशी जो असाधारण गुणसमुच्चय वास करतो तो कोणाच्याही जवळ नाही, हे जसें वस्तु. स्थितीस धरून, तसेंच यांच्यापैकी प्रत्येकाचा जो शिरोधार्य व परा कोटीस गेलेला गुणविशेष तो आपल्या अंगी नाही, याची जाणीव हेही सत्यपूर्ण. अशी परस्पर मनोमन ओळख असल्यावर कोणापुढे झाले तरी- नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कदापि कृथाः । अत्यंतसरसहृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि ॥ या अन्योक्तीची उजळणी कशास हवी ? तात्यासाहेबांपुढे तर सुतरां नको. कारण त्यांच्यासारखा रसिक, विद्वान्, निगर्वी, दूरदर्शी, सम- यज्ञ, अष्टपैलू, व्यवहारी, सरस्वतीकंठाभरण साहित्यशिरोमणि व राष्ट्रसेवक महाराष्ट्रांत तर कोणीच नाही आणि बाहेरील हिंदु- स्थानांतही विरळाच सांपडेल. परमेश्वर करो आणि सांप्रत उदयगूढ अशी अधिक अनुकूल व प्रसन्न परिस्थिति हिंदी राजकारणांत अव. तीर्ण होऊन, तात्यासाहेबांच्या अंगचे अभिजात गुण मायभूमीला वाढत्या प्रमाणांत उपयोगी होवोत म्हणजे झालें !

श्री. नरसिंह चिंतामण केळकर " The social, friendly, honest man, whatever he be, " . Tis he fulfils great Nature's plan, And none but he, Burns. 'संपादकानां केळकरोऽस्मि.' भगवान् श्रीकृष्णाने गीतेच्या दहाव्या अध्यायांत स्वतःचे वर्णन करतांना मी आदित्यांपैकी विष्णु, नक्षत्रांमध्ये चंद्र, देवांत इंद्र, वृक्षांत अश्वत्थ, गंधर्वात चित्ररथ, पक्ष्यांत गरुड, पांडवांत अर्जुन, मुनींत व्यास, असे सांगितले. भगवंताचा आजच्या काळांत अवतार झाला व असेंच वर्णन करण्याचा प्रसंग आला तर त्याने खरोखरच 'संपादकानां केळकरोऽस्मि' असा एक चरण गीतेतील वर्णनांत घातला असता. तात्यासाहेबांची त्या धंद्यां- तील श्रेष्ठता आहेहि तशीच. ते जसे कांहीं जन्मजात संपादकच. शाळा-कॉलेजांत असतांना काय लेखन केलें तें सोडून देऊ. परंतु १८९६ साली ते केसरी-मराठ्याला येऊन मिळाले तेव्हांपासून चालू घटकेपर्यंत त्यांचे लेखनकार्य चालूच आहे. सतत ३६ वर्षे संपादक म्हणून लेखनव्यवसाय करीत असलेला पुरुष विरळाच सांपडावयाचा. लेखनाचा त्यांना कंटाळा असा कधीच येत नाही. तोंडी सांगितलेलें टिपून घेण्यास कोणी मनुष्य असला म्हणजे बरेचसे इकडून तिकडे फेऱ्या घालीत व कांहीं खुर्चीवर पडून, असे त्यांचे अखंड काम चाललेले असावयाचें. लिहिणाराची बोटें दुखू लागावी, टाकाचे टोंक झिजावें, दौतींतील शाई संपत यावी, बरोबर आणलेले लिहाव- श्री. नरसिंह चिंतामण केळकर ७५ याचे कागद खलास व्हावे, पण त्यांच्या जिभेला उसंत नाहीं व डोक्यांत घोळत असणा-या विचारांना अंत नाही. केसरी-मराठ्याचे चार-पांच कॉलम लेख लिहावयाचा म्हणजे त्यांच्या हातचा मळ. हे कांहींच नाही. लो. टिळक निवर्तल्यावर त्यांनी पुण्यास येऊन टिळकांच्या आजारीपणाची हकीकत सांगून लिहविली व त्यांच्यावरच एक अग्रलेख लिहिला तो तर लेखन-क्षेत्रांतील अग्रगण्य पराक्रमच होय. आदल्या रात्री अकरा वाजेपर्यंत घरीं व दुसऱ्या दिवशी ऑफि- सांत सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांच्या मुखांतून वाक्यांची संततधार सारखी वहात होती. बरें, संपादक एकट्या केसरी-मराठ्यांतच होते असे नव्हे. टिळकांनी विलायतेंत ' इंडिया' पत्र आपल्याकडे घेऊन चालविण्याचे ठरविले. पण संपा- दक कोण ? टिळकांनी म्हटले, 'तात्यासाहेब, तुम्ही व्हा.' अर्थात् तात्यासाहेबांची तयारी होतीच. मिसेस वेझंटबाईना एकाएकी अटक झाल्याकारणाने त्यांचा 'न्यू इंडिया' अडचणीत आला. ते पत्र चालविण्यास तात्यासाहेब मद्रासलाहि गेले. याला म्हणावें खरा हौशी व उपजत संपादक! तुलना करणे अंमळ गैर खरे; तथापि साधारणपणे त्यांच्या बरो- बरीचे मद्रासचे ए. रंगस्वामी अय्यंगार अगर अलाहाबादचे सी. वाय. चिंतामणी किंवा मुंबईचे कृष्णाजीपंत खाडीलकर घेतले काय, हे एकमार्गी लेखक दिसतात. केळकरांच्या लेखनाच्या टांग्याला इंग्रजी व मराठी असे दोन घोडे जुंपलेले. आणि त्यांचा टांगा वर्तमान- पत्राच्या धोपट मार्गानेच केवळ जातो असें नाही, तर चरित्रग्रंथ, नाटके, काव्य, प्रस्तावना, इतिहास, गोष्टी, राजकारण, अर्थशास्त्र वगैरे अनेक लहानमोठ्या रस्त्यांनी सहज जाऊ शकतो. रंगस्वामींनी, एका केळीला एकच घड यावा, त्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेवर एकच ग्रंथ निर्माण केलेला आहे. कृष्णाजीपंतांच्या नाट्यप्रतिभेच्या ७६ स्वभाव-चित्रे वेलीला आलेला घोंस तर रससंपन्न आहेच आहे. पण तात्यासाहेबां- च्या लेखनाच्या उद्योगाने विस्तीर्ण असा बागच तयार होऊन राहिला आहे आणि त्यांत नानाप्रकारची फळांची व फुलांची झाडे आपल्या सौंदर्याचे व माधुर्याचे वातावरण सुगंधित करीत आहेत. त्यांनी मराठी भाषेला विलक्षण सौष्ठव प्राप्त करून दिले आहे. अगोदरच त्यांचे विचार स्पष्ट व स्वतंत्र, त्यांत ते प्रदार्शत करण्यास भापाहि सोन्यामोत्याचे दागिने ल्यालेली. मग काय ? मुली उखाणे घेतात त्याप्रमाणे 'किनखापाची गादी, त्यावर भरगच्ची लोड' अगर 'चांदीच्या वाटीत केशराचा गोळा' अशी त्यांच्या साऱ्या लेखांची स्थिति. जे लेखनाचे गुण तेच भाषणाचे. घशाच्या विकारा- मुळे व्याख्यान अस्खलित होऊच शकत नाही. पण ते खाजगी संभाषणासारखें व विचारपरिप्लत असावयाचे. ते इतके की, सभा संपून शिवाजी मंदिरांतून घरोघर जातांना लोक बोलतात देखील की, केळकर बोलले म्हणजे सभा कशाविषयीं झाली व प्रस्तुत विचार काय आहे हे बरोबर कळतें. आतां हे खरें की, हिरव्यागार गवतांत चालत असतां मध्येच एकादा कांटा बोचावा त्याप्रमाणे त्यांच्या राजकीय लेखनांत किंवा भाषणांत कोणा प्रतिपक्षीयांना कचित् चिमटा घेतलेला असावयाचा. पण तो केवळ प्रतियोगी म्हणून व तोहि मोठ्या खुबीदार व मार्मिक शब्दांत. त्यांनी नाटकावरील टीकेच्या रूपाने असहकारितावाद्यांना दिलेला घरचा अहेर कोण विसरेल ? तसेंच, त्यांनी शिवाजी-मंदिरांत राष्ट्रीय शिक्षणासंबंधींच्या एका व्याख्यानांत दिलेली 'ताडीच्या रिकाम्या पिंपावर लावलेल्या ताडाच्या झाडांच्या फांदी' ची उपमा आठवली म्हणजे तो सभेचा प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर उभा राहणारच. तद्वत् स्वभाव जरी मूळचा अत्यंत गोडवा असला, तरी खाजगी वादविवादांत काय अथवा जाहीर सभेत काय, कोटीला श्री. नरसिंह चिंतामण केळकर ७७ प्रतिकोटि करण्यांत किंवा हजरजबाबीपणांत ते काही कमी नाहींत. देशबंधु दास एकदां सहज चेष्टेने परंतु गर्भित अधिक्षेपाने म्हणाले की, मराठ्यांनीच तर राज्य गमावले. तेथल्या तेथेच केळकरांनी त्यांना बजावलें, 'अहो दासबाबू, तुम्ही म्हणतां तें सर्वस्वी खरें; पण तुम्ही हे विसरलां की, गमावण्यास तरी मराठ्यांचे राज्य होतें म्हणूनच गमावले की नाही ? ' दुसऱ्या वेळी असेंच एकदां मौ. शौकतअल्लींनी 'पानपत लक्षात आहे ना' असा सवाल केला होता. तेव्हां केळकरांनी तडकाफडकी उलट ठासून विचारले, 'रोहिल्यांना विसरलांत की काय ?" राजकारणाच्या व सामान्यतः सार्वजनिक कार्याच्या धकाधकीत हे प्रकार चालावयाचेच. एरवी त्यांचा स्वभाव म्हणजे काय सांगावा? शांतिप्रियता, सौजन्य, उद्यमशीलता व सदिच्छा यांचे जसें माहेरच. चळवळीचा धबडगा मनापासून नको. १९०८ साली ते बोलतांना एका व-हाडच्या पुढाऱ्याजवळ म्हणाले, 'I am at my best in peace times ' ते तंतोतंत व खरेखुरे आत्मवर्णन. बैठकीवर बसून एखाद्या विषयाची सांगोपांग चर्चा करण्यांत ते फारच निपुण. त्यांची बुद्धि पृथक्करणप्रधान दिसते. तिची ग्राहकताहि विशेष आहे. कारण त्यांचे वाचनांतील व लेखनांतील द्रुतगतित्व पाहिले म्हणजे सामान्य माणूस स्तंभित होतो. 'न खलु धीमतामविषयो नाम' असें म्हणतात तें कांहीं खोटें नाही. कारण त्यांची बुद्धि सर्व विषयांत अकुंठित रीतीने चालते; टिळकांचे विशाल चरित्र सांगते, मराठे व इंग्रज यांच्याशी संभाषण व वादविवाद करूं शकते, तोतयाचे बंड घडवून आणते, कृष्णार्जुनांचे युद्ध लढविते, इतिहासांत विहार करते, संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन करते, नवरदेवांची जोडगोळी सोडते, मौजेचे चार प्रहर घालविते, राज्यशास्त्रांत अवगाहन करते. मग ती वाचनालयांत नेहमी चरत असेल यांत काय नवल ? यथातथ्य स्वभाव-चित्रे संपादक म्हटला म्हणजे त्याला लायब्ररीची व संदर्भाच्या व्यवस्थेची अमूप आवडही सहज असावयाची. सांप्रत सर्वोत्कृष्ट वाचनालय व ग्रंथसंग्रहालय केसरी-मराठा संस्थेत करण्याची त्यांची हौस पाहिली म्हणजे या बाबतीत त्यांची मनीषा किती तीव्र आहे हे पटते. स्वतःच्या देखरेखीखाली दिवाणखाना बांधून घेऊन, कपाटे मागवून, पुस्तकें-अहवाल यांची व्यवस्था लावून लायब्ररी बनविण्याचे काम आज चालू आहे. त्याच्यासाठी निरनिराळ्या सरकारी व इतर पुस्त- कांचे कॅटलॉग मागवावयाचे, लायब्रेरिअन कसा असावा, त्याचे कर्तव्य काय या विषयांची इंग्रजी पुस्तकें आणावयाची, एक स्वतंत्र मनुष्य नेमावयाचा व महत्त्वाकांक्षा सफल करून घ्यावयाची. अशी तत्परता केवळ लायब्ररीपुरतीच असें नाहीं. कोणतेंहि काम करा- वयाचे म्हणजे, ते लहान असो वा मोठे असो, त्यांना धीर नाही. क्षुल्लक पत्र का असेना, त्याला तत्काळ उत्तर गेलेच पाहिजे. मोठी मोठी कामें योग्य तव्हेनें व निरलसतेने त्यांनी पार पाडावी हे कमप्राप्तच होय. आणि या कामांची उंच वाढणारी श्रेणी केवढी म्हणून सांगावें ? केसरी-मराठा संस्थेचे संचालक, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सभासद, म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष, शिक्षणप्रसारक मंडळी व डेक्कन एज्यु- केशन सोसायटी यांच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, सहकारी पत- पेढीचे अध्यक्ष, रायगड स्मारकाचे चिटणीस, टिळक-स्मारक मंदिराचे ट्रस्टी वगैरे वगैरे अनेक नात्यांनी ते काम करतात. टिळक हयात असतांना तर पुसूच नये. ताईमहाराजांचे खटले, औरंगाबादच्या साक्षी, त्यांतच दोन्ही वर्तमानपत्रे. तात्यासाहेबांच्या सारखा कामाचा उरक असणारा मनुष्य होता म्हणून सर्व कांहीं निर्विघ्नपणे सिद्धीस गेलें व संस्थेला हे दिवस लाभले. मौज अशी की, अशा अठरा कारखान्यांचे काम करीत असतांना त्रासिकपणा नसावयाचा. व्यग्र " श्री. नरसिंह चिंतामण केळकर ७९ असतांना सुद्धा कोणीही यावें, मोजक्या शब्दांत आपले काम सांगावे. त्यांनी होय, नाहीं, काय असेल ते म्हणावे व पुनः गाडा चालूच. मात्र वायफळ बडबडीची चीड फार. स्वतःला गप्पाष्टके मारावयास नकोत व दुसऱ्यांनी मारून वेळ घ्यावा हेहि नको, कोणी भेटावयास यायचे म्हणजे, इतर बड्या पुढाऱ्यांप्रमाणे 'व्हिजिटिंग कार्ड' नको, 'अपॉइंटमेंट' करावयास नको. हा जसा खाजगी व सार्वजनिक कामांत वागण्याचा साधेपणा प्रशंस- नीय तशी त्यांच्या मनाची ऋजुताही कौतुकास्पद आहे. पहिल्या प्रथमच त्यांच्या मनांत वांकडे कधी येत नाही. विरोधकांची बाजू अगोदर समजून घ्यावयाची; मग स्वतःच्या बाजूविषयी गैर- समज पसरेना, त्याची फारशी क्षिति बाळगावयाची नाही. मनाच्या उजूपणासारखा पोषाखांत व खाण्यापिण्यांतहि अगदी कमालीचा साधेपणा. कळीचा सदरा, धोतर आंखूड असले तरी हरकत नाही, कोट, उपरणे व पगडी. खिशांत रुमाल बहुधा नसावयाचा. कप- ड्यांत ऐट नको व जेवणांतहि बडेजाव नको. मोठ्यांत मोठे व्यसन म्हटलें म्हणजे वामकुक्षी, भुईमुगाचे दाणे व चहा. गमतीखातर पंक्तीस भोजनास बसले म्हणजे साधारणपणे अशा मेजवानांचे प्रसंगी घरांत नसणारा जिन्नस काय मागतील तेवढाच. अशा प्रकारच्या त्यांच्या गोड स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय व आदरणीय वाटतात. त्यांची मते ज्यांना पटतात, त्यांना तर ते हवेसे वाटावे हे योग्यच. पण त्यांच्याशी न जुळणाऱ्या लोकांत सुद्धा त्यांच्याविषयी पूज्यबुद्धि दिसून येते. हल्लीच्या राष्ट्रीय सभेच्या दृष्टीने त्यांची राजकीय मतें सौम्य भासतात हे नाकबूल करता येत नाही. पण वाटतें तें प्रांजळपणाने, निर्भीडपणाने ते पुढे मांडतात हे विशेष. म्हणून तर परवांच्या पुण्याच्या सभेत अमुक मार्गाने चालू लढा मिटावा असे त्यांनी प्रतिपादन केले. आणि ह्या त्यांच्या राष्ट्रीयत्वास ८० स्वभाव-चित्र पोषक पण स्वतंत्र विचारांबद्दल व सरळपणाबद्दल सगळ्या हिंदु- स्थानभर त्यांची कीर्ति झाली आहे. देशबंधु दास यांना त्यांच्या- विषयी धन्यता वाटे. दिल्लीस काँग्रेसचे जादा अधिवेशन मौ. अबुल कलम अझाद यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. केळकर वगैरे महा- राष्ट्रीय मंडळी दासबाबू उतरले होते तेथें प्रातःकाळी गेली. दासबाबू निजले होते ते खडबडून उठले व त्यांनी बंगाली प्रतिनिधींना बस- ण्यास खुर्ध्या आणण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी मजेनें विलायतें- तील एक गोष्ट सांगितली की, एकदा एका मोठ्या मनुष्याचा सन्मान करण्यासाठी त्याला दोन खुर्व्या देण्यात आल्या व केळकरांना तसेंच करण्याविषयी त्यांनी विनोदाने सुचविले. पण विनोदांतील अंतर्निष्ठ भावना उघड होती. पं. मोतीलाल नेहरू हेहि त्यांचे मन कलुषित होईपर्यंत तात्यासाहेबांना उच्च लेखीत. दिल्ली-सिमल्यास ते काही दिवस परकेपणाने 'केळकर' म्हणण्याचे सोडून देऊन प्रेमाने 'तात्यासाहेब' असेंहि संबोधू लागले होते. महात्मा गांधींना तर त्यांच्याविषयी काय वाटते ते त्यांनी अहमदाबादच्या राष्ट्रीय सभेत जाहीर रीतीने बोलूनच दाखविले. नामदार शास्त्री त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करतात; जयकरांना ते आपल्या येथे यावेत असे वाटते; फार काय न्यायमूर्ति मडगांवकर पण त्यांना भेटू चाह- तात! सर्वांचे चांगले व्हावें, निसर्गसृष्टीप्रमाणे जिकडे तिकडे शांततेचे साम्राज्य असावे, प्रत्येकाने आपले कर्तव्य आपली मर्यादा जाणून करावें, सर्वांनी व्यवहार सांभाळावा व सर्वांनी सदिच्छेनें, परोपकारबुद्धीने मगदुराप्रमाणे लोकसेवा करीत राहावे अशी त्यांची प्रायः सदैव वृत्ति असते. शिरोभागी असलेल्या बर्सच्या कवितेतील निसर्गाची योजना म्हणजे याच स्वरूपाची. असे गुण तात्यासाहेबांच्या ठायीं आहेत म्हणून तर आज छत्तीस वर्षे एके ठिकाणी ते ठाण मांडून आहेत. नाही तर काय, टिळ.

श्री. नरसिंह चिंतामण केळकर कांच्या संस्थेत कित्येक लोक आले आणि गेले तसेच त्यांचेंहि होतें. पण त्यांच्या स्वतःच्या अंगचे अनेक गुण व खुद्द टिळकांना त्यांची जाणीव असा योग जुळल्यावर, सर्व कठिण प्रसंगांतून सुखरूप निभावून ते स्थिरासन झाले व आपल्या आयुष्याच्या उंबरठ्यावर असतांच त्यांनी जे लोकसेवेचे व्रत स्वीकारलें तें आज वयास साठ वर्षे पुरी झाली तरी यौवन-सुलभ उत्साहाने व अनाळशी पद्धतीने ते करीत राहिले आहेत. ते राजकारणी असून सरस्वतीचे लाडके उपासक आहेत; लोकाग्रणी असून सर्वांना दर्शनसुलभ आहेत; कर्तबगार असून निरहंकारी आहेत; विद्वान् असून विनयशील आहेत; देशभक्त असून मितभाषी आहेत; रसिक असून सदभिरुचिसंपन्न आहेत. यांपैकी एखादा गुण मनुष्याच्या अंगी वास करीत असेल तरीहि तो प्रिय व मान्य होतो. मग हे सारे गुण ज्यांच्या ठिकाणी एकवटले त्यांची भारतवर्षांत तारीफ व्हावी व सर्वांनी त्यांच्या एक- सष्टाव्या वाढदिवढानिमित्त त्यांचा सत्कार करावा आणि अभीष्ट चिंता हे मनुष्यस्वभावास अनुरूपच आहे. त्यांच्या राजकीय मतांच्या सौम्यपणामुळे त्यांच्या अंगच्या इतर गुणांचीहि व्हावी तेवढी चहा नाही. पण त्यायोगे त्यांच्या लोकोत्तरत्वाला मुळीच कमीपणा येत होत नाही. गोल्डस्मिथने लिहिल्याप्रमाणे- “As some tall cliff that lifts its awful form Sivells from the vale and midway leaves the storm, Though round its breast the rolling clouds are spread, Eternal sunshine settles on its head. अशीच वस्तुतः त्यांचीहि स्थिति आहे. मतभेदाचे वारे मधल्या- मधेच घोंघावत राहतात. ढग काही कालाने नष्ट होऊन जातात. शेवटी सूर्यप्रकाश मात्र पर्वताच्या शिखरावर दैदीप्यमान होऊन राहतो. राष्ट्रीय सभेच्या राजकारणांत ते अध्यक्षपदाजवळ जाऊन " स्वभाव-चित्रे मागे पडले हे कबूल केले, तरी त्यांच्या अंगच्या गुणसमुच्चयाचें माहात्म्य कोण हिरावू शकणार ? त्यांचें तेज चमकल्याशिवाय राहणे शक्य नाही. असे आहे म्हणूनच सुभाषितकाराने विचारलें, विधाता रागावला तर हंसाचा कमलवनविलास तो नाहींसा करील; पण त्याच्या दुग्धजलभेदाविषयी असलेल्या वैदग्यकीर्तीचा अपहार कर- ण्यास कोण समर्थ होणार! या सर्व त्यांच्या अलौकिक गुणांचा प्रभाव हिंदी राजकारणांत पडो व त्यांचा उपयोग विद्यमान प्रक्षुब्ध वातावरण शांत करण्याकडे होवो, एवढेच त्यांच्या षष्टयब्दिपूर्तीच्या शुभप्रसंगानें चिंतितों.

