Library
Pahile Mahaayudhda Bhaaga Tisaraa
Front matter
UNIVERSAL
LIBRARY
OU_184294
LIBRARY
UNIVERSAL
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
॥ श्रा
पहिले महायुद्ध
१९१४-१८
(भाग तिसरा)
लेखक
श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
मुद्रक व प्रकाशक
श्री. यशवंत कृष्ण खाडिलकर
श्रीदत्तात्रय प्रिंटिंग प्रेस, १३ शेगवीवाडी मुंबई नं. ४
( आवृत्ति पहिली)
सन १९४०
किंमत १॥ रुपया
प्रस्तावना ती. काकासाहेब खाडिलकर यांनी गेल्या महायुद्धाच्या वेळी १९१६-१७ साली महायुद्धाच्या तिसऱ्या वर्षात चित्रमय जगत् मासिकात महिनेवारीने लिहिलेले लेख ह्या भागांत जसेच्यातसें घेतलेले असून लेख सुबोध व्हावेत म्हणून पूर्वीच्या भागाप्रमाणेच ह्या भागांत प्रसंगोचित नकाशाहि घातला आहे. ह्या पुढील उरलेले दोन भाग लवकरच प्रसिद्ध होतील.
॥ श्री॥ पहिले महायुद्ध भाग ३ रा) महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा ऑगस्ट-सप्टेंबर महिना जुलै महिन्याप्रमाणे आगस्ट महिनाहि दोस्त सरकाराच्या सरशीचा गेला; इतकेंच नव्हे तर आगस्टच्या शेवटच्या आठवड्यांत रोमानिया दोस्त सरकारांना मिळाल्या- मुळे दोस्त सरकारांच्या सैन्यांत सात आठ लख सैन्याची मोठी भर पडली, व अखेरच्या जयाविषयींची शंका निर्मूल झाली. रोमानिया दोस्त सरकारांना कां व कसा सामील झाला आणि त्यामुळे प्रथम बाल्कन प्रदेशावर व नंतर एकंदर महायुद्धावर कोणचे परिणाम होणारे आहेत याचा विचार करण्यापूर्वी आगस्ट महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांतील महायुद्धाच्या स्थितीचे अवलोकन करणे जरूर आहे. जुलै महिन्याप्रमाणे आगस्ट महिन्यांतहि फ्रान्सची रणभूमि व रशि- याची रणभूमि पूर्णपणे जागृत होती; इटलीच्या रणभूमीलाहि चेव आलेला होता व तुर्कस्थान विशेष धडपड करूं लागले होते. निद्रित अवस्था काय ती मेसापोटे. मियाच्या बाजूला दृष्टीस पडत होती, आगस्टच्या पूर्वी युफ्रेटीस व तैग्रीस नद्यांच्या संगमाजवळ उन्हाळा १२० डिग्रीहून अधिक असल्यामुळे इंग्रजी सेनेला विशेष हालचाल करता येणे शक्य नव्हते. तुर्कोनी चढाई करावी म्हणावे तर तुर्काच्या- पाशी त्या बाजूला तितकें बलच नाही. लहानसान आरबी टोळ्यांना फूस देऊन त्यांच्याकडून इंग्रजी सेनेची वाटमारी करण्याचा उद्योग तुर्कोनी केला, पण त्याचा तादृश कांहींच उपयोग झाला नाही, हे सांगणे नलगे, लेकव्हॅन व आमिनिया प्रांतांत रशियाचे पाऊल पुढे पडले; तथापि त्या बाजूला विशेष फेरबदल झाला नाही असे म्हणण्यास हरकत नाही. आगस्ट महिन्यांत तुर्कोनी जी विशेष हालचाल २ पहिले महायुद्ध दाखविली ती सुवेज कॅनालाच्या बाजूला आगस्टच्या ७-८ तारखेच्या सुमारास वीस पंचवीस हजार तुर्की सैन्य काटिया प्रांतांच्या बाजूने सुवेज कॅनालजवळ पंधरा सतरा मैलांवर येऊन धडकलें व तेथे दोन दिवस इंग्रजी सेनेची व तुकी फौजेची मोठी लढाई झाली. तुर्कीनी मोठया तोफा व जर्मन गोलंदाज आपल्याबरोबर आणले होते; तरी तुर्कोचा पुग पराभव होऊन पंचवीस तीस मैल मागे हटावें लागले. ह्या पीछेहाटींत तुर्कोना मोठया तोफा परत नेतां आल्या हे खरे, पण तीन चार हजार तुर्की सैन्य इंग्रजांच्या हाती लागले व सात आठ हजार सैन्याची खराबी झाली ! तुर्काचे हे जे मोठे नुकसान झाले त्याचे कारण पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तुर्कोना करता आला नाही हे होय. हवागण्याच्या दृष्टीने सुवेजनालावर हल्ला करण्यास आगस्ट महिना प्रतिकूल होता. अशा प्रतिकूल स्थितींत तुर्कोनी का हल्ला केला ? इजिप्तच्या संरक्षणाकडे इंग्रजांचे मन वेधले जाऊन पश्चिम रणभूमीतले इंग्रजांचे प्रयत्न ढिले पडावेत म्हणून. पण या हल्लयाने तुर्कोची निर्बल स्थिति तेवढी उघडी जाहली आणि सुत्रेजचा मार्ग निर्भय ठरला. रूमानिया महायुद्धांत सामील होण्या- पूर्वी सुवेज कनालजवळ तुर्काचा हा पराभव झाला होता; आणि त्यामुळे तुर्काच्या मनुष्यबलाविषयींच्या अफवा निराधार ठरल्या होत्या हे ध्यानात ठेवण्याजोगें आहे. आगस्ट महिन्यांत तुर्की रणभूमीत दोस्त सरकारचीच सरशी होती. इटा- लीच्या रणभूमीकडे पाहिले तर हीच सरशी दृष्टीस पडल्यावांचून राहात नाही. आगस्टच्या दुसऱ्या आठवड्यांत इटालियन सैन्याने इसांझो नदी काठच्या आस्ट्रि- यन फळीवर एकदम मोठा हल्ला चढविला व इसांझो नदी ओलांडून पलीकडचे गारीजिआ शहर इटलीने घेतले. गेले आठ दहा महिने गारिजिआ शहराकरितां एकसारख्या झटापटी होत होत्या. व आस्ट्रियाने या ठिकाणचा बंदोबस्तहि फार चांगला केला होता; पण इटलीने मोठया हिकमतीने हे ठाणे सर केले. दोन महिन्यापूर्वीच्या ट्रेटिनो प्रांतांतील इटलीच्या पीछेहाटीने इटालियन सेनेस जो कमीपणा आला होता तो गारिजिआ येथील पराक्रमाने धुतला गेला. गारिजिआ येथे इटलीला एवढा मोठा जय मिळाला की त्यावेळी इटलीने आद्रियाची फळी फोडली, असे सर्वांना वाटले, पण आगस्टच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यांत गारिजिआच्या पूर्वेस इटलीची प्रगति न झाल्यामुळे फळी फुटली नाही असे म्हणणे भाग आहे. फळी जरी फुटली नाही तरी गारिजियाचा विजय महत्त्वाचा ऑगस्ट-सप्टेंबर महिना होय. इटलीला एवढा मोठा विजय यापूर्वी मिळालेला नव्हता. शिवाय हा विजय ट्रेटिनो प्रांतांतील आस्ट्रियाची स्वारी मागे लोटत असतांना इटालीने मिळविलेला आहे. संकट ओढवले असतांनाहि इटलीची सेना पुन्हां वर डोके काढू शकते हैं या विजयाने ठरलें. ट्रिस्टी प्रांत आस्ट्रियापासून घेण्याच्या इटलीच्या मनोरथाला पुन्हां नवा वेग प्राप्त झाला. इटली महायुद्धांत सामील होऊन पांच सात महिने झाल्यावर असें वाटू लागले की, हा महायुद्धांत पडला कशाला ? याला ट्रिस्टीप्रांत कसला मिळतो ? ट्रेटिनो प्रांतांत आस्ट्रिया घुसला त्यावेळी वाटले की, इटलीची मदत दोस्त सरकारांना न होतां उलट इटलीला मदत करता करतां इंग्रजांना पुरेवाट होते की काय ? पण नाहीं; स्वतः आणि स्वतःच्या पायावरच इटली सावरला इतकेच नव्हे तर ईसांझोच्या बाजूला वर उसळून आस्ट्रियाला चोप देऊन गारिजिआ शहर घेऊन ट्रिस्टीची आशा धरण्यास इटली लायक आहे असे सर्व जगास इटलीने दाखविलें. ट्रिस्टी प्रांत आस्ट्रियापासून हिसकावून घेण्याच्या मार्गाला इटाली लागलेला आहे असें प्रत्यक्ष पाहिल्यावर ट्रॅन्ससिल्व्हानिया प्रांत आस्ट्रियापासून आपणासहि हिसकावून घेता येईल असें रोमानियाला कां वाटू नये ? पश्चिम रणभूमीतील रणकथेनेंहि आगस्ट महिन्यांत रोमानियाला उत्तेजन दिले. जुलई महिन्यामध्ये इंग्रजांचे पाऊल पुढे पडले खरे, पण आगस्ट महिन्यांत इंग्र- जांची गति फारच मंद झाली. जर्मनांनी इंग्रजांवर बरेच उलट हल्ले केले पण त्यांत जर्मनांना मुळीच यश आले नाही. आगस्ट महिन्यांत इंग्रजांच्या हातून श्रीप- व्हाल गांव घेववले नाही. तथापि सदर गांवाला पूर्वेकडून वळसा देण्याचा उद्योग सावधगिरीने पण नेटाने इंग्रजांनी चालविला आहे. पेरोनि गांवहि आगस्ट महिन्यांत फ्रेंच सेनेला घेतां आलें नाहीं तथापि इंग्रजांप्रमाणे फ्रेंचांनीहि आस्ते आस्ते पण जोराने पुढे पाऊल टाकण्याचा क्रम सुरू केला आहे. जुलै आगस्ट या दोन महिन्यांतील इंग्रज-फ्रेंच चढाईकडे पहातां पहिल्या आठवडयांतील घडकीसरसें इंग्रज व फ्रेंच जे कांहीं तीनचार मैल पुढे सरकले ते जवळ जवळ तेवढेच मैल आगस्टअखेर संभाळून राहिले असें म्हणावे लागते. प्रगति आहे, नाहीं असें नाहीं पण फळी फोडण्याचे स्वरूप त्या गतीला नाही. व्हडूनच्यापुढे जर्मन सेनेची जी स्थिति झाली जी स्थिति सोमनदीच्या काठी महिन्यांत ती इंग्रजांची व फ्रेंचांची होऊ लागली. इंग्रजांची चढाई स्तंभित झाली, आगस्ट पहिले महायुद्ध आणि सोम नदीच्या लढाईला किल्लयाच्या सभोवारच्या लढण्याचे स्वरूप प्राप्त झाले. इंग्रत्नांची व फ्रेंचांची ही मंदगति रोमानियाला उत्तेजन देणारी कशी होती ? इंग्रजांना व फ्रेंचांना वर्ष दीड वर्षाच्या तयारीने जर जर्मनांची फळी मोडतां आली नाही तर त्यांच्या पराक्रमावर भिस्त ठेवून रोमानियासारखें तटस्थ राष्ट्र त्यांच्या वतीने महायुद्धांत सामील कसें झालें ? आगस्ट महिन्यांत इंग्रजांना व फ्रेंचांना जर्मनीची फळी मोडतां आली नाही हे खरे; तथापि जर्मन सेनेशी सतत लढत राहून जर्मनांचा नाश रोजच्या रोज करण्याची ताकद इंग्रजांनी व फ्रेचांनी या दोन महिन्यांत प्रकट केली आहे, आणि या शक्तींत आणखी कित्येक महिने रतीभरहिं कमीपणा येणार नाही अशी स्पष्ट चिन्हें दिसत आहेत. जुलै महिन्यांत व्हडूनवर जोरजोगचे हल्ले जर्मनी करीत होता. पण आगस्ट महिन्यांत ते मंदावले, इतकेच नव्हे तर जर्मनांचे पाऊल पुढे पडण्याच्या ऐवजी फ्रेंचांचेच पाऊल व्हडू. नच्या सभोवती पुढे पडू लागले ! सहा महिने व्हईनवर हल्ला करून जर्मनांना यश मिळाले नाही, तोफांचे मोर्चावर मोर्चे रचण्याच्या कामांतील जर्मनांचे वर्चस्व व्हडू नपुढे नष्ट झाले. १९१५ साली रशियावर जर्मनीने जे जय मिळविले त्याची गुरुकिल्ली त्या वर्चस्वांत ! हे वर्चस्व नष्ट होण्याबरोबर तटस्थ राष्ट्रांत जर्मनीची इज्जत कमी झाली. इज्जत कमी होण्याबरोबर आपला फायदा करून घेण्यास कोणची हरकत आहे, असले विचार रोमानियांत खेळू लागले. हे लाभाचे विचार रोमानियाला गुगवीत असतांना इंग्रजांच्या व फ्रेंचांच्या चढाईमुळे रोमानियाला असे वाटले की, इंग्रज व फ्रेंच जरी जर्मनीची फळी फोडण्यास समर्थ नसले तरी जर्मनीचे मुख्य बल फ्रान्समध्येच अडकवून ठेवण्यास व त्याला रोज रोज उगाळून झिजवून टाकण्यास समर्थ आहेत. जर्मन तोफांचे आक्राळविक्राळ स्वरूप व्हडूननें सौम्य केले आणि जर्मन सेनेचा विस्तार इंग्रजांच्या व फ्रेंचांच्या चढाईने मर्यादित केला. अर्थात जर्भनीचे भय रोमानियाला राहिले नाही. भय उरलें नाहीं खरे, पण यश मिळेल अशी खात्री कशी पटली ? व्हडून येथील जर्मनीच्या अपयशाने ज्या कार्याचे बीज पेरले, अँग्लो-फ्रेंचांच्या चढाईमुळे ज्या कार्याचे बीजास अंकूर फुटले, इटलीच्या विजयाने ज्या कार्याला पल्लवीत केले, तें रोमानियाला सामील करून घेण्याचे कार्य रशियाच्या काथियनवरील स्वारीने फळास आणले. जून महिन्यांत रशियाने ऑस्ट्रियावर स्वारी करण्यास प्रारंभ केला. दोन अडीच महिन्यांत सर्व ऑगस्ट-सप्टेंबर महिना . ब्युकोव्हिनाप्रांत घेऊन रशिया कार्पेथियनवर चढला. आणि ब्युकोव्हिनाच्या उत्तरेकडील स्टॅनला प्रांत काबीज करून त्या बाजूचे कार्पेथियनचे घांटहि रशियाने व्यापिले; इतकेच नव्हे तर उत्तर ग्यालिशियांत कोव्हेल व लेबर्ग यांनाहि शह देऊन दोनतीन महिन्यांत सात आठ लाख आस्ट्रियन सैन्य रशियाने लोळविलें. जर्मनीला फ्रेंरांनी व इंग्रजांनी पश्चिम रणभूमीत पूर्णपणे वेधून धरलेले, आणि पूर्व रणभूमीत आस्ट्रियाला रशिया एका मागून एक तडाखे देत असलेला! अशी स्थिति पाहिल्या- वर रोमानियाला स्वतःचा लाभकाल जवळ आला असे वाटल्यास नवल ते कोणचें! रशियाच्या स्वारीने आस्ट्रियाचे व जर्मनीचे आसन डळमळीत केल्याचा हा चवथा प्रसंग होय. महायुद्धाच्या अगदी प्रारंभी जर्मनी बेल्जममध्ये व फ्रान्समध्ये जोरजोराने घुसत असतां रशियाने पूर्व प्रशियावर जोराची स्वारी केली व सर्व जर्मनीला घाबरवून सोडले. त्यावेळी पूर्व प्रशियाच्या सरहद्दीवरील दलदलीच्या जाळ यांत रशियाला पकडून सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांनी रशियाचे संकट टाळले. पुढे यिप्रेसच्या लढाईत जर्मन गुंतले असतांना दक्षिण व पश्चिम पोलंड आक्रमून जर्मनींत घुसण्याचा घाट रशियाने घातला. त्यावेळी कलेची हाव सोडून जर्मनीला आपले सैन्य रशियाच्या बाजूला न्यावे लागले. या दुसऱ्या खेपेला सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांनी रशियाला वार्सापर्यंत मागे हटविलें, पण वार्साच्या सभोवती रशियाने जर्मनीचें कांहीं चालू दिलें नाही. जर्मनीला वाराजवळ थोपविल्यानंतर प्रारंभी थंडी कमी झाल्यावर रशियाने पुन्हां उचल खाल्ली आणि प्रिझमिसलचा किल्ला घेऊन मार्च- एप्रिल महिन्यांत सर्व ग्यालिशिया व्यापून उत्तर कार्येथियन ओलांडण्यास सुरवात केली. आस्ट्रो-जर्मनांचे आसन डळमळीत झाल्याचा हा तिसरा प्रसंग होय. त्या वेळी इटली महायुद्धांत सामील झाला. सर्व हंगारी व्यापला जाऊन महायुद्धाची परिसमाप्ति रशियाच्या बाजूने एक-दोन महिन्यांत होणार असें सर्वांना त्यावेळी वाटले; पण जर्मनीला एक गोष्ट अनुकूल ह्यावेळी झाली. रशियाला मदत व्हावी म्हणून अँग्लो-फ्रेंचांनी जर्मनीच्या फळीवर बरेच हल्ले केले, आणि त्या हल्लयांत जरी यश मिळविले तरी इंग्रजांच्या बाजूला दारूगोळयाचा पूर्ण तुटवडा आहे असे जर्मनांच्या दृष्टोत्पत्तीस आणले. पाऊल पुढे पडले, पण व्यंग बाहेर आले. या व्यंगाचा फायदा घेऊन पश्चिम रणभूमीतील आपलें बरेंच सैन्य जर्मनीने पूर्वेकडे सालच्या ६ पहिले महायुद्ध नेलें आणि डुनाजी नदीच्या काठी रशियाचा पराभव करून रशियाच्या मोठया पीछेहाटीस सुरुवात केली. त्या पीछेहाटीने गतत्राण न होतां पुन्हां मोठी सेना उभारून शस्त्रास्त्रांनी ती सज्ज करून आगस्ट महिन्यांत रशियाने आस्ट्रो-जर्मनांचे आसन चवथ्यांदा डळमळीत केलें; व आगस्ट अखेरीस रोमानिया दोस्त सरकारांना सामील झाल्यामुळे हा डळमळणारा डोलारा या चवथ्या खेपेस खाली पडल्यावांचून राहाणार नाही, अशी सर्वांची खात्री झाली आहे. पहिल्या तीन प्रसंगी हा डोलारा स्थिर झाला, याचे कारण दारूगोळ्याच्या दृष्टीने अँग्लो-फ्रेंच सेना त्यावेळी कम- कुवत होती. पण आता ती स्थिति राहिलेली नाही. खुद्द जर्मनीची सामुग्री व्हर्जुन पुढे खर्च होऊन गेली आहे. तेव्हां सेनेच्या व दारूगोळयाच्या दृष्टीने जर्मनांपाशी विशेषशी शिल्लक राहिलेली नाही. जुलै व आगस्ट या दोन महिन्यांच्या चढाईने अँग्लो-फ्रेंच जरी मंदगति झाले असले तरी दारूगोळयाचा तुटवडा त्यांच्या बाजूला बिलकूल नाही. जून-जुलै महिन्यापेक्षां आगस्ट महिन्यांत रशिया जरी किंचित् थकलेला दिसला तरी रोमानियाच्या सात आठ लाख सैन्याच्या मदतीने हंगेरियाची पुरी फजिती उडविण्यास रशिया समर्थ आहे. आगस्ट महिन्यांत रशिया किंचित् थकलेला दिसत होता खरा पण हा थकवा थोडक्याशा मदतीने दूर होण्यासारखा अल्पस्वल्पच, रोमानियाच्या मदतीची जरुरी त्यावेळी रशियास वाटत होती. आपल्या मदतीची जरुरी वाटत आहे आणि मदत करण्याबरोबर यश येण्यास कोणचीच हरकत नाही अशी संधि पाहून रोमानियाने आगस्टअखेर आस्ट्रियाविरुद्ध युद्ध सुरू केले व लगेच जर्मनी, टर्की व बल्गेरिया यांनीहि रोमानियावर तरवार उपसली. रोमानिया महायुद्धांत सामील झाल्यामुळे दोन्ही पक्षांच्या लष्करी धोरणांत फरक पडलेला आहे. गेले दोन तीन महिने दोस्त सरकारचे धोरण असें होतें की पश्चिम रणभूमीत व पूर्व रणभूमीत जर्मनीला एकसारखे चेंचीत रहावयाचे व जर्मनी थकला म्हणजे फळी फोडून आत शिरून जर्मन सेनाशकटाचा चक्काचूर करावयाचा. पण रोमानिया सामील झाल्याने ह्या धोरणास एक नवीन वळण लागले आहे. जर्मनीला दमांत उखडण्याच्या क्रियेस यश मिळण्यास जर्मनीचा तुर्की साम्राज्याशी असलेला आगगाडीचा संबंध तोडणे जरूर आहे. तुर्कोचे मनुष्यबल व तुर्काचा दाणापाणी ह्या मदतीवर जर्मनीचा दम वाढण्याचा संभव आहे. नव्या ऑगस्ट-सप्टेंबर महिना असें आज बलाचा तुर्की सरा जर बंद झाला तर जर्मनीचा दम लवकर सुटेल. रोमानिया सामील झाल्याने तुर्काचा च जर्मनांचा संबंध तोडणे हे दोस्त सरकारांच्या लष्करी धोरणाच्या आटोक्यात आले आहे आणि सप्टेंबर-आक्टोबर किंवा नोव्हेंबर महि- न्यांत म्हणजे थंडीचा मोसम सुरू होण्यापूर्वी जर हा संबंध तोडतां आला तर रोमानिया सामील झाल्याचे योग्य फळ मिळाल्यासारखे होईल. बर्फापूर्वी जर हा संबंध तोडता आला नाही तर सात आठ लाख सैन्याची नवी कुमक मिळूनहि दोस्त सरकारांना योग्य फळ न मिळाल्यामुळे आस्ट्रो-जर्मन व तुर्क उल्हसित होतील, आणि जितक्या लवकर महायुद्धाची परिसमाप्ति होईल, वाटत आहे तितक्या लवकर ती होणार नाही. ह्या दृष्टीने विचार केला असतां पुढील तीन महिन्यांत तुर्काचा व जर्मनांचा संबंध तोडणे दोस्त सरकारांना भाग आहे. हा संबंध कसा तुटणार ? हा संबंध तोडाव याचा म्हणजे बेलग्रेडपासून कान्स्टान्टिनोपलपर्यंत जाणाऱ्या आगगाडीवर कोठे तरी दोस्त सरकारांच्या लष्कराची सत्ता स्थापन करावयाची. बेलग्रेडपासून कान्स्टान्टि- नोपलपर्यंत जाणारी आगगाडी तीन प्रांतांत मोडता येते. पहिला टापू बेलग्रेड, नीश, व सोफिया हा होय. दुसरा सोफिया-फिलिपोपोलिस-ऑड्रियानोपल हा होय. आणि तिसरा अॅडियानोपल-कान्स्टान्टिनोपल हा होय. ह्या तीन टापैकी कोणच्या तरी एका टापूत दोस्त सरकारच्या लष्करनें आगगाडी गांठली पाहिजे. आगगाडी गांठण्याचे हे काम कसे होणार ? प्रथम आपण पहिल्या टापूचा विचार करूं, बेलग्रेड-नीश व सोफिया ह्या टापूवर कोणत्या कोणत्या राष्ट्राची सेना उतरूं शकते तें पाहूं. बेलग्रेडपासून नीशपर्यंतच्या टापूवर रोमानियाची सेना सर्वात लवकर जाऊ शकते. अर्शीव्होपासून व्हिडीनपर्यंतचा डान्युब नदीचा भाग रोमानियन सैन्याने ओलांडला म्हणजे रोमानियाचे लष्कर सहियाच्या हद्दीत एकदम येते, व तेथून बेलग्रेड-नीशचा आगगाडीचा फाटा ६०-७० मैलच दूर राहातो. हे ६०-७० मैल डोंगराळ आहेत ही गोष्ट खरी, पण तेथे सहियन लोकांची वस्ती असल्यामुळे रोमानियाला पुढील मार्ग सुलभ होणारा आहे. डान्यूब नदी ओलांडून रोमानिया जर सहियाच्या मुलुखांत ह्या जागी आला तर सर्व सहियामध्ये आस्ट्रियाच्या विरुद्ध बंडे झाल्यावांचून राहणार नाहीत. देशत्याग करतांना सहियन लोकांनी ठिकठिकाणी पुरून ठेवलेल्या बंदुका व तोफा वर येतील, आणि सहियन मुलुख ८ पहिले महायुद्ध संभाळता संभाळतां आस्ट्रियन सैन्याला पुरेवाट होईल. बेलग्रेड-नीश झा टापूवर रोमानियाची मोहीम सुरू होण्याबरोबर सलिनोका येथे बसलेले अँग्लो-फ्रेंच सैन्य डोरेनच्या मार्गाने मासिडोनियामध्ये शिरून बर्दाद नदीच्या काठाने नीशच्या रोखाने उत्तरेस जाऊं लागेल. म्हणजे पहिल्या टापूंवर ईशान्येकडून रोमानिया व दक्षिणेकडून अँग्लो-फ्रेंच चाल करणार हे निश्चित होय. ह्या दोन खोऱ्यांना मदत होण्याकरिता दक्षिण आल्बेनियामध्ये इटालियन सैन्य उतरले असून ते युस्कपच्या रोखाने दक्षिण मासिडोनियांत घुसू पाहात आहे. ह्या इटालियन सन्यास मदत व्हावी म्हणून सलिनोका येथे उतरलेले एक लाख सहियन सैन्य मोनास्टिरच्या दक्षिण-पश्चिम बाजवर चाल करून जात आहे. रोमानिया लढाईत सामील होण्याबरोबर आगस्टच्या अखेरीस तिन्ही दिशांनी बेलग्रेड-नीश टापूवर तिन्ही स्वाऱ्यांस सुरवात झाली आहे. दक्षिण आल्बेनियांत इटालियन सैन्य उतरले असून समुद्र किनारा वर सोडून तीस मैल आंत हे सैन्य गेले आहे. आल्बेनियाचा हा प्रांत व युस्कपपर्यंतचा हा मासिडोनि- याचा प्रांत इतका डोंगराळ व बिन रस्त्यांचा आहे की, त्या बाजूने होणाऱ्या स्वारीस कोणीहि लष्करी धोरण्याच्या दृष्टीने फारशी किंमत देणार नाही. मग इटली असल्या स्वारीत का पडला ? स्वतःच्या जिवावर ही स्वारी यशस्वी करण्याकरितां नव्हे, तर सलिनोका येथील लाख सहियन सैन्य मोनास्टिरच्या दक्षिण पश्चिम टापूत जर आले तर त्यास मदत करण्याकरितां होय, रोमानिया महायुद्धांत सामील होण्याच्या सुमारास सामील होण्याच्या सुमारास मोनास्टिरच्या रोखाने सहियन सैन्य उत्तरेस जाऊ लागले. ह्या सैन्यास दक्षिण आल्बेनियाच्या पूर्व सरहद्दीवर जाऊन इटालियन सैन्याशी संलग्न होतां येऊ नये म्हणून मोनास्टिरच्या दक्षिणेस असलेल्या बल्गेरियन सैन्याने ग्रीशन हद्दीतील व्हार्मोवा सरोवराचा टापू आपल्या कबजांत घेतला; आणि व्हार्मोवाच्या पश्चिमेकडील फ्लोरिना गांव व त्याच्या आसपासच्या टेकडया येथे लष्करचा बंदोबस्त करून दक्षिण आल्बेनियाच्या पूर्व सरहद्दीकडे जाण्याचा सहियाचा मार्ग बंद केला. बल्गेरियाचा लष्करी डांवपेच ह्या ठिकाणी असा दिसतो की, सलिनोका येथील सैन्याने बेलग्रेड-नीश ह्या टापूवर चाल करून जावयाचे असल्यास बर्दाद नदीला धरून नीशपर्यंत तोंडास तोंड देऊन, लढत लढतच उत्तरेस गेले पाहिजे. बर्दाद नदीच्या दोन्ही बाजूला एकामागून एक डोंगरांच्या रांगा आहेत. डोंगराळ प्रदेशांतील शत्रूचे चर शेंदीडशे मैलपर्यंत तोंडाला तोंड देऊन काबीज करीत जाणे फार सायासाचे आहे. डोरेन येथे सप्टेंबर प्रारंभाला आगस्ट-सप्टबरमाहना अँग्लो-फ्रेंच सैन्याने बल्गेरियन सैन्यावर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. पण त्या हलयांना निकराच्या लढाईचे रूप अद्याप आलेले नाही. सव्हियन सैन्य व इटालियन सैन्य ह्यांचा मिलाफ न झाल्यास डोरेनच्या बाजूवर अँग्लो-फ्रेंचांचे जोराचे हल्ले होणार नाहीत. आर्शीव्हो व व्हिडीन ह्या टापूत डान्यूब नदी ओलांडल्याशिवाय बल्गेरियाला उत्तरेकडून तंबी बसणार नाही आणि बल्गे- रियाला उत्तरेकडून तंबी बसल्याशिवाय सालिनोकाच्या बाजूला बल्गेरिया हलका होणार नाही. बल्गेरिया हलका झाल्याशिवाय मोनास्टिर प्रांतांत सहियाला शिरतां यावयाचें नाहीं. मोनास्टिर प्रांतांत सहिया शिरून तेथे इटालियन सैन्याशी संलग्न होऊन अँग्लो-फ्रेंच सैन्याची डावी बगल निर्धास्त झाल्याशिवाय बर्दाद नदीच्या काठाने उत्तरेस तोंडास तोंड देऊन नीशपर्यंत लढत जाणे धोक्याचे होय, आर्शीव्हो व व्हिडीन ह्या प्रांतांत जर रोमानियाला आस्ट्रो- जर्मनांचा पराभव करता आला नाही तर डोरेनपासून नीशपर्यंत जरी अँग्लो-फ्रेंच सैन्य बदद नदीच्या काठाने वर गेलें तरी लष्करी दृष्टीने विशेषतः उपयोग न होतां सांपळयांत अडकून पडण्याचे संकट मात्र अँग्लो-फ्रेंचांवर ओढवण्याचा संभव आहे. रोमानिया पहिल्या धडकीसरशी डान्यूब नदीची फळी कोठे फोडतो ह्यावर सलिनोका येथील अँग्लो-फ्रेंच सैन्याची हालचाल अवलंबून आहे. आगस्टच्या शेवटच्या आठवड्यांत व सप्टेंबर प्रारंभाला आर्शीव्हो व व्हिडीन ह्या टापूत आस्ट्रो-जर्मनांचे व रोमानियाचे तुबळ युद्ध चालू झाले असून तेथील लढायांचा निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यांतहि लागला नाही. ह्या लढायांत जर रोमानियाला जय मिळाला तर उत्तर सहिया व दक्षिण सहिया हे दोन टापू सप्टेंबर-आक्टोबर महिन्यांतील मुख्य रणभूमि होऊन बसतील पण आर्शीव्हो व व्हिडीन या टापूत रोमानियाला जय न मिळतां बेलग्रेड-नीश हा आगगाडीचा फांटा मोडण्याचा नाद जर रोमानियाला सोडून द्यावा लागला तर सहियाच्याऐवजी बल्गेरियाचा मुलुख सप्टेंबर आक्टोबरमधील प्रधान रणभूमि होईल. बल्गेरियाचा मुलुख प्रधान रणभूमि झाली असतां रोमानियाच्या सैन्याची कशी हालचाल होईल तें आतां आपण पाहू या. बेलग्रेड-नीश हा फाटा एका बाजूला ठेवला आणि दुसऱ्या भागावर म्हणजे सोफीया फिलिपोपोलीस-आडियानोपल या भागावर रोमानिया चाल करून २ १० पहिले महायुद्ध येत आहे अशी कल्पना केली तर रोमानियाला डान्यूब नदी व्हिडीन व रश्चक यांच्या मध्यावर म्हणजे निकोपोली येथे ओलांडून इस्कर नदीच्या खोऱ्याने सोफियावर चाल करून गेले पाहिजे, किंवा प्लेव्हनाचा रस्ता धरून फिलिपोपोलीसवर स्वारी केली पाहिजे. डान्यूब नदी ओलांडल्यावर सोफिया व फिलिपोपोलीस या दोन्हीच्या रोखाने रोमानियन सैन्य पुढे सरसावेल हे उघड आहे. पण डान्यूब नदी ओलांडून इस्कर नदीचे खोरे व प्लेदहनाचा टापू ही जरी रोमानियाने कब्जांत घेतली तरी सोफिया-फिलिपोपोलीस या आगगाडीच्या फाट्यांवर येण्यास बाल्कन पर्वतांचा वाटेत मोठा अडथळा आहे. म्हणून बेलग्रेड-कॉन्स्टांटिनोपल ही आगगाडी मोड- ण्याच्या दृष्टीने व्हिडीन-आर्शीव्हो या टापूत आस्ट्रो-जर्मनांचा पराभव करण्यांत जेवढा फायदा आहे तेवढा फायदा व्हिडीन-रश्चक ह्या टापूत डान्यूब ओलांड- ण्यांत नाही. तेव्हां रोमानियाने पहिल्या धडकीसरशी व्हिडीन आर्शीव्हो टापूत आस्ट्रो-जर्मनांनी जोराने लढण्यास सुरवात केली हे यथायोग्यच केलें, निकोपोली येथे बल्गेरियनांचा बराच जमाव असून रोमानियाला दक्षिणेकडून तंबी देण्याकरिता आस्ट्रियाच्या मदतीने डान्यूब नदी ओलांडण्याचा बल्गेरियाचा प्रयत्न सुरू आहे. सप्टेंबर महिन्यांत रशियाची चांगली कुमक रोमानियाला मिळेल आणि रशियन सैन्य डान्यूब नदी ओलांडून बल्गेरियावर स्वारी करूं लागेल. ह्या रशियन स्वारीचे मार्ग दोन आहेत.एक रोमानियाच्या मध्यावर येऊन सोफिया फिलिपोपोलिस प्रांतांत घुसणे, आणि दुसरा डान्यूब नदीच्या मुखाजवळील रोमानियाच्या डोब्रुजा प्रांतांत उतरून तेथून रश्चक व व्हानी या टापूतून बल्गेरियांत शिरून काळ्या समुद्राच्या कांठाकांठानें तुर्कोच्या आड्रियानोपल व कान्स्टांटिनोपल प्रांतांत घुसणे हा होय. रोमानिया सामील झाल्यामुळे रोमानियांतून बल्गेरियांत व बल्गरियांतून इस्तंबल प्रांतांत अशारीतीने काळ्या समुद्रास धरून रशियास तुकावर जंगी स्वारी करण्यास सुलभ झाले आहे. आगस्ट अखेरीस या जंगी स्वारीच्या दृष्टीने रशियन सैन्य रोमानियांत उतरले असून दक्षिणेकडे कूच करूं लागले आहे. या सैन्यास अडथळा करण्याकरितां रश्चक व व्हार्ना यांच्या दरम्यान रोमानियाची सरहद्द ओलांडून डोब्रुजा प्रांतांत आगस्टअखेरीस बल्गेरियन सैन्य घुसलें अहे. सप्टेंबरच्या प्रारंभाला रोमानियन सेनेने सरहद्दीपासून थोडक्या अंतरावर बल्गेरियाला थोपवून धरले असून रशियन सेनेचा लोंढा उत्तरेकडून दक्षिणेकड वहात आल्यावर रोमानियांत घुसलेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिना बल्गेरियन सैन्याला पळता भुई थोडी होईल हे उघड आहे. रशियन सैन्य ज्या प्रमाणे रोमानियाच्या मदतीला जलदीने येत आहे त्याप्रमाणे आस्ट्रो जर्मन सैन्यहि डान्यूब नदीच्या दक्षिण तीरावर फार त्वरेनें गोळा होऊ लागले आहे. इंग्लंड, फ्रान्स, इटली व रशिया या चार राष्ट्रांशी त्यांच्या त्यांच्या सरहद्दीवर जोराची झुज चालू असतां व काही ठिकाणी रशियाने आस्ट्रियाची फजिती आरंभिली असतां डान्यूब नदीकडे पाठविण्याला आस्ट्रो-जर्मनांपाशी शिल्लक सैन्य कोठून आले १ रोमानिया लढाईत सामील होण्याबरोबर जर्मनीहि घाबरून गेला, आणि गेल्या चार पांच महिन्यांतील लष्करी धोरण जर्मनीने एकदम सोडून दिले. गेले सहा महिने पश्चिम रणभूमीत फ्रान्सवर हल्ले करून फ्रेंचांचा मोठा पराजय करण्याचा लोभ जर्मनीने धरला होता. या फाजील लोभास जर्मनी बळी पडल्यामुळे रशियास चांगले फावले, आस्ट्रियाची पीछेहाट झाली, आणि रोमानिया महायद्धांत सामील होऊन बाल्कन प्रदेशांत फटफजिती होण्याची वेळ आली. फ्रान्सच्या छातीवर बसून महायुद्धाची परिसमाप्ति करून घेऊ असें ह्मणणारा पक्ष जर्मन लष्करांत अधिकारारूढ अस- ल्यामुळे गेले चार महिने जर्मनी अधोगतीस लागला; पण रोमानियाची ठेच लागल्याबरोबर जर्मन बादशहाचे डोळे उघडले आणि लगेच रशियाच्या बाजूलाच महायुद्धाची परिसमाप्ति करून घेतली पाहिजे असें म्हणणाऱ्या पक्षाच्या हातांत जर्मन सेनेची सत्ता जाऊन सेनापति हिंडेनबुर्ग हे आस्ट्रो-जर्मन सेनेचे सर्वांत मुख्य अधिकारी झाले. पश्चिम रणभूमि, पूर्व रणभूमि व बाल्कन प्रदेश ऊर्फ दक्षिण या तिन्ही ठिकाणच्या आस्ट्रो-जर्मन सैन्यावर सेनापति हिंडेनबुर्ग यांची हुकमत सुरू झाली आहे. इंग्रजांच्या व फ्रेंचांच्या बाजूला आपली जागा संभाळून बसावयाचे व प्रसंगविशेषीं थोडे थोडे मागे हटावयाचे असे धोरण पश्चिम रणभूमीत सेनापति हिंडेनबुर्ग यांनी स्वीकारले असल्यामुळे फ्रान्स बेल्जममधील बरेंच सैन्य रशियाच्या बाजूला सेनापति हिंडेनबुर्ग हे नेऊ लागले आहेत. रोमानिया सामील झाल्यामुळे रशियाला आपल्या बलाची शिकस्त पूर्व कार्पेथियन ओलांडण्यांत व रोमानियाच्या मार्फत बल्गेरियावर चालून जाण्यांत करून दाखविणे जरूर आहे. अर्थात पूर्व काथियन व रोमनियाची दक्षिण सरहद्द ह्या दोन ठिकाणींच रशियाचे मुख्य बल खिळून राहाणार हे उघड आहे. तेव्हां उत्तरेकडील रिंगाचा टापू, मिन्स्कचा टापू व पिन्स्कचा टया येथे रशिया विशेष सबल राहाणे शक्य नाही. रशियाच्या ह्या १२ पहिले महायुद्ध उत्तर रणभूमीत रशिया तितका सबल न राहिल्यामुळे रवतःची जागा संभाळून राहिल्याने व प्रसंगविशेषीं थोडथोडे मागे हटल्यानेहि जर्मनीचें विशेषसें नुकसान होण्याचा संभव नाही. म्हणून उत्तरेकडील बरेच जर्मन सैन्य मध्यावर कोव्हेलच्या प्रांतांत व दक्षिणेस डान्यूब नदीच्या . तटाकी येऊ लागले आहे. रशियास पूर्व काथियनमध्ये व रोमानियास त्रान्स्लाव्हेनियाच्या पश्चिम सरहद्दीवरील पर्वतांत थोपवून धरून कापैथियन पर्वताच्या ह्या मुख्य रणभूमीच्या उजव्या बगलेस म्हणजे कोव्हेल लेबर्ग प्रांतांत किंवा डाव्या बगलेस म्हणजे डान्यूब नदीच्या तटाकी रशियाचा मोठा पराभव करण्याचा सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांचा हेतु आहे. ह्या लष्करी धोरणाला अनुसरून रोमानियाला पहिल्या धडकीसरशी रोमानियन सरहद्दीवरील कापेथियनचे घाट ओलांडून त्रान्स्लाव्हेनियाचा दक्षिण व पूर्व भाग एका आठवड्यांत त्यांनी व्यापून दिला. सप्टेंबर महिन्यांत सर्व त्रान्स्लाव्हेनिया रोमानिया व्यापून टाकील असा अदाज आहे. म्हणजे ज्या फळाच्या आशेने रोमानिया महायुद्धांत सामील झाला ते फळ सप्टेंबर महिन्यांतच रोमानियाच्या पदरांत पडून आस्ट्रियाची नाचक्की होणार. सेनापति हिंडेनबुर्ग हे आस्ट्रियाच्या नाचक्कीकडे दुर्लक्ष करून रोमानियाचे जितकें कमी सैन्य डान्यूब नदीकडे येईल तितकें बरें अया धोरणाने डाव खेळत आहेत असे दिसते. त्रान्सलाव्हेनियामध्ये जर रोमानियन सैन्याचा मुख्य भाग अटला गेला तर काथियनचे व त्रान्स्लाव्हेनि- याचे पर्वत ओलांडून हंगेरियाच्या मैदानावर उतरण्याचे धोरण रशियाला जारीने अमलात आणावे लागेल, आणि तसे झाल्यास काथिएनमध्ये व त्रान्स्लाव्हेनियाच्या पश्चिम पर्वतामध्ये रशियाला व रोमानियाला थोपवून धरण्याचे काम कमी सैन्याने साधण्याजोगे आहे. अर्थात त्रास्लाव्हिनिया व्यापण्याकडे रोमा- नियाचे बरेंच बल खर्च झाल्यास त्याला थोपवून धरण्यास मोठे लष्कर न लागतां डान्यूब नदीवर अधिक सैन्य पाठविण्याची सवड सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांना मिळ- णारी आहे. रोमानियाने त्रान्स्लाव्हेनिया व्यापला तर रोमानियाचे कार्य झाले; आस्ट्रियाची नाचक्की झाली; पण महायद्धांतील दोस्त सरकारांच्या पूर्वेकडील मुख्य लष्करी धोरणास मोठीशी मदत होणार नाही. हंगेरियाच्या मैदानावर उतरणे किंवा टर्कीशी असलेला जर्मन आगगाडीचा संबंध तोडणे हे रशियाच्या बाजूचे मुख्य लष्करी धोरण आहे. त्रान्स्लाव्हेनिया व्यापण्यांत जर रोमानियाचे मुख्य बल आटले गेले तर जेवढया सैन्याने आस्ट्रियाने रोमानियाला काथियन पर्वतांत थोपवूम धरले असते त्याहून कमी सैन्याने त्रान्स्लाव्हेनियाच्या पश्चिमेस रोमानियाला थोपवून ऑगस्ट-सप्टेंबर महिना १३ परण्याची वेळ यावयाची आहे. आजच त्या गोष्टीची घाई नाही पण काथियन र्वताचे घाट नुसते ताब्यात घेऊन जर रोमानियानें आपलें मुख्य बल पहिल्या घडकीसरशी बल्गेरियावर फेकले असते तर त्रान्स्लाव्हेनियामध्ये आस्ट्रियाची जी चक्की झाली ती नाचक्की बल्गेरियाची डान्यूब नदीच्या काठी झाली असती भाणि रशियन सैन्याचा लोंढा येण्याबरोबर सर्व बलोरिया धुवून जाऊन तुर्की सत्ता एकदम डळमळली असती. ह्या दृष्टीने विचार केला असतां त्रान्स्लाव्हेनियामध्ये बोराने घुसण्यांत रोमानियाने स्वतःच्या लाभाकडे अधिक लक्ष दिले व महायुद्धाच्या एकंदर लष्करी धोरणाकडे थोडेसें दुर्लक्ष करण्याची चूक केली असें म्हणावे लागते, 'हिल्या धडकीसरशी डान्यूब ओलांडली गेली नाही. असो. सप्टेंबर महिन्यांत भास्ट्रो-जर्मनांची व रशियानी डान्यूब नदीच्या काठी मोठी लढाई होईल व यावेळी ही चूक रशिया पूर्णपणे दुरुस्त करील, ह्यांत संशय नाही. सप्टेंबर-आक्टो- र महिन्यांत बल्गेरियावर रशियाची व रोमानियाची स्वारी होत असतांना सलिनोका थील अँग्लो-फ्रेंच सैन्य स्ट्र मा नदीच्या काठी बलोरियावर हल्ला करून स्ट्रमा दीच्या खोऱ्याने सोफियाकडे व स्ट्र मानदी ओलांडून पूर्वेस आड्रियानोपलकडे- बाल करून जाईल. स्ट्र मा नदीला धरून उत्तरेकडे जाण्यास ह्या पळा व्हावा म्हणून स्ट्र मा नदीच्या काठाचे ग्रीसचे रूपेल व सिरेस हे किल्ले नापल्या ताब्यांत आगस्टच्या दुसऱ्या आठवड्यांतच बल्गेरियाने घेतले व आगस्ट खेरीस कावला बंदर घेऊन स्ट्र मा नदीच्या पूर्वेकडील ग्रीसचा सर्व भाग बल्गे- रेयाने आपल्या कबजांत घेतला, ह्या भागांत ग्रीसचे सतरा किले असून सहा कोट पये ह्या किल्ल्यांवर खर्च झालेले आहेत. हे सर्व किल्ले तेथील दारूगोळा व तोफा ग्रांसकट ग्रीस सरकारने बल्गेरियन सैन्याच्या हवाली केले. ग्रीसच्या राजाचा घा चोरटया कारवाईमुळे सलिनोका येथील अँग्लो-फ्रेंच सैन्यास बल्गेरियावर चाल करून जाण्याच्या कामी मोठा अडथळा उत्पन्न झाला आहे. असल्या चोरटया कारवाईचा राजा तक्तावरून दूर करून दोस्त सरकारांना अनुकूल असलेले प्रधान डळ ग्रीस देशामध्ये स्थापण्याचा उद्योग आगस्ट अखेरीस व सप्टेंबरच्या प्रारंभी रीने सुरू झाला आहे. पण ग्रीसचे लष्कर अद्याप ग्रीसच्या राजाच्या लगामांतून रतें मोकळे झाले नसल्यामुळे बल्गेरियाचा एखाद दसरा चांगला पराभव होईतों दर उद्योगास प्रत्यक्ष फळ येईलसें वाटत नाही. सैन्यास अड- तिसऱ्या वर्षाचा सप्टेंबर-आक्टोबर महिना आगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यांतहि पश्चिम रणभूमीत इंग्रजांचें व फ्रेंचांचे पाऊल जोराने पुढे पडले. थिपवाल व कोबलस ही महत्त्वाची ठाणी इंग्रजांच्या हाती पडून जर्मनांना आपला पराजय स्वतःच्या मुखानें कबूल करावा लागला, कोंबलसच्या जवळ तीन चार ठिकाणचे रस्ते मिळत असल्यामुळे जर्मन सैन्याच्या हालचाली करण्यास हे ठिकाण सोईचे झाले होतें, सबंध सप्टेंबर महिना खर्च करून इंग्रजांनी व फ्रेंचांनी कोंबलसला चारी बाजूनी प्रथम घेरीत आणले आणि सप्टेंबर अखेरीस कोंबलसवर निकराचा हल्ला करून इंग्रजांनी जर्मनांना मानगुटीस धरून धक्के मारीत कोंबलसमधून बाहेर पिटाळून लावलें ! चरांच्या चक्रव्यूहांनी कोंबलस व थिपवाल ही ठाणी जर्मनांनी इतकी मजबूत केली होती की व्हईनच्या किल्ल्याची मजबुतीहि तज्ज्ञांच्या दृष्टीने ह्या ठाण्यांच्या पुढे कमी दर्जाची समजली गेली. पण असली ही मजबूत ठिकाणे इंग्रजांच्या व फ्रेंचांच्या शौर्याने सर केली, जर्मनांना व्हडून पुढे जे करता आले नाहीं तें इंग्रजांनी व फ्रेंचांनी कोंबलस येथे करून दाखविले. तोफखान्याच्या बलांत व सैनिकांच्या मर्दुमकीत इंग्रज व फ्रेंच जर्मनांहून सरस ठरले. अँग्लो-फ्रेंचांस हे मोठे यश मिळाले खरे पण त्याबरोबरच दुसरी एक अनिष्ट गोष्ट दृग्गोचर झाली. व्हई- नचा किल्ला डोंगराळ प्रदेशांत एका टेकडीवर असून त्याच्या सभोवती दहापंधरा मैलापर्यंत एकामागून एक लहान मोठया डोंगराच्या रांगा आहेत. हे टेकड्याचे जाळे पूर्वीच्या तरवारीच्या लढाईच्यावेळी ज्याप्रमाणे मजबूतीचे समजले जात होते त्याप्रमाणे हल्लींच्याहि मोठया तोफांच्या युद्धाच्यावेळी नैसर्गिक मजबुतीचे समजले जाते. ह्या टेकडयाच्या समूहावर चरांचे अलंकार ऋचांनी कुशलतेने खोदल्यामुळे व्हडून दुर्भेद्य ठरले. व्हईनला जी नैसर्गिक मजजुती आहे ती कोंबलसला नाही असे असतांनाहि जर्मनांनी खोल चरांच्या कृतिम उपायांनी कोंबलस व्हडूहून अधिक मजबूत केले. नकाशाकडे जर पाहिले तर असे दिसून येते की, तीन महिन्यापूर्वी कोंबसपासून पांच मैलांच्या आंत इंग्रजांचे चर होते म्हणजे तीन महिन्यांच्या चढाईने सोमनदीच्या काठच्या लढाईत वीस मैलांच्या तोंडावर सरसकट चारपांच मैल सप्टेंबर-आक्टोबर महिना १५ अँग्लो-फ्रेंच सैन्य पुढे गेलें म्हणजे महिन्यास मैल दीड मैलाची चाल पडली. बर्फ पडून लढण्याचा मोसम मंदावण्यास आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. ह्या दोन महिन्यांत म्हणजे आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत अँग्लो-फ्रेंच फार झाले तर आणखी चार पांच मैल पुढे जातील. म्हणजे पांच महिन्याच्या चढाईचे फळ दहा मैलांनी मिळणार ! जिंकलेल्या भूमीच्या दृष्टीने विचार केला असतां हे फळ फारच अल्प होय असें झणावे लागते. पण दुसच्या एका दृष्टीने या फळाची किंमत मोठी ठरते. डिसेंबरांत बर्फ पडून युद्ध मंदावले म्हणजे जर्मनी म्हणू लागेल की पांच सात महिने तुम्ही जोराची चढाई करून काय कमावले ? स्वतःच्या घरांतले सर्व सोने जपान अमेरिकेला देऊन टाकून तेथील लोखंड व दारू गोळा जमा करून आमची फळी तुम्ही कोठे फोडली १ सोम नदीच्या काठी आम्ही दहा मैलच मागे हटलों ना ! उत्तर फ्रान्सांतहि अद्याप कित्येक मैल आमच्या ताब्यात असून बेल्जमची मगरमिठी आमची सुटलेली नाही. रशियाला रोमानिया मिळून काय झाले ? एक तृतीयांश त्रान्स अल्बेनिया व ब्युकोव्हिना हे प्रांत रशियाने व रोमानियाने घेतले तर अधिक महत्वाचे व अधिक सुपिक असें डोब्राजा व कव्हेला प्रांत आम्ही गिळंकृत केले. १९१६ सालच्या प्रारंभाला जी स्थिति होती तीच स्थिति १९१६ सालच्या अखेरीला कायम राहून सोम नदीच्या काठी वीस मैलाच्या तोंडावर दहा मैल आंत जाण्यास तुम्हाला एक वर्षांची तपश्चर्या खर्च करावी लागली. रिगाचा प्रांत, पोलंड सहिया, माऊंटेनिग्रो, बेल्जम, उत्तर फ्रान्स, डोब्राज व कॅव्हेला येथून आम्हास नुसते हाकून लावण्यास तुम्हाला आणखी कितीतरी वर्षे लागतील. तेव्हां वृथा लढण्यांत शूर शिया- याचे प्राण खर्ची घालण्यापेक्षां त्वया मयार्थ' या धर्तीवर तह का करीत नाही ? डिसेंबर महिन्यांतील जर्मनांच्या ह्या तहाच्या बोलण्याला सूतोवाच सप्टेंबरमध्येच झाले आहे. अमेरिका, स्पेन येथे असल्या अर्धवट तहाची चळवळ सुरू झाली असून पोप महाराजांनी या चळवळीस दुजोरा दिला आहे. अखेरीस ज्यावेळी रोमानिया दोस्त सरकारांना मिळाला त्यावेळी महायुद्धाचा रंग एकदम पालटेल असे सर्वांना वाटले. पण सप्टेंबर अखेरीस असें निदर्शनास आले की, जर्मनीने आपला तोल सावरून धरला असून येत्या हिंवा- ळ्यांत पुन्हां जारीने तयारी करून १९१७ सालच्या उत्तरार्धात निकराने लढल्याशिवाय जर्मनी कांहीं हार जात नाही. जर्मनीला कुस्तीत पाडूनच जर तह आगस्ट पहिले महायुद्ध व्हावयाचा असला तर १९१७ साल कदाचित् १९१८ सालहि-युरोप खंडभर महायुद्धाचा वणवा पेटत राहाणार अशी चिन्हें सप्टेंबर अखेरीस दिसू लागली आहेत. रोमानिया मिळाल्याने दोन चार महिन्यांत जर्मनी लोळण घेईल व लवकरच तह होईल अशी वाटू लागलेली आशा सप्टेंबर अखेरीस मृगजल ठरली. आशेची ही निराशा अशा रीतीने झाल्यामुळे कनवाळू पोपसाहेबांना व अमेरिकेला स्पेन हॉलंडसारख्या चिमकुल्या राष्ट्रांची मदत घेऊन मध्यस्थी करण्याची स्फूर्ति उत्पन्न व्हावी हे साहजिक आहे. या मध्यस्थीला डिसेंबर-जानेवारी महिन्यांत उकळी फुटेल हे उघड आहे. त्यावेळी प्रतिष्ठितपणाने जर्मनी म्हणणार, आम्ही किती मुलुख जिंकून ताब्यात ठेवला आहे, हे नकाशा हातांत घेऊन पहा आणि मग तुम्ही शहाणेसुर्ते व कनवाळू मध्यस्थ काय काय सोडावे म्हणतां तें सांगा, बेल्जम सोडू म्हणतां ? सोडतो. उत्तर फ्रान्स सोडू म्हणतां १ सोडला. १८७० साली जिंकलेल्या आलसाक-लारेन प्रांतापैकी काही भाग सोडून फ्रान्सची जनी जखम भरून काढून फ्रान्सचा प्रेमाचा हात हातात घेऊ म्हणतां ? आलसाक-लारेनपैकी काही भाग सोडून स्नेहाचा हात फ्रान्सपुढे हा केला. मध्यस्थांचे इतकें ऐकल्यावर जर्मनी हळूच आपले घोडे पुढे ढकलणार आणि म्हणणार रशियाचा कोरलंड प्रांत तेवढा आम्हाला असू द्या. कारण तेथे जर्मन वस्ती बरीच आहे. रशिया-पोलंडला स्वराज्य देऊन चुकलाच आहे. तेव्हां पोलंडचे स्वतंत्र राज्य जर्मनीच्या कृपाछत्राखाली स्थापल्यास रशियाचे कांहींच नुकसान नाही. आतां बाकी राहिला बाल्कन प्रदेश व टर्की, बाल्कन प्रदेशांत जिंकलेला जुना सहिया म्हणजे बाल्कन युद्धापूर्वीचा सहिया जर सहियाच्या राजाला पुन्हां दिला, माऊंटनिग्रोचे जुने राज्य माऊंट निग्रोला