Library
Hara Naaraayand-a Aapat'e Yaan'chen' San'qsipta Charitra
Front matter
THE BOOK WAS DRENCHED
UNIVERSAL
LIBRARY
OU_184434
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
---
-----
-
--
हरि नारायण आपटे
यांचे
संक्षिप्त चरित्र.
किंमत १० आणे.
RAMMAR
-
Paneer
---
MAA
------.
-- --
No text on this page.
हरि नागयण आपटे
यांचं
संक्षिप्त चरित्र.
लम्बक .
बापुजी मार्तंड आंच कर
पुणे यंय
आयभपण छापखा- 1 अनत विनायक पटवधन
यानी छापन प्रमिद ले
--
ता. ३ मार्च सन १९२२.
किंमत दहा आणे.
No text on this page.
हैं पुस्तक
प्रिय भगिनी रमावहिनी आपटे
(हरिभाऊच्या पत्नी)
यांस
त्यांच्या मजवरील बंधुप्रेमाबद्दल
आदरपूर्वक
अर्पण केले आहे.
-पुस्तककर्ता.
RSSESSESESSESSISES
No text on this page.
प्रस्तावना. हरिभाऊंचे मी लिहिलेलें एक अल्प चरित्र मासिक मनोरजनाच्या सन १९१९ मधील एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्याच्या अनेक मित्रपरिचिताकडून माहिती मिळवून 'क सविस्तर चरित्र प्रसिद्ध करावे असाविचार होता. त्याकरिता काही प्रयत्नही केला; पण तो अल्पावधीत यशस्वी होणे तितके सोपे नाही असे वाटल्यावरून हल्लीचे हे संक्षिप्त चरित्र प्रसिद्ध करीत आहे. ज्यांचे चरित्र कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने तरुण पिढीस बोधक व मार्गदर्शक होईल अशी आपल्या इकडे अनेक माणसे झाली. यापैकी कोगाच नमुनेदार असे चरित्र प्रसिद्ध झाल्याचे उदाहरण सांपडलेच तर तें अपवादादाखलच सापडेल. याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे तसे चरित्र लिहिण्यास अवश्य असलेल्या सामुग्रीचा अभाव हे होय. रोजच्या दिनचर्येत विशेष घडलेल्या गोष्टीची रोजनिशी ठेवण्याची पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या इकडे पद्धत नसल्यामुळे चरित्रास अत्यंत उपयोगी पडणारे अस एक मोठे साधन आपणास उपलब्ध होत नाही हरिभाऊ व त्याचे अनेक परिचित स्नेही याच्याजवळ अशा रोजनिशा असत्या तर त्यांचे एखादे मोठे चरित्र निर्माण होणे खचित सुलभ झाले असते नुसत्या आठवणींवर मदार ठेवून एखाद्याचे चरित्र लिहूं म्हटल्यास ते केव्हाही सर्वांगपरिपूर्ण असे होणार नाही. हरिभाऊंच्या ५५।५६ वर्षांच्या गजबजलेल्या हयातीत त्याचे निरनिराळ्या वेळी जे निरनिराळे स्नेही होते त्यानकडून वेळची काहा महत्वाची माहिती मिळाल्यास पहावें, या विचाराने मी काही खटपट केली. हरिभाऊंच्या एखाद्या स्नेह्याची गाठ घेऊन “आपला हरिभाऊशी अमुक वेळी विशेष घरोबा होता तेव्हा त्या वेळची काही विशेष माहिती द्याल का?" असा पन केल्याबरोबर त्या गृहस्थांनी मोठ्या प्रेमाने म्हणावे, “ होय, आपण म्हणता त्याप्रमाणे हरिभाऊंचा आमचा फार निकट संबंध ! पुष्कळ माणसे पाहिली, पण हरिभाऊंसारखा माणस मिळणे काठण ! त्यांचे आमच्यावर काय प्रेम होते म्हणून सां" "त्यावेळेचे काही मनोरंजक किंवा मनोवेधक असे प्रसंग सागाल काय!" त्या त्या . . !
२ तशा गोष्टी असे विचारताच " त्यांच्या आमच्या वेळच्या काय गमती सागाण्या। तो कान आमच्या सर्व आयुष्यात मोठा मजेचा गेला ! " असे त्याने उत्तर यावे. झाले, हरिभाऊंसंबंधाची त्या गृहस्थांची माहिती अशाच प्रकारच्या दोन तीन वाक्यांत संपावयाची! काही विशेष गोष्टी सांगा " म्हटले की " कशा सागतां येतील ! आम्ही काय टिपण थोडेंच करून ठेवले आहे ! पण एकंदरीने मनुष्य मोठा बहारदार ।" असे उद्गार त्याच्या लाडू- निघावयाचे. सारांश काय की रोजच्या दिनचर्येतील स्मरण ठेवण्यासारख्या गोष्टीचा संग्रह करून ठेवण्याची आपल्या इकडे वहिवाट नसल्यामुळे एका माणसासंबंधाने हजारो माणसाना माहिती विचारली तरी ती चार दोन कायम ठशाच्या वाक्यातच प्राय:मिळावयाची! चरित्रास उपयोगी अशा माहितीचे दुसरे साधन म्हटले म्हणजे पत्रव्यवहार हे होय. याही बाबतीत आपल्या इकडे असावी तशी स्थिति नसते. एक तर पत्र- व्यवहार ही संपादन करण्यालायक अशी एक कला आहे, ही आपल्या इकडे पुष्कळाना कल्पनाच नसते. ज्या थोड्याना ती असते त्याच्यात या माधनाचा पद्धतशीर उपयोग करणारे असे त्याहूनही थोडे आणि यामध्ये पत्रव्यवहारातील महत्वाचे कागदपत्र नीट जतन करून ठेवणारे तर फारच विरळा | आमच्या इकडे पत्रव्यवहार बहुधा कधी खुशालीपलीकडे जावयाचाच नाही. एखाद्याने त्या पलीकडे तो नेऊन इतर काही महत्वाच्या गोष्टीचा त्यांत समावेश केलाच तर पत्रात हे हो काय याने भारूड लिहिले आहे," असेंच जो तो म्हणणार व त्याकडे दुर्लक्ष्य करणार. वस्तुतः रोजनिशी व पत्रव्यवहार याचा अधिकार फार मोठा आहे. या दोन्ही साधनांची सिद्धता असल्यास एखाद्या सामान्य मनुष्याचे चरित्रही प्रसंगवशात् हृदयंगम असें करिता येईल. मग हरिभाऊंसारख्यांच्या चरित्राची गोष्टच बोलावयास नको. चरित्रलेखनासंबंधात आपल्या इकडे अशा भाचणी असल्यामुळे ते कार्य व्यवस्थित रीतीने शेवटास नेणे किती कठिण असते हैं लक्ष्यात येईल. चरित्राची मिळावी तशो सामुग्री उपलब्ध होणे हे बरेच आयासाचे असून तसे आयास करून ती मिळविणे हे बरेच कालावधीचेही काम आहे. सुदैवाने हे सर्व योग जमून आले तर हरिभाऊंचे एक सविस्तर चरित्र प्रसिद्धही होईल.
पण तोपर्यंत त्यांच्या आयुष्यक्रमाची साधारण परेसा दर्शविणारे असें तरी निदान एखादें संक्षिप्त चरित्र वाचकांपुढे असावे याच उद्देशाने हे लहानसे पुस्तक लिहिले आहे. हरिभाऊंच्या तिस-या श्राद्धतिथीनिमित्त त्याचे एक अल्प यरित्र प्रसिद्ध करावे अशी काही मित्रांकडून सुमारे तीन चार आठवड्यांपूर्वी सूचना येताच मासिक मनारंजनात प्रसिद्ध झालेल्या ज्या चरित्राचा आरंभी निर्देश केला आहे, त्याचेच पुनर्मुद्रण करावे असा पहिला विचार होता. पण पुस्तक छापून छापावयाचेच तेव्हा त्यात आणखी काही माहेती घालता आल्यास ती घालावी असे साहजिकच वाटले आणि त्याप्रमाणे तजवीज करून हे पुस्तक तयार केले. एखाद्याच्या चरित्राची माहिती चरित्रनायकाचे आप्त व इष्टमित्र याच्या आठवणीवरच आधारलेली असली म्हणजे त्यांसंबंधात एक विशेष खबरदारी घेणे जरूर पडते. एखाद्या आठवणीत कोण्या व्यक्तीचा संबंध आला असला तर त्या आठवणीतील प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीची मान्यता मिळेल किंवा नाही, याचा पूर्ण विचार करूनच तिचा समावेश पुस्तकात करावा लागतो. नाही तर ती आठवण लिहावो आणि त्या आठवणीतील प्रसग मुळीच घडलेला नाही असे त्या व्यक्तीने म्हणावे! असा प्रसंग यावयाचा. विशेषतः एखायाचे चरित्र त्याच्या समकालीन पिढीतील कित्येक माणसें विद्यमान आहेत अशा स्थितीत लिहावयाचे म्हणजे तर असे प्रसंग टाळण्याबद्दल जितकी खबरदारी घ्यावी तितकी थोडीच होते. शिवाय ज्याचें चरित्र लिहावयाचे त्याचा मोठेपणा वाढविणा-या पण त्याबरोबरच त्याचे आप्त किंवा इष्टमित्र याना कमापणाआणणान्या अशाही गोष्टी चरित्रातून होता होईतो वगळणे भाग पडते. आधी माहितीचा पुरवठा बेताचाच भाणि त्यातही ही निरनिराळी पथ्ये पाळावयाची अशा स्थितीत चरित्र मनोवेधक व वाचनीय करणे हे अर्थातच विशेष कौशल्याचे काम भाहे. ते कोणा अधि- कारी माणसाच्या हातून होईल तेव्हा होवो ! पण ते होईपर्यंत हरिभाऊ, त्याचा लखनव्यवसाय व त्या व्यवसायाने केलेलें समाजोपकारक कार्य याची साधारण कल्पना तरी या लहानशा पुस्तकाच्या वाचनाने वाचकांच्या मनात आली तरीही पुस्तकपासिद्धीचा उद्वेश सिद्धीस गेला असे समजता येईल. !
चरित्रलेखनासंबंधाने साधारणतः अनिवार्य अशा अडचणी कोणत्या असतात हे वर थोडक्यात सांगितलेच आहे. त्याबरोबरच चरित्रनायक हरिभाऊसारखा एखादा अथकार असला म्हणजे या बाबतीत सुगमता आणणारी अशीही एक गोष्ट असते तिग निर्देश करणे जरूर आहे. हरिभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात समाजातील अनेक प्रवृत्तीच्या, सभ वाच्या मनोधारणाच्या माणसाचे शब्दचित्र रेखाटले आहे. यामध्य कित्येक ठिकाणी सहन किंवा बुद्धि- पुरःसर त्याच्या हातून स्वतःच्या स्वभावाचेलि छायाचित्र उमालेले दिसते. विशेषतः त्याच्या निकट परिचित माणसाप्त अशी स्थळे चटकन ओळखता येण्यासारखी आहेत. त्यांच्या चरित्रलेखनाचे कामी अशी स्थळे साहजिकच उपयोगी पड- ण्यासारखी असतात. आणि प्रस्तुत पुस्तकात त्यांचा यथावकाश उपयोगही केलेला आहे. आपल्या कादंब-यांत यानी दिलेली कित्येक स्वभाववर्णने व व्यक्त केलेले कित्येक विचार ही त्याच्या आयुष्यक्रमाचेच प्रतिबिंब दशविणारी आहेत. त्यांचा भरपूर रीतीने उपयोग केल्यास इतर रीतीनी मिळावयाच्या माहि- तीची उणीव बन्याच अशानी मन निघण्यासारखी आहे. हल्लीच्या सक्षिप्त चरित्रात त्याचा उपयोग अर्थातच सक्षिप्त गतीने होणे केवळ अपरिहार्य होते आणि तो तितक्याच प्रमाणात झाला आहे. आपले आत्मचरित्र लिहावे असा हरिभाऊंचा फार मनोदय होता. आणि तो शेवटास गेला असता तर मराठी वाङ्मयात एका उत्कृष्ट ग्रंथाची निःसंशय भर पडली असती. पण ती गोष्ट होणे आता शक्य नाही. त्यांच्यासारख्या प्रतिसृष्टि निर्माण करणान्या कादंबरीकाराच चरित्र लिहिणे हे काम तशाच आधिकाराच्या माणसाच्या हातून होणे अवश्य होते. पण या जगांत "घडणे जरूर आहेत अशा गोष्टी " व "प्रत्यक्ष घडून येणा-या गोष्टी" यांचा मेळ पडल्यास दुःखाचे किवा निराशेचे कारणच रहाणार नाही ! हरिमाऊचा व माझा निकट संबंध ल्याच्या आयुष्याच्या शेवटच्या चारा वर्षातच होता. या काळात त्यांच्या आयुष्यक्रमासंबंधाने त्यांच्या निकट सानिध्याने माझ्या मनावर जो ठसा उमटला तेवढ्यापुरतेच अधिकारपूर्वक रीतीने बोल में किंवा लिहिणे मला शक्य आहे. या पूर्वीच्या त्याच्या आयुष्यक्रमासंबंधाने जी माहिती या पुस्तकात आली आहे त्यांपैकी बहुतके भाग हारभाऊंच्या त्या त्या काळच्या स्नेही मंडळीच्या ५ तोंडन ऐकलेला अमाच माह. या मंडळ पैकी कित्येकानी आणसी महत्त्वाची माहिती पुरविण्याचे आश्वासन दिले अन्न ने त्याच्या हातून पूर्ण केले जाईल असा मला भावमा वाटतो. हा भावता सा टला तर हाही नवीन माहिती या पुस्तक ची द्वितीयावृत्ति नियमाचा मो मग याम या 'वृत्त त किंवा म्वतंत्र गतीने वाचकापुढे माडण्याग मी अवश्य प्रयत्न करीन. प्रस्तुत पुस्तक तयार करण्याचे कामी ज्या गृहस्थानी मला मदत केली त्याचा मी आभारी आहे. त्यात विशेषतः प्रो. ना. स. पानसे व ग रुष्णाजी के गोखले याचा विशेष गतीने निर्देश करणे जरूर आहे. त्याचप्रमाणे पुणे मगठी ग्रंथालयाचे व्यवस्थापक ग. आण्णा नारायण पावगी यांनी संग्रहा यातील कित्येक पुस्तकांचा उपयोग करण्याचे कामी वेळोवेळी मला सहाय्य केल्याग्दल त्याचाही मी आभारी आहे. पुणे, ना. मार्च बा. मा. आंबेकर. म. १९२२.
No text on this page.
अनुक्रमणिका. ... ... ... १-८ ... ... ९-१५ १६-२३ ...२४-३२ ... ... ... 33-30 ... ... ... ... १ हरिभाऊचे बाळपण २ मुबईहून पुण्यास आल्यावर... पंचविशीच्या आंतील लेखनव्यवसाय ४ मधली स्थिति ५ करमणुकीचा जन्म ६ कादंबन्याचा कार्यभाग ७ स्वभावाशी परिचय ८ अवातर लेखनव्यवसाय ९ परीक्षेची वेळ १० आनंदाश्रम ११ आणखी दोन संस्था १२ आवडत्या कन्येचा वियोग ... १३ मित्रपरिवार १४ राजकीय, सामाजिक व धार्मिक मते १५ आयुष्याची अखेर ... ३९-६ r७-५६ ५७-६४ ... ... ... ... ... ७०-७५ ... ७६-८० ८१-८७ ... ... ८८-९५ ...९६-१.३
No text on this page.
No text on this page.
MES जन्म-ता. ८।३।१८६४.] हरि नारायण आपटे. [म.यु-ता. ३।३।१९१९, ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. प्रकरण पहिलें. हरिभाऊंचे बाळपण. थोडी कुळकथा. "आपटे घराण्याचा इतिहास प्रसिद्ध झाला असल्यामुळे आता हरिभाऊंची कुळकथा फारशी लिहिण्याचे कारणच नाही. एका कुळाच्या दहा पांच पिढ्या घेतल्या तर त्यांतील पुरुषांचा एकमेकांशी मेळ कचितच लागते ज्या कुळांत तरवारबहादर होतात त्याच कुळांत तरवार्गचे नाव ऐकल्याबरोबर भिऊन पळून जाणारे वीर सापडतात. वैदिक शास्त्री यांच्याबद्दल नामाकित असलेल्या कुळांत कित्येक वेदशास्त्रशून्य निपजलेले दिसतात. सारांश, अनेक पिढ्या एकच व्यवसाय व एकच परंपरा चालू असलेली कुळे निघालीच तर ती अपवादादाखल निघतील. म्हणूनच कुळकथेच्या विशेष भानगडतिं न पडता हरिभाऊंच्या वडिलांपासून व चुलत्यापासूनच आपण आरंभ करूं. हरिभाऊंचे वडील नारायण चिमणाजी हे घरगुती अडचणीमुळे तरुणपणीच नोकरीत शिरले. पण ते एकधोरणी, हुषार व निश्चयी असल्यामुळे लवकरच चांगल्या हुवेदारीच्या जागेवर चढले. हरिभाऊंचे चुलते महादेव चिमणाजी यांचे नांव नामांकित वकील म्हणून सुप्रसिद्धच आहे. शिवाय आनंदाश्रम ही नमुनेदार संस्था स्थापन करून त्यांनी स्वतःच मापले स्मारक करून ठेवले आहे. महादेव चिमणाजी हे बी. ए. झाल्यावर त्यांनी मुंबईसच एका शाळेमध्ये नोकरी धरली. पण शिक्षकाचें काम त्यांनी काही थोडौं वर्षेच केलें. एलएल. बी.ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी मुनसबीची नोकरी धरली, आणि अलीबाग येथे काही दिवस मुनसबी काम केले. पण त्यांच्यासारख्या हुषार व कप्त्ववान् माणसास नोकरीचें मेलेलें २ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. अन्न न आवडणे स्वाभाविकच होते. आणि त्याप्रमाणे त्यानी नोकरी सोडून देऊन मुंबईस वकिलीचा धंदा सुरू केला. या धंद्यात उत्तरोत्तर त्यांचा उत्कर्ष होऊन त्यांना चांगले पैसे मिळू लागले. महादेव चिमणाजी हे वकील झाले त्या वेळचा काळ मोठा धामधुमीचा होता. देशोन्नतीकरितां सुरू झालेल्या अनेक धडपडी व मतांतराच्या उसळलेल्या लाटा यानी अगदी नादान लोकांचे मनही त्या काळाने आकर्षण केले होते.मग महादेव चिमणाजीसारख्या बुद्धिमान माणसाची मनःशक्ति व पैसा देशी उद्योगधंदे वाढ- विण्याकडे वळला यात आश्चर्य नाही. भागवत नामक कोणा होतकरू माणसाला त्यानी युरोपात काही काम शिकण्याकरिता पाठविले. येथे देखील चाकू- कान्याच्या कारखान्यात त्यांनी शेकडो रुपये ओतले होते. पण या कामी त्यांना यश आले नाही. एका टॅनिंग व लेदर मैन्युफैक्चरिंग करनीतही त्यानी पांच पंचवीस हजार रुपये घातले होते. पण तेही पुनः परत आले नाहीत. महादेव चिमणाजी हे हरिभाऊ चलने होते तरी त्यांचे हरिभाऊंवर अपत्यवत् प्रेम असे. आनंदाश्रमाशी हरिभाऊंचा जो आजन्म संबंध जडला तो महादेव चिमणाजी. मुळेच. आणि इतरही प्रकारे अण्णासाहेबांच्या आयुष्यक्रमाचा हरिभाऊंच्या जीवनवृत्तावर कसकसा परिणाम झाला हे पुढे यथावकाश समजेलच. हरिभाऊंचा जन्म. हरिभाऊंचा जन्म व-हाडात त्यांच्या आजोळी ता. ८ मार्च स. ८ मार्च स. १८६४ साली झाला. हरिभाऊच पाळण्यातलें नांव बाळकृष्ण असे होते. पण एक मनुष्य एकाच वेळी दोन जागी अखू शकत नाही, त्याप्रमाणेच एका नावाची दोन माणसे एकाच कुटुंबात असू शकत नाहोत. बाळकृष्ण हे नाव आपट्यांच्या कुटुंबात आधीच दुस-या कोणी पटकाविले असल्यामुळे हरिभाऊंना त्या नावा- वरचा आपला हक बिनतकार सोडून द्यावा लागला! लहानपणीच मातृवियोग होणे यासारखे दुसरें दुर्दैव कचितच असेल, आणि तेच हरिभाऊंच्या वाट्यास आले. हरिभाऊंना चवथे वर्ष लागते न लागते तोच त्याच्या मातुश्री इहलोक सोडून गेल्या. त्यांच्या वडिलाची नोकरी फिरतीची, त्यातून हरिभाऊंची आई त्यांना बाल्यावस्थेतच येथे एकटे टाकून सोडून गेलेली. यामुळे हरिभाऊंचा सांभाळ करण्याचा बोजा आधीच लळा असलेल्या त्याच्या चुलताचुलतीने शिरावर घेतल्यास नवल काय ? नानासाहेबानी दुसरे लम केले, दहा माणसांचे घर- हरिभाऊंचे वाळपण. ३ दानाचे कुटुंब. त्यातून हरिभाऊ म्हणजे थोरला मुलगा. त्यामुळे मर्यादशील नानासाहेब हरिभाऊंना फारसे येत नसत. पुढे तर आईच्या मृत्यूने मुलाचा व थापाचा संबंध तुटल्यासारखाच झाला. पुढे जुन्या नव्याच्या झगड्यामुळे होणान्या फाटाफुटांचा हा पायाच होय असे म्हणण्यास हरकत नाही. हरिभाऊंच्या मातुओचे देहावसान झाले, तेव्हां महादेव चिमणाजीचें बिहाड फणसवाडीत होते. त्या वेळेस परांत लहान मूल काय ते हरिभाऊच होते. एकुलते एक मूल आणि तेही आईवेगळे. तेव्हा त्याचे सर्वांनी लाठ करावे, त्याच्या खेळकरपगाचे कौतुक करावें, चुलताचुलतीस तर त्याला कोठे ठेवू आणि कोठे न ठेवू असे होऊन जावे यात काही आश्चर्य नाही. चिमुकल्या हरीने काही, तरी डोक्यावर घेऊन भाजीवाल्याप्रमाणे ओरडत चाळभर फिरावे अथवा, गारुड्याचा खेळ आवरला की हरिभाऊंनी आपल्या खेळण्याचा पसारा मांडून गारुड्याच्या पवित्र्यांत उभे रहावे व सर्वांगास झोले देऊन माना हालवून पुंगी वाजविण्याचा आविर्भाव करावा किंवा चाळीतल्या बालूची कोकणी भाषा बोलून हुबेहूब नकल करावी ! कौतुकाच्या चुलतीला व आजीला पोराचे कसे व किती कौतुक करूं असे होऊन जायचे. कोणी ओळखीची मागसें आली की हरीच्या या सर्व नकला व्हावयाच्या. महादेव चिमणाजीकडे त्यांची अनेक मित्रमंडळी येत. त्यात सरकारी नोकरीस गुलामगिरी हे नांव देऊन तिरस्कारयुक्त बोलल्याचे हरीच्या कानावर येताच आपण नाही युवा जन्मांत कोणाची नोकरी करावयाचे ' असें सहा सात वर्षांच्या वयापासूनच हरांचे भजन सुरू झाले आणि तेच अखेरपर्यंत कायम राहिले. हरिनाऊंचे वडील व नानासाहेबाचे वडील या दोघांचाही सरकारी नोकरीत जन्म गेला. अण्णासाहेबांनाही नोकरोचा थोडा डाग लागला. पण हरिभाऊंनी खरोखरच जन्मात कोणाची नोकरी केली नाही. यावेळी नानासाहेबही नोकरीनिमित्त मुंबईसच असत. आपल्या आमेष्टापेको कोणालाही ददात असू नये, आपल्याला जे काही मिळेल त्यांतच सर्वांचा परामर्ष घ्यावा असा या बंधुद्वयाचा बाणा असे. नानासाहेबांची प्राप्ति अण्णा- साहेबांपेक्षा अर्थातच कमी असे. पण नातेवाईकांचा परामर्ष घेण्यांत ते अण्ण- साहेबांपेक्षाही सरत असत. आपल्या आप्तेष्टांतील व्यकोचेंच नव्हे तर त्याच्या सांद कुटुंयाही, आपलेपणाच्या भावनेनें, त्यानी वर्षानुवर्ष पालनपोषण फेडे, 00 ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. . नवराबायको, चार दोन मुले अशी जवळच्याच काय, पण दूरच्याही आप्तेष्टांची कुटुंथे त्यानी आपल्या येथे वाढविली. कित्येकांच्या तर दोनतीन पिढ्याही यांच्याच येथे वाढ ल्या. हरिभाऊंच्या काकी सौ. पार्वतीबाई या हरिभाऊंवर अपत्यनिर्विशेष प्रेम करीत हे न पहावल्यामुळेच की काय, दुष्ट काळानें या बाईना इहलोकांतून ओढून नेले हरीची मुंज. सौ. पार्वतीबाई यांना हरीच्या मुंजीचा फार ध्यास होता. मुलाची मुंज फार हौसेने करावयाची, याकरिता त्यांनी जारीने तयारीही चालविली होती. पण योगायोग तसा नव्हता. हरिभाऊवर मुंजीच्या अक्षदा पडल्याचे पाहणे त्या बाईच्या दैवीं नन्हने ! हरिभाऊंची मुंज पुण्यास जानोरीकराचे वाड्यात (शेवड्याचा बोळ ) झाली. आणि पुन्हा काही दिवसांनी त्यांची मंडळी मुंबईस गेली, त्याबरोबर तेही मुंबईस गेले. त्यांचे मराठी शिक्षण मुंबईसच झाले. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू असल्यामुळे बाल्यावस्थेतच त्याचा मित्राचा गोतवळा बराच वाढला. हरिभाऊ सर्वांचे लाडके असल्यामुळे त्यांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना मिळे. पण त्यांत पुस्तकावरच त्यांचे विशेष प्रेम असे आणि महादेव चिमणाजी त्यांना वाटतील तितकी गोष्टीची पुस्तके आणूनही देत. खेळापेक्षा पुस्तके वाचण्याकडेच त्यांचे लक्ष असे. तरी त्यांबरोबर त्याचा खोडकरपणाचा व लोकाच्या नकला करण्याचा व्यासंगही चालू होता. मुंज झाल्यावर त्यांना कोणी म्हटले की, आता लंगोटी सोडता कामा नये, म्हणजे त्यानी मुद्दाम लंगोटी सोडून रस्त्यापर्यंत जाऊन यावें. बायका डाळ निवडण्यास बसल्या असता ती उडवून पळावे, अशा अनंत खोड्या करून हरिभाऊ उच्छाद आणीत. तरी पण अण्णासाहेबांचा त्यांना मोठा धाक असे, यामळे, हरि करील तें करील, या घरातील इतर माणसांच्या कौतुकाचा परिणाम मर्यादे- बाहेर कधीही गेला नाही. चिमा मावशी. नानासाहेब व अण्णासाहेब यांच्या कल्सवरत्या बायका चार वर्षांत नाहीशा झाल्यामुळे सर्व कुटुंबाचा बोजा चिमामावशीवर पडला.घरांत नानासाहेबांच्या मातुश्री होत्या; पण पंचवीस माणसांचा पसारा आवरण्याइतकी आक्रमशक्ति त्यांच्यांत नव्हती. अर्थात् नानासाहेबांच्या मावशीवरच-यांनाच चिमामावशी म्हणत-सर्व हरिभाऊंचे बाळपण. - जबाबदारी येऊन पडली. या बाई फारच हुषार असत. श्री. काशीताई कानिट. कर या बाईचे पुढीलप्रमाणे वर्णन देतात:- नानासाहेब व अण्णासाहये फक्त हातखाला लागेल येवढी रकम आपलेपाशी ठेवून घेऊन बाकी सर्व पैसा तिघ्या ( मावशीच्या ) स्वाधीन करीत. ती आपल्या सुना, नातवंडे, वगैरेना लत्ताकपडा, दागदागिना, औषधपाणी वगैरे सर्व करी. घरातील वर्षाची धान्य वगैरेची बेगमी करणे, चाकरनोकर पाहून ठेवणे काढणे, लग्नाच्या मुली असल्या तर त्याना स्थळे पहाणे, मुलाना केव्हां मुंजीचा मुहूर्त लाभतो वगैरे पाहून ठेवणे वगैरे सर्व कामे तोच करी. ती व्यवहारात मोठी दक्ष असे. तिचे स्वतःचे मूलबाळ काही एक नव्हते, पण बहिणीच्या परिवारालाच आपलें समजून ती मोठ्या प्रेमाने वागवी व शिक्षण देई. चुलतीच्या निधनानंतर या बाईनीच हरिभाऊंचे मोठ्या प्रेमाने संगोपन केले. *" भाजीची पाठ म्हणजे लहानग्या अपराधी नातवंडाच्या आश्रयाचा अतिशय बळकट असा किल्लाच होय. " हे उद्गार काढताना हरिभाऊंच्या पुढे याच बाई असल्या पाहिजेत. त्यांच्या सख्या आजीचेही त्याच्यावर प्रेम असे. आजीला कुठंही काही मिळो, किंवा घरात आणले जावो,त्यांतला बराच अंश नातवंडासाठी ठेवला नाही असें व्हायचे नाही" हा अनुभव त्याचा स्वतःचाच दिसतो. " लहानपणीच आई वारली असली म्हणजे आजीवांचून दुसरें कोणी लहान पोराना संभाळणारे नसते. ती जर असली तर आईपेक्षाही जास्त तन्में संभाळ होतो. आईपोरकी पोरें झाली व ती आजीने संभाळलेली असली म्हणजे ती अतिशयित लाडकी होऊन थोडीबहुत छांदिष्टही होतात" (गणपतराव प्र. २). हे गणपतरावाच्या निमित्ताने हरिभाऊंनी स्वताचेच वर्णन दिलेले असावे. चिमामावशी हरिभाऊंना जीव की प्राण करीत. पण धाक दाखविणे जरूर असेल तेथें धाक दाखवावयाचा, अशी त्यांची शिस्त असल्यामुळे हरिभाऊंच्या ठिकाणी लाडामुळे येणारा छांदिष्टपणा वयापरत्वे बराच कमी होत गेला. मुलांना ओळ लावावयाची ती केवळ धाकाने लावू म्हटल्यास त्याचे कसे दुष्परिणाम होतात, तेच त्यांत प्रेमाचे प्रमाणशीर मिश्रग असले म्हणजे ओळ लावण्याचा मूळ पण लक्षांत कोण घेतो ! प्र.५ व प्र.८.
ar ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. उद्देश कसा उत्कृष्ट रीतीने पार परतो, याबद्दलची हरिभाऊंनी आपल्या कादंबन्यातून जी चित्रे रेखाटली आहेत त्यांची रूपरेखा या मावशींच्या सांनिध्यानचे अंकित झाली असली पाहिजे. अण्णासाहेबांपुढील पेंच. अण्णासाहयांचे कुटुंब वारल्यानंतर त्यांनी आपल्या वडीलमावाप्रमाणे यथाक्रम नवीन संसार थाटावयाच्या तजविजीस लागावयाचे, पण पुनर्विवाहपंथाचे ते एक प्रमुख पुरस्कर्ते असल्यामुळे त्याना तसे करणे उचित वाटले नाही. माप्तसंबंधी माणसांचा पाश तोडून पुनर्विवाह करावा तर तितकी त्यांच्या मनाची तयारी होईना. बरें, जुन्या पंथाप्रमाणे दुसरे लग्न करावे तर तिकडूनही फजीती होणार, असा त्यांच्यापुढे पेच आला आणि पुन्हा लम करावयाचे नाही असा निश्चय करून ते या पेंचांतून तात्पुरते तरी बाहेर पडले. तात्पुरते म्हणण्याचे कारण आजन्म अविवाहित राहण्यांत विशेष अवघड गोष्ट जी असते ती त्याच्या होतून पार पडली नाही. रगड पैसा मिळणे, लोकांत मानमान्यता वाढत जाणे, कोणत्याही गोष्टीची उणीव नसणे अशा स्थितीत अविवाहित गहणे म्हणजे एक मयंकर दिव्यच होते. अण्णासाहेबांनी दुमरे लग्न केले नाही इतकेच; पण त्यांना भापला आयुष्यक्रम शुचिर्भूत रीतीने घालविता आला नाही. 'मधली स्थिति' या कादंबरीत ज्या दोन दुष्परिणामी दुर्व्यसनाचे हरिभाऊंनी वर्णन दिले आहे त्याचा घाला अण्णासाहेबांच्यावर याच वेळी पडला. आणि थोडक्याच दिवसांत त्याचे घर कुटुंयवासलास राहण्याला सर्वस्वी नालायक बनले; अर्थात आपला सर्व आप्तपरिवार मुंबईहून हालवून पुण्यास विहाड थाटावे असा नानासाहेबांना विचार ठरवावा लागला. तामसी होते तितकेच प्रेमळ होते. नानासाहेब व अण्णासाहेब हे दोघेहि बंधु कर्मठपरंपरेत वाढले होते. त्यातून अण्णासाहेब हे तर नवीन पद्धतीने शिकले सवरलेले. बह्मकर्माचे सर्व विधि त्यांना नानासाहेबांप्रमाणेच तोंडपाठ येत. याशिवाय त्यांना उपनिषदादिग्रंथही मुखोद्गत होते. तरी पण एकंदर आयुष्यक्रमाचा विचार करितां पावित्र्यासंबंधात नाना- साहेबांचा आयुण्यक्रमच अण्णासाहेबांपेक्षा सर्व नन्हेनें श्रेष्ठ ठरला. नानासाहेब हे एकधोरणी, सालस व मोठे करारी होते. कधी कधी जुन्यानव्याच्या झगड्यांत त्यांचा संताप आतरकास जाई. राव बहादूर पारसनीस हे हरिभाऊंचे हरिभाऊंचे बाळपण. स्नेही होते. ते विलायतेस जाऊन आल्यानंतर "नेहमीप्रमाणे हरिभाऊंच्या वडि. लांना भेटावयास गेले. त्या वेळी त्या तामसी ब्राह्मणाने (हरिभाऊंच्या वडिलांनी ) त्यांचा अपमान करून पुन्हां घरीं न येण्याबद्दल त्यांना यजाविलें " अशी हकीकत *"हरिमाऊशी दोन घटका" या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या आपल्या- लेखात कै. एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यानी दिली आहे. हरिभाऊंच्या वडिला- संबंधाने त्यांच्या लेखात एवढाच निर्देश आहे. तो तसाच राहू देणे म्हणजे हरि- भाऊंच्या वडिलांवर अन्याय करण्यासारखे आहे. धर्ममतासंबंधाने ते फार कडवे होते ही गोष्ट खरी आहे. पण जुनी परंपरा हाडीमासी खिळलेली व नवीन विचाराचे ज्याना वारेंहि नाही अशा गृहस्थात हा अवगुण असणे अक्षम्य होतें असें कोणासही म्हणता येणार नाही. "जितका मनुष्य तामसी तितकाच तो प्रेमळही असतो. त्याच्या मनोविकाराना त्याला आळा घालता येत नाही. संताप येण्यास कारण झालें म्हणजे ज्याप्रमाणे त्याची तामसी वृत्ति उसळून त्याच्या विचारशक्तीस दुर्घळ करून सोडते त्याचप्रमाणे प्रेम वगैरे वृत्तसिही जणूं काय मनांतून हद्दपार करून टाकते. त्याचप्रमाणे त्याची प्रेमवृत्ति जागृत होण्यास काही कारण झाल्या- बरोबर ती उचंबळून बाकीच्या सर्व वृत्तसि मनांतून त्या वेळेपुरतें नष्ट फरून टाकते. "हे दादासाहेबांचे वर्णन हरिभाऊंनी आपल्या 'भयंकर दिव्य' (प्रकरण ५० पा. २८५) या कादंबरीत दिले आहे. त्या वेळी हरिभाऊंनी आपल्या पुढे वडिलाच्या स्वभावाचाच फोटो धरिला असला पाहिजे. ज्यांचा वस्तुतः संबंध नाही अशा दहा पांच माणसांचा परामर्ष घेणारे नानासाहेब केवळ तामस वृत्तीचे निधि किंवा माणूसघाणे असतील हे केव्हाही संभवत नाही आणि ते तसे नव्हतेही. त्यांच्यासारखी सच्छील, सद्वर्तनी, एक- धोरणी व एकवचनी माणसें हल्लीच्या पिढीतही कचितच सापडतील. जुन्या परंपरेत वाढलेल्या माणसांत, नवीन विचाराने प्रगल्भ झालेल्या गृहस्थांनाही अवश्य अनुकरण करण्यासारखे काही सद्गुण असतात हे दाखविण्यासाठी हरि- भाऊंनी आपल्या पुस्तकातून ज्या भूमिका योजिल्या आहेत त्यांतील सर्वोत्कृष्ट जी दादासाहेबांची भूमिका, ती त्यांनी आपल्या वडिलांच्या दिनचर्येवरूनच रेखाटली असली पाहिजे. हारमाऊंना जुन्या नव्या धर्मममतांच्या प्रगड्यात * मासक मनोरंजन, एप्रिल १९१९. दया, ८ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. वडिलांच्यापासून त्रास झाला असला, त्यापासून त्यांना कितीहि पुस झाले असले तरी वडिलांच्या अंगचे सद्गुण ते पूर्णपणे जाणून होते आणि त्यांचा ते नेहमी आदरपूर्वकच उल्लेख करीत हे येथे सांगणे जरूर आहे. रा. रेंदाळकर यांनी हरिभाऊंच्या वडिलांच्या स्वभावांतील एकच विशेष आणि तोही त्याच्या- बद्दल लोकाच्या मनांत अनादर उत्पन्न व्हावा असा विशेष आपल्या लेखात दिला, म्हणूनच यासंबंधाने इतका विस्तृत खुलासा करावा लागला. दहा माणसाच्या कुटुंबात हरिभाऊ वाढले असल्यामुळे अनेक स्वभावाची, अनेक मनोवृत्तीची व अनेक आवडीनिवडीची माणसें पहाण्याची त्यांना लहान- पणीच संधि मिळाळी.आणि आपल्या भेदक व मर्मसंशोधक अशा निरिक्षणशक्तीने त्यांनी या सर्वांचे आकलन करून आपल्या ओजस्वी वाणीने त्यांचे हृदयगम शब्द- चित्र आपल्या कादंब-यात रेखाटून समाजाची दृष्टि अंतर्मुख केली. अविभक कुटुंबात वाढलेली व निरनिराळ्या लोकसमूहांत वावरणारी माणसे शेकडों- गणती निघतील; पण आपल्या डोळ्यांचा व डोक्याचा उपयोग करून समाजा- च्या डोळ्यात त्यास उपकारक असे दिव्याजन घालणारा हरिभाऊंसारखा प्रति- भावान व प्रेमळ प्राणी शंभर वर्षातून एखादाच निघतो ही गोष्ट त्यांच्या कादं. बन्या वाचणारांच्या अंतःकरणास पूर्णपणे पटल्यावांचून रहाणार नाही.