८ श्री. मुकुंदराव जयकर “ He was a scholar, and a ripe and good one; Exceeding wise, fair-spoken, and persuading; Lofty and sour to them that loved him not, But to those men that sought him sweet as summer. -Shakespeare. आज नऊ वर्षे होऊन गेली. त्या वेळी ना. हेवर्ड मुंबई सरकारचे गृहमंत्री होते. मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये कायदे मंडळाची बैठक चालू होती. बाबासाहेब जयकर स्वराज्यपक्षाचे अध्व! होते. ते व हेवर्डसाहेब समोरासमोर बसत. हेवर्डसाहेब बोलत असतां चुकून जयकरांना Leader of the Opposition असे म्हणण्याऐवजी Leader of the House असें बोलून गेले. सर्व सभासद हंसले. चूक तेव्हांच लक्षात आली. परंतु I am only anticipating असें म्हणून हेवर्डसाहेबांनी वेळ मारून नेली. मागें तात्यासाहेब केळ- करांचे नव्हते कां असेंच झालें ? Consistency is the virtue of an ass असे विधान करण्याऐवजी त्यांच्या तोंडून Consistency is the ass of a virtue असे शब्द निघून गेले. त्यांचेही त्यांनी समर्थन केले. व ते बरोबर होतेंही. बाबासाहेबांची तेव्हांपासूनची आजतागायत कामगिरी पाहिली तर हेवर्डसाहेबांची ती भविष्यवाणी तर नव्हती ना, असा विचार मनास चटकन् बंदुकीच्या गोळी- सारखा चाटून जातो. नवीन राज्यघटनेत जयकर, सप्रू वगैरे कोण होणार याची स्वप्नेही कित्येकांना पडूं लागली असली तरी त्यांत चावगें असें नाहीं. योग्य माणूस योग्य स्थळी बसावा, याहून अधिक स्वभाव-चित्रे समाधानाची दुसरी कोणती गोष्ट असणार ? सोन्याच्या अंगठति हिरकणी असावी, चांदीच्या वाटींत केशराचे गंध असावें, फुलदाणीत गुलाबांचा गुच्छ असावा, आणि बाबासाहेबांसारखा सद्गृहस्थ राज्यघटनेत उच्चासनावर कायदे-पंडित म्हणून, प्रधानमंत्री म्हणून, अध्यक्ष म्हणून किंवा परराष्ट्रांतील प्रतिनिधि म्हणून विराजमान व्हावा म्हणजे अगदीं औचित्य शिगेस आले म्हटले तरी चालेल. त्यांच्यासारख्या सुखी, संपन्न, मानी, शांतिप्रिय, लाडांत वाढलेल्या, हळव्या व अत्यंत सुसंस्कृत विद्वानाने राजकारणाच्या मामल्यांत पडावें हेच खरोखर कौतुक. बालपणी व तरुण वयांत आईबापांनी व आजोबांनी चोज केले तसे मोठेपणी जनतेने कोडकौतुक करावें इतकेंच. कोणाही मातबर व नेकीच्या माणसाकडून होईल तितकी कामगिरी जमेस धरणे हेच श्रेयस्कर व कृतज्ञपणाचे द्योतक. जें त्याच्याकडून झाले नाही किंवा जे त्याच्याकरवी व्हावे असा ईश्वरी संकेतच नव्हता त्याच्याबद्दल खेद करीत बसणे, मनाला हुरहूर लावून घेणे आणि त्या व्यक्तीला दूषण देणें समंजसपणाचें व व्यव- हारीपणाचे लक्षण नव्हे. बाबासाहेब शूर आहेत, कृतविद्य आहेत; पण त्यांचे शौर्य व त्यांची विद्या शांततेच्या काळांतील युद्धांतच केवळ उपयोगी पडणारी. एवढे मात्र त्यांच्या शत्रूला देखील कबूल केले पाहिजे की, या कामांत कुचराई म्हणून काडीमात्र व्हावयाची नाही. १९२४-२५ साली मुंबई कौन्सिलांत स्वराज्य पक्षाचे पुढारी म्हणून कर्तबगारी गाजविली ती निःसंशय स्तुतिपात्र होती. त्यांचे अंगी अनेक आकर्षक गुण असल्याकारणाने स्वराज्य पक्षाच्या बाहे- रील सभासद सुद्धा आपण होऊन त्यांना येऊन मिळावयाचे. पुढे अकोल्यास प्रतियोगी सहकारिता पक्ष स्थापन झाला तेव्हां तर त्याची मुंबईत, बंगाल्यांत, मद्रासकडे व महाराष्ट्रांत संघटना कर- ण्याची त्यांनी अविश्रांत मेहेनत घेतली. व ती कोठपासून, तर पक्षाचा श्री. मुकुंदराव जयकर RanAml ANAMAAN जाहीरनामा तयार करण्यापासून. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत निवडून गेले. तेथे सर्वसामान्य राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व त्यांचेकडेच आले. तिन्ही गोलमेज परिषदांतून त्यांनी सर तेजबहादुर सप्रू यांच्या सह- कार्याने चांगलेच भरीव कार्य केलें हें नाकबूल करता येणार नाही. युनिव्हर्सिटीच्या मतदार संघामार्फत निवडणुकीस उमेदवार उभे राहिले की दक्षिण कानडा जिल्ह्यापासून थरपारकरपर्यंत प्रवास कर- ण्याचा कंटाळा करणार नाहीत. पत्राची उत्तरें नियमितपणे पाठ- विण्यास विसरणार नाहीत. तज्ज्ञ लघुलेखक बरोबर घेऊन, स्वतः- बरोबर पहिल्या वर्गाच्या डब्यांत त्याला बसवून, मुंबईपासून पुण्या- पर्यंत त्यास आगगाडीत पत्रे सांगून स्टेशनवरूनच त्याला परत पाठवून, दुसऱ्या दिवशी पहाटे पुण्याहून मुंबईस पोचण्याच्या आंत काम तयार ठेवण्याची आज्ञा करण्यास मागेपुढे पाहाणार नाहीत. पंढरपुरच्या देवळाच्या प्रमाणे रोजी हजाराचे वर प्राप्ति असणारे एखादें अपील आले तरी कदाचित् घेणार नाहीत. सणूंच्या बरोबर राष्ट्रीय सभा व सरकार यांच्यात समेट घडवून आणण्याचे शांतिदूताचें काम अंगावर घेतले म्हणजे स्वतःचा प्रत्यक्ष जांबई निवर्तला तरी, ठरल्याप्रमाणे रात्रींच्या गाडीने मुंबई सोडून येरवड्याच्या तुरुंगांत महात्मा गांधींस भेटण्याचे दिरंगाईवर टाकणार नाहीत. तसे पाहिले तर या गर्भश्रीमंत, विलासी, अभिजात अभिरुचीच्या व बरिस्टरी देखील लहर लागेल तेवढीच करूं पाहणाऱ्या उमरावांना ही यातायात कशाला हवी होती ? पण लोणावळा परिषदेला अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळकांनी त्यांना राजकारणांत ओढले, तेव्हांपासून ते सतत त्या क्षेत्रांत आपल्या आवडीप्रमाणे काम करीत राहिलेच. नाही तर पूर्वी ठाकुरद्वार रस्त्यावरील किंवा आतां वुईटर रोडवरील भव्य व सुंदर बंगल्यांत दिवाणखान्यांतून, भिंतीवर आपटणाऱ्या समुद्राच्या लाटांकडे बघत, कोचावरून खुर्चीवर व खुर्चीवरून स्वभाव-चित्रे कोचावर बसत, चैनींत आयुष्य वेचून टाकले असते तर त्यांना कांहीं कमी कां होतें? परंतु हौस, त्याला ते काय करणार ! आपल्या मगदुराप्रमाणे का होईना, पण राष्ट्रसेवा करावी ही इच्छा खरी. एरवीं, घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजावयास ते जाते कशाला ? समेटासाठी दिल्ली, सिमला व पुणे या तीन शहरी त्यांना किती किती वेळां जावे लागले असेल ? लोकांनी लुडबुडे म्हणावे तरी यांनी प्रयत्न थांबवू नये असें चालले होते. बाबासाहेबांचा स्वार्थ- त्याग थोडाथोडका नाही. १९२०-२१ साली त्यांनी एक वर्ष वकिली तहकूब केली, इतकेच नव्हे तर खुद्द म. गांधींच्या शब्दाबर- हुकूम पंचवीस हजार रुपयांचा एकरकमी चेक एकाक्षणांत फाडून त्यांना दिला. अजून देखील वर्षअखेर कित्येक हजार रुपये निर- निराळ्या संस्थांना मदत म्हणून खर्ची पडलेले त्यांच्या जमाखर्चात आढळतात. बाबासाहेब नांवाचेच मुकुंद नाहीत. शिष्टाई व शांतिप्रधान कार्य या दोहोंची त्यांना मनापासून आवड व अशा प्रकारच्या कार्याला जे गुण असावे लागतात ते त्यांच्याजवळ भरपूर. एकनाथाने शिष्ट कसा असावा याचा खुलासा केला आहे. “शिष्ट नसावा महा भ्याड । शिष्टं न धरावी भीड । शिष्ट बोलका सुघड । निवडा प्रौढ निजबुद्धि ॥ शिष्ट पाहिजे चपळ चतुर । देऊ जाणे प्रत्युत्तर । राहो- नियां धुरेसमोर । स्वामिकार्यसाधक ॥ यांत वर्णिलेले सर्व गुण जयकरांच्या अंगी थोड्याबहुत प्रमाणांत खात्रीने वास करीत आहेत. त्यांच्याइतके परिपक्क बुद्धीचे मधुर वक्ते आज किती आहेत ? इंग्लिश काय व मराठी काय, भाषा जशी कांहीं रसनाग्रनर्तकी. शब्दलालित्य इतके ओतप्रोत भरलेले की, त्यांच्या व्याख्यानाला वृद्धांनी घर सोडून व तरुणांनी खेळ टाकून जावें. विलायतेंत लॉर्ड सकी यांनी त्यांना 'बडा शांतिदूत' ही पदवी अर्पण केली व परवां श्री. मुकुंदराव जयकर येथील भारतसेवक समाजांत पोलाक देखील म्हणाले की, गोलमेज परिषदेंत जयकरांच्या Melting persuasiveness में जितकें काम झालें तितकें दुसऱ्या कशानेही होणार नाही. प्रज्ञाप्रकर्ष असामान्य व वाङमाधुर्य अमूप अशी जोडी जमली मग कशाची उणीव ! व्याख्यानांत भावनावशता नाही, पण प्रवाहाचा प्रशांतपणा काही अलौकिक असतो. पंडित मालवीयांच्या बेहद भाषणांत माधुर्याबरो- वर भावनोदीपकता फार असते. जयकरांच्या मर्यादित भाषणांत शब्दसौष्ठव, व्यवस्थितपणा व विचारप्रगल्भता थोडी जास्त दिसते. प्रतिपक्षाला ते कधीं टाकून बोलत नाहीत; शिष्टाचार सोडीत नाहीत; मनांतून रागावतील, धुसफुसतील, आपल्या मित्रांजवळ क्रोध व्यक्त करतील; पण जाहीर रीतीने त्याचा स्फोट कधीं कर- णार नाहीत. त्यांचे मन फार सुसंस्कृत आहे व त्यांच्या एकंदर स्वभावांत एक प्रकारचा पद्यमय सुरेलपण आहे. मतभेद झाला तरी गृहस्थाश्रमां- तील आदरातिथ्यांत व उपचारांत किंचिदपि कमतरता त्यांचे हातून व्हावयाची नाही. स्वराज्य पक्षाचा व प्रतियोगी सहकारिता पक्षाचा कडाक्याचा वाद व्याख्यानांतून झाला. तथापि पंडित मोतीलाल नेहरू मुंबईस आले की उतरावयाचे बाबासाहेबांच्याच बंगल्यांत व त्यांच्या सन्मानार्थ बाबासाहेबांनी देखील मुंबईतील कांहीं बड्या लोकांना निमंत्रण देऊन थाटाची मेजवानी द्यावयाची. तसेच, आपल्या कट्टया विरोधकांच्या घरी का होईना, मंगल कार्य निघाले व निमंत्रणपत्रिका आली म्हणजे जयकर योग्य तो मानाचा अहेर पाठविण्यास कसूर करणार नाहीत. आणि त्यांच्याशी जे गोडीने व आपुलकीच्या नात्याने वागतील त्यांना तर त्यांचा सुहृद्भाव हिवाळ्यां- तील उन्हाप्रमाणे सुखकर व आल्हाददायक वाटतो. त्यांचे सगळेच वागणे ऐटबाज व डौलदार असते. खाजगी संभाषण असो किंवा e स्वभाव-चित्रे , जाहीर भाषण असो, त्यांत आत्मप्रौढीचा मसाला पुष्कळ पेर- लेला असावयाचा. त्यांत विनय नसतो असें नाहीं; पण तो विनय म्हणजे अभिमानाची शालजोडी पांघरणारा असावयाचा. आतांच मजकडे सुमारे एक डझन राष्ट्रीय सभेचे वजनदार गृहस्थ येऊन गेले व समेट घडवून आणा असे सांगून गेले; माझ्या खिशांत अशा प्रतिष्ठित लोकांची पत्रे आहेत की, त्यांवरून मी म्हणतों हे सिद्ध होण्यासारखे आहे.' अशा स्वरूपाचे उद्गार वरचेवर निघा- वयाचेच. हा अभिमान सर्वस्वी असमर्थनीय असतो असे म्हणणे निखालस चुकीचे होईल. तथापि ती एक कायमची ढब होऊन बसली आहे. भांडारकर रोडवरील राजाबहादुर गोविंदलाल शिव- लाल यांच्या बंगल्यावर, अस्पृश्यांच्या पुणे करारारावर शेवटच्या सह्या होण्याच्या अगदी ऐन वेळी जयकर जर म्हणाले की, “You see, Dr. Ambedkar gave us a lot of trouble. We have changed all that," तर तो एक विजयाचा उद्रेक माना- वयास हरकत काय? बाबासाहेबांना गायनाचा उपजत नाद आहे. नामांकित संगीत- शास्त्रज्ञ शिकविण्यास ठेवून ते शास्त्र शिकले आहेत व त्यांना सतार, दिलरुबा वगैरे वाद्ये वाजवितांहि येतात. दररोज दिवसभर कामधाम करून आल्यावर रात्री गायन झाल्याखेरीज निजावयाचें नाहीं असा त्यांचा आजही क्रम आहे. मुंबई कौन्सिलची बैठक चालू असतांना अण्णासाहेब भोपटकर, रामभाऊ सोमण, तात्यासाहेब जोशी, नानासाहेब सप्तर्षि इत्यादि सभासदांना आग्रहाने घरी बोलवावयाचें, ' I generally devote three quarters of an hour to music every day,' असे त्यांना सांगावयाचें, एक- दीड वाजेपर्यंत त्यांना गाणे ऐकवावयाचे, सुंदर कपांत मधुरशी कॉफी त्यांना द्यावयाची, नंतर नाजुक लहान लहान बशांतून खारे बदाम- श्री. मुकुंदराव जयकर पिस्ते पुढे करावयाचे, व मग त्यांना निरोप द्यावयाचा. या त्यांच्या गानप्रियतेमुळे त्यांच्या पोषाखांत, बोलण्याचालण्यांत, राहणींत विशेष मोहक रागदारी उत्पन्न झाल्यासारखी वाटते. कपड्यालत्यांत खाराखिरी फार. हरएक गोष्टींत आवडनिवड व चिकित्सा कांहीं विलक्षण. जिन्नस दिसण्यांत साधा, परंतु तलम, फिक्या रंगाचा, लज्जतदार असा असावा अशी जबर इच्छा. सर्व कांहीं नीटनेटके, रेखीव असावें. त्यांत तसूभर इकडेतिकडे होता कामा नये. शब्द वेंचक पाहिजेत. कोट, टोपी, धोतर परस्परांस शोभेशी पाहिजेत. साहेबी पोषाख असला तर त्यांत जुळणी व सुसंगतपणा पाहिजे. शिवाजी मंदिरात एकदां व्याख्यान होते. वेळेपूर्वी तात्यासाहेब केळकरांच्या घरीच ते बसले होते. निघतांना गळ्याभोंवतीं घ्यावयास काही तरी पाहिजे होते. तेव्हां तात्यासाहेबांनी आपली शाल देऊ केली. "छे, छे, That looks a little too gaudy." म्हणून ते 'नको' म्हणाले व शुभ्रकांठी उपरणे गुंडाळून बाहेर पडले. घराच्या बाबतींत देखील अशीच रसिकता नजरेस येते. वुइंटर रोडवरील बंगला घेतला, त्यांत हजारों रुपये खर्चुन पाहिजे तशी दुरुस्ती करून घेतली व बाबू सुभाषचंद्र बोसांसारखा पाहुणा आला म्हणजे त्याला समुद्राच्या बाजूच्या खिडक्या किती अंशांचा कोण करून उघडावयाच्या हे देखील सांगावयाचें, ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरची विजेची बटने दाख- वावयाची, डायनिंग हॉलमधील ग्रीक चित्रांचा गूढ अर्थ फोडून स्पष्ट करावयाचा व भोजनाची नाना प्रकारची व आकारांची सुबक कलाकुसरीची चांदीची उपकरणे कोठून कशी आणविली त्याचा इतिहास कथन करावयाचा. तें कांही असले तरी त्यांच्या सहवासाचा, बोलण्या-चालण्याचा व त्यांच्या खानदानी बडिवाराचा कंटाळा येत नाही. लहान मुलाने काही केले तरी त्याचे कौतुक वाटावें अगर कोंकरूं इकडून तिकडे स्वभाव-चित्रे नाचलें-बागडले तरी त्याच्या हालचाली आनंदमय वाटाव्या तसे बाबासाहेबांचे आहे. कोठेही गेले तरी त्यांच्याभोंवतीं ते प्रेमळपणाचें वातावरण निर्माण करतात. कृष्णाची मुरली व त्यांची जिव्हा. बंगल्यांत बसलेले पाहिले की खूप रोषनाई व आरास केलेल्या गणेशोत्सवांतील गणपतीच्या एकाद्या बालमूर्तीचे स्मरण व्हावें; आणि चेहऱ्यावर तर अद्यापि कॉलेजांतील विद्यार्थिदशेची छटाही कायमच टिकून आहे म्हणावयाची. लॉर्ड रोजबरी यांच्यासंबंधाने एका इतिहासकाराने म्हटले आहे की, तो पोक्तापुरवता केव्हां झालाच नाही. जयकरांची त्यांतलीच गत दिसते. अजूनही पोलो कॉलरचा शर्ट काय घालतील, शॉर्ट कोट काय घालतील, पायांत अल्लड तरुणांसारख्या चपला काय घालतील, जेवीत असतां वाढण्यासाठी आईच्या अंगावर काय खेकसतील, किंचित् बिघडले म्हणजे मनांतल्या मनांत रुसून काय बसतील व लागलीच मुलाच्या वृत्तीप्रमाणे विसरून काय जातील ! बरिस्टर म्हणून अगदी पहिले नव्हे, पण पहिल्या रांगेत ते बसूं शकतात. त्यांची वकिलीची पद्धत मात्र बॅरिस्टर जिनांच्या तंतोतंत उलट. जिना आपल्या ताठरपणाने व बेमुर्वतखोरपणाने जिंकतात, तर जयकर सौम्यपणाने यश संपादितात. त्यांची राजकारणांतील व समाजकारणांतील तरफदारीही मृदु स्वरूपाची असते. तथापि त्यांचे चातुर्य कमी पडतें असें मात्र नव्हे. सर्वपक्षीय परिषदेचे वेळी कल. कत्त्यास हिंदूंची बाजू उत्तम रीतीने मांडून जिनांवर त्यांनी मात केली ती हिंदु लोक कसे विसरतील ? तसेंच गांधी-आयर्विन समेट व पुणे करार हे दोन तर त्यांच्या कौशल्याचे विजयस्तंभच होत. सर- कार दरबारी वजन बऱ्यापैकी व सुज्ञ जनतेतही प्रगट किंवा अप्रगट आदराची भावना, अशी बाबासाहेबांची स्थिति फारशी स्पृहणीय नसली तरी त्यांस शोभादायक आहे हे मान्य केले पाहिजे. अली- कडे दोन-तीन वर्षांत त्यांची कीर्ति भारतवर्षाच्या बाहेर गेली आहे.

श्री. मुकुंदराव जयकर कंठांत सरस्वती, हातांत लक्ष्मी व अंतःकरणांत आपल्या समजुती- प्रमाणे स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्रसेवा करण्याची जागती इच्छा, असा योग जमून आल्यावर बाबासाहेबांना भाग्यवंत कां म्हणूं नये ? ठीकच आहे, सुभाषितकाराने म्हटले आहे- वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः । करणं परोपकरणं येषां केषां न ते वंद्याः ॥ असे असल्याकारणाने जयकरांची मते कोणास न आवडली तरी, स्वतः ते आवडत नाहीतसे केव्हांच होणे शक्य नाही. ग्रीक पुराणांत ज्याप्रमाणे कॅस्टर व पोलक्स यांची जोडी किंवा आपल्या इकडे ज्याप्रमाणे दोन अश्विन कुमार त्याप्रमाणे अलीकडे सप्रू-जयकरांचे झाले आहे. कोणी लिहिले आहे की, सप्रूच्या सान्निध्यामुळे जयकरांच्या नांवाचा डंका वाजला ! पण हे यथार्य नाही. उभयतांच्या अंगच्या गुणांनी व अंगीकृत कार्याच्या योगाने त्यांची सांधेजोड नमुनेदार जमली व टिकली इतकेंच. कोणी कोणाला हिणकसपणा आणला असें नाही. उलट पक्षीं, आधीं सोन्याचे होते तं जडावाचे झाले; मोत्याचे गोळीबंद दाणे तांबड्या फडक्यावर खुलून दिसावे त्याप्रमाणे झाले. आतां, या जोडीचे नवीन राज्यघटनेत स्थान काय याविषयी पुष्कळ कयास सुरू व्हावे हे स्वाभाविक आहे. बाबासाहेब प्रांतिक कायदे-मंडळांत राहणार कां मध्यवर्ति कायदेमंडळांत जाणार ? कायदे-मंडळाचे अध्यक्ष होणार कां प्रधानमंत्री होणार ? कां हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या जागेवर पाणी सोडले त्याप्रमाणे कोणतीच अधिकाराची जागा न स्वीकारतां, दुरून खेळ बघत राहणार ? पण राजकारणाचे व मानवी मनाचे कोणी झाले तरी काय सांगावें ? एवढे फक्त अगदी निश्चित की, ते कोठेही असले तरी चौसर कवीने आपल्या सरदाराचें He was a very perfect gentle Knight" हें जें वर्णन केले आहे ते त्यांना सदैव लागू होऊन राहलि. ?

