Library

Maajhii Vilaayatachii Saphara~

Korat'akara Vit't'alakeshavaraava · 2005-12-01

PDF Proofread

Front matter

THE BOOK WAS DRENCHED

UNIVERSAL
LIBRARY
OU_184477
LIBRARY
UNIVERSAL

OSMANIA UNIVERSITY LIBRARY
Call No.M914
K84M
Name of Book माझी विलयतची
सफर
Name of Author
कोरट कर

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

माझी क्लिायतची सफर
लेखक
विट्टल केशवराव कोरटकर
एलएल्. बी. (यु. वेल्स)
किंमत १॥ रुपया

प्रकाशक:
रा. ज. देशमुख
देशमुख आणि कंपनी
१९१ शनवार, पुणे २
१ पुढील आवृत्ति व उतारे घेणे वगैरे सर्व हक लेखकाकडे.
२ मुखपृष्ठावरील चित्र रा. दिनानाथ दलाल यांचे आहे.
मुद्रक :
गोपाळ बळवंत जोशी
आनंद मुद्रणालय
रिसेंबर १९४६
१९६/४६ सदाशिव, पुणे.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

पितृ चरणी समर्पण

No text on this page.

स्वागत विलायतेला काय, जाणारे हल्ला शेकडोशे झाले आहेत! अशा प्रत्येक प्रवाशाने आपले प्रवासवर्णन लिहिण्याचें मनांत आणले तर किती तरी पुस्तकें तयार होतील! पण त्या प्रत्येक पुस्तकांत नवीन असे काय वाचकांस वाचावयास किंवा मनन करावयास मिळेल ? लेखकाच्या अंगी जर तशी उच्च दर्जाची कला असेल तर मात्र गोष्ट वेगळी! साध्याच विषयांतला मोठा आशय, जो इतरांना कधीच दिसत नाही तो, तो प्रमट करील आणि आपण त्याच्या लेखनाने मोहून जाऊ किंवा चकित होऊं. एरवी त्याच वाटेनें, तशाच बोटींतून, आणि तेवढ्याच थाटाने जाणारे प्रवासी निरनिराळे असें काय सांगणार की जे वाचण्यास आपणांस उत्कंठा वाटेल? एकेकाळी विलायतेला जाणे म्हणजे काहीशी अपूर्वाईची गोष्ट होती. आता तशी स्थिति नाही. अनेकांनी केलेली आपल्या विलायतेच्या सफरीची मोठमोठी वर्णनात्मक पुस्तकें आपणांसमोर आहेत. पावगींनी आपला — विलायतचा प्रवास लिहिला तो काळ निराळा होता. आजहि तें पुस्तक अभ्यासासाठी नेमले जाते. कारण पावगींची संस्कृतशब्दघटित चमत्कृतिजनक लेखनपद्धति हे होय. चिटणीसांचे किंवा राजेसाहेब भोर यांची सचित्र विलायतप्रवासाची पुस्तकेंहि आपणांस माहितीच्या दृष्टीने उपयोगी पडण्यासारखी आहेत. " २ स्वागत मग विठ्ठलराव कोरटकरांनी हा प्रयत्न का केला? आणि त्याला प्रस्तावना लिहिण्याची विनंती मला का केली? विलायतेच्या प्रवासाची माहिती पुरवावी हा काही त्यांचा अर्थातच उद्देश नाही. एक गोष्ट खरी आहे की, आपल्या इष्टमित्रांत आपण आपल्या रोजच्या प्रवासाच्या गोष्टीहि पोटभर बोलतो. किंबहुना तसे केल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. तेव्हां अशा आपल्या इष्टमित्रांपैकी ज्यांना हा आनंद उपभोगतां आला नाही त्यांना थोडी फार तरी आपली आठवण रहावी हा एक उद्देश विठ्ठलरावांचा असला पाहिजे असें आपणास समजतां येईल. पण एवढाच कांही त्यांच्या मनांतला हेतू दिसत नाही. विठ्ठलरावांच्या या विलायतेच्या सफरी ' त काही विशेष आहेत. विठ्ठलरावांचे साधुस्वभाव वडील कै. न्या. मू. केशवराव यांनी धन आणि कीर्ति यांची भरपूर जोड करून ठेविली होती. तेव्हां, विलायतेला जाऊन येणें कांहीं विठ्ठलरावास विशेष जड नव्हते. पण विठ्ठलरावांना जर मित्रांनों डिवचले नसते तर त्यांच्या मनाने उचल केली नसती आणि विलायतेची वारी त्यांना कदाचित् घडली हि नसती. तेव्हां विठ्ठलरावांना आला असा योग जरा कचित् येण्याच्यांपैकींच म्हटला पाहिजे. आणि त्यांची ही सफर वाचून त्यांच्या सारखी अनुकूलता असणान्या दुसऱ्या कोणास हि तशी प्रेरणा झाली तर तो लाभ कांही कमी आहे असे म्हणतां यावयाचे नाही. असा लाभ घडावा आणि घडवून घ्यावा असा हेतू इतक्या वर्षांनी हे वृत्त प्रसिद्ध करतांना विठ्ठलरावांच्या मनांत डोकावून गेलाच नसेल असें नाही. दुसरा हा हि एक विशेष त्यांच्या या सफरींत आढळतो. विठ्ठलराव विलायतेस गेले ते असे एकदम आणि परत आले ते हि एकाएकी ! सुखदुःखाची ही अशी अचानक भेट किती चमत्कारिक म्हणावी लागेल! पण तें असो ! विलायतेस विठ्ठलराव पोचले खरे, पण पुढे काय ? पक्को आखणीच नव्हती. अखेर त्यांस इग्लंड सोडून वेल्स देश गांठावा लागला! इंग्लंडमध्ये गेलेले आणि जाणारे पुष्कळ, पण शिक्षणासाठी वेल्स् देश ज्यांच्या वाट्याला येतो असे आपल्यांतले किती ? आणि विठ्ठलरावांचा हा वेल्स-योग मग अपूर्वाईचाच म्हणावयास नको काय ? बरें, तेथे ते काही चारआठ दिवस राहून फेरफटका करून आले असें थोडेच होते ? गेलेच मुळी अभ्यासासाठी !

स्वागत ३ मग राहावे लागले चार वर्षे ! कोणाला खरें वाटणार नाही, पण इंग्लंडचा भाग वाटणारा हा वेल्स् देश परंतु येथले लोक वंशाने आणि भाषेनें इंग्लिशांपेक्षा निराळे आहेत! आणि आपण येथे इंग्रजीची एवढी प्रशंसा गातो ना, पण वेल्स मधील लाईट् जा िसारखे इंग्लंडचे मुख्य प्रधान आणि इंग्रजी भाषेचे नामांकित वक्ते सुद्धा आपल्या वेल्श् मातृभाषेचा जाज्वल्य आभिमान बाळागितात ! पण तेथे कोणी त्यांस भाषौदार्याचे तत्त्वज्ञान सांगू धजत नाहीत, कोणी त्यांस संकुचित म्हणत नाही, मागासलेले, बुरसटलेले म्हणण्यास सरसावत नाही आणि मुख्य प्रधान कीची व त्यांचे अंगावर चढविण्यास संकोचत नाही ! किती वोध घेण्यासारखा आहे आपण या अशा गोष्टीपासून ? 'महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत ' एका संपादकीय स्फुटांत तिकडील वेल्शदेर्शायांच्या वेल्श् भाषाभिमानाचे उदाहरण मी एकवार मुद्दाम विवेचिले होते. असो! अशा वेल्श् देशांत विठ्ठलराव राहिले ! या छोट्या सफरीत काही वेल्श् लोक, भाषा, आणि त्यांचा आणि इंग्रजाचा झालेला मेळ यांची उद्बोधक चर्चा विठ्ठलरावांनी केलेली नाही. पण त्यांनी तशी केली असती तर ती फारच उपयुक्त व मार्गदर्शक झाली असती यांत संशय नाही. विठ्ठलरावांचे वडील हि विठ्ठलराव असतांना विलायतेस येऊन गेले हा उभयता पितापुत्रांच्या आयुष्यातला एक चमत्कृतिजनक रमणीय प्रसंग ! विठ्ठलरावांच्या आयुष्यातील हे प्रसंग पाहिले म्हणजे त्यांत सांगण्यासारखें काहीतरी आहे यांत कोणासहि संशय वाटणार नाही. आणि परदेशांत झालेली आपल्या वत्सल आणि कीर्तिमान वृद्ध पित्याची भेट हीच विठ्ठलरावांची आणि त्यांची आयुष्यातील शेवटची भेट ठरावी हाहि प्रसंग तरी पुनः किती चमत्कारिक, शोककारक, करुणास्पद पण चमत्कृतिपूर्ण म्हटला पाहिजे ! विठलरावांना एकदम विलायतेस जावे लागले; आणि एकदमच विलायत सोडावी लागली : एवढे जगप्रसिद्ध पॅरिस शहर, परंतु त्यांस त्याचे पुरतें दर्शन सुद्धा घेता येऊ नये? किती विषाद वाटला असेल त्यांना? पण तेवढ्यांतहि तेथील नग्नविलासगृहांची कुंटणगिरी करणारा एक भारतीय त्यांस भेटावा ही तरी काय गोष्ट म्हणावी ? या निमित्ताने आणि एकंदर पाश्चिमात्य जीवनासं. बंधाने विठ्ठलरावांच्या मनावर घडलेले परिणाम हि त्यानी थोडक्यांत सूचित केले आहेत.

४ स्वागत कै. न्या. मू. केशवराव यांचा माझा परिचय केशवरावांच्या सार्वजनिक सेवाप्रेमामुळे सुमारे १९१४ । १५ त आला आणि तो त्यांच्या देहान्तपर्यंत वाढत गेला! हैदराबादेत एक महिनाभर राहिलों तेव्हा केशवरावांनी मजबरोबर जातीने हिंडून आमच्या शिक्षण प्रसारकमंडळीच्या न्यू पूना कॉलेजसाठी सुमारे ४ । ५ हजार मिळवून दिले त्या प्रसंगाची आणि त्याच्या सौजन्यशाली आणि कष्टाळू स्वभावाची आणि मधुर सहवासाची स्मृति माझ्या हृदयांत अद्यापि ताजी आहे ! चि. विठ्ठलराव पुण्यास शिक्षणासाठी राहिले तेव्हां त्यांचा माझा संबंध वडिलांच्या या स्नेहामुळे आला आणि याच स्नेहतंतूचे बळ पडून ही प्रस्तावना मजकडून लिहून मागण्याचा आपला सर्वमान्य हक्क चि. श्री. विठ्ठलराव यांनी बजाविला. छोट्याशा ग्रंथाला प्रस्तावना आणखी लांबविणे योग्य होणार नाही. ही सफर लिहिली तसे आणखी हि आपले अनुभव विठ्ठलरावांनी वाचकांस सादर करावे अशी इच्छा व्यक्त करून पुरे करतो. आश्विन शु. ४१६८ २८।९।४६ 'लोककल्याण', पुणे. दत्तो वामन पोतदार माझी विलायतची सफर पूर्व तयारी पुण्यास असतांना कॉलेजच्या मित्रमंडळींनी एके दिवशी माझी खूप थट्टा केली. या वेळी माझे धाकटे बंधू लंडन येथे होते. “ लहान बंधु विलायतेत आणि तूं येथेच रडतराऊतासारखा बैस, तुझ्यांत हिंमतच नाही" असे एकाचें बोलणे चालू असतांना मी म्हटले, “ त्यांत काय मी सुद्धा जातो." दुसऱ्या मित्राने ताबडतोब एका कार्डावर वडिलांस पत्र लिहावयास लाविलें. घरून त्या पत्राचे उत्तर ' तयारी करा' असें येतांच मी विलायतेला जाण्याच्या तयारीस लागलो. काय शिकावयाचे, कोठें रहावयाचे वगैरे कांहींच ठरविले नव्हते. तोन आठवड्याच्या आंत मला हैद्राबादेच्या रेसिडेंटकडून Pass-Port परवाना मिळाला. हिंदुस्तानी लोकांना इटालियन बोटीने प्रवास सोइस्कर पडतो असें काही लोकांचे मत पडले म्हणून मी लॉइड ट्रिस्टीनोअॅड मारिटाना इटालियाना कंपनीच्या s. S. Pilasna 'पिल्स्ना' बोटीने निघावयाचे ठरविलें. परदेशास जातांना आपण तेथे उत्कृष्ट रीतीने आपला कार्यक्रम पार पाडूं, आपले दिवस सुखांत जातील, आपल्याला नवे नवे देश पहावयास मिळतील, युरोपातील लोकांच्या सहवासाने आपणांस त्या लोकांच्या राहणीसंबंधी माहिती होईल, एकंदरीत एकप्रकारचे नाविन्य आपल्या अनुभवास येईल, दृष्टि विस्तृत होईल या कल्पनेने मन रंगून गेले होते. प्रवासांत होणा-या त्रासाची कल्पना मुळीच आली नाही. पण घर सोडतांना मात्र मन एकदम विव्हल होऊन गेले. अगदी आयत्यावेळी माझा निश्चय ढासळू लागला. मनस्थिति चमत्कारिक झाली.