पकरण दुसरें. मुंबईहून पुण्यास आल्यावर. तात्या पंतोजी. हारिभाऊ पुण्यास आले तेव्हा त्यांचे वय १४ वर्षांचे होते. पुण्यास आल्यावर हायस्कूलमध्ये ते इंग्रजी * थ्या इयत्तेत शिकू लागले. इतक्या अल्प वयांतच आपल्या बुद्धिवर्चस्वाने त्यानी आपल्या मित्रमंडळीवर छाप बसविला. याच वेळेला हरिभाऊंची नैसर्गिक लेखनप्रवृत्ति हळुहळू वाढत जाऊन किरकोळ कवनें प लेख या स्वरूपात ती प्रगट होऊ लागली. घरांतील किरकोळ प्रसंगावर कविता कराव्या, भाडणाची वगैरे हकीकत लिहावी, इंग्रजी कवितेतील बारीक चुटक्याचे कविताबद्ध भाषातर करावें, हा त्याचा क्रम वृद्धिंगतच होत चालला. पढें जी आपल्या कादंबरीत त्यानी अनेक प्रकारच्या स्वभावाची व मनोव्यापाराची मनोज्ञ चित्रे रेखाटली आहेत, त्यांपैकी काही निवडक नमुने ते यावेळी आपल्या मित्रमंडळीस साविर्भाव करून दाखवीत. जानवेकराच्या वाड्यांत हरिभाऊ रहात असत, तेथेंच बोळाचे तोंडाशी ठोसरांचे वाड्यात एका तात्या पंतोजीची शाळा असे. या पंतोजीची मजा पहाण्याकरिता हरिभाऊ तेथे जाऊन बसत असत. 'मी' कादंबरीतील प्रकरण ८ मध्ये त्यानी तात्या पंतोजीचे जे विनोदी वर्णन दिले आहे ते या वेळचेच असावे असे वाटते. जुन्या अमदानीत हे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवलेले असे जे काही गृहस्थ असतील त्यांनाच या वर्णनाची यथा. र्थता विशेष पटणार आहे. संस्कृत शिकविणारे स्त्रिी. हरिभाऊंना संस्कृत वगैरे शिकविण्यात मुद्दाम एक शास्त्रीयोवा ठेविलेले असत, अमरकोश, कालिदासाची नाटके, रघुवंश, वगैरेंचा अभ्यास त्यांनी याच शास्त्रीयोवाचे नजरेखाली केला. साधारण बुद्धिवान् मुलाला देखील शाळेत पर नंबर ठेविता येतो, मग हरिभाऊंसारख्या हुषार मुलाचे तेज वर्गात पडून ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र त्याचा मित्रमंडळीवर वचक बसावा यांत आश्चर्य नाही. पण हे फक्त प्रथम प्रथमच होते. पुढे शिक्षणक्रमात नेमलेल्या विषयांचे व हरिभाऊ वाचीत असत त्या पुस्तकाचे गोत्र न पटल्याने हरिभाऊंच्या विद्यार्थिपणांत साहजिकच फरक होत चालला. याच वेळी 'मी'मधील शिवरामपंतासारखा " चागल्या गोष्टींचे काय किवा वाईट गोष्टींचे काय, व्यसन झाले, त्या गोष्टी आपल्या कर्तव्याआड येऊ लागल्या म्हणजे नुकसान हे व्हावयाचेच. आपल्याला एखादी गोष्ट अतोनात आवडते पण ती जर आपल्या कर्तव्याचे आड येऊ लागली तर त्या आवडीस धरबंधच घातला पाहिजे समजलास!" असा उपदेश करणारा हरिभाऊंना लन्या कळवल्याचा एखादा मार्गदर्शक मिळाला असता तर परीक्षा नापास होण्याबद्दल पुढे त्यानी जो लौकिक मिळविला तो त्यांना कदाचित् टाळता आला असता. न्यू इंग्लिश स्कूल. हरिभाऊ १८७८ साली पुण्यास आल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झाले. या शाळेतील अगदी आरंभीच्या विद्यार्थ्यांपैकी ते एक होते. मो. राजवाडे, प. वा. हरि कृष्ण परांजपे, प्रो. आते, रा. रा. मो. साने, रा. वामनराव रानडे, प्रो. ना. स. पानसे, प्रि. बापुसाहेब ढेकणे ही मंडळीहि न्यू स्कूलमध्ये जाण्यासाठी आधी चार चार महिने शाळा सोडलेल्या विद्याथ्यापैकीच होत. ही वेळ मोठी खळबळीची होती. महाराष्ट्रात आज जी जागृति दिसत आहे तिची प्राणप्रतिष्ठा याच काळांत केली गेली.प. वा. रा. सा. रानडे, प. वा. महादेव मोरेश्वर कुंटे, प. दा. विष्णुशास्त्री चिपळूणकरप्रभृति थोर व विद्वान् पुरुषांच्या वास्तव्याने याच वेळी पुणे शहर मंडित झाले होते. लोकांमध्ये आत्म- निरक्षणाची प्रवृत्ति उत्पन्न करून त्यांचा उत्साह कार्यप्रवर्तक करावयाचा अशी एका बाजूनें रा. सा. रानडे यांची चळवळ सुरू झाली तर दुसन्या बाजूने लोकांना पूर्ववैभवाचे स्मरण करून देऊन त्यांच्या वृत्ति उत्तेजित करावयाची चळवळ के. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आपल्या ओजस्वी लेखणीने निबंधमालेच्या द्वारा करीत होते. ज्या अवगुणामुळे आपली परवश स्थिति झाली, ते अवगुण काढून टाकण्याबद्दल लोकांना उपदेश करण्याचे कामी एक पक्ष झटत होता, तर दुसरा पक्ष लोकांच्या अंगी गुण आहेत, सर्व काही आहे, पण त्यांची परकीय राज्यामुळे माती होत चालली आहे असे प्रतिपादन करन “ असंतोषः श्रियो मूलं " या पचनाच्या अनुरोधाने लोकजागृति करीत मुंबईहून पुण्यास आल्यावर होता. या दोन मार्गात निवड करणे हे त्यावेळच्या तरुण माणसांच्या पुढे कार मोठे अवघड काम होते. हे दोन्ही मार्ग आपापल्या परीने देशकार्यार्थ अवश्य आहेत ही जाणीव हरिभाऊंसारखी त्या वेळी दुसन्या कोणास कचितच झाली असेल. हरिभाऊंनी आपल्या सामाजिक कादंयन्यांनी पहिली कामगिरी केली व त्यांच्या ऐतिहासिक कादंबन्यांनी दुसन्या पक्षाच्या कार्यास सहाय्य केले. शास्त्रीबुवा. हारिभाऊ व त्यांचे मित्र हायस्कूल सोडून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले त त्या सर्वांना विष्णुशास्त्यांच्याबद्दल अत्यंत आदर वाटत होता म्हणूनच गेले, है उघड आहे. न्यू स्कूल निघण्यापूर्वी शास्त्रं बुवा हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्याशी या विद्यार्थ्यांचा आधीच परिचय जडलेला होता. त्यावेळी शास्त्रीबुवाच्या निबंधमालेने सर्व समाजांत खळबळ उडवून दिली होती ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. मराठी लेखनकलेंत एक प्रकारची जाज्वल्यता व तेज- स्विता आणण्याचे काम प्रथम शास्त्रीबुवांनीच केले. परकीय संस्कृतीचे विचार बेमालूम गतीने मराठी भाषेत व्यक्त करण्याची शाखीबुवांची हातोटी प्रशंसनीय होती. अशा गृहस्थांचा हरिभाऊंसारख्या बुद्धिवान व प्रतिभासंपन्न तरुणावर विशेष परिणाम व्हावा व आपल्यापुढे विष्णुशास्त्रयाचा आदर्श ठेवण्याची त्याच्या ठिकाणी इच्छा व्हावी हे स्वाभाविकच होते. विचारास थोडी प्रगल्भता आल्यानंतर हरिभाऊ ग. सा. रानडे यांचे कट्टे अनुयायी बनले. पण आरंभी त्यांच्या मना• वर जर कोणाची विशेष छाप यसली असेल तर ती विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचीच होय. त्यांच्या भाषेची ओजस्विता व सामर्थ्यवत्ता याबद्दल हरिभाऊंना विशेष आदर व कौतुक वाटे. हरिभाऊ हे निबंधमालेचे कट्टे भक्त होते, पण ते मालेची अगर ति-या कत्यांची नुसती प्रशंसा करूनच राहिले नाहीत, तर विष्ण- शास्त्रयांचा आदर्श पुढे ठेवून आपणही वाङ्मयमंदिराची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांनी आकाक्षा बाळागली. ही आकांक्षा विद्याव्यासंग व प्रतिभासंपन्नता यांच्या जोरावर हरिभाऊंनी कशी फलद्रूप केली याची साक्ष त्यांची सुंदर पुस्तकें व त्याचे विविध विषयांवरील लेख पटवीतच आहेत. शिक्षकांचे प्रेम. आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे आपल्या समवयस्क स्नेही मंडळाचे चित्त हरि- भाऊंना आकर्षण करून घेता आले, इतकेच नव्हे तर, काव्यमर्मज्ञता व ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. ज्ञानलालसा यांच्यायोगाने आगरकर, टिळक, आपटे, केळकरप्रभृति आपल्या गुरूचेही प्रेम व आदरबद्धि त्यांना संपादन करिता आली. हरिभाऊ वर्गात बसले म्हणजे विद्यार्थी, पण वर्ग सुटला म्हणजे ते आपले स्नेहीच आहेत अशो त्यांच्याबद्दल त्याच्या शिक्षकमंडळीची भावना असे. हरिभाऊंचा विद्यार्थिदशेचा हा काळ म्हणजे ३५ वर्षांपूर्वीचा होय. त्यावेळेस सातव्या इयत्तेतील विद्यार्थ्यां- नाही छड्या खाव्या लागत. पण हरीला कधी छडी मारावयाची नाही असा सर्व शिक्षकांचा कृतसंकल्प असे. प्रो. वासुदेवराव केळकर हे तर हरिभाऊंशी विशेष स्नेहाने व प्रेमाने वागत. हरिभाऊंच्या रसिकपणाबद्दल त्यांना इतका आदर वाटे की, त्यानी स्वत: कोणताहि लेख किंवा कोणतेही पुस्तक लिहिले तरी ते हरिभाऊंना आधी दाखवीत असत. एकदा तर ते मार्मियन शिकवीत असता हरिगऊंनी एका कवितेचा अर्थ सुचविला तो त्यांनी ग्राह्य मानला, आणि ते खरें अतेल यात शंकाच नाही. कारण प्रो. वासुदेवराक केळकर हे जसे गुणी होते तसेच गुणग्राहीही होते ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. शाळेतून कॉलेजांत. हरिभाऊची प्रवेशपरीक्षा १८८३ साली झाली. त्यांच्या आयुष्यातील परीक्षा पास झाल्याचा हा एवढाच प्रसंग होय ! प्रवेशपरीक्षा झाल्यानंतर ते डेकन कॉलेजमध्ये शिकावयास गेले. तेथे आपल्या हुशारीमुळे ते लवकरच प्रोफेसराचे परिचित झाले. तेथेही प्रोफेसरांनी काव्यातील किंवा नाटकातील एखाद्या भागाचा अर्थ सागावा व त्यावर हरिभाऊंनी दुसरा अर्थ सुचवावा आणि प्रोफेसरानी तो त्याचा अर्थ मान्य करावा असे प्रसंग कित्येक वेळा येत. डॉ. भांडारकर हे या वर्षी शाकुंतल शिकवीत असता ५ व्या अंकात एके ठिकाणी हरिभाऊंनी एक वेगळा अर्थ सुचविला. प्रथम डॉ. भाडारकराना तो पसंत पडला नाही, पण दुस-या दिवशी ते वर्गात आले, त्यावेळेस हरिभाऊंनी आदल्या दिवशी सागि. तलेला अर्थ बरोबर आहे असे त्यांनी वर्गात आल्याबरोबर सांगितले. हरि- भाऊंची ही काव्यमर्मज्ञता ते पी. ई. च्या वर्गात असता-आणि याच वर्गात स्यांना तीन चार वर्षे घालवावी लागली अनेक वेळा दृष्टोत्पत्तीस आली. य त्याच्या मर्मज्ञतेमुळे व विद्यामिरुचीमुळे डॉ. भाडारकराच्यासारख्या विद्वद्वर्गाचे त्यांच्यावर प्रेम बसावे हे स्वाभाविकच होते. हरिभाऊंवरील त्यांचे हे प्रेम पुढेही अव्याहत व अखंडित राहिले होते. लेखनव्यवसायाबद्दल हारिभाऊंची पुढे प्रसिद्धी मुंबईहून पुण्यास आल्यावर. १३ व झाली तेव्हा तर डॉ. भांडारकर हे त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागत असत. डॉक्टर भांडारकर यांच्याकडून कोणाला काही काम करून घ्यावयाचें असले तर हरिभाऊंची चिठ्ठी नेली की तें हमखास व ताबडतोब व्हावयाचे, इतके त्याच्यावर हरिभाऊंचे वजन असे. हे सर्व बस्तान ठीक होते. पण परीक्षेच्या अभ्यासाचा हरिभाऊंचा बारावा बृहस्पति केव्हाच पालटला नाही. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचा बहुतेक वेळ रीती- प्रमाणे अवातर पुस्तके वाचण्यातच गेला, आणि अखेर परीक्षेचा निकाल व्हावयाचा तो होऊन ते दुसन्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुन्हा पी. इ. च्या वर्गात आले. डेक्कनमधून फर्ग्युसनमध्ये न्यू इंग्लिश स्कूलमधील हरिभाऊ जसे पहिले विद्यार्थी, त्याप्रमाणेच फग्र्युसन कॉलेजच्या स्थापनसालीही ते त्या कॉलेजचे विद्यार्थी झाले. तेथील प्रोफेसर मंडळी आणि हरिभाऊ यांचा गुरुशिष्यसंबंध पूर्वीचाच होता. तेथें पूर्वीप्रमाणेच कै. वामनगव आपटे, प्रो. केळकर प्रभृति प्रोफेसराची त्याची कित्येक वेळा वाड्मयविषयक चर्चा होई व प्रोफेसरांच्याकडून काव्यमर्म ओळखल्यायद्वल हरिभाऊंनी धन्यवाद मिळविल्याचे अनेक प्रसंग येत; पण याही वर्षा परीक्षेचा त्याचा नन्नाचा पाढा चुकला नाही व ते याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १८८६ साली पुन्हाँ डेक्कन कॉलेजमध्ये गेले. फर्ग्युसनमधून पुनः डेक्कनमध्ये. प्रो. भानू, प्रो. विजापूरकर, रा. नारायण महादेव समर्थ वगैरे मंडळी याच वेळेस या कॉलेजमध्ये होती. याच वर्षी येथे गडिगरूम व लायबरी स्थापन झाली. या लायबरति घ्यावयाच्या पुस्तकांची निवड करणारापैकी हरिभाऊ है एक होते. या लायबरीतील कित्येक पुस्तके त्यानी एका वर्षात वाचली, पण इंग्लिश व संस्कृत याशिवाय बाकीच्या विषयाचे त्यांना दर्शन न घडल्यामुळे परीक्षेचा निकाल व्हावयाचा तोच झाला. हरिभाऊ एकंदर परीक्षेत नापास होत असले, तरी ज्या विषयात ते पास होत असत त्या विषयाच्या परीक्षकास त्यांचा पेपर वाचून कौतुक वाटल्याशिवाय राहात नसे. हरिभाऊ पी. ई. चे परीक्षेस बसले होते, त्यावेळेस प. वा. बाबासाहेब पेंडसे हे संस्कृतचे परीक्षक होते. "परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांत हरिभाऊंचाच पेपर २३ ह ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. मला उत्कृष्ट वाटला " असे त्यांनी एकदा उद्गार काढले होते. इग्लिशयातही न्यांचा असाच लौकिक असे. या पेपरमध्ये विशेषतः पॅराफेनबद्दल त्यांची प्रशंसा होत असे. गणितांतील अगणित अडचणी! इतकेंही अवून ते परीक्षा नापास होत असत, याचे कारण गणिताकडे त्यांचे दुर्लक्ष होते हे होय. हारभाऊंसारख्या बुद्धिवान् माणसाला, प्रयत्न केला असता तर गणित विषय पारंगत करून घेता आला नसता असें नाही. पण एकदा एक विषय आपल्याला येत नाही, त्यावर परिश्रम करणे निरर्थक होणार अशी समजत शली म्हणजे त्या विषयाकडे मनुष्याचे साहजिकच दुर्लक्ष होते. हरिभाऊंना 'तुम्ही गणित का करीत नाही' असा कोणी प्रश्न केला म्हणजे 'गणित विषयांत अगणित अडचणी आहेत ' असे ते विनोदाने सागत. लहानपगी वाचनाचा किंवा लेख लिहिण्याचा नाद लागून विद्याभ्यासाचे मातेर झालेले असे विद्यार्थी काही थोडे थोडके सापडत नाहीत. अशा विद्यार्थ्यांत हरिभाऊंसारखे पुढे नाव करणारे मात्र फारच थोडे असतात. 'मी' कादंबरीत शिवरामपंतानी 'मी'ला केलेला उपदेश हरिभाऊनी लिहिला त्या वेळेस विद्यार्थिदशेतील स्वतःचीच स्थिति त्याच्या डोळ्यांसमोर असली पाहिजे. 'मी । ऊर्फ भाऊ याने एक पुस्तक वाचण्याच्या नादात एके दिवशी शाळेला बुट्टीस दिली. ही गोष्ट समजल्यावर शिवरामपंत भाऊस म्हणतात:-- "तुझ्या या वयातच वाचनाचा किंवा कविता करण्याचा किंवा काही लेख लिहिण्याचा नाद लागला की, पुढे सगळेच मोठाले कवि किंवा मोठे पंडित किंवा मोठे वक्त होतात असे नाही. हजारात एखादा तरी होतो किंवा नाही कोणास ठाऊक. बाकी सारे अनिष्ट स्थितीलाच जागार. एखादी कविता केली. आपल्या स्नेही मंडळीत थोडेसे बरें भाषण केले किंवा एखादा निबंध लिहिला आणि त्याबद्दल स्ने यांनी वाहवा केली की चढून जाऊन त्याच नादाला लागणारे आपण कवी, किंवा वक्ते किंवा निवधकार होणार असें वाटू लागून त्यामुळे आपल्या अभ्यासावर पाणी ओतून नुकसान करून घेतलेले किती लोक आहेत याची तुला कल्पना आहे १ ९कदा अमुक विषयात कोणी बरा आहे असे म्हटले की लागली त्याची त्याच विषयाकडे लहर ! मग इतर विषयाचें काही का होईना ! किंबहुना इतर विषय आपल्याला येत नाहीत यातच त्याला पाढी वाटावयाला मुंबईहून पुण्यास आल्यावर. १५ गते. अशा प्रौढांमुळे किती मुलांचे नुकसान झाले आहे याची तुला आज उल्पना नाही. आजचा तुझा पहिलाच दिवस आहे म्हणून तुला मी सागतों आहे. " (मी-प्र. ३३) कॉलेज सोडणारांचे गुरुजी ! 'लहानपणी अभ्यास सोडून इतर वाचनाचा व्यवसाय करणान्या विद्यार्थ्या- पैकी हजारांत एखादा तरी पुढे मोठा पंडित होतो किंवा नाही कोणास ठाऊक हैं शिवरामपंताचें विधान यथार्थ नाही असे कोण म्हणेल १ हरिभाऊ यास अर्थातच अपवाद होते हे त्यांच्या पुढील चरित्रक्रमावरून कोणास सागावयास नकोच. हरिभाऊंनी कॉलेज सोडले त्या वेळी त्यांच्या कित्येक स्नेह्यानीहि विद्यार्थिः दशेचा निरोप घेतला. ह्या स्नेह्याच्या घरची वडीलधारो माणसे हरिभाऊना "कॉलेज सोडणाराचे गुरुजी " असें म्हणत ! सामान्य व्यवहारापलीकडे ज्याची दृष्टि जात नाही किवा हरिभाऊंसारखे ज्याना आजकालच्या गोष्टीचे निरक्षिणच काय पण उद्याच्या गोष्टीचेही अगाऊ आकलन करण्याचे सामर्थ्य नाही, त्यानी हरिभाऊ. बद्दल असे विधान करावें यात काही आश्चर्य नाही. हरिभाऊ पुढे आपल्या उत्कृष्ट ग्रंथानी समाजाचे गुरुजी झालेले पाहण्यास, या वडीलधा-या माणसापैकी जे हयात होते, त्यांना आपल्या वरील विधानाची आठवण होऊन अर्थातच विस्मय वाटल्याशिवाय राहिला नसेल !
प्रकरण तिसरें. पंचविशीच्या आंतील लेखनव्यवसाय. आजन्म विद्यार्थी. व्यवहारांत सामान्यतः ज्या काळास विद्यार्थिदशा असे समजण्यात येत असे, तो हरिभाऊंचा काळ त्याच्या वयाच्या २४ व्या वर्षी समाप्त झाला. पण हरिभाऊ हे वस्तुतः आजन्म विद्यार्थी होते. इतकेच नव्हे तर विद्येचे मर्म संशोधन करणारे होते. हरिभाऊंची बुद्धि खरोखरच अष्टपैलू होती. त्याच्याजवळील ग्रंथसंग्रह विविध प्रकारचा असे. वाड्मयाच्या एकाच शाखे- पुरते त्याचे वाचन मर्यादित नसे. इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, शामन. शास्त्र वगैरे अनेक शास्त्रावरील ग्रथ त्याचेपाशी असत आणि ते अगदी आज तारखेपर्यंतचे असत. कोणतेही वाचनीय असें नवीन पुस्तक निघो, ते हरि- भाऊंनी खरेदी करावयाचेंच. याची किंमत कितीही असली तरी त्याची ते पर्वा करावयाचे नाहीत. नवीन पुस्तकें कोणती झाली हे साधारणतः त्याना अगदी यगेवर माहीत असे. इतकेच नव्हे, तर त्यातील मुद्याचा भागही त्याना अवगत असे, निदान तो काढून दाखवावयाचा असल्यास ते चटकन क इन दाखवीत. हरिभाऊंच्या सहवासांत असलेल्या माणसापैकी जी काही थोडी विद्याभिरुचि बाळगणारी होती, त्याना त्यांच्या बहुश्रुततेचा कमीअधिक फायदा होत असे. विद्येचे एकनिष्ठ उपासक. सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणान्या जाणान्या माणसांची कितीही गर्दी असो, हरिभाऊंच्या हातात एखाद्या हारभक्तिपरायण माणसाच्या हातांत जपाची माळ असावी त्याप्रमाणे, एखादें पुस्तक हे असावयाचेंच. आणि या पुस्तकांत एखादा मनोरम भाग त्यांना आढळला तर तो ते भोवतालच्या मंडळींना अवश्य गचून दाखवावयाचे. ही मंडळी नेहमीच रमिक अभिरुचीची असे असें नाही. .
पंचविशीच्या आंतील लेखनव्यवसाय. कित्येक तर हे वाचन श्रवण करण्याचा कंटाळाही करीत. आपण हे वाचन न्याच्यावर बळजबरीने लादीन आहोत ही गोष्ट हरिभाऊंना समजत नसे असेही नाही. पण ग्रंथाच्या सौन्दर्याने ते इतके तलीन होऊन जात की, हे समजनही विवक्षित भाग वाचून दाखविण्याचा मोह त्याना आवरून धरवत नसे । विद्येचे ते खरोखरच एकानेष्ठ भक्त होते. पुस्तके वाचून न्याना कोठे शिकवा. वयाचे होते किंवा कोठे व्याख्याने यावयाची होती, अशातला भाग नव्हता; पण केवळ विद्येची महनी म्हणूनच ते तिची उपासना करणारे होते. मनाची प्रगल्भता व संस्कृति वृद्धिगत करण्यास साह्यभूत होणारे अभे प्रायः सर्व विषय त्याना परिचित असत. सर्वच विषयात त्याची पर्ण गति होती, अशी अर्थातच स्थिति नव्हती व तसे होणे शक्यही नव्हते. स्वतः गाना आले नाही तरी गवई गाऊ लागला की त्यातले हृद्गन समजावयाचे, त्यात चांगल्या-वाइटाची निवड करता यावयाची, अशा माणसाला जशी गाण्याची माहिती आहे असे म्हणतात, त्याप्रमाणेच हरिभाऊंची अनेक विषयान गति असे याच्याशी बोलावयाचें म्हणजे घरंच जपून बोलले पाहिजे असा गिशिष्ट विषयात पारंगत असलेल्या माणसामही वचक बसावा इतके त्याचे वाचन विस्तन द वेचियपर्ण असे. वाड्मय हा तर त्याचा हातखडा विषय असे. त्यात याची विवेचक द चिकि सक शक्ति पदोपदी दृष्टोत्पत्तीस येत अमे. भवभूति श्रेष्ठ की कालिदास श्रेष्ठ ! या शक्तीचे निदर्शन त्याच्या कॉलेजच्या दिवसातही वेळोवेळी कसे होत असे याचे दिग्दर्शन यापूर्वी केलेच आहे. त्याच्या या चिकित्सक शक्तीची चिन्हें त्याच्या अगदी अल्प वयातही दिसून आली. संस्कृत कवीमध्ये हरिभाऊंची कालिदासावर विशेष भक्ति अमे. कालिदास, शेक्सिपअर व भवभूति " या मथळ्याखाली प्रि. आगरकर यानी सन १८८१ साली केसरीत एक लेख लिहिला होता. त्यात त्यानी कवि या दृष्टीनं भवभूतीची योग्यता कालिदामाहूनही अधिक आहे असे विधान से होते. ते हरिभाऊना अर्थातच पसंत न पड़न त्यानी “बिचारा " या सहीन केसरीकडे एक पत्रव्यवहार पाठ- विला. तो त्या पत्राच्या त्याच सालच्या ता. २९ मार्चच्या अात प्रसिद्वही झाला आहे. या लेखात भवभूतीहन कालिदास हा कता आवेक सरस व मनोज्ञ कवि आहे, हे त्याच्या ग्रंथातील अनेक उतारे देऊन त्यांनी दाखविले होते. त्याचे चुलते १८ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. के. अण्णासाहे आपटे याजबरोबरही त्याचा या विषयासंबंधाने पुष्कळ वेळा वादविवाद होई. हरि आपली बाजू मोट्या वेषाने पण मार्मिक रीतीने प्रति- पादन करीत आहे हे पाहून अण्णासाहेबाना कौतुकच वाटे. त्याचा हा वाद विवाद नसता तोडामोडीच नव्हे तर कित्येक बेठा पत्रव्यवहारानेही चालन असे. कसरीवरील श्लोकाचे भाषांतर. याच सालात “ स्थिति नो । दध्याः " हा जो जगन्नाथ पडिताचा श्लोक केसरीवर येतो त्याचे पद्य भाषांतर करून हरिभाऊंनी केसरीकारांकडे विद्यार्थी या सहीने पाठविले होते. हरिभाऊंनी या श्लोकावर आपली सही करून तो पाठविला असता तर आगरकराना अर्थातच त्यास योग्य स्थान दिले असते. कारण त्याच्या आवडत्या हीकडून आलेल्या श्लोकाचा त्यानी केव्हाही अहेर केला नसता. पण बिनसहीने आलेल्या या श्लोकास त्यानी बिनतकार योग्य स्थळ दिले यात हरिभाऊच्या काव्यविशारदतेची विशेषच पारख झाली असें म्हणावे लागते. केसीकरिता त्यानी जो श्लोक पाठविला तो खालीलप्रमाणे होता. द्विपेंद्राच्या नाथा क्षणभरिहि या दुर्धर वनी, मदान्धा रे येथे वसति करणे आण न मनी, गजांच्या भ्रांतीने प्रखर नखरांनी गुरुशिला विदारोनी आहे बघ गिरिमधे सिंह निजला. मोजक्या शब्दात आणि मुबोध गतीने भाषातर करण्याच्या कामी हरिभाऊंचा कसा हातखंडा असे, याची माधारण कल्पना यावरून येणार आहे आणि हा श्लोक वयाच्या सतराव्या वर्षी हरिभाऊंनी केला ही गोष्ट लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे. 'लाँगफेलोच्या साम ऑफ लाईफ. "जीवितसार" या नावाने हरिभाऊंनी में कविताबद्ध भाषांतर केले आहे त्यावरूनही त्याची काव्याचे भाषांतर करण्याची हातोटी उत्कृष्ट गतीने दिसून येते. शिष्यजनविलाप, याच्या दुसन्या साली विष्णुशाखी चिपळूगकर यांच्या निधनाचा अत्यंत शोचनीय व जनतेची हृदये दुःखित करणारा प्रसंग घडून आला, त्यावेळी हरि- भाऊंनी "शिष्यजनविला "हे काव्य केलें. शास्त्रीबुवाची विद्वत्ता, त्यांच्या भाषेचा जोरकसपणा, त्यांची देशहिततत्परता, पुण्यपत्तनात त्यांनी निर्माण पंचविशीच्या आंतील लेखनव्यवसाय. १९ केलेल्या वेगवेगळ्या संस्था वगैरेंचे या काव्यांत फारच हृदयगम रीतीने वर्णन केले आहे. काव्यात उपयोजिलेले कित्येक अकार चांगल्या नाणावलेल्या कवीलाही भूषविण्यासारखे आहेत. त्यांची ही कविता अर्थात् त्याच्या नावाने प्रसिद्ध झाली नाही. पण कात्याचा प्रसाद व सरसता ही पाहून ते निर्माण कर- णाच्या विद्यार्थ्यांची सर्वजण प्रशंसा करूं लागले. शास्त्रीबुवाच्या मृत्यूबद्दल दुःख प्रदर्शित करण्याकरिता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सभा भग्ली, त्यावेळी पर- लोकवासी गोपाळराव आगरकर यानी या कामातील निवडक भाग मर्व विद्या जनाला वाचून दाखविला व असे काव्य निर्माण करणारे विद्यार्थी ज्या शिक्षण- संस्थेत निपजतात त्या संस्थेचा मविष्यत्काळ खरोखरच उत्कर्षमय होणार अशी खूणगांठ बांधण्यास काही हरकत नाही असे सद्गादित अंत:करणाने उद्गार काढले. या पुस्तकाच्या बहुतेक प्रती विद्यार्थ्यांतच खपल्या आणि त्या अवघ्या दोनच महिन्यात खपल्या. अथ लावण्याची हतोटी. याच सुमारास हरिभाऊ शाकुंतल वाचीत असत. त्यात पाचव्या अंकात दुष्यंताचे तोडी- स्त्रीणामशिक्षितपटुत्वममानुषीषु संदृश्यते किमुत या प्रतिबोधवत्यः । प्रागन्तरिक्षगमनात्स्वमपत्यजात- मन्यर्द्विजै. परभृता. खलु पोषयन्ति । असा लोक आहे. स्त्रियाची उपजत हुषारी पशुपक्ष्यांमध्येसुद्धा दिसून येते, मग ती मुबुद्ध अशा मनुष्यप्राण्यातहि दिसून यावी यांत आश्चर्य तें काय ? हा या श्लोकाचा भावार्थ समजण्यांत येतो, पण केवळ एवढाच त्याचा अर्थ असता तर शकुंतलेला इतके राग येण्याचे कारण नव्हते. तिने यानंतर राजाला में उत्तर दिले आहे ते राजाच्या या भाषणाने आपल्या दुःखावर डागण्या बसल्या या भावनेने दिले आहे. तेव्हा या श्लोकाचा जो उत्तान अर्थ दिसत आहे त्याहून वेगळा काही अर्थ निघ शकेल की काय असा विचार येऊन हरिभाऊंचे चुलते अण्णासाहेब यांनी आपल्या "मौजेच्या चार घटका" या पुस्तकात शाकुंतलाचे जे माषांतर दिले आहे, त्यांत त्यांनी 'अमानुषीषु' या पदाचा, अप्सरांमध्ये किंवा देवांगनामध्ये असाही अर्थ करता येण्यासारखा आहे अस ध्वनित केले आहे. हा हः ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. धागा घेऊन या श्लोकाने 'खाण तशी माती' असेच दर्शविण्याचा दुष्यंताचा हेतु असणे कसें संभवनीय आहे हे हरिभाऊंनी एका प्रसंगी स्पष्ट केले. स्त्रियांचा उपजत चाणाक्षपणा अप्सरांमध्ये नेहमीच दिसून येतो, मग मेनकेसारख्या ज्या प्रमुख अप्सरा आहेत त्यांची गोष्ट कशाला पाहिजे. देवांच्या वेश्या (परभृताः ) आपल्या अपत्याचे ब्राह्मणांकडून संगोपन व्हावे अशी अंतरिक्षात जाण्या पूर्वी तजवीज करितात, वगैरे या श्लोकाश अर्थ त्यानी लावला व प्रोफेसर परशराम नारायण पाटणकर यांनी आपल्या शाकुंतलाच्या प्रस्तावनेत तो विशेष मार्मिक आहे असे वाटल्यावरून दिला. विद्यार्थ्यांची गुरुवरील टीका. हरिभाऊंना परीक्षेत यश आले नाही, तरी त्याचा अधिकार फार मोठा होता हे अल्पवयातच कसे निदर्शनास आले याचे आतापर्यंत काही मासले दाखविले. पण वस्तुत: त्याच्या लेखनक्रियेला त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षीच प्रारभ झाला. इंग्रजी ४ थ्या इयत्तेत असतानाच त्यानी " पाडुरग हरि " या नावाच्या पुस्तकाचे बरेचसे भाषातर केले होते. ज्या वयांत मुलाना वर्गातील निबंध हिण्याचीही मारामार पडते त्या वयात हरिभाऊंच्या लेखनक्रियेस प्रारंभ हावा, ही गोष्ट वाड्मयसाम्राज्यात पुढे जे त्यानी अद्वितीय स्थान मिळविलें याची सूचक नव्हती असें कोण म्हणेल १ प. वा. गोपाळराव आगरकर याना केलेलें हॅम्लेटचे भाषातर विकारविलसित या नावाने प्रसिद्ध झाले. त्यावर निबंध. चंद्रिका मासिकात हरिभाऊंनी सन १८८२ साली एक टीकात्मक लेख लिहिला. यावेळी हारभाऊ हे विद्यार्थीच होत. आपल्या विद्यार्थ्याने आपल्या पुस्तकावर ७२ पृष्ठाचा एक टीकात्मक लेख लिहिला हे पाहून आगरकसना अर्थातच परमावर्धाचे कोतक वाटले आणि त्याबद्दल त्यांनी हरिभाऊंची वर्गा- तील सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रशंसाही केली. कै. नारायण बापूजी कानिटकर यांच्या रोमिओ अॅण्ड ज्यूलिएट या नाटकाच्या भाषातरावरही त्यानी विस्तृत द सागोपांग टीका केली होती. हरिभाऊंचा शेक्स्पिअरचा व्यासंग विशेष असे आणि त्या व्यासंगाला १७११८ वर्षांच्या अल्प दयातच साधारण प्रगल्भ स्वर आले होते हैं वरील हकीकनी वरून समजून येईलच. शेक्स्पिअर हा त्याचा आवडता काव होता. शेक्स्पि- अरची नाटके व त्यावरील विद्वान् ग्रंथकाराची परीक्षणे यांचा त्यांनी फारच पंचविशीच्या आतील लेखनव्यवसाय. चागला अभ्यास केला होता. शेक्स्पिअरचें एक विस्तृत परीक्षण करावे असा विचार ठरवून यानी जे थोडे लेख लिहिले ते चित्रमयजगतात प्रसिद्धही झाले आहेत, पण पुढे ते काम तसेच अपुरे राहिले. हे परीक्षण समाप्त करण्यास हरिभाऊ वाचले असते तर त्यामुळे महाराष्ट्रवाड्मयांत उत्कृष्ट प्रकारची भर पडली असती यात संशय नाही. शेक्स्पिअरच्या सप्तपद्याचेही ( सॉनेटस् ) भाषांतर त्यानी सुरू केले होते. त्याचा सरासरी तृतीयाश भाग लिहूनही तयार झाला आहे. तेवढा जरी प्रसिद्ध झाला तरी कवि या दृष्टीने शेक्स्पिअरची योग्यता केवढी मोठी होती हे मराठी वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. युनिव्हर्सिटीचे परीक्षक. हरिभाऊंना परीक्षेच्या कामात यश आले नाही तरी पण त्याचा विद्याव्यामंग अखंडित रीतीने चालल्यामुळे युनिव्हर्सिटीच्या पदवीची उणीव त्याना केव्हाही भासली नाही. किंबहुना सतत परिशीलनाने त्याना एवढा अधिकार आला होता की, पदवी मिळविण्याच्या दृष्टीने ज्या युनिव्हर्तिीत प्रवेश मिळता मिळता पाना मारामार झाली त्याच युनिव्हर्सिटी आपल्या अभ्य सप्रणालीतील अत्युच्च परीक्षेला त्याना सतत दहा वर्षे परीक्षक नेमून त्याच्याबद्दल आपला आदर व्यक्त केला. युनिव्हर्सिटीच्या कामाची दिशा ठरविणा-या सेनेटचेही ते सभासद होते. विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चरशिची जी जागा प्राय: पदवीधराचे वाट्याला यावयाची नाही हरिभाऊंना स. १९१५ मध्ये मिळाली होती. त्याची ही व्याख्याने झाली त्यावेळेस श्रोत्याची नेहमीच्या मानाने बरीच गर्दी जमत असे. युनिव्हर्सिटीच्या पदवीची उपाधी नसताही केवळ आपल्या आंगच्या पात्रतेने विद्वानाच्या समाजात प्रमुखस्थान मिळविल्याची हरिभाऊंच्यासारखी उदाहरणे कोठेही झाले तरी थोडीच असावयाची. पुढील आयुष्यक्रमांत काय करा. वयाचे हे ज्याचें आधी ठरलेले असते असे विद्यार्थी फारच थोडे सापडतील. हरिभाऊ अशा थोड्या विद्यार्थ्यांपैकीच एक होते. आयुष्यक्रमाचे ध्येय. शिष्यजनविलाप " या काव्याच्या शेवटच्या म्हणजे ८९ प्या श्लोकात त्यानी आपले हे ध्येय स्पष्टपणे सागितले आहे. शास्त्रीयुवांनी ज्या निर- निराळ्या शिक्षणप्रसारक संस्था स्थापन केल्या त्या चालविणे नूतन पिढीचे कसे कर्तव्य आहे हे सागताना हरिभाऊ या का-यांत म्हणतात:- २२ ह. ना. आपट याच संक्षिप्त चरित्र. युष्मच्छिक्षणवारिधीमधिं अम्ही जे मनसे राहिलों, वैया जरि जाउँ देउंच तया, जन्मा कशाला अलों? जो जो कृत्यसमूह या पुरिमधे धैर्य तुवां स्थापिला, तो तो चालविण्यास जन्म खरचूं सारा अम्ही आपुला शास्त्रीबुवानी व त्याच्या सहकारी मित्रानों में कार्य आरंभिलें होने ते आम्ही भव्याहत पुढे चालवू, ही जी हरिभाऊंनी या श्लोकांत शिष्यजनाच्या वतीने प्रतिज्ञा केली आहे ती केवळ काव्यसृष्टीतच न ठेविता प्रत्यक्ष व्यवहारा- तही त्यांनी तिची पूर्तता केली. विद्यालय, मुद्रगालय व पुस्तकालय हे शिक्षणप्रसाराचे आधुनिक कालातील प्रस्थानत्रयच होय. शास्त्रीबुवानी या तिन्ही साधनांचा आश्रय करून समाजांत ज्ञानप्रसार करण्याचा संकल्प केला. हरिभाऊंनीही आपल्या आयुष्यक्रमांत याच कार्याची परिपूर्ती करण्यास अगदी अल्प वयांतच प्रारंभ करून, तो अव्याहत ३०३२ वर्षाच्या परिश्रमाने उत्कृष्ट गतीने कसा तडीस नेला, याची त्याच्या या चरित्रा- वरुन वाचकांना निदान स्थूल कल्पना येईल अशी आशा आहे. पुनः तोच निकाल झाला ! हरिभाऊंनी एलएल. बी. व्हावें निदान वकिलीची परीक्षा तरी यावी अशी त्यांच्या चुलत्यांची व इतर आप्तेष्टांची फार इच्छा होती. पण पुढे जे कधीच घडावयाचे नव्हते ते कसे घडून येणार ! अण्णासाहयाच्या इच्छेप्रमाणे हरि- माऊंना वकील होता आले नाही. पण पुढे त्यांनी जी समाजाची वकिली करून त्यात स्थित्यंतर घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो पहातां, ते केवळ पेशाकरिता भाडोत्री वकील झाले नाहीत, हे सुदैवच समजले पाहिजे. त्यांचे चुलते अण्णासाहये यांचे हरिभाऊंवर पुत्रवत् प्रेम असे. पण हरि भाऊंचा विद्याभ्यास नीट रीतीने तडीस गेला नाही याबद्दल त्यांचीही हरिभाऊ. वर थोडीशी नाराजी झाली. ही नाराजी अर्थातच प्रेममूलक होती. वकिली नाही तर नाही, पण मुलाला काही तरी धंदा लावून द्यावा या हेतूने अण्णासा. हेबांनी त्यांना मुंबईस नेले व तेथे अगदीश्वर प्रेसमध्ये छापखान्याचे काम शिकण्यास ठेविले. पण शिकणे म्हटले म्हणजे त्याला काही तरी नियंत्रण व शिस्त लागते. त्यास लोकांनी घालून दिलेल्या मार्गाने निमूटपणे जाण्यासारखा आज्ञा- धारकपणा किंबहुना अंधविश्वासही लागतो. त्याचे हरिभाऊंच्या ठिकाणी असावे पंचविशीच्या आंतील लेखनव्यवसाय. २३ काम ! तसे वास्तव्य नसल्यामुळे याही ठिकाणी दुसन्यान ठरविलेल्या धंद्याची वेसण आपल्या नाकात अडकवून घेण्याची त्यानी चुकवाचकव केली आणि अखेर त्यांच्या पूर्वपरंपरेप्रमाणेच ते या छापखान्याच्या परीक्षेतही नापास झाले ! खिळे जोडणे, मशीनवर जाण्यास फर्मा तयार करणे, मशीनची माहिती मिळविणे फर्मा जुळविणे, कागद मोडणे, छपाईचा आकार ठरविण वगैरे छापखान्या संबंधातल्या सर्व गोष्टीची माहिती पुढे आनंदाश्रमातील पुस्तक प्रकाशनाचे चालविण्यासंबंधात हरिभाऊंना उपयोगी पडावी या हेतूनेच अण्णासाहेबानी त्याना मुंबईत जगदीश्वर छापखान्यात ठेविले होते. पण त्याचा परिणाम वर सांगितल्याप्रमाणेच झाला. आपल्या प्रिय भगिनी श्रीमती काशीताई कानिटकर व प्रिय मित्र रा० रुष्णाजी केशव गोखले यांना त्यानी त्या वेळी पत्रं लिहिली त्यात, हार नारायण आपटे व परीक्षा याचे अत्यंत वाकडे कसे आहे हे सुप्रसिद्धच आहे. त्याप्रमाणेच आम्ही येथील परीक्षेतही नापास झालो !" अशा आशयाचा मजकूर होता. हरिभाऊंचा बाणेदारपणा. जगदीश्वर प्रेसमधील शिक्षणाचा अशा त-हेन निकाल लागल्यानंतर अण्णा- साहेबानी "हरिभाऊस" एक पुस्तकप्रकाशनाची कपनी काढण्यास सागितले. पण हरिभाऊंनी ' माझ्याने ते काम होणार नाही. व त्यात न येईल असे स्पष्ट सागितले. पुढे त्यानी करमणूक काढली. तेव्हा अण्णासाहेबानी त्याप्त एक पत्र पाठवून खडखडीत सागितले की 'तुं जर माझी कोणतीच गोष्ट ऐकत नाहीस तर तुला मजकडून एक कपर्दाकसुद्धा मिळणार नाही. ' या पत्राचे उत्तर हरि- माऊंनीही तसेंच लिहिले, व अण्णासाहेबास कळविले की, “ मी तुमच्या पैशाची केव्हाच आशा केली नाही, तुमचा स्वकष्टार्जिन पेसा आहे. तुम्ही त्याचे मालक आहात, त्यावर माझा डोळा स्वप्नात सुद्धा नव्हता व आताही नाही. " खरोखरीच म प्रसंग मोठा आणीबाणीचा होता. दुसन्याचे म्हणणे अगदी निरुपयोगी, किंबहुना दुसन्याचे म्हणणे मुळीच नसले पाहिजे" अशी भयंकर दिव्यातील दादासाहेयाच्याप्रमाणे अण्णासाहेबाची प्रवृत्ति नसल्यामुळे त्यांनी हा वाद विकोपास न जाऊं देता थोडक्यातच मिळतें घेतले व हरिभाऊंची आनंदाश्रमावर स्थापना केली.