९ प्रो. शिवराम महादेव परांजपे - "Now is the stately column broke, The beacon-light ie quenched in smoke, The trumpet's silent sound is still, The warder silent on the hill !" Sir Walter Scott वाणी आणि लेखणी यांचा प्रभाव खरोखरच फार अजब आहे. जगाच्या इतिहासांत या दोन लहानशा साधनांनी जबरदस्त व क्रांतिकारक गोष्टी घडविल्या गेल्या आहेत. लेखणी म्हणजे एवढीशी नार, पण तिचे सामर्थ्य पाहावें तर असें आश्चर्यकारक की 'तरवारी- हूनही ती बलवत्तर' अशी इंग्लिश भाषेत म्हणच होऊन बसलेली! वाणीची शक्ति देखील अपरमित म्हणून तर 'वाग्भूषण हेच खरें भूषण ' असे म्हटले जाते; व शारदेचे वर्णन जसें वीणा-पुस्तक- धारिणी' या विशेषणाने आपल्या संस्कृत वाड्मयांत केले आहे, तसेंच 'पाशांकुशधरा' या पराक्रमदर्शक पदवीनेही केलेले आहे. सिसिरोच्या वक्तृत्वाचा नाद रोमच्या आसपासच्या गिरिकुहरांत चिरकाल घुमत राहणार हे निःसंशय. डिमॉस्थेनीसने आपल्या वाणीच्या जोराने स्वदेशाच्या इतिहासांत मोठीच उलटापालट करून टाकली. मॅझिनीच्या लेखणीतून निघणाऱ्या ज्वालांनीच इटलीच्या पारतंत्र्याची राखरांगोळी झाली. रूसो-व्हॉल्टेअरप्रभृति पराक्रमी लेखकांनी आपल्या पत्रकांच्या व ग्रंथांच्या साहाय्याने जी प्रचंड विचारक्रांति केली तिच्या कक्षेत सर्व जग सांपडले गेले. या लेखणी. बहाद्दरांच्या व वाग्वीरांच्या जवांमर्दीचे निरीक्षण केले म्हणजे त्यांची प्रो. शिवराम महादेव परांजपे उपकरणे व क्रियासिद्धि यांमधील विलक्षण विसंगतीने व अप्रमाण- बद्धतेने मन क्षणभर गुंग होऊन जाते. लेखणी ती केवढी व जिव्हा ती केवढी ? पण संस्कृत सुभाषितांत मदनाच्या व सूर्याच्या सामग्रीचे आणि त्यांच्या लोकप्रसिद्ध कृतींचें असें विरोधात्मक वर्णन केले आहे. त्याच प्रकारचे वरील दोन प्रकारच्या शस्त्रधाऱ्यांचेही केले पाहिजे. मदन स्वतः अनंग, त्याचे धनुष्य नाजुक फुलांचें, दोरी भुंग्यांची तथापि साऱ्या जगाला तो व्याकुळ करणारा. सूर्याचेही असेंच. रथाला चाक एक, घोड्यांचे लगाम म्हणजे सुळसुळीत साप, रस्ता आकाशांत आणि सारथि लंगडा; परंतु त्याचा दररोजचा जगज्जीवन- दायी प्रवास मात्र अखंड चालू. ते कसेही असले तरी, ज्यांना परमे- श्वराने ही द्विविध हत्यारे देऊन निर्माण केले व ज्यांनी त्यांचा लोककल्याणाकरितां उपयोग केला ते दैववान् हे खरेच. परंतु कै. शिवरामपंतांप्रमाणे ज्या सव्यसाची पुरुषांनी आपली वीर्यशाली लेखणी आणि तेजोमयी व चैतन्यधन वाणी सतत दोन-अडीच तपें मायभूमीच्या स्वातंत्र्य-संपादनाकरितां झिजविली ते तर सुतरां धन्य व कृतार्थ होत. अर्थात् परकी राज्याखाली ही गोष्ट करणे हे काही सोपें व बिन- कष्टाचे काम होते असे नव्हे. उलट तें सुळावरच्या पोळीसारखें होते. आणि अण्णासाहेबांना १९०८ मध्ये पकडल्यानंतर लो. टिळ- कांना गिरफदार करण्यापूर्वी उभयतांची गांठ पडली तेव्हां टिळ- कांनी त्यांना कानमंत्र सांगितला तो देखील हा की, 'हे पहा शिवरामपंत, तुम्ही तर सरकारी तोहमतींत आहांच, आम्हीही तुमच्या पाठोपाठ येतोच. हे सतीचे वाण आहे एवढेच लक्षात ठेवा.' राष्ट्रस्वातंत्र्यासाठी आंदोलन करतांना ज्या सरकारी आपत्ति व हालअपेष्टा सोसाव्या लागल्या त्या शिवरामपंतांनी मोठ्या आनंदाने सोसल्या. किंबहुना, बालपणींपासून त्यांच्या बाह्य वागणुकीवरून स्वभाव-चित्रे कल्पना न येण्यासारखा सोशिकपणा त्यांच्या अंगी वसत होता म्हटले तरी चालेल. महाडास अगस्त्याच्या झाडावरून फुलें काढ- तांना खाली पडून, शरीराची एक बाजूच्या बाजू सबंध चांगलीच दुखावली असतां ज्या 'बाळक्या' में नेसलेल्या धोतराचा सोगा पांघरून घेऊन जखम घरच्या माणसांपासून चोरून ठेवली, त्यानेच पुढे दोनदां तुरुंगवासांतील भोगास सादर व्हावें हे स्वाभाविक वाटते. अशी सहनशीलता बाणलेली होती म्हणून गतवर्षी नेहेरू रिपोर्टाच्या सर्वपक्षीय दौऱ्यांत जळगांवीं पायास ठेच लागली तिचें मधुमेहाने वाढलेले दुखणे त्यांनी सहा महिने शांत चित्ताने काढले; कपाळावर पोफळाहून मोठे एवढे गळू त्यानंतर झालें तें वहात असतां-असता बेळगांवच्या साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षाचे भाषण तयार केलें; फार कशाला, कानामागें प्राणांतक पुटकुळी उठली, ती वाहूं लागली, अत्यंत ठणका लागला तरी शिवरामपंतांचें रूसोच्या 'सोशल काँट्रॅक्ट' चे मराठी भाषांतरही चाललेले व नाटकाच्या प्रवेश- लेखनाचे कार्यही तहकूब नाही अशी स्थिति ! पण एवढी सहिष्णुता अण्णासाहेबांच्या एकंदर राहणीशी विजोड अशी दिसते. लहान वयापासून ते रसिक, रंगेल व गुलहौशी अशा वृत्तीत वाढलेले. यांचे पूर्वज पेशव्यांचे पदरी होते. ती पेशवाई जणुं काय यांच्या अंगी पक्की मुरलेली ! मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या वर्षी नापास झाले तेव्हां त्राग्याने रेशमी धोतरें कांही दिवस टाकली व अंगावरची सोने-मोती बाजूस ठेवली तितकीच. बाकी १९२१ साला. पर्यंत अण्णासाहेब म्हणजे नेहमी दरबारी थाटाच्या पोषाखांत असा- वयाचे. व्याख्यानाला जावयाचे म्हणजे उन्हाळा असेल तर, चॉसरने यतीचे वर्णन केल्याप्रमाणे 'कांचेसारख्या तुळतुळीत डोक्यावर' मोतिया रंगाचें पागोटें, भालपट्टावर रुंद नामाने लावलेले उभे केशरी गंध, एका कानांत झळकणारी टपोऱ्या मोत्यांची भिकबाळी, दुसऱ्या प्रो. शिवराम महादेव परांजपे ९५ कानांत अत्तराचा फाया, अंगांत पांढरा स्वच्छ पेशवाई अंगरखा, उजव्या बाजूच्या कांखेजवळ चकाकणारा जरीच्या जाकिटाचा भाग, अंगावर गोखले पद्धतीप्रमाणे गळ्याभोवतालून नव्हे व टिळक पद्धतीप्रमाणे बाहुवट्यावरूनही नव्हे, असें स्वतंत्र पद्धतीप्रमाणे कांखेखालून घेऊन त्याच बाजूने खांद्यावरून पाठीवर सोडलेलें दर्शनी वीतभर करवती कांठ असलेले उपरणे, नेसलेले शुभ्रकांठी धोतर, पायांत लाल पुणेरी जोडा व हातांत छत्री किंवा काठीच्या ऐवजी एखादें सुवासिक फूल किंवा गजरा, अशा ऐटबाज त-हेनें यांची स्वारी निघावयाची व रस्त्याच्या बाजूने ताठ पण मंदमंद पावले टाकीत गंभीर मुद्रेने जावयाची. सभा संपून घरी येतांच वडीलधाऱ्या बायका-मंडळीकडून यांची दृष्टही काढली जावयाची. महात्मा गांधींनी त्यांचा पेहेरावाचा दिमाख हिरावून घेतला; पण त्यांचे उपजत रसवैदग्ध्य कोण नष्ट करू शकणार ? जो पोषाखांत रसिकपणा, रुबाबदारपणा व ऐषआराम तोच त्यांच्या इतर सर्व बारीकसारीक बाबतींतील वागण्यांतही दिसून येतो. नुसता चहा प्यायचा तरी तो देखील, प्रसन्न चेहरा करून तो कढत कढत डोळ्याला लावावयाचा व मग त्याची थोडी महती गायल्या- सारखं करून धीरोदात्तपणाने चाखत चाखत घोटघोट ओष्ट-प्रदे- शाच्या खाली विनिर्मुक्त व्हावयाचा. अशा प्रकारचा त्यांचा कांटे- कोरपणा व सरसत्व हे गुण केवळ स्वतःपुरतेच नसून, त्यांजकडे कोणत्या तरी प्रसंगानें चार लोक जमले तरी त्यांच्या व्यवस्थेतही नजरेस पडत. राष्ट्रीय क्लब करण्याची अण्णासाहेबांची पाळी आली म्हणजे काही विचारूं नये. त्यांच्या घरचा क्लब म्हटला म्हणजे टापटीप, श्रीमंती थाटमाट, षड्सपूर्ण पदार्थ हे पाहून आपण एखाद्या सरदाराच्या तर मेजवानीला नाहीं ना आलों, असें कित्ये- कांना वाटावें ! १९२८ च्या महाराष्ट्रप्रांतिक परिषदेचे अण्णासाहेब ९६ स्वभाव-चित्रे स्वागताध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ केलेली ' अॅट होम' किती नमुनेदार होती तें ती समक्ष पाहाणारा- सच माहीत. कोणी एखादा सामान्य मनुष्य देखील त्यांचेकडे प्रसंगोपात्त कामाकरितां गेला तरी त्याचीही योग्यतेप्रमाणे बरदास्त राहावयाची. स्वतः किती घाईगर्दीत असले तरी त्याचे म्हणणे अगदी स्तब्ध अंतःकरणाने ऐकून घ्यावयाचे व जरी ते त्याच्याशी मोकळ्या मनाने बोलले नाहीत तरी, येणारा गृहस्थ त्यांच्या नितांत- मधुर वाणीने संतुष्ट होऊन आपली फत्ते झालो असे समजून माघारी जावयाचा व तेही दारापर्यंत त्याला 'बरें, ठीक आहे; या, या बरें असे म्हणण्यासाठी पोचविण्यास जावयाचे. 'वाङ्माधुर्यान्नान्यदस्ति प्रियत्वं ' म्हणतात तें कांहीं खोटें नाही. त्यांना शर्कराखंडखाद्य में जिवाइतकें प्यार होते त्याचा सर्व रस त्यांच्या जिभेतच संचित होऊन राहत असे की काय न कळे! टिळकसुद्धां एखादे प्रसंगी एक घाव दोन तुकडे करणारा प्रश्न समोरच्या मनुष्याला विचारीत. तात्यासाहेब केळकरांची मिठास भाषणाबद्दल प्रसिद्धि, पण तेही क्वचित् भेटीस येणाराला तुटक बोलून परत लावतील. दुसऱ्याशी वागण्याची खाडीलकरांची पद्धत तर बरीच तापटपणाची व माणुस- घाणेपणाची; पण शिवरामपंतांची रसना ही जशी कांहीं माधुर्यनिर्झ- रिणी व तीही सतत वाहणारी. असलें धाराप्रवाही प्रियंवादित्व असल्यावर ते जेथे जातील तेथे हवेसे वाटावे यांत नवल काय ? अप्पाबळवंताच्या चौकांत शास्त्री- बोवांच्या दवाखान्यांत रोज सायंकाळी टिळकांच्या राष्ट्रीय पक्षाची मंडळी गप्पा मारण्याकरितां जमत. तेथे अण्णासाहेब आपल्या संव- गड्यांच्या मध्ये श्रीकृष्ण बसावा त्याप्रमाणे बसत; आणि तेथे नेहमींची कृष्णाजीपंत खाडिलकर, वामनराव पोतदार, महाराज चिंचाळकर वगैरे मित्रमंडळी जमली म्हणजे यांचे संभाषण सुरू व्हावयाचें.

प्रो. शिवराम महादेव परांजपे ९७ मधुर वाणीला विद्वत्तापूर्ण विनोदाची जोड व बरोबरीची गप्पा मार- णारी माणसें. मग काय विचारावें ? तेथे एकेकाची कोटीवर कोटी चढावयाची, अकलेचे तारे तुटावयाचे, विनोदाची कारंजी उडा- वयाची. हा प्रकार पाहणारास व ऐकणारास भोजप्रबंधांतील संध्या- समयींच्या कल्पनाशक्तीच्या व प्रतिभायुक्त विनोदाच्या शर्यतीची आठवण व्हावी. एके वेळी भोज राजा सूर्यास्ताची शोभा पहात बसला असतां म्हणाला, सूर्य समुद्रात बुडत आहे." बाण उद्गारला, “ छः ! कमलाच्या अंतर्भागांत मधुलोलुप भ्रमर अडकून पडत आहे." महेश्वरांची कल्पना निराळ्याच दिशेने धांवली व ते म्हणाले, " तसे नव्हे, बागेतील वृक्षाच्या पोकळीत पक्षी आसरा घेत आहे." आणि शेवटी कविकुलगुरु कालिदास पुढे सरसावले; तुम्ही सारेजण चूक आहां; तरुण स्त्रियांच्या शरिरांत रतिकांत हळुहळु प्रवेश करीत आहे. " डॉक्टर जॉनसन यांचा जसा एक क्लब इंग्लंडच्या वाङ्मयेतिहासांत महशूर आहे, किंवा १८-१९ व्या शतकांत संपन्न विद्याविलासी गृहिणी फ्रान्समध्ये ज्याप्रमाणे आपा- पल्या घरी लोकधुरीणांची व इतर प्रसिद्ध व्यक्तींची संमेलने भरवीत, त्या तव्हेची शोभा व महत्त्व शिवरामपंत येऊन बसत तेव्हां या राष्ट्रीय क्लबाला होती म्हटले तरी अतिशयोक्ति नाही. अर्थात् एकदां गप्पांना सुरवात झाली म्हणजे त्यांना कांहीं निबंध नाही. गांव- कुटाळकीपासून तो राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा परा- मर्ष त्या स्थळी फार मौजेनें व मुक्तकंठाने घेतला जावयाचा. जी या राष्ट्रीय क्लबाची स्थिति तीच शिवरामपंत बुधवार चौकांत शेठ रामदास गोवर्धनदास यांच्या कापड दुकानी दररोज नियमितपणे जात तेथील. विशेषतः गुजराथी व्यापारी मंडळी त्या ठिकाणी आकृष्ट केली जात आणि तेथेही मनमुराद चकाट्यांचा अड्डा पडे व परस्पर स्नेहसंवर्धनाचा आनंद लुटला जाई. धार्मिक दृष्टया मनाने ९८ स्वभाव-चित्रे , सर्वस्वी व आचरणाने थोडेबहुत जुन्या जमान्यांतील असले तरी, मुसलमानांच्याविषयीही राजकारणासाठी का होईना त्यांची एक प्रकारची आपुलकीची भावना असे. ती इतकी की, मित्राच्या मोह- बतीखातर ते मुद्दाम निझाम हैद्राबादेकडे अहमदभाई तांबोळींच्या मुलाच्या शादीकरितां कांही दिवसांपूर्वी गेले होते. मात्र हा प्रेमळ- पणा त्यांच्या अंगी बऱ्याच लहान वयापासून असला पाहिजे. पूर्वी महाडच्या मुसलमान-मोहल्लयाला उन्हाळ्यांत दोन प्रहरी आग लागली होती तेव्हां त्यांनी आपल्या घरची गडीमाणसें पाठविलीं, आपण स्वतः गेले व आग विझविण्यास अतोनात मेहनत घेतली. इतक्यावरच ते थांबले नाहीत. घरी अन्न शिजवून एक वेळ दुःख. ग्रस्त मुसलमान मुलांबाळांना व बायाबापड्यांना खाऊ घातलें, सरकारकडे मदतीचा अर्ज त्यांना इंग्रजीत स्वतः लिहून दिला व त्याच वेळी अकस्मात् गव्हर्नरसाहेबांची स्वारी महाड रस्त्याने जाव- याची होती तेव्हां त्यांची मोटार थांबवून त्यांस समक्ष तो अर्ज देण्याविषयींचा समयसूचकपणा व मुत्सद्देगिरीचा सल्ला त्यांनीच दिला. मूळ स्वभाव अत्यंत प्रेमळ. विनसंबंधी लोकांशी वागणूक इतकी आपलेपणाची तर खुद्द नातेवाईकांशी किती तरी पटीने अधिक प्रेमाची असणे क्रमप्राप्त ठरते. आपली मुले, नातवंडे, सुना, भाचे यांची त्यांना अतिशय काळजी वाटावयाची. ठीकच आहे. 'अतिस्नेहः पापशंकी' असे म्हटलेच आहे. महाडच्या आपल्या घराविषयी व वास्तूविषयीही त्यांना निरतिशय प्रेम व अभिमान वाटे. साधारण समजूं-उमजूं लागल्यापासून 'ब' शी ( आजीशी) व 'बाती' शी (पार्वती, आईशी ) गप्पा मारण्यांत व त्यांना रात्री पोथ्या वगैरे वाचून दाख- विण्यांत गडी कसा दंग असे. तिकडील सर्व मिळकतीवरील हक्क त्यांनी सोडला, तथापि स्वतःच्या जन्मस्थानाची मूळ घरची जुनी ओवी आपल्याकडे ठेविली. अलीकडे सतत आजारीपणामुळे अंमळ प्रो. शिवराम महादेव परांजपे ९९ जिकिरीला आल्यासारखे झाले होते तेव्हां कित्येकवेळां धाकटी बहीण जवळ असतां " मी कनी, वेणे, बरा झालों म्हणजे आपण महाडला जाऊन राहूं" असे करुणास्पद व गहिवराचे उद्गार त्यांच्या खिन्न मुखांतून बाहेर येत. आणि खरोखरच त्या प्रसंगींच्या त्यांच्या चेहऱ्यावरील विकारांवरून त्यांच्या अंतःकरणांत गोल्डस्मिथ कवीच्या As an hare whom hounds and horns pursue, Pants to the place from whence at first he flew, I still had hopes, my long vexations past, Here to return--and die at home at last. या ओळी उचंबळत आहेत की काय असा संशय आल्यास तो त्यांच्या अभिजात उपस्थितीचा व वात्सल्याचा गौरवच होय. खऱ्या गृहस्थाश्रमी मनुष्याने कुटुंबाची चिंता वहावी व योगक्षेम चालवावा तसा ते अप्रतिम वळणदारपणाने व कसोशीने चालवीत. मन तर लोण्यासारखें मऊ. थोरले चिरंजीव नुकतेच विलायतेस गेले असतां त्यांस थोडा ज्वर येत असल्याचे कळतांच, बॅरिस्टरीच्या परीक्षेची वाट न पाहतां ताबडतोब परत बोलावले. सार्वजनिक कार्यातही पक्षाभिनिवेशामुळे इरेस पडून किंवा इरेस घातले असता त्यांच्या हातून कठोर कृत्ये घडली नाहीत असें नाही. तथापि आंतल्या मनाचा गाभा फार मृदु यांत शंका नाही. टिळकांच्या धाकट्या मुलाची प्रेतयात्रा चालली असतां टिळकांच्या केसरी-मराठा संस्थेच्या ट्रस्टीविषयी काही असभ्यपणाचे व गालिप्रचुर ओरडणे त्यांच्या कानी पडताच त्यांच्या डोळ्यांतून खळकन् आंसवें गळली ! स्वजनांविषयीं, स्वगृहाविषयी व स्वग्रामाविषयी अण्णासाहेबांना जी उच्च प्रकारची तीव्र निस्सीम भक्ति वाटे तीच शतगुणित रीतीने स्वदेशाविषयी वाटत असे. त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या सर्व शक्ति वेचल्या, आपला देह कष्टविला. हे त्यांनी सर्व कौतुका.

१०० स्वभाव-चित्रे स्पद निरलसतेने केले. अभ्यासाचा जसा हव्यास तसाच देश- कार्यार्थ लेख लिहिण्याचा व व्याख्याने देण्याचा. विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी आपल्या प्रोद्दीपक लिखाणाने स्वदेशाभिमान जागृत केला. शिवरामपंत परांजपे यांनी आपल्या परंतप लेखणीने व वाणीने तो देशाभिमान राष्ट्रीय स्वातंत्र्याकडे वळविला. राष्ट्रीय सभेने मद्रास येथे दोनच वर्षांपूर्वी आपले ध्येय स्वातंत्र्य हे जाहीर केले. अण्णा- साहेबांनी आपल्या आश्चर्योत्पादक लेखन-भाषणांनी, प्रवचन-पुरा- णांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाची घोषणा १८९५ सालापासून अव्याहत चालविली होती. आणि तीसुद्धां अशा लोकोत्तर पद्धतीने की, सर्वांनी त्या पद्धतीच्या प्रभावशालित्वाने स्तंभित होऊन तोंडांत बोटें घालावी. 'निबंधमाला' कार चिपळुणकरांनी स्फूर्तिदायक व देशा- भिमानाने दरवळणाऱ्या लेखरूपी फुलांच्या माला पक्कया मजबूत दोऱ्यांत गुंफल्या खऱ्या. 'केसरी' का टिळकांची गर्जना अजून महाराष्ट्रांत व इतरत्र दुमदुमून राहिली आहे. व ती ऐकून परपक्षाच्या छातीत धडकी भरत असे हे सर्वथैव खरें. जसे कांहीं .' ज्युलियस सीझर' नाटकांतील “ I am a plain blunt man, I speak rightly on " हे शब्द त्यांनीच भाषणापूर्वी उच्चारावे. परंतु काळ' का परांजप्यांची लिहिण्या-बोलण्याची प्रथाच आजिबात वेगळी. त्यांचा प्रज्ञोन्मेष, त्यांचा अलंकारशास्त्राचा सर्वांगीण व दीर्व- कालीन व्यासंग, त्यांचा जातिवंत उपरोधिकपणा व प्रखर विनोद, त्यांचे वक्रोक्तिौंडत्व, त्यांची व्यंग्योक्तिनिपुणता इत्यादि सर्व गुण त्यांच्या लेखनांत व भाषणांत त्यांच्या जळजळीत देशाभिमानाच्या भट्टींतून रसरूपाने उतरावयाचे. मौज अशी की, प्रायः सर्व महत्त्वाच्या लेखांचा व व्याख्यानांचा उपसंहार राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या कल्पनेंत व्हावयाचा. सागरं वर्ज- यित्वा कुत्र वा महानद्यवतरति' या न्यायाने परतंत्र राष्ट्रातील सर्व प्रो. शिवराम महादेव परांजपे १०१ गोष्टींचा शेवट स्वातंत्र्यलालसेंत व्हावा हे नैसर्गिक व यथायोग्य नव्हे तर काय ? 'पिकांची पाहणी केली तरी तेंच. 'दगडी कोळसा' उगाळला तरी तेंच. 'भाऊसाहेबांच्या घणां' तून निनाद निघावयाचा तोच. 'आम्रवृक्षा' ला फळ यावयाचें तेंच. ' कान- पूरच्या विहिरीत' बुडी मारली तरी हाती लागायचे तेंच. 'पशूच्या साम्राज्यां' त प्रवेश केला तरी तेंच. 'ऐतिहासिक पदार्थसंग्रहा- लयांत ' शिरले तरी तेंच. 'सोमयज्ञ' केला तरी तेच. 'झोपेंतील देखावा' पाहिला तरी तेंच. 'तेहि नो दिवसा गताः' यावर व्याख्यान दिले तरी तेंच. ' असंतोषः श्रियो मूलम् ' यावर प्रवचन केले तरी तेंच. 'जगी थोरला देव तो चोरिलासे' यावर पुराण कथन केले तरी तेंच. काउपरच्या कवितेत करवताच्या व इतर हत्यारांच्या आवाजाशिवाय स्वप्नाप्रमाणे गुपचुप उभ्या राहिलेल्या इमारतीचे वर्णन आहे व कोलरिजनें कुबलाखानाचाही एक जादूचा रमणीय व नाजूक तरता बंगला चित्रित केलेला आहे. त्याप्रमाणे शिवराम- पंतांच्या लेखांतून व भाषणांतून स्वातंत्र्याची दुर्दम्य आकांक्षा वाचकां- च्या व श्रोत्यांच्या मनःप्रांगणांत क्षीरसागरांत न्हालेली, इंद्रधनुष्या- च्या रंगांत नटलेली व नंदनवनांतील पुष्पांनी सुगंधित झालेली अशी सुप्रतिष्ठित होऊन बसावी. शिवरामपंतांच्या लेखणीने राम म्हटले व त्यांच्या वाणीने कायमची रजा घेतली. पण त्यांच्या लेखां- तील व भाषणांतील स्वातंत्र्याच्या भावनेचें अनुरणन चाललेंच आहे; शेलेने म्हटलें नाहीं का!- Music when soft voices die, Vibrates in the memory; Odours, when sweet violets sicken, Live within the sense they quicken. हीच त्यांची लेखनशैली व भाषाशैली शत्रुपक्षाला व त्याच्याशी १०२ स्वभाव-चित्रं , प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संगनमत करणा-या स्वजनांतीलच त्यांच्या विरोधकांना अत्यंत विलक्षण रीतीने बोचणारी वाटे. लेखांत व भाषणांत परपक्षाचे म्हणणे वगैरे साधकबाधक प्रमाणे देऊन केव्हांही खोडलेले नसावयाचे. पण तीव्र उपहासाच्या तीक्ष्ण व विषारी बाणांचा असा वर्षाव करावयाचा की सामनेवाले बिचारे विवश व विकल होऊन जावेत. या उपहासाचे अमोघ अस्त्र जेथे सूर्या' वर देखील सुटावयाचें तेथें टिळकांचा झाला तरी काय पाड ? चिरोल केस जारी असतांना एक खासगी सभा काही कारणा- ने भरली. दिवस शुक्रवारचा होता. टिळकांना येण्यास किंचित् वेळ लागला. गमतीखातर खरे; पण शिवरामपंत म्हटल्याशिवाय राहिले नाहीत, 'काय हो, विलायतचे टपाल पोष्टांत शुक्रवारींच घेतात, अगोदर घेत नाहीत, नाहीं !' याचा अर्थ त्यांना टिळकां- विषयी आदर कमी होता असा नव्हे. टिळकांना ते गुरुस्थानींच मानीत व नाशीकच्या स्वतःच्या मानपत्र-समर्पणाचे प्रसंगी त्यांनी आपल्याला घालण्यास आणलेला हार गुरु म्हणून अगोदर टिळकां- च्या तसबिरीला घातला. तरी पण टिळकांच्या राजकारणाशी ते समरस असे केव्हांच झाले नाहीत. टिळकांनी काही धोरण मुक्रर ठरविण्याकरितां गायकवाड वाड्यांत बोलावले म्हणजे आपली स्नेही मंडळी घेऊन जावयाचें; पण इकडे चर्चा जोरांत चालली असली तरी चकार शब्द तोंडावाटे बाहेर पडू न देण्याची खबरदारी घेऊन ते एका कोपऱ्यांत जसे काही ध्यानस्थ बसावयाचे. आलेल्या व वादविवादांत भाग घेणाऱ्या गृहस्थांना त्यांच्या मुकेपणाचा चमत्कार वाटावयाचा. फिलीप स्नोडनसाहेब अबकारी खात्यांत पूर्वी नोकर असता एका बाईने त्यांच्यावर गैरशिस्त वागणुकीचा आळ घेतला. ते म्हणाले, 'मी तुमच्यासमोर ब्रही उच्चारला नाही.' बाई म्हणाल्या, • That was the worst of it. You looked it I'arstoft प्रो. शिवराम महादेव परांजपे १०३ राजकीय वादप्रसंगी शिवरामपंतांविषयी त्यांच्या बरोबरीच्या लोकांना असेंच वाटावें. एखाद्या राजकीय अगर सामाजिक प्रश्नाचा उपन्यास करावा, उलट-सुलट मुद्दे पुढे मांडावे, त्यांचा निष्कर्ष काढावा, या कार्याला लागणारी जी एक विशिष्ट प्रकारची बुद्धि लागते ती जन्मादारभ्य त्यांना नव्हतीच. व्याख्यानाचेही असेच. एखाद्या ठरावावर पांच- दहा मिनिटें बोलावयाचे यांना सहसा जमावयाचे नाही. रणदुंदुभि ऐकून समरभूमीवर विजय पावणारा लष्करी घोडा कोणीकडे आणि मिरवणुकीचा प्रसंग साजरा करण्यासाठी नटणारा-नाचणारा घुगुर- वाळेवाला कोतवाल घोडा कोणीकडे ! नगाधिराजाच्या उत्तुंग शिख- रावर मानससरोवरांत ज्याने आयुष्य घालविले, त्या मरालकुल-नायकानें पल्वलजलामध्ये की हो दिवस काढण्यास कसें समर्थ व्हावें ? असें होते तर जगन्नाथाच्या अन्योक्तींत कांहींच स्वारस्य राहतें ना. व्याख्यानाला त्यांना एकट्याला भरपूर वेळ असला म्हणजे मग त्यांच्या पांडित्याचा प्रकर्ष आणि वक्तृत्वाचा ओघ पाहून घ्यावा व श्रोत्यांनी माना डोलवाव्या. बोलण्याला विषय काही असो वा नसो. कारणावांचून कार्य होत नाही हा अर्थ दाखविणारी • Making bricks without straw' अशी म्हण आहे. पण अण्णासाहेबांचे वैशिष्टय असे की, द्रव्यसामग्रीशिवाय विटाच काय, मोहक अशा ताजमहालास शोभण्यासारख्या जमिनीवर बसविण्याच्या बारकि चौकोनी रंगदार चिरेबंदी फरशा ते बनवीत. प्रख्यात विनोदी लेखक मोलिअर म्हणतो, खरा चतुर स्वयंपाकी तोच की, जो मालमसाल्या- शिवाय पंचपक्वान्नाचे सुग्रास भोजन तयार करूं शकतो. उत्कृष्ट साहित्य सज्ज असल्यावर कोणीही सामान्य बल्लव नाहीं कां पंगत खुष करणार व पाने शोभावणार ? अण्णासाहेबांचे असें अलौकिक कौशल्य, म्हणून तर १९०७-८ सालच्या शिवाजी-उत्सवांतील स्वभाव-चित्रे त्यांच्या व्याख्यानांना लोक सहस्रशः एकत्रित व्हावयाचे. मुलांची खेळण्याची अगदी लहान अशी कागदाची जपानी टिकली मिळते. ती पाण्यांत सोडली म्हणजे तिचा एकेक पदर आपोआप उलगडतां उलगडतां, एकांतून एक अशा नवीन आकृति जलपृष्ठावर तरंगू लागतात आणि आपल्या फुललेल्या सजावटीने प्रेक्षकांचे मन आक- धून घेतात. अण्णासाहेबांच्या व्याख्यानाचा विस्तार म्हणजे असा व्हावयाचा. शोभेच्या दारूचे झाड लावलें म्हणजे परस्परसंभूत ठिणग्या लागून त्यांतून स्फुलिंगमय फिरत्या, उडत्या, बोलत्या विविध व मनोज्ञ अशा अलंकारित घटना निर्माण व्हाव्या, त्याप्रमाणे शिवरामपंतांच्या व्याख्यानसमयीं बहुशः व्हावयाचें. गुदस्तां सायमन कमिशन नेमले गेले त्याच सुमारास वर्तमानपत्रांत त्यांनी 'रॉयल कमिशन फॉर ब्रीडिंग हॉर्सेस अँड म्यूल्स' नेमले गेल्याचेही वाचलें. मग काय ? यांच्या व्याख्यानाला भरपूर अवदान लाभलें व या दोन्ही कमिशनांमधील काल्पनिक साम्य त्यांनी आपल्या वक्रोक्तीच्या पाणी- दार हत्यारांनी उकलून दाखविले. तसेच त्याचवेळी गौरीचे दिवस होते. बायका दगडांच्या गौरी गोळा करतात या गोष्टीचें रूपक त्यांनी सायमन कमिशनच्या व इतर सहकारी व मध्यवर्ती प्रांतिक कमिट्यांच्या नेमणुकीवर बसविलें. अशा स्थितीत त्यांच्या वक्तृत्वाला दुसरा बहर आल्यासारखें लोकांस भासले. आतां हे सर्व संपले. त्यांच्या दीर्घकालीन आयुष्यांत त्यांनी एखादी विधायक संस्था स्थापली व ती कायमची चालू राहण्याची व्यवस्था केली असे नाही. स्वतः होऊन एखादी नवीन संघटित चळवळ काढून ती टोकास नेली असेंही फारसें म्हणण्यासारखें त्यांच्या हातून झाले नाही. त्यांच्या बुद्धीची व मनाची ठेवणच याला अनुकूल अशी नव्हती. कठिण समय असतां महाराष्ट्र स्वातंत्र्यो- न्मुख करण्यासाठी त्यांनी आपली विद्वत्ता, आपले वक्तृत्व व आपले -4 ...- प्रो. शिवराम महादेव परांजपे स्वाभाविक गुण खर्च केले हीच त्यांची प्रधान कामगिरी व तिज- बद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहील. पावसाचे कार्य म्हटले म्हणजे पडण्याचे. शेतीच्या पिकांकरितां त्याचा जास्तीत जास्त उप- योग करून घेण्याचे काम दुसऱ्याचें. अफाट धरण बांधून, त्यांतील पाणी डोंगरावरून जोराने सोडून त्यापासून वीज उत्पन्न करावयाची व विद्युत्संचय करून ठेवावयाचा. पण त्याच्यापासून योग्य फल- निष्पत्ति करून घेणे हे काम जो करील त्याचें. हे न घडलें तर पर्जन्याचा अथवा विजेचा दोष काय ! टिळकांचे व परांजप्यांचे म्हणण्यासारखें मनोमय ऐकमत्य नव्हते तरी टिळक याच दृष्टीने त्यांच्या कामाकडे पाहात. येत्या जानेवारी माहिन्यापासून राष्ट्रीय सभेनंतर संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीला कदाचित् पुन्हा एकदां तेज चढणारसे दिसते. १८९६ ते १९०८ सालांप्रमाणे शिवरामपंत असते तर, त्यांची स्वतंत्रतादेवीची वाड्मयोपासना महा- राष्ट्राला व पर्यायाने आखिल भारतवर्षाला साहाय्यभूत झाली असती. पण परमेश्वराची इच्छा वेगळीच होती. म्हणून तर स्वातंत्र्याच्या आधारस्तंभाची राख होऊन बसली, स्वातंत्र्याचा दिवा मालविला गेला, स्वातंत्र्याच्या तुतारीचे पडसाद आकाशांत विरून गेले व स्वातंत्र्याचा शाहीर देवाघरी गेला!! त्याचा आत्मा केव्हां बरें शांत होईल?

