Library

Viira Vinaayaka

Deshapaan'd'e Ga Vi · 2005-11-26

PDF Proofread

Front matter

वीर विनायक
74
वीर विनायक
वी. शामा
वा. गो. देशपांडे

UNIVERSAL
LIBRARY
OU_184290
LIBRARY
UNIVERSAL

OSMANILA UNIVERSITY LIBRARY
D
Accession
Author
देशपांडे, बायो
Title बीर विनायक (५७२
This book should be returned on or before the date
last marked below.

No text on this page.

विजय प्रकाशन १ लें
वीर विनायक
मूल्य २ रुपये
वा. गो. देशपांडे

*** प्रकाशक व मुद्रक
ग. वि. देशपांडे
विजय प्रकाशन
३६ नारायण, पुणे २.
प्रथमावृत्ति १९५२
सर्व हक्क प्रकाशकाधीन
*** मुद्रणस्थळ
बिंदिरा प्रेस,
२७० सदाशिव, पुणे २.
Checked 1983
Chocked 1969

प्रिय मित्र यशवन्त कृष्ण केळकर यांस- तात्या ! तूं व मी दोघांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र लिहावयाचं ठरविलं, पण अचानक तुला देवाघरचं बोलावणं आलं आणि तूंही कर्तव्यतत्परतेनं निघून गेलास. मात्र आपलं कार्य अपुरं राहिलं. तें पुरं करण्याचा मी हा अल्पसा प्रयत्न केला आहे. तें हे चरित्रात्मक पुष्प तुलाच अर्पण. वा. गो. देशपांडे राजकारणाला धर्म आहे नि धर्माला राजकारण आहे. अिटाली- मध्ये जन्मलेल्या रामदासांनाः मॅझिनी म्हणतात. हिंदुस्थानांत जन्मलेल्या मॅझिनीला रामदास म्हणतात. बाकी दोघेही अकच सांगतात की, राज- कारण धार्मिक असेल तरच तें पवित्र आहे व धर्म राजकीय असेल तरच तो पवित्र आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर 'वीर विनायका'चे स्वागत १ दि. १० मे १९५२ ला पुण्यास अभिनव भारताचा सांगता समारंभ आणि भारतीय क्रांतियत्नांत बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा स्मरणदिन वीर सावरकर यांचे नेतृत्वाने मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असतांच हे • वीर विनायक या शीर्षकाचे स्वातंत्र्य वीरांचे अद्ययावत् आणि आटोपशीर चरित्र प्रसिद्ध होत आहे, हा चांगला योग आहे. ज्या भारतीय क्रांतिपर्वाची स्वातंत्र्यप्राप्तीनें समाप्ति झाली त्या क्रांतिपर्वाचे द्रष्टे आणि अपक्रमशील पुढारी वीर सावरकर होते. या पुढारीपणामुळे आलेल्या महान नि प्राणघेण्या संकटांशी झुंजन त्यांना पुरून सावरकर अरले. त्यांच्या प्रज्ञेचे तेज जसे अंदमानांत जाण्यापूर्वी होते तसेंच नंतरहि झगझगीत राहिले, त्यांचा आत्मप्रत्यय अतूट राहिला, त्यांची प्रेरक कार्यक्षमता जागती राहिली, हे अक आश्चर्य होय. सावरकरांच्या जीवनाला में अक अद्भुतरम्यतेचें तेजोवलय मन:चक्षंना दिसतें तें त्यामुळेच. अंदमानांतून परत आल्यावर नवीन काही न करतां पूर्वार्जित प्रतिष्ठेच्या शिदोरीकर त्यांना कालक्रमणा सहज करतां आली असती. त्या सुस्थपणामध्ये कदाचित त्यांना मान- सन्मानहि अधिक लाभला असता. परकीय राज्याकडून झालेल्या छळानंतर स्वकीय लोक आणि राज्यकर्ते यांचे. कडूनहि छळ सोसण्याचे प्रसंग त्यांना आले नसते. १९१४ मध्ये लो. टिळक भंडालेहून सुटून आल्यावर त्यांनी संन्यास ध्यावा, काशीला जावें, गीताप्रवचनें करीत कालक्रमणा करावी अशा सूचना करण्यांत आल्या होत्या. पण त्या सूचना जशा टिळकांनी क्षणार्धात अव्हेरल्या. तद्वतच १९२४ नंतर वीर सावरकर यांनी केवळ सामाजिक कामांत रमून बुडून जावें असें परकीय राज्यालाहि वाटले असेल. पण ती सूचना मानली जाणार नाही हे निश्चित असल्याने त्यांनी त्यांच्यावर बंधने घातली. सरकारी बंधने नसलेले लोक दीर्घ शिक्षेच्या अनुभवाच्या कटु घुटक्यानंतर आपण होअन बंधनें पत्करतात. झुलट वीर सावरकरांवर बंधने घातली असतांहि ते त्या बंध- नाचे टोकांवर जासून पर्यायाने राजकारण करीत होते.. त्यांच्या त्या वेळच्या सामाजिक, धार्मिक व्याख्यानांवर कित्येक वेळा रूपकाने राजकीय प्रचार केल्याचा संशय सरकारला आला होता. पण त्यांना यासाठी छेडण्यास आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सावरकरांनी अलट कोटिक्रमाने अितकें गांगरून टाकलें, की या भाषणासाठी सावरकरांना पेचात टाकण्याचा अधोग केल्यास सरकारलाच पेंच पडेल अशी भीति त्यांना वाटली असावी. बंधविमोचनाची अत्स्फूर्त प्रेरणा हा सावरकरांच्या महनीय- तेचा मोठा अंश आहे. या प्रेरणेने स्वकीय-परकीय बंधनांशी झगडले. बंधनांचा त्यांना बाभू वाटण्याअवजी बंधन घाल- णाऱ्यांना त्यांचा बाझू वाटावा असा तेजस्वीपणा त्यांनी वेळो-

७
चळी प्रगट केला. स्वातंत्र्य लक्ष्मीचा जयघोष भारतांत प्रथम
विशीच्या आसपास असलेल्या वीर सावरकरांनी केला. पण
त्याचे मागें बुद्धिनिष्ट विचारसरणी, आणि अितिहास सिद्ध
मागांचे संशोधन हे होतेच. देशभक्तीच्या अत्कट भावनेला हे
दोन पंख होते. म्हणून त्यांची क्रांतीची भरारी केव्हाही
निव्वळ भावनावश नव्हती. भावनावशतेला बुद्धिवादाची जोड
सतत होती.
केवळ राजकीय क्रांतिकारी आणि नेते सावरकर असते
तरीहि त्यांचे नांव भारताचे अस्तित्व असेपर्यंत स्मरणीय
झाले असतेच. पण त्यांचे
मूलभूत
व्यक्तित्व त्या एका क्रांति-
कार्यापेक्षांहि मोठे, अदात्त आणि समावेशक आहे. ते
विहंगमाप्रमाणे प्रतिभेच्या झेपी घेणारे कवी आहेत. बुद्धि-
वादाच्या निकषावर सामाजिक रूढी घासून घेणारे
सुधारणा-
प्रेरक आहेत. अनेक विषयांत आपली बुद्धि चालवून सामान्य
लोकांना दिसते त्यापेक्षां पलीकडचे पाहणारे, द्रष्टे आहेत.
त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आहे. सर्व जग अलटें
चालत असले तरी आपल्याला पटलेला विचार, अच्चार आणि
आचार चालू ठेवणारे ते निश्चयाचे मेरू आहेत.
जे शिक्षेला किंवा छळाला भीत नाहीत त्यापैकी अनेक
लोक जननिदेला भितात. जननिंदा किंवा जनस्तुति यांच्यावर
दृष्टि ठेथून आपल्या मनाला मुरड घालतात. वीर सावकरांनी
हिंदुत्वाचे राष्ट्रीय भूमिकेनें स्पष्टीकरण आणि समर्थन केले, तें

८ मिळणार आहे. प्रस्तुत पुस्तक अशाच प्रकारचे आहे. श्री. असेंच लोकांना पचण्यास जड, कित्येकांना बोचणारे आणि कित्येकांच्या स्वार्थावर गदा आणणारे असल्यामुळे त्याला कडाडून विरोध झाला. पण वीर सावरकर सर्व बुद्धिसामर्थ्य वेचन परोपरीने त्याचे समर्थनच करीत राहिले. त्याप्रमाणेच हिंदूंच्या भोळ्या समजुती आणि आचार यांवर त्यांनी अड- विलेले बुद्धिवादाचे निर्भीड कोरडे अनेकांना झोंबणारे आणि विव्हल करणारे झाले. पण याहि संबंधात विरोधकांवर चिड़न न जातां पुनः पुन्हां साधार कोटिक्रमाने सावरकरांनी आपली मते मांडण्याचे सोडले नाही. क्रांतिकारकपणाव्यतिरिक्त सावरकर-चरित्राला तितकीच तेजस्वी अनेक अंगे आहेत, त्यापैकीच हे अक होय. अशा थोर पुरुषाच्या आयुष्याचे संकलित चित्र, जिवंत अितिहास-लेखकाच्या धाटणीने लिहून अनेक पुस्तकांतून लोकांपुढे मांडले जाणे अवश्य आहे. त्यायोगें अनेकांना देशार्थ आणि लोकोद्धारार्थ त्याग आणि कष्ट करण्याची स्फूर्ती शि. ल. करंदीकर यांचे मोठे सावरकर चरित्र किंवा सावरकरांचे होशं घातलेले विस्तृत्र आत्मचरित्र वाचण्याची शक्ति आणि 'फुरसत नसणारे अनेकश: लोक आहेत. विद्यार्थी आणि मध्यमवयस्क असेहि त्यांत आहेत. त्यांना या पुस्तकांत आलेले अित्थंभूत नि क्रमवार चरित्र फार अपयुक्त आहे. श्री. देशपांडे यांनी स्वयंप्रेरणेने हे पुस्तक लिहून आणि प्रसिद्ध करून सावरकर विषयक वाङ्मयांत महत्वाची भर घातली आहे. १८।४।५२ ग. वि. केतकर कृतज्ञता हे चरित्र अर्धवट लिहिले असतांच ' दैनिक भारता'च्या व्यवस्थापकांना दाखविलें. १० मेस साजऱ्या होणाऱ्या अभिनव भारत सांगता समारंभाचे कार्यवाह श्री. श्री. पु. गोखले यांनाही दाखविले. त्यांनी अनेक मोलवान सूचना केल्या. त्या मला पटल्या व मी त्या स्वीकारल्याही. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चिरंजीव विश्वास सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र पुरविलें व लेखनांत 'अ'ची बाराखडी असावी अशी अिच्छा व्यक्त केली. मी प्रथमपासूनच ती लिपी वापरत असतो; पण 'विश्वास' अिच्छेने अधिक कसेशिनें ती या चरित्रांत अपयोगिली आहे. आतां चरित्र तर लिहिलेच. पण प्रस्तावना ? सावरकर चरित्र लिहितांना अधिकार वाणी'ने लिहिणारा प्रस्तावनाकारच हवा. श्री. शि. ल. करंदीकर यांच्या चरित्रास साहित्य सम्राटांनी प्रस्तावना दिली. मी श्री. ग. वि. केतकारांना भेटलों व त्यांना प्रस्तावना मागितली. त्यांनीही 'वीर विनायकाचे स्वागत' पर चार शब्द लिहिले. ही सर्व सिद्धता झाल्यानंतर हे चरित्र प्रकाशित करण्याची व त्याची सुंदर सजावट करण्याची जोखमीची जबाबदारी माझे चुलते चित्रकार श्री. ग. वि. देशपांडे यांनी अचलली व ती अत्तम रीतीने पार पाडली.

अिंदिरा प्रेसचे श्री. ज. शं. मेटेकर यांनी व त्यांच्या काम- गारांनी पुस्तकाच्या छपाीचे काम वेळेवर व सबक केले. मुग्वपृष्ट श्री. सहस्त्रबुद्धे 'बालोद्यान प्रेस' यांनी सुंदर छापून दिले. प्रसिद्ध ब्लॉक मेकर श्री. मोघे यांनी ब्लॉक्स सुबक व जलद करून दिले. तसेच श्री. बाबूराव ठोकळ — श्री लेखन वाचन भाडार' यांनी विक्रीची जबाबदारी स्वीकारली व अभिनव भारत सांगता समारंभाच्या कार्यकारी मंडळाने पुस्तक १० मेस प्रसिद्ध करण्याचा योग जमवून दिला; तेव्हां त्यांच्या- बद्दल आणि पू. बाळशास्त्री हरदास व माननीय श्री. गोडे या थोर व्यक्तींनी अभिप्राय देअन व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहाय्य करून अपकृत केले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे माझें आद्य कर्तव्य आहे. १० मे १९५२ वा. गो. देशपांडे पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नांव आधुनिक भारतातील पराक्रमाचें, स्फूर्तीचे व तेजस्वी निर्भयतेचे प्रतीक उहावें अितकें त्या नांवाचे मोल आहे. सावरकरांचे अत्स्फूर्त चरित्र त्रिकाळचे संपादक श्री. शिवरामपंत करंदीकर यांनी लिहिले असून स्वतः सावरकरही खंडश: आपले आत्मचरित्र लिहित आहेत. सावरकरांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या आत्म- चरित्रांतील तेजस्विता, अितर कोणीही त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षां आगळीच असणार हे अघड आहे. तथापि श्री. वा. गो देशपांडे यांचे हे पुस्तक भारतांतील या सर्वश्रेष्ठ विभूतीच्या जीवनाचा माध्यमिक शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांना जसा परिचय करून देील तसा त्यांच्या मोठया चरित्र ग्रंथांनी होणार नाही. श्री. देशपांडे यांनी हे चरित्र लिहून विद्यार्थ्यांचे दृष्टीने आतिशय मोलाचे कार्य केलेले आहे, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभिनंदन करतो. आज सावर- करांच्या नांवाला लोकप्रियतेची व सहज सन्मानाची बैठक नाही. भारत देशांतील लोक आपला वीर व द्रष्टा ओळखा- वयास असमर्थ आहेत. पण सावरकरांच्या जीवनाचा व तत्त्व- ज्ञानाचा सूक्ष्म अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला भावी वैभवशाली व मानवतेचे पुनर्रचनेचे कार्य करूं शकणाऱ्या भारताचे सावरकर हेच द्रष्टे आहेत हे मान्य करावेच लागेल. जीव--

१२
नाच्या सर्व दालनांत ते आपल्या अपूर्व तेजाने तळपले आहेत.
सेडियमच्या कणाप्रमाणे अखंड स्फुरणशाली असणारे त्यांचे
जीवन अनेकांच्या जीवनांत कर्तृत्वाची महान् स्फूर्ति अत्पन्न
करील. या भारत राष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ गुणसंपत्तीचे महान् प्रतीक
असलेल्या जीवनाचा श्री. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना या
पुस्तकाच्या रूपाने करून दिलेला परिचय त्यांचे जीवन
ध्येवादानें, पराक्रमाने व त्यागानें अजळावयास कारणीभूत
होवो असें मी अिच्छितों.
अक्षय्यतृतीया
२७-४-५२
बाळशास्त्री हरदास

पालकांसाठी 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचं' चरित्र लिहावं असं माझ्या मनांत जेव्हां प्रथम आलं त्यावेळी मी अिप्रजी सहावीत शिकत होतो. त्याचवेळी श्री. शि. ल. करंदीकर यांचे चरित्रकथन वाचन संपविले. पण त्या वेळी तसें चरित्र लिहिणे मला जमलं नाही व शक्यहि झालं नाही. पण सुमारे वर्षापूर्वी माझ्या मनानं पुन्हां अचल खाल्ली व मी येथील 'महाराष्ट्र ग्रंथालयांत' जाधून चरित्र लिहिण्याच्या दृष्टीनं 'सावरकांचे आत्मचरित्र' श्री. शि. ल. करंदीकरांनी लिहिलेले 'सावरकर चरित्र कथन' श्री. भट यांचे अभिनव भारत' ही व अितहि अनेक पुस्तकें अभ्यासिली. अवढ्या- वरून स्वातंत्र्यवीरांचं चरित्र बव्हंशी लिहितां येणं शक्य होतं. प्रस्तुत चरित्र लिहित असतां प्रथम ते लहान मुलांसाठी लिहावे असा विचार होता. परंतु पुढे तो अनेक मित्रांच्या सूचनमुळे बदलावा लागून थोरांनी वाचले तर त्यांनाही ते अपयुक्त वाटा व व्हावे म्हणून लिहिण्याची धाटणी थोडीबहुत बदलावी लागली; तरीही मूळ प्राधान्य मुलांना आहे हे विसरून चालणार नाही. लहान मुलांची मनं ओल्या मातीसारखी असतात. माती ओली आहे तोवरच त्याला अिष्ट तें वळण देतां येते.

बालमनाचंही असंच आहे. या वयांत त्यांची मनं कोवळी असतात. यावेळी त्यांवर जसे संस्कार करावेत तसे ते पुढे चिरकाल टिकून राहतात. किंबहुना मुलाचे मोठेपण हे त्याच्या लहानपणचे प्रतिबिंबच असते असे म्हटल्यास चुकणार नाही. मुलांच्या मनाची ही ठेवण लक्षात घेअनच पालकवर्गानं त्यांच्या सभोवतालचं वातावरण निर्मळ राखलं पाहिजे. मुलांना राजकारणाचं सोयरसुतक तें काय ? अगर यांना त्यांतलं कळणार तरी काय ? तेव्हां कोणत्याही गजकारणी पुढाऱ्याबद्दल आदर अगर अनादर या दोन्हीही गोष्टी त्यांज- पासून दूरच असतात. मात्र आपण राजकीय पुढाऱ्यांबद्दल बोलतांना ज्या भावना वरचेवर दर्शवू त्या त्यांच्या डोळ्यांवर, मनावर व कानांवर आदळत गेल्यास त्यांचीही मतं. तीच बनतात. आणि वडिलांच्या मतानं राजकारणांत जो तिरस्कृत अिसम असेल त्याविषयी आपोआपच मुलांना तिटकारा वाढू लागतो आणि पुढे तो अितका वाढतो की, दुर्दैवाने तिरस्कृत झालेल्या त्या व्यक्तीचे नांवही त्याला सहन होत नाही. त्याच्या कपाळावर आठ्या चढतात, मुखांतून शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्याच्या आयुष्याचा, त्याने केलेल्या तळमळीच्या कार्याचा तो काडीमात्र विचार करण्यास तयार होत नाही, आजची वस्तुस्थिति ही अशी आहे. आपल्या दृष्टीनं विरुद्ध असलेल्या पुढाऱ्याविषयी मुलांच्या मनांत द्वेष निर्माण करणं ही गोष्ट आपण आतां सोडली पाहिजे. अशा पुढाऱ्यांची ग्वास

मुलांसाठी लिहिलेली चरित्रं पक्षोपपक्षाचा विचार न करता
दिली पाहिजेत. त्यांची मनं आपण निर्मळ । चिकित्सक
बनविली पाहिजेत.
आणि या दृष्टीनं मी 'चरित्र' लेखनास हात घालण्याचे
धाडस केलें. आज मी सावरकर चरित्र निवडले आहे. यालाही
कारणे तशीच आहेत. लहान सहान खेड्यापाड्यांतूनही
त्यांच्याविषयी अितका गैरसमज व द्वेष पसरविला गेला आहे
की, हा गैरसमज व ही गैरप्रथा तशीच राहू दिली तर तिचे
परिणाम अनिष्ट निदान ‘भावी पिढी'वर तरी अनिष्ट खास
होतील. हे स्पष्ट दिसणारे ‘भावी अनिष्ट' नस्मासुरी परिणाम
टाळणं व राजकाराणांतील गैरसमजाच्या युक्यांत बाळपिढीला
न घुटमळवणं हे पालकवर्गाचं आद्य कर्तव्य आहे.
याच दृष्टीनं यानंतर महात्माजी, पंडितजी व सरदारजी
यांचीही चरित्रे मी लिहावयास घेणार आहे.
ही चरित्र लिहितांना ही खबरदारी अवश्य बाळगली
आहे की, प्रतिपक्षियांविषयी तिरस्कार अप्तन्न होलि असे
प्रसंग वा शब्द निवडन होतां होलि नों टाळले आहेत.
लेखक

अभिप्राय श्री. वा. गो. देशपाण्डे यांनी लिहिलेले “वीर विनायक" या शीर्षकाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र मी वाचून पाहिले. हे चरित्र सुबोध भाषेत लिहिलेले असून विद्यार्थीवर्ग व लहान मुले यांना अद्बोधक वाटेल यांत संशय नाही. वीर सावरकरविषयक बरीच पुस्तकें आजवर मराठीत प्रसिद्ध झाली आहेत, परंतु ती सर्व प्रौढ भाषेत असल्यामुळे सामान्य जनतेस समजण्यास कठीण. प्रस्तुत चरित्र सुगम असून ते सामान्य जनतेला अपयोगी पडेल असे मला वाटते. थोर लोकांची चरित्रे ही नेहमीच स्फूर्तिदायक असतात. विशेषतः ती वाचल्याने लहान मुलें व विद्यार्थी यांच्या मनावर अिष्ट तो परिणाम होतो. यास्तव सुगम भाषेत लिहिलेली थोर विभूतींची चरित्रे जितकी जास्त लिहिली जातील तितकी पाहिजेच आहेत. या दृष्टीनें पहातां श्री. देशपाण्डे यांचा हा प्रथम प्रयत्न सर्वतोपरी अभिनंदनीय म्हटला पाहिजे. व. राणे १९५२.} पुणे ४ दि. २५/१९५२. प. कृ. गोडे क्यूरेटर, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मन्दिर.

有利

No text on this page.

- मुलांनो- अके दिवशी- - संध्याकाळची जेवणं झाली आणि आम्ही ओटीवर आलो. नेह- मींच्या रिवाजाप्रमाणं लहान लहान मुलं माझ्याभोवती गोळा झाली नि म्हणू लागली, 'दादा ! गोष्ट सांग ना अखादी.' माझ्याजवळच्या गोष्टी म्हणजे रामाचा अक्षय अशा बाणांचा भाता योडाच होता. सांगून सांगून माझ्याजवळच्या गोष्टी संपल्या होत्या व मी आतां या मुलांना काय सांगावे याचा विचार करू लागलों, तोच एक गंमत आठवली. जमलेल्या मुलांपैकी प्रत्येकाला मी विचारले की, मुलांनो, आज तुम्ही घरी काय जेवलांत ? प्रभाकर म्हणाला, 'मी भात खाल्ला. ' सुमन म्हणाली, 'मी भाकरी खाल्ली.'

वीर विनायक . ? प्रत्येकानें जें जे आपण खाल्ले तें तें सांगितले. मी सहज म्हटलें, 'काय रे मुलांनो ! तुम्हांला ही भाकरी कोणी वाढली?" आजीने!' झटकन् सर्वांनी उत्तर दिले. मी म्हटले, 'भाकरी आीने वाढली, कबूल. पण ती तुम्हाला मिळाली कुणामुळं नि कशी हे माहीत आहे का ? ' मुलांना काही सांगतां आलं नाहीं; तेव्हां मोच म्हणालों, अंका तर.' 'आपला तो रंगू आहे ना? त्याचे वडील सदबा. नेहमी शेतावर जातात. असेच अनेक लोक कष्ट करतात, शेतावर जातात, सकाळ- पासून संध्याकाळपर्यंत राबतात, अन्हांत घामानं थवथवतात, मेहनत मशागत करतात, नांगरतात, पेरतात, कोळपतात. शेतक-याची कारभारीण अन्हातान्हांतून रान तुडवीत येते. घरधन्याला चटणी- भाकर देते. शेतकऱ्यांची गुडघ्याओवढी पोरंही त्याला कामांत थोडाफार हातभार लावतात. पिकाला खत घालतात. पास पडतांच जमीन हिरवी हिरवी होते. हळू हळू पिकं मोठी होतात; तरी भांगलणं कोळ- पणं वगेरे शेतकऱ्यांची मेहनत चालूच असते. मग पिकांना कणर्स येतात. कणसांत दाणे भरतात. योग्य वेळ येतांच शेतकरी ती पिकं कापतात. कणसं खुडतात. शेतांतच खळं करतात, खळ्यांतून बैल व रूळ फिरवतात आणि दाणे विलग होतात, कणसं, पिश्या विलग होतात. मळणीनंतर शेतकरी व त्याची बायको, लहान लहान पारं देखील उफणूं लागतात. मोत्यासारखे ते टपोरे दाणे !'

मुलांनो
१०
.
'आणि अिकडे आपले बाबा, दादा, सारे कामाला जातात.
संध्याकाळी येतात. तेही सर्व दिवसभर कष्ट करतात. पैसे आणतात
आणि त्याचे धान्य घेथून घरी आीजवळ देतात.'
'मग आी काय करते? बाबांच्या गैरहजेरीत आपले सर्व काम
आटोपून ती ते नीट पांखडते, दळते. दळून दळून तिच्या हाताला
फोड देखील येतात. मग आजी आपल्याला भाकरी करून देते.
आणि तेव्हां करें आपल्याला भाकरी खायला मिळते.'
'बरंच कां रे दादा ? ' मध्येच मुलं म्हणाली, 'तर मग सारीच
माणसं आपल्याला भाकरी देतात म्हणायचं. आपल्यासाठी अितके
लोक राबतात का?'
'हो तर! पण कुणी कुणा अकट्यासाठी नाही राबत. सारीच
साऱ्यांसाठी राबतात.'
'अगदी तसंच आहे पहा आपल्या भारताचं. आज आपला देश
स्वतंत्र झाला आहे. आपले प्रधान नेहरू आहेत. त्यांच्याच हातांत
आपल्या देशाची सारी सूत्रं आहेत. पूर्वी आपले सूत्रधार अिंग्रज असत.
यावेळी आपण लिहावं काय, वाचावं काय, याचं देखील
स्वातंत्र्य नव्हतं.'
' पण आजपर्यंत अनेक वीर पुत्रांनी आपल्या सुखी संसाराचं
अजाड वाळवंट केलं. रक्ताचं पाणी केलं व स्वातंत्र्याला पाजलं. मांसाचं
रक्त केलं नि ते या वृक्षाच्या मुळाशी घातलं. ते या पिकाच्या
मुळाशी ओतलं.'

२० वीर विनायक ' अशा त-हेनं आपल्याच भाबंदांच्या रक्तामांसावर पुष्ट झालेली स्वातंत्र्याची भाकरी म. गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाी पटेल यांनी आपल्या पानांत वाढलो आणि आज आपण ती मोठ्या आनंदाने मिटक्या मारून खात आहो.' 'पण ती भाकरी खात असतां आपल्या श्रमिकांची, की ज्यांनी कष्ट करून ही भाकरी बनविली त्यांची आठवण नको कां ठेवायला ? ' आणि तशी जर आपण ठेवली नाही तर आपण कृतघ्न नाहीं कां ठरणार? केलेले अपकार आपण जाणत नाही असंच नाहीं कां होणार?' ' म्हणूनच आज मी तुम्हाला अक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट खूप मोठी आहे. ती गम्मत सांगण्यास बरेच दिवस लागतील. रोज रात्री याच वेळी मी ती गोष्ट सांगत जाीन. मी ज्याची गोष्ट सांगणार आहे ना, त्यानं जन्मभर आपल्या रक्ताचं पाणी आपल्या स्वातंत्र्याच्या मुळाशी ओतलं आहे. 'त्याचं नांव- विनायक दामोदर सावरकर.'

- मूळवृत्तान्त व बालपण सामान्य गोष्टीच्या संबंधांत सावरकरांचे बालपण, तरुणपण, ग्रौढपण ही सर्व अितर चार लोकांसारखींच ठरतात. कारण सावरकर झाले तरी मनुष्यस्वभावाला पुष्कळ गोष्टींत सामान्यच आहेत. पण मनुष्याचे सामान्यत्व किंवा असामान्यत्व हे अशा गोष्टींवरून न ठरवितां, कांहीं अितर विशेष गोष्टींवरून ठरवावें लागते. अशा गोष्टी थोड्या पण त्याच महत्त्वाच्या असतात. बालपणीच झालेली काव्यस्फूर्ति व काव्यशक्ति या गोष्टी सावरकरांमध्ये असामान्य कोटीपंकी होत्या. अत्कट देशभक्ति आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाची निर्भय घोषणा करण्याचे धैर्य हा सावरकरांच्या अल्पवयांतलाच गुणविशेष ठरतो. - साहित्यसम्राट केळकर. प्रस्तावना ( सावरकर चरित्र ) २२ वीर विनायक چ कोंकणच तें! डोंगराळ आणि मागासलेला, पावसाळी आणि अकलकोंडा प्रदेश ! तेथें अर्जितावस्था ती कसची होणार ? नशीब काढावयाचंच असेल तर या खडकाळ, अतराळ कोंकणी प्रदेशाचा त्याग करून जवळच असलेल्या देशावर जासून काढले पाहिजे, पूर्ण पटल्याने अनेक कोंकणी कुटुंबे देशावर आली. सावरकर कुटुंब हेही त्यांतलेच अक होय. पर्वी पेशवाच्या काळांत सावरकर-कुटुंबें चिपळूण तालुक्यांतून गुहागर पेट्यांतून देशावर आले. तेथे त्यांना भगरजवळील राहुरी हे गांव अिनाम मिळाले. तेथेच त्यांनी वस्ती केली. पेशवाओंत त्यांनी चांगलाच विश्वास कमाविला होता. शेवटच्या लढाींत दुस-या बाजीरावाने आपले कुटुंब विश्वासानं सावरकरांच्या स्वाधीन केले होते. या बाजीरावसाहेबांची पळपुटी धूळही सावरकरांच्या या भर गांवी लागली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आवडीची हर- भन्याची खमंग असळ खाल्ली होती. संस्कृत विद्येच्या सन्मानार्थ त्यांच्या- पैकी अका पूर्वजाला पालखीचा मानही पेशव्यांकडून मिळाला होता. सावरकर नांव कां पडले?- सावरकरांच्या घराण्यास सावरकर हे नांव कां पडले ? कांहीं म्हणा. माणसाची बुद्धि आडनांवांचे संशोधन करण्यास नेहमीच धड- पडत असते. आणि काहीतरी ठोकताळा आख्यायिकांच्या रूपाने बसवून आपलें समाधान करीत असते. रत्नागिरी जिल्ह्यांत गहागर पेट्यांत पालशेत नांवाचे अक गांव आहे. त्या गांवाशेजारी सांवरवाडी आहे. या सांवरवाडींत सांवरीची मूलवृत्तांत व बालपण २३ - म्हणजे कापसाची झाडे आहेत. यामुळेच त्या वाडीला तसें नांव पडले. सावरकर मुळचे येथलेच. म्हणून सांवरवाडींतील ते सांवरकर असें त्यांच्या घराण्यास नांव पडले. भगूर गांव- सावरकरांचे भगूर गांव पेशवाओंत श्रीमंतांचे आवडतें स्थान होते. तेथील पाणी उत्तम असे. गावाबाहेर अक पडकी वेस, महादेवाचे जुनें देअळ असा त्या गांवचा बाहेरील थाट होता. तेथे खंडोबाची भव्य मूर्ति असून जवळ असलेल्या मटांत पारिजातकाचे झाड डौलाने डुलत असे व सकाळी शुभ्र फुलांचा सडा पसरीत असे. गांवाजवळूनच दारणा नदीचे शांत व स्वच्छ पाणी झुळझुळ वहात असे. याच गांवांत सावरकरांचे हरभट नांवाचे कोणीतरी पूर्वज येअन राहिले होते. आी, वडील दामोदरपत हे सावरकरांच्या वडिलांचं नांव. दामोदरपंतांना महादेवराव नांवाचे थोरले भाभू होते. त्यांना बापूकाकाही म्हणत. दामोदरपंतांचे वडील त्यांचे लहानपणीच वारल्यामुळे बापूकाकांवरच संसाराचा भार पडला. बापूकाकांनीच त्यांचं सर्व लहानपण व शिक्षण केले होते. त्यांचे लग्नही बापूकाकांनीच करून दिले होते. असे जरी होते तरी नियमाला धरून पुढे ग दोघांत भाअबंदकी बरीच माजली. अितकी की, पुढे हे प्रकरण शब्दावरून गुद्यांवरही येअं लागलें. दामोदरपंतांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांचा स्वभाव मानी, संकोची पण रागीट होता. तसेंच ते मोठे धार्मिक, शिस्तप्रीय व कडक टापटिपीचे होते.

