Library
Shatashlokii Aavrxtti Tiisarii
Front matter
UNIVERSAL
LIBRARY
OU_184513
LIBRARY
UNIVERSAL
PAK
श्रीमच्छंकराचार्यप्रणीता
शतभोकी
(सान्वयार्थ-विवरण)
लेखक-विशुगतामन वाण्टशास्त्री
किंमत १ रुपयी।
No text on this page.
ॐ
श्रीमच्छंकराचार्यप्रणीता
शतश्लोकी
(सान्धयार्थ-विवरण)
लेखक व प्रकाशक
विष्णु वामन बापटशास्त्री
आवृत्ति तिसरी.
कार्तिक वद्य पंचमी, शके १८५४.
१८-११-३२
किम रुपया.
प्रकाशक-विष्णु वामन बापट, आचार्यकुल घर नं. ३२६, सदाशिव पेठ, पुणे. मुद्रक-गोपाळ बळवंत जोशी, आनदमुद्रणमंदिर, १९६/४६ सदाशिव पेठ, पुणे.
प्रस्तावना. श्रीमजगद्गुरु शंकराचार्यांचा शतश्लोकी या नांवाचा हा सुप्रसिद्ध प्रेय अन्वयार्थ व विवरण यांसह आम्ही दहा वर्षापूर्वी प्रसिद्ध केला होता. ती दुसरी आवृत्ति खलास झाल्यामुळे आज ही तिसरी आवृत्ति आचार्याच्याच कृपेने आम्ही प्रसिद्ध करीत आहो. दुसन्या आवृत्तीत राहिलेले दोष काढून मुळ श्लोकार्थ व भावार्थ समजण्यास अत्यंत अवश्य अशा सुधारणा या आवृत्तीत केल्यामुळे ती अधिक लोकोपयोगी होईल, अशी आम्हाला आशा आहे. ही आवृत्ति आचार्यकुलासाठी प्रसिद्ध केली आहे. अर्थात् तिचा फायदा त्या सस्थेस मिळणार आहे. म्हणून आम्ही तिची पूर्वीचीच किमत कायम ठेवली आहे. त्यावरून असले ग्रंथ प्रसिद्ध करण्यांत स्वतःच्या फायद्यापेक्षा लोकोपयोगाकडे आमची दृष्टि अधिक असते, हे सहज लक्षात येईल. सामान्य वाचकास सस्कृत टीकेचा उपयोग नसल्यामुळे या आवृत्तींतहि ती गाळली आहे. तत्त्वजिज्ञासु आचार्यभक्तांनी या प्रथाचा अभ्यास करून कृतार्थ व्हावें, अशी आमची श्रीचरणी नम्र प्रार्थना आहे. कार्तिक कृष्ण पंचमी १८५४ आचार्यभक्त, पुणे शहर. वि. वा. बापट. } अनुक्रमणिका. .... .... . .... .... .... विज्ञानकोशप्रकरणं आनंदकोशप्रकरणं जगन्मिथ्यात्वप्रकरणं कर्ममीमांसाप्रकरणं : .... . .... १-७३ ७३-८३ ८३- ९१ ९१- ९५ ९६- ९९ ..१००-१०१ ..१०२-११४ आत्मज्ञानप्रकरणं .... आत्मज्ञानफलं जीवन्मुक्तव्यवहारः उपदेशश्च ....
आचार्यकुलाला अर्पण केलेल्या पुस्तकांची यादी. १. शांकरभाष्यानुसार सुबोध गीता-( आवृत्ति दुसरी) [ अवतरण, मूळ श्लोक, अन्वय, सरळ सुबोध अर्थ, स्पष्टीकरण व उपोद्धात यांसह ] पृ. ३४१, किमत कागदी बाइंडिंग १॥ रु. कापडी बा. १॥ रु. २. शांकरभाष्यानुसार सुबोध उपनिषत्संग्रह- मूळ श्रुति, अन्वयार्थ, स्पष्टीकरण, प्रत्येक उपनिषदाचे सिंहावलोकन, यांसह ] ईश-केन-कठ-प्रश्न- मुंडक-मांडूक्य-तैत्तिरीय-ऐतरेय-छान्दोग्य-बृहदारण्यक-कौषीतकि-श्वेताश्वतर-जा. बाल-अर्थात् ब्रह्मसूत्रांत ज्यांचा विचार केला आहे, अशी महत्त्वाची तेरा उपनिषदे, प्रस्तावना, सविस्तर अनुक्रमणिका पृ. ८८0 किं. रु. ५॥ ३ शांकरभाष्यानुसार सुबोध ब्रह्मसूत्र-[वैयासिकन्यायमालेसह ] प्रत्येक अधिकरणाचे नांव-सूत्र-सूत्रार्थ-विषय-संगति-सिद्धान्त, वैयासिकन्यायमालेचे श्लोक-अन्वयार्थ, प्रस्तावना, सविस्तर अनुक्रमाणका, यांसह. पृ.५६० किं. रु. ३. ४. सुबोध पंचदशी-[ मूळ-अन्वयार्थ-स्पष्टीकरण प्रत्येक प्रकरणाचा म- थितार्थ, प्रस्तावना, सविस्तर अनुक्रमणिका, सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी याचे चरित्र यांसह ] पृ. ७५० किंमत पातळ प्रत रु. ३॥ जाड प्रत रु. ४. सभाष्य-भाष्यार्थ संपूर्ण वेदान्तप्रस्थानत्रय. १. श्रीमद्भगवद्गीताभाष्यार्थ---[ मूळ श्लोक, अन्वयार्थ, शांकरभाष्य, भा- ष्याचा सरळ व सुबोध अन्वयासह अर्थ, गीतारहस्यपरीक्षणात्मक विस्तृत टीपा, प्रस्तावना, सविस्तर विषयानुक्रमणिका, वादग्रस्त व अनेकार्थी शब्दांचा कोश, १ श्रीशकराचार्य, २ शरीररूपी रथ, ३ चतुर्भुज श्रीकृष्ण, अशी तीन सुंदर चित्रे व सर विठ्ठलदास दा. ठाकरसी यांचा फोटो, यांसह [ पृष्ठे १३४०. उत्तम ग्लेज कागदाची एका भागांत उत्तम बाइंडिंगची प्रत किं. रु. ७॥. २. दशोपनिषद्भाष्यार्थ-ईश ४६, केन ४८, काठक ४१२, प्रश्न ४१०, मुंडक ४८, गौडयादीय कारिकांसह मांडूक्य । रु. ( छापत आहे ) तैत्तिरीय १॥, ऐतरेय १॥, छान्दोग्य ४॥, बृहदारण्यक ॥ [ या दहा उपनिषदांचा- मूळ श्रुति, अर्थ, शांकरभाष्य व त्याचा सरळ स्पष्टीकरणासह अर्थ, यांसह ] ३. ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ-अध्याय १-४. भाग तीन. पूर्वोक्तप्रमाणेच पृष्ठे २५०० हून अधिक. किं. १५ रु.
श्री: श्रीमच्छंकराचार्यप्रणीता शतश्लोकी. सान्वयार्था महाराष्ट्रविवरणसमेता च । अश्मसार दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोहीनदातुः स्पर्शश्चेत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् । न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये स्वयिं साम्यं विधत्ते भवति निरुपमस्तेन वाऽलौकिकोऽपि १ अन्वयार्थ-' त्रिभुवन जठरे ज्ञानदातु सद्गुरोः दृष्टान्तः नैव दृष्टः त्रिभुवनांत ज्ञानदात्या गुरूना ( शोभेल असा ) दृष्टान्तच मिळत नाही. 'तत्र स्पर्शः कल्प्यः चेत् ( तथापि स न घटते ) ' त्याना परिसाची उपमा जर दिली, ( तर तीहि योग्य होत नाही. ) ' अहो यत् ( यद्यपि ) त स्वर्णतां नयति तथापि स्पर्शत्व न ( नयति )'-कारण अह। जरी परिस लोखं. डाला स्वर्णत्व-सुवर्णत्व देतो तरी परिसत्व देत नाही. ' सद्गुरु (तु )श्रित- चरणयुगे स्वीयशिष्ये स्वीय साम्य विधत्ते'-( परतु ) सद्गुरु चरणयुगुलाचा आश्रय करणाऱ्या आपल्या शिष्याला स्वतःचे साम्य देतात. 'तेन निरुपमः भवति '-आणि त्यामुळेच ते निरुपम आहेत. ' अलोकिकोऽपि वा ( दृष्टान्तः न दृष्टः ) '-अथवा ( त्याना योग्य असा ) प्रपचातीत ( अलौकिक ) दृष्टा- न्तहि मिळत नाही. [ परमपूज्य श्रीमज्जगद्गुरु आचार्य ह्या पहिल्या श्लोकांत प्रथमतः सद्गुरूची योग्यता व माहात्म्य सागतात. कारण ज्याची देवा. प्रमाणे गुरूवर परम भक्ति असेल त्यालाच तत्त्वप्रकाश होतो " ( श्वे. ६।२३ सु. उ. सग्रह पृ. ९३५.) अशी श्रुति आहे. ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना २ शतश्लोकी. शोभेल अमा दृष्टान्त ह्या त्रिभुवनामध्ये कोठेहि मिळत नाही. व्यावहारिक क्षुद्र विद्या शिकविणाऱ्या गुरूना योग्य असा दृष्टान्त कदाचित् मिळू शकेल, परतु प्रत्यक्ष भगवानानी " न हि ज्ञानेन सदृशा पवित्रमिह विद्यते ''-(गी. भा. पृ. ४५८ ) ज्ञानासारखा पवित्र वस्त या जगात नाही, अशा प्रकारे ज्या ज्ञानाच्या पवित्रतेविषयी थोरवी वर्णिली आहे, त्या ज्ञानाचे दान करणाऱ्या सद्गुरूना तर ह्या नाना चित्र-विचित्र वस्तूनी भरलेल्या त्रिभुवनात एकाहि दृष्टान्त आढळत नाही. आता कदाचित् परिम लंग्वडाला सुवर्णता देतो, म्हणून त्याचा दृष्टान्त देऊ म्हटले, तर तोहि योग्य होत नाही, कारण परिस लोख. डाला जरी सुवर्णत्व म्हणजे पूर्व स्थितीपेक्षा उच्चत्व तो, तरी आपले परि मत्व देत नाही. म्हणजे त्याग अनुग्राह्य ( याच्यावर अनुग्रह करावयाचा अशा ) बस्तला स्वत सारखे करिता येत नाही. पण सद्गुरूच्या चरणद्वयाचा आश्रय करून रहाणाऱ्या शिष्याला सद्गुरु स्वसाम्ब देतात, म्हणजे ते शिष्याला आपल्याप्रमाणेच वन्य करून साटितात आणि म्हणूनच त्याना नानाप्रकारच्या विचित्र वस्तूनी भरलल्या हवा देवादि तिन्ही लोकात योग्य अशी उपमा मिळत नाही. तसेच प्रपचा ति अमाहि त्याना योग्य दृष्टान्त मिळत नाही. कारण ते आत्मरूप झालेले असतात. नगानानीहि .. ज्ञानी त्वात्मैव मे मतम् "-ज्ञानी तर माझा आत्माच आहे, असे सांगितले आहे. साराश लद्गुरूच्या संगतीवाचून व ते प्रसन्न 'जन ल्याचा अनुग्रह झाल्या- वाचून कोणाहि सावकाला कृतार्थ होता यत नाही. गुरूला शरण गेल्याशि- वाय व शरण गेल्यानतरहि शिष्याचा अधिकार किती आहे, याविषयी त्यांचा निश्चय झाल्याशिवाय ते कवीहि तत्त्वाचा उपदेश करीत नाहीत पण त्यानी एकदा तत्त्वोपदेश केला की ता शिष्यहि सद्गुरूच्या योग्यतेचा होतो. तस्मात् गुरूपसदन, ( म्हणजे गुरूना शरण जाणे ) गुरुमेवा व तद्द्वारा त्याची प्रस- न्नता, हीच परमपुरुपार्थप्राप्तीची उत्कृष्ट साधने आहेत.] १. यद्वच्छीखण्ड वृक्षप्रसृतपरिमलेनाभितोऽन्येऽपि वृक्षाः शश्वत्सौगन्ध्यभाजोऽप्यतनुतनुभृतां तापमुन्मूलयन्ति । आचार्याल्लब्धबोधा अपि विधिवशतः संनिधौ संस्थितानां त्रेधा तापं च पापं सकरुणहृदयाः खोक्तिभिःक्षालयन्ति २ अन्वयार्थ-' यद्वत् श्रीखण्डवृक्षप्रसृतपरिमलेन अभितः अन्ये अपि वृक्षाः सान्वयार्थविवरण. शश्वत् सौगन्ध्यभाज' ( भवान्त )'-ज्याप्रमाणे चढनवृक्षापासून पसरलेल्या परिमलाने जवळ असलेले दुसरेहि वृक्ष निस्तर सुगधयुक्त होतात; ' ( न के- वल सौगन्ध्यभाज कितु ) अतनुतनुभता ताप अपि उन्मूलयन्ति '-( इत- केच नव्हे तर ) पुष्कळ लोकाचा नापहि नाहीसा करितात. ' (नद्वत् ) आ- चार्यात् विविवशत लब्धबोधा अपि मकरुणहृदया. ( सत.) स्वोक्तिभि. सनिधौ मस्थिताना त्रेधा तार च पान भालचन्ति'-त्याचप्रमाणे दैवयोगाने आचायापासून ज्याना मान प्राप्त झाले आहे, असे पुरुषाहि दयाई अतःकरणाने युक्त होत्सा स्वत च्या वाणाने आपला आश्रय करून रहाणाऱ्याचे विविध ताप व विविध पाप नाहीशी करितात. [ आता ह्या दुसऱ्या ओकामध्ये केवळ श्रीगुरूच्या सानियाहि जर शिष्य कृतार्थ होतो, तर मग उपदेशाने होईलच हे काय सागावे ? असे चदनाचा दृष्टान्त देऊन आचार्य प्रतिपादन करितात—म पगिरीवर सर्वच चदनाचे वृक्ष नसतात. ग्वरा चदन कोठे एखा- दाच असतो. पण त्याच्याग मून सर्वत पसरणा-या म्युगवाने आसपासचे दुसरे वृक्षहि निरतर सुधियुक्त होतात. केवळ ते मुगधयुक्त होतात इतकेच नव्हे, तर सर्व जातीच्या अनेक प्रायाचे तापहि नाहीसे करितात. म्हणजे मुख्य चद- नाच्या छायने, सुगधाने व उतने ज्याप्रमाण उप्ण दिवसामध्ये प्राण्याना आल्हाद वाटले, तमेच सानियाने चदनत्वास प्राप्त झाटेल्या ह्या वृक्षा- ची छाया, सुगध व उर्ट। या या योगानहि सकाचे नाप नष्ट होतात. ह्या श्लोकातील · अतनु ' ह्या पदाने लोकातील तारतम्य मात्र घालविला आहे. म्हणजे ते वृक्ष प्राण्याच्या जाति, वर्ण इत्यादिकाकडे न पाहता सर्वाच सारखे समाधान करितात, त्याचप्रमाणे दैववशात् आचायानामून ज्याना उपदेश मिळाला आहे असे दयाई अत करणाचे सत्पुरुष, काही कर्मधर्मसयोगाने आपला आश्रय करून रहाणाऱ्या साधकाचे आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक असे तीन ताप व कायिक, वाचिक आणि मानसिक अशी तीन प्रकारची पापे ज्यागा त्याच्या अधिकाराप्रमाणे कर्म, उपासना किवा ज्ञान याचा उपदेश करणाऱ्या स्वत च्या वाणीनच नाहीशी करितात. ‘विधिवशतः' या पदाने सदगुरपासून ज्ञानप्राप्ति होण अत्यत दुर्लभ आहे, हे सुचविले आहे. ] २. आत्मानात्मप्रतीतिः प्रथममभिहिता सत्यमिथ्यात्वयोगाद द्वेधा ब्रह्मप्रतीतिनिगमनिगदिता स्वानुभूत्योपपत्त्या।
४ शतश्लोकी. . - आद्या देहानुबन्धाद्भवति तदपरा सा च सर्वात्मकत्वाद् आदौ ब्रह्माहमस्मीत्यनुभव उदिते खल्विदं ब्रह्म पश्चात् ३ अन्वयार्थ-'प्रथमं सत्यमिथ्यात्वयोगात् आत्मानात्मप्रतीतिः अभिहिता' - प्रथमतः सत्यत्व आणि मिथ्यात्व याच्या योगाने आत्मा आणि अनात्मा यांचा अनुभव सांगितला आहे.-' स्वानुभूत्या उपपत्त्या ( च इति) द्वेधा ब्रह्मप्रतीतिः निगमनिगदिता'-स्वतःच्या अनुभवाने व युक्तीने अशी दोन प्रकारांनी ब्रह्म- प्रतीति येते, असे वेदामध्ये सांगितले आहे.-' आद्या (या प्रतीतिः सा) देहानुबन्धात्'-(त्यांतील) प्रथमतः जी प्रतीति येते ती देहाच्या योगानेच येते- तदपरा च ( या ) सा सर्वात्मकत्वात् भवति' त्याचप्रमाणे दुसरी उपपत्तीने जी प्रतीति येते, ती परमेश्वराच्या सर्वात्मकतेमुळे येते.-' आदौ ब्रह्माहमस्मि इति अनुभवे उदिते (सति) पश्चात् खलु इदं ब्रह्म (इति आत्मप्रतीतिः भवति)'- प्रथम 'मी ब्रह्म आहे,' असा अनुभव आल्यानतर मग हे सर्व ब्रह्म आहे, असा अनुभव येतो. ( आत्म्याची प्रतीति कशी व केव्हां येते, हे ह्या श्लोकांत आचार्यांनी सांगितले आहे. प्रथमतः विचार करू लागले असतां सत्य व मिथ्या अशा दोन कोटी आपल्यापुढे उभ्या रहातात. यास्तव सत्यत्वाचे यो- गाने आत्म्याची प्रतीति व मिथ्यात्वाचे योगाने अनात्म्याची प्रतीति येते. "सत्यं ज्ञानमनन्त ब्रह्म" (तै. भा. पृ. ७०) या श्रुतीप्रमाणे पाहिले असतां सत्य हे ज्ञान व मिथ्या हे तद्विपरीत अज्ञान होय. त्या सत्य-मिथ्यात्वाच्या योगाने सत्य म्हणजे आत्मा व मिथ्या म्हणजे तदितर सर्व जडवर्ग, अशी दोन प्रकारची प्रतीति प्रत्येक विचारवानाला प्रथमतः येते आणि असे ज्ञान झाले असता ब्रह्माचा साक्षात्कारहि दोन प्रकारांनी होतो; एक स्वतःच्या अनुभवाने व दुसरा युक्तीने. वेदांनींहि असेच सांगितले आहे. त्यांतील स्वानुभवसिद्ध अशी जी आद्य प्रतीति ती शरीरसंबंधाने म्हणजे स्थूलदेहापासून अंतःकरणापर्यंत सर्व कार्य-करणसंघात व आत्मा यांच्या अनुषगाने होते व दुसरी युक्तिद्वारा होणारी जी प्रतीति ती परमेश्वराच्या समष्टिरूपामुळे होते. सृष्टीतील प्रत्येक व्यक्ति ही व्यष्टि व त्या सर्व व्यक्तीचा समुदाय ही समष्टि. हिलाच सर्वज्ञ, परमेश्वर, हिरण्यगर्भ, सूत्रात्मा इत्यादि म्हणतात. ईश्वर सर्व चराचर पदार्थाचा समुदाय आहे. म्हणूनच तो सर्वात्मकहि आहे. अर्थात् माझ्यामध्ये जे तत्त्व आहे तेच सर्वत्र आहे, अशा युक्तिद्वारा ही प्रतीति येते. तात्पर्य, पूर्वी देहद्वारा 'मी ब्रह्म आहे', असा साक्षात्कार झाला असतां तदनंतर हे सर्वहि दृश्यजात सान्वयार्थविवरण. ५ आ- ब्रह्मच आहे असा युक्तिद्वारा ( अनुमानानेहि ) साक्षात्कार होतो. सारांश " एकमेवाद्वितीयं ब्रह्म" (छां. भा. पृ. ४१५ ) असा साक्षात्कार होण्या- पूर्वी ' मीच ब्रह्म आहे' असा ह्या देहामध्येच अनुभव आला पाहिजे. ] ३. आत्मा चिद्वित्सुखात्माऽनुभवपरिचितः सर्वदेहादियन्ता सत्येवं मूढबुद्धिर्भजति ननु जनोऽनित्यदेहात्मबुद्धिम् । बाह्येऽस्थिस्नायुमज्जापलरुधिरवसाचर्ममेदोयुगन्त- विण्मूत्रश्लेष्मपूर्ण स्वपरवपुरहो संविदित्वापि भूयः ४ अन्वयार्थ-'चिद्वित्सुखात्मा आत्मा अनुभवपरिचितः ( तथा ) सर्वदे- हादिय-ता-आत्मा सच्चिदानन्दरूप आहे व त्याचा अनुभवाने परिचयहि झालेला आहे. तसाच, तो सर्व देहादिकाचा नियता आहे.-' ननु एव सति ( अपि ) मूढबुद्धिः जनः अनित्यदेहात्मबुद्धि भजति'-पण खरोखर असे आहे तरी मूढबुद्धि जन अनित्य जो देह त्याचे ठिकाणी आत्मबुद्धि ठेवतात.-'अहो स्वपरवपु. बाह्ये अस्थिस्नायुमज्जापलरुधिरवसाचममेदोयुक् '-अहो पण, पलें किवा दुसऱ्याचे शरीर बाहेरून अस्थि, शिरा, मज्जा, मांस, रक्त, वसा, चर्म व मेद यानी युक्त आहे-' तथा अतः विण्मूत्रश्लेष्मपूर्ण'-आणि आत विष्ठा, मूत्र व श्लेष्मा यांनी भरलेले आहे;-' (इति) सविदित्वाऽपि भूयः (देहा- स्मबुद्धि भजते इति महदाश्चर्य)' हे जाणूनहि पुनः ते त्याचे ठिकाणी आत्म- बुद्धि ठेवितात, हे केवढे आश्चर्य आहे ? [ याप्रमाणे आचार्यानी पूर्वश्लोकांत नामनिर्देशाने दोन प्रकारची आत्मप्रतीति सागितली. आतां पुढे “ आत्मा चिद्वित्सुखात्मा " या श्लोकामध्ये तिचे पूर्वीपेक्षा अधिक निरूपण करितात. परमात्म्याचे सच्चिदान्दरूप केवल उपनिषद्वाक्यांवरूनच जाणतां येते असें नाही तर आपल्या नेहमीच्या अनुभवानेहि ते परिचत झालेले आहे. तो देह, इंद्रिये व प्राण यांचा चालक, भासक व नियामक आहे; तो देहाला क्रिया करण्याची शक्ति देतो, म्हणून चिद्रूप, इंद्रियांच्या द्वारा विषयोपभोग घेतो म्हणून ज्ञानरूप व निद्रावस्थेमध्ये केवल आनंदाचाच अनुभव घेतो, म्हणून आनंदरूप आहे. ह्याप्रमाणे तिन्ही अवस्थांमध्ये प्रत्येक प्राण्याला त्याचा अनु- भव येतो. तथापि हा मूढ पुरुष ह्या अनित्य देहालाच आत्मा असे मानतो. पण ते अगदी अयोग्य आहे. कारण बाह्य भागीं अस्थि, मांस, रक्त इत्यादि- दिकांनी व आंत विष्ठा-मूत्रादिकांनी भरलेलें में स्वताचे किंवा दुसऱ्याचे शरीर ६ शतश्लोकी. ते अत्यत अमगल व निद्य आहे, असे जाणून सुद्धा पुनः त्यालाच आत्मा समजून त्याची शुश्रूषा करणे हे केवढे आश्चर्य आहे !! सारांश निद्य शरीर व अत्यंत पवित्र आत्मा यांचे ऐक्य होणे त्रिकालीहि शक्य नाही. ] ४. देहस्त्रीपुत्रमित्रानुचरहयवृषास्तोषहेतुर्ममेत्थं सर्वे स्वायुर्नयन्ति प्रथितमलममी मांसमीमांसयेह । एते जीवन्ति येन व्यवहतिपटवो येन सौभाग्यभाज- स्तं प्राणाधीशमन्तर्गतममृतममुं नैव मीमांसयन्ति ५ अन्वयार्थ–'देहस्त्रीपुत्रमित्रानुचरहयवृपा मम तोषहेतु इत्थ सर्वे प्रथित अल स्वायु इह मांसमीमासया नयन्ति,'-देह, स्त्री, पुत्र, मित्र, सेवक, अश्व व वृषभ हे सर्वहि मला सतोष देणारे आहेत, असे समजून हे सर्व लोक आपले प्रसिद्ध असे सपूर्ण आयुष्य ह्या व्यवहारामध्ये मासमीमासा करीत घालवितात.-' (कितु ) एते येन जीवन्ति '-परतु हे सर्व (स्त्री-पुत्रादिक) ज्याच्या योगाने जिवंत राहतात,-' ( तथा ) येन व्यवहृतिपटवः ( भवन्ति तथा येन ) सौभाग्यभाज (भवन्ति ) ' ज्याच्यामुळे व्यवहारदक्ष होतात आणि ज्याच्यामुळे सौदर्यादिगुणसपन्न होतात, त अमु प्राणाधीश अत- र्गतं अमृत नैव मीमासयन्ति'-त्या ह्या सर्वातर्गत व मरणधर्मरहित अशा प्राणेश्वराची कधीच मीमासा करीत नाहीत. [ श्रीमत् आचार्य लोकांच्या अयोग्य वर्तनाकडे पाहून पुनः आश्चर्याने म्हणतात हे अखिल लोक, देहा- दिक सर्वहि मला आनद देणारे आहेत, अशा अभिमानाने आणि त्याचप्र- माणे देहादि पुष्ट किवा कृश झाले असता मीच पुष्ट किवा कृश झालो आहे असे खोटेच मानून आपले कुल, शील, विद्या यानी प्रसिद्ध असलेले सर्व आयुष्य ह्या मांसाचा विचार करण्यांत व्यर्थ घालवितात. म्हणजे ते स्वसबद्ध अशा दुसऱ्या सर्व वस्तु व प्राणी माझे आहेत, यांच्या स्वास्थ्याने मला सुख होणार, मला एकट्याला सुख होण्याकरिता जगांतील अनंत प्राण्यांना अनत केश झाले तरी काही हरकत नाही, अशा विवचनेत आपले अमूल्य आयुष्य घालवितात; परतु हे सर्व देह-स्त्री-पुत्रादिक ज्याच्यामुळे जिवत राहतात, ज्याच्या योगाने मोठे व्यवहारकुशल होतात आणि ज्याच्या योगाने सौद- र्यवान्, पराक्रमी, शूर, वीर इत्यादि विशेषणांना पात्र होतात, त्या सर्वो- ज्याहि अंतर्यामी असणाऱ्या व देहादिक नष्ट झाले तरी नष्ट न होणाऱ्या ह्या सान्वयाविवरण. स्वानुभवसिद्ध मुख्य आत्म्याचा कधीच विचार करीत नाहीत; हे केवढे आ- श्चर्य आहे !! बुद्धीला मोह पडला असता तिच्यामध्ये सदसद्विवेकशक्ति रहात नाही आणि त्यामुळेच खऱ्याला खोटे व खोट्याला खरे, असे ती मानिले. सर्व प्राकृत पुरुषाना मोह पडल्यामुळे त्यांना सद्रूप आत्म्याचा विसर पडतो व ते असत्य अनात्म्याच्या ठिकाणीच अभिमान ठेवितात. ह्यात आश्चर्य एवढेच की, ह्या आत्म्याचा सर्वदा अनुभव येत असूनहि त्याच्या- विषयी थोडा तरी विचार करावा, असे त्याना कवी चुकूनहि वाटत नाही.' ५ कश्चित्कीटः कथंचित्पटुमतिरभितः कण्टकानां कुटीरम् कुर्वस्तेनैव साकं व्यवहृतिविधये चेष्टते यावदायुः । तद्वज्जीवोऽपि नानाचरितसमुदितैः कर्मभिः स्थूलदेहम् निर्मायात्रैव तिष्ठन्ननुदिनममुना साकमभ्येति भूमौ ६ अन्वयार्थ---' कश्चित् पटुमति कीटः कयचित् अभितः कण्टकाना कुटीरं कुर्वन् तेनैव साक व्यवहृतिविधये यावदायुः चेष्टते'-कोणी एक बुद्धिमान् कीटक मोठ्या प्रयत्नाने आपल्या सभावी काट्याचे घर करून त्यासह- वर्तमानच व्यवहार होण्याकरिता सर्व आयुष्यभर क्रिया करीत असतो. तद्वत् जीवोपि नानाचरितसमुदितै कर्मभि स्थूलदेह निर्माय अत्रैव तिष्ठन् अमुना साक अनुदिन भूमौ अभ्येति' त्याचप्रमाणे हा प्राणीसुद्धा नानाप्रका- रच्या आचरणानी उत्पन्न झालेल्या कमानी स्थूलदेह निर्माण करून, त्यामध्येच राहून, त्यासहवर्तमान प्रतिदिवशी पृथ्वीवर सचार करितो. [ आतां देह आणि आत्मा यांचे साहचर्य दृष्टान्ताने दृढ करितात-ज्याप्रमाणे एखादा बुद्धिमान् किडा आपल्या कफापासून उत्पन्न केलेल्या धाग्यांनी आपल्याभोवती मोठ्या प्रयत्नाने कांट्यांचे घर करून खान-पानादिक व्यवहार करण्याकरितां सर्व जन्मभर त्या घरट्यासहवर्तमानच इकडे तिकडे फिरत असतो; त्याचप्रमाणे प्राणी अनेक जन्मांमध्ये अनेक आचरणे केल्याने त्यांपासून होणाऱ्या प्रारब्ध कर्माने स्थूल देह तयार करून व त्या देहामध्येच राहून त्याच्याच सहवर्तमान प्रतिदिनी पृथ्वीवर पर्यटन करीत असतो. म्हणजे जन्मभर त्या स्थूल देहाला न सोडितां सर्व स्थूल व्यवहार करितो. तात्पर्य असे की, त्या काट्यांच्या घरा- प्रमाणेच असणारा हा अचेतन देह स्वतः कोणतीहि चेष्टा करीत नाही. कारण आत्म्याचा वियोग झाला असतां काष्ठासारखे मरून पडणारे शरीर ज्या शतश्लोकी. लागतो. बरे, रथ नसून अर्थी कोणतीच चेष्टा करीत नाही, हे प्रत्यक्ष सिद्ध आहे, त्याअर्थी ह्या जड देहाकडून अनेक क्रिया करविणारा कोणी तरी चालक हा असलाच पाहिजे व तो चालक जीवच होय. जसे-रथ जड असल्यामुळे स्वतः त्याला चलनादिक कोणतीच क्रिया करितां येत नाही. पण अश्व जोडला की तोच वेगाने चालू केवल अश्वच असला तरीहि रथक्रिया होत नाही. त्याच न्यायाने कोणी चालक नसेल तर देहाची चेष्टाहि होणार नाही. तात्पर्य ह्या दोघांचे नित्य साहचर्य आहे ] ६. स्वीकुर्वन् व्याघवेषं स्वजठरभृतये भीषयन्यश्च मुग्धान् मत्वा व्याघ्रोऽहमित्थं सनरपशुमुखान बाधते किं नु सत्त्वान् । मत्वा स्त्रीवेषधारी स्त्र्यहमिति कुरुते किं नटो भर्तुरिच्छां तद्वच्छारीर आत्मा पृथगनुभवतो देहतो यः स साक्षी ७ अन्वयार्थ- यः ( कश्चित् पुरुष ) स्वजठरभृतये व्याघ्रवेष स्वीकुर्वन् मुग्धान् भीषयन् ( आरते स.) अह व्याघ्र इत्थ मत्वा सनरपशुमुखान् सत्त्वान् बाधते किनु ? '-जो ( कोणी एखादा पुरुष ) आपले उदर भरण्या- करिता वाघाचा वेष घेऊन अज्ञ बालकाना भिववीत असतो, तो ' मी व्याघ्र आहे ' असे मानून मनुष्य, पशु इत्यादिकांसहवर्तमान इतर प्राण्याना पीडा करितो काय?-' तथा स्त्रीवेषधारी नटः अह स्त्री इति मत्वा भर्तुरिच्छां कुरुते किं?'-किवा स्त्रीवेष घेतलेला नट 'मी स्त्री आहे' असे मानून पतीची इच्छा करितो काय ?- तद्वत् शारीर आत्मा देहत' यः अनुभवतः पृथक् अस्ति सः साक्षी'-त्याप्रमाणेच शरीराभिमानी आत्मा, जो अनुभवाने देहाहून निराळाच आहे, तो साक्षी आहे अर्थात् दहाचा व त्याचा काही संबंध नाही. [याप्रमाणे जीवाला देह जरी प्राप्त झाला असला तरी तो पारमार्थिक-सत्य नव्हे, तर अविद्येने कल्पित असल्यामुळे कृत्रिम आहे. म्हणून आचार्य देहाला अनुसरून आत्म्यांचे वागणे कधीहि योग्य होणार नाहीं; असे येथे दृष्टांताने निश्चित करतात-एखादा पुरुष भिक्षा मागून पोट भरण्याकरितां वाघाचा वेष घेतो आणि त्या वेषाने अज्ञ बालकादिकांना भिववीत रस्त्यांतून फिरत असतो. पण तो, माझ्या वेषानुरूप ' मी खरोखरच व्याघ्र आहे' असे समजून प्राणि- मात्रांची खऱ्या वाघाप्रमाणे हिंसा करितो काय ? छेः कधीच नाही. तर तो माझा हा व्याघ्रवेष माझ्या खऱ्या स्वरूपाहून निराळा आहे, असें जाणून सान्धयार्थविवरण. ९ आपल्या वेषाला शोभेल असें ( वाघासारख्या उड्या मारणे, ओरडणे, हातवारे करणे इत्यादि) कर्म करीत असतो. आचार्य हीच गोष्ट आणखी एका दृष्टान्ताने स्पष्ट करितात स्त्रीचा वेष घेणारा नट विषयेच्छा परिपूर्ण करून घेण्याकरितां भर्त्याची इच्छा कधी तरी करितो का ? कधीच नाही. तर तो आपल्या स्त्रीवेषाला अनुरूप असे नेत्रविलास, हस्तपादादिकांचे विन्यास इत्यादि हावभाव करून अन्य पुरुषांना मात्र लोभ उत्पन्न करितो. परंतु स्वतः ' मी स्त्री आहे ' असे समजून पुरुषसभोगेच्छा कधीच करीत नाही. त्याचप्रमाणे शरीराने युक्त असणारा आत्मा देहाहून पृथक् आहे, असा ज्याअर्थी अनुभव येतो त्याअर्थी तो देहादिकाच्या क्रियांचा साक्षी आहे. ज्याप्रमाणे व्याघ्रवेषधारी किवा स्त्रीवेषधारी पुरुष आपण व्याघ्र किवा स्त्री नसून केवळ त्यांचे वेष घेणारे आहो, असे पक्के समजून स्ववेषानुरूप चेष्टा करीत असतात, त्याचप्रमाणे शरीरोपाधिक आत्मा, अनुभवाने ' मी शरीरा- हून पृथक् आहे ' असे समजल्यानतर देहवेषानुरूप चेष्टा करीत असूनहि स्वतःच्या साक्षिरूपाला विसरत नाही. तात्पर्य देह पारमार्थिक नाही, म्हणून प्राकृत पुरुषाप्रमाणे तदनुरूप चेष्टा न करितां स्वस्वरूपाचे नेहमी भान ठेवून व्यवहार करीत असावे. ] ७ स्वं बालं रोदमानं चिरतरसमयं शान्तिमानेतुमने द्राक्षं खार्जुरमानं सुकदलमथवा योजयत्यम्बिकास्य । तद्धच्चेतोऽतिमूढं बहुजननभवान्मौढ्यसंस्कारयोगा- होधोपायैरनेकैरवशमुपनिषद्बोधयामास सम्यक् ८ अन्वयार्थ-'चिरतरसमय रोदमान स्वं बाल शाति आनेतुं अस्य अग्रे अ. म्बिका द्राक्ष खार्जूर आम्र अथवा सुकदल योजयति'-ज्याप्रमाणे पुष्कळ वेळ- पर्यंत रडत असलेले बालक उगी रहावे, म्हणून त्याची आई त्याच्यापुढे द्राक्ष, खजूर, आंबा किंवा उत्तम केळे ठेविते,-' तद्वत् उपनिषद् बहुजननभवात् मौढ्यसंस्कारयोगात् अवश सत् अतिमूढ चेतः अनेकैः बोधोपायैः सम्यक् बो. धयामास'-त्याचप्रमाणे उपनिषदांनी, अनेक जन्म घेतल्यामुळे व त्यांतील अनेक मूढ संस्कारांमुळे चंचल व मूढ झालेल्या मनाला, अनेक बोधोपायांनी उत्तम उपदेश केला आहे. [ ह्या श्लोकांत आत्मज्ञान होण्याकरितां अनेक उपाय योजणाऱ्या श्रुतिमातेचे कौशल्य दाखविले आहे. एखादि माता, पुष्कळ वेळप- १० शतश्लोकी. . यंत कशाकरिता तरी हट्ट घेऊन रडणाऱ्या आपल्या बालकाचे समाधान कर ण्याकरितां त्याच्या पुढे द्राक्ष-खजूरादिक गोड पदार्थापैकी काही पदार्थ टाकिते आणि त्यांपैकी एखाद्या तरी आवडीच्या पदार्थाने त्याचे समाधान व्हावे, अशी तिची इच्छा असते. त्याचप्रमाणे अनादिकालापासून अनेक जन्म घेतल्यामुळे व प्रत्यक जन्मात अनेक मूढ सस्कार झाल्यामुळे अत्यन्त चचल झालेल्या ह्या अज्ञानमय अतःकरणाला श्रुतिमातेने ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे अनेक ज्ञानोपायांनी बोध केला आहे. आत्मज्ञानाचे अनेक उपाय सागण्यामध्ये त्या अत्यत कारुणिक माउलीचा हाच हेतु की, यापैकी एखाद्याचा तरी स्वीकार करून प्राण्याने कृतार्थ व्हावे ! लौकिक माता आपल्या मुलाचा सताप दूर हो- ऊन त्याला शांति मिळावी, म्हणून जसे अनेक मिष्ट पदार्थाचे आमिष दाख- वित, त्याचप्रमाणे श्रुतिमाउलीने हि त्रिविध तापानी सतप्त झालेल्या मानवाला निरतिशय शांति प्राप्त व्हावी, म्हणून भजन, पूजन, यम, नियम, ध्यान, धारणा, श्रवण, मनन, इत्यादि, साधकाच्या इच्छेप्रमाणे व अधिकाराप्रमाणे अनेक उपाय योजिले आहेत.] ८ यत्प्रीत्या प्रीतिपात्रं तनुयुवतितनूजार्थमुख्यं स तस्मात् प्रेयानात्माथ शोकास्पदमितरदतः प्रेय एतत्कथं स्यात् । भार्या जीवितार्थी वितरति च वपुः स्वात्मनः श्रेय इच्छं- स्तस्मादात्मानमेव प्रियमधिकमुपासीत विद्वान्न चान्यत् ९ अन्वयार्थ-' यत्प्रीत्या तनुयुवतितनूजार्थमख्य प्रीतिपात्र ( भवति ) सः आत्मा तस्मात् प्रेयान् '-ज्याच्या प्रीतीने शरीर स्त्री, अपत्य व सर्वहि विष- यजात ही प्रीतिपात्र होतात, तो आत्मा त्या सर्वाहून अधिक प्रेमास्पद ' अथ इतरत् शोकास्पद '-आणि त्याहून अन्य सर्वहि शोकास्पद आहे.-' अतः एतत् प्रेयः कथ स्यात् ' तेव्हा ते प्रीतिपात्र कसे होणार ? जीवितार्थी भार्याध वितरति '-स्वतःचे जीवित रहावे, अशी इच्छा करणारा भार्या-पुत्र मित्रादि- कांना सोडतो.-' स्वात्मन. श्रेय. इच्छन् वपु ( वितरति )'-आपल्या कल्या- णाची इच्छा करून शरीराचाहि त्याग करितो.-'तस्मात् विद्वान् अधिकं प्रियं आत्मानमेव उपासीत'-तस्मात् विद्वान् पुरुषाने सर्वापेक्षा अधिक प्रिय अस- लेल्या आत्म्याचीच उपासना करावी.-' न चान्यत् '-अनात्म्याची करू नये. [आचार्यांनी आत्मा सर्वापेक्षा अधिक प्रिय आहे, हे ह्या नवव्या श्लोकांत सान्वयार्थविवरण. दाखविले आहे. ज्या आत्म्याच्या प्रीतीमुळे शरीरादि सर्वहि विषयजात प्रीति. पात्र होते, तो आत्माच खरे प्रेमाचे स्थान होय. सुख किवा दुःख यांपैकी कशाचा तरी अनुभव घेणे, याला भोग असे म्हणतात. तो भोग आत्म्यालाच होणे युक्त आहे. म्हणून विषयभोग घेण्याकरितां प्रवृत्त झालेल्या पुरुषाला प्रथमतः आत्म्याचीच प्रतीति होते आणि त्या मूलभूत आत्मप्रतीतिद्वारा सर्व विषय प्रिय होतात. त्यातहि शरीर हे भागसाधन असल्यामुळे त्याचे ठिकाणी प्रथम प्रेम जडते, तदनतर भोगातील उत्तम भोग जी स्त्री तिच्यावर प्रीति बसते. पुढे स्त्री-पुरुषांच्या प्रेमापासून उत्पन्न होणाऱ्या पुत्राविषयी प्रेम उत्पन्न होते. त्यानतर या सर्वाचा निर्वाह व्हावा, म्हणून द्रव्यार्जनाविषयी लोभ उत्पन्न होतो आणि शेवटी द्रव्यापासून साध्य होणारे अन्न-पान वस्त्र-ताबूलादि पदार्थ आवडू लागतात. एकदरीत आत्म्याची प्रीति मुख्य व त्याच्या अपेक्षेने अन्य सर्वाविषयीची प्रीति गौण आहे, हे प्रत्यक्षसिद्ध आहे. ज्याच्याविषयीं खरी व मुख्य प्रीति असते तो आत्माच सर्वापेक्षा अधिक प्रिय होय. याप्रमाणे आ मा सर्वापेक्षा अधिक प्रिय जरी असला, तरी प्राण्याची विषयाविषयीची जी प्रीति आपल्या अनुभवाला येते ती खरी प्रीति नव्हे, तर तो प्रीतीचा आभास आहे. दु.ख हेच विषयाच खरे स्वरूप आहे, असे आचार्यानी "इत- रत्" इत्यादि पदाने सुचविले आहे. उत्पत्ति, स्थिति व लय या तीन अव- स्थामध्ये जे दुःखद ते सर्वदा दु खरूपच असते, असा न्याय आहे. शिवाय सर्व अनात्मजात दुःख देणारे आहे, ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. " अर्जने रक्षण नाशे क्लेशदो विषयो भवेत् । सुखार्थ सज्जते तत्र मूढधीरिति विस्मयः"- विषय प्राप्त करून घेताना, प्राप्त झाल्यानतर त्याचे रक्षण करिताना व तो नष्ट झाला असता क्लेश देतो. पण मूढबद्धि पुरुष त्याचे ठिकाणी सुखाकरितां आसक्त होतो, हे मोठे आश्चर्य आहे, असे एकेठिकाणी म्हटले आहे. ह्या वचनाप्रमाणे व अन्वय-व्यतिरेकन्यायाने सर्व विषयजात दुःखास्पद आहे, असे सिद्ध झाले असता त्याच्याविषयी प्रेम कसे वाटणार ? आतां आत्मा सर्वांपेक्षा अधिक प्रिय कसा हे " भार्याचं.” इत्यादि चरणांत सांगितले आहे. स्वतः जिवंत रहावे, अशी इच्छा करणारा पुरुष भार्या-पुत्र-मित्रादिकां- चाहि त्याग करून स्वतःचे रक्षण करितो. शिवाय " आत्मान सतत रक्षे. हारैरपि धनैरपि " अशी लौकिक म्हणहि आहे. फार काय पण शरीरसुद्धा आत्मा नव्हे, असें ‘वपुः०' इत्यादि पदांनी आचार्य सांगतात. स्वतःचे अत्यंत कल्याण व्हावे, म्हणून लोक स्वशरीराचेहि गंगेमध्ये संतर्पण करून - १२ शतश्लोकी. किंवा क्षात्रधर्माप्रमाणे ते धारातीर्थी ठेवून ज्याअर्थी स्थूलदेहाचा नाश करून घेतात त्याअर्थी शरीरापेक्षा आत्मा अधिक प्रिय आहे व त्याच्याकरितांच शरीरादिक अन्य सर्व अनात्मजात प्रिय वाटत असते. तस्मात् विद्वान् पुरुषाने सर्वापेक्षा अत्यत प्रिय असणाऱ्या आत्म्याचीच उपासना करावी. परिणामी निष्फळ होणारी देहादिक जडवर्गाची सेवा करू नये.] ९. यस्माद्यावत्प्रियं स्यादिह हि विषयतस्तावदस्मिन्प्रियत्वं याबदुःखं च यस्माद्भवति खलु ततस्तावदेवाप्रियत्वम् । नैकस्मिन्सर्वकालेऽस्त्युभयमपि कदाप्यप्रियोऽपि प्रियः स्यात् प्रेयानप्यप्रियो वा सततमपि यतःप्रेय आत्माख्यवस्तु १० अन्वयार्थ-' इह हि यस्मात् विषयतः यावत् प्रिय ( भवति ) तावत् अस्मिन् प्रियत्व'- व्यवहारामध्ये ज्या विषयापासून जेवढे सुख होत असते, तेवढेच त्याच्या ठिकाणी प्रियस्व असते- यावत् यस्माच्च दुःख भवति खल ततः तावत् एव अप्रियत्वं '-आणि ज्याच्यापासून जेवढे दुःख होते तेवढेच त्याच्या ठिकाणी अप्रियत्व असते-' सर्वकाले एकस्मिन् उभयमपि न अस्ति' -सर्व काली एकाच वस्तूच्या ठिकाणी प्रीति आणि अप्रीति ही दोन्हीं कधीहि रहात नाहीत.- ' कदापि अप्रियोऽपि प्रियः प्रेयान् अपि अप्रियो वा स्यात् यतः (ततः ) सततमपि आत्माख्यवस्तु प्रय -कारण प्रसंगविशेषीं ज्याअर्थी आप्रिय वस्तुहि प्रिय होते व प्रिय पदार्थहि अप्रिय होतो, असे आहे, त्याअर्थी सतत प्रिय अशी आत्मा हीच एक वस्तु आहे. [ शरीरा- दिक अनात्म वस्तूच्या ठिकाणचे प्रेम, आत्म्याच्या प्रेमामुळेच कसे आहे, हे येथे स्पष्ट करून सांगतात-विषयांचा उपभोग घेत असतां ज्या भार्यादि विषयांपासून पुरुषाला जोपर्यंत सुख होत असते, तोपर्यंतच त्याचे त्या विषयांच्या ठिकाणी प्रेम असते. तसेच, त्याच भार्यादि विषयांपासून जसे जसे दुःख होऊ लागते तसे तसे ते अप्रिय होऊ लागतात. सारांश प्रियत्व व अप्रियत्व ही विषयाच्या ठिकाणी नियत कधीच नसतात. केव्हा केव्हां अप्रिय वस्तुहि काही कारणाने प्रिय होते आणि तसेच एखादे वेळी अत्यंत प्रिय असलेले भार्यादि विषयहि अप्रियाचरणादि आणि शरीरव्यथा इत्यादि निमित्तांनी कालपरत्वे अप्रिय होतात. पण आत्म्याची गोष्ट तशी नाही. याअर्थी सर्वदा तीच एक वस्तु खरी प्रिय होय. ह्या श्लोकांतील प्रतिपादनाला सान्वयार्थविवरण. १३. आधारभूत अशी बृहदारण्यकामध्ये 'न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रियाः.' इत्यादि श्रुति आहे. (बृह. भाष्यार्थ अ. २ पृ. १७५ पहा.) त्या श्रुतीवरील आचार्यकृत भाष्याचे तात्पर्य येथे दिले असतां श्लोकार्थ स्पष्ट होईल म्हणून ते येथे देतो-याज्ञवल्क्य मैत्रेयीला म्हणतात की, हे मैत्रेयि, पुत्रांची इच्छा पूर्ण होण्याकरितां पुरुषाला पुत्र प्रिय होत नसतात, तर आत्म्या-(स्वतः)-ची इच्छा पूर्ण होण्याकरितां ते प्रिय होतात. प्रथम स्वतःचा आत्मा प्रिय असतो म्हणून मग त्याच्याकरितां पुत्र हवेसे वाटतात. आपल्या पुत्राकरिता एक केळे घ्यावे, असे बाजारांत गेलेल्या पुरुषाला वाटते. ह्याठिकाणी पुत्राची प्रीति मुख्य आणि पुत्राकरितां फलादिकांच्या ठिकाणची प्रीति गौण असते. तसेच आत्म्याविषयींची प्रीति मुख्य आणि त्याच्याकरितां पुत्रादिकांची प्रीति गौण होय. सारांश आत्मप्रीतीच्या अगत्वाने बाकी सर्वाचे ठिकाणी प्रीति असते. त्या त्या पुत्र-वित्तादिकांविषयींच्या एषणा (इच्छा ) सोडणे अति कठिण आहे. ही आत्माख्य वस्तु खरोखरच पुत्राहून अति प्रिय आहे. कारण स्वभा. वतः जरी पुत्र प्रिय वाटत असला तरी आत्म्याशी त्याची तुलना करून पा- हिले असतां आत्माच अधिक प्रिय वाटतो. तसेच, वित्तादि सर्व विषयांहूनाहि आत्मा अधिक प्रिय आहे, ही गोष्ट केवळ शब्दसिद्ध आहे असे नव्हे, तर युक्तितःहि ती सिद्ध होते. हा आत्मा सर्वाच्याहि 'अतर' आहे व पुत्र-मित्रादि सर्व विषय 'बहिर्' आहेत. ही एक युक्ति व दुसरी युक्ति अशी की, आत्म्या- पेक्षा पुत्रवित्तादि अधिक प्रिय आहेत, असे म्हणणाऱ्या पुरुषाला असे विचारावे की, तुला अभिमत असलेले हे पुत्रवित्तादिक विषय जर अधिक प्रिय, तर त्याच्या उत्पत्ति, स्थिति व नाश या तीनहि कालांमध्ये त्यांच्या- पासून तुला शोक का होतो ? ज्यांच्यापासून दुःख होते ते प्रिय, असे म्हणणे कधी तरी शहाणपणाचे होईल का ? भगवतांनी गीतेमध्ये सांगितले आहे की, " ये हि संस्पर्शजा०....रमते बुधः " (गी. भा. पृ. ५२१.) अर्जुना, जे इंद्रिये व विषय यांच्या ससर्गाने होणारे भोग ते सर्वहि दुःखमूलकच आहेत. तसेच ते उत्पत्तिविनाशशील आहेत आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी सुज्ञ पुरुष कधीहि रममाण होत नाही. सारांश सर्वहि विषय दुःखाला कारण होणारे आहेत; म्हणून सर्वदा सर्वांत अधिक प्रिय असणाऱ्या आत्म्याविषयी आदरबुद्धि ठेवून पुत्रादि अनात्म्यांचा अनादर करावा. याप्रमाणे जो आत्म्याचीच उपासना करितो, त्याला विषय प्रिय वाटत नाहीत. ज्याप्रमाणे पुरुष घृताची रुचि समजेपर्यंत तैल भक्षण करीत असतो, त्याप्रमाणेच . १४ शतश्लोकी. आत्मानुभव येईपर्यंत हे पुत्रादि प्रिय वाटतात. भगवंतांनीहि "यं लब्ध्या चापरं लाभ मन्यते नाधिक तत "-ज्याची प्राप्ति झाली असतां अन्य कोणताहि लाभ त्याहून अधिक प्रिय वाटत नाही, असे म्हटले आहे. गी. भा. पृ. ५८०] १० श्रेयः प्रेयश्च लोके द्विविधमभिहितं काम्यमात्यन्तिकं च काम्यं दुःखैकबीजं क्षणलबविरसं तच्चिकीर्षन्ति मन्दाः । ब्रह्मैवात्यान्तकं यन्निरतिशयसुखस्यास्पदं संश्रयन्ते तत्त्वज्ञास्तच्च काठोपनिषदभिहितं षड्डिधायां च वल्ल्याम् १ अन्वयार्थ-लोके काम्य आत्यन्तिक च (इति) श्रेयः प्रेयश्च द्विविध अभिहित'-या जगामध्ये काम्य आणि आत्यतिक असे श्रेय व प्रेय दोन प्रकारचे सागितले आहे.-' यत् दुःखैकबीज क्षणलवविरस काग्य तत् मन्दाः चिकीर्षन्ति ' त्यांतील काम्य हे केवळ दु खालाच कारण होणारे असून त्याचे रमणीयत्व क्षणिक असते. पण मूढ पुरुष तेच सपादन करण्याची इच्छा करितात. 'ब्रह्मैव आत्यतिक-' ब्रह्म हेच आत्यतिक होय.-' यत् निरतिशयसुखस्यास्पद (यच्च ) तत्त्वज्ञाः सश्रयन्ते'-जे निरतिशय सुखाचे स्थान असून तत्त्वज्ञ पुरुष ज्याचा आश्रय करितात- तच्च काठोपनिषदभिहित (कुत्र इति चेत् ) षड्विधायां च वल्ल्याम्'-ते ब्रह्म कठोपनिषदामध्ये सागितले आहे. (कोठे म्हणाल तर) षड्विधवल्लीमध्ये सांगितले आहे. [ आत्मा सर्वात अधिक प्रिय आहे, ह्याविषयी काठोपनिषदाचेहि प्रमाण देतात. लोकांमध्ये प्रसिद्ध असलेले जे श्रेय म्हणजे पुण्यसाधन व प्रेय म्हणजे प्रीतिपात्र, ते काम्य आणि आत्यतिक, असे दोन प्रकारचे आहे. फलाच्या उद्देशाने जे कर्म करितात ते काम्य श्रेय होय आणि जे मोक्षसाधन ते आत्यंतिक श्रेय होय. त्याचप्रमाणे जायापुत्रादिक हे काम्य प्रेय व आत्मा (म्ह० हा शरीरोदियसमूह साक्षी) आत्यतिक प्रेय होय. यांपैकी काम्य श्रेय किंवा प्रेय केवळ दुःखालाच कारण होत असते. असे जर आहे तर लोकांची त्यात प्रवृत्ति कशी होते ? अशी शका कोणी घेतील म्हणून सांगतात ते काम्य भ्रमाने शुक्तिकेच्या ठिकाणी भासणाऱ्या रजताप्रमाणे अगदी थोडा वेळपर्यंतच मोठे रमणीय दिसत असते आणि म्हणून परिणा- माकडे लक्ष्य न देणारे मंद पुरुष त्याचा स्वीकार करितात. त्याचप्रमाणे आत्यं.