१० श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर « We must be free or die, who speak the tongue That Shakespeare spake." --Wordsworth. गुणी मनुष्यच गुण जाणतो' म्हणतात तें कांहीं खोटें नाहीं. म्हणून तर १८९६ साली लोकमान्य टिळकांनी खाडिलकरांना एकदम केसरी संस्थेत येण्याविषयी सांगितले. नाही तर 'विविधज्ञान- विस्तारां' त कृष्णाजीपंतांचे विद्यार्थिदशेतील "ब्राह्मण आणि त्यांची विद्या" या गोळे यांच्या पुस्तकाचे परीक्षण प्रसिद्ध होतें काय व तेवढेच वाचून टिळक त्या लेखकाला संपादक म्हणून निव- डतात काय ? पण ' उमटे तोचि तरुफळी, असतो जो काय गुप्त गुण बीजी' हे मोरोपंतांनी म्हटलें तें टिळकांनी बरोबर हेरलें, यांत संशय नाही. प्रथम तात्यासाहेब केळकर व मग काकासाहेब खाडिल- कर या उभयतांची टिळकांनी जी निवड केली ती किती योग्य व उत्कृष्ट ठरली हे काय महाराष्ट्रीयांस सांगावयास पाहिजे ? आतां हें खरें की गुणभेदामुळे केळकरांचे कार्य बहुशाखी व अनंत झाले, खाडिलकरांचे अगदी आटोपशीर व मर्यादित झाले. कांहीं वृक्षांना नुसती सुगंधी फुले येतात, काहींना केवळ मधुर फळेंच लाभतात, तर कांहीं थोड्यांना दोहोंचाही संभार प्राप्त होतो. पण त्यामुळे त्यांचे महत्व कांहीं कमीजास्त ठरविले जात नाही. तें कांहीं असले तरी ब्रह्मा म्हटले की ज्याप्रमाणे विष्णु आणि महेश यांची भाविकांस श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर १०७ आठवण व्हावयाचीच, त्याप्रमाणे टिळक हे नांव उच्चारलें कीं केळकर आणि खाडिलकर यांच्या मूर्ति डोळ्यांसमोर यावयाच्याच. आणि खरोखरच टिळकांचा व खाडिलकरांचा गुरु-शिष्य या नात्याचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा होताहि. खाजगी व्यवहारां- तील गुरु त्यांचे थोरले बंधु हरिपंत व सार्वजनिक प्रपंचांतील गुरु लोकमान्य टिळक. वडील भावाविषयी जी निस्सीम पूज्यबुद्धि तीच लोकमान्यांविषयी. टिळक कधीच चुकावयाचे नाहीत ही त्यांची पहिल्यापासून भावना होती. एखादे वेळी टिळक असतांना असे व्हावें की, बाहेर मंडळींत बोलतांना खाडिलकरांनी एक मत प्रति- दावे पण ते आंत जाऊन टिळकांचे म्हणणे ऐकून आले म्हणजे त्यांच्या मताचा तितक्याच आवेशाने पुरस्कार करावा ! याचे कारण एकच. ते म्हणजे कृष्णाजपितांची लोकमान्यांविषयींची खरी व निरुपम निष्ठा. या अव्यभिचारी निष्ठेचा परिणाम खाडिलकरांच्या भाषेवर व लेखनपद्धतीवर देखील झाला. तो इतका की टिळक तुरुंगांत गेल्यावर खाडिलकरांनी 'बेमालूम सांधा जोडला' असे सर्वांनाच वाटले. टिळकांप्रमाणे खाडिलकरांचे लिखाणहि देशाभि- मानाने व स्फूर्तिदायित्वाने रसरसलेले असावयाचे. जें वर्तमानपत्री लेखांत तेच त्यांच्या नाटकांतून. काही काही प्रसंगींची वाक्ये वाचली किंवा ऐकली म्हणजे वाचणाराचे व ऐकणाराचे रक्त उसळू लागलेच पाहिजे. श्री. कृष्णाजीपंतांची भाषण करण्याची पद्धत सुद्धां अशाच स्वरूपाची आहे. सावकाश सुरवात होऊन व्याख्यान ऐन रंगांत आले म्हणजे आवाज चढावयाचा व शब्दहि कांच- कारखान्याच्या भट्टीतील रसाप्रमाणे ज्वालामय अवस्थेत जणुं बाहेर पडावयाचे. ज्यांनी ज्यांनी त्यांची टिळकांच्या बरोबर असतांची किंवा स्वतंत्रपणे एकट्याने दिलेली कर्नाटक, महाराष्ट्र, व-हाड या प्रांतांतील स्वराज्यावरची भाषणे ऐकली त्यांना त्यांच्या वक्तृत्वाची १०८ स्वभाव-चित्रे . साक्ष पटते. शिवरामपंतांच्या भाषणांत उपरोधाचा वाड्मयविलास अधिक. तात्यासाहेबांच्या व्याख्यानांत तर्कशुद्धता व विनोद ही प्रधान. कृष्णाजीपंतांच्या व्याख्यानांत आवेश मुख्य. अलीकडे त्यांनी विश्रामं लभतामिदं च शिथिलज्याबंधमस्मद्धनुः' असे म्हणून राजकारणाविषयी लेखन व भाषण सोडून दिले आहे. तथापि त्यांच्या लेखणीला व वाणीला महाराष्ट्र सहसा विसरू शकणार नाही हे निश्चित. इतक्या उशीराने तरी त्यांना साहित्य-संमेलनाच्या अध्यक्ष- पदाचा मान मिळतोच, यावरून ही गोष्ट सिद्ध नाहीं का होत ? बारा-तेरा नाटके व संपादकीय लेख यांच्या पलीकडे त्यांचा वाङ्मय- व्यवसाय कधी गेला नाही. पण तेवढ्यावरून साहित्य-संमेलनाचे अध्यक्ष होण्यास ते पात्र आहेत यांत मात्र बिलकुल संशय नाही. संपादकीय लेखनांत ते जवळजवळ टिळक व नाट्यनिर्मितीत ते जवळजवळ शेक्सपीयर असे त्यांचे वर्णन कोणी केले तरी ते 'एक हात काकडी व नऊ हात बी' असे म्हणण्यासारखे नव्हे. शेक्स- पीयरनें ज्याप्रमाणे मनुष्यस्वभावाच्या मुळाला हात घातला त्याप्रमाणे कांहीं नाटकांत खाडिलकरांनीहि त्याचा अगदी ठाव घेतला. यामुळे त्यांची नाटके चिरकाल टिकणारी अशी उतरली. पौराणिक वस्तु घेऊन तींतून आधुनिक विचारसरणीस व परिस्थितीस समांतर असें मतप्रतिपादन करावयाचे ही त्यांची विशेष शैली. नाटक लिहिण्या- पूर्वी प्रतिपाद्य विषयाचे व गोष्टींचे चिंतन ते फार काळ करीत असतात. अमुक विषयावर नाटक लिहावयाचे मुक्रर केले म्हणजे त्याचा सदैव निदिध्यास चालू असतो. साबरमतीच्या तुरुंगांत असतांना तर त्यांनी दोन-तीन नाटके तयार करून ठेविली. नाटकांची पदें करतांनाहि असाच सतत डोक्यात विचार घोळत असावयाचा. घरी एकटे असतां, फेऱ्या घालतां घालतां मनातल्या मनांत पदरचना श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर १०९ . चाललेली असावयाची. अशा दीर्घकालीन चिंतनामुळे त्यांची नाटकें वाङ्मयांत व रंगभूमीवर अढळ पद प्राप्त करून बसली आहेत म्हटले तरी वावगे नाही. कोणी म्हणतात की, बालगंधर्व लाभले म्हणून खाडिलकरांच्या नाटकांचा एवढा बोलबोला झाला. पण कांही गुण सोनाराचा व कांहीं सोन्याचा, हे कबूल केलेच पाहिजे. कारण मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला' 'पांडवां सम्रादपदाला' 'या नवनवल नयनोत्सवा,' व 'किति मजेदार हार,' इत्यादि पदचरण गंधर्वांच्या गाननैपुण्यामुळे लोकांच्या तोंडी बसले हे जसे खरे, तसे भाऊबंदकी, कीचकवध, मानापमान, स्वयंवर, द्रौपदी, मेनका, सावित्री या नाटकांची कथानकें अशा रीतीने जुळविली की त्यांनीही जनतेच्या मनावर आपला पक्का पगडा बसविला आहे हेहि यथार्थ होय, असें म्हणावे लागते. दोघांची साथ अति उत्तम जुळली, एवढें बरीक खास. 'काळी चंद्रकळा आणि मोत्यांचा पदर' असें मुली म्हणतात तसे झाले. परस्पर शोभा वाढली ती दोघांच्या गुणांच्या संयोगामुळे, असे विधान केले तर ते कोणालाहि कमी लेखल्यासारखे नाही. द्रव्यलाभाच्या बाबतीत नाटकांनी खाडिलकरांना चांगलीच मदत केली. किंबहुना घरगुती अडचण हीच त्यांच्या नाटकांची जन्मदात्री होती म्हटले तरी चालेल. घरची मंगलकार्ये पार पाडण्यासाठी, त्या- प्रमाणेच 'नवाकाळ वाडी' उभी करण्यास व आपला स्वतंत्र छाप- खाना व वर्तमानपत्र प्रस्थापित करण्यास त्यांना नाटकांचाच फार उपयोग झाला. पन्नाशी उलटून गेल्यावर स्वतःच्या जबाबदारीवर दैनिक काढून ते यशस्वी करून दाखविणे व मुंबईसारख्या शहरी नवीनच जाऊन मालकीच्या इमारतीत स्थायिक होऊन राहावयाचे, दोन पत्रे चालवावयाची, दंडाची संकटे आली तरी ती धिटाईने सोसावयाची व टिकाऊ संस्था निर्माण करावयाची ही गोष्ट उतार ११० स्वभाव-चित्रे वयांत करून दाखविणे म्हणजे कांहीं लहानसहान पराक्रम नव्हे ! कृष्णाजीपंतांनी ती कामगिरी जगास निःसंशय करून दाखविली. असें कर्तृत्व सिद्ध करण्यास अवश्य लागणारा करारीपणा व आत्मविश्वास त्यांच्या अंगी भरपूर आहेत. या गुणांच्या जोरावरच ते १९०८ साली टिळक तुरुंगांत गेल्यावर दुर्वासऋषीसारखे क्रोधाय. मान होऊन केसरी-कचरींतून निघून गेले ते टिळक परत येईपर्यंत तिकडे फिरकले देखील नाहीत! या गुणांच्या जोरावरच ' लोकमान्य' कचेरीतून ' मी एखाद्या कंपनीचा मुनीम म्हणून काम करण्यास तयार नाही' असें निक्षून बजावून ते ताडकन् निघून गेले ते स्वतःच्या मालकीचे पत्र काढल्याशिवाय स्वस्थ राहिले नाहीत! ते खाजगी व सार्वजनिक वागणुकीत जसे निग्रही आहेत तसे बरेचसे एकमार्गी व एककल्लीहि आहेत. ते स्वतः गरीबींत वाढले असल्याकारणाने व त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी त्यांच्या शिक्षणाविषयी स्वार्थत्याग केला असल्याकारणाने त्यांच्या अंगी आपल्या निराश्रित कुटुंबीयांस सांपत्तिक व इतर मदत करण्याची बुद्धि. जागृत आहे. घरांत लक्ष द्यावयाचे नाही. ठराविक पैसा घरांत देऊन टाकला म्हणजे यांचे काम झाले. मग दिवसभर आपली खोली अन् आपण. स्वभाव तापट पडल्यामुळे लोकांची ये-जा प्रायः नाहीच. वाघ आपल्या गुहेत पडलेला किंवा फिरत असावयाचा, तशी यांची वृत्ति. केसरीत असतांना सुद्धां आतां अगदी समय येऊन ठेपला म्हणजे मग सोमवारी सकाळी अग्रलेख सांगावयाचा. एरवीं काय टाइम्स' वाचतील तेवढा. 'लोकमान्य' व 'नवा काळ ' नवीनच पत्रे असल्यामुळे केसरीपेक्षा थोडे अधिक त्यांजकडे लक्ष दिलें असेल इतकेंच. रोजची वर्तमानपत्रे गड्याने आणून ठेवली तर ती फक्त उलटी करून ठेवावयाची म्हणजे वाचून झाली असे समजा- वयाचे. लोकांची पत्रे येणे, त्यांना रीतसर वेळेवर उत्तरें धाडणे, श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर १११ लेख वाचणे-संपादणे वगैरे कामें त्यांच्या राज्यांत नाहीतच. सायंकाळी ते स्वतः काय डॉ. देशमुख किंवा छत्रे यांजकडे गप्पाष्टके करावयास जातील तेवढाच लोकसंग्रह किंवा त्यांच्याकडेच श्री. वासुकाका जोशी व श्री. गंगाधरराव देशपांडे उतरण्यास आले तर. पुण्यास वास्तव्य असतांना घरून सकाळी निघून लांब कोट, तेव्हां पगडी व आतां गांधी टोपी, गळ्याभोंवतीं उपरण्याची घडी अशा अगदी साध्या पोशाखानिशी गटाराच्या बाजूने एक पाय खर- डत खरडत कचेरीत यावयाचे व संध्याकाळी मोरोबादादांच्या वाड्यांत कवडेशास्त्री यांच्या दवाखान्यांत शिवरामपंत परांजपे वगैरे मंडळी रोज जमावयाची तेथे जावयाचे. १९२० सालानंतर तें सर्व बदलले. कचित् ते येथे आले तर एकदां कोणी साधारणतः नसेल अशा वेळी केसरी कचेरीत जुन्या स्नेही-ऋणानुबंधी लोकांना भेटा- वयास जावयाचे व केशवराव देशमुखांकडे संध्याकाळचा अड्डा पडावयाचा. तेथें तंबाखू खातखात गंभीर वाद, विनोदी चर्चा, चेष्टा वगैरे सर्व प्रकार चालावयाचा. त्यांचा स्वभाव इतका उग्र व कोपिष्ठ आहे की त्यांच्या विरुद्ध कोणी काही बोलल्यास त्याला एकदम काय टाकून बोलतील याचा नेम नाही. सर्वासच त्यांच्या- विषयी भीति वाटते. कोणा कारकुनाने त्यांना काही सुचविण्याचे धाडस केले तर त्याला 'मला माझ्या कारकुंड्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही' असे बक्षिस मिळालेच म्हणून खुशाल समजावें! मानीपणा व आत्मविश्वास तर इतका अंगांत भरलेला की स्वतःस काय करावयाचें तें केल्यानंतर दुसरा काय म्हणतो याची रतिमात्र पर्वा करावयाची नाही. त्यांच्यावर व त्यांच्या नाटकांवर कित्येक टीका व परीक्षणे झाली असतील. टीकाकारांना उत्तर देण्यासाठी त्यांनी कधी हातांत लेखणी धरली असेल तर शपथ. हत्ती आपल्या गतीने जात असतो, तो आजूबाजूला काय चालले आहे इकडे दृष्टि ११२ स्वभाव-चित्रे कधीच वळवीत नाही. कृष्णाजीपंतांची हीच स्थिति. एखादा विषय निघाला तर त्यावरची काही पुस्तकें पाहून साधकबाधक विचार करून आपल्या मनाशी सिद्धान्त बांधावयाचे, यासाठी जी एक प्रकारची तत्परता, साक्षेप व आकलनशक्ति लागते ती त्यांनी फारच कचित् प्रसंगी दाखविली व पटविली. निष्ठा हेच त्यांच्या बुद्धि- मत्तेचे मुख्य लक्षण. टिळकांनी साहाणेवर में गंध उगाळून ठेवावें त्याचा टिळा लावून मिरविणारे आम्हीं, असें में गंगाधरराव नेहमी गंमतीने म्हणतात तेंच कृष्णाजीपंतांनाहि लागू. टिळकांच्या मागें ती निष्ठा गांधींकडे वळली व तेथेही ती तितक्याच अनन्यभावाने खिळून राहिली. नाही तर गांधींच्या कार्यक्रमाची कृष्णाजीपंतांनी आरंभी आरंभी कमी का चेष्टा केली आहे ! परंतु निष्ठा म्हटली की निष्ठा. स्वतः सर्वस्वी तसे वागणे अशक्य असले तरी पुरस्कार अव्याहत- पणें गांधीजींच्या तत्त्वांचा व कार्यक्रमाचा. लहानपणी त्यांना सांग- ण्यांत आले होते की, बुडत असतांना रामराम म्हणावें. ते स्वतः एकदां नदीत बुडत असतां एका गृहस्थाने त्यांना वर काढले. लगेच घरी जाऊन 'मी रामराम म्हटले म्हणून वांचलों' असे सांगि- तले. ही विश्वासाची व निष्ठेची भावना त्यांच्या मनांत मुरलेली आहे. आणि त्या भावनेनेच ते गांधीजींच्या चरख्याच्या कार्यक्रमाचा आपल्या लेखांतून अखंड जप करीत असत. त्याच निष्ठेने अजूनहि त्यांचे जीवित चालले आहे. अलीकडे 'नवाकाळ' पत्राचा व इतर छापख्यान्याच्या धंद्याचा भार आपल्या चिरंजीवावर व संपादकमंडळावर सोपवून त्यांनी आपले लक्ष देवाधर्माकडे लावलेले दिसते. सांगलीस दत्तमंदिर स्थापून ते प्रवचनेंही करूं लागले आहेत. गीता, ज्ञानेश्वरी इत्यादि ग्रंथांचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी काही महिन्यांपासून आरंभिला आहे. त्यांच्या एकलकोंड्या स्वभावास हे वागणे अगदी जुळण्यासारखें श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ११३ आहे. हे मात्र ध्यानात ठेवले पाहिजे की, ते अंमळ वाजवीपेक्षा जास्त माणुसघाणे वाटले तरी बरोबरीच्या चार मंडळीत ते बसले म्हणजे गप्पाविनोदाला कांहीं वाण नाहीं असें असतें. तेथे बोलणें अघळ- पघळ व हंशाही खो खो खो. केव्हां जुन्या गोष्टी सांगतील; कधी आपणांस पकडण्यास खटाव विलिंडगमध्ये शिरतांना लांबून एका लठ्ठ गृहस्थास पाहिले तेव्हां सिनेमाची मोठी जाहिरात देणारे कूळ आले असे आशेने कसे वाटले तेंहि खुलवून सांगतील. पण हा लाभ अगदी निवडक परिचितांनाच मिळावयाचा. चतुरस्र संपादक म्हणून त्यांची कीर्ति नाही तरी केसरीत त्यांनी जे लेख लिहिले ते मराठी वाङ्मयांत टिकतील. परराष्ट्रीय राजकारणाचे ते मार्मिक पृथक्करण करू शकतात हे त्यांच्या 'चित्रमयजगत् ' मधील महायुद्धावरील लेखांवरून सिद्ध होते. पण त्यांची नाटके हेच त्यांचे शेखरीभूत वाङ्मयः' कचित् स्थळी अश्लीलसा वाटणारा विनोद असेल. कचित् स्थळी पदें कांहीतरीच वाटतील. सर्वच पात्रं सारखी उठावदार रीतीने चित्रित केलेली नसतील. पण या दोषांपासून शेक्सपीयर तरी कोठे सुटला आहे ? त्यांच्या नाटकांतील कथानक आकर्षक असावयाचे, महत्त्वाच्या तत्त्वावर नाटकाची उभारणी झालेली असावयाची, पौराणिक कथेचे आधुनिक परिस्थितीच्या चष्म्याने निरीक्षण केलेले असावयाचे, भापा तेजस्वी असावयाची, विविध रस चातुर्याने आळविलेले असावयाचे. अशा स्थितीत त्यांना 'नाट्याचार्य' पदवी जनतेने आपण होऊन वहाल करावी हे यथा- योग्यच होय. जसे चिंतामणराव वैद्य यथार्थत्वाने भारताचार्य व तात्यासाहेब केळकर साहित्याचार्य तसे काकासाहेब 'नाट्याचार्य.' असा हा महाराष्ट्रीय शेक्सपीयर साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विराजमान व्हावा हे जसें कांही रामाच्या देवळांत सोन्याची घांट बांधण्यासारखें परस्परशोभादायक झाले. याच्यापूर्वीच कृष्णाजी- ११४ स्वभाव-चित्रे पंतांना हा मान मिळावयास पाहिजे होता. परंतु त्यांना प्रसिद्धीचें फार वावडे. ज्या गृहस्थाने गतवर्षी आपला ६१ वा वाढदिवस जाहीर रीत्या होऊं नये असें उत्सव साजरा करणाऱ्या मित्रमंडळीस साफ सांगितले त्याला या मानापमानाचे काय होय ? त्यांना साहित्य- संमेलनाचे अध्यक्षस्थान इतके दिवस लाभू देण्यांत आले नाही हे सत्य. तथापि त्यांच्या नाट्याच्या विद्येचे कोणी हरण करूं शकला काय? असो. एक वर्षाच्या तुरुंगवासानंतर प्रकृति खचली म्हणून म्हणा किंवा 'येतां अशुभसा काल नवा, तपाने ध्येय मनि सेवा, स्वकर आवरा, कूर्म गुरु करा' या शिकवणीने म्हणा, त्यांनी मन धार्मिक, पारमार्थिक विषयांत घातले आहे. या चिंतनांतून एखाददुसरे परि- पक्क असें नाटकरूपी फळ मराठी भाषेच्या पदरांत पडलें तरी हवेंच आहे. अथवा गीता, ज्ञानेश्वरी वगैरे परिशीलनाने गीतारहस्या- सारखा प्राकृत लोकांस चिरंतन मार्गदर्शक होणारा 'ग्रंथराजु' बाहेर पडला तरीहि कृष्णाजीपंतांच्या हातून एका दृष्टीने आपले राजकीय गुरु लोकमान्य टिळक यांस गुरुदक्षिणा मिळाल्याचे स्वर्गीय समा- धान लाभेल.