धीर विनायक दामोदरपंतांच्या पत्नी म्हणजे सावरकरबंधूंच्या आश्री राधाबाी याही सालस, साध्या, देवभोळ्या, वत्सल, संसारदक्ष, पतीशी समरस होणाऱ्या आणि आनन्दी होत्या. त्यांना फळांफुलांची आवड फार असे. तीच आवड व तेच स्वभावविशेष पुढे त्यांच्या मुलांत अतरले असल्यास नवल कसले ? 'जन्म वबालपण- राधाबाओंना प्रथम दोन मुले झाली, परंतु ती जगली नाहीत. तिसऱ्या खेपेस झालेलें मूलही जगेल की नाही याची त्यांना शंकाच वाटे. पण देवाने कृपा केली व पुढची चार मुलें वांचली; अवढंच नव्हे तर जगांत आपलं नाव कमावून खऱ्या अर्थानं जगली. दामोदरपंतांचं हे तिसरं अपत्य म्हणजे गणेशपंत. गणेशपंतांच्या म्हणजे बाबांच्या पाठीवर विनायक. विनायकाच्या म्हणजेच तात्याच्या 'पाठीवर ओक मुलगी मैना आणि तिच्या पाठीवर नारायण अशी पुत्ररत्ने या जगांत नव्यान अवतरली. दामोदरपंतांना नारायणाच्या पाठीवरचे शेवटचे अपत्यही लाभलं नाही. २८ मे १८८३ साली राधाबाओंच्या पोटी विनायकानें जन्म घेतला. त्याचा जन्म भगर येथेच झाला. विशेष योगायोग असा की, १८८३ सालांतच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत अडन येथील तुरुंगांत मरण पावले. या वासुदेव बळवंतांनी आपला देश स्वतंत्र करण्या- साठी पुष्कळच हाल अपेष्टा सोसल्या होत्या आणि शेवटी त्यांना मरणही तुरुंगांत आले होते. त्यांची प्राणज्योत निमाली; पण तीच जणू विनायकाच्या शरिरांत शिरली आणि त्यामुळेच की काय विनायकानंही मूळवृत्तांत व बालपण २५ 'पुढे मोठमोठ्या धाडसी व कष्टप्रद चळवळी केल्या नि शत्रुला दे माय धरणी ठाय' करून सोडलं. बालपण विनायकाचें सारें बालपण भगरांतच गेले. आजी तुळसीची पूजा करीत असतां तिच्याजवळ बसावं, ती म्हणत असलेली सप्तपदी लक्ष देशून अकावी आणि आीने दिलेला दुधाचा प्रसाद गट्ट करून टाकावा हा त्याचा नित्यक्रमच होअन वमला होता. पुढे जसें त्याला वाचायला येअं लागले त्यावेळी घरांत सांपडतील त्या जुन्या पोथ्या तो वाचूं लागला. आपणही तशा काही लिहाव्या असं त्याला वाटू लागलं. चार बरोबरीची पोरं गोळा करावी, जवळच असलेल्या अंबरात जावं, मनसोक्त धुडगूस घालावा अशा आनंदांत त्याचं बालपण निघून चाललं होतं. शाळेत- विनायकाचं बालपण वाढत चाललं तसं त्यान शाळेत जाणं आवश्यक भासू लागलं. तो शाळेत जाश्रू लागला. शाळेत गुरुजी जे शिकवीत तें तो मन लावून शिके. त्यांत कधीं तो चुकारपणा करीत नसे. शाळेत होणाऱ्या विषयांकडं त्याचं बारीक लक्ष असल्यानं अरवी शाळेच्या बाहेर त्याला अभ्यास करावा लागत नसे. मग अरवीचा वेळ हुदड्या घालण्यास सहजच सांपडे. पण तो केवळ हुदड्याच घाली असें नाहीं. त्याही काळांत आपण काहीतरी नवी विद्या शिकावी असं त्याला मनापासून वाटे.

२६ वीर विनायक या वयांतच तो घोड्यावर बसायलाहि शिकला. पेशवाीपासून चालत आलेली तलवार घरी होतीच. तलवारीचे त्याने शिक्षण घेतले.. रामलक्ष्मणांच्या कथा त्यानं अकल्या होत्याच. आपणही तसंच धनुष्ट- बाण मारायला शिकावं असं त्याला वाटायला लागलं. त्यानं तीही विद्या आत्मसात करून सोडली. बाबा-तात्यांची धनुर्विद्या अकदां बाबा तरवारीचे वार खेळत होते आणि विनायक ते सफा- ओने चुकवून बाण सोडीत होता. बाण सोडला असं बाबांना भास. वावं आणि वाण तसाच धनुष्याला ठेवावा असं त्यानं तीन चार वेळां तरी केलं. बाबाला वाटलं विनायक कांहीं बाण सोडीत नाही. म्हणून तो कांहीसा बेसावध राहिला. विनायकानं हीच संधि साधली नि आपल्या धनुष्याचा बाण सोडून दिला. बाणच तो ! आपलं करायचं काम त्यानं फत्ते केलं. बाबांचा हात रक्ताळला. असा त्याचा खेळ असतांच त्यानं आपली शरीर-प्रकृती कमावण्याकडंही भरपूर लक्ष पुरविलं. लहानपणापासूनच त्यानं शरि- राची योग्य ती काळजी घेतल्यामुळं पुढं त्याला मोठेपणी अंदमानांतल्या यमयातना सहन करतां आल्या. अवढंच नव्हे तर प्रत्यक्ष यमराजाशी शालेल्या झुंजींतूनही तो शीरसलामत सुटू शकला. आश्री विना भिका असे दिवसामागून दिवस चालले होते. मुल आीच्या मायेखाली वाढू लागली होती. पण कठोर देवाला हे पहावले नाही. त्यानं चालू मूळवृत्तांत व बालपण २७ आजीच्या मायेचं हे आवरण निष्ठरपणे छिनावून घेतलं आणि ती मुलं अघडया जगांत आजीविना कुडकुडत पडली. आी गेली. विनायकाची आजी कॉलन्याला बळी पडली. विना यक व त्याची लहानथोर भावंडं भिकारी बनली. म्हणतात ना, ' स्वामी तिन्ही जगाचा आीविना भिकारी' यावेळी त्याचं वय फार तर ना वर्षाचं होतं. धाकटा भाग नारायण तर अवघा चारच वर्षाचा होता. वडीलच आधी झाले आी गेली म्हणून विनायकाच्या वडिलांनी आपल्या मुलांची आबाळ होशू दिली नाही. दुसरं लग्न होणं शक्य असूनही त्यांनी ते केलं नाही. कारण त्यांना दिसत होतं, दुस-या लग्नानंतर मुलांची पोटाची भूक भागेल पण मनाची नाही भागणार. मानवी मनाचा थांम मुळींच लागत नाही. भीष्मप्रतिज्ञा करूनही दुसऱ्या पत्नीच्या सह- वासांत या मुलांकडं दुर्लक्ष होणं अगदीच अशक्य नाही. म्हणूनच ते मुलांची आओ बनले. त्यांनी मुलांना भरविलें. आीच्या प्रेमानं वाढविलं आणि बापाच्या कर्तव्यानं शिकविलं. येसू वहिनी- विनायकाच्या वडिलांनी मुलांचं सं संगोपन आओप्रमाणेच केले. त्यांतच त्यास विनायकाच्या वहिनीची जोड मिळाली. आजी गेल्या- नंतर १-२ वर्षांतच बाबांचं लग्न झालं ६ घरात 'येसू घहिनी मोकळ्या मनानं वावरू लागली.

गति
सौ. येसू वहिनी
आपल्या प्रखर पातिव्रत्याने 'सती साध्वी,' मानाचे स्थान कायमचें
मिळविणारी, लहान वयांतच पति व मुलाप्रमाणे जतन केलेले
विनायकभावोजी, अंदमानांत खडी फोडणे, चकी पिसणे, तेल
काढणे असल्या यमयातना राष्ट्रासाठी सोशीत असतो,
विरहाश्रंनी ओली झालेली आपली दिव्य नजर
अंदमानाकडे लावून पति भेटीची आतुरतेने वाट
पहात धाकटा दीर विनायक व पति यांचे
मातृप्रेमाने संगोपनाचे कर्तव्य बजावणारी;
पण दीर्घद्वेषी सरकारच्या दुष्प्रवृत्तीमुळे
पतिविरहातच अंत पावलेली त्यागी,
कर्तव्यनिष्ट वीर महिला,
वाबारावांची पत्नी.

मूळवृत्तांत व बालपण २९ विनायकची ही वहिनी स्वभावाने फार मायाळू होती. त्या घरांत आल्यानंतर तिनं त्या भावडांना आीची अणीव मुळीसुद्धा भासू दिली नाही. त्यांतल्या त्यांत तिचा विनायकावर भारी जीव. बाळ व व माजी तिच्याहून लहान पडत. बाबा तर नवरदेवच. मगः राहतां राहिला विनायक. तोच तेवढा तिच्याबरोबरीचा. विनायकही वहिनीशी मिसळून वागायचा. तो तिच्या खोड्या फार करी. नाना पक्षांचे नाना आवाज काढून तो साऱ्यांना स्तिमित करी. थोरांच्या हुबेहूब नकला पाहून हसता हसतां मुरकुंडी वळवे. त्याच्या अंगी असलेल्या धर्य, बोलकेपणा, चौकसपणा व लाघवीपणा या गणांनी त्याने आपल्या वहिनीवर चांगलीच छाप पाडली होती. विनायकाच्या या वहिनीला लिहायवाचायला काही येत नव्हते. विनायकला वाीट वाटले. त्याने बहिनीला आणि आपल्या लहानग्या वहिणीला लिहायवाचायला शिकविले. लवकरच वहिनीची लिहिण्या- वाचण्यांत चांगलीच प्रगति झाली. अितकी को, पुढे बाबा आणि विनायक अंदमानांत तुरुंगांत असतांना त्यांच्या आठवणी तिने लिहून ठेवल्या. त्या अगदी साध्या, सुटसुटीत व मधुर शब्दांत लिहिलेल्या आहेत. कोणी अखाद्या विद्वान विदुपीनेच त्या लिहून ठेवल्या नाहीत ना असे वाटल्यावांचून राहत नाही. विनायकाच्या वहिनीचं विनायकाशी केवळ वाहिनीचंच नातं नहतं, अगर बाबांशी बाबांच्या पत्नीचंच नव्हते तर त्यांच्या कार्या.. तील विश्वासु मित्राचं, कर्तव्यदक्ष गुरुचंही होतं. जेव्हा हे दोघे बंधू कारागारांत अडकले तेव्हां तिने अनेक महत्त्वाच्या गोष्टी बिनबोभाट ३० वीर विनायक पार पाडल्या, म्हणून तेवढ्यावरच विझल्या नाहीतर आणखी केवढा हाहा:कार अडाला असतां तें कल्पनेनं वर्णन करता येणार नाही. विनायक वाचे काय? विनायकाच्या बालपणीं गांवांत केसरी, गुराखी, जगहितेच्छु अशी वर्तमानपत्रं येत. दामोदरपंत त्याच्याकडून केसरी वाचून घेत. पुढे पुढे विनायकाला वाचनाची चांगलीच गोडी लागली. तो स्वत: वाची. बरोबरीच्या सवंगड्यांना वाचून दाखवी. पेशव्यांची बखर, निबंधमाला अशी मोठी मोठी पुस्तकेंही तो मनापासून वाची आणि स्वतः कांहीं चटके, काही कविता करी. लहानपणापासूनच त्याच्या मनांत अशी ब्रिटिशांविरुद्ध देष पसर- विणारी, चीड व आवेश उत्पन्न करणारी वर्तमानपत्रे येत असल्याने तेवढ्याशा चिमुकल्या वयांतही त्याच्या मनांत अिंग्रजांविषयीं तिरस्कार व द्वेष भरून राहिला. त्याला वाटू लागलं या परकी लोकांना हाकलून लावलं पाहिजे आणि त्यासाठी आपण स्वत: काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचा स्वभावही संघटनाप्रीय. गांवांतीलच राणू शिंप्याची मुलं राजा आणि परशु, गोपाळ कुलकर्णी, आठवल्यांचा वासू ही आणि अितर काही मंडळी त्याच्या कच्छपी लागली. विनायकासारख्या हुपार तल्लख नि देशीय मुलांचा त्याच्या सवंगड्यावर परिणाम काय होी ते त्यानेच आपल्या आत्मचरित्रांत लिहिले आहे ते पाहणे चांगलें. तो लिहितो-- " माझ्या वाचनाचा, संगतीचा, राजकीय आकांक्षांचा, राजकीय खेळांचा, अत्सवांचा या सर्व मंडळींवर चिरस्थायी परिणाम होइन ३१ ~~~~~ मूवृत्तांत व बालपण तद्भावी तशा खेडवळ स्थितींत जो होणे दुर्घट होते, असा त्यांच्या बुद्धीचा आणि शक्तीचा त्या त्या प्रमाणांत विकास झाल्यामुळे पुढच्या अभिनव भारताच्या प्रचंड चळवळींत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपला लहानमोठा भाग अचलण्याची त्यांच्या मनांत पूर्ण सिद्धता तेव्हां- पासूनच होत गेली." 4 नाशीकला- विनायकाच्या मराठी पांच ीयत्ता पुन्या झाल्या. त्याला बारावे सरून तेरावें वर्ष लागले. आणि अिंग्रजी शिकावयाला तो नाशिकला गेला. नाशिकला येण्यापूर्वीच त्याने घरी स्वत:च्या हिमतीनेच अिंग्रजी दोन अियत्तांचा अभ्यास केला होता. नाशिकला जातांच तो शिवाजी. स्कूलमध्ये तिसरीत बसला व चार महिन्यांनी चौथीत बसला. संस्कारानंतर- विनायक भगूरला असतानांच केसरीसारखी वर्तमानपत्रं वाचून राष्ट्रीय विचारानं भारला होता. तशांतच राष्ट्रीय वृत्तीच्या देशभक्तांनी चालविलेल्या शाळेतच त्यानं आपलं नांव घातलं. साहजीकच त्याचे राजकीय विचार व ध्येयें पक्क होत चालली. मुळांतच सोने तशांतच अग्नीचा सहवास. मग काय, बावनकशीच ठरायचं! नाशीकला विनायक आला तरी त्याचा मळ स्वभाव कांहीं बद- लला नव्हता. त्याची भाषा मोठी मिठास, चेहरा सुंदर, नाजूक, ठसठसीत आणि सहज छाप पाडणारा त्यामुळे येथेही त्याला बरीच मित्रमंडळी भेटली. विनायक शाळेंत आल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांत त्याच्या संस्काराने अक निराळीच प्रथा निर्माण झाली. - ३२ वारविनायक यापूर्वीचे विद्यार्थी चैनी व टवाळखोर आणि अथळ अभ्यासाचे असत. त्याने येतांच ती परंपरा मोडून काढली नि विद्यार्थ्यांत राष्ट्रा- विषयी प्रेम अत्पन्न करणं, चार चौघांनी अकत्र जमणं, गुप्त खलबतं करणं ही नवीन परंपरा विद्यार्थ्यात निर्माण केली. स्वातंत्र्य शाहीर कवि गोविन्द विनायकाने नाशिकांत आपल्याभोवती जे मित्रगण गोळा केले होते त्यांत गोविन्द दरेकर हा एक मराठा तरुण प्रमुख होता. त्याची व विनायकाची ओळख होण्यापूर्वी रंगेल व छचोर मित्रांत मिसळायं व लावण्यादि पाचकळ काव्य लिहाव वा गावं असा त्याचा कार्यक्रम होता. पण विनायकाच्या सहवासांत त्याच्यांत अक विलक्षण क्रांति झाली. तमाशीथाटाचं वाङ्मय लिहायचं त्यानं सोडून दिलं व देशप्रेमानं ओथंबलेलं काव्य तो लिहू लागला. वक्तृत्ववीर विनायक- नाशीकला असतांना विनायकानं अनेक चढाओढीत भाग घेतला. त्याने अभ्यासाने वक्तृत्वकला संपादिली होती. त्याच्या भाषणांत वयाच्या मानाने फारच भारदस्तपणा, विचारांची परिप्लुप्तता, भाषा- माधुर्य असे. त्यामुळे परीक्षकांना वाटे, हे व्याख्यान त्याचे स्वत:चे नसावें. त्याने ते पाठ केले असावें. आणि तसे ते बोलनही दाखवीत व वक्षीस देण्यास खळखळ करीत. मानी विनायकाला हे मुळीच सहन होत नसे. अनेक अध्यक्षांशी त्याची यामुळे चकमक अडे. येथे असतांनाच त्याने काही मित्रांच्या सहाय्याने राष्ट्रभक्तसमूह ही संस्था स्थापन केली. या संस्थेत राष्ट्रावरील प्रेमाने भारलेले, सुखाचा, AN मूळवृत्तांत व बालपण अवढेच नव्हे तर सर्वस्वाचा होम करण्यास सिद्ध असलेले, पडेल तेव्हां व पडेल ते काम करावयास तयार असलेले साहसी व धोरणी सभासदच फार. त्यांच्या रात्रीच्यारात्री दरेकरच्या घरी गप्पा मारण्यांत, कारस्थानं करण्यांत जात असत. लवकरच त्यांच्या मित्रमंडळींची संख्या वाढली. व त्याला त्याने ' मित्रमेळा' हे नांव दिले. या मेळ्यातर्फे पुण्यास गणेशोत्सवांत व शिवोत्सवांत कार्यक्रम होत. निरनिराळी पदें, स्वदे- शीचा फटका, चाफेकरांचा पोवाडा, बाजी, तानाजी यांचा पोवाडा खड्या सुरांत म्हणत व सारे पुणे मोहीत करत. घडीलही गेले- या व अशा दुय्यम शाळेतील गोष्टी चालू होत्या. विनायक आपले सारे अद्योग व अलाढाली संभाळून अकेक ीयत्ता ओलांडीत होता. सर्व वर्षभर अितर अलाढाली कराव्या आणि परीक्षेच्या आधी मात्र सतत जागून अभ्यास करावा व पास व्हावं आणि तेही चांगल्या रीतीनं हें फक्त विनायकालाच साधे. तो कुठल्याही श्रीयत्तेत नापास झाला नाही. विनायक व त्याचा थोरला भाभू बाबा यांचे शालेय जीवन व्यव. स्थित चालू होते. पण त्यांची आी गेल्यापासून त्यांच्यामागें दारिद्रय नि संकट हात धुवून पाठीशी लांगली होती. सुमारे १८९९ च्या सप्टेंबरमध्ये भगूर गांवीं प्लेगनें कहर अडवून दिला. प्लेग प्रतिबंधक सरकारी अपाय फारच जालीम असल्याने लोकांची झुंदीर पडत असले तरी ते गुप्त ठेवण्याकडे प्रवृत्ती वळली होती. त्यामुळे तर प्लेगचे स्वरूप M+Henr .

वीर विनायक भयंकरच झाले होते. याच साथींत दामोदरपंत प्लेगनें पछाडले व शेवटी त्याच महिन्याच्या ९ तारखेस त्यांचे देहावसान झाले. पण केवळ वडिलांचा बळी घेअनच प्लेगचे समाधान झाले नाही. त्यांचे चुलते बापूकाकांनाही त्याने अचुकपणे अचलले. लहानग्या बाळालाही प्लेगनें पछाडले. घरी वडील माणूस कोणीच नाही. हीच अवढी ४ कच्चीबच्ची. जवळ राहाण्यास कोणी नाही, स्मशान- भूमीत भोंवती जळणाऱ्या प्रेतांच्या प्रकाशांत तेथील पडक्या देवा- लयांत वास्तव्य. वडील भावजय सौ. येसूबाजी व तें बंधुद्वय आपल्या आसन्नमरण धाकट्या लाडक्या भावाची अशा बिकट परिस्थितीत शश्रुपा करीत आहेत व जवळच अक अिमानी कुत्रे त्या भयंकर काळ रात्री त्यांचे सोबतीस आहे, अशा स्थितीत तेथे राहणे धोक्याचं बनलं म्हणून ती भावंडं नाशीकला आली. बाळ तापानं फणफणलेला. त्याची अवस्था फारच बिकट झालेली, साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यांत आलं व त्याच्या सेवेस स्वतः बावा तेथे राहिले. बाबांच्या सेवेनें देवाला दया आली व बाळला बरे वाटूं लागले. पण बाबाच त्या रोगाने आजारी पडले; तरी पुढे त्यांनाही बरे वाटू लागले. दैवाने खैरच केली म्हणायची. - यावेळी अिकडे प्लेगच्या वणव्यांत सावरकरांची लहान लहान मुलं होर- पळून निघत आहेत तो तिकडं भगूरला काय झालं ?

मूळवृत्तांत व बालपण ३५ त्यांच्या घरांतून राधाबाींच्या मृत्यूपासूनच लक्ष्मीने काढता पाय घेतला होता. पण प्लेगच्या संहारांत सावरकर कुटुंबाची वाताहात झाली हे पाहून त्यांच्या घरांतील सर्व चीजवस्तु लंबा झाली. भांडीकुंडी, कागदपत्र सारेच गडप झाले. एवढेच नव्हे तर पुढे जेव्हां बाबा घरची व्यवस्था पहावयास आले त्यावेळेस त्यांच्या भोळेपणाचा व भाबडेपणाचा फायदा घेथून काहींनी त्यांजकडून पैसेही अकळले आणि तेलही गेले तूपही गेले, हाती धुपाटणे म्हणजे दारिद्य मात्र राहिले. त्यामुळे बाबांना दुष्काळी कामावर नोकरीही धरावी लागली. घरी खायला काही नसावयाचेंच.आवश्यक वस्तुसुद्धा लाभावयाच्या नाहीत. तरीसुद्धां विनायकास याची थोडीसुद्धां झळ पोचूं नये म्हणून बाबा पति-पत्नि फार जपत असत. प्रसंगी स्वत:च्या पोटास चिमटाही घेत. पण शक्यतों विनायकास कळू देत नसत. पण अखादेवेळेस हे जिंग बाहेर पडेच. मग बाबा येसूवहिनीवर संतापत; पण ती तरी काय करील विचारी ? वस्तू तर आवश्यक असावयाची आणि प्रतिकूल परिस्थितिमुळे बाबांना ती वेळेवर आणून देतां यावयाची नाही. मग विनायकाने विचारल्यास त्याला काय बरें सांगावयाचें ? चाफेकर बंधू- अशी अकंदर स्थिति होती; तरी जगाच्या अितर धामधुमी चालच होत्या. अिकडे प्लेगनें लोक चिलटासारखे मरून पडत होते. भुकेनें तडफडत होते. तशांतच हिंदुस्थानच्या राज्ञीपणाचा शिक्का बसलेल्या व्हिक्टोरिया राणीचा हिरकमहोत्सव साजरा करण्याची सरकारी आज्ञा सुटली. ?

धीर विनायक याचवेळी सुशिक्षितांवर व वर्तमानपत्रांवर अनेक जाचक बंधनं घातली होती. याची विलक्षण चीड येथून पुण्यास गणेशखिंडीच्या रस्त्यावर दामोदरपंत व बाळकृष्णपंत चाफेकरांनी रँड व ऑयट या दोन गोऱ्या साहेबांचा २२-६-१८९७ रोजी खून केला. पुढे लवकरच ते सांपडले. या खटल्याशी टिळकांचा बादरायण संबंध जोडून त्यांच्यावर सरकारने राजद्रोहाचा खटला भरला. नातूबंधूंना तुरुंगांत टाकले. खटला चालू झाला. लोकमान्यांची गीता हातीं धरून चाफेकर फांशी गेले. याचवेळी आणखी अक विशेष गोष्ट झाली आणि ती ही की, ज्या द्रवीडबधूंनी हा कट फोडला त्यांचाही मागे राहिलेल्या चाफेकर, रान- ड्यांनी खून करून भावी फितुरांस दहशत बसविली. पुढे त्यांना तुरुंगांत ढकलले. तेथेही फौजदाराच्या अर्मट अत्तरांनी चिडून त्यावर व ब्रुीनवर पिस्तुल झाडलें व अखेर चाफेकर, रानडे, साठये ही त्रयी फांसावर लटकली. अशा या घटना विनायकाच्या भोवती घडत होत्या. देशांत ब्रिटिश सरकारने माजविलेला अत्याचार, चाफेकर बंधूंसारखे धडाडीचे देशवीर, त्यांचे ते हृदयास भिडणारे, काळजास हात घालणारे जबाब, नवे नवे निबंध घालून दडपू पाहणारे हुकूम यांनी त्याच्या बालमनावर विलक्षण परिणाम झाला आणि त्या भरात त्याने ठरविलें की- ' स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन चाफेकर फांसावर चढले. त्यांच्या प्राणज्योतीने जातां जातां चेतविलेली शत्रुजयवृत्ती, मूळवृत्तांत व बालपण ३७ यज्ञकुंडात समिधेमागून समिधा टाकून अशीच भडकावीत नेणे असेल तर त्याचे दायित्त्व आपल्यावरही पडत आहे.' विनायक-चतुर्भुज झाला चाफेकरांच्या प्राणज्योतीने विझतां विझतां विनायकाची देशप्रेमाची ज्योत पेटवून दिली. देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतु अभारून मारतां मारतां मरेतो झुंजण्याची ' त्याने प्रतिज्ञा केली; तरी त्याचे शिक्षण थांबलें नाहीं. १९०१ साली तो मॅटिक अत्तीर्ण झाला. त्याने स्थापन केलेल्या मित्रमेळा, अभिनव भारत या संघटना बाळसे धरूं लागल्या. विनायक मॅट्रिक झाला त्याच साली जव्हारचे कारभारी भासाहेब चिपळूणकर यांच्या · यमूताजी' नावाच्या मुलीशीं त्याचा विवाह झाला आणि त्यांच्या सहाय्याने कॉलेजला जाण्याच्या दृष्टीने त्याचे घरी, मित्रमंडळींत वारे वाहू लागले.

फर्ग्युसन कॉलेजांत - नाशीक जिल्ह्याच्या मर्यादित क्षेत्रांतच आपण आजवर कार्य करीत होतो, परंतु आपल्या मित्रमेळ्याची अच्च तत्त्वें महा- राष्ट्रातील तरुणांच्या मनावर बिंबवण्याकरितां मी पुण्यास फर्ग्युसन कॉलेजमध्ये जात आहे. पुण्याच्या कॉलेजमध्ये महा- राष्ट्रांतील निवडक बुद्धिमान नवयुवकांची मनें जर मी आपल्या ध्येयाने भारू शकलो, तर ते जेव्हां आपापल्या जिल्ह्यांत व शहरोशहरांत जातील, तेव्हां या ध्येयाची ज्वाला घेअनच ते अवधा महाराष्ट्र चेतवू शकतील, यामुळे सर्व महाराष्ट्रास अल्पावधीत मी अिष्ट तें वळण लावू शकेन. या माझ्या आकांक्षा मी पूर्ण करण्याचा कसून प्रयत्न करीन. त्यांच्या या चळवळीकडं प्रथमवर्षी अध्यापकवर्ग संशय दृष्टीने पाहूं लागला, दुसऱ्या वर्षी त्याच्या हृदयांत या आंदो- लनामुळे भय निर्माण झाले; तृतीय वर्षी भयाचे स्थान द्वेषाने फ,सन कॉलेजांत . पटकावलें व चवथे वर्षी तर त्यांच्या द्वेषाग्नीस क्रोधाचे अिंधन मिळाल्यामुळे, अध्यापकांच्या रागाच्या होळींत सावरकर संघाचे विद्यार्थी भरमसात होतात की काय अशीच जणो पाळी आली. - श्री. भोपेकृत 'सावरकर जीवन चरित्र' कॉलेजांत प्रवेश करण्यापूर्वीच विनायकाचे ध्येय निश्चित झालें होते. 'देशस्वातंत्र्य हे त्याच्या जीवनाचे ध्येय व सशस्त्र क्रान्ति हा त्याचा ध्येयप्राप्तीचा मार्ग' ठरला होता. त्यामुळे कॉलेज प्रवेशानंतर त्याच्यांत नवीन असा बदल होण्याचं कारण नव्हतं. अलट त्याने अंगिकारलेल्या कार्यात त्याला नवीन रक्ताचे व आपल्या ध्येयास जुळणारे सहकारी हवे असल्याने तो त्या दृष्टीने कॉलेजमध्ये वावरूं लागला व तरुणांची देशभक्तिप्रीय व त्यागप्रीय संघटना उभारण्याच्या कामी त्याला भरपूर यश आले. कॉलेज शिक्षणास पुण्यास येतांच विनायकाची कार्याची चक्रं जोरांत चालू झाली. लो. टिळक व शिवरामपंत परांजपे यांजकडे त्याचे येणे जाणे सुरू झाले. लो. टिळक तरुणांस सबुरीचा व सावधगिरीचा अिषारा देत; पण त्यांचा उत्साह स्वं देत नसत. परांजपे अशा क्रांतिप्रवण तरुणांस अत्तेजनच देत. परांजप्यांच्या मुलाशी-कृष्ण- रावाशी त्याची गाढ मैत्री जडली. कॉलेजमध्ये असतांना विनायकानें जर डोळे दिपविणारे कोणतें कार्य केले असेल तर परदेशी कपड्यांची होळी करण्याचे. या होळीस टिळकांचा, परांजप्यांचा भरपूर पाठिंबा होता. अवढेच नव्हे तर ते वीर विनायक त्यांत अघड अघड सामीलही होते. अका छकड्यांत त्यांनी विदेशी कपडे भरले. त्यांवर गुलाल अधळला. वाजत गाजत ही विदेशी कपड्यांची प्रेतयात्रा मंडीपासून निघाली व लकडी पुलाजवळील अका शेतांत अतरवून आणि रचून त्यांची होळी करून पेटविली. होळी धडाडू लागली. टिळकांनी व परांजप्यांनी व्याख्याने दिली. टिळकांनी सुचविल्याप्रमाणे होळी करावयाचीच तर .पोरकट दिसतां कामा नये, याची त्याने प्रथमपासूनच खबरदारी घेतली. विनायकानें विदेशी कपड्यांची होळी केली खरे; पण त्यामुळे त्याजवर कॉलेजच्या चालकांची अितराजी झाली. त्यावेळचे प्रिन्सिपॉल रँग्लर परांजपे यांनी त्याला दहा रुपये दंडाची व कॉलेजचे वसतीगृह सोडण्याची शिक्षा फर्माविली. विनायकाने त्याप्रमाणे वसतीगृह सोडले आणि विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गणी करून निधि जमविला. त्यांतील दहा रुपयांचा दण्ड भरला व बाकीचा पैसा विनायकाने 'पैसा फंडा' स देअन टाकला. विनायकास कॉलेज चालकांनी दंडाची व वसतिगृहांतून हकाल- पट्टीची शिक्षा दिल्याने टिळकांना संताप आला. त्याग व देशप्रेम यांतून निर्माण झालेल्या कॉलेजच्या चालकांनी केवळ दीडदमडीच्या सरकारी दानाला बळी पडून स्वाभिमानी व तेजस्वी विद्यार्थ्याला ही शिक्षा देशून आपल्या अज्ज्वल परंपरेस चालकांनी पायाखाली तुडविलें, सात्विक संतापाच्या भरांत केसरीतून त्यांनी त्यांजवर खरमरीत टीका केली व स्पष्टपणे बजावलें, 'हे आमचे गुरुच नव्हेत.'