दिले, रोमानियाचे जुनें राज्य रोमानियाच्या ताब्यांत तसेंच ठेवले, तर बाल्कन देशांनी जर्मनीच्या ग्रहमालिकेत प्रवेश करून जर्मन सूर्याभोवती फिरत रहाण्यांत का आनंद मानूं नये १ तुर्की साम्राज्य स्वतंत्र होऊन जर्मनांशी पाहिजे तसला तह तुर्कोनी केला तर त्यांत कोणाचा मुलूख थोडकाच जातो येतो आहे ? रशियाने खुशाल इराणांत उतरून खाली समुद्र गाठावा, जर्मनीची हरकत नाही. इतकेच नव्हे तर उलट जर्मनी या कामी मदतहि करील. रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति म्हणणाऱ्या मध्यस्थांना असल्या प्रकारचा तह पटणारा आहे; चिमकुल्या राष्ट्रांना सांप्रतच्या यमयातनेतून सोडविणारा आहे; फ्रान्सला खुलविणारा आहे; रशियाला पुसतम सप्टेंबर-आक्टोबर महिना महत्त्वाकांक्षेवर पाणी सोडावयास लागणाग खरा, पण तितका डवचणारा नाही. या अर्धवट ताने तुर्की साम्राज्याच्यामार्फत मुसलमानी जग नर्मनीच्या तावडीत सांपडून इंग्लंडच्या इजिप्तला व हिंदुस्थानाला जर्मनीचा शह पोचणारा आहे. असले तह नाकारणे इंग्लंडला जरूर आहे. आणि सप्टेंबर अखेरीस अमेरिकेत व स्पेनमध्ये चाललेल्या तहाचे चळवळीस उत्तर देतांना मि. लाईड जॉर्ज यांनी अर्धवट तहांचे लोढणे गळयांत बांधून घेण्याचे साफ नाकारले आहे. नाकारण्याची ही शक्ति कोंबलसच्या विजयाने इंग्लंडला प्राप्त झाली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी दोन महिन्यांत क्षेत्रफळाने मोटासा मुलुख जरी इंग्लंडने जिंकला नाही तरी जर्मनीच्या युद्धकौशल्याने निर्माण केलेले व्हडूनहूनहि अधिक बळकटीचे चराच्या चक्रव्यूहाचे किल्ले इंग्लंडला सर करता येतात हे इंग्लंडने सप्टेंबर अखेरीस खुद्द रणांगणावर सिद्ध केले आहे. १९१६ सालच्या प्रारंभी कुस्तीत ज्या इंग्लंडला जमीन पकडून पडून राहून विरुद्ध मल्लास पाठीवर खेळत राहूं देणे भाग झाले होतें तेंच इंग्लंड सर्व प्रजाजनांना सैनिक बनवन सर्व कारखान्यांत दारूगोळा तयार करावयास लावून नेटाने उठून पाठीवरच्या जर्मनीला अंगाखाली घालू शकले आहे. इंग्लंडचा हात जर्मनीच्या मानेवर चढण्यास १९१७ साल लागेल व जर्मन चीत होण्यास १९१८ साल लागेल. आणखी दोन वर्षे लढावे लागले म्हणून काय झाले ? आज समबल कुस्ती सोडून, तुर्कोच्या खुराकावर पांच सात वर्षे तयारी करण्यास जर्मनीला फुरसत देऊन, पांच सात वर्षांनी इजिप्त व हिंदुस्तान हातचे गमावण्यापेक्षा आजच आणखी वर्ष दीड वर्ष लढण्याचे कष्ट सोसून जर्मनांचा कुस्तीचा नाद कायमचा नष्ट करणे काय वाईट १ वर्ष दोन वर्षांनी अशा प्रकारचा प्रचंड विजय इंग्लंडास खात्रीने मिळणार हे सप्टेंबरमधील चढाईने सशास्त्र सिद्ध केले आहे, कोंबलसच्या विजयाचा उपयोग मुलुख मिळण्याच्या दृष्टीने जरी फारसा नसला तरी शास्त्रदृष्टया वरचढपक्ष कोणाचा हे ठरविण्याच्या कामी त्याचा फार उपयोग असून अर्धवट तहापासून हा विजय दोस्त सरकारांचा बनाव करणारा आहे. रोमानिया आणि रशिया आगस्ट अखेरीला पहिल्या धडकीसरशी रोमानियाने आपल्या सरहद्दीवरील काथियन पवताचे सर्व घाट एकदम कबजांत घेतले; आणि ऑस्ट्रियन सैन्याला मार्ग पिटाळून लावून ट्रान्स्लाव्हानियामध्ये जोगने प्रवेश केला. सप्टेंबर प्रारंभाला D २८ पहिले महायुद्ध हार्मनस्टॅड, बॉसो, आदिकरून दक्षिण व पूर्व ट्रान्स्लाव्हानियामधील महत्त्वाची गांवें रोमानियाने आपल्या कबजांत घेतली. सर्व ट्रान्स्लाव्हानिया व्यापण्यास रोमानियाला एखाददुसरा आठवडा लागेल, आणि सप्टेंबर अखेरीस किंवा आक्टोबर प्रारंभाला रोमानिया हंगारीचे मैदानात उतरूं लागून रशियाची व रोमानियाची गांठ हंगारीतच पडेल असें त्यावेळी तज्ज्ञाला वाटले होते. पण सप्टेंबर महिन्यामध्ये हे सर्व अंदाज चुकीचे ठरले. रोमानियाने पहिल्या आठवड्यांत जवळ जवळ एकत तीयांश ट्रान्स्लाव्हानिया व्यापला. याचे कारण आस्ट्रियन सैन्याचा पराजय नसून रोमानियाचे बरेच मोठे सैन्य ट्रान्स्लाव्हानियामध्ये आंत गुतवून ठेवून नंतर मंग रोमानियावरील उलट हल्लयास सुरुवात करावयाची असला डाव सेनापति हिंडेनबुर्ग खेळत होते हे होय. शत्रूला स्वतःच्या मुलुखांत घुसू द्यावयाचे हा लष्करी डावपेच कसला ? असल्या डावपेंचाने पहिल्या आठवड्यांतच आस्ट्रियाची नाचक्की झाली नाहीं काय ? रोमानिया आस्ट्रियाच्या मुलुखांत शिरला व आस्ट्रियाची नाचक्की झाली या गोष्टी खऱ्या; पण दोन संकटांपैकी हलक्या संकटाला हार जाऊन मोठे संकट तात्पुरतें तरी सेनापति हिंडेनबुर्ग यांनी टाळले. हे मोठे संकट कोणचें ? बल्गेरिया सलिनोकाच्या बाजूला त्यावेळी चांगला गुतला गेला होता, अशा समयीं काथियनचे घाट नुसते संभाळून जर रोमानियाने बल्गेरियावर एकदम जोराचा हल्ला केला असता तर सप्टेंबर महिन्यांत बल्गेरियाची बरीच पीछेहाट होऊन आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत वरून उतरणारे रोमानिया, व रशियाचे सैन्य, आणि सलिनोका येथून खालून वर जाणारे अँग्लो-फ्रेंच सैन्य, यांची गांठ बल्गेरियामध्ये पडुन तुर्की साम्राज्य जर्मनीपासून तुटले गेले असते; आणि येत्या हिवाळ्यांतच दोस्त सरकार सांगतील त्या अटीवर आस्ट्रो-जर्मनांना तह करणे भाग पडले असते. पण ट्रान्स्लाव्हानियाच्या लोभाला फाजील गुतून रोमानियाने हातचा बाण व्यर्थ दवडला आणि जी गोष्ट हिवाळयापूर्वीच घडून आली असती ती गोष्ट पुढील सालच्या वसंत काळानंतर घडवून आणण्याकरितां येत्या हिवाळयांत नवी तपश्चर्या करून पुन्हां तयारी करणे रशियास भाग पडणार आहे. सप्टेंबरमध्ये रोमानियाच्या रणभूमीत ज्या गोष्टी घडून आल्या त्यांकडे लक्ष दिले असता असे म्हणणे भाग पडते की, आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत किंबहुना येत्या हिवाळ्यांत टर्कीचा व जर्मनीचा आगगाडीचा संबंध तुटला जाण्याचा रंग नाही, आणि हा संबंध तुटल्याशिवाय सप्टेंबर-आक्टोबर महिना १९ आस्ट्रो-जर्मनांना चारीमुंडे चीत मारतां येणे शक्य नाही. सप्टेंबर प्रारंभाला रोमानि- याचे मुख्य लष्कर, ट्रान्स्लाव्हानियामध्ये गुतले आहे असे पाहून रोमानियाच्या डोब्रुज प्रांतावर बल्गेरियाच्या व टर्कीच्या सैन्याची मदत घेऊन आस्ट्रो-जर्मनांनी एकदम हल्ला केला. डोजा प्रांत म्हणजे डान्यूब नदी उत्तरवाहिनी होऊ लागल्या ठिकाणा- पासून डान्यूब नदी व काळा समुद्र यांमधील प्रदेश होय. हा डोब्रजा प्रांत रशियाचें सैन्य काळया समुद्राच्या किनाऱ्याने दक्षिणेस कान्स्टांटिनोपलवर चाल करून यावयाचे असल्यास त्या सैन्याचा राजरस्ता होय. पूर्वीहि रोमन बादशहाच्या वेळी उत्तरेकडले लोक याच मार्गाने कान्स्टांटिनोपलवर चाल करून येत असतां त्यावेळी या डोब्रुजा प्रांताच्या मध्यावर-म्हणजे जेथे डान्यूब नदी व काळा समुद्र यांच्यामध्ये अवघे २५-३० मैलांचे अंतर आहे, त्या ठिकाणी-हल्ली कान्स्टांटिनोपल बंदराची आगगाडी असलेल्या प्रांतांत-उत्तरेकडील सैन्याचा बंदोबस्त करण्याकरितां ३० मैल लांबीचा भलाभक्कम तट बांधण्यात आला होता. सप्टेंबर प्रारंभाला या डोब्रुजा प्रांतावर आस्ट्रो-जर्मनांनी दक्षिणेकडून हल्ला करून रोमानियन व रशियन लष्कराला पन्नास साठ मैल मागे हटविलें, व पंधरा सप्टेंबरच्या सुमारास आस्ट्रो-जर्मन सैन्य कान्स्टांजा रेल्वेच्या जवळ जाऊन थडकले. पंधरा सप्टेंबरपासून वीस सप्टेंबरपर्यंत कान्स्टांजा रेल्वेच्या प्रदेशांत तुबळ युद्ध होऊन आस्ट्रो-जर्मनांची गति खुटली. वीस सप्टेंबरनंतर दोन्ही पक्ष चर खणून बसले. कान्स्टांजा रेल्वे रोमानियाच्या ताब्यांत राहिली खरी, पण तीस मैल लांबीच्या चरानींच आस्ट्रो-जर्मनांना स्वतःचे संरक्षण करता येणे शक्य होऊन रोमानियाच्या मागे एक कायमचा भुगा लागला. रोमानियाने एक तृतीयांश ट्रान्स्लाव्हानिया मिळविला तर अर्धा डोब्रुजा गमविला. वीस सप्टेंबरच्या सुमारास डोब्रुजांतील लढाई मंदावते न मंदावते तोच आणखी दोन बाजूनी रोमानियाला शह देण्याचा उपक्रम जर्मनीने आरभिला. बल्गेरिया व रोमा- निया यांच्यामधील डान्यूब नदी ओलांडता यावी म्हणून सर्व डान्यूबनदीवर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत तोफांची सरबत्ती सुरू झाली, व प्लेव्हनाच्या उत्तरेस इस्कर नदी डान्यूबला ज्या ठिकाणी मिळते त्या कोराबिया टापूत आस्ट्रो-जर्मन रोमानि- याच्या बाजूच्या किनाऱ्यावर उतरूहि लागले, पण या कामी त्यांस यश आले नाही. दक्षिणेकडून डान्यूब नदी ओलांडून जाण्याचा उपक्रम करीत असतांना त्याच व पहिले महायुद्ध करून घेतला. व्हल्कन काथियन पर्वाच्या ऊर्फ ट्रान्स्लाव्यानिया आल्प्स पर्वताच्या घाटांतून रोमानियावर हल्ला करण्यास आस्ट्रो-जर्मनांनी सुरुवात केली. रोमानियांतून दक्षिण ट्रान्स्लाव्हानि. मांत जाणारे तीन प्रमुख घार आहेत. पहिला रोमानियाची राजधानी बुखारेस्ट शहर व त्याच्या थेट उत्तरेस असलेला टिमास घाट होय. या घाटानेच वर जाऊन रोमानियन सैन्याने ब्रासो शहर घेतले. दुसरा हेरेस्टोरनी थाट. या घाटाने वर माऊन रोमानियन सैन्याने हार्मनस्टॅड शहर घेतले. या दोन घाटांत आगगाडी असून तिसऱ्या घाटांत म्हणजे व्हल्कन घाटांत आगगाडी नाही. व्हल्कन घाटाच्या उत्तरेस आस्ट्रियाची आगगाडी आहे; पण दक्षिणेस रोमानियाची आगगाडी नाही. हल्कन घाट ओलांडून गेलेल्या रोमानियन सैन्यावर आस्ट्रो- जर्मनांनी अवचित बहल्कन घाट एकदम ताब्यांत घाटांतून जर आस्ट्रो-जर्मन उतरूं लागले तर रोमानियाच्या पश्चिम कोपऱ्यांतील डान्यूब नदीचे संरक्षण करणाऱ्या असो- व्हाच्या टापूमधील रोमानियन सैन्याची पिछाडी उघडी पडल्यावांचून रहाणार नाही, हे अरिष्ट ओळखून रोमानियाने व्हल्कन घाटाकडे मोठे सैन्य पाटविलें व खाली उतरणाऱ्या आस्ट्रियन सैन्याला घेरण्याचा उद्योग आरंभिला. आपण घेरले जात आहों असें पाहून आस्ट्रो-जर्मन सैन्याने व्हल्कन घाटांतून पाय मागे घेतले. आक्टोबर प्रारंभाला व्हल्कन घाटाच्या उत्तरेस आस्ट्रियाची व रोमानियाची मोठी लढाई सुरू झाली असून त्यांतील जयापजयावर दक्षिण ट्रान्स्लाव्हानियामधून रोमानियावर चाल करून येणाऱ्या हिंडेनबुर्गच्या डावपेंचाचे फळ बऱ्याच अंशी अवलंबून आहे. सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांनी प्रथम रोमानियाला चिरडून नंतर सलिनोका येथून अँग्लो-फ्रेंचांना हाकून देऊन रोमानियाच्या मार्गाने रशियाच्या डाव्या बगलेस वळसा देऊन काळ्या समुद्रावरील रशियाच्या ओडेसा बंदरापर्यंत रशियाला तंबी देण्याचा जंगी घाट घातला आहे असे म्हणतात. बाल्कन प्रदेशां. तील रशियाच्या बाजूचे हे धोरण यशस्वी करण्याकरितां सेनापति हिंडेनबुर्ग यांनी पश्चिम रणभूमीत उत्तर फ्रान्स व बेल्जम सोडून देऊन व्हाईन नदीपर्यंत मागे हटण्याचे ठरविले असून पश्चिम रणभूमीतील बरेंच सैन्य पूर्वेकडे नेले असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. पश्चिम रणभूमीतील सैन्य, बलोरियाचे सैन्य व तुर्की सैन्य मिळून दहा लाख नवें लष्कर ह्या कामगिरीकरितां गोळा केले असून त्यांपैकी सप्टेंबर-थाक्टोबर महिना २१ तीनचार लाख सैन्य कोव्हेलपासून ब्युकोव्हिनापर्यंतच्या रशियाच्या तोंअवर मदत म्हणून पाठविण्यांत भाले आहे. बाकीचे पांच सात लाख सैन्य रोमानियाच्या स्वारीवर नेमले असून डान्यूब व डोब्राजाच्या बाजूला सेनापति मॅकेन्सन ह्यांची नेमणूक झाली आहे. आस्ट्रो-जर्मन तोफांचा व सैन्याचा मुख्य जमाव दक्षिण ट्रान्सलाव्हाजियामध्ये जमला असून व्हल्कन घाट ब व्हेरेस्टोरोनी पाट ह्या दोन घाटानी रोमानियावर स्वारी करण्याचा आस्ट्रो-जर्मनांचा विचार दिसतो; व्हल्कन घाटाकडे आपली डाळ चांगली शिजत नाही व रोमानियन सैन्य त्याच बाजूला झुकले गेले आहे असे पाहून आस्ट्रो-जर्मन सैत्य सप्टेंबर अखेरीला व्हेरेस्टोरोनी पाटाच्या उत्तरेकडील हार्मनस्टेड शहराकडे एकदम वळले व तेथील रोमानियन सैन्याला त्याने चारी बाजूनी घेरलें. एक त-हेच्या वेढयांत सांपडल्यावरहि तीन दिवस शिकस्तीने लढून रोमानियन सैन्याने वेढयांतून निसटून दक्षिणेस व्हेरे- स्टोरोनी घाटाकडे मोठ्या शिताफीने पीछेहाट केली. दक्षिण ट्रान्स्लाव्हानिया, हान्यूब नदी व डोब्राजा प्रांत ह्या तीनहि ठिकाणी आस्ट्रो-जर्मन सैन्य रोमा- नियाला दाबू पहात आहे. ह्या दाबानें रोमानिया जर आक्टोबर महिन्यांत मोडला नाही किंवा वांकला नाही तर पश्चिम रणभूतींतील पीछेहाटीने सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांच्या डावपेचाची बरीच फजीति होईल. पण रोमानिया जर बराचसा वांकला किंवा मोडला तर बाल्कन प्रदेशांतील व रशियाच्या बाजूच्या संकटातून कांहीं काल तरी चौथ्यांदा आस्ट्रो-जर्मनांना सोडविण्याचे श्रेय सेनापति सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांना मिळेल. रशियाच्या तोंडावर तीन चार लाख नवे सैन्य पाठविले असता ही प्रिपेट नदीपासून रोमानियापर्यंतच्या सर्व तोंडावर रशिया आस्ट्रो-जर्मनांशी एकसारखी टकर देऊन लढत राहिला आहे. जुलै आगस्ट महिन्यांत रशियाचे पाऊल जसें पुढे पडले तसें सप्टेंबर महिन्यांत पुढे पडले नाही, किंबहुना आगस्ट अखेरला रशिया ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आक्टोबर प्रारंभालाहि दृष्टीस पडला ही गोष्ट खरी; पण कोव्हेलच्या टापूत आस्ट्रो-जर्मन रशियावर एकसारखे हल्ले करीत असताहि रशियाने त्यांना बिलकूल दाद दिली नाही. अधिक मुलख काबीज करण्याचे काम जरी सप्टेंबर महिन्यांत बंद पडले तरी पूर्वीच्या तीन महिन्यांत आठ लाख आस्ट्रो-जर्मन सैन्य रशियाने गारद केले असल्यामुळे आस्ट्रो-जर्मन सेनाशकट विस्खळित झाला असून पुन्हां योग्य संधि येतांच रशिया आस्ट्रो-जर्मनांच्या २२ पहिले महायुद्ध छातीवर बसल्यावांचून रहाणारा नाही, असें रशियन सैन्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यांत रशियाने रोमानियाला चांगली कुमक पाठविली. आक्टोबर महिन्यांतहि रोमानियाला रशियाची चांगली मदत मिळून हिंडेनबुर्गचें दडपण रोमानिया पार झुगारून देईल यांत संशय नाही. हिंडेनबुर्गच्या तडाक्यांतून रोमानियाला वाचविण्याकरितां जर रशिया दक्षिणेकडून धावून आला तर कोव्हेलचा टापू ढिला पडेल. तेव्हां रशियाची पीछेहाट आपण सुरू करू अशी घमेंड सेनापति हिंडेनबर्ग यांना वाटत असावी असे दिसते; पण रशियाने गेल्या चार महिन्यांत विस्खळित केलेल्या आस्ट्रियाच्या डोलान्यांत व पश्चिम रणभूमीत अँग्लो- फ्रेंचांनी झोडपलेल्या जर्मनीच्या सेनाशकटांत सेनापति हिंडेनबुर्ग मुख्य सूत्रधार झाले तरी, दोन दोन तीन तीन ठिकाणी जोराची चढाई करण्याचे सामर्थ्य कोठून असणार ? रशियाच्या बाजूला नव्या सैन्याची वाण बिलकूल नाही. लागेल तितके लढवय्ये रशियापाशी आहेत. भीति काय ती दारूगोळ्याच्या व तोफांच्या पुर, वठ्यासंबंधानें, पण इंग्लंडमध्ये नव्या तोफा व नवा दारूगोळा इतक्या झपाट्याने तयार होत आहेत की असल्या भीतीचा संशय मनांत येण्याचे ते दिवस आता उरले नाहीत. इंग्लंडांतील लोक इतका दीर्घोद्योग करीत आहेत असें पाहून इंग्लंडविषयींचा जर्मनीचा द्वेषाग्नि फारच भडकून गेला आहे. इंग्लंडला सता- वण्याच्या बुद्धीने जमनीच्या झेपेलिने लंडन शहरावर व उत्तरेकडच्या जिल्ह्यावर सप्टेंबर महिन्यांत तीन वेळां स्वाऱ्या केल्या. पूर्वीहून अधिक मोठया प्रमाणावर या स्वाऱ्या होत्या खऱ्या, पण त्यामुळे इंग्लंडचे म्हणण्यासारखे काहींच नुकसान न होतां जर्मनीची दोन तीन झेपेलिन विमाने मात्र इंग्लंडच्या तोफांना बळी पडली ! इंग्लंड रशियाला दारूगोळा पुरवीत आहे इतकेच नव्हे तर इंग्लंडनें इटलीला जर्मनीविरुद्ध चिथविले आणि ग्रीसच्या राजाची इच्छा नसतांहि ग्रीसमध्ये राज्य- क्रांति घडवून आणून जर्मनीविरुद्ध ग्रीसच्या सैन्याचा उपयोग करण्याचा डाव इंग्लंड खेळत आहे अशीहि बोटें इंग्लंडकडे पाहून जर्मनी मोडू लागला आहे. जर्मनीचा हा जळफळाट पाहिला म्हणजे जर्मनी आंतून कमकुवत होत चालला आहे असें अनुमान काढणे भाग पडत नाही काय ? रोमानिया मिळाल्यामुळे सप्टेंबर प्रारंभाला जर्मनीची धांदल उडाली तर आक्टोबर प्रारंभाला ग्रीसचे पवें भय जर्मनीपुढे दत्त म्हणून उभे राहिले आहे. रोमानिया मिळाला तरी ग्रीसच्या सप्टेंबर-आक्टोबर महिना २३ राजाने सप्टेंबर महिन्यांत दोस्त सरकारांना मिळण्याच्या प्रश्नाची टाळाटाळीच आरंभिली. जर्मनीच्या बाजूचा राजाचा हा कल पाहून माजी मुख्य प्रधान मि. व्हेनिजलास यांच्या पक्षाने क्रीट बेटांत जाऊन तेथे उघडपणे ग्रीसमधील राज्य- क्रांतीचा जाहीरनामा काढला. एम. व्हेनिजुलास हे स्वतः राज्यक्रांतीचे पुढारी झाले असून ग्रीसची सर्व बेटें व बरेचसे आरमार त्यांना मिळाले आहे. राज्यक्रांति पक्षाने तीस चाळीस हजार सैन्य तयार केले असून ग्रीसच्या लष्करांतील शेकडों सन्मान्य अधिकारी व कांही प्रसिद्ध सेनानायकहि राज्यक्रांति पक्षाला मिळाले आहेत. एम. व्हेनिजुलास यांची ही राज्यक्रांतीची चळवळ जरी रोजच्यारोज झपाट्याने वाढत आहे तरी ग्रीसच्या राजानें ग्रीसचे बरेच मोठे सैन्य आपल्या मुठीत ठेवले आहे. आक्टोबरमधील रोमानियाच्या व ऑस्ट्रो-जर्मनांच्या झटापटीचा काय परिणाम होतो तो पाहून नंतर तो दोस्त सरकारांना . कदाचित् मिळाल्यास रडतराऊसारखा मिळेल असा सांप्रतचा रंग दिसत आहे. सप्टेंबर महिना ग्रीसच्या ह्या घोटाळ्यामध्ये खाऊन टाकल्यामुळे सालिनोकाच्या बाजूला अँग्लो-फ्रेंचांना विशेष हालचाल करता आली नाही, हे सांगणे नकोच.
महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा आक्टोबर-नोव्हें. महिना रुमानियाची रणभूमि सप्टेंबर महिन्याचे अखेरीस रुमानियन युद्धाला प्राप्त झालेले महत्त्व आक्टोबर महिन्यांत कायम टिकलें, इतकेच नव्हे तर नोव्हेंबर व डिसेंबर हे दोन महिनेहि रुमानिया सर्वांचे लक्ष वेधून घेईल असें आक्टोबर अखेरीस स्पष्टपणे दिसून आले. सेनापति हिंडेनबुर्ग यांच्या हाती आस्ट्रो-जर्मन सैन्याची सर्व सूत्रे गेली त्यावेळी त्यांच्या लष्करी धोरणाविषयी तज्ज्ञांनी जे अंदाज बांधले होते, ते अंदाज आक्टो- बर महिन्यांत खरे ठरले. फ्रान्स व इंग्लंड यांच्या मुख्य सेनेवर चाल करून जाऊन तेथे मोठा विजय संपादन करून महायुद्धाची परिसमाप्ति करण्याची जर्मनीची हाव से. हिंडेनबुर्ग यांचे मताने चुकीची होती. आपल्या मुख्य प्रति- स्पर्ध्याच्या डोक्यावर एक जोराचा घाव घालावयाचा व त्या घावासरशी तो उलथून पडल्यावर इतर किरकोळांना ऐते गिळून टाकायचे हे एक लष्करी धोरणाचे स्वरूप असते. असलें लष्करी धोरण नेपोलियनला फार प्रिय असे. नेहमी विजयश्रीने नटलेल्या कर्त्या पण अहंकारी सेनापतीला हेच धोरण आवडते. दुसरे धोरण असें असतें की प्रथम वृक्षाच्या फांद्या तोडावयाच्या आणि वृक्ष निस्तेज झाल्यावर त्याच्या मुख्य बुध्यावार घाव घालावयाचा. से. हिंडेनबुर्ग हे दुसऱ्या धोरणाचे पुरस्कर्ते दिसतात. नेपोलियनचे अनुयायी ते नव्हत. पहिले धोरण ज्यांच्या अंगांत मस्ती मावत नाहीं त्यांनाच प्रियकर वाटते. महायुद्धाच्या प्रारंभी जर्मनीची मस्ती वीस वर्षांच्या तयारीने अमर्यादित झाली होती. त्यामुळे पहिल्या धडकीसरशी पॅरिसचा चुराडा करून फ्रान्समध्येच महायुद्ध संपविण्याची हाव जर्मनीने धरली; पण ती रग मार्न नदीवर जनरल जाफ्रे यांनी व यिप्रेस येथे इंग्रजांनी जिरविली. हा मद खाली उतरल्यानंतर से. हिंडेनबुर्ग यांचे सल्लयाने रशियाचे संकट टाळण्याचे उद्योगाला जर्मनी लागला. रशियाचे मनुष्यबलाला सीमा नाही हे खरे; पण शास्त्रीय सामुग्री व शास्त्रीय ज्ञान यांत रशिया मागासलेला; अर्थात दोस्त सरकारांच्या वृक्षांत मुख्य स्तंभाची जागा रशियाची नसून मोठया फांदीचे स्थल रशियाचे आहे.
आक्टोबर-नोव्हेंबर महिना २५ से. ही रशियाची फांदी तोडून टाकण्याचा उद्योग १९१५ साली जर्मनीने केला. ह्या कामीं से. हिंडेनबुर्ग व मॅकेनसन यांना चांगले यश मिळाले. हे यश चांगले तर खरेच; पण त्या यशाने जर्मनीचा बुद्धिभ्रंश झाला. मॅकेनसन यांनी रशियाची पाने फुलें तोंडली, से. हिंडेनबुर्ग यांनी रशियाची पिकलेली फळे खाल्ली, आणि सर्व जर्मनीला भ्रम झाला की यशस्वी जर्मन सेनेने रशियाची फांदीच मोडून टाकली ! बुद्धिभ्रंश विनाशाचे मूळ आहे. १९१६ सालच्या प्रारंभाला ह्या बुद्धिदंशामुळे १९१४ सालचा चढेलपणा पुन्हां चमकू लागला आणि फ्रेंचांचा पराजय करण्याच्या खुमखुमीने पुन्हां वर डोकें केलें. जर्मनीच्या उतरत्या कलेस येथूनच प्रारंभ झाला. व्हडूनवर जर्मनीने पांच सहा महिने जोराचे हल्ले केले आणि फ्रेंचांपुढे स्वतः पुढे स्वतःच डोके फोडून घेऊन महायुद्धास निराळे स्वरूप जर्मनीने आपण होऊन दिले ! व्हईनवरील हल्लयामुळे थकलेल्या जर्मनीवर योग्य संधि गाठून इंग्लंड व फ्रान्स यांनी सोमनदीच्या काठी उलट हल्ला चढ विला. अँग्लो-फ्रेंच सैन्याला पायाखाली तुडवू अशा दिमाखाने जर्मन सेना व्हडून पुढे आली असतां सोम नदीच्या काठी अँग्लो-फ्रेंचांच्या लाथा खात जर्मनीला मागे हटावे लागलें! फाजील गर्वाचा परिणाम हा असाच व्हायचा. याचवेळी जर्मनीच्या असें अनुभवास आले की रशियाची फांदी तुटलेली नसून नव्या पल्लवानें, नव्या फुलाने व नव्या फळाने ती पुन्हां भरगच्च झाली आहे. अनुभव येतो न येतो तोंच रुमानियाची नवी फांदी दोस्त सरकारांच्या महावृक्षाला फुटली तेव्हां जर्मनीचे डोळे उघडले. फ्रान्सच्या रणभूमीवर भलत्या महत्वाकांक्षेस बळी न पडतां जर जमनीने सलिनोकाच्या व इटालीच्या मोहिमेवर आपले सर्व बळ खर्च करून त्या दुय्यम फांद्यांना तोडून टाकले असते किंवा निदान फलपुष्प विरहित केले असते तर रुमानियाचे नवें संकट जर्मनीवर ओढवले नसते. धाकटा लाभ क्षुल्लक मानून मोठया लाभाच्या नादी लागून बरोबरीच्या नात्याने कुस्ती सुटण्याचें फळहि जर्मनीने हातचे गमावले. दोस्त सरकारचा जय होऊन खालीं मान घालूनच जर्मनीस तह करावा लागेल असा सिद्धांत तज्ज्ञांनी स्थापित करण्याचे कारण झाले तरी जर्मनीच्या अहंकाराने से. हिंडेनबुर्ग यांच्या लष्करी धोरणांत केलेली ढवळा- ढवळ होय. रुमानिया, अंजन डोळ्यांत घुसण्याबरोबर जर्मनीला पश्चात्ताप झाला, हा अखेरीस पुरा २६ पहिले महायुद्ध त्यार व झालेली चूक दुरुस्त करण्याची कामगिरी से. हिंडेनबुर्ग यांना सांगितली. से हिंडेनबुर्ग हुषार खरे, पण कालाची मर्यादा उल्लंघन केल्यानंतर हुषारीचा का उपयोग होणार ? तज्ज्ञांचे असे मत आहे की, बिघडलेली घडी से, हिंडेनबु यांचे हातून सुधारणे शक्य नाही. वेळ निघून गेली, ती परत येत नाही. से. हिंडेन्बु फार झाले तर आजचे मरण उद्यांवर ढकलतील इतकेंच. १९१६ च्या पूर्वार्धात शक्य होतें तें १९१६ च्या उत्तरार्धात किंवा १९१७ सालांत जसेच तसेंच कसे शक्य राहील? कालाच्या हेलकाव्याबरोबर जर आपण अनुरोधाने फिरत राहिलो नाही तर आपलें आसन डळमळीत केल्याशिवाय काळार गति कशी स्वस्थ बसेल ? १९१६ सालच्या पूर्वार्धात दोस्त सरकारच्या धाकटर फांद्या मोडण्याची जी कामगिरी जर्मनीने उरकून टाकावयास पाहिजे होती त कामगिरीची सुरवात सप्टेंबर महिन्यांत उशिराने से. हिंडेनबुर्ग यांनी केली. अर्था काळ से. हिंडेनबुग यांच्या विरुद्ध आहे. तथापि त्यांच्या अगच्या विलक्षण हुषार मुळे आणखी एक वर्षभर महायुद्धाचे आयुष्य वाढणार असें आक्टोबर महिन्यां दृष्टोत्पत्तीस आले. नव्या फांदीला-रुमानियाला-प्रथम तोडून टाकून नंतर सालिनोव व इटली यांचा समाचार घ्यावयाचा असा आस्ट्रो-जर्मनांचा सांप्रत हेतु दिसते या डावांत तात्पुरता थोडासा विजयहि से. हिंडेनबुर्ग यांना मिळण्याची चि आक्टोबर महिन्यांत दिसू लागली आहेत. आक्टोबर अखेरीस व नोव्हेंबरचे प्रारंभात रुमानियाला आस्ट्रो-जर्मनांनी कचाटींत पकडले आहे. नोव्हेंबर प्रारंभाला रुमानिया सर्व डोब्रुजा प्रांत जाऊन ट्रान्सलाव्हानियांतून रुमानियाला बाहेर पडावें लागून सरह वरील पर्वताचे सर्व घाट आस्ट्रो-जर्मनांचे हाती जाऊन या घाटाखाली रुमानियाच्य मुलुखांत आस्ट्रो-जर्मन सैन्य दोनचार ठिकाणी आंत घुसले आहे. आक्टोबर अखेरी रुमानिया फलपुष्पविरहित झाला हे खास. नोव्हेंबर-डिसेंबरांत जर रुमानियाची खां आस्ट्रो-जर्मनांना तोडतां आली तर तात्पुरतें यश तर तात्पुरतें यश हिंडेनबुर्ग यांना मिळाल्यासार होईल. तात्पुरते म्हणण्याचे कारण असे की जरी रुमानिया मागे हटून रुमानिया राजधानी बुखारेस्ट शहर आस्ट्रो-जर्मनांच्या हाती लागले तरी व्हडूनच्या लढ ईनंतर महायुद्धाच्या यशापयशाच्या प्रवाहाला जी दिशा लागली आहे ती दिइ काही केल्या पालटणार नाही. रुमानियाला कैचीत धरणे किंवा चुरडणे म्हण कांहीं रशियाचा पराभव नव्हे, रुमानिया सामील झाला नव्हता त्यावेळी आस्टो.
आक्टोबर-नोव्हेंबर महिना २७ जर्मन सैन्याचा धुव्वा रशियाने उडविला होता; रुमानियाला दाबण्यांत आस्ट्रो- जर्मनांचे बरेंच बळ खर्ची पडल्यावर पुढील सालच्या वसंत काळांत रशियाच्या नव्या तयारीपुढे आस्ट्रो-जर्मनांची काय स्थिति होईल ? रुमानिया सामील झाला नव्हता त्यावेळी अँग्लो-फ्रेंचांनी जर्मनीच्या मानेवर आपला हात चढविला होता; तो हात तसाच जोराने पुढे सरकत असून येत्या हिवाळ्यांत जरी त्याची मंदगति झाली, तरी पुढील सालच्या वसंत काळांत जर्मनीस उलथून पाडल्याशिवाय कसा राहील ? रुमानिया सामील झाला नव्हता त्यावेळी इटलीने आस्ट्रियाचे संकट धड- कावून देऊन गार्जियाचा विजय संपादन केला होता; इटलीच्या या जयाची मालिका पुढील साली अधिक लागण्यास कोणची हरकत आहे ? आपण अशी कल्पना करूं की, आगस्ट अखेरीस रुमानिया दोस्त सरकारांस मिळाला नसता तर काय झाले असते ? सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत अँग्लो-फ्रेंचांचे जितकें पाऊल पुढे पडलें तितकें पुढे पडले नसते इतकेंच. पण महायुद्धाचा ओघ कांहीं बदलत नव्हता. अँग्लो-फ्रेंचांवर, इटालीवर किंवा रशियावर चढाई करून जाण्याचा मान व्हईनच्या लढाईत जर्मनीनें जो गमावला तो गमावला! रुमानियाला हतवीर्य केल्याने तो मान जर्मनीला थोडाच परत मिळणार आहे ? महायुद्धाच्या सांदी-कोपऱ्यांत मिळविलेल्या विजयावर हा मान अवलंबून नसून, मनुष्य बल, द्रव्यबल व ज्ञानबल या त्रिवेणीसंगमाच्या प्रवाहांतील जिवंत झऱ्यावर हा मान अवलंबून आहे. जर्मनीचे हे झरे आटत आहेत आणि दोस्त सरकारांचे झरे आतां कोठे जोराने वाहूं लागले आहेत, त्याची साक्ष रशियाच्या व फ्रान्सच्या रणभूमीत रुमानियाला पटल्यानंतरच रुमानिया महायुद्धांत सामील झाला. दोस्त सरकारांची शक्ति यंदाच आस्ट्रो-जर्मनांना डोइजड झाली, ही वाढती शक्ति आहे याबद्दल वाद नाही. शक्ति जर वाढती आहे आणि आजच जर आस्ट्रो-जर्मनांच्या डोक्यावर बसली आहे, तर त्या शक्तीची आराधना करणारा रुमानिया नोव्हेंबर प्रारंभाला से. हिंडेनबुर्ग यांच्या चापांत कां सांपडावा ? रुमानिया कैचीत सापडण्याचे कारण असे आहे की, रुमानियाची रणभूमि कोनाकोपऱ्याची रणभूमि असून रशियाच्या बेसारेविया प्रांतांतील आगगाड्यां- शिवाय इतर दुसऱ्या कोणत्याहि मार्गाने रुमानियास इंग्लंड व फ्रान्स यांजकडून मदत पोचण्यास मार्ग नाही. फ्रान्सच्या व इटलीच्या रणभूमीत जोपर्यंत आस्ट्रो- २८ पहिले महायुद्ध जर्मन सैन्य लढाईत चढाईच्या नादांत गुन्तलें होतें तोपर्यंत तोफांचें बलहि पश्चिमे- कडेस झुकलेले होते; पण पश्चिम रणभूमीत चढाईचा नाद सोडून थोडथोडी पीछेहाट होऊन जेव्हां जर्मन तोफा पूर्वेकडे वळल्या, तेव्हां रशियाची सरशी होण्याचे बंद पडून पूर्व रणभूमीवर आस्ट्रो-जर्मन सेना व रशियन सेना समबल ठरली. रणभूमीवरील या फेरफाराकडे पाहिले म्हणजे एक गोष्ट चांगली नजरेस येते. ती ही की १९१५ सालापेक्षां १९१६ साली जर्मनीच्या तोफांच्या शक्तीला बराच कमीपणा येत चालला आहे. १९१५ सालीं जर्मनी एका दिशला समबल राहात असे व दुसऱ्या दिशेला वरचढ होत असे. १९१६ साली जर्मनी पश्चिमेस हतबल आहे व पूर्वेस समबल आहे. म्हणजे १९१५ सालचा नूर उतरला. १९१५ सालचा नूर उतरला खरा; तरी पूर्वेस रुमानिया महायुद्धांत सामील झाल्यावर सप्टेंबर व आक्टोबर दोन महिने ग्यालिशिया व उपोव्हिना प्रांतांत रशियाशी झुजतांना जर्मनी समबल ठरला ही ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात् गेल्या हिवाळ्यांत व वसंतकाळांत रशियास पोंचलेल्या दारूगोळ्यांची व तोफांची रेलचेल जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतील प्रचंड लढायांनी संपवून टाकली ! आक्टोबर महिन्यांत रशियाचा वरचढपणा कमी होऊन, रशिया समबल झाला. रशिया समबल होत चालला आहे असे पहाण्याबरोबर आणि बर्फाचा हिवाळा येण्यास एकदोन महिन्यांचीच अवधी आहे असे दृष्टीस पडल्याबरोबर, रीगाच्या बाजूची उत्तर रणभूमि, फ्रान्सची पश्चिम रणभूमि आणि इटलीची रणभूमि या तिन्ही ठिकाणच्या तोफा थोडथोडया कमी करून आक्टोबर प्रारंभाला ट्रान्स्ला- ल्व्हानियामध्ये दोनतीन लाख नवें सैन्य व बराच मोठा तोफांचा जमाव से.फॉलकेन- हेन यांचे हाताखाली देऊन आस्ट्रो-जर्मनांनी रुमानियावर चढाई सुरू केली. इतक्या तोफा व एवढे मोठे नवें सैन्य ट्रान्स्लाल्व्हानियामध्ये आस्ट्रो-जर्मनांना गोळा करता येईल असा रुमानियाचा अंदाज नव्हता. सप्टबरमध्ये एकतृतीयांशाहून अधिक ट्रान्स्लाल्व्हानिया रुमानियाने व्यापला होता; आणि रुमानियाला असे वाटत होते की, ट्रान्स्लाल्व्हानिया सोडून देऊन ट्रान्स्लाल्व्हानियाच्या पश्चिम सरहद्दीवर स्वतःचे संरक्षण करीत आस्ट्रो-जर्मन सैन्य बसेल आणि ट्रान्स्लाल्व्हानियाच्या मोबदला डोब्रुजा प्रांत व्यापून टाकून तहाच्या वेळी ट्रान्स्लाल्व्हानिया पाहिजे असल्यास डोब्रुजा सोडा असे बोलणे जर्मनीकडून येईल. लढाईत ट्रान्स्लाल्व्हानियापेक्षां डोब्रुजा प्रांताची आक्टोबर-नोव्हेंबर महिना २९ किंमत जर्मनीला अधिक, कारण रुसो-रुमानियाची बल्गेरियावर स्वारी होऊन बल्गेरियाचा पराभव झाल्यावर तुर्काचा आगगाडीचा संबंध तोडण्यास डोब्रुजाचाच मार्ग काय तो सुलभ, तुर्कोशी संलग्न होणे हा जर्मनीचा महायुद्धांतील मुख्य हेतु. तो मुख्य हेतु विफल होऊ नये म्हणून डोब्रुजा प्रांताची जर्मनीच्या लष्करी धोरणास अत्यंत जरुरी. शिवाय सप्टेंबर महिन्यांत से, मकेनसन यांनी मोठया त्वरेनें अर्धामुर्धा डोब्रुजा प्रांत व्यापला. अशा वेळी रुमानियाला कां वाटू नये की, दांत कोरून जमलेले आस्ट्रो-जर्मनांचे बल डोब्रुजा प्रांतांतच फेकण्यात आले आहे म्हणून ? रुमानियाला तसे वाटणे साहजिक होते. कारण एका बाबीकडे सर्व दोस्त सरकारांचें दुर्लक्ष झाले. ती बाब म्हणजे तुर्काची नवी सेना होय. गेल्या डिसेंबरांत तुर्की साम्राज्य जर्मनीशी संलग्न झाल्यावर इंग्लंडनें ज्याप्रमाणे सक्तीचा लष्करी कायदा अमलांत आणून नवें सैन्य उभारले त्याप्रमाणे जर्मनीनेंहि तुर्काना वेठीला धरून तुकोचे नवें सैन्य जर्मन अधिकाऱ्यांच्या नजरेखाली तयार केले. तीन महिन्यांपूर्वी रशियाच्या नव्या धडकीमुळे ज्यावेळी पांच सात लाख आस्ट्रियन सैन्य निकामी झाले त्यावेळी तुर्काच्या मदतीनेच आस्ट्रिया पुन्हां सावरला. सांप्रत रीगाच्या बाजूच्या उत्तर रणभूमीत तुर्कोचीच मदत जर्मनीला आहे; ग्यालिशियांत रशियाच्या क्रोधाग्नीत जळण्याकरितां तुर्कानाच पुढे करण्यांत येत आहे; आणि सप्टेंबर महि- न्यांत डोब्रुजावर जेव्हां से. मॅकेनसन यांची स्वारी सुरू झाली त्यावेळी त्यांच्या हाताखाली तुर्की सैन्याचाच भरणा मोठा होता. इंग्लंडच्या शक्तीचा अंदाज ज्या प्रमाणे जर्मनीला बरोबर करता आला नाही त्याप्रमाणे तुर्की साम्राज्यांत किती धहे कहे प्राणी जर्मनीच्या वेसणीत गोंवले जातील याचाहि अंदाज दोस्त सरकारांना बरोबर करता आला नाही. प्रमुखतः तुर्को-बल्गेरियन सैन्य से, मॅकेनसन यांच्या हाताखाली असतांना रुमानियाला वाटले की, आस्ट्रो-जर्मन तोफांचे बळ डोब्रूजा- च्याच बाजूला फेकण्यांत आले आहे. या बलाचा प्रतिकार करण्याकरितां रुमानियाने ट्रान्स्लाल्व्हानियांतील आपले काही सैन्य डोब्रुजा प्रांतांतील झर्नाव्होडा-कॉन्स्टांझा या आगगाडीचे संरक्षण करण्याकरितां पाठविले आणि चौथ्या आठवड्यांत रुमानियाने से. मॅकेनसन यांच्या तडाक्यापासून झ व्होडा-कान्स्टांझा रेल्वेचे संरक्षण केले. संरक्षण केले खरे पण ट्रान्स्लाल्व्हानियामध्ये सर्वच डाव आंगलट आला, कारण ह्याचवेळी ट्रान्स्लाल्व्हानियामध्ये से. फॉलकेनहेन यांच्या हाताखाली आस्ट्रो-जर्मनांचे ३० पहिले महायुद्ध मोठे सैन्य जमले होते. सप्टेंबरच्या अखेरीस अलूटा नदीच्या रोथेथुरम घाटाच्या उत्तरेकडील हरमनस्टँड गावांत रुमानियन सैन्याला आस्ट्रो-जर्मनांनी घेरलें; आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यांत टर्सबर्ग घाटाच्या उत्तरेकडील फोगॅरस ठाणे रुमानियाला सोडावे लागले; आणि आक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यांत म्हणजे ९।१० तारखेस प्रिडिअल घाटाच्या उत्तरेकडील ब्रासो शहराच्या टापूत मोठी लढाई होऊन रुमानियन सैन्याचा मोड झाला. या पराभवानंतर म्हणजे आक्टो- बरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस रुमानियास कळून चुकले की, से. फॉलकेनहेन यांचे हाताखाली आस्ट्रो-जर्मनांच्या मुख्य तोफा गोळा झाल्या असून काथियन पर्वताच्या पलीकडील ट्रान्स्लाल्व्हानियांत घुसलेल्या रुमानियन सैन्यास जड तोफांची मदत वेळेवर पोचणे शक्य नाही. ही स्थिति ध्यानांत येतांच लगेच रुमानियाने मोठ्या शिताफीने आणि व्यवस्थितपणाने ट्रान्साल्व्हानियांत पीच्छेहाट करण्यास सुरुवात केली, आणि एक तृतीयांश जिंकलेला ट्रान्साल्व्हानिया सोडून आक्टो- बरच्या तिसऱ्या आठवड्यांत सर्व रुमानियन सैन्य स्वतःच्या सरहद्दीवर आले. से. फॉलकेनहेन यांनी जोराचा पाठलाग सुरू केला. व्हल्कन घाट, रोथेथुरम घाट, टर्सबर्ग घाट, प्रिडियल घाट, बूझा घाट, ऐटझा घाट, ग्युमिस घाट, वेकार घाट आणि सर्वांत उत्तरेकडचा डोनव्हता हे सर्व घाट ओलांडून आक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यांत आस्ट्रो-जर्मन सैन्य रुमानियांत उतरूं लागले ! रुमानियाचे सामान्यतः तीन भाग करता येतात. पहिला भाग पूर्व रुमानिया याला धाकटा वोलेव्हिया असे म्हणतात. याच्या उत्तरेस व्हल्कन घाट असून पूर्वेस अर्शीवा व आयर्न गेट ही ठाणी आहेत; दक्षिणेस डान्यूब नदी असून पश्चिमेस रोथेथुरम घाटांतून उतरणारी असूंटा नदी आहे. हा धाकटा वोलेव्हिया. दुसरा भाग म्हणज थोरला बोलेव्हिया किंवा मध्य रुमानिया होय. या दुसऱ्या भागाच्या मध्यावर बुखारेस्ट राजधानी असून उत्तरेस प्रिडियल घाट आहे, तिसरा भाग म्हणजे नकाशांत उंच मानेसारखा दिसणारा मोल्डेव्हिया प्रांत होय. या मोल्डेव्हियाच्या मध्यांतून सिरेथ नदी कार्पेथियन पर्वता. पासून पंचवीस तीस मैलांच्या अंतरावरून वहात असून सिरेथ नदीच्या पूर्वेस पंचवीस मैलांवर रुमानिया व रशिया यांच्या सरहद्दीवर पूथ नदी वहात आहे. रशियाच्या बेसारेबिया प्रांतांतील एक आगगाडी सिरेथ नदीच्या उजव्या कांदाने उत्तरेकडून दक्षिण रुमानियांत येते; व दुसरी आगगाडी प्रूथ नदी व सिरेय नदी आक्टोबर-नोव्हेंबर महिना ३१ ओलांडून फॉकचीनी स्टेशनाजवळ सिरेथाच्या आगगाडीला मिळते. उत्तरेकडच्या मानेला म्हणजे मोल्डेव्हियाला मोडून टाकावें या इराद्याने से. फॉलकेनहेन यांनी बेकास, गुईमज व ऐटझा या तीन घाटांनी खाली उतरून सिरेथ नदी गांठण्याचा उद्योग आक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यांत आरंभला. आइप्स व युव्हमज या घाटाने तर ते बरेच पुढे आले आणि रुमानियाची मान मुरगळली जाऊन रुमा. नियाचे धड रशियापासून अलग होते की काय अशी भीति क्षणभर सर्वांना वाटली ! पण इतक्यांत वेळेवर रशियाची कुमक येऊन पोचल्यामुळे मोल्डेव्हियां तील आस्ट्रो-जर्मनांच्या चढाईस आळा बसला. डोब्रुजा प्रांतांतील रुमानियन सैन्य मोल्डेव्हियामध्ये धावून आले आणि रुमानियाच्या गळ्याभोवती आस्ट्रो-जर्मनांनी घातलेला फास ढिला पडला. मोडेव्हियांतील दाब कमी झाला खरा, पण आक्टो. बरच्या चौथ्या आठवड्यांत डोब्रुजा प्रांतात से. मॅकेनसन यांनी पुन्हां वर डोकें केलें; आणि झर्नाव्होडा-कान्स्टनझा रेल्वे एकदम ताब्यात घेऊन डान्यूब नदीवरील झर्नाव्होडा गांव आणि काळ्या समुद्रावरील कान्स्टनझा बंदर ही दोन्ही आस्ट्रो-- जर्मनांच्या हाती लागली. कान्स्टनझा बंदरांत गव्हाचा मोठा सांठा होता व तेथे पोळ्या खावयास मिळतील ह्या आशेने जर्मन सैन्य धावून गेलें; पण जहाजांत बसून निघून जातांना रशियन सैन्याने गव्हाच्या सांठयाला आग लावून दिल्यामुळे जर्मनीची फार निराशा झाली. झर्नाव्होडा-कान्स्टनझा रेल्वे से. मॅकेनसन यांच्या हाती लागण्याबरोबर त्यांनी उत्तर डोब्रुजा प्रांत धडकीसरशी दोन चार दिवसांत घेतला; नोव्हेंबर प्रारंभाला डोब्रुजा प्रांताच्या ईशान्य कोपऱ्यांत अवशिष्ट रूसो- रुमानियन सैन्य बळकट जागा पकडून से. मॅकेनसन यांच्याशी जोराने लढत राहिले आहे. या सैन्यास मोठीशी कुमक येऊन पोचणे संभवनीय नसल्यामुळे सर्व डोब्रुजा प्रांत से. मॅकेनसन यांचा झाला असे म्हणण्यास हरकत नाही. डोब्रुजा प्रांत मिळा. ल्यामुळे डान्युब नदीचा उजवा कांठ जर्मनीचा झाला; बलोरिया व टर्की रशियाच्या भीतींतून मुक्त झाले; आणि से. मॅकेनसन यांच्या हाताखालचे लाख दीड लाख सैन्य दुसऱ्या कामगिरीस मोकळे झाले. या विजयानंतर से, मकेनसन पुढे काय करणार ? कांहींचा अंदाज असा आहे की, ते सलिनोकाकडे वळणार; कांहींचे म्हणणे असें पड़ने की एक दोन आठवड्यांत ते आठैव्हा येथे येऊन पश्चिमेकडून रुमा नियावर स्वारी करणार; काहींचा तर्क असा आहे की, जर्मनीच्या शास्त्रीय ज्ञानाने ३२ पहिले महायुद्ध डान्यूब नदी ओलांडण्याची तयारी यापूर्वीच बल्गेरियांत करून ठेविली असली पाहिजे; आणि त्या साधनांचा उपयोग करून चलाख से. मॅकेनसन कोठे तरी डान्यूब नदी अवचित ओलांडून रुमानियाच्या राजधानीला एकाएकी भयाभीत करून सोडणार, यांपकी कोणचा तके खरा हे नोव्हेंबर महिन्यांत दृग्गोचर होईल. मोल्डेवियामध्ये जोराचा अडथळा रुसो-रुमानियन सैन्य करीत आहे असे पाहून आस्ट्रो-जर्मन सैन्य बाल्कन घाटांतील जीऊल नदीच्या खोऱ्याने, रोथेथुरम घाटांतील अलूटा नदीच्या खोऱ्याने व प्रिडियल घाटाजवळच्या प्रपोवा नदीच्या खोऱ्याने आक्टोबर अखेरीस जोराने खाली उतरू लागले. जीऊल नदीच्या खोऱ्यांत रुमा- नियन सैन्याने त्यांना मागे हटवून पुन्हां व्हल्कन घाट दाखविला; पण अल्या नदीच्या काठी, टर्सबर्ग घाटाच्या दक्षिणेकडील किंप्लागच्या जिल्ह्यांत व प्रिडियल घाटाच्या दक्षिण टापूत आस्ट्रो-जर्मन सैन्याचे पाऊल आस्ते आस्ते पुढे पडून या तीन घाटांनी खाली उतरलेलें सैन्य नोव्हेंबरच्या प्रारंभाला एकमेकांशी संलग्न झाले. ह्या ठिकाणी जोराच्या लढाईला सुरुवात झाली असून त्या लढायांच्या निकालावर आणि से. मॅकेनसन यांच्या हालचालीवर नोव्हेंबर-डिसेंबरांतील रुमा. नियाचा सोक्षमोक्ष अवलंबून आहे. पश्चिम रणभूमीत, रशियाच्या बाजूच्या ग्यालि. शियाच्या ब ब्युकोव्हिनाच्या रणभूमीत, इटालीच्या रणभूमीत भयंकर लढाया सुरू झाल्या असून आस्ट्रो--जर्मनांना दोस्त सरकार तंबी देत आहे; व रुमानियाला रशियाने मदत करूं नये म्हणून रशियाला आस्ट्रो-जर्मन सैन्य तंबी देत आहे. रूमानियांतलें युद्ध कोनाकोपऱ्यांतलें खरें, महायुद्धाच्या एकन्दर प्रवाहावर त्याचा कायमचा परिणाम होण्यासारखें नाहीं हेहि खरे; पण नोव्हेंबर डिसेंबरांत जर बुखारेस्ट शहर आस्ट्रो-जर्मनांच्या हाती गेले तर अभिमन्युवधाच्या वेळेप्रमाणे दोस्त सरकारांचे सर्व हितचिंतक शोकाकूल झाल्यावांचून राहाणार नाहीत; बहुजन समाजावर रुमानियाच्या पराभवाचा फार मोठा परिणाम होणार आहे; आणि त्या मुळेच नोव्हेंबर प्रारंभाला इतर सर्व रणभूमींना मागे टाकून रुमानियाच्या चिमु- कल्या रणभूमीला विलक्षण महत्व प्राप्त झाले आहे. नोव्हेंबर महिन्यांत वाचकांनी रुमानियाच्या रणभूमीकडील बातम्यांकडे विशेष लक्ष पोचवावें हे सांगणे नकोच.
महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा नोव्हेंबर-डिसेंबर महिना रुमानियाला वाईट महिना नोव्हेंबर महिना रुमानियाला वाईट गेला; आणि डिसेंबर प्रारंभाला रुमा- नियाची राजधानी बुखारेस्ट शहर शत्रूच्या हाती लागल्यासारखी होऊन नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे आणखी एक महिन्याने रुमानियाची वरची मान म्हणजे मोल्डेव्हिया तेवढा रुमानियन सरकारच्या ताब्यात राहून खालचे सगळे धड जर्म- नीच्या हाती लागेल, असा सांप्रत अंदाज दिसत आहे. रुमानियावर हा जो दुःखाचा प्रसंग गुदरला त्याबद्दल सर्व दोस्त सरकारांना अत्यंत वाईट वाटत असून रुमानियाला पुन्हां स्वस्थळी प्रस्थापित करण्याकरितां पुढील वसंतकाळी दोस्त सरकारां- कडून जिवापाड मेहनत करण्यांत येईल हे सांगणे नलगे. रुमानियाचा हा जो पराभव झाला त्याचे कारण दोस्त सरकारांपाशी लढवय्या लोकांची संख्या कमी आहे असे नव्हे, किंवा दोस्त सरकारांजवळ दारूगोळा संपत आला आहे असेंहि नव्हे. दर महिन्याला दोस्त सरकारांचे नवें सैन्य संख्येने अधिक वाढत आहे आणि दारू- गोळ्यांचे पर्वतहि अधिक अधिक उंच होत चालले आहेत. मग रुमानियावर हा प्रसंग कां गुदरावा ? खुद्द रुमानियापाशीं मनुष्यबळ कमी होते काय ? रुमा- नियाचे सैन्य सात आठ लाखांहून अधिक ! तेव्हां मनुष्यबळ कमी असे कसे झणावें १ रुमानियन सैन्य शौर्याने लढत नाही काय ? आपल्या घरादारांवर व बायकामुलांवर हा प्रसंग गुदरत आहे हे रुमानियाला माहीत असल्यामुळे राजा- पासून रंकापर्यंत सर्वानी लढण्याची शिकस्त केली. मग हा प्रसंग कां गुदरला ? या पराजयाची कारणे दोन आहेत. पहिले कारण असें की रुमानिया कोनाकोपऱ्यांत पडला असून रशियाच्या एखाददुसऱ्या अगदी कडेच्या-लांबवरच्या-अर्थात् कम- कुवत असलेल्या आगगाडीच्या फांटयाने रुमानिया रशियाशी संबद्ध झालेला आहे. रुमानियाचे रणक्षेत्र जर्मनी, आस्ट्रिया, बल्गेरिया व टर्की या चौघांनाहि अगदी परसांतलें ! घरातून बाहेर पडावयाचें तें रणभूमीवर उभे राहावयाचें ! चारी देशां- तील आगगाड्यांचे कित्येक फांटे रुमानियाच्या सरहद्दीला भिडलेले. यामुळे आस्ट्रो- जर्मनांना आपल्या मोठया तोफा रुमानियाच्या रणभूमीत फार सुलभतेनें वापरतां ल्या; आणि दारूगोळ्यांचा मुबलक पुरवठा पाहिजे त्या बिंदूवर पाहिजे त्यावेळी पाहिजे तितका करता आला, रुमानियावर जय तोफांनी मिळविला, यंत्रांनी मिळ- - ३४ पहिले महायुद्ध विला, युद्धसामुग्रीने मिळविला, माणसांनी नव्हे. बिचारा रुमानिया ! त्याच्यापाशी आस्ट्रो-जर्मनांच्या तोफांना तोंड देण्याइतक्या लायकीचा तोफखाना कोठून अस- णार ? चिमुकले राष्ट्र; तोफखानाहि चिमुकला! येऊन जाऊन रशियाने त्याला तोफांची मदत करावयाची; पण या महायुद्धांत तोफांच्या बाबतींत पहिल्यापासून रशिया गरजू व कर्जबाजारी. रशियाने आपली शिकस्त करून मदत केली खरी; पण ती मदत पुरेशी न झाल्यास नवल नाही व रशियाकडे दोषहि नाही. सांप्रतचे महायुद्ध हे यंत्रमय आहे. बोलायचे, चालायचे, खुणा करावयाच्या, इषारा द्याव- याचा, सर्व कांहीं यंत्राने, खावयाचें-प्यावयाचे देखील यंत्राने, अशांतली स्थिति झाली आहे. एखाद्या पलटणीतील लढणाऱ्या माणसाहून त्या पलटणीबरोबर असलेल्या यंत्रांचीच संख्या अधिक, त्या पलटणीवर हुकमत चालविणाऱ्या सेनानायकाहून वाकबगार इंजिनिअरांची संख्या अधिक, त्या पलटणीला खायला प्यायला देण्याची तरतूद करणाऱ्या खात्याहून यंत्रांच्या पोटांत टाकावयाच्या गोळ्यांची व पेट्रोलियमच्या पाण्याची व्यवस्था ठेवणारे खातें अधिक महत्वाचें, आजारी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या सैनिकांची शुश्रूषा करण्याकरितां जमा झालेल्या वैद्यमंडळाहून मोटार वगैरे निरनिराळया यंत्रांची दुरुस्ती करण्या- करितां रणभूमीजवळ पसरलेल्या बाजाराचेंच अवडंबर मोठे ! या महायुद्धातील एखाद्या रणभूमीचे जर देवदूताप्रमाणे आकाशांतून अवलोकन केले, तर एखाद्या विस्तीर्ण यंत्रालयांत व यांत्रिक कारखान्यांत मौजेखातर कांहीं सैनिक इकडून तिकडे फिरत आहेत असे वाटते. सैनिकांच्या बरोबर यंत्रे नसून, यंत्रांच्या जवळ कुतू- हलाने लष्करी पोषाखांचे थोडेसे लोक उभे आहेत असा भास होतो. हा यंत्रांचा पसारा आहे, शूर पुरुषांचा जमाव नव्हे. असल्या यंत्रांच्या प्रदर्शनापुढे बिचाऱ्या रुमानियाचे काय चालणार ! रुमानियाच्या पराभवाचे मुख्य कारण रुमानियाच्या बाजूला असलेला यंत्रांचा तुटवडा होय. दुसरे कारण असे की, जर्मनीचा यंत्राचा बाजार आटपता आला आहे, अशा भ्रमाने रुमानियाने चुकीचे लष्करी धोरण प्रथमपासून स्वीकारिलें. रुमानिया लढाईला सुरुवात करण्याबरोबर एकदम द्रान्साल्व्हानियामध्ये घुसला. हे लष्करी धोरण दोस्त सरकारांच्या सांगण्यावरून रूमानियाने स्वीकारले नव्हते. दोस्त सरकारांच्या लष्करी तज्ज्ञांनी असा सल्ला दिलाच नसता. ट्रान्साल्व्हानिया कबजांत घेण्याकरितां आपण लढाईत पडणार नोव्हेंबर-डिसेंबर महिना आणि तो एकदम ताब्यात घेण्याचेंच लष्करी धोरण आपण स्वीकारणार अशा अटीवरच रुमानिया लढाईत पडला. बल्गेरिया व तुर्कस्थानाला सालिनोका येथील सैन्याने तंबी द्यावी आणि रुमानियाने एकदम ट्रान्साल्व्हानिया व्यापावा असलें लष्करी धोरण रुमानियाने युद्धांत पडावयाचे वेळी आखून ठेविलें. हे धोरण आंगलट कसें आलें तें पहा. ग्रीसचा राजा दगलबाज ठरला, आणि त्यामुळे सालिनोकाच्या सैन्याला मोठीशी हालचाल करतांच आली नाही. ग्रीसच्या राजाचा पायबंद तोडून सालिनोकाचे घोडे आज पुढे दवडू शकत नाहीत, ही मनाशी पक्की खूणगांठ घालून बल्गेरियन व टर्किश सैन्य हाताशी घेऊन से. मॅकेनसन यांनी डोब्रुजा प्रांतावर एकदम चढाई केली, आणि पहिल्या झटक्याला मोठा जय मिळवून झर्नोव्होडा-कास्टांझा आगगाडी गांठली ! से. मॅकेनसन यांच्या या विजयाने ट्रान्साल्व्हानियामध्ये रुमानियाने मिळ- विलेल्या यशावर विरजम घातले; आणि डोब्रुजाच्या बाजूला ढासळू लागलेली भिंत सावरण्याकरितां ट्रान्साल्व्हानियाकडे लागलेली रुमानियाची दृष्टि डोब्रुजाकडे वळली. ही संधि साधून आस्ट्रो-जर्मनांनी ट्रान्साल्व्हानियामध्ये आपला यंत्रांचा मायावी बाजार एकदम उघडला. हा बाजार पाहून रुमानियन सैन्य अर्थात गांगरून गेलें; आणि रुमानियाच्या पीछेहाटीस सुरुवात झाली. ही पीछेहाट चालु असतांना आस्ट्रो-जर्मनांनी इतकी लगट केली की, रुमानियाच्या संरक्षणाच्या मुख्य जागा जे काथियन पर्वतांतील अवघड घाट रुमानियाला सोडून द्यावे लागले आणि त्यावेळे- पासूनच रुमानियाच्या ख-या संकटाला आरंभ झाला. काथियनाचे घाट मजबूत रीतीने पकडून बसणे आणि बल्गेरियावर एकदम स्वारी करणे असले लष्करी धोरण रुमानियाने प्रथमपासून स्वीकारले पाहिजे होते. त्या धोरणाच्या अगदी उलट धोरण रुमानियाने स्वीकारिलें. बल्गेरियावर हल्ला न केल्यामुळे डोब्रुजाची भिंत ढासळली; त्या बरोबर ट्रान्साल्व्हानियामध्ये रुमानियाचा हात लटका पडून जर्मन यंत्रांत बोट इतकी सांपडली की काथियन पर्वताच्या खांद्यावरून जर्मनी खाली उतरूं लागला. म्हणजे डोब्रुजाची पावलेंहि गेली आणि काथियन पर्वताचा खांदाहि गेला. काथियन पर्वताचे घाट उतरून जर्मनी खाली उतरूं लागला असता पायथ्या जवळच्या टेकडाळ मुलखांत जर्मनीला अडविण्याचा उद्योग आक्टोबर अखेरीस रुमानियाने सुरू केला. मग पुन्हां डोबजाकडे दुर्लक्ष होऊन काथियनकडे रुभानियाचे लक्ष अधिक वेधले गेले. असे होतांच से. मॅकेनसन यांनी पुन्हां उचल पहिले महायुद्ध केली आणि डोब्रुजाची सगळीच भिंत ढासळून टाकली. डोब्रुजाची चांदई ढासळण्या- बरोबर डान्यूब नदी ओलांडून दक्षिण पूर्वेचे शत्रूचे लष्कर रुमानियांत घुसते की काय अशी भीति उत्पन्न झाली. एकीकडे सावरावें तर दुसरीकडे पडते, तिकडे सावरावयाला जावें तर पहिले अधिक कोसळते; अशा त-हेच्या पडक्या घराच्या धांदलीत रुमानिया सांपडला असतां मोल्डेव्हियावर म्हणजे रुमानियाच्या मानेवर जोराचे व घालण्यास आस्ट्रो-जर्मनांनी सुरुवास केली. मोल्डेव्हिया गेला असता तर सर्व बाजूनी रुमानिया वेढला जाऊन रशियाची व रुमानियाची ताटातूट झाली असती. तेव्हां कसेंहि करून मोल्डेव्हियांत रणांगण पकडून राहाणे रुमानियास भाग होतें. मोल्डेव्हियाच्या संरक्षणार्थ बरेच सैन्य गुन्तले गेले. नंतर बुखारेस्टच्या थेट उत्तरेस असलेल्या प्रीडियल घाटाचे दक्षिणेस आस्ट्रो-जर्मनांनी जोर केला, येथून शत्रूला खाली येऊ देणे, म्हणजे प्राहोव्हा नदीच्या खोन्यांतील पेट्रोलियम, तांबें, वगैरेंच्या मोठमोठ्या खाणी शत्रूच्या हाती देऊन राजधानीतच शत्रूला बोलावण्यासारखे होते. तेव्हां प्रिडियलच्या बाजूला शत्रूला थोपवून धरणे भाग पडले. तेथेहि बरेंच सैन्य गुन्तले; प्रीडियलच्या पश्चिमेस किंपोलंगच्या टापूत आस्ट्रो-जर्मनांनी जोर करून दोन पावले पुढे टाकली; व त्याच सुमारास व्हल्कन घाटामध्ये दोन पावले मागे घेतली. आस्ट्रो- जर्मनांची ही हालचाल फसवेगिरीची होती व या फसव्या हालचालीने रुमानिया फसला. रुमानियाला वाटले, आस्ट्रो-जर्मनांच्या चढाईचे केंद्रस्थान प्रिडियल घाट असून पश्चिम व्होलेशियाचे बाजूला म्हणजे व्हल्कन घाटाचे बाजूला आस्ट्रो-जर्म- नांची तितकी जोराची तयारी नाही. व्हल्कन घाटांत जर आस्ट्रो-जर्मन दोन पावले मागे हटत आहेत तर मोठा बंदोबस्त या बाजूस कशास ठेवावा ? शिवाय आस्ट्रो- जर्मनांनी व्हल्कनच्या बाजूला जर जोरच केला तर अवचित असे काय होणार आहे ? पश्चिम व्होलेशियाच्या पश्चिम टोंकापासून लहान लहान लचके आस्ट्रो- जर्मन तोडीत बसतील इतकेंच, कार्पेथियन पर्वतांत उगम पाऊन उत्तरेकडून दक्षि. णेस डान्यूब नदीकडे येणाऱ्या कित्येक नद्या पश्चिम व्होलिशियामध्ये आहेत. एक नदी ओलांडून दुसरी नदी गांठण्यासच आस्ट्रो-मनांना किती तरी वेळ लागेल आणि तेवढया अवधीत रशियाची मोठी कुमक येऊन पोचण्यास हरकत पडणार नाही, अशा समजुतीने व्हल्कन घाटाच्या दक्षिणेकडील बंदोबस्त ढिला पाडण्यांत आला. रुमानियाच्या रणभूमीत ढिले स्थान कोणचे आहे याचे निरीक्षण से. हिंडे- नोव्हेंबर-डिसेंबर महिना चार नबुर्ग करीतच होते. नोव्हेंबर प्रारंभाला व्हल्कन घाटाचा टापू ढिला आहे असे त्यांना समजतांच प्रिडियल घाट व किंपोलंगचा प्रदेश येथील सैन्यास निकराने जिवापाड लढण्याचा हुकूम त्यांनी सोडला. त्यामुळे आस्ट्रो जमेनांच्या हल्लयाचे केंद्रस्थान प्रिडियल घाटच आहे अशी रुमानियाची भूल कायम राहिली. त्याच नेळी बुकीव्हिनाच्या दक्षिण टापूवरील रशियन सैन्यावरहि जोराचे हल्ले करण्यांत आले. त्यामुळे मोल्डेव्हिया पुन्हां मुख्य रणभूमि होतो की काय असाहि भास उत्पन्न झाला. अशा खोटया भावनेंत रुमानिया गुगला गेला असतांना व्हल्कन घाटाच्या टापूत नोव्हेंबरचे पहिले दोन आठवडे तीन लाख सैन्य जमा करण्यांत शत्रूने घालविले. मोठया लोंढयाची सर्व तयारी पूर्णपणे झाल्यावर व्हल्कन घाटांतून आस्ट्रो-जर्मनांचा प्रचंड प्रवाह विलक्षण जोराने एकदम खाली उतरू लागला. पहिले चार पांच दिवस रुमानियाला वाटले की आयत्या वेळी थोडे अधिक लोक आपल्या अंगावर चाल करून येत आहेत, आणि आपण थोडे थोडे मागे रेटले जात आहोत. चार पांच दिवसांनी या लोंढयाचे खरे स्वरूप त्यांच्या ध्यानात आले आणि उगीच आपण वेळ गमावला तर लोढयांत वाहून जाऊ असे त्यांनी ओळखले. लगेच त्यांनी मुख्य तोफा व त्या बाजूचे सैन्य जलदीने मागे घेतले आणि नोव्हेंबरच्या चवथ्या आठवड्यांत आल्ट नदीपर्यंतचा सर्व पश्चिम व्होलेशिया आस्ट्रो-जर्मनांना खाली करून दिला. पश्चिम व्होलेशियांतील सैन्याचा मुख्य भाग बचावला गेला आणि तोफाहि शत्रूच्या हाती गेल्या नाहीत. पण आल्ट नदीवरहि शत्रूला थोपवून धरतां आले नाही. कारण त्याच सुमारास सिनिझापासून टरक्यूकाईपर्यंत पन्नास पांऊणशे मैलांत डान्यूब नदी चार पांच ठिकाणी ओलांडून व्हेडे नदी काठचा अलेक्झांड्रियाचा प्रदेश, व ग्ल्यथेट्रिक नदी काठचा कोमनचा भाग, ह्या जागा से. मॅकेनसन यांनी गांठला. त्याचवेळी आल्ट नदी ओलांडून आलेल्या आस्ट्रो-जर्मनांनी पिटेस्टी जिल्हा व्यापून आर्निस नदीच्या खोऱ्याने बुखारेस्टवर चाल केली. बुखारेस्ट शहर बाल्कन प्रदेशांतील परीस समजले जाते. इतकें श्रीमत व सुन्दर शहर बाल्कन प्रदेशांत दुसरे नाही. ह्या शहरा सभोवती लहान लहान किल्लयांचे परिवेष्टण असून कित्येक महिने झजविण्यास हे शहर समर्थ होते, पण लढाईच्या प्रारंभी राजधानीचे शहर झुजविण्याचा प्रसंग आपणावर येईल असा अंदाज रुमानियन सरकारचा मुळीच ३८ पहिले महायुद्ध नसल्यामुळे सदर किलयाच्या तटबंदीवरील तोफा इतर ठिकाणी नेण्यांत आल्या होत्या. अर्थात् आस्ट्रो-जर्मन सैन्य बुखारेस्ट जवळ येण्याबरोबर राजधानी झज- विण्याचा विचार रुमानियाला सोडून द्यावा लागला, आणि डिसेंबर प्रारंभालाच लष्करी सामानसुमानाच्या दृष्टीने राजधानीचे शहर रिकामे करण्यांत आले. रुमा- नियन सरकार परराष्ट्रीय वकील, तिजोरी, जडजवाहीर व इतर महत्त्वाच्या सर्व वस्तु ह्यांसह रुमानियाच्या अगदी उत्तरेकडील ईशान्य कोपऱ्यांतील रशियाच्या सरहद्दीजवळील जासी गांवांत राहावयास गेले, आणि डिसेंबरच्या पहिल्या आठ- वड्यांत बुखारेस्ट शहर आस्ट्रो-जर्मनांच्या हाती पडल्यासारखेच झाले ! बुखारेस्ट शहर जर मुजविले नाही तर रणभूमीवर कोणत्या जागी रुमानियन सैन्याला नेटाने उभे राहातां येईल १ बुखारेस्टच्या उत्तरेकडून जाणाऱ्या प्राहोव्हा नदीच्या पलीलडे रुमानियन सैत्याला चांगली आश्रयाची जागा मिळेल आणि प्राहोव्हा नदीच्या खोऱ्यांत भयंकर लढाया होतील असा अंदाज आहे. पण ह्या नद्यांच्या आश्रयांत जो मोठा दोष आहे. तो हा की, डान्यूब नदीमध्ये आश्रयाच्या नदीच्या तोंडापर्यंत आस्ट्रो-जर्मन जहाजांना पाहिजे तसा सुखसंचार करता येतो; आणि या जहाजांच्या जोरावर रुमानियन सैन्याच्या डाव्या बगलेस वळसा घालतां येतो. असा वळसा पडला असतां त्या नदीचा आश्रय सोडणे भाग पडते. अशा दृष्टीने विचार केला असतां रुमानियन सैन्याची सांप्रत सुरू झालेली पीछेहाट प्राहोव्हा नदीपर्यंतच न थांबतां सिरेज व ग्रंथ या नद्या ओलांडून रुमानियाचा सर्व मुलुख सोडून रशि- याच्या सरहद्दीस बेसोरेबिया प्रांतापर्यंत पोचण्याचा संभव आहे. रुमानियाला जिंकून रशियाच्या डाव्या बगलेला वळसा देऊ असा आपला बेत से, हिंडेनबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. डान्यूब नदीच्या दोन्ही बाजू आपल्या ताब्यांत ठेवणे हे लष्करी धोरणाच्या दृष्टीने आस्ट्रो-जर्मनांना इष्ट आहे. तेव्हां बेसारेबियाचा डान्यूबच्या उत्तरेकडील भाग स्वतःच्या कबजांत घेण्याकरितां ह्यावेळी पूर्ण धडपड केल्याशिवाय आस्ट्रो-जर्मन राहाणार नाहीत; आणि डान्यूब नदीचे दोन्ही तट जेवढे जेवढे त्यांच्या ताब्यांत जातील तेवढया तेवढया भागापर्यंत दुहेरी किंवा तिहेरी आगगाडीसारखा सुलभ व जलदीचा पाण्याचा मार्ग त्यांच्या हाती पडत जाणार; यामुळे डान्यूब नदीला धरून होणारी त्यांची गति अर्थातच वेगाची झाल्यावांचून राहाणार नाही. डान्यूब नदीचा उपयोग करून घेऊन सर्व डान्यूब नदी ताब्यात नोव्हेंबर-डिसेंबर महिना ३९ घेणे, हा सांप्रत आस्ट्रो-जर्मनांचा हेतु दिसतो. हे लष्करी धोरण सोडून वाटेतच कोठेतरी मुक्काम करणे आस्ट्रो-जर्मनांना भाग पडण्यास फ्रान्समध्ये, ग्यालिशियामध्ये इटलीच्या रणभूमीत, किंवा सालिनोकाच्या बाजूला आस्ट्रो-जर्मन भयाभीत होतील एवढा मोठा जय दोस्तांना मिळाला पाहिजे. आक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत रशिया इंग्लंड, फ्रान्स, इटली व सहिया हे गप्प बसले नाहीत. रशियाने काथियन पर्व- तांत चांगला हात दाखविला, व्हईनच्या टापूत फ्रान्सने जर्मनीची बरीच तिरपीट उडविली; सोमनदीवर इंग्रजांनी जर्मनीकडून शाबास म्हणवून घेतले; इटलीने आल्प्स पर्वतांततहि आस्ट्रियास मागे रेटले; आणि सालिनोका येथील सैन्याने मोन- स्टिर घेऊन मासिडोनियाच्या त्या जुन्या राजधानीत स्थानभ्रष्ट झालेल्या सहियन लष्कराची पुन्हां प्राणप्रतिष्ठा केली. हे पराक्रम महत्त्वाचे तर खरेच; पण आस्ट्रो-जर्मन सैन्यांत गडबड उडून रुमानियावरील त्यांची स्वारी ढिली पाडण्या- इतके महत्त्वाचे नव्हत आणि आता तर हिवाळ्याचा मोसम पूर्ण सुरू झाल्यामुळे इतर रणभूमीतील विलक्षण फेरफारांच्या योगाने रुमानियन युद्ध मंद होण्याचा फारसा संभव नाही. डान्यूब नदी पूर्ण कब्जांत घेणे हे जसें आस्ट्रो-जर्मनांच्या लष्करी धोरणास इष्ट आहे तसेच साधल्यास सालिनोकाचेंहि बंदर आपल्या ताब्यात घेऊन तेथून दोस्त सरकारांच्या सैन्यास काढून टाकणे से. हिंडेनबुर्ग यांना जरुरीचे वाटणारे आहे. प्राहोव्हा नदीच्या उत्तरेस रुमानियन सैन्य गेलें म्हणजे खुद्द रशि- याच्या युद्धांतच रुमानियन युद्धाचा अंतर्भाव झाला, असें मानण्यास हरकत नाही. तेव्हां रशियाचे या बाजूचे युद्ध थंडीच्या मोसमापर्यंत लांबणीवर टाकण्यास आणि अगोदर सालिनोकाकडे वळण्यास आस्ट्रो-जर्मन राजी होण्याचा संभव आहे. पण रुमानियन पीछेहाटीमुळे मिळालेला फायदा पूर्णपणे पदरांत घेण्यास पुढील वसंत- काळची वाट पहाणे हे एका दृष्टीने सदोष आहे. कारण हिवाळयांत रशिया पुन्हां ताजातवाना होतो व सपाटून रहे देऊन आस्ट्रो-जर्मनांची हाडें मऊ करतो, असा गेल्या सालचा अनुभव आहे. तेव्हां रशिया ताजातवाना होण्यापूर्वी सर्व डान्यूब नदी गिळंकृत करतां आली तर आली. त्यानंतर नसती हांव धरणे फुकाचे होईल, तेव्हां सालिनोकाकडे न वळतां रुमानियाचाच पक्का पिच्छा पुढील दोन तीन महिन्यांत आस्ट्रो-जर्मन पुरवतील असें डान्यूब नदीचा लोभ सोडून सालि. नोकाच्या बाजूला एकाच गोष्टीमुळे आस्ट्रो-जर्मन सैन्य वळण्याचा संभव आहे, ती अनुमान निघते.
४० पहिले महायुद्ध हे गोष्ट म्हणजे ग्रीसचा राजा कन्स्टांटिनाईन यावर दोस्त सरकारांचे सैन्याने चाल करून जाणे ही होय. ग्रीसच्या राजाने चोरून जर्मनीला मदत कशी केली आहे, सालि. नोका येथील सैन्याला, त्याच्या फसवेगिरीने पायबंद कसा पडला आहे, वगैरे गोष्टी आतां पूर्णपणे उजेडांत आल्या असल्यामुळे या राजाच्या सैन्याचा विध्वंस करणे दोस्त सरकारांना भाग झाले आहे. आणि डिसेंबरमध्ये दोस्त सरकार व ग्रीसचा राजा थांमध्ये युद्ध सुरू झाल्यावांचून राहाणार नाही, असा काहींचा अंदाज आहे. युद्ध जर सुरू झाले तर रुमानियाच्या बाजूचे बरेंच आस्ट्रो-जर्मन सैन्य खाली दक्षिणेस सालिनोकाच्या बाजूला उतरेल. आस्ट्रो-जर्मन हिवाळ्यांत रुमानियाची पिच्छा पुरवीत असले काय किंवा सालिनोकाच्या बाजूला उतरले काय, दोन्ही रणभूमि दुय्यम दर्जाच्या असल्यामुळे महायुद्धाच्या पुढील सालच्या प्रवाहावर रुमानियांतील किंवा ग्रीसमधील घडामोडींचा फारसा परिणाम होणार नाही. नवे सैन्य तयार करणे, नवा दारूगोळा उत्पन्न करणे, या संबंधानें इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी व आस्ट्रिया, येथे जे सांप्रत जोराचे प्रयत्न चालले आहेत त्या प्रयत्नांचा परिणाम पुढील सालच्या महायद्धाच्या स्वरूपावर होणार आहे. रशियांत ड्यूमा सभेला अधिक हक्क मिळाले आहेत आणि ड्यूमा करणारे मुत्सद्दी रशियाचे मुख्य प्रधान झाले आहेत. अर्थात् लढाई जोराने चालविण्याच्या बाबतीत रशियांतील लोक सर- कारशीं एकजीव झाले आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. फ्रान्सने तर महायुद्धांत यश मिळविण्याकरितां सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करण्याचा विडाच उचलला आहे; रुमामियाच्या पीछेहाटीने इंग्लंडमध्ये लढाईचे नवें वारे भरले आहे, आणि आठ- वड्यांतून दोन दिवस माशाशिवाय व मांसाशिवाय व्रतस्थ रीतीने राहून रोजच्या दाणापाण्यांत शक्य ती काटकसर करून सर्व बाजूनी व सर्व प्रकारांनी महायुद्धाची तळी उचलण्याचा इंग्लंडने निश्चयच केला आहे. हा निश्चय पार पाडण्यास एकजिनसी प्रधानमंडळ असावे म्हणून लिबरल व कॉन्झर्व्हेटिव्ह या दोन जिनसांचें प्रधानमण्डळ मोडून मुख्य प्रधान मि. अस्क्विथ यांनीहि आपल्या जागेचा राजी- नामा डिसेंबर प्रारंभाला दिला. डिसेंबरांत युद्धाच्या आवेशाचे एकजिनसी व आटोपशीर प्रधानमण्डळ बनल्यावर त्यांतल्या त्यांत दोनतीन तडफदार मुत्सद्यांच्या हातीं महायद्धाची सर्व सूत्रे जातील. मग इंग्लंडचा जोर हल्लीहून दुप्पट होईल, हे सांगणे नकोच. इंग्लंड, फ्रान्स व रशिया यांच्या नव्या नव्या प्रयत्नाना सभेचे महत्त्व कबूल नोव्हेंबर-डिसेंबर महिना इचवाखक म्हामून जर्मनीनेहि आपकी शिकस्त करण्याचा निश्चय केलेला दिसतो. कामकाज करणाऱ्या मजुरांचा तुटवडा पडू नये म्हणून जर्मनीनें बेल्जममध्ये विसाव्या शतकांत गुलामगिरी सुरू केली आहे, पोलंडचे स्वतंत्र राज्य निर्माण केल्याबद्दलचा जाहीरनामा काढून तेथील लोकांना लष्करी नोकरी करणे भाग पाड- ण्यांत आले आहे. तुर्काना वेठीस धरण्याचा तर सपाटा चालला आहे; आणि आतां रुमानियांतील धान्याचा कणनाकण लुटन नेण्यांत येईल हे उघड आहे. एवंच चिघळल्यामुळे हिडिस दिसणाऱ्या स्वरूपांतहि पुढील साली लढाई नेटानें चालविण्याचा जर्मनीचा इरादा दिसतो. इतर कोणत्याहि कारणामुळे चाहीं तरी निदान या हिडीस स्वरूपामुळे युरोपखंडाविषयी अमेरिकेची दयाई बुद्धि जागी होऊन तह घडवून आणण्याच्या कामी हिवाळ्यात अमेरिकेकडून दीर्घोद्योग होण्याचा संभव आहे. तेव्हां पुढील दोन बीन महिन्यांत रुमानिया व सालिनोका येथील लढायांकडे लक्ष देतांना अमेरिकेतील लोकमताकडेहि वाचकांनी लक्ष पोंच- चावे अशी सूचना आहे. ६ महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा डिसेंबर-जानेवारी महिना रुमानियाची रणभूमि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यांत रुमानियाची राजधानी बुखारेस्ट शहर जर्मनीच्या हातीं जाऊन उत्तरेस बूझू शहर व बूझू नदी यांच्या रोखाने रुसो- रुमानियन सैग्य मागे हटू लागले. सर्व डिसेंबर महिना शत्रूशी निकराने लढत हे सैन्य मार्गे हटत होते. वाटेत बूझू गांवाजवळ आणि सरत-रिमनीच्या टापूत मोठया लढाया झाल्या. सरत-रमनी येथील लढाई डिसेंबर अखेरीस पांच दिवस चालली होती. या लढाईत जर्मन सैन्याचा फार नाश झाला, पण अखेरीस रुसो रुमानियन सैन्याला मागे हटावे लागले. जानेवारीचे प्रारंभाला फॉक्चनीच्या पूर्वेस सीरेद नदीचा टापू धरून सीरेद डॅन्यूबला मिळते तेथपर्यंत मोठया बंदोबस्ताने रुसो-रुमानियन सैन्य बसले आहे. सीरेदपर्यंतचा दक्षिण मोल्डेव्हिया जर्मनीच्या ताब्यात गेल्यासारखा असून सर्व मोल्डेव्हिया कबजांत घेऊन रशियाच्या बेसारेबिया प्रांतांत घुसण्याकरितां सर्व मोल्डेव्हियाभर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जर्मनीची एक- सारखी खटपट सुरू आहे. मोल्डेव्हियांतल्या लढाया म्हणजे नुसत्या रुमानियन सैन्याबरोबर होत असलेल्या लढाया नसून दक्षिणेकडील रशियाच्या मुख्य सैन्याशींच ही झुज आहे. तेव्हां जानेवारीत जर्मनीचे पाऊल फारसे पुढे पड़गार नाही. मोल्डे- व्हियांतील या लढाया एका बाजूस ठेवल्या तर डिसेंबर महिना प्रत्यक्ष लढण्याच्या दृष्टीने मंदीचाच गेला. मोल्डेव्हियाकडे रशियाला मोठे सैन्य आणतां येऊ नये म्हणून कोव्हेलच्या टापूत व गॅलेशियामध्ये जर्मनीने थोडीशी उचल करण्याचा प्रयत्न केला; त्याप्रमाणे फ्रान्सच्या रणभूमीत व इटलीच्या रणभूमीतहि लहान सहान चकमकी झाल्या. पण एकंदरीने डिसेंबर महिन्यांत चोहोंकडे सामसूमच होतें. बुखारेस्ट शहर पडल्यानंतर युद्धावार्तंत जीवच नाहीसा झाला. लढण्यासंबंधाच्या बातम्या निर्जीव व मिळमिळीत येऊ लागल्या आणि खुद्द युद्धाशिवाय इतर गोष्टीला महत्व प्राप्त झाले. रशियांतल्या मुख्य प्रधानांनी राजीनामा देऊन नवें प्रधानमंडळ अस्तित्वात आले; फ्रान्समध्ये प्रधानमंडळांत फेरबदल झाला; आणि इंग्लंडांत मि, अस्क्विथ यांचे प्रधानमंडळ बदलन मि. लॉइड जॉर्ज हे मुख्य प्रधान झाले. मि. अॅस्क्विथ यांचे डिसेंबर-जानेवारी महिना ४३ कारकीर्दीत प्रधानमंडळ पंधरा वीस असामींचे होते; पण महायुद्धासारख्या बिकट प्रसंगी वीस पंचवीस असामींच्या घोळक्याने राज्यशकट तडफेने हाकला जाणे शक्य नसल्याने मि. लाइड जॉर्ज यानी आपले प्रधानमंडळ पांच इसमाचें केले, आणि तीव्र नेटाने कामकाजाचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला. प्रधान- मंडळ पांच इसमाचे असले तरी सांप्रत इंग्लंडांत खरी राज्यसत्ता तिघांच्याच हातांत आहे. मि. लॉईड जॉर्ज, मि. बोनॉर्ला, व मि. बालफड या त्रींमूर्तीचेच सांप्रत प्रधानमडळ आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. मि. बोनॉर्ला यांची दृष्टि आर- मारावर आहे. मि. बालफर्ड यांचे तोंड परराष्ट्रांकडे वळलेलें आहे; व मि. लाइड जॉर्ज यांनी हातांत तलवार धरली आहे. अशा प्रकारचे त्या त्रिमूर्तीचे दर्शन आहे. आरमार खात्याचे व परराष्ट्रीय खात्याचे काम महत्वाचे खरे; पण सध्या जमिनीवर कसा जय मिळवावा हा मुख्य प्रश्न असल्यामुळे मि. लॉइड जॉर्ज यांच्या हाता- तील तलवारीने सर्वांचे लक्ष आकर्षण करून घेतले आहे. थोडक्यांत बोलावयाचें म्हणजे एकटया लॉइड जॉर्ज यांचे ठिकाणी इंग्लंडची सर्व सत्ता एकवटली आहे. मि. लॉइड जॉर्ज म्हणजेच प्रधानमंडळ; मि. लॉइड जॉर्ज म्हणजेज इंग्लंडचे पार्ल- मेंट; मि. लॉइड जॉर्ज म्हणजे इंग्लंडची सर्व राज्यसत्ता ! महायुद्धाच्या बिकट प्रसंगां- तून पार पडून जाण्याकरतां इंग्लंडनें पार्लमेंटरी राज्यव्यवस्था एका बाजूला ठेवून एकसुखी राज्यव्यवस्था पुष्कळ पडद्यांच्या पांघरुणाखाली स्वतःहि नकळत सुरू केली आहे, असे एका दृष्टीने म्हणण्यास हरकत नाही. बिकट प्रसंगी असेंच करावें लागते, किंबहुना प्रसंगामुळेच तसे घडून येते. मनुष्याच्या बुद्धिमत्तेने बहुमुखी राजसत्तेचा परिपोष करावा आणि महायुद्धासारख्या बिकट प्रसंगी याच बहुमुखी राज्यव्यवस्थेतून एकमुखी राज्यव्यवस्था उत्पन्न करावी, अशी ही जगाची घडामोड आहे. ग्रीसच्या व रोमच्या प्राचीन इतिहासांत असल्या घडामोडींची बरीच उदा- हरणे आहेत. देव करो आणि इंग्लंडचें सांप्रतचे वर्तन तसल्या घडामोडीच्या उदाहरणांच्या मालिकेंत गोवलें न जावो! असो, मि. लॉइड जॉर्ज यांचे तीन मुखी किंवा पंचमुखी प्रधानमंडळ पंचमुखी प्रधानमंडळ स्थापित होण्याला आणि बुखारेस्ट पडण्याला एकच गांठ पडली. बुगारेस्ट पडल्याबरोबर जर्मनीने आपले पार्लमेंट अव- चिन बोलाविलें आणि जर्मनीच्या मुख्य प्रधानाने जाहीर केले की, रणांगणावर होत असलेल्या युरोपच्या चुराड्याकडे जर्मन बादशहा रुमानियावर मिळविलेल्या विजयाच्या पहिले महायुद्ध प्रसंगी दया दृष्टीने पहात असून, ह्यापुढे लढाई चालू ठेवणे झणजे जमतेच्या दृष्टीने व परमेश्वरी सिंहासनापुढे जर्मन राष्ट्र अपराधी ठरेल असे त्यांस वाटू लागले नाहि, जर्मनीचा सलोख्याचा हात तेव्हां जर्मनीच्या स्नेही राष्ट्रांचा सल्ला घेऊन जर्मनीने सलोख्याचा हात अमेरिकेचे प्रे. डॉ. विलसन यांचेमार्फत पुढे केला आहे. नाटकामध्ये एखादा खटक्याचा प्रवेश अवचित प्रेक्षकांपुढे आल्यामुळे जसा अद्भुत रस उत्पन्न होतो, त्याप्रमाणे महायुद्धाचे पुढील तयारीकरितां सर्व राष्ट्र आपापल्या कंबरा जोरजोराने कसत असतांना जर्मनीने एकाएकी हा सलोख्याचा हात पुढे केल्यामुळे सर्वांना एकदम विस्मय वाटला, आणि लढाईच्या गोष्टी सोडून देऊन सर्व लोक तहाच्याच गोष्टी बोलू लागले. तहाला आपण राजी असल्याबद्दलचा खलिता जर्मनीने प्रे. विलसन यांजकडे पाठवून दिला, व प्रे. विलसन यांनी तो दोस्त सरकारकडे पाठविला. जर्मनीच्या तहाची बातमी दोस्त सरकारचे राजधानींत पोचतांच ठिकठिकाणच्या जबाबदार मुत्सद्यानी त्या तहाचा निषेध केला. प्रथम आपला विजय पुकारून नंतर जयोत्साहाचे मदांत जर्मनीने पुढे केलेला सलोख्याचा हात धरणे म्हणजे आपला पराभव कबूल करणे होय, तेव्हां असला अपमानास्पद तह कोण कबूल करतो, असा एकच ध्वनी रशिया, इटली, फ्रान्स व इंग्लंड या चारी देशांत एकसमयावच्छेदेंकरून एकू येऊ लागला! स्वतःच्या देशांत शत्रू असेतों व रुमानिया आणि सहिया यांचे स्वातंत्र्य पूर्ववत मुक्रर ठरेतों आपण तह करणार नाही असे रशियाने जाहीर केलें; कोणच्याहि कारणाने आपण आपल्या दोस्तांना सोडणार नाहीं असें इटलीने आश्वासन दिले; फ्रान्समधून शत्रूला हाकलून देऊन बेल्जमला सुसंपन्न स्थितीत पुन्हां पाहिल्याशिवाय तरवार म्यानांत घालणार नाही असा निश्चय फ्रान्सने केला; आणि इंग्लंडचे नवे मुख्यप्रधान मि. लाइड जॉर्ज यांनी पार्लमेंटातील आपल्या पहिल्या भाषणांत असें ठासून सांगितले की, जर्मनीला कृतकृत्याबद्दल पश्चात्ताप झाला पाहिजे, पुन्हां असा अपराध जर्मनीच्या हातून होणार नाही, अशी हमी जर्मनीने पटविली पाहिजे तरच तह होईल ! लष्करी धंदा करणारे इंग्लंडचे जुनें सैन्य नष्ट झाल्यावर इंग्लंडने बहुजन समजांतून नवें राष्ट्रीय सैन्य उभारले, नव्या तोफा ओतल्या आणि नवा दारूगोळा निर्माण करून एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदां नव्हे, तर कित्येक आठवडेच्या आठवडे जर्मनीला एकसारखा चोप दिला ! आपल्या अंगच्या शक्तीचा असा अनुभव इंग्लंडला
स्मानियानी रणनी
न
wedarnadarpanwarmt.
Lyrs
A
শাবানা
कोलारवा
FEArari
hori
Arihar.44
-A
MAHARAMATLw.9-
1m
No text on this page.