श्री. माधव श्रीहरि अणे
Who is the Happy Warrior ? Who is he
That every man in arms should wish, to be ?
'Tis finally the man, who, lifted high,
Conspicuous object in a Nation's eye,
Or left unthought-of in obscurity,
Who......
Plays, in the many games of life, that one
Where what he most doth value must be won:
Whom neither shape of danger can dismay,
Nor thought of tender happiness betray:
Who, not content that former worth stand fast,
Looks forward, persevering to the last,
From well to better daily self--surpast:
Finds comfort in himself and in his cause.
-Wordsworth
किर्लोस्कर नाटकगृहांत सभा होती. लोकमान्य टिळक अध्यक्ष
होते. बापूजी अण्यांचे भाषण झाले. तात्यासाहेब केळकरांनी आभार
मानले. आपल्या आभार-प्रदर्शक बोलण्यांत ते म्हणाले, अण्यांच्या
बाबतींत 'लहान मूर्ति पण थोर कीर्ति' ही म्हण सार्थ झाली.
१९१७ सालीच हे खरे होते तर आज सोळा वर्षांनी किती तरी
पटीने अधिक खरे नाही का ? तेव्हां बापूजी फार तर एकट्या
वहाडचे पुढारी गणले जात. आता ते अखिल भारताचे नेते म्हणून
समजले जातात व ते लोकनायक यथार्थनाम झाले आहेत. टिळकांची

स्वभाव-चित्रे लोकमान्य ही जशी पदवी, तशी अण्यांची लोकनायक ही. टिळक गुरु व अणे शिष्य. अशी गुरुशिष्यांची जोडी विरळाच आढळते. म्हणून तर श्रीधर कवीने अशी महती गाइली आहे की चतुर आणि पवित्र मित्र, सर्वज्ञ व दयाळू देशिक, भाविक व उदार शिष्य, सुंदर गृहिणी, भक्तिमान् पुत्र, व्युत्पन्न व सुरस वक्ता हे पूर्वसुकृतानेच प्राप्त होत असते. टिळक-गांधींची पुण्याई म्हणून अणे त्यांना शिष्य लाभले कां अण्यांचे पूर्वदत्त चांगले म्हणून टिळक-गांधींचें छात्रत्व त्यांच्या नशिबी आले, हे सांगणे जरा कठिण आहे. तथापि वस्तु- स्थिति मात्र अशी होऊन बसली की, टिळकांना अण्यांच्याविषयी अत्यंत अभिमान वाटावा व गांधींनाहि अण्यांचे सहकार्य म्हणजे राजकीय घबाड हस्तगत झाल्याचा आनंद व्हावा. १९१८ च्या स्वराज्याच्या दौऱ्यांत लोकमान्य टिळकांनी अण्यांचे जनतेवरील वजन समक्ष पाहिले, तेव्हां त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरवाचे निदर्शक असे पूस नदीच्या वाळवंटांत 'ही स्वराज्याची पंढरी होय' असे उद्गार काढले; तर गतवर्षी पनवेलच्या महाराष्ट्र प्रांतिक परिषदेच्या प्रसंगी 'Be my mouth-piece #1 strai sugiar agaran संदेश दिला. टिळकांचे अनुयायी अण्यांना छोटे टिळकच समज- तात. सामान्यपणे दिसण्यांत ते टिळकांच्यासारखे दिसतात सुद्धा. देहयष्टीने लहान-खुरे, डोक्यावर पगडी, मुद्रा किंचित्शी क्रूरांतच जमा, पोषाखाचा अगदी साधेपणा, खोल विचाराच्या दर्शक अशा कपाळावर दोन-तीन आठ्या, तें बसणे-उठणे, तें घाईने इतरांस चटकन् न समजणारे बोलणे, ती हातांतील काठी, इत्यादि गोष्टींत तर कोणीही 'हे चित्र पहा आणि हे चित्र पहा' असें साम्य दाखविण्याच्या हेतूने म्हणावें. शेक्सपीयरने असे लिहिलें तें विरोध- दर्शनासाठी. टिळक-अण्यांच्या रूपांतील व चाल-चलणुकीतील सारखेपणा काही विशेष वाटतो. राजकारणांतील विचारसरणी सदैव श्री. माधव श्रीहरि अणे युध्यमान; चर्चापद्धति अगदी सडेतोड, झोपेच्या वेळेशिवाय इतर वेळी स्वराज्य-स्वातंत्र्या-खेरीज दुसरी चिंता नाही. आणि असे संक्षिप्त टिळक महात्माजींच्या राजकीय कार्याला जुंपले गेले तर त्यांना तरी कां बरें अभिमान न वाटावा ? बापूजी अण्यांचे सार्वजनिक चारित्र्य व कार्य विकसित व वर्धिष्णु असे पाहिले म्हणजे मनूच्या माशाची आठवण होते. स्वतः नाग- पूरच्या मॉरिस कॉलेजांत असतांनाच १८९८ साली कॉलेजांत टिळ- कांना बोलाविण्याचा उपक्रम बापूजींनी केला. तेव्हापासून प्रारंभ. पुढे अमरावतीचे शिवाजी विद्यालय' झाले; स्वदेशीची चळवळ झाली; 'इरिकिशोर' पत्र झालें; यवतमाळची जिल्हा सभा झाली; व-हाडांतील जमीनधाऱ्याची व जंगल-तकारीची चळवळ झाली; स्वराज्य पक्षाची धामधूम झाली; लेजिस्लेटिव्ह अॅसेंब्ली झाली; नेहरू रिपोर्ट झाला; व-हाडांतील जंगलसत्याग्रह झाला; परवांची कलकत्ता काँग्रेस झाली. अगदी पहिल्या पायरीपासून सुरवात करून थेट शिखर गांठलें. लहान बीचा वाढत वाढत मोठा वृक्ष झाला. पाया- पासून बांधतां बांधतां मजलेदार इमारत पुरी झाली म्हणावयाची; प्रस्तावनेपासून परिसमाप्तिपावेतों ग्रंथाचे भाग लिहून झाले. तसे पाहिले तर त्यांना चोपन्नावें वर्ष चालू आहे. उमेद अशी आहे की अजून पुष्कळ देशसेवा करूं. 'अधिकस्याधिकं फलं' हे तर उघडच आहे. परंतु झालें तें कांहीं कमी का आहे ? अशी विलक्षण उत्क्रांति व विस्तार किती लोकाग्रणींच्या आयुष्यांत आढळतो ? खरोखरच हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या. जास्त नाही. दिळकांचे कल्याण गणले जाणारे बापूजी, गांधीजींच्या अनुयायांत कसे समाविष्ट झाले याचे कित्येकांना बरेंच आश्चर्य वाटते. पण जेथे जातीची अस्सल देशभक्ति आहे तेथें टिळक-गांधी हा भेद नष्टच होतो. आणि असला तरी स्वातंत्र्यप्राप्तीच्या आंदोलनांत तो भेदा- ११८ स्वभाव-चित्रे भेद लुप्त होऊन जाणे स्वाभाविक आहे. बरें, बापूजींच्या बाबतीत देशभक्ति कोणी उत्पन्न केली असें विचारणे, हे मोराचा पिसारा इतका सुशोभित कोणी केला, सूर्याला इतके तेज कोणी दिलें, चंद्राला इतके शांतिप्रद किरण कोणी अर्पण केले, असेंच विचारण्या- प्रमाणे होय. टिळकांसारखा वीर पुरुष सरकारशी सामना करणारा पाहिला, बापूजी तिकडे आकर्षिले गेले. टिळक गेले, गांधी आले; आणि ते जेव्हां राष्ट्रांत युयुत्सु प्रतिकारवृत्ति चेतवू लागले तेव्हां अणे निसर्गतःच त्यांच्या निशाणाखाली लढाई करूं लागले. प्रथम- पासून अण्यांची प्रवृत्ति युद्धप्रवण आहे. स्वार्थत्याग, तडफ, बाणेदार- पणा हे त्यांच्या कार्याचे स्थायिभाव होत. १९०९ साली, म्हणजे वकिली सुरू केल्यावर दोन-तीन वर्षांच्या आंतच, बापूजींची सनद रद्द करण्यांत आली, तेव्हां ते डगमगून तर नाहीच गेले; उलट म्हणाले की, सरकार फार तर सनद घेईल, पण बुद्धीवर कांहीं ताबा चालवू शकणार नाही ना! हे उद्गार वाचले म्हणजे, एका केवलमव साधनविधौ सेनाशतेभ्योधका नंदोन्मूलनदृष्टवीर्यमहिमा बुद्धिस्तु मा गान्मम । या आर्य चाणक्याच्या उक्तीची कशी आठवण झाल्याखेरीज राहील ? सांप्रत जरी तशीच स्थिति प्राप्त झाली तरी ते कधी दुःखाचे उसासे टाकीत बसले नाहीत. एकदा जें सतीचे वाण घेतले ते घेतले. १९२५ सालीं कुटुंब निवर्तलें तरी ते विषण्णमनस्क होऊन बसले नाहीत. त्यांचे अंगीकृत कार्य अखंड चालूच. त्यांत काडीची कसूर व्हावयाची नाही. टिळकांनी पुण्यास बोलाविलें की तडक निघून यावयाचें; दिल्ली-सिमल्यास असेंब्लीच्या कामासाठी असले म्हणजे मोठ्या मुकदम्याचा लाभ असला तरी उडाणटप्पू विद्यार्थ्या- प्रमाणे असेंब्लीला 'बुटीस' ? द्यावयाची नाहीं; नेहरू-रिपोर्टाच्या लेखनाच्या वेळी अलाहाबाद येथे घरदार सोडन माहनेन माहने श्री. माधव श्रीहरि अणे ११९ मुक्काम करावयाचा; महात्मा गांधींच्या उपवासाच्या निमित्ताने पुण्यास दीर्घकालीन तळ पडला की ठरल्याप्रमाणे रोज 'पर्णकुटी'. वर जाऊन त्यांच्या प्रकृतिमानाची चौकशी केल्याशिवाय राहावयाचे नाहीत. असा एकनिष्ठपणाचा कार्यक्रम अव्याहत चालावयाचा. याचा अर्थ ते एककल्ली आहेत असा मुळीच नाही हो. गप्पाष्टकें मारण्यांत ते कसे पट्टीचे आहेत. त्यांच्या इतपत लोकसंग्रह फार थोड्यांचा. टिळक-गांधींचा अफाट हे निःसंशय. पण त्यांच्याशी गप्पा मारावयास लहान माणसास जरा संकोच वाटतो. अण्यांचे तसे नाही. 'मौने मौनी गुणिनि गुणवान् पंडिते पंडितोऽसौ' या सुभाषितांत वर्णिलेल्या पुरुषाप्रमाणे त्यांची वागणूक. यवतमाळास घरी असले काय अगर परगांवीं कोणा स्नेह्याच्या घरी असले काय, त्यांच्याभोंवती मंडळी जमावयाचीच. एकदां चंची सोडून चर्चेचा, गप्पागोष्टींचा फड पडला म्हणजे काही विचारूं नये, 'अविदित. गतयामा रात्रिरेव व्यरंसीत् !' अशी अवस्था होऊन जावयाची. पत्नीनिधनानंतर पान सोडले. पण सुपारीची डबी ही जणुं पतिव्रते. सारखी त्यांची मनोभावाने सेवा सदैव करीत असते. गाडीच्या चाकाला वंगण व त्यांच्या रसनेला सुपारीची खांडे. एकाद्या लाडक्या गांवी आपल्या जिव्हाळ्याच्या बहुसाल मित्रमंडळीपैकी कोणाकडे ते गेले की हां हां म्हणतां बातमी गांवभर पसरावी व वामनाने वनसुधेत लिहिल्याप्रमाणे, खडबडोनि समस्तहि धांवले । सहित-वत्स हरीप्रति पावले ॥ असें दृष्टीस पडावे. आणि पुण्यास येऊन राहिले तरी देखील काय, एकदां गांधींकडे जाऊन येण्याचे काम उरकलें की येईल त्याच्याशी बोलावयास स्वारी तयारच. तात्यासाहेब केळकरांबरोबर राजकीय विषय उन्मखून निघत नाही म्हणून हवापाण्याच्या गप्पा १२० स्वभाव-चित्रे निघाल्या तरी त्यांत रंगणार व मूळाक्षरांच्या तक्त्याकडे बघत बघत ञ व ळ या दोन अक्षरांनी चित्रकारांना फसविलेंच की' असेंही म्हणणार; धुळ्याच्या आप्पासाहेब केळकरांचे समाजसत्तावादी चिरं- जीव आले तरी त्यांच्याशी समरस होणार; माटेमास्तरांसारखा गंभीर व विचारी पण खरी पोटतिडीक बाळगणारा अस्पृश्यता निवारक आला तरी त्याच्याशी तन्मय होणार; कवडेशास्त्र्यांसारखा कडकडीत सनातनी उपस्थित झाला तरी त्याच्याशी आपुलकीने बसणार-बोल- णार; घरी फार कंटाळा आला तर डॉ. केतकरांच्या बंगल्यावर जाणार किंवा बापूसाहेब चाफेकरांकडे बैठक मारणार. पुन्हा, बोलणे अगदी अघळपघळ. बोलतांना विनोद करतील, सहज कोणाची चेष्टा करावयाची असली तर नाकाला नुसतीच चिमटी लावून, तपकीर ओढल्यासारखे करून एखाद्याचा अभिनय करून दाख- वितील. क्वचित्प्रसंगी असे काही तरी बोलतील की बरोबर अस. लेल्या मंडळींच्या हसून हसून मुरकुंड्या वळून जातील. विशेष वाद निघाला तर ओघांत रागावतील, चिडतील, कदाचित् कोणास लागण्यासारखें बोलतील. पण मन आरशासारखें निर्मळ व प्रेमळ. त्यामुळे स्वतः ते तर ताबडतोब विसरतातच. पण ज्याला बोलले असतील तो देखील हवेत बोललेले हवेत विरून गेलें; पाटीवर लिहिले, पाटी पुसून टाकली; असेंच खरोखरी मानतो. बापूजींच्या गप्पा म्हणजे बौद्धिक मेजवानी. एका संस्कृत कवीने तीन प्रत्यक्ष सौख्ये सांगितली आहेत. त्यांत 'सुभाषितज्ञेन जनेन साकं संभाषणं' याला अग्रस्थान दिले आहे व इंग्लिश कवि पोप याने अशा स्वरूपाच्या कथाप्रसंगाला उद्देशून Feast of reason and flow of soul असा श्लोकचरण रचला आहे. बापूजींच्या गप्पागोष्टींना बऱ्याच अंशांनी हे वर्णन लावतां येते. कारण अणे हे नुसते राजकीय पुढारी नाहीत. ते लोकाग्रणी श्री. माधव श्रीहरि अणे असून व्युत्पन्न आहेत. पढिक विद्वान् असून विनयशाली आहेत. राजकारणी असून धर्मनिष्ठ सनातनी आहेत. चळवळ करणारे असून विद्याव्यासंगी आहेत. त्यांची बुद्धि क्षुरधारेसारखी तीक्ष्ण आहे. विचार करण्याची पद्धति खोल आहे. त्यांची उपस्थिति फार प्रशंस- नीय आहे. व्याख्यानांत बोलण्याची रीत अशी की त्यांना बोलतांना पाहिले व ऐकले म्हणजे टिळकांची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी आहेसे वाटावें. भाषणांत दाखले आले की ते भारत-रामायणांतील यावयाचे, आधार द्यावयाचा तर वेदांतील ऋचांचा. मूळ घराणे आंध्रांतील. तेलंगणांतील म्हणून वडे, भजी वगैरे तेलकट पदार्थ भातांत कुसकरून खाणे जसे त्यांना प्रिय, त्याप्रमाणे संस्कृत जुन्या- नव्या ग्रंथांचे परिशीलन. असेंब्लीत होते तेव्हां मध्यारात्रीपर्यंत जागून कागदपत्र वाचीत. रेल्वे फायनॅन्स कमिटीचे सभासद होते तेव्हां रात्रौ दोन-दोन वाजेपर्यंत बसून कोठे ज्यूक्सचा रिपोर्ट पाहा, कोठे स्वतःची टिपणे तयार कर हे चालावयाचे. वकिली होती तेव्हां इजारदारांच्या हक्क संरक्षणासाठी खलिते लिहून काढावयाचे. आतांहि रिकामपण सांपडले की, महाभारताची भांडारकर इन्स्टिटयूटची नवी आवृत्ति पहा, अगर डॉ. बाळकृष्णांच्या इंग्रजी शिवचरित्राची पाने चाळ, हा उद्योग आरंभावयाचा. अलीकडील इंग्रजी-मराठी वाड्मयाचा त्यांचा परिचय अगदींच नमस्कार करण्यापुरता, त्यांनीच परवां सिंहगडी गेले होते तेव्हां कबूल केले. पण ही उणीव जुन्या ग्रंथांच्या सघन ज्ञानाने त्यांनी खास भरून काढली आहे. पाठांतर व प्रत्युत्पन्नमतित्वही वाखाणण्यासारखे आहे. १९१९ साली यवतमाळास 'लोकमत' पत्र सुरू झाले. त्या पत्रावर घालावयास संपादकाने एक श्लोक बापूजींजवळ मागितला. पत्राच्या प्रसिद्धीचा दिवस तर येऊन ठेपलेला. बापूजी गांवाला जाण्यास मोटारींत बस- लेले. तथापि त्या मोटारगर्दीत एका शब्दाचा फरक करून त्यांनी the १२२ स्वभाव-चित्रं inn 'विचरति लोकमतः प्रदीप्तरश्मीः' हा जुनाच श्लोक क्षणांत लिहून संपादकाच्या हातांत टाकला. 'अध्यक्षस्यावालिप्तस्य' हे टिळकांचें अवतरण तर महशूर आहे. व केळकरांनी देखील किर्लोस्कर नाटक गृहाच्या आंत ब्रीदवाक्य म्हणून रंगविण्यासाठी स्वतःच एक ध्येय- दर्शी श्लोक बनवून दिल्याचे त्यांच्या मित्रवर्गास आतां ठाऊक झालें आहे. हे सारे खरे असले तरी, एवढे मात्र कबूल केले पाहिजे की, बापूजींच्या बोलण्यांत मधूनमधून गांवरानी शब्द येतात. सुग्रास भोजन करतांना मधेच दांताखाली करकन् खडा यावा, तसे त्यांचे कांही ठराविक प्राकृत शब्द आले म्हणजे ऐकणाराला होते. त्यांच्याशी ज्यांची दाट ओळख झाली आहे, त्यांना याचें कांहींच वाटत नाही. पण अंमळ नाजूक मनाच्या मनुष्याला धक्काच बसावयाचा. दुसरें असे की, त्यांचे हस्ताक्षर फार वाईट आहे. कोणी म्हणतात की, मोठ्या माणसांचे अक्षर वाईट असते. कोणी हस्ताक्षरावरून स्वभा- वाचा कयास बांधतात. बापूजींच्या बाबतींत असा स्वभावानर्णय सर्वस्वी खोटा ठरेल हे निश्चित. सुंदर व वळणदार · अक्षर म्हणजे कसे मोत्यासारखे असावें. बापूजींचे पाहिले तर कोंबडीचे पाय व बदकाची चोंच. शिवाय ते जसे घाईघाईत व तोंडांतल्या तोंडांत बोलतात, तसेंच गिचमिड गिचमिड लिहितात. परंतु लेखन मात्र तर्कशुद्ध असावयाचें. उगीच नाहीं गांधींनी देखील ' Calm logic of Mr. Aney ' असे आपल्या 'यंग इंडियांत' कधीच विधान करून ठेवलें! त्यांच्या वादपटुत्वाप्रमाणे त्यांचा करारीपणा लक्षात घेण्यासारखा आहे. असेंब्लींत कधी आपण होऊन अधिकारी साहेबापाशी लाळ. घोटेपणा करावयास गेले नाहीत. उभ्या अॅसेंब्लींत केळकर व अणे हे दोनच असे हिरवे सभासद की, त्यांनी आपली जागा केव्हां कामाशिवाय सोडली नाही. इतर काय, साहेब दिसला की स्मित श्री. माधव श्रीहरि अणे १२३ करावयाचे हस्तांदोलन व्हावयाचें; बरोबर चहा-बिस्किटें खावयाची; एकाद्या नातेवाईकाच्या नोकरीसाठी खटपट व्हावयाची; कोणी कोणी तर ज्योतिष पाहाण्याच्या बहाण्याने साहेबाच्या अंतर्गृहांत सुद्धा प्रवेश संपादन करावयाचे. अणे-केळकर काय, नाकासमोर जावयाचे व नाकासमोर परत यावयाचे. यवतमाळास प्रांतांतील बडे हपीसर येतात--जातात. त्यांनी बापूजींकडे वाटेल तर प्रथम यावे, मग बापू- जींनी परतभेट द्यावी. एरवीं नाहीं. तो भला नि आपण भले. पण हे सगळे हुद्दयावरील अधिकाऱ्यापुरतेच. आपापसांत कदापि नाही. पालघरला ठाणे जिल्हा परिषद् मागे झाली. बाळासाहेब दांडेकरांच्या भव्य बंगल्यांत स्वतंत्र खोलीत, ते अध्यक्ष या नात्याने, त्यांची खास सोय केली होती. बरोबर गेलेली प्रतिनिधि, पाहुणे वगैरे मंडळी त्यांच्यापासून दूर दूर आपले बिछाने घालून निघू लागली. आपणाला मंडळी टाळतात काय, असे पाहून बापूजी उठले, त्या मेळाव्यांत जाऊन घुसले व तेथील एका गादीवर मुद्दाम निजले. बरोबर त्यांना सामानाचा फारसा लबेदा नको असतो. प्रवासांत कोणी स्नेही- सोबती बरोबर असलेच तर गाडींत गप्पा मारावयाच्या व खायचें- प्यायचे. एकटेच असले तर आपली जागा सोडून खाली देखील उतरणे मुष्कील. पैशाचे पाकीट, छत्री, घड्याळ वगैरे जवळ संभा- ळणे म्हणजे त्यांना कटकट वाटते. राष्ट्रीय सभेच्या बैठकीला गेले की, मुक्कामावर पोंचतांच पैसे असतील नसतील ते एकाद्या बरो- बरच्या माणसाजवळ खुशाल देऊन टाकावयाचे; त्याने विचारावें 'बापूजी, पैसे कमजास्त झाले तर तुम्हांला कसे कळणार ? ' बापूजींनी उत्तर द्यावें, 'आम्ही देतो, आम्हांला कांहीं माणसाची पारख आहे की नाही?" इतके सारखे हिंडतात-फिरतात की, त्यांच्या पायाला जसें कांहीं कायमचे चाक बांधलेलें. पण असे असून धर्माचरणास कधी चुकत. -- १२४ स्वभाव-चित्रे नाहींत. स्नान, संध्या, उपोषण वगैरे अंतरावयाचे नाही. कडकडीत थंडीत अमृतसर येथे राष्ट्रीय सभेच्या वेळी किंवा अॅसेंब्लीच्या अधि- वेशन-प्रसंगी सिमल्यास सुद्धा संध्या केल्याशिवाय राहावयाचे नाहीत. कलकत्त्याच्या काँग्रेसच्या निमित्ताने अटक झाल्यावर त्यांना मिदना. पूरच्या कच्च्या तुरुंगांत ठेवले. संध्येच्या उपकरणासाठी भांडून अखेरीस ती मिळविली व त्या टिनपॉट भांड्यांनी संध्या पार पाडली. हा एक प्रकार. नेहरू रिपोर्टाच्या निमित्तानें अलाहाबादच्या वास्त- व्यांत सर तेजबदुर सप्रू यांच्याकडे, त्या दिवशींचे काम उशीरा संपल्यामुळे, रात्रींच्या भोजनाचा प्रसंग पडला. सप्रू म्हणजे भले मोठे लॉर्ड. त्यांच्या उमरावी थाटाच्या राजवाड्यांत संध्यावंदन म्हणजे लॉर्ड सिंह बिहारचे गव्हर्नर असतांना तेथील गव्हर्मेट हाऊस मधील तुळशी-वृंदावन अथवा तांबे मध्यप्रांताचे गव्हर्नर असतांना नागपूरच्या गव्हर्मेंट हाऊसमधील मंगळागौरीची पूजा, यांच्यासारखी एक 'न भूतो न भविष्यति' अशी जणुं अघटित घटना. मोठ्या प्रयासाने बापूजींनी काय काय सामान पाहिजे तें नोकराला नीट समजावून सांगितले. त्याने काय विचारतां, बड्या पाहुण्याची उत्तम बरदास्त ठेवावयाची म्हणून भव्य व्यासपीठ, भारी भारी शालजोड्या, चांदीचे उत्तर हिंदुस्थानी घाटाचे जंगी जंगी लोटे सादर केले. आणि मग त्या उच्चासनावर विराजमान होत्साते आमचे बापूजी अणे संध्यावंदन करते झाले ! हा दुसरा प्रकार. त्यांना बिचाऱ्यांना काय, पहिल्याचा विषाद नाही आणि दुसऱ्याचा हर्ष नाही. संध्या झाली एवढेच समाधान. याला म्हणावें स्थितप्रज्ञ. याचें नांव कर्म- योगी. या गोष्टीत त्यांची जी वृत्ति दिसून येते तीच त्यांची मोठी मोठी राजकारणे करतात त्यांतही प्रभावी असते. ते खरोखरच इतके त्यागी व विरागी आहेत की, कदा वाराणस्याममरतटिनीरोधसि क्सन्" हा भर्तृहरीचा श्लोक त्यांच्या जिव्हाग्रावर खेळत असेल श्री. माधव श्रीहरि अणे १२५ अशी कल्पना केली तरी ती काही अगदीच अवस्त्वारोप केल्याप्रमाणे होईल असे नाही. खरे खोटें कोणास ठाऊक, पण श्रीशंकराचार्य कुर्तकोटी त्यांनाच पीठावर नेमणार अशी वार्ता काही वर्षांपूर्वीच कित्येकांच्या कानी आली होती म्हणतात. शास्त्रीबोवांनीं 'विद्वत्व आणि कवित्व हा लेख निबंधमालेत लिहिला. अलीकडच्या काळी जर कोणी 'विद्वत्व आणि नेतृत्व' असा लेख लिहिला तर त्यांत बापूजींना बरेंच वर स्थान द्यावे लागेल. ही जोडी आतां फुटत चालली आहे असे समजले जात आहे. टिळक जसे पुढारी असून पंडित होते, तीच बापूजींची गत. विलायतेत देखील बर्क, ग्लॅडस्टन, डिझरॅली, ऑस्क्विथ यांची परंपरा जुन्या स्वरूपांत प्रस्तुत चालू नाही. कदाचित् लोकशाहीच्या काळांत ही दुक्कल सदैव कायम टिकून राहणे कठीणही होईल. पुढचे कोणी सांगावें ? बापूजींची प्रत्यक्ष वाङ्मयसेवा अशी अल्पस्वल्पच आहे यांत शंका नाही. ग्वाल्हेरच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. व-हाडच्या शारदाश्रमाचे ते सूत्र- चालक आहेतही. त्यांनी चार-सहा ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. मराठी भाषेवर व इतर राजकीय विषयांवर त्यांचे थोडेबहुत लिखाण आहे. त्यांच्या व्याख्यानांचा व लेखांचा एक ग्रंथ प्रसिद्धहि झालेला आहे. परंतु परांजपे, केळकर, खाडिलकर यांच्या लेखनसमृद्धाशी त्यांची तुलना करावयाची म्हणजे दर्या में खसखस. परंतु बापूजी केव्हां साहित्य- सेवेची बिरुदावली स्वतः डोक्यावर मिरवत नाहीत. सोलापूरच्या जिल्हासभेचे अध्यक्ष या नात्याने त्या शहरी गेले असतां, एका साहित्यसंस्थेने त्यांचा व तपस्वी बाबासाहेब परांजपे यांचा सन्मान केला. उंच रानगवतांतून चालून गेल्यावर धोतरांत गुंतलेली कुत्रीं काढून टाकावी, त्याप्रमाणे त्या उभयतांनीही आपल्या पदरास चिक- टत असलेली वाङ्मयसेवा झाडून टाकली. वस्तुतः बापूजींची जी १२६ स्वभाव-चित्रे वाङ्मयसेवा आहे ती कोंकणांतल्या भातशेतीसारखी आहे. एक शेत त्यांत राब पेटवून भाजावें, पाऊस पडला म्हणजे भातपेरणी करावी व त्याचे रोप चांगले उगवून तयार झाले म्हणजे मग ते उपटून बाकीच्या शेतांत दोन-दोन, तीन-तीन रोप वेगवेगळे दूर दूर लावावे. ही पुढची दुसरी विस्तरशः लागवड करण्यास बापूजींना सवडच मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या शेतीला पीक आले नाही. मग कोठारांत धान्यसंचय कसा होणार ? शिवाय, त्यांचा पेशाही थोडा निराळा. त्यांतून संधि आली तर कागदावर लेखणी ओढण्याचा मनस्वी कंटाळा. ते म्हणतातच, भाषण लिहून काढावयाचे आपल्या देवाच्याने होणे नाही. तें कांही असले तरी, त्यांना वाङ्मयाचा छंद असता तर ते त्या क्षेत्रांत सुद्धा पहिले नाही तरी, पहिल्या पंक्तींत बसण्यास पात्र ठरले असते, असे त्यांच्या असलेल्या लेखनावरून म्हणण्यास विशेष प्रत्यवाय नाही. ही बाजू नसल्यामुळे बापूजींची योग्यता किंचिदपि कमी होते असें मात्र नव्हे. कारण अखेरीस इतिहासांत पांडित्यप्रकर्ष श्रेष्ठ ठरणार, कां राजकीय कर्तबगारी व समरांगणावरील पराक्रम श्रेष्ठ ठरणार हे एक न सुटणारे कोडे आहे; व यदाकदाचित् ते सुटले तर ती एक न पटणारी गोष्ट होईल. जनरल वूल्फनें शिताफीने व शौर्याने केबेकचा किल्ला पाडाव केला. पण बाण सोडतांना, 'हा विजय संपादन करण्यापेक्षां The paths of glory learl but to the grave et à faizi 3110 PETÈOT बरे' असे त्याने उद्गार काढल्याचे इतिहासांत नमूद आहे. उलट स्कॉटने आपल्या कादंबऱ्यांतून जाज्वल्य देशाभिमानाचा प्रसार केला, पण स्वतः रणभीरु म्हणून त्याचा अधिक्षेपही कोणी केला तर तो सोसावा लागतो. या प्रश्नाचा निर्णय कांहीही लागो वा न लागो. वर्ड्सवर्थनें हॅपी वॉरियर' या कवितेत किंवा रे. टिळक कवीने ' लोकमित्र' श्री. माधव श्रीहरि अणे १२७ या कवितेंत जो पुरुष कल्पिला आहे, त्याच्याशी बापूजींचे फार साम्य आहे म्हटले तर अतिशयोक्ति नाहीं, वस्तुवर्णनच आहे. प्रत्येक तरुण हिंदी कार्यकर्त्याने त्यांचेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. हा 'सुखी योद्धा' आपल्या अंतःकरणांतील दीपशिखेच्या प्रकाशांत व्यवहार करतो. जितकें दुःख व कष्ट अधिक तितकी त्याची सहनशीलता वाढती. एकदां ध्येय निश्चित केले की, त्याच्या पूर्तीसाठी अव्यभिचारी निष्ठा व अप्रातहत यत्न. अकस्मात् आपत्ति कोसळली तरी त्याची बुद्धि विचलित होत नाही. राष्ट्राच्या डोळ्यात भरण्यासारखा अग्रपूजेचा मान मिळो अथवा अप्रसिद्ध स्थितीत राहून कार्य करण्याचा प्रसंग येवो. आयुष्यांत जी सिद्धि प्राप्त करून घ्यावयाची असते, तिच्यासाठीच परिश्रम करीत असतो. समोर धोका असला तरी डरत नाही, सुखाच्या विचारनें कच खात नाही. झाले एवढे पुष्कळ झालें, इतिकर्तव्यता झाली, असें म्हणून संतुष्ट होऊन राहात नाही, तर दृष्टि पुरोभागी फेकतो. अखेरपर्यंत यत्नसायास सोडीत नाही. कालच्याहून आज, आजच्याहून उद्यां अधिक, अशा चढत्या श्रेणीने यशःप्राप्तीच्या मार्गाचे आक्रमण करीत जातो. असा ववर्थचा 'हॅपी वॉरियर,' असाच रे. टिळकांचा 'लोकमित्र' आणि असेच आमचे बापूजी अणे. आणि म्हणूनच शेवटी त्या आंग्ल कवीच्या शब्दांच्या अनुरणनाचा वाचकांस आराम व लेखणीस विराम देऊ याः- This is the Happy Warrior; tbis is he That every man in arms should wish to be. आणि म्हणूनच रेव्हरंड टिळकांच्या समवेत आपणही भरतवाक्य - गाऊं याः- - धन्य ! धन्य ! या धन्य विभूति ! प्राप्ति यांची स्वर्गप्राप्ति ! देवा! यांची भारत जगती वाट सदा बघते !