२ माझी विलायतची सफर मी माघार घेतली. पण माझे वडील माघार घेईनात. माझें मन मात्र हेलकावे खाऊ लागले. वडिलांनी माझ्या खर्चाची रक्कम सुद्धा बँकेत जमा केली होती. हैद्राबादचे श्रीयुत, बॅरिस्टर रामचंद्र नाईक यांच्याकडे मोठी पार्टिंग फीस्ट झाली. यावेळी असिस्टंट रोसडेंटही हजर होते. अखेर लटकेंच धैर्य दाखवीत मी हैद्राबाद सोडले. मुंबईहून बोट २९ ऑगस्ट १९२८ ला निघणार होती. वाटेंत पुण्यास एक दिवस मुक्काम केला. पुण्याच्या मित्रमंडळींनी हंसत हंसत निरोप दिला. माझ्याबरोबर हैद्राबादचे आणखी दोन विद्यार्थी श्री. शिवेंद्रबदादर आणि बिहारीलाल हे होते. बोट सुटावयाचे दिवशी वडील हैद्राबादेहुन वेळेवर येऊ शकले नाहीत, कारण याच वेळी खंडाळ्याच्या घाटातील रस्ता खराब झाला होता. मुंबई सोडली बोटीने भोंगा ( Siren) वाजविला. माझ्या मनांत विचित्र कालवाकालव चालू होती. बोटीवर चढण्याची शिडी काढून घेण्यांत आली. मातृभूमीचा आणि माझा धागा तुटल्यासारखे वाढू लागले. अशा वेळी अपोलो बंदरावर खाली जमलेल्या मंडळींत मला माझे वडील दिसले. मी डेकवर उभा होतो. बोट हलू लागली. चमत्कारिक विचारांनी माझें मन इतके भांबावून गेले होतें की, त्यावेळची आठवणसुद्धा अजून नकोशी वाटते. बोटीवरून मी वडिलांना नमस्कार केला थोड्याच वेळांत मुंबईच्या मोठमोठ्या इमारती देखील हळू हळू धुक्यांत विराम पावत असल्याप्रमाणे दिसू लागल्या. माझ्या पोटांत अतिशय कालवाकालव सुरू झाली. मला बोट फार लागू लागली. मी आपल्या केबिन- मध्ये जाऊन पडलों. दुसऱ्या दिवशी दुपारी थोडा आराम वाढू लागला. मध्यंतरी एकादें द्राक्ष खावें तर ते सुद्धा बोट लागल्यामुळे जसेच्या तसे बाहेर येई ! मन घराकडे सारखें ओढ घेई. S. S. Pilasna बोटीची व्यवस्था फारच सुंदर होती. माझे तिकीट दुसऱ्या वर्गाचे होते तरी आम्हांला सगळीकडे हिंडण्याफिरण्याची परवानगी असे. बोटीस धोका झाल्यास Life-Belt बांधून आपला जीव कसा वांचवावा या संबंधी बोटीवर कवाईत पहिल्या एकदोन दिवसांत करून घेतात. यावेळी बोटीवर एकच गोंधळ उडतो. खरोखरच बोट बुडते की काय असें वाढू लागते पण ही माझी विलायतची सफर ३ -- भीति लौकरच मावळते. ही बोट म्हणजे एक राजवाडाच होता! प्रत्येक वर्गाला एक भोजनगृह, एक विश्रांतिगृह व एक धूम्रपानगृह असते. या शिवाय डेकवर जिकडे तिकडे सुंदर गालिचे पसरलेले असतात. प्रत्येक वस्तु अतिशय स्वच्छ आणि लकलकीत ठेवलेली असते. बसावयाच्या हॉलमध्ये एकएक टेबलाभोंवती सुंदर स्प्रिंगच्या खुर्त्या ठेविलेल्या असून पामची आणि फर्नची झाडें कौशल्याने ठेवलेली असतात. येथे पियानोही ठेवलेला असतो. वेळ फावेल तेव्हां तेथे मंडळी पत्ते खेळत बसतात आणि ज्यास गाण्याची चटक असेल तो पियानोवर बसून गुणगुणू लागतो. बोटीवर सर्व सुखसोयींची तरतूद केलेली असते. दररोज काही तरी नवा प्रोग्राम ठेवलेला असतो. एके दिवशी पाहता पाहतां पांच मिनिटांत कॅनव्हसचा हौद डेकवर उभा करण्यांत आला! आम्ही पांच पंचवीस लोकांनी त्यांत उड्या घेतल्या. कधी कधी डेकवर सिनेमा दाखवीत असत तर कधी कधी बँड चालत असे आणि त्या सुरावर लोक नाचूं लागत! या बोटीवर एक लहानशी व्यायाम-शाळाही होती. तेथे विजेचा घोडा, विजेची सायकल आणि विजेची वल्हवावयाची छोटी होडी होती. घोड्यावर बसून बटन दाबलें कीं, जोरांत घोडदौड सुरू होऊन चांगलीच हाडें नरम होत असत. तसेंच होडीत बसून होडी वल्हवतांना हातास रग लागे. सायकलवर बसून सायकल चालू केली म्हणजे समोर ठेविलेल्या घड्याळावर किती वेळांत किती मैल सायकल चालली हे समजत असे. बोटीवरील प्रत्येक प्रवाश्यास सर्व प्रवाश्यांची यादी देण्यात येते. कोण कोठल्या देशाचे आहेत वगैरे यांत नोंद केली असल्यामुळे इतर लोकांची ओळख करून घ्यावयास या यादीचा चांगला उपयोग होतो. बोटीवरील वेळ इतका आनंदांत जातो की, शेवटीं बोट सोडूं नये असे वाटू लागते. दोन तीन दिवसानंतर माझे बूट खराब झाले होते. गो-या लोकांना बूट साफ करावयास कसे सांगावे म्हणून एके दिवशी केबिनमध्ये दुसरे कोणी नाही असे पाहून मी आपल्या बुटास स्वतःच लाली चढविली | गुलामगिरीत आम्ही किती बुजरट झालो आहोत याचे मला नंतर हंसूं येत असे. पुढे मी दररोज रात्री बूट केबिन बाहेर ठेवू लागलों व दररोज बूट साफ होऊ लागला ! बोटीवर वर्तमानपत्र मिळत नाही म्हणून रोजचे रोज Bulletin बातमी- पत्रक टाइप करून वांटण्यांत येत असे. वायरलेसनी ज्या बातम्या येत त्यांचा माझी विलायतची सफर सारांश सर्वांना समजावा म्हणून ही सोय केलेली असते. पुढे एके दिवशी आमच्या बोटीवर एक प्रकार घडला. एक खलाशी ( Mast ) मास्टवरून पडून मेला. याला एका लाकडी कॉफिनमध्ये घालून जलसमाधि देण्यांत आली. बोटीवर एक छोटेखानी दुकान होते. तसेंच डॉक्टर, धोबी, न्हावी वगैरेंचीही व्यवस्था होती. एक पाद्रीही होता. खलाशी मेल्यावर त्याच्या आत्म्याला शांति मिळावी म्हणून याच पाद्याने प्रार्थना केली. प्रेतास जल- समाधि दिल्यावर बोटीने त्या जागेस एकवेळ वळसा दिला व बोट पूर्ववत् चालू झाली. आम्ही सर्वांनी वर्गणी जमा करून त्या खलाश्याच्या मुलांबाळां- करितां कांही रक्कम पाठवून दिली. बोटीवर बहुतेक आमचा वेळ डेकवर जात असे. डेकवर बसावयाची आरामखुर्ची आपली आपण घ्यावी लागते, ती मी मुंबईस विकत घेतली होती. डेकवर बहुतेक लोक कादंबऱ्या वाचीत पडलेले दिसतात. ही पुस्तकें बोटीच्या लायब्ररीतून मिळतात. काही लोक धूम्रपान करीत आपापल्या देशाच्या गप्पा मारीत बसतात. हिंदुस्तानी विद्यार्थ्याने जरूर इतर लोकांशी मिसळावे. अशाने विचार विनिमय होऊन आपले मन प्रगल्भ होतें. बोटीवर समुद्रच आपला आवडता सोबती वाढू लागतो. अथांग समुद्राच्या निरनिराळ्या स्थित्यंतराबरोबर आपल्या मनांतही निरनिराळ्या भावना उचंबळू लागतात. समुद्र खवळला की भीति वाढू लागते तर कधी शांत समुद्रा. च्या शीतल वायने मन प्रसन्न होतें. डेकवरून क्षितिजाकडे शून्य मनाने पहात बसावेसे वाटते. समुद्रावर सूर्योदयाची व सूर्यास्ताची शोभा फारच सुंदर आणि खुलून दिसते. कोठे कोठे सील माश्यांचे कळप सकाळचे कोवळे ऊन खात समुद्रसपाटीवर इतस्ततः उलट्या सुलट्या उड्या घेत असलेले दिसतात ? लाटा बोटीवर आदळून फुटू लागल्या म्हणजे तुषार उंच उडून सुंदर मोत्यांचे ढीग उंच फेंकले जात आहेत की काय असा क्षणभर भास होतो! बोटीच्या मागच्या भागास एका दोरखंडास एक चक्र बांधलेले असते! असे सांगत की या चक्राच्या फिरण्याच्या वेगावरून बोटीचा वेग ठरविण्यात येतो. बोट कोणत्या वेगाने चालली आहे वगैरे बातमी नोटीस बोर्डावर लिहिलेली असते. तसेंच पश्चिमेकडे जात असतां घड्याळांत सारखा फरक पडतो. आम्हांला आपली घड्याळे दररोज बोटीच्या घड्याळावरून लावून घ्यावी लागत. आमची बोट साधारण ७५ मैलांच्या वेगाने अरबी समुद्रांतून वाट काढीत होती. दिवसां व माझी विलायतची सफर रात्री डेकच्या कठड्याला टेकून आम्ही किती तरी तासचे तास घालविले असतील! रात्री बोट वेगाने चालू लागली म्हणजे पाण्याला इतक्या जोराने कापून जाई की, या पाण्यांतूनसुद्धा घर्षणामुळे ठिणग्या उडत ! रात्रींचा सौम्य आणि शीतल समुद्रावरचा वारा, डोक्यावर चंद्राची चमकणारी कोर आणि त्या भोवती अनंत तान्यांचा लुकलुकाट अशावेळी आपल्या बोटीपासून काही अंतरावर दुरून दुसरी बोट जाऊं लागली म्हणजे त्या दुसऱ्या बोटीची शोभा तर अवर्णनीयच; हजारों दिवे पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. समुदावरची दिवाळीच ही ! ही शोभा दुर्बिणीतून पहावयास फारच मौज वाटते. अशा वेळी दुसऱ्या बोटीतील अनोळखी लोकही आपापले हातरुमाल फडकवून आनंद व्यक्त करतात. एडन मुंबई सोडल्यापासून पांचव्या दिवशी आम्हाला एडनचे खडकाळ डोंगर दिसू लागले. बोटीवरून जमीन दिसू लागली म्हणजे सर्वांनाच आनंदी आनंद वाटू लागतो. प्रत्येकाच्या चेह-यावर आनंदाची छटा दिसू लागते आणि प्रत्येक जण जमीनीवर पाय ठेवण्यास उत्सुक झालेला दिसून येतो. आमची बोट समुद्रात बऱ्याच दूर अंतरापर थांबली. आम्ही लहान लहान होज्यांतून बंदरावर गेलो. इष्टमित्रांना लिहिलेली पत्रे पोष्टांत टाकून थोडासा फेरफटका केला. एडनला हिंदुस्थानी लोक पुष्कळ दिसून येतात. एडनला काही लोक मोटारीतून पाण्याचा तलाव पहावयास गेले. एडन हे अरबस्तानचे बंदर आहे. येथे अरबी व हबशी लोकांचा मोठा भरणा आहे. पूर्वीपासून हिंदुस्थानशीं व्यापाराबद्दल या ठिकाणची प्रसिद्धि आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हे बंदर १८३९ मध्ये आपल्या ताब्यात घेतले. येथील लोकसंख्या सुमारे ४५००० च्या वर आहे. बोटीवर लागणाऱ्या खाद्य सामानाचा सांठा एडनवर करून घेण्यात येतो. उंच, सडपातळ आणि गोरे अरब मण्याचे सामान, काठ्या, गालिचे, सिगारेटस् वगैरे विकावयास बोटीवर येतात. यांचे भोंवतीं एकच गर्दी होते. आमच्या बरोबर असलेल्या एका गृहस्थाने चाळीस पन्नास रुपयास सर्व अरबी पोषाकच विकत घेतला. एडनला आपले नाणे चालते. या पुढे मात्र रुपये कोणत्याही देशांत चालत नाहीत म्हणून मी माझ्या जवळचे उरलेले माझी विलायतची सफर रुपये बदलून त्यांचे पौंड करून घेतले. बोटीवर जे दलाल येतात ते एकादें काळे सावज मिळाले तर त्यास चांगलाच धोका देतात. गडबडीत कमी पैंड्स हाती देऊन चालते होतात. म्हणून बोटीवर प्रथम Inquiry Bureau मध्ये भाव विचारणें बरें. संध्याकाळी चार पांचाचे सुमारास आमची बोट एडन वरून हलली व आम्हीं तांबड्या समुद्रातून प्रवास करू लागलो. याला तांबडा समुद्र असें नांव कां पडले याचा आम्हाला अखेरपर्यंत पत्ता लागला नाही. अरबी समुद्रांतून आमची बोट हेलकावे खात खात आली ती आतां तांबड्या समुद्रात शांतपणे चालू लागली होती. सुवेझ कॅनॉल व बंदर सुवेझच्या आखाताच्या एका कोपऱ्यावर सुवेझ बंदर वसलेले आहे. इजिप्तच्या ताब्यांत हे बंदर आहे. हिंदुस्तान आणि इजिप्तमध्ये दळणवळणाचा जमिनीवरचा मार्ग होता तेव्हांपासून हे ठिकाण व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे गणले जात आहे. इ. स. १८६९ साली जेव्हां सुवेझ कॅनॉलचे काम पूर्ण झाले तेव्हापासून तर या बंदरास फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. सुवेझ कॅनॉलच्या योगाने तांबडा समुद्र आणि भूमध्यसमुद्र जोडला गेला आहे. द. लेसेप्स नांवाच्या एका फ्रेंच इंजिनियरने हा कालवा तयार केला. यापूर्वी हिंदुस्तानांत युरोपांतून बोटी आफ्रिकेस वळसा घालून येत होत्या. सुवेझ कॅनॉल झाल्यापासून दळणवळणाचा मार्ग फारच सुलभ झाला आहे. सुमारे सहा हजार मैलांचे अंतर कमी झाले. या कालव्याची लांबी सुमारे ८६ मैल आहे. पण कालव्यातून एक मोठी बोट जाईल एवढाच मार्ग आहे. कॅनॉलच्या दुतर्फा वालुकामय प्रदेश दिसू लागतो. कोठे कोठे काटेरी झुडपें नजरेस पडतात. कालव्याची रुंदी २०० ते ३०० फूटच आहे. दोन्ही बाजूची वाळू कालव्यांत घसरून पडत असते म्हणून वाळू काढून एका अंगावर टाकण्याचे काम सारखें चालू असते. सुवेझ कॅनॉलचा पहिला भाग, आम्ही झोपेत असल्यावेळीच आमच्या बोटीने आक्रमून टाकला होता. कालव्यांतून पसार व्हावयास आम्हाला दहा अकरा तास लागले. पोर्ट सय्यद सकाळी ९ च्या सुमारास आमची बोट पोर्ट सयब्द बंदरास लागली. तेथे माझी विलायतची सफर चार तास बोट थांबणार होती. एडन प्रमाणेच अनेक व्यापाऱ्यांनी बोटीवर गराडा घातला, तर काही वाटाडे खाली गांव पाहण्यास या अस इषारे करूं लागले. गांव पहावयाचे असेल तर चार सहा मंडळींनी ग्रुप करून जावें असें आम्ही ठरविले. पण गर्दीत हैदराबादचे एक गृहस्थ एकटेच पुढे निघून गेले. बोटीवरून उतरल्याबरोबर येथे भामट्यांचा फार सुळसुळाट आहे असे दिसून आले. जो तो, इकडे चला तिकडे चला म्हणून आमच्याशी जवळजवळ हिसकाहिसकी करूं लागला. येथील वाटाडे अतिशय लोचट तरी पण सावज पाहून पकडतात, हौशी आणि रंगेल प्रवासी भेटला तर त्याला अगदी नंगानाच सुद्धा दाखवितात. अर्थात पैसे उकळणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. येथे शिलिंग पेन्स वगैरे चालत नसल्यामुळे थोड्या रकमेचे फॅक्समध्ये रूपांतर करून घेतले व चहा कॉफी घेऊन व थोडा फराळ करून परत आम्ही बोटीवर फिरलो. कॉफीत चांगलेच बुडालों! कारण काहींच्या जवळून तर एक एक कप गचाळ कॉफीस हॉटेलवाल्यांनी एक शिलिंग लाटला ! परत येऊन पाहतो तर हैद्रा- बादचे गृहस्थ आपला अनुभव सांगू लागले आणि त्यांनी नग्न चित्रांचे एक पाकीट विकत घेतले होते ते दाखविण्याच्या उद्देशांनी त्यांनी काढले. आम्ही सर्व कुतूहलाने पाहूं लागलों तो त्यांत दोन आण्याचे खेळावयाचे पत्ते निघाले ! सर्वच हशा पिकला. या चित्रांकरितां त्या गृहस्थानें कमीत कमी पांच सात रुपये दिले होते | माझ्याबरोबर पोर्ट सय्यदच्या रस्त्यावर एक गृहस्थ टर्किश स्वीटस् घ्या म्हणून फारच लगट करूं लागला. मी तेथील पोलिसला हा प्रकार सांगितला पण तोहि नुसतो हंसतच उभा राहिला. मी मनांत ठरविलें की हा भामट्यांचा देश असावा आणि पोलिस शिपाई पंण त्यांच्यापैकीच दिसतो. पोर्ट सय्यद बंदरांत द लेसेप्सचा एक भव्य पुतळा आहे. साधारण ३० ते ४० फू. उंच चौथ-यावर २२ फू. उंचीचा हा पुतळा आहे. पोर्ट सय्यद सोडल्या- बरोबर आमच्या बोटीने युरोपांत प्रवेश केला. येथून निघाल्यावर दि. १४ सप्टेंबरला आमची बोट व्हेनिस येथे पोचली. आम्ही येथे उतरून पुढचा प्रवास रेलवेनी करावयाचे ठरविले होते. बोटीवरून उतरावयाचे वेळी केबिन् बॉयला मी चार पांच शिलिंग त्याच्या, हातावर ठेवून माझी डक चेअरही त्याला देऊन टाकली. कमी बक्षीस दिले तरी हे लोक कधीच नाखूष होत नाहीत.

८ माझी विलायतची सफर व्हेनिस व्हेनिस शहर फारच मनोहर आहे. प्रथम बंदरावर आमच्या सामानाची तपासणी झाली. तेथून आम्ही निघालों तो सरळ एका होडग्यांत Gondola मध्ये बसलों. इटलीत बंदराचे फोटो घेण्याची सक्त मनाई होती. या शहरांत रस्ते फारच क्वचित् दिसतात. समुद्राच्या पाण्याचे कालवे सर्व व्हेनिसमधून खेळविले आहेत. गाँडोला मधून जातांना फारच मौज वाटते. आम्ही बसलेली होडी एका हॉटेलच्या पाय-याशी थांबली. आमच्यांपैकी कोणासच इटालियन भाषा येत नव्हती म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हांस भाषेची अडचण पडू लागली. आम्ही शाकाहारी आहोत असें खाणा- खुणांनी हॉटेलवाल्यास कळविलें. आमच्यापुढे कसलेतरी शेवाळे त्याने शिजवून आणून ठेविलें. ब्रेड बटर व फळं खाऊन आम्ही तो दिवस काढला. आमच्या बरोबरच्या एका स्नेह्याने एका विश्रांति-गृहांत 'लेमन' पाहिजे म्हटल्याबरोबर हॉटेलवाल्याने बाजूच्या भाजी मार्केटकडे बोट दाखविलें! 'लिमू नोह' असें विश्रांति-गृहांतील पोऱ्याने विचारल्यावर आम्हों 'होय' म्हटले व आमची साधी चूक आमच्या लक्षात आली. व्हेनिस शहर पो नदीच्या मुखाजवळ असलेल्या शंभर लहान लहान बेटांवर वसलेले असून एक चांगले बंदर आहे. पुरातन कालांपासून हे शहर खलाश्या- करितां प्रसिद्ध आहे. पूर्वी येथील व्यापारी हिंदुस्तानचा माल मध्य युरोपांत खपवीत. येथे कालव्याच्या दोन्ही बाजूस सुंदर उंच उंच इमारती आहेत. मधून मधून इमारतींच्या भिंतीवरून सिनॉर मुसोलिनीची मूठ वळून तोंड वासलेली चित्रं दिसत. यावरून आम्ही कल्पना केली की, फॅसिझमच्या चळवळीसंबंधीच्या या जाहिराती असाव्यात. शहरांत मोठे रस्ते नाहीत व म्हणून मोटारींची गडबड नसल्यामुळे हे शहर तितकें गजबजलेले दिसत नाही, धुळीचे तर नांवच नाही. असे म्हणतात की, व्हेनिस श्रीनगरप्रमाणे सुंदर आहे. व्हेनिसमध्ये कालव्यावरून बांधलले पूलही सुंदर दिसतात. ठिकठिकाणी पुतळे दिसतात. इटली कलेकरितां पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. आम्ही डयू कॉले पॅलेस नांवाची एक इमारत पाहिली. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कमानींच्या मोठमोठ्या रांगा असल्याने ही इमारत फारच उठावदार दिसते. एकच दिवस माझी विलायतची सफर व्हेनिस येथे राहून आम्ही पुढच्या प्रवासास लागलो. व्हेनिस स्टेशनसुद्धा एका कालव्यावरच आहे. गाँडोलामधून आम्ही उतरलों तो स्टेशनच्या पायऱ्यावरच. येथून आम्ही Continental Express Train ने प्रवास केला. ही गाडी पॅडूआ-व्हिरोना, मिलान, ट्यूरिन वरून स्वित्झरलंड मधून उत्तर फ्रान्सच्या भागांतून कॅले बंदरावर जाते. इटली स्वित्झरलंड व फ्रान्सच्या सरहद्दीवर आमची तिकिटें 7 पासपोर्ट्स तपासण्यांत आले. मध्य युरोपातून जातांना दिसणारे सृष्टिसौंदर्य फारच मनोवेधक आहे. आल्पस् पर्वताचे उंच उंच कडे, त्यावर सकाळच्या किरणांत चमकणारे बर्फाचे ढीग, खालच्या सपाटीवरची हिरवीगार झाडी, यांत वसलेली छोटी छोटी शहरें फारच मनोरम दिसतात. उंचावरून काही ठिकाणांवरून वाहात असलेले पांढरे स्वच्छ धबधबे व बाजूस अर्धवट गोठलेले पाणी मी पूर्वी कधीच पाहिले नव्हते. कोठे कोठे मधून मधून सुंदर तलावही दृष्टीस पडतात. आणि भोवतालच्या हिरवळी- वर चरणारे मेंढरांचे मोठे कळप दिसतात. या भागांत शेती कमी दिसून येते. द्राक्षांचे मळे मात्र विपुल दिसून येतात. काळ्या द्राक्षांचे घोंसचेघोंस लागलेले आम्ही पळत्या गाडीतून पाहिले आणि मनात म्हटले द्राक्षे आंबट असावीत ! कले बंदर ---- सरासरी अठ्ठावीस तासांत आम्ही व्हेनिसहून फ्रान्सच्या कॅले बंदरावर येऊन पोचलो. पुन्हां पहिल्याप्रमाणेच सामानाची तपासणी झाली. दुपारी एक दीडच्या सुमारास आम्ही इंग्लिश चॅनलच्या प्रवासास सज्ज झालो. एक लहानशी बोट तयारच होती. जंगी जहाजांतून प्रवास केल्यावर या छोट्या बोटीवरच प्रवास सुरू झाला. राजवाड्यांत राहिलेल्या माणसास खेड्यांतील झोंपडीत रहावयास गेल्यावर जसे वाढू लागते तसे आम्हांस झाले. आम्ही या छोट्या बोटीच्या डेकवरच वेळ काढला. सरासरी दोन तासांत Folkston फोक्स्टन बंदराचे खडूचे डोंगर आम्हांस दिसू लागले. फोक्स्टन. बंदरावर पुन्हां सामानाची तपासणी झाली. एका सिगरेट टिनपेक्षा जास्त सिगरेटस् जवळ असल्यास त्यावरही येथे ठराविक कर आकारला जातो. फोक्स्टन बंदरावर आगगाडी तयारच होती. तेथून तीनचार तासांत सायंकाळी आम्ही लंडनच्या व्हिक्टोरिया माझी विलायतची सफर स्टेशनवर आलो. १६ सप्टेंबरला इंग्लंडच्या भूमीवर जेव्हा आम्ही पाय ठेवले तेव्हां आम्हांला आपल्या घरी आल्यासारखे वाटलें. लंडन -D व्हिक्टोरिया स्टेशनवर माझे धाकटे बंधू रामराव मला घ्यावयास येणार होते. परंतु ऐन वेळी ते न येऊ शकल्यामुळे मी थोडा गोंधळल्यासारखा झालो. गाडींतून सर्व लोक आपापलें सामान घेऊन चालू लागले. आपलें सामान वाहून नेण्यास यांना कमीपणा वाटत नाही. अर्थात एका माणसास न झेपण्यासारखें सामान असल्यास पोर्टर मदत करतात. यात्रेस निघाले म्हणजे इतर यात्रेकरू जिकडे जातात तिकडेच नवखेही वळतात, त्याप्रमाणे आम्ही दुस-या हिंदुस्थानी मंडळी- बरोबर — गाँवर स्ट्रीट' वरील Y. M. C. A. त पथारी ठोकली. दुसरे दिवशी सकाळी माझ्या धाकटया बंधूंनी माझी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली. Y. M. C. A. त हिंदुस्थानी तरुण मंडळींचा घोळका दिसू लागला होता. मला सर्व मंडळींत एकदम मिसळावे असे वाटले. पण कोणीच काही बोलेना! नंतर असे कळलें की ओळख करून दिल्याशिवाय इकडे कोणी कोणाशी बोलत नाहीत ! असा येथील शिष्ट-संप्रदाय आहे. लंडनमध्ये मी तीन आठवडे काढले. पुढे काय करावे हे काही सुचेना. खूपसें शिकावयाचे या कल्पनेच्या जोरावर येथवर मजल मारली. युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळविण्याकरता मी अर्ज टाकले होते. पण मला नकारार्थी उत्तरें येऊ लागली. लंडन, ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील विश्वविद्यालयांत तर शिरकाव होणे मला दुरापास्त दिसू लागले. लंडनमधील हे दिवस फारच चिंतेत गेले. स्वास्थ्य नाहीसे झाले. परदेशांत येण्यापूर्वी इकडील विश्वविद्यालयांत प्रवेश मिळविणे सोईचे होते. मला ही चूक रात्रंदिवस डोळ्यापुढे दिसू लागली. माझे धाकटे बंधु मला 'वैमानिक विद्या शिकण्याकरितां 'क्रायडन' येथे रहा ' असा आग्रह करूं लागले. पण कर्मधर्मसंयोगाने वेल्स युनिव्हर्सिटीकडून थोडेसें आशादायक उत्तर आलें. ते असे की, 'मला इंग्रजीतून कोणत्याही विषयावर एक निबंध लिहावा लागेल. तो जर पसंत पडला तर कॉलेजमध्ये घेतले जाईल. आणि कॉलेजच्या पहिल्या तिमाहीत पास न झाल्यास मॅट्रिकच्या मन- माझी विलायतची सफर परीक्षेस बसावे लागेल." या सर्व अटी कबूल करून मी वेल्स युनिव्हर्सिटीच्या अॅबरिस्टविथ येथील कॉलेजांत पदार्पण केले. डॉ. परांजपे यांची भेट लंडनडून निघण्यापूर्वी २९ सप्टेंबरला मी रँग्लर परांजपे यांना भेटावयास गेलो. ते यावेळी इंडिया कौन्सिलचे मेंबर होते. वडिलांची सक्त ताकीद होती की, मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागावें. परांजपे तेथे सहकुटुंब राहात होते. त्यांची तेथील साधी राहणी पाहून मला फारच आश्चर्य वाटले. एका साध्या इमार- तीच्या वरच्या मजल्यावर ते रहात असत. घरच्या गोष्टींसंबंधी त्यांनी विचारपूस केली. आणि विलायतेत पैशाचा अपव्यय करूं नये असा उपदेश केला. अजून मी पक्का शाकाहारी होतो. परांजपे यांनी आपल्या घरों मला. मांसाहाराची दीक्षा दिली. मी म्हटले की, 'मला या पदार्थांचा वासमुद्धां खप नाही. "यावर ते जरा रागांतच म्हणाले की, 'तूं काही महात्मा गांधींच्या सारखा येथें Experiment (प्रयोग) करावयास आला नाहीस. आणि असाच हट्ट धरशील तर प्रकृति खराब करून घेशील.' यापुढे ३-४ महिन्या- नंतर समोर येतील ते पदार्थ खावयाचा मी प्रयत्न करू लागलो. इंग्रजी जेवण- खरे म्हटले तर मनापासून मला कधीच आवडले नाही. परांजप्यांकडे चहा- फराळ झाल्यावर मी त्यांचा निरोप घेऊन निघालो. घटकाभर पुण्यासच त्यांच्या घरी असल्याचा भास झाला. अॅबरिस्टविथ (विश्वविद्यालयोन शहर ) अॅबरिस्टविथ एक विश्वविद्यालयीन शहर वेल्सच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलें आहे. वेल्श भाषेत अॅबर म्हणजे गांव आणि एस्टविथ एका नदीचें नांव आहे. एस्टविथ नदीवर वसलेला गांव असा या शब्दाचा अर्थ आहे. हे सुंदर शहर आहे. चार पांच मैलपर्यंत समुद्रकांठ ( Promenade ) बांधून काढला आहे. समुद्राच्या आंत बऱ्याच अंतरावर पुलासारखा रस्ता ( pier) काढून त्यावर एक विश्रांतिगृह आहे. याला 'पिअर कॅफे' असे म्हणतात. यांत एक लहानसें नृत्यालयही आहे. समुद्राच्या बाजूस एक टेकडी आहे. हिचें नांव Constitution १२ माझी विलायतची सफर Hill आहे. या टेकडीवरून पाहिले असता सर्व शहर चित्राप्रमाणे सुंदर दिसते. आमचे कॉलेजही समुद्रकांठांवर वसलेले आहे, इतके की, कधी कधी समुद्र खवळला म्हणजे वर्गाच्या भिंतीवर व तावदानांवर समुद्राच्या लाटांचे तुषार उडत असत ! सर्व शहरांत जिकडे तिकडे विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे फिरतांना दिसू लागतात. वसंतऋतूंत येथील हवा फारच चांगली असते म्हणून इंग्लंडां- तील गजबजलेल्या वस्तीतील राहणारे लोक या दिवसांत येथे येऊन राहतात. मध्यम स्थितीतील लोकांचा हा एक परिपाठच आहे की, वर्षांतून एक महिना तरी अशा प्रकारच्या समुद्रकांठांवरच्या शहरी जाऊन राहावयाचे आणि हंसण्याखेळण्यांत दिवस घालवावयाचे. उन्हाळ्याच्या दिवसांत तर अॅबरला एकाद्या यात्रेच्या ठिकाणचे स्वरूप येई. आक्टोबरच्या पहिल्या तारखेस मी अॅबरला पोचलो. पहिल्या दिवशी मी अॅबच्या लायन्स हॉटेलमध्ये राहिलो होतो. रात्रीचे जेवण आटोपून मी झोपावयास गेलो. एका मेड सर्व्हटनें गरम पाण्याने भरलेल्या दोन चिनी मातीच्या बरण्या खोलीत आणून ठेविल्या होत्या. मला वाटले रात्री प्यावयास पाणी ठेविले असेल. सकाळी त्या बाईने त्या बरण्या जेथल्या तेथे पाहून तोंडांत बोट घातलें ! 'बिछाना गरम रहावा म्हणून या बाटल्या बिछान्यांत ठेवायच्या असतात.' असे ती म्हणाली. न्याहारीच्या वेळी सर्व लोकांत या मेडनें we have a baby' असें म्हणून खूपच थट्टा केली. विद्यार्थ्यांकरितां येथे वसतिगृह नव्हते. पण ठराविक Registered Houses मधूनच विद्यार्थ्यांना राहावे लागत असे. अशा घरच्या मालकिणोस विद्यार्थ्यांच्या गैरवागणुकीसंबंधी रिपोर्ट करावयाचा अधिकार दिलेला असतो. आपले घर कॉलेजकरितां रजिस्टर्ड करावयास कॉलेजमध्ये हिला थोडी रकम फी म्हणून दाखल करावी लागते. मी अशाच एका घरांतील कुटुंबांत रहावयास गेलो. शिक्षण-पद्धति टर्म ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेस सुरू झाली. आणि कॉलेजांतील शिक्ष ग घड्याळांतील यंत्राप्रमाणे सुरू झाले. इकडे एकदा टर्म सुरू झाली म्हणजे मध्यंतरी सुटया वगैरे नसतात. हिंदुस्थानांतील कॉलेजांत हिंदु, मुसलमान, पार्शी, जैन आणि ख्रिस्ती लोकांच्या सणांच्या सुट्टयामुळे माझ्या मते अभ्यासांत फारच . .

