Library
Vatsaraaja Udayand-a
Front matter
Osmania University Library
Call No M. 2231 V 34 ki
Name Of Book वत्सराज उदयन
काटदरे
Name Of Authur
UNIVERSAL
LIBRARY
OU_184426
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
No text on this page.
हासिक चरित्र-माला १
वत्सराज उदयन
"लोके हारि च वत्सराजचरितम्।
रत्नावली.
: लेखक :
माधव केशव काटदरे
किंमत १ रुपया.
:प्रकाशक:
नवभारत प्रकाशनसंस्था, मुंबई ४.
प्रकाशक- रघुनाथ दिपाजी देसाई, नवभारत प्रकाशनसंस्था, ६, केळेवाडी, गिरगांव, मुंबई ४. MAYECHED. 1957 सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. Checked 1965 प्रथमावृत्ति आक्टोबर १९४१ Cheaked 1969 मुद्रक- - रघुनाथ दिपाजी देसाई, न्यू भारत प्रिटिंग प्रेस, ६, केळेवाडी, गिरगांव, मुंबई नं.
परलोकवासी
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर,
एम्. ए., पीएच. डी.
यांच्या
स्फूर्तिदायक स्मृतीस
卐
ॐ सह नाववतु।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्य करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः
:
*
१
व्हावे वास्तव्य एकत्र, व्हावें एकत्र सेवन,
सामर्थ्यवंत दोघांनी व्हावें एकत्र राहुन;
अध्याय आमुचा आम्हां तेजस्वी उभयां करो,
विद्वेष एकमेकांचा आम्हांकडुनि ना घडो. २
सर्वत्र शांतता नांदो,
शांति राज्य करो सदा
शांति, धर्मसाम्राज्य
वाढवो ज्ञानसंपदा.
प्रस्तावना खिस्तपूर्व सहाव्या शतकामध्ये बावेरूचे म्हणजे बाबिलोनचे असुरराज्य धुळीस मिळून असुर लोक नामशेष झाले आणि इराणांतले पारसीक लोक बलिष्ठ होऊन त्यांची सत्ता झपाट्याने चौफेर वाढू लागली. पारसीकसत्तेने पूर्वेकडे सिंधुनद गांठला होता. सिंधुनद ओलांडून भारत-वर्षात पाय पसरण्याच्या उद्योगामध्ये ही सत्ता असतांना ज्या पराक्रमी भारतपुत्राने तिला थप्पड लगावून आल्या वाटेने पुन्हा माघारी जावयाला लावलें तो पराक्रमी भारतपुत्र म्हटला म्हणजे वत्सराज उदयन होय. वत्सराज उदयन हा पौरव घराण्यांतला होता. सोमवंशांतील पुरूरव्याचा पणतू ययाति, आणि वृषपर्वा नामक असुरराजाची कन्या शर्मिष्ठा, यांची कथा पुराणप्रसिद्ध आहे. ययातीला शर्मिष्ठेपासून तीन पुत्र झाले. त्यांतील तिसऱ्या पुत्राचे नांव 'पूरु' असे होते. शर्मिष्ठेचा हा धाकटा पुत्र पूरुच ययाति राजाच्या मागून सिंहासनारूढ झाला आणि इतर राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणून त्याने 'चक्रवर्ति' ही पदवी संपादन केली. पूरूच्या वंशजांना 'पौरव' असे म्हणतात. प्रसिद्ध कौरव-पाण्डव हे पौरवच होते. पौरवराजघराणे वेदकाळापासून खिस्तपूर्व पांचव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अस्तित्वात होते. पौरवघराण्यांतील शेवटला राजा 'क्षेमक' नांवाचा होता असें आपणाला पुराणांवरून कळते. क्षेमकाचा अंत कसा झाला आणि क्षेमकानंतर पौरवराज्याचे मालक कोण झाले हे पुराणे सांगत नाहीत. पुराणे जे सांगू शकत नाहीत ते सांगण्याचा प्रयत्न मराठेशाहीच्या काळांतील आपल्या मराठी लेखकांनी केलेला आहे ! 'श्रीशिवदिग्विजय' या बखरीचा कर्ता असे सांगतो की पौरवघराण्यांतला शेवटला राजा क्षेमक याने आपले राज्य प्रद्योताला दिले आणि स्वस्त्रीसह कलाप- ग्रामी हिमालयाचे ठायीं तपश्चर्येसाठी गमन केले. 'राजवाडे खंड ८' आणि 'पंत अमात्य बावडा दप्तर-भाग १' यांमध्ये बावडेकर पंत अमात्यांच्या दप्तरांतील एक जुनी यादी छापलेली आहे. (रा. खं. ८ लेखांक ४९ आणि पं. अ. बा. द. भाग १ लेखांक ४२ ) या यादीमध्ये ur प्रस्तावना राजा युधिष्ठिरापासून औरंगजेबापर्यंत कोण कोण दिल्लीपती झाले व त्यांनी किती वर्षे राज्य केले ते दिलेले आहे. यादीकाराने हिंदुधर्मी दिल्लीपतींची नांवें भाट लोकांकडून मिळविलेली असावीत असे वाटते. तो पौरवराजांची जी नांवें सांगतो ती पुराणांतील पौरवराजांच्या नांवांहून वेगळी आहेत. तथापि तो सांगतो आहे ते पौरवराजे आणि पुराणांत सांगितलेले पौरवराजे हे एकच असले पाहिजेत असें पूर्ण विचारांती आमचे मत झालेले आहे. हा यादीकार शेवटल्या पौरव राजाला 'लखमीदेव' ( लक्ष्मीदेव) असे म्हणतो आणि लखमीदेवाचा प्रधान वीरसेन याने आपल्या स्वामीचा वध करून त्याचे राज्य बळकावले असे सांगतो. मराठेशाहीच्या काळांतील या दोन लेखकांनी केलेली ही विधाने दिसण्यांत परस्परविरुद्ध अशी दिसतात. तथापि दोघांच्याहि विधानांत कमी अधिक प्रमाणा- मध्ये सत्य असल्याचे आढळून येते. पौरवराजघराणे आर्यावर्तीतून निघून हिमालयांत खरोखरच जाऊन राहिलेले होते. पण तिकडे ते तपश्चर्येसाठी गेलेले नसून तिकडे संपादन केलेल्या नवीन मुलखावर स्वतः राज्य करावें या हौसेने ते तिकडे गेले. उजयिनीचे प्रद्योत राजे हे पौरवांचे जवळचे नातलग होते. पौरवांना हिमालयांत जाऊन राहण्याची हौस असल्यामुळे त्यांनी आर्यावर्तातील आपल्या राज्याचा कारभार प्रद्योतांकडे खरो- खरच सोपविलेला होता. पौरव हे त्या वेळी सार्वभौम होते. ते हिमालयांत जाऊन राहिल्यामुळे त्यांच्या इकडील राज्याची व्यवस्था पहाणे आणि सार्वभौम या नात्याने त्यांचे इकडे जे हितसंबंध होते त्या हितसंबंधाचे रक्षण करणे ही कामे त्यांचे प्रतिनिधि म्हणून प्रद्योत करूं लागले. ही कामे करीत असतांना प्रद्योतांचा मगधाच्या शैशुनागांशी तंटा उद्भवला. शैशुनाग हे देखील पौरवांचे नातलगच होते. पौरवांनी आपले प्रतिनिधि केल्यामुळे पोरवांवर ते रागावले होते आणि पूर्वेकडे आपल्या राज्याचा विस्तार करून सार्वभौम पौरवांच्या हितसंबंधाला बाध आणीत होते. सार्वभौम पौरवांचे नात्याने शैशुनागांचे पारिपत्य करणे हैं प्रद्योतांचे कर्तव्य होते. प्रद्योत आणि शैशुनाग यांचा तंटा पुढे कित्येक पिढया चालू होता. त्यांत अखेरीस शैशुनागांची सरशी झाली व शैशुनागांनी प्रद्योतांचा पार उच्छेद करून त्यांच्या ताब्यांतला सर्व मुलुख आपल्या राज्यांत सामील केला. हिमालयांत जाऊन राहिलेल्या पौरवांनी वास्तविक पाहिले तर या तंट्यांत प्रद्योतांना साह्य करणे अवश्य होते. परंतु पौरव हे हिमालयांत जातांना जसे प्रबळ अधोरेखीत केलेली वाक्ये अशी वाचावी. १ पौरवांनी प्रद्योतांना आपले प्रस्तावना ७ होते तसे हिमालयांत जाऊन राहिल्यावर प्रबळ राहिले नाहीत. तिकडे गेल्यावर ते दुर्बळ बनले. त्यामुळे त्यांचे तिकडे जे अधिकारी होते त्यांना पौरवांचे हिमालय प्रदेशांतले राज्य हस्तगत करण्याची इच्छा होऊ लागली. आर्यावर्तात शैशुनागांनी प्रद्योतांचा उच्छेद केला त्याच सुमारास हिमालयप्रदेशामध्ये शेवटल्या पौरव राजाचा वीरसेनाने खून करून त्याचे राज्य बळकावले व तो आपणाला वीरशाह असें म्हणवू लागला. पुढे ख्रिस्तपूर्व ३२६ या वर्षी ज्याने अलेक्झांडरला झेलम- नदीच्या काठी अडविण्याचा प्रयत्न केला तो इतिहासप्रसिद्ध 'पोरस' राजा म्हणजे याच वीरसेनाचा निपणतू होय. त्याचे नांव पर्वतराज असे होते. मुद्रा- राक्षस नाटकांत त्याला 'पर्वतेश्वर' असे म्हटले आहे, आणि कल्हण पंडिताच्या राजतरंगिणींत 'कुशेशय' असे म्हटले आहे. कुशेशय हा 'कुशीशाह' या पैशाची भाषेतील नांवाचा अपभ्रंश आहे, आणि कुशीशाह हे पैशाची भाषेतील नांव म्हणजे 'पर्वतराज' या नांवाचे केवळ भाषान्तर आहे. ज्याच्यापासून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले, आणि देव व ऋषि यांच्या- कडून जे सत्कारले गेलेले होते " अशी पौरवघराण्याची थोरवी पुराणकारांनी वर्णिलेली आहे. " पौरव म्हणजे विपद्ग्रस्तोद्धारसत्रांतले दीक्षितच होत कालिदासाने आपल्या अभिज्ञानशाकुंतल नाटकांत पौरवराजांसंबंधी उद्गार काढलेले आहेत. पौरवराजांची जुनी राजधानी हस्तिनापुर. पूरुवंशांतील 'हस्ति' नावाच्या एका राजाने हे नगर वसवून त्याला आपले नांव दिले अशी कथा आहे. हे नगर हल्लीच्या दिल्ली शहराच्या इशान्येस सुमारे ५७ मैल अंतरावर गंगातीरी होते. प्राचीन काळचे इंद्रप्रस्थ नगर सांप्रतच्या दिल्ली शहराजवळ होते. दिल्ली शहर यमुनेच्या पश्चिमतीरी आहे आणि इंद्रप्रस्थ हे यमुनेच्या पूर्वतीरीं होतें. इंद्रप्रस्थ नगर पांडवांनी वसविले. कौरवसभेमध्ये द्यूतांत आपले राज्य गमावीपर्यंत पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ ही होती. कौरव-पांडवांच्या घनघोर युद्धांत पांडव विजयी झाल्यानंतर धर्मराज युधिष्ठि- राला पुन्हां जो राज्याभिषेक झाला तो हस्तिनापुर येथे झाला. कौरवांबरोबरच्या युद्धांत पांडवांचे सर्व पुत्र मरण पावले होते. त्यांतील अर्जुनपुत्र अभिमन्यु यालाच तेवढी संतति होती. अभिमन्यूचा पुत्र परीक्षित् हा युधिष्ठिराच्या मागून राजा " असे महाकवि ८ प्रस्तावना झाला. परीक्षित् राजाच्यानंतर १ जनमेजय २ शतानीक ३ सहस्रानीक ४ अश्व- मेधदत्त, ५ अधिसीमकृष्ण (धर्म) आणि ६ निमिचक्र, उर्फ निचक्षु ( मनजीत) इतके पौरवराजे हस्तिनापुर येथे सिंहासनारूढ झाले. निमिचक्राच्या कारकीर्दीत गंगानदीला महापूर येऊन हस्तिनापुर वाहून गेले. त्यामुळे निमिचक्र राजाला आपली राजधानी दुसरीकडे नेणे भाग पडले. त्याने कौशाम्बी नगरी ही आपली राजधानी केली. हस्तिनापुर पुन्हा वसविण्याचा प्रयत्न पुढील काळांत कोणी केल्याचे दिसत नाही. विश्वामित्र ऋषि हा प्रथम कान्यकुब्ज देशाचा राजा होता हे प्रसिद्धच आहे. या विश्वामित्राचा आजा कुशिक या नांवाचा होता. त्यालाच 'कुशाम्ब' असेहि म्हणत. कौशाम्बी नगरी या कुशिक उर्फ कुशाम्ब राजाने वसविली अशी कथा आहे. ही नगरी ज्या प्रदेशांत होती त्या प्रदेशाला 'वत्सदेश' असे नाव होते. यामुळे कौशाम्बीला 'वत्सपत्तन' म्हणजे वत्सदेशांतले शहर असेंहि कोणी म्हणत. ही कौशाम्बी नगरी प्रयागच्या नैऋत्येस सुमारे तीस मैल अंतरावर यमुनेच्या उत्तरतीरी होती. आजला या ठिकाणी 'कोसाम' नावाचे एक लहानसे खेडे आहे. पौरव राजे हस्तिनापुर सोडून कौशाम्बी येथे रहावयास आले त्यावेळी त्यांच्या ताब्यांत गंगा आणि यमुना यांमधील बहुतेक प्रदेश असावा. पुढील काळांत या प्रदेशाच्या उत्तर भागावर त्यांचे वर्चस्व राहिलेले नसावे. तथापि पुढील काळांत त्यांनी यमुनेच्या दक्षिणेस विन्ध्यारण्यापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केलेला होता असे दिसते. पांडव सार्वभौम होते. मगधदेशचा राजा जरासंध हा पांडवांच्या पूर्वी सार्वभौम होता. पांडवांनी त्याचा वध करून आणि त्या वधानंतर दिग्विजय करून सार्व- भौमत्व संपादिले होते. पांडवांनी संपादन केलेला सार्वभौमत्वाचा मान पौरव घराण्याकडे पुढे बराच काळपर्यंत चालत होता. पौरवघराणे कौशाम्बी येथे राहूं लागल्यानंतर भारतवर्षावर परकीय लोकांची मुख्यत्वेकरून तीन आक्रमणे झालेली दिसतात. पहिले असुर लोकांचे आक्रमण, दुसरे तुराणी अथवा तुरुष्क लोकांचे आक्रमण, आणि तिसरे पारसीक लोकांचे आक्रमण, ही ती आक्रमणे होत. पारसीकांच्या आक्रमणानंतर सुमारे दोनशे वर्षांनी यवन अथवा ग्रीक लोकांचे आक्रमण भारतवर्षावर झाले. परंतु त्यावेळी कौशाम्बी येथील पौरवघराणे अस्तित्वांत नव्हते.
प्रस्तावना असुरांनी प्रथम पंजाबांतील मद्र नामक देश हस्तगत करून तेथे आपले राज्य स्थापले. शाकल नगर म्हणजे सांप्रतचे सियालकोट ही त्यांची राजधानी होती. मद्रांत राहून ते भारतीय बनले तरी आपल्या असुरत्वाची त्यांना पूर्णपणे जाणीव होती आणि असुरसंस्कृतीचा त्यांना अभिमानहि वाटत होता. त्यांचे आचारविचार बाह्य वळणाचेच होते. आपणावर इकडे तसेच मोठे संकट आले तर पश्चिमेकडील आपले संस्कृतिबांधव आपलें या बाजूकडे वर्चस्व टिकवून धरण्याचे कामी आप- णांला मदत करतील अशी त्यांची खात्री होती. भारतवर्ष आपल्या वर्चस्वाखाली आणून येथे आपले साम्राज्य स्थापण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी धरली आणि त्या उद्योगाला ते लागले. आसुरी संस्कृतीचा अभिमानी असणारा एक मग उपाध्याय या कामी त्यांना उत्तेजन देत होता. पश्चिमेकडील असुरांत त्याचे चांगले वजन होते. भारतवर्षांतील राजांच्या मुलीशी लग्ने करून त्या राजांना आपले मांडलिक बनविणे, आणि ते राजे अगर त्यांचे पुत्र यांना त्यांच्या सैन्यानिशी आपल्या स्वारीत हजर रहावयास लावणे, ही साम्राज्यविस्ताराच्या बाबतीत शाकलच्या या असुरराजांनी योजिलेली मुख्य युक्ति होती. अर्वाचीन काळांतील मोंगल बादशहा अकबर याने आपले साम्राज्य वाढवितांना याच युक्तीचा अवलंब केलेला होता हे प्रसिद्ध आहे. असुरसाम्राज्याची भारतवर्षांत स्थापना करणाऱ्या व्यक्तींची नांवें सुनीथ अथवा चन्द्रप्रभ, आणि सुमुंडि अथवा सूर्यप्रभ अशी होती. सुनीथ हा शाकलचा राजा असून सुमुंडि हा युवराज होता. स्थूलमानाने यांचा काळ ख्रिस्तपूर्व अकरावे शतक हा दिसतो. यांच्या वेळी कौशाम्बी येथे जनमेजय नांवाचा पौरवराजा होता. तो मोठा शूर, उदार, पंडित व अश्वमेधयाजी असा राजा होता. (पुराणे ज्याला 'सुषेण' असे म्हणतात, आणि यादीकार मराठी लेखक ज्याचे 'सुरसेन असे नांव सांगतो तो हा राजा असावा.) या जनमेजयाला परपुष्टा म्हणजे कोकिला नांवाची कन्या होती. ती त्याने हिमालयप्रदेशांतील आषाढपुरच्या राजपुत्राला देऊ केलेली होती. परंतु जनमेजयावर थोड्याच काळांत वायव्येकडून सुनीथ व सुमुंडि यांचे दडपण येऊन त्याला ती कन्या सुमुंडीला देणे भाग पडले. आप्त झालेल्या शाकलाधिप सुनीथाला युद्धप्रसंगी ससैन्य मदत करण्यालाहि जनमेजय बांधला गेला. याचा अर्थ शाकलाधिपतीचा तो ताबेदार बनला. पांडवांच्या वेळे- , १० प्रस्तावना पासून पौरव-घराण्याकडे चालत असलेला सार्वभौमत्वाचा मान पौरवराजे या वेळी गमावून बसले. हिमालय प्रदेशांतील एका राजपुत्राला देऊ केलेली पौरव राजाची कन्याशाकलच्या असुरांनी हरण केली म्हणून हिमालयप्रदेशांतले सर्व सत्ताधारी खवळले. त्यांच्यां- तील प्रमुख सत्ताधारी श्रुतशर्मा नांवाचा होता. त्याने सैन्याची मोठी जमवाजमव केली आणि हिमालयांतून खाली उतरून तो सुनीथाच्या मुलखांत शिरला. सुनी- थाने आपले सर्व आप्तराजे आपल्या मदतीसाठी ससैन्य बोलावले होते. सुनीथ आणि श्रुतशर्मा यांची इरावती ( रावी ) व चन्द्रभागा (चिनाब ) या नद्यांच्या संगमाजवळ गांठ पडून निकराची लढाई झाली. तीत सुनीथ मारला गेला आणि असुर व त्यांच्या मदतीला गेलेले भारतीय राजे यांचा मोड झाला. त्या प्रसंगी युवराज सुमुंडि हा आपल्या मग उपाध्यासह पश्चिमेकडे पळून गेला आणि तिकडील असुरसत्ताधाऱ्यांकडे मदतीची याचना करीत फिरूं लागला. त्याच्याबरोबर असलेल्या मग उपाध्यायाच्या खटपटीने त्याला तिकड चांगली मदत मिळाली. आपणाबरोबर मोठे सैन्य घेऊन तो परत आला आणि त्या सैन्याच्या जोरावर त्याने श्रुतशाचा पराभव करून कैलासाच्या दक्षिणेकडील सर्व हिमालय प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. हा कैलास म्हणजे आजच्या काश्मिर संस्थानांतील कैलास नांवाची पर्वतश्रेणी होय. सुनीथ व सुमुंडि यांचे हिमालयांतील ज्या सत्ताधाऱ्यांशी युद्ध झाले ते सत्ता- धारी आपणाला देवपुत्र असे म्हणवीत. हिमालयांतील त्यांचा मुलूख विद्याधरभूमि अगर विद्याधरवेदि म्हणून प्रसिद्ध होता. या विद्याधरभूमीलाच ऐतरेय ब्राह्मणामध्ये वैराज्य असे म्हटलेले आहे. विद्याधरभूमीत अनेक लहान लहान सत्ताधारी असत. जो पराक्रमी पुरुष त्या सर्वांना आपल्या ताब्यांत आणण्याचे कामी यशस्वी होई तो आपणाला वैराज् किंवा विद्याधरचक्रवर्ति असे म्हणवीत असे. विद्याधरभूमी- तील सत्ताधाऱ्यांवर विजय संपादन करून सुमुंडि हा विद्याधरचक्रवर्ति झाला. शाकल नगर सोडून तो विद्याधरभूमीतच राहूं लागला. शाकलच्या सिंहासनावर दुसऱ्या राजपुत्राची स्थापना झाली. या घराण्यांतील राजे आपणाला शाकलाधिप असें म्हणवीत. परदेशांत ते 'शांगलदीप' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यामध्ये आरंभी तरी पश्चिमेकडील असुरांप्रमाणेच मृतांची शरीरें औषधी लेप लावून भूगर्भात सुरक्षित ठेवण्याची प्रस्तावना ११ चाल होती. या घराण्याने सुमारे चार शतकें साम्राज्योपभोग घेतला असे दिसते. आपल्या सैन्यांत ते मुख्यत्वे करून भारतवर्षाबाहेरील वाळवंटमय प्रदेशांतील लोकांचा भरणा करीत होते आणि त्या काळांत वाळवंटमय प्रदशांतील लोकांपैकी अत्यंत सुधारलेले असे जे असुर लोक, त्यांच्याशी आपले नाते जोडीत होते. यामुळे त्या घराण्याला यथे आपले साम्राज्य दीर्घकाळ टिकवितां आलें. बाह्य लोक जोपर्यंत या घराण्याच्या आश्रयाने आपले पोट भरण्यासाठी इकडे येत होते तोपर्यंत त्यांच्या साह्याने या घराण्याचे साम्राज्य चालले. परंतु ज्या वेळी ते या घराण्याला जिंकण्याच्या इराद्याने इकडे चाल करून आले त्यावेळी मात्र या घराण्याचे साम्राज्य ढासळले. तुराणी अथवा तुरुष्क लोकांचे भारतवर्षावरील आक्रमण हे शाकलाधिपाच्या पारिपत्यानिमित्त झालेले होते. तुराणचा सम्राट आफ्रासियाब ( आफ्रासियाब म्हणजे सूर्य. आफ्रासियाब हे त्या सम्राटाचे नांव नसून बिरुद असावे असे वाटते.) याच्या साम्राज्याची दक्षिणसीमा आणि शाकलाधिपाच्या साम्राज्याची १ आफ्रिसियाबच्या वेळी आलेला तुराणी आणि भारतीय यांचा संबंध हा पहिला संबंध नसून आफ्रासियाबच्या पूर्वीदेखील तुराणी आणि भारतीय यांचा संबंध होता असे दिसते. प्राचीन काळांतील भारतीय राजे इंद्राच्या बोलावण्यावरून इंद्राला असुरांविरुद्ध मदत करण्यासाठी जात असल्याचे उल्लेख पुराणांतून अनेक आहेत. ज्याच्या मदतीला हे राजे जात होते तो इंद्र दिवस्पति नसून कोठला तरी भूपतीच असला पाहिजे हे उघड आहे. विद्याधर, यक्ष आणि गंधर्व हे लोक त्याला अनुकूल होते आणि असुर लोक हे त्याच्या विरुद्ध होते. ही परिस्थिति लक्ष्यांत घेतां त्या भूपति इंद्राचा मुलुख भारतवर्षाच्या उत्तरेस आणि वायव्येस असा दोन्ही दिशांकडे असला पाहिजे. असा मुलुख म्हणजे मध्य आशियांतील तुर्कस्थान हाच एक दिसतो. प्राचीन काळांतले भारतीय राजे ज्याच्या मदतीला जात तो इंद्र म्हणजे या तुर्किस्थानचा पुरातन काळांतील प्रभु असणे शक्य वाटते. इंद्राला जी अनेक नावे आहेत त्यांमध्ये ' तुरासाङ् ' असे एक नाव आहे. या नावाची व्युत्पत्ति कशीहि लावण्यांत येत असली तरी या नांवाचा सरळ अर्थ तुराणचा शहा म्हणजे राजा असा दिसतो आणि तो प्राचीन काळांतले भारतीय राजे ज्या इंद्राला मदत करण्यासाठी जात तो इंद्र कोणता असला पाहिजे हे सूचित करतो यांत संशय नाही.