फर्ग्युसन कॉलेजांत Ans." कालेजमधील सहकारी येथेही नाशीकप्रमाणेच विनायकाला नवीन व कार्यकुशल सह- कारी लाभले. बाबा खाप डेक्कन कॉलेजांत शिकत होते. आचार्य कालेलकरांशीही याचवेळी त्याची मैत्री जडली. निरनिराळ्या कॉले- जांत त्याचं मित्रमंडळ विखुरलं होतं. त्या सर्वांनी अकत्र जमून विचार ठरविण्यासाठी साप्ताहिक बैठकी सुरू केल्या. पर्वतीच्या मागील बाजूस टेकडी आहे, त्या घळीतून त्यांच्या गुप्त सभा व बैठकी भरूं लागल्या. कॉलेजांत बरीच गुंडाी माजून राहिली. प्रत्येक क्षेत्राचा तो राजकीय दृष्टया फायदा करून घेशू लागला. प्राध्यापक वर्गाकडून शाबासकी, कचित्प्रसंगी ' कानपिचक्या' ही घेझं लागला. हस्तलिखित मासिकांतून देशभक्तीपूर्ण लेख व काव्ये तो लिहूं लागला. जगांत काय चालले होते? पुण्यांत या घडामोडी चालू होत्या तेव्हां अवढ्या मोठ्या अफाट जगांतही काहीतरी अलथापालथ सुरू असलीच पाहिजे. तशांतच जगांतील कानाकोपरा हुडकून काढणारी नि ओरड करणारी वर्तमान- पत्रं यांचा सुळसुळाट झालेला. बारीक सारीक गोष्टी देखील चोहोंकडे - तात्काळ पसरत. खुद्द हिंदुस्थानांतच अिंग्रजांनी प्रजेला निःशस्त्र करून दुबळं केलं होतं, आमीष दाखवून भाळविलं होतं, लांचेनं स्वार्थांध बनविलं होतं, नवनवीन बंधनांनी जखडून टाकलं होतं. विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घ्यावयाचा नाही. नव्हे नव्हे, अखाद्या राष्ट्रीय पुढाऱ्याच्या सभे- लाही हजर रहावयाचे नाही असा कायदा करून नवशिक्षितांच्या ४२ वीर विनायक महत्त्वाकांक्षांचा खुडा चालविला. होता. अिलबर्ट बील मागे घ्यावयाला लाभून न्यायालयांत देखील गोरा व काळा हा भेद अभंग व अभेध राखला होता. केट्टा बलुचिस्तानास जोडला होता. १८९५ मध्ये चित्रळ प्रकरण उपस्थित करून हिंदुस्थानच्या सरहद्दी बळकट केल्या होत्या व रशियाचा धोका शक्यतों कमी करण्याची आणि आपल्या हिंदुस्थानांतील साम्राज्यास : स्थीरता' आणण्याची त्यांची कोशीस चालू होती. त्यांतच बंगालच्या फाळणीने बंगाल्याच्या काळजावरच सुरी चालविणाऱ्या कर्झनची नेमणूक व्हाीसरॉय म्हणून केली होती. राज्यकारभारांत होताहोआंतों सुशिक्षितांना प्रवेश द्यावयाचा नाही हे अिंग्रजांनी आधीपासूनच ठरविलं होतं. या सर्वांतून काहीतरी आपल्यास मिळावे म्हणून चार सुशिक्षित मंडळींनी 'जिंडियन नॅशनल काँग्रेस' स्थापन केली होती व तिचे राज्यकारभारांत अधिकार मिळविण्याचे सनदशीर प्रयत्न चालले होते. पण या मिळमिळीत भीक मागण्याला सरकार मुळींच भीक घालत नसल्याने त्याला यश येत नव्हते. अलट प्रजेवर अत्याचार अधिक सुरू झाले होते. दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरूं लागला होता. त्यामुळे प्रजा संास्त झालीच होती. त्यांतच कांहीसा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून पोषक अशाच घटनाही घडत होत्या. अॅबिसिनियासारख्या छोट्या व निर्बल राष्ट्राने अिटलीसारख्या बलाढ्य व शस्त्रसंपन्न राष्ट्राचा मोड केला. मागासलेले बोअर ! पण त्यांनी देखील अिंग्रजांविरुद्ध अठावणी केली. त्यांत त्यांचा पराभव शाला खें; पण त्यांनी टक्कर दिली हेही तितकेच खरे. चीनमध्ये .

फर्ग्युसन कॉलेजांत बॉक्सरी गुप्त संघटनेने पेकिंगवर उघड उघड हल्ला चढविला. १९०२ मध्ये अिंग्रजांना आशियांतील अका बुटक्या व छोट्या अशा जपान राष्ट्राशी तह करावा लागला. रशियांत झारशाहीविरुद्ध जोराचा असंतोष माजला होता व झारशाही अलथून पाडण्याचे यशस्वी गुप्त व अघड कट व प्रयत्न चालू होते. यापूर्वी फ्रेंच लोकांनी फ्रेंचांवर जुलम करणारी-लुीची जुलमी राजवट अलथून टाकली होती. अवढेच नव्हे तर सर्वच्या सर्व लुी कुटुंबाचा फडशा अडविला होता. अमेरिकेने तर ब्रिटिशांशी झगडून स्वातंत्र्य संपादन केलेच होते. जी अमेरिका आज अवढया अच्च पदाला आली ती ब्रिटिशांची अके काळी बटीक होती हे आज कुणाला खरेंसुद्धां वाटणार नाही. अन् अशा घटना कां घडत होत्या ? अकमेकांत स्पर्धा माजून राहिलेली राष्ट्र अशी धुसफुसत असलेल्या छोट्या देशांना शस्त्रास्त्रांची व पैशांची मदत करून हाताशी धरत. सशस्त्र क्रांतीकडे कल- मग आपणही अठावणी केल्यास कोणी राष्ट्र मदत करील काय ? आपल्याला शस्त्र मिळविता येतील काय ? आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणांत अिंग्रजी सरकारविरुद्ध बंड अभारूं शकू काय ? या व अशा प्रकारच्या अनेक विचारांनी विनायकाच्या मनांत थैमान घातलं व त्याचं मन अघड झुघड सशस्त्र क्रांतीकडे वळलं. सशस्त्र क्रांति म्हटल्यावर ती प्रकट करता येत नाही. ती लपून छपूनच करावी लागते. यासाठी त्याने गुप्त संघटना स्थापन केल्या. या संघटनेची पाळंमुळं खोलवर रुजली होती. या संस्थेस 'अभिनव भारता'चे फार - वीर विनायक मोठे भव्य नि अदात्त स्वरूप प्राप्त झाले. पुढे पुढे विनायक लंडन- मध्ये बॅरिस्टरीचा अभ्यास करीत असतां तेथें या अभिनव भारतांतील सदस्यांनी देशभर क्रांतीचा अठाव केला होता. परदेशांतून शस्त्रास्त्रांची आवक, जहरी वाङ्मयाचा प्रसार, अिंग्रज अधिकाऱ्यांचे खून, बाँम्चे कारखाने यांच्या ज्वाला साऱ्या अिंग्रज देशाला चाटू लागल्या होत्या. त्यांच्या वेदना त्यांना अितक्या असह्य होझू लागल्या की त्याचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये वरचेवर अमटू लागले. शारिरीक व बौद्धिक विकास अशा या धावपळीच्या काळांत विनायकाची लेखणी आणि वाणी आपलं काम करतच होती. पूर्वीप्रमाणे भारदस्त ग्रंथांचे वाचनही चालच होते. या काळात त्याचा शारिरीक नि बौद्धिक विकास चांगलाच झाला. पदवी परीक्षा आतां विनायकाची बी. ओ. ची परीक्षा जवळ येथून ठेपली. बरो. बरीचे मित्र व तो झटून अभ्यास करूं लागला. परीक्षा दोन महिन्यांवर आली तरी अभ्यासास हात लागला नव्हता आणि आतांचा तर हा निर्वाणीचा व अिभ्रतीचा प्रश्न होता. नसत्या फंदात पडणारी पोरं अभ्यासांत नेहमीच 'ढ' असतात. ती कधीच चांगल्या गुणांनी पास होत नाहीत व पालकांचे नुकसान करीत असतात, असा लोकांत ओक प्रवाद निर्माण झाला होता व तो खराही होता. तो डाग आपल्या सहवासांतील कोणाही विद्यार्थ्यास लागतां कामा नये यावर त्याचा फार कटाक्ष असे.

vvvv फर्ग्युसन कॉलेजांत म्हणूनच त्याने प्रसंगी शाळा बुडवूनही अभ्यास केला व शेवटी बी. ओ.च्या परीक्षेत यशही मिळविलें दरम्यानच्या काळांत त्याने मुंबीस जासून अल्. अल्. बी. च्या परीक्षा दिल्या होत्या व त्यांतही तो यशस्वी झाला होता. यावेळी त्याच्या संघटनेंत आज आपल्या मुंबी प्रान्ताचे मुख्य प्रधान असलेले बाळासाहेब खेर सामील झाले होते. पुढे काय ?- बी. अ. झाल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न विनायकापुढे अभा राहिला, पण तोही अकस्मात सुटला. लंडनमध्ये असलेल्या श्यामजी कृष्णवर्माचे लो. टिळकांना अक पत्र आले. त्यांत त्यांनी लिहिलं होतं की, 'आम्ही परदेशी शिकावयास येणाऱ्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्त्या द्यावयाच्या ठरविल्या आहेत. विद्यार्थी राष्ट्राभिमानी हवा. आपल्या माहितीच्या योग्य अशा विद्यार्थ्यांची नांवे कळवा.' श्यामजींचे मित्र राणा यांनी या तीन शिष्यवृत्त्या ठेवल्या होत्या. पैकी अक राणाप्रताप, दुसरी राष्ट्रीय मुसलमान विद्यार्थ्यासाठी व तिसरी शिवाजी शिष्यवृत्ति. टिळकांच्या शिफारसीने विनायकाला शिवाजी शिष्यवृत्ति मिळाली. अवढी शिप्यवृत्ति लंडनमध्ये राहून अभ्यास करण्यास अपुरी होती. म्हणून विनायक आपले सासरे भाभूसाहेब चिपळूणकरांस भेटला. भाभूसाहेबांचं आपल्या जांवयावर प्रेम फार. अवढ्या लहान वयांत त्याचे नांव सर्वतोमुखी झाले होते. वर्तमानपत्रांतून त्याचे लिखाण प्रसिद्ध होछू लागले होते. मुंबीच्या विहारी पत्रांतील त्याच्या लिखा णाने सर्व भारतभर त्याचं नांव दुमदुमू लागलं होतं. अशा जांवया वीर विनायक बद्दल त्यांना अभिमान कां न वाटावा ? त्यांनी अिंग्लंडच्या अितर खर्चाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आपला दुसराच मुलगा असं समजून त्यांनी त्याला सहाय्य केलं. त्यावेळी त्यांना काय वाटत असेल बरें? सुखस्वप्नाचे बुडबुडे आपला जावी नाणावलेला बरिस्टर होअन येील. खाऱ्याने पैसा मिळवील. कदाचित जव्हारचा. दिवाणही होील आणि माझी मुलगी यम् सुखानं संसार करील. त्यांचा तो संसार डोळे भरून पाहतां पाहतां मला कोण धन्यता वाटेल ! आपली यम् भाग्याची म्हणून तिला हा विनायक 'पति' म्हणून प्राप्त झाला. पण त्यांना काय कल्पना की, यमूचं आयुष्य खडतर तपश्चर्येत, हालांत जाणार आहे ते? आतां विनायक परत येील तो बरिस्टर होशून, जव्हारचा दिवाण म्हणून येणार नाही; तर तो एक ' भयंकर राजकीय कैदी म्हणून येणार व जन्मभर तुरुंगांत खितपत पडणार आणि आपल्या यमूस अकाकी योगिनी जीवन कंठावें लागणार याची त्यांना 'पुसट तरी कल्पना आली असेल का?

- लंडनमध्ये - गोदावरीच्या काठावर जितक्या निर्भयतेने स्वातंत्र्य वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष केला तितक्याच निर्भयतेने टेम्स नदीच्या काठीही भर लंडनमध्ये त्यांनी त्या स्वातंत्र्याचा डंका गाजविला. वि. श्री. जोशी. बॅ. सावरकर १९०८ व १९३८. पण त्यांना ( सावरकरांना ) सिव्हिल सर्व्हट होण्याकरितां विलायतेला जावयाचे नव्हते; तर तिकडे जासून हिंदुस्था- नच्या स्वातंत्र्याच्या मतप्रसाराचा अक नवा अड्डा किंवा आखाडा हिंदी तरुणांमध्ये निर्माण करावयाचा होता! न. चिं. केळकर. प्रस्तावना ( सावरकर चरित्र.) विनायकानें प्राथमिक शिक्षण भगूरला, दुय्यम शिक्षण नाशीकला नि अच्च शिक्षण पुण्याला फर्ग्युसनमध्ये संपविले. ज्या ज्या ठिकाणी VAATE देशपांडे मॅडम कामा परीसमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या क्रांतिकारकांच्या 'वंदेमातरम्' या पत्राच्या क्रांतिकारक संपादिका, सावरकरांच्या अभिनव भारताच्या प्रत्येक कार्यांत धडाडीने पाल टाक- णाऱ्या व जर्मनीमधील आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेसमध्ये भारताच्या राष्ट्रध्वज अभिमानाने फडकविणाऱ्या व त्यास अभिवादन करण्यास सर्व राष्ट्रांच्या प्रतिनिधींस हुकमी आवाजांत बजाविणाऱ्या पारशी विदुषी !

लंडनमध्ये तो गेला तेथे तेथे त्याने आपले मित्र जमविले व संघटित करून ठेवले. त्याने जमविलेले मित्र हे कार्याच्या तळमळीनं भारलेले, देश- प्रेमाने अचंबळलेले होते. विनायकाच्या गैरहजेरीत देखील त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे भारतात ब्रिटिशांविरुद्ध अकच रान अठविलें व त्यांना त्राही भगवान' करून सोडले. लंडनला आला - ज्या मित्रांच्या सान्निध्यांत गेली काही वर्ष आनंदांत आणि अला- ढालींत घालविली, ज्या मित्रांच्या सहाय्यानं 'राष्ट्रभक्त समूहा'चे बीज रुजविलें; राष्ट्रभक्तसमूहाला 'मित्रमेळ्या'च्या रोपट्याचे स्वरूप आणले व ज्या मित्रांच्या सहाय्याने त्या रोपट्याला 'अभिनव भारता'च्या विशाल वृक्षाचे स्वरूप दिलें, त्या मित्रांना त्या वृक्षाच्या जोपासनेसंबंधी योग्य त्या जबाबदारीच्या सूचना देशून व त्यांचा अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेथून विनायक पर्शिया' बोटीने १९०६ ला लंडनला येअन पोहोचला. पं. श्यामजी कृष्णवर्मा, राणा आणि मॅडम कामा --- विनायक लंडनला येण्यापूर्वीच पं. श्यामजी कृष्णवर्मानी बुद्धिमान, अत्साही व त्यागी तरुणांचे मण्डळ जमा केले होते. १९.५ साली आिडयन होमरूल सोसायटी स्थापून तिच्या विद्यमाने अिंडियन सोशि- यालिस्ट मासिक सुरू केले. त्याच साली लंडनमध्ये येणाऱ्या हिंदी राष्ट्रीय तरुण विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून अिंडिया नांवाचे वसतीगृह स्थापन केलें. श्यामजींच्या सहकार्याला राणा . हास वीर विनायक...३ वीर विनायक व मॅडम कामा आणि अितरही काही हिंदी कार्यकर्ते धावून आले. राणांनी हिंदी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या ठेवल्या तर श्रीमति कामानी जर्मनीमध्ये जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताचे राष्ट्रीय निशाण म्हणून सूर्यकमलांकित तिरंगीध्वज फडकाविला. त्यावेळेस श्रीमति कामांनी औजस्वी अद्गार काढले की, 'हे पहा भारतीय स्वातंत्र्याचे निशाण हिंदी युवकांच्या हौतात्म्याच्या रक्ताने ते आधीच पवित्र झालेले आहे. लोक हो! अठा आणि अभिनव भारताच्या या ध्वजाला प्रणाम करा ! ' अमेरिका, जर्मनी, आयर्लंड, फ्रान्स वगैरे युरोपांतील प्रमुख राष्ट्रांतील प्रमुख वर्तमानपत्रांतून व मासिकांतून हिंदुस्थानविषयक लेख लिहुन श्यामजींनी व पॅरीसमधील आपल्या 'वंदेमातरम्' पत्रा- मधून ज्वलंत लेख लिहून कामानीं त्या राष्ट्रांचे लक्ष वेधलें होतें. अवढ्या सर्व अनुकूल परिस्थितीने भुसभुशीत झालेल्या जमिनीत विनायकाचे कार्याचे बीज पडतांच त्यास अंकूर फुटून थोडक्याच काळांत मोठ्या वृक्षाचे स्वरूप आले असल्यास नवल कसचे ? - - हालचाल विनायक लंडनला आला. त्याचे पहिले काही दिवस 'स्वत:ची व्यवस्था लावण्यांत गेले. सर्व व्यवस्था ठाकठीक झाल्यानन्तर त्याने आपल्या आवडीच्या कार्यास सुरवात केली. डोळे उघडे ठेथून तो सभोंवार घडणाऱ्या घटनांकडे पाहूं लागला पार्लमेंटमध्ये होणारी भारतमंत्री व सभासद यांची भारताविषयींची प्रश्नोत्तरें, तेथील प्रमुख वर्तमानपत्रांतून भारतातील घटनांवरील होणारे लग्नमध्ये ५१ - प्रखर हल्ले व ते परतवून लावण्यास विनायकाने केलेले प्रतिहल्ले यांचे सविस्तर विवेचन तो नियामतपणे काळ पत्रांतून प्रसिद्ध करूं लागला. त्याची ती 'लंडनची बातमीपत्रे' वाचून अनेक तरुणांचे रक्त सळसळे स्वतंत्र राष्ट्रांशी संबंध- अिकडे लंडनची अितिवृत्ते विनायक भारतास सादर करत होता, तर तिकडे निरनिराळ्या प्रमुख राष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रांतून भार- तांतील ब्रिटिशांच्या जुलुमाची जळजळीत वर्णने करीत होता. अवढेच नव्हे तर ही जुलमी राजवट नाहीशी करण्यासाठी भारतातील तरुण किती हाल सोशीत आहेत, कशी दिव्ये करीत आहेत याचेही हृदय पिळवटणारे वर्णन करून साऱ्यांची मनं हिंदुस्थानवर केंद्रित करीत होता. त्याच्या या मार्गाला व कार्याला बरेंच यश आले. अितर युरो- पीय राष्ट्र हिंदुस्थानकडे आदराने पाहू लागली. जर्मनी तर अघड अघड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करू लागले. पुढे पुढे तर इ.स्त्रांची आणि पैशांची सढळ हाताने जर्मन ने मदत केली. या क्रांतिकारकांनी यावेळी जे हिंदुस्थानविषयी प्रेम जर्मनीमध्ये निर्माण केले त्या प्रेमाचा परिणाम म्हणजेच सुभाषबाबना गेल्या महायुद्धांत मिळालेली जर्मनीची मुक्तहस्ते मदत होय. गुप्त मंडळ्या- केवळ व्याख्यानबाजी किंवा लेखनबाजी या साधनांनी आपलं राष्ट्र स्वतंत्र होणार नाही. या फुसक्या साधनांनी ब्रिटिशांवर काडि- मात्र परिणाम होणार नाही. ब्रिटिशांना दहशत बसेल व कांहीतरी दरारा बसेल असे आपण करावयास पाहिजे. आणि आपण प्रत्यक्ष ५२ वीर विनायक काहीतरी करीत आहोत अशी खात्री पटली तरच परदेशस्थ राप्टें आपल्यास मदत करतील, असे विनायकास वाटू लागले. यासाठी आपण काय करावे ? त्याला प्रश्न पडला. पण त्याज- जवळ त्याचे अत्तर तयार होतेच. महत्त्वाकांक्षी, धाडसी, त्यागी, देश- भक्त तरुणांची संघटना त्यार करण्यांत तो अपेक्षेबाहेर यशस्वी झाला होता. त्याने या तरुणांस हाताशी धरले. पुन्हां साप्ताहिक बैटकी, गप्त बैठकी, चर्चा, सभा, सम्मेलने, भाषणे, अत्सव या गोष्टी सुरूं झाल्या. यावेळी लंडनच्या वारतव्यांत त्याने बऱ्याच धाडसाच्या गोष्टी केल्या. त्याचे प्रत्येक पाल अधिक विश्वासाने व द्रुतगतीने पडू लागले. हिंदुस्थानांत साधेल त्या मार्गाने व साधेल त्यावेळी पिस्तुले वैगेरे साहित्य पाठविण्याचा त्याने धुमधडाका सुरू केला. पुरतकें पोखरून त्यांत पिस्तुले भरावी व पोष्टाने हिंदुस्थानांत पाठवावीं, येणारा जाणारा अिसम गांठावा, त्याजजवळ कापडी बैठकीच्या लांकडी खुर्व्या द्याव्यात, त्या बैठकांतून पिस्तुले लपवावीत व त्या खुर्ध्या हिंदुस्थानला रवाना कराव्यात, अखादेवेळेस आपल्या विश्वासांतील माणूसच शस्त्रास्त्रे घेऊन भारताकडे धाडावा हा त्याचा अपक्रम नेटाने चाल झाला व अतोनात यशस्वीही झाला. पुढे हिंदुस्थानांतील अभिनव भारताच्या सदरयांच्या हाती ही पिस्तुलं येतांच त्यांनी वड्या बड्या अिंग्रज अधिकाऱ्यांचा खून करण्याचा सपाटा लावला. अकामागून अक गोऱ्या नोकरांचे मुडदे पडू लागले. त्यांच्या छातीत धडकी भरली. भारतांत फिरणें अगर दौरे काढणे त्यांना कठीण होभून बसलं.

लंडनमध्ये LARAM अशा प्रकारे हिंदुस्थानांत विनायक आणि मंडळींकडून शस्त्रास्त्रं येतच होती. त्याचेच जोडीला विनायकानें महत्प्रयास शून व अभ्यासून लिहिलेले मॅझिनी, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आदि ग्रंथ ब्रिटिश पोलिसांच्या, पोष्टल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत धूळ फेकून बेमालूमपणे पाठवावीत व त्यांचा प्रसार करावा; यांतही त्याला विलक्षण यश मिळाले. त्याने लिहिलेले ग्रंथ अितके ज्वलजहाल असत की जन्माआधीच त्यांवर सरकारची बंदी येी. अशा ज्वलज्जहाल वाङ्मयाचा व तडफदार मोहक वाणीचा हिंदी तरुणांवर भयंकर परिणाम होअन त्यांचे त्याजभोंवतीं अक कडेंच जमले. सेनापति बापट- याचवेळी सेनापति बापटही पण मुंबीहून आले होते. त्यांचाही विनायकाशी परिचय होअन तेही विनायकाच्या तरुण गटांत सामील झाले. विनायकानें बापटांना बाँबची विद्या शिकण्यासाठी पॅरीसला पाठविलें. बापट परीसला गेले व अका रशियन तरुणीजवळ ती विद्या शिकलेही. बापट परत लंडनला आले. बाँव्स्च्या पुस्तिका छापल्या जागं लागल्या व त्याचा भारतांत प्रसार होशू लागला. अकदा हा बाँब्स्चा कारभार अगदी फुटण्याच्या बेतांत आला होता; पण विनायकाच्या प्रसंगावधानानें तो वाचला. त्याचे असें झालें. सर्वजण शेकोटीभोंवतीं बसले होते. जवळच प्रिस्किप अॅसीडचे डाग पडलेले कागद पडले होते. बापटानी ते अचलले नि शेकोटीत टाकून दिले. झाले ! खूप मोठा आवाज झाला. दैव बलवत्तर म्हणूनच वनायकाने कसेबसे तें प्रकरण जिरविले.

सेनापति बापट
बाँबची विद्या हस्तगत होतांच ब्रिटिश पार्लमेंटवर तो टाकण्यास धावणारे,
सावरकरांच्या अभिनव भारताचे कवेळ क्रांतिकारक सभासद असलेले,
भारतांत सर्वत्र बाँबस्था प्रसार करणारे, म. गांधींच्या चळवळी-
तही अहममहिमकेनें भाग घेणारे, जनसेवा व देशसेवा प्राणा-
पलिकडे मानणारे, गांधी-वध अभियोगांत सारा महाराष्ट्र
प्रक्षुब्ध झाला असतां व सावरकरांचे केवळ नावही
घेणे अशक्य झालें असतां । अभियोगास'
न्याय सहाय्य निधीस अघड झुघड दहा
रुपये देण्याचे धाडस करणारे पहि-
लेच न्यायप्रेमी व थोर अन्तः
करणाचे महाराष्ट्राचे देशप्रेमी
व लाडके सेनापति.

लंडनमध्ये यानन्तर हिंदुस्थानांत बाँव्स्था प्रसार व्हावा म्हणून विनायकानें बापटांना भारतांत पाठविले. या विद्येचा प्रसार भारतांत फार मोठ्या प्रमाणांत झाला. पुणे, नासीक, कोल्हापूर, बंगाल, मद्रास सर्वत्र बाँब- स्फोट होशू लागले. ठिकठिकाणी बाँच्स्चे छोट्या प्रमाणांत कारखाने उघडले गेले. ही बाँबची विद्या हस्तगत होतांच सरकारी अधिकाऱ्यांवर, गाड्यांवर बाँस पडू लागले. असाच अक स्फोट मुझफरपूर येथे झाला. वास्तवीक हा बॉब मुझफरपूरच्या मॅजिस्ट्रेटवर टाकावयाचा होता; परंतु टांगा मॅजिस्ट्रेटच्या घरापुढेच थांबल्याने गैरसमज होअन मॅजिस्ट्रेट अवीं त्या टांग्यांतील दोन युरोपियन स्त्रिया मात्र हकनाक प्राणास मुकल्या. म्हणजे चोर सोडून संन्यासी बळी गेला. याबद्दल पुढे खुदीराम बसू पकडला गेला व फांशीही गेला. मात्र बसूला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचाही खून लवकरच झाला. 'धिंग्रा प्रकरण विनायकाच्या चरित्रांत अनेक वीरांची चरित्रं सामावली आहेत. त्यांत मदनलालला बऱ्याच वरचं, किंबहुना पहिलंच मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. मदनलाल हा अका पंजाबी सिव्हिल अिंजिनि- अरचा मुलगा 'आपण अच्च शिक्षण घेण्यास अिंग्लंडला जावं ' असं त्याला फार वाटे; पण त्याचा स्वभाव पडला हूड, त्यामुळे त्या गोष्टींस त्याला वडिलांची संमति मिळेना; तेव्हां त्याने अिंग्लंडला जाणाऱ्या अका बोटीवर आगलाव्याच्या हाताखाली काम पत्करलें व तो लंडनला आला. तेथे त्याने शिक्षणांत प्रथम दर्जाचे यश मिळविलें.

वीर विनायक लंडनमध्ये आल्यावर मदनलालची विनायकाशी ओळख झाली व तो वरचेवर भातभवनांत जाधू लागला. शेवटी तो अभिनव भारताचा सभासदही झाला. मदनलाल आतिशय सोशीक होता. अकदा त्याने सर्वचेसर्व टांचणी कांही शर्यतीवरून तळहातांत अरापार टोचून घेतली. रक्ताचे कारंजे झुडू लागले तरी बेट्यानें हूं की चूं केले नाही आणि आम्ही हिन्दी तरुणही सोशिकपणांत अितरांहून कमी नाही' हे पटवून दिले. तसेंच दुसऱ्या अका प्रसंगी बाँब्सचे मिश्रण तापविले जात होते. ठराविक अष्णतामानावर ते तापविलेंहि गेले होते. आतां तें नच अतरले तर साऱ्यांचे प्राण तर गेलेच असते. शिवाय सारे बिंग बाहेर पडून आजवरची सारी तपश्चर्या व्यर्थ गेली असती. मिश्रण अतरायला तर हवें होतें. अतरण्यास जवळपास चिमटा तर नव्हता. आतां करावें काय ? सारे विचारांत पडले. पण हा पठ्ठा पुढे झाला. बहादराने तें अकळते मिश्रण दोन्ही हातांनी धरून खाली अतरविले. त्याच्या हाताचे पळकेच्या पळके निघाले. मदनलाल जसा सोशिक, शूर व धाडसी होता, तसाच रंगेल व बेफिकीरही पण होता. अका प्रसंगी त्याच्या छचोरपणाबाबत त्याची विनायकाने चांगलीच कान अघाडणी केली. त्यावेळी भारतभवनांत आंतील दालनांत सभासदांची गुप्त बैठक भरली होती अन् बाहेर रस्त्यालगतच्या खोलीत मदनलाल रंगेल गाण्याच्या 'रेकॉर्डस्' लावीत बसला होता. रस्त्यावर खोलीच्या लंडनमध्ये im ~~~~~~ खिडकीपाशी बेछूट पोरींचा घोळका जमला होता. गलबला वाढू लागला. नि आंतील बैठकीला व्यत्यय येअं लागला. विनायक बाहेर आला नि पहातो तो हे राजश्री ! विनायक थोडासा चिडूनस म्हणाला, 'मदनलाल ! कृतीच्या आणि हौतात्म्याच्या गोष्टी बोलतोस आणि त्या गोष्टी श्रेष्ठ म्हणून बैठकी नि चर्चा टाळतोस! या पोरींचा घोळका नि या गाण्यांच्या ललकाय हीच काय तुझ्या कृतीची नि हौतात्म्याची लक्षणे !" या अद्गारांनी मदनलाल अितका शरमला की, त्याने चार दिवस विनायकाला. तोंडही दाखविलें नाहीं; अन् त्यानन्तर अकस्मात विनायकापुढे येअन त्याला विचारिलें, 'खरंच का हौतात्म्य गाजा- विण्याची वेळ आली आहे ?' विनायक म्हणाला, 'हुतात्मा मनाने खंबीर व सिद्ध झालेला असेल तर, त्यांत प्रायः हेही गर्भात असते की, हौतात्म्य गाजविण्याची वेळ प्राप्त झाली आहे.' विनायकाशी झालेल्या या भाषणानन्तर मदनलालांत विलक्षण बदल झाला. त्याने आपले मूळचे वास्तव्य बदललें व मिसेस मेरी हरीसन्या घरी वास्तव्य ठोकले. हिंदी विद्यार्थ्यांनी विनायक प्रभृतींच्या भारतभवनांत न अडकतां त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी म्हणून जी संस्था तेथील कांही ब्रिटिश व हिन्दी लोकांनी काढली. त्या नॅशनल अिडियन असोशिअशनचा तो असोशियेट मेंबर बनला व विनायकाच्या घोळक्यांतील अंक मेंढरू आपल्या कळपांत आल्या-

?
मदनलाल धिंग्रा
मृत्यूच्या मांडीवरही आीच्या मांडीवर लोळत असल्याचे सौख्य अफ
भोगीत असलेले, निर्विकार मनाने तुरुंगांत कंगवा, आरसा आदि
सौंदर्य प्रसाधक साधनांची मागणी करणारे, पिस्तुलाचा भयप्रद
अपयोग करूनही नाडी नेहमीप्रमाणेच ठीक चालणारे व
पकडले असतांही · अहो तो पलिकडया गॉगल जरा देतां
कां? ' एहणून विचारणारे, तो: हाती येतांच अटीनें
डोळ्यास लावणारे व पोलिसांनी दडपला अमताही
साऱ्या जगास हादरविणाग जबाब-चलेंज देशून
अजरामर ठरलेले भारताचे अभिनव भारतांतील
हुतात्मा
ते हे मदनलाल!