प्रकरण चवथें. मधली स्थिति. मनोज्ञ मन्वंतराचा पाया. पुढे आपण उत्कृष्ट लेखक होणार याची स्पष्ट सूचना देणार । हरिभाऊंच्या हातून जे लहान सहान प्रयत्न झाले त्यांची साधारण माहिती यापूर्वी दिलीच आहे. हे सर्व प्रयत्न त्याच्या विशी एकविशीत झालेले. यात सर्वात श्रेष्ठ व हरिभाऊच्या अकाल परिपक्वतेची स्पष्ट जाणीव उत्पन्न करून देणारा त्याचा प्रयत्न म्हटला म्हणजे त्याची 'मधली स्थिति' ही कादंबरी होय. या कादबरीची हकीकत मोठी मनोरंजक आहे. हे पुस्तक १८८५ साली प्रसिद्ध झाले. पण हरिभाऊच्या कल्पनेने ते यापूर्वीच एकदोन वर्ष लिहून निघाले असावे. या वेळी हरिभाऊंचा रेनॉल्डसच्या कादबन्याचा विशेष व्यासग असे. प्रथम वयात शास्त्रीबुवा हेच त्याचे आदर्श होते. आणि शास्त्रीबुवानी हवा तो विचार सुगम रीतीने प्रदर्शित करण्याच मराठी भाषेस सामर्थ्य आगले ते रेनॉल्डसच्या वाचनामुळेच होय, असा त्या वेळी लोकप्रवाद असल्यामुळे हरिभाऊही या कादंबऱ्या वाचीत असत. यामुळे त्याच्या डोळ्यावर जो परिणाम झाला तो त्याना जन्मभर भोगावा लागला. रेनॉल्डसची 'ओल्ड लडन' या नावाची एक कादंबरी आहे. तिलाच मराठी पेहराव चढवून ती महाराष्ट्रवाचकापुढे ठेवावी असा हरिभाऊंचा प्रथम मनोदय होता. त्याप्रमाणे या पुस्तकाचे पहिले प्रकरण भाषांतरमय आहे. पण परक्याच्या कल्पनाशक्तीवर चरितार्थ चालविणे मोठेसें भूषणावह नाही असें वाटूनच की काय, हरिभाऊंनी तो नाद सोडून दिला व या पुस्तकाच्या दुसन्याच प्रकरणापासून स्वतंत्र रीतीने ग्रंथरचना करण्यास मुरवात केली. ग्रंथाची काही प्रकरणे तयार झाली, ती त्यांनी आपल्या काही मित्राना दाखविली. ती पाहून त्याचे कित्येक स्नेही अर्थातच चकित होऊन गेले. मराठी भाषेतील एका नवीन पण, मनोज्ञ मन्वंतराचा हा पायाच होय असें त्यांना वाटले. पण हे पुस्तक छापून कसें निवावें ही विवंचना सर्वापुढे येऊन मधली स्थिति उभी राहिली शेवटी त्याच्या एका स्नेह्याने येथील पुणेवैभवाचे मालक प. वा. शंकरराव केळकर यांना त्याबद्दल विचारले. रा. केळकर हे जुन्या मताचे कहे अभिमानी होते. या पुस्तकाचा प्रतिपाद्यविषय सुधारको मताचा आहे हे समजूनही त्यानी हे पुस्तक पुणेवैभवात छापण्याचे कबूल केले. ही एकच गोष्ट हरिभाऊच्या रचनासौष्ठवाची साक्ष पटविते. रा. केळकर यांनी कबूल केल्याप्रमाणे हे पुस्तक दरमहा पुणेवैभवास जोडलेल्या एका जादा पुरवणीत खडशः प्रसिद्ध होऊ लागले. कादंबन्यांचे उद्दष्ट पहिले प्रकरण ज्या अकात प्रसिद्ध झाले त्या अकातच 'कादंब-याचे उद्दिष्ट' या मथळ्याखाली एक सुंदर अग्रलेख प्रसिद्ध झाला. कादंब-याचा उद्देश मनो. जन हा आहेच, पण त्याबरोबरच समाजाला सद्बोध करून त्यास सन्मार्गास लावण्याचे मत्कार्य कादंब-याच्या हातून होणे जरूर आहे, असें या लेखात प्रति- पादन करण्यात आले होते. हा लेख हरिभाऊंचाच होता. हरिभाऊंनी या लेखात निदर्शित केलेला कादबन्याचा उद्देश त्याच्या कादंब-यानी किती उत्कृष्ट तन्हेने सफल केला हे महाराष्ट्रवाचक जाणतच आहेत. साधारण कादंबरी म्हटली की ते हलक्या दर्जाचे वाङ्मय, म्हणून लोकानी नाके मुरडलीव म्हणून समजावे. पण हरिभाऊंची ही कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली तेव्हा समाजात खळबळ उडवून देण्याचे कामी अशा प्रकारचे वाडमय किती सामर्थ्यवान् असते हे लोकांच्या निदर्शनास आले. मधल्या स्थितीची दोन प्रकरणे प्रकाशित होताच पुण्याचेंच नव्हे, तर सर्व महाराष्ट्रीय वाङ्मयाचे वैभव वाढविणारा हा रचनाकर्ता कोण, हे जाणण्याची सबुद्ध समाजात तीव्र लालसा उत्पन्न व्हावी हे स्वाभाविकच होते. या पुस्तकाचा कर्ता कोण हे काही दिवस अज्ञातच होतें. प. वा. शकर मोरो गनडे, रावबहा- दूर काशिनाथ नारायण साने, रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनी वगेरे गृहस्थांनी पुणेवैभवकाला पत्रे लिहून " मधली स्थिति " निर्माण करणाराची मनःपूर्वक प्रशंसा केली. प. वा. शंकर मोरोनी तर आपल्या पत्रात असे लिहिले होते की, या कादवरांचे प्रकाशित प्रकरण वाचून झाल्यानंतर, पुढचे प्रकरण हाती केव्हा येईल, असें मनाला वाटू लागते. हरिभाऊंना लिहिण्याची स्फूर्ती प्रथम ज्यांच्या- मुळे झाली त्यांत शंकर मोरो रानडे यांना अग्रस्थान दिले पाहिजे. त्यांच्या २६ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. नाट्यकथार्णवानेच हरिभाऊंच्यामध्ये लेखनप्रवृत्ति उत्पन्न केली. अशा गृहस्थांच्या तोंडून आपल्या रुतीची प्रशंसा झालेली पाहून हरिभाऊना अर्थात धन्यताच वाटली असली पाहिजे या कादंबरीचे जनकत्व हरिभाऊंकडेच आहे ही गोष्ट बाहेर आली त्यावेळी त्यांच्याबद्दल पूर्वीच ज्यांच्या मनात आदर होता, त्याचा तो दुणावला व ज्यांना या पुस्तकाच्या योगानेच हरिभाऊंची माहिती झाली त्यांच्या मनांत तो उत्पन्न झाला. प्रतिभेचा प्रभाव. कादयन्याच्या मालिकेतील हरिभाऊंचे हे पहिलेच पुस्तक. अगदी लहान वयांत लिहिलेलें. चागल्या अनुभवी व चाणाक्ष माणसासही मनुष्यस्वभावाचे जे कप्पे सांपडणे कठीण ते हरिभाऊंना अगदी अल्पवयात कसे उघडे करून दाख- विता आले असा कित्येकापुढे प्रश्न उभा राहील आणि त्याचे एकच उत्तर यावयाचे म्हणजे हा सर्व प्रतिभेचा प्रभाव होय. या पुस्तकात वाचकानी नमूद करून ठेवण्यासारखे किंबहुना पाठ करण्यासारखे असे वर्णनात्मक किवा विचारा- स्मक अनेक उतारे सांपडतील. याचे कारण हे पुस्तक अगदी तारुण्यावस्थेत लिहिलेले आहे, हेच असावे. लहानपणीच हातात पुष्कळ पैमा आला म्हणजे तो किती खर्च करू आणि कसा खर्च करू असें मनुष्यास होऊ लागते, त्या- प्रमाणेच अकालपरिपक्क अशी प्रतिभा ज्यास लाभते त्या ग्रंथकाराची गोष्ट होय, त्यांच्या पहिल्या पहिल्या ग्रंथातून मुविचाराचे फवारे, कल्पनेच्या भरन्या व वर्णनाच्या बहारी यांची विशेष गर्दी उसळून गेलेली दिसते. एखाया सभेस किंवा सार्वजनिक समारंभास, समाजास अपरिचित अशा माणसास प्रथमच जावयाचे झाल्यास, तो जसा अगदी व्यवस्थित व नीटनेटका पोषाक करून जातो व सर्वांचे लक्ष आपल्याकडे जाऊन आपल्याला मानाची जागा मिळावी म्हणून खटपट करीत असतो; त्याप्रमाणेच तरुण ग्रंथकाराचीही स्थिति असते. आपल्या पुस्तकाचे विद्वान् लोकाकडून योग्य रीतीने गुणग्रहण व्हावे या इच्छेने तो साहजिकच आपल्या शक्तींचे त्यांत सारसर्वस्व ओत- ण्याचा कसा प्रयत्न करितो, याचा हे पुस्तक एक मासला होय, अशी वाचकाची खात्री झाल्यावांचून रहाणार नाही. हरिभाऊंची सूक्ष्म निरीक्षणशक्ति, कादंब-यातील भूमिकांशी तादाम्य पावण्याची त्याची हातोटी, व सर्व कथानक जणू काय आपल्या समोरच चालले मधली स्थिति. २७ आहे, किंबहना आपण स्वतः त्या कथानकातीलच एक घटक आहों असा आभास उत्पन्न करण्याचे त्याचे अप्रतिम कौशल्य त्यांच्या या अगदी तारुण्यात लिहिलेल्या कादंबरीतही चागल्या रीतीने दिसून येते. डग्गा व बाह्या. या पुस्तकात त्यांनी वेश्येच्या घराचे जे वर्णन केले आहे ते इतकं हुबेहूब साधले की, ते पाहून हा माणूस अष्टैःप्रहर वेश्येच्या घरीच काळ घालविणारा असला पाहिजे, असे येथील एका प्रमुख वेश्येने न्या वेळी उद्गार काढले होते. याच प्रकरणात एका बैठकीचे वर्णन देताना, त्या ठिकाणी बाह्या आणि डग्गा होता, असें हरिभाऊंनी म्हटले आहे. ही त्याची अर्थातच चक होती. डग्यासच बाह्या म्हणतात. डग्गा आणि तबला असें हरिभाऊंना म्हणावयाचे होते त्या ठिकाणी त्यांनी वरीलप्रमाणे चूक केली आहे, ही गोष्टही त्या वेश्येच्या निदर्शनास आली. दुसन्याकडून माहिती मिळवूनच याने हे वर्णन लिहिले आहे ही गोष्ट यावरून त्या चाणाक्ष वेश्येने ओळखली व हरिभाऊंबद्दल तिचा पहिला सशय अर्थातच नाहीसा झाला. पतित स्त्रियांबद्दलही सदयता. हरिभाऊंचे मनुष्यस्वभावाचे अवलोकन सूक्ष्म व मोठे मार्मिक होते. मनुष्य- स्वभावाचे दोषहि ते मोठ्या रसभारत रीतीने वर्णन करीत. पण यांत त्याची उपहासबुद्धि केव्हाही नसे. त्यांच्या वर्णनाच्या मुळाशी नेहमी सदयता वास करीत असे, हाच त्याच्या कादंबऱ्यातील विशेष होय. वेश्या झाल्या तरी त्या सर्वस्वी तिरस्करणीय नसून त्याच्याही परावर्तनाचे प्रयत्न करणे जरूर आहे असेंच त्यांना वाटे. आणि या प्रश्नाचे एका कादंबरीत पृथक्करण करून त्यावर उपायही सुचविण्याचा हरिभाऊंचा विचार होता. या प्रश्नाप्रीत्यर्थ त्यांची स्वतंत्र कादंबरी झाली नाही तरी कर्मयोगामध्ये नर्मदेची भूमिका रंगवून पतित स्त्रियाचाही उद्धार करणे कसें अवश्य आहे, याची त्यानी रूपरेखा दर्शविली आहे. भावा- नंदाच्या मठांत असलेल्या संस्थासमुदायांपैकी पतित स्त्रियांच्या उद्धाराकरिताही एक नमुनेदार संस्था चालली होती. त्या संस्थेतच शेवी नर्मदेला जावे लागले. स्त्रिया पतित होतात त्या प्रायः पुरुषांच्याच फुसलावणीने होतात. अशा स्थितीत ज्यांना रुतकर्माबद्दल सरोखरच पश्चात्ताप होत आहे, अशांना शिष्टसमाजांत परत येण्याचा मार्ग मोकळा का राहू नये, हा प्रश्नच ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र, त्याच्याजवळ नर्मदेच्या भूमिकेवरून हरिभाऊंनी उपस्थित केला आहे. यावरून हरिभाऊंच्या सदयतेचा व सामाजिक सुधारणेच्या संकल्पित कायांचा परिघ किती पल्लेदार होता हे दिसून येते. प्रत्यक्ष घडलेले उदाहरण. त्याचे चुलते अण्णासाहेब यांच्या पत्नी वारल्यानंतरचा त्याचा आयुष्यक्रम कशा प्रकारचा होता याची ओझरती सूचना वाचकाना पहिल्या प्रकरणावरून मिळाली असेलच. अण्णासाहेबाना अपत्य नसल्यामुळे त्यांची सर्व इस्टेट हरिभाऊंनाच मिळणार ही गोष्ट साधारण ठरल्यासारखीच होती. अर्थात् असलेल्या बाईना हरिभाऊंचे मुंबईस जाणे येणे तितकें खपत नसे. तरी पण त्या बाई मोठ्या हुषार व चाणाक्ष होत्या. हरिभाऊ हा साधारण माणसापैकी नव्हे, हे त्यानीही ओळखलें, अगा हुषार बाईवर असला अवनत आयुष्यक्रम घालविण्याचा प्रसंग यावा याबद्दल हरिभाऊंनाही वाईट वाटे. त्यानी सहज बोलल्याचालण्यात निघालेल्या इतर गोष्टीबरोबर बाईजवळ याबद्दलचे दिग्दर्शनही केले. त्याचा परिणाम बाईच्या मनावर तत्काळ घडला नसला तरी तेवढ्यानेच त्याच्या ठिकाणी पश्यात्तापाचे बीजारोपण झाल्याशिवाय राहिले नाही. पुढे बाईची त्याच आयुष्यक्रमांत अनेक परिवर्तन होऊन बन्याच वर्षांनी त्या पुण्यास रहावयास आल्या. त्या वेळी हरिभाऊंच्या उपदेशाची आठवण होऊन, आपल्या द्रव्याचा कांही सत्कार्यासाठी उपयोग करावा अशी त्यांच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न झाली. नेव्हा त्यानी हरिभाऊंच्याच सल्ल्याने येथील एका उपयुक्त संस्थेस दहा हजार रुपयाची देणगी दिली. ही देणगी स्वीकारावो किंवा न स्वीकारावी याबद्दल संस्थेच्या चालकाना बराच विचार पडला. पण सतकर्माबद्दल पश्चात्ताप झाला असताही वेश्येसारख्या एका विशिष्ट वर्गास आपली उन्नति करण्याचे द्वार समाजाने का बद ठेवावे, ही विचारसरणी हरिभाऊंनी चालकापुढे मांडली व अखेर बार्डच्या इच्छेप्रमाण त्याची देणगी स्वीकारली गेली. आपल्या समाजात स्त्रिया आधींच परावश. त्यातही नवरा दुर्व्यसनी असला म्हणजे त्याचे हाल कसे होतात हे या पुस्तकात हरिभाऊंनी दाखविले आहे. दारूच्या व्यसनामुळे मनुष्याच्याद्रव्याची हानि होते, शरीराची हानि होते, लौकिकाची हानि होते वगैरे त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामास प्राधान्य न देताअशाव्यसनी माण- साच्या बायकोस किती त्रास होतो, प्रसंगी तिचा जन्मही वाया जाण्याची कशी भीति मधली स्थिति. . असते हेच वाचकाच्या मनावर ठसविण्याचा हरिभाऊंचा हेतु दिसतो. याचे कारण दुसरे काही नसून स्त्रियांबद्दलचे त्यांचे दाक्षिण्य, त्यांच्या हिताबद्दलची त्यांची कळकळ,त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दलचा त्यांना वाटणारा द्वेष हाच होत. स्त्रियांची आधीच हीन असलेली स्थिति अधिकच हीनतर अवस्थेत समाजापुढे येऊन समाजास त्याच्याबद्दल तत्काळ कळवळा उत्पन्न व्हावा हाच मद्यपी लोक निवडून त्याचे चरित्र आपल्या कादंबरीत ग्रथित करण्याचा हरिभाऊंचा उद्देश स्पष्ट दिसतो. आणि तेच कार्य या कादंबरीने केलेले आहे. दुर्व्यसनी लोकांचा अड्डा. 'मधली स्थिति ' या कादंबरीचे कथानक हरिभाऊनी कसें जमविलें, याचे पुष्कळाना गूढ पडेल. पण कादंब-यांत वर्णन केलेली स्थिति त्यानी आपल्या कल्पनाशक्तीने रंगविलेली असली तरी तिचे मूळ स्वरूप त्यानी वस्तुसृष्टीत पाहिले होते. येथे शनीच्या पाराजवळ दुर्व्यसनी लोकांचा एक अड्डा होता, तेथे हरिभाऊंचे जाणे येणे असे. हरिभाऊंसारखा सुशिक्षित मनुष्य आपल्या कंपनीत असणे हा या लोकांना मोठेपणाच वाटे, त्यातील सर्व लोक हरिभाऊना आदराने वागवीत. प्रथम प्रथम हरिभाऊंच्यादेखत ते आपल्या दुर्व्यसनाचे प्रकार करण्यास लाजत असत. परंतु पु. परिचयाने भीड चेपत गेल्यामुळे हरिभाऊंस साक्ष ठेवूनही ते बेलाशक बाटल्या तोडाला लावू लागले ! हरिभाऊ हे अर्थातच केवळ निरीक्षकाचेच काम करीत असत. ते असल्या प्रकारापासून तेव्हांच काय, पण पुढेही आजन्म निर्लेप असन. विनायकराव, गोविंदराव वगैरे पात्रे याच आखाड्यातील होत. या कादंबरीतील कित्येक भूमिकाचे रूपवर्णनही या आखाड्यातील कित्येक मनुष्याशी तंतोतत जमते असे कित्येक माहितगार माणसें सागतात. मद्वर्तनाचा खंबीर पाया. मधली स्थिति प्रसिद्ध होऊ लागताच हरिभाऊ काही भलत्याच नादाला लागले नसतील ना १ अशी कित्येकांना शंका येऊ लागली. प्रत्यक्ष त्याचे चलते अण्णासाहेब याचेही मन हरिभाऊंच्यासंबंधाने क्षणैक संशयग्रस्त लें; पण यासंबंधाने बोलणे निघाले असताना रा. य. विष्णु मोरेश्वर महाजनी म्हणाले, मुलाचा अधिकार मोठा आहे. त्याच्याबद्दल असला भलता संशय घेऊ ३० ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. नका. दुवृत्त लोकाना मुमार्गावर आणण्याकरितांच ज्याचा जन्म ते स्वतः दुर्मार्गी कधीही होत नसतात. " हरिभाऊंच्या यानंतरच्या कामगिरीने हे सर्व सशयपटल आपोआपच दूर झाले. हरिभाऊ लहानपणापासूनच स्वतंत्र असत. वडील नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असणार, चुलत्याचे वास्तव्य वकिलीच्या घंद्याच्या निमित्ताने मुंबईस असगार, अर्थात् त्यांच्या तरुण वयांत त्यांना दायतें दडरतें कोणीही नव्हते. कोणत्या मंडळीत जावे आणि कोणत्या मंडळीत जाऊ नये याचा विधिनिषेध हरिभाऊंना नव्हता. एखादी सुगरण गृहिणी, प्रपंचाला लागणारी जी वस्तू जेथे सापडेल तेथून ती पैदा करून जशी प्रपंचाची ठाक- ठिकी बसविते, त्याप्रमाणेच आपल्या सामाजिक कादंब-याचा प्रपंच उभारण्यास निरनिराळ्या मनोरचना, निरनिराळे स्वभाव व निरनिराळ्या अभिरुचि अस. लेल्या व्यक्तीचे निरीक्षण करण्याचे हरिभाऊंचे काम अगदी बालपणापासून झाले होते. या महत्त्वाच्या कार्यामध्ये महत्त्वाच्या कार्यामध्ये ते इतके निमम झाले होते की, दुर्व्यसनाचा विचार त्याच्या मनात येण्यास वावच नव्हती! तरुण- पणांत बिघडण्याच्या जितक्या म्हणून सोयी असतात त्या सर्व त्याना अनुकुल होत्या; पण तितक्यांतूनही ते धुतल्या तादळाप्रमाणे शुद्ध राहिले, इतकेच नव्हे, तर इतगंचीही मने दुर्वर्तनापासून परावृत्त करण्याचा त्यांनी परिणामकारक रीतीने प्रयत्न केला. यावरून त्याचा सद्गुणाचा पाया किती खंबीर होता हे कोणासही समजून येण्यासारखे आहे. स्थितिवाचक की कालवाचक 'मधली स्थिति या नावावरून हरिभाऊंना खालची स्थिति व वरची स्थिति या दोन कादयन्या लिहावयाच्या असाव्यात, असा स्वाभाविकच तक होतो आणि तो खराही आहे. वरच्या स्थितीतील म्हणने जहागीरदार, इनामदार, वगैरे लोक व खालच्या स्थितीतील म्हणजे अज्ञानपंकात निमम झालेले अगदी निरुष्ट स्थितीतील लोक याना अनुलक्षून कथानकाची रचना करण्याचा त्याचा उद्देश असावा असे वाटते. 'जग हे असें आहे' या कादंबरीत खुपकाबाद संस्थानाचे त्यांनी जे वर्णन दिले आहे ते या हेतूच्या सिद्ध्यर्थच होय.महाराष्ट्रातील संस्थानांची ज्यांना माहीत आहे त्यांना हे जुनाट संस्थान कोणते असावे हे चटकन समजून येणार आहे ! 'मी' प्रकरण ४१ मध्यहि त्यांनी श्रीमंताच्या परवशतेचे वर्णन केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकाच्या स्थितीवर एखादें कथा.
मधली स्थिति. ॥ कै. . तक रचावे असा त्यांचा विचार होता. कदाचित् हे कथानक खालच्या स्थिती- नील लोकांची हवाल दर्शविणारे झाडे असते. " मधली स्थिति" हे शब्द कालवाचक आहेत किंवा स्थितिवाचक आहेत असा संशय येणे स्वाभाविकच आहे. हरिभाऊंनी ते शब्द दुस-या अर्थी वापरले होते. पण माझे मित्र रा. वाग्भट नागयण देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे, "मवली स्थिति म्हणजे इंग्रजी शक्षणाशी आमचा संबंध येण्यापूर्वीची स्थिति व त्या शिक्षणाने आमची मने मुसंस्कृत होऊन आमन्या स्थितीची जाणीव होऊन स्वोन्नतीचे विचार सुशि- क्षेताच्या डोक्यात येऊ लागले ही आजची स्थिति" असाही अर्थ करणे सयु- केक होईल. हरिभाऊंच्या कादंबन्याची यापुढे जी परिणति झाली आहे ती पहाता हाच अर्थ खरा दिमतो. रा. वाग्भट नारायण देशपांडे याचा हरि नागयण आपटे यांच्या सामाजिक कादंबन्या हा जो निबंध नुकताच प्रसिद्ध झाला आहे तो हरिभाऊंच्या कादवन्य ची मांडणी कोणत्या धर्तीवर आहे ई समजण्यास चांगला सहाय्यभूत होईल असे वाटते. हरिभाऊंच्या कादं- वन्याचे त्यांनी विशेष काळजीपूर्वक कसे अध्ययन केलेले आहे हे, त्याचा हा नेबंध वाचला असता, कोणाच्याही लक्षात आल्यावाचून रहाणार नाही. स्त्रियांच्या उन्नतीकरितां झटेन. मधल्या स्थितीनंतर हरिभाऊंची दुसरी कादंबरी म्हणजे गणपतराव ही होय. ही कादंबरी मनोरंजन आणि निबंधचद्रिका या मासिकाच्या १८८७ व १८८८ हालात प्रसिद झाली आहे. तिची केवळ १८ प्रकरणेच होऊन ती तशीच अपूर्ण स्थतीत राहिली. "विष्णुपंत व यमुना याचे प्रेमळ चरित्र गाण्याचे माझ्या मनात कर आहे, तेव्हा त्याचे ते चरित्र दुसन्या ठिकाणी गात आहे, हे येथे सागून ठेवू को काय असें हरिभाऊंनी मधल्या स्थितीच्या अखेरीस आश्वासन देऊन ठेविले. याप्रमाणे या दोन्ही भूमिका गणपतराव कादंबरीत आलेल्या आहेत. आपल्या समा. नांतील स्त्रियांची परवशता काढून टाकून त्याची स्थिति सुधारल्याखेरीज आपली उन्नति केव्हांहि होणार नाही. या विचाराचे काहूर गणपतरावासारख्या मुशिक्षित । प्रगल्भ विचाराच्या माणसाच्या मनात एकसारखें कसें उडून गेले आहे याचे र्णन हरिभाऊंनी या कादंबरीत वेलें आहे. स्त्रियांच्या परवशतेसंबंधाचे विचार गणपतरावाच्या मनास सुचले ते मिलच्या ग्रंथाच्या वाचनानेच होत. “मिलसाहेब भापण माझ्या मनाला जितकें उदात्तत्व दिले तितके दुसरे कोणीहि दिलेले नाही, ३१ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र तरी मी आजपासून स्त्रियाच्या उन्नत्यर्थ झटेन, अगदी शपथपुरस्सर झटेन," अशी शपथ गणपतराव प्रकरण १२ मध्ये घेतो. हरिभाऊंनी ही आपल्या अंतरीची तळमळ गणपतरावाच्या मुखाने व्यक्त केली, आणि येथून पुढे त्यांनी जी जी ग्रंथरचना केली तिचें, स्त्रियाची सुधारणा करणे, हे एकच सूत्र असलेले दिसून येईल. गणपतराव या कादंबरीची 30 व - पूर्वी जेवढी प्रकरणे झाली तेथेच अपरिसमाप्त स्थितीत तिला काळ कंठावा लागला आणि आता तर ती समाप्त होण्याची आशाच समाप्त झाली. एक कादंबरी लिहीत असतां दुसन्या अनेक कथानकांनी डोक्यात काहूर उसळून यावे आणि ज्या कथानकाचा विशेष जोर व्हावा तेंच पुढच्याला मागे सारून पुढे व्हावे, असे प्रकार हरिभाऊंच्या लेखनव्यवसायात अनेक वेळा घडले. त्याच्या कित्येक कादंब-या अपूर्ण राहिल्या, कित्येक तर बन्या प्रौढावस्थेस पोहोचल्या असतांही थकल्या त्याचे हेच कारण होय. मनोरंजन आणि निबंधचंद्रिका या मासिकात त्यानी आणखोहि कित्येक पुस्तके लिहिली. व्हिक्टर ह्यूगोच्या हर्नानी या पुस्तकाच्या आधारे श्रुतकीर्ति चरित्र हे नाटक लिहून त्यांनी याच मासिकात प्रसिद्ध केले. त्याचप्रमाणे विख्यात प्रहसनकार मोलियर याच्याहि कित्येक प्रहसनाची भाषातरें त्यानी यांतच प्रका- शित केली. मारून मुटकून वैद्यबुवा, धूर्तविलसित, जबरीचा विवाह ही अशाच प्रकारची प्रहसने होत. चाणाक्षपणाचा कळस, दुर्गाताईची ओवाळणी व पाड- व्याला भेट या गेष्टीहि त्यांनी याच काळात प्रसिद्ध केल्या १८८७ पासून १८८९ पर्यंत म्हणजे सुमारे तीन वर्षांत ही सर्व पुस्तके प्रसिद्ध झाली. मालिअ- रची त्यानी केलेली भाषातरें तर इतकी सुंदर झाली की, ती भाषातरे आहेत असें सांगितल्याशिवाय कोणाला ओळखताहि येणार नाही. असा त्याजवर प्रो. वासुदेवराव केळकर यांच्यासारख्या रसिक भाषाभिज्ञांनी अभिप्राय व्यक केला. अनेक भाषाभिज्ञता. या काळात त्यानी फ्रेंच भाषेचा अभ्यास केला. वर व्हिक्टर ह्यूगो व मोलियर याच्या पस्तकांची जी रूपातरे सांगितली ती या अभ्यासाचेंच फळ होत. गायन, वैद्यक, गणित वगैरे विषयाना जमा उपजत अंगस्वभाव लागतो, त्या- प्रमाणेच भाषाभिज्ञतेचीहि स्थिति असली पाहिजे. हरिभाऊंना फ्रेच व जर्मन या परभाषा व बगाली गुजराथी वगैरे देशी भाषा चांगल्या येत असत. आणि त्या स्याना अल्पायासाने व अल्पकाळांत अवगत करून घेता आल्या याचे कारण त्यांचा हा अंगस्वभावच होय असें म्हणण्यास हरकत नाही. .
प्रकरण पांचवें. करमणकीचा जन्म. वाचनाचे निकोप साधन. आपल्या हातून नियमित रीतीने काम होऊन आपला लेखनव्यवसाय अव्याहत डावा, यासाठी आपले एक स्वतंत्र पत्र असणे जरूर आहे, असें वयाध्या पंच- नितर हरिभाऊंना वाटू लागले व १८९० साली आक्टोबरअखेर त्यानी रमणूक" पत्र सुरू केले. यावेळी हरिभाऊंचे वय अवघे सव्वीस वर्षांचे होते. पण सामान्य धुद्वीच्या माणसाला आजन्म लेखनव्यवसाय चालवून जी कीर्ति विणे मुष्किलीच झाले असते, ती कीर्ति हरिभाऊंनी या अल्पवयांत संपादन जी होती. " करमणूक " पत्र सुरू होताच त्यावर वाचकांच्या उड्या पडू ल्या, व त्यांत प्रसिद्ध होणान्या गोष्टी, चुटके, कादंबन्या यांनी महाराष्ट्रातील पुरुष वाचकांना चटका लावून सोडला आणि रिकाम्या वेळात 'करमणूक' ती मणक होऊन बुद्धीचाहि विकास करण्याचे साधन बांना उपलब्ध करून दिले. काय करावं, पराठीत तुमच्यासारख्यांना वाचायला बुकेच नाहीत गलीशी. हेच इंग्रजी शिकतीस थोडंसं म्हणजे होती काही पंचाईत. " ( गण- १० ). गणपतरावासारख्या प्रगल्भ विचाराच्या ज्या पुरुषास पल्या पत्नीस शिकविण्याकरिता चांगल्या पुस्तकाची उणीव भासत होती, ती करण्याचे महत्त्वाचे कार्य करमणुकीने केले, याबद्दल कोणासही मनःपूर्वक ज्ञताच वाटेल. करमणुकीने वाचनाकडे ज्याची प्रवृत्ति झाली अशा आज डों स्त्रिया महाराष्ट्रात सापडतील. शेंकडों शाळानी में कार्य कदाचित् झाले ते ते करमणुकीने वर्षानुवर्ष बिनबोभाट कसे केले याचा इतिहास अगदी ना असल्यामुळे त्यासंबंधाने विशेष लिहिण्याचे कारण नाही. करमणुकीने स्त्री- कच काय, पण खलिखकहि निर्माण केले ही तिची कामगिरी महाराष्ट्र. ग्याच्या व स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात निःसंशय संस्मरणीय होऊन राहील. राव प्र.
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. ० करमणुक पत्र काढण्याचा जो उद्देश हरिभाऊंनी पहिल्याच अंकांत प्रदर्शित केला आहे, तो पाहिला म्हणजे या उद्देशात दर्शविलेल्या प्रतिज्ञेची त्यांनी आपल्या पुस्तकांनी कशी पूर्ती केली हे समजून येईल. हरिभाऊ आपल्या उद्देशांत म्हणतात:- केसरी सुधारक एखाया कठोर रित्याप्रमाणे कठोर शब्दाने सांगणार व समाजाचे अप्रशस्त वर्तन झाल्यास वेळी वाकप्रतोदारे तडाके लगावणार तीच गोष्ट हे पत्र प्रेमळ मातेप्रमाणे गोडगोड शब्दांनी व चांगल्या चांगल्या गोष्टीनी अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचें शासन करणार. येवढे मात्र ध्यानात ठेवावे, की हे पत्र आचरट आईप्रमाणे फाजील लाड करणार नाही.............ज्यास पुढल्या मापिावून चुलीपर्यंत व दिवाणखान्यांतील टेबलापासून फणीकरंड्याच्या पेटी. पर्यंत कोणाच्या हाती पडले तरी हवे त्याने, हवें त्याच्या देखत निःशंकपणाने वाचण्यास हरकत नाही असें पत्र पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य करमणुकीचे वर्गणीदार व्हावें ......शनिवारी संध्याकाळी थकून भागून आल्यावर आपल्या फुटंबांतील लहान मोठ्या माणसांस जमवून खुशाल हंसत खेळत करमणूक करून ज्ञान मिळविण्याची ज्याची इच्छा असेल त्याचे आम्ही नम्र सेवक आहोत. करमणुकीवरील अभिप्राय. वरील उद्देशावरून हरिभाऊंचा आत्मविश्वास केवढा दांडगा होता हे दिसून येते. कोणालाही, कोठेही व कोणाच्याही देसत बिनदिकत वाचता यावे असे वाङ्मय आम्ही प्रसिद्ध करूं, हे जे वरील उद्देशांत त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ग्रंथरचना अत्यंत शुद्ध व कुलीन माणसांनी वाचून मनन करण्यासारखी अशी केला. शृं रसाशिवायही कादंबरीस हृदयं- गमता कशी आणता येते हे त्यानी उत्कृष्ट गनीन दाखवून दिले. 'पण लक्ष्यात कोण घेतो, ' या कादंबरीतील प्रकरणे करमणुकीत प्रसिद्ध झाली त्या वेळी कित्येक प्रमुख स्त्रीपुरुषांकडून हरिभाऊस पडे येत. त्यांतील काही पत्रे फारच नामी असल्यामुळे त्यातील काही उतारे थोडक्यात येथे दिले असता अप्रासंगिक होईल असे वाटत नाही. कै. प्रि. वामन शिवराम आपटे हे आपल्या अभिप्रायांत म्हणतात:- " इतकी बोधपर, नीतिपर, आल्हादर गोष्ट फार विरळा सांपडेल. गोष्टीचे संविधानक फारच साधे व नित्य व्यवहाराच्या स्थितीलाधरूनच बहुशा आहे. परंतु .
" - करमणुकीचा जन्म. भाषाशटी फार शुद्ध व चटकदार आहे, तेणेकरून वाचणान्यांना कंटाळा येत नाही. शिवाय विशेष महत्वाची गोष्ट ही की, तिच्यात अश्लीलपणाचा गंधही नाही." प्रो. वा. बा. केळकर हे लिहितात:- "कल्पित कादंबऱ्यांविषयों नाके मुरडणान्या लोकांनी ही कादंबरी वाचन पहावी म्हणजे कादंबरी हा एक मनःशुद्धीच्या सौम्य उपायापैकी श्रेष्ठ व तीन गुणकारी उपाय आहे हे त्यांस तेव्हाच कळून येईल. मौ. काशीताई कानिटकर लिहितात:- दर सोमवारी टपाल आधी कोणाच्या हाती पडते यासाठी ती (मुलें ) जपत असतात व तो अंक घेऊन समयीजवळ कोडाळे करून ती सर्व वाचन कर्मणूक करून घेतात. त्याचपमाणे आम्ही मोठी माणसेही ती गोष्ट लक्ष लावून वाचतों व ती खरोखर घडलेली गोष्ट आहे असे आम्हाला वाटते. सौ. स. शिरगांवकर या लिहितात:- " ही कादंबरी (कदा वाचल्याने कंटाळा येण्याजोगी नाही तर जितक्यानदा वाचावी तितकी थोडीच असें वाटणारी आहे." सौ. रमाबाई रानडे लिहितात:- " ही गोष्ट वाचन कित्येक बायकांना तर ती भापली लहान वयांतील गोष्ट कोणी काही फेरबदल करून लिहिली आहे असे वाटल्यावाचून रहात नाही. तोच समज पुढेही काही ठिकाणी कायम राहतोच. " हरिभाऊंच्या सामाजिक कादंबन्या. पण लक्ष्यांत कोण घेतो व हरिभाऊंच्या इतर सामाजिक कादंबन्या यांतील पात्र अगदी रोजच्या व्यवहारांतील आहेत याबद्दल वर दिलेल्या, विशेषतः विदुषी स्त्रियांच्या अभिप्रायांवरून कोणास संशय राहील असे वाटत नाही. स्त्रीशिक्षण, सासुरवास न करणे, बालविवाहनिषेध, वाढ पूर्ण होण्यापूर्वी यौवन मुखानुभवाचा प्रतिबंध इत्यादि सर्व अपेक्षित सुधारणांचें घी रुजविण्याचा या एकाच कादंबरीत हरिभाऊंनी उपक्रम केला आहे. मी या कादंबरीत या सर्व आपत्ती दूर करण्याकरिता एका खन्या समाज- मुधारकाकरवी उपाय सुचविण्यात आला आहे. कर्मयोग हा 'मी' कादंबरीत मथित झालेल्या तत्त्वांचाच पुढचा विकास होय. 'यशवंतराव' खरे व आजच' या ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. दोन कादंबन्या समाजसुधारणेस प्रतिकूल असलेल्या व राजकीय सुधारणेवरच सर्वस्वी भर ठेवणा-या अशा आहेत. पण त्यांच्या कथानकास कोठेच पूर्णता आलेली नाही. कारण त्यापैकी 'आजच' ही कादंबरी अपूर्ण स्थितीत राहिली. 'जग हे असें आहे' या कादंबरीत सापत्न संबंधामुळे होणारे दुष्परिणाम वर्णिले आहेत. 'भयंकर दिव्य' यात सोनेरी टोळीची दुष्टकृत्ये वर्णन केलेली आहेत. • मायेचा बाजार ' या कादंबरीत दुष्टपतीमुळे स्त्रियाच्या होणान्या दुःस्थितीचे शब्दचित्र रेखाटले आहे. या सर्व कादंबन्यांत एकंदर तीन पिढ्यांचा इतिहास आहे. गणपतरावाचा मुलगा चंद्रशेखर हा कर्मयोगाचा नायक आहे. 'मी' या कादंबरीतील ताईचा मठ "भयंकर दिव्यात," " आजच" मध्ये व "कर्मयोगात"हि अधिष्ठित झालेला दिसतो. "यशवतरावांतील व "भयंकर दिव्यां"तील पात्रे "आजच"मध्ये आणि "कर्मयोगात " हि आलेली आहेत. वर दिलेल्या कादंब-यापैकी "गणपतराव" "आजच" व "कर्मयोग" या अपूर्ण आहेत. ऐतिहासिक कादंबन्या. हरिभाऊंच्या ऐतिहासिक कादबन्या पुढे दिल्याप्रमागे आहेत:-पहिली मैसूरचा वाघ" (आधाररचित ). दुसरी " उषःकाल ". यात शिवाजीचा उदयकाल वर्णन केला आहे. तिसरी ‘सूर्योदय ' यात अफजुल' खानाच्या वधाचे कथानक वर्णन केले आहे. चवथी 'सूर्यग्रहण' या कादंबरीत शिवाजी भोरंगजेयाच्या कैदेत पडलेला आहे, त्या काळची स्थिति आलेली आहे. पांचवी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे " गड आला पण सिंह गेला" ही होय. सहावी "मध्यान्ह" ही सवाई माधवरावांच्या काळची आहे. सातवी " चंद्रगुप्त." आठवी "कालकूट". या कादंबर्गत पृथ्वीराज चव्हा- णाचे कथानक आहे. नववी " वज्राघात " यात विजयनगरच्या विनाशका- लाची परिस्थिति वर्णन केली आहे, व दहावी " रूपनगरची राजकन्या " ही होय. या कादंब-यांपैकी "सूर्यग्रहण, " "मध्यान्ह," व "कालकूट" या अपूर्ण स्थितीतच आहेत. हरिभाऊंच्या सामाजिक तीन, व ऐतिहासिक तीन अशा एकंदर सहा कादंबऱ्या असमाप्त राहिल्या आहेत. या आपल्या हातून पुन्ग व्हाव्या, अशी त्यांची फार इच्छा होती. जलोदरासारख्या असाध्य रोगाने गाठले करमणुकीचा जन्म. ३७ असताहि त्यांचा हाच ध्यास सारखा चालला होता. "अपूर्ण कादंबऱ्यांची अव- शिष्ट कथानके डोक्यात सर्व तयार आहेत. हातात लेखणी धरण्यास शक्ति आली की हे काम मी ताबडतोब करीन" असे ते म्हणत. आपल्या मुलाबाळांची ब्यवस्था न करता आल्यामुळे मनुष्याची मृत्युशय्येवर जी स्थिति व्हावी. तीच हरिभाऊंची आपल्या असमाप्त कादंब-यासंबंधाने झाली होती ! देहावसान होतांना मृत्यलोकचा त्याना जर काही धागा राहिला असेल तर तो अर्थदर रस्त्यात सोडून दिलेल्या या आपल्या अपत्यासंबंधानेच होय ! कथानकाचा संकल्प ठरवून त्यांची सुसंगत रतिीने रचना करणे, त्यातील पात्राचा कथानकातील प्रसंगानुरूप उठाव करणे, स्थलवर्णनाची हुबेहुब माडणी करणे, पात्राच्या स्वभावाचे यथार्थ दिग्दर्शन करणे, कथानकांतील निरनिराळ्या घटकांचा परिपोष यथाक्रम व यथाप्रमाण होईल अशी तरतूद करणे वगैरे संबं. धात हरिभाऊंचा हातखंडा असे. कल्पनेने निर्मित अशा रुत्रिम सृष्टीची स्वामा- विक सृष्टीप्रमाणे बेमालुम बनावट करणे हा जो उत्कृष्ट कादंबरीकागचा गुण तो हरिभाऊंना सहजसाध्य होता. त्याच्या कादंब-या वाचणागला, काई- बात वर्णन केलेले प्रसंग प्रत्यक्ष आपल्या डोळ्यापुढे घडत आहेत असा भास झाल्याशिवाय रहात नाही. 'मायेचा बाजार' या कादंबरीत पोवर त्यांनी जे संकटाचे एकामागून एक भयंकर प्रसंग आणून त्यांतच तिची अखेर केली, ते प्रकार वाचून एका वाचकाने त्यांना एक पत्र पाठवून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. "या खीचा तूं इतका छळ केलास तेव्हां तूं असा पाषाणहृदयी आहेस तरी कोण ! तिला थोडा तरी सुखाचा अनुभव येऊ दिला असतास तर त्यांन तुझ्या बापाचे काही गेले असते का ?" असे या गृहस्थाने हरिभाऊंना पाठविलेल्या आपल्या पत्रात म्हटले होते. आपण निर्माण केलेली ही कल्पनासृष्टि आहे याचाहि या वाचकाला विसर पडला, हे पाहून हरिभाऊंना आपल्या लेखनकलेचे कौतुक वाटले असल्यास त्यात काही आश्चर्य नाही. • भयंकर दिव्य ' या कादंबरीत ' वार्धक्यकुठार ' नावाच्या औषधाची जाहिरात कथानकाच्या संदर्भान त्यानी आणली आहे, ती पाहून एकदोन माणसांकडून त्यांना हे औषध पाठविण्याविषयी पत्रेहि आली ! " पण लक्ष्यान कोण घेतो!" ही कादंबरी पुस्तकरूपाने प्रसिद्ध होईपर्यंत ती खरोखरच यमना ३८ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. नष्ट तर नावाच्या एका स्त्रीने लिहिली असे समजणारे कित्येक वाचक होते; आणि' त्याप्रमाणे हरिभाऊंकडे कित्येक पत्रेहि आली. नाशिकच्या एका विद्वान् शास्त्रयानी हरिभाऊंची “ चंद्रगुप्त " ही कादंबरी वाचली व हरिभाऊंना लिहिले, की, 'मुद्राराक्षम' नाटक मी कित्येक वेळा वाचलें व विद्यार्थ्यांनाहि शिकविले; पण आर्यचाणक्याच्या भूमिकेचे रहस्य आपली कादंबरी वाचूनच माझ्या लक्षात आलें।" हरिभाऊंच्या लेखनव्यवसायाच्या प्रारंभाचा काळ म्हणजे चाळीस वषी- पूर्वीचा काल, हा एका दृष्टीने विशेष नाजुक होता. इंग्रजी राज्याच्या वैभवाने आपल्या लोकांच्या डोळ्यांवर जो दीप आला होता तो अद्याप अवशिष्ट होता. येवढा थोरला प्रचंड देश एकछत्री करून त्यात इंग्रजांनी अखंड शातता स्थापन केली, या विचाराने लोकांची मने वेडावून गेल्यासारखी झाली होती. त्याच्यामधील आत्मविश्वास पूर्णपणे झाला होता. त्याचे पुनरुज्जीवन करून, आपणहि उद्योग केला आपला भविष्यतकाळ आपणाला खचित उज्ज्वल करता येईल, अशी लोकांमध्ये जाणीव उत्पन्न होणे यावेळी जरूर होते. ही जाणीव उत्पन्न करण्यास निरनि- राच्या प्रकारानी पात्र असलेले जे अनेक पुरुष त्या वेळेस जन्मास आले त्यातच हरिभाऊची गणना करणे कसे जरूर आहे, हे याच्या ग्रथाचे ज्यांनी परिशीलन केले आहे त्यांना वेगळे सागावयास नकोच. लोकांमध्ये आत्मविश्वास उत्पन्न करण्यास त्यांना त्यांच्या पूर्ववैभवाचे स्नग्ण करून द्यावे लागते. त्याचप्रमाणे ज्या अवगुणाच्यामुळे व सामाजिक टुष्ट चालीरीतीमुळे आपली अवनति झाली ते अवगुण व त्या चालीरीती याचा त्याग केल्याशिवाय आपल्याला पूर्ववैभवाचे पुनरुज्जीवन करता यावयाचे नाही, हेहि सत्य लोकाच्या मनावर ठसविणे जरूर असते. हरिभाऊंच्या ऐतिहा- निक व सामाजिक कादंबन्यांनी हाच महत्त्वाचा कार्यभाग केला, आणि ले त्यानी लोकाना समजेल अशा सुलभ व पटेल अशा मोहक रीतीने केल्यामुळे विशेष यशस्वी ठरला. त्यांचा दाडगा विद्याव्यासंग, त्याची उज्वल प्रतिभाशनि व मोठमोठे उदात्त विचारही अगदी सोप्या भाषेत करण्याची त्यांची हतोटी या गुणत्रयामुळे त्याची पुस्तकें इतकी लोकप्रिय झाली. लोक. जागृति करण्याच्या इतर शाखांत एकाला दोन किंवा दोहोला तीन अशी थोर माणसे सांपडतील, पण हरिभाऊंनी लोकजागृतीची जी विवक्षित शाखा अगदी अल्पवयापासून स्वीकारली, व जिची कायावाचामनेकरून त्यांनी आजन्म जोपासना केली त्या शाखेत मात्र त्याना एकहि जोडीदार मिळाला नाही. या शाखेत ते 'एकमेवाद्वितीयाच होऊन राहिले. व्यक्त प्रकरण सहावें. कादंबऱ्यांचा कार्यभाग. सद्य:स्थिति व ती सुधारण्याचे उपाय. आपल्या समाजातील स्त्रियाची जी अवनत स्थिति आहे ती सुधारल्या- शिवाय आपली खरी सुधारणा केव्हाही होणार नाही, ही कल्पना अगदी बाल्यावस्थेत हरिभाऊंच्या मनात उत्पन्न झाली व मिलच्या वाचनाने त्या कल्पनेस मजबुती येऊन मी आजपासून स्त्रियाच्या उन्नत्यथ' झटेन " अशी गणपतरावाच्या मुखाने त्यानी अगदी तरुण वयांत प्रतिज्ञा केली. " कोणाही गृहस्थाच्या ठिकाणी आपल्या बायकोच्या बोलण्याविषयी किंवा तिच्या मताविषयी आदरबुद्धि वसत असलेली त्याच्या नजरेस आली मगजे त्याला त्या गृहस्थाविषयी मोठी पूज्य बाद्ध वाटे. " ( गणपतराव प्र. १३). इतके स्त्रियांच्याबद्दल हरिभाऊंच्या ठिकाणी दाक्षिण्य वसत असे. असो. पुढे आपल्या निरीक्षणशक्तीने त्यानी जी सामुग्री जमविली ती या प्रतिज्ञा. पूर्तास पोषक अशीच होती. आपल्या समाजात आज स्त्रियांची स्थिति खरोखर कशी आहे याची त्यांनी आपल्या सूक्ष्म दृष्टीने छाननी केली ती किती समर्पक व मार्मिक आहे हे विशेषतः त्यांची 'पण लक्ष्यात कोण घेतो!' ही कादंबरी वाचली असता कोणाच्याही लक्षात येईल. सर्वत्र एकच हेतु. हरिभाऊंची कोणतीही कादंबरी ध्या, तीत कथानकाची उभारणी कोणत्याही प्रकारची असली तरी त्यात, खियाची स्थिति सुधारणे, हाच एक हेतु गर्भित झालेला दिसतो. 'पण लक्ष्यांत कोण घेतो । यामध्ये यमुनेने आपले चरित्र सांगितले तेही " मला माझे चरित्र काहीं हेतूने लिहावयाचे आहे, माझ्या पश्यात ते प्रसिद्ध होऊन त्यापासून कोणाला काही आमच्या हान स्थितीबद्दल कीव वाटू लागली तर माझी इच्छा अगदी परिपूर्ण होईल," व " आम्हा मुलींना आपल्या आयुण्यक्रमाबद्दल साधारणत: वाटते काय आणि आमचे स्वतःचे बरे वाईट अनुभव असतात काय, हे माझ्या पश्यात लोकांना कळावे आणि त्यांत ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. या खरोखर काही सुधारण्याजोगे वाटले तर त्यांनी तशी तजवीज करावी " हेतूनच सागितलेला आहे. यमुनेचे हे हृदयास पाझर फोडणारे व डोळ्यांतून अश्रू गाळावयास लावणारे आत्मचरित्र ऐकूनच की काय, दुबळ्या कष्ट्यांना जबरदस्तापासून त्रास होत असला तर तो दूर करण्याला आपला हात पुढे असावा " असे धोरण "मी"ने स्वीकारले. गणपतरावामधील गोदावरी, ' पण लक्ष्यात घेतो' मधील यमुना व दुर्गी, 'मी' मधील ताई, भयंकर दिव्यांतील कमला, मायेच्या बाजारामधील मालती व मथुरा या सर्व स्त्रियांचे आयुष्यक्रम निरनिराळ्या कथाप्रसंगांत गोवलेले असले तरी या स्त्रियांच्या संरक्षणार्थ 'मी' सारखे शेंकडों पुरुष उज्वल हेतु धरून निरपेक्ष भावनेने पुढे यावे हाच हरिभाऊंचा हेतु सर्वत्र सारखाच दिसून येतो. दांडगाईने सिद्ध होणार नाही. 'हा हेतु बळजबरीने अमलात आणणे हे समाजाच्या हिताला अपायकारक आहे' (गणपतराव पान ७r) व 'कोणतीही गोष्ट सावकाशी सावकाशीने जितकी होईल तितकी एकदम दांडगाईने होणार नाही.' (मी प्रकरण ६०). असेंच हरि- भाऊंचे मत होते. “ धीरे धीरे का होईना, पण खंत्रिीची सुधारणा पाहिजे. अतिशय उष्णतेतून निघून अतिशय थंडीत गेलें म्हणजे काय बरे अनर्थ होतात." (गणपतराव प्रकरण १०) हा प्रश्न डोळ्यांपुढे ठेवूनच हरिभाऊंनी आपली ग्रंथ- रचना केली आणि ती तशी केली म्हणूनच आज तिला इतके महत्त्व आले आहे. मनोघटनेशी तादात्म्य. हारभाऊंनी आपल्या स्त्रीवाचकांकडून व सहृदय व प्रगमनशील अशा पुरुष- वाचकांकडून "पण लक्ष्यात कोण घेतो" असे उद्गार काढविणारी कादंबरी लिहिली त्या वेळचा काळ कित्येक जुन्या चालीरीतींचा अस्त व नवीन कल्प. नांच उदय याचा संधिकाळ होता, त्याचा सांधा बरोयर जमविणे म्हणजे जुन्यातील चांगले तेवढे सजीव ठेवणे व वाईटाच्या कुडीत नवीन विचाराचे जीवन घालून त्याचे स्वरूप उज्वल व समाजोपकारक असे करणे हेच होय. हरिभाऊंच्या ग्रंथकर्तृत्वाचे हेच कार्य होते. हे योग्य रीतीने पार पाडण्यास समाजातील मुले, तरुण व वृद्ध स्त्रीपुरुष या सर्वांच्या मनोघटनेचे यथार्थ निरीक्षण हरिभाऊंनी केले व त्यांची शब्दचित्रे वस्तुसृष्टीस धरूनच त्यांनी रेखाटली. हरि- कादंबन्यांचा कार्यभाग. . भाऊंना अनेक भाषायेत होत्या याबद्दल ते अर्थातच प्रशंसेस पात्र होते. या भाषा कमी अधिक श्रमानें पुष्कळांना हस्तगत करून घेता येतील. पण त्यांनी आपल्या कादंब-यातून मुलामुलीचे, युवायुवतीचे, वयस्क स्त्रीपुरुषांचे, सुशिक्षित अशिक्षि- तांचे, सुष्ट टुष्टा, विचार हुबेहूब त्याच्या भाषेत प्रदर्शित केले आहेत, ही कला मात्र आजमितीपर्यंत तरी दुसन्या कोणास साधलेली दिसत नाही. त्याना ती उत्कृष्ट साधली याचे कारण या सर्वांच्या मनोघटनेशी त्याना तादात्म्य पावता आले, त्याच्या मनोव्यापारांची त्याना मनोमय साक्ष पटली हे होय. समाजाशी ते तद्रूप झाले म्हणूनच त्याच्या कादंबन्यात समाजाचे आत्मचरित्र प्रतिबिचिन झाले आहे. हरिभाऊंचे ग्रंथ समाजास दर्पणवत् नुसते बाह्यरूपदर्शकच झाने नाहीत तर एक्सरजप्रमाणे अन्तर्गत मनाही ज्ञान करून देणारे झाले. त्याच्या ग्रंथातील हा खरोखरच असाधारण गुण होय. मायेचें शासन. समाजास नवीन विचाराची जी शिकवण द्यावयाची ती देताना अनेक गोष्टीची खबरदारी घ्यावी लागते. समाजाचे अवगुण त्यास दाखवावयाचे म्हणजे ते मोठ्या खुधीने दाखवावे लागतात. आपली निदा स्वतःच्या कानाने ऐकणे कोणासही खपत नाही. समाजाच्या हितचिंतकांस व समाजाची खरी सुधारणा व्हावी अशी सदिच्छा बाळगणारास निंदा केल्याशिवाय तर गत्यंतर नसते. अशा स्थितीत “ मातेप्रमाणे गोडगोड शब्दानी व चांगल्या चागल्या गोशनी अप्रशस्त वर्तनाबद्दल त्यांस माय शासन" करावे लागते. समाजाची कोणत्याही प्रकारे खुशामत तर करावयाची नाही आणि त्याचें मन न दुखेल अशा रीतीने त्याचे अवगुण त्याच्या नजरेस आणून त्याची दृष्टि अंतर्मुख करावी लागतं. हे अवघड काम हरिभाऊनी आपल्या सामाजिक कादंघन्यांनी फारच बहारदार रीतीने केले आहे. विचारप्रवर्तन. सामाजिक सुधारणेवरील व्याख्याने किंवा लेख यांच्या योगाने समाजात जागृति होते. पण त्या जागृतीची मजल समाजांतील विचारवंत व मुबुद्ध जनते. पलीकडे जात नाही. सामान्य जनतेस हे विचार पटण्यास ते त्यांच्याच भाषेत मांडले गेले पाहिजेत. किंबहुना आपल्या आयुष्यक्रमाचे शब्दचित्र पाहून ते त्यांचे त्यांनाच मुचले पाहिजेत. हरिभाऊंची " पण लक्ष्यांत कोण घेतो" ही ४२ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. . कादबरी अशाच प्रकारे समाजास विचारप्रवर्तक झालेली आहे. व या कादबरीस श्रेष्ठ स्थान मिळण्याचेही हेच कारण होय. आपलेपणाची भावना. आपली सुधारणा करूं पहाणारा माणूस हा आपल्यातीलच आहे. त्याचा वागणूक, चालरीत, मनोधर्म वगैरे सर्व आपल्याशी जुळती आहेत अशी समां- जाची खात्री झाली म्हणजे तो या मनुष्याच्या म्हणण्याकडे सहाकिच लक्ष पुरवितो. या माणसास आपल्याबद्दल खरोखरच कळवळा वाटतो, आपले अवगुण जाऊन आपण सुमार्गास लागावे अशी त्याला खरोखरच मनापासून तळमळ वाटते हे समाजास दिसून आले, आपल्या अवगुणाचे आविष्करण करिताना आपल्या गुणांचेही यथार्थ निदर्शन करण्यास हा चुकला नाही ही गोष्ट समाजाच्या प्रत्य- यास आली म्हणजे ज्या बंधुप्रेमान, सदयतेने व जिव्हाळ्याने तो समाजास हाक मारतो त्याच बंधुप्रेमाने व जिव्हाळ्याने समाजही त्याच्या हाकेस मोठ्या तत्परतेने ओ देतो. हरिभाऊंनी समाजाबद्दल आपलेपणा धरला व त्याच्याशी जिवलग मैत्री कायम ठेवूनच त्यास मनोरंजनाच्या द्वारे सदुपदेश केला. म्हणूनच त्याच्या कादंबन्याना आजचा मोठेपणा प्राप्त झाला आहे. रचनाकौशल्य. कुशल सामाजिक कादंबरीकार आपल्या कथानकाची व त्यातील भूमि- काची अशी खुबीची रचना करितो की, वाचकापैकी कोणासही । आपलेच वर्णन आहे अशी ओळख पटली तरी ते तो कौतुकानें वाचतो. इतकेच नव्हे, तर माझ्या स्वभावाचे, आयुष्यक्रमाचे व मनोव्यापाराचे इंगित याच्या लक्षांत- संतोतंत कसे आले, याबद्दल त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. वेडेवाकडे गाणाराचे गाणे फोनोग्राफात धरून ते त्याचे त्यालाच ऐकविलें म्हणजे " माझे गाणे इतकें कां विचित्र असते" असा विचार त्याच्या मनांत येऊन क्षणेक त्याची त्यालासुद्धा करमणुक होते. पण त्यानंतर आपल्या गायन- कलेचे प्रदर्शन करण्याचे कामी तो जसा सावधगिरीनेच वागू लागतो त्याप्रमाणे च समाजाला आपला आयुष्यक्रम कादंबरीत हुबेहूब रंगविलेला दिसला की एवढाले ढोबळ अवगुण मी आज शेकडों वर्षे कसा वागवीत आलों, याबद्दल त्याचे त्यालाच आश्चर्य वाटू लागते व त्या अवगुणांचा निरास करण्याची त्याच्या मनात साहजिकच इच्छा उत्पन्न होते.