डिसेंबर-जानेवारी महिना . येत असतांना ही शक्ति वर्ष दोन वर्षे आणखी एकसारखी वाढत जाणारे असतांना, आणि सर्व राष्ट्राचे मनुष्यबळ व द्रव्यबल लागेल तसे व लागेल तितकें वर्च करण्याची मुभा देऊन नवीन जोरकस प्रधानमंडळ इंग्लंडनें स्थानापन्न केले असतांना, जर्मनीचा विजय कबूल करून आणि जर्मनीचे लष्करी यंत्र तोऱ्यांत ठेवून इंग्लंडनें तह कसा करावा ? लहान राष्ट्रांचा वाली आणि माणुसकीचा पोशिंदा या इंग्लंडच्या ख्यातीला असल्या तहाने काळिमा लागणार नाही काय ? मि. लाईड जॉर्ज, मि. अॅस्क्यिथ, मि. बोनाला, लॉर्ड कर्झन आदि करून सर्व नव्या जुन्या मुत्सद्यांनी जर्मनीच्या तहाची वरीलप्रमाणे संभावना केली. अमेरिकेची भूमिका जर्मनीचें तहाचे बोलणे मानभावीपणाचे ठरून तहासंबंधाच्या कल्पना लोकांपुढे वावरण्याचे बंद पडते की काय असे वाटू लागणार इतक्यांत प्रे. विलसन हे तहाचे पुरस्कर्ते म्हणून पुढे आले; आणि त्यांनी दोन्ही पक्षांना तहासंबंधाने एक खलिता पाठविला. जगाचे कल्याण करावे, माणुसकीची जोपासना करावी, दुर्बलांचा आयुष्य- कम दुःखाचा होणार नाही अशारीतीने सबलांनी वागून परमेश्वराचा दुवा संपादन करावा, आणि आपल्या राष्ट्राची योग्य वाढ करून मानवी प्राण्याचे हित साधण्याकड ठिकठिकाणच्या राज्यकत्यांनी लक्ष पोचवावें, हे नीतिमत्तेचे हेतु दोन्ही पक्ष साख्या जोराने वदत आले आहेत. तेव्हां प्रे. विलसन विचारतात ' महायुद्धांतील उच्च ध्येये जर दोघांची सारखींच तर तुम्ही लढतां तरी कशासाठी ? ' इंग्लंड म्हणतें मी लहान राष्ट्रांचा वाली, जर्मनी म्हणतो मला लहान राष्ट्रांच्या वाटेस जावयाचे नाही. इंग्लंड युरोपच्या सुधारणेला पूज्य मानत आहे तर जर्मनी पावलोपावली खिस्ती देवाला हाक मारीत आहे. आपले साम्राज्य सांभाळण्यापलीकडे इंग्लडला लोभ नाही, आणि जर्मनीला तर दुसऱ्याच्या काडीला हात न लावतां मोकळ्या पडलेल्या जागेपुरतीच आपली वाढ करून स्वतःच्या देशांत कुचमलेल्या स्वत:च्या शक्तीला हलकेपणाच्या यातनांतून सोडवावयाचे आहे. प्रे. विलसन म्हणतात, दोघांचीहि ध्येये जर एकमेकांच्या विरुद्ध नाहीत तर तुम्ही एकमेकांची डोकी फोडतां तरी कशाला ? मुढपणाने तुम्ही एकमेकांची डोकी फोडीत असला तर त्यांत तिन्हाइताने का पडावें, असें जर कोणी म्हणेल त्याला प्रे. विलसन असे उत्तर देतात की, युरोपच्या सुधारणेची चाड युरोपप्रमाणे अमेरिकेलाहि आहे, माणुसकीच्या जोपासनसाठी परमेश्वरापुढे जाव युरोपप्रमाणे अमेरिकेलाहि दिला पाहिजे, आणि पहिले महायुद्ध त्या लहान सहान राष्ट्रांचे संरक्षण योग्य रीतीने होते की नाही हे पाहाण्याचे काम नुसत्या युरोपवर सोपवून भागावयाचे नाही. दुर्बलांचा कैवार, माणुसकीची उभारणी आणि परमेश्वरी संतोष या तिन्ही गोष्टी महायुद्धातील लढवय्यांना जितक्या प्रिय आहेत तितक्याच प्रिय अमेरिकलाहि आहेत. महायुद्ध पुढे चालू राहिल्यास जर उच्च ध्येये खुरटी होऊ लागली तर अमेरिकेला इतर कारणासाठी नाही तर निदान ध्येयांच्या आस्तित्वाकरितां लढवय्यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून उभे राहाणे भाग आहे. उच्च ध्येयांची बाब एका बाजूस ठेवली तरी केवळ स्वार्थाकरतां सुद्धा हा तंटा मिटविण्याचा प्रयत्न करणे अमेरिकेस इप्ट आहे. ह्याचे कारण प्रे. विलसन असे सांगतात की, युरोपांतील महायुद्धाचा वणवा आतां असल्या त-हेने पेटला आहे की त्याच्या ठिणग्या अमेरिकेवर पडल्यावांचून राहावयाच्या नाहीत. अमेरिकेला आग लागण्यापूर्वीच स्वतःचे घर बचावण्याकरतां अमेरिकेने युरोपांतील आग विझविली पाहिजे. वरील आशयाचा खलिता तयार करून प्रे. विलसन यांनी कांहीं तडजोड निघते की नाही हे पहाण्याकरतां दोन्ही पक्षांचे वकील आपणांकडे पाठवून देण्याविषयी लढाईत गुतलेल्या सर्व राष्ट्रांना विनति केली. आज युरोपची अशी स्थिति आहे की, अमेरिकेच्या सयुक्तिक विनं. तीचा अव्हेर करून कोणाचेच चालावयाचे नाही. जर्मनीने अमेरिकेशी बेपर्वाईचे उद्धटपणाचे वर्तन केले तर केवळ व्यापारी दृष्टीने नव्हे सरकारी दृष्टीनेंहि अमेरिकेची मदत दोस्त होऊं लागेल. अमेरिका लढाईत न पडतांहि जर सर्व द्रव्यबल व बुद्धिबल खर्च करून दोस्त सरकारांना मदत करू लागली तर एखाद दुसऱ्या वर्षाहून अधिक आयुष्य जर्म- नीचे उरले नाही असे समजावें. बरें अमेरिकेच्या विवेकबुद्धीला जर दोस्त सरकारनी दूर टोटले तर द्रव्यबलाने व यंत्रबलाने दोस्त सरकारचे पारडे किंचित् हलके ठरून अखेरच्या विजयाबद्दलची खात्री अंशतः तरी डळमळू लागल्यावांचून राहाणार नाही. अमेरिकेची कृपादृष्टि ज्या पक्षाकडे वळेल तो पक्ष अखेरीस विजयी होगार, असली स्थिति अमेरिकेस सांप्रत प्राप्त झाली आहे. अमेरिकेच्या या महत्त्वामुळे आणि प्रे. विलसन यांच्या निःपक्षपाती सरलत्वामुळे तहासंबंधाची नुसती वाटाघाट करण्यास नाकवल होण्याचे धाडस कोणीहि करूं शकणार नाही. जर्मनीने आपल्या तहाच्या अटी प्रथम बोलण्यास सुरवात करावी म्हणजे वाटाघाटींच्या वेळी हजर नव्हे तर सरकारना डिसेंबर-जानेवारी महिना राहाण्यास ठीक पडेल अशी टीका प्रे. विलसन यांच्या विनंति-पत्रावर होऊ लागली. आपल्या अटी प्रे, विल्सन यांस कळविण्यास जर्मनी तयार झाला असल्याचे जानेवारी प्रारंभाला प्रसिद्ध झाले आहे. मध्यस्थ या नात्याने या अटी दोस्त सरकारां- पुढे मांडणे नुकसानीचे होणार नाही इतक्या बेताचेच जर्मनीचे मागणे आहे असे जर प्रे. विलसन यांना वाटले तर फेब्रुवारी महिन्यांत तहाच्या नुसत्या वाटाघ.ट ची सभा अमेरिकेंत भरेल आणि प्रे. विलसन यांच्या मध्यस्थीने काही तडजोड निघून एप्रिल मे महिन्याचे आंत तह होऊन महायुद्धाची परिसमाप्ति होईल. पण प्रे. विलसनसारख्याहि मध्यस्थाला मध्यस्थीची मखलाशी करता येणार नाही अशा स्वरूपाच्या जर जमनीच्या अटी असतील तर जानवातिच जर्मनीचा सलो- ख्याचा हात नवीन तयारीच्या धुमःश्चक्रीत पुरला जाईल. सारासार विचार प्रे. विलसनसारख्या मध्यस्थाला मध्यस्थी करण्यास काही हरकत नाही असे वाटण्या- जोग्या जर जर्मनीच्या अटी असतील तर जर्मनीचा पराभव करून जर्मनीचं लष्करी यत्र मोडण्यापूर्वी दोस्त सरकार तहावर सह्या करतील काय ? ह्या प्रश्नाचा विचार दोन्ही दृष्टीने केला पाहिजे, एक दृष्टि इभ्रतीची व दुमरी नफान कसानीची. या दोन्ही दृष्टी जरी परस्पराशी नेहमी संलग्न असल्या तरी व्यवहारांत कांहीं अतग वंत यांच्यातील भेद स्पष्ट दिसू लागतो. नफानुकसानीचे पोटींच इभ्रत जन्मास येते आणि इभ्रती- मुळेच नफानुकसानीला टिकाऊ स्वरूप प्राप्त होते, या गोष्टी खन्या आहेत. तथापि इभ्रत व नफानकसान अशा दोन दिशांनी विचार करण्यास हरकत नाही. प्रथम आपण नफानुकसानीच्या दृष्टीने विचार करूं. नफानुकसानीचा विचार करतांना रशिया, इंग्लंड, फ्रान्स व इटली यांचा पृथक पृथक व सर्व संयुक्त असा विचार केला पाहिजे. आपण अशी कल्पना करूं की, फ्रान्स व जर्मनी या दोघांनाहि प्रे. विलसन यांची मध्यस्थी कबूल झाली, तर प्रे. विलसन आज फ्रान्सला सामान्यतः काय सांगतील, व तें फ्रान्सला कितपत रुचेल ? लढाई सुरू झाल्यानतर जर्मनीने घेतलेला फ्रान्सचा मुलूख सोडून द्यावा, व बेल्जमची सर्व सत्ता पुन्हां बेल्जमच्या हवाली करावी; ह्या अटीस जर्मनी जर कबूल झाला आणि प्रे. विलसन यांनी निःपक्षपाती न्यायाधिशाचा छाप जर या अटीवर मारला, तर फ्रान्स काय म्हणेल ? लढाइतील नुकसानी दोन्ही पक्षानी आपआपली संभाळावी असें ठरल्यावर फ्रान्सच्या भावी अभ्युदयाच्या दृष्टीने थक स्थितीत विचार करतांना असल्या ४८ पहिले महायुद्ध तहावर सही करण्यास फ्रान्सला कोणतीच हरकत नाही. जर्मनीचे लष्करी यंत्र कायम ठेवल्यामुळे पुढे आपणास अधिक त्रास होईल अशीहि भीति फ्रान्सला बाळगण्याचे कारण नाही. १८७० सालच्या फ्राँको-जर्मन युद्धापेक्षां सांप्रतच्या महायुद्धांत फ्रान्सने किती तरी पटीने अधिक मोठे लष्करी यश संपादन केले आहे; व्हडूनच्या लढाईने स्वसंरक्षणाचा आत्मविश्वास फ्रान्समध्ये उत्पन्न झाला आहे; आणि चरांच्या चक्रव्यूहांची योजना आतां इतक्या परिणत स्थितीस पोचली आहे की, रशिया व इंग्लंडसारख्या एखाद्या स्नेह्याचे पाटबळ मिळाल्यावर आस्ट्रो-जर्मनांना पुढील युद्धांत फ्रान्सच्या सरहद्दीबाहेर अडवून धरण्यास कोणतीच हरकत येणारी नाही. पूर्वी अल्पसंख्याक देशांचे संरक्षण किल्ले करीत असत, आता यापुढे चरांचे चक्रव्यूह तें काम करणार. चरांच्या चक्रव्यूहांनी राष्ट्रीय संरक्षणाचे काम पूर्वीहून अधिक सुलभ केले आहे. ही पालटलेली स्थिति लक्षात घेतां फ्रान्सला १८७० सालानंतर जर्मनीचा जो बाऊ बाटत होता तो बाऊ सांप्रतच्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर वाटणे शक्य नाही. जर्मनीचे लष्करी यंत्र मोडल्याशिवाय जर तह केला तर आजच्या सारखीच दांडगाई पुन्हां जर्मनीने करूं नये ह्याची हमी कोण घेणार ? ह्या प्रश्नास उत्तर असें आहे की, ही हमी चरांच्या चकव्यूहागं घेतली आहे, ही हमी व्हईनच्या लढाईत फ्रान्सने दाखविलेल्या शौर्याने घेतली आहे; ही हमी फ्रान्सच्या एकजुटीच्या स्वार्थत्यागाने घेतली आहे. हमीची शक्ति फ्रान्सच्या खाकेंतच असतांना हमी म्हणून जर्मनीच्या सभोवती वळसे घालीत फिरण्यांत व्यर्थ कालक्षेप कोण करणार ? फ्रान्सच्या दृष्टीने पृथक जर विचार केला तर प्रे. विलसनसारख्या शांत व विचारी त्रयस्थाच्या बोलण्यास समति न देण्याचे कारण सामान्यतः फ्रान्सला रहात नाही. आतां रशिया संबंधाचा विचार करूं. रशियाने कोणच्या अटीवर तह करावा या संबंधाचे जर्मनीतर्फेचे दिग्दर्शन येणेप्रमाणे -पोलंडचे स्वतंत्र आपल्या पंखाखाली जर्मनीने निर्माण केले आहे, ते रशियाने मान्य करावें. रशियाच्या मनांतून पोलंडचे स्वतंत्र राज्य निर्माण करावयाचे होते, पण स्वतःच्या पंखाखाली निर्माण करावयाचे होते. तेव्हां था संबंधाने पंख कुणाचे म्हणून लढा पडणार. इतर अटींची जर तोंडमिळवणी करता आली तर पोलंडमध्ये जर्मनीची व रशियाची दोन्ही पंखे कमी जास्ती प्रमाणाने प्रे. विल्सन यांना मिळवता येतील. सामान्यतः आहे. राज्य , डिसेंबर-जानेवारी महिना . तेव्हां ही बाब मध्यस्थांच्या आटोक्याबाहेर आहे, असे म्हणता येत नाही. नंतर आला बाल्कन प्रदेश व टर्की या संबंधाचा प्रश्न. महायुद्धातील मुख्य तट्याची मेव येथेच आहे. बाल्कन प्रदेशावर व टीवर आपली छाप अमावी अशी रशि- याच्या राज्यकर्त्यांची दोनशे वर्षाची महत्वाकांक्षा आहे. ह्या महत्वाकांक्षेस तिला. जली देण्यास रशिया तयार होईल काय ? जर्मनी म्हणणार बाल्कन प्रदेश मी माझ्या पंज्यांत धरला आहे, आणि तुकस्थानाशी सलग्न झाला आहो. तेव्हां महा- युद्धातील हा 'अपरिहार्य अर्थ' म्हणून निष्कारण शोक न करतां रशियाने पुढल्या मार्गाम का लाग नये ? रशियाम आम्ही इगण देतो, तेथून त्यांनी दक्षिण समुद्र गाटन आपल्या अतस्थ उन्नतीचा मार्ग का अक्रम नये ? इस्तवटच्या मार्गानं रशियाचा व्यापार पूर्वीप्रमाणं ग्वलाच रहाणार. मग गगिया कोट नकमान आहे ? ममानिया, महिया, माउटनिग्रो वगेरे छोटेग्वानी गष्ट्राची गेल्या दहापधग वर्षात वाढलेली पन्च तंबढी उपटण्यांत येणार, पण तेथील जनता अनस्थ स्वातंत्र्य उप- भोगन स्वतःचे हित साधीत असतां तिच्या मागात जर्मनी थोडाच आडवा पडणार आहे ? बाल्कन प्रदेशावर व तुकस्थानवर आपली छाया पमरण्याचा उद्योग रशियाने गेल्या शंभर वर्षात दोन तीनदा केला नाही काय ? हा उद्योग रशियाम दोन तीनदा मोड़न द्यावा लागला ना ? हा उद्योग सोडून दिल्यानतर रशियाची भरभराट झाली आहे ना ? आज निसन्यांदा किंवा चवथ्यादा पुन्हां हा उद्योग सोडून द्यावा लागला रशियाच्या भरभराटीस कोटे अडथळा येणार आहे ? रशियाची नुकस्थाना- सबधाची महत्वाकांक्षा हृदयीं बाळगणारे रशियांतील बरेच लोक ह्या महायद्धात अशतः नालायक ठरले आहेत; आणि पग्गाष्ट्रीय वैभवाने रशियाची ग्वरी उन्नति होणार नसून अतस्थ मुधारणने रशिया अत्यन प्रबळ होगार आहे, असं मानणारा वर्ग महायुद्धामुळे आस्ते अस्ते अधिकार संपन्न होऊ लागला आहे. या मध्यम वर्गाला फाजील वर चढव न देण्याकरितां राज्यकत्यांच्या वरच्या लोकारेकी एक पक्ष आपल्या हृदयांतील महत्वाकांक्षा हृदयांतच कोडून टेवण्याम गजी होण्याचा संभव आहे. महत्वाकांक्षची इज्जत न समजणारा एक पक्ष रशियांत आहे, व या महत्वाकांक्षेकरितां आणग्बी दोन तीन वर्षोहे महायुद्ध चालू ठेवण्याचा हट्ट धरणाग हा दुमग प्रबळ पक्ष रशियांत ह्यावळी रशियन प्रधानमंडळांत एकसारखा फेरबदल होत राहिला आहे आणि म्हणन मध्यम आहे.
पहिले महायुद्ध रुमानियाची पिछेहाट जर रशियाच्या डाव्या बगलेच्या पिच्छेहाटीस से. हिडेनबुग म्हणतात त्याप्रमाणे महिना दीड महिन्यांत कारणीभूत झाली तर रशियांतील महत्वाकांक्षी पक्ष वरचढ राहाणे शक्य नाही. रशियाने जर तुर्कस्थानसंबंधाची महत्वाकांक्षा सोडली तर प्रे. विलसन यांच्या मध्यस्थीस इंग्लंडला कबुली देण्यास कोणतीच मानहानि नाही. या महायुद्धांत इंग्लंडचा एक केसहि वाकडा होण्याचा संभव नाही. तुर्की साम्राज्य जर्मनीच्या छायेखाली गेल्यामुळे इजिप्त व हिंदुस्तान येथील इंग्रजी सत्तेस जर्मनी मागे धक्का मारील, असला बागुलबोवा काहींनी उभा केला आहे. पण थोडासा विचार केला असतां ह्या भीतींतहि काही तथ्यांश नाही, असे दिसून येईल. इग्लंड आतां पूर्वीप्रमाणे व्यापारी सुखवस्तू चे राष्ट्र नसून लढवय्याचे साम्राज्य बनले आहे, आणि ह्या साम्राज्याची लष्करी शक्ति जर्मनीच्या बरोबरीची किंबहुना कांकणभर ज्यास्तच आहे. इंग्लंडनें लष्करी यंत्र स्वतःचें बनवले नव्हते त्या वेळी जर्मनीच्या लष्करी यंत्राचा बाऊ ! पण आतां काय ? 'डर तो पिछे रही'. जर्मनीने पाहिजे तर इंग्लंडच्या लष्करी यंत्राला भ्यावें; इंग्लंडचे भिण्याचे दिवस मागे गेले. युरोपमध्ये व इजिप्तमध्ये इंग्लंड, फ्रान्स व रशिया ह्या त्रिकुटीला आस्ट्रो-जर्मनांना भिण्याचे काहीच कारण नाही. चरांचे चक्रव्यूह आणि इंग्लंडची लष्करी नवी यांनी महा- युद्धाच्या पूर्वीपेक्षा अधिक सुलभतेने युरोपांतील राजकीय राजकीय उलाढालींचें प्रश्न आज सोडवून टाकलेले आहेत. येऊन जाऊन भीति कायती जर्मनीच्या पखाखालील तुर्काचे लष्करी यंत्र इराणमार्फत हिंदुस्थानास त्रास देईल एवढीच. पण ह्यांतहि काही अर्थ नाही. कारण इराणांत रशियाचा बांध पडणारा असून जर्मनीला तेवढे तुर्काचे लष्करी यंत्र बनवता येते आणि इंग्लंडला हिंदुस्थानचें लष्करी यंत्र बनवता येत नाही, असें थोडंच आहे ? जर्मनीने तुर्की यंत्र बनवलें, तर इंग्लंड हिंदी यंत्र बनवील. ह्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की, इंग्लंड फ्रान्स व रशिया या तीन साम्राज्यांची लष्करी शक्ति जर एवढी मोठी आहे तर जमनीच्या तोंडावरचाहि विजयाचा रंग उतरेपर्यंत यानी तह का करावा ? १९१७ साली जर्मनीच्या तोंडावरील विजयाचा तांबडा रंग काढून तेथे आपण काळा रंग फासू असा इंग्लंडला आज पक्का भरंवसा वाटत आहे. मग यदा कदाचित् रशिया डळमळ लागला तर त्यास सावरून धरून प्रसंग पडल्यास आणखी दोन तीन वर्षे बनावट डिसेंबर-जानेवारी महिना इंग्लंडने का लडूं नये ? प्रे. विलसन यांच्या मध्यस्थीस अशा स्थितीत कोठे वाव मिळणार आहे ? एका जागी कायती मध्यस्थाला सवड आहे. ही सवड म्हणजे इंग्लंड फ्रान्स जर्मनी किंवा रशिया सर्व ठिकाणी आतां लष्करी धंद्याचे व परंपरेचे पुढारी कमी कमी होत चालले असून राष्ट्रीय लष्कराचे राष्ट्रीय पुढारी पुढे येत चालले आहेत. असल्या लष्कराला स्वदेशावरील आपत्ति तेवढी समजते; पण महत्वाकांक्षेचे वळसे राष्ट्रीय लष्कराला बाधू शकत नाहीत. आणखी दोन तीन वर्षे जर महायुद्ध चालू राहिले तर स्वकीयांना वेठीला धरणे, जरा दूर असले- ल्यांच्या गळ्यांत गुलामगिरी बांधणे, स्वदेशांत परधर्म च्या व भिन्न रंगाच्या लोकांना कामकाजाकरतां राहूं देणे, तरुणांचा आपत्तीत नाश झाल्यामुळे बहुभार्याची रूढी मुरू करणे,द्रव्यनाशामुळे पुढेमागे अमेरिकेची व जपानची सावकारी डोक्यावर घेऊन उद्योग- धंद्यांत त्यांची कुळे होऊन बसणे, वगैरे एकना दोन कित्येक आधिव्याधी युरो- पच्या मागे लागणार आहेत. ह्या आधिव्याधी दोन तीन वर्षानंतर मिळविलेल्या विजयासहि हीडिस स्वरूप देणान्या अमल्यामुळे रशिया जर थोडामा डळमळीत झाला तर प्रे. विलमन यांच्या मध्यस्थीस बरीच वाव आजच मिळण्याचा सभव आहे. अशा स्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत अमेरिकेतील तहाच्या वाटाघाटी कडे व मोल्डेव्हियांतील लढायाकडे सर्वांचं लक्ष लागणार हे उघड आहे.
महायुद्धाचा तिस-या वर्षाचा जानेवारी-फेब्रुवारी महिना जर्मन पाणबुड्यांचा प्लेग जानेवारी महिन्याचे अग्वेरीस व फेब्रुवारीचे प्रारंभी युरोप खंडांत फारच थंडो पडली, व त्यामुळे युद्ध कथेस लिथिलता आली. जानेवारीच्या पहिल्या पंधरव. उयांत जर्मनीने बेला व फाक्सनी ही गांवें घेतली आणि सिरेत नदीचा चाळीस पन्नास मैल लांबीचा मुलग्ब कबजांत घेऊन, सी रेतची रटबंदी म्हणून ज्याला झण तात तो मुलुख कवजात घेऊन जर्मनीने चर स्वणण्यास आरंभ केला. रशियाशी युद्धप्रसंग आल्यास सीरेंतच्या तटबंदीच्या जागी रशियास थोपवून धरता यावे म्हणून जर्मनीच्या सल्याने व जर्मनीच्या मदतीने वर्ष दोन वर्षांपूर्वी रुमानियानेच हा प्रांत मजबुतीचा करून ठेवला होता. ही मजबुतीची पट्टी ताब्यांत येतांच सेनापति मकनसन यांच्या सैन्याने तेथेच तळ दिला व मागे हटणाऱ्या रूसो-रुमा- नियन सैन्याचा पाटलाग करण्याचे सोडून दिले. सर्व डोब्रुना प्रांत ताब्यात आला असतां, व डान्यब नदीची मुग्वे अर्धवट मोकळी झाली असतां रशियाच्या बेसारे- बिया प्रातांत सैन्य उतरवून रूसो-रुमानियन सैन्याला गुडाळून टाकण्याची सेनापति हिंडेनबर्ग यांची दर्पोक्ती खरी करून दाखविण्याचा प्रयत्न जर्मन सेनेने का सोडला? याच सुमारास जर्मनीच्या मदतीच्या आशेने उद्दाम झालेला ग्रीसचा गजा दोस्त सरका- रापुढे का लवला ? जानेवारीच्या तिसऱ्या व चवथ्या आठवड्यात आस्ट्रो-जर्मन सैन्य रुमानियाची रणभूमि सोडून दुसरीकडे कोठेतरी नेण्यात येत आहे अशा बातम्या आल्या. स्वित्झर्लेडच्या व हॉलंडच्या सरहद्दीवर भले मोटें ऑस्ट्रो-जर्मन सैन्य जमा होत असून हॉलंडची किंवा स्वित्झर्लंडची तटस्थवृत्ति जबरदस्तीने मोडून तेथे धुमाकूळ घालून ते देश बेल्जमप्रमाणे पादाक्रांत करण्याचा मदोन्मत्त जर्म- नीचा हेतु आहे असे काहींनी अनुमान काढले. दुसऱ्यांनी असा तर्क बांधला की, हॉलड व स्वित्झर्लंड यांची तटस्थवृत्ती मोडण्याचा हा उद्योग नसून येत्या वसत काळांत सोम नदीच्या काठी आपल्या परिणत झालेल्या जगी हल्लयास ज्यावेळी अग्लो-फ्रेंच सेना सुरुवात करतील, त्यावेळी फ्रेचांच्या उजव्या बगलेवर व इंग्रजांच्या डाव्या बगलेवर, दोन्ही टोकांवर अवचित हल्ले करता यावे, म्हणून सेनापति हिंडेनबुर्ग यांची ही आगाऊ तरतूद होय. जानेवारीच्या अखेरीस रुमा- जानेवारी-फेब्रुवारी महिना ५३ नियन व बाल्कन युद्ध शिथिल पडले; इतकेंच नव्हे तर पश्चिम रणभूमीत फ्रान्सच्या व बेल्जमच्या बाजूला आणि पूर्व रणभूमीत उत्तर व मध्य रशियाच्या बाजला ठिकठिकाणी लहानमहान हल्ले करून रशियाच्या सैन्याचा व अग्लो-फ्रेंच सैन्याचा मोटा जमाव कोठे आहे याची चांचणी घेण्यास जर्मनीने मुरवात केली. या सर्व चिन्हांवरून जानेवारी अखेरीस असे स्पष्ट झाले आहे की, मे-जन महिन्यांत दोस्त-सरकारांची पूर्ण तयारी होऊन त्यांचा वाफेचा रुळ फिरूं लाग- ण्यापूर्वी दोस्त सरकारांच्या बेतांची घडी बिघडून टाकण्याकरितां जमनी आपण होऊन मार्च एप्रिल महिन्यांतच अँग्लो-फ्रेंचांवर कोठे तरी गेल्या सालच्या व्हनच्या स्वारीप्रमाणे दोन तीन महिने निकराचे हल्ले करण्याच्या तयारीत असला पाहिजे. फेब्रुवारीच्या प्रारंभी जर्मनीने जी एक अत्यंत निर्दयपणाची गोष्ट जाहीर केली तिजवरूनहि वरीलच अनुमानास पुष्टि मिळाली. फेब्रुवारीचे प्रारभी जमीन अमेरिका, हालड, स्पेन आदि करून सर्व तटस्थ राष्ट्रांना कळविले की, फेब्रुवारीचे दुसऱ्या आठवड्यापासून इंग्लंडचा किनारा, फ्रान्सचा किनारा व इटलीचा किनारा असलेल्या समुद्राच्या टापूत कोणच्याही राष्ट्राचे कोण च्याहि मालाचें व कोणच्याहि स्वरूपाचं जें जें गलबत दृष्ट्रीस पडेल ते तें गलबत उतारूच्या किंवा खलाशांच्या करण्याची बिलकूल तरतूद न करतां सरसकट समुद्रात बडविण्याची आज्ञा जर्मनीने आपल्या पाणबड्या बोटींना दिली आहे. तेव्हां तटस्थ राष्ट्राच्या जहाजानी इंग्लंड, फ्रान्स व इटली यांच्याजवळचा हा मृत्युमय समुद्र अजिबात टाळावा. इतक्या दिवस पाणबुड्यांचा सुळमुळाट चालूच होता, पण अमेरिकेचे निशाण असले म्हणजे निष्कारण प्राणहानि करण्यांत येऊ नये अशी जर्मनीची आज्ञा पाणबुड्यांना होती; पण ती आज्ञा रद्द करण्यांत येऊन भूमध्य ममुद्रांत व इंग्लडच्या आसपासच्या समुद्रांत दोस्त सरकारांशी दळणवळण टेवणान्या मर्व जहाजांना सरसकट अमानुष क्रूरपणे जलसमाधी देण्याची अनियंत्रित अखत्यारी जर्मनीने जानेवारी अखेरीस दिली. रुमानियाच्या विजयाचा पूर्ण फायदा पदगत पडला असतांना जर्मनीनं । यमस्य करुणा नास्ति' अशा धर्तीचं अक्राळविक्राळ व अमानुष स्वरूप को धारण केलें ? रक्ताची चटक लागली म्हणून हा हिंस्र पशू अधिक क्रूर बनला, हे एक कारण तर खरेच; पण त्यापेक्षा लष्करी परिस्थितीत व लष्करी धोर- याच्या आसपास प्राणाचा बचाव पहिले महायुद्ध णांत या भयानक वर्तनाचें मूळ कोठेतरी पाहिले पाहिजे. जर्मनीच्या सर्व अत्याचाराच्या मागे लष्करी धोरण नेहमीं असतें, लष्करी धोरण सफल करण्याकरितां जर्मनी न्यायनीति पहात नाही; धर्माला जुमानीत नाही; माणुसकीची चाड धरीत नाहीं आणि राष्ट्रराष्ट्रांमधील करारमवार पायाखाली तुडविण्यास मागे पुढे पहात नाही. जर्मनीचे हे वर्तन निंद्य व गर्हणीय असून मनुष्यमात्राला लाजविणारे आहे. जर्मनीच्या या अमानुष वर्तनाचा तिटकारा आतां सर्व तटस्थ राष्ट्रांना आला आहे. अमेरिकेचे राष्ट्र हि जर्मनीशी युद्ध करण्यास सज्ज होऊ लागले आहे. अमला हा तैमूरलंगी क्रूरपणा जर्मनीने कां दाग्बवावा ? रानटी लोकांहून अधिक माणुसकी जर्मनींत कां दृष्टीस पडू नये ? एकदां पापाचरण ग्बपले म्हणजे पार पचनी पडून पिंडच पापमय बनू लागतो. जर्मनीची तशीच स्थिति होऊ लागली हे खरे; पण पापाच्या प्रत्येक गोळ्यासभोंवतीं लवरी घोरणाचे अवगुटन जर्मनीच्या आतांपयतच्या पापी कृतींत दिसून आले आहे. अनियंत्रित जलसमाधीच्या पापाच्या मागें जर्मनीचे लष्करी धोरण कोणचे आहे ते आतां पाहू या. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यांत सेनापति मकेनसन यांनी सीरत नदीवर मुक्काम केला. मुक्काम केला. त्यावेळी पूर्व पश्चिम दोन्ही रणभूमि संभाळून रुसो-रुमानियाची पीछेहाट करण्याइतकें फाटतुक सैन्य आस्ट्रो-जर्मनापाशी होते. हे अधिक सैन्य आता मोकळे झाले. डिसेंबर महि- न्यांत बग्वारेस्ट घेण्याबरोबर विजयी पक्ष असा डौल मारून जमनीने प्रेसिडेट विल्सन यांच्या मार्फत तहाचे बोलणे सुरू केले. इंग्लंड, फ्रान्स, रशिया व इटलो या चारहि राष्ट्रानी पराभूत पक्ष या नात्याचा तह करण्याचे नाकारले. प्रथम रण- भूमीवर विजय संपादन करूं आणि नंतर तह करूं, अशी प्रतिज्ञा या चारहि राष्ट्रानी केली. प्रेसिडेट विल्सन यांनी मध्यस्थी जोराने चालविली. जित कोणीच नाही. विजयहीन तह करण्यास हरकत नाही अशा धोरणाने प्रेसिडेट विल्सन यांनी जाने वारीत पुन्हां तहाची भाषणे बोलण्यास सुरवात केली. प्रे विल्सन यांची री अस्ट्रिया हंगे- रीने ओढली. पण इंग्लड कांहींच हालचाल दाखवीना. तेव्हां विजय सपादन करून जर्म- नीच्या पापाचे प्रायश्चित्त जर्मनीच्या पदरांत टाकूनच नंतर मग तह करण्याचा इंग्लंडचा निश्चय जर्मनीला कळून चुकला. इंग्लंडने तरी असा निश्चय का करावा ? नुसती मनाची हौस म्हणून इंग्लंडने असा निश्चय केला काय ? नाही. इंग्लंडला हे पुण्य- कम वाटते म्हणून इंग्लंडने तसा निश्चय केला. नुसते पुण्यकर्म वाट्न काय उपयोग?
जानेवारी-फेब्रुवारी महिना पुण्यमार्ग म्हणून केवळ नव्हे तर तो पुण्यमार्ग आचरण्याची धमक इंग्लंडच्या मनगटांत आहे, असे मुख्यप्रधान मि. लाईड जॉर्ज यांच्या बुद्धीला निश्चयाने वाटते म्हणून इंग्लंड वसंतकाळी व वसंतकाळानंतर पांच सात महिने निकराने लढण्यास सज्ज झाले. तहाचे बोलणे संपले. पुढील नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत घनघोर यद्ध चालणार, ही गोष्ट निर्विवाद ठरली. या अवधीत आपण विजय संपादन करणार, अशी इंग्लंडची पूर्ण खात्री ! कोणच्या जोरावर विजय संपादन करणार ? गेल्या वसंतकाळी तयारी पूर्णत्वास गेली नसतांहि सोम नदीच्या कांटी कित्येक आठवडे इंग्लंडने जर्मनीची एकसारखी पीछेहाट केली, त्यावेळी इंग्लंडचे सैन्य नवे होते. येत्या वसंतकाळी तेंच सैन्य लढून लढून मुरलेलें होणार ! शिवाय सवाई दीढीने वाढ- णार. सक्तीने सर्वांना मजुरीहि करावयास लावणारा कायदा मि. लाईड जार्ज त्यांच्या हातांत असून, पाहिजे त्याच्या खिशांतील पैसे सक्तीने काढून घेण्याची अखत्यारीहि मि. लॉईड जॉर्ज यांना देण्यास इंग्लंड तयार झाले आहे. म्हणजे येत्या मे-जून महिन्यांत जर्मनीचा पराभव करण्यास लागणारे जरूर तितक सैन्य मुबलक दारूगोळ्या- निशी पश्चिम रणभूमिवर उभे ठाकून पांचसहा महिने एकसारखी प्राणांतिक झुज झुजण्यास सुरवात करणार. इटली व रशिया ही दोन्ही राष्ट्रे त्याचवेळी आपल्या बलाची पराकाष्ठा करण्यास चुकणार नाहीत, हे उघड आहे. एवंच १९१७ साली इंग्लंडच्या अंदाजाने जर्मनीचा पराभव निश्चित ठरला. हा पराभव टाळण्याकरिता रुमानियाची राजधानी बुखारेस्ट शहर घेतल्यानंतर जर्मनीने तहाचे बोलणे लावले. पण स्वतःच्या बलाविषयींच्या आत्मविश्वासामुळे इंग्रजांनी हे बोलणे टाळले. रुमानिया घेतल्याने जर्मनी दुष्काळाच्या तडक्यांतून सुटला, पण इंग्रज आरमाराच्या कोंडमान्यामुळे उत्पन्न झालेल्या हालअपेष्टांतून जर्मनीची मुटका होणे शक्य नाही. ऑस्ट्रिया, जर्मनी, व टर्की येथील प्रजाजनांच्या हालअपेष्टा रोजच्या रोज वाढत आहेत आणि फार झाले तर १९१७ अग्वेर या हालआपेष्टा तेथील लोक सोसू शकतील. म्हणजे हालअपेष्टा सोसण्याच्या दृष्टीने १९१७ साल हे जर्मनीचे पराकाष्ठेचें साल होय. दोस्त सरकारांच्याकडे पाहिले तर आता कोठे प्रजाजनांज्या थोडयाशा हालअपेष्टा होऊ लागल्या आहेत. गेली दोन वर्षे सर्व लोक पूर्ववत् चैनीत होते; जणु काय महायुद्ध चाललेंच नव्हतें ! हालअपेष्टांच्या दृष्टीने जर्मनी व इंग्लंड यांमध्ये जमीनअस्मानाचे अंतर आहे. इंग्लंडच्या बलाढय आर- माराचा हा प्रताप होय. सैनिकांच्या संख्येच्या दृष्टीने पाहिले तर १९१७ साल है जर्मनीच्या पराकाष्ठेचे साल समजले पाहिजे; कारण १९१७ सालच्या अखेरीस पहिले महायुद्ध . नव्या तुर्काना वेठीला धरून लढविण्याचा मार्गहि तुर्की जवान संपत आल्यामुळे खुटल्या- वाचून राहाणार नाही. दोस्त सरकारांच्याकडे पाहिले तर फ्रान्स व इटाली यांना १९१७ साल पराकाष्ठेचे हे खरे; पण इंग्लंडचे सैन्य यावेळी ज्वानींत प्रथम येणार व उतारकाळास इंग्लंडास चारपांच वर्षांचा अवधी राहाणार. सैन्याचा झरा रशियांत नेहमीच अव्याहत वाहत असल्यामुळे सैनिकांच्या संख्येच्या दृष्टीने आणखी दहापांच वर्षे महायुद्ध चालविण्यास रशियास कोणचीच हरकत नाही. प्रजाननांच्या हाल- अपेष्टांच्या व सैनिकांच्या संख्येच्या तफावतीच्या या संकटांतून कसे पार पडाययाचे, हा जर्मनीपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. इंग्रजांच्या आरमारापुढे काही चालत नाही, अर्थात आपल्या हालअपेष्टा कांहीं चुकत नाहीन. आपण जर दुःग्वांत राहाणार तर इंग्रजांना तरी सुग्वांत कां म्हणून राहूं द्यावें ? सरळ मार्गाने जर इंग्रजांच्या हालअपेष्टा वाढविता येत नाहीत तर पापी मार्गाने तरी इंग्रजांना दुःखांत कां लोट नये ? अमा विचार करून इग्रजांच्या किना-या सभोंवतीं जर्मनीने आपल्या पाणबडया बोटींच्या प्लेगाम अनियंत्रितपणे संचार करण्यास परवानगी दिली. अलीकडे दोन तीन महिने या प्लेगाम रोज तीन चार जहाजे बळी पडत असत. पण फेब्रुवारीत या फलेगाचा संचार चहूकडे झाल्यावर या प्लेगाची रोजची मृत्युमंख्या विमापर्यंत जाईल, असा जर्मनीचा अंदाज आहे. इतकेच नव्हे तर इंग्रजाच्या किनाऱ्याला आम्ही एकहि जहाज पोचू देणार नाही अशा त-हेची या पटेगची वहावा अमेरिकेतील जर्मन लोक करीत आहेत. फेब्रुवारी प्रारभाला जमनीचा मुख्य प्रधानाने असे जाहीर केले आहे की एक वर्षापूर्वी सून नव्या त-हेच्या मोठ्या पाणबड्या बोटी जर्मनीने बांधल्या असून या बोटीच्या प्लेगापासून इग्रजी समुद्रास चांगली बाधा होऊन इग्लंडचा कोडमारा करण्यास जर्मनी समर्थ झाला आहे. ह्या कोडमान्याने इग्रजांच्या प्रजाजनांच्या हालआपेष्टा असह्य होतील; दारूगोळ चास लागणा-या सामानाचा इग्लडांत तुटवडा पडेल; आणि फ्रान्स व इटली येथे दगडी कोळशाचा दुष्काळ पडून ते देश डबघाईला येतील. म्हणजे जर्म- नीच म्हणणे असे की, पाणबुड्या बोटींच्या सांथीमुळे हालआपेष्ष्टा सोसण्याच्या कामी जर्मनीच्या पक्तीला इग्लंड, फ्रान्स व इटली हे देश १९१७ सालींच येऊन बस- तीन्ट, सैनिकांची संख्या अधिक या मुद्याला जर्मनीचें असें उत्तर दिसते की; पाणबुड्या बोटींनी जर दारूगोळयाला लागणारे सामान समुद्रांत नेऊन बुडविलें तर नसती अधिक संख्या घेऊन काय करावयाचें ? पाणवड्या बोटींचा प्लेग पघग जानेवारी-फेब्रुवारी महिना जर चार पांच महिने चांगला वाढत गेला तर जलै-आगस्ट महिन्यांत इंग्रजांची अफाट सेना दारूगोळ्याच्या तुटवड्यामुळे शक्तिहीन ठरेल; आणि इंग्लंडच्या सेनेकडे दुर्लक्ष करून रशियाचा किंवा इटलीचा पिच्छा पुरविण्यास आस्ट्रो-जर्मनाना संधि मिळेल. १९१६ सालच्या अखेरीस जर्मनीच्या चेहेऱ्यावर विजयाचा जो रंग चमकत होता तो १९१७ सालच्या अखेरीसहि कायम रहावा म्हणून पापापुण्याचा सलाहि विचार न करतां सरसकट सर्वांना बुडविण्याचा अधिकार वरील विचारसरणीस अनुसरून, आपल्या पाणबुड्या बोटीला जर्मनीने फेब्रुवारी प्रारभापासून दिला आहे. तटस्थांच्या हक्कांची पायमल्ली होऊन तटस्थ राष्ट्रे दोस्त सरकारांना मिळाली तर कसें १ सेनापति हिंडेनबुर्ग यासंबंधाने बेफिकीर आहेत. कोणचेंहि नवें राष्ट्र लढाईत पडो; त्याचे काही न चालू देण्यास जर्मन सेना समर्थ आहे; अशी फुशारकी सेनापति हिंडेनबुर्ग मारीत आहेत. जर्मनीच्या या नव्या प्लेगाने आपल्या हक्कांची पायमल्ली होते, असे अमेरिकेने जर्मनीला स्पष्ट कळविले असून जर्मनीशी बोलणे चालणेहि अमेरिकेने बद केले आहे. अमे. रिकन जहाजांना जर जर्मन प्लेगाची बाधा झाली तर अमेरिका जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारील असा अंदाज आहे. पण अमेरिकेपाशी अवघे ८०।