लंडनमध्ये . बद्दल त्यांनाही अकप्रकारचा विजयी अभिमान वाढू लागला. पण बेट्यांना मदनलालच्या पोटांतलं काय कळणार ? मदनलालांत झालेला हा बदल भारतभवनांतील अितर सभासदांना मुळीच पटला नाही. त्यांनी अकसारखा लकडा लावला की, ' मदनलाल फिरला, मदनलाल फितूर झाला, सबब त्याला आपल्या संस्थेच्या सभासदांच्या यादीतून कमी करावें.' यावेळी विनायकापुढे मोठाच पेंच अभा राहिला. मदनलालचे सर्व मनोव्यवहार त्याला माहीत होते; पण ते त्यास अघड करता येत नव्हते. बरं अिकडे या तिघांचे गुफ्तगू काय झालें तें सभासदांना जर ठाक नाही तर मदनलालचे मनोव्यापार त्यांना कळणार तरी कसे ? अशी त्याची दोरावरची सर्कस चालू होती. कसेबसें त्याने सभासदांचे समाधान केलें की, आपण आणखी काही दिवस थांबून काय घडतें तें पाहूं. आणि काय घडले?- आणि थोड्या दिवस थांबल्यानन्तर त्यांना काय दिसून आले ? मदनलाल फितुर झाला आहे असें कां त्यांना दिसून आले ? त्यांच्या संस्थेच त्याचे सभासदत्व कां त्यांना रद्द करावे लागले ? नाही. अलट संस्थेच्या प्रत्येक सभासदाला मदनलालची कार्ति गावी असेच कार्ट लागले. असे त्याने काय केलें बरें ? हरएक प्रकारच्या हिकमती लढवून त्याने पिस्तुलाचा परवाना काढला. नॅशनल विीडयन असोसिशनच्या स्त्री चिटणासांच्या सहा- ६० वीर विनायक केला. च्याने बड्या धेंडांच्या ओळखी करून घेतल्या अन् अका समारंभ प्रसंगी त्याने कर्झन वायली व दुसरा अक पारशी डॉक्टर यांचा खन थोड्याच क्षणांत त्याला पकडण्यांत आले. त्यावेळी डॉक्टरने त्याची नाडी व छाती तपासली. डॉक्टरांची छाती धडधडत होती. परंतु मदनलालची नाडी नेहमीप्रमाणेच शांत चालू होती. कोठडीत असतां त्याने कंगवा, आरसा आदि साधनांची मागणी केली होती. अशा या वीर पुरुषास १७ ऑगस्ट १९०९ ला फाशी दिले. मदनलालचा जवाब- मदनलालने कर्झन वायलीचा खून केल्याने आंग्ल जनतस धक्का बसला नसेल त्याच्या शतपटीने त्याच्या जबानीने सा-या जगास बसला. धिंग्राने आपल्या जबानींत सांगितलें, 'अिंग्रज लोकांनी चाल- 'विलेले अमानुष ढोंग, त्यांनी चालविलेला तमाशा व विटंबना आणि ते घेत असलेले भारतीयांचे पद्धतशीर खन, या कृत्यानींच मी हा खन करण्यास प्रवृत्त झालो. जित आणि जेते यांपैकी आपले स्वातंत्र्य परत मिळविण्याप्रित्यर्थ जितांनी जेत्याचा खून केल्यास तो खून वा गुन्हा होत नाही. तुम्ही मला फाशी द्या, खुशाल फांशी द्या. परमेश्वराच्या न्यायालयांत मी निदोषी आहे.' माय गॉड! सावरकर !! सावरकर !!!- वास्ताविक मदनलालनं केलेलं कृत्य देशा'साठी केलेलं होतं. त्यांत त्याचा वैयक्तिक स्वार्थ मुळीच नव्हता. अर्थातच त्या कृत्याचा लंडनमध्ये ६१ निषेध करण्याची आवश्यकता नव्हती. निदान भारतीयांनी तरी निषेध करण्याजोगें तें कृत्य खास नव्हते. पण काही शिष्ट व महंत भारतीय राजकारण्यांना हे कृत्य मानवलें नाही व त्यांनी त्याचा निषेध करण्या- साठी अक सभा भरवली. तेथें व्याख्यात्यांनी त्याच्या निषेधाची भाषणे केली व निषेधपर ठराव मांडला. त्या सभेचे अध्यक्ष आगाखान होते.. त्यांनी ' सर्वानुमतें पास ना?' असें नाममात्र विचारून, मतें न अजमावतांच ‘सर्वानुमतें पास' असे जाहीर केले. त्या सभेस विनायकही हजर होता. ताडकन तो अठून अभा राहिला नि म्हणाला, नाहीं ! ठरावाला विरोधी मतेही पण आहेत.' तापलेला रस कानांत ओतावा त्याप्रमाणे साऱ्या श्रोत्यांची अवस्था झाली. त्या सर्वांचे लक्ष त्या तेजस्वी तरुणाकडे गेलें. जो तो आपापसांत कुजबुजू लागला. 'कोण बरें हा वीर पुरुष असावा ? ' अवढ्या प्रचंड सभेमध्ये विरोध करावयास ठाकणाऱ्या त्या तेजस्वी विनायकाविषयी प्रत्येकालाच अत्सुकता लागून राहिली व त्याचे नांव जाणून घेण्याची जिज्ञासा अत्पन्न झाली. पण ज्यावेळी त्यांना त्याचं नांव कळन चुकलं तेव्हां सभेत जी काही धांदल अडाली ती अवर्णनीयच. केवळ 'सावरकर' या नांवाची धास्ती अिंग्लंडला किती बसली होती याचं तें अक अकृष्ट अदाहरणच आहे किंबहुना महाराष्ट्राची ती परंपरा आहे. मोगलांच्या स्त्रिया मुलांना गप्प बसविण्यासाठी 'संभाजी'चा धाक घालीत. संताजी- धनाजी तर मोगलांच्या घोड्यांना पाण्यांतसुद्धा दिसत व क्षणभर पाणी पिण्यासही ते थवकत. बंगालमध्ये महाराष्ट्रियांची अितकी धडक ६२ वीर विनायक - भरलेली असे की त्यांनी त्यासाठी मराठा खंदक खोदला आणि आजही आपल्या स्वातंत्र्यांतील सरकारला सर्वत्र मराठी वर्तमानपत्रेच भेडसावीत आहेत. असो. त्यावेळी त्या तरुणाचं नांव 'सावरकर' आहे असे कळले मात्र, सर्वांच्याच हृदयांत धडकी भरली. आतां हा तरुण काय भल- ताच प्रसंग निर्माण करील काय, असेंच ज्याला त्याला वाटू लागले. आंग्लस्त्रिया रडू लागल्या. कोणी खुर्ची खाली, बाकाखाली सांपडेल त्या ठिकाणी दडून बसू लागले. कोणी जीव घेथून सैरावैरा पळू लागले. असा तेथें अकच कोलाहल माजून राहिला. सभेचं पर्यवसान शेवटी धक्काबुक्कीत झालं व विनायकाच्या डोळ्यास जबर दुखापत झाली. हेरखात्यांत प्रवेश विनायक व त्याचे साथीदार आणि अितर क्रांतिकारक या प्रचंड अलाढाली करत असतां ब्रिटिश सरकार कांहीं झोंपा घेत बसल नव्हते. अगर ब्रिटिश वर्तमानपत्रे अगदीच नादान बनली नव्हती त्याच्या तर डोळ्याला डोळा लागत नसे. सतत डोळ्यांत तेल घालन ते सर्वत्र लक्ष पुरवत. लंडन टाअिम्ससारख्या वर्तमानपत्रानं तर विनायक व त्याची प्रभावळ आणि हिंदुस्थानांत प्रत्यही घडत असलेला राजकीय क्षोभ यांवर टीकेची झोड झुठविली होती. ब्रिटिश सरकारच्या दुबळ्या धोरणावर कडक हल्ले चढविले होते व काहीही करून या भारतीय क्रांतिकारक चळवळी दडपल्याच पाहिजेत असे सुचविलें होतें खुद्द लंडनमध्ये आपल्याच बांधवांकडून टीकेचे शेलापागोटें बहाल मिळू लागल्यावर सरकारने सर्वत्र हेरांचे जाळे पसरविले. भारतभवना, लंडनमध्ये ६३ वरही पाळत ठेवली. खुद्द भारतभवनांतही अका हेराने ठाण मांडले. पण विनायक काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता.. त्याने त्यांच्या डोळ्यांत त्यांचीच बोटें खपसली. भारतभवनांत ठाण मांडून बसलेल्या हेराला मोठ्या चातुर्याने फितविलें व सरकारचे सर्व बेत हाणून पाडले. त्याचप्रमाणे भारतीय तरुणांवर देखरेख ठेवण्यासाठी ब्रिटिशसरकारने अक हेरखाते उघडले होते. त्यावर देवरेख ठेवण्यासाठी अका हिंदी माणसाची प्रमुख' म्हणून नेमणूक केली होती. पण तोच मुळी विनायकाचा हस्तक होता. त्यामुळे सरकारला विनायकाची हालचाल कळण्याअवजी विनायकालाच सरकारच्या सर्व हालचालींची बित्तं- बातमी कळे. जिकडे भारतांत- अशी ब्रिटिशांना खडे चारणारी कृत्यं खुद त्यांच्याच राजधानीत चालली असतां अिकडे भारतांत काय चाललें होतें ? भारतांतील क्रांतिकारकही नेटाने कार्य करीत होते. भारतीय क्रांतिकारक आतां परमोच्च बिंदूवर अभे होते. त्यांची पावले आतां विनाशाच्या खोल दरीकडे पडं लागली होती व लवकरच . ते त्या कड्यावरून खाली खोल दरीत कोसळणार होते. विनायकाचे बंधू बाबा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. बाबांच्या गप्त कागदपत्रही संग्रहीं बाळगण्याच्या व गळ्याला तात लागली असतांही ते कोठे आहेत हे न सांगण्याच्या अशा क्षुल्लकशा भासणाऱ्या चुकीचे घोर परिणाम लवकरच भोगावे लागणार होते.

वीर विनायक - पारध्याने जाळे पसरले नाशीकचा कलेक्टर जॅक्सन अकदां किर्लोस्कर कंपनीचे शारदा नाटक पहाण्यास आला होता. गंधर्वांचे त्यांतील शारदेचे काम पाहून तो व सर्व नाटकगृह मोहून गेलें होतें. गंधर्वाचे गाणे रंगलें होतें. आणि हा मोका साधून अनंत कान्हेरे या क्रांतिकारकानें जॅक्सनचा पिस्तुलाने खून केला. येथेच भारतीय क्रांतिकारकांच्या पराभवाचा पाया रचला गेला. या खुनाबद्दल कान्हेरे, कावे, देशपांटे या त्रिवर्गांना फाशी दिले. या जैक्सन खन खटल्यांत नवीनच गोष्टी अघडकीस आल्या व या सर्व हालचालीमागे जबरदस्त असा कोणाचा तरी हातही असावा असा सरकारला संशय आला. जैक्सनचा खन प्रत्यक्षपणे नाशकांत झाला असला तरी त्याचा खरा सूत्रधार लडनमध्ये आहे. त्याला पकडावा कसा व हिंदुस्थानांतील न्यायालयामार्फत शिक्षा ठोठावावी कशी, याची हिंदुस्थान सरकारला विवंचना लागून राहिली. मध्यंतरी बाबांनी दडवून ठेपलेली सभासदांच्या नावांची यादी व अितर काही भक्कम परावा पोलिसांच्या हाती लागला. देशांत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर झडत्या व धरपकड होन, या सर्व प्रकारची मुळं खोलवर रुजली असून या सर्वांची सूत्रं सावरकर लंडनमध्ये राहून हलवीत आहेत अशी सरकारची पूर्ण खात्री पटली. तसा पुरावाही प्राप्त झाला व तशा अर्थाचा खटिता ब्रिटिश सरकारकडे खानाही लंडनमध्ये झाला. पारध्याने जाळे पसरून ठेवले व तो शिकारीची वाट पाहूं लागला. अखेर पारध गवसली हे जैक्सन प्रकरण पूर्णपणे क्रांतिकारकांच्या अंगाशी आलं. तिकडे लंडनमध्ये विनायकाच्या विरुद्ध सरकारच्या हालचाली चालच होत्या. मध्यंतरी झालेल्या हालचाली, धिंग्रा निषेधप्रकरणावेळी झालेली जखम, खाण्याची आबाळ या सर्वांचा परिणाम म्हणून विनायक आजारी पडला व त्याने फ्रान्समध्ये ब्रायटनला प्रयाण केलें. येथेच त्याला समुद्रकिनारी 'सागरा प्राण तळमळला' हे सुप्रसिद्ध काव्य स्फुरलें. भारतभवन ब्रिटिशांच्या वाढत्या रोषामुळे बंद करावे लागले. पाल. बाबूच्या निवासस्थानामध्ये सुद्धां राहणं धोक्याचं वाटू लागलं. अवढंच नव्हे तर अशक्य होअन बसलं. त्याला राहण्याला घर मिळेना व त्याची ‘शय्याभूमितलं दिशोऽपि वसनं ' अशी केविलवाणी स्थिति झाली. तेव्हा काही दिवस तरी स्थानत्याग अवश्य होता. पण हा स्थानत्यग त्याला फार दिवस लाभला नाही. हिंदुस्थानांत शेंकडों क्रांतिकारक पकडले गेले. अनेकांना फासावर लटकावले. बाबांना जन्मठेप झाली. त्यांची अंदमानांत रवानगी झाली. श्वशुरांची मिळकत जप्त झाली व या सर्वांस कारण आपण, केवळ आपण व आपणच. असे असूनही आपणच अशा सुरक्षित ठिकाणी राहणं त्याच्या मनाला रुचेना व त्याने फिरून लंडनला जाण्याचे ठरविलें. वीर विनायक...४ ६६ वीर विनायक पाहून " विनायकाच्या लंडनला जाण्याला मॅडम कामा, पं. श्यामजी कृष्णवर्मा, राणाजी या जाना कसून विरोध केला. पण त्याने जुमानले नाही. ' ज्या लोकांनी संसारावर निखारे ठेथून आपल्या सर्वस्वाचा होम केला आणि बालपणापासून आपले पुढारीपण मान्य केले अशा लोकांना संकटांत सांपडलेले त्याचे अन्तःकरण द्रवले, त्याच्या मनाची शांति ढासळली आणि आपले पुढारीपण सिद्ध करण्यासाठी तो तडक लंडनला येथून दाखल झाला. लंडनला येतांच व्हिक्टोरिया स्टेशनवर स्कॉटलंड यार्डच्या गुप्त पोलिसांनी दि. १३ मार्च १९१० रोजी रात्री त्यास वारंट दाखवून कैद केलं व अखेर भारताचा सिंह जाळ्यांत अडकला आणि पारध्यास शिकार ( पारध ) गवसली. सोडविण्याचा प्रयत्न- विनायकाला अटक झाली व ब्रिक्स्टनच्या तुरुंगात डांबण्यांत आले. सावरकर बचाव समितीतर्फे त्याच्या सोडवणुकीचे कायदेशीर प्रयत्न झाले व त्याजबरोबर त्याच्या धाडसी सहकाऱ्यांनी त्यास तुरुंगांतून सोडवून नेण्याचे प्रयत्न केले; पण दुर्दैवाने त्यांतील अकही सफल झाला नाही. ज्या वेळी त्याचे मित्रांना त्यास भेटण्याची परवानगी मिळाली त्यावेळी त्यांपैकी कोणातरी अका मित्राचा पोशाख करून त्याने निघून जावें व मित्राने तेथे रहावे असे ठरले. त्यावेळी त्यांजसमोर - लंडनमध्ये ६७ संभाजीचा अितिहास होता. पण प्रकृतिभिन्नतेमुळे तो प्रयत्न त्यांना अमलात आणता आला नाही. दुसरा प्रयत्न आयरिश तरुणांच्या सहाय्याने करण्यांत आला. खटला चालू असतां विनायकास अका गाडीतून कोर्टात नेत असत. अकदां त्या गाडीवरच त्यांनी हल्ला केला. परन्तु सरकारला या बेताची आगाच कुणकुण लागल्याने त्या दिवशी पोलिसांनी ती गाडी कोर्टाकडे मोकळीच नेली. त्यामुळे क्रांतिकारकांच्या हाती विनायक लागला नाही व क्रांति- कारकांचा तोही प्रयत्न हुकला. तेव्हां सनदशीर प्रयत्न जोराने सुरू झाले.

- कारागारांत -
आजपर्यंत शक्य तितकें अधिक काम करण्याची मी परा-
काष्ठा केलेली आहे. आता मला अधिकांत अधिक दारुण
दु:ख सहन करण्याची पराकाष्टा करू द्या.
सावरकर जीवन चरित्र
हिंदुस्थानचा क्रांतिसिंह अिंग्रजांच्या जाळ्यात अडकला. विनायक
अिंग्रजांचा कैदी बनला. त्यानन्तर थोड्याच दिवसांत त्याजवर खटला
भरण्यांत आला नि त्याच्या सुनावणीस सुरवातही झाली.
खटला सुरू असतांच सरकारला दिसून आलं की, विनायकाची
मित्रमंडळी ब-याच अलाढाली करीत आहे. मोठमोठे नामांकित वकील
देशून विनायकाची बाजू भकम करूं पहात आहेत. आणि न जाणो
अिग्लंड हे लोकशाही प्रधान राष्ट्र आहे. आरोपीचा अखादा वकील
काहीतरी विलक्षण मुद्दा अपस्थित करील नि हातची पारध सहजा-

कारागारांत सहजी निघून जाील. यापेक्षां कांहीतरी युक्ति योजून आरोपीची चौकशी येथे न करतां हिंदुस्थानमध्येच करावी. हिंदुस्थान हे साम्राज्या- तर्गत राष्ट्र आहे. तेथील न्यायालये आपलीच आहेत. तेथे आपण हवी तितकी कठोर शिक्षा ठोठावं. याचे भाकीत लाला हरदयाळांनीही पुढील प्रमाणेच केले होतें- कदाचित तिकडे हिंदुस्थानांत बचावा- साठी वकील-बॅरिस्टर देण्याची योजना होील; पण चौकशी होील ती शुद्ध पोरखेळाच्या स्वरूपाची होईल.' आणि हे जाणूनच सरकारी वकीलाने हा मुद्दा अपस्थित केला. व न्यायालयाने ' आरोपीला त्याच्या देशांतच चौकशी होणं हे अधिक फायद्याचं होील' असा निकाल दिला. तुरुंगांतून हलविलें अर्थात न्यायालयाचीच सम्मति मिळाल्यावर ब्रिटिश सरकार थाबतें थोडेच! त्याने त्यास हिंदुस्थानांत नेण्याची जय्यत तयारी केली. त्याला ज्या ' मोरिया' बोटीवरून न्यावयाचे ती बोट मध्यंतरी थांबणार की नाही याची वाच्यता सरकारने मुळीच होशं दिली नाही. त्याला माहीतच होते की, त्याचा मित्रगण विनायकास हरप्रयत्ने सोड- विण्याचा प्रयत्न करीत आहे. पण विनायक कांहीं बोळ्याने दूध पीत नव्हता. त्याने ऋषिजी अर्फ व्ही. व्ही. अस्. अय्यर, मॅडम कामा आदि सहकाऱ्यांना तुरुंगां- तून गुप्त पत्र लिहून ' मार्सेलिस बंदरावर जय्यत तयारीनिशी सज्ज रहा' असा आदेश पाठविला आणि त्याप्रमाणे झालेही. पण अशीरा. - HPA १५i ऋषिजी श्री. व्ही. व्ही. अस् अय्यर ! खरे नांव व्यंकट सुब्रह्मण्य अय्यर ! प्रथम चैनी, अहंमन्य पण पुढे सावरकरांचे ब्रिटिश राज्यपद्धतीने आपल्या- वर अपकार केले आहेत काय ? ' या व्याख्यानानंतर सावरकरांचे क्रांतिकार्यांतील अजवे हात बनले. भारतभवनांत ठाण मांडून बसलेल्या हेरालाच चतुराीने आपल्या जाळ्यात अडक- विलें. सावरकरांच्या अटकेनंतर त्यांच्या सुटकेसाठी अनेक धाडसाचे प्रयत्न केले. ब्रिटिश हेरांना सहजासहजी चकविलें व चमकाविले. पिंग्रा निषेध सभेच्यावेळी सावरकरांना जखम होतांच जखम करणाऱ्यावर चवताळून पिस्तूल रोखले. ते हे सावरकरांचे ऋषितुल्य व बंधुतुल्य नि सावरकरांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताची जबाब दारी पत्करणारे विश्वासू सहकारी !

कारागारांत ७१ ^^^^ - विनायकाला १-७-१० रोजी मोरिया बोटीवर चढविले. बोट चालू झाली. विनायकाचे विचारही चाल झाले. त्याने विचार केला 'आपण कैदी बनलो. शिवाजीही कैदी बनला होता. पण त्याने औरंगजेबाच्या डोळ्यांत धूळ फेकली व त्याच्या हातावर तुरी देशून मोठ्या बदोबस्तांतूनही निसटला. त्या शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रांतलें आपण. आपणही महाराष्ट्राचे तेज दाखवूया व शत्रूला पटवूया की, महाराष्ट्र मेला नाही, तो अजून जिवंत आहे. ज्या महाराष्ट्रांत हिंदुपत- पादशाही स्थापणारा शिवाजी झाला, अटकेवर ध्वज फडकविणारा राघोबा झाला, साऱ्या भारताला दरारा बसविणारा बाजीराव झाला, दिल्लीचे तख्त फोडणारा सदाशीवराव भास झाला तो महाराष्ट्र मरेल कसा? विनायकाच्या मनांत असा विचार आला मात्र; लगेच त्या दृष्टीने तो संधि पहूं लागला. बोट बिस्केच्या अपसागरांत शिरली. वादळी वारे वाहू लागले. बोट हेलकावू लागली. बिस्केचा अपसागार गेला. आतां बोट मार्सेलिस बंदरांत शिरली; तरीही विनायकाला संधि मिळाली नाही. होतां होतां मार्सेलिस बंदर आहे. बंदरांत बोट थांबणार नाही असाच सर्वांचा समज करून दिला होता आणि कदाचित थांबलीही नसती. पण बोटीच्या अॅजिनांत बिघाड झाला नि बोट थांबली. हीच खरी वेळ होती आणि विनायकाने ती साधलीही. त्याने पहारेकऱ्यांस 'संडास'मध्ये नेण्यास सांगितले. पहारेकऱ्याने त्यास संडास. मध्ये नेले. आंतील कैदी काय करीत आहे हे दिसावे म्हणून मोठ्या खुबीनें संडासांतील कांचांची रचना केली होती. चाणाक्ष विनायकाने हे तेव्हांच ताडले व काहीतरी निमित्ताने त्याने पहारेकऱ्यास तेथून दूर ७२ वीर विनायक , घालविले व तेवढ्या मुदतीत अंगावरील कपड्याने ते आरसे झांकून टाकले व संडासमधील पोर्टहोलमधून त्याने स्मुद्रांत अडी घेतली. तें पोर्टहोल बरेच लहान असल्याने विनायकाचें सारें अंग खरचटले व रक्ताळले; पण सागराने त्यास अलगत झेललें व मार्सेलिसच्या धक्क्या- जवळ नेसून सोडले. फ्रेंच हद्दीवर धक्याजवळ येतांच विनायकानें तो इंचच्या झुंच कडा चढण्यास प्रारंभ केला. पण थोडा वर जातो न जातो तोच तो खाली पाण्यांत कोसळला. सिंहगड चढत असतां तानाजीची यशवंती घोरपड पर- तली. ' यशवंतीने ' अपशकून केला. पण अवढ्याने 'तानाजी' डग- मगला नाही. त्याने फिरून प्रयत्न केला. विनायकही पुन्हां प्रयत्न करून तो तट चढला नि फ्रेंच हद्दीला लागला. जमिनीवर येतांच त्याने पोलिसास हाका मारण्यास सुरवात केली. तो स्वत: धावू लागला. त्याला फ्रेंचांच्या न्यायालयांत जायचं होतं. आपले सहकारी जवळपास तेथेच कोठे आहेत का हे पहावयाचे होते. पोहण्याचा, त्यांतच तट चढण्याचा शीण आलेला, अंग खरचटलेलें, भिकाऱ्यासारखाच नव्हे तर मवाल्यासारखा भासणारा तो महाराष्ट्रीय वीर समोरून बसेस् येत असतां, मागून बसेस् जात असतां पहात होता. त्यांत तो चढतां तर केव्हांच न्यायालयांत वा आपत्या मित्रांत पोचतो. पण त्याजजवळ त्यावेळी अंक दिडकीही नव्हती. त्याचे सह- कारीही तेथे हजर नव्हते आणि याचा परिणाम केवढा घोर झाला!

कारागारात ७३ पुन्हां कैद -- विनायकाने अवढा मोठा सांवळा गोंधळ केला तेव्हां बोटीवरही अकच गडबड असळली. 'कैदी पळाला, कैदी पळाला, सावरकर पळाला' अशा आरोळ्या निर्धू लागल्या. बोटींवरील प्रवाशांपैकी कोणी खेद, कोणी त्वेष, कोणी राग, कोणी आश्चर्य वा कोणी आनंदही दर्शवीत होते. बोटीवरील अधिकारीही त्याचा पाठलाग करूं लागले. विनायक मध्यंतरी चढतांना खालीं न कोसळता, अगर त्याजजवळ अखादी दिडकी वा पेनी असती, अथवा त्याचे बंधुतुल्य व्ही व्ही. अस् अय्यर प्रभृति सहकारी त्याचवेळी जवळपास कोठे असते, तर तो त्यांच्या हातास मुळीच लागला नसता. कदाचित् त्याचे आयुष्यही निराळे बनले असते. पण विधिघटना कोणाला टाळतां आली आहे का ? शेवटी पाठलाग करणाऱ्या आधिकाऱ्यांनी विनायकाला गांठलेच. * आतां आपला निभाव लागणार नाही' असे पाहतांच जवळ अस- लेल्या फ्रेंच पोलिसाच्या तो स्वाधीन झाला. पण फ्रेंच पोलीस पेशाला भाळला आणि लांच घेअन त्याने विनायकास ब्रिटिशांच्या ताब्यात परत दिले. विनायक परत कैदी म्हणून बोटीवर आला. आता त्याजवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. पहारेकरी त्याला पावलोपावली डिवचूं व हिणवू लागले; पण करतो काय ? पिंज-यांत डांबलेल्या सिंहासारखी त्याची अवस्था झाली होती.

वीर विनायक हेगच्या न्यायालयाचे बाहुले- लांच देशून विनायकाला ब्रिटिश पोलिसांनी परत घेतलं खरं; पण त्यानन्तर साऱ्या युरोपभर जो हल्लकल्लोळ माजला त्याला तोंड देणं हे कांहीं सोपं काम नव्हतं. विनायक 'फ्रेंचां'च्या 'जमिनी' वर उतरला होता, या गोष्टीचा त्याच्या मित्रांनी भरपूर फायदा करून घ्यायचं ठरविलं. राष्ट्राराष्ट्रांचे अकमेकांशी वागतांना काही विशिष्ट नियम उरलेले आहेत व ती बंधनें प्रत्येक राष्ट्राने पाळावयाची असतात. यांनाच आंतरराष्ट्रीय. कायदा म्हणतात. याच कायद्यांतील अक कलम असें की, परकीय. राष्ट्राचा कैदी पळाला व दुसऱ्या राष्ट्राच्या हद्दीत प्रवेशिला तर त्या कैद्यावरील मूळ राष्ट्राचा अधिकार नाहीसा होतो व त्यावर नवीन. सरकारचा अधिकार चाल होतो. 'या कलमाला धरून ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेला कैदी परत फ्रेंचांच्या ताब्यात द्यावा. नाहीतर तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरेल' असें वर्तमानपत्रांतून सर्व दिशांकडून हल्ले सुरू झाले. प्रथम फ्रेंच व ब्रिटिश सरकार त्याची दखलच घेीनात. पण पुढे या लिखा- गांत अितकी तीव्रता निर्माण झाली की, ब्रिटिश सरकारला हेगच्या. न्यायालयांत आरोपीच्या पिंजऱ्यांत अभे रहावे लागले. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या कटकटी कांहीं अितर राष्ट्रांच्या प्रतिनिधीस न्यायाधीश नेमून सोडवावयाच्या असतात. नुकताच रािणमधील तेलाचा प्रश्न ब्रिटिशांनी ' ' हेगच्या' आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे नेला होता. पण जोवर राष्ट्राराष्ट्रांत समबलत्व नाही किंवा जोवर बल- कारागारांत वान राष्ट्राच्या पंजाखालील राष्ट्रांच्या प्रतिनिधींची न्यायाधीश म्हणून नेमणूक होत आहे तोवर तरी ' हेग' च्या आंतरराष्ट्रीय न्यायालया- कडून न्याय्य न्याय मिळणं शक्य नाही. येथेही असेच झाले. हेम न्यायालयानं ब्रिटिशांना अनुकूल असाच निकाल दिला. भारतांत खटला चालू झाला- तिकडे युरोपांत आंतरराष्ट्रीय खळबळ माजून राहिली होती. जिकडे तिकडे हिंदुस्थान व सावरकर हेच प्रकरण गाजले होते. कोणी प्रौढी. मिरवितात की, भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्व आजच केवळ प्राप्तः झाले आहे. पण ही समजूत मुळांतच भ्रामक आहे. आज हिंदुस्थान स्वतंत्र आहे. भारताची लोकसंख्या अफाट आहे. तेव्हां पाश्चिमात्य व जगांतील अितर राष्ट्रांना हिंदुस्थानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आजची जागतिक परिस्थितीच अशी आहे की, त्यामुळे लहान लहान राष्ट्रांनाही आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त होत आहे. तेवढ्यासाठी कोणी शेखी मिरवू नये की, 'माझ्यामुळं या राष्ट्राला महत्पद प्राप्त झाले व जागतिक महत्त्व आले! आज अिराणही साऱ्या जगाच्या तोंडी आहे. अिजिप्त आहे. चीन आहे. मलाया देखील जागतिक महत्त्व प्राप्त झालेला देश आहे. गेल्या महायुद्धांत नेस्तनाबूद झालेली जपान, जर्मन ही राष्ट्रही पुनरपि नव्या जगाच्या रजतपटावर चमकू पहात आहेत. पण भार- ताला याही पूर्वी ' सावरकरांनी आंतरराष्ट्रीय महत्व आणून दिलं होतं.'' त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता. देशांत सार्वत्रिक अठावणी झाली नव्हती. आजच्यासारखें ब्रिटिनचे आसन डळमळीत झाले नव्हते. जगांत पहिल्या प्रतीचे व सामर्थ्यसंपन्न असें तें राष्ट त्यावेळी होते.. -- ७६ वीर विनायक आणि त्यावेळीच विनायकानें लंडनमध्ये राहून, ब्रिटिश सरकारवर मात करून, पेंचावर प्रतिपेंच टाकून व माझेलस बंदरांत ‘खवळलेल्या सागरामध्ये बोटीवरील अधिकाऱ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव होत असू- नही-झुडी घेथून ( आणि तेही मोठ्या कडक बंदोबस्तांत असतां व कैदी असता, ) भारताचा डंका त्रिखंड दुमदुमत ठेवला होता. अशा प्रकारे हेग प्रकरण चाल असतांच त्या न्यायालयाच्या निर्ण- याची वाटही न पाहतां हिंदुस्थान सरकारने विनायकावर खटला भरला व चालंही झाला. अर्थात हरदयाळनी म्हटल्याप्रमाणे येथील न्याया- लयीन चौकशी म्हणजे शुद्ध पोरखेळच ठरली. न्यायालयीन सर्व दिखा सोपस्कार झाले. विनायकाने या खटल्यांत स्वत:ची बाजू मांडण्याचं नाकारलं. त्याची मदार फ्रेंचांवर होती. आपले रक्षण फ्रान्स करील. कारण त्या राष्ट्राच्या अितिहासांत स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वत्रयींची परंपरा प्रस्थापित झाली होती. न्यायालयाने निकाल देतांना सांगितले, 'जिंग्लंडांत जाण्यापूर्वीचे आरोपीचे चरित्र व आरोपीने अिंग्लंडांत असतांना केलेली कृत्ये ही पाहतां आरोपीने पाठविलेली पिस्तुले, सरकारी अधिकाऱ्यांचे खून करण्यासाठीच पाठविली होती व आरोपीने धाडलेल्या पत्रकांतून असे खून करण्याचा अपदेश करण्यांत आला होता हे सिद्ध होते. यासाठी आम्ही आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सांगतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या खटल्यांतील पुरावा पाहतां, आरोपीनें जॅक्सनच्या खुनाला मदत केली आहे, असे सिद्ध होते. याही आरोपासाठी आरोपीस दुस-या जन्म- कारागारांत ७७ ठेपेची शिक्षा आम्ही सांगत आहोत. या दोनही शिक्षा अकाचवेळी भोगावयाच्या आहेत व आरोपीची सर्व मालमत्ता जप्त व्हावयाची आहे.' झाले ! भारतांतील खटल्याचा निकाल लागला व विनायक दोन जन्मठेपी झालेला भयंकर कैदी बनला. अशा भयंकर कैद्यासाठी फ्रान्सने आपला हेका चालवू नये असा हेग न्यायालयाने निकाल दिला व फ्रान्सच्या दुर्बळ अिभ्रतीचा काडीइतकाही अपयोग न होता विनायकाला अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्याला. पाठविण्याचे सरकारने मुक्रर केले.