कादंबन्यांचा कार्यभाग. ३ पछेिसे आईची मुलं. समाजास सदयता असते व सहृदयताही असते, तरी पण “ठी आजी- बाई" व " पिछेसे आई"चे त्याच्यावर जबरदस्त वजन असल्यामुळे त्यास सर्व गोधी कळल्या तरी त्या वळत नाहीत. ही पिछेसे आई आपल्या मुलांकडून स्वे ते घडवू शकते. " आपल्या पाच वर्षांच्या पोरीस साठ वर्षांच्या थेरड्याच्या गळ्यांत बांधण्यास लावते. बालवैधव्यानीने होरपळलेल्या आपल्या बारा तेरा वर्षाच्या पोरीचे शरीर आपल्या देखन विद्रूप करण्यास लावते. एके वेळी ती शरीराचे दहनही करण्यास लावीत असे. असा तिचा जोर, असे तिचे वजन, अशी तिची शक्ति " ! ( मी प्रकरण ५७ ). 'मी'ची आजी मोठी ममताळ. पण या लोकापवादरूपी खविसाने पछाडल्यामुळे आपली शुद्ध नातवंडेही निला अस्पृश्य वाटूं लागली! रूढीस धर्माचा पेहराव. रूढि ही खरोखर भयंकर राक्षसी होय. हिच्या तावडीत सापडून ज्या समा- जान आपली विचारशाक्त गमावली त्याचा अधःपात झालाच म्हणून समजावे. आणि या रूढीस धर्माचा पेहराव चढून तिचा धर्मातच मिलाफ होतो तेव्हां तर या अधःपातास सीमाच रहात नाही. कारण दुष्ट रूढि बदलण्याचा कोणी प्रयत्न केला की तो धर्मावर घाला घालतो, अशी धर्माभिमान्यांची प्रामाणिक समजूत होऊन ते या प्रयत्नास विरोध करूं लागतात. आणि गम्मत ही की, या विरो- धात स्त्रियाही पुरस्कार घेतात ! बाल्य, तरुण, वृद्ध वगैरे अवस्थांत स्त्रियांनी कोणाची तरी मनधरणी करून राहिले पाहिजे ही स्थिती ईश्वरप्रणीत धर्माने आपल्या मागे लावून दिली आहे अशी त्यांची दृढश्रद्धा असल्यामुळे, ती दूर झाली पाहिजे अशी इच्छा करणे हेही त्याना पाप वाटते आणि तसे प्रयत्न करणारास विरोध करण्यातच खो 'पुण्य ' आहे अशी त्याची समजत होते. गणपतरावांची स्त्री पुनर्विवाहित होती तरीसुद्धा ती " आता काही ताळतत्र राहिला नाही " (कर्मयोग)! असे नव्या काळाला उद्देशून उद्गार काढतेच । धर्मविषयक अवास्तव कल्पना. आपल्या समाजातील कोणतीहि बाई पहा, ती तोंडाने ' नको हा स्त्रियांचा जन्म ' असे म्हणत असते. पण तिचे वर्तन त्याच जन्माच्या अनेक आवृत्ती निघाव्या अशाच प्रकारचे असते ! स्त्रियांच्या मागे धर्माने अथवा धर्मावर ४४ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. निर्वाह करणाऱ्या लोकांनी जी व्रते लाविली आहेत, तो पाहिली म्हणजे या गोष्टीची सन्यता प्रत्ययास येईल. त्यांपैकी कोणाची फलश्रुति पुढच्या जन्मी नवरा चांगला मिळेल ही असावयाची किंवा सात जन्म अखंड सौभाग्य लाभल असा कोण्या व्रताचा फलादेश असावयाचा ! मिळून सदासर्वदा खी- जन्मच असावा अशाबद्दल भामच्या स्त्रियांची खटपट ! आपली गुलामगिरी जाऊन आपल्याला पुरुषांसारखेच मानसिक व बौद्धिक विकसनाचे मार्ग मोकळे असावे अशी ईश्वराजवळ प्रार्थना करणारी किवा इतउत्तर आपल्याला पुरुषाचाच जन्म यावा अशी उत्कट इच्छा बाळगणारी हिंदू स्त्री सांपडेल काय ? या सर्वांचे खरे कारण एकंदर समाजामधील, विशेषतः स्त्रियामधील धर्मसंबंधाच्या अवास्तव कल्पना हेच होय. शिक्षण हाच खरा उपाय. याला सरा उपाय लियाना शिक्षण देऊन त्यांची मने सुसंस्कृत करणे हा होय, हे हरिमाऊंनी आपल्या कादंबन्यात मोठ्या कुशलतेने समाजाच्या निदर्शनास आणलेले आहे. नगंदाभावजयाचे दुःस्वास, सासवा-सुनातील तेढ, बहिणीबहिणीतीलही हेवेदावे वगैरे प्रकारांमुळे हेवेदावे वगैरे प्रकारांमुळे वीसमाज कसा पोखरलेला आहे ही स्थिति, 'पण लक्ष्यात कोण घेतो' यांत अविभक्त कुटुंबाचा शब्दचित्रपट दाखवून हरिभाऊंनी उत्कृष्ट रीतीने दाखविली आहे. त्यांना शिक्षण देऊन त्यांची मने मुसंस्कृत केल्यास त्यांचे आपसातील कलह नाहीसे होतील व आपल्या उन्नतीचे उपाय त्यांना एकजुटीने योजिता येतील, याचाही ' पण लक्ष्यात कोण घेतो' मधून निघत असलेला ध्वनि चाणाक्ष वाच- कांच्या कानांत गुणगुणल्याशिवाय राहणार नाही. हरिभाऊंच्या सृष्टीचा स्वतंत्र काळ. सारांश काय की, हरिमाऊंच्या कादंब-या नुसत्या सदविचारांचे निरूपण करणान्याच नव्हेत, नर त्या विचाराच्या अनुरोधाने वारकांच्या मनात नवीन विचारांचे काहूर उसळवून देणान्या आहेत. हरिभाऊंनी सुमारे ३०३५ वर्षे जी ग्रंथरचना केली, तिने आपला एक स्वतंत्र काळच निमांग केला. याचे कारण त्यांनी विदग्ध वाङ्मयांत म्हटल्याप्रमाणे “ सौंदयांच्या आत्म्याने आनंद उत्पन्न करून सत्याचा संचार मनुष्याच्या मनात उत्पन्न करून देणारे वाङ्मय त्यांनी निर्माण केले हे होय. सत्य जसें त्रिकालाबाधित तशीच त्याचा आश्रय कादंबऱ्यांचा कार्यभाग. करून हरिभाऊंनी आपल्या पुस्तकात प्रतिपादिलेली विचारसरणीही त्रिकाला- बाधितच आहे. 'अबलोन्नति हे आपल्या कादंब-याचें बीजभूत तत्व धरून, दुबळ्या कष्टयाना जबरदस्तांकडून जो त्रास होतो त्यापासून त्यांचे संरक्षण करणे " या व्यापक धोरणांत त्यांनी त्याचा विकास केला आहे. व राजकीय, सामाजिक व औद्योगिक कोणत्याही कारणामुळे समाजात दुबळेपणा राहूं न देणे हेच व्यापक ध्येय या बीजभूत तत्वांगसून त्यानीं परिणत केलें आहे. आधीं सामाजिक की राजकीय. आधी सामाजिक की आधी राजकीय या वादाने आपल्या देशांत एक वेळ रणे पडली होती. त्याच काळांत लिहिलेल्या आपल्या 'मी' या पुस्तकात हरिभाऊंनी थोडक्यात असे उत्तर दिले आहे की, सगळ्या शरीराला अश. कता आली असता एक हात आधी लह करून या, मग बाकीच्या शरीराचे पाहं. असे म्हणण्यापैकी आधी अमुक मग तमुक असे म्हणणान्याचं म्हणणं असत. " राजकीय व सामाजिक सुधारणेच्या बाबी आमूलाग्र कशा एकरूप आहेत याचें हरिभाऊनी केलेले मार्मिक विवेचन अन्यत्र कचितच सापडेल. सरकार व लोक दोघेही खुशामतप्रिय कसे असतात याचे विवेचन करताना हरिभाऊ म्हणतात, " लोकाना आणि सरकारलाही केवळ स्तुती करून घेण्याची चटक लागलेली आहे. जुन्या चाली मग त्या बन्या असोत, वाईट असोत त्याची स्तुति केली की, लोक खुष होगत. सरकारी अधिकन्याची कत्ये बरी असोत, वाईट असोत ती वाखाणली, इंग्रजी राज्याचे दोष न दाखविता नुसते पोवाडे गाइले की सरकार खुष." " अधिकारी वर्गाला आपला अधिकार लोकांच्या सुपूर्त करण्याची फार दृढ अशी अनिच्छा. दुसरीकडून आपल्या पूर्वपरंपरागत समाजव्यवस्थेत सुधारणा करण्याची बहुजनसमाजाला फार अनिच्छा. या दोनही अनिच्छा कमी झाल्या पाहिजेत." सरकार व लोक, लोक व रीतीभाती, लोक व धर्म याचे संबंध कसे असावेत याबद्दलचे पुढील वर्णन अत्यंत समपर्क होय :- राजा व सरकार हे लोकांच्या मुखाकारिता, लोक त्यांच्या मुखाकरिता नव्हेत. रीतीभाती, आचारविचार हे लोकांच्या सुखाकरिता. लोक त्या रीतीभाती व ते आचारविचार यांकरिता नव्हेत. धर्म हाही लोकांकरितां, लोक धर्माकरिता ह. ना. आपटे यांचे संक्षित चरित्र. अवश्य नव्हेत. कोणतेही सरकार, कोणताही राजा, कोणत्याही रीतीभाती, आचार- विचार किंबहुना धर्ममुद्धा लोकांच्या सुखाआड येऊ लागला की स्यांत फरक हा झालाच पाहिजे. तो जर योग्य काळी योग्य तितका झाला तर चांगले. योग्य काळी योग्य तितका न झाला तर अनर्थकारक, असले विचार, असले ज्ञान जाणत्या लोकांच्या मनात मरवून देणे हेच आज आमचे कर्तव्य. " एकीकडून सरकारच्या धोरणाने घेऊन त्यांचेरासून ज्यास्त सवलती मिळविण्यास व दुसरीकडून लोकांच्या धोरणाने घेऊन त्यांचीही सामाजिक बावीत असहनता कमी करण्याला काय व कसे प्रयत्न करावें" १ हा प्रश्न उपस्थिन करून त्याचे उत्तरही हरिभाऊंनी मोठ्या विचारपूर्वक रीतीने दिले आहे. आणि ते "कोणतीही गोष्ट सावकाशी सावकाशीने जितकी होईल तितकी एकदम दांडगाईने होणार नाही. व दांडगाईने होणे इष्टही नाही. " हे होय. कर्माचे वेड लागलेली माणसें. विकासमार्गानेच या सर्व सुधारणा घडवून आणण्यास कार्याचे वेड लागून त्यास सर्वस्वी वाहून घेणारी माणसें पुढे येणे कसे आहे हे सगून हरिभाऊंनी आपल्या 'मी या कादंबरीत सेवासदन, अनाथ- बालिकाश्रम, सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी, पगैरेसारख्या संस्थांचा निर्देश करून सहकारी चळवळ, सक्तीचे शिक्षण वगैरे बाबींचाही उल्लेख केलेला आहे. हरिभाऊंची 'मी' ही कादंबरी ९५ सालापूर्वी लिहिली गेली. अर्थात् वरीलपैकी कोणतीही संस्था किंवा चळवळ किंवा चळवळ अस्तित्वांत नसता त्यांनी त्यांची बरोबर रूपरेखा आखावी यावरून आपल्या स्वोन्नतिकारक चळवळीस कालांतराने लागणान्या वळणाचें हरिभाऊंनी कसें बरोबर भविष्य वर्तविलें आहे हे दिसून येईल. त्याच्या आजच या कादंबरीत अराजक पक्षाच्या उत्प- तीही दिग्दर्शन केलेले आढळते, तेही बंगालमध्ये अराजक पंथ अस्तित्वात येण्यापूर्वी ५।४ वर्षे केलेले आहे, हीही गोष्ट येथे नमूद करणे जरूर वाटते. अशी भविष्यदी दृष्टि त्यांना येण्याचे कारण दुसरे काही नसून त्यांनी समा- जाचे नुसते वरवर अवलोकन न करता त्याच्या अंतरंगात प्रवेश केला, त्यांतील सर्व व्यापार त्यांनी काळजीपूर्वक अवलोकन केले व या व्यापारांचे पर्यवसान कोठे होणार हे आपल्या प्रतिभाशक्तीने बरोबर जाणले. तेजस्वी प्रतिभा, उज्वल कल्पनाशक्ती, सदय मनोवृत्ति या गुणांस विद्याव्यासंग व सदभिरुचि यांचे कोंदण असल्यावर उत्कृष्ट ग्रंथ कसे निर्माण होतात, अचेतन सृष्टीतही चैतन्य कसें घालता येते याचें हरिभाऊंच्या कादंबऱ्या हे सर्वथा प्रशंसनीय असें प्रत्यंतर होय.
प्रकरण सातवें. स्वभावाशी परिचय. अंतःकरणाने प्रेमळ व मनाने थोर. मनुष्याच्या आयुष्यक्रमात यच्च यावत् ज्या गोष्टी घडतात त्यास कारण त्याचा स्वभावच होय. मनुष्य लेख लिहो, किंवा व्याख्यान देवो, किंवा खाजगी संभाषण करो, त्यांत त्याचा स्वभाव नेहमी प्रतिथिक्ति होत असतो, किंबहुना मनुष्याच्या व्यवसायांतील कोडी वाटण्यासारख्या कित्येक गोष्टी त्याचा स्वभाव कळल्यावरोवर पटकन उकलतात. अर्थात् स्वभावाचा याप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यक्रमाशी अगदी निकट संबंध असल्यामुळे इतर सर्व गोष्टीपेक्षा त्यांस महत्त्व देणे अपरिहार्य होतें. हरिभाऊंच्या स्वभावाचे मुख्य गुण म्हटले म्हणजे त्याच्या अंतःकरणाचा प्रेमळपणा व मनाचा थोरपणा हे होत. त्याच्या कादंबन्यांत त्यांच्या अंगचे हे गुण पदोपदी प्रतिबिवित झालेले दिसतील. त्यानो आपल्या कादंबन्यातील सर्व भूमिकांना सदय अंतःकरणानेच वागविलेले आहे. केवळ शंकरमामंजी, दिगंबर- पंत, किंवा असे दुसरे चांडाळ चौकडीतील लोक यांचा मात्र त्यांनी तीव तिर- स्कार व निषेध केलेला आहे. इतर कोणत्याही भूमिकेसंबंधाने त्यांनी कठोर. पणाचा कधी एक शब्दही वापरला नाही. ते मनाने जसे मोठे होते तसे स्वभावानेही शांत असत. त्यांना राग फार कचित् येत असे. कोणी मनुष्य भेटीला आला तर त्याच्याशी ते फार प्रेमळ- पणाने बोलत. ते अगदी निकडीच्या कामात असले तरीसुद्धा भेटीस आलेल्या माणसास परत कधीहि पाठवीत नसत. कारण लोकाना हेलपाटे देऊन त्यांची अडचण का करा असे ते म्हणत. उलट त्यांजकडे येणाऱ्या लोकांनी अस। विचार केला असता तर हरिभाऊंचा निष्कारण जाणारा बराच वेळ वांचला असता. एकदा स्नेही म्हटला म्हणजे त्यास अंतर कधीहि द्यावयाचे नाही असा त्यांचा वाणा असे.त्यांच्या वागणुकीत अशी काही गंमत असे की त्याच्या प्रत्येक परिचितास आपण हरिभाऊंचे अगदी जिवलग स्नेही आहो असें वाटावें ! आपल्या हातून लोकांचा होईल तितका उपयोग व्हावा अशी त्यांना फार इच्छा असे. आपल्याकडे येणान्या सर्व लोकांचीच कामें आपल्या हातून व्हावी ४८ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र असे त्याना वाटे. पण ही त्यांच्या मनाची धाव पुष्कळ वेळां मिथ्या ठरून, त्याची इच्छा नसताही, कित्येक माणसाची निराशा होई. ते मोठे मनमिळाऊ असत. कोणाला उणें अधिक बोलून किंवा निष्कारण त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांनी एखादें मनुष्य तोडले असें वचितच होई. फार काय, त्यांची आगळिक केलेल्या माणसांबद्दलही ते अढी धरून बसत नसत व त्यालाही उप- योगी पडण्याची संधि आली असता वाया दवडीत नसत. नोकर-चाकरांचे प्रेम. त्याचा स्वभाव याप्रमाणे उदार असल्यामुळे नोकर-चाकरही त्याच्यावर खुष असत. नोकरांपैकी कोणी आजारी वगैरे पडल्यास ते त्याच्या औषधाची व शुश्रूषेची जरूर ध्यवस्था करीत. एकदां त्याच्या एका नोकराच्या गुडध्यास काही जखम झाली. ती विकोपास जाऊन गुडघा कापून टाकण्यापर्यंत मजल आली. पण तो नोकर ऑपरेशनला कबल होईना. तेव्हा तुझ्या पायाचे ऑपरे. शन केले तर " मी तुला बैठी नोकरी देईन, तुं काही काळजी करूं नकोस." असे त्यानी त्याला सांगितले व ऑपरेशननंतर त्याला बैठी नोकरीहि दिली. माणसांचे भोक्ते मडळीचे ते अतिशय भोत असत. त्याच्या सहवासांत एक दोन माणसे नाहीत असा दिवसच काय, पण एखादा तासही सापडणे कठीण. निदान आठ चार दिवसानी तरी चार दोन स्नेही पंक्तीला घेऊन भोजन करावे अशा याना इच्छा होत असे. आणि तसा योग ते घडवूनही आणीत. एखादा स्नेही असा मरू व असला की, त्याच्या येथे कोणाचाही हात भिजणे कठीण, तर त्याच्या घरी पुख्खा जमवून आणण्याचे काम हरिभाऊ खास करावयाचे ! घरात एखादा जिन्नस चागला स्वादिष्ट किवा रुचकर झाला तर तो एकटे बसून खाणे त्यांच्या जिवावर येई. तो सावयास बरोबर कोणी मिळावे म्हणून ते मुद्दाम टेहळणीवर बसून एखाद्यास घरात बोलवावयाचे. त्यांचे एक स्नेही त्याना विनोदाने म्हणत असत की, बुकडेपो व पक्वान्नांचे दुकान या धंद्यांस तुम्ही अगदी नालायख आहात. कारण, एखादा पदार्थ चांगला झाला की, तुम्हीं तो जाणा-या येणान्यांस वांटून टाकायचे, त्याचप्रमाणे डेपोत असलेली चागली पुस्तकेंही लोकांच्या मागे लागून त्यांना द्यावयाचे!
स्वभावाशी परिचय. विनोदी स्वभाव. त्यांच्या स्वभावात विनोदाचीही विपुलता असे. पण तो विनोदही प्रेममूलकच होता. ज्याची थट्टा करावयाची त्याला सुद्धा गम्मत वाटावी, अशा प्रकारचा त्यांचा विनोद अते. चुकून कोणाची अधिक थट्टा होऊन कोणास राग आला तर ते त्याची तात्काळ समजून करीत. ते म्हणत, स्नेह। घलविणं सोपं आहे. पण मिळविणे कठीण आहे. कित्येक थट्टेखार, माणसे फार चिडखोर असतात. लोकाची चेष्टा करण्यात ते मोठे बहावर, पण स्वतःची चेरा कोणी केली की तात्काळ झालेच लाल ! अशांतल हरिभाऊ नव्हते. कोणी मार्मिक रीतीने आपली चेष्टा केली की तेही हंसूं लागत. १९०८-१९०९ सालच्या सुमारास त्याचे डोळ फारच बिघडले व करम- णुकीचा मजकूर लिहिण्याचे काम त्याच्याच्याने होईना. तेव्हा त्यानी आपले मित्र रा. रुष्णाजी केशव गोखले याना करमणुकोकरिता मजकूर पाठविण्या- बद्दल विनंति केली. काका गोखल्याना अशा प्रकारचा मजकूर लिहिण्याची संवय नव्हती. तरी त्यानी प्रयत्न करून हरिभाऊंकडे दहा गारी लिहून पाठ- विल्या. त्या हरिभाऊंच्या उपयोगीही पडल्या. त्यानी काकाना याबद्दल आभार- प्रदर्शक पत्र लिहिले. त्यात 'अंधभक्ती ( अंधाबद्दलची भाक्ति ) बद्दल मी आपले आभार मानतो ' असे लिहिले होते। साधी वागणूक. हरिभाऊ श्रीमंतीत वाढले होते तरी त्याची वागणूक अगदी साधी असे. व याच्या सात वर्षांपासून त्याना थंड पाण्याने स्नान करण्याची सवय असे. कितीही थंडी असो किंवा ती कोणत्याहा प्रदेशातील अतो, हरिभाऊ नेहमी सकाळी थंड पाण्याने स्नान करीत: जेवणाची त्याची कधी तकार नसे. पण त्यातल्या त्यात चमचामित पदार्थ त्याना विशेष आवडन हा याचा लौकिक अगही कॉलेज च्या दिवसापासून होता. प्रवासात त्याना रिशेष बाइबिछानाही बरोबर घेऊन जावे लागत नते. कारण एक घोगडी व त्यावर एक चादर येवढे असले की त्यांचा बिछाना थाटला जाई ! हरिभाऊंनी सर्व हिंदुस्थानात प्रवास केला. पण त्यांना जेवणाखागाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची खोड नसल्यामुळे प्रवासांत त्याचे केव्हाही अडत नसे. कोणाच्याही घरी उतरले तरी ते घटका दोन घटकांच्या परिचयानेच घरांतल्या मंडळीत सामावून जावयाचे. असा त्यांचा ह ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. स्वभाव असे. जेथे ते उतरत तेथील माणते गरीब असोत किंवा श्रीमत असोत, हरिभाऊंना त्याची कधीहि क्षिती वाटली नाही. त्यांच्या स्नेह्यामध्ये श्रीमंताचाच भरणा फार असे. पण गरीब स्ने पाना ते विशेष आदराने वागवीत असत. त्यांचे वाचन दांडगे असल्यामुळे त्यांच्याजवळ विनोदमहदाख्यायिकांचा चांगला संग्रह असे. सकाळी स्नेही मंडळीप्तमवेत फिरावयास गेले म्हणजे त्यातील 'एक एक चुटके सांगून ते आपल्या मित्राची करमणूक करीत. सर्व मंडळींची बहार काय ती हरिभाऊंवर, हारभाऊ गांवाशिवाला गेले तर त्यांच्या मित्र परिवागस उदासवाणे वाटावे. हरिभाऊ मित्रमंडळाची केवळ रंगदेवताच होते. विसरभोळेपणा. हरिभाऊ विसरभोळे असत. कदाचित त्यांच्यामागे अनेक कामांचा व्याप असल्यामुळे त्यांच्या अंगी हा गुण आला असेल. पण एखादे वेळेला त्यांच्या विसरभोळेपणाचा अगदी कडेलोट होऊन जाई ! एकदा आपले स्नेही रा.वासुदेव गोविंद आपटे यांना त्यांनी जेवावयास बोलाविले होते. त्याप्रमाणे वासुदेवराव आनंदाश्रमात आले. पण त्यापूर्वीच हरिभाऊ जेवून यतले होते. वासुदेवरावाना पाहतांच एकदम आठवग होऊन ते खाली गेले. त्याची त्यांनी अथांतच जेवणाची तजवीज केली व आपणही त्याच्या पंक्तीस बसले. नंतर त्यांना सरा प्रकार काय झाला तो सागितला! लहरी स्वभाव. आनंदाश्रमात त्यांच्या बसावयाच्या जागा दोनतीन असत, त्या स ठिकाणी टेवल, खुर्ची, पुस्तकें व लिहावयाचे सामान जय्यत असे. पण या सर्वांची मांडणी आता पाहिली तशीच चार तासांनी राहील याचा काही भरवंसा नसून चार तासांपूर्वी जे टेबल दक्षिणोत्तर असावयाचें तेच पूर्वपश्चिम व्हावयाचें ! जी बुकें हरिभाऊंच्या समोर होती, ती त्याच्या पाठीमागे जावयाची, व पाठां- मागची पुढे याववाची! इतर वस्तंतही अशीच क्राति घडून आलेली दिसावयाची. ही नवीन व्यवस्थाही केव्हा बदलेल हेही सागवत नसे! खुर्चीतच डेस्काची सोय कशी असावी, टेबलालाच खुर्ची कशी जोडावी विचार त्याच्या मनामध्ये आले की, स्वता पान तयार करून ते तशी सोय तापरतोब करून घ्यावयाचे. लिहिण्याच्या सामानसुमानासंबंधातही त्यांची हीच स्थि ते असे. अनेक प्रकारच्या लाकडो पेन्सिली, नानाप्रकारची फाऊटन पने, .