१५ सान्वयार्थविवरण. तिक श्रेय किंवा प्रेय में ब्रह्म ते निरतिशय सुखाचे स्थान आहे आणि तत्त्वज्ञ पुरुष त्याचाच अंगीकार करितात. हाच सिद्धान्त कठोपनिषदामध्यहि सांगि. तला आहे. कठशाखा मोठी असल्यामुळे सहा वल्लीनी युक्त असलेल्या कठो- पनिषदांत हे सागितले आहे, (काठकोपनिषद्भाभाष्यार्थ पृ. ३९ पहा.) असे आचार्य सांगतात. ११. आत्माम्भोधेस्तरङ्गोऽस्म्यहमिति गमने भावयन्नासनस्थः संवित्सूत्रानुविद्धो मणिरहमिति वा चेन्द्रियार्थप्रततिौ। हृष्टोऽस्म्यात्मावलोकादिति शयनविधौ मग्न आनन्दसिन्धा- वन्तनिष्ठो मुमुक्षुः स खलु तनुभृतां यो नयत्येवमायुः १२ अन्वयार्थ-'गमने अह आत्माम्भोधेः तरगः ( इति भावयन् )-गमन- प्रसगी 'मी आत्मसमुद्राचा एक तरग आहे' अशी भावना करणारा,-'आसनस्थ: सवित्सूत्रानुविद्धः मणिः अह अस्मि (इति भावयन् )'-आसनावर बसला असता 'ज्ञानरूप सूत्रामध्ये ओवलेला मी एक मणि आहे ' अशी भावना करणारा -'इद्रियार्थप्रतीतौ आत्मावलोकात् हृष्टोस्मि (इति भावयन् )'-विषयानुभव घेत असतां आत्मदर्शन झाल्याने मी अत्यंत आनदित झालो आहे, अशी भावना करणारा व '-शयनविधी आनन्दसिन्धौ मग्न. च ( इति भावयन् )- निद्रावस्थेमध्ये मी आनदसमुद्रामध्ये निमग्न झाली आहे, अशी भावना करणारा यः मुमुक्षुः एव आयु. नयति स खलु तनुभृता अन्तर्निष्ठः '-जो मुमुक्षु याप्रमाणे आपले आयुष्य घालवितो, तो खरोखर प्राण्यामध्ये अतर्निष्ठ होय. हे सर्वहि ब्रह्म आहे, अशा भावनेने सिद्ध झालेल्या अतर्निष्ठ पुरुषाचे स्वरूप बारा आणि तेरा अशा दोन श्लोकांमध्ये सांगितले आहे. प्रसंगविशेषीं इकडे तिकडे गमन करीत असतां ज्याप्रमाणे पाण्याची लाट बाह्याभ्यंतर जलमयच असून इकडे तिकडे फिरते, त्याप्रमाणे मी-जीवसुद्धा ह्या पारावारशून्य आत्मसमुद्रामध्ये बाह्याभ्यतर तन्मयच असल्यामुळे लाटेसारखा आहे, अशी भावना करीत गमन करितो." क्रीडनूर्मिरपामिव "-उदकाच्या लाटेप्रमाणे क्रीडा करणारा अशी श्रुतिहि आहे. त्याचप्रमाणे आसनावर खस्थ बसला असतां तो 'आत्मस्वरूपभूत-ज्ञानरूप सूत्रामध्ये ओंवलेला मी जीवरूपी (माळे. तील मण्याप्रमाणे) एक माण आहे, अशी भावना करीत असतो. “माय सर्व- मिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव"-सूत्रामध्ये जसे माळेचे मणि ओंवलेले असतात, शतश्लोकी. त्याप्रमाणे माझे ठिकाणी हे सर्व दृश्यजात ओवलेले आहे, असें भगवंतांचेंहि म्हणणे आहे. (सु.गी. पृ. १३९) ह्याप्रमाणे देह व्यापार करीत असताहि मुमुक्षु अंतर्निष्ठ कसा असतो हे दाखवून आतां त्याचा इंद्रियव्यापार चालला असताहि तो अंतर्निष्ठच असतो हे दाखवितात. ज्याअर्थी कोणताहि अनुभव आत्म्या- ज्या ज्ञानकलेवांचून येणे शक्यच नाही त्याअर्थी तो त्या त्या इंद्रियाच्या विष- याचा अनुभव घेत असतां ' मला ह्यावेळी आत्म्याचेच दर्शन झाल्यामुळे मी अत्यंत सतुष्ट झालो आहे ' अशी भावना करितो व निद्रावस्था संपल्यानंतर मी आनंदसमुद्रामध्ये एवढा वेळपर्यंत निमग्न होतो, अशी भावना करितो. सारांश ह्याप्रमाणे जो मुमुक्षु आपले आयुष्य घालवितो त्यालाच अंतर्निष्ठ असे म्हणतात. ह्या श्लोकांत स्थूल देहाच्या व्यवहाराने जाग्रदवस्था; विषयानुभ- वाने स्वप्न किवा सूक्ष्मावस्था आणि निद्रावस्येने कारणावस्था दाखवून ह्या तिन्ही अवस्थांमध्ये अतर्निष्ठ पुरुष आत्मानुसंधान कसे ठेवितो, हे सुचविले आहे.] १२. वैराजव्यष्टिरूपं जगदखिलमिदं नामरूपात्मकं स्याद् अन्तःस्थप्राणमुख्यात्प्रचलति च पुनर्वेत्ति सर्वान्पदार्थान् । नायं कर्ता न भोक्ता सवितृवदिति यो ज्ञानविज्ञानपूर्णः साक्षादित्त्थं विजानन् व्यवहरति परात्मानुसंधानपूर्वम् १३ अन्वयार्थ- इदं आखिलं नामरूपात्मक जगत् वैराजव्यष्टिरूपं स्यात् '- हे सर्वहि नामरूपात्मक जगत् विराट्स्वरूप परमात्म्याच्या व्यष्टिरूप आहे; पुनश्च अन्तःस्थप्राणमुख्यात् प्रचलति'-आणि सर्व जगद्यवहार त्यांतील चैतन्यामुळे होतो,-' (तथा तस्मादेव) सर्वान् पदार्थान् वेत्ति,-' त्या चैतन्या- मुळेच त्याला सर्व पदार्थाचे ज्ञान होते.-' सवितृवत् न अयं कर्ता न भोक्ता इति ज्ञानविज्ञानपूर्णः यः [ भवति ] '-तसेच सूर्याप्रमाणे हा कर्ता किंवा भोका नव्हे, अशा परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाने जो पूर्ण असतो-' स साक्षात् इत्थं विजानन् आत्मानुसंधानपूर्व व्यवहरति,'-तो साक्षात् असे जाणून आत्मानुसंधानपूर्वक सर्व व्यवहार करितो. [ज्याची अंत:करणवृत्ति आत्मरूप मालेली आहे तो पुरुष ज्यावेळी बाह्यदृष्टि होतो, म्हणजे प्रारब्धकर्मानुरूप व्यवहार करू लागतो, त्यावेळी हे सर्वहि नाम-रूपात्मक विचित्र जगत् स्थूल समष्टिरूप जो विराट् त्या परमात्म्याच्या व्यष्टिरूप आहे म्हणजे त्याची ही सान्साय विवरण. एक आकृति आहे, अशी भावना करून जगांतील कोणत्याहि प्राण्याची किंवा पदार्थाची निंदा अथवा मत्सर न करितां व्यवहार करितो; त्याचप्रमाणे विराडात्म्याच्या व्यष्टिरूप असलेले हे सर्वहि जगत् अंतःस्थ चिद्रूप मुख्य प्राणाच्या योगाने व्यापार करिते, तसेच त्या चैतन्यामुळेच सर्व पदार्थाना जाणते, असे जाणून त्या परमात्म्याचे ठिकाणी अनुसंधान ठेवून तो व्यवहार करितो. तसेच, हा आत्मा सूर्याप्रमाणे सर्वांना चेतना देणारा असला तरी कर्तृत्वाभिमानशून्य असल्यामुळे कर्ता नव्हे व सर्व पदार्थाचा अनुभव घेत असूनहि भोक्तृत्वाभिमानशून्य असल्यामुळे तो भोक्ताहि नव्हे, इत्यादि शास्त्रो. त्पन्न ज्ञानाने व साक्षात् अनुभवाने जो पुरुष पूर्ण झालेला असतो, तो हैं असेच आहे, असे निश्चयाने जाणून, सर्वदा आत्म्याकडेच अनुसंधान ठेवून व्यवहार करितो.] १३. नैवेद्यं ज्ञानगर्भ द्विविधमभिहितं तत्र वैराग्यमाद्यं प्रायो दुःखावलोकाद्भवति गृहसुहृत्पुत्रविप्रेषणादेः। अन्यज्ज्ञानोपदेशाद्यदुदितविषये वान्तवद्धेयता स्यात् प्रव्रज्याऽपि द्विधा स्यान्नियमितमनसां देहतो गेहतश्च ॥ १४ अन्वयार्थ- (वैराग्य ) नैवेद्य ज्ञानगर्भ ( च इति ) द्विविध अभिहितं'. वैराग्य नैवेद्य आणि ज्ञानगर्भ, असे दोन प्रकारचे सागितले आहे.-' तत्र आद्य वैराग्यं प्रायः गृहसुहृत्पुत्रवित्तैषणादे. दुःखावलोकात् भवति '-त्यापैकी पहिले जे नैवेद्यनांवाचे वैराग्य ते बहुतकरून गृह, सुहृत्, पुत्र, वित्त इत्यादिकांच्या इच्छेमुळे प्राप्त होणाऱ्या दुःखाचा अनुभव आला असतां होते.- अन्यत् ज्ञानोपदेशात् [ भवति ] '-दुसरे में ज्ञानगर्भनांवाचे वैराग्य ते ज्ञानोपदेशा- मुळे प्राप्त होते.-' यत् उदितविषये वान्तवत् हेयता स्यात् '-ज्यामुळे पुत्रा- दिक विषय प्राप्त झाले असतां ते वान्तीप्रमाणे त्याज्य होतात.-' [तथा] निय. मितमनसा प्रव्रज्या अपि देहतः गेहतः च इति द्विधा स्यात् '-तसेंच, आत्मसं- यमी लोकांचा देहापासून व गेहापासून असा संन्यास सुद्धा दोन प्रकारचा आहे. [ आचार्य या चवदाव्या श्लोकांत दोन प्रकारचे वैराग्य सांगतात- वैराग्य हा ज्ञानाचा उपाय आहे. तें वैराग्य दोन प्रकारचे सांगितले आहे. त्यांतील एकाला नर्वेध म्हणजे दुःखापासून उत्पन्न कालेले व दुसऱ्याला ज्ञान- गर्भ म्हणजे ज्ञानमाहात्म्याने प्राप्त झालेले असे म्हणतात. पहिलें जे.नर्वेयु, तें - १ १८ बहुतकरून गृह, सुहत् , पुत्रैषणा, वित्तेषणा इत्यादिकांपासून प्राप्त होणाऱ्या दुःखामुळे उत्पन्न होते. दुःख होऊ नये म्हणून विंचू, साप इत्यादिकांना जसा कोणी स्पर्श करीत नाहीत, त्याचप्रमाणे परिणामी ज्यांच्यापासून दुःख होते, अशा पुत्रवित्तादिकांचे ठिकाणी विचारवान् पुरुष आदर ठेवीत नाहीत आणि यदाकदाचित् त्यांचा त्यांविषयी प्रथम आदर असला, तरी मग ते तो मोठ्या प्रयत्नाने सोडितात. दुसरे में ज्ञानगर्भ वैराग्य, ते केवळ ज्ञानोपदेशाने उत्पन्न होते. प्रथमतः गृह, पुत्र इत्यादिक दुःखमय आहेत, असा अनुभव आल्याने वैराग्य होते, असे सांगून, आतां आत्म्याहून भिन्न असलेले सर्व अनात्म- जात दुःखरूप आहे, असा गुरूपदेश झाल्याने पूर्वोक्त विषय वान्तीप्रमाणे त्याज्य होतात, असे सुचविले आहे. ज्याप्रमाणे वान्ति झाली असतां पुनः तिचे भक्षण करावे, अशी इच्छा होत नाही, त्याप्रमाणेच विषय हे अत्यंत नीरस आहेत, असें ज्ञान झाले असतां विवेकी पुरुषाला पुनः ते ग्रहण कर- ण्याची इच्छा होत नाही. योगवासिष्ठामध्ये “ बुध्वाप्यत्यन्तवैरस्य यः पदार्थेषु दुर्मतिः । बध्नाति वासनां भूयो नरो नासौ स गर्दभः "-जो मूढ पुरुष हे सर्वहि सृष्ट पदार्थ अत्यंत नीरस आहेत, असे जाणूनहि पुनः त्याच्या ठिकाणी दृढ वासना ठेवितो तो मनुष्य नव्हे तर गर्दभ होय, असे सांगितले आहे. संन्यासहि दोन प्रकारचा आहे. एक स्त्री, पुत्र, वित्त इत्यादिकांचा त्याग करून शास्त्रोक्त रीतीनें गृहांतून निघून जाणे-संन्यास करणे व दुसरा देहविषयक अभिमानाचा संन्यास (सर्वथा त्याग) करणे. देहाभिमानशून्य होणे, हाच देहतः संन्यास होय. सारांश-शिखासूत्राचा त्याग करून, भगवी वस्त्रे धारण करून, सर्व लौकिक स्वत्वाचा त्याग करून, यतिधर्माने कोठे तरी रहाणे, या आश्रम संन्यासाला गृहतः संन्यास व गृहादिकांप्रमाणेच प्रत्यक्ष स्वशरीराच्या ठिकाणचाहि अभिमान सोडून विदेहावस्थेमध्ये रहाणे, याला देहतः संन्यास असे म्हणतात.] १४. यः कश्चित्सौख्यहेतोस्त्रिजगति यतते नैव दुःखस्य हेतो- देहेऽहंता तदुत्था स्वविषयममता चेति दुःखास्पदे द्वे । जानन्रोगाभिघाताधनुभवति यतोऽनित्यदेहात्मबुद्धि- भीर्यापुत्रार्थनाशे विपदमथ परामेति नारातिनाशे ॥१५ अन्वयार्थ-विजगति यःकश्चित् सौल्यहेतोः यतते नैव दुःखत्व हेतोः'- - साम्यवाद विवरण. या त्रैलोक्यामध्ये कोणीहि पुरुष सौख्याकरितां यत्न करीत असतो; दुःखा- करितां नव्हे. ' (एवं सति) देहे अहंता तदुत्था खविषयममता च इति द्वे दुश्खास्पदे, भवतः'-तरी देहाचे ठिकाणी असलेली अहता व तिच्यामुळे देहाच्या हितासाठी उत्पन्न होणारी विषयममता ही दोन दुःखस्थाने आहेत. -'यतः अनित्यदेहात्मबुद्धिः ( ततः एव ) जानन् ( अपि ) रोगाभिघातदि अनुभवति'- पण मनुष्य अनित्य देहाचे ठिकाणी आत्मबुद्धि ठेवीत असल्या- मुळे असें जाणत असूनहि सर्वदा रोगादिकांचे आघात-केश अनुभवितो; ' ( तथा ) भार्यापुत्रार्थनाशे अथ परां विपदं एति ' -भार्यापुत्रादि विषय नष्ट झाले असतांहि तो मोठ्या विपत्तीमध्ये पडतो. (परंतु )-'अरातिनाशे (विपदं ) न (एति)' -पण शत्रूचा नाश झाला असतां त्याला दुःख होत नाही. [ ह्या पंधराव्या श्लोकामध्ये विविध वैराग्यापैकी ज्ञानाला कारण होणाऱ्या वैराग्याचा उपदेशरूपाने निर्देश करितात या त्रिभुवनांत कोणीहि जरी झाला तरी तो खतःला सुख व्हावे, या हेतूनेच यत्न करीत असतो; दुःख व्हावे म्हणून कधीहि कोणी प्रयत्न करीत नाही. पण ह्याप्रमाणे सुखाक- रिताच प्रयत्न करीत असतांहि देहाच्या ठिकाणी असलेली अहंता आणि त्या देहाचे हित व्हावे म्हणून उत्पन्न झालेली विषयममता ही दोन दुःखोत्पत्तीची स्थाने आहेत आणि हे जाणत असूनहि अनित्य देह हाच मी असा निश्चय ठेवणाऱ्या प्राकृत पुरुषाला ज्वरादि रोगापासून असह्य पीडा सहन कराव्या लागतात. म्हणजे देहाचे ठिकाणी अहता ठेवल्यानेच केवळ त्याला हे दुःख अनुभवावे लागते. तसेच, भार्या-पुत्रादिविषयांच्या ठिकाणी ममता ठेविल्याने त्यांचा नाश झाला असतांहि या पुरुषाला अत्यन्त यातना सहन कराव्या लागतात. पण ज्याप्रमाणे शत्रूच्या ठिकाणीं ममता नसल्यामुळे त्याच्या नाशाने कोणीहि पुरुष दुःखी होत नाही, तसाच देह व तत्संबधी विषय यांच्या ठिकाणीं ममता न ठेवणारा पुरुष दुःखी होणार नाही. सारांश-ज्या ठिकाणी अहंता किवा ममता त्याठिकाणी दुःख, असे ह्यांचे साहचर्य धूर व अग्नि यांच्या साहचर्याप्रमाणे सिद्ध आहे. ] १५. तिष्ठन् गेहे गृहेशोऽप्यतिथिरिव निजं धाम गन्तुं चिकीर्ष- गेंहस्थं दुःखसौख्यं न भजति सहसा निर्ममत्वाभिमानः । आयात्रायास्यतीदं जलदपटलवद्यात यास्यत्यवश्यं देहाचं सर्वमेव प्रविदितविषयो यच तिष्ठत्ययला ॥१९ अन्वयार्थ-गुहेशः गेहे तिष्ठन् अपि निजं धाम गन्तुं चिकीर्ष: आतिषिः इव निर्ममत्वाभिमानः सन् गेहस्य दुःखसौख्यं सहसा न भजति'- गृहस्थ गृहांत रहात असूनहि खग्रामाला जाण्याची इच्छा करणाऱ्या एखाद्या अतिथी- प्रमाणे अहंता व ममता यांनी रहित असल्यामुळे गृहांतील सुखदुःखांनी कधीहि सुखी किंवा दुःखी होत नाही.-' इह देहाय सर्वे एव जलदपटलवत् अवश्यं आयात आयास्यति यच्च यात (तत्) यास्यति (इति) प्रविदितविषयः अयनः सन् तिष्ठति'-तर मेघपटलाप्रमाणे हे सर्वहि देहादि विषयजात, में अवश्य येणारे असेल तें येईल व जे जाणारे असेल तें जाईल; ह्याप्रमाणे यथार्थ- ज्ञानी होऊन काहीहि प्रयत्न न करतां घरीं रहातो. [आतां आचार्य संन्यास करून गृहत्याग करणे जरी अत्यंत अवश्य आहे तरी शरीरादिकांच्या पारतं. त्र्यामुळे संन्यास करावयास अशक्त असलेल्या विवेकी पुरुषाला गृहांत राहू- नहि मोक्षोपायाचे अनुष्ठान करितां येते, असे येथे सांगतात—ज्याप्र- माणे आपल्या स्वतःच्या गांवाला जाण्याची इच्छा करणारा अतिथि मार्गा- मध्ये काही काल विश्रांति घेण्याकरितां एखाद्या गृहामध्ये उतरला असता तेथील सुख-दुःखांनी सुखी किंवा दुःखी न होतां मी या ठिकाणाहून आज किवा उद्यां अवश्य जाणार आहे, असा निश्चय करून असतोत्याप्रमाणे एखादा गृहस्थ घरांत राहून सुद्धा सर्व विषयांविषयी अहंता व ममता सोड- ल्याने संसारविषयक कोणत्याहि सुख-दुःखांनी सुखी किंवा दुःखी होत नाही. तर मग विषयांची प्राप्ति झाली असता किंवा त्यांचा नाश झाला असता तो उदासीन कसा रहातो, हे पुढील श्लोकार्धात सांगितले आहे. ज्याप्रमाणे मेघ- समूह यदृच्छेने उत्पन्न होतो व लय पावतो, त्याप्रमाणे देहादि सर्वहि विषय- जात जें अवश्य येणारे असेल तें येईल व जाणारे असेल ते जाईल, असें जा- .णतो व अशा अन्वय-व्यतिरेकांनी ज्याला सर्व विषयांचे ज्ञान झाले आहे तो विद्वान् पुरुष, सुखप्राप्तीकरिता किवा दुःखपरिहाराकरितां कांहींच यत्न न करितां घरांत रहातो. सारांश स्वतःच्या देहाविषयी अभिमान व तत्प्रयुक्त ममता सोडून जरी एखादा विद्वान् पुरुष शरीरादिकांच्या अशक्ततेमुळे संन्यासाश्रमाचा आश्रय न कारितां घरांत राहिला तरी तो मोक्षमार्गापासून व्युत होता नाही. ] १३. शक्त्या निर्मोकतः स्वाहहिरहिरिव यः प्रव्रजन् स्वीयगेहा- छाया मार्गट्ठमोत्या प्रथिक इव मनाक् संभयहसंस्थाम् ।
सान्द अल्पात तरुभ्यः पतितफलमयं प्रार्थयेद्रेक्ष्यमन्न स्वात्मारामं प्रवेष्टुं स खलु सुखमयं प्रव्रजेदेहतोऽपि ॥१७ अन्वयार्थ-'अहिः स्वाद निर्मीकतः शक्त्या बहि: इच यः स्वीयगे. हात् प्रव्रजन् मार्गबुमोत्या छायां पथिकः इव मनाक् देहसंस्था संश्रयेत् '-ज्या- प्रमाणे सर्प मोठ्या शक्तीने आपल्या काते-( जीर्णत्वचे.) पासून बाहेर नि- घतो, त्याप्रमाणे पुरुषाने स्वतःच्या घरांतून मोठ्या प्रयत्नाने बाहेर पडून, ज्याप्रमाणे मार्गस्थ मार्गातील वृक्षाच्या छायेचा थोडा वेळ आश्रय कारतो, त्याप्रमाणे काही काळ देहाचा आश्रय करावा.-'क्षुत्पर्याप्तं तरुभ्यः पतित- फलं अयं भैक्ष्यं अन्नं प्रार्थयेत्'-केवळ क्षुधा शांत होण्यापुरत्या, वृक्षावरून पड. लेली फळे ( हेच उत्तम भिक्षान्न ) ह्याच भैक्ष्य अन्नाची त्याने इच्छा करावी. - सुखमयं स्वात्मारामं प्रवेष्टुं सः खलु देहतः अपि प्रव्रजेत् '-( आणि शेवटी) अत्यंत आनंदमय असा जो स्वतःचा आत्मा त्यामध्ये प्रवेश कर- ण्याकरिता देहापासूनहि निधून जावें. ( देहाभिमान सोडावा.) [ आतां पूर्वी निर्दिष्ट केलेल्या दोन प्रकारच्या सन्यासाचा अनुवाद करितात--- सर्प जसा आपली कात टाकतांना मोठ्या सामर्थ्याने आपल्या जीर्णत्वचें. तून बाहेर निघतो, त्याप्रमाणेच जो पुरुष पुत्र, कलत्र इत्यादिकांचे ठि- काणी अनादिकालापासून प्रेम जडल्याने त्यांचा त्याग करणे जरी अत्यंत दुर्घट माहे, तरी मोठ्या धैर्याने त्यांचा व स्वगृहाचा त्याग करून संन्यास करितो आणि ज्याप्रमाणे मार्गस्थ पुरुष मला अद्यापि पुढे जावयाचे आहे, असा विचार करून विश्रांतीकरितां क्षणभर त्या मार्गातील वृक्षछायेचा आश्रय करितो, त्याप्रमाणे परमपुरुषार्थरूपी पुढील गांवाकडे मला जाणे आहे, इकडे लक्ष्य ठेवून त्याच्या उपायांचे अनुष्ठान करण्याकरितां थोडा वेळ म्हणजे प्रारब्ध कर्माचा क्षय होईपर्यंत तो या शरीराचा आश्रय करितो; तसेंच परम पुरुषा- यांच्या उपायाचे अव्याहत अनुष्ठान व्हावे, म्हणून शरीररक्षण अत्यंत आव- श्यक असल्यामुळे क्षुधाशांति होईल इतक्याच, वृक्षावरून पडलेल्या फल- रूपी मिक्षान्नाची अपेक्षा करितो, म्हणजे फलसंग्रहाची इच्छा न ठेविता पायाच्या योगाने जी फळे वृक्षावरुन भूमीवर पडलेली असतील त्यांच्याच योगानें क्षुधाशांति करून घेतो व स्वतः आपल्या हाताने जो फलच्छेद करत नाही त्याने आनंदमय अशा आपल्या स्वतःच्या आत्मारामामध्ये प्रवेश करण्याकरिता म्हणजे स्वस्वरूपाला मिळण्याकरितां गृहाप्रमाणे देहाला सोडूमः , निघून जावे. देहाच्या ठिकाणचा अभिमान सर्वथैव सोडणे, हाच देहसंन्यास होय.] १७. कामो बुद्धावुदेति प्रथममिह मनस्युदिशत्यर्थजातं तगृहातीन्द्रियास्यैस्तदनधिगमतः क्रोध आविर्भवेच्च । प्राप्तावर्थस्य संरक्षणमतिरुदितो लोभ एतत्त्रयं स्यात् सर्वेषां पातहेतुस्तदिह मतिमता त्याज्यमध्यात्मयोगात् ॥ अन्वयार्थ-' इह प्रथमं बुद्धौ कामः उदेति'-या व्यवहारामध्ये प्रथ. मतः बुद्धीत कामना उत्पन्न होते.-'मनसि अर्थजातं उदिशति' नतर विषयां- विषयी मनामध्ये पुरुष कल्पना करितो-' तत् इन्द्रियास्यैः गृह्णाति'-ते सर्वहि विषय इंद्रियद्वारा अनुभवितो.-' च तदनधिगमतः क्रोधः आविर्भवेत् '-पण त्यांची प्राप्ति न झाल्याने क्रोध उत्पन्न होतो.-' च अर्थस्य प्राप्तौ या संरक्ष- णमतिः स एव लोभः उदितः '-विषयांची प्राप्ति झाली असता त्यांच्या संर- क्षणाविषयींची जी बुद्धि तोच लोभ उत्पन्न झाला ( आहे असे समजावे. सारांश )-' एतत् त्रय सर्वेषां पातहेतु' ( स्यात् )' हे तिन्ही दोष सर्वाच्या अधःपाताला कारण होतात.-' तत् इह मतिमता अध्यात्मयोगात् त्याज्यं '- म्हणून बुद्धिमान् पुरुषाने आत्म्याकडे लक्ष्य ठेवून त्यांचा त्याग करावा. [आचार्य आता ह्या अठराव्या श्लोकांत काम, क्रोध आणि लोभ हे तीन दोष सर्व प्राण्यांना पतित करण्यास कारण होतात, असे सांगतात-प्रथमतः बुद्धीमध्ये विषयाभिलाष उत्पन्न होतो. त्यामुळे मनामध्ये रूप-रसादि विषयांचे चिंतन होते. तदनतर प्राणी आपल्याला अमुक विषयाची प्राप्ति व्हावी, असा विषया- विषयी संकल्प करितो. नतर तो चक्षुरादि इद्रियांच्या द्वारा त्या त्या विषयांचे ग्रहण करण्याचा प्रयत्न करितो. ह्याप्रमाणे प्रयत्न करूनहि मध्ये अनेक विनं आल्यामुळे विषयांची प्राप्ति न झाल्यास बुद्धीमध्ये क्रोधाचा प्रादुर्भाव होतो. भगवतांचेहि " कामाकोधोऽभिजायते" (सु. गीता पृ. ४७) असे वाक्य आहे. दैववशात् विषयांची प्राप्ति झाली असता हा माझा विषय आहे; याचा माझा कधीहि वियोग होऊ नये, अशी किवा त्याच्या रक्षणाविषयींची जी बुद्धि. तिलाच लोभ म्हणतात. ह्याप्रमाणे काम, क्रोध व लोभ हे तीन दोष सर्वहि प्राण्यांना अधोगतीला नेण्याला व दुःखरूप संसार देण्याला कारण होतात, - सान्बयाई.विवरण. , म्हणून बुद्धिमान् पुरुषाने बुद्धीच्याहि पलीकडे असलेल्या आत्म्याकडे अनु- संधान ठेवून म्हणजे मनाचा सर्वहि ओघ निरंतर आत्मचिंतनाकडे लावून या दोषांचा त्याग करावा. 'काम, क्रोध व लोभ हे त्रिविध नरकद्वार आहे ' असें गीतेंतहि म्हटले आहे. गी. भा. पृ. १०७५ ] १८. दानं ब्रह्मार्पणं यत्कियत इह नृभिः स्यात्क्षमाऽक्रोधसंज्ञा श्रद्धास्तिक्यं च सत्यं सदिति परमतः सेतुसंज्ञं चतुष्कम् । तत्स्याङ्कन्धाय जन्तोरित चतुर इमान् दानपूर्वैश्तुर्भि- स्तीत्वा श्रेयोऽमृतं च श्रयत इह नरः स्वर्गतिं ज्योतिराप्तिम् ॥१९ अन्वयार्थ—' इह नृभिः यत् ब्रह्मार्पणं क्रियते तत् दानं '- या मृत्यु- लोकांत मनुष्ये जे ब्रह्मार्पण करितात त्याला दान,-'या अक्रोधसंज्ञा सा क्षमा -ज्याला अक्रोध ही संज्ञा आहे तिला क्षमा,-' यत् आस्तिक्यं सा श्रद्धा आस्तिक्य म्हणजे विश्वास हीच श्रद्धा,-' यत् सत् तत् सत्यं इति प्रोक्त'- त्याचप्रमाणे सतसज्ञक जे ब्रह्म त्याला सत्य, असे म्हणतात. (हीं चार मुक्तीची साधने आहेत.)-' अतःपर चतुष्कं सेतुसझं ( भवति),' ह्यांच्या- हुन विरुद्ध असलेली जी अदानादिक चार त्यांना सेतु अशी सज्ञा आहे. -'तत् जन्तोः बन्धाय स्यात्'-ती सर्व प्राण्यांना बध उत्पन्न करितात.- (इति हेतोः ) इमान् चतुरः दानपूर्वैः चतुर्भिः तीव इह नरः श्रेयः अमृत स्वर्गति ज्योतिराप्तिं च श्रयते'- यास्तव या चार सेतूंचे दानादि चार साधनांनी उल्लं- धन करून पुरुष, मोक्ष, देवत्व (ऊर्ध्वगति) व सूर्य-चंद्रादि ज्योतींची प्राप्ति करून घेतो. [ह्याप्रमाणे काम-क्रोधादि दैत्यांचा नाश करून देवत्वप्राप्ति करून घ्यावी. ह्याविषयी सामवेदांतील कल्माषसामाचा अनुवाद करून आचार्य म्हणतात-पुरुष ह्या व्यवहारामध्ये ईश्वराला उद्देशून जो द्रव्याचा व्यय करितात, त्याला दान अशी संज्ञा आहे. तसेंच, दुसऱ्या प्राण्यांनी आपणाला कितीहि त्रास दिला तरी त्यांच्यावर न रागावणे याला क्षमा असे म्हणतात. तसेच, श्रुति, स्मृति आणि आचार्य यांनी सांगितलेल्या अनुष्ठानाचे फल अवश्य मिळेल, असा विश्वास ठेवणे, याला श्रद्धा असे म्हणतात आणि सत्- संज्ञक ब्रह्माला सत्य असें नांव आहे. ही चार मुक्तीची साधने आहेत. ह्यांच्या विरुद्ध असलेल्या अदान, क्रोध, अश्रद्धा आणि असत्य ह्या चतुष्टयाला सेतु बसें नाव आहे. हे सेतुचतुष्टय प्रत्येक प्राण्याला बंध उत्पन्न करिते. ह्या कारणास्तव হয়, ह्या चार अदामादिक सेतूंचे दानादिक चार मोक्षसाधनांनी उल्लंघन के«न पुरु- पार्थप्राप्तीची इच्छा करणारा पुरुष मोक्ष, स्वर्गलोक, देवत्व (ऊर्ध्वगति) आणि चंद्र-सूर्यादिक ज्योति यांची प्राप्ति करून घेतो. परमपूज्य श्रीमच्छंकराचार्यांनी हा ३ उ सेतूस्तर दुस्तरा३न् दानेनादानं हा ३ उ" इत्यादि सामवेदोक्त श्रुतीला अनुलक्षून हा श्लोक लिहिला आहे. त्या श्रुतीचे सर्वहि तात्पर्य या श्लोकांत आले असल्यामुळे ती श्रुति व भाष्य याचे तात्पर्य विस्तारभयास्तव पुनः दिले नाही. ज्याप्रमाणे सेतु पाण्याच्या प्रवाहाला प्रतिबंध करितो, त्या- प्रमाणे हे अदानादिक चार सेतु, अखडैकरस ब्रह्मज्ञानाला प्रतिबंध करितात. यास्तव या दुस्तर सेतूंचे मोठया धैर्याने उल्लघन करून पुरुषार्थप्राप्ति करून ध्यावी. भगवताच्या " यत्करोषि यदनासि०" (सु. गी. पृ. १७७ ) म्हणजे जे करतोस, जे खातोस किंवा जेवढी म्हणून क्रिया करितोस तेवढी सर्वहि मला अर्पण कर. इत्यादि वचनाप्रमाणे प्रत्येक पुरुषाने वर्तन केले असता अदानादिक सेतूंचे सहजच उल्लंघन होईल.] १९. अन्नं देवातिथिभ्योऽर्पितममृतमिदं चान्यथा मोघमन्नं यश्चात्मार्थ विधत्ते तदिह निगदितं मृत्युरूपं हि तस्य । लोकेऽसौ केवलाघो भवति तनुभृतां केवलादी च यः स्यात् त्यक्त्वा प्राणाग्निहोत्रं विधिवदनुदिनं योऽश्नुते सोऽपि मर्त्यः॥ अन्वयार्थः-'देवातिथिभ्यः अर्पित इदं अन्नं अमृत ( भवति ) च अ. न्यथा मोघ अन्नं ( भवति )'-देव किवा अतिथि यांना अर्पण केलेले अन्न अमृत होते आणि तद्विपरीत अन्न व्यर्थ होतें-- यश्च आत्मार्थ विधत्ते तत् हि तस्य मृत्युरूप निगदित'- जो केवळ आपल्या स्वतःकरितां अन्न तयार करितो, अन्न त्याच्या मृत्यूसारखे सांगितले आहे.-' लोके य केवलादी स्यात् असो तनुभृतां केवलाघः ( भवति )- जो पुरुष ह्या जगामध्ये केवळ स्वतःचे उदर भरणारा असतो त्याला सर्व प्राण्यांमध्ये मूर्तिमंत पापाचा पुतळा असे म्हण. तात.-'च विधिवत् प्राणाग्निहोत्रं त्यक्त्वा अनुदिन यः अश्नुते सः अपि मर्त्यः'- तसेच शास्त्रोक्त प्राणाग्निहोत्रादि कमै न करिता जो प्रतिदिवशी भोजन करितो तोहि मरणाराच असतो. [गृहस्थाश्रमाला अवश्य असलेले पंचमहायज्ञ न करितां " ये पचंत्यात्मकारणात् " (सु. गी. पृ. ५८ ) या भगवद्वचनाप्रमाणे जे स्वतःकरितां अन्न शिजवितात ते पापपुरुष होत, असे येथे सांगितले आहे. ते सान्वयार्थविवरण. वैश्वेदेवादिक कम करून, अतिथिपूजन करून, देवांना व प्राप्त झालेल्या अति- थींना अन्नसमर्पणानें तृप्त करून नतर अवशिष्ट राहिलेले अमृतसंज्ञक अन्न प्रत्येक गृहस्थाने मक्षण करावे, अशी शास्त्रमर्यादा आहे. पण असें न करितां "देवान् भावयतानेन.” (सु. गी. पृ. ५८)-देवांपासून प्राप्त झालेल्या पदार्थानी देवांची वृद्धि करा इत्यादि भगवद्वचनाप्रमाणे देवतासंतर्पण न करितां देव व आतिथि यांना फसवून ठेविलेले जे अन्न ने निष्फळ होय. शिवाय पुरुष केवल आपलाच पिंड पुष्ट करण्याकरिता जे अन्न शिजवितो, ते अन्न तर त्याच्या मृत्यूसारखेच आहे. कारण त्या अन्नाचा दुसऱ्या कोणासहि उप- योग न झाल्यामुळे परिणामी ते अन्न विषासारखे होत असते. जो पुरुष स्वतः एकटाच अन्नभक्षण करितो, त्याला केवल पापराशि असे म्हणतात. तसेच जो पुरुष शास्त्रोक्त पंचमहायज्ञ, अग्निहोत्र इत्यादि नित्यकर्म न करितां प्रति- दिनी भोजन करितो तोहि एक दिवस मरणाराच असतो. भगवतांनीहि " अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति" (सु. गी. पृ. ६०)-तो इंद्रियतर्पक पापी पुरुष ह्या जगांत व्यर्थ जिवंत रहातो, असे म्हटले आहे. या श्लोकांत आचार्यानी “ मर्त्य " हा शब्द सहेतुक योजिला आहे. कारण अग्निहोत्रादिक कम ह्या देहाचा त्याग केल्यानंतर उत्तमलोकप्राप्ति करून देत असतात. पण त्याकरिता दुसऱ्या कोणाला अन्न न देतां स्वतःचेच उदर जो भरतो तोहि शेवटीं मरतोच. त्यामुळे शास्त्रविहित अन्नदान न करितां स्वदेह पुष्ट केल्याने तो अजरामर होतो, असे मुळीच नाही. ] २०. लोके भोजः स एवार्पयति गृहगतायार्थिनेऽन्नं कृशाय यस्तस्मै पूर्णमन्नं भवति मखविधौ जायतेऽजातशत्रुः । संख्ये नाऽन्नार्थिने योऽर्पयति न स सखा सेवमानाय नित्यं संसक्तायान्नमस्माहिमुख इव परावृत्तिमिच्छेत्कदर्यात्॥ अन्वयार्थ- यः कृशाय गृहगताय अर्थिने अन्न अर्पयति सः लोके भोजः एव'-जो पुरुष कृश होऊन अन्नाकरितां आपल्या घरी आलेल्या याचकाला अन्न देतो तो भोज (होय)-'तस्मै मखविधौ पूर्ण अन्न भवति अजातशत्रु: (च) जायते'-त्याला यज्ञामध्ये अन्नाची कधी उणीव पडत नाही व तो अजातशत्रु होतो. (म्हणजे त्याला कोणी शत्रुहि उत्पन्न होत नाही.)-'नित्यं संसक्ताय सेवमानाय अन्नार्थिने सख्ये यः अन्नं न अर्पयति सः न सखा'- . २६ शवलोकी. तसेंच जो सर्वदा आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या, सेवा करणाऱ्या, अन्नाची याचना करणाऱ्या मित्राला अन्न देत नाही तो त्याचा सखा नव्हे.-'अस्मात् कदर्यात् विमुखः इव परावृत्ति इच्छेत् '-अशा कृपणापासूनच याचक विमुख झाल्याप्रमाणे दुसऱ्या दात्याकडे जाण्याची इच्छा करतो. [आपल्याकडे कोणीहि याचक आला असता त्याची इच्छा पूर्ण करणारा भोज होय, असे स इद्भोजो यो गृहवे ददात्यन्नम्" इत्यादि श्रुतीच्या आधाराने सांगतात. दारिद्याने अत्यत कृश होऊन याचना करण्याकरिता आपल्या घरी आलेल्या पुरुषाला जो शरीरस्वास्थ्याकरितां अत्यंत अवश्य असलेले अन्न देतो, तो ह्या जगामध्ये खरा भोज ( अन्नदाता) होय. त्याला यज्ञादिक कृत्यामध्ये कधीहि अन्नाची तूट पडत नाही. वस्तुत यज्ञादिक कृत्यामध्ये अन्नाचा पुरवठा होणे अत्यंत अशक्य असते. कारण त्यावेळी कितीहि जरी याचक आले तरी कोणालाहि विमुख होऊ न देतां यजमानाने मिष्टान्नसतर्पणाने त्यांना तृप्त करावे, असें विधान आहे. पण अशा प्रसगीहि दात्या पुरुषाला अन्नाची उणीव पडत नाही. तसेच हा दाता सर्वहि प्राण्याना यथेच्छ अन्नदान करून त्याच्या ठिकाणच्या देवताना तृप्त करीत असल्यामुळे त्याला कधीच कोणी शत्रु उत्पन्न होत नाही. ह्या व्यवहारात सुद्धा जो कधी कोणाचा द्वेष किवा हेवा करीत नाहीं त्याला पुष्कळ मित्र असतात, असा अनुभव आहे. आता याच्या उलट प्रकार कसा होतो, ते दाखवितात. जो पुरुष अन्नाची इच्छा करून सतत सेवा करण्याकरिता आपला आश्रय करून राहिलेल्या आपल्या मित्राला अन्न देत नाहीं तो जगांत कोणाचाहि मित्र होत नाही. तर तो पिशुन होतो. सारांश-आपली सेवा करून केवळ आपल्यावरच अवलंबून राहिलेल्या दरिद्री मनुष्याला जो अन्न देत नाही, तो इतरांना काय देणार ? या श्लोकामध्ये अर्थी पुरुषाला उद्देशून 'सख्ये ' असे पद घातले आहे. त्याचा हेतु असा की अर्थी पुरुष दात्याला स्वर्ग देत असतो (म्हणजे उत्तम पद प्राप्त करून देतो) म्हणून तो मित्र होय. पण ह्या कृपण पुरुषापासून इच्छा पूर्ण न झाल्या मुळे याचक विमुख होऊन आपले दुष्कृत्य त्याला देऊन व त्याचे सुकृत घेऊन दुसऱ्या दात्याकडे याचनेस्तव जातो. “ अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते। स तस्मै दुष्कृतं दत्वा पुण्यमादाय गच्छति" असे स्मृतिवचनहि आहे. ] २१. स्वाज्ञानज्ञानहेतू जगदुदय-लयौ सर्वसाधारणौ स्तो जीवेष्वास्वर्णगर्भ श्रुतय इति जगुहूयते स्वप्रबोधे ।
सान्वया पिवरण. विश्वं ब्रह्मण्यबोधे जगति पुनरिदं हूयते ब्रह्म तह- च्छुक्तौ रौप्यं च रौप्येऽधिकरणमथवा इयतेऽन्योन्यमोहात् ॥ अन्वयार्थ-'आस्वर्णगर्भ जीवेषु स्वाज्ञानज्ञानहेतू जगदुदय-लयो सर्व- साधारणौ स्तः इति श्रुतयः जगुः'-हिरण्यगर्भापर्यंत सर्वहि जीवाचे ठिकाणी, आत्म्याचे अज्ञान व ज्ञान यांच्या योगाने होणारे जगाचे उदय आणि प्रलय सर्वसाधारण आहेत, असे श्रुति प्रतिपादन करितात.-'यद्वत् च शुक्तौ रौप्यं अथवा रौप्ये अधिकरणं अन्योन्यमोहात् दूयते तद्वत् स्वप्रबोधे विश्व ब्रह्मणि हूयते'-ज्याप्रमाणे एकमेकांविषयी मोह पडल्याने शुक्तीच्या ठिकाणी रौप्य अथवा रौप्याच्या ठिकाणी अधिकरणभूत शुक्ति यांचा उदय होतो, त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले असता विश्व ब्रह्माचे ठिकाणी लीन होते-'अबोधे पुनः इदं ब्रह्म जगति हूयते'–पण स्वतःचे ज्ञान जेव्हां नसते त्यावेळी हे ब्रह्म जगामध्ये लोपून जाते. [जगाची व्यक्तावस्था व अव्यक्तावस्था म्हणजेच उत्पत्ति व प्रलय आहेत व ते आत्म्याचे अज्ञान व ज्ञान यांच्या द्वारा होत असतात. असे या श्लोकात आचार्यानी व्यक्त केले आहे. आब्रह्मस्तवपर्यत सर्वहि जीवांना आत्म्याचे ज्ञान व आत्म्याचे अज्ञान ह्या दोन कारणांनी अवश्य होणारे जगाचे उदय व अस्त सर्वसाधारण आहेत, असे श्रुति प्रतिपादन करितात, आत्मज्ञानाच्या योगाने जगाचा लय व आत्म्याच्या अज्ञानाने त्याचा उदय होत असतो. हिरण्यगर्भ सुद्धा स्वतःचे स्वरूप विसरून जाऊन 'मी ईश्वर आहे; मी ह्या अखिल सृष्टीचा नियता आहे ' असा अभिमान धरितो व त्यावेळी तो हे सर्व जगत् उत्पन्न झाले आहे, असे पहातो. तसेच ज्यावेळी 'मी नित्यशुद्ध- बुद्ध-मुक्त-स्वभाव ब्रह्म आहे' अशा ज्ञानाने स्वतःच्या स्वरूपामध्ये तो लीन होतो त्यावेळी ह्या सर्व विश्वाच्या आभासाचाहि लय होतो. म्हणजे ज्या वेळी जीव बहिर्दृष्टि होतो त्यावेळी त्याला जगाचा अनुभव येत असल्यामुळे त्याचा उदय होतो व ज्यावेळी जीव अतर्दृष्टि होतो त्यावेळी त्याला जगाचा अनुभव येत नसल्यामुळे त्याचा लय होतो, असे म्हणतात. असे हे जगाचे उदय व प्रलय सर्व जीवांचे ठिकाणी समानच आहेत. ज्याप्रमाणे शिपी व रुपे ह्यांपैकी एकाचेहि यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे शिपीच्या ठिकाणी रुप्याचा भास होतो, व त्यावेळी रुप्यामध्ये शिंपीचा लय होतो; पण भ्रमनिवृत्ति झाली असता भ्रमाला कारण होणाऱ्या शिंपीचे ज्ञान झाल्याने पूर्वी भासलेल्या रुप्याचा त्या शिंपीत लय होतो. म्हणजे शुक्तीच्या अज्ञानाने रजताचा उदय व तिच्याच .