१२ प्रस्तावना उत्तरसीमा या परस्परांना भिडून सीमेवरून त्या दोघांत प्रथम तंटा उद्भवलेला असावा. त्यांत शाकलाधिपाला हार खावी लागली आणि आफ्रासियाबने त्याच्या- वर वार्षिक खंडणी लादली. आपणाला खंडणी भरावी लागते हे शाकलाधिपाच्या मनाला न साहून तो आपले सैन्यबळ वाढवू लागला. चार हजार हत्ती, एक लक्ष घोडदळ आणि पांच लक्ष पायदळ एवढा सेनासंभार त्याजपाशी होतांच आफ्रा- सियाबला खंडणी देण्याचे त्याने बंद केले. आफ्रासियाबला त्यामुळे राग आला आणि आपला मुख्य सेनापति पिरान विसह याजबराबर मोठी फौज देऊन त्याची त्याने शाकलाधिपाच्या पारिपत्यासाठी रवानगी केली. हा प्रकार ख्रिस्तपूर्व सातव्या शतकाच्या अखेरीस अगर सहाव्या शतकाच्या आरंभी घडलेला असावा. तुरा- ण्यांच्या या स्वारीमुळे शाकलाधिपाच्या साम्राज्याची इमारत कोसळली आणि भारतीयांना डोके वर करण्यास अवसर मिळाला. तुराण्यांच्या स्वारीचा दुसरा एक असा परिणाम झाला की सिंधुनद आणि चन्द्रभागा नदी ( चिनाब ) यांमधील प्रदेशांत तुरुष्क लोकांचा भरणा होऊन लवकरच त्यांची तेथे राज्ये थाटली. या तुरुष्कांचा राजा मरण पावला म्हणजे थडग्यांत त्याचे प्रेत पुरतांना त्या प्रेताच्या शेजारी दुसरी जिवंत माणसे पुरीत. असे करणारांचा हेतु हा की त्या राजाला परलोकामध्ये ही माणसें नोकर म्हणून उपयोगी पडावीत ! तक्षशिला नगरीचा विद्यांचे माहेर म्हणून ज्या काळांत लौकिक होता तो काळ, आणि शाकलाधिपांच्या अमदानीचा काळ हे एकच दिसतात. शाकलाधिपांचे साम्राज्य नष्ट झाले तसे आर्यावर्तातले विद्यार्थि तक्षशिला येथे विद्या आणि शिल्प शिकण्यासाठी जाण्याचे बंद झाले. शाकलाधिपांच्या अमदानींत आर्यावर्तामध्ये काशीराज्य हेच एक सुस्थितीत असलेले राज्य दिसते. शाकलाधिपांना उतरती कळा लागली त्याच सुमारास काशीराज्यालाहि उतरती कळा लागलेली दिसते. शाकलाधिपांच्या साम्राज्याची इमारत कोसळल्यानंतर भारतवर्षांत आपणाला असुर अगर असुरांचे नातलग समजणारे जे सत्ताधारी राहिलेले होते त्यांजविरुद्ध भारतीयांची उठावणी झाली. भारतवर्षांत येऊन राहिलेले तुरुष्कहि या उठावणीत सामील झालेले असावेत. या उठावणीमुळे भारतवर्षातील असुरसत्ताधाऱ्यांची इतिश्री झाली. यानंतर थोड्याच वर्षांत इराणमधील हुवज ऊर्फ सुशिएना येथील हखामणी नामक घराण्यांतला राजा कुरु ( सायरस) हा बलाढय होऊन देशां- प्रस्तावना १३ मागून देश जिंकीत चालला आणि त्यानेंहि तिकडील, म्हणजे इराणच्या आखाता- जवळील असुरांवर शस्त्र उपसलें. बावेरूचे वैभवशाली असुरराज्य त्यानेच खिस्तपूर्व ५३८ या वर्षी बुडविलें. पारसीकांचे आक्रमण म्हणजे इराणी लोकांचे आक्रमण होय. इराणांतील निर- निराळ्या जातीचे लोक एकत्र करून हखामणी घराण्यातील कुरु उर्फ सायरस राजाने त्यांचे एक बलाढय राष्ट्र बनविले. कुरु हा तुराणच्या आफ्रासियाबचा नातु, म्हणजे मुलीचा मुलगा होता असे कोणी म्हणतात, तर कोणी तो माद म्हणजे मीडिया येथील राजाच्या मुलीचा मुलगा होता असे म्हणतात. त्याचा बाप कंबुजिय हा हुवज उर्फ सुशिएना येथे राज्य करीत असून मादभूपतीचा मांडलिक होता. कुरु हा खिस्तपूर्व ५५९ या वर्षी सिंहासनारूढ झाला आणि ख्रिस्तपूर्व , शकस्थान, कृष्णममुद्र 2 लई कताक अर्जिन सुगुड इकाराना धूमध्य समुद्र असूखी बात्री मद्राय माद पार्थव हरैव होवेरू हवन आर्थस्थान पार्स अरबाय राणीआ भारतीसमुद्र हखामणीसाम्राज्य ५२९ या वर्षी मध्य आशियांत शत्रूशी लढत असतां मारला गेला. आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत तो मांडलिकाचा स्वतंत्र राजा आणि स्वतंत्र राजाचा सम्राट (क्षायथिय क्षायथियानाम् क्षत्रियः क्षत्रियाणाम् राजाधिराज, सम्राट.) होऊन त्याने ईजीयन समुद्रापासून सिंधुनदापर्यंत आणि कश्यप समुद्र (कास्पियन समुद्र) व वंकू नदी (ऑक्सस) यांपासून खाली इराणचे आखात व सिंधुसागर येथवर आपले साम्राज्य वाढविले. कुरूच्या पश्चात् त्याचा ज्येष्ठ पुत्र कंबुजिय (कॅम्बीसिस) हा इराणचा सम्राट् झाला. त्याने मुद्राय म्हणजे मिसर देश जिंकला. कंबुजिय १४ प्रस्तावना क्रूर होता. मिसर देशांत त्याने अनेक क्रूरपणाची कृत्ये केली. लिबियांतील अॅमो- नियन लोकांवर पाठविलेल्या सैन्याची वाताहात आणि इथिओपिया जिंकण्याचे कामी आलेले अपयश, यांमुळे कंबुजियाला वेड लागले. वेडाच्या भरात त्याने आपला धाकटा भाऊ बर्दिय याचा वध केला. बर्दियाच्या वधाची बातमी सैन्याला नसल्यामुळे बर्दियाचा तोतया उभा राहिला. गौमात नांवाचा एक मग उपाध्याय होता. कुरुपुत्र बर्दिय तो मीच असा त्याने पुकार केला. कंबुजियाच्या क्रूरपणामुळे कंबुजियावर नाराज असलेले इराणी सैन्य त्या तोतयाला जाऊन मिळाले. तोतयाने साम्राज्यांतले अनेक प्रांत भराभर हस्तगत केले आणि तो सम्राट् या नात्याने सिंहासनारूढ झाला! कंबुजिय त्या वेळी सूर्या (सिरिया) नामक देशांत होता. त्याला हे वृत्त कळतांच त्याने आत्महत्या केली. (खिस्तपूर्व ५२२). गौमात मगाने बर्दियाचे सोंग घेऊन राज्य मिळविले खरे, पण त्याचे ते सोंग फार दिवस टिकले नाही. हा कुरुपुत्र बर्दिय नसून तोतया आहे असे सरदार मंडळीला लवकरच समजून आले. या मंडळीने एके दिवशी राजवाड्यांत घुसून गौमाताला ठार मारले. गौमाताला मारणाऱ्यांमध्ये विश्तास्पपुत्र दारयवहु (डरायस) नांवाचा एक सरदार कुरु व कंबुजिय यांच्याप्रमाणेच हखामणी घराण्यांतला होता. गौमाताच्या वधानंतर तोच इराणचा सम्राट झाला. (खिस्तपूर्व ५२१). साम्राज्यामध्ये ठिकठिकाणी उद्भवलेली बंडे मोडण्यांत दारयवहूला आपल्या कारकीर्दीची पहिली तीन वर्षे खर्च करावी लागली. या तीन वर्षात त्याने एकंदर आठ बंडखोरांची बंडे मोडून त्या बंडखोरांना जिवंत धरले आणि ठार मारले. या आठहि बंडखोरांचा एक विशेष म्हटला म्हणजे हा की गौमात मगासारखे ते सगळे तोतये होते ! बंडखोरांची वाट लावल्यानंतर दारयवहु भारतवर्षाकडे वळला. त्याने सिंधुनद समुद्राला कोठे मिळतो याचा शोध लावला आणि सिंधूच्या सप्तमुखांजवळील सैंधवांना जिंकून त्या भागांतील समुद्राचा उपयोग केला. त्यानंतर त्याचा आरुणि नांवाचा एक सेनापति आपणाबरोबर मोठी फौज घेऊन गांधारदेशांतून पंजाबांत शिरला, आणि पंजाबांतून पुढे सरकून यमुना व गंगा या नद्यांमधील पौरवराज्याचा काही भाग त्याने जिंकला. औरंगजेबाने संभाजीचा ज्या पद्धतीने वध केला तसल्याच पद्धतीने दारयवहु हादेखील युद्धांत पकडून आणलेल्या आपल्या शत्रूचा वध करीत असे. प्रवर्ति आणि चित्रतोक्म या त्याच्या दोन शत्रूना पकडून त्याच्यापुढे आणण्यांत आले प्रस्तावना १५ ... Nar.. तेव्हां दारयवहूनें प्रथम त्यांचे नाक कान व जीम हे अवयव कापून नंतर त्यांचे डोळे फोडले आणि डोळे फोडल्यावर मग त्यांना सुळी दिलें! आपल्या सेना- पतींना स्वारीवर रवाना करते वेळी तो आशा करी, " असेच जा आणि जे आपणाला माझे म्हणवीत नाहीत अशा अमित्रांना कापून काढा ! आरुणीला भारतवर्षावर रवाना करतांना त्याने अशीच आज्ञा केलेली असली पाहिजे. ही आज्ञा पाळण्यांत आरुणी बिलकुल कसूर करीत नव्हता; आणि त्यामुळेच इकडील लोकांना तो 'दारुणकर्मदक्ष' वाटला. या दारुणकर्मदक्ष आरुणीला वत्सराज उदयनाने मारले आणि पारसीकांची स्वारी मागे परतवून लावली. यानंतर पारसी- कांनी भारतवर्षावर पुन्हा स्वारी केली नाही. सिंधुनद हीच त्यांच्या साम्राज्याची पूर्वसरहद्द मानली गेली. पांडवांच्या पश्चात् पौरव घराण्यांतील विशेष प्रसिद्ध अशी व्यक्ति म्हटली म्हणजे वत्सराज उदयन हीच होय. ख्रिस्तोत्तर आठव्या शतकापर्यंत वत्सराज उदयनाच्या कथा भारतवर्षांत लोकप्रिय होत्या असे दिसून येते. उदयन चरित्राविषयी लोकांना वाटणाऱ्या प्रेमामुळे अनेक लेखकांनी उदयन विषयक छोट्या मोठ्या कथा लिहिल्या आणि कवींनी नाटके रचली. उदयन- विषयक कथांमध्ये सर्वात मोठी कथा लिहिणारा लेखक म्हटला म्हणजे वररुचि हा होय. हा नवनंदांतील शेवटल्या नंदराजाचा काही काळ अमात्य होता. तो मूळचा कौशाम्बी नगरीतला असल्यामुळे वत्सराज उदयनाविषयी त्याला आपलेपणा वाटून त्याने उदयनविषयक एक विस्तृत कथा लिहिली. वररुचीने लिहिलेल्या कथेचे पुढील काळांत काणभूति नांवाच्या मनुष्याने पैशाचीत भाषांतर केलें. शातवाहनकाळांतील गुणाढ्य पंडिताने त्या पैशाची भाषांतराला पद्यरूप दिले आणि बृहत्कथा नामक कथासंग्रहाची ती आवरणकथा बनविली. उदयन विषयक नाटकांपैकी १ प्रतिज्ञायौगंधरायण २ स्वप्नवासवदत्त, ३ प्रियदर्शिका आणि ४ रत्नावली ही नाटकें उपलब्ध आहेत. माधव केशव काटदरे
उदयनकालीन
भारतवर्ष
भर
सि न्यु
सुराष्ट्र
(पश्चिमसमुद्र
सा गर
गंगा सागर
(पूर्व समुद्र
मुरता
भा र त
(सक्षिण
महोद घि
मा)
वत्सराज उदयन १-अडीच हजार वर्षांपूर्वी पवित्र गंगा आणि यमुना यांचा संगम प्रयाग नामक क्षेत्राजवळ झालेला आहे. प्रयागच्या पश्चिमेकडील भूप्रदेशाला प्राचीन काळी वत्सदेश असें म्हणत असत. या देशाची कापसाच्या उंची वस्त्रांविषयी प्रासद्धि होती. या देशाच्या राजधानीचे नांव कौशाम्बी असे होते. ही नगरी यमुनेच्या उत्तरतीरीं असून मोठी शोभिवंत आणि धनाढ्य अशी होती. तेथे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी पौरव या नांवाचे घराणे राज्य करीत होते. त्या घराण्यातील राजे आपणाला पंडुपुत्र अर्जुनाचे वंशज म्हणवीत. हस्तिनापुर येथील पौरवांच्या नांवांसारखींच भीष्म, भीमसेन, आभिमन्यु, जनमेजय वगैरे नांवें या कौशाम्बीच्या पौरवांतहि होती. कौशाम्बीच्या पौरवांचे राज्य गंगा आणि यमुना यांमधील दुआबांत होते, त्याचप्रमाणे यमुनेच्या दक्षिणेकडील प्रदेशांतहि होते. त्यांच्या राज्याच्या दक्षिण सीमेवर विन्ध्यारण्य होतें. विन्ध्यारण्यांत भिल्ल वगैरे आटविक, म्हणजे जंगली लोक रहात. कौशाम्बांच्या पौरवांनी या आटविकांशी स्नेहभावाने वागण्याचे धोरण ठेवलेले होते. त्यामुळे पौरवराज्यांतील लोकांचा फायदा होता आणि आटविकांचाहि फायदा होता. आटविकांशी पौरव राजांचा स्नेह असल्यामुळे पौरवराज्यांतले सार्थवाह अथवा लमाण हे व्यापारी-मालाची नेआण विन्ध्यारण्यांतून निर्भयपणे करूं शकत, आणि आटविकदेखील अरण्यांत मिळणाऱ्या १८ वत्सराज उदयन R. वस्तु पौरवराज्यांत विकावयास आणीत. जंगली जीवनामुळे काटक, चपळ आणि धाडसी बनलेल्या आटविकांचा पौरवांच्या पायदळांत बराच भरणा होता. शिवाय पौरवराजांच्या पदरी शिकारी म्हणून नोकरी मिळण्याचीहि त्यांना सोय होती. पौरवराज्यांतील अगदी पूर्वेकडील प्रांताचें नांव लावाणक असें होतें. या प्रांताचा अधिकारी लावाणक नामक गांवीं रहात असे. हे गांव पौरवराज्याच्या पूर्वसीमेपाशी असल्यामुळे सीमेवरील जंगलांत शिकार करण्यासाठी म्हणून पौरवराजे केव्हां केव्हां या गांवीं येऊन रहात असत. लावाणक गांवीं स्वतःला रहाण्यासाठी त्यांनी एक वाडा बांधलेला होता. लावाणक प्रांताच्या पलीकडे मगधराज्याचा मुलुख होता. मगधराज्य म्हणजे मुख्यत्वेकरून हल्लींचा बिहार प्रांत होय. भारतवर्षाच्या प्राचीन इतिहासांत मगधदेशाला महत्त्वाचे स्थान आहे. मगधावर पूर्वी सम्राट् जरासंधाचे वंशज राज्य करीत होते. त्यांच्या घराण्याला बार्हद्रथ घराणे असे म्हणत. मगधाचें राज्य या बार्हद्रथ घराण्यापासून शैशुनाग घराण्याने नुकतेच जिंकून घेतलेलें होतें. अडीच हजार वर्षांपूर्वी या शैशुनाग घराण्याची राजधानी गिरिव्रज ऊर्फ राजगृह ही होती. पुढील काळांत या घराण्याने पाटलीपुत्र ऊर्फ कुसुमपुर ही आपली राजधानी केली. गिरिव्रज अथवा राजगृह हे ठिकाण हल्लीच्या पाटणा जिल्ह्याच्या दक्षिणसीमेवर होते. सांप्रत त्याला राजगीर असें म्हणतात. पौरवराज्याच्या उत्तरेला कोसलराज्य होते. हे कोसलराज्य म्हणजे सामान्यतः आजचा अयोध्या प्रांत होय. कोसलवर इक्ष्वाकु घराण्यांतले राजे राज्य करीत होते. ते आपणाला दाशरथी रामाचा पुत्र कुश याचे वत्सराज उदयन १९ वंशज म्हणवीत. त्यांच्या राजधानीचें नांव श्रावस्ती नगरी असें होतें. ही श्रावस्ती नगरी कोसलराज्याच्या उत्तर भागांत हिमालयाच्या पायथ्याजवळ होती. इक्ष्वाकु राजांची दुसरी राजधानी अयोध्या ही होती. कोसल, वत्स आणि मगध या तीन राज्यांच्या मध्ये काशीराज्य होतें. सुप्रसिद्ध काशी ऊर्फ वाराणसी नगरी ही या राज्याची राजधानी होती. काशीचे राजे ब्रह्मदत्त या नावाने प्रसिद्ध होते. ब्रह्मदत्त हे त्यांच्या घराण्याचे नांव होते. पौरखराज्याच्या नैऋत्येला अवंतिराज्य होते. अवंतिराज्य म्हणजे सांप्रतच्या माळव्याचा पश्चिमभाग होय. माळव्याच्या पूर्व भागाला प्राचीन काळी दशार्ण असें नांव होतें. अवंति येथील पूर्वीच्या राजघराण्याचा उच्छेद करून प्रद्योत नामक घराण्याने अवंतीवर नुकतीच आपली सत्ता प्रस्थापित केलेली होती. प्रद्योतांनी ज्या राजघराण्याचा उच्छेद करून अवंतिराज्य काबीज केलें, त्या घराण्याचे नांव वीतिहोत्र असें होतें. वीतिहोत्र आणि प्रद्योत या दोन्ही नांवांचा अर्थ अग्नि किंवा सूर्य असा होतो. प्रद्योतांची राजधानी उज्जयिनी ही होती. अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाचा काळ होय. पुराणप्रसिद्ध असुर लोक या शतकामध्ये पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट झाले. पश्चिमेस इराणच्या आखाताजवळ जे असुर सत्ताधारी होते त्यांचा उच्छेद इराणी लोकांनी केला आणि भारतवर्षांत जे असुर अगर असुरांशी आपलें नाते जोडणारे सत्ताधारी होते त्यांचा उच्छेद भारतीयांनी केला. कौशांबी येथील पौरख राजाने २० वत्सराज उदयन या कार्यात भाग घेतलेला होता. परंतु भारतीयांना विजय मिळालेला पहाण्यास तो जिवंत राहिला नाही. शत्रूबरोबर युद्ध चालू असतांना युद्धांतच तो मारला गेला. आसुरी वर्चस्वाला कायमची मूठमाती मिळावी म्हणून ज्या पौरव राजाने आपल्या प्राणांचे मोल दिलें त्या पौरव राजाचाच वत्सराज उदयन हा नातू होय. पौरवांनीं वत्सदेशांतील कौशांबी नगरी आपली राजधानी केल्यापासून कौशांबीच्या 'सिंहासनावर आरूढ झालेला प्रत्येक पौरव राजा हा वत्सराजच होता. तथापि उदयनालाच तेवढें 'वत्सराज' असें म्हणण्याचा प्रघात पडून गेलेला असल्यामुळे 'वत्सराज' हे उदयनाचे दुसरे नांवच बनले आहे ! २-उदयनाचें पूर्ववृत्त पांडवांच्या वेळेपासून चक्रवर्तित्वाचा मान पौरव घराण्याकडे चालत आलेला होता. परंतु ख्रिस्तपूर्व अकराव्या शतकामध्ये एका परकीय घराण्याने पौरवांपासून तो मान हिरावून घेतला आणि पौरवांना आपले मांडलिक बनविलें. पंजाबांतील चंद्रभागा ( चिनाब ) आणि इरावती ( रावी) या नद्यांमधील रेचना दुआबाला पूर्वी मद्रदेश असें म्हणत. पौरवांपासून चक्रवर्तित्वाचा मान हिरावून घेणारे परकीय घराणे या मद्रदेशांत येऊन स्थायिक झालेले होते. हे घराणे पश्चिमेकडील असुरांशी आपले नाते सांगणारे होते. शाकल नगर (सियालकोट शैलकूट) ही त्याची राजधानी होती. या घराण्यांतील राजे शाकलाधिप या नांवाने प्रसिद्ध होते. आर्यावर्तातील सर्व राजे या शाकलाधिपांचे अंकित बनलेले होते, आणि शाकलाधिप हे इच्छेस येईल त्याप्रमाणे राजांचे उदयास्त वत्सराज उदयन २१ NIV घडवून आणण्याला समर्थ असे सर्वशक्तिमान् प्रभु होऊन बसलेले होते. भारतवर्षांत ते बाह्य लोकांच्या साह्याने आपले वर्चस्व राखीत असल्याकारणाने त्यांच्या अमदानींत भारतवर्षाबाहेरील वाळवंटमय प्रदेशांतले शस्त्रजीवी लोक भारतवर्षांत सारखे लोटत होते. पंजाब हा भारतवर्षाचा उत्तरभाग त्यामुळे म्लेच्छमय बनून गेला आणि भारतीयांना उत्तर दिशा दूषित झालेली दिसू लागली. कौरव-पांडवांच्या वेळी यमुना आणि चर्मण्वती (चंबळा ) या नद्यांच्या पश्चिमेकडील प्रदेशांत सिंधुनदापर्यंत जी राष्ट्र होती ती सगळी नष्ट होऊन पुढील काळामध्ये त्या प्रदेशांत जिकडे तिकडे नवीं राज्ये थाटली होती; आणि हा सारा शाकलाधिपांचा प्रभाव होता. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकाच्या अखेरीपर्यंत शाकलाधिप प्रबल होते. त्यानंतर त्यांच्यावर तुराणी लोकांची स्वारी होऊन ते दुर्बळ बनले. शाकलाधिपांच्या दुर्बळतेचा फायदा घेण्याला भारतीय लोक उद्युक्त झाल्यास नवल नाही. आपले गमावलेलें चक्रवर्तिपद पुन्हां संपादन करण्याची संधि आतां आलेली आहे असें पौरवांना वाटू लागले आणि तेहि चक्रवर्तिपद प्राप्त करून घेण्याच्या कामी अवश्य असलेल्या पूर्वतयारीला लागले. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या आरंभी कौशाम्बी येथे जो पौरव राजा राज्य करीत होता त्याचे पौरवपरंपरेतील नांव जनमेजय असें होतें. वत्सराज उदयनाचा हा पणजा होय. शाकलाधिप दुर्बळ होतांच या जनमेजयाने आपले सैन्यबळ आणि राज्य वाढविण्याला सुरवात केली. आपल्या राज्याची सीमा त्याने एका बाजूस अवंतिराज्याला आणि दुसऱ्या बाजूस मगधराज्याला नेऊन भिडविली. त्याच्या पराक्रमामुळे लोक त्याला बृहद्रथ किंवा नरहरि असे म्हणूं लागले.
२२ वत्सराज उदयन बृहद्रथ म्हणजे महान् योद्धा आणि नरहरि म्हणजे पुरुषसिंह. लोकांत याच नांवानीं तो प्रसिद्धीस आल्यामुळे त्याचे स्वतःचे जनमेजय हे नांव मागे पडलें. कोसलचा इश्वाकुवंशी राजा कृतंजय ऊर्फ कृतवर्मा आणि मगधाच्या शैशुनागांचा मूळपुरुष शिशुनाग हे जनमेजय बृहद्रथाशी समकालीन होते. जनमेजय बृहद्रथाचा पुत्र, आणि उदयनाचा आजा याचें नांव वसुदान असे होते. याच्यावेळी पौरवांचे लष्करी सामर्थ्य पुष्कळच वाढलेलें होतें. पूर्णबल, आणि सहस्रानीक ही त्याची बिरुदें होती. सहस्रानीक या त्याच्या बिरुदावरून असे वाटते की त्याच्या गजदळांत एक हजार हत्ती होते. त्या वेळी चेदिदेशांतील जंगलांत उत्तम प्रतीचे हत्ती सांपडत असत आणि दशार्णदेशांतील जंगलांमध्ये मध्यम प्रतीचे हत्ती पुष्कळ होते. वसुदानाच्या पित्याने हे दोन्ही देश जिंकून पौरव राज्यांत सामील केलेले होते. त्यामुळे वसुदानाला आपले गजदळ वाढवितां आलें. वसुदानाने ही सर्व तयारी असुरांच्या उच्छेदासाठी केलेली होती. वसुदानाच्या राणीचें नांव मृगावती ऊर्फ कौसल्या असें होतें. मृगावती ही कोसलचा राजा कृतंजय ऊर्फ कृतवर्मा याची कन्या होय. मृगावतीचा भाऊ कोसलराज रणंजय, मगधाचे काकवर्ण, व क्षेमधर्मा ऊर्फ प्रसेनजित्, आणि अवंतीचा पुलिक प्रद्योत हे राजे वसुदानाशी समकालीन होते. आर्यावर्ताच्या पश्चिमेकडील आणि वायव्येकडील असुरपरंपरेचे सत्ताधारी व आर्यावर्तातील सत्ताधारी यांचा संग्राम वसुदानाच्याच वत्सराज उदयन २३ कारकीर्दीत झाला. आर्यावर्तातील सत्ताधाऱ्यांनी हा संग्राम जिंकला खरा; पण तो जिंकण्यापूर्वी पौरवसैन्यावर शत्रूचा एकाएकी जोर होऊन पौरव राजा वसुदान हा मारला गेला आणि त्याच्या सैन्याचा संहार झाला. पौरवांच्या आकांक्षांना हा एक मोठाच धक्का बसला. वसुदानाच्या पुत्राचे नांव शार्ङ्गदेव असें होतें; आणि शाङ्देवाच्या राणीचें नांव विष्णुमती ऊर्फ वैदेही असे होते. विष्णुमती ही विदेह देशांतील मिथिलानगरीच्या राजाची कन्या होती. मिथिला नगरी म्हणजे नेपाळांतील घाटी टेंकड्यांजवळचें सांप्रतचे जनकपूर होय. विष्णुमती आणि शार्ङ्गदेव हीच वत्सराज उदयनाची मातापितरें होत. शार्ङ्गदेवाच्या कारकीर्दीत पौरवांचे लष्करी सामर्थ्य कमी झालेलें होते. शार्ङ्गदेव हा केवळ शतानीक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या वेळी अवंतीचे प्रद्योत आणि मगधाचे शैशुनाग हे विशेष जोरांत होते. काशीचे राजे जरी जोरांत नव्हते तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतींत खाली आलेल्या पौरवांना संधी साधून चिमटे घेण्याला ते कमी करणारे नव्हते. शार्ङ्गदेव शतानीकाच्या अमात्याचे नांव युगंधर असें होतें. सेनापतीचे नांव सुप्रतीक असे होते आणि एक विनोदी ब्राह्मण त्याचा नर्मसचिव होता. या मंडळीला पौरवघराण्याची पूर्वपरंपरा अवगत असून पौरवघराण्याविषयी अभिमान वाटत होता. कसाहि बिकट प्रसंग आला तरी ही मंडळी आपल्या राजाला सोडून जाणारी नव्हती. चक्रवर्तिपदाची आकांक्षा आतां अवंतीचे प्रद्योत आणि मगधाचे शैशुनाग यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेली होती. दोघांच्या मध्ये पौरव हे ' अंतर्धि' म्हणजे बफर स्टेटच्या राजासारखे होते. पौरवांना आपल्या २४ वत्सराज उदयन , चर्चस्वाखाली आणून संधि सांपडतांच पलीकडच्या जबरदस्ताला मर्मी तडाखा द्यावयाचा आणि 'कुंडलें हिमविंध्यांची, सागरांता अशी मही' आपल्या अमलाखाली आणावयाची, हा त्या दोघांच्याहि मनांतला डाव होता. पौरवांवर आपले शक्तिसर्वस्व लोटून पौरवांना जिंकतां येणे त्यांना अशक्य नव्हते. परंतु पौरवांवर शक्तिसर्वस्व लोटल्यास पौरवहि प्राण पणाला लावून अखेरपर्यंत लढतील आणि त्याच्यामुळे आपली जी हानी होईल तिचा फायदा पौरवांपलीकडचा जबरदस्त ताबडतोब घ्यायला चुकणार नाही हे त्या दोघांतला प्रत्येक जाणून होता; आणि त्यामुळे पौरवांवर शक्तिसर्वस्व न घालतां कधीं थोडासा धाक दाखवून, कधी गोडीगुलाबीची भाषा वापरून तर कधी कसले तरी आमिष पुढे करून पौरवांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा उद्योग त्यांनी चालविला होता. परंतु पौरवांनी त्यांना दाद न देतां आपलें स्वातंत्र्य कायम राखलें. युगंधर अमात्याने त्यांची कारस्थाने हाणून पाडली आणि सुप्रतीक सेनापतीने त्यांच्या स्वाऱ्या परतवून लावल्या. शतानीकपुत्र वत्सराज उदयन याचा जन्म उदयपर्वतावर झाला व त्यामुळेच त्या राजपुत्राचे नांव ' उदयन ' असे ठेवण्यांत आले. उदयपर्वत म्हणजे उदयगिरि' होय. १ भारतवर्षात अनेक उदयगिरि आहेत. त्यांतील सांप्रतच्या भेलशाजवळचा उदयगिरि हे कदाचित् उदयनाचे जन्मस्थान असू शकेल. कथालेखक उदयनाचा उदयगिरिवर जन्म होण्याचे कारण म्हणून एक अद्भुत प्रकार वर्णन करतात. तो एखाद्या परीकथेतच शोभणारा आहे. उदयनाच्या मातेला प्रसूतीसाठी उदयगिरि येथे गुप्तपणे ठेवण्यांत आलेले असावे आणि त्याचे कारण पौरवांची त्यावेळी झालेली बिकट परिस्थिति हे असावें.
वत्सराज उदयन २५ उदयन हा अतिशय देखणा होता. त्यामुळे रूपदेव असें एक नांव त्याला मिळालेलें होतें. उदयनाचे शिक्षण उदयगिरि येथेच झाले. त्याला धनुर्विद्या शिकविणारा आचार्य जमदग्नि होता. जमदग्नि हे त्या आचार्याचें नांव असेल अगर कदाचित् गोत्रहि असू शकेल. उदयन हा गांधर्वविद्यानिपुण म्हणून प्रसिद्ध होता. गांधर्वविद्या म्हणजे संगीत होय. ही विद्या त्याने उदयगिरि येथें असतांनाच संपादन केली आणि पुढे अभ्यासाने वाढविली. उदयगिरिजवळ जंगल असून त्या जंगलांत भिल्ल लोक रहात असत. धनुर्विद्येचे शिक्षण संपल्यावर उदयन हा धनुष्यबाण घेऊन त्या जंगलांत शिकारीसाठी जात असे. एके दिवशी तो त्या जंगलांतून फिरत असतां एक भिल्ल एका नाग जातीच्या पुरुषाला पकडून नेत असलेला त्याने पाहिला. तो नाग गायन आणि वीणावादन या कलांमध्ये निष्णात असून त्याचे नांव वसुनेमी असे होते. त्याच्यापाशी घोषवती नांवाची एक उत्कृष्ट वीणा होती. तो कलावंत एका जंगली भिल्लाच्या तावडीत सांपडलेला पाहून उदयनाला त्याची दया आली. आपल्या हातांतलें सोन्याचे कडे त्या भिल्लाला देऊन उदयनाने वसुनेमीला सोडविलें, वसुनेमीने या उपकाराबद्दल उदयनाला गांधर्वविद्या शिकविली आणि आपली उत्कृष्ट घोषवती वीणाहि त्या राजपुत्राला अर्पण केली. घोषवती वीणेची प्राप्ति झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी उदयनाला उदयगिरीहून कौशाम्बी येथे नेण्यात आले आणि तेथे त्याला युवराजाचा अधिकार मिळाला. उदयनाचे वय त्यावेळी सुमारे सोळा वर्षांचे असावें.
२६ वत्सराज उदयन युवराज झालेल्या उदयनाला जे सहाय्यक देण्यांत आले ते शतानीकाच्या मंत्र्यांचे पुत्र होते. त्यांची नांवें यौगंधरायण, रुमण्वान् आणि वसंतक अशी होती. वयाने ते उदयनाहून थोडे मोठे असावेत. यौगंधरायण हा युगंधर अमात्याचा पुत्र होता. त्याला यौगंधरायण हे नांव त्याच्या बापाच्या नांवावरून पडले; आणि याच नांवानें तो प्रसिद्धीस आल्यामुळे त्याचे स्वतःचे नांव लुप्त झालें. यौगंधरायण या नांवाचा अर्थ युगंधरपुत्र असा होतो. यौगंधरायण हा लहानपणापासून आपल्या बापाच्या तालमेंत तयार झालेला होता. संकटामध्ये तो खिन्न होऊन बसणारा नव्हता. कसाहि अडचणीचा प्रसंग आला तरी तो स्वस्थ रहाणारा नव्हता. कपटाच्या पाशांत सांपडला तरी तो निरुत्साह होणारा नव्हता आणि शत्रूने कितीहि प्रत्याघात केले तरी प्राण जाईपर्यंत प्रयत्न म्हणून सोडावयाचा नाही असा त्याचा बाणा होता. सार्वभौमपद पौरवांचे आहे, आणि पौरवांना ते मिळाले पाहिजे असे त्याला वाटत होतें. रुमण्वान् हा सुप्रतीक सेनापतीचा पुत्र होता. पौरव सार्वभौम व्हावेत अशी यौगंधरायणाप्रमाणेच रुमण्वानाचीहि इच्छा होती. यौगंधरायण आणि रुमण्वान् हे दोघेहि एकमेकांना चाहणारे आणि एकमताने चालणारे असून कोणतेंहि काम एकदां करावयाचे ठरल्यावर ते पार पाडतांना पडतील ते प्रायास आणि लागतील ती साहसें करावयाला बिलकुल डगमगणारे नव्हते. वसंतक हा शतानीकाच्या नर्मसचिवाचा पुत्र होता. याचे मुख्य काम म्हटले म्हणजे विनोदपर भाषणे करून आणि कथा सांगून वत्सराज उदयन २७ उदयनाची करमणूक करणे हे होतें. उदयनविषयक नाटकांत वसंतक हा विदूषक म्हणून दाखविलेला असतो. उदयनाला यौवराज्याभिषेक झाल्यानंतर वास्तविक पहातां त्याचा विवाह व्हावयाचा; परंतु पौरवराज्याचे हिताहित उदयनाच्या विवाहाशी निगडित झालेले असल्यामुळे तो विवाह त्वरित उरकून घेता येण्यासारखा नव्हता. पौरवराज्याचे जेणेकरून हित होईल अशा रतिीने तो विवाह जुळण्याचा योग येण्यापूर्वीच राजा शतानीक मृत्यु पावला. अकाली मृत्यु पावलेल्या पित्याच्या पश्चात् अविवाहित उदयन सिंहासनारूढ होऊन 'वत्सराज उदयन' झाला. वत्सराज उदयनाच्या राज्यारोहणाचा काळ आणि इराणच्या हखामणी घराण्यांतील विश्तास्पपुत्र दारयवहु अथवा डरायस याच्या राज्यारोहणाचा काळ यांमध्ये फारसें अंतर नव्हतें. , ३-उदयन आणि त्याचे शेजारी ज्याचा पवित्र वेदग्रंथांत उल्लेख केलेला आहे, ज्यांत ' राजर्षि' पद धारण करणारे अनेक विख्यात राजे होऊन गेले, अशा आपल्या पौरवघराण्याचा वत्सराज उदयनाला मोठा अभिमान वाटत होता. उदयन राज्यारूढ झाला त्यावेळी कोसलदेशांत रणंजयपुत्र संजय राजा राज्य करीत होता. त्याला प्रसेनजित् नांवाचा पुत्र होता. तो वयाने उदयनाहून थोडा मोठा होता. मगधदेशांत शैशुनाग घराण्यांतला क्षत्रौजा ऊर्फ महापद्म राज्य करीत होता. त्याचा ज्येष्ठपुत्र बिंबिसार नांवाचा होता. उदयन आणि बिंबिसार हे दोघे एकाच दिवशी जन्मले. क्षत्रौजाला बिंबिसाराखेरीज आणखीं जी अपत्ये होती त्यांत पद्मावती २८ वत्सराज उदयन नांवाची एक कन्या होती. अवंतिदेशांत प्रद्योत घराण्यांतला चण्डमहासेन राज्य करीत होता. त्याला गोपालक आणि पालक असे दोन पुत्र आणि वासवदत्ता या नावाची एक कन्या मिळून तीन अपत्ये होती. गोपालक हा उदयनापेक्षां दोन तीन वर्षांनी लहान होता. काशीराष्ट्रांत ब्रह्मदत्तघराण्यांतला राजा राज्य करीत होता. तो मोठा कपटी असल्यामुळे उदयनाचा त्याच्यावर विशेष राग असे. शैशुनाग हे मूळचे काशीराष्ट्रांतले होते. त्यांचा मूळपुरुष शिशुनाग हा काशीराज्यांतला सरदार किंवा सेनापति असावा. खिस्तपूर्व ६०० च्या सुमारास त्याने बार्हद्रथांपासून मगधदेश जिंकून घेतला. हे मगधदेश जिंकण्याचे काम में त्याने केलें तें काशीराजाचा अधिकारी या नात्याने केले. नवीन जिंकलेल्या मुलखाच्या बंदोबस्तासाठी तो काशीराजाच्या अनुमतीने मगधदेशांतच गिरिव्रज येथे राहिला आणि आपला पुत्र काकवर्ण याला त्याने काशीत आपल्या अधिकाराच्या जागी ठेवलें. काकवर्ण याने आपल्या बापाच्या पश्चात् मगधाच्या बंदोबस्ताचें काम आपणाकडे घेण्यांत यश मिळविले. हा काकवर्ण काशीराजाचा सुभेदार या नात्याने न वागतां स्वतंत्र राजासारखा वागू लागला आणि त्यामुळे काशीचे राजे आणि शैशुनाग यांच्यांत युद्ध सुरू झाली. कोसलचे इक्ष्वाकु आणि कौशांबीचे पौरव हे काशीराजांचे जुने शत्रु होते. त्यांनीहि काशीराजांवर शस्त्र धरून काशीराज्य खच्ची करण्याला हीच संधि साधली. त्यामुळे काशीराजे व काशीराज्य यांना उतरती कळा लागली आणि शैशुनाग हे मगधाचे स्वतंत्र राजे बनून दिवसेंदिवस बळावत चालले. काकवर्ण याचा कोणी अज्ञात मनुष्याने खून केला. त्याच्या मागून वत्सराज उदयन २९ त्याचा पुत्र क्षेमधर्मा ऊर्फ प्रसेनजित् हा मगधाचा राजा झाला. हा क्षेमधर्मा अवंतीच्या पुलिक प्रद्योताचा जावई होता. असुरांविरुद्ध झालेल्या उठावणीत हा क्षेमधर्मा, कोसलचा रणंजय आणि अवंति येथील पुलिक प्रद्योताच्या वतीने त्याचा पुत्र युवराज जयसेन हे सामील झालेले होते. असुरांबरोबर झालेल्या युद्धांत वसुदान पौरव मारला गेला. परंतु ही मंडळी विजयश्री संपादून परत आली. परत आल्यानंतर आपण सार्वभौम व्हावे असे प्रत्येकाला वाढू लागले आणि त्या धोरणाने प्रत्येकाच्या उद्योगाला सुरवात झाली. क्षत्रौजा ऊर्फ महापद्म हा क्षेमधाचा पुत्र होय. त्याने बापाच्या वेळेपेक्षाहि मगधराज्याचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य वाढविलें. अवंतीच्या पुलिक प्रद्योताप्रमाणेच क्षत्रौजानें प्रद्योत हे बिरुद धारण केलेले होते. तो पुलिक प्रद्योताचा नातू , म्हणजे मुलीचा मुलगा होता. मातामहाचे बिरुद त्याने धारण केल्यामुळे आणि तो मगधाचा राजा असल्यामुळे पुढील काळांतील कित्येक मंडळीचा गैरसमज झाला. तो असा की, बार्हद्रथांनंतर प्रद्योतघराणे मगधावर राज्य करीत होतें व शैशुनागांनी त्या घराण्यापासून मगधराज्य काबीज केलें! क्षत्रौजाचा पुत्र बिंबिसार याची सिंहवर्मा, श्रेणिक आणि दर्शक अशी दुसरी नांवे होती. चंडमहासेन हा अवंति येथील प्रद्योतघराण्यांतला तिसरा पुरुष व दुसरा राजा होय. त्याच्या आजाचें नांव पुलिक किंवा पुरिक असें होतें. पुलिक हा प्रथम अवंतीमधील वीतिहोत्र घराण्यांतील राजाचा सेनापती होता. तथापि त्याचे विचार हे, लष्करी डावपेंच लष्करी हालचाली आणि युद्ध एवढ्यांपुरतेच मर्यादित झालेले नव्हते. , ३० वत्सराज उदयन त्याला मुत्सद्याचे डोकें होतें. तो धूर्त होता, महत्त्वाकांक्षी होता आणि साहसी होता. अवंतिराजाचे सर्व सैन्य त्याच्या ताब्यांत असल्यामुळे त्याला आपली महत्त्वाकांक्षा सिद्धीस नेतां आली. संधी साधून अवंतीच्या राजाचा त्याने वध केला आणि अवंतीचा राजमुकुट स्वतःच्या मस्तकावर ठेवला. पूर्वीच्या राजघराण्याचे ‘वीतिहोत्र' हे ज्या धर्तीचे बिरुद होते, त्याच धर्तीचे त्याने 'प्रद्योत' हे बिरुद धारण केले. त्यानंतर त्याने पश्चिमेकडे आपले राज्य वाढविण्यास सुरवात केली. पश्चिमेकडे त्याने साबरमती नदीपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. नर्मदा ऊर्फ रेवा ही त्याच्या राज्याची दक्षिणसीमा असून महीसागर (खंबायतचे आखात) व साबरमती ही पश्चिमसीमा होती. त्याने जिंकलेल्या मुलखांत मही ही मुख्य नदी होती; आणि भरुकच्छ (भडोच) हे बंदर होतें. पश्चिमेकडील अनेक सत्ताधारी त्याचे मांडलिक बनले होते. त्यामुळे पुलिक प्रद्योत हा आपणाला महेंद्र आणि राजाधिराज असें म्हणवू लागला. पुलिक प्रद्योत म्हातारा होऊन मरण पावला. त्याच्या म्हातारपणांत त्याचा पुत्र जयसेन हाच सर्व राज्यकारभार पहात होता. परंतु जयसेन हा आपल्या पित्याच्या हयातीतच कालवश झाल्यामुळे जयसेनपुत्र महासेन हा पुलिक प्रद्योताच्या मागून अवंतीचा राजा झाला. महासेन हा चंडिकादेवीचा भक्त होता. म्हणून लोक त्याला चंडमहासेन असें म्हणूं लागले. चंडिकादेवीला प्राचीनकाळी मदिरादेवी असेंहि म्हणत असत. चंडिकाभक्त चंडमहासेनाने पन्नास वर्षे राज्य केले. असुरांविरुद्ध झालेल्या उठावणींतून जे असुर वांचले, त्यांच्यावर पुढे लपून छपून दिवस काढण्याची पाळी येणे हे स्वाभाविक होते.