स्वभावाशी परिचय. ५१ भिन्न मिन्न टीपकागद, वेगवेगळ्या प्रतीचे नोटपेपर व लिफापे, लहान मोठी अनेक पॅडस् वगैरेंचा त्यांच्याजवळ मोठा संग्रह असे. आणि एक वस्तु आठ दहा दिवस वापरली, की तिचा कंटाळा यावा, दुसरी विशेष सुबक असावी अशी •त्यांना इच्छा उत्पन्न होऊन ती त्यांनी खरेदी करावी, असा त्यांचा स्वभावच बनला होता. अमुक एक गोष्ट करावयाची असे त्यांच्या मनात आले की ती झाल्या- शिवाय त्यांच्या चित्ताला चैन पडावयाचे नाही. दुपारी ऐन बारा वाजता त्याना एखादी वस्तु पाहिजे असली आणि बाजारात पाठविण्यास जवळ कोणी माणूस नाही अशी स्थिति असली तर हरिभाऊ स्वतः जाऊन ती वस्तु आणा- वयाचे ! रात्री बारा वाजता हरिभाऊ जागे झाले आणि एखाद्या पुस्तकाची त्यांना आठवण झाली तर दिवा लावून तायडतोय तिसन्या मजल्यावर जावया- चे व ते पुस्तक आणावयाचे. "लहानपणापासून माझ्या मनाची प्रवृत्तिच काही चमत्कारिक ! जे एकदा करावयाचे असें मनाने घेतले तें करून टाकल्या- खेरीज मनाला समाधान वाटावयाचे नाही. एकदा ते हातून घडले म्हणजे मनाला पूर्ण समाधान होऊन रुतरुत्य झालोसे वाटावयाचें" हे जे 'मी' कादंबरी- तील नायकाचे वर्णन त्यांनी दिले आहे ते त्याना तंतोतंत लागू पडते. वाड्मय. क्षेत्रात त्यांची कल्पनाशक्ति जशी तल्लख होती तशीच ती सामान्य व्यवहारांतही होती. फरक इतकाच की, त्या क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीचा प्रवाह कोणत्या दिशेने काढावयाचा याबद्दल त्याच्या मनाचा एकदा निश्चय झाला की तो सहसा फिरत नसे आणि व्यवहारात म्हणजे वस्तूंच्या व वस्तुरचनेच्या निवडी. संबंधांत त्यांचा होणारा निश्चय केव्हा फिरेल याचा भरंवसा नसे. नादी नारायण! 'मी'ला आपल्या वडिलाच्या खोलीत लखोटा सांपडला त्या वेळेस त्याला अक्षर- भोळखही नव्हती. फार काय, पण लसोटा फोडावयाचा कसा हे समजण्या- इतकेंहि त्याचे वय नव्हते. पण स्त्येिक दिवसपर्यंत त्या लखोट्याने त्याला इतकें वेडावून सोडले होते की एक क्षणभरही तो दृष्टीआड झाला की त्याला चैन पडावयाचें नाही। नादीपणाची ही जी बहार हरिभाऊंनी आपल्या कादंबरीत वर्णन केली आहे, ती करण्याचे कामी स्वतःचेच चित्र स्याना पुष्कळ अंशी उपयोगी पडले असावे असे वाटते. 'पण लक्ष्यांत काण घेतो ' मधील यमुनेच्या ५२ ह ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र . दादाला हरिभाऊनी " नादी नारायण " म्हटले आहे. त्यावेळी त्याना हरिनारा- यणाचेच स्मरण झाले असले पाहजे ! पोषाकाच्या त-हा. हा त्याचा स्वभाव त्याच्या पोषाकातही दिसत असे. त्याचे कपडे अगदी साधेच असत त्याना छानछुकांची केव्हाही आवड नसे. त्याचा पोषाख, त्याची रहाणी, किंबहुना त्याच्या कादबन्यातील भाषा या सर्वातच त्याचा. साधेपणा पूर्णपणे प्रतिबिंबित झालेला दिसतो. त्याचे कपडे साधेच असत. बाराबंदी आणि तोहि बहुधा सादीची त्याच्या अंगाशी आजन्म लगटलेली असे. त्याच्या एकंदर पोषाखात साधेपणा हा गुण सामान्य असे. पण त्यातही पहाणाराचे क्षण- भर मनरजन व्हावे अशा तन्हा असत. निरनिराळ्या शिलईचे सद्रे, शार्ट कोट, जाकिटे याची हरिभाऊंच्या जवळ रेलचेल असे. कपड्यात अमुक ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे असे त्याच्या मनात आले की, तो लागलीच दुरुस्तीला गेलाच म्हणून समजावें ! पाटस- कराच्या येथील माणूस कपडे बेतावयास आला म्हणजे या खेपेस हरिभाऊंची नवीन टूम काय निघते याबद्दल तो उत्सुक असावयाचा आणि हरिभाऊनी त्याची उत्सुकता, निष्फळ केली असे प्रसंग एकंदरीने क्वचितच असत ! हरिभाऊंच्या कपड्यांना खिसे मनस्वी असत. त्याच्या कपड्याना खिशाचेच अस्तर असे असेही म्हटले असता अतिशयोक्ति होणार नाही ! एकदा त्याच्या पायात उपरणे अडकून त्याना ठेच लागली. तेव्हापासून पुनः त्यानी उपरणे अंगावर घेतले नाही ! अंगावरील अवडंबर. एक पाती, दुपाती, चार पाती, असे लहान मोठे दोन तीन चाकू, पाच पाच निरनिराळ्या रंगाच्या पेन्सिली, एक दोन फाऊटन पेने, लोकांकडून आलेली पाच चार पत्रे,वोरी कार्ड,पाकिटे, निकिटें,मेणबत्तीचा तुकडा,सीलची लाख,काड्या- ची पेटी वगैरे जिनसा त्याच्या नेहमी अंगावर असावयाच्या! ते प्रवासाला निघाले म्हणजे या अवडंबरात आणखही भर पडावयाची ! स्टेशनवर हरिभाऊ हमाल करावयास लागले म्हणजे "येवढं अगडबंब ओझे अंगावर वागविणारास आपला बाडबिछाना सहज खाकेत मारून नेता येईल. त्याला हमाल कशाला पाहिजे " असेहि उद्गार त्याच्या एखाद्या निकटवर्ती स्नेह्याच्या तोंडून निघावयाचे ।
स्वभावाशी परिचय. आतून म'सें जाकीट घेऊन या असे त्यांनी एखाद्याम सागितले आणि त्याने ते एरव्हीच्या जाफिटाच्या कल्पनेनेच उच ठले तर त्य च्या हातास एकदन अचका बसल्याशिवाय राहणार नाही इतके ने भारदस्त असे ! पण इतकेंही असून त्यांची राणी अगदी साधी अमे. इतकी की त्याना उत्सुकतेने पहावयास आलेल्या मासात "हेच क हरिभाऊ" असे वाट सशिवाय हात नमे. त्यान्या इतर व्यवमायात व वार नातही हा लह वा दिसण्या- शिवाय रहात नसे. विशेषतः, आपल्या पर वयात त्यांनी होमिओपाथी. फोटोग्राजी वगेरे कलाचे नादलेले आहेत. जो ज्या वेळेला नाद लागेल त्या पेढी ल्याशिवाय दुसरे काही करावयाचे नाही भाग तो एकदा सुटला म्हणजे त्याकडे उहा हुकून पहावयाचे नाही अशी याची स्थिति अमे, फोटोग्राफीचा नाद लागला की त्याचे ग्रथ, त्याची उपकरणे व म्बन: । निरनिरच्या माणसाचे निर- निराठे बनलेले फोटो याची गर्दी त्याच्या खटी। दिनावय ची! पाल्या गेल्या प्रत्येक माणसाबरोबर याचसंबंधाने त्याचे बोलणे व्हावय चे! झा, नो नाद सुटला की ते ग्रंथ, ती सर्व सामुग्री वर्षानुवर्ष पुराळ खात पडली वर्ग हरिभाऊ तिचा शेध करावयाच नाहीत. वाचनाची त्यावी त-हा अशीच असे. जो विषय किंवा विषयाची शाखा वाचून काढण्याची त्याची लहर येईल त्या वेळी त्या विषयाशिवाय दुसरे पुस्तक त्यांच्या हाती कित्येक दिवस दिसावयाचे नाही. पुस्तक खरेदीही या लहरीला पोषक अशीच असावयाची ! परस्परविरोधी गुण. त्याच्या स्वभावात स्थिरता व अस्थिरता, ढिलाई व निश्चय याचे विलक्षण सं-िश्रम झालेले दिसे. एखादी गोष्ट मनात आलो को तो घडेल केव्हा असें स्याना होऊन जात असे. तर इतर कित्येक बाबतीत त्याची विलक्षण दिरंगाई दिसून येत असे. जे काम केवळ पाच मिनिटात व्हावयाचे ते करण्याम त्याना पाच दिवस, कित्येक वेळा पाच महिनेही लागत । त्याचा स्वभाव काही बाबतीत अगदी ढिला असे तर काही बाबतीत ते पराकाष्ठेचा निग्रह दाखवीत. सुमारे १७११८ वषाच्या वयात त्याना विड्या ओढण्याचे व्यसन लागले. झाले, थोड्याच दिवसांन सबंध जड़ों पेटविण्यापर्यंत ह. ना. आपटे याचे संक्षिप्त चरित्र. होता की, त्याची मजल गेली. पण हे व्यसन चांगले नाही, असा त्याच्या मनात विवेक येताच त्यानी या व्यसनाचा पाश कायमचाच तोडून टाकला. लहानपणी त्यांना कांदा लसूण खाण्याची विशेष आवड असे. पण या त्यांच्या आवडीघट्ठल त्यांच्या वडिलांच्या मावशीने तिरस्कार दासविताच त्यांनी या वस्तूंचा तात्काळ त्याग केला. आणि पुढील ४० वर्षांच्या आयुष्य क्रमांत त्यानी या वस्तूंचा आपल्याला केव्हाही संपर्क होऊ दिला नाही ? मधून मधून ते तपकीर ओढीत असत. पण हे व्यसन आवाक्याबाहेर जाऊं लागले की ते ते ताबडतोब सोडुन देत. भिडस्तपणा. कादंब-यान लुच्चया लफंग्यांची जी शब्दचित्रे त्यांनी रेखाटली आहेत त्यां- वरून हरिभाऊ मोठे वृत असावेत, त्यांना फसविणे किंवा नादी लावणे कोणाला शक्य नसले पाहिजे असें वाटे. पण वस्तुस्थिति तशी नव्हती. मनुष्याची लबाडी यदाकदाचित त्याना कळली तरी त्याचा भिडस्तपणा इतका काही विलक्षण ते पुष्कळ वेळा समजून उमजूनसुद्धा फसले जात असावे. भिडस्तपणामुळे त्याचे विशेषतः वेळाचे फार नुकसान हाई. पुष्कळ निरु- योगी माणमे त्याची निष्कारण भेट घेऊन त्याचा हवा तसा वेळ घेत. पुष्कळ नाद असतील, पण हा चकाटपिटीचा नाद मोठा कठीण असेंते नेहमी म्हणत असत. पण भिडस्तपणामुळ ते या नादात गोवले जाऊन दिवसातून काही वेळ अशा रातीने घारविणे त्यांचे व्यसनच होऊन बसले होते! मनुष्याने आयुष्यात नाही म्हणण्याची कला' शिकले पाहिजे म्हणजे त्याचे पुष्कळसें नुकसान वाचेल असे ते नेहमी म्हणत असत. जो कोणी आला त्याचा परामर्ष घेत बसणे म्हणजे आपल्या वेळाची काही किमत नाही असे दाखविणे होय ही त्याना जाणीव होती. पण तिचा अखेरपर्यंत काही उपयोग झाला नाही ! निरीक्षणशक्ति. पण हा सर्व काळ अगदीच वाया जात असे असे वाटत नाही. त्याची निरक्षिण- शक्ति हृदयक्रियेप्रमाणेच एकसारखी चालत असे. ते कोणाशीहि बोलत असले किंवा काहीही करीत असले तरी त्याचीही शक्ति कधीहि स्वस्थ नसे. त्यांच्या मेंदूवर अनेक गोष्टीचे ओझे असे. बाकीचे ओझे सर्व वर वर असावयाचे, अगदी मेंदूशी लगट कर- णारा योना म्हणजे कादंबन्याच्या कथानकाचाच होय.वरचे कपडे थोडे मळकट स्वभावाशी परिचय पुष्कळ . असले तरी चालतील पण अंगाबरोबर असलेला कपडा स्वच्छ असला पाहिजे, स्याप्रमाणे इतर कोणताही व्याप असला तरी आपली कथानके परीटघडीसारखी स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. आणि कथानकास परिपोषक अशी सामुयो जमविण्यास त्यांची निरीक्षणशाक्ति भाल्या गेल्याचा समाचार घेतल्याशिवाय कधीही राहात नसे. वेळा एखाद्याशी बोलतांना त्याच्या चेहेन्याचे, स्वभावाचे, व अंतर्गत विकाराचे ते सूक्ष्म निरीक्षण करीत असावे असे वाटे.असें ते निरखून पाहू लागले म्हणजे “ पहा हो मला एखाद्या कादंबरीत सिंदरीत उतरून घ्याल " असें त्याच्या निकट सहवासातील माणसे त्याना विनोदाने म्हणत असत. आणि त्यात अर्थ नव्हता असेंहि नाही. वस्तुसृष्टीतील भूमिका. 'पण लक्ष्यांत काण घेतो'मधील शंकर मामंजी, मायेच्या बाजारातील दिगंबर- पंत व मोरमास्तर, भयंकर दिव्यातील सदुनाना, प्रो. ड्याडी व काकासाहेब, यशवतरावमधील रावयादूर आडमुठे, कर्मयोगातील भाऊसाहेब ही पत्रे हार- भाऊंनी अशीच आपल्या निरीक्षणशक्तीने टिपून घेतलेली होत. ही केवळ मासल्याकरितांच दिली आहेत. पुणे शहरांतील गेल्या दोन पिढ्यामधील निवडक व्यक्तीची ज्याना माहिती आहे त्यांना हरिभाऊंच्या कादंब-यांतील निरनिराळ्या भूमिका पाहून हे अमुक गृहस्थ, हे .मुक गृहस्थ अशी पटापट बोटे दाखविता येतील! नाकाला वास येत नव्हता. हरिभाऊंच्या कादंबन्यांत अश्लील किंवा शिष्ट समाजात उच्चारता न येईल असा एखादाही शब्द सांपडणे कठीण पडेल. वाङ्मयसृष्टीतील त्याचे प्राणों द्रय इतके तीक्ष्ण असे,पण हरिभाऊंच्या नाकाला मुळीच वास येत नसे। कै. गोपाळ राव आगरकर याच्याही नाकाला वास येत नसे. तेव्हा ते एकदा हरिभाऊंना म्हणाले, हरिभाऊ, आपल्या नाकाना वास नाही म्हणून आपल्याला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. कोणत्या दिशेनें कोण प्राणी येतो याची चाहूल घेण्याक- रितां पशूना कान हलविण्याची शक्ति दिली आहे, माणसानाही ती तशी होती. पण पुढे समाजसंघटनेने रहाण्याचा जसजसा प्रचार वाढत गेला तसतसे या शक्तीचे कारण उरले नाही. म्हणून माणसांतील ही शक्ति नाहीशी झाली. वास ५६ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. हाही संकट ओळखण्याचे एक साधन आहे. ते पशंना असणे अर्थातच जरूर आहे. पण माणसाला त्याची आता जरूरी नाही तेव्हा हेही माणसाचे इंद्रिय नाहीसे होणार असें स्पेन्सर म्हणतो. याची प्रचिती तुम्हांआम्हाला येत आहे !" माणसाला कान हलविण्याची शक्ति होती, याचा पुरावा या पुणे शहरात आजामत्तीसही पहावयास सापडेल. येथील एका सन्मान्य पेन्शनर गृहस्थांना कान कसे हलविता येतात हे पुष्कळांना माहीत असेल ! विलक्षण स्वाभिमान. हरिभाऊ भिडस्त असन तसेच ले स्वाभिमानीहि असत. त्यांनी इतक्या कादंबन्या केल्या, गोष्टी लिहिल्या आणि इतरही लेख प्रसिद्ध केले, पण त्यापैकी कोणताही ग्रंथ कोण्या सस्था निकास, जहागिरदाराप्त किंवा एखाद्या लक्ष्मीपुत्रास त्यानी अर्पण केला नाही. तसा क्रम त्यानी स्वीकारला असता तर त्याना पैशाचीही चागली प्राप्ति होण्यास हरकत नव्हती. पण त्यानी तसे कधीहि केले नाही, हे त्यांच्या स्वाभिमानाचे घोतक होय. त्यानी आपली २६ पुस्तकें आपले वडील, आपले चुलते व आपले स्त्येिक जिवलग स्नेही यानाच अर्पण केली आहेत. या स्वाभिमानाचा कित्येक वेळा अतिरेक ही होई. ते आपली पुस्तके अभिप्राया- करिता कधीही पाठवीत नसत. कारण लोकाच्या चागल्या अभिप्रायाची आपल्या पुस्तकाच्या खपास मदत घेणे हेहि त्याना कमपणाचे वाटे ।
प्रकरण आठवें. अवांतर लेखनव्यवसाय. मनावर ठसा उमटत असे. कोणताही विशिष्ट प्रसंग हरिभाऊंनी पाहिला की, त्याचा ठसा त्यामा मना-र ताबडतोच उमटे. (खादा प्रसंग त्यानी पाहिला की ताकत को हकीक्तीच्या रूपान किंवा गोष्टीच्या रूपाने लिहून काढल्याशिवाय त्याना चे। डन नसे १८९९ रु'लच्या पेगमध्य यानी गो. गरिबाना मदत देण्याचे फार चागले काम केले. कोणाला औषधोपचाराची मदत पाहिजे पाहण्यासाठी ते परोघर हित व ज्याला जी मदन लागेल ती त्याला मिळावी अशी तजवी करीत. अनाथ प्रेताची तजवीज लावण्याकरिता त्यांनी या वेळी पगारी माणसे हे ठेविली होती. ते गेच्या दिवसात सहता बाहेर रहावयाला जात नसर. यामुळे प्लेगच्या विपानील येथील स्थिति त्याच्या चांगली दृष्टोत्पत्तीस येई. प्लेगच्या दिवसात येथील लोकाचे जे हाल झाले, कित्येक कुटुंबाची जी हलाखी पाली, ती पाहून त्याचे हृदय अर्थातच भडभडून आले. त्याची "कसे दिवस गेले" ही गोष्ट त्याच्या हृदयातील या कालवाकालवीची स्पष्ट साक्ष पटविते. पुण्याच्या प्लेगची उद्वेगजनक स्थिति या वेळी पुष्कळांनी पाहिली असेल व इतरानी ऐकली असेल. पण ' को दिवस गेले ' या गोष्टीने लोकाच्या मनात त्या कहराचें, जे हृदय विदारून सोडणारे चित्र उभे राहील ते दुसरे कशानेहि राहणार नाही. काळ तर मोठा कठिण आला. त्याचप्रमाणे, 'काळ तर मोठा काठण आला' या नावाची १८९७ साली त्यांनी दुष्काळासंबंधाने जी गोष्ट लिहिली तिनेही एके काळी मोठी खळबळ उडवून दिली होती. या गोष्टीचें " रामजी ट्रेजेडी ऑफ इंडियन फॅमिन " असें स्वतः हरिभाऊंनीच इंग्रजीत भाषांतर केले. या पुस्तकावर पायोनिअरने खूप झोड उठविली होती, या एकाच गोष्टीवरून त्याच्या महत्त्वाची कोणासही कल्पना येण्यासारखी आहे. त्यावेळी मुंबईस मि. चेंबर्स याच्या संपादकत्वाखाली चीप- ह. ना. आपटे यांच संक्षिप्त चरित्र. यन नावाचे पत्र निघत असे. त्यांत संपादकांनी या पुस्तकाची विशेष प्रशंसा केली आहे. दुष्काळामुळे गोरगरिबाची किता शोचनीय स्थिति होते याचे चित्र यांत हरिभाऊंनी फारच हृदयद्रावक रीतीने लिहिले आहे. चमत्कार करू शकतील. या गोष्टतिबंधाने कादंबरी' या आपल्या एका लेखात लिहितांना "पुढील १०।२० वर्षात हे ( हरिभाऊ) कदाचिन् सध्याच्या वाचकांच्या स्वप्नाही नाहीत असे स्वतंत्र चमत्कार करूं शकतील असें त्याच्या रामजी या गोष्टीवरून वाटते." असे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी उद्गार काढले आहेत. कोणाची स्तुति करण्यासंबंधात कंजषपणाबद्दलच राजवाड्यांची प्रसिद्धी आहे. रामजीच्या गोटाने त्यांच्याही तोंडून हे उद्गार निघाले, हा चमत्कार या गोष्टीच्या कयास भूषणावह नाही असें कोण म्हणेल ? अवांतर माल. हरिभाऊंची निरीक्षणशक्ति अष्टौपहर काम करीत असल्यामुळे एकट्या कादंघन्याचा व्याप त्या शक्तीस पुरा पडत नसे. कारखान्यात मुख्य माला. बरोबर जसे अवांतर (bye products) निन्नस निघतात त्याप्रमाणेच इकडे कादंयन्या चालू असताच त्याबरोबरच असल्या इतर गोष्टी व निबंध हरिभाऊ लिहीत असत. सद्यःस्थितिच श्रेष्ठावली पाहिजे. हरिभाऊंची निरीक्षणशक्ति जशी बहुविध विषय आकलन करण्यास समर्थ होती त्याप्रमाणे त्यांचे वाचनही अनेक विषय आपल्या कक्षेत आणणारे होते. हरिभाऊंसारखा चौरस बहुश्रुतपणा फारच थोडक्यात सापडेल. मिल्, मोर्ले, स्पेन्सर, वगैरे ग्रंथकार, टेनिसन, वर्डस्वर्थ, बायरन, बाउनिंग, आदिकरून- कवि, ग्रीन, गिवन् प्रभृति इतिहासकार,डिकन्स, स्कॉट, जेन ऑस्टेन, जॉर्ज इलि. यट, थेंकरे वगैरे कादंबर कार याचे ग्रंथ त्याना विशेष अवगत असत. ग्रंथकारापैकी एखाद्याच्या प्रथांतील विशेष महत्त्वाचा किंवा मनोहर भाग त्यांच्या वाचण्यात आला तर पुष्कळ वेळा त्यावर एखादा सुंदर निबंध लिहून ते एखाया संस्थेपुढे वाचीत. सारांश, आपणास जे जे काय कळेल ते बहुजनसमाजास सागून त्यांस शहाणे करावं हा समर्थाचा उपदेश हरिभाऊ तंतोतंत आचरणांत आणीत. “ साधारण लोकांची सद्यःस्थितिच श्रेष्ठावली पाहिजे. ज्या आम्हाला या अवांतर लेखनव्यवसाय. ५९ लोकांच्यामुळेच ज्ञान मिळा त्या आम्ही तेच ज्ञान आमच्या हाती केवळ ठेक समजन ते त्यांना पोहोचतें केले पाहिजे. (म. प्र. ६७ ). हे तत्त्व हरिभाऊंनी आजन्म अमलात आणलें. निरनिराळ्या विषयांवरील निबंध. 'पूर्वी पुण्यास फ्रेंडस लिबरल असोसिएशन या नावाची सस्था होती त्यांत "Philosophy of Fiction" "Realism in Fiction" व "Teachr ing of the Bhagwadgita" या तीन विषयांवर हरिभाऊंची व्याख्याने ताली. त्याचप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजच्या विद्याथ्यापुढे “Beauty" व "Joy of Life" या विषयावर त्यानी व्याख्याने दिली. यांपैकी दुसरे व्याख्यान कॉलेजच्या वाढदिवसाच्या एका समारंभात त्यानी दिले होते. डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुढे त्यांचे “ What is a Nation " ह्या विषयावर व्याख्यान ताले. त्यावेळी प्रिन्सिपाल बेन यानी या व्याख्यानाची विशेष प्रशंसा केली. गुणे येथील लिटररी अन्ड सायंटिफिक क्लबपुढे “ John Stuart Mill as revealed in his Letters" व "Ethics of Mahabharat" या वेपयावर त्याची व्याख्याने झाली. ठाणे येथील ग्रथसंग्रहालयाच्या समारंभाच्या वेली "मराठी वायाचा अभ्यास " या विषयावरील त्याचे झालेले व्याख्यान सुप्रसिद्धच आहे. मुंबई येथील हेमंत व्याख्यानमालेत प्राचीन काळची शस्त्रास्त्रे व हास्य या दोन विषयांवर त्याची निरनिगळ्या वेळी व्याख्याने झाली. महाराष्ट्र माहित्यपरिषदेच्या अध्यक्षस्थानावरून “ विदग्ध वामय " या विषयावर त्याचे तालेले व्याख्यान अगदी अलीकडील असल्यामुळे सर्वश्रुतच आहे. हे त्याचे व्याख्यान सर्वोत्कृष्ट आहे. विदग्ध वामयाचे इतके समर्पक, पण सोप्या व साध्या शब्दान केलेले विवेचन निदान मराठीन तरी अन्यत्र कोठेही सापडणार नाही. ही मव व्याख्याने म्हणजे त्यांच्या विविध वाचनव्यासंगाचें सारसर्वस्तच होत. भास कवीचे ग्रंथ. मास कवीचे ग्रंथ अलीकडेच प्रकाशित झाले. त्याचीही भाषांतरें हरि- माऊनी करमणुकीत प्रसिद्ध केली आहेत. मुळ नाटके जशी गद्याद्यात्मक आहेत, तशीच नी हरिभाऊंनी मराठीन आणून सोडली आहेत. मूळच्या सौदः पांची व सौकर्याची हानी न होता भाषातर कसे करता येते याचे मासले या भाषातरात ठिकठिकाणी सापडण्यासारखे आहेत.
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. याशिवाय तुकाराम, ज्ञानदेव आदिकरून महाराष्ट्र कविरही हरिभाऊचे कित्येक स्फुट लेख प्रसिद्ध झाले आहेत. महायुद्वात श्रापनेल, होविट झर, ट्रेंचमार्टर वगैरेजी शस्त्रास्त्रे उपयोगात आली त्यांचे समानार्थक शब्द महाभारतात साप- डतात की काय या दृशने त्यानी त्या ग्रंथाचे परिशीतन करून तसे काही शब्द व वर्णने निगडुनही काढली होती. व यावर एक निबंध लिहिण्याचाही त्याचा विचार होता. हरिभाऊंनी ज्ञानेश्वरीचा एक कोशही तयार केला असून तो कदाचित् लवकर प्रमिद्वही होईल. तीनही गुणांचा संगम. असामान्य ग्रंथकार म्हणवून घेण्यास वैदग्भ्य व चैपल्य या दोन गुणाची आवश्यकता असते. पण हारभाऊंनी त्यास वैचित्र्याचीही जोड दिली. या तिन्ही गुणाचा एकत्र संगम झालेली हरिभाऊसारखी उदाहरणे कचिन सापडतील. आपल्या समाजास उन्नतिपदास नेणा-या त्याच्या कादंब-याचा लौकिक निरंतर राहील. पण त्याचे अवांतर लेख व इतर गोष्टी घेतल्या तरी त्या एखाद्या विद्वान् व विद्याव्यासंगी माणसाच्या आजन्म चालणान्या लेसनव्यवसायास पुरुन त्याची कोत पश्चात् उरविण्यासारख्या आहेत. यावरून हरेभाऊंचा लेख व्यवसाय व तो ज्या उगमातून निघाला ती त्यांची बुद्धिमत्ता, निरीक्षणशक्ति व व्यासग ही किती प्रचंड होती याची कल्पना येईल. एखादी टोलेजंग इमार : बांधून उरलेल्या लाकूडफांट्यात व राड्यारोडयात १०।५ लहान लहान घर सहज व्हावी त्याप्रमाणे हरिभाऊंच्या या अतिर लेखनक्रियेनेच ग्रंथकार होण्याची महत्त्वाकाक्षा बाळगणा-या ५। गृहस्थांच्या कीर्तिरूप इमारती सहज उभारल्या जातील! हस्ते-परहस्तेमधील अंतर. हरिभाऊंनी हा सगळा लेखनव्यवसाय केला तो सर्व स्वतः लिहून केला. दुसन्याला मजकूर सागून तो लिहून काढण्याची त्याना मंवय नसे आणि ते त्यांना बरेंही वाटत नसे. ज्या अंतःकरणास स्फूर्ति झाली, त्याच हाताने मज- कूर लिहून निघाला पाहिजे, हस्ते आणि परहस्ते या मध्ये जे अंतर तेच स्वतः मजकूर लिहिण्यात व दुसन्याकडून लिहविण्यांत आहे, असे त्याना वाटत असावे. यासंबंधाने रा. रेंदाळकर म्हणतात, हारभाऊंची लेखणी फार चपल असे, ती नाना विषयांवर चाले. त्याचप्रमाणे ते फार झपाट्याने लिहीत. मात्र अवांतर लेखनव्यवसाय. अगदी आयत्या वेळाशिवाय त्याच्या हातून काही व्हावयाचे नाही, हे ठरलेलें। आरंभापासून त्यांना आपले सगळे लेखन स्वतः करण्याची सवय. त्यानी लेखक ठेविलाच नाही. काही अडचणीमुळे त्याना लिहिणे अशक्य झाले, आणि दुसन्या. ल' तोंडी मजकुर सांगण्याचा प्रसंग आला, तर ते त्याना बरे वाटत नसे. त्यांना दिसत नव्हते त्यावेळी एकदा मी “ सूर्यग्रहग " त्यांना वाचन दाखवीत होतो. माता रणदेवी नदीतीरावरील झाडाखाली बसली असता तिच्या पुत्राचा घोडा तिच्या मोहाने तिच्याकडे धावत आला; पण त्या नीचाने-कीर्तिसिगाने त्याच्या नाकाडावर मष्टिप्रहार करून त्याला ठार मारले. हा प्रमग इतका करुगरसप्रधान आहे की, मला तर थाबावेच लागत होते. पण हरिभाऊही डोळे पुशीत होते. नंतर ते म्हणाले, " असले प्रसग मला दुप्तन्याला मजकूर सागून कधीहि वठ- विता आले नसते ! अगदी एकातात मी एकटा असतांच असले प्रसग माझ्या हातून निर्माण झाले आहेत." हातावरील प्रपंच. हरिभाऊंनी आपली सर्व पुस्तके, गोष्टी, लेख व निबंध ही रोज रोज थोडी थोडी लिहून समाप्त केली असेंही नाही कारण, पद्धतशीरपणाने काम करणे हे त्याच्या स्वभावास केव्हाही माहीत नव्हते. मजकूर लिहिण्यासंबंधात त्याचा अगदी हातावरचा प्रपंच असे. अगदी गळ्याशी आले म्हणजे ते लिहावयास बसत. ही स्थिति अगदी मधली स्थितीपासून तो अखेरपर्यरत म्हणजे अगदी ३५ वर्षे एकसारखी चालू असे रोज थोडे लिहून शनिवारच्या करमणुकीकरिता ते मजकूर तयार करून ठेवण्याचा बेत करीत. पण तो केव्हांच फलद्रूप झाला नाही. हार- भाऊंचे असे फलद्रूप न झालेले बेत किती तरी सांपडतील. “ आपल्या बालपणापासून आपल्या एकंदर चारित्राचे परीक्षण करीत गेले तर मला वाटतें, फसलेल्या देताची जी रास दिसेल ती सिद्ध झालेल्या बेतापेक्षा किती तरी पचड असेल !" हे 'मी'च्या तोडचे उद्गार हरिभाऊंचा स्वानुभवच सागत असले पाहिजेत. पण निदान हरिभाऊसंबंधात तरी फसले- ल्या बेताची रास वाढण्याचे कारण ते आपल्या आवाक्याबाहेर बेत करीत, हेच असले पाहिजे. करमणुकीचा दिवस. असो. शुक्रवारी, फार झाले तर गुरुवारी पहाटे ते करमणुकीचा मजकूर लिहावयास सुरवात करीत. त्यांची बैठक मोठी दांडगी असे. आठआठ तास- ह. ना. आपटे यांचं संक्षिप्त चरित्र. पर्यन्त ते एकसारखे लिहीत असत. संत सखुबाई नाटक तर त्यांनी दीड दिव- सांत लिहिलें। या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना रात्रीचा दिवस करूनच लिहावे लागत असे. भाणि त्यांना झोप थोडी असल्यामुळे ते लवकर उठत व पहांटे मजकूर लिहि- ण्याच जमवीत. ग्रंथलेखनाच्या एकदर ३५ वर्षे काळापैकी पहिल्या वीस वर्षाच्या काळांत त्यांचा हा क्रम अव्याहत चालू होता, पण पुढे दृष्टिमांयामुळे पहाटेचे विशेष काम करणे त्यांना अशक्य होऊन गेले. तेव्हा दिवसाचे अनेक व्याप संभाळूनच हे सर्व काम त्यांना आटपावे लागत असे. या वेळी मनाची स्थिरता मोडण्याचे प्रसंग क्षणोक्षणी उपस्थित होत असतांही त्यांचे लिहिण्याचे काम जसा वेळ मिळेल तसे, चालत असे. कादंबन्याच्या कथानकाचें टिपण वगैरे त्याच्यापुढे केव्हाही नसे. अगदी करमणक छापण्याचा दिवस आला की आर्यभूषण छापखान्यांतील माणसे मजकुराकरिता आनंदाश्रमात सकाळपासून खेपा घालूं लागावयाची. इकडे नित्याप्रमाणे इतर मंडळी कामकाजानिमित्त किंवा पुष्कळ वेळां निष्कारणच मेटावयास येण्याचा सपाटा चालूच असावयाचा. त्यातच आनंदाश्रमाचे कार- कुन सह्यांना कागद आणावयाचे. इतक्यात अमुक वाजतां अमक्याला भेटा- वयला जावयाचें कबूल केले आहे याची त्यांना आठवण होऊन ते बाहेर जाऊन यावयाचे. जेवणाची तयारी झाली म्हणून खालून वरचेवर निरोप याव. याचे. अशा सर्व गोंधळांत हरिभाऊंच्या लिहिण्यास सुरुवात व्हावयाची. पण स्वांचे डोके शांत असे की या सर्व भगभगांचा समाचार घेऊन ते संध्याकाळी मजकूर पुर। करावयाचेच! टाकातून एकदा अक्षरे गेली, की, ती बहुधा कायमच होत असत, व ५।६ सास एकसारख्या लिहिलेल्या मजकुरात खोडाखोड साधारणतः केव्हाच दिसत नसे. एकदा मजकूर टाकातून निघून गेला की तो करमणुकीत छापून आल्या, वर त्याच्यापुढे यावयाचा. मध्यसरी रीतीप्रमाणे त्यांचेकडे प्रूफ यावयाचे. तें त्यांनी स्वतः पाहिल्याचे प्रसंग आलेच ते अपवादादाखलच होत ! स्वत: लिहावयाचें, अगदी आयत्या वेळी लिहाव- या प तेही अगदी अशा लमर्याहत आणि मजकूर लिहून गेल्यानंतर पुनः हरभाऊषी व त्याची दृष्टादश नाही अशा स्थितीत त्यांच्या कादंबन्यात पण भालेच तर अवांतर लेखनव्यवसाय. कचित् प्रसंगी संविधानकाची जुळणी विसकटलेली दिसावी, किंवा कित्येक ठिकाणी वस्तुवर्णनातील प्रमाणशीरपणा बिघडावा यात काही आश्चर्य नाही. पण असे प्रसंग एकंदरीने थोडेच आहेत, याबद्दल मजकुराचा प्रसर होण्या. पूर्वीची वरील स्थिति लक्षात घेता हरिभाऊंना कोणी विशेष दोष देणार नाही. हरिभाऊंच्या आयुष्याच्या शेवटच्या तीस वर्षांचे म्हणजे करमणुकीच्या जन्मापासून तो अखेरपर्यंतच्या काळाचे दहा दहा वर्षांचे तीन भाग पाडले तर स्पात प्रत्येक भागांत त्यांनी खालीलप्रमाणे ग्रंथरचना केलेली आढळते:- १८९० पासून १९०० सामाजिक:-पण लक्ष्यात कोण घेतो! (१८९०-९३) सगुणाबाईची आपल्या) मुलीस व गोविदरावांची (१८९१-९२) आपल्या मुलास पत्रे. यशवंतराव सरे. (१८९२-९५) मी. (१८९४-९५) जग हे असें आहे (१८९७-९९) काळ तर मोठा काठण (१८९१-९.) आला व कसे दिवस गेले. (१८९५) ऐतिहासिकः-म्हैसूरचा वाप (अपूर्ण) (१८९०-९१) उषःकाल. (१८९५-९७) केवळ स्वराज्यासाठी. (१८९८-९९) १९००~~१९१० सामाजिकः--भयंकर दिव्य, (१९०१-03) आजच (अपूर्ण). (१९०४-०६) ऐतिहासिकः-रूपनगरची राजकन्या. (१९००-०२) चंद्रगुप्त. (१९०२-०४) गड आला पण सिंह गेला. (१९०३ : सूर्योदय. (१९०५-०६) मध्यान्ह ( अपुर्ण). (१९०६-०८) सूर्यग्रहण (अपूर्ण.) (१९०८-०९) १९०-...९ सामाजिकः-मायेचा बाजार. (१९१०-१२) कर्मयोग ( अपूर्ण). (१९११-१७) ऐतिहासिक:-कालकूट ( अपूर्ण). (१९०९-११ वनाघात. (१९१३-१५) ह. ना. आपटे याचे संक्षिप्त चरित्र. हरिभाऊनी पहिल्या दहा वर्षांत चार सामाजिक कादबन्या व दोन ऐति- हासिक कादंबन्या लिहिल्या, दुस-या दहा वर्षात दोन सामाजिक कादंब-या लिहिल्या. त्यांतील एक अपूर्णर आहे. या काळात चार पूर्ण व दोन अपूर्ण अशा त्याना सहा ऐतिहासिक कादंबन्या लिहिल्या.तिस-या दहा सालीत दोन सामाजिक व दोन ऐतिहासिक कादबन्या लिहिल्या. त्यापैकी प्रत्येकांतील एक एक कादंबरी अपूर्णच आहे. यावरून असे दिसून येते की, स. १९०० नंतर हरिभाऊंनी भयंकर दिव्य व मायेचा बाजार या दोनच सामाजिक कादंब-या लिहिल्या. त्यानतर त्याचें लक्ष ऐतिहासिक कादबन्यांकडेच विशेष असलेले दिसते. दुसन्या दहा सालीत प्रायः प्रत्येक वर्षी त्यांनी एक एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली आहे. त्यांतील सूर्यग्रहण हे कथानकाच्या अनुरोधाने पाहतां वस्तुतः पूर्णच झाले आहे. फक्त माध्यान्ह हीच काय ती कादंबरी अपूर्ण राहिलेली दिसते. म्हणजे दहा वर्षांच्या काळात त्यांनी सात ऐतिहासिक कादंब-या लिहिल्या. स. १९.० नंतर हरिभाऊचे सामाजिक कादंब-याकडाल चित्त कमी का सालं असा साहजिकच प्रश्न उद्भवतो. त्याच निश्चित उत्तर देणे अर्थातच शक्य नाही. या काळात सुधारणा लोकांच्या काहीशा अंगवळणी पडत चालल्या. अर्थात् सामाजिक चवळीचा तितका जोर कमी झाल'. या परिस्थितीचाही हा परिणाम असेल. पण साधारणत: असे दिसते की, समाजांतील विद्यमान व पुढील दहावीस वर्षाच्या काळातील विचारपरिवर्तन त्यानी आपल्या १९०० पूर्वीच्या कादंबन्यातच चित्रित केली. या पुढच्याही काळाची सयःस्थिति रेखाटीत बसणे म्हणजे समाजाचे लक्ष त्या काळाकडे वेधून त्यास सद्यःस्थिती- कडे दुर्लक्ष्य करण्यास लावण्याप्रमाणे होणार आहे असा विचार त्यांच्या मनांत आला असावा. म्हणूनच ते ऐतिहासिक कादंब-याकडे वळले असावेत. ऐतिहा- सिक कादबन्याच्यायोगाने समाजास सयःस्थितीची व पूर्वस्थितीची तुलना करता येऊन दोहोमधीलही चागल्या गोडीचा मिलाफ करता येतो. आजच्या आणि यापुढे पच ीस वर्षांनी होणाऱ्या सद्यःस्थितीचे विवरण केल्यानंतर पूर्व- स्थितीचे सिंहावलोकन करणेच त्याना इष्ट वाटले असावे. स. १९१३ सालानंतर हरिभाऊंच्या हातून फारच थोडी ग्रंथरचना झाली याचे कारण अर्थातच त्यांच्या आवडत्या मुलीच्या मृत्यूने त्यांच्या मनःस्थैर्याचा सर्वस्वी बिघाड झाला हेच असले पाहिजे.
प्रकरण नववें. परीक्षेची वेळ. मारा करण्यास धामधुमीचा काळ. हरिभाऊंची करमणूक निघाली त्या वेळचा काळ मोठा धामधुमीचा होता. संमतिवयाच्या कायद्याने त्याच वेळी मतमेदाची धुमश्चक्री माजली होती. पंडिता रमाबाईच्या शारदासदनाने स्त्रीशिक्षणास विरोध करणान्या पक्षास सुधारकांवर एक नवीन हत्यार मिळालें में या वेळीच होय. पंचहौदमिशनमधील चहाप्रकरण उपस्थित होऊन वेचाळिसावर ग्रामण्य घालण्याची चळवळ कित्येक धर्माभिमान्यांनी सुरू केली ती या वेळीच होय. स. १८९१ सालचे स्थानिक वर्तमानपत्राचे त्या वेळचे अंक पाहिले तर त्यात वरील तीन बाबीशिवाय दुसरा विषय कचितच आलेला दिसेल. हरिभाऊ हे संमतिवयाच्या कायद्यास अनुकूल होते. व त्यांचे चुलते अण्णासाहेब हे प्रति- कूळ होते. आनंदाश्रमांतील तिस-या मजल्यावर या बिलाविरुद्ध जोराची चर्चा चालावयाची तर दुसन्या मजल्यावर हरिभाऊंच्या स्नेही मंडळीत, हे पिल पास झालेच पाहिजे, हे मत आग्रहाने प्रतिपादन करण्यात यावयाचे. चुलतेपुतणे असे एकमेकाविरुद्ध बाजूस होते तरी त्यांच्या प्रेमभावान यत्किंचितही व्यत्यय आला नाही हे लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. त्या वेळी घरोघरच्या वडीलधा-या माण. सांनी अशा प्रकारची सहिष्णुता दाखविली असती तर जुन्यानव्यातील झगड्या- मुळे पुणे शहरांतील ज्या कित्येक कुटुंबावर असमाधानाची वधुसफुशीची रुष्ण- छाया पसरली होती ती नाहीशी होऊन त्यामुळे सर्वांसच सुख लागले असते. फार कशाला, सहिष्णुतेच्या बाबतीत हरिभाऊंचे वडील अण्णासाहेबांप्रमाणेच असते तर हरिभाऊंचा जीवनक्रम बराच वेगळ्या प्रकारचा झाला असता. शारदासदन. संमतिवयाच्या कायद्याप्रमाणेच शारदासदन हाही विषय त्या वेळी तीव्र मत. भेदाचा झाला होता. या सदनाच्या स्थापक पंडिता रमायाई या मोठ्या की. - ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. त्ववान्, करारी व तेजस्वी बाई होत्या. हरिभाऊंना या बाईबद्दल कार भादर वाटे. स्त्रीशिक्षणाच्या कार्यास त्यांच्यासारखी विदुषी स्त्री मिळाली याबद्दल प्रगमनशील समाजास त्या वेळी एक प्रकारे आनंद वाटला. पण हा आनंद फार वेळ टिकणारा नव्हता. कारण या बाईनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. असल्यामुळे त्यांच्या स्त्रीशिक्षणविषयक प्रयत्नाकडे समाज साशंक दृष्टीने पार्ह लागला व त्यामुळे अखेर या बाईचें में तेज मालविलें तें कायमचेच मालविले. हिंदु धर्मात राहूनच पंडिताबाईंनी आपले स्वीकृत कार्य चालविले असते तर आज स्त्रीशिक्षणाची स्थिति आहे यापेक्षा किती तरी पट चांगली दिसली असती. बाई मोठ्या बुद्धिवान्, कर्तृत्ववान् व करारी होत्या. यामुळे पुणे शहरातील प्रगमनशील गृहस्थांवर या बाईंचे मोठे वजन असे. पण पुढे विस्तीधर्म प्रसारा- कडेच त्यांचे लक्ष अधिक लागून शारदासदनातील तुळशीचे झाड लाथेने उडविण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा कित्येक गृहस्थांना त्यांच्या संस्थेशी असलेला आपला संबंध तोडून टाकावा लागला. हरिभाऊंनाही या बाईबद्दल पूज्य बुद्धि वाटे; पण पुढे त्याच्या आयुष्यक्रमास वरीलप्रमाणे वळण मिळाल्या मुळे त्यांचा बाईशी असलेला स्नेह अर्थातच कमी झाला. चहाप्रकरण. तिसरी गोष्ट पंचाँद मिशनमधील चहाप्रकरण. यांतही हरिभाऊ होतेच.ज्या दिवशी हे चहापान झाले त्या दिवशीच हरिभाऊंचे एक चुलतभाऊ वारल्यामुळे त्यांना या समारंभास हजर राहता आले नाही. तरी त्यांचे नांव बेचाळिसांत प्रसिद्ध झालेच. मी हजर नव्हतों असें तूं प्रसिद्ध कर, असें हरिभाऊंच्या वडिलांनी त्याना सांगितले. पण हरिभाऊंनी ते ऐकलें नाही. मी हजर नसलो तरी तेथे हजर रहाण्याचे मी कबूल केले होते, त्याअर्थी आपण सांगता त्याप्रमाणे मजकूर मला प्रसिद्ध करता येत नाही असेंच त्यांनी वडिलाना सांगितले. वडिलांना असे सडेतोडपणाचे उत्तर देण्याचा हरिभाऊंच्या हयातीत हा येवढाच प्रसंग असला पाहिजे! प्रथम कुटुंबाचे निधन. सुधारकांविरुद्ध काहूर उठण्याची पुणे शहरांत अशी जणू काय पर्वणीच आली, त्याच सुमारास हरिभाऊंचे पहिले कुटुंय वारले आणि हरिभाऊंच्या परीक्षेची वेळ आली ! हरिभाऊंचे वय या वेळी सुमारे अठ्ठावीस वर्षांचे होते. आज या परीक्षेची वेळ. । वयाचे प्रथम वर शेकडो सांपडतील. पण त्या वेळी लमें लवकर होत असल्यामुळे हे वय चागले मोठ्या बिजवराचें असें गणले जाई. हरिभाऊंच्या मातुःश्री माप. मासांतच वारल्या. त्यांच्या प्रथम पत्नीने इहलोकची यात्रा संपविली ती याच महिन्यांत ! त्यांची आवडती व एकुलती एक कन्या त्यांना शोकसागरांत लोटून याच महिन्यांत परलोकवासी झाली! याचप्रमाणे त्याचे वडील व चलते यांच्या- वरही विधुर होण्याचा प्रसंग त्याच्या अठ्ठाविसाव्या वर्षीच आला ! हे दुःखाचे प्रसंग घडून येण्याचे बाबतीत असा पद्धतशीरपणा कां असावा हे कोडे कोण उकलणार? हरिभाऊंचे पहिले लग्न त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी साले. त्यांची प्रथम पत्नी हो कै. दामोदर विद्याधर गोखले याची कन्या होय. मधुराबाई ऊर्फ रमा- बाई या फार सालस होत्या. त्यांना नीन अपत्य झाली, पण त्यांपैकी कोणीही जगले नाही. तिसन्या बाळतपणाच्या वेळेस पहिल्या पांच दिवसांतच त्यांची तब्बेत बिघडली औषधोपचार चालू होतेच. पाचव्या दिवशी डॉक्टर परुति पाडून, आता काही पायरायास नको, म्हणून सांगून गेले आणि दोन तासांतष बाईचे देहावसान झालें । रमाबाई निवर्तल्यावर त्यांचे बालक त्यांच्या पश्यात् दोन महिनेच होते. या प्रसंगाने हरिभाऊंना फारच दुःख झाले, हे सांगावयास नकोच. तिघेही विधुर झाले. याच वेळी हरिभाऊंच्या दोन जिवलग मित्रांच्याही बायका मरण पावल्या. त्यापैकी एक तरहरिभाऊंच्या बायकोरमाणेच बाळंतपणांत मरण पावली. तिघेही मुधारक मताचे, तेव्हां अर्थातच आता पुढे कोणता मार्ग आक्रमावा हा प्रश्न त्यांच्या पुढे आला. घरातली मंडळी हरिभाऊंच्या जवळ लमाच्या गोष्टी काढू लागली, पण त्यांनी, मला लम करावयाचे नाही, असे सांगितले. हरिभाऊंचा स्वभाव घरांतल्या मंडळींना माहीत होता. तेव्हा हा आता "नाही म्हणतो तेव्हा खरोखरच लम करणार नाही असे वाटून सर्वांची अंत:करणे दु:खित ाली. याप्रमाणे सरासरी वर्ष गेले तरी हरिभाऊंचा निश्चय काही बदलत नाही असे पाहताच घरच्या मंडळींना फार काळजी वाटू लागली. वस्तुतः आपण सुधारको मताचे, तेव्हा आपण वास्तविक पुनर्विवाह केला पाहिजे. बरे, ते आपल्या हातून झाले नाही आणि आपण जुन्या पद्धतीप्रमाणेच लम केले तरी परातील जुन्या- नष्यातील सगल्यामुळे आपल्या पहिल्या बायकोस जसा त्रास झाला तसाच ६६ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. दुसन्या बायकोसही होणार, असा विचार मनात येऊनच यानी लन करावयाचे नाही असा निश्चय केला असावा. पण या वेळी एक विशेष गोष्ट घडून आली. त्याच्या वडिलांच्या मातु:श्री याच वेळी आजारी पडल्या. 'मी लम करीन' अशी कबुली तुझ्या तोंडून आल्याशिवाय मला मुखाने मरण येणार नाही' असें हरिभाऊंना जवळ बोलावून आजीने सांगितले. झालें, हरिभाऊंना पाझर फुटला आणि " बाळपणापासून ज्यांनी आपल्याला अत्यंत प्रेमाने वाढविले त्यांनी कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरून अग त्रागा करण्याची पाळी आणली तर आपण आपले मन आवरून त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याला प्रवृत्त होतो हे अंतगूढ प्रेमामुळेच होय " हे'मी' चे उद्गार त्यानी अन्वर्थक केले ! त्यांचे दोन स्नेही हरिभाऊ काय करतात याचीच वाट पहात बसले होते. हरिभाऊंनी अशा रीतीने मार्ग मोकळा करून दिल्यामुळे त्यांनीही पुनः यथाविधि गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला। सुधारकाचे पिल्लं. यासंबंधांत हे जरूर ध्यानात ठेले पाहिजे की, हरिभाऊंचे मत प्रथम पासूनच सुधारणा सावकाशीने झाली पाहिजे असे होते. “ कोणचीहि गोष्ट सावकाशी सावकाशीने जितकी होईल, तितकी एकदम दाडगाईने होणार नाही." (मी, प्र० ६० ) असें त्यांनी आपले मत स्पष्ट रीतीने प्रतिपादन केले आहे. त्यांचे दुसरे लग्न होण्यापूर्वीच पाच वर्षे त्यांनी गणपतराव कादंबरीत गोष्टी समाजास फार त्याज्य अशा वाटतात त्या बळजबरीने अमलात आणणे हे समाजाच्या हिताला अपायकारक आहे. त्या सावकाश व आपोआप प्रचारात आल्या म्हणजे फार हितावह होत." तरी पण स्वतःच्या वर्तनाचे हरिभाऊ केव्हा. ही समर्थन करीत नसत. याप्रसंगी थोडे धडाडीचे वर्तन आपल्या हातून होते तर फार चागले झाले असते, असेंच त्यांना वाटे. यावेळी सुधारकात प्रमुख गणले गेले नव्हते तरी त्याची बरीच प्रमिद्वी होती. श्रीधर विठ्ठल दाते हे तर त्याना " सुधारकाचे पिल्लू " म्हणत ! असो. याप्रमाणे त्याचा द्वितीय विवाह झाल्या. नंतर येथील एका धर्माभिमानी पत्रात त्याविरुद्ध टीका आलीच. हरिभाऊंचे श्वयुर रा. बळवंतराव चोळकर हे जुन्या मताचे व मोठे स्नानसंध्येशीळ असत. स्यांच्या पूजेला पाच तास लागत असत. हरिभाऊ सुधारक मताचे आहेत हैं त्यांना ठाऊक होते. पण ते यासंबंधाने बोलताना प्रो. पानसे यांजपार्टी ज्या ते परीक्षेची वेळ. म्हणाले होते की "आतां जुनै काय राहिले आहे आतां आगगाडीत सुद्धा माणसे फराळाचे खाऊं लागली!" धर्माभिमानी पत्रात एका बोलक्या सुधारकानी बागेत हळूच जाऊन लम केलें, आश्चर्य हे की, एका धर्मभोळ्या घ चार घटका नाक धरून बसणान्या गृहस्थाने आपली ११ वर्षांची मुलगी त्याला दिली. " भसा मजकूर प्रसिद्ध झाला होता. इकडे आड आणि तिकडे विहीर. हरिभाऊंच्या नवीन पत्नी रमाबाई या त्या वेळेच्या मानाने बन्याच शिकल्या होत्या. किंबहुना प्रो. पानसे यानी मुलीला चांगले लिहिता वाचता येते हे पाहूनच ती पसंत केली होती. लग्न झाल्यानंतर त्यानी रमाबाईना काही पुस्तके वाचाव- यास दिली होती. पुस्तके वाचून झाली नाहीत तर लम परत करूं, असाही त्याना धाक घातला होता! पाण हे असे किती दिवस चालणार ! जुन्या पद्धतीचा कित्ता एकाग्रतेने गिरविणा-या दहा माणसांच्या कुटुंबात जिला धाक दाखवावयाचा सर्वांनाच अधिकार, अशा नवीन मुलीस लिहिणे वाचणे कसे चालविता येणार ! हरिभाऊंची वस्तुतः आनंदाश्रमात रहाण्याची सोय होती, इतकेच नव्हे तर तेथेच त्यानी सहकुटुंब रहावे अशी महादेव चिमणाजीची योजनाही होती. पण इरिभाऊंच्या अनिश्ययामुळे म्हणा किंवा भिडस्तपणामुळे म्हणा, त्यांच्या हातून तें झाले नाही. यामळे "आम्हाला इकडे आड आणि तिकडे विहीर असे झाले आहे. घरच्या माणसाची बोलणी टाळायला जाव तर यांची मर्जी जाते, यांची संभा. ळावी तर त्यांची जाते " (मा प्र. ५२) असे रमावाहिनीस होऊन त्याना बराच त्रास सोसावा लागला असल्यास त्यात काही नवल नाही. विलक्षण भिडस्तपणा. हरिभाऊंनी याच वेळी आनंदाश्रमात ससार थाटला असता तर वडिलांचा त्याचेवर वाईटपणा आला असता. पण हरिभाऊ वागले त्या रीतीने तरी त्यांना वडिलाचा चांगुलपणा कोठे संपादता आला हरिभाऊ इतके जपून वागत होते तरी " तो कसा का वागेना ! आमच्या हातचा पार्थिव त्याने लाथेने उडवून दिला नाही म्हणजे मिळविली " असेंच त्याचे वडील म्हणत असत. यांत त्याचा दोषही नव्हता. ते एकधोरणी असल्यामुळे काही घेवाण देवाण करून तडजोड पाडणे त्यांच्या स्वभावाला अशक्य होते. हरिभाऊ गाह्याकारी कसेही वागले तरी त्यांची मते नानासाहेबांना पूर्ण माहीत होती. अशा स्थितीत नुसत्या वरकरणी वागणुकीने त्यांचे समाधान कसे व्हावें १ वडिलांच्या एकधोरणीपणाचेच अनुकरण करून हरिभाऊंनी आरंभापासूनच आपली वेगळी व्यवस्था ठेवली असती तर ते सर्व दृष्टीनी श्रेयस्कर झाले असते. पुढे काही वर्षानी तरी त्याना असें करावें लागलेच. असो. हरिभाऊंसारख्या जनमिळाऊ माणसाच्या हातून यापेक्षा वेगळे वर्तन झाले असते तरच आश्चर्य होते.