. ज्ञानाने रजताचा नाश होतो त्याचप्रमाणे आत्म्याचे ज्ञान झाले असता ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाचा लय होतो व आत्म्याच्या विस्मृतीने तेच अधिष्ठान- भूत ब्रह्म जगामध्ये लोपून जाते. ] २२. तुच्छत्वान्नासदासीद्गगनकुसुमवद्धेदक नो सदासीत् कित्वाभ्यामन्यदाव्यिवहतिगतिसन्नास लोकस्तदानीम् । कित्वांगेव शुक्तौ रजतवदपरो नो बिराड् व्योमपूर्वः शर्मण्यात्मन्यथैतत्कुहकसलिलवकि भवेदावरीवः ॥२३ अन्वयार्थ- गगनकुसुमवत् तुच्छत्वात् असत् न आसीत्'-(सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ) आकाशांतील पुष्पाप्रमाणे तुच्छ असणारे असत् नव्हते- 'भेदकं (च) सत् नो आसीत् । किंतु आभ्यां अन्यत् आसीत् '-व भेद करणारे सहि नव्हते. पण ह्या दोघांहूनहि अन्य असे होते- तदानीं लोकः व्यवहृति- मतिसन् न आस'-व्यावहारिक सत् सुद्धा त्या काळी नव्हते.-'अपरः व्यो. मपूर्वः विराट् नो-' आकाश व त्याचे कार्य विराट् , ह्यांतीलहि कांही नव्हते. 'किंतु शुक्त, रजतवत् अर्वाक् एवं'-परंतु शिपीच्या निमित्ताने तिच्या ठिकाणी जसे रुपे भासावे, तसे ( सृष्टीनंतरच हे सर्व भासत आहे ) '-अथ शर्मणि आत्मनि कुहकसलिलवत् आवरीवः भवेत् कि [नेत्यर्थः ] '-पण शुद्ध ब्रह्माला मृगजलासारखे हे जगत् झांकील काय ! (कधीही नाही.) [ह्या नोम-रूपात्मक व प्रत्यक्ष दिसणाऱ्या जगाचे उपादान कारण काय असावें ? असा विचार करूं लागले असतां शुद्ध व निष्क्रिय ब्रह्म कधीहि जगाचे कारण होणार नाही; असे वाटते. बरें ब्रह्माहून अन्य असे काही जगाचे कारण असावे, अशी कल्पना केल्यास ते सत् (भूत, भविष्य, वर्तमान काली रहा. णारे ) की असत् (कांहीं काल भासणारे ) आहे, अशी शंका येते. यास्तव त्याचा निर्णय या श्लोकांत केला आहे. ज्या द्रव्याचे कार्य झालेले असते, ते द्रव्य त्या कार्याचे उपादान कारण होय. मातीचा घट, माती ह्या द्रव्याने बनविलेला असतो; म्हणून ती घटाचे उपादान कारण आहे. तसेंच ह्या जगाचे उपादान कारण काय असावें ! आकाशाच्या पुष्पाप्रमाणे किंवा मनु- ध्याच्या शिंगाप्रमाणे कधीहि नसणारे असत् (म्हणजे शून्य) या सद्रूपाने भासणाऱ्या जगाचे कारण होऊ शकणार नाही. बरें सत् असें कांही जगाचे कारण म्हणावे तर सद्रूप असा एक नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव परमात्माच आहे, सान्ववासिबलश. २९ अन्य काहीहि सत् नाही, असा श्रुतिसिद्धान्त आहे व जगाचे कारणहि सतू आहे, असे मानल्यास ते सत् ब्रह्मस्वरूपामध्ये भेद पाडील म्हणजे श्रुतिविरुद्ध शुद्ध ब्रह्माहून पृथक् असे एक निराळेच जगाचे कारण 'सत्' आहे, असे होऊं लागेल. पण ते इष्ट नाही. म्हणून ब्रह्मस्वरूपांत भेद पाडणारे सहि जगाचे कारण नव्हे. तर सत् व असत् ह्याहून विलक्षण असे जगाचे कारण आहे. कार्याच्या पूर्वी कारण असते; हे सुचविण्याकरितां लोकामध्ये 'आसीत्' इत्यादि भूतकालिक क्रियापदे योजून जगाचे पूर्वरूप (कारण) सदसत्पेक्षा विलक्षण होते, असे प्रतिपादन केले आहे. पारमार्थिक सत् जरी पूर्वी नसलें तरी व्यावहारिक सत् तरी तेव्हां असेल, असे कोणी म्हणतील; म्हणून व्यावहारिक सहि जगाच्या उत्पत्तीपूर्वी नव्हते, म्हणजे त्याकाली ( सृष्टीच्या पूर्वी) व्यवहार नव्हता. तो ह्या स्थित्यवस्थेमध्येच आहे, असे आचार्य 'व्यव- हृतिगति०-' इत्यादि पदानी सागतात. आता यावर जरी कदाचित् साकार असे त्यावेळी काही नव्हते तरी निराकार आकाश व आकाशादिभूतांपासून होणारा विराट् तरी असेल, अशी तार्किक शका घेतील, म्हणून आकाश विराट इत्यादि काही नव्हते, असे अनेक श्रुतीना अनुसरून आचार्यानी येथे सांगून ठेविले आहे. पुनः यावर-पूर्वी नसून हे जगत् मध्ये कां उत्पन्न झालेले असेना पण ते शुद्ध ब्रह्माहून पृथक् असल्यामुळे त्या ब्रह्माला आच्छादित तरी करील म्ह० त्याचे ज्ञान होऊ देणार नाही, असे कोणी म्हणेल म्हणून, चवथ्या चरणांत त्याचाहि निषेध केला आहे. ज्याप्रमाणे माळ जमिनीवर भ्रमाने जलाचा भास होतो, पण तो भ्रम नष्ट झाल्यावर त्या भूमीला ते भासणारे जल आच्छादित करीत नाही, त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्मालाहि हे मायेने काही काल भास- णारे जगत् आवृत करू शकत नाही. ] २३. बन्धो जन्मात्ययात्मा यदि न पुनरभूत्तर्हि मोक्षोऽपि नासी- घद्रात्रिर्दिनं वा न भवति तरणौ किंतु दृग्दोष एषः । अप्राणं शुद्धमेकं समभवदथ तन्मायया कर्तृसंज्ञं तस्मादन्यच्च नासीत्परिवृतमजया जीवभूतं तदेव ॥२४ अन्वयार्थ-'यद्वत् रात्रिः दिनं वा तरणौ न भवति किंतु एषः दृग्दोषः', ज्याप्रमाणे रात्र किंवा दिवस सूर्याच्या स्वरूपात होत नसून तो केवळ दृष्टीचा दोष आहे;- तद्वत् जन्मास्ययात्मा बन्धः यदि न अभूत् तर्हि मोक्षः अपि शतकोकी. पुनः न आसीत्-त्याचप्रमाणे जन्म-मरणरूप बंध जर नसला तर पुनः मोक्षहि नाही.-'अप्राणं शुद्धं एकं समभवत् '-सृष्टीपूर्वी प्राणरहित, शुद्ध व एक असें तत्त्व होतें.-' अथ मायया तत् कर्तृसंज्ञं '-पुढे मायेने तेंच कर्ता झालें -च तस्मात् अन्यत् न आसीत्-' व त्याहून अन्य असे दुसरे काही नव्हते. '-तत् • एव अजया परिवृतं जीवभूतं ( अभूत् )'-तेच कर्तृसंज्ञक तत्त्व मायेनें वेष्टित झाल्याने जीव झाले. खरोखर पाहतां ब्रह्मस्वरूप असलेल्या जीवांना बंधहि नाहीं व मोक्षहि नाही. ते केवळ अज्ञानामुळे आत्म्याचे ठिकाणी कल्पित आहेत, असें ह्या श्लोकांत सांगितले आहे. 'बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न तत्त्वतः-' बद्ध व मुक्त ह्या संज्ञा मला सत्त्वादि गुणतः-गुणद्वारा (किंवा गौण वृत्तीने ) प्राप्त होतात, त्या खऱ्या नव्हेत. ह्या वचनाप्रमाणे जन्म-मरणरूप बंध जेव्हां नव्हता तेव्हां मोक्षहि नव्हता. कारण बधामुळे मोक्ष होतो. कोणीच जर बद्ध नाही तर मुक्त कोण होणार ? सृष्टीच्या पूर्वी एकच वस्तु असल्या- मुळे व त्याहून अन्य कांहींच नसल्यामुळे बद्ध किंवा मुक्त ( मोकळा ) तरी कोण होणार ? हीच गोष्ट सूर्याचा दृष्टान्त देऊन जास्त स्पष्ट करितात. सूर्याच्या ठिकाणी रात्र व दिवस नसतात म्ह० त्यांचा सूर्याशी काही संबंध नसतो. पण लोकांना सूर्याचे दर्शन जेव्हां होते त्या वेळी आतां दिवस आहे व तो दिसेनासा झाला की आता रात्र आहे, असे ते म्हणतात. तात्पर्य-रात्र किवा दिवस हे धर्म सूर्याचे नसतांना लोकांच्या नेत्रदोषाने ते त्याचे आहेत, असे भासते. त्याचप्रमाणे बध व मोक्ष हे आत्मरूप शुद्ध ब्रह्माला नसून ते त्यालाच आहेत, असे अविद्यादोषाने वाटते. शुद्ध ब्रह्माचा प्राणाशी संबंध नसतो म्हणजे ते क्रियाशकिरहित आहे, म्हणूनच त्याला प्राणरहित, शुद्ध व एक अशी विशेषणे दिली आहेत. असे ते अद्वितीय ब्रह्मच स्वाज्ञानसज्ञक मायेने हिरण्य- गर्भनामक जगत्कर्ता होतें. पूर्वी त्याहून अन्य काही नव्हते आणि तेच जन्म. रहित मायेने आच्छादित झाले असतां जीव झाले. सारांश-जीवहि वस्तुतः त्या शुद्ध तत्त्वाहून पृथक् नाही. केवळ आत्म्याच्या अज्ञानाने जीव, ईश्वर, जगत् व सर्व पदार्थ यांचा अनुभव येत असतो; पण तो वस्तुभूत (खरा)नव्हे, प्रतिभासिक आहे. खरे तत्त्व एक व अद्वितीय असे असून तेच सत्य (त्रिकाला- बाधित) आहे.] २४. प्रागासीद्भावरूपं तम इति तमसा गूढमस्मादतयं क्षीरान्तर्यद्वदम्भो जनिरिहजगतो नाम-रूपात्मकस्य ।
सान्ववार्य विवरण. .. कामाखातुः सिसृक्षोरनुगतजगतः कर्मभिः संप्रवृत्ता- द्रेतोरूपैमनोभिः प्रथममनुगतैः संततैः कार्यमाणैः ॥२५ अन्वयार्थ-'प्राक् भावरूपं तम इति आसीत्-' पूर्वी भावरूप अज्ञान होते.-' तमसा गूढं अस्मात् अत] ( किवत् ) यद्वत् क्षीरान्तः अम्भः'- दुधातील पाण्याप्रमाणे अज्ञानाने हे आच्छादित असल्यामुळे अतयं होतें. '-अनुगतजगत रेतोरूपै मनौभिः प्रथम अनुगतैः संततै' कार्यमाणैः कर्मभिः संप्रवृत्तात् सिसृक्षोः धातुः कामात् नाम-रूपात्मकस्य जगतः इह जनिः'-अनादि कालापासून चालत आलेल्या, तसेच अनादि कालापासून प्रवृत्त झालेल्या आणि प्रवाहाप्रमाणे सतत चालू असणाऱ्या, बीजभूत सृष्टीच्या कर्मानी प्रेरित झाल्यामुळे सृष्टि करण्याची इच्छा करणाऱ्या प्रजापतीच्या कामनेने नाम-रू- पांनी युक्त असलेल्या ह्या जगाची उत्पत्ति ( होते. ) [ मागच्या श्लोकामध्ये सृष्टीच्या पूर्वी जगत् नव्हते, असे सांगितले आणि आतां हें व्यक्त जगत् कसे उत्पन्न झाले किवा सृष्टयुत्पत्तीच्या पूर्वी हे कोणत्या अवस्थेत होते, हे स्पष्ट सांगतात-हे जगत् व्यक्त होण्यापूर्वी त्याचे उपादानरूप तम या नांवाचे अज्ञान होते. त्या तमाने हे जगत् आच्छादित झालेले होते व त्यामुळे दुधा- मध्ये असणाऱ्या उदकाचे जसे ज्ञान होत नाही, तसे जगाचे ज्ञान तेव्हा होत नव्हते. नतर त्या अज्ञानापासूनच ह्या नामरूपाने व्यक्त होणाऱ्या जगाची उत्पत्ति झाली. ज्याप्रमाणे बीजामध्ये वृक्ष गूढ असतो तरी तो व्यक्त होण्यास भूमि, उदक, बीजारोपण करणारा इत्यादि निमित्त कारणे लागतात, त्याच- प्रमाणे हे जगत् तमामध्ये गुप्त असते व ते व्यक्त होण्यास सृष्टीला उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या प्रजापतीच्या इच्छेची आवश्यकता असते. अनादि कालापासून प्रवृत्त झालेल्या ह्या जगांतील अनंत प्राण्यांच्या कर्मानी प्रजा- पतीला जगत् उत्पन्न करावे, अशी इच्छा होते आणि ती कर्मे बीजरूप, अनादिकालापासून चालत आलेली, सद्रूप व सतत निष्पन्न होणारी अशी असतात. म्हणजे तीच पुनरुत्पत्तीला कारण होतात. हा संसार अनादि असल्यामुळे त्यांतील प्राण्यांची संचित कर्मेहि अनादि आहेत. ती सद्रूप साक्षी जो आत्मा त्याच्या आश्रयाने असतात. म्हणून त्यांनाहि सद्रूप म्हटले आहे. प्रवाहरूपाने ती एकसारखी प्रत्येक संसारामध्ये प्रवृत्त होतात; प्रत्येक नवीन जन्मामध्ये नवीन कर्माची भर पडते व ज्ञानावांचून त्यांचा कधीहि क्षय होत नाही. म्हणून त्यांना 'संतवैः' व 'कार्यमाणैः' अशी विशेषणे दिली आहेत.
AR हा श्लोक, श्रीमदाचार्थीनीं 'तम आसीत्तमसा गूढम 'हम श्रुतीच्या आधा- राने लिहिला आहे. ह्या श्रुतीच्या भाष्याचे सर्व तात्पर्य येथे दिल्यास चर्वित- चर्वण होईल. कारण त्यांतील बहुतेक भाग वर येऊन गेलाच आहे. यास्तव श्लोकाचा अर्थ विशेष स्पष्ट होण्याकरितां काही भाग येथे घेतला आहे. श्रुतीमध्ये पूर्वी हे जगत् नव्हते असे सागितले आहे. पण यावर तार्किक अशी शंका घेतात की, 'पूर्वी जर हे जगत् नव्हते तर त्याची उत्पत्ति कशी झाली व उत्पन्न होणाऱ्या ह्या जगाची उत्पत्ति करणारा कोण ! कारण, कर्ता हे एक कारक आहे व कारक हा एक कारणाचाच विशेष आहे व कारण तर कार्योत्पत्तीच्या पूर्वी अवश्य विद्यमान असावेच लागते.' ह्या शकेचे निरसन करण्यासाठी उत्पत्तीच्या पूर्वीहि हे जगत् एका विशेष रूपाने असतेच, असे श्रुति सांगते. पूर्वी म्हणजे प्रलयकाली ही सर्व आकाशादि भूते व त्याच्यापासून होणारे पदार्थ यांना तमाने (अधकाराने) झांकून टाकिलें होते. जसा रात्रीतील अधकार सर्व पदार्थांना व्यापून सोडतो व त्यामुळे त्यांचे ज्ञान होत नाही, त्याचप्रमाणे मायासंज्ञक भावरूप अज्ञानाने आत्मतत्त्वाला झाकून टाकिले. म्हणूनच त्याला 'तम' असे म्हणतात. त्याच कारणभूत तमामध्ये हे सर्व जगत् गुप्त असते. त्या तमापासून ह्या नाम व रूप यांनी युक्त असलेल्या जगाने व्यक्त होणे हीच याची उत्पत्ति होय व हे आत्माच्छादक अज्ञानच त्याला उत्पन्न करते. 'सृष्टि उत्पन्न (म्हणजे व्यक्त) करावी' अशी ईश्वराला इच्छा होते व ह्या इच्छेला अनत प्राण्यांच्या अनत वासना हेच कारण होते. पूर्व कल्पामध्ये प्राण्यानी केलेल्या कर्माचे फळ त्यांना मिळ- ण्याची वेळ आली की कर्माध्यक्ष ईश्वराला सृष्टि उत्पन्न करण्याची इच्छा होते व त्याच्या इच्छाशक्तीनेच ही सृष्टि व्यक्त होते. ही गोष्ट अनुभवगम्य आहे; यास्तव साधकानी अनुभवी पुरुषांपासून ती समजून घ्यावी. ] २५. चत्वारोऽस्याः कपर्दा युवतिरथ भवेन्नूतना नित्यमेषा माया वा पेशला स्यादघटनघटनापाटवं याति यस्मात् । स्यादारम्भे घृतास्या श्रुतिभववयुनान्येवमाच्छादयन्ती तस्यामेतौ सुवर्णाविव परपुरुषौ तिष्ठतोऽर्यप्रतीत्या ॥ २६ F-कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान व अधिकरण ही सहा कारके होत. यांचा कोणत्याहि क्रियानिष्पत्तीशी संबंध असती, असे व्याकरणामध्ये सांगितले आहे.
सान्वयार्थ विवरण. अन्वयार्थ- अस्याः चत्वारः कपर्दाः ( सन्ति )'-ह्या मायेचे चार उत्कर्ष आहेत (ते असे-) 'अय एषा माया नित्यं नूतना ( अनः ) युवतिः भवेत् '-१ ही माया नित्य नूतन ( तरुणी) असते म्हणून ही युवति होय.- यस्मात् अघटनघटनापाटव याति तस्मात् पेशला वा '-२ ज्याअर्थी ही अ. त्यत दुर्घट अशी कृत्ये करिते त्याअर्थी ही अति कुशल आहे.-' आरभे घृता. स्या स्यात् '-३ प्रथमन ही मोठी रमणीय वाटते. – 'एव श्रुतिभववयुनानि आच्छादयन्ती'-४ व उपनिषदातील प्रतिपादनाला [ ही आपल्या शक्तीने] झाकून टाकिते.-' तस्या अर्थप्रतीत्या एतौ परपुरुषौ सुपर्णी इव तिष्ठतः'- तसल्या ह्या मायेमध्ये दोन पक्ष्याप्रमाणे जीव व शिव हे दोघे विषय भोगीत राहतात. [ह्या श्लाकात, पूर्व श्लोकात सांगितलेल्या 'तम'नावाच्या ह्या मायेचे चार उत्कर्ष आहेत, असे प्रतिपादन केले आहे. जी ही माया आपल्या विल. क्षण शक्तीने हे सर्व जगन् निर्माण करून पुनः त्याचा लय करिने तिचे चार उत्कर्ष [ मुख्य गुग ] आहेत. १ ही सर्वदा नत्री असते. ती कधीच वृद्ध होत नाही. यास्तर विद्वान् तिला युवति असे म्हणतात. २ ही फार कुशल आहे. कारण अति दुर्घट विलक्षण असे कृत्य करण्यात ही मोठो पटु आहे. हो माया चैतन्य व जड पदार्थ याचे ऐक्य [ तादात्म्य ] करून दाखविते. पण हे कृय प्रकाश व अबफर पाचे ऐक्य करून दाखविण्याइतके विलक्षण व अलौकिक आहे. म्हणून वस्तु एकप्रकारची असता ती भलत्याच प्रकारची करून दाखविण्यात ही माया फार चतुर असल्यानुळे हिला 'कुशल' असे म्हणतात. ३ ही सकृदर्शनी पुरुषाला मोठी रमणीय वाटते. पण परिणामी त्याला मोठया अनर्थात पाडिते. विषय दु ख देणारे असून ते प्रथमत किती सुखकर वाटतात ! पण मोठ्या आनदाने केलेल्या दुष्कृत्यांचे परिणाम जेव्हां रडत भोगावे लागतात, तेव्हा त्याचे खरे स्वरूप समजते. ही सर्वदा आपल्या मोहक रूपाने सर प्राण्याना मोह पाडून आपल्या अधीन करून घेते व नतर त्याना जन्ममरणगर्तेत ( खड्डयात ) लोटते, यास्ता हिला ' वृतास्या' ( तुपाने माखलेल्या तोडाप्रमाणे रमणीय दिसणारी ) असे म्हणतात. ४ उप- निषद्भागामधे सर्वत्र जो उपदेश व प्रतिपादन केलेले आहे त्याला आवरण घालून म्हणजे आपल्या मोहक रूपाने प्राण्यांना भुलवून " उपनिषदांतील सर्व प्रतिपादन खाटे आहे त्यांत काही तथ्य नाही, ती सर्व पोटभरू ठक ब्राह्मणांची जगाला फसविण्याची विद्या आहे" असे भासविते. असे हे हिचे चार उत्कर्ष असून दोन पक्षी ज्याप्रमाणे एका वृक्षाचा किंवा एका !
१५ शवलोकी. शाखेचा आश्रय करून राहतात, त्याप्रमाणे जीव व शिव हे दोघे विषयांचा अनुभव घेत हिचा आश्रय करून रहातात; माया जड असल्यामुळे ती कोण- स्याहि पदार्थाचें ज्ञान करून देत नाही, तर अबकाराप्रमाणे सर्व पदार्थाना झाकून टाकीत असते व परमात्मा चिद्रूप असल्यामुळे सर्व पदार्थाना प्रका- शित करितो. ( म्ह० त्याचे ज्ञान करून देतो.) प्रथम उ-कर्षाने ह्या मायेचें सर्वदा एकरूप, द्वितीय उत्कर्षाने हिची विक्षेपशक्ति, तृतीय उत्कर्षाने हिचे मोहकत्व व चतुर्थाने हेिचो आवरणशक्ति व्यक्त करून दाखविली आहे. अं- धान्या रात्री पुढे अम ठेठा वृक्ष मुळीच दिसत नाही हे आवरण व तो अंधुक दिसत असल्यामुळे हा कोणी पुरुष किवा निगाच आहे, असे वाटते, हा विक्षेप; म्हणजे पदार्थाचे मुळीच ज्ञान न होऊ देणे याला आवरण व तो मूळ पदार्थाहून भलताच काही पदार्थ आहे, असे भासविगे याला विक्षेप असें म्हणतात. माया आपल्या आवरणशक्तीने आत्म्याचे स्वरूपज्ञान होऊ देत नाही व विशेषशक्तीने देह हाच आत्मा आहे, असे कित्रा तो सुखी आहे, दुःखी आहे, कुगल आहे इत्यादि भासविते. जीव हा भोग भोगणारा व शिव भोग भोगावेगारा होय. म.येव्या यागाने व हे दोन भेद झाले आहेत. ही माया शुद्ध चैतन्याला जीव बनविते व ते चैतन्य ह्या मायाकृत जोबांचा कर्म- फलदाता ईश्वरहि हिच्यामुळेच होते.] २६. एकस्तत्रास्त्यसङ्गस्तदनु तदपरोऽज्ञानसिन्धुं प्रविष्टो विस्मृत्यात्मस्वरूपं स विविधजगदाकारमाभासमैक्षत् | बुद्धयान्तर्यावदैक्षद्विसृजति तमजा सोऽपि तामेवमेक- स्तावद्विप्रास्तमेकं कथमपि बहुधा कल्पयन्ति स्ववाग्भिः ॥ अन्वयार्थ-तत्र एकः असङ्गः अस्ति'-त्या दोघांपैकी शिव कोठेहि आसक्त होत नाहीं;-'तदनु तदपरः अज्ञानसिन्धु प्रविष्टः'-पण त्याच्याचसारखा असणारा दुसरा जो जीव तो अज्ञानसागरांत बुडाला आहे.-' सः (च) बारमस्वरूपं विस्मृत्य विविधजगदाकारं आभासं ऐक्षत्-' तो स्वतःचेच स्वरूप विसरूम नानाप्रकारच्या आकारांनी युक्त असलेला हा जगाचा भास पाई लागल.-' यावत् बुद्धया अन्तः ऐक्षत् तावत् तं अआ त्रिसृमति सः अपि तो (विसृमति इति ऐक्षत् )-पण (या अगदाकारावरून अणथर लक्ष सान्ववार्य किरण. ३५ - . हा मी' असे काढून ) तो भापल्या या हृदयांत जो बुद्धिद्वारा पाहूं लागला तो हो माया जीवाला उत्पन्न करिते व जीव हिला उत्पन्न करितो, असे त्याला दिसलें.- * एवं एकः तावत् ( अस्ति तथापि ) विप्राः त एक कथ अपि स्ववाग्भिः बहुधा कल्पयन्ति '-ह्याप्रमाणे तो एकच आहे; पण ब्राह्मण त्या एकाच विषयी कशी तरी आपल्या वाणीने अनेक प्रकारची कल्पना करितात. म्ह० तो एक अस- तांना त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा आरोप करितात. [ जीव व परमात्मा हे व्यवहारतः भिन्न भिन्न भासले तरी परमार्थतः ते एकच आहेत, असे ह्या श्लो- कांत सांगितले आहे. पक्ष्यांप्रमाणे मायेचा आश्रय करून राहणाऱ्या त्या जीव. शिवांपैकी शिव कोठेच आसक्त न होतां मायेला स्वाधीन ठेवून भोत्तमाना कर्मफले देत असतो व वस्तुतः त्याच्याच सारखा असगारा दुसरा जीव अज्ञान- समुद्रात बुडून व्याकुळ होतो. तो स्वतःचेच स्वरूप विसरून जाऊन नाना. प्रकारच्या व विलक्षण आकृतीच्या ह्या जगाचा अनुभव घेऊ लागतो. म्ह० ह्या बाह्य अनात्मभूत सृष्ट पदार्थामध्येच तो गर्क होऊन रहातो. त्याला खत.. चे भानहि नाहोंसे होऊन तो जड पदार्थातीलच एखाद्याला खोटेच समजतो. पण दैववशात् एखादे वेळी वैषयिक दृष्टि सोडून अतदृष्टीने व सूक्ष्म बुद्धीने जर आपल्या अतःकरणातच काय भरले आह ह्याचा त्याने विचार केला, तर माया जोबाला निर्माण करिते व जीव मायेला उत्पन्न करितो ( म्ह० माया ज्याला केवळ कल्पनेने बनविते तो व ती स्वतः ज्याच्या आधा- राने आहे तो, असे हे दोघे पृथ्क नसून एकच आहेत ) असा त्याला अनुभव येतो. मायेचा व जीव-शिवाचा खरोखर काहींच सबंध नाही, असे त्याला निश्चयपूर्वक कळून आल्याने चित्स्वरूपात जीव व शिव असा खड नसून ते अखंड एकरूपाने आहे, असा त्याला दृढ प्रत्यय येतो. वस्तुतः अशी जरी स्थिति आहे तरी वेद-वेदागपारग विद्वान् ब्राह्मग, शिष्यांना . बोध होण्या- सारखा शब्दव्यवहार करितां यावा म्हणून, केवल शब्दांनी त्या एकच अस- णाऱ्या परमात्म्याला अनेक नावे देऊन त्याची अनेक रूपे आहेत, अशी कल्पना करितात; पण ते खरे नव्हे. भगवान् आचार्यानी ह्या व मागच्या श्लोकात, चतुष्कपर्दा युवतिः सुपेशा.......विचष्टे ' इत्यादि श्रुतीचा अर्थ, स्पष्टपणे आणिला आहे.] २७. नायाति प्रत्यगात्मा प्रजननसमये नैव यात्यन्तकाले बरसोडखण्डोऽस्ति लैङ्गं मन इह विशति प्रबजत्यूर्ध्वमा ३६ शवलोकी. -- तत्कार्य स्थूलता वा न भजति वपुषः किंतु संस्कारजातै- स्तेजोमात्रा गृहीत्वा ब्रजति पुनरिहायाति तैस्तैः सहैव ॥ अन्वयार्थ-प्रत्यगात्मा प्रजननसमये न आयाति अन्तकाले च न एव याति'-सर्वान्तर्यामी आत्मा उत्पत्तिकाली येत नाही व मरणसमयीं जातहि नाही.-' यत् सः अखण्डः अस्ति'-कारण तो खण्डरहित आहे.-' इह ऊर्च अर्वाक् वा लैङ्ग मनः विशति (तथा च ) प्रव्रजति'-ह्या व्यवहारांत, देवलोकी किंवा मनुष्यलोकी, पंधरा कलांनी युक्त असलेले मनच गर्भामध्ये शिरते (व शरीर टाकून ) जाते.- तत् वपुषः कार्य स्थूलता वा न भजति '-ते मन देहाच्या कृशतेने किंवा स्थूलतेने कृश किवा स्थूल होत नाही.-'कितु संस्का- रजातैः सह तेजोमात्राः गृहीत्वा व्रजति पुनः इह तैः तैः सह एव आयाति'- पण ( ते मन मरणसमयीं ) सर्व पूर्व सस्कारासह दशेद्रिये व प्राण यांतील सूक्ष्म तेजें खेचून घेऊन जाते व पुनः जन्मकाली त्या त्या वासना व इन्द्रिया- दिकाची सूक्ष्म तेजे घेऊनच गर्भात येते. [ जन्म-मरणद्वारा विचार केला तरी सुद्धा जीव पृथक् नसून स्वरूपभूतच आहे; असे आता वर्णन करितात प्राणी जन्मास येतो त्यावेळी आत्मा कोणीकडून तरी येऊन गर्भात प्रवेश करितो व मरणसमयी तो शरीर सोडून कोठे तरी जातो, असे सर्व प्राकृत मनु. ध्याना वाटण्याचा सभव आहे, पण वस्तुतः तसे होत नाही. कारण ब्रह्मरूप आत्मा आकाशाहुनहि अति सूक्ष्म व अति विस्तृत आहे. सर्व भूताना आधार असणारे आकाश, सर्वाहून विस्तृत व सूक्ष्म असल्यामुळे, जर चलन-बलन करू शकत नाही तर मग त्याहूनहि अति विस्तृत व सूक्ष्म असणारे ब्रह्म कोठे जात नाही किवा कोठून येत नाही, हे काय सागावें ? जाणे, येणे, स्तब्ध रहाणे इत्यादि क्रिया परिमित (मोज-माप करितां येण्यासारख्या आकार- युक्त) वस्तूच्या ठिकाणींच संभवतात. अखड आत्मा सर्वव्यापी असल्यामुळे कोठे जात नाही व येत नाही. ऊर्ध्वलोकी किवा अधोलोकी जन्म घेताना वासना, पाच प्राण आणि दहा इद्रिये, यांसह मन ( अन्त करण) गर्भात प्रवेश करिते व तेच मरणकाली देह सोडून जाते. ते लिंगदेहात्मक मन रोगा- दिकांनी देह कृश झाला तरी कृश होत नाही व रसायनादि पौष्टिक औष- धींच्या सेवनाने तो पुष्ट झाला तरी तें पुष्ट होत नाही. म्ह० कृशता, पुष्टि, दृढता इत्यादि धर्म देहाचे आहेत, मनाचे नव्हेत. देहत्याग करण्याची वेळ आली असतां मन, अनेक पूर्व जन्मांतील व प्रस्तुत जन्मांतील संचित संस्कार सान्वयार्थ विवरण. ३७ -वासना आणि इंद्रियें व प्राण यांची तेजे ( त्यांतील ती ती शक्ति) घेऊन निघून जातें व पुनः जन्माच्या वेळी तेच सर्व पूर्व संस्कार व तेजोमात्रा (इंद्रि- यादिकांच्या शक्ति ) यांसह गर्भात प्रवेश करिते. ] २८. आसीत्पूर्व सुबन्धुर्भृशमवनिसुरो यः पुरोधाः सनाते- ाम्यात्कूटाभिचारात्स खलु मृतिमितस्तन्मनोगात्कृतान्तम्। तदाता श्रौतमन्त्रैः पुनरनयदिति प्राह सूक्तेन वेद- स्तस्मादात्माभियुक्तं व्रजति ननु मनः कर्हिचिन्नान्तरात्मा २९ अन्वयार्थ- पूर्व अवनिसुर. सुबन्धुः भृश आसीत् '-पूर्वी सुबधुनांवाचा कोणी एक प्रसिद्ध ब्राह्मण होता,-' य सनातेः पुरोधाः-' तो सनातिराजाचा पुरोहित ( उपाध्याय ) होता.-' स खलु ब्राह्मयात् कूटाभिचारात् मृति इतः -तो ब्राह्मगानी केलेल्या काटान प्रयोगाने मरण पावला -' तन्मनः कृतान्तं अगात् ' त्याचे मन यमाकडे गेले. नतर-'तदाता श्रोतमन्त्रैः (तत् ) पुनः अनयत् इति वेदः सूक्तेन प्राह '-त्या सुबंधूच्या भ्रात्याने श्रोत मत्रानी त्याच्या मनाला परत आणिले, असे वेदाने सूक्ताने सागितले आहे.- तस्मात् आत्मा- भियुक्तं मनः ननु व्रजति अन्तरात्मा कहिचित् न (ब्रजति)'-तस्मात् आत्म- प्रतिबिंबयुक्त मन मरणकाली जाते. अन्तरात्मा कधीहि जात नाही. [ आत्मा गर्भामध्ये कोठूनहि येऊन प्रवेश करीत नाही व मरणकाली शरीरातून कोठे निघून जात नाही; तर ते सर्व मन करीत असते. भगवान् आचार्यानी यावि- षयी ऋग्वेदातील एका आख्यायिकारूप श्रुतीचा येथे अनुवाद केला आहे. ऋग्वेदाच्या आठव्या अष्टकामध्ये "यत्ते यमं वैवस्वतं मनो जगाम दूर कम् इत्यादि श्रुतीमध्ये अशी आख्यायिका आहे की, पूर्वी सनातिनावाच्या एका राजाचे, बधु, सुबधु, श्रुतबंधु आणि विप्रबंधु असे चार भाऊ उपाध्ये होते. त्यांनी राजाच्या सागण्यावरून त्याच्या शत्रूचा नाश होण्याकरितां अनेक उपाय केले; पण ते शत्रूची हत्या करणारे अभिचारक कर्म मात्र करीतना. म्हणून त्या राजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला आणि दुसऱ्या दोघां कपटप- ट्रंना पुरोहित केले. त्यामुळे बंधु इत्यादिक चारी भाते क्रुद्ध होऊन राजाचाच नाश करण्यास प्रवृत्त झाले. ही गोष्ट त्या मायावी पुरोहितांना समजली असतां त्यांनी अभिचारक कर्म करून सुबंधुनांवाच्या पुरोहिताला मारले. पण त्याच्या, २८ मात्यांनी " यत्ते यमं वैवस्वत " इत्यादि पूर्वनिर्दिष्ट श्रुतिमंत्राने त्याला पुनः जिवंत करण्याचा प्रयत्न केला. त्या मंत्राचा अर्थ अखा-" हे सुबंधो, में तुझे मन सूर्यपुत्र यमवर्माकडे दूर गेले आहे, त्या तुझ्या मनाला ह्या लोका. मध्ये रहाण्याकरिता व व्यवहार करण्याकरितां ( आम्ही) परत फिरवितो." याप्रमाणे त्या तिन्ही बंधूंनी मंत्रद्वारा उपाय केले असतां तो सुबंधु पुनः जिवंत झाला. ह्या श्रौत कथानकाला उद्देशून आचार्यानी हा श्लोक रचला आहे, वेदामध्ये अभिचारक कर्म सागितले आहे. त्या कर्माने ब्राह्मण लोक कधी कधी आपल्या शत्रूवर कपटास्त्र प्रयोग करीत असत. परतु उपनिषदांनी त्या कर्माचा, मद्यपान, कलज ( एक प्रकारचे मास )-भक्षण, ब्रह्महत्या इत्यादिकाप्रमाणे, निषेध केला आहे. आभिचारक कर्म निषिद्ध असल्यामुळे प्रथमतः राजाच्या आज्ञेप्रमाणे सुवंबु ते करीना; पण राजाने बहिष्कृत केले असता त्याला क्रोध येऊन राजावरच अभिचार प्रयोग करण्यास ता सिद्ध झाला, पण राजाच्या नूतन पुरोहितांस ही गोष्ट समजताच त्याच अभिचारक कर्माने त्यांनी सुबं- धूला मारिले व त्याच्या बंधूंनी त्याचे मन यमलोकाहून परत आणिले. सारांश अंतरात्मा जन्मकाली किंवा मृत्युसमयी कोठेहि जात-येत नसून, गति (जाणे) व आगति ( येणे ) ही केवल मनालाच आहेत. ] २९. एको निष्कम्प आत्मा प्रचलति मनसा धावमानेन तस्मि- स्तिष्ठन्नग्रेऽथ पश्चान्न हि तमनुगतं जानते चक्षुराद्याः। यहत्पाथस्तरङ्गैः प्रचलति परितो धावमानस्तदन्त:- प्रापश्चादस्ति तेषां पवनसमुदितैस्तैः प्रशांतैर्यथावत् ॥३०॥ अन्वयार्थ-' यद्वत् पाथः पवन समुदितैः परितः धावमानैः तरगैः प्रच- लति तेषां अन्त प्राक् पश्चात् (च) तत् अस्ति ते प्रशान्तैः यथावत् '-ज्या- प्रमाणे उदक, वायूमुळे उत्पन्न होणाऱ्या व चोहोकडे यांवणाऱ्या तरगाच्या योगाने हालते, पण त्या तरंगांमध्ये, त्याच्या अलीकडे व पलीकडे तेच असते आणि तरग शांत झाले असताहि ते पूर्वीप्रमाणे होते.-' एकः निष्कम्पः आत्मा धावमानेन मनसा (सह) प्रचलति (तथा) तस्मिन् (अपि) तिष्ठन् सन् अथ अग्रे पश्चात् च (वर्तते) तं अनुगतं चक्षुराद्याः न हि जानते '-त्याचप्रमाणे एक व चलमरहित असा हा आत्मा धावणाऱ्या मनासहवर्तमान जातो-तसेच तो त्या मनामध्ये असून त्याच्यापुढे व मार्गेहि असतो. ह्याप्रमाणे ती आत्मा मनाच्या सान्ववार्य विवरण. ) अगदी बरोबर असतो तरी चक्षुरादिक वृत्ति त्याला जाणत नाहीत. [चलनादिक धर्म मनाचे आहेत, आत्म्याचे नव्हेत, असे ह्या श्लोकात सांगितले आहे. निष्क्रिय व एक असा हा आत्मा धावणाऱ्या मनासह धावत असल्यासारखा वाटतो. स्याचप्रमाणे तो मनामध्ये स्वतच्या प्रतिबिबरूपाने रहात असून त्याच्या मागे व पुढे किवा उत्पत्तीच्या पूर्वी व नाशानतरहि असतो. ह्याप्रमाणे जरी तो मनाला कधी सोडीत नाही, तरी चक्षुरादिक इद्रिये त्याला जाणत नाहीत, कारण तो बाह्य व आतर अशा दोन्ही इंद्रियाहून अतीत आहे. म्हणजे इद्रियादि- कांना त्याचे ज्ञान होणे शक्य नाही." यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षू षि पश्यति" (सु. उ. स पृ० १५) म्हणजे नेत्राने ज्याचे दर्शन घेता येत नाही, परंतु नेत्रामध्ये पाहण्याची शक्ति ज्याच्यामुळे आहे; इत्यादि अनेक श्रुति याला प्रमाण आहेत. वस्तुतः तो निष्क्रिय आहे तरी मनामुळे तोच चलना. दिक क्रिया करीत आहे, असे वाटते. हीच गोष्ट उदकाचा दृष्टांत देऊन स्पष्ट करितात. वायूमुळे उत्पन्न होणा-या तरगांच्या योगाने उदकच सर्वत्र धांवत आहे, असे वाटते व त्या धावणाऱ्या तरगामध्ये, त्याच्या उत्पत्ती पूर्वी व नाशा- नंतर (किवा पुढे-मागे ) उदकावाचून विचारवानाला अन्य काहीच दिसत नाही आणि तरग शात झाले असताहि ते स्वतःच्या रूपानेच पूर्वीप्रमाणे असते. तसेच मायामय इंद्रियादिकांच्या योगाने आत्मा व्यवहार करीत असल्यासार. खा वाटतो; पण तरगाप्रमाणे इद्रियादिक शांत झाले असता तो पूर्ववत् शांत. रूप होतो. ] ३०. एकाक्यासीत्स पूर्व मृगयति विषयानानुपूयान्तरात्मा जाया मे स्यात्प्रजा वा धनमुपकरणं कर्म कुर्वस्तदर्थम् । क्ले शैः प्राणावशेषैर्महदपि मनुते नान्यदस्माद्रीय- स्त्वेकालाभेऽप्यकृत्लो मृत इव विरमत्येकहान्याऽकृतार्थः।। अन्वयार्थ - सः अन्तरात्मा पूर्व एकाकी आसीत् '- हा अतरात्मा पूर्वी एकटाच असतो.-' ( अतः पर प्रथम ) मे जाया स्यात् प्रजा उपकरण धनं वा (इति) आनुपूर्व्या विषयान् मृगयति'-नतर प्रथम मला स्त्री असावी, मग पुत्र व्हावा व त्यानतर ससाराचें सावन जे धन ते मिळावे अशा अनुक- माने विषयांना हुडकितो ( त्यांच्याविषयी संकल्प कारतो.)- प्राणावशेषः शैः तदर्थ कर्म कुर्वन् अन्य महत् अपि अस्मात् गर्रायः न मनुते '-धन शतम्लेकी. मिळविण्यास्तव प्राग व्याकुळ होईतों क्लेश सहन करून कर्म करितो व दुसरी एखादी मोठी वस्तुहि ह्या विषयांहून अधिक आहे, असे मानीत नाही.-'एका. लाभे अपि अकृत्स्न सन् मृत इव विरमति (तथा) एकहान्या अकृतार्थः (भवति)-' ह्यांपैकी एखादा विषय न मिळाला तरी मी अपूर्ण आहे, ( असे समजून ) मृत पुरुषासारखा स्तब्ध होऊन बसतो व एखाद्या विषयाची हानि झाली तर हा अकृतार्थ होतो. [ प्रथमतः हा अंतरात्मा एकटाच असतो. त्यावेळी स्त्रो, पुत्र इत्यादिक विषय त्याच्यापाशी नसतात. पुढे प्रथमतः माझा विवाह व्हावा, अशी तो इच्छा करितो. नतर मला पुत्र असावेत, अशी त्याची भावना होते. तदनतर त्या सर्वाच्या निर्वाहाचे सावन व व्यवहारात अवश्य लागणारे जे धन ते मिळावे, अशी तृष्णा उत्पन्न होते व ते धन मिळविण्याकरिता मरेमरेतो क्लेश भोगूनहि सेवा, कृषि (शेतको ) वाणिज्य (व्यापार ) इत्यादि कर्मे करितो व हे धनादिविषय प्राप्त झाले असता आत्म्यासारख्या महद्वस्तूचेहि त्यापुढे त्याला महत्त्व वाटत नाही. याप्रमाणे स्त्री-पुत्र-चनादि अनेक विषयापैकी बहुतेक मिळून एखादाच न मिळाल्यास तो आपगाला अपूर्ण समजतो. ( अतृप्त होतो. ) उदाहरणार्थ एखाद्या गृहस्थास स्त्री व पुत्र अनून वित्त नसले किवा स्त्री व धन असून पुत्र नसला अथवा पुत्र व धन असून दैवयोगाने स्त्री नष्ट झाली तर तो 'हाय ! हाय ! माझा सर्वस्वी घात झाला, माझे घर बसले' इत्यादि प्रकारानी आक्रोश करितो. साराश, विषयप्राप्ति होऊन त्यांपैकी एका. चाच नाश झाला तरी हा स्वत ला अभागीच समजतो व इच्छिलेल्या अनेक विषयांपैकी एखादा न मिळाला तरी अतृप्तच असतो. ह्या श्लोकाला “ आत्मै वेदमग्र आसीत् एक एव सोऽकामयत " (सु. उ. स. पृ० ५५९) इत्यादि बृह- दारण्यकश्रुति आवार आहे व त्या श्रुतीचा सर्व अर्थ बर स्पष्ट झाला आहे. ]३१. नासीत्पूर्व न पश्चादतनुदिनकराच्छादको वारिवाहो दृश्यः किन्त्वन्तरासौ स्थगयति स दृशं पश्यतो नार्कबिम्बम्। नो चेदेवं विनाकं जलधरपटलं भासते तर्हि कस्मा- तद्वद्विश्वं पिधत्ते दृशमथ न परं भासकं चालकं स्त्रम् ३२ अन्वयार्थ-वारिवाहः अतनुदिनकराच्छादक ( भवति)'-मेव अत्यंत विस्तीर्ण सूर्याला झाकून टाकितो.-'सः पूर्व न आसीत् पश्चात् च न (भवति) किंतु असौ अन्तरा दृश्यः'-नो पूर्वी नसतो व मागूनाहे नसतो. तर हा काही काल मध्येच दिसतो.-'सः पश्यतः दृशं स्थगयति अर्कबिम्बंन (स्यगयति)- सान्वयार्थ विवरण. ४१ तो पाहणान्याच्या दृष्टीला आच्छादित करितो; सूर्यबिंबाला आच्छादित करीत नाही. कारण-'एवं नो चेत् तर्हि अर्क विना जलधरपटलं कस्मात् भासते' असे जर नसते तर मेघसमुदाय सूर्यावांचून अन्य कोणत्या प्रकाशाने दिसला असता!- तद्वत् विश्वं दृशं पिधत्ते'-त्याप्रमाणेच हे विश्व लोकांच्या दृष्टीला झांकतें. -'अथ पर भासक चालक स्व न'-पण सर्वश्रेष्ठ, सर्वाचा चालक, असा जो आत्मा त्याला झांकीत नाही. [ आचार्यानी ह्या श्लोकांत आवरणशक्तीचे स्पष्टीकरण केले आहे. हा सूर्य स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ ह्या लोकांना प्रकाश देणारा आहे. त्याअर्थी तो मेघापेक्षा किती तरी पटीने मोठा असला पाहिजे. परतु मेघ अशा प्रचड सूर्यालाहि झांकून टाकितोसा दिसतो. तो वर्षाकाला- पूर्वी ग्रीष्म ऋतूत नसून पुढे वर्षाकालानतर शरत्काली सुद्धा नसतो; तर तो वर्षाऋतूमध्ये मात्र दिसत असतो. असा हा मध्येच काही काल दिसणारा मेघ, सूर्याकडे पहाणाऱ्या लोकाच्या दृष्टींना आच्छादित कारता; परतु मेघापेक्षा सूर्य अतिशय विस्तृत असल्यामुळे त्याला आच्छादित करीत नाही. तथापि मेघाने सूर्याला झाकिले, अशी जी प्रतीति लोकांना येते, ती भ्रममूलक आहे. कारण सूर्यच जर खरोखर मेघांकडून आच्छादित झाला असता, तर मेघ दिस. लेच नसते. कारण, सूर्याच्या प्रकाशावांचून नेत्राना कोणत्याहि पदार्थाचे ज्ञान होत नाही. तसेच उत्पत्तीच्या पूर्वी व नाशानंतर हे जगत् नसून मध्येच कांहीं काल व्यक्त होते व ते आत्मस्वरूपाकडे पाहणा-या लोकाच्या हातींना झांकून टाकिते. पण आत्मस्वरूपाला झांकीत नाही, म्हणजे सर्य व त्याकडे पहाणारा पुरुष याच्यामध्ये मेघ येऊन पुरुषाची दृष्टि जशी आवृत होते, त्या- प्रमाणेच ब्रह्म व प्राणी यांच्यामध्ये हे नश्वर विश्व येऊन, प्राण्यांची दृष्टि आवृत झाल्यामुळे त्याना ब्रह्माचे ज्ञान होत नाही. म्हणजे त्यांना नश्वर विश्वाच्या पलीकडे दुसरी सत्स्वरूप अशी काही वस्तु आहे, अशी कल्पनाच होत नाही. पण तेवढ्यावरून हे परब्रह्मस्वरूप नाही, असे कधीहि म्हणता येणार नाही. कारण आपला स्वतःचा व्यवहार त्याच्याच सत्तेमुळे होतो व हे विचित्ररूप जगहि त्याच्याच सत्तेमुळे भासते. यास्तव अशा ह्या सर्वचालक परमात्म्याला हे भ्रामक जगत् परमार्थतः कधी तरी आच्छादित करील काय ? सर्वभासक ब्रह्मच आच्छादित झाल्यास सर्व व्यवहाराचाच लोप होईल. सारांश-जगाच्या आदि, मध्य व अंत ह्या तिन्ही अवस्थांमध्ये असणारे ब्रह्मच सत्य आहे आणि त्याच्याच अज्ञानामुळे उत्पन्न होणारा हा जगाचा आकार शुक्तिरजताप्रमाणे केवळ प्रातिभासिक आहे.] ३२.
मुञ्जानः स्वमराज्यं ससकलविभवो जागरं प्राप्य भूयो राज्यभ्रष्टोऽहमित्थं न भजति विषम तन्मृषा मन्यमानः । स्वप्ने कुर्वन्नगम्यागमनमुखमघं तेन न प्रत्यवायी तद्वजाग्रहशायां व्यवतिमखिला स्वप्नवद्विस्मरेच्चेत् ॥ ३३ अन्वयार्थ–'ससकलविभव.( सन् ) स्वप्नराज्य भुञ्जानः भूयो जागरं प्राप्य तन्मृषा मन्यमानः अह राज्यभ्रष्टः इत्य विषम न भजति '-सर्व वैभवासहवर्त- मान स्वप्नांतील राज्याचा उपभोग घेणारा पुरुष, जागा झाला असता त स्वप्न. राज्य मिथ्या आहे, असे मानितो आणि त्यामुळे 'मी आता राज्यभ्रष्ट झालो' असे समजून खेद करीत नाही.-' खमे अगम्यागमनमुख अब कुर्वन् तेन प्र. त्यवायी न (भवति)'-तसेच खमात अगम्यागमनादि पातके करणारा पु. रुष त्या पातकानी दोषी होत नाही.-'जाग्रद गाया (आप) अखिला व्यव- हृति स्वप्नवत् विस्मरेत् चेत् तर्हि तद्वत् (प्रत्यवायी न भवति ) '-जाग्रद. वस्थेतील सर्वहि व्यवहार जर प्राणी स्वप्नाप्रमाणेच विसरेल तर, तसाच दोषी होणार नाही. [आता स्वप्नाच्या दृष्टाताने प्रपच मिथ्या आहे, असें निरूपण करितात. सैन्य, भाडार, आयुये इत्यादि सामग्रोने युक्त असलेल्या स्वप्नातील वैभवशालि राज्याचा उपभोग घेगारा पुरुष जागा झाला असता आपला पूर्वी- चा तो दरिद्री देह व संसार पाहतो. पण ते स्वप्नातील राज्य खोटे आहे, असे समजत असल्यामुळे ' मी आता राज्यभ्रष्ट झालो. ' असे मानून तो कधीहि रडत बसत नाही. हीच गोष्ट आणखी एका दृष्टाताने स्पष्ट करितात-स्वप्ना- मध्ये चाडालस्त्रीगमन, मद्यपान, ब्रह्मवय इत्यादि पातके करणारा पुरुष जागा झाल्यावर पातकशालनार्थ प्रायश्चित्त घेण्यास पात्र हात नाही व त्याला स्वमां- तील पातक मिथ्या आहे, असे वाटत असल्यामुळे खेदहि होत नाही. त्याच. प्रमाणे जाग्रद्दशेत केलेला पाप-पुण्यरूप सर्व व्यवहार स्वप्नातील व्यवहाराप्र. माणेच जर प्राणी विसरेल तर तो स्वप्नातील पाप-पुण्याप्रमाणेच ह्या जागृतींतील पाप पुण्यात्मक व्यवहारानेहि लिप्त होणार नाही. कारण हे स्थूल व्यवहारहि खोटे आहेत, असेच तो मानीत असतो. श्रीभगवानांनीहि 'ब्रह्मण्याधाय कर्माणि.' (सु. गी. पृ० १०२)-सर्व कर्मे ब्रह्मसमर्पण करून व त्यांविषयी आसक्ति सोडून जो ती करितो, तो पमपत्र जसें उदकानें लिप्त होत नाही, तसा पापाने लिप्त होत नाही, असे म्हटले आहे. ] ३३.