वत्सराज उदयन ३१ ते गुहा, अडचणीच्या जागा अशा ठिकाणांतून राहू लागले आणि निर्वाहासाठी त्यांनी दरोडेखोरांची निशाचरी वृत्ति स्वीकारली. तरुण चंडमहासेनाने अशा असुरांपैकीं अंगारक नामक एका असुराचें निवासस्थान हुडकून काढले आणि लोकांना उपद्रव देणाऱ्या अंगारकाला ठार मारले. अंगारकाला शिवा ऊर्फ अंगारवती नांवाची एक सुंदर कन्या होती. तिला उज्जयिनीस नेऊन चंडमहासेनाने तिच्याशी विवाह केला. अवंतीची महाराणी झालेली ही असुरकन्या शिवादेवीच गोपालक, पालक आणि वासवदत्ता यांची माता होय. चंडमहासेनाच्या मुख्य अमात्याचे नांव भरतरोहक असें होतें. पिशुन नांवाचा एक राजनीतीनिपुण आचार्य चण्डमहासेनाच्या पदरी होता. तो राजपुत्रांना नीतिशास्त्र शिकवीत असे. राजपुत्र गोपालकाचे मन अर्थशास्त्रांत रमत असे. राजपुत्र पालकाला संगीताचा तिटकारा असून मल्लविद्येचा छंद होता. राजकन्या वासवदत्ता ही आपल्या आईप्रमाणे सुंदर असून तिला ललित विषयांची आवड होती. वत्सराज उदयनाच्या कारकीर्दीच्या आरंभी त्याचे जे शेजारी राजे होते त्यांत अवंतीचा चंडमहासेन हाच फार प्रबळ असा राजा होता. तो भारतचक्रवर्ति नसला तरी भारतवर्षाच्या पश्चिम भागांत तो चक्रवर्तीच होता. त्याचे सैन्य अफाट होते. त्यांत पश्चिमेकडील अनेक देशांतील लढवय्यांचा भरणा होता. त्याच्या आधिराज्याने पश्चिमेकडे पश्चिमसमुद्र गांठलाच होता. आपल्या आधिराज्याची पूर्वसीमा पूर्व- समुद्राला नेऊन भिडविण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी कौशांबीच्या पौरवांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न त्याने चालविले होते. पण अजुनपर्यंत तरी त्याचे ते प्रयत्न सफळ झालेले नव्हते.
३२ वत्सराज उदयन ४-चंडमहासेनाचे कारस्थान उदयनाचे राज्यारोहण झाले त्यावेळी अवंतीच्या चंडमहासेना, वय सुमारे पंचेचाळीस ते अठेचाळीस वर्षांचे असावें. त्याची कारकीर्द सुरू झाल्याला सुमारे चोवीस वर्षे लोटलेली होती. उदयनाने आपल्या राज्यारोहणप्रसंगी यौगंधरायणाला पौरव- राज्याच्या मुख्य प्रधानाची वस्त्रे दिली आणि रुमण्वानाला पौरवसैन्याचा सरसेनापति केलें. शतानीकाच्या वेळचा मुख्य प्रधान युगंधर आणि सरसेनापति सुप्रतीक हे उदयनाच्या राज्यारोहणप्रसंगी सेवानिवृत्त झाले. पौरवराज्याचा कारभार सर्व तरुण मंडळीच्या हाती आलेला आहे असे पाहून चंडमहासेनाने पौरवराज्यावर आपले वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्योगाला पुन्हां नेटाने आरंभ केला. या उद्योगांत असतांना पौरवराज्यावर त्याने एक स्वारीदेखील केली. परंतु ती यशस्वी झाली नाही. या स्वारीला तोंड देतांना यौगंधरायणाला जे अनुभव आले त्यांवरून चंडमहासेनाच्या सैन्याविषयी त्याचे असें मत झाले की तें सैन्य ऐदी आहे; त्याच्यांत कर्तव्यनिष्ठा नाहीं; आणि जे काही खरेखुरे लढवय्ये लोक त्यांत आहेत त्यांच्या ठिकाणी स्वामिभक्तीचा अभाव आहे. चंडमहासेनाच्या विचारांनाहि या स्वारीमुळे थोडी वेगळी दिशा लागली. युद्धामध्ये तो आणि उदयन हे समोरासमोर आलेले असतांना उदयनाचे तरुण वय आणि पराक्रम अवलोकन करून उदयनाविषयी त्याचे अनुकूल मत झाले. आपण एका उपवर मुलीचा पिता असल्याची त्याला जाणीव झाली आणि आपणापुढे शत्रु म्हणून उभा असलेला हा तरुण राजबिंडा जर वत्सराज उदयन ३३ जांवई म्हणून आपलासा करतां आला तर किती चांगले होईल असें त्याच्या मनांत आलें. ज्याला मुलगी द्यावयाची, त्याच्याकडून मुलीला प्रथम मागणी येणे निदान त्या काळांत तरी अवश्य होते. पण प्रद्योत आणि पौरव यांच्यांत युद्ध चालू असतांना पौरवांकडून प्रद्योतांच्या मुलीला मागणी कशी येणार ? युद्ध चंडमहासेनाने सुरू केलेले होते. परंतु तो राजाधिराज असल्यामुळे त्याने तहाची भाषा काढणे हे त्याच्या इभ्रतीला कमीपणा आणणारे होते; आणि पौरव हे जोपर्यत युद्धांत पराभूत झालेले नव्हते तोपर्यंत त्यांच्याकडूनहि तहाची याचना होणे शक्य नव्हते. या परिस्थितीतून वाट कशी काढावी याचा चंडमहासेन विचार करूं लागला. चंडमहासेन मोठे सैन्य घेऊन पुन्हा पौरवराज्यावर स्वारी करील असें यौगंधरायण आणि रुमण्वान् यांना वाटत होते. परंतु बरेच दिवस लोटले तरी चंडमहासेनाची स्वारी पौरवराज्यावर झाली नाही. चंडमहासेन हा मोठा कारस्थानी पुरुष आहे, तो स्वस्थ बसणारा नव्हे, यौगंधरायण जाणून होता. त्याच्या हालचालींचा सुगावा काढण्यासाठी त्याने हेरांची योजना केली. पण हेरांच्या द्वारेदेखील त्याला धड HD सुगावा लागेना. अशा स्थितीत चंडमहासेनाकडून एके दिवशी पौरवांच्या दरबारी एक दूत आला. त्याने अवंतीच्या राजाधिराजांचा म्हणून वत्सराजाला असा निरोप सांगितला की “ वत्सराज हे गांधर्वविद्यानिपुण असल्याचे आम्ही ऐकतों. अवंतिराजकन्या वासवदत्ता हिला ती विद्या शिकण्याची इच्छा आहे. तरी त्या विद्युत निपुण असलेल्या वत्सराजांनी राजकन्येला ३ ३४ वत्सराज उदयन " ती विद्या शिकविण्याचे पतकरल्यास आम्हांला संतोष होईल. हा निरोप ऐकतांच उदयन रागाने लाल झाला. उज्जयिनीचा राजा मला आपल्या मांडलिकांपैकीच एक समजतो असें त्याला वाटले. दूताला त्याने सांगितले की “ अवंतिराजकन्येला गांधर्वविद्या शिकण्याची इच्छा असल्यास पाहिजे तर तिनेच इकडे यावें असें तुमच्या राजाला माझें उत्तर कळवा. आपण केवळ बचावाचेच धोरण स्वीकारून राहिल्यामुळे प्रद्योत चढेलपणाने वागू लागले असें उदयनाच्या मनाने घेतलें. बचावाचे धोरण सोडून आपणदेखील चढाईचेच धोरण स्वीकारावयाचे असे त्याने ठरविलें. चढाईच्याच पोटी आपला बचाव असतो हे खरे, पण चढाई करावयाला जवळ सैन्यबळ भरपूर असावे लागते. सैन्यासाठी लागणारे घोडे त्यावेळी व्यापारी लोक सिंधुनदाच्या कांठचे देश व सिंधुनदाच्या पलीकडील देश यांतून आर्यावर्तात आणीत असत. संस्कृत भाषेमध्ये घोडा या अर्थाचे जे शब्द आहेत त्यांतले बरेचसे शब्द देशवाचक आहेत. उदाहरणार्थ, अर्वन् म्हणजे आरबी घोडा, तुरग म्हणजे तुराणी घोडा, वाजिन् म्हणजे बाजिस्तानकडील घोडा, हय म्हणजे सीस्तानकडील घोडा, आणि बनायुज म्हणजे बन्नूकडील घोडा. हल्लींच्या अफगाणिस्तानात त्यावेळी उत्तर, पूर्व आणि पश्चिम या दिशांकडील व्यापारीमार्ग परस्परांना मिळत होते. तेथेच भिन्न भिन्न देशांतले व्यापारी आपल्या देशांतील माल दुसऱ्या देशांतील व्यापाऱ्यांना देऊन त्यांच्यापासून त्यांच्या देशांतला आपणाला हवा असलेला माल घेत. भारतवर्षातील व्यापारी तिकडे सुती वस्त्रे, मसाले, मोती, वत्सराज उदयन ३५ हिरे, साखर, हत्ती वगैरे नेत व तिकडून सुका मेवा, नाना प्रकारचे धातु, सुगंधी द्रव्ये, माणकें, प्रवाळ, रेशमी कापड, लोकरीची वस्त्रे आणि घोडे वगैरे इकडे आणीत. घोड्यांना त्यावेळी इकडे चांगली मागणी होती. परंतु उदयनाला अश्वदळ वाढविण्याच्या बाबतीत चंडमहासेनाशी स्पर्धा करता येण्यासारखी नव्हती. चंडमहासेनाचें आधिराज्य पश्चिमेकडे असल्यामुळे घोड्यांच्या देशांतून इकडे येणारे घोडे चंडमहासेनालाच आधी निवड करून घेता येण्यासारखे होते. त्याला नको असलेले असे, म्हणजे अर्थातच कमी प्रतीचे घोडे उदयनाला मिळण्यासारखे होते. म्हणून अश्वदळावर भर न देतां आपल्या आजाप्रमाणेच गजदळावर भर देण्याचे उदयनाने ठरविले आणि गजदळाच्या जोरावर चंडमहासेनाला जिंकण्याचा त्याने निश्चय केला. चंडमहासेनापाशी नलागिरि नांवाचा एक मोठा बळकट हत्ती होता. पण तो अशिक्षित होता. आपल्या गजदळांतील हत्तींना योग्य शिक्षण देण्याचे उदयनाने ठरविलें होतें. नागवनांतून हत्ती धरून आणण्याचे काम उदयनाने दुसऱ्यांवर न सोंपवितां स्वतःच्याच हाती घेतलें. " महाराजांनी स्वतः हत्ती पकडण्यासाठी जाणे धोक्याचे आहे, हत्ती पकडण्याच्या कामी कुशल असे लोक आपल्यापाशी कांहीं थोडे नाहीत, त्यांच्यावर हे काम सोंपवावें." असें यौगंधरायण अमात्याने त्याला आपणाकडून पुष्कळ सांगितले. पण उदयनानें तें ऐकले नाही. आपल्या वीणावादनकौशल्यावर त्याचा विश्वास होता; आणि वीणावादनाच्या योगाने आपण पाहिजे तितके रानहत्ती सहज वश करूं अशी त्याला उमेद होती. बरोबर मोठे सैन्य घेतल्यास आपल्या आगमनाचा हत्तींना सुगावा ३६ वत्सराज उदयन .... लागल व ते रान सोडून दूर निघून जातील म्हणून उदयनाने आपणाबरोबर बेताचेच सैनिक घेतले. हत्तींची निवासस्थाने हेरण्यासाठी आणि वश केलेल्या हत्तींना ताब्यात घेण्यासाठी मात्र त्याने पुरेसे लोक आपणाबरोबर घेतले होते. आपली घोषवती वीणा त्याने आपणाबरोबर घेतली, सुंदरपाटल नांवाचा आपला आवडता घोडा बरोबर घेतला आणि नीलबलाहक नांवाच्या हत्तीवर आरूढ होऊन तो नागवनांकडे निघाला. राज्याचा सर्व कारभार त्याने यौगंधरायणावर सोपविला होता. त्याच्या वीणावादनाने रानहत्ती खरोखरच मोहित होऊ लागले ! आणि त्याच्याबरोबरचे लोक त्या मोहित झालेल्या हत्तींना ताब्यात घेऊ लागले. हाती घेतलेल्या उद्योगांत यश येऊं लागलेले दिसतांच अधिकाधिक हत्तींना वश करण्याचा हव्यास सुटून वत्सराज उदयन दूर दूर जाऊ लागला. उदयनाच्या हालचालींवर चंडमहासेनाने हेर ठेवलेले होते. त्यांनी चंडमहासेनाला कळविलें की वीणाविहारी वत्सराज अलीकडे गजवशीकरणाच्या उद्योगांत असून आपल्या राजधानीपासून दूर दूर जात आहे. त्याच्या सांप्रतच्या रोखावरून थोड्याच दिवसांत तो दक्षिणेकडील विध्यारण्यांत प्रवेश करील असे दिसते. " वत्सदेशचा हा रूपधारी, तरुण, आणि राजकुलीन वीणाचार्य आपण होऊनच आमच्याकडे चालत येतो आहे ! " चंडमहासेन मनांत म्हणाला; “ विध्यारण्यांत हा आलेला असतांना याला जर आम्हीं पकडू शकलो तर काय मौज होईल ! स्वतःला अगदी निर्धास्त समजून रानावनांतून वीणावादन करीत फिरणाऱ्या या धाडशी पोराला पण खाशी अद्दल घडेल ! याचा आजा असाच धाडशी होता !"
वत्सराज उदयन ३७ चंडमहासेनाच्या पदरी असलेला पिशुन आचार्य असे म्हणत असे की अमात्यांनी राजाची कामें राजाच्या कल्पनेहूनहि अधिक सरसपणे करून दाखविली पाहिजेत. चंडमहासेनाचा अमात्य भरतरोहक हा अशा प्रकारचा अमात्य होता. त्या वेळी सिंधुनदाच्या पश्चिमेस असलेल्या हखामणीसाम्राज्यांत देशोदेशींचे शस्त्रजीवी लोक सैनिक म्हणून भरले होते. हखामणी सम्राटांच्या पदरी पूर्वेकडील भारतीय सैनिक होते तसे पश्चिमेकडील ग्रीक अथवा यवन सैनिकहि होते. सिंधुनदाच्या पश्चिमेकडील मुलखांत यवन लोक वस्तीदेखील करूं लागलेले होते. या यवनांतले कांहीं लोक भारतवर्षांत येऊन चण्डमहासेनाच्या पदरीं राहिलेले असावेत, आणि भरतरोहकाने त्यांच्याकडून ट्रोजनयुद्धाची कथा ऐकलेली असावी असे वाटते. कारण विंध्यारण्यांत वत्सराज आलाच तर त्याला पकडण्यासाठी काय युक्ति योजावी असें चंडमहासेनाने भरतरोहकाला एकांतांत विचारले असता भरतरोहकाने त्याला जी युक्ति सुचविली ती ट्रोजनयुद्धांत योजिल्या गेलेल्या एका युक्तीशी सदृश अशी होती. ट्रोजनयुद्ध हे आशिया मायनरच्या वायव्य कोपऱ्यांत एका काळी राहत असलेले ट्रोजन लोक आणि ग्रीसमधील ग्रीक लोक यांजमध्ये झालेलें युद्ध होते. त्या युद्धांत ग्रीकांनी ट्रोजन लोकांना जिंकण्यासाठी लांकडांचा एक प्रचंड घोडा तयार केला व त्याच्या पोटांत सशस्त्र सैनिक लपवून ठेवले अशी कथा आहे. भरतरोहकानें चंडमहासेनाला सुचविलेली युक्ति या युक्तीसारखीच होती. ती अशी की लांकडांचा खरोखरीच्या हत्तीएवढा एक हत्ती तयार करावा, दुरून तो खरोखरीच्या हत्तीसारखाच दिसेल असा त्याला रंग द्यावा, त्याच्या पोटांत सशस्त्र ३८ वत्सराज उदयन सैनिकांना बसतां येईल अशी सोय करावी आणि तो हत्ती विध्यारण्यांतील नागवनामध्ये सोयीस्कर अशा एखाद्या दाट झाडींत नेऊन ठेवावा. वत्सराज त्या हत्तीला वीणावादनाच्या योगाने वश करण्यासाठी हटकून येईल अशी तजवीज करावी आणि हत्तीजवळ येऊन तो वीणावादन करीत असतांना हत्तीच्या पोटांतील सशस्त्र सैनिकांनी चटकन् बाहेर पडून त्यालाधरावें. चंडमहासेनाला ही युक्ति पसंत पडली. युक्ति यशस्वी होण्यासाठी तीत कोण कोणत्या सुधारणा कराव्या लागल याचा त्या दोघांनी नंतर विचार केला. भारतवर्षामध्ये घोडा हा बाहेरून आलेला प्राणी आहे. पण भारतवर्षांतला हत्ती हा भारतमातेचाच पुत्र आहे. भारतवर्षांतील पुष्कळ ठिकाणच्या जंगलांतून हत्तींची पूर्वी वस्ती असे. जंगलांतील हत्तींना पकडून त्यांच्याकडून शक्तीची कामें करून घेण्याला भारतीय लोकांनी प्राचीनकाळीच सुरवात केलेली होती. हत्तींचा युद्धामध्ये विशेष उपयोग होत असे; व त्यामुळे भारतीय राजे आपल्या पदरी पुष्कळ हत्ती बाळगीत; आणि त्यांना युद्धाचे शिक्षण देऊन तरबेज करीत. आग लावणे, आग विझवणे, तट, बुरुज व वेशी यांचा भंग करणे, शत्रुसैन्याची फळी फोडणे, सोंडेत पट्टा घेऊन शत्रूची कत्तल उडविणे वगैरे अनेक कामें हत्तींकडून करविली जात. उपयुक्ततेच्या दृष्टीने हत्तींच्या प्रतीहि लावण्यात आलेल्या होत्या. कलिंग ( गंजम, विजगापट्टण आणि गोदावरी हे जिल्हे ), अंग व त्याच्या पूर्वेकडील देश ( पूर्व बंगाल आणि आसाम ), चेदि आणि करुष (बुंदेलखंड व वाघेलखंड ) येथील हत्ती उत्तम प्रतीचे गणले जात. दशार्ण आणि अपरांत ( पूर्व माळवा व उत्तर कोंकण ) या ठिकाणचे हत्ती मध्यम वत्सराज उदयन ३९ प्रतांचे मानण्यात येत. सुराष्ट्र ( काठेवाड ) आणि पंजाब येथील हत्ती कनिष्ठ प्रतीचे होत असे समजले जाई. हत्तींचे निरनिराळे प्रकार, त्यांचा रंग व इतर लक्षणे यांची चर्चा करणारे आणि हत्तींना योग्य शिक्षण देऊन त्यांची उपयुक्तता कशी वाढवावी हे सांगणारे ग्रंथ निर्माण झालेले होते. चंडमहासेन आणि त्याचा अमात्य भरतरोहक यांनी आपली युक्ति यशस्वी व्हावी म्हणून या ग्रंथांतील माहितीचा उपयोग करून घेण्याचा बेत केला. हस्तिशिक्षा नांवाच्या ग्रंथांत चक्रवर्ति हत्ती नामक एका दुर्मीळ हत्तीची लक्षणे सांगितलेली होती. आपला कृत्रिम हत्ती त्या लक्षणांनी युक्त असाच बनवावयाचा असें चंडमहासेन व भरतरोहक यांनी ठरविलें. चंडमहासेनाच्या सेनापतःचें नांव शालंकायन असें होतें. वत्सराज उदयनाला पकडून आणण्याचे काम शालंकायनावर सोपविण्यात आले. त्याला कृत्रिम हत्तीची युक्ति समजावून देण्यांत आली व वत्सराजाला पकडून आणण्याचे काम बिनबोभाट पार पडलें पाहिजे असें पुन्हा पुन्हा बजावून सांगण्यांत आले. ५-उदयनाला पकडलें ! उदयन दशार्णदेशाला लागून असलेल्या विध्यारण्यांत शिरला आणि त्या अरण्याच्या दक्षिणसीमेजवळ जाऊन पोचला. तेथे एके दिवशी तो आपल्या लोकांसह हत्ती टेहळीत चाललेला असतांना त्याला काही अंतरावर हत्तींचा एक कळप दिसला. हा कळप सगळाच्या सगळा धरतां येईल की नाही या विषयी उदयन आपल्या लोकांजवळ बोलत उभा असतां तेथें जंगली भिल्लासारखा दिसणारा
वत्सराज उदयन
" त्याचे शरीर एक
"
"
एक मनुष्य आला. त्याने उदयनाला सांगितले की, " येथून सुमारे
एक कोस अंतरावर एक सालवन असून त्यांत आज एक नवाच हत्ती
आलेला मला दिसला. एवढा मोठा आणि इतका देखणा हत्ती
आजवर मी कधीच पाहिलेला नव्हता. नखें आणखी दांत खेरीजकरून
त्याचे शरीर एक जात निळ्या रंगाचे आहे ! या समोरच्या कळपांतील
हत्तींच्यासारखे काळें नाहीं !
काय म्हणतोस?"
उदयनाने विचारले,
जात निळ्या रंगाचे आहे ?
"होय देवा! निळ्या रंगाचें आहे ! त्या मनुष्याने उत्तर दिले.
" हस्तिशिक्षा नांवाच्या ग्रंथांत चक्रवर्ति हत्ती म्हणून जो सांगितला
आहे तो हाच! उदयन मनांत म्हणाला,
हा दुर्मीळ हत्ती कसहि
करून आपण हस्तगत केलाच पाहिजे. हा आपण हस्तगत करून
घेतला म्हणजे आपले युधिष्ठिरादि पूर्वज ज्या चक्रवर्तिपदाचा उपभोग
घेत होते तें चक्रवर्तिपद याच्या मागोमाग आपल्याकडे चालत येईल!
" तुम्ही येथेच रहा आणि या कळपावर नजर ठेवा ! " उदयनाने
आपल्या लोकांना सांगितलें, " मी सालवनांतील त्या निळ्या हत्तीला
वश करून आणतों. सुंदरपाटलाला सांभाळण्यासाठी एकटा हंसक
तेवढा माझ्याबरोबर येऊ दे."
महाराजांनी सालवनांत एकटेच जाऊ नये. आम्ही सगळेच
महाराजांबरोबर सालवनाकडे येतो." सैनिकांचा नायक हात जोडून
उदयनाला विनंति करता झाला.
तुम्ही सगळे माझ्याबरोबर आलांत तर तो हत्ती पळून जाण्याचाच
संभव अधिक.” उदयन म्हणाला; "तो चक्रवर्ति हत्ती आहे. त्याला पळून
.
वत्सराज उदयन ac " पुलिंदा! जाऊं देता कामा नये. त्याला वश करणेच अवश्य आहे. वीणारवाला लुब्ध होऊन माझ्या मागोमाग तो येथपर्यंत चालत येईल असें मी करीन! तुम्हीं माझ्याबरोबर न येतां येथेच रहावे अशी माझी तुम्हांला आज्ञा आहे." उदयन सुंदरपाटल घोड्यावर स्वार झाला. घोषवती वीणा त्याने आपणाबरोबर घेतली. त्याच्यापाशी त्यावेळी हत्यार म्हटलें म्हणजे एक तलवार होती. ती त्याच्या कमरपट्ट्याला लटकत होती. निळ्या हत्तीची बातमी सांगणाऱ्या मनुष्याला उदयन म्हणाला, चल, दाखीव आम्हांला कोठे आहे तो सालवनांतील निळा हत्ती." " असें इकडून, इकडून यावे देवांनी." तो मनुष्य म्हणाला, आणि चालू लागला. त्याच्या मागून उदयन चालला आणि उदयनाच्या मागून हंसक चालू लागला. ते तिघे सालवनापाशी जाऊन पोचले त्यावेळी सायंकाळची वेळ झालेली होती. वाटाड्याने चोर पावलांनी पुढे जाऊन एकदां येथे, एकदां तेथें, असें निरखून पाहिले. तो चोर पावलांनीच मागे आला आणि उदयनाला हलकेच म्हणाला, " देव, त्या तिथे ती वेलींची दाटी झालेली दिसते आहे ना, तिथें तो हत्ती आहे ! उदयन घोड्यावरून खाली उतरला. घोषवती वीणा त्याने हातांत घेतली. घोडा सांभाळण्यासाठी हंसकाला मागे ठेवून वाटाड्याबरोबर तो एकटाच निघाला. वाटाड्याने सालवनांतील एका मोठ्या वृक्षापाशी " त्याला नेलें. देव, निळा हत्ती तो पहा त्या तिथे उभा आहे." असे म्हणून वाटाड्याने एका बाजूकडे बोट दाखविलें.
४२ वत्सराज उदयन उदयनाने पाहिले. सुमारे अडीचशे पावलांच्या अंतरावर तो हत्ती असावा असे त्याला वाटले. हत्ती सावटांत असल्यामुळे आणि वेळ संध्याकाळची असल्यामुळे त्या हत्तीचा रंग व आकृति ही स्पष्ट दिसत नव्हती. तथापि दुरून त्याचे सुळे स्पष्ट दिसत होते. उदयनाने वाटाड्याला वृक्षापाशींच रहावयाला सांगितले आणि आपण वीणा वाजवीत वाजवीत त्या हत्तीजवळ जाऊ लागला. वीणा वाजवीत एकेक पाऊल पुढे टाकीत असतांना त्याने गावयाला देखील सुरवात केली. उदयन वीणावादन आणि गायन करीत त्या हत्तीकडे जात असतां वाटाड्याने आपली जागा सोडली आणि वृक्षांच्या आश्रयाने लपत छपत तो कोणीकडेसा निघून गेला ! RA INDIAN उदयन त्या हत्तीच्या जवळ जाऊन पोचण्यापूर्वीच त्या हत्तीची कूस एखादें दार उघडावें तशी एकाएकी उघडली आणि आंतून नागव्या तलवारी हातांत घेतलेले लोक पटापट उड्या मारून बाहेर आले !
वत्सराज उदयन
४३
४
"
-
ते सर्व उदयनावर धांवले. त्यांना येतांना पाहून उदयन मनांत समजला
की हे सगळे शत्रूचे कपट आहे. त्याने हातांतली वीणा खाली ठेवली
आणि कमरेला लटकत असलेली तलवार मेणांतून सर्कन् बाहेर काढली.
वत्सराज ! उदयनावर धावून आलेल्या लोकांपैकी एक जण
म्हणाला,
आपण शूर आहांत, परंतु आपल्या शौर्याचा येथे काही
उपयोग नाहीं ! शौर्य गाजविण्याच्या व्यर्थ भरीस न पडतां निमूटपणे
शरण येण्यांतच शहाणपणा आहे !
" पौरव कधी कोणाला शरण जात नसतात!" उदयन म्हणाला,
" पौरवांना अनेकवार पाठ दाखवून पळालेल्या प्रद्योता. हे सर्व कपट
आहे हे मी जाणतों, आणि हे सरळ कसे करावे हे पण मला
ठाऊक आहे !
असें म्हणून शत्रूवर तो तुटून पडला. परंतु शत्रूची संख्या अधिक
असल्यामुळे त्याचे काही चाललें नाहीं. शत्रूतील काही जण समोर
त्याच्याशी लढत राहिले आणि काहींनी त्याच्या पाठीमागे जाऊन
पाठीमागून त्याला धरलें ! त्याच्या हातांतील तलवार काढून घेण्यांत
आली आणि वेलींनी त्याचे हातपाय बांधण्यात आले ! अशा रीतीने
उदयनाला पकडणारे हे लोक म्हणजे अर्थातच चंडमहासेनाचा
सेनापति शालंकायन याचे सैनिक होते.
शालंकायन सालवनाच्या जवळच येऊन राहिलेला होता. तें
सालवन अवंतिराज्याच्या सीमेपासून दूर नव्हते. हेरांकडून मिळणाऱ्या
बातम्यांवरून वत्सराज उदयन हा त्या सालवनाच्या आसपास कोठें ना
कोठे तरी येईलच असा तर्क करून शालंकायनाने आपल्याबरोबरचें
बहुतेक सैन्य सीमेपाशीच ठेवले आणि शेलके शेलके असे सुमारे शंभर
४४ वत्सराज उदयन सैनिक, कित्येक कामकरी व तीन चार कसबी सुतार यांच्यासह सालवनाजवळच्या एका वृक्षपरिवेष्टित जागेत येऊन तळ दिला. सालवनाच्या जवळपास मनुष्यवस्ती नव्हती हे शालंकायनाच्या पथ्यावरच पडले. चंडमहासेनाच्या सूचनेप्रमाणे सुतारांकडून त्याने ग्वरोखरीच्या हत्तीएवढा एक लांकडी हत्ती तयार करविला. तो हत्ती आंत पोकळ होता. त्याच्या पोटांत बसून बाहेर काय चालले आहे हे पहाता यावे अशी व्यवस्था केलेली होती. आपल्या सैनिकांतून शालंकायनाने अत्यंत चपळ आणि खड्गयुद्धांत प्रवीण असे काही लोक निवडून काढले आणि त्यांच्याकडून हत्तीच्या पोटांत बसणे, हत्तीच्या पोटांत बसून बाहेरील मनुष्याच्या हालचाली हेरणे, पटापट उड्या मारून बाहेर पडणे व बाहेरील मनुष्यावर धावून जाऊन त्याला पकडणे या कार्यक्रमाची अनेकवार तालीम करविली. या तालमेमध्ये त्याने स्वतः कित्येक वेळां पकडल्या जाणाऱ्या उदयनाची भूमिका घेतली आणि पकडावयास येणाऱ्या सैनिकांबरोबर युद्ध केले. असे करण्यांत त्याचा हेतु इतकाच होता की उदयनाला पकडण्याच्या वेळी आपल्या लोकांकडून कोणत्याहि प्रकारची चूक होऊ नये. आपले लोक चांगले तरबेज झालेले आहेत अशी खात्री होतांच लाकडाचा तो कृत्रिम हत्ती सालवनामध्ये त्याने एका गर्द छायेच्या ठिकाणी नेऊन उभा केला. तो हत्ती दुर्मीळ असणाऱ्या चक्रवर्ति हत्तीसारखा दिसावा म्हणून त्याला निळा रंग देण्यांत आला. त्या सालवनांतहि उदयनाला पकडण्याच्या एकंदर कार्यक्रमाची चार पांच वेळां तालीम करण्यांत आली. इतके करून शालंकायन हा वत्सराज इकडे कधी येतो याची वाट पहात राहिलेला होता.