No text on this page.

No text on this page.

माझी विलायतची सफर १३ व्यत्यय येतो. येथील शिक्षण-पद्धतींत ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा फार ताण पडत नाही. वर्गात ३०-३५ विद्यार्थी असल्याकारणाने अध्यापकाचे लक्ष हरेक विद्यार्थ्यावर असते. हिंदु- स्थानांतील कॉलेजसंबंधी माझा अनुभव याच्या उलट आहे. शंभर शंभर विद्यार्थी वर्गात भरलेले असतात. प्रोफेसर ठराविक वेळी वर्गात येऊन तासभर अस्खलित लेक्चर देऊन मोकळे होतात, आणि विद्यार्थी अंधारांत चांचपडत काही समजले, काही समजले नाही असे म्हणत घरी पसार होतात ! पुढे एक- वेळेस फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपाल श्री. के. रा. कानिटकर यांची भेट लंडन येथे झाली होती. इकडील शिक्षणासंबंधीची ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनास आणली होती. आमच्या लॉ कॉलेजचे डीन बॅरिस्टर सिलव्हिअन लेव्ही M. A. LL. D. यांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यावर असे. त्यांची, पाऊण तास विषयनिरूपण करून शेवटी पंधरा मिनिटांत त्या विषयावर थोडक्यांत टिपण करून देण्याची पद्धति मला फारच आवडली. येवढ्यावरही न समजले तर शिक्ष- कांस केव्हाही विचारून विद्यार्थी शंकासमाधान करून घेत. विद्यर्थी प्रोफेसराची खूप थट्टा करीत पण वर्ग चालू असतांना मात्र वर्गात गंभीर वातावरण राही. स्टपिंग सारखा प्रकार चार वर्षांत एकदाही अनुभवास आला नाही. हिंदु- स्थानच्या विद्यार्थीवर्गाची मने आपल्या भावी आयुष्यावर खिळली असल्या- कारणाने की काय, त्यांची मने मोठों चिंताग्रस्त झालेली मला दिसून येत असत. इकडील विद्यार्थी आपल्या पुढच्या आयुष्याची भलतीच चिंता करीत बसत नाही. भावी संकटांची तो फिकीर बाळगीत नाही त्याचे मन वर्तमान- कालांत जास्त वावरते. आपला अभ्यास आणि हंसणे खेळणे हेच त्याला माहीत. या कारणाने सर्व कॉलेजांत एकप्रकारचे उत्साही वातावरण निर्माण होते. कॉलेजची वार्षिक फी २४ पौंड असते. यांत एक पौंड मेडिकल फी म्हणून घेण्यात येते. कॉलेजची एकंदर मेडिकल फी गांवांतील तीन चार प्रख्यात डॉक्टरांना वांटून टाकण्यात येते व करार त्यांच्याशी असा केला जातो की, त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्याला फुकट औषध व सला द्यावा. कॉलेजला जोडूनच एक इमारत होती जिला Refectory म्हणत. विद्यार्थी मधल्या वेळी येथे बसत. या ठिकाणी वर्तमानपत्रे, मासिके, पत्ते, पियानो वगैरे वरच्या मजल्यावर आणि खालच्या मजल्यांत एक विश्रांतिगृह होते, ज्यांत १४ माझी विलायतची सफर चहा, कॉफी, बिस्किटे वगैरे पदार्थ ठेविलेले असत. Refectory ची व्यवस्था विद्यार्थ्यांकडेच असे. विद्यार्थ्यांने स्वतःच कॉफी वगैरे ओतून घ्यावी, दोन चार जशी लागतील तशी बिस्किट घ्यावी, एका पेटीत त्याची किंमत टाकून द्यावी. कॉलेजांतील जीवन कंटाळवाणे कधीच होत नाही. अभ्यास, खेळ आणि इतर करमणूक यांत प्रमाणशीरपणा असतो. अध्ययन आणि करमणूक यांची सांगड घातल्याने दिवस फारच आनंदांत जातात आणि अभ्यासाचा कधी ताण पडत नाही. आठवड्यातून रविवारी पूर्ण आणि बुधवारी अर्धा दिवस सुटी असते. बुधवारी दुपारी टेनिस, हॉकी, रग्बी वगैरेंच्या मॅचेस ठेवण्यात येतात. बुधवारी सर्व मुलें कॉलेजच्या क्रीडांगणावर जमलेली दिसतात. अंबर येथे एक भली मोठी तीन मजली नॅशनल लायब्ररी आहे. ही इमारत एका टेकडीवर वसलेली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांस येथे वाटेल ते पुस्तक वाचावयास मिळते. या ग्रंथसंग्रहालयास जोडून जुने ग्रंथ (पोथ्या), चित्रे, पुतळे, नाणी वगैरे पदार्थांचे एक वस्तुसंग्रहालयही आहे. आणि तळमजल्यावर एक छापखानाही आहे. अभ्यासी विद्यार्थी वुधवारी येथे आपल्या आवडीची पुस्तके वाचीत बसलेला दिसेल तर काही विद्यार्थी आपल्या मैत्रिणींसह जवळ पासच्या डोंगरावर किंवा लांब समुद्रकांठावर सहल करावयास जातील. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कडाक्याची थंडी सुरू होते. झाडांवर, रस्त्यांतून, घरांवर बर्फच बर्फ दिसू लागते. झाडांची पाने थंडीने झडून जाऊन डहाळीवर बर्फाचे पांढरे थर बसतात. डोंगरांतील झ-याचे पाणी वगैरे पार गोठून जाते. अशा वेळी ओव्हरकोट चढवून खूप लांब सहल करून येण्यात मला फारच मौज वाटे. पुष्कळ ठिकाणी मुले व मुली पिठूळ बर्फाचे चेंडू करून एकमेकांच्या अंगावर फेकत असलेली दिसून येतात. अशावेळी मला पूर्वी मींच लिहिलेल्या दोन ओळी आठवत असत.- हिम अंथरलें जिकडे तिकडे हिम अंथरलें सारें कास पसरला चांदीचा हा लुकलुकती वर तारे ! थंडीच्या दिवसांत अंगावर कपडे फारच घालावे लागतात. अंगास चिकटून अंडरवेअर, त्यावर शर्ट, त्यावर पुल ओव्हर किंवा जाकीट, मग कोट आणि वर ओव्हर कोट. सकाळी एकदां कपडे चढविले म्हणजे झोपण्याचे वेळीच ते बदलावयाचे. मला इतके कपडे चढविणे जिवावर येई पण करतां काय !

. माझी विलायतची सफर १५ बसावयाच्या खोलीत ( Sitting room ) सकाळपासून रात्री अकरापर्यंत शेकोटी पेटलेली असावयाची, खोलीत गालिचे असावयाचे. येथे मऊ खुर्चीवर किंवा कोचावर शेकोटीजवळ बसून गप्पा मारणे हे थंडीच्या दिवसांतील मुख्य काम ! अर्थात पुस्तकें व वृत्तपत्रे वाचति बसावयाचे तर ह्या शेकोटी जवळच बसावे लागे. घरांच्या बाबतीत स्वच्छता, व्यवस्थितपणा आणि टापटीप फार ठेवली जाते. बसावयाचे खोलीत एल टेबल मधोमध ठेवून बहुतेक त्यावरील पुष्प- पात्रांत गुलाब, डॅफोडिल्स, टूलिप्स अशी फुले ठेवलेली असावयाची. ही फुलें एकदा विकत घेतली म्हणजे कमीत कमी दहा बारा,दिवस टिकतात. खोलीत सुदर चित्रे फ्रेम करून टांगलेली असावयाची. हे लोक इकडे जमिनीवर काही पदार्थ पडूं नयेत अशी फार दक्षता बाळगतात. आठवड्यांतून एक वेळेस सर्व पदार्थांची साफसफाई होते. कडी कोंडेसुद्धां पॉलिश लावून चकचकीत करण्यात येतात. मोठ्या ताव. दानांना पडदे असावयाचेच. अशा प्रकारच्या राहणीने जीवनास एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त होते आणि मन नेहमी प्रसन्न राहते. 'दो दिन की दुनिया, क्षणभंगुर जीवन, ही सर्व माया' अशा विचाराच्या आम्हां हिंदी लोकांना इंग्रजी जीवनां- तील हे सौंदर्यरहस्य कितपत पटेल कोणास ठाऊक ! जगांत कसे तरी दिवस काढावयाचे हे जसें कांही आमचें वेदवाक्य ठरत आहे. संबळीतील पितळी मूर्तीना रोज आपण स्नान घालून झकझकीत ठेवतो तेवढ्याच तत्परतेने इक- डील लोक घरांतील प्रत्येक वस्तु स्वच्छ ठेवतात ! हिंदुस्थानांतील आणि युरोपांतील लोकांच्या आर्थिक पारमार्थिक कल्पनाच निराळ्या असल्यामुळे त्यांच्या आणि आपल्या जीवनांत तसेच जमीन अस्मानाचे अंतर पडले असावे. आमची मने आध्यात्मिक विचारांनी इतकी भारून गेली आहेत की, जड वस्तूकडे आम्ही क्षुद्रतेने पाहतो. जडांतील सौंदर्य आमच्या नजरेत भरतच नाही. आर्थिक परि- स्थिति आमची निकृष्ट असल्यामुळे आम्ही सुखाचा संसार करू शकत नाही ही गोष्ट थोड्या अंशी खी आहे. पण सुखाने राहूनच काय करावयाचे आहे, आहे तसेंच राहावें, सर्व शेवटी व्यर्थ आहे, धडपड करणेही व्यर्थ आहे, नशीब ठेवील त्याप्रमाणे काल कंठावा, असे कमकुवत विचार आमच्या लोकांत प्रसृत पावत आहेत, हे एक दुर्भाग्याचे दुश्चिन्ह आहे. अगदी सकाळीच गवळी दुधाच्या बाटल्या घराच्या दारांत ठेवून जातो, तसेच वर्तमानपत्र वाटणारा पोयही वर्तमान पत्र ठेवून जातो. रस्त्यावरील माझी विलायतची सफर तिन्हाईत माणूस या सामानास हात लावीत नाहीत. येथील नोकरवर्ग फार इमानी वाटला. खोलीत घड्याळ, पैसे, नोटा वगैरे वस्तु टेबलावर टाकून खुशाल बाहेर जा, त्यांतून चोरीस कांहीं जाईल अशी भीति बाळगण्याचे कारण नाही. इंग्रज स्त्रिया काम करीत नाहीत अशी आमची खोटी समजूत झालेली आहे. स्त्रिया दिवसभर काही ना काही काम करीत असतात. आठवड्यांतून एक दिवस भाराभर कपडे धुतात. स्वयंपाकांत मात्र यांचा फार वेळ जात नाही. कारण यांना खाद्य पदार्थ नुसते उकळत ठेवण्याचे किंवा तळून काढाव. याचे असतात. एक वाजावयाचे सुमारास दुपारच्या लंचची (जेवण्याची ) वेळ; बरोबर यावेळी शहरांतील सर्व लोक जेवणांत गुंतलेले दिसून येतील. ही वेळ सर्व युरोपभर एकच ठरलेली आहे. आपल्या इकडे सकाळी नऊ पासून दुपारी एक दीड पर्यंत जेवण निरनिराळ्या वेळी चालू असते तसे विलायतेत नाही. नियमित वेळीच त्या वेळचे पदार्थ मिळावयाचे. या वेळेशिवाय मध्ये काहीं पदार्थ पाहिजे म्हटल्यास हॉटेल्समधून स्वच्छ नकार मिळावयाचा. खोलीच भाडे आणि जेवण मिळून आम्हांला अडीच-तीन पौंड खर्च येई. सर्वच पदार्थ विलायतेंत महाग पडतात. कपड्यांची धुणावळसुद्धा इकडील पांचसहा पट ! चार वेळच्या धुणावळंत हिंदुस्थानच्या शर्टची किंमत निघून जावयाची. मोजे व हातरुमालाला जवळ जवळ तीन पेन्स म्हणजे दोन आणे पडावयाचे. खर्चाला कंटाळून कधी कधी बाथरूममध्ये मी माझे हातरुमाल साबणांनी धुवून काढीत असे ! इंग्रजी जेवणाचा कंटाळा आला म्हणजे अधून-मधून आम्ही हिंदुस्थानी खाना म्हणजे, खिचडी, पापड, भाज्या, प्यानकेक्स (पोळ्या) करून एकाद्या वेल्श मित्रास जेवणाचे आमंत्रण देत होतो. पापड यांना फारच आवडत ! चांगले टोमॅटो सरासरी आठ दहा आण्यास अच्छेर मिळत. याचे कारण कांचेची गृहे बांधून त्यांतून यांना अशा भाज्यांची लागवड करावी लागते. खाण्याचे बहुतेक पदार्थ इंग्लंडांत परदेशांतून येतात. दक्षिण फ्रान्समधून भाज्या, डेन्माकमधून चीज, लोणी, मांस तर कॅनडा मधून गहूं आणि अमेरिके- हुन मोसंबी ! आठ दिवस जर बाहेरून कांहीं माल न आला तर आम्ही उपाशी मलं असें पुष्कळ वेळा हे लोक म्हणतात. येथील या लोकांचे जीवन मुख्यतः व्यापारावर अवलंबून आहे. सर्व उत्पादक धंद्यांतून स्त्रियांनाही कामे करावयाची माझी विलायतची सफर मोकळीक आहे. दुकानांतून, हॉटेलांतून, सिनेमागृहांत, पोस्टऑफिसांत जिकडे तिकडे स्त्रिया कामें करीत असलेल्या नजरेस पडतात. सरकारी दप्तरांतून कारखान्यांतून कारकुनाच्या जागेवर व टाईपरायटरच्या जागेवर स्त्रियांचा भरणा मोठ्या प्रमाणांत आहे. शक्तीची बोजड कामें मात्र स्त्रियांकडे सोपविली जात नाहीत. इमारतीचे बांधकाम स्त्रिया कधीच करीत नाहीत. घरगुती स्त्रिया काम आटोपल्यावर दुपारचा वेळ वाचनांत वगैरे घालवितात. त्या सार्वजनिक कामांत भाग घेतात, इतकेंच नव्हे तर पार्लमेंटच्या चढाओढीतही भाग घेतात. थिऑसाफिकल सोसायटीचे बरेच प्रस्थ वेल्श स्त्रियांत माजलेले दिसून आले. तसेंच S. P. C. A जीवदया संघाचेही प्रस्थ बरेंच आहे. मी माझ्या माल- किणीस नेहमी प्रश्न करीत असे की, 'तुम्ही जनावरांना दुःख देऊ नये अशा मताच्या आहांत, मग मांजरी व्याली तर तिची पिलें त्याच दिवशी मारून कां टाकतां ?" ती म्हणे “ घर स्वच्छ ठेवावयाचे तर असेंच थोडें निर्दयही बनावें लागतें ! नाही तर घरांत सारों मांजरीची पिलेंच व्हावयाची." शकुन अपशकुनाच्या कल्पनाही वेल्श लोकांत समूळ नाहीशा झाल्या नाहीत. घुबड आणि काळे कुळकुळीत मांजर शुभ, तर घरांत छत्री उघडणे हे लोक वाईट, अशुभ मानतात ! इंग्रज लोकांचे काही गुण इंग्रज लोकांचे अनेक गुण आपणांस शिकण्यासारखे आहेत. वक्तशीरपणा आणि शिस्त हे गुण तर त्याच्या हाडींमासी खिळलेले दिसून येतात. कसलेही साधे काम असो त्यांत आपणांस शिस्त पहावयास सांपडते. याची काही उदाहरणे मी पूर्वी दिली आहेतच. शिस्त रहावी म्हणून थोडीशी बंधनें या लोकांनी आपणांवर लादून घतली आहेत. नाटकगृहाचे तिकिट विकत घ्यावयास तासचेतास दूरवर लोकांना थांबावे लागते. पण असें थांबणे श्रेयस्कर असते. कितीही त्रास झाला तरी हा साधा नियम मोडावयाचा नाही असा जणूं काय त्यांनी मनांत पक्का निश्चयच केलेला असतो. शिस्त इतकी अंगवळणी पडली आहे की पांच सात इंग्रज लोक रस्त्यावरून चालू लागले तर सहजगत्या त्यांची पावले सारखी पडू लागतात. मा. वि. स. २ माझी विलायतची सफर आपल्याकडील रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांस पाहिले की, बरोबर दावें तुट- लेल्या गुरांचीच कल्पना माझ्या डोक्यात घोळू लागते. त्यांतून कपड्यांतील विषमतेमुळे कधी कधी थोडासा हास्यरसही उत्पन्न होणे शक्य होते. विलायतेंत रस्त्यांतून फार मोठ्याने बोलत जाणेसुद्धां चांगले समजत नाहीत तर आपल्या. कडे याच्याउलट रस्त्यांतून सर्व त-हेची ओरड व हातवारे नेहमी दिसून येतात. एकंदरीत बाजूस बसलेल्या किंवा चालत असलेल्या लोकांससुद्धा आपल्या वाग- णुकीने त्रास होऊ नये याची प्रत्येकजण दक्षता बाळगीत असतो व जर एखादे वेळेस चुकून याविरुद्ध वर्तन घडले तर ताबडतोब माफी मागतात. वेळेची किंमत तर त्यांना आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. प्रत्येक गोष्ट वेळे. वर झालीच पाहिजे. जेवण, चहा, फिरणे, खेळणे, व्याख्याने, भेटणे वगैरे कामे वेळच्यावेळी झालीच पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे इकडील जीवन एखाद्या यंत्राप्रमाणे भासते. कोणत्याही बाबतींत थोडा उशीर झाल्यास मला स्वतःची फारच फजिती झाल्यासारखे वाटत असे. दुसरा एक वाखाणण्यासारखा गुण म्हणजे चिकाटी. त्याचप्रमाणे आपले म्हणणे पटवून देण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. कॉलेजांतील मुलांतही हा गुण मला विशेष दिसून आला. इतकेच नव्हे तर या गुणाचा थोडा अतिरेकही मला दिसून आला. 'आम्ही म्हणतो तेच खरें' असा दुराग्रह व परपक्षाचे पूर्णपणे ऐकून न घेतां आपलेंच म्हणणे गळी उतरविण्याचा अट्टाहास, त्याच. प्रमाणे त्यांच्या स्वभावांत आढयता फार दिसून येते. अर्थात् प्रत्येक गोष्टीस अपवाद हा आहेच. इंग्रज लोक संकटाचे वेळी डगमगत नाहीत. कशा त-हेने संकटास तोंड देता येईल याचा ते शांतपणाने विचार करतात. त्यांची मर्ने गोंधळून जात नाहीत. शेवटपर्यंत हे युक्त्या शोर्धात असतात. त्यांची खात्री असते की ऐन आणीबाणीच्या वेळी कोणी ना कोणी स्वयंस्फूर्तीने पुढे येईल व कसलाही कठीण प्रसंग अथवा घोर संकट आले तरी आपण त्यांतून निभावून जाऊं; आणि पुष्कळ वेळां असें होतेंही! आपण या गुणास हवे तर आत्मविश्वास म्हणूं! देशाभिमान तर त्यांच्यात पूर्णपणे भरलेला दिसून येतो. देशाकरितां वाटेल तो स्वार्थत्याग करावयास हे मागेपुढे बघत नाहीत, हे गेल्या महायुद्धाच्या वेळीच प्रत्ययास आले. इंग्लंडविषयीं टाकून बोललेले यांना मुळीच खपत नाही.

No text on this page.

No text on this page.

