Library
Saara~tha Upanishhatsan'graha Bhaaga Sahaava
Front matter
THE BOOK WAS DRENCHED
UNIVERSAL
LIBRARY
OU_184414
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
No text on this page.
|| श्री॥
सार्थ उपनिषत्संग्रह.
भाग सहावा.
संपादक
हरि रघुनाथ भागवत, बी.
ए.
आवृत्ति पहिली.
शके १८४४
सन १९२२.
--------
अष्टेकर कंपनी, पुणे.
किंमत एक रुपया.
CHECKED 19
Printed by Mr. A. S. GOKHIALE .t his 6. VIJAYA PRIy”
570 Shaniwar Peth, Poona City,
IVD
Published by Mr. II R BA ALAT, at 620) Sadushua Irth
Poona City, for THE ASHTEKAK COMPANY
प्रस्तावना. सार्थ उपनिषत्संग्रहाचा हा सहावा भाग. पहिल्या पांच भागांत सर्व प्रमुख उपनिषदें येऊन गेली. राहिलेल्या उपनिषदांपैकी जी महत्वाची आढळली त्यांचे संन्यासोपनिषदें आणि योगोपनिषदें असे दोन वर्ग करून संन्यासोपनिषदांचा हा सहावा भाग केला आहे. याप्रमाणे योगोपनिषदांचा सातवा भाग करून मराठी भाषांतर प्रका- शित करण्याचा विचार आहे. म्हणजे मग सार्थ उपनिषत्संग्रहाचे काम पुरे होईल. या सहाव्या भागांत एकंदर आठ उपनिषदांचा समावेश केला आहे. उपनिषदें म्हटली म्हणजे संन्यासपरच असावयाची. पण त्यांतल्या त्यांत संन्यासाश्रमावर विशेष जोर देणारी आणि मागील भागांत येऊन न गेलेली अशी ही उपनिषदें आहेत. ही सर्व उपनिषदें अथर्ववेदाची आहेत. अर्थात् ही प्रमुख उपनिषदांइतकी प्राचीन नव्हेत. तथापि प्राचीन उपनिषदांतील विचारांचा ओघ यांमध्ये पुढे तसाच चालविलेला आहे हे पुढील पृष्ठं वाचली असतां वाचकांच्या लक्षात येईल. हे विचार वाचावे, पुनः पुनः वाचावे, यांचे मनन करावें, म्हणजे सर्वसारोपनिषदांत सांगितल्याप्रमाणे "आत्मा ईश्वरः, अनात्मनो दहादीनात्मवनाभिमन्यते सोऽ- भिमानः आत्मनो बंधः, तन्निवृत्तिर्मोक्षः। अशी ओळख पटून अहंकार नष्ट होईल व उपनिषत्कारांच्या वचनाप्रमाणे मोक्षाची प्राप्ति होईल. पुणे, रविवार, कार्तिक व. ८ शके १८४४. हरि रघुनाथ भागवत. " crv.}
अनुक्रमाणिका.
उपनिषदाचे नांव.
पृ.
७
M
१३
अमृतबिदु उपनिषत्
आरुणया उपनिषत
आत्मोपनिपत
गोपनिपत
प्राणाग्निहोत्रोपनिपत्
सर्वसारोपनिषत्
परमहस पनिपत्
ब्रह्मोपनिषत्
१२
-१५
१६-२५
२६-३४
३५-- ४२
...
४४---५१
सार्थ उपनिषत्संग्रह. भाग सहावा. अमृतबिंदु उपनिषत् ॥ :: - ॐ भद्रं कर्णेभिः इति शान्तिः॥ मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं चाशुद्धमेव च ॥ अशुद्धं कामसंकल्पं शुई कामविवर्जितम् ॥१॥ मन दोन प्रकारचे सांगितले आहे, शुद्ध आणि अशुद्ध. इच्छा- युक्त तें अशुद्ध आणि इच्छारहित ते शुद्ध. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः॥ बंधाय विषयासंगं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥२॥ मनुष्यांच्या बधाचे आणि मोक्षाचे कारण मनच आहे. विषयांचे ठिकाणी आसक्ति असलेले मन बंधाला कारण होते. विषयरहित मन मोक्षाला कारण होते. यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते॥ अतो निर्विषयं नित्यं मनः कार्य मुमुक्षुणा ॥३॥ ज्या अर्थी हे मन विषयरहित झाले असता मुक्ति होते, त्या अर्थी मोक्ष इच्छिणाराने आपले मन नित्य विषयरहित करावें. .
२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. निरस्तविषयासंगं संनिरुद्ध मनो हृदि ॥ यदाऽऽयात्यात्मनो भावं तदा तत्परमं पदम् ॥४॥ विषयांच्या इच्छेनें रहित असें मन हृदयामध्ये निरुद्ध होऊन जेव्हां आत्मभाव पावेल तेव्हां ते परम पद प्राप्त झाले असे समजावे. 'आत्मनो भाव' आत्मभाव-स्वस्वरूपाची प्राप्ति, म्हणजे जीव व ब्रह्म यांचे एकत्व. तावदेव निरोद्धव्यं यावददि गतं क्षयम् ॥ एतज्ज्ञानं च ध्यानं च शेषो न्यायश्च विस्तरः॥५॥ हृदयाचे ठिकाणी क्षय पावेपर्यंत मनाचा निरोध करावा. हेच ज्ञान आणि हेच ध्यान. याहून इतर तो केवळ वादविवाद आणि पाल्हाळ समजावा. नैव चिंत्यं न चाचित्यं न चिंत्यं चिंत्यमेव तत् ॥ पक्षपातविनिर्मुक्तं ब्रह्म संपद्यते तदा ॥६॥ हे परम पद म्हणजे इंद्रियांना सुखद अशा प्रकारचे समजू नये, किंवा तद्विरुद्ध असेहि समजू नये. या स्थितीप्रत आल्यावर मन पक्षपातरहित म्ह० सर्वत्र एकरूप होत्साते ब्रह्मरूप होते. स्वरेण संधयेद्योगमस्वरं भावयेत्परम्॥ अस्वरेणानुभावेन भावो वाऽभाव इष्यते ॥७॥ (प्रथम) अकारादि मात्रांनी ॐकाराचे ध्यान करावे, नंतर मानांनी रहित असें ॐकाराचें ध्यान करावे. म्ह० मात्रारहित ॐकारध्यानाच्या अनुभवाने अविधेचा अभाव. क ब्रह्माचा भास बात
अमृतबिंदु उपनिषत्.
.३
होतात (अथवा भाव म्हणजे सत्य ब्रह्म कोणते, आणि अभाव
म्हणजे अविद्या अथवा माया कोणती याचे यथार्थ ज्ञान होते).
तदेव निष्कलं ब्रह्म निर्विकल्पं निरंजनम् ॥
तद्ब्रह्माहमिति ज्ञात्वा ब्रह्म संपद्यते ध्रुवम् ॥८॥
ते म्हणजे अविधेच्या मिथ्यात्वाचे ज्ञान आल्यावर प्राप्त अथवा
ज्ञात होणारे तेच ब्रह्म होय. ते निष्कल म्हणजे अवयवशून्य,
निर्विकल्प म्हणजे भेदशून्य आणि निरंजन म्हणजे मालिन्यरहित
आहे. 'तें ब्रह्मच मी' असे ज्ञान झाल्याबरोबर ज्ञाता शाश्वत ब्रह्म-
रूप पावतो.
निर्विकल्पमनंतं च हेतुदृष्टांतवर्जितम् ॥
अप्रमेयमनादिं च यज्ज्ञात्वा मुच्यते बुधः ॥९॥
भेदरहित, अतरहित, तके व शान्त यांच्या पलीकडचें, अप्रमेय
आणि अनादि असें ब्रह्म आहे. याचे ज्ञान होतांच ज्ञाता मुरू होतो.
न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः॥
न मुमुक्षुन वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥१०॥
वास्तविक देहादिकांचा नाश नाही, उत्पत्ति नाही; कोणी बद्ध
नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही, मुक्त नाही. हे ज्ञान हेच पर-
मार्थतत्त्व.
एक एवाऽऽत्मा मंतव्यो जाग्रत्स्वप्नसुषुप्तिषु॥
स्थानत्रयव्यतीलस्य पुनर्जन्म न विद्यते ॥११॥
१
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा.
जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीनहि अवस्थांमध्ये एकच आत्मा
बाहे असें जाणावें. या तीन अवस्थांच्या पलीकडे जो गेला त्याला
पुनः जन्म (आणि मरण) नाही.
एक एव हि भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः॥
एकधा बहुधा चैव दृश्यते जलचंद्रवत् ॥१२॥
सर्व भूतांचा एकच आत्मा निरनिराळ्या भूतांचे ठिकाणी राहि-
लेला आहे. जलाचे ठिकाणी जसा चंद्र तसा एकच असलेला हा
अनेक प्रकारे दिसतो.
घटसंवृतमाकाशं नीयमाने घटे यथा ॥
घटो नीयेत नाकाशं तथा जीवो नभोपमः ॥१३॥
आकाश घटामध्ये असते. घट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
नेला असता तो घट नेला जातो, आकाश नेले जात नाही. त्याप्रमाणे
जीव आकाशासारखा आहे.
घटवद्विविधाकारं भिद्यमानं पुनः पुनः॥
तद्भग्नं न च जानाति स जानाति च नित्यशः॥१४॥
घटाप्रमाणे निरनिराळे आकार वरचेवर फुटले जात असता ते
फुटले असे त्यांतलें आकाश जाणीत नाही. परंतु जीव मात्र (आकाशा-
प्रमाणे कायम असला तरी) नित्यशः (शरीरांचे निरनिराळे आकार)
जाणतो.
शब्दमायावृतो नैव तमसाऽऽयाति पुष्करे ॥
भिन्ने तमसि चैकत्वमेक एवानुपश्यति ॥१५॥
अमृतबिंदु उपनिषत्. ५ ज्याप्रमाणे मनुष्य अंधकारामुळे नियमित स्थली येत नाही, स्याप्रमाणे शब्दादि विषयरूपी मायेने आच्छादिलेला जीव त्या माया- रूपी तमामुळे ब्रह्माचे ठिकाणी येत नाही. तमाचा नाश झाल्या- बरोबर (सर्वत्र) तो एकच उरल्याने ब्रह्माशी एकत्व पहातो. 'शब्दमायावृत':="केवळशब्दरूपी, वस्तुतः नव्हे, अशी माया त्या मायेने गुरफटलेला' असाहि अर्थ होईल. 'पुष्कर' याचा एक अर्थ स्थान अथवा स्थलविशेष; दुसरा अर्थ पुष्कल ब्रह्म. शब्दाक्षरं परं ब्रह्म तस्मिन्क्षीणे यदक्षरम् ॥ तद्विद्वानक्षरं ध्यायेद्यदिच्छेच्छांतिमात्मनः॥१६॥ ॐ अक्षर हे पर ब्रह्म होय. त्यांतलें शब्दत्व गल म्हणजे अक्षर [अविनाशी] ब्रह्मच रहाते. जर स्वतःला शांति मिळावी अंशी इच्छा असेल तर शहाण्या माणसाने त्या अ-क्षर ब्रह्माचें ध्यान करावें. द्वे विये वेदितव्ये तु शब्दब्रह्म परं च यत् ॥ शब्दब्रह्मणि निष्णातः परं ब्रह्माधिगच्छति॥१७॥ (ॐकाररूपी) शब्दब्रह्म आणि शब्दातीत परब्रह्म अशा दोन प्रकारच्या विद्या जाणल्या पाहिजेत. शब्दब्रह्माचे पूर्ण ज्ञान झालें म्हणजे परब्रह्म प्राप्त होते. ग्रंथमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञानतत्परः॥ पलालमिव धान्यार्थी त्यजेद्ग्रंथमशेषतः॥१८॥ ब्रह्माचे ज्ञान आणि ब्रह्माचा साक्षात्कार यांचे ठिकाणी बत्पर अशा बुद्धिमान् पुरुषानें ग्रंथाचे म्हणजे शब्दब्रह्माचें ज्ञान करून ar सार्थ उपनिषत्सग्रह-भाग सहावा. घेतल्यानंतर, त्याचा सर्वस्वी त्याग करावा-धान्यार्थी मनुष्य (धान्य घेतल्यावर) भुसा टाकून देतो तद्वत्. गवामनेकवर्णानां क्षीरस्याप्येकवर्णता ॥ क्षीरवत्पश्यते ज्ञानं लिंगिनस्तु गवां यथा ॥१९॥ गायी अनेक रंगांच्या असल्या तरी त्यांच्या दुधाचा रंग एकच नसतो. त्याप्रमाणे शहाणा मनुष्य-जशा गायी तशा अनेक शाखा असलेल्या वेदाचे-ज्ञान हे दुधाप्रमाणे (एकाच प्रकारचे सर्वत्र भाहे असें) पहातो. घृतमिव पयसि निगूढं भूते भूते वसति विज्ञानम् ॥ सततं मंथयितव्यं मनसा मंथानभूतेन ॥२०॥ दुधामध्ये जसें लोणी त्याप्रमाणे भूतमात्राचे ठिकाणी आत्मज्ञान गूढरूपाने राहिलेले आहे. मनोरूपी रवीने त्याचे सतत मंथन केलें पाहिजे. ज्ञाननेत्रं समादाय उस्टेडह्निवत्परम् ॥ निष्कलं निश्चलं शांतं तब्रह्माहमिति स्मृतम् ॥२१॥ ज्ञानरूपी अग्नि हाच नेत्र घेऊन तें परम [आत्मतत्त्व] बाहेर काढावें. 'निष्कल, निश्चल व शान्त असें ब्रह्म मीच' हे तें आत्म- तत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वभूताधिवासं यद्भूतेषु च वसत्यपि ॥ सर्वानुग्राहकत्वेन तदस्म्यहं वासुदेवस्तदस्म्यहं वासु- देव इति ॥२२॥ जसरे
अमृतबिंदु उपनिषत्
ज्याच्या ठिकाणी सर्व भूतें रहातात, आणि जे सर्वावर अनुग्रह
करणारे असल्यामुळे सर्व भूतांचे ठिकाणी रहाते, असें वासुदेवरूपी
ब्रह्म मी आहे.