वत्सराज उदयन ४५ वत्सराज सालवनापासून तीन चार कोसांच्या अंतरावर आलेला आहे असें एके दिवशी शालंकायनाला कळले. त्याच्या सैन्यांतहि कित्येक आटविक लोक होतेच. त्यांतील एका हुशार आटविकाला चांगला पढवून आणि वनचर भिल्लाचा वेष देऊन त्याने उदयनाकडे पाठविलें. चक्रवर्ति हत्तीच्या लोभाने उदयन सालवनांत बहुतकरून येईल असा शालंकायनाचा तर्क होता, आणि उदयन आलाच तर बरोबर दोन तीन मनुष्यांहून अधिक मनुष्ये तो आणणार नाही असेंहि शालंकायनाला वाटत होते. तो येतो आहे की नाही हे आधी कळावें म्हणून शालंकायनाने एका उंच ठिकाणी तीक्ष्ण दृष्टीचा एक टेहळ्या बसवून ठेवला आणि उदयनाला पकडण्याच्या कामावर नेमलेल्या सैनिकांना सालवनांत कृत्रिम हत्तीपाशी ठेवलें. आपण उदयनाकडे पाठविलेल्या आटविकाबरोबर उदयन येतो आहे असें दुरून दिसतांच टेहळ्याने धांवत येऊन प्रथम कृत्रिम हत्तीजवळच्या सैनिकांना हत्तीच्या पोटांत शिरून बसण्याची सूचना द्यावी आणि नंतर तसेंच पुढे येऊन उदयन येत असल्याचे आपणाला कळवावे अशी त्या टेहळ्याला शालंकायनाची आज्ञा होती. शालंकायनाच्या आज्ञेप्रमाणे सायंकाळच्या सुमारास टेहळ्या शालंकायनाकडे आला व त्यानें वत्सराज येत असल्याचे आणि सैनिक कृत्रिम हत्तीच्या पोटांत शिरून बसल्याचे शालंकायनाला कळविलें. तें ऐकून शालकायन पुढील कार्यासाठी तयार होऊन राहिलेला होता. शालकायनाच्या आटविक सैनिकानें वत्सराजाला सालवनांत आणून तो कृत्रिम हत्ती त्याला दाखवून दिला आणि नंतर आपण त्या ४६ वत्सराज उदयन सालवनांतून हलकेच निसटून तो सैनिक शालंकायनाकडे गेला. शालंकायनाला त्याने सर्व हकीगत सांगितली. ती ऐकतांच शालंकायन आपल्या लोकांसह मोठ्या त्वरेने निघाला. उदयनाचा घोडा सांभाळणाऱ्या हंसकाला त्याने पकडले आणि सालवनांत प्रवेश केला. कृत्रिम हत्तीच्या पोटांतून बाहेर पडलेल्या लोकांनी तोपर्यंत उदयनाला धरून बद्ध केलेले होते. शालंकायनाने उदयनाची बंधनें ताबडतोब दूर करविली, त्याला झालेल्या जखमा बांधल्या आणि त्याला शिबिकेंतून आपल्या शिबिरांत नेले. तेथे शस्त्रवैद्यांकडून उदयनाच्या जखमांची त्याने तपासणी करविली, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले आणि रातोरात विध्यारण्यांतून आपला तळ हालविला व उज्जयिनीची वाट धरली ! वत्सराजाला पकडल्याची बातमी उज्जयिनीस जाऊन पोंच- ण्याच्या आधींच चंडमहासेनापुढें वत्सराजाला नेऊन हजर करावयाचे असें त्याने योजिलें. उदयनाला खेचरांच्या गाडीत घालून आणि स्वतः घोड्यावर स्वार होऊन गाडीबरोबर तो पुढे झाला. हंसकाला त्याने सोडून दिले. कारण त्याची आतां त्याला गरज नव्हती. पकडून आणलेल्या उदयनाला चंडमहासेनाने एका मजबूत इमारतींत बंदोबस्ताने ठेवलें, तथापि त्याच्या जखमांवर त्याने काळजी- पूर्वक उपचार चालविले होते. उदयनाच्या जखमा बऱ्या होतांच चंडमहासेनाने राजकन्या वासवदत्ता उदयनाच्या दृष्टीस पडेल आणि ती कोण हे त्याला कळेल अशी व्यवस्था केली. आपणाला कपटाने पकडल्याबद्दल वत्सराज उदयन चंडमहासेनावर मनांतून खूप संतापलेला होता. परंतु अवंतिराजकन्या दृष्टीस पडतांच त्याच्या संतापाचा जोर ओसरला. त्याच्या मनांत वेगळेच विचार येऊ लागले. " पौरव आणि वत्सराज उदयन ४७ प्रद्योत हे वैरभाव सोडून जर परस्परांचे आप्त बनले तर” असें म्हणून तो आपल्या अंतश्चक्षूपुढे मोहक अशी अनेक चित्रे उभी करूं लागला. अशा स्थितीत तो असतांना एके दिवशीं चंडमहासेनाचा वृद्ध कांचुकीय बंधनगृहांत त्याजकडे आला. त्याने उदयनाला आपल्या स्वामीचा असा निरोप कळविला की, “ गांधर्वविद्या आपलीशी करावी अशी आमची प्रियकन्या वासवदत्ता हिची फार फार इच्छा आहे. वत्सराज गांधर्वविद्यानिपुण आहेत. त्यांनी अवंतिराजपुत्रीचा शिष्या म्हणून स्वीकार करून तिला ती विद्या शिकविल्यास तिला तर धन्यता वाटेलच पण वत्सराजांमुळे आपल्या प्रिय कन्येचें प्रिय करता येणे शक्य झालें म्हणून आम्हांलाहि समाधान वाटेल. शिष्या म्हणून अवंतिराजपुत्रीचा स्वीकार करण्याचें वत्सराज नाकारणार नाहीत अशी आशा आहे." उदयनाने या प्रसंगी पूर्वीसारखें रागाने लाल न होतां राजकन्या वासवदत्ता हिला गांधर्वविद्या शिकविण्याचे कबूल केलें. राजकन्येने संगीतशाळेंत गांधर्वविद्येचे शिक्षण घ्यावे आणि त्या वेळी राजकन्येची सखी कांचनमाला हिनें राजकन्येबरोबर संगीत- शाळेत असावें असें चंडमहासेनाने ठरविले. अग्नीच्या साक्षीने राजकन्या वासवदत्ता शिष्या म्हणून वत्सराजाच्या स्वाधीन करण्यांत आली आणि संगीतशाळेत तिच्या शिक्षणाला सुरवात झाली. ६-उदयनाची सुटका उदयनाने हत्तींच्या कळपावर नजर राखण्यासाठी मागे ठेवून दिलेले लोक आपले महाराज अजुन परत कसे येत नाहीत म्हणून ४८ वत्सराज उदयन चिंता करू लागले. कळपाला त्यांनी जाऊ दिले आणि रात्रीची वेळ झालेली होती तरी त्या जंगलांत त्यांनी आपल्या राजाचा शोध चालविला. सारी रात्र ते वत्सराज आणि हंसक यांना शोधीत राहिले. परंतु त्यांना त्या दोघांचा पत्ता लागला नाही. शालंकायनाने सोडून दिलेला हंसक दुसऱ्या दिवशी त्यांना भेटला. त्याने त्या लोकांना सर्व हकीगत सांगितली. ती ऐकून ते लोक प्रद्योतांना शिव्याशाप देत मोठमोठ्याने शोक करूं लागले ! नुसते शिव्या देऊन आणि शोक करून काय होणार ? " हंसक म्हणाला, “घडलेला हा अनिष्ट प्रकार आधीं आर्य यौगंधरायणांच्या कानावर घातला पाहिजे. मला एक घोडा द्या ! त्यावर बसून मी पुढे होतों ! तुम्ही सगळे मागाहून कौशांबीस या." थोड्या वेळाने हंसक एका घोड्यावर स्वार होऊन कौशांबीस जाण्यासाठी निघाला. चंडमहासेन काही तरी कपट करून आपल्या महाराजांना पकडण्याच्या उद्योगांत आहे अशी बातमी यौगंधरायणाला हेरांच्या द्वारें समजली. पण ती फार उशीराने समजली. उदयनाला सावध राहण्याची सूचना लागलीच देण्यासाठी विध्यारण्याकडे तो जासूद पाठविणार तोच विध्यारण्याकडून उदयनसेवक हंसक आला आणि प्रद्योताच्या लोकांनी महाराजांना धरून नेल्याची हकीगत त्याने यौगंधरायणाला सांगितली ! हंसकाच्या मागून काही दिवसांनी उदयनाबरोबरची इतर मंडळी कौशाम्बीस परत आली. ती मंडळी परत येतांच वत्सेश्वराला प्रद्योताने धरून नेल्याची बातमी सर्व राजधानीत आणि आजूबाजूलाहि पसरली. लोक क्षुब्ध झाले. सेनापति रुमण्वानाच्या वत्सराज उदयन ४९ वाड्यापुढे त्यांची गर्दी होऊ लागली. “ प्रद्योताच्या राजधानीला तुम्हीं अजुन वेढा कां घालीत नाहीं ? सैन्याचा तुटवडा असेल तर आम्ही सैन्यांत येतों !" अशा ते आरोळ्या मारू लागले. " आपले महाराज प्रद्योताच्या हातीं सांपडलेले असल्यामुळे प्रद्योताला चिडविणे शहाण- पणाचे होणार नाही. तो महाराजांना अपाय करील. महाराजांची सुटका करण्याच्याच उद्योगांत आम्ही आहों. हे काम युक्तीनेच केलें पाहिजे.” इत्यादि प्रकारे मांगून रुमण्वान् त्या लोकांना कसेबसे शांत करीत होता. आपण स्वतः एवढे जागरूक असतां प्रद्योतानें आपणाला चकविलें, आपल्या हेरांनादेखील त्याच्या कारस्थानाचा वेळीच सुगावा लागला नाही, म्हणून यौगंधरायणाच्या चित्ताला प्रथम थोडासा खेद वाटला; परंतु खेदाला आपल्या चित्तांत फार वेळ थारा न देतां उदयनाची सुटका करण्याच्या उद्योगाला तो उत्साहाने लागला. राजमाता विष्णुमती हिने डोळ्यांत पाणी आणून यौगंधरायणाला सांगितले की माझ्या पुत्राचा तूं मित्र आहेस, त्याचा अमात्य आहेस, आणि मलाहि पुत्रासारखाच आहेस. तेव्हा माझ्या पुत्राला पुत्रानेच सोडवून आणावें. राजमातेच्या या शब्दांनी यौगंधरायणाचा उत्साह द्विगुणित झाला. नानाप्रकारच्या धंद्यांत प्रवीण असलेले असे हेर यौगंधरायणाने अवंतिराज्यांत पाठविले. त्यांतील कित्येकांनी त्या राज्यांतील, निरनिराळ्या खात्यांत नोकऱ्या मिळविण्यात यश संपादिलें. कोणी गजदळांत राहिले. कोणी अश्वदळांत राहिले. कोणी नगररक्षण खात्यांत नोकरी मिळविली. उज्जयिनी येथे मदिरा आणि जुगार यांचे प्रस्थ बरेंच होते. मदिरालयांत जुगार खेळण्याचीहि व्यवस्था असे. ३ ५० वत्सराज उदयन मद्यपी आणि जुगारी यांच्याकडून बातम्या काढणे सोपे असल्यामुळे काहींनी उज्जयिनीत मदिरालये उघडली. यौगंधरायणाला हेरांकडून वेळोवेळी ज्या बातम्या मिळाल्या त्यांचा सारांश असा होता की चंडमहासेन हा वत्सराजाला वाईट रीतीने वागवीत नाहीं. वत्सराजाच्या पायांत शृंखला असली तरी लोकांना त्याचे दर्शन दुर्लभ नाही. चंडमहासेनाचे नोकर चाकर वत्सराजाला युवराजाप्रमाणे मान देत असतात. वत्सराजाला चंडमहासेनाच्या लोकांनी पकडले त्यावेळी त्याची घोषवती वीणाहि त्यांनी उचलली आणि ती चंडमहासेनापाशी नेऊन दिली. चंडमहासेनाने ती वीणा आपली कन्या वासवदत्ता हिला दिली. चंडमहासेनाच्या संगीतशाळेत त्याच्याच आग्रहावरून वत्सराज हा वासवदत्तेला वीणावादन आणि गायन शिकवीत असतो. अग्निसमक्ष त्याने वासवदत्तेचा शिष्या म्हणून स्वीकार केलेला आहे. या बातम्या ऐकून यौगंधरायणाची खात्री झाली की चंडमहा- सेनाच्या मनांतून आपली कन्या वत्सराजाला द्यावयाची असें आहे. त्या दोघांचे परस्परांवर प्रेम जडावें एवढ्याचसाठी त्याने आपल्या मुलीला गांधर्वविद्या शिकविण्याचे कामीं वत्सराजाची योजना केलेली आहे. वत्सराज आणि वासवदत्ता यांचे परस्परांवर प्रेम जडलें आहे असें त्याला दिसून आले म्हणजे आपल्या लाडक्या कन्येचें प्रिय करण्याच्या मिषानें तो आपली कन्या वत्सराजाला देणार आणि नंतर वत्सराजाला आपल्या कन्येसह कौशाम्बीस पाठविणार. म्हणजे वत्सराज उदयनाला त्याचे हक्काचे राज्य चंडमहासेनाचा केवळ प्रसाद म्हणून पुन्हा उपभोगावयाला मिळणार ! चंडमहासेनाचा हा डाव सिद्धीस चार टावयाचा नाही असा यौगंधरायणाने निश्चय केला.
वत्सराज उदयन ५१ वत्सराज उदयनाच्या सुटकेसाठी आपण स्वतःच उजयिनीस जावयाचे असें यौगंधरायणाने ठरविलें. पौरवराज्य त्याने सेनापति रुमण्वानावर सोपविलें. काशीराज, मगधराज यांनी गडबड करूं नये म्हणून पूर्वसरहद्दीवर भरपूर सैन्य ठेवण्याविषयीं रुमण्वानास सूचना केली. ज्यांना ज्यांना म्हणून हत्यार वापरता येते त्या सर्वांनी सैन्यांत दाखल व्हावे असे आज्ञापत्र काढले. या जादा सैन्याचा उपयोग कोणत्या कामी करून घ्यावयाचा ते रुमण्वानास त्याने सांगितले आणि वसंतकास बरोबर घेऊन तो कौशाम्बीहून निघाला. विध्यारण्यांतील भिल्ल वगैरे जे आटविक लोक पौरवांशी स्नेहभावाने वागणारे होते त्यांच्या पुढाऱ्यांच्या भेटी यौगंधरायणाने घेतल्या आणि त्यांना आपापल्या सैन्यासह तयार राहण्यास सांगितले. अवंतिराज्यात प्रवेश करण्यापूर्वी यौगंधरायण आणि वसंतक यांनी आपले वेष पालटले. यौगंधरायण उन्मत्तकाचे, म्हणजे वेड्याचे सोंग घेऊन उज्जयिनीत शिरला आणि तोंडाने कांहीं तरी असंबद्ध असें बडबडत व वेड्यासारखे चाळे करीत रस्त्यांतून फिरूं लागला. तो मध्येच हंसे मध्येच रडे, मध्येच मोठमोठ्या वल्गना करी, आणि सर्वकाल ज्याला कांहीं ताळमेळ नाहीं असें बोलत राही. पोरें त्याच्या पाठीस लागत, त्याला खडे मारीत; पण तो मात्र त्यांना मारीत नसे. हा वेडा कोणाच्या आंगावर येत नाहीं; नुसता बडबडतो, हंसतो, रडतो आणि हिंडतो असे दिसून येतांच लोक त्याच्या वाटेस जाईनासे झाले. यौगंधरायणाला त्यामुळे कोठेहि बिनहरकत जातां येऊ लागले. तोंडाने तो कांहींहि बडबडत असला तरी कोठे काय चालले आहे व कोठे कोण काय बोलत आहे इकडे त्याचे लक्ष असे. .
५२ वत्सराज उदयन VN whohn. वसंतकानें डिंडिकाचे, म्हणजे चमत्कारिक वेष आणि गमतींची भाषणे यांच्या योगाने लोकांना हंसवून भिक्षा मिळविणाऱ्या भिकाऱ्याचे सोंग घेतले होते. त्याने जो वेष धारण केलेला होता तो इतका विचित्र होता की पहाणाऱ्याला हसूच यावें. हंसू येईल असें बोलत आणि गात तो उज्जयिनीमध्ये भीक मागत हिंडू लागला. लवकरच त्याने राजवाड्याकडे आपला मोर्चा वळविला. राजकन्या वासवदत्ता हिला तिच्या दासींनी सांगितले की शहरांत अलीकडे एक विचित्र भिकारी आलेला आहे. तो इतका गमत्या आहे की जन्मांत कधीं न हंसलेला मनुष्यदेखील त्याच्या गमती ऐकून हंसेल. त्यावरून राजकन्येला तो गमत्या भिकारी पहाण्याची इच्छा झाली. एके दिवशी ती संगीतशाळेत असतांना बाहेर रस्त्यावर लोक मोठमोठ्याने हसत आहेत असे तिला वाटले. राजमार्गात लोक ज्या अर्थी मोठमोठ्याने हंसत आहेत, त्या अर्थी तो गमत्या भिकारी इकडे आलेला असावा असा तिने तर्क केला. आपल्या वीणाचार्यांची परवानगी घेऊन तिने त्या भिकाऱ्याला बोलावून आणण्यासाठी कांचनमालेला पाठविले. थोड्याच वेळांत वसंतकाची स्वारी कांचन- मालेबरोबर संगीतशाळेंत आली. येताक्षणीच वसंतकाची दृष्टि संगीतशाळेंत आचार्यांच्या आसनावर बसलेल्या वत्सराजाकडे गेली. आपल्या राजाच्या पायांत शृंखला पाहून वसंतकाची चित्तवृत्ति चमत्कारिक झाली. वसंतकाने जरी वेषांतर केलेलें होतें तरी वत्सराजाने आपल्या नर्मसचिवाला ओळखलें. " डिंडिका ! वत्सराज वसंतकाला म्हणाला, आपल्या विरूपतेसंबंधी तुला खेद वाटत असल्याचे दिसते! पण येथे माझ्यापाशी
वत्सराज उदयन
५३
म्हणाली,
"
तूं राहिलास तर तुझी विरूपता मी घालवू शकेन ! कुरूपाला
सुरूप बनविणाऱ्या दिव्य औषधी मला ठाऊक आहेत !'
" दिव्य औषधींच्या योगाने सुरूप बनतां येत असेल, तर
कुरूपाला कवटाळून बसणे कोणाला आवडेल ?
वसंतकाने उत्तर
दिले, " पण माझा धन्दा भिकाऱ्याचा असल्यामुळे फिरल्यावांचून
मला चैन पडत नाही. दिवसाचा मी भीक मागत फिरेन. रात्रींचा
आपल्या आश्रयाला येत जाईन !
"अहो विचित्रवेपधारी बुवा!” राजकन्या वासवदत्ता वसंतकाला
तुम्हाला पुष्कळ गमती करतां येतात असे आम्हीं
ऐकतों ! आम्हाला त्यांतल्या दाखवाना एक दोन गमती करून !"
" अवंतिराजपुत्रि ! वत्सराज उदयन वासवदत्तेला बोलला,
या डिंडिकाच्या गमती काय असतील त्या आपण मग पाहूं. आधीं
सरस्वतीपूजन झाले पाहिजे. म्हणून तूं आणि कांचनमाला लवकर
पूजासाहित्य घेऊन या.”
पूजासाहित्य आणण्यासाठी राजकन्या आणि तिची दासी निघून
गेल्यावर वत्सराजाने वसंतकाला जवळ बोलाविले आणि तो जवळ
येतांच · मित्रा!' असा शब्द हलकेच उच्चारला.
" महाराजांची सुटका करण्यासाठी आर्य यौगंधरायण वेषांतर
करुन उज्जयिनींत आलेले आहेत." वसंतक हळूच बोलला, " योग्य
वेळी ते महाराजांना सूचना देतील. त्यांच्या सूचनेप्रमाणे वागण्याची
महाराजांनी तयारी ठेवावी.
मित्रा!" वत्सराज उत्तरला, “आर्य यौगंधरायणाला तूं जाऊन
सांग की केवळ स्वतःची सुटका झाल्याने मला समाधान वाटणार
५४ वत्सराज उदयन नाहीं. प्रद्योताचा दपभगं करावा अशी माझी इच्छा आहे. माझी जी विटंबना झाली तिचा सूड मी केव्हां घेईन असे मला झाले आहे. आमचा पराक्रमी पूर्वज धनंजय याने पूर्वी द्वारकेंतून जशी यादवकन्या सुभद्रा हरण करून नेली, तशीच आतां उज्जयिनींतून प्रद्योताची कन्या वासवदत्ता हरण करून न्यावयाची असें मी ठरविले आहे. इतक्यांत वासवदत्ता आणि कांचनमाला पूजासाहित्य घेऊन आल्या. सरस्वतीपूजन झाल्यावर वसंतकानें वासवदत्तेला एक दोन गमतांच्या गोष्टी सांगितल्या आणि संगीतशाळेतून तो बाहेर पडला. त्याने यौगंधरायणाची एकीकडे गांठ घेऊन त्याला सर्व हकीगत निवेदन केली. ती ऐकून यौगंधरायण समजला की वत्सराज आणि वासवदत्ता यांचे परस्परांवर प्रेम जडले आहे. वत्सराजाबरोबरच वासवदत्तेलाहि जर येथून कौशांबीस नेतां आले तर चंडमहासेनाचा खरोखरच दर्पभंग केल्यासारखे होईल असें त्यालाहि वाटले. हे साधण्यासाठी काय काय करावे लागेल याचा त्याने काही वेळ विचार केला. त्याचा कांहीं एक निश्चय ठरला. वसंतकाच्या कानांत हलकेच त्याने काही सांगितले आणि नंतर ते दोघे दोन दिशांनी निघून गेले. वसंतक जातांना " माझे मोदक उन्मत्तकानें खाल्ले !" म्हणून उन्मत्तकाला शिव्या देत होता आणि यौगंधरायण " मी ऐरावण आहे ! ऐरावण ! " असे म्हणत व फिदी फिदी हसत जात होता! सगीतशाळेतील कार्यक्रम उरकला म्हणजे वत्सराज उदयनाला बंधनगृहाकडे नेण्यांत येत असे. बंधनगृहाचा रखवालदार शिवक याला वत्सराजाने अनुकूल करून घेतलेले होते. वसंतक रात्रीचा त्या बंधनगृहापाशी येई आणि शिवक त्याला आत घेत असे. उजाडण्यापूर्वी वत्सराज उदयन ५५ वसंतक तेथून निघुन जाई. वत्सराज आणि यौगंधरायण हे वसंतकाच्या द्वारे आपले बेत व विचार एकमेकांना कळवीत. एके दिवशीं वत्सराजाने संगीतशाळेमध्ये असतांना आपला स्वदेशी निघून जाण्याचा विचार वासवदत्तेला कळविला. या प्रयत्नांत मरण आले तरी पुरवलें, पण हा बंदिवास नको असें तो आवेशाने म्हणाला. त्याचे निर्धाराचे भाषण ऐकून वासवदत्तादेखील प्रेमासाठी त्याच्याबरो- बरच कौशांबीस जाण्याचे साहस करण्याला तयार झाली. वत्सराजाला तिने तसे सांगूनहि टाकले. अवंतिराजपुत्री पितृपक्षापासून विमुख होऊन आपणाबरोबर कौशांबीस यावयाला तयार आहे असें वत्सराजाने वसंतकाच्या द्वारें यौगंधरायणाला कळविलें. तेव्हां यौगंधरायणाने त्यांच्या सुटकेची तयारी चालविली. ती पूर्ण होतांच तो वसंतकाबरोबर रात्रीच्या वेळी बंधनगृहांत येऊन वत्सराजाला भेटला. " प्रभो ! " यौगंधरायण वत्सराजाला म्हणाला. आपल्या पायां- तील शृंखला तोडण्याचे हे साधन आपणापाशी घेऊन ठेवावें आणि उयां गत्री आपली येथून सुटका करून घ्यावी, प्रद्योताने राजकन्येला दिलेली भद्रवती नांवाची एक हत्तीण आहे. प्रद्योताचा नलागिरी हत्तीच काय तो एक तिची वेगांत बरोबरी करू शकतो. पण हत्ती हे केव्हांहि हत्तिणींशी युद्ध करीत नसल्यामुळे नलागिरीपासून भय बाळगण्याचे कारण नाही. भवतीच्या आषाढक महाताला मी आपलासा केला आहे. आपण उद्यां राजकन्येला चंडिकादेवीच्या पूजेचा समारंभ करावयाला सांगावें. चंडिका ऊर्फ मदिरा देवीचा प्रसाद म्हणून रात्रीच्या दुसऱ्या प्रहरांत राजवाड्यांतील सेवक, पहारेकरी आणि महात यांना ५६ वत्सराज उदयन बेशुद्ध पडेपर्यंत मद्य पाजण्याची व्यवस्था राजकन्येने करावी. मध्यरात्री देवीच्या दर्शनासाठी म्हणून राजकन्येने घोषवती वीणा घेऊन आपल्या विश्वासू कांचनमाला दासीसह भद्रवती हत्तिणीवर बसून निघावें. हत्तिणीचा महात या बंधनगृहापाशी हत्तीण आणील. त्यावेळी आपण आणि वसंतक यांनी हत्तिणीवरील अंबारीत बसावें. पुढे काय करावयाचे ते सर्व मी आपाढक महाताला सांगून ठेवले आहे. आपणाला कोणी अडविलें अगर आपला कोणी पाठलाग केला तर स्वसंरक्षणासाठी उपयोगी पडावीत म्हणून हत्तिणीवरील अंबारीत धनुष्य, बाणभाते आणि ढाल तलवार ही ठेवण्याची व्यवस्था मी करविली आहे. उद्यां सकाळीच मी पुढे जात आहे. कारण प्रद्योताचे सैन्य आपल्या मागोमाग आलेच तर विध्यारण्यांत त्याचा प्रवेश होऊ नये म्हणून भिल्लांकडून विध्यारण्यांतल्या सर्व वाटा अडवून धरण्याची व्यवस्था मला आधीच केली पाहिजे." वत्सराजाला याप्रमाणे सांगून आणि शृंखला तोडण्याचे साधन त्याजपाशीं देऊन यौगंधरायण उजाडण्यापूर्वीच बंधनगृहांतून निघून गेला. दुसऱ्या दिवशी वत्सराज उदयनाने वासवदत्तेला चंडिकादेवीच्या पूजेचा समारंभ करावयास सांगितले आणि आपल्या सुटकेसंबंधी एकंदर व्यवस्था कसकशी करण्यांत आलेली आहे याची तिला कल्पना दिली. आपणाकडे सोपविण्यात आलेली कामगिरी बिनचूकपणे पार पाडण्याचे वासवदत्तेने कबूल केले आणि कन्यांतःपुरांत जाऊन आपल्या दासींना तिनें पूजासमारंभाची तयारी विलंब न लावतां करा म्हणून आज्ञा केली. चंडिका ऊर्फ मदिरादेवी हे चंडमहासेनाचे दैवतच असल्यामुळे वत्सराज उदयन ५७ वासवदत्तेने चंडिकेच्या पूजेचा समारंभ करण्यांत कांहीं अस्वाभाविक अगर संशयास्पद आहे असें कोणालाच वाटण्यासारखे नव्हते. पूजासमारंभाचा एकंदर कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला. देवीचा प्रसाद म्हणून प्राशन केलेल्या मद्याच्या योगाने राजवाड्यांतील सेवक, पहारेकरी आणि महात बेशुद्ध होऊन पडले. महातांमध्ये आषाढक महात यानेच तेवढा देवीचा प्रसाद ग्रहण केलेला नव्हता. भर्तृदारिका देवीचे दर्शन घेऊन परत आल्यावर आपण प्रसाद ग्रहण करणार असें तो दुसऱ्या महातांजवळ म्हणाला. भद्रवती हत्तीणीवर अंबारी चढवून तिला त्याने सज्ज केलेली होती. बन्धनगृहाचा रखवालदार शिवक याला देवीचा प्रसाद देण्यांत आलेला होता. परंतु त्याने तो प्राशन केलेला नव्हता. व-सराज निघून गेल्यावर देवीचा प्रसाद सेवन करावयाचा असें त्याने ठरविले होते. मध्यरात्रीच्या सुमारास बंधनगृहापाशी भद्रवती हत्तीण येऊन उभी राहिली. तिच्या पाठीवरील अंबारीत राजकन्या वासवदत्ता व तिची सखी कांचनमाला या दोघी बसलेल्या होत्या. हत्तीण आली त्यावेळी वत्सराज आपल्या पायांतील शृंखला तोडून तयारच होता. शिवकाच्या मदतीने वत्सराज आणि वसंतक हे दोघे हत्तिणीवरील अंबारीत चढून बसले. वत्सराजाने अंबारीत बसतांच हातांत सज्ज केलेले धनुष्य घेतले. महाताने हत्तीण चालू केली. हत्तीण निघून जातांच शिवकानें देवीचा प्रसाद सेवन केला आणि तोहि बेशुद्ध होऊन पडला मदांत आलेल्या एका हत्तीनें उज्जयिनीचा तट एके ठिकाणी नुकताच फोडला होता. तो अजुन दुरुस्त व्हावयाचा होता. आषाढक ५८ वत्सराज उदयन महाताने भद्रवती हत्तीण चंडिका देवीच्या देवळाकडे न चालवितां फुटलेल्या तटाच्या बाजूकडे चालविली. फुटलेल्या तटापाशीं वीरबाहु आणि तालभट या नांवांचे दोन पहारेकरी होते. ते भद्रवतीला अटकाव करूं लागले. वत्सराजाने लगेच अंबारीतून त्या दोघांच्या छातीत एकेक बाण नेमका मारून त्या दोघांना जमीनीवर लोळविलें ! अशा रीतीने मार्ग मोकळा होतांच आषाढक महाताने फुटलेल्या तटाच्या वाटेने हत्तीण उज्जयिनीच्या बाहेर काढली आणि तिला भर वेगाने चालावयास लावले. ज्या उज्जयिनी नगरीत वत्सराज उदयन काही काळापूर्वी खेंचरांच्या गाडीतून बंदिवान म्हणून प्रविष्ट झाला, त्याच उज्जयिनी नगरीतून आतां तो हत्तिणीवर आरोहण करून आणि उज्जयिनीच्या राजाची कन्या बरोबर घेऊन बाहेर पडला ! ७-उदयन-वासवदत्ता-विवाह उदयन उज्जयिनीतून निघून गेल्यावर काही वेळाने उज्जयिनीतले फिरते रखवालदार फिरत फिरत फुटलेल्या तटापाशी आले. तेथील दोघे पहारेकरी छातींत बाण लागून मरण पावलेले आहेत असे आढळतांच त्यांची धावपळ आणि गडबड सुरू झाली. तटाला पडलेल्या खिंडारांतून एक हत्ती बाहेर पडून गेलेला असावा असा भद्रवतीची मातींत जी पावले उमटलेली होती त्यांवरून त्यांनी तर्क केला. पहारेकरी ज्या अर्थी बाण लागून मेलेले आहेत त्याअर्थी त्या हत्तीवर कोणीतरी धनुर्धर असला पाहिजे असे त्यांनी अनुमान बांधले. त्यांना हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे वाटून त्यांनी आपल्या मुख्य अधि- वत्सराज उदयन ५९ काऱ्याला त्याची तत्काल वर्दी दिली. दोन सरकारी कामदारांचे आपले काम बजावीत असतांना झालेले खून, आणि त्या खुनांशी एका गजा- रूढ धनुर्धराचा संबंध, म्हणजे नुसते गंभीर नव्हे, तर फारच गंभीर असे हे प्रकरण दिसते आहे; हे महाराजांच्या कानावर ताबडतोब घातले पाहिजे असा त्या मुख्य अधिकाऱ्याने विचार केला आणि तेवढ्या रात्री राजवाड्यांत जाऊन घडलेला प्रकार चंडमहासेनाला निवेदन केला. चण्डमहासेनाने लागलीच चवकशीला सुरवात केली. चवकशीत ज्या गोष्टी उघडकीला आल्या त्यांवरून हे कृत्य वत्सराजाचे असले पाहिजे असें तो समजला. आपला डाव हुकला, आपल्या कन्येला वत्सराज घेऊन गेला, आतां त्याच्याशी शत्रुत्व धरले तर न जाणो, आपली कन्या त्याच्या हातीं सांपडली आहे तिच्यावरच त्याचा तो सूड उगवील. तिच्याशी विवाह करण्याचे देखील टाळील; आणि असें झाले म्हणजे आमच्या प्रद्योत घराण्याची जगांत केवढी अप्रतिष्ठा होईल ? तेव्हां वत्सराजाला न चिडवितां या प्रसंगी गोंजारणेच इष्ट आहे. त्याला गोंजारून मुलीचे आणि त्याचे विलंब न लागतां लग्न. होईल अशी तजवीज पहिल्या प्रथम करणे हेच आतां श्रेयस्कर होय. असा चंडमहासेनाने पोक्त विचार केला. चवकशीची गडबड चालू असतांना राजपुत्र पालक जागा झाला. बाहेर गडबड कशाची आहे ते पहावे म्हणून तो बाहेर आला. त्याला बाहेर नलागिरी हत्तीचा महात दिसला. नलागिरी हत्तीचा महात हा सर्व महातांचा मुख्य होता. त्याला मद्यामुळे फारशी गुंगी येत नसे आणि आलेली थोड्याच वेळात उतरत असे. देवीच्या प्रसादामुळे त्याला जी थोडी गुंगी आलेली
६०
वत्सराज उदयन
~~
राजपुत्र पालकानें
"बेशरम
होती ती आतां उतरली होती. चंडमहासेनापुढे त्याची नुकतीच
जबानी झाली होती.
काय रे, कसली गडबड आहे ?
नलागिरीच्या महाताला प्रश्न केला.
वत्सराज भर्तृदारिकेला घेऊन पळाले असे म्हणतात ! "
महाताने उत्तर दिले.
" तो पळाला, तुझ्या धन्याच्या लेकीला घेऊन पळाला, नि तूं
अजून इथेच उभा आहेस ? " पालक रागावून म्हणाला,
कुठला ! चल, ऊठ, नीघ, धांव, पळ, ठोक धूम ! नलागिरीवर
आधीं अंबारी चढव ! तोपर्यंत मी माझें कवच चढवतों! माझी गदा
आणि मुद्गर घेतों ! तुला तुझ्या धन्याच्या लेकीबद्दल काळजी नसली
तरी मला माझ्या बहिणीची काळजी आहे. समजलास ? वत्सराजाचा
पूर्वज भीमसेन हा गदायुद्धांत नि मल्लयुद्धांत निपुण असला तरी
चत्सराजाला या विद्या अवगत नाहीत ! असत्या तर इथे असतांना
एकदा तरी त्याने माझ्याबरोबर गदायुद्ध अगर मल्लयुद्ध खेळण्याची
इच्छा प्रकट केली असती. एक वेळ तरी आमचा तालीमखाना पहावा
असें त्याला वाटले असते. त्याच्याबरोबर मी गदायुद्ध करीन. गदा
त्याच्यापाशी नसलीच तर मल्लयुद्धांत त्याला मी जिंकीन ! पळ, ठोक
धूम ! चढव नलागिरीवर आधीं अंबारी !"
पालकाची अशी आज्ञा झाल्यामुळे महाताला नलागिरी हत्ती
स्वारीसाठी सज करणे भाग पडले. पालकानेंहि कवच चढवून आणि
गदा मुद्गर घेऊन बहिणीला सोडविण्यासाठी आणि वत्सराजाला पुन्हा
पकडून आणण्यासाठी निघण्याची तयारी केली. हे चवकशी प्रकरण
वत्सराज उदयन
६१
परतवून आणलें
आटोपण्याच्या आंत चतुर्भुज केलेल्या वसराजाला वडिलांपुढे आणून
मी उभा करीन अशा उमेदीनें नलागिरी हत्तीवर आरूढ होऊन
राजपुत्र पालक निघाला.
राजपुत्र पालक वत्सराजाच्या पाठलागावर गेल्याचे चंडमहासेनाला
थोड्याच वेळांत समजलें.
" नीतिशास्त्र पढवावयास आलेल्या आर्य पिशुनांपुढे आपल्या
रथाच्या घोड्यांची प्रशंसा करीत बसून प्रत्यक्ष आपल्या आचार्यांचा
अपमान करणारा हा हूड पोर केवळ भलत्यावेळी भलतेच करण्यासाठी
जन्माला आलेला आहे की काय समजत नाहीं! " चंडमहासेन मनांत
म्हणाला,
सध्यांच्या प्रसंगी याला जर वेळीच
नाही तर या नाजूक परिस्थितीतून बाहेर पडण्याची आशाच
करावयाला नको!"
असें म्हणून चंडमहासेनाने पालकाला परत आणण्यासाठी राजपुत्र
गोपालकाची ताबडतोब रवानगी केली.
परंतु गोपालकाने पालकाला गांठण्यापूर्वीच पालक आणि वत्सराज
यांची गांठ पडली होती ! कारण नलागिरी हत्ती चालीला होताच तसा!
आषाढक महात भद्रवतीला सारखी पुढे दामटीत होता, आणि
मागून पाठलाग करीत येणाऱ्या पालकावर वत्सराज बाणांमागून बाण
सोडीत होता. पालकाच्या अंगांत कवच असल्यामुळे वत्सराजाच्या
बाणांची पालकाला पर्वा नव्हती.
" तूं त्या पळपुट्या हत्तिणीवर आपला नलागिरी घाल! वत्सराजाचे
केस धरून त्याला मी त्याच्या अंबारीतून ओढून काढतों !” पालक
आपल्या महाताला म्हणाला.