माझी विलायतची सफर देशाभिमानाबरोबर प्रांताभिमानही बराच वाढलेला मला दिसून आला. "रूल ब्रिटानिया"चा दिवसही हे लोक मोठया उत्साहाने पाळतात. इंग्रज आणि वेल्श इंग्रज आणि वेल्श लोकांत थोडीशी तेढ दिसून येते. इंग्रज लोक वेलश लोकांना थोडे कमी सुसंस्कृत समजतात. वेल्श भाषा कानाला कठोर लागते म्हणून इंग्रज मनुष्य या भाषेत बोलणाराची थोडी थट्टा करतो. वेल्सचे लोक मोठे भाषाभिमानी ! एका वेल्श पुढान्याचे आमच्या कॉलेजांत ता. १९ ऑक्टोबर १९३० ला एक व्याख्यान झाले. मि. सँडर्स लुईस हे त्याचे नांव होते. इंग्रजां- वर त्यांनी स्वार्थीपणाचा आक्षेप घेतला होता; आणि वेल्श संस्कृतीची नासाडी इंग्रजांनी केली; इंग्रज धूर्तपणाने वेल्सवर सत्ता गाजवीत आहेत असे त्याचे म्हणणे होते. वेल्समधील मोठमोठ्या अधिकाराच्या जागेवर इंग्रजांच्या नेमणुका, तेथील मोठमोठ्या कोळशाच्या खाणीचे मालक इंग्रज, अशी स्थिति होऊन बसली. इत्यादि. या पुढा-याने शेवटी 'वेल्सकरितां निराळे पार्लमेंट पाहिजे.' हा मुद्दा मांडला होता. वेल्सच्या लोकांना मुठीत दाबून धरण्याकरितां इंग्रज कशा नानाप्रकारच्या युक्त्या योजितात हे सप्रमाण व काही इंग्रज पुढाऱ्यांची पत्रे वाचून दाखवून सिद्ध केले होते. इंग्रज हिंदुस्थानच्या लोकांना जेव्हां सांगतात की, हिंदुस्थानांत अनेक भाषा आहेत, अनेक पंथाचे लोक आहेत तेव्हां त्यांना स्वतःच्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाही. वेल्समध्ये स्वराज्याची चळवळ बरीच फोफावलो होती. इतकी की, 'कारव्हन' कॅसलवर वेल्सचे निशाण असावे म्हणून वेल्श लोकांनी मोठे आंदोलन केले. शेवटी या किल्ल्यावर वेल्सचे आणि ग्रट ब्रिटनचेही निशाण असावे असा समेट झाला. वेल्श भाषेतून तारा वगरे देता येत नसत. काही लोकांनी तसे केले. आतां वेल्श भाषेतून तार। देण्याची सोय झाली आहे. वेल्स. मध्ये अजूनही काही खेड्यांतून इंग्रजी अगदीच न येणारा असा एखादा म्हातारा मनुष्य भेटतो. वेल्सचे लोक इंग्लिश लोकांपेक्षां दरिद्री आहेत. स्वभा. वाने हे लोक अगदीच गरीब वाटले. इंग्रज जेवढे गंभीर व मितभाषणी तेवढेच हे लोक बोलके व थट्टेखोर दिसले. हिंदुस्थानी लोकांप्रमाणेच पहिल्या प्रथम वेल्शमन् हवापाण्यासंबंधी बोलणे सुरू करून संभाषणास सुरुवात करतो.

२० माझी विलायतची सफर हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नांसंबंधी हे लोक फार सहानुभूति दाखवितात. अॅबरला वेल्श गॅझेट नांवाचें वेल्श भाषेतील वर्तमानपत्र प्रसिद्ध होते. त्यांतून या विषयावर लेखही येत असत. अर्थात् असा लेख आला म्हणजे वेल्श मुले आम्हांला अर्थ सांगत. वेल्सचा ' राष्ट्रीय दिन' वेल्श लोक मोठया उत्साहाने पाळीत. डॅफोडिल हे फूल राष्ट्रीयत्वाचे सूचक समजले जाते. या दिवशी शहरांतून मोठी मिरवणूक निघते. प्रत्येकाच्या कोटावर हे फूल लाविलेले दिसावयाचे आणि या दिवशी प्रत्येकाच्या चेह-यावर राष्ट्रीय आनंद आणि उत्साह विलसत असलेला दिसून येतो. दक्षिणवेल्स मधील कोळशाच्या खाणींतून काम करणे हा मजुरांचा मुख्य धंदा आहे. या कामगारांना अत्यंत मेहनतीचे काम करून सुद्धा मुबलक पैसा मिळत नाही. कोळशाच्या खाणींच्या कपारी ढांसळून पुष्कळ वेळां काम करणारे शेंकडों मजूर प्राणास मुकतात. या मजुरांना गरिबीमुळे गरम कपडे व बूट मिळत नाहीत. म्हणून अंबर येथे एकदां Miners' Day मजुरांचा दिन पाळण्यात आला. जुने बूट, गरभ कोट, ओव्हर कोट, जुन्या हँटस् वगैरे दान देण्याजोग्या वस्तू असतील त्या अमुक तारखेस काढून ठेवाव्यात' असे आम्ही जाहीर केले होते. त्या दिवशी कॉलेजांतील विद्यार्थ्यांनी नाना त-हेची सोंगे घेऊन गांवांतून एक मिरवणूक काढली आणि प्रत्येक घरांतून सामान गोळा केले व खाणींतील कामकन्यांना पाठवून दिले. मजूरांनी आम्हांला फार धन्यवाद दिले. गाय फॉक्सडे कॉलेजांतील मुलांची गंमत अशी की, अभ्यासाचे वेळी पूर्ण लक्ष लावून त्यांचे अध्ययन चालते पण इतर वेळी ही इतका वांडपणा करतात की काही विचारूच नये. प्रतिवर्षी नोव्हेंबरच्या ५ व्या तारखेस 'गाय गाय क्स डे पाळण्यात येतो. इंग्लंडांत १७ व्या शतकाच्या आरंभी रोमन कॅथॉलिक लोकांचा छळ चालू होता. इंग्लंडच्या बाहेरूनही या लोकांना मदत मिळेना. शेवटी त्रस्त होऊन रॉबर्ट कॅट्स्वी याच्या नेतृत्वाखाली येथील लोकांनी जेम्स राजा व पार्लमेंट उडवून टाकण्याचा निश्चय केला. शिकारीचे सोंग करून शस्त्रास्त्रे गोळा केली. आणि गुप्तपणे दारूगोळा पार्लमेंटच्या तळमजल्यांत गोळा करून ठेविला. फितुरीची जय्यत तयारी झाली असता आपल्या नातेवाइकास माझी विलायतची सफर २१ बचावण्याकरिता कटांतील एका माणसाने एक पत्र पार्लमेंटमधील मेंबरला लिहिले. गाय फॉक्स' दारुगोळ्यास बत्ती लावणार एवढ्यांत ही गुप्त बातमी फुटली. फितूर झालेल्या लोकांचा पाठलाग करण्यात आला. आणि यांना फाशी देण्यांत आले. याची नकल गाय फॉक्स डे ' या दिवशी करण्यांत येते. ५ व्या नोव्हेंबरला कॉलेजांत Mook Parliament भरविण्यांत आले. खालच्या तळघरांत टोपलांच्या टोपली फटाके, फुलबाजे, सुरुंग इ. भरून ठेविले होते. गाय फॉक्सला धरुन समुद्रकांठावर नेण्यात आले. ज्या लोकांनी कटांत भाग घेतला त्यांना केळीच्या सोपटांनी खूप मार देण्यांत आला, व शेवटीं गाय फॉपची कत्तल करण्यांत आल्याचे जाहीर करण्यांत आले. क्रिसमस ~ १९२८ चा क्रिसमसचा आठवडा लंडन येथे घालवावा असें मी ठरविले व त्याप्रमाणे लंडनला गेलो. क्रिसमस हा इंग्रजांचा सर्वांत मोठा सण. जिकडे तिकडे आनंदी आनंद. प्रत्येकास हर्षवायु झाला आहे की काय असे वाटते. रंगीबेरंगी कागदांच्या कातकामानें घरे सुशोभित केलेलों होती. भर थंडीचे हे दिवस, भोवताली बर्फ पडलेला ! पण सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा तजेला दिसत होता. सुट्या असल्यामुळे तर सर्वांच्या खेळाडू वृत्तीला जणू काय ऊच आला होता. सकाळी बिछान्यांतून उठतांनाच 'क्रिसमस कैरोल ' गाणे म्हणत जात असतांना रस्त्यांतून दिसले. या दिवशी Happy xmas to you असें जो भेटेल त्याला म्हणावयाचे व दुसरेही याच वाक्याचा पुनरुच्चार करतात. आपल्या ओळखीच्या माणसास क्रिसमस कार्डस् पाठवितात. पोष्टाचें काम इतके वाढतें की पोष्टखात्यांत बरेचसे स्पेशल पोष्टमन नेमावे लागतात. मित्रमंडळींकडून आलेली क्रिसमस कार्डे दिवाणखान्यांत रांगेनें लावून ठेवितात. व घरचे लोक मोठ्या आढयतेने सांगतात की, 'हे पहा, आमचा मुलगा आफ्रिकेत काम करतो त्याने हे पाठविले. हे दुसरे आमच्या मुलीचें न्यूयॉर्कहू आलें!' घरांतील मुलेही खूपच आनंदात असतात. कारण या दिवशी सकाळी उठतांच खेळणी भरून ठविलेली पिशवी त्यांना आपल्या बिछान्यांत सांपडते. मुले विचारतात, " कोठून आली ही पिशवी ?" आई सांगते, २२ माझी विलायतची सफर "रात्री फादर क्रिसमसने आणून ठेविली." माझ्या बिछान्यांतही अशीच एक पिशवी घरच्या मालकिणीने आणून ठेविली होती. या दिवशी प्रेझेंटस्ची खूप देवाण घेवाण चालू असते. मी सकाळी न्याहारी झाल्यावर प्रेझेंटस् देण्याच्या वस्तू खरेदी करावयास गेलो. तो लंडनच्या रस्त्यावर अतोनात गर्दी. स्त्रीपुरुषांना खांदे घासून मार्ग काढावा लागतो. मधून मधून लाल डगले घालून, लांब पांढरी स्वच्छ दाढी लावलेली सांताक्लाज फादर क्रिसमसची सोंगे फिरत होती. त्यांच्या भोवती लहान मुलांची गर्दी असते. रस्त्याच्या दुतर्फा तीन चार मजली दुकानें मालांनी भरगच्च भरलेली होती. लहान मुलाप्रमाणे प्रत्येक वस्तू मला घ्यावीशी वाटली. पण मी मनांत म्हटले, 'कुबेराच्या वाड्यांत दारिद्याचे पाऊल!' कित्येक दुकानांत वरच्या मजल्यावर जाण्यास फ्री लिफ्टस होते. माल घ्या किंवा न घ्या दुकानें फिरून येण्यांतच मला मौज वाढू लागली. बरें, चार मजली दुकानांत इकडे तिकडे फिरून कंटाळा आला की वरच्या बाजूलाच चहा कॉफीची व्यवस्था होती. पाय थकेपर्यंत व पैशाचे पाकीट हलके होईपति फिरून मी घरी आलो. क्रिसमसच्या दुपारच्या जेवणांत टर्की आणि क्रिसमस केक हैं पदार्थ ठरलेले असत. टी हा एक मोठा बगळ्यासारखा पक्षी असतो. त्याला क्रिसमसच्या अगोदर खूप खाऊ घालून लठ्ठ करतात. अशा मोठ्या टर्कीची किंमत दोन पौंडपर्यंत असते. जेवण आटोपून लोक उठले. एक तरुणी चुकून किंवा मुद्दाम व 'मिसलटो' खाली उभी राहिली. पटदिशी एक तरुग उठला आणि त्याने तिचे चुंबन घेतले. या दिवसांत घराच्या दारांतून किंवा बसावयाच्या जागी 'मिसलटो' नावाच्या झाडाच्या फांद्या टांगून ठेविलेल्या असतात. याच्या खालों कुणों उभे राहिले की चुंबन घेण्यास परवानगी ! शेवटी एका खट्याळ तरुणाने डाव्या हातांत मिसलटोची फांदो घेऊन प्रत्येक तरुणीच्या डोक्यावर धरून चुंबने घेण्याचा सपाटा चालविला ! अशा प्रकारास हे लोक गर्दा समजत नाहीत ! उलट हसण्या- खिदळण्याचा एक मनोरंजक भाग समजतात. पिणे, नाचणे आणि गाणे या दिवसांत सारखें चालू असते. इकडे मदिरादेवीचे भयंकर प्रस्थ आहे. मी एका गृहस्थास भेटावयास गेलो. मेडनें बाहेरून कळविले की, 'He is Keeping xmas.' ( साहेब पिऊन तर्र पडले आहेत) ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे माझी विलायतची सफर २३ आनंदाचा कळस ! लंडनच्या सर्व रस्त्यावर दिव्यांची आरास केलेली. मोठ- मोठ्या चौकांत चोहोकडून टॉर्चलाइट सोडलेले. रस्त्यांत सुद्धा चुंबनांची लय- लूट. आमच्या पैकी एकाची तर फारच गाळण उडाली. हा थोडा काळसर होता. एका अनोळखी बाईने त्याचे चुंबन घेतले व म्हटले की, काळ्या माणसाचे चुंबन आज घेणे आमच्याकडे फार शुभ समजले जाते. आता आमचें पुढील वर्ष फार आनंदांत जाईल." लंडनच्या नृत्यालयांतून अनेक स्त्रीपुरुष नाच करीत असलेले दिसले. या दिवशी रात्री बरोबर १२ वाजतां स्त्रीपुरुष हातांत हात धरून मोठी कडी करतात व गतवर्षाचे आनंदाने विसर्जन करून येणान्या वर्षाचं अभिनंदनपर गाणे गातात. क्रिसमसनंतर मी आपल्या गांवी अॅबर येथे गेलो. वडिलांचे विलायतेस आगमन निरनिराळे देश पाहाण्याचा विचार वडिलांच्या मनांत फार दिवसांपासून घोळत होता. प्रकृति सुधारण्याच्या दृष्टीनेही त्यांचे युरोपांत येणे फायदेशीर होतें. मीही पण पत्रांतून तसा आग्रह केला होता. अखेर श्री. गुरुवर्य धोंडो केशव कर्वे यांच्या बरोबर माझे वडीलही विलायतेस निघाले. १९२९ च्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत ते लंडनला पोचले. माझ्या धाकट्या बंधूकडे दोन आठवडे राहून पुढे माझ्याकडे आले. उतार वयांत इतक्या लांबच्या प्रवासावर निघण्याच्या त्यांच्या धैर्याचे मला राहून राहून आश्चर्य वाढू लागले. अॅबर येथे मिसेस लइसकेड टालिमा नांवाच्या घरांत मी आणि चंद्रभान सिंधाल रहात होतो. वडिलांचे इंग्रजी साधारण होते. ते सिंघाल बरो- बर तासचे तास हिंदीत बोलत बसत. हिंदी विद्यार्थी आपापसांत हिंदीतूनच बोलण्याचा आतांशा प्रघात पडू लागला आहे. त्रावणकोरचा एक विद्यार्थी बाळकृष्ण मेनन आणि बंगालचे विद्यार्थी देखील मोडक्या हिंदीतूनच बोलण्याचा प्रयत्न करीत. माझे वडील सकाळच्या चहानंतर फिरावयास जात. दुपारी विश्रांति व संध्याकाळी हिंदी विद्यार्थ्यांबरोबर पुन्हां फेरफटका करीत, गु. अण्णासाहेब कर्वे निरनिराळ्या शिक्षणसंस्था पहावयास लंडनहून निघून गेले होते. त्यांची 'एक गोष्ट माझे वडील सांगत, बोटांचा प्रवास संपल्यावर स्टुअर्डला इनाम द्यावा लागतो. गु. अण्णासाहेब कव्यांनी ५ शिलिंग काढले व स्टुअर्डला त्याचे नांव २४ माझी विलायतची सफर विचारून म्हणाले, “हे पहा, मी एक गरीब हिंदुस्तानी मनुष्य आहे. माझी एक शिक्षण संस्था पुण्यास आहे. त्या संस्थेला मदत म्हणून हे पांच शिलिंग तुझ्याकडून घेतो. ही रसीद घे." स्टुअर्डनें श्री. कर्त्यांचे आभार मानिले. इतकी कळकळ संस्थेसंबंधी असावी तेव्हां कोठे संस्थेस उर्जितावस्था येते असे माझे वडील म्हणत. वेल्श युनिव्हर्सिटीकडूनही आम्ही काही पौंड मदत म्हणून गु. कर्वे यांचेकडे पाठवून दिले होते. माझे वडील अण्णासाहेब ( ना. न्या. मू. केशवराव ) यांचे निरीक्षण तीव्र होते. अॅबर येथील वेल्श नॅशनल लायब्ररी पहावयास ते गेले होते. तेथील व्यवस्थापकांनी १५।२० फूट लांब असें एक रामरावण युद्धाचे चित्र दाखविलें आणि व्यवस्थापक सांगू लागले की हे चित्र कमीत कमी इ. स. पूर्वी सात आठ शतकापूर्वीचें आहे ! वडिलांनी प्रश्न केला की 'हेचित्र येथे कसें आलें ?" व्यवस्थापकाने म्हटलें- 'एका वेल्श सोल्जरने हें लायब्ररीस दिले आहे, आहे, त्याने हे चित्र हिंदुस्थानांतून येतांना आणिलें होतें. वडिलांनी या चित्राकडे थोडे निरखून पाहिले व ते म्हणाले. 'हे चित्र आपण म्हणतां येवढे जुनें मुळीच दिसत नाही. रामरावण युद्धाचे वेळी शिपाई फिरंगी टोप्या घालीत नसत, व त्याकाळी बंदुकीपण नव्हत्या. तेव्हां इंग्रज हिंदुस्तानात आल्यानंतरचे हे चित्र असावें." व्यवस्थापकांनी ही गोष्ट लगेच नोट करून घेतली. लपीटर लँपीटर येथे एक रग्बी मॅच पहावयास माझ्याबरोबर वडीलही निघाले. मोटरबस भरगच्च भरली होती. विलायतेत स्त्रीपुरुप हा भेद मानण्यात येत नाही. तरुण बायका अखेर तरुण पुरुषांच्या मांडीवर बसल्याः कम्यूनिटी सिंगिंग सुरू झाले. हंसणें खिदळणे सुरू होतेच. हा प्रकार पाहून वडिलांस प्रथम विचित्र वाटले. पण शेवटी ते म्हणाले, “यांत वावगे असे काय आहे ? अशा आनंदी वातावरणाने उलट उत्साह वाढतो." मॅचच्या ठिकाणी बस उशीरा गेली. तिकिटें संपली होती. वरून पिठूळ बर्फ पडत होता. मला वाटले यांना उगीच त्रास दिला. पण वडील म्हणाले, “या खेड्यांतील मॅच पाहण्यांत सुद्धा एकप्रकारची मौज आहे, नाहीतर मी आलों कशाला ?" मॅच पाहून आम्ही अबरला परत फिरलो. हिंदुस्तानी विद्यार्थ्यांबरोबर वडील निरनिराळ्या विषया.

No text on this page.

No text on this page.