इति अथर्ववेदीया अमृतबिंदुपनिषत्समाप्ता ।।
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. आरुणेयी उपनिषत् ॥ ॐ भद्रं कर्णेभिरिति शान्तिः॥ ॐ आरुणिः प्रजापतेर्लोकं जगाम, तं गत्वोवाच केन भगवन्कर्माण्यशेषतो विसृजानीति । तं होवाच प्रजापतिः। तव पुत्रान्भ्रातृन्बंध्वादीशिखां यज्ञोपवीतं च यागं च सूत्रं च स्वाध्यायं च भूर्लोक-भुवर्लोक- स्वर्लोक-महर्लोक-जनलोक-तपोलोक-सत्यलोकं च । अतल-पाताल-वितल-सुतल-रसातल-तलातल-महा- तल-ब्रह्मांडं च विसर्जयेइंडमाच्छादनं च परिग्र- हेच्छेषं विसृजेच्छषं विसृजदिति ॥१॥ आरुणि ब्रह्मदेवाच्या लोकी गेला आणि त्याजकडे जाऊन म्हणाला-हे भगवन् , कर्माचा सर्वस्वी त्याग मी कसा करूं ? त्याला ब्रह्मदेव म्हणाला-तुझे पुत्र, भ्राते, नातलग वगैरे, शिखा, यज्ञो- पवीत, याग, यागसंबंधी ग्रंथ - (सूत्र), स्वाध्याय (वेद), भूर्लोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, व सत्य- लोक, हे लोक; तसेंच अतल, पाताल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि ब्रह्मांड ही सर्व सोडून द्यावी. दंड आणि वस्त्र एवढी घ्यावी व इतर सर्वाचा त्याग करावा. गृहस्थो ब्रह्मचारी वानप्रस्थो वा लौकिकाग्नीनुद- राग्नौ समारोपयेद्गायत्री च स्ववाचाग्नौ समारोपये- आरुणेयी उपनिषत्. दुपवीतं भुमावप्सु वा विसृजेत्कुटीचरो ब्रह्मचारी कु- टुंबं विसृजेत्पात्रं विसृजेत्पवित्रं विसृजेइंडांश्च लौकि- काग्नींश्च विसृजेदिति होवाच। अत ऊर्ध्वममंत्रवदा- चरेदूर्ध्वगमनं विसृजेत्रिसंध्यादौ स्नानमाचरेत्संधि समाधावात्मन्याचरेत्सर्वेषु वेदेष्वारण्यकमावर्तयेदुप- निषदमावर्तयेदुपनिषदमावर्तयेत् ॥२॥ गृहस्थ अथवा ब्रह्मचारी अथवा वानप्रस्थ जो जसा असेल तसा त्याने लौकिकाग्नीचा उदराग्नीचे ठिकाणी समारोप करावा. गायत्रीचा स्वतःच्या वाचारूपी अग्नीचे ठिकाणी समारोप करावा. जानवें भूमी- वर किंवा उदकांत टाकावे. कुटीचर संन्यासी असेल त्याने कुटुंब सोडावें, भिक्षापात्र टाकून द्यावें, वस्त्र टाकावे, दंड आणि लौकि- काग्नि टाकावे. यानंतर मत्ररहित वागावें, (स्वर्गादि) लोकांच्या प्राप्तीची इच्छा सोडावी. तिन्ही संध्यासमयी स्नान करावे. समाधी- मध्ये आत्म्याचे ठिकाणी संधी म्हणजे संयोग करावा. सर्व वेदांपैकी फक्त आरण्यके आणि उपनिषदें एवढींच म्हणावी. खल्वहं ब्रह्म सूत्रं, सूचनात्सूत्रं, ब्रह्म सूत्रमहमेव विद्वान् त्रिवृत्सूत्रं त्यजेद्विद्वान्य एवं वेद, संन्यस्तं मया संन्यस्तं मया संन्यस्तं मयति त्रिःकृत्वा। 'अभयं सर्वभूतेभ्यो' 'मत्तः सर्वं प्रवर्तते' 'सखा मा गोपायौजः सखा योऽसींद्रस्य वज्रोऽसि' इत्यनेन मंत्रेण कृत्वोज़ १० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. ब्रह्म वैणवं दंडं कौपीनं परिग्रहेत् औषधवदशनमाचरे- दौषधवदशनमाचरेत्, ब्रह्मचर्यमहिंसां चापरिग्रहं च सत्यं च यत्नेन हे रक्षतो ३ हे रक्षतो ३ हे रक्षत ३ इति ॥३॥ जगाचे सूत्र जें मी आहे. ज्यांत ओवलेले असते तें सूत्र. ब्रह्म हे (जगाचे) सूत्र आहे. ते मी जाणतों. जो हे ब्रह्म या प्रकारे जाणतो त्याने त्रिवृत् सूत्राचा म्हणजे तीन सुतांच्या यज्ञोपवी- ताचा त्याग करावा. 'संन्यस्तं मया' (=मी टाकले आहे) या मत्राचा तीन वेळा उच्चार करावा. 'सर्व भूतांना (मजपासून) अभय आहे' 'माझ्यापासून सर्व (जग) निर्माण होतें' असा तीनदां उच्चार करावा. 'तूं माझा सखा आहेस, माझें रक्षण कर, तूं सामर्थ्य आहेस, इंद्राचे वज्र तूं आहेस' या मंत्राने (हातांत) बांबूचा दंड उंच धरून कौपी- नाचा (म्हणज लंगोटीचा) स्वीकार करावा. खाणे औषधाप्रमाणे (अल्प) ठेवावें. ब्रह्मचर्य, अहिंसा, अपरिग्रह आणि सत्य ही तुम्ही यत्न पूर्वक संभाळा. कुटीचर, बहुदक, हंस आणि परमहंस असे संन्यासाचे एकाढून एक श्रेष्ठ असे चार प्रकार आहेत. कुटीचर संन्यासी स्वतःच्याच घरी राहून मुलाजवळ भिक्षा मागून खातो. अथातः परमहंसपरिवाजकानाम्। आसनशयनाभ्यां भूमौ ब्रह्मचारिणां मृत्पात्रं वाऽलाबुपात्रं वा, दारुपात्रं कामक्रोधलोभमोहदंभदोसूयाममत्वाहंकारानृतादी- आरुणेयी उपनिषत्. ११ नपि त्यजेद्वर्षासु ध्रुवशीलोऽष्टौमासानेकाकी यतिश्वरेत् द्वावेव वा चरेत् द्वावेव वा चरेत् ॥४॥ आतां परमहंस संन्यासी यांचे आचरण सांगतात--त्यांनी जमी- नीवरच बसले पाहिजे व शयन केले पाहिजे. ब्रह्मचारी तर सर्व संन्यासी असलेच पाहिजेत. माती अथवा भोपळा अथवा लाकूड यांचेच पात्र असावें. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, गर्व, मत्सर, ममत्व, अहंकार आणि असत्य भाषण यांचा त्याग करावा. पावसा- न्याचे चार महिने एका ठिकाणीं रहावें, बाकीचे आठ महिने एकटें हिंडावें, किंवा दोघांनी मिळून हिंडावें. खलु वेदार्थ यो विद्वान्सोपनयनादूर्ध्वं स तानि प्रा- ग्वा त्यजेत्पितरं पुत्रमग्न्युपवीतं कर्म कलत्रं चान्यद- पि। इह यतयो भिक्षार्थं ग्रामं प्रविशन्ति। पाणिपात्र. मुदरपात्रं वा। ॐ हि ॐ हि ॐ हीत्येतदुपनिष- दं विन्यसेद्विद्वान्य एवं वेद। पालाशं बैल्वमौदुंबरं दंडमाजनमेखलां यज्ञोपवीतं च त्यक्त्वा शूरो य एवं वेद। ताद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः। दिवी- व चक्षुराततम्। तद्विप्रासो विपन्यवो जागृवांसः स- मिंधते। तद्विष्णोर्यत्परमं पदमित्येवं निर्वाणानुशासनं वेदानुशासनं वेदानुशासनमिति ॥५॥ वेदाचा अर्थ ज्याला कळला त्याने उपनयनानंतर किंवा तत्पूर्वी देखील त्यांचा त्याग करावा-पिता, पुत्र, अग्नि, यज्ञो- १२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. पवीत, कर्म, भार्या, आणि इतर सर्वाचा. यतींनी (केवळ) भिक्षे- करितां गांवांत प्रवेश करावा. आपले हात किंवा आपले उदर हेच भिक्षापात्र समजावे. ॐ ॐ ॐ या उपनिषन्मंत्राचा सर्व शरीर- भागी न्यास करावा. जो याप्रमाणे जाणतो तोच ज्ञाता होय, पळस, बेल, अथवा औदुंबर यांचा दंड, तसेच अजिन म्ह०हरिणचमवस्त्र, मंखला आणि यज्ञोपवीत यांचा (ब्रह्मचारी यांनी संन्याससमयीं) त्याग करावा. याप्रमाणे जो जाणतो तोच शूर होय. "आकाशा- मध्ये सर्वत्र पसरलेल्या चक्षूप्रमाणे विष्णूचें तें परम पद ज्ञाते सर्वदा पहातात. क्रोधरहित व जागरूक होत्साते ज्ञाते ते विष्णूचे परम- पद प्रज्वलित ठेवतात. मोक्षासाठी वंदाने सांगितलेला उपदेश हा होय. इति अथर्ववेदीया आरुण्युपनिषत्समाप्ता ।।
आत्मोपनिषत्.
१३
आत्मोपनिषत् ॥
ॐ अथैवांगिराः। त्रिविधः पुरुषस्तद्यथा बाह्या-
त्माऽन्तरात्मा परमात्मा चेति । त्वगस्थिनखमांसरोमां-
गुल्यंगुष्ठपृष्ठीवंशनखगुल्फोदरनाभिमेढ़कटयूरुकपोल-
झवौ ललाटबाहू पार्श्वशिरोधमनिकाक्षीणि श्रोत्राणि
भवन्ति जायते म्रियत इत्येष बाह्यात्मा नाम ॥१॥
आगरा मुनि म्हणाले--पुरुष तीन प्रकारचा आहे, बाह्यात्मा,
अंतरात्मा आणि परमात्मा. त्वचा, अस्थि, हातांची नखें, मांस,
केस, बोटें, आंगठे, पाठीचा कणा, पायाची नखे, घोटे, पोट,
नाभि, लिंग, कंबर, मांड्या, गाल, भुवया, कपाळ, बाहु,
पार्श्व
(बाजू ,, मस्तक, शिरा, डोळे, कान, इत्यादि, आणि जें जन्म घेतें
व नाश पावतें तो बाह्यात्मा.
अथांतरात्मा नाम । पृथिव्यप्तेजोवाय्वाकाशेच्छाद्वे-
षसुखदुःखकाममोहविकल्पनादिभिः स्मृतिलिंगः उ-
दात्तानुदात्तहस्वदीर्घप्लुतस्खलितगर्जितस्फुटितमुदि-
तनृत्यगीतवादित्रप्रलयावजांभतादिभिः श्रोता घ्राता
रसयिता मंता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरुषः पुराणं
न्यायो मीमांसा धर्मशास्त्राणीति श्रवणघ्राणाकर्षणक-
मविशेषणं करोत्येषोंऽतरात्मा नाम ॥२॥
साथे उपनिषत्सग्रह-भाग सहावा.
,
,
आता अंतरात्मा- पृथिवी, आप, तेज, वायु, आकारा, इच्छा-
द्वेष, सुख-दुःख, काम, मोह, संशय (अथवा मिथ्याज्ञान), उदात्त
अनुदात्त, हस्व-दीर्घ-प्लुत स्वर अडखळत, मोठ्याने अथवा अर्धवट
बोलणे, आनंद, नृत्य, गाणे, वाजविणे, मूर्छा, जांभई, इत्यादि-
कांसंबंधाने ऐकणारा, वास घेणारा, स्वाद घेणारा, विचार करणारा,
जाणणारा, कर्ता, निवड
करणारा, आणि स्मरण ठेवणारा, तसेच
पुराणे, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र इत्यादिकांचे अध्ययन करणारा-
सारांश, ऐकणे, वास घेणे, ग्रहण करणे इत्यादि विशिष्ट कर्मे कर-
णारा जो पुरुष तो अंतरात्मा.