-
६२ वत्सराज उदयन " " " " आयुष्मन् ! ! " महाताने नम्रपणाने म्हटले, आपला नलागिरी हा हत्तिणीवर केव्हांहि चाल करून जाणार नाहीं ! बडबड पुरे कर पालक दरडावून म्हणाला, निमूटपणे त्या हत्तिणीवर आपला हत्ती घाल ! " जशी आयुष्मंतांची आज्ञा !” असें म्हणून महाताने नलागिरीला अंकुश टोंचून भद्रवतीवर चाल करून जाण्याचा इशारा दिला. पण नलागिरीने तो इशारा मानला नाही. महाताने पुन्हा अंकुश टोचला. त्याबरोबर तो गजराज चिडला; त्याने मोठ्याने शब्द केला आणि वाट सोडून तो सैरावैरा धांवत सुटला. हत्ती भडकलेला पाहून पालक घाबरला! हा आपणाला आतां एखाद्या खड्डयांत तरी पाडील नाहीं तर जंगलांत तरी नेऊन टाकील असें त्याला भय पडलें. नलागिरी भडकल्यामुळे वत्सराजाला पुढे निघून जाण्याला संधि मिळाली. महाताने नलागिरीला कसाबसा शांत करून पुन्हा वाटेवर आणले त्यावेळी वत्सराज पुष्कळच पुढे निघून गेलेला होता. आता काय करावे याचा पालकाला विचार पडला. इतक्यांत राजपुत्र गोपालक तेथे येऊन पोंचला, त्याने वडिलांची आज्ञा पालकाला कळविली आणि पालकाला तो आपणाबरोबर परत उज्जयिनीस घेऊन गेला. मध्यरात्री उज्जयिनीहून निघालेली भद्रवती दुसऱ्या दिवशी दोन प्रहरी पौरवराज्याच्या सीमेवरील विध्यारण्यापाशी जाऊन पोंचली. एवढा काळ सारखें चालत राहिल्यामुळे ती बिचारी अगदी थकून गेली. तिला फार तहान लागली. तिला विसावा देणे अवश्य झाल्यामुळे वत्सराज, वासवदत्ता, कांचनमाला आणि वसंतक ही मंडळी खाली वत्सराज उदयन ६३ उतरली. महातानें हत्तिणीला पाणी पाजण्यासाठी नेले. श्रमांमुळे अतोनात तान्हावलेलें तें जनावर पाणी दिसतांच पी पी पाणी प्यालें आणि थोड्याच वेळांत त्याने प्राण सोडला! विध्यारण्यांतील भिल्लांच्या नायकाला आपण आल्याचे वर्तमान कळविण्यासाठी वत्सराजाने वसंतकाला पुढे पाठविले आणि आपण वासवदत्ता, कांचनमाला आणि आषाढक महात यांसह पायींच हळू हळू वाट चालावयास सुरवात केली. वसंतक भिल्लांच्या पल्लीला जाऊन पोंचतांच भिल्लांच्या नायकाला त्यानें वत्सराज येत असल्याचे वर्तमान कळविलें. यौगंधरायण आणि कित्येक प्रमुख भिल्ल अशी मंडळी लगेच वत्सराजाला सामोरी जाण्यासाठी निघाली. त्या मंडळीबरोबर वत्सराज, वासवदत्ता, कांचनमाला आणि आषाढक ही भिल्लांच्या पल्लीला गेली. दुसऱ्या दिवशी यौगंधरायणाने रुमण्वानाकडे दूत पाठवून वत्सराज बंधमुक्त होऊन परत आल्याचे त्याला कळविलें. रुमण्वानाने ती आनंदाची वार्ता लगेच कौशांबीच्या लोकांना कळविली आणि आपल्या राजाला राजधानीत घेऊन येण्यासाठी विंधारण्याकडे हत्ती, घोडे, छत्र, चामरे आणि सैन्य यांची रवानगी केली. वत्सराज उदयन विधारण्यामध्ये भिल्लांच्या पल्लीत असतांना तेथेंच त्याच्याकडे उज्जयिनीहून चंडमहासेनाचा प्रतीहारी आला. त्याने वत्सराजाला चंडमहासेनाचा असा निरोप कळविला की, आपणाला आमचे जामात करावयाचे याच हेतूने आम्ही उज्जयिनीस आणलें, आणि मुलीचे व आपलें परस्परांवर प्रेम जडावे म्हणून मुलीला शिष्या या नात्याने आपल्या स्वाधीन केली. मुलीचें व आपलें परस्परांवर प्रेम ६४ वत्सराज उदयन जडलें हे पाहून आम्हांला आनंदच झाला. आतां मुलगी आपणास अर्पण करावयाची असे आम्ही मनांत आणले. परंतु आपण मानी असल्यामुळे येथे आपणाला मुलगी अर्पण केल्यास आपणाला तो अपमान वाटेल की काय अशी आमच्या मनांत शंका आली; आणि आपणापाशी हा विषय कसा काढावा हे आम्हांला एक कोडेंच होऊन बसले. त्यानंतर आपणाकडून जी कृति झाली तिच्यामुळे हे कोडे आपोआपच सुटले हे कळविण्यास संतोष वाटतो. आतां लवकरच युवराज गोपालक यांस आम्हीं कौशांबीस पाठविणार आहोत. तो मुलीचे आपणास विधिपूर्वक दान करील." हा निरोप ऐकून वत्सराज आणि वासवदत्ता या दोघांनाहि आनंद झाला. रुमण्यानाने पाठविलेल्या सैन्याबरोबर ती कौशांबीस गेली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी राजपुत्र गोपालक हा उज्जयिनीहून मोठ्या लव्याजम्यानिशी कौशांबीस आला आणि त्याने अवंतिराजकन्या वासवदत्ता ही वत्सराज उदयनाला विधिपूर्वक अर्पण केली. उदयन आणि वासवदत्ता यांचा विवाह होऊन वासवदत्ता ही पौरवराज्याची महाराणी झाल्यानंतर थोड्याच दिवसांनी सांकृतायनी नांवाची एक संन्यासिनी पंडिता उज्जयिनीहून येऊन वासवदत्तेपाशी राहिली. उदयनविषयक नाटकांपैकी प्रियदर्शिका नांवाच्या नाटकांत ही पंडिता दाखविलेली आहे. ८-पारसीकांची स्वारी. प्रद्योत आणि पौरव यांच्यांत सोयरीक होऊन स्नेहभाव उत्पन्न झाल्यामुळे पौरवराज्याची एक बाजू सुरक्षित झाली. अशाच रीतीने वत्सराज उदयन ६५ मगधाच्या शैशुनागांशी सोयरीक झाल्यास पौरवराज्याची आणखींहि एक बाजू सुरक्षित होईल, आणि पौरवांना आपले गेलेलें चक्रवर्तिपद पुन्हां प्राप्त करून घेण्याच्या उद्योगाला निर्वेधपणे लागतां येईल, या विचाराने यौगंधरायण अमात्याने वत्सराज उदयन आणि राणी वासवदत्ता यांना न कळवितांच मगधाचा शैशुनाग राजा क्षत्रौजा उर्फ महापद्म याच्या पद्मावती कन्येला वत्सराजासाठी मागणी घातली! परन्तु मगधराजाने तिला मान्यता देण्याचे लांबणीवर टाकलें. जावई म्हणून वत्सराज त्याला नापसंत नव्हता. परंतु वत्सराजाला कन्या देणे म्हणजे सवतीवर मुलगी देणे असल्यामुळे त्याच्या मनाचा निश्चय होत नव्हता. काय केले असतां मगधराज आपली कन्या वत्सराजाला द्यावयास तयार होईल या विचारांत यौगंधरायण असतां एकाएकी अशी परिस्थिति उत्पन्न झाली की तिच्यामुळे आर्यावर्तातील प्रमुख सत्ताधाऱ्यांना आपसांतले भेदभाव बाजूला ठेवून प्रबळ अशा एका परकीय सत्तेशी झगडण्याकरितां आपली जूट बनविणे अवश्य झालें. अमात्य यौगंधरायणाने त्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि आपले उद्दिष्ट साधलें. इराणचा हखामणी सम्राट् पहिला दारयवहु याच्या कारकीर्दीच्या आरंभी पारसीकांचे साम्राज्य सिंधुनदाच्या पश्चिमतीराला भिडले होते. साम्राज्यांत ठिकठिकाणी झालेली तोतयांची बंडे मोडून काढण्याच्या कामी दारयवहूला आपल्या कारकीर्दीची पहिली तीन वर्षे खर्च करावी लागली. दारयवहु तोतयांची बंडे मोडून तोतयांना सुळी देत होता त्या वेळी त्याचा बाप विश्तास्प हयात होता इतकेच नव्हे तर सम्राट बनलेल्या आपल्या पुत्राला तोतयांची बंडे मोडण्याचे कामीं तो ससैन्य ६६ वत्सराज उदयन . , मदत करीत होता. तोतयांचा उच्छेद केल्यानंतर ख्रिस्तपूर्व ५१७ ते ५१३ या पांच वर्षांच्या काळांत दारयवहूचें केव्हातरी भारतवर्षाकडे लक्ष्य वेधले व त्यावेळी त्याचा बाप विश्तास्प हा नुकताच मरण पावलेला होता. स्वतः दारयवहूनें भारतवर्षावर स्वारी केली नाही. आरुणि नांवाच्या आपल्या एका सेनापतीला भारतवर्षावर त्याने ससैन्य रवाना केलें. आरुणि हा गांधार देशाकडून भारतवर्षांत प्रविष्ट झाला. आज ज्या नदीला आपण झेलम असें म्हणतो तिला प्राचीनकाळी 'आर्जीकीया' असें नांव होतें. आरुणीने त्या नदीला दारयवहूचा बाप विश्तास्प याचे नांव दिले आणि त्याच नांवाचे पुढे इकडे 'वितस्ता' असें रूपांतर झाले. मुलुख सर करीत करीत पंजाबांतून तो खालीं यमुनेपर्यंत आला. इकडील लोकांपैकी कोणाला तो 'दारुणकर्मदक्ष' वाटला, तर कोणाला 'पापी राहूसारखा' वाटला. यमुनानदीच्या कांठाशी आल्यावर आरुणीची पुढे प्रद्योत, पौरव, इक्ष्वाकु आणि शैशुनाग या सत्ताधाऱ्यांशी गांठ पडणार होती. आरुणीला आतांपर्यंत भेटलेल्या सत्ताधाऱ्यांसारखे हे सत्ताधारी लेंचेपेंचे नसून चांगले कणखर होते. आरुणि हे जाणून असला पाहिजे. येताक्षणीच या सत्ताधाऱ्यांवर एकदम चाल करून जाण्याचे त्याने टाळले. यमुनातीरीं शूरसेनांचे मथुरा हे ठिकाण होते. आरुणीने ते आपल्या ताब्यात घेतले. त्या ठिकाणाची त्याने मजबुती केली आणि तेथे राहून त्याने आपल्या पुढील उद्योगाची पूर्व तयारी चालविली. इकडे येतांना त्याने आपणाबरोबर जेवढें सैन्य आणलेले होते तेवढे आतापर्यंतच्या . - वत्सराज उदयन ६७ ..~- त्याच्या उद्योगाला पुरेसे झालेले असले तरी पुढील उद्योगाला तें अपुरें पडेल असें त्याला वाटत होते. स्वदेशांतून पुरेशा सैन्याचा पुरवठा होईलच अशी त्याला खात्री नव्हती. कारण, हखामणीसाम्राज्याचा मुलुख दिसायला कितीहि विस्तृत असला तरी त्याचा पुष्कळसा भाग वाळवंटमय होता. समुद्रांत जशी बेटे तशी त्या वाळवंटांत मधून मधून ओलवणे होती; आणि त्या ओलवणांतूनच काय ती मनुष्यवस्ती असे. आर्यावर्तीतील सत्ताधाऱ्यांची राज्ये दिसायला लहान असली तरी ती मनुष्यवस्तीने गजबजलेली होती. वाळवंटमय मुलखांत आपल्या साम्राज्याचा पसारा घालून बसलेल्या हखामणींना त्या साम्राज्यांतील दूरदूरचे देश ताब्यांत राखण्यासाठी नेहमीच जवळ भरपूर सैन्य ठेवावें लागत होते. लोकवस्तीने गजबजलेलें असें दूरचे आर्यावर्त काबीज करण्याच्या ईयेला बळी पडून तें सैन्य जर ते आरुणीच्या मदतीसाठी भारतवर्षांत रवाना करते तर वाळवंटमय मुलखांत विस्तारलेले त्यांचे साम्राज्य वादळांत सांपडलेल्या सिकतापर्वताप्रमाणे तेव्हांच उडून गेलें असते. अशी परिस्थिति असल्यामुळे आरुणीला स्वदेशांतून मोठ्या प्रमाणावर लष्करी कुमक मिळण्यासारखी नव्हती. इकडे काबीज केलेल्या मुलखांतूनच सैन्यांत भरती करून ' हिंदाव'ची मोहीम पुरी करणे त्याला प्राप्त होते. परंतु इकडील लोकांचा विश्वास संपादण्याऐवजी आपल्या दारुणकर्मांमुळे इकडील लोकांच्या द्वेषाला मात्र तो पात्र होत होता. मथुरा येथे सैन्यभरतीचे काम जोरांत चालू असतांनाच पारसीक- सेनापति आरुणि याजकडून पुढील अर्थाचे खलिते आर्यावर्तातील सत्ताधाऱ्यांकडे रवाना झाले: - ६८ वत्सराज उदयन " मथुरा-स्कंधावारांतून. हखामणी-कुलोत्पन्न विश्तास्प-पुत्र महापराक्रमी दारयवहु महाराज, जे राजांचे राजे, पार्स देशाचे प्रभु, आणि दस्यूंचे स्वामी आहेत, ज्यांचे एकछत्री माहाराज्य सिंधुनदापासून यवनदेशापर्यंत, आणि शकस्थानापासून कुशापर्यंत ( आफ्रिकेंतील सांप्रतच्या न्यूबिया प्रांतापर्यंत ) देवश्रेष्ठ अहुर मज्दाच्या कृपने पसरलेले आहे, त्या महापराक्रमी दारयवहु महाराजांचे एकनिष्ठ आणि अत्यन्त आज्ञाधारक बद्धक, सेनापति आरुणि यांजकडून- हिंदावांतील राजे रजवाडे आणि इतर सत्ताधारी यांस कळविण्यांत येते की देवश्रेष्ठ अहुर मज्दाने संपूर्ण पृथ्वीचे राज्य महापराक्रमी दारयवहु महाराजांस दिलेले असून त्या राज्याचा पूर्वभाग आपल्या स्वाधीन करून घेण्यासाठी महाराजांच्या आज्ञेवरून आमचें हिंदावांत आगमन झालेले आहे. तरी महाराजांच्या भूमीचा आजवर उपयोग घेणाऱ्या राजेरजवाडयांनी आणि इतर सत्ताधाऱ्यांनी त्या भूमीचा अतःपर उपभोग न घेतां ती भूमि महाराजांचे प्रतिनिधि जे आम्ही, त्या आमच्या स्वाधीन विलंब न लावतां करणे यांतच त्यांचे कल्याण आहे. तरी त्यांनी मथुरास्कंधावारांत स्वतः येऊन महाराजांची भूमि महाराजांस परत दिल्याचे लिहून द्यावे, आपणास महाराजांचे भृत्य असें म्हणवावें, महाराजांशी आणि महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांशी सदोदित निष्ठापूर्वक वागण्याची शपथ घ्यावी, आणि महाराजांचे प्रतिनिधि या नात्याने आम्ही आज्ञा करूं त्याप्रमाणे चालावें. असे केल्यास महाराज त्यांच्यावर प्रसन्न होऊन आपल्या विस्तीर्ण माहाराज्यांत त्यांना अधिकारी म्हणून नेमून त्यांचें ऊर्जित करतील. जे असें करणार वत्सराज उदयन ६९ नाहींत ते आमच्या महापराक्रमी महाराजांचे शत्रु आहेत असे समजून त्यांच्यावर यत्किंचित् देखील दया न दाखवितां त्या सर्वांस त्यांच्या अनुयायांसह कापून काढण्यात येईल. कळावें." आरुणीने मथुरा हे ठिकाण काबीज केले आणि त्याची तो मजबुती करूं लागला त्यावेळीच त्याच्या पुढील हेतूंची कल्पना आर्यावर्तातील सत्ताधाऱ्यांना झालेली होती. त्याच्याकडून आलेले खलिते वाचून पाहिल्यावर तर त्यांची खात्रीच झाली. ते आरुणीला एक जुटीने तोंड देण्याच्या तयारीला लागले. आर्यावर्तातील सत्ताधाऱ्यांची आरुणीविरुद्ध जूट बनत असतांनाच अमात्य यौगंधरायणाने पौरव आणि शैशुनाग यांजमध्ये सोयरीक घडवून आणण्याचा अपला हेतु सिद्धीस नेला. यौगंधरायणाने पूर्वी सेनापति रुमण्वानालाच तेवढा आपला हेतु कळवून त्याची त्या हेतूला मान्यता मिळविली होती. मगधराजाने मागणीला रुकार दिल्यानंतर वत्सराज उदयन आणि देवी वासवदत्ता यांना पौरव व शैशुनाग यांजमधील सोयरिकीची आवश्यकता आपण पटवून देऊ आणि त्यांची अनुकूलता संपादन करूं अशी त्याला उमेद होती. पण मगधराज रुकार देईना, अगर नकार देऊन दूताला परतहि पाठवीना ! मगधराजाकडून नकार येणे यौगंधरायणाला इष्ट नव्हते. मगधराजाची कोणत्या प्रकारची समजूत झाली तर त्याच्याकडून चटकन् रुकार येईल हे यौगंधरायणाने ताडलें. पारसीकांनी पौरवराज्याच्या सीमेजवळच तळ ठोकल्यामुळे पौरवराज्याला पारसीकांपासून तत्काल भय होते. त्यामुळे पौरव आणि शैशुनाग यांची ताबडतोब मैत्री होणे आणि त्या मैत्रीचें सोयरिकीच्या रूपाने लगेच दृढीकरण केले जाणे वत्सराज उदयन अत्यावश्यक होते. हे साधण्यासाठी यौगंधरायणाने एक कारस्थान रचलें. सेनापति रुमण्वान् त्या कारस्थानांत सामील झाला. पारसीकसेनापति आरुणि याच्या आक्रमणाला पायबंद कसा घालावा हे ठरविण्याच्या निमित्ताने अमात्य यौगंधरायण याने वासवदत्तेचा ज्येष्ठ भ्राता गोपालक याला उज्जयिनीहून तातडीने कौशाम्बीस बोलाविलें. गोपालक कौशांबीस येतांच यौगंधरायणाने त्याची एकांती भेट घेऊन त्याला एकंदर परिस्थिति समजावून सांगितली. गोपालकाला ती पटली आणि तोहि यौगंधरायणाच्या कारस्थानांत सामील झाला. यौगंधरायणाने नंतर गोपालकाच्या मार्फत वासवदत्तेला आपल्या कार्याचे महत्त्व पटवून देऊन तिची संमति मिळविली. यौगंधरायणाने आपल्या कारस्थानाचा वत्सराज उदयनाला बिलकुल सुगावा लागू दिलेला नव्हता. वत्सराज उदयन आरुणीचा खलिता वाचून संतप्त झालेला होता. यमुना ओलांडून मथुरेवर स्वारी करण्याची भाषा तो बोलत होता. दारयवहूचे दास बनण्यास तयार नसलेल्या स्वातंत्र्यप्रिय भारतीयांना कापून काढण्याच्या इराद्याने इकडे आलेल्या पारसीकसेनापतीला रणांत गांठून स्वतः त्याचे मस्तक धडावेगळे करण्याची प्रतिज्ञा वत्सराजाने केलेली होती. यौगंधरायण आणि रुमण्वान् या दोघांनी त्याला आवरून धरले होते म्हणून बरें; नाहीतर आरुणीवर स्वतःच्याच तेवढ्या सैन्यानिशी चालून जाण्यास त्याने कमी केले नसते. तो जबर धाडशी होता. भय म्हणजे काय चीज असते हे त्याला ठाऊकच नव्हतें ! यौगंधरायणानें वत्सराजाला सांगितले की “शत्रु आपल्या सीमेवरच येऊन बसल्यामुळे त्याचे व आपलें युद्ध जुंपण्यास आतां विलंब लागणार वत्सराज उदयन ७१ . नाही. परंतु या परदेशी शत्रूशी लढण्यांत आम्ही गुंतलेले आहोत असे पाहून आमचे शेजारी शत्रु काय करतील याचा नेम नाही. त्यांची नीति विचित्र आहे. ते हीच संधि साधून आमच्या राज्याचे लचके तोडण्यास कमी करणार नाहीत. कोसलराज आपले जुने आप्त आहेत, त्यांचा व आपला आज तीन पिढ्या स्नेह आहे; ते या प्रसंगी आपणाला साह्य करण्यास मागे पुढे पहाणार नाहीत. अवंतिराज तर देवींचे वडील. त्यांचेंहि आपणाला भरपूर साह्य होईल. परंतु काशीराज आणि मगधराज यांचा भरंवसा नाही. एकटा काशीराज आमचें कांहीं एक वांकडे करूं शकत नाही. खरी धास्ती अशी मगधराजाचीच वाटते. म्हणून आरुणीशी गांठ घालण्यापूर्वी मगधाकडील आपल्या सरहद्दीचा पक्का बंदोबस्त करणे अवश्य आहे. यासाठी महाराजांना माझी अशी नम्र विनंति आहे की आरुणीच्या हालचालींवर नजर राखण्यासाठी रुमण्वान् यांना अंतर्वेदींत ठेवून आपण लावाणकास जाऊं व तिकडील सरहद्दीचा स्वतःच्या नजरेखाली पक्का बंदोबस्त करूं. मगधराजाला संशय येऊ नये म्हणून मृगयेच्या निमित्ताने तिकडे जाणे बरें. देवी, देवींचे बंधु आणि नर्मसुहृद् वसंतक यांनाहि आपणाबरोबर घ्यावे असे मला वाटते. मृगयेच्या निमित्ताने सरहद्दीवरील जंगलांत संचार करता येऊन जंगलांतील वाटांच्या बंदोबस्ताची तजवीज करता येईल. देवी, देवींचे बंधु व वसंतक ही मंडळी बरोबर असल्याने वत्सराज केवळ आठ पंधरा दिवस विश्रांति घेण्याच्या हेतूनेच लावाणकास आलेले आहेत असें मगधराजाला वाटेल." यौगंधरायणाची ही सूचना वत्सराजाला पसंत पडली. आरुणीच्या हालचालींवर नजर देण्यासाठी रुमण्वानाला अन्तवदीत ठेवून वत्सराज आणि यौगंधरायण हे आपणाबरोबर वासवदत्ता, गोपालक व वसंतक ७२ वत्सराज उदयन - यांना घेऊन लावाणक गांवीं गेले. त्यांच्या परिवारांत लष्करी अधिकारी असे कोणीच दिसत नव्हते. लावाणकांत जाऊन पोचल्यावर अमात्य यौगंधरायणाच्या कारस्थानाला खरी सुरवात झाली. वत्सराज मृगयेसाठी म्हणून जंगलांत गेलेला असतां लावाणकमधील राजवाड्याला आग लावण्यांत आली, आणि देवी वासवदत्ता त्या आगीत जळून मेली अशी बातमी पसरवण्यांत येऊन मगधराजाच्या कानीं ती बातमी जाईल अशी व्यवस्था केली गेली. वासवदत्ता मरण पावली असे कळतांच मगधराज क्षत्रौजा आपली कन्या पद्मावती ही वत्सराजाला द्यावयास तयार झाला. राणी वासवदत्ता सुखरूप होती. वाड्याला आग लावण्यांत आली त्यावेळी ती वाड्यांत नव्हती. तिने राणीचा वेष टाकून ब्राह्मण- स्त्रीचा वेष धारण केला होता आणि ती मगधदेशांत आपल्या भावी सवतीजवळ जाऊन राहिली होती. यौगंधरायणानेच तिला तिकडे पोंचविले होते. तेथे ती आपणाला आवंतिका (म्हणजे अवंतिदेशांतली) असें म्हणवीत होती. पद्मावतीजवळ राहून पद्मावतीच्या स्वभावाचे तिने निरीक्षण केले आणि पुढील आयुष्यात हिचे व आपलें पटायला काही हरकत नाही इतकी आपली खात्री करून घेतली. वत्सराजाला यांतलें कांहींच ठाऊक नव्हते. तो शिकारीहून परत आला तेव्हां वासवदत्ता जळून मेल्याचे त्याला कळविण्यांत आले. तें ऐकून तो दुःखी झाला. यौगंधरायण त्याचे समाधान करूं लागला. असें चाललें असतां मगधराजाकडून एके दिवशी दूत आला आणि त्यानें वत्सराजांना आपली कन्या द्यावयास मगधराज तयार आहेत असें यौगंधरायणाला सांगितले.
वत्सराज उदयन ७३ ......JNIN यौगंधरायणानें वत्सराजाला ते कळविले आणि म्हटले की, " महाराजांना देवी वासवदत्ता वारल्यामुळे किती दुःख होत आहे हे मी जाणतो. परंतु राजाचा मुकुट धारण करणाऱ्या व्यक्तीची राज्यविषयक जी कर्तव्ये आहेत ती पार पाडलीच पाहिजेत. ती पार पाडतांना वैयक्तिक सुखांना आणि दुःखांना बाजूलाच ठेवले पाहिजे. ज्यांत चक्रवर्ति भरत, गांगेय भीष्म, राजा युधिष्ठिर असे थोर थोर पुरुष होऊन गेले तो पौरव राजवंश पुढे चालला पाहिजे आणि तो चालण्यासाठी महाराजांनी आपल्या द्वितीय विवाहाला संमति देणे हेच योग्य होईल असे मला वाटते. आरुणिसारखा प्रबळ शत्रु पौरवराज्याच्या सीमेवर येऊन बसला आहे. त्याचा निःपात करण्यासाठी मगधराजाची मदत मिळाली तर तीहि आपणाला हवीच आहे. मगधराज आपला आप्त झाला म्हणजे आपणाला तो मदत केल्यावांचून राहणार नाही. पौरव राज्याचें तेणे करून हितच होणार आहे. महाराजांना मी अधिक कांहीं सांगावे असे नाही. महाराज सर्व जाणतातच. " ज्यांत पौरवराज्याचे हित असेल तें मला अप्रिय असले तरी राज्यहिताकडे लक्ष्य देऊन मी मोठ्या आनंदाने करीन." वत्सराज म्हणाला, " पण आर्य यौगंधरायण, एक मात्र तुम्हांला मी सांगतों, देवी वासवदत्तेला मी विसरणे केव्हांहि शक्य नाही. यौगंधरायणाने मगधराजास कळविलें की " मगधराजकन्येचें पाणिग्रहण करण्यासाठी आजपासून सातव्या दिवशी वत्सराज राजगृहाला येतील. आपण सर्व सिद्धता करावी. वत्सराज विवाहविधि संपतांच स्वराज्यांत परत येतील. पारसीक शत्रु समीप असल्यामुळे त्यांना राजगृह येथे अधिक काळ रहातां येण्यासारखें नाहीं. , ७४ वत्सराज उदयन सातव्या दिवशी वत्सराज यौगंधरायणासह राजगृहास गेला आणि तेथें वत्सराज आणि पद्मावती यांचा विवाह झाला. विवाह पार पडतांच यौगंधरायणाने मगधराजाकडून अग्निसमक्ष अशी शपथ घेवविली की " वत्सराजाशी मी इतःपर वैर करणार नाही." विवाह झाला त्याच दिवशी वत्सराज आणि यौगंधरायण हे पद्मावतीला घेऊन राजगृहाहून निघाले. पद्मावतीबरोबर आवंतिकाहि निघाली. लावाणकाला येऊन पोंचतांच आवंतिका ही राणी वासवदत्ता म्हणून प्रकट झाली ! वत्सराज आश्चर्यचकित झाला. पद्मावतीला आपणाकडे कनिष्ट राणीचे पद आले म्हणून वाईट वाटावयाचे, परंतु तसे ते वाटले नाही. वासवदत्तेवर तिचे प्रेम जडले होते. तिला ती आपल्या वडील बहिणीप्रमाणे मानूं लागली. आपल्याकडे आपल्या मुलीपाशी आवंतिका म्हणून जी तरुण मुलगी राहिली होती ती वत्सराजाची स्त्री वासवदत्ता होती व लावाणकास जातांच ती प्रकट झाली हैं मगधराजाला कळतांच या मंडळीने आपणाला फसवलें हैं तो समजून चुकला. परंतु मुलीचे लग्न होऊन गेल्यामुळे त्याला त्या बाबतीत आतां कांहीं करता येण्यासारखे नव्हतें. वत्सराजाला त्याने कळविलें की " आमची फसगत झाली! आपणाला मुलगी दिली म्हणून पश्चात्ताप करण्याची पाळी आम्हांवर आणू नका! इतकें तरी आतां करा म्हणजे पुष्कळ झालें ! पण मगधराजाला पडलेली काळजी त्याच्या मुलीनेच दूर केली. पद्मावतीने मगधराजाला कळविलें की " आपण व्यर्थ कष्टी होऊ नका. आर्यपुत्रांचे माझ्यावर प्रेम आहे आणि वासवदत्ताहि माझ्याबरोबर अगदी सख्ख्या बहिणीप्रमाणे वागते." " वत्सराज उदयन " हे कळतांच मगधराज संतुष्ट झाला आणि “वासवदत्तेलाहि मी आपली कन्याच समजतों !” असें म्हणाला. अशा रीतीने मगधराजाला आपलासा करून घेतल्यावर आरुणीच्या पारिपत्याचा प्रश्न यौगंधरायणाने तांतडीने हाती घेतला. 'मगधराजाला आम्ही आपलासा करून घेतला आहे' असे त्याने चंडमहासेनाला कळविलें. चंडमहासेनाकडून उत्तर आले की “ आतां वेळ गमावू नका. लवकर उद्योगाला लागा. गंगायमुनांमधील प्रदेशामध्ये आरुणीला शक्य तितकें आंत ओढून ध्यावे, त्याने भारतवर्षांतील जे लोक आपल्या नोकरीला ठेवलेले आहेत त्यांना फितूर करावे आणि मग त्याच्यावर एकदम सर्व बाजूंनी हल्ला करून त्याचा फडशा उडवावा असा त्याच्याविरुद्ध जूट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा विचार ठरला. आरुणि हा पौरव राज्याच्याच सीमेवर तळ देऊन राहिल्यामुळे पुढे होणारें युद्ध हे मुख्यत्वेकरून आरुणि आणि वत्सराज उदयन यांजमधील युद्ध होते आणि त्या युद्धांत भाग घेणारे इतर सत्ताधारी हे वत्सराजाचे साह्यकर्ते होते. वत्सराजाकडे इतर राजांचे पुढारीपण अशा रीतीने आपोआपच येत होते. यौगंधरायणाला तें इष्ट होते आणि वत्सराजाकडे एकदां आलेले पुढारीपण पुढेहि टिकवून धरावयाचे हा त्याचा डाव होता. यौगंधरायणाचे आणि चण्डमहासेनाचे हुशार हेर आरुणीच्या देशी सैन्यांत फितुरी पेरूं लागले. मगधराज आपलें सैन्य सिद्ध करूं लागला. चण्डमहासेनाने आपल्या सैन्याची सिद्धता केली. कोसलराजानेहि आपलें सैन्य हालविलें.
वत्सराज उदयन 1. ^ , , , .NIV" Vvn मगधराज कोसलराज आणि वत्सराज यांची गजदळे मोठी होती. अवंतिराजाचे अश्वदळ मोठे होते. आरुणिपाशीहि अश्वदळ मोठे होते. गजदळ त्याच्यापाशी मुळीच नव्हते म्हटले तरी चालेल. आपल्या सैन्यांत शāनी फितूर पेरला असेल अशी आरुणीला कधी शंकादेखील आली नाही. हखामणी सम्राटांच्या सेनासागरांत भारतीय, ग्रीक, पारसीक, बावेरुवीय, माद, पार्थव, अर्मिनीय वगैरे भिन्न भिन्न राष्ट्रांतलेच लोक होते. त्यांनी हखामणींना आजवर जे विजय मिळवून दिले त्या विजयांच्याच धुंदीत अजुन सेनापति आरुणि होता. भारतीय राजांच्या गजदळांची त्याला मुळीच भीति वाटत नव्हती. आतांपर्यंत त्याचा हत्तींशी जो थोडा बहुत संबंध आला तो पंजाबांतील हलक्या प्रतीच्या हत्तींशी आला; आणि तेवढ्यावरूनच गजदळांविषयी त्याने आपले मत बनविलेलें होतें. आपण ज्या राजेरजवाड्यांकडे आणि इतर सत्ताधाऱ्यांकडे खलिते रवाना केले त्यांतील एकदेखील आपल्या स्कंधावारांत येऊन हजर झाला नाही म्हणून सेनापति आरुणि संतप्त झाला. आर्यावर्तातले सर्व सत्ताधारी त्याला भयंकर राजद्रोही वाटले. या भयंकर राजद्रोह्यांचे पारिपत्य करणे हे दारयवहू महाराजांचा एकनिष्ठ बद्धक या नात्याने आपलें पवित्र कर्तव्य होय असे त्याच्या मनाने घेतले. या भयंकर राजद्रोह्यांपैकी प्रत्येकाला जिवंत पकडून त्याचे मी नाककान कापीन, त्याचे डोळे फोडीन, जीभ छाटीन, आणि त्याच्याच नगरांत त्याच्या प्रासादापुढे त्याला मी सुळी देईन अशी त्याने प्रतिज्ञा केली. हखामणी सम्राटांपूर्वीचे असुर राजे अपराध्यांना जिवंत सोलीत असत. हखामणी सम्राटाशी द्रोह करणारांना ती आसुरी शिक्षा दिल्यास वावगे होणार वत्सराज उदयन ७७ नाहीं असहि एकवार त्याच्या मनांत आले. पण असली शिक्षा देण्याचा अधिकार आपणास नाहीं या जाणीवेनेच तो त्या शिक्षेचें पुनरुज्जीवन करण्यास धजला नाही. पारसीकसेनापति आरुणीचा लष्करी तळ आणि पौरवराज्य यांच्या दरम्यान यमुनानदी होती. पौरवराजा हा एक बडा गवय्या आहे असे आरुणीने ऐकलें होतें. गवय्या हा लढवय्या कचितच असतो असा त्याचा समज होता. तथापि पौरवराजाचा सेनापति जर चांगला हुशार असला तर आपणाला तो लवकर दाद देणार नाहीं; म्हणून पौरवराज्याच्या लष्करी सामर्थ्याची प्रथम थोडी चांचणी घेऊन पहावी असा त्याने विचार केला. त्याने आपल्या सैनिकांच्या टोळ्या पौरवराज्यांत लूटफाट करण्यासाठी पाठविण्यास सुरवात केली. त्या टोळ्यांनी पौरवराज्यांत शिरून कोठे लुटालूट केली, कोठे मारहाण चालविली आणि कोठे रक्तपातहि केला. तथापि त्या टोळ्यांना म्हणण्यासारखा प्रतिकार असा कोणीच केला नाहीं. पारसीकसैनिकांना पाहून पौरवराज्यांतले रहिवासी पळ काढीत नि रानावनांतून दडून बसत. पारसीकसैनिकांच्या कोठे कोठे पौरव- सैनिकांबरोबरदेखील चकमकी झाल्या. परंतु प्रत्येक चकमकीत पारसीक सौनिकच विजयी झाले आणि पौरवसैनिक जीव घेऊन पळण्याच्या कामांत मात्र पटाईत दिसले ! यमुनाकांठानजीकच्या पौरव मुलखांत धुमाकूळ घालून परत येणाऱ्या पारसीकटोळ्यांचे नायक वेळोवेळी सेनापति आरुणीकडे जे वृत्तांत सादर करीत त्यांवरून त्या पारसीकसेनापतीचा असा ग्रह झाला की पौरवराज्यांतले लोक पांचनदाइतपतदेखील शूर नाहीत.