माझी विलायतची सफर २५. वर चर्चा करीत बसत. हिंदी ही राष्ट्रभाषा होणे इष्ट आहे किंवा नाहों ! आपल्या देशाला तुम्ही लोक पुढे कसे आणणार ? इंग्रजांची विभक्त कुटुंब. पद्धति बरी किंवा आपली अविभक्त कुटुंबपद्धति बरी ? इतकेच नव्हे तर, इंग्रज मुलीशी लग्न करण्यासंबंधीही त्यांनी मुलांची मने चाळून पाहिली. एकादे वेळी प्रौढ विवाहांतील गुणदोषाचे विवरण होई तर कधों धर्मातरासारख्या विषया- संबंधीही विगविनिमय होई. चर्च (गिरजा घर) रविवारी शाळा कॉलेजें व ऑफिसेंही बंद ठेविली जात असल्याने या दिवशी कसे चुकल्या चुकल्यासारखे होई. सकाळी आठाच्या सुमारास सर्व लोक उत्तम उत्तम कपडे करून प्रार्थनेस जातात. एका रविवारी वडोल व मी दोघही चर्चमध्ये जाऊन तेथील सार्वजनिक जागेत बसलो. चर्चेसमधून आपापल्या जागेचे भाडे द्यावे लागते आणि प्रार्थनेनंतर टोपी फिरवितात, त्यांत कांही तरी दक्षिणा म्हणून मदत टाकावी लागते. आठवड्यांतून एक दिवस धार्मिक कर्तव्य म्हणून हे लोक चर्चसमधून जातात, त्यांत भाविकपणाचा अंश कमीच असतो, असे आम्हांस वाटते. आपल्या देशाप्रमाणे धर्माचे प्राबल्य इकडे इतके माजलेले नाही. भक्तिरसाची तेवढी गोडी यांना नाही असे आम्हांस वाटते. बहुतेक सारेच लोक कांचनभक्त ! पुरुष आणि स्त्रिया सर्वांनाच अतोनात द्रव्यप्राप्तीची लालसा लागून राहिलेली दिसून येते. कल्पनातति पैसा मिळवावा, जग पहावें, खूपशी मौज करावी हेच सर्व साधारण व युरोपांतील माणसाचे तत्त्वज्ञान असावे असें वाटते. अर्थात् लेखक, कवि, तत्त्ववेत्ते आणि राज्यशास्त्रज्ञ इकडे नाहीत असे म्हणावयाचा माझा उद्देश नाही. सर्वसाधारणपणे पाहूं गेलें असतां युरोपांतील बहुजन समाज पैशाचा पूजक आहे असें माझें ठाम मत बनले. जितका जास्त पैसा मिळवावा तेवढे अधिक सुख प्राप्त होते असे यांना वाटते. या कल्पनेमुळे हे लोक सतत कमावण्याच्या शोधांत असतात; आणि सांपत्तिक स्थिति सुधारा- वयास अतोनात धडपड करितात. हाही एक यांचा सद्गुणच नव्हे तर काय ? पार्टी वडिलांना लौकर हिंदुस्थानांत परत जावयाचे होते म्हणून त्यांच्या सन्मानार्थ माझी विलायतची सफर एक पार्टी द्यावयाचे ठरले. कीन्स् हॉटेलमध्ये डिनरची व्यवस्था केली. इंग्रज व वेल्श मित्र मैत्रिणींना आमंत्रणे दिली होती. इकडील पद्धतीप्रमाणे डिनर संपतांच एका गृहस्थाने पियानो वाजवावयास सुरुवात केली व इतर मंडळी जोड्या जोड्या करून नाचूं लागली. मी वडिलांशी बोलत बसलो होतो. एवढयांत मि. सिंधाल आले व ते वडिलांस म्हणाले, 'विठ्ठलभी बहोत अच्छा डान्स करता है, अगर आप उसको इजाजत दें तो वह भी डान्स करेगा" वडिलांनी ताबडतोब परवानगी दिली व मी भीत भीतच आपलं डान्सचे प्राविण्य दाखवू लागलो. रात्री घरी आल्यावर बराच वेळ या विषयावर चर्चा झाली. डान्स वगैरे इंग्रजी उन्मादक चालीरीतीत आपण भाग घ्यावा किंवा अलिप्त रहावें, परस्त्रीला स्पर्श करणे सुद्धा हिंदी संस्कृतीत चांगले समजले जात नाही. हिंदी विद्यार्थी पुष्कळ वेळी डान्स वगैरेच्या नादी लागून पुढे आपलें पावित्र्य गमावून बसतात. येवढेच नव्हे तर आपण विलायतेत शिक्षण संपादन करण्याकरिता आलो आहोत या गोष्टीचा सुद्धा त्यांना विसर पडू लागतो. स्त्रियांना हातांशी धरून नाचण्याने मन चंचल होते. त्यांतून इंग्रज स्त्री पुरुषांच्या दर्शनी प्रेमाची चित्रं म्हणजे हातात हात घालून चिकटून चालणे, बागेतून किंवा डोंगरांतून तरुण तरुणींचे एकांतवासांत बसणे- वगैरे पाहून आपणही तसेंच करावें ही कल्पना साहजिकच हिंदी विद्यार्थ्यांच्या मनांत घोळू लागते. इंग्रज तरुणांचा कित्ता गिरवून बरेच हिंदी विद्यार्थी मार्गच्युत झालेले आहेत यांत शंका नाही. १७-१८ वर्षाच्या मुलांना विलायतेस पाठवू नये असेंही कांहीचें मत पडते, पण या विरुद्ध असेंही दिसून येते की, काही प्रौढ विवाहित विद्यार्थीसुद्धा पिण्याच्या व स्त्रियांच्या नादी लागून फसतात. विलायतच्या अशा वातावरणात राहून आपला अभ्यासक्रम यशस्वी रीतीने संपवून परत येणे म्हणजे एक दिव्यच नाही तर काय ? रस्त्याच्या बाजूस किंवा समुद्र किना-यावर वाळूत पडून एकमेकांना कवटाळीत असलेली कितीतरी जोडपी दररोज पहावयास मिळतात! हा प्रकार आम्हांला किळसवाणा वाटे. आम्हांला वाटे की, या बेट्यांना घरे नाहीत की काय ? असले प्रकार आम्ही हिंदुस्थानात कोण याही गांवीं पाहिले नाहीत. यामुळे हिंदुस्थानांत कितीहि वाईट प्रकार असले तरी अजून पूर्ण स्वेच्छाचारास आळा असल्यामुळे आमचा देश व आमची संस्कृति आम्हांला हजार पटीने बरी वाटते. अर्थात् विलायतेंत यांत वाईट असें कांहींच माझी विलायतची सफर ? मानीत नाहीत. पवित्रपणाच्या कल्पनेत केवढे महदंतर पडले आहे हे। नीति अनीतीच्या कल्पना देशांतील लोकांच्या विचाराप्रमाणे बदलतात ह्याचे आम्हांस चांगलेच प्रत्यंतर आले. यावरून असा कोणी कयास बांधू नये की विलायतेत साराच गलिच्छ प्रकार आहे. यांच्या सामाजिक व्यवस्थेस यांच्या चालीरीती पोषकच आहेत. यांची लग्ने फारच प्रौढ वयांत होतात. स्त्री-पुरुषांत भेदभाव नसतो. अठरा वर्षांची मुलगी झाली की ती आपणांस स्वतंत्र समजू लागते. स्त्रिया द्रव्य संपादन करू शकतात यामुळे त्या कोणावर अवलंबून राहात नाहीत. प्रमोत्तर विवाहपद्धत युरोपात रूढ असल्यामुळे, प्रेम संपादन करण्यांत तरुण तरुणींचा बराच काळ लोटतो. स्त्री पुरुषांचा एकत्र संबंध आल्याशिवाय त्यांची मैत्री होणार कशी? आणि मैत्रीशिवाय प्रेम उद्भूत होणार कसे ? व प्रेम नसले तर विवाह करायचा तरी कसा ? या सर्व गोष्टींचा विचार केल्यास यांच्या डान्स वगैरे प्रकारास वाईट म्हणतांच येणार नाही. उलट हे प्रकार त्यांच्या जीवनास पोषकच आहेत असे दिसून येते. विलायती विचार व विलायती प्रकारांना हंसण्यांत व एकदम त्यांना अतिवाईट लेखण्यांत काही अर्थ नाही. हिंदुस्तानांत विवाह कसे होतात हे त्या लोकांनी जेव्हां आमच्याकडून ऐकिले तेव्हां ते लोक पोट धरून हसू लागले ! ज्या स्त्रीची आणि तुमची पकी ओळख होत नाही तिच्याशी तुम्ही लग्न करतां तरी कसे ? असा प्रश्न हे लोक आम्हांस विचारीत. अर्थात् स्त्रीपुरुषांच्या दाट ओळखी होऊन आपापली निवड करून विवाहबद्ध होणे इष्ट किंवा पत्रिका पाहून, कुटुंबाची सुस्थिति व इस्टेट वगैरे पाहून वडील मंडळीनी " जोडा छान दिसतो" म्हटल्यावर अक्षता पडून विवाहबद्ध होणे इष्ट याचा निर्णय वाचकांवरच तूर्त सोपविणे बरें. कारण प्रेमोत्तर विवाहपद्धतीत सुद्धां किती जोडपी खरोखर सुखी होतात, हेही पाहिले पाहिजे. विलायतेंत विवाहपद्धत कशी आहे हे निर्दिष्ट केले म्हणजे पुरे आहे. १९२९ च्या एप्रिलच्या ३ या तारखेस वडील हिंदुस्तानात जावयास निघाले. मी त्यांना स्टेशनवरच निरोप दिला. माझ्या संबंधी त्यांचे काय ग्रह झाले असतील, त्यांना काय वाटत असेल, वगैरे विचार माझ्या मनांत घोळू लागले. स्टेशनवर निरोप देतांना, या जगांतील त्यांची व माझी ही शेवटचीच भेट, अशी कल्पना सुद्धा माझ्या मनाला शिवली नाही.

२८. माझी विलायतची सफर इंग्लिश पुढान्यांची व्याख्याने व लेख मोठमोठ्या इंग्रज पुढाऱ्यांची व्याख्याने ऐकावयाची मला फार हौस होती. लॉइड जॉर्ज यांचे भाषण ऐकावयाची इच्छा तशीच राहून गेली. लोक असें सांगत की, त्यांचे भाषण म्हणजे जणू काय विजेच्या ठिणग्याच वाटत ! बोलतांना लॉइड जार्ज यांजा भयंकर स्फुरण येत असे. पण या व्यक्तीविषयी खुद्द वेल्श लोकांत दुमत होते. वेल्सचे जहाल पुढारी यांना पाण्यात पहात. कारण लॉइड जार्ड निर्भेळ वेल्स स्वातंत्र्याच्या विरुद्ध होते. वेल्स देशाला लॉइड जार्ज यांनी इंग्लंडच्या घशात घातले म्हणून वेल्श जहाल पुढारी त्यांच्या- वर जळफळत असत. इंग्लंडचे या काळांतील मुख्य प्रधान मि. बाल्डविन यांचे एक व्याख्यान आमच्या कॉलेजांत ऐकावयाची संधि मिळाली होती. त्यांचे व्याख्यान वाङ्मया- त्मक विषयावर होते. रोमन व ग्रीक संस्कृतीचा इंग्रजी वाङ्मयावर कसा परिणाम झाला हे त्यांनी विस्तृत करून दाखविले होते. जागतिक राजकारणाच्या घडामोडींत, वरील सारख्या विषयाचा सखोल अभ्यास करावयास यांना वेळ तरी कसा मिळतो याचे मला आश्चर्य वाटले. कारण व्याख्यानांत त्यांनी कित्येक ग्रीक व लॅटिन पुस्तकांचा इवाला आपल्या मतपुष्टोकरणार्थ दिला होता. मि. बाल्डविन आलेल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती एक एक पाइप (चिलीम ) होती! विद्यार्थ्यांनी फंड गोळा करून हजारों पाइप मागविल्या होत्या. येणा-या पाहुण्याची सविनय थट्टा करावयाचा हा एक प्रकार आहे ! सर जोसूआ स्टॅप यांचे व्याख्यान दि. ६ मार्च १९३० रोजी अर्थशास्त्रावर मी ऐकिलें. १९१४ च्या महायुद्धानंतर युरोपांतील आर्थिक परिस्थिति कशी ढांसळून गेली, जर्मनीच्या मार्क्स नाण्याची पड कशी झाली, हजारों मार्क्स देऊन एक कप चहा मिळत नसे. युद्धानंतर अशी परिस्थिति निर्माण होण्याची कारणे व ती न होऊ देण्याचे उपाय, वगैरे विषयांवर यांनी प्रकाश पाडला. हिंदी स्त्री म्हणजे एक चालती बोलती बँक, कारण हिंदी स्त्रियांच्या अंगावर सोन्या मोत्यांचे दागिने फार असतात' असा शेरा यांनी मारला होता. यामुळे हिंदी विद्यार्थी थोडे चिडून गेले होते. आम्ही सर स्टँप यांना भेटून हिंदुस्थानच्या गरिबीचे चित्र त्यांच्या समोर रेखाटले, तरी ते मानीनात. ते माझी विलायतची सफर २९ म्हणत, " हिंदी स्त्रियांनी आपली दागिन्याची किंमत व्यापारांत गुंतविली पाहिजे. इतके सोनें अंगावर वापरल्याने व्यापारांत मुद्दलाची तूट पडते." अखेर पर्यत आम्हांला हे मत पटले नाही. आम्ही पुष्कळ सांगितले की, सर्व हिंदी- स्त्रियांजवळ आपण म्हणतां इतके दागिने नसतात. तरी सर साहेबांना हे पटेना. यानंतर सर ऑस्टिन चेंबरलेन यांचे “ब्रिटिश आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयावर व्याख्यान ऐकावयाची संधि मिळाली. या दिवशी व्याख्यात्यांची विद्यार्थ्यांनी भयंकर चेष्टा केली. चेंबरलेन स्टेशनवर उतरले तो त्यांच्याच उंचीचा व जवळ जवळ त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या एका विद्यार्थ्यांस चंबरलेन ह्यांच्या सारखा पोषाख चढविला. सर्व विद्यार्थ्यांच्या नाकावर एक कांचेचा चष्मा लावलेला होता । हिंदुस्थानचे प्रतिनिधि म्हणून आम्हाला फेटे बांधून स्टेशनमध्ये उभे करण्यात आले. सर चेंबरलेन यांना स्टेशनमधून एका मोटारीत घालून गांवापासून १० मैल अंतरावर नेण्यांत आलें । तेथें एका झोपडीत १०५ विद्यार्थी लांकडे फोडावयाचे, भांडी धुण्याचे, झाडू मारण्याचे वगैरे काम करू लागले होते. येथे छोटे ऑफिसही तयार ठेविलें होतें. सर ऑस्टिन यांना कॉलेज दाखविण्याऐवजी ही (Work-house) संस्था दाखविण्यांत आली ! अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे राबविण्यांत येते असे सांगताच, सर साहेबांना समजून आले की, ही सारी थट्टा आहे. पण त्यांनी ही थट्टा शांतपणे सहन केली. सरसाहेबांना व्याख्यानाच्या हॉलमध्ये यावयास अर्धा पाऊण तास विलंब झाला. इकडे हॉलमध्ये तोतया सर ऑस्टिन खुर्चीवर विराजमान झाले होते. टेबलाच्या बाजूस हाडांचा सांगाडा वेडावांकडा उभा करून त्याच्या हातांत एक पाटी दिली होती. त्यावर — British Foreign Policy is dead ' असें ठळक अक्षरांत लिहिले होतें ! व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेची खूप तारीफ केली. सर साहेबांनी आपल्या व्याख्यानांत कालच्याच जर्मन शत्रूची आज भरपूर स्तुति केलेली ऐकून आम्हांला आचर्य वाटले ! एकंदर व्याख्यानाचा सारांश जर्मनीबरोबर वैर करण्यापेक्षा मैत्रीच संपादन करावी' असा होता ! १९२९: विद्यार्थी परिषद एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यांत अंबर येथे इंग्लंडांतील निरनिराळ्या विश्व- ३० माझी विलायतची सफर विद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परिषद भरली होती. बरेच हिंदी विद्यार्थी मँचेस्टर, लंडन, शेफील्ड, ऑक्सफोर्ड, केंब्रिज वगैरे ठिकाणांहून परिषदेस उपस्थित होते. याच वेळी पुण्यातील माझ्या परिचयाची मंडळी श्री. भास्करराव कर्वे, श्रीमती शकुन्तलाबाई परांजपे व श्रीमती कुसुमावतीबाई जयवंत वगैरेंची भेट झाली. या वेळी पार्लमेंटची नकली बैठक भरवून भाषणे करण्यांत आली. शकुन्तला परांजपे यांनी फारच जोरदार भाषण करून आम्ही हिंदुस्थानचा राज्यकारभार पहावयास पूर्णपणे लायक आहोत. इंग्रजांनी चूपचापपणे हिंदु- स्थानांतून पाय काढावा." असे म्हटले. परिषदेनंतर एक मोठे डिनर देण्यांत आले, व त्याबरोबरच डान्सचीही व्यवस्था करण्यांत आली होती. परिषद यशस्वी रीतीने पार पडली. हिंदुस्तानचा राजकीय प्रश्न आणि वृत्तपत्रे साधारणतः अंबर येथील हिंदी विद्यार्थ्यांना राजकारणाचे थोडें वावडेंच होते. तरी पण मधून मधून हिंदी राजकारणासंबंधी वृत्तपत्रकांतून जेव्हां लेख येत तेव्हां राजकारणाच्या विषयास थोडाबहुत ऊत येई. डेली मेलच्या जानेवारीच्या १३ (१९३०) मध्ये Jerry-building for a crash in India अशा मथळ्याचा लॉइड जॉर्ज यांचा लेख प्रसिद्ध झाला. हिंदुस्थानावरील इंग्लंडची पक्कड मजबूत करावी, अशा आशयाचा हा लेख होता. तसेंच Strong hand in India असा लेख व्हायकौंट ब्रेट फोर्ड यांनी लिहिला. A grave warning या मथळ्याचा लेख जे. एल. गारव्हिन यांनी ( Observer 2nd nov. 1930) प्रसिद्ध केला. तसेंच No surrender in India ! असा अग्रलेख Daily Mail मध्ये 28-1-30 रोजी आला. Shall we clear out of India- (F. Britten Austin) Sunday Pictorial 2-10-29. No Change of policy in India E- Clephan Palmer ( Daily News 6th nov. 1929 ) अशा मथळ्याचे लेखही प्रसिद्ध होऊ लागले. सर्वच लेख मोठे कडक असत. कधी कधीं हिंदुस्थानसंबंधी इतक्या अपुन्या ज्ञानावर लेख लिहिले जात की त्यांचे आम्हांस पोटभर हंसू येई. असेच एकदां 'भारत गौ परिषदे'च्या मिरवणुकीचा फोटो छापून ( Daily mail Nov. 18-1929 ) या पत्रांत The neril in India मा लेख सर रोजिना यांनी प्रसिद्ध केला होता।

माझी विलायतची सफर एकंदरीत हिंदी लोक राजकारभार चालविण्यास नालायक आहेत, हिंदुस्थानांत एकी नाही म्हणून इंग्रजांनी आपला पाय काढला तर अंदाधुंदी माजेल; अशा आशयाचे हे लेख असत. १९२९ च्या सुमारास हिंदुस्थानांत फारच खळबळ उडाली होती. हिंदी पुढाऱ्यांना अटक झालेल्या बातम्या प्रसिद्ध झाल्या म्हणजे अर्थातच थोडा क्षोभ होई. कै. लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्ज व अखेर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. तेव्हां सर्वांना फार वाईट वाटले. सायमन कमिशन निःपक्षपाती निवाडा देणार असें वृत्तपत्रांतून लिहून आले म्हणजे थोडी आशा उत्पन्न होई. हिंदी स्वराज्य अगदी जवळ आल्यासारखे होई तर केव्हां केव्हां दूर जात आहे तर कधी दृष्टीआड होत आहे असे वाटे, आणि आशानिराशेचे हे नाटक आनंदपर्यवसायी होणार किंवा कसे, इकडे लक्ष लागून राही. २६ मार्च १९२९ ला महात्माजींना अटक झाल्याची बातमी आली तेव्हांही आमची मने अशीच उद्विग्न झाली होती. इंग्रज राजकीय पुढाऱ्यांच्या व्याख्यानीतून बहुतेक हिंदुस्थानसंबंधी काहींना काही पर्यालोचन केलेले असेच, येवढेच नव्हे तर, चर्चेसमधून प्रार्थनेच्या नंतर देखील "हे परमेश्वरा, आमच्या हिंदी प्रजेचे कल्याण होवो. हिंदीराजकारणाच्या लढ्यात समेट घडून येवो. परमेश्वराने हिंदुस्थानच्या हिताची जी जबाबदारी आम्हांवर लादली आहे ती आमच्या हातून चांगल्या रीतीने पार पडो." अशी प्रार्थना आमच्या कानांवर येई. आम्हांलाही इंग्रजांची कीव येई. आम्ही म्हटले 'हे केवढे ओझे परमेश्वराने इंग्रजांच्या खांद्यावर नाहक लादले आहे व यांना किती त्रास होत आहे. ज्या दिवशी हे हलके होईल त्या दिवशी खरोखर इंग्रज सुखी होतील. ' ओझें हलके करावयास हे लोकही १९१७ पासून तयार' आहेत. पण एकदम नव्हे! पार्लमेंटची निवडणूक १९२९ च्या मे महिन्यापासून अंबर येथे इंग्लंडच्या पार्लमेंटच्या निवडणुकी संबंधी खळबळ सुरू झाली. प्रत्येक पक्षाची सार्वजनिक व्याख्याने होऊ लागली. लिबरल पक्षाकडून नुकतेच हिंदुस्तानांतून परत आलेले सर जॉन सायमन यांचे व्याख्यान अबरिस्टविथ येथे दि. ८ मे १९२९ रोजी झाले. प्रत्येक पक्ष आम्ही ३२ माझी विलायतची सफर हिंदुस्थानास कशा त-हेनें वागविणार, हिंदी प्रश्न कसा सोडविणार, यावर प्रवचनें करीत सुटे. सर जॉन सायमन यांनी " हिंदुस्थानचा राजकारभार हिंदी- जनतेच्या हाती देऊन टाकावयाचे ठरले आहे व लिबरल पक्षाचे धोरण हेच राहील " असे घोषित केले होते. या नंतर आम्ही हिंदी विद्यार्थ्यांनी त्यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले. देशांतील निरनिराळ्या संघांतर्फे व्याख्यानांची झोड संपल्यावर, निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसा लोकांचा उत्साह वाढू लागला. निवडणुकीची नोंद टॉऊन हॉल, काउंटीस्कूल व इतर सरकारी इमारतींतून होणार होती. मलाही कॉलेजचा विद्यार्थी म्हणून मताधिकार होता. मी मत. दानाच्या खोलीत जाईपर्यंत प्रत्येक पार्टीच्या लोकांनी हस्तपत्रके दिली व मत देण्यास विनवण्या केल्या. आमच्या मालकिणीने मि. हॉपकिन् मॉरिस (लिब. रल ) यांना मत द्यावयास गळ घातली होती. खुद्द मॉरिस यांनाही हिंदीराज- कारणाची कळकळ आहे असे दिसून आले होते. म्हणून मी यांनाच मत दिले. हॉपकिन मॉरिस साहेब पार्लमेंटच्या शिष्टमंडळाबरोबर पुढे ( १९४६ ) मध्ये हिंदुस्थानांत आले. निकालाच्या दिवशी सर्व शहरांतील रस्ते गजबजून गेले होते. मतांच्या मोजण्या होऊन विजयी लोकांची नांवे लंडनहून टेलीफोननें येऊ लागली होती. तास अर्धा तासाच्या अंतराने ही नांवे मोठमोठ्या इमारती. वरून मॅग्या फोननें पुकारण्यांत येत. आपण मत दिलेली व्यक्ति यशस्वी झाल्याचे ऐकताच मोठ्याने ओरड होई व टाळ्यांचा गजर होऊन आनंद प्रदर्शित केला जाई. मि. २. मेकडोनाल्डचे नांव येतांच असाच गजर बराच वेळ चालू सर्वाना नांवें ऐकू यावीत म्हणून ध्वनिक्षेपक यंत्राची व्यवस्था केली होती. लोकांना खाण्यापिण्याच्या वेळेची सुद्धां भ्रांत राहिली नाही. कि. ठिकाणी मॅजिक लॅटर्नच्या सहाय्याने नांव पडद्यावर दर्शविले जाईल. एकंदरांत जनरल इलेक्शनची धामधूम मोठी पाहण्यासारखी असते. या निवडणुकीनंतर मजूर- पक्षाचे मि. र. मॅकडोनाल्ड हे मुख्यप्रधान झाले होते आणि मि. वेजवुडबेन हे हिंदुस्थानचे स्टेट सेक्रेटरी नेमले गेले होते. एक अपघात चालू होता. -- १९२९ जूनच्या २८ तारखेस माझ्यावरचे एक प्राण संकट टळ. या माझी विलायतची सफर ३३ दिवशी पोहावयास मी समुद्रावर गेलो. समुद्र फारच शांत होता. आनंदाच्या भरांत मी सरासरी अर्धा मैल पोहत गेलो असेन. परत फिरतो तो अर्ध्या वाटेत माझे पाय गारठून गेले. समुद्रकांठ जवळ होता पण ओहोटीमुळे पाणी मला आंत आंत खचूं लागले. Help, Help म्हणून मी आरोळी ठोकली व पाठीवर कसातरी तरंगत राहिलो. मला Mr. H. T. Holman ( 34, Wolfington Rd- London ) या गृहस्थाने वाचविले. याने सुटाबुटांसकट समुद्रात उडी ठाकली व त्याने मला ओढून काढले. Pe. 5 Jones यानेही मदत केली. या दोघांनाही मी कृतज्ञ होऊन चांदीचे फ्लावर पॉट्स नजर केले. पुढे दोन दिवस समुद्राकडे पहावयाची सुद्धां हिंमत होईना. माझ्या अंगावर कांटा उभा राही, म्हणून मी काही दिवसांकरितां लंडनला बंधूंकडे निघून गेलों. एकदम निघून येण्याचे कारण बंधूंना कळेना. मी सहज आलों असें तुटक उत्तर दिले. पण त्याच दिवशी वर्तमानपत्रांत — Mr. Nithol Cotkar हिंदुस्तानी विद्यार्थी बुडतां बुडतां वांचला' अशी अॅबरची बातमी बंधूच्या लँडलेडीने दाखवितोच, भांडें फुटलें! लंडन व प्रेक्षणीय स्थळे शास्त्राचा या वेळी मी लंडनला आलों याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या मनांतील अपघाताची भीति जावी हे होते. दोन दिवसांतच मला प्रसन्नता वाढू लागली. वार्षिक परीक्षा संपून मी पास झालो होतो. क्रॉयडनला माझे बंधु वैमानिक- अभ्यास करीत असत. मीही क्रॉयडनला राहिलो होतो. मध्य-युरोपांतून क्रॉयडनवर सारखी विमाने येत असत. या रहदारीची मला गम्मत वाटे. या विमानांतून दहाबारा माणसांची सोय केलेली असते. या लंडनच्या मुक्कामांत मी पक्का भटक्या बनलों ! वाट फुटेल तिकडे दिवसभर लंडनमध्ये फिरावें, थकवा आला म्हणजे कोठेही कार्नर हाऊस मध्ये किंवा A. B. C. रेस्टारंटमध्ये चहा कॉफी घ्यावी, कुठे तरी लंच खावी व · रात्री ८ ला क्रॉयडनला परत फिरावें. गप्पा मारावयास २१ क्रॉमवेलरोडच्या हिंदी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांत, तर कधी गॉवर स्ट्रीटवरील Y.M.C.A. त जावें. येथे हिंदुस्थानी जेवणही मिळत असे. फार लांब भटकत गेल्यास अंडर ग्राउंडमें मा. वि. स. ३.