९० हजारच सैन्य आजमितीस असल्यामुळे, महायुद्धांत अमेरिका सामील झाल्याने १९१७ साली युरोपांतील लष्करी परिस्थितीत विशेषसा फरक पडणे शक्य नाही. हॉलंड, डेन्मार्क व स्वित्झर्लंड यांच्या सरहद्दीवर जर्मन सेनेना मोठा तळ पडला असल्यामुळे व रुमानियाचे उदाहरण या चिमुकल्या राष्ट्रांपुढे ताजे असल्यामुळे, इंग्रजी समुद्रातील जर्मनीच्या या अत्याचाराने ही राष्ट्र रागावली तरी दोस्त सरकारांना सामील होण्याचा सभव नाही. स्वीडनचा बाजचा अमल्यामुळे नॉर्वे इंग्रजांच्या बाजूस असून नसल्यासारखा आहे. म्हणजे घरोपातील लहान लहान तटस्थ राष्ट्राना जर्मनीच्या दडपशाहीविरुद्ध तक्रार करून आपली जहाजे इंग्रजी व्यापारांतून काढून घेण्याशिवाय गत्यंतर नाही; आणि फेब्रुवारीच्या प्रारभी कांहीं राष्ट्रानी तसे केले. वसंतकाळापूर्वीचे दोनतीन महिने लढाईच्या दृष्टीने मंदीचे पाणबुडया बोटींचा प्लेग इंग्लंडास कितपत बाधा देतो व या बावेपासून स्ततःचे संरक्षण इंग्लंड कसे करून घेतं, ही गोष्टच पुढील दोन तीन महिन्यांत प्रमुग्वपदास चढणार, हे उघड आहे. " कल जर्मनीच्या बाजचा असल्यामुळे ८ महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा फेब्रुवारी-मार्च महिना फेब्रुवारी महिन्यांत मेसापोटेमियामधील इंग्रजी व हिंदी सेनेने तुर्कापासून कुतुल-आमारचे ठाणे परत घेऊन गेल्या सालच्या अपजयाचा कलंक धुवून टाकला. गेल्या साली जनरल टाऊनशेंड हे कुतुल-आमारा येथे वेढले जाऊन जेव्हां तुर्की सैन्याच्या हवाली झाले तेव्हां युफ्रेतीस व तैग्रीस नदीच्या कांटी दक्षिण इराणांत इग्रजी सेनेच्या इज्जतीस बराच धक्का बसला; दक्षिण इराणांत बंडखोरांचा सुळ- सुळाट झाला; व त्याचे वाईट परिणाम बलुचिस्थानांतील उपद्व्यापी पठाणांवर होऊन हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवर शांततेचा भंग बऱ्याच अंशी झाला. जनरल टाऊनशेड कुतुल-आमारा येथे तुर्कोच्या हाती लागण्यापूर्वी इराणच्या वायव्य कोपऱ्याजवळ तुर्काच्या आमिनियन प्रांतांत रशियन फौजेनें तुर्कोचा चांगला पराभव केला होता; व त्यामुळे दक्षिण इराणांतील गडबडीच्या आगीच्या ज्वाळा उत्तर इरागास लागल्या नाहीत. दक्षिणेच्या या ज्वाळा जर उत्तरेस पसरल्या असत्या तर तेहरान येथील इराणी सरकार तुर्काच्या जाळ्यांत सांपडून अफगाणिस्थानच्या असीरावरहि तुर्को- जर्मनांची छाप बसली असती. आमिनियामध्ये रशियाने एक वर्षापूर्वी जो विजय मिळविला त्यामुळे इराणी सरकार व अफगाणिस्थानचे अमीर यांना रशियाची दह- शत पूर्वीइतकीच पुन्हां वाटू लागली; आणि तेहरान व काबूल येथे तुर्को जर्म- नांच्या चळवळी मंडळ्यांची वर्षभर स्थापना झाली असतांहि आपली तटस्थवृत्ति सोडण्यास अफगाणिस्थानचे अमीर प्रवृत्त झाले नाही. आमिनियांतील रशियाच्या विजयाचा हा मोठा उपयोग झाला, पण त्या विजयामुळे उत्पन्न झालेली सुरक्षित- तेची परिस्थिति दक्षिणेस बसऱ्याच्या बाजूने पोखरली जाते की काय अशी भीति वाटू लागली होती. या भीतीचे निवारण करण्यासाठी गेल्या साली बसऱ्याच्या बाजूला बरेच मोठे नवें सैन्य पाठविण्यांत आले. बसऱ्यापासून उत्तरेस नवी आग- गाडी बांधण्यात आली व फेब्रुवारीचे अखेरीस कुतुल-आमाराचे ठाणे तुर्कीना सोडावयास भाग पाडून तुर्काच्या बळाहून इंग्रजांचे बळ वरचढ आहे, असें दक्षिण इराणांतील मुसलमानांचे निदर्शनास सेनापति मॉड यांनी आणले. जानेवारी फेब्रु- वारी महिन्यांत पांच सात हजार तुर्की सैन्य इंग्रजांनी कैद केलें; व वीस पंचवीस फेब्रुवारी-मार्च महिना फ्रान्सच्या हजार तुर्की सैन्याची खराबी केली. तुर्की सैन्य आस्ते आस्ते मागे हटत आहे व जनरल माड हे व्यवस्थेने पाठलाग करीत आहेत. तथापि कुतुल-आमारा येथे तुर्काचा झालेला पराभव बगदादला शह पोचण्याइतक्या मोठ्या स्वरूपाचा नाहीं. इंग्रजांच्या तरवारीची इज्जन पुन्हां प्रस्थापित होऊन दक्षिण इगणांतील गडबड मर्यादित करण्याइतक्या स्वरूपाचा जनरल माड यांचा विजय आहे यात शंका नाही. बगदाद इंग्रजांच्या हाती लागतो इराण तुर्काच्या शहांतून मुक्त व्हावयाचे नाही, पण सांप्रत जर्मनांचे व तुकाचे लक्ष युरोपखंडांत स्वतःचा बचाव करण्याकडे लाग. लेले असल्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत सुरू होणाऱ्या युरोपांतील धुमश्चक्रीचा निकाल लागत असतांना इराणांत अधिक गडबड होण्याची धास्ती जनरल माड यांच्या विजयाने दूर केलेली आहे. युफ्रेतीस व तैग्रीस नदीच्या कांटी ज्याप्रमाणे इग्रजांचे पाऊल फेब्रुवारी महिन्यांत पुढे पडले, त्याप्रमाणे रणभूमीतहि सोम नदीच्या उत्तरेस अँकर नदीच्या काठी दहाबार मैल रुंदीच्या पट्ट्यावर इंग्रजी सेना एकदोन मैल आंत घसली व जर्मनांच्या ताब्यांत अमलेली दहा पंधरा गांव इग्रजांनी व्यापून टाकिली. हा भाग ताब्यात घेण्याकरिता इंग्रजांना विशेष से लढावें लागले नाहीं, सामान्य फाटाफूट होऊनच ही गांवं इग्रजांच्या हाती आली! यासंबं- धानें जर्मनीचे म्हणणे असे प्रसिद्ध झाले आहे की, नवीन तयार केलेल्या बदो- बस्ताच्या जागा व्यापण्याकरितां आम्ही आमचें मैन्य केव्हां मागे हटविले हे इग्र जांच्या ध्यानांतच आले नाही. ते कसेंहि असो; येवढी मात्र गोष्ट ग्वरी की, पश्चिम रणभूमीत जोगनें लढून अग्लो-फ्रेच मैन्याला शक्य तेवढी मोटी किंमत द्यावयास लावल्याशिवाय आपल्या पायाखालची जमीन जर्मनांनी सोडण्याचे हे पहिलेच उदाहरण होय. यावरून एक गोष्ट सिद्ध होते; ती ही की, इंग्रजांवर तुटून पडून इंग्रजी सेनेची खोड मोडण्याची जर्मनांनी जंगी तयारी चालविली आहे म्हणून जे प्रसिद्ध झाले होते, त्यांत कांहीं तथ्यांश नाहीं. इग्रजांवर तुटून पडून कले गांठण्याचा जर जर्मनीचा सांप्रत इरादा असता तर भरपूर लढल्याशिवाय एक इचहि जमीन जर्मनीने सोडली नसती. अर्थात् पश्चिम रणभूमीत एप्रिल-मे महि- न्यांत सुरू होणाऱ्या धुमश्चक्रीच्यावेळी स्वसंरक्षण करण्यापलीकडे जर्मनी विशेष कांही करणार नाही, असें अनुमान निघते. १९१७ साली पश्चिम रणभूमीत जर्मनांवर मोठा विजय संपादणे इंग्रजांना भाग आहे. आम्ही तसे करून दाखव - ६० पहिले महायुद्ध असे आश्वासन इंग्रजांनी आपल्या दोस्तांना दिले आहे. किंबहुना इंग्रजांच्या या आश्वासनावर विसंबून राहून फ्रान्स, इटली व रशिया यांनी तहाच्या वाटाघाटींत पडण्याचें नाकारले असे म्हणण्यासहि हरकत नाही. या दृष्टीने पश्चिम रणभूमीचा विचार केला असतां जय मिळविण्याचा बोजा इंग्रजांवर पडतो; आणि इंग्रजांना जर जय मिळाला नाही तर तेवढयानेच, म्हणजे इंग्रजांचा उलट पराभव न करतांहि, जर्मन मुत्सद्यांचे बरेचसे कार्य साधते. आपला चराचा चक्रव्यूह मोडूं द्यावयाचा नाही, प्रसंगविशेषीं थोडीशी पीछेहाट झाली तरी पत्करली, पण इंग्रजी सेनेला आंत घुसू द्यावयाचे नाही, अशा धोरणाने जर्मन सेना पश्चिम रणभूमीत मुख्य धुमश्चक्रीच्यावेळी वागणार आणि इंग्रज अत्यंत निकराने जर्मनांवर तुटून पडून महायुद्धाचा सोक्षमोक्ष वसंतकाळी करून घेणार, असें फेब्रुवारीतील हालचालीं- वरून अनुमान निघतें. पश्चिम रणभूमीत जर्मनी पराभव टाळण्यापलीकडे जर दुसरे तिसरें कांहीं करणार नाही तर जर्मनीने गेले तीन चार महिने नवें सैन्य उभारण्याची येवढी खटपट केली ती कशाकरितां ! बेल्जममधील लोकांना गुलामाप्रमाणे राचावयास जर्मनीने लाविले. इतकेच नव्हे, खुद्द जर्मनींत सक्तीच्या लष्करच्या कायद्याप्रमाणे सक्तीच्या कामकऱ्यांचा कायदा पास केला. ही सक्तीची गुलामगिरी सुरू करून लढण्यालायक जे लोक इतर धंद्यांत गुतले होते ते सर्व जर्मनीने लष्करी कामासाठी मोकळे केले,अशारीतीने दांत कोरून जर्मनीने वसंतकाळासाठी नवें सैन्य उभारले. या ताकतीचा उपयोग जर्मनी कोठे करणार ? तज्ज्ञाचे असें मत प्रसिद्ध झाले आहे की, एप्रिल मे महिन्याच्या सुमारास बर्फ वितळल्यावर रिंगाच्या बाजूला म्हणजे रशियन रणभूमीच्या उत्तर भागांत कोठेतरी रशियाची फळी फोडण्याचा उद्योग जर्मनी केल्यावांचून राहाणार नाही, उत्तर भागांतच कशावरून हा उद्योग दृष्टीस पडेल ? याचे कारण असे सांगण्यांत येते की, १९१८ सालीं महायुद्ध सुरू ठेवण्याची ताकद प्रजाजनांच्या उपासमारीच्या दृष्टीने जर्मनीत राहिलेली नाही. तेव्हां १९१७ सालींच रशियावर जर्मनीला येवढा मोठा जय मिळविला पाहिजे की, तह करण्यावांचून रशियास गत्यंतर राहाणार नाही. रशियाची कितीहि पीछेहाट झाली तरी रशिया तह करणार नाही. राजधानीचे पेट्रोग्राड शहर गेले तरच रशि. यास तह करणे भाग पडेल. पेट्रोग्राडवर चाल करून जावयाचे म्हणजे रिगाऱ्या -की A गोमती रि. वानी नीत अपना तर फेब्रुवारी-मार्च महिना होय. जर्मनीला आपल्या आरमाराचाहि उपयोग करून घेता येण्यासारखा आहे. हा विचार जर्मनीच्या दृष्टीने ठीक झाला. पण रशियाने रिगाच्या बाजूची आपली फळी वर्ष दीड वर्ष चांगली मजबूत करून ठेविली आहे, त्याची काय वाट ? रिगाची ,बाज दिली करून रशिया इतर ठिकाणी आपले सैन्य नेईल, हे संभवत नाही. चरांचा चक्रव्यह फोडणे फार कठीण पडते; गेल्या अडीच वर्षांत सेनापति मॅकेनसन यांना तोफखान्याच्या जोरावर चरांचे चक्रव्यूह फोडून आंत घुसण्याची संधी डुनाजी नदीच्या काठी एकदां काय ती मिळाली. रोमानियाची पीछेहाट झाली ती चरांच्या चक्रव्यूहांच्या लढाईतील पराभवामुळे नव्हे, तर खड्या लढाईतील पराभवामुळे शिवाय रोमानियन युद्ध जानेवारी अखेरीस थंडावले ह्याचे कारण चरांच्या चक्रव्यूहांचा अडथळा सुरू झाला हे नसून ऐन कडाक्याच्या थंडीच्या वेळी रुमा- नियास रशियाची मोठी कुमक येऊन मिळाली हे होय. ब्युकोव्हिना व रुमानिया येथील रणभूमि अद्याप चरांच्या चक्रव्यूहांनी पूर्णपणे व्याप्त झालेल्या नाही. रिंगाच्या बाजूच्या रणभूमीची तशी स्थिति नाही. रिगाच्या बाजूला समुद्रावरून कांहीं काम करण्यास जर सवड आहे तर रुमानियन रणभूमीच्या बाजूला डान्यूब, सीरेथ व प्रुथ या नद्यांच्या मुखांचाहि उपयोग करून घेतां येण्यासारखा आहे. म्हणजे जर सेनापति हिंडेनबुर्ग यांजपाशी फालतुक सैन्य जरूर तितकें असेल तर रशियावर जय मिळविण्यास रिंगाच्या रणभूमीपेक्षां रुमानियाची रणभूमि अधिक सोइस्कर होणारी आहे. रुमानियाची रणभूमि सोडन सेनापति हिंडेनबुर्ग रिंगाच्याच याजूला अधिक लक्ष पुरवील, असे मानणारा पक्ष पेट्रोग्राड घेतल्याशिवाय रशिया तहाला तयार होणार नाही या मुद्यावर अधिक भिस्त ठेवतो. पण रशियांतील गजकीय स्थितीच्या दृष्टीने विचार केला असतां पेट्रोग्राडवर मोहीम न मारण्यांतच जर्मनीचे अधिक हित आहे, असे मानणारा दुसरा एक पक्ष आहे. रशियांत सांप्रत राजमंडळ व डयूमा सभा यांमध्ये बरीच लछालछी सुरू झाली असून अंतस्थ भांडणे चांगली विकोपास गेली आहेत; त्या तंटयापासून जर्मनीचा आपोआप मोठा फायदा होण्याचा संभव आहे. पण जर्मनी जर पेट्रोग्राडवर चाल करून जाऊ लागला तर भयंकर अरिष्टामुळे अंतस्थ कलह आपोआप नष्ट होईल व रशियांतील सर्व दर्जाच्या लोकांची जूट होऊन जर्मनीस आज जो रशिया थोडासा मऊ पडलेला दिसत आहे तोच रशिया उग्र स्वरूप धारण केल्यावांचून राहाणार पहिले महायुद्ध नाही. तेव्हां पेट्रोग्राडवर चाल करून जावयाचे म्हणजे रशियांतील अंतस्थ कलहा- मुळे मिळणारा फायदा निष्कारण गमवावयाचा. रशियास अंतस्थ कलहांत निमग्न ठेवून त्याच्या वाटेस १९१७ साली न जाण्यांतच जर्मनीचा अधिक फायदा आहे असे या पक्षाचे मत आहे. मग जर्मनी करणार तरी काय ? रुमानियाचा अवशिष्ट राहिलेला भाग घेण्याची थोडीशी खटपट मार्च एप्रिलांत जर्मनीकडून होईल, पण आस्ट्रो-जर्मनांची खरी धाड यंदा इटालीवर पडेल असे या पक्षाचे हणणे आहे. गेल्या साली इटलीच्यामागे आस्ट्रिया लागला असतांना रशिया अवचित उठला व ग्यालिशियांतील रशियाच्या विजयाने सर्वच पारडे फिरून गेले. पण यंदा रशियाची तशी भीति राहिली नाही. अंतस्थ कलह व पाणबुड्या बोटींचा व्याप या दोन कारणांमुळे गेल्या सालाइतका दारूगोळ्याचा व तोफांचा मुबलक पुरवठा यदा रशियास होणे संभवनीय नाही. तेव्हां अंतस्थ कलहानेंच रशियास पीडित ठेवून इटलीवर सूड उगविण्याचा विचार जर्मनीला अधिक प्रिय वाटणे संभवनीय आहे. पाणबुडथा बोटींचा प्लेग पश्चिम रणभूमीत एप्रिल-मे महिन्यापासून मोटी धुमश्चक्री सुरू होणार यांत शंका नाही. फ्रान्सच्या बाजूला जर्मनीची लढण्याची इच्छा असो वा नसो, जर्म- नीच्या इच्छेवर ही धुमश्चक्री अवलबून नाही, इंग्लंड व फ्रान्स या दोन राष्ट्राना पुढील चार पांच महिन्यांत जर्मनीशी निकराने लढून जर्मन सेनेला पायाखाली तुडविणे भाग आहे. कारण, जर १९१७ साली तसे केले नाही तर १९१८ साली पाणबड्या बोटींच्या प्लेगामुळे इंग्लंडच्या शक्तीची वाढ खुटण्याचा संभव आहे. फेब्रुवारीचे प्रारंभापासून इंग्लंड, फ्रान्स व इटली यांच्या सभोवारच्या समु. द्रांना घेरून सर्रास सर्व जहाजांना, इस्पितळाच्या जहाजांनासुद्धां, जलसमाधी देण्याचा जर्मनीने आपला निश्चय जाहीर केला. फेब्रुवारी महिन्यांत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याहून अधिक जहाजें जर्मनांना बुडवितां आली नाहीत. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हिशेब पाहिला तर दररोज दहा हजार टनांची जहाजे जर्मनीस बुडविता आली, असे म्हणण्यास हरकत नाही. जर्मनांनी बांधलेल्या मोठ्या पाणबुड्या बोटी आणि समुद्राखाली बुडून मार्ग आक्रमीत असतां शत्रूच्या जाळ्यांत न सापडावे म्हणून जाळे कातरण्याची केलेली व्यवस्था, याकडे पाहिले असतां या जर्मन प्लेगच्या रोजच्या मृत्युसंख्येचे प्रमाण गेल्या तीन M फेब्रुवारी-मार्च महिना ६३ सालभर महिन्याच्या सरासरीप्रमाणे १९१७ पडेल असे म्हणण्यास हरकत नाही. रोजची दहा हजार टनांची सरासरी म्हणजे विशेष भयप्रद नव्हे. इंग्लंडची व्यापारी जहाजे इतकी पुष्कळ आहेत की, आणि नवीन जहाजे बांधण्याचे इंग्लंडचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की, वरील नुकसान इष्ट हेतूपासून इंग्लंडला ढळविण्यास बिलकुल पुरेसे नाही. तथापि १९१७ सालभर हा जर्मन प्लेग जर सांप्रतच्या जोराने चालू राहिला तर १९१८ साली इंग्लंडच्या राजकारस्थानावर व इंग्लंडच्या शक्तीवर त्याचा बराच परिणाम झाल्यावांचून राहाणार नाही. इंग्लंडच्या व्यापारी जहाजांना इंग्लंडला अन्नसामग्री व युद्ध सामग्री पुरविण्याचे तेवढें काम करावे लागत नसून हिंदुस्थान, पूर्व आफ्रिका, मेसापोटेमिया, इजिप्त, सलिनोका, इटली व फ्रान्स येथील रणभूम्यांकडे सैन्याची नेआण करण्याचे काम करावे लागते; रशिया, फ्रान्स व इटली या तीन राष्ट्रांना युद्धसामग्री पोचवावी लागते आणि फ्रान्स, इटली या दोन देशांना कोळ शाचा पुरवठा करावा लागतो. शिवाय स्वतःच्या देशांत युद्धसामग्री तयार करण्यास लागणारा कच्चा माल परदेशांतून आणावा लागतो. म्हणजे युद्धविषयक बाबीशिवाय इतर गोष्टीकरितां लागणारे जिन्नस परदेशाहून इंग्लडांत आणण्याम व इंग्लंडच्या कारखान्यांतून तयार होणारे युद्धोपयोगी नव्हे तर संमारोपयोगी जिन्नस परदेशास पोचवून इंग्लंडची व्यापारी श्रीमंती खालावून देण्यास लागणारी व्यापारी जहाजें इग्लडपाशी पुरेशी नाहीत. इतक्या दिवस नार्वे, डेन्मार्क, हालड, स्पेन व अमेरिका या देशांच्या व्यापारी जहाजांचा इंग्लंडास बराच उपयोग होत होता. पण फेब्रुवारीमध्ये जर्मनीच्या प्लेगाला भिऊन वरील देशांतील व्यापारी जहाजांनी इंग्लंडशी व्यापारी दळणवळण ठेवण्याचे बऱ्याच अंशी नाकारिलें आहे. जर्मनीटों युद्ध पुकारण्याचा विचार अद्याप अमेरिकेचा चालूच आहे, व आणखी एक दोन महिने या विचाराचें घोंगडे तसेंच भिजत पडेल असा अंदाज आहे. म्हणजे जर्मन प्लेगचा प्रत्यक्ष परिणाम जरी इंग्रजी व्यापारी जहाजांच्या संख्येवर विशेषमा होण्याचा संभव नाही, तरी अप्रत्यक्ष रीतीने म्ह गजे तटस्थ राष्ट्राशी अमलेला व्यापारी संबंध तुटत चालल्यामुळे हा प्लेग इंग्लंडास जाचक होऊ पहात आहे. हे संकट मि. लाईड जॉर्ज यांच्या प्रधानमंडळाने पूर्णपणे ओळखले असून त्याचा प्रतिकार करण्याच्या सर्व योजनांची सुरवात फेब्रुवारी महिन्यापासूनच करण्यात पहिले महायुद्ध नव्हे, तर खुद्ध आली आहे. सर्व व्यापारी जहाजांवर तोफा ठेवून लष्करी शक्तीने त्यांना इना. क्युलेट करण्यात येणार आहे. संसाराला अत्यंत आवश्यक तेवढयाच वस्तू इंग्लंडांत येऊ द्यावयाच्या व बाकीच्या अनवश्यक वस्तूंची ने आणच व्यापारी जहाजांनी करावयाची नाही असे ठरविण्यांत आले आहे. शिवाय इंग्लंडमध्ये अधिक धान्य पिकविण्याची व्यवस्था घालण्यात आली असून प्रत्येक मनुष्याने किती अन्न रोज खावे याचेहि निबंध करण्यांत येत आहेत. म्हणजे जर्मनीतील लोकांप्रमाणे इंग्लं- डांतीलहि लोकांचा संसार अंशतः तरी कष्टाचा होऊ पहात आहे. ह्या हालअपेष्टेच्या स्थितीने इंग्लंड, फ्रान्स व इटली या तीन राष्ट्रांनाच तेवढे घेरलें आहे असे रशियांत धान्याची समृद्धि शेतांतून व खेड्यापाड्यांतून दृष्टीस पडत असतांहि आगगाड्यांना लष्करी कामाला वाहून नेणें भाग पडल्यामुळे शहरांतून फार महागाई झाली आहे, हॉलंड, स्पेनसारख्या तटस्थ देशांतहि महागाईने उग्र स्वरूप धारण केले असून महायुद्धांत न पडतांहि तेथील लोकांचा संसार कष्टाचा झाला आहे. इंग्रजी आरमाराने जर्मन राष्ट्राचा केलेला कोंडमारा आणि जर्मनीने पाणबुडया बोटींचा केलेला अनियंत्रित फैलाव, या दोन कारणामुळे सर्व युरोपखंडभर मित्रामित्र व तटस्थ सर्व लोकांचे संसार दुःखाचे झाले आहेत. या दुःखी संसारांतील बायकामुलांच्या शिव्याशापांचे ओझे डोक्या- वर घेऊन १९१८ सालीहि महायुद्ध तसेंच जोराने चालू ठेवण्यास कोणताहि मुत्सद्दी धजणार नाही. अर्थात् १९१७ सालींच महायुद्धाचा निकाल लावून घेणे सर्व युरोपखंडाला भाग आहे. या दृष्टीने विचार केला असतां, एप्रिल, मे महिन्या- पासून इंग्लंड, फ्रान्स व इटली हे तीन देश आस्ट्रो-जर्मनांवर तुटून पडण्याची शिकस्त करूं लागतील आणि यांच्या या पहिल्या धडकीतून निभावल्यानंतर जर्मनी. फालतुक सैन्य उरल्यास इटलीकडे किंवा रशियाकडे मोर्चा फिरवील असे अनुमान काढणे भाग पडते.
महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा मार्च-एप्रिल महिना रशियांतील राज्यक्रांति मार्च महित्यांतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रशियांतील राज्यक्रांति होय. मार्चचे पहिल्या आठवड्यांत रशियाची राजधानी पेट्रोग्राड येथे मोठी महागाई झाली व अन्नाकरितां लोक रस्त्यांतून फिरून लुटालुटीस प्रारंभ झाला. उप शी मरणाऱ्या लोकांच्या थव्यावर सरकारने पोलिस सोडले; निघण पोलिसने लोकांवर बंदुका झाडल्या; व शेंकडों लोक मृत्यमुखी पडले. घरीं खायला काही नाही, घरी परत जावें तर उपाशी मरण्याची पाळी, तेव्हां उपासमारीच्या मृत्यूपेक्षां गळी. बाराचा मृत्यु बरा असे लोकांना साहजिक वाटले. लोकांनी सर्व रस्ते आडवून धरले. पोलिसच्या गोळीबाराने रस्त्यांतील दगेधोपे कमी होईनात. याच सुमारास रशियाची उपमासमा पेट्रोग्राड येथे भरावयाची होती. ड्यूमासभेकरितां जमलेल्या प्रतिनिधीनी खवळलेल्या लोकांचे नायकत्व आपल्याकडे घेतले, व राजधानी स्वतःच्या ताब्यात घेण्याची पद्धतशीर खटपट सुरू झाली. झारसाहेबांनी ड्यूमासभा भरूं न देण्याचा हुकुम सोडला. या हुकमास धाब्यावर बसवून ड्यूमासभा भरली व ड्यूमासभेने सर्व सत्ता आपल्या हाती आल्याचे जाहीर केले. पोलिसच अत्याचार सुरूच होते; पण रशियांतील लोकांच्या सुदैवाने प्रत्येक पोल सच्या जवळ असलेली काडतुसांची संख्या अगदी थोडी असल्यामुळे पोलीसला लोकांचे स्वन फारसे व रतां आले नाहीत. याप्रसंगी अमानुष निर्दयतेच्य’ व निर्लज्ज अत्याचारांच्या कसोटीस पोलीस उतरले खरे; पण अखेरीस निर्बल ठरले. लोकांनी पोलीमला खरपूस मार दिला; त्यांच्या कचेऱ्या, त्यांचे कागदपत्र, व त्यांची घरेंदारे जाळली; व सर्व कैद. स्त्राने बुले करून राजकीय कैद्याना एकदम मोकळे केले. अशाप्रकारे पेट्रोग्राड शहरावर ड्यूमा सभेची सत्ता बसत चालली आहे असं पाहून झारसाहेबांनी आपल्या विश्वासांतले निवडक वीस हजार सैन्य पेट्रोग्राड शहरावर पाठविले. हे सैन्य पेट्रोग्राड शहरांत येण्याबरोबर लोकांनी त्यांच्यापुढे गुडघे टेकले, आणि विनति केली की, 'देशोद्धार करूं पाहणाऱ्या देशबांधवांना तुम्ही पाहिजे तर तारा किंवा पाहिजे तर मारा.' लष्करी लोक सामान्यतः उदार मनाचे असतात. पोलीसनी स्वीकारलेल्या हलकट वृत्तीचा मार्ग त्यानी स्वीकारला नाही. झारच्या विश्वासांतल्या ९ पहिले महायुद्ध सदर लष्करने लोकांना अभिवचन दिले व लगेच ड्यूमासभेकडे जाऊन ड्यूमा. सभेची सत्ता कबूल केली. ड्यूमा सभेच्या आशेने राजवाड्यावरील बादशाही निशाण खाली पाडण्यात आले व पेट्रोग्राड शहरभर चोहोंकडे ड्यूमासभेचे निशाण फडकू लागले ! पूर्वीचे प्रधानमंडळ ड्यूमा सभेनें कैद केलें व ड्यूमा सभेतील पुढान्यांच्या नव्या प्रधानभंडळाची नेमणूक करण्यांत आली. ठिकठिकाणच्या प्रमुख सेनापतीनी व रशियांतील मोठमोठया शहरांनी या राजक्रांतीस आपली संमति असल्याचे कळविले. इतक्या थराला गोष्ट गेल्यावर झारसाहेबांनी आपला बाद- शाही हक्क सोडून दिल्याचा लेख ड्यूमासभेस लिहन दिला. सांप्रत रशियाची राज- सत्ता ड्यूमासभेच्या प्रधानमंडळाच्या हाती आहे. या प्रधानमडळाने असे जाहीर केले आहे की, परराष्ट्राशी पूर्वीच्या सरकारने केलेले सर्व करारमदार नव्या रशिया- कडून एकनिष्ठपणे पाळण्यात येतील व सांप्रतच्या महायुद्धांत यश संपादण्याकरितां लढण्याच्या कामी कोणाचीहि कसूर नव्या रशियाकडून होणार नाही. महायुद्धांत यश संपादन करण्याचा हा निश्चय प्रसिद्ध केल्यानंतर नव्या रशियाचा कार्यक्रम म्हणून खालील गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. (१) रशियांतील प्रत्येक मनुष्यास मत देण्याचा अधिकार असला पाहिजे ह्या तत्त्वास अनुसरून ड्युमासभा लवकरच मोटी लोकसभा बोलावणार असून, रशियांतील राज्यसत्तेचे स्वरूप ह्या लोकसभे- कदन ठरविण्यात येणार आहे. असे जरी असले तरी रशियांत रिपब्लीकच स्थापण्यांत येईल असें ठरल्यासारखेच आहे. ह्या ठरावास अनुसरून रशियांतील पूर्वीच्या राजघराण्यांतील सर्व संबंधी स्त्रीपुरुषाना नजरकैदेत ठेवण्याचा क्रम सुरू झाला आहे. ( २ ) अमीर उमराव, सरदार, तैनातदार व इनामदार वगैरे पूर्वीच्या सर्व हक्कदारांचे जमीन जुमले काढून घेऊन सामान्य लोकांना ते वाटून देण्यांत येणार आहेत. ( ३ ) रशियांतील धार्मिक व इतर निर्बध काढून टाकण्यात येऊन स्त्रियां- नाहि मुख्य प्रधान होण्यापर्यंतचे पुरुषांचे सर्व हक्क पूर्णत्वाने देण्यात येणार आहेत. रशियांतील ही राज्यक्रांति फारच अल्पकाळांत, फार थोडे मानवी रक्त सांडले जाऊन, व अतिशय शांततेने घडून आली. या विलक्षण राज्यक्रांतीचे परिणाम सर्व देशांतील व सर्व स्थितींतील लोकांच्या आचारविचारांवर फारच विलक्षण झाल्यावांचून रहाणार नाहीत हे उघड आहे. रशियन राज्यक्रांतीचे हे व्यापक स्वरूप एका बाजूस ठेवून महायुद्धांतील दोस्त सरकारांच्या व जर्मन संघाच्या मार्च-एप्रिल महिना लष्करी धोरणावर व लष्करी डावाचावर ह्या राज्यक्रांतीचे कोणते परिणाम होतील याचा आपण विचार करूं, युरोपांतील लष्करी परिस्थितीचा विचार करतांना रशियांतील राज्यक्रांतीमुळे रशियाचे लष्करी सामर्थ्य वाढले किंवा कसे, या मुद्याचा प्रथम विचार केला पाहिजे. रशियन लोकांमध्ये नव्या रशियन सरकारची इभ्रत जुन्या सरकाराहून अधिक वाढली आहे यांत संशय नाही. नवें सरकार म्हणजे सामान्य जनसमूहाचा आत्माच होय. अर्थात ह्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे जनसमूह पाहिजे तसा डोलणार, हलणार, व लढणार हे उघड आहे. म्हणजे सैनि- कांच्या संख्येच्या दृष्टीने विचार केला असतां नवें सरकार अधिक सामर्थ्यवान ठरते. पण सैन्याची संख्या म्हणजे लष्करी सामर्थ्य नव्हे. मोठया संख्येचें सैन्य लष्करी दृश्या समर्थ व्हावयाला त्या सैन्याला दारूगोळयाचा व तोफांचा मुबलक पुरवठा पाहिजे; तरबेज सेनानायकांचे धुरीणत्व पाहिजे; व शत्रूशी निकराने झुझण्यास लागणारी मनाची हौस पाहिजे. या तीन गोष्टींवर राज्यक्रातीचा कस- कसा परिणाम होईल, याचा आपण आतां विचार करूं. नवीन सरकाराम दारू. गोळयाचा व तोफाचा मुबलक पुरवठा करता येईल काय ? पूर्वीच्या सरकारच्या कृतीशी तुलना केली असतां नवं सरकार आणखी चार सहा महिने तरी थोडेसे कमकुवत रहाणार अशी चिन्हें दिसत आहेत. याचे कारण जुन्या सरकारच्या अखे- रच्या महिन्या दोन महिन्यांत रशियांतील आगगाड्यांच्या कारभारांत पुग गोंधळ उडून गेला होता, हे होय. रुमानियाच्या पराभवामुळे रशियाचे दक्षिण लष्कर सेना- पति हिंडेनबुर्ग गुण्डाळून फेंकून देतात की काय अशी भीति न्यावेळी वाटू लागली होती. त्या भीतीचे निराकरण करण्याकरितां रशियन सरकारने ऐन थंडीचे दिव सांत फार तांतडीने सामानसुमान व सैन्य रुमानियाच्या बाजूला ढकलत नेले होते. रशियाच्या आगगाड्यांचे बल या कामी इतकं खर्च झाले की, त्याच्यांतील व्यव- स्थितपणा अगदी नष्ट झाला. रुमानियन पराभवामुळे आगगाडयाच तेवढया दमांत उखडल्या असे नव्हे, तर राजमंडळाच्या कर्तृत्वावरील लाकगचा विश्वास उडाला व राजमंडळहि महायुद्ध चालविण्यासंबंधाने डळमळीत विचाराचे दिसू लागले. आपल्या सेनेचा दोनदा मोठा पराभव झाला, यापुढें युद्ध चालविण्यांन असें म्हणणारा राजमंडळांतील पक्ष जोरावला व हलके हलके बादशहा तहास अनुकुल होऊ लागले. राजमंडळाच्या ह्या मानमिक स्थितीमुळे हित नाही, पहिले महायुद्ध . नवीन तयारीकडे दुर्लक्ष झाले; अव्यवस्थेची व्यवस्था लावण्याकडे कोणी लक्ष देईना; इतकेच नव्हे, तर अव्यवस्थेमुळे लोकांनी दंगेधोपे केल्यास त्या दंग्या- घोप्याचे निमित्त करून, आम्ही दमांत उखडलो आहोत. आतां तह करण्याशिवाय आम्हांस गत्यंतर नाही, असें उजळ माथ्याने इंग्लंडला कळविण्याची संधि केव्हां मिळते म्हणून जुनें रशियन राजमंडळ वाट पहात बसलें ! डिसेंबर-जानेवारीमध्ये जर्मनीने सुरू केलेलें तहाचे बोलणे झारच्या राजमंडळाने आनंदाने मान्य केलें असते; पण इंग्लंडचे नवे मुख्य प्रधान मि. लाईड जॉर्ज यांच्या निश्चयी व करारी तडफेने केलेली इंग्लंडची प्रचंड तयारी पाहून आम्ही दमांत उखडलों म्हणून कबूल करण्याची झारच्या राजमंडळाला लाजच वाटली! लोकांच्या दंग्याधोप्याच्या निमि त्ताची ते वाटच पहात होते. ही संधि त्यांना मिळाली; पण रशियाच्या सुदैवाने सारच्या निवृण पोलिसला हा दंगा मोडतां न येऊन दंग्याधोप्यामुळे महायुद्धाची परिसमाप्ति न होतां झारच्या बादशाही अंमलाचीच परिसमाप्ति झाली ! नवें रशियन सरकार अस्तित्वात आले त्यावेळी जुनें रशियन सरकार दर्मात उखडले होते, आणि एकदाचा तह झाला म्हणजे सुटलों असे प्रसिद्ध कर- णारे शब्द त्या सरकारच्या जिभेच्या शेंड्यावर आले होते. झारचे राजमंडळ दमांत उखडले म्हणजे काय? आस्ट्रो-जर्मनांबद्दल त्यांच्या मनांत स्नेह उत्पन्न झाला होता, असा त्याचा अर्थ नाहीं; आस्ट्रो-जर्मनांविषयींचा द्वेष कमी झाला नव्हता; कान्स्टान्टिनोपल घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा कमी झाली नव्हती; आणि युरोपांतील आपल्या महतीच्या आड आस्ट्रो-जर्मन्स येत आहेल हे त्यांच्या मनांतील शल्य पूर्वीच्या इतकेंच त्यांच्या मनाला टोचत होते. अँग्लो-फ्रेंचांनी भलताच आपल्या मनाचा ग्रह करून दिला व त्यामुळे आम्ही फसलों, अशी वृत्ति झारच्या राजमंड- ळांत उत्पन्न झालेली नव्हती. दोस्त-सरकाराच्या ध्येयांतील सत्यतेवर त्यांचा पूर्ण भरंवसा होता. मग ते दमांत उखडले होते म्हणजे काय ? आपला सत्पक्ष असला तरी तो निर्बल आहे, असे त्यांच्या अनुभवास येऊ लागले होते. जबरदस्तापुढे सत्पक्षासहि वारंवार मान वांकवावी लागते, अशांतलाच हा प्रसंग दोस्त सरकारवर येऊ पहात आहे, तेव्हां 'सर्वनाशे समुत्पन्ने अर्ध त्यजति पंडितः' या न्यायाने कसला बसला तह करण्याच्या विचारांत ते होते. स्वतःचा सत्पक्ष आहे अशी त्यांच्या मनाची पूर्ण खात्री असल्यामुळेच भिडू जर जोराने लढतो म्हणतो आहे .
मार्च-एप्रिल महिना तर आपण नको कसे म्हणावे असे त्यांना वाटत होते. आपल्या पक्षाच्या सत्यते- विषयींचा मनाचा जोर 'तह करा' हे शब्द उच्चारू देत नव्हता, तर निर्बलतेचा येत चाललेला अनुभव वरील अपमानास्पद शब्द उच्चारण्यास जिभेची उठावणी करीत होता. म्हणजे पूर्वीच्या राजमंडळाच्या विचाराने रशियावर निर्बलतेचा छाप मारलेला होता. हे लांछन धुवून टाकण्यास नवें सरकार कितपत समर्थ आहे ? झारचे राजमंडळ घागेरड्या विलासांत व पूर्ण अनीतीच्या चैनीत लोळणारे अस- ल्यामुळे रोमानियाच्या पराभवाबरोबर ते दमांत उखडलें. अनीतींत पुरे बुडलेले लोक अधिकारावरून दूर झाले. दुर्जनांच्या हातची सत्ता सज्जनांच्या हाती गेली. अर्थात दोनचार चपराकीसरशी उत्पन्न झालेली मनाची दुर्बलता नष्ट झाली. नवीन सज्जन मनाने खंबीर खरे; पण जुन्या घाणीचे ते शत्र असल्यामुळे लष्करी सामर्थ्य उत्पन्न करण्याबरोबरच जुनी घाण उपसून नष्ट करण्याचा बोजा त्यांच्या शिरावर पडलेला आहे. हे दुप्पट काम त्यांच्याने कितपत रेटते याविषयी त्यांची मित्रमंड. ळीहि साशंक राहाणे अनुचित नव्हे. जुनी घाण रशियांत कोठकोठे दडून बसली असेल याचा पत्ता नाही. असली घाण उपसून काढून देश स्वच्छ करावयाला एक दोन पिढया सहज लागतात. ही भाण जाचक व रोगोत्पादक न होण्याइतकी कमी करण्यास निदान दोन तीन वर्षे सहज पाहिजेत. रशियांतील मोठमोठे लष्करी अंमलदार ह्या घाणीच्या अंमलाने धुद झालेल्या वातावरणात वाढलेले, ह्या सर्वांना दूर करून त्यांच्या जागी नवीन लष्करी अधिकारी निर्माण करण्यास दोन चार महिने तरी सहज लागणार. लष्करचा अधिकारी वर्ग बिनजुटीचा; लष्करावर पूर्वीच्या सरकारने दमांत उखडल्याचा छाप मारलेला; नव्या सरकारला लष्करच्या सुधारणेबरोबरच अंतस्थ स्वच्छतेकडे लक्ष देणे भाग पडलेलें; ही परिस्थिति लक्षांत घेतां रणांगणावरील लढण्याच्या दृष्टीने नवें सरकार जुन्या सरकाराहून १९१७ साली अधिक सुदृढ होईल असे म्हणता येत नाही. शिवाय सज्जनपणा व देशा. भिमान यामुळे उत्पन्न होणाऱ्या बलाला नव्या रशियाने एक प्रकारचा आळा घालन घेतला आहे. नव्या रशियाने असे जाहीर केले आहे की, स्वतःच्या देशा. बाहेरच्या भूमीचा अभिलाष नव्या रशियास बिलकूल नाही. पोलंडची जशी इच्छा असेल तशा पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र्य पोलंडला देण्याचाहि नव्या रशियाचा इरादा आहे. रशियाला जर तुर्कोची भूमि नको, जर तुर्कोच्या कान्स्टांटिनोपलवर रशियाचा १ पहिले महायुद्ध डोळा नाही, तुर्कोचा आमिनिया प्रांत खिशांत टाकून उत्तर इराणवर सत्ता चालवि- ण्याची जर महत्त्वाकांक्षा रशियाला नाही, आणि पोलंडचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्याने जर नव्या रशियास आनंद पाटणार आहे, तर रशियाने लढावयाचे तरी कशासाठी ? रशियाच्या अंतिम ध्ययासंबंधाच्या सदर पत्रकाने लढण्यांतील हेतूच नष्ट झाला आहे. रशियाने यापुढे लढावयाचे म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे ! गेली दोनशे वर्षे रशियाने तुर्काच्या कान्स्टांटिनोपलवर डोळा ठेवला; या महायुद्धांत रशियास कान्स्टांटिनोपल घेऊन देऊ असें अभिवचन इंग्लंडने रशियास दिले. असा पूर्व इतिहास असतांहि नव्या रशियाने जुन्या रशियाच्या महत्त्वाकांक्षेचे ध्येय एक जाहीरनामा काढून फेकून दिलें ! अर्थात् नव्या रशियाची लढण्याची हौस तितकी जाज्वल्य नाही, असेंच एक तन्हेनें सर्व जगाला कळविण्यात आले. मोठमोठया जमीनदारांच्या इस्टेटीव जमिनी सामान्य जनसमूहांत वाटून द्यावयाच्या अपाहि एक भाग नव्या रशियाच्या कार्यक्रमांत आहे. आपल्या सरकाराला शत्रचा मुलूख घ्यावयाचा नाहीं; आणि स्वतःच्या देशांत जमिनींची व इस्टेटींची नवीन वाटणी व्हावयाची आहे, इतके कळल्यावर रणांगणावरील कोणचा सामान्य सैनिक शेताभाताच्या वाटणीच्या वेळी स्वत:च्या घरी हजर राहाण्यास आतुर होणार नाही ? रशियांतील नव्या सरकारचा कार्यक्रम सामान्य सैनिकांची लढण्याची हौस मारणारा आहे. एकाच गोष्टीसाठी ते उत्सुकतेने लढतील ती गोष्ट म्हणजे नव्या सरकारची स्थिरस्थापना होय. नव्या सरकारास अडथळा करणारा शत्रू आहे, असे त्यांच्या मनाने घेतल्यास रशियांतील सैनिक जिवावर उदार होऊन लढतील. नव्या रशियाच्या लष्करी मनाची ही स्थिति ओळखून कावेबाज आस्ट्रो-जर्मन सरकारने मार्च महिन्याच्या अखेरीस नव्या रशियाबद्दल फार प्रेम व्यक्त केले, आणि झारची बादशाही सत्ता रशियांत पुन्हां प्रस्थापित करण्याची खटपट आस्ट्रो-जर्मनांकडून होणार नाही, असें नव्या रशियास त्याने अभिवचन दिले. रशियाचे आम्हास काही ध्यावयाचे नाही व रशियास आमचे काही घ्यावयाचें नाहीं; तेव्हां दोघांमध्ये लढण्यास काही कारणच उरले नाही, अशा स्थितीत इतर देशाचीहि मानहानि न होईल असला तह करण्यास आपण तयार आहों; असें आस्ट्रो-जर्मन सरकारने जाहीर करून ह्या पुढची तहाची भाषा बोलण्यास रशियाने पुढे यावे असे सुचविलें आहे. इंग्लंड व फ्रान्स यांच्या संमतिशिवाय तहाची भाषा बोलण्यास नवा रशिया मार्च-एप्रिल महिना - पुढे येईल काय ? नव्या रशियास अंतस्थ शत्रू आगखी कितीएक वर्षे फार रहाणार हे उघड आहे. तेव्हां इंग्लंड व फ्रान्स यांना धोक्यात घालून केवळ स्वतःच्या स्वास्थ्याकरितां नव्या रशियानें तह केला, ही बदनामी नव्या रशियामा टिकाऊ- पणास कमीपणा आणणारी झाल्यावांचून रहाणार नाही. म्हणजे सगळ्यांचा मिळून सह झाल्यास नवा रशिया तहास तयार होईल, आणि जर्मनीच्या तहाच्या अटी इंग्रजांना व फ्रेंचांना मान्य न झाल्यास एकटयाचा स्वतंत्र तह नवा रशिया आस्ट्रो-जर्मनाशी करणार नाही. स्वतःस लढण्याची मोठीशी हौस नाही आणि शस्त्र खाली ठेवणे स्नेह्यांना अपायकारक, अशी लष्करी स्थिति सांप्रत नव्या रशियांत दृष्टीस पडते. म्हणजे १९१७ साली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आस्ट्रो- जर्मनांवर चाल करून जाण्याचे बल रशियाच्या अंगी दिसणार नाही, पण आस्ट्रो-जर्मनांनी जर पेट्रोग्राडवरच चाल केली, किंवा बादशाही सत्ता रशियांत स्थापू पाहणा-या रशियांतील देशद्रोह्यांना मदत होईल,असली जर लष्करी हालचाल आस्ट्रो-जर्मनांनी केली, तर सर्व रशियन राष्ट्र जिवावर उदार होऊन आट्रो- जर्मनांची खोड मोडल्यावांचून राहाणार नाही. वरील प्रसंगाशिवाय इतर प्रसंगी नवें रशियन सरकार, रशियाचे सैनिक, व सामान्य जनसमूह लढण्यापेक्षां अंतस्थ नव्या रचनेकडे अधिक लक्ष देणार हे उघड आहे. अमेरिकेचा युद्धांत प्रवेश महायुद्धांतील लष्करी हालचालींच्या दृष्टीने रशियांतील राज्यक्रांतीच्याइतकीच महत्त्वाची दुसरी एक गोष्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यांत घडून आली आहे. ती गोष्ट म्हणजे अमेरिकेने एप्रिल ता. ५ रोजी जर्मनीशी लढाई पुकारिली ही होय. ही लढाई का केली पाहिजे, यासंबंधाने प्रेसिडेंट विल्सन यानी अमेरिकेच्या काँग्रे- सला कळविलेला संदेश फार महत्त्वाचा आहे. फाजील विजयेच्छेने अमेरिका लढा- ईत पडली नाही, कोणाच्या भूमीचा अपहार करण्याची बुद्धि अमेरिकेला शिवली नाही, आणि महायुद्धांत जय मिळविल्यानंतरहि लढाईच्या खर्चाकरितां म्हणून किंवा इतर कारणाकरितां म्हणून जर्मनीपासून खंडणी उकळण्याचा लोभ अमेरिकेला बिलकूल नाही. जर्मनी निणतेनें व अन्यायाने शांतताप्रिय लोकांचे हक पाया- खाली तुडवीत आहे आणि व्यापारी जहाजे बुडविण्याची चांचेगिरी जर्मः नीने सुरू केली आहे. असल्या कुमार्गापासून जर्मनीला परावृत्त करण्याच्या सोवळ्या व सात्विक इच्छेने अमेरिकेने हातांत तरवार धरली आहे.
७२ पहिले महायुद्ध गुप्त बेत करून कुमार्गाच्या मार्गाने अवचित जाऊन सज्जनांना खड्यांत पाडण्याची दुष्ट कारस्थाने एकमुखी राजसत्तेला सफल करता येतात व त्यामुळे मानव जातीवर आजपर्यंत भयंकर संकटपरंपरा ओढवली आहे. असली एकमुखी राजसत्ता संपुष्टांत आणून विमल अंत:करणाने व सात्त्विक बुद्धीने उजेडांत बसून राज्यकारभार पाहणारा लोकांचा खुला दरबार अरेरावी राजांच्या सिंहासनांच्या जागी स्थापिल्याशिवाय सामान्य जनतेस सुखशांति मिळणार नाही, असे प्रेसिडेंट विल्सन यांचे मत आहे. ही उच्च ध्येये अमलात आणण्याकरितां त्या ध्येयाची जोपासना करणाऱ्या इंग्लंड-फ्रान्स व रशिया येथील बहुजन समाजांनी चालविलेल्या महायुद्धांत पूर्णपणे पडून सत्पशास निर्लोभपणे अमेरिकेने उचलून धरले पाहिजे, असे काँग्रेसला त्यांनी कळविले आणि लढाई पुकारण्याची व लढाईकरितां दहा लाख नवें सैन्य उभारून हरएक प्रकारे दोस्त सरकारांना मदत करण्याची परवानगी प्रेसिडेंट विल्सन यांनी काँग्रेसपाशी मागितली. ही परवानगी ता. ५ एप्रिल रोजी काँग्रेसने दिली. लगेच अमेरिकेने जर्मनीशी युद्ध पुकारले. दोस्त सरकारांचा उज्वल माथा प्रे. विल्सन यांनी अधिक देदीप्यमान केला व त्यामुळे दोस्त सरकारांच्या सर्व प्रजाजनांत आनंदोत्सव झाला. फ्रान्सचे प्रेसिडेंट, इंग्लंडचे सांप्रतचे व माजी मुख्य प्रधान या सर्वांनी प्रे. विल्सन यांच्या भाषणाचे धन्यवाद गाऊन अमेरिकेचें अभिनंदन केले. इंग्लंड, फ्रान्स व रशिया येथील वतमानपत्रांनी प्रे. विल्सन यांचे भाषण म्हणजे युरोपांतील बहुजनसमाजास नवी मिळालेली स्वातंत्र्याची सनदच होय, असे आनंदोद्गार काढले; व आस्ट्रिया आणि जर्मनी येथील बादशाही तक्तें लयाला जाऊन आस्ट्रो-जर्मनांना राष्ट्रमुखी सत्तेची सुखें चाखावयास मिळण्यां- तच सांप्रतच्या महायद्धाचे पर्यवसान होणार अशी गोड भविष्य वर्तविली. रशियांतील राज्यक्रांतीस अमेरिकेने स्वतःच्या कृतीने दुजोरा दिला असून सांप्रतचे महायुद्ध म्हणजे एकमुखी राजसत्ता व राष्ट्रमुखी राजसत्ता यांमधील झगडाच होय असे सर्व जगाच्या निदर्शनास आतां आले आहे. अमेरिका लढाईत सामील झाल्गने इंग्लंड, फ्रान्स, इटली व रशिया या चारहि राष्ट्रांत नवीन जोम उत्पन्न झाला आहे. महायुद्धांत आपले कसे काय होतें या विचाराने अंतःकरणावर पडलेले दडपण आतां दूर झाले असून सर्वांच्या मनाला हलके वाटू लागले आहे. ह्या सुस्थितीचा परिणाम रणभूमीवरील लष्करी हालचालीवर कसा होण्याचा संभव आहे याचा आतां आपण विचार करूं.