वत्सराज उदयन . " त्यांना आपण तेव्हांच जिंकू ! " आरुणि उल्हासून म्हणाला " आणि आमचा खलिता न मानणाऱ्या त्यांच्या गवयी राजाला : त्याला बदसल्ला देणाऱ्या त्याच्या प्रधानाला नि सेनापतीला पौरवांच्य राजधानीत राजवाड्यापुढे सुळी देऊ ! असें केलें म्हणजे हिंदाबांती सगळ्या राजांना आमची चांगलीच दहशत बसेल आणि लोटांगणे घालीत ते आपसुख आमच्यापुढे येतील ! " आपल्या गैरहजेरीत उजयिनीच्या राजाने मथुरेवर हल्ला करण्या धाडस केलेच तर त्याची खोडकी जिरविण्यासाठी म्हणून आरुणी कांहीं सन्य मथुरानगरीपाशी ठेवून दिले, त्याच्यावर आपला एक भरवशाचा अधिकारी नेमला, आणि बाकीचे सर्व सैन्य आपणाबरोब घेऊन त्याने यमुनानदी ओलांडली. पौरवांचा अंतर्वेदींतील मुलर काबीज करीत करीत मोठ्या झपाट्याने तो आग्नेयीस चालला लवकरच तो कौशांबीवर येऊन थडकणार असा सुमार दिसू लागला परंतु पार्सदेशाच्या महापराक्रमी महाराजाचा तो हावभरी सेनापति जसजसा पुढे जात होता तसतसा तो आणि त्याचे सैनिक हे शत्रूच्य जाळ्यांत अधिकाधिक गुंतत होते. अवंतिराज्य आणि मथुरेच्या शूरसेनांचे राज्य यांच्या दरम्यान अरण्य होते. आरुणि अंतर्वेदीत घुसला तेव्हापासूनच अवंतिराजाचे सैन्य सेनापति शालंकायनाच्या नेतृत्वाखाली त्या अरण्यांतून हल हलके मथुरेकडे सरकत होते. आरुणि पूर्वेकडील राजांशी लढण्यांत गुंतलेला असतांना मथुरा येथील त्याच्या ठाण्याचा पार विध्वंस करावा सिंधुपलीकडील पारसीकसाम्राज्य व आरुणि यांजमधील दळणवळण तोडावें, आणि मथुरेत पुन्हा शूरसेनांची स्थापना करावी अस वत्सराज उदयन ७९ अवंतिराज चंडमहासेन याचा डाव होता. त्याचा हा डाव वत्सराज, मगधराज आणि कोसलराज या तिघांनाहि पसंत होता. अंतर्वेदींत कौशांबीच्या वायव्येस कांहीं कोसांच्या अंतरावर वत्सराजाने सोयीस्कर असें एक ठिकाण पाहून ठेवले होते. पारसीक- सेनापतीला फसवून त्या ठिकाणी आणतां आलं तर तेथें तो आणि त्याचे सैन्य यांचा पूर्णपणे फडशा पाडतां येईल अशी वत्सराज उदयनाला खात्री वाटत होती. पारसीकसेनापतीला त्या ठिकाणी आणण्याचे काम वत्सराज उदयनाचा सेनापति रुमण्वान् याने आपल्या आंगावर घेतले होते, आणि तें काम तो मोठ्या कुशलतेने बजावीत होता. वत्सराज उदयनानें पसंत करून ठेवलेल्या ठिकाणाच्या आग्नेयीस वत्सराजाचे शेलके सैन्य होते आणि तें सारें खास वत्सराजाच्या हुकमतीखाली होते, त्या ठिकाणच्या ईशान्य बाजूला मगधराजाचें सैन्य होते. त्या सैन्यावर मगधाचा युवराज बिंबिसार ऊर्फ दर्शक हा मुख्य अधिकारी होता. त्या ठिकाणाच्या वायव्येस गंगेपलीकडे कोसलराजाचें सैन्य होते. या तीन सैन्यांच्या मध्ये पारसीकसेनापतीला त्याच्या सैनिकांसह ओढून आणण्याची कामगिरी रुमण्वानाला पार पाडावयाची होती. रुमण्वानाने आपले सैनिक पारसीक सेनापतीच्या तोंडावर ठेवले होते. कोठेहि गाडून उभे न राहतां धांवती लढाई देत देत आरुणीला सारखें पुढे पुढे ओढीत आणावयाचे हे त्याचे काम होते; आणि हे काम ते समाधानकारक रीतीने करून दाखवीत होते. पारसीक- सेनापति आहाण हा त्यांच्याकडून पुढे पुढे ओढला जात असतांना वत्सराज उदयन असें समजत होता की आपण पौरवराजाच्या शेंदाड शिपायांना पिटाळीत चाललों आहोत आणि लवकरच पौरवराजधानीवर पारसीकांचा विजयी झेंडा फडकावयास लावण्याचे श्रेय आपणास लाभणार आहे ! कोसलराजाचें सैन्य गंगापार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाच्या पुढे आरुणि निघून जातांच तें सैन्य गंगा तरून अंतर्वेदीत आले आणि त्याने आरुणीचा मागे जाण्याचा मार्ग अडवून धरला. इष्ट त्या ठिकाणापर्यंत आरुणि पुढे ओढला जातांच रुमण्यानाने पूर्वी ठरल्याप्रमाणे वत्सराज आणि मगधाचा युवराज यांजकडे स्वार पिटाळून त्यांना कळविलें की पारीक शत्रु इष्ट त्याच स्थानी प्राप्त झालेला आहे. त्याच्या पदरी असलेले सर्व भारतीय सैनिक आपणाला अनुकूल आहेत. युद्धाला आरंभ होतांच ते आपणाला मिळतील आणि पारसीकांवर हत्यार चालू करतील. भारतवर्षाला राहूप्रमाणे ग्रासणाऱ्या या परकीय शत्रूचे पारिपत्य करण्याचा समय हाच आहे. याप्रमाणे सूचना मिळतांच वत्सराज आणि मगधाचा युवराज हे आपापल्या सैन्यासह पारसीकांवर चाल करून निघाले. रुमण्वानाच्या सैनिकांना आतां आपली युद्धपद्धति बदलणे अवश्य झाले होते. रुमण्वानाचे सैन्य पळत पळत लढण्याचे सोडून रणांत आतां गाडून उभे राहिले होते आणि शत्रूशी प्राणपणाने लढत होते. ज्यांना आपण पळपुटे समजत होतो तेच लोक आतां आपणाबरोबर निकराने लढावयास उभे राहिले आहेत असे दिसतांच आरुणीला मोठे आश्चर्य वाटले. तितक्यांतच त्याचे भारतीय सैनिक त्याच्यावर वत्सराज उदयन ८१ ... स्वतःला उलटले आणि त्याच्या परदेशी सैनिकांवर तुटून पडले. त्याच्या सैन्याच्या उजव्या बगलेवर वत्सराजाचा हल्ला झाला आणि डाव्या बगलेवर मगधाच्या युवराजाचा हल्ला झाला. आपणाला शत्रूनी फसविलें, मोठे हुशार समजणारे आपण शत्रूकडून फसविले गेलों, आणि संकटांत सांपडलों, याची आरुणीला आतां जाणीव झाली. तथापि तो डगमगून जाणारा नव्हता. आपल्या पारसीकादि परदेशी सैनिकांना तो धीर देऊ लागला आणि शत्रूबरोबर स्वतः लढू लागला. एकाएकी त्याच्यासमोर वत्सराजाचा 'विजयकुंजर' नामक हत्ती आला. दारुणकर्मदक्ष आरुणे!” हत्तीवरील हौद्यांत सजचाप असलेला वत्सराज त्याला म्हणाला, उभा रहा ! उभा रहा " तूं कोण आहेस ? आरुणीने त्याला विचारलें. “पौरवांचा राजा उदयन म्हणतात तो मी !” वत्सराज उत्तरला. " तूं लढवय्या नाहींस ! गवय्या आहेस ! " गवय्यांबरोबर आपण लढत नसतों ! माझ्या राज्यावर तूं चाल करून आलास! वत्सराज म्हणाला, माझ्या शेकडों लोकांचे तूं नाहक प्राण घेतलेस! आणि माझ्याबरोबर लढत नाही म्हणतोस ? हे तुझें म्हणणे कोण ऐकेल ? तूं लढ अगर नको लढूं, आम्ही पौरव या संपूर्ण भारतवर्षाचे पुरातन काळापासून देवनिर्मित रक्षक आहोत. भारतवर्षाची यत्किंचित् देखील कोणी आगळिक केलेली आम्हांला खपत नाहीं. आगळिक करणाराचे शासन करणे हे आम्ही आमचे पवित्र कर्तव्य समजत आलेले आहोत. तूं या भारतवर्षाची नुसती आगळिक नव्हे, तर घोर असे अनेक अपराध आरुणि म्हणाला, " ८२ वत्सराज उदयन कलेले आहेस, आणि त्या घोर अपराधांबद्दल तुला देहान्त प्रायश्चित्त देण्यासाठी मी येथे प्राप्त झालेला आहे, समजलास ? माझ्या हातून आज तूं जिवंत सुटूं शकत नाहींस ! आरुणि यावर काही बोलला नाही. एक तीक्ष्ण बाण त्याने वत्सराजावर उत्तरादाखल सोडला ! वत्सराजाच्या कवचावर आदळून तो बाण भूमीवर पडला. " गवय्याशी न लढण्याचा तुझा निश्चय तूं मोडलास तर ! " वत्सराज हंसून म्हणाला, आणि आरुणीवर त्याने शरवृष्टि चालू केली. वत्सराज आणि आरुणि यांच्या युद्धांत वत्सराजाने अखेरीस तीक्ष्ण धारेचा एक अर्धचंद्र बाण सोडून त्या पारसीकसेनापतीचा शिरच्छेद केला व आपली प्रतिज्ञा शेवटास नेली. संस्कृत भाषेमध्ये असुरवाचक असे जे शब्द आहेत त्यांतील 'पूर्वदेव' आणि 'सुरद्विष्' हे शब्द पारसीकांना लागू पडणारे आहेत. पारसीक लोक प्राचीन काळी ईश्वरास · देव ' (दएव) असे म्हणत असत. पुढे त्यांच्यावर असुरोपासक असुर लोकांचे वर्चस्व झाले. त्या वर्चस्वामुळे पारसीकांनी ईश्वरास · देव' म्हणण्याचे सोडून दिले आणि ' अहुर मज्द ' म्हणजे — असुर महस्' असे ते ईश्वराला म्हणू लागले. देवाला 'असुर' म्हणावयास सुरवात केल्यामुळे त्यांच्या भाषेत देव शब्दाला राक्षस असा अर्थ प्राप्त झाला ! पुढील काळांतील ख्रिस्ती आणि महंमदी संप्रदायांच्या लोकांप्रमाणे धर्मप्रसारार्थ दुसऱ्या लोकांचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा नाद पारसकांना लागलेला नव्हता. आपल्या सम्राटाची मर्जी एवढेच भारतवर्षावर त्यांनी स्वारी करण्याला कारण होते. परंतु सम्राटाची मर्जी राखण्यासाठी त्यांनी भारतवर्षावर , , .
वत्सराज उदयन ८३ .... v....... केलेली स्वारी त्यांना पुरी भोंवली. अंतर्वेदींतील लढाईच्या घनचक्करीत त्यांचा सेनापतीच मारला गेला आणि शत्रूकडून त्यांची लांडगेतोड करण्यात आली. रणांतून पळ काढून ज्यांनी मागें मथुरेकडे जाण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटेंत कोसलराजाच्या लोकांनी धरून कापून काढले. अन्तर्वेदीमध्ये पारसीकांचा संहार होत असतां तिकडे अवंतिराजाच्या सेनापतीने पारसीकांच्या मथुरा या लष्करी केंद्रावर हल्ला चढविला आणि तेथील सैनिकांचा फडशा उडविला. मथुरेत पुन्हा शूरसेनांची स्थापना झाली. तथापि एवढ्यानेच पारसीकांचा पुरता बंदोबस्त होण्यासारखा नव्हता. सिंधुनदापासून यमुनेपर्यंत त्यांनी जो मुलुख काबीज केलेला होता त्या मुलखांतील त्यांचा अंमल पार उखडून टाकणे, तिकडील पूर्वीच्या राजघराण्यांची त्यांच्या पूर्वपदावर पुन्हा स्थापना करणे आणि त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेणें अवश्य होते. हे करण्यासाठी वत्सराज उदयन आणि त्याचे साह्यकर्ते यांना पंजाबाकडे वळावें लागले. उदयनाने तेथील जुन्या सत्ताधारी घराण्यांचा उद्धार करून त्यांना संरक्षणाची हमी दिली व पंजाबावर आपले वर्चस्व स्थापलें. वत्सराज उदयनाचा हाच उत्तरदिग्विजय होय. उदयन-पद्मावती विवाह आणि उदयनाने केलेला आरुणीचा वध या उदयनचरित्रांतील प्रसंगांवर ' स्वप्नवासवदत्त ' नामक विख्यात नाटकाची उभारणी झालेली आहे. भास कवि हा या नाटकाचा कर्ता होय. भास कवीच्या एकंदर नाटकांमध्ये ' स्वप्नवासवदत्त' हे नाटक उत्कृष्ट म्हणून समजण्यांत येते. .
८४ वत्सराज उदयन ९-उदयनाचा दिग्विजय पारसीकांच्या स्वारीचा पुरता बन्दोबस्त करण्याच्या उद्योगांतच वत्सराज उदयनाच्या आधिराज्याचा उदय झालेला होता; आणि उत्तर दिशा त्याने जिंकलेली होती. तथापि आपल्या प्रभूने एवढ्यावरच संतुष्ट न राहतां पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या दिशा देखील जिंकाव्या व धर्मराज युधिष्ठिराप्रमाणे भारतचक्रवर्ति व्हावे अशी अमात्य यौगन्धरायणाची इच्छा होती. परंतु यौगन्धरायणाची ही इच्छा पूर्ण होणें वत्सराजाचे श्वशुर अवंतिराज आणि मगवराज यांच्या अनुकूलतेवरच अवलंबून होते. कारण अवंतिराज आणि मगधराज हेच दोघे विशेष प्रबल असे सत्ताधारी होते. ते दोघे एक झाल्यास त्यांच्यापुढे इतरांचे काही चालण्यासारखे नव्हते. ही वस्तुस्थिति यौगंधरायण जाणून होता. पारसीकांच्या स्वारीचे संकट सर्वांवरच असल्यामुळे पारसीकांचे पारिपत्य करण्याच्या कामी उदयनाच्या श्वशुरांनी उदयनाला साह्य कलें यांत कांहींच नवल नव्हते. तसे ते न करते तरच नवल होतें. उदयनाने उत्तर दिशा आपल्या वर्चस्वाखाली आणली म्हणूनदेखील त्यांना वाईट वाटण्याचे कारण नव्हते. पंजाबाकडे त्यांचे कसलेच हितसंबंध नव्हते. आपल्या जावयाने पांचनदांना आपल्या संरक्षणाखाली घेऊन त्या बाजूकडे म्लेच्छांच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱ्यांना तोंड देण्याची नसती जबाबदारी मात्र आपल्या शिरावर घेतली असेंच उदयनाच्या उत्तरदिग्विजयासंबंधी त्यांचे मत झालेले असेल ! उदयनाने पूर्व, दक्षिण आणि पश्चिम या दिशा जिंकावयास निघणे हे मात्र त्यांच्या हितसंबंधांच्या आड येणारे होते. अवंतिराज दक्षिणापथांतील वत्सराज उदयन ८५ अश्मकांवर आपले वर्चस्व स्थापण्याच्या उद्योगांत होता आणि पश्चिमेस सिंधुनदापर्यंत त्याला आपल्या आधिराज्याचा विस्तार करावयाचा १ अश्मक हे 'सकलदक्षिणापथेश्वर' शातवाहनांपूर्वीचे दख्खनचे राजे होत. ते कौरव-पांडवांच्या वेळी होते आणि उदयनाच्या वेळींहि होते. त्यांच्या राज्याला 'अश्मकविषय ' असे म्हणत. अश्मकविषय म्हणजे स्थूल मानाने आजचा महाराष्ट्र होय. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर या विद्वान् संशोधकांच्या मते वाल्मीकिरामायणांत रावणाची बहीण शूर्पणखा हिची जहागीर म्हणून जनस्थानांत जी एक राक्षसवसाहत दाखविलेली आहे त्या वसाहतींतील लोकांतून पुढील काळांत ' अश्मक' हे राजघराणे निघाले. त्याचे राक्षसी आचारविचार सुटलेले असल्यामुळे त्याची कोणी राक्षसांत गणना केली नाही. रामायणाच्या उत्तरकांडांत राक्षसांसंबंधींच्या कित्येक प्राचीन आख्यायिका संग्रहीत झालेल्या आहेत. त्या विचारांत घेतां डॉ. केतकरांचे मत बरोबर दिसते. त्या आख्यायिकांवरून लंकेत प्रथम सालकटंकट राक्षस राज्यकर्ते होते. ते शत्रुपुढे निभाव लागत नाही असे पाहून समुद्रापलीकडे निघून गेले. नंतर काही काळाने त्यांच्यांतला सुमाली नामक एक राक्षस समुद्रापलीकडून लंकेत अगर मलबारांत परत आला व लंकेत पुन्हा राक्षसराज्य स्थापण्याच्या उद्योगाला लागला. त्याच्या कन्येचा पुत्र रावण याने लकेत पुन्हा राक्षसराज्याची स्थापना केली. या रावणाला शूर्पणखा नांवाची हीण होती. रावणाने तिच्या नवऱ्याशी युद्ध करून त्याला युद्धांत मारले, त्याचे मथुरेचे ( म्हणजे मदुरेचे ) राज्य आपल्या राज्यांत सामील केले व बहिणीला दूर जनस्थानची जहागीर देऊन ठेवले. या जहागिरीच्या बंदोबस्तासाठी जे सैन्य होते तें खास रावणाचेच होते. शूर्पणखेचे नव्हते. लंकेतून निघून गेलेले सालकटंकट राक्षस समुद्रापलीकडे अरबस्थान व सोमालीलंड येथे गेलेले असले पाहिजेत. तिकडून इकडे परत आलेला सुमाली म्हणजे वस्तुतः एखादा सोमाली असला पाहिजे. रावणाने लंकेंत राक्षसराज्याची पुन्हा स्थापना केली तेव्हां त्याच्या मदतीला समुद्रापलीकडून पुष्कळ राक्षस आलेले होते. त्यांतच अश्मकांचे पूर्वज असावेत, व त्यांची नेमणूक पुढे जनस्थानांत झाली. आफ्रिकेंतील अबीसीनिया देशांतले आजचे ' अमेरिक' व इकडे होऊन गेलेले अश्मक हे मूळात एकच असले पाहिजेत.
८६ वत्सराज उदयन , होता. मगधराजाला अंग, वंग, पौण्डू , ओडू आणि विदेह हे देश आपल्या वर्चस्वाखाली आणावयाचे होते. या दोघां बलिष्ठ राजांना अनुकूल करून घेतां आलें तरच वत्सराजाचा दिग्विजय पूर्ण होऊ शकेल हे यौगंधरायण ओळखून होता. त्याने असा विचार केला की अवंतिराज आणि मगधराज या दोघांपुढे वत्सराजाच्या दिग्विजयाची संपूर्ण योजना मांडावयाची आणि त्या दोघांचे तिच्यासंबंधी काय म्हणणे पडते हे पहावयाचे. या संबंधांत कोसलराजाचेंहि मत अजमावण्याचे त्याने ठरविले. कारण जुन्या समजुतीप्रमाणे ऐल आणि ऐक्ष्वाक या दोन वंशांतलेच पुरुष काय ते चक्रवर्ति पदाचे अधिकारी समजले जात. वत्सराज उदयनाचा मूळ पुरुष पूरु हा ऐल वंशांतला असल्यामुळे वत्सराज उदयनदेखील ऐल वंशांतलाच होता आणि त्यामुळे त्याने चक्रवर्ति व्हावयाचें मनांत आणले तर त्या पदाला तो अनधिकारी आहे असे इतर राजांना म्हणतां येण्यासारखे नव्हते. कोसलचा राजा प्रसेनजित् याची गोष्ट तशी नव्हती. तो ऐक्ष्वाक म्हणजे इक्ष्वाकूच्या वंशांतला असल्यामुळे त्याला स्वतःला चक्रवर्ति होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतां येण्यासाखी होती, आणि तशी तो ती बाळगता तर वत्सराज उदयनाला चक्रवर्ति पद प्राप्त करून घेण्याच्या मार्गात तो एक प्रतिस्पर्धी म्हणून आडवा येता. यासाठी त्याचेंहि मत अजमावण्याची अमात्य यौगंधरायणाला आवश्यकता वाटली. कोसलराज, अवंतिराज आणि मगधराज या तिघांना वत्सराजाच्या दिग्विजयाची योजना कळवून त्यांचे तिच्या संबंधींचे मत काढून घेण्यासाठी यौगंधरायणाने तिघांकडे तीन हुशार दूत रवाना केले. कोसलराजाने कळविले की, “ भारतवर्षांतील जुनी राजघराणी वत्सराज उदयन ८७ vvvN सारखी मावळत आहेत, आणि नवी नवी घराणी सारखी उदय पावत आहेत. ऐक्ष्वाक आणि ऐल ही दोनच प्राचीन राजघराणी आजवर टिकाव धरून राहिलेली आहेत. त्यांची परस्परांशी स्पर्धा असावी हे मला योग्य वाटत नाहीं. चक्रवर्तीपदाची इच्छा मी धरली तरी ती सफल होणे दुरापास्त आहे हे मी पूर्णपणे जाणतों. अवन्तिराज, मगधराज यांच्यासारखे प्रबळ राजे ज्यांचे आप्त आहेत त्या वत्सराजांनी चक्रवर्तिपदाची इच्छा धरली तर ती मात्र सफल होणे शक्य आहे. तरी आपल्या प्रबल आप्तांना अनुकूल करून घेऊन त्यांनी ती अवश्य सफल करावी. नुकताच पारसीकांनी इकडे येऊन जो धूमाकूळ घातला त्यावरून आपणाला जर कांहीं बोध घेतां येण्यासारखा असेल तर तो हाच की परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारतवर्षांतील सर्व क्षत्रियांची एका पुढाऱ्याच्या नेतृत्वाखालीं जूट झाली पाहिजे. सर्व क्षत्रियांचे पुढारी व्हावयाला ऐल हेच सर्वतोपरी लायक आहेत. चक्रवर्ति जरासंव हा ऐलच होता. त्याच्यामागून चक्रवर्ति झालेला पंडुपुत्र युधिष्ठिर हादेखील ऐलच होता, आणि युधिष्ठिर वनवासांत असतांना चक्रवर्तिपदाचा उपभोग घेणारा धार्तराष्ट्र दुर्योधन हाहि पण ऐलच होता. शाकलाधिपांच्या आगमनापर्यंत भारतचक्रवर्तिपद ऐलांकडेच होते. शाकलाधिपांचा उच्छेद करून आपलें चक्रवर्तिपद पुन्हा संपादन करण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्राणाचा बलि दिला ते बृहद्रथपुत्र सहस्रानीक महाराज ऐलच होते. वत्सराज उदयन हे त्यांचेच पराक्रमी पौत्र आहेत. भगवान् विष्णूनें पापी राहूचा त्याचप्रमाणे वत्सराजांनी पारसीकसेनापति दारुणकर्मदक्ष आरुणि याचा शिरच्छेद करून आपला पराक्रम सर्व जगाला दाखविलेला आहे. भारतचक्रवर्ति ८८ वत्सराज उदयन व्हावयाला वत्सराजच सर्वस्वी योग्य असे आहेत. पूर्वदिग्विजयाच्या कामीं वत्सराजांना अवश्य तें साहाय्य करावयास मी सिद्ध आहे." अवंतीच्या चण्डमहासेनाने कळविलें कीं, “ वत्सा वासवदत्ता आमची लाडकी; द्रुपदकन्या याज्ञसेनीप्रमाणे भारतसम्राज्ञी होण्याचे भाग्य जर तिला लाभलें तर आम्हांला त्यांत आनंदच आहे. ऐल किंवा ऐक्ष्वाक यांनाच तेवढा चक्रवर्तिपदाचा अधिकार आहे, इतरांना तो नाहीं असें मात्र आम्हांला वाटत नाही. राज्य काय किंवा साम्राज्य काय, जो संपादील त्याचे आहे. मग तो ऐल किंवा ऐक्ष्वाक, असो वा नसो! वत्सराज उत्साही आहेत; उत्साही पुरुषांना असाध्य असें कांहींच नाहीं; साम्राज्यलक्ष्मी उत्साही पुरुषांच्याच भजनी असते; म्हणून चक्रवर्तिपद संपादन करण्याचा उद्योग वत्सराजांनी अवश्य हाती घ्यावा. त्या उद्योगांत आमचे त्यांना साह्य होईलच. मात्र वत्सराजांच्या साम्राज्यांत आमच्या आजच्या मांडलिकांवर आमचाच ताबा रहावा आणि दक्षिणापथांतील कृष्णानदीपर्यंतचा प्रदेश हा आमच्या वर्चस्वाचे क्षेत्र म्हणून समजण्यात यावा. मगधाच्या क्षत्रौजाने कळविलें कीं ॥ पारसीकसेनापतीला रणांगणांत समोरासमोर गांठून आमच्या जामातांनी त्याचा शिरच्छेद केला या त्यांच्या अतुलपराक्रमामुळे भारतवर्षाचे ते आजच चक्रवर्ति झालेले आहेत. चक्रवर्तिपद संपादण्यासाठी त्यांना आणखीं दिग्विजय करण्याची आवश्यकता आहेच असे नाही. आतां इतकें खरें आहे की तरुण मंडळी ही हौशी असते; आणि आमचे जामात तरुण असल्यामुळे हौशी असणे स्वाभाविक आहे. दिग्विजयाच्या मिषाने भारतवर्षांत प्रवास करण्याचीच जर त्यांची हौस असेल तर वत्सराज उदयन ८९ ती वावगी आहे असे कोण म्हणेल ? ती त्यांनी खुशाल पुरवून घ्यावी असेंच आम्हीं म्हणूं ! याकामी त्यांना आमच्याकडून जें साह्य लागेल तें देण्यास आम्ही तयार आहों. त्यांना चक्रवर्ति म्हणून अभिषेक होतांच आम्ही आमच्या मांडलिकांसह त्यांना सार्वभौम म्हणून मान देऊ आणि सार्वभौम या नात्याने त्यांनी केलेल्या आज्ञा मनःपूर्वक पाळू. यांत अंतर होणार नाही. आमचे जामात सार्वभौम झाल्यानंतर त्यांच्या साम्राज्याचे राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी वेगवेगळे भाग करण्यांत येतीलच. त्यांतील महत्त्वाच्या अशा एका भागावर आमच्या शैशुनाग घराण्यांतील राजपुत्राची सम्राटांचा अधिकारी म्हणून नेमणूक व्हावी हे आमचे म्हणणे मान्य करण्यांत आले म्हणजे आमच्या जामातांच्या साह्याला आम्ही केव्हांहि तयार आहोत असे समजून चालावें." अमात्य यौगंधरायणाने कोसलराज, अवंतिराज, आणि मगधराज या तिघांकडून आलेल्या उत्तरांचा नीट विचार केला. शेवटी त्याने असे ठरविलें की या तिघांच्या म्हणण्याला मान्यता देऊन आणि त्यांची मदत घेऊन प्रथम दिग्विजयाचे काम उरकून घ्यावें. आपल्या महाराजांना एकदां चक्रवर्ति म्हणून अभिषेक झाला म्हणजे पौरवांची वरिष्ठ सत्ता खंबीर करण्याच्या उद्योगाला लागतां येईल, आणि एकदां ती सत्ता खंबीर झाली म्हणजे मग दुसऱ्या कोणाला कोणत्याहि प्रकारची गडबड करता येणार नाही. यौगन्धरायणाच्या सूचनेवरून सेनापति रुमण्वानानें पौरव सैन्याची सिद्धता केली. कोसल, मगध व अवन्ति येथील सैन्ये वत्सराजाच्या मदतीला आली. आपलें आणि आपल्या आप्तांचें सैन्य बरोबर घेऊन वत्सराज उदयन , ९० वत्सराज उदयन दिग्विजयासाठी बाहेर पडला. काशीचा राजा संधि साधून पौरवराज्याला वारंवार उपद्रव देत असल्यामुळे वत्सराजाचा काशीराजावर विशेष राग होता. त्याने प्रथम काशीराज्यावरच स्वारी केली. काशीराज युद्धाला उभा राहिला. परंतु वत्सराजाबरोबर असलेल्या प्रचंड सैन्यापुढे त्याच्या सैन्याचा निभाव लागला नाही. अखेरीस तो वत्सराज उदयनाला शरण आला. उदयनाला त्याने करभार दिला आणि त्याचे सार्वभौमत्व मान्य केलें. * वत्सराज उदयन काशीवरून पुढें पूर्वेस कामरूप देशापर्यंत दिग्विजय करीत गेला. कामरूप देशावरून तो खालीं वंग देशांत आला. वंग देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याने आपला विजयस्तंभ उभारला. येथपर्यंत कोसलराजाचे सैन्य त्याच्या बरोबर होतें. पूर्वदिग्विजय पूर्ण झाल्यामुळे तें आतां परत स्वदेशी गेलें. वत्सराजाने पौरव, आवंत्य व मागध सैन्यांसह पुढे कलिंगदेशाकडे कूच केले आणि कलिंगदेशांतील राजांना शरण यावयास लावून त्यांच्यापासून कर म्हणून हत्ती घेतले. पूर्वसमुद्राला अनेक मुखांनी मिळणारी गोदावरी नदी उतरून त्याने दक्षिणेकडील चोलमंडलांत प्रवेश केला. चोलराजधानी कावेरी नदीच्या दक्षिणेस सांप्रतच्या त्रिचनापल्लीजवळ होती. वत्सराजाने कावेरी ओलांडून चोल राजाला जिंकलें आणि तो पश्चिमसमुद्राकडे वळला. मुरला नदीच्या प्रदेशांतील लोकांना नमवून दक्षिणापथांतून तो उजयिनीस आला. ज्या * उदयनाचा मांडलिक बनून काशीराजाने या वेळी आपला बचाव केला खरा, पण जित्याची खोड मेल्याखेरीज कधीच जात नसते. पुन्हा त्याने आपले पूर्वीचे दुष्ट चाळे सुरु केले. तेव्हां वत्सराजाने काशीराज्य खालसा केले. काशीराज्याच्या मुलखाची वत्सराज, कोसलराज आणि मगधराज या तिघांत वांटणी झाली.
वत्सराज उदयन उज्जयिनीत मागें तो बन्दिवान् होऊन आलेला होता त्याच उजयिनीत आतां त्याने राजाधिराज या नात्याने प्रवेश केला. त्याच्या दोन्ही राण्या, वासवदत्ता व पद्मावती या त्यावेळी उज्जयिनींतच होत्या. वासवदत्ता आपल्या माहेरी आलेली होती आणि येतांना आपल्या सवतीला तिने आपल्या वडिलांची ऐश्वर्यसंपन्न राजधानी दाखविण्यासाठी बरोबर आणलें होतें. उज्जयिनीमध्ये चण्डमहासेनाने केलेला सत्कार स्वीकारून वत्सराज उदयन पश्चिमदिग्विजयाला निघाला. त्याने लाटदेशाच्या राजाला आपला मांडलिक बनविले आणि सिन्धुदेशावर स्वारी करून तेथील राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणलें. अशा रीतीने संपूर्ण दिग्विजय करून वत्सराज उदयन कौशाम्बीस परत आला आणि भारतचक्रवर्ति या नात्याने त्याने पुन्हां आपणाला अभिषेक करून घेतला. त्याप्रसंगी त्याने राणी वासवदत्तेचा बंधु गोपालक याला विदेहदेशाचा अधिकारी नेमले आणि पद्मावतीचा बंधु बिंबिसार याला चेदिदेशाचा अधिकारी केले. परंतु बिंबिसार त्या अधिकारावर फार दिवस राहिला नाही. बिंबिसाराचा पिता क्षत्रौजा हा ख्रिस्तपूर्व ५१२ या वर्षी मृत्यु पावला आणि त्यामुळे बिंबिसार हा चदिदेशाचा अधिकारी न राहतां मगधाचा राजा झाला. १०-उदयनाचे साम्राज्य भारतवर्षांतील प्राचीन काळची साम्राज्ये म्हणजे मुख्यतः परकीयांच्या आक्रमणांपासून स्वतःचा बचाव करता यावा या उद्देशाने अस्तित्वात आलेले राज्यसंघ होत. संघामध्ये जितकीं अधिक राज्ये ९२ वत्सराज उदयन , सामील असतील तितकें तें साम्राज्य मोठे असे. सर्वांत बलिष्ठ असा राजा या ' साम्राज्य' संज्ञक राज्यसंघाचा पुढारी असे, व त्यालाच सार्वभौम, सम्राट्, चक्रवर्ति अगर राजाधिराज असें म्हणत. त्याने आपली बलिष्ठता इतर राजांना जिंकून सिद्ध केलेली असे. आपली बलिष्ठता सिद्ध करण्यासाठी एखाद्या चक्रवर्तिपदेच्छु राजाने बाहेर पडणे या प्रकारालाच दिग्विजयार्थ निघणे अशी संज्ञा होती. या दिग्विजयामध्ये मारीन किंवा मरेन अशा प्राणपणाने युद्धे कचितच होत. दिग्विजयाला निघालेला राजा बलिष्ठ आहे असे पाहून कांहीं राजे युद्धाचा प्रसंग न आणतांच त्याचे वर्चस्व कबूल करीत आणि त्याला करभार देत. कांहीं राजे त्याच्याशी युद्ध करून तो खराच बलिष्ठ आहे अशी आपली खात्री करून घेत आणि नंतर त्याचे वर्चस्व कबूल करून त्याला करभार देत. अशा रीतीने हे 'साम्राज्य' नामक राज्यसंघ तयार होत. संघाचा नेता असणारा राजा हा सम्राट्, आणि संघांतील इतर राजे हे त्याचे मांडलिक, अशी स्थिति होती. मांडलिक राजे सम्राटाला करभार देत आणि युद्धांत त्याला ससैन्य मदत करीत. संघांतील प्रत्येक राज्य आपला कारभार स्वतंत्रपणे चालवी. अन्तर्गत कारभाराच्या बाबतीत वरिष्ठ सत्तेचे त्याच्यावर दडपण नव्हते. संघांतील एखादा राजा संघांतून फुटून निघण्यासाठी टपलेला, वारंवार वरिष्ठ सत्तेवर उलटणारा, नेहमी विरुद्धपक्षाशी कारस्थाने करून संघावर बाहेरून संकटें आणणारा असा निघाला तरच त्याचे राज्य खालसा करण्याची पाळी सम्राटावर येई. सम्राट्पदाचा मान बहुत करून ऐल किंवा इक्ष्वाकुवंशांतील राजांकडे असे. वत्सराज उदयनाने स्थापन केलेले साम्राज्य हे याच नमुन्याचे वत्सराज उदयन ९३ .... साम्राज्य होतें. उदयन हा पौरव होता. पौरव हे ऐल वंशांतलेच असल्यामुळे उदयनाला सम्राट्पद मिळाल्यास जुनी परंपरा मोडेल अशी हाकाटी कोणालाच करता येण्यासारखी नव्हती. वास्तविक पाहिले तर शाकलाधिप सम्राट् झाले त्या वेळीच जुनी परंपरा मोडली होती; आणि उदयन पौरव हा सम्राट् झाल्याने जुनी परंपरा पुन्हा चालू होणार होती. शाकलाधिपांच्यापूर्वी पौरवच सम्राट् होते. यामुळे, आणि उदयनाने विशेषतः अवंतिपति व मगधराज या दोन प्रबळ शेजाऱ्यांशी नाते जोडून त्यांना आपलेसे केल्यामुळे तो फारसे प्रयास न पडतां साम्राज्य स्थापन करूं शकला. पारसीकसेनापति आरुणि याला त्याने कंठस्नान घातले त्या वेळीच त्याचा पराक्रम जाहीर झालेला होता. त्यानंतर तो दिग्विजयाला निघाला तेव्हां त्याच्या पराक्रमाची आणखी परीक्षा करण्याचे इतर राजांना तादृश कारण नव्हते. त्यांनी उदयनाचें वर्चस्व मान्य करून त्याला करभार दिला आणि उदयनसाम्राज्य अस्तित्वात आले. उदयनसाम्राज्य कितीहि विस्तृत असले तरी त्यांत सम्राटाच्या खास मालकीचा असा मुलुख थोडाच होता. साम्राज्याचा एकेक विभाग म्हणजे एकेक राज्य होते आणि त्या राज्याचा कारभार तेथील स्थानिक राजा स्वतंत्रपणे पहात होता. करभार आणि जरूर तर युद्धप्रसंगी सैन्याची मदत यांपलीकडे त्या विभागांतून सम्राटाला दुसऱ्या कशाचीहि अपेक्षा करता येण्यासारखी नव्हती. वत्सराज उदयनाशी समकालीन असा जो हखामणी सम्राट् पहिला दारयवहु, त्याचे साम्राज्य वेगळ्या प्रकारचे होते. त्यांत मांडलिक असा एकच राजा होता. हखामणी घराण्यांतला पहिला सम्राट् कुरु याने आपलें राज्य वाढविण्याच्या उद्योगांत असतांना जिंकलेली राज्ये आपल्या ९४ वत्सराज उदयन //AVM . , वर्चस्वाखाली राखण्याचे सोडून ती खालसा करण्याचा सपाटा लावला व त्याचेच अनुकरण त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी केले. हखामणी सम्राट हे स्वतःला 'राजांचे राजे' म्हणवीत असले तरी वस्तुतः ते राजांचे राजे नव्हते. जिंकलेल्या राजांची बिरुदावलि स्वतःला लावण्याची त्यांना खोड होती. त्यांनी जिंकलेला मादभूपति हा राजांचा राजा होता. त्याचे बिरुद 'राजांचा राजा' हे हखामणींनीं धारण केलें इतकेंच. हखामणी हे सर्वराजोच्छेत्ते होते. जिंकलेल्या राजांचे मुलुख ते खालसा करीत असल्यामुळे त्यांचे साम्राज्य म्हणजे विस्तृत असें एक माहाराज्य होते. त्या माहाराज्याचा एकेक विभाग म्हणजे एकेक सुभा होता. हखा- मणींनी नेमलेले सत्रप नांवाचे अधिकारी त्या सुभ्यांचा कारभार पहात. हखामणी-साम्राज्याच्या धर्तीचे साम्राज्य स्थापन करण्याचा उद्योग वत्सराज उदयनाच्या पश्चात् इकडेहि करण्यांत आला, हखामणींचें अनुकरण इकडे प्रथम शैशुनाग करूं लागले, आणि शैशुनागांनी आरंभिलेले कार्य पुढे नंदांनी पूर्ण केले. हखामणींचे अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीने भारतवर्षानंतर चीन देशाकडे आपला मोर्चा वळविला. वत्सराज उदयनाने केलेली साम्राज्य स्थापना म्हणजे पूर्वीच्या पौरव साम्राज्याचे पुनरुज्जीवन होते; आणि पौरवसाम्राज्याचे पुनरुज्जीवन झालें यामुळेच महाभारत या भारतवर्षाच्या राष्ट्रीय ग्रंथाची निर्मिति होऊ शकली. आरंभी हा ग्रंथ म्हणजे एक पद्यबद्ध बखर होती. तीत कौरव- पांडवांच्या युद्धाची हकीगत असून तिचें नांव ' ' असें होतें. 'भाऊसाहेबांची बखर' आणि रघुनाथ यादवकृत 'पानिपतची बखर' या मराठीतील बखरींवरून प्राचीन काळांतील 'जय' नामक बखरीचें जय .