माझी विलायतची सफर सरळ आपल्या राहण्याच्या ठिकाणी येता येत असे. रस्ता चुकल्यास सात फूट उंच असलेल्या पोलिसची मदत घ्यावी. येथील पोलीस फारच चांगल्या रीतीने वागतात. आसपासच्या भागाचा नकाशाच जणूं त्याच्या डोक्यांत असतो! कुठ ही भागास कसे जावें हे दोन मिनिटांत ते समजावून देतात. लंडनचे रस्ते फारच विस्तीर्ण, त्यांतून जाणारा जनसमुदायाचा प्रवाह, पांच, सात मजली टोलेजंग दुतर्फा इमारती, चौकातून लहान लहान हिरवळीच्या बागा, आणि मधून मधून भव्य पुतळे, एकंदरीत या जगांतील सर्वांत मोठ्या शहराची शोभा फारच अवर्णनीय ! ट्राफलगार चौकांतील भव्य विजयस्तंभ आणि त्यावरील नेलसनचा पुतळा फारच उठावदार दिसतो. चहा, कॉफी घेत मोठ्या हॉटेलांत बसलो तर एकाद्या राजाच्याही नशिबात नसेल असे सौख्य लाभल्यासारखे वाटे. हॉटेलांत बसावयाची जागा म्हणजे भला मोठा हॉल, आंत गालिचा अंथरलेला, बाजूस मोठमोठे संगमरवरी खांब, फर्नची झाडे लाविलेल्या सुशोभित कुंड्या आणि एका कोप-यांत दहावीस माणसें वायें वाजवून मजुळ खरांनी लोकांचे मनरंजन करीत असलेले; शेकडों लोकांच्या गर्दीत पांच पंचवीस मेडस् इतक्या चपळाईने काम करीत, की नवीन मनुष्य बसला म्हणजे तिसऱ्या मिनिटांतच त्याने माग- विलेले पदार्थ बिनचूक त्याच्या समोर यावयाचे ! मी एके दिवशी क्रिस्टल पॅलेस पहावयास गेलो. यावेळी येथे प्रदर्शनही होते. हा राजवाडा सर्व कांचांनी बनविला आहे. क्रिस्टल पॅलेसच्या बाजूच्या मैदानावर मोटर सायकल रेस चालू होती. पॅलेसच्या रस्त्यावरून ख्रिश्चन लोकांची एक मिरवणूक चालली होती. या मिरवणुकीत काही ख्रिस्ती मिशन- यांनी धोतर नेसून, डोक्यास तांबडा फेटा व वहाणा पायांत घातल्या होत्या. ही एक धर्मप्रचाराची चळवळच होती म्हणाना ! आकाशांत उंच वर एक विमान उडून ते कसल्याशा धुरांनी जाहिराती लिहीत होते. क्रिस्टल पॅलेस- मधील प्रदर्शन पाहून मी परत फिरलो. थेम्स नदीच्या डाव्या बाजूस टॉवर ऑफ लंडन आहे. ते पाहिले. हे टॉवर ज्यूलियस सीझरने बांधलें, पुढे White Tower हा भाग विल्यम दि काँकरर याने बांधिला व तिसऱ्या हेन्रीने याला राजवाड्याचे स्वरूप दिले. या टॉवरभोवती मोठ मोठे दोन तट उभे आहेत. ११९८ मध्ये हे तट बांधून काढले आहेत. टॉवरच्या तळमजल्यांत जुनी शस्त्रास्त्रे पाहण्यांत आली. यांत कांहीं तोफा माझी विलायतची सफर ३५ दक्षिण हैद्राबादच्या होत्या. टॉवरच्या वरच्या मजल्यावर राजमुकुट, राजदंड व राणीचे इतर दागिने एका कांचेच्या छोट्या वर्तुळाकार खोलीत ठेविलेले होते. राणीच्या मुकुटावरच्या 'कोहिनूर' या हैदराबाद येथील गोवळकोंड्याच्या खाणीतील हिन्याचे दर्शन झाले. इ. स. १६५० पासून हा हिरा इतिहास. प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, इंग्रजांनी पंजाब जिंकल्यावर इ. स. १८४९- ५० चे सुमारास हा हिरा विलायतेस नेला व व्हिक्टोरिया रागीला नजर केला. असे सांगतात की, राजमुकुट वगैरे ठेविलेल्या काचेच्या खोलीभोवती वीज वाहत ठेविली आहे. म्हणून कोणासही आंत हात घालता येत नाही अर्थात् याची आम्ही प्रचीति पाहिली नाही! सेंट जॉन्स चॅपेल नांवाची सुंदर इमार- तही टॉवर मध्येच आहे. पूर्वी या इमारतीत राजकीय कैदी डांबून ठेवीत असत. कांहीं कैद्यांचा शिरच्छदही येथे केला होता. या टॉवरच्या बाजूस थेम्स नदीवर एक उचलता पूल आहे. जहाज नदीतून जावयाचे असल्यास पुलाचे दोन भाग अलग होऊन वर उचलले जातात व वाट दिली जाते. लंडनमध्ये प्रेक्षणीय स्थळे पुष्कळ आहेत. सर्व स्थलांची वर्णने देणे म्हणजे एक गाइड बुकच होईल. तसा माझा हेतु नाही. पार्लमेंटच्या इमारती, लॉ कोर्टस्, सेंट जेम्स पॅलेस, मार्बल आर्च, वेस्ट मिन्स्टर अबे, पिक्चर गॅलरी, सेंट (स्टेट ) पॉल कॅथेड्रल, झू वार्डन्स, ब्रिटिश म्यूझियम वगैरे स्थले मी पाहिली. ब्रिटिश म्यूझियम मध्ये शास्त्रीय दृष्टया संग्रहालयाचे भाग केलेले आहेत आणि त्यावर निरनिराळे तज्ज्ञ अधिकारी नेमले आहेत. छापील पुस्तकें, जुन्या पोथ्या, पौर्वात्य हस्तलिखितांची बंडलें, ग्रीक व रोमन कालांतील ऐतिहा- सिक पुस्तकें, पुरातन कालीन नाणी वगैरे पाहण्यात आली. हे जगांतील एक श्रेष्ठ संग्रहालय आहे. लंडन झू गार्डन्स मध्येही नाना त-हेचे प्राणी, अत्यंत लहान खारीपासून तो अजस्र हिपोपोटॅमसपर्यंत शास्त्रीय दृष्टया विभाग करून ठेवलेले दिसून येतात. एका दिवसांत हे प्राणी पाहून सुद्धा होत नाहीत. सिंह आणि वाघिणी- मिश्र प्राणी पाहिला. असून शरिरावर वाघासारखे पट्टे होते. पतियाळाच्या महाराजांनी हा प्राणी भेट म्हणून 'झू गार्डन्स' ला दिला आहे. याच बागेत औरंगे टॅग वानरेंही पाहिली. आम्ही जातांच या उंच, माणसासारख्या वानरांनी सलाम ठोकला पासून झालेला याला आयाळ ३६ माझी विलायतची सफर व सिगारेटकरिता हात पुढे केला. पण बाहेर नोटीस होती. Please do not offer Cigarettes. लंडन झू मध्येच एम्पोरियमही आहे. येथे हजारों जातींचे मासे कांचेच्या हौदांतून ठेविले आहेत. काही तर संक्रांतीच्या तिळगुळा येवढे बारीक आणि रंगीबेरंगी आहेत. काचेच्या हौदांत जेवढी उष्णता यांना जिवंत ठेवण्यास लागते तेवढी विजेनें व वाफेने ठेवून त्या त्या जातीच्या माशांना अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. येथून आम्ही परत फिरलो. या नंतर एके दिवशी मॅडम टयूसाडचे मेणाच्या चित्राचे प्रदर्शन पाहिले. हे प्रदर्शन एका भव्य इमारतींत ठेविले आहे. माझ्याबराबर एक दोन इंग्रज मित्रही होते. या प्रदर्शनांत मेणाची चित्रे इतकी हुबेहूब आहेत की, दारांत सलूट करून उभा असलेल्या शिपायाच्या चित्रास, खरा शिपाई समजून पट. दिशी इतर प्रेक्षक सॅल्युट करतात ! आंत, इंग्लंडचे पूर्वीचे नामांकित प्राइम मिनिस्टर्स, कवि, लेखक यांचे पुतळे पाहण्यात आले. हे इतके चांगले साधले आहेत की, आपण ख-याखुऱ्या जिवंत माणसासमोर उभे आहोत की काय असा भास होतो. मॅडम टयूसाड ही फ्रेंच बाई, एके काळी फ्रान्स मध्ये असे पुतळे तयार करीत असे. तिला फ्रेंच लोकांनी हडळ ठरवून फ्रान्समधून हाकून लाविलें, पुढे ती लंडन येथे येऊन पुतळे करूं लागली. तिच्याच नावाने हे प्रदर्शन प्रसिद्ध आहे. तिचंही अंतकालचें एक चित्र ठेविले आहे. नेपोलियन बादशहाचे अंत्यदर्शन पाहण्यालायक आहे. हे पहात असतांना गांभीर्याचे वातावरण भोंवतीं पसरतें. प्रदर्शनांत एका ठिकाणी महात्मा गांधीही चरखा चालवीत बसलेले दिसून येतात. याच इमारतीच्या गाभाऱ्यात दुष्ट व क्रूर लोकांचे पुतळे ठेविले आहेत. इंग्लडच्या प्रख्यात डाकू, चोर आणि खुनी लोकांच्या संगतीत एक क्षण आपण आहोत असे वाटून येथील भयंकर वातावरणाचा परिणाम मनावर झाल्या- शिवाय रहात नाही. नानात-हेची जुनी कत्तल करावयाची आयुधे या ठिकाणी ठेवली आहेत. Guillotine नांवाचे कत्तल करावयाचे यंत्र पाहून अंगावर शहारेच आले. आता सुधारलेल्या राष्ट्रांत म्हणे, फाशीची शिक्षा झालेल्या माणसास विजेच्या खुर्चीवर बसवून त्याला नकळत त्याचा शेवट करण्यात येतो!