अंदमानांत 'शौर्याची शर्थ करून विश्वासरावाने अल्पवयांतच समरांगणी आपला चिमुकला देह ठेवला. त्याच समरांगणाच्या धुमश्चक्रीत त्याचा पितृबंधू सदाशिवरावभासू अल्पवयांतच त्या भाअ. गर्दीत नाहीसा झाला. श्री ज्ञानेश्वरानी आपलं अिप्सित कार्य अल्पवयांतच संपवून आपली अवतारसमाप्ती केली; आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी देखील आपल्या तेजस्वी बुद्धीची अज्ज्वल ध्वजा फडकावून अिहलोकींची यात्रा अल्पवयांतच संपविली. थोरल्या माधवरावांनी पराक्रमांची दीर्घ मालिका गुंफून आपला देह ठेवला, तोही अल्पवयांतच. त्याच अल्पवयांत हा स्वातंत्र्यवीर आपले अफाट कर्तृत्व नि अजोड शूरत्व जगाला दर्शवून, त्या कर्तृत्वाने नि शूरत्वाने जगाचे डोळे दिपवन, अखाद्या कर्मयोग्याप्रमाणे अंदमानच्या काळ्या पाण्यावर, श्रीरामाप्रमाणे केवळ चौदाच वर्षे नव्हे तर आयुष्याची पन्नास अंदमानांत ७२ वर्षे वनवास भोगण्यासाठी स्वकर्तव्य पालनाच्या विशाल आनंदांत निघून गेला. भा. द. खेर न्यायालयाने विनायकाला दोन जन्मठेपेची व असेल नसेल त्या मालमत्तेच्या जप्तीची शिक्षा दिली. न्यायालयीन निकालानन्तर तुरुंगांत असतां अके दिवशी त्याची प्रियपत्नी त्यास भेटावयास आली. आपले पति आतां अंदमानावर जाणार. ५० वर्षे तेथें शिक्षा भोगणार. तेथील यमयातनांतून ते परत येतील कां, या विचारांनी तिचे डोळे पाण्याने भरून गेले. बिचारीचा सारा संसारच अन तार- ण्यांत अजाड बनला. पतीशी चार शब्द प्रेमळपणे बोलण्याचे सुखसुद्धा आतां आपल्याला लाभणार नाही. स्त्रियांचा धर्म जो पतिसेवा त्याला तर तिला आतां जवळ जवळ कायमचेच मुकावे लागणार. त्यावेळी तिच्या हृदयांत कोण कालवाकालव झाली असेल ? पण ती एका शूर देशभक्ताची वीर पत्नी होती. तिने आपलें अन्तःकरण दगडासारखे घट्ट केलें व येथील त्या प्रसंगास तोंड देण्यास योगिनीप्रमाणे सिद्ध झाली. या बिकट प्रसंगी त्या वीरपत्नीचं साजेलशा शब्दांतच विनायकनं -सांत्वन केलं. तो म्हणाला, 'तुम्हीं वीरपत्नी आहात. सुशील, सुविद्य तशाच सुविचारी आहांत. विचार करा. चार भिंतीआडच्या जगांत राहून चारदोन मुला- बाळांतच मनुष्याच्या आयुष्याची अितिश्री आहे काय ? असा संसार कावळे चिमण्याही करतात. समंजसपणा धरा व भोंवतालचा विचार वीर विनायक N करा. कदाचित आपली ताटातूट झाल्यानेच अितर हजारों घरांतून प्रेमाचे संगीत निर्माण होअं लागेल. सोन्याचा धूर निघू लागेल.' या समयोचित व वीरोचित सांत्वनाने तिला पुढील भकास काळ कंठण्यास थोडा तरी धीर मिळाला. अंदमानकडे रवाना- हिंदुस्थानांतील विनायकाचा कारावास संपला. १-७-११ रोजी मद्रास बंदरांत 'महाराजा' बोटीवर त्याला चढविले. महाराजा बोट चालू झाली. कंसाने देवकीच्या मांडीवरील तान्हुल्यास जितक्या कठोरतेनें हिसकून घेतलें तितक्याच कठोरतेनें, अगर त्याहीपेक्षां अक्रूराने कृष्णास यशोदामातेपासून कर्तव्यबुद्धीने दूर नेले. तद्वत । महाराजा बोटीने अनिच्छेने भारताच्या या लेकराला दूर नेलें व अका भयानक व रुक्ष प्रदेशांत आणून सोडले, ही अपमाच अधिक सार्थ होईल. ४.७-११ रोजी 'महाराजा' बोट अंदमानला लागली व त्याच दिवसापासून त्याचे अंदमानांतील 'भयंकर कैद्या'चे जीवनास सुरुवात झाली. - नाशीक व पुण्यास अंदमानची स्थिति- विनायकानें आपलें बालपण ' भगूरा 'स संपविले. विद्यार्थीदशा. संपविली. क्रांतिकारक आयुष्य लंडनमध्ये घालविलें.. आणि आतां पुढील पन्नास वर्षे त्याला अंदमानांत काढावयाची होती. अंदमानांत जातेवेळी त्याचे वय अवघे २७ होते. म्हणजे त्याने तारुण्यात पदार्पण करून अवघी ३ वर्षे झाली होती. आतां पूर्वीप्रमाणे त्याची शैशवावस्था, बाल्यावस्था राहिली नव्हती. म्हणून येथून पुढे ३ अंदमानांत ८१ , त्यास 'विनायक' या अकेरी नांवाने संबोधणे चक होील. यावेळी जगांत तो ‘विनायक' या नावाने ओळखला जात नव्हता. तर 'सावरकर ' हे त्याचे नांव जगभर निनादून राहिले होते. म्हणून आपणही त्याच नावाने त्यास संबोधणे अधिक चांगले नाही का ? सावरकर अंदमानांत येण्यापूर्वी अंदमानाची स्थिति बरीच असंतोषाची झाली होती. सुरुवाती सुरुवातीच्या कैद्यांना मिळत असलेल्या सवलती रद्दबातल झाल्या होत्या. पठाण कैद्यांना ते गुन्हेगार असूनही केवळ आडदांड पठाण म्हणून अितर कैद्यांवर देखरेख ठेवण्याचे अधिकार प्राप्त झाले होते. ते हे पठाण व अितर अधिकारी या बंदिवानांवर अनन्वित जलम करूं लागले. अमानुष कामें करावयास लावून बंदिवानांचे रक्त शोषणाचे काम राजरोसपणे या बड्या जळवांकडून चाल होते. यामुळे बंदिवान व अधिकारी यांच्यात वारं- वार खटके झुडत. पण अधिकाऱ्यांच्या हातांत सत्ता असल्याने कैद्यांच्या घुसफुशीचा फारसा उपयोग होत नसे. उलट अशा असंतुष्टतेमुळे वरिष्ठांची अितराजी मात्र होत असे. सावरकर अंदमानांत आले नि ही जबरदस्ती बंद होत आली कारण त्यांचा घालमेली व अठाठेवी स्वभाव येथेही स्वस्थ बसू देत. नव्हता. येथेही त्यांनी कैद्यांत अकमेकांविषयी आपुलकी, स्वत्व स्वाभिमान व प्रेम निर्माण केले. त्यांच्यांत संघटना करून प्रचंड बळ संपादिले व अधिकाऱ्यांस नमविले. संप, अन्नत्याग यासारखी तेजस्वी हत्यारें अपसून जुलमी अधिकाऱ्यांना 'सळो की पळो' करून सोडले, वीर विनायक...५ sease Hi. बाबाराव सावरकर आणि हे बाबाराव सावरकर ! स्वा. सावरकरांचे थोरले बंधू ! स्वतःच्या जीवनाचा ' स्वातंत्र्य लढ्यांत पूर्णपणे होम करून देशास · वीर विनायकाचे फल प्राप्त करून दिले. आज सजविलेले स्वातंत्र्याचे मन्दिर आपण मनसोक्त पहात आहोत. स्वा. सावर- करांसारखे अनेक संगमरवरी पत्थर या स्वातंत्र्य मन्दिराच्या मितींत आपण पहात आहोत; पण या स्वातंत्र्य मन्दि- राचा पाया बाबाराव सावरकरांसारख्या प्रसिद्धी- विन्मुख पण कर्तव्यतत्पर फत्तरांवर अभारला आहे. त्यांना आपण प्रथम वन्दन करूंया!

अंदमानांत - अंदमानांतील कैद्यांना धर्मचिन्हें अंगावर वापरूं देण्यास मनाजी असे. अका पंजाबी ब्राह्मण तरुणाने स्वतः बलिदान केले व त्यामुळे धर्म- चिन्हांवरील बंदी अठवावी लागली. तुरुंगांत खितपत पडलेल्या कैद्यांना खावयास बऱ्यापैकी सुद्धा अन्न मिळत नसे. तें सुधारावे म्हणून अनेक बंदिवानांनी अपवास करावयास आरंभ केला. नानी गोपाळ हा तर कोवळा तरूण; पण त्याने ७२ दिवस अपवास केला. त्यांतही कैद्यांनी यश मिळविले व अन्नांत सुधारणा झाली. शिक्षांचे स्वरूप- सावरकर अंदमानांत आल्यानंतर त्यांनाही अितर कंयाप्रमाणे शारीरिक कष्टाची कामें अंगमेहनतीने करावी लागली. ती नारळांची वासलात लावणे, त्यांच्या शेंड्या व केशर सोडविणे, तें केशर व शेंड्या कुटन काथ्याच्या दोऱ्या वळणे, आंतील खोबऱ्याची भकलं पाण्यात घालणे, घाणा ओढून त्यांतून तेल गाळणे आणि चुकून कुठे गुप्त पत्र अगर कोरा कागद सांपडला तरीही त्यास टांगलेल्या हलकडीत अडकळवून लोंबकळवणे व सर्व शरीर रक्तलांछित करणे, ही सारी कामें सावरकरांनी केली व या साऱ्या शिक्षा त्यांनी निमूटपणे सोसल्या. मात्र यांतूनही कांहीं कैदी नंदगोपालासारखे निघत. कामांत व्यवस्थित टाळाटाळ करीत व योग्य ती अत्तरे देशून अधिका-यांवर मात करीत. त्यांना चूप बसवीत. कांहीं कैदी अघड अघड अधिकाऱ्यांचा पाणअतारा करीत. काहींना अंदमानांतील हाल अितके जाणवत की, त्यांना जगणे.

धीर विनायक सुद्धा असह्य होी. जिंदुभूषणसारखे कैदी तर आत्महत्या करीत. अल्हासकरासारख्या कैद्यांना वेड लागे, बाबाराव सावरकरांसारख्या कैद्यांना क्षयाचा त्रास होी. अशा प्रकारच्या रानटी शिक्षांचा सावरकरांच्या शरिरावर फार अनिष्ट परिणाम झाला. दिवसेंदिवस त्यांची प्रकृति क्षीण होशू लागली. अितर अनेक व्याधींचा किरकोळ त्रास होछू लागला. क्षयाची पूर्व- चिन्हें दिसू लागली. वजन घटत घटत ९२ पौंडांवर येथून ठेपलें. दरम्यानच्या काळांत सावरकरांच्या मनांत अनेक वार आत्महत्येचे विचार चमकून गेले. पण विचारावर विवेकाने मात केली व तसें काही अभद्र घडून आले नाही. अशा स्थितीत दिवस कंठीत असतांही त्यांच्या नेहमीच्या गोष्टी चालूच हो या. अंदमानांत नवीन येणाऱ्या कैद्यांकडून भारताविषयीं नवीन गोष्टींच ज्ञान घेणं चालूच होतं. बेड्यांच्या खुळखुळन्या आवाजावर सांकेतिक लिपी बसविलेली होती. गळ्यांतील डी तिकिटांचा संदेशवाहक बिल्याप्रमाणे अपयोग केला होता. लिहिण्यास कारागृहाच्या नियमाप्रमाणे कागद मिळत नसे, तर तुरुंगाच्या भिंतींच्या विटांवर कोरून ठेवीत. स्वतः मुखोद्गत करीत. लवकरच शिक्षा संपून बाहेर पडणार असणाऱ्या बंदिवानांकडून पाठ करवून घेत. किंवा अनेक हिकमतीने कागद मिळवून त्यावर आपलें काव्य अतरवीत आणि मग त्याचा भारतांत प्रसार होी. ज्या काव्यानं सावरकरांना अभिजात कवि अशी मान्यता मिळवून दिली तें 'कमला' हे काव्य याच अंधार कोठडींत जन्माला आले.

अंदमानांत हिंदुत्वाचा पाया- यक्षपत्नी व यक्ष आपापले विरह दिवस जसे मोठ्या कष्टानं मोजीत घालवीत, तद्वत सावरकर आपल्या भारतमातेच्या वियोगाचे अंदमानांतील दिवस घालवीत होते. या वास्तव्यांत त्यांना दिसून आलं की, आपला हिंदू समाज विस्कळीत आहे. आपल्याच बांधवां- विषयीं तो अदासीन आहे. खुद्द अंदमानांतच पठाणांनी पद्धतशीर मुस्लिमीकरण चालविले होते. अशा धर्मांतरित कैद्यांशी हिंदू कैदी फटकून वागत. यामुळे अंदमानांतील हिंदू कैद्यांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली तर मुसलमानी कैद्यांची वाढू लागली. हिंदूधर्मावरील हा घाला सावरकरांनी जाणला व त्यांत जातीने लक्ष घालून व प्रसंगी अितर हिंदू कैद्यांचा रोष पत्करूनही हे पठाणीकरण हाणून पाडले. येथूनच त्यांचे लक्ष हिंदुत्वाकडे, निद्रिस्त हिंदुत्वाकडे गेले. रत्नागिरीस सभोवार पाहिले की, हिंदूंवर आजपर्यंत अनेक हल्ले झाले आहेत. अद्यापिहि हिंदूंवर अत्याचार होत आहेत व पुढेही जलम नि अना- चार चालूच रहाणार, या सर्व घडामोडींचा त्यांनी अभ्यास केला व त्यांची खात्री पटली की, मुसलमान हिंदुत्वावर घाला घालून स्वतःचे राष्ट्र हिंदुस्थानांत स्थापू पहात आहेत. शून्यांतून ते पाकिस्तान नि पहात आहेत. त्यास शह द्यायचा असेल तर हिंदूंनी संघटित झालं पाहिजे, हिंदू म्हणूनच जगलं पाहिजे व हिंदू म्हणूनच मेलं पाहिजे लष्करीकरणाची मुहूर्तमेढ- सावरकरांच्या आयुष्यांत ' हिंदुत्वाचा 'पाया अंदमानच्या लहानशा कोठडीत घातला गेला व त्यांनी अहिंदूशी हिंदूंनी वागतांना पुढील- ८६ वीर विनायक . प्रमाणे वागावे असा अिपारा दिला. तो कांहीं काल परवाचा झालेला त्यांचा कायापालट नव्हे. त्यांनी बजावले, ' अहिंदू येतील तर त्यांचे. सह, न येतील तर त्यांचेवांचन, व विरोध करतील तर त्या विरोधास अच्छेट्न हिंदू आपलं न्याय्य स्वातंत्र्य मिळवतीलच मिळवतील. जशी सावरकरांची ' हिंदुत्वाची' भूमिका पूर्वीचीच आहे. त्याच प्रमाणे ' लष्करी' करणाची भूमिकाही त्यांनी पूर्वीच स्वीकारली आहे. तीही काही गेल्या महायुद्धात सोयीप्रमाणे स्वीकारलेली व हिंदुस्थाना- वरील साहेबाची पकड घट्ट व्हावी म्हणून केलेली 'रिक्रूटभरती'ची आरोळी नव्हे. कारण अंदमानांतच सावरकरांच्या सैनिकीकरणा'ची मुहुर्तमेढ रोवली गेली. १४ सालचं युद्ध जर्मनीगट विरुद्ध अिग्लडगट असें चालू होत जर्मन जहाज अंदमानाभोंवती घिरट्या घालत होतं. सावरकर प्रभृति राजवंदींना त्यांना पळवून न्यायचं होतं. लाला हर- दयाळ अकवेळ सावरकरांचे विश्वासु सहकारी होते. त्यानी अमेरिकेत गदग' पार्टी स्थापन केली होती. जर्मनीने आपल्या पार्टीस शस्त्रांची व अर्थाची मदत करावी अशी त्यांची खटपट चाल होती. आणि त्यास यशही आले. पण ब्रिटिशांचे सुदैव व भारताचे दुर्दैव म्हणून 'गदग' पार्टीस यश आले नाही. व शेवटी जर्मनीही पराभवाच्या खोल दरीत कोसळला. युद्धांत जर्मनीचा पराभव होणार हे दूरदर्शीपणाने जाणूनच अिकडे भारतांत लो. टिळकांनी सैनिकीकरणा'चा धडाडीने पुरस्कार चाल. विला होता. लोकमान्य यावेळी काही सरकारचे कैदी नव्हते. अगर त्यांना स्वतःची सुटका करून घ्यावयाची नव्हती. अथवा स्वत:चा अंद नांत स्वार्थही त्यांना साधावयाचा नव्हता किंवा ब्रिटिशांची पकडहीं हिंदुस्थानभोंवतीं घट्ट करावयाची नव्हती. मग त्यांनी सनिकीकरणाचे अगर विरोधी पक्ष सावरकरांच्या रीनिकीकरण धोरणाची टरेबाजी अडवीत असतां वापरणाऱ्या अपहासगर्भ रिकटभरतीचे धोरण का स्वीकारले ? अलट त्यांना देश स्वतंत्र करावयाचा होता व ते हे निश्चित जाणून होते की ' आल्या संधीचा आपण अवश्य फायदा घेतला पाहिजे. १८५७ नंतर भारताला निःशस्र करून ब्रिटिशांनी गोगलगाय बनविले आहे. साध्या चाकूनही भारतीय तरुण अर्धमेला होत आहे. अन् हे युद्ध आले नसते तर अद्यापही त्याची तीच स्थिति झाली असती. देवाने खर केली नी म्हणूनच युद्धांत भारती- यांना प्रत्यक्ष प्रवेश मिळाला. त्यांनी आतां शिवस्त केली पाहिजे. सर्व सैनिकी क्षेत्रे व्यापली पाहिजेत नि लढा बनलं पाहिजे; तरच आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य लढ्यांत व त्या नंतर स्वातंत्र्य मंदिरास चिरस्थायी स्वरुप देण्यास निभाव लागेल. अरवी नाही. सैनिकीकरणाचा अंदमानांतून प्रचार करतांना सावरकरांचीही हीच विचारप्रणाली होती. अगदी अलिकडच्या काळांतही हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून त्यानी हेच मत प्रतिपादन केले व आजही ते याच मताचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांचे निश्चित मत हे आहे की, कोणत्याही राष्ट्राचे स्वातंत्र्य व अिभ्रत ही त्या राष्ट्रांत सज्ज असलेल्या सैनिकी सामर्थ्यावर अवलंबून आहेत. साक्षरता प्रसार- । हिंदुत्व आणि सैनिकीकरण यांबरोबरच सावरकरांनी आणखीहि वीर विनायक कांहीं राष्ट्राच्या हिताची कामं केली. त्यांपैकींच साक्षरताप्रसार हेही अक होय. अंदमानांत येणारे सर्वच कैदी कांही शिकलेले नसत. त्यामुळे त्यांना सुशिक्षितांत अत्पन्न झालेलें देशप्रेम, स्वातंत्र्य, नीति व अनीति यांची काहीच कल्पना नसे. भयंकर स्वरूपाचे खाजगी हेव्यादाव्याचे गुन्हे करून कांहीं कैदी अंदमानांत येत. सावरकरांनी या सर्वांना हाताशी धरले. त्यांना लिहायवाचायला शिकविलें. पूर्वी जो कैद्यांचा कर्दनकाळ म्हणून गाजलेला तुरुंगाधिकारी बारी होता तो अतिशय जुलमी होता. तो यावेळी बदलला होता व त्याचाच कोणी नातलग तुरुंगाधिकारी झाला होता. या अधिकाऱ्याने त्यांच्या पुढील कार्यात कांहीच अडथळा आणला नाही. आणि यावेळी कैद्यांतही मोठी अकजूट झाली होती. त्याची थोडीशी चुणूक अधिकारी वर्गाला दिसून आली होती. २० साली जेव्हां लोकमान्य टिळक वारले तेव्हां तुरुंगां- तील सर्व कैद्यांनी अपवास केला व सुतकदीन पाळला. संघटनसामर्थ्यामुळे अधिकारीवर्ग बिचकू लागला होता. या त्यांच्या बढती व सुटका- अधिकारीवर्ग कैद्यांना भिझू लागला. येथपर्यंत सावरकरांनी मजल ठोकली. आतापर्यंत अंदमानांतील अधिकारीवर्ग फर्मावील त्या शिक्षा भोगाव्यात, जुलमी शिक्षा व वाीट अन्न यांविरुद्ध कैद्यांत चेतना अत्पन्न करावी, संप,अन्न सत्याग्रह धडवून अधिकारीवर्गावर दडपण आणावं व कैदीवर्गांत आत्मविश्वास निर्माण करावा, धर्मांतरितांची शुद्धि करावी व अशिक्षितांना सुशिक्षित करून सोडावे अशा प्रकारची अंदमानांत अनेक कार्ये त्यांनी केली होती व शिक्षेतील अनेक दिवस संपविलेही होते. तुरुंगाच्या नियमाप्रमाणे कैद्यांस ज्या सवलती असत त्या मिळण्यासाठी सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे अनेक अर्ज केले होते पण कशाचीच दाद लागली नव्हती. शेवटी त्यांस तेल गुदामा- वरील अधिकारी केलें व अशा रितीने त्यांस बढती मिळाली. अंदमानांतून परत भारताकडे - गुंतागुंत झालेल्या दोऱ्याची अक गांठ अकलावी म्हणजे दुसऱ्या गांठी सहजासहजी अकलं लागतात; त्याप्रमाणे सावरकरांना बढतीचे सख मिळाले व त्यानंतर अंदमानांतून बाहेर पडण्याचे सुखही लवकरच - प्राप्त झाले. भारतांतील भारतवासियांनी केलेल्या खटपटीस यश आले व १९२१ साली सावरकरांना अंदमानांतून हलविण्यात आले. अंदमानची ती कोठडी सोडतेवेळी त्यांना मनस्वी भडभडून आले. सहजच आहे. कृष्णाची जन्मभूमी जरी मथुरा असली तरी त्याचं सारं बाळपण यशोदेच्या कुशात, नंदाच्या घरी व गोपालांच्या संगतीत गेलं. अक्रूराबरोबर त्यांना सोडन जात असतां सारं गोकूळ दु:खी झाल्यास नवल नाही. तसेंच कृष्णाचे डोळेही पाणावल्यास आश्चर्य कसले ? जवळ जवळ ११ वर्षे त्या भूमीनं आपल्या मांडीवर त्यांना खेळविलं कुरवाळिलं, संभाळिलं. अनेक झगड्यांशी झगडे देअन स्वत:ला बढती प्राप्त करून घेतली. अभिजात कवि म्हणून ज्या काव्याने त्यांचे नांव मराठी वाङ्मयांत अजरामर करून ठेवलें तें 'कमला' काव्य व अितरही अनेक ग्रंथ येथीलच चार भिंतीच्या आंतील वीर विनायक " खुराड्यांत जन्म पावले ती भूमी सोडगं - आणि तेही मातेसमान असलेल्या येसूवहिनीच्या दुःखद निधनानंतर – साहजीकच सावर- करांच्या जिवावर आले. त्यावेळी त्यांच्या मन:चक्षूपढ़ें येस वहिनींची करुण पण तेजस्वी मूर्ती तरळू लागली. लहान वयांत येसूबहिनींचे पति गणेशपत अर्फ बाबा अंदमानांत गेलेले ! प्राणापलिकडे जतन केलेले विनायक भावोजीही अंदमानांतच बाबांना सोबत करण्यास गेलेले ! घरी केवळ धाकटा दीर व विनायक भावोजींची साध्वी पत्नी यमुना यांच्या सान्निध्यांत पतिराजाचे आणि भावोजींचे स्मरण चाललेलें ! कडींतील सारे प्राण अकवटून आणून डोळ्यांत सांठविलेलें आणि ती नजर-ती दिव्य नजर हजारों मैल दूर असलेल्या व कोठडीच्या आंत कोंडलेल्या व साखळदंडांनी जखडलेल्या, हलकच्यांत अडकविलेल्या नी तेलाचा घाणा ओढीत असलेल्या, छिलका कुटत असलेल्या नि काथ्याच्या दोऱ्या वळत असलेल्या त्या बंबुद्वयांकडे लागलेली ! तिकडे सावरकर बंधूंच्या हातांतून रक्ताचे थेंब झिरपत असत तर अिक्डे यांचे डोळ्यांतून अश्रृंच्या धारा ओघळत ! अशाही स्थितीत आपणांस दर्शन घडावं म्हणून येस् वहिनींनी आपले प्राण कुडीत जतन करून ठेविले. धाकट्या दिराने त्यांची अंदमानांत भेट घेता यावी म्हणून सरकारदरबारी शिकस्त केली; पण फत्तराहूनही कठीण हृदय असलेल्या सरकारने त्यांना परवानगी दिली नाही तेव्हां शेवटी केवळ भेटीच्या आशेनें आसुसलेला, तगलेला तो जीव 'पतिराजांचा हंबरडा फोडीत व 'भावोजीं' चा टाहो फोडीत निघून गेला होता.

अंदमानांत घातली. ती वहिनीची वत्सल मूर्ति पुन्हां आपणास दिसणार नाही हे विचार मनात येथून त्यांचं हृदय सुन्न झालं होतं. नकोच ते भारतांत जाणं असेही क्षणभर त्यांना वाटलं. पण खुद्द सरकारनेच त्यांना व त्यांच्या बंधूंना-गणेशपंतांना-बाबांना अंदमानातून हालवायचं ठरविलं होतं. सरकारच्या अिच्छेपुढं कोण काय बोलणार? अखेरीस त्यांचे अंद- मान सुटलें, कायमचे सुटले. अंदमान सोडते वेळी अंदमानांतील सावरकरांच्या बंदिवान सह- काऱ्यांनी, मित्रांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांचा निरोप घेतला व सरकारी हुकूम धाब्यावर बसवनही अका बंदिवान जमादाराने त्यांच्या गळ्यांत चांफ्याची पुष्पमाला आणि मग सावरकर 'महाराजा' बोटीने भारतास परत आले. अक्रूरानं कृष्णास नेतांना सुरक्षित परत आणून देण्याचं गोकुळ वासि- यांना व नंदाच्या यशोदेला अभिवचन दिले होते. 'महाराजा' बोटीनही भारताचा हा कान्हा भारतास परत आणून दिला. सावरकर अंदमानांतून परत आले तरी त्यांचा कारावास सुटला नव्हता. पण हाही काल गेला. येथीलही तीन वर्षांची कारावासाची मुदत संपली. त्यांचे शारिरीक हाल संपले. त्यांच्या अलाढाली संपल्या- त्यांचा हिंदुत्वाचा अवतार पुढे चालू झाला नि १९२४ साली सावर- करांची सशर्त मुक्तता झाली. दोन जन्मठेपी झालेला हा कैदी सुटेल व परत आपल्याला पहा- वयास मिळेल असें कुणाच्या स्वप्नांतही आले नसेल- -

९२
वीर विनायक
AN
पण कालाच्या झुदरांत काय दडलंय ते कुणाला समजायचं ?
कांही अटींवर कां होीना, पण त्यांची सुटका झाली व ते
थापल्या निवासस्थानी रवाना झाले. आपण त्यांचे शुभ चिंतन
चिंतूंया व त्यांना आपणांत परत आणून सोडणाऱ्या कालाचीही
-स्तुती गाजू या.
कालाय तस्मै नमः ।
.
.

-अध्यक्षपदावरून राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यंच साधनम् अभ्युत्थानाय हिंदुनामयं पक्षः प्रवर्तितः जोपर्यंत मुसलमानपक्ष काँग्रेसला आपणाकडे घेगानें सेंधून घेत आहे, तोपर्यंत हिंदुसभेच्याद्वारे काँग्रेसच्या या गतीला विरोध करण्यासाठी आपण या पक्षांत मिळालों असून राष्ट्रोद्धाराच्या खऱ्या झगड्यांतून काँग्रेसच्या बरोबर खांद्यास खांदा लावून लढं. अणुमात्राही मागें सरणार नाही. --वीर सावरकर स्वा. सावरकरांनी हिंदुसभेच्या अध्यक्षपदाचे स्वरूपच बदलून टाकले. अध्यक्षपदानें ते मोठे झाले नाहीत; तर अल त्यांच्या योगें अध्यक्षपद मोठे झाले, आणि तसें प्रभावी संग्राहक नि जागरूक नेतृत्व दुसऱ्या कोणाचे नसल्यामुळे वीर विनायक त्यांनाच हिंदुराष्ट्राने कानपूरला अक मताने सहाव्यांदा अध्यक्ष- स्थानी निवडले. ग. वि. केतकर ( सह्याद्री, जून ४३) सावरकरांची तुरुंगांतून कायमची मुक्तता झाली, पण त्यांजवर काही अटी लादल्या. ' राजकारणापासून दूर रहावयाचें व केवळ र ना- गिरी जिल्ह्यांतच हिंडावयाचे' याच त्या अटी होत. या नजरकैदेच्या मुदतीतही सावरकर स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी आपलं तन, मन, धन सामाजिक कार्यासाठी वेचलं. आपलं सर्वख हिंदुत्वा'च्या चरणीं वाहिलं. हिंदुत्वाला कीड लावणारी जातीयतेची, धार्मिक भोळेपणाची, बुवाबाजीची व अनिष्ट रूढींची बांडगुळं त्यानी जाळून टाकण्याची कोशीस केली. झुणकाभार सहभोजन, औद्योगिक कार्य, मंदिर प्रवेश, जलप्रवेश, भापाशुद्धि, लिपिशुद्धि आदि कार्ये त्यांनी नेटाने केली. अका धनिकाचे सहाय्याने त्यांनी रत्नागिरीस सांस खुलें असें पतित पावन' मंदिर बांधलें. याचवेळी सावरकर रत्नागिरी हिंदूसभेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. महासभा अजून राजकारणांत अतरली नव्हती. सावरकर बंधु त्रिवर्गांनी मोठ्या धाडसानं हिंदूसमाज सुधारण्याचं व जागत करण्याचं काम सुरू केलं. ' श्रद्धानंद' मधून नियमियपणे ते हिंदूसंस्कृतीचा पुरस्कार व प्रचार करीत. पूर्ण मुक्तता- आणि काय चमत्कार ! हीही स्थानबद्धता संपून गेली. १९३७ साल आलें. कूपर मंत्रिमंडळ आस्तित्वात आले. त्यांतील अक मंत्री अक्षध्यपदावरून श्री जम्नादास मेथा' यानी विशेष खटपट करून गव्हर्नर लॉर्ड बेबोर्नना सावरकरांची बिनशर्त सुटका करणेस भाग पाडलं आणि २७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानन्तर सावरकर पूर्णपणे स्वतंत्र झाले. सावरकरांची संपूर्ण मुक्तता होतांच त्यांनी मुंबीस वास्तव्य कर- ण्याचं टरविलं नि ते मुंबईकर बनले. वैचारिक मंथन राजकीय निबंधांतून सावरकरांची पूर्णपणे मुक्तता झाली. प्रत्येक पक्षियांना वाटू लागलं होतं; सावरकरांनी आपल्या पक्षाला येथून मिळावं. त्यावेळी काँग्रेसपक्ष देशांतील प्रमुख पक्ष म्हणून मानला जात होता. म. गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाभी पटेल अशा अव्वल दजाच्या लोकाग्रणींचे काँग्रेसला नेतृत्व लाभले होते. सावरकरांची मुक्तता होतांय त्यांनी आपल्या वसति- स्थानावर काँग्रेसचा तिरंगी ध्वजही उभारला होता. सुभापवाबूंनीही त्यांना काँग्रेसमध्ये येण्याविषयी विचारणा केली होती म्हणतात. काँग्रेसखेरीज दुसरा पक्षही हिंदुस्थानांत होता व तो म्हणजे हिंदु- महासभा. यावेळी हिंदुमहासभेला राजकीय महत्त्व मुळीच प्राप्त झाले नव्हते. ती अक केवळ सांस्कृतिक विचार करणारी संस्था अवढंच तिला महत्त्व होतं. पं. मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय, तात्यासाहेब केळकर, डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी, विजय राघवाचा- रियर असे प्रमुख पुढारी या वेळपर्यंत महासभेला लाभले होते. महा. सभेच्या शैशवावस्थेत तर काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडूनच व काँग्रे. सच्या मंडपांतच आधिवेशन भरत असे व तीमधीलच पढारी तिचे वीर विनायक अध्यक्ष होत. १९२७ साली तर म. गांधी महासभेचे चिटणीस. म्हणून होते, असा अके ठिकाणी अल्लेख आढळतो. म्हणजे काँग्रेसशी तसा महासभेचा संघर्ष मुळीच नव्हता. पण रत्नागिरी तुरुंगांतून सावरकर सुटले त्याच वेळी काँग्रेसची पावलं मुसलमानांचा अनुनय करण्याकडं वेगानं पडू लागली होती. त्या आधीं खिलापतीची चळवळ झालीच होती. 'या खिलापती- तूनच मलबारमधील आफत निर्माण झाली होती. या खिलापतीनेच मोपल्यांच्या बंडास जन्म दिला व तेथील हिंदूंची तेथील मुसलमानांनी सरसहा कत्तल केली. अबला व असहाय्य स्त्रियांवर अनेक पाशवी अत्याचार केले व लहान लहान अर्भकांची तर चराचर कंठनाळें चिरली. तरीही काँग्रेस स्वस्थच होती. तरीही काँग्रेस खिलापतीच्या चळवळीस हातभार लावाच म्हणत होती; आणि अिकडे मुंबी क अितर शहरांतूनही मुसलमान हिंदूंवर हल्ले चढवीतच होते. बाटवा- बाटवीचे तर प्रस्थ राजरोस चालू होते. अल्पसंख्य असतील त्या प्रदेशांत ते अल्पसंख्य म्हणून व बहुसंख्य असतील तेथे बहुसंख्य म्हणून त्यांना सवलती हव्याच होत्या. या सवलती पदरांत पाडून घेण्यासाठी जीनांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीगही मार्ग आक्रमू लागली होती. लोकांत नैराश्य असल्यामुळे व काँग्रेसने लोकांना भारले असल्यामुळे बहुसंख्याकत्वाच्या सबबीवर सिंध हा मुंबीपासून विलग करण्यांत आला होता व त्याचवेळी आमच्या काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्या, हातांनीच अशा रीतीने पाकिस्तानचा पाया अभारला होता. त्यास अनुसरूनच जीनांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती.