वत्सराज उदयन ९५ . . जय , स्वरूप कशा प्रकारचे असू शकेल याची काहींशी कल्पना होईल. या नामक बखरीत ज्या योद्धयांची नांवे येत होती त्या योद्धयांची व त्यांच्या घराण्यांची माहिती ऐकण्याविषयी लोक उत्सुक असल्यामुळे ती माहिती त्या बखरीतच समाविष्ट करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली व 'जय' बखर वाढविण्यांत येऊन तिला 'भारत' असें नांव देण्यात आले. हा प्रकार उदयनपूर्व काळांत—कदाचित शाकलाधिप घराण्याच्याहिपूर्वी घडून आला. भारत हा सुमारे चोवीस हजार श्लोकांचा ग्रंथ होता. वत्सराज उदयनाने पौरवसाम्राज्याची पुन्हा स्थापना केल्यानंतर या चोवीस हजार श्लोकांच्या भारतामध्ये अनेक उपाख्याने व विविध विषयांची माहिती यांचाहि समावेश करण्यांत येऊ लागला. त्यामुळे चोवीस हजार श्लोकांचे भारत वाढतां वाढतां शेवटी त्याचे लक्ष श्लोकात्मक 'महाभारत' बनले आणि त्याला ज्ञानकोशाची कळा आली ! भारताचे महाभारत बनविण्याची क्रिया पुराणिकाच्या धंद्यावर निर्वाह करणाऱ्या सूतांच्या हातून मुख्यतः झाली. पुराणकथनप्रसंगी चौकस श्रोत्यांना सांगावी लागणारी विविध प्रकारची अवांतर माहिती आपल्या संग्रहामध्ये कोठे तरी एके ठिकाणी असावी या हेतूने त्यांनी हा उद्योग केला. एकदां सुरू केलेला उद्योग पूर्ण करावयाला त्यांना सुमारें अडीच शतकें लागली. सूतांपाशी अनेक पुराणांच्या पोथ्या असल्या पाहिजेत. त्या सोडून भारतांतच त्यांनी इतकी विपुल माहिती समाविष्ट का केली याचे कारण हे की पौरवघराण्यांतला वत्सराज उदयन दिग्विजय करून चक्रवर्ति झाल्यामुळे पौरवांचे नांव सर्वत्र गाजू लागले आणि त्या घराण्यांतील पूर्वीच्या दिग्विजयी वीरांची हकीगत सांगणाऱ्या भारताचे श्रवण ९६ वत्सराज उदयन N "........ ...." करण्याविषयी लोकांची उत्सुकता वाढली. भारतश्रवणालाच जिकडे तिकडे एकाएकी ऊत आला आणि भारतकथनप्रसंगींच विविध प्रकारची अवांतर माहिती श्रोत्यांना पुरविण्याची पाळी सूतांवर वारंवार येऊ लागली. त्यामुळे ते ती माहिती भारतांतच समाविष्ट करूं लागले. भारतवर्षाचा राष्ट्रीय ग्रंथ जो महाभारत, त्याच्या निर्मितीला अशा रीतीने वत्सराज उदयनाचे साम्राज्य कारणीभूत झालेले आहे. अर्थात् महाभारत ही वत्सराज उदयनाच्या साम्राज्याची भारत वर्षाला उदार देणगी आहे. ११-उदयनाचे उत्तर चरित्र भारत वर्षावर हखामणींनी रवाना केलेल्या सैन्याची पूर्णपणे वाताहात होऊन भारत वर्षांतील क्षात्रतेज उदयनसाम्राज्याच्या रूपाने परकीयांच्या आक्रमणाचा समाचार घेण्यासाठी दंड ठोकून उभे राहिले; यामुळे भारतवर्ष जिंकण्याची मनीषा हखामणींना सोडून दणे भाग पडले. पुन्हा केव्हांहि ते भारतवर्षाच्या वाटेला गेले नाहीत. पुढे दारयवहूचा पुत्र क्ष्यार्षा (झझिंस, पहिला; कारकीर्द खिस्तपूर्व ४८५ ते ४६५) याच्या वेळी हखामणींच्या सैन्याने पश्चिमेकडे ग्रीकांच्या हातचा भरपूर मार खाल्ला; आणि तेव्हापासून हखामणीसाम्राज्याला उतरती कळाच लागली. साम्राज्यस्थापनेनंतर चक्रवर्ति उदयन याने पौरवराज्याचा आणि नूतन संपादित साम्राज्याचा सर्व मुलकी कारभार आपल्या यौगंधरायणादि अमात्यांवर टाकला व लष्करीदृष्टया आपले साम्राज्य बलवान् करण्याचे काम तेवढें आपणाकडे ठेवून आपला काळ तो बागबगीचे तयार वत्सराज उदयन करणे, फुलझाडे व फळझाडे यांच्यावर नाना प्रकारचे प्रयोग करून पहाणे यांमध्ये, आणि गायन, वीणावादन, काव्यशास्त्रविनोद, व मृगया यांत घालवू लागला. वासवदत्तेचा ज्येष्ठ भ्राता गोपालक हा विदेहदेशांत आपल्या अधिकाराच्या जागी न राहतां कौशाम्बी येथे येऊन राहिला. तो अर्थशास्त्र जाणणारा होता. साम्राज्याची एकंदर व्यवस्था लावण्याला आणि पाहण्याला त्याच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञाची गरज भासल्यामुळे अमात्य यौगन्धरायणाने त्याला कौशाम्बी येथे मुद्दाम बोलावून घेतलें होते. कौशाम्बीत राहून गोपालक हा अमात्याचे काम करीत होता. तथापि त्याला अमात्य असे कोणी म्हणत नसे. त्याची पदवी विदेहराज अशी होती. प्रद्योत घराण्यांतला गोपालक हा कौशाम्बी येथें अमात्याचें काम करीत राहिलेला असल्यामुळेच प्रद्योत हा पौरवराजाचा प्रधान होता अशी मराठेशाहीच्या काळांतील बखरलेखकांची समजूत झालेली दिसते. मागें शाकलाधिपांच्या अमलाखाली जेवढा प्रदेश होता तेवढा सारा आपल्या अमलाखालीं असावा असें उदयनाच्या मनांत होते. शाकलाधिपांच्या घराण्यांतील सुमुंडीने विद्याधरवेदि जिंकलेली होती. तेवढीच उदयनाच्या ताब्यात आलेली नव्हती. विद्याधरवेदींतले पुष्कळसे विद्याधर उर्फ वाहीक लोक शाकलाधिपांच्या अमदानीमध्ये पंजाबांत येऊन राहिलेले होते. विद्याधरवेदीशी त्यांचे दळणवळण असे. पंजाबावर आतां उदयनाची सत्ता असल्यामुळे ते पौरवराज्यांत येऊ लागले. उदयनाला रसाळ आणि अद्भुत अशा कथा ऐकण्याचा शोक होता. त्यामुळे वाहीक लोकांतील गोष्टीवेल्हाळांचे चांगलेच फावलें.
९८ वत्सराज उदयन त्यांच्या अद्भुतरम्य विद्याधरकथा उदयनाला प्रिय झाल्या; आणि तेव्हांपासून भारतवर्षांत विद्याधरकथांचा फैलाव व्हावयास सुरवात झाली. विद्याधरकथांतला अद्भुतपणा काढून टाकला म्हणजे विद्याधर नांवांतली सगळी जादू एका क्षणांत नाहीशी होते आणि आपल्या डोळ्यांपुढे भारतवर्षाच्या वायव्यसरहद्दीवरील आजच्या लोकांशी सदृश अशा एका जातीच्या लोकांचे चित्र उभे राहतें. वायव्यसरहद्दीवरील आजच्या लोकांचे जे जे काही विशेष म्हणून सांगता येतील त्यांतले बहुतेक त्या लोकांच्या ठिकाणी होते. त्या लोकांतील काहींची नांवें भारतीय पद्धतीची, कांहींची इराणी पद्धतीची तर काहींची तुर्की पद्धतीची दिसतात. यावरून ते लोक मिश्र जातीचे होते असे अनुमान होतें. ते लोक पैशाची भाषा बोलत असत. ही पैशाची भाषा म्हणजे आजच्या उर्दू भाषेसारखीच एक भेसळ भाषा होती. या लोकांनी व्यापलेला प्रदेश हा हिमालयांतला असल्यामुळे तो जिंकणे सोपे नव्हते. विद्याधरवेदींत विद्याधरांखेरीज गंधर्व, असुर, यक्ष, राक्षस, गुह्यक आणि कूष्माण्ड या जातींचे लोकहि कमी अधिक प्रमाणांत रहात होते. यांतील गंधर्व हे विद्याधरांहून फारसे भिन्न नव्हते. असुर हे सुमुंडीच्या वेळी आलेले होते. उदयनाच्या वेळी ते बहुतेक विद्याधरांतच मिसळून गेलेले होते. यक्ष, राक्षस, गुह्यक व कूष्माण्ड या जाती उदयनकाळांत विद्याधरवेदीमध्ये राज्यकर्त्या नव्हत्या. उदयनाच्या प्रतीहाराचें नांव नित्योदित असे होते. नित्योदिताला एक पुत्र होता. त्याचे नांव गोमुख. उदयनाच्या पुरोहिताचें नांव शांतिकर असें होतें. हा मूळचा पौरव राज्यांतला नसून पंजाबाच्या दक्षिणभागांतला होता व तिकडून , वत्सराज उदयन ९९ वत्सदेशांत येऊन तो उदयनाचा पुरोहित झालेला होता. त्याच्यापाशी शांतिसोम आणि वैश्वानर या नांवांचे त्याचे दोन अल्पवयी पुतण्ये होते. यौगंधरायणाला एक पुत्र होता. त्याचे नांव मरुभूति असें होतें. रुमण्वानाला एक पुत्र होता. त्याचे नांव हरिशिख ऊर्फ विजयसेन असें होतें. विनोदी वसंतकालाहि एक पुत्र होता. त्याचे नांव तपंतक असें होतें. वत्सराज उदयनाला चक्रवर्ति म्हणून अभिषेक झाल्यानंतर लवकरच वासवदत्ता राणीपासून पुत्र झाला. त्याचे नांव अभिमन्यु असे ठेवण्यांत आले. भारतीयुद्धांतील अभिमन्युपेक्षांहि या अभिमन्यूने पुढे मोठा पराक्रम करून विद्याधरवदि काबीज केली. वत्सराज उदयनाने आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या शिक्षणाकडे चांगले लक्ष्य पुरविले होते. त्याने राजधानीबाहेर सर्व प्रकारच्या सोयींनी युक्त असें एक विद्यामन्दिर तयार करविलें. निरनिराळ्या विषयांत पारंगत असे आचार्य मिळविले आणि राजपुत्र अभिमन्यूला त्यांच्यासह त्या विद्या- मंदिरांत ठेविलें. विद्यामंदिरांत व्यायामाची सोय होती, घोड्यावर बसणे, हत्ती चालविणे आणि रथ हांकणे; त्याचप्रमाणे घोड्यावरून, हत्तीवरून व रथावरून युद्ध करणे हे शिकविले जात होते. शस्त्रविद्या शिकविली जात होती, अस्त्रविद्या शिकविली जात होती, शास्त्रे शिकविली जात होती आणि कलाहि शिकविल्या जात होत्या. वत्सराज उदयन आणि वासवदत्ता व पद्मावती या दोघी राण्या राजपुत्राला भेटण्यासाठी विद्यामंदिरांत वारंवार जात. विद्यामंदिरांतील सर्व शिक्षणक्रम पुरा होईपर्यंत राजपुत्राला राजधानीत आणावयाचें नाहीं असे उदयनाने ठरविले होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर राजपुत्र अभिमन्यूला समारंभपूर्वक १०० वत्सराज उदयन राजधानीस आणण्यांत आले आणि त्याला युवराजाचा अधिकार देण्यांत आला. अभिमन्यूला युवराजाचा अधिकार देतांना युवराजाला मदत करणारे अधिकारीहि नेमण्यांत आले. गोमुख हा युवराजाचा प्रतीहार झाला; मरुभूति अमात्य झाला, हरिशिख ऊर्फ विजयसेन हा सेनापति झाला; तपंतक हा नर्मसचिव झाला आणि शान्तिसोम व वैश्वानर हे पुरोहित झाले. या सर्वांमध्ये नित्योदितपुत्र गोमुखावर अभिमन्यूची विशेष मर्जी होती. याचे कारण गोमुख हा आपल्याच कामांत तेवढा हुशार या वर्गातला नसून चौरस होता हे होय. युवराज अभिमन्यूचा काही काळाने कोसलराज प्रसेनजित् याच्या भगीरथयशा नामक कन्येबरोबर विवाह झाला. मागें वत्सराज बृहद्रथ आणि कोसलराज कृतंजय हे जसे परस्परांचे व्याही झालेले होते तसेच वत्सराज उदयन आणि कोसलराज प्रसेनजित् हे आतां परस्परांचे व्याही झाले. कोसलराज प्रसेनजिताचे शैशुनाग हेहि सोयरे झालेले होते. प्रसेनजिताची एक बहीण मगधाचा शैशुनाग राजा बिंबिसार याला दिलेली होती. प्रसेनजिताला भगीरथयशेखेरीज आणखींहि एक कन्या होती. ती पुढे त्याने बिंबिसार राजाचा पुत्र अजातशत्रु याला दिली. अजातशत्रु हा बिंबिसाराचा पुत्र असला तरी प्रसेनजिताच्या बहिणीचा पुत्र नव्हता. त्याचप्रमाणे प्रसेनजिताची बहीण हीदेखील बिंबिसाराची ज्येष्ठ राणी नव्हती. ती कोसलच्या राजघराण्यांतली होती म्हणून मगध देशांतले लोक तिला 'कोसलदेवी' असे म्हणत. तिचे स्वतःचें नांव अज्ञातच आहे. युवराज असतांनाच अभिमन्यूनें विद्याधरवेदि काबीज केली.
वत्सराज उदयन १०१ M भारतसम्राटाला परदेशी लोकांच्या स्वाऱ्यांपासून भारतवर्षाचा बचाव करण्यासाठी विद्याधरवेदि या नांवाने ज्ञात असलेला हिमालयप्रदेश आपल्या ताब्यात घेणे अवश्यच होते. या विद्याधरवेदींत आजच्या नेपाळ संस्थानाचा उत्तरभाग, आजच्या काश्मीरसंस्थानाचा उत्तर व पूर्वभाग, कांग्रा, गढवाल आणि कुमाऊन यांतील हिमालयप्रदेश व आजच्या तिबेटाचा पश्चिमभाग एवढा भूभाग समाविष्ट होता. हा भूभाग आपल्या ताब्यात घेऊन तेथील काटक व चपळ अशा पार्वतीय लोकांचे सैन्य तयार करणे आणि ते सदोदित सज्ज ठेवून भारतवर्षांत वायव्येकडून वारंवार घुसणाऱ्या परदेशी बुभुक्षितांविषयी मनांत कोणत्याहि प्रकारच्या कोमल भावनांना थारा न देतां ते आततायी लेखून त्यांना सीमेवरच गांठणे, आणि पुढील तीन चार पिढ्यांच्या काळांत तरी ते पुन्हां स्वारी करून येण्याला समर्थ होऊ नयेत म्हणून त्यांचा कमालीचा संहार करून टाकणे हे भारतवर्षाचा संरक्षक या नात्याने भारतसम्राट् म्हणविणाऱ्या प्रत्येक सत्ताधाऱ्याचे आद्यकर्तव्य होते. हे आद्यकर्तव्य बजावण्याचे बाबतींत दुर्लक्ष्य करणारे भारतसम्राट् अन्य बाबतीत कितीहि थोर दिसत असले तरी भारतसम्राट्या मुख्य नात्याने भारतवर्षाचे ते घोर अपराधीच ठरतील. अशा अपराध्यांत वत्सराज उदयनाची मात्र केव्हांहि गणना करता येणार नाही. कारण दिग्विजय करून भारतसम्राटाचा मुकुट एकदां त्याने आपल्या मस्तकावर चढविल्यानंतर भारतवर्षांतील लोकांतली क्षात्रवृत्ति मारून टाकण्याची, आणि क्षात्रतेज नष्ट झालेल्या दुबळ्यांवर अधिकार गाजविण्याची राष्ट्रघातक इच्छा तर त्याने कधीं धरली नाहींच, पण पश्चिमेकडील पारसीक, आणि उत्तरेकडील तुराणी लोक भारतवर्षांत घुसूं लागलेच तर त्यांना आंत येऊ न देतां सीमेवरच - , १०२ वत्सराज उदयन , - त्यांचा समाचार घेतां यावा अशा प्रकारची योजना त्याने हाती घेतली व आपल्या पुत्राकडून ती पूर्ण करविली. भारतचक्रवर्ति उदयनाची भारतवर्षाच्या बचावाविषयींची कळकळ यावरून दिसून येते. आपली योजना इष्ट फल देणारी अशी करण्याला अवश्य तितका काळ उदयन पुढे वांचला नाही, आणि उदयनाच्या पश्चात् शैशुनागांची स्वार्थसाधु वृत्ति बळावून ते पौरवसाम्राज्यांतून फुटून निघाले व बंडखोरी करूं लागले, यामुळे उदयनाची योजना सुपरिणामकारक झाली नाही हे खरे, पण त्याचा दोष उदयनाच्या माथीं मारतां येणार नाही. उदयनाच्या मृत्यूनंतर १६७ वर्षांनी अलेक्झांडरची भारतवर्षावर स्वारी झालेली असतांना अलेक्झांडरला अडविण्यासाठी पर्वतराज ऊर्फ पोरस झेलम नदीवर जाऊं शकला हे बव्हंशी उदयनाने आपल्या हयातीत करून ठेवलेल्या योजनेचेच फळ होते असे दिसून येते. पर्वतराज अलेक्झांडरला अडविण्याचे कामी यशस्वी कां झाला नाही याची कारणे वेगळी आहेत. त्यांचा संबंध उदयनाशी पोचत नाही. विद्याधरवेदि म्हणून गणल्या गेलेल्या प्रदेशांत लहान थोर असे अनेक सत्ताधारी होते. त्यांची आपसांत भांडणे होती. विद्याधरवेदि काबीज करण्याच्या कामाला हात घालण्यापूर्वी पौरवांनी त्या सत्ताधाऱ्यांतले कित्येक सत्ताधारी आपलेसे केले होते. पौरवांच्या युवराजाने कित्येक सत्ताधाऱ्यांच्या मुलींशी लग्ने करून त्यांना आपले निकटचे आप्त बनविले होते. यामुळे विद्याधरवेदीला पौरवांच्या प्रबल बाहूचे जर रक्षण मिळेल तर चांगले होईल असे उघडपणे प्रतिपादणाऱ्या लोकांचा एक वर्ग विद्याधरवदति निर्माण झालेला होता. विद्याधरवेदी काबीज करतांना पौरवांना या वर्गाची विशेष मदत झाली.
वत्सराज उदयन १०३ - विद्याधरवेदीमध्ये तीन सत्ताधारी प्रबळ होते. कैलासाच्या उत्तरेकडील वेद्यर्धांत मंदरदेव नांवाचा सत्ताधारी प्रबळ होता आणि कैलासाच्या दक्षिणेकडील वेद्यर्षांत गौरीमुण्ड व मानसवेग हे सत्ताधारी प्रबळ होते. पौरवांचा विद्याधरवेदीत प्रवेश होणे त्यांना इष्ट वाटत नव्हते. या तीन सत्ताधाऱ्यांचा उच्छेद केल्यावांचून पौरवांना विद्याधर- वेदीचा ताबा मिळणे अशक्य होते. गौरीमुंड हा दक्षिणेकडील राजा होता. त्याच्या राजधानीचें नांव गोविंदकूट असे होते. मानसवेग (मानसबेग मानस सरोवरांचा प्रभु ) याच्या राजधानीचें नांव आषाढपुर असें असून तिबेटांतील आजच्या नारीखोरसूम नामक विभागावर त्याचा ताबा होता. मानस नांवाची प्रसिद्ध सरोवरें याच विभागांत आहेत. अभिमन्यूनें पौरवसैन्य बरोबर घेऊन दक्षिणेकडून विद्याधरवेदीवर स्वारी केली. पौरवांना अनुकूल असलेले विद्याधर सत्ताधारी आपापल्या सैनिकांसह अभिमन्यूला येऊन मिळाले. गौरीमुंड आणि मानसवेग हे दोघे एक होऊन अभिमन्यूला अडवावयाला आले. परंतु युद्धांत ते दोघेहि ठार होऊन त्या दोघांच्या ताब्यांतला मुलुख अभिमन्यूला मिळाला. अभिमन्यूनें त्यानंतर कैलासाच्या उत्तरेकडील मंदरदेवावर स्वारी केली. मंदरदेवाचा पराभव झाला. तो अभिमन्यूच्या हातीं सांपडला. अभिमन्यु त्याचा वध करणार होता. परंतु मंदरदेवाच्या बहिणीने अभिमन्यूची प्रार्थना केल्यामुळे अभिमन्यूनें त्याला सोडून दिले. बहिणीच्या रदबदलीमुळे आपले प्राण वाचले याची मंदरदेवाला शरम वाटली व तो तपोवनांत निघून गेला. अभिमन्यूने आपणास अनुकूल असलेल्या अशा एका विद्याधराची मंदरदेवाच्या राज्यावर स्थापना १०४ वत्सराज उदयन केली व त्याला आपला मांडलिक बनविलें. या विद्यावराचें नांव अमितगति असें होतें. विद्याधरवेदीची उत्तरसीमा तुराणी सम्राटाच्या मुलखाला लागलेली होती. विद्याधरवेदींत अभिमन्यूला जे लागोपाठ विजय मिळाले त्यांमुळे त्याचा उत्साह वाढला. तुराणी साम्राज्यावर स्वारी करण्याची भाषा तो तरुण पौरव बोलू लागला. परंतु त्याच्या मंत्र्यांनी त्या बाबतीत त्याला उत्तेजन दिले नाही. " आपणांस प्राप्त झाले आहे एवढे पुष्कळ आहे. अधिकाची हाव धरून सगळेच गमावण्याची वेळ येईल !” असें ते म्हणाले. तेव्हां तुराणी साम्राज्यावर स्वारी करण्याचा विचार अभिमन्यूनें सोडून दिला. विद्याधरवेदीतील सर्व सत्ताधाऱ्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणणारा असा पहिला वीरपुरुष म्हटला म्हणजे ऋषभ शाक्वर हा होय. हाच विद्याधरांचा पहिला चक्रवर्ति असे समजण्यांत येत असे. या ऋषभ शाक्वराने रचलेल्या अशा एका सूक्ताचा ऋग्वेदामध्ये संग्रह करण्यांत आलेला आहे. (ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १६६.) ऋषभाला तेथे 'वैराज्' म्हणजे वाहीक लोकांचा राजा असे म्हटलेले आहे. सूक्ताच्या शेवटीं ऋषभाने आपल्या शत्रूना अनुलक्षून पुढील अर्थाचे उद्गार काढलेले आहेत:- "जसे उच्चस्वरें भेक आक्रोशा करिती जळी, रहा करीत आक्रोशा मदंघीच्या तसे तळी !!" सर्व शत्रूना आपल्या पायाच्या टाचेखाली दाबून आक्रोश करावयास लावणाऱ्या ऋषभाने विद्याधरचक्रवर्ति म्हणून आपणाला ज्या पर्वतावर अभिषेक करवून घेतला त्या पर्वताला पुढे ऋषभपर्वत असें नांव मिळाले. . - वत्सराज उदयन १०५ ~ पुढील काळांतला प्रत्येक विद्याधरचक्रवर्ति ऋषभपर्वतावरच आपणाला चक्रवर्तित्वाचा अभिषेक करवून घेत असे. संपूर्ण विद्याधरवेदि काबीज करणाऱ्या अभिमन्यूला विद्याधरवेदीतील या पूर्वपरंपरेला मान द्यावा लागला. ऋषभपर्वतावरच त्याने विद्याधरचक्रवर्ति म्हणून आपणाला अभिषेक करवून घेतला. भारतचक्रवर्ति उदयनाचा पुत्र उदयनाच्या हयातीतच विद्याधरचक्रवर्ति झाला. त्यावेळी त्याचे वय सुमारे १८/१९ वर्षांचे असेल. विद्याधरचक्रवर्ति झालेल्या अभिमन्यूचे शांतिसोम आणि वैश्वानर हे पुरोहित होते. मरुभूति हा मुख्य अमात्य होता. हरिशिख ऊर्फ विजयसेन हा मुख्य सेनापति होता, तपंतक हा नमसुहृद् होता आणि गोमुख हा प्रतीहार होता. भारतचक्रवर्ति उदयन हा आपल्या दोघी राण्या आणि यौगंधरा- यणादि अमात्य यांच्यासह विद्याधरवेदींत जाऊन विद्याधरचक्रवर्ति झालेल्या आपल्या पुत्राला भेटला. विद्याधरवेदि म्हणजे इहलोकचा स्वर्गच होय असें त्याला वाटले. आपल्या पुत्राची राजधानी व एकंदर ऐश्वर्य पाहून तो संतुष्ट झाला. विद्याधरवेदीत काही दिवस घालविल्यानंतर बरोबरच्या मंडळीसह तो कौशांबीस परत आला. प्रयाणसमयीं चरणांवर मस्तक ठेवून नम्र झालेल्या आपल्या पुत्राला तो म्हणाला, वत्सा, हे स्वर्गतुल्य स्थान तूं आपल्या बाहुबलाने संपादन केलेंस यामुळे आपलें पौरव कुल धन्य झाले आहे. महर्षि कृष्ण द्वैपायन आजला प्रकट असते तर तुझ्या या पराक्रमावर दुसरें नामक काव्य निर्माण करण्याची स्फूर्ति त्यांना झाली असती यांत संशय नाही. मीदेखील या विद्याधरभूमीत वास्तव्य केलें असतें. . जय वत्सराज उदयन .. परंतु चिरसहवासामुळे भारतभूमीकडे माझें मन ओढ घेते आणि भारतभूमीतच आपले आयुष्य घालवावे असे मला वाटते. यासाठी कौशाम्बीस मी परत जात आहे. येथे तुझ्यापाशीं तुझे बाळमित्र मरुभूति, विजयसेन, तपन्तक आणि गोमुख हे आहेतच. पौरव राज्यांतले सहस्रावधि सैनिकहि येथे तुझ्यापाशी आहेत. यामुळे ही विद्याधरवेदि म्हणजे पौरवांची जणूं काय एक वसाहतच झालेली आहे ! त्यांच्यासह या विद्याधरवेदीचा उपभोग घेतांना आपले पराक्रमी पूर्वज गाण्डीवधारी वीर धनंजय यांना कुरुक्षेत्रावर यदुकुलोत्पन्न भगवान् वासुदेव यांनी केलेला दिव्य उपदेश तूं केव्हांहि विसरूं नको असें माझें तुला आग्रहाचे सांगणे आहे. पौरव कितीहि ऐश्वर्यसंपन्न झाले तरी उदकांत राहून उदकापासून अलिप्त असणाऱ्या कमलासारखी त्यांची सदैव वृत्ति असली पाहिजे. तरच जगाला ते आदर्शभूत होतील. आपली पूर्वीची देवपरंपरा सोडून असुरपरंपरेंत प्रविष्ट झालेले आणि त्या परंपरेचा अभिमान बाळगणारे पशु आतां पारसीक या नांवाने प्रसिद्धीला येऊन पश्चिमेस आपलें माहाराज्य विस्तारून बसलेले आहेत. उत्तरेस ययातिपुत्र तुर्वशाचे वंशज बुभुक्षित लांडग्यांप्रमाणे वावरत आहेत. या दोघांची लोभी दृष्टि भारतवर्षाकडे वळल्यास त्यांना भारतरक्षक पौरवांकडून भारतवर्षाच्या सीमेवरच धारातीर्थी कंठस्नान घातले जावें म्हणून या विद्याधरवेदीत तुझी स्थापना झालेली आहे असें त्वां समजून चालावें आणि आपलें पवित्र कर्तव्य निरलसपणे बजावीत रहावें. भगवान् कैलासनाथ, कौबेरीपति कुबेर, आणि पौरवकुलाच्या संरक्षक देवता तुझें सदैव कल्याण करोत ! पुराणें उदयनपुत्र अभिमन्यूला ' वहीनर' असे म्हणतात. कथा- " -- वत्सराज उदयन १०७ .. . सरित्सागरामध्ये अभिमन्यूला 'नरवाहनदत्त' असे म्हटले आहे. 'वहीनर' म्हणजे वाहीक ऊर्फ विद्याधर लोकांचा ईश्वर; आणि 'नरवाहनदत्त' म्हणजे कुबेराने दिलेला. अभिमन्यूची हीं उघड उघड बिरुदें दिसतात.* चक्रवर्ति उदयन हा शिवभक्त होता. तथापि पौरव राजघराण्याच्या कुळाचारांत वासुदेव कृष्णाला महत्त्वाचे स्थान होते, आणि कुळाचारांतील वासुदेव कृष्णाचे स्थान कायम ठेवूनच उदयनाला आपली शिवोपासना * अभिमन्यूचे 'वहीनर' हे बिरुद जसें वाहीकांच्या भाषेतलेच वाटते तसे नरवाहनदत्त' हे वाटत नाही. ' नरवाहनदत्त' हे अभिमन्यूच्या एखाद्या पैशाची बिरुदाचे केवळ संस्कृतीकरण असावे असा बळकट संशय येतो. ज्या शब्दाचे संस्कृतीकरण केले जाते त्या शब्दाचा उच्चार बऱ्याच अंशी संस्कृतीकरणांत कायम रहातो; परंतु अर्थ कायम रहातोच असे नाही. कित्येक वेळां तो पार बदलतो. शेरबेग या नांवाचा अर्थ व्याघ्रराज असा आहे. याचे संस्कृतीकरण 'शरवेग' असे होईल. 'शरवेग' या संस्कृतीकरणांत 'शेरबेग' या मूळ नांवाचा उच्चार बऱ्याच अंशी कायम राहिलेला दिसेल, परंतु अर्थमात्र पार बदलेल, 'शरवेग' नावाचा अर्थ बाणाच्या वेगाप्रमाणे वेग असलेला असा होईल. नरवाहनदत्त' यांतील शेवटचे 'दत्त' हे पद 'दात' शब्दाचे संस्कृतीकरण असावे असा संशय येतो. 'दात' हा शब्द 'दत्त' या शब्दाचा नातलग नसून सेमिटिक लोकांतील 'दाविद' अथवा 'दाउद' या नांवांचा नातलग आहे. त्याचा अर्थ 'प्रिय' अगर 'लाडका' असा होईल. त्याच्याशी अर्थदृष्टया आणि उच्चारदृष्टया सदृश असा संस्कृत शब्द म्हटला म्हणजे 'दयित' हा होय. ( असुर- वाचक ' दैत्य' हा शब्द या 'दयित' शब्दाचाच नातलग असणे संभवनीय आहे.) उदयनपुत्र अभिमन्यु याचे संपूर्ण बिरुद ‘वहीनरदात' असें, अगर अशासारखे असावे; आणि त्याचा अर्थ मूळांत 'वाहीकांच्या देवाचा लाडका असा असावा. जिंकलेल्या वाहीकांना संतुष्ट राखण्यासाठी त्याने हे बिरुद धारण केले. प्राचीनकाळचे भारतीय राजे आपणाला देवाचे लाडके म्हणवीत. अभिमन्यु वहीनरानंतर सुमारे दोनशे वर्षांनी होऊन गेलेला अशोक मौर्य हा आपणाला. 'देवानां प्रिय' म्हणजे देवांचा लाडका असें म्हणवीत होता हे प्रसिद्धच आहे. ' , .