१२ पंडित जवाहरलाल नेहरू शमयति गजानन्यान् गंधद्विपः कलभोऽपि सन् भवति सुतरां वेगोदग्रं भुजंगशिशोर्विषम् । भुवमधिपतिर्बालावस्थोऽप्यलं परिरक्षितुम् न खलु वयसा जात्यैवायं स्वकार्यसहो भरः ।। -विक्रमोर्वशीयम् महात्मा गांधींचा संयुक्त प्रांतांतील दौरा काही आठवड्यांपूर्वी संपला. परत जातांना लोकांनी त्यांना विनंति केली, " महात्माजी, आपला कांहीं तरी संदेश सांगा की जो आम्ही सगळ्या जनतेला निवेदन करावा." महात्माजींची लघुसंदेशपदा वाणी बाहेर पडली की, " सर्वजण पंडित जवाहरलाल व्हा. " नेपोलियन बोनापार्टला ज्याप्रमाणे कौतुकानें 'लिट्लू कॉरपोरल् ' म्हणून पदवी देण्यात येत असे, त्याप्रमाणे म. गांधी पं. जवाहरलालजींना नेहमी मजेनें आमचा तरुण सेनापति' या नावाने संबोधतात. आजकाल ज्याच्या त्याच्या तोंडी पंडित जवाहरलाल नेहरू व बाबू सुभाषचंद्र बोस. सर्वांचे डोळे या उभयतांच्या हालचालींकडे व संभाषणा- व्याख्यानांकडे. यंदा नागपूरला अखिल भारतीय मजूर-संघ परिषद् होती, तिचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल. गुदस्तां पुण्यास मुंबई इलाखा युवक परिषद् होती, तरी तिच्या अध्यक्षत्वाची माळ पंडित- जींच्या गळयांत. अगदी १९१२ साली बैरिस्टर होऊन ते परत आले, तेव्हांपासून नाही तरी १९१७ साली मिसेस अनी बेझंट यांच्या हामरूलच्या चळवळीत ते भाग घेऊ लागल्यापासून राजकीय आंदो- लनाच्या आघाडीस ते आहेतच असे म्हणण्यास काही हरकत नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू १२९ १९१९ साली 'इंडिपेंडंट' पत्राचे ते डायरेक्टर झाले. पंजाब- मधील हत्याकाण्डानंतरच्या राष्ट्रीय सभेच्या चौकशीत प्रमुखपणे त्यांनी आपल्या कामाचा वाटा उचलला. १९२० साली वकिलीवर उद्धक सोडले. नंतर औध येथील शेतकी चळवळीत पुढाकार अवला, व कुळांचा कायदा बदलून घेतला. १९२३ सालापासून तर राष्ट्रीय सभेचे ते सर चिटणीस आहेतच. हिंदुस्थानी सेवादलाचे ते दोनदां सभापति झाले; पहिल्या रिपब्लिकन (स्वाधीन भारत) परि- षदेची मुहूर्तमेढ मद्रास येथे १९२७ मध्ये त्यानी रोवली. साम्राज्य-विरोधी संघाची जागतिक परिषद् दोन वर्षांपूर्वी ब्रूसेल्स येथे भरली, तिला हिंदी राष्ट्रीय सभेचे पहिले प्रतिनिधि म्हणून तेच हजर; सोव्हिएट रशियांतील स्थिति ते समक्ष अवलोकन करून आले, व तत्संबंधी असें चित्ताकर्षक पुस्तक निर्माण केले की, ते थोडक्या अवधीत कल्पनेबाहेर लोकप्रिय होऊन बसले. स्वातंत्र्य-संघाचे प्रणेते तेच. युवकांच्या चळवळीचे सूत्रधार तेच. संयुक्त प्रांतीय परिषदेस दोनदां अध्यक्ष तेच. केरळ व पंजाब प्रांतिक परिषदांच्या वरासनांवर ह्यांचीच योजना. अखिल वंगीय विद्यार्थि-परिषदेच्या व्यासपीठावर तेच अधिष्ठित. सरकारच्या रोषास तर चारपांच वेळां बळी पडलेले. १९२० साली त्यांनी अफगाणिस्थानच्या वकिलांस भेटू नये म्हणून त्यांना बंदी. १९२१ सालीं असहकारितेंत सहा महिने शिक्षा. तीन महिन्यांनी सुटका होतांच फिरून पावणे दोन वर्षे कारागृहवासाची सजा; पुन्हा मुक्तता व नाभाच्या अकाली शीखांच्या बाबतीत पुन्हा अटक. फार काय, आतां खुद्द राष्ट्रीय सभेचेच ते अध्यक्ष, व ते देखील रडत रडत अध्यक्षस्थान स्वीकारून नव्हे. बहुसंख्याक प्रांतिक काँग्रेस कमिट्यांनी निवड केली होती महात्माजींची. त्यांनी नकार दिला. सरदार वल्लभभाईना विचारले, तेव्हा ते म्हणाले, ' How can १३० स्वभाव-चित्रे a soldier dare to take up the place that the General himself shrinks from ? ' पंडित मोतीलाल नेहरूंचेही नांव पुढे आले. त्यांनी मखलाशी करून चेंडू उडवून लावला. त्यांनी उत्तर केलें, If Mahatma Gandhi is a back number, I am much more so, being eight years his senior. अध्यक्ष पं. मोतीलालजींसारखे श्रेष्ठ मुत्सद्दी, व नवीन अध्यक्षाच्या जागी निवडणूक व्हावयाची अननुभवी मुलाची. तथापि जेव्हां म. गांधींनी खाजगी रीतीने पुत्र पंडित जवाहरलालजींना पृच्छा केली तेव्हां त्यांनी नार्हति तातः पुंगवधारितायां धुरि दम्यं नियोजयितुम् ,' असे विक्रमोर्वशीयम् नाटकांतील कुमाराप्रमाणे राजकारणात अस्थानी असणाऱ्या शालीनतेचे उद्गार काढले नाहीत. तर त्यांनी ठासून म. गांधींना सांगितलें, • If it is thrust upon me, I hope I shall not wince. ' शत्रुपक्षाच्या डोळ्यांत सलणाऱ्या व त्याचा नायनाट करण्यासाठी सज्ज असलेल्या या लोकपक्षीय बिनीच्या स्वाराकडे पाहिल्यावर, 'समरशिरसि चंचत्पंचचूडश्चमूना।- मुपरि शरतुषारं कोऽप्ययं वीरपोतः (किरात) हा श्लोक क्षणभर एखाद्याच्या स्मृत्याकाशांत चमकून गेला तर तें यथायोग्यच होय. जवाहरलालजींची उमर अवघी उणीपुरी चाळीस वर्षांची! पण इतक्या वर्षांत एवढी लोकसेवा व मानसन्मान फारच थोड्यांच्या नशिबी येतात. ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष निवडले गेले तेव्हां पुष्क- ळांना आश्चर्य वाटले. वृद्धांनी घूत्कार केला की, अगदीच पोरसवदा अध्यक्ष झाला; राष्ट्रीय सभेत पोराटकी व बाळनायकी व्हावयाची, दुसरे काय ? तथापि कर्तबगारी वयावर थोडीच अवलंबून असते! गंधद्विपाचा बच्चा का असेना, इतर हत्तींना भारी असावयाचा; वति- ?