प्रकरण दहावें. आनंदाश्रम. करावा वास त्याला वस्तुसृष्टीतील अद्भुत! हरिभाऊंचे चुलते अण्णासाहेब यांनी आनंदाश्रमावर हरिभाऊंची स्थापना केल्याचे यापूर्वीच सागितले आहे. ही संस्था म्हणजे वस्तुस्थितीतील एक अद्भुत गोष्टच होय. या संस्थेचे स्थापक कै. वा. महादेव चिमणाजी आपटे याचा आयुष्यक्रम पहातां त्यांनी जुन्या पंथाचे वैदिक, शास्त्री, सन्यासी, वगैरेंकरिता व जुन्या संस्कृत ग्रथांच्या प्रकाशनार्थ एक संस्था काढण्यांत आपल्या सर्व द्रव्याचा विनियोग याबद्दल कोणासही आश्चर्यच वाटेल. भाड्यात जी वस्तु प्रथम ठेवावी तिचा लागतो असे जे म्हणतात ते पुष्कळ वेळा मोठ्या विचित्र रीतीने प्रत्ययास येते; त्यातीलच हे एक उदाहरण असावें. अण्णासाहेब प्रथम मुधारक म्हणून, विशेषतः पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते, म्हणून समाजापुढे आले. त्यांचा पुढील आयुष्यक्रमही जुन्या पंथाला कोणत्याही प्रकारचा पोषक असा नव्हता. त्यांनी आपला द्रव्यनिधि वस्तुतः एकाद्या आधुनिक तन्हेने चाललेल्या शिक्षणसंस्थेस किंवा एकाद्या सुधारणाप्रचारकसंस्थेस यावयास पाहिजे होता. पण नसें न करिता त्यांनी जुन्या पद्धतीप्रमाणेच तो वैदिक, शास्त्री, संन्यासी वगैरेंच्या सहाय्यार्थच बंचला. याचे कारण, जुन्या संस्कारांचा त्यांच्या प्रथम वयांत त्यांच्या मनावर उमटलेला ठसाच असावा असे वाटते. चतुर्थाश्रम घेण्याचा त्यांचा बेत पूर्वी- पाएनच ठरला होता. आनंदाश्रमाचा खर्च चालण्यास अवश्य असलेली रक्कम जमतांच चतुर्थाश्रम घेऊन आश्रमात रहावयाचे असा त्यांचा संकल्प झाला होता. संस्थेला यदाकदाचित अधिक पैशाची जरूरी पडली तर चतुर्थाश्रमातही पकिली करण्याचे त्यांनी ठरविले होते । खरोखरच ही त्यांची इच्छा मूर्तस्वरूपात आली असती तर वस्तुसृष्टीत एका अद्भुताचा प्र यक्ष प्रयोग घडलेला लोकांना वयास सापडला असता!
आनंदाश्रम. ७१ आपटेघराण्याचा अभिमान. या आश्रमाच्या दोन उपयुक्त शाखा म्हणजे विद्यार्थीगृह व ग्रंथप्रकाशन या होत. विद्यार्थीगृहांत कोंकणस्थांची गरीब व होतकरू मुले विद्याभ्यासाकरिता ठेवून त्यांचे पालनपोषण करावे, असा माधवरावजीचा संकल्प होता. त्याचप्रमाणे अप्रकाशित पण चांगल्या नामांकित संस्कृत ग्रंथांचे या आश्रमाच्या विद्यमाने प्रकाशन व्हावे असाही त्यांचा हेतु होता. आश्रमातील या दोन उपयुक्त शाखा हरिभाऊंनी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या पश्यात् पचवीस वर्षेपर्यंत चालविल्या व हल्लीही त्या तशाच चालू आहेत. आपल्या आपटे घराण्यातील मुलें मूर्ख निपजूं नयेत, असाही माधवरावजीचा विद्यार्थीगृह काढण्यात एक उद्देश होता. त्या उद्देशा- नुसार माधवरावजींच्या तिन्ही भावाचे मुलगे आनंदाश्रमांत विद्याभ्यासाकरिता राहून गेले. त्यातील कित्येकाचे थोडे थोडकें शिक्षणही झाले. पण अण्णासाहेबानी केलेल्या या सोयीचा फायदा घेऊन नावलौकिकास चढलेला असा अद्याप एकही मुलगा निघाला नाही ! हा विलक्षण योगायोगच म्हटला पाहिजे. हरिभाऊंना आनंदाश्रमासारखी संस्था मिळाल्यामुळे त्याना बरेचसे स्वास्थ्य त्यांच्या आयुष्यास निश्चितपणा येण्यास या संस्थेचे सहाय्य झाले. ग्रंथ- लेखनाच्या कामास स्वस्थपणाची व सुखसोयीची अनुकूलता लागते ती या आश्रमानें त्याना लाभून दिली. पण ही संस्था चालविणाराने जुन्या पद्धतीनेच राहिले पाहिजे, असा निर्बध असल्यामुळे हरिभाऊंना, स्वतःस संमत वाटणा-या प्रगमनशील गोष्टी आचरणांत आणण्याचा मार्ग कायमचाच बंद झाला. जी मते आपण प्रतिपादीत आलो त्याचे आचरण होण्याचे कामी अशा रीतीने आपण काय- मचा बंधारा घालून घेतला ही गोष्ट हरिभाऊंच्या मनास अर्थातच जाचक झाली असली पाहिजे. पण वडीलधान्या माणसाचे प्रेमपाश तोडून स्वमताभिमानास अनुरूप असे आचरण करण्यास प्रवृत्त होण्यासारखी धडाडी आणि नियहत्यांच्या अंगी नसल्यामुळे या जाचाचा प्रतिकार त्यांना करिता आला नाही. कर्तव्य की श्रद्धा! हरिभाऊंच्या सहवासाने आणि साहचर्याने ज्या : आश्रमाचे नांव अन्वर्थक झाले त्या आश्रमाची व्यवस्था पाहण्याचे काम हरिभाऊंनी पंचवीस वर्षे केलें. येथील निरनिराळ्या प्रकारचे विधि, व्रतवैकल्ये, उत्सव, कथाकर्तिन, वगैरे सर्वांची व्यवस्था हरिभाऊ अगदी यथासांग रीतीने करीत. या सर्व गोष्टी ते आले.
७२ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. अंगीकृत कर्तव्य म्हणून करीत किवा अंतःकरणपूर्वक श्रद्धेने करीत यासंबंधाने एकमत होणे अर्थातच शक्य नाही. ते कसेही असले तरी आपले ज्यांनी पितृवत् पालन केले त्या आपल्या चुलत्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी ही संस्था पंचवीस वर्षे निवैध रीतीने चालविली व ते त्यांच्या ऋणांतून मुक्त झाले. है त्यांनी कर्तव्य म्हणूनच केले हे पुढे एका प्रकरणांत डॉ. पॉल ज्युसेन यांचा जो उतारा दिला आहे त्यावरून लक्षात येईल. महादेव चिमणाजींचा दृष्टान्त. आनंदाश्रमाचे काम सोडून द्यावे असे हरिभाऊंच्या मनात वरचेवर विचार येत होते. पण तसे करणे हे काही सोपें काम नव्हते. त्यांच्यावर ती एक मोठी जबाबदारी होती. या संस्थेच्यामुळे आपल्या सामाजिक मताचा सर्वस्वी कोड मारा होतो असे त्यांना एकीकडून वाटे तर दुसरीकडून ज्यांनी आपले पुत्रवत् पालन केले त्यांनी आपल्या सुप्रन केलेली कामगिरी अर्धवर कशी टाकून द्यावी, अशी त्यांच्या मनांत वरचेवर धडपड चाले. कित्येक वेळा संस्थेचे काम सोडून देणेच श्रेयस्कर आहे, असाही त्याचा निश्चय झाल्यासारखा होई. अशाच एका प्रसंगी “ हे काम सोडूं नये " असा त्याना अण्णासाहेबांचा दृष्टान्त झाला. तेव्हापासून या बाबतीत त्यानी आपल्या मनाची चलबिचल होऊ दिली नाही. हरिभाऊंचा स्वप्नावर व दृष्टान्तावर विश्वास होता. अशा गोष्टीवर विश्वास बसणे न बसणे हे सर्वस्वी त्यांचा, जसा ज्याला अनुभव येईल त्यावर अवलंबून असते. स्वप्न आणि दृष्टान्त हे पुष्कळ वेळा भावी स्थितीचे पूर्व ज्ञान करून देण्याचे कामी साहाय्यभूत होतात असा आपल्या आयुष्यक्रमात हरिभाऊंना अनुभव आला असला पाहिजे. त्यामुळेच त्याचा अशा गोष्टीवर पुष्कळ वेळां विश्वास असल्याचे दिसून येत असे. पण लक्ष्यात कोण घेतो, मी, भयंकर दिव्य वगैरे त्याच्या कादंब-यात पुढील स्थितीचे ज्ञान करून देणारी स्वप्ने पडल्याचे जे कित्येक ठिकाणी निर्देश आहेत तेहि हरिभाऊचा अशा गोष्टीवर विश्वास अस- ल्याचेच द्योतक होत. ग्रंथप्रकाशन. आनंदाश्रमांत जुन्या नव्या पंथाचे यती, संन्यासी, शास्त्री वगैरे अनेक प्रकारचे लोक येत. पण हरिभाऊंच्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे साचे आदरातिथ्य यथास्थित हे ऊन कोणाचेही असमाधान होण्यास जागा रहात नसे.
आनंदाश्रम ७३ आनंदाश्रमात तैलंगणातील विद्वान् शाखी पाहन पुष्कळ वेळां येत, त्यांच्याशी हरिभाऊ संस्कृतात बोलत. हरिभाऊंचे संस्कृत चांगले असे, त्याचा त्याना अशा वेळी चांगला उपयोग होत असे. विशेषतः त्यांच्या या गुणाचा उपयोग आश्रमा. च्या ग्रंथप्रकाशनाच्या शाखेसंबंधांत उत्कृष्ट झाला. त्यांच्या पंचवीस वर्षाच्या अमदानीत ही शाखा चांगली रंगरूपाला आली. आनंदाश्रमाच्या विद्यमाने प्रकाशित झालेल्या ग्रंथापैकी " सर्वदर्शनसंग्रह " हा ग्रंथ हरिभाऊंनीच संपादिला होता. आणि त्यानी आपल्या आयुष्यक्रमात जर काही संपादन केले असेल तर ते सर्वदर्शनसंग्रह हेच होय. त्याच्या कादंबन्यांतही हाच संग्रह पाहून वाचकांचे मन चकित होऊन जातें। यात, संन्यासी यांच्या गमती. आश्रमात निरनिराळ्या ठिकाणचे यती, संन्यासी, उतरावयास येत. त्यांच्या एकेक गमतीदार गोष्टी हरिभाऊंस पहावयास सापडत. एकदा एक स्वामी दोन दिवस आश्रमात जेवले व पुढे जेवावयास बाहेर जाऊ लागले. आपण जेवावयास बाहेर का जाता १ असा त्याना प्रश्न केला. तेव्हा त्याना सागितले की, तुमच्या घरी गाय व्याली असल्यामुळे तुम्हाला सोयर आहे। काही स्वामी पैशास हात लावीत नसत. पैसा घ्यावयाचा असला की तो वस्त्रांत बाधून दिलेला घेत असत. कोणी एक स्वामी तोंडात बाण ठेवीत व तो पूजेच्या वेळेस काढून त्याची पूजा करीत ६ पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवीत ! एकदा एक स्वामी आले. त्यांनी पानातील पहिल्याच वाढीचा काला करून खाल्ला व पुन्हा काही एक घेतले नाही. तेव्हा हरिभाऊना फारच वाईट बाटले. स्वामी पी ही पद्धत आधी माहीत असती तर त्यांना चांगले चागले पदार्थ त्यानी प्रथमच वाढविले असते. या स्वामींनी काही पैसे घ्यावेत, छाट्या घ्याव्यात किंवा निदान काही संस्कृत ग्रंथ तरी घ्यावेत अशी हरिभाऊंची इच्छा होती. पण त्यांनी यापैकी कशाचाही स्वीकार केला नाही. आनंदाश्रमात येणान्या संन्याशामध्ये असे निर. पेक्ष व निस्पृह गृहस्थ फारच थोडे येत. हे स्वामी जे एकदा गेले त्यानंतर त्यांचे पुन्हा कधीहि दर्शन घडले नाही. एक स्वामी आले. त्याची एकेक बस्ताने फारच कठीण होती. आंघोळ केल्यानंतर शूद्राचे तोंड पहावयाचे नाही, जेवण अंधागत जेवावयाचे, व जेव- .
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. तांना एकेक घास लोकांनी त्यांच्या हातात दिला पाहिजे ! असे त्यांचे विचित्र नियम असत. आनंदाश्रमातून या स्वामीना एक दिवसांतच गाशा गुंडाळून निघून जावे लागले. एकदा एक पाहुणे आले ते दागदाण पाय आपटीत मालकाचा शोध करूं लागले. त्याबरोबर हरिभाऊंनी पुढे होऊन त्याची विचारपूस केली. तेव्हा ते गृहस्थ, आपल्याला काय पाहिजे, काय नाही गबद्दल हुकूम करण्याच्या आवा. जानें गुरकावू लागले. मनुष्यस्वभावाचे निरीक्षण करण्यात पटाईत असलेल्या हरिभाऊसही त्यांच्या या वृत्तीचे कारण समजेना. या मनुष्याचे डोके वगैरे फिरले असेल अशी समजूत होऊन हरिभाऊंनी त्याची सर्व व्यवस्था नीट रीतीने ठेविली. शेवटी ' आनंदाश्रम ' नावाची पुण्यात एक खानावळ आहे, त्या खाणा- वळीत आपण आहोत असे हा गृहस्थ समजत असल्याचें हरिभाऊंच्या लक्षात आलें। माणसांची रहदारी. आनंदाश्रमात हरिभाऊंकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खो दिल्यासारखी एकामागून एक माणसे येत. पण हरिभाऊंना माणसांचे वेड इतके होते की, स्वतांची कितीहि गैरसोय झाली तरी ते कोणास कधीहि दुखवीत नसत. जो भेटावयास येई त्याच्याशी शातपणाने बोलून ते त्याचा परामर्ष घेत. कोणाच्या अंतरींची कोणतीहि व्यथा असो, ती हरिभाऊंपाशी निवेदन करण्याकरिता यावयाचे असा पुढे पुढे तर कित्येक लोकांचा अगदर्दी क्रमच ठरल्यासारखा असे. हरिभाऊ मात्र आपली व्यथा कोणापाशीहि कधी सांगावयाचे नाहीत. प्रत्ये. काच्या मागे त्याची स्वतःची भगभग आहेच. आपण आणखी त्यात भर कशाला घाला, असे ते नेहमी म्हणत. त्यांच्या वेळेवर मात्र कोणीहि स्वामित्व गाजवावें असा त्यांच्या आंमी विलक्षण भिडस्तपणा होता. नाटपेड भानगडी. हरिभाऊंच्या मागे हा नुसता माणसांच्या रहदारीचा ससेमिरा असे असे नसून इतरही अनेक नाटपेड भानगडी असत. पुण्यात कोणतीहि संस्था निघो, इरिभाऊ पत्रातील श्रीकाराप्रमाणे त्या संस्थेचे एक सभासद असावयाचेच; एखाया संस्थेचे सेक्रेटरी, दुसन्या संस्थेचे अध्यक्ष, तिसरीचे उपाध्यक्ष, चवीचे आनंदाश्रम. नियामक अशाप्रमाणे प्रमुख स्थानावर नेमून घेण्याची मनुष्यास एकदा संवय होत गेली म्हणजे त्या चक्रांत तो कायमचाच अडकला जातो. इतक्या संस्थांचे काम एकाच्या हातून होणे अर्थातच अशक्य असते, यामुळे पुष्कळ संस्थांची पुरस्कर्ती व प्रमुख म्हणून जी माणसें गणली जातात त्यांची प्रसिद्धी व हातून प्रत्यक्ष होणारे काम हे बहुधा व्यस्त प्रमाणातच असते. कोठल्याही संस्था घ्या, त्या सर्वात शहरांतील प्रमुख व पुढे पुढे असणाऱ्या दहा पाच माणसांपैकी आलटून पालटून एक दोन किंवा तीन असे सभासद असावयाचेच. यापेक्षा एका माणसाने दोन तीन संस्थापेक्षा अधिक संस्थांचे सभासद व्हावयाचें नाही असा मभासद होणागनी किंवा त्याना सभासद कर- णारानी निबंध ठेविल्यास तो खरोखरच उभयपक्षीहि हितावह होईल. शेंकडों संस्थाशी मनुष्याने संबंध ठेवला तरी अखेर एक दोन संस्थाच फार तर त्यास आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठविणे शक्य असते. हरिभाऊंचेच उदाहरण पाहिले तर अनेक संस्थांशी कोणत्याना कोणत्या स्वरूपात त्याचा संबंध असला तरी त्यांच्या नावाचे साहचर्य ज्या संस्थेशी जोडले जाईल अशी फक्त एकच संस्था निघेल. आणि ती नूतन मराठी विद्यालय हीच होय, अनेक संस्थांत धावाधाव करण्यापेक्षा एक दोन संस्थातच स्थिरतेने व एकतानतेने काम करणे परिणामी अधिक श्रेयस्कर ठरते. हे तख समाजांत प्रमुख गणलेल्या व्यक्तींनी लक्षात ठेवल्यास त्यापासून सर्वस्वी हितच होईल.
प्रकरण अकरावें. आणखी दोन संस्था. नूतन मराठी विद्यालय. आनंदाश्रमाप्रमाणेच हरिभाऊंचा सुमारे ३०-३५ वर्षे संबंध होता अशा दुसन्या एका संस्थेचा येथे निर्देश करणे अवश्य आहे. किंबहुना तो निर्देश करण्याचे चुकल्यास, हरिभाऊंनी आपल्या आयुष्यक्रमात केलेला एक अत्यंत महत्त्वाचा कार्यभाग नमूद न केल्यासारखे होईल. ती संस्था म्हणजे नूतन मराठी विद्यालय ही होय. शास्त्रीबुवानी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये लाइफ मेयर म्हणून काम करण्याची हरिभाऊंची फार इच्छा होती. पण ते पदवीधर नसल्यामुळे व पदवीधराशिवाय कोणासही लाइफ मेंबर घ्यावयाचे नाही, असा सोसायटीचा निबंध असल्यामुळे त्याची ही इच्छा सफळ होणे शक्य झाले नाही. तरी पण स्वस्थ न बसतां त्यानी भापली ही मनीषा शेवटास नेण्याची दुसरीच एक संधि साधली. सन १८८३ साली शास्त्रीबुवाचे स्मारक म्हणून एक शाळा येथे सुरू करण्याचा बूट निघाला. या कार्यास ट्रेनिंग कॉलेजमधून पास झालेले २।३ गृहस्थ तयार झाले. गेल्या ता. 17 फेब्रुवारी रोजी परलोकवासी झालेले रा. रुष्णाजी बल्लाळ डोंगरे हे यापैकीच होत. या शाळेचा अचलपासून अखेरपर्यंत इतिहास माहीत असलेले शाळेतल्या शिक्षकांकी, हे एकच गृहस्थ होते. यांना संस्था स्थापन करण्याच्यावेळी हरिभाऊंच्यार सल्लामसलतीचा विशेष फायदा झाला. या संस्थेशी हरिभाऊंचा, एक आस्थेवाईक प्रमुख कार्यकर्ते म्हणून, अन्याहत संबंध होता. हरिभाऊंचा उत्साह, कर्तृत्वशक्ति व शिक्षणलालसा ह्या तिन्ही गुणाचा जर कोठें विशेष उपयोग झाला असेल तर तो या संस्थेसंबंधांतच होय. डी. ई. सोसायटीने त्यांना लाईफ मेंबर म्हणून घेतले असते तर त्याना फार तर प्रो. आपटे म्हणून प्रसिद्धी मिळविता आली असती. पण या संस्थेशी त्यांचा अगदी आरंभापासून संबंध जडल्यामुळे त्यांना एक वेगळी संस्था निर्माण आणखी दोन संस्था. ७७ करण्यात प्रमुखपणा घेता आला. अगदी तान्यापंतोजी शाळेपासून पूर्ण कॉलेज- पर्यंत चढत गेल्याचे या संस्थेसारखें इलाख्यातील शिक्षणाच्या इतिहासात . दुसरे उदाहरण सांपडणार नाही. ही संस्था हरिभाऊंच्या वैचित्र्यमय आयुष्यांतील खरोखरच एक संस्मरणीय गोष्ट होय. संस्थेचा विकास. ही संस्था प्रथम मोरोबादादांच्या वाड्यात सुरू झाली. एक दोन वर्षांतच या शाळेस इंग्रजी तीन इयत्ताचे वर्ग जोडण्यात आले. सन १८९० साल इंग्रजी ५ इयत्तापर्यंत मजल गेली आणि १८९५ साली या शाळेचें हायस्कूल झाले. यानंतर वीस वर्षांनी कॉलेजचे पहिले दोन वर्ग निघाले व चार वर्षांत हे फर्स्ट ग्रेड कालेज झाले. नुतन मराठी शाळेच्या अंकुरातून न्यू पूना कॉलेजचा वृक्ष तयार झाला, त्याचे श्रेय या शाळेच्या स्वार्थत्यागी चालका- प्रमाणेच हरिभाऊंनाही देणे जरूर आहे. शिक्षकाचे काम. . शाळेला इंग्रजी वर्ग जोडण्यात आले तेव्हापासूनच हरिभाऊ आठवड्यातून काही तास शाळेत शिकवू लागले. हा त्यांचा क्रम पुढे १०।१२ वर्षे चालच होता. शिकविण्याबद्दल त्यानी वेतन वगैरे काही घेतले नाही हे सागावयास नकोच. हरिभाऊंच्या शिकवण्यावर विद्यार्थ्यांचे साहजीकच प्रेम असे. एक दोन वर्षे तर त्यानी सायन्स हा विषय सातव्या इयत्तेस शिकविला,तेव्हा तो विशेष मनोरंजक केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांकडून वहावा मिळविली. हरिभाऊंना इतर पुष्कळ व्याप असत, पण या संस्थेच्या कामास ते नेहमी अग्रस्थान देत. या संस्थेसंबंधानें पूर्वक्यात आपण ठरविलेले मनोरथ आपल्या हयातीत पाहून त्यांना परमावधीचा आनंद होत असे । मुलांना उपदेश. शाळेतील मुलांकरिता दरसाल एक उपदेशात्मक व्याख्यान द्यावयाचे हा त्यांचा क्रम कमीत कमी २० वर्षे चालला होता. संस्थेच्या उत्कर्षाकरिता जे जे म्हणून करणे जरूर असे ते ते मोठया औत्सुक्याने व तत्परतेने ते करीत. कॉलेज निघाल्यानंतर त्याच्या लायबरीकरिता त्यांनी आपला सुमारे पाच हजार रुपये किंमतीचा पुस्तकसंग्रह त्यास बक्षीस दिला. अशा रीतीने शिक्षणसंस्था सिद्धीला गेलेले ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. व लेखनव्यवसाय या दोन्ही मार्गानी हरिभाऊंनी तरुण पिढीस उपरुत केले आहे. ऑनररी पदव्या. हरिभाऊंना युनिव्हर्सिटीची पदवी संपादन करता आली माही, पण युनिव्ह: र्सिटीच्या परीक्षांना ते परीक्षक झाले. सीनेटच्या फेलोच्या जागी त्याची योजना झाली. उच्च शिक्षणातील परीक्षाना विद्यार्थी पाठविणारी एक संस्थाही त्यांच्या प्रमुखत्वाने अगदी अल्पारंभामधून विकास पावली. त्यांनी लिहिलेले कित्येक यंथही उच्च परीक्षांच्या अभ्यासाकरिता नेमण्यात आले. त्यांना याहून अधिक पदवी ती कोणती मिळावयाची राहिली होती ! अशा गृहस्थांना युनिव्हर्सिटीकडून त्यांच्या गुणानुरूप ऑनररी पदव्या देणे किती अवश्य आहे हे हरिभाऊंच्या उदाहरणावरून विशेष रीतीने लक्षात येते. अशा पदव्या दिल्याने त्या घेणाराचा मोठेपणा वाढतो अशातला भाग नसून त्यांवरून युनिव्हर्सिटीस खरी गुणग्राहकता आहे हे मात्र सिद्ध होईल. पुणे शहर म्युनिसिपालिटी. हरिभाऊंच्या आयुष्यक्रमाशी सलम असलेली तिसरी संस्था म्हटली म्हणजे पुणे शहर म्युनिसिपालिटी ही होय. हरिभाऊ म्युनिसिपालिटीचे सुमारे२०वर्षे सभासद होते व तीन वर्षे अध्यक्ष होते. हरिभाऊंची शांतवृत्ति व मनमिळाऊ स्वभाव असल्या- मुळे म्युनिसिपालिटींतही त्यांना काही माणसांचा आत्मपरिवार करिता आला. ते म्युनिसिपालिटीत होते तोपर्यंत त्यांची अशी एक स्वतंत्र संघटना होती आणि स्या संघटनेच्या सामर्थ्यावर त्यांना बरीच महत्त्वाची कामें करितां आली. कित्येक वर्षे तर हरिभाऊ म्हणने पुण्याची म्युनिसिपालिटी अशीच स्थिति झाली होती. अबकारी कमिटी. पुणे जिल्ह्याकरिता प्रथम अबकारी कमिटी नेमली तेव्हा ते म्युनिसि- पालिटीतर्फे तीत सभासद असून लोकपक्षाची बाज़ कमिटीपुढे माडण्याचे काम त्यानी अनेक वेळा चांगल्या तम्हने केलेले आहे. त्या वेळी त्यांच्या खटपटीने काहीं गुत्ते बंद होणे, काहींचे स्थलांतर होणे, गुत्ते उघडे राहण्याची वेळ कमी होणे अशा कित्येक श्रेयस्कर सुधारणाही झाल्या आहेत. म्युनिसिपालिटीच्या स्कूल बाडेचे चेअरमन असता त्यांनी पुणे येथील अजबखान्यांत शिक्षण या विषयावर शिक्षकांपुढे व्याख्याने दिली, ती फारच महत्त्वाची व अध्यापनाचे काम करणारांना अत्यंत उपयक्त अशी होती.
आणखी दोन संस्था. ७९ म्युनिसिपालिटीसारख्या बारभाईचे संस्थेत एका व्यक्तीला आपल्या कामाचा शेष ठसा उमटविणे अर्थात् कठीण असते. तरी पण म्युनिसिपालिटीत विशेष कळकळीने काम केल्याबद्दल ज्या गृहस्थांची प्रशंसा होईल त्यांत हरिभाऊंची गणना झाल्याशिवाय राहणार नाही. म्युनिसिपालिटीत शिरले नसते तर ! म्युनिसिपालिटीत हरिभाऊ शिरले नसते तर फार बरे झाले असते, असे यांच्या कित्येक मित्रांचे म्हणणे आहे. म्युनिसिपालिटीसंबंधांत त्यांचा बराच वेळ वाया गेला ही गोष्ट खोटी नाही. आणि इतका वेळ त्यांना आपल्या लेखन. यवसायाला देता आला असता तर महाराष्ट्रमंदिराची शोभा अधिकच वाढली असतीही निर्विवाद आहे. प्रत्यक्ष हरिभाऊंनाही आपण म्युनिसिपालिटीच्या गमगीत शिरलों हे फार वाईट केलें असें कित्येक वेळा वाटत होते. अमुक झाले असते म्हणजे तमुक घडले असते, किंवा अमुक झाले नसत हणजे तमुक टळले असते हा काथ्याकूट केव्हाही निरर्थकच असतो आणि यातलाच हाही आहे. एक तासांत पांच पाने लिहिली म्हणजे वीस नासात शंभर पाने होतील लेखनव्यवसायासंबंधांत तंतोतत राशिकाने शेिव करणे केव्हाही शहाणपणाचे होणार नाही. जमिनीला पांच रुपयांचे खत घातले म्हणजे दहा रुपयाचे पीक येते, येवब्यावरून ५०० इपयाचे खत घातले म्हणजे १००० रुपयांचे पीक येईल असा अंदाज धरून जमिनीतून पकि काढणारा जसा पश्यात्तापात पडेल, त्याप्रमाणेच दर दिवसास लेखनाची एक दोन तास सरासरी पाल्यावर इरिभाऊंनी जर अठरा कादं. बन्या केल्या तर सबंध दिवस त्यांना याच उयोगाला मिळाला असता तर त्यांचे हातून बारा पट काम झाले असते असे म्हणणे हेही वेडेपणाचे होईल । झाले हे काम पुष्कळ झालें. हरिभाऊंच्या हातून झाले हे काम काही थोडे झाले नाही. सहा सामाजिक व सात ऐतिहासिक अशा एकंदर तेरा पूर्ण कादंब-या त्यांनी लिहिल्या व तीन सामाजिक व दोन ऐतिहासिक अशा ५ कादंबऱ्या अपूर्ण लिहिल्या. याशिवाय पांच सहा नाटके, दहावीस उत्कृष्ट निबंध व शें दोनशें स्फुट गोष्टी इतकी ग्रंथ. रचना त्यांनी केली. वस्तुतः एका माणसाचे हयातीत येवठी ग्रंथोत्पत्ति झाली असा - ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. वयाच्या ती काही कमी नाही. म्युनिसिपालिटीत गेल्यानंतरच्या चवदा वर्षात हरि भाऊंनी दहा कादंब-या लिहिल्या. १९१३ नंतर मात्र त्यांचा व्यवसाय खुटल्या सारखाच झाला. आणि त्याचे कारण त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या कन्येचा अत्यंत शोकजनक मृत्यु होय. हरिभाऊ हरिभाऊ आपल्या ५६ व्या वर्षी निवर्तले. तरी पण त्यांच्या आयुष्यातील शेवटची ६ वर्षे ग्रंथोत्पत्तसिंबंधांत प्रायः व्यर्थच गेली. त्यांच्या हातून खरा लेखन. व्यवसाय १८९० पासून १९१३ पर्यंत म्हणजे तेवीस वर्षेच झाला. यांत पहिल्या पंचविशीतला व्यवसाय अर्थातच धरलेला नाही. कारण मागील एक। प्रकरणांत त्यासंबंधाने सविस्तर माहिती दिली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करिता हरिभाऊंच्या हातून अधिक ग्रंथोत्पत्ति झाली नाही याबद्दल निष्कारण दुःख करीत न बसता पन्नास वर्षांच्या हयातीत कोणाही विख्यात ग्रंथकारात भूषणीभूत होईल इंतकी ग्रंथरचना त्यांच्या हातून झाली यायद्दल आनंद मानणेच अधिक सयुक्तिक होईल, असे वाटते. आनंदाश्रम, नूतन मगठी विद्यालय, व म्युनिसिपालिटी यांशिवायही त्याचा अनेक संस्थाशी थोडा फार संबंध असे. पुणे येथील सेंट जॉन अंब्युलन्स कमिटीचे ते सभासद होते त्याचप्रमाणे फीमेल हायस्कूलच्या कौन्सिलचेही ते सभासद होते. डेकन सभा, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी, भाढारकर इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशीही त्याचा अत्यंत निकट संबंध होता. सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे धर्मादाय देणग्या संबंधाने विचार करण्याकरिता जी परिषद भरली होती तीत मुंबई इलाख्यातर्फे ते सभासद होते. पंचवीस वर्षांपूर्वी प्लेगच्या कहरांत पुणे शहरी त्यांनी केलेली कामगिरी सुप्रसिद्धच आहे. स. १९१८ मधील इन्फ्ल्यूएंज्ञा च्या साथीत इन्फ्ल्युएंझा हॉस्पिटल निघाले ते त्याच्या प्रमुखत्वानेच होय. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पुण्यात नाव घेण्यासारखी अशी संस्था किवा चळवळ सांपडणे कठीण पडेल की तिच्याशी हरिभाऊंश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष -रीतीने संबंध नव्हता. पुण्यातच काय पण सबंध महाराष्ट्रात असा बहुविध आयुण्यक्रम कचितच सापडेल.