सान्वयाल्मि. स्वप्नावस्थानुभूतं शुभमथ विषमं तन्मृषा जागरे स्या- जाग्रत्यां स्थूलदेहव्यवहतिविषयं तन्मृषा स्वप्नकाले। इत्थं मिथ्यात्वसिद्धावनिशमुभयथा सजते तत्र मूढः सत्येतद्भासकेऽस्मिन्निह हि कुत इदं तन्न विद्मो वयं हि ३४ अन्वयार्थ-' स्वप्नावस्थानुभूत यत् शुभ अथ विषम तत् जागरे मृषा स्यात्-' स्वप्नावस्थेमध्ये अनुभावलेले शुभ किंवा अशुभ विषय जाग्रदवस्थेत खोटे ठरतात.-' जाग्रत्या यत् स्थूलदेहव्यवहनिविषय तत् स्वप्न काले मृषा स्यात् '-नसच, जाग्रतीमध्ये जे स्थूल देहाच्या व्यवहारातील विषय ते स्वप्नामधे खोटे ठरतात.-' इत्थं उभयथा मिथ्यात्वसिद्धी इह हि अस्मिन् एतत्भासके सति अनिश तत्र मूढ. सजते '-याप्रमाणे दोन्ही प्रकारानी विषय मिथ्या आहेत, असे सिद्ध असतां व त्या दोन्ही अवस्थाचा भासक अंतरात्मा येथे प्रत्यक्षसिद्ध असताहि मूह पुरुष सतत विषयाच्या ठिकाणी आ- सक्त होतो.-' तदिद कुतः इति वय न विद्म. हि '-पण हे असे का होते, हे आम्हाला कळत नाहीच. [ आचार्य आता ह्या चवतिसाव्या श्लोकामध्ये जाग्रत् व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था भ्रममूलक आहेत, असे प्रतिपादन करितात. स्त्रा- प्निक राज्यप्राप्ति इत्यादि इष्ट भोग व यात्राने भाग करगे, सर्पदश होणे इत्यादि अनिष्ट भोग त्या अवस्थेमध्ये जरी सुख-दुःख देत असले तरी जाग्रतीत ते खोटे आहेत, असा मनाचा निश्चय होतो. तसेच जागृतीत स्थूलदेहद्वारा प्राप्त होणारे मिष्टान्नभोजन, स्त्री पुत्र-धनादिप्राप्ति इत्यादि इष्ट व शरीरपीडा, मानसिक व्यथा इन्यादि अनिष्ट भोग स्वप्नावस्थेत खोटे ठरतात. याप्रमाणे ह्या अवस्था खोट्या आहेत, असे सिद्ध झाले असतां व त्या दोन्ही अवस्थाचा प्रका- शक-ज्ञान किवा स्मरण देणारा आत्मा प्रत्यक्ष प्रत्ययाला येत असता मूर्ख पुरुष विषयांमध्ये का आसक्त होतात, हे आम्हाला मुळीच समजत नाही. ] ३४. जीवन्तं जाग्रतीह स्वजनमथ मृतं स्वप्नकाले निरीक्ष्य निर्वेदं यात्यकस्मान्मृतममृतममुं वीक्ष्य हर्ष प्रयाति । स्मृत्वाप्येतस्य जन्तोनिधनमसुयुतिं भाषते तेन साकं सत्येवं भाति भूयोल्पकसमयवशात्सत्यता वा मृषात्वम् ॥
अन्वयार्थ-इह जाग्रति जीवन्तं स्वजनं अय स्वप्नकाले मृतं निरीक्ष्य अकस्मात् निर्वेद याति'-ह्या जाग्रदवस्थेत आपल्या एखाद्या जिवंत असलेल्या आप्ताला स्वप्नांत मृत पाहून एकाएकी मनुष्य शोक करूं लागतो-' अथवा (जाग्रत्यां) मृत अमु (स्वप्नकाले ) अमृतं वीक्ष्य हर्ष प्रयाति-' किंवा तसेच जाग्रत्काली मेलेल्या आप्ताला स्वप्नांत जिवन पाहून तो हर्ष मानितो.-' एतस्य जन्तोः निधन स्मृत्वा अपि (अथवा जीवतः ) असुयुति स्मृत्वा अपि तेन साकं भाषते (तथा मृतेन दर्दानालाप करोति)'-ह्या प्राण्याच्या (स्वप्नांतील ) मर- णाचे ह्याला जाग्रतीत स्मरण असूनहि, त्याच्याशी बोलतो; तसेच जाग्रतीत मृत झालेल्याला स्वप्नांत जिवत पाहिल्याचे स्मरण असूनहि त्याच्याविषयी दीनालाप ( खेद ) करितो.-' एव सति भूयोऽल्पकसमयवशात् सत्यता मृषात्वं वा भाति ' असे असताहि दीर्घकाल भासणे व थोडा वेळ भासणे यांमुळेच एक अवस्था सत्य व दुसरी खोटी, असे भासते. [ मागच्या श्लोकात निर्दिष्ट केलेलीच गोष्ट आणखी एक दृष्टान्त देऊन स्पष्ट करितात-व्यवहारामध्ये एखादा पुरुष आपल्या जिवत आप्ताला स्वप्नामध्ये मृत पहातो आणि त्या स्वप्नावस्थेमध्येच त्या आप्ताविषयी आक्रोश करितो. तसेच खरोखर मृत झालेल्या मनुष्याला स्वप्नात जिवंत पाहुन मोठा आनद मानितो. पहिल्या दोन चरणात जाग्रदवस्थेतील विपय स्वप्नांत मिथ्या कसे ठरतात ,ते दाखविले आहे. पण यावर कदाचित् कोणी त्या मरणाचे अथवा जिवतपणाचे स्मरण नसल्या. मुळे असे भ्रामक ज्ञान होते, असे म्हणतील, म्हणून "स्मृत्वा०" इत्यादि पुढील चरणांत सांगतात-जागा झाल्यावर ज्या मनुष्याला स्वप्नामध्ये मृत पाहिले होते त्याच्याशी, त्याच्या मरणाचे स्मरण असूनहि, भाषणादि सर्व व्यवहार करितो. म्हणजे त्याला स्वप्नांतील गोष्टी खोट्या आहेत, असे निश्चयाने माहीत असते. तसेच खरोखरच मृत झालेल्या मनुष्याला हा स्वप्नांत जिवत पहातो व जागा झाल्यावर त्याला त्या स्वप्नाची आठवण असली तरी पूर्वीप्रमाणेच त्या मृताविषयी रडत बसतो. ह्याप्रमाणे दोन्ही प्रकारानी खप्न व जागृति मिथ्या आहेत, असा अनुभव येत असूनहि खामातील विषयांची अगदी थोडा वेळ प्रतीति येत असल्यामुळे ते मिथ्या व जाग्रदवस्येतील विषयांचा बराच वेळपर्यत सत्य, असे लोक मानितात. कारण एका खप्नांत जी वस्तु आपण पाहिली तीच दुसऱ्या खमांतहि पहावयास सांपडेल, किंवा तिचे निदान स्मरण तरी होईल, असा नियम नाही. पण जाग्दवस्थेमध्ये . बापण एकदा ज्याचा अनुभव घेतला त्याच विषयाचा पुनः काही काल अनु. अनुभव येतो येतो म्हगून ते सान्वयार्थ विवरण. भव घेता येतो. किंवा निदान प्रस्तुत देह आणि आत्मा यांचा संबंध असेपर्यंत त्याचे स्मरण तरी असते. म्हणून खमाला मिथ्या व जागृतीला सत्य असें आम्ही भ्रमाने म्हणतो. परतु सूक्ष्म दृष्टीने विचार करू लागले असता त्या दोन्ही अवस्था मिथ्याच आहेत, असे प्रत्ययाला येते. ] ३५. खाप्नस्त्रीसङ्गसौख्यादपि भृशमसतो या च रेतश्च्युतिः स्यात् सादृश्यातदेतत्स्फुरति जगदसत्कारणं सत्यकल्पम् । स्वप्ने सत्यः पुमान्स्यायुवतिरिह मृषैवानयोः संयुतिश्च प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिरिति यतः कल्पनामूलमेतत् ॥३६ अन्वयार्थ-'भृश च असत अनि खामस्त्रीसगसौख्यात् या रेतश्च्युतिः स्यात्'-अगदी खोट्या अशा स्वप्नातील स्त्रीसगसौख्यापासूनसुद्धा जे रेतस्खलन होते.-' तद्वत् असत्कारण एतत् जगत् सादृश्यात् सत्यकल्प स्फुरति '. त्याचप्रमाणे ज्याचे कारण खोटे आहे, असे हे जगत् वरील दृष्टांताप्रमाणेच असल्यामुळे खरे असल्यासारखे भासते.-' स्वप्ने पुमान् सत्यः स्यात् इह युवतिः अनयोः सयुतिः च मृषा एव'-स्वप्नामव्ये पुरुष (भोक्ता ) मात्र खरा असतो, स्त्री व त्या स्त्रीपुरुषाचा सग ही दोन्ही खोटींच असतात; ( परंतु )-' प्रातः शुक्रेण वस्त्रोपहतिः ( प्रत्यक्षसिद्वा ) इति यत. (तस्मात् )-एतत् कल्पनामू- लम् '- परतु प्रातःकाली शुक्राच्या योगाने वस्त्र मलिन झालेले आपण प्रत्यक्ष पाहतो. ज्याअर्थी असे आहे त्याअर्थी हे सर्व कल्पनामूल आहे. [ आतां ह्या श्लोकांत, विश्वाचे उपादान कारण जरी असत् आहे तरी ते व्यावहारिक सत्य कसे, हे दृष्टान्ताने स्पष्ट करितात. स्वप्नातील स्त्रीसग खोटा असतो. परंतु त्याचा परिणाम मात्र सत्यत्वाने अनुभवाला येतो. त्याचप्रमाणे हे जगत व्यावहारिक सत्य असल्यामुळे त्याचे कारण जरी असत् आहे तरी ते सत्य असल्यासारखे भासते. येथे असत् म्हणजे सदसद्विलक्षण अविद्या आणि सत् म्हणजे अनुभवाला योग्य अशी सर्व व्यक्त सृष्टि, असा अर्थ करावा. जगत् सत्य असल्यासारखे भासते, असे म्हटले आहे; केवळ ' सत्य आहे' असे म्हटले नाही. कारण सुषुप्ति-(निद्रा-) अवस्थेमध्ये त्याचा अस्त होत असतो; म्हणून ते परमार्थ सत्य नव्हे, तर तें व्यावहारिक सत्य आहे. पुढील श्लोकार्धात दृष्टान्ताप्रमाणेच दार्टीतिक ( जगत् ) आहे, असे सिद्ध केले आहे. स्वप्नामध्ये पुरुष सत्य असून स्त्री व संभोग हीं खोटी असतात व प्रातःकाली शाल्लोकी जागृत झाल्यावर त्याला शुक्रलिप्त वस्त्र प्रत्यक्ष दिसते. तसेंच आत्मा सत्य असून स्थानीय माया अस-य आहे व त्या दोघांचा संबंध आरोपित अस. ल्यामुळे खोटा आहे आणि त्यापासून उत्पन होणारे जगत् व्यावहारिक सत्य आहे. साराश हे सर्वहि काल्पनिक आहे. यात पारमार्थिक सत्यत्याचा याक- गहि नाही.] ३६. पश्यन्त्याराममस्य प्रतिदिवसममी जन्तवः स्वापकाले पश्यत्येनं न कश्चित्करणगणमृते मायया क्रीडमानम् । जाप्रत्यर्थव्रजानामथ च तनुभृतां भासकं चालकं वा नो जानीते सुषुप्तौ परमसुखमयं कश्चिदाश्चर्यमेतत् ॥३७॥ अन्वयार्थ-अभी जन्तवः प्रतिदिवस स्वापकाले अस्य आराम पश्यन्ति'- हे सर्व प्राणी प्रत्येक दिवशी निद्रित झाले असतां ह्या आत्म्याची क्रीडा- (स्वप्नावस्थेतील व्यवहार ) पहातात; ( परतु)-करणगण ऋते मायया कोड- मान एन न कश्चित् पश्यति'-परतु बाह्येद्रियाचे साहाय्य घेतल्याशिवाय स्वप्नातील देहेद्रियरूरी मायेच्या योगाने व्यवहार करणाऱ्या ह्या आत्म्याला कोणीहि पहात नाहीत.-' अथ जाग्रति अर्थ जाना भासक तनुभृता च चालकं वा ( न पश्यनि)-नसेच जागृतींतहि सस विषयसमहा चा भासक व सर्व प्राण्यांचा चालक, अशा आत्म्याला कोणोहेि पहात नाही,-- ( तथा ) सुषुप्तौ परमसुखमय कश्चित् नो जानीते एतत् आश्चर्यम्' -( आणि पुनः तसेंच) सुषुप्तीमध्ये ( म्हणजे स्वप्नरहित निद्रावस्थेमध्ये ) अत्यत सुखमय अशा आत्म्या- लाहि कोणी पहात नाही, हे केवढे हो आश्चर्य आहे! ! [ आतां श्रीमत् आचार्य तिन्ही अवस्थांमध्ये आत्म्याचा प्रत्येकाला अनुभव येत असूनहि, त्याचे कधी कोणी विवेचन करीत नाही, ह्याविषयी आश्चर्य प्रदर्शित करितात. तिन्ही अवस्थांत आत्म्याचा, स्थूल व सूक्ष्म व्यवहाराने व असंत आनंदवृत्तीने सर्वाना अनुभव येत असूनहि त्याला कोणी जाणीत नाहीत. इसकें व नव्हे तर, त्याच्याविषयी विचार करण्यासहि कोणी तयार होत नाहीत. फार काय पण कित्येक ह्या लोकिक संपत्तीने व विद्वसने मोहित होऊन सर्वाचा निया- मक असा हा परमात्मा आहे. किंवा नाही, ह्या विषयींच साशंक असनाला हे कपड़े बहान आहे! ] ३७.
सान्वयायिय. स्वप्ने मन्त्रोपदेशा श्रवणपरिचितः सत्य एष प्रोगे स्वामादेव प्रसादादाभेलषितफलं सत्यतां प्रातरेति । सत्यप्राप्तिस्त्वसत्यादपि भवति तथा किं च तत्स्वप्रकाशं येने भाति सर्व चरमचरमथोच्चावचं दृश्यजातम् ॥३८॥ अन्वयार्थ- स्वप्ने मन्त्रोपदेशः श्रवणारेचितः सन् एपः प्रबोधे सत्यः ( भवति)' स्वनातील ( गुरूंचा ) मंत्रोपदेश कर्णगोचर झाल्याने जागृत झाल्यावर प्रातःकाली तो सत्य होतो. ( जशाचा तसा आठवतो )-' तथा स्वामात् प्रसादात् एव अभिलाषेतफल ( प्राप्त ) प्रातः सत्यता एति'-तसेच स्वप्नांत ( ईश्वर-) प्रसादाने प्राप्त झालेले इष्ट फठ सकाळी खरे ठरते.-' तथा (च) सत्यप्राप्ति तु अस-यात् अपि भवति'-याअर्थी सत्याची प्राप्ति अस. त्यापासूनसुद्धा होते. '-किंच येन इद सब चर अचर अथ उच्चावच दृश्य. जातं भाति तत् स्वप्रकाश ( आस्ति ) -शिवाय ज्याच्या योगाने हे सर्वहि स्थावर जगमात्मक व उच्च-नीच दृश्यजात भासते (प्रतीतीला येते ) तें आत्मस्वरूप स्वप्रकाश आहे. | जाग्रवस्था मिथ्या आहे, असे स्वप्नदृष्टान्ताने सांगितले असता त्या अवस्थेममे गुरूपदेश ने व अनिषदाच्या विचाराने होणारा ब्रह्मबोध व ज्या ब्रह्माचा अशा मिथ्या जाग्रदयस्येत बोध होणार तें ब्रह्म ही दोन्ही वध्यापुत्राप्रमाणे मिथ्याच असली पाहिजेत, अशी शका कोणी घेतील म्हणून आचार्य म्हणतात-गुरु प्रिय शिष्याच्या स्वप्नात येऊन त्याला मंत्राचा उपदेश करितात. तो मत्र त्याच्या सूक्ष्म श्रवणेंद्रियाशी परिचित झा. ल्याने प्रातःकाली जशाचा तसा आठवतो. म्हणजे तो मंत्रोपदेश सत्य ठरतो. तसेच, एखादा पुरुष ईश्वराच्या अनुग्रहाने स्वप्नांत इष्ट फल मिळालेले पहातो व तीच गोष्ट सकाळी खरी ठरते ( प्रत्ययाला येते). स्वप्नांत एखाद्याला मित्रा- दिकांचे पत्र आल्याचे दिसते, किंवा कोणी रोगग्रस्त आप्त बरा होण्याचे शुभसूचक स्वप्न पहातो व तसाच त्याला जागेपणी पुढे अनुभवहि येतो. सारांश-ज्याअर्थी असत्यापासून सुद्धा सत्याची प्राप्ति हाते, ही गोष्ट सिद्ध झाली, त्याअर्थी मिथ्या जाग्रदवस्थेमध्ये होणारा ब्रह्मबोध सत्य अशा तुरीयाव. स्थेत सत्य ठरण्यास काही प्रत्यवाय नाही. शिवाय या सर्व दृश्य पदार्थाना प्रकाशित करणारा परमात्मा स्वप्रकाश आहे, म्हणजे एका दिव्याला पहाण्या- करितां अशी दुसम्या दिव्याची बामश्याका मसते तशीच याया जानाला दुसम्या कमातीहि अशा माही..] ३८.
१८ शरलोकी. मध्यप्राणं सुषुप्तौ स्वजनिमनुविशन्त्यमिसूर्यादयोऽमी वागाद्याः प्राणवायुं तदिह निगदिता ग्लानिरेषां न वायोः। तेभ्यो दृश्यावभासो भ्रम इति विदितः शुक्तिकारौप्यकल्प: प्राणायामव्रतं तच्छ्रुतिशिरसि मतं स्वात्मलब्धौ न चान्यत् ३९ अन्वयार्थ-'सुषुप्तौ अमी अग्निसूर्यादयः स्वजनिं मध्यप्राण अनुविशन्ति'- सुषुप्तीमध्ये ह्या अग्नि-सूर्यादिक देवता स्वकारणभूत मुख्य प्राणामध्ये प्रविष्ट होतात.-' (तथा ) वागाद्याः प्राणवायु (अनुविशन्ति ) ' तसेच, वागादि इंद्रियें प्राणवायूत प्रविष्ट होतात.-' तत् एषा-इह ग्लानिः निगदिता' म्हणून त्यांचा सुषुप्त्यवस्थेमध्ये लय होतो, असे सागितले आहे.-' (कितु ) वायोः न (ग्लानिः)'-(परतु ) प्राणवायूचा कोंच लय होत नाही. -'शुक्तिका- रौप्यकल्प तेभ्यः ( यः ) दृश्यावभासः ( सः) भ्रम' इति विदितः '-( अर्थात् ) शिंपीच्या ठिकाणी जसा रुप्याचा भास होतो, तसा इद्रियांच्या योगाने जो हा जगाचा भास होत असतो, तो श्रम आहे, असे समजत.-'तत् स्वात्मलब्धौ प्राणायामत्रत श्रुतिशिरसि मत न च अन्यत् ' म्हणून आत्मप्राप्त होण्याक- रिता प्राणायामवतच वेदान्तसमत आहे, अन्य काही नाही [ह्याप्रमाणे माग. च्या श्लोकांत स्वप्नाच्या दृष्टान्ताने जगत् मिथ्या आहे, असे प्रतिपादन करून ह्या श्लोकांत ' ते सत्य आहे' असे भासणाचा जाग्रत्-अवस्थेतहि ते मिथ्याच आहे, असे निरूपण करितात. 'वाणीची देवता अग्नि, प्राणाची देवता वायु, नेत्रांची देवता सूर्य, श्रवणांची देवता दिशा व त्वगिंद्रियाची देवता ओपधि- वनस्पति होय' असे उपनिषदातून अनेक ठिकाणीं वर्णन आहे. सुषुप्तीमध्ये ह्या सर्व इद्रियदेवता मुख्य प्राणात ( विराट्सज्ञक जीवतत्त्वांत ) प्रविष्ट होतात. कारण तो मुख्य प्राणच त्यांचे उत्पत्तिस्थान आहे. तसेच वाक्, चक्षु इत्यादि इंद्रियें इंद्रनांवाच्या प्राणवायूत प्रविष्ट होतात. म्हणूनच देवतांसह इंद्रियांचा सुषप्तीत लय होतो, असें उपनिषदांत सागितले आहे. पण ह्या स्थूलसूक्ष्मप्रपचाचा जीत लय होत असतो, अशा सुषुप्नींत प्राणवायूचा कवींच अस्त होत नाही. कारण श्वासरूपाने तो त्या अवस्थेतहि प्रत्यक्ष दिसत असतो व यावरून जा- गृतीत आपल्या इंद्रियांच्या द्वारा जी रूप-रसादि विषयांची प्रतीति येत अस- ल्यासारखी वाटते ती खरी नव्हे, तर तो शुक्तिरौप्यप्रतीतीप्रमाणेच भ्रम आहे, असे समजते. यास्तव तिन्ही अवस्थांमध्ये लय न पावणाऱ्या प्राणाचे नियमन सावकार्य विवरण. करणे हाच आत्मज्ञानाचा उत्तम उपाय आहे, असें वेदान्तांत सांगितले आहे; पण चक्षुरादि इंद्रियव्रता चा कोठेहि उपदेश केलेला नाही. कारण ती इंद्रिये कोणत्याच अवस्थेत आत्मसाक्षात्कार करून द्यावयास समर्थ होत नाहींत. ] ३९ नोऽकस्मादामेघः स्पृशति च दहनः किन्तु शुष्कं निदाघा- दाई चेतोऽनुबन्धैः कृतसुकृतमपि स्वोक्तकर्मप्रजाथैः । तहज्ञानाग्निरेतत्स्पृशति न महसा किन्तु वैराग्यशुष्कं तस्माच्छुद्धो विरागः प्रथममभिहितस्तेन विज्ञानसिद्धिः ॥४० अन्वयार्थ- ' दहनः आर्द्र एध अकस्मात् नो स्पृशति च किन्तु निदा घात् शुष्कं (स्पृशति)'-अग्नेि ओल्या काष्ठाला एकाएकी स्पर्श करीत नाही; परतु उष्णतेने वाळून शुष्क झालेल्या काष्ठाला स्पर्श करितो ( जाळतो ). --' तद्वत् अनुबन्धै एतत् आई चेत स्त्रोक्त कर्मप्रजायैः कृतसुकृत अपि ज्ञानाग्निः सहसा न स्पृशति'-तसेच भार्यापुत्रादि आधीनी आई झालेल्या ह्या अंत:- करणाला, विहित कर्म, प्रजा व वित्त याच्या द्वारा त्या अतःकरणाने सुकृत केले असले तरी, ज्ञानाग्नि सहसा स्पर्श करीत नाही.-'किन्तु वैराग्यशुष्क (स्पृशति )'-तर वैराग्याने शुष्क झालेल्या अतःकरणाला तो स्पर्श करितो तस्मात् प्रथम शुद्धः विराग. अभिहित: ' म्हणून प्रथमतः शुद्ध विरक्ति सांगितली आहे-( ततः ) तेन विज्ञानासिद्धिः ( भवति )'-आणि मग तिच्या- योगाने विज्ञानसिद्धि होते. [ आचार्यानी वैराग्याच्या योगानेच ज्ञानप्राप्ति होते, असे ह्या श्लोकात दर्शविले आहे. ओल्या काष्ठाला अग्नि एकदम जाळीत नाही. पण वाळलेल्या इंधनाला तत्क्षणीच जाळून टाकतो, हे जगत्प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे भार्यादि विषयाच्या योगाने दूषित झालेल्या अतःकरणांत ज्ञानोदय होत नाही. आपल्या वर्णाला व आश्रमाला उचित अशी सध्या. वंदनादि कमैं, धर्मपत्नीपासून पुत्रोत्पत्ति व द्रव्यसाध्य यज्ञ दानादि यांच्या योगाने, एखाद्या पुरुपाने पुष्कळ पुण्य जरी सपादन केले असले तरी त्याचे अंतःकरण विषयासक्त असल्यामुळे त्यातहि ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. परंतु विषयवैराग्याने ज्या धन्य पुरुषाचे अतःकरण रुक्ष होऊन गेलेले असते त्यालाच ज्ञानप्राप्ति होते. म्हणून प्रथमतः साधकानें अवश्य शुद्ध वैराग्यसपन्न ( वांति होऊन पडलेल्या अन्नाप्रमाणे विषयांविषयी निस्तृष्ण ) व्हावे, असें वेदान्तांत अनेक स्थळी सांगितले आहे व असे उत्तम वैराग्य प्राप्त झाले असतां मग बनायासें ज्ञानसिद्धि होते. ह्याविषयीन कर्मणा न प्रजया धनेन स्यागेन.' (सा. ना. पृ० ३५) म्ह० कर्माने, प्रजेनें, किंवा वित्ताने मोक्षप्राप्ति होत नसून केवळ विरक्तीनेच त्याची प्राप्ति होते, अशा अर्थाची श्रुति प्रमाण आहे. ४०. यत्किंचिन्नामरूपात्मकमिदमसदेवोदितं भाति भूमौ येनानेकप्रकारैर्व्यवहरति जगयेन तेनेश्वरेण । तद्वत्प्रच्छादनीयं निभृतरशनया यद्वदेव द्विजिह्वः तेन त्यक्तेन भोज्यं सुखमनतिशयं मा गृधोऽन्यद्धनाद्यम् ॥ अन्वयार्थ- यत् किंचित् असत् एव उदित इदं नामरूपात्मकं ( जगत्) भूमौ येन भाति '-जे हे काही मिथ्याच उत्पन्न झालेले नामरूपात्मक जगत् या व्यवहरात ज्याच्यामुळे भासते,-' येन जगत् अनेकप्रकारैः व्यवहरति '- ज्याच्यायोगाने प्राणी अनेकप्रकारे व्यवहार करितात,-'तेन ईश्वरेण यद्वदेव निभृतरशनया द्विजिह्वः तद्वत् प्रच्छादनीयं '-त्या ईश्वराने रज्जु जशी सर्पाला झांकून टाकिते, तसे (हे) झाकून टाकावें. (सारांश ह्याप्रमाणे )-'तेन त्यक्तेन (च) अनतिशय सुखं भोज्यं '-जगदाभासाचा त्याग करून अत्युत्तम सुखाचा उपभोग ध्यावा व-' अन्यत् धनाद्य मा गृधः '-धनादि अन्य विषयांची इच्छा करूं नये. [ पूर्व श्लोकात प्रथमतः वैराग्यसपत्ति व नंतर त्यापासून ज्ञान असा क्रम सांगितला आहे. आता त्या उपदेशक्रमाला आधार असणाऱ्या ' ईशावा- स्यमिद सर्व....मा गृधः कस्यस्विद्धनं ' (सु. उ. स. पृ० १) इत्यादि ईशा- वास्य श्रुतीचा येथे अनुवाद करितात-शिंपीच्या ठिकाणी भ्रमाने जसा रुप्याचा उदय होतो, तसेच हे केवल स्वाज्ञानाने नाम-रूपानी व्यक्त झालेले जगल् ज्याच्यामुळे प्रतीतीला येते व ज्याच्यामुळे यांतील सर्व जन व्यवहार करितात, त्या ईश्वराच्या योगाने हे साधकाने झांकावें. म्ह० व्यवहारांत दोरीचे ज्ञान न झाल्याने हा सर्प आहे, अशी आपणाला प्रतीति येते; पण दोरीचे यथार्थ ज्ञान झाले असतां जसी तो सर्प दोरीत विलीन होतो ( दोरीने त्याला झाकल्यासारखे आपणाला वाटते ) तसेच हे भ्रामक जगत् ब्रह्मानें झांकून टाकावे. हे सर्व जगत् सर्वप्रवर्तक जे ब्रह्म, तद्रूप आहे, असे पहावे आणि अशा भावनेने सर्व जगदाभास सर्वथैव नष्ट झाला असता, सर्वोत्कृष्ट सुखाचा यथेच्छ अनुभव ध्यावा. पण धनादि अन्य विषयांची पुनः कधीहि इच्छा करूं नये. कारण सान्वयार्थ विवरण. ११ त्यांच्यायोगाने सावक स्वरूपज्ञानापासून भ्रष्ट होतो. सारांश १ ईश्वरमय सर्व जगत् पहावें; २ त्यामुळे अत्यंत सुख भोगावें व ३ विषयांची इच्छा करूं नये, असे तीन उपदेश या श्लोकांत केले आहेत. ] ४१. जीवन्मुक्तिर्मुमुक्षोः प्रथममथ ततो मुक्तिरात्यन्तिकी च तेऽभ्यासज्ञानयोगाद्गुरुचरणकृपापांगसंगेन लब्धात् । अभ्यासोऽपि द्विधा स्यादधिकरणवशादैहिको मानसश्च शारीरस्त्वासनाद्यो ह्युपरतिरपरो ज्ञानयोगः परोक्तः ॥ ४२ अन्वयार्थ-'अथ मुमुक्षोः प्रथमं जीवन्मुक्तिः ततः आत्यन्तिकी च मुक्ति'- प्रथमत मुमुक्षूला जीवन्मुक्ति आणि नतर निरतिशय मुक्ति प्राप्त होते-ते गुरुचरणकृपापाङ्गसगेन लब्धात् अभ्यासज्ञानयोगात् ( भवतः)'-व त्या दोन मुक्ति, गुरुचरणकृपाकटाक्षाच्या योगाने साध्य झालेल्या अभ्यासाने व ज्ञानयो- गाने प्राप्त होतात.-' अभ्यास अपि अधिकरणवशात् दैहिक. मानसः च इति द्विधा स्यात् '-आधाराच्या योगानें दैहिक व मानसिक असा दोन प्रकारचा अभ्यास आहे-'आसनाद्यः शारीर. अपर हि उपरतिः ( मानस')'-यम, नियम, आसन, इत्यादि शरीराचा व शाति, प्रपंचोपशम वगैरे हा मनाचा अभ्यास होय.-' ज्ञानयोगः परोक्तः हि'-ज्ञानयोग हा सर्वापेक्षा श्रेष्ठच सागि- तला आहे. [ आता दोन प्रकारचा मोक्षोपाय सांगतात-मुमुक्ष पुरुषाला प्रथ- मतः जीवन्मुक्ति प्राप्त होते. जिवत असता मुक्ताप्रमाणे नि.संग असणे हाच जीवन्मोक्ष होय. भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी अशा जीवन्मुक्त पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हटलं आहे. प्राक्तन भोग संपल्यावर देहाचा त्याग करून, शुद्धोदक शुद्धोदकात टाकिले असतां जसें तें तद्रूप होऊन जाते त्याप्रमाणे, तो मुमुक्षु ब्रह्मरूप होऊन जातो. ह्यालाच निरति- शय मुक्ति असे म्हणतात व ह्या दोन्हीहि मुक्ति, पूज्य गुरूंच्या कृपाकटाक्षाने प्राप्त झालेला अभ्यास (म्ह० एकच क्रिया पुन पुन. करणे) व ज्ञानयोग, या दोन उपायांनी प्राप्त होतात. तो अभ्यास देहाच्या आश्रयाने व मनाच्या आश्रयाने होत असतो. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार हा देहाच्या योगाने होणारा अभ्यास आणि मनाच्या सर्वहि वृत्ति शांत झाल्यामुळे जो सर्व प्रपंचाचा उपशम होत असतो, तो दुसरा मानसिक अभ्यास होय. वस्तुतः भासनादिसिद्धि व प्रपंचाचा उपशम हा अभ्यास नसून, ही दोन्ही अभ्या- १२ शतश्लोकी. - साची फलें आहेत व आसनादि सिद्धि होण्याकरिता योगशास्त्रांत सांगितल्या- प्रमाणे पुनः पुनः प्रयत्न करणे हाच खरा अभ्यास होय. ज्ञानयोग या द्विविध अभ्यासाहून श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे व तो या अभ्यासाच्या योगाने प्राप्त होतो.] ४२. सर्वानुन्मूल्य कामान् हृदि कृतनिलयान्क्षिप्तशंकूनिवाच्चै- जीर्यदेहाभिमानस्त्यजति चपलतामात्मदत्वावधानः । यात्यूलस्थानमुच्चैः कृतसुकृतभरो नाडिकाभिर्विचित्रं. नीलश्वेतारुणाभिः स्रवदमृतभरं गृह्यमाणात्मसौख्यः ॥ ४३ अन्वयार्थ-' उच्चैः क्षिप्तशंकुन् इव हृदि कृतनिलयान् सर्वान् कामान् उन्मूल्य जीर्यदेहाभिमानः आत्मदत्तावधानः (च) सन् चपलता त्यजति जोराने ठोकलेल्या खिळ्याप्रमाणे हृदयामध्ये घर करून राहिलेल्या सर्वहि इच्छांना काढून टाकून ज्याने देहाभिमान सोडला आहे व ज्याने आत्मानुसं- धान ठेविले आहे, असा पुरुष मनाची चपलता टाकितो-' (तथाभूतः सन् ) कृतसुकृतभरः गृह्यमाणात्मसौख्यः नीलश्वेतारुणाभिः नाडिकाभिः विचित्रं स्रवदमृतभरं उच्चैः ऊर्ध्वस्थान याति '-त्र याप्रमाणे वृत्तिरहित होऊन ज्याने पुष्कळ पुण्य केले आहे व जो आत्मसौख्याचा अनुभव घेत आहे, असा जीव- न्मुक्त, नील, श्वेत व अरुणा अशा नाड्यांनी विचित्र व ज्याच्यापासून अमृत- स्राव होत असतो अशा सर्वोत्कृष्ट ब्रह्मस्थानाला जातो. [ पूर्व श्लोकात सांगि. तलेल्या दोन मुक्तीपैकी जीवन्मुक्ति कोणती हे सांगतात-ज्याप्रमाणे तीक्ष्ण अनाचा खिळा जोराने भूमीमध्ये ठोकला असतां तो पुष्कळ खोल जाऊन तेथे घर करून बसतो, त्याप्रमाणे अनेक कल्पपर्यत संस्काररूपाने (बीजरू- पाने ) हृदयामध्ये दृढ होऊन राहिलेल्या सर्व मनोरथांना समूळ काढून टाकून जो मुमुन देहाविषयी निरभिमान झाला आहे व जो आत्म्याच्या ठिकाणी अंतःकरणाचे अवधान ठेवून राहतो, त्याच्या मनाची विक्षिप्तावस्था ( चांचल्य) सर्वथैव नष्ट होते. मनाची चंचलता गेली असता प्राण्याच्या हातून राजस व तामस कृत्ये होत नाहीत. त्यामुळे त्याचा पुष्कळ पुण्यसंचय होतो. पण देहसंबंधामुळे किंचित् अभिमान राहिल्याने ' मी आत्मानुभवी आहे' असे त्याला वाटत असते. सारांश, आत्मानुभवी जीवन्मुक्त पुरुष निळ्या, पांढऱ्या व आरक्त नाड्यांनी विचित्र व कुंडलिनीचा भेद झाल्यामुळे ज्याच्यापासून अमू- सान्वयार्थ विवरण. ५३ यदा ताचा स्राव होत असतो अशा सर्वश्रेष्ठ ब्रह्मरंध्राला सुषुम्नानाडीच्या द्वारा जातो. या प्रतिपादनाला सर्वे प्रमुच्यन्ते० " (सु. उ. सं. पृ०६९२) इत्यादि बृहदारण्यकांतील चार कंडिका आधार आहेत. त्यांचे तात्पर्य-या मुमुक्षु पुरुषाच्या अतःकरणांतील सर्व वासना नष्ट झाल्या असतां तत्क्षणींच तो ( मरणधर्मवान् ) अमृत ( मरणधर्मरहित ) होतो व त्याला या देहांतच ब्रह्मानुभव येतो १. याज्ञवल्क्य जनकाला म्हणाले-“हे राजा, जशी सर्पाची जीर्ण त्वचा (कात ) सर्पाच्या बिळांत साप्रमाणेच पडलेली असते व ती निश्चेष्ट असली तरी दुरून पाहणाराला सर्पासारखीच भासते; पण सर्पाच्या दंशादि क्रिया मात्र करीत नाही; तसाच हा जीवन्मुक्त पुरुष शरीरांत राहू. नहि काही क्रिया करीत नाही व स्थूल-सूक्ष्म देहांविषयी अभिमानरहित होऊन रहातो. त्याच्याकडे पहाणाराना तो इतरांप्रमाणेच व्यवहारी आहे, असे वाटते, पण वस्तुतः तो तसा नसतो" २. गुरूपदेशद्वारा प्राप्त झालेल्या उत्तम व सुषुम्नानाडीरूप असल्यामुळे अति सूक्ष्म अशा मार्गाचे मी अनुष्ठान केले. कारण ह्या मार्गाच्या अवलबनाने धीर ब्रह्मज्ञानी पुरुष ससारापासून मुक्त होऊन ब्रह्मरन्ध्रनावाच्या उत्तम पदाला जातात ३. शुक्ल, नील इत्यादि अनेक रंगांच्या नाड्यानी ते स्थान विचित्र झाले आहे. ह्या सुषुम्ना मार्गाचेच अनुष्ठान ब्रह्मदेवाने मजकडून करविले; पुण्याचरणी आणि विराडूप झालेला ब्रह्मज्ञानी त्याच मार्गाने जातो.] ४३. प्रापश्यद्विश्वमात्मेत्ययमिह पुरुषः शोकमोहायतीतः शुक्रं ब्रह्माध्यगच्छत्स खलु सकलवित्सर्वसिझ्यास्पदं हि । विस्मृत्य स्थूलसूक्ष्मप्रभृतिवपुरसौ सर्वसंकल्पशून्यो जीवन्मुक्तस्तुरीयं पदमधिगतवान्पुण्यपापैविहीनः ॥ ४ ॥ अन्वयार्थ-इह शोकमोहाद्यतीतः अयं पुरुषः विश्वं आत्मा इति प्राप- श्यत्'-या देहामध्ये असतांनाच सर्व शोक व मोह यांचा त्याग करून हा पुरुष हैं विश्व आत्मा आहे, असे पाहतो.-' (तया) शुक्र बह्म अध्यगच्छत् ' त्याच- प्रमाणे [हिरण्यगर्भनांवाच्या ] शबलब्रह्माची त्याला प्राप्ति होते.-' तथा सः खलु सकलवित् सर्वसिद्धयास्पदं हि ( जातः)'-खरोखर तो सर्वज्ञ पुरुष सर्व सिद्धींचे स्थानच होतो.-' असौ स्थूल-सूक्ष्मप्रभृति वपुः विस्मृत्य सर्वसंकल्प- शून्या सन् तुरीयं पदं अधिगतवान्'-तसेंच हा पुरुष स्थूल, सूक्ष्म इस्लादि ५४ शरीरांस विसरून सर्वहि मनोवासनांचा त्याग करून तुरीयपदाची प्राप्ति करुन घेतो.-'(ततः) पुण्यपापैः विहीनः जीवन्मुक्तः (भवति)'-नंतर तो पुण्यपा- परहित होऊन जीवन्मुक्त होतो. [ आचार्य पूर्वनिर्दिष्ट जीवन्मुक्ताचे प्रतिपादन करणाऱ्या “यस्मिन्सर्वाणि भूतानि०" ह्या ईशावास्योपनिषद् श्रुतीचा अनुवाद करून म्हणतात-हा पुरुष ह्या देहामध्ये असतांनाच सर्वहि सांसारिक शोक व मोह ह्यांचा त्याग करून हे सर्वहि विश्व आत्माच ( म्हणजे ब्रह्मरूप) आहे, असे पहातो. म्हणजे त्या सूक्ष्मदृष्टि पुरुषाचा मोह सर्वथैव नष्ट झाल्या- मुळे, केवळ भ्रमाने भासणारे हे जगत् त्याला जगद्रूपाने न दिसतां ब्रह्मरूपाने दिसते व अभ्यासाने त्याची दृष्टि ह्या सर्व सृष्ट पदार्थात अत्यत गुप्त अस- णाऱ्या तत्त्वाला पहाण्याइतकी सूक्ष्म झाल्यामुळे सर्वहि जगत् स्वात्मरूप आहे, असें तो पहातो. म्हणूनच हिरण्यगर्भनावाच्या शबल ब्रह्माची त्याला प्राप्ति होते. म्हणजे तो स्वतःच हिरण्यगर्भ ( सूत्रात्मा ) होतो. त्यामुळेच त्याचे ठिकाणी सर्वज्ञत्व येते व त्याला अणिमा, लघिमा इत्यादि यौगिक अष्टसिद्धि प्राप्त होतात. त्याचप्रमाणे हा पुरुष स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही शरीरें विसरून व सर्वहि शुभाशुभ वासना सोडून शुद्ध व निरंतर अशा आत्मसु. खाचा अनुभव घेतो. नतर इतक्या सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या ह्या जीव- न्मुक्त पुरुषाला पुण्य-पाप स्पर्शहि करीत नाही. म्हणजे त्याची संचित व क्रिय- माण कर्मे दग्ध होतात. वर निर्दिष्ट केलेल्या ईशोपनिषदातील श्रुतीचे बहुतेक तात्पर्य ह्या श्लोकामध्ये आलेच आहे. म्हणून विस्तार करीत नाही. [ईशोपनिष- द्भाष्यार्थ पृ. २२ पहा ] ४४. यः सत्त्वाकारवृत्तौ प्रतिफलति युवा देहमात्रावृतोऽपि तहमैंर्बाल्यवाादिभिरनुपहतः प्राण आविर्बभूव । श्रेयान साध्यस्तमेतं सुनिपुणमतयः सत्यसंकल्पभाजोऽ- प्यभ्यासाद्देवयन्तः परिणतमनसा साकमूवं नयन्ति ॥१५ अन्वयार्थ- यः युवा सत्त्वाकारवृत्तौ प्रतिफलति प्राणः आविर्बभूव'-जो आत्मा अंतःकरणांत प्रतिबिबित होतो, तोच प्राण होय.-' (सः) देहमात्रावृतः अपि तद्धमैंः बाल्यवाद्धर्यादिमिः अनुपहतः सन् श्रेयान् (च) साध्यः (आस्ति)- तो देहेंद्रियांनी आच्छादित झालेला असला तरी त्यांच्या बाल्य, वार्धक्य इत्यादि धर्मानों लिप्त होत नसून कल्याणरूप व साध्य आहे.-' तं सत्यसंकल्पभाज:
सान्वया विवरण. उत्पन्न सुनिपुणमतयः अपि अभ्यासात् देवयन्तः परिणतमनसा साकं ऊर्ध्वं नयन्ति'- त्याला कुशल बुद्धीचे केवल ब्रह्माविषयींच संकल्प करणारे व अभ्यासाने देवस्वप्राप्ति करून घेण्याची इच्छा करणारे पुरुष एकाग्र अतःकरणासहवर्तमान ऊर्ध्वलोकी (ब्रह्मरंध्रांत ) नेतात. [ श्रीमत् आचार्य आतां ह्या श्लोकामध्ये जीवन्मुक्ताचे मन व प्राणहि अधोगतीला न जाता ऊर्ध्व गतीला जातात, असे ऋग्वेदस्थ "युवा सुवासाः परिवीत. '' इत्यादि श्रुतीच्या आधाराने सांगतात-जो आत्मा पचमहाभूताच्या सत्त्वगुणांशापासून झालेल्या अतःकरणांत प्रतिबिाबत होतो तोच जीव होय. तो देहेंद्रियांनी वेष्टित झाला तरी बाल्य, यौवन इत्यादि देहधर्म व अंधत्व, बधिरत्व इत्यादि इंद्रियधर्म यानीं लिप्त होत नाही. तो अत्यत कल्याणरूप असून त्याची प्राप्ति करून घेता येते. (तद्रूप होतां येते. ) अशा त्या प्राणाला, सूक्ष्मबुद्धि पंडित, सत्य अशा ब्रह्माचे ठिकाणी मनोवृत्ति ठेवणारे उत्तम साधक व पूर्वी बेचाळीसावे श्लोकात सागितलेल्या विविध अभ्यासाने देवत्वप्राप्ति करून घेणारे मुमुक्षु सस्कारांच्या योगाने अत्यत निर्मल झालेल्या अंत:- करणासहवर्तमान ऊर्ध्वश्लोकी नेतात; म्हणजे सुषुम्नानाडीच्या द्वारा ब्रह्मरन्ध्रांत नेतात. ] ४५. प्रायोऽकामोऽस्तकामो निरतिशयसुखायात्मकामस्तदाऽसौ तत्प्राप्तावाप्तकामः स्थितचरमदशस्तस्य देहावसाने। प्राणा नैवोकमान्त क्रमविरतिमिताः स्वस्वहेतौ तदानीं कायं जीवो विलीनो लवणमिव जलेखण्ड आत्मैव पश्चात् ॥ अन्वयार्थ-' (जीवन्मुक्तः पुरुषः ) प्रायः अकामः ( यतः) अस्तकामः'- जीवन्मुक्त पुरुष बहुतकरून निष्काम असतो. कारण त्याच्या सर्वहि तृष्णा नष्ट झालेल्या असतात.-' तदा असौ निरतिशयसुखाय आत्मकामः' त्यावेळी हा पुरुष परमानंदप्राप्ति होण्याकरिता आत्मप्राप्तीचीच इच्छा करितो-' तत्प्राप्ती स्थितचरमदशः सन् आप्तकामः'- व आत्म्याची प्राप्ति झाली असतां स्याची अंत्यावस्था सिद्ध होऊन त्याच्या सर्वहि तृष्णा पूर्ण होतात.-' देहावसाने तस्य प्राणाः नैव उत्क्रान्ति (कितु) स्वस्वहेतौ क्रमविरति इताः (भवन्ति)'- मरणस- समयीं त्याचे प्राण निघून जात नाहीत, तर ते आपापल्या कारणामध्ये जमा लीन होतात. तदानी कम जीयः (न काल यसः)बले लानं इस विलीन:'- तेव्हां हा जीव कोठे असतो ! अर्थात् कोठेहि नाही. कारण जला. मध्ये लवण जसे विरून जाते, तसा तो खकारणामध्ये लीन होतो.-'पश्चात् अखण्ड आत्मा एवं'- व असे झाल्यानतर तो अखंड आत्माच होय. [ आतां निर्वाण मुक्ति की प्राप्त होते ते सांगतात-पूर्वी ज्या जीवन्मुक्ताचे निरूपण केलें तो जीवन्मुक्त पुरुष नियमाने नाही, तरी बहुतकरून निष्कामच असतो. कारण दृढाभ्यासाने आत्मरूप झालेल्या मनाची विक्षेपशक्ति नाहींशी झाल्या- मुळे तजन्य सर्व तृष्णाहि नाहीशा होतात. असे जरी आहे तरी परमानदरूप मात्म्याची प्राप्ति झाली असता हा पुरुष निरिच्छ होतो. कारण परमानंदामध्ये बाकीच्या सर्व क्षुद्र आनदांचा अतर्भाव होणे साहजिक आहे. भगवानानीहि 'यं लब्ध्वा चापरं लाभ मन्यते नाविक ततः'-ज्या परमानदरूप योगाची प्राप्ति झाली असता त्याहून दुसरा एखादा अधिक लाभ आहे, असे त्याला वाटत नाही, असे म्हटले आहे. नंतर त्याची अगदी शेवटची अवस्था सिद्ध होते; म्हणजे देहसंबंध असल्यामुळे मुख्य विदेह मुक्तीहून थोडयाशा अली- कडच्या अवस्थेमध्ये तो राहतो. अशा ह्या जीवन्मुक्ताचा मरणकाल प्राप्त झाला असता त्याचे प्राण हे शरीर सोडून जात नाहीत. पुनः जन्म घेण्याकरिता संचिताचा साठा बरोबर घेऊन ज्यावेळी मन देहाला सोडून जाते, तेव्हां त्याला प्राणोत्क्रमण असे म्हणतात; परंतु जीवन्मुक्त पुरुषाचे सर्व संचित व क्रियमाण कर्म ज्ञानाग्नीने दग्ध झाल्यामुळे त्याला पुनर्जन्म घ्यावयाचा नसतो. म्हणून त्याच्या प्राणांचें उत्क्रमणहि होत नाही. तर त्यांची ज्या ज्या तत्त्वापासून उत्पत्ति झालेली असते, त्या त्या तत्त्वामध्ये ते उत्पत्तीच्या क्रमानेच लनि हो- तात. त्यावेळी मग हा जीव कोठून रहाणार ! कारण उदकांत लवण जसे लीन होते तसाच हा स्वतःच्या उपादान कारणांत लीन होतो. मग हा जीव आणि हा आत्मा, असा भेद पाडणारी त्याची उपाधि नष्ट झाल्यामुळे तो स्वतः अखंड आत्माच होऊन राहतो. — ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति' (सु. उ. सं. पृ. ६९१ )-जीव प्रथमतः ब्रह्मच असून मध्येच जीवदशेत येतो व पुनः ब्रह्माला मिळतो' अशी श्रुतिहि आहे.] ४६. पिण्डीभूतं यदन्तर्जलनिधिसलिलं याति तत्सैन्धवाख्यं भूयः प्रक्षिप्तमस्मिन्विलयमुपगतं नामरूपं जहाति । प्राज्ञस्तद्वत्परात्मन्यथ भजति लयं तस्य चेतो हिमांशी । वागमौ चक्षुर। पयसि पुनरसप्रेतसी दिक्षु कर्णौ ॥ १७ ॥ ? -- मान्नवार्य पिपरण. ५७ अन्वयार्थ- यत् पिण्डीभूतं अन्तर्जलनिधिसलिलं तत् सैन्धवाख्यं याति' -जे शुष्क होऊन खड्यासारखें घट्ट झालेलें समुद्राचे पाणी, त्यालाच सैन्धव (मीठ ) असे म्हणतात.-' भूयः ( तत् ) अस्मिन् प्रक्षिप्त विलयं उपगतं सत् नामरूपं जहाति '-व तेच पुन. पाण्यात टाकिले असतां विरघळून जाऊन आपलें नामरूप सोडिते.-'तद्वत् प्राज्ञः परात्मनि लय भजति'-त्याचप्रमाणे जीव परमात्म्याचे ठिकाणी लय पावतो.-' अथ तस्य चेतः हिमाशौ वाक् अग्नौ चक्षुः अर्के पुनः असृप्रेतसी पयसि कर्णौ दिक्षु विलय (भजतः)'-तसेच क्रमाने त्याचे अतःकरण चद्रामध्ये, वाणी अग्नीमध्ये, नेत्र सूर्यामध्ये, तर रक्त व रेत उदकामध्ये आणि कर्ण दिशांमध्ये लय पावतात. [ मागच्या श्लोकांतील लवणाचा दृष्टान्त आता येथे स्पष्ट करितात-समुद्रांतील उदकाचाच सैधव हा एक विकार आहे. पण तो सैववरूपाने भासू लागला असता त्याचे पूर्व नामरूप जाऊन लवण हे नांव, पांढरे रूप व शुष्क खड्यासारखा आकार, हीं त्याला येतात म्हणजे याची उत्पत्ति उदकापासून झाली असेल, असे कोणालाहि वाटत नाही. पण तेच लवण कारणभूत उदकांत टाकिले असता पुनः आपल्या मूळच्या रूपाला प्राप्त होऊन आपले नामरूप टाकिते. तसेच प्राज्ञ-प्रत्य- गात्मा सच्चिदानंदस्वरूपांत मिळतो व त्याचें नाम, रूप, वर्ण, आश्रम इत्यादि सर्व नष्ट होतात आणि असे झाले असता त्या प्रत्यगात्म्याला जीवत्व प्राप्त करून देणारे अंतःकरण, वाणी, नेत्र, रक्त, रेत इत्यादिकांचा त्यांच्या त्यांच्या कारणांमध्ये लय होतो. सारांश-ज्याप्रमाणे उदकांत टाकिलेला मिठाचा खडा त्यांत विरून गेला असता, पुनः बाहेर काढूत पृथक्पणे दाखवितां येत नाही, त्याचप्रमाणे चित्तादिक उपाधींचा लय होऊन प्रत्यगात्मा स्वरूपाला जाऊन मिळाला असता त्याला पुनः जीवत्वदशा प्राप्त होत नाही. बृहदारण्यक श्रुतींत ( २.४ पृ. १९८ ) भगवान् याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीनामक ज्येष्ठ पत्नीला हाच जल-लवणाचा दृष्टान्त देऊन उपदेश केला आहे. त्याचप्रमाणे आतभागनामक जरत्कारुपुत्राने-" जीवन्मुक्त पुरुष मृत झाला असता, त्याची वाणी अग्नीमध्ये, नेत्र सूर्यामध्ये, मन चंद्रामध्ये, कर्ण दिशांमध्ये, इत्यादि आपल्या म्हणण्या- प्रमाणे ख-ख-कारणामध्ये जर प्रविष्ट होत असतील तर त्यावेळी हा जीव कोठे राहतो" असा याज्ञवल्क्यांस प्रश्न केला आहे. शिवाय ऐतरेयोपनिषदामध्ये " अग्नि वाणी होऊन मुखांत, वायु प्राण होऊन नासिकमध्ये, आदित्य चक्षु होऊन नेत्रांत, दिशा श्रोत्र होऊन कर्णामध्ये, औषधि व वनस्पति लोम होऊन त्वचेमध्ये व आप रेत होऊन शिश्नामध्ये प्रविष्ट होते " असे स्पष्ट सांगितले आहे.] ४७. क्षीरान्तर्यद्वदाज्यं मधुरिमविदितं तत्पृथग्भूतमस्मा- द्भूतेषु ब्रह्म तद्वद्व्यवहृतिविदितं श्रान्तविश्रान्तिबीजम् । यं लब्ध्वा लाभमन्यत्तृणमिव मनुते यत्र नोदेति भीतिः सान्द्रानन्दं यदन्तः स्फुरति तदमृतं विद्यतो ह्यन्यदातम्॥ अन्वयार्थ–' यद्वत् क्षीरान्तः आज्यं मधुरिमविदित तत् अस्मात् पृथग्भूत' -ज्याप्रमाणे दुधांत असणारे घृत त्याच्या माधुर्यावरून समजते व ते दुग्धाहून पृथक् असते- तद्वत् भूतेषु ब्रह्म व्यवहृतिविदित श्रान्तविश्रान्तिबीज (आस्त) त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये ब्रह्म आहे व ते सर्वभूतांच्या व्यवहारावरून समजते. ( अर्थात् ते पृथक् आहे.) ते श्रांत पुरुषाच्या निद्रावस्थेतील विश्रांतीचे कारण आहे.-'य लब्ध्वा अन्यत् लाभं तृण इव मनुते '-ज्याची प्राप्ति झाली असतां पुरुष इतर लाभ तृणासारखे मानितो;-' यत्र भीतिः न उदेति'-तसेच ज्या- ठिकाणी कोणत्याहि प्रकारची भीति उत्पन्न होत नाही-'यत् सान्द्रानन्दं अन्तः स्फुरति '-जें अत्यत आनदरूप तत्त्व आंतल्या आत स्फुरते- तत् अमृतं विद्धि ' ते अमृत आहे, असे तू जाण.-' अतः अन्यत् आर्त हि'-याहून इतर सर्व पदार्थ नाशिवत आहेत. [ आता ह्या श्लोकामध्ये विश्वातील सर्व प्राण्यांचा व्यवहार आत्मसबंधानेच होत असतो, असे सांगतात-दुधामध्यें घृत असते दुधाच्या मिष्टपणावरून समजते. ते धृत दूध या पदार्था हून भिन्न आहे, असें मथनानतर प्रत्यक्ष अनुभवाला येते. पण ज्याप्रमाणे तेच दुधापासून काढिलेले घृत पुनः दुधामध्ये टाकिले असता त्यांत मिळून जात नाही, त्याच- प्रमाणे सर्व सृष्ट पदार्थामध्ये ब्रह्म आहे; त्याचे सर्व प्राण्यांच्या व्यवहारावरून ज्ञान होते आणि म्हणूनच तें सर्वहि भूताहून भिन्न आहे. ज्ञानी पुरुषाला तें पृथक् आहे, असा अनुभव आला म्हणजे तो जरी जगांतील सृष्ट पदार्थाकडे पहात असला, तरी त्यांच्याहून पृथक् असलेल्या ब्रह्माला कधीहि विसरत नाही. हे ब्रह्म जागृतींत अनेक व्यवहार करून श्रमलेल्या पुरुषाच्या सुषुप्ती. मध्ये प्राप्त होणाऱ्या विश्रांतीला कारण होते. ज्याची प्राप्ति झाली असतां ज्ञानी पुरुष सर्व जगाला तृणासारखें तुच्छ लेखितो; ज्या ब्रह्माच्या ठिकाणी द्वैतभाव नसल्यामुळे व्यवहाराप्रमाणे तेथे कोणतीहि भीति मसते, ज्याच्या योगाने निदा- व ते सान्वयार्थ विवरण, ५९ वस्थेमध्ये स्थूल-सूक्ष्म प्रपंचाचा लय होऊन मन आत्मरूप होतें वज्यामुळे अत्यंत आनंदरूप वस्तूचा अंतःकरणांत प्रकाश पडतो ते अमृत (ब्रह्म ) आहे, असे समज. त्याच्याहून दुसरे सर्वहि पदार्थ क्षुद्र आहेत. कारण शक्तिकेच्या ठिकाणी भासणाऱ्या रजताप्रमाणे त्यांच्या अधिष्ठानाचे ज्ञान झाले असता त्यांचा बाध होतो. सारांश, केवल उदकमय दुग्धामध्ये जे उदकाहून अगदी निराळे असे माधुर्य अनुभवाला येते, ते घृताचेच होय, उदकाचे नव्हे हे प्रसिद्ध आहे. तसेच या जड देहामध्ये जे चलनादिक व्यापार व इद्रियांमध्ये जी विषय. रहणशक्ति आहे, ती आत्म्याचीच आहे, शरीराची नव्हे; कारण मृत शरीर नेश्चेष्ट असते, हे प्रसिद्ध आहे. ] ४८. ओतः प्रोतश्च तन्तुष्विह विततपटश्चित्रवर्णेषु चित्र- स्तस्मिजिज्ञास्यमाने ननु भवति पटः सूत्रमात्रावशेषः । तद्वद्विश्वं विचित्रं नगनगरनरग्रामपश्वादिरूपं प्रोतं वैराजरूपे स वियति तदपि ब्रह्मणि प्रोतमोतम् ॥४९ अन्वयार्थ-' इह चित्रवर्णेषु तन्तुषु चित्रः विततपटः ओतः प्रोतश्च (दृश्यते)'-ह्या व्यवहारात रगीबेरगी ततूमध्ये (धाग्यांमध्ये ) रंगीबेरंगी विस्तृत वस्त्र ओतप्रोत (भरून राहिलेले) दिसते.-' तस्मिन् जिज्ञास्यमाने ननु पटः सूत्रमात्रावशेषः भवति'- पण त्या वस्त्राविषयी विचार करून पाहूं लागले असता त्यामध्ये खरोखरच केवल धागे मात्र हाती लागतात (म्ह० धाग्यावाचून त्यांत दुसरे काही दिसत नाही. ) -तद्वत् नगनगरनरग्रामप- श्वादिरूपं विचित्र विश्व वैराजरूपे प्रोत'-त्याचप्रमाणे पर्वत, नगरें, पुरुष, लहान लहान गांवे, पशु इत्यादि रूप हे विचित्र जगत् विराडात्म्याच्या शरी- रामध्ये ओविलेले आहे. -'सः वियति (प्रोतः)-' तो विराडात्मा आकाशांत ऑविलेला आहे व-'तत् अपि ब्रह्मणि ओतं प्रोतं ( दृश्यते )-ते आकाशहि ब्रह्मामध्ये ऑविलेले आहे. [हें विश्व परंपरेने ब्रह्मामध्येच ओविलेले आहे, असे ह्या श्लोकांत दाखवितात-व्यवहारामध्ये बहुतेक सर्व मनुष्यांच्या परिचयाचें लांब-रुंद वन तंतुमय असते. वस्त्रोत्पत्तीच्या पूर्वी, वस्त्ररूपाला प्राप्त झाल्यावर व वस्त्रत्वाचा नाश झाला असतां तें तंतुरूपच असते व जसे धागे असतील तशा प्रकारचें तें होतें. चित्र-विचित्र धागे असल्यास वस्त्रहि तसेच होते. पण वस्त्र या नांवाने व लांबीरुंदीच्या आकाराने भासणारे जे क्स तो केवळ तंवंची विकार आहे. उभ्या तंतूमध्ये आडवे तंतु विशेष प्रकाराने ओवून विणले असतां त्याच ततूंस वस्त्र ही संज्ञा प्राप्त होते. म्हणून पटाविषयी विचार करून पाहू लागले असता त्यामध्ये ततूंवाचून दुसरे काहीहि नाही, असा आपला निश्चय होतो. त्याचप्रमाणे सत्त्वादि गुण व पाप-पुण्य उत्पन्न करणारी कायिक, वाचिक व मानसिक कर्मे यांच्या वैचित्र्यामुळे विचित्र झालेले हे जगत् विराड्नांवाच्या स्थूल समष्टीमध्ये ओविलेले आहे; ती स्थूल समष्टि सूक्ष्म आ- काशामध्ये ऑविलेली आहे ( म्हणजे ती आकाशाच्या आधाराने रहाते) व तें सर्वहि स्थूल-सूक्ष्म प्रपचाला आधार असणारे आकाश ब्रह्माच्या आश्रयाने राहते. याविषयी बृहदारण्यकोपनिषदामध्ये " स होवाच यदू ....तदनाति कश्चन" (सु. उ. स. पृ० ६३६ ) या श्रुतीमध्ये प्रश्नप्रतिवचनरूपाने सविस्तर प्रतिपादन केलेले आहे. ] ४९. रूपं रूपं प्रतीदं प्रतिफलनवशात्प्रातिरूप्यं प्रपेदे ह्येको द्रष्टा द्वितीयो भवति च सलिले सर्वतोऽनन्तरूपः । इन्द्रो मायाभिरास्ते श्रुतिरिति वदति व्यापकं ब्रह्म तस्मा- ज्जीवत्वं यात्यकस्मादतिविमलतरे बिम्बितं बुद्धयुपाधौ ॥५. अन्वयार्थ-' इद प्रतिफलनवशात् रूप रूप प्रातिरूप्यं प्रपेदे'- हे ब्रह्म प्रतिबिंबाच्या योगाने उपाधीप्रमाणे निरनिराळ्या रूपांचे झालें.-‘एको हि द्रष्टा सलिले द्वितीयः भवति '-( जलाशयाचे तीरीं उभे राहून उदकांत ) प- हाणारा एकच पुरुष स्वतःचेच रूप उदकामध्ये दिसू लागल्यामुळे अनेक होतो- इन्द्रः मायाभिः सर्वतः अनन्तरूपः आस्ते इति च श्रुतिः वदति'-व इंद्र मायेच्या योगानें अनत रूपे घेतो, असे श्रुति सागते.-' तस्मात् व्यापक ब्रह्म अतिविमलतरे बुद्धयुपाधौ बिम्बितं अकस्मात् जीवत्वं याति'- तस्मात् सर्वव्यापि ब्रह्मच अति निर्मल अशा बुद्धिरूप उपाधींमध्ये बिंबित झाले असतां तत्क्षणींच जीव होते. [ आतां ह्या श्लोकामध्ये 'एकच बिंब अनेक प्रतिबिंबांमध्ये असतें' ह्या न्यायाने आत्म्याचे सर्वात्मकत्व दाखवितात. ह्या ठिकाणी " ध्यद आपर्वण. " " सलिल एको द्रष्टा० " " इन्द्रो मायाभिः०" ह्या प्रतिबिंब- विषयक तीन श्रुतींचा निर्देश केला आहे. ब्रह्म ज्या ज्या उपाधींमध्ये प्रतिबिंबित झालें त्या त्या उपाधीप्रमाणे भासू लागलें या पहिल्या श्रुतीविषयी वेदांत अशी आख्यायिका आहे की, पूर्वी देवांचे अश्विननांवाचे दोन वैद्य आत्मज्ञा- सान्दया विवरण. नाचा उपदेश घेण्याकरितां दधीचि ऋषीकडे गेले व 'आम्हांस आत्मावयचा उपदेश करा' अशी त्यांनी त्यांना विनंति केली. त्यावर दधीचि ऋषींनी पुनः केव्हां तरी उपदेश करीन, असे उत्तर दिले. ते ऐकून ते उभयतां स्व. स्थानी निघून गेले. इतक्यांत इंद्र दधीचीकडे आला व माझ्या वैद्याना तुम्ही उपदेश करू नका आणि जर हे माझे म्हणणे अमान्य करून तुम्ही उपदेश कराल, तर मी तुमचा शिरश्छेद करीन, असे बोलून निघून गेला. तदनंतर कांहीं कालाने ते उभयतां वैद्य पुनः दधीची कडे आले असता त्याने त्यांना झालेला वृत्तांत सांगितला. तो ऐकून ते वैद्य म्हणाले की, महाराज, आपण पुनः केव्हां तरी उपदेश करीन, असे जे सांगितलेत ते असत्य होणे योग्य नाही. याकरितां आम्ही आपले हे मस्तक कोठे तरी लपवून ठेवून येथे अ- श्वाचे शिर आणून बसवितो. त्या अश्वमुखाने आपण आम्हाला उपदेश करा. नंतर इद्र आपला शिरश्छेद करून निघून गेला, म्हणजे आम्ही आपले मस्त- क पुनः जोडून देऊ. हे त्यांचे भाषण ऐकून दधीचि ऋषींनी तसे करण्यास वैद्यास अनुमोदन दिले आणि नतर अश्वमुखाने त्यांनी त्याना उपदेश केला. स्या उपदेशामध्ये “ रूप रूपं प्रतिरूपो बभूव " ही श्रुति आहे. नदीच्या किवा जलाशयाच्या तीरी एकच पुरुष उदकातील प्रतिबिबरूपाने आपणाला अनेकत्वाने पहातो. परमात्मा आपल्या मायाशक्तीच्या योगाने अनेकरूप झाला. साराश सर्वव्यापि सर्व प्रतिबिबाना व्यापून असणारे ब्रह्मच अति निर्मल बुद्धी- मध्ये प्रतिबिंबित झाले असतां जीव होते व अनेक उपाधीमुळे त्याचे ठिकाणी अनकत्व येते.] ६०. तज्ज्ञाः पश्यन्ति बुद्धया परमबलवतो माययाक्तं पतङ्गं बुद्धावन्तः समुद्रे प्रतिफलितमरीच्यास्पदं वेधसस्तम् । यादृग्यावानुपाधिः प्रतिफलति तथा ब्रह्म तस्मिन्यथास्यं प्राप्तादर्शानुरूपं प्रतिफलति यथाऽवस्थितं तत्सदैवम् ५१ अन्वयार्थ-तज्ज्ञाः परमबलवतः मायया आक्तं त पतङ्ग बुद्धौ समुद्रे अन्तः वेधसः प्रतिफलितमरीच्यास्पदं बुद्धया पश्यन्ति '-शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत बल- वान् अशा हिरण्यगर्भाच्या मायेनें मोहित झालेला तो पतंग-जीव बुद्धिरूप समु- द्रामध्ये प्रतिबिंबित झालेले आत्म्याचे जे किरण तद्रूप आहे, असे निश्चयात्मक अंतःकरणवृत्तीने पहातात.-'यथा आत्यं प्राप्तादर्शानुरूपं प्रतिफलति तत् (पुनः) १२ सदा यथावस्थितं'-जसें मुख समोर आलेल्या आरशाप्रमाणे त्यामध्ये प्रतिबि- बित होते व ते स्वतः तर सर्वदा जसेच्या तसेंच असते,-' एवं याहक यावान् उपाधिः तथा तस्मिन् ब्रह्म प्रतिफलति '-तसेच जेवढ्या प्रमाणाची व जशा प्रकारची उपाधि असेल तसेच तेथे ब्रह्म प्रतिबिंबित होते. [ मागच्या श्लोका- मध्ये प्रतिपादन केलेल्या अर्थाला अनुरूप अशा ऋग्वेदस्थ “पतंगमक्तमसुरस्य... इच्छन्ति वेधसः" या श्रुतीचा येथे अनुवाद करितात-बुद्धिरूप समुद्रामध्ये सच्चि- दानदस्वरूप परमात्मा प्रतिबिबित होतो. परमात्म्याच्या दुर्लध्य मायेने मोहित झाल्याने त्यालाच जीव, असे नांव प्राप्त होते. तोच पतग होय. कारण स्वरूपा- पासून भ्रष्ट होणे, हा त्याचा स्वभावच आहे. जीव त्या परमात्म्याच्या प्रतिबि- बभूत आहे, असे शास्त्रज्ञ पुरुष निश्चयात्मक बुद्धिवृत्तीने पहातात. मुखास- मोर तांबडा, पिवळा, मलिन किवा स्वच्छ इत्यादि जशा प्रकारचा आरसा धरावा तसे त्यामध्ये ( आरशाच्या रंगाप्रमाणे ) मुखाचे प्रतिबिब पडते; पण बिंबभूत मुख तर सर्वदा जसेच्या तसेच असते. तसेंच उपाधिभूत अंत.करण जसे सात्त्विक, राजस किवा तामस असेल, त्याप्रमाणे ब्रह्म त्यात प्रातीबाबत होते. पण दृष्टान्तांतील मुखाप्रमाणे बिबभूत ब्रह्म त्रिकालीहि अविकारि (स्वस्व- रूपाने जशाच्या तसेच ) असते.] ५१. एको भानुस्तदर्थप्रतिफलनवशाद्यस्त्वनेकोदकान्त- नानात्वं यात्युपाधिस्थितिगतिसमतां चापि तद्वत्परात्मा । भूतेषूच्चावचेषु प्रतिफलित इवाभाति तावत्स्वभावा- वच्छिन्नो यः परंतु स्फुटमनुपहतो भाति तावत्स्वभावैः ५२ अन्वयार्थ- यः तु एकः भानुः अनेकादकान्तः तदर्थप्रतिफलनवशात् नानात्वं याति '-जो एकच सूर्य अनेक उदकपूर्ण पात्रांमध्ये स्वतः प्रतिबिंबित झाल्यामुळे अनेकत्वाने भासतो-'उपाधिस्थितिगतिसमतां च अपि (याति) - आणि उपाधि असेपर्यंत असणे, उपावि नष्ट झाली असता नष्ट होणे, इत्यादि उपाधिधर्माशी साम्य पावतो;- तद्वत् परात्मा उच्चावचेषु भूतेषु प्रतिफलित इव आभाति '-तसेच, परमात्मा लहान-मोठ्या भूतांमध्ये प्रतिबिंबित झाल्या- सारखा भासतो.-' यः तावत् स्वभावावच्छिन्नः परतु स्वभावै. तावत् अनुपहतः स्फुट माति'-जो उपाधीच्या स्वभावाने तर युक्त होतो; पण स्वतःच्या स्वभा - बानीहि (कधी) हीन झेत नाही, असे स्पष्ट दिसते. [ आज हीच गोष्ट सान्वयार्यविवरण. सूर्याच्या दृष्टान्ताने पुनः स्पष्ट करितात अनेक पात्रांमध्ये पाणी भरून ती पाने उघड्या जागेत ठेविली असता त्या प्रत्येकामध्ये निरनिराळा सूर्य दिसू लागतो. पात्रांतील उपाधिभूत उदक हालू लागले असता ते प्रतिबिंबहि हालत आहे, असें भासते व उदक ओतून टाकिलें असतां ते नष्ट झाले, असे वाटते. परंतु ह्या विक्रियापैकी बिबभूत सूर्याला कोणतीच विक्रिया होत नाही. तसेच सर्वहि लहान-मोठ्या शरीरातील अतःकरणामध्ये परमात्मा प्रतिबिंबित झाल्यासारखा भासतो व अनेक अत करणोपाधींमुळे तो जीवरूपाने अनेक असल्यासारखा वाटतो. अंतःकरणरूप उपाधि असेपर्यत जीवाचे अस्तित्व असते. अतःकरण सुखी किवा दुःखी झाले असतां जीवहि सुखी किंवा दुखी झाल्यासारखा वाटतो. परतु ज्याप्रमाणे उदकोपाधीच्या धर्मानी सूर्यप्रतिबिबे युक्त झाली तरी खतःचे प्रकाशत्व टाकीत नाहीत, त्याचप्रमाणे सुख-दुःखादि उपाधिधर्मानी जीव युक्त झाला तरी खत'चे चैतन्यादि स्वभाव टाकीत नाही. ] ५२. यहत्पीयूषरश्मौ दिनकरकिरणैबिम्बितैरेति सान्द्र नाशं नैशं तमिस्रं गृहगतमथवा मूर्छितैः कांस्यपात्रे । तद्वबुद्धौ परात्मद्युतिभिरनुपदं बिम्बिताभिः समन्ता- द्भासन्ते हीन्द्रियास्यप्रसूतिभिरनिशं रूपमुख्याः पदार्थाः। अन्वयार्थ-'यद्वत् पीयूषरश्मौ बिम्बितैः दिनकरकिरणैः सान्द्र नैश तमिस्र नाश एति'-ज्याप्रमाणे चद्रामध्ये प्रतिबिबित झालेल्या सूर्यकिरणांनी रात्रींचा दाट अधकार नाश पावतो;-'अथवा कांस्यपात्रे मूर्छिते. ( दिनकरकिरणैः) गृहगत (तमिस्र नाश एति )'-किंवा कांशाच्या भांड्यामध्ये प्रतिबिवित झालेल्या सूर्यकिरणांनी गृहांतील अंधकार नाहीसा होतो;-'तद्वत् बुद्धौ बिम्बि- ताभिः अनुपद इन्द्रियास्यप्रसूतिभिः परास्मद्युतिभिः रूपमुख्याः पदार्थाः सम- न्तात् अनिश भासन्ते'-त्याप्रमाणे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या व तत्काल इंद्रियमुखानी प्रसार पावणाऱ्या परमात्मज्योतींनी रूपादिक सर्व विषय चोहों- कडून सर्वदा भासतात. [ मागच्या श्लोकांतील प्रतिपादनावर आतां कोणी कदाचित् ‘जलादि उपाधीमध्ये दिसणारे सूर्यप्रतिबिंब स्वतःचे रूप मात्र प्रकट करिते; अन्य पदार्थाना प्रकट करीत नाही. तेव्हां आत्मप्रतिबिबभूत जीव तरी अन्य पदार्थाना प्रकाशित कसा करणार ( म्ह. त्याला त्यांचे ज्ञान कसे शेणार) अशी शंका घेतील. लिचे दृष्टान्त देऊन समाधान करितात. बल- शवलोकी.. . मय असणाऱ्या चंद्राच्या ठिकाणी सूर्यकिरणे पडून त्या किरणांच्या परावर्त- नाने रात्रींचा निबिड अधार नाहीसा होतो; किवा कांशाचे भांडे, आरसा इत्यादिकांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या सूर्यकिरणाचे परावर्तन घरामध्ये झाले असतां घरांतील अंधकार नाहीसा होतो, ही गोष्ट सर्वाच्या अनुभवाची आहे. किवा संसर्गानें अग्नीतील दाह जसा लोखडांत येतो त्याचप्रमाणे पर- मात्म्याची प्रकाशनशक्ति त्याच्याशी उपाधिरूपाने संबद्ध झालेल्या बुद्धीमध्ये येते. हेच बुद्धीतील प्रतिबिब होय. ह्याप्रमाणे संसर्गद्वारा परामात्म्याची ज्ञान शक्ति अतःकरणांत आली असतां अतःकरणाशी सबद्ध असणाऱ्या इद्रियां- मध्येहि ती येते. सारांश-अशा त्या इद्रियाच्या द्वारा आसपास पसरणाऱ्या आत्मज्योतीने शब्द, स्पर्श, रूप, रस, गध इत्यादि विषयांचे ज्ञान होते. ] ५३. पूर्णात्मानात्मभेदात्रिविधमिव परं बुद्ध्यवच्छिन्नमन्य- तत्रैवाभासमात्रं गगनमिव जले त्रिप्रकारं विभाति । अम्भोवच्छिन्नमस्मिन्प्रतिफलितमतः पाथसोन्तर्बहिश्च पूर्णावच्छिन्नयोगे व्रजति लयमविद्या स्वकार्यैः सहैव ॥५४॥ अन्वयार्थ- अम्भोवच्छिन्न-पाण्याने वेष्टित होऊन तेवढेच निराळे भासणारे,-' अस्मिन् प्रतिफलित'-पाण्यात प्रतिबिबित झालेले व-'अतः पा- थसः अन्तर्बहिः च '-त्या पाण्याला आंतून व बाहेरून व्यापणारे-'इति जले त्रिप्रकार गगन इव '-असे जलांत तीन प्रकारचे आकाश जसे भासते,-(तथा) 'पर बुद्धयवच्छिन्नं अन्यत्तत्रैव आभासमात्र इति इह पूर्णात्मानात्मभेदात् (ब्रह्म) त्रिविध आभाति'-तसेच, एक पूर्ण, दुसरे बुद्धयवच्छिन्न व तिसरे बुद्धीतच प्रतिबिंबित झालेले असे ब्रह्महि पूर्ण, आत्मा व अनात्मा अशा तीन भेदांनी तीन प्रकारचे भासते.-' ( एवं) पूर्णावच्छिन्नयोगे (सति ) अविद्या स्वकार्यैः सह एव लय व्रजति '-( ह्याप्रमाणे) पूर्ण व उपाधिव्यापी अशी ही तत्वे एकच आहेत, असे अखण्ड ज्ञान झाले की, आपल्या कार्यासहवर्तमानच अविद्या नाश पावते. [ भगवान् आचार्य उपाधीमध्येच तीन प्रकारची ब्रह्मप्र- नीति येते, असें ह्या श्लोकांत सांगतात. ह्या अतःकरणरूप जीवाच्या उपाधीमध्ये सर्वव्यापि पूर्ण परब्रह्म, आत्मा व अनात्मा अशा तिघांचाहि भास होतो. त्यातून पाहिले जे परिपूर्ण ब्रह्म ते उपाधीच्या आत बाहेर ओतप्रोत भरलेले असते; दुसरे अंतःकरणवेष्टित झाल्याने तेवढेच पूर्ण ब्रह्मापासून पृथक होऊन केवळ सानलारण. बुद्धीलाच ज्यामूमन राहाताव तिसरेबुद्धीमध्ये केवल प्रतिस्विकासारखें मासते व मोष्ट मास्तम्स्पष्टपणे लक्षात यावी म्हणून उहकांमध्ये तीन प्रकारांनी मास. जाग्या मगनाचा दृष्टान्त देतात--जलाला आतबाहेर व्यापून राहणारे, कुल जेक्हें असेल तेवढेच पूर्णाकाशाहून पृथक् भासणारे व त्यांत प्रतिबिबित होणारें असें एकच आकाश जसे 'उपाधीमुळे तीन प्रकारचे भासते, तसेच एक.पर- ब्रह्म उपाधीमुळे तीन प्रकार के होते; पण ज्ञानाच्या योगाने त्याच्या अखंडवा. चा (म्ह० तिन्ही ठिकाणी भासणारे तत्व एकच आहे असा ) निश्चय, झाला की, तत्क्षणींच उपाधिभून अविद्या आपल्या प्रतिबिंधीदिक कार्यासह स्वाश्र- यामध्ये जाऊन मिळते. अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला असतां भ्रम माहीसा होतो.] ५४. दृश्यन्ते दारुनार्यों युगपदगणिताः स्तम्भसूत्रप्रयुक्ताः संगीतं दर्शयन्यो व्यवहृतिमपरां लोकसिद्धां च सर्वाम् । सर्वत्रानुप्रविष्टादभिनवविभवाद्यावदर्थानुबन्धा- तत्सूत्रात्मसंज्ञाद्वयवहरति जगद्धर्भुवःस्वमहान्तम्॥५५॥ अन्वयार्थ-'युगपत् अगणिताः स्तम्भसूत्रप्रयुक्ती दारुनार्यः संगीतं अपरा लोकसिद्धां सर्वो व्यवहति च दर्शयन्त्य दृश्यन्ते'-एकाच काली कलासूत्राने प्रेरित होणाऱ्या लाकडाच्या असंख्य बाहुल्या नृत्य-गायनादिक व सर्व लौकिक व्यवहार करून दाखवितात, असे दिसते.-' तद्वत् सर्वत्रानुप्रविष्टात् अमिनव. विभवात् यावदानुबन्धात् सूत्रात्मसंज्ञात् भूर्भुवःस्वमहान्तं जगत् व्यवहरति :- त्याचप्रमाणे सर्वव्यापी, अतर्व्यसामर्थ्यवान् व कर्मानुरूप फल देणारा को सूत्रात्मसंज्ञक परमात्मा त्याच्याकडून प्रेरित होऊन भूर्भुवःस्वर व महाकाप- येत सर्व जगत् व्यवहार करिते. [ आता ह्या सर्व श्लोकांमध्ये सूत्ररूप सर्व व्यापि परब्रह्माचा निर्देश करितात-कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात एकाच काली अनेक बाहुल्यांना सूत्रधार पडयामध्ये बसून बारीक ताराच्या कोर्टाने नाचवितो व त्यांच्याकडून मल्लयुद्ध, शिकार, इत्यादि लौकिक व्यवहारहिकर- वितो. तो सूत्रधार बाहुल्यांपासून पडद्यातील खांबापर्यंत शिल्पकाराने जोड. लेल्या तारांच्या द्वारा हे व्यवहार करितो. त्याचप्रमाणे सर्वहि कार्यामध्ये ओत- प्रोत भरून राहणाऱ्या विश्वव्यापी, अतर्व्यसामर्थ्यमन्, कर्मानुरूप फल ला- ज्या व फलाकरिता देशकालानुरूप व्यवहार करविणाध्या सूत्राभ्याकडून प्रेरित W - 'शवलोकी होऊन भूर्लोकापासून महर्लोकापर्यंत सर्व विश्वांतील प्राणी व्यवहार करितात. तात्पर्य, ' ईश्वरप्रेरणेवांचून वृक्षाचे पानहिं हालत नाही' अशी जी लौकिक म्हण आहे ती अगदी यथार्थ आहे. " वायुर्वै गौतम यत्सूत्रं...सन्दृब्धानि भवन्ति " ही बृहदारण्यक श्रुति ह्या श्लोकांतील प्रतिपादनाला प्रमाण आहे. (बृ. भाष्यार्थ. अ. ३. ब्रा. ७ पृ. १७४ पहा.)] ५५. तत्सत्यं यस्त्रिकालेष्वनुपहतमदः प्राणदिग्व्योममुख्यं यस्मिन्विश्रान्तमास्ते तदिह निगदितं ब्रह्म सत्यस्य सत्यम्। नास्त्यन्यत्किंच यहत्परमधिकमतो नाम सत्यस्य सत्यं सच्च त्यच्चेति मूर्तीद्युपहितमवरं सत्यमस्यापि सत्यम् ॥५६॥ अन्वयार्थ-' यत् त्रिकालेषु अनुपहत अदः प्राणदिग्व्योममुख्यं तत् सत्यम् 'जे त्रिकालीहि नष्ट न होणारे हे प्राण, दिशा, व्योम इत्यादि अमूर्त जगत् ते सत्य होय.-' ( इद ) यस्मिन् विश्रान्त आस्ते तत् ब्रह्म इह सत्यस्य सत्यं निगदितम् ' हे सत्य ज्याचा आश्रय करून रहाते, त्या ब्रह्माला शास्त्रांत सत्याचेंहि सत्य, असे म्हटले आहे.-' किंच यद्वत् अतःपर आधिक (वा) अन्यत् सत्यस्य सत्य नाम नास्ति'- शिवाय याच्यासारखे किंवा याच्याहून अधिक व श्रेष्ठ असे 'सत्याचे सत्य या नांवाचे दुसरे काही नाही.-' सच्च त्यच्च इति मूर्ताद्युपहितं अवर सत्य (ब्रह्म तु ) अस्य अपि सत्यम् '-सत् व त्यत् या नावाच्या व्यक्त व अव्यक्त भूतानी ज्याचा आश्रय केला आहे तें शबल ब्रह्म सत्य आहे; पण शुद्ध ब्रह्म त्याचेहि सत्य होय. [भगवान् आचार्य ब्रह्मच 'सत्य' या शब्दाला पात्र आहे, असे येथे सांगतात-भूत, भविष्यत् व वर्तमान या तिन्ही काली ज्याचा बाध होत नाही, अशा ह्या प्राणादि अव्यक्त जगाला सत्य असे व्यवहारांत म्हणतात. पण हे प्राणादि जगत् ज्याच्या आधाराने राहते, त्या ब्रह्माला आत्मानुभवी पण्डित सत्याचे सत्य म्हण- तात. ह्या बह्मासारखें किवा याहून अधिक असें सत्याचे सत्य दुसरे काहीहि नाही. कारण तसे जर काही असते तर त्याचा सर्वप्रकाशक वेदांत अवश्य कोठे तरी उल्लेख असता. पण तसा उल्लेख कोहि नाही. अर्थात् ब्रह्मच सत्य आहे. या श्लोकाच्या चतुर्थ चरणांत सत्यशब्दाची व्युत्पत्ति सांगितली आहे. सद म्हणजे पृथ्वी, आप् व तेज ही साकार भूतें व त्यत् म्ह० वायु व आकाश में निराकार भूते, ज्याच्या आश्रयाने राहतात, त्या शबळ ब्रह्माला सत्य असें म्हणतांत; पण शुद्ध ब्रह्म या सत्यांचेंहि सत्य आहे. ] ५६. .
६ सान्ववार्थ विवरण. १५ यत्किचिदात्यसत्यं व्यवह्यतिविषये रौप्यसाम्बुमुख्य तद्वै सत्याश्रयेणेत्ययमिह नियमः सावधिोकसिद्धः। तद्वत्सत्यस्य सत्ये जगदखिलमिदं ब्रह्माण प्राविरासी- न्मिथ्याभूतं प्रतीतं भवति खलु यतस्तच्च सत्यं वदन्ति । अन्वयार्थ-'यत् किचित् रौप्यसम्बुिमुख्य व्यवहृतिविषये असत्यं भाति तत् वै सत्याश्रयेण इति अय सावधिः नियमः लोकसिद्धः ( दृष्टः )'-व्यवहा- रांतील दृश्य पदार्थामध्ये जे काही रुपे, सर्प, मृगजल इत्यादि असत्य भासतें तें सर्वहि सत्याच्या आश्रयाने असते, असा हा अवधियुक्त (साधिष्ठान) नियम लोकसिद्ध आहे.-' तद्वत् सत्यस्य सत्ये ब्रह्मणि इदं अखिल जगत् प्राविरासीत् ' -त्याचप्रमाणे सत्याचेहि सत्य असे जे ब्रह्म, त्याच्या आधारावर हे सर्व जगत् व्यक्त होते- मिथ्याभूत च यत' प्रतीत भवति तत् खलु सत्य वदन्ति'-आणि मिथ्याभूत सर्वहि पदार्थाचा ज्याच्या योगाने प्रत्यय येतो, तेच सत्य असे लोक म्हणतात. [आता या श्लोकामध्ये पूर्णब्रह्माचे प्रतिपादन करितात-शिंपीच्या ठिकाणी रुपे, रज्जूच्या ठिकाणी सर्प व मरुभूमीवर मृगजल इत्यादि जेवढे म्हणून पदार्थ भ्रमाने भासतात, तेवढे सर्वहि शुक्ति, रज्जु, भूमि इत्यादि सत्य पदार्थाच्या आश्रयाने भासतात. रौप्यादिक भ्रम शुक्तिका, रज्जु इत्यादि व्यव- हारातील सत्य पदार्थाच्या आश्रयाने होतात. कारण शुक्ति इत्यादिक अधिष्ठान नसेल तर ते भ्रम होणेच सभवनीय नाही. साराश ह्या व्यवहारामध्येसुद्धा प्रत्येक भ्रम साधिष्ठान असतो म्ह० त्याचे अधिष्ठान सत्य असते; असा हा सावधि नियम सिद्ध झाला. सावधि म्हणजे अवधिसह. हे रजत नसून शुक्तिका आहे, असें ज्ञान होईपर्यत जो अवधि, त्या अवधीने युक्त असा हा भ्रम असतो. किवा अवधि म्हणजे सीमा असा अर्थ घेतल्यास, शुक्तिकेसारख्या सत्य वस्तूच्या ज्ञानापर्यत भ्रमाची मर्यादा असते. म्हणजे सत्य अशा अधिष्ठानाचे ज्ञान होतांच भ्रमाच्या अस्तित्वाचा लोप होतो, तस्मात् असत्य सत्याश्रयाने असते हा सावधि नियम सर्वलोकसिद्ध आहे. तात्पर्य, अधिष्ठानाचे ज्ञान होईपर्यंत सर्व भास सत्य वाटतात; पण अशा भ्रामक सत्याचेहि सत्य में ब्रह्म त्याच्या आश्रयाने हे सर्व जगत् व्यक्त झाले आहे. असे हे सत्यत्वाने भासगारें जगत् सावधि अस- ल्यामुळे खरे नसून भ्रामक आहे. भ्रमांतील वस्तु ज्याच्या सत्तेमुळे प्रतीतीला येतात तेच खरोखर सत्य, असे शास्त्रज्ञ म्हणतात. ] ५७.