पंडित जवाहरलाल नेहरू १३१ ? भर लांब असला तरी अस्सल सापाचे विष सौम्य असते असे नाही. तसेच धाकट्या पंडितजींचें. विल्यम् पिट इंग्लंडचा मुख्य मंत्री झाला तेव्हां तर तो पं. जवाहरलालजींपेक्षा किती तरी लहान नव्हता का ? महाराज दशरथाच्या दरबारी पोक्त माणसें नव्हती असें नाहीं; परंतु अध्वरविघातशांतीसाठी विश्वामित्र ऋषीने त्यांच्याकडे याचना केली ती काकपक्षधर प्रभु रामचंद्राची. असे आहे म्हणून तर 'तेजसां हि न वयः समीक्ष्यते' असा कालिदासाने सर्वांच्या तोंडी बसलेला मनोज्ञ अर्थातरन्यास आपल्या प्रतिभेनें निर्माण केला. पं. जवाहरलालजींच्या या तेजोमय व विस्फारित होणाऱ्या चारि. त्र्याचे आश्चर्य वाटतें तें असें की, पं. जवाहरलालजींसारख्या अत्यंत संपन्न वडिलांच्या पोटी जन्मास येऊन अशी जगाविरहित गोष्ट कशी घडली ? इंग्लिश भाषेत म्हण आहे:-He that hath one hog, makes him fat; and he that hath one son, makes him a fool. ' जवाहर म्हणजे एकुलता एक मुलगा. सर्व कुटुंबच शिरीषपुष्पाप्रमाणे नाजुक. 'पांडवप्रतापां'त श्रीधराने एके स्थळी वर्णन केले ते नेहरूंच्या कुटुंबीयांना लावावयाचे म्हटले तर, सर्व मुले-माणसें अशी गौरवर्ण, कोमल व कांतिमय की नवनीताची घडली आहेत , कापराच्या चूर्णाची बनविली आहेत, गंगेचे पाणी तर नाही ना आटवून मनुष्याकार झालें, चंद्रकिरणांची ओतली का क्षीरसागरांतून बाहेर पडली, असे पाहणारांस वाटावे. त्यांतल्या त्यांत जवाहर म्हणजे राजबिंडा मुलगा. मग काय विचारावें ? पण त्यांच्या बाबतींत पं. मोतीलालजींनी वरील इंग्लिश म्हण खोटी ठर• विली. मुलास विद्या पहिल्या प्रतीची प्राप्त करून देण्यासाठी जेवढ्या सोयी करता येण्यासारख्या होत्या तेवढ्या त्यांनी केल्या. जसा कांहीं जवाहर म्हणजे इंग्लंडांतील एखाद्या बड्या लॉर्डाचाच मुलगा. हिंदु- स्थानांत प्राथमिक शिक्षण नामांकित खाजगी इंग्लिश शिक्षकांमार्फत १३२ स्वभाव-चित्रे इंग्लंडमध्ये हॅरोच्या सुप्रसिद्ध शाळेत दुय्यम शिक्षण; केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजांत प्रवेश व पुढील अभ्यास; व शेवटी इनर टेंपलमध्ये बॅरिस्टरच्यिा ज्ञानाचे संपादन. याशिवाय पोहणें होतें, घोड्यावर बसणें होतें, गिर्यारोहण होतें, व शिशिरक्रीडा होतीच. मुलाच्या विद्यार्जनाची व सर्वांगीण प्रगतीची इतकी चिंता बापानें वाहिल्यावर व मुलगाही जातिवंत कर्तृत्ववान् असल्यावर पं. जवाहरलालजी- सारखें नररत्न भारतमातेच्या कां बरें हृदयावर दैदीप्यमान होणार नाही ? सूर्याच्या पोटीं शनैश्चर आला नाहीं; प्रतिसूर्य उदय पावला. दिव्यापासून अधिक ज्योतिर्मय असा दुसरा प्रदीप तळपूं लागला. अशा मुलाचे किती किती म्हणून कौतुक व्हावें ? पित्यालाच केवळ जीव की प्राण वाटावा असे नव्हे, तर साऱ्या 'आनंदभुवना' चा आनंद तोच; लहानमोठ्यांच्या, नोकराचाकरांच्या, आल्यागेल्याच्या प्रेमाचे निधान तेंच. कोडकौतुक इतके की, 'From the Cradle to the Bar' या नांवाचे पं. जवाहरलालजींच्या फोटोचें एक पुस्तक बांधवून ठेवीसारखें जपून ठेवले आहे ते पहावे म्हणजे त्याची थोडीबहुत कल्पना येते. प्रेमळ पित्याला आपल्या लाडक्याच्या सगळ्याच गोष्टींचे कौतुक. जवाहर तुरुंगांत गेला तेव्हां थट्टेने पं. मोतीलालजींनी म्हणावें, आतां ' From the Bar to the Prison-- bar' असा या पुस्तकाचा दुसरा भाग तयार केला पाहिजे. अशी परिस्थिति असून देखील पं. जवाहरलालजींनी आजन्म देशसेवेची दीक्षा पत्करली व असिधाराव्रत स्वीकारले हेच त्यांचे वैशिष्टय व लोकोत्तरत्व. आणि तें खरेंच आहे. कमळ स्वच्छ सरो- वरांत उत्पन्न झालेलें, विष्णूच्या हातांत त्याचा निवास, आपण स्वतः लक्ष्मीचे घर, सुगंध घ्यावा तो देवांचे हृदयही काबीज करणारा; असे गुण कमळाच्या अंगी, पण त्या सर्वांची पराकाष्ठेची उन्नति किंवा त्यांचे उत्कृष्ट चीज केव्हां म्हणावयाचें ? जगन्नाथ पंडिताने आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू उल्लासात म्हटल्याप्रमाणे, जेव्हां द्विजश्रेष्ठ हंसाच्या ठायीं त्याची प्रीति असेल तेव्हां. एरव्हीं नाही.पं. जवाहरलालांच्या अंगी खरोखरच अनेक गुण आहेत. 'निसर्गभिन्नास्पदमेकसंस्थमास्मन्द्वयं श्रीश्च सर- स्वती च' असे त्यांचे वर्णन केले तरी त्यांत अतिशयोक्ति नाही. त्यांच्या ऐश्वर्यसंपत्तीबद्दल बोलावयासच नको; पण विद्यादेवीने देखील त्यांच्यावर वरदहस्त जणुं ठेवला आहे. विलायतेत ट्रिनिटी कॉलेजांत बी. ए. च्या परीक्षेत सन्मान मिळवून ते उत्तीर्ण झाले. इतकेच नव्हे, त्यांच्या खोल विचारांचे व दांडग्या वाचन-व्यासंगाचे प्रत्यंतर त्यांच्या लेखन-भाषणांत मिळते. रिकामा वेळ सांपडला की तो एखाद्या महत्त्वाच्या ग्रंथाच्या परिशीलनांत गेला म्हणून सम- जावें. अलाहाबादेहून पुण्यास यावयास निघाले तरी ट्रंकेंत रशिया- विषयी काही निवडक नूतन पुस्तकें, कोठें एमिली लडविगचें नेपोलियनचे ताजे चरित्र असें सांपडावयाचे. एखाद वेळ आवडत्या मुलीसाठी व्हिएन्ना येथे विकत घेतलेली नामी कलाकुसरीची रेशमी पिशवी हाती लागावयाची; व ती अशी की, दृष्टीस पडतांच व तिला स्पर्श करतांच तिने आपल्या कानांत आपणांस विकत घेणा- राच्या ललितवस्तुप्रियतेची व अभिजात सौंदर्यसमीक्षेची गोष्ट गुण- गुणत सांगावी. निसर्गसुत ववर्थ कवीने आपल्या 'एक्स्कर्शन काव्यांत, एका मुलीला हातांतील शिंपला स्वतःच्या मातृ-जलनिधीची कथा साकल्याने पण निःशब्द आवाजांत सांगत असल्याचे नाही का वर्णन केलें ? दोन-चारदां कारागृहवास भोगला, तथापि बाहेर आल्यावर आंत कालक्षेप कसा केला विचारले, तेव्हां जाड्या तीन वह्या त्यांनी दाखविल्या. आंत उघडून पाहिलें तो तेथे वाचलेल्या हिंदी-इंग्रजी गद्यपद्य पुस्तकांतील टिपणे व उतारे. लेखन-पद्धतीही फार सुंदर व गोंडस. गेल्या वर्षीच्या येथील युवक-परिषदेचे भाषण सर्व आगगाडीच्या प्रवासाच्या धबडग्यांत , १३४ स्वभाव-चित्रे चौकी व भुसावळ यांच्या दरम्यान लिहिलेले. परंतु ते इतकें रेखीक व चिरेबंदी भाषेत लिहिले आहे व त्यांतील विचार इतके गंभीर क चिंतनीय आहेत की, प्रत्येकानें तें तोंडपाठ ठेवावें. अर्भकाविषयी एक वाक्प्रचार रूढ आहे की, ' They are to be seen, not heard,' तसें त्यांच्या भाषणाविषयी कोणी असे विधान केले की, ते कानाने ऐकण्यापेक्षां डोळ्यांनी वाचलेलें अधिक परिणामकारक, तर ते सर्वस्वी खोटे ठरणार नाही. कारण त्यांचे व्याख्यान आपले बेताचें. काठी मोठी भव्य नाही, पोषाख म्हणजे खादीचा पायघोळ सदरा, वर बिनगुंड्यांचें जाकीट, डोक्यावर खादीचीच टोपी व नेसलेलेही धोतर खादीचेंच, फारच थंडी कडाक्याची असली तर शाल पांघरलेली, वाणी विशेष तेजस्वी व प्रोद्दीपक नाही, बोलतांना जीभ जरा अडखळणारी व सभेला गर्दी मी म्हणणारी. या तयारी- निशी कसले व्याख्यान आणि काय ? तथापि व्याख्यानाला ते डर- तात असे नाही. जंगी सभांत बोलतात, आणि त्यांची कार्यनिष्ठा व कळकळ अशी आहे की, उपरिनिर्दिष्ट सर्व दोष असून देखील श्रोतृ- वृंदांना ते आपलेसे करून घेतात. वास्तविक पं. जवाहरलाल हे सोन्याचे गोकर्ण तोंडांत धरूनच जन्मास आलेले; जसे कांहीं कुबेराच्या श्रीमंतींत वाढलेले. एवढ्या- बरोबर आळस यावयाचा; पण जवाहरलाल इतके निरलस की त्यांच्या- बरोबर काम करणे कठिणच. बरें शिस्तबाज असे की कांहीं विचारण्याची सोय नाही. अलाहाबादेस असले म्हणजे अकरा ते पांच राष्ट्रीय सभेच्या हेवेट रोडवरील कचेरीत जाऊन काम करीत बसावयास कदापि चुकावयाचे नाहीत. कचेरीची व्यवस्था तर अशी ठेवली आहे की, जणुं काय सरकारी सेक्रेटरीएटच. मोठ्या प्रमाणावर भारतवर्षभर प्रतिस्पर्धी लोकसत्ता प्रस्थापित होणे शक्य असेल किंवा नसेल. एकवीस प्रांतिक कमिट्या, जिल्हा कमिट्या व एकंदर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सभेचा प्रपंच या बाबतीत तरी पं. जवाहरलाल यांनी सर चिटणीस झाल्यापासून अत्यंत सुयंत्रितपणा चांगलाच चालू करून ठेवला आहे. पत्रांची उत्तरें नेमल्यावेळी मुद्देसूद पाठविणे हा साहेबांचा गुण त्यांनी तंतोतंत उचलला आहे. पत्नीच्या प्रकृतिस्वास्थ्या- साठी जिनीव्हाला गेले असोत अगर डलहौसी-मसूरी येथे असोत, किंवा राजकीय दौऱ्यावर असोत, त्यांच्या टपालाची निरवानिरव नमुनेदार पद्धतीने व्हावयाची. त्यांचे जोडीदार बाबू सुभाषचंद्र बोस आहेत. पण सुभाषबाबूंच्या राज्यांत पोस्टखातें अजीबात नाही असे त्यांचे वर्तन; क्वचित् तारखाते असले तर असावयाचे. दासबाबूंचेही असेंच. पं. मदनमोहन मालवीय यांचा देखील तोच खाक्या. नेपो. लियनची अशी कथा सांगतात की, पत्रं आली म्हणजे पंधरा दिवस टेबलाच्या खणांत ठेवावयाची व मग खण उघडून पत्रे वाचावीं बहुतेकांची उत्तरे आपोआपच जाऊन ती विल्हेस लागलेली असा- वयाची. पत्रोत्तराच्या नियमितपणांत पं. जवाहरलाल नेहरूंचे उदा. हरण नजरेसमोर ठेवण्यासारखें. स्वभावाचा साधेपणाही असाच आश्चर्योत्पादक व त्यांच्या खानदानी नबाबशाहीशी विसंगत दिसण्या- सारखा. कोणीही सामान्य माणसाने जावे व त्यांना भेटावें, कोणाला फारसा निबंध त्यांच्या संबंधांत तरी नाही. पं. मोतीलालजींच्या संबंधांत काय आडकाठी असेल ती वेगळी. स्वतः जवाहरलाल आपणांस शिपाई समजतात व तसे वागतात देखील. मग इतका साधेपणा त्यांच्या वागणुकीत असावा हे साहजिकच होय. एखादे वेळेस बोलण्यांत किंचित् दिमाखाची झांक मारते, नाही असे नाही. कल्याणहून मोटारीने पुण्यास येतांना खंडाळा, लोणावळा ही आपली महाराष्ट्रीय थंडगार हवेची ठिकाणे वाटेत लागली. ते सहजगत्या बोलून गेले, " Oh, these are apologies of hill-stations! " तथापि सौंदर्यनिरीक्षणाची व सांस्कृतिक विद्येची अभिरुचि इतकी १३६ स्वभाव-चित्रे जबर की, त्याच वेळी मुद्दाम मोटार थांबवून, पायाने इकडे-तिकडे पुष्कळ फिरून आले व कारल्याची लेणी तर सूक्ष्मभावाने तज्ज्ञा- प्रमाणे पाहिली. त्यांची शोधकबुद्धि किती कुशाग्र होती ते त्यांनी अलाहाबादेहून मसुरीस आपल्या दहा वर्षांच्या इंदिरेला पाठविलेल्या व नुकत्याच ग्रंथरूपाने प्रकाशित झालेल्या पत्रांत दृग्गोचर होतें. कार्य उरकण्याची चपळाई अशी दिसते की, ऑल इंडिया काँग्रेस- कमिटीच्या सभांतून चिटणीस या नात्याने किंवा एका परिषदेचे अध्यक्ष या नात्यानें तडित्स्फुरणाप्रमाणे चटचट आपल्यापुढील कामाचा ते निकाल लावतात. वयोमान परिपक्क कमी, वडिलांचा मुलगा म्हणूनही कदाचित् मोठेपणा जरा लवकर व प्रभूत प्राप्त झालेला, योग्यताही सामान्याच्या वरच्या दर्जाची. यामुळे त्यांच्यांत कांहीं दोष शिरले आहेत यांत शंका नाही. अनुभवाचे व विवेकाचे माप थोडे कमी म्हणून म्हणा अथवा उत्सवाचा, कळकळीचा व स्वातंत्र्य-लालसेचा अतिरेक म्हणून म्हणा, त्यांचे बोलणें-चालणें कांहीं कांही प्रसंगी उर्मटपणाचें भासते. सभा चालू असतां कोणाला 'तुम्हांला युनिटरी पद्धति व फेडरल पद्धति यांमधील अंतर कळलें आहे की नाही, याची वानवा आहे' असे टाकून बोलावयाचे, तर एखाद्या पक्या मुरलेल्या ब्रिटिश मुत्सद्दयाचा — He has not the brains of a cat ' असा अधिक्षेप करावयाचा, हे अंमळ चमत्कारिक म्हणावें लागते. कार्य करतांना त्यांचा तादृश अविवेक दिसून येतो तसा तो त्यांच्या विनोदांतही आढळतो. व्हाइसरॉय साहेबांच्या जाहीर- नाम्याला उत्तर म्हणून तयार केलेल्या पुढाऱ्यांच्या पत्रकावर स्वातंत्र्य. वादी असून सही केली व मग, 'T have made the mistake of my life' अशा पश्चात्तापानें विदग्ध होऊन बसले व मित्रांना लिहूं लागले, 'It will be set right soon.' हेच विनोदांत. अध्यक्ष- पंडित जवाहरलाल नेहरू १३७ ? पदावरच्या उपसंहाराच्या स्वतःच्या भाषणास 'प्रेतयात्रेचे भाषण' असे म्हणण्यांत सदभिरुचि काय ? कदाचित् ' Indiscretion is the better part of valour' असे त्यांचे मत असल्यास न कळे. असे होते हे खरे. परंतु एवढ्या कार्यैकनिष्ठ, उद्यमशील, शिस्तबाज तहाहयात देशसेवकाच्या अंगांत थोडेसे अवगुण दिसले तरी, त्यांच्याकडे कानाडोळा करणे योग्य व जरूर नाही काय ! अगदी निर्दोष व धुतल्या तांदुळासारखा निर्मल कोण मनुष्य सांप- डणार बरें ? म्हणून तर सुभाषितकार म्हणतात, 'एकोहि दोषो गुणसंनिपाते निमज्जतींदोः किरणेष्विवांकः' व म्हणूनच तर शेक्स- पीयरने लिहून ठेवले की, They say, best men are moulded out of faulte; And, for the most, become much more the better For being a little bad." आणि त्यांचे थोडक्या अवधीतील कार्य व त्यांचे गुणबाहुल्य यांच्या योगानेच तर ते आज हिंदी जनतेच्या गळ्यांतील ताईत होऊन बसले आहेत. सन १९२० सालापासून म. गांधींनी जसें एका दृष्टीने हिंदी राष्ट्रीय चळवळीला निराळे वळण लावले, तसें पं. जवाहरलालजींनीही लावले आहे. राष्ट्रीय सभेचा हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत बोलबाला महात्माजींनी केला. पंडितजींनी राष्ट्रीय सभेचा कीर्तिडिंडिम सुधार- लेल्या जगभर वाजविला व राष्ट्रीय सभेची विजयपताका इंग्लंड, जपान वगैरे राष्ट्रांत नेऊन फडकविली. रशियांतील परिस्थतीचें अवलोकन करून आले, स्वतः समाजसत्तावादी बनले व प्रायः सर्व राष्ट्राची मनोवृत्ति पालटून टाकली. इतके दिवस ते तरुणांचे अध्वर्यु म्हणून गणले जात होते. आता ते अखिल जनतेचे सेनापति झाले आहेत. परवां लाहोरास त्यांची घोड्यावरून जी प्रचंड मिरवणूक लोकांनी काढली ती या सेनानीच्या सन्मानाची घोतक न म्हणावी स्वभाव-चित्रे तर काय ? एकावन्न तोफांची सलामी काय, दोन लाख जनसंमर्द काय, घोडेस्वार काय व इतर लवाजमा काय ! 'टाईम्स' च्या बातमीदाराने तोंडांत बोट घातले. त्याने देखील पं. जवाहरललाजींना "The idol of the revolutionary wing in the Congress' q'The youthful politician who is determined to make history at Lahore ' अशा पदव्यांनी भूषविले. जवाहरलालजींच्यावर सांप्रत खूप मोठी जबाबदारी आली आहे. एकंदर राष्ट्र व राष्ट्रीय सभा क्रांतीच्या जबरदस्त धुमश्चकीत प्रवेश करीत आहे. अध्यक्षपद सोडतांना व मुलास वस्त्रे अर्पण करतांना पं. मोतीलाल नेहरू यांनी आशा प्रकट केली की, पित्याचे कृत्य पुत्राने तडीस न्यावे. ते सार्वत्रिक क्रान्तीचे मानसपुत्र आहेत. आज समाज सुखी नाही. समाजांतील सर्व घटकांस सारखेच सुख-समा- धान संपादन करून घेता आले पाहिजे, अशी समाजसत्तावादाच्या पायावर सामाजिक पुनर्घटना करणे हे त्यांचे एक ध्येय. आणि सर्वांस राजकीय स्वातंत्र्य मिळवून देणे हे दुसरें. सामान्य जनता म्हणजे मजूर, शेतकरी इत्यादींचे संघ निर्माण करून त्यांच्यामार्फत अनत्याचारी राष्ट्रीय संप घडवून आणणे हा त्यांचा मार्ग. सगळी विचारसरणी व वागणूक या मार्गाप्रत पोचविणारी. त्याच्याकरितां 'आनंदभवना'ची धर्मशाळा झाली तरी चिंता नाही, ही मनाची तयारी. जवाहरलालांची तडफ व तरतरी अशी आहे की, ते आपल्या कामांत केव्हाही कसूर किंवा अंगचोरपणा करतील हे स्वप्नांत देखील संभवनीय नाही. अज व रघु, फिलीप व अलेक्झांडर, बाळाजी विश्वनाथ व बाजीराव, कृष्णशास्त्री व विष्णुशास्त्री चिपळूणकर या पिता-पुत्रांच्या जोड्यांप्रमाणे मोतीलाल व जवाहरलाल ही जोडी देखील इतिहासांत निःसंशय चिरस्मरणीय होईल. ' शिष्यादिच्छेत् पराजयम् ' या न्यायाने 'पुत्रादिच्छेत् पराजयम्' हा न्याय देखील पंडित जवाहरलाल नेहरू १३९ पेत्यांना अभिमानास्पद नव्हे का ? गुरु महात्माजी व पिता पंडित गोतीलालजी या दोघांनाही स्वातंत्र्य हिंदुस्थानाच्या दृष्टिपथांत आणतां आलें नाहीं तें शिष्य व पुत्र पं. जवाहरलालजी यांनी आणले तर त्याहून बहारीची दुसरी कोणती गोष्ट असणे शक्य नाही. सारथि श्रीकृष्ण व योद्धा धनुर्धर पार्थ असा सदृशसंयोग जुळल्यावर पशःसिद्धि पूर्ण व्हावी हे ईश्वराचे देणे आहे. शिवाय, पं. जवाहर- लालजींचा विशेष भर युवकसंघाच्या चळवळीवर आहे व तरुणांनाही महात्माजींनी 'पं. जवाहरलाल व्हा' असा उपदेश केला आहे. पण वस्तुतः या सूत्रांत उपदेशापेक्षां आशीर्वादच अधिक भरलेला आहे. महापुरुषांचा आशीर्वाद बहुशः विफल नसतो. महात्माजींचा हा आशीर्वाद लवकरच खरा ठरो; पं. जवाहरलाल नेहरूंना स्वीकृत कार्यात विजय प्राप्त होवो व महात्माजींच्या तोंडांत साखर पडो!!

१३ बाबू सुभाषचंद्र बोस दधानः प्रेमाणं तरुषु समभावेन विपुलां न मालाकारोऽसावकृत करुणां बालबकुले । अयं तु द्रागुयत्कुसुमनिकराणां परिमलै- दिगन्तानातेने मधुपकुलझंकारभरितान् ।। -जगन्नाथपंडित. डेक्कन जिमखान्याच्या मैदानावरील प्रसंग. १९२८ सालच्या मे महिन्याचे दिवस होते. रात्रीचा समय. शुभ्र चांदणे पडले होते. येथे भरलेली महाराष्ट्र प्रांतिक पारषद् संपून महाराष्ट्रीय प्रतिनिधि मंडळी श्रमपरिहाराचा फराळ वगैरे आटोपून मौजेने एकत्र बसली होती. मांडवपरतण्याच्या निमित्ताने म्हणून स्वागताध्यक्ष कै. शिव- रामपंत परांजपे बोलावयास उभे राहिले व त्यांनी पहिलेच वाक्य उच्चारलें तें हैं : ' वर एक चंद्र प्रकाशत आहे आणि खालीहि एक चंद्र आज अधिष्ठित आहे!' सहज सुचलेली उपमा, परंतु खरोखरच अत्यंत अर्थपूर्ण व समर्पक होय. नावाने सुभाषचंद्र तसे खाजगी व सार्वजनिक कार्यात व वर्तनांत देखील. प्रत्यक्ष नामा- भिधान व आचारविचार यांचे इतकें सादृश्य फारच क्वचित् दिसून येते. एरवीं 'नांव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा' ही म्हण कशाला रूढ होती व कालिदासाने तरी 'परंतपो नाम यथार्थनामा' असा रघुवंशांतील स्वयंवर-वर्णनांतील एका राजाचा विशिष्ट गौरव कशाला केला असता ? शेक्सपीयरने तिरस्काराने विचारले की, नांवांतच काय आहे ? गुलाबाला कोणतीही नांवें ठेवली तरी त्याचा बाबू सुभाषचंद्र बोस १४१ सुवास कायमच. तथापि नांव, कर्तृत्व व स्वभाव यांचा उत्तम मेळ जमला तर त्यांत पराकाष्ठेचे स्वारस्य नाहीं असें कोण बरें म्हणणार ? 'अधिकस्याधिकं फलं' हा जगाचा न्यायच होय. दुधात साखर पडली तर माधुर्य वाढणार व सोन्याला सुगंध प्राप्त झाला तर त्याच्या किंमतीत जास्त भर पडणारच. सुभाषचंद्रांच्या वाणींत निरतिशय गोडी भरलेली आहे, व त्यांची चालचालणूकहि चंद्राप्रमाणे शांत, प्रसादयुक्त व आल्हाददायक आहे. त्यांच्या तोंडून एखादा तरी दुसऱ्यास लागणारा शब्द बाहेर पडत असेल की नाही याची शंका वाटते. किती कामाने कंटाळले असले तरी चेहऱ्यावर त्रासिकपणाची छटा नाहीं अगर कपाळावर आठी चढावयाची नाही. सर्व आयुष्यच लोकसेवेला व राष्ट्रस्वातंत्र्याला वाहिलेले असल्यामुळे लहानथोर अनेक व्यक्तींशी सदैव बोलण्या- चालण्याचा प्रसंग; पण पावसाला अथवा सूर्यप्रकाशाला राजवाडा व झोपडी हा विधिनिषेध नाही, त्याप्रमाणे त्यांचा स्वाभाविक गोडवे. पणा व वाङमाधुर्य यांचा प्रवाह अखंड चालूच. कलकत्त्यास त्यांच्या राहत्या बंगल्यांत तागाच्या गिरणींतील कामगार, जमशेटपूर येथील मजूर, विद्यार्थी व इतर तरुण लोक व शिष्ट नागरिक यांची सारखी पैरवी असावयाची; परंतु सुभाषबाबूंच्या जिभेला खळ नाही, आपले- पणाने व प्रेमाने बोलण्यांत कमतरता नाही, समोर बसलेला माणूस केव्हां निघून जातो आहे असे कधी वाटले नाही, की टेबलावरील किंवा मनगटावरील घड्याळाकडे चोरटी नजर नाही. बाहेरगांवीं गेले तरी तसेंच. ते स्वतः दुसऱ्या कोणाकडे भेटावयास गेले तरी तीच रीत. मुंबईस वुईटर रोडवरील बाबासाहेब जयकरांच्या बंगल्यांत दासबाबूंच्या स्नेहास स्मरून उतरले काय, कांतिलाल परेख यांच्या ऑपेरा हाऊस शेजारच्या बंगल्यात स्वतःची त्यांच्याशी केंब्रिज येथील कॉलेजांतील मैत्री म्हणून उतरले काय, अगर पुण्यास अण्णा- १४२ स्वभाव-चित्रे साहेब भोपटकरांच्या 'बलवंताश्रमांत' उतरले काय त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत ओघ असावयाचा. आश्चर्य असें की एवढ्या जंजाळांत सुद्धा सुभाषबाबू जसा गृहस्थ येईल तसे त्याच्याशी संभाषण करीत राहावयाचे. त्यांतच जयकर यावयाचे, त्यांतच मजूर-संघाचे लोक यावयाचे, त्यांतच युवक-संघाचे कार्यकर्ते तरुण सल्लामसलतीला यावयाचे, त्यांतच अमेरिकन बातमीदार तासन्तास त्यांच्याशी उच्च राजकारणाची चर्चा करण्यास यावयाचे, त्यांतच हिंदी वर्तमानपत्रांचे प्रतिनिधि मुलाखत घेण्यास यावयाचे, त्यांतच फोटोग्राफर फोटो काढून घेण्यास यावयाचे; असे एक ना दोन, किती प्रकार वर्णावे? सुभाषबाबूजींचा कारभार मात्र अगदी धिम्मपणाने व शांत चित्ताने चालावयाचा. बिचाऱ्यांना घाई हा शब्दच ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशींच्या प्रांतिक परिषदेच्या अधिवेशनासाठी आदल्या रात्री १२। चे गाडीने पुण्यास जावयास निघावयाचे, पण बारा वाजून पांच मिनिटे झाली तरी हे राजश्री आपले बॅरिस्टर जिना व विठ्ठलभाई यांच्याकडे सावकाश गप्पा मारीत बसलेले. रात्रीच्या लाहोर एक्सप्रेसने धुळ्यास जाण्यासाठी निघावयाचे, पण बोरी- बंदरावरून गाडी सुटण्यास अर्धा तास उरला तरी या स्वारीचें गिरगांवांत जेवणच चाललेले. शिवाजी मंदिरांत सहा वाजतां व्याख्यान जाहीर झालेले, पण टिळक-मंदिरांतून खासगी चर्चा आटोपून भोपटकरांकडे परत येण्यास साडेसहा झाले तरी, चटकन् व्याख्या- नास जाण्याऐवजी धीरे धीरे त्यांचे मुखमार्जन होत असलेलें. रोजची पत्रांची पुडकीं येऊन पडावयाची. त्यांची उत्तरे लिहिण्याची देखील फारशी घाई नसावयाची. एक दोन ताराच येऊन धडकल्या तर पाहावयाचें; नाही तर आलेल्या आलेल्या पत्रांना उत्तराच्या अभावी किंवा विलंबाने आपोआपच उत्तर मिळालेले असावयाचे. या बाब.