अध्यक्षपदावरून vm प्रत्येक कार्यात मुस्लिमांची ही अडचण होअन बसली. पाकि- स्तान दिल्याशिवाय ते पुढे पाअल टाकण्यास तयारही होनात व काँग्रेस तिचा अनुनय करण्याचेही सोडून देीना. त्यामुळे ते जास्तच शेफारले. ते करतील त्या मागण्या काँग्रेसने मान्य केल्या तरी त्यांचा आपला हात पुढेच. शेवटी तर महात्माजींनी त्यांना कोरा चेक' दिला. तरीही त्यांचे समाधान होीना. डोंगर महंमदाकडे येत नाही तर महंमदाने डोंगराकडे गेले पाहिजे, असे काँग्रेस नेते बजावू लागले. पूर्ण विचारान्ती- पण सावरकरांनी जाणलें की हा डोंगर साधा डोंगर नाही. स्वतः तो अकाच जागी स्थिर नाही. त्याला पंख आहेत नि त्यामुळं त्याला अंडतां येतं नि महंमद जसजसा त्याजकडे जाझं लागला, तसतसा हा डोंगरही मागे मागे सरकू लागला. या शर्यतीत डोंगराचे समाधान होण्याची मुळीच शक्यता नाही. अलट मागें आहे व महंमद त्याचे मागे मागें धांवत आहे तो शेवटीं महंमद कोणत्यातरी दरीत कोसळून त्याच्या या चिंधड्या अडणारच. हे सम- जून आपण वेळीच सावध झाले पाहिजे. मुसलमानांचे हिंदूंबर अत्या- चार होत आहेत ते, ते हिंदू म्हणून होत आहेत. प्रत्यक्ष हिंदूनी कितीही नाकारले तरी 'तं हिंदू आहेस म्हणून तुझा कांटा काढला पाहिजे' अशा हिरीरीनेच ते हिंदूंशी मुकाबला देत आहेत. पण मुसलमान हिंदूंवर अघड अघड हल्ले कां करूं शकत होते? त्यांचं शस्त्रबळ हिंदूंपेक्षा जास्त होतं का ? त्यांचं संख्याबळ हिंदुंपेक्षा डोंगर जसजसा सरकत वीर विनायक...६ माल होतं का? माला बसल्या होतं. हिंदु विस्कळित झाले होते. हिंदूंना विदंविषयींच प्रेम व विश्वास जाटत नहता. अकोळ हिंदू आले नाहीत तरी चालेल; पण मुसलमानांनी आपल्याशी हात- मिळपणी केलीच पाहिजे. त्याशिवाय देश स्वतंत्र होइंच शकणार नाही. 'अशी आपल्या हिंदुनेत्यांनी स्वतःची समजूत करून घेतली होती. आणि काँग्रेसमध्ये- ती ही फुटीर वृत्तीच हिंदूंचा व हिंदू संस्कृलीचा नायनाट करीत आहे, हे सावरकरांनी अघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं व काँग्रेस मुस्लिमांच्या अनुनयाने हिंदुत्वाचा सौदा करत आहे हे त्यानी जाणलं होतं. त्यानी हेही जाणलं होतं की, आज काँग्रेसमध्ये शिरून या मोष्टीला पायबंद घालतां येणे अशक्यच आहे. आणि आपल्या बाजस लोकमत येणंहि अशक्य आहे. अलट आपलीच अचलबांगडी व्हावयाची आणि ही कल्पना तर पुढे संपूर्णपणे खीही ठरली आहे. खरे-नरिमन व्यांची हकालपट्टी झालाच, महात्माजींचा पराभव करूनही त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या व जनतेच्या कंठांतील प्राण म्हणून स्थान मिळालेल्या सुभाषचंद्रांना काँग्रेस सोडावी लागली. अितकेंच नाही तर स्वत:च्या मायदेशालाहि परागंदा व्हावे लागले. जयप्रकाशादि समाजवादी काँग्रेसभक्तांना काँग्रेसला रामराम ठोकावा लागला आणि आज अकवेळ जे काँग्रेसचे अध्यक्ष होते, गेल्याच वर्षी अध्यक्ष पदासाठी अभे राहिले होते व कदाचित् सरदारजींचा टंडनना पाठिंबा नसता तर अध्यक्षही झाले असते, त्याच कृपलानींना आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले आहे. आणि अध्यक्षपदावरून - यांतच भर म्हणून की काय आजचे स्वतंत्र भारताचे पंतप्रधान नेहरूंनी क्रॉमवेली हुकुमशाहीने टंडनजींची अध्यक्षपदावरून हकाल- पट्टी करून स्वत:च अध्यक्षपदाची खुर्थी बळकावून अितिहासाची पुनरावृत्ती होते ती ही अशी, असें पुन्हां अकदां सिद्ध केलें. आणि सावरकर अगर त्यांच्याच मताचे अितर हे जर काँग्रेसमध्ये शिरले असते तर त्यांना याहून दुसरें फळ मिळाले असते असे म्हणवत नाही. या सर्व गोष्टी व त्यांचे भावी परिणाम आणि देशाचे वारे कोणत्या दिशेनें वहात आहे तें सावरकरांनी दूरदर्शीपणाने जाणले. म्हणूनच त्यांना द्रष्टे म्हणावयाचे व म्हणूनच ते काँग्रेसमध्ये गेले नाहीत. महासभेचे अध्यक्ष झाले- हिंदुस्थानचे कोटकल्याण व स्वातंत्र्य अवलंबून असेल तर हिंदूं- वरच, हे जाणून त्यांनी हिंदु कार्य धडाडीने चालविले. आणि यामुळेच त्यांना १९३७ साली कर्णावती (अहमदाबाद) येथे भरलेल्या अखिल भारतीय हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला व सुस्वातीस वर्णन केल्याप्रमाणे हा मान पुढे सतत सहा वर्षे त्यांना मिळत राहिला. अध्यक्ष झाल्यानंतर- सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले आणि महासभेस अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. प्रथम दर्जाच्या श्रेणीला ती लवकरच येशून ठेपली नि वयाने व ज्ञानाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ काँग्रेसशी ती स्पर्धा करू लागली. राजकीय पेंचप्रसंग सोडवितांना काँग्रेसच्या बरो- बरच महासभेचे मत राजकर्त्यांना विचारांत घ्यावे लागं लागले. आजवर व्हॉअिसरॉय गांधी व जीना यांनाच भेटत असत पण आतां - १०० वीर विनायक व्हॉअिसरॉयना हिंदूंचा प्रतिनिधी या नात्याने सावरकरांचाही सल्ला ध्यावा लागू लागला. गेल्या महायुद्धकाळी क्रिप्ससाहेब कांही निरवा- निरव व देवाणघेवाण करण्याच्या अद्देशाने हिंदुस्थानांत आले. वाटा- घाटीसाठी त्यांनी काँग्रेसच्या प्रतिनिधींना भेटीस बोलाविले. त्याचप्रमाणे महासभतर्फे सावरकर व डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी यांनाही भेटीस बोलाविलें. म्हणजे गांधी-जीनांप्रमाणे सावरकरांना पाचारण करणे ही अके राजकारणांत अत्यावश्यक गोष्ट होभून बसली. क्रिप्स् शिष्टाीचे- वेळी त्यांतील धोक्याची स्थळे सावरकरांनी तेव्हांच जाणली व ती योजना त्यांनी फेटाळून लावली. मागाहून काँग्रेसनेही ती योजना घुडकावली. हिंदुस्थानांत असंतोष भडकला आहे. त्याचे ज्ञान व्यवस्थित व्हावे म्हणून प्रे. रुझवेल्टनी आपले वैयक्तिक प्रतिनिधी फिलिप्स यांस हिंदुस्थानांत पाठविले. त्यावेळी गांधी-जीनाप्रमाणेच सावरकरांना त्यांनी त्यांच्या बंगल्यावर भेट दिली. त्यावेळचे सावरकरांचे की घेतले रत न हे अम्ही अंवतेने, लब्धप्रकाश अितिहास प्रकाशनाने, तें दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे, बुद्ध याच वाण धरिले करी हे सतीचे' असे अितिहाससिद्ध विवेचन अंकून फिलिप्सनी तोंडात बोटे घातली अशा प्रकारे सर्व देशात काँग्रेस-महासभा-लीग असे तीन पक्ष प्रबळ म्हणून गणले जाळू लागले. स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील अमेदवारापासून तो मध्यवर्ती निवडणुकीतील अमेदवारापर्यंत सोरे महासभेचे अमेदवार निवडून येअं लागले. अवढे घवघवीत यश महासभेला सावरकरांनी अवघ्या सहा वर्षांत प्राप्त करून दिलें. काँग्रेससारख्या बलिष्ट पक्षाचा कठोर व प्राण- अध्यक्षपदावरून घातक हल्ला होत असूनहि त्यांनी हे प्रचंड यश प्राप्त करून दिले. गांधी-नेहरू जनतेच्या गळ्यांतील ताीत बनले असता, त्यांना देवतातुल्य स्थान प्राप्त झाले असतां व ते करतील ती पूर्व अशी वस्तुस्थिति असतांही त्यानी काँग्रेसवर हा प्रचंड विजय मिळविला तो कांहीं केवळ सहजासहजी अगर त्यांच्या अकवेळच्या पूर्वपुण्याीने नव्हे; तर हिंदुराष्ट्र व्हावें ही तळमळ यामुळे. प्रकृति प्रतिकूल असतांही त्यानी चिकाटीने व धडाडीने कार्याशी अकनिष्ट राहून काढलेले दौरे व अवढ्या वृद्धापकाळांतही देशाविषयीं हृदयांत सांठविलेलं प्रेम यांमुळेच त्यांना त्यांच्या या कार्यांत अलौकिक असं यश संपादितां आलं. आधींच प्रकृतीचे अस्वास्थ्य. तशांत वृद्धापकाळाची झुळक यामुळे ते सतत आजारी असतच; पण तरीही त्यानी स्वीकारलेल्या कार्यांत रतिमात्र चुकारपणा केला नाही. सतत अविश्रांत दौरे काढले. काश्मीर- पासून कन्याकुमारीपर्यंत सारा हिंदुस्थान त्यांनी धुंडाळला. त्यांच्या अितकें तुफानी धांवते दौरे त्या काळांत कोणाही पुढाऱ्याने काढले नाहीत. त्यानी आपल्या प्रकृतीची पूर्ण हेळसांड केली. त्यामुळे प्रकृती पूर्ण ढासळली. पाय अधू झाले आणि शारिरिक व्यंगावर टीका करणारे पशयोनीतील नीच टीकाकार त्यांच्या पायाच्या अधूपणावरही कठोर टीका करूं लागले. तरीही त्यानी दौरे सोडले नाहीत. चालत्या खुर्चीत बसून व धापा टाकूनही कां होीना, पण त्यानी आपली व्याख्याने चालच ठेवली होती. अशी तोळामासा प्रकृति असूनही भागानगरच्या (हैदराबादच्या ) पीर विनायक बंधूंची व भगिनींची त्यांनी आर्त किंकाळी अकली व त्यांच्या सहा- य्यास ते धावून गेले. भागानरगच्या निजामी राज्यांत हिंदूंवर क्रूरपणे अत्याचार होश्रू लागले म्हणून निःशस्त्र प्रतिकाराचे रणशिंग महासभेनें कुंकलें. आर्यसमाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (वैयक्तिक जबाबदारीवर) महासभेच्या हातात हात घालून, खांद्यास खांदा भिडवून तुरुंगांत गेले. तुरुंगांतील कैद्यांवर लाठीमार वगैरे अमानुष अत्याचार, वंदेमातरम् घोषणांबद्दल फटके आदि कठोर शिक्षा होशू लागल्या तरी सत्या- ग्रहींची रीघ कमी झाली नाही आणि शेवटी महासभा त्या सत्याग्रहांत विजयी ठरली निजाम नमला व दिंना काही अधिकार त्याने दिले. त्यावेळेस सावरकर स्वतंत्र भारताचे प्रधान नव्हते, अथवा त्याजजवळ आधुनिक शस्त्रास्त्रं नव्हती की चतुरंग सेनादलही नव्हतं. तसाच भागलपूरचा लढा. तोही त्यांनी यशस्वीपणे व मुत्सदेगिरीने लढविला. महासभेचे अधिवेशन भागलपूरला भरावयाचे ठरले. पण सर- कारने त्याजवर बंदी घातली. तेथेही सावरकर धडाडीने पुढे झाले आणि सरकारी बंदी मोडूनही अधिवेशन भरविण्याचा त्यांनी आदेश महासभावाद्यांना दिला. भागलपूरला स्वयंसेवकांचे जथेच्या जथे रवाना होशू लागले. खुद्द त्या अधिवेशनाचे अध्यक्ष सावरकर भागलपूरला निघाले. पण सरकारी शिपायाने मध्येच भागलपूरच्या अलिकडे त्यांस अटक केली व सहा दिवसांची कारावासाची शिक्षा दिली. पण ज्या ठिकाणी भागलपूरला अधिवेशन भरणार होते त्या स्थळी कोणी अका स्वयंसेवकाने हिमतीने शिरून महासभेचा ध्वज रोवलाच. आणि याही लढ्यांत सावरकर यशस्वी झाले. अशा प्रकारे त्यांनी अध्यक्षपदावरून १०३ हिंदूत विलक्षण जागृति केली. त्यांच्या स्वत्वाची त्यांत जागीय कारवनं दिली मुसलमानांचे पाशवी अत्याचारांस व सरकारच्या पक्षपाती धोर- णास आळा घातला. अशी त्यांची अलौकिक तळमळ, धडपड व देशप्रेम या अजोड गुणांनीच त्यांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा महा- सभेला मान मिळवून दिला. मग अपयश का? अवढे हेवा वाटण्याजोगे यश कमावले असूनही पुढे महासभेस दैन्यावस्था को प्राप्त झाली ? सावरकरांच्या वेळचे महत्त्व महासभेस पुढे कां राहिले नाही ? त्यांचे नेतृत्वच दोषी होते काय ? महासभेस ही जी दुरावस्था निर्माण वा प्राप्त झाली त्याला जबाबदार सावरकर होते काय? सावरकरांच्याकडे दोष द्यावयाचाच तर रुपयांतील दोन आणे दोष त्यांना देता येईल. त्यांचे सर्व आयुष्य अंदमानसारख्या कारागारांत गेल्याने व तेथें अनंत यातना भोगाव्या लागल्याने ते प्रकृतीने अशक्त बनले व महासभेला त्यांच्या प्रभावी नेतृत्वास लवकरच मुकावे लागले. नुकतीच कुठे ती बाळसं धरू लागली होती. सावरकरांच्या हाताला घरुन थोडी धिटाअीनं पावलं टाकू लागली होती. पण त्यांच्या नेतृत्वा- अभावीं अकाओकी तिची पोरक्या पोरासारखी अवस्था झाली. दुसरे असें, त्यांच्या आयुष्यांत झगडेच फार असल्याने व अधि- कान्यांचा ताठरपणा नमविण्यासाठी कडकपणा धारण करावा लाग- ल्याने, तसेच त्यांचं बरंचसं आयुष्य अंदमानसारख्या दूरच्या प्रदेशांत, १०४ वीर विनायक . जिथं बंदिवानांखेरीज दुसरा मनुष्यच नाही अशा ठिकाणी गेल्याने त्यांचा स्वभावच असा बेफिकीर, अकलकोंडा बनला व त्यांनी आयु- ष्यांत ' वरं जनाहितध्येयं केवला न जनस्तुतिः' असे कठोर सतीचं वाण स्वीकारलं. यामुळे जनतेच्या मनांत शिरावं कसं, तिला आपलीशी करावी कशी, प्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालावी कशी व जनतेच्या कलानं घेअन तिला आपली तत्वं मान्य करायला लावावीं कशी हे त्यांना व्यवस्थितपणे साधू शकले नाही. आी अगर बाप मुलाचं कल्याण व्हावं म्हणूनच झटतात खरे. बाप झुठल्यासुठल्या धाकानं, कठोर शब्दानं अगर दंडुक्यानं मुलास बजावतो, ‘ह्यांतच तुझं हीत आहे. या मार्गानंच तूं जावंस. दुसरा मार्ग चुकीचा आहे. अकणार नाहीस तर तुला मला कठोर शिक्षा करावी लागेल; पण तुला अकणं भाग पडेल. मला तुझं हीत पहायचंय. केवळ तुला गोंजारायचं नाही.' आणि आी ! आओ आपल्या मधुर व प्रेमळ शब्दांनी मुलाचं हृदय काबीज करते व सहजतेने त्यास चांगल्याचे धडे देशू शकते. ती म्हणते:-- 'बाळ! असं काय बरं वेड्यासारखं करावं ? प्रभु राम. चंद्रानं असं केलं होतं कां? कृष्णानं? शिवाजीनं आणि आपल्या टिळकांनी तरी? अशानं लोकं तुला नाव नाहीत कां ठेवणार? तूं चांगला वागला नाहीस तर तुलाच नाही कां बरं त्रास होणार! लोक तुला वेडा म्हणतील, चोर म्हणतील. त्यापासून तुझ्या आीवडिलांना त्रास पोचेल. आवडेल का तुला ?' सावरकरांचे हृदय पित्यासारखे कठोर होते. त्यांतच मातेच्या ममतेचा थोडासा ओलावा हवा होता.

अक्षध्यपदावरून A- पण तसे नव्हते म्हणून स्वतः ते होते; तेव्हां त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व, अविश्रांत धडपड याने दिपून जासून बरेच कार्यकर्ते महासभेस मिळाले. पण ते दूर होतांच हे कार्यकर्ते अगदीच दुर्बल झाले व महासभेची केविलवाणी स्थिति झाली. महात्माजींच्या प्रभाव- ळींत पंडित जवाहरलाल, सरदार वल्लभभाी असे प्रचंड व्यक्तिमत्वाचे कार्यकर्ते निर्माण झाले. पण कारणे काहीं असोत, असे प्रचंड व्यक्ति- मत्व ज्यास प्राप्त झाले आहे असा अकही कार्यकर्ता सावरकरांच्या महासभा प्रभावळीत निर्माण झाला नाही. नाही म्हणावयास श्यामा- प्रसादांकडे बोट दाखविता येील तेवढेच. पण याला कारण केवळ सावरकरच असावे का? वर म्हटलेच आहे. द्यावयाचाच दोष तर सावरकरांना दोन आणे धावा; पण झुर- लेला १४ आणे हा आम्हां महासभावादी म्हणविणाऱ्या लोकांवर, आमच्या मत्सरग्रस्त व अंधानुकरणवादी वृत्तीवर व आमच्या कमालीच्या शांतपणावादावर आहे. ज्यावेळी सावरकरांच्या हाती महासभेची सूत्रे आली त्यावेळी आपली महाराष्ट्रीय जनता महात्माजींच्या कच्छपी पूर्णपणे लागली होती. तिला स्वत:चे मत मुळी राहिलंच नव्हतं व अक वर्षांत स्वराज्य; सत्यमेव जयते; अहिंसा परमोधर्म:; तुम्ही आम्ही सारे भाभी' या मत्राने भारली होती. अशा प्रकारें अकदां भारली गेलेली जनता परत भानावर आणणे सुतराम् अशक्य होतं. तसंच आजवर झालेल्या पुढाऱ्यांनी, मान्यवर पुढान्यांनी जनता नाराज होील असं काही प्रतिपादन केलं नव्हतं वा भारतवासियांतील वीर विनायक कोणाही तर्देशीय बहुसंख्याकांचा रोष स्वत:वर ओढवून घेतला नव्हता, व ज्यांनी अशा प्रकारे जनतेच्या भावनांशी झगडा देण्याचा प्रयत्न केला त्यांची त्याकाळी जनतेनं देना अडविली. आगरकरांची जिवंत- पणों प्रेतयात्रा काढली. म. फुल्यांवर दगडफेक केली. भारतीय संतांची तर कोण विटंबना केली. नि म्हणून तर आपल्यांत म्हणतातही 'सजीव तोवरि लत्ता देती, मरतां घेती खांधावरती, अफराटा सन्मान' असा आमध्या. जनतेचा खाक्या आहे. सावरकरांच्या कठोर वाणीने व लेखणीने त्यांना स्वत.च्या जमातींतच अनेक शत्रु निर्माण झाले. अस्पृश्यता निवारणाचा हिरीरीनं पुरस्कार केल्याने व अितरही प्रगतिपर गोष्टींचा पुरस्कार केल्याने पुराणमतवादी सनातनवर्ग त्यांच्यावर चिडून राहिला. 'लेखण्या मोडा तरवारी ध्या' या कटुसत्य अद्घोषाने ' साहित्यिक ' त्यांजवर धुसफुसू लागले. लिपिशुद्धि व भाषाशुद्धि या चळवळीमुळे काही व्याकरणवीर व काही भाषावीर त्यांजवर तडक लागले. गांधी-नेहरूंसारख्या जनतेच्या गळ्यांतील ताअितांवर टीका करीत राहिल्याने अखिल भारतीय जनतेचा क्रोधानी त्यांजभोवती भडकू लागला होता. विरोधक अकजुटीने सावरकरांवर तुटून पडत होते. त्यांजजवळ पैसा, मनुष्य व वृत्तपत्र यांचे अचाट बळ होते. आजच्या- सारखे समाजवादी फुटीर, शे. का. प. फुटीर, प्रजापक्ष फुटीर, पुरोगामी फुटीर असा आजचा फुटीरपणाचा फायदा त्यावेळी घेता येत नव्हता. खेड्यापाड्यांतून आमच्या सुशिक्षित विरोधकांनी खेदुतांना खोटेनाटें बोल काढून जितकें चिपून मडकाविले होते की, व्यक्तिशः सावरकर तेथे जाते तर जिवंत हाती लागते ना. टिवंककाली व त्या आधी अध्यक्षपदावरून 'स्वराज्या' या अच्चार करणं जितकं घोक्याचे होजन बसलं होतं स्णहून शतपटीनं अधिक धोक्याचं काँग्रेसविरुद्ध बोलणं होतं. कारण ब्रिटिशांविरुद्ध झगडत असतां केवळ · सरकार व काही चारदोन त्याचे पित्ते' यांचीच काय ती दहशत होती. परंतु काँग्रेसविरुद्ध शब्द काढणं म्हणजे जनतेशी झुंज देणं होतं. आणि जनतेनंच न्यायदान हाती घेतल्यावर जनता किती कठोरपणे निर्णय देते हैं समंजस टीकाकारांना आतां नव्यानं सांगायला नको. जे सावर करांच्या नेतृत्वाला नावं ठेवितात व दोषी ठरवितात त्यांनी विचार करावा की, त्यावेळचा संघटित विरोध आज आहे का ? अखादं शबॅडं पोरही अठतं नि काँग्रेसची नालस्ती करतं. ही स्थिति त्याकाळी होती कां ? आणि अकंदरीत आमचे महाराष्ट्रीयच स्वत्व विसरले नव्हते का? महात्माजींच्या प्रभावशाली नेतृत्वांत तरी असा अकतरी महाराष्ट्रीय वीर पुरुप तयार झाला आहे कां की जो पटेलांची व नेहरूंची बरोबरी करूं शकेल ? सावरकरांच्या नेतृत्वास दोष देतांना स्वत:च्या नालाय- कीवर पांघरूण घालणं हाच अकमेव हेतु आम्हां त्यांचे अभिमानी म्हणविणाऱ्या टीकाकरांचा असतो. किंवा हल्लीच्या विमनस्क परिस्थि- तीने किंकर्तव्यमुढ झाल्याने केवळ सावरकरांच्या नेतृत्वावरच साऱ्या दोषांचं खापर फोडून ' काय करावें, सावरकरांचे नेतृत्वच दोषी होते हो,' म्हणून आपण नामनिराळेच होण्याचा विचार असतो. दोषी सावरकरांचं नेतृत्व नव्हतं तर त्यामागे जे आम्ही नालायक अभे राहिलों ते आमचे अनुयायित्व दोषी होतं. धनी शहणा असला तरी गडी मूर्ख असेल तर तेथे कार्य धनी रडेल ? .

वीर विनायक दुर्दैवाने सावरकरांना असेच अनुयायी भेटले की, जे गांधींपासून मुळांतच फटकून राहिले. आणि नंतर त्यांच्या स्वत:च्या सामर्थ्यावर महासभा फुलवली. पण त्यांची प्रकृती पूर्णपणे ढासळली ६ त्यांनी अध्यक्षपदाचा राजिमामा दिला. वरील अनुयायांना पुढे मिळावे तसे प्रभावी नेतृत्व मिळू शकले नाही. अनुयायांच्या निष्टेस तळमळ, चिकाटी, त्याग करण्याची तयारी व कष्ट घेण्याची हुषारी यांचा त्यांना पाठिंबा मिळाला नाही नि सावरकरांच्या कारकिर्दीत खुद्द तेच अटत होते म्हणून झटणारे कार्यकर्ते त्यांचेनंतर अकमेकांत लहालट्टी मात्र करूं लागले. कार्याचे नांवाने रड सुरू झाली; अवढेच नव्हे तर लागोपाठ सहाही वर्षे सावरकरच अध्यक्ष झाले नि कानामागून येअन तिखट झाले म्हणून मनांतून रुष्ट झालेले व मत्सराग्नीने भडकलेले जेष्ट व श्रेष्ठ कार्यकर्ते व त्यांचे पित्ते महासभेतील दुय्यम कार्यकर्ते महाराष्ट्रीयच ) मस्सरग्रस्त होअन त्यांचे नांवे जळफळं लागले व त्यांच्या मताचा विपर्यास करून आपल्या वर्तमानपत्रांतून बेफामपणे मरकट्टू लागले. माझा असा दावा आहे की, सावरकरांनी श्रमाने दिलेली ही कीर्ति मातीमोल करण्यास कारणीभूत कोण असेल तर हे असले महासभेतील मत्सरग्रस्त व स्वार्थलोलुप गटबाज कार्यकर्ते ! मला त्यांना म्हणायचंय, · सावरकरांचं नेतृत्व दोषी होतं व म्हणून तुम्हीं मागं पडला म्हणता; पण त्यावेळी निदान सावरकर अकाकी बलिष्ट काँग्रेसशी झुंजत होते. आज तुमच्या हाती नेतृत्व आले आहे व (तही अध्यक्षपदावरून VN N काँग्रेसची छकलं छकलं अडाली आहेत व तुमचा विरोधकच आज खिळखिळा झाला आहे. असं असूनही सावरकरांच्या वेळचीच नव्हे तर निदान त्या आधींची तरी प्रतिष्ठा कां मिळवितां येीना? पण सावरकरांचा 'द्वेष' यांखेरीज त्यांजजवळ दुसरे अत्तरच नाही. आणि यांतच पराभवाची मुळं साठविलेली आहेत. तशांतच पुढे गांधीवध झाला नि सरकारने त्याचा महासभेशी बादरायण संबंध जोडल्याने तिची होती तेवढीही पत नाहीशी झाली नि महासभेला. देशाच्या वाळवंटांत वैराण भटकावे लागले.