१२ यत्राकाशविकास कलयति च कलामावतायत काली यविशिावसान हंदिह हि विरो, पूर्वमेवौगिधास्ते । सूतं यत्राविसिन्मिहदीप महंतस्तौद्ध पूर्णोच्च पूर्णम् संपूर्णादर्णवादेरपि भवति यथा पूर्णमेकार्णवाम्भः ॥ ५८॥ अन्वयार्थ-' यथा संपूर्णात् अर्णवादेः अपि एकार्णवाम्भः पूर्ण भवति '- ज्याप्रमाणे उदकाने परिपूर्ण असणाऱ्या समुद्रादिकांपेक्षा सातहि समुद्रांचे एकत्र झालेले पाणी अधिक पूर्ण असतें-' ( तथा ) यत्र आकाशावकाशः यत्र च कालः कलामात्रतां कलयति ' त्याचप्रमाणे ज्याठिकाणी आकाश रहाते, जेथे हा अगणित काल एका कलेसारखा भासतो,-'यत्र एव आशावसानं इह हि बृहत् विराट् पूर्व अर्वाक् इव आस्ते'-जेथे दहा दिशांनाहि राहण्यास जागा मिळते आणि जेथे हे स्थूल विराब्रह्मसुद्धा अर्वाचीन असल्यासारखे असते व-. यत्र महत. अपि महत् सूत्र आविरासीत् तत् हि पूर्णात् पूर्ण'-जेथे विरा- डात्म्यापेक्षां अति मोठा असा सूत्रात्मा प्रकट होतो, ते ब्रह्म निःसंशय पूर्णी- हून पूर्ण आहे. [ आचार्य ह्या श्लोकामध्ये " पूर्णमदः पूर्णमिदं....अवशिष्यते" (सु. उ. स. पृ० ७०९ ) या श्रुतीत प्रतिपादन केल्याप्रमाणे ब्रह्म पूर्णाहून पूर्ण आहे, असे सांगतात-ज्याप्रमाणे उदकाने तुडुब भरलेल्या एका समुद्रा- पेक्षा अथवा नदीपेक्षां सप्त समुद्रांचे ऐक्य झाले असता त्यांचे उदक अधिक पूर्ण असते, त्याप्रमाणे ज्यामध्ये आकाशालाहि जागा मिळते, जेथे सृष्टीच्या आरंभापासून सृष्टीच्या अंतापर्यतचा अगणित काल एका क्षणासारखा भासतो, ज्यामध्ये दहाहि दिशांचा अनायासे अतर्भाव होतो, विराटसज्ञक स्थूलसमष्टीचा अभिभानी वैश्वानरहि ज्याच्यामुळे अर्वाचीनसा ठरतो, तसेच ज्याठिकाणी ह्या विराडापेक्षाहि मोठा ( विराडाचे कारण ) हिरण्यगर्भ (सूक्ष्मसमष्टि) व्यक्त 'झाला, ते शुद्ध ब्रह्म सर्व पूर्णापेक्षा पूर्ण आहे. आकाशादि कांहीं भूतें सर्वव्यापी असल्यामुळे पूर्ण असतात. पण हे ब्रह्म त्याहूनहि पूर्ण म्हणजे निरतिशय पूर्ण आहे. ] ५८. अन्तः सधौषधीनां पृथगमितरसैर्गन्धवीर्यविपाकै- रेके पाथोदपाथः परिणमति 'यथा तहदेवान्तरात्मा सान्वर विहाण. बाबस्वभावैर्वहति वसुमती येन विलं पयोदो वर्षत्युवेर्हताश: पचति दहति का येन सर्वान्तरोऽसौ ॥१९ अन्वयार्थ-'यथा एक पाथोदपाथः सर्वोषधीनां अन्तः अमितरसैः गन्धवीयः विपाकैः पृथक् परिणमति'-एकच मेघोदक अनेक औषधीमध्ये अनेक रस, अनेक गंध, निरनिराळी शक्ति व पृथक् पाक इत्यादि निरनिराळ्या प्रकारांनी परिणत होते (म्हणजे एक व उदक निरनिराळ्या वनस्पतींमध्ये गेले असतां जसे निरनिराळ्या गुणधर्मानी युक्त होते )- तद्वत् एव अन्तरात्मा '- त्याप्रमाणेच झ एकच अंतरात्मा ( परिणाम पावतो.) 'येन वसुमती नानाभूतस्वभाव वहूति'-हीं पृथ्वी ज्याच्यामुळे नानाप्रकारच्या भूतस्वभावांनी व्यवहारयुक्त होते,-' ( येन ) पयोदः विश्वं उच्चैः वर्षति'-ज्यामुळे मेघ पृथ्वीवर जलाचा मोठा वर्षाव करितो व-' येन हुताशः पचति दहति वा ( सः ) असौ सर्वान्तरः (अस्ति)'-ज्याच्यामुळे अग्नि पाक व दाह करितो, तोच हा सर्वाच्या अंत- र्यामी रहाणारा परमात्मा होय. [ ब्रह्मच सर्व सृष्ट पदार्थामध्ये ओतप्रोत भरून राहिले आहे, असे " यः पृथिव्यां तिष्ठन् ” इत्यादि बृहदारण्यकाच्या तिसऱ्या, अध्यायांतील सातव्या खडामध्ये (बृ. भा. पृ. १७७ ) सांगितले आहे व आचार्यांनी तीच गोष्ट या श्लोकामध्ये मेघोदकाच्या दृष्टान्ताने स्पष्ट केली आहे. जसें एकच उदक नाना उपाधींच्या ससर्गाने नानाप्रकारचे रस, रूप, गंध इत्यादिकांनी युक्त होते, तसेच अनेक उपाधींच्या योगाने एकच ब्रह्म अनेक प्रकारानी भासते. ] ५९. भूतेष्वात्मानमात्मन्यनुगतमखिलं भूतजातं प्रपश्य- प्रायः पाथस्तरङ्गान्वयवदथ चिरं सर्वमात्मैव पश्येत् । एकं ब्रह्माछितीयं श्रुतिशिरसि मतं नेह नानास्ति किंचि न्मृत्योराप्नोति मृत्यु स इह जगदिदं यस्तु नानव पश्येत् ॥ अन्वयार्थ- भूतेषु आत्मान आत्मनि च आखिलं भूतजातं पाथस्तरंगा- वयवत् अनुगतं प्रायः प्रपश्येत् '-अनेक भूतांमध्ये एक आत्मा व एका आ- व्याचे ठिकाणी, जल आणि त्याचे तरंग यांच्या संबंधाप्रमाणे, हे समग्र भूत: जात ओतप्रोत भरलेले आहे, असे पहावे.-'ब्रह्म एक अद्वितीयं ( च ) श्रुति- शिरसि मतं (अवः) अप चिरं सर्वे आमा एव पश्येत 'बह अद्वितीय शतश्लोकी. व एक आहे, असें उपनिषदांत सांगितले आहे; म्हणून सर्वदा सर्वहि सृष्टि' आत्माच आहे असे पहावें.-'यः तु इद जगत् नाना इव पश्येत् स मृत्योः मृत्यु आप्नोति ( यतः) इह किंचित् नाना न अस्ति'-जो ह्या जगाकडे द्वैतरूपाने पहातो तो मृत्युपरंपरेमध्ये सांपडतो. कारण ह्या जगामध्ये अनेक असें कांहीं नाही. [ ह्या श्लोकांत ब्रह्म एक आहे, असे प्रतिपादन करणाऱ्या अनेक मूल- भूत श्रुतींना पुष्टि देणाऱ्या ' यस्तु सर्वाणि ..न विजुगुप्सते' (सु. उ. सं. पृ० ३) या ईशावास्यश्रुतीचा व जगात नानात्वाची भावना ठेवणारा पुरुष मृत्यूच्या परपरेत सांपडतो' असे सांगणाऱ्या ' मृत्यो स मृत्युमाप्नोति०' इत्यादि कठश्रुतीचा अनुवाद केला आहे. ज्याप्रमाणे एकाच उदकांत हजारों तरंग दिसतात व त्यांत एका उदकावाचून अन्य काही नसते; त्याचप्रमाणे जड व चर असे अनेक पदार्थ आपणाला जगांत दिसतात, पण त्या सर्वामध्ये एक आत्मा भरून राहिलेला आहे व ही सर्व भूते आत्म्यामध्ये भरून रा- ली आहेत. शिवाय अनेक श्रुतींमध्ये आत्मा सजातीय-विजातीयादिभेदरहित आहे, असेच प्रतिपादन केले आहे. यास्तव साधकाने तात्त्विक दृष्टीने सर्वत्र एक आत्मतत्त्वच आहे, अशी भावना ठेवावी. पण या अनुशासनाविरुद्ध जो जगांत परमार्थतः अनेकत्वाची भावना ठेवितो तो देहाभिमान नष्ट न झाल्या- मुळे जन्ममरणपरपरेत पडतो. साराश-परमार्थदृष्टीने सर्वत्र अद्वैतभावना ठेवणे परम श्रेयस्कर आहे.] ६०. प्राक् पश्चादस्ति कुम्भाद्गगनमिदमिति प्रत्यये सत्यपीदं कुम्भोत्पत्चावुदति प्रलयमुपगते नश्यतीत्यन्यदेशम् । नीते कुम्भेन साकं ब्रजति भजति वा तत्प्रमाणानुकार- मित्थं मिथ्या प्रतीतिः स्फुरति तनुभृतां विश्वतस्तद्वदात्मा ६१ अन्वयार्थ- कुम्भात् प्राक् पश्चात् च इदं गगन अस्ति इति प्रत्यये (सति) अपि इर्द कुम्भोत्पत्तौ उदेति '-घटाच्या उत्पत्तीपूर्वी व नाशानतर हे आकाश असते, असा प्रत्यय येत असूनहि हे घटाकाश घटोत्पत्ति झाली असतां उत्पन्न होते,-'प्रलयं उपगते नश्यति अन्यदेश नीते (सति ) कुम्भेन साक व्रजति वा तत्प्रमाणानुकारं भजति'-घट नष्ट होतांच ते नष्ट होते, तो अन्य ठिकाणी नेला असता त्याच्या बरोबर जातें व घटाच्या प्रमाणाचें होतें इत्यं तनुभृतां मिथ्या प्रतीतिः स्फुरति तद्वत् विश्वतः आत्मा (अस्ति) -या- सान्वसर्व विषरण. -- प्रमाणे प्राण्यांना मिथ्याप्रतीति जशी होते, तसाच विश्वाच्या पूर्वी व नतर हा, आत्मा असतो. पण तो उत्पन्न होतो,, लय पावतो इत्यादि मिथ्या ज्ञान होते., [श्रीमत् आचार्यानी पूर्व श्लोकांत ज्या सिद्धान्ताचे प्रतिपादन केले, त्याचेच ह्या श्लोकांत ते दृढीकरण करितात-हैं आकाश सर्वदा स्वस्वरूपानें स्थित असते; तरी घटाची उत्पत्ति झाली असतां महाकाशाहून निराळे असे घटा- काश उत्पन्न झाले; घट नष्ट झाला असता तेहि नाश पावले; घट इकडे ति- कडे नेला असतां तेहि त्याबरोबर गेले व घटाकाराप्रमाणेच ते वर्तुलाकार, लहान, मोठे झाले, अशी सर्व प्राण्यांना खोटीच प्रतीति येते. त्याप्रमाणेच ह्या सर्व चराचर सृष्टीच्या पूर्वी व नतर आत्मा स्वरूपानेच असतो; असें जाणूनहि दृष्टान्तांतील आकाशाप्रमाणेच प्राणी त्याविषयी भ्रांतिमूलक अनेक कल्पना करितात.] ६१. यावान्पिण्डो गुडस्य स्फुरति मधुरिमैवास्ति सर्वोऽपि तावा- न्यावान्कर्पूरपिण्डः परिणमति सदामोद एवान तावान् । विश्वं यावद्विभाति द्रुमनगनगरारामचैत्याभिरामं तावच्चैन्यमेकं प्रविकसति यतस्तत्तदात्मावशेषम् ॥ १२ ॥ अन्वयार्थ-' यावान् गुडस्य पिण्ड स्फुरति तावान् सर्वः अपि मधुरिमा एव अस्ति'-जेवढा गुळाचा खडा दिसतो तेवढा तो सर्वहि गोडीने युक्तच असतो.-' ( तथा ) यावान् कर्पूरपिण्ड: अत्र तावान् सदा आमादः एव परिण- मति' तसेच, जेवढा कापराचा खडा असतो तेवढा तो सर्वहि सर्वदा वासाने भरलेलाच असतो.-' यावत् द्रुमनगनगरारामचैत्याभिरामं विश्व विभाति तावत् चैतन्य एक प्रविकसति यतः तत् तत् आत्मावशेषम् ' त्याचप्रमाणे वृक्ष, पर्वत नगरें, उपवने, यज्ञभूमि इत्यादिकानी रमणीय वाटणारे हे जगत् जेवढे म्हणून प्रत्ययाला येते तेवढे ते सर्वहि एक चैतन्यच स्फुरत असते. कारण ते ते सर्वहि पदार्थजात आत्म्याचाच अंश आहे. [पुनः अन्य त-हेने आत्म्याचे सर्वात्मकत्व सिद्ध करितात. जेवढा गुळाचा खडा तेवढी गोडी किंवा जेवढा कापूर तेव. ढाच परिमल, असा व्यवहारांत आपणाला नेहमी अनुभव येतो. त्याचप्रमाणे वृक्षादि अनेक पदार्थोनी भरलेले हे जगत् जेवढे म्हणून प्रत्ययाला येते तेवढे ते सर्वहि चैतन्यच आहे; अन्य काही नाही. कारण जो जो पदार्थ आपण पहावा तो तो,सर्वहि मात्म्याचाच शेष आहे. तो परमात्मा आपल्या एका खपामध्य शाम सर्व सृष्टील व्यापितोंक लावें तीन अशा लाग्या स्वर अवस्थित असतात, असें वेदवचनहि याविषयी प्रमाण आहे. ] ६२. वाद्यान्मदानुभूतियदपि तदपि सा नूनमाघातगम्या वाद्याघातध्वनीनां पृथगनुभवतः किन्तु तत्साहचर्यात् । मायोपादानमेतत्सहचरितमिव ब्रह्मणा भाति तद्व- तस्मिन्प्रर प्रतीते न किमपि विषयीभावमाप्नोति यस्मात॥ अन्वयार्थ-' यदपि वाद्यात् नादानुभूतिः तदपि नून सा आघातगम्या'- जरी वाद्यापासून नाद निघतो, असे वाटते तरी तो खरोखर आघातामुळे निघत असतो.-' वाद्याघातध्वनीना अनुभवत' पृथक् किन्तु तत् साहचर्यात् ( अनुभूयते)' वाद्य, आघात व ध्वनि ही वस्तुतः पृथक् असतात. परता त्यांचा अनुभव मात्र एकदम यतो.-' तद्वत् एतत् मायोपादानं ब्रह्मणा सहच- रितं इव आभाति'-तसेंच हे मायाद्रव्याने तयार झालेले जगत् ब्रह्मासहव- र्तमान असल्यासारखे भासते. (पण ते पृथक् आह. )-' यस्माता तस्मिन् प्रत्यक्प्रतीते सति किमपि विषयीभाव न आप्नोति ' कारण ते ब्रह्मध माझा आत्मा आहे, असा प्रत्यय आला असता त्या पुरुषाला कोणत्याच विषयाची भावना होत नाही [ ह्या श्लोकात सुद्धा आचार्य ब्रह्माच्या सर्वात्मकतेचेंच प्रतिपादन करितात-नगारा, नौबत इत्यादि वाद्यांवर काठीने प्रहार केला असतां त्यांचा मोठा ध्वनि होतो. पण तो आघातावाचून कधीच होत नाही. येथे वाद्य, प्रहार व ध्वनि हे तीन पदार्थ एकमेकाहून अगदी निरनिराळे आहेत, असे सर्वानाहि जरी ठाऊक असते तरी वाद्याचा ध्वनि ऐकतांना हे कोणाच्या ध्यानात येत नाही; तर आझाला वाच,प्रहार व ध्वनि यांचा एकाच काली प्रत्यय येतो. तसेच मायाद्रव्याने बनलेले हे जगत् ब्रह्माबरोबर भासते. म्ह० ब्रह्म व जगत् ही निरनिराळ्या धर्माची व परस्परविरुद्ध अशी दोन तत्त्वे, पृथक् न भासतां एकरूपाने भासतात. पण खरोखर पहातां ब्रह्म जगाहून अगदी भिन्न आहे. कारण एकदा 'चित्स्वरूप ब्रह्म मी आहे' असा अनुभव आला की मग जगाचे भानच नाहीसे होते व त्यामुळे मी विषयी आहे व जगातील इतर पदार्थ माझे विषय आहेत, असे कधीच वाटत नाही. ' यथा दुन्दुभेहन्यमानस्य०' (बृ. भा. अ. २ बा. ४ पृ. १८३ ) इत्यादि प्रमाणभूत अतीतील ध्वनीचा दृष्टान्तच येथे आचार्यांनी दिला आहे. आघात या शब्दाचा सान्वयाविकास अर्थ लक्षणेने प्रहार किंवा तोंडाने फुक्यो, असा करावा, कारण सनईसारख्या, वाद्यांचा ध्वनि तोंडाने फुकले असता होतो, हे सर्वप्रसिद्ध आहे. ] ६३. दृष्य साक्षादिदानीमिह खालु, जगतामीश्वरः, संविदात्मा विज्ञानस्थाणुरेको गगनवदभितः सर्वभूतान्तरात्मा ॥ दृष्टं ब्रह्मातिरिक्तं सकलमिदमसद्रूपमाभासमात्रं शुद्धं ब्रह्माहमस्मीत्यविरतमधुनात्रैव तिष्ठेदनीहः ॥ ६४॥ अन्वयार्थ-' इह खलु सविदात्मा विज्ञानस्थाणु एकः गगनवदभितः सर्व- भूतान्तरात्मा जगता ईश्वरः इदानीं साक्षात् दृष्ट.'-खरोखर ह्याच देहामध्ये, ज्ञानरूप, अनुभवाचा जणु स्तंभ, एक, आकाशासारखा व्यापी व सर्वभूतांचा अतरात्मा असा जगाचा नियन्ता मी आतां साक्षात् पाहिला.-'ब्रह्मातिरिक्त इदं सकलं असद्रूप आभासमात्र दृष्ट'-तसेच ब्रह्माहून निराळे असे हे सर्व जगत् शून्यरूप व केवल भास आहे, असेहि पाहिले व-'अह शुद्धं ब्रह्म अस्मि इति अधुना अनीहः अत्र एव अविरत तिष्ठेत्'-मीच शुद्ध ब्रह्म आहे, म्हणून आता कोणतीहि क्रिया न करिता सर्वदा याच स्थितीमध्ये असावे. [ येथपर्यंत निस्- पण केलेल्या सिद्धान्ताचें आतां फल सांगतात-आत्मज्ञानाच्या उपायांचे पूर्ण- पणे अनुष्ठान केल्यामुळे चित्तशुद्धि होऊन ह्याच देहामध्ये असतांना मला जगन्नियंत्याचा अनुभव आला. तत्त्वभूत ब्रह्माहून अन्य पदार्थजात मिथ्या आहे व त्याचा जो प्रत्यय येत असतो तो केवल भास आहे, अशीहि माझी खात्री झाली व जे शुद्ध ब्रह्म ते मीच आहे, असा निःसशय अनुभव आला; म्हणून आतां यापुढे मी निष्क्रिय होऊन मरेपर्यत असाच या देहांत राहणार. सारांश, या सिद्धस्थितीतच मी ( साधकाने ) सर्वदा रहा एवढीच मी इच्छा करितो. या ठिकाणी या प्रथांतील विज्ञानकोश प्रकरण समाप्त झालें. ] ६४. इन्द्रेन्द्राण्योः प्रकामं सुरतसुखजुषोः स्याद्रतान्तः सुषुप्ति- स्तस्यामानन्दसान्द्रं पदमतिगहनं यत्स आनंदकोशः। तस्मिन्नो वेद किंचिन्निरतिशयसुखाभ्यन्तरे लीयमानो दुःखी स्याहोधितः सन्निति कुशलमतिर्बोधयेव सुप्तम् ॥ अन्वयार्थ प्रकामं सुरतसुखजुषोः इन्द्रेन्द्राण्योः रतान्तः सुषुप्तिः स्यात्'- ययेष्ठ संगमसुखाचा अनुभव घेणाऱ्या इंद्र-इंद्राणींची जी सतिसम्मति तीच शतमोकी सुषुप्ति होय.-' यत् अतिगहनं आनंदसान्द्रं पदं स आनंदकोशः'-त्या अव- स्थेतील अति गहन व आनंदधन असें जे स्थान तोच आनदकोश होय.- तस्मिन् निरतिशयसुखाभ्यन्तरे लीयमानः किंचित् न वेद'-त्या निद्रावस्थे- तील अत्यन्त सुखामध्ये लीन झालेला प्राणी कांहीच जाणत नाही.-'बोधितः सन् दुःखी स्यात् इति कुशलमतिः सुप्त नैव बोधयेत् '-त्याला झोपेतून जागे केले असतां दुःख होते. म्हणून शहाण्या पुरुषाने निद्रिताला उठवू नये. [ आतां यापुढे आनदमय कोशाचे व्याख्यान करितात-आनदस्वरूप ब्रह्माचा निद्रावस्थेत स्पष्ट अनुभव येत असतो, म्हणून प्रथमत. त्या अवस्थेचेच स्वरूप ह्या श्लोकात सागतात-दक्षिण नेत्रातील दृक्शक्तिमान् पुरुषाला इद्र व डाव्या नेत्रांतील विषयप्रकाशक ज्योतीला इंद्राणी असे म्हणतात. त्या दोघांच्या संगमाची जी समाप्ति तीच निद्रावस्था होय. लौकिक सुरताच्या अंती म्हणजे रेतस्खलनाच्या वेळी जसे सुख होते, तसेच इद्र व इद्राणी यांच्या सभोगसमाप्तिकाली ( म्ह० निद्रावस्थेत ) सुख होते. जागृतामध्ये ती दोघे भुवयाच्या मध्यभागी राहतात; निद्रा आली असतां ती दोघे तेथून निघून हृदयाकाशातील पुरीततिनांवाच्या सूक्ष्म नाडीत जाऊन एकत्र राहतात. तेथे त्याचा जो सुरतप्रसग ( सगम ) होतो तीच स्वप्नस्थिति व सगमाची समाप्ति हीच निद्रावस्था होय. त्या गाढ निद्रेतील जें आनदाने भरलेले स्थान तोच शेवटचा (पाचवा ) आनदमय कोश होय. त्या सुषुप्तिरूप आनदकोशामध्ये जीव मग्न झाला की त्याला काही समजत नाही. कारण तो त्यावेळी निर- तिशय सुखामध्ये निमग्न होऊन गेलेला असतो. आता 'दुःखी स्यात् इत्यादि चतुर्थ चरणांत त्या सुखाची सर्वातिशयता व्यक्त करितात. निद्रित पुरुषाला जर झोपेतून बलात्काराने उठविले तर त्याला मोठे दुख होते. फार काय पण त्याच्याच हिताकरितां ( म्ह० भोजनादि विषयसुख घेण्या- करिता ) जरी त्याला एकदम जागे केले तरी तो उठविणान्यावर अतिशय रागावतो. तस्मात् सर्व विषयजन्य सुखाहून आत्ममुखच श्रेष्ठ आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. साराश-आत्मसुख सर्वात अधिक असल्यामुळे, निद्रावस्थेत सुख भोगीत असलेल्या पुरुषाला सुज्ञ मनुष्याने जागे करू नये. कारण श्रुतीमध्येहि निद्राभग करण्यांत मोठा दोष सांगितला आहे. ह्या श्लोकातील प्रतिपादनाला अनेक शतपथ श्रुति प्रमाण आहेत. खप्न व सुषुप्ति यांविषयी ' अथ हैतत्पु. रुषः....काम परिवर्तते ।। अथ यदा न कस्य च न... एवमेवेष तच्छेते इत्यादि अनेक श्रुति श्लोकप्रतिपादित अर्याचेच स्पष्टीकरण करीत आहेत. ]१५, सान्वयार्थ विवरण. सर्वे नन्दन्ति जीवा अधिगतयशसा गृह्णता चक्षुरादी- नन्तःसर्वोपका बहिरपि च सुषुप्तो यथा तुल्यसंस्थाः । एतेषां किल्बिषस्पृक् जठरभृतिकृते यो बहिर्वृत्तिरास्ते त्वक्चक्षुःश्रोतनासारसनवशमितो याति शोकं च मोहम् ॥ अन्वयार्थ- अन्तः चक्षुरादीन् गृह्णता बहिः अपि च सर्वोपक; अधि- गतयशसा यथा सुषुप्तौ ( तथा ) तुल्यसस्था सर्वे जीवाः नन्दन्ति :-आत चक्षुरादि इद्रियाना व्यापणाऱ्या व बाहेराहि ( विषयद्वारा ) सर्वावर उपकार करणाऱ्या आणि ( सर्वदा सर्वाना ) प्राप्त असलेल्या ब्रह्माने, गाढ निद्रावस्थे प्रमाणे सारख्या स्थितीत असणारे सर्व जीव आनदित हातात - ' एतेषा यः जठरभृतिकृते बाहेवृत्ति आस्ते ( सः ) किल्बिषस्पृक् -त्यातील जो पोट भर- ण्यास्तव बहिवृत्ति ( देहेद्रियाभिमानी ) होतो तो दुख भोगतो.- (सः) त्वक्चक्षुःश्रोत्रनासारसनवश इतः सन् शोक मोह च याति'- त्वक्-त्वचा, चक्षु, श्रोत्र-कान, घ्राण व रसना याच्या अवीन झाल्याने त्याला शोक व माह होतो. [पूर्व श्लोकात आत्मसुख सर्वात श्रेष्ठ आहे, असे सुषुप्तीतील अनुभवाने दाखविले. आता येथे त्याच अर्थाचे प्रतिपादन करणाऱ्या ऋग्वेदस्थ सर्वे नन्दन्ति यशसा ०' इत्यादि श्रुतीचा अनुवाद करितात-आत्मा ( ब्रह्म ) सर्व प्राण्यांच्या हृद्देशी असल्यामुळे सर्वाना पूर्वीच प्राप्त झालेला आहे. अशा त्या सर्वाच्याहि अगदी जवळ असणाऱ्या, देहात नेत्रादि इद्रियांना दर्शन, श्रवण इत्यादि शक्ति देऊन (म्ह० त्यांना स्वाधीन ठेवून ) व देहाबाहेर रूपरसा- दि विषयाचा भोग करवून सर्व प्राण्यांवर उपकार करणाऱ्या आत्म्याच्या स- तेने सर्वाना आनद होत असतो. निद्रावस्थेमध्ये सर्व एका अनिर्वाच्य रूपाला जाऊन मिळत अमतात व त्यामुळे त्यांच्यामध्ये जसा कोणत्याहि प्रकारचा भेद रहात नाही, तसाच ह्या सर्वहि प्राण्यामध्ये वस्तुतः वर्णाश्रमादि कोण- त्याहि प्रकारचा भेद नाही. पण ह्यांच्यापैकी जो प्राणी उदरभरणार्थ अनादि विषय संपादन करूं लागतो तो तत्क्षणींच दुःखी होतो. त्वचेने रुयादि स्य. र्शाच्या, नेत्राने सौदर्यादि रूपाच्या, श्रोत्राने गायनादि श्रवणाच्या, घ्राणाने सुगंधादिकांच्या व रसनेने मिष्टान्नादि रसाच्या अधीन झाला की पुरुष मोहित होऊन दुःखांत पडतो. सारांश हा संसार अनर्थकर होण्याला हे विषयच का- रण आहेत तस्मात् विचारवानाने निरतिशय सुखरूप आत्म्याकडे अनुसं.
- धान ठेवून, केवल विषयचिंतनानेच प्राप्त होनाल्या अतर्याला बळावें, हाच, खरा पुरुषार्थ आहे. ] १६. जाग्रत्यामन्तरात्मा विषयसुखकृतेऽनेकयत्नाम्बिधास्यन् श्राम्यत्सर्वेन्द्रियौघोऽधिगतमपि सुखं विस्मस्न्याति निद्राम् । विधामाय स्वरूपे त्वतितरसुलभं तेन चातीन्द्रियं हि सौख्यं सर्वोत्तमं स्यात्परिणतिविरसादिन्द्रियोत्थात्सुखाच्च ॥ अन्वयार्थ--' जाग्रत्यां अन्तरात्मा विषयसुखकृते अनेकयत्नान् विधास्यन्, श्राम्यत्सर्वेन्द्रियौघः अधिगत सुख अपि विस्मरन् स्वरूपे विश्रामाय निद्रा याति'- जाग्रदवस्थेमध्ये जीव विषयसुखाकरिता अनेक प्रयत्न करितो; पण त्यामुळे त्याचा सर्व इद्रियसमुदाय श्रान्त झाला असतां (विषयापासून ) प्राप्त झालेल्या सुखाला विसरून श्रमपरिहारार्थ तो स्वात्मस्वरूपांत निद्रित ( लीन ) होतो- 'तेन तु परिणतिविरसात् इन्द्रियोत्थात् सुखात् च अतीन्द्रिय हि सौख्य सर्वो- त्तमं अतितरसुलभ च अस्ति'-यास्तत्र परिणामी दुःख देणाऱ्या व इद्रि- यांच्या योगाने प्राप्त होणाऱ्या सुखाहून हे अतींद्रिय सुखच श्रेष्ठ आणि अत्यत सुलभ आहे. [ परमानदापुढे हे विषयोपभोगापासून होणारे सुख अति क्षुद्र व तुच्छ आहे आणि प्राण्यांचा अनुभवहि असाच आहे, असें या श्लोकांत सांगतात-जागृतींत विषयसुखप्राप्त्यर्थ प्राणी अनेक प्रयत्न करीत असतो. ह्या विषयाकरितां, विद्वान् अति कष्टकर असे देशपर्यटन करितो, एखाद्या दुष्ट धन्याची सेवा करितो; नीचाकडेहि याचना करितो. शूर योद्धा हे विषय भोगावयास सापडावे म्हणून समरांगणांत प्राण देण्यासहि तयार होतो, चोर ह्या विषयास्तव दुसऱ्यांचे गळे कापतो. गारुडी इत्यादि कपटपटु लोक ह्या क्षुद्र क्षणभगुर व अनर्थकर विषयांकरितां लोकांना अनीतीने, असत्याने व निर्दयपणाने फसवितात. सारांश, ह्याप्रमाणे, बहुतेक सर्व प्राणी विषयाकरिता अश्रान्त श्रम करून थकले असता त्यांची इद्रिये शिथिल ( काम करण्यास असमर्थ ) होतात व असे झाले असतां दैवयोगाने व दीर्घ प्रयत्नाने प्राप्त झालेल्या विषयांनाहि विसरून (त्यांचा अव्हेर करून) श्रमपरिहारार्थ ते आपल्या हृदयस्थ आत्मरूपांत प्रविष्ट होऊन काही काल निद्रा घेतात. विषय- प्राप्ति न झाल्यामुळे होणा-या संबापाची शांति करण्याकरितहि प्राण्याला- विरे- चाच आश्रय करावा लागतो. अाद परिणामी दुःख देवयान्या इंदिराजन्य सान्वाय विवरण. रण. सुखाहून हे अतींद्रिय ( इंद्रियांच्या साहाय्यावांचून होणारे ) सुख सर्वोत्कृष्ट अहि व 'या सुखाच्या प्राप्तीकरितां वैषायकसुखप्राप्तीसारखे दीर्घ प्रयत्नहि करावयास नकोत, असे प्रत्येक प्राण्याच्या अनुभवाने सिद्ध झाले आहे. सारांश वैषयिक आनद कष्टसाध्य व कष्टद आहे आणि परमानंद सुखसाध्य व सुखद आहे. तेही आतां यांतील कॉणत्या आनंदाचा अवलंब करावा, हे ज्याचे त्यानेच ठरविणे प्रशस्त होय.] ६७. पक्षावभ्यस्य पक्षी जनयति मरुतं तेन यात्युच्चदेशं लब्ध्वा वायुं महान्तं श्रममपनयति स्वीयपक्षौ प्रसार्य । दुःसंकल्पैर्विकल्पैर्विषयमनुकदर्थीकृतं चित्तमेत- खिन्नं विश्रामहेतोः स्वपिति चिरमहो हस्तपादान्प्रसार्य । अन्वयार्थ-पक्षी पक्षौ अभ्यस्य मरुत जनयति तेन उच्चदेश याति'-पक्षी आपले दोन्ही पंख हालवून वायु उत्पन्न करितो व त्याच्या योगाने ( आकाशात) उंच वर जातो -' महान्त वायु लब्ध्वा स्वीयपक्षौ प्रसार्य श्रम अपनयति'- (तेथे ) मोठ्या वायूपर्यंत पोचला असता आपले दोन्ही पख पसरून ( आपले ) श्रम घालवितो.-' दुःसंकल्पैः विकल्पै ( च ) विषय अनु कदर्थी- कृत एतत् चित्त खिन्न सत् विश्रामहेतो हत्तपादान् प्रसार्य अहो चिरं स्वपिति' -( तसेच ) दुष्ट संकल्प व विकल्प याच्या योगाने, विपयाना अनुलक्षून, दीन (रक ) झालेल हे चित्त खिन्न होऊन विश्रातीस्तव हातपाय पसरून पुष्कळ वेळपर्यत निजते. [ ' तद्यथास्मिन्नाकाशे० ' इत्यादि श्रुतींतील पक्ष्याच्या दृष्टा- न्तानेच मागच्या श्लाकातील अर्थ येथे निश्चित कारितात-पक्षी पख हालवून चारा उत्पन्न करिता व त्याच्या साहाय्याने आकाशात उच उडून जातो. अंत- रिक्षातील महावायूपर्यंत जाऊन पोचल्यावर तो आपले पख पसरून त्या महा- वायूच्या साहाय्याने तेथें तरगत राहतो; त्यामुळे पख हालविण्यापासून झालेल्या त्याच्या श्रमाचा परिहार होतो. त्याचप्रमाणे विषयाना उद्देशून हे चित्त अनेक सकल्प व तद्विपरीत विकल्प करिते आणि त्यांच्या योगानें पराधीन व दीन झालेले हे चित्त अत्यन्त खिन्न होते व आपले श्रम घालविण्याकरितां हातपाय पसरून स्वस्थ झोप घेते. ह्याप्रमाणे निद्रावस्थेत सुख भोगीत असलेल्या प्रा- ण्याला जागे केले असतां तो अत्यत दुःखी होतो. 'तं नायत बोधयेदित्याहुः।' पास्तव हातपाय पसरून स्वस्थ निद्रित झालेल्या पुरुषाला जागे करू नये, ) + शतश्लोकी. . . असे सांगतात. ' अशी व ' तस्मादुह स्वपन्त० म्ह० ' म्हणून सुरतासक झालेल्या इद्र व इंद्राणीच्या सुखाचा भग करणे मला उचित नाही, असा विचार करून निद्रिताला उठवू नये' अशी श्रुति आहे. या श्रुतीने 'निद्राभग करणा- राला मोठा दोष सागितला आहे. ] ६८. आश्लिष्यात्मानमात्मा न किमपि सहसैवान्तरं वेद बाह्य यहत्कामी विदेशात्सदनमुपगतो गाढमाश्लिष्य कान्ताम् । यात्यस्तं तत्र लोकव्यवहतिरखिला पुण्यपापानुबन्धः शोको मोहो भयं वा समविषममिदं न स्मरत्येव किंचित् ॥ अन्वयार्थ-' यद्बत् विदेशात् सदन उपगतः कामीं कान्तां गाढ श्लिष्य किमपि बाह्य आन्तर वा न वेद '-ज्याप्रमाणे परदेशातून घरी आलेला विषयी पुरुष स्त्रीला आलिंगून सुग्व घेता व त्यापुढे आ-( गृहां-) तील व बाहेरील दुसरे काहीएक जाणत नाही, 'तद्वत् आत्मा आत्मान सहसा एत्र आ- श्लिष्य ( न वेद)'-त्याचप्रमाणे जीव परमात्म्याला एकाएकी आलिगितो आणि (त्यामुळे ) त्याला आं ( देहा-) तील व बाहेरील ज्ञान होत नाही.-' तत्र अखिला लोकव्यवहृतिः अस्त याति'-त्या अवस्थेमध्ये सर्वहि लोकव्यवहार नष्ट होतो.-' ( तथा ) पुण्यपापानुबन्ध शोकः मोहः भय इद समाविषम वा किंचित् न स्मरति एव '-(तमेच ) पुण्यपापव्यवहार, शोक, मोह, भय किंवा अन्य ( दसऱ्या) सर्व समविषम भावना यांतील काहीएक त्याला आठवत नाही. [ येथे निद्रेची पूर्ण गाढावस्था सागितली आहे. एखादा कामी पुरुष पुष्कळ दिवसांनी परदेशांतून घरी परत आला असता स्वस्त्रीला दृढालिंगन देऊन फार सुखी होतो व त्याला त्या सुखापुढे अंतर्बहिर् कोणत्याच सुखाचें भान राहात नाही. तसेच जीव परमात्म्याशी निद्रावस्थेत एकरूप होतो व त्या सुखापुढे स्वप्नांतील सूक्ष्म किवा जागृतीतील स्थूल सुख त्याला मुळीच भासत नाही. कारण सर्व अतःकरणवृत्तींचा त्या अवस्थेत लय झालेला असतो. त्यामुळेच ह्या सर्व लोकव्यवहाराचाहि तेथे अस्त होतो. तसेंच पुण्यपापादि- संबध व शोकादिक यापैकींहि त्याला तेथे कांहीं एक स्मरत नाही. 'तद्वा अस्यै तदात्मिका०' इत्यादि श्रुति या श्लोकोक्त प्रतिपादनाला प्रमाण आहे. १९. अल्पानल्पप्रपंचप्रलय उपरतिश्चेन्द्रियाणां सुखाप्ति- जीवन्मुक्तौ सुषुप्तौ त्रितयमपि समं किन्तु तत्रास्ति भेदः।
F सान्वयार्थ विवरण. प्राक्संस्कारात्प्रसुप्तः पुनरपि च परावृत्तिमति प्रबुद्धो नश्यसंस्कारजातो न स किल पुनरावर्तते यश्च मुक्तः।। अन्वयार्थ- अल्पानल्पप्रपचप्रलय. इद्रियाणां उपरतिः सुखाप्ति. च (इति) त्रितयं अपि सुषुप्तौ मुक्तौ (च ) सम '-स्थूल-सूक्ष्म प्रपंचाचा लय, इद्रियांची शांति व सुखप्राप्ति ही तिन्हीहि गाढ निद्रा व मुक्ति या दोन्ही अवस्थेत सार- खींच आहेत.-'किन्तु तत्र भेदः अस्ति '-पण त्यात भेद आहे.-' प्रसुप्त. प्राक् सस्कारात् पुन' अपि च परावृत्ति एति '-निद्रित पुरुष जागृतींतील सकल्या- मुळे पुनः जागृतींत परत येतो.-' य च प्रबुद्ध स मुक्त सन् नश्यत्सस्कार- जातः सन् न किल पुन' आवर्तते '-व जो ( अज्ञान नष्ट झाल्यामुळे ) ज्ञानी झालेला असतो तो मुक्त झाल्यामुळे व त्याचे सर्व सस्कार नष्ट झाल्यामुळे पुन: कधीहि ( देहाभिमानाकडे ) परत येत नाही. आता मुक्ति व सुषुप्ति या अव- स्थांचे लक्षण जरी एक असले तरी त्याच्यात मोठा भेद आहे, असे या श्लोकांत सागतात-जीवन्मुक्ति व गाढ निद्रा या अवस्थेत सर्व स्थूल-सूक्ष्म प्रपचाचा लय, इद्रियशांति व आनदप्राप्ति ही सारखीच असतात. असे जर असेल तर मग मुक्तीकरितां इतके प्रयास करण्याचे काय कारण " असा कोणी प्रश्न करतील म्हणून आचार्य सागतात-पण त्यांत एक मोठा भेद आहे निद्रित पुरुष (जीव) जागृतींतील अनेक वासनामुळे पुनः देहाभिमानावर येतो (देहाभिमान धरितो) व पूर्ववत् व्यवहार करू लागतो आणि आत्मज्ञानी पुरुष तत्क्षणीच मुक्त होत असल्यामुळे व त्याचे सचित-क्रियमाणकर्मजन्य सस्कार नष्ट होत असल्यामुळे तो कधीहि देहाभिमान धरीत नाही आणि त्यामुळे त्याला या व्यव- हारांतहि पडावे लागत नाही. साराश, प्राण्याच्या अनेक सकल्पविकल्पामुळेच त्याला पुनः पुनः जागृति, स्वप्न, जन्म, मरण इत्यादि अवस्था अनुभवाव्या लागतात. ] ७०. आनन्दान्यश्च सर्वाननुभवति नृपः सर्वसंपत्समृद्ध- स्तस्यानन्दः स एकः स खलु शतगुणः संप्रतिष्ठः पितृणाम् । आदेवब्रह्मलोकं शतशतगुणितास्ते यदन्तर्गताः स्यु- ब्रह्मानन्दः स एकोऽस्त्यथ विषयसुखान्यस्य मात्रा भवन्ति । अन्वयार्थ- यः सर्वसपत्समृद्धः नृपः सर्वान् आनदान् अनुभवति '-जो एखादा सर्व संपत्तीने समृद्ध असणारा राजा. सर्व सुखात्रा अनुभव घेतो- पुनः . सः तस्य एकः आमदः म्यतो त्याचा एकग्वानंद होपः सत्खलु-संत गुणः संपतिष्ठः पितृणां (एकः )'-तोच सातपट झाला असतां पितराजा ( एक आनंद होतो.)-' ( एव ) आदेवब्रह्मलोक शतशतगुणिताः ते यदन्तर्गताः स्युः' -यांप्रमाणे देवलोकापासून ब्रह्मलोकापर्यत शतपटीने अधिक असणारे हे सर्व- 'हि आनंद ज्यात अतर्भूत होतात- सः एकः ब्रह्मानन्दः अस्ति'-तो ब्रह्मानद होय.-' अथ विषयसुखानि अस्य मात्राः भवन्ति '-आणि ही सर्व 'विषयसुखे ह्या ब्रह्मानदाचेच अंश आहेत. [ सर्व ऐहिक व पारलौकिक सुखां- पेक्षा आत्मसुख श्रेष्ठ व अधिक आहे असे येथे ( अनुमानादि ) तर्काने दाखवितात-दरिद्री पुरुषांना अन्न, स्त्री, पुत्र यांपैकी एखाद्याच विषयाची प्राप्ति झाली तरी तेवढाच आनंद होत असतो. हा झाला एक आनद. मध्यम स्थितींतल्या पुरुषांना त्याहून एखाद्या अधिक विषयाची प्राप्ति झाली, की तितक्याच मानाने थोडा अधिक आनंद होतो. हे झाले दोन आनद. ह्याप्र. माणेच उत्तरोत्तर जशी जशी अधिक विषयप्राप्ति तसा तसा प्राण्याला आधि. काधिक आनद होतो. या न्यायाने पाहिले असता निष्फटक सार्वभौम राज्य, सुदर स्त्री, सतति, शरीरदृढता इत्यादि सर्व ऐहिक सुखाने सपन्न असलेल्या राजाचा एक मानुष आनद होतो त्या आनदाहून पितराचा एक आनद शत. पट अधिक असतो. ह्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत प्रत्येक लोकातील आनद शत- पटीने अधिक असतो. मृत्युलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्वहि आनंदांचा मिळून एक ब्रह्मानद होतो. म्ह० पूर्वोक्त सर्व वैषयिक सुखे हे या ब्रह्मानदाचेच क्षुद्र अंश आहेत. अंशांहून अशी श्रेष्ठ असतो हा न्याय व हस्तपादादि अवयवां- पेक्षा त्यांचा समूह जो देह तो श्रेष्ठ आहे, असे लोक मानितात, हा व्यावहा- रिक अनुभव या प्रतिपादनाला प्रमाण आहे. सारांश ब्रह्मानद सर्वात श्रेष्ठ आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. जसा एकच आत्मा उपाधीच्या योगाने अनेक असल्यासारखा भासतो, तसाच परमानन्दहि विषयसुखाच्या रूपाने क्षुद्रत्वाने प्रत्ययाला येतो. या श्लोकोक्त प्रतिपादनाला " स यो मनुष्याणां राद्धः०" " अथैष ब्रह्मलोकः सम्राडित०" (बृह. भा. अ. ४ ब्रा. ३ पृ. २१७-१८) इत्यादि श्रुति प्रमाण आहेत. ] ७१. यत्रानन्दाश्च मोदाः प्रमद इति मुदश्वासते सर्व एते यत्राप्ताः सर्वकामाः स्युरखिलविरमात्केवलीभाव आस्ते। मां तत्रानंदसान्द्रे कृधि चिरममृतं सोम पीयूषपूर्णा धामिन्द्रायदेशित्यपि-निमगिरोचयुगान्तर्गताय -१ व सान्वयार्थ विवरण. ८१ अन्वयार्थ-'मोदाः च :प्रमदः च मुद. इति एते सर्व आनन्दाः यत्र आसते'-( मनुष्य, पितर व देव यांचे ) मोद, प्रमद व मुद या नांवाचे सर्व आनद जेथे आहेत,-' यत्र सर्वकामा. आप्ता. स्युः'-जेथे सर्वहि तृष्णा पूर्ण होतात,-' ( यत्र ) अखिलविरमात् केवलीभाव' आस्ते '-सर्व कार्याचा लय होत असल्यामुळे (जेये ) कैवल्य असते-' हे सोम तत्र आनन्दसान्द्रे मा चिरं अमृत कृषि' हे सोमा, त्या आनन्दपूर्ण पदी, मला चिरकाल मरण वर्मरहित कर-'भ्रूयुगान्तर्गताय इन्द्राय पीयूषपूर्णा वारा देहि इति निगमगिरः अपि (प्राहुः )'-आणि भ्रूयुगुलाच्या मध्ये असणाऱ्या जीवात्म्याला पूर्ण अमृतधारा दे, असेच श्रुतीहि सागतात. [ पूर्वनिर्दिष्ट अर्याचेच प्रतिपादन करणाऱ्या ऋग्वेदाच्या सातव्या अष्टकातील " यत्रानन्दाच मोदा..” इत्यादि श्रुतीचे तात्पर्य या श्लोकात सागतात-ज्या परमानदामध्ये सर्वहि उत्तरोत्तर अधिक असणारे मनुष्यादिकाचे आनद रहातात, ज्या परमानदामध्ये सत्यलोकप्रा प्यादि सर्व कामना पूर्ण होतात व ज्याठिकाणी सर्व स्थूल-सूक्ष्म प्रपचाचा लय होत असल्यामुळे कैवल्य ( केवलभाव ) राहते, त्या परमानदपूर्ण स्थली, हे पोडशकलारूप सोमा, ( चद्ररूप परमात्म्या,) जीवदशेला प्राप्त झालेल्या मला घेऊन जा व नेये नेऊन मला अमर कर. तसेच ह्या जीवात्म्याला अमृ- ताची पूर्ण वार दे. तो जीवात्मा दोन्ही भुवयाच्या मध्यभागी राहतो. अनेक श्रुतींनी असेच वर्णन केले आहे. शिवाय मुक्त ( ममाविस्थ ) साधकाच्या तालूतील सोमनावाच्या चक्रापासून अमृतस्राव होत असतो, असे योगशास्त्रां- तहि प्रसिद्ध आहे. ] ७२. आत्माऽकम्पः सुखात्मा स्फुरति तदपरा त्वन्यथैव स्फुरन्ती स्थैर्य वा चञ्चलत्वं मनसि परिणति याति तत्रत्यमस्मिन् । चाञ्चल्यं दुःखहेतुर्मनस इदमहो यावदिष्टार्थलब्धि- स्तस्यां यावस्थिरत्वं मनास विषयजं स्यात्सुखं तावदेव ॥ अन्वयार्थ- आत्मा अकम्पः सुखात्मा स्कुति'-आत्मा निष्कप ( चलन- रहित ) व आनदम्प आहे, असा प्रत्यय येतो.-' तदपरा तु अन्यथा एव स्फुरन्ती'-(परतु ) त्याच्याहून निराळी जी प्रकृति ती तर त्याच्याहून विपरीतच आहे व त्याच्यामुळेच ती अनुभवाला येणारी आहे.-'तत्रत्यं स्थैर्य चश्चलत्व वा अस्मिन् मनसि परिणति याति'. त्यांच्या ( आत्म्याच्या व प्रकृती- - १ - च्या) ठिकाणचें स्थैर्य व चंचलता ही ह्या मनामध्ये परिणत (व्यक्त) होतात.- 'अहो यावत् इष्टार्थलब्धिः ( तावत् प्रयत्नशताकुलस्य) मनसः इदं चाञ्चल्यं दुःखहेतुः (भवति )-' अहो इष्ट विषयाची प्राप्ति होईपर्यत तदर्थ ( अनंत प्रयास करून थकलेल्या) मनाचे हे चांचल्य दुःखाला कारण होते- तस्यां सत्यां मनसि यावत् स्थिरत्वं तावदेव विषयजं सुख स्यात् '-व ती इष्टप्राप्ति झाली असतां जेवढा वेळ मनाची स्थिरता असते तेवढा वेळच विषयजन्य सुख होते. [ आता याविषयी परमानंद हे अतीद्रिय सुख व विषयानंद हे इंद्रियजन्य सुख असा ह्या दोन सुखात विलक्षण भेद अनुभवसिद्ध असतांना ह्याच परमानदाच्या अंशाचा आश्रय करून अन्य प्राणी सुख भोगितात, असे कसे म्हणता येईल ? अशी कोणी शंका घेईल म्हणून आचार्य ह्या व पुढच्या श्लोकांत तिचे समाधान करितात. आत्मा कंपरहित व सुखरूप आहे, ह्यावि षयी ' विज्ञानमानन्दं०' ही श्रुति व सुषुप्तीतील प्रत्येकाचा अनुभव, हीच दोन उत्तम प्रमाणे आहेत आणि असा त्याचा प्रत्यय येतो म्हणूनच ' स्फुरति (स्फुरण पावतो, अनुभवाला येतो ) असे श्लोकात म्हटले आहे. तसेच त्याच्या- पेक्षां विलक्षण जी माया ती त्याच्याविरुद्ध (म० चाचल्य, दुःख इत्यादि) धर्मांनी युक्त आहे, असे सांगितले आहे व आत्म्याच्या आश्रयानेच तिचा अनु- भव येतो. तात्पर्य त्या आत्म्यामध्ये व मायेमध्ये असणारे ( स्थिरता व चंच- लता हे ) गुण मनामध्ये स्पष्टपणे प्रतीत होतात, कारण चैतन्य व जडवर्ग या दोघांची प्रथि (संधि) म्हणजेच मन होय. सारांश, इष्ट विषयाची प्राप्ति होईपर्यंत अविश्रात श्रम करणाऱ्या मनाचे चांचल्य प्राण्याला दुःख देते व एकदा विषयप्राप्ति झाली की, मी कृतकृत्य झालो, असें जीवाला वाटल्यामुळे जोपर्यंत त्याचे मन स्थिर असते तोपर्यतच विषयांपासून त्याला सुख होते. तात्पर्य, मनातील स्थैर्य हा आत्म्याचा गुण असून त्यापासून आनद व चांचल्य हा प्रकृतीचा गुण असून त्यापासून दुःख प्राप्त होते. ] ७३. यद्वत्सौख्यं रतान्ते निमिषमिह मनस्येकताने रसे स्या- स्थैर्य यावत्सुषुप्तौ सुखमनतिशयं तावदेवाथ मुक्तौ । नित्यानन्दः प्रशान्ते हृदि तदिह सुखस्थैर्ययोः साहचर्यम् नित्यानन्दस्य मात्रा विषयसुखमिदं युज्यते तेन वक्तुम् ॥ अन्वयार्थ-' इह रतान्ते मनसि रसे एकताने सति यद्वत् निमिषं सौख्यं सान्वी विवरण. स्यात् '-सर्वानुभवसिद्ध संभोगाच्या अंती मन शृंगाररसाशी एकरूप ( शृंगार रसमय ) झाले असता जसें क्षणभर सुख होते;-' तथा सुषुप्तौ मनास-यावत् स्थैर्य तावदेव अनतिशयं सुखं भवति '-तसेंच निद्रावस्थेत मनामध्ये जेवढी स्थिरता तेवढेच निरतिशय सुख जसे होते,-'अथ मुक्तौ हृदि प्रशान्ते (सति) नित्यानन्दः ( भवति)' त्याचप्रमाणे मोक्षावस्थेमध्ये अंतःकरण शांत झालें असतां नित्यानद होतो.-'तत् सुखस्थैर्ययोः इह साहचर्य [ अनुभवसिद्धं ]'- त्याअर्थी सुख व चित्तस्थैर्य याचे लोकांत साहचर्य आहे (हे अनुभवसिद्ध झाले.)- तेन इद विषयसुख नित्यानदस्य मात्रा इति वक्तु युज्यते'-त्यावरून हे विषयजन्य सुख हा नित्यानदाचा एक अंश ( कला ) आहे, असे म्हणणे युक्त आहे. [ आता ह्या श्लोकात विषयसुखे नित्यानंदाच्या कला आहेत; हे दाखविण्याकरिताच आणखी दोन-तीन दृष्टान्त देतात. स्त्रीसभोगाचे अती मन विषयरसांत तल्लीन ( एकाग्र ) होऊन गेले असतां एक क्षणभर सुख होते. गाढ निद्रा लागली असताहि मन स्थिर होते व ते स्थिर असेपर्यत जीवाला अत्यंत आनद होतो. मुक्तीमध्यहि अतःकरण अत्यन्त शात झाल्यामुळे नित्या- नंदाचा अनुभव येतो. त्याअर्थी चित्तस्थैर्य असेल तर आनद व ते नसेल तर आनंदाचा अभाव, असे अन्वय-व्यतिरेकानी याचे साहचर्य (व्याप्ति) सिद्ध झाले आणि याच कारणास्तव विषयसुख ही नित्यानदाची एक कला आहे, असे म्हणणे सयुक्तिक होय. येथे आनदकोशप्रकरण समाप्त झाले. ] ७४. श्रान्तं स्वान्तं सबाह्यव्यवहृतिभिरिदन्ताः समाकृष्य सर्वा- स्तचत्संस्कारयुक्तं ह्युपरमति परावृत्तमिच्छन्निदानम् । स्वानान्संस्कारजातप्रजनितविषयान् स्वामदेहेऽनुभूतान् प्रोत्स्यान्तः प्रत्यगात्मप्रवणमिदमगाद्भरिविश्राममस्मिन् ७५ अन्वयार्थ-सबाह्यव्यवहृतिभिः श्रान्त निदान इच्छत् (च) परावृत्त इदं स्वान्तं ताः सर्वाः समाकृष्य तत्तत्सस्कारयुक्त हि उपरमति'-सर्व स्थूल. सूक्ष्म व्यवहार करून थकलेले ( व त्यामुळे ) स्वतःच्या कारणामध्ये लीन होण्याची इच्छा करून परतलेले हे मन ते सर्व व्यवहार बद करून त्याच्या संस्कारांसह शांत होतें.-' स्वानदेहे अनुभूतान् स्वानान् संस्कारजातप्रजनित. विषयान् प्रोत्स्य'-(नंतर ) स्वप्नदेहामध्ये अनुभविलेले, वीजभूत सस्कारां. पासून उत्पन्न झालेले खान ( खोटे) विषय टाकून-' इदं अन्तः प्रत्यगात्मप्र- शतलोकी. . . वणं अस्मिन् भूरि विश्राम अगात् '-हें प्रत्यगात्म्याकडे अंतर्मुख झालेलें (वळ- लेलें) मन परमात्म्यामध्ये अत्यंत विश्रांति घेते. [ आतां येथून पुढे जगन्मि- थ्यात्वप्रकरण सुरू झाले. प्रपंच मिथ्या आहे, असे प्रतिपादन करीत असतां स्वप्नांतील प्रपंचासारखाच तो आहे, हे दाखविण्याकरितां प्रथमत: स्वप्नाच्या स्वरूपाचे वर्णन करितात. स्त्री, पुत्र, सेवक इत्यादिकांच्या पोषणाकरितां अनेक स्थूल व्यवहार करून थकलेले व अत्यन्त आनदस्वरूप अशा आपल्या कारणामध्ये जाऊन विश्रांति घेण्याची इच्छा करून अन्तर्मुख झालेले मन सर्व व्यापार बद करून शात होते. ह्या अवस्थेलाच सुषुप्ति असे म्हणतात. श्लोकांत 'इदन्ताः' असे पद आहे त्याचा ' इद' व 'ताः' (व्यवहृतीः ) असा पदच्छेद करावा किवा 'इदन्ताः ' ( म्ह० 'हे' असे प्रत्यक्षत्वाने भास- णारे विषय ) असे एकच पद घ्यावे. ह्याप्रमाणे बाह्य व्यवहार जरी मनाने टाकले तरी त्यांच्या दृढ चितनाने झालेले सस्कार त्याच्या बरोबरच असतात. त्यामुळे शरीर निश्चेष्ट असतानाच त्या विषयांचे स्मरण होते. या स्मरणरूप अवस्थेलाच 'स्वप्न ' असे म्हणतात. त्या स्मरणारूढ झालेल्या संस्कारापासून उत्पन्न होणाऱ्या स्वप्नांतील सूक्ष्म विषयांनाहि टाकून परमात्म्याशी सयुक्त होण्याच्या इच्छेने परतलेले मन ह्या हृदयस्थ साक्षीमध्ये विश्रांति घेते. जसा कोणी राजा एखाद्या मोठ्या पुरुषाचे दर्शन घेण्याकरिता गेला असता सैन्यादि इतर सर्व अनुयायाना द्वाराबाहेर ठेवून प्रधानादि दोघां-तिघांसह आंत जातो व पुढे गेल्यावर त्यानाहि शेवटच्या द्वारापाशी सोडून स्वतः एकटाच दर्शना- करिता आत शिरतो; त्याप्रमाणेच हे मन आत्मदर्शनाला निघालें असतां करिते. ह्या श्लोकात मनाला प्रथमत. निद्रावस्थाच प्राप्त होते व 'खप्न' ही अवस्था मध्येच केव्हातरी कर्मयोगाने प्राप्त होणारी आहे, असे सुचविले आहे.] ७५. स्वप्ने भोगः सुखादेर्भवति ननु कुतः साधने मूर्च्छमाने स्वाप्नं देहान्तरं तब्द्यवहृतिकुशलं नव्यमुत्पद्यते चेत् । तत्सामग्न्या अभावात्कुत इदमुदितं तद्धि सांकल्पिकं चे- चत्कि स्वाप्ने रतान्ते वपुषि निपतिते दृश्यते शुक्रमाक्षः ।। अन्वयार्थ-'ननु सावने मूर्च्छमाने (सति) खमे लुखादेः भोगः कुतः भवति' अहो पण देहाद्रि भोगसाधने निश्चेष्ट पडली असता खनात सुखादिकांचा सान्वयार्थ विवरण. [ ? उपभोग (प्राण्याला ) कसा होतो ?