अथ परमात्मा नाम। यथाक्षरमुपासनीयः। स च
प्राणायामप्रत्याहारसमाधियोगानुमानाध्यात्मचिंतकं,
वटकणिका श्यामाकतंडुलो वालाग्रशतसहस्राविकरप-
नादिभिर्न लभ्यते नोपलभ्यते । न जायते न
म्रियते न शुष्यते न दह्यति न कंपते न भिद्यते न
च्छिद्यते निर्गुणः साक्षीभूतः । शुद्धो निरवयवात्मा
केवलः सूक्ष्मो निष्कलो निरंजनो निरभिमानः
शब्दस्पर्शरसरूपगंधवार्जितो निर्विकल्पो निराकांक्षः
सर्वव्यापी सोडचिंत्योऽवर्ण्यश्च पुनात्यशुद्धान्यपूतानि
निष्क्रियःसंस्कारो नास्ति संस्कारो नास्त्येष परमात्मा
पुरुषो नाम ॥३॥
आत्मोपनिषत्. १५ आतां परमात्मा वेदांत सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करावी. प्राणायाम, प्रत्याहार, समाधि वगैरे योगमार्गाने व ज्ञानयोगाने अध्या- त्मविचार करणाऱ्या मनुष्याला तो परमात्मा प्रकट होतो. वट- वृक्षाचे बी, श्यामाक तंडुलाचे बी, किंवा केसाच्या अग्राचा लक्षांश भाग यांहून तो सूक्ष्म आहे. म्हणून कर्मेंद्रियांनी त्याचे ग्रहण करणे शक्य नाही, वा ज्ञानेद्रियांनी त्याचे ज्ञान होणे शक्य नाही. तो जन्माला येत नाही, मरण पावत नाही, सुकविला जात नाही, दहन केला जात नाही, कंप पावत नाही, मोडत नाही, तुटत नाही. तो गुणरहित, सर्वाचा साक्षीभूत आहे. शुद्ध, अवयवरहित, एक, सूक्ष्म, विभागरहित, निष्कलंक, निरभिमान, शब्द-स्पर्श-रूप-रस गंध- रहित, निर्विकल्प, निरिन्छ, सर्वव्यापी, अचिंत्य, अवर्णनीय, जन्माने वा कर्माने अशुद्ध असतील त्यांना पावन करणारा असून निष्क्रिय आहे. अनादि असल्यामुळे त्याला संस्कार नाही. हाच परमात्मा, हाच पुरुष. टीप-या उपनिषदामध्ये आत्म्याचे वर्णन आहे प्रथमत शापाचद्र याने स्थूल शरीर हाच आत्मा अमें मांगून 7 रक्षा र हा अत्मा गरेर मागि- तले आणि इतके झाल्यावर सूक्ष्मान सूक्ष्म जो परमात्मा तोच आत्मा म्हणजे जीवात्मा असे सांगितले. इति अथर्ववेदीया आत्मोपनिषत् ॥
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. गर्मोपनिषत् ।। हे अथर्ववेदापैकी एक उपनिषत् होय. याला 'अमृतगोपनिषत्' असेहि नांव आहे. ॐ भद्रं कर्णेभिः, सह नाववतु इति शान्तिः॥ ॐ पंचात्मकं पंचसु वर्तमानं षडाश्रयं षड्गुणयोगयुक्तम्॥ तत्सप्तधातु त्रिमलं द्वियोनि चतुर्विधाहारमयं शरीरम् ॥१॥ पंच महाभूतांचे बनलेलें, शब्दादि पांच विषयांचे ठिकाणी स्थित, सहा रसांचे आश्रयस्थान, सहा गुणांच्या संयोगाने युक्त, सात धातु, तीन मल, दोन योनि असलेले आणि चतुर्विध आहार- मय असे हे शरीर आहे. भवति पंचात्मकमिति कस्मात् ? पृथिव्यापस्तेजो वा- युराकाशमिति । अस्मिन्पंचात्मके शरीरे का पृथिवी का आपः किं तेजः को वायुः किमाकाशम् ? तत्र य- कठिनं सा पृथिवी, यद्रवं तदापो,यदुष्णं तत्तेजो, यत्संचरति स वायुः,यत्सुषिरं तदाकाशमित्युच्यते।तत्र पृथिवी नाम धारणे, आपः पिंडीकरणे, तेजो रूपद- र्शने वायुयूंहने, आकाशमवकाशप्रदाने । पृथुस्तु ॥ , १७ गर्भोपनिषत्. श्रोत्रे शब्दोपलब्धौ, त्वक्स्पर्श, चक्षुषी रूपे, जिह्वा रसने, नासिकाऽऽघ्राणे । उपस्थश्चानंदने - पानमुत्सर्गे बुद्धया बुध्यति मनसा संकल्पयति वाचा वदति । पडाश्रयामिति कम्मात् ? मधुराम्ललवणतिक्तकटु- कषायरसान्विदते । (षड्गुणयोगयुक्तं च कस्मात् ?) षड्जर्षभ- गांधारमध्यमपंचमधैवतनिषादाश्चेति । इष्टानिष्टा शब्दसंज्ञाप्रणिधानादशविधा भवन्ति ॥२॥ पंचात्मक कसे ? [उत्तर-] पृथिवी, आप, तेज, वायु व आकाश यांचे. अशा या पंचभूतात्मक शरीरांत पृथिवी कोणती, आप कोणते, तेज कोणतें, वायु कोणता आणि आकाश कोणते ? [उत्तर-] यांतला जो कठिण भाग ती पृथिवी, जो द्रवभाग ते आप, जें तें तेज, जो संचार करतो तो वायु आणि जी पोकळी ते आकाश. पृथिवी धारण करण्याचे कामी, आप पिंडाकरणाचे कामी, तेज रूपाच्या दर्शनाचं कामी, वायु मिळविण्याचे कामी आणि आकाश अवकाश म्हणजे जागा देण्याचे कामी, (याप्रमाणे या पांच भूतांचा उपयोग होतो). हे शरीर पृथु म्हणजे स्थूल असल्यामुळे याला जागेची अवश्यकता आहे. शब्दाची उपलब्धि होण्याकरितां श्रोत्रे, स्पर्शासाठी त्वचा, स जाणण्याकरिता जिह्वा, वास घेण्याकरितां नासिका, तसेंच उष्ण २८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. आनंद देण्याकरितां उपस्थ आणि उत्सर्गाकरितां अपान आहेत. बुद्धीने मनुष्य जाणतो, मनाने संकल्प करतो आणि वाचेने बोलतो. षडाश्रय कसे ? [उत्तर-] मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट आणि तुरट असे सहा रस यापासून प्राप्त होतात. (सहागुणांनी युक्त कसे ?) पड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद हे सात स्वर सहा रागांचे असल्याने षड्गुणयुक्त. शब्दाचा व्यवहार आणि प्रत्ययाचा व्यवहार असे दोन्ही व्यव- हार प्रवृत्तिरूपाने व निवृत्तिरूपाने करण्यास (शब्दादि) दहा कारण होतात. शुक्लो रक्तः कृष्णो धूम्रः पीतः कपिलः पांडुरः सप्तधातुकमिति । कस्मात् ? यथा देवदत्तस्य द्रव्य- विषया जायन्ते परस्परं सौम्यगुणत्वात्पड्विधो रसः। रसाच्छोणितं शोणितान्मांसं मांसान्मेदो मेदसः स्नाबा स्नान्नोऽस्थीन्यस्थिभ्यो मज्जा मज्ज्ञः शुक्र शुक्रशोणितसंयोगादावर्तते गर्भः । हृदिव्यवस्था- नीति । हृदयेऽतराग्निः, अग्निस्थाने पित्तं, पित्तस्थाने वायुः, वायुस्थाने हृदयं प्राजापत्यात्क्रमात् ॥३॥ पांढरा, तांबडा, काळा, धुरकट, पिवळा, कपिल काळसर] आणि पांडुर [फिकट] अशा सात धातूंचे शरीर आहे. कसे ? जसे namel माला उदा० देवदत्ताला सात प्रकारचे द्रव्य मिळते व .
गर्भोपनिषत्. १९ ते प्रकार परस्परांस अनुकूल असतात तसेच शरीरांत हे सात धातु परस्परांस अनुकूल आहेत. त्यांच्या या परस्पर अनुकूलतेने शरीरांत (अन्नाचा) सहा प्रकारचा रस होतो. त्या रसापासून रक्त होते, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून स्नायु, स्नायूपासून अस्थि, अस्थीपासून मज्जा आणि मज्जेपासून शुक्र याप्रमाणे उत्पन्न होतात. शुक्र आणि शोणित यांच्या संयोगाने गर्भ उत्पन्न होतो. ही धातूंची रूपें हृदयामध्ये स्थित आहेत. हृदयांत अंतराग्नि आहे. अग्नीच्या आधाराने पित्त, पित्ताच्या आधाराने वायु, आणि वायूच्या आधाराने हृदय अशी (त्या गर्भात) उत्पन्न होतात. ही उत्पत्ति प्रजा- पतीच्या पद्धतीने होते. टीप-प्रजापतीने सृष्टीची उत्पत्ति केली त्याचे बहदारण्यकामध्ये वर्णन आहे. प्रजापति एक असून तोच दोन झाला व त्यापासन पुढे द्वंद्वरूपाने उत्पत्ति झाली. तसा प्रकार येथे समजावा एका दीपापासन दुसरा दीप होतो तसा नव्हे. ऋतुकाले प्रयोगादेकरात्रोषितं कलिलं भवति, सप्तरात्रोषितं बुबुदं भवति, अर्धमासाभ्यंतरेण पिंडो भवति, मासाभ्यंतरेण कठिनो भवति, मासद्व- येन शिरः कुरुते, मासत्रयेण पादप्रदेशो भवति । अथ चतुर्थे मासेंडगुल्यजठरकटिप्रदेशो भवति, पंचमे मासे पृष्ठवंशो भवति, षष्ठे मासे नासाक्षिश्रोत्राणि भवन्ति, सप्तमे मासे जीवेन संयुक्तो भवति, अष्टमे, मासे सर्वसंपूर्णो भवति । , २० सार्थ उपनिषत्संग्रह-भाम सहावा. पितू रेतोतिरिक्तात्पुरुषो भवति, मातू रेतोतिरि- तास्त्रियो भवन्ति, उभयो/जतुल्यत्वान्नपुंसको भवति । व्याकुलितमनसोंऽधाः खंजाः कुब्जा वामना भवन्ति । अन्योन्यवायुपरिपीडितशुक्र?ध्यात् द्विधा तनूः स्याद्युग्माः प्रजायन्ते । पंचात्मकः समर्थः पंचात्मिका चेतसा बुद्धिगंध- रसादिज्ञाना, ध्यानात्क्षरमक्षरं मोक्षं चिंतयतीति । तदेकाक्षरं, ज्ञात्वाऽष्टौ प्रकृतयः षोडश विकाराः शरीरे तस्यैव देहिनाम् । अथ मात्राऽशितपीतनाडी- सूत्रगतेन प्राण आप्यायते । अथ नवमे मासि सर्वलक्षणसंपूर्णो भवति पूर्व- जातीः स्मरति कृताकृतं च कर्म, शुभाशुभं च कर्म विंदति ॥४॥ ऋतुकाली स्त्रीपुरुषसंयोग झाला म्हणजे एका दिवसानें गर्भ किंचित् घट्ट होतो, सात दिवसांनी बुडबुड्याप्रमाणे होतो, अर्ध्या महिन्याने त्याचा पिंड बनतो, एक महिन्याने तो कठिण होतो, दोन महिन्यांनी त्याला मस्तक येते, तीन महिन्यांनी पाय येतात, चवथ्या महिन्यांत हात, पोट आणि कंबरेचा भाग ही होतात, पांचव्या महिन्यांत पाठीचा कणा होतो, सहाव्या महिन्यांत नाक, डोळे व कान होतात, सातव्या महिन्यांत गर्भ जीवाने युक्त होतो. आणि आठव्या महिन्यांत तो सर्वसंपूर्ण होतो.
गर्मोपनिषत. पित्याचे रेत अधिक असल्यास पुरुष होतो, मातेचें रेत अधिक असल्यास स्त्री होते, दोघांचेंहि बीज समान असेल तर नपुंसक होतो. पिता व माता यांचे चित्त व्याकुळ असेल तर अंधळे, पांगळे, वांकड्या अवयवांचे आणि ठेगू असे होतात. परस्परांच्या शरीरा- तील वायूने पीडित झाल्यामुळे शुक्राचे दोन भाग झाले म्हणून दोन शरीरे होतात व (त्यापासून) जुळी मुले जन्मास येतात. पंचभूतात्मक पिंड विचार करण्यास समर्थ होतो, (शब्दादि) पंचविषयात्मक बुद्धि चित्ताने गंध- रस इत्यादि ज्ञान घेण्यास समर्थ होते आणि तो गर्भ विनाशी शरीर व अविनाशी मोक्ष यांचा विचार करूं लागतो. तो एकाक्षराचे म्हणजे ॐकाराचे चिंतन करतो. त्याचे ज्ञान झाल्यावर मनुष्याच्या शरीरांतील आठ प्रकृति आणि सोळा विकार त्याला कळतात. मातेने खाल्लेले अन्न आणि प्यालेलें उदक नाडीच्या सूत्रांतून जाऊन त्याने त्याचा प्राण वृद्धि पावत असतो. नंतर नवव्या महिन्यांत सर्व लक्षणांनी पूर्ण होतो, त्याल पूर्वीचे जन्म आठवतात, केलेली व न केलेली कमें आठवतात, तसेंच शुभ कर्म कोणते व अशुभ कर्म कोणते याचे ज्ञान होते. टीपा-आठ प्रकृति = प्रकृति, महत् अथवा बुद्धि, अहंकार, आणि रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श हों पांच तन्मात्रे यांपैकी प्रकृति ही विकार नाही. महदादि सात मात्र प्रकृति व विकृति अशा दोन्ही स्वरूपांत आहेत, तथापि ते सातहि केवळ विकार नाहीत, म्हणून सर्व आठांसहि प्रकृति म्हटले आहे.
२२
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा.
नानायोनिसहस्राणि दृष्ट्वा चैव ततो मया ।
आहारा विविधा भुक्ताः पीताश्व विविधाः स्तनाः॥५॥
(तो गर्भ चिंतन करतो---) अनेक प्रकारचे जन्म मी घेतले,
विविध प्रकारचे आहार खाल्ले, विविध स्तन प्याले.
जातस्यैव मतस्यैव जन्म चैव पुनः पुनः।
अहो दुःखोदधौ मनो न पश्यामि प्रतिक्रियाम् ॥६॥
अनेक वेळां जन्मलेल्या आणि मेलेल्या मला पुन्हा पुन्हां जन्म
प्यावा लागत आहे. अहो ! मी (केवढ्या) दुःखसागरांत बुडालों
आहे ! मला (यांतून सुटण्याला) इलाज दिसत नाही !
यन्मया परिजनस्यार्थे कृतं कर्म शुभाशुभम् ॥
एकाकी तेन दह्यामि गतास्ते फलभोगिनः ॥७॥
माझ्या भोवती असलेल्या माणसांकरितां मों में शुभ व अशुभ
कर्म केले त्या कर्माने मी एकटा दहन पावत आहे. त्या कर्मापासून
मिळणाऱ्या (तत्कालीन) फलाचा उपभोग घेणारे ते (दुसरीकडे) गेले !
यदि योन्याः प्रमुंचामि सांख्यं योगं समाश्रये॥
अशुभक्षयकर्तारं फलमुक्तिप्रदायिनम् ॥८॥
जर मी या योनीतून बाहर आलो तर सांख्यशास्त्राचा किंवा
योगशास्त्राचा आश्रय करीन. कारण ते शास्त्र पापाचा नाश करणारें
आणि मोक्षरूपी फल देणारे आहे.