गांधीवधानत्तर 'महायुद्धांत ब्रिटन दुबळे होील तेव्हां झाडावरून फळ पडावे तसे स्वराज्य तुमच्यावर पडणार आहे, त्यांत अिस्लामी जातीयता बिघाड करील, तो टाळणे यावर आपलें मुख्य लक्ष असले पाहिजे. 'छोडो हिंदुस्थान'ची चळवळ पुकारणारांचे लक्ष स्वराज्यांतील सत्ता आपल्या पक्षाच्या हाती कसेही करून यावी यावर आहे.' सावरकर १९४२ 'ब्रिटनला अपरिहार्य गोष्टींतून अदारपणाचे श्रेय काढ- ण्याची अिच्छा होती. मुस्लीमलीगला पाकिस्तान हिसकून घेण्याची अिच्छा होती. काँग्रेसला स्वराज्यांतील सत्तेचा मक्ता घेण्याची घाी होती. या तिन्ही पक्षांचा लग्गा साधला, पण या लगीन घाऔंत भारताच्या हजारों जीवांची हत्त्या, सर्वनाश, मांसोमबाजार अबलांच्या शिजलीले धिंडवडे यांच्याकडे नियंचेही दुर्लक्षच होते.' केसरी आम्हांस काय वाटते?' ४-१२-५१ १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीयांनी ब्रिटिश अधिसत्तेशी ज्या टकरा दिल्या व ब्रिटिश अमलाला ज्या धडका मारल्या त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यकाळ समीप आला होता. तशांतच युरोपांत दोन महायुद्धे झाली व त्यांत जरो ब्रिटिशांचा जय झाला तरी अकंदरीत तें राष्ट्र दुर्बळच होत गेले. दुसऱ्या महायुद्धानतर तर त राष्ट्र अितकें कमजोर बन की, स्वत:च्या चिमुकल्या अिग्लंडचं रक्षण करतां येील की नाही ही विवंचना त्याला पडली. आर्थिक बाबतीत तें राष्ट्र पूर्णपणे अमेरिकेच्या आहारी गेलें महायुद्धांत अणूची कागदपत्रे वगैरे सर्व गुप्त माहिती अमेरिकेला पूर्णपणे देशून टाकल्याने त्या बाबतीत तें राष्ट्र पूर्ण कंगाल बनले. अिकडे रशियाची पोलादी मूठ त्या राष्ट्राच्या मानेभोवती आवळू लागली. अकंदरीत सर्वच क्षेत्रांत जिग्लंडचा बोऱ्या बाजला नि निदान राष्ट्र सोडावयाचे तर मोठेपणा घेथून कां सोडूं नये असा पोक्त विचार करून ब्रिटिश सरकारने आपल्या साम्राज्यांतील काही प्रबल राष्ट्रांना स्वातंत्र्य देण्याचं ठरविलं; पण तें देतांनाही ते राष्ट्र कमजोर व्हावे म्हणून कांही मेखाही मारण्याचे ठरविले. नि त्यास अनुसरूनच १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य देण्यात आले. पण याच स्वातंत्र्याबरोबर जेथे काही शे ११२ धीर विनायक वर्षांपूर्वी मुसलमानांचा पत्ताही नव्हता तेथे त्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. भारताची फाळणी केली. शून्यांतून पाकिस्तानं निर्माण झाले. हे पाकिस्तान निर्माण होशू नये म्हणून सावरकरांनी अखेरपर्यंत देह, वाणी आणि लेखणी तनानें, मनाने आणि धनाने झिजवली. भारताची फाळणी मान्य करणारे आज म्हणत आहेत की, ही जातीयवादी (सावरकरवादी) मंडळीच पाकिस्तान निर्माण होणेस कारण आहेत. पण अितिहास आंधळा, बहिरा वा मुका असत नाही. जोवर चलती होती तोवर फाळणीचे पाप दुसऱ्याच्या माथी मारणाऱ्या व स्वातंत्र्याचे पुण्य स्वत:च्या पदरी बांधणाऱ्या या सोज्वल मंडळींनी अितिहासाचा विपर्यास केला व तो त्यावेळेस जनतेला खराही वाटला. काँग्रेसवाद्यांच्या विपर्यस्त प्रचाराच्या वाद्यांच्या गजरांत, धुमधडाक्यांत 'स्वातंत्र्यवीर सावरकरा'. सारख्या अप्रियतेच्या चितेवर चढविण्यांत आलेल्या सतीच्या पाकिस्तान विरोधाच्या किंकाळ्या अकू येणार कोणाला ? पण आज तीच जनता अघड अघड म्हणत आहे, 'फाळणी काँग्रेसनं केली व ती नेहरू-पटेल आदि मंडळींनी विरोधकांच्या विरोधास डावलून अंधारांत केली. आजच्या अितिहासावरील या व्यक्तींचं दडपण पूर्णपणे कमी होतांच २०-२५ अगर ५० वर्षांनन्तरचा अितिहास नमूद करेल, ' भारताची फाळणी नेहरू-पटेलांनी केली. भारताची छकलं नेहरू-पटेलांनी केली. त्यास काँग्रेसमधील अकाच व्यक्तीनं म्हणजे टंडनजींनी कसून विरोध केला. पण महात्माजींनी आपला शब्द खर्च केला. फाळणीस मान्यता मिळाली व मगच देश दुभंगला. सावरकरादि मंडळींनी फाळणी केली नाही. शेवटपर्यंत ते प्राणपणाने त्याशी लढले परंतु त्यांचे सामर्थ्य गांधीवधानन्तर ११३ तोकडे पडले म्हणून अपयश आले. ' आजचा किंवा भावी अितिहास अन्याय्य बनणार नाही. शिवकालीन अितिहास तर्काने वा जुन्या संशयित कागदपत्रांनी परस्परांविरूद्ध खरा मानावा लागतो. पण आज दोनही बाजू 'रेकॉर्ड 'ला तयार आहेत. अितिहासकाराला अितिहास लिहितांना दोहोंचाही विचार करूनच तो लिहावा लागेल. पक्षपाती अितिहास चाल जमान्यांत निरंतर टिकणार नाही. पाकिस्तान निर्मितीनंतर सुरुवातीस वर्णन केल्याप्रमाणे काँग्रेसची अधिकार स्वीकाराची घाी, मुसलमानांची पाकिस्तानासंबंधी तीव्रता आणि ब्रिटिशांची डोीजड साम्राज्यपसारा आवरण्याची अपरिहार्यता यांचे बरोबर बेच. क्यांत त्यावेळचे व्हाीसरॉय मॉअंटबॅटन यांनी घेरलें व भारतीय नेत्यांनी खंडित भरताचे स्वातंत्र्य स्वीकारले आणि काँग्रेसने भारतीय सत्ता आपले हाती घेतली. पं. जवाहर लाल नेहरू स्वतंत्र भारताचे पंत्रप्रधान झाले. सरदार पटेल भारताचे अपपंतप्रधान झाले. गांधीजी 'न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तिच्या चार' या कृष्ण नीतीने भारत सरकारला सल्ला देअं लागले. भारतीय नेत्यांनी दर्शविल्याप्रमाणे पाकिस्ताननें जन्मापासूनच भारताशी मित्रत्त्व न पत्करतां शत्रुत्व पत्करलं व त्यावर कुरघोडी कर- ण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानात हिंदूंच्या कत्तली झाल्या. स्त्रियांची विटंबना झाली. सर्व मालमत्ता, घरदार, जमिनजुमला सरकारजमा झाली नि भारतांत निर्वासितांचा तांडाच्या तांडा येशू लागला. पाकिस्तानांत वीर विनायक...

वार विनायक ते हिंदू म्हणून त्यांचे हाल कुत्रे खाीना व अिकडे भारतांत निर्वासित म्हणून त्यांची दैना थांबेना व मृदुंगाप्रमाणे दोहोकडूनही त्या बिचा- न्यांना थपडा बसू लागल्या. रहायला घर नाही. ल्यायला वस्त्र नाही. खायला अन्न नाहीं अशी निर्वासितांची केविलवाणी स्थिति झाली. तेव्हां दिसतील त्या कुलपबंद घरांतून व देवळांतून नि मशिदीतून ते राहू लागले. ही घरे पाकिस्तानात गेलेल्या मुसलमानांची होती. हा निर्वासितांचा घोर अनाचार मौलाना आझादादि ' राष्ट्रीय ' मुसलमानांना पाहवेना. त्यांनी गांधींभोंवतीं धरणे धरले नि शेवटी महात्माजींनी प्राणांतिक अपोषण सुरू केले. महत्माजीचे प्राण वाचावेत म्हणून भारत सरकारने गांधी- जींच्या सातही मागण्या मान्य केल्या आणि त्या अन्वयें मुसलमानांची बेवारशी घरं पुन्हां मोहोरबंद केली, मशिदीतून निर्वासितांना हुसकून लावलें, पाकिस्तानला त्याचे ५५ कोटि रुपये देण्यास भाग पाडले. भारत सरकारने ही रकम पाकिस्तानला देण्याचे स्थगित कां केलें होते याचे खुद्द पं. नेहरुनीच पत्रकारांपुढे निवेदन केले होते की, 4 पाकिस्तानला ५५ कोटि रुपये आणि दारूगोळा भारताने पुरविला तर काश्मिरांतील हत्याकांड पुढे चालविण्याला आपणच सहाय्य केल्यासारखे होअील. यासाठी सरकारने तें द्रव्य आणि दारूगोळा यावयाचे स्थगित केले. आहे.' असे असूनही गांधीजींच्या प्राणाची ढाल पुढे करून राष्ट्रीय मुसलमानांनी सातही मागण्या स्वत:च्या ‘पदरांत पाडून घेतल्या. वास्तविक मुसलमानांवर अत्याचार अपवादा- दाखल कोठेतरी होत होते; ते ही तुरळक आणि प्रथम मुसलमानांनी गांधीवधानन्तर खून खटला- आगळिक केली म्हणूनच. पण तेही 'बाँब' वर्षावाच्या धमकीनें नेहरूंनी मोडून टाकले होते. अशा प्रकारे परधर्माविषयी आदर म्हणजे स्वधर्माविषयीं द्वेप, कुत्तर ओढ असे समीकरण गृहीत धरल्याने व काँग्रेसचे धोरण म्हणजे घरच्या म्हातारीचे काळ बनल्याने भारत सरकार व महात्मा गांधी यांबद्दल जनतेत असंतोप वाढू लागला. महात्माजींचे जीवनही धोक्यांत येणूं लागले व अखेर ३० जानेवारी १९४८ रोजी सायंप्रार्थनेस जात असतां त्या वाढत्या असंतोषाग्नीत महात्माजीचा बळीही पडला. गांधी महात्माजींचा वध नथुराम गोडसे या असंतोषी व क्रोधाग्नी भडक- लेल्या तरुणाने केला. नथुरामचे हे कृत्य चांगले की वासीट, त्याच्या या कृत्याने भारताचा कांही फायदा झाला की तोटा, याचे विवेचन भावी अितिहासकारच करतील. अितक्या खोल पाण्यात शिरण्याचं आपणांस कांहींच कारण नाही. आपणास विचार करावयाचा तो फक्त अवढाच की, यांत सावरकरांचे अंग होते काय ? आतापर्यंतच्या विवेचनावरून सावरकरांविषयी मनांत द्वंद्व निर्माण घालूं लागेल हे खरे आहे. सावरकर व सावरकरांची संघटना यांनी लंडनच्या वास्तव्यांत व त्यापूर्वीच्या भारताच्या वास्तव्यांत शस्त्रे वापरली, पिस्तुलें, बंदुका यांचा सरसहा अपयोग केला, बॉब्स्चेही सर्वत्र स्फोट अडविले, अिंग्रज अधिकाऱ्यांचे खूनही पाडले; साहजीकच भासू लागते अशा अनेक अलाढाली केलेला मनुष्य पुढे निवळेल हे शक्य नाही.

वीर विनायक पण आपण क्रांतिकार्य को स्वीकारले याचे सावरकरांनी सांगितलेले कारण पडताळलें, आयर्लंडचा क्रांतिकारक डी व्हॅलेरा व आफ्रिकेचा जनरल स्मॅटस् यांचे क्रांतिकार्योत्तर आयुष्य न्याहाळले, सेनापति बापट, ब. असफअल्ली आदि त्यावेळी अभिनव भारताचे सभासद होते हे विचारांत घेतले आणि सावरकरांचे गुरु शिवरामपंत परांजपे हे पुढे अहिंसा परमोधर्मःचे अपासक बनले याचा विचार केला तर आपणांला सहजच पटेल की अकदां क्रांतिकारक असलेला मनुष्य नेहमींच क्रांतिकारक राहीलच असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. रावसाहेब पटवर्धन यांनी अका व्याख्यानप्रसंगी हेच सांगितले होतें की, 'कालचे क्रांतिकारक आज व आजचे क्रांतिकारक अद्या मवाळ होतात.' आणि याचेच प्रत्यंतर सावरकर अंदमानांतून बाहेर पडल्यानंतर त्यानी केलेल्या सनदशीर कार्यांत दिसून येते. स्वातंत्र्य वीर सावरकर हिंदुमहासभेचे अन्यक्ष होते तोवर म. गांधी वधासारखी घटना हो शकली नाही पण सनदशीर मार्गाने चाललेल्या काँग्रेसच्या झेंड्या- वालील देशभक्तांकडून मात्र चिमण अष्टेकरांसारख्या कोवळ्या मुलांचे वून शाले, रेल्वेगाड्या अलथवल्या, सरकारी खजीने लुटले गेले, स्टेशने जाळली गेली; अवटच नव्हे तर काहींचे प्राणही धोक्यांत आणले गेले या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. अकदां गव्हर्नर लॉीड जॉर्ज व सावरकर यांची भेट झाली असतां सावरकरांनी क्रांतिकारकांचे हृदय अकलून दाखविले त्यावेळी ते म्हणाले होते- जेव्हां कोणत्याही शांत किंवा वैध मार्गाने आमच्या गांधीवधानन्तर ११७ राष्ट्राच्या राजकीय आकांक्षा पूर्ण होण्याचा संभव अरलेला आढळेना तेव्हां क्रांतिकारक आडमार्गाच्या आणि भीषण रानांतून वाट काढीत जाणे आम्हांस भाग पडले. जर सध्यां दिलेल्या सुधारणेनें राष्ट्राच्या प्रगतीची व विकासाची शक्यता दिसत असेल तर आम्हीही आमच्या क्रांतिकारक चळवळींतही प्रतियोगी तत्वाप्रमाणे शांत आणि वैध मार्गाचे अवलंबन करूं.' आणखीही अके ठिकाणी या विषयीं सावरकरांनी लिहिले आहे की, 'जेथें सत्त्याचे प्रतिपादनास प्रतिबंध असेल, तेथेच गुप्त संस्था अपरिहार्य म्हणून न्याय्य होत. जेथें राष्ट्रसंस्थेच्या विकासास व नैस- गिक अ-क्रांतीला बलाक्तार वाव ठेवीत नसेल, तेथेंच क्रांतीचा आघात न्याय्य आहे. राज्यघटनेच्या सौम्य मार्गाने लोकांना आपले मत जेथे स्थापन करता येते, अशा अिंग्लंड, फ्रान्सप्रभृति देशांतून शांतीचे वैध ( सनदशीर) प्रयत्न सोडून क्रांतिकारक चळवळी कोणी करील तर तो मात्र आततायीपणा होील. अशा शांतीचा व राज्य- घटनेचा वैध मार्ग आमच्या देशांत शक्य होतांच आम्हीं गुप्तव सशस्त्र प्रतिरोध आनंदाने सोडू. हिंदुस्थानास शांतिमार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याची अस्कट अिच्छा आहे. परंतु तुमचा बलाक्तार तें अशक्य करतो म्हणून आम्ही बलानेच बलाक्तार हाणूं पाहतो. सनद नसतां सनदशीर चळवळीचे बोलणे म्हणजे थट्टा करण्या- सारखें हास्यास्पद कृत्य होय; परंतु राष्ट्रसंवर्धन करणारी घटना प्राप्त होत असल्यास कृतीची भाषा बोलणे अधिक थट्टास्पद नव्हे अधिक दोपास्पद आहे.' ' ११८ वीर विनायक हिंदुस्थान पारतंत्र्यांत असतेवेळी काढलेले हे सावकररांचे अद्गार आहेत. त्यावेळी जर ते अितक्या संयमाने बोलत होते व वागत होते तर स्वातंत्र्य प्राप्त होतांच व सनदशीर घटनेची शिडी प्राप्त होतांच ती लाथाडण्याचा आततायीपणा ते करतील व गांधीवधासारख्या कृत्यांत ते सहभागी होतील असा मनाशी ग्रह करून घेणे हे त्यांच्या विषयीं मुळांतच मनांतून हेप भडकला आहे हे अघड करण्यासारखं आहे. पण तें कांही असो. महा-माजींचा वध करण्यांत अनेकांचा हात असावा असा सरकारला संशय आला व त्याप्रमाणे धरपकडही सुरू झाली. या खुनांत सावरकरांचे अंग असावे असाही सरकारने तर्क बांधला व सावरकर आणि अितर ८ आरोपी अशा ९ आरोपींवर गांधी खुनाच्या व खुनास मदत करण्याच्या आरोपाखाली खटला भरला व तो लाल किल्ल्यात न्यायमूर्ती आत्माचरण यांच्या विशेष न्यायालया- खाली १४ जून १९४८ पासून सुरू झाला. सरकातर्फे श्री. सी. के. दफ्तरी हे काम पहात होते व सावरकरांतर्फे, भोपटकर, जमनादास, ब. पी. आर. दास आणि बचाव समिती काम पहात होती. सरकारी वकील दफ्तरी यांनी प्रथम भाषण केलें. दि. २४ पासून साक्ष नोंद- णीला सुरुवात झाली. सुमारे ८४ दिवस तें काम चालन फिर्यादी पक्षाच्या १४३ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. साक्ष नोंदणींत सुमारे ६९६ टाीप फुलस्केप पाने भरली असून माफीच्या साक्षीदाराचें- बडगेचें-निवेदन ७९ पाने आहे. नथूरामचे ९३ पाने व सावरकरांच ५७ पाने आहे. फिर्यादी पक्षाने ११८ कागदपत्रे सादर केली. प्रत्येक प्रश्न व गांधीवधानान्तर याचे अत्तर हिंदुस्थानी, मराठी, तेलगू यांत अनुवादित केली जात होती. सावरकरांवर आरोप- सरकारने निश्चित परावा नसतां संशयाने सावरकरांना खटल्यांत गोंवले. सरकारी वकिलानी सावकरांवरील आरोपपत्र वाचून दाखविलें, ते म्हणाले, 'शेवटचे आरोपी वि. दा. सावरकर अका विशिष्ट विचारप्रणालीच्या संप्रदायाचे पुढारी असून हिंदूमहासभेचे ते अध्यक्ष होते. त्यांचे धोरण व विचार सर्वांस विदित असून गेले कित्येक दिवस गोडसे व आपटे या आरोपीवर त्यांचे फार वजन होते. आपले अकमेव मार्गदर्शक व 'गुरु' म्हणूनच ते सावरकर यांना समजत असत असें म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही. सावरकर यांच्या आशिर्वादानेच 'अग्रणी' निघाला. त्या पत्राला आर्थिक सहाय्यही त्यांचे होते. आरोपीचे ते थोर देवत' होते. त्यांचा फोटो प्रत्येक अग्रणीच्या मुखपृष्टावर छापलेला असे. मुंबांतील दादर येथील निवासस्थानी गोडसे व आपटे त्यांची वारंवार भेट घेत असत. पुढे काय घडणार आहे, याची पुरेपूर माहिती त्यांना होती; अितकेच नव्हे तर त्यांच्या संमतीविना अशा धाडसाला आरोपीनी हातच घातला नसता असे सिद्ध करण्यास सबळ पुरावा आहे.' 'हिंदुराष्ट्र दलाची स्थापना सावरकर यांच्या प्रेरणेनें-संमतीने झाली. त्यांची कित्येक पुस्तकें ही देशांतील अका विशिष्ट विचार- सरणीच्या सांप्रदायांत पाठ्यपुस्तकांसारखी वाचली जात व गोडसे, आपटे, परचरे हे त्याचा प्रचार करीत. गोडसे, आपंट, करकरे १२० वीर विनायक यांच्याशी सावरकर यांचा धनिष्ट संबंध होता. जेव्हा जेव्हां ते मुंबी- बाहेर पडत त्या त्या वेळी आपटे व गोडसे त्यांच्याबरोबर. असत व त्यांच्याबरोबर रहात. दि. १४ जानेवारीला आपटे व गोडसे यांनी दादर येथील निवसस्थानी सावरकर यांची शेवटची भेट घेतली. त्यानंतर ४ दिवसांनी ते दिल्लीकडे रवाना झाले.' सरकारी वकिलाच्या भाषणानंतर अनेक साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. सावरकरांवरील आरोपांचा ज्यांवर डोलारा अभारला होता तो माफीचा साक्षीदार बडगे याची विधाने महत्वाची पण फुसकी आणि अकीव होती. ती विधाने महत्वाची म्हणावयाचे कारण या पुसक्या विधानांवरच सरकारने सावरकरांवर आरोप लादले होते. बडगे आपल्या माफीच्या साक्षीत म्हणाला होता, ' मला आपट्याने सांगितले की, 'तात्यारावांनी गांधीजी, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि सुहावर्दी यांचा निकाल लावून टाकण्याचे ठरविले आहे. गांधीजींची शंभर वर्षे भरली; तेव्हां आपण आपल्या कार्यांत निश्चित यशस्वी होणार याबद्दल शंका नाही असे भाकीत केले आहे.' बडग्याचे साक्षीनंतर क शांता मोडकची साक्ष झाली. तिने आपल्या साक्षीत सांगितले को, तिने त्यांना स्वत:च्या मोटारीतून सावरकर सदनावर सोडले. यानंतर प्रो. जैन, मोरारजी देसाी यांच्याही साक्षी झाल्या; पण त्याही बडगेप्रमाणेच अकीव माहितीवर आधारलेल्या. ब. पी. आर. दासांचें बचावाचं भाषण- साक्षीदारांची तपासणी, फेरतपासणी आदि फापटपसारा आवरतांच गांधीवधानन्तर १२१ . सावरकरांचे वचावाचे वकील ब. दास बचावाचे भाषण करूं लागले. ते म्हणाले. 'सावरकरांच्या पुरतेच बोलायचे तर कट होता की नाही याबद्दल शंका घेण्यास जागा आहे. आणि असलाच तरी त्यांत सावरकरांचे अंग होते वा नाही याबद्दलची शंका घेण्यास जागा आहे.' बडग्याची अंकीव साक्ष केवळ अग्राह्यच नव्हे तर सवस्वी विसंगत आहे. कु. शांता मोडकनें आपटे गोडसेला आपल्या मोटारीत घेअन सावरकर सदनाच्या वाटेवर सोडलें यावरून ते नकी सुदनांत गलेच होते असे सिद्ध होत नाही.' 'शिवाय सावरकरांच्या दर्जाची व्यक्ती महात्मा गांधींसारख्या व्यक्तीचा खून करण्याच्या कामी सहभागी होील, ही गोष्टच अशक्य दिसते. तत्वप्रणालीच्या बाबतीत मूलभूत मतभेद असूनही गांधीजींचा सावरकरांच्या बाबतीत विश्वास व सद्भाव होता. महासभेनें नेहरू सरकारला पाठिंबा दिलाच पाहिजे ही गोष्ट खुद सावरकरांनीही बऱ्याच वेळां सांगितलेली आहे. सावरकरांच्या मनांत गांधीजींच्याविषयी द्वेष होता हे दाखविण्याजोगा क्षुल्लकही पुरावा फिर्यादी पक्ष सावर- करांच्या असंख्य भाषणांतून व कागदपत्रांतून काढून दाखवू शकलेला नाही. म्हणून सावरकरांचे कटांत अंग असेल हे विश्वासार्हच नाही. 'शिवाय प्रत्यक्ष राजकीय जीवनाच्या धकाधकीतून अंग काढून घेथून स्वस्थपणे आयुष्य घालवीत राहिलेली श्री. सावरकरांसारखी व्यक्ति कटांत भाग घेील, हे म्हणणेच विचित्र दिसते. ' १२२ वीर विनायक -- सावरकरांच्या बाबतीत आपण काय निर्णय द्याल याबद्दल मला रतिमात्र शंका वाटत नाही. परंतु केवळ. 'निदोंपी' अबढे म्हणून सावरकरांचे समाधान होणार नाही. त्यांच्या चारित्र्याला यत्किंचितही कलंक लागणार नाही असा निर्णय आपण त्यांचे बावत देणे जरूर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकररावी जवानी प्रस्तुत खन खटला ' सावरकरांचे भवितव्य' व अितिहासांतील त्यांचे स्थान ठरविणार होता. या खटल्यांत जर ते दोषी ठरले असते तर त्यांच्या आजवरच्या देशकार्याम काळिमा फासला जाणार होता. जी अवस्था · सूर्याजी पिसाळाची' झाली, जो दशा — कलुपा कबजीची' झाली, जी स्थिति 'बाळाजीपंत नातू ' ची झाली त्याच मालिकेत सूर्याजी पिसाळ ' नसूनही, ' कलुपा कवजी ' नसूनही ' बाळाजी- पंत नात ' नसूनही सावरकर हे कायमचे गोंवले गेले असते. आणि अभ्या आयुष्यांत ' कीर्तीची हांव ' धरली नसली तरी — अपकीतीचा कलंकही ' त्यांनी अपेक्षिला नहता. निदान कीर्तीच्या अद्यानांत विहरतां आलं नाही, लोकप्रियतेच्या हिंदल्यावर हिंदोलतां आलं नाही, तरी दुष्कीतीच्या नरकांत लोळत पडावे अशी अिच्छा ही काही सावरकरांनी खासच केली नव्हती. पण आज प्रत्यक्षांतच तो प्रसंग घडू पहात होता. सहाजीकच त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं नि गालांवर ओघळू लागलं. अका अिंग्लश वर्तमानपत्रानं या पवित्र जलांतच सावरकरांचं निदपित्त्व' प्रतिबिंत झालं आहे. असं लिहिल. सावर- करांनी आपली जबानी दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं-- " -- गांधीवधानन्तर १२३ 'आपल्या स्वराज्याला धोक्याच्या पक्षकलहापासून व यादवी- पासून बांचविण्यासाठी क्रांतीमय प्रवृतीला सनदशीरपणाचे वळण देणे आवश्यक असल्याने हिंदुमहासभा व काँग्रेस या दोन संघटना अका महान आघाडीवर अभ्या रहाव्यात व मध्यसरकारचे हात मजबूत व्हावेत, अशीच माझी अिच्छा होती. या अिच्छेनुसारच मी नवीन राष्ट्रध्वज स्वीकारला व आपल्या निवासस्थानी तो फडकाविला.आजारी असतांही दिल्लीस सर्व पक्ष हिंदू परिपदेला गेलों व मध्य सरकारला पाठिंबा देणारा प्रस्ताव संमत केला. डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी याची नेमणूक याच कारणासाठी आम्हांस मान्य होती. ' हिंदुस्थानची फाळणी होअं नये याकरितां मी शक्य ती चळवळ केली. पण १९४७ मध्ये आपल्या मातृभूमीचे अरे विच्छेदन झालेच ! पाकिस्तान जन्माला आले खरे, पण हिंदुस्थानचा मोठा प्रदेश परकियांच्या मगरमिठीतून मुक्त झाला. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळालेले पाहण्यास मी जगलो याचीच मला धन्यता वाटली.' 'आसिंधु सिंधुपर्यंत आमच्या मातृभूमीचे अक्य परत घडवून आणण्याची आकांक्षा आम्ही सोडली नव्हती. परंतु ती आकांक्षा पूर्ण होण्यासाठी सुद्धा जे मिळाले आहे त्याचे जतन करणे आवश्यक असल्याने मध्यसरकार मजबूत करणे हे आपलें परमकर्तव्य आहे असेंच मी जनतेच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. आजच्या नेतृत्वांत जर काही बदल घडवून आणावयाचा असेल तर तो सनदशीर मार्गानेच घडवून आणला पाहिजे असें मी प्रतिपादिले आहे.

१२४ वीर विनायक ~~~~ यावरून फिर्यादी पक्षाचीही खात्री पटेल की, माझ्या विरुद्ध करण्यांत आलेल्या आरोपापैकी अकही गुन्हा मी केलेला नाही किंवा तसा गुन्हा करण्याचे मला काही कारणही नाही. फिर्यादी पक्षाने माझ्यावर ज्या कटाचा किंवा कटाच्या संगनमताचा जो आरोप केला आहे त्यांत माझें मुळींच अंग नव्हते हे मी निक्षून सांगतो. अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या योजनेची मला कसलीही माहिती नव्हती. मी पूर्णपणे निर्दोषी आहे. मी सादर केलेल्या सर्व कारणांचा साकल्याने विचार करून माझ्या चारित्र्यावर कसल्याही प्रकारचा शिंतोडा न अडवितां न्यायमूर्तीनी माझी ताबडतोब मुक्तता करावी, अशी न्यायाल- याला माझी विनंति आहे. कैफीयत वाचण्यास सावरकरांना अक तास वीस मिनिटे लागली. आपल्या जबानींतील देशविच्छेदनावावतचा भाग ते वायूं लागतांच सावरकरांच्या भावना अितक्या अँचबळून आल्या की, त्यांच्या डोळ्यां- वाटे अक्षरश: घळघळा अश्रुधारा वाहूं लागल्या. 'मातृभूमीच्या राजकीय स्वातंत्र्य संग्रामांतील अक सैनिक या नात्याने मीही सतत ५० वर्षे लढलों असून माझ्या पिढीच्या कोणत्याही लोकसेवकांअितकाच देह दंड मी सोसला आहे व स्वार्थत्याग केला आहे.' अशी वाक्ये अच्चारतांना तर त्यांचा कंठ दाटूनच आला. हातरुमालांनी गालांवर ओघळलेली आंसवें टिपून ते पुढे म्हणाले, ' अखेर स्वातंत्र्यसंग्रामांत विजय प्राप्त होन स्वतंत्र व सार्वभौम हिंदी संघराज्य जन्माला आले.' वरील झुगारांच्या वेळी सावरकरांच्या भावनाशी सारें न्यायालय अकरूप झाल्याने काही काळ न्यायालयांत गंभीर शांततेचे वातावरण निर्माण झाले होते. .

गांधीवधानन्तर १२५ निकाल व सुटका- न्यायालयापुढे सावरकरांबाबत आलेला कपोलकल्पित व नाटकी पुरावा, स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी न्यायालयांत दिलेली बिनतोड जबानी आणि स्वातंत्र्यवीरांचा बचाव करणाऱ्या बॅ. दासांचे निश्चयी, ठाम भाषण यांवरून सावरकरांविषयीं निकाल काय लागेल ते ठरले होते. न्यायमूर्तीनी · स्वातंत्र्यवीर सावरकर पूर्णपणे निर्दोषी आहेत.' असाच निकाल दिला. निकाल सांगतांना न्यायमूर्ती म्हणाले, 'माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीवरून सावरकरांच्या बाब- तीत कोणताही निर्णय करणे बरोबर होणार नाही. दि. २० जानेवारीला व दि. ३० जानेवारी १९४८ ला दिल्ली येथे जे गुन्हे घडले त्यांत सावरकर यांचा काही हात होता अशी कल्पना करण्याचेही कारण नाही. सावरकर यांच्यासंबंधी जो पुरावा आला आहे त्यावरून नथुराम गोडसे व आपटे हे सावरकर सदनापुढे अतरून सावरकर यांना भेटा- वयास गेले हे कोणत्याही रीतीने सिद्ध होत नाही. सावरकर सदनांत सावरकरच रहात होते असे नाही. तेथें भिडे व दामले हेही होते.. २७ जानेवारी १९४८ ला कोट्टीयन याच्या साक्षीप्रमाणे गोडसे, आपटे व बडगे हे शिवाजी पार्कमध्ये गेले अवढें सिद्ध होते. परंतु हा पुरावा माफीच्या साक्षीदाराने सावरकर यांनी गोडसे व आपटे यांना कांही सांगितले व तें माफीच्या साक्षीदाराने अकलें असें शाबीत करूं शकत नाही.'

१२६ वीर विनायक 'माफीच्या साक्षीदाराने आपल्या साक्षींत सांगितले आहे की, • यशस्वी होअन या' असें गोडसे व आपटे यांना सावरकर म्हणाले, पण जो पुरावा दाखल झाला आहे त्यावरून सावरकर आणि नथूराम गोडसे व आपटे यांच्या दरम्यान वरील वाक्य अच्चारण्यापूर्वी कोणतें भाषण झालेले हे शाबीत होत नाही. म्हणून जे वाक्य सावरकर यांनी त्या दोघांना अद्देशून म्हटलें तें महात्मा गांधींच्या खून करण्याच्या कटा- बाबत होते असे समजण्याला काही कारण नाही. ' म्हणून मी सावरकरांना त्यांच्यावरील आरोपांतून संपूर्ण मुक्त करीत आहे. सावरकर पूर्णपणे निदोपी आहेत.' गळलेले दुवे- सरकारी वकिलांचे आरोपपत्र, सावरकर संबंधित साक्षीदारांच्या साक्षी, सावरकरांच्या वकिलांचे भाषण,स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बचावाचे भाषण आणि न्यायमूर्ती आत्माचरण यांचे सावकरांबद्दलचे निकालपत्र याचनही वाचकांस प्रश्न पडेल की सरकारी वकिलांनी सावरकरांवर आरोप लादतेवेळी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्वाचं निराकरण अवढ्यानेच होणार नाही. अदाहरणेच घ्यावयाची तर पुढीलप्रमाणे घेता येतील. (१) गोडसे व आपटे यांजवर सावरकरांचे फार वजन होतें. ( २ ) गोडसे व आपटे सावरकर याना आपले 'गुरु' व 'मार्गदर्शक' मानत. ३) गोडसे व आपटे यांच्या 'अग्रणी'स सावरकरांचा आशीर्वाद होता. त्यास त्यांनी १५००० रुपयांची आर्थिक मदत केली होती.