माझी विलायतची सफर rrrrrrr. नाटकगृहें व सिनेमागृहें लंडनची भव्य आणि विशाल नाटकगृहे पाहून आश्चर्य वाटल्यावांचून राहात नाही. यांत ४-५ हजार लोक व्यवस्थितपणे बसू शकतील अशी व्यवस्था केलेली असते. तिकिटाच्या खिडकीजवळ कधीच गर्दी होत नाही. कारण 'क्यू' करून लोक उभे असतात. बोलपट दुपारी ३ पासून रात्री १२ पर्यंत चालू असतात. पहिला खेळ पहावयास गेलेल्या गृहस्थास तो दुसरा खेळ जरी पहात बसला तरी कोणी उठवीत नाही. पण लोकांना कामाची गडबड असल्यामुळे असे कोणीच करीत नाही. चित्रपट चालू असतांना केव्हाही प्रवेश मिळवावयाचा व आपण पाहि- लेल्या भागापर्यंत चित्रपट आला की उठून जावयाचे असें चालते. सिनेमागृह आणि नाटकगृह बहुतेक ३-४ मजली असते. प्रत्येक मजल्यावर मागच्या बाजूस विश्रांतिगृह असते. बोलपट पहात असतां मध्यंतरी चहा वगैरे घ्याव- याचा असेल तर, सीट वरून उठून २०-२५ पावले मागें गेलें तर आपण भव्य अशा हॉटेलमध्ये असल्याचे दिसून येते. चहा किंवा लेमनेड घेतल्यावर पुन्हां जाऊन आपल्या पहिल्या जागेवर बसावे किंवा बाहेर जावें. लंडनचे रस्ते रात्री दोन वाजेपर्यंत गजबजलेले असतात. श्रीमंत व चैनी लोकांच्या जीवनास येथे रात्री १२ नंतर दिवस उजाडतो! रात्री लंडनमध्ये भटकणा-या तरुण विद्या- र्थ्याने मात्र रस्त्यांतून सरळ व जपूनच चालावें. नाहीतर पाय घसरावयाचा ! वांकडे पाऊल पडावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या तरुण स्त्रियांचे तांडे रस्त्यांतून फिरत असतात, किंवा बंद झालेल्या दुकानांच्या पाय-याजवळ एखादी 'रंभा' उभी राहून तोंडाला पावडरची पुढे देत अथवा ओंठाला लिस्टिक लावीत अथवा आपला चिमुकला आरसा आपल्या हँडबॅगमधून काढून स्वतःचे सौंदर्य ठाकठीक करीत असलेली दिसून येईल ! हिचे काम म्हणजे तरुणांना चिमुकलें हास्य देऊन, रुकार मिळाल्यास त्यांच्या पैशांचा धुव्वा उडवून नाटकास जाव- याचे, प्यावयाचे, नाचावयास जावयाचे. एकूण चैन करावयाची एवढेच ! असो. अंडर-ग्राऊंड ट्रेनची मला फारच मौज वाटावयाची. भल्यामोठ्या लिफ्ट- मधून जमिनीखाली १०० फूट किंवा त्याहून जास्त अंतरावर उतरावयाचें कांहीं ठिकाणी तर आपोआप खालींवर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. त्यांवर दोन तीन माझी विलायतची सफर मिनिटे उभे राहिले की माणसें खाली जात तर दुसऱ्या बाजूने खालची माणसे वर येत. जमिनीखाली मोठमोठी स्टेशनें आहेत. ( मुंबईचे व्हिक्टोरिया स्टेशन जमिनीच्या आंत असल्याची कल्पना केल्यास या स्टेशनची थोडी कल्पना वाचकांस येईल.) काही ठिकाणी अशा स्टेशनमध्ये थोडी फार छोटी मोठी दुकानेंही पहाण्यांत आली. तिकिटें विकत घ्यावयाचे स्टँडस उभे असतात. यावर निरनिराळ्या स्टेशनची नांवें व दर लिहिलेले असतात. यंत्रांत तेवढे पैसे टाकले की पटदिशी तिकिट आपल्या हातांत येते. दोन तीन दिशेस गाड्या चालतात. जिकडे तिकडे सूचक पाट्या लिहिलेल्या असतात. आपणांस जिकडे जावयाचे त्या प्लॅटफार्मवर उभे रहावयाचें. दर तीन चार मिनिटांनी ट्रेन येते. दारे आपोआप उघडली व झांकली जातात. परंतु आंत शिरावयास जर ठराविक वेळेपेक्षा दोन सेकंदही जरी उशीर झाला तर मात्र त्या दारांत बोटें किंवा शरिराचा एकादा भाग चेंगरण्याचीच पाळी ! रस्त्यांतून भीक मागावयास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे फूटपाथवर एखादा भिकारी रंगीत खडूंनों चित्रे काढून आपली टोपी उपडी ठेवतो. चित्रे दाखवून पैसे कमावण्याचा (भीक मागण्याचा ) हा एक प्रकार आहे. एखादे वेळी भिकारी दहा पावलें आपल्या बरोबर येऊन हळूच आपली हकीकत सांगता व ‘मदत केल्यास मी फार आभारी होईन.' म्हणतो; पण पोलिसला पहातांच हा लगेच दुरून चालू लागतो. येथे पैशांत लोळणारे श्रीमंत लोक जितके आढळून येतात त्याच्या कितीतरी पट दरिद्री लोकहि नजरेस पडतात. अशा लोकांना झोपावयास जागा सुद्धां भाड्याने घ्यावी लागते. एखादे वेळी जागा न मिळाली तर बागेत अथवा रस्त्यांत कोठे तरी झोपल्यामुळे थंडीने गारठून मृत झाल्याचीहि उदाहरणे ऐकण्यांत येतात! गरिबागुरिबांकरितां अगदी स्वस्त दराच्याही झोपावयाच्या जागा आहेत. दोघे दोघे किंवा तिघे तिघे मिळून एक पलंग भाड्याने घेतात व झोपतात ! कांहीं खबदा. अशी आहेत की एका माणसा- सही रहावयास अपु-या असणान्या खोलीत सात सात जण सुद्धा राहातात. अशा ठिकाणांना Slums म्हणतात. हे लोक तुटके किंवा एखादें ओढून टाकलेले सिगारेटचे थोटुक मिळाले तर तेवढयावर सुद्धा समाधान मानतात. हे लोक काज्याच्या पेट्या अगर बुटाच्या लेसेस हातांत धरून विकीत फिरतात. यांच्या नवळून कोणी जर एखादी वस्तु घेतली तर त्याच्या किंमतीच्या दुप्पट पैसे माझी विलायतची सफर -~- त्याच्या हातांत टाकतात. गरीब आणि श्रीमंत या दोघांनाही खूष ठेवणे हा पाश्चात्य राष्ट्रांत राजकारणाचा एक मोठा डाव होऊन बसला आहे. इंग्लंडमध्ये श्रीमंत लोकांवर खूपसे कर आहेत. त्यांच्या चैनीच्या वस्तूंवरही कर असल्यामुळे त्यांच्याकडून बराच पैसा ओढिला जातो. मृत्यूनंतरही श्रीमंत लोकांच्या इस्टेटीचा काही भाग सरकार घेतेच. गरिबांची सोय जर न केली तर हे लोक मोठे आंदोलन केल्याशिवाय राहात नाहीत. म्हणून यांना 'डोल' (खाण्यापिण्याची मदत) देण्यांत येते. पुअर- लॉचा प्रचार असल्यामुळे या कायद्यानेही गरिबांना मदत दिली जाते. Unemployment Bureau आहेत यांत बेकार लोकांकरतां फंड जमा केलेला असतो. बेकारांनी यावें, मेंबर व्हावे. यांना काम मिळवून देणे हे या संस्थेचे काम असते. कामावर असतांना मजुरीचा काही ठराविक हिस्सा या फंडांत जमा होतो व काम नसेल तेव्हां यांतून मदत केली जाते. काम मिळाले म्हणजे बेकारांनी कामावर गेलेच पाहिजे. नाहीतर वरील संस्थेतून नांव काढिले जाते. असें म्हणतात की डॉक्टरचे खोटें सर्टिफिकेट पाठवून कामावर न जातां घरी बसून बेकारीची मदत खाणारा एखादा चुकारतही नजरेस पडतो ! म्हातारपणामुळे काम होत नसेल तर अशांच्या साठी, 'old age pension' ची व्यवस्था आहे. याशिवाय विधवांना 'Widows pension' ही मिळतें. एकंदरीत येथील सरकारकडून म्हातान्यांना, विधवांना, बेकारांना व गरिबांना केवढी मदत केली जाते हैं यावरून दिसून येईल. आपल्याकडे त्यांचा आधार म्हणजे परमेश्वरच! हाइडपार्क मार्बल-आर्च मधून एक रस्ता ओलांडून गेलों म्हणजे आपण हाइडपार्क गार्डन्समध्ये जातो. येथे बाग काही मोठीशी नाही पण हिरवळीची सुंदर मैदानें असून मधूनमधून चांगल्या वाटा तयार केलेल्या आहेत. रविवारची संध्याकाळ म्हणजे अत्यंत आनंदाची वेळ ! सर्व कामकरी वर्गाना दर शनिवारी आठ- वडयाचा पगार मिळतो. पुष्कळ लोक या पैशांतील मोठा भाग पिण्यांत आणि चैन करण्यांत खर्च करून टाकतात. सुंदर कपडे घालून स्त्री-पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी फुलपाखरांप्रमाणे इतस्ततः विहरत असलेल्या दिसन येतात. या ठिकाणी माझी विलायतची सफर . हातात हात घालून हंसत खिदळत असलेले हे लोक पाहिले म्हणजे यांच्या प्रेमसागराला जणूं भरतीच आली आहे की काय असे वाटू लागतें ! असें म्हणतात की, या ठिकाणी वाटेल त्या पार्लमेंटरी पुढान्याची वाटेल तशी टीका करून वाटतील तेवढे शालजोडीतील * * मारण्याची पुरातन कालापासून कायद्याने परवानगी दिली आहे ! आणि म्हणूनच रविवारी हाइड. पार्कमध्ये फुटकळ वक्त्यांच्या व्याख्यानांची गर्दी चाललेली असते दर ५-५. पावलांवर प्लेटफॉर्म उभा करून कोणी तरी वक्ता मोठमोठ्या लोकांवर घसा फोड फेडून तोंडसुख घेत असलेला दिसून येतो. व्याख्यानांत फारसा अर्थ नसतो पण ऐकत रहावयास मात्र मौज वाटते. एका प्लॅटफार्मवर हिंदुस्थान. संबंधीही जोरदार भाषण चालू होते. वक्ता जीव तोडून तोडून बोलत होता. लोकही मधून मधून प्रश्न विचारून त्याला उल्हसित करीत होते. आम्ही मनांत म्हटले, का बाबा, उगीच शिरा ताणतोस, अशाने थोडाच हिंदुस्थानचा प्रश्न सुटणार आहे? हाइडपार्क मधून थोडे पुढे गेले असता ' सर्पटाइन लेक ' ( नाग तलाव ) लागतो किनाऱ्यांवर भाड्याने नावा मिळतात. गुलहौशी लोक या नावा भाड्याने घेऊन दीडदोन तास वल्हवीत फिरतात. अशा त-हेनें हाइडपार्क पाहून मी निवासस्थानी परतलों. लंडनचे बॅरिस्टर व्हिक्टर एव्हन नावाचे गृहस्थ आमच्या युनिव्हर्सिटीत पार्ट-टाइम प्रोफेसर होते. यांना नं. ४ पेपर बिल्डिंगज्मध्ये मी भेटावयास गेलो. इकडील प्रोफेसर्सही फारच थट्टेखोर असतात असे वाटते. लंच वगैरे झाल्यावर त्यांनी मला लंडन हायकोर्ट दाखवावयास नेले. तेथे लॉर्ड रीडिंग चीफ जस्टिस यांचा इजलास दाखवीत असताना मला हळूच उचलून लॉर्ड रीडिंग यांच्या खुर्चीवर बसविले व ते म्हणाले की, “ काही सांगता येत नाही, कदाचित् तूंही हिंदुस्थानात चीफ जस्टिस होशील ! " अर्थात् कोर्ट बंद होते! मला प्रोफेसरसाहेबांचे हसू आले व मी Thanks एवढेच म्हटले. मी लंडनला जेथे उतरत असे त्या लँडलेडीचा पति महायुद्धांत मृत्युमुखी पडला होता. हिच्या घरी मँटल पीसवर जर्मनशिपायाचें एक तुटके मोडकें हेलमेट ( शिरस्त्राण ) ठेवले होते. ते दाखवीत ती म्हणे, “ जर्मन शिपाई अतिशय निर्दय व क्रूर ! त्यांच्या क्रूरपणाला अंतच नाही." असे म्हणून माझी विलायतची सफर तिने एका लहान सळईच्या खालच्या बाजूस असलेले भोंवरे दाखविले. भोव- न्यांच्या खाली अणकुचीदार तीक्ष्ण खिळे होते. ती म्हणाली, " हे पहा, शाळा सुटावयाच्या वेळी विमानांतून पोतींच्या पोती असलें भोंवरें जर्मनलोक लहान मुलांवर टाकीत. यामुळे कित्येक मुलांची डोकी फुटून त्यांचा अंत झाला व कित्येक जखमी झाली. " बाईच्या बोलण्यावरून सहज दिसून आले की अजून जर्मन लोकांसंबंधी इंग्रज लोकांत तेढ आहे! असे म्हणतात की, तरुण तरुणींचे बेफाम वर्तन, पिण्याच्या व्यसनाचा अतिरेक वगैरे अवगुण महायुद्धा. नंतरच येथे फार पसरले आहेत. थोड्या दिवसानंतर लंडनसंबंधी अनुकूल प्रतिकूल मते बनवीत वेल्सला अंबर येथे परत फिरलो. लढाऊ जहाज उन्हाळ्याची सुटी अजून संपली नव्हती. अंबरला हवा उन्हाळ्यात फारच चांगली असते म्हणून इंग्लंडांतील पुष्कळ लोक येथे महिना दीड महिना येऊन राहातात. अशा वेळी लोकांना दाखविण्याकरितो सरकारचे एक लढाऊ जहाज दूरवर समुद्रात ठेवले होते. तिकिट काढून आम्ही जहाज पहावयास गेलो. या जहाजावर उभे राहिल्यानंतर आमचा हिंदुस्थान देश आरमाराच्या बाबतीत किती लुळा पांगळा आहे याची प्रत्यक्ष कल्पना आली. जहाजाच्या सर्व बाजूंनी भल्या मोठ्या लांब पल्ल्याच्या तोफा रोखून ठेविलेल्या होत्या. तसेंच कोपन्यांवर दुर्बिणी उभ्या करून ठेविल्या होत्या. चार सर्चलाइटचे दिवे होते. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बोटीच्या तळमजल्यांत १० विमानें ठेवलेली होती. बटन दाबताच एक एक विमान तळमजल्यांतून डेकवर येई व तेथेच वर आकाशात उडविण्याची व्यवस्था होती. सर्वात वरच्या मजल्या. वर वायरलेसची व्यवस्था होती. तसेंच आकाशांत जर एखादें शत्रूचे विमान उडत असले तर त्याचा सूक्ष्म ध्वनि व दिशा दाखविणारे यंत्र ठविलेले होते. आम्ही या लढाऊ जहाजाच्या तळमजल्यांतही गेलो होतो. या ठिकाणी पाण्यां. तून शत्रूच्या सबम्रीनला टाडो सोडून फोडण्याचे तोफेसारखें यंत्र होते. लढाऊ जहाज पाहून आम्ही परत फिरलो. रात्री आठाला जहाजावरून सर्च लाइटचा प्रकाश गांवावर पाडला. सर्व समुद्रकिनारा दिवसासारखा स्पष्ट दिसत ४२ माझी विलायतची सफर होता. एवढेच नव्हे तर एक दडि मैलावरून पाडलेल्या प्रकाशांत वर्तमानपत्रही स्पष्ट वाचता येत होते. आकाशांत दूरवर प्रकाशाचे पट्टे एकमेकांना छाटून जाता तसेच ते समुद्राच्या पाण्यांतही जेव्हां घुसत तेव्हां मासेसुद्धा स्पष्ट दिसत. या जहाजांतील बारीक सारीक महत्त्वाच्या जागा दाखवीत नाहीत. त्याचप्रमाणे जवळून फोटो घेण्याचीही मनाई होती. वेल्सचा पश्चिम किनारा वेल्सचा पश्चिम किनारा फारच सुंदर आहे. काही छोटों मोठी बंदरे आहेत. अशा ठिकाणी मैटच्या मैल समुद्र किनारा बांधून काढला आहे. माझे वर्ग-बंधु मि. रॉडरिक बोवेन ( आतां १९४५ मध्ये पार्लमेंटचे मेंबर झालेले ) यांच्या बरोबर मोटारीतून पश्चिम किनाऱ्यावर जवळ जवळ ३०० मैल प्रवास कर. ण्याची संधि आली होती. ऑगस्टच्या ३१ ता. ला आम्ही निघालो. खरे पाहूं गेल्यास वेल्स डोंगराळ प्रांत आहे. डोंगरावरील हिरवीगार कुरणे फारच मनो- रम वाटतात. या कुरणांवर मेंढ्यांचे कळपचे कळप चरत असलेले दिसतात. येथील मुख्य धंदा लोकरीचा आहे. वेल्स लोंकर जगप्रसिद्ध आहे. दक्षिण वेल्समध्य होंडा व्हॅलीमध्ये कोळशाच्या उत्कृष्ट खाणी आहेत. उत्तर वेल्स मध्ये खेडी विरळ तर दक्षिणेत शहरे वसलेली असून लोकसंख्याही जास्त आहे. कार्डिफ, स्वानसी, न्यू पोर्ट ही नावाजलेली बंदरे आहेत. कार्डिफ बंदरांतून वेल्श कोळसा जगांतील अनेक देशास पोचविला जातो. पुढे दुसऱ्या वर्षी Llangranog (ख्लान ग्रॅनोज ) Tenby North Beach आणि Goscar Rocks पाहिले. १९३१ च्या सप्टेंबर महिन्यांत मी ब्लॅकपूल येथील रोषणाई पाहण्यास गेलो होतो. वेल्समध्ये लॅकपूल हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. येथील ५-७ मैलांचा समुद्रकांठ तीन पाय-यांनी घाटवजा बांधून काढला आहे. प्रत्येक पायरी म्हणजे मोठी सडकच ! संध्याकाळी यावरून मोटारी जा ये करितात समुद्र- कांठावर ठिकठिकाणी स्नानाकरितो बाथ्स आहेत, आणि समुद्रक ठावरच्या पलीकडील रस्त्यावर भले मोठे नृत्यालय आहे. शहराच्या मधोमध एक लोखंडी फारच उंच असे टॉवर आहे. हे टॉवर फ्रान्समधील इफेल टॉवरच्या धर्तीवर बांधलेले आहे. लिफ्टमधून यावर जावे लागते. येथून रात्रीच्या वेळी १९३२ मध्ये

No text on this page.

No text on this page.

माझी विलायतची सफर . ब्लॅकपूलची शोभा फारच अवर्णनीय दिसते ! उन्हाळ्यांत दरवर्षी २० दिवस येथे आरास करण्यात येते. सर्व ट्रॅम्स्ना हिरवे, निळे, पिवळे इ रंगांचे विजेचे दिवे लावलेले असतात. शहरांतून जागोजागी रंगीत दिव्यांच्या मोठमोठ्या कमानी उभारून त्यांतून मध्यभागी कृत्रिम फळाफुलांच्या मोठमोठया परज्या लटकत असतात ! लोक हौशीने आपल्या वाहनांसही रंगीत दिवे लावतात. बागेतून रंगीत प्रकाशाचे जोरदार किरण झाडांवरून सोडतात. अशा त-हेनें झाडांची पानेसुद्धा रंगीबेरंगी दिसतात. कोठे सुशोभित हौदांचे पाणी केशरी दिसते तर कोठे नाना रंगांचे फवारे या हौदांवर उडत असलेले दिसतात. बाथमधून पाण्यांच्या तळांतून असेच रंगीत दिवे ठेवलेले असल्यामुळे नाना- रंगांचे पाणी मोठे सुंदर दिसते एकाच नमुन्याच्या फुलपांखराचे वीस पंचवीस सांचे एकापुढे एक ठेवून प्रत्येक सांच्याचे दिवे चटचट लावले आणि विझविलें असतां मोठे रंगीत फुलपांखरूं उडत असल्याचा भास होतो. अशा त-हेची निरनिराळी चित्रे ठेवली होती. सर्वात मजा अशी की, वर विमाने उडत असून त्यातूनही रंगीत सर्च-लाइटस् सर्व शहरावर पाडले जात. ही शोभा टॉवरवर उभे राहून एकसमयावच्छदेंकरून पाहिली असता .क्षणभर स्वर्गीय- सौंदर्य-दर्शनाचा लाभ झाल्याप्रमाणे वाटते. ब्लॅक-पूल पाहून आम्ही परत अंबर येथे येऊन पोहोचलो. अजून सुटीचे दिवस संपले नव्हते. एक दोन वर्षापासून माझी आणि मि. पार्डी यांची फारच गट्टी जमत चालली होती. हे गृहस्थ Doctor of Divinity चा अभ्यास करीत होते. फावल्या वेळी हिंदुधर्माची माहिती गोळा करण्यास ते माझ्याकडे मधून मधून येऊन बसत असत. मि. पार्डी यांचा स्वभाव फार मनमिळाऊ असल्यामुळे यांच्याशी गप्पा करण्यांत वेळ मजेत जाई. धार्मिक अभ्यास केल्यावर आपली नेमणूक हिंदुस्थानांत करवून घेण्याचा त्यांचा विचार होता. म्हणून माझ्याकडून त्यांनी हिंदी शिकून घेण्याचे ठरविले. मि पार्डी यांना हिंदी धुळाक्षरें लौकर येईनात. पण इंग्रजीतून हिंदी शब्द लिहून यांना शिकविणे सोपे जाईल असे वाटून तसे सुरू केलें. एक दोन महिन्यांतच 'आप कैसे है, आपका नाम क्या है, अशी लहान लहान वाक्ये बोलण्यापर्यंत त्यांची प्रगति झालेली पाहून मलाही आनंद होऊ लागला. भेटीनंतर प्रथम चार सहा वाक्ये हिंदीतूनच बोलण्याचा आम्ही परिपाठ ठेवला होता. हे गृहस्थ मधून मधून माझी विलायतची सफर मला अंबरच्या पार्सनकडे घेऊन जात. पार्सन २४ तास ख्रिस्ती धर्माची महति माझ्यापुढे गात असत व शेवटी ठराविक वाक्य उच्चारीत की, 'ख्रिस्ती झाल्या- शिवाय स्वर्ग मिळत नाही.' मी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घ्यावी म्हणूनही कदा- चित् त्याचा प्रयत्न असावा. मीही त्या वाक्याचे उत्तर एकच देत असे की, 'तुमचा परमेश्वर मोठाच चमत्कारिक दिसतो. याने स्वर्गाच्या दाराला भनें मोठे कुलूप लावून दारावर एका ख्रिस्त्यालाच बसविले आहे असे दिसते, व ज्याच्या हातांत ख्रिस्ताचे तिकिट असेल त्यासच स्वर्गात प्रवेश मिळत असावा. बुद्धधर्मी, मुसलमानधर्मी, हिंदु व तसेच इतर धर्मी लोक या दारांतून जाऊं शकत नाहीत यावरून तुम्ही जो परमेश्वर मानला आहे तो फारच पक्षपाती दिसतो." यावर त्यांचेकडून काहीच उत्तर येत नसे. धार्मिक लोकांत थोडेसें वावरल्याबरोबर १९२९ च्या तिसन्या आठवड्यांत इंग्लंडातील ख्रिस्ती धर्म परिषद अंबर येथे भरली होती त्याचे आमंत्रण येऊन थडकलें! मी परिषदेस नियमाने जाऊन बसू लागलो. इतकेच नव्हे तर १५ मिनिटे बोलण्याचाही योग आला. १५ मिनिटांत हिंदुधर्मावर काय बोलणार ? पण मी असे पाहिले की, माझ्या ज्ञानाच्या मानाने १५ मिनिटें सुद्धा मला बोलतां येईल की नाही शंकाच. कसा बसा १५ मिनिटें मी बोललो. " हिंदुधर्मातील आश्रम व्यवस्था आणि स्त्रियांचा दर्जा' येवढ्या दोन मुद्यांवर माझें भाषण होते. आम्ही 'स्त्रियांना जनावरांप्रमाणे वागवितों अशी कांहींच लोकांची मते होती. त्यांना माझी १०५ वाक्ये ऐकून पराकाष्ठेचा विस्मय वाटला. परिषद संपल्यावर माझ्यावर हजारों प्रश्नांचा भडिमार होऊ लागला. मी मनांत म्हटले आपग स्वामी विवेकानंदांचा आविर्भाव आणला हे काही बरे केले नाही. आता निस्तारणे कठीण ! मग काहींना प्रश्नांची उत्तरे देऊन व 'रचा प्रभू' हे पद खड्या सुरात म्हणून दाखवून व त्याचा अर्थ सांगून तेथून पळ काढला. जाता जातां सर्वांनी मोठ्या प्रेमाने बायबलची एक सचित्र प्रत माझ्या हातात दिली. कांहीनों माझा Adutograph घेतला. मला महापुरुष झाल्यासारखे वाटत होते! एवढे मात्र खरे की, मला अजूनही वाटते की चांगले धार्मिक ज्ञान करवून घेऊन आपल्या धर्माची माहिती देण्यासाठी पुन्हा एकदां विलायतेस जावें. प्रत्येक धर्मात निरनिराळ्या चालीरीति असतात. त्यांना आपण कधीहि इंसू नये. एक गोष्ट मला आठवते. मी ज्या घरांत रहात होतो. तेथोल माझी विलायतची सफर मालकाचे देहावसान झाले. हिवाळ्याचे दिवस होते. घरातील लोकांनी जवळ जवळ ८-१० दिवस प्रेत घरींच ठेवले. रोज काही लोक येऊन दर्शन घेऊन जात. पण आपल्याकडील लोकांप्रमाणे कोणी मोठयाने रडत नाहीत अथवा छाती बडवून घेत नाहीत याचे मला नवल वाटले. नुसता हातरुमाल काढून धुस पुसत होते. अर्थात् दुःख तर होणारच पण त्याचा देखावा करीत नाहीत. घराच्या खिडक्यांवर काळे पडदे टाकलेले असत, परंतु घरांत रोजचे व्यवहार व्यवस्थित चालू होते. आपल्याकडील सुतकाच्या पद्धतीसारखी इकडे पद्धत नाही. अखेरच्या दिवशी मात्र तेथील पाद्री येऊन मृताचें, त्याच्या वडिलाचे आजाचे वगैरे नांवे व रहाण्याच्या ठिकाणचे नांव वगैरे म्हणून, मृतात्म्याच्या शांतीसाठी काही मंत्र उच्चारून मृताच्या पेटीस शेवटचे खिळे ठोकावयास आरंभ केला. यावेळी मात्र मृतांचे आप्तेष्ट मोठमोठ्याने हुंदके देऊ लागले. मृतास, उत्कृष्ट त-हेचा काळा सूट घातला होता. स्मशानयात्रेच्या वेळी पेटी गाडीवर ठेवण्यात आली. वाटेत ओळखीचे लोक भेटले म्हणजे पुष्प-वर्तुळे Wreaths या पेटीवर ठेवीत. स्मशानांत प्रेतास पुरावयाची जागा भाड्याने घ्यावी लागते व त्यावर वार्षिक करही द्यावा लागतो. याचे मात्र आश्चर्य वाटले. असो. इंग्लंडमधील शेवटचे दिवस माझी LL. B. ची परीक्षा २ एप्रिल १९२८ ला संपली होती. अजून निकाल लागला नव्हता. तीन महिन्यांची सुटी होती. मला आतां एकच काळजी राहिली होती. ती म्हणजे बॅरिस्टरीचा कोर्स संपविणे. बॅरिस्टरीच्या टर्म भरावयास न चुकता मी लंडनला जात असें. जून महिन्याची टर्म भरावयास मी लंडनला गेलो. टर्म भरणे म्हणजे ( Dinner ) खाना खाणे ! LL. B. चा व बॅरिस्टरीचा अभ्यास एकच असल्यामुळे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांस अशा रीतीने टर्मस् भरून परीक्षेस बसता येते. लंडनला गेलों म्हणजे एखादे चांगले नाटक अथवा सिनेमा पहावयाचा हा माझा कार्यक्रम ठरलेला होता. सिनेमा पाहून परत फिरणार, पण रात्रीच्या गाडीला अजून दोन तास अवकाश होता. एका मित्राने सुचविले की, स्टेशनजवळ न्यूजरील दाखवितात. तेथे बसावें व ट्रेनची वेळ झाली म्हणजे तेथून उठून ट्रेन गांठावी ~~~.....