यदि योन्याः प्रमुंचामि तं प्रपद्ये महेश्वरम् ॥
अशुभक्षयकर्तारं फलमुक्तिप्रदायिनम् ॥९॥
गर्भोपनिषत् २३ जर मी या योनीतून बाहेर आलों तर त्या महेश्वराला मी शरण जाईन. कारण तो महेश्वर पापाचा नाश करणारा व मोक्षरूपी फल देणारा आहे. यदि योन्याः प्रमुंचामि ध्याये ब्रह्म सनातनम्॥१०॥ जर मी या योनीतून बाहेर आलो तर मग सनातन ब्रह्माचेंच मी ध्यान करीन. अथ योनिद्वारं संप्राप्तो यंत्रेणापीड्यमानो महता दुःखेन जातमात्रस्तु वैष्णवेन वायुना संस्पृष्टः तदा न स्मरति जन्ममरणं न च कर्म शुभाशुभम् ॥११॥ नतर (जन्मसमयीं) योनिद्वारी आल्यावर तत्संकोचामुळे क्लेश पावन असलेला तो मोठ्या दुःखाने जन्मास येतो. जन्मास आल्या- बरोबर ईश्वरी (मायारूपी) वायूचा स्पर्श होऊन जन्म व मरण यांची आठवण जाते आणि शुभ व अशुभ कर्मे तो विसरतो. शरीरमिति कस्मात् : साक्षादमयोऽत्र श्रियन्ते, ज्ञानाग्निर्दर्शनाग्निः कोष्ठाग्निरित । तत्रकोष्ठााने म अशितपीतलेह्यचोष्यं पचतीति, दर्शनाग्निः रूपा- दीनां दर्शनं करोति, ज्ञानाग्निः शुभाशुभं च कर्म विंदति । त्रीणि स्थानानि भवन्ति, हृदये दक्षिणाग्नि- रुदरे गार्हपत्यो मुख आहवनीयः । आत्मा यजमानो, बुद्धिः पत्नी, मनो ब्रह्मा, लोभादयः पशवो, धृति- , २४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. , , , , दीक्षा संतोषश्व, बुद्धींद्रियाणि यज्ञपात्राणि, कर्मेंद्रि- याणि हवींषि, शिरः कपालं, केशा दर्भा, मुखमंतर्वेदिः। चतुष्कपालं शिरः षोडश पार्श्वदंतोष्ठपटलानि, सप्तोत्तरं मर्मशतं, साशीतिकं संधिशतं, सनवर्क स्नायुशतं, सप्त शिराशतानि, पंच मजाशतानि, अस्थीनि च ह वै वीणि शतानि षष्टिश्च. अर्धच- तस्रो रोमाणि, कोट्यो हृदयं पलान्यष्टौ, द्वादश पलानि जिह्वा, पित्तं प्रस्थं, कफस्याढकं, शुक्लं कुडवं, मेदः प्रस्थौ द्वौ, अनियतं मूत्रपुरीषमाहारपरिमाणात् ॥ पैप्पलादं मोक्षशास्त्रं परिसमाप्तं पैप्पलादं मोक्ष- शास्त्रं परिसमाप्तमिति ॥१२॥ याला 'शरीर' कां ह्मणतात? तर साक्षात् अग्नि श्रियन्ते' म्हणजे याचा आश्रय करतात म्हणून 'शरीर' म्हणतात. ज्ञानाग्नि, दर्शनाग्नि आणि कोष्ठग्नि हे ते अग्नि. खाल्लेलें, प्यालेलें, चाटलेले आणि चोख- लेले पचवितो तो कोष्ठाग्नि काठ्यांतील अग्नि]. रूपादिकांचे दर्शन करवितो तो दर्शनाग्नि. शुभ कर्म कोणते व अशुभ कर्म कोणते हे सांगतो तो ज्ञानाग्नि. यांची तीन स्थाने आहेत, हृदयामध्ये दक्षि- णाग्नि, उदरामध्ये गार्हपत्याग्नि आणि मुखामध्ये आहवनीयाग्नि. आत्मा हा यजमान, बुद्धि ही त्याची पत्नी, मन हा ब्रह्मा [ब्रह्मा नायक ऋत्विज ] लोभादि (सहा रिपु) हे पशु, धृति आणि संतोष ही दीक्षा, ज्ञानेंद्रिये ही यज्ञपात्रं, कर्मेद्रिये हे हवी, शिर हे कपाल, केश हे दर्भ आणि मुख ही अंतर्वेदी होय. .
गर्मोपनिषत्. २५ शिराची चार कपाले; पार्श्व, दांत, ओष्ठ व पटले (?) हीं प्रत्येकी सोळा; एकशे सात मर्मस्थले, एकशे ऐशी संधी, नऊशें स्नायु, सातशे शिरा, पांचशे मज्जा, तीनशे साठ अस्थि, साडेतीन कोटी केस, रस -हृदयं] आठ पलें, उदक [-जिह्वा] बारा फ्लें, पित्त एक प्रस्थ, कफ एक आढक, शुक्र एक कुडव, मंद दोन प्रस्थ आणि मूत्र व पुरीष ही आहाराच्या परिमाणाप्रमाणे कमी जास्त असें शरीराचे परिमाण असते. याप्रमाणे पिप्पलाद मुनींनी सांगितलेले मोक्षशास्त्र समाप्त झाले. टपि-वर उल्लेखिलेली प्रमाणे अशी जाणावी ४ पले-१ ऑजळ किवा कुडव ४ कुडव- १ प्रस्थ, ४ प्रस्थ% १ आढक. ॥ इति म पनिषत्समासा॥
२६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. प्राणाग्निहोत्रोपनिषत् ॥ . अथातः सर्वोपनिषत्सारं संसारज्ञानातीतं अन्न- सूक्तं शारीरं यज्ञं व्याख्यास्यामः । अस्मिन्नेव पुरुष- शरीरे विनाऽप्यग्निहोत्रेण विनाऽपि सांख्ययोगेन संसा- रविमुक्तिर्भवतीति । स्त्रेन विधिना अन्नं भूमो निक्षिप्य "या ओषधयः सोमराज्ञीः” इति तिसृभिः "अन्न- पते." इति द्वाभ्यामनुमंत्रयते ॥ सर्व उपनिषदांचे सार, संसारज्ञानाहून श्रेष्ठज्ञान, अन्नसूक्त, असा जो शारीर यज्ञ त्याची आतां व्याख्या सांगतो. अग्निहोत्रावांचून आणि सांख्य व योग यांच्या ज्ञानावांचून या शरीरामध्येच संसारापासून मुक्ति मिळते. आपल्या शाखेच्या सूत्रांत सांगितलेल्या विधीने भूमी- वर अन्न ठेवून "या ओषधयः सोमराज्ञीः' या तीन मंत्रांनी व " अन्नपते." या दोन मंत्रांनी त्या अन्नाचे अभिमंत्रण करावे. ते मंत्र असे "या ओषधयः सोमराज्ञीर्बह्वीः शतविचक्षणाः। बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुंचन्तु अंहसः॥ याः फलिनीर्या अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः । बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुंचन्तु अंहसः ॥ जीवलां नवारिषां मा ते बनाम्योषधिम् । या त आयुरुपहरादप रक्षांसि चाऽऽतयात् ॥
प्राणाग्रिहोत्रोपनिषत्. ज्यांचा राजा चंद्र आहे, ज्यांच्यामध्ये अनेक रोगहारक गुण आहेत व बृहस्पतीपासून ज्या उत्पन्न झाल्या आहेत त्या ओषधी आम्हांला पापापासून मुक्त करोत. फलांनी युक्त अशा, बृहस्पती- पासून उत्पन्न झालेल्या ज्या ओषधी त्या आम्हांला पापापासून मुक्त करोत. (हे वनंदवंत,) जीव घेणारी व उद्वेगकारक अशी ओषधि मी घेत नाही. आयुष्य हरण करणाऱ्या व राक्षसांना जवळ आण- णाया ओपधी मी घेत नाही. "अन्नपतेऽन्नस्य नो धेह्यनमीवस्य शुष्मिणः । प्रप्रदातारं तारिष ऊर्ज नो धेहि द्विपदे चतुष्पदे ॥ हे अन्नपते ! पापरहित व तेजस्वी अशा अन्नाचे आम्हांस भागी- दार कर. आम्हांला अन्न देणाराचे तारण कर. आम्हांला, आमच्या माणसांना व आमच्या पशूना बलवान् कर. यदन्नमामि बहुधा विराद्धं रुद्रैः प्रजग्धं यदि वा पिशाचैः । सर्व तदीशानो अभयं कृणोतु ॥ शिवमीशानाय स्वाहा ॥ अंतश्वरसि भूतेषु गुहायां विश्वतोमुखः । त्वं यज्ञस्त्वं ब्रह्मा त्वं रुद्रस्त्वं विष्णुस्त्वं वषट्कारः ।। आपो ज्योती रसोऽमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरों नमः ॥ आपः पुनन्तु पृथिवीं पृथ्वी पूता पुनातु माम् । पुनन्तु ब्रह्मणस्पतिर्ब्रह्मपूता पुनातु माम् ॥
२८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. , यदुच्छिष्टमभोज्यं वा यद्वा दुश्चरितं मम । सर्व पुनन्तु तं ह्यापो असतां च प्रतिग्रहम् ॥ जे अन्न सिद्धीला विरोधी आहे, अथवा जे भयंकर पिशाचांनी खाल्लेले [म्ह० त्यांना अर्पिलेले आहे, असें जें अन्न मी खाल्लें तें सर्व ईश्वर अभयकारक व कल्याणकारक करो. ईशानाय स्वाहा. (हे जठराग्ने) सर्वत्र मुख असलेला तूं प्राण्यांच्या अंतरांत असलेल्या जागेत वावरतोस. तूं यज्ञ आहेस, ब्रह्मा, रुद्र, विष्णु, वषट्कार, उदक, तेज, रस, अमृत, ब्रह्म, भूः, भुवः, स्वः, ॐ सर्व तूं आहेस. तुला नमस्कार असो. उदक पृथिवीला पावन करो. पावन झालेली पृथिवी मला पावन करो. श्रेष्ठ असे ब्राह्मण [ब्रह्मणः पतयः पृथिवीला पावन करोत. ब्राह्मणांनी पवित्र केलेली पृथ्वी मला पावन करो. मी जें उच्छिष्ट किंवा अभोज्य अन्न खाल्लं असेल, किंवा मी जे काही गैर कृत्य केले असेल ते सर्व ही उदकें पावन करोत. दुर्जनांपासून घेतलेला प्रतिग्रहहि पावन करो. आपोऽमृतमस्यमृतोपस्तरणमस्यमृतं प्राणे जुहो- म्यमा शिष्यांतोऽसि । प्राणाय प्रदानाय स्वाहाऽ- पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहो- दानाय स्वाहेति कनिष्ठिकयांगुल्यांगुष्ठेन च प्राणे जुहोमि । अनामिकयाऽपाने मध्यामकया व्याने प्रदेशिन्या समाने सर्वाभिरुदाने । तूष्णीमेकामे- कऋषौ जुहोति द्वे आहवनीय एकां दक्षिणाग्ना- प्राणाग्निहोत्रोपनिषत्. २९ वेकां गार्हपत्य एकां सर्वप्रायश्चित्तीये ॥१॥ इति प्रथमः खंड ॥ हे उदकांनों! तुम्ही अमृत आहांत, अमृताचा आधार अंथरूण आहांत. मी हे अमृत प्राणामध्ये हवन करतो. हे शिष्य, तुझे भोजन झाले काय ?(१) प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान या पांच प्राणांस आहुति देतो. करांगुली, आणि अंगुष्ठ यांनी मी प्राणामध्ये हवन करतो. अनामिकेने (व अगुष्ठाने) अपानामध्ये, मध्यमिकेने (व अगुष्ठानें) व्यानामध्ये, तजनीने (व अगुष्ठाने) आणि सर्व अंगुलीनी उदानामध्ये हवन करतो. (नतर) मुकाट्याने एक आहुति अग्नीमध्ये हवन करावी, (मुखस्थ) आबनीय अग्नीमध्ये दोन आहुति द्याव्या, (हृदयस्थ) दक्षिणानामध्ये एक आहुति द्यावी, कोष्ठस्थ गार्हपत्य अग्नीमध्ये एक आहुति द्यावी आणि (नाभीच्याखाली स्थित) सर्व प्रायश्चित्तीय अग्नीमध्ये एक आहुति द्यावी. १ खंड दुसरा. अथापिधानमस्यमृतत्वायोपस्पृश्य पुनरादाय पुनरुपस्पृशेत् । सव्ये पाणावपो गृहीत्वा हृदयम- न्वालभ्य जपेत् । तूं (अमृताचे) आच्छादन आहेस. अमृताकरितां पुनः स्पर्श करून (उदक) घ्यावे व पुनः स्पर्श करावा. उजव्या हातात उदक घेऊन हृदयाला स्पर्श करून जप करावा- -- ३० सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. ० प्राणोऽग्निः परमात्मा पंचवायुभिरावृतः । अभयं सर्वभूतेभ्यो न मे भीतिः कदाचनेति ॥ विश्वोऽसि वैश्वानरो विश्वरूपो, विश्वं त्वया धार्यते जायमानम् । विश्वं तु त्याहुतयः सर्वा यत्र ब्रह्मा विश्वामृतोऽसीति ।। महानवोऽयं पुरुषो योऽगुष्ठाग्रे प्रतिष्ठितः। तमद्भिः प्रतिषिंचामि सोऽस्यांतेऽमृताय च ॥ इत्येष एवात्मा ध्यायेत अमिहोत्रं जुहोमीति । सर्वेषामेव सूनुर्भवति । अथ यज्ञपरिवृत आहुती- होमयति । स्वे शरीरे यज्ञं परिवर्तयामीति ॥ प्राण हा अग्नि आहे, पंच वायूंनी वष्टिलेला परमात्मा आहे. मजपासून सर्व प्राण्यांना अभय आहे, मला केव्हांहि भीति नाही. हे प्राणा ! तूं विश्व आहेस, वैश्वानर म्ह० सर्वभक्षक आहेस, विश्वरूप आहेस. जन्मास आलेले सर्व विश्व तूं धारण करतोस (अथवा विश्व तुझ्या आधाराने जन्मास येते) जेथें ब्रह्मदेव आहे असे हे सर्व विश्व तुझ्या आहुति हात. विश्वामध्ये तूं अमर आहेस. अगुष्टाग्राचे ठिकाणी स्थित असा हा पुरुष मोठा अन्नतर्पक आहे. त्याला मी उद- काचे सिंचन करतो. अंतकाली हा अमर होवो. हाच आत्मा होय. (नंतर) अमिहोत्राचेच हवन मी करीत आहे असे ध्यान करावे. तो सर्वांचा पुत्र म्ह० आवडता होतो. यज्ञसमाप्तीसाठी "स्वतःच्या प्राणाग्निहोत्रापनिषत्. ३१ शरीरांत यज्ञ करतो" या बुद्धीने आहुति द्यावी. चत्वारोऽग्नयस्ते किंनामधेयाः । तत्र सूर्योऽग्नि- नर्नाम सूर्यमंडलाकृतिः सहस्ररश्मिाभिः परिवृत एकर्षिर्भूत्वा मूर्ध्नि तिष्ठति, यस्मादुक्तः । दर्शना- निर्नाम चतुराकृतिराहवनीयो भूत्वा मुखे तिष्ठति । शारीरोऽग्निर्नाम जराप्रणुदा हविरविस्कंदति, अर्ध- चंद्राकृतिर्दक्षिणाग्निर्भूत्वा हृदये तिष्ठति । तत्र कोष्ठा- ग्निर्नामाशितपीतलीढखादितानि सम्यक्श्रपयित्वा गाईपत्यो भूत्वा नाभ्यां तिष्ठति । प्रायश्चित्तीयस्त्व- धस्तास्त्रियस्तिस्रः हिमांशुप्रभः प्रजननकर्मा ॥२॥ इति द्वितीयः खंडः ॥ त्या चार अग्नींची नांवे कोणती ? एक सूर्य हा अग्नि सूर्यमंडला- कृति, सहस्रावधि किरणांनी वष्टिलेला एकर्षिरूपाने मस्तकांत स्थित आहे, कारण वेदांमध्ये त्याच असें वर्णन आहे. (दुसरा) दर्शनाग्नि म्हणजे प्रत्यक्ष दिसणारा अग्नि हा चार प्रकारची आकृति असणारा आहवनीय अग्निरूपाने मुखाचे ठिकाणी स्थित आहे. तिसरा) शारीर अग्नि जरेचा नाश करणारा, हवि भक्षण करणारा, अर्धचंद्राकृति, दक्षिणाग्निरूपाने हृदयामध्ये स्थित आहे. आणि (चवथा) कोष्ठाग्नि खालेलें, प्यालेले, व चोखलेले सर्व अन्न यांचे नीट रीतीने पचन करून गार्हपत्य--अग्निरूपाने नाभीचे ठिकाणी स्थित आहे. (पांचवा) प्रायश्चित्तीय अग्नि (इडा, पिंगला, सुषुम्ना ३२ साथे उपनिषत्संग्रह-भाग सहावा. नामक नाडीरूपी) तीन स्त्रियांनी युक्त, चंद्राप्रमाणे प्रभा असलेला, जननकर्ता सर्वांच्या खाली आहे. खंड तिसरा. अस्य शारीरयज्ञस्य यूपरशनाशोभितस्य को यजमानः। का पत्नी। क ऋत्विजः। के सदस्याः । कानियज्ञपात्राणि । कानि हवींषि । का वेदिः। कोत्त- रवेदिः । को द्रोणकलशः । को रथः । कः पशुः । कोऽध्वर्युः । को होता । को ब्राह्मणाच्छंसी। कः प्रति- प्रस्थाता। कः प्रस्तोता। को मैत्रावरुणः। क उद्गाता। का धारापोता। के दर्भाः। कः सुवः । काज्यस्थाली। कावाघारौ । कावाज्यभागौ । के प्रयाजाः। के अनु- याजाः। केडा। कः सूक्तवाकः। कः शंयोर्वाकः । के पत्नीसंयाजाः । को यूपः । का रशना । का इष्टयः । का दक्षिणा । किमवभृथमिति ॥ इति तृतीयः खण्डः ॥३॥ यूप आणि रशना यांनी शोभित अशा या शरीरयज्ञाचा यजमान कोण ? पत्नी कोण ? ऋत्विज कोण ? सदस्य कोण ? यज्ञपात्रे कोणती? हवि कोणते ? वेदी कोणती ? उत्तरवदी कोणती ? द्रोण- कलश कोणता ? रथ कोणता ? पशु कोणता ? अध्वर्यु कोण ? होता कोण ? ब्राह्मणाच्छंसी कोण ? प्रतिप्रस्थाता कोण ? प्रस्तोता प्राणाग्निहोत्रोपनिषत्. ३३ कोण ? मैत्रावरुण कोण ! उद्गाता कोण ? धारापोता [पवमान ह्मणणारा] कोण ? दर्भ, स्रवा, आज्यस्थाली, आधार. आज्यभाग, प्रयाज, अनुयाज, इडा, सूक्तवाक, शंयोर्वाक, पत्नीसंयाज, यूप, रशना, इष्टि, दक्षिणा व अवभृश्व ही कोणती ? अस्य शारीरयज्ञस्य यूपरशनाशोभितस्यात्मा यज- मानः । बुद्धिः पत्नी । वेदा महत्विजः । अहंकारोऽ- ध्वर्यः । चित्तं होता। प्राणो ब्राह्मणाच्छंसी। अपानः प्रतिप्रस्थाता । व्यानः प्रस्तोता । उदान उद्गाता। स- मानो मैत्रावरुणः। शरीरं वेदिः। नासिकोत्तरवेदिः । मूर्धा द्रोणकलशः। पादो रथः । दक्षिणहस्तः सुवः । सब्यहस्त आज्यस्थाली । श्रोत्रे आघारौ । चक्षुषी आज्यभागौ । ग्रीवा धारापोता। तन्मात्राणि सदस्याः। महाभूतानि प्रयाजाः । भूतगुणा अनुयाजाः । जिह्वेडा । दन्तोष्ठौ सूक्तवाकः । तालुः शंयोर्वाकः । स्मृतिर्दया क्षान्तिरहिंसा पत्नीसंयाजाः। भोकारो यूपः । आशा रशना । मनो रथः । कामः पशुः । केशा दर्भाः। बुद्धींद्रियाणि यज्ञपात्राणि। कर्मेंद्रि- याणि हवींषि । अहिंसा इष्टयः। त्यागो दक्षिणा । अवभथं मरणात् । सर्वा ह्यास्मन्देवताः शरीरेऽधि समाहिताः।
३४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. यूप व रशना यांनी शोभित अशा या शारीर यज्ञाचा आत्मा हा यजमान, बुद्धि ही पत्नी, वेद हे प्रमुख ऋत्विज, अहंकार अध्वर्यु, चित्त होता, प्राण ब्राह्मणाच्छंसी, अपान प्रतिप्रस्थाता, व्यान प्रस्तोता, उदान उद्गाता, समान मैत्रावरुण, शरीर ही वेदी, नासिका उत्तरवेदी, मस्तक हा द्रोणकलश, पाय रथ, उजवा हात सुवा, डावा हात आज्यस्थाली, श्रोत्र हे आघार, डोळे आज्यभाग, मान धारापोता, तन्मात्रा हे सदस्य, महाभूतें प्रयाज, भूतांचे गुण हे अनुयाज, जीभ इडा, दंत व ओष्ठ सूक्तवाक, तालु शंयोर्वाक, स्मृति- दया-शांति-अहिंसा हे पत्नीसंयाज, ॐकार यूप, आशा रशना, मन रथ, काम पशु, केश दर्भ, बुद्धीद्रिये ही यज्ञपात्रं, कमेंद्रियें हवि, अहिंसा इष्टि, त्याग दक्षिणा आणि मरणानतर अवभृथस्नान. (अशा) सर्व देवता या शरीरामध्ये राहिलेल्या आहेत. वाराणस्यां मृतो वाऽपि इदं वा ब्रह्म यः पठेत् ॥ एकेन जन्मना जंतुर्मोक्षं च प्राप्नुयादिति मोक्षं च प्राप्नुयादिति ॥४॥ वाराणसी क्षेत्रांत ज्याला मरण आलें तो, किंवा जो हे ब्रह्म पठन करतो तो मनुष्य, या एकाच जन्मांत मोक्ष पावतो. इति अथर्ववेदे प्राणाग्निहोत्रोपनिपत्समाप्ता ।।
सर्वोपनिषत्. ३५ सर्वोपनिषत् ।। अथवा सर्वसागेपनिषत् । --SER/- ॐ कथं बंधः ? कथं मोक्षः ? काऽविद्या ? का विद्येति ? जाग्रत्स्वप्नं सुषुप्तं तुरीयं च कथं ? अन्नमयः प्राणमयो मनोमयो विज्ञानमय आनं- दमयः कथं ? कर्ता जीवः क्षेत्रज्ञः साक्षी कूट- स्थों तर्यामी कथं ? प्रत्यगात्मा परमात्माऽऽत्मा माया चेति कथं ? बच कोणता ? मोक्ष कोणत! ' अविद्या कोणती विद्या को जागति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुरीया या अवस्था ह्मण काय अन्नमय. पाणमय, मनोगय. विज्ञानमय, आणि आमय कोश ह्मणजे काय ' कर्ता, जीव, क्षेत्रज्ञ. साक्षी, कूटस्थ आणि अतयामी म्हणजे काय : प्रत्यगात्मा, परमात्मा, अत्मा आणि माया म्हणजे काय ? आत्मेश्वरोऽनात्मनो देहादीनात्मत्वेनाभिमन्यते सोऽभिमान आत्मनो बंधः। तन्निवृत्ति क्षः । तदभिमानं कारयति या साऽविद्या। सोऽभिमानो ययाऽभिनिवर्तते सा विद्या। मनआदिचतुर्दश- करणैः पुष्कलैरादित्याद्यनुगृहीतैः शब्दादीन्विष- ३६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. यान्स्थूलान्यदोपलभते तदाऽऽत्मनो जागरणम् । तद्वासनारहितश्चतुर्भिः करणैः शब्दाद्यभावेऽपि वामनामयाशब्दादीन्यदोपलभते तदाऽऽत्मनःस्वप्नम्। चतुर्दशकरणोपरमाद्विशेषविज्ञानाभावो यदा तदाऽs- त्मनः सुषुप्तम् ॥१॥ इश्वर असलेला आत्मा आत्मेतर जे देहाहि त्यांचे ठिकाणी तेच आपण असा अभिमान करतो; हा अभिमान आत्म्याचा बंध होय. या (खोट्या) अभिमानाची निवृत्ति झणजेच मोक्ष. हा अभिमान आत्म्याकडून जी करविते ती अविद्या. हा अभिमान जिच्या योगाने परत जातो ती विद्या. आदित्यादिकांनी ह्मणजे चंद्र. वायु, दिशा, अग्नि इत्यादिकांनी] अनुगृहीत होत्सात्या मन आदि चवदा इंद्रि- यानी शब्दादि स्थूल विषय जेव्हां उपलब्ध होतात तेव्हां ती आत्म्याची जागृतावस्था. त्या विषयांच्या वासनेनें रहित अशा आत्म्याला, शब्दादिकांचा अभाव असतां, चार इंद्रियांनी, केवळ वासनामय शब्दादिकांची उपलाब्ध होते तेव्हां ती आत्म्याची स्वप्ना- वस्था. चवदाहि इंद्रियांचा उपरम झणजे शांति झालेली असता, विशिष्ट विज्ञानाचा जो अभाव होतो तेव्हां ती आत्म्याची सुषुप्ता- वस्था. अवस्थात्रयभावात् भावसाक्षि स्वयं भावाभाव- रहितं नैरतयं चैक्यं यदा तदा तत्तुरीयं चैतन्यमि- त्युच्यते । अन्नकार्याणां षण्णां कोशानां समूहोऽन्न- सर्वोपनिषत्. ३७ य कोश इत्युच्यते। प्राणादिचतुर्दश वायुभेदा अन्नमये कोशे यदा वर्तन्ते तदा प्राणमयः कोश इत्युच्यते । एतत्कोशद्वयसंयुक्तो मनआदिचतुर्भिः करणैः आत्मा शब्दादिविषयान्संकल्पादिधर्मान्यदा करोति तदा मनोमयः कोश इत्युच्यते । एतत्कोश- ग्यसंयुक्तः तद्गतविशेषाविशेषज्ञो यदाऽवभासते दा विज्ञानमयः कोश इत्युच्यते । एतत्कोशचतुष्टयं वकारणज्ञाने वटकणिकायामिव गुप्तवटवृक्षो यदा र्तिते तदा आनंदमयकोश इत्युच्यते । सुखदुःख- द्ध्याश्रयो देहान्तः यदा तदा कर्ता । तदा इष्ट- वेषये बुद्धिः सुखबुद्धिः, अनिष्टविषये बुद्धिर्दुःस्त्र- पुद्धिः, शब्दस्पर्शरूपरसगंधाः पुण्यपापकर्मानुसारी भूत्वा प्राप्तशरीरसंधिवियोग- प्राप्तशरीरसंयोगमिव कुर्वाणो यदा दृश्यते तदो- हितत्वाज्जीब इत्युच्यते । मनआदिश्च प्राणा. देश्च सत्त्वादिश्वेच्छादिश्च पुण्यादिश्चैते पंचवर्गा इत्येतेषां पंचवर्गाणां धर्मी भूतात्मज्ञानादृते न वेनश्यति । आत्मसंनिधौ नित्यत्वेन प्रतीयमान मात्मोपाधिर्यः तल्लिंगं शरीरं हृद्रंथिरित्युच्यते । त्र यत्प्रकाशते चैतन्यं स क्षेत्रज्ञ इत्युच्यते ॥२॥ सुखदुःखहेतवः ।
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. (जागृति, स्वप्न व सुपुप्ति या) तीन अवस्था आत्म्याला होतात म्हणून त्या अवस्थांचे साक्षी म० पहाणारें, पण स्वतः मात्र त्या अवस्थांचा भाव अथवा अभाव यांनी रहित, निरंतर म्ह० शाश्वत आणि एक असें केवळ चैतन्य जेव्हां असते तेव्हां ती आत्म्याची तुरीयावस्था होय. अन्नापासून उत्पन्न होणाऱ्या (स्नायु, अस्थि, मज्जा, त्वचा, मांस व रक्त या) सहा कोशांचा जो समूह तो अन्न- मय कोश. प्राणादि चवदा वायु अन्नमय कोशामध्ये जेव्हां संचार करीत असतात तेव्हां त्याला प्राणमय कोश ह्मणतात. या दोन कोशांनी, आणि मन आदि [-मन. बुद्धि, चित्त, अहंकार] चार इंद्रियांनी, युक्त असा आत्मा शब्दादि विषय आणि संकल्पादि धर्म जेव्हां करतो, तेव्हा त्याला मनोमय कोश ह्मणतात. या तीन कोशांनी युक्त, आणि त्यांचे विशेष व अविशेष जाणणारा असा जेव्हां आत्मा प्रकाशमान असतो तेव्हां त्याला विज्ञानमय कोश मणतात. आपल्या आस्तित्वाचे कारण जे 'ज्ञान' म. ब्रह्म त्याचे ठिकाणी,-वटवृक्षाच्या बीजामध्ये जसा गुप्तरूपाने वटवृक्ष असतो जेव्हां हे चारहि कोश रहातात तेव्हां त्याला आनंदमय कोश ह्मणतात. (अमुक) सुख, (अमुक) दुःख अशा बुद्धीचा ज्याने आश्रय केला आहे, आणि जो देहाच्या आंत आहे तो कर्ता. तेव्हां इष्ट विषयाचे ठिकाणी असणारी बुद्धि ती सुखबुद्धि असते, अनिष्ट विषयाचे ठिकाणी असणारी बुद्धि ती दुःखबुद्धि असते आणि शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध हे सुखदुःखाचे हेतु अस- तात. पुण्यकमांना आणि पापकर्माना अनुसरणारा होत्साता (ह्मणजे तसे सर्वोपनिषत्. ३९ पुण्यपापानुरूप जन्म पावणारा) प्राप्त शरीरसंबंधाचा वियोग आणि अप्राप्त शरीराचा संयोग करतो असें जेव्हां दिसते तेव्हां या (शरीर- रूपी) उपाधींमुळे त्याला जीव म्हणतात. मन आदि, प्राणादि, सत्वादि, इच्छादि आणि पुण्यादि हे पांच वर्ग आहेत; या पांच वर्गाच्या समुदायाने युक्त असलेला हा (जीव) यथार्थ आत्मज्ञानावां- चून नाश पावत नाही (म्हणजे आत्मैक्यरूप पावत नाही). आत्म्याच्या सान्निध नित्यत्वाने ज्याची प्रतीति होते अशी जी आत्म्याची उपाधि [ म्हणजे ज्याला आत्माच समजतात] त्याला लिंग- शरीर अथवा हृदयग्रथी म्हणतात. तेथे प्रकाशमान होणारे जे चैतन्य त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. टीपा-सहा कोश-"स्नायबस्थिमज्जानः शुक्रावमांसास्राणि शोणितात् । घाटकोशिकमिदं प्रोक्तं सर्वदेहेषु देहिनाम् ॥" म्हणजे स्नायु, अस्थि व मग्न ही नीन शुक्रापासून, आणि त्वचा, मांस व रक्त ही तीन शोणितारासून, अशा प्रकारे शुक्रशोणितसंयोगापासून हे सहा कोशांचे शरीर निर्माण होते. प्राणादि चवदा वायु- "प्राण-अपान-व्यान-उदान-समान-नाग-कूर्म- कृकर -देवदत्त-धनंजया दश । चत्वारोऽन्ये "वैरंभणः स्थानमुख्यः प्रद्योतः प्रकृतस्तथा। वैरंभणादयस्तत्र सर्ववायुवशगताः ॥ इति ।" उपहितत्वाज्जीव इत्युच्यते-म्हणजे नानाशरीररूपा उपाधींनी युक्त असल्याने जीव असे म्हणतात पंचवर्ग--(१) मनआदि= मन, बुद्धि, चित्त, अहंकार. (२)प्राणादि-प्राण अपान वगैरे पांच वायु. (३) सत्त्वादि= सत्त्व, रज व तम हे तीन गुण. (४) इच्छादि काम, संकल्प, विचिकित्सा, श्रद्धा, अश्रद्धा, धृति, अधृति, लज्जा, भीति, आणि जाणीव. (५) पुण्यादि- पुण्य व पाप याच्या ज्ञानाचे संस्कार. .