मार्च-एप्रिल महिना ७३ अमेरिका दहा लाखांचे नवें सैन्य उभारणार आहे हे खरें, पण आज अमेरिकेगी सैन्य नाही. महिना दोन महिन्यांत दहा वीस हजारच काय तें सैन्य फ्रान्समध्ये पाठवून अमेरिका आपले निशाण युरोपच्या रणभूमीवर फडकवणार आहे. युरोपांतील सर्व रणभूम्यांची सांप्रतची स्थिति अशी आहे की, दहा वीस हजार सैन्य म्हणजे 'शाकाय वा लवणाय वा' असेंच मानले जाईल. प्रत्यक्ष रणभूमीवर या मिठाचा उपयोग १९१७ साली अगदी अल्प होणारा असला तरी अमेरिकेचे मीठ इंग्लंड व फ्रान्स यांच्या लष्करांतील अळणी- पणा दूर करण्यास पुरेसें झाल्यावांचून रहाणार नाही. इंग्लंड व फ्रान्स यांची अडचण आतां दूर झाली. अमेरिकेची अवाढव्य संपत्ति दोस्त सरकारांच्या सेवेस दासी म्हणून हजर रहाणार; अमेरिकेतील प्रचंड कारखाने दोस्त सरकारांना दारू गोळ्याचा पुरवठा अव्याहत करणार; आणि अमेरिकेची व्यापारी जहाजे अमेरिकेच्या आरमाराच्या संरक्षणाने जर्मन पाणबुड्या बोटींच्या प्लेगाला हरताळ फासणार. पाणबुड्या बोटींच्या प्लेगामुळे १९१७ सालापुढे महायुद्ध सुरू ठेवणे इंग्लंडला कठीण गेलें असते; पण आतां १९१८-१९ साली काय पण १९२० सालीहि महायुद्ध सुरू राहिले तरी मुख्य प्रधान मि. लाईड जार्ज यांच्या रोजच्या झोपेत युद्धाच्या काळजीने यत्किंचिहि बिघाड होण्याचा संभव नाही. अमेरिका जर लढ ईत पडली नसती तर १९१७ सालींच फ्रान्सच्या रणभूमीत मोठा विजय संपादून महायुद्धाची परिसमाप्ति करून घेणे इंग्लंडास भाग होते. कायद्याच्या कोर्टात खटला लढण्याकरिता दोन पक्ष न्यायाधिशापुढे उभे राहिले असतांना कायद्याप्रमाणे कोणत्या तरी एका पक्षावर पुराव्याचा बोजा पडत असतो. ज्या पक्षावर हा बोजा पडतो त्या पक्षाने पुरावा देऊन आपली बाजू जर सिद्ध केली नाही तर विरुद्ध रक्षास कांहींएक न करितां आपोआप जय मिळतो. हाच न्याय रणभूमीलाहि लागू आहे. रणभूमीवर एकमेकासमोर दोन दलें लढण्याकरितां उभी ठाकली असतांना सभों- वारची परिस्थिति अशी बनते की, दोन पक्षांपैकी एका पक्षावर दुसऱ्याच्या अंगावर चाल करून जाण्याचा बोजा पडतो. परिस्थितीने हा बोजा ज्या पक्षावर टाकला असेल त्या पक्षाने विरुद्ध पक्षाची हाडे जर मऊ केली नाही तर विरुद्ध पक्षाच्या गळयांत विजयश्री माळ घालते. रशियांतील राज्यक्रांतीमुळे रशिया एक प्रकाराने दमांत उखडलेला, सहिया व रुमानिया यांना गिळंकृत करून आस्ट्रो-जर्मन पहिले महायुद्ध. कृतकार्य झालेले, आणि पाणबुड्यांचा प्लेग सुरू करून १९१८-१९ सालचा इंग्लंडचा जोम आंतून पोखरण्यास सुरुवात झालेली, या परिस्थितीने १९१७ साली फ्रान्सच्या रणभूमीत आस्ट्रो जर्मनांवर चाल करून जाऊन त्यांची हाडे मोड- ण्याचा बोजा अँग्लो-फ्रेंचावर टाकला होता; पण अमेरिका महायुद्धांत सामील झाल्याने १९१७ सालींच जर्मनीची हाडे फ्रान्सच्या रणभूमीत मोडली पाहिजेत नाही तर दोस्त सरकारांना अपजय येईल, अशी परिस्थिति आतां उरलेली नाही. अमेरिकेने रशियाचा लुलेपणा कमी केला आहे; पाणबुड्या बोटींच्या प्लेगाची भीति आणखी तीन चार वर्षे बाळगण्याचे कारण उरलें नाहीं; आणि १९१८-१९ साली दहा पंधरा लाप नव्या रक्ताच्या व नव्या जोमाच्या जवानांची मदत अमेरिकेहून होणार आहे. ही मदत येऊन पोहोचण्यापूर्वी खात्रीने जय मिळणार असें पके वाटल्याशिवाय इंग्लंडने तरी १९१७ सालींच सोक्षमोक्षाची लढाई कां लढावी १ १९१८ सालच्या वसंतकाळापर्यंत वाट बघण्यास आतां इंग्लंडास हरकत नाही. म्हणजे अंगावर करून जाऊन लढण्याचा बोजा अमेरिकेने इंग्लंडच्या डोक्यावरून उचलून जर्मनीच्या डोक्यावर ठेवला आहे. रणांगणावरील हालचाली सबंध मार्च महिना अँग्लो-फ्रेंच सेनेपुढे पश्चिम रणभूमीत आरासपासून ऐन नदीपर्यंत जर्मनी मागे हटत होता. कोठे पांच मैल, कोठे सात मैल तर कोठे १२ मैल अशा प्रमाणाने जर्मनी मागे हटला. मागे हटतांना जर्मनीने सर्व देश उध्वस्त केला. झाडे मोडली, घरादारांचे मैदान केलें, व सर्व पत्यावर तृणाची काडीहि ठेविली नाही; तरुण स्त्री-पुरुषांना धरून नेले, आणि म्हातारे कोतारे व लहान मुले यांच्याजवळ पांच-सात दिवसांची अन्नसामग्री ठेवून दहा पांच खेड्यांची माणसें एका खेड्यांत कोंडून मागे सोडण्यात आली ! ठिकठिकाणचे पूल व रस्ते यांचा विध्वंस करण्यांत आला. अशा रीतीने जाळपोळ करीत जर्म- नीने सदर मुलख सोडला. मार्च अखेरीस व एप्रिलच्या प्रारंमी जर्मनीचे मार्गे हटणे मंदावले असून सेंट क्वेंटिनच्या आसपास मोठया निकराची लढाई सुरू झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यांत सेंट क्वेंटिन अँग्लो-फ्रेंचांच्या हाती लागेल असा अंदाज आहे. जर्मनीची ही पीछेहाट को १ दहा बारा मैल मागे हटलेल्या जागी नव्या घरांचे चक्रव्यूह जर्मनीने तयार केले असून ती जागा पूर्वीहून अधिक बिकट मार्च-एप्रिल महिना लष्कर आहे असे म्हणतात. शिवाय सोडून दिलेली जागा साफ मैदान बनल. असल्यामुळे अँग्लो-फ्रेंचांचें तोफखाने जर्मनीच्या तोफखान्याच्या मान्याखाली चांगले सांपडले जाण्याचा संभव आहे. सोडून दिलेली जागा जर्मनीच्या रांगेस पोंक आल्यासारखी असल्यामुळे सदर शे-सवाशें मैलांच्या पट्ट्यात जर्मनीची रांग आतां सरळ रेषेची झाली आहे. तेव्हा या नव्या जागेचे संरक्षण करण्यास पूर्वीहून कमी लोक पुरणारे आहेत. सनिकांची ही काटकसर कां ? पश्चिम रणभूमीत काटकसर करून शिल्लक टाकलेले हे सैन्य अँग्लो-फ्रेंचांच्या जंगी हल्ल्याच्या वेळी ठिकठिकाणी येणारा तुटवडा भरून काढण्यास पुरेसे होईल, असा जर्मनीचा अंदाज आहे. ह्याशिवाय गेल्या हिवाळ्यांत बेल्जम, फ्रान्स, पोलंड व रुमानिया येथील जिंकलेल्या लोकांना वेठीला धरून जर्मनीतील निरनिराळ्या कारखान्यांत त्यांना कामाला लावून उद्योग- धंद्यांतील लोकांचे नवे दहा लाखांचे सेनापति हिंडेनबुर्ग यांच्या हवाली करण्यात आले आहे. कोणच्या तरी रणभूमीतील सेनाशकटाचा चुराडा करण्याचे काम एप्रिल-मे महिन्यापासून सेनापति हिंडेनबुर्ग सुरू करणार आहेत, असे प्रसिद्ध झाले आहे. या नव्या दहा लाख सैन्याची गदा कोणावर फेकण्यात येणार ? कोणी म्हणतात पेट्रोगाड शहरावर सेनापति हिंडेनबुर्ग चाल करून जाणार; कोणी म्हणतात, ओडेसा व कीव्ह प्रांतावरच त्यांचा डोळा आहे; तर कोणी ह्मणतात, इटलीच्या डोक्यावर ही गदा आदळण्यांत येईल. इटले वरच स्वारी होईल असें झणणारांची भिस्त इटलीची रणभूमि फ्रेंच रण- भूमीच्या जवळ असल्यामुळे एकीकडचे सैन्य दुसरीकडे जलदीने नेता येईल, या मुद्यावर विशेष आहे. इटलीवर स्वारी करीत असतांना अँग्लो-फ्रेंचांनी जर विशेष लगट केली दार चटदिशी इटलीच्या बाजूचे सैन्य पश्चिम रणभूमीकडे वळविता येईल हे खरे; पण त्या बरोबर दुसरी एक गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, इटलीची थोडीशी पीछेहाट होऊन एकटया इटलीच्या हातून निभत नाही असें ठरतांच अँग्लो-फ्रेंच सैन्य फ्रान्समधून इटलीच्या मदतीला सहज धावून जाईल. इंग्लंड फ्रान्स व इटली या तिघांचे सैन्य व तिघांचा तोफखाना त्या बाजूच्या आस्ट्रो-जर्मन सैन्याहून व सेनापति हिंडेनबुर्ग यांच्या नव्या दहा लाख सैन्याहून अधिक आहे, हे विसरता कामा नये. म्हणजे पहिल्या एक दोन आठवड्यांतच फळी फोड्न एकदम आंत घुसतां आलें तर बरें. नाही तर इटलीवरील स्वारी म्हणजे गेल्या ७६ पहिले महायुद्ध सालच्या व्हईनच्या स्वारीची सुधारून वाढविलेली मोटी आवृत्ति होईल इतकेंच. शिवाय अमेरिका महायुद्धांत सामील झाल्यामुळे १९१७ सालींच अँग्लो-फ्रेंचांनी फ्रान्समधील जर्मनीची फळी फोडली पाहिजे अशांतलाहि भाग उरलेला नाही. इट- लीच्या व सलिनोकाच्या बाजूची आपली फळी भकम करून नंतरच फ्रान्समधील मोठया चढाईस प्रारंभ होईल, पश्चिम रणभूमीतील लष्करी हालचालींची ही अशी परिस्थिति असल्यामुळे सेनापति हिंडेनबुर्ग यांना पश्चिमेपेक्षा पूर्वच अधिक श्रेयस्कर वाटण्याचा संभव आहे. रशियन राज्यक्रांतीमुळे रशियन सेनाशकटाचा जमाव बराच विस्खळित झाला असला पाहिजे. रशियांतील राज्यसत्ता आतां राष्ट्रमुखी झाली असल्यामुळे रशियाचा एखादा दुसरा पराभव झाला असतां, सर्व राष्ट्र एकदम खवळून उठेल व भलतेंच संकट अंगावर ओढून घेऊन जर्मनीतहि राष्ट्र- मुखी सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्योगाला लोक लागतील अशी भीति जर्मनींतील राज्यकर्याना व सेनानायकांना एप्रिल-मे महिन्यांत रशियावर चाल करून जात असतां वाटण्याचा संभव आहे. पण अमेरिका महायुद्धांत सामील झाल्याने यासंबंधाची 'डर तो पीछे रही' असें जर्मनीस झाले असले पाहिजे. राष्ट्रमुखी सत्ता जर्मनीतहि स्थापिली गेली पाहिजे असली आरोळी पूर्वेपेक्षां पश्चिमेच्या बाजूने जर्मनीस अधिक जोराने ऐक येत असली पाहिजे. राष्ट्रमुखी सत्ता व अरेरावी सत्ता यांमधील हा झगडा आहे, हे जर्मन लोकांपासून जर्मनीचे राज्यकर्ते कसे लपवून ठेवणार १ सेनापति हिंडेनबुर्ग रशियावर तुटून पडले काय किंवा फ्रान्सवर तुटून पडले काय,सदर मुद्दा लोकांच्या दृष्टीआड करता येणे शक्य नाही. अमेरिका महायुद्धांत पडल्यामुळे, व रशियांत विलक्षण राज्यक्रांति झाल्यामुळे जर्मन राज्यकत्यांची स्थिति आतां फार नाजुक झाली आहे. कोठेंना कोठेतरी मोठा विजय संपादन करून राष्ट्रमुखी सत्ता लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने पंगू असते असें रणभूमीवर प्रत्यक्ष ठरल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. या दृष्टीने विचार केला असतां असा तर्क निघतो की, पश्चिम रणभूमि, इटाली व सलिनोका येथे अँग्लो-फ्रेंच व इटालियन सैन्य यांजकडेच चढाई करण्याचे काम सोपवून सेनापति हिंडेनबुर्ग रशियाच्या बाजूला वळतील, व रशियाच्या बाजला ओडेसा व कीव्ह या टापूच्या रोखाने चढाई होईल. पेट्रोग्राडच्या बाजूला नव्या रशियन सरकारास विशेष पाठिंबा आहे; रशियाच्या दक्षिण लष्करांत बादशाही अमलांचे पुरस्कर्ते अधिक आहेत; शिवाय मार्च-एप्रिल महिना ७७ ओडेसा व कीव्ह हे प्रांत काबीज केल्याने काळा समुद्र आस्ट्रो-जर्मनांच्या अधिक ताब्यांत जाऊन तुर्कस्थानास पर्यायाने मदत होणारी आहे. मार्च महिन्यांत इंग्र. जांनी बगदाद शहर घेऊन इराणच्या पश्चिम सरहद्दीवर उत्तरेकडून खाली उतर- लेल्या रशियन सैन्याचा इंग्रजी सेनेशी मिलाफ झाला; इजिप्तच्या बाजूला सुवेज कॅनॉलावरील इंग्रजी सेनेने तुर्काच्या पॅलेस्टाईन प्रांतावर हल्ला करून वीस हजार तुर्की सेनेचा पुरा मोड केला. अशा स्थितीत पेट्रोग्राडवरील स्वारीपेक्षां तुर्कोना पर्या. याने मदत करणारी ओडेसावरीलच स्वारी सेनापति हिंडेनबुर्ग यांना अधिक इष्ट वाटण्याचा संभव आहे.
महायुद्धाचा तिसन्या वर्षाचा एप्रिल-मे महिना एप्रिल महिन्यांत महायुद्धासंबंधाने तीन गोष्टी महत्त्वाच्या घडून आल्या. रशियन राज्यक्रांतीचे स्वरूप या महिन्यांत पूर्णपणे प्रकट झाले; लढाईचा फैलाव करण्यापेक्षा लढाई मिटविण्याकडे रशियन राज्यक्रांतीचा ओढा अधिक आहे, असे या महिन्यांत दिसून आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व एप्रिल महिनाभर फ्रान्सच्या रणभूमीत चाललेली अँग्लो-फ्रेंचांची जंगी चढाई होय. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की, जर्मन पाणबुडया बोटींचा धमाकूळ अंदाजाबाहेर झाला व त्यामुळे इंग्लंडांत एकप्रकारची काळजी उत्पन्न झाली. पाणबुड्या बोटींनी जे बळी मार्च महिन्यांत घेतले त्यांचे आंकडे पाहिले असतां रोजची सरासरी तीन चार जहाजांची पडते. पण एप्रिलच्या दुसन्या व तिसऱ्या आठवड्यांत दर आठवड्यास पन्नास साठ याप्रमाणे एकटया इंग्लंडची जहाजे बुडविण्यात आली. याशिवाय दर आठ- वड्यास फ्रेंचांची दहावीस, इटलीची दहा पांच व नॉर्वेची दहा पांच अशी जहाजें बुडविण्यांत आली. इंग्लंडांत नवीन जहाजे बांधण्याचे काम झपाट्याने सुरू झाले आहे; शिवाय अमेरिकेंतहि नवीन जहाजें निर्माण करणारे कारखाने जोरजोराने काम करीत आहेत. तथापि इंग्लंड व अमेरिका या दोन्ही राष्ट्रांनी आपली परा- काष्ठा करून दर आठवडयास जितकी नवीन जहाजे बांधावी त्याहून अधिक जहाजे जर्मनीमा पाणबुडया बोटी बुडवून टाकतात, अशी स्थिति आहे. यामुळे इंग्लंडांतील अन्नसामग्री दिवसानुदिवस कमी होत चालली आहे. जर्मनींतील तज्ज्ञांचें असें मत आहे की, ये या हिवाळ्याच्या आधी इंग्लंडांतील शेतीचे नवें धान्य इंग्लं. डांतील लोकांना मिळण्यापूर्वीच इग्लंडांत धान्याची इतकी महर्गता होईल की, त्यामुळे इंग्लंडच्या मुत्सद्यांना तह करणे भाग पडेल. याच हेतूनें जर्मनीने पाणबुड्या बोटींच्या अनियन्त्रित यमपुरीचे प्रदर्शन निर्दयपणे उघडले. जर्मनीचा हा हेतु साध्य होणे शक्य आहे काय ? जर्मनीचा हा हेतु साधणे म्हणजे समुद्रावरील इंग्लंडचे वर्चस्व जर्मनीच्या पाणबुडया बोटींनी गिळंकृत करणे होय. पाणबुडया बोटींना नवीन महत्व एप्रील महिन्यांत प्राप्त झाले ह्यांत संशय नाही पण इंग्लंडचे समुद्रावरील वर्चस्व एप्रिल-मे महिना डळमळीत करण्याइतके मोठे हे महत्त्व आहे काय ? जर्मनीची पहिली पाणबुडी बोट जर्मन किनारा सोडून गेल्या साली जेव्हां अमेरिकेला जाऊन परत आली त्यावेळेला पाणबुड्या बोटींचे महत्व शास्त्रीय दृष्टया प्रस्थापित झाले; व डेड नॉटांच्या मोठ्या आरमाराला निरर्थक करणारा शत्रु जन्मास आला असें भविष्य तज्ज्ञांनी त्यावेळी वर्तविले. पण सांप्रतच्या महायुद्धांत पाणबुझ्या बोटीवर विसंबून राहून इंग्लंडांतील अन्नसामग्री आकुंचित करण्याचा उद्योग जर्मनी करील असें कोणासहि वाटले नव्हते. एप्रिल महिन्यांत जर्मनीच्या नव्या पाणबुड्या बोटी समुद्रात फार दूरवर प्रवास करूं शकतात; महिनानमहिना पुन्हां बंदराला परत नाही आले तरी चालेल एवढी हरएक प्रकारची सामग्री त्यांच्यावर राहू शकते, शिवाय दोनचार तोफा या पाणबुड्यांवर असून त्या व्यापारी जहाजांवर तोफांचे गोळेहि टाकू शक- तात. अशाप्रकारच्या या नव्या शत्रूला हाणून पाडण्याकरितां कांहीतरी युवित काढावी म्हणून इंग्लंडांतील कुशाग्र बुद्धीच्या लोकांची एक कमिटी आज दोनतीन महिने एकसारखें काम करीत आहे, पण अद्याप योग्य इलाज सांपडलेला नाही. या पाणबुडया बोटींचे भय इंग्लंडांत सर्वांनाच वाटू लागले आहे. तथापि लार्ड कर्शन, लाइड जॉर्ज आदिकरून इंग्रजी प्रमुख मुत्सद्यांचें असें ठाम मत आहे की, अन्नपाण्यासंबंधाने इंग्लंडांतील लोकांना पूर्वीच्या समृद्धीच्या व चैनीच्या दृष्टीने बरेच हाल सोसावे लागले तरी महायुद्धाच्या शेवटच्या निकालासंबंधाने जर्मन पाणबुड्यांना मुळीच किंमत नाही. जर्मन पाणबुडया बोटींचे भय अंदाजाहून मोठे ठरले खरे पण तह करण्याइतकी इंग्लंडची उपासमार होणार नाही. रोजची दहा जहाजें बुडाली तरी इंग्लंडवर तसलें संकट ओढवणार नाही. कारण इंग्लंडनें रोजच्या शिध्यांत काटकसर करण्यास सुरवात केली असून अनावश्यक व चैनीच्या वस्तूना आस्ते आस्ते बहिष्कारहि घातला आहे. खुद्द बादशाह साहेबांनीहि स्वतःच्या प्रपंचां- तील माणसांचा रोजचा शेर योग्य प्रमाणाने तोडला असून सर्व प्रजाजनांनीहि तसेंच करावे, अशी त्यांची आज्ञा जाहीर करण्यांत आली आहे. शिवाय या बाबतींत में महिन्यांत कायदाह होण्याचा रंग आहे. मग जर्मन पाणबुड्यांनी येऊन जाऊन काय केले १ इंग्लंडचा रोजचा शेर तोडला. शेर तोडला म्हणजे उपासमार नव्हे; चैम नाहीशी झाली इतकेंच. आठवडयांतून काही दिवस मांस खावयास मिळावयाचे पहिले महायुद्ध नाही, काही दिवस बटाटे मिळावयाचे नाहीत, आणि गव्हाच्या रोटीऐवजी काही दिवस मका वगैरे इतर धान्याच्या भाकरीवर काढावे लागतील इतकेंच, इंग्लंडच्या लोकांचे थोडे हाल होतील ही गोष्ट खरी; पण जर्मनीच्या हालाच्या मानाने इंग्लंडचे हाल कांहींच नव्हत. तेव्हा महायुद्धातील यशापयशाच्या दृष्टीने विचार केला असतां इग्लंडचे नुकसान जर्मन पाणबुड्यांनी काहीच केले नाही असे म्हणावे लागते. दोन तीन बाबतीत मात्र अप्रत्यक्ष नुकसान झाले आहे. चालू वसंतकाळापासून पडीत जमिनीपैकी दहा लाख एकरांची नवी जमीन इंग्लंडो लागवडीस आणली आहे. या नव्या लागवडीकरितां लढण्याच्या कामाला उपयोगी पडणारे काही लोक गुंतवून ठेवणे भाग पडले. लढण्याच्या दृष्टीने हे एक लहानसें नुकसान झाले तसेंच व्यापारी जहाजे बांधण्याकडेहि पूर्वीहून अधिक लोक गुतवावे लागले. शिवाय दारूगोळ्याच्या कारखान्यांत लागणारा परदेशचा कच्चा माल पूर्वीइतका मुबलक मिळत नसल्यामुळे थोडीशी हानि झाली. अन्नपाण्यासंबंधाने लोकांना सोसावे लागणारे हाल व वरील किरकोळ बाबतींतील नुकसान येवढे जर्मन पाणबुड्या बोटींनी मिळविले; पण गमावले काय ? सर्व अमेरिका जर्मनीने गमावली. या बात- तींत इंग्लंडच्या नफानुकसानीचा विचार करितांना अमेरिकेचे कलम इंग्लंडच्या नफ्याच्या बाजूला मांडले पाहिजे. दारूगोळ्यासंबंधाने, अन्नपाण्यासंबंधाने अमेरिकेचे येवढे मोठे घबाड इंग्लंडला लाभले आहे की, जर्मन पाणबुडया बोटींनी अपकार न करतां इंलंडवर उपकारच केले आहेत, तथापि जर्मन पाणबुडया बोटीसंबंधाने इंग्लंडास काळजी वाटत आहे. ही काळजी या महायुद्धांत आपले कसे होईल याब. द्दलची नसून पाणबुड्यांच्या चांचेगिरीवर लाग पडणाऱ्या मात्रेचा शोध अद्याप लागला नाही याबद्दलची आहे. जर्मनापाशी सांप्रत दोनतीनशेच पाणबुड्या बोटी आहेत असे म्हणतात. या जर पांचसातशे बोटी असत्या तर कसे झाले असते ? रोज दहा व्यापारी जहाजें बुडतात, त्याऐवजी वीमपंचवीस जहाजे बुडाली असती; आणि पंचवीसतीस लाख लोक इंग्लंडकरितां जिवावर उदार होऊन लढत असताहि आणि जगांत अत्यंत बलाढय मानले गेलेले आरमार मोठया तोन्याने समुद्रावर फिरत असतांहि अनान्नगत होऊन मानी इंग्लंडला शत्रूपाशी तहाची याचना फरावी लागली असती ! पाणबुड्या बोटीचें सांप्रतचे संकट येवढया मोठया स्वरू- पाचे नाही. अन्नपाण्यासंबंधाने थोडेसे हाल सोसले म्हणजे तेवढयावरच हे भागणारे एप्रिल-मे महिना ८१ आहे. ड्रेडनाट जहाजांसारख्या आरमारी किल्ल्यांचे दिवस संपून छोट्या पाण- बुड्यांचा मनु सुरू झाला की काय अशी शास्त्रीय शंका याठिकाणी उद्भवण्याचा संभव आहे, पण शंकेचा संबंध चाल महायुद्धाशी सांप्रत येत नसून महायुद्धानंत रच्या शास्त्रीय शोधांशी विशेष येत असल्यामुळे इंग्लंडच्या समुद्रावरील वर्चस्वास जर्मनीने आजच पोखरून फोल केले असं कोणासहि म्हणतां यावयाचें नाहीं. रोजची जवळ जवळ दहा जहाजें जर्मन पाणबुडया बोटी बुडवू लागल्या आहेत, ही गोष्ट खरी; पण ही त्यांच्या कर्तबगारीची पराकाष्ठा आहे; प्रारंभ किंवा मध्य नव्हे. अर्थात् इंग्लंडच्या समुद्रावरील वर्चस्वाचा प्रश्न येवढयाने उपस्थितच होऊ शकत नाही. मे-जून महिन्यांत हा आंकडा पंधरावीसापर्यंत गेला तर मात्र गोष्ट निराळी. एप्रिल महिन्यांत फ्रान्सच्या रणभूमीत लढाईस अगदी ऊत आला. मार्च महि- न्यांत सोम व ऐन नद्यांच्या काठी जर्मनीच्या पीछेहाटीस सुरुवात झाली. ती पीछेहाट एप्रिलच्या दुसन्या आठवड्यापर्यंत एकसारखी सुरूच होती. या पीछे- हाटीसंबंधाने जर्मनीचे म्हणणे असें पडतें की, इंग्रजांची व फ्रेंचाची तयारी फार मोठी म्हणून अधिक मजबुतीची व प्रसंगी मागे हटण्यास अधिक सोईची अशी जागा पाहून तेथे लढाईस तोंड देणे इष्ट असल्यामुळे ही पीछेहाट लष्करी धोणाला अनुसरून व.रावी लागली. या बाबीसंबंधाने अँग्लो-फ्रेंचांचें झगणे असे की, सद रह पीछेहाट केवळ लष्करी धोरणाने आगाऊ आंखून ठेवलेल्या कलमापैकी कलम नसून अँग्लो-फ्रेंच सैन्याचे वजन असह्य होऊ लागल्यामुळे जर्मनांनी केलेली ही थारपालट होय, सोम आणि अँकर नद्यांच्या कांठची जागा नदीनाल्याच्या वळ. णांनी पूर्ण व्यापलेली असल्यामुळे प्रसंगी मैल दोन मैल मागे हटण्यास फार धोक्याची आहे. सामनेवाला जर विशेष जबर असेल तर असल्या जागी उभे राहून लहणे हे अव्यवस्थितपणाचे लक्षण होय. अशा दृष्टीने विचार केला असतां जर्म- नांचे कृत्य एका अंशी बरोबर दिसते, पण जागा गैरसोईची येवढयाने या पीछ- हाटीचा चांगलासा खुलासा होत नाही. जागा गेल्या साली गैरसोईची नव्हती काय ? १९१६ साली याच ठिकाणी भयंकर रणकंदन माजून राहिले होते. त्यावेळी जर्मन याच ठिकाणी मागे हटले; पण त्यांची फळी फुटली नाही. मग यंदा ती जागा अधिक धोक्याची कां वाटावी, याठिकाणींच फळी फुटण्याचा कदाचित् ८२ पहिले महायुद्ध संभव, तेव्हां आगाऊ पीछेहाट करून अधिक मजबुतीच्या जागी जाऊन बसावें अशी भीति यंदा जर्मनांना कां वाटावी ? नदीनाल्यांच्या स्थानिक दोषामुळे जर्म- नांनी ही पीछेहाट केली हे म्हणणे युक्तिजुक्तीस पटत नाही. मग अँग्लो-फ्रेंच सैन्याने त्यांना मागे रेटले असे म्हणावे काय ? तेंहि जुळत नाही. कारण या पीछे- हाटीच्या वेळी सर्व सामानसुमान घेऊन जर्मन मागे हटले इतकेच नव्हे, तर सर्व खेडींपाडी व शेतीभाती त्यांनी पाळामुळासकट उध्वस्त केली ! अर्थत् जर्मनांची मार्च महिन्यांतील पीछेहाट हे पूर्व संकेताचे फळ होय. रेटारेटींतील अवचित कृत्य नव्हे. हा पूर्व संकेत कशाकरितां ? स्थानदोषाची सबब हा बाहेरचा बाणा होय. याहून अधिक सबळ लष्करी कारण या पीछेहाटीच्या मागे असले पाहिजे. तें कोणते ? सेनापति हिंडेनबुर्ग ह्यानीं सोम नदीवरील आपलें ठाणे अशारीतीने मागे का आणावें ! जर्मनीची उपासमार चालली आहे; तेव्हां १९१७ सालींच महा. युद्धाची परिसमाप्ति करण्याचा बोजा जर्मनीने सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांच्यावर लादणे अगदी साहजिक आहे. १९१७ साली सेनापति हिंडेनबुर्ग यांनी जर्मनीला कोठे व कसा जय मिळवून द्यावयाचा ? फ्रान्समध्ये जय मिळवून देऊं या आशेने त्यांनी आपले बातबेत ठरविले असले पाहिजेत, ह्या म्हणण्यांत कांही अर्थ नाही.१९१७ सालच्या वसंतकाळांत फ्रान्समधील अँग्लो-फ्रेंचांची तयारी मोठी पराकाष्ठेची होणार हे जर्म- नीला ठाऊक.गेल्यासाली व्हई नचे हल्ले विफल झालेले व सोम नदीवरहि मार खाल्लेला हेहि जर्मनीला ठाऊक. अशा स्थितीत १९१७ साली फ्रान्समध्येचअँग्लो-फ्रेंचांची फळी फोडून महायुद्धाची परिसमाप्ति करून घेऊ, असा बेत करणे शहाणपणाचे कसे ठरणार ? सेनापति हिंडेनबुर्ग हे रशियाच्याच बाजूला विजय मिळविण्याच्या दृष्टीने पहात असणार. अर्थत् फ्रान्सकडील त्याची दृष्टि बचावाची, आपली फळी फोडून देता मोठा पराभव फ्रान्समध्ये टाळून पूर्वेस मोठा जय कसा मिळविता येईल, ही सेनापति हिंडेनबुर्ग यांची विवंचना. अँग्लो-फ्रेंचांच्या तयारीच्या मानाने जितके कमी लोक व कमी तोफा फ्रान्समध्ये त्यांना राखणे भाग होईल तितकेच कमी लोक व तितक्याच कमी तोफा फ्रान्समध्ये ठेवून बाकी सर्व लोक व मव तोफा पूर्वेस हाकून नेणे त्यांना इष्ट आहे. रशियाकडील कामगिरीकरितां अधिक तोफा व अधिक लोक कसे मिळवावयाचे ? अँग्लो-फ्रेंचांनी जर कित्येक लाखांनी आपले सैन्य वाढविले तर पराभव टाळण्याकरितां जर्मनांनीहि - एप्रिल-मे महिना ८३ - सैन्य वाढविले पाहिजे. हजारो नव्या तोका जर अँग्लो-फ्रेंचांनी फ्रान्सच्या रणभूमीत डागल्या तर जर्मनानींहि पराभव टाळण्याकरितां आपल्या तोकांची संख्या थोडीबहुत वाढविली पाहिजे. फ्रान्समध्ये जर सैन्य वाढवावयाचे आणि तोफाहि वाढवावयाच्या तर पूर्वेच्या बाजूला जय मिळविण्यास सैन्य व तोफा शिल्लक कोठे राहातात १ नवीन तोफा निर्माण करणे व नवें सैन्य उभारणे या दोन्ही कामांत इंग्लंड जर्मनीच्या पुढे फार गेलेले आहे, आणि तोफांची संख्या व सैन्याची संख्या येवढींच लक्षणे पाहून जर युद्धाचा निर्णय द्यावयाचा असेल तर जर्मनी पराभूत झाला असें आज जाहीर करण्यास कोणचीच हरकत नाही. पण नुसत्या संख्येवर यश.पय : अवलंबून नसते. सैन्य वापरण्याची हिकमत लागते. संख्या जेव्हां फारच अधिक मोठी होते तेव्हां हिकमतीचेंहि कांहीं चालत नाही. अँग्लो-फ्रेंचांची संख्या सध्यां जर्मनीहून अधिक मोठी आहे; पण हिकमतीलाह धाब्यावर बसवि ण्याएवढी मोठी नाही. तसलें भयंकर स्वरूप या संख्येस प्राप्त होऊ नये म्हणून जर्मनांनी पाणबुड्यांच्या अनियत्रित संचारास आपली संमति दिली आहे. १९१७ साली ही संख्या बरीच मोठी असली तरी हिकमतीच्या जोरावर आपण अग्लो- फ्रेंचांचे कार्य विफल करू व रशियास मेटाकुटीस आण असें सेनापति हिंडेनबुर्ग ह्यांना वाटत आहे. ही हिकमत कोणती ? फ्रान्समध्ये अँग्लो-फ्रेचांच्या सैन्याच्या व तोफांच्या मानाने होईल तितकें कमी जर्मन सैन्य अडकवून ठेवणे हे या हिकमतचे सार आहे. थोड्या लोकांवर अधिक कामगिरी करून घ्यावयाची या दृष्टं ने विचार केला असतां मार्च महिन्यांतील जर्मनीची पीछेहाट व एप्रिल महिन्यांतील घनघोर रणसंग्राम यांची सांगड ठीक पडते किंवा कसें तें आतां पाहू या. नकाशाकडे जर पाहिले तर असे दिसून येईल की, सोम व अँकर नद्यांच्या काठी जर्मन चक्रव्यूहाचें में पोट पुढे आले होतें तें पोट मार्च महिन्यांत मागे ओढून घेण्यांत आले. या योगाने चक्रव्यूहाची लांबी कमी झाली, अर्थात चक्रव्यूहाचे संरक्षण करण्याकरिता लागणा-या लोकांची संख्या कमी झाली. एवढयानेच भागत नाही. तर पुढे आलेल्या पोटाचा विध्वंस करण्याकरितां अँग्लो-फ्रेंचांनी जो तोफांचा मोठा जमाव योग्य जागी मोर्चे बांधून उभा केला होता तो जमाव विफल झाला, जर्मनांनी मागे हटतांना सर्व प्रदेश उध्वस्त करून झाडझडूपहि मैदानांवर ठेवले नाही. यामुळे नवीन जागांवर मोर्चे बांधून नव्या चक्रव्यूहावर रोख धरून तोफा पुन्हां पहिले महायुद्ध भाग दुसरा म्हणजे उभ्या करण्याचे काम कठीण झाले. तोफांचे मोर्चे तयार होण्यास अशा स्थितीत दोन तीन महिने तरी लागणार. पूर्वीच्या मोर्चाच्या माऱ्याबाहेर शत्रू गेला. नवीन मोर्चे मोकळ्या मैदानावर शत्रूच्या दृष्टीसमोर व शत्रूच्या तोफखान्यांच्या माऱ्याखाली बांधावयाचे, या अडचणीमुळे सोमनदीच्या काठी गोळा झालेल्या तोफा दोनतीन महिने असून नसल्यासारख्या झाल्या. फ्रान्स व बेल्जममधील रणभूमीचे सामान्यतः तीन भाग करता येतात. पहिला बेल्जमच्या किनाऱ्यापासून आरासपर्यंत, पोट वाढलेला आराससून हीम्सपर्यंतचा भाग, आणि तिसरा हीम्सपासून स्वित्झर्लंडच्या हद्दीपर्यंतचा भाग. या तीन भागांपैकी व्हीम्सपासून स्वित्झर्लंडच्या हद्दीपर्यंतच्या भागांत गेल्यासाली व्हडूनच्या मोठया लढाईकरितां जर्मनीच्या व फ्रान्सच्या तोफा जमा झाल्या होत्या. यंदाहि त्या तेथेच असल्या पाहिजेत. शिवाय गतवर्षीपेक्षां यंदा फ्रान्सचे मनुष्यबळ वाढलेले नाही. फ्रान्सच्या मनुष्यबळाची पराकाष्ठा गेल्यासाली झाली. विलक्षण रीतीनें मनुष्यबळ यंदा वाढलें तें इंग्रजांचें, फ्रान्सचे नव्हे. विलक्षण वाढ यंदा तोफांची झाली ती इंग्रजांची; फ्रान्सची नव्हे. अर्थात् जर्मनांची डोकी फोडावयाची ती इंग्रजी सेना व इंग्रजी तोफखाने यांनी; फ्रान्सच्या सेनेने किंग फ्रान्सच्या तोफखान्याने नव्हे. मुख्य काम इंग्रजांकडे, फ्रान्स मदतीस. गेल्यासाली सोमनदीच्या काठच्या लढायांच्यावेळी इंग्रजांनी मुख्य बोजा उचलला व फ्रान्सने सोमनदीला लागून असलेल्या त्यांच्या भागांत चांगली मदत केली फ्रान्स इंग्लंडच्या शेजारीच जोराने लढत होते; त्यामुळे इंग्लंडचें एक पाऊल पुढे पडण्याबरोबर त्याच जागी, त्याचवेळी, ताबडतोब फ्रान्सचे पाऊल पुढे पडण्यास इंग्रजांच्या पावलांची मदत झाली. फ्रान्सचे पाऊल पुढे पड़े, तत्काळ इंग्रजांच्या भोवतालचा पेंच ढिला होई व लगेच इंग्रज उशीसरसे चार पावलांची एकदम उडी मारीत ! गेल्यासालची सोमनदीच्या कांठची लढाई अशा रीतीने अन्योन्याश्रयाची झाली. हातात हात घालून, खांद्याला खांदा भिडवून इंग्रज व फ्रान्स यावेळी पुढे सरसावले; पण यंदा सोमनदीच्या कांठचे पोट सेनापति हिंडेबुर्ग यांनी स्वतःच्या पाठीस मिळविल्यामुळे आणि सोम व अँकर नद्यांच्या कांठची रणभूमि दोनतीन महिने घनघोर लढाईस नालायक केल्यामुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यामधील अन्योन्याश्रयाची सांखळी तुटली. एकाच्या हाताचा उपयोग एप्रिल-मे महिना सन्याच्या हातास तत्काळ होण्याचे बंद पडले. एकाचा पुढे जाण्याचा वेग सयासहि पुढे ओढून नेण्यास सहजरीत्या उपयोगांत आणणे अशक्य झाले. त्यक्ष संबंधाने आपोआप मिळणारे फायदे नष्ट झाले. अशा रीतीने फ्रान्सची सेना ग्रजी सेनेपासून सेनापति हिंडेनबुर्ग यांनी अलग केली. सोमनदीकाठचा इंग्रजांचा गोठा तोफखाना काही काळ पर्यंत विफल झाला, व अँग्लो-फ्रेंचांची साखळी टली, येवढे दोनच फायदे सोमनदीवरील पोंगाच्या पीच्छेहाटीने जर्मनीला मिळाले से नव्हे, तर तिसराहि फायदा जर्मनीला मिळाला. तो असाः–बेल्जमच्या केनान्यापासून सोमनदीपर्यंतच्या भागांपैकी आरासपासून सोमनदीपर्यंत खरी लढाई [ चालतां आरासच्या आसपास चाळीस पन्नांस मैलपर्यंतच कायतें घनघोर रणक्षेत्र प्रिलांतील इंग्रजांच्या चढाईच्या वेळी होणार, हे जर्मनीला मार्चमध्येच निश्चित रितां आलें. बेल्जमांतील रणक्षेत्रांपैकी बराच भाग म्हणजे यिप्रेसपासून किना-या. यंतचा भाग समुद्राचे बांध फोडून पाण्यात बुडविला गेला आहे. दोन्ही पक्ष ते ये राण्याच्या तटबंदीच्या आंत उभे आहेत. तेव्हां तो टापू तोफांच्या जंगी चढाईला गालायक, अर्थात् बाकी राहिलेला यिप्रेसपासून आरासपर्यंतचाच भाग काय तो ग्रजांच्या चढाईला लायक. याच टापूत एप्रिल महिन्यांत इंग्रजांच्या जंगी चढाईस मुरुवात आरासच्या उत्तरेस चाळीस मैलांच्या ६ एप्रिल रोजी तोफांच्या जंगी सरबत्तीस प्रारंभ होऊन पुढे चार पांच दिवसानी ग्रजी सेनेने हल्ले चढविण्यास सुरुवात केली. सर्व एप्रिल महिनाभर सर्व तोपा एकसारख्या उडत होत्या; व इंग्रजी सैन्य जिवावर उदार होऊन पराकाष्ठेने लढत होते. एक महिनाभर इतकें तुबळ युद्ध माजून राहिले की, त्या लढाईने व्हडूनच्या उढाईस मागे टाकले. याच सुमारास हीम्सच्या वायव्येस व कोपेन प्रांतांत चांनीहि जर्मनीवर तुटून पडण्याची पराकाष्ठा केली. अँग्लो-फ्रेंचांची मिळून भिर मैलांच्या तोंडावर 'न भूतो न भविष्यति' अशीच प्रचंड लढाई झाली. ही उठाई तीन आठवडे एकसारखी चालली. महायुद्धाया पावणेतीन वर्षाच्या इति- मासांत एवढा मोठा तोफांचा समुदाय इतक्या जोराने एकसारखा उडत राहिल्याचे आणि इतके लाखो लोक शत्रूशी इतक्या निकराने लढत राहिल्याचे, दुमरें उदाहरण नाही. एप्रिल महिन्यांतील ही लढाई झणजे जगाच्या इतिहासांतील अत्यत पाली. पन्नास तोंडावर ता.
८६ पहिले महायुद्ध भयंकर लढाई होय, अशी वर्णने या लढाईची प्रसिद्ध झाली आहेत. मे प्रारंभाला ही लढाई थोडी थंडावली असून तिने पुन्हां मेच्या दुसऱ्या आठवड्यांत उचल केली आहे. मे महिन्यांत ही लढाई अशीच चालू राहील हे खरे; पण तिचा जोराचा बहार एप्रिलांत संपून गेला असें ह्मणण्यास हरकत नाही. एप्रिलच्या लढाईत इग्रजांनी वीस हजार जर्मन कैद केले व तीनशे तोफा काबीज़ केल्या. शिवाय इग्रज व फ्रेंच सरासरीने चारपांच मैलपर्यंत पुढे सरकले. अँग्लो-फ्रेंच सेना तोकांच्या जिवावर पुढे सरकत राहिल्यामुळे अँग्लो-फ्रेंचांच्या नुकसानीपेक्षां जर्मन सेनेची अधिक नुकसानी झाली. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून ह्या लढाईत उलट हल्ले करण्यास जर्मनांनी सुरवात केली असून जर्मन प्रेतानी सर्व रणभूमि व्यापूस टाकली आहे. एप्रिलच्या लढाईत अँग्लो-फ्रेंचांचा एकंदरीने विजय झाला; पण जर्मनीची फळी फुटली नाही. जर्मनीची फळी फोडून जर्मनीला स्वतःच्या सरहद्दीकडे पिटाळून लावण्याकरितां जी जंगी तयारी अँग्लो-फ्रेचांनी कित्येक महिने केली, तिचा पहिला बहार फळी न फुटतां जर्मन सैन्याची चांगली खराबी करण्यांत खर्च झाला. तथापि या लढाईत तोफा काबीज करण्याच्या कामांत व जर्मन चें नावाजलेलें सैन्य चिरडण्याच्या कामांत इंग्रजांना जे यश मिळाले त्या यशाकडे पाहिले असतां मे-जून महिन्यांतील या चढाईचा दुसरा बहार अधिक संतोषकारक होईल असा भरंवसा सर्वांना वाटत आहे. याठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की, मार्च महिन्यांत सोमनदीवर जर्मनांनी केलेल्या पीच्छेहाटीनंतर आरासपासून हीम्सपर्यंतच्या टापूत अँग्लो-फ्रेंच तोफा जर्मन चक्रव्यूहाशी करीपर्यंत महिना दोन महिने ही लढाई लांबणीवर का टाकण्यात आली नाही ? एका मोठया टापूतील तोफा गप्प बसल्या, फ्रेंच हाताशेजारी नाहीत, व आरासच्या बाजूलाच लढणे भाग, अशा सदोष स्थळी व काळी जंगी चढाईचा पहिला बहार का खर्च करण्यात यावा ? अर्जुनाकरिता राखून ठेविलेली शक्ति घटोत्कचावर कां सोडली जावी ? सोम नदीकाठच्या तोफा पुढे सरकून योग्य जागी उभ्या राहीतों दोन महिने ही घनघोर लढाई पुढे ढकलण्यास कोणची हरकत होती ? इंग्रज सैनिकांनी व सेनापतीनी या लढाईत शाबास म्हणवून घेतले खरे; पण मॅकेन्सनच्या डुना- जीच्या वळणावरहि लढाई न जातां व्हईनच्या वळणावर ही लढाई गेली. कारण लगट .
एप्रिल-मे महिना हिंडेबुर्गनें केलेल्या पीछेहाटीमुळे उत्पन्न झालेल्या दोषांचे परिमार्जन होण्यापूर्वी जंगी तयारीचा पहिला बहार खर्च करण्यात आला. ही लढाई अकाली झाली; हे असें कां व्हावें ? ही चूक लष्कराची नसून राजकीय परिस्थितीने उत्पन्न केलेल्या प्रसंगामुळे जर्मनांची फळी फोडण्यापेक्षां जर्मन सेना पश्चिम रणांगणांत गुतवून ठेवून तेथे त्याचा रोज खरपूस समाचार घेण्याची जी जरुरी इंग्रजांना भासू लागली आहे त्या जरुरीचे हे फळ आहे. आपले लष्करी धोरण सुव्यवस्थितपणे अंमलात आणण्यास सध्या इंग्रजांना सवडच नाही. लष्करी धोरण एका बाजूस ठेवून रोज हजारों लर्मन मारून जर्मनांना पश्चिम रणभूमीत डांबून ठेवणे अत्यंत जरूर झाले आहे. या जरुरीच्या दृष्टीने पाहिले असता इंग्रजी सेना आपली काम- गिरी फार संतोषकारक रीतीने पार पाडीत आहे, असे म्हटल्यावांचून गत्यतर नाही, पण ही जरुरी कोणी कोणावर व कशी लादली १ रशियांतील राज्यक्रांतीने ही जरुरी उत्पन्न केली. रशियांतील राज्यक्रांति पेट्रोग्राड येथे असलेल्या मैनि- कांच्या व कामकन्यांच्या संघाने घडवून आणली. सैनिकांच्या आणि यां कामकऱ्यांच्या पुढान्यांचें असें मत मार्च महिन्यांतच जाहीर झाले की, रशियाने दुसऱ्या कोणत्याहि मुलखाचा अभिलाष धरतां कामा नये. हे मत जाहीर होण्याबरोबर आस्ट्रो-जर्मनांनी रशियास असे उलट कळविले की, तुम्ही आमच्या मुलखाचा अभिलाष धरूं नयेत आम्ही तुमच्या मुलखाचा अभिलाष धरूं नये हे तत्त्व आम्हांस मान्य आहे. याच सुमारास आस्ट्रियाच्या बादशहाने असे कळविले की, कोणालाच अपमानास्पद होणार नाही अमला तह करण्यास आम्ही राजी आहोत. यानंतर अर्थातच द्राविडी प्राणायामच्या दृष्टीने एप्रिल प्रारंमापासून तहाच्या वाटाघाटीस लांबून लांबून सुरुवात झाली. डिसेंबरमधील तहाची वाटाघाट ज्याप्रमाणे इंग्लंडनें बमल्याजागीच धुडकावून लाविली त्याप्रमाणे आतां करणे योग्य नव्हे; कारण आतां रशिया लढण्याच्या कामी अगदी निरुत्साह झालेला आहे, आणि दोस्तांना खड्डयांत खड्डयांत पाडण्याचे पातक लागू नये येवढयाच करितां रशियन सैन्य रणांगणावर उभे आहे. पेट्रो ग्राड येथे कामकऱ्यांच्या व सैनिकांच्या संघाचे वर्चस्व विशेष आहे. या संघाच्या पाठबळाशिवाय रशियांतील नवें सरकार अल्पायु होण्याचा संभव आहे, आणि या संघाच्या पुढान्यांचे व जर्मन सोशियालिस्टांचे संगनमत झाले असून ..