-' तब्द्यवहृतिकुंशलं नव्यं स्वानं देहान्तरं उत्पद्यते चेत् तत्सामग्याः अभावात् इद कुतः उदित '-स्वप्नांतील व्यवहा- राला योग्य असें नवीनच दुसरे स्वाप्न शरीर उत्पन्न होते, असे जर म्हणाल तर देहोत्पत्तीची सामग्री नसतांना ते कसे उत्पन्न होते ?-'तत् हि साकल्पिक चेत् तत् स्वाप्ने रतान्ते निपतिते वपुषि शुक्रमोक्षः किं दृश्यते'-ते शरीर केवळ सकल्पमय आहे, असे म्हणावे तर स्वप्नातील स्त्रीसंभोगानतर निश्चेष्ट पडलेल्या शरीरात शुक्रपात झाल्याचे कां दिसते ? [ आचार्य आता पूर्वपक्ष उघड करून येथे स्वमत दृढ करितात-स्थूल देह सुख-दुःखादि भोगांचें साधन आहे. तो साधनभूत देह ज्ञानेद्रिये व कर्मेंद्रिये यांसह निश्चेष्ट होऊन पडला असतां स्वप्नावस्थेमध्ये सुख-दुःख देणाऱ्या विपयांचा भोग कोणत्या साधनाने (देहाने ) होतो ? स्वप्नातील विषयांचा उपभोग घेण्यास योग्य असा नवीनच दुसरा देह तेथे उत्पन्न होतो व त्याच्या द्वारा स्वप्नातील भोग होतात, असे जर म्हणाल तर त्या देहाच्या उत्पत्तीला लागणारी शुक्र-शोणि- तादि सामग्री नसताना तो कसा उत्पन्न होतो ? पिशाचसचाराप्रमाणे तो केवल कल्पनेने खोटाच उत्पन्न होतो असे म्हणशील तर स्वप्नावस्थेतील स्त्रीसभोगाच्या अती ह्या निश्चेष्ट पडलेल्या देहांत रेतस्खलन का होते ? तें त्या स्वप्नातील खोट्या देहातच का होत नाही? कारण खोट्या देहाचा भोगहि खोटाच असणे युक्त आहे. मग स्त्रीसभोगाचे द्योतक जे रेतस्खलन ते जागें झाल्यावर या निश्चेष्ट देहात प्रत्यक्ष कां दिसते ? ] ७६. भीत्या रोदित्यनेन प्रवदति हसति श्लाघते नूनमस्मा- स्वप्नेऽप्यनेनुबन्धं त्यजति न सहसा मूञ्छितेऽप्यन्तरात्मा। पूर्व ये येऽनुभूतास्तनु-युवति-हय-व्याघ्र-देशादयोऽर्था- स्तत्संस्कारखरूपान्सृजति पुनरमूचित्य संस्कारदेहम् ॥ अन्वयार्थ-भीत्या अनेन रोदिति ( तथा अनेन ) प्रवदति हसति श्लाघते'- स्वप्नांत भीति वाटल्याने या देहाने रडतो, ह्यानेच बडबडतो, ह्यानेच हंसतो व ह्यानेच स्वतःची स्तुति करितो.-' नूनं तस्मात् अन्तरास्मा स्वप्ने अपि अङ्गे मूच्छिते अपि सहसा अनुबन्धं न त्यजति ' तेव्हां खरोखर यावरून अंतरात्मा स्वप्नांत सुद्धा देह निश्चेष्ट पडला तरीहि त्याचा सबंध एकाएकी सोडीत नाही, (असें झालें.)-'पूर्व तनु-युवति-हय-व्याघ्र-देशादयः ये ये अर्थाः ८३ अवलोकी- - पूर्व - अनुभूताः तत्सस्कारस्वरूपान् अमून् पुनः संस्कारदेहं श्रित्य सृजति'- अनादि जाग्रतीत देह, स्त्री, अश्व, व्याघ्र, प्रदेश इत्यादि जे जे विषय अनुभविले होते त्यांच्या संस्काररूप असे हे सर्व विषय तो पुनः लिगदेहाचा आश्रय करून उत्पन्न करितो. [ स्वप्नात अन्य देह उत्पन्न होतो, असे मानल्यास आणखी कोणता दोष येतो ते सांगून पुनः स्वमत स्पष्ट करितात- स्वप्नांत चोराची किंवा व्याघ्राची भीति वाट्न प्राणी स्थूलदेहानेच मोठमोठ्याने आ- कोश करितो. यानेच काहीतरी बडबडतो, हसतो व मी कृतकृत्य झालो अशी स्वतःचीच वाहवा करितो, हे सर्वांना प्रसिद्ध आहे. ह्याप्रमाणे पूर्वपक्षाचा अनुवाद करून आतां पूर्वी सागितलेलीच गोष्ट सिद्ध झाली, असे सागतात- ह्यावरून स्वप्नात स्थूल देह निश्चेष्ट असला तरी अतरात्मा त्याचा सबध सह- सा टाकीत नाही, असेच निश्चित झाले. ' अहे। पण, पूर्वी त्यांचा काही सबध नाही, असे सागून आता येथे त्याच्याविरुद्ध कसे सागता ?' असा प्रश्न कोणी विचारतील म्हणून सांगतात-अनादिकालापासून प्रवृत्त झालेल्या ह्या जन्म- मरणरूप ससारात हा प्राणी अनेक देहानी अनेक जाग्रतीत असख्य भोग भोगितो. ते जे पूर्वानुभूत उच्च-नीच देह, स्वकीय किवा परकीय स्त्री, गमन- साधन अश्व, भयकारण व्याघ्र, काशीसारखे प्रदेश इत्यादि विषय त्यांचा मनाला सस्कार झालेला असतो. त्यामुळे सस्कार ( स्मृतीचे कारण, बीज) हेच ज्याचे स्वरूप आहे, असे ते शरीरादि विषय पूर्वीप्रमाणे जसेच्या तसे भासतात. सारांश, अतरात्मा शरीराचा आश्रय करितो व त्यामध्ये सर्व सस्कार उद्बुद्ध होऊन त्या त्या विषयरूपाने व्यक्त होतात. ] ७७. सन्धौ जाग्रत्सुषुप्त्योरनुभवविदिता स्वाप्न्यवस्था द्वितीया तत्रात्मज्योतिरास्ते पुरुष इह समाकृष्य सर्वेन्द्रियाणि । संवेश्य स्थूलदेहं समुचितशयने स्वीयभासान्तरात्मा पश्यन्संस्काररूपानभिमतविषयान्याति कुत्रापि तद्वत् ॥७८ अन्वयार्थ-'जाग्रत्सुषुप्त्योः सन्धौ ( या ) अनुभवविदिता स्वाप्ती अवस्या (सा) द्वितीया'-जायदवस्था व सुषुप्त्यवस्था यांच्या सधीत ( मध्ये ) जी सर्वांच्या अनुभवाला येणारी स्वप्नावस्था (ती) दुसरी होय.-'तत्र इह सर्वेन्द्रि- याणि समाकृष्य पुरुषः आत्मज्योतिः आस्ते '-त्या अवस्थेमध्ये स्वस्वरूपांत सर्वहि इंद्रिये ओढून घेऊन आत्मा स्वप्रकाशाने युक्त होऊन रहातो.-' स्थूल- सान्वार्थ विवरण. देहं समुचितशयने सवेश्य संस्काररूपान् अभिमतविषयान् स्वीयभासा पश्यन् अन्तरात्मा कुत्र अपि तद्वत् याति'-ज्या शय्येवर तो निजलेला असतो तेथेच स्थूल देह ठेवून सस्काररूप इष्ट विषयांना स्वप्रकाशाने पाहणारा अंतरात्मा पाहिजे तेथे सस्काररूपानेच जातो. [आतां मागील श्लोकांत सांगित- लेला सिद्धान्त श्रुतिसमत आहे, असे येथे सांगतात-जाग्रहवस्थेचा अत व निद्रावस्थेचा आरंभ यांच्यामध्ये असणारी व सर्वहि प्राण्यांच्या अनुभवाची अशी ही स्वप्नदशा दुसरी आहे. जाग्रत् पहिली, स्वामी दुसरी व सुषुप्ति तिसरी, असा ह्या अवस्थाचा क्रम शास्त्रांत सांगितला आहे. त्या दुसऱ्या अवस्थे. मध्ये स्वत.च्या स्वरूपात सर्वहि सूक्ष्म इद्रियाना लीन करून आत्मा आपल्या साक्षिरूपाने रहातो. विषयाचा भोग होण्याला इद्रियांची आवश्यकता असते; पण या द्वितीय अवस्थेमध्ये सर्व इद्रिये लीन होत असल्यामुळे हा अतरात्मा स्वतःच्या ज्ञानरूपानेच तेथे स्वाप्न विषयाचा भोग घेतो. 'तर मग त्यावेळी स्थूल देहाची काय वाट होते ?' असे कोणी विचारतील म्हणून सांगतात- जाग्रत् काली ज्या तल्पावर ( अथरुणावर ) तो निद्रा घेण्याकरिता हात पाय पसरून पडतो, तेथेच त्या स्थूल देहाला तसाच टाकून स्वतःच्या ज्ञानसाम- र्थ्याने सस्कारानुरूप स्वप्नदेह व इद्रियसमूह उत्पन्न करून वाटेल त्या स्थळी त्या सस्काररूपानेच जाऊन व्यवहार करितो. साराश, त्या अवस्थेत देह वस्तुतः उत्पन्न होत नाही, किवा तो संकल्पात्मकहि नाही; तर सस्कारद्वारां व आत्म्याच्या ज्ञानमाहात्म्यानेच त्या अवस्थेचा प्राण्याला अनुभव येतो.] ७८. रक्षन् प्राणैः कुलायं निजशयनगतं श्वासमात्रावशेषै- माभूतप्रेतकल्पाकृतकमिति पुनः सारमेयादिभक्ष्यम् । स्वप्ने स्वीयप्रभाव त्सृजति हयरथान्निम्नगाः पल्वलानि क्रीडास्थानान्यनेकान्यपि सुहृदबलापुत्रमित्रानुकारान् ॥ अन्वयार्थ- ( इद ) प्रेतकल्पाकृतकं पुनः सारमेयादिभक्ष्य मा भूत् इति श्वासमात्रावशेषैः प्राणैः निजशयनगत कुलाय रक्षन् ( यत्र कुत्रापि याति इति पूर्वेण सबन्धः )'-(हें शरीर) प्रेतासारखे अमगल किंवा कोल्ह्याकुत्र्याचे भक्ष्य होऊ नये म्हणून केवल श्वासरूपाने अवशिष्ट रहाणाऱ्या प्राणाच्या योगाने स्वतःच्या शय्येवर पडलेल्या शरीराचे रक्षण करणारा (जीवात्मा हवा तेथे जातो, असा पूर्व श्लोकाशी संबध.)-'स्वमे स्वीयप्रभावात् हयरथान् निनमाः ५४ शतश्लोकी. पल्बलानि अनेकानि क्रीडास्थानानि अपि च सुहृदबलापुत्रमित्रानुकारान् सृजति ' तो स्वप्नावस्थेत स्वतःच्या सामर्थ्याने घोडे, रथ, नद्या, लहान जलाशय, अनेक विहारस्थाने तसेच, सुहृद्, स्त्रिया, पुत्र, मित्र इत्यादिकांना पूर्वीच्या सुहृदादिकांप्रमाणेच उत्पन्न करितो. [पूर्व श्लोकांत देहाला पूर्वस्थळींच सोडून जीवात्मा जातो, असे म्हटले आहे. पण त्याविषयी 'तो ह्या देहाला जिवत अवस्थेत सोडतो की निर्जीव अवस्थेत सोडतो ? जिवत अवस्थेत सोडीत असल्यास पूर्वीप्रमाणे तो देहव्यापार का करीत नाही ! व निर्जीव अवस्थेत सोडीत असल्यास त्यामध्ये श्वास कसा राहतो ? ' असे प्रश्न कोणी करतील, म्हणून आचार्य ह्या व पुढच्या श्लोकात त्याना उत्तर देतात-पूर्वी निजलल्या ठिकाणीच असणाच्या निश्चेष्ट शरीराची आप्तानी शवाप्रमाणे व्यवस्था करू नये किंवा वासावरून शवाला ओळखणाऱ्या पशु-पक्ष्यांनी त्याला खाऊ नये म्हणून केवल श्वासरूपाने मागे राहणाऱ्या प्राणांनी त्याचे रक्षण करून स्वाप्नभोग भोगण्याकरितां हा अतरात्मा इप्ट स्थळी जातो व स्वतःच्या ज्ञानसामर्थ्यानेच तो अनेक काल्पनिक विषय निर्माण करितो. प्राण जड असल्यामुळे त्यांना प्रेरणा करणारा कोणी तरी सचेतन असल्यावांचून त्यांची क्रिया होणे संभवनीय नाही, म्हणून 'अतरात्मा प्राणांना श्वासरूपाने शरीररक्षण करण्याकरिता ठेवून जातो' असे म्हटले आहे. ] ७९. मातङ्गव्याघ्रदस्युहिषदुरगकपीन्कुत्रचित्प्रेयसीभिः क्रीडन्नास्ते हसन्वा विहरति कुहचिन्मृष्टमश्नाति चान्नम्। म्लेच्छत्वं प्राप्तवानस्म्यहमितिकुहचिच्छङ्कितः स्वीयलोका- दास्ते व्याघ्रादिभीत्या प्रचलति कुहचिद्रोदिति ग्रस्यमानः।। अन्वयाथ-'मातङ्गव्याघ्र दस्युद्विषदुरगकपीन् (सृजति इति पूर्वण सम्बन्ध.)' -तसेच, चाण्डाल, व्याघ्र, चोर, शत्रु, सर्प, कपि इत्यादिकानाहि ( उत्पन्न करितो, असा पूर्व श्लोकाशी सबंध.)-'कुत्रचित् प्रेयसीभिः क्रीडन् हसन् वा आस्ते '-कोठे आवडत्या स्त्रियांशी क्रीडा करीत किवा हंसत असतो.-'कुह- चित् विहरति मृष्टं अन्नं च अश्नाति '-कोठे विहार करितो तर कोठे स्निग्ध अन्न खातो.-' अहं म्लेच्छत्वं प्राप्तवान् अस्मि इति कुहचित् खीयलोकात् शङ्कितः आस्ते '-मी म्लेच्छ झालो आहे, असे समजून कोठे स्वतःच्या आप्तादिकांना लाजून ( लपून ) रहातो.-'व्याघ्रादिभीत्या प्रचलति कुहचित् , - सान्वयार्थ विवरण. ४९ ग्रंस्यमानः रोदिति '-कोठे व्याघ्रादिकांच्या भीतीने पळतो तर कोठे ते खात आहेत, असे पाहून रडतो. [अनेक स्वाप्न भोगांतील काहींचा येथे स्पष्ट उल्लेख केला आहे. व्याघ्र, सर्प यांसारखा एखादा दुष्ट प्राणी मागे लागला आहे, असे पाहून तो पळू लागतो; पण पाय अगदी लुले पडून पळतां येत नाही, असे पाहून अति दुःखी होतो. इतक्यांत त्याने येऊन पकडले आहे व तो आप- ल्याला खात आहे, असे पाहून तो मोठ्याने आक्रोश करितो. सारांश-या अवस्थेत प्राणी अनेक इष्ट व अनिष्ट भोगांचा उपभोग घेतो. या दोन श्लोकां- तील प्रतिपादनाला " स यत्राय प्रस्वपितीत्यस्य .अधि भयानि पश्यन् " ही बृहदारण्यक श्रुति (बृ. भाष्यार्थ अ. ४ ब्रा. ३ पृ.११२-३०) प्रमाण आहे. ८०. यो यो दृग्गोचरोऽर्थो भवति स स तदा तद्गतात्मस्वरूपा- विज्ञानोत्पद्यमानः स्फुरति ननु यथा शुक्तिकाज्ञानहेतुः । रौप्याभासो मृषैव स्फुरति च किरणाज्ञानतोम्भो भुजङ्गो रज्ज्वज्ञानान्निमेषं सुखभयकृदतो दृष्टसृष्टं किलेदम् ८१ अन्वयार्थ--' ननु यथा शुक्तिकाज्ञानहेतुः रौप्याभास किरणाज्ञानतः अम्भः रज्ज्यज्ञानात् भुजङ्गः निमेष सुखभयकृत् मृषैव स्फुरति '-खरोखर ज्याप्रमाणे शिपीच्या अज्ञानाने रुप्याचा भास, किराणाच्या अज्ञानापासून मुगजळ, रज्जू- च्या अज्ञानामुळे भुजग इत्यादि क्षणिक सुख व भय देणारे खोटेच पदार्थ भासतात;-' तथा यः यः दृग्गोचरः अर्थः भवति स' सः तदा तद्गतात्मस्वरूपा- विज्ञानोत्पद्यमानः स्फुरति'-त्याचप्रमाणे जो जो इद्रियगोचर पदार्थ असतो तो तो त्याकाळी त्या पदार्थात असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने उत्पन्न होऊनच भासतो.-' अतः किल इद दृष्टसृष्टम् ' म्हणून खचित हे सर्व केवल दर्शनकालींच उत्पन्न होते. [ या श्लोकात आत्म्याच्या अज्ञानानेच सर्व पदार्थ भासतात, असे दृष्टान्त देऊन सिद्ध करितात. शिंपीच्या तुकड्याचे ज्ञान न झाल्यामुळे ते रुपे आहे, असा भ्रम होतो, किवा सूर्यकिरणाचे ज्ञान न झाल्याने मारवाडांतील भूमीवर जलाचा भास होतो, अथवा दोरीचे ज्ञान न झाल्याने तो सर्प आहे, असे वाटते; पण ते बाटणे खरे नसते, असा ज्याप्रमाणे नेहमी व्यवहारांन अनुभव येतो, त्याचप्रमाणे जाग्रदवस्थेमध्ये जे जे मनुष्य, पशु, पक्षी, कीट, वृक्ष, पाषाण इत्यादि पदार्थ दिसतात, ते ते सर्वहि त्यांत गूढ असलेल्या आत्म्याचे ज्ञान न झाल्यामुळे दिसतात. म्ह० ९० SIV अवस्की. आत्म्याच्या अज्ञानानेच त्यांची उत्पत्ति होते. कारण सुषुप्तीमध्ये अंतःकरण- वृत्ति आत्मरूप झाल्यामुळे कोणताच पदार्थ दिसत नाही. 'अहो पण, हा संसार जर खरोखरच भ्रामक आहे तर त्यापासून सुख-दुःखादिकाची प्राप्ति कशी होते ? ' अशी शका घेऊ नये. कारण दरिद्री पुरुष रस्त्यांत पडलेल्या शिपीच्या तुकड्यास ते रुपे आहे, असे समजून मोठ्या आनदाने घेऊ लागतो. तृषित पुरुष मृगजलाकडे पाहून आनदित होतो व रज्जुसर्पाला पाहून भीतीने तो दुःखी होतो. ह्या गोष्टी सर्वानुभूत आहेत. साराश, जगातील धामक पदा- पासून क्षणिक सुख किवा दुःख होणे अशक्य नाही, म्हणून हे जगत् आपण पहातो तेव्हाच उत्पन्न होते व त्याच्या उत्पत्तीला आत्म्याचे अज्ञान हेच एक कारण आहे. वस्तुतः असे जरी आहे तरी त्याकडे एकसारखे पाहण्याची प्राण्याना संवय लागल्यामुळे हेच सत्यासारखे वाटून सत्य जी आत्मवस्तु ती असत्य वाटते. जोराने फिरविलेले कोलित जसे वर्तुलाकार भासते तसेंच हे जगहि दृढ वासनेमुळे सत्य वाटते.] ८१. मायाध्यासाश्रयेण प्रविततमखिलं यन्मया तेन मत्स्था- न्येतान्येतेषु नाहं यदपि हि रजतं भाति शुक्तौ न रौप्ये । शुक्यंशस्तेन भूतान्यपि मयि निवसन्तीति विष्वग्विनेता प्राहास्माद्दृश्यजातं सकलमपि मृषैवेन्द्रजालोपमेयम् ॥८॥ अन्वयार्थ–'यत् मायाध्यासाश्रयेण मया अखिल प्रविततम् '- ज्याअर्थी (जगाच्या) खोट्या आरोपाला आश्रय होणाऱ्या मी हे सर्व जगत् पसरिले आहे- 'तेन मत्स्थानि एतानि अह एतेषु न' त्याअर्थी ही सर्व भूते माझ्या आश्रयाने रहातात. मी मात्र त्यांच्यामध्ये नाही.-' हि यदपि शुक्तौ रजत भाति (परतु) रौप्ये शुक्त्यशः न ( भाति)'-कारण जरी शुक्तीच्या ठिकाणी रुपे भासते, तरी त्या रुप्यांत शुक्तीचा अश मुळीच दिसत नाही.-' तेन भूतानि अपि मयि निवसन्ति इति विष्वग्विनेता प्राह '-म्हणूनच भूते माझ्यामध्ये असतात; पण मी त्याच्यांत नसतो, असे विश्वोपदेशक भगवान् सांगतात.-' अस्मात् सकलं अपि दृश्यजातं इन्द्रजालोपमेयं मृषा एत्र'-यास्तव हे सर्वहि दृश्यजात गारुडाप्रमाणे खोटेच आहे. [आचार्य पूर्वप्रतिपादित अर्थाचेच भगवद्वाक्य या श्लोकांत सुचवितात. गौडबंगालासारखा जो जगम प्रत्ययाला येत आहे त्याला आधार मीच आहे. अर्थात् मीच ही सर्व नाम-रूपात्मक सृधि सर्वत सान्वार्थ विवरण. पसरिली आहे आणि त्यामुळेच ही सर्व भूते माझ्या आश्रयाने असल्यासारखी वाटतात. पण मी असंग (कोहि आसक्त न होणारा ) असल्यामुळे त्यांच्या- मध्ये नसतो.. कारण कार्याला व्यापून असते, असा जगांत अनुभव असतांना मी त्यांत नसतो, असे भगवान् कसे म्हणतात ?'-अशी शका कोणी विचा- रतील म्हणून आचार्य ' यदपि हि रजतं' इत्यादि ग्रंथाने उत्तर देतात- जरी शिंपीच्या ठिकाणी रुपे भासते, तरी त्या भासणाऱ्या रुप्याच्या ठिकाणी शिंपीचा किचिहि अंश भासत नसतो आणि जर कदाचित् शिपेचा अश भासू लागला तर मग तेथे रुप्याचा भ्रमच होणार नाही. तस्मात् मी अधि- ष्ठाता असल्यामुळे ती सर्व भूते माझ्यामध्ये आहेत; पण मी त्यांच्यामध्ये नाही. म्ह० त्याच्या अस्तित्वाला माझी जशी गरज असते तशी माझ्या आस्तित्वाला त्यांची कधीच गरज लागत नाही. मी तिन्ही काळी स्वतःच्या सत्तारूपाने असतो. पण ती भूते केवळ मध्यावस्थेत ( स्थितिकाली ) मात्र माझ्या सत्तेने सत्तावान् होतात, असेच यादवेद्र गोपालकृष्णांनी 'मया ततमिद सर्व०' इत्यादि गीतोक्त श्लोकात स्पष्टपणे सागितले आहे. (गी. भा. पृ. ६८५) यावरून हे सर्वहि दृश्यजात गारुडासारखे खोटे ( काही काळ भासणारें ) आहे, असे अनुमान करिता येते. ] ८२. हेतुः कर्मैव लोके सुखतदितरयोरेवमज्ञोऽविदित्वा मित्रं वा शत्रुरित्थं व्यवहरति मृषा याज्ञवल्क्यातभागौ । यत्कर्मैवोचतुः प्राक् जनकनृपगृहे चक्रतुस्तत्प्रशंसा वंशोत्तंसो यदूनामिति वदति न कोऽप्यन तिष्ठत्यकर्मा ॥ अन्वयार्थ- लोके सुखतदितरयोः हेतुः कर्म एव '-व्यवहारांतील सुख- दुःखाचे कारण कर्मच आहे.-' एव अज्ञः अविदित्वा मित्र शत्रु वा इत्थं मृषा व्यवहरति '-पण अज्ञ हे न जाणून 'हा मित्र किवा शत्रु' असा उगाच व्यवहार करितो.-' यत् प्राक् जनकनृपगृहे याज्ञवल्र्यातभागौ कर्म एव ऊचतुः तत्प्रशंसां (च) चक्रतुः '-कारण पूर्वी जनकराजसभेत याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनी ( सुखदुःखांचे कारण ) कर्मच सांगितलें व त्याची प्रशंसा केली.-' अत्र कः अपि अकर्मा न तिष्ठति इति यदूनां वंशोत्तंसः (अपि ) वदति '-व्यवहारात कोणीहि अज्ञ कर्म न करिता रहात नाही, असे यदुकुल. श्रेष्ठहि सांगतो. [ आतां येथून पुढे कर्ममीमांसाप्रकरण सुरू झाले. या श्लोकांत ९२ शतश्लोकी. प्राण्यांच्या बऱ्यावाईट भोगाला त्यांचे कर्मच कारण आहे, असें निरूपण करितात. प्राण्यांच्या सुखदुःखांचे त्यांच्या कर्माहून दुसरे काहीएक कारण नाही. पण अज्ञ प्राण्याना हे समजत नाही. ते उगीच जगांत काही पदार्थ इष्ट व काही अनिष्ट मानितात. ज्याच्यापासून सुख होते ते भार्यापुत्रादि आप्त व ज्यांच्यापासून दुःख होते ते अनाप्त, असे प्राणी मानितो. पण पूर्वी जनक- सभेत मोठा वादविवाद करून याज्ञवल्क्य व आर्तभाग यांनी 'कर्म हेच सुखादिकांचे कारण आहे ' असे ठरविले व त्याचीच प्रशंसाहि केली. [ बृ. भा. अ. ३. बा. २. पृ. ५९.) शिवाय भगवान् गोपालकृष्णांनीहि 'एक क्षण- भरसुद्धां कोणा अज्ञ प्राण्याला जगांत कर्म न करिता रहातां येत नाही.' (गी. भा. पृ. २७० ) असे स्पष्ट सागितले आहे. ] ८३. वृक्षच्छेदे कुठारः प्रभवति यदपि प्राणिनोद्यस्तथापि प्रायोऽन्नं तृप्तिहेतुस्तदपि निगदितं कारणं भोद प्राचीनं कर्म तहद्विषमसमफलप्राप्तिहेतुस्तथापि स्वातन्त्र्यं नश्वरेऽस्मिन्न हि खलु घटते प्रेरकोऽस्यान्तरात्मा। अन्वयार्थ--' यद्यपि वृक्षच्छेदे कुठारः प्रभवति तथापि प्राणिनोद्य '- कु-हाड जरी वृक्ष तोडण्यास समर्थ आहे, तरी प्राणी तिला प्रेरणा करील तेव्हांच ती ते कार्य करिते.-'प्रायः अन्न तृप्तिहेतु. तदपि भोक्तृयत्नः कारणं निगदितम् '-क्षुधाशातीला जरी अन्नच कारण आहे तरी त्याला भोक्त्याचा प्रयत्नहि कारण असतो, असे सांगितले आहे.-' तद्वत् प्राचीन कर्म विषमसम- फलप्राप्तिहेतुः '-तसेच प्राक्तन कर्मच जरी बऱ्यावाईट फलप्राप्तीला कारण आहे-' तथापि नश्वरे अस्मिन् स्वातन्त्र्य न हि खलु घटते '-तरी ह्या विनाशि कर्माच्या ठिकाणी स्वतत्रता सभवत नाही. (ते स्वतःच फल देण्यास समर्थ नाही.)-( अतः) अस्य प्रेरकः अन्तरात्मा'-म्हणून त्याचा प्रेरक अन्तरात्मा आहे. [ पूर्व श्लोकांत जरी कर्माची प्रशसा केलेली आहे तरी केवळ कर्म अचेतन असल्यामुळे फल देण्यास असमर्थ असते. म्हणून सचेतन ईश्वर जेव्हा त्याला प्रेरित करील तेव्हाच ते फलाला कारण होते, असे दृष्टान्त देऊन येथे सिद्ध करितात-वृक्ष तोडण्यास कु-हाडच पाहिजे. तिच्यावांचून वृक्षच्छेद कधीहि होणार नाही, हे खरे. पण ती जड असल्यामुळे प्राण्याच्या साहाय्यावांचून तिला ती क्रिया करिता येत नाही. किंवा अन्नच सान्वयार्थ विवरण. ९१ क्षुधाशांतीला जरी कारण होत असले तरी ग्रास उचलणे, चर्वण करणे, कोठयांत ते जिरविणे इत्यादि क्रिया करण्याकरिता सचेतनाची आवश्यकता असते, हे सर्वाना ठाऊक आहे. तसेंच पूर्व कर्म जरी सम किंवा विषम फल देण्यास कारण आहे, तरी ते दृष्टान्तस्थ कु-हाडीप्रमाणे किंवा अन्नाप्रमाणे अचे. तन आहे. शिवाय कर्म तत्क्षणीच नाश पावत असते, हेहि प्रत्यक्षसिद्ध आहे. अर्थात् त्याना फलोन्मुख होण्याविषयी प्रेरणा करणाऱ्या आत्म्याचे साहाय्य लागते. या सर्वाचे तात्पर्य असे—प्राणी जी बरीवाईट कर्मे करितो ती तत्क्ष- णींच नष्ट होतात; पण त्यांचे धर्माधर्मरूप संस्कार अत.करणामध्ये असतात. पुढे फलभोगाची वेळ आली असता त्याना तो कर्मसाक्षी प्रेरणा करितो व अविद्येमुळे देहाच्या ठिकाणी आत्माभिमान ठेवणारा जीव त्यांचा भोग घेतो. श्रुति-स्मृतीतूनहि असेच प्रतिपादन केलेले आहे. ] ८४. स्मृत्या लोकेषु वर्णाश्रमविहितमदो नित्य-काम्यादि कर्म सर्व ब्रह्मार्पणं स्यादिति निगमगिरः संगिरन्तेऽतिरम्यम्। यन्नासानेत्रजिह्वाकरचरणशिरःश्रोत्रसंतपणेन तुष्येदङ्गीव साक्षात्तरुरिव सकलो मूलसंतपणेन ॥ ८५ ॥ अन्वयार्थ-'लोकेषु स्मृत्या यत् अदः नित्य-काम्यादि कर्म वर्णाश्रमविहितं तत् सर्व ब्रह्मार्पण स्यात् इति निगमगिरः अतिरम्य सगिरन्ते '-ह्या मृत्युलोकांत स्मृतीने वर्णाश्रमाच्या अनुरोधाने जी नित्य-काम्यादि कर्मे सागितली आहेत ती सर्व ब्रह्मार्पणच होतात, असे वेदवाणी सयुक्तिकपणाने सांगते.-' यत् मूलसंतपणेन सकल: तरुः इव नासानेत्रजिह्वाकरचरणशिरःश्रोत्रसतर्पणेन साक्षात् अङ्गी इव तुष्येत् '-कारण ( पाणी घालून ) मुळांना तृप्त केले असता जसा सर्व वृक्ष तृप्त होतो तसा घ्राण, नेत्र, जिह्वा, हस्त, चरण, मस्तक, कर्ण इत्यादिकांची तृप्ति केल्याने, जणुकाय साक्षात् हा अगी ( आत्माच ) तुष्ट होतो. [ क्षुद्रदेवताची जरी आराधना केली तरी ती ब्रह्मालाच पोचते, असे या श्लोकांत सागतात-स्मृतीने वर्णाश्रमव्यवस्थेला अनुलक्षून जी नित्य, काम्य इत्यादि कर्मे सांगितली आहेत, त्यांतील निषिद्ध सोडून बाकीची पांच कम ब्रह्मार्पणच होतात, असे श्रुतीने मोठया मार्मिकपणाने वर्णन केले आहे. कर्म- कर्ता फलाच्या इच्छेने जरी अन्य देवतांना उद्देशून काम्य कर्म करितो, तरी ते अवयवीभूत ब्रह्मालाच पोचते. पण कर्त्याची भावना मात्र तशी नसते.
२४ तर तो ही कमें मी अमुक अमुक देवतेच्या प्रीत्यर्थ करीत आहे, अशी दृढ वासना ठेवितो. नित्य, काम्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना व प्रतिषिद्ध अशी सहा प्रकारची कर्मे आहेत. ज्यांचे अनुष्ठान न केल्यास दोष लागतो अशी संध्यावंदनादि ही नित्य, स्वर्गादि इष्ट फलांची साधनें जी ज्योतिष्टोमादि ती काम्य, पुत्रजन्मादि निमित्ताने होणारी जी जातेष्टयादि कर्मे ती नैमित्तिक, पापक्षय करणारी प्रायश्चित्त, देवतांची आराधना ही उपासना व हिंसादिक ही निषिद्ध कर्मे होत. त्यांतील नित्यादि चार कर्माचे बुद्धिशुद्धि व उपासनेचे चित्तै- काग्य हे मुख्य फल आहे. नित्य, नैमित्तिक व उपासना यांचे पितृलोकप्राप्ति हे अवांतर ( दुसरे, गौण ) फल आहे. 'विविदिषन्ति यज्ञेन० ' व 'कर्मणा पितृलोकः ' ह्या श्रुति व 'तपसा किल्बिष हन्ति' ही स्मृति याला प्रमाण आहे. आतां अन्य देवतांना उद्देशून केलेली कमें ब्रह्माला कशी अर्पण होतात, ह्याविषयीं एक दृष्टान्त देऊन, असे होणे सयुक्तिक आहे, हे सुचवितात--वृक्षा- च्या मुळात पाणी घातले असता त्यांच्या तृप्तीने जसा वृक्ष तृप्त होतो त्याप्रमाणे अन्य देवतांना उद्देशून जरी कर्म केले तरी त्याने अवयवी भूत ( सर्व देवतारूप ) परमेश्वरच तृप्त होतो. म्ह० नासिका, नेत्र, इत्यादि अवयव तृप्त झाले असता त्या सर्वाचा समूह जो अवयवी देही तोच तृप्त होतो. / ८५. यः प्रैत्यात्मानभिज्ञः श्रुतिविपि तथा कर्मकृत्कर्मणोऽस्य नाशः स्यादल्पभोगात्पुनरवतरणे दु:खभोगो महीयान् । आत्माभिज्ञस्य लिप्सोरपि भवति महाशाश्वतः सिद्धिभोगो ह्यात्मा तस्मादुपास्यः खलु तदधिगमे सर्वसौख्यान्यलिप्सोः।। अन्वयार्थ- यः श्रुतिविद् अपि तथा कर्मकृत् आत्मानभिज्ञः (सन्) प्रैति अस्य कर्मणः अल्पभोगात् नाशः स्यात् '-जो वेदवेत्ता व तसेंच कर्मठ पुरुषहि आत्म्याविषयी अज्ञ राहूनच परलोकी जातो त्याच्या कर्माचा ( स्वर्गात ) कांहीं काल भोग मिळाला असतां नाश होतो-( अस्य ) पुनः अवतरणे महीयान् दुःखभोगः (भवति )'-(व त्याला) पुनः या लोकी जन्म घेतांना अत्यत दुःख होते.-' आत्माभिज्ञस्य लिप्सोः अपि महान् शाश्वतः सिद्धिभोगः भवति'- आत्मज्ञानी असून जो कर्मफलाची इच्छा करितो त्यालाहि श्रेष्ठ व नित्य असे अणिमादि सिद्धीचे भोग मिळतात.-'अलिप्सोः तदधिगमे खलु सर्वसौख्यान भवन्ति '-फलाच्या इच्छेने कमैं न करणान्या पुरुषाला आत्मज्ञान झाले असता सान्वयार्थ विवरण. खरोखर सर्व सुखें प्राप्त होतात.-' तस्मात् आत्मा हि उपास्यः' म्हणून आत्म्याचीच उपासना करणे योग्य आहे. [ ज्ञानरहित कर्म व ज्ञानसहित कर्म यांची फलव्यवस्था दाखवून सर्व सुखांच्या प्राप्तीकरितां आत्मज्ञान करून घेणेच योग्य आहे, असे येथे सांगतात-एखादा पुरुष मोठा वेदवेत्ता व मोठा कर्मठहि असून आत्मज्ञानी नसला तर त्याला स्वर्गलोकी गेल्यावर काही काल भोग भोगिल्याने कर्मक्षय झाला असता पुनः या लोकीं येऊन जन्म घ्यावा लागतो. पण त्यावेळी त्याला अत्यन्त दुःख होते. भगवानांनी 'क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति' त्या विशाल स्वर्गलोकांतील भोग भोगल्याने कमैं नष्ट झाली असता ते मृत्युलोकी पुन जन्म घेतात, असे सांगितले आहे. (गी. भा. पृ. ७०६ ) कर्मक्षयामुळे स्वर्गलोकातून भ्रष्ट होऊन मर्त्यलोकी जन्म घेतांना प्राण्यांना अत्यंत दुःख होते. कारण देहधारण व देहविसर्जन अतिकष्टकर आहे. शिवाय व्यवहारात सुद्धा उच्च स्थितीतल्या पुरुषाला अवनति ( हीना- वस्था प्राप्त ) झाली असता किती दुःख होते, हे सर्वाना ठाऊक आहेच. आत्मज्ञानी असून जो कर्मफलाची इच्छा करितो त्याला स्वर्गाहून श्रेष्ठ व पुष्कळ काल रहाणाऱ्या अणिमादि अष्ट सिद्धि प्राप्त होतात. तसेच कोण- त्याच फलाची इच्छा न करणाऱ्या परोक्ष आत्मज्ञानी पुरुषाला साक्षात् आत्म- ज्ञान झाले असता सर्व सुखें ( परमानद ) प्राप्त होतात. 'अथ यो हवा अस्मात् ..कामयते तत्तत्सृजते' ही श्रुति या श्लोकोक्त प्रतिपादनाला आधार आहे.] ८६. सूर्याधैरर्थभानं न हि भवति पुनः केवलैनीत्र चित्रं सूर्यात्सूर्यप्रतीतिर्न भवति सहसा नापि चन्द्रस्य चन्द्रात् । अग्नेरग्नेश्च किन्तु स्फुरति रविमुखं चक्षुषश्चित्प्रयुक्ता- दात्मज्योतिस्ततोऽयं पुरुष इह महो देवतानां च चित्रम् ॥ अन्वयार्थ- सूर्याधैः केवलैः पुनः अर्थभानं न हि भवति इति अत्र न चित्रं'-केवल सूर्यादिकांच्या योगाने विषयज्ञान होत नाही, पण यांत कांहीं आश्चर्य नाहीं,-'सूर्यात् सूर्यप्रतीतिः सहसा न भवति अपि च चन्द्रस्य चन्द्रात् अग्नेः अग्नेः च न (प्रतीतिः )'-सूर्यामुळे सूर्यप्रतीति कधीच होत नाही. तसेंच चंद्रामुळे चंद्राची व अग्नीमुळे अग्नीचीहि प्रतीति होत नाही -'किन्तु चित्प्रयुक्तात् चक्षुषः रविमुख स्फुरति'-तर चैतन्यप्रंयुक्त नेत्रांच्या योगाने ९६ शवम्लोकी. सूर्यादिक भासतात.-'ततः अयं पुरुषः आत्मज्योतिः इह देवतानां च चित्रं महः अस्ति'-यास्तव हा पुरुषच खयंज्योति व विषयभोगकाली (चक्षुरादि ) देव- तांचे विचित्र तेज आहे. [ चंद्रसूर्यादि ज्योति खतंत्रपणे विषय प्रकाशित करण्यास समर्थ नाहीत, असे येथे सांगतात केवल सूर्यादि ज्योतींच्या योगाने विषयांचे ज्ञान होत नाही, असे जे पूर्वी निरूपण केले तेच खरे आहे. त्यांत अपूर्व असे काही नाही. सूर्यादि देवता आपापल्या विषयांचे ज्ञान करून देतात, असे जे लोक समजात ते मात्र चमत्कारिक आहे. कारण सूर्यामुळे सूर्य, चद्रामुळे चंद्र किवा अग्नीमुळे अग्नि कधीच प्रतीत होत नाही, तर चैतन्ययुक्त नेत्रानी त्या सर्वाची प्रतीति येते. (ते सर्व दिसतात. ) कारण जात्यन्ध अथवा निद्रित पुरुषाला त्याची प्रतीति कधीच येत नाही, हे सर्व प्रसिद्ध आहे. यास्तव हा आत्मा जाग्रतीत व स्वप्नातहि आत्मज्योति ( स्वप्रका- शरूप, अन्यप्रकाशनिरपेक्ष ) आहे व इद्रियव्यापारकाली चक्षुरादिकाच्या रूपरसादि परस्परविलक्षण विपयाना प्रकाशित करणारे तेज आहे याविषयी 'चित्रं देवानामुदगात्०' ही श्रुति प्रमाण आहे. ] ८७. प्राणेनाम्भांसि भूयः पिबति पुनरसावन्नमश्नाति तत्र तत्पाकं जाठरोऽग्निस्तदुपहितबलो द्राक् शनैर्वा करोति । व्यानः सर्वाङ्गनाडीष्वथ नयति रसं प्राणसंतर्पणार्थम् निःसारं पूतिगन्धं त्यजति बाहिरयं देहतोऽपानसंज्ञः ॥ ८८ अन्वयार्थ-' असौ प्राणेन अम्भांसि भूयः पिबति पुन. अन्नं च अनाति' - हा आत्मा प्राणद्वारा वारवार पाणी पितो व पुनः पुनः अन्न खातो. '-तत्र तदुपहितबलः जाठरः अग्नि द्राक् शनैः वा तत्पाक करोति-' अन्नादि भक्षण केल्यावर प्राणांच्या साह्याने (श्वासद्वारा) बलयुक्त झालेला जठराग्नि शीघ्र किंवा हळुहळू त्या अन्नादिकांचे पचन करितो.- 'अथ व्यानः प्राणसतर्पणार्थ सर्वाङ्गनाडीषु रसं नयति अय अपानसज्ञ निःसारं पूतिगन्ध बहिः त्यजति–' व्यान प्राणाना तृप्त करण्याकरिता सर्व नाडयामध्ये ( त्यांतील ) रस ने (आणि ) हा अपाननांवाचा वायु ( अन्नोदकांचा) निःसार व घाण भाग मूत्र व विष्ठारूपाने शरीरातून बाहेर टाकितो. [ या श्लोकांत क्रमाने प्राण, व्यान व अपान हे तीन वायु शरीरांत काय करितात, हे सांगितले आहे. मात्मा प्राणाच्या योगाने अन्न खातो व उदक पितो. म्ह० क्षुधा व तृषा हे सान्वयार्थ विवरण. प्राणाचे धर्म असून त्यांच्या शांतीकरितां भक्षणादि क्रिया तोच करितो. पण त्यांपासून भोक्त्याला दुःख व तृप्ति होते. हे भोग त्याला प्राणाच्या द्वारांच प्राप्त होतात, असे सुचविण्याकरितां प्रथम चरणांत आत्मा प्राणद्वारा खातो' इत्यादि मटले आहे. प्राण श्वासोच्छ्वास करून जठराग्नीला प्रदीप्त करितो. तो जशी जलद किवा मद श्वसनक्रिया करील तसा तो अग्नि खाल्लेल्या अन्ना- दिकांचे शीघ्र किवा हळुहळू पचन करितो. नतर त्या पक्क अन्नोदकातील सार व्यान सर्व शरीरांतील सर्व नाडयाना पोचवितो व त्यामुळे प्राणाची तृप्ति होऊन त्याना पुनः सतत क्रिया करण्याचे सामर्थ्य येते. येथे प्राणशब्दा- में इद्रियेहि ध्यावी. कारण त्यांनाहि आपापले कर्म करण्याची शक्ति या सार- भूत अन्नरसामुळेच येते. ह्याप्रमाणे पक अन्नोदकातील सार व्यानाने घेतले असता त्यांचा अवशिष्ट राहिलेला नि सार घाण भाग अपान वायु, मूत्र व विष्ठा या रूपाने देहाबाहेर टाकितो.] ८८. व्यापारं देहसंस्थः प्रतिवपुरखिलं पञ्चवृत्त्यात्मकोऽसौ प्राणः सर्वेन्द्रियाणामधिपतिरनिशं सत्तया निर्विवादम् । यस्येत्थं चिढनस्य स्फुटमिह कुरुते सोऽस्मि सर्वस्य साक्षी प्राणस्य प्राण एषोऽप्यखिलतनुभृतां चक्षुषश्चक्षुरषः ॥८९ अन्वयार्थ- अनिश यस्य चिद्धनस्य सत्तया इह पञ्चवृत्त्यात्मक देह- सस्थः सन्द्रियाणा आधिपतिः असौ प्राणः इत्थं प्रतिवपुः निर्विवाद अखिल व्यापार स्फुट कुरुते '-सर्वदा ज्या चिद्रूप परमात्म्याच्या सत्तेने या शरीरांत पाच वृत्तींनी युक्त असणारा, देहांत राहणारा व सर्व इद्रियाचा अधिपति असा हा प्राण ह्याप्रमाणे प्रत्येक शरीरात निःसशय सर्व व्यापार स्पष्टः पणे करितो;-' स सर्वस्य साक्षी (अह) अस्मि'-जो सर्वसाक्षीच (मी) आहे. -'अखिलतनुभृता प्राणस्य प्राणः एषः चक्षुष चक्षुः अपि एपः '-सर्व देह- धाऱ्याच्या प्राणाचा प्राण हा व व सर्वाच्या नेत्राचाहि नेत्र हाच आहे. [ ह्याप्रमाणे पूर्व श्लोकांत प्राणादिकाचे कर्म सागून आता सर्ववृत्तिसमूह- रूप जो मुख्य प्राण त्याला सत्ता व प्रकाश देऊन त्याचा साक्षा होणारा जो सच्चिदानदरूप आत्मा त्याचे विवेचन करण्याकरिता येथे लक्षण सागतात केवल चैतम्यरूप आत्म्याच्या सत्तेने (अस्तित्वाने ) सदूप व पूर्वोक्त प्राण. नादि पांच वृत्तीनी युक्त होऊन हा मुख्य प्राणवायु: या व्यष्टि व समष्टि देहांत रहातो. तो समष्टिरूपाने उपास्य व व्यष्टिरूपाने उपासक होतो. तोच समष्टि व व्यष्टि देहांतील इंद्रियांचा ( ज्ञान-कर्मसाधनांचा ) स्वामी आहे. कारण त्याच्यावांचून कोणत्याच इद्रियाची प्रवृत्ति होत नाही. असा तो हा प्राण जीवरूपाने प्रत्येक शरीरामध्ये अगदी स्पष्टपणे सर्व व्यवहार करितो. ह्याप्रमाणे सर्वांना सत्ता ( अस्तित्व ) व प्रकाश (ज्ञानशक्ति) देऊन त्यांच्याकडून व्यवहार करवीत असल्यामुळे तो सर्व कार्याचे निमित्त व उपादान कारण आहे. त्यामुळेच असा हा सर्वाचा साक्षी (प्रत्यक्ष प्रकाशक) जो आत्मा तोच मी आहे. ह्याविषयी प्रमाणभूत श्रुतीच्या एकदेशाचा श्लोका- तच निर्देश करितात. हा प्रत्यगात्मा सर्व व्यापाराला कारण होणाऱ्या वायूचेहि कारण व तसेच सर्वाच्या ज्ञानशक्तीचेहि बीज आहे. ] ८९ यं भान्तं चिढनैकं क्षितिजलपवनादित्यचन्द्रादयो ये भासा तस्यैव चानु प्रविरलगतयो भान्ति तस्मिन्त्रसन्ति । विद्यत्पुंजोऽग्निसंघोऽप्युडुगणविततिर्भासयेत्कि परेशं ज्योतिः शान्तं ह्यनन्तं कविमजममरं शाश्वतं जन्मशून्यम्॥ अन्वयार्थ-'ये प्रविरलगतय. क्षितिजलपवनादित्यचन्द्रादय.'-जे स्वरूपतः अगदी भिन्न असणारे पृथ्वी, जल, वायु, सूर्य, चद्र इत्यादि पदार्थ-'ते य चिद्धनैक भान्तं सन्तं तस्य भासा एव च अनुभान्ति च तस्मिन् वसन्ति'-ते ज्या चैतन्यपूर्ण, एक व प्रकाशरूप असणाऱ्या आत्म्याच्या स्वप्रकाशामागून प्रकाशित होतात व ज्याच्यामध्येच रहातात,-' तं शान्त ज्योतिः अनन्त कवि अज अमरं हि शाश्वत जन्मशून्यं परेश'-त्या शान्त, प्रकाशरूप, अतरहित, सर्वज्ञ, जन्मरहित, अमर, म्हणूनच नित्य व जन्मशून्य अशा परमेश्वराला-' विद्यत्पुंजः अग्निसंघः अपि उडुगणवितति भासयेत् कि '-वीज, अग्निममूह किवा तारागण प्रका- शित करील काय ? ( कधीहि नाही.) [ 'सर्वप्रकाशकत्व ' हे ब्रह्माचे लक्षण सांगून, स्थूणानिखनन-(खुटा हालवून हालवून घट्ट करणे या) न्यायाने पुनः तेच दृढ करून आतां न तत्र सूर्यो भाति०' ( काठकमा. पृ. १३२) या प्रमाणभूत श्रुतीच्या आधाराने पुनःतेच येथे निश्चित करितात-पृथ्यादि प्रत्येक तत्त्वाचे स्वरूप भिन्न-भिन्न असल्यामुळे त्यांचा अगदी पृथक् रीतीने व्यवहार होतो. ती सर्व तत्त्वे जरी प्राण्याला प्रकाशरूप दिसतात, तरी तो त्यांच्या अंगचा प्रकाश नसतो. तर ती सर्वहि सच्चिदानंदवन, दुसन्या प्रकाशाची सान्वार्य विवरण. ९९ . अपेक्षा न धरितां स्वरूपानेच प्रकाशित होणारा, एक व सर्वांना प्रकाश देऊन व्यवहारपटु करणारा जो परमात्मा त्याच्या प्रकाशानें प्रकाशित होतात. शिवाय ती सर्व तत्त्वे त्याच्या सत्तेनेंच ( अस्तित्वानेच ) सत्तावान् होतात व आपापले व्यवहार करितात. सारांश-सर्व जगाचे कारण, वासनाशून्य, नाशरहित, सर्व शास्त्रांचे बीज असल्यामुळे सर्वज्ञ, नित्य अविकारी असल्यामुळे जन्मशून्य व मरणशून्य अशा त्या आत्म्याला लोकांना प्रकाशमय दिसणारा विजेचा गोळा, अग्नि, नक्षत्रमाला किवा चद्र-सूर्यादि तरी प्रकाशित करतील काय ? छे:! कधीच नाही. कारण सत्तारूप आत्म्यावांचून कधीच कोणाची स्थिति होणे सभवनीय नाही. शिवाय व्यवहारात सुद्धा एक प्रकाश दुसऱ्या प्रकाशाला प्रकाशित करीत नाही, असाच अनुभव आहे. या लोकांत यास्कमुनिपठित जायते, अस्ति०' इत्यादि म्ह० जन्म घेतो, जीवत असतो, वाढतो, यौवनावस्थापन्न होतो, वृद्ध होतो व मरतो या सहा भावविक्रियाचा ' अज०' इत्यादि पदानी निषेध केला आहे.] ९०. तद्ब्रह्मैवाहमस्मीत्यनुभत्र उदितो यस्य कस्यापि चे? पुंसः श्रीसद्गुरूणामतुलितकरुणापूर्णपीयूषदृष्टया । जीवन्मुक्तः स एव भ्रमविधुरमना निर्गतेऽनाद्युपाधौ नित्यानन्दकधाम प्रविशति परमं नष्टसंदेहवृत्तिः॥११॥ अन्वयार्थ—— यस्य कस्य अपि पुस. श्रीसद्गुरूणां अतुलितकरुणापूर्णपीयूप- दृष्टया तब्रह्म एव अह अस्मि इति अनुभव उदितः चेत् '-कोणाहि एखाद्या पुरुषाला. श्रीसद्गुरूच्या अप्रतिम करुणेने पूर्ण अशा अमृत दृष्टीने • ते ब्रह्मच मी आहे ' असा अनुभव जर आला तर-'भ्रमविदुरमना. ( अत एव ) नष्टसदेहवृत्ति ( सन् ) जीवन्मुक्त. ( भवति )'-त्याचे मन भ्रमरहित होते, ( त्यामुळेच त्याचे ) सर्व सशय नष्ट होतात व तो जीवन्मुक्त (होतो)-'स एव अनाथुपाधौ निर्गते सति परम नित्यानन्दैकधाम प्रविशति'--आणि तोच त्याची अनादि उपाधि नष्ट झाली असता श्रेष्ठ व नित्य आनंद हेच ज्याचे रूप आहे अशा आत्म्यामध्ये प्रवेश करितो. [ मागच्या श्लोकात सागितल्याप्रमाणे प्रकाशरूप आत्म्याचा अनुभव आला असतां जीवन्मुक्ति हे फल मिळते, असे येथे सागतात-कोणाहि अधिकारी पुरुषाला श्रीगुरूच्या निरुपम करुणेने भरल्यामुळे अमृततुल्य ( मरणाची निवृत्ति करणाऱ्या) दृष्टीने प्राप्त झालेल्या . १०० शतश्लोकी. ब्रह्मविद्येच्या योगाने ' मी ब्रह्म आहे ' असा अनुभव आला असतां ( म्ह० गुरूंनी सांगितलेल्या लक्षणाचें, देश, काल, वस्तु इत्यादिकांनी होणाऱ्या परिच्छेदाने रहित व महावाक्यस्थ 'तत्'-पदाचे लक्ष्य ब्रह्मच मी-त्वपद- लक्ष्य कूटस्थ आहे, त्याहून भिन्न नाही, असा निश्चयात्मक साक्षात्कार झाला असतां ) तेव्हाच त्या पुरुषाचे मन विपरीतज्ञानरहित होते. (म्ह० प्रारब्धा- प्रमाणे जीवन्मुक्त्यवस्थेमध्ये व्यवहार करण्यास योग्य असे ते होते.) अंत:- करण भ्रमशून्य झाल्यामुळेच त्याच्या सशययुक्त वृत्ति नाहीशा होतात. असे झाले असता पुरुष (साधक) जीवन्मुक्त होतो. ' स एव' या पदांनी त्या जीवन्मुक्तालाच विदेहमुक्ति हे फल मिळते, असे सांगतात. तो जीवन्मुक्तच प्रारब्ध कर्माचा क्षय झाला असतां व मायारूपी उपाधि समूळ नष्ट झाली असतां, पुनर्जन्माचे बीज अशी जी सचितादि कर्मे ती पूर्वी आत्मज्ञानकालीच नष्ट झाल्यामुळे, कार्यकारणभावशून्य ( म्ह. निरुपाधिक ) व निरतिशय आनंदरूप अशा मुख्य गृहामध्ये ( स्वरूपांत-तेजामध्ये ) प्रवेश करितो. धाम म्ह० तेज किंवा गृह असे जे स्वतःचे रूप ते सर्व सूर्यादि तेजांना प्रकाशित करिते, म्हणून तेज व आब्रह्मस्तम्बपर्यंत सर्वाचे ते वसतिस्थान असल्यामुळे गृह होय. अशा त्या तेजांत किवा गृहांत ( म्ह ० स्वतःच्या रूपांत ) तो लीन (तद्रूप ) होतो. ह्या श्लोकाच्या प्रथम चरणात 'यस्य कस्यापि ' ही पदे योजून व्यवहारसिद्ध मनुष्य, पशु इत्यादि जाति, ब्राह्मणादि वर्ण, ब्रह्मचर्यादि आश्रम, बाल्यादि वयोवस्था, स्त्री, पुरुष, उच्च, नीच इत्यादि भेद शास्त्रीय ज्ञानाला प्रतिबंध करीत नाहीत, असे सुचविले आहे. लोक भ्रमाने काहीना मोक्षाचा अधिकार आहे व काहीना नाही, असे मानतात. पण अमुक अमुक लक्षणानी युक्त असलेला कोणीहि पुरुष मोक्षाचा अधिकारी आहे, असे प्रतिपादन करणाऱ्या वाक्यांनी त्यांचे निराकरण केले आहे. 'पुंस ' असे पद श्लोकांत योजून मोक्षाचे मुख्य साधन जे तत्त्वज्ञान तें प्राप्त होण्याकरितां गुरुशुश्रूषा व तद्वारा श्रवणादिसाधने यांचे अनुष्ठान मुमुक्षूने प्रयत्नपूर्वक करावे, असे सुचविले आहे. ' श्रीसद्गुरूणा' म्ह० मुक्ति व श्री ( सपत्ति ) यासहवर्तमान असणारे व तद्रूप ब्रह्माचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे, अशा उपदेशक गुरूचा. आत्मज्ञानी गुरु श्रीयुक्त असतात, याविषयी ' भट्टैषां लक्ष्मी हिता- विवाचि' अम्ति ब्रह्मेति चेद्वेद०' इत्यादि अनेक श्रुति प्रमाण आहेत. ] ९१. नो देहो नेन्द्रियाणि क्षरमतिचपलं नो मनो नैव बुद्धिः प्राणो नैंवाहमस्मीत्यखिलजङमिदं वस्तुजातं कथं स्याम् । . .