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. ज्ञातृज्ञानज्ञेयानां आविर्भावतिरोभावज्ञाता स्वय- मेव आविर्भावतिरोभावहीनः स्वयंज्योतिः स साक्षी- त्युच्यते । ब्रह्मादिपिपीलिकापर्यंत सर्वप्राणिबुद्धि- ध्वविशिष्टतयोपलभ्यमानः सर्वप्राणिबुद्धिस्थो यदा तदा कूटस्थ इत्युच्यते । कूटस्थाद्युपहितभेदानां स्वरूपलाभहेतुर्भूत्वा मणिगणसूत्रमिव सर्वक्षेत्रे- ष्वनुस्यूतत्वेन यदा प्रकाशत आत्मा तदाऽन्तर्यामी- त्युच्यते । सर्वोपाधिविनिर्मुक्तः सुवर्णवद्विज्ञानघनः चिन्मात्रस्वरूप आत्मा स्वतंत्रो यदाऽवभासते तदा त्वंपदार्थः परमात्मेत्युच्यते ॥३॥ ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांचे आविर्भाव (म्ह ० प्रकट होणे) आणि तिरोभाव (म० अदृश्य होणे) यांना जाणणारा, स्वतः मात्र अशा प्रकारच्या आविर्भाव-तिरोभावांनी रहित, व स्वयंप्रकाश जो आत्मा, त्याला 'साक्षी' म्हणतात. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व प्राण्यांच्या बुद्धीचे ठिकाणी अविशिष्टतेने म्हणजे एकाच प्रकाराने उप- लब्ध होणारा व सर्व प्राण्यांच्या बुद्धीचे ठिकाणी स्थित जव्हां आत्मा असतो तेव्हां त्याला कूटस्थ म्हणतात. कूटस्थादि उपाधिभेदांच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्याला कारण होऊन, (माळेच्या) मण्यांम- धील सूत्राप्रमाणे सर्व शरीरांमध्ये ओंवल्यासारखा जेव्हां आत्मा प्रकाशमान होतो तेव्हां त्याला अंतर्यामी म्हणतात. सर्व उपाधीं.
सर्वोपनिषत्. ४१ पासून मुक्त झालेला, सुवर्ण जसे घम तमा ज्ञानाने घन, केवल ज्ञानमात्रस्वरूप व स्वतंत्र असा जेव्हां आत्मा प्रकाशमान होतो तेहां त्वंपदार्थ [='तत्त्वमसि' यांतील त्वं' पदाचा अर्थ होय. त्यालाच प्रत्यगात्मा म्हणतात. सत्यं ज्ञानमनंतमानंदं ब्रह्म । सत्यमविनाशि, नामदेशकालवस्तुनिमित्तेषु विनश्यत्सु यन्न विन- श्यत्यविनाशि तत्सत्यमित्युच्यते । ज्ञानमिति उत्प- त्तिविनाशरहितं चैतन्यं ज्ञानमित्यभिधीयते । अनंतं नाम मृद्विकारेषु मृदिव, सुवर्णविकारेषु सुवर्णमिव, तंतुकार्येषु तंतुरिव, अव्यक्तादिसृष्टिप्रपंचेषु पूर्व व्यापकं चैतन्यं अनंतमित्युच्यते । आनंदो नाम सुखचैतन्यस्वरूपः अपरिमितानंदसलुद्रः अविशि- ष्टसुखरूपच आनंद इत्युच्यते । एतस्तुचतुष्टयं यस्य लक्षणं देशकालवस्तुनिमित्तेवव्यभिचारि स तत्पदार्थः परमात्मा परं ब्रह्मेत्युच्यते । त्वंपदार्था- दौपाधिकात्तत्पदार्थादःपाधिकाद्विलक्षण आकाशव- सर्वगतः सूक्ष्मः केवलः सत्तामात्रोऽसिपदार्थः स्वयं- ज्योतिरात्मेत्युच्यते । अतत्पदार्थश्च आत्मेत्युच्यते । अनादिरंतर्वत्नी प्रमाणाप्रमाणसाधारणा न सती नासती न सदसती, स्वयमविकाराद्विकारहेतौ , ४२ सार्थ उपनिष-संग्रह-भाग सहावा. निरूप्यमाणेऽसती, अनिरूप्यमाणे सती, लक्षण- शून्या सा मायेत्युच्यते ॥४॥ ब्रह्म हे सत्य, ज्ञान, अनंत आणि आनंद असे आहे. सत्य म्हणजे अविनाशि; नाम, देश, काल, वस्तु आणि निमित्त ही पांच नाश पावली असता देखील जे नाश पावत नाहीं तें अविनाशि, त्याला सत्य म्हणतात. ज्ञान म्हणजे -उत्पत्ति आणि विनाश यांनी रहित असें जे चैतन्य त्याला ज्ञान म्हणतात. अनंत म्हणजे-मृत्ति- केच्या विकारांमध्ये जशी मृत्तिका. सुवर्णाच्या विकारांमध्ये जसे सुवर्ण, तंतूंच्या कार्यामध्ये [म० पटामध्ये] जसा तंतु, त्याप्रमाणे अव्यक्तादि सृष्टिप्रपंचामध्ये प्रथम व्यापून रहाणारे जे चैतन्य त्याला अनंत म्हण- आनंद म्हणजे- सुखस्वरूप व चैतन्यस्वरूप व अवि- शिष्ट-सुखस्वरूप =अमुक एकाच प्रकारचे सुख असे नव्हे, तर सर्व प्रकारचे असा जो अपरिमित आनंदसमुद्र त्याला आनंद म्हण- तात. हे वस्तुचतुष्टय (म० सत्य, ज्ञान, अनंत आणि आनंद) , ज्याचे लक्षण आहे असा, व ज्याचे हे लक्षण देश, काल, वस्तु आणि निमित्त यांचे ठिकाणी सर्वदा कायम आहे, तो तत्पदार्थ [-तत् पदाचा अर्थ परमात्मा होय. त्याला 'परं ब्रह्म' म्हणतात. उपाधियुक्त पदार्थाहून आणि उपाधियुक्त तत्पदार्थाहून निराळा, आकाशाप्रमाणे सर्वव्यापी, सूक्ष्म, एकटा, सत्तामात्र, स्वयंप्रकाश असा जो 'असि' पदाचा अर्थ, त्याला आत्मा म्हणतात. अनादि, कार्यरूपी गर्भाने युक्त, प्रमाण व अप्रमाण या दोहोंनाहि साधारण (म० कोणाचाच विषय न होणारी), जिला अस्तित्व नाहीं क तात.
सर्वसारोपनिषत्.
१३
नास्तित्वहि नाहीं, (तसेंच) जिला अस्तित्व व नास्तित्व ही
दोन्ही आहेत असेंहि नाहीं, (कारण) विकाराचे ती कारण आहे
असे म्हणू लागले तर तिला स्वतःला विकार नाही म्हणून 'असती,
विकाराचे ती कारण नाही असे म्हटले तर 'सती' (अशा प्रकारें)
लक्षण करण्यास अशक्य,
तिला माया असे म्हणतात.
॥ इति अथर्ववेदीया सर्वसारोपनिषत् ॥
४४ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. परमहंसोपनिषत् ॥ ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्ये- माक्षभिर्यजत्राः । स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्ताक्ष्योऽरिष्ट- नेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ हे देवहो, आमचे कर्ण कल्याणकारक (गोष्टी) श्रवण करोत. हे यजनीय देवहो, आमचे चक्षु कल्याणकारक (गोष्टी) पाहोत. स्थिर अशा अवयवांनी व शरीरांनी युक्त होत्सात्या आझांकडून तुमचे स्तवन होवो. देवांनी दिलेले जे आयुष्य असेल तें आह्मांस प्राप्त होवो. कीर्तिमान् इंद्र आमचे कल्याण करा, सर्वज्ञ आदित्य आमचे कल्याण करो. अरिष्टाचा नाशक गरुड आमचे कल्याण करो, बृहस्पति आमचे कल्याण करो. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।। अथ योगिनां परमहंसानां कोऽयं मार्गस्तेषां का स्थितिरिति नारदो भगवन्तमुपगत्योवाच । तं भगवानाह । योऽयं परमहंसमागों लोके दुर्लभ- तरो न तु बाहुल्यो, योको भवति स एव नित्य- पूतस्थः, स एव वेदपुरुष इति विदुषो मन्यन्ते, , परमहंसोपनिषत्. ४५ महापुरुषो, यञ्चित्तं तत्सर्वदा मय्येवावतिष्ठते, तस्मादहं च तस्मिन्नेवावस्थीयते । असौ खपुत्र- मित्रकलत्रबंध्वादीन शिखायज्ञोपवीते स्वाध्यायं च सर्वकर्माणि संन्यस्यायं ब्रह्मांडं च हित्वा, कौपीनं दंडमाच्छादनं च स्वशरीरोपभोगार्थाय च लोकस्यो- पकारार्थाय च परिग्रहेत्तच्च न मुख्योऽस्ति कोऽयं मुख्य इति चेदयं मुख्यः ॥१॥ 17 समजावा. नारद भगवान् ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणाला, भगवन्, परमहंस योग्यांचा मार्ग कोणता ? त्यांनी कसे रहावें ? त्याला भगवान ब्रह्म. देव म्हणाला- हा जो परमहंसाचा मार्ग तू विचारतोस तो फार दुर्लभ आहे, हा कांहीं बहुतांचा मार्ग नव्ह, (एखाद्याचाच आहे) एखादा जरी असला तरी तोच नित्य शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी शुद्ध वेदांमध्ये वर्णिलेला वंदपुरुष (म्हणजे, ब्रह्मच) तो, असे ज्ञाते समजतात. तो महापुरुष होय, कारण जे चित्त ते तो सर्वदा मजमध्ये स्थित करतो. म्हणून मीहि सर्वदा त्याच्यामध्येच रहातो. आपले पुत्र, मित्र, भार्या, बांधव इत्यादींचा, सेंच शिखा, यज्ञोपवीत, स्वाध्याय आणि (इतर) सर्व कर्मे यांचा त्याग करून, या ब्रह्मांडालाहि सोडून कौपीन, दंड आणि बन शरीररक्षणार्थ व लोकोपकारार्थ जरूर तेवढे धारण करतो. हे धारण देखील मुख्य परमहंसाचे नव्हे. मुख्य परमहंस कोण म्हण. शील तर सांगतों ऐक.