माझी विलायतची सफर तें एक मूकचित्रपटाचे अति लहान असे थिएटर होते. तेथे जाऊन बसलों व नंतर रात्रीची ट्रेन गांठली. माझ्याबरोबर अर्ध्या वाटेपर्यंत एक वेल्श मित्र होता. त्यामुळे आगगाडीतील रात्रीचा वेळ गप्पासप्पांत निघून गेला व सकाळी अंबरला पोहोचलो. सकाळी घरी जाऊन टपाल हाती घेऊन फोडलें तो पुण्याहून कधी न येणारा 'ज्ञानप्रकाशचा ' अंक जून १९३२ च्या तिस-या आठवड्यांत माझ्या हाती आला. वाचून पाहातो तो त्यांत माझ्या वडिलांच्या प्रेतयात्रेची बातमी ! आणि डॉ. परांजपे यांचे स्मशानभूमीवर भाषण !! माझ्या अंगावर काटा उभा राहिला. डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. मला काही सुचेना. रडू लागलों! परदेशांत दुसरे काय करणार ? माझ्या मालकिणीने पुष्कळ समजाविलें. तसाच उठून पत्र वगैरे आहे किंवा काय हे पहावयास कॉलेजांत गेलो. माझें चित्त ठिकाणावर नव्हते. कॉलेज बोर्डवर एक तार व एक माझ्या वडील बंधूंचे पत्र होते. 'तारेनें पैसे पाठविले आहेत. ताबडतोब हिंदुस्थानास परत यावे ' एवढाच मजकूर होता. मनुष्याचे जीवन पूर्ण सुखाचे कधीच असू शकत नाही असे वाटते. जगांत जर दुःख नसतेंच तर सुखाची किंमतच राहिली नसती, म्हणूनच परमेश्वर मधून मधून दुःखाच्या डागण्या देतो की काय कोण जाणे ? इंग्लंडमध्ये मला सौख्यमंदिराच्या शिखरावर असल्यासारखे वाटत होते. तो आनंद एकदम रसातळाला गेल्यासारखे वाटले. माझा आधारच तुटला ? त्याबरोबरच विला. यतची यात्राही संपुष्टांत आली. शिक्षणही आटोपलें. विलायतेस जावयाचे जसें एकाएकी ठरले तसेंच तेथून निघावयाचेही एकदमच ठरवावे लागले. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच इटालियन लाइट ट्रिस्टिनो कंग्नीस तारेनें जागा राखून ठेवावयास कळविले होते. व्हिक्टोरिया' बोटींत जागा मिळाली. अबरहून मला पाठविण्यास डॉ. शिरनामे माझ्याबरोबर लंडनपर्यंत मुद्दाम आले.. त्यांनी मला बराच धीर दिला. अगदी निघावयाच्या दिवशी प्रो. व्हिक्टर एव्हन्स यांनीही येऊन बराच धीर दिला. परत हिंदुस्थान हिंदुस्थान सोडून जातांनाचे संपूर्ण वर्णन मी केले आहे. हिंदुस्थानांत परत तांना एकतर काही विशेष घडलेही नाही आणि दुसरे असे की, नवीन माझी विलायतची सफर काही पहावे अशी माझी मनस्थितीच नव्हती. परत येतांना कॅले, पॅरिस, जिनेवा या मार्गाने मी आलो. अंबरएस्टविथवर मी एक शेवटची नजर टाकली. या गांवांत मी ४ वर्षे घालविली असल्यामुळे त्या गांवासंबंधी फारच आपलेपणा वाटत होता. यापुढे हे सर्व स्वप्नवत् होणार या भावनेने मी या गावास शेवटचा प्रणाम केला. जुलै १९३२ च्या पहिल्या आठवड्यांत मी इकडे येण्यास निघालो. स्टेशनवर मित्र- मंडळींनी निरोप दिला, हस्तांदोलने झाली, माझ्या लँडलेडीने व घरच्या मंड- ळीनों माझी भराभर चुंबने घेतली आणि पुढील प्रवास सुखाचा घडो असे आशीर्वाद दिले गाडीने शिटी दिली व मी तेथून लंडनला आलो. लंडन ते मुंबड्चा पॅसेज मी तारेनें बुक केला होता. लंडनमधील काही मित्रमंडळींची भेट गाँवरस्ट्रीटमध्ये असलेल्या वाय्. एम्. सी. ए. मध्ये झाली. वडिलांच्या निधनाच्या बातमीमुळे माझं मन मुळीच स्थिर नव्हते. जातांना ज्या मार्गाने गेलों तसाच लंडन ते फोकस्टन व तेथून पुढे छोट्या जहाजांतून कॅले येथे पोहोंचलों. कॅले येथे माझ्या सामानाची तपासणी झाली. तेथून पॅरिस गांठले. पॅरिस येथे दोन स्टेशने आहेत. गारदे नॉर आणि गारदोलेय . पॅरिसहून पुढे जिनेवा बंदरावर . आलो. परिसला फक्त एक रात्रीचा मुक्काम केला संध्याकाळी गार्देनार स्टेशनवर पोहोचलो. पॅरिस बघावयाची माझी इच्छा होती. पण ती तशीच राहून गेली. मोटार ठरवून मोटारीतून संध्याकाळी गांवांत एक चक्कर मारली. इंग्रजी भाषा येत असलेल्या स्टेशनजवळच्या एका हॉटेलांत मुकाम ठोकला. भोजना. नंतर एक फेरफटका मारावा या उद्देशाने रस्त्यावर आलो. दहा पांच मिनिटें चालून गेल्यावर एक हिंदुस्थानी गृहस्थ भेटले. मला वाटले, बरे झाले. गप्पा. मारण्यांत तरी वेळ जाईल. मला खरोखरच फार सुसंधि वाटली. कारण पर- देशांत आपला मनुष्य पाहिला म्हणजे मनुष्य त्याच्याशी फार आपलेपणाने वागतो. परंतु वरील गृहस्थासंबंधी अनुभव मात्र वाईट आला. हा हिंदुस्थानी गृहस्थ पॅरिसमध्ये कुंटणखान्याच्या एजंटचे काम करीत होता. मी मनांत म्हटले वारे । भारतभूच्या सुपुत्रा ! परदेशांत चांगला धंदा चालविला आहेस ! हा गृहस्थ मला पॅरिसच्या वेश्यागृहांची वर्णने सांगू लागला. रूजस्ट्रीटवर चला. तेथें तीन तीन मजली इमारती नम तरुण स्त्रियांनी गच्च भरलेल्या आहेत. आंत पाऊल ठेवल्याबरोबर आंतली व्यवस्थापिका. सुद्धा तुम्हांत नम माझी विलायतची सफर दिसेल. दारांतच तुमचे कपडे उतरून घेण्यांत येतील, मग तुम्ही नंदनवनांत असल्यासारखे तुम्हांस वाटेल. मी तेथे नेऊन तुम्हांस सोडतों व परत तुमच्या घरी मोटारीतून आणून सोडीन. मला फक्त ४० फ्रैंक्स या म्हणजे झाले. तेथे तुम्हांस जास्त खर्च येणार नाही. जवळ जवळ ४० फॅक्स पडतील. फारच सुंदर तरुणी पसंत केलीत तर ५० फंक्स पडतील एवढेच. याठिकाणी परिस मधील मोठमोठ्या घराण्यांतील मुली सुद्धां घरून पळून येतात. अमुक मैत्रिणी- कडे ४ दिवस जाऊन येते अशा घरी थापा देऊन या गृहांतून राहातात आणि आपली विषयवासना तृप्त करून घेतात. वगैरे सांगून तो शक्य तेवढे माझं मन वळवू लागला. हा परका गृहस्थ मला भुतासारखा वाटला. त्याला चट. दिशी नमस्कार ठोकला व मी आपल्या हॉटेलांत येऊन विचार करू लागलो. हेच का पॅरिस की जेथें रूसोसारखे मोठमोठे क्रांतिकारक ग्रंथकार निर्माण झाले! पॅरिसहून सकाळची गाडी गांठून जिनेवा बंदरावर गेलो. दुपारचे १२ वाजले होते. सामानसुमान स्वतःच बोटीवर पोचतें केलें. बोट सुटावयास तीन चार तास अवकाश होता. पोटांत कावळे ओरडू लागले. कोठे जावे, काय खावें, आमची इंग्रजी भाषा लंगडी पडली. जिनेवा बंदराजवळ मार्केट होते. सरळ मी मार्केटांत घुसलो. पिकलेले १०-२० जरदाळू घेऊन खाण्याचा सपाटा चाल- विला. सर्व युरोपियन लोक माझ्या भोवती उभे राहुन हंसत होते. त्यानंतर एका हॉटेलांत ब्रेड आणि चहा ढोसला व बंदरावर आलो. हे बंदर दुमजली बांधलेले आहे. मोठ्या इमारतींना जसा पोर्च असतो तसाच बंदराचा पुढचा भाग आहे. तेथून बोटीवर सहज जाता येते. माझी एस्. एस्. व्हिक्टोरिया इटालियन बोट तयार होती. मी जाऊन माझी केबिनरूम गांठली. ही बोट पिलसना बोटीपेक्षा मोठी होती व क्रूड ऑइलवर चालणारी होती. म्हणून बोटीवर धुराचें नांव नव्हते व पिलसनापेक्षा वेगाने जाणारी होती. या बोटांवर हैद्राबादचे मि. गेही व मि. बी. रंगारेड्डी एक्साइज ऑफिसर भेटले. ते माझ्या वडिलांचे मित्र होते. वडिलांच्या निधनाचे वर्तमान त्यांना समजले तेव्हां त्यांनाही फार वाईट वाटले. व जिनेवा ते मुंबईपर्यंत त्यांनी मला फारच प्रेमाने वागविले. माझे तिकीट दुसऱ्या वर्गाचे असूनही ते मला दिवसभर आपल्या बरोबर पहिल्या वर्गात बसवून घेत असत. वाटेंत इटलीमध्ये जावयाच्या माझी विलायतची सफर अगोदर व्हेसुव्हियस नांवाचा ज्वालामुखी पर्वत आम्ही दुर्बिणीतून पाहिला. श्री. रंगारेड्डी साहेबांची इच्छा पाँपिआ शहर पहाण्याची होती. त्यांनी मला शहर बघावयास चलण्याचा आग्रह केला. परंतु मला काहीही पहावयाचे नाही असे त्यांना सांगितले. परंतु त्यांनी मोटार ठरवून मला बळेंच शहर बघावयास नेलेच. पाँपिया शहर पुरातनकाली भूकंपाचे धक्के खाऊन जमीनदोस्त झाले होते. तें शहर पुराणवस्तु-संशोधकांनी उकरून काढले आहे. येथील पुराणवस्तु संग्रहा- लय फारच पहाण्यासारखे आहे. आमच्याबरोबर कांहों इटालियन मंडळी होती. हे लोक मोठे गानप्रिय वाटले. गेअटरवर भराभर गाणी म्हणू लागले. फ्रेंच लोक आणि इटालियन लोक मोठे भावनाप्रधान ! रस्त्यांतून त्यांच्या ओळ- खीची मंडळी भेटली की हे भराभर एकमेकांची चुंबने घेतात आणि खूप मोठ. मोठयाने बोलतात. काही इटालियन तर अगदी आपल्याकडील पद्धतीप्रमाणे आलिंगन देतात. इटलीच्या रस्त्यावरून जात असतांना आम्हांला हिंदुस्थानां- तच असल्याचा भास होई. इकडील बऱ्याच स्त्रिया केशकर्तन करीत नाहीत. येथील माणसें ठेंगू व थोडी गबाळी भासली. पापिया येथील वस्तुसंग्रहालयांत पुतळ्यांचाच भरणा आहे. हे पुतळे व शहर लाव्हा रसाखाली दडल्यानंतर उत्खनन करून काढिलेले आहे. दिवेलावणी, पंचपात्री वगैरे पाहून घटकाभर वाटले की हिंदी संस्कृति यथपर्यंत पोहोचली असावी. लाव्हाच्या रसांतून खर- डून काढलेले एक भलेमोठे कुत्रेही बघावयास मिळाले. तसेच गॅडिएटर म्हणजे पहिलवानही मुठी वळवून उभा असलेला जसाच्या तसा खणून काढून ठेविला आहे. त्याचप्रमाणे प्रसूतिवेदना होत असलेली स्त्रीही जशीच्या तशी लाव्हा. रसांतून काढून ठेवलेली आहे. ही चित्रं पाहिली तेव्हां आमची मने थरारून गेली. त्यानंतर आम्ही सर्व शहर पाहिले. मोठमोठी जीर्ण सभागृहें, पूर्वीची नाटकगृहे, विलासमंदिरें व पार्लमेंटच्या धर्तीवर बांधलेली इमारत पाहिली. ग्रीक संस्कृतीचा विकास स्थापत्यशास्त्रांत केवढा झाला होता याचें प्रत्यंतर युरोपांतील आधुनिक मोठमोठ्या इमारती धर्तीवर बांधून काढलेल्या असाव्यात असे वाटते. पॉपिया शहराच्या भरभराटीच्या काली येथे लिंगपूजेला महत्व असावे असे वाटते. कारण तशा प्रकारचे बरेचसे कोरीव काम येथे पहावयास मिळाले. दारूचे रांजग मा. वि. स. ४ आले. याच माझी विलायतची सफर व पुरातन कालची वेश्यागृहें पण पहाण्यांत आली. या खोल्यांतून स्त्रियांना जाण्याची मनाई आहे. कारण या ठिकाणी अतिशय गर्हणीय अशी कोरीव कामें आहेत. पापियामधील जुने खांब, भिंती, प्रवेशद्वारे वगैरे पाहून मनाला फारच अचंबा वाटला. मी हिंदुस्थानांतील कृष्णदेवराय यांच्या नष्टस्मृति साम्राज्याची राजधानी अनागुंदी ( हंपी ) पाहिली होती. पापियांतील काही ठिकाणे पहात असतांना हंपीस असल्याचा भास झाला. पापिया पाहिल्यावर वाटेंत संगमरवरी दगडाचे पुतळे करण्याचा कारखाना पाहिला. आठवणीकरिता म्हणून येथील कांहीं वस्तु खरेदी करून आम्ही स्टीमरवर परतलो. स्टीमरने १४ जुलै १९३२ ला मुंबई शहर गांठले. मुंबईस बॅलार्डपीअरवर उतरलो. माझे मन फारच खिन्न झालें होते. जातांना केवढा उत्साह वाटत होता, पण आज मी माझ्या मातृभूमीवरच एका परक्या माणसाप्रमाणे उतरलो. कारण पितृनिधनाने मला सारखें पोरका झाल्यासारखे वाढू लागले होते. माझा सर्व आधार तुटला होता. मुंबईहून हैद्राबादेस मी कसा येऊन पोहोंचलों याचे उद्धां मला भान राहिले नाही.

देशमुख आणि कंपनीची प्रकाशने साने गुरुजी " ३ " ५ ३ ३ २ ॥ वि. स. खांडेकर १ फुले आणि दगड ( आ. दु) १ २ घरट्याबाहेर ३ पहिली लाट ) ३ ४ स्त्री आणि पुरुष ( ) २ ५ सूर्यकमळे ) २॥ ६ कालची स्वप्ने ७ आजची स्वप्ने ८ कलिका २॥ ९ मृगजळांतील कळ्या २॥ १० सुवर्णकण २॥ ११ सोनेरीसावल्या १२ मंजिन्या १३ सायंकाल ( आ. दु.) १४ अविनाश १५ मंदाकिनी १॥ १६ कल्पलता १७ आगरकर व्यक्ति आणि विचार ३॥ १८ सहा भाषणे २ १९ फुले आणि कांटे २० मराठीचा नाटयसंसार २१ हिरवा चांफा (आ. तिसरी) ५ २२ दोन ध्रुव ( २३ उल्का ( आ. लि.) २४ पहिले प्रेम (आ. दुसरी) ३ २५ क्रौंचवध ( २६ पांढरे ढग ( २७ जळलेला मोहर १ पुनर्जन्म (आ. दुसरी) ३ २ आस्तिक ( ) ३ ३ संध्या ४ ना खंत ना खेद ( कृष्णा हाथीसिंग) ५ सोन्या मारुती ? (दु.आवृत्ति)२ ६ निळा पक्षी (आवृत्ति दुसरी) २॥ ७ गोड निबंध ( भाग पहिला ) ३ ८ गोड निबंध ( भाग दुसरा) ३ ९ गोड निबंध ( भाग तिसरा ) ३ ग. व्यं. माडखोलकर १ अवशेष २ २ व्यक्तिरेखा २॥ ३ माझी नभोवाणी ४ नवे संसार ( जप्त) ५ चंदनवाडी ६ नागकन्या ७ दोन त ना. धो. तामनकर १ तात्या भा. १ला (आ. दुसरी) ४ २ तात्या भा. २रा ३ ३ निवाडे भा. १ ला २॥ ४ निवाडे भा. २ रा ५ चकमकी १॥ ६ बच्चा नवरा ७ अनेक आशीर्वाद ८ दाजी भा. १ला (आ.ति.) ३॥ ३ २ ५ سم ) ) ३ देशमुख आणि कंपनीची प्रकाशनें ३ १ बहणिभाऊ -111. १० संतु वा. म. जोशी १ स्मृति-लहरी २ विचार-लहरी २॥ ३ विचार विहार ४॥ चिं. वि. जोशी १ आणखी चिमणराव (आ. २री)४ २ वायफळाचा मळा ( ) ५ ३ नवें भारूड ४ स्टेशन मास्तर २ ५ नटश्रेष्ठ ३ " २ दत्तु बांदेकर १ सख्या हरी (आ. दुसरी) २ २ नवी आघाडी १॥ ३ तूं आणि मी २॥ ४ नजरबंदी २॥ प्र. के. अत्रे १ साखरपुडा ( आ. दुसरी) २ २ ललित वाङ्मय ३॥ ३ दूर्वा आणि फुले २॥ ना. म. पटवर्धन १ हितपत्रे ३ २ वा. म जोशी चरित्र ४॥ द. र. कवठेकर १ अपुरा डाव ३ २ रेशमाच्या गाठी ३ ३ आभाळाची सांवली अनंत काणेकर १ धुक्यांतून लाल तान्याकडे ( आ. दुसरी) २ पिकली पाने ( आ. दुसरी) १॥ ३ उघड्या खिडक्या १॥ काकासाहेब कालेलकर १ ब्रह्मदेवाचा प्रवास २ भक्ति-कुसुमें ३ सामाजिक प्रश्न ३ य. दि. पेण्ढरकर १ प्रापंचिक पत्रे ३ २ घायाळ ना. ह. आपटे १ फसगत २ साजणी पु. य. देशपांडे १ नवें जग?- २॥ भाई बेके १ रॉयचरित्र- वि. स. खांडेकर (परिचय लेखक) १ काव्यज्योति ( आ. दुसरी) १ आनंदीबाई जयवंत १ पारंब्या रा. वि. फडतरे १ मृगया लक्ष्मणराव सरदेसाई १ ढासळलेले बुरूज प्रो. वि. ह. कुलकर्णी १ व्यक्तिचित्र २ २ ८ २॥

देशमुख आणि कंपनीची प्रकाशन श्री. किनरे १ प्रकृति दर्शन प्रो. हेरॉल्ड लास्की १ राज्यशास्त्र प्रवेश बाबुराव गोखले १ वारा फोफावला २ प्रो. एम्. एल्. दांतवाला १ आपली राहणी १॥ ४। बापू गोखले १ निवड سه ३ ५ शकुंतलाबाई परांजपे १ भिल्लिणीचों बोरें ३ कृष्णाबाई मोटे १ मीनाक्षीचे जीवन २॥ र. गो. सरदेसाई १ चलती नाणी २ संपादक आचार्य भागवत १ वर्धा शिक्षग योजना रा. श्री. जोग १ सैंदर्यशोध आणि आनंदबोध ८ वि.वि. बोकील १ बेबोची बहीण सत्याग्रही १ ग्रह आणि तारे- ४॥ वि. म. भुस्कुटे १ स्टॅलिन- ३॥ २ आई ( मॅक्झिम गॉर्की) कमलाबाई टिळक १ आकाशगंगा २॥ रामतनय १ साखरगोटी ह.रा. महाजनी १ आपलें आर्थिक नियोजन पं.क्षमा राव १ देणगी २॥ गोपीनाथ तळवळकर १ मंगल धाम ३ ३ अरविंद गोखले १ उन्मेष रमातनय १ समाजजीवन बिवलकर १ नाना पाटील चरित्र १ एस्. एन्. आग्रवाल १ विद्यार्थ्यांसाठी विधायक कार्यक्रम १ वियोगी हरी १ अंतरीचे बोल सौ मालतीबाई दांडेकर १ वज्रलेख कुसुमावती देशपांडे २॥ पट्टाभी सितारामय्या १ गांधी आणि गांधीवाद ३॥ विठ्ठलराव कोरटकर १ माझी विलायतची सफर १॥ ५ १ मोळी ४ या खुणेची पुस्तकें संपली आहेत.

देशमुख आणि कंपनीची आगामी प्रकाशने महात्मा गांधी १ तेजस्वी तरुणी नेताजी सुभाषचंद्र बोस १ लाल किला वि. स. खांडेकर २० तुरुंगांतील पत्रे २१ गडकरी (व्यक्ति आणि वाङ्मय) (दु. आ.) २२ न लिहिलेली भाषणे २३ तिसरा प्रहर २४ चल ये रणी ग. व्यं. माडखोलकर १ तीन दिवस २ माझे आवडते कवि ३ चक्रवर्ति उदयन ४ कांता (दु. आ.) ५ स्वप्नांतरिता १ अश्रु २ बुद्ध आणि हिटलर ३ तिसरी भूक ४ वर्षाकाल ६ ऊर्वशी ७ उमरखय्याम ८ विलापिका ५ छाया भाग १-२ ६ चार भिंती ७ दोन मनें ( आ. ति.) ८ बडी मां ९ चक्रवर्ति १० वटपत्रे ११ १९४२ १२ उद्यांची स्वप्ने १३ विसावे शतक ९ हे युद्ध दत्त रघुनाथ कवठेकर १ आपुलकीची झळ २ ढगाआड ३ आग आणि पाणी ४ नितळलेल्या भावना १४ अश्रु आणि हास्य १५ माझ्या कादंबऱ्या साने गुरुजी १६ वालुका १७ तृणांकुर १८ साहित्य साधना १९ श्यामची पत्रे १ आवडत्या गोष्टी १ ते १० भाग गोपीनाथ तळवलकर १४२ आणि नंतर देशमुख आणि कंपनीची आगामी प्रकाशने ४ आजीबाई ५ माणुसकी दत्तु बांदेकर १ हिरवी माडी २ कवुली जबाब ३ मोहनिद्रा ना. धों. तामनकर १ गुजाताई २ शेजारी ३ वडिलांचे सेवेशी प्र. के. अत्रे १ 'मी' कसा झालों? ? (लघुकथा) कृष्णाबाई मोटे अनामिकेची पूजा २ कलाक्षेत्रांत ३ मवाली ४ गुणाची पोर काकासाहेब कालेलकर ४ गडी फू शकुंतला परांजपे १ चांदणी पां. वा. गाडगीळ १ (१) राजकीय निबंध एम्. एल्. दांतवाला १ गांधीवादाचा फेरविचार एस्. एम्. जोशी १ (१) राजकीय निबंध अनंतराव लिमये १ दर्यापार १ स्मरण यात्रा २ ? (पत्रे) अनंत काणेकर १ काळे आणि पांढरे २गिवानच्या कथा चिं. वि. जोशी कुसुमाग्रज १ समीधा १ गुंड्याभाऊ २ दरबार कथा ३ लंकावैभव प्रो. कामत १ नवें शिक्षण * या खुणेची पुस्तकें प्रकाशित झालो आहेत.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

Maajhii Vilaayatachii Saphara~

Author
Korat'akara Vit't'alakeshavaraava
Title
Maajhii Vilaayatachii Saphara~
File name
Maajhii Vilaayatachii Saphara~
Text
OCR done
Citation
1946
Published
2005-12-01
Publisher
Deshamukha Aand-i Kan'pani
Language
Sanskrit
Pages
86
Classification
Geography. Biography. History
DLI number
369594
Barcode
2030020016416.00
Scanning centre
RMSC, IIIT-H
Digital publisher
Digital Library Of India
Rights
IN_COPYRIGHT
VMLT id
ow5edcPbFiB
Download PDF

Maajhii Vilaayatachii Saphara~