८८ पहिले महायुद्ध तसाच प्रसंग आल्यास रशियाने एकट्याने जर्मनीशी तह करून या महायुद्धाच्या कटकटीतून मुक्त व्हावे असे उघडपणे म्हणण्यापर्यंत या संघाची मजल आलेली आहे. नवें रशियन सरकार या कामी आपल्या अनुयायांची समजूत घालण्यांत गुतलें असून ते काम सुलभ व्हावे म्हणून जर्मनीचा नक्षा उतरण्याकरितां एप्रिल महिन्यांत आपल्या जंगी तयारीचा पहिला बहार इंग्रजांना खर्च करावा लागला. मे जून महिन्यांतहि ही लढाई जरी जर्मनांची फळी फुटली नाही तरी, अँग्लो-फ्रेंचांना जोराने चालू ठेवावी लागेल. कारण हे दोन महिने आणीबाणीचे आहेत. लढाई सबंधाने आणीबाणीचे नव्हेत, तहाच्या वाटाघाटीसंबंधाने आणीबाणीचे आहेत. पश्चिम रणभूमीशिवाय युरोपांत इतर सर्व रणभूमीवर चोहोंकडे सांप्रत सामसूम आहे. बगदादच्यापुढे समारापर्यंत जनरल माँड यांचे ठाणे गेले असून इजिप्शियन सैन्याने पालिस्तैनमधील गाझाला शह दिला आहे. या सर्व इंग्रजी सेनेच्या यशस्वी हाल- चाली होत; पण इंग्रजांशिवाय इतर सर्व ठिकाणी महायुद्ध गारठलेले आहे. एप्रिल मे महिन्यांत हे युद्ध बर्फामुळे गारठलेले नसून रशिया एकटा स्वतंत्र तह करतो की काय ह्या धास्तीने गारठलेले आहे. रशियास एकटयास स्वतंत्र तह करूं न देतां रशियाचें मन खंबीर करण्यासाठी व तसे करणे कठीण दिसल्यास सर्वांचा मिळून तह करण्यासाठी काही तरी बोलणे चालणे अमेरिकेंत सुरू झाले आहे. इंग्लंडचे परराष्ट्रीय प्रधान मि. बाल्फर, फ्रान्सचे माजी मुख्य प्रधान मि. विव्हॅनी व सेनाध्यक्ष मि. जोफ्रे व इटलीचे काही मुत्सद्दी एप्रिलच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यांत अमेरिकेंत गेले. ते ह्या तहाच्या वाटाघाटीसंबंधाने गेले असावेत, असा अंदाज आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटची गुप्त सभा ता. १० मेला व्हावयाची असून त्याच्या आधी जर्मनीच्या तहाच्या अटी स्वित्झर्लंडच्या वकिलामार्फत अमेरिकेचे प्रेसिडेंट विल्सन यांना कळविण्यात येणार आहेत, असे म्हणतात. तहाच्या वाटाघाटीच्यावेळी म्हणजे मे व जून या दोन महिन्यांत रशियाने धीर सोडू नये व जर्मनीनेंहि शेकारून जाऊ नये म्हणून इंग्रजी सेनेने लष्करी धोरणाची विशेष पर्वा न करतां जर्मन सेनेचा रोज संहार करीत राहणे भाग आहे. एप्रिल महिन्यांत इंग्रजी सेनेने हा संहार चांगला केला. मे-जून महिन्यांत तहाच्या वाटा- घाटीला अनुसरून संहाराचेंहि काम तसेंच पुढे चालू राहील, हे सांगणे नलगे, या महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा मे-जून महिना एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्यांतहि फ्रान्सच्या रणभूमीत भयंकर लढाया साल्या. अँग्लो-फ्रेंच सैन्याचे पाऊल या लढयांत थोडेसें पुढे सरकले; पण एप्रिलच्या मानाने पुढे सरकण्याची ही गति बरीच मंदावली आहे असें दृष्टीस पडले. एप्रिल अखेर जर्मनांचे उलट हल्ले सुरू झाले; व मे महिन्यांत अँग्लो- फ्रेंचांच्या इतकेच हल्ले जर्मनांनी करून शांपेन प्रांतांत फ्रेंचांवरच उलट चढाई करण्याचा रंग जर्मन हालचालींत दिसू लागला. जर्मनांची ही हालचाल मे महिन्यांत कदाचित विशेष बळावली असती, पण इटलीने यान सुमारास आपल्या पूर्व सरहद्दीवर उत्तरेच्या टोकापासून खाली ट्रिस्टीपर्यंत जोराचे हल्ले आस्ट्रियावर करून ट्रिस्टीच्या बाजूला आस्ट्रियास काही मैल मागे रेटल्यामुळे फ्रान्समधील जर्मनीचा जोर कमी झाला. आणि सर्वांचे लक्ष इटालियन रणभूमीने आपणांकडे ओढून घेतले. पहिल्या धडकीच्या हल्लयांत इटलीला चांगला जय मिळाला; व इटलीची ट्रिस्टीच्या बाजूवी मोहीम यशाच्या मार्गाला लागलीसें भासले. ह्या कामी इंग्रजी तोफांनी इटलीस चांगली मदत केली ही समाधानाची गोष्ट होय. इटलीजवळ जरूर तितकें मनष्यबल आहे. पण गेल्यासाली तोफांची उणीव फार होती व त्यामुळे ट्रेन्टिनो प्रांतांत इटलीला माघार खावी लागली होती, पण यंदा ही तोफांची उणीव इंग्रजांच्या दीर्घोद्योगामुळे भरून निघाली असून गेल्या सालापेक्षां इटली आज अधिक समर्थ आहे. हे नवें सामर्थ्य इटलीने मे महिन्यांत बरेच प्रकट केले. रशियाच्या बाजूला सर्व ठिकाणी सामसूमच असल्यामुळे आस्ट्रियाला सैन्याची व तोफांची कुमक इटलीच्या बाजूला पाठवितां आली. एक दोन आठवड्यांतच ट्रिस्टी घेण्याचा इटलीचा आवेश इटलीस आवरून धरावा लागला. सर्व मे महिनाभर फ्रान्सच्या रणभूमीची जी स्थिति होती तीच स्थिति मे अखेरीप्त व जूनच्या प्रारंभी इटलीतहि रणभूमीची झाली. जूनच्या आरंभी अँग्लो-फच व इटालियन सैन्य ऑस्ट्रो-जर्मनांना मगरमिठी घालून रोज जोरजोराने लढत आहे. दोन्ही पक्ष रकमेकांवर सारखेच जोराचे हले करीत आहेत. अँग्लो-फ्रेंचांनी व इटालियनांनी तेवढे हल्ले करावेत व जर्मनांनी नुसत्या बचावाच्या उद्योगांत निमग्न असावे अशी स्थिति उरलेली नाही. उलट हल्ले करण्याचे काम ऑस्ट्रो-जर्मनांनीहि केलेले आहे. १२ पण ९ पहिले महायुद्ध त्या लढाया आणि अँग्लो-फ्रेंच व इालियन सैन्याला विसावा द्यावयाचा नाही असा जर्मनीचा संकल्प दृष्टीस पडू लागला आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांत फ्रान्सच्या व इटलीच्या रणभूमीत जवळ जवळ एक लाख जर्मन सैन्य कैद करण्यांत आले. व लहान मोठया तीनचारशे तोफा हिसकावून घेण्यात आल्या ! असे असतांहि जूनच्या प्रारंभी नव्या तोफा आणून जर्मनी हट्टाने जोराचे उलट हल्ले करण्यास किमपीहि शिथिलता दाखवू लागलेला नाही. इंग्रजांनीहि नव्या चढाईची तयारी मे अखेरीस जोराची केली असून जूनच्या प्रारंभाला तोफांच्या भयंकर सरबत्तीस सुरुवात केली आहे. या सर्व चिन्हांवरून असे म्हणण्यास हरकत नाही की, जून व जुलई महि- न्यांत रणकन्दनाचे मुख्य काम फ्रान्सच्या रणभूमीतच चालून इटलीची रणभूमीहि चांगली जागी राहील. मार्च, एप्रिल व मे असे तीन महिने ज्या लढाया जोर- जोराने फ्रान्समध्ये चाललेल्या आहेत आखी दोन तीन महिने तितक्याच जोराने चालल्यावांचून राहाणार नाहीत. सहा महिने एकसारखे चालणा-या ह्या रणकंदनाचा मध्य जून महिन्यांत येत असल्यामुळे जून महिना कदाचित् एप्रिल महिन्यावरहि संहाराच्या दृष्टीने ताण करील असें ह्मणावे लागते. दोन्ही बाजूचा हा जून-जुलई महिन्यांत विकोपास जाईल. सोक्षमोक्ष करून घेण्याच्या इराद्याने व कितीएक प्रसंगी लष्करी धोरण एका बाजूस ठेऊन व नफानुकसान मनीं न आणून संहाराचा खून अंगीं चढ- ण्याच्या आवेशाने व बेपर्वाईने लढाया माजून राहून रक्ताच्या नद्या फ्रान्सच्या व इटलीच्या रणभूमीत वाहूं लागतील. कारण जून व जुलई हे दोन महिने देखील एप्रिल व मे या महिन्याप्रमाणे महायुद्धाच्या इतिहासांत आणीबाणीचे गणले जातील. एप्रिल व मे या दोन महिन्यांत निकालाच्या दृष्टीने जरी नसल्या तरी संहाराच्या दृष्टीने पहिल्या प्रतीच्या ठरल्या जातील असल्या लढाया फ्रान्समध्ये झाल्या. एक दोन महिन्यांत येवढा मोठा संहार झाला. असली उदाहरणे इतर युद्धांतहि क्वचितच ठिकाणी नमूद केलेली दृष्टीस पडतील, जवळ जवळ एक लाख जर्मन सैन्य कैद करण्यांत आले. अर्थात् मेले व जखमी झालेले यांची संख्या चार पांच लाखांहून अधिक असली पाहिजे. या दोन महिन्यांत अंगावर चाल करून जाण्याचे काम अँग्लो-फ्रेंचांकडे होते. चराच्या युद्धांत चढाई करणारांचे नुकसान विरुद्ध पक्षाच्यापेक्षा तिप्पट चौपट होत असते. या नियमाला अनुसरून हिशेब केला असतां अँग्लो-फ्रेंचांचे नुकसान दहा पंधरा लाखाहून अधिक असले पाहिजे मे-जून महिना ९१ निघतें. पण असें अनुमान वस्तुतः तसें नुकसान झालेले नाही. हल्ली इंग्रजांच्या तोफखान्याची तयारी फारच मोठी झालेली आहे. तोफांच्या मान्यखालीं शत्रूकडील चरांची इतकी धुळदाण उडविण्यांत येते की, पायदळ ज्यावेळी चरांच्या जवळ जाऊन पोचते त्यावेळी शत्रूकडील लोक चरा. मध्ये फारसे जिवंतच रहात नाहीत. तोफखान्यांची अशी जंगी तयारी असल्यामुळे जर्मनांहून अधिक नुकसान इंग्रजांचे झाले नाही म्हणतात. दुसऱ्या बाजूने असे प्रसिद्ध झाले आहे की, इंग्रजांच्या तोफांची जंगी तयारी जर्मन लोक ओळखून असत्य पुळे त्यांनी हल्ली फ्रान्समध्ये चरांची व्यवस्था फार निराळ्या प्रकारची केलेली आहे. तोंडाला लढणाऱ्या चरांच्या मागे दूरवर तिरप्या जाणाऱ्या चरांच्या रांगा तयार करून ठेविलेल्या असतात. आणि तोफखान्यांचा भडिमार सुरू झाला म्हणजे तोंडावरच्या चरांतील लोक मागे जाऊन दडून बसतात. व शत्रूकडील पायदळ हालू लागले म्हणजे इषारत पोंचतांच तोंडावरच्या चरांत शत्र पोचण्याच्या आधी जाऊन बसतात. म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस होणारा तोफांच्या गोळ्यांचा वर्षव सामान्यतः रिकाम्या चरावरच होत असतो. तोफांच्या लढाईच्या वेळी चर रिकामे ठेवावयाचे व पायदळ हातघाईवर आले म्हणजे चर भरून काढावयाचे, अशा प्रकारची योजना केल्यामुळे जर्मनीचें नेहमींहून फार कमी नुकसान झाले व इंग्रजी तोफांचे गोळे वायां गेले असें जर्मनीचे झणणे आहे. कसेंहि असो, एप्रिल-मे महिन्यांत मोठे तुम्बळ युद्ध झाले व कांहींच निर्णय लागला नाही, येवढी गोष्ट मात्र खरी. दोन महिने भयंकर संहार होऊन जर रणदेवता निकाल देत नाही तर त्याच त्याच ठिकाणी त्याच त्याच मुद्यावर रणभूमीला कौल लावण्यांत तरी पुरुषार्थ कोणता? जून- जुलई महिन्यांत इंग्रजांनी तरी जर्मनांवर चढाई करून का जावें ? बरें, इंग्रजांचे हल्ले मदावले तर जर्मनीने तरी उलट हल्ले का चढवावे ? फ्रान्सच्या रणभूमीत यासाली निकाल लागू शकत नाही एवढे निदान गेल्या तीन महिन्यांच्या लढायांनी ठरविलें आहे. पुढील सालच्या वसंतकाळांत हा निकाल लागल असें तज्ज्ञांची वाचा बोलू लागली आहे. एप्रिल-मे महिन्यांतील लढाया फ्रान्सला समाधानकारक झाल्या नाहीत असें फ्रान्सचे लोकमत बनत चालले असून क्षुब्ध झालेल्या लोकमताला शांत करण्याकरिता फ्रेंच सरकारला मुख्य सेनापति बदलावा लागला. पुढील साली अमेरिकेचें पांच सहा लाख सैन्यावें बल फ्रान्समध्ये येऊन पोचल्यावर अँग्लो- ९२ पहिले महायुद्ध फ्रान्सने काय, फ्रेंचांना अनुकूल परिस्थिति उत्पन्न होईल, असे आश्वासन देण्यात येत आहे. इंग्लंडांतून हिंदुस्थानांत नुकतेच परत आलेले ना. सिंह यांनी कलकत्त्यास जूनच्या प्रारंभी असे उदगार काढले आहेत की, या महायुद्धांत अखेरीस इंग्लंड विजपी होणार याविषयी इंग्लंडांत कोणास शंका नसली तरी आणखी वर्ष दोन वर्षे हैं महायुद्ध चालणार असा इंग्लंडांतील वरच्या लोकांचा अंदाज आहे. म्हणजे अडीच तीन वर्षाच्या ऐवजी पांचसहा वर्षांची आयुर्मर्यादा महायुद्धास देण्याकडे तज्ज्ञांचा कल पडू लागला आहे. यासाली जर फ्रान्सच्या रणभूमीत अनुकूल परिस्थिति नाही व पुढील साली जर ती प्राप्त व्हावयाची आहे तर जून, जुलई महिन्यांत फ्रान्सच्या रणभूमीत भयंकर संहाराच्या लढाया होतील असा अंदाज कां ? हा संहार करण्यास इंग्लंडनें काय, जर्मनीने काय, किंवा इटलीने काय कां प्रवृत्त व्हावें ? निकाल होईलसें कोणासच वाटत नाही मग संहाराकडे प्रवृत्ति का ? या प्रश्नाचे उत्तर देण्याकरितां आपणांस आतां रणभूमि सोडून रशियन राज्यक्रांतीने उत्पन केलेल्या नव्या परिस्थितीतील विलक्षण गुतागुतीकडे वळले पाहिजे. रशियाची अंतस्थ स्थिति थोडथोडी निवळत चालली आहे. रशियांतील राज्यक्रांति घडवून आणण्याला ड्यूमा सभेची बुद्धिमत्ता जशी कारणीभूत झाली त्याप्रमाणे कामकरी व सैनिक यांच्या प्रतिनिधींची पेट्रोग्राड येथील कमिटीहि कारणी- भूत झाली. राज्यक्रांति करणारे शरीरबल या कमिटीने उत्पन्न केले. सेनापति अलेक्झीपसारख्या प्रमुख सेनानायकांची ही सहानुभूति या राज्यक्रांतीस मिळाल्या- मुळे झारच्या हातांतील शरीरबलहि झारला निरुपयोगी ठरले इतकेच नव्हे, तर उलट क्रांतिवाल्यांना मिळाले. कामकऱ्यांच्या कमिटीचे शरीरबल, ड्यूमा सभेची म्हणजे रशियांतील मध्यमवर्गाची बुद्धिमत्ता व सेनानायकांची सहानुभूति या त्रिवेणी संगमाने रशियन राज्यक्रांति घडवून आणिली. राज्यक्रांति घडल्यानंतर या तीन शक्तींचा पूर्ण मिलाफ न होतां सदर तीन नद्या पुन्हां विभक्त होऊन वाहूं लागल्या. कामकऱ्यांच्या कमिटीचे म्हणणे पडले की, आमच्या हातापायांनी ही राज्यक्रांति आणिली तेव्हां आम्ही ठरवू त्याच दिशेने रशियाचा राज्यकारभार यापुढे हाकलला गेला पाहिजे. सांप्रतचे महायुद्ध हे बड्या बड्या सरदारांच्या व कोटयाधीशांच्या स्वाकरितां, महतीकरितां व इज्जतीकरितां चाललेले आहे. घडवून मे-जून महिना ९३ यांत सामान्य जनसमूहाचें कांहींच हित नाही. वैभव वाढावयाचे वरच्या थोडक्या लोकांचें; आणि मरणाची पाळी यावयाची खालच्या बहुजनसमाजावर ही स्थिति आम्हांस बिलकूल मान्य नाही. कोणत्याहि राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा मुलूख स्वतःच्या राज्यास जोडू नये किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यापासून खंडणीहि घेऊ नये. प्रत्येक राष्ट्रास तेथील बहुजनसमाजास पसंत पडेल अशी राज्यव्यवस्था अमलांत आणन आपल्या देशाच्या सुखशांतीची स्वेच्छेला येईल तशी वाढ करून घेण्याची पूर्ण अखत्यारी असावी व इतरांनी त्यांच्या कारभारांत किमपीहि ढवळाढवळ करूं नये. वरील प्रकारच्या मतांनी प्रेरित होऊन कामकऱ्यांच्या कमिटीने नानाप्रकारचे हुक्म रशियन सैन्यास व रशियन लोकांस एकसारखे सोडण्याचा सपाटा चालविला. रशियन सैन्यास या कमिटीने कळविले की, झारच्या वेळी नेमल्या गेलेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही मुजरा करण्याचे काहीच कारण नाही. तुमचे तुम्ही अधिकारी निवडा आणि जर्मनी जर कोणी कोणाचा मुलूख घ्यावयाचा नाही या तत्त्वावर तह करण्यास तयार असेल तर तुमचा तुम्हीच तहहि घडवून आणा. वरील प्रकारचे कामकऱ्यांच्या कमिटीचे हुक्म रशियन सैन्यांत वाचले गेल्यानंतर सैन्याचे अधिकारी व सैग्य या दोहोंमध्ये एकदम दुफळी झाली, सैन्याच्या अधिकाऱ्यांचा ओढा डयूमा सभेतील बुद्धिमान पुढान्यांच्या बाजूला वळला आणि सैनिकांची वृत्ति कमिटीच्या बाजूची झाली. लढाई करून करून सैनिक दोन तीन वर्षे थकलेले; राज्यक्रांतीमुळे आपल्या घरादारांची सांपत्तिक स्थिति सुधारेल या आशेने तहाची वाट पहात ते बसलेले; अशा स्थितीत कामकऱ्यांच्या कमिटीच्या त्यांच्या परिणाम युद्धावरचे त्यांचे मन उडालें; लढण्याची हौस मावळून गेली; व अधिकाऱ्यांचे हुकूम धाब्यावर बसविण्यात येऊ लागले; काही लोक सैन्य सोडून घराकडे निघून गेले; व बाकी राहिलेल्यानीं आपलें नवेंच अधिकारी मंडळ उत्पन्न केले. सैन्याची शिस्त बिघडली इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या टापूतील सैन्याने समोरच्या शत्रूशी म्हणजे जर्मनांशी दळणवळण सुरू करून वैरभाषाच्या ऐवज तात्पुरत्या स्नेहभावानेंहि वागण्यास सुरुवात केली. आस्ट्रो-जर्मनांनीहि या संधीच चांगला फायदा घेतला. मुलूख नको व खंडणी नको ही दोन्ही तत्त्वे जर्मनीस मार असून या तत्त्वानसार रशियाशी स्वतंत्र तह करण्यास जर्मनी एका पायावर तया. हुकमांचा मनावर भलताच साला.
९४ पहिले महायुद्ध अर्मनीचा कावा डयूमा असून इंग्लंडच्या फायद्याकरितां तुम्ही फुकाचें कां मरता? असें नानात-हेने रशियन सैन्याला व रशियन सोशालिस्टांना विचारण्याचा जर्मनीने धूमधडाका चालविला. सभेच्या पुढाऱ्यांनी ओळखिला. आंज रशियाशी स्वतंत्र तह करून फ्रान्सच्या सैन्याचा पक्का चुराडा करावयाचा आणि नंतर रशियासहि अंकित करण्यास तयार व्हावयाचे अशांतले हे बोलणे होते. त्यांतले विष डयूमासभेच्या तेव्हांच ध्यानात आले व ड्यूमासभेने नेमलेल्या नव्या सरकारने स्वतंत्र तह कर- ण्याचें नाकारले. स्वतंत्र तह करण्याचें नाकारले खरे; पण सैन्याची घडी बिघडली त्याची वाट काय ? नव्या सरकारने हुकूम सोडावे व सैन्याने अमान्य करावे अशी स्थिति झाली. या स्थितीचे वर्णन रशियन मुख्य प्रधानांनी फार चांगल्या रीतीने केले आहे. नव्या रशियाचा नावलौकिक राखण्याची जबाबदारी तेवढी आमच्यावर, आणि राष्ट्रांत हुकूम चालतो कामकन्यांच्या कमिटीचा. हुकूम करण्याचा अधिकार या कमिटीच्या हाती, पण अमकें तमकें घडवून आणलेच पाहिजे अशी जबाबदारी या कमिटीवर काहीच नाही. घोड्यावर बसावयाचे एकानें, लगाम दुसऱ्याच्या हातीं, अशांतला हा प्रकार, ही स्थिति पालटण्याकरितां मे महिन्यांत नव्या रशियन सर- कारची पुनर्घटना करण्यांत आली. जर्मनीचा नक्षा उतरविलाच पाहिजे असें ठासून सांगणाऱ्या दोन तीन प्रमुख प्रधानांना त्यांच्या जागेवरून काढून टाकण्यांत आले आणि कमिटीच्यातर्फेचे चार पांच पुढारी प्रधान-मंडळांत सामील करून घेण्यांत आले. सोशियालिस्ट परराष्ट्रीय प्रधान झाले व सोशियालिस्टच लढाई. खात्याचे प्रधान झाले. या नव्या प्रधान-मंडळाने असें ठरविले की, मुलूख व खंडणी नको या तत्त्वावरच तह कराययाचा; पण तो तह एकटया रशियापुरता न करितां सर्वांचा मिळून. या तत्त्वाला अनुसरून तह घडवून आणावयाचा आणि तसा तह घडवून येईतों लढण्याच्या कामी दोस्त सरकारांना शक्य ती मदत करावयाची. बऱ्याच मारामाऱ्या व झटापटी होऊन ड्यूमासभा व कामकऱ्यांची कमिटी यांच्या- मध्ये एकमत झाले. आणि मे अखेरीला रशियन सैन्य व जर्मन सैन्य यांच्यामध्ये जे स्नेहभावाचे दळणवळण चाललें होतें-म्हणजे रणभूमीवरच जो एक स्वतंत्र तह होऊन राहिला होता त्या तहाचें-तें दळणवळण बंद पाडण्यांत आले. दुसरी एक कटकट मे महिन्यांतच उत्पन्न झाली. मुलूख नको व खंडणी नको या तत्त्वावर सर्वांचा मिळून तह घडवून आणण्याविषयींचा रशियन कामकरीपक्षाचा पण मे-जून महिना ९५ हह विशष वाढू लागला; आणि मुलूख नको व खंडणी नको या शब्दांच्या अर्थाची ओढाताण सर्व युरोपखंडभर सुरू झाली. आस्ट्रो-जर्मनांनी वरील मंत्र कबूल केला. पण अर्थाच्या वेळी त्या मंत्राला भलतीच दिशा दाखविली, पोलंडचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास जर्मनीची हरकत नाही, पण या स्वतंत्र राज्याचे वेडेवाकडे पाऊल पडू नये म्हणून जर्मनीने आपली कृपादृष्टि त्यावर ठेवण्यास कोणती हर- कत ? सहिय व रोमानिया यानी बाल्कन युद्धाच्या वेळी मिळविलेले मुलूख सोडणे म्हणजे 'मुलूख नको' या तत्त्वाप्रमाणे वागणे नव्हे काय ? शिवाय सहियाने आस्ट्रियाचा पुन्हां उपमर्द करूं नये अशी काही तरी तजवीज या तहांत झाल्या. शिवाय आस्ट्रियाच्या मनाला स्वस्थता तरी कशी प्राप्त होईल ? असे एक ना दोन कित्येक प्रश्न अर्थाच्यावेळी उपस्थित करून जर्मनीने सरळ कबुली देण्याचे नाका- रलें, पण कामकरीपक्षाशी आपले असलेले सूत मात्र तोडले नाही. रशियावरील संकटाचा फायदा घेऊन जर्भनी त्यांतल्यात्यांत आपले घोडे पुढे ढकलतो आहे असे पाहून इंग्लंड, फ्रान्स व इटली यांनी 'ना मुलूख ना खंडणी' या रशियन मंत्राचे चार चार पांच पांच अर्थ करण्यास सुरुवात केली. आल्साक लारेन्स हा फ्रान्सचा पूर्वीचा मुलूख जर्मनीने इ. स. १८७० साली घेतला. तो जर फ्रान्सने परत मागि- तला, तर फ्रान्सनें तो मुलूख या युद्धांत राज्यास जोडला असें कसें म्हणावें ? बेल्जम व फ्रान्स येथील घरादारांची नासाडी जर्मनीने केली, हे नुकसान मागणे म्हणजे खंडणी घेणे नव्हे. माऊंटनिनो, सहिया, रोमानिया या देशांचा एक स्वतंत्र पट्टा आस्ट्रिया-जर्मनी व तुर्की-साम्राज्य यांच्यामध्ये निर्माण करून जर्मनीचा बगदाद- वरील डोळा निष्पाप करण्यांत मुलख जोडण्याचे पाप कोणास लागणार आहे ? आर्मेनियन लोकांना व आरबांना तुर्कोच्या सत्तेखालून सोडविणे हे पुण्य नव्हे काय ? शिवाय आफ्रिकेंतील जर्मनीच्या वसाहतीमधील आफ्रिकन मूळ रहिवाश्यांना जर्मनीची सत्ता जर नकोशी असली तर त्या वसाहती तरी जर्मनीला कशा परत द्याव्या ? अशारीतीने 'ना मुलूख ना खंडणी' या रशियन सूत्रवाक्यावर लांबलचक वर्तिकें सुरू होऊन अर्थाचा अनर्थ होऊ लागला. तेव्हां सांप्रत तहाची वाटाबाट सोडून देऊन एकदां चांगले लढावयाचे, जर्मनांचा चांगला पुरता समाचार आणि मग तहाची वाटाघाट करावयाची असे दोस्त सरकाराप्रमाणे रशियाच्या नव्या सरकाराने ठरविले, आणि जर्मनीवर चाल करून जाण्यास रशियन लष्कर समर्थ होईल अशा प्रकारची नवी ध्यावयाचा पहिले महायुद्ध तयारी आरंभिली. पण रशियांतील सोशियालिस्ट पक्षाला प्रथम लढाईत जय मिळवावयाचा आणि मग तहाचे बोलणे बोलावयाचे, हा कार्यक्रम आवडला नाही. आणि रशियांतील कामकरी व सोशियालिस्ट पक्षाने स्वीडन देशांत स्टॉकहोम येथे तहाची वाटाघाट करण्याकरितां सर्व राष्ट्रांतील सोशियालिस्ट प्रतिनिधींची कान्फरन्स बोलाविली. या कान्फरन्सला जर्मनीतून नऊ प्रतिनिधी जून प्रारंभालाच गेले असून इंग्लंडांतूनहि काही प्रतिनिधी जाणार आहेत. इंग्लंडांतील प्रतिनिधि हे सरकारतर्फे किंवा सर्व राष्ट्राच्या तर्फे जाणार नसून जुलैमधील कान्फरन्सच्या बैठकीलाहि हजर राहणार नाहीत. रशियांतील कामकरी पक्षाला इंग्लंडांतील कामकरी पक्षाचे म्हणणे समजून सांगण्यास ते जाणार असून वाटेंत स्टॉकहोम येथे काही लोकांच्या गांठीं ते घेणार आहेत इतकेंच, फ्रान्समधील सोशियालिस्ट पक्षाने आपले प्रतिनिधि निवडले; पण फ्रेंच सरकारने त्यांना फ्रान्समधून बाहेर जाण्याची परवानगी देण्याचे नाकारले. एवंच जुलै महिन्यामध्ये भरणारी कान्फरन्स ही जर्मनी व रशिया या दोन राष्ट्रांतील सोशालिस्ट पक्षांचीच तेवढी होय. या कान्फरन्सच्या ठरावाप्रमाणे जर्मनी थोडाच वागणार आहे ? कारण जर्मनीतील सोशालिस्ट पक्ष म्हणजे जर्मन सरकार नव्हे. सांप्रत स्टॉकहोम येथे जमलेले व जुलै महिन्यांत जमणारे रशियन सोशालिस्ट झाले तरी नव्या रशियन सरकारने नेमलेले प्रतिनिधि नव्हे. ते उपटसुभ व स्वयंभु प्रतिनिधि दिसतात. यांना पेट्रोग्राड येथील नव्या सरकारचा पाठिंबा दिसत नाही. पेट्रोग्राड येथील कामकरी व सैनिक यांच्या कमि- टीत आपापसांतच या स्टॉकहोमच्या कान्फरन्ससंबंधाने बराच मतभेद झाला असून कामकरी पक्षांत दुही झाली आहे. या दुहींतील एक पक्ष लवकर तह झाला पाहिजे व प्रसंग पडल्यास स्वतंत्रहि तह करण्यास हरकत नाही असे प्रतिपादन करणारा असून दुसरा पक्ष दोस्त सरकारांच्या तंत्राने वागण्याच्या कामी रशियन नव्या प्रधान- मंडळाला मदत करणारा आहे. तहवाले व लढवय्ये असे दोन तट सांप्रत रशियांत झाले आहेत. तहवाल्यांचें केंद्रस्थान सांप्रत पेट्रोग्राड शहरी नसून फिनलंडच्या आखातांतील रशियाच्या आरमाराचे मुख्य ठिकाण जे अनस्टँड बंदर त्या जागी आहे. ऊन स्टँडचा सर्व जिल्हा तहवाल्यांच्या वतीचा झाला असून बाल्टिक समु- द्रांतील रशियाचे आरमारहि तहवाल्यांना मिळाल्यासारखे झाले आहे. या तहवाल्यांनी जूनच्या प्रारंभी पेट्रोग्राड येथील सरकारला अशी धमकी दिली आहे की, जर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला संमति दिली नाही तर आमचे खलाशी पेट्रोग्राड शहराजवळ उतरून पेट्रोग्राड शहर हस्तगत करून घेण्यास चुकणार नाहीत. या धमकावणीला मे-जून महिना पेट्रोग्राडचे प्रधानमंडळ भीक घालीत नसून धीमेपणाने व पोक्तपणाने वागण्याचा निश्चय पेट्रोग्राडच्या सरकारने केला आहे. या क्रूनस्टँडच्या बंडाळीचा अनिष्ट परिणाम रशियाच्या लष्करावरहि होत असून लष्करची बिघडलेली घडी पुन्हां बसविण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी नाही असे वाटून सेनापति आलेक्झिप यांनीहि जन प्रारंभी आपल्या जागेचा राजीनामा दिला. सेनापति ब्रुसिलाफ हे मुख्य सेनानायक झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली रशियन लष्कर जर्मनीशी टकर देण्यास समर्थ होईल असा भरंवसा उत्पन्न झाला आहे. कसेंहि असो; आणखी दोन तीन महिने तरी रशिया जर्मनीवर स्वारी करण्यास लायक होऊ शकत नाही. तेवढया अवधीत रशियांतील तहवाल्यांची आरडाओरड जर बंद झाली तरी देखील दोस्त सरकारांचे मोठे काम होईल. रशियाने जर्मनीवर उलट स्वारी करून जर्मनांचा पक्का पराभव करावा अशा प्रकारच्या रशियन मदतीची अपेक्षा दोस्त सरकारांना नाही. रशियाने तसे केले तर चांगलेच; पण त्यामुळे दोस्त सरकारांचा शेवटचा विजय नडला आहे अशांतला भाग मुळीच नाही. रशियाने स्वतंत्र तह न करतां रशियाच्या रणभूमीत सांप्रत ऑस्ट्रो-जर्मन सैन्य जेवढे आहे तेवढे तरी आणखी वर्ष दोन वर्षे गुन्तवून ठेविलें तरी पुढील वसंतकाळी अमेकेिच्या पांच दहा लाख लोकांच्या सहाय्याने जर्मनीस मेटाकुटीस आणल्यावाचून दोस्त सरकार राहणार नाही. एप्रिल महिन्याच्या अखेरीस जर्मनीच्या पाणबुड्या बोटींचे भय जितकें वाटत होते तितकें मे महिन्याच्या अखेरीस राहिले नाही. मे महिन्यांत एप्रिलच्या निम्याने व्यापारी जहाजांचा संहार जर्मन पाणबुडया बोटीनी केला. व हे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत जाईल असे म्हणतात. पाणबुड्या बोटींच्या चांचेगिरीमुळे इंग्लंडला फार हाल सोसावे लागत आहेत आणि अन्नोदकासंबंधाने विशेष काटकसर करावी लागत आहे हे खरे; पण त्यामुळे उपासमार होऊन जर्मनीच्या तहाच्या अटी इंग्लंडला कबूल कराव्या लाग- तील हे मात्र खोटें. रशियन राज्यक्रांतीमुळे जनीचा यंदाचा पराभव जरी टळला तरी पुढील साली तो टळणे शक्य नाही. मात्र रशियांतील तहाची आरडाओरड बंद पडली पाहिजे. आणि त्या आरडाओरडीच्या दृष्टीने जून-जुलै हे दोन महिने विशेष भानगडीचे व आणीबाणीचे दिसतात. या वेळी रशियांतील तहवाल्यांची छाप रशियन लष्करावर फाजील म्हणून अँग्लो-फ्रेंच व इटालियन सैन्य ऑस्ट्रो-जर्मनांवर एकसारखें तुटून पडणार हे उघड आहे. पडूं नये महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा जून-जुलई महिना बेल्जम-फ्रान्स व इटली या टापूतील जून महिन्यांतील लढाया एप्रिल व मे महिन्यांतील लढायांप्रमाणे रक्तपाताच्या दृष्टीने जरी फार भयंकर झाल्या नाहीत तरी राजकीय वातावरणाच्या दृष्टीने बऱ्याच महत्त्वाच्या झाल्या, एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतील लढायांनी पश्चिम रणभूमीसंबंधाने म्हणजे फ्रान्स व इटली या टापूसंबंधाने आतां असें सिद्ध केले आहे की यंदाच्या साली तरी लष्करी धोर- णाच्या दृष्टीने तेथे मोठीशी कामगिरी कोणत्याहि पक्षाच्या हातून होण्याची चिन्हें दिसावयाची नाहीत. इंग्लंडनें जून महिन्याच्या प्रारंभाला यिप्रेसच्या दक्षिणेला मेसीनी येथे मोठा विजय संपादन केला. मेसीनीच्या टेकड्यांवर उभा राहून जर्म- नीला यिप्रेसच्या बाजूच्या इंग्रजी लष्कराच्या हालचालीवर डोळा ठेवता येत होता. यिप्रेस व आमेटरीज या दोन ठिकाणच्या लष्करांमध्ये मेसीनीची पाचर जर्मनीच्या हातांत होती. हे पाचराचे व टेहेळणीचे ठिकाण जर्मनीपासून हिसकावून घेतल्याशिवाय फ्लॅडर्सच्या बाजूच्या इंग्रजी लष्कराला चैन पड़णे शक्य नव्हते. हे ठिकाण हाती लागावे म्हणून इंग्रजांनी गेल्या वर्षापासून तयारी चालविली होती. मेसीनीच्या टेकडीच्या खाली प्रचंड सुरुंग तयार करून ठेवलेले होते, हे सर्व सुरुंग एकदम उडविण्यात आले, व त्याच वेळी शेकड़ों तोफांनी रात्रंदिवस मेसीनीवर एवढा भयकर भडिमार केला की पृथ्वीच्या पोटांतून बाहेर निघणाऱ्या व आकाशांतून खाली पडणाऱ्या विलक्षण आगीच्या लोळांचे हातघाईचे युद्धच भूपष्ठावर होत आहे की काय, असा भयानक देखावा दोहों बाजूच्या दुलांना दिसू लागला ! या आगीच्या लोळांनी पृथ्वी अकस्मात घुसळली गेली, टेकड्यांची मैदाने झाली व मैदानांचे तलाव झाले. ओढे, नाले व पुरातन वृक्ष हे तर बेपत्ता झाले ! त्या ठिकाणच्या पृथ्वीचा शेदोनशे वर्षाचा आकार एका दिवसांत बदलला. असले हे भयानक पृथ्वीमंथन चालू झाल्यावर इंग्रजी सैनिकांनी हां हां म्हणतां मेसीनीचे ठाणे कबजांत घेतलें, सात आठ हजार जर्मन कैदी व कित्येक तोफा इंग्रजांना मिळाल्या व इंग्रजांच्या शक्तीची चांगली बहुत जर्मनांना बसली. मेसीनीचा विजय मोठा तर खराच, पण तो अखेरीस स्थानिक स्वरूपाचा ठरला. कारण, जून-जुलई महिना ९९ मेसीनीच्या पूर्वेस या विजयानंतर दोन चार दिवस लढूनहि जर्मनीची फळी इंग्रजांना फोडता आली नाही. मेसीनींच्या या विजयावर विरजण घालण्याकरिता जर्मनानी यिप्रेसपासून बेल्जमच्या किनाऱ्यापर्यंत बरीच हालचाल केली. लांब पल्ल्याच्या तोफांनी डंकर्कच्या बंदरावर गोळे टाकले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बेल्जम व फ्रान्स यांच्या किनाऱ्याजवळचा पश्चिम रणक्षेत्राचा भाग फ्रान्सने इतक्या दिवस आपल्या हाती ठेविला होता. स्वत:च्या किना-यावर परराष्ट्राच्या लष्कराचा अंमल नको, या भावनेने फ्रान्सने तसे केले होते, पण तीहि भावना सोडून देऊन फ्रान्सने अलिकडे तो टापू इंग्रजांच्या हवाली केला. या स्थित्यंतरामुळे अधु दुव्यावर घाव मारावयास सांपडेल या आशेने जर्मनीने त्या बाजूवर हल्ले चढविले, पण ते सर्व निष्फळ झाले. मेसीनींच्या प्रचंड उद्योगानंतर यंदांच्या साली जर्म नीची फळी फोडण्याचा हिय्या धरण्यापेक्षा पुढच्या वसंतकाळी अमेरिकेची पांच सात लाखांची पूर्ण मदत येऊन पोचल्यावर त्या साहसाला प्रवृत्त होणे योग्य होय, असें लष्करी तज्ज्ञांचे मत पडले. तथापि जूमच्या उत्तरार्धात इंग्रजी लष्कर स्वस्थ बसले नाही. जर्मन लष्कराला रोज उगाळून उगाळून झिजविण्याचा क्रम सेनाध्यक्ष हेगसाहेब यांनी अव्याहत चाल ठेवला. लेन्स शहराच्या उत्तरेस व दक्षिणेस इंग्रजांनी जर्मनांना थोडथोडे मागे हटविले आणि पश्चिम व दक्षिण या तिन्ही बाजूनी लेन्स शहराला वेढा दिला. उत्तर फ्रान्सांतील मौल्यवान खाणींच्या प्रदेशास लेन्सपासून प्रारंभ होत असून त्यासंबंधाच्या कित्येक उद्योगधंद्यांचें केन्द्रस्थान लेन्स शहर आहे. या शहरांतील मौल्यवान चीज वस्तु जर्मनांनी लांबविली असून लष्करी दृष्टयाहि अवजड सामानसुमान जर्मनीने तेथे ठेवले नाही. प्रसंग पडल्यास पलायन करण्याची सर्व तयारी जर्मनीची झालेली आहे. तेव्हा हे पिकलेले फळ लवकरच इंग्रजांच्या हातीं गळन पडेल असा तज्ज्ञांचा अन्दाज आहे. तथापि या शहरांतील रस्त्यांत चर खणून आणि मोठमोठया इमारतींना किलयांचे स्वरूप देऊन प्रत्येक आळी प्रत्येक पेठ लढवून नंतर लेन्स शहर इंग्रजांच्या हवाली करावयाचे, असा दृढनिश्चय जर्मनीचा दिसतो. मतलब हा की, इंग्रजांच्या तोफांनी फ्रेंचांच्या सुंदर हवेल्या व प्रचंड कारखाने जमीनदोस्त होऊन क्रोडो रुपयांच्या फ्रेंचांच्या मालमत्ते. वरून इंग्रजांनी गाढवांचे नांगर फिरविले अशी बोंब ठोकाक्यास सोपडावी. लेन्स शहर चिकाटीने धरून बसण्याबरोबरच जर्मन वर्तमानपत्रांतून १०० पहिले महायुद्ध या वरील प्रकारच्या चोरांच्या उलटया बोंबा सुरू झाल्या आहेत. या हाकाटीस इंग्रज किंवा फ्रेंच भीक घालणारे नसल्यामुळे लेन्स घेण्याचे इंग्रजांचे प्रयत्न जुलै महिन्यांत शिथिल पडणार नाहीत हे उघड आहे. जून महिन्यांत इंग्रजांच्या बाजूला जसल्या लढाया चालल्या होत्या तसल्या लढाया फ्रेंचांच्याहि बाजूला सुरूच होत्या. फ्रेंचांच्या हल्लयापेक्षा जर्मनांनी या बाजूला अधिक हल्ले केले. किंबहुना व्हईनच्या हल्लयाची पुनरावृत्ति करण्याचे धाडस या बाजूस करण्याच्या उद्योगांत जर्मन आहेत की काय असेंहि जून अखेरीस वाटू लागले. सांप्रत फ्रेंचांचे सबंध राष्ट्राच्याराष्ट्र रणभूमीवर उभे आहे. लढाई करण्यास लायक असा एकहि पुरुष मागे उरलेला नाही. अशा स्थितीत फ्रेंचांवर असह्य भार टाकून फ्रान्सांतील सामान्य जनसमुहालाहि लढाईची कटकट नको असें भासावयास लावणारा उद्योग जर्मनांनी करावा ह्यांत कांहीं नवल नाही. एप्रिल मे महिन्यांत फ्रेंचांनी जी जंगी चढाई सुरू केली त्याचा परिणाम फ्रान्सच्या अटकळीप्रमाणे झाला नाही. सामान्य जनसमूह थोडासा संतुष्ट झाला व फ्रेंच पार्लमेंटमध्ये सेनापतींच्या कर्तबगारीवर कडक टीका करण्यांत आली. टीकेस उत्तर देतांना फ्रेंच प्रधानमंडळाने असे सांगितले की, लोकांनी निष्कारण भलत्याच आकांक्षा मनांत उद्भवू दिल्या व त्यामुळे वाईट वाटून घेण्याचा हा प्रसंग गुदरला. तथापि फ्रान्सच्या मुख्य सेनापतीमध्ये अदलाबदल करण्यांत आली व क्षुब्ध झालेले लोकमत शांत झाले. लोकमताची ही क्षुब्धता कायम रहावी व फ्रान्सने फ्रेंच प्रधानमंडळाइतकें तहास नाखुष राहूं नये, ह्मणून फ्रेंच लष्करावरच जर्मनीने जून महिन्यांत आपला मुख्य मारा सुरू केला. हीम्सच्या टापूत व व्हडूनच्या टापूतील म्यूजनदीच्या डावीकडील भागांत जर्मनांनी काही ठिकाणी अवचित हल्ले करून किरकोळ जय मिळविला. हा जय क्षुलक व स्थानिक स्वरूपाचा ठरून जर्मन शवानी रणमैदान तेवढे आच्छादून गेले. जर्मनांना मोठासा विजय मिळाला नाही किंवा फ्रेंचांची फळी फुटली नाही. तथापि एवढी गोष्ट मात्र खरी की, जून अखेरीस फ्रेंचांना बराच ताण बसला. जून महिन्यांत फ्रेंच रणभूमीप्रमाणे इटलीचे रणभूमी- सहि आस्ट्रो-जर्मनांनी बराच त्रास दिला. मे अखेरीस इटलीने ट्रिस्टीच्या रोखाने मोठा जप मिळवून ट्रिस्टीबंदर दोन चार आठवड्यांत इटलीच्या हाती खास लागणार असें वाटू लागले. पण जून महिन्यांत ही स्थिति पालटून आस्ट्रियाचा दाब धैर्याने सोसण्याची पाळी इटलीवर आली, कार्योच्या मैदानावर क्षुलक व जून-जुलई महिना १०१ स्थानिक स्वरूपाचे खरे, पण इटलीला थोडेसे मागे हटविणारे असले जय आस्ट्रि- याला मिळू लागले. आणि ट्रेंटिनोच्या टापूत गेल्या सालच्या रणभूमीमध्ये एक दोन घाटांतून आपले बिनीचे लोक इटलीला मागे घ्यावे लागले. गेल्यासालइतकें दटपण जून महिन्यांत इटलीवर पडलें नाहीं हे खरे पण इटलीला चटदिशी धावून येऊन मदत करणाऱ्या फ्रान्सच्या लष्कराला एकसारखे त्रस्त स्थितीत ठेवून इटली- वरचे दडपण जोरजोराने वाढवीत जावयाचें; असला लष्करी डाव आस्ट्रो-जर्मन्स खेळत आहेत की काय अशी भीति उत्पन्न झाली. रशियाप्रमाणे इटलीलाहि तहासंबंधाने उत्सुक करावयाचे व तसे करूनहि जुलै महिन्यांतील तहाची वाटाघाट जर्मनीला अनुकूल अशी न झाल्यास इटलीवरील दडपण एकदम विलक्षण जोराने वाढवून हिवाळ्यापूर्वी दोस्त सरकारांचा एक पाय लंगडा करून ठेवावयाचा, असले लष्करी धोरण जून महिन्यांतील फ्रान्स-इटलीच्या बाजूच्या आस्ट्रो-जर्मनांच्या हालचालीवरून दृग्गोचर होऊ लागले. फ्रान्सप्रमाणे इटलीचेहि सामान्य प्रजाजन जून महिन्यांत अस्वस्थ होऊ लागले. जून अखेरीस इटलीच्या पार्लमेंटची बैठक आठ दिवस चालून तहाच्या वाटाघाटीसंबंधाने व लष्करी धोरणासंबंधाने बरीच चर्चा झाली. प्रधानमंडळाने केलेला खुलासा इटलीचे पार्लमेंटास पटला व प्रधानमंडळावर विश्वास ठेवण्याची सूचना पार्लमेंटमध्ये उघडपणे पास झाली%3B तथापि जून अखेरीस आस्ट्रो-जर्मनांच्या दडपणामुळे इटली थोडासा चिंताक्रांत झाला. गेल्या सालासारखी काळजी करण्याइतके हे दडपण जन महिन्यांत जोराचें नव्हते तरी रशियांतील घोटाळा माजत जाऊन रशिया सर्व सालभर निश्चितपणे स्वस्थच राहाणार असें सिद्ध झाल्यास रशियाच्या बाजूचे आपल्या सैन्याचे वजन काढून घेऊन फ्रान्सला नेहमी त्रस्त स्थितीत ठेवून ठेवून इटलीला तुडविण्याचा बेत अंमलात आणण्याकरितां दीर्घोद्योग केल्यावांचून सेनापति हिंडेनबुर्ग हिवाळा पाहणार नाहीत, अशी भीति इटलीला वाटू लागली. गेल्या साली रशियन सेनापति ब्रुसेलॉफ यांनी इटलीच्या अशा संकट समयीं गॅलिशिया. मध्ये एकदम जोराची चढाई सुरू केली व आस्ट्रियाचा मोठा पराभव करून इटलीच्या रणभूमीचे स्वरूप एकदम पालटून टाकले. यंदा रशियाच्या असल्या कुमकेची बिलकूल आशा नव्हती. रशियाकडून लष्करी मदत होणार नाही असें वाटत होते, इतकेच नव्हे तर रशियांतील बजबजपुरी वाढून रशियाचें तहाचे बोलणे पहिले महायुद्ध रशिया दोस्त सरकारांच्या घशांत कोंबतो की काय अशीहि भीति वाटू लागली होती. पण जून अखेरीस व जुलईच्या प्रारंभी रशियाच्या गॅलिशियांतील सैन्याने टार्नपूलच्या पश्रिमेस पुन्हां उचल केली. आस्ट्रियाच्या व टर्कीच्या सैन्यास पळावयास लावून कित्येक तोफांसह पंधरा-वीस हजार सैन्य कैद केले. गैलिशियांत रशियन सेनापति ब्रुसेलॉफ यांनी तीन चार लाखांची नवीन सेना गोळा केली असून या सेनेस रशियन राज्यक्रांतीच्या पूर्वीच्या दिवसाहून अधिक भरभक्कम मदत नव्या तोकांनी व दारूगोळयांनी केलेली आहे. प्रिपेट नदीपासून ब्युकोव्हिनापर्यंत सर्व रशियन रगभूमि जागी झाली असून जुलै प्रारंभाला टार्नपूलच्या पश्चिमेस असलेल्या बेमनीच्या महत्त्वाचे ठाण्यास उत्तर व दक्षिण या तीन बाजूनी रशियाने वेढा दिला आहे. या चढाईच्या पहिल्या बातम्यांवरून गेल्या सालच्या रशियाच्या विजया- प्रमाणे यंदाहि सेनापति ब्रुसेलॉफ मोठा विजय संपादन करणार अशी सुखमय आशा वाटू लागली होती; पण जुलईच्या पहिल्या आठवड्यांत आलेल्या बातम्या तितक्या उत्साहजनक नसून ब्रेझनीच्या पूर्वेस व प्रिपेट नदीच्या उत्तरेस पिन्स्कच्या टापूत आस्ट्रो-जर्मनानी रशियावर उलट हल्ले करण्यास सुरवात केली आहे, असे प्रसिद्ध झाले आहे. रशियाने मिळविलेला विजय गेल्या सालाइतका मोठा नसला तरी दक्षिणेच्या बाजूची रशियाची सेना पुन्हां उठली असून आस्ट्रो-जर्मनांना थोडथोडी मागें रेटू लागली आहे ही गोष्टच रशियाच्या सांप्रतच्या स्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे. रशिया पुन्हां लढू लागला आहे हे ऐकून दोस्त सरकारांना फार आनंद झाला, आणि रशिया झोपी जाऊन सर्वांच्या गळ्यांत भलत्याच तहाचे लोढणे बांधतो की काय ही भीति विलयाला जाऊ लागली. रशियाच्या ह्या हाल- चालीने फ्रान्स व इटली यांवरील दडपण हलकें होईल, इतकेच नव्हे तर रशियांतोल बजबजपुरीस आळा पडून राज्यक्रांतीनंतरचे नवें सरकार लष्करी दृष्टया अधिक कार्यक्षम होईल. रशियाच्या या नव्या चढाईचे परिणाम महायुद्धाच्या लष्करी धोरणावरच तेवढे व्हावयाचे नसून रशियन राज्यक्रांतीने उत्पन्न केलेल्या राजकीय परिस्थितीवरहि व्हावयाचे आहेत. तेव्हां आतां या राजकीय परिस्थितीच्या विवेचनाकडे वळणे उचित होय, रशियांत राज्यक्रांति झाल्यानंतर जरी नवें प्रधानमंडळ नेमले गेलें व न्या प्रधानमंडळास रशियाचे नवें सरकार अशी संज्ञा प्राप्त झाली तरी खरी सला ।