१६ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. टीपायोग म्हणजे चित्तवृत्तिनिरोध. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि या आठ अंगांनी युक्त असा योग ज्यांना सिद्ध झाला आहे ते योगी. 'अधिकारप्राप्तनिष्काम कर्मानुष्ठानमपि योग एव' असें नारायणस्वामींनी या उपनिषदावरील टीकेत म्हटले आहे. परमहंस वैराग्यशील तत्त्वज्ञानी; अथवा कुटीचर, बहूदक, हंस आणि परमहंस असे संन्या- साचे जे एकाहून एक वरचढ असे चार प्रकार आहेत त्यांतल्या चवथ्या प्रकारचे संन्यासी. 'जीवपरमात्मनोः अभदात् हसस्थ परमहसता' असे नारायणस्वामी हंसोपनिषदावरील दाषिकेत म्हणतात. 'न तु बाहुल्यः'= हा बहुताचा म्हणजे majority चा मार्ग नव्हे. भगवदी- तेंत म्हटले आहे--- मनुष्या सहस्रेषु श्विद्यतति सिद्धथे। यनतामपि सिद्धाना काश्चन्मा वत्ति तत्त्वतः ॥ 'सर्वकर्माणि संन्यस्य' वाण ज्ञानामृतेन तृप्तस्य ?तकृत्तस्य योगिनः । नैवास्ति किचित्कर्तव्यमस्ति चेन स तत्ववित् ॥' 'लोकोपकाराय' या शब्दाचे स्वारस्य मट समजत नाही. परमहसाला लोको- पकार कसला उरला ? शकरानदांनी "संन्याश्याना भिक्षादि दिल्याने स्वधर्मनिष्ट लोकाना पुण्य प्राप्ति व त्यापासून ज्ञानप्राप्ति व्हावी म्हणून" असा अर्थ कला आहे, पण त्यात समाधान होत नाही. न दंडं न शिखां न यज्ञोपवीतं नाऽऽच्छादनं चरति परमहंसः। न शीतं न चोष्णं न सुखं न दुःखं न मानावमाने च षडूमिवर्ज निंदागर्व- मत्सरदंभदच्छाद्वेषसुखदुःखकामक्रोधलोभमोहहर्षा- सूयाहंकारादींश्च हित्वा स्ववपुः कुपणमिव दृश्यते यतस्तद्वपुरपध्वस्तम् । संशयविपरीतमिथ्याज्ञानाना ४७ परमहंसोपनिषत्. यो हेतुस्तेन नित्यनिवृत्तः तन्नित्यबोधः तत्स्वयमे- वावस्थितिः तं तं शान्तमचलमद्वयानंदविज्ञानधन एवास्मि तदेव मम परमधाम तदेव शिखा च तदे- वोपवीतं च परमात्मात्मनोरेकत्वज्ञानेन तयोर्भेद एव विभग्नः सा संध्या ॥२॥ दंड किंवा शिखा किंवा यज्ञोपवीत किवा आच्छादन यांपैकी परमहंस कांही घेत नाही. शीत, उष्ण, सुख, दुःख, मान, अवमान, सहा ऊर्मि, निंदा, गर्व, मत्सर, दंभ, दर्प, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, काम, क्रोध, लोभ, मोह, हर्ष, असूया, अहंकार इत्यादि सर्वाचा त्याग करून आपले शरीर प्रेतवत् समजतो. कारण शरीरत्वाच्या कल्पनेचा नाशच झालेला असतो. संशय, विपर्यय आणि मिथ्याज्ञान यांचे जे कारण [ अविद्या ] त्यापासुन कायमचा निवृत्त होत्साता, कायमचे ब्रह्माचे ज्ञान प्राप्त झालेला, आणि "शान्त, अचल, अद्वय, आनंद व विज्ञानघन असें ब्रह्म मीच, हेच माझ खरे स्वरूप" अशा ज्ञानाने त्या ब्रह्मामध्येच स्थित असा रहातो. हे ज्ञान हीच त्याची शिखा आणि हेच त्याचे यज्ञोपवीत. परमात्मा व आत्मा यांच्या एकत्वाच्या ज्ञानाने यांचा भेदच मुळी नष्ट झाला. (या दोहोंचा अभेद अथवा एकीकरण) हीच त्याची संध्या. २. ] षडूमि = शरीर, बुद्धि व प्राण यांचे प्रत्येकी दोन मिळून सहा धर्म अश- नाया झ• भूक, पिपासा झ• तहान, शोक, मोह, जरा आणि मरण.
४८ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. सर्वान्कामान्परित्यज्य अद्वैते परमस्थितिः। ज्ञानदंडो धृतो येन एकदंडी स उच्यते ॥ काष्ठदंडो धृतो येन सर्वाशी ज्ञानवर्जितः । स वाति नरकान्धोरान्महारौरवसंज्ञकान् ॥ इदमंतरं ज्ञात्वा स परमहंसः ॥३॥ सर्व इच्छांचा त्याग करून अद्वैताचे ठिकाणी ज्याने कायमचा वास केला व ज्याने ज्ञानरूपी दंड धरला त्याला एकदंडी म्हणतात. ज्याने केवळ काष्ठाचा दंड धारण केला आहे, जो सर्व इच्छांनी मुक्त व ज्ञानरहित आहे, तो महागैरव नामक धोर नरकांना जातो. या दोहोमधले हे अतर जो जाणतो तो परमहंस होय. त्रिदंडी संन्यासी व एकदंडी मंन्यासी असे संन्याश्याचे भेद आहेत. त्रिदंडी संन्यासी तीन दंड एकत्र बांधून घेतात. वाग्दंड, कर्मदंड व मनोदंड अशा तीन दंडांची ही खूण होय. एकदंड म्हणजे ज्ञानदंड. आशांबरो ननमस्कारो न वधाकारो न निंदा न स्तुतिर्यादृच्छिको भवेद्भिक्षुर्नाऽऽवाहनं न विस- जनं न मंत्रं न ध्यानं नोपासनं च न लक्ष्यं नालक्ष्यं न पृथग्नापृथगहं न न त्वं न सर्व चानिकेतस्थितिरेव भिक्षुः । सौवर्णादीनां नैव परि- ग्रहेन्न लोकं नावलोकं चाऽऽबाधकः क इति चेद्वा- धकोऽस्त्येव । यस्माद्भिक्षुर्हिरण्यं रसेन दृष्टं च स परमहंसोपनिषत्. , ब्रह्महा भवेत् । यस्माद्भिक्षुर्हिरण्यं रसेन स्पृष्टं स च पोल्कसो भवेत् । यस्माद्भिक्षुर्हिरण्यं रसेन ग्राह्य च स आत्महा भवेत् । तस्माद्भिक्षुहिरण्यं रसेन न इष्टं च, न स्पृष्टं च, न ग्राह्यं च । सर्वे कामा मनोगता व्यावर्तेत । दुःखे नोद्विग्नः सुखे न स्पृहा त्यागो रागे सर्वत्र शुभाशुभयोरनभि- स्नेहो न द्वेष्टि, न मोदं च । सर्वपामिंद्रियाणां गतिरुपरमते यः आत्मन्येवावस्थीयते यत्पूर्णानंदै- कबोधस्तब्रह्माहमस्मीति कृतकृत्यो भवति कृत- कृत्यो भवति ॥४॥ दिशा हे त्याचे वस्त्र, तो कोणाला नमस्कार करीत नाही, पित- रांना पिंड देत नाही, कोणाची निंदा करीत नाही, कोणाची स्तुति करीत नाही, तो संन्यासी यादृच्छिक म्ह० निबंधरहित असतो. तो कोणत्याहि देवतेचे आवाहन करीत नाही, विसर्जन करीत नाही, मंत्र म्हणत नाहीं, ध्यान करीत नाही, उपासना परीत नाही, त्याला (कोणतीहि वस्तु) लक्ष्य नाही, .हीं, (कोणीहि) पृथक् नाही, अ-पृथक नाही, मी नाही, तूं नाही, कोणी नाही, निवासाला स्थान करून तो संन्यासी रहात नाही. सुवर्णादिकांचे दान त्याने स्वीकारता कामा नये. त्याने शिष्यवर्ग जमवू नये. त्यांचे अवलोकन देखील करूं नये. अलक्ष्य सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. यांना बाधक दोष काय आहे म्हणाल तर, बाधकत्व आहे. जर संन्यासी इच्छेने सुवर्णाकडे बघेल तर त्याला ब्रह्महत्येचा दोष लागेल; जर संन्यासी इच्छेने सुवर्णाला स्पर्श करील तर तो पोल्कस समजावा; आणि जर संन्यासी इच्छेने सुवर्ण घेईल तर त्याला आत्महत्येचा दोष लागेल. म्हणून संन्याश्याने इच्छेने सुवर्ण पाहू नये, स्पशू नये आणि घेऊ नये. अशा संन्याश्याच्या मनाच्या सर्व इच्छा निघून जातात. दुःखाने तो उद्विग्न होत नाही, सुखाची त्याला इच्छा नाही, त्याने विषयप्रीति सोडून दिलेली असते, शुभ व अशुभ या दोहोंचेहि ठिकाणी त्याला अनिच्छा असते, तो त्यांचा द्वेष करीत नाही, त्यांपासून त्याला आनंद होत नाही. (अशा प्रकारे) जो आत्म्याचे ठिकाणी रहातो, आणि ज्याला 'तें ब्रह्म मी आहे' अशा अद्वैतज्ञानाने पूर्णानंद प्राप्त झाला, त्याच्या सर्व इंद्रि- यांची गति निवृत्त होते, आणि तो कृतकृत्य होतो. लक्ष्य-मन व इंद्रिये यांना गोचर असे विकार, व अलक्ष्य=मि याज्ञान असे अर्थ शंकरानंदांनी केले आहेत. पौल्कस-निषादाच्छूद्रायां जातः पुल्कसः तत्तुल्यः। किवा प्रतिलोम संतति ती सर्व पोल्कस होय. ब्रह्महत्त्या, वैराग्य, आत्महत्त्या, आत्मस्थिति, कृतकृत्यता यांची व्याख्या करतांना नारायणस्वामींनी पुढील वचने दिली आहेत- "ब्रह्म नास्तीति यो ब्रूयाद्वेष्टि ब्रह्मविदं च यः । अभूतब्रह्मवादी च त्रयस्ते ब्रह्मघातकाः ॥" "पतत्यसौ ध्रुवं भिक्षुर्यस्य भिक्षोयं भवेत् । धीपूर्व रेतउत्सर्गो द्रव्यसंग्रह एव च ॥" "योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते । -
परमहंसोपनिषत्.