प्रकरण बारावें. आवडत्या कन्येचा वियोग. RE- मुलांवरील प्रेम. हरि माऊंना लहान मुलांची फार आवड होती. त्यांचा दिवसांतील काही काळ मुलाच्या संगतीत गेला नाही असे कचितच घडले असेल.दिसण्यांत तरतरित आणि बाळसेदार असें कोणाही मूल घेऊन खेळवावेसे वाटते. असें मूल मनुष्य साह- जिकच उचलून घेतो. पण हरिभाऊंची मुलांच्या कामात अशी आवडनिवड नसे. मुल मग ते कसलेही असो, त्यांना प्रिय असावयाचें. अगदी जरत्करू झालेलें, अंगाला सुरकुत्या पडलेल्या, स्वताच्या आयुष्यास जणूं काय कंटाळलेंच आहे असा आंबट चेहरा केलेलें, सदा किरकिर करणारे असें, 'पण लक्ष्यात कोण घेतो? मधील दुर्गीच्या मुलाप्रमाणेही एखादें मूल असले तरी हरिभाऊ त्याला प्रेमाने कडेवर घेत. त्यांचे बालवात्सल्य पाहून भोवतालच्या माणसांना खरोखरच मोठे आश्चर्य वाटे । हरिभाऊ कोणाच्या घरात गेले की, आधी त्यांची दृष्टि तेथील चिल्यापिल्याकडे किंवा बाळगोपाळांकडे जावयाची ! मुलांना त्यांच्या या प्रेमाची मनोमय साक्ष पटूनच की क.य, जी मुले आपल्या आईबापांशिवाय किंवा सहवा- सातील माणसांशिवाय इतरांचे वारेही लागू द्यावयाची नाहीत ती मुलें हरिभाऊ. कडे आनंदाने जात. तशातूनही एखादे मूल त्यांच्याकडे जाण्यास नाराज दिसले की, त्यांचे मन खरोखरच खट्ट होत असे. मुलांच्या निष्कपट सहवासात त्यांना जितका रम्यपणा वाटे तितका तो इतर बाबतीत कचितच वाटत असे. हरिभाऊ ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणची मुलें ते येण्याची वाटच पहात बसलेली असावयाची. मुलांचे मनोगत, त्यांची भाषा, त्यांच्या हालचाली वगैरेंचे हरिभाऊ फारच कौतुकानें निरीक्षण करीत, म्हणूनच मुलेही त्यांच्याशी इतका लागठपणा करीत असावी. ६ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. हरिभाऊंचे बालस्नेही. हरिभाऊंचा आवाज ऐकला की, घांतील मुळे त्यांच्या भोवती जमलीच म्हणून समजावे. मुलाची त्याची एकदां गांठ पडली की, ते त्यांच्याशी संभाषण करण्यात गर्क होम्न जावयाचे । मुलांशी काय बोलत बसता, असे जवळच्या कोणी माणसानी विचारले की, “ मुलाशी लाडवाळपणाने बोलण्यात काय गम्मत आहे हे तुम्हाला काय माहिनी ! " असें हरिभाऊ म्हणत. मुलांचे मनोधर्म, सभोवारच्या सृशमंबंधाने त्याच्या कल्पना, पाहिले तसे करावे आणि ऐकले तसे बोलावे ही त्याची वृत्ति, बहीणभावंडाचे एकमेकावरील प्रेम, वडील माणसाच्या वागणुकीचा व बोलण्याचालण्याचा मुलांच्यावर होणारा परिणाम वगैरेचे त्यांनी आपल्या कादंब-यातून जे मनोहर वर्णन दिले आहे त्याची सिद्धता, मुलाशी वात्सल्यपूर्वक सम्वास करूनच, ते नेहमी करीत असावेत असे वाटते. हरिभाऊंनी या आपल्या वृत्तीने कित्येक बालस्नेही केले होते. फिरून येताना यातले कोणी भेटले की त्यास ते घरीही आणावयाचे व त्याच्याशी घटका दोन घटका बोलून, त्यास काही फराळाचे देऊन परत पाठवावयाचे. एखादे वेळी लहर लागली की, एखाद्या मुलावर लहानशी कविता करून ती त्यालाच वाचावयाला द्यावयाचे व कविता वाचन तो हंसू लागला की आपण स्वनाही त्याच्या डे प्रसन्न मुद्रेनें पहात बसावयाचे ! मुलाना चित्रे किवा पुस्तकें बक्षिस देण्याचाही त्यांची पद्धत असे. लहर लागली तर एखाद्या मुलाला “कायरे, आम्हाला जेवायला कधी बोलावणार ? " असाही प्रश्न करावयाचे आणि त्याने बोलावले तर खरोखरच जेवून यावयाचें ! घरच्या मंडळीनी त्याचे स्वागत केले तर त्यांना म्हणावयाचे की माज आम्ही तुमचे पाहुणे नाही, आम्ही मुलाचे पाहुणे आहों ! पुष्कळ वेळा असा ते गमतीत काळ घालवावयचे. कोणाच्या येथे उतरायला गेले आणि तेथील मुलाना खाऊ द्यावयाचा असला तर हरिभाऊ सहसा रोख पैसे केव्हाही द्यावयाचे नाहीत. चित्र, पुस्तकें, फळफळावळ किंवा असेच काही तरी जिन्नस विकत घेऊन यावयाचे. गेख पैसे दिले की, ते वडील माणसाच्या हाती जाऊन खर्च होतात, व मुलें कोरडी ती कोरडाच राहतात याकरितांच ते असा मार्ग स्वीकारीत. मुलींवर अधिक प्रेम. मुलांन्यापेक्षा त्यांचे मुलीवर अधिक प्रेम असे. आपल्या स्नेह्यांच्या मुलींना ते कित्येक वेळा बरोबर हिंडावयासही घेऊन जात. एखादी हुषार मुलगी - आवडत्या कन्येचा वियोग. ८१ दिसली की " ही मुलगी आम्हाला या " असे तिच्या आईचापाजवळ म्हणत. मापी पुस्तके मुलीना वाचावयास देऊन त्यांतला सारांश त्याना विचारीत. मुलीने सारांश चांगला सांगितला म्हणजे त्याना अतिशय कौतुक वाटे. या त्याच्या प्रेमळपणामुळे त्याच्या कित्येक मित्रकन्या त्याच्याशी फारच लडिवाळ- पणाने वागत आणि यापासून हरिभाऊंना जो आनंद होई तो दुसन्या कशानेही होत नसे! ते सहज वाटेने गेले तरी . काय हरिभाऊ कसे काय आहे ?" असा कित्येक मुले त्याना प्रश्न करीत व हरिभाऊही त्यास स्मित करून उत्तर देन । साराश, हरिमाऊ हे मुलाचे अत्यंत जिवलग स्नेही असत. माझ्या बहिणीची मुलगी आहे. त्याच्या या यालवात्सल्याच्या किती तरी गोष्टी सागता यतील. एकदात्याच्या येथे एक स्वयपाकाची बाई होती. तिची पाच सात वर्षांची मुलगी हरिभाऊंच्या नेहमी जवळ जवळ असे. जेवायलासुद्धा त्याच्याजवळ बसे. संध्याकाळी माडीवर मंडळी जमली की ही मुलगी हरिभाऊंच्या जवळ जाऊन बसावयाची. कोणी खाली जा म्हटले तरी ती काही तेथुन हालावयाची नाही! तेव्हा मडळी- पैकी एका वृद्ध गृहस्थानी हरिभाऊंना विचारले, “ ही आपल्या पहिल्या कटवाची मुलगी वाटते ! " तेव्हा हरिभाऊ म्हणाले, कुटुंबाची नाही, ही आमच्या एका बहिणीची मुलगीआहे !" हरिभाऊचे हे विश्वभगिनी व खरोखरच प्रशसनीय च होते. त्यांच्याकरिता बंधुप्रेमाने हळहळणा-या अशा किती तरी भगिनी दाख- विता येतील। आपल्याला धार्जिणे नाही. हरिभाऊंचें बालकप्रेम असे विलक्षण होते तरी त्याना स्वतःला पुष्कळ दिवस अपत्य नव्हते. त्याच्या प्रथम पत्नीस तीन मुले झाली. पण त्यांपैको एकही जगले नाही. त्याची पहिली बायको बाळंतपणातच मेली, यामुळे आप- ल्याला मूल न होईल तरच यरे, कारण बायकाना बाळंतपणाचा हा मोठा धोका असतो, आणि त्यातून भापल्याला ता हे मुळीच धार्जिणे नाही असे त्याना वाटत असे. हरिभाऊ साधारणतः मोठे धीराचे असत, कोणताही प्रसंग आला तर ते साधारण डगमगावयाचे नाहीत. पण एखाया गोष्टीचा त्याना एकदा धसका बसला की तो कायमचाच रहात असे, पहिल्या बायकोचा त्यांनी फोटो काढून मोठी तसयोर तयार करविली आणि ती थोडक्याच दिवसानी ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. . वारली. फोटो आपल्याला धार्जिणा नाही असें में तेव्हापासून त्यांच्या मनाने एकदा घेतले ते काही अखेरपर्यंत सुटले नाही. त्यानंतर फोटोला बतावयाचे म्हणजे त्यांच्या अगदी जिवावर येई ! मुलीचा जन्म. हरिभाऊंचा द्वितीय विवाह झाल्यानंतर दहा वर्षांनी त्यांना मुलगी झाली. तेव्हापासूनच त्यांना काळजी वाटू लागली. आपल्याला अपत्य लाभत नाही, त्यात काही तरी संकटे येतात असें त्याना एकसारखे वाटे. माणि मित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात त्याप्रमाणे त्याग ही मुलगी झाली तोच त्याच्या कुटबाची नब्बेत बिघडली! इतकी की, ती विकोपाला जाऊन काही मलते सलतें होतें की काय, अशीही काळजी वाटुं लागली. सुदैवानं तसे काही न होतां रमावहिनी त्यातून निभावल्या. पण आईच्या प्रसनीचा मुलीच्या प्रकृतीवर मात्र अनिष्ट परिणाम झाला ! हा पाहिलात का पेशंट ! मुलीची पहिली दोन तीन वर्षे तर आजारांतच गेली. हरिभाऊंसारखा उपाय करणारा नसता तर ती मुलगी या आजारातच जावयाची. पण तिच्या दुस- ण्याशी झगडण्याचाच तिच्या आईबापांनी निश्चय केल्यामुळे ती आणखी काही वर्षे जगली. मुलीला भगेंद्रासारखा रोग झालेला होता. त्यावर दोनदा ऑपरेशन केले, तरी जखम भरून येईना. तेव्हां कर्नल बर्क-त्या वेळचे सिव्हिल सर्जन- यानी सागितले की, ही मुलगी फार दिवस जगणार नाही. जगलीच तर लंगडी- लुळी होईल, व मेदूवर परिणाम होऊन वेडी होईल! पण तिची जखम अखेर घरच्याच टाणाटोणा औषधाने बरी होऊन ती या दुखण्यांतून पार पडली. पुढे काही दिवसांनी एका पार्टीचे वेळी हरिभाऊंची व कर्नल बकं यांची गांठ पडली. मुलगी हरिभाऊंच्या बरोबरच होती. तिला दाखवून हरिभाऊ कर्नल यर्क यांना म्हणाले, " हा पाहिला का तुमचा पेशंट ! " आपली सर्व भविण्ये सोटी ठरविणारा हा पेशंट पाहून कर्नल वर्क अर्थातच आश्वयंचकित झाले. एकदम चालू लागली! मुलगी दुखण्यातून उठली हे पाहून तिच्या आईबापांना अर्थातच आनंद झाला. तिला संभाळण्याकरितां नागूबाई नावाची एक बाई ठेवली होती. या बाईने ताईची फारच चांगली सेवा केली. त्या बाईला हरिमाऊ सहज म्हणाले, आवडत्या कन्येचा वियोय. नागूबाई, तुम्ही ताईला चालवायला शिकवा, म्हणजे तुम्हांला एक मोठे लुगडे देईन. " या वेळी नागूबाई मुलीचा हात धस्न हळूहळू घालत होती. हरिभाऊचे हे शब्द ऐकताच ती मुलीला म्हणाली, " चालूं लाग बाई लवकर, मला लुगडे मिळावयाचे आहे. " असे म्हणून नागूबाईने तिचा हात एकदम सोडून दिला आणि ताई खरोखरच चालू लागली! आणि नागूनाईना लुगडे मिळाले ! पुढे आई यापांना शोकसागरांत लोटून जावयाचे होते म्हणूनच की काय ताईने आपल्या अल्पवयातच चकित करून सोडण्यासारखे असे अनेक चमत्कार केले. ! मुलीचा सुस्वभाव. ताई (शाताबाई) रूपाने सामान्यच होती. पण तिचे नाकडोळे मोठे तरतरीत होते. तिचा वर्ण काळा होता, पण अंतःकरण पाढरे शुभ्र होते. ती मोठी मोकळ्या मनाची व जगन्मित्र असे. हरिभाऊंकडे कोणीही आले तरी त्यांच्याशी इचें पांच मिनिटात जमावयाचें ! तिची तोंडाची टकळी एकसारखी चालू असे. कर्मयोगात चंद्रशेखराची बहिण चंद्री इचा जो स्वभाव वर्णन केला आहे तो ताईला तंतोतंत लागू पडतो! किंबहुना आपल्या मुलीचेंच चरित्र चंद्रीच्या मिषाने हरिभाऊंनी लिहिले असावे अशी ते वर्णन वाचन खात्री झाल्या- शिवाय रहात नाही. लिहिण्यांत सव्यसाची ! ताई फार हुषार होती. तिच्यात बापाची अस्थिरता असल्यामुळे प्रथम तिचे लिहिण्यावाचण्याकडे चित्त नसे. पण पुढे तिला लिहिण्यावाचण्याचा इतका नाद लागला की, इसापनीतीसारखें पुस्तक ती तासचे तास घडाघडा वाचीत बसे. ती अक्षर तर इतके वळणदार काढू लागली की, हरिभाऊंकडे येणा-या जाणा-या गृहस्थांचा तो कौतुकाचा विषय होऊन राहिला ! आणि त्यातही मुलीची गंमत अशी होती की, ती उजव्या व डाव्या दोनही मतांनी सारखेच वळणदार अक्षर काढी! अंतःकरणाची सदयता. ताई अंतःकरणानेही फार दयाळू असे. पहारेवाल्याने भिक्षेकन्यांस " कांही मिळत नाही म्हटले की, ही त्याला "घरातून आणते, उभा रहा, जाऊ नकोस." असें म्हणून खरोखरच मिक्षा घाली व " आई त्याला जेवायला नको का ग, ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. आपण मिक्षा वाढली नाही तर त्याला जेवायला कसे मिळेल !" असें म्हणे. मुलें म्हणजे फोनोमाफासारखी असतात असें चंद्रीला अनुलक्षून हरिभाऊंनी जे वर्णन केले आहे ते ताईला बरोबर लागू पडत होते. देखत बोलण्याची सोय नाही. मोठी माणसे घरात अनेक गोष्टी बोलतात. शेजारी मुलें असली तरी त्याचे त्यांना काही वाटत नाही. पण यापैकी काही मुले अशी हुषार व चाणाक्ष अस- तात की, मोठ्या माणसाच्या बोलण्यातील वेचक मजकूर लक्ष्यात ठेवून ती पुढे केव्हा तरी, अजाणत का होईना, अगदी विलक्षण परिस्थितीत बोलून दाखवितात ! कित्येक वेळा अशा प्रसंगी आईबापांना या मुलाच्या देखत आपण बोललों कशाला, असे होऊन जाते. अशाच मुलांपैकीं ताई होती. अस्थिर वृत्ति. मुलीची अस्थिरता मात्र हुबेहूब हरिमाऊंसारखी होती.ती एका जाग्यावर स्वस्थ म्हणून कधी बसावयाची नाही. पुस्तक घेऊन वाचीत असली तरी आता या जाग्यावर, तर क्षणामराने दुसरीकडे, अशा सारख्या खेपा घालीत असावयाची. तात्या बाहर निघाले की, सर्व सोडून एकदम त्यांच्याच मागे लागायची. हरिभाऊ तिला बहुधा बरोबर बाहेर घेऊन जात. ती फार अचपळ असे. बाहेर नेली तर तिचा सारखा हात धरून ठेवावा लागे. हात सुटला की कोगीकडे जाईल याचा काहीं भरंवसा नाही. मुंबईत ती अशी एकदा चुकलीही होती ! ताई तूं कोठे आहेस? हरिभाऊंना आधी मुलाची फार आवड. त्यातही ताई एकुलनी एक. अत्यंत बोलकी व चाणाझ. मग त्यांनी तिला जीव की प्राण करावें यात आश्चर्य ते काय ! नाई तूं कोठे आहेत १ असा हरिभाऊंनी प्रश्न केला की मुलीने हार. भाऊंच्या हृदयास हात लावून “ येथे " म्हणून सागावें । ताई मागेल ती वस्तु तिला मिळावयाची. मागेल ते पुस्तक, मागेल ती खेळणी, लागतील तितके कपडे, सर्व वस्तूंची रेलचल उडून गेलेली ! दहा मुलाना पुरेल इतका संसार एकट्या ताईचा। बालकदिन. ताई अमुक होईल, नाई तमुक होईल असे तिच्यासंबंधाने हरिभाऊंचे हजारों मनोरथ नालावयाचे. आईबापाना तिला कोठे ठेवू आणि कोठे न ठे आवडत्या कन्येचा वियोग. असे होऊन जात असे. शहरातील आपले सर्व बालमित्र आपल्या येथे एकत्र जमवून त्यांचा ताईशी स्नेह जमवून देण्याकरितां हरिभाऊंनी बालकदिन समा. रंभ केला. सर्व मुलामुलींचा भोजनसमारंभ चाललेला पाहून हरिभाऊंच्या डोळ्यांतून प्रेमाश्रु चालले होते ! पण हे प्रेमाश्रु अखेरचेच ठरले. यानंतर थोडक्याच दिवसांत ताई आपल्या आईबापांना टाकून परलोकी गेली । मुलीने हृद्रोग लावला! या प्रसंगाने हरिभाऊंच्या मनाला फार मोठा धक्का बसला. त्यांची शरीर प्रकृति मूळची चांगली निकोप. त्यांचे शरीरही साधारण गुटगुटित. अंगांत कोट, डोक्याला एक लहानसा रुमाल, डोळ्याला चष्मा व अंगावर उपरणे नाही अशी ती त्याची साधारण मध्यम उंचीची मूर्ति अनेक वर्षे एकसारखी कायम होती. पन्नाशीचा सुमार आलेला, तरी हरिभाऊ साधारण तरुणच दिसत. पण या मुलीच्या मृत्यूनें, तिच्या हृद्रोगाने त्याचे शरीर थोडक्याच दिवसात पार पोखरून निघालें ! त्यांच्या डोळ्यातील पाणी पार नाहीसे झालें। अंबा, केळे,चहा, कढी वगैरे मुलीला आवडत्या अशा सर्व वस्तूंचा त्यानी त्याग केला. पण वस्तुतः इहलोकाच्या कोणत्याच वस्तूने त्यांना आनंद होईनासा झाला. मुलीमुळे जे जग त्याना उपवनाप्रमाणे वाटत होते तेंच तिच्या देहावसानानंतर जीर्णारण्याप्रमाणे वाटू लागले ! फार काय, पण " या विश्वाला उत्पन्न करणारा जर कोणी असेल, तर तो सदय अंतःकरणाचा परमेश्वर नसून पक्का निर्दय व कठोर असा राक्ष- सच असला पाहिजे" असेही कन्यावियोगाच्या वैतागात त्यांच्या तोडून उद्गार निघण्यास चुकले नाहीत ! स्थितीत आपण अमुक कादंब-या लिहूं आणि तमुक कथानकें संपवं वगैरे त्यांच्या मनोरथाचे किल्ले पार ढासळून पडावे यांत आश्चर्य ते काय ! हरिभाऊ आपल्या मुलीच्या पश्यात् सहा वर्षे हयात होते, पण त्याच्या मुलीबरोबरच त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाची प्रायः समाप्ति झाली। अशा प्रकरण तेरावें. मित्रपरिवार. काही निवडक मित्र. हरिमाऊचा स्वभाव प्रेमळ व विनोदी असल्यामुळे त्यांचा मित्रांचा परिवार फार मोठा होता. त्यांच्या स्नेह्याची यादी करावयाची म्हणजे एक लहानसें पुस्तकच होईल ! थोडक्यात सांगावयाचे म्हणजे महाराष्ट्र, व-हाड व मध्यप्रात यातील मुबुद्ध व प्रमुख लोकात हरिभाऊंचा स्नेही किंवा परिचित नव्हता असा मनुष्य कचितच सापडेल. तरी पण, त्यांच्या विशेष घरोब्याचे स्नेही म्हटले म्हणजे प्रो. ना. स. पानसे, प्रो. राजवाडे, प्रो. भानू, रा. रामचद्र मोरेश्वर साने, श्री. काशि. ताई कानिटकर, प्रि वि. ग. आपटे, रा. य. ग. रु. साटे, रा. वासुदेवराव जोशी, रा. ब. अंजनगावकर, नगरचे रा. रुष्णराव वाघळे, ग. ना, म. समर्थ, ग्वाल्हेरचे रा. ब्र रावजी जनार्दन भिडे, डॉ. यशवंत गोविंद आपटे, रा. वासुदेव गेविंद आपटे, इंदूरचे रा. दामोदर विनायक कीर्तने, डॉ. ताये, रावसाहेब वि. अ. पटवर्धन, ग. दि. ह. वाकनीस, रा. अ. ग. वागीकर, रा. हरि सिताराम दीक्षित, रा. ब, म. के. कुमठेकर, रा. ब. विष्णु मोरेश्वर महाजनी, नागपूरचे रा. मोरोपंत दीक्षित, रा. वि.स.पटवर्धन, रा. ल. र.गोखले इत्यादि होत. हारेभाऊंच्या परलोकस्थ मित्रांत नमूद करण्यासारखे म्हटले म्हणजे महादेव दिनकर जोशी, रामरुष्ण भिकाजी कुलकर्णी, वामन विष्णु लेले, रु. वि. सोहनी, प्रो. वासुदेव- गव केळकर,नारायणराव फाटक,विनायक महादेव पंडित, हरि महादेव भडकमकर, विनायक नारायण आपटे, चिंतामण नारायण आपटे, वामनराव रानडे, गोपिंदराव कानिटकर, शं. मो. रानडे, रु. प. गाडगीळ, नारायण बापुजी कानिटकर, कृष्णाजी बल्लाळ डोंगरे इत्यादि होत. पुणे शहरांत म्युनि- सिपालिटीशी व इतर अनेक संस्थांशी हरिभाऊंचा प्रमुखत्वाने संबंध आल्यामुळे वकील, व्यापारी, शेट सावकार, वगैरे सर्व वर्गात त्यांचे मित्र असत आणि कोणचेंहि महत्वाचे काम आले की हे मित्र हरिभाऊंच्या सल्ल्याचा फायदा मित्रपरिवार. घेण्यास कधीहि चुकत नसत. कोणी काही कामाकरिता आल्यास हरिभाऊहि त्याच्या उपयोगी पडण्यास सदैव तत्पर असत. सर्व वर्गातील स्नेही. हरिभाऊंच्या स्वभावांन अन्योन्यविरोधी गुणांची छटा दिसत होती, त्या- प्रमाणेच त्याच्या मित्रमंडळीतही अनेक वर्णीच्या, वर्गाच्या व वयाच्या गृहस्थाचा भरणा असे. सामाजिक, राजकीय वगैरे यायतीत कोणत्याही प्रकारची ममानता नाही अशा गृहस्थांशीहि हरिभाऊंची निर्व्याज व अरुत्रिम मैत्री असे. या ठळक उदाहरण म्हटले म्हणजे चित्रशाळेचे मालक रा. रा. वासुदेवराव जोशी यांचे होय. हरिभाऊ व वामदेवराव हे सार्वजनिक बाबींत अगदी विरुद्ध असत, तरी उभयतांचा खाजगी प्रेमसंबंध ४१ वर्षेपर्यंत अस्खलित रीतीने चालू होता. हरिभाऊ आणि वासुकाका यांची गाठ पडली नाही, असा एखादा दिवस सांपडला तर कचितच सापडेल, इतकी त्यांची निकट मैत्री होती. हरि- भाऊनी आपली 'सूर्योदय ' ही कादंबरी त्यांना अर्पण केली होती. पण चित्र- शाळेतच ती छापली असल्यामुळे, अर्पणपत्रिकेवरील आपले नाव काढून, "मतवैचिच्यामुळे, किंबहुना मतविरोधानेहि पसतीस वर्षात ज्याच्या व माझ्या स्नेहात अणुभर मुद्धा अंतर पडले नाही अशा माझे मित्रास हे पुस्तक अर्पण केले आहे" ह्यः आशयाचा मोघमच मजकूर वासुकाकांनी शिल्लक ठेविला ! नागरिककर्तव्य. ६९१८ च्या मार्च महिन्यांत कै. टिळक व त्यांचे कित्येक सहकारी हे डेप्यु- टेशनवर विलायतेस जावयास निघाले. त्यावेळेस पुणे येथे खांडवानी मॅन्शनमध्ये उद्यानोपाहाराचा व पानसुपारीचा समारंभ झाला. वस्तुतः के. टिळक व हरि- भाऊ यांचे सामाजिक काय व राजकीय काय या दोन्ही बाबतीत भिन्न गोत्र होते. तरीहि एका प्रमुख नागरिकाच्या सत्कारसमारंभाच्या वेळी हजर राहणे हे नागरिक म्हणन आपले कर्तव्य आहे,ही जाणीव बाळगूनच हरिभाऊ या समारंभात इजर राहिले. टिळकांचा प्रवास निर्विघ्न होऊन हाती घेतलेल्या कार्मी त्यांना यश येवो, अशी इच्छा प्रदर्शित करतांना त्यावेळी हरिभाऊ म्हणाले, "गुरुवयं टिळक, आपण ज्या कार्याला जात आहा त्या कार्यात आपणास पूर्ण यश मिळो, अशी सर्वांच्या वतीने मी परमेश्वराची प्रार्थना करितो. भापल्याला पूर्ण यश मिळो, अतें म्हणण्यांत नातवाच्या डोक्यावर छत्रचामरे पाहण्याचा वर . .
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. मागणान्या अंध व वृद्ध बाह्मणाचेच मी अनुकरण केले आहे. पूर्ण यश मिळो म्हणण्यांत आयुरारोग्य व सामर्थ्य ही आलीच; याबद्दल निराळी प्रार्थना नको." आयुष्यक्रमावर वजन. वरील मित्रांच्या यादीपैकी हरिभाऊंच्या आयुष्यावर ज्यांचा विशेष परिणाम झाला असे फारच थोडे होते. यांत कै. गोविंदराव कानिटकर व श्री. काशीताई कानिटकर या दंपत्याचा प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. गोविंदराव फारच प्रेमळ गृहस्थ असत. वादविवादात मोकळ्या मनाने बोलणारा व मोकळ्या मनाने बोलून घेणारा त्याच्यासारखा दुसरा गृहस्थ कचितच सापडेल. त्यांचा विद्याव्यासंग ब-यापैकी असून लेखक म्हणूनही त्याचा लौकिक होता. त्याच्या पत्नी श्री. काशीताई यानीही बहुधा स्वावलंबी प्रयत्नाने शिक्षण संपादन करून विदुषी स्त्रियांत स्थान मिळविले. जुन्या नव्यानील चांगल्या गोष्टींचे प्रमाणशीर संमिश्रण आपल्या वर्तनक्रमात दाखवून समाजाच्या आदरास पात्र होणान्या खियात काशीताईंना प्रमुख स्थान दिले पाहिजे. या दंपत्याचा आणि हरिभाऊंचा ३५ वर्षे अव्याहत स्नेह होता. हरिभाऊंनी काशीताईंना आपल्या वडील बहिणीप्रमाणे मानिले होते, आणि काशीताईही हरिभाऊंना आपल्या सख्या बंधुप्रमाणे लेखीत. कै. शंकर मोरो रानडे व रा. ब.वि.मो. महाजनी याच्या योगानंच हरिभाऊंना लेखनक्रियेची स्फूर्ति मिळाली याबद्दलचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. के. रु. प. गाडगीळ हेही हरिभाऊंचे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्याच्या विद्याव्यासंगाबद्दल व विशेषतः उत्कृष्ट इंग्रजी लिहिण्याच्या हातोटीबद्दल हरिभाऊंना अतिशय आदर वाटे. कै. माधवराव जोशी. हरिभाऊंच्या आयुष्याच्या पूर्वभागाशी विशेष संलम असलेले असे दुसरे दोन गृहस्थ म्हटले म्हणजे कै. माधवराव जोशी व हार महादेव पंडित हे होत. रा. माधवराव जोशी हे मोठे विचारी गृहस्थ असून त्यांनाही वाचनाचा नाद असे. ते इंग्रजी चांगले लिहीत असत. सुधारकाच्या इंग्रजी कालमांत त्यांनी लिहिलेले कित्येक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. यांचा व हरिभाऊंचा अतिशय स्नेह असे. १८९७ साली माधवरावांना प्लेग झाला त्या वेळेस अगदी अखेरपर्यंत हरिभाऊ. नाच त्यांची शुश्रूषा केली. माधवरावजींच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पार्वती- मित्रपरिवार. - बाई जोशी यांचाही हरिभाऊंनी उत्कृष्ट परामर्ष घेतला. पार्वतीबाईना त्यांनी आपली बहीण मानली होती व अखेरपर्यंत पार्वतीबाईशी प्रेमळ भावाप्रमाणेच त्यांचे वर्तन असे. हरिभाऊंच्या हातून दुसन्याच्या उपयोगी पडल्याची वरीलप्रमाणे अनेक उदाहरणे सागतां येतील. कै. ह. म. पंडित. कै. हरि महादेव पंडित हेही हरिभाऊचे एक निकट स्नेही असत. हे हरि. भाऊंपेक्षा दहा वर्षांनी मोठे होते. हरिभाऊ नागपुग्ला कॉग्रेसकरितां जात, निमित्ताने याची व त्याची ओळख झाली. पंडितही हरिभाऊंप्रमाणेच विद्याव्यसनी असल्यामुळे पुढे त्यांचा चागला स्नेह जमला. सामाजिक बायतीत या गृहस्थाशी त्यांची नेहमी चर्चा होई. स्वतःचे विचार हरिभाऊंच्या ज्या कादंबरीत विशेष प्रतिबिंबित झालेले दिसतात ती 'मी' कादंबरी त्यांनी पंडितानाच अर्पण केली आहे. गोपाळराव गोखले आता हरिमाऊंच्या जिवलग मित्रापैकी ज्याचा विशेष रीतीने निर्देश केला पाहिजे असे गृहस्थ म्हटले म्हणजे कै. गोपाळराव गोखले हे होत. गोपाळरावाच्या. बट्ठल हरिभाऊंना फारच प्रेम व आदर वाटत असे. ते हरिभाऊंच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होते, तरी हरिभाऊ वडील भावाप्रमाणे त्याना मान देत. गोपाळ- राव हे स्वभावाने जरा तापट असत. त्याच्या मनात एखादी गोष्ट करावयाची नसली म्हणजे तेथे सहसा कोणाची भीड चालावयाची नाही, असा त्याचा स्वभाव असे. पण यास हरिभाऊ मात्र अपवाद' असत. हरिभाऊंचे सांगणे गोपाळगवानी मोडले असें बहुधा कधीही होत नसे. गोपाळराव व हरिभाऊ हे एक- मेकाचे विश्रामस्थान असत. गोपाळगाचा पुण्यास मुक्काम असला म्हणजे हरिभाऊंची व त्यांची भेट झाली नाही असा दिवस कचितच जात असे. हरि. भाऊंचा व त्यांचा स्नेह प्रथम १८८७मध्ये झाला. दोघाच्याहि उज्ज्वल आयुष्य- क्रमाचा तो केवळ प्रारंभ होता. त्या वेळी गोपाळरावांनी हरिभाऊंना सहज प्रश्न केला की, " हरिभाऊ, पुढे आपल्या आयुष्यक्रमात तुम्ही काग व्हावें असें तुम्हाला वाटते ! " हरिभाऊंनी गोपाळरावांनाही तोच प्रश्न केला. “ तुम्ही आधी सागा, तुम्ही आधी सांगा " अशात काही वेळ गेल्यानंतर गोपाळराव म्हणाले, १२ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. "कॅबिनेट मिनिस्टर होऊन आपल्या देशाची कामगिरी करावी अशी माझी आकाक्षा आहे." हरिभाऊंना गोपाळरावांचा हा निश्चय ऐकून फारच आश्चर्य वाटले. पण गोपाळरावांच्या मृत्यूनंतर त्यांनी वरील प्रसंगाचा निर्देश केला त्यावेळी " गोपाळरावानी खरोखरच स्वतःस कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा प्राप्त करून घेतला" असे त्याच्या तोंडून कौतुकाने उद्गार निघाले. गोपाळ- रावांनी वरीलप्रमाणे आपली इच्छा सांगितल्यानंतर हरिभाऊंनीही " समाजास सन्मार्गदर्शक असा विख्यात कादंबरीकार व्हावे अशीच माझी इच्छा आहे " असें सांगितले दोघेही केवळ इच्छा करून राहिले नाहीत, तर दोघांनीही आपल्या बुद्धिमत्तेचा व आपणांस आलेल्या संधींचा योग्य उपयोग करून घेऊन तरुणपणीच ठरलेलें आपापले ध्येय कसे हस्तगत करून घेतले हे कोणाम सांगा- चयास नकोच कादंबऱ्या अधिक काळ जिवंत राहतील. हरिभाऊ १९०९ साली मुंबई कायदे कौन्सिलच्या निवडणुन करिता उभे राहिले होते. ते निवडून येतील असे अगदी अखेरपर्यंत वाटत होते. पण अगदी आयत्या वेळी काही विशिष्ट कारणामुळे परिस्थितीत एकदम पालट झाला व हरिभाऊ निवडून आले नाहीत. कौन्सिलकरिता ते उभे राहिले ते गोपाळ- सांच्या आग्रहामुळेच होत. हरिभाऊ निवडून आले नाहीत,यामुळे गोपाळरावाना अर्थातच फार वाईट वाटले व त्यांनी हरभाऊंना मित्र या नात्याने समाधानाचे एक पत्र लिहिले. त्यात " तुम्ही निवडून आला नाही ही गोष्ट वाईट झाली. पण ती तुम्हास मनास लावून घेण्याचे काही कारण नाही. अामच्या कौन्सिल. मधील कामापेक्षाही तुमच्या कादंबन्या अधिक काळ जिवंत राहतील. " इत्यादि आशयाचा मजकूर होता. हरिभाऊंच्या कादयन्यासंबंधाने गोपाळराव- सारख्यांनाही किती आदर वाटे हे यावरून दिसून येते. गोपाळगवाच्या देहावसानापूर्वी दोन तीन दिवसच हरिभाऊ त्यांच्याशी योलत बसले असतां गोपाळरावांनी हरिभाऊंस विचारले. "तुम्हाला आजपर्यंत कोणाच्या मृत्यूनें विशेष दुःख झाले ! " तेव्हा, हरिभाऊ म्हणाले, "माझ्या मुलीच्या मरणाने." गोपाळराव म्हणाले, " नांव सांगा " हरिभाऊंनी अर्थातच माधवराव जोशांचे नाव घेतलें. गोपाळ- राषांच्या या प्रश्नाचा रोख हरिभाऊंनी आधीच ओळखला होता. आपला मृत्यु एखाद्या स्नेह्याचे मित्रपरिवार. दररोज जवळजवळ येत आहे ही गोपाळरावाना पूर्ण जाणीव होती. आणि आपल्या मरणाने हरिभाऊंना अतिशय दुःख होईल हा विचार येऊ नच त्यांनी वरील प्रश्न केला होता. यानंतर तीनच दिवसांनी हरिभाऊवर तो दुःखद प्रसंग आला ! ता. १९ फेब्रुवारी ता. १९ फेब्रुवारी १९१५ रोजी रात्री आठ वाजता गोपाळरावाची तब्येत अधिक बिघडली असा निरोप कळताच हरिभाऊ व मी असे टांग्यांत सईट्स ऑफ इंडिया सोसायटीत गेलो. त्या वेळेस गोपाळराव अत्यवस्थ होते. तरी पण ते चागले शुद्धीत होते. हरिभाऊंना पाहताच त्याना समाधान झाले. अंथरुणावरून मला आरामखुर्चीवर बसवा,असें गोपाळरावानी सागितल्यावरून दोन तीन माणसांनी त्याना धरून खुर्चीवर बसविले.त्यानंतर पाचच मिनिटात त्यांचे प्राणोत्क्रमण झाले? शेवटी वर बोट करून व मान हालवून "हरिभाऊ जाता आतां" असे म्हणून गोपाळ- रावांनी त्याना नमस्कार केला व डोळे मिटले. तो प्रसंग फारच हृदयद्रावक होता. आणि जेव्हा जेव्हा त्याची आठवण होई तेव्हां तेव्हा हरिभाऊंचे हृदय दुःसाने भरून येत असे. हरिभाऊंची मुलगीही त्यापूर्वी दोनच वर्षे ता.१९ फेब्रुवारी रोजीच निवर्तली. अर्थात त्या दिवशी त्यांना एक प्रकारची अस्वस्थता येत असे. तेव्हा हा दिवस म्हणजे त्गना दोन प्रिय माणसाच्या वियोगाचा दिवस असे. मुंबईस ते जलोदराने आजारी पडले तेव्हां ता. १९ फेब्रुवारी या दिवशी गोपाळ. रावांची चवथी निधनतिथि पडली. हरिभाऊंना सघंध रात्रभर झोप आली नाही. याच दिवशी आपली दोन प्रिय माणसे आपणास सोडून गेली, आपणही याच दिवशी इहलोक सोडून जातो की काय, असे त्याना एकसारखे वाटत होते. त्यानंतर हरिभाऊंचा इहलोकींचा लागावगंधा बाराच दिवस राहिला होता ! यानंतर सातच दिवसानी हरिभाऊ लिमये याच्या आकास्मक मृत्यूची बातमी ऐकुन त्याना पराकाष्ठेचे दुःख झाले. ओपनिंग सेरिमनी मी करीन. हरिभाऊ लिमये यांच्या मृत्यूपूर्वी दोन तीनच महिने प्रेतें नेण्याच्या पद्धती- संबंधात काही सुधारणा होणे जरूर आहे, अशाबद्दल मडळति बोलणे निघाले. प्रेतें नेण्याकरिता एखादी सुंदर गाडी करावी, अशी हरिभाऊनों सूचना केली.
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. ती, हरिभाऊ लिमये यानाही पसंत पडली. यावर हरिभाऊ आपटे, हरिमाऊ लिमये यांना म्हणाले, " हरिभाऊ, तुम्ही भिऊ नका, मी तुमच्यापेक्षा वडील आहे. या गाडीचा ओपनिंग सेरिमनी मीच करीन." हे त्यांचे बोलणे झाल्या- वर दोघेही हरिभाऊ चार महिन्यांच्या मातच पाच दिवसांच्या अंतराने पर- लोकवामी झाले! युरोपियन मित्र. युरोपियन लोकातही हरिभाऊंची मित्रमंडळी बरीच असत. सर जेम्स डुबोले, सर क्लाड हिल, नामदार कारमायकेल, मि. माउंटफर्ड, ना. कीटिग, ना. किंकेड, मि. रॉबर्टसन्, मि. स्विफ्ट वगैरे अनेक गृहस्थांशी त्याचा चागला परिचय असे. ना. किंकेड आणि ना. कीटिग याच्याशी तर त्यांचा विशेष स्नेह असे. एकदा कीटिंग यांचा जुन्नरास मुक्काम असताना त्याच्या निमंत्रणावरून हरिभाऊ त्यांचे ८ दिवसपर्यंत पाहुणे होते. हरिभाऊ हे शाकाहारी व जेवगा- खाण्यांत जुन्या पद्धतीचे आहेत, ही गोष्ट मि. कीटिंग याना माहीत असल्यामुळे न्यानी हरिभाऊंकरिता तशी मुद्दाम तजवीज ठेविली होती. हरिभाऊ मोठे विद्याव्यासंगी व बहुश्रुत असत, यामुळेच त्याच्याशी परिचय करून घेण्याची युरोपियन लोक इच्छा बाळगीत. हरिभाऊंचा जमीनजुमला नव्हता, सावसावकारी नव्हती, किंवा सरकारातून त्याना काही इनाम जहागीर मिळवावयाची नव्हती. अर्थात ते होऊन कधी कोणाच्या भेटीप्त गेले नाहीत, युरोपियन गृहस्थांनी भेटीची इच्छा केली तरच ते त्याच्याकडे जात. एरव्ही जात नसत. तरी हरिभाऊच्या शेवटच्या दहा बारा वर्षांत त्यांच्याशी परिचय करून घेतला नाही असा कलेक्टर्स, कमिशनर्स न कौन्सिलर्स याच्यामध्ये कचि- तच गृहस्थ सांपडेल, अशी स्थिति आली होती. लॉर्ड विलिंग्डन ही त्याना मोठ्या आदराने व प्रेमाने वागवीत. साहेब शुद्धीवर आले. युरोपियन अधिकान्यांमध्ये एखाद्या तिस्मारखांशी गाठ पडली तर हरिभाऊ स्याची तेथल्या तेथेच संभावना करण्याप्त कमी करीत नसत. एकदा एका युरो- पियन अम्मलदाराने त्यांना चिठी पाठवून आपल्या भेटीला बोलाविले होते. पण साहेबांची काय लहर फिरली कोणास ठाऊक, हरिभाऊंनी आपल्या नावाचे कार्ड पाठविले तेव्हां, 'आतां मला वेळ नाही,' असा साहेबांनी आंतन निगेप मित्रपरिवार. पाठविला. 'चिठीने भेटावयास योलावून भेटण्यास वेळ नाही असे सांगणे शिष्टा- चारास धरून नाही ही गोष्ट हरिभाऊंनी साहेबांच्या निदर्शनास आणली, तेव्हा साहेब बाहेर आले व "आम्हांला काम अतिशय असते,फरसत मुळीच नसते,अशा फुशारकीच्या गोष्टी सागू लागले."हरिभाऊंनी साहेबांच्या तोंडून हे शब्द ऐकताच नाबडतोब उत्तर केले की, "आम्ही रिकामे लोक आहोत,अशीच आपली समजत अ. सेल तर ती साफ चुकीची आहे मला आपल्यापेक्षाहि अधिक कामे आहेत. आपली चिही आली म्हणूनच मी आपल्या भेटीस आलो. पुन्हा मात्र आपल्या चिठीचा मान ठेवण्याचे मला कारण उरले नाही हे चांगलेच झाले." या उत्तराने सोहब ठिकाणावर आले व त्यानी झाल्या प्रकारायद्वल हरिभाऊची माफी मागितली. युरोपियन लोकांशी सार्वजनिक बाबीसंबंधाने बोलण्याचा प्रसंग आला तर आपले मत स्पष्टपणे सांगण्यास ते केव्हाही कचरत नसत, कै. टिळक हे मंडाले- हुन मुटून आले, त्यावेळेम त्याच्या घराशेजारी पोलीसपहाग ठेवण्यात येऊन त्याच्या भेटीला जाणान्यावर टेहळणी ठेवली जात असे. या वेळी हरिभाऊ त्यांना भेटावयास गेले होते. त्याचें नाव पोलीसकडून वरती कळविण्यात अले ही गोष्ट त्याना समजल्याबरोबर ते के टिळक याना आणखीही दोन वेळा भेटाव- यास गेले. यानंतर "सरकारी पेन्शनर व सरकारातून पदव्या मिळालले लोक यानी कोणत्याही रीतीने टिळकाशी संबंध ठेवू नये, तसा ते ठेवतील तर सरकार. कडून त्याचे योग्य रीतीने पारिपत्य होईल' असे ता. ६ जुलै १९१४ रोजी शिक्षणखात्याच्या डायरेक्टराच्या सहीने एक खाजगी सक्युलर निघाले. याच सुमारास हरिभाऊंचे एका कौन्सिलरशी भाषण झाले. त्यात या सर्वयुलरचा निर्देश करून त्यानी त्या युरोपियन अम्मलदाराला स्पष्ट सांगितले को "तुमचे है सक्युलर अत्यंत हास्यास्पद व अन्यायाचे आहे. मला सरकारने केसर-ई हिंदचा चाद दिला म्हणून मी आपले व्यक्तिविषयक स्वातव्य आणि माझ्या हालचाली या सरकारच्या केव्हाही स्वाधीन करणार नाहीं ! माझ्या स्वातंत्र्याची चादी उडत असेल तर मी तो चाद परत करीन व इतरही पदवीधरांना तसे करावयास सांगेन." हरिभाऊंच्या या बोलण्याचा त्या युरोपियन अधिकान्यावर काय परिणाम झाला हैं सागता येत नाही. पण पुढे या सर्युलरची अम्मलबजावणी मात्र झाली नाही. टिळकाच्या दारासमोरील पोलीसाचा पहारा उठविण्यासंबंधांतत्या वेळी ज्यानी विशेष खटपट केली त्यांत हरिभाऊ प्रमुख होते हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे. राजकीय मतभेदामुळे, नागरिक कनव्यास आपण पराङ्मुख होता कामा नये असें हरिभाऊंचे मत होते. आणि ते त्याप्रमाणे कसे वागत याचा वरील हकीकत हा उत्कृष्ट पुरावा होय.