बाबू सुभाषचंद्र बोस ११३ तीत त्यांच्या बरोबरीचे पांडत जवाहरलाल एका टोकाला व हे दुसऱ्या टोकाला. यासारखाच विरोध दोघांच्या चालण्यांत व वक्तृत्वांतही दृष्टो- त्पत्तीस येतो. आग विझविण्यास जाणाऱ्या बंबाप्रमाणे जवाहरलाल हे नेहमी धांवत असतात. त्यांचे भाषण चाचरत चाचरत व वाघ पाठीस लागल्यासारखें किंवा लवंगी फटाक्यांची माळ पेटविल्या- सारखे असावयाचे. शरीरयष्टि तेजस्वी असली तरी पोरसवदा खरीच. वागणुक सुद्धां थोडी बालिश व लाडिकपणाची म्हटली तरी काही खोटे नव्हे. सुभाषबाबूंचे याच्या अगदी उलट. देह भव्य; चेहेरा बुद्धासारखा गभीरसत्त्व; अंगावर मोहक कांति; डोळ्यांत स्वातंत्र्य- लालसेच्या पाण्याची चमक; गति आत्मविश्वासाची द्योतक व हत्ती- सारखी मंद; प्रशमशुचित्वाशी संवादी असा पांढरा स्वच्छ खादीचा बंगाली पोषाख; व्याख्यान प्रभुत्वाच्या उत्कर्षाने विनटलेलें; त्यांचे गुरुजी देशबंधु दास यांच्यासारखें पावसाळ्यांत घाटांत कड्यावरून खाली पाणी कोसळावें तसें नाहीं; पंडित मालवीयांच्यासारखें जान्हवीतोयहि नाहीं; महात्मा गांधींच्या सारखें ‘लघुसंदेशपदा सरस्वती' अशा वर्णनालाहि पात्र होण्यासारखें नाहीं; राजगोपाळा- चार्यांच्यासारखें मुद्देसूद व तीक्ष्ण नाहीं; मौलाना शौकतअल्लींच्या. सारखें शब्दबंबाळ नाही; महंमद अलम किंवा पट्टाभी सीतारामय्या यांच्यासारखे महाबळेश्वराच्या किंवा अंबोली घाटांतील पावसाप्रमाणह नाही. तर वर्षाकाळी बोरघाटच्या निसर्गसौंदर्यामधून वाट काढीत काढीत वर येणाऱ्या डेक्कन कीनमधील प्रवासासारखें अथवा भुई. नळ्याने लावलेल्या शोभेच्या दारूच्या झाडासारखें. देशाभिमानाने उद्दीपित झालेली, स्वार्थत्यागाने ललामभूत झालेली, स्वभावाने सर्वप्रिय झालेली, कृतीने व यशाने महामान्य झालेली व भावी विजयाच्या आकांक्षेने शुभसूचक भासणारी अशी ही लोको- १४४ स्वभाव-चित्रे तर मूर्ति दृष्टीस पडली म्हणजे भवभूतीच्या नाटकांत माल्यवानाने काढलेलें भार्गवाचे चित्र कां बरें आठवणार नाही ? दृढनिश्चयाची दर्शक अशी जड व ठाम पावले टाकीत चालतांना त्यांना देखलें म्हणजे 'धीरोद्धता नमयतीव गतिर्धरित्रीम् ' ही कुशवर्णनाची ओळ मनांत येणारच. दासबाबू त्यांना वारंवार । पोक्त तरुण' (Young old man) असें गमतीने संबोधीत याचे स्मरण झाले म्हणजे 'कौमारकेऽपि गिरिवद्गुरुतां दधानः हा पुढला श्लोकचरण ओठावर साहजिकच यावा. • Who lives, 'if Bengal dies ? ' I stand for an Independent Indian Republic.''Freedom is to me an end in itself. It is something priceless beyond measure. 'Freedom is a necessity for the human soul as oxygen is for the human lungs.' 'Self-conscious youth will not only act, but will also dream; will not only destroy but will also build.' 'बंगाल मेला तर कोण जग- णार ? ' ' भारतवर्ष हे संपूर्ण स्वतंत्र राष्ट्र व्हावे असें माझें मत आहे.' ' स्वातंत्र्याकरितां स्वातंत्र्य हे माझें ब्रीद. स्वातंत्र्याला दुसरें तिसरें मोल नाही.' 'फुफ्फुसांना जसा ऑक्सिजनवायु तसे आत्म्याला स्वातंत्र्य.' 'तरुणांत स्वतःची जाणीव निर्माण झाली म्हणजे ते कर्तबगारी गाजवितील इतकेच नव्हे, तर त्यांना स्वप्नेहि पडूं लाग- तील. ते विध्वसंक कार्य करून थांबतील असे नव्हे, तर विधायक रचनाहि तेच करू शकतील.' हे त्यांच्या व्याख्यानांतील स्फूर्ति- स्फुलिंगाप्रमाणे असलेले उद्गार वाचावे. बंगाल ऑर्डिनन्सखाली अटकेत असतां त्यांना क्षयाची भावना झाली. काही अटींवर बंगाल सरकार त्यांस सोडण्यास तयार झाले. त्या वेळी त्यांनी आपले बॅरिस्टर बंधु शरच्चंद्र बोस यांस ब्रह्मदेशां- बाबू सुभाषचंद्र बोस तील इनसाईन तुरुंगांतून १९२७ साली ता. ४ एप्रिल रोजी, त्या अपमानकारक निबंधाचा निषेध करणारे पत्र लिहिले त्यांतील खालील उतारा वाचावाः ' Thank God. I am at peace with myself, and I can face with perfect equanimity any ordeal that He in His wisdom may choose to visit me with. I regard myself as doing penance in my own humble way for the past sins of our nation and I am and shall be happy in my atonement. Our thoughts will not die, our ideas will not fade from the nation's memory and posterity will be heir of our fondest dream s. This is the faith which will sustain me in my tribulation for ever and for ever !' 'परमेश्वराची खैर म्हणावयाची की, आहे या स्थितीत माझें मन समाधान पावत आहे. जे दिव्य देव माझ्यापुढे करील त्यांतून मी न डगमगतां पार पडेन. आपल्या मायभूमीने जी पापें पूर्वी केली त्यांच्या निवृत्तीकरितां मी माझ्या सामर्थ्याप्रमाणे तप करीत आहे अशी माझी समजूत आहे. या प्रायाश्चित्तांतच मला सुख वाटत आहे. आपले विचार कदापि मरण पावणार नाहीत. स्मृतिपटलावरून आपल्या कल्पना केव्हांहि कोमेजून जाणार नाहीत. भावि पिढी आपल्या सुखस्वप्नांची वारसदार होईल. हा विश्वास हाच माझ्या कष्टमय अवस्थेत माझा आधारस्तंभ.' त्यांच्या पत्रांतील ही वाक्य वाचली म्हणजे तर 'वीरो रसः किमयमेत्युत दर्प एव या उपर्युक्त श्लोकाची शेवटची ओळ अभावितपणे मुखांतून निघून जाते. खरो- खर ज्यांनी सुभाषबाबूंना १९२८ च्या कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेच्या वेळी स्वयंसेवकदलाचे सरसेनापति (General Officer Commanding) म्हणून लष्करी पोषाकांत, राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष पंडित १४६ स्वभाव-चित्रे मोतीलाल नेहरू यांच्या मिरवणुकीचे पुढें, घोड्यावर बसलेले पाहिले त्यांना तर वीररस रूपास आला की काय, देशभक्तीने नरदेह धारण केला की काय, स्वार्थत्यागाचा साक्षात् अवतार झाला की काय, असा संशय आला ! तो देखावा असा की, मेकॉलेसाहेबांनी आपल्या एका ग्रंथांत वर्णिल्याप्रमाणे, एकदां पाहावा व जन्मभर आठ. वीत राहावा. त्यांच्या शौर्याची व स्वार्थत्यागाची किती म्हणून कसोटी पाहावी ? तीनदां तुरुंगवास पदरी आला तरी त्याची क्षिति नाही. एकदा देशसेवेचे सतीचे वाण घेतलें तें घेतले. स्वार्थत्यागाची तर पराकाष्ठा ! आय. सी. एस्. ची परीक्षा उतरलेली. पण नागपूरच्या राष्ट्रीय सभेत असहकारितेचा ठराव मंजूर झाल्यावर, हक्काच्या सरकारी नोकरीवर लाथ मारून, देशबंधु चित्तरंजन दास यांना येऊन ते मिळाले. बंगालच्या राष्ट्रीय महाविद्यालयाचे आचार्य झाले. कांहीं दिवस दासबाबू मेयर असतांना सुभाषबाबू कलकत्ता कार्पोरेशनचे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर झाले. स्वतः मेयर होण्याचाहि असामान्य मान त्यांना मिळाला. दासांच्या 'फॉरवर्ड' पत्राच्या संपा- दकत्वाचे कामहि त्यांनी केले. स्वराज्यपक्षाचे एक अग्रणी म्हणून प्रांतिक कायदेमंडळांतहि त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा नापास झाली म्हणून सार्वजनिक क्षेत्रांत उडी घालणारे थोर गृहस्थ, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके का होईना, पण सांपडतील. परंतु परीक्षा चांगल्या त-हेनें पास होऊन, पाया- पाशी लोळत आलेली सरकारी नोकरी दूर लोटून, राष्ट्रकार्याला सर्वस्व अर्पण करणारा पुरुष म्हणजे सुभाषबाबूच 'एकमेवाद्वितीय' दिसतात. असे महानुभावित्वाचे अंगी गुण व दासबाबूंनी हातांत धरले; मग काय कमी ? दासांच्या पाठीमागें बंगालचे नेतृत्व तर त्यांच्या शिरावर पडलेच. शिवाय आखिल भारतांतील तरुणांच्या बाबू सुभाषचंद्र बोस गळ्यांतील ते सांप्रत कंठमाण होऊन बसले. कवि म्हणतोः सिध्यंति कर्मसु महत्स्वपि यन्नियोज्याः संभावनागुणमवेहि तमीश्वराणाम् । किं वा भविष्यदरुणस्तमसां विभत्ता तं चेत् सहस्रकिरणो धुरि नाकरिष्यत् ॥ हे काही अंशी वस्तुस्थितीस धरून असे मानले तरी, 'प्रभवति शुचिबिबोद्ग्राहे मणिर्न मृदां चयः' व 'पात्रविशेषन्यस्तं गुणांतरं व्रजति शिल्पमाधातुः' हेहि तितक्याच प्रमाणांत खरे असल्याचे व्यवहारांत अनुभवास येते. तें कांही असले तरी गुरु-शिष्यांची अशी जोडी विरळा. भारतांतील दाखलाच द्यावायचा तर द्रोणा- र्जुनांचा, इतर कोणाचा नाही. पाहिले तर वय अवघे चौतीस. अजून अविवाहित. शिक्षणक्रम देखील, एकदा प्रोफेसर ओटन यांजवर हल्ला केल्याच्या आरोपावरून प्रेसिडेन्सी कॉलेजांतून काढून लावल्यामुळे व एकदां स्वतःच्या डोक्यांत यतिधर्म स्वीकारण्याची लहर आल्याकारणाने हरिद्वार, वृंदावन इकडे कॉलेज सोडून निघून गेल्याकारणानें, असा दोनदा त्रुटित झाला तरी तो लवकर पुरा केला. आई अक्षरशः अष्टपुत्रा सौभाग्यवती. तिचे बाळकडू म्हणून म्हणा अगर दुसऱ्या कोणत्या कारणाने म्हणा, त्यांना बालपणापासून लोकसेवेची आवड. त्या लोकसेवेच्या उपजत इच्छेला दासबाबूंच्या सहवासाने योग्य अवसर मिळाला. बंगाली लोक जात्याच ध्येयवादी. व सुभाष तर वंगदेशाच्या करपुतळीसारखे. सरोजिनी बाईनी १९२२ च्या गया काँग्रेसच्या वेळी प्रथमच सुभाषबाबूंना दासबाबूंच्या बरोबर पाहिले. बाईची दृष्टि नेहमीच काव्यदृष्टि. त्या एकदम म्हणाल्याः He has the genius of Bengal on his face and youth on his brow.' (त्यांच्या चेहऱ्यावर बंगालची बुद्धिमत्ता व कपाळावर तारुण्य दृष्टीस पडत १४८ स्वभाव-चित्रे आहे.) हे उद्गार शंभराच्या वर टक्के खरे ठरले. नुसत्या बंगालचेच काय, सुभाषबाबू आज सर्व भारतीय युवकसमाजाचे अध्वर्यु गणले जातात. कोठल्याहि प्रांतांत युवकपरिषद् असो, तिच्या अध्यक्ष- स्थानाची सुपारी सुभाषबाबूंकडे निश्चयाने यावयाची. तसेंच ज्या गांवीं त्यांनी जावे त्या गांवांतील एखाद्या कॉलेजाचे संमेलन असहें की तन्निमित्त भाषण करण्याचे आमंत्रण त्यांनाच यावयाचे. महाराष्ट्राविषयी त्यांना पहिल्यापासून आदर. हा प्रांत इतरांहून कांहीं तरी आगळा आहे ही मनोमय खात्री. त्यांत सुदैव असें की टिळकांना ब्रह्मदेशांत ज्या कारागृहांत ठेवण्यांत आले होते तेथेच सुभाषबाबूंनाहि ठेवण्यांत आले. हे आपले विलक्षण नशीब असें त्यांना अजूनहि वाटते व टिळकांच्या अध्याहृत सहवासाचा ठसा त्यांच्या मनावर कायम स्वरूपांत उमटलेला दिसतो. चालू पिढीतील तरुण कार्यकर्ते अहंमन्यतेने म्हणतात, १९२० सालाच्या पूर्वीचे राजकारण आम्हांस माहीत नाही. सुभाष आपले नाते दासांबरोबर टिळकांशी साभिमान जोडतात. बंगाल-महाराष्ट्र आम्ही दोघे भाऊभाऊ असें ते मानतात. म्हणून तर ते प्रांतिक परिषदेचे मागें अध्यक्ष झाले व आतां प्रथम महाराष्ट्र युवकपरिषदेचे अध्यक्ष होण्याचे, बंगाल प्रांताची परिस्थिति अतिशय नाजुक असून देखील, त्यांनी कबूल केले. स्वतःच्या कार्यापेक्षा मित्रकार्य गुरुतर वाटावें हे तर साधु जनांचे व दुसऱ्या नरश्रेष्ठांचे लक्षण. देशांतील तरुणांच्या अंतःकरणांतील भावना त्यांच्या अंतःकरणांत आरशाप्रमाणे प्रतिबिंबित झालेल्या दिसतात, मग ते एवढे प्रिय व्हावे यांत नवल ते काय ? राष्ट्राला स्वातंत्र्यप्राप्ति करून देणे हे साध्य. त्यासाठी घरादारावर, आत्मसुखावर, फार काय, जीवितावर तुळशीपत्र ठेवलेले. सत्तावीस सालीं अत्यवस्थ आजारी पडल्यामुळे सरकारने त्यांना मुक्त केले. लगेच पाटणा येथे भाषण केले. त्यांत बाबू सुभाषचंद्र बोस १४९ MARA म्हणाले, "आपणांस आजारी पडण्यास सवड नाही." इतकी जबरदस्त ध्येयपूर्तीसाठी तळमळ व पोटतिडीक. प्लूटार्कने ईपॉमि- नोंडास या रणधुरंधर सेनानीची एक गोष्ट सांगितली आहे. लढाईला तोंड लागण्याच्या ऐन वेळीच एक चांगला योद्धा वारल्याची बातमी त्याला कोणी कळविली. तो त्याने विचारले 'अरे, इतकी दंगल चालू असतांना त्याला मरावयाला फुरसत कशी मिळाली ?' त्या पैकींच सुभाषबाबूंचे वरील बोलणे. तुलना करूं लागणे गैरच. प्रचलित राजकारणांत सुभाषबाबूंना जोड नाही, तरी पण केशवाय नमः म्हटले की, नारायणाय नमः यावयाचे. तद्वत् पंडित जवाहरलाल व बाबू सुभाषचंद्र यांची नांवें एकदम उच्चारली जातात. जवळ जवळ जोडाक्षरेंच. एक तर जवाहरलालजींची चाळिशी उलटलेली. चार-पांच वर्षे त्यांनी आपलें स्वतंत्र व्यक्तित्व, विचारसंपत्ति, ओजस्विता निःसंशय दाख- विली व हिंदुस्थानचे डोळे दिपविले. अलीकडे त्यांचे पाणी कमी झाले. लाहोरच्या राष्ट्रीय सभेत त्यांच्या प्रभेचा मध्यान्ह झाला. महात्मा गांधींच्या संप्रदायाच्या लोंढ्यांत ते वाहवले. सुभाषबाबूंची प्रथा सर्वथा वेगळी. त्यांच्या स्वातंत्र्याच्या ध्येयांत हीण नाही. महात्मा गांधी स्वातंत्र्याचे खोटें माप मागू लागले, तेव्हां कल- कत्त्याच्या राष्ट्रीय सभेत वीरपोताप्रमाणे विरोध करण्यास कचरले नाहीत. बोलघेवडे श्रीनिवास अय्यंगार परीक्षेच्या प्रसंगी बारगळले. राष्ट्रीय सभेच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाचे आद्यप्रवर्तक पं. जवाहरलाल यांनी दांतओंठ चावले तरी अखेरीस ते महात्माजींना बधले. सुभाष एकटे पायावर खंबीर राहिले. कराचीस देखील परिस्थितीमुळे सुभाषबाबूंनी राष्ट्रीय सभेच्या चालकांशी दोन हात करण्याचे टाळले, पण ध्येय सोडले नाही. त्यांच्या स्वातंत्र्याच्या निस्सीम निष्ठेत हिंदी संस्कृतीविषयी दुर्दम्य स्वभाव-चित्रे अभिमानाची बहुमाल भर पडल्यामुळे त्यांचे ध्येय अधिकच खुलून दिसते. इतर समवयस्क पुढारी व हे त्यांच्यांत हा मोठा फरक वाटतो. स्वातंत्र्य पाहिजे, स्त्रियांनी सार्वजनिक चळवळींत अवश्यमेव भाग घेतला पाहिजे, समाजसत्तावाद पाहिजे, पाश्चात्य सुधारतील क्षीर तेवढे पाहिजे; तथापि आपल्या अभिजात परंपरागत संस्कृत चें संरक्षण केलेच पाहिजे, असे त्यांचे मत. पूर्वजांविषयी अभिमान तर त्यांच्या मनाच्या कोंदणांत हिऱ्याच्या खड्यासारखा बसविलेला. काय कॉम्युनिझम म्हणतां ? आमच्याकडे आसामांत खासी लोक तर त्यांतच वावरतात. काय लोकशाही म्हणतां? के. पी. जयस्वाल यांचे पुस्तक पाहा; लोकशाही अस्तित्वात असलेली ८१ संस्थानांची यादी तुम्हांला सांपडेल. हिंदी संस्कृति ही एक विशाल नदी आहे. ती कालाच्या दोन तीरांमधून सारखी वाहात चालली आहे; अनेक लहानमोठे जलप्रवाह तींत येऊन समरस होऊन जात आहेत. ही त्यांची कल्पना. अतएव कोवळ्या मनाच्या भावनाप्रधान तरुणांना त्यांचा आग्रह असा की, 'मार्क्स, बाकुनिन' यांच्या लिखाणांच्या लाटांवर शीड नसलेल्या जहाजाप्रमाणे गटंगळ्या खाऊ नका; हिंदी मनोभूमिका फार भिन्न परंपरा वेगळी; त्यांना अनुसरून जरूर त्या नवीन घटना बनवा. गेल्या जून महिन्यांत सुभाषबाबू येथे आले होते. तात्यासाहेब केळकरांकडे दुपारचा चहा चालला होता. केळकरांसारखाच त्यांनाहि वेळेस एका कपाहून जास्त चहा लागतो. ते स्पष्ट सांगतात. च की कपभर पिऊन झाल्यावर जो आपण चहा घेतों व गप्पा मारतों त्या गप्पांची लज्जत आरै असते. त्यावेळी ते नेहमीच्या आनंदी वृत्तीने व विनोदी स्वभावास अनुसरून म्हणाले, 'केळकर जर दीड कप चहा घेत असतील तर मग मी त्यांचा अनुयायी आहे म्हणावयाचे.' काय योगायोग असेल तो खरा. हल्लींची राष्ट्रीय बाबू सुभाषचंद्र बोस १५१ ~~~~ सभा व सुभाष यांची नीटशी सांधेजोड जमत नाही एवढे उघड आहे. दासबाबू व पंडित मोतीलाल यांचे सूत नव्हते. बंगाल में क्रांतिकारकाचे आगर म्हणून महात्मा गांधींच्या मनांत आढी. त्यांत दासबाबूंनी स्वराज्यपक्षाच्या प्रतिष्ठापनेत पुढाकार घेतला. सुभाष बोस त्यांचे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू मानसपुत्र. सरकारहि सुभाष . बाबूंना क्रांतिकारकांचे पाठीराखे समजते. या सर्वांचा एकंदर परि- णाम असा झाला आहे की राष्ट्रीय सभेच्या गाभाऱ्यांत सुभाषबाबूंना मज्जाव. दासबाबूंच्या नंतर बंगाल प्रांतिक काँग्रेस कमिटींत सतत मारामारी सुरू आहे. ती तोडण्याकरितां पं. मोतीलालजींची योजना मागे झाली. तेव्हां त्यांनी समक्ष कलकत्त्यास जाऊन, सुभाषबाबूंना बाजूस सारून, बॅरिस्टर सेनगुप्त यांच्या शिरावर प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षत्वाचा, कॉर्पोरेशनच्या मेयरशिपचा व कौन्सिलांतील स्वराज्य पक्षाच्या नायकत्वाचा असा तिकोनी मुकुट ठेवला. यंदा पुनः काँग्रे- सच्या निवडणुकीची कटकट निघाली. आमच्या बापूजी अण्यांची पंच म्हणून नेमणूक वर्किंग कमिटीने केली. तडजोड अशी झाली की, सुभाषबाबूंना प्रांतिक कमिटींतून सर्वस्वी अंगच काढून घेणे योग्य वाटले. अनिर्वाह पक्ष म्हणून एक वर्ष त्यांना पं. जवाहरलाल व डॉ. सय्यद महमुद यांच्याबरोबर राष्ट्रीय सभेचे चिटणीस निव- डले. पण बहारीची गोष्ट अशी की, काँग्रेसचे पत्रांचे कागद छापले त्यांत डाव्या कोपऱ्यांत नांवें दोनच, सुभाषबाबूंचे नाहीच. काही महिन्यांपूर्वी एकाच ठिकाणच्या दोन विभागलेल्या परिषदांचे अध्यक्ष- स्थान सरदार वल्लभभाई पटेल व बाबू सुभाषचंद्र यांस देण्यांत आले. परिषदांच्या तारखांपूर्वी सुभाष बोर्डोलीस गेले. तेथे त्यांना त्यांच्या दर्जास अनुरूप असे वागविण्यांतहि आले नाही म्हणतात. कराचीहून परत जातांना महात्मा गांधींनी त्यांच्याबरोबर खाजगी मनमोकळी चर्चा करण्याकरितां आपल्याबरोबर दिल्लीपर्यंत मुद्दाम घेतलें. गांधी सुद्धा त्यांचे मन काबीज करूं शकले नाहीत.

१५२ स्वभाव-चित्रे , राष्ट्री : सभेने त्यांना झिडकारले तरी त्यांत सुभाषबाबूंसारख्या राजकीय कर्मयोगी तपस्व्याची काय हानि होणार ! माळ्याने बागें- तील बकुळीच्या झाडाला पाणी घातलें नाहीं तरी, आपल्या निसर्ग- दत्त सौरभ्याने, तें मधुपांना आकृष्ट करणारच व त्यांच्या गुण- गुणण्याने दाही दिशा निनादून टाकणारच हे सांगणे नलगे. विधाता रागावला तर हंसाच्या कमल-निवासाचा विलास नष्ट करूं शकतो, पण त्याच्या वैदग्ध्यकीर्तीला उणेपणा आणूं शकत नाही, हे सुभा- षितकारांचे आप्तवाक्य. सिंहाला झाले तरी वनराज म्हणून आभिषेक- संस्कार का कोणी करावयास गेलें आहे ! ती त्यांची स्वयंभू पदवी होय. ते त्यांच्या विक्रमशालित्वाचे फळ होय. आतापर्यंत झाली ही सुभाषबाबूंच्या सार्वजनिक कामगिरीची केवळ प्रस्तावना म्हटली तरी चालेल. अर्धेअधिक आयुष्य अद्यापि जावयाचे आहे. चंद्रिका प्रभा फाकू • गली आहे. चंद्र उदयोन्मुख झाला आहे. कलमावर गुलाबकळी विकास पावू लागली आहे. प्रफुल्ल पुष्पापेक्षां कलिकाच अधिक सुंदर व मधुर असते असा कविसंकेत आहे. नुकताच उगवू लागलेला असा बीजेचा चांद अधिक पुण्यकारक असे मानतात. क्रोणी काही म्हटले तरी योग्यकाळी कळी पूर्णपणे फुलते व शशांकहि आपल्या षोडश कलांच्या संभाराने जगतास आनंदमय व सुखकर प्रकाशांत बुडवून टाकतो. परमेश्वर करो आणि सुभाषचंद्र बोस यांना भरपूर आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्या अंगच्या उदात्त गुणसमुच्चयाचा, राष्ट्राच्या स्वातंत्र्यसंपादनाच्या महत्कार्यात, उत्तरोत्तर अधिक उपयोग होवो ! प्रिय सुभाष, आपलें झालें हे कार्य दिव्य आहेच; पण आपला भावी काल हा रम्यतर होणार असें अनुमान काढणें अनाठायीं बिलकुल नाही. आणि म्हणूनच नाशिकच्या गोविंद कवीच्या भूपाळीतील शब्दांनी आपणांस सांगतों- मुक्या मनाने किति उधळावे शब्दांचे बुडबुडे । तुझ्यावर ।। शब्दांचे बुडबुडे ॥ तुझे पवाड गतिल पुढतीं तोफांचे चौघडे ।। -

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

Svabhaava Chitren' Prathamaavrxtti

Author
Divekara Dinakaravaasudeva
Title
Svabhaava Chitren' Prathamaavrxtti
File name
Svabhaava Chitren' Prathamaavrxtti
Text
OCR done
Citation
1934
Published
2005-11-30
Publisher
Aananda Mudrand-aa Man'dira
Language
Sanskrit
Pages
179
Classification
Philosophy. Psychology
DLI number
369654
Barcode
2030020016473.00
Scanning centre
RMSC, IIIT-H
Digital publisher
Digital Library Of India
Rights
IN_COPYRIGHT
VMLT id
TQ47y9vPjzI
Download PDF

Svabhaava Chitren' Prathamaavrxtti