५१
किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥"
"न मुखं देवराजस्य न सुखं चक्रवर्तिनः ।
यत्सुखं वीतरागस्य ज्ञाननिष्ठस्य योगिनः ।।"
"ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः ।
नवास्ति किंचित्कर्तव्यमस्ति चेत्र स तत्त्ववित् ॥"
ॐ भद्रं कर्णेभिरिति शान्तिः।
इति परमहंसोपनिषत् ॥
५२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. ब्रह्मोपनिषत् । अथास्य पुरुषस्य चत्वारि स्थानानि भवन्ति, नाभिर्हदयं कंठं मूर्या च । तत्र चतुष्पादं ब्रह्म विभाति, जागरितं स्वप्नं सुषुप्तं तुरीयमिति । जाग- रिते ब्रह्मा स्वप्ने विष्णुः सुषुप्ते रुद्रस्तुरीयं परमा- क्षरम् । स आदित्यः स पुरुषः स विष्णुश्वेश्वरश्च । स्वयममनस्कमश्रोत्रमपाणिपादं ज्योतिर्विदितम् । यत्र लोका नलोका देवा नदेवा वेदा नवेदा यज्ञा नयज्ञा माता नमाता पिता नपिता स्नुषा नस्नुषा चांडालो नचांडालः पौल्कसो नपौल्कसः श्रमणो नश्रमणस्तापसो नतापसः । इत्येकमेव तत्परं ब्रह्म विभाति निर्वाणम् । न तत्र देवा ऋषयः पितर ईशते प्रतिबुद्धः सर्वविदिति ॥१॥ या पुरुषाची (शरीरामध्ये) चार स्थाने आहेत- नाभि, हृदय, कंठ आगि मूर्धा. तेथे (म्हणजे या चार स्थानांत अनुक्रमें) जागरित, स्वप्न, सुषुप्त आणि तुरीय असे चार प्रकारचे ब्रह्म प्रका- शते. जागृतावस्थेमध्ये बह्म', स्वनामध्ये विष्णु, सुषुप्तामध्ये रुद्र आणि तुरीय हे परमाक्षर होय. तोच आदित्य, तोच पुरुप, तोच विष्णु, तोच ईश्वर. तें स्वयं (म्ह० अविद्याव्यतिरिक्तरूपाने) मनो- रहित, श्रोत्ररहित, हस्तपादरहित, प्रकाशस्वभाव, आणि प्रकाशमान - ब्रह्मोपनिषत्. आहे. या (स्वरूपाचे) ठिकाणी लोक नलोक होतात, देव नदेव होतात, वेद नवेद होतात, यज्ञ नयज्ञ होतात, माता नमाता होते, पिता नपिता होतो, स्नुषा नस्नुषा होते, चांडाल नचांडाल होतो, पोल्कस नपोल्क्स होतो, संन्यासी नसंन्यासी होतो, तापस नतापस होतो. असे ते एकच परम ब्रह्म निर्विकार रूपाने प्रकाशते. तेथे देव, ऋपि, पितर यांची सत्ता चालत नाही. (कारण) या अवस्थेत तो आत्मसाक्षात्कारयुक्त व सर्वज्ञ असा असतो. लोकाः = कर्म फलानि असा अर्थ शंकरानंद करतात. निर्वाण = निर्गतं वाणं स्थलं शरीरं यस्मात्तनिर्वाणम । हृदिस्था देवताः सर्वा हृदि प्राणाः प्रतिष्ठिताः । हृदि प्राणश्च ज्योतिश्च त्रिवृत्सूत्रं च यन्महत् ॥२॥ सर्व देवता हृदयामध्ये स्थित आहेत, हृदयामध्येच इंद्रियें स्थित आहेत. हृदयामध्येच प्राण आणि प्रकाशस्वरूप ब्रह्म स्थित आहेत. तसेच महत् त्रिवृत्सूत्रहि आहे. त्रिवृत्सूत्र = तेज, आपं व अन्न [छां. ६. २ ४] किंवा सत्त्व, रज, तम. हृदि चैतन्ये तिष्ठति यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात् । आयुष्यमग्रथं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ॥३॥ तें चैतन्य हृदयामध्ये आहे ह्मणूनच ह्मणतात--- "यज्ञोप- वीतं."=परम पवित्र, जे सृष्ट्यारंभी प्रजापतीच्या बरोबर जन्म पावले, ५२ सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. ब्रह्मोपनिषत् । अथास्य पुरुषस्य चत्वारि स्थानानि भवन्ति, नाभिर्हदयं कंठं मूर्या च । तत्र चतुष्पादं ब्रह्म विभाति, जागरितं स्वप्नं सुषुप्तं तुरीयमिति । जाग- रिते ब्रह्मा स्वप्ने विष्णुः सुषुप्ते रुद्रस्तुरीयं परमा- क्षरम् । स आदित्यः स पुरुषः स विष्णुश्चेश्वरश्च । स्त्रयममनस्कमश्रोत्रमपाणिपादं ज्योतिर्विदितम् । यत्र लोका नलोका देवा नदेवा बेदा नवेदा यज्ञा नयज्ञा माता नमाता पिता नपिता स्नुषा नस्नुषा चांडालो नचांडालः पौल्कसो नपौल्कसः श्रमणो नश्रमणस्तापसो नतापसः । इत्येकमेव तत्परं ब्रह्म विभाति निर्वाणम् । न तत्र देवा ऋषयः पितर ईशते प्रतिबुद्धः सर्वविदिति ॥१॥ या पुरुषाची (शरीरामध्ये) चार स्थाने आहेत- नाभि, हृदय, कंठ आगि मूर्धा. तेथे (म्हणजे या चार स्थानांत अनुक्रमें) जागरित, स्वप्न, सुषुप्त आणि तुरीय असे चार प्रकारचे ब्रह्म प्रका- शते. जागृतावस्थेमध्ये ब्रह्म', स्वनामध्ये विष्णु, सुपुप्तामध्ये रुद्र आणि तुरीय हे परमाक्षर होय. तोच आदित्य, तोच पुरुप, तोच विष्णु, तोच ईश्वर. तें स्वयं (म्ह० अविद्याव्यतिरिक्तरूपाने) मनो- रहित, श्रोत्ररहित, हस्तपादरहित, प्रकाशस्वभाव, आणि प्रकाशमान ब्रह्मोपनिषत्. आहे. या (स्वरूपाचे) ठिकाणी लोक नलोक होतात, देव नदेव होतात, वेद नवेद होतात, यज्ञ नयज्ञ होतात, माता नमाता होते, पिता नपिता होतो, स्नुषा नस्नुषा होते, चांडाल नचांडाल होतो, पोल्कस नपोल्कस होतो, संन्यासी नसंन्यासी होतो, तापस नतापस होतो. असें तें एकच परम ब्रह्म निर्विकार रूपाने प्रकाशतें. तेथे देव, ऋपि, पितर यांची सत्ता चालत नाही. (कारण) या अवस्थेत तो आत्मसाक्षात्कारयुक्त व सर्वज्ञ असा असतो. लोकाः = कर्मफलानि असा अर्थ शंकरानंद करतात. निर्वाणं - निर्गतं वाणं स्थूलं शरीरं यस्मात्तनिर्वाणम् हृदिस्था देवताः सर्वा हृदि प्राणाः प्रतिष्ठिताः । हृदि प्राणश्च ज्योतिश्च त्रिवृत्सूत्रं च यन्महत् ॥२॥ सर्व देवता हृदयामध्ये स्थित आहेत, हृदयामध्येच इंद्रियें स्थित आहेत. हृदयामध्येच प्राण आणि प्रकाशस्वरूप ब्रह्म स्थित आहेत. तसेच महत् त्रिवृत्सूत्रहि आहे. त्रिवृत्सूत्र = तेज, आप व अन्न [छां. ६. २ ४] किंवा सत्त्व, रज, तम. हृदि चैतन्ये तिष्ठति यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतर्यत्सहजं पुरस्तात् । आयुप्यमग्रथं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः ॥३॥ ते चैतन्य हृदयामध्ये आहे ह्मणूनच ह्मणतात-- "यज्ञोप- वीतं."=परम पवित्र, जे सृष्टयारंभी प्रजापतीच्या बरोबर जन्म पावले, सार्थ उपनिपत्संग्रह-भाग सहावा. जे आयुष्य, श्रेष्ठ, आणि शुभ्र आहे असे यज्ञोपवीत आमाला बल. वान् व तेजस्वी करो. (अविद्येपासून) सुटका करो. सशिखं वपनं कृत्वा बहिःसूत्रं त्यजेद्बुधः । यदक्षरं परं ब्रह्म तत्सूत्रमिति धारयेत् ॥४॥ शिखेसुद्धां वपन करून शहाण्याने बाह्य सूत्राचा त्याग करावा. जे अविनाशी परम ब्रह्म तेंच सूत्र ह्मणून धारण करावें. सूचनात्सूत्रमित्याहुः सूत्रं नाम परं पदम् । तत्सूत्रं विदितं येन स विप्रो वेदपारगः ॥५॥ सूच= आरंभ करणे; जगताचा या ब्रह्माने आरंभ केला मग्न याला सूत्र ह्मणतात. हे परम पद होय. हे सूत्र ज्याने जाणलें तो ब्राह्मण वेदवेत्ता होय. येन सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ तत्सूत्रं धारयेद्योगी योगवित्तत्त्वदर्शिवान् ॥६॥ सूत्रामध्ये जसे मणि त्याप्रमाणे ज्या सूत्राने हे सर्व विश्व प्रोत ह्मणजे गुंफलेले आहे, ते सूत्र तत्त्वदर्शी योग्यवेत्त्या योग्याने धारण करावे. बहिःसूत्रं त्यजेद्विद्वान्योगमुत्तममास्थितः ॥७॥ उत्तम योगाचा आश्रय करणाऱ्या विद्वानाने बाह्य सूत्राचा त्याग करावा. ब्रह्मभावमिदं सूत्रं धारयेद्यः सचेतनः ।
ब्रह्मोपनिषत,
धारणात्तस्य सूत्रस्य नोच्छिष्टो नाशुचिर्भवेत् ॥८॥
जो ज्ञानी हें ब्रह्मरूपी सूत्र धारण करतो, तो त्या सूत्राच्या धार-
णामुळे कवी उच्छिष्ट किंवा अशुचि होत नाही.
सूत्रमंतर्गतं येषां ज्ञानयज्ञोपवीतिनाम् ।
ते वै सूत्रविदो लोके ते च यज्ञोपवीतिनः ॥९॥
ज्ञानरूपी यज्ञोपवीत धारण करणाऱ्या ज्यांचे सूत्र अंतर्गत झणजे
शरीरांतर्भागी स्थित ब्रह्म आहे, तेच या जंगी सत्रवेत्ते होत, आणि
तेच यज्ञोपवीती होत.
ज्ञानशिखिनो ज्ञाननिष्ठा ज्ञानयज्ञोपवीतिनः ।
ज्ञानमेव परं तेषां पवित्रं ज्ञानमुच्यते ॥१०॥
ज्ञान हीच ज्यांची शिखा व ज्ञान हेच ज्यांचे यज्ञोपवीत अशा
ज्ञाननिष्ठ पुरुपांना ज्ञान हेच परम होय. ज्ञान हेच त्यांचे पवित्रतेच
साधन होय.
अग्नेरिव शिखा नान्या यस्य ज्ञानमयी शिखा।
स शिखीत्युच्यते विद्वान्नेतरे केशधारिणः ॥१॥
अग्नीला ज्याप्रमाणे स्वस्वरूपी (ज्वाला) शिखा असते त्याप्र-
माणे ज्ञान हीच ज्याची शिखा त्या विद्वानाला शिखी ह्मणतात.
इतर केशधारी लोक हे शिखी नव्हेत.
कर्मण्यधिकृता ये तु वैदिके ब्राह्मणादयः ।
तैः संधार्यमिदं सूत्र क्रियांगं तद्धि वै स्मृतम् ॥१२॥
सार्थ उपनिषत्संग्रह-भाग सहावा. वैदिक कर्माचे ठिकाणी ममत्वबुद्धि ठेवणा-या ब्राह्मणादिकांनी हे सूत्र धारण करावे. हे सूत्र कर्माचे अंग म्हणून म्हटलेलें आहे. शिखा ज्ञानमयी यस्य उपवीतं च तन्मयम् । ब्राह्मण्यं सकलं तस्य इति ब्रह्मविदो विदुः ॥१३॥ ज्ञानरूपी ज्याची शिखा त्याचे उपवीतहि ज्ञानरूपच होय. त्याचे ठिकाणी सर्व प्रकारे ब्राह्मण्य आहे, असें ब्रह्मवेत्ते समजतात. इदं यज्ञोपवीतं तु परमं यत्परायणम् । स विद्वान्यज्ञोपवीती स्यात्स यज्ञस्तं यज्विन विदुः ॥१४॥ हे श्रेष्ठ व परायण (म० अविधेचा आश्रय असलेले किंवा अंतिम प्राप्तव्य असलेले) ब्रह्म हेच (खरें) यज्ञोपवीत होय. हे जाणणारा हाच यज्ञोपवीती; तोच यज्ञ आणि तोच यज्ञकर्ता. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा । कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ॥१५॥ हा सर्व भूतांचे ठिकाणी गूढ रूपाने असलेला एक देव आहे; सर्वव्यापी, सर्व भूतांचा अंतरात्मा, कर्माचा अध्यक्ष म० पहाणारा, सर्व भूतांचे ठिकाणी वास करणारा, साक्षी, केवल ज्ञाता आणि निर्गुण असा आहे. हा मंत्र श्वेताश्वतरांत [६.११] आहे.
ब्रह्मोपनिषत्. ५७ एको वशी सर्वभूतांतरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति । तमात्मानं येऽनुपश्यन्ति धीरा- स्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम्॥१६॥ एक, स्वामी, सर्व भूतांचा अंतरान्मा, जो एक रूप बहुत प्रका- रांनी दाखवितो, त्याला स्वतःचे ठिकाणी जे शहाणे पहातात त्यांनाच शाश्वत शान्ति प्राप्त होते, इतराना नाही. श्वेताश्वतर ६.१२ पहा. आत्मानमरणिं कृत्वा प्रणवं चोत्तरारणिम् । ध्याननिर्मथनाभ्यासाद्देवं पश्येन्निगृढवत् ॥१७॥ आत्मा ही (खालची) अरणी व ॐकार ही वरची अरणी करून ध्यानाच्या सतत मंथनाने गूढ असल्यासारखा जो देव तो पहावा. श्वेताश्वतर १. १४ व कैवल्योपानपत् १.११ पहा. तिलेषु तैलं दधनीव सर्पि- रापः स्त्रोतःवरणीपु चाग्निः । एवमात्माऽऽत्मनि गृह्यतेऽसौ सत्येनेनं तपसा योऽनुपश्यति ॥१८॥ तिळांमध्ये जसें तेल, दह्यामध्ये जसें लोणी, झन्यामध्ये जस उदक आणि अरणींमध्ये जसा अग्नि, त्याप्रमाणे हा आत्मा जो सत्याने आणि तपाने याला शोधतो-~-त्याजकडून आत्म्यामध्ये -
मार्थ उपनिषसंग्रह-भाग सहावा.
म्हणजे स्वतःमध्येच जाणला जातो.
वताश्वतर २.१५ पहा.
ऊर्णनाभिर्यथा तंतून्सृजते संहरत्यपि ।
जाग्रत्स्वप्ने तथा जीवो गच्छत्यागच्छते पुनः ॥१९॥
जसा कोळी तंतु उत्पन्न करतो व नाहीसे करतो त्याप्रमाणे जीव
जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये जातो आणि पुनः येतो.
नेत्रस्थं जागरितं विद्यात्कंठे स्वप्नं समाविशेत् ।
सुपुप्तं हृदयस्थं तु तुरीयं मूर्धनि स्थितम् ॥२०॥
जागृतावस्थागत आत्मा विश्वात्मा] नेत्राचे ठिकाणी स्थित
जाणावा. स्वप्नावस्थागत आत्मा [तैजस] कंठाचे ठिकाणी स्थित
जाणावा. सुषुप्तावस्थागत आत्मा [प्राज्ञ] हृदयामध्ये स्थित जाणावा.
आणि चवथा तुरीयात्मा मस्तकामध्ये स्थित जाणावा.
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ।
आनंदमेतज्जीवस्य यज्ञात्वा मुच्यते बुधः ॥२१॥
ज्याप्रत प्राप्त न होतां ज्यापासून वाणी मनासह निवृत्त होते
तो हा (तुरीयात्मा) जावाचा आनद होय. याचे ज्ञान झाले म्हणजे
ज्ञाता मुक्त होतो.
सर्वव्यापिनमात्मानं क्षीरे सपिरिवार्पितम् ।
आत्मविद्यातपामूलं तद्ब्रह्मोपनिषत्पदं तद्ब्रह्मोपनिष
त्पदामिति ॥२२॥
ब्रह्मोपनिपत्.
दुधामध्ये जसे लोणी त्याप्रमाणे सर्व व्यापून रहाणारा आत्मा
हाच तो आनद होय. आत्मज्ञान आणि तप यांच्या योगाने हा
आत्मा प्राप्त होणारा आहे. हा आत्मा म्हणजेच ब्रह्म. हाच उपनि-
पदाचा म० रहस्यविद्येचा विषय होय.
इति अथर्ववेदीया ब्रह्मोपनिपन्समाप्ता ।।
marmarathmeermahade
numnamaAMr
विक्रीस तयार.
नवीन वेदान्तपर ग्रंथ.
संपादक-हरि रघुनाथ भागवत बी.ए.
सार्थ उपनिषत्संग्रह भाग चवथा-कैवत्य,
कौषीतकि, जाबाल, मैत्रायणीय आणि श्वेताश्वतर ही
पांच उपनिषदे, मराठी भाषांतर व टीपा यांसह.
किमत दोन रुपये.
सूचना-सार्थ उपनिषत्संग्रहाच्या पहिल्या तीन
भागांच्या दोन आत्ति संपल्या. नवी आवृत्ति छापा-
वयाची आहे.
अटेकर आणि कंपनी.
वेदान्त-पुस्तक-प्रकाशक पुणे-शहर,
--
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.