सान्वयार्थ विवरण. १०१ नाहंकारो न दारागृहसुतसुजनक्षेत्रवित्तादि दूर साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिलजगदधिष्ठानभूतः शिवोऽहम्॥ अन्वयार्थ- अह देहः नो इन्द्रियाणि न क्षर अतिचपल मनः च नो बुद्धिः न एव प्राणः न एव अस्मि'-मी देह नव्हे, इद्रिये नव्हे, क्षयि व अत्यंत चपल असे मन नव्हे, बुद्धिहि नव्हे, प्राणहि नव्हे,-'इति इद अखिल जड वस्तु- जात कथं स्याम् '-मग मी हे सर्व जड वस्तुजात कसे असेन ?-' अहकारः न दारागृहसुतसुजनक्षेत्रवित्तादि दूर न (अस्मि)'-मी अहकार नव्हे; (देहापासून) दूर (निराळी ) असणारी स्त्री, गृह, पुत्र, बाधव, शेत, द्रव्य, इत्यादिहि मी नव्हे-'साक्षी चित्प्रत्यगात्मा निखिलजगदधिष्ठानभूत' शिवः अह अस्मि'- तर मी साक्षी ज्ञानरूप, सर्वान्तर्यामी व सर्व जगाला आधार देणारा शिव आहे. [ आतां येथे त्याच ज्ञान्याच्या प्रारब्ध कर्माचा क्षय होईतो, व्यवहाराला प्रतिबब न होता जीवन्मुक्तीचे सुखहि त्याला घेता यावे, म्हणून देहादि सर्वाविषयी सर्वदा दृढ असत्त्वभावना ठेवून त्याने स्वत:च्या आत्मस्वरूपाचें अनुसधान ठेवावे, असे सागतात-पचीकृत पचभूनाचे कार्य व अन्नाचा विकार असा हा स्थूल देह मी नव्हे. कारण मी सच्चिद्रूप आहे व देह क्षय पावणारा व प्रतिक्षणी निरनिराळ्या रूपाचा होणारा म्ह० विकारी आहे; पण आत्मा सद्रूप असल्यामुळे स्थिर व चिद्रूप आहे, असा सूक्ष्मदृष्टि पुरुषाला अनुभव येतो. अर्थात् त्या उभयतामध्ये अगदी वैलक्षण्य ( अतर ) असल्यामुळे मी देह नव्हे, तसेच मी ( आत्मा ) क्रियेची व ज्ञानाची साधनें जी इद्रिये तीहि नव्हें. ती परस्पर पृथक् असल्यामुळे असत्त्वरूप आहेत, हे उघडच आहे. शिवाय विषयाच्या असत्त्वानेच त्याचे असत्त्व प्रतीतीला येत असल्यामुळे व ती चंचल असल्यामुळे मी नव्हे. इद्रिये आत्मा नव्हे, असे सिद्ध करण्याकरितां पूर्व विशेषणे येथेहि घ्यावी. मी सशयात्मक मन नव्हे. काम, क्रोध इत्यादि वृत्तींनी युक्त असल्यामुळे मन विकारि आहे, असे सिद्ध होते व ने असद्रूप असल्यामुळे वस्तुतः नाहीच. पण मी मनोविकाराची उत्पत्ति व नाश यांना प्रकाशित करितो व सच्चिद्रूपाने प्रकाशमान आहे, म्हणून मी मन नव्हें. निश्चयात्मक अत करणवृत्तिहि मी नव्हे, कारण ती बुद्धि जाग्रढादि अवस्था- मध्ये उत्पन्न होते व सुषुप्तींत लय पावते व मी आत्मा तर तिन्ही अवस्था व जाग्रत्-स्वप्नांतील बुद्धि याचा साक्षी व सद्रूप आहे, म्हणून मी बुद्धि नव्हें. शिवाय शरीरांतील प्राणापानादि पांच वृत्तींनी युक्त असलेला प्राणवायु मी - १०२ अवशोकी. नव्हे. हे सर्वहि देहादि जड ( चैतन्यशून्य ) पदार्थजात माझें प्रकाश्य ( मज- कडून प्रकाशित-ज्ञात होणारे, माझ्यामुळे अस्तित्वात येणारे) आहे व मी विकृतिशुन्य सच्चिदानदरूप आहे. तेव्हा आम्हां उभयतांचे ऐक्य कसे होणार ? त्यामुळेच मी अहंकारहि नव्हें. कारण अहंकाराला विषय होणारे सर्व पदार्थ दृश्य जड, निस्तत्त्वरूप व विकारी असल्यामुळे अहकारहि निस्तत्त्वादि धर्म युक्तच आहे. अर्थात् माझ्यापेक्षां पृथक् आहे. अगदी निकट असणारा देह व देहधर्मसुद्धां जर मी नव्हे तर स्त्री, गृह, पुत्र, आप्त, इष्ट, बाधव, क्षेत्र ( शेत), द्रव्य इत्यादि मजपासून धडधडीत निराळे असणारे पदार्थ मी कसा असेन ? मी ह्या देहादि जड पदार्थांना साक्षात् प्रकाशित करितो ( जाणतो) म्हणून मी त्याचा साक्षी आहे. ज्ञानरूप असल्यामुळे मी चित् (चैतन्य ), बुद्धयादि सर्वाच्याहि आंत असून स्वयज्योति असल्यामुळे मी प्रत्यक्, सर्वाचा स्वतःमध्ये लय करीत असल्यामुळे व सद्रूप असल्यामुळे मी आत्मा व ज्याच्या- वांचून सर्गभ्रमाला अधिष्ठान होणाऱ्या शबल ब्रह्माचीहि सिद्धि होत नाही तो गौणरीतीने सर्व जगाचे अधिष्ठान होणारा मी (आत्मा) कल्याणरूप आहे. ] ९२. दृश्यं यद्रूपमेतद्भवति च विशदं नीलपीताद्यनेकं सर्वस्यैतस्य दृग्वै स्फुरदनुभवता लोचनं चैकरूपम् । तदृश्यं मानसं दृक् परिणतविषयाकारधीवृत्तयोऽपि दृश्या ग्रूप एव प्रभुरिह स तथा दृश्यते नैव साक्षी ॥९३ अन्वयार्थ-दृश्यं यत् एतत् नीलपीताद्यनेक च रूप विशद भवति'- दृश्य ( नेत्राचा विषय ) असे हे जे निळे, पिवळे इत्यादि अनेक प्रकारचे रूप स्पष्ट भासते-'सर्वस्य एतस्य दृक् वै स्फुरदनुभवता तच्च लोचन एकरूपम्'- त्या सर्वाचे दर्शनसाधन प्रतीतीला येणारा अनभवपणाच आहे. तोच नेत्र आहे व तो एकरूपच असतो.-'तत् दृश्य मानस दृक् (तस्य धीः दृक्) परिणतविषयाकारधीवृत्तयः अपि दृश्या.'- पण तोहि दृश्य ( अनुभव विषय) आहे. त्याचे दर्शनसाधन मन आहे. ( मनाचा प्रत्यय बुद्धीला येतो.) विषया- काराने परिणाम पावलेल्या (त्याच्यासारख्या आकाराच्या ) बुद्धिवृत्तीसुद्धां दृश्य आहेत.-' (कितु ) इह प्रभुः साक्षी दृग्रूपः एव '-(पण ) या सर्व जडसमूहांत सर्वाचा नियामक व साक्षी असा जो आत्मा तोच ज्ञानरूप आहे-'स तथा नैव दृश्यते'- विषयांप्रमाणे त्याचा अनुभव कोणालाच येत नाही. [ पूर्व श्लोकांत - सान्वार्थ विवरण. १०३ जीवन्मुक्त पुरुष आत्मानुसंधान कसे ठेवितो तें सांगितलें आतां येथे तेच पुनः निराळ्या प्रकाराने सांगतात हे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे रूप निळे, काळे, पांढरे, पिवळे, इत्यादि अनेक प्रकारांनी भासत असल्यामुळे दृश्य ( अनुभवाला योग्य ) आहे. ह्या प्रतीत होणाऱ्या सर्व रूपांचे ग्रहण कर- णारी व जिच्यामध्ये अनुभवरूप स्फुरणे भासतात, अशी दृष्टिच नेत्र होत. कारण ते नेत्र रूपदर्शनाचे साधन आहेत. पण त्यांची प्रतीति एकरूपानेच येते म्ह० रूपामध्ये जसे नीलादि अनेक भेद दिसतात तसे नेत्रांत कोठेच दिसत नाहीत. ते नेत्रहि दृश्य आहेत. कारण नेत्रांचा मनाला अनुभव येतो. त्या मनाला निश्चयरूप अत करण (बुद्धि) पाहते ( विषय करिते.) ती बुद्धिहि दृश्य आहे. कारण विषयरूप झालेल्या अंतःकरणवृत्तींचाहि भोक्त्याला अनुभव येत असतो. म्हणून भोक्त्याच्या अनुभवाला येणारे हे सर्व पदार्थजात जड व विकारी असल्यामुळे आत्म्याहून पृथक् आहे, असा निश्चप करावा. ह्या जड पदार्थात गूढ राहून सर्वोचाहि अनुभव घेणारा प्रभु व सर्वाच्या निकट राहून त्याना साक्षात् पाहणारा साक्षी आत्माच ज्ञानरूप आहे. सर्व पदार्थाना जरी हा आपल्या ज्ञानसामर्थ्याने प्रकाशित ( व्यवहारयोग्य ) करितो व सर्वाचा अनुभव घेतो, तरी याला प्रकाशित करणारा व याचा अनुभव घेणारा दुसरा कोणीहि नाही. तात्पर्य- विषयांचा अनुभव नेत्रादि इद्रिये, नेत्रांचा मन, मनाचा बुद्धि व बुद्धीचा अनुभव आत्मा घेतो; पण त्याचा अनुभव घेणारा दुसरा कोणीहि प्रतीत होत नाही. म्हणून हाच स्वप्रकाश, स्वयज्योति, अनुभवरूप व ज्ञान ( ज्ञेय नव्हे ) आहे. साराश व्यवहारात आम्ही सर्व प्राकृत लोक बुद्धिस्थ सस्कारानाच 'ज्ञान' म्हणून म्हणतो. पण ते खरे ज्ञान नसून ज्ञेय आहे. कारण त्याचाहि अनुभव दुसरा कोणी घेत असतोच, पण आम्हा विषयी जनाना ते समजत नाही.] ९३. रज्ज्वज्ञानाद्भुजङ्गस्तदुपरि सहसा भाति मन्दान्धकारे स्वात्माज्ञानात्तथासौ भृशमसुखमभूदात्मनो जीवभावः । आप्तोक्त्याहिभ्रमान्ते स च खलु विदिता रज्जुरेका तथाहं कूटस्थो नैव जीवोनिजगुरुवचसा साक्षिभूतः शिवोऽहम् ॥ अन्वयार्थ- ( यथा ) मन्दान्धकारे रज्ज्वज्ञानात् तदुपरि सहसा भुजङ्गः भाति -ज्याप्रमाणे मद अधकारामध्ये दोरीचे ज्ञान न झाल्यामुळे तिच्या ठिकाणी सर्प भासतो,-' तथा स्वात्माज्ञानात् असौ आत्मनः जीवभावः भृशं १०४ शवश्लोकी. असुख (भाति)'-तसाच स्वात्म्याच्या अज्ञानाने आत्म्याचा जीवभाव अत्यंत दुःखरूप (भासतो)-' (यथा ) आप्तोक्त्या अहिभ्रमान्ते सः च खलु विदिता एका रज्जुः एव अभूत् '-आताच्या सांगण्यावरून सर्पभ्रम निवृत्त झाला असतां जसा तो ज्ञात झालेली ती एक रज्जुच होतो,-' तथा निजगुरुवचसा (जीव. त्वभ्रमान्ते ) अह जीवः न एव अस्मि ' तसाच आपल्या गुरूच्या वचनाने (जीवत्वभ्रम नष्ट झाला असता ) मी जीव नव्हेच तर-'अह साक्षिभूतः कूटस्थः शिवः अस्मि '-मी सर्वसाक्षी, निर्विकार व कल्याणरूप आहे. ( असा बोध होतो.) [ आतां येथे त्या जीवन्मुक्ताचे स्वरूप सागतात व साधकाने गुरूंवर विश्वास ठेवून, त्यांनी सागितलेल्या वचनानुरूप तर्क करून, युक्तीने स्वतःच्या जीवत्वाचा बाध करून आत्मानुसधान कसे करावे, हेहि सागतात. जसे- अति अधकारहि नाही व प्रकाशहि नाही, अशा वेळी रस्त्यात पडलेल्या दोरांचे यथार्थ ज्ञान न झाल्याने म्ह० तिच्या स्वरूपाच्या अज्ञानाने पहाणाराला तो मोठा सर्प आहे, असे एकाएकी वाटते, तसेच स्वतःच्या आत्म्याचे यथार्थ स्वरूप न समजल्याने म्हणजे आत्म्याचे आत्मरूप यथार्थ ज्ञात न झाल्यामुळे त्याच्याच ठिकाणी हा सर्व प्राकृताच्या प्रत्ययाला येणारा आत्मसबधी अत्यत दुःखरूप जीवभाव भासतो. सर्पभ्रमाला रज्जूचे ज्ञान न होणे हे कारण असून तीच जशी त्याला आधार असते तसेच जीवत्वभ्रमाला आत्म्याचे अज्ञान कारण व तोच आधार आहे. पण ज्याच्यावर आपला विश्वास असतो, अशा एखाद्या पुरुषाने ' अरे तो मर्प नव्हे, दोरी आहे ' असे सांगितले असता व त्याप्रमाणे आपणाला अनुभव आला असता जसा सर्पभ्रम नष्ट होतो व पूर्वी भासलेला सर्पच केवल एक दोरी होऊन राहतो म्ह० दोरीचे ज्ञान झाल्याने तद्विषयक अज्ञान व अज्ञानकार्य नष्ट होते व रज्जुरूपाने ज्ञात झालेली एकटी रज्जुच अवशिष्ट राहते, त्याप्रमाणे स्वगुरूच्या ( आत्मज्ञानोपदेशकाच्या ) वचनाने म. त्यानी सागितलेल्या ' तत्त्वमसि' इत्यादि वाक्याच्या अर्थद्वारा व युक्तीने जीवत्वभ्रम नष्ट झाला असता, सुख, दुःख, जन्म, मरण, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादि धर्मानी युक्त होणारा जीव मी नव्हे, तर मी जीवादिकाचा साक्षात् अनुभव घेणारा आहे. त्यामुळेच आत्मज्ञानी मला साक्षी म्हणतात. पण वस्तुत मी निर्विकार व कल्याणरूप आहे, असे आत्मानुसधान जीवन्मुक्त पुरुषाने सर्वदा ठेवावे. सारांश -सर्पभ्रम जसा आप्तोपदेशाने नष्ट होतो, तसाच जीवत्वभ्रमहि गुरू- पदेश, शास्त्रवचन, तदनुसार तर्क व स्वतःचा अनुभव यांच्या योगाने निःशेष घालवून सर्वदा आत्मस्वरूपचिंतनांत अवशिष्ट आयुष्य घालवावे. ] ९४.
सान्वयार्थ विवरण. कि ज्योतिस्ते वदस्वाहनि रविरिह मे चन्द्रदीपादि रात्री स्यादेवं भानुदीपादिकपरिकलने किं तव ज्योतिरस्ति । चक्षुस्तन्मीलने किं भवति च सुतरां धीधियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोऽहम् ॥ अन्वयार्थ- ते कि ज्योतिः वदस्व '-प्रश्न-हे शिष्या, तू कोणत्या तेजाने (प्रकाशाने ) व्यवहार करितोस ते सांग.-' इह अहनि मे रविः रात्रौ चन्ददीपादि स्यात्-' उत्तर--या व्यवहारांत दिवसा मूर्य व रात्रीं चद्र, दीप इत्यादि माझी तेजे आहेत.-' एव भानुदीपादिकपरिकलने तब कि ज्योतिः अस्ति'-प्रश्न- ठीक आहे. पण मूर्य, दीप इत्यादिकाचे ग्रहण तू कोणत्या ज्योतीने करितोस ?- चक्षुः '-उत्तर-नेत्राने.-' तन्मीलने च कि भवति'- प्रश्न-आणि नेत्र मिटल्यावर कोणत्या तेजाने व्यवहार करितोस ?- सुतरां धीः '-उत्तर-सर्वथा सर्व प्रकाशक बुद्धीने.-' वियः प्रकाशे कि ( अह)'- प्रश्न-बुद्धीचा प्रकाशक कोण ? उ०-( मी अहकार.)-'तत्र एव कि अहं'- प्रश्न-तुझा प्रकाशक कोण ? उत्तर-मी शुद्ध चिद्घन आत्मा.-' ततः त्व तत् असि '-गुरु-तस्मात् तू ते आहेस.-' हे प्रभो अहं परमक ज्योतिः अस्मि'- शिष्य-हे प्रभो, मी सर्वश्रेष्ठ तेज आहे. [ आचार्य आता येथे तोच जीवन्मुक्त स्वतःच्या अत:करणांत गुरुशिष्याची कल्पना करून त्यांच्या सवादद्वारा परम ज्योतीरूप आत्म्याकडे अनुसधान कसे ठेवितो, ते सांगतात-गुरु प्रश्न करितात हे शिष्या, दिवसा जो तू सर्व पदार्थाशी व्यवहार करितोस व रात्रीहि जो तुझा दिवसाप्रमाणेच व्यवहार होतो तो कोणत्या प्रकाशाने ते मला सांग. शिष्य-महाराज दिवसा सूर्यप्रकाशाने व रात्री चद्र, दीप इत्यादिकाच्या प्रकाशाने मी व्यवहार करितो. गु०-त्या चद्रसूर्यादि वस्तुप्रका- शक वस्तूचे ज्ञान तरी तुला कसे होते ? शिष्य-महाराज, मी माझ्या नेत्रांनी त्यांचे ग्रहण करितो व माझे नेत्र त्या प्रकाशाच्या साहाय्याने सर्व पदार्थ पहातात. गु०-पण तू जेव्हा नेत्र मिटतोस तेव्हां, किवा निद्रेमध्ये तुझे डोळे जेव्हां आपोआप मिटतात तेव्हा सूर्यादि प्रकाशक व घटादि प्रकाश्य यांचा अनुभव घेणारे कोणतें तेज असते ? शि०-नेत्र मिटले असतां अत्यन्त प्रका- शक जी बुद्धि तिच्या योगाने माझा सर्व व्यवहार होतो. गु०-बरे, बुद्धीचा प्रकाशक कोण ? कारण चद्र-सूर्याप्रमाणेच तीहि प्रकाशमय आहे, असा अनु- .. घनश्की. भव येत असतो; तर तिचा अनुभव घेणारा कोण ! शि०-मी ( अहंकार ) कारण मी बुद्धीच्या सर्व चेष्टा जाणतो. (ह्याप्रमाणे शिष्याने गुरूंना उत्तर दिले असतां पुनः ) गुरु म्हणतात-पण त्या अनुभवाला येणाऱ्या अहंतेचा व्यवहार तूं कोणत्या ज्योतीने करितोस ? ( असा प्रश्न केला असता शिष्याला स्वस्वरूपाहून अन्य तेज न दिसल्यामुळे पुन: अहकाराला प्रकाशित कर- णारा मीच ( आत्मा ) आहे, असे त्याने सांगितले. हे ऐकून ) गुरु म्हण- तात-तर मग तुझ्याहून अन्य दुसरा कोणताच पदार्थ खरोखर प्रकाशरूप नसल्यामुळे व जे सूर्यादि व्यावहारिक प्रकाशरूप पदार्थ आहेत तेहि त्या आत्म्याला, तो स्वयंज्योति व म्हणूनच प्रकाशरूप असल्यामुळे, प्रकाशित करूं शकत नाहीत, म्हणून ती श्रेष्ठ ज्योतिच (म्ह० कार्य-कारण, प्रकाश्य- प्रकाशक इत्यादि व्यावहारिक भावाशी यत्किचिािह सबध न ठेवणारे तेज) तू ('स्व' पदाचा लक्ष्यार्थ आत्मा ) आहेस. असा कृपाळु गुरूनी उपदेश केला असतां, शिष्य त्याविषयी स्वतःशी एकान्तांत विचार करून स्वतःचा अनुभव सागतो-ह प्रभो, मीच ती श्रेष्ठ ज्योति आहे. याच अर्थी 'आत्मैवास्य ज्योतिः' इत्यादि बृहदारण्यकश्रुति प्रमाण आहे. (बृ. भा. अ. ४ ब्रा. ३ पृ. ४१-५०) येथे आचार्यानी गुरुशिष्यसवादरूपाने विचाराची दिशा फार मार्मिकपणे, श्रुतीच्या आधाराने, दाखविली आहे. ] ९५. कंचित्कालं स्थितः को पुनरिह भजते नैव देहादिसंघ यावत्प्रारब्धभोग कथमपि स सुखं चेष्टतेऽसङ्गबुद्ध्या । निईन्द्वो नित्यशुद्धो विगलितममताहंकृतिनित्यतृप्तो ब्रह्मानन्दस्वरूपः स्थिरमतिरचलो निर्गताशेषमोहः ॥ ९६ अन्वयार्थ–'कचित्काल को स्थित इह पुनः देहादिसघ न एव भजते'- (तो) काही कालपर्यंत पृथ्वीवर राहिला तरी पुनः येथे देहादिसमूहावर आस्था ठेवीत नाही.-' यावत्प्रारब्धभोग कथमपि असगबुद्धया स निईन्द्वः नित्यशुद्ध. विगलितममताहकृति नित्यतृप्त ब्रह्मानदस्वरूप. स्थिरमति अचल. निर्गताशेषमोह: (सन्) सुख चेष्टते '-(तर) प्रारब्धकर्मभोग सपेपर्यंत कसा तरा निःसंग ब्रह्मच आत्मा आहे, अशा ज्ञानाने सुख-दुःखादि द्वद्वरहित, सर्वदा शुद्ध, ज्याची अहंता व ममता नष्ट झाली आहे, ज्याची बुद्धि स्थिर आहे, जो अचल आहे व ज्याचा सर्व मोह नष्ट झाला आहे, असा तो जीवन्मुक्त सान्वमार्य विवरण. १०७ पुरुष मोठया आनंदाने व्यवहार करितो. [ आता या श्लोकांत आचार्य, पूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्याला अनुभव आला आहे, असा जीवमुक्त जगांत कसा व्यवहार करितो ते सांगतात-कांहीं कालपर्यत ( म्ह० प्रारब्ध कर्माचा क्षय होईतो ) तो ब्रह्मवेत्ता पुरुष या पृथ्वीमध्ये रहात असल्यासारखा वाटतो. 'कु' म्ह० पृथ्वी असा जरी रूढ अर्थ आहे तरी या ठिकाणी 'कु' म्ह० अंतःकरण असा अर्थ करणे योग्य आहे. कारण ब्रह्मदेव, वसिष्ठ इत्यादि आत्मज्ञानी सिद्ध, अन्य लोकांमध्ये रहातात, असे पुष्कळ ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणून 'कु' या शब्दाचा क्षेत्र ( अत करण ) असा व्यापक अर्थ करावा. सारांश, अतःकरणात तो पुरुष रहात असल्यासारखा वाटतो खरा, पण तो तेथे राहूनहि स्थूल देह, स्त्री, पुत्र, मित्र इत्यादि विषयसमूहाचे ठिकाणी आस्था ठेवीत नाही. कारण देहादि पदार्थ निस्तत्व आहेत, अशी त्याची दृढ समजूत झालेली असते व त्यामुळे ते सत्य आहेत किंवा आत्म्याचा व त्यांचा काही सबध आहे, असें तो मुळीच मानीत नाही. तो या स्थूल-सूक्ष्म देहामध्ये प्रारब्ध कमीचा क्षय होईतो आनदाने रहातो. ब्रह्मवेत्ता स्वतः ईश्वर असल्यामुळे तो वस्तुतः माया व प्राक्तन यांच्या अधीन झालेला नसतो. पण त्याच्या अधीन झाल्यावाचून कर्तृत्व, भोक्तृत्व, सिद्ध होत नाही. म्हणून तो प्रारब्धकर्मलयापर्यंत देहात यदृच्छेने रहातो. तात्पर्य—भोक्तृत्वादिकांची अन्य त-हेने उपपत्तिच लागत नसल्यामुळे व देवादिकाच्या ठिकाणीहि कर्तृ. त्वादि दिसत असल्यामुळे ब्रह्मवेत्त्याचा व्यवहारहि अनिर्वचनीय आहे, असेच म्हटले पाहिजे आणि हे सुचविण्याकरिताच 'कथमपि ' असे श्लोकात म्हटले आहे. तो जीवन्मुक्त ' माझा आत्मा कोठेहि आप्तक्त न होणारा आहे ' अशा सतत भावनेने मोठ्या आनदाने व्यवहार करीत रहातो. कारण त्याचे आत्म- विषयक सर्व सशय नष्ट झालेले असतात. त्याला असगबोध कसा होतो व त्याचा परिणाम त्याच्यावर कसा घडतो हे पुढच्या अर्धातील विशेषणानी स्पष्ट करितात-निर्द्वद्व ' झ० तो नित्यशुद्र असल्यामुळे सुख-दुःख, गीतोष्ण इत्यादि द्वद्वरहित होतो. 'नित्यशुद्ध '-जीव पाप-पुण्यवान् असल्यामुळे त्याला सर्वदा शुद्ध रहाता येत नाही, तर पापामुळे तो बहुतेक सर्वदा अशु. द्धच असतो आणि पुण्यामुळे केव्हा केव्हा शुद्ध होतो. पण आत्मज्ञानी पुरुष ब्रह्मच होत असल्यामुळे त्रिकालीहि पाप-पुण्यहीन असतो, म्हणून तो नित्य- शुद्ध होय. तो नित्यशुद्ध असतो म्हणूनच त्याचा देहेंद्रियादिकांविषयीं अह- कार व देहाहून पृथक् असणाऱ्या पुत्रादिकांविषयीं ममता ही नष्ट होतात.
.१०८ शवश्लोकी. अहं-ममभाव नष्ट झाल्यामुळे तो सर्वदा तृप्त असतो. त्याच्या तृप्तीला कधींच प्रतिबंध होत नाही. कारण तो अपरिमित आनदरूप होतो. त्याची बुद्धि ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होते व तो स्वतः ब्रह्मरूप होत असल्यामुळे अचल होतो. कारण त्याचा मोह मूल अविद्यारूप कारणांसह नष्ट झालेला असतो. तात्पर्य-जीवन्मुक्त व्यवहार करीत असल्यासारखा जो सर्वाना प्रत्यय येतो, तो मायिक आहे, खरा नव्हे. कारण तो पुरुष मायामय देहादिकांनी जरी व्यवहार करीत असला तरी अतःकरणांत आत्मस्वरूपाविषयी सर्वदा सावधा- न असतो.] ९६. जीवात्मब्रह्मभेदं दलयति सहसा यत् प्रकाशैकरूपं विज्ञानं तच्च बुद्धौ समुदितमतुलं यस्य पुंसः पवित्रम् । माया तेनैव तस्य क्षयमुपगमिता संसृतेः कारणं या नष्टा सा कार्यकर्ती पुनरपि भविता नैव विज्ञानमात्रात् ९७ अन्वयार्थ प्रकाशैकरूप यत् विज्ञान सहसा जीवात्मब्रह्मभेद दलयति'- प्रकाश हेच ज्याचे मुख्य रूप आहे, असे ज्ञान तत्क्षणीच जीव, आत्मा व ब्रह्म यातील भेद घालवितें - तत् च पवित्र अतुल यस्य पुसः बुद्धौ समुदितं ( अभूत् )'- व ते पवित्र आणि निरुपम ज्ञान ज्या पुरुषाच्या बुद्धीत उत्पन्न होते - तस्य ससृतेः कारण या माया'- त्याची ससाराला कारण होणारी '- सा तेन एव क्षयं उपगमिता' - ती त्या ज्ञानानेच क्षय पावते. ( तरी तिचे भान असते.)-' विज्ञानमात्रात् सा नष्टा पुनरपि कार्यकर्ती न एव भविता'-पण केवल ज्ञानानेच, नष्ट झालेली ती माया पुनः भ्रम हे कार्य करणारी होत नाहीं, जीवत्वभ्रम उत्पन्न करीत नाही. आचार्य ज्ञानी पुरुष जरी क्रिया करीत असल्यासारखा वाटतो, तरी त्याची ती क्रिया अज्ञानी पुरुषाच्या क्रियेप्रमाणे सुखदुःखादि ससार उत्पन्न करीत नाही, असे येथे सकारण प्रति. पादन करितात-आत्मज्ञान वेदांतील महावाक्यापासून उत्पन्न होत असते. पण त्यांच्या अर्थाचा बोध गुरुमुखाने करून घेतला पाहिजे व गुरूपदेशा- नतर स्वतः युक्तिप्रयुक्तीने तोच वाक्यार्थ सत्य आहे, अशाविषयी आपला दृढ निश्चय केला पाहिजे. ह्या निश्चित ज्ञानाला ' चरमवृत्ति ' म्ह० शेवटची बुद्धिवृत्ति, असे म्हणतात. कारण ' मी ब्रह्म आहे' अशी एकदा वृत्ति झाली की तो पुरुष अतःकरणवृत्तिशून्य होत असतो. ज्याचे प्रकाश ( अनुभव- जी माया, सान्वयार्थ विवरण. १०९ तें साक्षात्कार) हे मुख्य रूप आहे, असें हे ज्ञान उत्पन्न होतांच ते जीव-त्वंपद- लक्ष्य कूटस्थ आत्मा व तत्पदलक्ष्य ब्रह्म यांतील भेद तत्क्षणीच नष्ट करिते. राग, द्वेष इत्यादि दोषांच्या वासनांसह मनाचा सर्व मल घालविते. म्हणून ते पवित्र व निरुपम आहे. असे श्रेष्ठ ज्ञान ज्या दृढ प्रयत्न करणाऱ्या उत्तम अधिकाऱ्याच्या शुद्ध अंतःकरणांत उत्पन्न होते, त्याच्या त्या ज्ञानाने ससा- रोत्पत्तीला कारण होणारी माया नष्ट होते. कारण मायेचा नाश करण्यास अन्य कोणत्याच साधनाची अपेक्षा नसते. कार्य-कारणभावरहित असल्यामुळे ती निस्तत्त्वरूप माया, प्रकृति या नांवाने शास्त्रात प्रसिद्ध आहे. मूळ अज्ञान नष्ट झाले तरी तो ज्ञानी व्यवहार करीत असल्यासारखा भासतो, पण त्या केवळ भासानेच एकदा नष्ट झालेली माया पुनः कधीच भ्रमरूप कार्य करूं शकत नाही, ही गोष्ट अगदी निश्चित आहे. ] ९७. विश्वं नेति प्रमाणाद्विगलितजगदाकारभानस्त्यजेरै पीत्वा यहत्फलाम्भस्त्यजति च सुतरां तकलं सौरभाट्यम्। सम्यक सच्चिद्घनैकामृतसुखकवलास्वादपूर्णो हृदासो ज्ञात्वा निःसारमेवं जगदाखिलमिदं स्वप्रभः शान्तचित्तः॥ अन्वयार्थ—'यद्वत् फलाम्भः सुतरां पीत्वा तत् फल सौरभाढ्य वै त्यजति' -ज्याप्रमाणे आम्रादि फलातील रस निःशेष पिऊन-चोखून ते फल उत्तम वासाने युक्त असले तरी (प्राणी) टाकितो,-' (तद्वत् ) असौ विश्व न इति प्रमाणात् विगलितजगदाकारभान:'-(त्याचप्रमाणे) हा (जीवन्मुक्त) 'विश्व नाही' ह्या प्रमाणवाक्याच्या योगाने ज्याचें जगदूपि भान नष्ट झाले आहे-'हृदा सम्यक् सच्चिद्धनैकामृतसुखकवलास्वादपूर्णः च (सन्) -व जो सूक्ष्म दृष्टीने चैतन्यपूर्ण, एक व नाशरहित अशा मुखाचा अनुभव घेऊन नित्यतृप्त झाला आहे,-'शान्त- चित्तः स्वप्रभः एवं अखिलं इदं जगत् निःसारं ज्ञात्वा त्यजेत् '-अशा त्या शातचित्त व स्वयज्योति ज्ञानी पुरुषाने याप्रमाणे सर्व जगत् निःसार आहे, असे जाणून टाकावे. [ ज्ञानी पुरुष ससार करीत असल्यासारखा जरी दिसतो तरी त्याचा तो त्याग करितो. म्हणजे त्यांत आसक्त होत नाही, असे येथे दृष्टान्त देऊन सांगतात-हा ज्ञानी 'जगत् नाही' 'अन्य काही नाही' असे प्रतिपादन करणाऱ्या स्वतःप्रमाण श्रुतिवाक्यांच्या हटानुसंधानाने निःशंक होतो. त्यामुळे जगदाकाराप्रमाणे सर्वोच्या अंतःकरणात असणारे जे जगद्रूप मान ते त्याच्या ठिकाणी नसते, तर तें कारणासह नष्ट होते. सर्वहि दृश्य पदार्थाचे परीक्षण करून प्रत्येक पदार्थाला उद्देशून 'हे नव्हे ' ' हे नव्हे' असा सर्वांचा बाध केल्यामुळे अवशिष्ट रहाणारा जो चैतन्यपूर्ण, स्वगतादिभेदरहित व नाशहीन आनंद त्याचा तो ग्रास करितो. म्ह० त्या परमानंदाचा यथेच्छ अनुभव घेतो. मनुष्य अन्नाचे प्रास जसे हाताने तोडांत घालितो, तसाच हा त्या पूर्ण आनंदरूप अन्नाचे वैदिक साख्य व योग ह्या हस्तानी अतःकरणाच्या विद्या- रूप मुखामध्ये ग्रास घेतो. जिव्हेने काही काल रसास्वाद घेतला असतां प्राणी तृप्त होतो, तसा त्या आनदानुभवाने हा ज्ञानी नित्यतृप्त होतो व हे सर्व जगत् असार आहे म्ह० यात सत्त्व किवा सुख नाही, असा त्याचा निश्चय होतो आणि असा निश्चय झाला असतां चित्तविक्षेपाचे कारणच नष्ट झाल्या. मुळे त्याचे अतःकरण शात होते. त्यामुळे भाजलेल्या बीजाप्रमाणे ते चित्त ससारोत्पत्तीच्या निरुपयोगी झाले असता ज्ञान्याने ह्या जगाचा त्याग करावा. याविषयी एक लौकिक दृष्टान्त देतात-जसा व्यावहारिक पुरुष आंबा, नारिंग इत्यादि फलातील सर्व रस पिऊन अवशिष्ट राहिलेला नीरस भाग सुवासिक असला तरी, त्याला त्याची गरज नसल्यामुळे टाकून देतो, तसाच मुमुक्षूने ज्ञानानतर हा ससार टाकावा.] ९८. क्षीयन्ते चास्य कर्माण्यपि खलु हृदयग्रन्थिरुद्भिद्यते वै छिद्यन्ते संशया ये जनिमृतिफलदा दृष्टमात्रे परेशे । तस्मिंश्चिन्मात्ररूपे गुणमलरहिते तत्त्वमस्यादिलक्ष्ये कूटस्थे प्रत्यगात्मन्यखिलविधिमनोऽगोचरे ब्रह्मणीशे ९९ अन्वयार्थ– तस्मिन् चिन्मात्ररूपे गुणमलरहिते तत्त्वमस्यादिलक्ष्ये कूटस्थे प्रत्यगात्मनि अखिलविधिमनोऽगोचरे ब्रह्मणि ईशे परेशे दृष्टमात्रे सति'-त्या केवल चैतन्यरूप, सत्त्वादि गुणकृत मलाने रहित, तत्त्वमसि इत्यादि महा- वाक्यांचा लक्ष्यार्थ, निर्विकार, सर्वान्तर्यामी सर्व वैदिकविधि व मन यांना अगोचर, निरतिशय श्रेष्ठ व ईश अशा परमेश्वराचे दर्शन होतांच-'अस्य च कर्माणि क्षीयन्ते'-साधकाची सर्व कर्मे नष्ट होतात.-' खलु हृदयग्रन्थिः अपि उद्भिद्यते '-हृदयग्रथि तेव्हांच तुटते व-'ये जनिमृतिफलदाः संशयाः ते छिद्यन्ते वै'-जन्ममरणरूप फल देणारे जे आत्मविषयक संशय तेहि नष्ट होतात. [ आतां येथे ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाने मिथ्या ठरलेल्या अहं.
सान्वयार्थ विवरण. १११ ? कारादि सृष्टीची प्रतीति येत असून जरी तो तद्वारा कर्मे करितो तरी त्यांच्यामुळे त्याला बंध उत्पन्न होत नाही, याविषयी ' भिद्यते हृदयग्रन्थिः । इत्यादि मुंडकश्रुतीचे ( मु. भा. पृ. ७९ ) प्रमाण देतात. वेदान्तामध्ये सांगि- तलेल्या सर्व लक्षणांनी ज्ञात होणारें केवल चैतन्यरूप (म्ह ० केवल विषयी, अहंकारादिकाप्रमाणे विषय नव्हे ) केवल ज्ञान (ज्ञेय नव्हे ) व निर्विकार असे जे ब्रह्म, तद्रूप ज्याची अंतःकरणवृत्ति झाली आहे त्याला परमेश्वराचें दर्शन ( ज्ञान, साक्षात्कार ) झाले असता तत्क्षणीच त्याची सर्व संचित व क्रियमाण कम क्षीण होतात. ह्या ब्रह्मसाक्षात्कारवान् पुरुषाची हृदयस्थ चित् व जड यांचे ऐक्यरूप अज्ञानग्रथि ( गांठ) निःसशय सुटते. म्ह० अहका- रादि सर्व भाव जड आहेत व आत्माच एक चैतन्ययुक्त आहे असा निश्चय झाल्याने पुन. पूर्वीप्रमाणे तो भ्रमाने जड-चैतन्यांचे तादात्म्य करीत नाही. आतां असा प्रथिभेद होतोच म्हणून कशावरून, असे कोणी विचारतील म्हणून सांगतात-देहाहून आत्मा पृथक् आहे की ते दोघे एकच ? अशा तन्व्हेचे त्याचे सर्व सशय नष्ट होतात. कारण हे सशय त्या अज्ञानग्रथीपासून उद्भवणारे असल्यामुळे अज्ञानग्रथि नष्ट झाली असतां तिचे कार्य ( सशयहि ) नष्ट होते. हे आत्म्याविषयीचे सशयच पुन. पुन जन्ममरणरूप फल देत अस- तात. म्हणून सशय नष्ट झाले असता जन्ममरणपरपराहि नाहीशी होते. साराश, ब्रह्मज्ञानाने सर्व अनर्थ टळतात. द्वितीयार्धात अनेक विशेषणे योजून वेदान्तोक्त सर्व ब्रह्मलक्षणे सुचविली आहेत. रज व तम ह्या गुणापासून उत्पन्न होणारे रागद्वेषादि मल ज्याच्या ठिकाणी नाहीत, जो ' तत्वमसि ।। अह ब्रह्मास्मि' सत्य ज्ञानमनन्त ब्रह्म प्रज्ञानघन एवं 'प्रज्ञानं ब्रह्म' इत्यादि महावाक्यानी केवळ जहदजहल्लक्षणेनेच लक्षित होतो; जो सर्वव्यापी आहे; माया व मायाकार्य अहकारादि, याचा त्याच्यावाचून निर्वाहच होत नसल्या- मुळे जो ईश (नियन्ता ) आहे; जो वेदातील कोणत्याच विधींनी प्रेरित न होणारा असून मनालाहि ज्याच्याविषयीं सकल्प करितां येत नाहीं; जो निर्वि- कार आहे; अतर्मुख शुद्ध वृत्तीने अज्ञानाचा नाश होतांच स्वतःच जो प्रका. शित होतो; व्यवहारामध्ये ब्रह्मादिकांचे व मायेचे नियमन करणारा असे ज्याला उगीच म्हणत असतात; म्ह० ज्याच्यावांचून त्यांचे किंवा त्यांच्या कार्याचे अस्तित्वच सिद्ध होत नाही; तो परमेश होय. अशा त्या परमेशाचेच दर्शन झाले असतां परमपुरुषार्थ प्राप्त होतो. ] ९९.
११२ शवकोकी - आदौ मध्ये तथान्ते जनिमृतिफलदं कर्ममूलं विशालं ज्ञात्वा संसारवृक्षं भ्रममदमुदिताशोकतानेकपत्रम् । कामक्रोधादिशाखं सुतपशुवनिताकन्यकापक्षिसंघ छित्त्वासङ्गासिनैनं पटुमतिरभितश्चिन्तयेद्वासुदेवम् ॥१.. अन्वयार्थ- आदौ मध्ये तथा अन्ते (असन्नपि ) जनितिफलद '-उत्प. त्तीपूर्वी, उत्पत्तीनंतर व तसेच नाशानतर ( असद्रूप असूनहि ) जन्ममरणरूप फल देणारा;-' कर्ममूलं'-कर्मापासून उत्पन्न होणारा,-' विशाल '-महान्- 'भ्रममदमुदिताशोकतानेकपत्रं'-भ्रम, मद, हर्ष, शोक, इत्यादि अनेक पानी युक्त असणारा;-' कामक्रोधादिशाख'-काम, क्रोध इत्यादि शाखांनी युक्त व- 'सुत-पशु-वनिता-कन्यकापक्षिसघ ससारवृक्षं ज्ञात्वा'-पुत्र, पशु, स्त्री, कन्या, इत्यादि पक्षिसमुदाययुक्त असा हा ससारवृक्ष (निस्तत्त्व आहे, असे ) जाणून- 'एन असङ्गासिना छित्त्वा पटुमति अभितः वासुदेव चिन्तयेत् '-शहाण्या पुरु- षाने त्याला असंग शस्त्राने तोडून सतत वासुदेवाचे चितन करावे. [आता अशा ज्ञान्याची ' ब्रह्मच आत्मा आहे ' अशी सतत वृत्ति ( शेवटची वासना उत्पन्न होईतो ती ) दृढ करण्यास्तव त्याने ध्यान व ध्यानापूर्वीहि अवश्य कर्तव्य कर्म करावे, असे येथे सांगतात–हा ससारवृक्ष तिन्ही काली खोटा अमून जन्मम- रणरूप फल देणारा आहे. प्राण्यांचे कर्म हेच त्याचे मूळ आहे. तो फार विस्तीर्ण आहे. विपरीत ज्ञान, मी श्रेष्ठ आहे असा गर्व, हर्षवृत्ति, खेदवृत्ति इत्यादि त्या वृक्षाची जणु काय अनेक पर्णे ( पाने ) आहेत. काम (प्रिय विषयाविषयी इच्छा ), क्रोध ( इच्छेला प्रतिबध झाला असतां उत्पन्न होणारी रोपवृत्ति ), लोभ (विषयसरक्षणमति ) इत्यादि जशा काही त्याला शाखा (खांद्या) आहेत. पुत्र, गायी, बैल इत्यादि पशु, स्त्रिया, कन्या, हेच जणुकाय त्यावर राहणारे पक्षी आहेत. हा संसार ज्ञानाने नष्ट होत असल्यामुळे किंवा व्यवहारातहि तो क्षणिक असल्याचे सर्वाच्या प्रत्ययाला येत असल्यामुळे त्याला वृक्ष असे म्हटले आहे. ' ऊर्ध्वमूलोऽवाक्शाख ( काठ. भा. पृ. १३४) ही श्रुति व 'ऊर्ब- मूलमधःशाख०' (गी. भा. पृ. १०१९) ' ह्या ससारवृक्षाचे मूळ वर-श्रेष्ठ असून शाखा खालीं-कमी प्रतीच्या आहेत' ही स्मृति या रूपकाला प्रमाण आहे. अशा अश्वत्थ-(क्षणिक )संज्ञक ससारवृक्षाचे यथार्थ ज्ञान करून घेऊन मननादिकांच्या अनुष्ठानाने ज्याची बुद्धि सूक्ष्म झाली आहे, अशा मुमुक्षूने, मी . .
सान्वयार्थ विवरण. ११३ . असंग आहे ( मी कोठेच आसक्त होत नाही) असा अनुभव, हेच असंगशस्त्र घेऊन त्याच्या योगाने या वृक्षाचा छेद करावा (संसाराचा क्षय करावा) आणि नंतर सतत वासुदेवाचे चिंतन करावें. वासुदेव म्हणजे भगवान् गोपालकृष्ण. अथवा वा+असु+देवः म्हणजे 'या' विकल्पाने, पर्यायाने; असूनां'-प्राण व इंद्रिये यांचा 'देवः'-प्रकाशक-सर्व प्राणेंद्रियांना प्रकाशित करणारा आत्मा असा अर्थ करावा. ] १००. जातं मन्येव सर्वं पुनरपि मयि तत्संस्थितं चैव विश्वं सर्व मय्येव याति प्रविलयमिति तब्रह्म चैवाहमस्मि । यस्य स्मृत्या च यज्ञाद्यखिलशुभविधौ सुप्रयातीह कार्य न्यूनं संपूर्णतां वै तमहमतिमुदैवाच्युतं सन्नतोऽस्मि १०१ अन्वयार्थ–'सर्व मयि एव जातं पुनः अपि च तत् विश्वं मयि संस्थितं'- सर्व द्वैतजात माझ्या ठिकाणीच उत्पन्न झाले आहे आणि पुनः ते विश्व मा- झ्यामध्येच स्थित आहे.-'तत् सर्व मयि एव प्रविलयं याति '-ने सर्व माझ्या मध्येच लीन होतें,-' इति च ब्रह्म एव अहं अस्मि'-यास्तव तें ब्रह्मच मी आहे- च यस्य स्मृत्या यज्ञायखिलशुभविधौ न्यूनं कार्य वै संपूर्णतां सुप्रयाति'-शिवाय ज्याच्या स्मरणाने यज्ञादि सर्व शुभ कृत्यांत न्यून कर्महि निश्चयाने संपूर्ण होतें,-'तं अच्युतं एव अहं अतिमुदा सन्नतोऽस्मि '-त्या अच्युताला-( स्वा- स्म्याला )च मोठ्या आनंदाने मी साष्टांग प्रणाम करितो. [ भगवान् आचार्य आतां ह्या शेवटच्या उपसंहारात्मक श्लोकांत 'सर्वांच्या उत्पत्ति-स्थिति-लयांचा आधार ब्रह्म आहे' असें स्वतःच्या आत्म्यामध्ये ब्रह्माचें अनुसंधान करावें म. माझा आत्माच सर्वाधार ब्रह्म आहे, अशी सर्वदा चित्ताची भावना ठेवावी व स्वात्मज्ञान झाले असतांच सर्व करें समाप्त होतात, असे येथे स्पष्टपणे सांगून स्वात्म्याला नमस्कार करितात हे सर्व द्वैतजात ब्रह्मरूप कूटस्थ जो मी आत्मा त्या माझ्यामध्ये (माझ्या आधारानें ) उत्पन्न झाले आहे म्ह० ब्रह्म व आत्मा एक आहेत, असे मला ज्ञान झाले आहे. 'एव'शब्दाने येथे ब्रह्मीभूत आत्म्या- हून सृष्टीला अन्य कोणीहि आधार नाही, असे सुचविले आहे. याठिकाणी उत्पन्न होणे म्ह० नामरूपाने व्यक्त होणे असा अर्थ आहे. उत्पत्तीनंतरहि हे सर्व जगत् माझ्या ( शबल-कारण ब्रह्माच्या) आधाराने असते आणि निद्रा व प्रलयकालीहि ते माझ्या मध्येच लीन होते. प्रलयकाली ते पुनरुत्पत्तीला ११४ शतश्लोकी कारण होणाऱ्या संस्कारांसह लीन होत असल्यामुळे त्याला प्रविलय व मुक्ति- काली आत्मज्ञानाने कारणासह द्वैताचा नाश होत असल्यामुळे त्याला मोक्ष असे म्हणतात. “ यतो वा इमानि....नौति" या तैत्तिरीयश्रुतिप्रतिरादित- लक्षणयुक्त ब्रह्म, सृष्टीला तीन्ही काली कारण होत असल्यामुळे ते तिचे उपा- दान कारण होय. तसेच देश, काल, वस्तु इत्यादिकांच्या योगाने ज्याला किंचिहि गौणत्व येत नाही, असें तें ब्रह्मच मी (महावाक्यस्थ 'अहं' पदाचा लक्ष्यार्थ) आहे, म्हणून ज्या ब्रह्मरूप प्रत्यगात्म्याचे स्मरण केल्याने यनादि सर्व शुभविधीत एखादें कर्म (मंत्रतंत्रादिकांनी) न्यून असले तरी निःसंशय पूर्ण होते (इष्टफल देण्यास समर्थ होते), त्या स्वभावापासून कधीच च्युत न होणाऱ्या ब्रह्मबर आत्म्याला मी (ब्रह्मात्मज्ञानी ) मोठया आनंदाने साष्टांग नमस्कार करितो म्ह० आठ अंगांच्या आठ प्रकृतीसह त्यांत लीन होतो.] १०१. ह्याप्रमाणे आचार्यभक्त विष्णुशर्मकृत श्रीमच्छंकराचार्यकृत शतश्लोकीचे मराठी सान्वयार्थ विवरण समाप्त झाले.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
No text on this page.
ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ अध्याय-१ ला. भाग १ ला. [ मूळ सूत्र, सूत्रार्थ, शांकरभाष्या, चतुःसूत्रीपर्यंत रत्नप्रभा टोकेप्रमाणे भाषार्थनयोजना,भाष्य,पांचव्या अधिकरणापासून आनंदज्ञानां- च्या टांकच्या भाषांतरार: भाष्याचे स्पष्टीकरण द भाष्ययोजना, भावनप्रभा टीकांतील आशय व्यक्त क.गाया टीपा, प्रस्तावना, सविस्तर कमणिका, आचार्य व बाद गयण व्यास यांची चित्रं यांसह ] प्र. ८१२ किं. ५ रु. अध्याय २ रा, भाग २ रा. सदरहूप्रमाणेच श्रीशंकराचार्याचे चित्र पृ. ७२० किं. ४॥रु. अध्याय ३ रा व चवथा, भाग ३ रा. वरीलप्रमाणेच, श्रीप्रज्ञानन्द- सरस्वतींचे गचरित्र छायाचित्र पृष्टे ८८०, किं. ५॥ रुपये. सर्व ग्रंथांची किं. १५ रु. - .... इतर पुस्तकें. शतश्लोकी ( श्रीशकराचार्गप्रणीता -सान पार्थनि, सार्थ तैत्तिरांयोपनिषद् (व • यो, भृगु) ०-१०-० मर्श ०-११-० आत्मपुराण अध्याय १-२-१० अनुभूतिप्रकाश अ. १-२ २- दर्शनमाला. पा-मार ( सखंडन) २ श्रीतकसंग्रहसार इतर दर्शन शिल्लक नाहीत. आचार्यकुल मासेकांत मूळासह सर्व दर्शने सुरू होणार आहेत. । .... आचाय पुणे नं. २. विष्णुशाग्त्री बापट सं.५ अ ार्य कुल. R