१०८ वत्सराज उदयन गज चालविणे प्राप्त होते. अलीकडील काळांत एखादा हिन्दु मनुष्य ख्रिस्ती अगर मुसलमान झाला म्हणजे एका क्षणांत तो आपली सर्व कुलपरंपरा टाकून सेमिटिक लोकांच्या पुराणांतील पहिल्या मानवी जोडप्याच्या संततीत दाखल होतो व ज्या लोकांशी त्याच्या पूर्वजांचा वस्तुतः काही संबंध नसतो त्या लोकांना तो आपले पूर्वज समजू लागतो! यामुळे कादंबरीपेक्षांहि खोटा असा इतिहास तयार व्हावयाला सुरवात होते ! प्राचीन काळी असा प्रकार घडत नव्हता. प्राचीन काळांतील सामान्य लोकांनाच केवळ नव्हे, तर राजांना देखील आपले कुळाचार यथासांग पाळावे लागत. पाळून मग त्यांनी कुलदेवतांखेरीज इतर देवतांना पाहिजे तर भजावें असा शिरस्ता होता. हा शिरस्ता सेमिटिक रक्ताच्या लोकांनी गेल्या दोन हजार वर्षांत काढलेले वाळवंटी धर्मपन्थ प्रसारासाठी इकडे आणीपर्यंत सुरळीतपणे चाललेला होता; आणि सेमिटिकांचे वाळवंटी पंथ इकडे आयात झाल्यानंतर देखील हा शिरस्ता पूर्णपणे असा कधीच मोडला गेला नाही. इतर देशांतील लोक खिस्ती अगर मुसलमानी संप्रदायाचा स्वीकार करतेवेळी आपली पूर्वपरंपरा आणि कुलाचार यांची होळी करून बसले. यामुळे मानवी समाजांचा प्राचीन इतिहास अभ्यासणाऱ्यांना भारतवर्षांत साधनसामुग्री जशी विपुल मिळू शकते तशी ती इतर देशांत मिळू शकत नाही. उदयनानंतर सुमारे सवादोन शतकांनी भारतवर्षांत बौद्ध संप्रदायाला सार्वभौम सत्तेचा पाठिंबा मिळाला आणि मुख्यतः त्या पाठिंब्यामुळेच त्या संप्रदायाला एकाएकी मोठा जोर चढला. तथापि बौद्ध बनलेल्या भारतीय कुटुंबांचे कुळाचार कायमच राहिलेले होते. बौद्ध संप्रदायाचा प्रवर्तक शुद्धोदनपुत्र सिद्धार्थ हा चक्रवर्ति उदयनाच्या वत्सराज उदयन वेळी होता. उदयनाच्या आधी जन्माला येऊन उदयनाच्या मागून तो मरण पावला. तो शाक्य जातीचा असून त्याच्या घराण्याचे नांव गौतम असें होतें. शाक्य हे लोक भारतवर्षाबाहेरच्या शक लोकांचे संबंधी होते. भारतवर्षांत ते बहुतकरून शाकलाधिपांच्या अमदानीमध्ये आले आणि हिमालयाच्या पायथ्या पायथ्याने पुढे सरकत सरकत विदेह देशापर्यंत त्यांनी मजल मारली. हे लोक संघ करून रहाणारे होते. त्यांच्या हकीगतीत त्यांच्या जातींतले जे कोणी राजे म्हणून दिसतात ते पुढील काळांतील मालोजी भोंसल्यासारखे अनेक गांवांचे पाटील भासतात ! भारतवर्षांत शाक्य लोकांचे मातबर असे एखादें राज्य कोठेच नव्हते. त्यांच्यांतल्या कित्येक कल्पना आणि समजुती या सेमिटिक लोकांच्या कल्पना आणि समजुती यांच्याशी सदृश होत्या. गौतमकुलोत्पन्न सिद्धार्थाने स्थापन केलेल्या बौद्ध संप्रदायांत त्या आढळून येतात. शाक्य लोकांत सख्खा भाऊ व सख्खी बहीण यांचे परस्परांशी लग्न होऊं शके. सिद्धार्थ हा ख्रिस्तपूर्व ५५७ या वर्षी कपिलवस्तु नगराजवळच्या लुंबिनी वनांत जन्मला. हखामणी सम्राट् पहिला कुरु हा त्या वेळी नुकताच आपल्या बापाच्या राज्याचा मालक झालेला होता; आणि भारतवर्षांत कौशाम्बी येथे वसुदान सहस्रानीकाची पंजाबांतील असुरवंशी सत्ताधाऱ्यांचा उच्छेद करण्याची तयारी जारीने चालू होती. सिद्धार्थाने ख्रिस्तपूर्व ५२९ या वर्षी गृहत्याग करून वनांत गमन केले. त्या वेळी कौशाम्बी येथे शाहूदेव शतानकि राज्य करीत होता. सिद्धार्थाने गृहत्याग केला त्याच वर्षी हखामणी सम्राट् पहिला कुरु हा मध्य आशियांतील भटक्या लोकांशी लढत असतां मारला गेला. ख्रिस्तपूर्व ५२२ या वर्षी ११० वत्सराज उदयन , आपणाला पूर्ण ज्ञान झाले अशी सिद्धार्थाला खात्री पटून तो आपणाला बुद्ध' म्हणजे ज्ञानी असें म्हणवू लागला आणि आपला शिष्यवर्ग निर्माण करण्याच्या उद्योगाला लागला. याच वर्षी इराणांत कुरुपुत्र बर्दियाचा तोतया गौमात मग याची धामधूम चालू होती व याच वर्षी हखामणी सम्राट् कंबुजिय याने सूर्यादेशांत आत्महत्या केली. उदयन हा या वेळी वत्सदेशाचा युवराज होता. बिंबिसार हा मगधाचा युवराज होता आणि प्रसेनसित् हा कोसलचा युवराज होता. आपणाला 'बुद्ध' असें म्हणवू लागलेला सिद्धार्थ ख्रिस्तपूर्व ४७८ या वर्षी कुशनगराजवळच्या सालवनांत मृत्यु पावला. त्यावेळी उदयनपुत्र अभिमन्यु वहीनर हा हिमालयांत आजच्या काश्मीरमध्ये राज्य करीत होता. उजयिनीमध्ये पालक प्रद्योत राज्य करीत होता. मगधदेशांत बिंबिसारपुत्र अजातशत्रु राज्य करीत होता आणि कोसलदेशांत प्रसेनजिताचा पुत्र क्षुद्रक ऊर्फ विदूदभ हा राज्य करीत होता. इराणांत त्यावेळी पहिला दारयवहु याचा पुत्र पहिला क्ष्यार्षा ( झझिस ) याची कारकीर्द चालू होती. सिद्धार्थ हा गौतम बुद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. तो मरण पावला त्यावेळी चक्रवर्ति उदयनाच्या मृत्यूला पंधरा वर्षे झालेली होती आणि बिंबिसाराच्या मृत्यूला आठ वर्षे झालेली होती. चक्रवर्ति उदयन आणि गौतम बुद्ध यांची भेट झालेली होती असे म्हणतात. त्या दोघांची भेट झालेली असणे अशक्य नाही. परंतु गौतम बुद्धाचा संचार मुख्यत्वेकरून कोसल आणि मगध या देशांत असल्यामुळे कोसलचा राजा प्रसेनजित् आणि मगधाचे राजे बिंबिसार व अजातशत्रु यांच्याशी त्याचा जसा विशेष निकटचा संबंध होता तसा तो चक्रवर्ति उदयनाशी असेल असे वाटत नाही.
वत्सराज उदयन १११ १२-उदयनाचा अंत उदयनाने सुमारे सत्तावीस वर्षे राज्य केलें. ख्रिस्तपूर्व ५२० ते ४९३ हा स्थूलमानाने त्याच्या कारकीर्दीचा काळ होता.* अवंतीचा चंडमहासेन म्हातारा होऊन ख्रिस्तपूर्व ४९४ मध्ये मृत्यु पावला. त्याची पट्टराणी अंगारवती ऊर्फ शिवादेवी ही सती गेली. चंडमहासेनाच्या मागून सुमारे एक वर्षाने चक्रवर्ति उदयनाने आपली इहलोकची यात्रा संपविली. चंडमहासेनाचा ज्येष्ठ पुत्र गोपालक हा बापाच्या पश्चात् अवंतीचा राजा व्हावयाचा. परन्तु कांहीं अन्तस्थ कारणामुळे दिवसेंदिवस तो विरक्त बनत चाललेला होता. त्याने अवंतीच्या सिंहासनावर आरूढ होऊन अवंतिराज्याची सूत्रे हाती घेण्याचें नाकारले. तो कौशांबींतच चक्रवर्ति उदयनाचा सल्लागार म्हणून राहिला. उदयनाने त्यामुळे त्याचा धाकटा भाऊ पालक याची अवंतिराज्यावर स्थापना केली. चंडमहासेनाचा प्रधान भरतरोहक अजून हयात होता. तोच पालकाचाहि प्रधान झाला. चक्रवर्ति उदयनाला नाद होता. अमात्य यौगंधरायणाने अनेक प्रसंगी त्याची कानउघडणी केलेली असताहि त्याचा तो नाद कमी झाला नाही. मद्यप्राशनामुळे उदयनाच्या हातून राज्यप्रकरणी काही प्रमाद झाले नाहीत हे खरे, पण मद्यामुळे त्याच्या शरीराला मात्र व्याधि जडली व शेवटी तीच विकोपास जाऊन तिने उदयनाची पन्नाशी पुरी होते न होते तोंच त्याचा बळी घेतला ! * मौज, दिवाळी अंक १९४१ मधील " वत्सराज उदयनाचा काळ प्रस्तुत लेखकाचा लेख पहा. (पृष्ठ ११५ ते १२३). मद्यप्राशनाचा " हा ११२ वत्सराज उदयन वासवदत्तेशी विवाह झाल्यापासून चंडमहासेनाविषयी उदयनाच्या मनांत आदर उत्पन्न झालेला होता. चंडमहासेनाला तो आपल्या पित्याच्या ठिकाणी मानीत होता. तो मृत्यु पावला याचा उदयनाच्या मनावर फार परिणाम झाला व त्याला आधींच जडलेली व्याधि त्या स्थितींत बळावली. किती उपाय केले तरी ती हटण्याचे चिन्ह दिसेना. या दुखण्यांतून आपण आतां उठत नाहीं असें उदयनाच्या मनाने घेतले. तो हाडामासाचा क्षत्रिय होता. बिछान्यावर खितपत पडून मरणें हे त्याला कमीपणाचे वाटलें. त्याने आपले अमात्य, मंत्री, विदेहराज गोपालक आणि राण्या यांना आपल्या बिछान्याजवळ बोलावले. " झाले! इहलोकांतलें माझें कर्तव्य संपलें !" भारतचक्रवर्ति उदयन म्हणाला, " जनमेजय महाराजांच्या वेळी पौरवांनी गमावलेलें साम्राज्य मी पुन्हा संपादन केलें, भारतवर्षावर पारसीकसेनापतीला स्वतःच्या हाताने कंठस्नान घातलें, पारसीकांची आणि तुरुष्कांची पापी दृष्टि भारवर्षाकडे वळण्यास इतउत्तर धजूं नये म्हणून माझ्या एकुलत्या एक पुत्राची भारतवर्षाच्या प्रवेशद्वारापाशींच स्थापना केली. भारतरक्षक देवतांनी मजकडे सोपविलेले कार्य एवढेच असले पाहिजे असे मला वाटते; आणि म्हणूनच ज्ञाताच्या पलीकडील प्रदेशांतून अज्ञात अशा शक्ति मला आतां तिकडे येण्याविषयी आज्ञापीत आहेत ! त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याला मी मर्य समर्थ कसा असणार ? मला गेले पाहिजे. अनाद्यनंत म्हणून समजल्या गेलेल्या कालालादेखील जो जरा आणतो, त्या भगवान् कालंजर देवाच्या पर्वतावरून खाली उडी घेऊन मी देहपात करणार! आर्य चालून आलेल्या वत्सराज उदयन ११३ यौगंधरायण, माझी निघण्याची तयारी करा! तुम्ही लहानपणापासूनचे माझे मित्र; तरी एवढे हे शेवटचे मित्रकार्य कराच. नाही म्हणूं नका. " प्रभूची प्रकृति एवढी चिन्ताजनक आहे असें भिषग्वर्यांना वाटत नाही.” यौगंधरायणाने म्हटले, " कुमार अभिमन्यु यांना विद्याधरवेदीतून इकडे बोलावून आणावें, पौरवराज्याचा आणि भारतचक्रवर्तित्वाचा त्यांना अभिषेक करावा आणि ते व त्यांचे अमात्य असणारे आमचे पुत्र यांच्यावर राज्य आणि साम्राज्य सोंपवून आपण सर्वांनीच तपोवनाचा मार्ग धरावा असे मला वाटते." " विद्याधरवेदी ज्याने जिंकली, " उदयनाने म्हटले, " त्याने ती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सदोदित विद्याधरवेदीतच राहिले पाहिजे. वेदकाळांतला ऋषभ शाक्वर हा विद्याधरवेदीचा पहिला चक्रवर्ति झाला. त्याच्यानंतर सर्वदमन, बंधुजीवक, विश्वन्तर आणि शाकलाधिपांच्या घराण्यांतला सुमुंडि अथवा सूर्यप्रभ* हे प्रसिद्ध विद्याधरचक्रवर्ति झाले. या सर्वांना विद्याधरवेदि ताब्यांत राखण्यासाठी विद्याधरवेदीतच रहावें लागलेलें होतें असें मी ऐकले आहे. कौशाम्बीचे राज्य चालविण्यासाठी कुमाराला जर कौशाम्बीस बोलावले तर विद्याधरवेदि त्याच्या हातची जाईल आणि भारतवर्षाचे प्रवेशद्वारदेखील बाह्य लोक बळकावून बसतील. हे प्रवेशद्वार ताब्यात असल्यामुळेच शाकलाधिपांसारखें भारतवर्षाच्या बाहेरचें असुर घराणे वाटेल तेवढ्या बाह्यांना भारतवर्षांत * सुमुंडि ऊर्फ सूर्यप्रभ याच्यासंबंधी विस्तृत विवेचन प्रस्तुत लेखकाने आपल्या 'सूर्यप्रभकथा आणि तीत गुंतलेला इतिहास नामक लेखमालेत केलेले असून ती लेखमाला 'ज्योत्स्ना' मासिकांत प्रसिद्ध झालेली आहे. (ज्योत्स्ना, अंक नोव्हेंबर डिसेंबर १९३८, व जान्युआरी ते एप्रिल १९३९ पहा. , ८ ११४ वत्सराज उदयन , घेत राहून भारतवर्षाच्या छातीवर चारशे वर्षे पाय देऊन राहिलेलें होते. त्यानेच आमचें सार्वभौमत्व हिरावून घेतलेले होते. जे मागें झालें तें पुन्हा होऊ नये अशी जर आमची मनापासून इच्छा असेल तर आमच्या पूर्वजांच्या हातून घडलेले प्रमाद आपल्या हातून न घडतील अशी दक्षता आम्ही ठेवली पाहिजे. कुमाराला विद्याधरवेदींतून वत्सदेशांत येऊन राहण्यासाठी बोलावले तरी तो तें कबूल करणार नाही. कारण, विद्याधरवेदि आणि भारतवर्षाचे प्रवेशद्वार स्वतःच्या हाती राखण्याचे महत्त्व तो पुरेपूर जाणतो. त्याला इकडे केवळ भेटीसाठी बोलावण्यांत देखील काही अर्थ नाही. कारण तो इकडे येऊन पोचण्याच्या आधीच माझी इहलोकची यात्रा संपलेली असेल. धीर देण्याच्या सदिच्छेनें भिषग्वर्य कांहींहि म्हणोत, माझी मनोदेवता मला स्पष्ट सांगत आहे की तूं आतां फार थोड्या दिवसांचा सोबती आहेस. म्हणून सर्व निरवानिरव करून मी पवित्र कालंजर पर्वतावरून देहपात करणार, आणि शिवलोक प्राप्त करून घेणार ! मी केलेली व्यवस्था माझ्या पुत्राला मान्य होईल अशी माझी खात्री आहे." इतकें बोलून उदयन थोडा वेळ थांबला. नन्तर विदेहराज गोपालकाकडे वळून म्हणाला, " गोपालक, आपणावर सख्ख्या भावाप्रमाणे मी प्रेम करीत आलेला आहे. साम्राज्याची घडी नीट बसविण्याचे कामी आपण अहोरात्र कसे श्रम केले हे मला ठाऊक आहे. अवंतीचे श्रीमान् राज्य आपले हक्काचे असतां तें स्वीकारण्याचे आपण नाकारले. परंतु आतां हे पौरवराज्य मी आपल्या हाती देत आहे याचा स्वीकार करा. हे नाकारूं नका! माझ्या मागें देवी, अमात्य, मंत्री पौरव राज्यांतले लहान थोर अधिकारी आणि प्रजा या सर्वांचा योग्य वत्सराज उदयन ११५ परामर्श आपणच घेऊ शकाल. आपणासारखे अर्थशास्त्री या राज्याच्या सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर या राज्याची आर्थिक स्थिति नेहमीच भरभराटीची राहणार याविषयी मला संशय नाही. कुमार अभिमन्यु माझ्या मागे भारतसम्राट् झाला म्हणजे त्याचे भारतवर्षांतले तुम्हीं प्रतिनिधि. तथापि वत्सदेशचे हे राज्य तुमचे स्वतःचें. वत्सराज्याचा उपभोग घेऊन इकडे आर्यावर्तात आणि दक्षिणेकडील अगस्त्यखंडांत भारतसम्राटाचे जे जे हितसंबंध आहेत त्यांचे तुम्हीं रक्षण करावें. वत्सराज्य आणि सम्राटाचे प्रतिनिधित्व तुमच्याकडे, विदेहदेशची सुभेदारी तुमचे बंधु पालक यांच्या पुत्राकडे, आणि चेदिदेशची सुभेदारी बिंबिसारपुत्र अजातशत्रूकडे अशी व्यवस्था मी करीत आहे. ही पार पाडण्याचे तुम्ही सर्वांनी मनावर ध्यावे असें माझें तुम्हांस सांगणे आहे. " राज-राजाधिराज!” गोपालक डोळ्यांत आसवें आणून बोलला, " कौशाम्बीचे हे समृद्ध राज्य आणि भारतसम्राटांच्या प्रतिनिधी, पद मला देऊन आपण मजवरील आपले प्रेमच व्यक्त केले आहे. परंतु काय असेल तें असो, राज्य, ऐश्वर्य आणि सुखोपभोग यांचा दिवसेंदिवस मला वीट येत चालला आहे. राज्यव्यवहारांत ज्याला अर्थ म्हणतात तो अनर्थसा वाढू लागलेला आहे. तपोवनांत जाऊन तपस्वी व्हावे असे वारंवार मनांत येते. केवळ आपल्या, आणि प्रिय भगिनी वासवदत्ता हिच्या प्रेमाखातर मी आजवर कसा तरी येथे राहिलो. उद्या राहीनच असा भरंवसा नाही, अशा स्थितीत वत्सराज्य आणि भारतसम्राटाच्या प्रतिनिधीचें पद स्वीकारण्यास मी असमर्थ आहे हे कळविण्यास मला वाईट वाटते." तुम्हांला काय वाटते हे ऐकावयाला मला नको आहे !
११६ वत्सराज उदयन " - उदयन रागावून म्हणाला, " सम्राटाचा मुकुट अजून माझ्याच मस्तकावर आहे. तो जोपर्यंत माझ्या मस्तकावरून निघून दुसऱ्या कोणाच्या मस्तकावर चढलेला नाही तोपर्यंत माझें तुम्हांला सांगणे म्हणजे सम्राट् या नात्याने मी तुम्हांला केलेली आज्ञा आहे. ती तुम्हांला पाळलीच पाहिजे. मी कोणाचा दुसरा एखादा अपराध सहन करीन, पण आज्ञाभंग हा अपराध प्रत्यक्ष माझ्या पुत्राचादेखील सहन करणार नाहीं !" राज-राजाधिराजांच्या आज्ञेचा भंग करण्याच्या हेतूने मी बोललों नाहीं, " गोपालक म्हणाला, पण तुमचा पण नको नि बिण नको!" चक्रवर्ति उदयन म्हणाला, पण बिण जो काय तुमचा असेल तो आमच्या पश्चात् आमच्या पुत्राला कळवा ! आर्य यौगंधरायण, आम्ही केलेली व्यवस्था पुत्राला कळविण्यासाठी विद्याधरवेदींत आजच दूत रवाना होऊ द्या. आमच्या प्रयाणाची उद्या तयारी ठेवा ! उद्यांपासून हे गोपालक तुमचे प्रभु ! माझ्यामागें देवींनी पाहिजे तर विद्याधरवेदीत पुत्रापाशीं रहावें, पाहिजे तर येथेच रहावें." 'जिकडे आर्यपुत्र, तिकडे आम्ही !' दोन्ही राण्यांनी निश्चयाच्या स्वराने सांगितले. त्यांच्या सांगण्याचा खरा अर्थ काय हे उदयन मनांत समजला. "आमचे सर्व आयुष्य प्रभूच्या सेवेत गेलें;" यौगन्धरायण हात जोडून म्हणाला; "प्रभूवांचून आम्हांला एक क्षणभरदेखील चैन पडणार नाही. आमची स्थिति वेड्यासारखी होईल. म्हणून प्रभुंनी आपणाबरोबर आम्हांलाहि न्यावे अशी माझी, रुमण्वान् सेनापतींची आणि वसन्तकाची प्रभुचरणी प्रार्थना आहे. .
वत्सराज उदयन ११७ " " जगणे अशक्य म्हणून मी मरणाला कवटाळीत आहे." उदयनाने म्हटले; " देवींची अगर तुमची स्थिति कांहीं अशी नाही. तुम्ही माझ्याबरोबर येण्याची इच्छा कां धरावी ? इच्छा वगैरे मला काही समजत नाही." वासवदत्ता राणी म्हणाली, "माझी आई इतकी वृद्ध झालेली, पण वृद्धपणीदेखील तिने पुत्रादिकांचा मोह बाजूला ठेवून पतिसह गमन केलें. तिचंच रक्त माझ्या नसानसांतून खेळते आहे. जिकडे आर्यपुत्र तिकडे मी !" " आणि मी देखील!" राणी पद्मावती म्हणाली. " मी काय, रुमण्वान् काय, अगर वसंतक काय, " यौगंधरायण म्हणाला, " आम्ही व्यक्तिनिष्ठ माणसें. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आमची निष्ठा, त्या व्यक्तिप्रीत्यर्थच आमची बुद्धिमत्ता काम करावयाची, ती व्यक्ति गेली म्हणजे आमच्या बुद्धिमत्तेलाहि पक्षघात झालाच म्हणून समजावें. अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या मागे जगांत दुर्धर जिणे कंठण्या- पेक्षा त्या व्यक्तीबरोबरच परलोकवास पतकरणे चांगले नव्हे का ? , * * , दुसऱ्या दिवशी वत्सराज उदयन, त्याच्या राण्या आणि यौगंधरायण रुमण्वान् व वसंतक हे सचिव, इतकी मंडळी कौशाम्बीहून कालंजर पर्वतावर जाण्यासाठी निघाली. कौशाम्बीच्या नैऋत्येस सुमारे तीस कोस अंतरावर कालंजर पर्वत होता. कौशाम्बींतले हजारों नागरिक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहिलेले होते. यमुना नदी ओलांडून ही मंडळी कालंजर पर्वतावर तिसऱ्या दिवशी जाऊन पोंचली. तेथे गेल्यावर प्रथम चक्रवर्ति उदयनाने घोषवती वीणेसह कालंजर पर्वतावरून खाली उडी टाकून आपली इहलोकची ११८ वत्सराज उदयन यात्रा संपविली. त्याच्या मागून राण्यांनी पर्वतावरून खाली उड्या टाकून प्राणत्याग केला. राण्यांच्या मागून आर्य यौगंधरायण, सेनापति रुमण्वान् व नर्मसचिव वसंतक यांनी पर्वतावरून उड्या टाकल्या व परलोकवास पतकरला ! राजाच्या मृत्युप्रसंगी राजाच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी प्राणत्याग करण्याची चाल जपानांत आहे. चक्रवर्ति उदयनाच्या मृत्युप्रसंगी घडलेला प्रकार पाहून जपानमधील त्या चालीची आठवण होते. उदयनाच्या वेळी जपानमध्ये जे राजघराणे राज्य करीत होतें तेंच आज देखील जपानवर राज्य करीत आहे ! जपानच्या राजघराण्याइतकें प्राचीन राजघराणे पृथ्वीच्या पाठीवर दुसरें नाहीं. १३-उपसंहार उदयनाच्या मृत्युनंतर गोपालकानें कौशाम्बीचे राज्य आणि सार्वभौमाच्या प्रतिनिधी, पद आपला कनिष्ठ बंधु पालक याच्या हवाली केले आणि आपण विरक्त होऊन असितपर्वतावरील कश्यपाश्रमांत जाऊन राहिला. पालक प्रद्योताला कौशाम्बीच्या राज्याचा स्वामी आणि पौरव सार्वभौमांचा प्रतिनिधि म्हणून उदयनपुत्र अभिमन्यूने मान्यता दिली. यामुळे पालक प्रद्योताचे वैभव फारच वाढले. त्याच्या ताब्यांतील मुलुख आतां पूर्वेकडे शैशुनागांच्या मुलखाला भिडला. विदेह देशावर आपल्या घराण्यांतला पुरुष सुभेदार म्हणून नेमण्याचा अधिकार पालकाकडे आला आणि सार्वभौमांचा प्रतिनिधि या नात्याने शैशुनागांवरहि त्याला वर्चस्व गाजविण्याची संधि लाभली. साम्राज्यसत्तेचे केंद्र आतां वत्सराज उदयन ११९ कौशाम्बीहून उज्जयिनीकडे हालले. अनेक प्राचीन कथांतून उज्जयिनी नगरी ही संपूर्ण भारतसाम्राज्याची राजधानी असल्याचे दृश्य दिसते. तें अगदीच निराधार नाही हे यावरून दिसून येईल. तथापि प्रद्योत हे सार्वभौम पौरवांचे प्रतिनिधि या नात्याने भारतवर्षाचा कारभार पहात होते. भारतवर्षाचे मालक या नात्याने पहात नव्हते हे लक्ष्यात घेतले पाहिजे. हे लक्ष्यात घेतले म्हणजे प्रद्योत घराण्याच्या अंतापर्यंत पौरवसाम्राज्य अस्तित्वात होते असे दिसून येते. , निमिचक्राच्या वेळेपासून जिने राजधानीचा मान भोगला त्या कौशाम्बी नगरीचे आणि कौशाम्बींतील नागरिकांचे आपुलकीच्या भावनेने कौतुक करण्याला मात्र चक्रवर्ति उदयनाच्या मागे कोणी राहिला नाही. ती बिचारी नगरी साम्राज्याच्या राजधानीचा मान तर गमावून बसलीच होती, पण साधा वत्सराज्याच्या राजधानीचा जुना मानदेखील तिला आपणाकडे राखतां आलेला नव्हता. कौशाम्बीचा राजा उज्जयिनीस होता आणि सम्राट् काश्मीरांत होता ! उदयनाच्या वेळी पौरवसाम्राज्याची स्थापना झाली ती मुख्यतः प्रद्योत व शैशुनाग यांच्या मदतीमुळे झालेली होती. उदयनानंतरचा पौरवसम्राट् हिमालयप्रदेशांत असल्यामुळे त्याच्या दूरत्वाचा सगळा फायदा प्रद्योतांना मिळाला, किंवा पौरवांनीच एकट्या प्रद्योतांना तो दिला. यामुळे शैशुनाग राजा बिंबिसार हा आपल्या बहिणीच्या सावत्र मुलावर, म्हणजे उदयनाच्या पश्चात् सम्राट् झालेल्या अभिमन्यूवर रागावला. त्याने पूर्वेकडे पौरवसम्राटांचे जे मांडलिक होते १२० वत्सराज उदयन त्यांजकडून स्वतःच खंडणी वसूल करण्यास सुरवात केली. त्यामुळे पौरवसम्राटाचा प्रतिनिधि या नात्याने पालक प्रद्योताला बिंबिसार शैशुनागावर शस्त्र उपसणें प्राप्त झाले. प्रद्योत-शैशुनागांचा झगडा सुरू होण्याचे हे खरे कारण होय. हा झगडा पुढे कित्येक पिढ्या चालू होता व त्यांत अखेरीला प्रद्योत हरले. पालकाचा ज्येष्ठ बंधु गोपालक याला एक पुत्र होता. तो म्हटला म्हणजे मृच्छकटिक नाटकाचा कर्ता ज्याला 'गोपालदारक आर्यक' असें म्हणतो तो होय. परंतु मृच्छकटिकाच्या कर्त्याने गोपालदारक आर्यकाविषयी स्वतःची गैरसमजूत करून घेतलेली आहे. भासकवीचे 'चारुदत्त' हे अपूर्ण नाटक ' दरिद्र चारुदत्त' या नावाखाली पुढे पूर्ण झालेले होते. मृच्छकटिकाच्या कर्त्याने त्यांतच गोपालदारक आर्यकाचे कथानक घुसडून त्याचे मृच्छकटिक बनविलें. त्याला आर्यकाविषयी मिळालेली माहिती अगदीच तुटपुंजी होती. नाटकांत तिचा उपयोग करण्यापूर्वी त्याने तिची चिकित्सा करण्याची देखील तसदी घेतलेली दिसत नाही. तो ' गोपालदायक आर्यक' म्हणजे गवळ्याचा मुलगा आर्यक असा अर्थ करतो आणि आर्यकाने पालक प्रद्योताला मारून अवंतिराज्य काबीज केलें असें दाखवितो. आर्यक हा गवळ्याचा पोर असता तर त्याला अवंतिराज्य मृच्छकटिककार दाखवितो तितक्या सुलभतेने प्राप्त होण्याचा आणि नंतर ते पचण्याचा मुळीच संभव नव्हता. तो गोपालकपुत्र, म्हणजे प्रद्योत घराण्यांतलाच राजपुत्र असल्यामुळे, व अवंतीच्या गादीवर वडीलकीच्या नात्याने त्याचा अधिक हक्क पोंचत असल्यामुळे अवंतिराज्यांतले पुष्कळ लोक, किंबहुना लष्करदेखील त्याला मिळून तो अल्पायासाने अवंतीचा राजा होऊ .
वत्सराज उदयन शकला. ज्याला मारून त्याने अवंतिराज्य घेतलें तो पालक प्रद्योत नव्हे. तो पालक प्रद्योताचा पुत्र अवंतिवर्धन ऊर्फ विशाखयूप होय. अवंतिवर्धन ऊर्फ विशाखयूप हा आर्यकाचा सख्खा चुलत भाऊ होता. त्याला मारून आर्यकाने त्याने अवंतीचें राज्य काबीज केलें. आर्यकाला या कामी शैशुनागांकडून देखील थोडी फार मदत मिळालेली असली पाहिजे. कारण प्रद्योतांत यादवी माजणें शैशुनागांच्या फायद्याचेच होते. पुराणें आर्यकाला · अजक ' असे म्हणतात. त्याला ती प्रद्योत घराण्यांतलाच मानतात. प्रद्योत घराण्याच्या राजनामावळींत अजकाचें स्थान ती विशाखयूपानंतर असल्याचे दाखवितात. चक्रवर्ति उदयनाच्या योजनेनुसार हिमालय प्रदेशामध्ये स्थायिक झालेल्या पौरव राजघराण्यांत एकंदर चार राजे झाले. ते हे: १ अभिमन्यु वहीनर, २ दंडपाणि ऊर्फ धनपाल, ३ भीम ऊर्फ निरामित्र, ४ क्षेमक ऊर्फ लक्ष्मीदेव. या चार पौरवराजांनी हिमालयप्रदेशांत सुमारे पाउणशे वर्षे राज्य केले. ज्याच्यापासून ब्राह्मण व क्षत्रिय उत्पन्न झाले, आणि देव व ऋषि यांच्याकडून जो सत्कारला गेला, असा श्रेष्ठ पौरवराजवंश क्षेमकापर्यंत येऊन पोचल्यावर कलींत संस्था पावला. ( म्हणजे कलियुगांत पौरव राजघराण्याचा नाश झाला !) ज्याने पुरातनकाळापासून चालत आलेलें पौरव राजघराणें नाहींसें केलें तो पुरुष वीरसेन होय. वीरसेन हा शेवटल्या पौरव राजाचा अमात्य होता. बहुतकरून तो रुमण्वानाचा वंशज असावा. रुमण्वानाला हरिशिख नामक जो पुत्र होता त्याचेच अन्य नांव विजयसेन असें होतें. हा हरिशिख ऊर्फ विजयसेन अभिमन्यु वहीनराचा सेनापति होता.
१२२ वत्सराज उदयन . . सेनापतींच्या ताब्यांत सर्व सैन्य असल्यामुळे त्यांना आपल्या राजाला मारून त्याच्या जागी स्वतःच राजा होणे सुलभ असते. ज्याने क्षेमक पौरवाला मारलें त्या वीरसेनाच्या बापाचें नांव शूरसेन असे होते आणि आजाचें नांव वीरसेन असेंच होतें. क्षेमकाचा वध करणाऱ्या वीरसेनाचा आजा वीरसेन हा हरिशिख ऊर्फ विजयसेन याचा पुत्र असला पाहिजे. रुमण्वानाचा वंशज शूरसेनपुत्र वीरसेन याने खिस्तपूर्व ४२० चे सुमारास क्षेमक पौरवाचा वध करून पौरव राजघराणे नष्ट केले आणि हिमालयप्रदेशांतलें पौरवराज्य बळकावून तो आपणाला ' वीरशाह असें म्हणवू लागला. वीरशाह याचा पुत्र अनंतशाह, अनंतशाह याचा पुत्र हरीरूप; हरीरूपाचा पुत्र सुलोचन; आणि सुलोचनाचा पुत्र पर्वतराज ऊर्फ कुशीशाह होय. पर्वतराज यालाच ग्रीक लेग्वक 'पोरस' म्हणतात. 'पोरस' हे 'पूर' नावाचे ग्रीक रूप आहे. पर्वतराज पौरवांचा राजा होता म्हणून ग्रीक लेखकांनी त्याला 'पोरस' म्हटले आहे, भारतवर्षाचा प्राचीन इतिहास निवेदन करणारे ग्रंथकार देखील पर्वतराजाला ग्रीक लेखकांप्रमाणे 'पोरस' असेच म्हणतात ! 'पोरस' हा भारतीय राजा असतां भारतवर्षाचा इतिहास निवेदन करणारे ग्रन्थकार त्याची पूर्वपीठिका सांगू शकत नाहीत! मौर्यसाम्राज्य हेच त्यांना भारतवर्षांतलें पहिले साम्राज्य वाटतें ! उदयनसाम्राज्याचा पत्ता त्यांना अजुन लागावयाचा आहे ! उदयनसाम्राज्याचा त्यांना पत्ता लागेपर्यंत 'पोरस' च्या पूर्वपीठिकेसंबंधी ते गाढ अज्ञानांतच राहणार !!! "
No text on this page.
No text on this page.
No text on this page.