जून-जुलई महिना म्हणजे मनुष्यबळाची सत्ता सैनिक व कामकरी या कमिटीच्या हातींच राहिला. अर्थात् नव्या सरकारच्या हुकमांची अंमलबजावणी होईना. इतकेच नव्हे तर, कमिटीने काढलेले जाहीरनामे सैन्यांतील शिस्तीस विघातक होऊन लढण्याच्या कामांत रशियन सेना नालायक होऊ लागली. कमिटी, ड्यूमासभा, आणि नवें सरकार या तिघांचा परस्परांशी मेळ बसेना, तेव्हां कमिटींतील प्रमुख लोकांना प्रधानमंडळांतील सहा जागा देण्यांत आल्या व प्रधानमंडळाची व कमिटीची एक त-हेची तोंडमिळवणी करण्यांत आली. लढाईचे खातें व परराष्ट्रीय खातें ही सोशियालिस्ट पक्षाच्या हाती गेल्यावर सैन्यांत पुन्हां शिस्त उत्पन्न करण्याच्या कामास सुरवात झाली. सोशियालिस्ट पक्षाचे लोक प्रधानमंडळांत शिरले त्यावेळी त्यांच्या बऱ्याच अटी नव्या सरकारकडून मान्य करण्यांत आल्या. या नव्या अटींत दोन तीन अटी प्रमुख आहेत. 'ना मुलूख ना खंडणी ' या तत्त्वाला धरून सर्व राष्ट्रांचा मिळून तह घडवून आणण्यास रशियन सरकारने उघडपणे झटले पाहिजे अशी एक अट सुदर करारनाम्यांत आहे. शिवाय सर्व लष्कर व आरमार बड्या लोकांच्या अंमलाखाली न राहतां सैनिकांनी व खलाशांनी निवडलेल्या अंमलदारांच्या अंमलाखालींच राहिले पाहिजे, अशी दुसरी अट असून रशियाची राजसत्ता कोणत्या स्वरूपाची असली पाहिजे हे मुक्रर ठरविण्याकरितां रशियाचे नवे मोठे पार्लमेंट लवकरच बोलाविले पाहिजे अशी तिसरी अट आहे. म्हणजे तह, सैन्याची रचना व राज- सत्तेचे स्वरूप या बाबीसंबंधाने करारमदार करून सोशियालिस्ट पक्षाचे लोक प्रधान मंडळांत शिरले. हे करारमदार झाले व सोशियालिस्ट पक्षाचे हातांत बरीच सत्ता गेली तरी रशियांतील बजबजपुरी जून महिन्यांत कमी झाली नाही. रशियाची राजधानी पेट्रोप्राड या शहराजवळील छैनस्टँड बंदरांतील कमिटीने आपल्या प्रांताचा कारभार स्वतंत्रपणे हाकण्यास सुरवात केली व जून महिन्यांत फिनलंडच्या आखातावरील प्रमुख बंदरांनी कनस्टँडचाच कित्ता गिरविला. फिनलंडच्या काँग्रेसनें फिनलंडचे स्वतंत्र रिपब्लीक असावें, असें ठरविले. उत्तरेकडील म्हणजे रिंगाच्या बाजूचे लष्कर आणि मध्यावरील म्हणजे पोलंडच्या बाजूचे लष्कर यांनी आपापले अंमलदार निवडण्यास सुरुवात करून सैन्यांत घोटाळा उत्पन्न केला. कोसाक जातीच्या सैनिकांच्या काँग्रेसने जर्मनांना रशियांतून हांकून देईतो लढले पाहिजे असा ठराव पास केला तर सोशियालिस्ट पक्षाने पूर्षीची झारची ससा १०४ पहिले महायुद्ध पुन्हां प्रस्थापित करण्यास काही लष्करी लोक झटत आहेत अशी हाकाटी केली, शेतकऱ्यांची काँग्रेस, दक्षिणेकडील प्रांताची काँग्रेस, सैनिकांची काँग्रेस अशा प्रकारें कितीएक सभा मे-जून महिन्यांत रशियांत भरल्या. प्रत्येक सभेनें काही तरी एक नवें तत्त्व पुढे आणावयाचे, अशी स्थिति या सभांतून दृष्टीस पडली. रशियन भाषा म्हणून जिला म्हणतात ती भाषा राजदरबारची भाषा असली तरी इतर कित्येक भाषा रशियांत चालू आहेत. धर्माच्या बाबतींतहि एकी नसून एकाच खिश्वानिटीचे कित्येक धर्मपंथ होऊन धर्मबंधनाचीहि कित्येक शकले झालेली आहेत. भाषेच्या अनुरोधाने रशियाचे तुकडे पाडून त्या सर्व भागांना स्वतंत्र रिपब्किचे अधिकार देऊन भाषा स्वातंत्र्य पूर्णपणे अंमलात आणावें व असल्या रिपब्लिकांची मोट बांधणारी एक लोकसभा पेट्रोग्राड येथे स्थापून तिचा कारभार तेवढा रशियन भाषेमध्ये चालावा, असें कांहींचे म्हणणे आहे, तर काहींचे म्हणणे असे आहे की, धर्मपंथाप्रमाणे रशियाचे विभाग करून प्रत्येक विभाग स्वतंत्रच लोकसत्तात्मक राज्य बनावें. नवीन राज्यसत्तेसंबंधाने व तिच्या घटनेसंबंधाने असली नाना प्रकारची मतें रशियांत सांप्रत वावरत आहेत. लष्कराकडे दृष्टि दिली तर काळया समुद्रांतील रशियाचे आरमार व गॅलिशियाच्या बाजूचे म्हणजे दक्षिणकडचे लष्कर हीच कायती वरील नाना प्रकारच्या मतांच्या बाधेपासून अलिप्त राहिलेली आहेत, सेनापति आलेक्झीप हे उत्तरेच्या बाजूचे सेनापति होते व जनरल ब्रुसेलॉफ हे दक्षिणेचे सेनापति होते. उत्तरेची सेना शिस्तीच्या लगामापासून मोकळी झाल्यावर नवी शिस्त अंमलात आणण्यास सेनापति आलेक्झीप हे असमर्थ झाले. राणांगणावर कोठे तरी काही तरी करून दाखविण्याची शक्ति त्यांच्या अंगी राहिली नाही. कारण उत्तरेकडील व मध्यावरील सैन्याने इतके नवे अंमलदार स्वतः निवडले की, आणि पूर्वीचे अंमलदार इतके काढून टाकले की, कोणत्या कामास कोण लायक आहे व कोणास हुकूम केला असतां कार्य सिद्धीस जाईल हे समजण्याची मुख्य सेनापति आलेक्सीप यांना पंचाईत पडू लागली. त्यांनी कोणाला व कसा हुक्म करावा ? सर्वच लष्करी सृष्टी नवीन ! पूर्वीच्या ओळखी देखील राहिल्या नाहीत. मुख्य सेनापति आलेक्सीप अशा रीतीने पंगू झालेले पाहून त्यांना त्यांच्या जागेवरून दूर करण्यात आले. आणि त्यांच्या जागी सेनापति ब्रुसेलॉफ यांची नेमणूक करण्यांत आली. गॅलिशियाच्या बाजूच्या लष्करात गेल्या साली सेनापति ब्रुसेलॉफ यांनी मोठा जून-जुलई महिना १०५ विजय संपादन करून दिलेला आहे. अर्थात् त्यांची दक्षिणेच्या लष्करांत मानमान्यता मोठी आहे व या लष्कराचे अंमलदार त्यांच्या अगदं भजनी लागलेले आहेत. दक्षिणेकडचे लष्कर आपल्या हातचे आहे असे पाहून या लष्करांत जून महिन्यांत नवा दम सेनापति ब्रुसेलॉफ यांनी उत्पन्न केला. आणि उत्तरेकडच्या व मध्यावरच्या लष्कराची तयारी होण्यापूर्वीच जून अखेरीस व जुलईच्या प्रारंभी नव्या रशियाच्या नव्या चढाईस सुरवात झाली! दक्षिणेकडील लष्कराचा हा कित्ता मध्यावरील लष्करने, उत्तरेकडच्या लष्करने व फिनलंडच्या आखातांतील आरमाराने गिरवून रशि. यास धन्य करावे, अशी आग्रहाची विनंति उत्तरेच्या बाजला जुलैच्या पहिल्या आठव- ड्यांत करण्यांत आली आहे. उत्तरेची तयारी होण्यापूर्वी आपल्या हातांतील दक्षिणेचा बाण सेनापति ब्रुसेलॉफ यांनी कां सोडला, असा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो. सदर प्रश्नास उत्तर देण्याकरितां रशियांतील तहाच्या वाटाघाटीकडे आपण वळले पाहिजे. जर्मनीतील सोशालिस्ट पक्षाच्या मार्फत जर्मनीने रशियाशी तहाचे बोलणे सुरू केलें आहे. रशियाला नानाप्रकारच्या सवलती देऊन द्रव्याचीहि मदत करण्याचे जर्मनीने आश्वासन दिले व दोस्त सरकारांना सोडून स्वतंत्र तह करण्याविषयी फार गळ घातली; पण रशियांतील सर्व पक्षांनी या एकटयापुरत्या तहाची फेटाळणी करून दिली. रशियन राज्यक्रांतीनंतर रशियांत जी नानाप्रकारची मते पुढे आली त्या मतांमध्ये, राजानी व बादशहांनी चालविलेल्या सांप्रतच्या या महायुद्धाचा उघडपणे निषेध करून लढाई एकदम बंद पडली पाहिजे असा हह धरून बसणारें एक मत होते. या मताचा पगडा पेट्रोग्राड येथील सैनिकांच्या व कामकऱ्यांच्या कमिटीवर प्रारंभी प्रारंभी पडला व त्यामुळे रशियाच्या उत्तरेकडील सैन्यालाहि त्या मताची थोडीशी बाधा झाली; पण नवें रशियन सरकार दोस्त सरकारांच्या बाजूचे पूर्णपणे असल्या- मुळे आणि जर्मनांशी झुजण्यास अनुकूल अशी मते ड्यूमासभेची राहिल्यामुळे जर्म: नीचा रशियाला फोडण्याचा डाव फसला. तथापि गेल्या मे महिन्यांत कमिटीचे सभा- सद ज्यावेळी रशियन प्रधानमंडळांत सामील झाले त्यावेळी 'ना खंडणी ना मुलूख' या मंत्राला धरून सर्वांचा मिळून तह करण्याची खटपट करण्यास नवें रशियन सरकार उद्युक्त झाले. 'ना मुलख ना खंडणी' हा मंत्र पेट्रोग्राड येथील कमिटीने उच्चारल्याबरोबर आस्ट्रियाने त्याची 'री' ओढली व जर्मनीने अस्पष्ट संमति दिली. इंग्लंड, फ्रान्स व इटली या तीन राष्ट्रांनी सदर मंत्रांतील सामान्य तत्त्व १०६ पहिले महायुद्ध कबूल केले खरे पण असल्या तत्त्वांचा बहाणा करून जर्मनी आपल अपजय कसा टाळीत आहे हे त्यांनी स्पष्टपणे सर्व जगाच्या निदर्शनास आणून दिले. रशियांत राज्यक्रांति होऊन लढण्यास रशिया असमर्थ झाला असतांहि आस्ट्रो-जर्मनांना या तीन राष्ट्रांनी मिळून चांगले मार्गे रेटले असून त्या तिघापैकी कोणालाहि जर्मनीला उलट हात दाखवितां आला नाही. म्हणजे मनुष्यबळाच्या दृष्टीने आज तुलना केली असतां जर्मनी, आस्ट्रिया, बल्गेरिया व टर्की या चौघांच्या वजनाइतकें वजन आज इंग्लंड, फ्रान्स व इटली या तिघाचे आहे. शिवाय इंग्लंडचें वजन वाढण्यास अद्याप पुष्कळ वाव आहे; पण आस्ट्रो-जर्मनांची वाढ पुरतेपणी खुटलेली आहे. अशा स्थितीत रशियाने थोडीशी पुन्हां हालचाल केली तर पुढील साली अमेरिकेची पूर्ण मदत येऊन पोचल्यावर खरपूस मार खाऊन तहाची भिक्षा मागितल्याशिवाय जर्मनीला गत्यंतर राहणार नाही. आम्ही अमक-ला जिंकू, तमक्याला जिंकू अशी घमेंड जर्मनीच्या सेनापतींना आतां राहिलेली नाही. जर्मनीला जो मुलूख पाहिजे होता तो मुलूख जर्मनीने गिळंकृत केला आहे व महायुद्धांतील जर्मनीचें साध्य आजच सिद्ध झालेले अहे, ही गोष्ट खरी; पण गिळलेली रत्न पचविण्याचे सामर्थ्य जर्मनीच्या अंगांत नाही असे दोस्त सरकारांचे म्हणणे आहे; व यंदाच्या सालच्या लष्करी तयारीने आपल्या मताची सत्यताहि दोस्त सरकारांनी जगास पटविली आहे. दोस्त सरकारांच्या वाढत्या शक्तीला आळा घालण्याकरितां जर्मनीने दोस्त सरकारांवर आपल्या पाणबुड्या बोटी सोडलेल्या आहेत, आणि जर्मनी आतां उघडपणे अशी प्रौढी मिरवू लागला आहे की, पाणबुडया बोटींच्या संहारामुळे इंग्लंडच्या अत्यंत हालअपेष्टा होतील व इंग्लंडासच 'दाती तृण धरून तहाची याचना जर्मनीपाशी करावी लागेल. या दर्पोक्तीचा जर आपण नीट विचार केला तर असे दिसून येईल की, गेल्या साली रुमानियन सैन्याला जर्मनीने टोला दिला तसा टोला यंदा कोणासहि देण्यास जर्मनीपाशी शिल्लक सैन्यच नसून जिंकलेले राखण्यापलिकडे जर्मनीला आज तरी दुसरे कांहीं एक करता येण्यासारखे नाही. रशियाला टोला देण्याकरितां सेनापति हिंडेनबुर्ग यांनी ८-१० लाखांचा गठा तयार करून ठेविला होता खरा, पण मार्च-एप्रिल व मे या तीन महिन्यांतील अँग्लो-फ्रेंचांच्या चढाईने सेनापति हिंडेनबुर्ग यांच्या गठ्यास पोकळ करून ठेविलें आहे व रशियास एका दृष्टीने निर्धास्तहि केले आहे. जर्मनीची भिस्त काय ती आतां जून-जुलई महिना लहण्याचा ठरत चालला पाणबुड्यांच्या संहारावर. मे महिन्यांत या पाणबुड्यांनी जितकी जहाजे बुडविली, जवळ जवळ तितकीच जहाजे जूनमध्ये बुडविली. दर आठवड्यास इंग्लंडची वीस-पंचवीस व इतरांची दहा-पंधरा जहाजे बुडविण्याचा क्रम यापुढेहि असाच राहाणार असें गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. पण इंग्लंडच्या मुत्सद्यांचे असें ठाम मत आहे की, हा पाणबुडयांचा संहार असाच चालला तरी अन्नान्नगत होऊन किंवा दारूगोळयाचा तुटवडा पडला म्हणून एक रतिभरहि कमी जोराने प्रसंग इंग्लंडवर केव्हांहि येणार नाही. रणमैदानावर जर्मनी कमकुवत आहे आणि पुढील साली रशियाच्या व अमेरिकेच्या मदतीने रणभूमीवर जर्मनीस आपण चोपूच चोपू असा पूर्ण भरंवसा अँग्लो-फ्रेंचांना वाटत आहे. जर्मनी कमकुवत झाला असें सिद्ध करणारी दुसरी एक गोष्ट जून महिन्यांत घडून आली. ग्रीसमध्ये अँग्लो-फ्रेंचांचे सैन्य उतरून ग्रीसचा राजा कॉन्स्टॅटाइन याला त्याच्या थोरल्या मुलासह ग्रीसमधून बाहेर काढून लावण्यांत आले व धाकटया मुलाला गादी देण्यांत येऊन सॅलिनोकाच्या बाजला जमनीविरुद्ध लढणारे माजी मुख्यप्रधान व्हेनीझेलॉस यांच्या हाती सर्व सत्ता जाऊन ग्रीसमधील नवें धान्य सलिनोकाच्या लष्कराला मिळाले, व सर्व ग्रीसचा एक नवा शत्र जर्मनीस उत्पन्न झाला. आपला मित्र व नातेवाईक ग्रीसचा राजा कॉन्स्टॅटाईन हा अशा रीतीने पदच्युत होत असतां सलिनोकाच्या बाजूला जर्मनीने बिलकूल हातपाय हालविले नाहीत. यावरून रणांगणावरील जर्मनीचा कमकुवतपणा सिद्ध होतो असें कांहींचे म्हणणे आहे. उलटपक्षी असे प्रतिपादन करण्यांत येतें की, जर्मनी रशियाच्या कारस्थानांत गुतला असून तहाचे बोलणें निष्फळ होणार असें ठरल्यास रशियावरच चढाई करून रशियांतील अव्यवस्था अधिक गोंधळाची करण्याचा त्याचा विचार आहे. जर्मनीचे हे लष्करी धोरण खरे असो वा खोटे असो, रशियाने दम धरून आपल्या सर्व शक्तींचा पूर्ण उपयोग केल्यास यंदा नाही तर नाही पण पुढील साली तरी अमेरिकेच्या मदतीने जर्मनीस चारीमुंडे चीत मारूं असें दोस्त सरकारांना वाटत आहे. तेव्हां 'ना मुलूख, ना खंडणी' अशा थाटाचा गळमुळीत तह करण्यास इंग्लंड बिलकूस तयार नाही. इंग्लंड व फ्रान्स यांची ही मते नव्या रशियन सरकारास व पेट्रोग्राड येथील कमिटीस पूर्णपणे समजावून सांगण्यात आली. तथापि कमिटीचे तीन प्रमुख गृहस्थ जर्मनीबरोबर तहाची पहिले महायुद्ध वाटाघाट करण्याकरितां जून अखेरीस स्वीडनमध्ये स्टॉकहोम येथे गेले व जुलैच्या प्रारंभाला त्यांनी जर्मनीच्या सोशियालिस्टांशी तहाची वाटाघाटहि सुरू केली. स्टॉकहोम यथे वाटाघाट सुरू करून हे त्रिकूट इंग्लंड, फ्रान्स व इटली येथे जाऊन तेथील सरकारांशी तहाचें खलबत करणार आहे. सर्व जुलै महिना ह्या तहाच्या वाटाघाटीत जाईल हे उघड आहे. या वागघार्टीत कमिटीचें त्रिकूट व जर्मनी यांचे जर मेतकूट झाले आणि बेल्जम, सहिया, आल्साक, लोरेन्स व जर्मन वसाहती यासंबंधाने सदर मेसकुटाने केलेली तडजोड जर अँग्लो-फ्रेंचांना पसंत पडली नाही तर करें ? सदर त्रिकूट म्हणजे काही रशियन सरकार नव्हे, पेट्रोग्राड येथील कमिटीचे ते प्रतिनिधी आहेत. या कमिटीच्या हातांत जरी खरी सत्ता सांप्रत असली तरी या कमिटीच्याविरुद्ध असलेला एक बलवान पक्ष रशियांत सांप्रत पुढे येत असून दोस्त सरकारांचे म्हणणे पूर्णपणे उचलन धरण्यास हा पक्ष एका पायावर तयार आहे. ह्या पक्षाचे अध्वयं सेनाध्यक्ष जनरल ब्रुसेलॉक हे असून ड्यूमासभेचा पाठिंबा या पक्षास आहे. ड्यूमासमा मोडण्याचा हुकूम जून अखेरीस पेट्रोग्राडच्या कमिटीने केला व सप्टेंबरच्या ३० व्या तारखेस रशियाच्या नव्या लोकसभेची निवडणूक होऊन आक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यांत लोकसभा भरावी असें कमिटीने जाहीर केले. ड्यूमासभा मोडण्याचा कमिटीचा हुकूम ड्यूमासभेने जुलई प्रारंभाला अमान्य केला व कमिटीचे त्रिकूट स्वीडनमध्ये तहाची वाटाघाट करावयास निघाले असतां सेनापति ब्रुसेलॉफ याच्या दक्षिणेच्या सेनेने चढाईस सुरवात केली. अशा स्थितीत जुलई महिन्यांत तहाच्या वाटाघाटीस कोणचे स्वरूप प्राप्त होतें, त्रिकूटाचे व जर्मनीचे संगनमत कितपत होते, दोस्त सरकारांचा व त्रिकुटाचा लढा कोठे पडतो, व या त्रिकुटाच्या पेट्रोग्राड येथील कमिटीचे महत्त्व कमी करण्यास जनरल ब्रुसेलॉफ यांची चढाई कितपत उपयोगी पडते, या गोष्टींकडे वाचकांनी जुलै महिन्यांत लक्ष पोंचवावें हे सांगणे नकोच, महायुद्धाचा तिसऱ्या वर्षाचा जुलई-आगस्ट महिना रशियांत राज्यक्रांति झाल्यापासून जून अखेरपर्यंतचे चार महिने विशेष काळ- जीचे गेले नाहीत, पण जुलै महिना फार काळजीचा गेला व हे काळजीचे ग्रहण आगस्ट-सप्टेंबर महिन्यांत तरी सुटते की नाही अशी चिंता आगस्ट प्रारंभाला लागून राहिली. रशियन राज्यक्रांतीने रशियांतील लोकस्थिति तेवढी बदलली पण रणांगणाची स्थिति कांही बदलली नाही, असें प्रथम प्रथम वाटले. काहींना तर उलट अशी नवीन आशा वाटू लागली की रशियांतील लोकमुखी राज्यसत्तेमुळे लष्करचा जोर दिढी दुपटीने वाढल्यावांचून राहणार नाही; पण ही नवी आशा लवकरच फोल ठरली. कारण, रशियांतील नवें सरकार ड्यूमा सभेच्या मुत्सद्दी मंडळाच्या हातांत न रहातां सोशियालिस्ट पक्षाच्या कामकरी कमिटीच्या हातांत गेले. या कमिटीनेच राज्यक्रांति घडवून आणिली. ज्याचा तो स्वतंत्र, लढाई नको, कांहीं नको राज्यसत्तेप्रमाणे लष्करहि लोकमुखी झाले पाहिजे; व जमीनदारांच्या जमिनीची वाटणी सर्वांना सारख्या प्रमाणाने करून दिली पाहिजे अशा नानाप्रकारच्या सोशियालिस्ट मतांनी चोहोंकडे गोंधळ माजविला. लष्करांतील दहा पंधरा लाख शेतक-यांनी लष्कर सोडून जमीनदारांना हांकून देऊन व काही ठिकाणी जमीन- दारांचे खून करून जमिनी बळकाविल्या ! रेल्वेचे लहान लहान भाग स्वसत्ताक झाले. काही कारखाने व उद्योगधंदे कामकऱ्यांच्या कब्जांत जाऊन पूर्वीचे मालक मालकीला मुकले. चार महिन्यांत महिना पंधरा दिवस टिकणारी कित्येक लहानसहान रिपब्लिके जन्माला आली व लयाला गेली. फिनलंड आखातावरील आरमाराच्या ठाण्यांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले आणि खुद्द फिनलंडच्या पार्लमेंटने स्वतःच स्वतःला बोलावून फिनलंडची अंतस्थ अखत्यारी जाहीर करून पेट्रोग्राड येथील नव्या रशियन सरकारास धाब्यावर बसविण्याचा उपक्रम केला. दक्षिणेकडील उन प्रांताने म्हणजे कीव्हच्या प्रांतानें तीन हजार प्रतिनिधींची सभा बोलावून उन प्रांतास अंतस्थ अखत्यारी मिळाली पाहिजे असे जाहीर केलें व लष्करा- संबंधाच्या बाबतींतहि स्वत:चे निराळे लष्कर ठेवून लढाई करणे व तह करणे यासंबंधाने उक्रेन प्रांताचे स्वतंत्र मत घेतले पाहिजे असा हा ११० पहिले महायुद्ध धरला. या सर्व अंदाधुंदीचा व फाटाफुटीचा लष्करी दृष्टया अत्यंत वाईट परिणाम झाल्यावांचून रहाणार नाही असे नव्या रशियन सरकारच्या तेव्हांच ध्यानात आले, आणि जून अखेरीस त्यांनी असें ठरविलें की कोठे तरी लष्करी चढाईस प्रारंभ करून महायुद्धाकडे सर्व राष्ट्रांचे मन वेधल्याशिवाय बेबंदशाहीस आळा बसणार नाही. जनरल ब्रुसेलॉक यांना बोलावून आणिले व सैन्याचे मुख्य अधिपति त्यांना नेमण्यांत आले. गॅलिशिया व ब्युकोव्हिना या टापूतील रशियन सैन्याने चढाई करावी असें ठरून नव्या तोफा, दारूगोळा, विमाने व इंग्रजी लढाऊ मोटारगाड्या ऊर्फ टॅक्स यांचा मुबलक पुरवठा या सैन्यापाशी देण्यात आला. जुलई प्रारंभाला या नव्या चढाईस सुरवात झाली. टार्नपूलच्या दक्षिणेस स्टीर नदी ओलांडून रशियाने ब्रेझनीवर पहिल्या झटक्यासरशी हल्ला केला व आठ दहा हजार आस्ट्रियन सैन्याला कैद केलें, ब्रेझनीच्या बाजूचा हल्ला मुख्य हल्ला नव्हता. न्युकोलिनांतून ग्यालिशियांत वर शिरावयाचें व हेलिक्स, स्टॅनिला-स्टीक ह्या रोखाने लेंवर्गकडे जाऊन वाटेंत ब्रेझनीच्या सैन्यास मिळून नंतर उत्तरेकडील सैन्याने लेबर्ग: कडे व ब्युकोव्हिनांतील सैन्याने पूर्व कार्येथियन ओलांडून हंगारीत घुसावयाचे, असें लष्करी धोरण या नवीन रशियन चढाईनें स्वीकारले होते. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांत ह्या लष्करी धोरणास बरेंच यश आले. पहिल्या आठवड्यांत ब्रेझनीजवळ गेलेल्या लष्करची गति कुंठित झाली खरी; पण ब्युकोव्हिनांतील सैन्याने हॅलिक्स स्टॅनिला घेऊन बरेच मोठे जय संपादन केले व वीस पंचवीस हजार आस्ट्रियन सैन्य कैद केलें, इतकेच नव्हे, तर काथियन पर्वताच्या जंगलाच्या टापूंत किती एक मैल रशियन सैन्य पुढे सरसावले. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांत लेंबर्ग घेण्यापेक्षां हंगारीमध्ये घुसणे हाच या चढाईचा मुख्य हेतु आहे, असे स्वच्छ दृष्टीस पडले. लेबर्गच्या रोखाची हालचाल ब्युकोव्हिनामधून हंगेरियावर करावयाच्या स्वारीची उत्तर बगल सुरक्षित ठेवण्या. करितांच होती. हंगेरीत घुसल्यावर रोमानियन सैन्यास उचल करण्यास ठीक पडेल व आस्ट्रियाहि 'ना खंडणी, ना मुलूख' या रशियन तत्त्वाप्रमाणे एकदम तह करण्यास स्वतःची कबुली देऊन व जर्मनीचीहि कबुली मिळवून देईन अशी आशा धरून या चढाईची उभारणी केली होती. आठ दहा. दिवसांत तीस पस्तीस हजार सैन्य कैद करण्यात येण्याबरोबर आस्ट्रियांत एकदम धांदल उडाली; व रोमानियाने जुलई-आगस्ट महिना १११ पुन्हां कंबर कसण्यास सुरुवात केली. चढाईच्या बुडाशी असलेले राजकीय हेतु सफल होण्याच्या पंथाला लागले. आस्ट्रियामध्ये तहाची ओरड मोठमोठयाने ऐकू येऊ लागली, व त्या ओरडीचा प्रतिध्वनि जर्मनीतहि उमटू लागला, जर्मन पार्लमेंटमध्ये जर्मन सरकारने आपले तहासंबंधाचे बेत स्पष्टपणे लोकांपुढे मांडावे अशी मागणी करण्यांत आली. व सोशियालिस्टपक्षाने 'ना खंडणी, ना मुलूख' या तत्त्वावर जर्मनीनेंहि तह केला पाहिजे अशा अर्थाचा ठराव उघडपणे पार्लमेंट सभेपुढे मांडला. तहवाले व लढवय्ये असे दोन पक्ष जर्मनींत दिसू लागले व महायुद्धाच्या पूर्वीपासून जर्मनीचे मुख्य प्रधान असलेले बेथमन हालोवेग यांचाहि कल 'ना मुलुख, ना खंडणी' हे तत्त्व स्वीकारण्याकडे ढळू लागला. लढवय्या पक्षाने मुख्य प्रधानाविरुद्ध काहूर मांजविलें. केसर बादशहाचा विश्वास डॉ. बेथमन हालोवेग यांजवर विशेष असल्यामुळे सोशियालिस्ट पक्ष जर्मनीमध्ये वरचढ होणार असें क्षणभर सर्वांना वाटले, पण इतक्यांत लढवय्या पक्षाचे निमंत्रणावरून जर्मनीच्या युवराजाची स्वारी बर्लिन येथे दाखल झाली. सेनापति हिंडेनबुर्ग हेहि धावून आले. त्यांच्या बरोबर त्यांचे हस्तक सेनापति ल्यूडेनॉफ हेहि हजर झाले. या सर्व योद्धयांनी रशियाच्या चढाईमुळे भिण्याचे कारण नाहीं, आम्ही थोडेच दिवसांत मोठे विजय मिळवून दाखवितो असे आश्वासन केसरला दिले. मुख्यप्रधान बेथमन हालोवेग यांना आपल्या जागेचा राजीनामा देऊन घरी बसावयास लाविलें. मुत्सद्देगिरीत आजपर्यंत पुढे न आलेले डॉ. मेकेलीस यांच्या अंगावर लढवय्या पक्षाने मुख्यप्रधानाची वस्त्रे घातली आणि पार्लमेंट सभेतील निरनिराळया पुढान्यांना बोलावून आणून खाजगीरीतीने लष्करी गोष्टी त्यांना समजावून सांगून काही दिवस पार्लमेंट सभा विश्रांति घेईल असा बंदोबस्त लढ वय्या पक्षाने केला. जर्मन पार्लमेंट सभेला विश्रांति देण्यापूर्वी नवे मुख्यप्रधान डॉक्टर मेकेलीस यानी रणांगणावर कोणालाहि हार न जाण्याविषयींची जर्मनीर्च दर्पोक्ति सभासदांना ऐकविली व तहासंबंधाने निर्णयात्मक कांहींच न बोलत पार्लमेंट सभेची सुट्टी त्यांनी जाहीर केली. जर्मनीची राजकीय परिस्थिति अशारीतीने नाजुक झाली असतांना रशियाची चढाई जर्मनीस चांगली भोंवल्यावांचून राहाणार नाही असे सर्वोस वाटले. पण कर्मधर्म संयोगाने जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठव ड्यांत गॅलिशियाच्या रणभूमीत एकदम एक चमत्कार घडून आला. गॅलिशिय ११२ पहिले महायुद्ध व ब्युकोव्हिना या दोन ठिकाणी रशियास अडविण्याकरितां सेनापति हिंडेनबुर्ग यानी जुलैच्या प्रारंभापासूनच तयारी करून ठेविली असली पाहिजे हे उघड आहे; पण त्या तयारीस इतक्या थोडया अवकाशांत एवढे मोठे फळ येईल असें जर्मन सेनापतींनाहि वाटले नसले पाहिजे. गॅलिशियाच्या ईशान्य कोपऱ्यांत टार्नपूल व ब्रांडी यांच्या दरम्यान रशियाचे अकरावें लष्कर लढत होते. पहिल्या पंधरावड्यांत सरशीच्यावेळी रशियन कामदारांचे अंदाजाहून अधिक बळी रणभूमीला पडले, पण असले नुकसान सोसूनहि रशियन सैन्य पुढे पाऊल टाकीत होते. या सैन्याचा टार्नपूल व ब्रॉडी यांच्या दरम्यान पहिला पराभव जर्मन सैन्याने केला. यश मिळत होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते; पण पहिला पराभव होण्याबरोबर सैन्यांतील सर्व शिस्त बिघडली. अकराव्या लष्करातील कित्येक पथके रणांगण सोडून एकदम मागे वळली. त्यानी आपल्या कामदारांचे खून केले; सर्व अवजड तोफखाना शत्रूच्या हाती लागला; व हलके सामानसुमान घेऊन सर्वांना पळतांभुई थोडी झाली. अकरावें उधळले त्याबरोबर बारावें लष्कर उधळले व नवव्या दहाव्या लष्करालाहि बेबंदशाहीचा रोग जडला; आणि सर्व गॅलिशियामध्ये रशि- याची पीछेहाट होऊन टार्नपूल पहिल्या पराभवापासून १।२ दिवसांतच जर्मनीच्या हाती लागले. गॅलिशियांतील रशियन फळीत पंधरा-वीस मैलांच्या तोंडावर भला मोठा भोसका पाडून जर्मन सेना आंत घुसू लागली. त्याच सुमारास पेट्रोग्राड शहरांतहि लेनिन प्रभति एकदम तह केलाच पाहिजे म्हणणाऱ्या काही सोशियालिस्टांनी थोड्याशा सैनिकांच्या मदतीने नव्या रशियन सरकारचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला, दोन तीन दिवस पेट्रोग्राड शहरांत बरीच मारामारी झाली, पण अखे- रीस लेनिन प्रभृतींचा पराभव होऊन नव्या सरकारची सत्ता पेट्रोग्राड शहरांत पुन्हां प्रस्थापित झाली. लेनिन प्रभृति मंडळो जर्मनीचे हेर ठरून जर्मनीपासून लांच घेऊन पेट्रोग्राड येथे दंगे केले व लष्करांत फूट पाडून जर्मनीस घरांत शिरूं दिलें असा भकम पुरावा आगस्टचे प्रारंभाला रशियन सरकाराला सांपडला आहे. कोहि असो, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यांत गॅलिशियामधील रशियाची फळी फुटावयाला व पेट्रोग्राड येथे दंगे व्हावयाला एकच गांठ पडली ही गोष्ट खरी आहे. विस्ख. लित लष्कर व डळमळीत सरकार, असल्या जोडीचा हा योग त्यावेळी आला, व तो योग आगस्टचा पहिला आठवडा होऊन गेला तरी अंशतः कायम राहिला ही जुलई-आगस्ट महिना रशियाच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. पेट्रोग्राड येथील दंगे तत्काळ नाहीसे झाले खरे, पण नव्या सरकारचे डळमळलेलें आसन काही केल्या जुलै महिन्यांत स्थिर होईना; पेट्रोग्राड येथे दंगे झाले त्यावेळी लढाईखात्याचे प्रधान केरेन्स्की हे रणभूमीकडे फिरतीवर गेले होते. हे परत येण्याबरोबर निष्ठरपणाने बंडखोरांना चिरडून टाक- ण्याचा प्रयत्न करण्यांत आला व त्यांत त्यांना चांगले यश मिळाले, ही समाधानाची गोष्ट होय. लेनिन आदिकरून बंडवाल्यांना पकडण्यांत आले व आगस्टचे प्रारंभी बंडफितुरीचा आरोप त्यांजवर ठेवण्यांत येऊन त्यांची उघडपणे चौकशी करण्याची व्यवस्थहि लागली. पेट्रोग्राड येथील या देग्याने प्रधानमंडळाची रचना बरोबर नाही असे दृष्टोत्पत्तीस आले त्यावेळी प्रधानमंड- ळांत सोशियालिस्ट पक्षाचे सहा व बाकीचे इतर मताचे लोक होते. अर्थात त्यांचे आपापसांत पटेना. कोणी जमिनीची ताबडतोब वाटणी करून दिली पाहिजे असे म्हणत, कोणी ड्यूमा सभा बंद झाली पाहिजे असे म्हणत, तर कोणी फिनलण्ड वगैरे प्रांतांना आजच अखत्यारी दिली पाहिजे असे प्रतिपादन करीत. या शिवाय तहवाल्यांचा पक्ष प्रधानमण्डळांत होता, एखाद्या प्रधानमण्डळाने एखादी गोष्ट झाली पाहिजे असा हट्ट धरला आणि इतरांनी त्यास संमति दिली नाही म्हणजे पेट्रोग्राड येथील कामकऱ्यांची म्हणा शेतकऱ्यांची म्हणा, किंवा लढवयांची म्हणा, कोगाची ना कोणाची तरी संस्था त्या प्रधानांचे मत उचलून धरी, आणि या संस्थेच्या कच्छपी असलेले लोक हत्यारबंद होऊन इतरांना धाकदपटशा दाख. विण्याकरितां पेट्रोग्राडच्या रस्त्यांतून फिरूं लागत, आणि लगेच सरकार उलथन पडते की काय, अशी सर्वांना भीति वाटे ! पेट्रोगाड शहरचे हे क्षुब्ध वातावरण व प्रधानमण्डळाची बिनजुटीची रचना, यामुळे नव्या सरपारचे जीवित फार संकटाचे झाले. ही स्थिति ओळखून प्रधानमण्डळापैकी त्यावेळचे मुख्य प्रधान व त्यांचे दोनतीन अनुयायी यांनी राजीनामा दिला व मि. केरेन्स्की यांजकडे मुख्य प्रधान, लढाई खात्याचे प्रधान व परराष्ट्रीय प्रधान ह्या तिघांची कामें आलीं, इतर कामावर सोशियालिम्ट मताचेच लोक नेमण्यांत येऊन प्रधानमंडळांत सोशियालिस्टपक्षाचे मताधिक्य झाले. प्रधानमंडळ अशा रीतीने बऱ्याच अंशी एकजिनसी झाले खरे, तरी असावी तितकी जूट प्रधानमंडळांत उत्पन्न होईना. कोणी म्हणत, पेट्रोगाड शहर सोडून मास्को शहरांत नव्या सरकारांनी जावें. कोणी ११४ पहिले महायुद्ध म्हणत, मास्को येथे सर्व राजकीय संस्थांच्या प्रतिनिधींची काँग्रेस भरवून त्या काँग्रेसकडून पुढील कार्यक्रम आखून घ्यावा व निरनिराळया मतांची ही बजबजपुरी बंद पाडावी. मास्कोच्या काँग्रेसची कल्पना प्रधानमंडळाला रुचली, पण सर्व राजकीय संस्थांचा सामान्यतः विश्वास बसेल अशीच प्रधानमंडळाची रचना अस. ल्याशिवाय काँग्रेसपुढे उभे रहाणे ठीक नव्हे असें प्रधानमंडळाला वाटले. म्हणून मास्कोची काँग्रेस तहकूब करण्यांत आली, व जुलै अखेरीस प्रधानमंडळाची पुन्हां दुसरी रचना करण्याच्या उद्योगाला मि. केरेन्स्की हे लागले. पेट्रोग्राड येथे दंगे झाले त्यावेळी तहवाल्यांचा सुळसुळाट होऊन गॅलिशियांतील कित्येक पथकांनी पळ काढला. अशा फितुरी पळपुटयांना जागच्याजागी ठार मारावे व लष्करी आज्ञेचा भंग करणारांना देहांत शिक्षा देण्यात यावी असला करडा अंमल मि. केरेन्स्की यांनी सुरू केला! पण या अंमलास विरोध करणारेहि काही लोक सोशिया- लिस्टपक्षांत निघाले. सर्व सोशियाशिस्टपक्षाचा पूर्ण भरंवसाहि मि. केरेन्स्की यांजवर दिसेना. ड्यूमासभा व क्याडेट सैन्याची संख्या यांचा तर सोशियालिस्टपक्षावर बेभरंवसा. अशा फाटाफुटीच्या वेळी आगस्ट प्रारंभाला ब्युकोव्हिना व गॅलिसिया येथे आस्ट्रो-जर्मनांची चढाई बरीच जोरावली; व दहाबारा दिवसांत साठसत्तर आस्ट्रो-जर्मन्स पुढे चालून गेले. सेनापति ब्रुसेलॉफ यांच्या कतब- गारीवरील रशियाचा विश्वास त्यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला. गॅलिशियांत लढणाऱ्या अकराव्या लष्कराच्या सेनापतीचा खून पाठींत गोळी घालून करण्यांत आला. व उत्तरेकडचे सेनापति गोर्की हे नव्या सरकारच्या विरुद्ध आहेत व झा'शी गुप्त पत्रव्यवहार करीत आहेत, असे वाटल्या. वरून त्यांना अटकेत ठेवण्यात आले. विशेष नावलौकिकाचा उरलेला नाही; सैन्याची शिस्त बिघडलेली; शत्रूने मोठी चढाई सुरू केलेली; लोकांत नाना मते व नाना पाखंडे वावरत असलेली; अशी स्थिति पाहून प्रधानमंडळ एकतंत्री असण्याची आवश्यकता मि, केरेन्स्की यांच्या ध्यानांत आली व त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या जमेना. तेव्हां त्यांनी आगस्ट प्रारंभाला रशियांत पुढे होणाऱ्या विचित्र गोष्टीची जबाबदारी आरणास आपल्या माथ्यावर घेववत नाही असें प्रधान- 'डळास कळविलें, व आपल्या जागेचा राजीनामा दिला. नंतर सर्व प्रधानमंडळ कामकरी कमिटीचे मंडळ, क्याडेट सैन्याचे मंडळ, ड्यूमासभेचे कौन्सिल व शेतक: उडाला व जुलई-आगस्ट महिना व्याच्या काँग्रेसचे पुढारी यांची सभा भरली. रात्रभर वादविवाद झाला, व शेवटी निर्णय लागला की, रशियाचा राज्यकारभार हांकण्यास मि. केरेन्स्की याशिवाय दुसरा कोणीहि लायक पुरुष नाही. लगेच सर्वांनी आपापले राजीनामे मि. केरेन्स्की यांच्या हातांत ठेवले व त्यांच्या इच्छेस येईल त्याप्रमाणे त्यानी एकजिनसी व एकतंत्री प्रधानमंडळ बनगवें अशी त्यांना विनंति करण्यांत आली. आगस्टच्या पहिल्या आठवड्यांत रशियांतील नवें लोकमुखी सरकार अशारीतीने एकमुखी झाल्यावर मि. केरेन्स्की यानी आपल्या प्रधानमंडळाची एकतंत्री रचना करून घेतली; व रशियांत बेबंदशाही पूर्णपणे माजते की काय म्हणून वाटत असलेली भीति अंशतः तरी केली, मि, केरेन्स्की हे सोशियालिस्ट पक्षाचे असले तरी इतर पक्षाशी तडजोडीने कसे वागावें हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे. रणभूमीवर टिकाव धरल्या- शिवाय रशियांतील राज्यक्रांति टिकाऊ होणार नाही हे तत्त्व ते पूर्णपणे ओळखून आहेत, आणि बेबंदशाहीचे डोके जोराने ठेचावयास लागणारी करारी निश्चयाची शक्ति-बुद्धीची तरतरी त्यांच्या अगी आहे. रशियाचे हे क्रॉमवेल होत, असें कांहींचें ह्मणणे आहे, तर काहीं यांना नेपोलियनच्या पदवीला चढवितात. सर्व रशियाची व त्याबरोबरच सर्व दोस्त सरकारांची मदार आतां मि. केरेन्स्की यांजवरच आहे. एकदोन महिन्यांच्या अवधीत मि. केरेन्स्की यांचे कर्तृत्व सर्वाच्या प्रत्ययास येईल. व रशियासंबंधी वाटत असलेली धाकधूक निरर्थक ठरेल, हे येथे सांगणे नकोच. रशियाच्या अंतस्थितीचा येथवर विचार झाला. जर्मनींच्या ज्या चढाईमुळे ही अंत- स्थिति इतकी विकोपास गेली त्या चढाईकडे आतां वळू. रशियावर जर्मनीची चढाई रशियांत राज्यक्रांति झाल्यापासून जर्मनी रशियाच्या वाटेला गेला नव्हता, जुलै प्रारंभाला रशियाने गॅलिशियावर चढाई केल्यामुळे त्या चढाईचा प्रतिकार करण्याकरितां आस्ट्रो-जर्मनांचे सैन्य ब्युकोव्हिना व गॅलिशिया या बाजूला वळलें व काही रशियन पथकांनी एकाएकी रणभूमि सोडल्यामुळे उलट चढाई करण्यास आस्ट्रो-जर्मनांना ठीक पडलें, टार्नपूलच्या पश्चिमेस पंचवीस तीस मैल व नीस्टर नदीच्या दक्षिणेस तीस चाळीस मैल रशियन सैन्य चाल करून गेले होते. आस्ट्रो- जर्मनांनी उलट हल्ल्यांत टार्नपूलच्या पूर्वेस पंचवीस तीस मैल रशियनांना मागे हट- विले. सर्व गॅलिशियांतून मागे हटून रशियास कामेनेट-पोडोलिया प्रांतात परत ११६ पहिले महायुद्ध पश्चिमेकडून जावे लागले, व त्याहि प्रांतांत सरहद्दीवरील नदी बऱ्याच ठिकाणी ओलांडून आस्ट्रो-जर्मनांचे सैन्य घुसले. रशियाचा कामेनेट-पोडोलिया हा प्रांत व त्याच्या जवळचा गैलिशियाचा भाग यांच्या दक्षिण सरहद्दीनें नीस्टर नदी वहात असून या नीस्टर नदीला सदर दोन प्रांतांत मिळून पंधरा वीस मैलांच्या अंतरावर दहाबारा नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वहात येऊन मिळतात. पूर्वेकडे मागे परतणाऱ्या सैन्याला या नद्यांचा चांगला आश्रय मिळतो. या सर्व नद्यांचा उगम टार्नपूल व पोडोलिया प्रांतांच्या उत्तर भागांतून होतो. अर्थात् हा नद्यांचा मुलूख जर कब्जात घ्यावयाचा असेल, तर त्यांच्या उगमा जवळचा प्रांत प्रथम ताब्यात घेतला पाहिजे, आणि नंतर नदीच्या ओघाने खाली उतरून शत्रूस पलीकडच्या नदीचा आसरा घ्यावयास लाविलें पाहिजे. टार्नपूलचा प्रांत आस्ट्रो-जर्मनांच्या हाती पडतांच टार्नपूलच्या दक्षिणेकडील सर्व गॅलिशिया आठ दहा दिवसांत आस्ट्रो-जर्मनांना आक्रमितां आला. जुलै अखेरपर्यंत दररोज पांच सहा मैल या वेगाने आस्ट्रो-जर्मन्स साठसत्तर मैल चालून गेले, आगस्ट आरंभाला टार्नपूलच्या पूर्वेस व वायव्येस पंचवीस तीस मैलांवर रशि. याने जर्मनीस अडवून धरिलें आहे. ही आडकाठी मोडून टार्नपूलपासून ओडेसा. पर्यंत जाणाऱ्या आगगाडीच्या रोखाने आस्ट्रो-जर्मन्स साठसत्तर मैल आंत घसे- पर्यत, म्हणजे कीव्ह पासून कामेनेटस-पोडोलिया प्रांतांत येणाऱ्या आगगाडीचे जंक्शन स्टेशन गाठीपर्यंत, पोडोलिया प्रांतावर आस्ट्रो-जर्मनांचा शह बसणे शक्य नाही. गॅलिशियावर स्वारी करणाऱ्या रशियन सैन्याचा मुख्य जमाव सांप्रत पोडोलिया प्रांतांत आहे व तो जमाव मोड ग्यास टार्नपूलपासून पोडोलिया प्रांतांतून ओडेसाकडे जाणान्या आगगाडीनेच आस्ट्रो-जर्मनांनी पुढे सरकले पाहिजे. आगस्ट प्रारंभाला आस्ट्रो-जर्मनांचा विशेष नेट टार्नपूलच्या पूर्वेस दिसत नसून ब्युकोव्हिना प्रांतांतून असारेबियामध्ये घुसण्याकडे अधिक कल दिसतो. जुलै अखेरीस व आगस्ट प्रारं भाला आस्ट्रो-जर्मनांचा विशेष नेट टार्नपूलच्या पूर्वेस दिसत नसून बुक व्हिना प्रांतांतून बेसारेवियामध्ये घुसण्याकडे अधिक कल दिसतो. जुलै अखेरीस व आगस्ट प्रारंभाला सर्व ब्युकोव्हिना प्रांत आस्ट्रो-जर्मनांनी घेतला असून झर्नोव्हिटस शहरहि आस्ट्रो-जर्मनांच्या हाती आगस्टच्या चवथ्या पाचव्या तारखेला लागले. न्युकोव्हिनां- तील बरेच रशियन सैन्य त्यानी उत्तरेकडून दक्षिणकडे रोमानियाच्या मोल्डेव्हिया जुलई-आगस्ट महिना पोडोलियामधून अलग प्रांतांत मागे रेटले. झर्नोव्हिटस शहर सोडतांना रशियन सेनेला सोंव्हिटसच्या दक्षिणेत प्रुथ नदी ओलांडून खाली उतरावे लागले. पूर्वेस बेसारेबिया प्रांतांत त्या सैन्यास जाता आले नाही. ब्युकोव्हिनापासून काळया समुद्रापर्यंत बेसारेबिया प्रांत पसरलेला आहे. बेसारेबिया प्रांत व रोमानिया ह्यांच्यामध्ये प्रुथ नदी असून उत्तर बायव्य सरहद्दीला नीस्टर नदी आहे. ह्या बेसारेबिया प्रांतांत ग्रंथ व नीस्टर ह्या दोन नद्यांमध्ये किरकोळ नद्यानाले काही नाहीत; व चाल करून जाणाऱ्या सैन्यास वाटेत नैसर्गिक अडथळा कोठेहि नाही. बेसारेबियामध्ये साठसत्तर मैल आस्ट्रो-जर्मन सैन्य चाल करून गेले तर कीव्हपासून बेसारेबियामध्ये येणारी आगगाडी ते गांठतील व त्यांनी तसे केल्यास रोमानियांतील व बेसारेबियातील रूसो-रुमानियन सैन्य एकदम पडेल. जुलै अखेरीला व आगस्टचे आरंभाला ब्युकोव्हिनांत विशेष जोर करून बेसारेबियामध्ये घुसण्याची आस्ट्रो-जर्मनांनी जी घाई केली त्यांतील लष्करी धोरण रोमानियास अलग पाडण्याचे दिसते. ब्युकोव्हिना व गॅलिशिया येथे या लढाया चालल्या असतात. मोल्डेव्हियामध्ये रुसो-रुमानियन सैन्य आस्ट्रो-जर्मनां वर हल्ला करूं लागले, व आस्ट्रो-जर्मनांनी त्यांना अंगावर येऊहि दिले. रोमानियाचे हे पुढे पडलेले पाऊल बेसारेबियांतून आस्ट्रो-जर्मन जर रोमानियाच्या पिछाडीस उतरले तर रोमानियास अधिक जाचक झाल्यावांचून राहणार नाही. कारण झाशीच्या पिछाडीस जर आस्ट्रो-जर्मन सैन्य गेले तर सर्व मोल्डेव्हिया तांतडीने सोडून दक्षिण बेसारेबियांत जाऊन ओडेसाचा रस्ता जलदीने गांठण्याशिवाय रोमानियास गत्यं- तरच राहणार नाही. अशा रीतीने बेसारेबिया व रोमानिया येथील सैन्य ओडेसा. कडे हांकण्याच्या हेतूनें आस्ट्रो-जर्मन्स बेसारेबियामध्ये घुसत आहेत. बेसारेबियांतील हे लष्करी धोरण साध्य व्हावे म्हणून टार्नपूलपासून ओडेसाकडे जाणाऱ्या आगगा- डीच्या मार्गानेंहि आस्ट्रो-जर्मनांची जोराची चढाई होईल. कारण, त्या मार्गावर जोराचा नेट लाविला असतां बेसारेबियास विशेषशी कुमक येऊन पोचणार नाहीं व बेसारेबियाच्या रोखाने आतां जलदीने पुढे पडणारे पाऊल अधिक जोराने आगस्ट महिन्यांत पोडोलिया व्यापून बेसारेबिया निम्याहून अधिक घेऊन रूसो- रुमानियन सैन्याला जर ओडेसाकडे आस्ट्रो-जर्मनांनी रेटले नाही तर जुलै अखेरीस सुरू झालेली जर्मनीची चढाई वर्षदीड वर्षापूर्वीच्या सेनापति मॅकेन्सन साहेबांच्या पडेल.
११८ पहिले महायुद्ध चढाईच्या तोडीची न ठरतां किरकोळ स्वरूपाची ठरेल. पण आस्ट्रो-जर्मनांनी जर पोडोलिया प्रांत व्यापला आणि बेसारेबियाचा बराच भाग घेऊन रोमानियाला ओडेसाकडे रेटले तर ही चढाई भयंकर स्वरूपाची ठरेल. कारण पुढे सप्टेंबर- आक्टोबर महिन्यांत ओडेसा हातचा जाऊन सार्नी, रोव्हनो, या टापूतून व पोडो- लियामधून कीव्हवर चाल करून जाण्यास आस्ट्रो-जर्मन्स चुकणार नाहीत. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की, ज्या लष्करी धोरणाचे पर्यवसान कीव्ह ओडेसा घेऊन दक्षिणेकडील सर्व रशियन सैन्य गारद करून रशियास स्वतंत्र तह करावयास भाग पाडण्यात होणारे आहे,असलें लष्करी धोरण स्वीकारण्यास लागणारे मनुष्यबळ आस्ट्रो-जर्मनांपाशी आहे काय ? कोणी म्हणतात आहे, कोणी झणतात नाही. ज्या अर्थी सेनापति हिंडेनपूर्ग यांनी पांच तास वर्षे नावाजलेले जर्मनीचे मुख्य प्रधान मि. बेथमन हालोवेग यांना राजीनामा द्यावयास भाग पाडले, त्या अर्थी रशि- यास मोठा टोला देण्याची त्यांची तयारी असली पाहिजे, व गॅलिशियांत व ब्युको. व्हिनांत ऐती संधि मिळाल्यावर रशियास कायमचा लंगडा-लुला करण्यास ते कमी करणार नाही, असा काहींचा तर्क आहे. उलटपक्षी असें साधार प्रतिपादण्यांत येते की, गेले चार पांच महिने फ्रान्स-बेल्जममध्ये जर्मनीचें मनुष्यबळ अतोनात खर्ची पडलेले असल्यामुळे दीडदोन वर्षांपूर्वीची ताकद जर्मनीत आतां उरलेली नाही. जर्मनीने जर रशियावर विशेष जोराची चढाई केली तर फ्रान्स-बेल्जममध्ये जर्मनी लगडा पहलाच पाहिजे; फ्रान्स-बेल्जमकडील आपली बाज जर जर्मनीने सावरून धरिली तर रशियाच्या रणभूमीत तुटपुजा जयाशिवाय जर्मनीला कांहींच लभ्यांश होणार नाही. बेल्जममध्ये जुलै अखेरीला व ऑगस्ट प्रारंभाला अँग्लो-फ्रेंचांनी जर्मनीवर निकराचे हल्ले सुरू केले असून आजपर्यंत झालेल्या लढायांहून ही अधिक भयंकर लढाई लढण्यास सुरवात केली आहे; व बारा पंधरा मैलांच्या तोंडावर अर्धा मैल, मैलपर्यंत जर्मनीस मागें रेटले आहे. पश्चिम सांभाळून पूर्वेस पुढे पाऊल टाकण्याइतकें मनुष्यबळ आस्ट्रो-जर्मनांपाशी आहे किंवा कसे याचा निर्णय ऑगस्ट महिन्यांत लागणार असल्यामुळे ऑगस्टच्या संकटांतून रशिया कसा काय निभावतो या काळजीने सर्वांना सांप्रत ग्रासले आहे. HERE तिसरा भाग समाप्त 1420 आमच्याकडे मिळणारी पुस्तकें श्री.कृ.प्र.खाडिलकरांची नाटके - - संगीतमाला. बायकांचे बंड- किं. ४१२ आणे. सावित्री किं. ४१२ आणे. मेनका- किं. ४१२ आणे. द्रौपदी- किं. ८१२ आणे. स्वयंवर- किं. ४१२ आणे. विद्याहरण-किं. ४१२ आणे. मानापमान-किं.४१२ आणे. - गद्यमाला. कीचक वध-किं. ४१२ आणे. कांचनगडची मोहना- किं. ४१२ आणे. सवाई माधवराव- यांचा मृत्यु- किं. ४१२ आणे भाऊबंदकी- प्रेमध्वज- किं. ४१२ आणे सत्वपरीक्षा-किं. ८१२ आण सवतीमत्सर-किं. ४१२ आणे - कि. - ४१२ आणे श्री. य. कृ. खाडिलकरकृत कादंबऱ्याः- संसार शकट, सदानंद, आजकाल, प्रत्येकी किंमत १॥ रुपया. श्री. के. रा. पुरोहितकृतः-शून्यजगत् , आकाश पुष्प, प्रत्येकी किं.२ रु. श्री. भा. रा. धुरंधरकृतः-९० रुपयांचा चेक किंमत १॥ रुपया, गीता बोध किंमत ४६ आणे. पुस्तके मिळण्याची ठिकाणे नवा काळ ' ऑफीस मुंबई; चित्रशाळा दुकान-मुंबई, व पुणे; व सर्व बुकसेलर्स, म्यानेजर-नवा काळ, मुंबई. .
विक्रीस तयार! विक्रीस तयार! खाडिलकरांचा रुद्र (लेखक:-श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर) . श्री. काकासाहेब खाडिलकरांचा हा ग्रंथ म्हणजे त्यांनी रुद्राचे आणि वैदिक वाङ्मयाचे जे भक्तिपूर्वक मनन चिंतन गेली सुमारे १० वर्षे चालविले होते त्या तपश्चर्येचें सुफल आहे. रुद्रांतील मंत्रांचे विवेचन करतांना श्री. काकासाहेबांनी अभिनव अशी दृष्टी वापरली असून रुद्र अर्वाचीन पेहेरावांत त्यांनी वाचकांपुढे ठेवला असल्यामुळे 'खाडिलकरांचा रुद्र' हे ग्रंथाचें नांव सर्वतोपरी सार्थ ठरत आहे. ह्या ग्रंथांत श्री. काकासाहेबांची रुद्रावरील प्रवचने दिली आहेत आणि नित्य- पठणासाठी त्याचप्रमाणे नित्य अध्ययनासाठी या ग्रंथाचा उपयोग व्हावा म्हणून ह्या ग्रंथांत रुद्राचे मंत्र व त्याचा अर्थ ठळक टाइपांत दिला असून मंत्राचे लरहि दिले आहेत. मंत्रावर सविस्तर टीपाहि दिल्या आहेत. ग्रंथाची किंमत एक रुपया आहे. ट, ह, निगळा, मॅनेजर--नवा काळ, गिरगाव मुंबई. चित्रशाळा दुकान--पुणे व मुंबई. परचुरे पुराणिक आणि मण्डळी, मुंबई ४.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.