प्रकरण चवदावें. राजकीय, सामाजिक व धार्मिक मतें. रा. सा. रानड्यांचे अनुयायी. हरिभाऊंनी वेळोवेळी जी व्याख्याने दिली, जे लेख लिहिले व इतर ज्या चळवळी केल्या, त्यांवरून त्याची राजकीय, सामाजिक व धार्मिक मते काय होती याचे सविस्तर विवेचन करण्याचे कारण नाही. पुण्यातील दोन पक्षांना तीव्र स्वरूप गेल्या चवदा वर्षातच आले असले तरी हे पक्ष रावसाहेव रानडे यांच्या वेळेपासूनच अस्तित्वात असून त्याचे पहिले दृश्य स्वरूप म्हणजे डेक्कन सभेची स्थापना हे होय. त्यापूर्वीहि १८९१ मध्ये संमतिवयाच्या पिलाच्या वेळी आणि १८९५ साली पुणे येथे राष्ट्रीय सभा भरली त्यावेळी या पक्षभेदाची मजल बरीच पुढे गेलेली दिसून आली. रावसाहेय रानडे यांचे त्यावेळेपासून जे एकनिष्ठ अनुयायी आहेत त्यांकीच हरिभाऊ हे प्रमुख होते. गेल्या पंचवीस तीस वर्षांत गवसाहये रानडे यानी घालून दिलेल्या मार्गाने ज्या अनेक चळवळी चालू आहेत त्यांशी हरिभाऊंचा निकट संबंध असे.टिळकांना उद्यानोपाहार व पानसुपारी झाल्याचा पूर्वी निर्देश केला आहे त्यावेळी भाषण करताना, हरिभाऊंनी आपल्या मताचे दिग्दर्शन थोडक्यात पुढे दिल्याप्रमाणे केले होते. त्यावेळी ते म्हणाले "न्यू इंग्लिश स्कूल व फग्र्युसन कॉलेज या संस्था उघडल्या त्या दिवशी ज्यांनी आपली नावें त्या संस्थांच्या पटात नोदविली त्या विद्यार्थ्यांपैकीच मी एक होतो; परंतु शिक्षणाची इतिश्री झाल्यानंतर व्यवहारविचाराला सुरवात शल्यावर मी कै. रानडे यांच्या शाळेत शिरलो. व तेथे कै. गोखले यांच्या स्नेहाची जोड मिळाल्याकारणाने माझी मते त्याच शिकवणीत बनली गेली व अयापिहि ती तशीच आहेत. " स्वराज्य चालविण्यास हिंदी लोक पात्र असून स्वराज्य. दानाविरुद्ध जे कित्येकांकडून आक्षेप घेण्यात येतात ते कसे निरर्थक आहेत है त्यांनी रा. रा. ल. ब. भोपटकर याच्या "स्वराज्याची मीमांसा" या पुस्तकास लिहिलेल्या छोट्या प्रस्तावनेत मार्मिक व स्पष्ट रीतीने दर्शविले आहे. "करभार राजकीय, सामाजिक व धार्मिक मतें. ९७ देणारांच्या हातीच कारभार पाहिजे " हेच सूत्र त्यांनी त्या ठिकाणी आपल्या ओजस्वी लेखणीने विशद करून सागितले आहे. हरि- भाऊंच्या राजकीय विचाराची अगदी अलीकडील स्पष्टोक्त याच प्रस्तावनेंत पहावयास सापडते. रानड्यांचे अनुयायी. हरिभाऊ हे डेक्कन सभेचे कित्येक वर्षे सेक्रेटरी होते. डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी- चेही ते एक प्रमुख सभासद होते. पुण्यात १९१५ साली पंधरावी प्रातिक परिषद भरली त्या वेळेस स्वागत कमिटीच्या चेअरमनच्या जागी त्यांची योजना साली होती. राष्ट्रीय सभेचे ते कट्टे भक होते. राष्ट्रीय सभेच्या निम्मेहून अधिक अधि- वेशनांना ते हजर राहिले होते. काँग्रेसला स्त्रियांनी हजर रहावे याबद्दल दुसन्या काँग्रेसच्या वेळीच त्यांनी खियांना उद्देशून एक विनंतिपत्र काढले होते. ज्ञान मिळण्याची सर्व साधनें खियांना उपलब्ध असावीत याबद्दल त्यांना आपल्या आयुष्यक्रमाच्या आरंभापासूनच कशी मनापासून कळकळ वाटत होती, हे यावरून दिसून येईल. गनडे-पक्षाचे प्रथमपासूनच निदर्शन कर- णान्या ज्ञानप्रकाश पत्राशी सपादक या नात्याने सातआठ वर्षे त्यांचा संबंध होता. पूर्वी ज्ञानप्रकाश आंग्लो-मराठी असतांना इंग्रजी बाजूचे संपादकत्व हरिभाऊंकडेच कित्येक दिवस होते. ज्ञानप्रकाश दैनिक करण्यास ज्याची आस्था विशेष कारण माली, त्यांतच हरिभाऊंचा प्रामुख्याने उल्लेख करणे भाग आहे. आरंभी दैनिक ज्ञानप्रकाशाचे संपादकत्वही त्यांच्याकडेच होते. मताने प्रगमनशील. हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्यांचा प्रतिपाय विषय पाहिला म्हणजे त्यांची सामाजिक मते कोणत्या प्रकारची होती हे वेगळे सांगावयास नकोच. समाजसुधारणेचे ते निस्सीम चहाते होते. संमतिवयाच्या कायद्यापासून तो पटेल- बिलाच्या काळापर्यंत ज्या ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्यांना हरिभाऊंची अंतःकरणपूर्वक अनुकूलता होती. १९१९ च्या जानेवारीत म्हणजे हरिभाऊंच्या मृत्यपूर्वी दोनच महिने, त्यांचे इंदूर येथें पटेलबिलावर सर्वस्वी अनुकूल असे भाषण झाले होते. भानंदाश्रमासारख्या जुन्या पंथाच्या संस्थेचें चालकत्व त्यांच्याकडे अगदी तरुण वयात आल्यामुळे त्यांना कार्यसुधारक होता आले नाही. शिवाय त्यांच्यासारख्या मनमिळाऊ व स्वमताभिमानापेक्षाही वडील ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. माणसांच्या मनाला न दुखविणे हे अधिक महत्त्वाचे कर्तव्य समजणाऱ्या माणसा. चा आयुष्यक्रम गेला यापेक्षा वेगळा गेला असता तरच आश्चर्य होते. मनाने ते अत्यंत प्रगमनशील होते, तरी पुरागमताभिमानाची त्यांच्यावर अगदी अखेर पर्यंत छाप होती त्यांशपेहेराव व आचरण यांतही जुन्या पंथाचीच झाक पर दिसून येत असे, त्याचेही हेच कारण असावें. दृष्टिकोण बदलण्याचे कार्य. कर्ने सुधारक म्हणून त्यांना केव्हाहि लौकिक संपादिता न आला तरी समाजसुधारणेस ज्या शक्ति साहाय्यभूत झाल्या त्यात त्यांच्या कादंबन्यांस बरेच वरचे स्थान येईल. कारण समाजाचा दृष्टिकोण बदलून तो सुधारणामि. मुख करण्याचे कार्य त्याच्या कादंबन्यांनी जसे केले तसे गेल्या चाळीम वर्षात दुसन्या कोणीही केले नाही. सुधार सिंबंधाने इतर जे जे प्रयत्न झाले त्यांत हरिभाऊंसारखा टिकाऊ प्रयत्न दुसरा कोणाचाही झाला नसेल. स्वता ते कर्तृत्ववान् सुधारक नसले तरी तसे सुधारक निर्माग करण्याइतकी प्रतिमा । लेखनशक्ति त्यांना लाभली होती. तिचा त्यांनी उरुष्ट उपयोग करून समाज- सुधारणेचें जे बीज समाजात मोठ्या शिताफीने रुजविले, त्यास अंकुर येऊन त्याचा मोठा वृक्ष झाल्याशिवाय केव्हाही रहाणार नाही, आनचीच तरुण पिडी घेतली तर ज्या मनोवारगेनें हरिभाऊंनी आपल्या कादंयन्या लिहिल्या तीच मनोधारणा स्वीकारून सामाजिक सुधारणेस ही पिडी अंतःकरणपूर्वक मान्यता दर्शवीत असल्याचे दिसून येते. ही पद्धति पथ्यावरच पडली. हरिमाऊ पुनर्विव हित असते, त्यांच्या डोक्यावर केस असते, नेक्टाय् कॉलर, यूट, पाटलोण, वारे युरोपिअन् पेहेराव त्यांच्या आंगावर असता तर त्यांचे ग्रंथ त्याच्या समकालीन तरुग पिढीस इतके प्रिय झाले असते किंग नाही याची शंकाच आहे. जुन्या समानात बाळबोध गणलेले असे जे वळण त्यांच्यात दिसून येत असे त्य मुळे समाजास ते आप्तस्वकीय असल्याप्रमाणेच वाटत. सामाजिक बाबतीत त्यांच्या कादंपन्यांना आज जे आप्तवाक्याप्रमाणे महत्त्व आले आहे ते, अशी स्थिति नसती तर, कदाचित् आलेही नसते. भर्थात् ज्या पद्धतीने त्यांनी आयुग्यक्रम घालविला ती पद्धत कार्यनिर्वाहाच्या दृष्टीने एक प्रकारे श्रेयस्कान टरली.
राजकीय, सामाजिक व धार्मिक मते मूळची विरुद्ध मतांची धडपड. वार्मिक यायतीत हरिमाऊंची खरोखर काय स्थिति होती हे निश्चित सागणे त्यांच्या अगदी निकटवर्ती मित्रासही कठीण पडेल. ते आनंदाश्रमातील हवकव्य, विधि वगैरे यथासाग करीत, देवदर्शनही घेत, सोमवार व शनिप्रदोष अशा- सारखे उपवासही करीत ! त्यांना अपचनाची व्यथा असल्यामुळे आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याबद्दल डॉक्टर्गनी सांगितले होते. त्या दिवशी सोमवार असल्यामुळे तेव्हापासून पुढे दर सोमवारी ते उपवास करीत असत. त्याच्या सोमवारच्या उपासाची मीमांसा अशा तन्हेने लावितां आली तरी त्यानी शनि- प्रदोष मात्र आपल्या वडिलांच्या सांगण्यावरूनच धरिला होता. त्याचप्रमाणे घरात काही सत्यनारायणासारखे कोणाचे नवस फेडावयाचे असले तर तेही ते फेडीत असत. नेहमी बोलण्यात चालण्यांत मात्र, ते नास्तिक नसले तरी अज्ञेयवादी असले पाहिजेत, असें त्याच्याशी संभाषण करणाराना वाटे, त्यांची परंपरागत आस्तिक्य बुद्धि व मिलच्या वाचनाने मनावर झालेला संस्कार यांच्यामध्ये गलू असलेली धडपड त्यांच्यामध्ये शेवटपर्यंत टिकली असे दिसते. एक उदाहरण विद्यार्थीदशेत असताना ते पंचहौद मिशन में फादर रेव्हिंग्टन याच्याकडे फ्रेंच व जर्मन शिकावयास जात. एके दिवशी फ दर रेव्हिग्टन हे काही कामात गुंतले होते. तेव्हा हरिभाऊ बाहेरच एका मिशनरीशी बोलत बसले. त्याचे बोलणे अर्थातच धर्मासंबंधाने निघाले. मिशनरी गृहस्थाने हिंदू धर्मावर ताशेरा झाडण्यास सुरवात केली. हरिभाऊंनी या वेळेस नास्तिक पक्षाची बाजू घेतल्या- मुळे मिशनन्याचे अर्थातच गाडे खुंटले. पण दुस-या दिवशी याचा चमत्कारिक परिणाम झाला. आपल्याकडे शिकावयास येतो हा गृहस्थ नास्तिक आहे असे या मिशनन्याने फादर रेव्हिंग्टन यांना सांगितले. त्याबरोबर हरिभाऊंना तेथे शिकावयास जाण्याची बदी होणार असा सुमार दि लागला. तेव्हां. हरिभाऊ फादर रोहिंग्टन यांना म्हण ले, “ मी नास्तिक बाजू घेतली ती केवळ मिशनरी गृहस्थाला अडविण्याकरिता व घेतली. त्याने हिंदु धर्माला शिव्या यावयाच्या आणि मी ख्रिस्ती धर्माची विटंबना करावयाची, असा प्रकार चालू गहिला असता तर प्रकरण भलत्या थरावर गेले अमते. हा परिणाम टाळण्याकरिताच मी ही शक्कल काढली. " या खुलाशने हरिभाऊंना अर्थातच फादर रेव्हिंग्टन याच्या .
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. ...... सान्निध्यात पूर्ववत् प्रवेश मिळू लागला. हरिभाऊंनी ही खेळ अशा रीतीने मारून नेली तरी हा प्रसंग, मिलच्या वाचनाने त्यांच्या मनावर जो परिणाम केला, त्याचाच द्योतक होता असें म्हणावयास हरकत नाही. "धर्म हा एक विकार आहे, विचार नहीं, तो श्रद्धामूल आहे..... आहे.......परमेश्वर मुळीच नाही. यदाकदाचित् असला तरी तो आता सृष्टीशी संबद्ध नाही, त्याने कोणाची प्रार्थना ऐकणे सभवनीय नाही. आपल्याला जे नीतियुक्त म्हणून वाटेल त करीत रहावे. लोक हाच परमेश्वर. त्याच्या हितासाठी झटणे हीच परमेश्वरी सेवा ज्याचे आपल्याला ज्ञान नाही, ज्याने कधी आपले अस्तित्व ज. गाच्या अनुभवात आणून दिले नाही, अता एखादा सर्वव्यापी पुरुष कल्पावयाचा, आणि त्याच्यावर भार टाकुन आपले व्यवहार चालवावयाचे म्हणजेच दौर्बल्य". चद्रशेखराची ही जी स्थिति हरिभाऊंनी आपल्या कर्मयोगांत वर्णन केली आहे तीच त्यांच्या तरुण वयात त्याची स्वतांची असली पाहिजे हे उघड आहे. फरक इतकाच की, चंद्रशेखगच्या शिक्षणात धर्मविषयक शिक्षणाचा भाग अगदी सुद्धा आला नव्हता. त्याने आपल्या वडिलापासून जे काय ग्रहण केलें होते ते जुन्या धर्मविषयक आचागच्या कुचेष्टे । रच हे ते. हरिभाऊंना बालवयात वडिलापासूनच जुन्या पंथाचे संस्कार झाले होते त्यामुळे चंद्रशेखरापमागे त्यांच्या मनात विचार येत अमले तरी ते काय चे मुळ घरून रहाणें शक्य नव्हते. या विचारानी त्याची आस्तिक्य बुद्धि हेलकावे खात असली तरी बाल- पयांत घडलेल्या संस्कारांचे पाश तुटून जाण्याइतके या विचारांचे पायल्य त्यांच्या वर बसलें नसावे असें साधारणतः म्हणण्यास हरकत नाही. यापूर्वी शिष्य- जनविलापांत त्यांनी शास्त्रीबुवांच्या आगच्या अनेक गुणांबद्दल प्रशंसा केली त्यांत त्यांच्या आस्तिक्यबुद्धीचाहा त्यांनी अंतर्भाव केला आहे. 'संत सखुबाई' व 'सती पिंगला' या त्याच्या नाटकावरूनही त्यांची आस्तिक्य बुद्धिच निद. शनास येते. एकीकडे मिल, स्पेन्सरसारखे हरिभाऊ बोलत, तर दुसरीकडे कुळधर्म-कुळाचारांत आस्तिक्य बुद्धीने पडत असलेले दिसून येत. तेव्हा हे को उकलावे कसे हा मोठाच प्रश्न आहे त्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग खाली दिला आहे. त्यावरून या प्रवास काहीसें समर्पक उत्तर मिळेल असे वाटते.
राजकीय, सामाजिक व धार्मिक मतें १०१ सन १८९३ साली विख्यात जर्मन पंडित डॉ. पॉल डायसन (कील युनि- व्हर्सिटीमधील प्रोफेसर ) हे हिंदुस्थानात आले होते, तेव्हा त्यांचा पुणे येथे- ही एक दोन दिवस मुक्काम होता. हरिभाऊंनी या साहेबांच्या सहवासात राहून त्यांना येथील सर्व प्रसिद्ध स्थळे दाखविली. त्यावेळी या उभयतांमध्ये धर्मसंबंधा च्याही गोष्टी निघाल्या. या जर्मन प्रोफेसरांनी आपल्या हिंदुस्थानातील आठ- वणी म्हणून एक पुस्तक त्याचवेळी प्रसिद्ध केले. त्यांत हरिभाऊंशी झालेल्या संभाषणावरून त्याच्या धर्ममतांबद्दल आपल्या मनावर कोणता ठसा उमटला, याचे वर्णन डॉ. पॉल डायसन यांनी खालीलप्रमाणे दिले आहे:- - “Apte, a highly cultured and learned man, professed of course no religion but the Vedanta, butlike Telang in Bombay, declared he was obliged to adhere to the worship of the gods on account of his family. All the images of the gods he looked upon as incarnations of the Atman, but he always took care not to confuse a mind that had not been able to rise to the idealism of this stand-point. I had the conviction here that those who think in India take the free standpoint in matters of religious doctrine as the thinkers of Europe, but out of consideration for their families still adhere to the worship of the gods, in the same way that we still hold fast to the ceremonies of a Church marriage, baptism and burial, though free from all superstitious ideas." विचारास में पटेल तेच ग्राह्य मानणारा व धर्माचार व धर्मविधि यांवर विश्वास नसलेला असा यूरोप खंडांत जो सुधारकांचा साप्रदाय निघालेला आहे त्यातही, केवळ कुटुंबांतील माणसांच्या समजुतीकरितां प्रार्थनामंदिरात जाऊन डोळे मिटणारे व विवाहविधि, बाप्तिस्मा, अंत्यविधि वगैरेंस चिकटून रहाणारे पुष्कळ सापडतात. त्याप्रमाणेच हिंदुस्थानातील सुधारक पंथाचे वर्तन आहे,ही गोष्ट डॉ.पॉल यांच्या निदर्शनास आली व तीच त्यांनी वरील उतान्यात व्यक्त केली आहे.माझा धर्म बेदान्ताचा आहे, पण कुटुंबातील माणसांकरिता मला देवदेवतापूजन करायें १०२ ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. लागते असेच आपल्याजवळ हरिभाऊंनी सागितल्याचे डॉ. पॉल वरील उतायात म्हणतात. यावरून हरिभाऊंची धर्ममते कशा प्रकारची असली पाहिजेत याचे साधारण अनुमान काढता येण्यासारखे आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे आज प्रायः घरोघरच्या माणसांची धर्माबद्दल जी विचार प्रवृत्ति आहे तीच हरिभाऊंची होती. हरिभाऊंसारख्या विशिष्ट परिस्थितीतील माणसाना विचार आणि आचार यांत मेळ राखणे कसे कठिण पडते याचीही कल्पना स्वानुभवाने पुष्कळाना येण्यासारखी आहे. “ I have purchased family peace at the cost of my reputation. " हे कै. का. त्रिं. तेलंग यांचे उद्गार स्यांच्याच परिस्थितीत असलेल्या हरिभाऊंसारख्यांनाही ततोतंत लागू पडण्या- सारखे आहेत. जुन्या-नव्याच्या झगड्यांन धडाडीने पुढे जाण्याची धमक ज्याना दासविता भाली नाही त्यांना लौकिकाची हानि पत्करूनही कुटुंबात समाधान नांदविता आले असते तर एका दृष्टीने त्याचे अभिनंदन करता आले असते. पण वस्तु- स्थिति पुष्कळ ठिकाणी य हून भिन्न होती. सामाजिक सुधारणेसंबंधात ज्यांनी तेलंगांप्रमाणे वर्तन ठेवले त्याना लौकिकाची हानि पदरात घेऊनही घरच्या माणसांचा वाईटपणा टाळता आला नाही ! दा परिणाम पाहिला म्हणजे त्यांचे वर्तन कोणत्याही दृष्टीने अभिनंदनीय न ठरता अनुकंपनीयच ठरते. हरिभाऊंच्या काळांत अशी उदाहरणे काही थोडीथोडकी होती असे नाही. फार काय पण प्रगतीचे आगर म्हणून प्रसिद्धि पावलेल्या युरोपखंडातही अशा उदाहरणाची रेल. चेल कशी दिसते हे वरील उता-यावरून लक्ष्यात येते.
प्रकरण पंधरावें. आयुष्याची अखेर ! प्रकृति थकत चालली. हरिभाऊंच्या उज्ज्वल आयुष्यक्रमाचा प्रारंभ कशा गतीने झाला,त्यांच्या पुढील मोठेपणाची चिन्हें त्याच्या बालवयातच कशी दिसू लागली, ते आपल्या प्रेमळ स्वभावाने महाराष्ट्राला कसे प्रिय झाले, इतर सार्वजनिक उपयुक्ततेचे अनेक व्यव- साय करून त्यांना उत्कृष्ट ग्रंथ कसे निर्माण करता आले, त्यांचा विद्याव्यासंग वयोमानाप्रमाणे वृद्धिंगतच कसा होत गेला, आपल्या ग्रंथात समाजाच्या दुष्ट चालीरीतीवर त्यांनी आघात केला असताही समाजाचे त्याच्यावरील प्रेम अबा- धित कसे राहिले वगैरे वाचीचे आतापर्यंत थोडक्यात निदर्शन केले. आवडत्या शांताबाईच्या मृत्यने हरिभाऊंच्या सर्व आशा, सर्व हेतु, सर्व मनोरथ धरणी- कंपाचा धक्का बसल्याप्रमाणे कसे एकदम ढासळून पडले यांचेही वर्णन पूर्वी येऊन गेलेच आहे. मुलींच्या मृत्यूनंतर हरिभाऊंचे इहलोकचे वास्तव्य केवळ शरीरमात्रेकरून होते. त्यांचे मन, त्यांचा मेंदु, त्याची प्रतिभा वगैरे सर्व मुलीच्या मृत्यूबरोघर लुप्तप्राय होऊन गेली ! कोणत्याही गोष्टीला काय, मर्यादा असावी लागते. प्रेम झाले तरी तेही मर्यादेतच पाहिजे. पण जगास शहाणे करण्याच्या हरिभाऊंनाही आपल्या मुलीबद्दलचे प्रेम आवाक्यांत ठेवता आले नाही! प्रेमपाशाचा प्रभाव असा वळत्तर आहे! "ताई तूं कोठे आहेस?" असा हरिभाऊंनी प्रश्न केल्याबरोबर, मुलगी, त्यांच्या हृदयावर हात ठेवून " येथे " असे उत्तर पावयाची. आणि मुलीच्या मृत्यूनंतर अखेर तेच खरे ठरले ! त्यांचे हृदय तेव्हा- पासून सरोखरच शून्यवत् झाले आणि त्यांची मूळची सशक्त व निकोप प्ररुति हळू हळू गसळू लागली. अमुक करीन,तमुक करीन अशी ते तोंडाने इच्छा मात्र व्यक्त करीत, पण अंगात उत्साह न राहिल्यामुळे त्यांच्या हातून उद्योग होई- नासा झाला व मुलीच्या मरणानंतरच्या सहा वर्षांत पूर्ण अशा दोनच कादंबऱ्या त्यांच्या हातून झाल्या !
ह ना. आपटे यांचे सांक्षप्त चारत्र. हृदयविकार. तीप्त वर्षापूर्वी म्हणजे सन १८८८ मध्ये ते मुंबईस असता : त्याना इन्फ्लुएंझा झाला त्या वेळेपासूनच त्यांना हृदयाचा विकार जडला होता.केव्हा केव्हा तर त्याच्या हृदयाची जागा कढत होऊन हृदय इतक्या वेगाने हलूं लागे की, वर हात ठेवला असताही ही स्थिति लक्षात येई. मुलीच्या धसक्याने तर त्यांचा हा रोग विशेषच बळावल्यासारखा झाला. आणि आज काय ताप भाला, उद्या अपचनाचा विकार झाला, परवा छातीत बाध बसला अशा अनेक उपाधीनी त्याचा पाठपुरावा चालविला. जे हरिभाऊ पन्नाशी उलटेतोपर्यंत अगदी तरुण माणसाप्रमाणे दिसत, त्याच हरिभाऊंवर जरेची छाया झपाट्याने पसरूं लागली. आगंतुक भगभग. त्याच काळांत आणखी एका अनाहूत कार्याची निष्कारण भगभग त्यांच्या- मागे लागली. बंगालमध्ये एका रेल्वेच्या फाट्याची परवानगी मिळवून त्या- प्रीत्यर्थ विवक्षित भाडवलाचे शेअर, त्यावर काही कमिशन घेऊन, जम- वावयाचे अशी एक योजना एका गृहस्थाने हरिभाऊंकडे आणली. हरिमाऊंनी मोठमोठ्या लोकांस चिठ्या चपाट्या देऊन त्याजकडून शेअर घेण्याबद्दल आपले वजन खचावयाचे व या गृहस्थांनी अंगमेहनत करून योजनेची पूर्वतयारी ोण्यास लागेल तो खर्च करावयाचा, असें ठरले. पण या कामात दोन मुख्य अडचणी होत्या, त्या हरिभाऊंच्या लक्ष्यात आल्या नाहीत. पहिली अडचण स्वत:- च्या फाययाकरिता लोकांकडे तोंड वेगाडण्याची हरिभाऊंस संवय नव्हती व तसे त्याचे शीलही नव्हते. हाच धंदा त्यांना करावयाचा असता तर त्यांनी आपल्या कादंयऱ्या राजेरजवाड्यांना अर्पण करून अमूप द्रव्याची प्राप्ति करून घेतली असती. या कामास ते स्वभावतःच नालायक होते,ही गोष्ट या बाबतीत पदोपदी दृष्टोत्पत्तीस आली.एखाद्या श्रीमान् माणसाकडे किंवा संस्थानिकाकडे त्यांनी रेल्वेसाठी जावें आणि तेथें फक्त रेल्वेचीच गोष्ट न काढतां श्रीमंतांचा निरोप घ्यावा असे कित्येक प्रसंग घडले ! हातून काम तर होईना आणि शिरावर जबाबदारी तर घेतलेली असा त्यांचा दोहीकडून कोंडमारा झाला. या बाबतीत दुसरी अडचण अशी होती की, याच सुमारास सरकारने वॉरलोनचे शेकडा पांच सहा टक्यांचे वारबाँड काढले. अशा स्थितीत तितक्याच टक्यांचे रेल्वेचे शेअर कोण आयुष्याची अखेर. १०५ जम- घेतो मिळून चोहोकडूनही प्रतिकूल स्थिति असता हरिभाऊंना या कामात पड- ण्याची बुद्धि झाली, आणि त्यांच्या मागे हा दुसरा एक नसता हृद्रोग लागला ! ज्या कामात आपण पडू नये त्यांत पडलों, ते साधत नाही तर सोडून यावें हेही त्यांच्याने होईना. आणि अखेर पाच चार वर्षे याच व्यग्रतेत त्यांना निष्का- रण घालवावी लागली. आधीच हृद्रोगाने पोखरलेले त्यांचे शरीर या काळजीमुळे जास्तीच निशक्त झाले. सतरा कामांची धावाधाव याबरोबर चालूच होती. त्यात इन्फ्लुएंझा हास्पिटल काढण्याची दगदग तर त्यांना फारच जाणवली आणि सन १९१० च्या आक्टोबरमध्ये त्यांच्या एका डोळ्याची पापणी साली पडून डोळ्याच्या पक्षघातासारखा त्यांना विकार झाला. यातून बरे झाल्याबरोबर डिसेंबरच्या सुरुवातीसच वरील रेल्वेचे शेअर विण्याकरिता ते कलकत्याकडे फिरावयास गेले. तेथून परत येताना ते इंदुरास उतरले व त्या ठिकाणी जलोदराची भावना झाल्याचे त्यांना डॉक्टग्नी सांगितले. शेवटी हा रेल्वेचा व्यापच त्याना पुरुन उग्णार असा योगायोग होता व तोच अखेर सरा झाला ! आशा जागच्या जागी राहिल्या ! रेल्वेचे शेअर जमविण्याकरिता त्यांनी ही जी सफर केली ती यशस्वी होण्याची स्पष्ट चिन्हें दिसत होती. विशेषतः, इंदुरास असता हे काम पूर्ण झाल्यासारखेच होते. आणि जलोदराने मार्गात अवचित गाठून त्यांना मृत्यूच्या स्वाधीन केलें नसते तर हेही घेतलेले काम यशस्वी झालेले पहाण्याचा योग त्यांना खास भाना असता. हरिभाऊंनी प्रचंड लेखनव्यवसाय केला.पण दिसूळ वाङ्मयाची झपाट्याने उत्पत्ति करणान्या कित्येक माणसांनी जे द्रव्य संपादले तितकेंहि द्रव्य हरिभाऊंना आपल्या अविनाशी वाङ्मयाने जोडता आले नाही. याचे कारण अर्थातच त्यांचा अनियमितपणा होय. अमुक पुस्तक समाप्त होऊन प्रसिद्ध होते केव्हां अशी वाचकांनी प्रतीक्षा करीत बसावें आणि हरिभाऊंनी शेवटची एकदोन प्रकरणे लिहिण्यास प्रसंगी वर्षानुवर्षे लावल्यामुळे त्याच्या त्या प्रतीक्षेचा हिरमोड हावा असे होत असे. रेल्वेचे काम जुळून आल्यास वार्धक्यात पैशाची ददात मिटून आपल्याला निश्थितपणे आपला व्यवसाय चालविता येईल अशीही त्याची या कामांत पडण्याची एक दृष्टि असावी. ती सफल होण्याचाही मुमार दिर ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. पण लागला होता. पण वर सांगितल्यामुळे एका असाध्य रोगाने त्यांच्यावर अचानक साप टाकल्यामुळे त्यांच्या सर्व आशांची इमारत एकदम कोरुळून पडली ! या स्थितीतच ते औषधोपचाराकरिता मुंबईस आले. त्या वेळी मतदान- कमिटीचे साक्षी घेण्याचे काम तेथे चाल होते. हरिभाऊंच्या हातापायास सूज माली असता व त्याची प्रकृति अगदी क्षीण झाली असाही ते या कमिटीपुढे साक्षीकरिता गेले होते. पहिल्या दिवशीची अपूर्ण राहिलेली साक्ष पूर्ण करण्या- करिता दुसऱ्या दिवशीही ने कमिटीपुढे जाणार होते. पण डॉक्टरनी प्रतिबंध केल्यामुळे त्यांचा निरुपाय झाला. जलोदरासारख्या असाध्य रोगाच्या तावडीत आपण सोपडलो आहोत ही जाणीव असताही त्यानी याप्रमाणे आपल्या कर्तव्यात चूक न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी हे पाहून त्यांच्याबद्दल कोणा- सही कौतुक वाटल्यावाचून रहाणार नाही. डॉ. नानासाहेब देशमुख, डॉ. भाजेकर, डॉ. भडकमकर प्रभृति मुंबईच्या नामांकित डॉक्टरानी त्याची प्रकति पाहिली व त्याना बरे करण्याकरिता सर्वानी आपली कसोशी केली. जेथे रोगच असाध्य तेथें मानवी प्रयत्नाची काय मात्रा चालणार ? स्थिरता कायम असे. आपली इहलोकची वस्ती आटपत आली ही गोष्ट हरिभाऊंसारख्या चाणाक्ष माणसास, विशेषत: आपल्या कादयन्यातून मृत्यूचे व त्यापूर्वीच्या स्थितीचे प्रसंग हुबेहुब डोळ्यांपुढे उभे करणान्या त्यांच्यासारख्या कांदबरीकारास लोकांनी सागावयास पाहिजे होती असे नाही. भेटीला येणारे जाणारे गृहस्थ तर त्यांना उलट धरिच देत होते. पण त्यात काही तथ्य नव्हेत हे हरिभाऊ पूर्ण जाणून होते. तरी त्यांची शांति केव्हाही ढळली नाही. आप्तसंबंधी माणसें भोवताली असत, त्याना निष्कारण भीति वाटू नये किंवा ती घाबरूं नयेत याबद्दलच उलट उलट ते खबरदारी घेर। समाचा राला येणान्या माणसांची सकाळपासून सायंकाळपर्यंत एकसारखी गर्दी उडून जात असे. कोणी काही समाधानाच्या गोष्टी सांगत, कोणी काही उपाय सुचवीत, कोणी अमक्या ठिकाणी या रोगावर हमखास उपाय होतो म्हणून सांगत, तर कोणी हरिभाऊंच्या स्थितीकडे पाहून सचिंत व स्तब्ध असे बसत. तरी बरि- माऊंच्या मनाची स्थिरता कायमच असे ।
आयुष्याची अखेर. १०७. ग्रंथ हेच खरे आप्तेष्ट. अशा प्रकारे सुमारे दीड दोन महिने त्यानी मृत्युशय्येवर काढले. अशा प्रसंगीही जर कोणाच्या सानिध्याने त्यांना विशेष आनंद झाला असेल तर तो पुस्तकांच्या सानिण्यानेच होय. आसन्न स्थितीत असलेला मनुष्य आमाइष्टांपैकीच मला अमक्याला भेटावयाच, मला तमक्याला भेटावयाचे अशी इच्छा प्रदर्शित करुन त्याना पत्र पाठवावयास किंवा तारा करावयास सांगतो. पण हरिभाऊंचे खरे आप्तइष्ट त्यांचे आवडते ग्रंथच होते. त्यांनाच ते आपल्या भेटीस प्रेमाने बोलवात, आणि त्याच्याच दर्शनात मुख मानीत । "प्राणव्यसनीही " त्याचे हे विद्येचे व्यसन अखंड राहिले हे पाहून समोर उभ्या असलेल्या मृत्यूसही विस्मय बाटल्यावाचून राहिला नसेल ! नवीन पुस्तके आणून वाचण्यासारखी त्याची स्थिति नव्हती. तरी पुस्तके आणण्याचा त्याचा लोभ अगदी अखेरपयत सुटला नाही. एखाद्या पुस्तकाची पानेच फाड, एखाद्यास पुष्टिपत्र घाल, एखायावरून नुसताच हात फिरीव किंवा एखाद्यास प्रिय अपत्याप्रमाणे पोटाशी कवटाळून धर असा त्यांचा एकसारखा क्रम चाललेला असावयाचा ! आपल्या प्राणापेक्षाही प्रिय अशा आपल्या मुलाच्या तोंडावरून हात फिरविण्यात वत्सल पित्याला जे सुख वाटते तेंच सुख पुस्तकावरून हात फिरविण्यात हरिभाऊंना वाटे । रा.ग्दाळकर हे यासंबंधाने लिहिताना म्हणतात:-मी एकदा त्याना विचारले, "तुम्हाला या पुस्तकाकडे नुसते पहात बसण्यात काय मौज वाटते १" तेव्हा ते प्रेमाई स्वराने म्हणाले, "मला हे जे शेकडो व्यवहारी लोक भेटावयास येतात त्याच्यामुळे जो त्रास होतो, तो या माझ्या आप्ताकडे पाहून पार नष्ट होतो. माझे हे अत्यंत जिवलग स्नेही आहेत. आणि सापतच्या माझ्या स्थितीत याचा नुसता सहवासही मला फार मुसाचा वाटतो !" मृत्युशय्येवरील वाग्विहार. इको रोगावर उपाय चाललेच होते. दुखण्याला कधीं चढ मावा,कधी उतार दिसावा, असा आशे-निराशेचा अगडा चालू होता. तरी हरिभाऊंची शांत वृत्ति मात्र अचल होती. अपूर्ण क दंब-यांची अवशिष्ट कथानकें त्यांच्या एकसारखी डोक्यात घोळत होती. ही आता आपल्या हातून पूर्ण होणार नाहीत असे एकी- कडे त्यांच्या मनास वाटन त्यांना अर्थातच दुख होई ! अशाच स्थितीत त्यांनी ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. हा म्हणून सांगून येणान्या जाईल रात्र, मग होइल ती सकाळ, होऊन रव्युदय, पंकजही फुलेल; ही आस भुंग धरि त्यांतचि कोंडलेला हा ! हा ! तशांत उपडी गज पद्मिनीला! श्लोक एके दिवशी केला. यावरून आपले मनोरथ जागच्या जागी ठेवून आपण जाणार, याबद्दल त्यांच्या मनात कोणताही संशय राहिला नव्हता असे स्पष्ट दिसून येते.तरी सुद्धा समाचारास येणाऱ्या माणसांस हरिभाऊंना समाधानाच्या गोष्टी सांगण्याचा केव्हाही प्रसंग येत नसे. उलट हरिभाऊच 'माझे बरे आहे' जाणान्या अनेक माणसाशी दुसन्याच गोष्टी बोलत. एके दिवशी सकाळी त्यांचे एक स्नेही त्याच्याजवळ बसले होते. हे आतां बराच वळपर्यंत आपली चांगली करमणूक करतील, असें हरिभाऊंना वाटत होते. इतक्यात दुसरे एक गृहस्थ येऊन त्या मित्रास घेऊन गेले. ते गेल्यानंतर हरिभाऊंनी एक आर्या लिहून ठेवली. स्नेही आल्याने याची आपल्याला करमणक होईल अशी आशा आपल्या मनांत उत्पन्न झाली इतक्यांत आर्थरदर्शनलोलुप शंकर गेला गणूस घेऊन ", असें झाल्यामुळे आपणांस सिन्नता कशी आली हे त्यांनी या आर्यंत वर्णन केले होते. मजबरोबर चला. म्हणून मृत्यु हाताने खूण करतो आहे अशा स्थितीत सुद्धा आपले विचार पद्यमय करण्याइतकी स्थिरता त्यांच्या ठिकाणी दिसावी, यावरून सरस्वतीचे ते एकनिष्ठ भक्त होते हैं जसे सिद्ध झाले तसें त्र त्यांची मनःशांति एखाद्या विदेही माणसासही भूषणीभूत होण्यासारखी कशी होती हेही उत्कृष्ट रीतीने दृष्टोत्पत्तीस आलें ! अखेर ता. 3 मार्च स. १९१९ रोजी ते पुण्यास आले. येता येता गाडीतच त्यांची अत्यवस्थ स्थिति होऊन ते कसे बसे आनंदाश्रमांत येऊन पोहोचले. दुपारची ऐन एक वाजण्याची वेळ ! प्ररुति अगदी तुटलेली आणि त्यांत उन्हाच्या वेळी गाडीची दगदग झालेली! घरी येऊन पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांच्या तोंडा- तून रक्ताच्या गुळण्या येऊ लागल्या. बरोबर डॉ. रेळे आले होते. त्यांनी योग्य औषधोपचार करून त्याना थोडीशी स्वस्थता आणली,तरी गुळण्या चालूच होत्या. आता आपण काही तासांचेच सोबती आहोत ही गोष्ट ध्यानात आल्या- बरोबर पुढील तीन चार तासांत आपल्या पत्नीसंबंधाने त्यांना जी काय व्यवस्था करावयाची होती ती त्यांनी मोठ्या शांतपणाने केली!
आयुष्याची अखेर १०९ देहावसान ! ही त्याची शात प्ररुति अगदी निधनकालापर्यंत कायम होती. डॉ. रेळे हे तिहींच्या एक्सप्रेसनें मुंबईस परत गेल्यावर डॉ. शिखरे, डॉ. व्ही. सी. गोखले, व डॉ. एन. एल. रानडे हे हरिभाऊंच्या शुश्रूषेकरितां अगदी अखेरपर्यंत होते, या जगांत आता आमचे किती तास उरले आहेत ? " असे त्यांनी डॉ. शिखरे यांना विचारले, तेव्हा 'तसें निश्चित करें सांगता येईल, कदाचित् आपण आणखाही काही दिवस जगाल.' असे त्यानी उत्तर दिले. सर्व प्रेमपाश सोडून इहलोकचा अखेरचा निरोप घेण्याची वेळ संनिध आला असताही हरिभा- ऊंनी दाखविलेली ही शाति पाढून डॉ. शिखरे यांनाही त्याच्याबद्दल विशेष आदर वाटला. व तो बाहेर येऊन त्यानी आपल्या व्यवसायबंधुंजवळ व्यक्तही केला, आणि त्यानतर एक तासाने हरिभाऊंचे देहावसान झाले ! घरांत प्रवेश केल्या- पास्न सहाच तासात ते आपल्या परिवारास दुःखात सोडून परलोकी गेले ! सर्व इष्टानिष्ट व्यापार करणारा आत्मा आत कायम आहे तोपर्यंत कोणा- चीही माती कोणालाही जड नाही, परंतु एकदा का पिजन्याचे दार उघडून करारी होणान्या सुंदर पाखराप्रमाणे तो आत्मा अदृश्य झाला म्हगजे मग ते शरीर आईचे असो, बापाचे असो, भावाचे असो, बायकोचे असो किंवा आणखी कोणाचे अतो, ते देन ताससुद्धा दृष्टीसमोर ठेवणे मोठ दुःसह होते." यात्यानीच वर्णिलेल्या वस्तुस्थितीप्रमाणे त्याच्याही स्थूल देहाची व्यवस्था लागली ! तरुण पिढीला अनेक प्रकारे बोधक आणि मार्गदर्शक अशा हरिभाऊंच्या वैचि. ज्यमय चारित्र्याची ही केवळ रूपरेखा दर्शविली आहे. हरिभाऊंच्या आयुष्यक्रमां- तील विशेष गुग झटला ह्मणने त्यांचा जबर विद्याव्यांसंग हा होय. विद्वत्तेसंबंधाने त्याचा एवढा मोठा अधिकार असताहि त्यानी आपली विनयशीलता केव्हाही सोडली नाही. त्यांच्या विनयशील वृत्तीचे थोडक्यांत वर्णन यावयाचे ह्मणजे त्यांचा सहवास करतांना थोर व्यक्तींना ठेंगणे होण्याचे कारण नसे, व लहान माणसांना उंच व्हावे लागत नसे. स्वताची जाहिरात देणे हे त्यांच्या स्वभावाला कधीहि आवडत नसे. प्रेमळपणा हा यांच्या अंगच्या सर्व गुणांचा कंठमाणच होय. या त्याच्या गुणामुळे ते सहस्त्रावधि लोकांचे विश्रामस्थान बनले होते. हरि- भाऊ हा समास सोडवावयास सांगितले तर तो कर्मधारयाप्रमाणेच सोडवावा लागेल ! त्यांच्याशी सहवास घडण्याचा सुयोग आलेल्या माणसांना ते आपल्या !
ह. ना. आपटे यांचे संक्षिप्त चरित्र. मावाप्रमाणेच वाटत. त्यांनी आपल्या मुस्वभावाने, प्रेमळपणाने, शांतवृत्तीने व प्रमावशील लेखनसामर्थ्याने हजारो माणसांची मनें आपल्याकडे आकषून घेतली होती. तरुग पिढीला त्यांचा आयुष्यक्रम आदर्शवत् होऊन त्यांच्यामध्ये घर सांगितलेल्या गुणाचे बीजारोपण होवो व हरिभाऊंचे प्रतिमासंपन्न ग्रंथ त्यांच्या मध्ये लेखनव्यवसायायद्वल स्फूर्ति उत्पन्न करोत ! " मृत्यु येऊन व्यक्तीचे शरीर पतन पावते. त्याचा आत्मा आणि त्या आम्याचे उन्नत विचार वरवरच जातील. कधी त्यापासून अवनति हे.णार नाही " याच न्यायाने, हरिभाऊंनी आपल्या प्रतिभासामथ्याने ज्या विचारांचे बीजारोपण केले आहे, त्या विचारांचा एक- सारखा विकास होत जाऊन ते पूर्णतेच्या मार्गाप्रन जावोत । समाप्त.
कै. हार नारायण आपटे यांनी लिहिलेले ग्रंथ. ... ... ... ... ... ... ... ... .. ... ... ... ... ३. मी. ... ... ऐतिहासिक कादंबऱ्या. किं० रु० आ०पै. १. उषकाल. (नं. १)... २. गड आला पण सिंह गेला. (नं. २) ३. रूपनगरची राजकन्या (न..)... ४. चंद्रमुप्त (नं.)... ५. वज्राघात. (नं. ५) ... ६. सूर्योदय (नं. ६) ७. केवळ स्वराज्यासाठीं। (न. ७) २- ८. सूर्यग्रहण ( नं. ८) सामाजिक कादंबऱ्या. “१. आजकालच्या गोष्टी [ मधली स्थिति ] (नं..) २--0- २. पण लक्ष्यांत कोण घेतो ! (नं. २) २--८--0 ( न.६) २--८-० ४. यशवंतराव खरे (नं. ७) ५. गणपतराव (अपूर्ण) (नं. ९) १-४-० नाटके व प्रहसनें. १. संगीत संत सखूबाई. २. संगीत पिंगला नाटक. ३. भासकवीच्या नाटककथा ०-१२-० गोष्टी. १. स्फुट गोष्टी, भाग १, २, ३, ४. प्रत्येकी २. कसे दिवस गेले ! ! (प्लेगच्या कहरातील एक गोष्ट ) खालील पुस्तकें संपलेली आहेत. लवकरच छापून तयार होतील. १. भयंकर दिव्य ! (नं. ३) २. जग हे असें आहे ! (नं. ४) ३मायेचा बाजार. (नं. ५) चाणाक्षपणावा कळस. (नं. ८). ता. १131१९२२. मॅनेजर, आर्यभूषण प्रेस, पुणे सिटी. ... ... ... ... ... ... ... १ ...
संग्राह्य व वाचनीय पुस्तकें. ... ... ... ... ... ... , सार्थवाग्मट डॉक्टर गर्देकत रु. आ. पे १ श्रीतुकाराममहाराज यांचा मुळ श्लोक, भाषांतर, टीपा सांप्रदायिक गाथा... ...3-.-. व सूची यांसह. २ एकनाथी भागवत २ भारतीय ज्योतिःशाख अ. ३ जैमिनीअश्वमेध ४ पांडवप्रताप थवा भारतीय ज्योतिषाचा ५ रामविजय ०-१२-० इतिहास (शं. बा. दीक्षित.)3-7-. ६ भक्तिविजय ०-१२-० ३ सरदार परशरामभाऊ पट- ७ हरिविजय वर्धन यांचे चरित्र व पेशवा ८ दासबोध मोठा ईतील धामधुमीचा देखावा..-१२-. ९ दासबोध मध्यम ... विलायतचा प्रवास भाग १० दासबोध गुटका (कापडी) १-- दुसरा (रा. भ. पावगीरुत.)१-.-. ११ गुरुचरित्र मोठे ५ पानिपतचा दुर्दैवी मोहरा. १-०-० . १२ श्रीगुरुचरित्र धाकटें ६ कुवलयपूरची राणा कुमद्वती १-०-० १. श्रीगुरुचरित्र रे० गुटका . जर्मनीतील लोकशिक्षण ०-१२-० ११ सतलीलामृत १५ शिवलीलामृत ८ वधूवरपत्रिकासंमेलन आ- १६ रुक्मिणीस्वयंवर मि कोकणस्थ व कन्हाडे १७ श्रीमद्भगवद्गीता यांची गोत्रावळी. १८ त्रिकालसंध्या ऋम्वेदी ९ ना. गो. रु. गोखले चरित्र .--. १९ त्रिकालसंध्या हिरण्याकेशी..-.-1 .. राष्ट्रीयसमा व तिची वाढ २० श्रीतुकाराम चरित्र अध्यक्षांचे तीस फोटोसह. .-८-. २१ त्रिसुपर्ण सार्थ ... ... ... ... . ही पुस्तकें पुणे व मुंबई येथील सर्व बुकसेलर्सकडे मिळतील. मॅनेजर-आर्यभषण प्रेस, पणे.
No text on this page.
KKKKKKKKK KAR 兴《《《《《《《《《《《《《《《《《《《《《《《条 ह. ना. आपटे यांच्या प्रसिद्ध न झालेल्या कादेबन्या लवकरच छापून तयार होतील. सामाजिक ऐतिहासिक १ आजच. १मध्यान्ह २ कर्मयोग. २ कालकूट. KAKKREKKKAKAKKARERRRRRRK- ------ Sures- In the Press The Wilson Philological Lectures Delivered in 1915 ON MARATHI LANGUAGE, its aources & development. BY H. N. APTB. --- -- - --
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.