गांधीवधानन्तर (४) अग्रणीवर प्रतिदीनी सावरकरांचा फोटो छापलेला असे. (५) आरोपींचा सावरकरांशी घनिष्ट संबंध होता. या सर्व गृहीत कृत्यांच्या पत्त्यांचा बंगला सावरकांनी आपल्या निवेदनात स्पष्टीकरणाच्या वाऱ्याने कोसळून लावला आहे. वास्तविक सावरकरांची सर्वच जवानी येथे द्यावयास हवी होती. कारण ती हृदयास पीळ पाडणारी, डोळ्यांतून अश्रू झिरपविणारी, वक्यावाक्यागणिक विद्वत्तेचे, मुत्सद्दीपणाचे, बिनतोट कोटिक्रमाचे व हजरजबाबीपणाचे तेज प्रगट करणारी आहे. त्यांत जणू सावकरकरांनी आपलं हृदयच ओतलं आहे नि ते ओरडून सांगत आहे, ' मी निदोष आहे, संपूर्ण निर्दोष आहे, मी निष्कलंक आहे.' पण ही जवानी अति विस्तृत असल्याकारणाने संपूर्ण देतां येत नाही. तरीही अत्यंत आवस्यक अशा प्रश्नांचा खुलासा करणं अगत्याचं असल्यानं सावकरांचा तेवढा बचाव घेणं जरूर आहे. सावरकर यांनी खलासा करतांना सांगितले.-' न्यायालयापुढे आलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, आपटे व गोडसे हे बुद्धीचे गुलाम नव्हते. त्यांच्या मनास पटेल तेच ते करत असत. कोणा अका व्यक्तीच्या सांगण्यास ते मान देशून करत असत असे त्यांच्या बाबतींत 'असने ' विद्वत्त्व वा कर्तृत्व नव्हते. आणि याचेच प्रत्यंतर णजे बार्शीच्या अधिवेशनांत ते भोपटकरांच्यावर सुरा घेअन धांवले तें व मी स्वातंत्र्य दिनादिवशी राष्ट्रध्वज माझे निवासस्थानावर फडकविला त्याबद्दल त्यांचा तीव्र असंतोष झाला ही होत.'

१२८ वीर विनायक आपटे व गोडसे सावरकरांना 'गुरु' ' मार्गदर्शक ' अथवा 'थोर देवत' मानत हा कांहीं सावरकांचा दोष वा अपराध नव्हे. आजही असे अनेक महाभाग आहेत की, ते अखाद्या व्यक्तीस पूज्य वा दैवत मानतात. पण कार्य मात्र स्वत:च्या जबाबदारीवरच करतात. काली- मातेला 'दैवत' समजणारे बंगाली 'काली'स बळी देतात याला जबाबदार कोण 'कालीमाता' धरावयाची काय? 'बुद्धा'स गुरु व दैवत मानणाऱ्या चिनी नि जपान्यांनी जी धोर हत्या केली, रक्ताचे पाट वाहविले, परकियांवर अत्याचार केले, खाण्यामध्येही मांसाहार वापरला त्यास जबाबदार कोणास 'बुद्धास धरावयाचें ? अथवा संभाजीच्या दुर्वर्तना'बद्दल शिवाजीच्या व्यक्तिमत्वास बळी द्यावयाचें ? किंवा बल साडच्या फेरमत- मोजणींत मतपत्रिका फाडण्याची जी निंद्य कारवामी झाली तिला 'भोरारजींचीच' फस होती असें म्हणावयाचें?.याबद्दल सावरकर म्हणतात 'गांधींना गुरुस्थानी व देवस्थानी मानणाऱ्या त्यांच्या अनेक अनुयायांनी ४२ च्या लढ्यांत त्यांच्या नांवाचा जयजयकार करून डाके घातले. कित्येक खून केले. सर्वत्र असंतोप माजविला. म्हणून त्याबद्दल गांधींना दोषी ठरवन ब्रिटिश सरकारने त्यांजवर खटला भरला का? तसेंच अग्रणी- वर माझा फोटो आपटे-गोडसे छापीत म्हणून त्यांच्या धोरणास मी जबाबदार कसा ? टिळकांचा फेटो केसरीवर असतो म्हणून आजच्या केसरींतील प्रत्येक वाक्याला टिळकच जबाबदार आहेत असे समजण्याअितपत हे हास्यास्पद आहे. दुसरं असें, मी अितर हिंदुत्वनिष्ट वृत्तापत्रांस मदत देत असे तशीच 'अग्रणी'स दिली आहे.' आणि आज काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या वृत्तपत्रांना जिल्हा- गांधीवधानन्तर १२९ , - निहाय सढळ हातांनी मदत देत आहेत' ही जनतेची ओरड अकली तर सावरकरांचेवरील आर्थिक सहाय्याबद्दल आरोप किती फुसका व 'दुसऱ्याच्या डोळ्यांतील कुसळ दिसते पण स्वत:च्या डोळ्यांतील मुसळ मात्र दिसत नाही' अशा स्वरुपाचा आहे हे ठरते. यानंतरही गोडसे- भापटे यांच्या घनिष्ट संबंधाबद्दल सावरकर म्हणाले- 'मी अध्यक्ष होतो तोवर महासभेच्या कार्यकर्त्यांशी माझा संबंध येी. कार्यकत्यांचीही पत्रं येत. अखाद दुसरें माझें अत्तरही त्यास जात असे पण कोणत्याही प्रमुख पुढाऱ्यास या गोष्टी कराव्याच लागतात. गोडसे आपटे हे महासभेचे कार्यकर्ते होते. अितर कार्यकर्त्याप्रमाणेच माझा त्यांचेशी संबंध येी अवढेच महासभेचे अध्यक्षपद सोडलेनन्तर माझा महासभेशी व सहाजीकच कार्यकर्त्यांशी संबंध तुटला.' सावरकर सुटले. पुढे काय ?- अशा प्रकारें सावरकरांचा 'गजेंद्र मोक्ष' झाला. 'सरकारी, नक्राने स्वातंत्र्यवीरांची प्रतिष्टा' भक्ष्य म्हणून जनसरोवरांत ओढली; परंतु बचाव समितीगजाने मगरीच्या तोंडांतून त्यांना ओढून काढले. वास्तवीक या कटांत सावरकरांना सरकारने ओढावयास नको होतें. कारण अध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष व घडाडीने भाग घेतला नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्याचा खराखुरा आनन्द त्यांना झाला होता. प्रसूतीच्या वेदना प्रसूतीलाच समजणार व मुलाचा खरा आनन्द तिलाच होणार आणि म्हणूनच सावरकर अशा स्वातत्र्यांत 'सनदशीर मार्ग प्राप्त झाले असता ' महात्माजीसारख्या थोर व्यक्तीच्या - श्रीविनायक १३० वीर विनायक खुनाच्या कटांत भाग घेणेच अशक्य होते. पण दुर्दैव सावरकरांचे. दुसरे काय ? म्हणूनच त्यांना खटल्यांत ओढावे असे सरकारला वाटले, तसेंच विधिमंडळांत सावरकरांची जप्त मालमत्ता मुक्त करणेबाबत श्री. रामभा मंडलिकांनी प्रश्न विचारला असतां मुंबीच्या गृहमंत्र्यांनी 'सावरकरांनी देशहित करण्यापेक्षाही देशनाशच अधिक केला आहे. ते देशभक्त नसून देशद्रोही आहेत' असे पूर्वग्रहदूषित अद्गार काढले. ही सरकराची सदोष नजर असल्यामुळे सावरकरांवर खटला भरला. वृद्धावस्थेतही त्यांना कारावासाचा व मानसिक विवंचनेचा त्रास दिला. अवढेच नव्हे तर कुप्रसिद्ध लियाकत-नेहरू करार झाला त्यावेळी परत त्यांना तुरुंगांत टाकलें. म्हातारपणी हिंडलग्यासारख्या दूरच्या तुरुंगांत डांबले. कुटुंबीय मंडळींनाही भेट् दिले नाही. ज्या स्वातंत्र्या- करता सावरकरांनी सर्व हयात शिजवली, हाडांची काडं केली, रक्ताचं पाणी केलं, मांसाचं खत केलं त्या स्वातंत्र्यांत सावरकरांवर बंदीवान होण्याची वेळ यावी, त्याच स्वातंत्र्यांत आम्ही जनतेनं त्यांना पायाखाली तुडवावं, बाबाराव सावरकरांसारख्यांचा दुःखद अंत अघड्या व निर्विकार डोळ्यांनी पहावा, नारायणराव सावरकरांना लाठ्यांचा मार देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन त्यांनी केलेल्या सेवेची अशी फेड करावी, भारतमाते ! यापरते तुझ्या देशाचा दुलौकिक तो काय? पण तरीही, माते, तुला दोष देणेची जरूर नाही. ब्रिटिश सरकारने सावरकरांना शिक्षा देतांनाच मुळी १९१० ते १९६० अशी ५० वर्षांची दिली आहे. ब्रिटिश सरकार गेले, आपले सरकार आले, तरी गांधीवधानन्तर १३१ vvvvvvvs vvvvvvv Nov • vvvvvv vvv स्वातंत्र्यवीरांवर अप्रत्यक्ष बंधने आहेतच. याचाच अर्थ अद्यापही सावरकर तुरुंगांतच आहेत व त्यांची पूर्ण मुक्तता १९६० साली म्हणजे आणखी आठ वर्षांनी व्हावयाची आहे. तोवर सावरकरांना असेंच अपमानास्पद जीवन कंठावें लागणार ! आणि असें जिणे चुकले आहे कोणाला ? ज्ञानेश्वरांचे त्यांचे हयातीत हालच झाले. तुकारामांची कोण दैना केली ! रामदासांच्या व शिवाजीच्या कार्याची थोर महती त्यांच्या मृत्यूनंतरच कळली. अदाहरण ध्यावयाचे तर आगरकरांचे. ते जिवंत असतांना त्यांची प्रेतयात्रा काढली, नेताजी सुभापचंद्र बोसांना मायदेश जिवंतपणी सोडावा लागला. पण आज त्यांच्या मृत्यूनंतर जनता त्यांना डोक्यावर नाचवत आहे. म्हणूनच म्हणतात- 'सजीव तोंवरि लत्ता देती, मरतां घेती खांद्यावरती, अगदी ताजे अफराटा सन्मान.'

- धुक्यांतून बाहेर मुलांनो ! आतापर्यंत आपण सावरकरांचे जीवन चारित्र्य न्याहाळले. आपले सर्व आयुष्य त्यांनी राष्ट्रासाठी झिजवलें, हेही आपण पाहिले. अशा शूर देशभक्ताला अद्यापही आपण पूर्णपणे ओळखले नाही असेंच मोठ्या खेदाने म्हणावे लागते. कारण कान टवकारून जनतेत वाव- रणाऱ्या काही पुढाऱ्यांची सावरकरांबाबतची कुजबूज अकली तर सर्वत्र त्यांचेविषयींच्या गैरसमजाचे धुकें हेतुपुरःसर पसरविले जात आहे हे स्पष्ट दिसेल. कुणी म्हणतात सावरकर जातीय आहेत, कुणी म्हणतात प्रांतीय आहेत, कुणी म्हणतात संकुचित व प्रतिगामी आहेत; तर कुणी म्हणतात ते धर्मबुडवे आहेत. मराठी भाषेचे ते कसाी आहेत असेंही म्हणण्यास कुणी कचरत नाही. या प्रकरणांत आपणास खरोखरच ते तसे आहेत का याचाच विचार व तोही खुद्द त्यांच्यांत शब्दांत करा- वयाचा आहे व गैरसमजाच्या धुक्यांतून बाहेर पडावयाचे आहे.

धुक्यांतून बाहेर - - . . सावरकर जातीय आहेत काय?- जो अठतो तो म्हणत सुटतो की, सावरकर जातीय आहेत. कारण काय तर ते केवळ हिंदुधर्माचाच नि हिंदूजातीच्याच हिताचा विचार करतात. मागें अका प्रकरणांत आपण सावरकरांनी 'हिंदुधर्मावर' लक्ष कां केंद्रित केले याचा विचार केलाच आहे. १९३७ साली ते हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून म्हणाले होते की— हिंदू हे सार्वलौकिक संयुक्त हिंदी राष्ट्र बनविण्यास समुत्सुक आहेत आणि आपले कोणतेही राखून ठेवलेले असे स्वतंत्र हक्क वा अधिकार हिंदुस्थानांतील अहिंदु वर्गावर मुळींच लादूं अिच्छित नाहीत. पण तें हिंदीराज्य मात्र निर्भेळ असू द्या. त्या राज्याने मता. धिकार, नोक-या, हुद्दे, कर यांच्या संबंधांत धर्माच्या व जातीच्या तत्त्वांवर कसल्याहि मत्सरोत्तेजक भेदभावांना मुळीच थारा देशं नये. त्या हिंदी राज्यांतील सर्व नागरिक त्याच्या त्याच्या वैयक्तिक गुणाव- गुणानुसार वागविलें जाशं द्या. कोणतीही जात किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारांत न घेतां अक मनुष्य अक मत' असा सर्वसामान्य नियम होअं द्या. अशा स्वरुपाचें हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल तर हिंदुसंघटनवादी स्वत: हिंदू संघटनाच्या हितार्थ त्या राज्याला अन्तःकरणपूर्वक पहिल्याने आपली निष्टां अर्पितील.' असें शुद्ध राष्ट्रीय प्रतिपादन करणारे सावरकर जातीय कसे ? सावरकर प्रांतीय व संकुचित आहेत काय?- सावरकरांना जातीय संबोधण्यांत जी चक होते तीच त्यांना - १३४ वीर विनायक प्रांतीय व संकुचित म्हणण्यांत होते. सावरकरांनी असें डागाळलेलें धोरण कधीच स्वीकारले नाही. त्यांनी प्रांतीयतेचा अभिमान धरला पण मर्यादित. तें स्पष्टच म्हणतात की, 'देशाभिमानाच्या आड न येणारा प्रान्ताभिमान दाखविण्यांत मला मुळीच कमीपणा वाटत नाही. मात्र हा प्रांताभिमान अितर प्रान्तांची अवहेलना करण्यास प्रवृत्त होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.' असा अितरही प्रातियांचा प्रांताभिमान जाणणारे व त्यांच्या भावना जाणून त्या भावनांस जपणारेही सावरकर प्रान्तीय ठरतील कसे ? आणि केवळ हिंदुस्थानापुरतेंच न पाहतां जगांतील अितर राष्ट्रां- कडे बारकाीने पाहणारे सावरकर संकुचित तरी कसे ठरतील ? त्यांचे कर्णावतीचे (अहमदाबादचे) अध्यक्षीय भाषणच पहा ना. त्यांत त्यांनी नेपाळचा विचार केला आहे. फ्रेंच हिंदुस्थान नि पोर्तुगीज हिंदु- स्थान यांचा विचार केला आहे. अितकेच नव्हे तर जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक राष्ट्रांतील आपल्या प्रत्येक बांधवाच्या सुखदुःखाचा विचार केलेला आहे. जणू काही सावरकर हे स्वतंत्र राष्ट्राचे पंतप्रधान आहेत नि त्यांनी आपल्या राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण आखलेलें आहे. तें विशाल धोरण आखतांना ते म्हणतात, 'आपल्या सहधर्मीय देशबांधवांपैकी जे आफ्रिका, अमेरिका, मॉरिशस नि असेच जगाचे अितर भाग यांतून जासून तेथे कसलाही गाजावाजा न करतां महत्तर हिंदुस्थानची अभारणी करीत आहेत; आणि तसेच जे बलिद्वीपांतल्याप्रमाणे अद्यापहि आपल्या हिंदुजातीच्या प्राचीन जागतिक साम्राज्याचे अभिमानास्पद अवशेष टिकवून धरून धुक्यांतून बाहेर १३५ vv राहिलेले आहेत त्याहि सर्वांना सहानुभूतीचा नि प्रेमळ स्मृतीचा संदेश पाठविण्याचे आम्ही विसरू शकत नाही. समग्र हिंदूजगाची 'पितृभू' नि 'पुण्यभू' असें हें आपलें भारतवर्ष त्याची स्वतंत्रता, सामर्थ्य नि महता यांच्याशी त्यांची भाग्ये सुद्धा अविभाज्य रीतीने बद्ध. झालेली आहेत.' तद्तच हिंदुस्थानांतील तथाकथित 'फ्रेंच हिंदुस्थान' नि 'पोर्तुगीज हिंदुस्थान ' या भागांत राहत असलेल्या हिंदूंचाही आम्हांस विसर पडणे शक्य नाही. आजच्या या कृत्रिम नि बलात्कृत राजकीय विभागणीचा विचार अकीकडे ठेवला तर आपण सर्व रक्त, धर्म नि देश यांच्या टिका बंधांनी अविभाज्य रीतीने अकत्र बांधलेलेच आहोत. काही झाले तरी आपण आपले ध्येय म्हणून निश्चयपूर्वक घोपित केलेच पाहिजे की, अद्यांचा हिंदुस्थान हा काश्मीरपासून रामेश्वरापर्यत नि सिंधपासून आसामपर्यंत केवळ संयुक्त म्हणून नव्हे तर अभिन्न राष्ट्र म्हणून अक नि अविभाज्यच राहिला पाहिजे!' सावरकर प्रतिगामी व धर्मबुडवे आहेत काय?- सावरकरांवरील 'ते जातीय आहेत, प्रांतीय आहेत, संकुचित आहेत' हे आरोप कसे फोल आहेत व निराधार आहेत ते पाहिलेच. आतांचे हे जे आरोप आहेत ते पररस्परांविरुद्ध आहेत. प्रतिगामी मनुष्य धर्मबुडवा असूच शकत नाही व धर्मबुडवा मनुष्य प्रतिगामी असू शकत नाही. साहजिकच सावरकर 'पुरोगामी 'च आहेत व ' धर्मवीर पण सुधारक धर्मवीर ' आहेत. कारण अघडच आहे. जें जें वीर विनायक न। त्याचा त्यांनी पुस्कार केला आहे. यंत्राचे स्वागत केले आहे. कारखान्यांचे स्वागत केले आहे. विज्ञानाची त्यांनी कास धरली आहे. विधवांच्या विवाहाचा पुरस्कार केला आहे. जरठ-कुमारी विवा- हाचा निषेध केला आहे. जाती-अपजातींचा व भोळसट व घातक रूढींचा विच्छेद केला आहे, बळजोरीने भ्रष्ट झालेल्या स्त्रियांचा चांगल्या मनाने समाजाने स्वीकार केला पाहिजे, असाच त्यांनी पुर- स्कार केला आहे. असे असूनही त्यांनी धर्मग्रंथ जाळा म्हणून सांगितले नाही. हिंदू धर्माचा तळपट होवो असा कुःशापहि दिला नाही. अलट त्यांनी त्यांचा आदरच राखला आहे. मंदिरांचे पावित्र्य पटविले आहे. देवतांचे मांगल्य राखलें आहे. ते म्हणतात- 'त्या काळच्या (प्राचीन काळच्या) परिस्थितीत आपल्या पूर्वजांस में में करता येण्याजोगें होतें नि जी साधनें त्यांना अपलव्ध होती, त्यांच्या कडे पाहतां ती त्यांच्या बुद्धीमत्तेची निदर्शकच मानली पाहिजेत नि या दृष्टीने अखिल हिंदूंनी कृतज्ञतेनें, अभिमानाने, आदराने त्यांस सन्मानिले पाहिजे. पण ते केवळ श्रुति-स्मृति पुराणोक्तांतच गुरफटून गेले नाहीत; तर ते लगेच पुढे म्हणतात- 'आम्ही कोणताहि ग्रंथ अपरिवर्तनीय आणि त्रिकालाबाधित मानीत नाही. श्रुतिस्मृति प्रभृति सारे ग्रंथ आम्ही अत्यंत कृतज्ञ आदराने आणि ममत्वाने सन्मानितों, पण अतिहासिक ग्रंथ म्हणून 'धुक्यांतून बाहेर अनुलंध्य धर्मग्रंथ म्हणून नव्हे. त्यांतील सारे ज्ञान आणि अज्ञान आजच्या विज्ञानाच्या कसोटीस आम्ही लावणार आणि त्यानन्तर आज राष्ट्रधारणास अवश्य असेल तें बेधडक आचरणार. आम्ही अद्या- वत् बनणार, अपटुडेट बनणार. सावरकर व भाषाशुद्धि- अशा प्रकारे ' अप टु डेट' बनण्याची महत्त्वाकांक्षा मनाशी बाळ- गली असता त्यांनी मराठी: भाषेच्या शुद्धीकडे लक्ष पुरविलें. स्वतः सावरकर मराठी भातील नावाजलेले व कसलेले प्रतिभावान साहि- त्यिक आहेत. स्वयंसिद्ध भावनोत्कट व मुमूर्प कवि आहेत; बुद्धिवादी आणि श्रद्धावादि, स्वयंस्फूर्त आणि तेजस्वी तसेंच चढाीखोर नाटक- कारही आहेत; म्हणून तर त्यांना रत्नागिरी साहित्य सम्मेलनाच्या व सांगली नाट्यशताब्दि महोत्सवाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. अका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, ' मी वृत्तीने कवि व कलावंत आहे, पण परिस्थितीने मला राजकारणी पुरुप केलें आहे.' आणि ते खोटेही नाही. अंदमानांत असतांना त्यांनी रचलेली काव्ये, महाकाव्ये मनांतून गुणगुणूं लागलों तर याची सत्यता पटेल. 'चांदोबा चांदोबा भागलास कां ? लिंबुणांचे झाडावर बसलास कां ? लिंबुणीचे झाड करवंदी, करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी, चिरेबंदी, मामाच्या वाड्यांत येथून जा, येशून जा ! तूप रोटी खान जा, खाअन जा!' हे त्यांचे जानपद व शिशु गीत तर बालसृष्टीत व बाङ्मय क्षेत्रांत अमर होभून राहिले आहे. मराठी भाषेत त्यांनी १३८ वीर विनायक अशी बरीच मोलाची भर घालून ते मराठी भाषेला कायमचे ललामभूत लेणे होअन बसले आहेत. अशी मराठीची मनोभावे सेवा करणारे सावरकर मराठी भाषेच्या नरडीला नख लावतील हे संभवतें कसे? पण त्यांनी स्वीकारलेल्या भाषाशुद्धीच्या धोरणास त्यांचे विरोधक हीच झुपमा देतात. स्वतः चा गैरसमज ( हे तः अगर अहेतुतः ) करून घेतात व अितरांचा तसा तो करून देतात. वास्तवीक सावकरांनी मराठी भाषेस मृतावस्था प्राप्त व्हावी, ती दुर्बोध, क्लिष्ट व अशुद्ध व्हावी; तिचं माधुर्य नाहींसें व्हावे अशा प्रकारची भाषाशुद्धी व्हावी असं कधीच सांगितलं नाही. त्यांनी सांगितलेली भाषाशुद्धीची मूलतत्वे वा सूत्रेच तपासाना. (१) गीर्वाण भाषेतील साराचा सारा संस्कृत शब्दसंभार आणि संस्कृतनिष्ठ अशा तामील, तेलगू ते आसामी, काश्मिरी, गौंड, भिल्ल बोलीपर्यंत ज्या आमच्या प्रांतिक भाषाभगिनी आहेत त्या सर्वांतील मूळचे प्रांतिक शब्द हे सर्व आमच्या राष्ट्रभाषेच्या मूलधन-राजकीय शब्दांचे भांडवल होय. (२) ह्या आपल्या राष्ट्रीय शब्दभांडारांत ज्या वस्तूंचे वा विचा- रांचे वाचक शब्द होते वा आहेत वा निर्मिता येतात त्या अर्थाचे अई, अिंग्रजी प्रभृति परकीय शब्द वापरू नयेत. जर तसे परकीय शब्द आपल्या पूर्वीच्या ढिलाीमुळे आपल्यांत घुसले असतील तर त्यांना हुडकून काढून टाकावें; अद्यतन विज्ञानाची परिभाषा नवनवे संस्कृत-प्राकृतोप्तक शब्द पाडून व्यक्तविली जावी.

धुक्यांतून बाहेर १३९ (३) परंतु ज्या परदेशी वस्तु अित्यादि पूर्वी आपल्या अिकडे नव्हत्या, त्यामुळे ज्यांना आपलें स्वकीय जुने शब्द सांपडत नाहीत. आणि ज्यांना त्यांच्या त्या परकीय शब्दासारखे सुटसुटीत स्वकीय शब्द काढणे दुर्घट जाते, त्यांचे परकीय शब्द मात्र आपल्या भाषेत जसेच्या तसे घेण्यास प्रत्यवाय नसावा. जसे बूट, कोट, जाकीट, गुलाब, जिलबी, बूमरँग, टेबल, टेनिस अित्यादि. तथापि अशा नव्या वस्तु आपल्याकडे येतांच जर कोणी त्यांनाही स्वकीय नांवे रुळून दाखवतील तर अत्तमच. (४) त्याचप्रमाणे जगांतील कोणत्याहि परकीय भाषेत जर अखादी शैली, वाक्प्रयोग, मोड ही सरसहा चटकदार वाटली तर तीही आत्मसात करण्यास अडकाठी नसावी. अशी चार सूत्रे सांगून सावरकर विरोधकांना राष्ट्रीय स्वाभिमाना- पायी नि स्वभाषेच्या प्रतिष्ठेसाठी कळकळीची विनंति करतात की, त्यांनी (विरोधकांनी) अंक आठवडाभर तरी भाषाशुद्धी विरुद्ध त्यांचे जे काही पूर्वग्रह असतील ते अगदी अकाबाजूस ठेवावे, समालोचकाला शोभेल अशा शांत नि समाहित मनःस्थितित भाषाशुद्धीची वर दिलेली मूलसूत्रे तेवढी पुढे टेवावी आणि स्वत:ला विचारावे की, परकियांनी तल- वारीच्या बळावर आमच्यावर जी परराज्ये स्थापली त्याच परदास्याचा परिणाम म्हणून घुसलेल्या या दास्यशीलतेच्या सूक्ष्म रोगाणूंना, आपल्या मनोभूमीतच परशJनी अभारलेल्या या आमच्या पराभवाच्या सूक्ष्मः स्मारकांना-या अनवश्यक अिंग्रजी, अर्दू शब्दांना-आज आमचाही दिवस अगवला असता, विधर्मीय नि विराष्ट्रीय राज्यसत्ता आज आम्ही १४० वीर विनायक अखड्न टाकली असतां ह्या अनावश्यक परकीय शब्दांनाही कां अखडून टाकं नये ? आपले स्वकीय शब्द कां वापरू नयेत ? निदान तसे कोणी वापरले तर त्यांत वावगे काय आहे ? अशाच भावनेने अिंग्रजीला अखडून आयर्लंडने गलिक भाषा पुनरुज्जीवित केली, अरेबीला अखडून तुकांनी स्वकीय तुर्की भाषा जिवंत केली नि गेली हजार वर्षे जी अक्षरश: मृतप्राय झालेली होती ती हिरू भाषा गेल्या अवघ्या दहा वर्षांत ज्यूनी नुसती जिवंत केली नाही तर ती राष्ट्रभाषा नि राज्यभाषा करून सोडून परराष्ट्र दूतागारां- तहि तीच वापरली पाहिजे म्हणून ठरवून टाकलें ! अशाच वीरोचित भावनेने शिवछत्रपतींनी राज्यव्यवहार कोश लिहविला. त्याच वीरोचित भावनेने प्रेरित होअन आमच्या राष्ट्रभाषेचे साहित्यमन्दिर संस्कृत निष्ठतेच्या बळकट नि पवित्र पायावर अभारावयास हवे.

अमर पत्र मित्रांनो, ीश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाची भूमिका ठरवून टाकली आहे. आपण आपली प्रत्येकाने भूमिका वठवावी यासाठी आपली ताटातूट होत आहे. ीश्वराने नेमून दिलेली भूमिका वठवित असतांना प्रसंगी जळत्या खडकांना बांधून कोंडून पडावे लागेल. प्रसंगी कीर्तिच्या असळणाऱ्या लाटांच्या शिखरांवर स्वार होतां येील, कधी आपण लोकांना दिसं, तर कधी अदृश्य राहूं, कधी आपण अवनत होशं, तर क्वचित अन्नत हो ! जगन्नियंत्याने कोणत्याहि परि- स्थितीत ठेवले तरी ती परिस्थिति सर्वोत्तम आहे असे मानून आपण असे समजले पाहिजे की, आपले जीवितकार्य अकाकी पार पाडणे हेच आपल्या वाट्याचे कार्य आहे. अकाद्या अदात्त पौर्वात्य नाटकांत भरतवाक्याच्या वेळी नाटकांत मेलेली व न मेलेली सर्व पात्र अकत्र जमतात. आपण सगळे अिति- १४२ वीर विनायक हासाच्या अफाट रंगमंदिरांतील असंख्य नटच आहोत. आपल्या कृतीची प्रशंसा करणारे मानवजातिरूपी प्रेक्षक टाळ्या वाजविण्या- साठी आपल्यासमोर बसलेले आहेत. हे प्रेक्षक कृतज्ञ व आनंदी बनून जोरजोराने टाळ्या वाजवतील तेव्हां त्या टाळ्यांचा गरजणारा आवाज दऱ्याखोऱ्यांपर्यत जासून दुमदुमेल ! प्रेमळ मित्रांनो, तो क्षण येीपर्यंत रामराम ! माशा देहपात होअन माझ्या अस्थि आणि रक्षा कोठे पडतील याचा नेम नाही. अंदमानचे वातावरण आधींच निर्जन व भेसूर आहे. तेथे वाहणाऱ्या नदी-नाल्यांचा अदासवाणा तेथील आवाज मूळच्या निर्जन- पणाला अधिकच भेसूर बनवित असतो. कदाचित माझ्या अस्थि नि रक्षा त्या अदास नदी नाल्यांच्या जवळ पडून राहातील. किंवा असेंहि घडेल की, मध्यरात्री आपला नियत खेळ आकाशांत खेळणाऱ्या तार- कांचे प्रतिबिंब पोटांत सामावून घेणाऱ्या गंगामातेच्या स्फटीक शुद्ध प्रवाहाच्या शेजारी कोठेतरी माझ्या अस्थि नि रक्षा पडून राहातील ! त्या कोठेहि पडलेल्या असोत ! श्रीरामाने आपल्या आवडत्या लोकांचा पक्ष विजयधवल ठरविला आहे, दुष्टांना माघार घ्यावी लागली आहे, आणि त्यांचा पाय जेथून पुढे पडला तेथवर त्यांना मागे हटविण्यांत आले आहे. आपला हा भारतवर्ष वैभवांत अभा आहे, मानव जातीचे अमर पत्र - मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ म्हणून यापुढे तो तेजास्वतेने तळपत राहील असा पुकारा झाला, आणि, 'हौतात्म्य गाजविणाऱ्या विचार- वीरांनो नी कृतिवीरांनो, तुम्ही ज्या संग्रामात लढलात आणि पडलात तो संग्राम यशस्वी झाला, अठा!' अशी घोषणा झाली की, त्यावेळी त्या पडून राहिलेल्या अस्थि-आणि ती पडून राहिलेली रक्षा यांच्यात फिरून तेज आणि चैतन्य सळसळू लागेल ! तोवर प्रिय मित्रांनो, रामराम! हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या स्नेह्यांना ब्रिस्टल तुरुंगां- तुन पाठविले. काव्य-प्रतिभा व देशभक्ति यांचा संगम घडलेले सुंदर स्थळ म्हणून याचा साहित्यसाम्राट केळकरांनी निर्देष केला आहे. स्वातंत्र्य प्राप्त होीपावेतों त्यांनी आपल्या सर्व स्नेह्यांचा निरोप घेतला आहे नि स्वातंत्र्य प्राप्त होतांच स्वातंत्र्याचा जयघोष निना. दण्यासाठी आपल्या अस्थीसुद्धां तेजाने भरून सळसळू लागतील अशी काव्यमय व ओजस्वी कल्पना यांत त्यांनी रंगवली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या पुण्याने त्यांना 'याचि देहिं याची डोळां' स्वातंत्र्य पहावयास मिळाले. पण ज्या हुतात्म्यांचे आधीच प्राण पंचमहा.

'वीर विनायक भूतात विलीन झाले आहेत, त्या सर्व हुतात्म्यांच्या अस्थि आज आता १० मेच्या 'हुतात्मा सांगता दिनी' भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यांत अध्वस्वराने पुकारा करतील. होताम्य गाजविणाऱ्या विचारवीरांनो नि कृतिवीरांनो, तुम्ही ज्या संग्रामांत लढलात आणि पडलात तो संग्राम यशस्वी झाला, अठा!' समाप्त

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

No text on this page.

Viira Vinaayaka

Author
Deshapaan'd'e Ga Vi
Title
Viira Vinaayaka
File name
Viira Vinaayaka
Text
OCR done
Citation
1952
Published
2005-11-26
Publisher
On'diraa Presa~
Language
Sanskrit
Pages
156
Classification
Geography. Biography. History
DLI number
369477
Barcode
2030020016294.00
Scanning centre
RMSC, IIIT-H
Digital publisher
Digital Library Of India
Rights
IN_COPYRIGHT
VMLT id
w94T7XkhedL
Download PDF

Viira Vinaayaka